✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 03 ऑगस्ट 2024💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/uKjwW3NMPZfuD7Vy/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••⚪ *_ या वर्षातील २१६ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• ⚪ *_महत्त्वाच्या घटना:_* ⚪•••••••••••••••••••••••••••••••••*२००४: राज्यपाल महंमद फझल यांच्या हस्ते सोलापूर विद्यापीठाचे औपचारिक उद्घाटन झाले. १ ऑगस्ट २००४ रोजी या विद्यापीठाची स्थापनाझाली होती.**२०००: मल्याळी दिग्दर्शक शाजी एन. करुण यांना फ्रेन्च सरकारने ’नाईट ऑफ आर्टस अँड लेटर्स’ पुरस्काराने सन्मानित केले.**१९९४: संगीतकार अनिल विश्वास यांना मध्य प्रदेश सरकारचा ’लता मंगेशकर पुरस्कार’ जाहीर**१९९४: सहज सोप्या व गोड कविता आणि सूक्ष्म व मार्मिक वर्णनात्मक लेख यांद्वारे हिन्दी साहित्याची अमूल्य सेवा करणारे डॉ. हरिवंशराय बच्चन यांना उत्तर प्रदेश सरकारतर्फे विषेश पुरस्कार जाहीर.**१९६०: नायजरला (फ्रान्सकडून) स्वातंत्र्य मिळाले.**१९४८: भारतीय अणूऊर्जा आयोगाची (Indian Atomic Energy Commission) स्थापना झाली.**१९३६: आंतरमहाविद्यालयीन पुरुषोत्तम करंडक ही स्पर्धा आयोजित करणार्या ’महाराष्ट्रीय कलोपासक’ या संस्थेची हौशी आणि प्रायोगिक नाट्यसंस्था सुरू झाली. महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार या संस्थेचे पहिले अध्यक्ष झाले.**१९१४: बव्हेरियाचे राजे लुडविक यांच्याकडे आपणांस सैन्यात दाखल करून घ्यावे असा हिटलरने अर्ज केला आणि त्याची सैन्यात नियुक्तीझाली.**१९००: ’द फायरस्टोन टायर अँड रबर कंपनी’ ची स्थापना झाली.**१७८३: जपानमधील माउंट असामा ज्वालामुखीचा उद्रेक होऊन सुमारे ३५,००० जण मृत्यूमुखी पडले.* ⚪ *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ⚪••••••••••••••••••••••••••••••••• *१९९२: रसिका सुनील ( धबडगांवकर) -- अभिनेत्री**१९८४: सुनील छेत्री -- भारतीय व्यावसायिक फुटबॉलपटू* *१९८१: मनीष पॉल -- भारतीय अभिनेता, टीव्ही होस्ट, अँकर, मॉडेल आणि गायक**१९७७: सुनील ग्रोव्हर. --- भारतीय विनोदी अभिनेता* *१९६७: बिपिन मयेकर -- लेखक**१९६५: प्रा. डॉ. शुभांगी रामचंद्र परांजपे (डोरले)-- कवयित्री, लेखिका* *१९६०: ईश्वर विठ्ठलराव मगर -- कवी,लेखक समाज प्रबोधन**१९५९: अजय बिरारी -- अहिराणी व मराठी कवी,गझलकार व अभिनेता* *१९५६: विजया सुकाळे. -- लेखिका* *१९५६: बलविंदरसिंग संधू – १९८३ च्या क्रिकेट विश्वचषक विजेत्या संघातील क्रिकेटपटू**१९५६: प्रकाश शंकरराव जंजाळ-- लेखक* *१९४९: रमेश भाटकर -- मराठी चित्रपट, रंगमंच आणि टीव्ही अभिनेता(मृत्यू: ४ फेब्रुवारी २०१९ )**१९४२: अनु आगा -- भारतीय उद्योगपती आणि सामाजिक कार्यकर्त्या**१९३६: पंडित छन्नूलाल मिश्रा -- बनारसमधील प्रसिद्ध हिंदुस्थानी शास्त्रीय गायक**१९३४: डॉ. गो. बं. देगलूरकर -- मूर्तिशास्त्राचे अभ्यासक**१९३३: माणिक कामिनी कदम -- कामिनी कदम या नावाने प्रसिद्ध भारतीय अभिनेत्री (मृत्यू: १८ जून २००० )**१९३२: भा.ल.महाबळ -- मराठी साहित्यातील प्रसिद्ध विनोदी लेखक**१९२४: लिऑन युरिस – अमेरिकन कादंबरीकार (मृत्यू: २१ जून २००३ )**१९१८: जयदेव (जयदेव वर्मा )-- हिंदी चित्रपटांतील संगीतकार (मृत्यू: ६ जानेवारी १९८७ )**१९१७: मनहर देसाई -- अभिनेते (मृत्यू: २५ फेब्रुवारी १९९२ )**१९१६: शकील बदायूँनी – गीतकार आणि शायर (मृत्यू: २० एप्रिल१९७० )**१९००: क्रांतिसिंह नाना पाटील – स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, ’पत्री सरकार’चे (प्रति सरकार) संस्थापक आणि कम्युनिस्ट पक्षाचे खासदार (मृत्यू: ६ डिसेंबर १९७६ )**१८९८: उदयशंकर भट्ट – आधुनिक हिंदी नाटककार, एकांकिकाकार, कवी आणि कादंबरीकार.(मृत्यू:२८ फेब्रुवारी १९६६ )**१८८७: श्रीकृष्ण नीलकंठ चापेकर-- कवी, जुन्या पिढीतील महत्वाचे समीक्षक (मृत्यू: १७ डिसेंबर १९४२ )* *१८८६: मैथिलिशरण गुप्त – हिन्दी कवी. त्यांचे सुमारे ४० स्वतंत्र ग्रंथ आणि ६ अनुवादित ग्रंथ प्रसिद्ध झाले. त्यांच्या ’भारतभारती’ या काव्यग्रंथामुळे त्यांना राष्ट्रकवी म्हणून मान्यता मिळाली. (मृत्यू: १२ डिसेंबर १९६४ )**१८६३: सालोमन शालोम आपटेकर -- नाटककार व किर्तनसंहिता- लेखक (मृत्यू: २१ हे १९५७ )* ⚪ *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ⚪ ••••••••••••••••••••••••••••••••• *२०२३: नामदेव धोंडो (ना .धो.) महानोर -- प्रसिद्ध मराठी कवी आणि गीतकार (जन्म : १६ सप्टेंबर १९४२)**२०२२: मिथिलेश चतुर्वेदी --भारतीय चित्रपट आणि थिएटर अभिनेता (जन्म : १५ऑक्टोबर१९५४)**२०२०: जॉन ह्यूम - आयरिश नोबेल पीस पुरस्कार विजेते राजकारणी (जन्म: १८ जानेवारी १९३७ )* *२००७: सरोजिनी वैद्य – प्रसिद्ध लेखिका (जन्म: १५ जून १९३३ )**१९९३: स्वामी चिन्मयानंद सरस्वती – अध्यात्मिक गुरू (जन्म: ८ मे १९१६ )**१९५७: देवदास गांधी – पत्रकार, ‘हिन्दुस्तान टाइम्स‘चे संपादक, महात्मा गांधींचे चिरंजीव (जन्म: २२ मे १९०० )**१९३०: व्यंकटेश बापूजी केतकर – विख्यात गणिती व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्योतिर्विद (जन्म: १२ जानेवारी १८५४ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*नजर हटी ; दुर्घटना घटी*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *महिला सक्षमीकरणामुळेच देश महासत्ता होईल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ तर मराठा आंदोलकांकडून काळे झेंडे दाखवत निषेध*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव नामांतराला विरोध करणारी याचिका फेटाळली, नामांतरप्रकरणी हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार; नाव बदललं की काही लोक समर्थनार्थ आणि विरोधात असणारच, सुप्रीम कोर्टाचे निरीक्षण*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *शेतकऱ्यांना मोठा दिलासा, पीक नुकसान भरपाईसाठी ५९६ कोटींचा निधी मंजूर*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *एस टी कर्मचाऱ्यांचा पगार होणार वेळेवर, कर्मचाऱ्यांनी दिला होता आंदोलनाचा इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *राज्याच्या प्रशासकीय कामकाजात ‘महिला राज’; शोमिता बिश्वास ठरल्या पहिल्या महिला वनबल प्रमुख*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *हरमनप्रीत सिंहच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय हॉकी संघाने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी करत ऑस्ट्रेलियाचा 3-2 असा पराभव केला. भारतीय हॉकी संघासाठी हा विजय विशेष महत्त्वाचा ठरलाय*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *श्रीलंकेविरुद्धच्या पहिला एकदिवसीय सामना अनिर्णित, दोघांच्या धावा झाल्या समान*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *जंतूचा शोध कोणी लावला ?* 📙 १८६० च्या आधी कोणालाच जंतू म्हणजे काय याची माहिती नव्हती. रोग कशामुळे होतात, याबद्दलचे अनेक समज प्रचलित होते. देवाचा कोप, भूत-प्रेत यांची बाधा, जादूटोणा अशा अनेक कारणांचा यात समावेश होता. त्यामुळे रोगांवरचे उपाय हे देवाची आराधना करणे, बळी देणे, मांत्रिकाकडून भूत उतरवणे, गळ्यात ताईत गंडे बांधणे आणि गावातच कुणाला औषधी वनस्पतींबद्दल माहिती असेल तर त्यांच्याकडून उपचार करून घेणे, या प्रकारचे असत. आपल्या देशातील आयुर्वेद उपचार पद्धतीतील त्रिदोष संकल्पनेनुसार खूप पूर्वीपासून उपचार केले जात. सर्वप्रथम १८६० मध्ये लुई पाश्चर या फ्रेंच सूक्ष्म जीवशास्त्रज्ञाने हवेत जीवाणू असतात हे दाखवून दिले. त्यामुळे रोग का होत असावेत याचा नवीन विचार सुरू झाला. पाश्चरने रोगजंतूंमुळे रोग होतात या संकल्पनेचा विकास व पाठपुरावा केला. रॉबर्ट कॉक या शास्त्रज्ञाने १८७७ मध्ये अँथ्रॅक्स हा रोग जीवाणूपासून होतो हे दाखवून दिले. यानंतर सुक्ष्म जीवशास्त्राचे सुवर्णयुग सुरू झाले. व एकामागे एक अनेक जीवजंतूंचा शोध लागला. या जंतुंचे जिवाणू (Bacteria) व विषाणू (Virus) हे दोन प्रकार पडतात. यापैकी विषाणू केवळ इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक खालीच दिसू शकतात. जीवाणू मात्र साध्या सूक्ष्मदर्शक यंत्राखाली सुद्धा दिसतात. आकारातील बदला खेरीच त्यांच्यात पुष्कळ फरक असतात. कॉलरा, टायफॉइड, क्षयरोग हे जिवाणूंमुळे होणारे रोग आहेत; तर पोलिओ, कावीळ, गोवर, गालफुगी हे रोग विषाणूंमुळे होतात. जिवाणूंना मारणारी प्रभावी औषधे आजकाल उपलब्ध आहेत, पण विषाणूंना मारतील अशी प्रभावी औषध आजही उपलब्ध नाहीत.*महत्त्वाच्या जंतुंचा शोध* -जंतू -- साल -- शास्त्रज्ञ गोनोकोक्कस -- १८७९ -- निसरक्षयरोग -- १८८२ -- रॉबर्ट कॉककुष्ठरोग -- १८७४ -- हॅन्सनन्युमोकोक्कस -- १८८६ -- फ्रेंकेलघटसर्प -- १८८४ -- लोफ्लरकॉलरा -- १८८३ -- रॉबर्ट कॉकगोवर -- १९५४ -- एंडर्स, पीबलसइन्फ्यूएंझा -- १९३३ -- स्मिथ, ॲन्ड्र्यूज र्हायनो व्हायरस (सर्दीपडशाचा विषाणू) -- १९६० -- टूरेल व इतर*डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित* यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अनुभव हा महान शिक्षक आहे , पण तो मोबदला मात्र फार घेतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) देशात कोणते राज्य कीटकनाशक वापरण्यात प्रथम क्रमांकावर आहे ?२) भारताचे प्रथम नागरिक कोण असतात ?३) अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था ( आर्टी ) च्या कार्यालयाचे उद्घाटन कोठे होणार आहे ?४) 'दंडवत' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) 'टायगर प्रोजेक्ट' हा उपक्रम कोणत्या पंतप्रधानांच्या कार्यकाळात सुरू करण्यात आले होते ? *उत्तरे :-* १) उत्तरप्रदेश २) राष्ट्रपती ३) मुंबई ४) नमस्कार ५) इंदिरा गांधी *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 अजय बिरारी, साहित्यिक, नाशिक👤 रमेश करपे, शिक्षक, कुंडलवाडी👤 प्रदिप कारले👤 पोतन्ना चिंचलोड, सामाजिक कार्यकर्ते, धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गुरु मानुष करि जानते ते नर कहिये अन्ध ।यहां दुखी संसारमें आगे यमके बन्ध ॥ 34 ॥।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपण किती खरे बोलतो आणि किती खोटे बोलतो हे,फक्त आपल्यालाच सर्वांत जास्त माहित असते. कारण, दुसऱ्याला कितीही खोटे सांगून स्वतः चा समाधान करण्यासाठी भलेही प्रयत्न असेल तरीही अंतर्मनाला सर्व काही माहित असते त्यामुळे प्रयत्न करून सुद्धा स्वतःला पाहिजे तो समाधान मिळत नाही. म्हणून असेही वागू नये की, तीच सवय लागून जगण्याची वेळ आपल्यावर येईल.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*स्वतःची किंमत* "एकदा एक श्रीमंत माणूस नदी काठावरील मंदिरात देवदर्शनासाठी गेला. अचानक त्याच्या मनात आले, नदीत जाऊन हात-पाय धुवावेत व मग मंदिरात देवदर्शनासाठी जावे. तो नदीवर गेला. हात-पाय धूत असताना त्याच्या तोल गेला आणि तो नदीत पडला. त्याला पोहता येत नव्हते. त्याची धडपड सुरू झाली. तो ओरडू लागला पण त्याला वाचविण्यासाठी कुणीही पुढे येईना. अखेर, एका साधूने नदीत उडी घेतली. त्या साधूने त्याला वाचविले. काठावर आणले. काही वेळाने, तो श्रीमंत गृहस्थ भानावर आला. त्याने खिशातून खूप नोटा बाहेर काढल्या. पण त्यातील फक्त एक रूपयाची नोट साधूच्या हातावर ठेवली.हे पाहून काठावर जमलेले लोक संतापले. चिडून त्यांना थांबविले. त्यांनी त्या व्यापार्याला उचलले व नदीत टाकणार इतक्यात साधूने त्यांना थांबविले. साधू म्हणाला, 'थांबा, त्यांने स्वत:चा किंमतीएवढेच बक्षिस दिले आहे. यात त्याची काय चूक? त्याची किंमत एवढीच आहे.'*तात्पर्य :- माणसाची खरी किंमत प्रसंगानेच कळते. उपकारकर्त्याचे उपकार स्मरणे हेच माणसाचे कर्तव्य आहे."*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment