✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 14 ऑगस्ट 2024💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://kathamaala.blogspot.com/2019/05/blog-post_67.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💮 *_ या वर्षातील २२७ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 💮 *_महत्त्वाच्या घटना:_* 💮•••••••••••••••••••••••••••••••••*२०१०: पहिल्या ’युवा ऑलिम्पिक स्पर्धा’ सिंगापूरमधे घेण्यात आल्या.**२००६: श्रीलंकेच्या वायुदलाने केलेल्या बॉम्बहल्ल्यात चेन्चोलाई येथे ६१ तामिळ मुली ठार झाल्या.**१९७१: बहारीनला (युनायटेड किंग्डमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.**१९५८: ’एअर इंडिया’ ची दिल्ली - मॉस्को विमानसेवा सुरू झाली.**१९४७: भारताच्या घटनासमितीने सत्ता स्वीकारण्याचा ठराव मंजूर केला आणि लॉर्ड माऊंटबॅटन यांची स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून नेमणूक केली.**१९४७: पाकिस्तानला (युनायटेड किंग्डमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.**१८९३: मोटर वाहनांची नोंदणी सुरू करणारा फ्रान्स हा पहिला देश बनला.**१८६२: मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना**१८६२: कलकत्ता उच्च न्यायालयाची स्थापना**१६६०: मुघल फौजांनी संग्रामगड (चाकणचा किल्ला) ताब्यात घेतला.*💮 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 💮••••••••••••••••••••••••••••••••• *१९८३: सुनिधी चौहान -- भारतीय गायिका* *१९८०: ज्ञानेश्वर अर्जुन सूर्यवंशी (ज्ञानेश) -- कवी* *१९७७: हंसराज पूर्णानंदन बनसोड -- लेखक**१९७३: प्रा.डॉ.गिरीश नारायणराव सपाटे -- कवी, समीक्षक* *१९६८: प्रवीण आम्रे – क्रिकेटपटू**१९६४: संजय सोनवणी -- मराठी साहित्यिक, कथा, कादंबरी, कविता, तत्वज्ञान, इतिहास संशोधन असे चौफेर लेखन**१९६१: मोहनीश बहल -- भारतीय चित्रपट उद्योग आणि भारतीय दूरदर्शनवर काम करणारा भारतीय अभिनेते**१९५७: डॉ.श्याम हिराचंद मोहरकर -- लेखक* *१९५७: जॉन प्रकाश राव जनुमला ऊर्फ ’जॉनी लीवर’– विनोदी अभिनेता**१९५३: डॉ.सर्जु काटकर -- अनुवादक* *१९४८: यशवंत बाबुराव कदम -- लेखक, कवी**१९४५: जयश्री रंगनाथ नायडू -- लेखिका**१९३९: शांता गोखले -- लेखिका, पत्रकार, अनुवादक आणि नाट्यसमीक्षक,साहित्य अकादमी पुरस्कारांनी सन्मानित**१९३५: वीणा चिटको--- लेखिका,कवयित्री, गीतकार आणि संगीत दिग्दर्शक (मृत्यू: १९ सप्टेंबर २०१५ )**१९२५: जयवंत दळवी – साहित्यिक, नाटककार व पत्रकार.कथा, कादंबरी, नाटक, प्रवासवर्णन, विनोदी लेख असे विविध प्रकार त्यांनी हाताळले. (मृत्यू: १६ सप्टेंबर १९९४ )**१९१५: सिंधू गाडगीळ -- कादंबरीकार कथाकार* *१९१०: डॉ.गणेश त्र्यंबक देशपांडे -- मराठी व संस्कृत लेखक (मृत्यू: १६ नोव्हेंबर १९८९ )* *१९०७: गोदावरी परुळेकर – मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या, सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका.'जेव्हा माणूस जागा होतो’ हे त्यांचे पुस्तक वेगळ्या जगाची ओळख करुन देणारे आहे.(मृत्यू: ८ आक्टोबर १९९६ )**१८९८: सदाशिव कानोजी पाटील (स.का. पाटील ) -- महाराष्ट्रातील काँग्रेसचे माजी नेते, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार, अभ्यासक आणि वक्ते(मृत्यू: २४ मे १९८१)**१७७७: हान्स क्रिस्टियन ओरस्टेड – डॅनिश भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: ९ मार्च १८५१ )* 💮 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 💮••••••••••••••••••••••••••••••••• *२०२२: विनायक तुकाराम मेटे-- पूर्व विधान परिषद सदस्य शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख (जन्म: ३० जून १९६३ )**२०२०: पंडित सुधीर माईणकर -- ज्येष्ठ तबलावादक, संशोधक, लेखक, संगीततज्ज्ञ (जन्म: १६ मे १९३७ )**२०१२: विलासराव देशमुख – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय अवजड उद्योग मंत्री (जन्म: २६ मे १९४५ )**२०११: शम्मी कपूर – सुप्रसिद्ध हिन्दी चित्रपट अभिनेता व निर्माता (जन्म: २१ आक्टोबर १९३१ )**२०१०: बाबूराव गोविंदराव शिर्के -- मराठी बांधकाम व्यावसायिक (जन्म: १ ऑगस्ट१९१८ )**१९८८: एन्झो फेरारी – रेस कार निर्माते आणि ड्रायव्हर (जन्म: १८ फेब्रुवारी १८९८ )**१९८४: कुस्तीगीर खाशाबा दादासाहेब जाधव – १९५२ च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमधे वैयक्तिक पदक मिळवणारे पहिले भारतीय, शिवछत्रपती पुरस्कार [मरणोत्तर] (जन्म: १५ जानेवारी १९२६ )**१९५८: जीन फ्रेडरिक जोलिओट – मूलद्रव्याच्या समस्थानिकांच्या (Isotopes) शोधाबद्दल नोबेल पारितोषिक (१९३५) मिळवणारा फ्रेन्च पदार्थवैज्ञानिक (जन्म: १९ मार्च १९०० )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त एक देशभक्ती पर लघुकथा*व्यर्थ न हो बलिदान*सकाळी सकाळी रेडिओ ऑन केल्या बरोबर ती बातमी कानावर पडली आणि सविताच्या काळजाचे ठोके वाढले होते. पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 40 भारतीय सैनिक मारल्या गेल्याची ती बातमी होती. सविताने लगेच फोन हातात घेतला आणि एक नंबर डायल करायला लागली. आपने डायल किया हुआ नंबर अबी बंद है, थोडी देर बाद प्रयास करे वारंवार हेच वाक्य तिच्या कानी पडत होता. जशी जशी वेळ जात होता तशी तशी तिची बैचेनी................ पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *15 ऑगस्टला डॉ. मनमोहन सिंग यांना मागे टाकणार पीएम नरेंद्र मोदी, लाल किल्ल्यावर 11 व्या वेळी तिरंगा फडकावून रचणार विक्रम, पं नेहरू यांनी 17 वेळा लाल किल्ल्यावर तिरंगा फडकविला आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *नगराध्यक्षांचा कालावधी ५ वर्ष करण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत घेतला निर्णय; नगराध्यक्षपदाची स्वप्ने पाहणाऱ्या नगरसेवकांची घोर निराशा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पत्रकारांसाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांची सरकारकडे मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *22 ऑगस्ट रोजी नवी मुंबईत संभाजी ब्रिगेडचे राज्यस्तरीय अधिवेशन, महाराष्ट्र धर्म जागवण्यासाठी सर्वांनी सहभागी होण्याचे प्रवीण गायकवाड यांचे आवाहन*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मराठवाड्यातील खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनाम व देवस्थानच्या जमिनी वर्ग एक करण्याचा निर्णय, लाखो नागरिकांना लाभ*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *सांस्कृतिक कार्य विभागामार्फत प्रदान करण्यात येणारे विविध पुरस्कार जाहीर, सन २०२४ चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यान बॉर्डर गावसकर ट्रॉफीचे पाच सामने होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *सांधे का दुखतात ?* 📙************************ सांधेदुखीचे अनेक कारणे आहेत. 'सांधे आहेत म्हणून ते दुखतात !' असे उत्तर माझ्या आजोबांनी त्यांच्या मित्राला दिल्याचे मला अजून आठवते.दोन हाडे एकमेकांना जोडण्यासाठी सांधे असतात. सांधे असल्यामुळेच शरीराची हालचाल होऊ शकते. सांध्यांमध्ये असलेल्या हाडांच्या टोकांभोवती एक कुर्चा असते. तसेच सांध्यांच्या पोकळीत एक द्रवपदार्थ असतो, जो वंगणासारखे काम करतो. म्हातारपणात हा द्रव कमी होतो. हाडे एकमेकांवर घासली जाऊ नयेत यासाठी ही रचना असते. वृद्धापकाळात या कुर्चेची झीज होते व हाडांची टोके एकमेकांवर घासून सांधे दुखायला लागतात. काही वेळा सांध्याच्या पोकळीत जंतूसंसर्गामुळे किंवा दुखापतीमुळे द्रव गोळा होतात व सूज येते. यामुळेही सांधे दुखायला लागतात. गाऊटसारख्या रोगात काही रासायनिक पदार्थांचे स्फटिक सांध्याच्या पोकळीत जमा होतात. साहजिकच सांधे दुखतात. लहान मुलांमध्ये हृदयाच्या आजारातही सांधे दुखतात. रोगप्रतिकारक संस्थेच्या काही रोगांमध्येही सांधेदुखी होते. सांधेदुखीच्या कारणानुरूप त्यावर उपचार करायला हवेत. काही सर्वसाधारण उपचार लक्षात घेऊ. विश्रांती घेतल्याने सांधेदुखी कमी होते. दुखणाऱ्या सांध्यांना विश्रांती दिल्याने दुखणे कमी होते. सांध्यांना शेकून काढण्यानेही वेदना कमी होतात. ॲस्पिरिनसारख्या वेदनाशामक गोळ्यांनी वेदना कमी होते, तसेच सूजही कमी होते. वृद्धापकाळातील सांधेदुखीसाठी प्रत्येक सांध्यासाठीचे साधेसाधे व्यायाम नियमितपणे करायला हवेत, म्हणजे सांध्यांच्या हालचालींवर पडलेल्या मर्यादा दूर होतील. अशी सांधेदुखी पुर्णपणे बरी होत नसल्याने निदान दैनंदिन व्यवहार करणे तरी रुग्णाला शक्य होईल व आयुष्य सुखकर होईल.*डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित* यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••माता, पिता, गुरु आणि स्वदेश यांची सेवा म्हणजेच परमेश्वराची सेवा.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) आंध्रप्रदेश राज्याचा राज्यपक्षी कोणता ?२) डोमिनिका या देशाचा राष्ट्रीय पक्षी कोणता ?३) पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली ?४) 'दुर्धर' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये पदकतालिकेत भारत कितव्या क्रमांकावर आहे ? *उत्तरे :-* १) पोपट २) पोपट ३) सहा ( सुवर्ण - ०, रजत - १, कांस्य - ५ ) ४) कठीण, गहन ५) ७१ व्या*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 शंकर कळसकर, शिक्षक, देगलूर👤 गजानन गंगाधरराव रामोड, सामाजिक कार्यकर्ते, धर्माबाद👤 पवन लिंगायत वाळंकी👤 प्रवीण संगमकर काळे👤 किरण मुधोळकर, फोटोग्राफर, देगलूर👤 गजानन पाटील👤 राम दिगंबर होले👤 सुनील गुडेवार👤 राजू टोम्पे👤 गणेश ईबीतवार, येवती, धर्माबाद👤 मुनेश्वर सुतार*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गुरु बतावै साधुको साधु कहै गुरु पूज ।अरस परसके खेलमें भई अगमकी सूज ॥ 43 ॥।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• पाण्याची असो किंवा चांगल्या माणसाची योग्य त्याच वेळेत किंमत करावे. तहान लागल्यावर जशी पाण्याची आठवण येते तशीच आठवण आपण अडचणीत किंवा दु:खात असताना आपल्या जवळच्या चांगल्या माणसाची आठवण होते म्हणून त्यांचे महत्व जाणून आपल्यात माणुसकी कायम ठेवावे. या जगात सर्वच काही पैशाने विकत घेता येते पण, आपले दु:ख समजून मदतीला धावून येणारा व आपुलकीच्या नात्याने साथ देणारा माणूस एकदा दूर निघून गेल्यावर मनाने तर काय पण, त्याला पैशाने सुद्धा विकत घेता येत नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*गोड बोलणाऱ्यापासून सावधान* "एका शेतकऱ्याने एकदा आपल्या कोंबड्याला हाका मारायला सुरुवात केली असता तो कोंबडा पळून जाऊ लागला.त्याच शेतकऱ्याने पिंजऱ्यात एक ससाणा पाळला होता. तो त्या कोंबड्याला म्हणाला, 'अरे वेड्या, मालक एवढ्या प्रेमाने तुला हाका मारत आहे, आणि तू असा पळून का जातोस ? एवढ्या प्रेमाने जर त्याने मला हाक मारल्या असत्या, तर मी मोठ्या आनंदाने त्याच्याकडे गेलो असतो.'यावर तो कोंबडा म्हणाला, 'अरे ससाण्या, आजवर माझ्या अनेक नातेवाइकांना या मालकाने अशाच प्रेमाने जवळ बोलावून, त्यांच्या माना कापताना मी पाहिले आहे. त्याची प्रेमळ हाक ऐकताच मी त्याच्यापासून पळून जाण्याचा प्रयत्न करीत आहे. तुझी गोष्ट अगदी निराळी आहे. त्याच्या दृष्टीने तुझे मांस रुचकर नसल्याने, तुला त्याच्याकडून कापले जाण्याचे भय नाही.'*तात्पर्य* : प्रेमळ बोलणाऱ्यांच्या मनात प्रेम असतेच असे नाही."•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment