✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 08 ऑगस्ट 2024💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/cYUnUt5Nq9XMW2jG/?mibextid=xfxF2i••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🟫 *_भारत छोडो दिन_* 🟫••••••••••••••••••••••••••••••••••••••🟫 *_ या वर्षातील २२१ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🟫 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟫•••••••••••••••••••••••••••••••••*२००८: चीनमधील बिंजिंग येथे येथे २९ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.**२०००: महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणारा ’महाकवी कालिदास संस्कृत-साधना पुरस्कार’ पुण्याचे वेदमूर्ती मोरेश्वर घैसास गुरुजी यांना जाहीर**१९९८: संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (DRDO) सात प्रयोगशाळा औद्योगिक क्षेत्रासाठी खुल्या झाल्या.**१९९४: पुणे येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेने फक्त महिलांसाठीच असलेले देशातील पहिले वास्तुशास्त्र महाविद्यालय (Dr. Bhanuben Nanavati College of Architecture for Women) सुरू केले.**१९८५: भाभा अणुशक्ती केंद्र तुर्भे येथे ’ध्रुव’ ही भारताची सहावी व आतापर्यंतची सर्वात मोठी संशोधनपर अणुभट्टी कार्यान्वित झाली.**१९७४: वॉटरगेट प्रकरण – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी राजीनामा दिला.**१९६७: इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपाइन्स, सिंगापूर व थायलँड यांनी ASEAN ची स्थापना केली.**१९६३: इंग्लंडमधे १५ जणांचा टोळीने रेल्वेवर दरोडा टाकुन २६ लाख पौन्ड पळवले.**१९४२: भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने मुंबईतील गोवालिया टँक मैदानावर (ऑगस्ट क्रांति मैदान) झालेल्या अधिवेशनात ’चले जाव’ चा ठराव मंजुर केला. याप्रसंगी महात्मा गांधींनी ’करेंगे या मरेंगे’ हा संदेश दिला.* 🟫 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟫 ••••••••••••••••••••••••••••••••• *१९८१: रॉजर फेडरर – स्विस लॉन टेनिस खेळाडू**१९७९: जास्मिन रमजान शेख -- कवयित्री, लेखिका, समुपदेशक* *१९७२: छाया बेले --- कवयित्री लेखिका**१९७०: शिवाजी निवृत्ती राव घुगे -- कवी लेखक* *१९६९: डॉ. आशुतोष राराविकर -- अर्थशास्त्रज्ञ व प्रसिद्ध मराठी साहित्यिक* *१९६७: डॉ. मोना मिलिंद चिमोटे -- समीक्षक, संशोधक आणि लेखिका* *१९६४: विवेक दत्तात्रय जोशी -- प्रसिद्ध कवी* *१९५८: अशालता अशोक गायकवाड -- कवयित्री, लेखिका**१९५५: श्याम खांबेकर -- गीतकार व कवी* *१९५१: अरुण वि. देशपांडे --लेखक, कवी, बाल साहित्यिक, समीक्षक**१९४८: प्रा. डॉ. रमेश जाधव -- इतिहास संशोधक**१९४८: कपिल सिब्बल -- प्रसिद्ध भारतीय वकील आणि राजकारणी**१९४७: सुरेशचंद्र वारघडे -- लेखक* *१९४०: दिलीप सरदेसाई –क्रिकेटपटू (मृत्यू: २ जुलै २००७ )**१९३९: डॉ. रंगनाथ नाथराव जोशी-- गीतकार, लेखक* *१९३५: डॉ.लक्ष्मण रामदास नसिराबादकर -- संत साहित्याचे गाढे अभ्यासक (मृत्यू: ४ डिसेंबर २०१८ )**१९३४: डाॅ. माधव आत्माराम चितळे -- जागतिक कीर्तीचे मराठी जलतज्ज्ञ**१९३२: दादा कोंडके – सुप्रसिद्ध अभिनेते, निर्माते,दिग्दर्शक,संवादलेखक (मृत्यू: १४ मार्च १९९८ )**१९३१: सुमन माटे -- ज्येष्ठ गायिका**१९२६: शंकर पाटील – साहित्यिक, चित्रपट कथालेखक, ग्रामीण कथालेखक, भारतीय चित्रपट महामंडळाचे संस्थापक सचिव आणि ’बालभारती’चे संपादक.(मृत्यू: ३० जुलै १९९४ )**१९२५: डॉ. वि .ग. भिडे – शास्त्र व तत्त्वज्ञानाचे अभ्यासक, पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरु, केंद्र सरकारचे वैज्ञानिक सल्लागार,पद्मश्री (मृत्यू: जून २००६ )**१९२४: यूजीन मेरिल डीच -- अमेरिकन चित्रकार, ॲनिमेटर , कॉमिक्स कलाकार, आणि चित्रपट दिग्दर्शक (मृत्यू: १६ एप्रिल २०२०)**१९२०: उषा श्रीपाद पंडित -- कथालेखिका* *१९१६: सदाशिव रामचंद्र गाडगीळ -- संशोधक, समीक्षक (मृत्यू: ९ ऑक्टोबर २००८ )* *१९१२: बंगळुरू वेंकट तथा बी. व्ही. रमण – जागतिक कीर्तीचे फलज्योतिषी (मृत्यू: २० डिसेंबर १९९८ )**१९१२: तुकाराम केरबा ऊर्फ टी. के. अण्णा वडणगेकर – कोल्हापूरची कलापरंपरा जपणारे चित्र व शिल्पकलेतील दिग्गज (मृत्यू: ३१ मार्च २००४ )**१९०८: सिद्धेश्वरी देवी -- हिंदुस्तानी संगीत शैलीत गाणाऱ्या,वाराणसी येथील गायिका(मृत्यू: १८ मार्च १९७७ )**१९०६: परशुराम महादेव बर्वे -- विज्ञान विषय लेखन करणारे लेखक* *१९०२: पॉल डायरॅक – नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: २० आक्टोबर १९८४ )**१८९८: गजानन विश्वनाथ केतकर --निबंधकार, विचारवंत,गीतेचे अभ्यासक ( मृत्यू:१५ जुलै १९८० )* 🟫 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟫••••••••••••••••••••••••••••••••• *२०२१: अनुपम श्याम ओझा -- भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन अभिनेता(जन्म: २० सप्टेंबर १९५७ )**२०२१: मखराम पवार -- बहुजन महासंघाचे संस्थापक,सह आयुक्त तथा माजी मंत्री म.रा.(जन्म: १ मार्च१९३९ )**२०१७: डॉ.भीमराव गस्ती -- देवदासी प्रथा नष्ट व्हावी म्हणून आयुष्यभर संघर्ष करणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व साहित्यिक (जन्म: १०मे १९५० )* *२०१३: जयमाला शिलेदार -- हिंदुस्थानी शास्त्रीय गायिका आणि नाट्य अभिनेत्री (जन्म : २१ऑगस्ट १९२६ )**१९९९: गजानन नरहर सरपोतदार – चित्रपट निर्माते व दिग्दर्शक (जन्म: २३ एप्रिल १९४०)**१९९८: डॉ.सुमती क्षेत्रमाडे – वैद्यकीय व्यवसाय सांभाळुन साहित्यिक अभिरुची जोपासणार्या लेखिका व कादंबरीकार.(जन्म: ७ मार्च १९१३ )**१८९७: व्हिक्टर मेयर – जर्मन रसायनशास्त्रज्ञ (जन्म: ८ सप्टेंबर १८४८ )**१८२७: जॉर्ज कॅनिंग – ब्रिटनचे पंतप्रधान (जन्म: ११ एप्रिल १७७० )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*देशाची 'युवा भारत' म्हणून ओळख निर्माण करू या ....!*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मंत्रिमंडळ निर्णय ! महाराष्ट्र लॉजिस्टिक धोरण राबविणार ; 5 वर्षात 30 हजार कोटींचे उत्पन्न, 5 लाख नोकऱ्या*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *100 पटाच्या विद्यार्थी संख्येला मुख्याध्यापक पद ग्राह्य धरणार, शिक्षणमंत्री दीपक केसरकर*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राज्यसभेच्या बारा जागांसाठी पोटनिवडणूक, ३ सप्टेंबर रोजी होईल मतदान. मतदान संपल्यानंतर लगेच मतमोजणी होणार आहे. यात महाराष्ट्रातील दोन जागांचा समावेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *रक्षाबंधनपूर्वीच बहिणींना मिळणार ओवाळणी ! लाडकी बहीण योजनेचा पहिला हफ्ता 17 ऑगस्टला मिळण्याची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *विना परवानगी झाड तोडल्यास आता भरावा लागणार पन्नास हजाराचा दंड, मंत्रीमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पॅरिस ऑलिम्पिक २०२४च्या फायनलला पोहोचलेली भारताची पैलवान विनेश फोगाट अपात्र; 50 किलो वजनी गटात 100 ग्रॅम वजन जास्त भरल्याने कारवाई, भारताला मोठा धक्का*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *श्रीलंकेने भारताचा 110 धावानी केला पराभव, 2-0 ने सिरीज जिंकली*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *कोमा म्हणजे काय ?* 📙 ************************रॉबीन कूकच्या 'कोमा' या कादंबरीवर 'कोमा' हा चित्रपट निघाला. तो अनेकांनी पाहिला असेल. त्यानंतर निघालेल्या बऱ्याच हिंदी चित्रपटांमध्येही आपला आवडता नायक, नायिका व त्यांचे मायबाप कोमात गेल्याचे (बिचारे!) तुम्ही बघितले असेल. अधूनमधून 'अमुक तमुक राजकीय पक्षाचे वयोवृद्ध नेते कोमात' अशी बातमीही तुम्ही वाचली असेल. कोमा म्हणजे नेमके काय ? - हा प्रश्न तेव्हापासून तुम्हाला सतावत असेल. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर काही अशी गाढ झोप आहे ज्यातून माणसाला कितीही वेदना होणारे उद्दीपन दिले तरी तो जागा होऊ शकत नाही. झोप वा कोमा यांतील याखेरीच महत्त्वाचा फरक म्हणजे झोपेतला माणूस ठरावीक काळात झोपत असल्याने त्याच्या पोषणाचा प्रश्न निर्माण होत नाही; पण कोमातील माणसाला जर शिरवाटे पोषण पुरवले नाही तर तो जिवंत राहणार नाही.मेंदूचे कार्य काही प्रमाणात बंद पडणे म्हणजे माणूस कोमात जाणे, असे म्हणता येईल. यात मेंदूतील सर्व अत्यंत महत्त्वाच्या केंद्रांचे काम बंद पडते. मेंदूच्या वा त्यावरील आवरणांच्या आजारांमुळे, मेंदुला होणाऱ्या दुखापतींमुळे, अफू व दारू यांच्या विषबाधेमुळे तसेच मधुमेहात व मूत्रपिंडाच्या गंभीर आजारामुळे रुग्ण कोमात जाऊ शकतो. व्यक्तीचा मृत्यू हा मेंदूतील श्वसन, रक्ताभिसरण इत्यादी गोष्टींचे नियंत्रण करणारी केंद्रे निकामी झाल्याने होतो. कोमा हा आजार नसून आजारांमुळे होणारा परिणाम आहे. आजकाल कृत्रिम उपायांनी लंबमज्जा, मज्जारज्जू तसेच सर्व शरीराचा रक्तपुरवठा सुरळीत चालू ठेवता येतो. त्यामुळे कोमात गेलेल्या अशा व्यक्ती बराच काळ जिवंत राहू शकतात. अर्थात त्या शुद्धीवर येणे जवळपास अशक्य असते.भारतीय कायद्याने आता 'मेंदूचा मृत्यू म्हणजे मृत्यू' ही कल्पना मान्य केली आहे. ज्या व्यक्तींच्या मेंदूच्या कार्याचा विद्युत प्रवाहांचा आलेख हा ५ मिनिटे घेतला तरी सरळ रेषेत दाखवतो अशी व्यक्ती मृत झाल्याचे घोषित करून तिच्या शरीरातील मृत्रपिंड, हृदय असे अवयव इतर रुग्णांसाठी वापरता येतात.*डॉ. जगन्नाथ दीक्षित डाॅ. अंजली दीक्षित* यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून मनोविकास प्रकाशन👆*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवन फुलासारखे असू द्या, पण ध्येय मात्र मधमाशीसारखे ठेवा.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) पॅरिस ऑलिम्पिक समारोप सोहळ्यात भारताचा ध्वजवाहक कोण असणार आहे ?२) पश्चिम घाटाचा विस्तार किती राज्यात आहे ?३) भारताची युपीआय सेवा स्वीकारणारा पहिला युरोपीय देश कोणता ?४) 'दागिना' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते ? *उत्तरे :-* १) मनू भाकर, शूटर २) सहा ( केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र, गुजरात ) ३) फ्रान्स ४) अलंकार, भूषण ५) राज्यसभा *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 अरुण वि. देशपांडे, साहित्यिक, परभणी👤 अवधूत पाटील सालेगावकर👤 चंदू नागुल, नांदेड👤 योगेश ढगे पाटील👤 ऋषिकेश सोनकांबळे👤 लक्ष्मण खमशेट्टी👤 नागेश कानगुलवार👤 रावजी मारोती बोडके👤 संतोष वाढवे👤 रवी वाघमारे👤 गजानन सावंत👤 सौ. रेखा बालाजी सुंकेवार, देगलूर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गुरु सीढ़ी ते ऊतरै शब्द बिहूना होय।ताको काल घसीटि हैं राखि सकै नहिं कोय || 38 || ।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••खेळ कोणताही असो त्यात हार आणि जीत हे दोन्ही कायम असते त्या दोन्ही शिवाय खेळाला महत्व येत नाही. पण, त्यात कोणाची हार झाली असेल त्यावर विचारमंथन केले जाते व जीत झाली असेल त्यात आनंद उत्सव साजरे होताना बऱ्याच ठिकाणी बघायला मिळत असते. पण एक गोष्ट अवश्य लक्षात ठेवावी जेथे हार झाली बघून स्वतःचा समाधान करण्यासाठी कोणावर मोठ्याने हसू नये. तसेच जीत झाली बघून आपला स्वाभिमान कोणत्याही परिस्थितीत तेथे विकू नये कारण, असे केल्याने आपलीच कधी हार होईल हे, आपल्या लक्षात सुद्धा येणार नाही.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *❃ देवाचा मित्र ❃* ••◆•◆•◆★◆•◆•◆•• एक छोटा मुलगा रणरणत्या उन्हात फुलांचे गजरे विकत होता. ऊन खूप होते. तो मुलगा घामाघूम झाला होता. त्याचे अनवाणी पाय भाजत होते. सारखा तो पाय वर-खाली करत होता. तरीही चिकाटी न सोडता तशा रखरखत्या उन्हात पाय भाजत असताना तो गजरे विकत होता. त्याचे भाजणारे पाय बघून एका सज्जन माणसाला फारच वाईट वाटले. त्याने समोरच असलेल्या दुकानातून त्या मुलासाठी एक चप्पल खरेदी केली आणि त्या मुलाला दिली. त्या मुलाला तो म्हणाला ही चप्पल घाल. तुला मी भेट देतोय. यामुळे तुझे पाय भाजणार नाहीत. मुलगा लहान होता. त्याला त्याचे अप्रूप वाटले. त्याने लगेचच चप्पल घालून बघितली. त्याला खूप छान वाटले. तो आनंदी झाला. आनंदात त्या मुलाने त्या माणसाचा हात धरला व त्याला म्हणाला, ""काका, तुम्ही देव आहात का?‘‘ या प्रश्नावर तो सज्जन गृहस्थ आपले दोन्ही हात कानाला लावून म्हणाला, ""अरे नाही रे बाबा, मी देव नाही.‘‘ मुलगा पुन्हा तसाच निरागस हसला म्हणाला, ""काका - तुम्ही देव नाही मग नक्कीच देवाचे मित्र असणार.‘‘ मी कालच देवाला प्रार्थना केली होती. माझे पाय खूप भाजतात. मला चप्पल हवीय. देवानेच तुम्हाला पाठवले. तुम्ही देवाचे मित्रच असणार, हे वाक्य ऐकताच त्या सज्जन माणसाने त्या मुलाला जवळ घेऊन दोन वाक्ये बोलून तेथून त्या मुलाचा निरोप घेतला. संपूर्ण वाटेत त्या सज्जन माणसाच्या मनात एवढाच विचार घोळत होता, आपल्याला देव होता येत नाही; पण देवाचा मित्र होणे मात्र सहज शक्य आहे. खरोखर मित्रांनो आपल्यापैकी कुणीही देवाचा मित्र होऊ शकतो.*स्वामी विवेकानंद म्हणायचे ज्याला चालत्या-बोलत्या माणसातला देव कळत नाही, त्याला दगडातला देव काय कळणार? म्हणून "शीवभावे जीवसेवा "करा व देवाचा मित्र व्हा*"जे का रंजले गांजले -त्यासी म्हणे जो आपुले | तोची साधु ओळखावा -देव तेथेची जाणावा" || •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment