✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 17 सप्टेंबर 2024💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/7FKkQVMripWWJTGL/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🟪 *_मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन_* 🟪•••••••••••••••••••••••••••••••🟪 *_ या वर्षातील २६१ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🟪 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟪•••••••••••••••••••••••••••••••••*२००१: सप्टेंबर ११ च्या अतिरेकी हल्ल्यांनंतर न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज पुन्हा सुरू झाले.**१९८८: कवी कुसुमाग्रज यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर**१९८८: दक्षिण कोरियातील सेऊल येथे २४ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.**१९८३: वनीसा विल्यम्स ’मिस अमेरिका’ बनणारी पहिली कृष्णवर्णीय स्त्री ठरली.**१९५७:मलेशियाचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश**१९४८: हैदराबादच्या निजामाने शरणागती पत्करली आणि हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले.**१६३०: बॉस्टन शहराची स्थापना झाली*🟪 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟪••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८८: डॉ. प्रितीराणी जुवेकर -- कवयित्री**१९८६: प्रिया आनंद -- भारतीय चित्रपट अभिनेत्री आणि मॉडेल**१९६९: प्रकाश भास्करराव कापसे -- लेखक**१९६५: सुरेंद्र उदेभान मेश्राम -- कवी* *१९५१: डॉ. राणी बंग – सर्च सामाजिक संस्थेच्या संस्थापिका, समाजसेविका, लेखिका**१९५१: सुभाषचंद्र वैष्णव -- बाल साहित्यिक**१९५०: मा. नरेन्द्र दामोदरदास मोदी – स्वतंत्र भारताचे १५ वे पंतप्रधान,गुजरातचे माजी मुख्यमंत्री**१९४६: विलास वि. फडके -- प्रसिद्ध लेखक**१९३९: राजाभाऊ (कृष्णा बालाजीपंत) भुगावकर -- संत साहित्याचे अभ्यासक, लेखक**१९३९: रविंद्र सदाशिव भट – गीतकार (मृत्यू: २२ नोव्हेंबर २००८ )**१९३८: दिलीप पुरुषोत्तम चित्रे – लेखक, कवी आणि टीकाकार (मृत्यू: १० डिसेंबर २००९ )**१९३७: सीताकांत महापात्र – १९९३ चा ज्ञानपीठ पुरस्कार विजेते प्रख्यात ओडिया कवी**१९३६: प्रल्हाद नरहर देशपांडे -- इतिहास विषयाचे अध्यापक, संशोधक व संपादक (मृत्यू: २७ मे २००७ )**१९३२: रमेश अणावळकर -- मराठी संगीतातील महान गीतकार (मृत्यू: ३० जानेवारी २००४ )**१९३०: लालगुडी जयरामन – व्हायोलिनवादक, संगीतकार व गायक (मृत्यू: २२ एप्रिल २०१३ )**१९२९: अनंत पै ऊर्फ ’अंकल पै’ – ’अमर चित्र कथा’ चे जनक (मृत्यू: २४ फेब्रुवारी २०११ )**१९२८: मधुकर दत्तात्रय वैद्य -- लेखक* *१९२५: शरद तानाजी पाटील -- प्राच्यविद्यापंडित, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक आणि कृषी संस्कृती, ज्येष्ठ विचारवंत.(मृत्यू: १२ एप्रिल २०१४ )**१९१५: मकबूल फिदा हुसेन – चित्रकार व दिग्दर्शक (मृत्यू: ९ जून २०११ )**१९१४: थॉमस जे. बाटा – बाटा शू कंपनीचे संस्थापक (मृत्यू: १ सप्टेंबर २००८ )**१९१२: लक्ष्मण श्रीधर वाकणकर -- लिपिकार, संशोधक (मृत्यू: १५ जानेवारी १९९९ )**१९०९: गणेश विनायक अकोलकर -- शिक्षण तज्ञ ललितलेखक (मृत्यू: २३ नोव्हेंबर १९८३ )**१९०६: ज्युनिअस जयवर्धने – श्रीलंकेचे दुसरे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: १ नोव्हेंबर १९९६ )**१८८५: केशव सीताराम तथा प्रबोधनकार ठाकरे – पत्रकार, समाजसुधारक, लेखक, वक्ते व संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील एक प्रमुख कार्यकर्ते (मृत्यू:२० नोव्हेंबर १९७३)**१८८२: अवंतिकाबाई गोखले – महात्मा गांधीच्या पट्टशिष्या, चरित्रकार, परिचारिका व ’हिंद महिला समाज’च्या संस्थापिका (मृत्यू: १९४९ )**१८७९: पेरीयार ई. व्ही. रामस्वामी – स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक आणि द्रविड चळवळीचे प्रणेते (मृत्यू: २४ डिसेंबर १९७३ )*🟪 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟪••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२२: नीलकांत ढोले -- विदर्भातील ज्येष्ठ गझलकार (जन्म: १५ जानेवारी १९३९ )**२०१८: अन्ना राजम जॉर्ज-मल्होत्रा - भारतीय प्रशासकीय सेवेतील पहिल्या महिला अधिकारी (जन्म: १७ जुलै १९२७ )**२००२: विश्वनाथ वामन तथा वसंत बापट – कवी व संगीतकार (जन्म: २५ जुलै १९२२ )**२०१५: बाल जगन्नाथ पंडित --- भारतीय क्रिकेटपटू , लेखक आणि प्रसारक (जन्म: २४ जुलै १९२९ )* *१९९९: हसरत जयपुरी – गीतकार (जन्म: १५ एप्रिल १९२२ )**१९९४: व्हिटास गेरुलायटिस – अमेरिकन लॉन टेनिसपटू (जन्म: २६ जुलै १९५४ )**१९८१: त्र्यंबक गोविंद माईणकर -- प्राध्यापक, भाषातज्ज्ञ, लेखक (जन्म: १५ मार्च १९१५ )**१९३६: हेन्री लुईस ली चॅटॅलिअर – फ्रेन्च रसायनशास्त्रज्ञ (जन्म: ८ आक्टोबर १९५० )**१८७७:हेन्री फॉक्स टॅलबॉट – छायाचित्रणकलेचा पाया घालणारे (जन्म: ११फेब्रुवारी १८०० )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त प्रासंगिक लेख*मराठवाड्याचा रोमांचक इतिहास*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *आज वाजत गाजत श्री गणरायाला मिळणार निरोप, रत्नागिरीत 37 हजाराहुन अधिक घरगुती गणरायाचे विसर्जन*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *विकसित भारताच्या दिशेने देशाचं दमदार पॉल पडलं आहे - पंतप्रधान नरेंद मोदी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *शिक्षक संघटनेकडून 25 सप्टेंबर रोजी शाळा बंद ठेवण्याची हाक, दोन शासकीय निर्णय मागे घेण्याबाबत पुकारले आंदोलन*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *लोकसभेत तिकीट कापलेल्या हेमंत पाटलांना मंत्रिपदाचा दर्जा, मुख्यमंत्री शिंदेंकडून राजकीय पुनर्वसन*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *छत्रपती संभाजीनगर - दोन दिवसीय भारतीय कापूस परिषदेचे आयोजन, 10 राज्यातील 1 हजार प्रतिनिधी उपस्थित राहणार; बदलत्या जागतिक परिस्थितीवर तज्ञांचे मार्गदर्शन*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज राजीनामा देण्याची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आशियाई चॅम्पियन ट्रॉपी - भारतीय हॉकी संघाचा विजयी षटकार, द. कोरियाला हरवत फायनल मध्ये दाखल*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📕 *धुरामुळे गुदमरल्यासारखे का होते ?* 📕धुरात माणूस गुदमरतो. याचे कारण काय ते आता पाहू. आपण हवा श्वासावाटे आत घेतो. त्यात ऑक्सिजन (२०.९३ टक्के), कार्बन डायऑक्साइड (०.०३ टक्के), नायट्रोजन (७८.१ टक्के) तसेच अत्यल्प प्रमाणात निऑन, ॲगन, क्रिप्टॉन, झेनॉन व हेलीयम हे वायू असतात. या खेरीज पाण्याची वाफ, अमोनिया तसेच धूळ. जिवाणू, वनस्पतीजन्य कचरा असे तरंगणारे पदार्थही असतात.धुरामध्ये कार्बन डाय ऑक्साइड असतो. हवेतील त्याचे प्रमाण वाढल्याने व ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याने गुदमरल्यासारखे वाटत असेल असा पूर्वी समज होता. प्रत्यक्षात मात्र ऑक्सिजनचे प्रमाण १८ टक्क्यांपर्यंत कमी झाले.वा कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण ५ टक्क्यांपर्यंत वाढले, तरी आपल्याला फारसा त्रास होत नाही, असे शास्त्रीयनिरीक्षणाद्वारे सिद्ध झाले आहे.धुरामध्ये माणसाला गुदमरल्यासारखे वाटते, अस्वस्थ वाटते. याचे कारण म्हणजे तापमानात होणारी वाढ.तापमानातील वाढीमुळेच माणसाचा मृत्यूही ओढवू शकतो. कलकत्त्यामध्ये एका तुरुंगात १८ × १४ X १० फुटाच्याखोलीत १४६ कैदी होते. खोलीला वायूवीजनासाठी पुरेशा अशा दोन लहान खिडक्या होत्या. ऑक्सिजन, कार्बनडायऑक्साइड यांचे प्रमाण सामान्य राहूनही त्यातील फक्त २३ जण जिवंत राहिले. कारण त्या खोलीतील तापमानव आर्द्रतेत खूपच वाढ झाली होती. अर्थात धुरामुळे हवेतील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण ५ टक्क्यांच्या वर गेले, तर त्यामुळेही गुदमरल्यासारखे होते.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*B. A. M. S. - Bachelor of Ayurvedic Medicine and Surgery*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्या प्रमाणे पक्ष्यांचे आश्रयस्थान घरटे असते, त्याप्रमाणे आपल्या वाणीचे आश्रयस्थान मौन असते. --- रवींद्रनाथ टागोर*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) पंतप्रधानांच्या निवासस्थानी गायीने जन्म दिलेल्या वासराचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणते नाव ठेवले आहे ?२) कुस्तीपटू विनेश फोगाट व बजरंग पुनिया यांनी कोणत्या पक्षात प्रवेश केला आहे ?३) भारताची पहिली वंदे मेट्रो ट्रेन कोणत्या दोन ठिकाणादरम्यान धावणार आहे ?४) 'पंडित' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) जम्मू काश्मीरमधील डोडाला ५० वर्षात भेट देणारे पहिले पंतप्रधान कोण ? *उत्तरे :-* १) दिपज्योती २) भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ३) अहमदाबाद ते भूज ( ३३४ किमी ) ४) शास्त्री, विद्वान, बुद्धिमान ५) नरेंद्र मोदी*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 दयाकर रेड्डी, येताळा👤 महेश राखेवार, कलाशिक्षक, नांदेड👤 जितेंद्र टेकाळे, माहूर👤 बालाजी गाडेवाड👤 किसन कोनापुरे👤 अक्षय वानोळे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *हरिपाठ*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••हरिपाठकीर्ति मुखें जरी गाय । पवित्रचि होय देह त्याचा ॥१॥ तपाचे सामर्थ्ये तपिन्नला अमूप । चिरंजीव कल्पकोटि वैकुंठीं नांदे ॥२॥ मातृपितृभ्राता सगोत्र अपार । चतुर्भुज नर होऊनि ठेले ॥३॥ ज्ञान गूढ गम्य ज्ञानदेवा लाधलें । निवृत्तीनें दिधले माझे हातीं ॥४॥ ।। संत ज्ञानेश्वर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••चौकशी हे नाव खूप सुंदर आहे. जेव्हा याच नावाच्या आधाराने एखाद्या दु:खी, पिडीत, अडचणीत सापडलेल्या माणसांच्या भल्यासाठी तसेच चांगल्या गोष्टीसाठी चौकशी केली जाते. त्याक्षणी या नावाचा मान वाढत जातो. पण, नको त्या गोष्टीसाठी चौकशी केली जाते त्यावेळी मात्र याच नावाचे चौकशी ऐवजी चौकशा या प्रकारचे नाव पडले जाते. त्या सुंदर अशा नावाचा अपमान होतो. म्हणून एखाद्याच्या भल्यासाठी चौकशी करणे अजिबात वाईट नाही उलट आवश्यकता आहे. पण,विनाकारण कोणाला त्रास देण्यासाठी चौकशी करणे हे, सुद्धा माणसाला शोभण्यासारखे कार्य नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*कालियाला शिक्षा झाली*संपूर्ण गल्ली कालियावर नाराज होती. कधी कधी तो भुंकून रस्त्यावरून येणाऱ्या लोकांना घाबरवायचा . कधी चावायला धावत असे. भीतीपोटी मुलांनी त्या गल्लीत एकटे जाणे बंद केले होते. त्या रस्त्यावर चुकून एखादं मुल गेलं तर त्याच्या हातातील खाद्यपदार्थ हिसकावून पळून जायचे. कालियाने तिच्या मित्रांनाही त्रास दिला होता. सगळ्यांना घाबरवून तो स्वत:ला गल्लीचा सेट समजू लागला. त्याच्या कळपात शेरू नावाचा एक छोटा कुत्राही होता. तो कोणालाही त्रास देत नाही, अगदी लहान मुले देखील त्याच्यावर खूप प्रेम करतात. एके दिवशी राहुलने शेरूसाठी रोटी आणली. शेरू खूप खुश झाला आणि तो भाकरी घेऊन गाडीखाली धावला. तिथे बसून जेवायला सुरुवात केली. शेरूला भाकरी खाताना पाहून कालियाने जोरात धक्का दिला आणि भाकरी घेऊन पळून गेला. शेरू जोरजोरात रडू लागला. राहुलने वडिलांना सांगितले. कालियाची कृती त्याच्या वडिलांना माहीत होती. त्याने यापूर्वीही पाहिले होते. त्याला खूप राग आला. एक काठी काढून कालिया दुरुस्त केला. कालियाला आता आजीची आठवण झाली. तो इतका सुधारला होता की रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांनाही तो त्रास देत नाही. लहान मुलाला पाहून तो लपून बसायचा.नैतिक – वाईट कर्मांचे वाईट परिणाम होतात, वाईट कर्म टाळावे.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment