✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 12 फेब्रुवारी 2024💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2019/02/blog-post_7.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील ४३ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* ••••••••••••••••••••••••••••••••*१९९३:एम. एन. वेंकटचलैय्या यांनी भारताचे २५ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.**१९७९:वसंत गोपाळ आपटे यांनी किर्लोस्करवाडी येथून "आपले जग" नावाचे साप्ताहिक सुरू केले**१९७६:पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या हस्ते हडेक्की (केरळ) प्रकल्प देशास अर्पण.**१५०२:लिस्बन, पोर्तुगाल येथून वास्को-द-गामा भारताच्या दुसर्या सफरीवर निघाला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८३:नवनाथ रणखांबे-- कवी,लेखक* *१९८३:राजीव मासरूळकर-- कवी* *१९८०:भाऊसाहेब मिस्तरी(भाऊसाहेब वाल्मीक गवळे)-- कादंबरीकार,स्तंभ लेखन**१९७६:विजय ढाले-- कवी**१९६०:सुरेखा गावंडे -- प्रसिद्ध बालसाहित्यिक,कवयित्री* *१९५७:डॉ.तात्याराव पुंडलिकराव लहाने-- प्रसिद्ध नेत्रचिकित्सक* *१९५६:गिरीश चौक-- लेखक**१९५२:ई.झेड.खोब्रागडे-- निवृत्त सनदी अधिकारी* *१९५०:भास्कर चिंधूजी नंदनवार-- लेखक**१९४९:गुन्डाप्पा विश्वनाथ – शैलीदार फलंदाज**१९४८:डॉ.सुधाकर सोमेश्वर मोगलेवार-- कवी,लेखक**१९४३:सतीश काळसेकर-- मराठी साहित्यातील कवी,संपादक,अनुवादक, लघुनियतकालिकांच्या चळवळीतील अग्रणी कार्यकर्ते(मृत्यू:२४ जुलै २०२१)**१९३९:अजितसिंग चौधरी-- भारतीय शेतकरी नेते,राष्ट्रीय लोक दलाचे संस्थापक(मृत्यू:६ मे २०२१)**१९३४:प्रा.डॉ.शरद काशिनाथ कळणावत-- प्रसिद्ध लेखक,कवी,वक्ते* *१९२९:दत्तात्रेय धोंडोपंत रत्नपारखी-- लेखक* *१९२९:प्राचार्य डॉ.गोपाळ श्रीनिवास बनहट्टी-- लेखक,नाटककार* *१९२०:कृष्ण सिकंद ऊर्फ ’प्राण’ – चित्रपट अभिनेता (मृत्यू:१२ जुलै २०१३)**१९१४:दत्तात्रय कृष्ण पेठे-- कवी* *१८८१:अॅना पाव्हलोव्हा – ’द डाइंग स्वान’ म्हणून प्रसिद्ध असलेली रशियन बॅलेरिना (मृत्यू:२३ जानेवारी १९३१)**१८७६:थुब्तेन ग्यात्सो – १३ वे दलाई लामा (मृत्यू:१७ डिसेंबर १९३३)**१८७१:चार्लस फ्रिअरी तथा दीनबंधू अॅन्ड्र्यूज – इंग्लिश मिशनरी,महात्मा गांधींचे जवळचे मित्र,समाजसेवक आणि भारताच्या स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते (मृत्यू:५ एप्रिल १९४०)**१८२४:मूळशंकर करसनदास तिवारी तथा स्वामी दयानंद सरस्वती – संस्कृत विद्वान आणि आर्य समाजाचे संस्थापक (मृत्यू:३१ आक्टोबर १८८३)**१८०९:चार्ल्स डार्विन – उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडणारे ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ (मृत्यू:१९ एप्रिल १८८२)**१८०९:अब्राहम लिंकन – अमेरिकेचे १६ वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू:१५ एप्रिल १८६५)**१८०४:हेन्रिक लेन्झ – जर्मन भौतिकशास्त्रज (मृत्यू: १० फेब्रुवारी १८६५)**१७४२:बाळाजी जनार्दन भानू उर्फ 'नाना फडणवीस' – पेशव्यांच्या दरबारी असणारे मराठा साम्राज्यातील मुत्सद्दी,पेशवाईतील साडेतीन शहाण्यांपैकी एक (मृत्यू:१३ मार्च १८००)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२२:राहुल बजाज-- बजाज ग्रुप उद्योग समूहाचे चेरमन,माजी राज्यसभा सदस्य,पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित(जन्म:१० जून १९३८)**२०१६:वसंतराव राजूरकर-- ग्वाल्हेर घराण्याचे भारतीय शास्त्रीय संगीत गाणारे मराठी गायक(जन्म:२४ एप्रिल १९३२)**२०१२:प्रा.डॉ.रत्नाकर बापूराव मंचरकर तथा र.बा.मंचरकर-- मराठी साहित्याचे समीक्षक व संत साहित्याचे अभ्यासक(जन्म:६ आक्टोबर १९४३)**२००१:भक्ती बर्वे – अभिनेत्री (जन्म:१० सप्टेंबर १९४८)**२०००:विष्णुअण्णा पाटील – सहकार क्षेत्रातील नामवंत नेते* *१९९८:पद्मा गोळे – सुप्रसिद्ध कवयित्री (जन्म:१० जुलै १९१३)**१८०४:एमॅन्युएल कांट – जर्मन तत्त्ववेत्ता (जन्म:२२ एप्रिल १७२४)**१७९४:पेशवाईतील मुत्सद्दी महादजी शिंदे यांचे वानवडी येथे निधन (जन्म:१७३०)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••महर्षी मार्कंडेय जयंती निमित्ताने प्रासंगिक लेख*महर्षी मार्कंडेय : पद्मशाली समाजाचे कुलदैवत*ब्रह्मदेवाचे मानसपुत्र म्हणजे भृगु महर्षी. या भृगु महर्षी आणि त्यांची पत्नी कयार्थी यांना भार्गवी, धाता आणि विधाता अशी तीन अपत्ये होती. भार्गवी म्हणजे लक्ष्मी ही विष्णूची पत्नी. धाता व अयाती यांना प्राणूडु नावाचा पुत्र होता. तर विधाता आणि नियती यांच्या पुत्राचे नाव होते मृकंड. भगवान शंकराचे परमभक्त असलेले मृकंडला एकही पुत्र नव्हते. त्यांनी पुत्रप्राप्तीसाठी शंकर भगवानची कठोर तपस्या केली. त्यांच्या या कठोर तपश्चर्येला भगवान शंकर प्रसन्न झाले आणि............ पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मध्यप्रदेश मधल्या झाबुआ इथे पंतप्रधानाच्या हस्ते 7300 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पाचं उदघाटन*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *लोकांचं आरोग्य व्यवस्थित राहावं म्हणून केंद्र सरकारने आयुष्यमान भारत ही योजना सुरू - उपराष्ट्रपती*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *नाशिक :- राज्यातील पहिल्या वातानुकूलित बसस्थानकाचे लोकार्पण*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *नांदेड जिल्ह्याला गारपीटीचा तडाखा, हाता तोंडाशी आलेल्या रब्बी पिकांचे मोठे नुकसान, पंचनामे करून तातडीने मदत करण्याची शेतकऱ्यांकडून मागणी.*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *नमो महारोजगार मेळाव्यासाठी समन्वयाने काम करा : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे आवाहन ; विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा बैठक*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *तलाठी संघटनेचे अधिवेशन : तलाठ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन सकारात्मक ; महसूल मंत्री विखे पाटील यांची ग्वाही*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *U19 World Cup - ऑस्ट्रेलियाने भारताला 79 धावांनी हरवून विश्वकप जिंकला*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🍖 *तुटलेली हाडं परत पूर्वीसारखी कशी होतात ?* 🍖 ***********************'उजव्या हाताच्या करंगळीचं फ्रॅक्चर झाल्यामुळे अनिल कुंबळेची कसोटीतून माघार' किंवा 'मनगटाचं फ्रॅक्चर झाल्यामुळे बोरिस बेकर विम्बल्डन खेळू शकणार नाही', अश्या बातम्या आपण वर्तमानपत्रांमधून वाचतो, त्यावेळी वाटतं की संपलं त्या खेळाडूंची कारकीर्द संपली. एवढंच नाही तर आता आयुष्यभर त्या तुटलेल्या अवयवानिशीच त्याला वावरावे लागणार आहे. पण नाही. दोन कसोटीनंतर अनिल कुंबळे आपल्या फिरकीची जादू घेऊन परत अवतरतो आणि बोरिस बेकर आपल्या झंझावाती सर्व्हिसेसने प्रतिस्पर्धी खेळाडूंना सळो की पळो करून सोडतो. मग साहजिकच प्रश्न पडतो की खरी जादू अनिल कुंबळेंनं नव्हे तर त्याच्या त्या मोडलेल्या हाडावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी केली तर केली नाही ?पण नाही जादू कोणी केलीच असेल तर ती निसर्गानं केली आहे. निसर्गानेच तुटलेली हाडं परत सांधण्याची व्यवस्था मुळातच करून ठेवली आहे. हाड टणक असते. त्यामुळे ते नखांसारखे निर्जीव आहे की काय असं वाटतं. पण तसं नाही. इतर कोणत्याही अवयवासारखा हाही चैतन्यानं सळसळणारा अवयव आहे. जेव्हा एखादं हाड तुटतं त्यावेळी त्याच्यातून जाणाऱ्या रक्तवाहिन्याही तुटतात. त्यांच्यामधून रक्त बाहेर सांडू लागतं. पण इतर जखमांप्रमाणेच तेही गोठतं आणि त्या ठिकाणी फ्रॅक्चर हॅमेटोमा तयार होतो. तो हाडाला स्थिर करून त्यांची तुटलेली टोकं परत सांधतील अशा जुळणीच्या स्थितीत आणून ठेवतो. गुठळी झाल्यामुळे त्या टोकांच्या वेड्यावाकड्या झालेल्या भागाला रक्तपुरवठा होत नाही. त्यामुळे ती झिजून जातात आणि परत सांधण्यासाठी गुळगुळीत पृष्ठभाग तयार होतो. त्या भागात नवीन रक्तवाहिन्या प्रस्थापित केल्या जातात. काही दिवसांनंतर तिथल्या पेशी नवीन स्नायूंचे धागे तसंच कुर्चा तयार करतो. त्यामुळे ती तुटलेली टोकं एकमेकांना बांधली जाऊ शकतात. त्या टोकांमध्ये तयार झालेली फट भरून काढण्याच्या दिशेने नवीन पेशी व उती तयार होऊ लागतात. आता आॅस्टीअोब्लास्ट या पेशी कामाला लागतात आणि त्या तिथं तयार झालेल्या उतीचं हाडांच्या पेशींमध्ये रूपांतर करू लागतात. थोडक्यात नवीन हाड तयार व्हायला लागतं. आता आजूबाजूच्या मांसल भागात आपलं स्थान पक्कं करण्याच्या दिशेने हाड कार्यरत होतं. मृत पेशीच आतल्या आत शोषल्या जातात आणि नवीन पेशी टणक होऊन दोन टोकांमधली फट भरून काढतात. हाड नव्यानं सांधलं जातं. कॅल्शियम आणि फॉस्फरसचा नव्यांनं पाझर होऊन त्या नवीन हाडाला पूर्वीचीच ताकद दिली जाते. बोरीस बेकरचे मनगट परत त्याच जोमाने चेंडू टोलवायला तयार होते.*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" जी व्यक्ती तुमच्या चेहऱ्यावर हास्य फुलवू शकते, तीच तुमच्या आयुष्याला अर्थ देऊ शकते."**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) पाण्याशिवाय वर्षभर जीवंत राहू शकणारे प्राणी कोणते ?२) निसर्गातील सफाई कामगार म्हणून ओळखला जाणारा पक्षी कोणता ?३) इतिहासात पहिल्यांदाच कोणत्या वर्षी ५ व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार घोषीत झाले आहे ?४) क्रिकेटच्या तिन्ही प्रकारामध्ये अव्वल स्थान पटकावणारा जसप्रीत बुमराह हा जगातील कितवा वेगवान गोलंदाज ठरला आहे ?५) अंटार्क्टिकावर जाणारी भारतातील पहिली महिला कोण ? *उत्तरे :-* १) विंचू व कासव २) गिधाड ३) वर्ष २०२४ ४) पहिला ५) अदिती पंत*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 भागेश्री देशमुख👤 नवनाथ रणखांबे👤 निलेश पाटील👤 नागनाथ चंदे👤 रविंद्र डुबिले👤 हणमंत गुरुपवार👤 विनोदकुमार भोंग👤 विजयकुमार पवारे👤 अशोक शिलेवाड, पो. पा. येवती👤 सुनील कवडे, कुपटी, माहूर👤 जलील अब्दुल👤 सौ. मनिषा जोशी, विषय शिक्षिका, कन्या शाळा धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मना ना कळे ना ढळे रुप ज्याचे। दुजेवीण तें ध्यान सर्वोत्तमाचे॥ तया खुण ते हीन दृष्टांत पाहे। तेथे संग निःसंग दोन्ही न साहे ॥१९२॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷आजची विचारधारा......*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवन जगत असताना माणसाला अन्न,वस्त्र, निवारा, पाणी, पैसे अशा बऱ्याच आवश्यक असलेल्या वस्तूंची गरज भासत असते. पण सर्वात जास्त अन्नाची व पाण्याची गरज असते. अचानक त्यावेळी कोणी आपुलकीने अन्नाचा ताट हातात देत असेल तर चुकीच्या मार्गाने जाऊन त्या अन्नाचा किंवा अन्न देणाऱ्याचा कधीही अपमान करू नये. कारण एकदा का त्या दोघांचा अपमान झाला की, परत पुन्हा त्याच आपुलकीने तो अन्न,किंवा पाणी मिळेलच असे नाही.म्हणून असे चुकूनही करू नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••" उन्हाळ्याच्या दिवसात, एक सिंह, एका आंब्याच्या थंड छायेत सुस्त निजला होता; तिथे एक उंदीर येतो. तो उंदीर सिंहला खूप त्रास देतो. त्यामुळे जागा होऊन, सिंहने पंजात उंदीरला धरला आणि त्यास आता फाडून टाकणार इतक्यात, त्या उंदराने त्याची प्रार्थना केली, ‘महाराज, आपण थोर, सर्व श्वापदांचे राजे, मी आपल्यापुढे केवळ रंक, माझ्या रक्ताने आपले हात विटाळू नयेत. मला जीवदान दयावे, हेच आपणास उचित आहे.’ ते ऐकून सिंहास त्याची दया आली आणि त्याने त्यास सोडून दिले.पुढे एके दिवशी सिंह अरण्यात फिरत असताना आंब्याच्या झाडाजवळ जातो, त्याच आंब्याजवळ पारध्याने जाळे मांडले होते, त्यात सिंह सापडतो. त्यावेळी त्याने आपले सगळे बळ खर्चून फार धडपड केली. पण त्याची सुटका होईना. तेव्हा तो निराश झाला आणि मोठमोठयाने ओरडू लागला. ती ओरडणं ऐकून तो उंदीर त्या ठिकाणी आला आणि सिंहास म्हणाला, ‘राजा, भिऊ नको, स्वस्थ रहा. ’ इतके बोलून, त्याने आपल्या दातांनी ते जाळे कुरतडले व सिंहाची सुटका केली.*तात्पर्य:-* जे मोठे आहेत त्यांचेही एखादे मोठे काम लहानाच्या हातून, एखादे वेळी होते. यासाठी, कोणास क्षुद्र समजून त्याचा उपहास करू नये किंवा त्यास दुखवू नये. लहानाच्या हातूनही उपकार होऊ शकतात, हे लक्षात ठेवावे. वैभव कायम राहीलच, असा नेम नाही, यासाठी आपल्या चालत्या काळी, मनुष्याने लोकांवर उपकार करून ठेविले, तर पडत्या काळात तेच "•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment