✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 19 सप्टेंबर 2024💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/MPc1haJbvyR7ELVi/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🟩 *_ या वर्षातील २६३ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🟩 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟩•••••••••••••••••••••••••••••••••*२००७: टी २० क्रिकेट सामन्यातील एका षटकात सहा षटकार मारणारा युवराजसिंग हा पहिला खेळाडू बनला.**२००१: महात्मा गांधींच्या मूल्यांचा ब्रिटनमध्ये प्रसार करणारे कार्यकर्ते व विचारवंत डॉ. सतीशकुमार यांना 'जमनालाल बजाज पुरस्कार’ जाहीर**२०००: भारताच्या करनाम मल्लेश्वरीने सिडनी ऑलिम्पिक स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये ६९ किलो वजन गटात ब्रॉन्झ पदक पटकावले आणि ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला बनली.**१९८३: सेंट किटस आणि नेव्हिसला स्वातंत्र्य मिळाले.**१९५९: सुरक्षिततेच्या कारणास्तव रशियाचे अध्यक्ष निकिता क्रुश्चेव्ह यांना अमेरिकेतील ’डिस्नेलँड’ला भेट देण्यास मनाई करण्यात आली.**१९४६: फ्रान्समधील कान्स येथे पहिला आंतरराष्ट्रीय चित्रपट समारोह झाला.**१८९३: न्यूझीलंडमधे महिलांना मतदानाचा हक्क मिळाला.* 🟩 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟩 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८२: कविता रामभाऊ जवंजाळ --कवयित्री* *१९७७: आकाश चोप्रा -- भारतीय क्रिकेटर , समालोचक**१९७१: प्रसेनजीत गजानन गायकवाड -- कवी, कथाकार, लेखक* *१९६८: प्रा. डॉ. राजेंद्र रामभाऊ वाटाणे-- प्रसिद्ध लेखक, समीक्षक, संपादक* *१९६६: वर्षा गजेन्द्रगडकर -- अनुवाद, पर्यावरण, लोककथा आणि स्त्री-संस्कृती या सर्व विषयांना स्पर्श करणाऱ्या प्रसिद्ध लेखिका* *१९६५: सुनीता विल्यम -मुळ भारतीय असलेली अंतराळवीर पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित**१९६४: गणेश उत्तमराव साखरे-पाटील -- कवी, लेखक**१९६१: आनंद पेंढारकर -- प्रसिद्ध कवी**१९६० संध्या सूर्यकांत धर्माधिकारी -- लेखिका**१९५९: चिरंजीव पुणाजी बिसेन -- कवी* *१९५९: प्रा.देवबा शिवाजी पाटील -- प्रसिद्ध बालसाहित्यिक, लेखक* *१९५८: लकी अली – गायक,अभिनेता व गीतलेखक**१९५५: इंदुमती महावीर जोंधळे -- प्रसिद्ध मराठी लेखिका* *१९५१: अनिल दिगंबर पाटील -- लेखक**१९५०: विश्वास सदाशिव कुलकर्णी-- आंतरराष्ट्रीय वास्तू विशारद व्हीं. के. ग्रूप्सचे संचालक**१९३८: मोहम्मद ताहिर हुसेन खान -- (१९ सप्टेंबर १९३८ - २ फेब्रुवारी २०१०), ता हुसेन या नावाने ओळखले भारतीय , एकचित्रपट निर्माता,पटकथा लेखक,अभिनेताआणि चित्रपट दिग्दर्शक (मृत्यू: २ फेब्रुवारी २०१०)**१९३८: विनायक विष्णू खेडेकर -- राष्ट्रीय पातळीवर सर्वपरिचित असणारे गोवा राज्यातील लोकसंस्कृती आणि लोकसाहित्याचे ज्येष्ठ संशोधक* *१९२२: गणपती वासुदेव बेहेरे -- लेखक, झुंझार पत्रकार,आणि संपादक (मृत्यू: ३० मार्च १९८९ )**१९१७: अनंतराव कुलकर्णी – साहित्याची उत्तम जाण असलेले प्रकाशक,’कॉन्टिनेन्टल प्रकाशन’चे संस्थापक(मृत्यू: ६ नोव्हेंबर १९९८ )**१९११: विल्यम गोल्डिंग – नोबेल पारितोषिकविजेते इंग्लिश लेखक (मृत्यू: १९ जून १९९३ )**१९०३: अनंतराव सदाशिव फडके -- लेखक (मृत्यू: २७ ऑगस्ट १९५९ )**१८६७: शतायुषी पंडित श्रीपाद दामोदर सातवळेकर – चित्रकार, संस्कृतपंडित, वेदांचे अभ्यासक-संशोधक विद्वान व लेखक. (मृत्यू: ३१ जुलै १९६८ )* 🟩 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟩••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१५: वीणा चिटको -- लेखिका, कवयित्री,गीतकार आणि संगीत दिग्दर्शक (जन्म: १४ ऑगस्ट १९३५ )**२००७: दत्तात्रेय शंकर तथा दत्ता डावजेकर ऊर्फ’डी.डी’ – संगीतकार (जन्म: १५ नोव्हेंबर १९१७ )**२००४: दमयंती जोशी – सुप्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना (जन्म: ५ सप्टेंबर १९२८ )**२००२: प्रिया तेंडुलकर – रंगभूमी,चित्रपट व दूरचित्रवाणीवरील अभिनेत्री,लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या.(जन्म: १९ आक्टोबर १९५४ )**१९९२: ना. रा. तथा अण्णासाहेब शेंडे – साहित्यिक,विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष (जन्म: ७ नोव्हेंबर १९१४ )**१९६३: सर डेविड लो – जगप्रसिद्ध व्यंगचित्रकार (जन्म: ७ एप्रिल १८९१ )**१९६२: विठ्ठल सीताराम गुर्जर उर्फ वि.सी. गुर्जर-- मराठी लघुकथा लेखक (जन्म: १८ मे १८८५ )**१९३६: पं. विष्णू नारायण भातखंडे – संगीतशास्त्रकार, हिन्दुस्थानी संगीताचे प्रसारक,संशोधक व गांधर्व महाविद्यालयाचे एक संस्थापक (जन्म: १० ऑगस्ट १८६० )**१८८१: जेम्स गारफील्ड – अमेरिकेचे २० वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: १९ नोव्हेंबर १८३१ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*भीक मागणे एक दुष्कृत्य*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *सणासुदीच्या काळात गहू व तेलाचे भाव राहणार स्थिर*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *एक देश एक निवडणूक प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता, लोकसभा आणि देशातल्या सर्व विधानसभांची निवडणूक एकत्र घेण्याचा प्रस्ताव, तर धोरण व्यावहारिक नाही म्हणत काँग्रेसचा विरोध*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *गणपती विसर्जनानंतर महायुती आणि मविआकडून जागावाटपाच्या चर्चेचा श्रीगणेशा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *अनुसूचित जमातीमधून आरक्षण मिळावं या मागणीसाठी धनगर समाजाचे पंढरपुरात 10 दिवसांपासून आंदोलन*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *सुप्रिया सुळे यांचं प्राधान्य संसदेला, राज्यातील सत्तास्थानाबद्दल त्यांना आस्था नाही, महिला मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेवर शरद पवारांची प्रतिक्रिया*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *शिक्षकांचे ऑनलाईन माहिती देणे बंद, प्रशासनाविरुद्ध असहकार, 25 ला काढणार मोर्चा, जीआर मागे घेण्याची मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *अफगाणिस्ताननं दक्षिण आफ्रिकेला 6 विकेटनं पराभूत केलं आहे. अफगाणिस्तानचा दक्षिण आफ्रिकेवरील पहिला विजय ठरला.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एकदा बुद्धांचे एका गावात आगमन झाले. तेथील राजाने त्यांचे आणि त्यांच्या अनुयायांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. त्यानंतर गावातील सर्व जण बुद्धांना भेटण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी येऊ लागले. बुद्धांना सगळेजण वेगवेगळ्या भेटवस्तू देऊ लागले. त्यामध्ये मौल्यवान दागिने, कपडे आदींचा समावेश होता. राजानेही अत्यंत मौल्यवान भेटवस्तू दिली. बुद्ध सगळ्या भेटवस्तूंना केवळ उजव्या हाताने स्पर्श करून त्या स्वीकारत होते. काही वेळाने एक अतिशय साधारण वस्त्रे परिधान केलेली वृद्ध महिला बुद्धांना भेटायला आली. तिने बुद्धांना नमस्कार केला आणि म्हणाली, "माझी परिस्थिती काही चांगली नाही. मी अत्यंत गरीब आहे. रानातील फळे वगैरे गोळा करून, ती विकून मी माझा उदरनिर्वाह करते. आज हे डाळिंब खात असताना तुम्ही गावात आल्याचे समजले आणि मी तशीच तुम्हाला भेटायला आले. आता माझ्याकडे देण्यासारखे काहीच नाही. फक्त हे उष्टे (अर्धवट खाल्लेले) डाळिंब माझ्याकडे आहे. खरं तर हे डाळिंब तुम्हाला दान करण्यात मला संकोच वाटत आहे. तुम्हाला ते स्वीकारण्याचा आग्रहही मी करणार नाही. मात्र तुम्ही ते स्वीकारलेत तर मी कृतार्थ होईल.' वृद्ध महिलेची ही सारी अवस्था पाहून बुद्धांनी दोन्ही हात पुढे केले आणि तिच्या हातातील डाळिंब आनंदाने स्वीकारले. एवढेच नव्हे तर डाळिंब खाण्यासही सुरूवात केली. हे दृश्य पाहून राजा पुढे आला आणि तो बुद्धांना म्हणाला, "माझ्यासह सर्वांनी तुम्हाला अत्यंत मौल्यवान भेटवस्तू दिल्या. त्या तुम्ही स्वीकारल्यात. पण फक्त उजव्या हाताचा स्पर्श करून. मात्र या वृद्धेने दिलेले उष्ट्या फळाचे दान तुम्ही दोन्ही हातांनी स्वीकारलेत आणि खाल्लेतही. आमचे दान एका हाताने आणि वृद्धेचे दोन्ही हातांनी? हे असे का?' राजाचे हे म्हणणे ऐकून बुद्धांनी अगदी शांतपणे उत्तर दिले. बुद्ध म्हणाले, "हे राजा, तुम्ही साऱ्यांनी जे दान केलेत तो तुमच्या संपत्तीतील दहावा हिस्सादेखील नव्हता. तुम्ही मला गरज नसतानाही हे दान दिलेत. तुम्ही हे सारे दान गोरगरिबांच्या कल्याणासाठीही वापरू शकला असता. मात्र तुम्ही तसे न करता ते मलाच दिलेत. उलट या वृद्धेने जे दान केले आहे तो तिच्याकडे आज असलेल्या संपत्तीचा संपूर्ण भाग होता. हे डाळिंब दिल्यानंतर तिच्याकडे आजसाठी काहीही उरणार नाही, हे ठाऊक असूनही तिने अत्यंत श्रद्धापूर्वक अंत:करणाने हे दान दिले. तिला संपत्तीचा कोणतीही मोह नाही. तिचे हे दान मोहविरहित असल्याने तुमच्यापेक्षा अधिक सात्विक दान ठरले.' बुद्धांनी या प्रसंगातून दिलेला संदेश ऐकून सगळीकडे शांतता पसरली.*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*G. P. F. - General Provident Fund*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••विजयाची नव्हे तर कसोटीची वेळच माणसांना महान बनविते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) युएस ओपन २०२४ महिला एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले ?२) रशिया व युक्रेन या दोन देशांमधील युद्ध केव्हा सुरू झाले ?३) भारतातील 'अधिकाऱ्यांचे गाव' म्हणून कोणते गाव ओळखले जाते ?४) 'पान' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) गोदावरी नदीचा उगम कोठे झाला ? *उत्तरे :-* १) आरीना सबालेंका २) २४ फेब्रुवारी २०२२ ३) पडीयाल, जि. धार, मध्यप्रदेश ४) पर्ण, पत्र, पल्लव ५) त्र्यंबकेश्वर, नाशिक*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 प्रा. देवबा पाटील, साहित्यिक, खामगाव👤 मनीष बिरादार👤 प्रवीण साधू👤 आनंद पाटील*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *हरिपाठ*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी । पापे अनंत कोटी गेली त्यांची ॥१॥ अनंत जन्मांचे तप एक नाम । सुगम हरिपाठ ॥२॥ योग याग क्रिया धर्माधर्म माया । गेले ते विलया हरिपाठीं ॥३॥ ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिया धर्म । हरिविण नेम नाहीं दुजा ॥४॥ ।। संत ज्ञानेश्वर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• प्रत्येकांनी बोलताना तारतम्य ठेवायलाच पाहिजे. विशेषतः इतरांविषयी बोलताना जरा विचार करूनच बोलावे. कधी कधी अनवधानाने एखाद्या विषयी बोलताना आपला तोल देखील जावू शकतो.कोण कोणाचा मित्र,नातेवाईक असेल हे सांगता येत नाही.म्हणून इतरांविषयी बोलताना जरा संयम ठेवलेलं केव्हाही बरे.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••उपकार स्मरावेअज्ञात वासात असताना पांडव एका गरीबाच्या घरी राहिले होते. त्या गावच्या लोकांना बकासुराचा त्रास सुरू झाला होता. त्याला रोज गाडाभर अन्न व एक माणूस एवढे खाद्य पाठवावे लागे. आज माणूस पाठवण्याची पाळी त्या गरिबावर आली. घरातल्या कोणाला पाठवावे ? चर्चा सुरू होती. संकट मोठे होते – पण कुंतीन ठरविले त्या ब्राह्मणाच्या मुलाऐवजी आपल्या भीमाला पाठवावे. पण पाहुण्यावर संकट ढकलणे म्हणजे महान पाप! पण कुंतीने त्यांची समजूत काढली. आपल्या मुलाला काहीही त्रास होणार नाही याची खात्री पटविली अखेरीस भीमानही शब्द खरे करून दाखविले. बकासुराचा वध करून गावावरचे संकट दूर केले. संकटकाली आपल्याला आश्रय देणाऱ्या त्या गरीबाच्या उपकार्याचीही फेड केली.तात्पर्यः उपकाराची जाण ठेवावी.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment