✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 30 ऑगस्ट 2024💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - *तुझी जात कंची ?* https://www.facebook.com/share/p/zpmUgRkrUgcrGFGj/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🟠 *_ या वर्षातील २४३ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🟠 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟠••••••••••••••••••••••••••••••••• *१९७९: सुमारे दहा लाख हायड्रोजन बॉम्बच्या स्फोटांएवढी ऊर्जा निर्माण करुन ’हॉवर्ड-कुमेन-मायकेल्स’ हा धूमकेतू सूर्याच्या पृष्ठबागावर आदळला. सूर्याच्या पृष्ठभागावर धूमकेतू आदळण्याची मानवी इतिहासातील ही पहिली नोंद आहे.**१९७५: पहिले बालकुमार साहित्य संमेलन पुणे येथे भा.रा.भागवत यांच्या अध्यक्षतेखाली भरले**१९४५: दुसरे महायुद्ध - ब्रिटिश सैन्याने हाँगकाँगची जपानच्या अधिपत्यातुन सुटका केली.**१८३५: अमेरिकेतील ह्युस्टन शहराची स्थापना झाली.**१८३५: ऑस्ट्रेलियातील मेलबर्न शहराची स्थापना झाली.*🟠 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟠•••••••••••••••••••••••••••••••••*१९९१: गुररंजोत सिंग रंधावा-- भारतीय गायक, गीतकार आणि संगीतकार**१९७७: अनंत ढवळे -- गझलकार**१९७३: डॉ.कल्पना मनोहर नरांजे-- लेखिका**१९७०: प्रा.डॉ.मधुकर विठोबाजी नंदनवार- लेखक**१९६९: दिलीप सीताराम पाटील-- कवी* *१९६७: प्रा. डॉ. म .सु. पगारे -- विचारवंत, साहित्यिक, संशोधक**१९६५: विजयकुमार दळवी -- लेखक , पत्रकार**१९५८: दिलिप भाऊराव पाटील-- कवी, लेखक,अनुवादक* *१९५६: विजय सीताराम सोनारघरे -- लेखक* *१९५३:गौरी माहुलीकर -- संस्कृततज्ज्ञ, संशोधक, लेखिका**१९५३: अरविंद रामचंद्र बुधकर -- लेखक* *१९३७: शुभा खोटे-- मराठी अभिनेत्री* *१९३६: जमुना -- भारतीय अभिनेत्री, दिग्दर्शक आणि राजकारणी( मृत्यू: २७ जानेवारी २०२३ )* *१९३४: बाळू गुप्ते – लेग स्पिन गोलंदाज (मृत्यू: ५ जुलै २००५ )**१९३०: दशरथ पुजारी – संगीतकार (मृत्यू: १३ एप्रिल २००८ )**१९३०: वॉरन बफे – अमेरिकन उद्योगपती आणि दानशूर**१९२३: शंकरदास केसरीलाल ऊर्फ ’शैलेन्द्र’ – गीतकार (मृत्यू: १४ डिसेंबर १९६६ )**१९१८: म. म. बाळशास्त्री हरदास -- लेखक, ज्ञानक्षेत्रातील भाष्यकार (मृत्यू: ११ऑगस्ट१९६७ )**१९१७: आत्माराम पांडुरंग नारायणगावकर --गायक व लेखक (मृत्यू: २३ ऑक्टोबर २००१ )**१९०४: नवल होर्मुसजी टाटा – उद्योगपती, पद्मभूषण [१९६९](मृत्यू: ५ मे, १९८९ )**१९०३: भगवतीचरण वर्मा – हिन्दी कथाकार, कादंबरीकार,कवी,एकांकिकाकार, पटकथाकार व नाटककार (मृत्यू: ५ आक्टॊबर १९८१ )**१८९८: अनंत सदाशिव आळतेकर -- प्राचीन भारतीय इतिहासाचे जागतिक कीर्तीचे संशोधक (मृत्यू: २५ नोव्हेंबर १९५९ )**१८८३: जगन्नाथ गणेश गुणे तथा स्वामी कुवलयानंद – योगविद्येचे पुरस्कर्ते व शारीरिक शिक्षणतज्ञ (मृत्यू: १८ एप्रिल १९६६ )**१८७१: अर्नेस्ट रुदरफोर्ड – नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: १९ आक्टोबर १९३७ )**१८५०: काशिनाथ त्र्यंबक तेलंग – प्राच्यविद्या संशोधक,न्यायमूर्ती, ्समाजसुधारक,मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू (१८९२),भगवद्गीतेचा त्यांनी इंग्रजीत अनुवाद केला.(मृत्यू:१ सप्टेंबर १८९३ )**१५६९: जहांगीर – ४ था मुघल सम्राट (मृत्यू: २८ आक्टोबर १६२७ )* 🟠 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟠••••••••••••••••••••••••••••••••• *२०२२: मिखाईल सेर्गेयेविच गोर्बाचेव -- माजी सो सोव्हिएत संघाचा राष्ट्रप्रमुख(जन्म: २ मार्च १९३१ )**२०२१: सदाशिव साठे (भाऊ साठे)-- भारतीय शिल्पकार(जन्म: १७ मे १९२६ )**२०२१: वासुदेव जगन्नाथ परांजपे -- भारतीय क्रिकेटपटू (जन्म: २१ नोव्हेंबर १९३८ )**२०१६: विनायक गजानन कानिटकर (ग्यानबा.रा.म.शास्त्री)-- मराठी विचारवंतलेखक (जन्म: २६ जानेवारी १९२६ )* *२००३: चार्ल्स ब्रॉन्सन – अमेरिकन अभिनेता (जन्म: ३ नोव्हेंबर १९२१ )**१९९८: नरहर वामन तथा ’नरुभाऊ’ लिमये – स्वातंत्र्यसैनिक, निर्भिड पत्रकार व काँग्रेसचे तत्त्वनिष्ठ नेते (जन्म: ८ नोव्हेंबर १९०९ )**१९९४: शंकर गोपाळ तथा शं. गो. तुळपुळे – प्राचीन मराठी भाषेचे गाढे व्यासंगी,संत वाङ्मयाचे अभ्यासक व संशोधक, पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख (जन्म: ५ फेब्रुवारी १९१४ )**१९८५: न्या. राम केशव रानडे -- अध्यात्माचे अभ्यासक, होते,न्यायमूर्ती (जन्म: २२ फेब्रुवारी १९०८ )**१९८१: जयंत पांडुरंग तथा ’जे. पी.’ नाईक – शिक्षणतज्ञ, ’इंडियन इन्स्टिट्युट ऑफ एज्युकेशन’चे संस्थापक, ’नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग’चे संस्थापक (जन्म: ५ सप्टेंबर १९०७ )**१९४७: नारायण मुरलीधर गुप्ते ऊर्फ ’कवी बी’ – त्यांची ‘चाफा बोलेना, चाफा चालेना ...‘ ही कविता खूप प्रसिद्ध आहे.(जन्म: १ जून १८७२ )**१९४०: सर जे. जे. थॉमसन –इलेक्ट्रॉनच्या शोधाबद्दल १९०७ चे नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: १८ डिसेंबर १८५६ )**१८७७: तरुलता दत्ता (जोतोरू दत्त) -- भारतीय बंगाली कवी आणि अनुवाद (जन्म: ४ मार्च१८५६ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*तुझी जात कंची ?*जात अशी आहे की, काही केल्या जात नाही. तिचेच नाव जात आहे............... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *देशभरात 5 दिवस पासपोर्ट सेवा पोर्टल राहणार बंद, 2 सप्टेंबरपर्यंत सुविधा बंद, तांत्रिक देखभालीमुळं निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *छत्रपती शिवरायांची एकदा नव्हे 100 वेळा माफी मागायला कमीपणा वाटणार नाही, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया, शिवरायांचा मजबूत, भक्कम आणि भव्य पुतळा पुन्हा उभारणार मुख्यमंत्र्यांचा निर्धार*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचे 29 सप्टेंबरपासून पुन्हा उपोषण, फडणवीसांचे 113 आमदार पाडण्याचा निर्धार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राज्यातील 7 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या ; मनीषा आव्हाळेंवर पुण्यात मोठी जबाबदारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *सर्वांसाठी परवडणारी घरं बनवणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शब्द, म्हाडाची घरं 10 ते 15 लाखांनी स्वस्त !*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *नाशिक-नगरकरांनी सोडला नि:श्वास ! जायकवाडी धरणानं ओलांडली 65 टक्क्यांची पातळी, समन्यायी पाणीवाटपाचा तेढ सुटला*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *मुंबई क्रिकेटच्या पंढरीत रमाकांत आचरेकरांचे स्मृतीशिल्प उभारण्यास मान्यता; सचिन तेंडुलकर भावूक, राज्य सरकारचे मानले आभार*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••'झाले बहू... होतील बहू...' छत्रपती शिवाजी महाराजांचा अंश असलेली मराठमोळी नावेछत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत. महाराजांच्या जीवनाचा प्रभाव हा प्रत्येकाच्या जीवनावर आहे. असं असताना ही परंपरा आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावी, महाराज पुढच्या पिढीला कळावी असं प्रत्येकाला वाटत असतं. अशावेळी अनेकजण महाराजांच्या नावावरुन आपल्या मुलांची नावे ठेवू इच्छितात. अशा व्यक्तींसाठी महाराजांच्या नावातून निर्माण झालेली नवीन युनिक अशी नावे. यामध्ये महाराजांच्या नावावरुन मुलींची नावे आणि मुलांची नावे असे युनिक नावे सांगितले आहेत. शिवांश- 'शिव' आणि 'अंश' या नावातून शिवांश हे नाव तयार झालं आहे. या नावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा झळकते. राजशिव - राज म्हणजे राजा. शिव म्हणजे शिव शंकर. या दोघांच्या नावातून हे 'राजशिव' हे नाव तयार झालं आहे.वीरशिव - वीर असा या नावात उल्लेख आहे. वीर म्हणजे शूर आणि शिव म्हणजे शिव शंभो. छत्रपती शिवाजी महाराज हे शिव शंकराचे भक्त होते. त्यांच्याप्रमाणे विरता आणि शूरता तुमच्या बाळामध्ये असावी असा या नावाचा अर्थ आहे. शिवराज - शिवराज हे अतिशय मराठमोळ पारंपरिक नाव आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा रुबाब या नावामध्ये पाहायला मिळतो. शिवांग - शिवाचा अंग असा तो शिवांग. शिवाजी महाराजांसोबत असलेले डिवाइन कनेक्शनयामध्ये पाहायला मिळतं. राजमुद्रा - राजमुद्रा हे नाव महाराजांच्या जीवनाशी जोडलेले असे आहे. मुद्रा, शिवाजी महाराजांच्या काळातील एक शिक्कामोर्तब. शिवेंद्र - शिव आणि इंद्र असा याचा उल्लेख आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाशी निगडीत हे नाव मुलासाठी निवडा. राजयश - राज्य हे छत्रपतींच्या काळातील म्हणजे खऱ्या अर्थाने गोकुळ. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील नियम असा या नावाचा अर्थ आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची आणखी काही नावे मुलांसाठीशिवाजी, स्वराज, शिवांश, शिवबा, शिवांक, शिवेंद्र, शिवम, शिवतेज, शिवशंकर, शिवानंद, शिवजित, शिवराज, शिवाक्ष, शिवशंभू, शिवार्थ, शिवंकरछत्रपती शिवाजी महाराजांची मुलींसाठी नावे हिंदवी, शिवश्री, शिवानी, शिवांजली, शिवांगी, शिवजा, शिवन्या, शिविका*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्याच्या सोबतीला सुंदर विचार असतात तो कधीच एकटा नसतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) शाळेची बस ही पिवळ्या रंगाचीच का असते ?२) जगातील सर्वात वयोवृद्ध महिला कोण ?३) कोणत्या देशाने 'राईट टू डिस्कनेक्ट कायदा' पास केला आहे ?४) 'निर्जन' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) ICC चे अध्यक्ष म्हणून बिनविरोध कोणाची निवड झाली आहे ? *उत्तरे :-* १) सावधानतेचा इशारा, मोटार वाहन नियम १९७८ च्या नियम १७८ नुसार, आनंद व उत्साहाचा प्रतीक २) तोमिको इतुका ( जपान, ११६ वर्ष ९९ दिवस ) ३) ऑस्ट्रेलिया ४) ओसाड ५) जय शाह, भारत *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 नागभूषण मॅकावाड, येवती👤 दिलीप झरेकर, शिरूर👤 माधुरी हतनुरे, धर्माबाद👤 नीरज नागभूषण दुर्गम, नांदेड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *हरिपाठ*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••पर्वताप्रमाणे पातक करणें । वज्रलेप होणें अभक्तासी ॥१॥ नाहीं ज्यांसी भक्ति ते पतित अभक्त । हरिसी न भजत दैवहत ॥२॥ अनंत वाचाळ बरळती बरळ । त्यां कैंचा दयाळ पावे हरि ॥३॥ ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान । सर्वांघटीं पूर्ण एक नांदे ॥४॥ ।। संत ज्ञानेश्वर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवन जगत असताना एकटे पडल्यावर जास्त दु:खी होऊ नये. कारण शेवटपर्यंत कोणीच, कोणाचे आधार नसतात. भलेही आपल्यापाशी सर्व काही असेल तरी वेळ प्रसंगी कामी पडत नाही म्हणून आपले काहीच नसते. मनुष्य प्राण्याचे जीवन मिळाले यातच सर्व काही बघण्याचा प्रयत्न करावा. कधी काळी सांगता येत नाही त्या केलेल्या प्रयत्नामुळे कधी नं संपणारी संपत्ती सुद्धा मिळू शकते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *संस्कारीत मुलेच यशस्वी*नैतिक मूल्यांचे शिक्षण देणा-या एका शिक्षकाने मुलांसाठी चॉकलेटस मागवली होती. त्यांनी सगळ्या मुलांना रांगेत बसवले होते. शिक्षक चॉकलेटस वाटायला सुरुवात करणार इतक्यात शाळेचा शिपाई त्या वर्गात येऊन पोहोचला व म्हणाला,''सर तुम्हाला आताच्या आत्ता प्राचार्यांनी काही महत्वाचे सांगण्यासाठी त्यांच्या कार्यालयात बोलावले आहे.'' शिक्षकांनी चॉकलेटचा डबा हातातून खाली ठेवला व मुलांना म्हणाले,'' मुलांनो मला काही कामासाठी प्राचार्यांकडे जावे लागत आहे. खरेतर ही चॉकलेटस मला माझ्या स्वत:च्या हाताने तुम्हाला द्यायची खूप इच्छा होती. परंतु मला जावे लागणार आहे. पाहिजे तर तुम्ही हाताने चॉकलेटस घेऊ शकता. अन्यथा मी परत आल्यावर तुम्हाला देईन'' ही चांगली संधी आहे. असा काही विद्यार्थ्यांनी विचार केला व त्यांनी चॉकलेटस स्वत:च्या हाताने घेऊन खाल्ली तर काही विद्यार्थ्यांनी शिक्षकांची वाट बघण्यात वेळ घालविला. शिक्षक परत आले व त्यांनी मुलांना विचारले,'' मुलांनो ज्यांनी ज्यांनी स्वत:च्या हाताने चॉकलेटस खाल्ली त्यांनी आपले हात वर करा'' ज्यांनी चॉकलेटस खाल्ली होती त्यांनी हात वर केले. मग शिक्षकांनी उरलेल्या मुलांना प्रेमाने चॉकलेटस वाटली. काही वर्षानंतर त्या शिक्षकांनी त्या विद्यार्थ्यांची माहिती मिळविली तेव्हा त्यांना असे दिसून आले की ज्या मुलांनी स्वत:च्या हाताने चॉकलेटस घेतले होते ती मुले सामान्य स्वरूपातील कामे करून उदरनिर्वाह करत होते तर ज्यांना शिक्षकांनी चॉकलेटस दिली ते सर्व विद्यार्थी उच्च पदावर काम करत होते. ही सर्व संस्कारांची देणगी होती.तात्पर्य :- संस्काराने माणूस घडतो. मिळालेली संधी आणि तिचा योग्य वापर करणे हे मानवाच्या हाती आहे. चुकीच्या मार्गाने गेल्यास व संयम न पाळल्यास योग्य संधी मिळूनही तिचा वापर करता येत नाही.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment