✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 27 जानेवारी 2024💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2017/06/blog-post_86.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील २७वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९७३:पॅरिसमध्ये झालेल्या एका करारान्वये ३१ वर्षे चालू असलेले ’व्हिएतनाम युद्ध’ संपुष्टात आले. अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राला व्हिएतनामसमोर माघार घ्यावी लागली.**१९६७:महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाची स्थापना झाली. सद्ध्या ही संस्था ’बालभारती’ या नावाने ओळखली जाते.**१९४५:दुसरे महायुद्ध – रशियाच्या _’रेड आर्मी’_ने पोलंडमधील _’ऑस्विच’_ येथील छळछावणीतील बंदिवानांची मुक्तता केली.**१९४४:दुसरे महायुद्ध – ८७२ दिवस लेनिनग्राडला घातलेला वेढा जर्मन फौजांनी उठवला.**१८८८:वॉशिंग्टन डी. सी. येथे _'द नॅशनल जिऑग्रॉफिक सोसायटी'_ची स्थापना* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८१:अरविंद उन्हाळे-- गझलकार* *१९७६:श्रेयस तळपदे --हिंदी आणि मराठी चित्रपट अभिनेता,चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता**१९६७:बॉबी देओल – हिन्दी चित्रपट कलाकार**१९६३:डॉ.उत्तम भगवान अंभोरे-- मराठी साहित्यातील प्रसिद्ध कवी,लेखक**१९६३:आरती अंकलीकर टिकेकर-- भारतीय शास्त्रीय गायिका* *१९५१:आनंद दिघे--धर्मवीर नावाने प्रसिद्ध हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते(मृत्यू:२६ ऑगस्ट २००१)**१९३४:मुकुंद विष्णू टेकाडे -- बालसाहित्यिक, लेखक* *१९२७:वसंत विठ्ठल गाडे (गाडे गुरुजी)-- संघटक,संस्थापक, [विनोबा विचार केंद्र नागपूर] (मृत्यु:२४ जुलै २०१४)**१९२६:जनरल अरुणकुमार वैद्य – भारताचे १३ वे लष्करप्रमुख (मृत्यू:१० ऑगस्ट १९८६)**१९२२:अजित खान ऊर्फ ’अजित’ – हिन्दी चित्रपटांतील चरित्र अभिनेते (मृत्यू:२२ आक्टोबर १९९८)**१९२०:स्नेहलता यशवंत किनरे-- कवयित्री* *१९०९:डॉ.सविता भीमराव आंबेडकर(माईसाहेब) -- सामाजिक कार्यकर्त्या,लेखिका (मृत्यू:२९ मे २००३)* *१९०९:श्याम नीळकंठ ओक-- चित्रपट समीक्षक,लेखक(मृत्यू:१० मार्च १९८२)**१९०५:राजाराम प्रल्हाद कानिटकर -- लेखक संपादक* *१९०१:लक्ष्मण बाळाजी तथा तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी – महाराष्ट्रातील प्रबोधन युगाचे एक प्रमुख उद्गाते,विचारवंत,संस्कृत पंडित,मराठी विश्वकोशाचे प्रधान संपादक आणि साहित्य संस्कृती मंडळाचे पहिले अध्यक्ष,१९२३ मध्ये कलकत्त्याच्या शासकीय संस्कृत महाविद्यालयातून त्यांनी _’तर्कतीर्थ’_ ही पदवी संपादन केली. (मृत्यू:२७ मे १९९४)**१८५०:एडवर्ड जे. स्मिथ – आर.एम.एस. टायटॅनिक जहाजाचा कप्तान (मृत्यू:१५ एप्रिल १९१२)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_*••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२२:अनिल अवचट-- सामाजिक कार्यकर्ते आणि सुप्रसिद्ध लेखक (जन्म:२६ आगस्ट १९४४)**२०१६:दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी-- आधुनिक मराठी साहित्यातील विख्यात समीक्षक आणि ललितनिबंधकार (जन्म:२५ जुलै १९३४)**२००९:आर. वेंकटरमण – भारताचे ८ वे राष्ट्रपती,केन्द्रीय मंत्री,कायदेपंडित, स्वातंत्र्यसेनानी (जन्म:४ डिसेंबर १९१०)**२००८:डॉ.सुरेश महादेव डोळके-- धर्मशास्त्र व तत्त्वज्ञानाचे गाढे अभ्यासक, महानुभाव साहित्याचे संशोधक व ज्येष्ठ साहित्यिक (जन्म:२१ सप्टेंबर १९२६)* *२००८:सुहार्तो – इंडोनेशियाचे दुसरे राष्ट्राध्यक्ष (जन्म:८ जून १९२१)**२००७:कमलेश्वर – पद्मभूषण पुरस्कार विजेते हिन्दी लेखक,पटकथालेखक,दूरदर्शनचे अतिरिक्त संचालक (जन्म:६ डिसेंबर १९३२)**१९८६:निखिल बॅनर्जी – मैहर घराण्याचे सतारवादक (जन्म:१४ आक्टोबर १९३१)**१९६८:सदाशिव अनंत शुक्ल ऊर्फ ’कुमुदबांधव’ – नाटककार व साहित्यिक (जन्म:२६ मे १९०२)**१९४७:पॉल हॅरिस – रोटरी क्लबचे संस्थापक (जन्म:१९ एप्रिल १८६८)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*कमवा आणि शिका*स्वतःच्या विकासावर कुटुंबाचे विकास अवलंबून असते. कुटुंबाच्या विकासावर गावाचा विकास आणि मग राज्य व देशाचा विकास होतो. या विकासासाठी शिक्षण हे अत्यंत महत्त्वाची बाब आहे. शिक्षणाशिवाय कोणाचाही विकास अशक्य आहे. शिक्षणामुळे दोन डोळ्याचे माणसे तिसऱ्या डोळ्याने डोळस होऊ शकतात. अन्यथा डोळे असून ही आंधळ्याची अवस्था होते. महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाचे महत्त्व सांगताना म्हटले आहे की, ............. पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *प्रजासत्ताक दिन संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाने जिंकली उपस्थितांची मनं, महाराष्ट्राच्या चित्ररथात छत्रपती शिवाजी महाराजांची गाथा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *आझाद मैदानाकडे निघालेल्या मनोज जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम, मान्य केलेल्या मागण्यांचे जीआर दुपारी 12 पर्यंत देण्याची मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *महामार्गावर तीन कोटींचा सशस्त्र दरोडा, आंतरराज्य टोळी जेरबंद; संशयितांमध्ये माजी सैनिकांचा समावेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *नितीश कुमार यांचा शपथविधी रविवारी होण्याची शक्यता, भाजपला दोन उपमुख्यमंत्रिपदं मिळणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *नागपुरातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले अभिनंदन*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *दिग्गज अभिनेत्री वैजयंती माला आणि दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवी यांना पद्म विभूषण तर बॉलिवूड अभिनेते मिथुन चक्रवर्ती आणि उषा उथुप यांना पद्म भूषण पुरस्कार जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *इंग्लंडविरोधात पहिल्या कसोटीचा दुसरा दिवसही भारताच्या नावावर; केएल राहुल-जाडेजाची फटकेबाजी, भारताकडे 175 धावांची आघाडी*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी*तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी (जानेवारी २७, १९०१ - मे २७, १९९४) हे मराठी लेखक, कोशकार व सामाजिक शास्त्रांचे अभ्यासक-संशोधक होते.त्यांचा जन्म धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथे आणि शिक्षण वाई येथील प्राज्ञ पाठशाळेत झाले. त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभाग घेतला होता. त्याकरिता इ.स. १९३२ साली त्यांना तुरुंगात जावे लागले.संस्कृत भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते हिंदू धर्माचा त्यांनी सखोल अभ्यास केला होता. वेद, उपनिषदे, रामायण, महाभारतइत्यादी शास्त्रांवर ते अधिकारवाणीने बोलू शकत. हिंदू तत्त्वज्ञान त्यांनी चांगल्या प्रकारे अवगत केले होते.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••यशस्वी होण्याची पहिली पायरी म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *बोन्साय* ची मूळ कल्पना कोणत्या देशातील आहे ?२) महाराष्ट्रातील पहिली महिला रुग्णवाहिका ड्रायव्हर कोण ?३) राष्ट्रीय मतदार दिवस कोणत्या वर्षीपासून साजरा केला जातो ? *उत्तरे :-* १) चीन २) विषया लोणारे, भंडारा ३) सन २०११*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 माधवराव बोमले, चिरली👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तुटेना फुटेना कदा देवराणा। चळेना ढळेना कदा दैन्यवाणा॥ कळेना कळेना कदा लोचनासी। वसेना दिसेना जगी मीपणासी॥१७७॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपले असणारे सर्वच नातेवाईक जर शेवटपर्यंत साथ देणारे राहिले असते तर त्यांचा समाजात कायम पर्यंत उदोउदो होताना बघायला मिळाले असते. पण, तसं कधीच होताना दिसत नाही म्हणून होऊन गेलेल्या थोर संतानी म्हटले आहे की, सोयरे, धायरे संपत्तीचे लोक त्यांची वाणी सत्य आहे. सदैव त्यांच्या विचारांचे आपण स्मरण करावे. व ज्यांनी आपल्यासाठी सोन्यासारखे जीवनाचे बलिदान दिले त्यांना शेवटच्या श्वासापर्यंत आठवणीत ठेवावे कारण खऱ्या अर्थाने तेच आपले नातेवाईक, प्रेरणास्थान, महात्यागी व मार्गदर्शक होते आणि आजही आहेत त्यांच्यामुळे आपल्याला न्याय, हक्क,शिक्षण,अधिकार सर्वच काही मिळाले आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *जंगलचा राजा !*एकदा एका अस्वलाने झाडामागे लपून सिंहाला जंगलात फिरताना पाहिलं.जंगलचा राजा सिंह जंगलात रुबाबात फिरे. थोडसं चालून मग पुन्हा एकदा मागे वळून बघे.अस्वलाला वाटलं...'आपण ही जंगलचा राजा व्हावं. सिंहासारखं रुबाबात फिरावं.'अस्वलानं ठरवलं... आता आपण रोज सिंहाचा पाठलाग करायचा. तो कसा चालतो? तो कसा बसतो? तो कसा खातो? तो कसा फिरतो? हे नीट पाहायचं. मग आपण ही तसंच करायचं. जंगलचा राजा व्हायचं. तेव्हापासून रोज ते अस्वल, सिंहाच्या पाळतीवर राहिलं. लांबून झाडामागून सिंहाच्या बारीक सारीक गोष्टी पाहू लागलं.सिंहाचं ऐटित चालणं. झाडाखाली त्याचं डौलदार बसणं. सिंहाची भरदार आयाळ. त्याचं राजा सारखं जंगलात फिरणं.पण, चार-पाच दिवसात अस्वल कंटाळलं. अस्वलाला वाटलं...खरं म्हणजे जंगलचा राजा मीच व्हायला पाहिजे. कारण सिंहापेक्षा मी जाडजूड आहे. सिंहाला तर फक्त मानेवरच आयाळ आहे.माझ्यातर सर्व अंगावर सिंहासारखी आयाळ आहे. आणि मी पण झाडाखाली डौलात बसतोच की! जंगलामधे फिरतोच की!पण...मला सिंहासारखं चालता येत नाही म्हणून मी जंगलचा राजा होत नाही! मी सरळ चालतना मागे वळून पाहात नाही म्हणून जंगलचा राजा होत नाही!बस्स!! आता ठरलं तर... आज पासून चालताना मधे-मधे मागे वळून पाहायचं आणि जंगलचा राजा व्हायचं. त्या दिवसापासून ते अस्वल चालताना मागे वळून पाहू लागलं. आपण चालताना मागे वळून पाहातो, हे इतर प्राणी पाहतात की नाही? हे पण पाहू लागलं.'मी किती जाडजूड आहे पाहा. माझी अंगभर आयाळ पाहा. माझं रुबाबदार चालणं पाहा. आता तरी मला राजा म्हणा..असं भेटेल त्या प्राण्यांना सांगू लागलं.पण...तरीही जंगलातले छोटे मोठे प्राणी त्याला राजा म्हणेनात.अस्वलाच्या पाठी हेच प्राणी ख्वॅ ख्वॅ, फॅक्वॅक फॅक्वॅक करुन हसायचे. शेपट्या हलवून, तोंडं वाकडी करुन त्याला चिडवायचे.अस्वल वैतागलं. भलतंच चिडलं. चराचरा केस खाजवत, कराकरा दात चावू लागलं.अस्वलाने ठरवलं... 'आजच काय तो फैसला करू.जंगलातल्या या चुटूक पुटूक प्राण्यांच्या नादी लागण्यात काही अर्थ नाही. आपला रुबाब, आपली चाल त्या सिंहालाच दाखवू. सिंहाशीच सरळ सरळ पंगा घेऊ. माझी राजेशाही चाल पाहताच सिंह आपोआपच मान खाली घालून जंगलातून निघून जाईल. मग या जंगलचा मीच राजा होईन!! अस्वल जे घरातून उठलं ते तरातरा सिंहासमोरच गेलं. सिंह झाडाखाली सुस्तावला होता. अस्वल सिंहाच्या सरळ समोर जाऊन ऊभं राहिलं. सिंहाने शेपटी उडवत अंगावरच्या माशा हाकलल्या. मान वाकडी करत डाव्या पायाने आयाळ खाजवली.अस्वल सिंहासमोरच सिंहासारखं चाललं. म्हणजे थोडसं चालून त्याने पुन्हा पुन्हा मागे वळून पाहिलं. चालताना सिंहासारखं ऐटित चालण्याचा प्रयत्न केला.आता...'हा कोण नवीन रुबाबदार राजा?' असं म्हणत सिंह चवताळून उठेल. किंवा... आपली ऐटबाज चाल पाहून सिंह हे जंगल सोडून पळूनच जाईल, असं अस्वलाला वाटलं होतं.पण....सिंहाने अस्वलाकडे पाहिलं ही नाही! त्याला काही किंमतच दिली नाही. सिंह आपल्याच मस्तीत होता. सिंह आरामात शेपटी उडवत माशा हाकलवत होता. आता मात्र अस्वल भलतं म्हणजे भलतंच चिडलं. त्याच्या अंगावरचे केस ताठ झाले. त्याने उजव्या हाताची नखं झाडावर कराकरा घासली. अस्वलाने ठरवलं... आता आपण सिंहापेक्षा वरचढ व्हायचंच. राजा सिंह सरळ चालताना मधे मधे मागे वळून पाहातो. ठीक आहे. पण आपण आता.. मागे मागे बघतच सरळ चालायचं. आणि जंगलचा राजा व्हायचं. अस्वल मागे मागे पाहात पुढे चालू लागलं. राजा होईन म्हणता म्हणता सरळ खड्यात पडलं!•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment