✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 20 ऑगस्ट 2024💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/VHe5kDQz9RVFcAy1/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••☀️ *_सदभावना दिन_* ☀️••••••••••••••••••••••••••••••••• ☀️ *_अक्षय ऊर्जा दिवस_* ☀️•••••••••••••••••••••••••••••••••☀️ *_ या वर्षातील २३३ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• ☀️ *_महत्त्वाच्या घटना:_* ☀️•••••••••••••••••••••••••••••••••*२००८: भारताचा कुस्तीगीर सुशीलकुमार याला बिंजिंग ऑलिंपिकमध्ये ब्राँझ पदक मिळाले.**१९८८: इराण इराक युद्ध – सुमारे ८ वर्षांच्या युद्धानंतर युद्धबंदी करार झाला.**१९६०: सेनेगलने आपण (मालीपासुन) स्वतंत्र असल्याचे जाहीर केले.**१९४१: दुसरे महायुद्ध – फ्रान्समधील भुमिगत चळवळ उखडून काढण्याच्या उद्देशाने जर्मनांनी एका दिवसात ५० हजार नागरिकांना अटक केली**१९२०: डेट्रॉइट, मिशिगन येथे जगातील पहिले व्यावसायिक नभोवाणी केंद्र सुरू झाले.**१९१४: पहिले महायुद्ध – जर्मन फौजांनी ब्रुसेल्स शहराचा ताबा घेतला.**१८९७: सर रोनाल्ड रॉस यांनी (भारतात) हिवतापाच्या जीवाणूचा शोध लावला. आल्मोडा येथे मलेरियावर केलेल्या संशोधनासाठी त्यांना १९०२ मध्ये नोबेल पुरस्कार देण्यात आला.**१८२८: राजा राम मोहन रॉय यांनी महाराजा द्वारकानाथ टागोर (ठाकूर), कालिनाथ रॉय आणि मथुरानाथ मलिक या तीन मित्रांच्या साहाय्याने कोलकाता यथे ब्राम्हो सभेची स्थापना केली. या सभेलाच पुढे 'ब्राम्हो समाज’ म्हणू लागले.*☀️ *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ☀️ •••••••••••••••••••••••••••••••••*१९८३: दत्तात्रय भानुदास जाधव (दत्ता जाधव) -- लेखक**१९७६: रणदीप हुडा -- भारतीय अभिनेता**१९६६: शुभंकर बॅनर्जी -- फारुखाबाद परंपरेतील भारतीय संगीतकार आणि तबला वादक(मृत्यू:२५ऑगस्ट २०२१)**१९६४: दीपक गणपतराव ढोले -- कवी, लेखक**१९६३: डॉ. आनंद देशपांडे -- प्रसिद्ध लेखक**१९५९: सरोज शरद भरभडे -- प्रसिद्ध लेखिका**१९५२: प्रा. विश्वास प्रभाकरराव वसेकर -- लेखक, कवी, संपादक, बालकुमार साहित्य चळवळीतील कार्यकर्ते* *१९४६: एन. आर. नारायण मूर्ती – ’इन्फोसिस’चे सहसंस्थापक**१९४५: चंद्रकांत संतराम मस्के -- प्रसिद्ध कवी (मृत्यू: २० मे २०२१)**१९४४: सलमा बेग (बेबी नाझ) -- भारतीय अभिनेत्री (मृत्यू: १९ ऑक्टोबर १९९५ )**१९४४: राजीव गांधी – भारताचे ६ वे पंतप्रधान,भारतरत्न (१९९१) मरणोत्तर (मृत्यू: २१ मे १९९१ )**१९४२: जगदीश अभ्यंकर -- प्रसिद्ध लेखक (मृत्यू: ५ एप्रिल २००१ )**१९३७: प्रतिभा पंढरीनाथ रानडे -- प्रसिद्ध कथाकार, कादंबरीकार**१९२३: शांता विनायक परांजपे -- चरित्र लेखिका**१९२२: प्रभाकर गोविंद अत्रे -- कथा, कादंबरीकार**१९१९: विष्णू श्रीधर जोशी -- मराठी लेखक आणि इतिहाससंशोधक (मृत्यू: २५ एप्रिल २००१ )**१९१५: पांडुरंग (पांडबा) गोपाळ जाधव -- नाट्यलेखक* *१८३३: बेंजामिन हॅरिसन – अमेरिकेचे ३३वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: १३ मार्च १९०१ )**१७७९: जेकब बर्झेलिअस – स्वीडीश रसायनशास्त्रज्ञ (मृत्यू: ७ ऑगस्ट १८४८ )* ☀️ *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ☀️••••••••••••••••••••••••••••••••• *२०१३: डॉ. नरेन्द्र दाभोळकर -- विज्ञानवादी, समाजसुधारक, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक, थोर समाजवादी विचारवंत व साधना साप्ताहिकाचे संपादक ( जन्म: १ नोव्हेंबर १९४५ )**२०१३: जयंत साळगावकर –मराठी ज्योतिषतज्ज्ञ, लेखक, पत्रकार व उद्योजक (जन्म: १ फेब्रुवारी १९२९ )**२००१: मधुकर रामराव तथा एम. आर. यार्दी – प्राच्यविद्येचे गाढे अभ्यासक, केंद्रीय वित्त सचिव, भारतीय विद्या भवनच्या पुणे केंद्राचे अध्यक्ष (जन्म: २२ऑगस्ट१९१६ )**२०००: प्राणलाल मेहता – चित्रपट निर्माते (किनारा, किताब, बेजुबान, मरते दम तक, पुलिस पब्लिक )* *१९९७: प्रा.चंद्रहास जोशी -- लेखक (जन्म: १९२७ )**१९९७: प्रागजी डोस्सा – गुजराथी नाटककार व लेखक, नेहरू पुरस्कार व साहित्य अकादमी पुरस्कार विजेते (जन्म: ७ आक्टोबर १९०७ )**१९८८: माधवराव शिंदे – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व संकलक. ’कन्यादान’, ’धर्मकन्या’ या त्यांच्या चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाले तर ’शिकलेली बायको’ या चित्रपटाला दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला.(जन्म: ३ आक्टोबर १९१७ )**१९८५: अकाली दलाचे अध्यक्ष हरचंदसिंग लोंगोवाल यांची शेरपूर येथे एका गुरूद्वारात गोळ्या घालुन हत्या करण्यात आली. (जन्म: २ जानेवारी १९३२ )**१९८४: अविनाश व्यास -- गुजराती चित्रपटांचे भारतीय संगीतकार, गीतकार आणि गायक(जन्म: २१ जुलै १९१२ )**१९८४: रघुवीर भोपळे ऊर्फ ’जादूगार रघुवीर’ – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जादूगार (जन्म: २४ मे १९२४ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*श्रद्धा आणि अंधश्रद्धा*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी २३ ऑगस्टला युक्रेनला जाणार, ३० वर्षानंतर भारतीय पंतप्रधान करणार दौरा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मराठा आरक्षण कायद्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोलाची भूमिका - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *आमदार भावना गवळी यांनी बांधली पंतप्रधान मोदींना राखी, मोदी देशातील कोट्यवधी बहिणींचे भाऊ असल्याची प्रतिक्रिया*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *काश्मीरच्या उधमपूर येथे अतिरेक्यांना घेरुन मारताना केंद्रीय राखीव पोलीस दलाचा अर्थात सीआरपीएफचा निरीक्षक हुतात्मा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पॅरिस येथे आयोजित पॅराऑलिम्पिक स्पर्धेतल्या सहभागी खेळाडूंशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधून दिल्या शुभेच्छा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *अर्ध्या तासाच्या पावसाने नाशिक जलमय, पुण्यातही जोरदार हजेरी; यवतमाळमध्ये दुचाकी गेली वाहून*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *तीन दिवसात 40 विकेट्स, द. आफ्रिकेकडून वेस्ट इंडिजचा धुव्वा, द. आफ्रिकेचा सलग 10 कसोटी मालिकामध्ये वेस्ट इंडिजवर विजय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *रेणू* 📙 मूलद्रव्याच्या लहानात लहान कणाला अणू म्हणतात. अणूची रचना काहीशी सूर्यमालेसारखी असते. अणूचे बहुतेक सर्व वस्तुमान अणूकेंद्रात असते. धनविद्युतभारित प्रोटॉन आणि तेवढ्याच वस्तुमानाचे पण विद्युतभार नसलेले न्यूट्रॉन यांनी अणुकेंद्र बनते. त्याच्याभोवती विविध कक्षांत इलेक्ट्रॉन घिरट्या घालीत असतात. प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन यांची संख्या समान म्हणून अणू मात्र विद्युतभाराच्या दृष्टीने किंवा विद्युतदृष्ट्या उदासीन असतो.चांदी, सोने इत्यादी अशा प्रकारची धातूरूप मुलद्रव्ये वगळता सृष्टीतील बाकी सर्व पदार्थ हे रेणूंनी बनलेले असतात. रेणू म्हणजे दोन किंवा अधिक अणू एकत्र गुंफून झालेली रचना. ऑक्सिजन, हायड्रोजन, नायट्रोजन ही मुलद्रव्ये त्यांच्या रेणूंची बनलेली असतात. त्यांच्या प्रत्येक रेणूत दोन अणू असतात. पाणी हे संयुग. ऑक्सिजनचा एक अणू आणि हायड्रोजनचे दोन अणू एकत्र आले की, पाण्याचा एक रेणू बनतो. नित्याच्या आढळतील बहुसंख्य पदार्थ संयुग स्वरूपातच असतात. शिवाय अनेक मुलद्रव्येही त्यांच्या रेणूंचीच बनलेली असल्यामुळे आपल्या पर्यावरणातील सारे विश्व रेणूंचे बनले आहे असे म्हणता येईल.रेणूंचे काही गुणधर्म विलक्षण आहेत. ऑक्सिजन आणि हायड्रोजन एकत्र येऊन बनणाऱ्या पाण्याचे गुणधर्म त्याच्या घटक मूलद्रव्यांच्या गुणधर्माहून किती वेगळे ! साखर तर हायड्रोजन, ऑक्सिजन आणि कार्बन यांनी बनते. परीक्षानळीत साखर तापवली की खाली काळा साका आणि नळीच्या तोंडाशी पाण्याचे बारीक थेंब मिळतात. कितीतरी प्रकारचे अणू एकत्र येऊन प्रचंड रेणू बनू शकतात. अमिनो आम्ले, प्रथिने, डीएनए हे सर्व गुंतागुंतीच्या रचनांचे रेणूच आहेत. मात्र तरीही रेणू खूप लहान असतो, हे विसरायचे नाही. घोटभर पाण्यात सहावर तेवीस शून्य इतके रेणू असतात !असे असंख्य रेणू एकत्र येऊन पदार्थ बनतो. हे रेणू एकमेकांशी कसे गुंफलेले आहेत, यावर पदार्थाचे भौतिक गुणधर्म ठरतात. गुंफण घट्ट असेल, तर पदार्थ घन असतो. अगदी शिथिल असेल, तर द्रवरूप आणि प्रत्येक रेणू सुटा असेल तर पदार्थ वायुरूप असतो. रेणूची हालचाल तापमानावर अवलंबून असल्याने उष्णता देऊन पदार्थ वितळता येतो आणि द्रवाचे वायूत रूपांतर करता येते.'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्यांना अन्यायाकडे डोळे झाक करायची सवय असते. त्यांना प्रकाशाची कुस कधीच कुरवाळता येत नाही. - बाबा आमटे*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *महाराष्ट्र राज्याचा राज्यपक्षी* कोणता ?२) 'हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे' ह्या गीताचे रचनाकार कोण ?३) प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी घालणारे पहिले राज्य कोणते ?४) 'धनुष्य' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) भालाफेकपटू नीरज चोप्रा हा कोणत्या राज्यातील खेळाडू आहे ? *उत्तरे :-* १) हरियाल २) सेनापती बापट ३) हिमाचल प्रदेश ४) चाप, कोदंड, धनू, तीरकमठा ५) हरियाणा*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 हरीश बुटले, संस्थापक व अध्यक्ष, डीपर, पुणे👤 इरेश्याम झंपलकर, शिक्षक, बिलोली👤 महेश कुडलीकर, साहित्यिक, देगलूर👤 विजय दिंडे, शिक्षक, धर्माबाद👤 गणेश येवतीकर, येवती, धर्माबाद👤 साई मोहन👤 विवेक सारडे👤 दीपक पाटील👤 सतीश दिंडे👤 कांतीलाल घोडके👤 प्रमोद मुधोळकर👤 जयपाल दावणगीरकर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवन यौवन राजमद अविचल रहा न कोई।जा दिन जाये सत्संग में जीवन का फल सोए॥ 50॥।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रत्येकांपाशी बळ असते. मग ते बळ पैशाचे असो किंवा जबरदस्त संगतीचे असो किंवा अफाट धन संपत्तीचे. त्या बळामुळे माणूस मनाप्रमाणेच सर्वच काही कमावू शकतो, वाटू शकतो. पण, ज्याच्याकडे खऱ्या दर्जेदार शब्दांची व सत्य समजून घेण्याची ताकद असते ती ताकद मात्र ह्या सर्व, व्यर्थ ताकद पेक्षा कितीतरी महान असते. ही ताकद पैशाने विकत मिळत नाही तर संघर्षातून अनुभव आल्यानेच येत असते. म्हणून तिचा उपयोग चांगल्या कार्यासाठी करावा. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *मासा आणि हंस*एका सरोवरात एक मासा राहत होता. तिथेच एक हंस येत असे. त्या दोघांची घनिष्ट मैत्री होती. दोघेही एकमेकांशी भरपूर गप्पा मारत असत. रात्र झाल्यावर मासा सरोवराच्या तळाला जात असे तर हंस जवळच्या झाडावर झोपत असे. सकाळ झाल्यावर हंस कुठेतरी जात असे आणि परत माशाला भेटावयास येत असे. एकेदिवशी माशाने हंसाला विचारले,"तू रोज सकाळी इथून उडून जातो हे मी पाहतो. पण तू कुठे जातो हे तू मला कधीच सांगितले नाहीस" हंस म्हणाला,"अरे मित्रा ! मी समुद्राकडे जात असतो. कारण समुद्रात भरपूर शिंपले असतात. त्या शिंपल्यातून निघणारे मोती मला हवे असतात. कारण माझे अन्नच मोती आहे. मी हंस आहे मी फक्त मोतीच खातो. त्यामुळे मला रोजच समुद्रावर जावे लागते." हे ऐकून मासा म्हणाला,"मित्रा ! मलाही एकदा समुद्र बघायचा आहे." मित्राची अशी इच्छा पाहून हंस म्हणाला,"येथून थोडे पुढे गेल्यावर एक नदी आहे, ती समुद्राला मिळते, तू त्या पोहोच." त्यावर्षी प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, सरोवराचे पाणी जावून नदीला मिळाले तसा मासाही नदीच्या पाण्यात पोहोचला. नदीचा प्रवाह फार जोरात असल्याने मासा अतिशय वेगाने समुद्राकडे वाहून गेला. माशाला समुद्रात त्याच्यासारखेच लाखो मासे दिसले, पण कुणीच तो आल्याची न दखल घेतली न कुणी बोलले. तो त्या समुद्रात एकटा पडला.त्याला राहून राहून आपल्या हंस मित्राची आठवण येत होती. पण आता पर्याय नव्हता. तेथून परतणे शक्यच नव्हते आणि आलेल्या प्रसंगाला तोंड देणे हेच त्याच्या प्रारब्धात लिहिले होते.*तात्पर्य*मोठ्या गोष्टी मिळवण्याच्या नादात आपण आपल्याला आनंद देणाऱ्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. त्याने आपल्याला मोठ्या गोष्टीही मिळत नाहीत आणि छोट्या गोष्टी आपण सोडलेल्या असतात.📚📚📚📚📚📚📚📚📚•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment