✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 16 ऑगस्ट 2024💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.loksatta.com/sampadkiya/features/india-s-educational-evolution-from-post-independence-commissions-to-modern-reforms-psg-98-4538127/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌼 *_ या वर्षातील २२९ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🌼 *_महत्त्वाच्या घटना:_* 🌼•••••••••••••••••••••••••••••••••*२०१०: जपानला मागे टाकुन चीन ही जगातली दुसर्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली.**१९९४: बांगलादेशातील लेखिका तस्लिमा नसरीन यांना स्वीडीश पेन क्लबतर्फे ’कुर्ट टुचोलस्की साहित्य पुरस्कार’ जाहीर**१९६०: सायप्रसला (युनायटेड किंग्डमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.**१९४६: कोलकात्यात वांशिक दंगल उसळुन ७२ तासात सुमारे ४,००० जण ठार झाले.**१९१३: स्त्रियांना प्रवेश देणारे तोहोकू विश्वविद्यालय हे जपानमधील पहिले विश्वविद्यालय बनले.* 🌼 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🌼 ••••••••••••••••••••••••••••••••• *१९८५: प्रा.सुरेश आडके -- कथा व कादंबरीकार लेखक**१९७८: संजय नाना गोरडे -- कवी,लेखक* *१९७४: शिवनारायण चंद्रपॉल-- प्रशिक्षक आणि वेस्ट इंडिज क्रिकेट संघाचे माजी कर्णधार* *१९७२: संदीप बाळासाहेब वाकचौरे -- लेखक* *१९७०: मनीषा कोईराला – नेपाळी-भारतीय अभिनेत्री**१९७०: सैफ अली खान – अभिनेता**१९६७: नरेंद्र भगवंतराव नाईक -- प्रसिद्ध कादंबरीकार, कवी* *१९५९: मंगेश विश्वासराव -- जेष्ठ पत्रकार, मराठी साहित्यिक* *१९५८: महेश मांजरेकर-- आघाडीचे भारतीय चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक, कथाकार व निर्माते**१९५८: मॅडोना – अमेरिकन गायिका, गीतलेखिका, अभिनेत्री, दिग्दर्शिका, निर्माती, नर्तिका आणि उद्योजिका**१९५७: रावसाहेब रामराव पाटील ऊर्फ आर.आर.पाटील- माजी उपमुख्यमंत्री म.रा ( मृत्यू: १६ फेबुवारी २०१५ )**१९५४: हेमलता – पार्श्वगायिका**१९५२: कीर्ती शिलेदार – गायिका व अभिनेत्री**१९५१: डेव्हिड धवन -- हिंदी चित्रपटांचे प्रसिद्ध भारतीय दिग्दर्शक**१९५०: जेफ थॉमसन – ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज**१९४९: अच्युत वझे -- रंगकर्मी, लेखक* *१९४४: प्रा.तुकाराम पाटील -- प्रसिद्ध मराठी साहित्यिक* *१९४३: गिरीश घाणेकर -- मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक, तसेच मराठी चित्रपट व जाहिरातपट निर्माते (मृत्यू: २३ सप्टेंबर १९९९ )**१९३७: प्रा. आर. व्ही. मुदलियार -- लेखक**१९३४: विष्णुपंत गोपाळराव ब्रह्मनाथकर -- लेखक**१९३४: वसंत पेंढारकर -- जीवनाचे प्रतिबिंब असलेल्या कविता करणारे कवी (मृत्यू: ३१ जुलै २००८ )* *१९३२: नारायण आठवले -- मराठी भाषेतील पत्रकार, साहित्यिक, स्वातंत्र्यसैनिक आणि माजी खासदार (मृत्यू: २८ एप्रिल २०११ )**१९२६: वसंत रामराव रत्नपारखी -- लेखक**१९२६: मनोरमा -- जुन्या काळातील अभिनेत्री (मृत्यू: १५ फेब्रुवारी २००८ )**१९१३: मेनाकेम बेगीन – इस्त्रायलचे ६ वे पंतप्रधान व नोबेल पारितोषिकविजेते (मृत्यू: ९ मार्च १९९२ )**१९०४: सुभद्राकुमारी चौहान – हिन्दी कवयित्री (मृत्यू: १५ फेब्रुवारी १९४८ )**१९०१: श्रीपाद रामचंद्र टिकेकर-- लेखक, संशोधक (मृत्यू: १९७९ )**१८७९: जगन्नाथ रघुनाथ आजगावकर – संतचरित्रकार, १९०७ ते १९३५ या काळात त्यांच्या 'महाराष्ट्र कविचरित्र’ या ग्रंथाचे नऊ खंड प्रकाशित झाले होते.(मृत्यू: २७ ऑगस्ट १९५५ )* 🌼 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🌼•••••••••••••••••••••••••••••••••*२०२०: चेतन चौहान -- माजी क्रिकेटर(जन्म: २१ जुलै १९४७ )* *२०१८: अटलबिहारी वाजपेयी- माजी भारतीय पंतप्रधान आणि प्रसिद्ध हिंदी कवी, भारतरत्न (२०१४) (जन्म: २५ डिसेंबर १९२४ )**२०१०: नारायण गंगाराम सुर्वे – प्रसिद्ध कवी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित (जन्म: १५ आक्टोबर १९२६ )**२०००: रेणू सलुजा – ’परिंदा’, ’धारावी, ’सरदार’ आणि ’गॉडमदर’ इ. चित्रपटांच्या संकलनासाठी चार वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपट संकलक (जन्म: ५ जुलै १९५२ )**१९९७: अनेक देशांत भारतीय संस्कृती व अध्यात्म यांचा प्रसार करणारे पं. वसंतशास्त्री विष्णुशास्त्री उर्फ आबाजी पणशीकर यांचे निधन**१९९७: नुसरत फतेह अली खान – कव्वालीला जागतिक परिमाण मिळवून देणारे पाकिस्तानी गायक (जन्म: १३ आक्टोबर १९४८ )**१९७७: एल्व्हिस प्रिस्टले – अमेरिकन गायक, गिटारवादक, अभिनेता आणि ’किंग ऑफ द रॉक अँड रोल’ (जन्म: ८ जानेवारी १९३५ )**१७०५: जेकब बर्नोली – स्विस गणितज्ञ (जन्म: २७ डिसेंबर १६५४ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••लेखिका संगीता पाखले यांचा लोकसत्ता मधील लेख*स्वातंत्र्योत्तर काळातील शैक्षणिक टप्प्यांचा…*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *'लाडकी बहीण योजना' अंतर्गत ८० लाखांपेक्षा जास्त लाभार्थ्यांना मिळाले पैसे अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कोल्हापूर जिल्ह्यात पथदर्शी प्रकल्पाचा शुभारंभ*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *सर्व महापालिकांनी त्यांच्या क्षेत्रात एक लाख झाडे लावावीत, मुख्यमंत्र्यांचे निर्देश !*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पद्मशाली पंच कमिटी पुणे शहर (भवानी पेठ) यांच्यावतीने श्री क्षेत्र आळंदी देवाची येथे नुतन पद्मशाली समाज धर्मशाळेचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या हस्ते उद्घाटन *•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांना शंभर टक्के सौर उर्जेद्वारे वीज पुरवठा करण्याची महावितरणची तयारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *प्रतिभावान लेखक, कवी, रंगकर्मी डॉ. शंतनू अभ्यंकर यांचे वयाच्या 60 व्या वर्षी निधन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *बांगलादेश विरुद्ध च्या कसोटी सामन्यातून जसप्रीत बुमराहला विश्रांती मिळण्याची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *विजेचे उत्पादन व वाटप* 📙 आपण अलीकडे क्वचित वर्तमानपत्रात वाचतो, 'काल साऱ्या महाराष्ट्रात वीज गेली होती.' आता मनात येते की, महाराष्ट्र तर एवढा मोठा, तिथे कितीतरी वीजकेंद्रे आहेत. औष्णिक आहेत, जलविद्युत आहेत, आण्विक आहेत. मग सगळीच्या सगळी बंद पडून अख्खा महाराष्ट्र अंधारात कसा जातो ? फार पूर्वी असे नव्हते. कोयनेची वीज मुंबईला जाई. भुसावळ कोराडीचे उत्तर महाराष्ट्राला जाई. तर पुण्याला स्वतःचेच वीजकेंद्र काम करत होते. या पद्धतीत त्या त्या गावापुरते वीजनिर्मिती पुरवठा करण्याचे काम सोपवलेले असे.पण ही पद्धत महागडी होती, अनिश्चित होती. गाव वाढेल, तसतशी ही पद्धत अपुरी पडत असे. मग तेथील पुरवठा नेहमीसाठीच कमी पडे.यावर उपाय म्हणून अख्ख्या महाराष्ट्रातील सर्व मोठी केंद्रे एकमेकांना प्रथम थेट जोडली गेली. याला 'इलेक्ट्रिक ग्रिड' किंवा 'विद्युतकेंद्रांची साखळी' असे म्हणतात. मग या साखळीतून पुढे प्रत्येक गावांकडे फाटे काढून पुरवठा केला गेला.आता समजा, तुम्ही एकमेकांचे हात धरून साखळीची शिवाशिवी खेळत आहात आणि एकाचा पाय दुसऱ्याच्या पायात अडकला. सर्वच मुले बदाबद पडतात की नाही ? अगदी हाच प्रकार या ग्रीडमुळे वीजकेंद्राच्या बाबतीत होतो.एखाद्या केंद्रात काही बिघाड झाला की, ते बंद पडते. पण दुसऱ्याच्या पायात पाय घालून ते दुसऱ्यालाही ओढते. पण हा प्रकार येथेच थांबावा, यासाठी तात्काळ त्या केंद्राशी असलेला जोड आपोआप काम करण्याचे थांबवतो. याच पद्धतीत सर्व जोड काम करेनासे होतात. सर्व महाराष्ट्रात अंधार पडतो, तो असा.पण मूळ केंद्रातील बिघाड थोड्या वेळात दुरुस्त केला जातो. ते सुरू झाले की, ओळीने सर्व जोड पुन्हा काम करू लागतात. अंधारात विझत गेलेले जाळे पुन्हा उजेडात प्रकाशू लागते. संपूर्ण भारतात आता नॅशनल ग्रिडचे जाळे जोडले गेले आहे.‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••चांगुलपणाचा मार्ग काटेरी असला, तरी त्याची फळे गोड असतात.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) विदर्भातील एकमेव गिरिस्थान कोणते ?२) देशातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठ कोणते ठरले आहे ?३) २०२८ मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहेत ?४) 'दैन्य' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार २०२४ कोणाला जाहीर झाला आहे ? *उत्तरे :-* १) चिखलदरा, अमरावती २) ISI बंगळुरू ३) अमेरिका ४) दारिद्र्य ५) डॉ. रघुनाथ माशेलकर*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 निखिल देवेंद्र खराबे, कुही, नागपूर👤 प्रसाद कामुलवार, परभणी👤 रमेश बारसमवार👤 सुभाष पालदेवार, धर्माबाद👤 अशपाक सय्यद👤 मिथुन बिजलीकर👤 प्रवीण खुमसे, MIT, अंबाजोगाई👤 सदानंद वतपलवाड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कह कवीर दरगाह सो जेहि उतरी है भार ।सोइ करै गुरुआइया झकि २ मरे गँवार ॥ 47 ॥।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपल्या मनात काय चालू आहे ते फक्त आपल्यालाच माहीत असते. दुसऱ्यांच्या मनात काय चालले आहे या विषयी आपल्याला कल्पना सुद्धा नसते. कारण प्रत्येकाची मानसिकता वेगळी असते.प्रत्येकांचे मन, स्वभाव, बोलीभाषा, आपुलकी ही वेगवेगळी असते. म्हणून कोणाविषयी उगाचच बोलून स्वतःचे समाधान करू घेवू नये. कारण असे केल्याने आपल्याही वाटेत काटे पेरणारे टपून बसलेले असतात.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *गाढवाचा गैरसमज* एकदा एका पाथरवटाने दगडांच्या चांगल्या सुंदर मूर्त्या बनवल्या व त्या बाजारात विकायला न्यायला सुरवात केली.नेण्यासाठी एक गाढव आणले ,दगडाचे ते देव पोत्यात भरले .व रस्त्याने चालू लागले लोकांना ते देव पाहून लोक हात जोडु लागले .हे सर्व गाढवाच्या लक्षात आले कि ,माणसे आपल्याला हात जोडत आहे .मग गाढव एका जागेवर उभे राहले .गाढव का बर चालत नाही याचे कारण काही पाथरवटाला समजले नव्हते ,पण जेव्हा त्याला माहिती झाले की गाढव लोकांचा मान स्वीकार करण्यासाठी उभे आहे .तेंव्हा त्यावर दोन काडी चे फटके दिले व म्हणाला ,आता चालतो नीट की परत देऊ मुर्खा हा जो नमस्कार आहे तुला नव्हे तर त्या देवांना आहे .*तात्पर्य :- खोट्या अहंकाराचे फजितीची वेळ येते*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment