✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 17 ऑगस्ट 2024💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://m.tarunbharat.com/article/value-education-through-geography-2/1411567••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌼 *_ या वर्षातील २३० वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🌼 *_महत्त्वाच्या घटना:_* 🌼•••••••••••••••••••••••••••••••••*१९९७: उस्ताद अली अकबर खाँ यांना अमेरिकेचा ’नॅशनल हेरिटेज’ पुरस्कार जाहीर**१९८२: पहिली सी.डी. (Compact Disk) जर्मनीमधे विकण्यात आली.**१९८८: पाकिस्तानचे ६ वे राष्ट्राध्यक्ष मुहम्मद झिया उल हक आणि अमेरिकेचे पाकिस्तानातील राजदूत अर्नॉल्ड रॅफेल विमान अपघातात ठार झाले.**१९५३: नार्कोटिक्स अॅनॉनिमस या संस्थेची पहिली सभा दक्षिण कॅलिफोर्नियात झाली.**१८३६: जन्मलेल्या प्रत्येक बालकाचा जन्म नोंदवला गेलाच पाहिजे, अशी सक्ती करणारा 'रजिस्ट्रेशन ऑफ बर्थस अॅंक्ट' ब्रिटिश संसदेने मान्यता दिल्याने अमलात आला. पुढे हा सर्व ब्रिटिश वसाहतींना लागू करण्यात आला आणि १८३७ पासुन त्याची अंमलबजावणी सुरू झाली.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••• *१९८७: स्वप्निल कोकाटे --- कवी**१९८४: अंकिता भार्गव पटेल (अंकिता करण पटेल)-- टेलिव्हिजन अभिनेत्री* *१९७८: दिशा वकानी-- भारतीय थिएटर, चित्रपट आणि दूरदर्शन अभिनेत्री* *१९७५: बालाजी मदन इंगळे. -- मराठी कवी, कादंबरीकार* *१९७०: जिम कुरिअर – अमेरिकन लॉन टेनिस खेळाडू**१९६८: रेखा शिरीष चवरे -- लेखिका**१९६७: सुप्रिया पिळगांवकर -- भारतीय अभिनेत्री**१९६३: शंकर षणमुगम (एस. शंकर) -- भारतीय चित्रपट दिग्दर्शक, चित्रपट निर्माता आणि पटकथा लेखक**१९६१: राधा भावे -- कवयित्री, लेखिका* *१९६०: गिरीश ओक -- चित्रपट अभिनेते, संपादक, कवी**१९५८: स्मिता ठाकरे -- भारतीय सामाजिक कार्यकर्त्या आणि चित्रपट निर्मात्या**१९५७: सचिन पिळगांवकर -- प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेते, निर्माते**१९५०: मीना खोंड-- प्रसिद्ध कवयित्री, लेखिका**१९५०: भरत सक्सेना-- चित्रपट अभिनेते**१९४९: निनादराव बेडेकर – प्रसिद्ध इतिहास संशोधक (मृत्यू: १७ मे २०१५ )**१९४८: डॉ. शेषराव मोरे -- प्रसिद्ध मराठी लेखक आणि वक्ते* *१९४७: सुखदेव ढाकणे -- प्रसिद्ध कवी, कादंबरीकार, समीक्षक* *१९४४: प्रा.पुरुषोत्तम दत्तात्रय देशमुख-- लेखक, अनुवादक* *१९३८: प्रा.रमेशचंद्र गोकुळप्रसाद दीक्षित-- कवी, लेखक* *१९३६: शांताराम पवार -- प्रसिद्ध चित्रकार,हकवी (मृत्यू: ९ऑगस्ट २०१८ )**१९३२: व्ही. एस. नायपॉल – नोबेल पारितोषिक विजेते त्रिनिदादी-भारतीय लेखक (मृत्यू: ११ ऑगस्ट २०१८ )**१९३२: रेखा कामत -- भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन अभिनेत्री (मृत्यू: ११ जानेवारी २०२२ )**१९२५: लक्ष्मीदास कृष्ण बोरकर -- कथाकार कादंबरीकार पत्रकार**१९२३: बाळ बापट ऊर्फ श्रीकृष्ण बापट -- मराठी चित्रपटसृष्टीतील गाजलेले छायाचित्रकार**१९१६: डॉ. विनायक विश्वनाथ तथा ’अप्पासाहेब’ पेंडसे – शिक्षणतज्ञ, देशभक्त, तत्त्वज्ञ, कुशल संघटक, लेखक, पत्रकार आणि ’ज्ञानप्रबोधिनीचे संस्थापक (मृत्यू: १९ ऑगस्ट १९७५ )**१९१६: अमृतलाल नगर -- प्रमुख हिंदी लेखक (मृत्यू: २३ फेब्रुवारी १९९० )**१९१०: चिंतामण गणेश काशीकर -- वेदशास्त्र अभ्यासक, लेखक (मृत्यू: २८ डिसेंबर २००३ )**१९०८: दत्तप्रसन्न नारायण कारखानीस -- कवी (मृत्यू: १९८६ )**१८९३: मे वेस्ट – हॉलिवूडमधील अभिनेत्री, गायिका, संवादलेखिका व सौंदर्यवती (मृत्यू: २२ नोव्हेंबर १९८० )**१८९०: सीताराम शिवराम लोटलीकर-- कादंबरीकार,चरित्रकार (मृत्यू: ११ऑक्टोबर१९३६ )**१८८८: गुरुवर्य बाबूराव गणपतराव जगताप – बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी झटणारे कार्यकर्ते, श्री शिवाजी मराठा हायस्कूलचे संस्थापक,पुण्याचे महापौर (१९६२)(मृत्यू: १ऑक्टोबर १९७८ )**१८७३: नरहर गोपाळ सरदेसाई --प्राच्यविद्या अभ्यासक (मृत्यू: २२ जून १९४३ )**१७६१: पं. विल्यम केरी – अर्वाचीन बंगाली व मराठी गद्यलेखनाचा पाया घालणारे धर्मप्रसारक (मृत्यू: ९ जून १८३४ )* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••*२०२०: पंडित जसराज -- भारतातील प्रसिद्ध शास्त्रीय गायक (जन्म: २८ जानेवारी १९३० )* *२०२०: निशिकांत कामत -- भारतीय चित्रपट निर्माता आणि अभिनेता(जन्म:१७ जून १९७०)**२०१९: नीलम शर्मा -- भारतीय अँकर दूरदर्शनच्या संस्थापक अँकर म्हणून प्रसिद्ध (जन्म: ७ मार्च १९६९ )* *१९८८: मुहम्मद झिया उल हक – पाकिस्तानचे ६ वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: १२ ऑगस्ट १९२४ )**१९०९: भारतमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक कर्नल विल्यम कर्झन वायली यांची हत्या करणारे क्रांतिकारक मदनलाल धिंग्रा यांना फाशी देण्यात आली.(जन्म: १८ फेब्रुवारी १८८३ )**१८५०: जोस डे सान मार्टिन--पेरू देशाचे पहिले अध्यक्ष (जन्म: २५ फेब्रुवारी १७७८ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तरुण भारत मधील दिलीप व. बेतकेकर यांचा लेख *भूगोलातून मूल्यशिक्षण*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *झारखंड आणि महाराष्ट्र या दोन राज्यातील निवडणुका जम्मू काश्मीर आणि हरियाणा राज्यातील निवडणुका पार पडल्यावर होतील असे निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत स्पष्ट सांगितले आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *केंद्रीय निवडणूक आयोगाने जम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक केले जाहीर, काश्मीरमध्ये तीन टप्यात होणार मतदान*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *रक्षाबंधनापूर्वी मला ओवाळणी मिळाली, राज्यभरातील भगिनींनी आपल्या मुख्यमंत्री भावाकडे व्यक्त केली भावना.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *विधानसभेसाठी वंचित बहुजन आघाडी, प्रहार जनशक्ती, भारत आदिवासी पार्टी पक्षांना निवडणूक चिन्ह वाटप*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *विदर्भ-मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प ( VMDDP ) च्या दुसऱ्या टप्प्यास १४९ कोटींचा निधी मंजूर:दूध खरेदीपोटी २००० कोटी रुपयांचा मोबदला थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *७०व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये कांतारा फेम ऋषभ शेट्टी सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय अभिनेता तर परेश मोकाशींचा 'वाळवी' ठरला सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारतीय क्रिकेट संघातील यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशनची बुची बाबू स्पर्धेत दमदार शतकी खेळी*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *ऑक्टोपस म्हणजे काय ?* 📙 ************************ऑक्टोपस या अष्टपाद जलचराबद्दल त्याने घातलेल्या वेढ्याबद्दल अनेक दंतकथा जगभर प्रचलित आहेत. एखाद्या सिनेमाचा हिरो पाण्यात गेल्यावर त्याला याने घातलेला विळखा व त्यातून त्याने करून घेतलेली सुटका हाही अनेक वेळा सुरस व चमत्कारिकपणे दाखवला गेलेला प्रकार आहे. जमिनीवरचा साप हा प्राणी व पाण्यातला ऑक्टोपस या दोन्हींबद्दल असा टोकाचा दृष्टिकोन मानवाने भीतीपोटी घेतलेला आढळतो. खरे म्हणजे दोन्ही प्राणी विषारी जरूर आहेत; पण मानवाला त्यांच्यापासून मुद्दाम होऊन क्वचितच इजा होते. ऑक्टोपस हा मृदूकाय (Molluse) प्रकारचा प्राणी आहे. त्याला कसलेही कवच नसते. याचे शरीर जेमतेम वीतभर असते पण भुजा मात्र फूटभर लांब असतात. याचे तोंड डोक्याच्या आतील बाजूस बंद केले जाते. डोक्यावर टपोरे डोळे असतात. त्याची दृष्टी तीक्ष्ण असते. त्यामुळे भक्ष्य शोधणे व हल्लेखोरापासून पळ काढणे या दोन्ही गोष्टी त्याला छान जमतात. यासाठी त्याला त्याच्या शरीराच्या ठेवणीची खूपच मदत होते. एखाद्या चेंडूसारखी शरीराची वळकटी करून एखाद्या कपारीत शरीर लोटून दिले की त्याच्यावर हल्ला होऊच शकत नाही. याउलट एखाद्या भक्ष्यावर हल्ला करताना हा तोंडातून पाणी ओढून घेऊन ते शरीरातील एका विशिष्ट नळीवाटे वेगाने बाहेर फेकतो. एखाद्या जेटप्रमाणे बघता बघता हा भक्ष्याजवळ जाऊन पोहोचतो व त्याला आपल्या भुजांनी वेढून टाकतो. याच वेळी त्याच्या तीक्ष्ण दातांनी लहानसा चावा घेऊन थोडेसे विष त्या भक्ष्याला टोचले जाते. भुजांची ताकद व विषामुळे येणारी गुंगी यांमुळे एखादे बळकट भक्ष्यही हा सहज पकडतो व गट्टम करतो. याचे आवडते भक्ष्य म्हणजे समुद्री खेकडे. अर्थातच खेकडे समुद्राच्या किनाऱ्याजवळील ज्या भागात उथळ पाण्यात, कपारीत राहतात तेथेच याचेही वास्तव्य असते.ऑक्टोपस जगभर उथळ पाण्यात आढळतात. याच्या दीडशे जाती आहेत. वीतभर आकारापासून खरोखर अजस्त्र म्हणावा असा पॅसिफिक महासागरात आढळणारा ऑक्टोपस चक्क वीस ते बावीस फूट लांबीच्या भुजा असलेला आढळतो. पण याचेही धड व डोके जेमतेम दीडदोन फुटांचेच असते. अस्ताव्यस्त पसरलेल्या भुजांमुळे हा मोठा वाटतो. ऑक्टोपस हा निशाचर जलचर आहे. खास करून अंधारात हा उदरभरणाला बाहेर पडतो. दिवसा कुठेतरी कपारीत झोपा काढणे याला आवडते. या त्याच्या सवयीमुळेच माणसाशी त्याचा फारसा संबंध खरे म्हणजे येतच नाही. फक्त खास करून ऑस्ट्रेलिया किनाऱ्यावर आढळणारे ऑक्टोपस विषारी डंखाने मानवी मृत्यूला कारणीभूत ठरतात. हा डंखही झाल्याचे कळत नाही, इतका नाजूक असतो. डंख पोहोचणारा माणूस काठावर आला की काही काळाने हृदयक्रिया बंद पडून त्याचा मृत्यू ओढवतो. वांब जातीचा सापासारखा मासा मात्र ऑक्टोपस खाण्यात पटाईत आहे. हा मासाही खूप मोठा म्हणजे सहज आठ दहा फूट लांब व लहान मुलाच्या मांडीएवढा जाड असतो. तीक्ष्ण दातांनी तो बघताबघता याचा फडशा पाडतो. अगदी उथळ पाण्यात, पण डोंगरकपारी असलेल्या भागात मासेमारी करणाऱ्यांना सटीसमासी जाळ्यात अाॅक्टोपस सापडतात. अर्थात एखाद्या जलसंग्रहालयात त्यांची पाठवणी करण्याचा मासेमार प्रयत्न करतात; पण फारच क्वचित हे प्रयत्न यशस्वी होतात. जमिनीवरील काही प्राणी रंग बदलतात. तीच कला ऑक्टोपसच्या काही जातींनाही साध्य आहे. त्याच्या कातडीत असलेल्या काही रंगद्रव्याचा पाण्यातील प्रकाशाप्रमाणे रंग बदलत जातो. त्यामुळे अनेकदा याचे अस्तित्व ओळखणे अन्य प्राण्यांना कठीण होत जाते. ऑक्टोपसची मादी माशांप्रमाणेच कपारीमध्ये अंडी घालते. एका वेळी घातलेल्या अंड्यांची संख्या किती असावी ? एक ते दीड लाख अंडी अगदी सूक्ष्म स्वरूपात एकत्रित करून घातली जातात. पण यातून होणाऱ्या नवनिर्मितीचे प्रमाण मात्र खूपच कमी असते, कारण ही अंडी अनेक जलचरांकडुन नष्ट होतात.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मनुष्य विचारी असेल तर तत्त्वज्ञानी बनतो व विकारवश असेल तर तो बेताल बनतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) पाकिस्तानचा पहिला सुवर्ण पदक विजेता भालाफेकपटू कोण ?२) महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळाने राज्यांतील नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाचा कालावधी अडीच वर्षावरून किती वर्ष करण्याचा निर्णय घेतला आहे ?३) देशातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांची यादीत कोणती संस्था प्रथम स्थानावर आहे ?४) 'देव या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाचा २०२४ चा 'गानसम्राज्ञी लता मंगेशकर' पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ? *उत्तरे :-* १) अर्शद नदीम ( पॅरिस ऑलिम्पिक २०२४ ) २) ५ वर्ष ३) IIT चेन्नई ४) सुर, ईश्वर, ईश, परमेश ५) अनुराधा पौडवाल *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 मीना खोंड, लेखिका, हैद्राबाद👤 बालाजी मदन इंगळे, शिक्षक तथा साहित्यिक, उमरगा👤 मा. राजेश कुंटुरकर, संचालक, NDCC बँक, नांदेड👤 रवींद्र धुप्पे, नांदेड👤 अरुणा राजीव भोसले, शिक्षिका, कोल्हापूर👤 सचिन एडके, धर्माबाद👤 बालाजी बरडे, धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••पंडित पढि गुनि पचि मुये गुरु बिन मिलै न ज्ञान ।ज्ञान बिना नहि मुक्ति है सत्य शब्द प्रमान ॥ 48 ॥।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••स्पष्ट व खरे बोलताना आपल्याला साथ देणारे खूप कमी मिळतील. आणि खोटे बोलून गोड शब्दात बोलणारे कोसो दूरचे असंख्य भेटतील पण,जेव्हा आपल्यावर वेळ, प्रसंग येईल त्यावेळी मात्र गोड बोलणारे सुद्धा अनोळखी होऊन जातील. हजार विरोधक निर्माण झाले तरी चालेल पण,खरे व स्पष्ट शब्दात बोलणे सोडू नये. भलेही त्यावेळी कोणी साथ नाही दिली तरी चालेल पण,स्वतः कडूनच मिळालेली साथ खूप मोठी असते म्हणून स्वतः वर पूर्ण विश्वास असू द्यावा. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *एकीचे बळ* एकदा एक कबुतराचा मोठा थवा आकाशात अन्नाच्या शोधासाठी उडत होता. ते एका घनदाट जंगलात गेले. एक कबुतर आपल्या बाकीच्या सहकाऱ्यांना बोलले ‘मित्रांनो, आपण खूप लांबच्या अंतरावरून येत आहोत. आपल्यातील सर्वच खूप थकलेले आहेत. तर, आपण थोडा वेळ येथे आराम करू या.’पण मध्यम वयीन कबुतर बोलला ‘तू जे बोलत आहेस ते खरे आहे, पण आपण सर्व भूकेलो आहोत.’ आणि जर आपण उशीर केला तर आपल्याला अन्न मिळणार नाही. बाकीच्या कबुतरांचे पण तेच म्हणणे होते. सर्व कबुतर बरोबर उडायला लागले. त्यांनी बघितले की जमिनीवर धान्य पसरलेले होते.ज्या कबुतराला आराम हवा होता तो बोलला ‘बघा! आपले धान्य! चला आपण ते वेचूया.’ सर्व कबुतर धान्य वेचण्यासाठी खाली उतरले. तिथे भरपूर प्रमाणात धान्य होते. सर्वात जास्त वयस्कर कबुतर बोलतो की ‘या, या लवकरात लवकर धान्य उचला व खा.’जेव्हा सर्व कबुतर धान्य खात होते तेव्हा अचानक एक जाळी त्यांच्या अंगावर येऊन पडली. सर्व त्यामध्ये अडकले.‘आता आपण काय करायचे?’ सर्व रडायला लागले. एक शिकारी झाडावर बसलेला होता त्याच्याकडे धनुष्य व बाण होते. त्यामुळे एक कबुतर बोलला ‘मित्रांनो, माझी एक युक्ती आहे आपण सर्व जण मिळून ताकद लावून एकाच वेळेस जाळीसह वरती उडू या व आपण सहजपणे यातून सुटू शकतो.’सर्व कबुतरांनी त्यांची सर्व ताकद पणाला लावून जाळीसह वरती उडायला लागले व ते खूप उंचावर उडले आणि त्यांची अवघड परिस्थितीतून सुटका झाली.हे बघून तो शिकारी आश्चर्य चकित होऊन व स्तब्ध झाला.एक कबुतर बोलला ‘आपण शिकाऱ्यापासून सुटलो आहोत, आता आपण आपल्या उंदिर मित्राकडे जाऊ तो आपल्याला मदत करेल.’ते कबुतर पुन्हा आपली शक्ती एकत्र करून उडायला लागतात व डोंगराच्या पायथ्याजवळ जातात. तेथील बिळात राहणाऱ्या उंदराला ते मदतीसाठी बाहेर बोलवतात. उंदिर त्यांना मदत करायला तयार होतो, व काही मिनिटांतच तो आपल्या तीक्ष्ण दातांनी ती जाळी कुरतडून टाकतो व कबुतरांची जाळीतून मुक्तता करतो.शेवटी कबुतर उंदराचे आभार मानून आपल्या घरी जातात.*तात्पर्य - एकतेतच बळ असते. एकतेमुळे अवघडातल्या अवघड परिस्थितीमधून आपली सुटका होऊ शकते. "*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment