✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 15 ऑगस्ट 2024💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/38MvdaxSoBALiuHu/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🇮🇳 *_भारताचा स्वातंत्र्य दिन_* 🇮🇳•••••••••••••••••••••••••••••••••🇮🇳 *_ या वर्षातील २२८ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••• 🇮🇳 *_महत्त्वाच्या घटना:_* 🇮🇳•••••••••••••••••••••••••••••••••*१९८८: पंतप्रधान राजीव गांधी यांनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणानंतर ‘मिले सुर मेरा तुम्हारा‘ हे गाणे दूरदर्शनवरुन पहिल्यांदाच प्रसारित करण्यात आले.**१९८२: भारतात रंगीत दूरचित्रवाणीच्या प्रसारणास सुरूवात झाली.**१९७५: बांगला देशात लष्करी उठाव होऊन बांगला देशाचे संस्थापक शेख मुजीबूर रहमान व त्यांच्या कुटुंबीयांची हत्या करण्यात आली.**१९७१: अमेरिकन डॉलरचे सोन्याशी असलेले संधान खंडित झाले.**१९४७: ब्रिटिश राजवट संपून भारत स्वतंत्र झाला. देशाची फाळणी झाली. पश्चिम पंजाब, सिंध,बलुचिस्तान, वायव्य सरहद्द प्रांत व पूर्व बंगाल हे पाकिस्तानात समाविष्ट झालेले प्रदेश सोडून संस्थाने वगळता राहिलेला प्रदेश स्वतंत्र भारत म्हणून अस्त्त्त्वात आला.**१९४७: भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून पं. जवाहरलाल नेहरू यांनी सूत्रे हाती घेतली.**१९४७: पाकिस्तानचे निर्माते मुहम्मद अली जिना यांचा पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून कराची येथे शपथविधी झाला.**१९४५: दुसरे महायुद्ध – जपानने शरणागती पत्करली.**१९२९: ग्राफ झेपेलिन हा संशोधक ’झेपेलिन’ बलूनमधून जगप्रवासासाठी रवाना**१९१४: पनामा कालव्यातुन एस. एस. अॅनकॉन हे पहिले व्यापारी जहाज पार झाले.**१८६२: मद्रास उच्च न्यायालयाची स्थापना**१५१९: पनामा सिटी शहराची स्थापना झाली.* 🇮🇳 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_*🇮🇳 •••••••••••••••••••••••••••••••••*१९८२: संदीप काळे -- न्यूझ चॅनलचे अँकर, लेखक आणि कवी**१९७७: वर्षा मारुती भिसे -- कवयित्री, लेखिका**१९७१: प्रमोद श्रीपाद पंत -- कवी, कथाकार**१९६९: भारत गणेशपुरे -- मराठी चित्रपट अभिनेता**१९६९: डॉ.संतोष खेडलेकर -- लेखक, पत्रकार* *१९६८: लोकराम केशव शेंडे -- कवी**१९६६: डॉ. मथू सुरेश सावंत -- प्रसिद्ध लेखिका* *१९५९: प्रा. विजया मारोतकर-- प्रसिद्ध कवयित्री, लेखिका, विविध पुरस्कारांनी सन्मानित* *१९५८: सिंपल कपाडिया – अभिनेत्री आणि वेशभूषाकार (मृत्यू: १० नोव्हेंबर २००९ )**१९५७: मृणालिनी चितळे -- प्रसिद्ध लेखिका* *१९५५: नीना कुलकर्णी -- भारतीय अभिनेत्री**१९५४: जीवन साळोखे -- लेखक**१९५३: प्राचार्य डॉ. अमरसिंग राठोड -- प्रसिद्ध लेखक* *१९५१: प्रा. डॉ. रावसाहेब चोले -- कवी लेखक* *१९५०: अच्युत गोडबोले -- तंत्रज्ञ,समाजसेवक आणि मराठीतील लेखक आणि वक्ते* *१९४९: अनुराधा गोरे -- प्रसिद्ध मराठी लेखिका**१९४९: ललित बहल -- भारतीय अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता आणि लेखक(मृत्यू: २३ एप्रिल २०२१)**१९४७: राखी गुलजार – प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री**१९४७: अरुणा खनगोरकर -- कवयित्री* *१९४४: पुरुषोत्तम पंडित क-हाडे-- लेखक**१९४४: अनिल किणीकर -- लेखक, अनुवादक, संपादक* *१९४२: डॉ. श. भा. चांदेकर -- लेखक,संस्कृत साहित्याचे व संत साहित्याचे गाढे अभ्यासक तथा निवृत्त शिक्षण संचालक* *१९३८: उषा टाकळकर -- प्रसिद्ध लेखिका, संपादिका* *१९३८: प्राण कुमार शर्मा -- चाचा चौधरीचे निर्माता व भारतीय चित्रकार (मृत्यू: ५ ऑगस्ट २०१४ )**१९३६: डॉ. माधव गोडबोले -- माजी केंद्रीय गृहसचिव तथा लेखक**१९३३: सीमाताई साखरे-- समाजसेविका, लेखिका* *१९२९: उमाकांत निमराज ठोमरे – संपादक, बालसाहित्यकार (मृत्यू: ७ आक्टोबर १९९९ )**१९२६: शिवराम दत्तात्रेय जोशी -- अर्वाचीन भाषाशास्त्रज्ञ, राष्ट्रीय संस्कृत पंडित (मृत्यू: २९ जुलै २०१३ )**१९२२: वामन(वामनदादा) तबाजी कर्डक -- मराठी शाहीर, कवी आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते (मृत्यू: १५ मे २००४ )**१९१७: सरोजिनी मधुसूदन शारंगपाणी –ललित, वैचारिक, नाट्य, काव्य आदी विविध प्रकारांत मोठ्या प्रमाणावर लेखन करणार्या लेखिका.(मृत्यू: १३ नोव्हेंबर २००१ )**१९१५: इस्मत चुगताई – ऊर्दू कथा व पटकथा लेखिका (मृत्यू: २४ आक्टोबर १९९१ )**१९१३: भगवान रघुनाथ कुळकर्णी ऊर्फ 'फुलारी' ऊर्फ 'बी. रघुनाथ' – लेखक व कवी (मृत्यू: ७ सप्टेंबर १९५३ )**१९१२: ’सूर रंग’ उस्ताद अमीर खॉं – इंदौर घराण्याचे संस्थापक व गायक (मृत्यू: १३ फेब्रुवारी १९७४ )**१९०७: भगवंत दिनकर गांगल -- कथालेखक कादंबरीकार (मृत्यू: ३० सप्टेंबर १९९७ )**१९०६:पद्मश्री रामसिंग भानावत-- बंजारा समाजाचे समाजसेवक (मृत्यू: १० जून २००२)**१९०५: शंकर गणेश दाते -- मराठी लेखक, सूचिकार (मृत्यू: १० डिसेंबर १९६४ )**१८९४: विनायक गोविंद साठे -- कवी, लेखक**१८८५: विठ्ठल सिताराम गुर्जर- प्रसिद्ध लेखक (मृत्यू: १९ सप्टेंबर १९६२ )**१८७२: योगी अरविंद घोष – क्रांतिकारक, तत्त्वचिंतक,योगी व कवी(मृत्यू: ५ डिसेंबर १९५० )**१८६७: गणपतराव जोशी – रंगभूमीवरील असामान्य अभिनेते, शेक्सपियरच्या नाटकांतील त्यांच्या भूमिका अतिशय गाजल्या होत्या (मृत्यू: ७ मार्च १९२२ )**१७६९: नेपोलिअन बोनापार्ट – फ्रान्सचा सम्राट,असामान्य सेनापती आणि कर्तबगार प्रशासक (मृत्यू: ५ मे १८२१ )* 🇮🇳 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🇮🇳•••••••••••••••••••••••••••••••••*२०१९: विद्या सिन्हा - भारतीय चित्रपट अभिनेत्री (जन्म: १५ नोव्हेंबर १९४७ )* *२०१८: अजित लक्ष्मण वाडेकर -- भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू (जन्म: १ एप्रिल १९४१)**२००४: अमरसिंग चौधरी – गुजरातचे माजी मुख्यमंत्री (जन्म: ३१ जुलै १९४१ )**१९७५: शेख मुजीबुर रहमान – बांगलादेशचे संस्थापक व पहिले राष्ट्राध्यक्ष यांची लष्करातील सैनिकांनी त्यांच्या प्रासादावर हत्या केली. (जन्म: १७ मार्च १९२० )**१९४२: महादेव देसाई – स्वातंत्र्य लढ्यातील नेते आणि महात्मा गांधींचे स्वीय सहाय्यक (जन्म: १ जानेवारी १८९२ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल : 9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*फ्रेश मॉर्निंग बुलेटिन दहाव्या वर्षात पदार्पण*15 ऑगस्ट 2015 रोजी सुरू झालेल्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिन या सेवेला आज नऊ वर्ष पूर्ण होत असून दहाव्या वर्षात पदार्पण करत आहे. त्यानिमित्ताने या सेवेचा घेतलेला आढावा ........... पूर्ण वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *आज भारताचा 78 वा स्वातंत्र्य दिन, पीएम मोदी लाल किल्ल्यावरून जनतेला संबोधित करणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *पुणे : जीवनात यशस्वी होण्यासाठी ध्येय ठरवून प्रयत्न करा- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *लाडकी बहीण योजनेचे 3 हजार रुपये महिल्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राज्याच्या हरित महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी १४ हजार कोटींची गुंतवणूक योजना*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *इतिहासातून पोवाड्याचे महत्व कळते, एअर मार्शल भूषण गोखले यांचे मत; सृजनसभा प्रस्तुत कलासाधक सन्मान व संवाद कार्यक्रम*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मराठा आरक्षणाकडे तातडीने लक्ष द्या, मराठा मावळा संघटनेच्या लोटांगण आंदोलनाने वेधले सर्वांचेच लक्ष*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *क्रीडा लवादाने आता विनेश फोगटची याचिका फेटाळली असून तिला कोणतेही पदक मिळणार नसल्याचे आता समोर आले*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••भारताला १५ ऑगस्ट १९४७ याच दिवशी स्वातंत्र्य बहाल करण्याचा निर्णय ब्रिटिश सरकारने का घेतला?आज स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी देश सज्ज झाला आहे. मात्र, भारताला १५ ऑगस्ट १९४७ याच दिवशी स्वातंत्र्य बहाल करण्याचा निर्णय ब्रिटिश सरकारने का घेतला, याची माहिती इतिहासाच्या पोटात दडलेली आहे. प्रत्यक्षात, भारताचे तत्कालीन व्हॉइसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन यांच्या आग्रहामुळे देशाची या ऐतिहासिक दिवशी पारतंत्र्यातून सुटका झाली आहे. गुजरातमधील दिवंगत व निवृत्त सनदी अधिकारी तसेच इतिहासाचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. के. सी. सगर यांनी केलेल्या नोंदीतून या बाबीवर प्रकाश पाडला आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाले, त्या वर्षी डॉ. सगर गुजरात प्रांताचे महसूल सचिव होते. सनदी कामकाज करताना इतिहासात रुची असल्याने ते रोज घडणाऱ्या परंतु, महत्त्वाच्या घटनांची नोंद करून ठेवत असत. त्यांच्या या अनोख्या सवयीमुळेच देशाच्या स्वातंत्र्यदिनाच्या तारखेमागील गूढ उकलले गेले आहे. डॉ. सगर यांनी केलेल्या नोंदीनुसार, लॉर्ड माऊंटबॅटन यांनी भारतात येण्यापूर्वी १९४५ मध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या महायुद्धात ब्रिटन आणि मित्रराष्ट्रांकडून जपानवर करण्यात आलेल्या लढाईचे नेतृत्व केले होते. जपानला १५ ऑगस्ट याच दिवशी चारीमुंड्या चीत करण्यात त्यांना यश आले होते. या विजयानंतर त्यांच्या आयुष्याला नवीन दिशाच मिळाली. त्यामुळे ते १५ ऑगस्ट या तारखेला "लकी' दिवस मानत. दुसऱ्या महायुद्धानंतर भारतातील नेत्यांनी स्वातंत्र्यासाठीचा लढा अधिक तीव्र केला. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल या नेत्यांशी चर्चा झाल्यानंतर देशाला स्वातंत्र्य देण्याबाबत ब्रिटिश सरकार तयार झाले. मात्र, तारीख निश्चिचत होत नव्हती. लॉर्ड माऊंटबॅटन यांनी १५ तारीख ठरवली आणि ती भारतातील ज्येष्ठ नेत्यांना कळविली. या तारखेची कहाणी इथेच संपत नाही. लॉर्ड माऊंटबॅटन यांच्या या निर्णयाला देशातील नेत्यांनी विरोध केला नाही. मात्र, पश्चि म बंगालच्या कोलकत्यातील त्या वेळचे प्रसिद्ध ज्योतिषशास्त्रज्ञ स्वामी मदनानंद यांनी आक्षेप घेतला होता. त्याच्या म्हणण्यानुसार, १५ ऑगस्ट १९४७ हा "अशुभ' दिवस आहे. या दिवशी देशाला स्वातंत्र्य देण्यात येऊ नये. ब्रिटिशांनी १६ ऑगस्टला स्वातंत्र्य द्यावे, असेही त्यांनी लॉर्ड माऊंटबॅटन यांना सुचविले होते. तसे पत्रही त्यांनी पाठविले होते. १५ ऑगस्टला देशाला स्वातंत्र्य मिळाल्यास अनेक संकटे निर्माण होऊ शकतील, असे भाकीत स्वामी मदनानंद यांनी वर्तविले होते. स्वातंत्र्यानंतर देशात उसळलेला जातीय हिंसाचार, दुष्काळ, पाकिस्तान आणि चीनशी झालेले युद्ध अशी अनेक संकटे देशावर कोसळली. या सर्व संकटांचे मूळ त्या तारखेत असल्याचे मत स्वामी मदनानंद यांनी मानल्याचे डॉ. सगर यांनी नोंदविले आहे.*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••स्वातंत्र्यता घेण्याचे नाही तर देण्याचे नाव आहे – नेताजी सुभाषचंद्र बोस*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) १५ ऑगस्ट २०२४ ला आपण कितवा *स्वातंत्र्य दिन* साजरा करत आहोत ?२) ऑलिम्पिकमधील सर्वोच्च पुरस्कार कोणता ?३) ऑलिम्पिकमधील विशेष योगदानासाठी भारताच्या कोणत्या खेळाडूला प्रतिष्ठेच्या 'ऑलिम्पिक ऑर्डर' ने सन्मानित करण्यात आले ?४) 'धवल या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) डेंग्यू हा आजार कशामुळे होते ? *उत्तरे :-* १) ७८ वा २) ऑलिम्पिक ऑर्डर ३) अभिनव बिंद्रा, नेमबाज ( २००८ बीजिंग ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता ) ४) पांढरे, शुभ्र ५) इडिस नावाची मादा डास चावल्याने*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 मा. खासदार वसंतराव चव्हाण साहेब, नांदेड लोकसभा मतदार संघ👤 डॉ. आदर्श बाबुराव जाधव👤 अरविंद कुलकर्णी, साहित्यिक, पुणे👤 युसूफ शेख, शिक्षक, कंधार👤 शिवानंद सुरुकुटवार, सामाजिक कार्यकर्ते, नांदेड👤 बळवंत भुतावले👤 अशोक ढवळे👤 राजाराम मोरे👤 डॉ. आदर्श बाबुराव जाधव*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अवर्ण वरण अमूर्ति जो कहौं ताहि किन पेख ।गुरू दयाते पावई सुरति निरति करि देख ॥ 45 ॥।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपल्या मनात काय चालू आहे ते फक्त आपल्यालाच माहीत असते. दुसऱ्यांच्या मनात काय चालले आहे या विषयी आपल्याला कल्पना सुद्धा नसते. कारण प्रत्येकाची मानसिकता वेगळी असते.प्रत्येकांचे मन, स्वभाव, बोलीभाषा, आपुलकी ही वेगवेगळी असते. म्हणून कोणाविषयी उगाचच बोलून स्वतःचे समाधान करू घेवू नये. कारण असे केल्याने आपल्याही वाटेत काटे पेरणारे टपून बसलेले असतात.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*ज्ञानार्जनासाठी* *एका साधूला पितळेच्या धातूचे सोन्यात रूपांतर करण्याची कला अवगत होती. पण याचा उपयोग तो गरजुंना करण्यासाठीच करत होता. एकेदिवशी एक गरीब ब्राह्मण त्याच्याकडे आला. त्याला मुलीच्या लग्नासाठी पैशांची आवश्यकता होती. साधूने त्याची अडचण ओळखून त्याला एका पितळेच्या भांड्याचे रूपांतर सोन्यात करून दिले. ब्राह्मण सोनाराकडे गेला. सोनाराला त्याच्याकडे सोन्याचे भांडे पाहून मनात संशय आला. सोनार राजाकडे गेला. राजाने त्याची चौकशी केली केली तेव्हा ब्राह्मणाने खरी घटना सांगितली. राजाच्या मनात लोभाची भावना उत्पन्न झाली. त्याने साधूला ती विद्या शिकविण्याचे फर्मान काढले. साधूने राजाला ठामपणे नकार सांगितला. राजाने साधूला 15 दिवसांची मुदत दिली अन्यथा फासावर लटकावेन अशी धमकी दिली. राजा त्याच्याकडून काय उत्तर येते यासाठी दूत पाठवित असे पण साधू काही होकार देईना. हे पाहून राजाने वेश पालटला व तो साधूच्या येथे राहून त्याची सेवा करू लागला. साधूने राजाच्या सेवेवर प्रसन्न होऊन त्याला पितळापासून सोने तयार करण्याची विद्या शिकविली. राजा महालात परतला. पंधराव्या दिवशी साधूला बोलावून त्याला विद्या शिकविण्याची आज्ञा केली. साधूने परत नकार दिला. तेव्हा राजा गर्वाने म्हणाला,’’ साधू तू मला कला शिकवली नसती हे मी जाणून होतोच पण मी ही हट्टी आहे. मी पण तुझ्याजवळ राहून ती कला शिकून तयार झालो आहे.’’ साधू म्हणाला,’’महाराज तुम्ही माझी सेवा करून ती कला शिकला आहात, धमकी देऊन नाही. *_🌀तात्पर्य_ ::~ * ज्ञानासाठी गुरुची मर्जी सांभाळावी लागते.’’*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment