✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 02 सप्टेंबर 2024💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - पोळा https://www.facebook.com/share/p/qX6erzgJNaPjGUua/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*💧जागतिक नारळ दिवस 💧**💧बैल पोळा निमित्ताने शुभेच्छा 💧*•••••••••••••••••••••••••••💧 *_ या वर्षातील २४६ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 💧 *_महत्त्वाच्या घटना:_* 💧••••••••••••••••••••••••••••••••• *१९९९: भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ही इंग्लिश खाडी दोनदा पोहणारी आशियातील पहिली महिला ठरली.**१९४६: भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.**१९४५: व्हिएतनामने (जपान व फ्रान्सपासुन) स्वातंत्र्य घोषित केले.**१९३९: दुसरे महायुद्ध – जर्मनीने पोलंडमधील डांझिग शहर ताब्यात घेतले.**१९२०: कोलकाता येथे महात्मा गांधींनी ब्रिटिश सरकारविरुद्ध असहकार आंदोलन सुरू केले.**१९१६: पाटणा उच्च न्यायालयाची स्थापना* 💧 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस_* 💧•••••••••••••••••••••••••••••••••*१९८८: इशांत शर्मा -- भारतीय क्रिकेटपटू**१९८२: प्रा. लता बिरु एवळे-- कवयित्री, लेखिका**१९७६: उत्तम शंकर सावंत -- कवी**१९७३: रवींद्र तुकाराम पाटील -- लेखक**१९७१: सरोज प्रभाकर आल्हाट -- कवयित्री लेखिका* *१९७०: प्राचार्य डॉ.पवन भाऊ मांडवकर-- कवी, कथाकार, कादंबरीकार* *१९६९: अलका बडोला कौशल -- भारतीय अभिनेत्री आणि निर्माती* *१९६६: नितीन आरेकर -- लेखक**१९६२: पुष्पा कृष्णाजी कोल्हे -- लेखिका**१९६०: नितीन विनायक देशमुख -- कवी* *१९५२: जिमी कॉनर्स – अमेरिकन लॉन टेनिस खेळाडू**१९५२: एकनाथ खडसे -- माजी महसूल मंत्री**१९५२: डॉ. अनिल कुमार मेहंदळे -- लेखक, गीतकार, समीक्षक* *१९४९: वामन हरी पांडे -- लेखक* *१९४७: प्रा. मोतीराम राठोड -- विचारवंत, लेखक,सामाजिक कार्यकर्ते (मृत्यू: १९ आगस्ट २०१९ )**१९४३: शुभदा शरद गोगटे -- मराठी साहित्यातील एक प्रथितयश लेखिका**१९४३: मुकुंद रघुनाथ दातार -- समीक्षक, संपादक, कवी,संतसाहित्याचे अभ्यासक**१९४१: साधना शिवदासानी ऊर्फ ’साधना’ – चित्रपट अभिनेत्री**१९२८: कुसुम देशमुख -- कवयित्री, लेखिका* *१८८६: प्रा.श्रीपाद महादेव तथा श्री. म. माटे – साहित्यिक, विचारवंत व अस्पृश्यता निवारणासाठी सतत प्रयत्न करणारे कृतिशील समाजसुधारक.(मृत्यू: २५ डिसेंबर १९५७ )**१८७७: फ्रेडरिक सॉडी – नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ (मृत्यू: २२ सप्टेंबर १९५६ )**१८४५: डॉ. अण्णा मोरेश्वर कुंटे -- लेखक, वैद्यकशास्त्राचे अभ्यासक (मृत्यू: १५ जुलै१८९६ )* 💧 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन_* 💧•••••••••••••••••••••••••••••••••*२०२१: सिद्धार्थ शुक्ला -- भारतीय अभिनेता, मॉडेल ( जन्म: १२ डिसेंबर १९८० )**२०१७: शिरीष व्यंकटेश पै -- मराठी कवयित्री, लेखिका आणि नाटककार (जन्म: १५ नोव्हेंबर १९१९ )* *२०११: श्रीनिवास खळे – जेष्ठ प्रसिद्ध संगीतकार (जन्म: ३० एप्रिल १९२६ )**२००९: आंध्र प्रदेशचे १४ वे मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी यांचे विमान अपघातात निधन (जन्म: ८ जुलै १९४९ )**१९९९: डी. डी. रेगे – चित्रकार व लेखक, लोकसभा व विधानसभेतील अनेक राष्ट्रपुरुषांची चित्रे त्यांनी काढलेली आहेत. (जन्म: १७ डिसेंबर १९११ )**१९९०: नरहर शेषराव पोहनेरकर – कवी, कथाकार,कादंबरीकार,संशोधक आणि 'मराठवाडय़ाचा चालताबोलता इतिहास' (जन्म: ३ आक्टोबर १९०७ )**१९७६: विष्णू सखाराम तथा ’वि. स.’ खांडेकर – सुप्रसिद्ध मराठी लेखक,कादंबरीकार, लघुनिबंधकार व समीक्षक, १९४१ मध्ये सोलापूर येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष,त्यांच्या ’ययाति’ या कादंबरीसाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार (१९७४) (जन्म: १९ जानेवारी १८९८ )**१९६९: हो ची मिन्ह – व्हिएतनामचे राष्ट्रपती (जन्म: १९ मे १८९० )**१९६०: डॉ.शंकर पुरुषोत्तम आघारकर – वनस्पतीतज्ञ, ’विज्ञानवर्धिनी महाराष्ट्र’ (MACS) या संस्थेचे संचालक**१९३७: वासुदेवशास्त्री लक्ष्मणशास्त्री पणशीकर -- संपादक, प्रकांड पंडित(जन्म: ३० मे १८६० )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*बैलांचा सण : पोळा*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी रविवारी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या 75 व्या वर्धापनदिनाच्या स्मरणार्थ नवीन ध्वज आणि चिन्हाचे केले अनावरण*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *सातारा जिल्ह्यातील मान्याची वाडी ठरले राज्यातील पहिले सौरग्राम गाव*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *नांदेड : राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आवश्यक असणाऱ्या मतदार यंत्रांची तपासणी करून ते मतदानासाठी सज्ज करण्यात आले आहेत.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पुणे :- डॉ. प्रभा अत्रे शास्त्रीय संगीत पुरस्काराने देवकी पंडित सन्मानित:विज्ञान-तंत्रज्ञानाबरोबर कलांचे शिक्षण देणारी संयुक्त प्रणाली असावी - डॉ. विजय भटकर*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पुणे :- स्त्री आधार केंद्रातर्फे महिला स्वयंसेवकांसाठी महिला सुरक्षितता स्वयंसेवक प्रशिक्षण, महिला सुरक्षितता कार्यक्रम राबवण्यासाठी डॉ.नीलम गोऱ्हे यांचे महिलांना मार्गदर्शन*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *हिंगोलीत पावसाचा कहर, पुरात 9 जण अडकले, बचाव पथकासह हेलिकॉप्टरला पाचारण, उपजिल्हाधिकाऱ्यांचं मंत्रालयाला पत्र*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *पॅरालिम्पिक : बॅडमिंटनमध्ये मनीषा रामदासची जपानच्या मामिको टोयोडाचा पराभव करत उपांत्य फेरीत धडक*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*नारळाची उपयुक्तता*ओल्या नारळाच्या गरामध्ये प्रथिने, तेल आणि इतर काही ऑग्रेनिक तत्त्व असतात, त्यामुळे त्वचेला त्याचा फायदा होतो. निस्तेज व कोरडी त्वचा असलेल्यांनी नारळाच्या पाण्यामध्ये दुधावरील थोडी साय मिसळून त्याने त्वचेला हळुवार हाताने मसाज करावा, त्वचा ग्लो करेल. नारळाचे पाणी व दूध त्वचेच्या क्लिझगसाठीही उपयुक्त ठरतात . कोरडेपणामुळे जेव्हा त्वचा काळवंडलेली, निस्तेज आणि रखरखीत वाटायला लागते तेव्हा नियमित नारळाच्या दुधाने चेह-याला मसाज केल्यास त्वचा पुन्हा स्निग्ध तुकतुकीत दिसायला लागते.गर्भधारणेनंतर - नारळाच्या पाण्याविषयी एक अतिशय महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे गर्भधारणेनंतर आठवडयातून दोन-तीन वेळा नारळाचे पाणी नियमित प्यायल्यास बाळाची कांती सुधारते आणि बाळाचा रंग उजळतो. शिवाय टॉनिक म्हणूनही ते उपयुक्त आहे.*निरोगी हृदयसाठी -* हृदय हा शरीराचा खूप महत्त्वाचा भाग आहे. शरीर निरोगी ठेवण्यासाठी हृदय निरोगी असणे फार महत्त्वाचे असते. नारळ खूप पौष्टिक घटक आहेत जाणे हृदय निरोगी राहण्यास मदत मिळते. काही वेळेस डॉक्टर सुद्धा सांगतात कि नारळाचेसेवन केले पाहिजे म्हणून.*केसांसाठी उपयुक्त* -पावसाळ्यामध्ये केस धुणे म्हणजे एक मोठा प्रश्न असतो. केसासाठी नारळाचे पाणी अतिशय उपयुक्त आहे. केस धुण्यापूर्वी साधारण एक तास आधी नारळाचे पाणी केसांना आणि टाळूला चोळावे. यामुळे केस मुलायम होतातच, शिवाय केसांच्या मुळांचे पोषण होऊन केस गळण्याचे प्रमाण कमी होऊन केसांची वाढ होते.*वजन घटण्यास उपयुक्त -* नारळाच्या दुधात अधिक प्रमाणात फॅट्स असले तरी हे फॅट्स मीडियम चिल्ड फॅटी अॅसिड असतात. यामुळे हे फॅट्स शरीरात चरबीप्रमाणे साचत नाहीत. त्याचबरोबर नारळाच्या दुधामुळे बराच वेळ भुकेवर नियंत्रण राहते.*मेंदूची क्षमता वाढण्यास मदत मिळते*नारळामध्ये ब्रेन बुस्टिंग गुणधर्म आढळतात . जे पौष्टिक तत्त्व तुमच्या मेंदूच्या सेल्य्सला सक्रिय करतात. त्यामुळे तुमचा मेंदू अधिक चांगल्या पद्धतीने कार्य करायला लागतो. आणि स्मृती व बुद्धी तल्लख होते. आणि मेंदूची क्षमता वाढण्यास मदत मिळते.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*I. T. I. - Industrial Training Institute*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अर्धा तास रिकामे बसण्यापेक्षा कोणतीही काम केलेले अधिक बरे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) महाराष्ट्रातून *राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार* कोणाला जाहीर झाला आहे ?२) समुद्र तळाचा वेध घेण्यासाठी कोणती मोहीम राबवण्यात येणार आहे ?३) बहुजन समाज पक्षाच्या ( बसप ) राष्ट्रीय अध्यक्षपदी कोणाची एकमताने फेरनिवड झाली ?४) 'नीच या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) WHO च्या माहितीनुसार नेपाळचे कोणते शहर हे पहिले 'निरोगी शहर' आणि आशियातील दुसरे 'आरोग्यदायी शहर' बनले आहे ? *उत्तरे :-* १) मंतैया बेडके, गडचिरोली व सागर बागडे, कोल्हापूर २) समुद्रयान ३) मायावती ४) तुच्छ, अधम, चांडाळ ५) धुलिखेल*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 राजाराम राठोड, उपक्रमशील शिक्षक, नांदेड👤 किशोर तळोकार, साहित्यिक तथा शिक्षक, यवतमाळ👤 अनुजा देशमुख, साहित्यिक, नाशिक👤 प्रवीण इंगळे👤 शरद शेळकांडे👤 रवी भलगे👤 हणमंत भोसके👤 विठ्ठल पाटील*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *हरिपाठ*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••संतांचे संगतीं मनोमार्ग गति । आकळावा श्रीपति येणें पंथें ॥१॥ रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा । आत्मा जो शिवाचा राम जप ॥२॥ एकतत्व नाम साधिती साधन । द्वैताचें बंधन न बाधिजे ॥३॥ नामामृत गोडी वैष्णवां लाधली । योगियां साधली जीवनकळा ॥४॥ सत्वर उच्चार प्रल्हादीं बिंबला । उद्धवा लाधला कृष्णदाता ॥५॥ ज्ञानदेव म्हणे नाम हें सुलभ । सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे ॥६॥ ।। संत ज्ञानेश्वर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वेळ ही अनमोल असते. म्हणून वेळेचे महत्व जाणण्याचा प्रयत्न करावा. आपली माणसं सुखा, दुःखात साथ देत असतील तर कोणत्याही परिस्थितीत त्यांना विसरू नये. कारण परिस्थिती येते अन् निघून जाते पण, जी माणसं आपुलकीने साथ देऊन माणुसकी धर्म निभावून दाखवतात. पण, जेव्हा आपल्या विषयी सर्व काही कळल्यावर मात्र ते, स्वतः दु:खी होतात. जीवनात सर्व काही कमावता येते पण,आपुलकीचे माणसं एकदा दूर निघून गेले की, त्यांना परत आणता येत नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *पश्चाताप*मेहमूद नावाचा एक इराणी व्यापारी होता. एकदा त्याने मोठी पार्टी दिली. मध्यरात्रीपर्यंत खानपान चालू होते. या गर्दीत एक चोर हवेलीत येऊन लपला. मेहमूदने त्याला पाहिले होते. परंतु तो त्याला काहीच बोलला नाही. जेव्हा सगळे पाहुणे गेले तेव्हा त्याने नोकरास दोन व्यक्तिंचे जेवण लावण्याचे आदेश दिले. त्यानंतर लपून बसलेल्या चोराजवळ तो गेला. चोर घाबरला, मेहमूदने त्याला प्रेमाने जेवू घातले. त्यानंतर चोरी करण्याचा उद्देश विचारला. तेव्हा चोर म्हणाला, माझे नाव रमीझ आहे, मी श्रीमंत होतो पण दारूमुळे मी या अवस्थेत आलो आहे. मेहमूदने त्याला काही धन दिले आणि काही व्यवसाय चालू करण्याविषयी सुचविले. चोराने त्याचे म्हणणे ऐकले. दरम्यान काही वर्षे या गोष्टीला लोटली. एकदा तो मेहमूदकडे आला, मेहमूदने त्याला ओळखले नाही. चोर स्वत:च म्हणाला,तुम्ही चोरी सोडण्याविषयी सांगितल्यानंतर मी तुम्ही दिलेल्या पैशातून व्यापार सुरु केला. आज माझ्याकडे लाखोंची संपत्ती आहे. फक्त एक मेहरबानी करा. मी ज्यांच्याकडे चोरी त्यांचे पैसे परत करण्याची मला इच्छा आहे. त्यांचे पैसे परत केल्याने माझ्या मनावरील ओझे कमी होईल. मेहमूदने त्याला कोतवालाकडे नेले. कोतवाल त्याचे बोलणे ऐकून प्रभावित झाला. ज्यांच्याकडे त्याने चोरी केली होते त्यांची नुकसानभरपाई म्हणून दुपटीने पैसे दिले. लोकांनीही त्याला मोठ्या मनाने माफी दिली.*तात्पर्य :- केलेल्या वाईट कृत्यांचा पश्चाताप होणे ही मनुष्य असण्याची खूण होय.*वर्तमानपत्रातून संग्रहित•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment