✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 27 ऑगस्ट 2024💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/wK9wi8xQmNRHAZUH/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌸 *_ या वर्षातील २४० वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🌸 *_महत्त्वाच्या घटना:_* 🌸•••••••••••••••••••••••••••••••••*१९९१: युरोपिअन महासंघाने इस्टोनिया, लाटव्हिया व लिथुआनियाच्या स्वातंत्र्यास मान्यता दिली.**१९९१: मोल्डोव्हाने आपण (सोविएत युनियनपासुन) स्वतंत्र असल्याचे घोषित केले.**१९६६: नाट्यसंपदा निर्मित,वसंत कानेटकर लिखित व पुरुषोत्तम दारव्हेकर दिग्दर्शित ’अश्रूंची झाली फुले’ या नाटकाचा पहिला प्रयोग गिरगाव येथील साहित्य संघ मंदिर येथे झाला.**१९५७: मलेशियाची राज्यघटना अमलात आली.**१९३९: सर फ्रँक व्हीटल आणि हॅन्स ओहायन यांनी शोध लावलेल्या Heinkel He 178 या जगातील पहिल्या टर्बो जेट विमानाचे उड्डाण झाले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••*१९८०: नेहा धुपिया -- भारतीय अभिनेत्री**१९७६: अभिजीत आप्पासाहेब पाटील-- प्रसिद्ध कवी**१९७५: अनंत हनुमंत धनसरे -- कवी लेखक**१९७२: दिलीप सिंह राणा( 'द ग्रेट खली' ) -- भारतीय व्यवसायिक कुस्ती लढणारे, २००७ मध्ये डब्ल्यु डब्ल्यु ईत ते वर्ल्ड हेविवेट चॅम्पियन बनले* *१९६८: नितीन वैद्य -- लेखक संपादक**१९६७: सुजाता गुंडूराव शिंदे -- कवयित्री* *१९६६: भोजराज रतीराम लांजेवार - कवी* *१९५६: सुनिता अरळीकर -- प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या, लेखिका* *१९४४: नीलकंठ चिरकुटराव चव्हाण -- कवी, लेखक**१९३९: मीना प्रभू -- कवयित्री, ज्येष्ठ लेखिका, प्रवासवर्णनकार**१९३५: श्रीरंग विष्णू जोशी -- मराठी लघु कथालेखक व कवी* *१९३०: डॉ. बद्रीनारायण रामुलाल बारवाले-- भारतीय संशोधक, उद्योजक (मृत्यू: २४ जुलै २०१७ )* *१९२५: नारायण धारप – लेखक, नाटककार रहस्यकथाकार (मृत्यू: १८ ऑगस्ट २००८ )**१९२५: वसंत केशव दावतर -- लेखक समीक्षक (मृत्यू,:१८ मार्च २००४ )**१९१९: विनायक रा. करंदीकर – संतसाहित्याचे अभ्यासक (मृत्यू: १५ एप्रिल २०१३ )**१९१०: सेतू माधवराव पगडी – इतिहासकार, विचारवंत, संशोधक, लेखक, वक्ते, तत्त्वचिंतक, समीक्षक, कार्यक्षम मुलकी अधिकारी, ’गॅझेटियर्स’चे संपादक असे विविधांगी पैलू असलेले व्यक्तिमत्त्व. 'जीवनसेतू’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.(मृत्यू: १४ आक्टोबर १९९४ )**१९०९: नानासाहेब(ना.तु.) ठाकूर - कवी* *१९०८: सर डोनाल्ड ब्रॅडमन – ऑस्ट्रेलियन फलंदाज, संघनायक व विक्रमवीर. १९४९ मध्ये त्यांना 'सर’ हा किताब देण्यात आला. (मृत्यू: २५ फेब्रुवारी २००१ )**१९०८: लिंडन बी. जॉन्सन – अमेरिकेचे ३६ वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: २२ जानेवारी १९७३ )**१८९९: रमाकांत पंढरीनाथ कंगले -- अनुवादक, विश्लेेषक, लेखक(मृत्यू: २७ जून १९८९ )**१८५९: सर दोराबजी टाटा – उद्योगपती व लोकहितबुद्धी (मृत्यू: ३ जून १९३२ )**१८५४: गणेश श्रीकृष्ण तथा 'दादासाहेब’ खापर्डे – प्रख्यात कायदेपंडित, विद्वान आणि राजकीय नेते, लोकमान्य टिळकांचे निकटचे सहकारी,'वर्हाडचे नबाब’ (मृत्यू: १ जुलै १९३८ )* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••• *२०१९: कुसुम गोपीनाथ शेंडे -- किराणा घराण्याच्या गायिका व नाट्यअभिनेत्री ( जन्म: १२ डिसेंबर १९२९ )* *२००६: हृषिकेश मुकर्जी – चित्रपट दिग्दर्शक (जन्म: ३० सप्टेंबर १९२२ )**२०००: मनोरमा वागळे – रंगभूमी, चित्रपट व मालिकांमध्ये विविध भूमिका केलेक्या अभिनेत्री (जन्म: १९२८ )**१९९८: दादासाहेब पोतनीस( दतात्रेय शंकर पोतनीस) -- स्वतंत्र सेनानी 'गावकरी' या मराठी भाषिक वृत्तपत्राचे संपादक ,पत्रकार (जन्म: २२ नोव्हेंबर १९०९ )**१९७९: लॉर्ड लुई माउंटबॅटन – भारताचे शेवटचे व्हॉईसरॉय आणि स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल (जन्म: २५ जून १९०० )**१९७६: मुकेश चंद माथूर तथा ‘मुकेश‘ – पार्श्वगायक. तीस वर्षांच्या फिल्मी कारकिर्दीत त्यांनी १०,००० हून अधिक गीतांना आवाज दिला. ऊर्दू, पंजाबी, तमिळ, बंगाली, मराठी, गुजराथी या भाषांतही त्यांनी गाणी गायली. (जन्म: २२ जुलै १९२३ )**१९५५: जगन्नाथ रघुनाथ आजगावकर – संतचरित्रकार,१९०७ ते १९३५ या काळात त्यांच्या 'महाराष्ट्र कविचरित्र’ या ग्रंथाचे नऊ खंड प्रकाशित (जन्म: १६ ऑगस्ट १८७९ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••फेसबुक आणि व्हाट्सअप्प ची स्थिती म्हणजे*एक ना धड भाराभर चिंध्या*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *लडाख या केंद्रशासित प्रदेशात 5 नव्या जिल्ह्याची स्थापन करण्याचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *जम्मू काश्मीरमध्ये भाजपकडून आधी 44 उमेदवार जाहीर, मग तासाभरात उमेदवार यादी रद्द, नव्याने 15 उमेदवारांची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *विधानसभेला महायुतीचा प्रमुख चेहरा एकनाथ शिंदे, पण मुख्यमंत्री निवडणुकीनंतर ठरणार, अशोक चव्हाणांचं महत्त्वाचं वक्तव्य*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *गणपतीपूर्वी गोवा हायवेवरची वाहतूक सुरळीत करा, मुख्यमंत्र्यांच्या सूचना, खड्डे बुजवण्यासाठी हार्डनरच्या वापराचं प्रात्याक्षिक*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *सिंधुदुर्ग किल्ल्यावर वर्षभरापूर्वी पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन झालेला छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फुटी पुतळा कोसळला*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *नांदेड लोकसभेचे विद्यमान खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन, हैदराबादमधील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास, ते 71 वर्षाचे होते. आज नायगाव येथे शासकीय पद्धतीने होणार अंतीम संस्कार*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *राज्यातील सर्व शाळांमध्ये अत्याधुनिक पॅनिक बटण बसवणार - शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गोपाळकाला*दहीहंडीचे महत्त्व*दहीहंडीची प्रक्रिया अत्यंत मजोशीर असते. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी याचे आयोजन केले जाते. या दिवशी मातीच्या मडक्यात दही, लोणी, मिठाई, फळे इत्यादी भरुन एका उंच ठिकाणी हे मडके टांगले जाते. याला फोडण्यासाठी विविध तरुण मंडळी प्रयत्न करतात. दहीहंडी फोडण्यासाठी विविध मंडळातील तरुण एक दुसऱ्याच्या पाठीवर चढून मानवी मनोरा तयार करतात. या मनोऱ्याच्या सर्वात वरच्या थरावर असतो तो गोविंदा. तो आपला तोल सांभाळत हंडी फोडतो. हंडी फोडणाऱ्या मंडळांना विविध भेटवस्तू देऊन गौरविण्यात येते. मुंबईत गोविंदांसह गोपिकाही या उत्सवात सहभागी होतात. अनेक मंडळे अशी आहेत, ज्यात केवळ मुलीच आहेत. या मुली मुलांप्रमाणेच धाडस दाखवत थरांवर थर लावून हंडी फोडतात. या उत्सवात सेलिब्रिटी देखील हजेरी लावतात आणि अनेक मोठी मंडळी या उपक्रमात सहभागी होत तरूणांना प्रोत्साहन देत उत्साह वाढवतात.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••चांगले विचार मनात फार वेळ टिकत नाहीत म्हणून ते मनात येताच कृती करा.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी केंद्र शासनाने १४० कोटी जनतेसाठी कोणती संकल्पना राबविण्याचा निर्धार केला आहे ?२) भारतात किती ठिकाणी नोटांची छपाई केली जाते ?३) "गब्बर" या टोपण नावाने कोणता भारतीय क्रिकेटपटू परिचित आहे ?४) 'चौफेर' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) भगवान श्री कृष्ण यांचे आई - वडिलांचे नांव सांगा ?*उत्तरे :-* १) एक पेड मेरी माँ के नाम २) चार - महाराष्ट्रात नाशिक, मध्यप्रदेशात देवास, कर्नाटकात म्हैसूर, पश्चिम बंगालमध्ये सालबोनी ३) शिखर धवन ४) चहूकडे, सर्वत्र, भोवताली ५) देवकी - वसुदेव*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 नागभूषण दुर्गम, शिक्षक नेते, नांदेड👤 दत्तप्रसाद सुरुकुटवार, नांदेड👤 ज्योती आळंदकर, लातूर👤 अतुल वैद्य, पेण, रायगड👤 प्रशांत रुईकर, लातूर👤 दिगंबर सोळंके👤 विकास गायकवाड, नांदेड👤 विश्वनाथ आडेराव, धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *हरिपाठ*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••योगयागविधि येणें नोहे सिद्धी । वायांचि उपाधि दंभ धर्म ॥१॥ भावेंविण देव न कळे नि:संदेह । गुरुविण अनुभव कैसा कळे ॥२॥ तपेंवीण दैवत दिधल्याविण प्राप्त । गुजेंविण हित कोण सांगे ॥३॥ ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात । साधूचे संगती तरणोपाय ॥४॥ ।। संत ज्ञानेश्वर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एकमेकांची काळजी घेतली पाहिजे असे बरेचजण म्हणत असतात. हा एक समाजसंकेत आहे. पण त्याच वेळेला आपण आपल्याच घरातील माणूस आजारी असताना त्याची का बरं काळजी घेत नाही. ..? हा एक प्रश्नच आहे. एकदा तो माणूस बरा झाल्यावर मात्र वेळात, वेळ काढून दिखावूपणा करुन काळजी घेण्यात काय अर्थ...? म्हणून काळजी करायची असेल किंवा सेवा करायची असेल तर आपल्या मनात आपुलकी व त्या माणसासाठी वेळ असणे आवश्यक आहे आणि आज ती अत्यंत काळाची गरज आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *वडिलांना मदत*भगवान बुद्ध त्या काळात आपल्या शिष्यगणांसह गावोगावी जात होते. एका गावाच्या वेशीवर एक वृद्ध आपल्या मोठ्या टोपलीतून भाजी विकण्यास बसला होता.ती टोपली जड होती व त्याला तेथून दुसरीकडे जायचे होते म्हणून येणार्या - जाणार्या वाटसरुंना तो आपल्या डोक्यावर टोपली ठेवण्यास मदत करण्याची याचना करत होता. पण कोणीही त्याच्याकडे लक्ष देत नव्हते. ते शिष्यगणही मजा बघत होते. हे पाहताच भगवान बुद्ध स्वतः पुढे झाले व त्यांनी वृद्धाच्या डोक्यावर टोपली उचलून दिली. त्या वृद्धाने त्यांना ओळखले होते.तो म्हणाला, सार्या जगाच्या दृष्टीने ते कोणीही असोत, पण माझ्या दृष्टीने माझ्या मुलासारखे आहेत ! त्याचे बोलणे ऐकून शिष्य आश्चर्यचकित झाले. त्यांनी विचारले, हे कसे शक्य आहे ? तो वृद्ध उत्तरला, जगात प्रत्येक मुलगा हा आपल्या मातापित्यांचा आधार असतो. त्यांचे कष्ट उपसण्यास नेहमीच मदत करत असतो. आज त्यांनीही मला मदत केली आहे. माझे कष्ट हलके केले आहेत. मग ते माझ्या मुलासमानच नाहीत का ? सार्या शिष्यांनी त्या वृद्धाचे पाय धरले व क्षमा मागितली.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment