✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 24 जानेवारी 2024💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2018/01/blog-post_25.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन_**_राष्ट्रीय बालिका दिवस_*•••••••••••••••••••••••••••••••••*_ या वर्षातील २४वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९८४:अॅपल मॅकिन्टॉश कॉम्प्युटर्सची विक्री सुरू झाली.**१९७६:’बर्मा शेल’ या ब्रिटिश तेलकंपनीचे राष्ट्रीयीकरण करुन तिचे नाव ’भारत रिफायनरीज’ असे ठेवण्यात आले. पुढे १ ऑगस्ट १९७७ रोजी त्या कंपनीचे नाव बदलून ’भारत पेट्रोलियम’ (BPCL) असे करण्यात आले.**१९७२:गुआममध्ये इ. स.१९४४ पासून लपलेला जपानी सैनिक,शोइची योकोइ सापडला.त्याला दुसरे महायुद्ध संपलेले माहितीच नव्हते.**१९६६:भारताच्या तिसर्या पंतप्रधान म्हणून इंदिरा गांधी यांचा शपथविधी झाला.**१९६६:एअर इंडियाचे 'कांचनगंगा' हे विमान युरोपातील आल्प्स पर्वतातील माँट ब्लँक या शिखरावर कोसळले. या अपघातात भारतातील अणूविज्ञानाचे शिल्पकार डॉ.होमी जहांगीर भाभा यांचे निधन झाले.**१९४३:पुण्यातील कॅपिटॉल चित्रपटगृहात बॉम्बस्फोट होऊन चार जण ठार**१९४२:दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांनी बँकॉकवर बॉम्बहल्ला केला. यामुळे थायलँडला इंग्लंड व अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारणे भाग पडले.**१९१६:नागरी स्वातंत्र्यावर आक्रमण होते या कारणामुळे अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने प्राप्तिकर घटनाबाह्य ठरविला.**१८६२:बुखारेस्ट ही रुमानियाची राजधानी करण्यात आली.**१८५७:दक्षिण आशियातील पहिल्या विद्यापीठाची कोलकाता येथे स्थापना झाली.**१८४८:कॅलिफोर्निया गोल्डरश – कॅलिफोर्नियातील सटर्स मिल येथे एका ओढ्यात जेम्स मार्शल नावाच्या माणसाला मोठ्या प्रमाणात सोने सापडले. या बातमीमुळे जगभरातून लाखो लोक सोने मिळवण्यासाठी कॅलिफोर्नियात दाखल होऊ लागले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_*••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७४:जयंत देवाजी लेंझे-- कवी* *१९७१:प्रा.डॉ.गणेश नत्थुजी चव्हाण -- प्रसिद्ध भरकाडीकार,लेखक,संपादक* *१९५६:रामकृष्ण दत्तात्रेय पराडकर-- कवी, लेखक,संपादक**१९५३:भगवान ठग-- प्रसिद्ध कवी आणि अनुवादक (मृत्यू:२२जानेवारी२००९)**१९४७:जयप्रकाश बाळकृष्ण म्हात्रे -- विज्ञान चळवळीचे कार्यकर्ते,वक्ते,लेखक* *१९४४:रामदास पाध्ये -- बोलक्या बाहुलीचे निर्माते आणि त्यांचे प्रयोग करणारे कलाकार* *१९४४:अशोक शेवडे --चित्रपट आणि नाटक विषयांवरील ज्येष्ठ पत्रकार (मृत्यू:१८ मार्च २०२१)**१९४३:सुभाष घई – प्रसिद्ध हिन्दी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथालेखक**१९३९:नामदेव वासुदेव लोटणकर-- कवी* *१९३६:लक्ष्मण बाकू रायमाने-- मराठी व कानडी साहित्याचे गाढे अभ्यासक,लेखक आणि समीक्षक**१९२६:जय ओम प्रकाश-- प्रसिद्ध भारतीय चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक(मृत्यू:७ ऑगस्ट २०१९)**१९२४:मेघश्याम पुंडलिक तथा मे. पुं. रेगे – तत्त्वचिंतक,मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष (मृत्यू:२८ डिसेंबर२०००)**१९२३:रतन साळगावकर ऊर्फ हंसा वाडकर – मराठी व हिन्दी चित्रपट अभिनेत्री ’सांगत्ये ऐका’ नावाचे त्यांचे आत्मचरित्रही प्रसिद्ध आहे. (मृत्यू:२३ ऑगस्ट १९७१)**१९१८:वामन बाळकृष्ण भागवत-- लेखक, संस्कृत भाषातज्ज्ञ(मृत्यू:९ फेब्रुवारी २००४)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१६:आनंद विनायक जातेगावकर--मराठी कथालेखक व कादंबरीकार(जन्म:६ जून १९४५)**२०११:स्वरभास्कर पण्डित भीमसेन जोशी – सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक (जन्म:४ फेब्रुवारी १९२२)**२००५:अनुताई लिमये – गोवा मुक्तिसंग्राम, संयुक्त महाराष्ट्राचा लढा यात सक्रीय सहभाग घेणार्या स्वातंत्र्यसेनानी आदिवासी महिला व बालकांच्या कल्याणासाठी झटणार्याव सामाजिक कार्यकर्त्या**२०००:केशव पांडुरंग जोग--राष्ट्रीय संस्कृत व्याख्याता,संशोधक(जन्म:२६ मार्च १९२५)**१९९६:वसंत देव-- भारतीय लेखक,गीतकार आणि पटकथा लेखक(जन्म:१९२९)**१९६६:एअर इंडियाचे ’कांचनगंगा’ हे विमान युरोपातील आल्प्स पर्वतात कोसळुन भारतीय भौतिकशास्त्रज्ञ डॉ.होमी जहांगीर भाभा मृत्यूमुखी पडले. (जन्म:३०आक्टोबर १९०९)**१९६५:विन्स्टन चर्चिल – दुसर्या महायुद्धकाळातील ब्रिटनचे पंतप्रधान, साहित्यिक,वृत्तपत्रकार,थोर राजकारणी आणि नोबेल पारितोषिक विजेते (जन्म:३० नोव्हेंबर १८७४)* *_शुभ बुधवार_* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*26 जानेवारी : प्रजासत्ताक दिन*आपल्या देशात प्रामुख्याने दोन दिवस राष्ट्रीय सण म्हणून मोठ्या उत्साहात साजरी केली जातात. एक म्हणजे स्वातंत्र्य दिन आणि दुसरे प्रजासत्ताक दिन होय. प्रजासत्ताक दिनाला गणराज्य दिन किंवा गणतंत्र दिवस म्हणून सुद्धा ओळखले जाते. ........... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *लोकसभा निवडणूक 16 एप्रिलला होणार या व्हायरल पत्राचे स्पष्टीकरण देत निवडणूक आयोग म्हणाले, ही तारीख फक्त कामकाजाच्या संदर्भासाठी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकुर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *सूरत डायमंड बोर्सकडे हिरे व्यापाऱ्यांची पाठ, वल्लभभाई लखानींसह बड्या व्यापाऱ्यांचा पुन्हा मुंबईकडे मोर्चा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मराठा आरक्षण सर्व्हेच्या पहिल्याच दिवशी अडथळे, सर्वर बंद झाल्याने काही वेळासाठी कामकाज रखडलं*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पुण्यात 1 लाख 75 हजार मतदार वाढले, तरुण मतदारांच्या संख्येतही मोठी वाढ*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *सोन्या-चांदीचे दागिने महागणार? केंद्र सरकारने आयातकर वाढवला आणि उपकरही लावला*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *ICC कडून 2023 वनडे टीमची घोषणा, 6 भारतीयांना स्थान, रोहितकडे नेतृत्व, पाकिस्तानचा एकही खेळाडू नाही*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••केरळमधील एका रेस्टॉरंटमधील घटना सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. हे रेस्टॉरंटचं बिल हे मल्याळम भाषेत आहे. ही कहाणी मानवतेच्या दृष्टीकोनातून सर्वात महत्वाची मानली जात आहे. केरळमधील मल्लापुरम भागातील रेस्टॉरंटमध्ये एक जण जेवत होता. बाहेर उभ्या असलेल्या लहानशा भाऊ-बहिणीचे डोळे त्या व्यक्तीच्या जेवणाच्या ताटाकडे भूकेच्या नजरेने पाहत होते. त्या व्यक्तीने इशारा केला, चिमुकल्या भाऊ-बहिणींची नाजूक, पण गरीबीच्या खुणा असलेली पावलं, घाबरत-घाबरत रेस्टॉरंटमध्ये पडली. जेवत असलेल्या त्या व्यक्तीने काय खायचंय ? असा इशारा केल्यावर, भावा-बहिणीने त्या व्यक्तीच्या ताटाकडे इशारा केला. चिमुकल्यांसाठीही जेवण मागवण्यात आलं. मुलं लहानशा हातात येईल तेवढं, पटापट खात होते, त्यांचं लक्ष फक्त ताटाकडे होतं. भरपेट जेवा, असं सांगण्याचंही काम त्या व्यक्तीला आलं नाही. छोट्याशा निष्पाप पोटातली, भूकेची भीषण आग विझत असावी. मुलांचं जेवण झालं, रेस्टॉरंटच्या काऊंटरवरून बिल आलं, बिल पाहून व्यक्ती चक्रावला, बिलावरचा आकडा कधीही न विसरता येणारा होता, बिलावर लिहिलं होतं..."आमच्याकडे असं मशीन किंवा आकडा नाहीय, की ज्यात मानवतेची किंमत मोजता येईल, परमेश्वर तुमचं भलं करो..!"🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼*संकलन :- श्याम ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 राहुल तांबे, मुंबई👤 मेघा हिंगमिरे👤 आशिष कोटगिरे👤 सोनू राजेंद्र येरमलवाड👤 प्रशांत उकिरडे, सहशिक्षक, बार्शी👤 रेश्मा कासार, पुणे👤 सिध्दांत मनूरकर, पाथर्डी👤 योगेश फत्तेपुरे👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जया चक्षुने लक्षिता लक्षवेना। भवा भक्षिता रक्षिता रक्षवेना॥ क्षयातीत तो अक्षयी मोक्ष देतो। दयादक्ष तो साक्षिने पक्ष घेतो॥१७४॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दिवसभरात आपल्याला अनेक कल्पना सुचत असतात. काही कल्पना योग्य वाटतात तर काही नको वाटतात. म्हणून त्याकडे आपण दुर्लक्ष करायचे का...?. वेळ, प्रसंगी सांगता येत नाही एकादी कल्पना आपल्यासाठी दिशादर्शक ठरू शकते. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आत घेतलं. पण चौकशी करताना जेव्हा पहारेकऱ्याच्या कळालं कि ज्यांना रात्री आपण दरवाजावर आडवलं ते खरोखरच महाराजच होते तेव्हा मात्र त्याचे धाबे दणाणले. त्याला त्याचा कडेलोट दिसू लागला. चेहरा भीतीने पंधरा पडला.पहारेकऱ्याची अवस्था महाराजांच्या लक्षात आली. ते शांत पावलानं पहारेकऱ्याजवळ गेले. त्याच्या पाठीवर शाब्बासकीची थाप दिली. स्वतःच्या गळ्यातला कंठा काढून त्याच्या गळ्यात घातला. आणि म्हणाले, "तुमच्यासारख्या प्रामाणिक सोबत्यांच्या जिवावरच आमचं स्वराज्य उभं आहे. "•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment