✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 13 सप्टेंबर 2024💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/w6G4wmZZ1Gu7dCfP/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🛟 *_ या वर्षातील २५७ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🛟 *_महत्त्वाच्या घटना:_* 🛟••••••••••••••••••••••••••••••••• *२००८: दिल्ली येथे झालेल्या बॉम्बस्फोटांच्या मालिकेत ३० जण ठार तर सुमारे १३० जण जखमी झाले.**२००७: दारिद्र्य रेषेखालील ६५ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेले वृद्ध नागरिकांना निवृत्ती वेतन देण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय**१९९६: महिला आणि बालकल्याणासाठी लक्षणीय कामगिरी बजावणार्या महिलेला देण्यात येणारा ’श्रीमती जानकीदेवी बजाज पुरस्कार’ ज्येष्ठ समाजसेविका आणि स्वातंत्र्य चळवळीतील कार्यकर्त्या श्रीमती इंदुमती पारिख यांना देण्यात आला.**१९८९: आर्चबिशप डेसमंड टुटू यांनी वर्णद्वेषी धोरणाला विरोध करण्यासाठी दक्षिण अफ्रिकेत विशाल मोर्चा काढला.**१९४८: ऑपरेशन पोलो – विलीनीकरणासाठी भारतीय सैन्याने हैदराबादवर चढाई केली.**१९२२: लीबीयातील अझिजीया येथे ५७.२° सेल्सिअस ही जगातील आजवरच्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली.* 🛟 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🛟••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८८: माधव श्रीकांत किल्लेदार -- नट, लेखक, दिग्दर्शक* *१९८१: प्रा. डॉ. अविनाश शरदराव धोबे -- लेखक**१९७८: डॉ.भारती पवार - माजी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री**१९७५: भगवान चिले -- इतिहास अभ्यासक व लेखक**१९७३: महिमा चौधरी-- भारतीय मॉडेल व सिने-अभिनेत्री**१९६९: शेन वॉर्न – प्रसिद्ध ऑस्ट्रेलियन लेगस्पिनर (मृत्यू: ४ मार्च २०२२ )**१९६९: प्रा. डॉ. स्वानंद गजानन पुंड -- प्रसिद्ध लेखक, प्रवचनकार, विविध पुरस्कारांनी सन्मानित* *१९६८: मीनल अविनाश कुडाळकर -- कवयित्री, लेखिका**१९६७: मायकेल जॉन्सन – अमेरिकन धावपटू**१९६५: प्राचार्या डॉ. साधना निकम -- कवयित्री, लेखिका**१९६२: प्रा. डॉ. सुजाता महाजन -- कवयित्री, लेखिका* *१९५९: श्रीकृष्ण अडसूळ -- प्रसिद्ध साहित्यिक, समीक्षक,संशोधक,आणि सामाजिक कार्यकर्ते**१९५६: डॉ. रमेश आवलगांवकर -- प्रसिद्ध लेखक,महानुभाव संप्रदायाचे अभ्यासक* *१९५५: प्रा. चंद्रशेखर डाऊ -- विज्ञान विषयावर लेखन करणारे लेखक**१९५४: महेश सखाराम भावे -- लेखक* *१९५२:सुतेजा सुभाष दांडेकर -- कवयित्री* *१९४६: उषा नाडकर्णी -- मराठी नाटके व चित्रपटांमधील अभिनेत्री**१९४५: शरदचंद्र लक्ष्मण जोशी -- लेखक**१९४३: डाॅ. वासुदेव मुलाटे -- मराठवाड्यातील प्रसिद्ध ग्रामीण कथाकार, समीक्षक आणि प्रकाशक**१९३९: प्रभा अत्रे -- किराणा घराण्याच्या गायिका व लेखिका(मृत्यू: १३ जानेवारी २०२४)**१९३४: अच्युत दत्तात्रेय ओक --- लेखक**१९३०: प्रा. श्रीनिवास रघुनाथ कावळे -- मराठी लेखक (मृत्यू: ३१ जानेवारी १९९० )* *१९२६: वसंत श्रीपाद निगवेकर -- लेखक**१९०७: लक्ष्मण नीळकंठ छापेकर (आण्णासाहेब) -- कवी लेखक संपादक (मृत्यू: ६ फेब्रुवारी १९८६ )**१९०१: जमशेद बोमन होमी वाडिया -- प्रसिद्ध बॉलीवूड चित्रपट दिग्दर्शक, पटकथा लेखक, निर्माता (मृत्यू: ४ जानेवारी १९८६ )**१८९२: वालचंद रामचंद कोठारी -- संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील सक्रिय नेते, प्रतिभाशाली विचारवंत, प्रसिद्ध साहित्यिक आणि समाजहितैषी पत्रकार.(मृत्यू: १० फेब्रुवारी १९७४ )**१८८६: सर रॉबर्ट रॉबिनसन – वनस्पतिज रंग व अल्कलॉईड्सवर संशोधन करणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेते (मृत्यू:८ फेब्रुवारी १९७५ )**१८५७: मिल्टन हर्शे – ’द हर्शे चॉकलेट कंपनी’चे संस्थापक (मृत्यू: १३ आक्टोबर १९४५ )* 🛟 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🛟••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२३: माणिक गोविंद भिडे -- भारतीय हिंदूस्थानी शास्त्रीय संगीत गायिका (जन्म: १५ मे १९३५ )**२०१२: रंगनाथ मिश्रा – भारताचे २१ वे सरन्यायाधीश (जन्म: २५ नोव्हेंबर १९२६ )**२०११: गौतम राजाध्यक्ष -- मराठी फॅशन प्रकाशचित्रकार . व्यक्तिचित्रण प्रकारातल्या प्रकाशचित्रांसाठी ते विशेष नावाजले जात असत(जन्म: १६ सप्टेंबर १९५० )**१९९७: लालजी पाण्डेय तथा ’अंजान’ – हिन्दी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गीतकार (जन्म: २८ आक्टोबर १९३० )**१९९५: डॉ. महेश्वर नियोग – प्रख्यात आसामी साहित्यिक आणि इतिहासकार, पद्मश्री (१९७४), आसाम साहित्य परिषदेचे अध्यक्ष (जन्म: ७ सप्टेंबर १९१५ )**१९७१: केशवराव त्र्यंबक दाते – चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते, नाट्यशिक्षक. महाराष्ट्र नाटक मंडळी या संस्थेच्या नाटकांमधून त्यांनी काही स्त्री नायिकांच्या भूमिका केल्या. (जन्म: २४ सप्टेंबर १८८९ )**१९२९: जतिन दास -- लाहोर कटातील क्रांतिकारक जतिन दास यांनी तुरुंगातील जुलुमाचा निषेध म्हणून केलेल्या उपोषणात त्यांचा ६३ व्या दिवशी मृत्यू झाला.(जन्म: २७ आक्टोबर १९०४ )**१९२६: श्रीधर पाठक – हिन्दी कवी,लखनौ येथे भरलेल्या पाचव्या हिन्दी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (जन्म: ११ जानेवारी १८५८ )**१८९३: मामा परमानंद – पत्रकार व विचारवंत, प्रार्थना समाजाचे एक संस्थापक (जन्म: ३ जुलै १८३८ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*सायकलच्या आठवणी*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 10 नोव्हेंबरला होणार असून या परीक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबरपर्यंत आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *सोलापूर : अक्कलकोट न्यायालय इमारत बांधकामासाठी ६० कोटी मान्यता, आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या पाठपुराव्याला यश*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *नागपूर-सिकंदराबाद वंदे भारत एक्स्प्रेस १५ सप्टेंबर पासून होणार सुरू*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *एकदिवसीय विश्वचषकातून भारताची छप्परफाड कमाई; आजवरचे विक्रम मोडले, 1.39 अब्ज डॉलर म्हणजेच 11,637 कोटी कमावले*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मंत्री धर्मरावबाबा आत्रामांच्या मुलीने अखेर तुतारी फुंकली, भाग्यश्री आत्राम यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *ज्येष्ठ माकप नेते सिताराम येचुरी यांचे वयाच्या 72 व्या वर्षी निधन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारतीय हॉकी संघाचा विजयी चौकार, द. कोरियावर ३-१ ने केली मात*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*N. I. I. T. - National Institute of Information Technology*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••संकटांना जिद्दीने तोंड देणे याचेच नाव बुद्धिमत्ता. -- कार्लाइल*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) अंतराळात जाणारी पहिली खाजगी व्यक्ती कोण ठरणार आहे ?२) पॅरिस पॅराऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी एकूण किती पदके जिंकली आहेत ?३) जगातली सर्वात बलशाली कंपनी कोणती ?४) 'पोपट या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) गोदावरी नदीची लांबी किती किमी आहे ? *उत्तरे :-* १) जेरेड इसाकमॅन २) २९ पदके ३) ॲपल ४) राघू, रावा, शुक, कीर ५) १४५० किमी *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 कबीरदास गंगासागरे, मुख्याध्यापक, जि. प. हा. करखेली👤 अनिता देशमुख, गझलकार, कल्याण👤 दीपश्री वाणी, शिक्षिका, पुणे👤 योगेश रघुनाथ वाघ👤 नवीन रेड्डी👤 जी. राज शेखर *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *हरिपाठ*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एक नाम हरि द्वैतनाम दुरी । अद्वैत कुसरी विरळा जाणें ॥१॥ समबुद्धि घेतां समान श्रीहरि । शमदमांवरी हरि झाला ॥२॥ सर्वांघटीं राम देहांदेहीं एक । सूर्य प्रकाशक सहस्ररश्मी ॥३॥ ज्ञानदेवा चित्तीं हरिपाठ नेमा । मागिलिया जन्मा मुक्त झालों ॥४"|| ।। संत ज्ञानेश्वर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एखाद्याच्या राहणीमानाकडे बघून त्याची लायकी ठरवणे हे सुद्धा चुकीचे आहे. एखादी व्यक्ती सत्य बोलत असेल आणि त्याचे बोलणे ऐकून न घेता किंवा समजून न घेता त्याचा अपमान करणे हा माणुसकी धर्म नाही. गोड बोलून विश्वासात घेणाऱ्यांना जवळ करणे ही, सुद्धा सर्वात मोठी चूक आहे. चांगल्यात,चांगले बघणे अजिबात वाईट नाही पण, सर्व काही समजून सुद्धा न समजल्यासारखे वागणे हे, माणसाला शोभत नाही. म्हणून बघायचे असेल तर सकारात्मक दृष्टीने बघण्याचा प्रयत्न करावा. पण,कोणाच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचेल या प्रकारचे वागणे आपल्यात नसले पाहिजे. शेवटी नियतीच्या खेळाची वेळ कधीही सांगून येत नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*कृती महत्त्वाची*एकदा स्वामीजींना काही लोकांनी सत्संगासाठी निमंत्रित केले होते. दिवस थंडीचे होते. येणारे लोक शाली, स्वेटर घालून तसेच मफलर बांधून आले होते. मात्र, स्वामीजींचा वेश साधाच. अंगावर घाबळी पांघरलेली. एका मोठ्या प्रशस्त दिवाणखान्यात सभा सुरू झाली आधी एक भजन सुरू होते. मग स्वामीजींचा उपदेश. तेवढ्यात एक याचक त्या दिवाण खान्याच्या दाराशी आला. उघडाबंब थंडीने कुडकुडत, हातात कटोरा घेऊन उभा होता. दीनवाण्या मुद्रेने त्याने आत पाहिले. भजन सुरूच होते. स्वामीजी उठून त्या याचकाकडे गेले. आपल्या अंगावरची घाबळी त्याच्या अंगावर पांघरली आणि शिष्याला खूण केली. शिष्याने काही नाणी त्याच्या कटोर्यात टाकली आणि मग तो गरीब याचक निघून गेला. हे दृश्य सर्वच लोक बघत होते. भजन संपले. सूत्रसंचालक म्हणाला, आता स्वामीजी आपल्याला उपदेश करतील. पण स्वामीजी काही बोलेनात. श्रोत्यांमध्ये चुळबुळ सुरू झाली. अखेर सूत्रसंचालक म्हणाला, स्वामीजी, आपण आम्हाला उपदेश देताय ना? मी उपदेश दिला आहे. स्वामीजी खणखणीत आवाजात म्हणाले. आपण काहीच बोलला नाहीत. सूत्रसंचालक म्हणाला. अस्सं! म्हणजे तुम्हाला फक्त शब्दांचा उपदेश हवा आहे, कृती नको. त्या थंडीत कुडकुडणार्या माणसाची अवस्था तुमच्या ध्यानी नाही आली? मी केलेली कृती हाच माझा उपदेश! *तात्पर्य - केवळ कोरड्या शब्दांपेक्षा कृती महत्त्वाची असते.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment