✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 19 ऑगस्ट 2024💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/LnKSErtU13Su99ME/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🔵 *_जागतिक छायाचित्रण दिन_* 🔵••••••••••••••••••••••••••••••••🔵 *_ या वर्षातील २३२ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🔵 *_महत्त्वाच्या घटना:_* 🔵•••••••••••••••••••••••••••••••••*१९९९: बेलग्रेड, युगोस्लाव्हिया येथे हजारो सर्बियन लोकांनी राष्ट्राध्यक्ष स्लोबोदान मिलोसेव्हिच यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन केले.**१९४५: हो ची मिन्ह व्हिएतनामच्या सत्तेवर आले.**१९१९: अफगाणिस्तानला (युनायटेड किंगडमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.**१९०९: इंडियानापॉलिस मोटर स्पीडवे येथे मोटारींची पहिली शर्यत झाली.**१८५६: गेल बॉर्डन या शास्त्रज्ञाला दुधाच्या शीतकरण प्रक्रियेचे पेटंट मिळाले.* 🔵 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🔵•••••••••••••••••••••••••••••••••*१९९८: आकाश हरिभाऊ भोरडे -- कवी, लेखक**१९८९: शेल्डन कॉट्रेल -- वेस्ट इंडीजचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट**१९८३: जगदीशचंद्र शरदचंद्र पाटील-- लेखक, निर्माता, व्याख्याते**१९८०: सुनील प्रभाकर पांडे -- प्रसिद्ध मराठी लेखक* *१९७२: पंडित कल्याणजी गायकवाड -- गायक व संगीतकार**१९७२: मोहन कुंभार -- लेखक कवी* *१९७१: उत्तम निवृत्ती सदाकाळ -- लेखक कवी**१९७०: विठ्ठल बापूराव भोसले -- लेखक**१९६५: किसन एकनाथ पिसे -- लेखक, कवी**१९६५: हेमंत बिर्जे -- भारतीय अभिनेता**१९५९: प्रा. रेखा अशोक कुलकर्णी -- कवयित्री, लेखिका संपादिका* *१९५६: प्रा. डॉ. राजकुमार पुरुषोत्तम खर्चे -- कवी, लेखक**१९५५: डॉ. अशोक नरहरराव देव -- लेखक, संपादक* *१९५०: पंडित चंद्रकांत लिमये -- भारतातील हिंदूस्थानीशास्त्रीय गायक**१९५०: सुधा कुळकर्णी-मूर्ती -- प्रसिद्ध भारतीय सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका* *१९४६: बिल क्लिंटन – अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष**१९४६: प्रा. मधुकर गोपाळ देशपांडे -- मराठवाड्यातील सुप्रसिद्ध साहित्यिक**१९४३: शरद सांभराव देऊळगावकर -- मराठवाड्यातील सुप्रसिद्ध लेखक* *१९२२: बबनराव नावडीकर (मूळ नाव: श्रीधर यशवंत कुलकर्णी) -- मराठी गायक, कवि, लेखक व कीर्तनकार (मृत्यू: २८ मार्च २००६ )**१९१८: शंकरदयाळ शर्मा – भारताचे ९ वे राष्ट्रपती व ८ वे उपराष्ट्रपती (मृत्यू: २६ डिसेंबर १९९९ )**१९०८: उस्ताद अब्दुल रशीद खान -- हिंदुस्थानी संगीताचे भारतीय गायक (मृत्यू: १८ फेब्रुवारी २०१६)**१९०७: हजारी प्रसाद द्विवेदी -- हिंदी कादंबरीकार, साहित्यिक इतिहासकार, निबंधकार, समीक्षक आणि अभ्यासक (मृत्यू: १९ मे १९७९ )**१९०७: सरदार स्वर्ण सिंग – माजी केन्द्रीय मंत्री (मृत्यू: ३० आक्टोबर१९९४ )**१९०६: प्राचार्य गणेश हरि पाटील -- प्रसिद्ध मराठी कवी, शिक्षणतज्ज्ञ आणि बालसाहित्यिक (मृत्यू: १ जुलै १९८९ )**१९०५: वामन भार्गव पाठक -- कवी, कादंबरीकार, समीक्षक (मृत्यू: २७ जानेवारी १९८९ )**१९०३: गंगाधर देवराव खानोलकर – लेखक व चरित्रकार, ‘अर्वाचीन मराठी वाड़्मय सेवक’ या कोशाचे सात खंड त्यांनी प्रकाशित केले. (मृत्यू: ३० सप्टेंबर १९९२ )**१८८६: मोरेश्वर वासुदेव तथा नरकेसरी अभ्यंकर – स्वातंत्र्यसैनिक, टिळकांच्या विचारसरणीचे मध्य प्रांताचे नेते,वकील (मृत्यू: २ जानेवारी १९३५ )* 🔵 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🔵•••••••••••••••••••••••••••••••••*२०२०: डॉ. मधुकर अनंत मेहेंदळे -- पारशी धर्मग्रंथाचे अभ्यासक, प्रकांड पंडित (जन्म : १४ फेब्रुवारी १९१८ )**२०१९: खय्याम (मोहम्मद जहूर खय्याम हाश्मी) -- भारतीय चित्रपटांचे प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक (जन्म: १८ फेब्रुवारी १९२७ )**२०१९: प्रा. मोतीराज राठोड -- विमुक्त भटक्या चळवळीचे लढवय्ये नेतृत्व, अभ्यासक, साहित्यिक, संशोधक( जन्म: २ सप्टेंबर १९४७ )* *१९९४: लिनस कार्ल पॉलिंग – रसायनशास्त्रज्ञ आणि अण्वस्त्रांच्या विरोधात लढणारे सामाजिक कार्यकर्ते, नोबेल पारितोषिकाचे दोनदा विजेते [१९५४ - रसायनशास्त्र, १९६२ - शांतता] (जन्म: २८ फेब्रुवारी १९०१ )**१९९३: उत्पल दत्त – रंगभूमी आणि चित्रपट या दोन्ही माध्यमात आपला ठसा उमटवणारे कलाकार (जन्म: २९ मार्च १९२९ )**१९९०: रा. के. लेले – पत्रकार, संशोधक आणि मराठी वृत्तपत्रांच्या इतिहासाचे लेखक**१९८५: श्रीकृष्ण दामोदर पानवलकर -- प्रभावी कथाकार (जन्म: १३ फेब्रुवारी १९२८)**१९७५: डॉ. विनायक विश्वनाथ तथा ’अप्पासाहेब’ पेंडसे – शिक्षणतज्ञ, देशभक्त, तत्त्वज्ञ, कुशल संघटक, लेखक, पत्रकार आणि ’ज्ञानप्रबोधिनीचे संस्थापक (जन्म: १७ ऑगस्ट १९१६ )**१९४७: विनायक दामोदर कर्नाटकी ऊर्फ ’मास्टर विनायक’ – अभिनेते, दिग्दर्शक व निर्माते. त्यांनी २२ चित्रपटातून भूमिका केल्या तर २९ चित्रपट दिग्दर्शित केले.(जन्म: १९ जानेवारी१९०६ )**१६६२: ब्लेझ पास्कल – फ्रेन्च गणितज्ञ आणि तत्त्वज्ञ (जन्म: १९ जून १६२३ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*वडील ही वात्सल्यसिंधू*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्र दौरा, 25 ऑगस्ट रोजी जळगावमध्ये लखपती दीदी कार्यक्रम*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *महिलांचा आत्मसन्मान वाढविला तर राज्याचा विकास होतो, देश पुढे जातो - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पंढरपूरला जाणारी रेल्वे आटपाडीमार्गेच जाईल, दिल्लीत प्रयत्न ; खासदार विशाल पाटलांचा भरसभेत शब्द*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *शिवप्रतिष्ठानकडून सांगली जिल्ह्यात 25 ऑगस्ट रोजी बंदची हाक; संभाजी भिडेंकडून घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *भाविकांना आषाढीतही मिळणार केवळ 2 तासात दर्शन, 110 कोटी रुपयांचा आराखडा मंजूर*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक राकेश पाल यांचं निधन, संरक्षणमंत्र्यांकडून श्रद्धांजली*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार पॅट कमिन्सची मोठी घोषणा, क्रिकेटमधून अचनाक घेतला ब्रेक*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *वावटळ* 📙 *****************फार मोठ्या प्रदेशावर पसरलेल्या, अनेक दिवस हिंडत धुमाकूळ घालणाऱ्या चक्रीवादळापेक्षा वावटळ कधीकधी अधिक विध्वंस घडवून आणते. हरिकेन वा टायफून याही नावाने ओळखल्या जाणाऱ्या या वादळी प्रकाराला आपण 'वावटळ' म्हणतो. वावटळीचेसुद्धा एक केंद्र असतेच. या केंद्राभोवती प्रचंड वेगाने फिरणारे वारे घोंगावतात, त्यावेळी मध्ये सापडणाऱ्या कशाचीच धडगत नसते. चक्रीवादळाचा वेग बहुधा मोजता येतो, सांगता येतो; पण वावटळीत अनेकदा वेग मोजायची यंत्रे पार मोडून जातात. ब्युफोर्ट स्केल या प्रकारात बारा हा आकडा सर्वात धोकादायक समजला जातो. या पद्धतीने वाऱ्याचा वेग हे स्केल दाखवते. वावटळ येणार आहे वा येऊन गेली म्हणजे हा बाराचाच आकडा व्यक्त करायची पद्धत पडली आहे. अंदाजे अडीचशे ते चारशे किलोमीटर वेगाने वावटळ येऊन धडकते. वावटळ निर्माण होण्याचे कारण म्हणजे समुद्रावर कमी दाबाचा पट्टा गरम हवेमुळे निर्माण होतो, हेच. या पट्टय़ाकडे धाव घेणारी हवा बाष्पही ओढून आणते. बघता बघता हे वायूचे प्रवाह वेग घेत स्वतःभोवती फिरू लागतात. सुमारे तीनशे चारशे किलोमीटर एवढ्याच प्रदेशात या घडामोडी झपाटय़ाने घडतात. वावटळीचे केंद्र पाच ते पंचवीस किलोमीटर एवढे असू शकते. वावटळ बघता बघता किनाऱ्याकडे सरकू लागते. जमीन तापल्यामुळे भर दुपारी या भागात कमी दाब असतो. सुरुवातीला ज्या किनाऱ्याकडे वावटळ जाते तेथे एकदम हवेचा दाब कमी झाल्याचे जाणवू लागते. हवेमध्ये एक प्रकारचा सन्नाटा जाणवतो आणी काही वेळातच भीषण स्वरूपात द्वारे धिंगाणा घालू घालतात. सोसाटय़ाचा, पावसाचा वारा या दरम्यान चालू असतोच. पॅसिफिकमध्ये नेहमीच वावटळी उद्धवतात. उत्तर अमेरिकेचा संपूर्ण पश्चिम किनारा वर्षाकाठी आठ दहा वेळा या वावटळींना सामोरा जातो. नांगरलेली बोट नांगर उखडून कलंडणे किंवा महाकाय लाटेबरोबर किनाऱयावर फेकली जाणे यासारखे अविश्वासार्ह गोष्ट वावटळीत सहज घडते. अमेरिकेत एका वावटळीत रस्त्यावरील मोटार उचलून गरगरत एका घराच्या छपरावर विसावली होती. रस्त्यात उघड्यावर माणसे कधी थांबतच नाहीत; पण चुकून कोणी सापडला, तर रस्त्यातल्या पाचोळ्याबरोबर तोही इकडेतिकडे भिरकावला जातो. झाडे उन्मळून पडणे, घरे पिळवटून वेडीवाकडी होणे, हेही खास वावटळीचेच तांडव. अनेकदा हे भीषण वारे स्वतःबरोबर महाकाय लाटा आणतात. कित्येक फूट उंचीच्या लाटा सारा किनारा उद्ध्वस्त करतात. हा सारा काही तासांचा खेळ आटोपला की पुन्हा आभाळ पूर्ण निरभ्र होते; जसे काही घडलेच नव्हते, असा सूर्यप्रकाश पुन्हा पडतो. अटलांटिकवरील 'हरिकेन', हिंदी महासागरातील चक्रीवादळ हेही वावटळीचेच प्रकार.आजकाल या वावटळी उपग्रहाद्वारे आधी समजू शकतात. त्यांची दिशा कळते. त्या भागातील लोकांना तातडीचे इशारे देऊन जागे करता येते. जे मच्छीमार समुद्रावर निघाले असतील, त्यांना थांबवणे व समुद्रावरील लोकांना परतायची सूचना देणे या स्थानिक रेडिओवरून तातडीने केल्या जाणाऱ्या गोष्टी आहेत. ज्या कोणी वावटळी पाहिल्या आहेत, अनुभवल्या आहेत, त्यांना त्या विसरणे आयुष्यात कधीच शक्य होत नाही.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कला ही जीवनाची दासी आहे, तिचे कार्य जीवनाची सेवा करणे हे आहे.- रवींद्रनाथ टागोर*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) हिम बिबट्याला राष्ट्रीय चिन्ह म्हणून कोणत्या देशाने घोषित केले आहे ?२) कोळी बांधव मासेमारी करायला समुद्रात कोणत्या सनापासून सुरूवात करतात ?३) UPI पेमेंट स्वीकारणारा पहिला परकीय देश कोणता ?४) ७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला ?५) प्रादेशिक भाषेत निकाल देणारे भारतातील पहिले न्यायालय कोणते ? *उत्तरे :-* १) किर्झिस्थान २) नारळी पौर्णिमा ३) भूतान ४) वाळवी ५) केरळ *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 शिवकुमार टाले, मुख्याध्यापक, नांदेड👤 उत्तम सदाकाळ, बाल साहित्यिक, जुन्नर👤 मोहन शिंदे👤 प्रीती माडेकर दरेकर, यवतमाळ👤 संदीप राजे गायकवाड, मुख्याध्यापक, बिलोली👤 संतोष कडवाईकर👤 योगेश मठपती👤 मन्मथ चपळे👤 विशाल वाघमारे👤 महेश हातझडे👤 संभाजी वैराले पाटील👤 कवयित्री अंतरा*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मूल ध्यान गुरु रूप है मूल पूजा गुरु पाव।मृलनाम गुरु बचनहै सत्य मूल सत भाव॥ 49॥।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कोणामुळे कोणाचेच अडत नाही असे, अनेकदा ऐकण्यात येते. म्हणजेच कोणाचे अडत नसावे. पण जेव्हा वेळ आल्यावर कोणीच जवळ नसतात त्यावेळी मात्र ती आलेली वेळच सर्व काही सांगत असते. म्हणून गर्वाच्या भोवऱ्यात अडकून चुकीचे पाऊल उचलू नये कारण चिखलातून बाहेर काढणारे कमी दिसतात आणि त्याच खोलवर चिखलात गाडणारे जास्त मिळत असतात हे सदैव लक्षात असू द्यावा.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आयुष्याची खरी किंमत*एका नातवाने आपल्या आजोबांना प्रश्न विचारला " आयुष्याची खरी किंमत कायअसते हो ? " आजोबांनी त्याला एक दगड दिला आणि म्हणाले " ह्या अगोदर तू ह्या दगडाची खरी किंमत कळावी अशी माझी इच्छा आहे. दगडाची फक्त किंमत काढून ये, विकू नकोस. " सर्वप्रथम नातवाने एका फळवाल्याला त्या दगडाची किंमत विचारली. तो त्या चकाकणाऱ्या दगडाला बघून म्हणाला, " या दगडाचा मोबदला म्हणून मी तुला एक डझन सफरचंदे देऊ शकतो." नातवाने आजोबांच्या आज्ञेमुळे दगड विकू शकत नसल्याबद्दल त्याची माफी मागितली व निघाला. वाटेत त्याला एक भाजीवाला दिसला आणि त्याने त्याला त्या चकाकणाऱ्या दगडाची किंमत विचारली, " मी तुम्हाला याच्या बदल्यात एक पूर्ण पोते भरून बटाटे देऊ शकतो." पुन्हा एकदा नातवाने आजोबांच्या आज्ञेमुळे दगड विकू शकत नसल्याबद्दल त्याची माफी मागितली व निघाला. आता त्याला एका सराफाचे दुकान लागले. आत जाऊन त्याने तो चमकणारा दगड सराफाला दाखवून त्याची किंमत विचारली. आपल्या भिंगातून त्या खड्याचे निरीक्षण करताच तो सराफ उत्तरला, " या खड्यासाठी मी तुम्हाला दश लक्ष रुपये देऊ शकतो." नातवंडाला फार आश्चर्य वाटले पण नातवाने आजोबांच्या आज्ञेमुळे दगड विकू शकत नसल्याबद्दल त्याची माफी मागितली व निघाला. थोडे पुढे आल्यावर त्याला अतिशय दुर्मिळ रत्न आणि मणी विकणारे दुकान दिसले. त्याने तो दगड तिथल्या रत्नपारख्यास दाखवला. तो रत्नपारखी ह्या विषयात अतिशय निष्णात होता. त्याने अलगद तो दगड एका मखमली कापडावर ठेवला. त्या दगडाच्या अवती भोवती प्रदक्षिणा घालत तो म्हणाला, " अहो, एवढा अमूल्य दुर्मिळ अनघड हिरा तुम्ही कुठून बरे आणला ? मी माझे अख्खे दुकान जरी विकले तरी सुध्दा ह्या हिऱ्याची किंमत तुम्हाला देऊ नाही शकणार ."आता मात्र नातू अतिशय चकित झाला आणि गोंधळलेल्या मनःस्तिथीत तो आजोबांकडे परतला. त्याचे सर्व अनुभव ऐकून आजोबा म्हणाले, " मला वाटते फळवाला, भाजीवाला, सराफ आणि रत्नपारखी ह्यांच्या उत्तरावरून तुला आयुष्याच्या मोलाविषयी कळले असेल. तुम्ही जरी अतिशय दुर्मिळ अमूल्य हिरा असलात तरी सुध्दा लोक तुमची किंमत त्यांच्या सीमित समजुती, आकलनशक्ती, हेतू आणि कुवतीनुसारच करणार." त्यामुळे आयुष्यात स्वतःची किंमत जाणून घेणे सर्वात महत्वाचे असते. स्वतःचा आदर करा. इतरांबरोबर कोण्यात्याही निरर्थक तुलने मध्ये गुंतू नका. कारण तुम्ही या विश्वातील एक अभिनव आणि अद्वितीय निर्मिती आहेत. तुमच्या सारखे फक्त तुम्हीच आहात. हीच तुमच्या आयुष्याची खरी किंमत आहे .*आपल्या सर्वांनाही स्वतःची खरी किंमत कळून स्वतःवर प्रेम करायला शिकू....*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment