✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 15 जानेवारी 2024💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2018/01/blog-post_12.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_भारतीय लष्कर दिन_**_ या वर्षातील १५वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००१:सर्वांना मोफत असलेला ज्ञानकोश ’विकीपिडिया’ हा इंटरनेटवर प्रथमच उपलब्ध झाला.**१९९९:गायिका ज्योत्स्ना भोळे यांना राज्य सरकारच्या वतीने गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात आला.**१९९६:भारतातील रेल्वेयुगाच्या प्रारंभापासून ब्रिटिश परंपरा व संस्कृतीचा डौल मिरवणाऱ्या बोरीबंदर (व्हिक्टोरिया टर्मिनस) या स्थानकाचे नाव बदलुन ते छत्रपती शिवाजी टर्मिनस (CST) असे करण्यात आले.**१९७३:जनरल गोपाळ गुरुनाथ बेवूर यांनी भारताचे ९ वे लष्करप्रमुख म्हणून सूत्रे हाती घेतली. हे लष्करप्रमुख होणारे पहिले महाराष्ट्रीयन आहेत.**१९७०:मुअम्मर गडाफी लीबीयाचे सर्वेसर्वा झाले.**१९४९:जनरल करिअप्पा यांनी ब्रिटिशांकडुन भारतीय सेनेची सूत्रे हाती घेतली.**१८८९:द पेंबरटन मेडिसिन कंपनी या कंपनीची अटलांटा, जॉर्जिया, यू. एस. ए. येथे स्थापना झाली. ही कंपनी सध्या द कोका कोला कंपनी म्हणून प्रसिद्ध आहे.**१८६१:एलिशा जी. ओटिस या संशोधकाला सुरक्षित उद्वाहकाचे (Lift) जगातील पहिले पेटंट मिळाले.**१७६१:पानिपतचे तिसरे युद्ध संपले.**१५५९:राणी एलिझाबेथ (पहिली) हिचा इंग्लंडची राणी म्हणून वेस्टमिन्स्टर अॅबे येथे राज्याभिषेक झाला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८२:नील नितीन मुकेश चंद माथूर-- भारतीय अभिनेता,निर्माता आणि लेखक**१९७२:सुरेखा अशोक बो-हाडे-- कवयित्री, ललित लेखिका* *१९७२:गजानन कमल जानराव सोनोने -- कवी,लेखक* *१९६५:श्रीकांत परशुराम नाकाडे-- लेखक**१९५७:वंदना पंडित-- मराठी अभिनेत्री* *१९५६:जीवन बळवंत आनंदगावकर-- सुप्रसिद्ध कवी,लेखक तथा निवृत्त न्यायाधीश**१९५२:संजीव गोविंद लाभे-- लेखक**१९४३:जयराम पोतदार -- हार्मोनियम आणि आॅर्गन वादक व लेखक**१९३९:निलकांत ढोले--ज्येष्ठ गझलकार,कवी व लेखक (मृत्यू:१७ सप्टेंबर २०२२)**१९३१:वासुदेव बेंबळकर -- लेखक* *१९३१:शरच्चंद्र वासुदेव चिरमुले-- कथाकार (मृत्यू:२७ मार्च १९९२ )**१९२९:मार्टिन ल्युथर किंग (ज्युनिअर) – कृष्णवर्णीयांचे गांधी म्हणून ओळखले जाणारे अमेरिकेतील मानवी हक्क कार्यकर्ते आणि नोबेल पारितोषिक विजेते (मृत्यू:४ एप्रिल १९६८)**१९२८:राज कमल-- प्रसिद्ध भारतीय संगीतकार(मृत्यू :१ सप्टेंबर २००५)**१९२६:कुस्तीगीर खाशाबा दादासाहेब जाधव – १९५२ च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमधे वैयक्तिक पदक मिळवणारे पहिले भारतीय, शिवछत्रपती पुरस्कार [मरणोत्तर] (मृत्यू:१४ ऑगस्ट १९८४)**१९२१:बाबासाहेब भोसले – महाराष्ट्राचे ९ वे मुख्यमंत्री [कार्यकाल:२१ जानेवारी १९८२ ते १ फेब्रुवारी १९८३] (मृत्यू:६ आक्टोबर २००७)**१९२०:डॉ.आर.सी.हिरेमठ – कन्नड साहित्यिक,कर्नाटक विद्यापीठाचे कुलगुरू (मृत्यू:३ नोव्हेंबर १९९८)**१९१२:गजानन काशिनाथ रायकर -- लेखक, संपादक (मृत्यू:१६ मे २००२)**१९०५: यशवंत कृष्ण खाडिलकर-- कादंबरीकार,संपादक (मृत्यू:११ मार्च १९७९)* *१७७९:रॉबर्ट ग्रँट – मुंबई इलाख्याचे राज्यपाल,मुंबईतील ग्रँट मेडिकल कॉलेजचे एक संस्थापक,मुंबईतील ग्रँट रोड हा त्यांच्याच नावाने ओळखला जातो. (मृत्यू:१८३८)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१४:नामदेव लक्ष्मण ढसाळ – जेष्ठ साहित्यिक (जन्म:१५ फेब्रुवारी १९४९)**२०१३:डॉ.शरदचंद्र गोखले – समाजसेवक (जन्म:२९ सप्टेंबर १९२५)**२०१०:मंदाकिनी कमलाकर गोगटे-- मराठी लेखिका(जन्म:१६ मे१९३६)**२००२:विठाबाई भाऊ नारायणगावकर – राष्ट्रपतिपदक विजेत्या तमाशा कलावंत (जन्म: १९३५)**१९९८:गुलजारीलाल नंदा – भारताचे दुसरे पंतप्रधान,स्वातंत्र्यसैनिक व गांधीवादी कार्यकर्ते (जन्म:४ जुलै १८९८)**१९९४:हरिलाल उपाध्याय – गुजराथी लेखक, कवी व ज्योतिषी (जन्म:२२ जानेवारी १९१६)**१९७१:दीनानाथ दलाल – अत्यंत लोकप्रिय व प्रतिभावान चित्रकार (जन्म:३० मे १९१६)**१९१९:लक्ष्मण श्रीधर वाकणकर--लिपिकार, संशोधक(जन्म:१७ सप्टेंबर १९१२)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*मकर संक्रांती निमित्त लेख**बंधूभावाचा संदेश देणारा सण*मकरसंक्रांत हा नवीन वर्षातील पहिला सण आहे. ............. पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *आशियातील सर्वात मोठी महायात्रा; सोलापूरच्या ग्रामदैवत सिद्धेश्वर यात्रेला सुरुवात, लाखो भाविकांची उपस्थिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *काँग्रेस नेते राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेला मणिपूरमधून सुरूवात, 67 दिवसांत 110 जिल्ह्यांमध्ये प्रवास, महाराष्ट्रमध्ये होणार समारोप*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *काँग्रेसला रामराम करत मिलिंद देवरा शिवसेनेच्या शिंदे गटात, मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश, 10 माजी नगरसेवक आणि 25 पदाधिकाऱ्यांचाही प्रवेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *ग्रामपंचायतीला निधी न मिळाल्याने बच्चू कडूंची महायुतीच्या बैठकीला अनुपस्थिती, सध्या आमची भूमिका तटस्थ, वाट पाहू नाही तर गेम करू, बच्चू कडूंचं भाजपला पुन्हा आव्हान*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *अवयवदानात महाराष्ट्रातील पुणे जिल्हा ठरला अव्वल; वर्षभरात सर्वाधिक नोंदी तर दुसरा नंबर मुंबईचा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *महाराष्ट्रात येत्या १९ जानेवारीपासून पारा घसरणार, उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळं महाराष्ट्रातील तापमान कमी होऊन थंडी वाढण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *दुसऱ्या T20 सामन्यात भारताने अफगाणिस्तानला 6 विकेटने हरवून 2-0 ने मालिका जिंकली*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*संक्रांतीच्या दिवशी तीळ का खातात ?*नव्या वर्षातील पहिला सण म्हणजे मकरसंक्रांती. या दिवशी तीळगूळाचे सेवन करतात. पण तीळगूळचं का? त्यामागे अनेक कारणे आणि फायदे पण आहेत त्याबद्दल थोडं पाहूया ...👉 तिळाच्या सेवनाने शरीराला मोठ्या प्रमाणात कॅल्शियम मिळते. तीळ खाल्ल्याने केस मजबूत होतात. 👉 जिम किंवा व्यायामशाळेत नियमित जाणाऱ्या मुलांनी तिळाचे नियमित सेवन करावे याने शरीरातील मांसधातू उत्तम पद्धतीने वाढतो.👉 थंडीमध्ये बाहेरील तापमान थंड असल्याने शरीराचे तापमान उष्ण राहण्यासाठी तिळाचे सेवन केले जाते.👉 जखम होऊन ती भरून येत नसेल तर तिळाची लगदी तिथे लावून ठेवावी. जखम फार चांगल्या पद्धतीने भरून येते.👉 थंडीमध्ये दररोज थोड्या प्रमाणात तिळाचे सेवन केल्यास मानसिक स्वास्थ्य चांगले राहते. 👉 तीळासोबत बदाम आणि खडीसाखर खाल्ल्यास पचनशक्ती वाढते. 👉 तिळात मोनोअनसॅच्युरेटेड मेदाम्लं अधिक प्रमाणात असतात. त्यामुळे रक्तातील कोलेस्टेरॉल नियंत्रित राहण्यास मदत होते.👉 बद्धकोष्ठ, मूळव्याध आदी विकार तिळाच्या सेवनाने कमी होतात. मुळव्याध होऊन सारखे रक्त पडत असेल तर काळे तीळ कुटून त्याची चटणी लोण्यासोबत खावी.👉 दातांच्या हिरड्याचे आयुष्य वाढून, दात मजबूत व्हावेत यासाठी काळे तीळ चावून खावेत. दात हालत असल्यास किंवा हिरड्यातून रक्त वा पू येत असल्यास तीळ खावेत.👉 तीळ स्निग्ध असल्यामुळे कोरडी त्वचा असणा-यांनी याचं तेल अंगाला चोळावे. त्यामुळे त्वचा मऊ होते. म्हणूनच थंडीच्या दिवसांत किंवा वर्षभरात तिळाचा आहारात समावेश करावा.*संकलन :- श्याम ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दुसऱ्याबद्दल तेवढेच बोला जेवढे स्वतःबद्दल ऐकू शकाल.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) जगात सर्वात *नक्षीदार घरटे* कोणत्या पक्ष्याचे असते ?२) स्वच्छ सर्वेक्षण २०२३ मध्ये एक लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरात 'देशातले सर्वात स्वच्छ शहर' कोणते ?३) कोणत्या प्राण्यांच्या पिलांना जन्मतःच शिंग असतात ?४) भारतातील सर्वात मोठा सागरी सेतू कोणता ?५) लाल समुद्राचा लाल रंग कशाच्या अस्तित्वामुळे आहे ? *उत्तरे :-* १) सुगरण २) इंदोर ( सलग सातव्यांदा ) ३) जिराफ ४) अटलबिहारी वाजपेयी शिवडी - न्हावासेवा अटल सेतू ५) एकपेशीय वनस्पती*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 चिं. नीरज रामानंद रामदिनवार, नांदेड👤 साईनाथ अन्नमवार, नांदेड👤 दत्ता बेलूरवाड👤 एकनाथ पावडे👤 सागर घडमोडे👤 व्ही. एम. पाटील👤 सलीम शेख, बिलोली👤 कोमल ए. रोटे, सोलापूर👤 सतिष बोरखडे, यवतमाळ👤 सुरज लता सोमनाथ, श्रीरामपूर👤 शिवशंकर वाघमारे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••देहादीक प्रपंच हा चिंतियेला।परी अंतरी लोभ निश्चित ठेला॥हरीचिंतने मुक्तिकांता करावी।सदा संगती सज्जनांची धरावी॥१६५॥सरळ अर्थ :- देहाविषयीच्या चिंतेने प्रपंच केला म्हणजे मनात लोभ हा उपजत रहातोच. तो विसरून हरीचे चिंतन करावे. लोभी वृत्तीऐवजी अंतिम मुक्ती हीच आपली प्रियव्यक्ती असल्यासारखी तिच्या भेटीची आस ठेवावी. नेहमी सज्जनांची संगत धरावी.।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एखाद्याच्या जीवनात जेव्हा वाईट परिस्थिती येते त्याप्रसंगी आपण स्वतःचा समाधान करण्यासाठी त्यावर खळखळून हसत असतो एवढेच नाही तर त्या वाईट परिस्थितीची पेरणी करण्यासाठी आपण पूर्ण वेळ देत असतो. पण,सर्वच दिवस त्या प्रकारचे नसतात. ज्यावेळी आपण दुसऱ्यांवर हसतो त्याच वेळी नियती हसणाऱ्यांच्या बाजूने नाही तर ज्याचा खेळ मांडला असते त्याच्या बाजूने उभी असते, त्यात मात्र एक गोष्ट अशी की,ती कोणालाही दिसत नाही. शेवटी सत्याचाच विजय होतो म्हणून कोणावर आलेल्या परिस्थितीवर हसू नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *चतूर न्यायमुर्ती*एका गृहस्थाने आपली विहिर शेजा-याला विकली. नवा मालक या विहिरीचे पाणी काढायला गेला असता, विहिरीचा पहिला मालक त्याला पाणी भरु देईना.आश्चर्यचकीत झालेल्या नव्या मालकानं त्याला विचारलं, 'अरे ! मी पूरेपूर पैसे मोजून तुझी जमीन विकत घेतली असताना, तू मला तिचे पाणी का भरु देत नाहीस?'जुना मालक म्हणाला, 'मी तुला केवळ विहीर विकली आहे. तिच्यातलं पाणी काही विकलेलं नाही. तेव्हा त्या पाण्यावर तुझा बिलकूल हक्क नाही.' या अजब तर्कटाने संतापलेला त्या विहिरीचा नवा मालक न्यायालयात गेला. न्यायमुर्तींनी त्या विहीरीच्या नव्या व जुन्या दोन्ही मालकांना बोलावून घेतलं आणि त्या जुन्या मालकाला विचारलं, 'तू तुझी विहीर या तुझ्या शेजा-याला विकलीस हे खरे आहे काय?'जुना मालक - होय. पण विहिरीचं जे विक्रीखत झाले आहे त्यात मी माझी फ़क्त विहिरच काय ती याला विकली असल्याचा उल्लेख केला असल्याने, त्या विहिरीतील पाण्यावर या माझ्या शेजा-याचा बिलकूल हक्क नाही.न्यायमुर्ती - तुझं म्हणणं अगदी शंभर टक्के बरोबर आहे. जुना मालक - (आनंदून) न्यायमुर्ती ! आपल्यालासुध्दा माझं म्हणण रास्त वाटत आहे ना ? वाटणारच. पण असं असूनही हा माझा शेजारी, केवळ ती विहिर विकत घेतली, म्हणून तिच्यातील पाण्यावर हक्क सांगतो आहे !न्यायमुर्ती - ते त्याचं म्हणणं चूक आहे, पण त्याचबरोबर, तू तुझी विहीर विकली असूनही पाणी ठेवण्यासाठी तिचा वापर करतोस. तेव्हा आता त्या विहिरीचा असा वापर करीत राहीपर्यंत दर दिवशी पन्नास रुपये भाडे त्या विहिरीचा आता मालक झालेल्या तुझ्या शेजा-याला दिले पाहिजेस.'न्यायमुर्ती असे म्हणताच, तो मनुष्य़ त्यांना शरण गेला व केल्या अपराधाबद्दल क्षमा मागून, त्याने ती विहिर शेजा-याला पाण्यासह विकत दिल्याचे मान्य केले.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment