✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 06 जानेवारी 2024💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2019/12/blog-post_6.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_पत्रकार दिन_**_ या वर्षातील सहावा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९४४:दुसरे महायुद्ध – रशियन सैन्य पोलंडमध्ये शिरले.**१९२९:गोरगरिब व रुग्णांची सेवा करण्यासाठी मदर तेरेसा यांचे कोलकाता येथे आगमन**१९२४:राजकारणात भाग न घेणे व रत्नागिरी जिल्ह्यातच राहणे या अटींवर स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जन्मठेपेतुन सशर्त मुक्तता**१९१२:न्यू मेक्सिको हे अमेरिकेचे ४७ वे राज्य बनले.**१९०७:मारिया माँटेसरी यांनी पहिली माँटेसरी शाळा सुरूकेली.त्यांच्या शाळांमुळे पूर्वप्राथमिक शिक्षणात आमूलाग्र बदल झाला.**१८३२:पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी इंग्रजी व मराठीतील पहिले साप्ताहिक वृत्तपत्र ’दर्पण’ सुरू केले**१६७३:कोंडाजी फर्जंद यांनी अवघ्या ६० मावळ्यांनिशी पन्हाळा जिंकुन महाराजांचे १३ वर्षे अपुर्ण असलेले स्वप्न पूर्ण केले.**१६६५:शिवाजी महाराजांनी सूर्यग्रहणाच्या निमित्ताने राजमाता जिजाऊ व सोनोपंत विश्वनाथ डबीर यांची सुवर्णतुला केली. श्री क्षेत्र महाबळेश्वर येथील देवळासमोर ही सुवर्णतुला झाली.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८१:मुरहारी कराड -- कवी,लेखक संपादक* *१९७३:किरण दत्तात्रय दशमुखे-- लेखक, संपादक* *१९७१:श्रीकांत अनंत उमरीकर-- कवी,संपादक* *१९६६:ए.आर.रहमान – संगीतकार**१९६४:विनोद जनार्दन शिंदे-- कवी,लेखक**१९६३:प्रशांत प्रकाशचंद्र पनवेलकर -- प्रसिद्ध कवी**१९५९:कपिल देव निखंज – भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार समालोचक व प्रशिक्षक**१९५५:रोवान अॅटकिन्सन – विनोदी अभिनेते व पटकथालेखक**१९३१:डॉ.आर.डी.देशपांडे – पर्यावरण क्षेत्रातील शा’स्त्रज्ञ,’महाराष्ट्र असोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्स’चे (आघारकर रिसर्च इन्स्टिट्युट) अध्यक्ष**१९२८:विजय धोंडोपंत तेंडुलकर-- प्रसिद्ध मराठी नाटककार,लेखक,पटकथालेखक,तथा राजकीय विश्लेषक(मृत्यू:१९ मे २००८)**१९२७:राम तेलंग-- कवी,लेखक**१९२६:डॉ.पद्मिनी भांडारकर-- लेखिका(मृत्यू:४मार्च २०१३)* *१९२५:रमेश मंत्री – प्रवासवर्णनकार, कथाकार,विनोदी लेखक (मृत्यू:१९ जून १९९८)**१८८३:खलील जिब्रान – लेबनॉनमधे जन्मलेले अमेरिकन कवी, लेखक व कलाकार (मृत्यू:१० एप्रिल १९३१)**१८६८:गणेश दत्तात्रय सहस्रबुद्धे उर्फ 'दासगणू महाराज' – आधुनिक संतकवी, ’भक्तिरसामृत’,’भक्तकथामृत’ आणि ’संतकथामृत’ हे त्यांचे संतचरित्रात्मक ग्रंथ आहेत.(मृत्यू:२५ नोव्हेंबर १९६२)**१८१२:बाळशास्त्री जांभेकर – मराठी पत्रकारितेचे पितामह,१८३२ मधे 'दर्पण' हे वृत्तपत्र काढून त्यांनी वृत्तपत्र व्यवसायाचा पाया घातला.’दिग्दर्शन’हे मराठीतील पहिले मासिकही त्यांनीच १८४० मधे सुरू केले. (मृत्यू:१८ मे १८४६)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१८:तुलसीदास हरिश्चंद्र बेहेरे-- लोकसाहित्याचे अभ्यासक,नाटककार, दिग्दर्शक आणि दशावतार या लोकनाट्याचे अभ्यासक आणि संशोधक.(जन्म:१५ मे १९५२)**२०१०:प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे – लेखक व इंग्रजीचे प्राध्यापक (जन्म:१६ जुलै १९४३)**१९८४:’विद्यानिधी’ सिद्धेश्वरशास्त्री विष्णू चित्राव – महामहोपाध्याय,वैदिक साहित्याचे अभ्यासक व मराठी कोशकार (जन्म:१ फेब्रुवारी १८८४)**१९८१:ए.जे.क्रोनिन – स्कॉटिश लेखक (जन्म:१९ जुलै १८९६)**१९७१:प्रफुल्लचंद्र तथा पी.सी.सरकार – जादूगार (जन्म:२३ फेब्रुवारी १९१३)**१९१९:थिओडोर रुझव्हेल्ट – अमेरिकेचे २६ वे राष्ट्राध्यक्ष,नोबेल पारितोषिक विजेते (जन्म:२७ आक्टोबर १८५८)**१९१८:जी.कँटर – जर्मन गणितज्ञ (जन्म:३ मार्च १८४५)**१८८५:भारतेंदू हरिश्चंद्र – आधुनिक हिन्दी साहित्याचे जनक मानले जाणारे हिन्दी साहित्यिक,१८५० ते १९०० हा काळ हिन्दी साहित्यात’भारतेंदू काळ’ म्हणून ओळखला जातो.(जन्म:९ सप्टेंबर १८५०)**१८८४:ग्रेगोर मेंडेल – जनुकांची (genes) संकल्पना मांडणारा जर्मन जीवशास्त्रज्ञ (जन्म:२० जुलै १८२२)**१८५२:लुई ब्रेल–अंधांना उपयोगी पडणाऱ्या ब्रेल लिपीचे जनक व शिक्षक (जन्म:४ जानेवारी १८०९)**१८४७:त्यागराज – दाक्षिणात्य संगीतकार (जन्म:४ मे १७६७)**१७९६:जिवबा दादा बक्षी – महादजी शिंदे यांचे सेनापती,मुत्सद्दी* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*हिवाळा ऋतूतील खास रानमेवा*खास करून हिवाळा ऋतूमध्ये अनेक फळे खाण्यासाठी उपलब्ध होतात जसे जांभ आणि बोरं. ही दोन्ही फळं खाल्याने सर्दी आणि खोकला होण्याचा धोका असतो म्हणून पालक वर्ग मुलांना हे फळं खान्यापासून मज्जाव करतात. तरी देखील मुलं चोरी चोरी चुपके चुपके खातातच. सायंकाळच्या वेळेला जेंव्हा शिंक येते त्यावेळी आई बरोबर ओळखते आणि बोरं किंवा जांभ खाल्लं का ? म्हणून जोरात बोलते. लहान मुलांना खास करून आवडणारे फळ म्हणजे बोरं. जंगलातील हा रानमेवा................. पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *लोकसभा निवडणुकीआधी PM मोदींचा नाशिक दौरा, तब्बल दीड किलोमीटरपर्यंत करणार रोड शो*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *सरकारी योजनाचे लाभ नाकारता येणार; गिव्ह ईट अप योजना लागू करणार महाराष्ट्र ठरलं पहिलं राज्य*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मराठा अन् ओबीसी समाज आझाद मैदानासाठी आग्रही; पोलिसांकडे परवानगीसाठी पत्र*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *"वेळेचे योग्य नियोजन हाच यशस्वी जीवनाचा मंत्र"; राज्यपाल रमेश बैस यांचे नाशकात वक्तव्य*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 5 सहकारी बँकांना RBI चा दणका, 50 हजार ते 5 लाखांचा ठोठावला दंड*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मुंबई आयआयटीच्या 85 विद्यार्थांना एक कोटींपेक्षा जास्त पॅकेज*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *टी-२० वर्ल्ड कप १ जूनपासून वेस्ट इंडिज आणि अमेरिका या दोन्ही देशांत संयुक्यरित्या खेळवण्यात येणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*कपिलदेव निखंज*कपिल देव हे एक भारतीय क्रिकेट खेळाडू आहेत. यांच्याच नेत्रुत्वात भारताने इंग्लंड मध्ये 1983 मध्ये पहिला क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. क्रिकेट क्षेत्रातील योगदान - कपिल देव हे एक भारतीय क्रिकेट खेळाडू आहेत. यांच्याच नेतृत्वात भारताने इंग्लंड मध्ये आपला पहिला क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. रामलाल निखंज आणि पूर्वाश्रमीच्या राजकुमारी लाजवंती यांच्या सात अपत्यांमधील कपिल हे सहावे अपत्य. रावळपिंडीनजीकच्या एका खेड्यातून फाळणीच्या वेळी रामलालजी चंडीगढला येऊन राहिले होते आणि बांधकाम साहित्य व लाकडे पुरविण्याचा व्यवसाय ते करीत होते. वयाच्या बाराव्या वर्षी कपिल देशप्रेम आझादांचा चेला बनला. नोव्हेंबर १९७५ मध्ये कपिल सर्वप्रथम हरयाणासाठी खेळला आणि सहा बळी मिळवले. त्या हंगामात ३ सामन्यांमधून १२ बळी त्याने मिळवले. १९८२-८३ च्या हंगामात गावसकरला विश्रांती देण्यात आल्याने कपिलवर कर्णधारपदाची जबाबदारी टाकण्यात आली. वेस्ट इंडीज दौर्यापासून तो नियमित कर्णधार बनला आणि त्या दौर्यावर त्याच्या संघाची सर्वात मोठी कामगिरी म्हणजे वेस्ट इंडीजला एका एकदिवसीय सामन्यात हरविणे! गावसकरने या सामन्यात ९० तर कपिलने ७२ धावा केल्या होत्या आणि ४७ षटकांमध्ये २८२ धावा करून भारतीयांनी त्या राखल्या होत्या. १९८३ च्या विश्वचषकातील अजिंक्यपद हा कपिलच्या कारकिर्दीचा कळसाध्याय होता.सौजन्य :- इंटरनेट••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" ज्याच्याजवळ उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही."**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) NHAI तर्फे महाराष्ट्रातील पहिला *'ऑक्झिजन बर्ड पार्क'* कोठे उभारण्यात येत आहे ?२) विश्व मराठी साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात आले आहे ?३) आकाश हे कोणत्या प्रकारचे क्षेपणास्त्र आहे ?४) पोलीस दलात महिलांची नेमणूक करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ?५) बौद्ध धर्माचे साहित्य कोणत्या भाषेमध्ये आहे ? *उत्तरे :-* १) नागपूर २) वाशी, मुंबई ( २७ ते २९ जानेवारी २०२४ ) ३) जमिनीवरून आकाशात मारा करणारे क्षेपणास्त्र ४) महाराष्ट्र ५) पाली*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 अभिषेक अडकटलवार👤 साईनाथ जगदमवार👤 भगवान चव्हाण 👤 रितेश जोंधळे👤 बजरंग माने👤 सुदर्शन कोंपलवार👤 श्रीनिवास गंगुलवार👤 मोहन घोसले👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••म्हणे जाणता तो जनी मूर्ख पाहे।अतर्कासि तर्की असा कोण आहे॥जनीं मीपणे पाहता पाहवेना।तया लक्षितां वेगळे राहवेना॥१५६॥सरळ अर्थ - आपल्याला ते परब्रम्ह तत्व समजले आहे असे जो म्हणतो तो मूर्ख आहे. कारण जे अतर्क्य आहे त्याचा तर्कही कोणी करू शकत नसतो. ‘मी पाहिलं, मी जाणलं’ असा अहंकार बाळगून असणाऱ्याला तर ते दिसणार नाही, कळणार नाही. त्याला पाहणं म्हणजे त्याच्यात सामावून जाणं. एकतत्व होणं. जिथं ‘मी’पणा आहे तिथं ते जमणं केवळ अशक्यच.।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सोन्यासारख्या मौल्यवान धातूंच्या सानिध्यात लोखंडासारखा एखादा तुकडा जरी आला तरी त्या तुकड्याला सोन्याचाच तुकडा समजायला लागतात.कारण सहवास सोन्याचा असतो म्हणून.अशाचपध्दतीने सज्जनांचा सहवासात साधारण माणसे जर आली तर त्यांच्यातील असणारे दुर्गूण सज्जनांच्या सहवासाने काही प्रमाणात कमी होऊन तेही सज्जन होण्यास कारणीभूत ठरतात.म्हणून आपल्यातील काही दुर्गूण असतील तर ते दूर होण्यास सज्जनांची संगतच हवी.जीवनात दुर्जनांच्या संगतीत राहण्यापेक्षा सज्जनांच्या संगतीत राहणे केव्हाही चांगले.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *हुशार गोनू*मिथिला नगरीत राहणार्या गोनूच्या हुशारीमुळे राजाची त्याच्यावर अतिशय मर्जी बसली होती. दरबारातल्या काही जणांना हे सहन होत नव्हते. अशांपैकी एक असलेला असूयानंद शास्त्री हा एकदा राजाच्या कानात कुजबुजला, 'महाराज, तसे पाहता चातुर्यात आम्ही इतर दरबारी मंडळीही काही कमी नाही, पण गोनूप्रमाणे उठल्या-बसल्या आपल्या चातुर्याचे प्रदर्शन करणे आम्हाला आवडत नसल्याने आपली मर्जी त्या गोनूवर कारण नसता जडली आहे. गोनू जर खरोखरच चतुर असेल, तर चिंचोळय़ा तोंडाच्या साधारण मोठय़ा मडक्यात बरोबर मावेल एवढय़ा आकाराचा काळा भोपळा ते मडके न फोडता भरून दाखवायला त्याला सांगा.'शास्त्रीबुवांच्या सुचनेनुसार एके दिवशी राजा गोनूला म्हणाला, 'गोनू, अद्यापपर्यंत मी तुला बरीच इनामे दिली, पण आता मला तुझ्याकडून एक भेट हवी आहे. ते बघ तिथे चिंचोळय़ा तोंडाचे मडके व मध्यम आकाराचा काळा भोपळा आहे. तू ते मडके न फोडता त्या मडक्यात तो भोपळा भरून आणून दे. माझी मागणी सामान्य आहे ना? करशील ती पूर्ण तू?'गोनू म्हणाला, 'का नाही पुरी करणार? अवश्य करीन, पण सध्या मी एका धार्मिक ग्रंथाचे पारायण करायला घेतले असल्याने येत्या दोन-तीन महिन्यांत मला कशी ती सवड नाही. त्या पारायणातून मोकळा झालो रे झालो की, आपल्याला हवी असलेली भेट मी घेऊन येईन, मात्र तोवर ते मडके मी माझ्या घरी नेऊन ठेवून येतो, म्हणजे मला आपल्या मागणीचा विसर पडणार नाही.'आपली विनंती राजाने मान्य करताच गोनू ते मडके घेऊन घरी गेला. त्याच दिवशी कुणाच्या लक्षात येणार नाही अशा तर्हेने ते मडके झाकून घेऊन तो जवळच असलेल्या खेड्यातील एका ओळखीच्या शेतकर्याकडे गेला. त्याच्या झोपडीच्या गवताने शाकारलेल्या छपरावर काळय़ा भोपळय़ाचा वेल चढला होता व त्या वेलावर मूठ मूठ आकाराचे कोवळे कोवळे भोपळे लागले होते.स्वत: गोनू त्या मडक्यासह त्या छपरावर चढला आणि त्याने एक मूठभर आकाराचा भोपळा त्याच्या वेलासकट त्या पक्क्या मडक्याच्या चिंचोळय़ा तोंडातून आत ढकलला. एवढे झाल्यावर त्याने त्या शेतकर्याला ती गोष्ट पूर्णपणे गुप्त ठेवायला सांगून त्याचा निरोप घेतला.तो भोपळा प्रतिदिवशी मडक्यातल्या मडक्यात थोडाथोडा वाहू लागला. त्याच्यावर नजर टाकण्यासाठी गोनू आठवड्यातून एक फेरी त्या शेतकर्याकडे मारत होताच. दोन-अडीच महिन्यांत जेव्हा त्या भोपळय़ाने त्या मडक्याचा बहुतांश अंतर्भाग व्यापून टाकला, तेव्हा 'आता अधिक दिवस हा भोपळा अशाच स्थितीत राहू दिला, तर हा मडके फोडून टाकेल, असा विचार करून गोनूने तो देठात कापला आणि एके दिवशी तो ते मडके दरबारात घेऊन गेला.आपण दिलेल्या पक्क्या मडक्याचे तोंड एवढे चिंचोळे असताना त्यात एवढा मोठा भोपळा गोनूने कसा घातला? असा पेच राजापुढे पडला. त्याने गोनूला 'तू हा चमत्कार कसा केलास?' अशी पृच्छा केली. आपण अवलंबिलेल्या युक्तीची कल्पना गोनूने देताच राजा त्याच्यावर प्रसन्न झाला. त्याला 1,000 मोहरा देत तो त्याला म्हणाला, 'गोनू, या तुझ्या चातुर्यावर प्रसन्न होऊन मी तुला 1,000 मोहरा तर देत आहेच, शिवाय तुझ्यावर जळणार्या ज्या असूयानंद शास्त्रांनी तुला या पेचात टाकण्याचा मला सल्ला दिला, त्या शास्त्रीबुवांनीही तुला 500 मोहरा द्याव्यात, अशी मी त्यांना आज्ञा करीत आहे.' •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment