✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 29 ऑगस्ट 2024💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/gyK8N8cAfV5fgtUp/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🟤 *_राष्ट्रीय क्रीडा दिन_* 🟤••••••••••••••••••••••••••••••🟤 *_ या वर्षातील २४२ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🟤 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟤•••••••••••••••••••••••••••••••••*१९७४: चौधरी चरणसिंग यांनी ’भारतीय लोक दल’ या राजकीय पक्षाची स्थापना केली.**१९४७: डॉ. बाबासाहेब आंबेडकर घटना समितीचे अध्यक्ष झाले.**१९१८: लोकमान्य टिळक यांनी मुंबई येथे काँग्रेसचे विशेष अधिवेशन बोलावले.**१८३३: युनायटेड किंगडमने आपल्या साम्राज्यात गुलामगिरीवर बंदी घातली.**१८३१: मायकेल फॅरेडे याने विद्युत चुंबकीय प्रवर्तनाचा शोध लावला.**१८२५: पोर्तुगालने ब्राझिलच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली.**१४९८: वास्को द गामाने कालिकतहुन पोर्तुगालला परतण्याचा निर्णय घेतला.* 🟤 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_*🟤•••••••••••••••••••••••••••••••••*१९८७: प्रा.ऋषिकेश ऊर्फ गणेश नंदकुमार खारगे -- कवी**१९८२: डॉ. मिलिंद भिवाजी कांबळे -- कथा, कादंबरी व समीक्षण करणारे मराठी लेखक**१९७४: नेताजी रामदास सोयाम -- कवी* *१९७४: रिचा शर्मा-- भारतीय पार्श्वगायिका तसेच भक्ती गायिका**१९७०: डॉ. श्रीराम यशवंत गडेकर -- प्रसिद्ध लेखक, समीक्षक* *१९६९: कल्याणी विजय मादेशवार-- कवयित्री, लेखिका* *१९६६: अनंत वासुदेव माळवे -- लेखक, कवी* *१९६०: संजय वासुदेव कठाळे -- लेखक* *१९५९: अक्किनेनी नागार्जुन उर्फ नागार्जुन -- भारतीय दक्षिणात्य तसेच हिंदी चित्रपट अभिनेता, निर्माता* *१९५८: मायकेल जॅक्सन – अमेरिकन पॉप गायक, गीतलेखक, संगीतकार, निर्माता, अभिनेता (मृत्यू: २५ जून २००९ )**१९५७: मकरंद साठे-- मराठी नाटककार, लेखक व नाट्यदिग्दर्शक**१९५४: शिरीष पुरुषोत्तम मोराणकर -- कवी, लेखक**१९५३: वासुदेव वामन बापट -- धार्मिक विषयांवर लेखन करणारे मराठी लेखक (मृत्यू: १५ नोव्हेंबर २०१५)**१९५०: लीना चन्दावरकर - हिन्दी चित्रपटातील अभिनेत्री**१९४७: शोभा अनिल भागवत -- बाल आणि पालक शिक्षण तज्ञ, लेखिका संचालिका, गरवारे बालभवन**१९४४: डॉ. मृणालिनी भालचंद्र फडनाईक -- कथाकार, कवयित्री, लेखिका**१९२९: गो. मा. पुरंदरे -- कादंबरीकार* *१९२३:रिचर्ड अॅटनबरो – इंग्लिश निर्माते, दिग्दर्शक व अभिनेते**१९१५: इन्ग्रिड बर्गमन – स्वीडीश अभिनेत्री (मृत्यू: २९ ऑगस्ट १९८२ )**१९०५: मेजर ध्यानचंद – प्रसिद्ध भारतीय हॉकीपटू (मृत्यू: ३ डिसेंबर १९७९ )**१९०१: पद्मश्री विठ्ठलराव एकनाथराव विखे पाटील – सहकारमहर्षी (मृत्यू: २७ एप्रिल १९८०)**१८८०: लोकनायक माधव श्रीहरी तथा 'बापूजी' अणे-विदर्भातील सामाजिक, राजकीय, संस्कृतिक क्षेत्रातील नामवंत व्यक्तिमत्व (मृत्यू: २६ जानेवारी १९६८ )* *१८६३: गिदुगु वेंकट रामामूर्ती -- तेलुगू लेखक आणि ब्रिटिश राजवटीत सर्वात प्राचीन प्राचीन तेलुगू भाषा आणि सामाजिक द्रष्टे होते. रामा मूर्ती यांचा जन्मदिवस "तेलगू दिवस" म्हणून साजरा केला जातो ( मृत्यू: २२ जानेवारी १९४० )*🟤 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟤••••••••••••••••••••••••••••••••• *२०२१: जयंत पवार-- पत्रकार, मराठी नाटककार आणि नाट्यसमीक्षक (जन्म: २२ फेब्रुवारी १९६० )* *२००८: जयश्री गडकर – अभिनेत्री (जन्म: २१ फेब्रुवारी १९४२ )**२००७: बनारसी दास गुप्ता – स्वातंत्र्यसैनिक व हरयाणाचे मुख्यमंत्री (जन्म: ५ नोव्हेंबर १९१७ )**२०००: विजया साने -- बालसाहित्यिक, लेखिका (जन्म: ५ ऑक्टोबर १९२३ )* *१९८६: गजानन श्रीपत तथा ’अण्णासाहेब’ खेर – पुणे विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक (जन्म: १५ जून १८९८ )**१९७६: काझी नझरुल इस्लाम – स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारक व हिंदु मुस्लिम ऐक्याचे समर्थक असलेले बंगाली कवी. (जन्म: २५ मे १८९९ )**१९७५: इमॉन डी व्हॅलेरा – आयर्लंड प्रजासत्ताकाचे पहिले राष्ट्राध्यक्ष (जन्म: १४ आक्टोबर १८८२ )**१९६९: मेहबूब हुसेन पटेल ऊर्फ ’शाहीर अमर शेख’ – लोकशाहीर (जन्म: २० ऑक्टोबर १९१६ )**१९०६: बाबा पद्मनजी मुळे – ख्रिस्ती धर्मप्रसारक, ग्रंथकार व मराठी ख्रिस्ती वाङमयाचे जनक (जन्म: मे १८३१ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*सोशल मीडिया आणि आधार*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *प्रधानमंत्री जनधन योजना यशस्वी अंमलबजावणीला एक दशक पूर्ण*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *वाहनांच्या गर्दीने सीईओंवर पायी चालण्याची वेळ, हिंगोली जिल्हा परिषदेत वाहने उभी करण्यापासून शिस्तीला सुरुवात*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *भारताच्या आर्थिक विकासात स्टार्टअप्सचे भरीव योगदान, आनंद गानू पिंपरी चिंचवड विद्यापीठ आणि गर्जे मराठी ग्लोबल इनक्युबेशन सेंटरचे उद्घाटन*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *केंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय, महाराष्ट्रातील दिघीसह देशभरात 12 औद्योगिक स्मार्ट शहरे उभारणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करा, ऑल इंडिया सोनार फेडरेशनची मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *राज्य सरकारच्या विरोधात मविआचं 01 सप्टेंबर पासून आंदोलन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आशियाई चॅम्पियन ट्रॉफीसाठी भारतीय हॉकी संघाची घोषणा, 14 सप्टेंबर ला पाकिस्तानशी होणार सामना*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *आहार कसा असावा ?*शरीराच्या कष्टाच्या मानाने व प्रकृतीनुसार पुरेसा व समतोल आहार आवश्यक आहे. आहाराचे प्रमाण, प्रकार, वेळा इत्यादींवर आरोग्य ब-याच अंशी अवलंबून असते. तिखट मसालेदार पदार्थ जेवणात कमी प्रमाणात असावेत. हॉटेलमध्ये खाणे शक्यतो टाळावे. पचायला साधा हलका ताजा आहार, भूक असेल तेव्हाच जेवणे, थोडी भूक ठेवून खाणे हे साधे नियम आहेत.आयुर्वेदाप्रमाणे गोड, आंबट, खारट, तिखट, कडू आणि तुरट अशा सहा चवींचे पदार्थ असतात. या प्रत्येक चवीचा आपल्या खाण्यात समावेश असावा. एकाच चवीचे पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ले तर त्याचाही त्रास होण्याची शक्यता असते.आहार पचण्याची एक चांगली खूण म्हणजे शौचास घाण वास न येणे. तसेच जेवणानंतर सात-आठ तासानंतरही खाल्लेल्या पदार्थाचा वास ढेकरांतून येणे ही अपचनाची खूण आहे.ऋतुमानाप्रमाणे आहारात बदल व्हावेत. पावसाळयात, उन्हाळयात भूक मंद असते म्हणून पचायला हलका, कमी आहार घेणे आवश्यक ठरते. याउलट हिवाळयात जड पदार्थही चांगले पचतात. चातुर्मासाची कल्पना यादृष्टीने योग्य आहे. आहारात त्या त्या ऋतूतले पदार्थ (ताजे) घेणे पोषणाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.आहाराचा विचार करताना जास्त प्रक्रिया केलेले पदार्थ हे कनिष्ठ असतात हे लक्षात ठेवावे. उदा. त-हेत-हेच्या मिठाईपेक्षा साधे ताजे दूध आहारशास्त्राच्या दृष्टीने चांगले असते.स्निग्ध पदार्थांमध्ये वनस्पती तूप (सर्व प्रकारचे) हे तर अपायकारक आहे. आयुर्वेदाच्या दृष्टीने मात्र गावठी तूप (गाईचे साजूक) आहारात असणे आवश्यक आहे. ‘पुफा’ गटातली तेले चांगली.प्रत्येक व्यक्तीला विशिष्ट पदार्थ कमी अधिक सोसतो. या अनुभवावरून प्रत्येकाने आपल्या आहाराचे नियोजन केले पाहिजे. आयुर्वेदातला आहार विचार यासाठी मार्गदर्शक आहे.आहारासंबंधी आणखी एक नियम म्हणजे उपवास. निदान तिशीनंतर आठवडयातून एक दिवस पूर्णवेळ किंवा एकवेळ उपास करणे आवश्यक आहे. पचनसंस्थेच्या आणि इतर एकंदर आरोग्यासाठी हे आवश्यक आहे. जैन धर्मियांकडून उपासांचे शास्त्र शिकण्यासारखे आहे. निरनिराळया खिचडया व पदार्थ खाऊन केलेला उपास म्हणजे केवळ रूचिपालट असतो, उपवास नाही. *संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आयुष्यात अडचणी सोडविण्यास समर्थ असते तेच शिक्षण होय.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *एग्नेस गोक्झा बोजाक्झिऊ* हे नाव असणाऱ्या व्यक्तीस आपण कोणत्या नावाने ओळखतो ?२) युक्रेनला कोणत्या देशाद्वारे मानवतावादी मदत म्हणून 04BHIMA CUBE देण्यात आले ?३) केंद्राची युनिफाईड पेन्शन योजना लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे ?४) 'नारळ' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) २०२४ मध्ये कोणता ग्लोबल फूड ब्रँड रँकिंगमध्ये जगातील सर्वात मजबूत अन्न आणि दुग्धजन्य ब्रँड ठरला ? *उत्तरे :-* १) मदर तेरेसा २) भारत ३) महाराष्ट्र ४) श्रीफळ, नारिकेल ५) AMUL*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 सौ. योगिता रामानंद रामदिनवार, नांदेड👤 रवी शिंदे, इंग्रजी विषय तज्ञ, कुंडलवाडी👤 रवींद्र केंचे, क्रियाशील शिक्षक, अहमदनगर👤 गणेश येडमे👤 शिवराज पाटील चोळाखेकर, अ. भा. छावा तालुकाध्यक्ष, धर्माबाद👤 सचिन बावणे👤 ईश्वर शेटीये, ब्रह्मपुरी, चंद्रपूर👤 गणेश राऊत👤 विनायक कुंटेवाड👤 अनिरुद्ध खांडरे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *हरिपाठ*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••साधुबोध झाला तो नुरोनियां ठेला । ठायींच मुराला अनुभवें ॥१॥ कापुराची वाती उजळली ज्योति । ठायींच समाप्ति झाली जैसी ॥२॥ मोक्षरेखे आला भाग्यें विनटला । साधूंचा अंकिला हरिभक्त ॥३॥ ज्ञानदेवा गोडी संगति सज्जनीं । हरि दिसे जनीं वनी आत्मतत्वीं |4| ।। संत ज्ञानेश्वर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एकमेकांची काळजी घेतली पाहिजे असे बरेचजण म्हणत असतात. हा एक समाजसंकेत आहे. पण त्याच वेळेला आपण आपल्याच घरातील माणूस आजारी असताना त्याची का बरं काळजी घेत नाही. ..? हा एक प्रश्नच आहे. एकदा तो माणूस बरा झाल्यावर मात्र वेळात, वेळ काढून दिखावूपणा करुन काळजी घेण्यात काय अर्थ...? म्हणून काळजी करायची असेल किंवा सेवा करायची असेल तर आपल्या मनात आपुलकी व त्या माणसासाठी वेळ असणे आवश्यक आहे आणि आज ती अत्यंत काळाची गरज आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••धर्मएकदा एका राजाने दवंडी पिटवली की जो कोणी मला सर्वश्रेष्ठ धर्माचे महत्व समजावून सांगेल त्याला मी मोठे बक्षीस देईन व तो धर्म मी स्वीकारेन. ही वार्ता ऐकताच सगळीकडे मोठमोठे धर्मगुरु, धर्मोपदेशक, आचार्य राजाला आपल्या धर्माचे महत्व समजावून सांगण्यासाठी येऊ लागले. ते सर्वच जण एकच गोष्ट आठवणीने करत होते की स्वत:च्या धर्माचे महत्व सांगताना मात्र दुस-याला धर्माला कमी लेखत होते. दुस-याच्या धर्माची निंदानालस्ती करत होते. यातून एकच झाले की, राजाला काहीच कळेना की कोणता धर्म सर्वश्रेष्ठ आहे व त्यामुळे तो दु:खी होत होता. पण त्याने शोध सुरुच ठेवला. वर्षानुवर्षे हाच क्रम चालू राहिला. राजा वृद्ध होत चालला. शेवटी राजा एका साधूच्या दर्शनास गेला. तेथे गेल्यावर त्याने साधूला नमस्कार केला व म्हणाला,''साधूमहाराज, मी सर्वश्रेष्ठ धर्माच्या शोधात आहे पण आजपर्यंत मला सर्वश्रेष्ठ धर्म कोणता हेच कळाले नाही.'' साधूने राजाकडे पाहिले व म्हणाले,''सर्वश्रेष्ठ धर्म तर जगात अस्तित्वातच नाहीत. जगात एकच धर्म आहे आणि बाकी सगळे हे त्या धर्माला फुटलेले अहंकार आहेत. धर्म तर तोच असतो जिथे व्यक्ती निष्पक्ष असतो, पक्षपात करणा-या मनात धर्म राहूच शकत नाही.'' साधूचे हे बोलणे ऐकून राजा प्रभावित झाला. साधू पुढे जाऊन राजाला म्हणाला,''राजन, चला आपण नदी पार करून पलीकडे जाऊया'' नदीतीरावर दोघे पोहोचले, त्यांनी तिथे अनेक सुंदर नावा (होडया) पाहिल्या. साधू राजाला म्हणाले,'' राजे, चला आपण एका सर्वश्रेष्ठ नावेतून पैलतीर गाठूया'' प्रत्येक नावेपाशी जाताच साधू त्या नावेबद्दल काही ना काही चुक दाखवित असे व पुढे जात असे. असे करता करता दुपार झाली. राजाला भूक लागली व त्रासून राजाने साधूला म्हटले,''महाराज आपल्याला नावेतून फक्त पलीकडे जायचे आहे, अहो इतकी छोटी नदी आहे की पोहूनसुद्धा आपण पटकन पलीकडे पोहोचून जाऊ मग त्याची इतकी चर्चा कशाला'' साधूने राजाकडे पाहिले व म्हणाले,'' राजन, हेच तर मला तुम्हाला सांगायचे आहे. धर्माला नाव नसतेच, धर्म आपल्याला स्वत:ला पोहून पार करायचा असतो. दुसरा कोणी आपल्याला धर्मापलिकडे पोहोचवू शकत नाही. आपल्यालाच जावे लागते.'' राजा सर्व काही समजून चुकला.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment