✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 13 जानेवारी 2024💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2016/08/blog-post_27.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील १३ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००७:के.जी.बालकृष्णन यांनी भारताचे ३७ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.**१९९६:'पुणे - मुंबई दरम्यान ’शताब्दी एक्सप्रेस’ सुरू झाली.**१९६७:पुण्यातील स.प. महाविद्यालयाचा सुवर्णमहोत्सव श्री.चिंतामणराव देशमुख यांच्या हस्ते संपन्न.**१९५७:हिराकूड धरणाचे पंडित नेहरूंच्या हस्ते उद्घाटन झाले.**१९५३:मार्शल टिटो युगोस्लाव्हियाच्या अध्यक्षपदी**१८९९:गोविन्द बल्लाळ देवल यांच्या ’संगीत शारदा’ या नाटकाचा पहिला प्रयोग इंदूर येथे झाला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९४:वैभव भिवरकर-- प्रतिभावंत कवी, लेखक,वक्ते**१९८७:डॉ.कुणाल मुरलीधर पवार -- कवी* *१९८३:इम्रान खान – भारतीय चित्रपट कलाकार**१९८२:कमरान अकमल – पाकिस्तानी क्रिकेटपटू**१९७८:प्रा.कीरण नामदेवराव पेठे-- कवयित्री**१९७१:संतोष दत्तात्रय जगताप-- कवी,लेखक**१९७०:स्वाती प्रभाकरराव कान्हेगावकर-- लेखिका* *१९७०:सत्यवान सीताराम देवलाटकर -- लेखक**१९६३:मोरेश्वर रामजी मेश्राम-- कवी* *१९५५:सरिता रमेश आवाड -- लेखिका**१९४९:राकेश शर्मा–अंतरिक्षात जाणारे पहिले भारतीय, आणि जगाचे १३८ वेअंतराळवीर**१९४८:आत्माराम कनिराम राठोड(तांडाकार) -- प्रसिद्ध लेखक,कवी (मृत्यू:२३ मे २००५)**१९४७:प्रा.वसंत मारुतीराव जाधव-- कवी, संपादक* *१९४२:जावेद सिद्दीकी-- भारतातील हिंदी आणि उर्दू पटकथा लेखक,संवाद लेखक आणि नाटककार* *१९३८:पं.शिवकुमार शर्मा – प्रसिद्ध संतूरवादक व संगीतकार**१९२६:शक्ती सामंत – हिन्दी व बंगाली चित्रपट दिग्दर्शक व निर्माते (मृत्यू:९ एप्रिल २००९)**१९१९:एम.चेन्ना रेड्डी – आंध्र प्रदेशचे ११ वे मुख्यमंत्री, माजी राज्यपाल(मृत्यू:२ डिसेंबर १९९६)**१९१८:प्रा.अच्युत केशवराव भागवत -- लेखक संपादक,अनुवादक* *१९१५:प्रा.दत्तात्रय सखाराम दरेकर-- लेखक, चरित्रकार* *१९०८:रावसाहेब म्हाळसाकांत वाघमारे-- कवी,लेखक (मृत्यू:७ मार्च१९८९)**१८९६:मनोरमा श्रीधर रानडे-- मराठी कवयित्री,रविकिरण मंडळाच्या सदस्या(मृत्यू:१९२६)**१८९१:गोपाळ रामचंद्र परांजपे-- विज्ञान लेखक व संपादक ( मृत्यू:६ मार्च १९८१)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१४:अंजली देवी-- भारतीय अभिनेत्री,चित्रपट निर्माती (जन्म:२४ ऑगस्ट १९२७)**२०११:प्रभाकर विष्णू पणशीकर –मराठी रंगभूमीवरील अभिनेते,दिग्दर्शक आणि नाट्यनिर्माते (जन्म:१४ मार्च १९३१)**२००१:श्रीधर गणेश दाढे – संस्कृत पंडित व लेखक.कालिदासाचे ’मेघदूत’ कवींद्र परमानंद यांचे 'शिवभारत’ यांचे पद्यमय अनुवाद त्यांनी केले आहेत.* *१९९८:शंभू सेन – संगीत दिग्दर्शक व नृत्य दिग्दर्शक* *१९९७:मल्हार सदाशिव तथा ’बाबूराव’ पारखे – उद्योजक व वेदाभ्यासक (जन्म:१५ एप्रिल १९१२)**१९८९:श्रीकृष्ण जनार्दन जोशी-- लेखक (जन्म:१ ऑगस्ट १९१५)**१९८५:मदन पुरी – हिन्दी व पंजाबी चित्रपटांतील चरित्र अभिनेता (जन्म: १९१५)**१९७६:अहमद जाँ थिरकवा – सुप्रसिद्ध तबला वादक (जन्म: १८९२)**१९६७:हरी दामोदर वेलणकर-- संस्कृत पंडित व ग्रंथकार (जन्म:१८ऑक्टोबर १८९३)**१८३२:थॉमस लॉर्ड – लॉर्डस क्रिकेट ग्राउंडचे संस्थापक (जन्म:२३ नोव्हेंबर १७५५)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *तरुण भारत देश*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पंतप्रधान मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्यात विकासकामांच्या उद्घाटनाचा सपाटा, शिवडी-न्हावा शेवा सी लिंकचं लोकार्पण, दिघा रेल्वे स्थानक, लेक लाडकी योजनेचा शुभारंभ, नाशिकमध्ये युवा महोत्सवाला हजेरी, काळाराम मंदिरात पूजा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *कोणतीही नशा करू नका, ड्रग्जपासून लांब राहा, माता बहिणींवरुन शिवीगाळ करु नका, युवा दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचं तरुणांना आवाहन*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मनोज जरांगे यांना हायकोर्टाचा मोठा दिलासा, मराठा मोर्चा मुंबईत धडकणार, विरोधातील याचिका फेटाळली!*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *विश्व मराठी संमेलनात मराठी भाषा प्रेमींना सामावून घ्यावे - दीपक केसरकर*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *‘स्वत:ला स्वत:विरुद्ध उभं करताना’ कविता संग्रहास ‘युवा’ साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पुणे :- समता परिषदेच्या कार्यकर्त्याचा स्तुत्य उपक्रम, जिल्हा परिषदेच्या १६० विद्यार्थ्यांना दाखवला ‘सत्यशोधक’ चित्रपट*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *पंतप्रधान मोदी यांनी अयोध्येतील राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापने पूर्वी 11 दिवसांचं विशेष अनुष्ठान करणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *राकेश शर्मा*हे अंतरिक्षात जाणारे पाहिले भारतीय आहेत.भारताचा पहिला आणि जगाचा १३८ वा अंतराळवीर बनण्याचा सन्मान विंग कमांडर राकेश शर्मा यांनी पटकावला तो २ एप्रिल १९८४ रोजी भारत-रशिया अवकाश संशोधन मंडळ कार्यक्रमांतर्गत रशियाच्या सोयूझ टी-२ यानातून दोन रशियन अंतराळ संशोधकासमवेत राकेश शर्माने अवकाश सफरीचा अनुभव घेऊन या क्षेत्रात प्रगतीचे नवे दालन भारतीयांसाठी खुले केले.राकेश शर्मा पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी अंतराळातून बोलत होते. अंतराळातून भारत कसा दिसतो, या प्रश्नाला त्यांनी "सारे जहाँसे अच्छा हिंदोस्ताँ हमारा' असे अभिमानी उत्तर दिले होते.पटियाला येथे जन्मलेले राकेश भारतीय वायू दलात वैमानिक होते.नंतरच्या काळात त्यांचा अशोक चक्र देऊन सन्मान केल्या गेला.सौजन्य : इंटरनेट••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही..आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा कोण आहेत ?२) स्वच्छ सर्वेक्षण २०२३ मध्ये देशातील सर्वात स्वच्छ राज्य कोणते ?३) पंतप्रधान विश्वकर्मा योजना लागू करणारा देशातील पहिला केंद्रशासित प्रदेश कोणता ?४) हवेला वजन असते हे कोणी सिद्ध केले ?५) उच्च रक्तदाबाच्या स्थितीला काय म्हणतात ? *उत्तरे :-* १) उषा तांबे २) महाराष्ट्र ३) जम्मू काश्मीर ४) गॅलिलिओ ५) हायपरटेन्शन ( Hypertension )*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 कु. मित दर्शन भोईर, रायगड👤 माधव सोनटक्के, सहशिक्षक, बिलोली👤 व्यंकटेश भांगे, सहशिक्षक, धर्माबाद👤 विजयकुमार चिकलोड👤 बालाजी देशमाने*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••देहेबुद्धिचा निश्चयो दृढ जाला।देहातीत ते हीत सांडीत गेला॥देहेबुद्धि ते आत्मबुद्धि करावी।सदा संगती सज्जनाची धरावी॥१६३॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दु:ख हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. दिखावूपणाचे दु:ख दाखवून डोळ्यातील अश्रू सांडवून वणवा पेटवणे खूप सोपे असते. पण, आतमधील दु:ख मात्र ओळखणे फार कठीण असते. जे खरे दु:खी असतात व त्या परिस्थितीतून जातात ते कधीच दुसऱ्याला दु:ख देत नाही. तर समजून घेतात म्हणून खरे दु:ख कसे असते हे ओळखल्या शिवाय कोणालाही बोल लावू नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *आरसा* एका गुरूंच्या घरी एक शिष्य मनोभावे गुरुंची सेवा करून शिक्षण घेत होता. त्याच्या या सेवेमुळे गुरु त्याच्यावर प्रसन्न होते. शिक्षण् पूर्ण झाल्यावर विद्यार्थी घरी जाण्यासाठी निघाला तेव्हा गुरुंकडे त्याने जाण्याची आज्ञा मागितली तेव्हा गुरुंनी त्याला आशीर्वाद म्हणून एक आरसा भेट दिला व सांगितले की, हा दिव्य आरसा (दर्पण) असून यात मानवी मनात चालणारे विचार प्रगट होऊन दिसतात. विद्यार्थी मोठा आनंदीत झाला. हा आरसा खरेच कार्य करतो की नाही याची शहानिशा करण्यासाठी त्याने लगेच आपल्या गुरुंसमोर हा आरसा धरला व गुरुंच्या मनात कोणते भाव आहेत, दुर्गुण आहेत हे पाहू लागला आणि गुरुंच्या समोर आरसा धरताच त्याच्या चेह-यावरचा रंग पार उडाला कारण तो आरसा गुरुंच्या अंतकरणात मोह, अहंकार, क्रोध आदि विकार दाखवित होता. त्याला याचे फारच दु:ख झाले की आपण ज्या गुरुची मनोभावे पूजा केली, ज्यांना पूर्ण ईश्र्वराचा दर्जा दिला त्यांच्या मनातही विकार आहेत, ते सुद्धा मानवी विकारापासून अजून सुटलेले नाहीत याचे त्याला वैषम्य वाटले. तो गुरुंना काहीच न बोलता तो आरसा घेवून गुरुकुलातून निघाला.रस्त्यात भेटणा-या प्रत्येकाच्या मनातील भाव पाहणे हे त्याचे कामच झाले होते. गावी परत जाताच त्याने आपल्या प्रत्येक परिचिताबरोबर हा प्रयोग करून पाहिला. त्याला प्रत्येकाच्या मनात कोणता ना कोणता दुर्गुण दिसून आला. शेवट त्याने आपल्या जन्मदात्या आई वडीलांच्या समोरही हा आरसा ठेवला. ते दोघेही पण त्यातून सुटले नाहीत. त्यांच्या हृदयात पण त्याला काही ना काही दुर्गुण दिसले. शेवटी या गोष्टीचा त्याला मनोमन राग आला व तो गुरुकुलातील गुरुंकडे धावला. गुरुंपाशी जाऊन तो म्हणाला,’’ गुरुदेव, मी आपण दिलेल्या या आरशातून प्रत्येकाच्या मनात, हृदयात, अंत:करणात डोकावून पाहिले आणि मला असे जाणवले की प्रत्येकाच्याच मनात काही ना काही विकार आहेच, काही ना काही दोष आहे. एखाद्याच्या मनात कमी तर कुणाच्या मनात जास्त असे विकार, दोष भरून राहिले आहेत. हे पाहून मी फार दु:खी झालो आहे, कृपया मला मार्गदर्शन करा.’’ गुरुंनी काहीच न बोलता तो आरसा फक्त त्याच्याकडे केला आणि काय आश्र्चर्य त्याला त्याच्या मनाच्या प्रत्येक कोप-यात राग, द्वेष, अहंकार, क्रोध, माया आदि दुर्गुण भरून राहिलेले दिसले. गुरुजी म्हणाले,’’ वत्सा, हा आरसा मी तुला तुझे दुर्गुण पाहून ते कमी करण्यासाठी दिला होता पण तू दुस-यांचे दुर्गुण पाहत बसलास आणि नको तितका वेळ खर्च केलास, अरे याच वेळेत जर तू स्वत:चे अवलोकन केले असते तर तुला तुझ्यातील दुर्गुण सुधारता आले असते. याच काळात तु एक असामान्य व्यक्ती झाला असता.मानवाची ही कमतरता आहे, कमजोरी आहे की तो दुस-यातील दुर्गुण पाहत बसतो आणि स्वत:ला सुधारण्याचा प्रयत्नही करत नाही. हेच या आरशातून मला तुला शिकवायचे होते. जे तुला शिकता आले नाही.’’*तात्पर्य : आपण नेहमीच दुस-या व्यक्तीचे दुर्गुण बघतो, त्यावर टीका करतो पण आपल्यातील दुर्गुणांवर आपले कधीच लक्ष जात नाही. कधीतरी जर आपण आत्मनिरीक्षण केले तर आपल्यालाही आपले दुर्गुण सापडतीलच.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment