✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 20 सप्टेंबर 2024💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/kGjGcjZbtq3CHgNm/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🟨 *_ या वर्षातील २६४ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🟨 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟨•••••••••••••••••••••••••••••••••*२०११: प्रसिद्ध हिंदी साहित्य अमरकांत आणि श्रीलाल शुक्ला यांना २००९ सालाचा तर कन्नड नाटककार चंद्रशेखर कंबार यांना २०१० चा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर* *२००१: अमेरिकेने दहशतवादाविरुद्ध युद्ध पुकारले (War on Terror).**१९७७: व्हिएतनामचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.**१९१३: वीर वामनराव जोशी यांच्या ’राक्षसी महत्त्वाकांक्षा’ या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबईत झाला.**१८५७: १८५७ चा राष्ट्रीय उठाव - ब्रिटिश (ईस्ट इंडिया कंपनीच्या) सैन्याने दिल्ली परत ताब्यात घेतली.*🟨 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟨 •••••••••••••••••••••••••••••••••••••• *१९९८: राशिद खान अरमान -- अफगाणिस्तानचा क्रिकेटपटू**१९८०: जनार्दन केशव म्हात्रे -- कवी, गजलकार**१९७७: सुचिता त्रिवेदी -- अभिनेत्री**१९७७: अरविंद जगताप -- चित्रपट लेखक**१९७२: डॉ. कांतीलाल चव्हाण -- लेखक**१९७०: विमल दादासाहेब मोरे -- भटक्या-विमुक्त चळवळीतील कार्यकर्त्या व लेखिका**१९५७: अनुपम श्याम ओझा -- भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन अभिनेता (मृत्यू: ८ ऑगस्ट २०२१)**१९४९: रमण रणदिवे -- कवी, संगीतकार, गायक* *१९४९: महेश भट्ट – चित्रपट दिग्दर्शक**१९४७: डॉ.वासंती गंगाधर इनामदार -- कादंबरीकार* *१९४६: इंदुमती हस्ते -- प्रसिद्ध लेखिका**१९४५: लक्ष्मणराव काशीराम खेतले (जाधव) -- लेखक* *१९३९: जयश्री मधुकर रुईकर -- कथाकार, कादंबरीकार, कवयित्री* *१९३४: सोफिया लॉरेन – हॉलीवूडमधील इटालियन अभिनेत्री**१९३३: डॉ. शिवाजीराव अप्पाराव गऊळकर- लेखक, समीक्षक* *१९२२: द. न. गोखले – चरित्र वाङ्मयाचे गाढे संशोधक, मराठी शुद्धलेखनाचे अभ्यासक, पुणे विद्यापीठाने त्यांना डी. लिट पदवी देऊन गौरविले होते.(मृत्यू: २७ जून २००० )**१९१३: प्रभाकर बलवंत वैद्य -- पत्रकार आमदार, कवी, लेखक**१९०९: गुलाबदास हरजीवनदास ब्रोकर – गुजराती लेखक व समीक्षक, पद्मश्री (१९९१) (मृत्यू: १० जून २००६ )**१८९८: नारायण भिकाजी तथा 'नानासाहेब' परुळेकर --’सकाळ’ वृत्तपत्राचे संस्थापक संपादक, त्यांना पद्मभूषण सन्मानाने गौरविण्यात आले होते. ‘निरोप घेता‘ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.(मृत्यू: ८ जानेवारी १९७३ )**१८८०: प्रा. चिंतामणी निळकंठ जोशी -- लेखक (मृत्यू: १६ जून १९४८ )* 🟨 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟨 •••••••••••••••••••••••••••••••••••••• *२०१७: शकिला -- भारतीय अभिनेत्री (जन्म: १ जानेवारी १९३५ )**२०१५: जगमोहन दालमिया -- कोलकाता शहरातील भारतीय क्रिकेट प्रशासक आणि व्यापारी (जन्म: ३० मे १९४० )**२०१४: डॉ. अशोक रामचंद्र केळकर -- आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भाषावैज्ञानिक आणि साहित्य समीक्षक (जन्म: २२ एप्रिल १९२९ )**१९९७: कल्याण कुमार गांगुली तथा अनुप कुमार -- चित्रपट अभिनेते (जन्म: ९ जानेवारी १९२६ )**१९९६: दया पवार( दगडू मारोती पवार)-- सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक(जन्म: १५ सप्टेंबर १९३५ )**१९३३: अॅनी बेझंट – थिऑसॉफिस्ट, सामाजिक कार्यकर्त्या व भारतीय स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या, १९१६ मध्ये त्यांनी ’होमरुल लीग’ची स्थापना केली. (जन्म: १ आक्टोबर १८४७ )**१९१५: संत गुलाबराव महाराज -- संत व लेखक, काव्यशास्त्र, आयुर्वेद, संगीत इत्यादी अनेक विषयांवर लेखन (जन्म: ६ जुलै १८८१ )**१८१०: मीर तकी मीर – ऊर्दू शायर (जन्म: १७२३)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *जीवन सुंदर आहे भाग - 1*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *कितीही विरोध झाला तरी लाडकी बहीण योजना बंद करणार नाही - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मनोज जरांगेंचे उपोषण सुरु असताना मोठे बंधू भाऊसाहेब जरांगे अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *रक्ताचे पाट वाहतील, पण भूसंपादन होऊ देणार नाही; 'शक्तीपीठ'साठी शक्ती लावणाऱ्यांना राजू शेट्टींचा इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *बिहारचा सिंघम IPS शिवदीप लांडेंचा पोलीस सेवेतून राजीनामा, कारण अद्याप गुलदस्त्यात*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *राज्यात मान्सून पुन्हा अॅक्टिव्ह; शनिवारपासून मुसळधार पावसाचा इशारा, मराठवाडा-विदर्भात यलो अलर्ट*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *इस्राईलनं पुकारलं नवं युद्ध, लेबनॉनमध्ये पेजर- वॉकीटॉकीच्या साखळी स्फोटात 20 ठार, 3 हजारहून अधिक जखमी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *चेन्नई येथील पहिल्या कसोटी सामन्यात भारताचे 6 बाद 339 धावा, आर. अश्विनचे दमदार शतक*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*📕 कावीळ - ब विरोधी लस कोणी घ्यावी?📕*मध्यंतरी कावीळ व प्रतिबंधक लसीकरणाच्या शिबिरांचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले. त्यामुळे अनेकांनी त्या लसी घेतल्या. पण खरेच सर्वांनी त्या लसी घेण्याची गरज होती का?कावीळीत डोळे, त्वचा, लघवी पिवळी होतात. भारतात विषाणूंमुळे होणारी कावीळ अर्थात शास्त्रीय भाषेत यकृतदाह मुख्यत्वे आढळून येतो. 'अ' प्रकारची कावीळ दूषित पाणी अन्नातून पसरते. 'ब' प्रकारची कावीळ दूषित रक्त, तसेच शरीरातील वीर्य, योनीस्राव आदी स्रावांपासून पसरते. साहजिकच 'अ' प्रकारची कावीळ कोणालाही होऊ शकते; पण 'व' प्रकारची कावीळ मात्र रक्त व शरीरातील इतर स्रावांशी संपर्क येऊ शकणाऱ्या व्यक्तींनाच होऊ शकते.यात वैद्यकीय विद्यार्थी, परिचारिका, रुग्णालयात काम करणारे कर्मचारी, प्रयोगशाळेत काम करणारे तंत्रज्ञ, समलिंगी. संबंध ठेवणारे पुरुष, शिरेवाटे मादक पदार्थ घेणारी व्यक्ती, वारंवार रक्त घ्याव्या लागणाऱ्या व्यक्ती तसेच वेश्या आदींचा समावेश होतो. साहजिकच या व्यक्तींनी कावीळ 'ब' विरोधी लस घ्यायलाच हवी. या लसीचा डोस प्रौढ व्यक्तींसाठी १ मिली, तर मुलांसाठी ०.५ मिली इतका आहे. महिन्याच्या अंतराने पहिले दोन डोस व नंतर सहा महिन्यांनी तिसरा डोस घ्यावा लागतो. यामुळे ५ वर्षे संरक्षण मिळते. सर्वसामान्यपणे सगळ्यांना पाणी वा अन्नाद्वारे पसरणारी कावीळ 'अ' होण्याचा धोका जास्त असतो. या रोगाचा प्रतिबंध करण्यासाठीही लस उपलब्ध आहे. मात्र एका लसीने एकाच प्रकारच्या कावीळीचा प्रतिबंध होतो. त्यामुळे ज्याला कावीळ 'ब' होण्याचा धोका आहे, त्यानेच त्या लसीवर पैसे खर्च करावे हेच योग्य होईल.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*G. P. F. - General Provident Fund*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जी व्यक्ती कर्म आणि सत्यावर जास्त भर देते, त्या व्यक्तीस अपेक्षेपेक्षा जास्त मोठं फळ प्राप्त होते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची नियुक्ती झाली आहे ?२) कुणाच्या नावावरून अंदमान निकोबारची राजधानी 'पोर्ट ब्लेअर' हे नाव देण्यात आले होते ?३) केंद्र सरकारने अंदमान निकोबारची राजधानी 'पोर्ट ब्लेअर'च्या नावाऐवजी कोणत्या नावाची घोषणा केली ?४) 'प्रजा' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) भारताने आशियाई हॉकी चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कितव्यांदा धडक मारली ? *उत्तरे :-* १) आतिशी मार्लेना सिंह २) कॅप्टन आर्चिबाल्ड ब्लेअर, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा नौदल अधिकारी ३) श्री विजयपुरम ४) लोक, रयत, जनता ५) सहाव्यांदा*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 सौ. संगीता देशमुख, शिक्षिका तथा लेखिका, वसमत👤 पांडुरंग कोकरे, शिक्षक सोलापूर👤 संतोष पटने, धर्माबाद👤 शितला प्रभू👤 उमेश पाटील वडजे👤 प्रकाश कांबळे, नांदेड होमगार्ड समादेशक अधिकारी👤 चिं. जिग्नेश क्रांती बुद्धेवार, धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *हरिपाठ*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वेदशास्त्रपुराण श्रुतिचे वचन । एक नारायण सार जप ॥१॥ जप तप कर्म हरिविण धर्म । वाउगाचि श्रम व्यर्थ जाय ॥२॥ हरिपाठीं गेले ते निवांतचि ठेले । भ्रमर गुंतले सुमनकळिके ॥३॥ ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र । यमें कुळगोत्र वर्जियेले ॥४|| ।। संत ज्ञानेश्वर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एखाद्या व्यक्तीला मदतीची गरज असेल आणि त्या व्यक्तीला न कळताच नि:स्वार्थ भावनेने मदत केल्याने जो, समाधान आपल्याला मिळत असते तो, समाधान जगावेगळा असतो. आणि याच विषयी जेव्हा त्या व्यक्तीकडून सकारात्मक विचार इतरांकडून ऐकायला मिळत असतात त्यावेळी मात्र आपल्याला सर्वच काही मिळाल्यासारखे वाटते. या प्रकारची भूमिका पार पाडताना तेवढे काळीज मोठे असावे लागते. असे काळीज प्रत्येकांकडे असणे आवश्यक आहे. कारण या जीवनात सर्वच काही कमावता येतो पण, अडचणीत सापडलेल्या माणसांच्या मदतीसाठी धावून जाणे हाच खरा माणुसकी धर्म आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*📜 सत्य 📜*एक राजा होता. राजाच्या इच्छेपुढे कोणाचे काही चालत नसे. एके दिवशी त्याला काय इच्छा झाली कुणास ठाऊक पण त्याने दरबारात आज्ञा दिली कि मला स्वर्गातील फुलांचा हार गळ्यात घालायला पाहिजे आहे. दरबारातील सारे विचारात पडले कि असा हार कसा मिळवायचा?. एका विद्वान मुनींनी राजाचे हे आव्हान स्वीकारले आणि राजाला स्वर्गातील हार आणून देण्याचे कबूल केले. काही दिवसानंतर मुनी राजाकडे आले व म्हणाले,"राजन! मला स्वर्गातील हार तर मिळाला आहे पण हाराबद्दल एक अडचण आहे." राजा म्हणाला,"काय आहे ती अडचण?" विद्वान मुनी म्हणाले,"तो स्वर्गातील हार फक्त पुण्यवान लोंकानाच दिसेल. पापी लोंकाना हा हार दिसणार नाही." या नंतर मुनींनी राजाच्या गळ्यात हार घालण्याचे नाटक केले व एक दोरी त्याच्या गळ्यात घातली. राजाला कळेना कि आपल्या गळ्यात अशी दोरी का घातली आहे. राजा विचारात पडला कि आता याला दोरी म्हणावे कि हार? कारण दोरी म्हणाले तर पापी ठरतो आणि हार म्हणावे तर दोरी गळ्यात घालून फिरावे लागते. तो काहीच बोलला नाही त्याने ते स्वीकार केले व गप्प राहिला. दरबारातील लोकांनीही हाच विचार केला कि राजाला जर दोरी घालणे पसंत असेल तर आपण कशाला काही बोलायचे आणि हार नाही म्हंटले तर आपण पापी ठरतो. म्हणून दरबारीही गप्प राहिले. दोन-तीन दिवसांनी दरबारातील एक जुना सरदार गावावरून परत आला. त्याला या प्रसंगाची काहीच कल्पना नव्हती. त्याने येताक्षणी राजाला विचारले,"राजेमहाराज!आज पर्यंत मी तुम्हाला हिरे माणिक, मोत्यांचे हार घातलेले पहिले आहे पण आज हि दोरी का गळ्यात अडकवून तुम्ही फिरत झाले आहे, जो कोणी सत्य सांगण्याचा प्रयत्न करतो त्याचे म्हणणे हे दाबून ठेवले जाते व सत्य जगासमोर येत नाही.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment