✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 23 ऑगस्ट 2024💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/eVXfbHvfhWeP3jk2/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🟢 *_जागतिक वडा पाव दिवस_* 🟢•••••••••••••••••••••••••••••••••••🟢 *_ या वर्षातील २३६ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🟢 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟢•••••••••••••••••••••••••••••••••*२०१२: राजस्थानात अतिवृष्टीमुळे ३० जण ठार!**२०११: लीबीयातील हुकुमशहा मुअम्मर गडाफीची सत्ता उलथण्यात आली.**२००५: कविवर्य विंदा करंदीकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान**१९९७: हळदीच्या पेटंटबाबतचा अमेरिकेशी चालू असलेला कायदेशीर लढा भारताने जिंकला. एखाद्या विकसनशील देशाने अमेरिकन पेटंटला आव्हान देऊन तो जिंकण्याची ही पहिलीच घटना आहे.**१९९०: आर्मेनियाने आपण (सोविएत युनियनपासुन) स्वतंत्र असल्याचे जाहीर केले.**१९६६: ‘लूनार ऑर्बिटर-१‘ या मानवरहित अंतराळयानाने चंद्रावरून पहिल्यांदाच पृथ्वीची छायाचित्रे काढली.**१९४२: दुसरे महायुद्ध – स्टालिनग्राडची लढाई सुरू**१९४२: मो. ग. रांगणेकर यांच्या ’कुलवधु’ नाटकाचा पहिला प्रयोग झाला.**१९१४: पहिले महायुद्ध – जपानने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.**१८३९: युनायटेड किंगडमने हाँगकाँगचा ताबा घेतला.* 🟢 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_*🟢 ••••••••••••••••••••••••••••••••• *२००४: अभिषेक रामकृष्ण भंडारे -- कवी**१९८९: आशा नेगी -- भारतीय अभिनेत्री* *१९८८: वाणी कपूर -- भारतीय अभिनेत्री* *१९८४: संदीप परसराम जगताप -- कवी, लेखक* *१९७३: मलाईका अरोरा-खान – मॉडेल व अभिनेत्री**१९६६: संजय बच्छाव -- प्रसिद्ध लेखक, अनुवादक, निवेदक**१९६३: डॉ. राजेंद्र झुंजारराव -- कवी* *१९६२: प्रा. डॉ. वेंकटलक्ष्मी नारायण पुरणशेट्टीवार -- सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका**१९६२: अनंत देविदास बोरसे -- लेखक**१९५९: नंदू परदेशी-- कवी, लेखक**१९५८: राजीव गजानन पुजारी -- लेखक* *१९५१: प्रा.लीला शिंदे -- प्रसिद्ध लेखिका* *१९४४: सायरा बानू – प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री**१९३८: मधुराणी श्रीराम भागवत -- कादंबरीकार व कथालेखिका (मृत्यू: २२ नोव्हेंबर २०२२ )**१९३१: दत्ता तन्नीरवार-- इतिहास लेखक (मृत्यू: १४ फेब्रुवारी २०२४ )**१९२६: दादा देशकर -- लेखक* *१९२५: नारायण बाळकृष्ण मराठे -- लेखक, संपादक* *१९२३: महादेव रामचंद्र बडवे -- लेखक* *१९२३: बलराम जाखर -- माजी लोकसभेचे अध्यक्ष आणि मध्य प्रदेशचे राज्यपाल (मृत्यू: ३ फेब्रुवारी २०१६ )**१९२३: वसंत दिगंबर कुलकर्णी -- समीक्षक (मृत्यू: २५ ऑगस्ट २००१ )**१९२२: सदाशिव अंबादास डांगे -- संशोधक, कोशकार, लेखक(मृत्यू: २५ ऑक्टोबर १९९९ )**१९१८: अण्णा मणी -- भारतीय भौतिकशास्त्रज्ञ आणि हवामानशास्त्रज्ञ (मृत्यू: १६ ऑगस्ट २००१ )**१९१८: गोविंद विनायक तथा 'विंदा' करंदीकर – लेखक, कवी, लघुनिबंधकार व टीकाकार. देशाच्या साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च प्रतिष्ठेचा एकोणचाळिसावा ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना ’अष्टदर्शने’ या साहित्यकृतीसाठी प्रदान करण्यात आला.(मृत्यू: १४ मार्च २०१० )**१९१५: बळवंत चिंतामण सहस्रबुद्धे-- विनोदी कवितांच्या व वात्रटिकांच्या संग्रहामुळे ‘वात्रटिकाकार’ म्हणूनही प्रसिद्ध (मृत्यू: ३१ मे १९९१ )* 🟢 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟢••••••••••••••••••••••••••••••••• *१९९४: आरती साहा – इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली भारतीय महिला जलतणपटू (जन्म: २४ सप्टेंबर १९४० )**१९७५: पं. विनायकराव पटवर्धन – नामवंत शास्त्रीय गायक, गुरू, संगीतप्रसारक व अभिनेते. १९३२ मध्ये त्यांनी पुण्यात गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केली.(जन्म: २२ जुलै १८९८ )**१९७४: डॉ.शंकर दामोदर पेंडसे – मराठी ग्रंथकार आणि संतसाहित्याचे गाढे अभ्यासक. पंढरपूर येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे (१९५५) ते अध्यक्ष होते.(जन्म: २८ फेब्रुवारी १८९७ )**१९७१: रतन साळगावकर ऊर्फ हंसा वाडकर – मराठी व हिन्दी चित्रपट अभिनेत्री ’सांगत्ये ऐका’ नावाचे त्यांचे आत्मचरित्रही प्रसिद्ध आहे. (जन्म: २४ जानेवारी १९२४ )**१८०६: चार्ल्स कुलोम – फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: १४ जून १७३६ )* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*लघुकथा - कुलदीपक*..... पूर्ण कथा वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पोलंडचे पंतप्रधान यांच्यात वॉर्सा येथे प्रतिनिधीस्तरीय द्विपक्षीय चर्चा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *IAS अधिकारी इक्बालसिंह चहल यांची बदली, मुख्यमंत्र्यांकडून आता देवेंद्र फडणवीसांच्या खात्याची धुरा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पुण्यातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश, MPSC ने संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पुढे ढकलली; तरीही विद्यार्थी आंदोलनावर ठाम म्हणाले, आयोगाने पुढे ढकलण्यात आलेल्या परिक्षेत कृषी विभागाच्या 258 जागांचा समावेश करावा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *प्रविण मसालेवाले ट्रस्टच्या वतीने पुरस्कारांचे वितरण, अर्णवाझ दमानिया यांना सुहाना कमल जीवनादर्श पुरस्कार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *छत्रपती संभाजीनगर : ऑनलाइन दंड बंद करा, ऑटोरिक्षा चालक - मालकांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने, पंतप्रधानांना पाठवले निवेदन*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *अमूलच्या शिरपेचात मानाचा तुरा, जगातील सर्वात मजबूत फूड ब्रँड म्हणून मान्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आयसीसीच्या क्रमवारीत भारतीय खेळाडूंचा दबदबा, कसोटी क्रिकेटमध्ये फिरकीपटू रविचंद्रन अश्विन आणि अष्टपैलू जाडेजाही प्रथम क्रमांकावर*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आयुर्वेद म्हणजे काय?आयुर्वेद ही औषधाची एक नैसर्गिक पद्धत आहे जी भारतात 5000 वर्षांपूर्वी उगम पावली. हा निरोगीपणाचा एक समग्र दृष्टीकोन आहे जो आपल्या अस्तित्वाच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक पैलूंचा समतोल राखतो. आयुर्वेदाला "जीवनाचे विज्ञान" देखील म्हटले जाते, तुमचे शरीर आणि आरोग्य सुधारू शकते. आयुर्वेदात 'आयुर' म्हणजे जीवन, आणि 'वेद' म्हणजे विज्ञान किंवा ज्ञान. हे मानते की मानवी शरीरात विश्वातील पाच घटक असतात: अवकाश, वायू, अग्नि, पाणी आणि पृथ्वी, जे तीन महत्त्वपूर्ण ऊर्जा किंवा दोष तयार करतात: वात, पित्त आणि कफ. या दोषांचे संतुलन उत्तम आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. जेव्हा ते सुसंवाद साधतात तेव्हा ते चैतन्य आणि आरोग्याकडे नेत असतात आणि त्यांच्यातील असंतुलनामुळे आजार किंवा आरोग्य समस्या उद्भवू शकतात.आदर्श आरोग्य संतुलन राखण्यासाठी आयुर्वेदिक आरोग्य टिप्सध्यान : तणाव आपल्या आरोग्यासाठी चांगला नाही. आपल्या मानसिक तंदुरुस्तीवर परिणाम करण्याव्यतिरिक्त, आपल्या शारीरिक आरोग्यावर त्याचा परिणाम होतो, आणि तणाव कमी करण्याचा आणि मन शांत करण्याचा ध्यानाचा सराव करण्यापेक्षा दुसरा कोणताही चांगला मार्ग नाही. योगासारख्या सरावांमुळे लवचिकता आणि सामर्थ्य सुधारू शकते. हे तणाव कमी करते, मानसिक स्पष्टता वाढवते आणि संपूर्ण आरोग्यासाठी एक महत्त्वाची आयुर्वेद पद्धत आहे.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••स्वत:ला कधीही कमी लेखू नका ; तुमच्या आत्मविश्वासाने अशक्य गोष्टी सुद्धा शक्य होऊ शकतात.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर कोणत्या ताऱ्याचे चिन्ह आहे ?२) महात्मा फुले यांनी सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ कोणत्या साली लिहिला ?३) प्राण्यांचे वर्गीकरण प्रथम कोणी केले ?४) 'नजराणा' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) NDA चा full form काय आहे ? *उत्तरे :-* १) पंचकोनी तारा २) १ एप्रिल १८८९ ३) Aristotle ४) भेट, उपहार ५) National Defence Academy*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 लक्ष्मी पुरणशेट्टीवार, साहित्यिक, नांदेड👤 सुनील भेंडे, वसमत👤 सचिन बोरसे, जर्मनी ( नांदेड )👤 यादव ढोणे👤 रामदास पेंडपवार, निझामाबाद, तेलंगणा👤 आनंद यादव, धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *हरिपाठ*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••चहूं वेदीं जाण साहीशास्त्रीं कारण । अठराही पुराणें हरिसी गाती ॥१॥ मंथुनी नवनीता तैसें घे अनंता । वायां व्यर्थ कथा सांडी मार्गु ॥२॥एक हरि आत्मा जीवशिव सम । वायां तू दुर्गमा न घाली मन ॥३॥ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ । भरला घनदाट हरि दिसे ॥४॥।। संत ज्ञानेश्वर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••केलेल्या चांगल्या, वाईट कर्माची फळ ज्यांनी, ज्यांनी कशाप्रकारे भोगले आहेत त्यांच्याकडे बघून सुद्धा आजचा माणूस पूर्णपणे जागा होत नाही व आपल्यातील वाईट विकार सोडत नाही आणि चांगल्या विचारांना आत्मसात करत नाही. ही सत्यता नाकारता येत नाही. या भूमीवर माणूस म्हणून जन्म मिळाला आहे निदान त्या मिळालेल्या मानवी जीवनाचे कशाप्रकारे सार्थक करता येईल यासाठी थोडा प्रयत्न करून बघावा.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *राजा आणि मंत्री*एका सम्राटाला झोप येत नव्हती, ते फेरफटका मारत असताना आपल्या कक्षाबाहेर आले तर मंत्री महोदय आपल्या हिशोबाच्या वह्या काढून हिशोब तपासत आहेत असे त्यांच्या लक्षात आले. मंत्र्याच्या चेहऱ्यावर कसली तरी चिंता आहे हे महाराजांच्या अनुभवी नजरेने हेरले. महाराजांनी त्यांना या चिंतेचे कारण विचारले तेंव्हा मंत्री म्हणाले, "महाराज ! मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी कर अधिक जमा झाला आहे. पण त्याचे कारण मला समजले नाही" सम्राट म्हणाले,"अहो! हिशोबात काही चूक असेल." मंत्री म्हणाले,"हिशोब अचूक आहे. मी स्वततपासला आहे." सम्राट म्हणाले," रात्र जास्त झाली आहे. हि समस्या उद्या सकाळी सोडवा." परंतु मंत्री म्हणाला," उत्पन्न अशा प्रकारे वाढणे साम्राज्यासाठी चिंतेचे कारण आहे. कराची कमतरता सहन करणे शक्य आहे पण अन्यायाची एक पै तिजोरीत जास्त आली तर तिच्यामुळे साम्राज्याला तळतळाट लागू शकतो. महाराज ! कुणा गरीबाचा तळतळाटाचा पैसा चुकून जरी आपल्या तिजोरीत पडला तर तुम्हाला आणि मला आपल्या दोघांना आवडणार नाही. यामुळे मी तो हिशोब तपासत आहे." आता सम्राटही गंभीर झाला आणि मंत्राच्या समोर बसला. बराच वेळ विचार केल्यावर मंत्री म्हणाला ,"महाराज! उन्हाळा जास्त झाल्याने नदीची पाणी पातळी खालावली आहे. त्यामुळे काठावरच्या जमिनीला शेतकऱ्यांनी कुंपण घातले. शेतकऱ्यांनी पिके कमी घेतली पण सरकारचा कर बुडवायचा कसा? या विचाराने त्यांनी सरकारात धन जमा केले. त्यामुळे जास्त धन गोळा झाले." यावर राजा म्हणाला,"जर दुष्काळाची परिस्थिती असेल तर त्या गरीब शेतकऱ्यांनी जमा केलेला कर आपल्या तिजोरीमध्ये ठेवून मला पापाचा धनी व्हायचे नाही. गरीब शेतकऱ्यांना शेतीसाठी मदत म्हणून तोच पैसा परत करा." सम्राटाच्या आज्ञेचे पालन करण्यात आले. पुढील वर्षी त्या राज्यात भरपूर पाऊस झाला. जनतेचे आशीर्वाद फळाला आले.*तात्पर्य :- सर्वांचे हित जाणणारा, प्रेम, आत्मीयता व कठीण प्रसंगात योग्य साथ देणारी व्यक्तीच योग्य प्रकारे सत्ता चालवू शकते.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment