✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 25 जानेवारी 2024💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2018/01/blog-post_22.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_राष्ट्रीय पर्यटन दिन_* *_राष्ट्रीय मतदार दिन_*••••••••••••••••••••••••••••••••*_ या वर्षातील २५वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००१:स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर व शहनाईनवाझ बिस्मिल्ला खाँ यांना ’भारतरत्न’**१९९५:अमेरिकेने धृवीय प्रकाशाची (Aurora Borealis) माहिती घेण्यासाठी एक क्षेपणास्त्र सोडले. रशियन सरकारच्या रडारवर ते दिसू लागताच अमेरिकेने अण्वस्त्र सोडले असावे, असा संशय रशियन अधिकार्यांनी व्यक्त केल्यामुळे रशियाचे अध्यक्ष बोरिस येल्त्सिन यांनी अमेरिकेवर अण्वस्त्रे डागण्यासाठी ’न्युक्लिअर ब्रिफकेस’ हातात घेतेली होती!**१९९१:मोरारजी देसाई यांना ’भारतरत्न’**१९८२:आचार्य विनोबा भावे यांना ’भारतरत्न’**१९७१:हिमाचल प्रदेशला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला व ते भारताचे १८ वे राज्य बनले.**१९४१:’प्रभात’चा ’शेजारी’ हा चित्रपट रिलीज झाला.**१९१९:पहिले महायुद्ध संपल्यानंतर लीग ऑफ नेशन्सची स्थापना झाली.**१८८१:थॉमस अल्वा एडिसन आणि अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल यांनी ओरिएंटल टेलिफोन कंपनीची स्थापना केली.**१७५५:मॉस्को विद्यापीठाची स्थापना झाली.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८४ स्वाती बाळासाहेब ठुबे-खोडदे-- कवयित्री* *१९७५:एकता मेनकुदळे--- लेखिका**१९७१:डॉ.मिलिंद चोपकर -- लेखक* *१९५८:कविता कृष्णमूर्ती – प्रसिद्ध पार्श्वगायिका**१९५४:मदन रामसिंह हजेरी -- कादंबरीकार,बालकथाकार**१९५२:प्रकाश नथुभाऊ खरात -- कवी,लेखक (मृत्यू:१९ एप्रिल २०२१)**१९५१:हेमलता प्रदीप गीते-- प्रसिद्ध कवयित्री**१९५१:अर्चना पंडित-- कवयित्री**१९३८:सुरेश विनायक खरे – मराठी नट, लेखक,दिग्दर्शक,जाहिरातपटकार,चित्रपट पटकथालेखक,नाट्यावलोकनकार, संवादक,मुलाखतकार,आणि मराठी नाटककार व समीक्षक**१९३३:दिनेश वामन वाळिंबे -- कवी**१९३१:डॉ.रामचंद्र विश्वनाथ मंत्री-- लेखक**१९१७:श्रीपाद दत्तात्रेय कुलकर्णी -- लेखक**१९१६:बापूसाहेब गोविंदराव लाखनीकर-- संस्थापक,लेखक (मृत्यू:२६ डिसेंबर २००१)**१९१४:जगन्नाथ शामराव देशपांडे-- प्राचीन मराठी संशोधक,संपादक* *१८८६:पांडुरंग नरसिंह पटवर्धन-- इतिहास संशोधक(मृत्यू:६ जुलै १९२१)**१८८३:आनंदीबाई धोंडो कर्वे ऊर्फ बाया कर्वे -- मराठी सामाजिक-शैक्षणिक कार्यकर्त्या (मृत्यू:२९ नोव्हेंबर १९५०)* *१८८२:व्हर्जिनिया वूल्फ – ब्रिटिश लेखिका (मृत्यू:२८ मार्च १९४१)**१८७४:डब्ल्यू. सॉमरसेट मॉम – इंग्लिश लेखक व नाटककार (मृत्यू:१६ डिसेंबर १९६५)**१८६२:रमाबाई रानडे – ’सेवा सदन’च्या संस्थापिका व सामाजिक कार्यकर्त्या (मृत्यू: १९२४)**१७३६:जोसेफ लाग्रांगे – इटालियन गणितज्ञ (मृत्यू:१० एप्रिल १८१३)**१६२७:रॉबर्ट बॉईल – आयरिश रसायनशास्त्रज्ञ (मृत्यू:३० डिसेंबर १६९१)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१५:मधुकर दत्तात्रय तथा म.द. हातकणंगलेकर – ज्येष्ठ समीक्षक आणि सांगली (२००८) येथील ८१ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (जन्म:१ फेब्रुवारी १९२७)**१९९६:प्रशांत सुभेदार – रंगभूमी व चित्रपटांतील गुणी अभिनेते* *१९८०:लक्ष्मणशास्त्री दाते – सोलापूरचे ’दाते पंचांग’कर्ते (जन्म:१८९०)**१९६४:शंकरराव रामचंद्र कानिटकर-- शिक्षणतज्ज्ञ व समाजसेवक(जन्म:११ जुलै १८८७)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त* *मतदार राजा जागा हो....!*इंग्रजांच्या दीडशे वर्षे गुलामगिरीच्या नंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश स्वतंत्र झाले. त्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी देश प्रजासत्ताक झाले. भारतात लोकशाही पद्धतीने राज्यकारभार चालविला जातो. जगात सर्वात यशस्वी लोकशाही............ पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मराठा आरक्षण विषयी मुंबईकडे कूच केलेल्या मनोज जरांगे पाटील यांना उच्च न्यायालयाची नोटीस*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *दहावी-बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना यावर्षी देखील दहा मिनिटं जादा वेळ, मंडळाची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्र्यांना आत्ताच अयोध्येतील राम मंदिरात न जाण्याचा दिला सल्ला*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *महाराष्ट्र तलाठी भरती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर; महाराष्ट्र तलाठी अंतिम निकाल mahabhumi.gov.in या लिंकवर पाहता येईल*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *ऐन परीक्षेच्या काळात शिक्षकांना मराठा आरक्षण सर्व्हेचं काम, शिक्षण व्यवस्था सलाईनवर!*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *युक्रेनजवळ रशियन लष्कराचं विमान कोसळलं, किमान 65 जणांचा मृत्यू*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *44 वर्षांच्या टेनिस स्टारनं रचला इतिहास, रोहन बोपन्नाची ऑस्ट्रेलियन ओपनच्या सेमीफायनलमध्ये धडक*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🐝 *मधमाशी चावल्यावर काय होतं ?* 🐝डासांचा चावा असं म्हटलं जातं, पण मधमाशीचा असतो तो डंख. याचं कारण म्हणजे जेव्हा मधमाशी डसते तेव्हा ती एक विष आपल्या शरीरात सोडत असते. सहसा मधुपर्काच्या शोधात असलेली मधमाशी डंख करत नाही; पण ती तुडवली गेली आणि एखाद्या व्यक्तीपासून तिच्या पोळ्याला धोका आहे असं तिला जाणवलं तर मात्र त्वेषानं तुटून पडते. तरीही मधमाशी एकदाच डंख करू शकते, कारण डंख करण्यासाठी तिच्या अंगी जो एक सुईसारखा अवयव असतो, याला स्टिंग असंच म्हणतात, तो तुटून आपल्या शरीरातच अडकून पडतो. खरंतर ही सुई साधी नसते. या सुईच्या दोन्ही बाजूला तिला जोडलेले दोन काटेरी पट्टे असतात. ते वर खाली होऊ शकतात. यातला एक पट्टा आपल्या कातडीत शिरून तिथे अडकून पडतो. त्यामुळे तो आणखी आत ओढला जाऊन सुईला आपल्याबरोबर ओढून नेतो. त्याबरोबर आता दुसऱ्या बाजूचा काटेरी पट्टा आपली हालचाल करू लागतो. असं करत ते सुईला कातडी पार करून आपल्या मांसल स्नायूपर्यंत पोचवतात. त्यावेळीच ते विष शरीरात सोडलं जातं. हे सारं सव्यापसव्य करताना त्या काटेरी दातांसकट ती सुई मांसल भागात चांगलीच रुतून बसते. त्यामुळे ती परत बाहेर काढली जाऊ शकत नाही. पण माशी तसा प्रयत्न करते तेव्हा ती सुई तुटते. ती सुई माशीच्या पोटाला जोडलेली असल्यामुळे त्या ओढाताणीत तो पोटाचा भागही तुटून पडतो. ते सहन न होऊन माशी मरून पडते. विषाबरोबरच माशी एक गंधयुक्त रसायन, याला फेरोमोन म्हणतात, तिथं आणि हवेत पसरवते. त्याच्या ओढीनं इतर माशाही तिथं आकर्षित होतात. अशा वेळी मग एकाऐवजी अनेक माशांचा डंख पचवावा लागतो. सहसा या विषाचा फारसा परिणाम होत नाही. मात्र जळजळ आणि खाज येऊ लागते. काही जणांना या विषाची अॅलर्जी असते. त्यांना मात्र सावधगिरी बाळगावी लागते. तातडीने उपचार करून घेणं योग्य ठरतं. अन्यथा या अॅलर्जीची प्रतिक्रिया तीव्र होऊन ती घातकही ठरू शकते. या विषात मेलिटिनबरोबरच हिस्टमिनही असल्यामुळे सहसा हिस्टीमिनला नाकाम करणारी उपाययोजना केली जाते.उतारवयातल्या व्यक्तीला किंवा लहान मुलांना जर अनेक मधमाशांचा डंख झाला तर मात्र काही वेळा स्नायूंना इजा होऊ शकते. तसंच मूत्रपिंडांच्या कामातही बाधा आणली जाऊ शकते. तोंडात किंवा गळ्याजवळ डंख झाला तर त्यापायी श्वासनलिकेचं नियंत्रण करणारे स्नायू बाधित होतात व श्वासोच्छ्वासाला अडथळा होऊ शकतो. परंतु अशी परिस्थिती क्वचितच उद्भवते.*बाळ फोंडके यांच्या 'काय ?' या पुस्तकातून**संकलन :- श्याम ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर दिसण्याला काहीच अर्थ नाही. कारण सुंदर दिसण्यात अन असण्यात खूप फरक असतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) कर्पूरी ठाकूर यांच्या शंभराव्या जयंतीच्या पूर्वसंध्येला मरणोत्तर यांना कोणता पुरस्कार घोषित झाला ?२) बिहारचे जननायक म्हणून कोणाला ओळखले जाते ?३) बिहारचे पहिले बिगर काँग्रेसी मुख्यमंत्री कोण होते ?४) राज्यात मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण मोफत करणारे देशातील पहिले मुख्यमंत्री कोण ?५) बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांचा जन्म केव्हा झाला ? *उत्तरे :-* १) भारतरत्न २) कर्पूरी ठाकूर ३) कर्पूरी ठाकूर ४) कर्पूरी ठाकूर ५) २४ जानेवारी १९२४*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 श्रीमती कल्पना दत्ता हेलसकर, जालना👤 प्रा. वैशाली देशमुख, कुही नागपूर👤 ललेश पाटील मंगनाळीकर👤 राजीव सेवेकर👤 महेबूब पठाण👤 अंबादास कदम👤 राहुल आवळे👤 नरेश दंडवते👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••विधी निर्मिती लीहितो सर्व भाळी। परी लीहिता कोण त्याचे कपाळी॥ हरू जाळितो लोक संहारकाळी। परी शेवटी शंकरा कोण जाळी॥१७५॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपले नातेवाईक किंवा संगे, सोयरे सुख,दु:खात आपुलकीने साथ देणारे असतील तर त्यांच्या विषयी कायमच आपल्या मनात आदर राहतो व कोणाची वेळ निघून गेली की, ते विसरूनही जातात.पण, असे व्हायला नको. पण दिलेल्या मदतीची आपण जाणीव ठेवावी जे आपुलकीने मदत करतात त्यांना विसरू नये व जे कोणी मदत करत नाही. त्यांच्याकडून कोणतीही अपेक्षा ठेऊ नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कृती महत्वाची*स्वामीजींच्या प्रवचनासाठी गावोगावहून लोक आले होते. स्वामीजी आपल्या श्रोत्यांना उत्तम उपदेश करत. या उपदेश सभेला ‘सत्संग‘ म्हणत. एकदा स्वामीजींना काही लोकांनी सत्संगासाठी निमंत्रित केल होत. दिवस थंडीचे होते. येणारे लोक शाली, स्वेटर घालून तसेच मफलर बांधून आले होते. त्यात काही काही उच्चभ्रू श्रीमंतही होते. मात्र, स्वामीजींचा वेश साधाच. अंगावर घाबळी पांघरलेली. एका मोठया प्रशस्त दिवाणखान्यात सभा सुरू झाली आधी एक भजन सुरू होते. मग स्वामीजींचा उपदेश. तेवढ्यात एक याचक त्या दिवाणखान्याच्या दाराशी आला. उघडाबंब थंडीने कुडकुडत, हातात कटोरा घेऊन उभा होता. दिनवाण्या मुद्रेने त्याने आत पाहिल. भजन सुरूच होत. स्वामीजी उठून त्या याचकाकडे गेले. आपल्या अंगावरची घाबळी त्याच्या अंगावर पांघरली आणि शिष्याला खूण केली. शिष्याने काही नाणी त्याच्या कटो-यात टाकली आणि मग तो गरीब याचक निघून गेला. हे सर्व दृष्य सर्वच लोक बघत होते. भजन संपलं.सत्संग सूत्रसंचालक म्हणाला, ‘आता स्वामीजी आपल्याला उपदेश करतील. आपले कान त्यासाठी आतुरले आहेत‘. पण स्वामीजी काही बोलेनात. बराच वेळ झाला तरी ते स्वस्थच बसून होते. श्रोत्यांमध्ये चुळबूळ सुरु झाली. अखेर सूत्रसंचालक म्हणाला, ‘स्वामीजी, आपण आम्हाला उपदेश देताय ना?‘‘मी उपदेश दिला आहे,‘ स्वामीजी खणखणीत आवाजात म्हणाले. ’आपण काहीच बोलला नाहीत,‘ सुत्रसंचालक म्हणाला.‘अस्स! म्हणजे तुम्हाला फक्त शब्दांचा उपदेश हवा आहे; कृती नको. त्या थंडीत कुडकुडणा-या माणसाची अवस्था तुमच्या ध्यानी नाही आली ? मी केलेली कृती हाच माझा उपदेश! सर्व श्रोते थक्क झाले.तात्पर्यः केवळ कोरड्या शब्दांपेक्षा कृती महत्वाची असते.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment