✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 21 सप्टेंबर 2024💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/xMRaYdepVHFKtLx8/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🟥 *_आंतरराष्ट्रीय शांतता दिन_* 🟥•••••••••••••••••••••••••••••••• 🟥 *_जागतिक अल्झायमर जागृता दिन_*🟥•••••••••••••••••••••••••••••••••🟥 *_जागतिक अंधश्रद्धा निर्मूलन दिवस_*🟥•••••••••••••••••••••••••••••••••••••• 🟥 *_ या वर्षातील २६५ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🟥 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟥••••••••••••••••••••••••••••••••• *१९९१: आर्मेनिया हा देश (सोविएत संघापासुन) स्वतंत्र झाला.**१९८४: ब्रुनेईचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश**१९८१: ’बेलिझे’ या देशाला (युनायटेड किंग्डमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.**१९७६: सेशेल्सचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश**१९७१: बहारिन, भूतान आणि कतार या देशांचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश**१९६८: रिसर्च अँड अॅनॅलेसिस विंग (RAW) या भारतीय गुप्तचर संघटनेची स्थापना झाली.**१९६५: गाम्बिया, मालदीव आणि सिंगापूर यांचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश**१९६४: माल्टा हा देश (युनायटेड किंग्डमपासुन) स्वतंत्र झाला.**१९३४: ’प्रभात’च्या दामलेमामांनी इंदूरच्या सरदार किबे यांचे लक्ष्मी थिएटर भाड्याने घेऊन व थोडे सजवून 'प्रभात चित्रमंदिर’ या नावाने सुरू केले. ’प्रभात’चाच ’अमृतमंथन’ हा तिथे प्रदर्शित होणारा पहिला चित्रपट होता.**१७९२: अठराव्या लुईचं साम्राज्य लोकांनी बरखास्त केलं आणि फ्रेन्च प्रजासत्ताकाचा जन्म झाला.* 🟥 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिव:_* 🟥••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९७: अक्षय तेली -- लेखक**१९९३: नम्रता प्रधान -- अभिनेत्री व मॉडेल**१९८१: रिमी सेन -- भारतीय अभिनेत्री व मॉडेल**१९८०: करीना कपूर – अभिनेत्री**१९७९: ख्रिस गेल – जमैकाचा क्रिकेटपटू**१९६८: डॉ. सुनिता सुनील चव्हाण -- कवयित्री, लेखिका* *१९६६: किरण काशिनाथ -- अनुवादक, लेखक, कवी, अभिनेता**१९५८: डॉ. श्यामा घोणसे -- लेखिका**१९५५: गुलशन ग्रोव्हर -- भारतीय अभिनेता* *१९५४: डॉ. मंगला रमेश वरखेडे -- लेखिका, संपादिका* *१९५१: अन्थनी लुईस परेरा -- बालकथाकार, लेखक* *१९४४:स्नेहल वासुदेव जोशी-- लेखिका**१९४३: डॉ. शरद पांडुरंग हेबाळकर -- इतिहास संशोधक, लेखक* *१९३९: लक्ष्मीकांत सखाराम तांबोळी -- मराठी साहित्यातील प्रसिद्ध कवी, कथाकार, कादंबरीकार**१९३९: सुलभा श्रीराम सरदेसाई -- लेखिका**१९३४: अनंत मिराशी -- मराठी नाट्यअभिनेते (मृत्यू: १३ जून २०२० )**१९३१: सिंगीतम श्रीनिवास राव -- भारतीय चित्रपट दिग्दर्शक, पटकथा लेखक, निर्माता, संगीतकार आणि अभिनेता**१९२९: पं.जितेंद्र अभिषेकी – प्रसिद्ध शास्त्रीय गायक, संगीतकार व शास्त्रीय संगीताचे अभ्यासक (मृत्यू: ७ नोव्हेंबर १९९८ )**१९२६: डॉ. सुरेश डोळके -- धर्मशास्त्र व तत्त्वज्ञानाचे गाढे अभ्यासक, महानुभाव साहित्याचे संशोधक ( मृत्यू: २७ जानेवारी २००८ )* *१९२६: ’मलिका-ए-तरन्नुम’ नूरजहाँ ऊर्फ अल्लाह वसई – पाकिस्तानी गायिका आणि अभिनेत्री (मृत्यू: २३ डिसेंबर २००० )**१९२५: गोविंदराव पटवर्धन -- सुप्रसिद्ध हार्मोनियम आणि ऑर्गन वादक(मृत्यू: ३१ जानेवारी १९९६ )**१९२१: बाळकृष्ण मोरेश्वर लोणकर -- लेखक**१९१२: केशव हरी बोरगावकर -- लेखक संपादक**१९०८: दादासाहेब पोहनेरकर -- महाराष्ट्रातील विख्यात इतिहास संशोधक आणि साहित्यिक(मृत्यू: २ सप्टेंबर १९९० )**१८६६: एच. जी. वेल्स – विज्ञानकथांसाठी प्रसिद्ध असलेले इंग्लिश लेखक (मृत्यू: १३ ऑगस्ट १९४६ )* 🟥 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟥•••••••••••••••••••••••••••••••••••••• *२०२२: सत्य प्रकाश राजू श्रीवास्तव -- भारतातील विनोदी कलाकार (जन्म: २५ डिसेंबर १९६३ )**२०१२: गोपालन कस्तुरी – पत्रकार, ’द हिन्दू’ चे संपादक (जन्म: १७ डिसेंबर १९२४ )**२०११: मकबूल अहमद साबरी -- पाकिस्तानी कव्वाली गायक (जन्म: १२ ऑक्टोबर १९४५ )**२००३: मोरेश्वर नीळकंठ पिंगळे उपाख्य मोरोपंत-- भारतातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक वरिष्ठ नेते (जन्म: ३० डिसेंबर १९१९ )**१९९९: पुरुषोत्तम दारव्हेकर -- सुप्रसिद्ध मराठी नाटककार, लेखक, दिग्दर्शक, कवी (जन्म: १ जून १९२६ )**१९९८: फ्लॉरेन्स ग्रिफिथ जॉयनर – अमेरिकेची धावपटू (जन्म: २१ डिसेंबर १९५९ )**१९९२: ताराचंद बडजात्या – चित्रपट निर्माते [राजश्री प्रॉडक्शन्स] (जन्म: १० मे १९१४ )**१९८२: सदानंद रेगे – मराठी कवी, कथाकार आणि अनुवादक (जन्म: २१ जून १९२३ )**१७४३: सवाई जयसिंग – जयपूर संस्थानचा राजा (जन्म: ३ नोव्हेंबर १६८८ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*नोकरी श्रेष्ठ की शेती*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *अशोक चव्हाण यांना मोठा धक्का, मेहुणे भास्करराव खतगावकर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *काश्मीर मध्ये BSF जवानांची बस दरीत कोसळून तिघांचा मृत्यू तर 32 जण जखमी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *देशात एकेकाळी समाजवादी आणि साम्यवादी यांचा बोलबाला होता, पण औद्योगिक प्रगती नंतर ते बाजूला पडले - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांसाठी निर्भय व मुक्त वातावरण हवे, त्याकरिता संस्थांनी पुढाकार घ्यावा - उच्च व तंत्र शिक्षण विभागाचेप्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *लाडकी बहीण योजनेचा अर्ज दाखल करण्याची शेवटी तारीख जाहीर; 30 सप्टेंबर पर्यंत दाखल करता येणार अर्ज, 4500 खात्यात जमा होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *ठाण्यातील 58 महाविद्यालयात सुरू होणार आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *चेन्नई कसोटीतील दुसरा दिवस गोलंदाजांनी गाजवला, बांगलादेशचा डाव 149 धावांवर आटोपला, दुसऱ्या दिवसाअखेर भारताकडे 308 धावांची आघाडी*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*खोकल्याच्या औषधांचा काय उपयोग असतो ?* खोकून दाखवा म्हटले तर तुम्ही खोकून दाखवू शकाल. म्हणजेच कोणताही आजार नसतानाही आपण खोकू शकतो. खोकणे म्हणजे काय हे आता समजून घेऊ. खोकताना प्रथम आपण दीर्घ श्वास घेतो. त्यानंतर श्वासनलिकेवर एपिग्लॉटीस हा पडदा टाकला जातो. मग दाबाखाली हवा बाहेर टाकली जाते. त्याबरोबर बेडका बाहेर पडतो.खोकला ही शरीराची एक संरक्षक प्रतिक्रिया आहे. श्वसनमार्गात जीवजंतू गेले, घाण गेली की ती घाण व अनावश्यक स्राव शरीराबाहेर टाकण्यासाठी खोकला येतो. खोकला हे श्वसनसंस्थेच्या विविध रोगांमध्ये आढळून येणारे मुख्य लक्षण आहे. याखेरीज जंतांची लागण, काही मानसिक रोग, काही हृदयविकार यातही खोकला येतो.खोकल्यावर समूळ उपचार करायचा, तर आजारासाठी प्रभावी उपचार करावे लागतील.खोकल्याच्या औषधांचे एक्स्पेक्टोरंट अर्थात बेडके बाहेर टाकण्यास साह्य करणारे व अँटीटसीव्ह अर्थात खोकला थांबवणारे असे दोन प्रकार असतात. कोरड्या खोकल्यासाठी नोस्कॅपीन सारखे अँटीटमीव्ह औषध उपयोगी पडू शकते; पण जेव्हा बेडके पडायला हवेत, तेव्हा ते दिल्यास उलटाच परिणाम हाईल. गंमत म्हणजे ८५% खोकल्याच्या औषधात ही दोन्ही प्रकारची औषधे एकत्र असल्याने ती निरुपयोगी असतात असे शास्त्रीय पाहण्यांमध्ये सिद्ध झालेले आहे. म्हणून खोकल्याचे औषध घेताना ते डॉक्टरी सल्ल्यानेच घ्यावे. खोकला बरा करण्यापेक्षा आजार बरा करणे महत्त्वाचे आहे हे आपण कधीही विसरता कामा नये.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*C. B. S. E. - Central Board of Secondary Education*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवनाचा प्रवास हा अगदीच सोपा नसतो, तो सोपा आपणच करावा लागतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) फ्रान्स व श्रीलंका या देशांचा राष्ट्रीय पक्षी कोणता ?२) आशियाई हॉकी चषक स्पर्धा - २०२४ चा कप कोणत्या संघाने जिंकला ?३) आयसीसीच्या पहिल्या पाकिस्तानी महिला पंच म्हणून कोणाची निवड झाली ?४) 'प्रपंच' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) १ मण म्हणजे किती किलो ? *उत्तरे :-* १) जंगल कोंबडा २) भारत ३) सलीमा इम्तियाज ४) संसार ५) ४० किलो *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 निशांत जिंदमवार, माध्यमिक शिक्षक, धर्माबाद👤 विष्णू गंभीरे, गणित शिक्षक, आय जी पी धर्माबाद👤 सचिन तोटावाड, धर्माबाद👤 गोविंद पाटील👤 सौ. स्मिता मिरजकर-वडजे, शिक्षिका, नांदेड👤 आकाश कोलापकर👤 प्रकाश जाधव👤 चिं. जिग्नेश क्रांती बुद्धेवार, धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *हरिपाठ*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••काळ वेळ नाम उच्चारितां नाही । दोन्ही पक्ष पाहीं उद्धरती ॥१॥ रामकृष्ण नाम सर्व दोषां हरण । जडजीवां तारण हरि एक ॥२॥ हरिनाम सार जिव्हा या नामाची । उपमा त्या देवाची कोण वानी ॥३॥ ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ । पूर्वजां वैकुंठ-मार्ग सोपा ॥४॥ ।। संत ज्ञानेश्वर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सर्व काही समजून न समजल्या सारखे वागणे,किंवा टाळाटाळ करणे हे, सुद्धा एकप्रकारचे दुर्लक्षितपणाचे लक्षण आहेत. म्हणून कोणत्याही गोष्टींकडे दुर्लक्ष करू नये.बरेचदा अशा वागण्याने आपलेच नुकसान होण्याची शक्यता असते. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कोणे एके काळी एका लहानशा गावात अंकुर नावाचे एक छोटेसे बीज होते. अंकुरने एका सुंदर फुलात वाढण्याचे स्वप्न पाहिले. एके दिवशी एक हुशार वृद्ध शेतकऱ्याने जमिनीत कोंब लावले. अंकुराने विचारले, "मी कशी वाढू?" शेतकऱ्याने उत्तर दिले, "तुम्हाला तीन गोष्टींची गरज आहे: पाणी, सूर्यप्रकाश आणि संयम." अंकुराने कठोर परिश्रम केले, पाणी प्याला, सूर्यप्रकाश मिळवला आणि धीराने वाट पाहिली. दिवस गेले, आणि अंकुर एक लहान रोप बनला. जसजसे अंकुर वाढत गेले, तसतसे तिला आव्हानांचा सामना करावा लागला. कडक वारा, भुकेले पोट आणि तीव्र उष्णता. पण तिने धीर धरला, तिच्या मुळांचा वापर करून स्वतःला आणि सूर्यप्रकाश गोळा करण्यासाठी तिच्या पानांचा वापर केला. लवकरच अंकुर एक आश्चर्यकारक फुलात बहरला, हवा गोड सुगंधाने भरली. नैतिक : अंकुराप्रमाणेच आपल्याला चांगल्या सवयींनी स्वतःचे पालनपोषण करणे आवश्यक आहे, आव्हानांना धैर्याने सामोरे जाणे आणि आपली स्वप्ने साध्य करण्यासाठी धीर धरणे आवश्यक आहे.From - AI•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment