✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 01 फेब्रुवारी 2024💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2018/05/32.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील ३२वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००४:मक्का येथे चालू असलेल्या हज यात्रेत चेंगराचेंगरी होऊन २५१ यात्रेकरू ठार तर २४४ लोक जखमी झाले.**१९९२:भोपाळच्या मुख्य न्यायाधीशांनी युनियन कार्बाइडचा मुख्य अधिकारी वॉरेन अॅंडरसन याला फरारी घोषित केले.**१९८१:ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडमधील एक दिवसीय क्रिकेट सामन्यात शेवटच्या चेंडुवर न्यूझीलंडला ६ धावा हव्या असताना ग्रेग चॅपलने आपला भाऊ ट्रेव्हर चॅपलला अंडरआर्म बॉल टाकण्यास सांगितले. ट्रेव्हरने चॅपलने तसा चेंडू टाकला व ऑस्ट्रेलियाने सामना जिंकला परंतु यानंतर अंडरआर्म गोलंदाजी बेकायदा ठरवण्यात आली.**१९७९:१५ वर्षे विजनवासात काढल्यानंतर ईराणचे आयातुल्ला खोमेनी तेहरानला परतले.**१९६४:प्र.बा.गजेन्द्रगडकर यांनी भारताचे ७ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.**१९५६:सुधी रंजन दास यांनी भारताचे ५ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.**१९४६:नऊ शतकांची राजसत्ता बरखास्त करुन प्रजासत्ताक बनण्यास हंगेरीच्या संसदेने मान्यता दिली.**१९४१:डॉ.के.बी.लेले यांनी ’गुरुकिल्ली’ हे जादुविद्येला वाहिलेले मराठी भाषेतील पहिले नियतकालिक सुरू केले.**१८९३:थॉमस एडिसनने पहिल्या चलचित्रपटाची निर्मिती पूर्ण केली.**१८८४:’ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरी’ची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली.**१८३५:मॉरिशसमधे गुलामगिरी प्रथेचा अंत* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९२:विकी पांडुरंग कांबळे-- कवी**१९८१:प्रमोद अंबडकर-- कवी,गीतकार**१९७५:डॉ.प्रिया प्रवीण मदनकर (धांडे)-- कवयित्री* *१९७४:इंदिरा गोविंदराव चापले-भोयर-- कवयित्री**१९७२:यशवंत गोविंदा निकवाडे -- कवी, लेखक* *१९७२:भगवान मार्तंड पाटील-- कवी**१९७१:अजय जडेजा – प्रसिद्ध क्रिकेटपटू, अभिनेते**१९६०:सुरेश प्रल्हाद साबळे-- लेखक, समीक्षक,व्याख्याते,कवी**१९६०:जॅकी श्रॉफ – प्रसिद्ध अभिनेता**१९५९:रामदास लक्ष्मण राजेगावकर - बालकवी,लेखक,समीक्षक* *१९४५:मधुकर रामदास गजभिये-- कवी**१९४५:प्राचार्य रमेश भारदे-- लेखक* *१९४४:अरुण चिंतामण टिकेकर -- लोकसत्ता या दैनिक वृत्तपत्राचे ११ वर्षे संपादक,लेखक अनुवादक (मृत्यू:१९ जानेवारी २०१६)**१९४३:मधुकर पांडुरंग खरे-- लेखक**१९३१:बोरिस येलत्सिन – रशियन फेडरेशनचे पहिले अध्यक्ष (मृत्यू:२३ एप्रिल २००७)**१९३१:पांडुरंग पिलाजी धरत-- लेखक* *१९३१:शशिकांत दत्तात्रय कोनकर-- लेखक**१९२९:जयंत साळगावकर –ज्योतिर्भास्कर, लेखक व उद्योजक (मृत्यू:२० ऑगस्ट २०१३)**१९२७:मधुकर दत्तात्रय तथा म.द. हातकणंगलेकर – ज्येष्ठ समीक्षक आणि सांगली (२००८) येथील ८१ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (मृत्यू:२६ जानेवारी २०१५)**१९२७:प्रा.बन्सीलाल लुकडू सोनार-- लेखक* *१९१७:ए.के.हंगल– चित्रपट अभिनेते व स्वातंत्र्यसैनिक (मृत्यू:२६ ऑगस्ट २०१२)**१९१२:राजा बढे – संपादक,चित्रपट अभिनेते,लेखक,गायक,कवी आणि गीतकार (मृत्यू:७ एप्रिल १९७७)**१९०४:बाबुराव रामचंद्र घोलप --शिक्षणतज्ज्ञ (मृत्यु:२६ मे १९८२)**१९०१:क्लार्क गेबल – अमेरिकन अभिनेता (मृत्यू:१६ नोव्हेंबर १९६०)**१८८४:सिद्धेश्वरशास्त्री विष्णू चित्राव – महामहोपाध्याय,वैदिक साहित्याचे अभ्यासक व मराठी कोशकार (मृत्यू:६ जानेवारी १९८४)**१८६४:जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर – अमेरिकन वनस्पतीतज्ञ,शिक्षणतज्ञ,संशोधक आणि शास्त्रज्ञ (मृत्यू:५ जानेवारी १९४३)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१२:अनिल मोहिले – संगीतकार व संगीत संयोजक* *२००३:कल्पना चावला – भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर (जन्म:१ जुलै १९६१)**१९९५:मोतीराम गजानन तथा मो.ग. रांगणेकर – नाटककार,चित्रपट दिग्दर्शक व पत्रकार (मृत्यू:१० एप्रिल १९०७)**१९७६:वेर्नर हायसेनबर्ग – ’क्वांटम मॅकॅनिक्स’मधील मूलभूत संशोधनासाठी नोबेल पारितोषिक मिळवणारे (१९३२) जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (जन्म:५ डिसेंबर १९०१)**१९६४:नारायण पैकाजी पंडित(बाबाजी महाराज)-- प्रवचनकार,ग्रंथकार(जन्म:१२ जानेवारी १८८६)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*शिक्षण म्हणजे विचार करण्याची कला*मुलांनो, तुम्ही शाळेत कशासाठी जाता ? असा प्रश्न जर कोणी विचारला असता, मुले उत्तर देतात की, शिकण्यासाठी तर कोणी म्हणतो की ज्ञान मिळवण्यासाठी. मग शिक्षण किंवा ज्ञान आपणाला फक्त शाळेतूनच मिळते काय ? प्रसिद्ध विचारवंत टी. एडवर्ड यांच्या मतानुसार, शिक्षण म्हणजे जन्मापासून मरेपर्यंत सर्व वातावरणाचा परिणाम, सर्व प्रकारचे शिक्षण, शिस्त आणि संस्कृतीची बेरीज. म्हणूनच आपण आजीवन विद्यार्थी म्हणून जगत असतो. शाळेतून फक्त आपणाला अक्षरज्ञान आणि संख्याज्ञान मिळते, तर समाजात वावरताना जे अनुभवाचे ज्ञान मिळते त्यावर आपण यशस्वी जीवन जगू शकतो. म्हणूनच आचार्य विनोबा भावे म्हणतात की.............. पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्यातून देण्यात येणारा पहिला मानाचा "शिवसन्मान पुरस्कार" भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घोषित, साताऱ्यातील सैनिक स्कूलच्या भव्य मैदानावर १९ फेब्रुवारी २०२४ रोजी शिवजयंती दिनी गौरवपूर्ण प्रदान करण्यात येणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *हेमंत सोरेन यांचा राजीनामा, चंपाई सोरेन होणार झारखंडचे नवे मुख्यमंत्री*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *नॅशनल स्कूल ऑफ ड्रामातर्फे ‘25 वा भारत रंग महोत्सव’:1 ते 21 फेब्रुवारी दरम्यान होणार पुण्यात; NSDचे संचालक चित्तरंजन त्रिपाठींची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय:राज्यातील 17 IAS अधिकाऱ्यांच्या तर CP, DCP, SPसह 42 पोलिस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *खा. सुप्रिया सुळेंची सरकारकडे मागणी:टंचाईचा आढावा घेऊन बारामती लोकसभा मतदार संघात चारा छावण्या, पाण्याचे टँकर सुरू करा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पोलिसांच्या 100 टक्के जागा भरण्यास अर्थ विभागाने दिली मंजुरी, राज्यात तब्बल 17 हजार 471 पोलिसांची भरती होणार, सरकारचा मोठा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण सहाव्यांदा संसदेत उभ्या राहून १ फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*अंतराळवीर कल्पना चावला*• काही लोक निधनांनतरही आपल्या आठवणीत सदैव जिवंत राहतात. अंतराळवीर कल्पना चावला यांचा शेवटचा अंतराळ प्रवास अनेकांच्या मनात कोरला आहे.• 17 मार्च 1962 रोजी जन्मलेली कल्पना चावला यांचं बालपण हरियाणाच्या कर्नालमध्ये गेलं. त्या अंतराळात भरारी घेणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या.• 1976 साली कर्नाल टागोर स्कूलमधून त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केलं. तर 1982 साली पंजाब इंजिनीअरिंग कॉलेजमधून वैमानिक इंजिनीअरिंग (Aeronautical Engineering) मध्ये पदवी घेतली. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी त्या अमेरिकेला गेल्या.• 1984 मध्ये टेक्सास युनिव्हर्सिटीतून वैमानिक इंजिनीअरिंगमध्ये त्यांनी मास्टर्स पूर्ण केलं.• अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था The National Aeronautics and Space Administration (NASA) इथं कल्पना यांनी 1988 पासून फ्ल्युड डायनॅमिक्समध्ये संशोधनाला सुरुवात केली.• नासामध्ये काम केल्यानंतर ओवरसेट मेथड्स कंपनीत उपप्रमुख म्हणून रुजू झाल्या. त्याठिकाणी त्यांनी एरोडायनॅमिक्समध्ये महत्त्वपूर्ण संशोधन केलं. त्यांचे रिसर्च पेपर अनेकदा चर्चेत राहिले.• नासाने 1994 साली संभाव्य अतंराळवीराच्या यादीत कल्पना यांचा समावेश केला. मार्च 1995 साली अंतराळ क्षेत्राचा विशेष अभ्यास करण्यासाठी नासाच्या जॉनसन एरोनॉटिक्स सेंटरमध्ये प्रशिक्षण चालू केलं.• त्या दरम्यान त्यांना अंतराळवीरांच्या 15 व्या फळीत ठेवण्यात आलं. तसंच एका वर्षाच्या प्रशिक्षणानंतर अंतराळयानाच्या नियंत्रण कक्षाच्या देखभालीचं काम देण्यात आलं.• नोव्हेंबर 1996 मध्ये नासानं एक घोषणा केली. त्यामध्ये ATS-87 मिशनच्या संशोधनाची जबाबदारी कल्पना याच्याकडं सोपवण्यात आली.• शेवटी तो दिवस उजाडला. 19 नोव्हेंबर 1997. त्यादिवशी हरियाणाच्या मुलीनं अंतराळात झेप घेतली. त्यावेळी त्यांनी 376 तास आणि 34 मिनिटं अंतराळात घालवली.• एका महत्त्वपूर्ण योजनेचं नेतृत्व करणाऱ्या कल्पना आणि त्यांच्या टीमने पृथ्वीला 252 फेऱ्या मारल्या म्हणजे त्यांनी 1 कोटी 46 हजार किमीहून अधिक प्रवास केला.*कल्पना यांचा शेवटचा प्रवास*• नासाने जेव्हा एक महत्त्वपूर्ण योजना आखली तेव्हा अनुभवी अंतराळवीर कल्पना चावला 7 सदस्यांच्या टीममध्ये महत्त्वाची जबाबदारीही त्याच्याकडं देण्यात आली.• जानेवारी 2003 च्या 16 दिवसांच्या मिशनमध्ये त्यांची विशेषतज्ज्ञ म्हणून नेमणूक केली. अंतराळात केले जाणारे प्रयोग हे कल्पना यांच्या नियंत्रणाखाली करण्यात आले होते.• 1 फेब्रुवारी 2003 ला कोलंबिया अंतराळयानाने पृथ्वीकडं येण्यासाठी अमेरिकेजवळच्या पॅसिफिक समुद्राकडं झेप घेतली. अंतराळवीरांनी स्पेस सुट घातला. त्यावेळी सर्व योग्यरीत्या सुरू होतं.• त्यावेळी स्थानिक वेळेनुसार सकाळच्या 8.40 वाजता कोलंबिया यानानं पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केला. अंतराळवीर आणि नासातल्या अंतराळयान नियंत्रण कक्षातले सगळेजण आनंदी होते.• 22 मिनिटांत ते यान पृथ्वीवर उतरणार होतं. सुमारे 8.54 वाजता यानाचा आणि नियंत्रण कक्षाचा संपर्क तुटायला सुरुवात झाली. 9.16 वाजता काही गोष्टी स्पष्ट व्हायला लागल्या आणि कोलंबिया यान इतिहासात जमा झालं.• तेव्हा कोलंबिया स्पेस शटलचा अपघात झाला आणि त्यातच सगळ्या अंतराळवीरांचं निधन झालं.।। विनम्र अभिवादन ।।संकलन••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" उत्पतीशिवाय स्थिती नाही, स्थितीशिवाय लय नाही, लयावाचून पुनःउत्पती नाही. "**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारतात सध्या किती व्याघ्र प्रकल्प आहेत ?२) संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम ( UNEP ) चे मुख्यालय कोठे आहे ?३) 'विक्टर सिटी' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?४) राष्ट्रीय पर्यटन दिवस केव्हा साजरा केला जातो ?५) ऑस्ट्रेलियन महिला ओपन टेनिस स्पर्धा २०२३ चे जेतेपद कोणी पटकावले ?*उत्तरे :-* १) ५३ २) नैरोबी, केनिया ३) सलमान रश्दी ४) २५ जानेवारी ५) आर्यना सबालेंका, बेलारूस *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 शेख एम. बी. केंद्रप्रमुख👤 नारायण गायकवाड👤 शिवानंद सूर्यवंशी👤 कवी गजानन काळे👤 अतुल भुसारे👤 शिवम पडोळे👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नव्हे चेटकी चाळकू द्रव्यभोंदु। नव्हे निंदकू मत्सरू भक्तिमंदू॥ नव्हे उन्मतू वेसनी संगबाधू। जनी ज्ञानिया तोचि साधु अगाधू॥१८१॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *आजचा विचाधारा......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नदीतील पाण्याच्या धारेला कितीही अडवण्याचा प्रयत्न जरी केले तरी त्या,धारेला आधार देण्यासाठी एखादा झरा आपोआप तयार होत असतो. कारण त्याला, त्याची महती कळत असते.तसंच सत्याच्या वाटेवर चालणाऱ्याच्या वाटेत टोकदार काटे पेरणारे कितीही असले तरी चालणाऱ्याला साथ देण्यासाठी त्या निर्मळ झऱ्याप्रमाणे एखादी व्यक्तीची साथ मिळत असते. म्हणून कोणालाही अडविण्याचा प्रयत्न करू नये. कारण वेळ एक, एक सेकंदाला बदलत असते. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*सम्राट आणि साधू*एक सम्राट रात्रीच्या वेळी राजधानीत फेरफटका मारीत असे आणि काय चालले आहे याचा आढावा घेत असे. फेरफटका मारत असताना सम्राटाला एक साधू जागा असलेला दिसायचा. त्याच्या कुटीत पाण्याचे मडके आणि दोन कपडयाशिवाय काहीच नव्हते तरी तो ‘’जागे रहा, झोपू नका, नाहीतर लुटले जाल’’ असा जोरजोरात आवाज देत असायचा. सम्राटाला वाटले हा साधू वेडा आहे मात्र त्याच्याशी एकदा बोलायला हवे. सम्राटाने एके दिवशी त्याला विचारले,’’तुमच्याकडे धनदौलत, गाडीघोडा, संपत्ती वगैरे काहीही नसतानासुद्धा तुम्ही इतके का जागता आणि सावधान राहता,’’ साधू म्हणाला,’’ राजा, आपण आपल्या महालात जो कचरा जमा केला आहे की, तो जर लुटला गेला तर काही फरक पडणार नाही, कारण आपण तो परत मिळवू शकता, परंतु या माझ्याकडे जे धन आहे ते लुटले गेले तर ते परत मिळणार नाही.त्यामुळे मी सदैव सावध राहतो.’’ राजा म्हणाला,’’ माझ्याकडे असलेल्या हत्ती घोडे, हिरे दागिने, सोने चांदी याला तुम्ही कचरा समजत आहात’’ साधूने उत्तर दिले,’’ ज्याला आपण अमूल्य समजत आहात ते धन, संपत्ती, हत्तीघोडे, राजवाडा कोणीही तुमच्याकडून हिसकावून घेऊ शकते पण माझी संपत्ती ही ईश्र्वरदत्त आहे. त्यामुळे मी स्वतला सावधान करतो, माझ्या मनात मोह, लोभ, मद, मत्सर, क्रोध, वासना, भय, अहंकार यांचा प्रवेश होऊ नये, अर्थात माझे मन हे ईश्वराने दिल्याप्रमाणे, लहान बालकाप्रमाणे कोरे असावे. या मानवी दुर्गुणांचा स्पर्श जर माझ्या मनाला झाला तर माझे कर्म बिघडेल आणि माझ्याकडून पाप घडेल. म्हणून मी रात्री स्वतलाच सांगत असतो नव्हे माझ्या आत्म्याला सांगत असतो झोपू नको, तू झोपलास तर हे विषय तुझ्यावर आक्रमण करतील व तुला गिळंकृत करतील.’’ साधुचे ते विचार ऐकून राजा त्याचे चरणी लीन झाला व साधुला गुरुस्थान दिले.*तात्पर्य :- मोह, लोभ, मद, मत्सर, क्रोध, वासना, भय, अहंकार यांची संगत न घेता जर जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर जीवन सुखकर होते. वाईटापासून आपले संरक्षण होते.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment