✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 02 ऑगस्ट 2024💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/KagHN9Fs8UmWSC66/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🟠 *_ या वर्षातील २१५ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🟠 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟠•••••••••••••••••••••••••••••••••*२००१: ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेतील विजेता पुल्लेला गोपीचंद याची भारतीय क्रीडाक्षेत्रातील सर्वाधिक प्रतिष्ठेच्या राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारासाठी निवड.**१९९६: अटलांटा ऑलिंपिक स्पर्धेत अमेरिकेच्या मायकेल जॉन्सनने दोनशे आणि चारशे मीटरच्या शर्यतीत, एकाच ऑलिंपिक स्पर्धेत सुवर्णपदके पटकावून ऑलिंपिकच्या इतिहासातील पहिला खेळाडू होण्याचा मान पटकवला.**१९९०: इराकने कुवेतवर आक्रमण केले.**१९७९: नगर जिल्ह्यातील डॉ. रजनीकांत आरोळे व त्यांच्या पत्नीला मॅगसेसे पुरस्कार जाहीर**१९५४: दादरा व नगर हवेली हा प्रांत भारतीयांनी पोर्तुगीजांकडुन ताब्यात घेतला.**१९२३: काल्व्हिन कूलिज अमेरिकेचे ३० वे राष्ट्राध्यक्ष बनले. हे अतिशय मोजके बोलण्यासाठी प्रसिद्ध होते.**१७९०: अमेरिकेत पहिली जनगणना सुरू झाली.*🟠 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟠 •••••••••••••••••••••••••••••••••*२००१: चिन्मय मोघे -- कवी, नाटककार**१९७९: प्रशांत देशमुख-- लेखक, प्रसिद्ध व्याख्याते**१९७४: सिद्धार्थ रॉय कपूर -- भारतीय चित्रपट निर्माता आणि रॉय कपूर फिल्म्सचा संस्थापक**१९६७: गजानन यशवंत देसाई -- कादंबरीकार* *१९६७: प्रा.डॉ.गजानन गोपाळराव हेरोळे -- कवी, लेखक, संपादक* *१९६६: सुनील ओवाळ -- कवी, लेखक**१९६१: प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले -- लेखक, कवी, वक्ते* *१९५८: अविनाश धर्माधिकारी-- भारतीय प्रशासकीय सेवेतील माजी अधिकारी, विचारवंत, लेखक**१९५८: अर्शद अयुब – भारतीय क्रिकेटपटू आणि व्यवस्थापक**१९४७: मा. रमेश बैस -- महाराष्ट्राचे माजी राज्यपाल**१९४१: ज्यूल्स हॉफमन – नोबेल पारितोषिक विजेते फ्रेन्च जीवशास्त्रज्ञ**१९३८: गोविंद पुरुषोत्तम देशपांडे -- नाटककार, कवी आणि निबंधलेखक ( मृत्यू:२६ आक्टोबर २०१३)**१९३५: डॉ. रमेश शास्त्री-- कवि आणि गीतकार (मृत्यू: ३० एप्रिल २०१० )**१९२८: दत्तात्रय गंगाधर कुलकर्णी (दत्ताजी कुलकर्णी) -- लेखक* *१९२३: विष्णुपंत श्रीनिवासराव सुभेदार-- लेखक, संपादक* *१९१८: दादा जे.पी.वासवानी –आध्यात्मिक गुरू,सिंधी धर्मीयांतील गुरुतुल्य व्यक्तिमत्त्व,(मृत्यू: १२ जुलै, २०१८ )**१९१०: पुरुषोत्तम शिवराम रेगे – कादंबरीकार, नाटककार, कवी आणि समीक्षक (मृत्यू: १७ फेब्रुवारी १९७८ )**१८७७: श्रीकृष्ण नीलकंठ चापेकर -- कवी आणि समीक्षक (मृत्यू: १७ डिसेंबर १९४२ )**१८७६: पिंगाली वेंकय्या – भारतीय तिरंग्याचा रचनाकार (मृत्यू: ४ जुलै १९६३ज्ञ)**१८६१: आचार्य प्रफुल्लचंद्र रे – भारतीय रसायनशास्त्रज्ञ, देशातील वैज्ञानिक चळवळीचे प्रणेते, (मृत्यू: १६ जून १९४४ )**१८३५: अलीशा ग्रे – वेस्टर्न इलेक्ट्रिक कंपनीचे एक संस्थापक (मृत्यू: २१ जानेवारी १९०१ )**१८२०: जॉन टिंडाल – ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: ४ डिसेंबर १८९३ )* 🟠 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟠 ••••••••••••••••••••••••••••••••• *२०२३: नितीन चंद्रकांत देसाई -- भारतीय कला दिग्दर्शक , प्रॉडक्शन डिझायनर आणि चित्रपट आणि दूरदर्शन निर्माता (जन्म: ६ ऑगस्ट १९६५ )**२०२१: प्रभाकर लक्ष्मण गावडे-- जेष्ठ शिक्षणतज्ज्ञ, विचारवंत (जन्म: २० जून १९२४ )**२०२०: पंडित गोविंद भिलारे -- अंतरराष्ट्रीय ख्यातीचे पखवाज वादक (जन्म: ८ जून १९७४)**२०१३: बाबासाहेब केदार--विदर्भातील ज्येष्ठ नेते आणि माजी ग्रामविकास मंत्री (जन्म: १५ मे १९२८ )**२०१०: कमल कपूर -- भारतीय अभिनेता आणि निर्माता (जन्म: २२ फेब्रुवारी १९२० )**२००८: चेतन दातार -- मराठी नाटककार, अभिनेते आणि नाट्यरंगकर्मी (जन्म: १९६४)**१९७९: करण दिवाण -- हिंदी चित्रपटांमधील चित्रपट अभिनेता (जन्म: ६ नोव्हेंबर १९१७ )**१९३४: पॉल फॉन हिन्डेनबर्ग – जर्मनीचे दुसरे राष्ट्राध्यक्ष (जन्म: २ आक्टोबर १८४७ )**१९२२: अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल – स्कॉटिश - अमेरिकन पदार्थ वैज्ञानिक, टेलिफोनचा संशोधक (जन्म: ३ मार्च १८४७ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मैत्री दिन - 04 ऑगस्ट त्यानिमित्ताने *जिंदगी का नाम दोस्ती ....*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय; SC,ST मध्ये उपवर्ग तयार करण्यास मंजुरी, आरक्षणाचा लाभ फक्त पहिल्या पिढीला मिळावा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मराठा समाजाच्या आर्थिक परिस्थितीकडे अपवादात्मक दृष्टीनं पाहणं गरजेच; राज्य मागास प्रवर्ग आयोगाचं हायकोर्टात प्रतिज्ञापत्र सादर*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *भिवंडी महानगरपालिकेकडून स्वच्छता अभियान मोहीम, आठशे विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *PSI परीक्षेत अमोल घुटुकडे राज्यात पहिला, सातारकरांसाठी अभिमानाची गोष्ट; MPSCचा निकाल जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश:सातारा जिल्ह्यातील धबधबे आणि सर्व पर्यटनस्थळे 5 ऑगस्टपर्यंत बंद राहणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकणाऱ्या नेमबाज स्वप्नील कुसाळे यांना राज्य सरकारकडून एक कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *टी20 मालिका विजयानंतर आता टीम इंडिया श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी सज्ज, प्रेमदासा स्टेडियम मध्ये आज होणार पहिला एकदिवसीय सामना*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*सागरगड*अलिबागपासून ७ किमी.अंतरावर डोंगरावर हा शिवकालीन किल्ला आहे. हा समुद्रसपाटीपासून सुमारे १३५७ फूट उंचावर आहे. येथे जाण्याकरीता अलिबाग - पेण मार्गावरील खंडाळा गावातून रस्ता आहे. गावाच्या पूर्वेला डोंगर दिसतो. त्याच्या पाठीमागे सागरगड लपलेला आहे. खंडाळा गावातून फलवाटेने गडावर जावे लागते. गडाच्या निम्म्या उंचीवर सिध्देश्वर मंदिर आहे. या मंदिराजवळच आश्रम तसेच विहीर आहे. येथे विश्रांतीची सोय होऊ शकते. पावसाळयाच्या दिवसात मंदिराजवळच एक धबधबा वहात असतो. श्रारावणी सोमवारी येथे बरेच भाविक हजेरी लावतात. या आश्ररमाच्या थोडं अलिकडेच एक वाट डावीकडे वर सागरगडाकडे जाते. सिध्देश्वरपासून साधारणत फन ते एक तासात आपण सागरगडावर येवून पोहचतो. सागरगडाच्या मुख्य दरवाजा पूर्णपणे ढासळलेला आहे. परंतू त्याच्या बाजूचे दोन बूरूज पडक्या अवस्थेत अस्तत्त्वात आहेत. या प्रवेशारातून गडावर प्रवेश करायचा. माची व बालकिल्ला अशा स्वरूपात गडाची रचना आहे. बालेकिल्लेवर एक लहानसं तळं मंदिर तसेच एका पडक्या इमारतीचे अवशेष आहेत. गडावर एक बारमाही पाण्याचे कुंड (पांडवकुंड) आहे.माचीवर सतीची माळ नावाची जागा आहे. तिथं नऊ थडगी आहेत. या बाजूच्या टोकाला एक सुळका आहे त्यास वानरटोक असे म्हटले जाते. गडावर इतर कोणत्याही सोयीसुविधा उपलब्ध नाहीत.*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••पुस्तके व मित्र हे थोडकेच असावेत पण ते चांगले असावेत.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *'मेरी झाशी नही दुंगी'* ही घोषणा कोणाची आहे ?२) २०२४ चा 'लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार' कोणाला जाहीर झाला ?३) लोकसभा खासदारांना त्यांच्या मतदारसंघात खर्च करण्यासाठी किती रुपये निधी दिला जातो ?४) 'दंत' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) स्वतंत्र भारताकडून एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके मिळवणारी पहिली खेळाडू कोण ठरली ?*उत्तरे :-* १) राणी लक्ष्मीबाई २) डॉ. सुधा मूर्ती ३) ५ कोटी रुपये ४) दात ५) मनू भाकर, शूटर*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 जी. पी. मिसाळे, सेवानिवृत्त शिक्षक तथा पत्रकार, धर्माबाद👤 काशिनाथ उशलवार, सामाजिक कार्यकर्ते, धर्माबाद👤 कैलास चंदोड, सामाजिक कार्यकर्ते, येताळा👤 दुर्गा डांगे👤 प्रतिक गाडे👤 आनंद पाटील धानोरकर👤 शिवानंद गायकवाड👤 रवींद्र वाघमारे, शिक्षक, नांदेड👤 दयानंद भुत्ते👤 दिगंबर वाघमारे, संपादक, कंधार*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्ञान समागम प्रेम सुख दया भक्ति विश्वास।गुरु सेवा ते पाइये सतगुरु चरण निवास ॥ 33 ॥ ।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जेथे पिकते तेथे विकत नाही असे, अनेकदा ऐकण्यात आले आहे. तरीही पिंकाची असो किंवा आपल्या विचारांची पेरणी करायचे थांबवू नये. समाजात आजही बऱ्याच लोकांना वेगवेगळ्या पिंकाची आवश्यकता आहे तीच आवश्यकता विचारांची सुद्धा आहे. कारण समाजात राहणारे सर्वच लोक एक सारखे नसतात. काही लोक दु:खी असतात तर काहींच्या बाबतीत विचार करणे सुद्धा अवघड जाते. म्हणून ज्या प्रकारे होईल त्या प्रकारे पिकांची असो किंवा आपल्या विचारांची आवर्जून पेरणी करावी. ती पेरणी करण्याचा सर्वांनाच अधिकार आहे तो, अधिकार आपण कोणत्याही परिस्थितीत गमावू नये. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*अति शहाणा त्याचा बैल रिकामा* " एके काळाची गोष्ट आहे. एक गाढव होते. दुसरे प्राणी नेहमी त्याची थट्टा करत. तो दुसऱ्या प्राण्यांचे असे वागणे पाहून कंटाळला होता. तो नेहमी विचार करत असे की, त्याच्या जवळ सुध्दा ताकात,सौंदर्य किवा गोड आवाज असता तर दुसऱ्या प्राण्यांनी त्याची थट्टा केली नसती.एकदा गाढव असाच कुठे तरी जात होता. वाटेत त्याला सिंहाचे कातडे पडलेले दिसले. प्रथम गाढवाने त्याचाकडे दुर्लक्ष केले आणि पुढे तो चालू लागला. मग त्याला अचानक एक युक्ती सुचली. त्याने ते सिंहाचे कातडे घेतले आणि अंगावर टाकले. त्याला वाटले आता सगळ्या प्राण्यांना वाटेल कि, मी सिंह आहे आणि ते माझा आदर करतील .सिंहाचे कातडे अंगावर पांघरून गाढव पुढे निघाला. वाटेत तो एका गिधाडाजवळ पोहचला. गिधाडाने त्याला सिंहच समजले आणि तो घाबरून तेथून पळून गेला. गाढवाला हे सर्व पाहून खूप मजा आली. आता त्याला वाटले कि, तो आता सहज जंगलात राजा बनेल. त्यानंतर तर जो कोणी कातडे पांघरलेल्या गाढवाला पाहत असे ते घाबरून पळून जायचे. गाढवाला या खेळामध्ये खूप मजा वाटायला लागली.थोड्याच वेळात गाढव एका कोल्हीनी शेजारी येउन थांबला. गाढव तिला घाबरावायला जातो. कोल्हीन त्याचा आवाज ऐकते .कोल्हीन त्याला म्हणाली ,जर मी तुझा रेकण्याचा आवाज ऐकला नसता तर मी पण तुला घाबरले असते. गाढव बिचारा एवढंस तोंड करून निघून गेला. सिंहाचं कातडे पण त्याचा बावळटपणा लपू शकला नाही.*तात्पर्य - अति शहाणा त्याचा बैल रिकामा "*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment