✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 10 ऑगस्ट 2024💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/rw6VVBFxftZ9eYgx/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🟥 *_ आंतरराष्ट्रीय बायोडीज़ल दिवस_* 🟥••••••••••••••••••••••••••••••••••••🟥 *_जागतिक सिंह दिवस_* 🟥••••••••••••••••••••••••••••••••••🟥 *_ या वर्षातील २२३ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🟥 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟥•••••••••••••••••••••••••••••••••*१९९९: औषधांच्या दुकानांत विकल्या जाणार्या औषधांत प्राणिज पदार्थ असल्यास त्याचा उल्लेख वेष्टणावर करणे अनिवार्य असल्याचा केंद्रसरकारच्या सामाजिक न्याय खात्याचा निर्णय.* *१९९९: ’इंडियन फिजिक्स असोसिएशन’ तर्फे देण्यात येणारा ’डॉ. मो. वा. चिपळोणकर स्मृती पुरस्कार’ डॉ. निवास पाटील व डॉ. प्रकाश तुपे यांना जाहीर**१९९०: मॅगेलान हे अंतराळयान शुक्रावर पोचले.**१९८८: दुसर्या महायुद्धात बेकायदेशीरपणे बंदिवासात टाकलेल्या किंवा हद्दपार केलेल्या जपानी वंषशाच्या अमेरिकन नागरिकांना राष्ट्रपती रोनाल्ड रेगन यांनी प्रत्येकी २०,००० डॉलर भरपाई देण्याचे कबूल केले.**१८२१: मिसुरी हे अमेरिकेचे २४ वे राज्य बनले.**१८१०: ’स्मिथसोनियन इन्स्टिट्युशन’ ची स्थापना झाली.* 🟥 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟥 ••••••••••••••••••••••••••••••••• *१९९१: प्रदीप दत्ताराम बडदे -- कवी* *१९६६: आशा वेलणकर -- मराठी अभिनेत्री**१९६५: ज्योत्स्ना प्रदीप राजपूत - कवयित्री* *१९६२: निर्मल पांडे -- चित्रपट अभिनेते (मृत्यू::१८ फेब्रुवारी २०१० )**१९६०: देवांग मेहता – भारताच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील एक अग्रणी व्यक्तिमत्त्व आणि नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्विस कंपनीज (NASSCOM) चे अध्यक्ष (मृत्यू: १२ जुलै २००१ )**१९५८: प्रा. डॉ. तरुजा भोसले वळसंगकर -- प्रसिद्ध लेखिका, कवयित्री**१९५७: डॉ. सत्यपाल श्रीवास्तव -- हिंदी व मराठी मध्ये लेखन करणारे लेखक**१९५५: प्रा. डॉ. कुमार शास्त्री -- प्रसिद्ध लेखक, वक्ते* *१९५१: अजित वाच्छानी -- भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन वरील चरित्र अभिनेते (मृत्यू: २५ ऑगस्ट २००३ )**१९३९: हरिहर बाबाराव खंडारे -- प्रसिद्ध कवी, लेखक* *१९३४: डॉ. सुधीर नरहर रसाळ -- सुप्रसिद्ध समीक्षक,संपादक* *१९३२: सुरमणी' पंडित रघुनाथ पाणिग्रही -- संगीतकार आणि संगीत दिग्दर्शक (मृत्यू: २५ ऑगस्ट २०१३ )**१९३१: कृष्णचंद्र पंत -- माजी केंद्रीय मंत्री (मृत्यू: १५ नोव्हेंबर २०१२)**१९३०: मनोहर दत्तात्रेय आपटे -संस्थापक (मृत्यू: ६ मे २००२ )**१९२४: राम कृष्ण जोशी -- कथा,कादंबरीकार व बालसाहित्यिक* *१९२०: मधुसूदन बालकृष्ण वर्धे -- कथा, कादंबरी लेखन व संपादक* *१९१७: प्रेम आदिब -- भारतीय अभिनेते (मृत्यू: २५ डिसेंबर १९५९)**१९१६: वसंत साठे --पटकथाकार व 'बॉम्बे पब्लिसिटी सर्व्हिस'चे पार्टनर (मृत्यू: १२ जुलै १९९४ )**१९१५: नारायण धबाडू पाटील -- कवी लेखक**१९१३: डॉ.अमृत माधव घाटगे – संस्कृत व प्राकृत विद्वान (मृत्यू: ८ मे २००३ )**१९०२: नॉर्मा शिअरर – कॅनेडियन - अमेरिकन अभिनेत्री (मृत्यू: १२ जून १९८३ )**१८९४: व्ही. व्ही. गिरी – भारताचे चौथे राष्ट्रपती,लोकसभा सदस्य आणि केंद्रीय मंत्री (मृत्यू: २३ जून १९८० )**१८७४: हर्बर्ट हूव्हर – अमेरिकेचे ३१ वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: २० आक्टोबर १९६४ )**१८६०: पं.विष्णू नारायण भातखंडे – संगीतशास्त्रकार, हिन्दुस्थानी संगीताचे प्रसारक, संशोधक व गांधर्व महाविद्यालयाचे एक संस्थापक (मृत्यू: १९ सप्टेंबर १९३६ )**१८५५: ’गान सम्राट’ उस्ताद अल्लादियाँ खाँ – जयपूर -अत्रौली घराण्याचे संस्थापक व कोल्हापूर दरबारचे प्रसिद्ध गायक (मृत्यू: १६ मार्च १९४६ )* 🟥 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟥•••••••••••••••••••••••••••••••••*२०२१: डॉ.बालाजी तांबे-- आयुर्वेद, योग व संगीतोपचार या विषयांतील तज्ज्ञ (जन्म: २८ जून १९४० )* *२०१२: सुरेश दलाल – साहित्य अकादमी पुरस्कार विजेते गुजराथी कवी, लेखक आणि संपादक (जन्म: ११ आक्टोबर १९३२ )**२०११: पदिंजरेथलाकल चेरियन अलेक्झांडर -- महाराष्ट्राचे माजी राज्यपाल (जन्म: २० मार्च १९२१ )* *२००३: पं.गंगाधर वामन पिंपळखरे -- पुण्यातील जेष्ठ संगीत गुरू (जन्म: १२ जून १९११ )**१९९७: नारायण पेडणेकर – कवी व नाट्यसमीक्षक* *१९९२: लेफ्टनंट जनरल शंकरराव पांडुरंग पाटील (SPP) थोरात -- संयुक्त राष्ट्रसंघाने शांतता प्रस्थापनेसाठी कोरियात पाठवलेल्या शांतिसेनेचे ते सेनापती होते. कीर्तिचक्र, पद्मश्री, सावरकर पुरस्कार असे अनेक मानसन्मान त्यांना मिळाले होते. (जन्म: १२ ऑगस्ट १९०६ )**१९८६: जनरल अरुणकुमार वैद्य -- १९६५ आणि १९७१ च्या भारत पाकिस्तान युद्धात अतुलनीय शौर्य गाजवल्याबद्दल त्यांना ’महावीरचक्र’ मिळाले होते. त्यांच्या लष्करप्रमुखपदाच्या काळातच ’ऑपरेशन ब्ल्यू स्टार’ची कारवाई झाली होती. (जन्म: २७ जानेवारी १९२६ )**१९८२: मनाली कल्लट तथा एम. के. वैणू बाप्पा – भारतीय खगोलशास्त्रज्ञ. तार्यांची प्रत आणि त्यांच्या वर्णपटातील परस्परसंबंधांची उकल केली. (जन्म: १० एप्रिल १९२७ )**१९७७: श्यामलाल गुप्ता -- भारतीय कवी आणि गीतकार (जन्म: ९ सप्टेंबर १८९६ )**१९५०: खेमचंद प्रकाश – संगीतकार (जन्म:१२ डिसेंबर १९०७ )**१९४२: हुतात्मा शिरीषकुमार (जन्म: २८ डिसेंबर १९२६ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*हिंदूंचा पवित्र महिना - श्रावण*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *घरोघरी तिरंगा अभियानाचे रूपांतर आता लोकचळवळीत - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *ST आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी आज अधिवेशन, सकल धनगर समाजाच्या वतीने राज्यव्यापी अधिवेशनाचे आयोजन*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *12 ऑगस्ट पर्यंत चालणारे अधिवेशन गुंडाळले, दोन्ही सभागृह अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आले*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *"जय सेवा, जय बिरसा मुंडा'च्या जयघोषाने दुमदुमले गोंदिया, आदिवासी नृत्य ठरले आकर्षणाचे केंद्र*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *NEET PG परीक्षा 11 ऑगस्टलाच होणार, परीक्षा पुढे ढकलण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाला ग्रामपंचायतीकडून जप्तीची नोटीस, कर थकवल्याने कारवाई*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्यपदक जिंकलं; पाकिस्तानच्या अर्शद नदीमनं पदकांचा दुष्काळ संपवला, सुवर्ण जिंकत रचला इतिहास*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *अमीबा म्हणजे काय ?* 📙 **************************साऱ्या जगात किमान दहा लाख प्रकारचे प्राणी सापडतात. पण प्राणीशास्त्राबद्दल चर्चा सुरू झाली किंवा अभ्यास करायचे ठरवले की सर्वप्रथम नाव निघते ते अमीबाचेच. एकपेशीय प्राणी हे त्याचे वैशिष्ट्य.१६६५ साली रॉबर्ट हुक या इंग्लिश निसर्गप्रेमी शास्त्रज्ञाने पेशी (Cell) हा शब्द प्रथम वापरला. बुचाच्या अभ्यासामध्ये त्याला आढळलेल्या पेशींचे वर्णन त्याने त्यावेळी करून ठेवले आहे. त्यानंतर मायक्रोस्कोपखाली सर्वच गोष्टी न्याहाळल्या जाऊ लागल्या. स्वतंत्रपणे जगू शकणारा. पुनरुत्पादनाची क्रिया स्वतंत्रपणेच करणारा एकपेशीय असा हा अमीबा त्यानंतर प्रसिद्ध पावला. अमीबा दिसण्यासाठी मायक्रोस्कोपची तशी गरज नसते. काही प्रकारचे अमीबा अर्धा मिलिमीटरएवढे मोठे असतात. ते नुसत्या डोळ्यांनीही पाण्याच्या थेंबात दिसतात. साधे भिंग वापरले, तर त्यांची हालचालही न्याहाळता येऊ शकते. काही जाती मात्र अगदी सूक्ष्मदर्शक यंत्राखाली पाहाव्या लागतात. जेलीचा एखादा गोळा कसा असावा, तसा हा प्राणी सतत स्वतःचा आकार पालटत हालचाल करत असतो. भक्षाच्या शोधात भटकंती करताना अंगाची वेटोळी लांबुडकी पसरत हा भक्षाच्या दिशेने सरकतो. भक्ष्य आवाक्यात आले की त्याला चहूबाजूंनी प्रथम तो गुरफटून टाकतो. अर्थातच याचे भक्ष्य म्हणजे त्याच्या जीवाच्या आकारास साजेसेच असते. छोटे जीवाणू, प्राणिज व वनस्पती शैवाळ सतत गट्टम करत जाणे हा त्याचा नित्यक्रम.भक्ष्य गुरफटून मग पेशीतील पेशीद्रव्यामध्ये विरघळवण्याची क्रिया सुरू होते. यावर नियंत्रण असते पेशीकेंद्राचे. गरजेप्रमाणे पाणीपण शोषले जात असतेच. पचन पूर्ण झाल्यावर नको असलेला भाग व तत्सम द्रव्ये बाहेर टाकली जातात.साध्या पेशीविभाजन पद्धतीने यांची वाढ होत असल्याने यांची संख्या फार मोठ्या प्रमाणावर वाढत असते. पाणी, मग ते कसलेही असो, अमीबाचा वावर तेथे आढळणारच. त्यातल्या त्यात साचलेले पाणी, डबकी, चिखल यांमध्ये यांची वाढ चांगली होते. वाहत्या पाण्यात त्या मानाने अमीबा कमी सापडतात. अमीबा या प्राण्याबद्दल माणसाला सतत जागरूक राहावे लागते. पिण्याच्या पाण्यातून माणसाच्या शरीरात अमीबाचा एकदा का प्रवेश झाला की त्याच्या शरीरात सर्वत्र संचार सुरू होतो. वाढही छान होते. सर्व पचनसंस्था पोखरून काढण्याची ताकद या एकपेशीय प्राण्यात आहे. पोटाचे विविध आजार, पोटदुखी, मोठ्या आतड्याचे आजार, यकृताची गंभीर दुखणी या अगदी लहान प्राण्यामुळे होतात. जेमतेम ३० वर्षांपूर्वी या दुखण्यांसाठी फारसे खात्रीचे उपायही नव्हते. आजकाल मात्र यांवर खात्रीची औषध उपलब्ध आहेत. जगाच्या पाठीवर सर्वत्र आढळ असलेला हा अमीबा भारतीय हवामानात सर्व प्रांतांत त्याचे राज्य पसरून आहे.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••" जेव्हा आम्ही नम्रतेने लहान होतो, तेव्हा आम्ही महानतेच्या निकट जातो."*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) २०२४ या वर्षाचा *पहिला विज्ञानरत्न पुरस्कार* कोणाला जाहीर झाला आहे ?२) भारतीय विज्ञान क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार कोणता ?३) गोंदियाचे नवे पोलीस अधिक्षक म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे ?४) 'दीन' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) अणुबॉम्बचे जनक कोणाला म्हटले जाते ? *उत्तरे :-* १) गोविंदराजन पद्मनाभन, प्रख्यात बायोकेमिस्ट २) विज्ञानरत्न पुरस्कार ३) गोरख भामरे ४) गरीब ५) ज्युलियस रॉबर्ट, अमेरिकन भौतिक शास्त्रज्ञ*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 अशोक मगरे, साहित्यिक, नांदेड👤 राहुल मगरे, नांदेड👤 गणेश मोहिते👤 शुभांगी पवार, साहित्यिक👤 व्यंकटेश पुलकंठवार, आरोग्य विभाग, नांदेड👤 तुकाराम यनगंदलवाड, पुणे👤 हेमंत पापळे, शिक्षक तथा साहित्यिक, कारंजा, वाशिम👤 संतोष येवतीकर, येवती, धर्माबाद👤 यशवर्धन पवार👤 माधव परसुरे👤 नागराज आहिरे👤 दिगंबरराव भीमराव सावंत👤 गोविंदराव शिवशेट्टे👤 सचिन सुरबुलवाड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गुरु पारस गुरु परस है चन्दन बास सुबास |सतगुरु पारस जीवको दीना मुक्ति निवास ॥ 40 ॥।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आठवण त्यांची काढावी ज्यांनी जग दाखवले, आठवण त्यांची काढावी ज्यांनी चिखलातून वर काढले, आठवण त्यांची काढावी ज्यांनी माणूस बनून माणसाची जाणीव करुन दिली, आठवण त्यांची काढावी जे, फुकटात प्राणवायू देतात आणि आठवण त्यांची काढावी जे, वेळात, वेळ काढून कोणतेही बहाणे न करता मदत केली हे सर्वच त्यागी व नि:स्वार्थी होते आणि आजही आहेत म्हणूनच स्वतः पेक्षा दुसऱ्यांसाठी जगून दाखवले. या सर्वांना क्षणभरासाठी सुद्धा विसरु नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*प्रयत्न* " एकदा एक व्यापारी त्याच्या काही नोकरांबरोबर दुसऱ्या देशात व्यापार🏇🏇🏇 करण्यासाठी जात असतो जाताना त्यांना रस्त्यात वाळवंट लागते. वाळवंटात चालून चालून त्याच्या काही नोकरांना पाण्याविना चक्कर यायला लागते. उन्हामुळे आणि जवळ कोठेही पाणी नसल्यामुळे🚱🚱 नोकर कासावीस होऊ लागतात . 🏖🏖त्यांची अवस्था पाहून व्यापारी मनात विचार करतो जर मीच माघार घेतली तर माझे नोकर पण माघार घेतील. मला माघार घेऊन चालणार नाही. मला आशावादी राहायला हवे. व्यापारी इकडे तिकडे पाहू लागतो त्याला जवळच एक हिरवे झुडूप दिसते. ☘☘☘व्यापारी विचार करतो 🤔🤔कि जर पाणी नाही तर हिरवे झुडूप कसे आले? म्हणजे नक्कीच येथे पाणी असावे . व्यापाऱ्याला हायसे वाटते. 🙂🙂व्यापार्याने नोकरांना तेथे खोदायला सांगितले त्याचे नोकर खोदतात पण खाली दगडच दिसतात. पाणी लागतच नाही व्यापारी म्हणतो आणखी खोल खोदा व्यापारी दगडांना आपले कान लावतो त्याला जमिनी खालील पाण्याच्या प्रवाहाचा आवाज ऐकू येतो. व्यापारी त्या दगडांवर एक हातोडा मारतो. आणि काय आश्चर्य जमिनीतून पाण्याचे कारंजे उडू लागते. ते पाणी पिउन सर्वाना खूप आनंद होतो. त्यांच्या कष्टाचे सार्थक होते.*तात्पर्य – प्रयत्न केला तर यश मिळते.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment