✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 10 सप्टेंबर 2024💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2016/10/blog-post_6.html?m=1••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💢 *_जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन_* 💢•••••••••••••••••••••••••••••••••💢 *_ या वर्षातील २५४ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 💢 *_महत्त्वाच्या घटना:_* 💢•••••••••••••••••••••••••••••••••*२००२: परंपरेने तटस्थ देश स्वित्झर्लंड देश युनायटेड नेशन्समध्ये सामील झाला* *१९९६: गोमंतक मराठी अकादमीचा पहिला ’कृष्णदास शामा पुरस्कार’ गोमंतकीय मराठी साहित्यिक बा.द.सातोस्कर यांना तर ’पंडित महादेवशास्त्री जोशी मराठी साहित्य पुरस्कार’ कवी नारायण सुर्वे यांना जाहीर**१९६७: जनमत चाचणीत जिब्राल्टरच्या जनतेने स्पेनमधे सामील होण्याऐवजी ब्रिटनमधेच राहण्याचा निर्णय घेतला.**१९६६: पंजाब राज्याचे विभाजन होऊन पंजाब व हरियाणा अशी दोन राज्ये अस्तित्वात आली**१९४३: दुसरे महायुद्ध – जर्मन फौजांनी रोम ताब्यात घेण्यास सुरूवात केली.**१९३९: दुसरे महायुद्ध – कॅनडाने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.**१८४६: एलियास होवे याला अमेरिकेत शिवणाच्या मशिनचे पेटंट मिळाले.* 💢 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 💢 •••••••••••••••••••••••••••••••••••••• *१९८८: अमोल आसाराम घाटविसावे - कवी, लेखक* *१९७१: राजेंद्र कृष्णराव घोरपडे -- लेखक, संपादक* *१९६९: किरण काशिनाथ लोखंडे -- लेखक, संपादक* *१९६८: संजय अनंत पाटील- मायखोपकर -- कादंबरीकार, कथाकार**१९६५: अतुल कुलकर्णी -- मराठी चित्रपट व नाट्य अभिनेते* *१९६४: सुभाष नारायण वाणी -- कवी, लेखक**१९६३: डॉ. उर्मिला राघवेंद्र चाकूरकर -- कवयित्री, लेखिका, संपादिका* *१९६२: पंकज कुरुळकर -- मराठी व इंग्रजी भाषेमध्ये लेखन करणारे लेखक**१९५७: विद्याधर रावसाहेब पांडे -- कवी, लेखक**१९५६: प्रा. डॉ. मंदाकिनी कुलकर्णी-- कवयित्री**१९५५: प्रा.पुरुषोत्तम रामकृष्ण रामदासी -- प्रसिद्ध लेखक**१९५४: श्रीपाद श्रीरंग पसारकर -- कवी तथा निवृत्त कार्यकारी अभियंता**१९५४: अमर हबीब -- पत्रकार, समाजिक कार्यकर्ते आणि लेखक**१९५३: बबन सराडकर -- सुप्रसिद्ध कवी* *१९४८: भक्ती बर्वे – अभिनेत्री (मृत्यू: १२ फेब्रुवारी २००१ )**१९३८: शमीम अहमद खान -- सितारवादक आणि संगीतकार (मृत्यू: १४ फेब्रुवारी २०१२ )**१९३७: पंढरीनाथ रावजी पाटील -- लेखक* *१९३३: नीलमणी फुकन -- आसामी भाषेतील भारतीय कवी, ज्ञानपीठ पारितोषिक विजेते (मृत्यू: १९ जानेवारी २०२३ )**१९३३: व्ही. के. नाईक - मराठी चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक (मृत्यू: ८ सप्टेंबर २०१४ )**१९३२: मधुकर नारायण ऊर्फ म. ना. गोगटे -- स्थापत्य अभियंता,मराठी विज्ञान परिषदेचे संस्थापक (मृत्यू: १० मे २०२२ )**१९३०: डॉ.मनोहर बाळकृष्ण कुलकर्णी -- संस्कृतचे गाढे अभ्यासक, ज्येष्ठ लेखक व समीक्षक (मृत्यू: २९ जानेवारी २०१४ )* *१९२८: सुशीला मधुकर महाजन -- लेखिका* *१९१८: वसंत श्यामराव वरखेडकर-- कादंबरीकार,नाटककार (मृत्यू: १६ मार्च १९८५ )**१९१२: बसप्पा दानप्पा तथा बी. डी. जत्ती – भारताचे ५ वे उपराष्ट्रपती, राष्ट्रपती फख्रुद्दीन अली अहमद यांच्या आकस्मिक निधनामुळे जत्ती यांच्यावर राष्ट्रपतीपदाची जबाबदारी आली. पाच महिने ते हंगामी राष्ट्रपती (मृत्यू: ७ जून २००२ )**१९००: गजानन यशवंत चिटणीस -- वृत्तपत्रकार, कादंबरीकार (मृत्यू: २२ऑगस्ट१९४९ )**१८८८: मोरेश्वर नारायण आगाशे -- अध्यापक, यशस्वी चिकित्सक (मृत्यू: २७ ऑक्टोबर १९६० )**१८८७: गोविंद वल्लभ पंत – स्वातंत्र्यसैनिक, भारताचे दुसरे गृहमंत्री व उत्तर प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री,भारतरत्न (१९५७), (मृत्यू: ७ मार्च १९६१ )**१८८०: चिंतामण निलकंठ जोशी -- निबंधकार,प्राचीन मराठी कवितेचे संशोधक (मृत्यू: १६ जून १९४८ )* *१८७२: के. एस. रणजितसिंहजी – कसोटी क्रिकेट खेळाडू व महाराजा, यांच्या स्मरणार्थ १९३४ पासून 'रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा’ खेळल्या जातात.(मृत्यू: २ एप्रिल १९३३ )* 💢 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 💢 •••••••••••••••••••••••••••••••••••••• *२००९: भिका शिवा शिंदे -- प्रसिद्ध नाटककार, साहित्यिक (जन्म: ९ मार्च १९३३ )**१९६४: श्रीधर पार्सेकर – व्हायोलिनवादक (जन्म: १९२० )**१९२३: सुकुमार रॉय – बंगाली साहित्यिक आणि 'संदेश’ या लहान मुलांच्या मासिकाचे संस्थापक, चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रॉय यांचे वडील (जन्म: ३० आक्टोबर १८८७ )**१९००: रावबहादूर डॉ. विश्राम रामजी घोले – महात्मा फुले यांचे सहकारी व नामवंत शल्यचिकित्सक(जन्म: १८३३ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त प्रासंगिक लेख*आत्महत्या हा पर्याय नाही*शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा सध्या समाजात असलेली एक मोठी समस्या बनून पुढे येऊ पाहत आहे. सरसरी दररोज तीन शेतकरी विविध कारणामुळे मृत्यूला जवळ करीत आहेत. शेतकऱ्यांना निसर्गाची ही साथ मिळत नाही ना सरकारची साथ यामुळे तो समस्याग्रस्त बनत चालला आहे आणि त्याच विवंचणेत आत्महत्या शिवाय दूसरा पर्याय त्याला सुचेना झाले. यावर्षी शेतात भरघोस पीक येईल आणि डोक्यावर असलेले कर्ज संपून जाईल या विचारात दरवर्षी नव्या उमेदीने तो शेतात राबतो पण त्यांच्या कपाळी सुख लिहिलेले नाही तर कसे सुख मिळणार ?............ पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *आता चंद्रावर वीज निर्मिती, भारत चीन आणि रशिया सोबत साकारणार आण्विक करार*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *तुम्ही बोलवाल तिथं सभेला येईन, राहुल गांधींचं महाराष्ट्रतील नेत्यांना आश्वासन, राहुल गांधींच्या 15, प्रियंका गांधींच्या 10 सभा घेण्याचा राज्य काँग्रेसचा विचार*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याकडून साडे तीन हजारांचा भाव जाहीर, निवडणुकीच्या तोंडावर अभिजीत पाटलांचा मास्टरस्ट्रोक*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *समृद्धी महामार्ग संभाजीनगर मार्गे पुण्याला जोडणार, प्रकल्पाला जवळपास साडेनऊ हजार कोटी खर्च अपेक्षित*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *जागावाटपादरम्यान सर्व घटकपक्षांचा मान राखला जाईल, अमित शाहांकडून एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना हमी, मुंबई विमानतळावर बैठक संपन्न*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *राज्य सरकारच्या तिन्ही वीज कंपन्यांमधल्या कंत्राटी कामगारांना 19 टक्के वेतनवाढ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आशियाई चॅम्पियन ट्रॉपी 2024 मध्ये भारतीय हॉकी संघाने जपानवर 5-1 ने मिळविला धमाकेदार विजय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*उपयुक्त ड्रॅगन फळ*ड्रॅगन फळ प्रामुख्याने दक्षिण अमेरिकेत आढळते. हे द्राक्षवेलीवरचे एक फळ आहे. ड्रॅगन फळाचे स्टेम्स मांसल आणि रसाळ असतात. हे फळ दोन प्रकारचे असते. एका प्रकारच्या फळात पांढरा आणि दुसऱ्या प्रकारच्या फळामध्ये लाल रंगाचा रसाळ भाग असतो. ड्रॅगन फळ औषध म्हणून देखील वापरले जाते. हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. ड्रॅगन फळामध्ये बरीच पोषक तत्त्वे असतात. त्यात फायबर, अँटीऑक्सिडेंट्स, खनिज आणि जीवनसत्त्वे यासारखे पोषक असतात. हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. ड्रॅगन फळामध्ये कॅलरी, प्रथिने, कर्बोदको आणि फायबर असतात. आपण नियमितपणे ड्रॅगन फळ खाल्लात तर ते तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.वजन कमी करण्यास मदत करतेहृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करतेत्वचेचे आरोग्य सुधारतेस्नायूंच्या दुखण्यापासून मुक्त होण्यासाठी कार्य करते.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*A.S.E.R. - Annual Status of Education Report.*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जी व्यक्ती कर्म आणि सत्यावर जास्त भर देते, त्या व्यक्तीस अपेक्षेपेक्षा जास्त मोठं फळ प्राप्त होते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) कोणत्या झाडाच्या लाकडाला *'गोल्डन वूड'* असे म्हटले जाते ?२) आजच्या घडीला जगातला सर्वात मोठा प्लॅस्टिकचे प्रदूषण करणारा देश कोणता ?३) अंतराळवीर सुनीता विल्यम्स ही कोणत्या देशाच्या वंशाची अंतराळवीर आहे ?४) 'पाणी' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) २०२४ मध्ये देशात सर्वात जास्त आयकर भरणारा सेलिब्रिटी कोण ठरला आहे ? *उत्तरे :-* १) सागवान २) भारत ३) भारतीय वंश ४) जल, पय, उदक, वारी, नीर, सलील, जीवन ५) शाहरुख खान*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 ईश्वर येमुल, सामाजिक कार्यकर्ता, नांदेड👤 संतोष पांडागळे, सामाजिक कार्यकर्ता, नांदेड👤 नागनाथ शिंदे, शिक्षक, धर्माबाद👤 साईनाथ लोसरे👤 आकाश गाडे👤 प्रवीण भिसे पाटील👤 रोहित मुडेवार👤 विश्वांभर पापुलवाड, धर्माबाद👤 राजेश भाऊराव चिटकुलवार👤 प्रसाद पुडेवाड👤 संभाजी साळुंके👤 ज्ञानेश्वर इरलोड👤 राजू सूर्यवंशी👤 विजय गड्डम, नांदेड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *हरिपाठ*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••समाधि हरिची सम सुखेंवीण । न साधेल जाण द्वैतबुद्धि ॥१॥ बुद्धीचें वैभव अन्य नाहीं दुजें । एका केशवराजें सकळ सिद्धि ॥२॥ ऋद्धि सिद्धि निधी अवघीच उपाधि । जंव त्या परमानंदीं मन नाहीं ॥३॥ ज्ञानदेवी रम्य रमलें समाधान । हरिचें चिंतन सर्वकाळ ॥४॥ ।। संत ज्ञानेश्वर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपल्या आयुष्यात एखाद्याचे चांगले करण्याचे भाग्य लाभले नसेल तर वेळ बघून शेवटच्या क्षणी तरी त्याच्यासोबत आपुलकीच्या नात्याने प्रेमाचे दोन शब्द बोलून माणुसकी धर्म निभावून दाखविण्याचा प्रयत्न करून बघावा. कारण हे दोन शब्द एखाद्या साठी सर्वच काही असू शकतात. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*थ्री रॅबिट किंग्स*रितेश तिसरीच्या वर्गात शिकत होता. त्याच्याकडे तीन लहान गोंडस बनी होते . रितेशला त्याचा ससा खूप आवडायचा. शाळेत जाण्यापूर्वी पाकमधून मऊ हिरवे गवत आणून तो आपल्या सशाला खाऊ घालत असे . आणि मग शाळेत गेले. शाळेतून आल्यावरही त्याच्यासाठी गवत आणायचा.एके काळी रितेशला शाळेला उशीर होत होता. तो गवत आणू शकला नाही, आणि शाळेत गेला. शाळेतून आल्यावर ससा घरात नव्हता. रितेशने खूप शोधले पण कुठेच सापडला नाही. सगळ्यांना विचारलं पण ससा कुठेच सापडला नाही.रितेश दुःखी झाला आणि रडून त्याचे डोळे लाल झाले. रितेश आता पार्कात बसून रडायला लागला. काही वेळाने त्याला दिसले की त्याचे तिन्ही ससे गवत खात खेळत होते. रितेश खूश होता आणि त्याला समजले की त्याला भूक लागली आहे म्हणूनच तो उद्यानात आला आहे. जेव्हा मला भूक लागते तेव्हा मी माझ्या आईला अन्न मागते. पण तरीही मी त्यांचा नाही. ससाला भेटून तो दु:खी आणि आनंदीही झाला.नैतिक शिक्षण – ज्याला दुसऱ्याचे दुःख कळते त्याला दु:खाला स्पर्श कसा करावा हे देखील कळत नाही.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment