✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 26 ऑगस्ट 2024💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/p3EbER57WmGFfmD9/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🔶🔶 *_श्रीकृष्ण जन्माष्टमी_* 🔶🔶 •••••••••••••••••••••••••••••••••••🌸 *_आंतरराष्ट्रीय श्वान दिन_*🌸•••••••••••••••••••••••••••••••••🌸 *_महिला समानता दिवस_* 🌸••••••••••••••••••••••••••••••••🌸 *_ या वर्षातील २३९ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🌸 *_महत्त्वाच्या घटना:_* 🌸•••••••••••••••••••••••••••••••••*१९९६: दक्षिण कोरियात १९७९ मध्ये झालेल्या लष्करी कटाबद्दल माजी अध्यक्ष चुन दू वान यांना मृत्यूदंडाची तर त्यांचे उत्तराधिकारी प्रो ताय वू यांना साडेबावीस वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली.**१९९४: लोन टेनिसपटू रमेश कृष्णन आणि मध्यम पल्ल्याचा धावपटू बहादूर प्रसाद यांना के. के. बिर्ला फांउंडेशनचा पुरस्कार जाहीर**१९७२: पश्चिम जर्मनीतील म्युनिच येथे २० व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.**१९४४: दुसरे महायुद्ध - चार्ल्स द गॉलने पॅरिसमधे प्रवेश केला.**१८८३: डच इंडीज (सध्याचे इंडोनेशिया) बेटावरील क्राकाटाऊ ज्वालामुखीच्या उद्रेकात १३५ गावे भस्मसात होऊन सुमारे ३६,००० लोकांचा बळी गेला.**१७६८: कॅप्टन जेम्स कूक एच.एम.एस. एन्डेव्हर या जहाजातुन आपल्या पहिल्या सफरीवर निघाला.**१४९८: मायकेल अँजेलो याने ’पिएटा’ या जगप्रसिद्ध शिल्पकृतीच्या कामास सुरूवात केली.* 🌸 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🌸•••••••••••••••••••••••••••••••••*१९९०: इशिता दत्ता शेठ -- अभिनेत्री**१९८२: नचिकेत सतीश क्षीरे -- लेखक**१९७९: सोनाली नवांगुळ -- प्रसिद्ध लेखिका,मूळ तामिळ लेखिका सलमा यांची कादंबरी ‘मध्यरात्रीनंतरचे तास’ या नावांनी मराठीत अनुवादित केली.अनुवादित कादंबरीला मराठी साहित्य अकादमीचा पुरस्कार**१९७७: दिनेश कृष्णाजी चव्हाण -- कवी**१९७६: प्रा. निर्मला रणजित शेवाळे -- कवयित्री, लेखिका**१९७५: अंजली धानोरकर -- उपजिल्हाधिकारी तथा प्रसिद्ध लेखिका**१९७३: इंदर कुमार. -- भारतीय अभिनेता (मृत्यू: २८ जुलै २०१७ )**१९७१: अनिता पिरन खैरनार - कवयित्री**१९७१: राजेश मनोहरराव चौधरी -- कवी**१९६८: मधुर भांडारकर -- भारतीय चित्रपटदिग्दर्शक, निर्माता, पटकथालेखक**१९६६: संगिता सुहास अरबुने -- प्रसिद्ध कवयित्री,लेखिका**१९६५: प्रा. भगवंत केशव शोभणे -- कवी, लेखक* *१९६२: विलास कृष्णाजी नाईक -- मराठी साहित्यिक**१९५६: प्रकाश गव्हाणे -- प्रसिद्ध कवी तथा लेखक**१९५६: मनेका गांधी -- माजी केंद्रीय मंत्री**१९५५: पुरुषोत्तम बोरकर -- कादंबरीकार* *१९५५: प्रा. लक्ष्मण काशिनाथराव मोहरीर -- लेखक, व्याख्याते* *१९५५: डॉ. सुजाता जोशी-पाटोदेकर -- नेत्रतज्ज्ञ तथा लेखिका**१९५२: छाया विजय नाईक -- लेखिका, संपादिका* *१९४८: अरुण यशवंत ताम्हणकर -- कादंबरीकार* *१९४८: डॉ.आशा अरविंद सावदेकर -- ज्येष्ठ समीक्षक, कादंबरीकार (मृत्यू: २२ एप्रिल २०२१ )* *१९४४: अनिल अवचट – लेखक,सामाजिक कार्यकर्ते, चित्रकार आणि पत्रकार (मृत्यू: २७ जानेवारी २०२२ )**१९३९: ताराचंद खांडेकर -- प्रसिद्ध विचारवंत,समीक्षक**१९२८: नारायण हरी पालकर -- चरित्रकार (मृत्यू: १ मार्च १९७६ )**१९२७: बालकृष्ण विठ्ठलदास दोशी -- भारतीय वास्तुविशारद (मृत्यू: २४ जानेवारी २०२३ )**१९२६: प्राचार्य दिनकर विष्णू जोशी -- कादंबरीकार, कथाकार* *१९२२: ग. प्र. प्रधान – समाजवादी विचारवंत, स्वातंत्र्यसैनिक, शिक्षणतज्ञ, राजकारणी, लेखक, महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती. (मृत्यू: २९ मे २०१० )**_१९१०: मदर तेरेसा – भारतरत्न व नोबेल पारितोषिक विजेत्या समाजसेविका (मृत्यू: ५ सप्टेंबर १९९७ )_**१७४३: अॅन्टॉइन लॅव्हाझिये – फ्रेन्च रसायनशास्त्रज्ञ, आधुनिक रसायनशास्त्राचा जनक (मृत्यू: ८ मे १७९४ )* 🌸 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🌸 ••••••••••••••••••••••••••••••••• *२०२३: देव कोहली -- भारतीय हिंदुस्थानीकवी आणि गीतकार (जन्म: २ नोव्हेंबर १९४२)* *२०१२: ए. के. हंगल – चित्रपट अभिनेते व स्वातंत्र्यसैनिक (जन्म: १ फेब्रुवारी १९१७ )**२००१: आनंद चिंतामणी दिघे -- शिवसेना पक्षाचे नेते (जन्म: २७ जानेवारी १९५१ )**२०००: मनोरमा वागळे - मराठी चित्रपटांतील अभिनेत्री (जन्म: ३०ऑगस्ट१९२८ )**१९७४: चार्ल्स ऑगस्टस लिंडबर्ग – धाडसी अमेरिकन वैमानिक. १९२७ मध्ये त्यांनी पॅरिस ते न्यूयॉर्क या ५,८०० किलोमीटरच्या विनाथांबा विमानोड्डाण स्पर्धेत भाग घेऊन साडे तेहतीस तासांत ती स्पर्धा जिंकली. वैमानिकी जीवनाच्या अनुभवांवरील त्यांच्या ’द स्पिरीट ऑफ सेंट लुईस’ या पुस्तकास पुलित्झर पुरस्कार मिळाला. (जन्म: ४ फेब्रुवारी १९०२ )**१९४८:कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर – ख्यातनाम नाटककार व पत्रकार, ’केसरी’चे संपादक, 'नवाकाळ’चे संस्थापक (जन्म:२५ नोव्हेंबर १८७२)**१७२३: अँथनी व्हॉन लीवेनहॉक – डच सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ (जन्म: २४ आक्टोबर १६३२ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*शालेय अभ्यासक्रमात खेळाचे महत्व*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *महिलांवर अत्याचार अक्षम्य अपराध, तो करणारा कोणीही सुटता कामा नये ; मुलींवरील अत्याचाराच्या घटनेनंतर जळगाव येथील लखपती दीदी कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे परखड भाष्य*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *नेपाळमधील बस अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पुण्यातील खडकवासला धरणातून विसर्ग सुरू; भिडे पूल पाण्याखाली, पुलाची वाडी परिसरात घरांमध्ये शिरलं पाणी, सतर्कतेच्या सूचना*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मुंबई : यंदाही गणेशोत्सवासाठी धावणार ‘मोदी एक्सप्रेस’ ; चाकरमान्यांचा होणार मोफत प्रवास !*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना पगाराच्या ५० टक्के निवृत्ती वेतनाची दिली हमी, यासाठी मोदी सरकारने एकीकृत निवृत्ती वेतन योजना केली जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *आदीपुरुष चित्रपटातील शबरीची भूमिका केलेल्या आशा शर्मा यांचे वयाच्या 88 व्या वर्षी झाले निधन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *रावळपिंडीच्या मैदानावर झालेल्या कसोटी सामन्यात पाकिस्तानची हार, बांगलादेशचा मोठा विजय, दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने घेतली आघाडी*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कृष्ण जन्माष्टमी*श्रीकृष्ण जयंती आणि गोकुळाष्टमी यासह विविध नावांनी कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते. गुजरातमध्ये याला सतम अठम (Satam Atham) असं संबोधले जाते, तर दक्षिण भारतात, विशेषत: केरळमध्ये या सणाला अष्टमी रोहिणी असं म्हणतात. भारतात आणि जगभरातील हिंदूंद्वारे जन्माष्टमी उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी केली जाते.मथुरा, उत्तर प्रदेशातील वृंदावनभगवान कृष्णाचे जन्मस्थान मथुरेला जन्माष्टमीच्या वेळी विशेष महत्त्व आहे, कारण यादिवशी कृष्णभक्त दिवसभर उपवास करतात, मध्यरात्रीपर्यंत जागरण करतात, जे कृष्णाच्या जन्माचे प्रतीक असल्याचे मानलं जातं. मध्यरात्रीची पूजा ही एक खास गोष्ट आहे, ज्या दरम्यान कृष्णाच्या मूर्तीला विधीपूर्वक स्नान करून नवीन कपडे घातले जातात. मथुरेतील लोकं कृष्णाच्या जन्माची कथा दर्शविणारी पालखी तयार करतात, ज्याला झांकी असेही म्हणतात. कृष्णाच्या जीवनामधील आणखी एक महत्त्वाचे स्थान वृंदावन, कृष्णाच्या बालपणाचं आणि किशोरवयीन वर्षांशी आणि त्यांच्या प्रसिद्ध रास लीलांशी संबंधित आहे. जवळपास १० दिवस अगोदर वृंदावनात जन्माष्टमीचा उत्सव सुरू होतो. ज्या दिवशी कृष्णाचे जीवन रास लीलांद्वारे, झांकीस अभिषेकसह पुन्हा निर्माण केले जाते, त्या दिवशी कृष्णाचे भव्य विधीवत स्नान केले जाते.तसेच पुणे, मुंबई आणि उत्तरप्रदेश च्या गोकुळ मध्ये ही हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जसे प्रकाशाच्या साह्याशिवाय वस्तू दिसत नाही, तसे विचाराशिवाय ज्ञानप्राप्ती होत नाही.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) कोणत्या देशाने *सोफिया* या पहिल्या यंत्रमानवास नागरिकत्व बहाल केले ?२) भारतातील पहिले डिजिटल गाव कोणते ?३) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मॅट्रीक परीक्षा उत्तीर्ण झाले तेव्हा त्यांना बुद्धचरित्र हे पुस्तक कोणी दिले ?४) 'नृप' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) महात्मा फुले यांच्या आईचे नाव काय होते ? *उत्तरे :-* १) सौदी अरेबिया २) अकोदरा, गुजरात ३) कृष्णाजी अर्जून केळुस्कर ४) राजा, भूप, भूपती, भूपाळ, नरेश, महीपती ५) चिमणाबाई फुले *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 नारायण शिंदे, उपक्रमशील शिक्षक, रत्नागिरी👤 संदीप आवरे, धर्माबाद👤 दिगंबर खपाटे बन्नाळीकर👤 प्रशांत ईबीतवार👤 प्रशांत कोकने👤 मधुकर बोईनवाड, साधनव्यक्ती, धर्माबाद👤 दत्ता बोडलवाड👤 सुमेध भंडारे👤 संदीप सोनकांबळे👤 मारोती ताकलोर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *हरिपाठ*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••भावेंवीण भक्ति भक्तिविण मुक्ति । बळेंवीण् शक्ति बोलु नये ॥१॥ कैसेनि दैवत प्रसन्न त्वरित । उगा राहें निवांत शिणसी वायां ॥२॥ सायासें करिसी प्रपंच दिननिशीं । हरिसी न भजसी कवण्या गुणें ॥३॥ ज्ञानदेव म्हणें हरिजप करणें । तुटेल धरणें प्रपंचाचें ॥४॥ ।। संत ज्ञानेश्वर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••बुध्दीवान व्यक्ती खऱ्या अर्थाने बुध्दीवान असतो. समोरचा माणूस कोणत्या शब्दात बोलत आहे आणि का म्हणून बोलत आहे याचं एक प्रकारे परीक्षण करत असतो. अशी व्यक्ती वाचाळ नसते. आपल्या मुखातून कोणतेही शब्द न काढता शांत राहण्यातच स्वतःला धन्य समजते. अशी व्यक्ती शांतपणे आपले संस्कार, मानसन्मान, पद, प्रतिष्ठा जपत असते. कारण एवढे सारे मिळविण्यासाठी किती संघर्ष करावा लागला हे, फक्त त्याच व्यक्तीला माहीत असते. अशी व्यक्ती कळत न कळत लोकांसाठी श्रध्देचे स्थान बनत असते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• " खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एका जंगलात एक लांडगा राहत होता. तो लांडगा मस्त मजेत शिकार करून खात असे. शिकार खात असताना अचानक एक हाड त्याच्या घशामध्ये अडकते. घशामध्ये अडकलेल्या हाडामुळे लांडग्याला त्रास होऊ लागला. त्यामुळे त्याला खाता येत नव्हते .त्याला कोणीही मित्र नव्हता की, जो त्याला ते हाड काढण्यासाठी मदत करू शकेल. तो शेजारून जाणाऱ्यांना विनंती करू लागला की, माझ्या घशातील हाड काढून द्या. मग तो सगळ्यांना म्हणतो की, जो कोणी माझ्या घशातील हाड काढून देईन त्याला तो म्हणेल ते बक्षीस देईन पण लांडग्याच्या भीतीने कोणीच आले नाही.शेवटी एक सारस पक्ष्याला लांडग्याने न मारण्याचे आश्वासन दिल्यानंतर हाड काढण्यास त्या पक्षानं होकार दिला. सारसने लांब चोचीने लांडग्याच्या घशातले हाड बाहेर काढले. लांडग्याने सुटकेचा नि:श्वास सोडला. तेव्हा सारस त्याला म्हणाला , " तू मला या मदतीच्या मोबदल्यात काय देणार ? "लांडग्याने दुष्टपणे हसत म्हटले, " मी तुझा जीव वाचविला नाही का ? जेव्हा तू तुझी चोच माझ्या तोंडात घातली तेव्हाच मी तुला मारून टाकू शकत होतो." सारस पक्षी लांडग्याचे असे बोलणे ऐकून नाराज झाला आणि जाता जाता विचार करू लागला की, हा लांडगा पण किती पटकन उपकार विसरणारा निघाला. मी त्याची मदत करायला नको होती.*तात्पर्य - उपकाराची फेड आपकाराने करू नये ."*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment