✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 26 जानेवारी 2024💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2018/01/blog-post_25.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_🇮🇳भारतीय प्रजासत्ताक दिन🇮🇳_*••••••••••••••••••••••••••••••••*_ या वर्षातील २६वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००१:गुजरातमधील कच्छ भागात झालेल्या मोठ्या भूकंपात सुमारे २०,००० लोक ठार झाले.**१९९८:कॅप्टन लक्ष्मी व उषा मेहता यांना ’पद्मविभूषण’ पुरस्कार प्रदान**१९७८:महाराष्ट्रात रोजगार हमी कायदा सुरू**१९५०:भारताची राज्यघटना अस्तित्त्वात आल्याने भारत हे सार्वभौम प्रजासत्ताक राष्ट्र बनले. भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून डॉ. राजेंद्रप्रसाद यांचा शपथविधी झाला.**१९५०:एच. जे. कनिया यांनी भारताचे पहिले सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.**१९४२:दुसरे महायुद्ध – अमेरिकन फौजांचे युरोपातील नॉर्दन आयर्लंड येथे आगमन**१९२४:रशियातील सेंट पीट्सबर्गचे लेनिनग्राड असे नामकरण करण्यात आले.**१८७६:मुंबई आणि कलकत्ता दरम्यान रेल्वे वाहतुकीस सुरूवात झाली.**१८३७:मिचिगन हे अमेरिकेचे २६ वे राज्य बनले.**१६६२:लोहगड-विसापूर आणि तिकोना या किल्ल्यांच्या परिसरात मुघल फौजांच्या चढाया**१५६५:विजयनगर साम्राज्य आणि दख्खनचे सुलतान यांच्यात तालिकोटा येथे लढाई झाली. या लढाईत रामरायाचा पराभव होऊन दक्षिण भारतात अनिर्बंध मुस्लिम सत्तेला सुरूवात झाली.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८१:भारती संजय तितरे -- कवयित्री**१९८०:संतोष पवार चोरटाकार-- लेखक* *१९८०:अॅड.मयुर परशुराम जाधव -- लेखक, विविध वृत्तपत्रांमध्ये स्तंभलेखन* *१९७९:संदीप शामरावजी धावडे -- कवी, लेखक**१९७८:डॉ.सुनील अभिमान अवचार-- समकालिन संवेदनशील कवी,चित्रकार* *१९७७:सारिका उबाळे परळकर -- प्रसिद्ध कवयित्री* *१९७४:किरणताई नामदेवराव मोरे (चव्हाण)-- कवयित्री* *१९७०:स्वप्निल श्रीकांत पोरे-- प्रसिद्ध लेखक कवी* *१९६८:वर्षा विद्याधर चौबे-- लेखिका* *१९६२:सुहिता थत्ते-- भारतीय मराठी अभिनेत्री**१९५८:उदय नारायण क्षीरसागर-- कवी* *१९५७:शिवलाल यादव – क्रिकेटपटू**१९५२:सुप्रिया सरवटे -- लेखिका* *१९२६:विनायक गजानन कानिटकर-- मराठी विचारवंत लेखक (मृत्यू:३०ऑगस्ट २०१६)**१९२५:पॉल न्यूमन – अभिनेता,दिग्दर्शक व रेस कार ड्रायव्हर (मृत्यू:२६ सप्टेंबर २००८)**१९२१:अकिओ मोरिटा – सोनी कार्पोरेशनचे संस्थापक (मृत्यू:३ आक्टोबर १९९९)**१९१९:लक्ष्मण वामनराव सबनीस -- लेखक* *१९११: विष्णू (पंडित) गंगाधर सप्रे-- कवी**१९११:भार्गव महादेव फाटक उर्फ बाबा फाटक-- क्रांतिवीर देशभक्त(मृत्यू:५ सप्टेंबर १९८१)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२३:डॉ.सतीश शास्त्री-- कादंबरीकार(जन्म:३१ जानेवारी १९५२)**२०२२: श्यामकांत विष्णू कुलकर्णी -- कवी, लेखक (जन्म:७ जुलै १९३३)**२०१८:गोरख शर्मा-- भारतीय गिटार वादक(जन्म:२८ डिसेंबर १९४६)**२०१५:रासीपुरम कृष्णस्वामी तथा आर.के. लक्ष्मण – व्यंगचित्रकार,पद्मभूषण (१९७१), रॅमन मॅगसेसे (१९८४), पद्मविभूषण (२००५) इत्यादि पुरस्कारांचे मानकरी (जन्म:२४ आक्टोबर १९२१)**१९६८:लोकनायक माधव श्रीहरी तथा 'बापूजी' अणे--शिक्षणतज्ज्ञ,स्वातंत्र्यसैनिक, राजकारणी आणि संस्कृत कवी (जन्म:२९ ऑगस्ट १८८०)**१९६५:प्रल्हादबुवा सीताराम सुबंध-- वारकरी संप्रदाय,कीर्तनकार,प्रवचनकार, लेखक (जन्म:१८९५)**१९५४:मानवेंद्रनाथ रॉय – देशभक्त, क्रांतिकारक व भारतातील कम्यूनिस्ट पक्षाचे संस्थापक (जन्म:२१ मार्च १८८७)**१८२३:एडवर्ड जेन्नर – देवीची लस शोधून काढणारे संशोधक व डॉक्टर (जन्म:१७ मे १७४९)* 🇮🇳🇮🇳🇮🇳 *_भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा_* 🇮🇳🇮🇳🇮🇳~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••26 जानेवारी - भारतीय प्रजासत्ताक दिन..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *भारताच्या 75 व्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन हे राहणार आहेत.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्व देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देताना अयोध्येतील राम मंदिर, G20 शिखर परिषद, भारतरत्न कर्पूरी ठाकूर आणि खेळाडूंचे कौतुक केले.*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *भारताच्या Aditya-L1 ची आणखी एक मोठी कामगिरी, ग्रहांची शक्ती मोजणारे यंत्र केले स्थापित*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *आतापर्यंतचा सर्वात मोठा डेटा लीक, जगभरात 26 अब्ज अकाउंट्सची खासगी माहिती चोरीला*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पुणे - द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लावले जातील:उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आश्वासन, कोल्ड स्टोरेजचे उद्घाटन*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *आरक्षणासाठी मराठा समाजाला आंदोलनाची गरज नाही:सरकार सकारात्मक, सरकारला सहकार्य करण्याचे CM शिंदेंचे आवाहन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *विराट कोहली ठरला 2023 मधील एकदिवसीय फॉरमॅट मधील सर्वोत्कृष्ट खेळाडू, ICC ची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*राष्ट्रध्वज फडकावण्याचे नियम (ध्वजसंहिता)*२६ जानेवारी १९५० रोजी भारताने स्वतंत्र राज्यघटना स्वीकारली. म्हणूनच हा दिवस आपला गणतंत्र दिवस किंवा प्रजासत्ताक दिवस म्हणून ओळखला जातो. राष्ट्रीय प्रतीक असणाऱ्या आपल्या तिरंगी ध्वजाचा मान राखणे, हे आपल्या सगळ्यांचे कर्तव्य आहे. १९५० मध्ये भारत प्रजासत्ताक झाल्यावर ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डने १९५१ मध्ये पहिल्यांदा ध्वजासंदर्भात काही नियम जाहीर केले. १९६४ मध्ये यात बदल करण्यात आले. १७ ऑगस्ट १९६८ मध्ये यात आणखी काही बदल करण्यात आले. ध्वजाचा आकार, निमिर्ती, रंग आदी सर्व सर्वच बाबतीत हे नियम लागू करण्यात आले. सूर्यांदयाच्या वेळी ध्वजारोहण आणि सूर्यास्ताच्या वेळी ध्वज उतरवणे कायद्याने बंधनकारक आहे. काही खास प्रसंगी सार्वजनिक इमारतींवर रात्रीच्या वेळेसही ध्वज फडकावता येतो. इतर देशांच्या राष्ट्रध्वजांबरोबर ध्वज फडकावयाचा असेल, तर त्यासाठी असणाऱ्या खास नियमांचे पालन करावे लागते. नॉन नॅशनल फ्लॅग्ज म्हणजे कॉपोर्रेट फ्लॅग किंवा अॅडव्हर्टायझिंग बॅनरबरोबर ध्वज फडकावयाचा असल्यास राष्ट्रध्वज मध्यभागीच असायला हवा. मिरवणुकीच्या वेळेसही राष्ट्रध्वज अग्रभागी असायला हवा. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री, केंदीय मंत्री आदी महत्त्वाच्या व्यक्तींच्याच गाडीवर राष्ट्रध्वज लावण्यास परवानगी आहे. अन्य कोणालाही आपल्या गाडीवर ध्वज लावता येत नाही. तसेच राजकीय महत्त्वपूर्ण व्यक्ती परदेशात जात असल्यास त्या विमानावर राष्ट्रध्वज लावता येतो. महत्त्वाच्या व्यक्तीचे निधन झाल्यास ध्वज अर्धवट उतरवण्यात येतो. ध्वज खराब झाल्यास तो जमिनीखाली पुरून किंवा जाळून नामशेष करावा लागतो, पण त्या वेळीसुद्धा त्याचा यथोचित मान राखायला लागतो. एकंदरच निमिर्तीपासून शेवटापर्यंत आपल्या राष्ट्रध्वजाचा मान राखणे हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. मंत्रालय आणि सिंधुदुर्ग किल्ल्यावरच सगळ्यात मोठे झेंडे फडकताना दिसतात.*संकलन :- श्याम ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••देशाने तुमच्यासाठी काय केले ? हे विचारण्यापेक्षा तुम्ही देशासाठी काय करत आहात ? हे स्वत:ला विचारा…*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) प्रजासत्ताक दिनी झेंडा कोणाच्या हस्ते झेंडा फडकविला जातो ?२) भारताचा राष्ट्रीय ध्वज कुणी तयार केला होता ?३) राष्ट्रीय शौर्य पुरस्कार कोणाला दिले जातात ?४) प्रजासत्ताक दिन साजरा करण्यास कधीपासून सुरुवात झाली ?५) राज्यघटनेत पंचवार्षिक योजनेची संकल्पना कुठून घेण्यात आली होती ?उत्तरे :- १) राष्ट्रपती २) पिंगली वेंकय्या ३) शूर मुला-मुलींना ४) 26 जानेवारी 1950 ५) सेव्हिएत संघाच्या (USSR) घटनेतून*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 सुरेश पवार👤 प्रा. रवींद्र मुपडे, धर्माबाद👤 शेख जावेद👤 सतिशकुमार साटले👤 चंद्रकांत लांडगे👤 दिलीप सोनकांबळे👤 ओमसाई कोटूरवार👤 सचिन पुरी👤 मारुती गुंटूरकर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जगी द्वादशादित्य हे रुद्र अक्रा। असंख्यात संख्या करी कोण शक्रा॥ जगी देव धुंडाळिता आढळेना। जगी मुख्य तो कोण कैसा कळेना॥१७६॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मनन व चिंतन सतत चालणारी मानसिक प्रक्रिया आहे. मनातल्या मनात विचार करत राहणे,विचार येणे हा मनोव्यापार आहे. मनात कधी चांगले तर कधी वाईट विचार येतात.आपल्या मनात काय चालले आहे ते फक्त आपल्यालाच माहीत असते. आपले मनच जाणत असते.म्हणून जे काही चालले असेल ते चांगल्यासाठी असू द्यावे. कारण चांगल्या कार्याची भलेली उशीरा ओळख होत असेल तरी ती ओळख बघून मनाला एक वेगळ्याच प्रकारचा समाधान मिळत असतो.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••२६ जानेवारीलाच संविधान का लागू केले गेले?२६ जानेवारी १९५० रोजी या दिवशी संविधान लागू करण्यात आले, ज्याची अनेक कारणे होती. देश स्वतंत्र झाल्यानंतर २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने राज्यघटना स्वीकारली. त्याच वेळी २६ जानेवारी १९५० रोजी लोकशाही शासन प्रणालीसह संविधान लागू करण्यात आले. या दिवशी भारताला पूर्ण प्रजासत्ताक घोषित करण्यात आले. २६ जानेवारीला संविधान लागू करण्याचे मुख्य कारण म्हणजे १९३० मध्ये या दिवशी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने भारताच्या पूर्ण स्वातंत्र्याची घोषणा केली होती.सन १९२९ मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून एक बैठक आयोजित करण्यात आली होती. ज्यामध्ये सर्वसंमतीने असे घोषित करण्यात आले की ब्रिटिश सरकारने २६ जानेवारी १९३० पर्यंत भारताला डोमिनियन दर्जा द्यावा. या दिवशी प्रथमच भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment