✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 05 ऑगस्ट 2024💠 वार - गुरूवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/QC3AMHJEUY5wRe13/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🟪 *_भारतीय शिक्षक दिन_*🟪•••••••••••••••••••••••••••••••••🟪 *_ या वर्षातील २४९ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🟪 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟪•••••••••••••••••••••••••••••••••*२००५: इंडोनेशियातील सुमात्रा येथे मंडाला एअरलाइन्सचे ’फ्लाईट ०९१’ हे उड्डाण दाट लोकवस्तीच्या भागात कोसळुन विमानातील १०४ आणि जमिनीवरील ३९ लोक ठार झाले.**२०००: ज्येष्ठ दिग्दर्शक हृषीकेश मुकर्जी यांना ’दादासाहेब फाळके’ पुरस्कार जाहीर**१९६७: ह. वि. पाटसकर पुणे विद्यापीठाचे सातवे कुलगुरू झाले.**१९४१: इस्टोनिया हा प्रांत नाझी जर्मनीने ताब्यात घेतला.**१९३२: फ्रेन्च अपर व्होल्टा या प्रांताचे विभाजन करुन आयव्हरी कोस्ट, फ्रेन्च सुदान आणि नायगर असे देश निर्माण करण्यात आले.* 🟪 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟪••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९०: अजय भिल्लारे-- कवी* *१९८७: संतोष सुभाष जपे -- लेखक**१९८६: प्रज्ञान ओझा -- भारतीय क्रिकेटपटू**१९८४: भक्ती प्रशांत जोशी -- लेखिका**१९७८: लक्ष्मण एकनाथ जगताप --- लेखक**१९७७: डॉ.रामकिशन दहिफळे -- लेखक, संपादक* *१९७७: रोहिणी मुकुंद पांडे -- कवयित्री, लेखिका**१९७६: चंद्रकांत घाटाळ -- लेखक**१९७६: बाळासाहेब गर्कळ -- लेखक, कवी**१९७३: प्रमोद बाबुराव चोबीतकर -- लेखक**१९६९: धोंडोपंत शंकरराव मानवतकर -- कवी लेखक**१९६७: कविता महाजन -- मराठी लेखिका, कवयित्री (मृत्यू: २७ सप्टेंबर २०१८ )**१९६४: ग्यानचंद ताराचंद जांभुळकर- लेखक**१९६३: सुनंदन लेले -- क्रिकेटर ते पत्रकार अशी ओळख असलेले सुप्रसिद्ध क्रीडा समीक्षक**१९६३: योगेन्द्र सिंह यादव -- ज्येष्ठ राजकीय विश्लेषक* *१९५९: दत्तात्रेय मारुतीराव माने (द.मा.माने) -- लेखक, कवी**१९५९: डॉ. संध्या टिकेकर -- मराठी व हिंदी भाषेमध्ये लेखन करणाऱ्या कवयित्री, लेखिका**१९५५: स्मिता तळवलकर -- मराठी चित्रपट,नाट्य आणि दूरचित्रवाणी अभिनेत्री, निर्मात्या आणि दिग्दर्शक(मृत्यू: ६ ऑगस्ट २०१४ )**१९५५: पुष्पा देवीदास कांबळे -- कवयित्री* *१९५४: लक्ष्मीकांत देशमुख -- भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी, सुप्रसिद्ध साहित्यिक व बडोदा येथील ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष* *१९५२: विधू विनोद चोप्रा-- लेखक, निर्माता, दिग्दर्शक, संपादक, गीतकार, अभिनेता**१९५०: अनवर कुरेशी -- गझल गायक**१९४७: महादेव श्रीराम इलामे -- लेखक व कवी* *१९४४: देविदास श्रीगिरीवार -- निवृत्त शिक्षण सहसंचालक तथा लेखक* *१९४२: डॉ. पं. केशव गिंडे --भारतीय शास्त्रीय बासरीवादक**१९३०: अण्णा शिरगावकर -- लेखक व नामवंत इतिहास संशोधक (मृत्यू: ११ ऑक्टोबर २०२२ )**१९२८: दमयंती जोशी – सुप्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना (मृत्यू: १९ सप्टेंबर २००४ )**१९२०: लीला पोतदार तथा लीलावती भागवत – बालसाहित्यिका.ओघवती भाषा, चित्रमय वर्णन व बोलकी संवादशैली ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये...(मृत्यू: २५ नोव्हेंबर २०१३ )**१९०७: जयंत पांडुरंग तथा ’जे.पी.’नाईक – शिक्षणतज्ञ, ’इंडियन इन्स्टिट्युट ऑफ एज्युकेशन’चे संस्थापक, ’नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग’चे संस्थापक,(मृत्यू: ३० ऑगस्ट १९८१ )**१९०४: भालचंद्र पंढरीनाथ बहिरट -- संत साहित्याचे अभ्यासक, तत्त्वज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ (मृत्यू: १४ आक्टोबर १९९८ )**१८९५: अनंत काकबा प्रियोळकर – भाषा व इतिहास संशोधक, लेखक, संपादक व समीक्षक (मृत्यू: १३ एप्रिल १९७३ )**_१८८८: डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन – भारताचे दुसरे राष्ट्रपती, पहिले उपराष्ट्रपती आणि तत्त्वज्ञ, त्यांच्या गौरवार्थ त्यांचा जन्मदिन हा भारतात ’शिक्षक दिन’ म्हणून साजरा केला जातो.(मृत्यू: १७ एप्रिल १९७५ )_**१८७७: कृष्णाजी पांडुरंग लिमये -- जुन्या पंडिती वळणाचे कवी (मृत्यू: १ नोव्हेंबर १९२२ )**१८७२: त्रिंबक नारायण आत्रे -- महाराष्ट्रातील ग्रामीण समाजाचे व मागासलेल्या जातिसंस्थांचे अभ्यासक तसेच ग्रामव्यवस्था व गुन्हेगारी जगत या विषयांचे तज्ज्ञ लेखक(मृत्यू: फेब्रुवारी १९३३ )*🟪 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟪•••••••••••••••••••••••••••••••••••••• *२०१९: किरण नगरकर -- मराठी आणि इंग्रजी भाषेत लिहिणारे आधुनिक लेखक, नाटककार, समीक्षक(जन्म: २ एप्रिल १९४२ )* *२०१५: आदेश श्रीवास्तव -- भारतीय गायक व संगीत दिग्दर्शक ( जन्म: ४ सप्टेंबर १९६६ )**२०००: रॉय फ्रेड्रिक्स – वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू (जन्म: ११ नोव्हेंबर १९४२ )**१९९७: मदर तेरेसा – भारतरत्न व नोबेल पारितोषिक विजेत्या समाजसेविका (जन्म: २६ ऑगस्ट १९१० )**१९९५: सलील चौधरी -- हिंदी चित्रपटांचे प्रसिद्ध संगीतकार (जन्म: १९ नोव्हेंबर १९२३ )**१९९२: अतूर संगतानी – उद्योगपती व दानशूर व्यक्ति* *१९९१: शरद जोशी – हिन्दी कवी, लेखक व उपहासकार (जन्म: २१ मे १९३१ )**१९७८: रघुनाथ रामचंद्र तथा रॉय किणीकर – कवी, संवादलेखक, नाटककार व पत्रकार. (जन्म: १ जानेवारी १९०८ )**१९१८: सर रतनजी जमसेटजी टाटा – टाटा घराण्यातील उद्योगपती व दानशूर व्यक्ति (जन्म: २० जानेवारी १८७१ )**१९०६: लुडविग बोल्टझमन – ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: २० फेब्रुवारी १८४४ )* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••खास शिक्षक दिनानिमित्त you tube वर प्रसारित कथा*हाताची जादू ओळखणारा शिक्षक*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *राज्य सरकारचा मोठा निर्णय; नागपुरात उभारणार मिनी बॉलिवूड; 100 हेक्टरमध्ये भव्य चित्रनगरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राज्य सरकारची एसटीला 300 कोटींची मदत, सवलतमुल्याच्या प्रतिपूर्तीसाठी महामंडळाला दिली रक्कम, ST कर्मचाऱ्यांचा संप मागे*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या सर्व पास-नापास विद्यार्थ्यांना सरळसरळ वरच्या वर्गात प्रवेश (फुल कॅरी ऑन) देण्याचा महत्वपूर्ण निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *13 सप्टेंबर रोजी होणाऱ्या 'पुणे फेस्टिव्हल'चे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते, क्रीडा स्पर्धां आणि विशेष कार्यक्रमांचे आयोजन*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *आता पेन्शन धारकांना मिळणार कोणत्याही बँक शाखेतून पेन्शन, सुविधा 1 जानेवारी 2025 पासून होणार सुरू*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *CBI कडून अनिल देशमुखांविरुद्ध गुन्हा दाखल ; महाविकास आघाडीचे सरकार असतानाचे प्रकरण*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *सांगलीतील आटपाडीच्या पठ्ठ्याने इतिहास रचला,सचिन खिलारीला पॅरालिम्पिकमध्ये रौप्य पदक*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*नारळ खाण्याचे फायदे*नारळात असलेले ट्रायग्लिसराइड शरीरातील चरबी जाळण्यास मदत करते. कच्च्या नारळाच्या सेवनाने भूक कमी होते, ज्यामुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. थंडीच्या काळात सर्वाधिक लोकांना बद्धकोष्ठताची समस्या असते. जर तुम्ही बद्धकोष्ठतेच्या समस्येने त्रस्त असाल तर कच्च्या नारळाचे सेवन करू शकता.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*A. I. R. - All India Radio*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••काळ जरी तुम्हाला बदलता येणे शक्य नसेल तरी आपण बदलण्याचा हा काळ आहे हे ओळखा.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) अमेरिकन सैन्याच्या कोणत्या विशेष तुकडीने ओसामा बिन लादेन यांची पाकिस्तानातील अँबोटाबाद येथे हत्या केली ?२) जोतिबांना 'महात्मा' ही पदवी कोणत्या साली बहाल झाली ?३) शहीद खुदीराम बोस यांना कोणत्या कारागृहात फाशी देण्यात आली ?४) संस्कृत व्याकरणाचा प्रमाण ग्रंथ कोणत्या ग्रंथाला मानतात ?५) सम्राट हर्षवर्धनच्या काळात चीनमध्ये तयार होणाऱ्या रेशमी कापडाला भारतात काय म्हणायचे ? *उत्तरे :-* १) Navy Seals 6 २) सन १८८८ ३) मुज्फरपूर कारागृह ४) अष्टाध्यायी ५) चीनांशुक*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 राजकुमार काळे, सहशिक्षक, बिलोली👤 रत्नाकर चिखले, मुंबई👤 धोंडोपंत मानवतकर, औरंगाबाद👤 लक्ष्मीनारायण येरकलवार, सहशिक्षक, चंद्रपूर👤 नितीन शिंदे, सहशिक्षक, पुणे👤 नरेश रेड्डी, धर्माबाद👤 सौरभ सावंत, नांदेड👤 बालाजी आरेवार, येवती👤 गंगाधर मरकंटवाड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *हरिपाठ*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••विष्णुविण जप व्यर्थ त्याचें ज्ञान । रामकृष्णीं मन नाहीं ज्याचें ॥१॥ उपजोनी करंटा नेणें अद्वय वाटा । रामकृष्णीं पैठा कैसेनी होय ॥२॥ द्वैताची झाडणी गुरुविण ज्ञान । तया कैचें कीर्तन घडे नामीं ॥३॥ ज्ञानदेव म्हणे सगुण हें ध्यान । नामपाठ मौन प्रपंचाचे ॥४॥ ।। संत ज्ञानेश्वर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कधी कधी आपल्याला वाटत असते की, सर्वांशी दोन शब्द प्रेमाने बोलावे आणि माणुसकी धर्म निभावून दाखवावे पण त्याच शब्दांविषयी न कळताच जेव्हा आपल्या पाठीमागे जमून फायदा घेतला जात असेल तर मात्र त्यावेळी आपले मन दुखावत असते व आपुलकी वरचा विश्वास कायमचा उडून जातो. म्हणून समोरच्या व्यक्तीसोबत बोलताना आधी स्वतःला वाचावे व त्या व्यक्तीला सुद्धा वाचावे दु:खी होण्याची वेळ आपल्यावर येणार नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*खरा वेडा कोण*एका वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये वेड्यांना बाहेर पडेपर्यंत म्हणजेच पूर्ण बरा झाला आहे की नाही हे पाहण्यासाठी अनेक मानसशास्त्रीय चाचण्यांना तोंड द्यावे लागत असे. त्यातील शेवटच्या चाचणीमध्ये वेड्यासमोर एक नवे कोरे चकचकीत पाच रूपयांचे नाणे आणि एक मळकट पन्नास रूपयांची नोट ठेवली जाई. त्यातील फक्त एकच गोष्ट त्याला उचलण्यास सांगितली जाई. वेड्याने पन्नास रूपये उचचले की त्याला डिसचार्ज दिला जाई व तसे न केल्यास त्याला पुन्हा एकदा चाचण्या पार करायला सांगितल्या जात. गरज पडल्यास पुन्हा उपचारासाठीही पाठविले जाई. हॉस्पीटलमधील एक वेडा शेवटच्या चाचणीपर्यंत सगळ्या चाचण्या पटापट पार करत असे मात्र शेवटच्या चाचणीला मात्र नापास होत असे. अनेकदा असे घडल्यावर चाचणी घेणारे डॉक्टर कंटाळले व त्यांनी एक युक्ती केली पुढच्या वेळेला त्या वेड्यासमोर एक पाच रूपयांची जुनी नोट व पन्नास रूपयांची कोरी करकरीत नवी नोट ठेवली तरीही त्या वेड्याने पाच रूपयांचीच नोट उचचली. हे पाहून डॉक्टर आश्चर्यचकित झाले व ओरडले,'' अरे मूर्खा, सगळ्या चाचण्या आरामात पार करतोस आणि शेवटच्या चाचणीत मात्र कायम चुकतोस. तुला पाच आणि पन्नास यातील फरक कळत नाही काय'' वेडा शांतपणे म्हणाला,'' ते मला चांगलं कळतं डॉक्टरसाहेब, पण इथून बाहेर पडलो की, मला रोजचा खर्च स्वत:लाच करावा लागणार आहे. त्यापेक्षा पाच रूपयांचे नाणे उचचले की, मला इथून बाहेर पडावे लागत नाही, पाच रूपयेही मिळतात आणि खाणेपिणेराहणे सगळे काही फुकटात होते. मग मी पन्नास रूपयांची नोट उचलून स्वत:च्या पायावर धोंडा पाडून का म्हणून घेऊ''वर्तमानपत्रातून संग्रहित•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment