✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 16 जानेवारी 2024💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2018/01/blog-post_15.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील १६वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००८:टाटा मोटर्सच्या नॅनो या एक लाख रुपये किंमतीच्या 'पीपल्स कार'चे अनावरण**१९९८:ऊर्दू लेखक व कवी अली सरदार जाफरी यांना 'ज्ञानपीठ पुरस्कार’ जाहीर**१९९६:पुण्याचे शिल्पकार दिनकर शंकरराव थोपटे यांची ललित कला अकादमीच्या पुरस्कारासाठी निवड**१९९५:आयएनएस विद्युत या संपूर्ण देशी बनावटीच्या क्षेपणास्त्र नौकेचे गोवा येथे जलावतरण झाले.**१९७९:शहा ऑफ इराण यांनी कुटुंबासह इजिप्तमध्ये पलायन केले.**१९५५:पुणे येथील नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या इमारतीचे (तात्कालीन) मुंबई राज्याचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्या हस्ते उदघाट्न**१९४१:नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे देशाबाहेर प्रयाण**१९२०:अमेरिकेचे अध्यक्ष वूड्रो विल्सन यांच्या १४ कलमी कार्यक्रमानुसार स्थापन झालेल्या राष्ट्रसंघाची (League of Nations) पहिली बैठक झाली.**१९१९:अमेरिकेच्या संविधानात १८ वा बदल करण्यात आला आणि संपूर्ण देशात दारूबंदी लागू करण्यात आली.**_१६८१:छत्रपती संभाजी राजे यांचा ’छत्रपती’ म्हणून राज्याभिषेक झाला._**१६६०:रुस्तुम झमान आणि फाजल खान हे आदिलशहाचे सेनापती शिवाजी महाराजांवर चालुन आले आणि पराभूत होऊन परत गेले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९६२:प्रा.विनय अमृतराव पाटील -- कवी**१९६०:साहेबराव विश्वनाथ कांगुणे-- लेखक, वक्ते**१९५८:श्रीकांत सदाशिव मोरे-- प्रसिद्ध कवी, लेखक**१९५६:नारायण भगवानराव पांडव-- कवी* *१९५१:डॉ.जयप्रकाश रामचंद्र कुलकर्णी -- लेखक**१९५०:मधुकर सदाशिव वाघमारे -- कवी, लेखक* *१९४७: सिद्धार्थ यशवंत वाकणकर-- हस्तलिखितशास्त्र व भाषाशास्त्रज्ञ,संशोधक**१९४६:कबीर बेदी – चित्रपट अभिनेते**१९४३:नलिनी भीमराव खडेकर -- कवयित्री, लेखिका**१९४२:कृष्णा चौधरी --कवी,लेखक**१९२८:बाळासाहेब पित्रे--ज्येष्ठ उद्योजक व समाजसेवक(मृत्यू:१२ जानेवारी २०१८)**१९२८:रामचंद्र दत्तात्रेय लेले--वैद्यकशास्त्रज्ञ**१९२७:कामिनी कौशल-- भारतीय अभिनेत्री**१९२६:ओंकार प्रसाद तथा ओ.पी.नय्यर – संगीतकार (मृत्यू:२८ जानेवारी २००७)**१९२०:नानाभॉय अर्देशीर ऊर्फ ’नानी’ पालखीवाला – कायदेपंडित आणि अर्थतज्ञ (मृत्यू:११ डिसेंबर २००२)**१९१९:मधुसूदन ऊर्फ लालजी रघुनाथराव गोखले-- ज्येष्ठ तबलासम्राट(मृत्यू:१६ नोव्हेंबर २००२)**१९०९:विनायक रघुनाथ चितळे -- लेखक**१८५३:आंद्रे मिचेलिन – फ्रेन्च उद्योगपती (मृत्यू:४ एप्रिल १९३१)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२२:अरुण जाखडे-- मराठी ग्रंथप्रकाशक आणि लेखक(जन्म:७ जानेवारी १९५५)**२०१७:प्रा.पुरुषोत्तम पाटील-- मराठी कवी आणि केवळ मराठी कवितांना वाहिलेल्या नियतकालिकाचे संपादक होते (जन्म:३ मार्च १९२७)**२०११:प्रभाकर कृष्णराव काळे-- कवी, संपादक (जन्म:१९३८)* *२००५:श्रीकृष्ण हरी मेहेंदळे – संगीतकार, ’पेटीवाले’ मेहेंदळे* *२००३:रामविलास जगन्नाथ राठी – सुदर्शन केमिकल्स उद्योगसमुहाचे संस्थापक* *१९९७:कामगार नेते डॉ. दत्ता सामंत यांची गोळ्या घालून हत्या (जन्म:१९३३)**१९८८:डॉ.लक्ष्मीकांत झा – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थतज्ञ,मुत्सद्दी,कुशल प्रशासक, रिझर्व बँकेचे गव्हर्नर,जम्मू काश्मीरचे राज्यपाल व भारताचे अमेरिकेतील राजदूत (जन्म:२२ नोव्हेंबर १९१३)**१९६७:रॉबर्ट व्हॅन डी ग्राफ – अमेरिकन पदार्थवैज्ञानिक (जन्म:२० डिसेंबर १९०१)**१९६६:साधू वासवानी – आध्यात्मिक गुरु व शिक्षणतज्ञ (जन्म:२५ नोव्हेंबर १८७९)**१९५४:बाबूराव पेंटर – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक,चित्रकार,शिल्पकार आणि ’कलामहर्षी’ (जन्म:३ जून १८९०)**१९३८:शरदचंद्र चट्टोपाध्याय – बंगाली साहित्यिक,त्यांच्या ‘पथेर दाबी' या कादंबरीतील क्रांतिकारक विचारांनी ब्रिटिश राज्यकर्त्यांतही खळबळ उडवून दिली होती. पु.बा.कुलकर्णी यांनी त्या कादंबरीचे ’भारती’ या नावाने मराठीत भाषांतर केले आहे. (जन्म:१५ सप्टेंबर १८७६)**१९०९:न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे – समाजसुधारक,धर्मसुधारक,अर्थशास्त्रज्ञ व न्यायाधीश (जन्म:१८ जानेवारी १८४२)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*प्रत्येक शाळेला संरक्षणभिंत हवे*प्रत्येक गावात स्थानिक स्वराज्य संस्थेची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असते. पूर्वीच्या शाळा कोणाच्या घरात, ओसरीवर किंवा झाडाखाली भरविली जात असे आणि सर्वाना शिकवायला एकच शिक्षक असायचा. मात्र ........... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी आठवडाभरात पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर; सोलापुरात 19 जानेवारीला देशातील सर्वात मोठ्या गृहप्रकल्पाचं लोकार्पण, 30 हजार कामगारांच्या घराचे स्वप्न होणार पूर्ण*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राहुल नार्वेकरांनी न्यायालयाचा अवमान केला, आमदार अपात्रतेच्या सुनावणीवर आक्षेप घेत ठाकरे गटाची सर्वोच्च न्यायालयात धाव, तर आम्हीच खरी शिवसेना, ठाकरेंचे 14 आमदार अपात्र करा, शिंदे गटाची उच्च न्यायालयात याचिका*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *शरद मोहोळ हत्याकांडातील मुख्य आरोपी रामदास मारणेला अटक, आतापर्यंत 19 जणांना बेड्या, सर्व आरोपींना आज न्यायालयात हजर करणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीणच्या लाभार्थ्यांना 540 कोटी रुपयांचा पहिला हप्ता जारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *भारतीतील दारिद्र्य घटलं! गेल्या नऊ वर्षात सुमारे २५ कोटी भारतीयांचा राहणीमानाचा दर्जा सुधारला*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *22 जानेवारीला अयोध्येमध्ये राम मंदिराची प्राण प्रतिष्ठा होणार आहे. त्यानिमित्ताने एक ट्रिलियन आर्थिक उलाढाल अपेक्षित; राम मंदिरामुळे व्यवसायाला चालना!*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *कर्नाटकचा फलंदाज प्रखर चतुर्वेदीने मुंबईविरुद्ध खेळताना नाबाद 404 धावा करून वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 #उत्क्रांती म्हणजे काय ? 📙 भाग ५ (५/६) - मानवी वाटचालगोरिला आणि चिंपांझी या माकडांच्या शरीरातील रक्तातील प्रथिने, हिमोग्लोबिन आणि डी.एन.ए. यांचे माणसाच्या शरीरातील याच घटकांची मोठ्या प्रमाणावर साम्य आहे. यावरूनच गोरिला, चिंपांझी आणि माणूस या तीन्ही शाखा सुमारे चाळीस ते पन्नास लाख वर्षांपूर्वी एकाच पूर्वजापासून जन्मल्या असाव्यात, असा अंदाज केला जातो. उत्खननात सापडणाऱ्या जीवाश्मांच्या मदतीने मानवाच्या उत्क्रांतीतील वाटचालीचा खुणा धुंडाळाव्या लागतात.सर्वात प्राचीन जीवाश्म आहे रामपिथेकसचा. भारत आणि पूर्व आफ्रिकेत आढळून आलेल्या अवशेषांवरून आजच्या माणसाशी साम्य सांगणाऱ्या शारीरिक खुणा रामपिथेकसमध्ये होत्या हे लक्षात येते. त्याचा काळ होता सुमारे एक कोटी वीस लाख वर्षांपूर्वीचा.त्यानंतर भेटतो सुमारे पस्तीस लाख वर्षांपूर्वी वावरणारा ऑस्ट्रेलोपिथेकस अफरेनिस. मागच्या दोन पायांवर उभे राहून ताठ चालणे हे मानवी प्राण्याचे वैशिष्ट्य या पूर्वजात पुर्ण रुजलेले आढळते. मात्र मेंदूचा आकार अद्याप लहानच होता. तर जबडा आणि दातांचा आकार मोठा होता. ऑस्ट्रेलोपिथेकस - आफ्रिकॅन्स ऑस्ट्रेलोपिथेकस - रोबोस्ट्स असे बदल होत सुमारे दहा लाख वर्षांपूर्वी 'होमो' या जातीचा जन्म झाला.होमो इरेक्ट्स ही ऑस्ट्रेलोपिथेकस आणि आजच्या मानवाच्या मधली पायरी होती.आजचा मानव म्हणजे होमो सेपियन्स. जीवाश्म स्वरूपात हा होमो सेपियन्स भेटतो साधारण पाच लाख वर्षांपूर्वीच्या काळात.मेंदूच्या आकारात वाढ होत गेली होती.सुरुवातीला होमो सेपियन्स निअँडरथालच्या कवटीची हाडे जाड होती, कपाळ अरुंद होते.हे सगळे शारीरिक बदल होत आजच्या स्वरूपातील माणूस सुमारे चाळीस हजार वर्षांपूर्वीच्या अवशेषांमध्ये भेटतो.सजीव सृष्टीची उत्पत्ती कशी झाली, हे कोडे विचारवंतांना अनेक वर्षे पडलेले आहे. 'देवाने प्रत्येक प्रकारच्या प्राण्याची एकेक जोडी बनवली,' या बायबलमधील मताशी सहमत होणे अनेकांना जड जात होते. अनेकांनी या कोड्याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला.उपलब्ध पुरावे, सूक्ष्म निरीक्षण आणि साऱ्यांची सांगड घालून मांडलेली तर्कशुद्ध शास्त्रीय उपपत्ती अशा स्वरूपात उत्क्रांतीवाद मांडणारा पहिला शास्त्रज्ञ ‘चार्ल्स डार्विन'क्रमश :- ‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" विश्वास हा खोडरबर सारखा असतो तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो. "**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली ?२) स्वच्छ सर्वेक्षण २०२३ मध्ये एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरात 'देशातले सर्वात स्वच्छ शहर' कोणते ?३) कोणत्या प्राण्याला उडणारी खार किंवा भीम खार असेही म्हणतात ?४) बारामती येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली ?५) नुकतेच कोणत्या देशाने ५१ वर्षानंतर प्रथमच चंद्राचा अभ्यास करण्यासाठी पेरेग्रीन हे lander पाठविले आहे ? *उत्तरे :-* १) मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस अध्यक्ष २) सासवड, पुणे ३) शेकरू ४) स्वाती राजे ५) अमेरिका *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 साईनाथ सायबलू, मुख्याध्यापक, धर्माबाद👤 वैभव तुपे, शिक्षक, नाशिक👤 रमेश सरोदे👤 ज्ञानेश्वर मोकमवार👤 सचिन होरे, धर्माबाद👤 किरण शिंदे👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अहंकार विस्तारला या देहाचा।स्त्रियापुत्रमित्रादिके मोह त्यांचा॥बळे भ्रांति हें जन्मचिंता हरावी।सदा संगती सज्जनांची धरावी॥१६६॥सरळ अर्थ :- देहाच्या प्रेमाबरोबरच त्याच्या अहंकाराचा विस्तार होऊन त्याच्याशी संबंधित बायको, मुलं, मित्र, आप्त इत्यादींचा मोह वाढीला लागतो. परंतु हा मोह झटकून टाकून देहादिक प्रेमाचा भ्रम दूर केला पाहिजे.।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपलं ठेवावं झाकून आणि दुसऱ्याच पहावं वाकून या प्रकारची समाजात एक प्रचलित असलेली म्हण नेहमीच ऐकायला, वाचायला मिळत असते. म्हणजेच असे होत असावे म्हणून कदाचित ही म्हण प्रचलित झाली असावी. पण, त्यात एक गोष्ट अवश्य लक्षात असू द्यावे जेव्हा आपण स्वतः चा समाधान करण्यासाठी काळजीपूर्वक दुसऱ्याकडे वाकून बघत असतो त्यावेळी आपल्याकडेही दहा पटीने लोक वाकून बघत असतात. जर बघायचं असेल तर एखाद्याच्या डोळ्यातील अश्रू बघावे,कोणाच्या व्यथा जाणावे ,कोणाचे दु:ख बघून त्या दु:खात माणुसकीच्या नात्याने सहभागी व्हावे पापात जाणार नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*सुंदर माझे घर*बिट्टी बेडकुळी कितीतरी वेळ कमळाच्या पानावर लोळत होती. वरून पावसाच्या धारा येत होत्या. सगळया तळयात 'टिप...टिप..' आवाज येत होता, हवा कशी गार गार झाली होती. बिट्टीला मजेत गाणे गावेसे वाटत होते. तिने त्याप्रमाणे तोंड उघडलेही. इतक्यात पलीकडच्या झाडावरून मंजुळ स्वर ऐकू आले. बिट्टीने तिकडे पाहिले. एक छोटीशी मुनिया आपले घरटे विणीत होती. नाजुक, नाजुक काडयांचे विणकाम करताना मधेच गाणे गुणगुणत होती. आता मात्र बिट्टीला राहवले नाही. एका उडीतच तिने पलीकडचा काठ गाठला. म्हंटले 'माझे घर पाहिले कां केवढे मोठे आहे ते?आत कशी रंगीबेरंगी कमळे फुललीत. 'ती कौतुकाने तळयाकडे पाहत म्हणाली. 'शी! हे कसले सुंदर घर? आत भरला आहे गाळ अन् चिखल!' मुनिया नाक मुरडत म्हणाली. बिट्टी मग टुणटुणत पुढे निघाली. आज सगळीकडे कसा मऊ मऊ चिखल पसरला होता. त्यात घसरगुंडी खेळाविशी वाटत होती. बिट्टीला एक भलामोठा दगड दिसला. त्यावर उडी मारताच आतून आवाज आला, 'कोण आहे?' पाठोपाठ कासवदादा मान बाहेर काढून इकडेतिकडे पाहू लागले. 'अगबाई! कासवदादा तुम्ही त्यात राहता वाटते?' बिट्टीने विचारले. 'तर काय! हेच माझे घर!' पुन्हा आत शिरत ते म्हणाले. मजाच आहे नाही? बिट्टी मनाशी विचार करत पुढे जाऊ लागली. वाटेत झाडावर एक मधाचे मोठ्ठे पोळे लोंबत होते. त्याभोवती मधमाशा उडत होत्या. काही जात होत्या, तर काही येत होत्या. 'बायांनो! तुम्ही इतक्याजणी ह्या छोटयाशा घरात कशा ग राहता?' बिट्टीने विचारले. 'छोटेसे आहे कां ते? आत कशा षट्कोनी खोल्याच खोल्या आहेत! अगदी आरामात राहता येते सर्वांना!'. बिट्टीभोवती गुणगुणत एका माशीने उत्तर दिले. बिट्टी तिथेच थांबून इकडची तिकडची मजा बघत होती. किती गंमतीदार घरे आहेत नाही प्रत्येकाची, ती स्वत:शी म्हणत होती. रस्त्यावर फळांनी लगडलेले एक भलेमोठे झाड होते. त्यावर सुगरणींची लोंबती घरे होती. वाऱ्याने ती इकडून तिकडे हलत! सुगरणबाई उडत येऊन खालून वर जात होत्या. आपल्या इवल्याशा चोचीने विणकाम करत होत्या. बापरे! एवढया वा-यावादळातही घर कसे पडत नाही? बिट्टी वर पाहत असताना जवळून आवाज आला. 'माझे घर कित्ती छान आहे! खाऊच्याच घरात मी राहते.' बिट्टीने ह्या टोकाकडून त्या टोकाकडे डोळा फिरवत शोधाशोध केली.शेजारी एक भलामोठा पेरू पडला होता. त्यातून एक अळी डोके बाहेर काढून बिट्टीशी बोलत होती. 'हो! हे बाकी खरेच!' बिट्टीने मान डोलावली. इतक्यात आभाळातून पुन्हा गडाड-गुडूम आवाज आला व पाऊस पडू लागला. समोर एक भली मोठी छत्री उगवली होती. बिट्टी पळत पळत जाऊन त्याखाली उभी राहिली. आता मात्र तिला पुन्हा एकदा गाणे म्हणावेसे वाटले व त्या आनंदात ती गाऊ लागली. 'गार गार वारा अन् पावसाच्या धारा, भिजलेली राने अन् पानोपानी गाणे, झुळझुळणा-या पाण्यात थेंबांची नक्षी, फांदीवर डुलतात भिजलेले पक्षी, ओल्या मातीत सुगंधाची भर, सगळयात सुंदर सुंदर माझेच घर !! •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment