✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 23 जानेवारी 2024💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2024/01/super-handwriting.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील २३वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००२:वॉल स्ट्रीट जर्नलचा पत्रकार डॅनिअल पर्ल याचे कराचीतुन अपहरण**१९९७:मॅडलिन ऑलब्राईट या अमेरिकेच्या पहिल्या महिला परराष्ट्रमंत्री बनल्या.**१९७३:अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी व्हिएतनाम बरोबर शांतता करार झाल्याचे जाहीर केले.**१९६८:शीतयुद्ध – उत्तर कोरियाने अमेरिकेची यू.एस.एस.प्युएब्लो ही युद्धनौका ताब्यात घेतली.**१९४३:दुसरे महायुद्ध – ब्रिटिश सैन्याने त्रिपोली (लिबीयाची राजधानी) शहर जिंकले.**१९३२:’प्रभात’च्या ’अयोध्येचा राजा’ची हिन्दी आवृत्ती’अयोध्याका राजा’ मुंबईत प्रदर्शित झाली.**१८४९:डॉ.एलिझाबेथ ब्लॅकवेल ही वैद्यकशास्त्रातील पहिली महिला पदवीधर बनली.**१७०८:छत्रपती शाहू महाराजांनी स्वत:ला राज्याभिषेक करवून घेतला. त्याच दिवशी सातारा ही राज्याची नवी राजधानी जाहीर केली गेली.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९०:देविदास महादेव सौदागर -- कवी लेखक**१९७१:मेघना जोशी -- कवयित्री* *१९६९:अनिल मनोहर कपाटे (अनिल शेवाळकर)-- कवी,कथाकार,कादंबरीकार* *१९६६:भागवत घेवारे -- कवी* *१९६२:मेधा इनामदार -- लेखिका* *१९५५:भगवान कृष्णा हिरे -- लेखक, अभिनेता,दिग्दर्शक,तज्ञ परीक्षक* *१९५३:डॉ.विलास चिंतामण देशपांडे -- प्रसिद्ध ज्येष्ठ लेखक,संपादक* *१९५२:अशोक बाबुराव लोणकर-- कवी, लेखक,संपादक**१९५०:आसावरी काकडे-- सुप्रसिद्ध मराठी-हिंदी कवयित्री आणि गद्यलेखिका**१९४७:मेगावती सुकार्नोपुत्री – इंडोनेशियाच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष**१९४७:डॉ.प्रमिला जरग-- लेखिका**१९४६:विजय पांडुरंग शेट्ये-- कवी,लेखक**१९४६:डॉ.सुभाष सावरकर --साहित्यिक, समीक्षक,संपादक (मृत्यू:२३ सप्टेंबर २०१३)**१९३९:अॅड.जयंत काकडे -- सुप्रसिद्ध साहित्यिक,व्यंगचित्रकार* *१९३५:विलास शंकरराव साळोखे-- लेखक**१९३५:प्रमोद सच्चिनानंद नवलकर --- जेष्ठ साहित्यिक,माजी मंत्री,(मृत्यू:२० नोव्हेंबर २००७)**१९३४:सर विल्यम हार्डी – ब्रिटिश जीवरसायनशास्त्रज्ञ (मृत्यू:६ एप्रिल १८६४)**१९२६:बाळ केशव ठाकरे ऊर्फ बाळासाहेब ठाकरे -- महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाचे संस्थापक,राजकारणी,संपादक,व्यंगचित्रकार (मृत्यू:१७ नोव्हेंबर २०१२)**१९२०:श्रीपाद रघुनाथ जोशी--- कोल्हापूर येथील मराठी लेखक,शब्दकोशकार व अनुवादक(मृत्यू:२४ सप्टेंबर २००२)* *१९१५:कमलनयन बजाज – उद्योगपती, जमनालाल बजाज यांचे चिरंजीव,बजाज आटो,बजाज इलेक्ट्रिकल्स,उदयपूर सिमेंट इ. कंपन्यांचे अध्यक्ष (मृत्यू:१ मे १९७२)**१८९८:पं.शंकरराव व्यास – गायक व संगीतशिक्षक,पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांचे शिष्य (मृत्यू:१७ डिसेंबर १९५६)**१८९७:नेताजी सुभाषचंद्र बोस-- भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक अग्रेसर नेते (मृत्यू: १८ ऑगस्ट १९४५ )**१८१४:सर अलेक्झांडर कनिंगहॅम – भारतातील पुरातत्त्व संशोधनाची मुहूर्तमेढ करणारे ब्रिटिश अधिकारी (मृत्यू:२८ नोव्हेंबर १८९३)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१८:प्रा.डॉ.अनिल नितनवरे--मराठीचे गाढे अभ्यासक,कवी,प्रयोगशील एकांकिकाकार तथा समीक्षक(जन्म:१९६५)**२०१०:पं. दिनकर कैकिणी – शास्त्रीय गायक (जन्म:२ आक्टोबर १९२७)**१९९२:ह.भ.प.धुंडामहाराज देगलूरकर– भक्तिसांप्रदायिक आणि ज्ञानेश्वरीचे गाढेअभ्यासक(जन्म:१५ मे १९०४)**१९८९:साल्वादोर दाली – स्पॅनिश चित्रकार. (जन्म:११ मे १९०४)**१९८२:मुद्दू बाबू शेट्टी-- हिंदी चित्रपटातील स्टंटमन,अॅक्शन कोरिओग्राफर आणि अभिनेता(जन्म:१ जानेवारी १९३८)**१९५९:विठ्ठल नारायण चंदावरकर – शिक्षणतज्ञ आणि कायदेपंडित**१९३१:अॅना पाव्हलोव्हा – ’द डाइंग स्वान’ म्हणून प्रसिद्ध असलेली रशियन बॅलेरिना (जन्म:१२ फेब्रुवारी १८८१)**१९१९:राम गणेश गडकरी – नाटककार,ककवी व विनोदी लेखक(जन्म:२६ मे १८८५)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जागतिक हस्ताक्षर दिवस त्यानिमित्ताने प्रासंगिक लेख*सुंदर हस्ताक्षर : एक दागिना*शाळेतील विद्यार्थ्यांच्या गृहपाठाच्या वह्या तपासतांना सुंदर हस्ताक्षरात लिहलेल्या वह्या मनाला आनंदीत करून जातात. खरोखरच वळणदार अक्षराला किती महत्व आहे ! सुंदर हस्ताक्षर पाहुन त्या मुलाचे कौतूक केल्याशिवाय कुणालाच राहवत नाही............. पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *वनवास संपला, प्रभू रामलल्ला आता तंबूत राहणार नाहीत, ते दिव्य मंदिरात राहणार; प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे उद्गार*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *अयोध्येच्या राम मंदिरामुळे पर्यटक वाढणार आणि यूपीची तिजोरी भरणार, राज्याच्या महसुलात 25 हजार कोटींच्या वाढीची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *श्रीराम मंदीर प्राणप्रतिष्ठापणा निमित्ताने देशभर दुसऱ्यांदा साजरी झाली दिवाळी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सह त्यांच्या चाळीस आमदारांना सर्वोच्च न्यायालयाची नोटिस*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी प्रयत्न:राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे प्रतिपादन*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *रवी शास्त्री यांना जीवन गौरव तर शुभमन गील यांना BCCI कडून वर्षातील सर्वोत्तम खेळाडू पुरस्कार*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *किंग कोहलीची इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटीतून माघार; बीसीसीआयची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *आपल्याला भूक का लागते ?* 📙 आपलं शरीर सतत काम करत असतं. जेव्हा आपण विश्रांती घेत असतो किंवा झोपेत असतो तेव्हाही श्वसन, रक्ताभिसरण, हृदयाची धडधड यांसारख्या प्रक्रिया चालूच असतात. त्यामुळे शरीराला सतत ऊर्जेची गरज भासते. हिचा पुरवठा अखंड असण्यासाठी शरीराला वेळोवेळी पोषण मिळणं आवश्यक असतं. आपण जेव्हा अन्न खातो तेव्हा हे पोषण मिळतं. ते साठवूनही ठेवलं जातं. पण तो साठा संपला की परत पोषक पदार्थ शरीराला मिळण्याची गरज असते. याचीच जाणीव आपल्याला करून देण्यासाठी भुक लागण्याची भावना निर्माण होते.आपल्या मेंदूमधील हायपोथॅलॅमस या अवयवामध्ये भुकेवर नियंत्रण ठेवणारं केंद्र असतं. त्याला संदेश मिळाला की ते कार्यरत होतं आणि भुकेची भावना जागृत करतं. त्या केंद्राला मिळणारे संदेश विविध प्रकारचे असतात. त्यातले काही शरीराच्या आतून उत्पन्न होतात. म्हणजेच ते अंतर्गत असतात, तर काही बाहेरून येणारे असतात.शरीराला ऊर्जा मिळते ते ग्लुकोजच्या ज्वलनातून. त्यामुळे रक्तात ग्लुकोजचं प्रमाण एका निर्धारित पातळीवर नेहमी राहील याची व्यवस्था केलेली असते. ते जर त्या पातळीपेक्षा फारच चढलं तर ते आरोग्याला बाधक असल्यानं इन्सुलीन या संप्रेरकाचा पाझर सुरू होतो. ते संप्रेरक ग्लुकोजची निर्धारित पातळी राखण्यात मदत करतं. जर ग्लुकोजची पातळी या निर्धारित प्रमाणापेक्षा फारच घसरली तर तो संदेश मिळून भुकेचं केंद्र जागृत होतं. त्यावेळी आपण पुरेसं अन्न पोटात टाकलं तर मग भुक मिटल्याची भावनाही याच केंद्रातून निर्माण केली जाते.आपल्या पोटाचं आकारमानही विशिष्ट पातळीवर ठेवण्याची व्यवस्था केली जाते. तसंच ते काही विविक्षित प्रमाणात भरलेलं असेल हेही बघितलं जातं. पोट जर रिकामं झालं तर ते आकुंचन पावून त्याचं आकारमान घटतं. भुकेचं केंद्र जागृत करायला तोही एक संदेश पुरतो. अशा वेळी पाणी पिऊन आकारमान वाढवलं तरीही भुक भागल्याची भावना निर्माण होते.आज जरी आपल्याला हवं तेव्हा अन्न उपलब्ध होत असलं तरी आदिमानवाच्या काळात जेव्हा रानावनात कंदमुळे गोळा करून किंवा शिकार करून मनुष्यप्राणी आपली पोषणाची गरज भागवत होता. तेव्हा अन्न केव्हा मिळेल याची शाश्वती नव्हती. त्यामुळे असं ते मिळालं की प्रत्यक्ष पोषणाची आवश्यकता असो-नसो, त्याच्या दर्शनाने किंवा गंधानंही भुकेची भावना चाळवली जात असे. उत्क्रांतीच्या ओघात हा गुणधर्म टिकून राहिला आहे. त्यामुळे स्वादिष्ट अन्न दिसलं किंवा त्याचा दरवळ नाकपुड्यांना चाळवून गेला म्हणजेही आपल्याला भूक लागते.*बाळ फोंडके यांच्या 'का ?' या पुस्तकातून**संकलन :- श्याम ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कल्पनाशक्ती ही ज्ञानापेक्षा जास्त महत्वाची आहे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारतातील सर्वात मोठी पाकोळी पक्ष्याची वीण वसाहत कोठे आहे ?२) लष्करी क्षमतेच्या बाबतीत सर्वात शक्तिशाली देश कोणता ?३) हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२४ मध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो ?४) २०२३ चा 'फिफा प्लेअर ऑफ द इअर' हा पुरस्कार कोणी जिंकला ?५) मनोज जरांगे - पाटील कोण आहेत ? *उत्तरे :-* १) बर्ड आयलँड, वेंगुर्ला द्वीप समुह २) अमेरिका ३) ८० वा ४) लिओनेल मेस्सी ५) मराठा आंदोलनाचे नेते*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 संतोष बोधनकर, नांदेड👤 भालचंद्र गावडे, सोलापूर👤 दिनेश चिंतावाड, नांदेड👤 नम्रता उभाळे👤 यदुराज ढगे, चिरली👤 शंकर नरवाडे👤 श्याम खंडेलोटे👤 सुनील बंडेवार, धर्माबाद👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••स्वरुपी उदेला अहंकार राहो। तेणे सर्व आच्छादिले व्योम पाहो॥ दिशा पाहतां ते निशा वाढताहे। विवेके विचारे विवंचुनि पाहे॥१७३॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मानवी जीवनात विनोदाला विशेष महत्त्व आहे. जर एखादी व्यक्ती हसत असेल तर असे मानले जाते की व्यक्ती त्याच्या आयुष्यात आनंदी आहे. जर एखाद्याच्या आयुष्यात हास्य आणि उत्साह असेल तर त्याचे जीवन सुंदर मानले जाते.हसणे जीवन आहे, हसवणे ही एक प्रकारची कला आहे व स्वतः आनंदाने हसत राहून दुसऱ्याला रडवणे ही कुटनीती आहे. ह्या तिनही मध्ये खूप फरक आहे. म्हणून नेमकं हास्य काय असते हे कळणे आवश्यक आहे. जेव्हा या विषयी कळेल तेव्हा खऱ्या अर्थाने हास्य या नावाचा मान राहील. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*चल रे भोपळया टुणुक टुणुक*एक होती म्हातारी. एकदा ती आपल्या लेकीकडे जायला निघाली. लेक रहायची दुसर्या गावाला.रस्त्यांत होते मोठे जंगल. म्हातारी काठी टेकत, टेकत रस्त्याने निघाली. वाटेत तिला भेटला कोल्हा. तो म्हणाला 'म्हातारे, म्हातारे, मी तुला खातो'. पण म्हातारी होती हुषार. ती म्हणाली 'मला खाऊन तुझे पोट भरणार नाही. त्यापेक्षा थोडे दिवस थांब. लेकीकडे जाते , तूपरोटी खाते, लठ्ठ मुठ्ठ होते, मग मला खा.' कोल्ह्याला म्हातारीचे म्हणणे पटले.म्हातारी पुढे निघाली. तिला भेटला वाघ. तो म्हणाला 'म्हातारे, म्हातारे, मी तुला खातो'. त्याने डरकाळी फोडली. म्हातारी त्याला म्हणाली 'मला खाऊन तुझे पोट भरणार नाही.त्यापेक्षा थोडे दिवस थांब. लेकीकडे जाते , तूपरोटी खाते, लठ्ठमुठ्ठ होते, मग मला खा. ' वाघाची अशी समजूत काढून म्हातारी पुढे निघाली.लेकीकडे ती खूप दिवस मजेत राहिली. खाऊन पिऊन लठ्ठमुठ्ठ झाली. आपल्या घरी परत येताना तिने एक मोठा लाल भोपळा घेतला. त्यात बसून ती भोपळयाला म्हणाली ' चल रे भोपळया टुणुक टुणुक'. भोपळा रस्त्याने निघाला. वाटेत वाघाने भोपळा पाहिला. तो म्हणाला 'म्हातारे, म्हातारे थांब!' आतून म्हातारी म्हणाली 'कशाची म्हातारी आणि कशाची कोतारी. चल रे भोपळया टुणुक टुणुक'. त्याबरोबर भोपळा जोरात पळू लागला. पुढे गेल्या भेटला कोल्हा. कोल्ह्यानेही भोपळयाला थांबवण्याचा प्रयत्न केला. पण म्हातारी आतून म्हणाली 'चल रे भोपळया टुणुक टुणुक!'. पुन्हा भोपळा जोरात पळू लागला.अशी होती म्हातारी हुषार. कोल्हा आणि वाघाच्या तावडीत ती काही सापडली नाही. भोपळयात बसून ती सुखरूप आपल्या घरी पोचली.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment