✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 09 सप्टेंबर 2024💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/KR2ze6ghdEdEATcb/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🟨 *_ या वर्षातील २५३ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🟨 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟨•••••••••••••••••••••••••••••••••*२००९: ठीक ९ वाजुन ९ मिनिटे व ९ सेकंदांनी ’दुबई मेट्रो’चे उद्घाटन झाले.**२००१: व्हेनिस येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मीरा नायर दिग्दर्शित ’मॉन्सून वेडींग’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ’गोल्डन लायन’ पुरस्कार मिळाला.**१९९७: सात वेळा राष्ट्रीय विजेतेपद मिळवलेल्या प्रवीण ठिपसे याला बुद्धिबळातील सर्वोच्च असा ’ग्रँडमास्टर’ किताब देण्याची घोषणा जागतिक बुद्धिबळ महासंघाने केली.**१९९१: ताजिकिस्तानने आपण (सोविएत युनियनपासुन) स्वतंत्र असल्याचे घोषित केले.**१९९०: श्रीलंकन सैन्याने बट्टिकलोआ येथे १८४ तामिळींची हत्या केली.**१९८५: मूकबधिर जलतरणपटू तारानाथ शेणॉय याने तिसर्यांदा इंग्लिश खाडी पोहून पार करुन विक्रम केला.**१९४५: दुसरे चीन जपान युद्ध – जपानने चीनसमोर शरणागती पत्करली.**१९३९: मुंबईच्या ’सेंट्रल’ सिनेमामधे ’प्रभात’चा ’माणूस’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. फिल्म जर्नॅलिस्टस असोसिएशनने १९३९ सालातील सर्वोत्कृष्ट चित्रपट असा बहुमान त्याला दिला.**१८५०: कॅलिफोर्निया हे अमेरिकेचे ३१ वे राज्य बनले.**१८३९: जॉन हर्षेल याने जगातील पहिले छायाचित्र काचेच्या पट्टीवर घेतले.* 🟨 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟨•••••••••••••••••••••••••••••••••••••• *१९८८: ऋतुजा बागवे -- भारतीय अभिनेत्री आणि नृत्यांगना**१९७९: प्रा.डॉ. प्रभाकर गणपतराव जाधव -- लेखक**१९७८: जान्हवी प्रभू-अरोरा -- मराठी या गायिका**१९७४: मंदार आपटे-- भारतीय मराठी गायक आणि संगीतकार**१९७४: कॅप्टन विक्रम बत्रा -- भारतीय सेनादलातील एक अधिकारी, कारगिल (काश्मीर) येथील कारवाई दरम्यान दाखवलेल्या शौर्याबद्दल त्यांना भारताचा सर्वोच्च शौर्य पुरस्कार परमवीरचक्र हा मरणोत्तर प्रदान करण्यात आला (मृत्यू:६ जुलै १९९९)**१९७२: प्रा. डॉ. अजय खडसे -- कवी, लेखक* *१९७२: विशाखा पाटील -- लेखिका**१९७२: डॉ.महेंद्र सुदाम कदम -- प्रसिद्ध लेखक, कवी, समीक्षक**१९७१: संजय रामदास महल्ले -- प्रसिद्ध वऱ्हाडी लेखक**१९६७: अक्षयकुमार (जन्म नाव:राजीव हरीओम भाटिया) --- भारतीय हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता**१९६१: प्रा. डॉ. सतीश शिरसाठ --- कवी, लेखक* *१९५४: जीवन महादेव खोब्रागडे -- कवी**१९५३: दादाकांत धनविजय -- लेखक, नाटककार, दिग्दर्शक, कलावंत**१९५१: प्रा. श्याम मानव -- अंधश्रद्धा विरोधी चळवळीचे संस्थापक-राष्ट्रीय संयोजक, तर्कवादी, तत्वज्ञानी, व्यक्तिमत्व विकास मार्गदर्शक* *१९५०: श्रीधर फडके – प्रसिद्ध संगीतकार व गायक**१९४८: शालिनीताई देवराव मांडवधरे- कवयित्री* *१९४८: दि. मा. देशमुख -- प्रसिद्ध कवी, लेखक**१९४१: अबीद अली – अष्टपैलू क्रिकेटपटू**१९३९: डॉ.मल्हार गंगाधर कावळे -- कादंबरीकार, कथाकार**१९३८: डॉ. संभाजीराव सावळाराम भोसले -- सुप्रसिद्ध साहित्यिक* *१९३५: विद्या हनुमंतराव नाडगौडा -- लेखिका**१९३१: मदनलाल द. शिंगवी -- कवी* *१९२९: डॉ. केशव वामन आपटे -- चरित्रकार, लेखक* *१९२५: पुरुषोत्तम दास जलोटा -- भारतीय शास्त्रीय आणि भक्ती संगीत गायक (मृत्यू: १८ जानेवारी २०१८ )**१९१९: प्रा. डॉ. अनंत गणेश जावडेकर -- तत्वज्ञान विषयांचे अभ्यासक, लेखक* *१९१८: मुरलीधर गजानन पानसे -- लेखक, संशोधक, संपादक (मृत्यू: २२ ऑगस्ट १९७० )**१९०९: लीला चिटणीस – अभिनेत्री (मृत्यू: १४ जुलै २००३ )**१९०९: मेहबूब खान -- भारतीय चित्रपटसृष्टीतील एक अग्रणी निर्माता-दिग्दर्शक (मृत्यू: २८ मे १९६४ )**१९१०: नवलमल फिरोदिया – गांधीवादी, स्वातंत्र्यसैनिक आणि उद्योगपती (मृत्यू: २६ मार्च १९९७ )**१८९६: श्यामलाल गुप्त -- हिंदी भाषेतील कवी होते. यांनी "झंडा ऊँचा रहे हमारा" हे हिंदी भाषेतील गीत रचले (मृत्यू: १० ऑगस्ट १९७७ )**१८५०: भारतेंदू हरिश्चंद्र – आधुनिक हिन्दी साहित्याचे जनक मानले जाणारे हिन्दी साहित्यिक (मृत्यू: ६ जानेवारी १८८५ )**१८२८: लिओ टॉलस्टॉय – रशियन लेखक (मृत्यू: २० नोव्हेंबर १९१० )* 🟨 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟨•••••••••••••••••••••••••••••••••••••• *२०१२: पंडित मनोहर वासुदेव चिमोटे- विख्यात हार्मोनियमवादक (जन्म: २७ मार्च १९२९ )**२०१२: व्हर्गिस कुरियन – भारतीय दुग्धोत्पादनातील 'धवल क्रांती’चे जनक, ’अमूल’चे संस्थापक, पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण,रॅमन मॅगसेसे पारितोषिक विजेते (जन्म: २६ नोव्हेंबर १९२१ )**२०१०: वसंत नीलकंठ गुप्ते – समाजवादी कामगारनेते, लेखक व समाजवादाचे अभ्यासक (जन्म: ९ मे १९२८ )**२००१: अफगणिस्तानचे उपराष्ट्राध्यक्ष व परराष्ट्रमंत्री अहमदशाह मसूद यांची हत्या (जन्म: २ सप्टेंबर १९५३ )**१९९७: आर. एस. भट – ’युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया’चे पहिले अध्यक्ष* *१९७६: माओ त्से तुंग – आधुनिक चीनचे शिल्पकार,मुत्सद्दी,मार्क्सवादी-लेनिनवादी विचारसरणीचे पुरस्कर्ते (जन्म: २६ डिसेंबर १८९३ )**१९६०: अली सिकंदर ऊर्फ ’जिगर मोरादाबादी’ – उर्दू कवी व शायर (जन्म: ६ एप्रिल १८९० )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आई म्हणजे संस्काराची खाण*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 सप्टेंबर रोजी करणार जम्मू काश्मीरचा दौरा, निवडणूक रॅलीना संबोधित करणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांची भाजपा ला सोडचिठ्ठी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *वारकरी संप्रदाय हा समाज प्रबोधनाची व सन्मार्गाची दिशा देणारा - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय, 90 दिवसांसाठी हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास केंद्राची मान्यता, सोयाबीनला 4 हजार 892 रुपयांचा हमी भाव मिळणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *अमरावतीच्या अर्थ व सांख्यिकी विभागाचे सहसंचालक पद पहिल्यांदाच महिलेकडे, संध्या गवई यांनी स्वीकारला पदभार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *संपूर्ण मराठवाड्यात मुसळधार पाऊस पडणार, संध्याकाळी वादळी वाऱ्यांची शक्यता, हवामान विभागाचा इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *पॅरालिम्पिकमध्ये भारताची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी, 7 सुवर्णपदकांसह केली 29 पदकांची कमाई*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••रिकाम्या पोटी हे फळं खाऊ शकताकिवी- किवीमध्ये भरपूर पोषक असतात जे तुम्ही रिकाम्या पोटी खाऊ शकता. डेंग्यूच्या आजारात किवी खूप चांगली आहे. यामुळे पचनक्रिया बरोबर राहते आणि शरीराला भरपूर ऊर्जाही मिळते.सफरचंद - रिकाम्या पोटी तुम्ही सफरचंद आरामात खाऊ शकता. यामुळे तुमचे वजन नियंत्रणात राहण्यासोबतच शरीरात पोषक तत्वांची कमतरता भासणार नाही. बद्धकोष्ठता आणि गॅसपासून मुक्ती मिळेल. पचनसंस्था चांगली राहील.डाळिंब - डाळिंबात भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी असतात. तुम्ही रिकाम्या पोटी आरामात डाळिंब खाऊ शकता. डाळिंब खाल्ल्याने शरीरात लोहाची कमतरता होत नाही. आणि रोगप्रतिकारक शक्ती देखील चांगली असते.पपई - पपई खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात. वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर पपई सर्वोत्तम आहे. तसेच कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते. बद्धकोष्ठता आणि पोटफुगीच्या समस्येपासूनही आराम मिळतो.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*F. L. N. - Foundational Literacy and Numeracy*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••विजयाची नव्हे तर कसोटीची वेळच माणसांना महान बनविते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) पॅरिस पॅराऑलिम्पिक २०२४ मध्ये पुरुषांच्या उंचउडी T64 स्पर्धेत सुवर्णपदक कोणी जिंकले ?२) कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच पोलीस दलात महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण जाहीर केले ?३) सामाजिक परिवर्तनासाठी यंत्रणा मजबूत करण्याच्या उद्देशाने पंचायती राज मंत्रालयाने कोणासोबत करार केला ?४) 'परिमल' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) टाईम मॅगझिनच्या AI मधील सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत कोणत्या केंद्रीय मंत्र्याचा समावेश करण्यात आला आहे ? *उत्तरे :-* १) प्रवीण कुमार २) राजस्थान ३) युनिसेफ इंडिया ४) सुवास, सुगंध ५) अश्विनी वैष्णव*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 आरती डिंगोरे, साहित्यिक, नाशिक👤 गोविंदराव इप्पकलवार, वसमत👤 किशन मतकर👤 रमेश पेंडकर👤 अरशद खान👤 श्रीकांत पाटील👤 महेश ठाकरे👤 उमाकांत कोटूरवार👤 यश सीतावार*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *हरिपाठ*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••हरि उच्चारणीं अनंत पापराशी । जातील लयासी क्षणमात्रे ॥१॥ तृण अग्निमेळें समरस झालें । तैसें नामें केलें जपतां हरि ॥२॥ हरि उच्चारण मंत्र पै अगाध । पळे भूतबाधा भेणे तेथें ॥३॥ ज्ञानदेव म्हणे हरि माझा समर्थ । न करवे अर्थ उपनिषदां ॥४॥ ।। संत ज्ञानेश्वर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जे काही चांगले करायचे असेल ते करण्याचा नक्कीच प्रयत्न करून बघावा. कारण येणारी प्रत्येक वेळ एकसारखी नसते किंवा सांगूनही येत नाही. म्हणूनच म्हणतात की, गेलेली वेळ परत येत नाही. या सुंदर विचारांना आत्मसात करावा. जरी जोराने येणारी हवा अंगाला स्पर्श करुन जात असेल तरी ती आपल्याला कधीच दिसत नाही.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *मांजर पळून जाते*ढोलू-मोलू हे दोन भाऊ होते. दोघे खूप खेळायचे, अभ्यास करायचे आणि कधी कधी खूप भांडायचे. एके दिवशी दोघेही त्यांच्या घराच्या मागे खेळत होते. एका खोलीत दोन लहान मांजरीचे पिल्लू होते. मांजराची आई कुठेतरी गेली होती, दोन्ही मुलं एकटीच होती. त्याला भूक लागली होती म्हणून तो खूप रडत होता. ढोलू-मोलूने दोन्ही मांजरीच्या पिल्लांचा आवाज ऐकला आणि आजोबांना हाक मारली. दोन्ही मांजरीचे पिल्लू भुकेले असल्याचे आजोबांनी पाहिले. आजोबांनी त्या दोन्ही मांजरीच्या पिल्लांना एक वाटी दूध दिले. आता मांजराची भूक शमली आहे. दोघेही एकमेकांशी खेळू लागले. ते पाहून ढोलू-मोलूने मांजर वाचल्याचे सांगितले.आजोबांनी ढोलू-मोलूचे अभिनंदन केले.नैतिक शिक्षण – इतरांचे भले केल्याने आनंद मिळतो•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment