✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 12 ऑगस्ट 2024💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://surveyheart.com/form/66ad9d9e311b89197db7723b••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🔅 *_आंतरराष्ट्रीय युवा दिन_* 🔅••••••••••••••••••••••••••••••🔅 *_आंतरराष्ट्रीय हत्ती दिन_* 🔅••••••••••••••••••••••••••••••🔅 *_भारतीय ग्रंथपाल दिवस_* 🔅•••••••••••••••••••••••••••••••••🔅 *_ या वर्षातील २२५ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🔅 *_महत्त्वाच्या घटना:_* 🔅•••••••••••••••••••••••••••••••••*२००५: श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री लक्ष्मण कादिरमगार यांची तामिळ अतिरेक्यांनी हत्या केली.**२००२: १२ वर्षे ७ महिने वयाचा सर्गेई कार्जाकिन हा युक्रेनचा खेळाडू जगातील सर्वात लहान वयाचा बुद्धीबळातील ग्रँडमास्टर बनला.**२०००: प्रसिद्ध पर्यावरणवादी कार्यकर्त्या मेधा पाटकर यांची गांधी सेवा पुरस्कारासाठी निवड**१९९८: सचिन तेंडुलकर यांना ‘राजीव गांधी खेल रत्न‘ पुरस्कार जाहीर**१९९५: जागतिक मैदानी स्पर्धेत अमेरिकेच्या मायकेल जॉन्सनने २०० मी आणि ४०० मी अशा दोन्ही धावण्यांच्या शर्यतीत सुवर्णपदक मिळवले. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच पुरुष धावपटू आहे.**१९८९: कुसूमाग्रज यांच्या अध्यक्षतेखाली पहिली 'जागतिक मराठी परिषद’ मुंबई येथे सुरू झाली.**१९८२: परकीय कर्जाचे हप्ते चुकवता येत नसल्यामुळे मेक्सिकोने दिवाळे काढले. त्यामुळे दक्षिण अमेरिका व तिसर्या जगातील देशांमधे आर्थिक आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली.**१९८१: आय. बी. एम. कंपनीचा पहिला पर्सनल कॉम्प्युटर बाजारात आला.**१९७७: श्रीलंकेत झालेल्या वांशिक दंगलीत ३०० हुन अधिक तामिळ ठार झाले.**१९६४: वंशभेद केल्याबद्दल दक्षिण अफ्रिकेची ऑलिम्पिक स्पर्धांमधुन हकालपट्टी झाली.**१९५०: अमेरिकन युद्धकैद्यांना उत्तर कोरियन सैन्याने ठार मारले.**१९४८: लंडनमधे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने हॉकीमधे सुवर्णपदक मिळवले.**१९४२: चले जाव चळवळ – पुण्यातील अप्पा बळवंत चौकात रणगाडे आणून गोळीबार, २ ठार १६ जखमी**१९२२: राम गणेश गडकरी यांच्या निधनानंतर जवळजवळ ४ वर्षांनी त्यांनी लिहीलेल्या ’राजसंन्यास’ नाटकाचा पहिला प्रयोग झाला.**१९२०: शिवराम महादेव परांजपे यांनी ’स्वराज्य’ नावाचे साप्ताहिक सुरू केले.**१८५१: आयझॅक सिंगरला शिवणाच्या मशीनचे पेटंट मिळाले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस_* 🔅•••••••••••••••••••••••••••••••••*१९९५: सारा अली खान -- चित्रपट अभिनेत्री**१९६२: सुरेश वांदिले -- एक बहुआयामी, पथदर्शी,भविष्यवेधी लेखक तथा पूर्व संचालक माहिती व जनसंपर्क विभाग* *१९५९: गुरुनाथ तेंडुलकर -- कथाकार* *१९५९: प्रवीण महादेव ठिपसे -- 'ग्रॅंडमास्टर किताब मिळवणारे पहिले भारतीय बुद्धिबळ खेळाडू**१९५६: चित्रा जगदीश शर्मा-- लेखिका, कथाकार* *१९५३: कांताराम गंगाराम सोनवणे -- कवी, लेखक,पत्रकार* *१९५२: अनंत सामंत -- प्रसिद्ध मराठी लेखक**१९४८: फकिरा मुंजाजी तथा ’फ. मुं.’ शिंदे – प्रसिद्ध कवी, समीक्षक व अनुवादक**१९४४: मिलिंद श्रीपती येरमाळकर -- कवी लेखक**१९३४: वसंतराव आजगावकर -- मराठी भावगीत गायक आणि संगीतकार* *१९२६: बी. आर. तथा अप्पासाहेब खेडकर – गणेशमुर्तीकार ते शिल्पकार (मृत्यू: १३ ऑगस्ट २०१६ )**१९२४: मुहम्मद झिया उल हक – पाकिस्तानचे ६ वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: १७ ऑगस्ट १९८८ )**१९१९: डॉ. विक्रम साराभाई – भारतीय अवकाश संशोधन कार्यक्रमाचे शिल्पकार (मृत्यू: ३१ डिसेंबर १९७१ )**१९१४: तेजी हरिवंशराय बच्चन -- भारतीय सामाजिक कार्यकर्ता (मृत्यू: २१ डिसेंबर २००७ )**१९०६: लेफ्टनंट जनरल शंकरराव पांडुरंगराव (पाटील) तथा एस. पी. पी. थोरात -- संयुक्त राष्ट्रसंघाने शांतता प्रस्थापनेसाठी कोरियात पाठवलेल्या शांतिसेनेचे ते सेनापती होते. कीर्तिचक्र, पद्मश्री, सावरकर पुरस्कार असे अनेक मानसन्मान त्यांना मिळाले होते. (मृत्यू: १० ऑगस्ट १९९२ )**१८९२: एस. आर. रंगनाथन – भारतीय गणितज्ञ व ग्रंथालयशास्त्रतज्ञ (मृत्यू: २७ सप्टेंबर १९७२ )**१८८७: आयर्विन श्रॉडिंगर – नोबेल पारितोषिक विजेता ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: ४ जानेवारी १९६१ )**१८८१: सेसिल डी मिल – अमेरिकन चित्रपट अभिनेता, निर्माता व दिग्दर्शक (मृत्यू: २१ जानेवारी १९५९ )**१८८०: बाळकृष्ण गणेश खापर्डे – चरित्रकार, वाड्मयविवेचक ( मृत्यू: १९६८ )**१८०१: जॉन कॅडबरी – ब्रिटिश उद्योगपती व ’कॅडबरी’ चे संस्थापक (मृत्यू: १२ मे १८८९ )* *_ मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन _*🔅••••••••••••••••••••••••••••••••• *२०२२: माधव गरड --ज् येष्ठ कवी, ललित लेखक (जन्म: २५ ऑक्टोबर १९६० )* *२००५: लक्ष्मण कादिरमगार – श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री, मुत्सद्दी, वकील व तामिळ नेते (जन्म: १२ एप्रिल १९३२ )**१९९७: गुलशन कुमार दुआ -- संगीत निर्माता व कॅसेट इंडस्ट्रीज लिमिटेड (टी-सीरीज) चे संस्थापक (जन्म: ५ मे १९५१ )**१९८२: हेन्री फोंडा – अमेरिकन अभिनेते (जन्म: १६ मे १९०५ )**१९७३: दयानंद बाळकृष्ण ऊर्फ ’भाऊसाहेब’ बांदोडकर – गोव्याचे पहिले मुख्यमंत्री, महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाचे संस्थापक, उद्योगपती आणि दानशूर (जन्म: १२ मार्च १९११ )**१९६४: इयान फ्लेमिंग – दुसर्या महायुध्दातील गुप्तहेर, लेखक, पत्रकार आणि ’जेम्स बाँड’चा जनक (जन्म: २८ मे १९०८ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दिनांक 15 ऑगस्ट 2015 रोजी प्रारंभ झालेल्या *फ्रेश मॉर्निंग बुलेटिन* ला पाहता पाहता नऊ वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने पालक, शिक्षक व विद्यार्थी यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी एक प्रयत्न म्हणून google फॉर्म तयार केला आहे. तरी ते भरून भरून आपले अमूल्य प्रतिक्रिया कळवावे. ही नम्र विनंती..... प्रतिक्रिया नोंद करण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *नांदेडमध्ये काँग्रेसची आढावा बैठक संपन्न, काँग्रेसचे नेते अमित देशमुख यांनी गाजविली सभा.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *सोलापुरातील कुर्डूवाडीत शरद पवारांची गाडी मराठा आंदोलकांनी रोखली, मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *कितीही पैसा लागू दे, जसं होतं तसंच केशवराव भोसले नाट्यगृह उभं करा; अजितदादांकडून स्पष्ट निर्देश*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *हिंगोलीत आज मराठवाड्यातील सर्वात मोठी कावड यात्रा, मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह मंत्र्यांची उपस्थिती राहणार; 50 हजार भाविकांची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *जुनी पेन्शन योजना संदर्भांत राज्य सरकारी कर्मचारी संघटना कृती समिती 29 ऑगस्टपासून बेमुदत संपावर जाणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *उपचारांसाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन, पैलवान विजय डोईफोडेच्या उपचारांसाठी ‘पुनीत बालन ग्रुप’कडून 5 लाखांची मदत*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *नोकरीसाठी नव्हे, तर सुवर्ण पदकांसाठी खेळतो, नेमबाज मनू भाकर आणि सरबज्योत सिंग हरियाणा सरकारची नोकरीची ऑफर नाकारली*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *वसाहती अंतराळातील* 📙 विज्ञानकथाकारांना आकर्षक वाटणारी अंतराळ वसाहतींची कल्पना आता मुर्त ठरू पाहत आहे. १९५७ साली स्पुटनिकने अंतराळ तंत्रज्ञानाची सुरुवात झाली. १९६९ मध्ये मानव चंद्रावर गेला. तर १९८०-९० सालच्या दशकात अंतराळवीरांनी पृथ्वीभोवती चक्कर मारणार्या स्पेस शटलसदृश यानात जास्त वेळ राहण्याचे विक्रम सुरू केले. अंतराळ वसाहत म्हणजे अशाच पद्धतीने पृथ्वीभोवताली फिरणारी वसाहतच, जी अंतराळात मानवी जीवनासाठी लागणार्या सर्व सुविधा पुरवू शकेल.अंतराळातील वसाहतीत पृथ्वीपेक्षा सर्वात मोठा जाणवणारा फरक म्हणजे तेथील अतिसूक्ष्म गुरुत्वाकर्षणाचा. पृथ्वीच्या आकर्षणामुळे प्रत्येक वस्तूला वजन असते. आपल्या शरीराला, मेंदूला, मनाला ह्या वजनाची सवय झालेली असते. अमुक वजन पेलता यावे म्हणून स्नायूंचे गठन झाले असते. अंतराळात गुरुत्वाकर्षण जवळजवळ नसल्याने आपण वसाहतीत तरंगू, तसेच वर खालीचा फरक नाही ! पेल्यातला द्रव पेला उघडा केला तर खाली पडत नाही. तो झटकून काढला की, गोळ्याच्या स्वरूपात तरंगतो. अर्थात हे विचित्र अनुभव आपल्याला खातापिताना आणि देहधर्मांसाठी येणार ! अाणि अशा स्थितीत सतत राहिल्याने मानसिक परिणाम काय होतील, ते सतत अभ्यासले जात आहेत.अंतराळात वसाहत उभी करणे वाटते तितके अवघडही नाही; कारण 'वजन' हा गुण नसल्याने सिमेंट काँक्रीटचे भव्य प्रासाद बांधायची सूर नाही, हलके साहित्य चालेल. अशा घरबांधणीचे अर्थातच नवे शास्त्र असेल. शिवाय गुरुत्वाकर्षणाचा अभाव असल्याने द्रव ठेवायला पेला नको, तसेच दोन द्रवांचे मिश्रण अधांतरी करता येईल. अशा स्थितीचा फायदा घेऊन काही अतिशुद्ध औषधे बनवता येतील, ज्यांना भांड्याचा संसर्ग नाही. धातूंची मिश्रणे (नव्या प्रकारची) करणेसुद्धा अंतराळात शक्य होईल. गुरुत्वाकर्षणविरहित अवस्थेतील वैज्ञानिक प्रयोग इथे करता येतील.एकूण अंतर वसाहत हे आता स्वप्न राहिले नसून विज्ञान तंत्रज्ञानाच्या विकासातील एक संभाव्य टप्पा आहे. केवळ पृथ्वीवर जागा नाही म्हणून अंतराळात राहावे, असे कोणी म्हणणार नाही. उलट तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन लोकसंख्या काबूत आणणे अधिक व्यवहार्य आहे. परंतु जे औद्योगिक आणि वैज्ञानिक प्रकल्प गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवर राबवणे शक्य नाही, ते अशा वसाहतीत करता येतील, हे त्यांचे वैशिष्ट्यच. शिवाय अंतराळात जवळजवळ पोकळी असल्याने वसाहतीबाहेरच्या पोकळीतदेखील वेगळे प्रयोग करता येतील. त्यांच्यासाठी पृथ्वीवर कृत्रिम पोकळी निर्माण करणे खर्चाचे असेल.‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्याची चांगुलपणावर श्रद्धा आहे त्याला कशाचेही भय वाटत नाही.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) २०२४ या वर्षाचा रसायनशास्त्राचा शांती स्वरूप भटनागर पुरस्कार ( राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार ) कोणाला जाहीर झाला आहे ?२) भारतातील कोणता पुरस्कार हा नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो ?३) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना फिजी या देशाच्या कोणत्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ?४) 'दुनिया' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) फिजी या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता ? *उत्तरे :-* १) विवेक पोलशेट्टीवार, वैज्ञानिक २) शांती स्वरूप भटनागर पुरस्कार ३) कॅम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी ४) जग ५) कॅम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 जेष्ठ कवी फ. मुं. शिंदे, छत्रपती संभाजीनगर👤 वसंत हंकारे, व्याख्याते व प्रबोधनकार, सांगली👤 रवीकुमार येळवीकर, नांदेड👤 पोतन्ना लखमावाड, पत्रकार, धर्माबाद👤 चंद्रकांत गायकवाड, शिक्षक तथा साहित्यिक, मुखेड👤 मंगेश पापनवार, वसमत👤 दीपक कोकरे👤 आशिष अग्रवाल👤 श्रीनिवास बिचकेवार, धर्माबाद👤 पांडुरंग गायकवाड👤 बालाजी घायाळ*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गुरु सो भेद जो लीजिये शीश दीजिये दान।बहुतक भोंदू बहि गये गखि जीव अभिमान ॥ 41 ॥ ।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपले जर विचार सकारात्मक असतील आणि त्याच प्रकारचे जगणे असेल तर कोणाच्या समोर खोटे बोलून स्वतः चा समाधान करण्याची आवश्यकता पडत नाही. कारण ज्या प्रकारचे विचार असतील त्या प्रकारच्या वागण्यातून आपोआप दिसत असते.फरक एवढेच की, सकारात्मक विचार करुन जगणारे खोट्याला कधी साथ देत नाही व खोटे बोलणारे सत्य स्वीकार करायला तयार नसतात म्हणून शेवटी ते, नको त्या वाटेने जाऊन पश्चातापात पडत असतात. म्हणून अशी वेळ आपल्यावर येऊ नये यासाठी नेहमीच सकारात्मक विचारांना आत्मसात करुन जगण्याचा प्रयत्न करावा. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*सिंह आणि उंदीर*" उन्हाळ्याच्या दिवसात, एक सिंह, एका आंब्याच्या थंड छायेत सुस्त निजला होता; तिथे एक उंदीर येतो. तो उंदीर सिंहला खूप त्रास देतो. त्यामुळे जागा होऊन, सिंहने पंजात उंदीरला धरला आणि त्यास आता फाडून टाकणार इतक्यात, त्या उंदराने त्याची प्रार्थना केली, ‘महाराज, आपण थोर, सर्व श्वापदांचे राजे, मी आपल्यापुढे केवळ रंक, माझ्या रक्ताने आपले हात विटाळू नयेत. मला जीवदान दयावे, हेच आपणास उचित आहे.’ ते ऐकून सिंहास त्याची दया आली आणि त्याने त्यास सोडून दिले.पुढे एके दिवशी सिंह अरण्यात फिरत असताना आंब्याच्या झाडाजवळ जातो, त्याच आंब्याजवळ पारध्याने जाळे मांडले होते, त्यात सिंह सापडतो. त्यावेळी त्याने आपले सगळे बळ खर्चून फार धडपड केली. पण त्याची सुटका होईना. तेव्हा तो निराश झाला आणि मोठमोठयाने ओरडू लागला. ती ओरडणं ऐकून तो उंदीर त्या ठिकाणी आला आणि सिंहास म्हणाला, ‘राजा, भिऊ नको, स्वस्थ रहा. ’ इतके बोलून, त्याने आपल्या दातांनी ते जाळे कुरतडले व सिंहाची सुटका केली.*तात्पर्य:-*जे मोठे आहेत त्यांचेही एखादे मोठे काम लहानाच्या हातून, एखादे वेळी होते. यासाठी, कोणास क्षुद्र समजून त्याचा उपहास करू नये किंवा त्यास दुखवू नये. लहानाच्या हातूनही उपकार होऊ शकतात, हे लक्षात ठेवावे. वैभव कायम राहीलच, असा नेम नाही, यासाठी आपल्या चालत्या काळी, मनुष्याने लोकांवर उपकार करून ठेविले, तर पडत्या काळात तेच "•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment