✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 04 जुलै 2024💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/EBUZQqR5irXBijYQ/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🛑 *_जागतिक फणस दिन_* 🛑 🛑 *_ या वर्षातील १८६ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🛑 *_महत्त्वाच्या घटना:_* 🛑 •••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९९: लष्कराच्या १८ व्या बटालियनने कारगिलमधील द्रास या उपविभागातील ’टायगर हिल्स’ हा लष्करीदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा टापू घुसखोरांच्या ताब्यातून मुक्त केला. याबद्दल लष्करप्रमुख वेदप्रकाश मलिक यांनी १८ व्या युनिटला ’युनिट सायटेशन’ हा विशेष सन्मान जाहीर केला.**१९९७: ’नासा’चे पाथफाइंडर हे मानवविरहित यान मंगळावर उतरले.**१९९५: टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या (TIFR) जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोपचे (GMRT) संचालक डॉ. गोविंद स्वरूप यांना एम. पी. बिर्ला पुरस्कार प्रदान**१९४७: ब्रिटिशांच्या ताब्यात असलेल्या भारताचे ‘भारत‘ व ‘पाकिस्तान‘ असे दोन स्वतंत्र देश निर्माण करावेत असा ठराव ब्रिटनच्या संसदेत मांडण्यात आला.**१९४६: सुमारे ३८१ वर्षे परकीय सत्तांनी राज्य केल्यानंतर फिलीपाइन्सला (अमेरिकेपासुन) स्वातंत्र्य मिळाले.**१९३६: ’अमरज्योती’ हा ’प्रभात’ चा चित्रपट मुंबईच्या ’कृष्ण’ सिनेमात प्रदर्शित झाला.**१८२६: अमेरिकेच्या स्वातंत्र्य दिनाच्या सुवर्ण महोत्सवाच्या दिवशी अमेरिकेचे तिसरे राष्ट्राध्यक्ष थॉमस जेफरसन आणि दुसरे राष्ट्राध्यक्ष जॉन अॅडॅम्स यांचे निधन झाले.**१७७६: अमेरिकेने स्वत:ला इंग्लंडपासुन स्वतंत्र घोषित केले.* 🛑 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस_* 🛑 •••••••••••••••••••••••••••••••••*१९८३: गोविंद दत्ताराम कवळे -- कवी**१९८०: संजय माणिक राठोड-- कवी, लेखक**१९७६:सुरेश बाब्या राठोड-- चित्रकार, लेखक**१९७३: वृषाली सानप-काळे -- मराठी आणि हिंदी भाषेतून लेखन करणाऱ्या कवयित्री, लेखिका**१९७०: शिल्पा देवळेकर -- कवयित्री, लेखिका* *१९६९: प्रतिभा सिन्हा -- भारतीय अभिनेत्री* *१९६८: डॉ. वाल्मीक हिरामण अहिरे -- लेखक, समीक्षक**१९६६: डॉ. प्रभाकर शेळके -- कवी, कथाकार* *१९६५: रमेश पांडुरंग तांबे -- लेखक, कवी* *१९६०: देवेंद्र भुजबळ -- लेखक, संपादक तथा माजी माहिती संचालक* *१९५९: नीना गुप्ता -- हिंदी चित्रपट अभिनेत्री , टीव्ही कलाकार आणि चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता* *१९५६: डॉ.संजीवनी मुळे -- लेखिका, कवयित्री**१९५४: डॉ सुनंदा देशपांडे -- लेखिका* *१९४९: जोगिंदर शेली -- अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता, लेखक, गायक, गीतकार आणि वितरक (मृत्यू: १५ जून २००९ )**१९४८: योगिनी वेंगुर्लेकर -- प्रसिद्ध मराठी लेखिका**१९४७: गणेश आप्पासाहेब धांडगे -- कादंबरीकार कथाकार* *१९४७: डॉ.आनंद पाटील -- जेष्ठ साहित्यिक**१९४४: पंडित प्रभाकर कारेकर -- हिंदुस्थानी शास्त्रीय गायक* *१९३३: डॉ.अरविंद वामन कुलकर्णी -- प्रख्यात समीक्षक,लेखक,कवी (मृत्यू: २९ ऑक्टोबर २००३ )**१९२८: जयराम आचार्य -- प्रसिद्ध भारतीय सितार वादक (मृत्यू: ५ एप्रिल २०१७ )**१९२८: पंडितराव कुलकर्णी -- ज्येष्ठ उद्योगपती ( मृत्यू: ६ जुलै २०२०)**१९२६: विनायक आदिनाथ तथा ’वि.आ.’ बुवा – विनोदी साहित्यिक (मृत्यू: १७ एप्रिल २०११ )**१९१४: निवृत्तीनाथ रावजी पाटील ऊर्फ ’पी. सावळाराम’ –भावगीतलेखक कुसुमाग्रज यांनी त्यांना ’जनकवी’ ही उपाधी दिली. १९८५ मधे जयसिंगपूर येथे झालेल्या दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.(मृत्यू: २१ डिसेंबर १९९७ )**१९१२: पं. निवृत्तीबुवा सरनाईक – जयपूर-अत्रौली घराण्याचे गायक (मृत्यू: १६ फेब्रुवारी १९९४ )**१९११: विठ्ठल रामचंद्र सरदेशमुख -- हार्मोनिअम वादक, गायक (मृत्यू: ६ एप्रिल १९८१ )**१८९८: गुलजारीलाल नंदा – भारताचे दुसरे पंतप्रधान, स्वातंत्र्यसैनिक व गांधीवादी कार्यकर्ते (मृत्यू: १५ जानेवारी १९९८ )**१८९०: नारायण केशव बेहेरे -- कवी, कादंबरीकार काव्य समीक्षक (मृत्यू: १९ जानेवारी १९५८ )**१८९०: क्षमादेवी राघवेंद्र राव -- संस्कृत भाषातज्ज्ञ (मृत्यू,:२४ एप्रिल:१९५४ )**१८७२: काल्व्हिन कूलिज – अमेरिकेचे ३० वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: ५ जानेवारी १९३३ )**१७९०: भारताचे सर्वेक्षण करणारे कर्नल सर जॉर्ज एव्हरेस्ट (मृत्यू: १ डिमेंबर १८६६ )*🛑 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन_* 🛑 •••••••••••••••••••••••••••••••••*१९९९: वसंत शिंदे – विनोदसम्राट, कलागौरव पुरस्कार, चित्रभूषण पुरस्कार व बालगंधर्व पुरस्काराने सन्मानित (जन्म: १४ मे १९०९ )**१९८२: भरत व्यास – भक्तिप्रधान, पौराणिक, ऐतिहासिक व सामाजिक चित्रपटांचे गीतकार (जन्म: ६ जानेवारी १९१८ )**१९८०: रघुनाथ वामन दिघे – रसाळ लेखन करणारे कादंबरीकार.(जन्म: २४ एप्रिल १८९६ )**१९६३: पिंगाली वेंकय्या – भारतीय तिरंग्याचा रचनाकार (जन्म:२ ऑगस्ट १८७६ )**१९३४: मेरी क्यूरी – नोबेल पारितोषिक विजेत्या पोलिश-फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: ७ नोव्हेंबर १८६७ )**१९०२: स्वामी विवेकानंद – भारतीय तत्त्वज्ञानाचा जगभर प्रसार करणारे तत्त्वज्ञ, रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य, गुरुंची स्मृती चिरंतन राहावी यासाठी त्यांनी ’रामकृष्ण मिशन’ची स्थापना केली.(जन्म: १२ जानेवारी १८६३ )**१८३१: जेम्स मोन्रो – अमेरिकेचे ५ वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: २८ एप्रिल १७५८ )**१८२६: थॉमस जेफरसन – अमेरिकेचे ३ रे राष्ट्राध्यक्ष, २ रे उपाध्यक्ष आणि १ ले परराष्ट्रमंत्री. त्यांनी मांडलेल्या विचारांवर अमेरिकेची राज्यघटना आधारित असून तेथील लोकशाहीला ’जेफरसनची लोकशाही’ असे म्हणतात. (जन्म: १३ एप्रिल १७४३ )**१८२६: जॉन अॅडॅम्स – अमेरिकेचे २ रे राष्ट्राध्यक्ष आणि पहिले उपराष्ट्राध्यक्ष (जन्म: ३० आक्टोबर १७३५ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• " सरकारी शाळेची कथा "..... पूर्ण लघुकथा वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अडवणूक, दिरंगाई किंवा पैशाची मागणी केल्यास कारवाई, मुख्यमंत्र्यांचा तलाठ्यासह अधिकारी व दलालांना इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *जनतेने अपप्रचाराला नाकारून विश्वासाच्या राजकारणाला निवडले - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *हाथरस दुर्घटनेत बळींची संख्या १२१ वर, आयोजकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *सर्वसामान्य वीज ग्राहकांना स्मार्ट मीटर नाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *सेन्सेक्सने पार केला ८० हजारचा टप्पा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *कापूस पिकाच्या खर्च व उत्पन्नातील तफावातीबाबत धोरण ठरवणार - पणन मंत्री अब्दुल सत्तार यांची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *T20 विश्वकप विजेता टीम इंडियाचे मुंबईत जंगी स्वागत*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*हरभजन सिंह*आपल्या जादूही फिरकीने भारताला अनेक सामन्यांमध्ये विजय मिळवून देणारा आपल्या फिरकीने भल्या भल्या फलंदाजांची त्रेधातिरपीट उडविणारा भारतीय क्रिकेट संघातील फिरकीपटू हरभजनसिह याचा 3 जुलै हा वाढदिवस.अगदी लहान वयात भारतीय संघात दाखल झालेल्या हरभजनच्या कारकिर्दीची सुरुवात विचित्र झाली. त्याच्या गोलंदाजीच्या शैलीवरून वादंग झाले आणि तो संघाबाहेर फेकला गेला. इ.स. २००१ मध्ये भारताच्या दौऱ्यावर स्टीव्ह वॉचा संघ आला होता. संघाचा प्रमुख फिरकी गोलंदाज अनिल कुंबळे खांद्याच्या दुखापतीने जायबंदी झाल्याने, कप्तान सौरव गांगुली चिंतेत पडला होता. ऑसी फलंदाज ऑफस्पिन गोलंदाजाला बिचकून खेळतात, याचा पक्का अभ्यास सौरवने केला असल्याने, त्याने हरभजनसिंगला संघात घेण्याकरता निवड समितीला साकडे घातले. निवड समितीने केवळ कप्तानाच्या आग्रहाखातर हरभजनला संघात घेतले. भारतीय संघाच्या कामगिरीला निर्णायक कलाटणी देणाऱ्या त्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत हरभजनने तब्बल ३२ बळी मिळवून कमाल केली. भारताने मालिका २-१ फरकाने जिंकली आणि हरभजनला मालिकेचा मानकरी ठरवण्यात आले.इ.स. २००६ ते इ.स. २००८ चा काळ हरभजनकरता निराशेचा ठरला. १३ कसोटी सामन्यांत जेमतेम ३७ बळी या काळात हरभजनला मिळवता आले. या काळात त्याला खराब कामगिरीमुळे संघाबाहेर पडावे लागले. इ.स. २००७ मध्ये इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघात हरभजन नव्हता; पहिल्या टी२० वर्ल्ड कपकरता निवड समितीने हरभजनला संघात परत आणले, तो क्षण मोलाचा ठरला. इ.स. २००८ मध्ये गॉल कसोटीत भारतीय संघाला विजयी करून देताना हरभजनने दोनही डावांत मिळून १० बळी मिळवले. चांगली कामगिरी करून हरभजनवर प्रकाशझोत पडला नाही, कारण सेहवागने त्या सामन्यात द्विशतकी खेळी केली होती.2009 हरभजनला आपल्या फलंदाजीच्या गुणवत्तेची अचानक जाण आली. विंडीज मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यातील विजयात संघाला नितांत गरज असताना हरभजनच्या अर्धशतकी खेळीने कमाल साधली. मायदेशातील मालिकेत न्यूझीलंडविरुद्ध हरभजनने लागोपाठच्या दोन कसोटी सामन्यांत शतके झळकावून संघातील सहकाऱ्यांना चकित केले. इ.स. २०११ वर्ल्ड कपच्या यशात हरभजनसिंगच्या नावासमोर भरपूर बळी नसल्याने, त्याच्यावर टीका केली गेली. प्रत्यक्षात समोरच्या संघातील खेळाडूंनी विचारपूर्वक हरभजनच्या गोलंदाजीचा धोका न पत्करता, नुसते खेळून काढण्याचा निर्णय घेतला होता. हरभजनच्या नावासमोर जास्त बळी नसले तरी त्याने आपल्या १० षटकांत खूप कमी धावा दिल्या आहेत, तसेच पॉवर प्लेच्या महत्त्वाच्या षटकात टिच्चून गोलंदाजी केली आहे. डो मनिका कसोटी सामन्यादरम्यान हरभजन सिंगने ४०० कसोटी बळींचा टप्पा पार केला. असे अचाट काम करणारा तो तिसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. अनिल कुंबळे ६१९ बळी आणि कपिल देव ४३२ बळी हे दोनच भारतीय गोलंदाज हरभजनच्या पुढे आहेत.*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्ञानाचे पहिले काम असत्य जाणून घेणे व दुसरे काम सत्याला जाणणे हे आहे.**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) आदिमानव ही मानवाची प्रजाती प्रथम कोणत्या खंडात अस्तित्वात आली ?२) *जागतिक प्लॅस्टिक पिशवी मुक्त दिवस* केव्हा साजरा केला जातो ?३) शेअर बाजाराची सुरुवात करणारा जगातील पहिला देश कोणता ?४) 'जीर्ण' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) नुकतेच कोणत्या देशाने भारताकडून ब्राम्होस क्षेपणास्त्र विकत घेतले आहे ?*उत्तरे :-* १) आफ्रिका खंड २) ३ जुलै ३) नेदरलँड ४) जुने ५) फिलिपाईन्स*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 कवी गोविंद कवळे, उमरी👤 श्रीपाद जोशी येवतीकर👤 बंडोपंत लोखंडे, पदवीधर शिक्षक, नांदेड👤 वृषाली सानप काळे, साहित्यिक👤 कमलाकर जमदाडे, बिलोली👤 राजकुमार बिरादार👤 बंडू आंबटकर, कोल्हापूर👤 गणेश मंडाळे👤 बालाजी मदनलवार👤 परमेश्वर मेहेत्रे👤 अविनाश खोकले👤 श्याम उपरे👤 प्रदीप यादव*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••माटी कहे कुम्भार से तू क्यों रौदे मोए। एक दिन ऐसा आएगा मै रौंदूंगी तोए॥4॥अर्थ – माटी कुम्भार से कहता है जिस प्रकार तुम मुझे रौद रहे हो एक दिन ऐसा आएगा जिस दिन मई तुम्हे रौंदूंगी ( जब इंसान मरता है तो उसकी शरीर जो मिटटी से ही बनी है वो वापस मिटटी में ही मिल जाती है ) इसी को मिटटी कहता है , के आज इस अभिमान को छोड़ दो क्यूंकि एक दिन तुमको भी मुझ में ही मिल जाना है यानि मिटटी में।।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कोणाच्या समाधानासाठी आपण कितीही चांगले काम केले किंवा त्याच प्रकारची वागणूक ठेवून जरी जगून दाखवले तरी समोरच्या व्यक्तीला समाधान होईलच असे नाही. कारण, प्रत्येकांकडेच समाधान या नावाची संपत्ती नसते. म्हणून आपल्याला काय वाटते आपणच ठरवावे. दुसऱ्यांचे समाधान करताना थोडे स्वतः च्या विषयी विचार करावे शेवटी स्वतःलाच जगावे लागते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*"एकदा स्वामी विवेकानंद शाऴेत असतानाची गोष्ट आहे.स्वामी विवेकानंदाचे खरे नाव नरेंद्र होते.त्यावेऴी नरेंद्रची उद्या परीक्षा असते.पण नरेंद्र अभ्यास न करता एका मंदिरात जावून विणा वाजवत बसलेले असतात.तेवढ्यात तेथे**त्यांचा मित्र त्यांना शोधत येतो.आणी म्हणतो.अरे नरेंद्रा उद्या आपली वार्षिक परीक्षा आहे.आणी तू अभ्यास करण्याऐवजी इथे येवून**विणा वाजवत बसलास.तू कसा पास होशील.तेंव्हा नरेंद्र म्हणाला अरे मित्रा उद्याची परीक्षा आपण* *वर्षभर काय केले याची आहे.मी आज काय करतो याची नाही.**तात्पर्यः* *"कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिऴवायचे असेल तर सुरूवातीपासून कष्ट केले पाहीजे.**एका दिवसात यश प्राप्त होत नाही. "*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment