✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 22 ऑगस्ट 2024💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/oUSHev1wvsCQ5Ev4/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🛑 *_ या वर्षातील २३५ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🛑 *_महत्त्वाच्या घटना:_* 🛑•••••••••••••••••••••••••••••••••*१९७२: वर्णद्वेषी धोरणाबद्दल र्होडेशिया (झिम्बाब्वे) ची आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीतुन हकालपट्टी करण्यात आली.**१९६२: फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष चार्ल्स द गॉल यांची हत्या करण्याचा कट फसला.**१९४४: दुसरे महायुद्ध – सोविएत युनियनने रोमानिया जिंकले.**१९४२: दुसरे महायुद्ध – ब्राझिलने जर्मनी व इटालीविरुद्ध युद्ध पुकारले.**१९४१: दुसरे महायुद्ध – जर्मन सैन्याने लेनिनग्राडला वेढा घातला.**१९०२: कॅडिलॅक मोटर कंपनीची स्थापना**१८४८: अमेरिकेने न्यू मेक्सिको हा प्रांत ताब्यात घेतला.* 🛑 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_*🛑 •••••••••••••••••••••••••••••••••*१९८६: अविनाश सचदेव -- भारतीय अभिनेता* *१९८५: देवोलिना भट्टाचार्जी -- भारतीय टेलिव्हिजन अभिनेत्री* *१९८४: मंगेश पुंडलिक जनबंधू -- लेखक**१९८४: प्रज्ञा सदाशिव वझे -- लेखिका**१९६६: विजयकुमार मेश्राम -- लेखक, कवी* *१९६६: प्रा. डॉ. प्रल्हाद वावरे -- लेखक, समीक्षक, संपादक* *१९६५: महेंद्र सीतारामजी गायकवाड-- लेखक, कवी* *१९६४: मॅट्स विलँडर – स्वीडीश टेनिस खेळाडू**१९६२: सुनील महादेव सावंत -- कवी, लेखक**१९५८: मानसी मागीकर -- मराठी अभिनेत्री* *१९५५: सुरेश मारोतराव आकोटकर -- प्रसिद्ध कथाकार* *१९५५: चिरंजीवी – सुप्रसिद्ध अभिनेते* *१९५४: खुशालदास तुकारामजी कामडी -- कवी, गीतकार* *१९५४: माणिकराव गोविंदराव ठाकरे -- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी राज्यमंत्री* *१९५१: अशोक कोठावळे -- मॅजेस्टिक' प्रकाशनाचे प्रमुख**१९४८: कंवरजीत पेंटल -- भारतीय अभिनेता आणि विनोदी कलाकार* *१९४७: उज्ज्वल वामनराव कुलकर्णी -- कथाकार**१९४६: सुधीर शंकर सुखठणकर -- प्रसिद्ध विनोदी लेखक**१९४६: प्रल्हाद सोनवणे -- लेखक**१९४६: मा. विकास शिरपूरकर -- सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती**१९४२: डॉ. भवान महाजन -- लेखक**१९३५: पंडित गोपीकृष्ण – कथ्थक नृत्यशैलीचे बनारस घराण्याचे नर्तक, नृत्यदिग्दर्शक व अभिनेते.(मृत्यू: १८ फेब्रुवारी १९९४ )**१९३४: अच्युत पोतदार -- भारतीय अभिनेते, ज्यांनी १२५ हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे**१९२६: एन. सी. सिप्पी -- भारतीय चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक (मृत्यू: २५ नोव्हेंबर २००१ )**१९२५: गणपत दत्तोबा बारवाडे -- कथा कादंबरी व नाट्य लेखक**१९२२: इंदुमती श्रीपाद केळकर -- कादंबरी व चरित्र लेखिका**१९२०: नारायण यशवंत देऊळगावकर (अण्णासाहेब) -- पटकथालेखक (मृत्यू: ३ जून २००८ )**१९२०: डॉ. डेंटन कूली – ह्रुदयरोपण शस्त्रक्रियेचा पाया घालणारे अमेरिकन शल्यविशारद**१९१९: गिरीजाकुमार माथूर – हिन्दी कवी (मृत्यू: १० जानेवारी १९९४ )**१९१८: डॉ.बानू कोयाजी – कुटुंबनियोजनाच्या क्षेत्रात सलग साठ वर्षे कार्य करणार्या सामाजिक कार्यकर्त्या. त्यांना पद्मभूषण, रॅमन मॅगसेसे पुरस्कार (मृत्यू: १५ जुलै २००४ )**१९१६: मधुकर रामराव यार्दी-- पूर्व केंद्रिय वित्त सचिव,संस्कृत अभ्यासक (मृत्यू: २० ऑगस्ट २००१ )**१९१५: शंभू मित्रा – बंगाली रंगभूमीवरील अभिनेते, दिग्दर्शक व नाटककार (मृत्यू: १९ मे १९९७ )* 🛑 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🛑 ••••••••••••••••••••••••••••••••• *२०१४: उडुपी राजगोपालाचार्य अनंतमूर्ती -- कन्नड भाषेतील भारतीय समकालीन लेखक आणि समीक्षक( जन्म: २१ डिसेंबर १९३२ )**२००१: शरद तळवलकर -- चित्रपटांतील अभिनेते (जन्म: १ नोव्हेंबर १९१८ )* *१९९९: सूर्यकांत मांडरे – मराठी चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते, पद्मश्री (१९७३).(जन्म: २ जून १९२६ )**१९९५: पंडित रामप्रसाद शर्मा – संगीतकार, ट्रम्पेट व व्हायोलिनवादक. ‘लक्ष्मीकांत-प्यारेलाल‘ या जोडीतील प्यारेलाल यांचे ते वडील होत.* *१९८९: पं. कृष्णराव शंकर पंडित – ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक. राष्ट्रपती डॉ. राजेन्द्रप्रसाद यांनी त्यांचा ’राष्ट्रीय गायक’ म्हणून गौरव केला होता.(जन्म: २६ जुलै १८९३ )**१९८२: एकनाथजी रामकृष्ण रानडे – क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक व कन्याकुमारी येथील विवेकानंद शिला स्मारकाचे शिल्पकार. (जन्म: १९ नोव्हेंबर १९१४ )**१९८०: किशोर साहू -- चित्रपट अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक बँकॉक विमानतळावर विमानात चढत असताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन (जन्म: २२ नोव्हेंबर १९१५ )**१९७८: जोमो केन्याटा – केनियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष (जन्म: २० आक्टोबर १८९३ )**१९७०: डॉ. मुरलीधर गजानन पानसे -- लेखक, संशोधक, संपादक (जन्म: ९ सप्टेंबर १९१८ )**१९७०: विठ्ठल गोपाळ खोबरेकर -- लेखक, पुराभिलेख संशोधक, संपादक(जन्म: २० जुलै१९२३ )**१८१८: वॉरन हेस्टिंग्ज – भारताचा पहिला गव्हर्नर जनरल (जन्म: ६ डिसेंबर १७३२ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*मोठं मन*..... पूर्ण कविता वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *विमानतळावर पोलंड सरकारचे प्रतिनिधी लष्कर प्रमुखांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे केले स्वागत*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राज्यातल्या सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिले जातील हेक्टरी पाच हजार रुपये*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राज्याच्या विकासात सहकार आणि शिक्षण क्षेत्राचं मोठं योगदान - उपमुख्यमंत्री अजित पवार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *ग्लोबल फायनान्स सेंट्रल बँकर रिपोर्ट कार्ड मध्ये सलग दुसऱ्या वर्षी A+ ग्रेड मिळाल्याबद्दल RBI चे गव्हर्नर शक्तीकांत दास यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *हमीभाव कायदा करा अन्यथा देशव्यापी संप पुकारू 250 पेक्षा जास्त शेतकरी संघटनेच्या नेत्यांचा सरकारला इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आम्ही कटिबद्ध केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे प्रतिपादन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *पाकिस्तान व बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात पाकिस्तान 4 गडी बाद 158 धावा केल्या*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••श्रावण महिन्यातील आहारश्रावण महिन्यात फळांचे सेवन जरूर करा. दररोज कमीत कमी एक वाटी फळं खाल्ल्याने तुमचा अशक्तपणा तर दूरच राहतो, पण तुमचे शरीर दिवसभर ऊर्जावान राहते. अशा परिस्थितीत सफरचंद, केळी, द्राक्षे, डाळिंब आणि पपई हे चांगले पर्याय आहेत. भरपूर फायबर असल्याने या गोष्टी खाल्ल्याने तुमचे पोट दीर्घकाळ भरलेले राहते.संध्याकाळी उपवास सोडताना तुम्ही तुमच्या आहारात मूठभर सुक्या मेव्याचाही समावेश करू शकता. त्यामध्ये भरपूर जीवनसत्त्वे आणि अनेक पोषक घटक असतात, जे तुम्हाला थकवा आणि अशक्तपणापासून वाचवण्यात मोठी भूमिका बजावतात. अशा परिस्थितीत तुम्ही काजू, बदाम, अक्रोड आणि अंजीर यासारख्या गोष्टींचे सेवन करू शकता.उपवासात साबुदाणा खूप आवडतो. त्याच्या मदतीने, तुम्ही चविष्ट पदार्थ तयार करू शकत नाही. या साबुदाण्यात फायबर आणि अनेक आवश्यक पोषक तत्वांचे भांडार देखील आहे. संध्याकाळी उपवास सोडताना तुम्ही त्याची खिचडी किंवा कमी तेलात केलेली टिक्कीही खाऊ शकता.उपवास दरम्यान सर्वात लोकप्रिय पदार्थांपैकी एक म्हणजे शिंगाड्याचे पदार्थ. याचे सेवन केल्याने केवळ चयापचय वाढतो असे नाही, तर ऑक्सिडेटिव्ह तणावापासूनही तुमचे संरक्षण होते. हे खाल्ल्याने शरीराला अनेक आवश्यक अँटीऑक्सिडंट्स मिळतात आणि पचनसंस्थाही निरोगी राहते.श्रावण मासात उपवासाच्या वेळी तुम्ही तुमच्या आहारात नारळाचाही अनेक प्रकारे समावेश करू शकता. शरीराला हायड्रेट ठेवण्यासोबतच जेवणाची चवही वाढवते आणि याच्या सेवनाने पोट दीर्घकाळ भरलेले राहते.या गोष्टी टाळा -श्रावण महिन्यात जास्त मसालेदार पदार्थ खाणे टाळावे. यामुळे केवळ पोटात जळजळ आणि ॲसिडिटी होत नाही तर रक्तदाबही वाढू शकतो. याशिवाय तुम्ही जास्त कार्ब असलेल्या पदार्थांचे सेवन टाळावे.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••" वाचनाने मनुष्याला आकार येतो, सभेमुळे तो प्रसंगावधानी, तत्पर होतो आणि लिखाणामुळे तो सर्वांगिण होतो."*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) संयुक्त राष्ट्रामध्ये भारताचे राजदूत व स्थायी प्रतिनिधी म्हणून कोणाची निवड झाली आहे ?२) कोणता देश प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी घालणारा पहिला देश ठरला आहे ?३) राज्यघटनेतील कितव्या अनुच्छेद नुसार केवळ एकाच जागेवर खासदार म्हणून राहता येते ?४) 'नगर' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर कोणते आहे ? *उत्तरे :-* १) हरीश पर्वतनेनी २) न्युझीलंड ३) अनुच्छेद १०१ ४) शहर, पूर, पुरी ५) किली मांजरो, उंची - ५८९५ मी.*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 शंकरराव हामद, केंद्रप्रमुख, बिलोली👤 शंकर गंगूलवार, धर्माबाद👤 आशिष देशपांडे, पत्रकार, कुंडलवाडी👤 नागराज येम्बरवार, किनवट👤 शिवा गैनवार, धर्माबाद👤 कु. पूजा गुरुपवार, नांदेड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *हरिपाठ*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी । तेणें मुक्ति चारी साधियेल्या ॥१॥ हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा।पुंण्याची गणना कोण् करी ॥२॥असोनि संसारीं जिव्हे वेगु करी । वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ॥३॥ ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खुणा । द्वारकेचा राणा पांडवांघरीं ॥४॥।। संत ज्ञानेश्वर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मन हे, हवे पेक्षा वेगवान तसेच चंचल असते,असे अनेकजण म्हणतात. कदाचित हे खरे असू शकते म्हणूनच आपण एका जागी असताना सुद्धा मन आपल्याला एका क्षणात कोसोदूर घेऊन जात असते फिरवून आणत असते. पण,एक गोष्ट अवश्य लक्षात ठेवावी प्रत्येक वेळी आपले मन चांगल्याच मार्गाने नेईलच असेही नाही म्हणून जरा त्यापासून थोडे सावधगिरी बाळगावी. ते आपल्यासाठी व इतरांसाठी सुद्धा भल्याचे राहील.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*करढोक व मासे*-करढोक नावाचा एक पक्षी नदीकाठी राहून व पाण्यात बुड्या मारून मासे धरून खातो. या जातीचा एक पक्षी म्हातारा झाल्याने त्याला पाण्यातले मासे दिसेनासे झाले. त्यामुळे काहीतरी ढोंग करून आपला चरितार्थ चालवण्याचा त्याने विचार केला, 'तो ज्या कालव्याजवळ बसला होता, त्यातला एक मासा पाण्याच्या पृष्ठभागावर आला असता, तो म्हातारा करढोक त्याला म्हणाला, 'अरे, तुला तुझ्या स्वतःच्या नि तुझ्या भाऊबंदांच्या जिवाबद्दल जर थोडी-बहुत काळजी वाटत असती तर कालव्याचा मालक एकदोन दिवसात कालव्यातलं सगळं पाणी बाहेर सोडणार आहे, याकरता तुम्ही आपले जीव वाचविण्यासाठी काहीतरी उपाय करा.' हे ऐकून तो मासा पाण्याच्या तळाशी गेला आणि सगळ्या माशांची सभा भरवून तो करढोकाचा निरोप त्याने सांगितला. तो ऐकताच आपल्यावर येणार्या संकटाची सूचना देणार्या त्या करढोकाचे आभार मानण्याचा व या संकटातून मुक्त होण्यासाठी उपाय सुचविण्याविषयी त्याला विनंती करण्याचा ठराव त्यांनी केला व तो त्या करढोकास कळविण्याचे काम त्या निरोप घेऊन येणार्या माशावर सोपविले. त्याप्रमाणे त्याने करढोकास जाऊन आपला ठराव त्याला कळविला. तो ऐकताच करढोक त्याला म्हणाला, 'या संकटातून वाचण्याचा एकच मार्ग आहे. तुम्ही सर्वांनी पाण्याच्या पृष्ठभागावर यावं म्हणजे मी तुम्हाला माझ्या घराशेजारच्या तलावात नेऊन पोहचवीन. ती गोष्ट माशांनी कबूल केली. मग करढोकाने त्यांना एका उथळ पाण्याच्या तलावात नेऊन सोडले व थोड्याच दिवसात त्या सर्वांना गट्ट केले.*तात्पर्य*-शत्रूच्या गोड शब्दावर विश्वास ठेवून त्याच्या जाळ्यात सापडणे हा मूर्खपणा होय.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment