✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 11 जानेवारी 2024💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2017/09/blog-post_12.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील ११ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००१:एस.पी.भरुचा यांनी भारताचे ३० वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.**२०००:छत्तीसगड उच्च न्यायालयाची स्थापना**१९९९:’कमाल जमीनधारणा कायदा’ रद्द करणारा वटहुकूम केंद्र सरकारकडून जारी**१९८०:बुद्धिबळाच्या खेळात नायजेल शॉर्ट वयाच्या १४ व्या वर्षी जगातील सर्वात लहान ईंटरनॅशनल मास्टर झाला.**१९७२:पूर्व पाकिस्तानचे बांगला देश असे नामकरण करण्यात आले.**१९६६:गुलजारीलाल नंदा यांनी भारताचे हंगामी पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारला.**१९४२:दुसरे महायुद्ध - जपानी फौजांनी कुआलालंपूर जिंकले**१९२२:मधुमेहावर उपचार करण्यासाठी प्रथमच इन्सुलिनचा वापर करण्यात आला.**१७८७:विल्यम हर्षेल याने ’टिटानिया’ या युरेनसच्या सर्वात मोठ्या चंद्राचा शोध लावला. त्याच दिवशी त्याने ’ओबेरॉन’ या युरेनसच्या दुसर्या मोठ्या चंद्राचाही शोध लावला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९२:डॉ.मयूर बंडू लहाणे-- लेखक* *१९७९:डॉ.रेणुका शरद बोकारे-- लेखिका, संपादिका* *१९७४:प्रा.डॉ.संभाजी व्यंकटराव पाटील-- लेखक* *१९७३:राहुल द्रविड_भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार,मुख्य प्रशिक्षक,उत्कृष्ट फलंदाज**१९६७:मधुकर गणपतराव कोटनाके-- कवी**१९६६:लक्ष्मण शंकर हेंबाडे-- कवी* *१९६५:धनंजय लक्ष्मीकांतराव चिंचोलीकर-- स्तंभलेखक,कथा,कादंबरी, नाटक या वाड:मय प्रकारात लेखन* *१९६१:राधिका मिलिंद राजंदेकर -- कवयित्री* *१९५५:आशा खाडिलकर – उपशास्त्रीय व नाट्यसंगीत गायिका**१९५४:चद्रकांत भोंजाळ-- प्रसिद्ध मराठी लेखक आणि जेष्ठ अनुवादक**१९५०:अरुण गुलाबराव डावखरे -- लेखक,अनुवादक* *१९४४:शिबू सोरेन – झारखंडचे ७ वे मुख्यमंत्री**१९४२:प्रा.डॉ.यशवंत देशपांडे-- विज्ञान कथा लेखक**१९३६:डॉ.नरसिंह महादेव जोशी-- प्रसिद्ध मराठी शिक्षणतज्ज्ञ आणि साहित्यिक**१९२८:पं.अरविंद रामचंद्र गजेंद्रगडकर-- बासरीवादक,लेखक(मृत्यू:३० मे २०१०)**१९२५:श्री.के.केळकर-- लेखक (मृत्यू:१० जानेवारी १९९६)**१८९८:विष्णू सखाराम खांडेकर -- सुप्रसिद्ध मराठी कादंबरीकार,ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित(ययाति १९७४ )(मृत्यू:२ सप्टेंबर, १९७६)**१८५९:लॉर्ड कर्झन – ब्रिटिश मुत्सद्दी आणि भारताचे व्हॉइसराय (मृत्यू:२० मार्च १९२५)**१८५८:श्रीधर पाठक – हिन्दी कवी,लखनौ येथे भरलेल्या पाचव्या हिन्दी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (मृत्यू:१३ सप्टेंबर १९२६)**१८१५:जॉन ए.मॅकडोनाल्ड – कॅनडाचे पहिले पंतप्रधान (मृत्यू:६ जून १८९१)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२१:डाॅ जुल्फी शेख--संत साहित्याच्या अभ्यासिका,संवेदनशील कवयित्री डी.लिट.पदवीने संन्मानीत (नागपूर विद्यापीठ)(जन्म:७ मे १९५४)**२००८:य.दि.फडके – लेखक व इतिहाससंशोधक (जन्म:३ जानेवारी १९३१)**२००८:सर एडमंड हिलरी – माउंट एव्हरेस्टवर सर्वप्रथम चढाई करणारे न्यूझीलंडचे गिर्यारोहक (जन्म:२० जुलै १९१९)**१९९७:भबतोष दत्ता – अर्थतज्ञ (जन्म:२१ फेब्रुवारी १९११)**१९६६:स्वतंत्र भारताचे तिसरे पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांचे ताश्कंद येथे निधन झाले. त्यांना मरणोत्तर ’भारतरत्न’ सन्मानाने गौरविण्यात आले होते.(जन्म:२ आक्टोबर १९०४)**१९६४:शांताराम गोपाळ गुप्ते--कादंबरीकार, नाटककार (जन्म:१९०७)**१९५४:सर जॉन सायमन – स्वातंत्र्यपूर्व काळात भारताला राजकीय सुधारणा देण्यासाठी नेमलेल्या 'सायमन कमिशन’ या आयोगाचे अध्यक्ष.जे पुढे इंग्लंडचे पंतप्रधान झाले. (जन्म:२८ फेब्रुवारी १८७३)**१९२८:थॉमस हार्डी – इंग्लिश लेखक आणि कवी (जन्म:२ जून १८४०)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*शिक्षक आनंदी तर मुले आनंदी*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *शिंदे गट हीच खरी शिवसेना- राहुल नार्वेकरांचा ऐतिहासिक निकाल, ठाकरे गटाला मोठा धक्का*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सत्यशोधक हा मराठी सिनेमा करमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेला मणिपूरमध्ये परवानगी नाकारली, इंफाळमधूनच सुरुवात करणार, काँग्रेस भूमिकेवर ठाम*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *अयोध्येतील राम मंदिराच्या कार्यक्रमात काँग्रेस सहभागी होणार नाही, भाजप आणि RSS चा इव्हेंट असल्याचा आरोप*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *नांदेड :- दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या माळेगाव यात्रेस उत्साहात प्रारंभ*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत सासवड आणि लोणावळा नगरपरिषदेची बाजी, राष्ट्रपतींच्या हस्ते होणार गौरव*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील पहिल्या टी-20 सामन्यात स्टार खेळाडू विराट कोहली आज खेळणार नाही असे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*विष्णू सखाराम खांडेकर*(जन्म : ११ जानेवारी १८९८ - मृत्यू ०२ सप्टेंबर १९७६) हे मराठी कादंबरीकार, लेखक होते.इ.स. १९२० साली खांडेकरांनी महाराष्ट्रातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडे या गावी शिक्षकी पेशास सुरुवात केली. तेथे त्यांनी इ.स. १९३८ पर्यंत काम केले. ह्या काळात मिळालेल्या फावल्या वेळेत त्यांनी मराठी साहित्याच्या निरनिराळ्या प्रकारांमध्ये लेखन केलेआपल्या आयुष्यात त्यांनी १६ कादंबर्या, ६ नाटके, जवळपास २५० ललितलेख, १०० निबंध आणि कित्येक टीकाटिपण्या लिहिल्यावि.स. खांडेकर हे सोलापूरला १९४१ साली भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.साहित्य अकादमी पुरस्कार (१९६०) - ययाति (कादंबरी)पद्मभूषण पुरस्कार (१९६८)ज्ञानपीठ पुरस्कार (१९७४) - ययाति कादंबरीसाठीकोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाने त्यांना डी. लिट. (डॉक्टर ऑफ लिटरेचर) बहाल केली.सौजन्य : इंटरनेट*संकलन :- श्याम ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" मनुष्या जवळची नम्रता संपली कि, त्याच्या जवळची माणुसकीच संपली म्हणून समजावे. "**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारतातील *पहिल्या मुस्लिम महिला शिक्षिका* कोण ?२) नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्याशी जोडणाऱ्या सेतूचे नाव काय आहे ?३) 'ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स - २०२३' मध्ये प्रथम तीन देश कोणते ?४) सावित्रीबाई फुले यांनी कोणत्या वर्षी महिलांसाठी देशातील पहिली शाळा स्थापन केली ?५) ऑक्झिजनशिवाय माऊंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली भारतीय महिला कोण ? *उत्तरे :-* १) फातिमा शेख २) अटल बिहारी वाजपेयी शिवडी - नाव्हासेवा अटल सेतू ३) स्वित्झर्लंड, स्वीडन, अमेरिका ४) सन १८४८ ५) पियाली बसाक *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 बालाजी पुलकंठवार, सहशिक्षक, धर्माबाद👤 सिध्देश्वर मोकमपल्ले👤 हणमंत पांडे👤 राहूल ढगे, सहशिक्षक👤 लोकेश येलगंटवार👤 साई यादव, येवती👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अहंतागुणे सर्वही दुःख होते।मुखे बोलिले ज्ञान ते व्यर्थ जाते॥सुखी राहता सर्वही सूख आहे।अहंता तुझी तुंचि शोधुन पाहे॥१६१॥सरळ अर्थ - अहंकारामुळे माणसाला सर्वत्र दु:खच मिळते कारण अहंकारी माणूस काय बोलतो याकडेही कोणी लक्ष देत नाही. आनंदी आणि समाधानी वृत्तीने जगल्याने सर्वत्र आनंद आणि आनंद मिळतो. म्हणून मनुष्याने स्वतःचा अहंकारी स्वभाव शोधून तो सोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे.।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एखाद्याने केलेला त्याग, समर्पण, संघर्ष, वेदना, दु:ख,तळमळ आणि जिव्हाळा हे सर्व अनमोल संपत्ती आहेत.या अंतर्गत गुणांना ओळखणे खूप कठीण असते.या अंतर्गत गुणांना जो ओळखत असतो. तीच व्यक्ती सामाजिक संबंध वृद्धिंगत करु शकते. त्यासाठी त्याच प्रकारची दृष्टी आपल्यात असणे आवश्यक आहे. एवढेच नाही तर अशांना समजून घेण्यासाठी आणि ओळखण्यासाठी आल्यात सुद्धा त्याच प्रकारची संपत्ती असणे आवश्यक आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*वानर व कोल्हा* एकदा एक 🐒वानर व कोल्हा 🐕यांची अरण्यात🌳☘🌿🌱🍃🍀🌳🌴🍂🍁☘🌿🌱🌴🌳🌳 गाठ पडली तेव्हा वानर🐒 कोल्ह्याला म्हणाला, 'अरे, तुझ्या झुपकेदार शेपटाचा काही भाग तू मला देशील तर तो मी लावून वार्यापासून माझं रक्षण करीन. तुझे शेपूट तुला पुरून उरण्यासारख आहे. नाही तरी तू ते धुळीत मळवतोस. तर त्यातलं थोडं मला दिलस तर तुझी फारशी अडचण होणार नाही अन् माझंही काम होईल. हे ऐकून कोल्हा म्हणाला, 'अरे वानरा, तू म्हणतोस त्याप्रमाणे माझं शेपूट कदाचित मोठं असलं, तरी ते मी जन्मभर असंच धुळीत मळवीन पण त्यातला एक केसही तुला देणार नाही.'तात्पर्य - काही माणसांजवळ बरेच ऐश्वर्य असते पण ते स्वतः त्याचा उपयोग घेण्यास समर्थ नसतात, पण त्यांचा स्वभाव मात्र विलक्षण असतो की, त्या ऐश्वर्याचा ते नाश होऊ देतील पण दुसर्याला कधीही देणार नाहीत.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment