✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 12 जानेवारी 2024💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2018/01/blog-post_11.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *राष्ट्रीय युवक दिन*💥 ठळक घडामोडी :- १९३६ - डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची धर्मांतराची घोषणा.इ.स. २००६ - हज यात्रेच्या अखेरच्या दिवशी मक्केजवळ मीना येथे प्रतीकात्मक दगड फेकण्याचा विधी चालू असताना झालेल्या चेंगराचेंगरीत ३४५ मुस्लिम भाविकांचा मृत्यु व २९० जखमी.💥 जन्म :-१५९८ - छत्रपती शिवाजी राजांची आई राजमाता जिजाबाई१८६३ - भारतीय तत्त्वज्ञ स्वामी विवेकानंद, १९०२ - धुंडिराजशास्त्री विनोद,महर्षी न्यायरत्न.१९०६ - महादेवशास्त्री जोशी, भारतीय संस्कृतीकोशाचे व्यासंगी संपादक.१९१८ - सी.रामचंद्र, ज्येष्ठ संगीतकार.१९१७ - महाऋषी महेश योगी, भारतीय तत्त्वज्ञ.💥 मृत्यू :- १९४४ - वासुकाका जोशी, लोकमान्य टिळकांचे निकटचे सहकारी व चित्रशाळेचे विश्वस्त.१९९२ - पंडित कुमार गंधर्व, हिंदुस्थानी संगीताच्या क्षेत्रातील ख्यातनाम गायक.२००५ - अमरीश पुरी, भारतीय अभिनेता••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••राजमाता जिजाऊ जयंती विशेष**आई असावी जिजाऊसारखी*जिजाबाई शहाजीराजे भोसले यांचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे झाला. राजमाता जिजाऊ ह्या मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री होत्या. सिंदखेडचे लखुजी जाधव हे जिजाबाईंचे वडील तर आईचे नाव म्हाळसाबाई..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *01 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन करणार देशाचं बजेट सादर, संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला 31 जानेवारी पासून होणार सुरुवात*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *चकाचक महाराष्ट्र, स्वच्छतेमध्ये देशात पहिला नंबर, स्वच्छ शहरांच्या यादीत नवी मुंबई तिसऱ्या नंबरवर तर इंदूर पहिल्या क्रमांकावर*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, नाशिकमध्ये युवा महोत्सवाचं उद्घाटन, तर नवी मुंबईतील शिवडी- न्हावा शेवा अटल सेतूचं लोकार्पण करणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचं अजित पवारांना निमंत्रण, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यासह अयोध्येला जाण्याची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *सोलापूरकरांची चिंता वाढणार, उजनी धरणात केवळ 9 टक्के पाणीसाठा; पाण्याची नासाडी केल्यास कारवाई*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *दिल्ली आणि भोवतालच्या परिसराला भूकंपाचा धक्का, जम्मू काश्मीरमध्येही भूकंपाचा धक्का. भूकंपामुळे भारतात जीवितहानी झाल्याची नोंद नाही.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *मोहाली येथील पहिल्या टी 20 सामन्यात भारताने अफगाणिस्ताचा 6 विकेटनी केला पराभव*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *स्वामी विवेकानंद*स्वामी विवेकानंद (जानेवारी १२, १८६३ - जुलै ४, १९०२) हे भारताचे थोर संत व नेते होते. विवेकानंद यांचे खरे नाव नरेंद्रनाथ दत्त (नरेंद्र, नरेन) असे होते. ते मूळचे बंगालचे रहिवासी होते. ते श्री रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य होते. रामकृष्णांचा संदेश जनमानसांत पोहचवण्यासाठी त्यांनी रामकृष्ण मिशन सुरू केले. जगामध्ये रामकृष्ण मिशनच्या अनेक शाखा आहेत.कलकत्त्यातील सिमलापल्ली (सिमुलिया, उत्तर कोलकाता) येथे जानेवारी १२, १८६३, सोमवारी सकाळी ६:३३:३३ वा. (पौष कृष्ण सप्तमीच्या दिवशी) विवेकानंदांचा जन्म झाला.(जानेवारी १२, १८६३ हा दिवस योगा योगाने मकर संक्रती चा होता .) बाळाचे नाव नरेंद्र ठेवण्यात आले. वडील विश्वनाथ दत्त हे कोलकाता उच्च न्यायालयात (वकील)अॅटर्नी होते. ते सामाजिक आणि धार्मिक बाबीत पुरोगामी विचाराचे आणि दयाळू स्वभावाचे होते. आई भुवनेश्वरी देवी या धार्मिक वृत्तीच्या होत्या. नरेंद्रनाथाच्या विचारसरणीला आकार देण्यात त्यांच्या पालकांचा वाटा होता. नरेन्द्रनाथाला दर्शनशास्त्रे, इतिहास, समाजशास्त्रे, कला, साहित्य इत्यादी अनेक विषयांत रुची आणि गती होती. वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत, भगवद्गीता आदि धार्मिक साहित्यात त्यानी विशेष आवड दाखवली. त्यांना शास्त्रीय संगीताची देखील जाण होती आणि त्यांनी बेनी गुप्ता आणि अहमद खान या उस्तादांकडून गायन आणि वादनाचे रीतसर शिक्षणही घेतले. किशोरावस्थेपासूनच त्यांनी व्यायाम, खेळ आदी उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेई. जुनाट अंधश्रद्धा आणि जात्याधारित भेदभाव यांच्या वैधतेसंबंधी त्यानी लहान वयातच प्रश्न उपस्थित केले होते आणि सारासार विचार आणि व्यवहारी दृष्टिकोण यांचा आधार नसलेली कुठलीही गोष्ट स्वीकारण्यास नकार दिला होता. विवेकानंद मित्र परिवारात प्रिय होते, त्यांचे मित्र त्यांना बिले या नावाने हाक मारत तर त्यांचे गुरु नोरेन या शब्दाने. त्यांना वाचन, व्यायाम, कुस्ती, मुष्टियुद्ध, पोहणे, होडी वल्हवणे, घोडेस्वारी, लाठीयुद्ध, गायन आणि वादन इ. छंद होते.सौजन्य :- इंटरनेट••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाही, भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *किर्गिस्तानचे राष्ट्रीय चिन्ह* म्हणून नुकतेच कोणत्या प्राण्याला घोषित करण्यात आले आहे ?२) पावसाळ्यात वीज पडून जिवीत हानी होऊ नये यासाठी उपाययोजना म्हणून भारत सरकारने कोणते ॲप तयार केले आहे ?३) महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसूबाई ( १६४६ मी. ) कोणत्या जिल्ह्यात आहे ?४) महात्मा फुलेंनी स्थापन केलेल्या 'सत्यशोधक समाजाच्या स्थापने'ला किती वर्षे पूर्ण झाली ?५) पृथ्वी जेव्हा सूर्याच्या सर्वात जवळ असते, त्या स्थितीस काय म्हटले जाते ? *उत्तरे :-* १) हिम बिबट्या २) दामिनी ॲप ३) अहमदनगर ४) १५० वर्षे ५) पेरीहेलिऑन*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 सुधाकर थडके, सहशिक्षक अध्यक्ष, सहकारी पतपेढी, नांदेड👤 डी. बी. शेख, लोहा👤 कन्हैया भांडारकर, गोंदिया👤 रत्नाकर जोशी, साहित्यिक, जिंतूर👤 सुरेश गभाले👤 भारत राठोड👤 नागनाथ भिडे👤 गणेश पाटील भुतावळे👤 अरशद शेख👤 नरेश परकोटवार👤 अमरदीप वाघमारे👤 राहुल दुबे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अहंतागुणे नीति सांडी विवेकी।अनीतीबळे श्लाघ्यता सर्व लोकी॥परी अंतरी अर्वही साक्ष येते।प्रमाणांतरे बुद्धि सांडूनि जाते॥१६२॥सरळ अर्थ :- ज्ञानी माणसे आपल्या अहंकारापोटी कधीच नियम-कायदे पाळत नाहीत.नियमांच्या विरुद्ध जबरदस्तीने केलेले काम थोड्या काळासाठी चांगले वाटते पण आतून सत्य न समजल्यामुळे बुद्धी भ्रष्ट होते. त्यामुळे सत्य ओळखणे अत्यंत आवश्यक आहे. त्याच वेळी, सत्याच्या मार्गावर चालणे चांगले आहे.।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••विसर त्यांचा पडायला नको ज्यांनी स्वतः साठी न जगता इतरांसाठी जगून दाखविले. व जे स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी आपला वापर करून धोका देतात त्यांच्या आठवणीत कधीच वेळ वाया घालवू नये,दु:खी होऊ नये.आठवण त्यांची काढावे ज्यांनी जगायला शिकवले कारण खऱ्या अर्थाने तेच मानवी जीवनाचे उद्धारकर्ते होते. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *बुझणारा घोडा* एका घोड्याला आपल्याच सावलीत बुझण्याची सवय होती. ही सवय जावी म्हणून त्याच्या स्वाराने बराच प्रयत्न केला. शेवटी काटेरी लगाम घालून पाहिला, पण तरीही त्याची सवय जाईना. तेव्हा तो स्वार घोड्याला म्हणाला, 'मूर्खा, सावली म्हणजे तुझीच सावली. तुझ्या शरीरातून प्रकाश आरपार जात नाही म्हणून सावली पडते. सावलीला दात नाहीत; पंजे नाहीत अन् तुझ्यासारख्याच्या आडही ती येऊ शकत नाही, तर मग तू तिला भितोस का?' घोड्याने उत्तर दिले, 'अहो कोणी कितीही मोठा झाला तरी त्याला कशाना कशाची तरी भीती वाटतेच. तुम्ही माणसं स्वप्नात भीता किंवा अंधारात एखाद्या लाकड्याच्या ओंडक्याला पाहून घाबरता ते काय म्हणून ? तिथे तरी तुमच्या कल्पनेशिवाय तुम्हाला घाबरवणारं कोणी असतं काम ?'*तात्पर्य* : - मी हसे लोकांना आणि शेंबूड माझ्या नाकाला•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment