✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 04 जानेवारी 2024💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2017/10/blog-post_25.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील चौथा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९९६:साहित्यिक चंद्रकांत खोत यांच्या ’बिंब प्रतिबिंब’ या कादंबरीला कोलकता येथील भारतीय भाषा परिषदेचा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला.**१९५९:लूना - १ हे अंतराळयान चंद्राच्या अगदी जवळ पोहोचले.**१९५८:१९५३ मध्ये माउंट एव्हरेस्टवर यशस्वी चढाई करणारे सर एडमंड हिलरी दक्षिण धॄवावर पोहोचले.**१९५४:मेहेरचंद महाजन यांनी भारताचे ३ रे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.**१९५२:ब्रिटिश सैन्याने सुएझ कालव्याची नाकेबंदी केली.**१९४८:ब्रम्हदेश (म्यानमार) ला (इंग्लंडपासुन) स्वातंत्र्य मिळाले.**१९४४:१०वर्षावरील सर्व मुलामुलींना राष्ट्राच्या युद्धसेवेत दाखल करुन घेण्याबद्दलचा हिटलरचा वटहुकूम जारी झाला.**१९३२:सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतल्याबद्दल पंडित नेहरूंना दोन वर्षांची शिक्षा**१९२६:क्रांतिकारकांच्या गाजलेल्या काकोरी खटल्याच्या सुनावणीस लखनौ येथे सुरुवात झाली.**१८८१:लोकमान्य टिळक यांनी पुणे येथे ’केसरी’ या वृत्तपत्राची सुरूवात केली.**१६४१:कर भरायला नकार देणार्या लोकप्रतिनिधींना पकडण्यासाठी इंग्लंडचा राजा पहिला चार्ल्स हाऊस ऑफ कॉमन्समध्ये शिरला.या अभूतपूर्व घटनेची परिणती यादवी युद्धात झाली.त्यात चार्ल्सचा पराभव होऊन मग त्याचा शिरच्छेद करण्यात आला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७१:प्रा.डॉ.विजय नरसिंग जाधव-- लेखक संपादक**१९७१:सुनील राम गोसावी-- लेखक,कवी**१९६७:जयश्री अनिल पाटील-- कवयित्री* *१९६७:श्रीमंत माने-- कार्यकारी संपादक लोकमत तथा लेखक* *१९६५:प्रा.गोविंद जाधव-- कवी**१९६४:प्रसाद कुलकर्णी - लोकप्रिय कवी, उत्तम व्याख्याते* *१९६४:मिलिंद शांताराम गांधी-- कवी, गीतकार* *१९६३:प्राचार्य डॉ.जगन्नाथ शामराव पाटील-- प्रसिद्ध लेखक**१९५५:प्राचार्य डॉ.श्रीकांत तिडके-- विदर्भातील प्रसिद्ध लेखक व वक्ते**१९४१:कल्पनाथ राय – माजी केन्द्रीय मंत्री, राज्यसभा खासदार काँग्रेसचे नेते (मृत्यू:६ ऑगस्ट १९९९)**१९४०:श्रीकांत वसंत सिनकर -- कथालेखक**१९३३:मनोहर सप्रे-- प्रसिद्ध व्यंगचित्रकार, लेखक* *१९३१:दिगंबर कुलकर्णी-- कथाकार कादंबरीकार* *१९२५:प्रदीप कुमार – हिन्दी व बंगाली चित्रपटसृष्टीतील अभिनेता (मृत्यू:२७ आक्टोबर २००१)**१९२४:विद्याधर गोखले – नाटककार व संपादक (मृत्यू:२६ सप्टेंबर १९९६)**१९२२:भालचंद्र शंकर भणगे-- लेखक (मृत्यू:२९ मार्च१९८०)**१९१४:इंदिरा संत –साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध कवयित्री व लेखिका (मृत्यू:१३ जुलै २०००)**१९०९:प्रभाकर आत्माराम पाध्ये--संपादक, साहित्यिक,सौंदर्यमीमांसक, समीक्षक(मृत्यु:२२ मार्च १९८४)**१९०५:कृष्णाजी बाबुराव मराठे -- चरित्रकार* *१८१३:सर आयझॅक पिटमॅन – शॉर्टहँड या लघुलिपीचे जनक (मृत्यू:१२ जानेवारी १८९७)**१८०९:लुई ब्रेल – अंधांना उपयोगी पडणाऱ्या ब्रेल लिपीचे जनक व शिक्षक (मृत्यू:६ जानेवारी १८५२)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२२:सिंधूताई सपकाळ-- सामाजिक कार्यकर्त्या,अनाथाची माय पद्मश्री पुरस्काराने सन्मानित (जन्म:१४ नोव्हेंबर १९४८)**१९९४:राहूलदेव बर्मन तथा ’पंचमदा’ – संगीतकार (जन्म:२७ जून १९३९)**१९६५:टी.एस.इलियट – अमेरिकेत जन्मलेले ब्रिटिश कवी, नाटककार, टीकाकार आणि नोबेल पारितोषिक विजेते (जन्म:२६ सप्टेंबर १८८८)**१९६१:आयर्विन श्रॉडिंगर – नोबेल पारितोषिक विजेता ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ (जन्म:१२ ऑगस्ट १८८७)**१९१७:सखाराम कृष्ण देवधर(बापूसाहेब देवधर)--गायत्री मंत्राचे उपासक,ज्ञानेश्वरीचे अभ्यासक**१९०८:राजारामशास्त्री भागवत – विद्वान व समाजसुधारक, ज्ञानाच्या क्षेत्रातील मोठे प्रज्ञावंत, संपादक (जन्म:११ नोव्हेंबर १८५१)**१९०७:गोवर्धनराम त्रिपाठी – गुजराथी लेखक, 'सरस्वतीचंद्र’ हा गाजलेला चित्रपट त्यांच्याच चार भागांतील कादंबरीवर आधारलेला आहे. (जन्म:२० आक्टोबर १८५५)**१७५२:गॅब्रिअल क्रॅमर – स्विस गणिती (जन्म:३१ जुलै १७०४)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *बोलण्याचे संस्कार*आपल्यावर बोलण्याचे संस्कार आहेत काय ?असे कोणी विचारणा केली तर आपण संभ्रमात पडतो. बोलण्यासाठी कोणत्या संस्काराची गरज आहे ? किंवा तसे संस्कार करता येतात काय ? याविषयी आपण लहान असताना नकळत विचार करतो मात्र त्यास बोलण्याचे संस्कार............... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 15 जानेवारीपर्यंत मनाई आदेश जारी; पाच पेक्षा जास्त व्यक्ती जमण्यास देखील मनाई*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *यापुढे सरकारशी चर्चा बंद, 20 जानेवारीला मुंबईकडे निघणारच, मनोज जरांगेंची मोठी घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *कोकणातील यावर्षीचा प्रवासही खड्ड्यातूनच; मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी 31 डिसेंबर 2024 नवी डेडलाईन*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *ओबीसी आरक्षणाच्या विरोधात हायकोर्टात याचिका, 7 फेब्रुवारीला मुख्य न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर सुनावणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मुंबईतील शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूवर टोलची रक्कम ठरली, तब्बल 500 रुपयांचा टोल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *राज्यामध्ये 22 जानेवारी रोजी दिवाळीप्रमाणे उत्साह साजरा केला जाईल सोशल मीडियावरुन मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *केपटाऊनचं मैदान इतिहासाला जागलं, दुसऱ्या कसोटीत मोहम्मद सिराजनं भगदाड पाडलं, दक्षिण आफ्रिकेचा डाव अवघ्या 55 धावांत गुंडाळला, सिराजला 6 विकेट्स*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 उल्कापात म्हणजे काय ? 📙 रात्रीच्या वेळी शिळोप्याच्या गप्पा रंगल्या असताना निरभ्र आकाशात अचानक एखादा चमकदार पदार्थ झळाळत निखळताना दिसतो. सगळ्यांचेच लक्ष तिकडे वळते. पण हा झळाळणारा पांढराशुभ्र चमकदार पदार्थ पृथ्वीच्या नजीक आल्यावर दिसेनासाही होतो. हा असतो उल्कापातातला एक छोटासा तुकडा. पृथ्वीवर दरवर्षीच अनेक वेळा लहान मोठ्या उल्का कोसळत असतात. त्यांच्याबद्दल विविध अंदाज व्यक्त होतात. पृथ्वीपर्यंत पोहोचणाऱ्या उल्कांचा आकडा लक्षात घेतला तर रोज एखाद दुसरी उल्का जमिनीपर्यंत पोहोचते. पण न पोहोचणाऱ्या त्यापेक्षा कितीतरी जास्त असतात. त्या वातावरणात होणाऱ्या घर्षणाने तापून प्रकाशमान होतात, वितळतात व नंतर त्यांची वाफ होऊन वातावरणातच नष्ट पावतात. खऱ्या अर्थाने एखादी मोठी उल्का येथे येऊन आदळण्याचे प्रकारही अनेकदा घडले आहेत. असा सर्वात मोठा ज्ञात प्रकार अॅरिझोना या अमेरिकेतील राज्यात घडला असावा. किमान पंचवीस हजार वर्षांपूर्वी घडलेल्या या उल्कापातातील उल्केचे वजन पन्नास हजार टन असावे. यामुळे निर्माण झालेला खळगाच मुळी सव्वा किलोमीटर व्यासाचा आहे. भारतात लोणारचे तळे याच पद्धतीने तयार झाले असावे, असा अंदाज व्यक्त केला जातो. उल्कापाताने निर्माण झालेले खड्डे हे चंद्रावर तर ठायीठायी आढळतात. ऑस्ट्रेलिया व ब्राझीलमध्ये असे मोठाले उल्कापात अलीकडच्या शतकात झाले आहेत.उल्कापातातील दगड हे पृथ्वीवरच्या दगडांपेक्षा एकदम वेगळे असल्याने त्याबद्दल शास्त्रज्ञांना कुतूहल वाटत आले आहे. काही पूर्णत: लोहाचे काही पूर्णत: शिलांचे तर काहींमध्ये मिश्रा असे हे दगड असतात. सूर्य व ग्रहमालिका तयार झाली त्या वेळी काही अवशेष अवकाशातच भिरभिरत राहिले. त्यांतील काही शिळा, काही धूर, तर काही वायूरूप अवस्थेत आहेत. ग्रहांच्या आकर्षणाने ते ज्यावेळी कक्षेत खेचले जातात तेव्हा उल्कापात घडतात. पृथ्वीचे परिभ्रमण चालू असताना काही वेळा एखाद्या अशा धुळीच्या लोटातून पृथ्वी जाते. अनेक छोटेमोठे उल्कापात या वेळी होतात. गारांचा सडा पडावा तशा या छोट्यामोठ्या उल्का वातावरणात येतात; पण त्यांतील बहुसंख्य तेथेच वितळून चकाकत नष्ट होऊन जातात. पृथ्वीवर समुद्रात कोसळणाऱ्या उल्कांचा तर पत्ताच लागत नाही व अशांचा आकडा फार मोठा असणार आहे.उल्कांचा संग्रह करणारे अनेकजण आहेत. हा एक तेजीत चालणारा व्यवसाय आहे. उल्का वा पृथ्वीवरच्या दगड ही जाण त्यासाठी असणे ही प्रमुख अट. येथेच बरेचजण गळतात. त्यानंतर यासाठी करावी लागणारी वणवण व त्याला लागणारा अफाट पैसा ही दुसरी अडचण. तिसरी अडचण विविध देशांचे कायदे. पण यावरही मात करून अनेकजण ही हौस भागवतात, तर काहीजण यातूनच पैसा करतात. मोठ्या आकाराच्या उल्केला कित्येक हजार रुपयांची मागणी सतत असते, हे विशेष.उल्कापाताचा एक मोठा अंदाज फार पुरातन काळी झालेल्या उलथापालथीशी नेहमीच जोडला जातो. या महाप्रचंड उल्कापातानेच पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात धूर, धूळ साचून सूर्यप्रकाश पोहोचायला अडथळा झाला असावा व येथील प्राणीजीवन खूपसे नष्ट झाले असावे, असे काहींचे म्हणणे आहे. डायनॉसॉर जातीचे महाकाय प्राणी किंवा सरपटणाऱ्या जाती यातच उपासमार होऊन नष्ट झाल्या असाव्यात, असे मानले जाते. या अंदाजाला पुष्टी देणारा त्या उल्कापाताचा मोठ्या आकाराचा पुरावा मात्र मिळत नाही, ही या अंदाजातील कमतरता म्हणावी लागते. तुम्ही राहता त्या गावातील संग्रहालयात एखादी उल्का आहे का याची चौकशी करा. नसल्यास कुठे बघायला मिळेल, याची माहिती संग्रहालयाच्या प्रमुखांना विचारा. चंद्रावरील आणलेले काही दगड नील आर्मस्ट्राँग यांनी आपल्या देशाला भेट दिले आहेत, हे ज्ञात आहे का ?‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून**संकलन :- श्याम ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" स्वभावातील गोडीने आणि जिभेवरील माधुर्याने माणसे जोडली जातात "**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *'कौन बनेगा करोडपती'* या प्रसिद्ध टीव्ही सिरीयलचा अँकर कोण आहे ?२) जगातील सर्वाधिक सुरक्षित शहर कोणते ठरले आहे ?३) १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत ?४) 'Why Bharat Matters' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?५) कोणाच्या स्मरणार्थ इसवी सनाची सुरुवात झाली ? *उत्तरे :-* १) सुपरस्टार अमिताभ बच्चन २) अबुधाबी शहर ३) डॉ. जब्बार पटेल ४) एस. जयशंकर ५) येशू ख्रिस्त*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 बालाजी डिगोळे, सहशिक्षक, अहमदपूर👤 अंकुशराजे जाधव👤 माधव बोइनवाड, येवती👤 चंद्रभीम हौजेकर, पत्रकार, धर्माबाद👤 राजेश कुकूटलवार👤 निलेश आळंदे👤 माधव सूर्यवंशी, मुंबई👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••महावाक्य तत्त्वादिके पंचीकरणे।खुणे पाविजे संतसंगे विवरणे॥द्वितीयेसि संकेत जो दाविजेतो।तया सांडूनि चंद्रमा भाविजेतो॥१५४॥सरळ अर्थ - महावाक्ये, वेदांमधील तत्वे, पंचमहाभूते या केवळ खुणा आहेत अंतिम सत्य जाणण्याच्या. त्यांचे विवरण संतांकडून करून घेणे, समजून घेणे हे महत्वाचे. द्वितीयेचा चंद्र दाखवण्यासाठी वापरलेला संकेत सोडून प्रत्यक्ष चंद्र बघणे हे महत्वाचे.।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कोण कधी, कुठे आणि कधी भेटतील व अचानकपणे जुळतील हे सांगता येत नाही. हा एक प्रकारचा योगायोगच असतो आणि त्यात जुळलेले सर्वचजण नि:स्वार्थी असतील असेही नाही. पण त्यातील काहीजण चांगले देखील असू शकतात.त्यांनाही जवळून ओळखावे.पण आपण मात्र अशा ठिकाणी जुळून रहावे जेथे सुकल्यानंतर सुध्दा आपल्याला मायेचा आधार मिळेल ..जसे झाडात,वेल्यांमध्ये माया आणि नि:स्वार्थ भावना असते त्याप्रमाणे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*स्वतः मध्ये बदल**कोकिळ पक्षी कधी स्वतः घरटे बांधत नाही. अंडी घालायची वेळ आली म्हणजे कोकिळा आपली अंडी एखाद्या कावळ्याच्या घरट्यात घालते. पिल्ले बाहेर पडून उडू लागेपर्यंत कावळा त्यांचे रक्षण करतो. एकदा एक कोकिळा एका घुबडाजवळ येऊन त्याला म्हणाली, 'घुबडदादा, हे कावळे किती दुष्ट आहेत पहा ! माझी अंडी पूर्ण विश्वासाने मी त्यांच्या स्वाधीन करतो. पण याबद्दल ते मला काय बक्षीस देतात पहा ! मी कुठेही एकटी सापडले तर ते माझा पाठलाग करून जीव नकोसा करतात. ही काय त्याची रीत झाली ?' घुबड म्हणाले, 'अग कृतघ्न कोकिळे, तुझ्या पिल्लांना तू टाकून दिलंस, त्यावेळी ज्या कावळ्यांनी मायेने त्यांना वाढवलं, त्यांचे उपकार तू विसरून जातेस, त्या अर्थी कावळे तुला टोचतात हेच योग्य.'**तात्पर्य:- दुसर्याला उपदेश करण्या अगोदर आपल्यातील दोष दूर करून वागणूकीत बदल केलेला कधीही चांगले असते.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment