✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 06 ऑगस्ट 2024💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/hKSJgmomTG47KavR/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🟧 *_अणूबॉम्ब निषेध दिन : हिरोशिमा दिन_*🟧 •••••••••••••••••••••••••••••••••••🟧 *_ या वर्षातील २१९ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🟧 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟧•••••••••••••••••••••••••••••••••*१९९७: कोलंबो येथे भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यात श्रीलंकेने ६ बाद ९५२ अशी विक्रमी धावसंख्या उभारली. त्यात सनत जयसूर्या याने ३४० धावा केल्या.**१९९४: डॉ. शिवराम कारंथ यांना राष्ट्रपती डॉ. शंकरदयाळ शर्मा यांच्या हस्ते ’इंदिरा गांधी पर्यावरण पुरस्कार’ प्रदान**१९९०: कुवैत बळकावल्याबद्दल संयुक्त राष्ट्रांनी इराकवर व्यापारी बंधने लादली.**१९६२: जमैकाला (इंग्लंडपासुन) स्वातंत्र्य मिळाले.**१९६०: अमेरिकेने घातलेल्या व्यापारबंदीला प्रत्युत्तर म्हणून क्युबाने अमेरिकन बँकांसह सर्व परदेशी बँकाचे राष्ट्रीयीकरण केले.**१९४५: अमेरिकेने जपानमधील हिरोशिमा या शहरावर अणूबॉम्ब टाकला. यात ७०,००० जण तात्काळ मृत्यूमुखी पडले तर पुढील अनेक वर्षे लोकांवर किरणोत्सर्गाचा परिणाम झाला.**१९४०: सोविएत युनियनने इस्टोनियाचा बेकायदेशीरपणे ताबा घेतला.**१९२६: जेरट्रूड एडर्ले ही इंग्लिश खाडी पोहुन जाणारी पहिली महिला बनली.**१९१४: पहिले महायुद्ध - सर्बियाने जर्मनीविरुद्ध तर ऑस्ट्रियाने रशियाविरुद्ध युद्ध पुकारले.* 🟧 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟧 ••••••••••••••••••••••••••••••••• *१९८७: आदित्य नारायण झा -- भारतीय गायक, होस्ट आणि अभिनेता**१९८३: प्रा. डॉ. विजय हरीराम रैवतकर-- लेखक* *१९७४: प्रा. डॉ. ललित अधाने -- कवी**१९७२: डॉ.अनुजा दत्तात्रेय जोशी -- कवयित्री, संपादिका* *१९७२: गजानन इंदूशंकर देशमुख -- कवी, लेखक**१९७०: एम. नाईट श्यामलन – भारतीय वंशाचे अमेरिकन चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथालेखक**१९६७: तुषार दळवी -- भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन अभिनेता* *१९६५: नितीन चंद्रकांत देसाई --- भारतीय कला दिग्दर्शक , प्रॉडक्शन डिझायनर आणि चित्रपट आणि दूरदर्शन निर्माता (मृत्यू: २ ऑगस्ट २०२३)**१९५९: राजेंद्र सिंग -- भारतीय जलसंधारणवादी आणि पर्यावरणतज्ज्ञ , "वॉटरमॅन ऑफ इंडिया" म्हणूनही ओळखले जाते**१९५८: अनंत बागाईतकर. --ज्येष्ठ पत्रकार**१९५४: नदीम अख्तर सैफी -- नदीम-श्रवण भारतीय संगीत दिग्दर्शक जोडीतील संगीतकार* *१९५०: बाहरु सोनावणे -- लेखक* *१९४९: श्रद्धा मधुकर पराते -- कवयित्री**२९४८: प्रा.बाळासाहेब हणमंतराव कल्याणकर -- कवी, लेखक, संपादक* *१९४७: अजित सोमण -- प्रसिद्ध बासरीवादक, संगीतज्ञ, संहितालेखक, जाहिरातलेखक आणि इंग्रजी भाषेचे प्राध्यापक (मृत्यू:२ फेब्रुवारी २००९ )**१९४२: अपर्णा मोहिले -- केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाच्या (सेन्सॉर बोर्ड) माजी अध्यक्षा व ज्येष्ठ लेखिका (मृत्यू: २७ जुलै २०२२ )**१९३९: मधुकर रामचंद्र गोसावी -- संत साहित्याचे ज्येष्ठ लेखक आणि कवी(मृत्यू: १६ एप्रिल २०१९ )* *१९२६: वसंत राजाराम जोशी -- कथालेखक**१९२६: प्रा. डॉ. सुमन गोविंद वैद्य -- इतिहास विषयक लेखन करणाऱ्या लेखिका**१९२५: योगिनी जोगळेकर – प्रसिद्ध कवयित्री, लेखिका (मृत्यू: १ नोव्हेंबर २००५ )**१९२०: गोपाळकृष्ण अनंत भोबे -- संगीत विषयक ललितलेखन करणारे लेखक (मृत्यू: १४ फेब्रुवारी १९६८ )**१९०९: बाळकृष्ण मार्तंड दाभाडे -- कवी, निबंधकार कला समीक्षक (मृत्यू: २२ मे १९७९ )**१८८१: अलेक्झांडर फ्लेमिंग – नोबेल पारितोषिक विजेते स्कॉटिश शास्त्रज्ञ (मृत्यू: ११ मार्च १९५५ )**१८०९: लॉर्ड टेनिसन – इंग्लिश कवी (मृत्यू: ६ आक्टोबर १८९२ )* 🟧 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟧 ••••••••••••••••••••••••••••••••• *२०२०: बाबा शिंगोटे-- 'दैनिक पुण्यनगरी'चे संस्थापक-संपादक (जन्म: ७ मार्च १९३८ )**२०१९: सुषमा स्वराज -- माजी परराष्ट्रमंत्री (जन्म: १४ फेब्रुवारी, १९५२ )**२०१५: लक्ष्मण बाळकृष्ण लोंढे -- विज्ञानकथाकार, कादंबरीकार, प्रवासवर्णनकार (जन्म: १३ आक्टोबर १९४४ )**२०१४: स्मिता तळवलकर -- मराठी चित्रपट,नाट्य आणि दूरचित्रवाणी अभिनेत्री, निर्मात्या आणि दिग्दर्शक (जन्म: ५ सप्टेंबर १९५५ )**२०१३: महामहोपाध्याय डॉ. ब्रह्मानंद श्रीकृष्ण देशपांडे -- मराठी इतिहास संशोधक, प्रसिद्ध वक्ते आणि महानुभाव पंथाचे अभ्यासक (जन्म : १३ जून १९४० )**१९९९: कल्पनाथ राय – माजी केन्द्रीय मंत्री, काँग्रेसचे नेते (जन्म: ४ जानेवारी १९४१ )**१९९७: वीरेन्द्रकुमार भट्टाचार्य – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आसामी साहित्यिक (जन्म: १४ आक्टोबर १९२४ )**१९६५: वसंत पवार – प्रसिद्ध संगीतकार (जन्म:१९२७ )* *१९२५: सुरेंद्रनाथ बॅनर्जी – भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक आणि त्यातील जहाल गटाचे नेते, ’राष्ट्रगुरू’ (जन्म: १० नोव्हेंबर १८४८ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*शिक्षण : जीवन विकासाचे साधन*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *नाशिक : शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना किमान दहा हजार वेतन द्यावे, यासह विविध प्रलंबित मागण्यासाठी पोषणआहार कर्मचारी आक्रमक*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *पुजा खेडकरची युपीएससीच्या निर्णयाच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *आज सुप्रीम कोर्टात शिवसेना, राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *गणेश मंडळांना सरसकट पाच वर्षांची मंडप परवानगी द्या, पालिका आयुक्तांना पत्र*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *भारत-बांगलादेश सीमेवरील परिस्थितीवर बारकाईने लक्ष, बीएसएफकडून पत्रक जारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज 10 व्या दिवशी भारताच्या पदरी निराशा, बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनचं कांस्य पदक हुकलं*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *उजनीत पाणी वाढलं, पंढरपूरला पुराचा धोका, आमदाराने घेतली तातडीची बैठक; 18 वर्षांपूर्वीच्या पुराची आठवण*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📕 *पोलिओने पाय लुळा का होतो ?* 📕 पोलिओ हा विषाणूंमुळे होणारा एक रोग आहे. तीन प्रकारच्या विषाणूंमुळे हा रोग होतो. या रोगाचे जंतू रुग्णाच्या विष्ठेतून पिण्याच्या पाण्यात मिसळले जातात व निरोगी लोकांना हा रोग होतो. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची सुरक्षित व्यवस्था व मलमूत्र विसर्जनाची विल्हेवाटीची व्यवस्था नसलेल्या देशांमध्ये हा रोग मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. भारतात या सुविधांचा अभाव असल्याने पोलिओ आढळून येतो. पाच वर्षांखालील मुलांना हा रोग प्रामुख्याने होतो. दरवर्षी दर लाख लोकसंख्येमागे १५ जण पोलिओमुळे लुळे होतात.पोलिओचे विषाणू दूषित पाण्यातून तोंडावाटे शरीरात प्रवेश करतात. पचनसंस्थेत प्रवेश केल्यानंतर सौम्य प्रकारचा आजार होतो (यात ताप, उलट्या व जुलाब ही लक्षणे असतात) व बऱ्याचदा तो आपोआप बरा होतो. अशा रुग्णांपैकी क्वचित एखाद्याच्याच आतड्यातून हे विषाणू रक्तात जातात. रक्तातून स्नायूत व मग मज्जासंस्थेत रतात. मज्जासंस्थेच्या ज्या भागावर वा नसेवर विषाणू हल्ला करून तिला निकामी करतात, त्यानुसार त्या नसेशी संबंधित असे स्नायू लुळे पडतात. सामान्यपणे पाय लुळा पडतो, कधी कधी हात, तर कधी हात व पाय वा शरीर लुळे पडू शकते.रक्तात वा स्नायूत विषाणू असल्यास रुग्णाला जर इंजेक्शन दिले गेले, तर हातपाय लुळे पडण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्याच्या काळात व विशेषत: पोलिओची साथ चालू असल्यास ताप, हगवण झाल्यास चुकूनही इंजेक्शन देऊ नये.पोलिओ टाळण्यासाठी महत्त्वाचा उपाय म्हणजे सर्व लहान मुलांना पोलिओची लस पाजणे. जन्माच्या दिवशी पहिली लस दिली जाते. त्यानंतर दीड, अडीच, साडेतीन महिने वय असताना व नंतर दीड वर्ष वय असताना परत ही लस पाजली जाते. ही लस दिल्यास पोलिओ होत नाही. दूरगामी प्रतिबंध करण्यासाठी राहणीमानाचा दर्जा उंचावणे, सुरक्षित पाण्याचा पुरवठा करणे व मलमूत्र विसर्जन विल्हेवाटीसाठी सुयोग्य व्यवस्था करणे, हे आवश्यक ठरते.पोलिओने पाय लुळा पडल्यास भौतिकोपचार तसेच कॅलीपर (पायाचा आधार) वगैरे वापरून शक्ती परत आणण्याचा प्रयत्न करता येतो. काही वेळा शस्त्रक्रियेचाही उपयोग होतो. अर्थात, हे सर्व करण्यापेक्षा लसीकरण करून रोग टाळणे, हेच योग्य ठरेल.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कला ही जीवनाची दासी आहे, तिचे कार्य जीवनाची सेवा करणे हे आहे.- गुरुदेव रवींद्रनाथ टागोर*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारताचे रेल्वेमंत्री कोण आहेत ?२) राज्यातील पहिले *सौरग्राम* कोणते ?३) भूतकाळातील घटनांचा शास्त्रशुद्धपणे केलेला अभ्यास म्हणजे काय ?४) 'दारा' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 'मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजने'चा प्रारंभ कोठून झाला ? *उत्तरे :-* १) अश्विनी वैष्णव २) मान्याचीवाडी, ता. पाटण, जि. सातारा ३) इतिहास ४) बायको, पत्नी ५) सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 हर्ष पाटील👤 इरेश वंचेवाड👤 गणेश धुप्पे👤 गंगाधर दगडे, बिलोली👤 सुदर्शन पाटील जोगदंड, शिक्षक, धर्माबाद👤 दीपक पाटील हिवराळे👤 नरसिंह पावडे देशमुख👤 राजेंद्र पोकलवार*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सुखिया सब संसार है खाये और सोए।दुखिया दास कबीर है जागे और रोए ॥36॥।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मन हे मनोव्यापाराचे केंद्र आहे.आपल्या मनात अनेक विचार येत असतात. असेच विचार इतरांच्या मनात देखील येत असतातच.आपल्या मनात काय चालले आहे हे फक्त आपल्यालाच माहित असते. इतरांच्या मनात काय चालले आहे त्या विषयी मात्र माहीत नसते. पण, काही का असेना त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव मात्र आपोआप दिसून येतात. त्यावेळी कोणी दु:खात असेल तर कोणी आनंदी असेल पण, त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरील भाव ओळखून माणुसकीच्या नात्याने आपण मदत करावा किंवा सांत्वना देण्याचा प्रयत्न करावा. त्यामुळे आपल्याला सुखद समाधान मिळाल्याचा विशेष आनंद होईल. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• " एका जंगलात एक हरीण रहात होते. त्या हरणाला सोनेरी शिंगे होती त्यमुळे त्या हरणाला शिंगाचा खूप गर्व होता. पण तो कधीही आनंदी नसे. कारण त्याला वाटे की, आपले पाय खूप काटकुळे व विद्रूप आहेत. जेव्हा तो शिंगाकडे पाही तेव्हा तो खूप खूष असे. पण जेव्हा त्याचे आपल्या पायाकडे लक्ष जाई तेव्हा त्याला त्याचा खूप राग येत असे.एक दिवस हरिण जंगलातील एका झऱ्यावर पाणी पीत होते. पाणी पिता पिता त्याला पाण्यात त्याची सोनेरी शिंगे दिसली. सुंदर सोनेरी शिंगे पाहून त्याला खूप आनंद झाला. तेवढ्यात त्याला कसलातरी आवाज ऐकू आला आणि मागे वळून पाहतो तर समोरच त्याला एक शिकारी दिसला. शिकारी त्याच्यावर निशाणा साधत होता. शिकाऱ्याला पाहून हरिण घाबरले आणि जोरजोरात पाळायला लागले.शिकारी त्याचा पाठलाग करू लागला. हरणाचे पाय त्याला उत्तम साथ देत होते. त्या पायांमुळे तो इतका जोरात पळत होता. परंतु पळता पळता हरणाची शिंगे एका झाडाच्या फांद्यामध्ये अडकली. हरिण खूप प्रयत्न करतो पण शिंगे काही निघत नव्हती. शेवटी शिकारी आला आणि हरणाला पकडून घेऊन गेला.हरणाला रडायला येते आणि ती स्वत: शीच पुटपुटतो,अरे माझी सुंदर शिंगेच माझ्यासाठी आज संकट बनली. त्यांच्यामुळे शिकाऱ्याने आज मला पकडले*तात्पर्य-* फक्त सौंदर्यच सर्व काही नसते. कुठल्याही गोष्टीचे गुण-दोष पण पारखले पाहिजेत ."•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment