✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 19 जानेवारी 2024💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2016/12/blog-post_7.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील १९वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९९६:उस्ताद अल्लारखा खाँ यांची मध्य प्रदेश सरकारच्या कालिदास सन्मानासाठी निवड**१९९६:प्रसिध्द मल्याळी लेखक एम. टी. वासुदेवन नायर यांची १९९५ च्या ज्ञानपीठ पुरस्कारासाठी निवड**१९६८:पहिली यशस्वी ह्रुदयरोपण शस्त्रक्रिया डॉ. ख्रिस्तोफर बर्नाड यांनी केली.**१९५६:देशातील सर्व विमा कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण करण्याचा राष्ट्रपतींचा वटहुकूम**१९५४:कोयना धरणाच्या जलविद्युत प्रकल्पाचे भूमिपूजन**१९४९:पुणे नगरपालिका व उपनगरपालिका विसर्जित होऊन ’पुणे महानगरपालिका’ स्थापन झाली.**१९४९:क्यूबाने इस्त्रायला मान्यता दिली.**१९४२:दुसरे महायुद्ध – जपानी सैन्याने ब्रह्मदेशवर आक्रमण केले.**१९०३:अमेरिकेचे अध्यक्ष थिओडोर रुझव्हेल्ट यांनी इंग्लंडचे राजे एडवर्ड (सातवे) यांना बिनतारी संदेश पाठवला. अटलांटिक महासागरापार पाठवलेला हा पहिला बिनतारी संदेश होता.**१८३९:ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीने एडनचा ताबा घेतला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९५: लक्ष्मीदेवी रेड्डी-- कवयित्री* *१९६७:स्वाती घाटे -- कवयित्री**१९६५:प्रा.डॉ.हेमंत खडके-- लेखक* *१९५८:संजीव लक्ष्मण साळगावकर -- लेखक**१९५७:गणेश निवृत्ती आवटे-- लेखक**१९५६:एकनाथ(जीजा) दगडू आवाड-- दलित चळवळीचे नेते आणि मानवी हक्क अभियानाचे राष्ट्रीय अध्यक्ष,लेखक (मृत्यू:२५ मे २०१५)**१९५१:नामदेव ज्ञानदेव आबने-- कवी, गझलकार,लेखक* *१९४९:अनंत शंकरराव भूमकर(नाईक)-- प्रसिद्ध कवी* *१९३९:शरद बापूजी मुंजवाडकर -- लेखक* *१९३६:झिया उर रहमान – बांगलादेशचे ७ वे राष्ट्राध्यक्ष्य (मृत्यू:३० मे १९८१)**१९२४:वसंत प्रभू-- महाराष्ट्रातील संगीतकार(मृत्यू:१३ ऑक्टोबर १९६८)**१९२०:शिवगौडा बाळाप्पा संकनवाडे -पाटील-- लेखक**१९२०:झेवियर पेरेझ द कुइयार – संयुक्त राष्ट्रांचे पाचवे सरचिटणीस**१९०६:विनायक दामोदर कर्नाटकी ऊर्फ ’मास्टर विनायक’ – अभिनेते,दिग्दर्शक व निर्माते.त्यांनी २२ चित्रपटातून भूमिका केल्या तर २९ चित्रपट दिग्दर्शित केले.(मृत्यू:१९ ऑगस्ट १९४७)**१८९२:चिं.वि.जोशी – विनोदी लेखक व पाली साहित्याचे संशोधक (२१: नोव्हेंबर १९६३)**१८८६:रामचंद्र गणेश कुंदगोळकर तथा ’सवाई गंधर्व’ – हिन्दुस्तानी शास्त्रीय गायक, खाँसाहेब अब्दुल करीम खाँ यांचे शिष्य,पं भीमसेन जोशी आणि गंगुबाई हनगळ यांचे गुरू,दादासाहेब खापर्डे यांनी त्यांना 'सवाई गंधर्व' ही पदवी दिली.(मृत्यू:१२ सप्टेंबर १९५२)**१८०९:एडगर अॅलन पो – अमेरिकन (गूढ व भयकथांचा) लेखक व कवी (मृत्यू:७ आक्टोबर १८४९)**१७३६:जेम्स वॉट – स्कॉटिश संशोधक व यंत्र अभियंता (मृत्यू:२५ ऑगस्ट १८१९)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१८:चारुदत्त सरपोतदार उर्फ चारूकाका--मराठी चित्रपट आणि नाटय़सृष्टीचा चालता-बोलता इतिहास, कलाकारांचे आधारवड, पुण्याचे सार्वजनिक काका (जन्म:१५ मे १९३५)**२००५: भानुदास श्रीधर परांजपे-- कवी,नाटककार (जन्म:१६ मार्च १९१४)**२०००:मुथ्थय्या अन्नामलाई तथा एम.ए. चिदंबरम – उद्योगपती व क्रिकेट प्रशासक, ’बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया’ (BCCI) चे अध्यक्ष;उपाध्यक्ष व खजिनदार,तामिळनाडू क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष, चेन्नईचे महापौर (१९५५),चेन्नईतील ’चेपॉक’ स्टेडियमला त्यांचे नाव देण्यात आले आहे.(जन्म:१२ आक्टोबर १९१८)**१९६०:रामचंद्र गोपाळ ऊर्फ ’दादासाहेब तोरणे – चित्रपट निर्माते व दिग्दर्शक,मराठी चित्रपटसृष्टीचे आद्य प्रवर्तक (जन्म:१३ एप्रिल १८९०)**१९५८:नारायण केशव बेहरे-- विदर्भातील कवी,कादंबरीकार व इतिहासकार (जन्म:४ जुलै १८९०)**१५९७:महाराणा प्रतापसिंह उदयसिंह_ राजस्थान राज्यातील उत्तर-पश्चिम भारतातील मेवाडचा तेरावा राजा (जन्म:९ मे, १५४०)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *हमें तो लूट लिया*मोबाईलमुळे आज जग बदलल्यासारखे आणि जवळ आल्यासारखे वाटत आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात मोबाईलची क्रांती संपूर्ण इतिहास बदलून टाकली आहे. आजही ते पोस्टातील पत्रव्यवहाराचे दिवस आठवले की " डाकिया डाक लाया " हे गीत आठवण आल्या शिवाय राहत नाही. पोस्टमन गावात आला म्हटले की, लोक उत्साहाने त्याच्याकडे पाहायचे कोणाचे पत्र आले म्हणून...........? ..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *कर्मचार्यांच्या उदंड भावना आणि त्यांच्या विनंतीमुळे केंद्र सरकारने 22 जानेवारी 2024 रोजी सर्व केंद्र सरकारची कार्यालयं, केंद्रीय संस्था आणि केंद्रीय औद्योगिक आस्थापनं राम मंदिर प्राणप्रतिष्ठानिमित्त दुपारी 2:30 वाजेपर्यंत अर्धा दिवस बंद ठेवण्याची घोषणा केली आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *16 वर्षाखालील विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश देता येणार नाही, केंद्राच्या नव्या मार्गदर्शक सूचना*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *अदानी ग्रुप महाराष्ट्रात करणार 50 हजार कोटींची गुंतवणूक, 20 हजार जणांना मिळणार रोजगार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मराठा समाजाचे मागासलेपण तपासणी साठी येत्या 23 जानेवारीपासून सर्वेक्षण होणार सुरू*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *शिंदे समितीला सापडलेल्या 54 लाख नोंदीनुसार तात्काळ कुणबी प्रमाणपत्र देण्याचे आदेश, मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारची कार्यवाही*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना भागाकार जमेना, तर अनेकांना दुसरीतलं मराठीही वाचता येईना; ASER सर्वेक्षणाचा धक्कादायक निष्कर्ष*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *MPSC ची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर, विनायक पाटील राज्यात प्रथम*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 तारामंडळे व आकाशगंगा 📙विश्वाचा विस्तार व त्यातील असंख्य तारामंडळे यांबद्दल सतत नवनवीन माहिती उपलब्ध होत असते. या सर्वांची गणना करणे हे काम जगभरातील ज्योतिर्विद अनेक वर्षे करत आहेत व ते तसेच चालूही राहील.दीर्घिका, सर्पाला व आकारहीन अशा तीन प्रकारांत विश्वातील तारामंडळे विभागली आहेत. लंबगोलाकृती मोठा पसरट गोल व मध्यभागी थोडी फुगठी असलेल्या तारकामंडळांना 'दीर्घिका' म्हणतात, तर वेटोळे आकृती दिसणाऱ्यांना 'सर्पिला' असे संबोधले जाते. ज्यांचा विशिष्ट आकार सांगता येत नाही, त्यांना 'आकारहीना' म्हणतात. आपली आकाशगंगा सर्पिला प्रकारात मोडते.आपली आकाशगंगा एक लाख प्रकाशवर्षे या अंतरात विस्तारली आहे. पण विश्वाच्या पसाऱ्यात ते एक किरकोळ तारामंडळ म्हणावे लागेल. सूर्य व ग्रहमाला हा आपल्या आकाशगंगेचा एक छोटा भाग. अनेक तारे आपल्या आकाशगंगेत असून सर्वांचा प्रकाश एकमेकांत मिसळल्याने पांढुरका पट्टाच आकाशात आपल्याला दिसतो. म्हणूनच आपल्या आकाशगंगेला 'मिल्की वे' असेही म्हटले जाते. त्या पट्ट्यात काही भाग काळेकुट्ट आहेत, जेथे धुळीमुळे ताऱ्यांचा प्रकाश शोषला गेला आहे. आपल्या आकाशगंगेच्या सर्पाकृती वेटोळ्याचे तीन वेगळे भाग केंद्रातून उगम पावताना स्पष्ट करता येतात. त्यांना ओरायन, परसियस व सॅजिटेरियस अशी नावे दिलेली आहे. सूर्यमालिका ओरायन या पट्ट्यामध्ये येते. सर्पिलाकृती वेटोळे स्वतःभोवती फिरण्याचा काळ ओरायन पट्टय़ाच्या बाबतीत दर पंचवीस कोटी व वर्षांनी पूर्ण होतो. आकाशगंगेचे वर्णन गॅलिलियोने प्रथम स्पष्ट केले. नंतर हर्षल यांनी आकाशातील ताऱ्यांच्या गणनेच्या संदर्भात आकाशगंगेचा आकार निश्चित वर्णन केला, तर हबल यांनी आकार व स्वरूप यांबद्दल १९२० साली महत्त्वाचे निष्कर्ष मांडले. रेडिओ अॅस्ट्रोनॉमीला १९४० साली सुरुवात झाल्यानंतर आकाशगंगेतील तीन पट्टे, त्यांना भरून राहणारे हायड्रोजनचे ढग, त्यातील रेडिओकिरण या सर्वांबद्दल पुरेशी माहिती उपलब्ध होत गेली. यासाठी २.१ सेमी वेव्हलेंथच्या लहरी उपयोगी पडल्या.आज आपली आकाशगंगा व जवळची काही तारामंडळे मिळून 'लोकल ग्रुप' या नावाने ओळखली जातात. यात एकंदर ३२ तारामंडळांची नोंद सध्या झाली आहे. यांतील सर्वात मोठे तारामंडळ अँड्रोमेडा सर्पिल आकाराचे आहे. दुसरा क्रमांक मिल्की वे चा. पृथ्वीवरून साध्या डोळ्यांनी अँन्ड्रोमेडा व मॅगेलान दिसू शकतात.कन्या राशीच्या दिशेने असलेल्या तारामंडळांच्या गटात प्रचंड आकाराची तारामंडळे अस्तित्वात असावीत, असे मार्च १९९३ मध्येच नोंदले गेले आहे. त्यांचा आकार आजवर माहीत असलेल्या अन्य तारामंडळांच्या कित्येकपट मोठा असावा, असेही भाकीत केले गेले आहे. म्हणूनच यांना 'दडलेले राक्षस' असे टोपणनाव दिले गेले आहे. सूर्यमालिका ही आपल्या आकाशगंगेत मुख्य केंद्राच्या एका बाजूला आहे. सूर्य केंद्रापासून किमान तीस हजार प्रकाश वर्षे दूर आहे. आकाशगंगेचा अभ्यास आपल्याला पृथ्वीवरील निरीक्षणातूनच करावा लागणार आहे. रेडिओ अॅस्ट्रोनॉमी प्रगत होत गेल्याने अन्य तारामंडळांत होणाऱ्या घडामोडींचा थोडाफार अंदाज येथे लागत आहे, एवढेच.आपल्या आकाशगंगेत १००-२०० अब्ज तारे असावेत. परंतु गेल्या दोन दशकांतील वेधातून असे दिसून येते की, आपल्या किंवा इतर आकाशगंगेत ताऱ्यांनी व्याप्त भागापलीकडे पुष्कळ लांबवर अदृश्य वस्तुमान भरले आहे. त्या पदार्थांचे गुरुत्वाकर्षण जाणवते, पण ते दिसत मात्र नाहीत! हे पदार्थ कशाचे बनले आहेत ते रहस्यही अद्याप उकललेले नाही.आपल्या किंवा इतर आकाशगंगांत तारे, धूळ, गॅस व अदृश्य पदार्थ याव्यतिरिक्त चुंबकीय क्षेत्रसुद्धा आढळते. विश्वकिरणांतील विद्युतभार असलेल्या कणांचे मार्ग या चुंबकीय क्षेत्राने नियंत्रित केले जातात. ‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून**संकलन :- श्याम ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••विचार असे मांडा कि तुमच्या विचारांवर कुणीतरी विचार केलाच पाहिजे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) पंख असूनही उडता न येणाऱ्या पक्ष्याचे नाव काय ?२) मुंबईचा गवळीवाडा कोणत्या शहराला म्हणतात ?३) जागतिक हवामान संस्थेने ( WMO ) कोणत्या वर्षाला 'सर्वाधिक उष्ण वर्ष' म्हणून जाहीर केले ?४) पांडवांच्या वडिलांचे नाव काय होते ?५) इलेक्ट्रिक इस्त्रीमधील तापणारा घटक कोणता ? *उत्तरे :-* १) शहामृग २) नाशिक ३) वर्ष २०२३ ४) पंडू राजा ५) नायक्रोम*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 अजय कोंडलवाडे, सहशिक्षक, बिलोली👤 अजय परगेवार उमरेकर👤 माधव चपळे👤 शिवशंकर स्वामी👤 सिद्धार्थ कैवारे, चिरली👤 बालाजी सुरजकर👤 चंद्रकांत कुमारे, पांगरी*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नसे अंत आनंत संता पुसावा। अहंकारविस्तार हा नीरसावा॥ गुणेवीण निर्गुण तो आठवावा। देहेबुद्धिचा आठवु नाठवावा॥१६९॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एकमत करून एखाद्याला एकटे पाडून त्याची मोठ्या आनंदाने मज्जा बघत राहणे म्हणजे माणुसकी नव्हे. बरेचदा आपल्या जीवनात वेळ, प्रसंगी बरेच लोक येतात आणि जातात. पण, शेवटपर्यंत कोणीच, कोणाला साथ देत नाही म्हणून ज्या गोष्टीला अर्थ नसते त्याच्या आधीन होऊ नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *एका गाढवाची गोष्ट*एक धोबी आपल्या गाढवाकडून दिवसभर ओझी वाहण्याचे काम करून घेई आणि रात्री तो त्याला गावाबाहेर चरायला सोडून देई. रात्रभर गवत, नाही तर कुणा ना कुणाच्या शेतातली धान्याची रोपे पोटभर खाऊन झाल्यावर पहाटे पहाटे ते गाढव आपल्या घरी जाई. या रात्रीच्या भ्रमंतीत त्याची एका कोल्ह्याशी ओळख झाली.एके रात्री पुनवेचे पिटूर चांदणे पडले असताना ते गाढव म्हणाले, 'कोल्होबा, या चांदण्यांमुळे मन कसे प्रफुल्लित झाले आहे. मी थोडा वेळ गाऊ का?'कोल्हा म्हणाला, 'मामा, तुम्ही आणि गाणार? म्हणजे प्रलयच धडकला म्हणायचा!''का रे, मला गाण्याची माहिती नाही, असे का तुला वाटते?' असा प्रश्न विचारून ते गाढव स्वर किती, सप्तके किती व राग किती वगैरे माहिती देऊन त्या कोल्ह्याला म्हणाले, 'आता तरी माझ्या रागदारीच्या ज्ञानाबद्दल तुझ्या मनात संशय उरला नाही ना?कोल्हा म्हणाला, 'नुसते ज्ञान असणे वेगळे आणि गाण्याचा आवाज वेगळा. त्यातून कुणी, कुठे व कसे वागायचे याबद्दल मार्गदर्शक असे काही नियम आहेत. उदाहरणच द्यायचे झाले, तर या जगात सुरळीतपणे जगण्याची इच्छा असेल, तर खोकला झालेल्याने व जो झोपाळू आहे त्याने चोरी करण्याच्या फंदात पडू नये व रोगग्रस्ताने जिभेचे चोचले पुरवू नयेत. खोकला झालेला जर कोणी चोरी करायला गेला आणि चोरी करता करता त्याला खोकला आला, तर ज्याप्रमाणे घरमालकाकडून मार खाण्याचा त्याच्यावर प्रसंग येईल, त्याचप्रमाणे तुम्ही जर या रात्रीच्या वेळी गाऊ लागलात, तर ज्याच्या शेतातली कोवळी कणसे आपण चोरून खात आहोत, तो शेतकरी जागा होईल आणि आपल्या दोघांनाही चोप देईल.'गाढव म्हणाले, 'कोल्होबा, तू अगदीच अरसिक कसा रे? तो स्मशानात राहणारा रुक्ष मनोवृत्तीचा शंकर जर त्या रावणाने सुकवलेल्या स्नायूंपासून तयार केलेल्या तंतुवाद्यातून रागदारीचे मधुर स्वर काढताच त्याच्यावर प्रसन्न झाला, तर माझे गोड गाणे ऐकून त्या शेताची रखवाली करणारा माणूस मला मारणे शक्य आहे का? उलट तो माझा सन्मानच करील.'हा आपले ऐकण्याचे लक्षण दिसत नाहीसे पाहून तो कोल्होबा त्या शेताच्या कुंपणाबाहेर पडून दूर उभा राहिला आणि त्या गाढवाने टिपेत गायला प्रारंभ केला. त्याबरोबर त्या शेताच्या जाग्या झालेल्या राखणदाराने त्याला बेदम मार दिला. त्या माराने ते गाढव मूच्र्छा येऊन जमिनीवर कोसळताच त्या राखणदाराने त्याच्या गळय़ात दोरखंडाने एक उखळ बांधले.एवढे करून तो पहारेकरी आपल्या झोपडीत जाताच शुध्दीवर आलेले ते गाढव गळय़ात बांधण्यात आलेल्या उखळासह कसेबसे घराकडे जाऊलागले, तेव्हा दूर उभा राहिलेला कोल्हा त्याला म्हणाला, 'गाढवमामा, तुमचा दिव्य गायनावर बेहद्द खूष होऊन त्या पहारेकर्याने तुमच्या सन्मानार्थ हा 'भव्य मणी' तुमच्या गळय़ात बांधला का?' पण लाजेने चूर झालेले ते गाढव एकही शब्द न बोलता निघून गेले.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment