✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 31 जानेवारी 2024💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2024/01/ashok-saraf.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील ३१वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९५०:राष्ट्रपती म्हणून डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी संसदेपुढे पहिले भाषण केले.यापूर्वी ते घटना समितीचे अध्यक्ष होते.**१९५०:अमेरिकन राष्ट्राध्यक्ष हॅरी एस. ट्रूमन यांनी हायड्रोजन बॉम्ब बनवण्याच्या योजनेस मान्यता दिली.**१९४९:बडोदा व कोल्हापूर ही संस्थाने (तत्कालीन) मुंबई राज्यात विलीन झाली.**१९४५:युद्धातुन पळ काढल्याबद्दल एडी स्लोव्हिक या सैनिकाला अमेरिकेने मृत्यूदंड दिला.* *१९२९:सोविएत रशियाने लिऑन ट्रॉटस्की याला हद्दपार केले.**१९२०:डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ’मूकनायक’ या पाक्षिकाची सुरूवात**१९११:स्वातंत्र्यवीर सावरकर यांना दुसर्या जन्मठेपेची शिक्षा झाली.तत्कालीन ब्रिटिश साम्राज्यात दोनदा जन्मठेपेची शिक्षा झालेले ते एकमेव आहेत.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८३:सतीश जनाराव अहिरे-- कवी, गझलकार* *१९७५:प्रीती झिंटा – चित्रपट अभिनेत्री व उद्योजिका**१९६५:प्रा.डॉ.संजय निळकंठ पाटील-- लेखक**१९५८:प्रा.डॉ.शंकर चव्हाण -- लेखक, संपादक* *१९५२:डॉ.रमेश नारायण वरखेडे -- जेष्ठ समीक्षक,संशोधक संपादक* *१९५२:डॉ.सतीश शास्त्री -- लेखक (मृत्यू:२६ जानेवारी २०२३)**१९५०:लीना मेहेंदळे--भारतीय प्रशासन सेवेतील पूर्व सनदी अधिकारी आणि प्रसिद्ध लेखिका**१९४८:राजा सखाराम जाधव-- समीक्षक, दलित साहित्याचे अभ्यासक(मृत्यू:१९ डिसेंबर २००८)**१९३१:गंगाधर महांबरे – गीतकार कवी व लेखक (मृत्यू:२३ डिसेंबर २००८)**१९२१:प्रा.डॉ.गंगाधर विठ्ठल कुलकर्णी-- कवी,लेखक**१९१५:हरिश्चंद्र त्र्यंबक देसाई-- चरित्र लेखक* *१८९६:दत्तात्रय रामचंद्र बेन्द्रे तथा ’अंबिकातनयदत्त’ – कन्नड कवी,पद्मश्री (१९६८),त्यांच्या ’नाकु तंती’ या काव्यसंग्रहास १९७३ मधे ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. (मृत्यू:२१ आक्टोबर १९८१)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२१:इलाही जमादार-- सुप्रसिद्ध गझलकार आणि महाकवी(जन्म:१ मार्च १९४६)**२००४:व्ही.जी.जोग – व्हायोलिनवादक (जन्म:२२ फेब्रुवारी १९२२)**२००४:सुरैय्या जमाल शेख ऊर्फ ’सुरैय्या – गायिका व अभिनेत्री (जन्म:१५ जून १९२९)**२०००:वसंत कानेटकर – नाटककार (जन्म:२० मार्च १९२०)**२०००:कृष्ण नारायण तथा के.एन.सिंग – हिन्दी चित्रपटांतील गाजलेले खलनायक (जन्म:१ सप्टेंबर १९०८)**१९९५:सुरेश शंकर नाडकर्णी – बँकिंग तज्ञ, ’रोखे बाजार नियामक मंडळाचे’ (SEBI) चे अध्यक्ष,पद्मभूषण* *१९९४:वसंत जोगळेकर – मराठी व हिन्दी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक**१९९०:प्रा.श्रीनिवास रघुनाथ कावळे-- मराठी लेखक (जन्म:१३ सप्टेंबर,१९३०)**१९८६:विश्वनथ मोरे – संगीतकार* *१९७२:महेन्द्र – नेपाळचे राजे* *१९६९:अवतार मेहेरबाबा – आध्यात्मिक, मौनव्रती संत (जन्म:२५ फेब्रुवारी १८९४)**१९५४:ई.एच.आर्मस्ट्राँग – एफ.एम. रेडिओचे संशोधक (जन्म:१८ डिसेंबर १८९०)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*चेहऱ्यावरील हावभावाने विनोद निर्माण करणारा अभिनेता - अशोक सराफ*अशोक सराफ हे मराठी चित्रपटसृष्टीतील गुणी आणि दमदार अभिनेता म्हणून अवघ्या हिंदुस्थानाला परिचीत आहे. मराठी चित्रपटसृष्टी बरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांनी आपले वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे. अशोक सराफ यांना चार फिल्मफेअर मराठी पुरस्कारांसह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. अशोक सराफ यांना 2023 महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांनी त्यांचे अभिनंदन केले............... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मराठी व हिंदी चित्रपटातील जेष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना 2023 महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राज्यसभेसाठी भाजपकडून चाचपणी सुरू, विनोद तावडे, पंकजा मुंडे आणि विजया रहाटकर यांच्या नावाची चर्चा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *अमेरिकेत मराठी शिक्षणाऱ्या मुलांना बालभारती पुरवणार पाठ्यपुस्तकं, शिक्षण विभागाचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *यंदाचा 'प्राईड ऑफ बीएमसीसी' पुरस्कार:प्रसिद्ध गायिका सावनी शेंडे आणि प्रसिध्द उद्योगपती डॉ. विक्रम मेहता यांना जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *प्रा. जी. रघुराम, डॉ. राजेंद्र सिंह, कौशिकी चक्रवर्ती व डॉ. अशोक गाडगीळ यांना भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *एप्रिलनंतर वीज दरवाढीचा शॉक ; घरगुती वीजदर वाढण्याची शक्यता, छोट्या घरगुती ग्राहकांवर मोठा भार*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारतीय नौदलाच्या INS सुमित्राचा समुद्रात भीमपराक्रम; 19 पाकिस्तानी नागरिकांसह, 17 इराणी नागरिकांची समुद्री चाचांच्या तावडीतून सुटका*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *आम्लपित्त*आम्लता ही नेहमी आढळणारी तक्रार आहे. ब-याच माणसांना कधीना कधी याचा अनुभव येतोच. पण काही जणांना आम्लतेचा नेहमी त्रास होतो. अशांना वैद्यकीय सल्ल्याची गरज असते. आम्लता किंवा आम्लपित्त म्हणजे जठरात प्रमाणापेक्षा जास्त आम्ल (आंबट द्रव) तयार होणे. या जादा आम्लामुळे पोटात जळजळ, तोंडात आंबट पाणी येणे, छातीत जळजळ अशा तक्रारी निर्माण होतात. कधीकधी जठरातले पदार्थ उलटीवाटे बाहेर पडतात.खालील कारणांनी आम्लता येऊ शकते. - • नेहमी जास्त तिखट, मसालेदार, तेलकट पदार्थ खाणे. • मानसिक ताण, काळजी, सदैव घाई-गडबड. • अनियमित जेवणाची सवय आणि जागरण • धूम्रपान, तंबाखूसेवन, दारूसेवन, इत्यादी. • काही औषधांमुळे आम्लता होते. उदा. ऍस्पिरीन, सांधेदुखीची औषधे. • हेलिकोबॅक्टर नावाच्या एका जिवाणूंशी आम्लता आणि जठरव्रणाचा संबंध आढळला आहे. जठरव्रणापैकी साठसत्तर टक्के जठरव्रण हे या जिवाणूंमुळे होतात. (यासाठी डॉक्सी किंवा ऍमॉक्सिसिलीन हे औषध पाच दिवस देऊन पहावे.) • आम्लपित्तामुळे पुढे अल्सर (जठरव्रण) निर्माण होऊ शकतो. अल्सर असेल तर पोटात एका ठरावीक जागी दुखत राहते. जेवणामुळे हे दुखणे थांबते तरी किंवा वाढते तरी. आम्लपित्तावर उपचार करताना तो अल्सर नाही याच्याबद्दल खात्री करून घ्यावी.उपचार - • जेवणात नियमितता ठेवावी. • साधा आहार घ्यावा. • तेलकट, तिखट पदार्थ टाळावेत. • मानसिक ताण, काळजी, सदैव चिंता यांच्यावर नियंत्रण ठेवावे. (व्यायाम, विश्रांती, करमणूक वगैरेमुळे उपयोग होईल.) • आम्लविरोधी (ऍंटासिड) गोळया घेतल्यावर जळजळ कमी होते. • दुधामुळे काही जणांची आम्लता कमी होते तर काही जणांची वाढते.( इंटरनेटवर मिळालेली माहिती )••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सर्वोत्तम प्रयत्न केले की, यशाचा मार्ग मोकळा होतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) २०२४ च्या प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्राचा चित्ररथाची संकल्पना काय होती ?२) आयसीसी - २०२३ चा सर्वोत्कृष्ठ कसोटी क्रिकेटर कोण ठरला आहे ?३) आशिया खंडातील सर्वात मोठा देश कोणता ?४) घोड्यांना ठेवतात त्या जागेला काय म्हणतात ?५) बेळगावचा वाद हा कोणत्या दोन राज्यात आहे ? *उत्तरे :-* १) छत्रपती शिवाजी महाराज - लोकशाहीचे जनक २) उस्मान ख्वाजा, ऑस्ट्रेलिया ३) रशिया ४) तबेला किंवा पागा ५) महाराष्ट्र व कर्नाटक*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 विनायक हिरवे, सहशिक्षक, कोल्हापूर👤 राजेश्वर रामपुरे, धर्माबाद👤 जयेश पुलकंठवार, धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जया मानला देव तो पुजिताहे। परी देव शोधुनि कोणी न पाहे॥ जगी पाहता देव कोट्यानुकोटी। जया मानली भक्ति जे तेचि मोठी॥१७८॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• या जगात कोणताही जीव जन्माला आला की,त्याचा जीवनप्रवास ख-या अर्थाने सुरू होतो.त्याला त्याचे जीवन कसे जगायचे यासाठी परमेश्वराने त्यांच्यासोबत मन आणि बुद्धी ह्या दोन महत्त्वाच्या गोष्टी त्याला म्हणजे विशेष करुन मानवाला आयुष्याच्या शेवटपर्यंत पुरेल अशी भेट म्हणून बहाल केली आहे. ह्याचा आधार घेऊनच जीवन कसे जगायचे याचे तंत्र तो शिकतो.त्यानंतर तो आपल्या मनाचा आणि बुध्दीचा चांगला सदुपयोग केला तर नक्कीच जीवनाचा प्रवास सुखावह करतो आणि जर का दुरुपयोग करायला लागला तर जीवनप्रवास दु:खमय व्हायला लागतो.ह्या दोन गोष्टी मन आणि बुद्धी यावरच अवलंबून आहेत.मग मानवरुपी जीवाने आपले जीवन कसे जगायचे आणि आपले जीवन जगण्यासोबत इतर जीवांना आपण न दुखवता कसे जगवायचे हे जरी कौशल्य मनाच्या आणि बुध्दीच्या सृजनशील कौशल्याने हाताळायला आले तरी परमेश्वराने दिलेल्या जन्माचे नक्कीच सार्थक झाल्याचे समाधान वाटेल.हा जन्म परत येणार नाही हे तर संत्र्याच्या आहेच.यानंतर आपले शरीररुपी अस्तित्व संपणार आहे पण आपण आपल्या जीवनात केलेले चांगले कार्य येणा-या जीवांच्या जीवनासाठी प्रेरणा ठेवून जाणार आहे अर्थात तुम्ही तुमच्या कार्याने अमर राहणार आहेत हे लक्षात असू द्यावे.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *समयसुचकता*एकदा अरण्याचा राजा सिंह याने आपल्या प्रजाजनांना दरबारात हजर राहण्याचा हुकूम सोडला. त्याप्रमाणे बहुतेक प्राणी सिंहाच्या दरबारी आले. अस्वलाला सिंहाच्या स्वयंपाक घरातून येणारा वास सहन न झाल्याने त्याने आपले नाक दाबून धरले. हा त्याचा उद्धटपणा पाहून सिंह रागावला व त्याने आपल्या पंजाच्या एका तडाख्यात अस्वलाला मारले. हा भयंकर प्रकार पाहून माकड भितीने थरथर कापू लागले. मग काहीतरी बोलायचे म्हणून ते सिंहास म्हणाले, 'राजेसरकारांच्या स्वयंपाक घरातून येणारा सुवास निरनिराळ्या उंची मसाल्याचा आहे. तो त्या मूर्ख अस्वलाला सहन झाला नाही. हे त्याचं दुर्दैव होय. राजे सरकारांचे पंजे तर फारच सुंदर आहेत, तसे इतर कोणाचेही नसतील.' माकडाचे हे बोलणे ऐकून सिंहाचे समाधान तर झाले नाहीच पण तो इतका चिडला की, एका क्षणात त्याने त्या माकडाच्या चिंधड्या उडविल्या. नंतर तो कोल्ह्याकडे वळून त्याला म्हणाला, 'कसे काय कोल्हेदादा ? माझ्या स्वयंपाकघरातून येणारा वास कशाचा असावा असं तुला वाटतं ?' त्यावर तो कोल्हा धूर्तपणे म्हणाला, 'महाराजाधिराज, नुसत्या वासावरून तो वास कशाचा आहे हे सांगता येण्याइतकं माझं नाक आधीच तीक्ष्ण नाही त्यातून मला आज पडसं झालेलं असल्यामुळे आपल्या घरातून येणार्या वासासंबंधाने अभिप्राय देण्याचं धाडस मी करत नाही.'तात्पर्य :- प्रसंगावधान व समयसूचकता या गुणांच्या बळावर माणुस वाटेल तसल्या संकटातून मुक्त होऊ शकतो.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment