✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 01/01/2020 वार - बुधवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *नवीन वर्ष शुभारंभ* 💥 ठळक घडामोडी :- ● १८६२ - इंडियन पीनल कोड अस्तित्वात आले. 💥 जन्म :- ● १८९२ - महादेव हरिभाई देसाई गांधीवादी कार्यकर्ते. ● १८९४ - सत्येंद्रनाथ बोस भारतीय भौतिकशास्त्रज्ञ. ● १९०२ - कमलाकांत वामन केळकर भारतीय भूवैज्ञानिक. ● १९३६ - राजा राजवाडे साहित्यिक. ● १९४३ - रघुनाथ माशेलकर . 💥 मृत्यू :- ● १७४८ - योहान बर्नोली, स्विस गणितज्ञ. ● १९५५ - शांतिस्वरूप भटनागर भारतीय रसायनशास्त्रज्ञ. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *भाविकांच्या विरोधानंतरही 1 जानेवारीपासून पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात मोबाईल बंदी, मंदिर प्रशासनाकडून मोबाईल ठेवण्यासाठी अडीच हजार लॉकरची व्यवस्था* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी यासह विविध मागणीसाठी येत्या आठ जानेवारीला देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *'कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ परिसरात आज, एक जानेवारी रोजी गर्दी होणार असल्याने कोरेगाव भीमा, सणसवाडी येथील शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात येणार आहेत. मात्र, या भागातील कंपन्या सुरू राहणार आहेत,' असे निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांनी सांगितले.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *सरकारने एनपीआरचा नवा फॉर्म तयार केला आबे. सरकारी सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनपीआरच्या नवीन डेटाबेसमध्ये आधार नंबर, पॅन नंबर, वोटर आयडी नंबरसह जवळपास 7 नवीन घटकांचा समावेश करण्यात आला आहे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *मेट्रोच्या कामासाठी पुण्याच्या शिवाजीनगर बसस्थानकाचे स्थलांतर, शिवाजीनगर बसस्थानक खडकीत हलवल्यानं येथे जाण्यायेण्यासाठी जास्तीचा वेळ खर्ची पडणार आहे. तसेच या स्थानकावर येण्या जाण्याचा खर्चही वाढणार आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *देशाचे नवे लष्करप्रमुख म्हणून मराठमोळ्या मनोज मुकुंद नरवणे यांनी पदभार स्वीकारला, जनरल बिपिन रावत चीफ ऑफ डिफेन्स स्टाफपदावर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *न्यू ईयर सेलिब्रेशननिमित्त माथेरान हाऊसफुल्ल, मिनी ट्रेन सुरू झाल्याने पर्यटकांच्या संख्येत वाढ* ••••••••••••••••••••••••••••••••••••• नववर्षाभिनंदन ! फ्रेश मॉर्निंग बुलेटिनच्या सर्व वाचकांना नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा !!! ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *नवीन वर्ष सुखाचे जावो* मुलांनो, ग्रेगरियन कॅलेंडरनुसार काल सरत्या वर्षाला निरोप देऊन आज आपण नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सज्ज झालो आहोत. ख्रिसमस म्हणजे नाताळाचा सण संपला की, संपूर्ण जगाला नवीन वर्षाची चाहूल लागते. संपूर्ण जगात या नवीन वर्षाचे स्वागत वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. भारतात इंग्रज लोकांनी दीडशे वर्षे राज्य केले आणि जाता ...... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/12/blog-post_31.html      लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃  *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आले वर्ष नवे* ---------------------- सरले सरले वर्ष हे हो जुने स्वागत करूया आले हे वर्ष नवे... पाहू स्वप्ने नवी करू संकल्प नवे प्रयत्न करूया देई यश वर्ष नवे... गोड सदा बोलावे वाईट ना बोलावे मनापासून हेच नवं वर्षात करावे -------------------------------- -अरुण वि.देशपांडे-पुणे. 9850177342 ----------------------------------- *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जेव्हा एखादा मार्ग तुम्ही निवडता तेव्हा तो तुम्ही शेवट पर्यंत चालला पाहीजे.  व्यक्तीगत कारणासाठी त्यापासून दूर जाऊ नये. *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *भारताची राष्ट्रीय मिठाई कोणती ?* जिलेबी 2) *भारतातून चहाची आयात सर्वाधिक कोणता देश करतो ?* इंग्लंड 3) *शिकागो येथे भरलेल्या जागतिक सर्वधर्म परिषदेमध्ये हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व कोणी केले ?* स्वामी विवेकानंद 4) *ब्रह्मपुत्रा नदी बांग्लादेशात कोणत्या नावाने ओळखले जाते ?* जमुना 5) *जगातील सर्वात मोठा धबधबा कोणता ?* एंजल *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 अनिकेत भारती, नांदेड 👤 सुरेश सावंत, साहित्यिक, नांदेड 👤 दिलीप धामणे, साहित्यिक, हिंगोली 👤 संजय नलावडे, साहित्यिक, मुंबई 👤 पांडुरंग कोकुलवार, साहित्यिक, नांदेड 👤 पेंडम पवन, नवीपेट, तेलंगणा 👤 शिवराज पा. गाडीवान, पत्रकार, धर्माबाद 👤 शेख बिस्मिल्ला सोनोशी 👤 उमेश कोकुलवार *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌼 🌼 *_हार्दिक शुभेच्छा !!!_* 🌼 🌼 *'धूर' जसा वातावरणात 'प्रदूषण' करतो तसे 'शब्द'ही जगण्यात प्रदूषण करतात. तेव्हा निरोगी मनाच्या, निरोगी शब्दांच्या शोधात रहाणे, त्यांचा सहवास मिळविणे यात वेळ घालविणे आधिक चांगले. अशावेळी 'चुगलखोर' शब्दांना मूठमाती देणे आधिक चांगले.* *आज 31 डिसेंबरला नववर्षाच्या शुभेच्छा देताना सर्वांना एकच मॅसेज पाठवत आहे... 'मी जर तुमच्याविषयी काही वाईट बोललो असं जर तुम्हाला कुणी सांगितलं, तर मनात ठेवू नका. माझ्याशी 'संवाद' साधा. मला तुमच्याशी 'मैत्री' हवी आहे. शब्दांमुळे आपल्यात अंतर नको......'*        🌟  *_Good Bye -  2017_*  🌟 🌟💥 *_WELCOME - 2018_*💥🌟   *_नववर्ष मैत्रीपूर्ण, आनंददायी जावो !!!_*      *_मन:पुर्वक हार्दिक शुभेच्छा !!!_* 💐           *_--संजय नलावडे आणि परिवार_*    💥💥💥💥💥💥💥💥💥          📱 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो* *आज 2020 मध्ये आपण पदार्पण करीत आहोत.* *या संपूर्ण एका वर्षासाठी आजपासून नवीन संकल्प करा. ते डायरीत लिहून ठेवा. मित्र परिवारात जाहीर करा. वारंवार ते संकल्प आठवा* *काही संकल्प* १) प्रथम स्वतः वर प्रेम करा. २) वडिलधा-यांना मान द्या. ३) बचत करायला शिका. ४) निरोगी राहण्यासाठी प्रयत्न करा. ५) चांगला मित्र परिवार वाढवा. ६) व्यसनांपासून दूर रहा. ७) भक्तीमार्ग अवलंबा. ८) समाजसेवा करा. ९) आपल्या मागे आपली आठवण काढणारी माणसे आहेत, याची सदैव जाणीव ठेवा. १०) सल्ला घेऊनच प्रत्येक काम करा. ११) आजच्या तरूण पणावरच उद्याचे वृद्धत्व अवलंबून आहे. हे विसरू नका. १२) मागा म्हणजे मिळेल, आणि शोधा म्हणजे सापडेल. या प्रमाणे वागल्यास पुढेच जाल. १३) यशोगाथांचे वाचन करा. १४) नैसर्गिक जीवन जगा. १५) आयुष्य फार लहान आहे. प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. आदर्श जीवन जगण्यासाठी जरुर वाचा.. 💎1) चूक झाली तर मान्य करा. 💎2) समोरच्याचे मत विचारात घ्या. 💎3) चांगल्या कामाची स्तुती करा. 💎4) आभार मानायला विसरू नका. 💎5) मी ऐवजी आपण शब्द प्रयोग करा. 💎6) सतत हसतमुख रहा. 💎7) दुसऱ्यातील चांगले गुण ओळखा. 💎8) कुणाच्याही व्यंगावर हसु नका. 💎9) स्वतःची कुवत व ताकद ओळखा. 💎10) टिका तक्रार यात वेळ घालवु नका. 💎11) कृती पुर्व विचार करा. 💎12) लोकांच्या खांद्यावर अपयश लादू नका. 💎13) क्रोधावर नियंत्रण ठेवा. 💎14) मैत्री भावना कायम मनी राहु द्या. 💎15) नेहमी सत्याची कास धरा. 💎16) इतरांना चांगली वागणूक द्या. 💎17) सुखाचा गुणाकार व दुखाचा भागाकार करा. 💎18) विचार करून बोला. 💎19) वाहन चालवताना स्वतः ची काळजी घ्या 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 *संकलन -:* *अशोक लक्ष्मण कुमावत.* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 🙏 *निवास* :-समर्थ,त्रिकोणी बंगला, अमृतधाम, पंचवटी, नासिक 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• प्रत्येकाने असा संकल्प केला पाहिजे की,आपल्या जीवनात कोणत्याही बाबतीत हार मानायची नाही किंवा माघार घ्यायची नाही. कारण आपण ज्या गोष्टी साध्य करणार आहोत त्या गोष्टींसाठी मनात जिद्द ठेवून आणि यश मिळविण्याचे लक्ष आपल्यासमोर ठेवून समोर येणा-या आव्हानाला प्रयत्नाने आणि त्या प्रयत्नामध्ये सातत्याने साध्य करण्यासाठी सज्ज झालात तर यश हे तुमच्यापासून कधीच दूर जात नाही.तुमच्या मनात हारण्याचीदेखील भावना स्पर्श करणार नाही. सदैव तुम्ही दिवसेंदिवस यशाकडेच मार्गक्रमण करत राहणार.पण तुमच्या मनाचा थोडाजरी आत्मविश्र्वास कमी झाला तरी तुमच्या यशस्वी जीवनामध्ये बाधा निर्माण करुन तुम्हाला तुम्हीच अपयशाला कारणीभूत ठरु शकाल हे मात्र नक्कीच. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *एकीचे बळ* एका वृद्धाने सदान्- कदा भांडणार्‍या आपल्या मुलांना हातभर लांबीची एकेक काठी मोडायला सांगणे एक गृहस्थ म्हातारपणामुळे बराच थकला होता. आयुष्यात चांगली कमाई करून आणि स्वत: चांगले जीवन जगूनसुद्धा त्याच्या पाच मुलांमध्ये सदान्-कदा चालणार्‍या भांडणांमुळे तो दु:खी होई. त्याने आपल्या मुलांना बराच उपदेश केला; पण पालथ्या घडावर पाणी. एके दिवशी त्याने आपल्या पाचही मुलांना प्रत्येकी हातभर लांबीची एकेक काठी घेऊन यायला सांगितले. त्याप्रमाणे ती मुले एकेक काठी घेऊन आली. त्या गृहस्थाने त्यांच्यापैकी प्रत्येकाला आपापली काठी मोडण्यास सांगितले. वडिलांनी सांगितलेली ती गोष्ट प्रत्येक मुलाने लगेचच करून दाखवली. वडिलांनी पाच काठ्यांची जुडी करून प्रत्येकाला ती मोडायला सांगितल्यावर एकालाही ती मोडता न येणे पुन्हा त्या गृहस्थाने त्या मुलांना तशाच प्रकारची एकेक काठी घेऊन यायला सांगितले. पाच जणांनी पाच काठ्या आणून वडिलांपुढे ठेवल्या. वडिलांनी त्या पाच काठ्यांची एका दोरीने मोळी बांधली आणि प्रत्येकाला ती मोडायला सांगितली. पाच काठ्या एकत्र असलेली ती मोळी आपल्या पाच मुलांपैकी कुणालाच मोडता येत नसल्याचे पाहून तो गृहस्थ त्यांना म्हणाला, बघितलंत ना ? एकीचे बळ किती असते ते ? वडील एवढेच बोलले; पण ते सूज्ञ मुलगे समजायचे ते समजले. तेव्हापासून एकजुटीने वागू लागले.संघटित राहून केलेल्या कार्यास यश नक्कीच प्राप्त होते. तात्पर्यः एकीचे बळ फार मोलाचे असते. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~

*नवप्रेरणा* नवप्रेरणा जीवनी आली आनंदाचे क्षण पुलकीत झाले विसावल्या त्या क्षणाला विसरून सारे पुढे गेले अंतःकरणाचा पुलकीत क्षणाचा घेऊया आपण मागोवा रे उणेदुणे सोडून सारे विसरून त्याला जाऊयारे काळाचा वाहत्या ओघाचे आपण सारे आहोत भागीदार आयुष्याचा क्षणाक्षणाचा हिशेब मग आपण कसा ठेवणार? सर्वांनी द्यावी इतकी मायाआणि स्नेहमय छाया वैरत्वाचा वैरत्वाची प्रेमाने पालटुया आपणरे काया सरलेल्या आयुष्याचे क्षण नाही आपण मोजायचे आणि उरलेल्या आयुष्यात मनात माञ घर करुन राहायचे नवप्रेरणेने जीवन पुढील जगायचे,सुखदुःखाचे धागेदोरे मोजत नाही बसायचे हसतखेळत जीवन आपले छानसे रंगतदार करायचे. 💐💐💐💐💐💐 *सर्वांना नुतन वर्षाचा हार्दिक स्नेहमय शुभकामना*💐💐💐 〰〰〰〰〰〰 ✍ प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.

वर्षे सरताना आठवणीचा शिदोरीने भरून गेले माझे मन वर्षे सरतानाही घेईन मागोवा नाही जातील त्या विसरून 〰〰〰〰〰〰

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 31/12/2019 वार - मंगळवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••     *वर्षातील शेवटचा दिवस* 💥 ठळक घडामोडी :-  ● १६००: ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीची स्थापना. 💥 जन्म :- ● १८७१: आधुनिक भारतीय व्यायामविद्येचे प्रवर्तक गजानन यशवंत ताम्हणे तथा माणिकराव ● १९१०: हिन्दुस्तानी शास्त्रीय गायक पं. मल्लिकार्जुन मन्सूर ● १९२५: भारतीय लेखक श्री लाल शुक्ला ● १९३४: भारतीय लेखक, कवी आणि विद्वान अमीर मुहम्मद अकरम अववान ● १९३७: वेल्श अभिनेता अँथनी हॉपकिन्स  💥 मृत्यू :-  ● १९२६: इतिहासाचार्य वि. का. राजवाडे ● १९९७: स्वरराज छोटा गंधर्व *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *महाविकास आघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्ताराचा शपथविधी सोहळा विधिमंडळ परिसरात संपन्न झाला. एकूण ३६ आमदारांना राज्यपालांनी पद आणि गोपनियतेची शपथ दिली. अजित पवार, अशोक चव्हाण, दिलीप वळसे पाटील, आदित्य ठाकरे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यासह २६ आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची तर दहा आमदारांनी राज्यमंत्रिपदाची घेतली शपथ* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार यांची निवड होताच काटेवाडीत आनंदाला उधाण गुलालाची उधळण , फटाक्याची आताषबाजी करत आनंदोत्सव साजरा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *दोन लाखांवरच्या शेतकरी कर्जदारांसाठी कर्जमाफीची नवी योजना आणणार तर, नियमित कर्जफेड करणाऱ्यांसाठीही विशेष योजना राबवणार असल्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *बिपीन रावत भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ, केंद्र सरकारकडून घोषणा, लष्करप्रमुखपदावरून रावत आज निवृत्त होणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *कोरेगाव भीमा येथे 1 जानेवारीच्या कार्यक्रमासाठी पोलिसांचा 'मास्टर प्लान', पोलिसांकडून 250 व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप्सना नोटीस तर फेसबुकवरून 12 पेजेस डिलीट* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *मुंबईतून तब्बल 26 खासगी रेल्वे धावणार, रेल्वेला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी रेल्वे मंत्रालयाचा प्रयत्न, 10 ते 15 दिवसात खासगी रेल्वेसाठी निविदा निघणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पुसेसावळी (खटाव) शाखेत रविवारी अज्ञात व्यक्तींनी धाडसी दरोडा टाकला. यामध्ये बँकेतील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा सुमारे १ कोटी ६५ लाख ९६ हजार १५९ रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या घटनेमुळे सातारा आणि सांगली जिल्हा परिसरात एकच खळबळ उडाली आहे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  *स्मार्टफोनचा विळखा, वेळीच ओळखा* अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. पण कालांतराने या मूलभूत गरजामध्ये अजून कांही वस्तूची वाढ होत गेली त्यात प्रामुख्याने मोबाईलचा समावेश करणे अगत्याचे आहे. आज माणसाला एक वेळ अन्न, वस्त्र किंवा निवारा यांची कमतरता असेल तर चालून जाईल मात्र खिशात मोबाईल नसेल तर ती व्यक्ती जिवंत राहू ......... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_22.html       लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *मुरमान्स्कचे बंदर* 📙 जगातील सर्वात उत्तरेकडचे बंदर म्हणजे मुरमान्स्कचे बंदर. रशियाच्या उत्तरेकडच्या भागातील बव्हंशी भाग कायमचा गोठलेला असतो. विशेषत: हिवाळ्यात तर विचारायलाच नको. बॅरेंट्स समुद्रातील कोला खाडीजवळील एक भाग मात्र तेथील समुद्रप्रवाहामुळे बाराही महिने गोठतच नाही. संपूर्ण उत्तरेकडील समुद्राचे निरीक्षण करताना हा न गोठणारा बिंदू शोधून काढला तो दुसर्‍या निकोलस झारने. १९१६ साली बंदराची जागा नक्की केली जाऊन बंदर उभारणीसाठी तंत्रज्ञ तेथे पाठवले गेले. या शेवटच्या झारला भूगोल व विज्ञान दोन्हींची विलक्षण जाण होती. देशाला बारमाही बंदर हवेच, या कल्पनेने त्याला पूर्ण झपाटले होते. त्यातूनच या बंदराची उभारणी त्याने सुरू केली. मात्र बंदर पूर्ण होण्यापूर्वीच त्याची सत्ता जाऊन क्रूर हत्या झाली. १९१६ साली बंदरबांधणी झाली. त्या वेळी जेमतेम लाकडी घरातून उभारले गेलेले छोटेसे गाव आज आता मोठे शहर झाले आहे. सहा लाख वस्तीचे परिपूर्ण नांदते, रसरसते शहर ही सुद्धा या टोकाच्या हवामानातील एक वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणावी लागेल. झारची सत्ता गेली, तरी बंदर मोठ्या चिकाटीने उभे राहिले. ६९ अंश उत्तर अक्षांश व ३३ अंश पुर्व रेखांशांवर हे बंदर उभे आहे. आसपासचे वातावरण बहुधा वर्षभर शून्याच्या आसपास असते. रात्रीच्या वेळी उणे पंधरा ते उणे तीस सेंटिग्रेड यादरम्यान ते खाली जाते. आर्क्टिक प्रदेशातील झोंबरे वारे सतत वाहत असतातच. नोव्हेंबर महिन्यात इथला सूर्य शेवटचा मावळतो, तो एकदम संक्रांतीनंतरच उगवतो. प्रत्यक्ष बंदराच्या आसपास समुद्र जरी गोठत नसला तरी थोडा लांबचा टप्पा क्वचित गोठू लागतो. बंदरातील हिमफोड्या नौका ताबडतोब त्या दिशेने जाऊन रस्ते मोकळे करून देतात. अन्नधान्य, इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा बाहेरून आणावा लागतो. पण मुरमान्स्क येथे दोन गोष्टींची उणीव नाही. खनिज तेल व मासे यांची प्रचंड साठवण व निर्यात या बंदरातून जगभर होते. सैबेरियन भागातून तेलाच्या विहिरीतून काढलेले तेल पाइपातून येथे आणून मग ते ठिकठिकाणी पाठवले जाते. या बंदराची भरभराट याच कारणामुळे होत गेली आहे. दोन्ही महायुद्धांमध्ये रशियाची रसद व नाविक हालचालींची ताकद मुरमान्स्क बंदरातच एकवटली होती. तिथपर्यंत पोहचायची सवय व या हवामानाला तोंड देण्याची ताकद फक्त रशियन नौदलातील नावीकांना होती. रशियाची पश्चिम बाजू जर्मनांनी व्यापली असल्याने या बंदरातून सर्व आवश्यक तो पुरवठा केला गेला व रशिया महायुद्धातून सुखरूप बाहेर येऊ शकला. आज भौगलिक उपयुक्ततेनुसार मुरमान्स्कचे स्थान अढळ बनले आहे, ते युरोपकडून जपानकडे वा जपानकडून युरोपकडे होणाऱ्या मोठ्या जलवाहतुकीमुळे. या वाहतुकीला मार्ग दोन. दक्षिणेकडून किंवा उत्तरेकडून. मध्यंतरी अनेक वर्षे सुवेझचा कालवा बंद होता, तेव्हा ही वाहतूक उत्तरेकडून वळवली गेली होती. आजही जेव्हा जेव्हा मध्य आशियात अस्वस्थपणा येतो, तेव्हा हाच रस्ता वापरला जातो. त्या प्रत्येक वेळी रसदीसाठी, मधल्या मुक्कामासाठी, दुरुस्तीसाठी मुरमान्स्कचा थांबा अटळ राहतो. दोन्ही ध्रुवांवर मानवाने पाय रोवला असला तरी जवळपास तितक्याच दुर्गम हवामानात पाय रोवून बारमाही व्यावहारिक जीवन जगायचे म्हणजे मुरुमान्स्कमध्ये काम करायचे असे म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरू नये. *'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• अडचणी येतात आणि जातात. फक्त जाताना आपलं वय घेऊन जातात. ~ वपु काळे | पार्टनर *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *कलकत्याहून वंदेमातरम हे वृत्तपत्र कोण प्रकाशित करत असे ?* अरविंद घोष 2) *महाराष्ट्राचे वर्तमान उपमुख्यमंत्री कोण आहेत ?* अजित पवार 3) *'माझे सत्याचे प्रयोग' या आत्मकथनात्मक ग्रंथाचे कर्ते कोण ?* महात्मा गांधी 4) *संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीतील नकाराधिकार (व्हीटो) असलेल्या कायमच्या सदस्य राष्ट्राची संख्या किती ?* 5 5) *महाराष्ट्रात शेकरू ( उडणारी खार ) कोठे आढळते ?* भीमाशंकर *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 रामचंद्ररेड्डी सामोड, येताळा 👤 ताहेर पठाण, धर्माबाद 👤 किरण अबुलकोड, समराळा 👤 अमोल बुरुंगुले 👤 शशांक पुलकंठवार 👤 सचिन चव्हाण *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आपल्याला कोणी विचारले, कसे आहात, की आपले उत्तर असते "ठिक आहे, बरं चालले आहे" पण, झकास चालले आहे, मजेत आहोत." असे म्हणणारे कमीच असतात. परंतु शेजा-याचे, परिचिताचे कसे काय चालले आहे, असे विचारले तर मात्र आपले उत्तर बदलते. अर्थात तेही शेजारी किती सख्खे आहेत, परिचित किती जवळचे आहेत वगैरेवर अवलंबून असते. "ते एकदम मजेत आहेत. त्यांना काय धाड भरली आहे." वगैरे उत्तरे आपण देतो. आपल्याबद्दल बोलताना असणारी सावधगिरी इतरांच्या बाबतीत फारशी नसते.* *अर्थात हेही सारे सगळ्यांच्याच बाबतीत खरे असते असे नाही. स्वत:बद्दल गैरसमज असणारी मंडळीही असतात. आपण खूप विद्वान आहोत, खूप यशस्वी आहोत, खूप सुखी आहोत, असे मानणारे लोकही असतात. 'सुख' म्हणजे काय ? एक कल्पना? मनुष्य हा बुद्धिमान प्राणी आहे, असे म्हटले जाते. पण सुखाच्या कल्पनेमागे धावणा-या माणसाला पाहून ते खरे वाटत नाही. समर्थ रामदास म्हणतात--* *"जगी सर्व सुखी असा कोण आहे.* *विचारी मना तूचि शोधूनी पाहे."* *॥ रामकृष्णहरी ॥* 🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀 *संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो* *आज 31 डिसेंबर* *2019* *गेल्या दोन वर्षांपासून मी अखंड सुप्रभात ही लेखन मालिका चालू* *चालू ठेवली आहे.काही* *वाचतात,काही बघतात, काही डिलीट करतात,काही कॉपी पेस्ट करून* *फॉरवर्ड करतात,काही प्रतिसाद देतात,काही आठवण* *_काढतात.काहीही असो पण निमित्ताने भेटतात.जी जी_* *माणसं भेटत गेली, मला आवडली आणि मी ती जोडत गेलो !!* *चला..* *या वर्षाचा हा अखेरचा दिवस माझ्याकडून काही चुक झाली असल्यास क्षमस्व, आणि तुमच्या या प्रेमळ मैत्री व नात्यांबद्दल खुप सारे धन्यवाद..!!* *तुमच्या या मैत्रीची साथ* *अशीच कायम असू द्या...* *नव्या उमेदीने पुन्हा असेच ऋणानुबंध जपू या...* ✳ *आपला सदैव ऋणी* - *अशोक लक्ष्मण कुमावत.* *एम.ए. एम.एड.* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्याप्रमाणे प्रत्येक वस्त्रामध्ये आडवा आणि उभा तागा एकमेकांच्या साथीने मिळून घेतलेला असतो तेव्हा ते वस्त्र किंवा कापड तयार होते.त्याचप्रमाणे संसारातही पती-पत्नी आपल्या संसाररुपी वस्त्राला नेहमी जपत असतात.कुठे जरी फाटले तरी त्या संसाररुपी वस्त्राला आपल्या विचाररुपी सुईने आणि समजदारीच्या दो-याने सतत त्या संसाररुपी वस्त्राला शिवत राहतात.कितीही त्याला ठिगळ लागले तरी चालेल पण त्या ठिगळरुपी,वस्त्ररुपी संसारुपी गोधडी जीवनाच्या शेवटपर्यंत टिकून राहण्यासाठी ही दोन धागे कार्यरत असतात.जर का त्यापैकी एकजरी धागा कमकुवत झाला तर ते संसारुपी वस्त्र वस्त्र म्हणून राहत नाही किंवा त्याला वस्त्रही म्हणत नाही.मग त्याला वापरुन वापरुन राहिलेली चिंधी म्हणून बाजूला फेकून दिली जाते.मग संसाररुपी वस्त्र एकसंघ राहत नाही.संसारात दोघांनाही तेवढाच अधिकार आहे तेवढा वस्त्रामध्ये आडवा आणि उभा धागा एकमेकांत गुंतून आहे. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद...९४२१८३९५९०. 🏠🌷🏠🌷🏠🌷🏠🌷🏠 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *परीस* एक माणूस परीस ( पारस ) शोधायला निघाला.... त्यासाठी रस्त्यात जो दगड येईल तो घ्यायचा, गळ्यातल्या साखळीला लावायचा आणि फेकून द्यायचा असा त्याचा दिनक्रम सुरू झाला दिवस गेले... महिने लोटले... वर्षे सरली.... पण त्याच्या दिनक्रमात बदल झाला नाही ....दगड घ्यायचा, साखळीला लावायचा आणि मग तो फेकून द्यायचा.... शेवटी तो माणूस म्हातारा झाला.... आणि ज्या क्षणि तो आपले शेवटचे श्वास मोजत होता त्यावेळी अचानक त्याचे लक्ष त्याच्या गळ्यातील साखळीकडे गेले... ती साखळी सोन्याची झाली होती..... दगड घ्यायचा, साखळीला लावायचा आणि फेकून द्यायचा या नादात त्याचे साखळीकडे लक्षच गेले नाही.... तात्पर्य: प्रत्येकाच्या जीवनात एकदा तरी परीस येत असतो...कधी आई- वडिलांच्या रूपाने, तर कधी भाऊ-बहीनीच्या नात्याने...तर कधी मित्राच्या मैत्रिणीच्या नात्याने .....तर कधी मार्गदर्शकाच्या नात्याने..... कोणत्या ना कोणत्या रूपात तो आपल्याला भेटत असतो... आणि आपल्यातल्या लोखंडाचे सोने करीत असतो...... आपण जे काही असतो किंवा बनतो त्यात त्यांचा बराच हातभार असतो ....... पण फार कमी लोक या परीसाला ओळखू शकतात. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 30/12/2019 वार - सोमवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~ http://fmbuletin2019.blogspot.com/2019/12/30-2019.html •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    *रिझाल दिन - फिलिपाईन्स* 💥 ठळक घडामोडी :-  ● १८०३ - अंजनगाव सूर्जी येथे शिंदे व इंग्रज यांच्यात तह. ● १९४३ - नेताजी सुभाषचंद्र बोसनी अंदमान आणि निकोबारची राजधानी पोर्ट ब्लेर येथे पहिल्यांदा स्वतंत्र भारताचा ध्वज फडकाविला. ● १९५३ - जगात पहिल्यांदा रंगीत दूरचित्रवाणी संच अमेरिकेत विक्रीला. किंमत - १,१७५ डॉलर. ● १९९६ - आसाममध्ये बोडो अतिरेक्यांनी रेल्वेत बॉम्बस्फोट घडवून आणला. २६ ठार. ● २००४ - भारत व एशियन गटाच्या देशांदरम्यान व्यापारी सहकार्य व शांततेचा करार. 💥 जन्म :- ● १८६५ - रुड्यार्ड किप्लिंग, ब्रिटीश लेखक. मोगलीच्या कथा, कुमाऊंचे मानवभक्षक,जंगल बुक इ. लिहीले.मुंबईत जन्म. ● १८७९ - रमण महर्षी, भारतीय तत्त्वज्ञानी. ● १८८७ - कनैयालाल माणेकलाल मुन्शी, भारतीय स्वातंत्र्यसैनिक, शिक्षणतज्ञ, कायदेतज्ञ, गुजराती साहित्यिक.'भारतीय विद्याभवन' चे संस्थापक. 💥 मृत्यू :- ● १९७१ - विक्रम साराभाई, भारतीय अंतराळतज्ञ. ● १९७४ - शंकरराव देव, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा नेता व महात्मा गांधींचे सहकारी. ● १९९२ - शाहीरतिलक पिराजी रामजी सरनाईक, मराठी शाहीर. ● २००१ - हर्षद महेता, भारतीय शेअर दलाल. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *ठाकरे सरकारचा आज पहिला मंत्रिमंडळ विस्तार, अजित पवार, धनंजय मुंडे, आव्हाड, अशोक चव्हाण शपथ घेण्याची शक्यता, तर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईला 3 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता * ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन यांनी झारखंडचे 11 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्यासोबत काँग्रेसच्या दोन तर आरजेडीच्या एका नेत्याने घेतली शपथ, राहुल गांधी, ममता बॅनर्जींसह अनेक नेते शपथविधीला उपस्थित* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *चित्रपटसृष्टीतील अत्यंत मानाच्या दादासाहेब फाळके पुरस्काराने बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा सन्मान, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला, यावेळी बच्चन कुटुंबीयांसह दिग्गजांची उपस्थिती पाहायला मिळाली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *अर्ध्या देशात गोठवणारी थंडी, दिल्लीसह सहा राज्यांमध्ये रेड अलर्ट जारी तर दिल्लीतील अनेक भागात तापमानाचा पारा 2 अंश सेल्सिअसपेक्षा खाली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *खिलाडी अक्षय कुमार आणि करीनाचा 'गुड न्यूज' चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; पहिल्या दिवशी 17.56 कोटींचा गल्ला तर दोन दिवसांत 39.34 कोटींची कमाई* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *वेगवान गोलंदाज पीटर सिडलचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा, न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटीतील चौथ्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी ड्रेसिंग रूममध्ये सहकाऱ्यांसमोर सिडलने निवृत्तीचा निर्णय जाहीर केला.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *दक्षिण आफ्रिकेने पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात चिवट वृत्तीच्या इंग्लंडला १०७ धावांनी केले पराभूत.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *गरज तेथे मदत करा*      http://nasayeotikar.blogspot.com/2018/05/blog-post_8.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *किरणोपचार म्हणजे काय ?* 📙 ******************************* अनेक पदार्थ किरणोत्सर्गी असतात. यात नैसर्गिक व कृत्रिम पदार्थांचा समावेश होतो. क्ष-किरण, गॅमा किरण, अल्फा, बीटा व प्रोटॉन असे अनेक किरणोत्सर्ग आपल्याला ज्ञात आहेत. अणुबॉम्बसारख्या विध्वंसक अस्त्रामुळे होणाऱ्या दुष्परिणामांमध्ये किरणोत्सर्गाचे दुष्परिणाम खूप महत्त्वाचे असतात. किरणोत्सर्गाच्या प्रभावामुळे रक्ताचा कर्करोग इतर इंद्रियांचे कर्करोग तसेच आयुष्यमान कमी होणे हे तीन महत्त्वाचे दुष्परिणाम होतात. उपरोक्त किरणोत्सर्गांपैकी क्ष-किरण व गॅमा किरण हे शरीरात खोलवर जाऊ शकतात. क्ष-किरणांच्या शरीरातून आरपार जाऊ शकणाऱ्या गुणधर्माचा वापर क्ष-किरण फोटो काढण्यासाठी करतात. हाडे, स्नायू, हवा यांच्या वेगवेगळ्या घनतेमुळे कमी अधिक प्रमाणात क्ष-किरण त्यातून आरपार जाऊ शकतात व क्ष-किरण प्लेटवर पडतात. याचे दृश्य स्वरूप म्हणजे क्ष-किरण फोटो होय. किरणोत्सर्गी आयोडीनचा वापर थायरॉईड ग्रंथीचे कार्य व्यवस्थित चालू आहे वा नाही हे बघण्यासाठी होतो. गॅमा किरणांमुळे शरीरातील पेशी मरतात. या गुणधर्माचा वापर किरणोपचारात केला जातो. एका यंत्राच्या सहाय्याने किरणोत्सर्गी कोबाल्ट धातूपासून निघणारे किरण विशेष नियंत्रणाखाली कर्करोग झालेल्या इंद्रियावर सोडले जातात. हा उपचार गरजेनुसार अनेक वेळा केला जातो. किरणोत्सर्गामुळे कर्करोगाच्या पेशी मरतात. सामान्यत: शस्त्रक्रियेने अथवा औषधी चिकित्सेने कर्करोग बरा होण्यासारखा नसल्यास किरणोपचाराचा वापर करतात. अशा प्रकारे किरणोपचाराने हजारो कर्करोगग्रस्त रुग्णांचे आयुष्य वाढवता येते. *डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित* यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून, मनोविकास प्रकाशन ०२० ६५२६२९५० *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• एका ओघळणाऱ्या थेंबामागे, न गाळलेले हजारो अश्रू असतात. ~ वपु काळे | काही खरं काही खोटं *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया कोणी घातला ?* लॉर्ड मेकॅले 2) *भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान कोणता ?* भारतरत्न 3) *भारताचा सर्वोच्च लष्करी सन्मान कोणता ?* परमवीर चक्र 4) *स्त्रियांना मतदानाचा हक्क सर्वप्रथम कोणत्या देशाने बहाल केला ?* न्यूझीलंड 5) *मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते ?* सेनापती बापट *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 किरण रणवीरकर, साधनव्यक्ती       गटसाधन केंद्र, धर्माबाद 👤 मारोती छपरे 👤 निवृत्ती लोखंडे 👤 राजेश्वर रामपुरे 👤 साहेबराव कांबळे 👤 आनंद यडपालवार 👤 संजय भोसीकर 👤 भारत पाटील सावळे *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *'मोगरा' साक्षात ईश्वराची निर्मिती. मोगऱ्यासारखं फुल म्हणजे ईश्वराने आपल्यावर केलेलं भरभरून प्रेमच जणू.. या मोगऱ्याचे किती वर्णन करावे... मोगरा म्हणजे प्रेम. त्याचा दरवळ म्हणजे आत्मानुभूती. निसर्गाचं सुगंधी वाण. मोगरा फक्त देणं जाणतो. दुसऱ्या फुलांना लाभलेले नेत्रसुखद रंग याला लाभले नसले म्हणून काय झालं? मनमोहक, स्वर्गीय असं सुगंधाचं लेणं याला लाभलेलं आहे, जे तो स्वतःकडे न ठेवता सगळ्यांना मुक्तहस्ते वाटत असतो. त्याला फक्त सुगंधीत होणं कळतं. त्याचा शुभ्र रंग आपल्याला संमोहित करतो. तरी रंगापेक्षाही गंधाकडेच आपण वळतो. म्हणजे काय रंग महत्वाचा, पण गंध त्याहूनही अधिक महत्वाचा...वरवरचं उथळ असं काहीही फार काळ टिकत नाही.* *आपणही होऊ या नं मोगरा. कशाला हवाय बाह्य रंगाढंगाचा हेवा. करू या उधळण आपल्यातील गुणांची, हृदयात असलेल्या मायेची नं प्रेमाची, आपुलकीची अन माणुसकीची. आत्ममग्नता बाजूला सारून वाहू देऊ प्रेमाचा झरा. बरसू दे.. आत्मीयतेच्या धारा, दरवळू दे आसमंत सारा एकमेकांच्या सोबतीने. सुगंध देऊ या अन घेऊ या. आपली मनातील सद्भावना सतत इतरांना जाणवू दे. आपल्यातील गोडव्याने भवताल चिंब चिंब होऊ दे, तुम्ही आणि मी सारेच होऊयात ना 'मोगरा !'*          ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••     🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸     *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*          📱 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *_मित्रांनो,_* *सदाचार हा माणसाचा खरा अलंकार आहे.* *होठोपे सच्चाई रहती है।* *जहाँ दिलमे सफाई होती है।* *हम उस देशके वासीं है,जिस देशमे* *गंगा बहती है।* *अस असलं तरी चेहरा न देखो दिलको देखो।* *चेहरे ने लाखोंको लुटा।* *दिल सच्चा और चेहरा झुटा।* *हे पण तितकेच महत्वाचे आणि खरे* *आहे.* *मनुष्याचं चारित्र्य कमकुवत करणारे दोन मुख्य अवगुण म्हणजे--लोभ* *आणि असत्य.मोठमोठ्या गोष्टीविषयी* *असणारा लोभ पटकन लक्षात येतो.* *पण सूक्ष्म स्तरावर असणारा लोभ लगेच लक्षात येत नाही.* *या छोट्या आणि सूक्ष्म लालसा म्हणजे,समाजामध्ये,मित्रांमध्ये* *लोकप्रिय होण्याची इच्छा, इतरांच्या तोंडून आपली स्तुती व्हावी ही* *अपेक्षा, आपण जसे आहोत, त्यापेक्षाही अधिक सुंदर* *दिसावं,कष्टाविना सुखसुविधा प्राप्त व्हाव्यात अशा इच्छा.* *या लालसाच माणसाला अपराध करण्यासाठी प्रवृत्त करतात. तसेच* *खोट बोलायला भाग पाडतात. त्यामुळे आपल्या शब्दांची ताकद नाहीशी होते.* *झूठे इंसान की ऊंची आवाज सच्चे इंसान को खामोश कर देती हैं l परंतु* *सच्चे इंसान की खामोशी झूठे इंसान की बुनियाद हिला देती है l* *सत्य परेशान होता है, पराजित नही।* *हे लक्षात ठेवून मार्गक्रमण करावे.* *खरा माणूस पहायला मिळेल.* *अशोक कुमावत, नाशिक* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्या व्यक्ती अश्रूंचा सहारा घेऊन जगतात त्या जीवनात कुठेतरी पराभव पत्करलेल्या असतात किंवा त्यांच्या मनावर कुठेतरी आघात झालेला असतो किंवा कुणीतरी मनाविरुद्ध करण्यासाठी प्रवृत्त केलेले असते.हे जरी खरे असले तरी अशा व्यक्ती शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या कमकुवत झाल्याने त्यांना जीवनात जगण्याची काही अपेक्षा उरली नाही किंवा आता आपण जगून तरी काय करावे असा सतत विचार करत आणि डोळ्यांत अश्रू आणून कसेबसे जीवन जगतात.अशा दुबळ्या मनाने जीवन जगण्यापासून जीवनाला परावृत्त करायचे असेल तर जीवनात आणि आपल्यासमोर चांगले जीवन जगण्याची उमेद प्रथमत: नजरेसमोर ठेवायला हवी, नेहमी आपण काहीतरी असले तरी मी कोणत्याही कठीण प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी सक्षम आहे असा उदात्त विचार करून जगायला शिकले पाहिजे,कुणीजरी आपले मन दुखवण्याचा प्रयत्न केलातरी मी त्याकडे दुर्लक्ष करीन असाही सकारात्मक विचार केला आणि मन घट्ट करून जगायला शिकले तर अश्रूंचा आधार घेऊन जगायची काही गरजच भासणार नाही.जीवन तर सुखदु:खाने भरलेले आहे ते कुणाच्या वाट्याला कमी-जास्त असणारच.सुख जास्त झाले म्हणून जास्तही त्या सुखाचा अतिरेक होऊ द्यायचा नाही आणि दु:ख झाले म्हणून अति दु:खी व्हायचे नाही.आपण सारेजण सुखदु:खाच्या चक्रव्युहात अडकलेलोच आहोत आणि त्या चक्रव्युहाला भेदूनच चांगले जीवन जगायचे आहे हे लक्षात ठेवायला हवे. व्यंकटेश काटकर,नांदेड संवाद..९४२१८३९५९० 🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *अहंकार आणि गर्व असू नये.* रामकृष्ण परमहंस आपल भक्तांसमोर प्रवचन देत होते. ते म्हणत होते, हे पहा, तुमच्यासमोर मी बसलेलो आहे, हे तुम्ही पाहता. पण मी एखादे वस्त्र माझसमोर धरले, तर मी तुम्हाला दिसणार नाही. तथापि, पूर्वीप्रमाणेच मी तुमच्याजवळ आहे. कपडय़ाआड असल्याने तुमच्या   दृष्टीस मात्र पडू शकणार नाही. म्हणजे तुमच्या दृष्टीने अदृश्य होईन. तसाच परमेश्वरसुद्धा तुमच्या-माझ्या सर्वांच्या जवळ असतो. परंतु अहंकाराच्या पडद्यामुळे आपण त्याला पाहू शकत नाही. तुम्ही आपल्या डोळ्यांसमोर लहानसा कापडाचा तुकडा जरी धरला, तरी समोरचा मोठा पर्वत दृष्टीला अगोचर होईल. तात्पर्यं - अहंकार आणि गर्व यांचा पडदा जोपर्यंत आपण बाजूला करीत नाही, तोपर्यंत ईश्वराचा साक्षात्कार, ज्ञानप्राप्ती आपणाला होणार नाही. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~

आठवणीची शिदोरी २९-१२-१९ स्मरण करता काव्याचे मन हर्षूनी जाते माझे आठवणीची शिदोरी जपून ठेवूया अंतरी 〰〰〰〰〰

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 28/12/2019 वार - शनिवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- ●१६१२ - गॅलेलियोने नेपच्यून ग्रहाची नोंद केली परंतु त्याचे वर्गीकरण स्थिर तारा असे केले. ●१८३६ - स्पेनने मेक्सिकोचे स्वातंत्र्य मान्य केले. ● १८४६ - आयोवा अमेरिकेचे २९वे राज्य झाले. ● १८७९ - डंडी, स्कॉटलंड येथे टे रेल्वे पूलावरून गाडी जात असताना गाडीसह कोसळला. ७५ ठार. 💥 जन्म :- ● १८९९ - गजानन त्र्यंबक माडखोलकर, मराठी साहित्यिक व पत्रकार. ● १९३२ - धीरूभाई अंबाणी, भारतीय उद्योगपती. ● १९३७ - रतन टाटा, भारतीय उद्योगपती. 💥 मृत्यू :- ● १९६७ - द.गो.कर्वे, अर्थशास्त्रज्ञ; कुलगुरू, पुणे विद्यापीठ; प्राचार्य, बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय. ● १९७१ - नानकसिंग, पंजाबी साहित्यिक. ● १९७७ - सुमित्रानंदन पंत, हिंदी कवी. ● २००० - मेघश्याम पुंडलिक रेगे, भारतीय विचारवंत. ● २००० - उस्ताद नसीर अमीनुद्दीन डागर, ध्रुपदगायक, डागरबंधूंपैकी एक. ● २००३ - चिंतामणी गणेश काशीकर, कुलगुरू, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ. ● २००३ - कृष्णाजी सुंदरराव तथा कुशाभाउ ठाकरे. ● २००६ - प्रभाकर पंडित, मराठी संगीतकार. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *10 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर सरसकट 10 टक्के कराची शिफारस ; आगामी अर्थसंकल्पात केंद्र सरकारकडून मध्यमवर्गीयांना दिलासा मिळण्याची शक्यता* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळात दिग्गजांसह नवख्या चेहऱ्यांना संधी; तिन्ही पक्षांकडून नावं जवळपास निश्चित* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *महाराष्ट्रात असलेल्या आठ न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा पैकी फक्त दोन ठिकाणी, म्हणजे कोल्हापूर व नांदेड येथे डीएनए प्रयोगशाळा नव्हते, परंतु येत्या वर्षात साधारणपणे मार्च महिन्यापर्यंत, या दोन्ही ठिकाणी हे विभाग सुरू करण्यात येतील.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *एसटीच्या चालकांसोबत वाहकांनाही ऑन ड्युटी मोबाईल वापरण्यास बंदी; वाहकांमधून तक्रारींचा सूर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *मराठीचा अभिमान बाळगा, दीक्षांत सोहळ्यात इंग्रजी भाषण करणाऱ्यांना राज्यपालांचा खोचक सल्ला; पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर विद्यापीठाच्या 15 व्या दीक्षांत सोहळ्यात वक्तव्य* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *मुंबईत एकीकडे सीएएविरोधात तर दुसरीकडे सीएएच्या समर्थनात रॅली, ऑगस्ट क्रांती मैदानात भाजपची जाहीर सभा, तर आझाद मैदानात विद्यार्थ्यांकडून निषेध* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *मुंबई :- वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या रणजी करंडकात रेल्वेची ऐतिहासिक कामगिरी, 41 वेळा रणजी विजेत्या मुंबईवर पहिल्यांदाच मात* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *विशेष बातमी : 10 ते 12 जानेवारी दरम्यान होणाऱ्या 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची निमंत्रण पत्रिका जाहीर ; संमेलनाच्या व्यासपीठावर एकही राजकीय व्यक्तीला स्थान नाही ; कवी पद्मश्री ना.धों. महानोर यांच्या हस्ते उदघाटन ; समारोप प्राचार्य रा.रं. बोराडे उपस्थित राहतील* *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••          *गुरुदक्षिणा* मोटे सरांना मोबाईलवर बोलल्यापासून डॉ.गिरीश अस्वस्थ वाटत होता. त्यांच्या चेहर्‍यावर काळजीची लकेर स्पष्ट दिसत होती. पहिल्यांदाच मोटे सरांनी त्यांच्याकडे एक अपेक्षा व्यक्त केली होती. ती अपेक्षा पूर्ण करणे डॉ.गिरीशच्या डाव्या हाताचा मळ होता. परंतु त्यासाठी मोटे सरांना डॉ.गिरीश ज्या दाते मेमोरियल ............ वरील कथा पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://kathamaala.blogspot.com/2017/04/blog-post_53.html      लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🔬 *सूक्ष्मदर्शक यंत्र कसे कार्य करते ?* 🔬 जीवशास्त्राचे प्रयोग दाखवताना तुम्हाला सरांनी सूक्ष्मदर्शक यंत्र दाखवले असेलच. सूक्ष्मदर्शक यंत्रातून पहिल्यावर पेशी किंवा इतर सूक्ष्म जीव कित्येक पटीने मोठे असलेले आपल्याला दिसतात. हे कसे होते ते आता पाहू. साधे काचेचे भिंग घ्या. त्या भिंगातून वर्तमानपत्रातील अक्षरांकडे पाहा. अक्षरे मोठी झालेली दिसतात. सूक्ष्मदर्शक यंत्र याच तत्त्वावर काम करते. सूक्ष्मदर्शक यंत्रांमध्ये भिंगे अशा प्रकारे बसवलेली असतात की त्यांच्या एकत्रित परिणामांमुळे आपल्याला वस्तू हजारो पट मोठ्या दिसतात. पेशी, सूक्ष्म जीवजंतू आपल्याला नुसत्या डोळ्यांनी दिसू शकत नाहीत. कारण त्यांचे मोजमाप १ मी.मी. च्या हजाराव्या भागाच्या प्रमाणात केले जाते. विषाणू तर याहूनही लहान असतात. त्यामुळे हजारो पट मोठे केल्यानंतरच हे जीव वा पेशी आपल्याला दिसू शकतात. पेशी व सूक्ष्म जीवजंतुच्या परीक्षणामुळे रोगाची अवस्था समजते आणि व्यक्ती रोगी आहे का ते कळते. रोग बरा होतो आहे काय तेही समजते. क्षयरोग, हिवताप, कुष्ठरोग, कॉलरा, हगवण आदी रोगांमध्ये तसेच रक्तक्षय, रक्ताचा कर्करोग, इतर कर्करोग यातदेखील सूक्ष्मदर्शकद्वारे केलेल्या तपासणीमुळे रोगाचे निदान होते व उपचार करण्यास मदत होते. *असे हे सूक्ष्मदर्शक यंत्र म्हणजे सूक्ष्म जीवांच्या अजब गुहेत प्रवेश करण्यासाठी मानवाला लाभलेला जादूचा दिवाच बनले आहे.* *डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित* यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून, मनोविकास प्रकाशन *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" कोणतीही विद्या, ज्ञान कधीच वाया जात नाही. "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *उटी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?* तामिळनाडू 2) *पाठीच्या कण्यात एकूण किती मणके असतात ?* 33 3) *अमेरिकेतील गुलामगिरीची प्रथा कायद्याने कोणी बंद केली ?* अब्राहम लिंकन 4) *भारतीय घटनेत भारताचा उल्लेख कसा केला आहे ?* संघराज्य 5) *'डिस्कव्हरी ऑफ इंडिया' हा ग्रंथ कोणी लिहिला ?* पं जवाहरलाल नेहरू *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 साई पाटील, धर्माबाद       श्री कंप्युटर्स & मल्टीसर्व्हिसेस 👤 वृषाली वानखडे, अमरावती       सामाजिक कार्यकर्ती & साहित्यिक 👤 श्रीधर सुंकरवार, नांदेड 👤 व्यंकटेश माडेवार, धर्माबाद 👤 अजय तुम्मे 👤 योगेश शंकर ईबीतवार, येवती 👤 नंदकिशोर सोवनी, पुणे 👤 ओमसाई सितावार, येवती 👤 ओमकार ईबीतवार *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *रंग, शब्द, स्वरास एकाग्रचित्ताची समाधी लागली की, अवीट सौंदर्याचा आविष्कार घडतो. राष्ट्रे मोठी होतात ती एकाग्रचित्तानं, प्रामाणिकपणे काम करणा-या माणसांच्या बळावर; आळशी माणसांवर नव्हे. जीवन सुखाने जगण्यासाठी, आनंदासाठी, हसण्यासाठी, गाण्यासाठी, खेळण्यासाठी आहे; रडण्यासाठी नव्हे. आळशी माणसांवर रडण्याची वेळ येते. आळसाची सवय झाली की, माणूस आळशीपणाचा गुलाम बनतो. खरंतर आळशी माणूस बंद पडलेल्या घड्याळासारखाच असतो. परमेश्वराने माणसाला दोन हात आणि एक तोंड दिले आहे. याचाच अर्थ, दोन हातांनी काम करा आणि तोंडाची भूक भागवा.* *माणसाच्या हाताची पाच बोटे म्हणजे एक सुंदर महाकाव्यच ! बोटांचा जिथं स्पर्श होईल तिथं स्वर्ग निर्माण होईल. यासाठी आळसाला कायमची सुट्टी द्या. आळशीपणा हेच अनेक दुर्गुणांचं उगमस्थान असतं. प्रेमाने प्रेम वाढते, द्वेशाने द्वेष, यशाने यश, विश्वासाने विश्वास वाढतो; तसे आळसाने आळस वाढतो. आपल्यासाठी कोणीतरी काम करावे आणि आपल्याला आरामात जगता यावे, ही आळशी माणसाची वृत्ती. आळशीपणाने सतत आराम करण्यात वेळ घालवणे म्हणजे जिवंतपणी आत्महत्या करण्यासारखे आहे. आळस माणसाच्या मनाला जडलेला कर्करोग आहे, असे हेडवूड नावाच्या विचारवंताने म्हटले आहे. 'दैव देईल ते मी घेईल' असे म्हणणारे लोक आळशीच. कष्ट करून मला मिळेल ते घेईन असे म्हणणारे लोक उद्योगी असतात.* *'हे ईश्वरा माझे हाती काम दे* *परी ते करण्याची शक्ती दे.'* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• ⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡ *--संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040** •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो* *मानवी मेंदू सर्वांनाच मिळाला आहे पण कोण कसा वापर करतो हे ज्याच्या त्याच्या हातात आहे.* *मानवी संगणक' शकुंतला देवी एक अदभुत किमयागार ठरली आहे.* *साधे गणित सोडवायचे असले तरी आपल्याला कंटाळा येतो, मग गणितातील समस्या अंकगणित, गुणाकार, भागाकार, समीकरणे, सुत्रे यामध्ये कोण पडणार? मात्र त्यासाठी ईश्वर कृपेचा वरदहस्त लाभलेल्या शकुंतलादेवी भारतात जन्मल्या.* *तर शकुंतला देवी यांचा जन्म 4 नोव्हेंबर 1929 रोजी कर्नाटकमधील बंगळूर येथे झाला. विशेष म्हणजे वयाच्या 3 ते 5 व्या वर्षातच त्या गणितज्ञ झाल्या, त्यावेळी त्यांचे साधारण शिक्षणही झाले नव्हते.* *बीबीसी लंडन या संस्थेने त्यांना एका कार्यक्रमासाठी निमंत्रण दिले. त्यावेळी त्यांनी फक्त संगणकावरच सोडविण्यासारखा प्रश्न विचारण्यात आला. मात्र त्यांनी क्षणार्धात तोंडी उत्तर देऊन सर्वांना अचंबित करून सोडले.* *अत्यंत किचकट अंकगणितातील प्रश्न त्यांनी तोंडी सोडवून दाखवून जगातील सर्व शास्त्रज्ञांना त्यांची नोंद घेण्यास भाग पाडले. शकुंतलादेवी संख्याशास्त्राबरोबरच फलज्योतिष्यशास्त्रातही आपली बुद्धिमत्ता वापरत असत.* *मानवी संगणक म्हणून ओळख* : *1977 मध्ये शकुंतलाचा सामना डॅलस युनिव्हर्सिटीत कॉम्प्यूटर 'युनिव्हॅक' शी झाला. शकुंतलाला 201 अंकाचे 23 वे वर्गमूळ काढायचे होते. ते सोडविण्यास त्यांना 50 सेकंद लागले. तर 'युनिव्हॅक'ला 62 सेकंद घेतले. तेव्हापासून शकुंतला जगभरात मानवी संगणक म्हणून ओळखली जाते.* *विशेष कामगिरी* : *1982 मध्ये नावाची ‘गिनीज बुक ऑफ रिकॉर्ड’ मध्ये नोंद.* ● *1988 मध्ये वाशिंगटन डी.सी. मध्ये ‘रामानुजन मॅथेमॅटिकल जीनियस अवार्ड’ ने सन्मानित.* ● *मृत्युच्या एक महिन्यापूर्वी 2013 मध्ये मुंबईमध्ये ‘लाइफटाइम अचीवमेंट अवार्ड’ ने सम्मानित.* ● *84 व्या जन्मदिवशी 4 नोव्हेंबर 2013 रोजी गूगलने त्यांच्या सन्मानार्थ ‘गूगल डूडल’ ठेवले.* *आपणास जमले तर बघा, मेंदूला योग्य दिशा आणि चालना द्या.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• कोणत्याही संकटाला सामोरे जाण्यासाठी किंवा त्या संकटाला तोंड देण्यासाठी जी व्यक्ती सदैव तयार असते तीच व्यक्ती जीवनात यशस्वी होते. संकटं ही प्रत्येकाच्या जीवनात कमी-जास्त तर असणारच.... पण संकटाला पाहून दूर पळून जाणारी फार असतात.कारण एकीकडे त्यांच्यामध्ये प्रतिकार करण्याची क्षमता नसते,ते हतबल होतात,त्यांची मानसिकता नसते,दूरचा विचार करत नाहीत त्यामुळे त्यांचा जगण्याचा त्यांच्यावरच विश्वास नसतो.त्यामुळे संकटासमोर शरण जातात.तर दुसरीकडे काही व्यक्ती कोणत्याही संकटाला तोंड द्यायला तयार असतात.काही असो आपण त्या संकटाला तोंड दिलेच पाहिजे जर नाही दिले तर आपण जगणार कसे ? आपल्यासमोर उभे आयुष्य आहे ते कसे जगणार ?आज आपण सामोरे नाही गेलो तर जगण्याला अर्थच काय राहणार ? नाही आपल्याला जगायचे तर मग पुढे कसे जीवन जगणार ? जगायचेच असेल तर पहिल्यांदा आपला आपल्यावर आत्मविश्वास ठेवायला हवा आणि त्या आत्मविश्वासावरच पुढे पुढे पाऊल टाकायला हवे आणि त्याप्रमाणे जगायला हवे अशी सकारात्मक विचार घेऊन जगणारी व्यक्तीच जीवन चांगल्याप्रकारे जगू शकते. अशा आशादायी, ध्येयवादी असणा-या व्यक्तींचे अनुकरण करायला हवे आणि कोणत्याही संकटाला तोंड देणा-या अशा व्यक्तीकडे पाहिले तर अनुकरण करणा-या व्यक्तीला अधिक बळ मिळते आणि पुढील संकटाला सामोरे जाण्यासाठी तयार होते. म्हणून कोणत्याही संकटाला न घाबरता सामोरे जाऊन जीवन जगायला शिकले पाहिजे.तरच जीवन जगण्याला अर्थ आहे. अन्यथा जीवन व्यर्थच आहे असे समजावे. © व्यंकटेश काटकर,नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *समाधान* मुंगी तांदळाचा दाणा घेऊन आनंदाने निघाली. पण तितक्यात वाटेत तिला डाळीचाही दाणा दिसला. मुंगी मनात म्हणाली, 'क्या बात है देवा! तू भाताची सोय केलीच होती, आता वरणाचीही सोय झाली.' पण एकावेळी दोन्ही दाणे उचलणे मु़ंगीला शक्य नसल्यामुळे ती खिन्न झाली. तेव्हा कबीर म्हणाले, 'वेडाबाई! तुला दोन्ही गोष्टी नाही मिळणार. तुला भात हवा असेल, तर वरणाचा त्याग करावा लागणार आणि वरण हवे असेल, तर भाताचा त्याग करावा लागणार.' तांदळाचा दाणा गवसल्यावर अतिशय आनंदाने, समाधानाने व लगबगीने आपल्या वारुळाच्या दिशेने निघालेल्या मुंगीचा आनंद व समाधान, डाळीने हिरावून घेतला. माणसाचंही तसंच आहे. जोवर समोर विकल्प उपलब्ध नसतो, तोवर माणूस आहे त्या गोष्टीत समाधानी असतो. पण विकल्प निर्माण झाले, की ते त्याचा आनंद आणि समाधन क्षणात हिरावून घेतात..! तात्पर्यः शक्य तेवढया मिळालेल्यात समाधानी राहणे हेच योग्य. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 27/12/2019 वार - शुक्रवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *डॉ पंजाबराव देशमुख जयंती* 💥 ठळक घडामोडी :- ●१७०३ - पोर्तुगाल व इंग्लंडने मेथुएनच्या तहावर सही केली. पोर्तुगालहून आयात केलेल्या मद्याला(वाइन) इंग्लंडमध्ये प्राधान्य. ● १८३१ - चार्ल्स डार्विन एच.एम.एस. बीगल या जहाजातून गॅलापागोसला जाण्यास निघाला. ●१९४५ - २८ देशांनी जागतिक बँकेची स्थापना केली. ● १९४५ - कोरियाची फाळणी. ●१९४९ - इंडोनेशियाला नेदरलँड्सपासून स्वातंत्र्य. ● १९७८ - ४० वर्षांच्या हुकुमशाहीनंतर स्पेन प्रजासत्ताक. 💥 जन्म :- ● १८९८ - पंजाबराव देशमुख, विदर्भातील सामाजिक नेता, शिक्षण प्रसारक, केंद्रीय कृषिमंत्री. ● १९६५ - सलमान खान, भारतीय चित्रपट अभिनेता. 💥 मृत्यू :- ● १९६५ - देवदत्त नारायण टिळक, मराठी साहित्यिक, संपादक, ज्ञानोदय. ● १९९७ - मालती पांडे-बर्वे, मराठी भावगीत गायिका. ● २००२ - प्रतिमा बरुआ-पांडे, असमी लोकगीत गायिका. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात पावसाचा अंदाज, कोल्हापुरात मुसळधार तर नागपूरसह विदर्भातील काही भागात पावसाच्या हलक्या सरी, पुण्यातही शिडकावा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *नवी दिल्लीः उत्तर भारतात थंडीने केला कहर, दोन दिवसांपासू या ठिकाणी जबरदस्त थंडी असून केवळ लुधियानात कमीत कमी ८ लोकांचा मृत्यू झाला आहे. उत्तर भारतात आणखी पाच दिवस कडाक्याची थंडी राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन मिळावी यासाठी भारतीय आयुर्विमा महामंडळ (लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया LIC) कडून राबवली जाणारी वय वंदना योजनेसाठी केंद्र सरकारने लाभार्थींना आधार कार्ड केले बंधनकारक* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *एस टी महामंडळाच्या एस टी प्रवासभाडे सवलतीसाठी स्मार्टकार्ड बंधनकारक, 15 फेब्रुवारी 2020 पासून मासिक, त्रैमासिक पासधारक तसेच विद्यार्थ्यांसाठी 1 जून 2020 पासून स्मार्टकार्ड बंधनकारक करण्यात येत आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *विद्यार्थ्यांची हजेरी बायोमेट्रीक पद्धतीनं घेणार असल्याचा नवा निर्णय सरकारनं घेतला आहे. केंद्र सरकारनं निश्चित केलेल्या परफॉरमन्स ग्रेड इंडेक्सनुसार शासकीय आणि अनुदानित शाळांना हा नियम असणार आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *दिल्ली विधानसभेसाठी काँग्रेसच्या स्क्रिनिंग कमिटी अध्यक्षपदी राजीव सातव यांची निवड, राजीव सातव हे सध्या गुजरातचे प्रभारी म्हणून काम पाहत आहेत.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *काल या दशकातील शेवटचं सूर्यग्रहण; केरळ, अबुधाबीमध्ये रिंग ऑफ फायरनं डोळ्याचं पारणं फेडलं, तर मुंबईत सूर्य आणि ढगांची लपाछपी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      *मरावे परी अवयवरूपी उरावे* जन पळभर म्हणतील हाय हाय !  मी जाता राहील कार्य काय ? गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या आवाजातील कविवर्य भा. रा. तांबे यांची कविता रेडियोवर ऐकताना मन एकदम भूतकाळात गेले. इयत्ता दहाव्या वर्गात शिकत असताना ............. वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_17.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🦈🐟 *मासे* 🐟🦈 ******************** मासे हे जलचर प्राणी आहेत. श्वसनासाठी त्यांना कल्ले असतात. शरीरामध्ये जवळपास संपूर्ण लांबीचे पाठीच्या कण्याचे हाड असतेच असते. या तीन महत्त्वाच्या गोष्टी कोणत्याही माशात आढळणारच. सजीवांची उत्पत्ती पाण्यात झाली. त्यांतील अनेक पाण्याबाहेर पडले, पण मासे पाण्यातच राहिले. जगातील पृष्ठवंशीय प्रकारच्या एकूण प्राण्यांतील निम्म्याहून अधिक जाती मासेच आहेत. पाण्यातून बाहेर पडलेले अनेक प्राणी वेगाने हालचाल करू शकतात. पण पाण्याच्या घनतेमुळे, वजनामुळे मासे त्या मानाने खूपच कमी वेगवान असतात. माशांचे शरीर खवल्यांनी भरलेले असते. हे खवलेच त्यांच्या पृष्ठभागाचे संरक्षण करतात. झीज झाल्यावर पुन्हा नवीन खवले येण्याची क्रिया सतत चालूच असते. खवल्यांमुळे माशांच्या हालचाली चमकदार दिसतात. माशांच्या हालचाली मुख्यत: शरीरातील स्नायूंच्या वेड्यावाकड्या आकुंचन प्रसारणातून होतात. यालाच मदत म्हणून त्रिकोणी पंखाकृतीच्या (फिनच्या) जोड्या काम करतात. माशाच्या छातीजवळचा भाग, तेथीलच तळाजवळचा भाग व पाठीवरचा भाग येथे एकेक पंखांची त्रिकोणी जोडी आढळते. माशांच्या जातीनुसार व आकारमानानुसार या पंखांची ताकद बदलत जाते. मुख्य पंख म्हणजे शेपटीचे. त्यांचा वापर सुकाणूसारखा तर केलाच जातो, पण खेरीज वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठीही हे पंख वापरले जातात. माशांची श्वसनक्रिया कल्ल्यांमार्फत होते. एखादा लांबलचक कंगवा असावा, तशी त्यांची रचना असते. तोंडातून घेतलेले पाणी या कल्ल्यांतून सतत बाहेर टाकले जाते. या क्रियेत येथील रक्तवाहिन्या पाण्यातून प्राणवायू शोषून घेतात. तोंडावाटे घेतलेले अन्न मात्र या कल्ल्यातून बाहेर पडू नये, अशी व्यवस्था आतील कडा वळवून केलेली असते. श्वसनक्रिया व अन्न गिळणे या दोन्ही गोष्टी एकदमच केल्या जाऊ शकतात. त्यामुळे अनेक मासे तोंडाने पाणी घेतानाच येणारे पदार्थ म्हणजे लहान मासे, प्लांक्टन वनस्पती, शेवाळे गिळतात व उरलेले पाणी कल्ल्यांवाटे बाहेर टाकतात. माशांचे खाद्य मुख्यतः मासेच. पण या खेरीज अनेक अन्य जलचरांची अंडी, अळ्या, शेवाळी या खाद्यांचीसुद्धा सर्व लहान माशांना गरज भासते. समुद्रातील प्रवाळांच्या खडकांमध्ये शिरून तेथील हे आयते खाद्य पटकावणे हा लहान माशांचा दिवसभरचा उद्योगच असतो. हे सर्व खडक ठराविक आकाराचे असल्याने त्यात शिरकाव करणे व बाहेर पडणे यासाठी ठराविक आकाराची जाडीच चालू शकते. पण याखेरीज काही अगडबंब मासे फारसे कष्ट न करता फक्त आ वासून वाटेत येणारे सर्व लहान मासे फस्त करत जातात. एखादा मध्यम आकाराचा शार्क दिवसभरात एखादा टन मासे सहज संपवतो. यावरून त्यांच्या भुकेची कल्पना येऊ शकेल. मासे व पृथ्वीवरचे अन्य प्राणी यांच्या संवेदना इंद्रियांत फारसा फरक नाही. डोळे तर नेहमीप्रमाणेच काम करतात. कान दिसत नाहीत, पण अन्य प्राण्यांप्रमाणेच तोल सावरणे, ऐकणे या गोष्टींसाठी माशांचे कान उपयुक्त ठरतात. आणखी एका प्रकारे संवेदना जाणवतात. आपल्या कातडीला हात लावल्यावर जशा संवेदना मिळतील, तशाच संवेदना पाण्यातील तरंगांच्या हालचालीतून संपूर्ण लांबीमधील पृष्ठभागातून माशाला मिळतात. याचा वापर करूनच लांबवरचा शत्रू, भक्ष्य, पाण्यावरील अन्य जलचरांचा वावर याचे ज्ञान मासा मिळवत राहतो. माशाचे आयुष्य किती ? मासे पाळले, तर सांगता येईल, अन्यथा अवघडच. पण मोठे मासे कित्येक म्हणजे पन्नासच्या वर वर्षे जगत असावे. लहान मासे मात्र जेमतेम वर्षभरातच आयुष्य संपवतात. याच काळात वाढ, अंडी घालणे वगैरे सर्व गोष्टी घडतात. पृथ्वीवरील सजीवांमध्ये आकारमान व आयुष्य यांची सांगड निसर्गाने घालून ठेवली आहे. मासे गोड्या पाण्यात असतात, समुद्रात, पाणथळीच्या जागी असतात, तसेच खोल डोहात, चिखलाच्या पाण्यात असतात, तसेच नितळ अशा सरोवरात. अत्यंत आकर्षक माशांप्रमाणेच अत्यंत बोजड विचित्र तोंडाचे माशांचे प्रकारही पाहायला मिळतात. जेमतेम चार ते पाच मिली ग्रॅम वजनाच्या छोटय़ा माशांपासून पस्तीस ते चाळीस टन वजनाच्या शार्क माशांपर्यंत माशांचे वजन आढळते. मासे खाणे हा मानवी आहाराचा एक नित्याचा भाग आहे. किंबहुना याचा फायदा म्हणून पृथ्वीवर, जमिनीवर निर्माण होणाऱ्या अन्नात आपण बचत करू शकतो आहोत. अत्यंत पौष्टिक असा आहार माशांपासून मिळू शकतो. या सागरी संपत्तीचा पूर्ण विनियोग करणे माणसाला शक्यच होणार नाही, इतकी ती अफाट आहे. जगातील ज्ञात आकडे एकत्र केले, तर वर्षांकाठी दहा कोटी टन मासे समुद्रातून पकडले जातात. यात गोड्या पाण्यातील माशांचा समावेश नाही. *'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• “ज्या माणसाजवळ संयम आहे तो प्रत्येक गोष्टीचा धनी असतो.” *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *'हिंदू ऑफ लाईफ' या पुस्तकाचे लेखक कोण ?* डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन 2) *लोकलेखा समिती आपला अहवाल कोणास सादर करतो ?* लोकसभा सभापती 3) *पंचायतराज योजनेचा सर्वप्रथम स्वीकार कोणत्या दोन राज्यांनी केला ?* राजस्थान व आंध्रप्रदेश 4) *दागिने तयार करण्यासाठी सोन्यात कोणते धातू मिसळतात ?* तांबे 5) *जिल्हा परिषदेमध्ये सर्वसाधारणपणे किती समित्या असतात ?* 10 *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 पूजा बागुल, साहित्यिक, नाशिक *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *'आपलं असं आहे की आपल्याला खोटं सहन होत नाही.' असं निक्षून सांगणारेही खोटं बोलतच असतात. कित्येकदा 'खोटं' हे ख-यापेक्षा सुंदर वाटतं. शतश: खरं किती लोक बोलत असतील हा संशोधनाचा विषय ठरेल. 'खोटं बोला पण रेटून बोला' असं म्हटलं जातं, ते व्यवहारात खूप खपत असतं; नव्हे त्याचीच जीवनाची दुकानदारी नफ्यात दिसते. सतत खरं बोलणारा, कल्पनाविश्वातही असत्याला न शिवणारा महात्मा किंवा संतही प्रसंगी असत्यासमोर हथप्रभ होतो. त्याच्या सत्यावर असत्य विजय धारण करून जातो.*  *परंतु माणसाचं अंतर्मन हे सतत सत्य असते. तुम्ही केलेले कृत्य हे काय आहे ? पवित्र आहे कि अपवित्र आहे? खरे आहे कि खोटे आहे? हे फक्त अंतर्मनात नेहमीकरता 'सेव्ह' अर्थात सुरक्षित झालेले असते. मग लोक तुमच्या खोटे दडवून टाकण्याच्या नाटकीपणामुळे प्रभावित होऊन तुमचे खोटे खरे मानू लागले तरी तुमच्या 'इनर माइंड'ला ते मान्य नसते. ते तुम्हाला सतत आठवण करून देत असते की बाबा रे, जगाच्या नजरेत तू निर्दोष नाही हे तुला ठाऊक आहे. सत्यावर असत्याचा 'पेहराव' हा नाटकातील नटाने धारण केलेल्या पात्रासारखा असतो. तो सर्वकाळासाठी नसतो. नटाला नाट्यप्रयोग संपताच सामान्य म्हणजे सत्यस्थितीत परतावेच लागते.*    ••● 🔸‼ *रामकृष्णहरी* ‼🔸●••             🔹🔹🔹🔹🔹🔹     *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो,* *किती पुजला देव तरी* *देव कुणाला पावला नाही,* *कुठे राहतो कुणास ठाऊक* *पण अजून कुणाला घावला नाही.* *ही गाडगेबाबांनी कविता ऐकली होती,आणि देव कुठे असतो हे* *समजत नव्हते,पण काल सकाळी 7* *वाजताच आनंदवन* *ता.वरोरा,जि.चंद्रपूर या बाबा* *आमटे यांच्या गावात पोहचलो आणि* *देव काय असतो,कुठे वसतो, कसा दिसतो,काय करतो या सगळ्या* *प्रश्नांची उत्तरे देत येथील कुष्ठरोगी जनतेने त्यांच्या* *चालण्या,बोलण्या आणि वागण्यातून दाखवून दिले.या महामानवाच्या* *म्हणजेच मुरलीधर* *आमटे(बाबा)व साधना* *आमटे यांच्या समधीस्थळी* *आम्ही नतमस्तक झालो,कारण ही पती पत्नीची समाधी* *शेजारी आणि अद्वितीय आहे.* *योग जुळून आला म्हणजे आज बाबांची जयंती ,आणि भारतीताईचा* *वाढदिवस साजरा* *करण्याचे भाग्य लाभले.* *घरची प्रचंड श्रीमती, वतनदारी असूनही बाबांनी सेवा तत्वामुळे घर* *सोडले.1939 ला आनंदवनात* *एक झोपडी आणि रोग्यांच्या सेवेसाठी 2 झोपड्या* *एवढ्यावर सुरू केलेला प्रपंच आज सातासमुद्रापार मोठ्या दिमाखाने* *बाबांची महती सांगतोय.* *मनाचे बळ इतके प्रचंड की* *कुष्ठरोग्यांच्या सेवेबरोबर बाबांनी ते जंतू शरीरात घालून जगाला मनाच्या* *ताकदिचा नवा संदेश दिला.* *आज बाबा नाहीत पण बाबांच्या रूपाने भारतभर* *दिनदलित ,अंध,अनाथ,कुष्ठरोग्यांच्या जीवनात एक देव अधिराज्य करतोय.* *पुरस्कारांच्या राशी आजही बाबांच्या पायाशी लोळण घालत आहे.* *बाबांच्या स्नुषा डॉ.भारतीताई विकास* *आमटे यांच्याशी तासभर दिलखुलास गप्पा मारल्या.मनातील* *सर्व प्रश्नांना आम्हीही मोकळी वाट करून दिली* *आणि साठी उलटलेल्या भारतीताईंनी तेव्हढ्याच प्रेमळपणे व* *भावनांच्या गोंगाटात कर्तव्य किती अनमोल असते हे मोठ्या खुबीने* *पटवून दिले.* *स्वातंत्र्यसैनिकाने व एका खासदाराच्या घरात मोठी झालेली* *भारतीताई एव्हढा मोठा त्याग करू शकते हे त्यांच्या व्यक्तिमत्वाकडे* *पाहून विश्वास न बसण्यासारखे होते.* *ज्यांच्या जवळ कुणी फिरकत नव्हते,ज्यांना समाजाने नाकारले होते* *अशा कुष्ठरोग्यांच्या आयुष्यात नवी पहाट दाखवणाऱ्या बाबांना शब्दात मांडणे माझ्या बुद्धीच्या पलीकडे आहे.* *बाबांना मानाचा मुजरा.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जीवनात अनेक प्रश्न गुंतागुंतीचे असतात.असे प्रश्न आपण कितीही सोडवण्याचा प्रयत्न केला तरी ते सुटत नाहीत.अशावेळी आपण हतबल होतो. त्यातून आपली सुटका व्हावी.काहीतरी मार्ग निघावा असे वाटते. मग आपण जिथे यावर तोडगा निघणार आहे, आपल्या मनाला समाधान मिळणार आहे.अशाठिकाणी जाऊन आपण आपला संसारुपी भवसागर तरुण जाण्यासाठी   कुणाचातरी धावा करतो अर्थात परमेश्वराचा.पण परमेश्वर काही येत नाही. परंतू परमेश्वराने आपला प्रतिनिधी म्हणून आपल्याकडे गुरुला पाठविले. जीवनाला योग्य दिशा मिळावी म्हणून ज्यांचे आढळाचे स्थान आपल्या जीवनात आहे.ज्यांच्यावर आपली नितांत श्रद्धा आहे अशा ईश्वररुपी गुरुच्या सानिध्यात राहून त्यांचे मार्गदर्शन घेतो आणि आपल्या जीवनाचे कल्याण करुन घेतो.या जगात सर्वात जास्त आणि आपल्या जीवनाला योग्य दिशा देणारे गुरू हेच आपले परमेश्वर आहेत.हे कधीही विसरुन चालणार नाही. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *यशाचे बिजगणित* आजोबा! तुम्ही हे कुठले विचित्र गणित सोडविताहात?' अदितीने विचारले. मी माझ्या दैनंदिनीमध्ये काही तरी लिहित होतो व अदिती अजोबाच्या मागे केव्हा येऊन उभी ठाकली हे कळलेच नाही. दैनंदिनीच्या पानावर लिहिले होते- (त+म+ध) न? 'हे एक नवे बीजगणित आहे नि मी ते सोडविण्याचा प्रयत्न करतोय, आजोबानी  टाइमपास म्हणून उत्तर दिले.  'मलाही समजावून सांगा ना!' -अदिती म्हणाली.  आजोबानी तिला म्हटले, मी तुला नक्की समजावून सांगेन. आधी मला हे सांग '(त+म+ध) न' याचा अर्थ काय आहे? तुही बीजगणित शाळेत शिकली आहेस ना!'  'सिम्पल आहे, आजोबा! यातील 'ब्रॅकेट' काढून 'तन+मन+धन', असे लिहिले असावे. कारण 'त', 'म', 'ध' हे तिनही अक्षरे 'न'शी गुणिले आहेत ना- अदिती बोलली. 'शाब्बास', आजोबा म्हटले- 'चल, आता प्रश्नचिह्नाचा विचार करू. तन, मन, धन अर्पण करणे म्हणजे तरी काय?'  'खूप परिश्रम' घेऊन काम करणे, अदितीने अचूक उत्तर दिले. तन+मन+धन हे परिश्रमाचे सूत्र आहे.  'वाह! क्या बात है!' असे म्हणून आजोबानी तिची पाठ थोपटून कौतुक केले.  'आजोबा! हे ठीक आहे. पण एखादे उदाहरण देऊन समजावून सांगा ना, प्लीज।' अदिती म्हणाली.  'ओके! बघ, तुझ्या अभ्यासाचे उदाहरण घेऊ या. तुला परीक्षेत पहिला नंबर काढायचाय का?  अदितीने मान हलवून होकार दिला व आजोबाकडे लक्ष देऊ लागली. 'पहिला नंबर येण्याकरीताही हा फॉर्म्युला लागू पडतो. खाण्‍या-पिण्याकडे लक्ष दिले पाहिजे, दररोज थोडेसे खेळले पाहिजे, व्यायाम केला पाहिजे, तसेच स्वच्छतेकडे लक्ष दिले पाहिजे तरच तन अर्थात शरीर स्वच्छ राहिल. आजारी पडलात तर तुमच्याकडून अभ्यासच होणार नाही. दूसरे म्हणजे, मन. मनाची एकाग्रता असेल तरच अभ्यासात मन लागेल व चांगला अभ्यास करू शकाल. वर्गात शिक्षकांकडून जे शिकविले जाते, ते चटकन लक्षात राहते.  'मला हे समजले आजोबा! मात्र, हे धन मी कोठून आणू? अदितीने अतिशय योग्य प्रश्न विचारला. मी म्हणालो, तु त्याचा विचार करू नकोस ती माझी व तुझ्या वडीलांची जबाबदारी आहे. मात्र तुला मिळणार्‍या 'पॉकेटमनी'चा तू चांगल्या कामात उपयोग करू शकते. थोडे-थोडे पैसे जमा करून तू एखादे जनरल नॉलेजचे पुस्तक, ज्ञानवर्धक विषयाचे पुस्तक, डिक्शनरी, कॅल्क्युलेटर वगैरे. खरेदी करू शकते. या माध्यमातून तू 'धना'चा सदुपयोग करू शकते.  ''खूप चांगले! 'थॅंक्स!' अदिति खुश होऊन बोलली। 'खरंच, यशाचा हा फॉर्मूला खूप मजेदार आहे. पहिला नंबर येण्याकरीताही हा फॉर्म्युला लागू पडतो. खाण्‍या-पिण्याकडे लक्ष दिले पाहिजे, दररोज थोडेसे खेळले पाहिजे, व्यायाम केला पाहिजे, तसेच स्वच्छतेकडे लक्ष दिले पाहिजे तरच तन अर्थात शरीर स्वच्छ राहिल. आजारी पडलात तर तुमच्याकडून अभ्यासच होणार नाही. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 26/12/2019 वार - गुरूवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :-  ● २००४ - हिंदी महासागरात इंडोनेशियाजवळ रिश्टर मापनपद्धतीनुसार ९.३ तीव्रतेचा भूकंप. यानंतर आलेल्या त्सुनामीत भारत, श्रीलंका, इंडोनेशिया, थायलंड, मलेशिया, मालदीव, इ. देशात ३,००,०००हून अधिक मृत्युमुखी. ● १९९१: सोव्हिएत युनियन औपचारिकरित्या बरखास्त करण्यात आले. ● १९९७: विंदा करंदीकर यांना महाराष्ट्र फांऊंडेशन पुरस्कार. 💥 जन्म :- ● १८९३: आधुनिक चीनचे शिल्पकार माओ त्से तुंग  ● १९१४: कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी आयुष्य वाहून घेणारे थोर समाजसेवक डॉ. मुरलीधर देविदास ऊर्फ बाबा आमटे १९१४: स्वतंत्र भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री डॉ. सुशीला नायर  ● १९१७ - प्रभाकर माचवे मराठी व हिंदी साहित्यिक. ● १९३५ - डॉ. मेबल आरोळे मॅगसेसे पारितोषिक विजेत्या.(रजनीकांत आरोळे यांच्या पत्नी) ● १९४८: डॉ. प्रकाश आमटे 💥 मृत्यू :-  ● १९७२ - हॅरी ट्रुमन, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष. ● १९९९: भारताचे ९ वे राष्ट्रपती व ८ वे उपराष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा ● २०११ - सरेकोप्पा बंगारप्पा, कन्नड-भारतीय राजकारणी, कर्नाटकाचे मुख्यमंत्री. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *फडणवीसांच्या काळातच अजित पवारांना क्लीन चीट, सिंचन घोटाळ्याप्रकरणी एसीबीचे महासंचालक परमवीर सिंह यांचं हायकोर्टात शपथपत्र* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मंत्रिमंडळ विस्तारात गृहखातं शिवसेनेकडून राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता, अजित पवार, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटलांमध्ये शर्यत* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *शालेय सहल घेऊन जाणाऱ्या ST बसला भीषण अपघात, 18 जण गंभीर जखमी, मुंबई-पुणे महामार्गावर भरधाव एसटीची ट्रॉलीला धडक, जखमींना पवना रुग्णालयात उपचारासाठी दाखल* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *मुंबई : राज्यात थंडीचा जोर वाढत असतानाच पुढील दोन दिवसात महाराष्ट्रात काही भागांत पावसाची शक्यता, महाराष्ट्रात मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही भागांत हलक्या पावसाच्या सरी अपेक्षित आहेत, असा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तविला आहे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *जगभरात ख्रिसमसचं सेलिब्रेशन, वसई, मुंबईत चर्चेसना रोषणाई, तर सुट्टीनिमित्त पंढरपूर, महाबळेश्वर आणि शिर्डीमध्ये भाविकांची गर्दी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *नियम मोडणाऱ्या, कचरा करणाऱ्या मुंबईकरांवर 10 हजार कॅमेरांची नजर, बीएमसीकडून 'व्हिडीओ अॅनालिटिक्स टूल' तंत्राचा वापर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *राज्य सरकारकडून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या सुरक्षेत कपात, आदित्य ठाकरेंना मात्र 'Z' श्रेणी सुरक्षा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *विशेष बातमी :- दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेली नांदेड जिल्ह्यातील माळेगावची यात्रा उत्साहाच्या वातावरणात संपन्न* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *ग्रहण म्हणजे काय ?*     २६ डिसेंबर २०१९, रोजी होणार सूर्य  ग्रहण  कंकणाकृती अथवा  खंडग्रास   दिसणार आहे, तुम्ही सर्वानी ते नक्की पाहावं. मुंबई मध्ये हे ग्रहण  खंडग्रास दिसणार असून  भारतीय प्रमाण वेळेनुसार  सकाळी ८. ०४ मिनिटांनी सुरु होईल, पुढे ९. २१  मिनिटांवर अधिकाधिक ७८. टक्के सूर्याला झाकेल, ११.५५ मिनिटांवर ग्रहण पूर्णतः संपेल. ग्रहणा विषयी अधिक माहिती वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://fmbuletin2019.blogspot.com/2019/12/blog-post.html         ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *✍ स्तंभलेखक नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💉 *लस म्हणजे काय ?* 💉 *अनेकदा लस लसीकरण वा व्हॅक्सीनेशन हे शब्द आपण वाचतो. टीव्हीवर याच्या जाहिरातीही पाहत असतो. पण लस म्हणजे नक्की काय या विषयी शास्त्रीय माहिती आपल्याला नसते.* *बर्‍याचदा आपण बघतो की उन्हात जर एखादा दिवस खूप फिरलो तर लगेच डोकेदुखी, अंगदुखी, इत्यादींचा त्रास होतो. आपण त्याला ऊन बाधले असे म्हणतो. पण जर रोज उन्हात जायला लागलो तर मात्र उन्हाचा तेवढा त्रास होत नाही. नेहमी घरचेच वॉटरबॅगचे पाणी पिणारा मुलगा बाहेरचे पाणी प्यायला तर त्याच्या पोटात दुखते, संडास लागते. शरीराला एखाद्या गोष्टीची सवय झाली तर नंतर त्रास होत नाही, असे साध्या भाषेत म्हणता येईल. पण शरीराला जीवजंतूंची सवय होते का ? सवय म्हणण्यापेक्षा जीवजंतूंचा अनुभव येतो असे म्हणता येईल. एकदा अनुभव पाठीशी असला म्हणजे शरीर दुसऱ्यांदा त्या जीवजंतूंशी चांगला लढा देऊ शकते. एकदा गोवर झाल्यावर सहसा परत होत नाही, ते याचमुळे. हे का होते हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.* *शरीरात रोगप्रतिकार शक्ती दोन प्रकारे निर्माण होते. जंतू शरीरात शिरल्यानंतर त्यांच्यातील प्रथिन वा कर्बोदक घटकांसाठी शरीरात प्रतिकार करणारी द्रव्ये (अँटीबॉडीज) तयार होतात किंवा जंतूंना मारण्यासाठी पेशींचे प्रशिक्षण होते. या दोन्ही मार्गांनी जीवजंतू पुढच्यावेळी आले तर त्यांना मारून टाकता येते. पण प्रत्येक वेळी आधी जीवजंतूंचा शरीरात प्रवेश करून घेऊन रोगाला सामोरे जाणे परवडण्याजोगे नसते. यासाठी शास्त्रज्ञ जंतूंना अर्धमृत (Attenuate) करतात वा पूर्णपणे मारतात. असे अर्धमृत वा मृत जंतू शरीरात गेल्यावर रोग निर्माण करू शकत नाहीत. पण त्यांच्याविरुद्ध प्रतिकार करणारी द्रव्ये आणि प्रशिक्षित पेशी तयार होतात. लसी अशाच अर्धमृत वा मृत जंतू किंवा त्यांच्यातील घटकांपासून बनवलेल्या असतात. लस देण्याच्या क्रियेला लसीकरण म्हणतात. ५००० वर्षांपूर्वी चिनी लोक देवी रोग होऊ नये म्हणून लसीकरण करत. अशी वैद्यक इतिहासात नोंद आहे. पहिले शास्त्रोक्त लसीकरण करण्याचा मान एडवर्ड जेन्नरकडे जातो. त्याने १७९६ मध्ये देवी रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण केले.* *आज आपल्याकडे क्षयरोग, गोवर, घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, पोलिओ, कॉलरा, रेबीज, विषमज्वर, कावीळ तसेच गालफुगी अत्याधिक रोगांवरील प्रतिबंधक लसी उपलब्ध आहेत. लसीकरणामुळे बऱ्याच गंभीर रोगांचा प्रतिबंध आपण करू शकलो आहोत.* *डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित* यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून, मनोविकास प्रकाशन ०२० ६५२६२९५० *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य ज्याच्याकडे असते, तो जग जिंकण्याची जिद्द राखून पुढे जातो "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *रक्तातील तांबड्या पेशींची निर्मिती शरीरात कोठे होते ?* अस्थीमज्जा 2) *ऍनिमिया हा आजार कोणत्या द्रव्याच्या कमतरतेमुळे होतो ?* लोह 3) *लिलीचे फुल हे कोणत्या देशाचे राष्ट्रचिन्ह आहे ?* फ्रान्स 4) *डॉ विक्रम साराभाई अवकाश संशोधन केंद्र कोठे आहे ?* थूम्ब 5) *भारताच्या कोणत्या सरन्यायाधीशानी राष्ट्रपती म्हणून कार्यभार सांभाळला होता ?* एम. हिदाय तुला *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 नरसिंग जिड्डेवार, भोकर 👤 आकाश सरकलवाड, धर्माबाद 👤 कपिल जोंधळे 👤 अशोक लंघे *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मानवाचं मन... अनेक प्रकारचे सुखदु:खात्म प्रसंग, विवंचना, काळजा, आसूया, स्पर्धा, द्वेष, मत्सर, उत्सुकता आणि कुतूहल...यांनी सदैव त्याचे मन 'पिसाट' झालेले. अप्राप्याचा ध्यास म्हणजे आपल्याकडे जे नाही ते मिळवण्याचा अथक प्रयत्न आपण सारे करीत असतो; पण 'मन:शांती' चा शोध घ्यायला नेमके विसरतो. 'मन:शांती' हे महत्वाचे जीवनसूत्र आहे, हेच आपण या सा-या धबडक्यात हरवून जातो. 'निरंजनी आम्ही बांधियेले घर' असे संतवचन आहे. ही निरांजनावस्था महत्वाची. जन्मापासून मृत्यूपर्यंत माणसाला सतत काही ना काही करावे लागते. यातून त्याची सुटका नाही. मनाची सर्वार्थाने मुक्तता तशी कठीणच. कारण वैयक्तिक भावभावना, विकार-विचार आणि अहंकार यापासून स्वत:ला अलग करणे जवळजवळ अशक्यप्राय.* *पाण्यात पडले म्हटले की कोणीही ओलाचिंब होणारच. मात्र एखादा खडक त्या जलाशयात असेल तर तो पाण्यात राहून अलिप्तच की ! अशी अलगता संसारात राहून साधायची, म्हणजे शरीरक्रिया चालू आहे पण मन मात्र अलिप्त आहे. त्याच्या पृष्ठभागावर कोणत्याच लहरी नाहीत, तरंग नाहीत. मनाच्या समधात अवस्थेचे वर्णन संत ज्ञानेश्वरांनी 'नुरोनिया ठेला' असे केले आहे. म्हणजे बाह्यस्वरूपी तो इतका निश्चल की जिवंत आहे का, हा इतरांना प्रश्न पडावा, आणि तो जिवंत असला तरी जणूकाही जिवंत नाही, असे वाटावे असा... त्याच्या मनाच्या या अवस्थेला 'सहजस्थिती किंवा 'निजस्थिती' असेही त्यांनी म्हटले आहे. हे क्षण प्राप्त व्हावे, असे वाटत असल्यास संतानी सांगितलेला उपाय म्हणजे नामस्मरण...' नामापरते सुख नाही रे सर्वथा !' हाच तो सद्रगुरूपदेश...* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🚩‼🚩‼🚩‼🚩‼🚩 *--संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो,* *काल आयुष्यातील एक अविस्मरणीय अनुभव घेतला.* *अंधारी व्याघ्र प्रकल्प ताडोबा, चंद्रपूर येथे 12 वाजता पोहचलो.जातांना* *200 की मी पूर्ण जंगलातून सफर अगोदरच भामरागडची करून आलो.आणि आता* *12 ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत ताडोबात चित्तथरारक* *अनुभव घेतला. माहिती घेतली आणि* *2 वाजेपासून 6.30 वाजेपर्यंत जंगल सफारी केली.किर्रर्र* *झाडी,निर्मनुष्य जंगल,भयाण शांतता.जितेंद्र आणि* *सचिन असे 2 सफारी गाईड गाडी चालवणाऱ्याची कमाल म्हणावी* *लागेल,झाडाझुडुपांमध्ये गाडी चालतांना जीव मुठीत धरून सगळे* *शांत बसले होते.* *या प्रकल्पात जनगणना नुसार 96 वाघ ,लेफर्ड आहेत. जंगल 1100 चौ* *की मी ,600 कोअर जंगल,या मोसमात प्राणी जास्त बाहेर येत नाही,त्यांचा एकत्र राहण्यासाठी* *चा हा काळ असतो,प्रेग्नन्ट एरिया अस म्हणतात त्याला. 3 महिने बांधलेला* *असतो,उन्हाळ्यात पाण्यासाठी वाघ दुपारी जास्त बाहेर* *पडतात,उन्हल्यात स्थलांतरित होतात म्हणून जास्त* *दिसतात,जंगलात लोकवस्ती अगदी तुरळक आहे,कर्मचारी वर्ग जादाकरुन* *येथे राहतात. उंचावर त्यांच्या 2 ठिकाणी कुटी आहेत.सिंह* *आणि हत्ती सोडून जंगलात सर्व प्रकारचे प्राणी आहे,* *फिरण्याचा एरिया टोटल 42 की मी आहे ,4 तास फिरण्यासाठी मुभा* *दिली होती.* *कुणबी तेली माळी समाज या जंगलात पूर्वीपासून राहतात,सुधीर मुनगंटीवार यांची शेती जंगलात* *आहे,आत जंगलात गाव नाही,चिमूर पर्यंत परिसर आहे,आत प्राण्यांसाठी* *18* *ठिकाणी सोलर बोअरवेल बसवलेले आहे* *प्राणी इथे पाणी पिण्यासाठी येतात.* *वाघ समोर दिसला तरी ऍटॅक करत नाही, त्यांना त्रास दिला तरच प्राणी* *हल्ला करतात.* : *पर्यटक नियमित चालू असतात,मोहाची फुले वेचने, पर्यटक* *त्यांची सेवा,एवढाच या लोकांचा व्यवसाय ,पण अगदी आनंदी* *आणि काटक,शिक्षणा साठी मूल चंद्रपूर येथे पाठवतात, गाईड* *एम.ए.झालेला,पण रोजगार नाही म्हणून काम करतात. सचिन* *गाऊत्रे, माळी समाजाचा सुशिक्षित मुलगा,मुली मिळताना अडचणी येतात,नोकरीच्या शोधात भरपूर फिरलो पण नोकरी नाही,शेवटी स्थानिक व्यवसाय करतो.* *बुध्दापौर्णिमेल प्राणी पाणी पिण्यासाठी तळ्यावर येतात,तेव्हा* *रात्रभर येथे पर्यटक आधीपासूनच बुकिंग करून ठेवतात.* *2 कुटी वर आधिकारी असतात.* *मोहूर्ली गेट ,मामला गेट, असे दोन गेट आहेत.आजच्या सफरीत आम्ही* *अगदी नशीबवान ठरलो,कारण* *अस्वल,लांडगे,गवे,मोर,रानमांजर ,कोल्हे सोडून कुणालाही वाघ दिसले* *नाहीत,मात्र आम्हाला घनदाट जंगलात गाडी चिखलात गेल्याने सर्वांच्या हृदयाचे ठोके चुकले.कुणी गाडी सोडून खाली उतरायला तयार नव्हते,शेवटी एकमेकांच्या आधाराचे धाडस करून गाडी चिखलातून उचलून,काही लोटून बाहेर काढली.आयुष्यातील सर्वात खतरनाक शॉट अनुभवल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.पुढे गेल्यावर काही अवधीतच लांबलचक* *तब्बेतशीर चित्ता, आणि बिबट्या यांचे जवळून* *दर्शन झाले.सगळा ताण तिथेच विसरलो.प्राणी कितीतरी वेळ ते जंगलात घाबरून पळत गेले,तो* *पर्यंत आम्ही त्यांना नेहाळत बघत होतो.आयुष्यातील एक* *अनमोल क्षण ताडोबात घातला.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• संकल्प असतात तरी काय ? हे कळायला खूप अवघड आहे.नवे वर्ष लागले की,लोकांचे कितीतरी संकल्प करताना सुरुवातीला जाहीर करतात आणि काही दिवस गेले की,कोणते संकल्प केले हेही विसरुन जातात.वर्ष संपत आले की,मग पुन्हा संकल्प करणार याचे नियोजन करतात.पण हे जे काही संकल्प करणारे आहेत ना ते सगळे जगाला बनवायला काही कमी नाहीत.उगीचच आम्ही काहीतरी करत असल्याचा भास लोकांना भासवितात पण प्रत्यक्षात काहीच करत नाही.अशा बनवना-या लोकांपासून सावध रहायला हवे.यांच्या ओठांवर एक आणि प्रत्यक्षात करायचे एक..! संकल्प केल्याने पूर्ण होत नाही किंवा सांगितल्याने पूर्ण करावेत असेही नाही.तर नेहमीच चांगले काम करण्यासाठी संकल्प करणा-याला येणारा प्रत्येक दिवस हा चांगला च असतो.तो कधीही सांगत सुटत नाही.मनामध्ये दृढ विश्वास असला आणि चांगले काम करण्याची प्रबळ इच्छा झाली की,तो निश्चितच स्वत:साठी व इतरांसाठी कल्याणकारी संकल्प करतोच.त्याला नवीन वर्षाची किंवा नवीन दिवसाच्या मुहर्ताची काहीच गरज नाही.संकल्प असे करावे की,आपले हित कमी व इतरांचे जास्त असायला हवे.त्यातून काहीतरी नवीन शिकले पाहिजे.ज्यामुळे स्वत:ला मानसिक समाधान आणि इतरांना काहीतरी वाममार्गाला लागलेल्यापासून दूर करण्यासाठी आपण काहीतरी केल्याचा आनंद निर्माण होईल असा काहीतरी उद्देश आपल्यासमोर ठेवून केलेले एखादे कार्य म्हणजेच माझ्यामते खरा संकल्प होईल अन्यथा संकल्पच्या ठिकाणी संकल्पनाच एक वल्गनाच होईल.मग तुम्हीच संकल्पाची संकल्पना कशी निर्माण करायची ते ठरवावी.चांगल्या संकल्पाला मुळीच काळ, वेळ आणि वर्ष याची काहीच गरज नाही. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🌞🌜🌞🌜🌞🌜🌞🌜🌞🌜 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *वडिलांना मदत* भगवान बुद्ध त्या काळात आपल्या शिष्यगणांसह गावोगावी जात होते. एका गावाच्या वेशीवर एक वृद्ध आपल्या मोठ्या टोपलीतून भाजी विकण्यास बसला होता. ती टोपली जड होती व त्याला तेथून दुसरीकडे जायचे होते म्हणून येणार्‍या - जाणार्‍या वाटसरुंना तो आपल्या डोक्यावर टोपली ठेवण्यास मदत करण्याची याचना करत होता. पण कोणीही त्याच्याकडे लक्ष देत नव्हते. ते शिष्यगणही मजा बघत होते. हे पाहताच भगवान बुद्ध स्वतः पुढे झाले व त्यांनी वृद्धाच्या डोक्यावर टोपली उचलून दिली. त्या वृद्धाने त्यांना ओळखले होते. तो म्हणाला, सार्‍या जगाच्या दृष्टीने ते कोणीही असोत, पण माझ्या दृष्टीने माझ्या मुलासारखे आहेत ! त्याचे बोलणे ऐकून शिष्य आश्चर्यचकित झाले. त्यांनी विचारले, हे कसे शक्य आहे ? तो वृद्ध उत्तरला, जगात प्रत्येक मुलगा हा आपल्या मातापित्यांचा आधार असतो. त्यांचे कष्ट उपसण्यास नेहमीच मदत करत असतो. आज त्यांनीही मला मदत केली आहे. माझे कष्ट हलके केले आहेत. मग ते माझ्या मुलासमानच नाहीत का ? सार्‍या शिष्यांनी त्या वृद्धाचे पाय धरले व क्षमा मागितली.  *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 24/12/2019 वार - मंगळवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    *भारतीय ग्राहक दिन* 💥 ठळक घडामोडी :- ● १२९४ - पोप सेलेस्टीन पाचव्याने राजीनामा दिल्यावर पोप बॉनिफेस आठवा सत्तेवर. ● १७७७ - जेम्स कूकला किरितिमाती तथा क्रिसमस द्वीप पहिल्यांदा दिसले. ● १८५१ - लायब्ररी ऑफ काँग्रेसला आग. ● १८६५ - अमेरिकेच्या दक्षिणेतील सेनापतींनी कु क्लुक्स क्लॅन या वर्णद्वेषी संस्थेची स्थापना केली. ● १९२४ - आल्बेनिया प्रजासत्ताक झाले. 💥 जन्म :- ● १८९९ - पांडुरंग सदाशिव साने तथा साने गुरुजी, मराठी लेखक. ● १९२५ - मोहम्मद रफी, भारतीय पार्श्वगायक. ● १९५९ - अनिल कपूर, हिंदी चित्रपट अभिनेता. 💥 मृत्यू :- ● १८७३ - जॉन्स हॉपकिन्स, अमेरिकन उद्योगपती व दानशूर. ● १९१४ - जॉन मुइर, अमेरिकन निसर्गसंवर्धक. ● १८६३ - एम.जी. रामचन्द्रन, तमिळनाडूचे मुख्यमंत्री. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *आयुष्मान खुराणा आणि विकी कौशल ठरले सर्वोत्कृष्ट अभिनेते, 'पाणी'साठी आदिनाथ कोठारेचाही गौरव* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर, 27 किंवा 30 डिसेंबरचा नवा मुहूर्त* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *2022 पर्यंत देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यार असून देशात २२ हजार गावात ग्रामीण कृषी मार्केटच जाळ उभारणार असल्याची माहिती केंद्राच्या शेतकरी उत्पन्न दुप्पट करणे अभ्यास समितीचे अध्यक्ष डॉ अशोक दलवाई यांनी दिली आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *भाजपला धोक्याची घंटा, एका वर्षात गमावली पाच राज्यातील सत्ता, काँग्रेस-जेएमएमचं सरकार निश्चित ,काँग्रेस, जेएमएम आणि राजद आघाडीला 42 जागांवर आघाडी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटेंवर पुणे जिल्हाबंदी, कोरेगाव-भीमा इथं होणाऱ्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी, 160 जणांनाही नोटीस* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *27 आणि 28 डिसेंबरला कोकण रेल्वेवर मेगाब्लॉक, दहा गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम, नाताळ आणि नववर्षानिमित्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना फटका* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या ट्वेन्टी ट्वेन्टी आणि वन डे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सलामीवीर शिखर धवनचं संघात पुनरागमन तर रोहित शर्मा आणि गोलंदाज मोहम्मद शमीला विश्रांती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  *साने गुरुजी जयंतीनिमित्त प्रासंगिक लेख* *मानवतेची शिकवण देणारे साने गुरुजी* पांडुरंग सदाशिव साने ज्यांना आपण सर्वजण साने गुरुजी या नावाने ओळखतो. त्यांचा जन्म 24 डिसेंबर 1899 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावी झाला. सदाशिवराव व यशोदाबाई यांच्या पोटी जन्मलेला दुसरा मुलगा असून तिसरे अपत्य म्हणजे साने गुरुजी. त्यांचे प्राथमिक शिक्षण गावातच पूर्ण झाले. त्यांचे वडील सारा गोळा करण्याचे काम करीत होते. साने गुरुजी यांची आई त्यांना श्याम या नावाने प्रेमाने ........ वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/12/blog-post_23.html             लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *मोहम्मद रफी* मोहम्मद रफी हिंदी सिनेमातील महान प्लेबॅक गायक होता.नाटकांच्या आवाजाचा आणि त्यांच्या आवाजाचा विस्तार करण्यासाठी त्यांनी आपल्या समकालीन गायिकांबरोबर ओळखले. त्यांना शायनशाह-ए-तारानुम असेही म्हटले जाते. मोहम्मद रफीच्या आवाजात त्यांच्या आगामी काळात अनेक गायकांनी प्रेरित केले. हे सोनू निगम , मोहम्मद अजीज आणिउदित नारायण च्या नाव आहे - या आता अनेक त्याच्या स्वत: च्या ओळख आहे तरी. 1 9 40 ते 1 980 पर्यंत सुरूत्याने एकूण 26,000 गाणी गायली. [2]मुख्य प्रवाहात हिंदी अतिरिक्त गीते गझल , भजने , देशभक्तीपर गीत, कव्वाली समावेश आणि इतर भाषांमध्ये गाणे गायली. कलाकार त्यांच्या संगीत चित्रित आहेत कोठे गुरु दत्त , दिलीप कुमार , देव आनंद , भारत भूषण , Johnnie वॉकर , जॉय मुखर्जी , शम्मी कपूर , राजेंद्र कुमार , राजेश खन्ना ,अमिताभ बच्चन ,  धर्मेंद्र ,  जितेंद्र  आणि  ऋषी कपूर ते गायक अभिनेता व्यतिरिक्त किशोर कुमारदेखील नाव समाविष्ट आहे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" कोणतीही विद्या, ज्ञान कधीच वाया जात नाही. "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *'शेती' हा विषय कोणत्या सुचीमध्ये समाविष्ट आहे ?* राज्यसूची 2) *समुद्राची खोली कोणत्या परिमाणात मोजतात ?* फॅदम 3) *नाताळ' केव्हा साजरा केला जातो ?* 25 डिसेंबर 4) *'पुरुज्जीवन राष्ट्रवाद' या संकल्पनाचे जनक कोण ?* योगी अरविंद घोष 5) *स्निग्ध पदार्थाच्या पचनास कोणत्या रसाची आवश्यकता असते ?* पित्त *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 निर्मला बोधरे, सहशिक्षिका, पुणे 👤 विठ्ठल मुजळगे, सहशिक्षक, धर्माबाद 👤 रणजित बाळासाहेब गुंजाळ, पत्रकार, *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आयुष्याच्या संध्याकाळी आपल्या कुटुंबासमवेत निवांतपणानं जगता यावं नि जीवनाचं सार्थक व्हावं, अशी प्रत्येकाची मनोमन ईच्छा असते. आज मात्र एकाकीपणाच्या गर्तेत स्वत:ला कोंडून घेण्याची वेळ अनेकांवर येताना दिसत आहे. पाश्चात्य देशातून आलेल्या संस्कृतीनं गेली अनेक वर्षे आमच्या सामाजिक रचनेला हादरे दिल्याने आमच्या कुटुंबव्यवस्थेला तडे गेले आहेत.* *संयुक्त कुटुंबव्यवस्थेत अनेक अडचणी व भौतिक सुखांच्या अभावातही आत्मिक सुखासाठी जगणारी माणसं आज हरवून गेली आहेत. पडद्यावरील आजी-आजोबा आम्हांला भावतात, पण वास्तवात प्रत्येकाला कुटुंब हवं ते चौकोनात बांधलेलं. त्यात इतरांना जागाच उरलेली नाही.* *"काळाच्या बदलात आलेली ही स्थित्यंतरं अत्यंत वेदनादायी आहेत, पण ती स्विकाराणं ही आमची अपरिहार्यता...?* *आहे....?...की.....?"* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सज्जनहो,* *पी* *.एच. डी.करून किती* *अभ्यासकांनी जीवन आनंदी व* *कितीचं सुखकर झालं माहीत नाही,.* *पण जे कधी शाळेत गेले नाहीत* *त्यांचा अभ्यास पी.एच. डी.करणारे* *करतात हे मात्र सत्य आणि वास्तव आहे.* *त्याच मुळही तसेच आहे,या लोकांनी* *माणस वाचली,पाहिली,* *लिहिली,अभ्यासली आणि* *माणसाच्याच गराड्यात ही लोक* *राहिली.* *संत ज्ञानेश्वर, रवींद्रनाथ टागोर,* *बहिणाबाई चौधरी यांनी कधी शाळेच* *तोंड पाहिले नव्हते पण* *आज पी.एच. डी. करणारे या महान* *व्यक्तीचा अभ्यास करतात.* *तर मग एकच ठरवा मला माणसात* *रहायच , माझा आनंद* *माणूस आहे, माझं जीवन* *माणूस आहे,मी फ्लॅट मध्ये* *ब्लॉक होणार नाही,आणि* *ब्लॉकमध्ये फ्लॅट होणार* *नाही.माणसात राहून माणूस बनेल.* *माणसालाच सुखी करेल व सुखी* *राहील.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••• ईश्वरावर श्रध्दा असणे काही चुकीचे नाही,पण ईश्वरच जे काही करेल ते मी स्वीकारेन असे म्हणून त्याच्यावर विसंबून राहणे मात्र चुकीचे ठरेल.ईश्वर ही आपल्यासाठी एक अप्रतक्ष प्रेरणा आहे.जेव्हा तुम्ही तुमच्या प्रयत्नाने आणि जिद्दीने प्रामाणिकपणे काम करता ते काम नक्कीच यशाकडे घेऊन जाते.त्या तुम्ही करत असलेल्या कामामध्ये ईश्र्वर नक्कीच प्रेरणा देतो.केवळ काम न करता मला माझ्या कामात नि जीवनात यश मिळू दे असं म्हणत असाल तर तो तुमचा विचार तुम्हाला पराभवाकडे घेऊन जाणाराच ठरेल.म्हणून प्रथम आपल्या कामाचा प्रारंभ प्रसन्न मनाने आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून करायला सज्ज राहिलातकी,मग तुम्हीच तुमच्या मनातून ईश्र्वराचे आभार मानायला विसरणार नाहीत हे मात्र खरेच आहे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मातृभक्त लक्ष्मणदेव* एका गांवात एक स्त्री गांवाबाहेर आपल्या लहान मुलाला घेऊन एकटीच रहात होती. मुलाचे वडील त्याच्या लहानपणीच देवाघरी गेले होते. मुलाचे नाव होते लक्ष्मणदेव. आई धुणीभांडी करून आपला चरितार्थ चालवित होती. मुलगाही आईला कामात मदत करत असे. काम करून तो लांबच्या शाळेत पण जाई. एक दिवस तो शाळेतून परत आला तर आई झोपलेली होती. तिला खूप ताप भरला होता. लक्ष्मण आईची सेवा करू लागला. बरेच दिवस झाले तरी आईचा ताप उतरेना. खांण बंद झालं. ती खूप अशक्त झाली. लक्ष्मणाला घरची बाहेरची सर्वच कामे करावी लागत. आईची सेवा तो अगदी मन लावून करत असे. तिला दूध गरम करून देणे तिची औषधं वेळच्या वेळी देणे. एका रात्री आईने लक्ष्मणाला हाक मारली. 'लक्ष्मणा थोडे पाणी देतोस' लक्ष्मण घरात पाणी आणायला गेला. पाणी घेऊन तो परत आला तेवढयात आईला झोप लागली. गुंगीत आई पडून होती. रात्र संपली पहाट झाली. गार वार्‍याच्या झुळुकीबरोबर आईला जाग आली. तिने पाहिले समोर हातात पाण्याचा पेला घेऊन लक्ष्मण उभा होता. आई म्हणाली 'लक्ष्मणा अरे तु रात्री झोपलाच नाहीस का ? वेडया अरे मला उठवायचे नाही कां ? लक्ष्मण आईच्या हातात पाण्याचा पेला देत म्हणाला, 'आई अग माझ्या लहानपणी माझ्यासाठी तु किती रात्री जागुन काढल्यास मग मी एक रात्र तुझ्या करता जागलो तर काय झालं'. तिने त्याला पोटाशी धरले. तिच्या डोळयातले अश्रू त्याच्या मानेवर ओघळत होते. *तात्पर्यः आईवडीलाची सेवा करणे हीच खरी पुण्याई आहे.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

🔰🌸🔰🌸🔰🌸🔰 *🌷🌷जीवन विचार*🌷🌷 *〰〰〰〰〰〰〰* मनुष्याच्या संग्रही वृत्तीला मर्यादा नाही.माणसाचा भयंकर शञू जर कोणी असेल तर तो आहे लोभ.लोभ हा सर्व सद्गूणांचा नाश करतो.गीतेत माणसाच्या नरकाची व्दारेच काम, क्रोध ,लोभ ही सांगितलेली आहेत. माणसाच्या लोभाची बरोबरी दुसरे कोणी करु शकत नाही. सर्व जिवात्म्यांमध्ये मनुष्यच असा प्राणी आहे की तो संग्रहवृत्तीने जगतो.मनुष्य कितीही क्रोधीही झाला तरी तो वाघाइतका क्रोधी होऊ शकत नाही आणि कितीही कामी झाला तरी तो चक्रवाक पक्ष्याइतका कामी होऊ शकत नाही असे म्हणतात. पशूंना द्रव्याची इच्छा नसते,परंतु तीच इच्छा माणसाला पशू बनविते. मानवाच्या अंगी जी लोभी प्रवृत्ती आहे त्याची बरोबरी कोणी करु शकत नाही.म्हणूनच धनाचा संचयाच्या मागे लागलेल्या लोभी प्रवृत्तीचा मनुष्यास साध्या व्यवहाराची शिकवण संतानी दिली... *संत कबीर सांगून गेले "पानी वाढो नाव में, घरमें बाढो दाम l दोनों हात उलीचिये , यही सयानो काम ll"* अर्थः माणसाला धनाची गरज आहे पण घरात नाही समाजात पाहिजे.नावेतील पाण्याने जसा धोका होतो तसा घरातील धन वाढल्याने धोका होतो. माणसाने आपल्या गरजेनुसार धनाचा वापर करावा. पण गरजेपेक्षा अधिक धनाचा संचय करणे म्हणजे ही झाली लोभी प्रवृत्ती. या लोभी प्रवृत्तीपासून जोपर्यंत माणूस दूर होत नाही तोपर्यंत तो समाधानकारक जीवन जगू शकत नाही. 〰〰〰〰〰〰〰 *'आपल्या श्रमाचे फळ, हीच जगातील सर्वोत्तम संपत्ती आहे.'* 〰〰〰〰〰〰〰 🌺🌸🌺🌸🌺🌸🌺 *🙏शब्दांकन/संकलन*🙏 *✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे).* जि.प.प्रा.शा.गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड.

आजची चारोळी अधीर मन झाले नांदत आहे सासरी भेटण्यासाठी भाऊराया अधीर मन झाले येशील काय तू घ्यावया. 〰〰〰〰〰〰 श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 23/12/2019 वार - सोमवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *राष्ट्रीय किसान दिन* 💥 ठळक घडामोडी :-  ●१६२० - विल्यम ब्रॅडफोर्ड आणि मेफ्लॉवर पिल्ग्रिम्स प्लिमथ, मॅसेच्युसेट्स मध्ये प्लिमथ रॉक या ठिकाणी उतरले. यांची वसाहत म्हणजे अमेरिकेतील ब्रिटीश वसाहतींची मुहूर्तमेढ होय. ●१९५८ - चार्ल्स दी गॉल फ्रांसच्या अध्यक्षपदी. युनियन देस् देमोक्रातेस् पुर ला रिपब्लिक पक्षाला ७८.५%चे बहुमत. ●१९६८ - अपोलो ८चे केनेडी स्पेस सेंटरहून उड्डाण. फ्रँक बॉर्मन, जेम्स लोव्हेल आणि विल्यम ऍंडर्स अंतराळात. ●१९८७ - फिलिपाईन्सच्या तब्लास सामुद्रधुनीत प्रवासी फेरी दोन्या पाझ आणि तेलवाहू जहाज व्हेक्टर १ मध्ये टक्कर. १,०००हून अधिक ठार. 💥 जन्म :- ●१९६३- गोविंदा,हिंदी चित्रपट अभिनेता ●१९५९-कृष्णम्मचारी श्रीकांत,भारतीय क्रिकेटपटू ●१९०३ - भालचंद्र दिगंबर गरवारे उद्योगपती. ● १९२१ - पी.एन. भगवती भारताचे सतरावे सरन्यायाधीश 💥 मृत्यू :- ● १८२४ - कंपवाताचा मानवी मेंदुशी संबंध आहे हे सिद्ध करणारे जेम्स पार्किन्स ● १९४५ - जनरल जॉर्ज पॅटन दुसऱया महायुद्धातील यूरोपमधील अमेरिकन सेनापती. ● १९६५ - गणपतराव बोडस, मराठी संगीत नाटकांतील गायक-अभिनेता. ● २००४ - पी. व्ही. नरसिंहराव, भारतीय पंतप्रधान. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *आंदोलनांद्वारे तुम्हाला CAA चा विरोध करायचाच असेल तर तुम्ही माझे पुतळे जाळून आंदोलन करा, पण हिंसाचार, शासकीय मालमत्तेची हानी तसेच गरिबांची वाहने जाळू नका, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी केले.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *विलेपार्ले स्टेशन परिसरातील इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल, इमारतीत काही लोक अडकल्याची शक्यता.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर पोलिसांची गाडी पलटली. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. ओझर्डे गावातच हा अपघात झाला आहे. या गाडीत चार पोलीस कर्मचारी होते.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून शेतकरी कर्जमाफीची घोषणा, सप्टेंबर 2019 पर्यंतचं 2 लाखाचं कर्ज माफ, सरसकट कर्जमाफीची शेतकरी नेते, विरोधकांची मागणी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *महाराष्ट्रात विभागनिहाय मुख्यमंत्री कार्यालय, 50 ठिकाणी 10 रुपयांत शिवभोजन तर पूर्व विदर्भात पोलाद प्रकल्प, मुख्यमंत्र्यांच्या 10 मोठ्या घोषणा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *जवळपास 26.7 कोटी फेसबुक युजर्सच्या डेटा ऑनलाइन लीक झाल्याची माहिती एका संशोधक कंपनीने दिली आहे. यात फेसबुक युजर्सच्या खासगी माहितीचा समावेश आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *कटक मध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात टीम इंडियाचा वेस्ट इंडिजवर चार विकेट्सने मात, मालिका 2-0 ने खिशात, विराट, रोहित, राहुलची अर्धशतकं* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *राष्ट्रीय किसान दिनानिमित्त* *शेतकऱ्यांना जगवायचे असेल तर .....!* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. https://nasayeotikar.blogspot.com/2016/02/blog-post_20.html?m=1 लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" घोंगड्याने काम भागत असेल तर रेशमी वस्त्राचा हट्ट धरु नये. "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *'भटनागर पुरस्कार' कोणत्या क्षेत्रात दिला जातो ?* विज्ञान 2) *जिल्हा निधीतून पैसा काढण्याचा आणि त्याचे वितरण करण्याचा अधिकार कोणास आहे ?* मुख्य कार्यकारी अधिकारी 3) *शून्यधारीत अर्थसंकल्पाचे आद्यप्रवर्तक कोण ?* पीटर पिहर 4) *रासायनिक द्रव्यांचे कारखाने महाराष्ट्रात कोठे आहेत ?* पनवेल व अंबरनाथ 5) *पृथ्वी स्वतः भोवती फिरते हे प्रथम कोणत्या भारतीय खगोल शास्त्रज्ञाने सांगितले ?* आर्यभट्ट *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 सार्थक सुगंधे, धर्माबाद 👤 चिं. श्रीपाद हणमंलू शंकरोड, येवती 👤 प्रवीण गुंटोड 👤 ज्ञानेश्वर ताटीकुंडलवार 👤 राजू पाटील कुरुंदे *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आपल्या मुखावाटे आपल्या शरीरात जे अन्न जाते, त्यावर आपण खूप नियंत्रण ठेवतो. आपण आपला आहार सदोदित संतुलित ठेवायचा प्रयत्न करतो. वैद्दकिय सल्ल्यानुसार आवश्यक ते पथ्य पाळतो. जेवायच्या आधी आपण दररोज स्वच्छ हात धुतो. शुद्ध पाणी पितो. वेळोवेळी आपण उपवास करतो. आपल्या तोंडातून जे काही आत जाते ते पोटात जाते आणि शेवटी ते शरीराबाहेर टाकले जाते. हे आपल्याला माहित असूनसुद्धा ही सगळी काळजी आपण घेतोच.* *पण आपल्या मुखावाटे बाहेर पडणा-या शब्दांची तशाच प्रकारची काळजी आपण घेत नाही. ज्या मुखातून आपण परमेश्वराचे गुणगान करतो, त्याच मुखातून आपण खुशाल अपशब्द उच्चारतो. ज्या झ-यातून केवळ निर्मळ पाणी झरले पाहिचे, तो झरा आपणच प्रदूषित करतो. आपल्या अमंगल वाणीने तो झरा आपणच विटाळून टाकतो.*                      ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••      🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷     *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*          📱 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो* *काल दुपारी तीन वाजता पाटोदा,ता.गंगापूर, जि.औरंगाबाद* *येथे पोहचलो.नाव ऐकल्यानंतर तुम्ही पण ओळखलं असणार,पण प्रत्यक्ष अनुभव आणि अप्रत्यक्ष अनुभव यात फरक असतो म्हणून या गावाची प्रत्यक्ष पाहणी केली.* *गावात प्रवेश करताच स्वागताचे फलक,पुरस्कार मिळालेले फलक,समोरच ग्रामपंचायत* *कार्यालय, ते ही स्वप्नातील इमारत आहे की काय अस वाटलं.* *तिथे आशा कार्यकर्ती भाग्यश्री देवडे यांनी स्वागत केले,प्रथम कार्यालयात* *नेले.पाहून आश्चर्य वाटले,3350 लोकवस्तीच्या 7 वी* *शिकलेल्या सरपंच भास्करराव पेरे यांची व्हिडीओ क्लिप आणि प्रत्यक्ष करमत खरोखर वाखाणण्याजोगी* *आहे.* *हा माणूस गावासाठी 24 तास काम करतो.प्रत्येक कर्मचारी प्रथम ग्रामपंचायत कार्यालयात बायोमेट्रिक* *हजेरी थंब मशीनवर लावतो . गावात कुठे काय चालू आहे ,उदा.शाळेत काय* *चालत,अंगणवाडीत काय चालतय,धोबीघाट,मुख्य चौक,सभागृहात काय चालत ते* *ग्रामपंचायत मध्ये बसून समजते.संपुर्ण गावात प्लेव्हर ब्लॉक,मोफत वायफाय,मोफत शुद्ध* *पाणी,मोफत दळण, मोफत शेतीला पाणी,गरम पाणी,वापरायचे पाणी,प्रत्येक घरासमोर झाडे, त्यांना* *रोज पाणी.अशा कितीतरी बारीक बारीक गोष्टींचं सूत्रबद्ध नियोजन बघून* *खूप भारावून गेलो.आणि एव्हढी सगळी किमया बघून पैसा आणि पारितोषिक त्यांच्या पर्यंत धावून* *येतात. एक मोठं दालन पुरस्काराने भरलेले. हे सगळं बघून पी एच डी झालेले लोक अस काही का करत* *नाहीत किंवा अनेक पुढारी यांना का अस वाटत नाही की माझा गाव,माझा माणूस,माझा देश* *असा व्हावा.फक्त एकच काम या माणसाने केलं ते म्हणजे निष्काम कर्मयोग,24 तास जनसेवा,* *गावासाठी काहीही करायची तयारी.* *तिथेच त्यांनी सर्वांना चहा दिला ,आणि एक अविस्मरणीय अनुभव घेऊन तेथून विचारांच्या* *मनोयुध्दात निघालो.* *जर प्रत्येक भारतीयांच्या मनात आणि मनगटात हे पेरे नावाचं भूत शिरलं* *तर भारत महासत्ता व्हायला वेळ लागणार नाही.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• एखाद्याच्या जीवनाचा जीवनसंघर्ष म्हणजे एक चित्रपटच असतो.त्यांच्या जीवनात अनेक प्रसंग सुखदु:खाच्या खाचखळग्यांनी ओतप्रोत भरलेले असते.तरीही ते डगमगत नाहीत. कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाऊन जीवन जगण्याचे खरे ध्येय ते गाठतातच.परिस्थिती कशीही असो त्याला हाताळण्याचे सामर्थ्य त्यांच्या ठायी ठायी वसलेले असते.म्हणूनच त्यांच्या आदर्शाचा परिपाठ आपण आपल्या जीवनात अनुसरायला हवा.तरच आपल्याला जीवन जगण्याची चांगली प्रेरणा मिळेल. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *सिंहाचा जावई* एकदा एक सिंह जाळ्यात अडकला होता. एकदा उंदराने जाळे कुरतडून त्याला मुक्त केले. यामुळे सिंह उंदरावर प्रसन्न झाला आणि म्हणाला, "तुला हवं ते मागं. मी तुझी इच्छा पूर्ण करीन.' सिंहाने असे म्हणताच उंदीर म्हणाला, "महाराज आपण मला शब्द दिला आहे. माझी मागणी ऐकून आपण दिला शब्द मोडणार तर नाही ना?' यावर सिंह म्हणाला, "अरे नाही रे, मी राजा आहे आणि राजा आपले वचन कधीच मोडत नाही. माग तुला काय हवे ते'. यावर उंदीर म्हणाला, "मला तुमचा जावई करून घ्या.' सिंहाने ते मान्य केले. त्याप्रमाणे सिंहाने आपल्या मुलीशी उंदराचे लग्न लावून दिले. सर्व विधी झाले. पण सप्तपदीच्या वेळी नवरीच्या पायाखाली नवरदेव सापडले व चिरडून ठार झाले. तात्पर्यः *आपल्या कुवती बाहेरच्या एखाद्या गोष्टीची हाव धरलीतर स्वत:चाच नाश ओढवतो.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *राष्ट्रीय किसान दिन* किसान दिन हा दरवर्षी भारतात २३ डिसेंबर या दिवशी साजरा करण्यात येतो. भारताचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांचा हा जन्मदिवस संपूर्ण भारतात किसान दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी किसान घाटावर त्यांना सलामी दिली जाते. शासनाकडून वेगवेगळी प्रदर्शने आणि शेती संबंधित कार्यशाळा आयोजित केल्या जातात. *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

चिञचारोळी दि.२२-१२-१९ बुट पाॕलीश करून पोट परिवाराचे भरतो आहे कष्टाची कमाई करून जीवन मी जगतो आहे. 〰〰〰〰〰〰 श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.

*डोळस प्रेम* (दि.२१-१२-१९) प्रेम कुणावरही कधीही करावं हे जरी खर असलं तरीही प्रेम हे कधी आंधळं नसावं प्रेम करताना ते सहज डोळस असावं जीवनाचा सारीपाट खेळताना हातचा डाव राखून खेळलेल बर म्हणजे आपण हरलो कधी तरीही खेळण्याचा आनंद नक्कीच मिळू शकेल असच प्रेमात ही आपण एकमेकांना ओळखून असलेलं नेहमी बर म्हणजे कडाक्याच्या भांडणातही कधी जास्त अबोला होणार नाही कधी सरासरी प्रेमा मध्ये प्रेमभंग हा बहुतेकांच्या नशिबी ठरलेला असतो असा प्रेम भंग कुणाचा कधी होऊ नये म्हणून म्हणतो प्रेम हे डोळस असावं.... 〰〰〰〰〰〰 श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे ता.हदगाव जिल्हा नांदेड.

डोळस प्रेम दि.२१-१२-१९ मनाने मनाशी जोडावे नाती, डोळस प्रेम करून निभवावी नाती,आयुष्यभर अशी जपावी नाती हीच डोळस प्रेमाची खरी महती... 〰〰〰〰〰〰〰 श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे ता.हदगाव जिल्हा नांदेड.

*डोळस प्रेम* (दि.२१-१२-२०१९) माझ्यासारखं कधी तरी, तू ही डोळस प्रेम करून बघ..... मनात वेदना असताना, तू ही माझासारख हसून खेळून राहून बघ..... माझासारख डोळस प्रेम तुही करून बघ.... विरहात होणाऱ्या यातना तू ही तुला सोसून बघ..... माझासारख डोळस प्रेम तुही करून बघ... कधी तरी आठवणीने माझा तु तुलाच हरवून बघ.. माझासारख डोळस प्रेम तूही करून बघ.... काट्यांकुट्यांच्या भरलेल्या वाटेवर तू ही कधीतरी चालून बघ..... माझासारख डोळस प्रेम तूही करून बघ.... सुख ,दुःखाचा अनुभव घेताना एकदा, तू ही रडून बघ..... माझासारख डोळस प्रेम तूही करून बघ.... माझासारख कधी तूही जगून बघ.. दु:ख काय असते स्वत:वर, तू ही झेलून बघ..... माझासारख डोळस प्रेम तूही करून बघ.... माझ्यासारखे जिवंतपणी, कधीतरी तू ही मरून बघ.. डोळ्यातून अश्रू, तू ही वाहून बघ..... माझासारख डोळस प्रेम तूही करून बघ... 〰〰〰〰〰〰 श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे ता.हदगाव जिल्हा नांदेड.

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 21/12/2019 वार - शनिवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 घडामोडी :- ● १६२० - विल्यम ब्रॅडफोर्ड आणि मेफ्लॉवर पिल्ग्रिम्स प्लिमथ, मॅसेच्युसेट्स मध्ये प्लिमथ रॉक या ठिकाणी उतरले. यांची वसाहत म्हणजे अमेरिकेतील ब्रिटीश वसाहतींची मुहूर्तमेढ होय. ● १९५८ - चार्ल्स दी गॉल फ्रांसच्या अध्यक्षपदी. युनियन देस् देमोक्रातेस् पुर ला रिपब्लिक पक्षाला ७८.५%चे बहुमत. ● १९६८ - अपोलो ८चे केनेडी स्पेस सेंटरहून उड्डाण. फ्रँक बॉर्मन, जेम्स लोव्हेल आणि विल्यम ऍंडर्स अंतराळात. ● १९८७ - फिलिपाईन्सच्या तब्लास सामुद्रधुनीत प्रवासी फेरी दोन्या पाझ आणि तेलवाहू जहाज व्हेक्टर १ मध्ये टक्कर. १,०००हून अधिक ठार. 💥 जन्म :- ● १९६३- गोविंदा,हिंदी चित्रपट अभिनेता ● १९५९-कृष्णम्मचारी श्रीकांत,भारतीय क्रिकेटपटू ● १९०३ - भालचंद्र दिगंबर गरवारे उद्योगपती. ● १९२१ - पी.एन. भगवती भारताचे सतरावे सरन्यायाधीश 💥 मृत्यू :- ● १८२४ - कंपवाताचा मानवी मेंदुशी संबंध आहे हे सिद्ध करणारे जेम्स पार्किन्स ● १९४५ - जनरल जॉर्ज पॅटन दुसऱया महायुद्धातील यूरोपमधील अमेरिकन सेनापती. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *भूकंपाच्या झटक्याने उत्तर भारत  हादरला, काश्मीरमध्ये भूकंपाची तीव्रता अधिक, अफगाणिस्तानच्या काबूल उत्तर पूर्वमध्ये भूकंपाचे केंद्र* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *अजित पवार होणार उपमुख्यमंत्री, पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात कुणाला मंत्रीपद मिळणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं असताना उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांच्या नावावर खा. संजय राऊत यांनी शिक्कामोर्तबच केले आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *विठुरायाच्या चरणावरील हार आता भाविकांच्या गळ्यात, हारांमुळे रोज किमान 500 किलोचे निर्माल्य तयार होत होते . यात्रा काळात हे निर्माल्य हजारो टनात तयार होत असल्याने कचरा ही मंदिर प्रशासनासाठी डोकेदुखी बनू लागली होती. यावर मार्ग काढण्यासाठी मंदिर प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *महाराष्ट्र विकास आघाडीच्या मंत्रीमंडळ विस्ताराचा मुहूर्त अखेर ठरला, 24 डिसेंबरला होणार मंत्रीमंडळ विस्तार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात महाराष्ट्रात जागोजागी आंदोलन, किरकोळ अपवाद वगळता शांततेत निदर्शने, काही ठिकाणी समर्थनार्थ मोर्चे, औरंगाबादमध्ये एमआयएमआयमचा विराट मोर्चा, देशभरात तीव्र पडसाद * ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *राज्यात 2018 पर्यंतच्या 66 हजार कोटी रुपयांच्या कामात अफरातफर, उपयोगिता (युटिलिटी) प्रमाणपत्रांच्या संख्येमध्ये तफावत असल्याचं  कॅगचं निरीक्षण* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *इंटरनेट शटडाऊन करण्यात भारताचा पहिला नंबर, इंटरनेट शटडाऊन ट्रॅकर या ऑनलाईन पोर्टलच्या माहितीनुसार या वर्षात 95 वेळा इंटरनेट शटडाऊन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 फलक लेखन आणि वाचन ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      *उपक्रम :- वाचू आनंदे* इयत्ता पहिली ते आठवीसाठी उतारा खालील लिंकवर उपलब्ध आहे. http://projectforchild.blogspot.com/2019/12/21-2019.html उपक्रम वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" खरा आनंद हा दुसऱ्यांना देण्यात असतो; घेण्यात किंवा मागण्यात नसतो. "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *सर्व सजीव पेशींनी बनलेले असतात ही कल्पना प्रथमतः कोणी मांडली ?* श्वादन व श्वान 2) *कोणार्क हे प्रसिद्ध सुर्यमंदिर कोणत्या राज्यात आहे ?* ओडिसा 3) *महाराष्ट्राचे विद्यमान अर्थमंत्री कोण आहेत ?* मा.जयंत पाटील 4) *महाराष्ट्राचे विद्यमान गृहमंत्री कोण आहेत ?* मा. एकनाथ शिंदे 5) *कोणत्या घटनादुरुस्ती अन्वये भारतीय घटनेत मूलभूत कर्तव्याची तरतूद केली आहे ?* 42 वी *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 लक्ष्मी जैपाल ठाकूर, गोंदिया 👤 मन्मथ खंकरे 👤 श्रीमती माणिक नागावे 👤 गजानन गायकवाड 👤 संभाजी तोटेवाड 👤 जयश्री सोनटक्के *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *खरंतर मनाच्या कुपीत अत्तरासारखा जपून ठेवावा, असा अनमोल ठेवा असतो 'घर.' परस्परांशी लळा लागला की जुळून आलेले जन्माचे ऋणानुबंध घराला घरपण देतात. मग घरच मंदिर होऊन जातं. एकमेकांच्या स्वप्नांसाठी प्रार्थनेच्या स्वरांनी भरलेली घरं कुणालाही हवीहवीशी वाटतात. काही घरांची दारं मात्र सदैव बंद असतात. मनाची कवाडं जिथं बंद असतील, तिथं घराची कवाडं कशी उघडतील? अशा घरांच्या उंचीवरून घरातल्या रास्त आनंदाची मोजदाद होत नसते. तर आनंद हाच घरांचा, तिथल्या माणसांच्या उंचीचा मापदंड असतो. ज्या घरात कटुतेच्या भारानं मनं गुदमरलेली असतात, त्या घरातला प्रपंच सुखाचा कसा होईल?* *कृत्रिम वस्तूंच्या, बेगडी जगण्याच्या मायावी जाळ्यात अडकत चाललो आहोत का आपण? हे जाळं भल्याभल्यांना मोहवतं. घर जर आपुलकीवर, माया-ममतेच्या भिंतींवर उभं असेल तर येत्या जात्या वाटसरूंनाही ते आपलं वाटतं. जिथं तृप्तीची वीणा झंकारत असते. माझ्या घरातली सारी माणसं माझी आहेत ही भावनाच सा-यांना जोडून ठेवते. अशा मनस्वी माणसांच्या अस्तित्वाचं सर्वांना आकर्षण असतं, चुंबकासारखं. सुखी संसार त्याचीच परिणती असते. ही अथांग तृप्तीची गोळाबेरीज संपत्तीच्या पलिकडची असते."साधे गवत फुलण्याला सुख म्हटले मी, सहज भेटलेल्या जगण्याला सुख म्हटले मी, अवती भवती झगमगती नक्षत्रे होती, पण वातीच्या जळण्याला सुख म्हटले मी"* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• ☀☀☀☀☀☀☀☀☀ *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो* *मला माणूस हवाय,मला माणूस* *हवाय।* *देताय ना शोधून ,नाही,राग मानू नका* *गर्दीत हरवलाय म्हणून म्हटलो.* *मोगऱ्याचं फूल ओंजळीत घेतलं...* *की त्याचा गंध मनाला... शरीराला प्रसन्न करून जातो..* *सहवासातील माणसाचं देखील असंच असतं...* *काही माणसं काही क्षणातच मनाला खूप आवडतात...* *आपली होऊन जातात...* *तर काही कितीही सहवासात राहिली तरी आतून ओढ नसतेच...* *चेहरा बघण्यापेक्षा...* *नेहमीच समोरच्याच्या मनात उतरून बघावं...* *शोधूनही तिथं माणूसपण सापडत नसेल तर...* *त्याचं सुंदर दिसणंही मग किळसवाण वाटतं....* *शरीराची सुंदरता वयाबरोबर संपते* *तर मनाची सुंदरता,* *टिकून राहाते शेवटपर्यंत...* *शरीराला वय असतं....* *मनाला ते कधीच नसतं...* *शेवटी काय आपण व्यक्तीच्या स्वभावाच्या प्रेमात असतो...* *शरीर तर असतं निमित्तमात्र...* *माणसाच्या स्वभावात गोडवा...* *शालीनता...* *प्रामाणिकपणा...* *आणि विनयशीलता असेल...* *तर त्याची काही क्षण जरी सोबत मिळाली...* *तरी ती हवीहवीशीच वाटते...* *म्हणूनच बाहेर लक्ष दिव्याची सुंदर आरास असूनही,* *देवघरातील समईच्या तेजापुढं* *आपण नतमस्तक होतो...* *आयुष्यात अशी माणसं कधी भेटली तर...* *त्यांच्यावर जीवापाड प्रेम करावं...!* *आपल्या आवडत्या माणसाचं...* *आपल्यासोबत असणं...* *ही आयुष्यातील सगळ्यात मोठी कमाई...* *ती प्रत्येकाच्या वाट्याला येतेच असं नाही...* *आजकाल अशी माणसं भेटतात तरी कुठे ?* *नशिबानं कधी भेटलीच...* *तर हळुवार जतन करून ठेवावीत...* *कदाचित पुन्हा भेटतील न भेटतील...?* *माणूस बनुया,माणस जपुया,* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपण आपल्या दैनंदिन जीवनात काय केले आहे हे आपण जिथे नोंद करुन ठेवलेली असते.त्यात काल,आज आणि उद्या या तिन्ही काळाचा उलगडा केलेला असतो.आपण आपल्या जीवनात कसे वागलो आहोत त्याचीही नोंद केलेली असते.कधी आपल्याला विस्मरण झालेले असेल तर ते स्मरण करुन देण्याचे काम ती करते.आपण किती खरेखोटे जीवनात इतरांशी बोललो किंवा वागलो त्याचाही हिशोब ती आपणच नोंदवलेल्या शब्दांत आपल्यासमोर आरशासारखे काम करते.ती एक आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनलेली असते.तिला आपण कधीही विसरण्याचा प्रयत्न केला तरी विसरु शकत नाही.एवढे प्रेम ती आपल्यावर करते आणि आपण तिच्यावर करतो.ती आपल्याला आपल्या जीवनात सतत प्रेरणा देते आणि आपल्या जीवनाला तिला पाहून, वाचून सावरतो अशी प्राणप्रिय वस्तू म्हणजे डायरी अर्थात आपली रोजनिशी.जी माणसे जीवनात खरे यशस्वी होतात ती आपल्या जीवनात घडलेल्या, घडून गेलेल्या आणि घडणाऱ्या घटनांची सत्यतेची नोंद करतात आणि त्यासाठी ती डायरी अत्यंत मोलाचे काम करते.तीच आपल्यासाठी कोणत्याही काळात न बदलणारी,सत्य उलगडून आपल्यातील दोष दूर करण्यासाठी जाणीव करून देणारी खरी मैत्रीण असते ती आपल्या जीवनात असायलाच हवी नाहीतर आपल्या जीवनातले दुसरे कोणीही एवढे काम करणार नाही. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०. 📚📝📚📝📚📝📚📝📚📝📚 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *राजा आणि संत* एका वनात दोन संत राहत होते. एकांतात आपल्‍या तपश्‍चर्येत लीन राहत होते. कधीतरी यात्रेकरूंचा जत्‍था जायचा तेव्‍हा ते संत त्‍यांच्‍याशी बोलत असत. त्‍याच यात्रेकरूकडून त्‍यांना तेथील राजास त्‍या संतांबाबत माहिती मिळाली. तो या दोघांना भेटण्‍यास निघाला. जेव्‍हा संतांना ही गोष्‍ट कळाली.तेव्‍हा त्‍या दोघांना वाटले की आता राजा येणार व त्‍याने आपला चांगूलपणा पाहिला तर तो आपणास सतत भेटण्‍यास येईल, त्‍याच्‍याबरोबर अनेक माणसे येतील, त्‍यां माणसांच्‍या संगतीने अजून काही माणसे येतील व अशाने या वनातील शांती भंग पावेल व एकांत मिळणार नाही व एकांत नसल्‍याने आपणास ध्‍यानसाधना करता येणार नाही. राजा आम्‍हाला दोघांना सामान्‍य माणूस समजेल असे काहीतरी केले पाहिजे. राजाचा लवाजमा तेथे पोहोचला तेव्‍हा राजाने पाहिले की ते दोघेही संत हातात लाठ्याकाठ्या घेऊन एकमेकांशी भांडत होते. पहिल्‍या संताने दुस-याला म्‍हटले,'' तू स्‍वत:ला कोण समजतोस, मी इतके ज्ञान मिळविले आहे की ते तू सात जन्‍मातही मिळवू शकणार नाही.'' दुसरा संत त्‍यावर म्‍हणाला,'' अरे तू तर पक्का खोटारडा आहेस, तुझ्या ज्ञानाच्‍या गप्पा मारून तू लहान मुलाला फसवू शकशील पण मला नाहीस. तुझ्यापेक्षा जास्‍त ज्ञान मी माझ्या शिष्‍यांना दिले आहे.'' राजाने व त्‍याच्‍याबरोबरच्‍या लोकांनी हे भांडण पाहिले व विचार करू लागले हे साधू संत तर सामान्‍य माणसाप्रमाणेच भांडत आहेत व त्‍यांनी सर्वांनी असल्‍या साधूसंतांचा संग नको म्‍हणून वनातून जाणेच पसंत केले. राजा व लोक जाताच दोन्‍ही संतांनी एकमेकांकडे पाहून मंदस्मित केले व गळाभेट घेतली. दोन्‍हीही साधू आपल्‍या साधनेत रममाण झाले. तात्‍पर्य : चांगली गोष्‍ट घडवून आणण्‍यासाठी कधीकधी असा देखावा करावा लागतो. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मानवी जनुकांचा नकाशा व जैविक रेणू* १९५३ साली डॉक्टर वॅटसन आणि क्रिक यांनी डीएनएची मुलभूत आण्विक रचना जगासमोर मांडली. त्यानंतरची सुमारे ५० वर्षे मानवी जनुकांचा शोध घेण्यात गेली. अत्यंत चिकाटीचे असे हे काम वैज्ञानिकांच्या आवाक्यात आले, आहे असे २६ जून २००० रोजी अमेरिकेचे अध्यक्ष बिल क्लिंटन यांनी जाहीर केले. हा दिवस शास्त्रज्ञांनी *'मानवी उत्क्रांतीचा सोनेरी अक्षरात लिहून ठेवण्यासारखा दिवस'* म्हणून साजरा केला. हे सारे काय आहे ? माणसाच्या शरीरात अब्जावधी पेशी असतात. प्रत्येक पेशीत सजीवातल्या 'प्राणांचे' अस्तित्व असते. प्रत्येक पेशी तेच तेच अन्न मिळवते व बिनबोभाट कामही करत राहते. प्रत्येक पेशीचे हे काम शिस्तीत आणि इतरांच्या जोडीने जनुकांच्या इशाऱ्यावर चाललेले असते, ज्या पेशीत विभाजनाची क्षमता असते, त्यांच्यातील केंद्रक हा गोलाकार भाग असतो. सूक्ष्म नळ्या व पापुद्रे यांनी बनवलेली कोशिकांगे पेशीत असतात. यांना 'ऑर्गॅनेल्स' म्हणतात. त्यांपैकीच एक म्हणजे सूत्रकणिका म्हणजे मायटोकॉंड्रिया. केंद्रक व सूत्रकणिकेत आपली जनुके म्हणजेच डीएनएचे (डीऑक्सि रायबोन्यूक्लिक अॅसिड) विशिष्ट तुकडे एका पातळशा पडद्याआड बंदिस्त असतात. शरीरातल्या सगळ्या पेशींच्या केंद्रांमध्ये डीएनएचा रेणू सारखाच असला, तरी तो ज्या पेशीत असतो, जी पेशी घडवणार असते, त्यानुसार त्याचे गुणधर्म प्रकट होतात. गर्भावस्थेच्या अगदी प्राथमिक स्थितीतच अवयवांचे अस्तित्व जाणवयाच्या आधीच साऱ्या पेशींनी आपापसात कोण बनायचे हे ठरवलेले असते. त्या पेशींची गर्भातली जागा आणि नियंत्रक जनुकांचा प्रभाव यानुसार पेशी ऊती अवयव संस्था शरीर बनते. त्यांमध्ये काही जनुके मुख्य बटणाची भूमिका बजावतात, तर काही विशिष्ट भागाच्या बटणाची. अशा पद्धतीत गर्भावस्थेपासून व त्यानंतरही असंख्य जनुकीय बदल नियंत्रितरित्या होतात व शरीराचे संवर्धन होत राहते. पेशींचे विभाजन होताना त्यांच्यातील डीएनए रेणूसुद्धा आपल्या दोन प्रती बनवतो. त्यातून पहिल्या पेशीचे सारे गुणधर्म दुसऱ्या पेशीकडे पोहोचतात. डीएनएचे घटक शरीररचनेतील अत्यावश्यक प्रतीने बनवतात. डीएनएमधील (एटीजीसी) अॅडीनाईड, थायमाइन, ग्वानाइन, सायटोसिन या चार रासायनिक घटकांच्या विशिष्ट क्रमवारीत आनुवंशिकतेचा सारा अर्थ सामावलेला असतो. अत्यावश्यक अमिनो अॅसिड अशा प्रथिनांचा विशिष्ट क्रम विशिष्ट प्रथिन बनवतो. हा बदलला वा चुकला, तर त्यातून बनणारे प्रथिन, पेशी, अवयव हे सारे दिसण्यात, वागण्यात बदलू शकते. डीएनएचा रेणू इतर काही घटकांबरोबर लांबलचक दोऱ्याच्या गुंडाळीसारखा मुडपून, दुमडून वेढे घेत रंगसूत्रांच्या (क्रोमोझोम) स्वरूपात केंद्रात आढळतो. माणसाच्या पेशीत प्रत्येकी ४६ रंगसूत्रे असतात. त्यातील २३ आईकडून तर २३ वडिलांकडून घेतल्यावर दोघांचीही जनुके मुलांच्या व मुलीच्या पेशीत येतात. अशाप्रकारे प्रत्येक पेशीतील ४६ रंगसूत्रे व त्यावरची २५ ते २७ हजार जनुके या साऱ्याला 'जीनोम' असे म्हटले जाते. समजा पुस्तकातील अक्षरांची उपमा द्यायची ठरवली तर हे २५ हजार अक्षरांचे पुस्तकच बनते. अक्षरांचा क्रम बदलला, तर अर्थ बदलतो, अर्थ बदलला तर अनर्थ होतो. म्हणजेच पेशीपासून बनलेले अवयव कमी प्रतीचे, चुकीचे काम करू लागतात. या बदलाला 'म्युटेशन' असे म्हणतात. ह्युमन जिनोम प्रोजेक्टमध्ये म्हणजेच जनुकांच्या नकाशामध्ये या प्रत्येक अक्षराची जागा त्याचे काम व त्याचे निरोगी अवस्थेतील सर्वसाधारण क्रम नोंदवला गेला आहे. यात बदल आढळला, तर तो डीएनएच्या चाचण्या करणाऱ्या प्रयोगशाळेत शोधता येतो. त्यातून आजाराचे, दोषांचे स्वरूप कळते. डीएनए चाचणी केल्यास अनुवंशिकतेच्या म्हणजेच जनुकांच्या वरून मुलाचे वडील व आई यांची निश्चिती करणे आता शक्य झाले आहे. हैदराबाद येथील प्रयोगशाळेत ही सोय झाली आहे. जनुकांचा नकाशा म्हणजे त्या त्या जिवांसंबंधातील एकत्रित संकलित संपूर्ण माहिती. कुठेही जपून ठेवता येण्याजोगी. जैविक रेणूंची बनलेली डीएनए व आरएनए म्हणजेच डीऑक्सीरायबो न्यूक्लिक अॅसिड व रायबोन्यूक्लिक अॅसिड हे प्रथिनांच्या साखळीने बनलेली असतात. जीवनाला आवश्यक अशी वीस अमायनो प्रथिने आहेत. याआधी पाहिलेल्या चारांचा (एटीजीसी) यात समावेश होतो. चयापचयाशी संबंधित प्राथमिक गोष्टींवर नियंत्रण व सहभाग हे त्यांचे सततचे काम. अन्नघटकातून आपण रोज त्यांची कमतरता भरून काढत असतो. या विसांपैकी कोणतेही एक कमी पडले, तर विशिष्ट लक्षणे सुरू होतात व आजाराला निमंत्रण मिळते. आरएनएचे काम पेशीतील प्रथिनांचा संचय राखणे हे असते. प्रत्येक जैविक रेणूमध्ये अमायनो घटक (-NH2) समूह व कार्बोक्झिल समूह (-COOH) असे असतात. अमायनो अॅसिडच्या रेणूंच्या साखळीने प्रीथिने बनतात. या साखळीतील छोटेमोठे असंख्य असे हजारांहून जास्त घटक असू शकतात. जी प्रथिने निव्वळ अमायनो अॅसिड बनतात त्यांना साधी सिंपल प्रथिने म्हणतात, तर अन्य बहुतेक कर्बोदके, फाॅस्फेट्स यांच्या बरोबरची संयुगे असतात. *'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

http://www.livemaharashtra.com/news_details.php?id=987

http://worldmediaorganization.weebly.com/wmo-india-blog/2188523 *जालनाजिल्हा ब्युरोचीफ :- राम किसन बोडखे* *वर्ल्ड मिडिया न्यूज़ चैनल अँड वेब पोर्टल*

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 20/12/2019 वार - शुक्रवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आंतरराष्ट्रीय मानवी एकता दिवस* *संत गाडगेबाबा पुण्यतिथी* 💥घडामोडी ● १५२२ - नाइट्स ऑफ ऱहोड्सची सुलेमान द मॅग्निफिसन्टपुढे शरणागति. जीवनदान मिळालेले हे सरदार माल्टात वसले व नाइट्स ऑफ माल्टा म्हणून प्रसिद्ध झाले. ● १८०३ - लुईझियाना खरेदी पूर्ण. ● १९४५-मुंबई-बंगलोर प्रवासी विमानसेवा सुरू. 💥जन्म ● १५३७ - जॉन तिसरा, स्वीडनचा राजा. ● १९४२-राणा भगवान दास,पाकिस्तानातील पहिले हिंदू मुख्य न्यायाधीश 💥मृत्यू ● २१७ - पोप झेफिरिनस. ● १९५६-डेबूजी झिंगराजी जानोरकर उर्फ संत गाडगेबाबा ● १९९६: बलुतंकार दलित लेखक दगडू मारुती तथा दया पवार *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *पुरवणी मागण्यांवर मतदानाच्या मागणीची विरोधकांची हुल आणि सत्ताधाऱ्यांची उडाली धावपळ, सभागृहात तळ ठोकून बसणाऱ्या अजित पवारांनी आलेल्या नवख्या आमदारांची शाळा घेतली तर काही ज्येष्ठ आमदारांना आल्याबद्दल हात जोडून आभार मानले.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *शिवाजीराव गर्जे आणि अदिती नलावडे राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेवर, राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून आज शपथ घेणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधातील आंदोलनांमुळे संपूर्ण दिल्लीत 144 कलम लागू करण्याचे आदेश, लाल किल्ला, जामा मशीद, चांदनी चौक येथे जमावबंदी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोगाचा पहिला प्रस्ताव खालच्या संसदेत 230 वि 197 मतांनी पास झाला* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *आज डिजिटल माध्यमांमुळे प्रत्येकाला मोठा उद्योगपती होण्याची संधी : माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांचे प्रतिपादन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *नांदेडमध्ये मोठा शस्त्रसाठा जप्त, पोलिसांना सापडल्या 25 तलवारी ही शस्त्रे नेमकी कशासाठी आणली होती आणि कुणाला विक्री केली जात होती त्याचा पोलीस आता तपास करत आहेत. त्यातून महत्त्वाची माहिती हाती लागेल अशी शक्यता व्यक्त केली जातेय.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *IPL 2020 : लोकेश राहुलचं प्रमोशन, पंजाबच्या कर्णधारपदी नियुक्ती, सह-मालक नेस वाडीया यांची माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••              प्रतिलिपी डॉट कॉम वरील स्पर्धा गत आठवणीचा हिंदोळा मधील लघूकथा           *लहानपण देगा देवा* वीस-पंचवीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्या काळात कोणाच्या घरी लाइट नव्हते तर टीव्ही दुरची गोष्ट. रेडियो नावाची चालती बोलती वस्तू मात्र घरोघरी दिसून यायची. आकाशवाणी केंद्रचे अनेक चाहते होते. मात्र टीव्हीचे दिवाने अगणित होते. पण बघायला कुठे मिळायचे. ते दिवस आजही जशास तसे आठवते. टीव्ही वर दर रविवारी *रामायण* मालिका चालू झाली होती. गावात कुणाकडे ही टीव्ही नव्हती तेंव्हा तीन ........ वरील कथा पूर्ण वाचण्यासाठी खालील प्रतिलिपीच्या लिंक वर वाचन करावे आणि आपल्या मित्रांपर्यंत share करावे. https://marathi.pratilipi.com/na-sa-yevtikar-nasa/lahanpan लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *अश्फाकउल्ला खान* अश्फाकउल्ला खान यांच्यासारखा ध्येयवेडा क्रांतीकारक आपण कल्पना करू शकणार नाही अशा आनंदाने फाशी गेला.फाशीच्या एक दिवस आधी ते छानपैकी हसून हसून गप्पा मारत होते आणि भेटणार्यांना म्हणायचे , मित्रांनो, उद्या माझ लग्न होणार." दुसर्‍या दिवशी सकाळी त्यांना लवकर उठवण्यात आलं, फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी थोड्याच वेळात होणार होती , मरणाच्या उंबरठ्यावर असूनही त्यांच कवीमन नदीच्या पाण्यासारखं निखळ होत. तेवढ्या क्षणातसुद्धा त्यांनी काही शेर लिहून ठेवले होते , त्यापैकी एक असा , "फनाह है हम सबके लिए, हम पै कुछ नही मौकूफ ! वफा है एक फकत जाने की ब्रिया के लिए ॥ (अर्थ : नष्ट तर सगळेच होणार आहेत, फक्त आम्ही एकटे थोडेच आहोत.न मरणारा तर केवळ एक परमात्मा आहे.) अश्फाकउल्ला खान यांचे सहकारी आणि आदर्श रामप्रसाद बिस्मिल हे सुद्धा अचाट प्रतिभेचे कवी होते. काकोरी कटाचे प्रमुख म्होरक्या म्हणून त्यांच्यावर खटला चालवला गेला, तसे ते फार शिकलेले नव्हते पण मुख्य कोर्टात आपल अपील त्यांनी स्वतःच लिहिल होतं. ज्यावेळेस त्यांना फाशीच्या तख्तावर उभ करण्यात आलं त्यावेळेस ते म्हणाले - I wish the downfall of the British Empire. (ब्रिटिश साम्राज्याचे पतन हीच माझी सर्वात मोठी ईच्छा आहे) अश्फाक यांचा जन्म २२ ऑक्टोबर १९०० चा...चार भावंडांमध्ये सर्वात लहान त्यामुळे थोडे लाडके... घरची परिस्थिती उत्तम..सुखवस्तू असलेल्यांपैकी... महाविद्यालयीन दिवसांत १९२२ मध्ये त्यांचा संबंध रामप्रसाद बिस्मिल यांच्याशी आला. दोघेही चांगले मित्र होतेच पण बरोबर उत्तम उर्दू शायर देखील होते.राम प्रसाद हे टोपणनाव (तखल्लुस) 'बिस्मिल' तर, अशफाक 'वारसी' आणि नंतर 'हसरत' या उपनावाने लिहायचे... 'काकोरी कटाची' योजना दोघांच्या नेतृत्वाखालीच पार पडली आणि कटात दोषी आढळल्यामुळे दोघांना एकाच तारखेला, दिवशी आणि एकाच वेळी फाशी दिली गेली... केवळ जेल वेगळे (फरिजाबाद आणि गोरखपुर) देशाच्या स्वातंञ्यासाठी आपल्या कुटुंबकबिल्याचा त्याग करून तेवत असणाऱ्या धगधगत्या अग्निकुंडात सर्वस्व अर्पण करणार्‍या या सच्च्या क्रांतीकारकांना एक त्रिवार कुर्निसात...! *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" घटनांना विचारांचे स्वरुप देणे हे वाङमयाचे कार्य आहे. "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले ?* सरदार वल्लभभाई पटेल 2) *मराठीतील पहिले मासिक कोणते ?* दिग्दर्शन 3) *राज्यसभेचे सदस्य कोणत्या पद्धतीने निवडले जातात ?* प्रमाणशीर प्रतिनिधित्व 4) *'सिद्धांत शिरोमणी व लिलावती' या ग्रंथाचा कर्ता कोण ?* भास्कराचार्य ( गणित शास्त्रज्ञ ) 5) *कृत्रिम रेशमास कोणत्या नावानेही ओळखले जाते ?* रेयान *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 शंकर हासगुळे, सहशिक्षक, बिलोली 👤 पल्लवी टेकाळे, कुपटी, माहूर 👤 परमेश्वर नन्नवरे, सहशिक्षक, उस्मानाबाद 👤 विठ्ठल नरवाडे, सहशिक्षक, धर्माबाद 👤 गजानन मुडेले, देगलूर 👤 सोपान हेळंबे, उमरी *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• . *"गेले द्यायचे राहून,* *तुझे नक्षत्रांचे देणे !* *माझ्यापास आता कळ्या,* *थोडी ओली पाने !!"* *पाने ओली असेतोवरच ती देण्याघेण्यात मजा आहे. कोरडी पाने कुरकुरतात. माणसाच्या आयुष्यात प्रत्येक टप्याचा एक वेगळा 'गोडवा' आहे.* *बालपण कसे टिपूर टिपूर निरागसतेने भरलेले, पौगंडावस्थेत अदमु-या कुतूहलाचे काहूर, तारूण्यात भन्नाट मस्ती, चाळीशीत पोक्त पालवी, पन्नाशी हा फळे चाखायला सुरूवात करण्याचा काळ, साठीनंतरचे आयुष्य म्हणजे सेकंड इनिंग खरेतर बोनसच. त्यासाठी लागणारी तंदरूस्ती टिकवावी लागते. यातही 'दैवं चैवात्र पंचम'नामे घटक असतो, त्याने प्रभाव दाखवल्यास सगळेच देणे-घेणे राहून जाते, विशेषत: घेणे. 'दिल अभी भरा नही' सिच्यूएशनला भरल्या ताटावरून, भरल्या घरातून, रंगल्या मैफलीतून उठून जाणा-यांची 'वही कोरीच' राहते.* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●•• 🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो* *थोडक्यात पण खूपच अर्थपूर्ण* *पाणी आयुष्यभर झाडाला मोठं* *करत...* *म्हणूनच कि काय पाणी लाकडाला कधीच बुडू देत नाही...!* *अगदि आपल्या आई-वडीलांसारख....!!* *याकरिता* *चार चौघात आई बापाची मान खाली झुकु नये असे लेकीने जगावं* *आणि* *आई वडिलांना कुणापुढे हात पसरायची वेळ येऊ नये अस मुलाने जगावं* *तुमच्याबद्दल कुणी वाईट बोलत असेल,तर तो आशीर्वाद समजा* *तुमची कुणी स्तुती करत* *असेल,तर ती प्रेरणा समजा* *तुमच्यावर कोणी खोटेनाटे* *आरोप करत असेल,तर ती तुमच्या सत्याची ताकद समजा* *अकारण कोणी तुमच्या* *मार्गात आडवे येत असेल,तर ती तुमच्या मार्गाची* *साफसफाई समजा* *उगाचच तुमच्याशी असलेले* *नाते कोणी तोडत असेल,तर तो तुमच्यातल्या नम्रतेचा विजय समजा* *तुमच्या सद्वर्तनाची कसोटी लागते तेव्हा तुम्ही योग्य मार्गावर आहात असे समजा.* *चांगले काम करणाराच्या मार्गात* *अडथळे असणारचं..* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• तुमच्या आशारुपी पंखांना खूप पसरु द्या.कारण तेच पंख तुमच्या आशा पूर्ण करण्यासाठी मदत करतात.त्यांना जर संकुचित वृत्तीने तुमच्याच मनामध्ये जवळ करुन ठेवलात तर तुमच्या मनातल्या असलेल्या इच्छा पूर्ण कशा होतील ? त्यापेक्षा त्या पंखामध्ये आत्मविश्वासरुपी बळ निर्माण करुन त्यांना नवे काहीतरी करण्यासाठी पसरु द्या म्हणजे तुम्हाला आनंदाने आणि समाधानाने जीवन जगण्यासाठी संधी निर्माण करुन देतील. पक्षी आकाशात स्वच्छंदपणे विहार करतात ते पंखाच्या बळावरच ना ! मग पंखच पसरले नसते किंवा एखादी बाजू पंख विरहित असली तर कसे बरे आकाशात विहार करु शकले असते नाही ना ? मग तसेच मानवी जीवनाचे आहे. आशारुपी पंखांचे तसेच आहे त्यांनाही थोडे स्वातंत्र्य द्या आणि जीवनरुपी आकाशात स्वच्छंदपणे विहार करायला प्रेरणा द्या. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद...९४२१८३९५९०. 🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *पारंगत* खूप वर्षापूर्वी रामपूर गावात एक आंधळा माणूस राहात होता. तो कोणत्याही पक्ष्यांला, प्राण्याला हात लावून तो कोणत्या प्रकारचा प्राणी आहे हे ओळखण्यात तो फार हुशार आणि प्रसिद्ध होता. एकदा एका माणसाने एक लांडग्याचे पिलू त्याच्याकडे परीक्षेसाठी आणले. आंधळ्याने त्याला जवळ घेऊन अंग चाचपून पाहिले, पण त्याची नीट परीक्षा त्याला झाली नाही. मग तो थट्टेने त्या लांडग्याच्या पोराला म्हणाला, 'अरे, तू कुत्र्याचं पिलू आहेस की लांडग्याचं हे मी खात्रीपूर्वक सांगू शकलो नाही, तरी तुला मेंढराच्या कळपात सोडण्याचा सल्ला मी कधीही देणार नाही.!' *तात्पर्य :- सुंदर जरी गाढवाचे पोर दिसले तरी त्याचा गाढवपणा कधीही लपत नाही.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 19/12/2019 वार - गुरूवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *स्वातंत्र्य दिन - झांझिबार* *गोवा मुक्ती दिन* 💥 ठळक घडामोडी :- ● १९६१ - भारताने दमण आणि दीवचा ताबा घेतला.गोवा मुक्ती दिन. ● २००१ - व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांच्या 'कॉमन मॅन'च्या पुतळ्याचे पुणे येथे अनावरण. 💥 जन्म :- ● १९६९ - नयन मोंगिया भारतीय क्रिकेटपटू. ● १७७८ - मरी तेरीस शार्लट, फ्रांसचा राजा लुई सोळावा व मरी आंत्वानेतची पहिली मुलगी. ● १९७४ - रिकी पाँटिंग, ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- ● १९५३ - रॉबर्ट अ‍ँड्र्युज मिलिकान ,नोबेल पारितोषिक विजेता. ● १९९८ - छ्यान चोंग्शू, चिनी भाषेमधील लेखक, अनुवादक. ● २०१० - गिरीधारीलाल केडिया, भारतीय उद्योगपती. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांचा मशाल मोर्चा, खा. सुप्रिया सुळेही सहभागी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *चंदा कोचर यांच्या बडतर्फीला दिलेली परवानगी कायदेशीरच, आरबीआयची हायकोर्टात माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *मराठी साहित्यकार अनुराधा पाटील यांच्या कदाचित अजूनही या काव्य संग्रहाला यंदाचा साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालय शाळा कृती समितीतर्फे काढण्यात आलेल्या मोर्चाला अर्थमंत्री जयंत पाटील यांच्याकडून ठोस आश्वासन न मिळाल्यामुळे कडक थंडीत शिक्षकांनी मॉरिस कॉलेज टी पॉइंटवर ठिय्या आंदोलन सुरू केले.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *पुणेः नटसम्राट डॉ. श्रीराम लागू यांच्या पार्थिवावर शुक्रवारी होणार अंत्यसंस्कार, डॉ. लागू यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचे राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने काढले आदेश* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *वेस्ट इंडिजविरुद्ध विशाखापट्टणम येखील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात कुलदीप यादवने हॅटट्रीकची नोंद केली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोनदा हॅटट्रीक नोंदवणारा कुलदीप ठरला पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *विशाखापट्टणम : भारताने विशाखापट्टणम् एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजवर १०७ धावांनी दणदणीत विजय मिळवत तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. कटक येथे होणारा मालिकेतील तिसरा सामना आता निर्णायक ठरणार आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••             *शिक्षकांना स्वातंत्र्य हवं* http://nasayeotikar.blogspot.com/2019/11/blog-post_81.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• " एकदा एका मोठ्या ऑटोमोबाईल कंपनीचा मालक आपल्या अति महत्वाच्या उच्च अधिकाऱ्यांबरोबर , एका ठिकाणी तातडीच्या मिटिंग ला निघाला होता . . मोठी आलिशान गाडी होती . आणि प्रवास साधारण तीन चार तासाचा होता . सर्वजण सकाळी लवकर निघाले होते . . गाडी वाटेत आल्यावर . . गाडीच्या ड्रायव्हर ला लक्षात आले कि मागील एक चाक पंक्चर आहे , त्याने ती गाडी एका बाजूला घेतली . आणि सर्वाना उतरायला सांगितले . सर्वजण तसे खुश झाले कारण सगळे सकाळीच निघाल्याने आणि मध्ये न थांबल्याने ब्रेक हवाच होता . मालक आणि बाकी सर्वजण उतरून इकडे तिकडे गेले . कोणी जवळच्या धाब्यावर सिगारेट ओढू लागले . कोणी झुडुपाआड गेले . . अर्ध्यतासाने सर्वजण एका ठिकाणी एकत्र जमले पण सर्व टीम एकत्र आली मात्र मालक नाही दिसले . सगळे जण शोधायला लागले पण कुठे दिसेना . दहा मिनिटानी सर्वजण जिथे गाडी पंक्चर झाली होती तिथे जमले तर , मालक हातात स्पॅनर घेऊन . . शर्टाचे हात कोपरापर्यंत दुमडून . . घामेघूम होऊन . . चेहऱ्यावर मंद स्मित ठेवून ड्रायव्हर ला स्टेपनी चे चाक हातात घेऊन मदत करताना दिसले . . आणि तिथेच पहिला धडा सर्व उच्च अधिकार्यांना मिळाला . " थोर व्हायला . . . तुम्हाला जमिनीवर उतरून काम करावे लागते आणि जमिनीवरील प्रॉब्लेम माहित असावे लागतात . नुसते आदेश सोडून अधिकारी बनतात . . . मालक नाही होता येत . " . त्या उद्योपतीचे मालकाचे नाव . . " श्री. रतन टाटा " . . नाशिक येथे नेल्को ची टीम घेऊन जाताना प्रत्यक्ष घडलेला प्रसंग . . संदर्भ : The Habit of Winning *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" कोणत्याही गोष्टीची उणीव भासल्याखेरीज तिची खरी किंमत कळत नाही. "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1)  *मोगलांची राज्यकारभाराची भाषा कोणती होती ?*         पर्शियन 2)  *'समाजवाद' या शब्दाचा वापर सर्वप्रथम कोणी केला ?*         रॉबर्ट ओवेन 3)  *'मुंबई हाय' हे नाव कोणत्या उत्पादनाशी संबंधित आहे ?*          खनिजतेल 4)  *'मी म्हणजे राज्य होय' असे कोणी म्हटले होते ?*         फ्रान्सचा राजा 14 वा लुई 5)  *'रेडक्रॉस' या संघटनेची स्थापना कोणी केली ?*         जे. एच. डूनांट *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*         👤 संजय हरणे, सहशिक्षक, माहूर 👤 शंकर जाजेवार, येताळा 👤 सुभाष चिखले पाटील, औरंगाबाद *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• . *"गेले द्यायचे राहून,* *तुझे नक्षत्रांचे देणे !* *माझ्यापास आता कळ्या,* *थोडी ओली पाने !!"* *पाने ओली असेतोवरच ती देण्याघेण्यात मजा आहे. कोरडी पाने कुरकुरतात. माणसाच्या आयुष्यात प्रत्येक टप्याचा एक वेगळा 'गोडवा' आहे.* *बालपण कसे टिपूर टिपूर निरागसतेने भरलेले, पौगंडावस्थेत अदमु-या कुतूहलाचे काहूर, तारूण्यात भन्नाट मस्ती, चाळीशीत पोक्त पालवी, पन्नाशी हा फळे चाखायला सुरूवात करण्याचा काळ, साठीनंतरचे आयुष्य म्हणजे सेकंड इनिंग खरेतर बोनसच. त्यासाठी लागणारी तंदरूस्ती टिकवावी लागते. यातही 'दैवं चैवात्र पंचम'नामे घटक असतो, त्याने प्रभाव दाखवल्यास सगळेच देणे-घेणे राहून जाते, विशेषत: घेणे. 'दिल अभी भरा नही' सिच्यूएशनला भरल्या ताटावरून, भरल्या घरातून, रंगल्या मैफलीतून उठून जाणा-यांची 'वही कोरीच' राहते.* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●•• 🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रानो* *थोडं सकारात्मक...* *स्वतः ला रोज सांगा,आजचा दिवस सुंदर आहे.मी रोज जे काही करतो* *किंवा मला वाटते त्यापेक्षा मी बरेच काही करू शकतो.... नुसती* *काळजी आणि दुःख करुन काहीच होणार नाही. मी स्वतःला* *झोकून प्रयत्न केले तर मी नक्कीच समाधानी होईन.रोजच असे* *क्षण असतात जे आनंदाने भारलेले असतात. आज मी स्वतः* *आनंदी राहीन आणि इतरांनाही आनंद देईन.जीवन सुंदर आहे आणि मी ते* *_अजुन सुंदर करणार आहे. येणारे दिवस आनंदाने* *जगणार._* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जीवनाच्या अनेक रंगमंचावर बहुरुपी होऊन अनेक पात्र साकार करण्यासाठी आपल्या आत्मविश्वासाची गरज लागते तेव्हा कुठे जीवनाची अनेक पैलू सहजपणे साकारता येतात.कधी गरिब तर कधी श्रीमंत व्हावे लागते तर कधी दु:ख आणि सुख सहन करुन जगासमोर भाव चेहऱ्यावर आणावे लागतात तर कधी एकाकीपणे जीवन जगण्याची आशा दृढ करावी लागते.अनेक जीवनातल्या नवरसांचे रसायन रंगमंचावर आपल्या अभिनयाने सादर करावे लागतात.अशा अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असणाऱ्या च व्यक्ती जीवन जगू शकतात.ज्यांना जमत नाही ती व्यक्ती जीवनातल्या रंगमंचामागील पडद्यामागचे जीवन जगतात त्यांचे कोणतेच रंग इतरांना दिसत नाही अर्थात त्याचे जीवन रंगहीन,रसहीन आणि उदासीन जीवन जगल्यासारखेच आहे.म्हणून जीवनाच्या प्रत्येक रंगमंचावर आत्मविश्वासाने पात्र साकारण्याची नेहमी तयारी ठेवायला शिकले पाहिजे तरच जीवनाला खरा अर्थ आहे अन्यथा जीवन व्यर्थच समजावे. © व्यंकटेश काटकर,नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🦋🍃🦋🍃🦋🍃🦋🍃🦋🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कर्म पूजा* एकदा एक बाई रामकृष्ण परमहंसाकडे आल्या आणि म्हणाल्या , " मला या संसाराचा विट आला आहे . मुलं मोठी झाली. आता प्रपंच सुटेल असे वाटले . पण नातवंडांच्या प्रेमात पडले . रोज त्याला सांभाळावे लागते . तेव्हा आता घर सोडायचा विचार आहे . " रामकृष्णांनी विचारले , " घर सोडून तुम्ही काय करणार ? " त्या बाई म्हणाल्या , " गंगेच्या तीरावर एक झोपडी बांधणार . त्यात श्रीकृष्णाची मूर्ती बसविणार . रोज त्या मूर्तीची पूजा करणार . कृष्णाला नेवैद्याने जेवू घालणार . कृष्णाला झोपेतून उठविणार, आंघोळ घालणार . " परमहंसांनी विचारले , " श्रीकृष्णाची मूर्ती दगडाची असणार न ? " तेव्हा त्याबाई ' हो ' म्हणाल्या . रामकृष्णांनी विचारले , " आपण दगडाच्या मूर्तीत श्रीकृष्ण पाहणार ? " त्या बाई ' हो ' म्हणाल्या . त्यावर रामकृष्ण म्हणाले . " आपण दगडाच्या मूर्तीत श्रीकृष्ण पाहणार , मग नातवंडामध्ये श्रीकृष्ण का पाहत नाहीत ? श्रीकृष्ण समजून नातवंडाला जेवू घाला. श्रीकृष्ण म्हणून आंघोळ घाला. श्रीकृष्ण म्हणून त्याला झोपवा. " तुम्ही तुमच्या नातवंडानाच तुमचा श्रीकृष्ण समजून वागा. मनातला भाव चांगला ठेवा. म्हणजे तुम्हाला सर्वत्रच भगवंत दिसेल आवश्यक नाही मुर्तीतच देव पाहणे.तुम्ही तुमच्या नित्यकर्मात पण देवाचे दर्शन घेऊ शकता. *तात्पर्य : नित्य कर्मामध्ये भगवतभाव ओतला की ते कर्म नाम साधनेच्या दर्जाचे होते व तेच कर्म पूजा ठरते.* *'कर्मे ईशू भजावा.'* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

चारोळी (दि.१८-१२-२०१९) मनःलहरी प्रगतीचा मार्ग दाखवती मनःलहरी माझा स्पंदनातील, प्रयत्न मजला करावे लागते यशस्वी ध्येयाचा उंचीचा कळस गाठण्याचा 〰〰〰〰〰〰 प्रमिलाताई सेनकुडे ता.हदगाव जिल्हा नांदेड .

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 18/12/2019 वार - बुधवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *अल्पसंख्याक हक्क दिन* *आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिन*     *प्रजासत्ताक दिन - नायजर.* 💥 ठळक घडामोडी :-  ◆ २०१२ - पुण्यात इमारतीचे बांधका करीत असताना छत कोसळून १३ कामगार ठार. ◆ २००६: संयुक्त अरब अमिरातींमध्ये (UAE) प्रथमच निवडणूका घेण्यात आल्या. 💥 जन्म :- ◆ १८५६ - सर जे.जे. थॉमसन, नोबेल पारितोषिक विजेता इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ. ◆ १९७१ - बरखा दत्त, भारतीय पत्रकार. ◆ १९७१ - अरांता सांचेझ व्हिकारियो, स्पेनची टेनिस खेळाडू. ◆ १८९०: एफ. एम. रेडिओचे संशोधक ई. एच. आर्मस्ट्राँग यांचा जन्म 💥 मृत्यू :-  ◆ १९९३: चित्रपट दिग्दर्शक राजा बारगीर ◆ १९९५: राष्ट्रीय कीर्तनकार कमलाकरबुवा औरंगाबादकर ◆ २०००: इतिहास संशोधक, वैदिक संस्कृतीचे अभ्यासक मुरलीधर गोपाळ तथा मु. गो. गुळवणी ◆ २००४: भारतीय क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार विजय हजारे *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *बेकायदेशीर स्कूल व्हॅन्सविरोधात पोलिसांची राज्यभरात मोहिम राबवण्यात येत आहे. गेल्या पंधरा दिवसांत 1502 वाहनांवर कारवाई, 614 वाहनं जप्त तर 41 लाख 66 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *अपघातांची वाढती संख्या, बसचे बिघडलेले वेळापत्रक, अस्वच्छता इत्यादी कारणांमुळे एसटीच्या शिवशाही वातानुकूलित बसकडे प्रवासी पाठ फिरवू लागले आहेत. मुंबई, पुणे प्रदेश वगळता अन्य शहरांत शिवशाहीला प्रवाशांकडून अल्प प्रतिसाद मिळत असून प्रति किलोमीटर ३ रुपये तोटा एसटीला सहन करावा लागत आहे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) अनुत्तीर्ण असलेल्या राज्यभरातील शिक्षकांची सेवा समाप्त करण्याच्या अवर सचिवांच्या आदेशाची प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून अद्याप कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे प्राथमिक शिक्षण संचालनालय टीईटी अनुत्तीर्ण शिक्षकांना का पाठीशी घालत आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *वसंत आबाजी डहाके यांना महाराष्ट्र फाउंडेशनचा जीवनगौरव, केरळमधील कोझिकोडे येथील केरळ शास्त्र साहित्य परिषद या संस्थेला डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार जाहीर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *आपल्या नैसर्गिक अभिनयाच्या बळावर मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवणारे चतुरस्त्र अभिनेते, मराठी रंगभूमीचा अनभिषिक्त नटसम्राट, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. श्रीराम लागू यांचं वृद्धापकाळाने झाले निधन झालं. ते ९२ वर्षचे होते* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *एकूण अर्थसंकल्पापैकी शैक्षणिक अर्थसंकल्पाची टक्केवारी ही 2008- 2009 साली 5.4 टक्के होती. ती 2019-20मध्ये जवळपास दुप्पट म्हणजे 9.5 टक्के झाली. मात्र अर्थसंकल्पचा टक्का जरी वाढला असला तरी दुसरीकडे 10 वर्षात विद्यार्थ्यांची संख्या 33 टक्के इतकी कमी झाल्याची माहिती समोर आली आहे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *मुंबई : रणजी करंडकाच्या दुसऱ्या फेरीला आजपासून सुरुवात झाली. दुसऱ्या फेरीत आज पहिल्याच दिवशी विदर्भ आणि महाराष्ट्रानं वर्चस्व गाजवलं. विदर्भाच्या फलंदाजांचा दबदबा, कर्णधार फैझ फझलच्या दमदार शतकाच्या जोरावर विदर्भानं राजस्थानविरुद्ध पहिल्या दिवसअखेर 4 बाद 288 धावांची मजल मारली आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        *पालकांनी मुलांकडे लक्ष द्यावे* http://nasayeotikar.blogspot.com/2019/11/blog-post_29.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *मरूउद्यान (Oasis)* 📙 अफाट पसरलेल्या वाळवंटात अचानक एखादा हिरवागार टापू आढळतो. खजुराची झाडे, खुरटी हिरवी झुडपे, थोडीफार शेती व त्याला धरुन असलेली वस्ती माणसे आणि पाळीव प्राणी यांनी तेथे सुखाने वस्ती केलेली आढळते. या सगळ्याचे मोठे आश्चर्य येथे प्रथमच आलेल्याला वाटत राहते. पण तेथे राहत असलेल्यांना हे सारे नैसर्गिकच वाटत असते. त्यांच्या दृष्टीने या जागी त्यांना पाणीपुरवठ्याची कधीच अडचण वाटत आलेली नसते. या जागांना मरूउद्याने किंवा ओअॅसिस असे म्हणतात. वाळवंटातील हिरवळीचा भाग असेही याचे वर्णन करता येईल. येथील पाणीपुरवठा हा पावसावर अजिबात अवलंबून नसतो. दूरवरून येणारे पाण्याचे खोलवरचे प्रवाह येथे एक तर तळ्याच्या स्वरूपात वर येतात किंवा विहिरीच्या स्वरूपात पारंपरिकरित्या ज्ञात असतात. त्यामुळे या आसमंतात अजिबात पाऊस न पडला, तरीही येथील पाण्याचा साठा कायम राहतो. अर्थात याला मर्यादा आहेच. पण ही मर्यादा आपोआपच पाळली जाते. कारण येथील वस्तीत वाढ फारच क्वचित होते. शेती हे येथील उत्पन्नाचे व जीविताचे साधन सहसा नसल्याने पाण्याचा वापर त्याही कारणाकरता फार केला जात नाही. कापूस, फळभाज्या, बाजारी यांचे थोडेफार उत्पन्न या भागात घेतले जाते. मरूउद्यानांचे महत्त्व आजकालच्या यांत्रिक युगात तितकेसे जाणवणार नाही. कारण संपूर्ण वाळवंट काही तासांमध्ये यांत्रिक पद्धतीने पार करता येते. पण जेमतेम गेल्या शतकापर्यंत हा भाग पार करणे म्हणजे एक जीवावरचीच कसरत असे. महिनोनमहिने प्रवास करत वाळूची वादळे, विषम हवामान याला तोंड देत जाताना बव्हंशी रस्ते मरूउद्यानांना जोडत पार केले जात. भारतातील कच्छच्या रणात वा थरच्या वाळवंटात अशी अनेक छोटी छोटी मरूउद्याने सापडतात. जैसलमेर, जोधपूर, बिकानेर ही शहरेही अशा पाण्याच्या आधारानेच वसत गेली आहेत. सहारा वाळवंटातही अशी मरूउद्याने आहेतच. काही ठिकाणी तर विश्वास बसू नये, अशी विस्तीर्ण तळी पाण्याचा साठा राखून आहेत. मरूउद्याने आटण्याचे प्रकार घडतात, ते यांत्रिक पद्धतीने पाणी उपसा केल्याने. एकाच वेळी ठिकाणी अनेक विंधनविहिरी घेऊन यांत्रिक पाणी उपसा केल्याने हा प्रकार गेल्या पाच पंचवीस वर्षांत घडत आहे. दुसरे कारण म्हणजे झाडांची वाढती संख्या. यावर नियंत्रण न ठेवल्यामुळे खोलवर जाऊन पाणी तेथेच शोषू लागतात. वाळूची वादळे फार मोठ्या प्रमाणावर झाल्यास येथील पाणवठ्याच्या जागेत त्याचे थर जमू शकतात. या थरांची वेळीच देखभाल होऊ शकली नाही, तरीही मरुउद्याने धोक्यात येतात. जीवनातही खडतर प्रवासात ज्यावेळी एखादा आनंदाचा, विसाव्याचा क्षण मिळतो, तेव्हा त्याला आपण ओअॅसीसची उपमा सहजपणे देतो. दूरवरून उन्हातून आलेला, तहानलेला प्रवासी गरम बाजारीची भाकरी, ताजी भाजी, खजूर व दूध यांचा आस्वाद सावलीला बसून घेतो, तेव्हा त्यालाही अगदी अशीच अंतीव आनंदाची भावना होते. *'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" कोणतीही विद्या, ज्ञान कधीच वाया जात नाही. "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *1) 'एक झाड दोन पक्षी' हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?* विश्राम बेडेकर *2) कोणत्या मुघल राज्यकर्त्याने अमृतसरचे सुवर्णमंदिर बांधण्यासाठी जमीन दिली ?* अकबर *3) जगातील सर्वात मोठे अणुऊर्जा केंद्र कोणते ?* फुशियाना ( जपान ) *4) पुणे करारावर कोणी स्वाक्षरी केली ?* डॉ बाबासाहेब आंबेडकर *5) नैसर्गिक रबर अधिक लवचिक व मजबूत बनविण्यासाठी त्यामध्ये कशाचा वापर केला जातो ?* सल्फर *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 रवी यमेवार, धर्माबाद 👤 विजयकुमार भंडारे, सहशिक्षक 👤 उदयराज कोकरे *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *ज्या महापुरूषांनी आपलं कर्तृत्व सिद्ध केले आहे, ज्यांनी समाजासमोर आपले आदर्श उभे केले आहेत, ज्यांच्या विचारांनी समाजाला दिशा आणि गती मिळाली. अशा महापुरूषांचे पुतळे आपण उभे करतो किंवा केले आहेत. त्यांच्या विचारांची एक रेष पुसण्यासाठी ताकद न काळात असते न व्यवस्थेत. अर्थात, या पदापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी त्यांच्या आयुष्याची पुरेपूर किमंत मोजलेली असते. शाळा-महाविद्यालय तथा विद्यापीठीय पदव्यांची भेंडोळी त्यांनी मिळवलेली नसते. त्यांनी ज्या परिक्षा दिलेल्या असतात; जे पेपर सोडवलेले असतात; ते सामान्यांच्या आवाक्याबाहेरचे असतात.* *त्यांचा व्यासंग, त्यांची साधना, त्यांचा त्याग, त्यांची सेवा, त्याचं कर्तृत्व यामुळे त्यांनी गगनाएवढी उंची गाठलेली असते. मात्र, त्यांना एका झटक्यात आपण दगडाचा पुतळा करून खुजं करून टाकतो. याचं भान जसं आपल्याला नसतं, तसंच त्यांनी उभ्या केलेल्या मूल्यांचा न आपला अभ्यास असतो न तपास केलेला असतो. जयंती-पुण्यतिथीत मिरवणूक काढून डीजेच्या तालावर नाचून घेणे. ही त्यांच्या कार्याप्रती आपण परत केलेली पावती आपल्या स्वत:लाच वाटत असते. हाच मोठा विनोद आहे. ज्यांनी समाजाच्या उद्धारासाठी आपली संपूर्ण हयात खर्ची घातली, अशा महापुरूषांचे विचार आपल्या मनात रूजविण्याऐवजी आपण अतिशय उथळ कृतीत रममाण झालो आहोत. त्यांनी त्यांचे जे विचार इथल्या मातीत पेरलेले असतात, त्यांचे दरसाल उगवून येणे महत्वाचे असते. आपण थेट कोंभानाच खुरपं लावतो.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱 *संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल- 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो* *स्वप्नं, किती छोटा शब्द आहे.* *पण माणूस आयुष्यभर त्यांचा* *पाठलाग करत राहतो.काही दिवसा* *स्वप्न बघतात,काही रात्रीचे* *स्वप्न बघतात,तर काही* *दिवास्वप्न बघतात.* *स्वप्न नुसती बघायची नसतात तर रात्रंदिवस त्यांच्या मागे लागून कठोर* *परिश्रम करून त्यांना कवेत* *घेता आले पाहिजे.आपले* *आयुष्य तसे सामान्यच आणि स्वप्नेही तशीच; पण* *असामान्य व्यक्तींची 'स्वप्ने' लोकविलक्षणच असतात. संत* *एकनाथांना ज्ञानेश्वरांनी स्वप्नात येऊन दृष्टांत दिला की,'अजानवृक्षाची मुळी* *माझ्या गळ्याभोवती वेढली गेली आहे. '* *एकनाथांनी मग आळंदीला जाऊन ज्ञानदेवांची समाधी शोधून काढली.* *तिचा जिर्णोद्धार केला.* *इतकेच नव्हे, तर ज्ञानेश्वरीची* *शुद्ध प्रत तयार केली. तुकारामांच्या स्वप्नात संत नामदेव* *आले आणि त्यांनी आपली शतकोटी अभंगाची प्रतिज्ञा पूर्ण* *करावी, असे तुकोबांना सुचविले. जिजाऊंनी शिवरायांच्या राज्याभिषेकाचे स्वप्न मनोमन पाहून* *शिवरायांना स्वराज्याचे तोरण बांधण्याची प्रेरणा* *दिली होती.* *स्वामी विवेकानंदांनी कन्याकुमारी येथे खडकावर, ध्यानमग्न स्थितीत, दैदिप्यमान भारताचे स्वप्न पाहिले. 'देशवासियांच्या जाड्याभरड्या अन्नवस्त्राची तरी सोय व्हावयास हवी.' हे रामकृष्ण परमहंसांचे बोल त्यांच्या मनात गुंजत होते. बोधिवृक्षाखाली ध्यानस्थ बसलेल्या गौतम बुद्धांचे मनही उपेक्षित लोकांसाठी तळमळत होते. स्वत:पलिकडे लोककल्याणाचा ध्यास घेतलेल्यांची स्वप्ने भव्य-दिव्य असतात. संत कबीर यांनी प्रत्येक जीवाने सत्-चित् , आनंदरूप व्हावे, अशी आस बाळगली, तर तुकडोजी महाराजांनी भेदभावरहित सुखी भारताची आकांक्षा धरली.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जीवनात सुंदरतेला अधिक महत्व आहे.सुंदरता ही दोन प्रकारची आहे. एक म्हणजे बाह्यस्वरुपाची आणि दुसरी आंतरिक स्वरुपाची. तुम्ही कसेही असा तुम्हाला जे काही नैसर्गिक जन्माबरोबर शारीरिक सुंदरता मिळाली आहे ते आपल्याला जसे आहे तसे स्वीकारणे आवश्यक आहे. त्यात आपल्याला बदल करता येत नाही. काहीजण बदलण्यासाठी खूप प्रयत्न करायला पाहतात. त्यासाठी विविध प्रकारची सुंदरतेची सौंदर्य प्रसाधने, पेहराव वापरतात. परंतू त्यात काही बदल घडून येत नाही. फक्त त्यात बाह्यस्वरुपात राहणीमान बदलल्याचा फरक दिसून येतो. यामुळे आपण कसे आहोत हे जगासमोर बाह्यस्वरुपात काही काळ दिसू शकतो पण जास्त काळ त्यांच्या मनावर राज्य करु शकत नाही. त्यावर कितीही पैसा खर्च करुनही वाया जाणारच..! त्यापेक्षा आंतरिक सुंदरतेचा जर अधिक विचार केला तर आपलेही स्वत:चे कल्याण तर होईलच त्याचबरोबर इतरांचेही. कारण तुमच्या आंतरिक सुंदरतेला अधिकाधिक सुंदर बनविण्यासाठी जास्त काही धन अर्थात पैसा खर्च करायची गरज नाही. गरज आहे ती चांगल्या लोकांच्या सहवासात राहण्याची. चांगल्या लोकांच्या सहवासाने आपल्या मधील असणारे दोष काय आहेत ते स्वत:ला ओळखता येतात आणि त्यात बदल घडवून आणता येतात. चांगल्याच्या संगतीत सदैव राहिले तर आपले संकुचित असलेल्या विचारांना पायबंद घालून चांगल्या विचारांची वाढ करता येईल. अशासाठी धन किंवा पैसा खर्च करण्याची काही गरज नाही. यासाठी हवी आहे फक्त तुमच्या मनाची तयारी. तुम्ही जर आंतरिक सौंदर्याने समृद्ध झालात तर जग तुमच्या सोबत नक्कीच राहील आणि एक दिवस तुमचे नक्कीच अनुयायी बनतील. हे केवळ तुमच्या आंतरिक सुंदरतेच्या झालेल्या बदलामुळे. तुमच्या बाह्य सुंदरतेपेक्षा आंतरिक सुंदरता तुम्ही व तुमचे सुंदर जग बनवण्यासाठी अधिक मोलाचे किंवा महत्वाचे ठरु शकते. हे मात्र विश्वासाने सांगता येते. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०. 🌷🍃🌷🍃🌷🍃🌷🍃🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *लालसेपायी प्राण गेले* जय आणि विजय यांच्‍यात घनिष्‍ट मैत्री होती. दोघेही पट्टीचे पोहणारे होते. नदीच्‍या पाण्‍यात भरपूर मस्‍ती केली. तितक्‍यात स्‍थानिक प्रशासनाकडून बंधा-याकडून पाणी सोडण्‍यात येत असल्‍याची सूचना देण्‍यात आली. त्‍यामुळे दोघेही नदीच्‍या बाहेर आले. जेव्‍हा बंधा-यातील पाणी सोडण्‍यात आले तेव्‍हा नदीला पूर आल्‍यासारखी स्थिती निर्माण झाली. जय आणि विजय सुरक्षित स्‍थळी थांबले होते. नदीच्‍या पाण्‍याचा ओघ पाहत असतानाच नदीच्‍या प्रवाहात एक घोंगडी तरंगत येत असल्‍याचे दोघांच्‍याही दृष्‍टीस पडतील. विजयला ती घोंगडी ओढून आणावीशी वाटली. जयने त्‍याला थांबविण्‍याचा प्रयत्‍न केला. परंतु विजयने तोपर्यंत पाण्‍यात उडी मारली होती. तो घोंगडीजवळ गेला आणि तिला ओढत असतानाच त्‍याचे संतुलन बिघडले. विजय जितका जोम लावून किना-यावर येण्‍याचा प्रयत्‍न करत असतानाच पाण्‍यात उठणा-या लाटा त्‍याला दूर लोटत असत. मित्र असा संकटात सापडलेला पाहून जय ओरडला,''अरे मित्रा, घोंगडी सोड आणि परत निघून ये'' पण विजय म्‍हणाला,'' अरे जय मी घोंगडी सोडण्‍याचा खूप प्रयत्‍न करतो आहे पण घोंगडीनेच मला धरून ठेवले आहे.'' जयला कळून चुकले की विजयला त्‍या घोंगडीची लालसा निर्माण झाली आहे. विजयने घोंगडीसह किना-यावर येण्‍याचा खूप प्रयत्‍न केला पण तो अयशस्‍वी ठरला. शेवटी तो पाण्‍यात मृत्‍युमुखी पडला.त्याच्या लालसेने त्याचा जीव घेतला. तात्‍पर्य- कोणत्‍याही प्रकारची लालसा प्रसंगी आपल्‍या जीवाशी खेळू शकते.आणि त्यामध्ये आपले प्राणही जाते. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 17/12/2019 वार - मंगळवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    💥 ठळक घडामोडी :-  ● १७७७: फ्रान्सने अमेरिका या देशाला मान्यता दिली. ● १३९८ - तैमूर लंगने दिल्लीजवळ सुलतान नसिरुद्दीन मेहमूदच्या सैन्याचा पाडाव केला. ● १९२६ - लिथुएनियातील उठावात अंतानास स्मेतोनाने सत्ता बळकावली. ● १९२८: भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांनी ब्रिटिश पोलिस ऑफिसर जेम्स साँडर्स याची लाहोर येथे हत्या केली. ● १९६१ - गोवा मुक्तिसंग्राम - भारतीय सैन्याने गोव्याला पोर्तुगालपासून मुक्त केले. ● १९६७ - ऑस्ट्रेलियाचा पंतप्रधान हॅरोल्ड होल्ट पोर्टसी, व्हिक्टोरियाजवळ समुद्रात पोहत असताना गायब. ● १९७०: जयंतीलाल छोटालाल शहा यांनी भारताचे १३ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला. ● १९७० - पोलंडमध्ये ग्डिनिया शहरात सैनिकांनी कामगारांवर गोळ्या झाडल्या. सुमारे २५ ठार. ● २०१६: शरद पवार यांनी एमसीए (मुंबई क्रिकेट असोसिएशन) च्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. 💥 जन्म :- ● १९०१: मराठी लघुकथाकार व प्रसाद मासिकाचे संपादक यशवंत गोपाळ तथा य. गो. जोशी ● १९०८ - विल्लर्ड लिब्बी,कार्बन १४ किरणोत्सर्ग कालमापन पद्धतीचा शोध लावणारा नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ. ● १९०५: भारताचे सहावे उपराष्ट्रपती आणि अकरावे सरन्यायाधीश मुहम्मद हिदायतुल्लाह  ● १९७२: अभिनेते व मॉडेल जॉन अब्राहम  ● १९७८: हिंदी चित्रपट अभिनेते रितेश देशमुख 💥 मृत्यू :-  ● १९२९ - मनुएल गोम्स दा कॉस्टा, पोर्तुगालचा ९६वा पंतप्रधान आणि १०वा राष्ट्राध्यक्ष. ● १९६४ - व्हिक्टर फ्रांझ हेस, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ. ● १९६७ - हॅरोल्ड होल्ट, ऑस्ट्रेलियाचा पंतप्रधान. ● १९८५: नाटककार, कथाकार आणि पटकथाकार मधुसूदन कालेलकर  ● २०००: अ‍ॅथलॅटिक्सचे पितामह आणि नामवंत प्रशिक्षक जाल पारडीवाला ● २०१०: पुणे विद्यापीठाचे कुलगुरू देवदत्त दाभोळकर *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *देशातील नागरिकांची सुरक्षा महत्त्वाची असल्याने हिंसक आंदोलनाला आळा घाला. तसेच फेक न्यूज आणि सोशल मीडियावरील अफवा त्वरीत रोखा, अशा सूचना केंद्रीय गृहमंत्रालायने राज्यांना दिल्या आहेत.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *फडणवीस सरकारने त्यांच्या कार्यकाळात घेतलेले दोन महत्वपूर्ण निर्णय रद्द करण्यासाठी ठाकरे सरकारने हालचाली सुरु केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. यात जनतेतून थेट नगराध्यक्ष, सरपंच निवड आणि चार प्रभाग पद्धतीचा समावेश आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *रिलायन्सने २५ हजार कोटींना विकला जिओचे टॉवर रिलायन्स इंडस्ट्री जिओचे टेलिकॉम टॉवर अॅसेट्स कॅनडाच्या ब्रुकफिल्ड इन्फ्रास्ट्रक्चर पार्टनर्स एलपीला विकणार असल्याची घोषणा केली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *नाशिकमध्ये डिझेल अभावी एसटी महामंडळाची सेवा ठप्प झालेली आहे. नाशिकच्या आगार क्रमांक 1 मध्ये डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्याने एसटीच्या 100 फेऱ्या रद्द कराव्या लागल्या* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *मुंबई : यंदाच्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या मिस वर्ल्ड २०१९ या सौंदर्य स्पर्धेचा किताब जमॅका टोनी एन सिंग हिने पटकावला आहे. लंडनमध्ये मोठ्या दिमाखात हा झगमगता सोहळा पार पडला. सौंदर्यवतींच्या या स्पर्धेत भारताची कन्या सुमन रावने सेकेन्ड रनर अप होण्याचा मान मिळवला आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ताज्या क्रमवारीनुसार कसोटी क्रिकेटमध्ये विराट कोहली फलंदाजीत तर टीम इंडिया संघाच्या यादीत अव्वल स्थानी आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *63व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं आयोजन पुण्यात होणार असून पुण्यातील बालेवाडी येथे 2 ते जानेवारी मध्ये कुस्तीच्या लढती रंगणार आहेत.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *एक राष्ट्र : एक रेशनकार्ड*      http://nasayeotikar.blogspot.com/2019/12/blog-post_4.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *मनुष्यप्राण्याचे मूळ* 📙 ************************** प्रत्येकाला आपल्या पूर्वजांबद्दल एक गूढ आकर्षण असतेच. मग समस्त शास्त्रज्ञांना मानवजातीच्या मुळाबद्दल प्रचंड आकर्षण वाटत राहिले, तर त्यात नवल ते काय ? पृथ्वी कशी निर्माण झाली व माणूस कसा निर्माण झाला, याबद्दलची चर्चा कधीही व कुठेही रंगतच जाते. अनेक वर्षांच्या संशोधनानंतर सध्याचे निष्कर्ष सांगतात की, पूर्व आफ्रिकेच्या भागात चाळीस लाख वर्षांपूर्वी आदिम मानवाचे वास्तव्य होते. एकूण चार विविध टप्प्यांतून सध्याच्या होमो सेपियन्स या मानवजातीची उन्नती होत गेली आहे. होमो सेपियन्स म्हणजे 'शहाणा माणूस'. ते चार टप्पे असे, १. *ऑस्ट्रेलोपिथेकस अफारेन्सिस* २. *ऑस्ट्रेलोपिथेकस रोबस्टस* ३. *होमो इरेक्ट्स* ४. *होमो सेपियन्स* अंदाजे अडीच लाख वर्षांपूर्वी सध्याचा मानवप्राणी सध्याच्या स्वरूपात उत्क्रांत झाला असावा. प्रथम आफ्रिकेत वास्तव्य असलेला मानवप्राणी हळूहळू समशीतोष्ण व थंड हवामानाकडे वाढत जाणाऱ्या संख्येमुळे स्थलांतर करू लागला. जसजसे स्थलांतर पसरत गेले, तसतसे हवामानातील घटकांनुसार रंग, ठेवण, शरीराची जडणघडण यातही बदल होऊ लागले. उत्तरेकडे ज्या जाती पसरल्या, त्यांना 'ड' जीवनसत्त्वाची गरज भागवण्यासाठी अधिक सूर्यप्रकाशाची गरज पडू लागली. सूर्यप्रकाश तर कमी होता. मग कातडीखालील रंगद्रव्यांची निर्मिती हळू हळू कमी होत कातडीतील काळेपणा कमी झाला. याचप्रमाणे प्रखर सूर्यप्रकाशाला ज्या प्रदेशात तोंड द्यावे लागते, अशा पूर्वेकडच्या लोकांची गालांचे खाडे उंचावून डोळे मिचमिचे व बारीक होत गेले. कायम बर्फाळ प्रदेशात राहणाऱ्या मंडळींना अधिक उबेची गरज असल्याने त्यांच्या चेहऱ्यावर चरबी वाढून उघड्या चेहऱ्याच्या संरक्षणाची निसर्गत: सोय झाली. बर्फाळ प्रदेशातील लोक गुबगुबीत चेहर्‍याचेच का, याचे उत्तर यामुळेच मिळते. माणसाचे स्थलांतर पृथ्वीवर कसे झाले, हे पाहणेसुद्धा औत्सुक्याचे ठरेल. पूर्व आफ्रिकेच्या प्रदेशातून प्रथम उत्तरेकडील भागात, नंतर पूर्वेकडील भागात मानव हळूहळू पुढे सरकत राहिला. युरोपमधील मोजका भाग व्यापून संपल्यावर आशिया खंडांकडे त्याचा मोर्चा वळला. सैबेरियातील काही भाग त्या काळी बर्फामुळे अलास्काच्या भागास जोडलेला होता. अतिशीत अशा या भागातून उन्हाळ्याच्या काळात बहुधा अमेरिका खंडात माणसाचा चंचुप्रवेश झाला. अलास्कापासून मग खाली उतरत उतरत त्याने सर्व अमेरिका खंड व्यापले. पॅसिफिक समुद्रातील मोजकी बेटे सोडली तर मानवाने सारे जग कित्येक हजार वर्षे व्यापलेलेच आहे. या बेटांवरील वस्ती मात्र जेमतेम सात आठ हजार वर्षांतली असावी. आपण जेव्हा विविध संस्कृतींचा विचार करतो, तेव्हा आपल्या डोळ्यांसमोरची वर्षे असतात हजारांत. मानवी मूळ शोधतानाची वर्षे आहेत लाखांत, हे येथे पक्के ध्यानात ठेवणे आवश्यक आहे. या लाखो वर्षांबद्दलचा पुरावा कुठल्याही लिखित स्वरूपात तर आपल्या हातात नाहीच. जे निरनिराळ्या अवशेषांतून हाती लागत आहे, त्यातूनच आपण उलगडा करून इतिहासाची पाने उलटत जातो. मानवी वस्ती जगभर पसरत गेली, स्थायिक होत गेली; पण प्रत्यक्ष शेतीची लागवड करण्याची सुरुवात मात्र जेमतेम दहा हजार वर्षांपूर्वीच झाली. या लागवडीला सुरुवात झाली आणि पुन्हा एकदा गरजेनुसार मोठ्या प्रमाणावर स्थलांतर सुरू झाले. या स्थलांतराची दिशा या वेळी भारत, मध्य आशिया ते युरोप व खाली उत्तर आफ्रिका अशी उलटी होती. ती लाट आफ्रिका खंडात जेव्हा पोहोचली, तेव्हा त्याआधीची कित्येक हजार वर्षे अस्तित्वात असलेली मूळ जात पुन्हा दक्षिणेकडे ढकलली गेली. सध्याची बांटू ही जात म्हणजे मूळ आफ्रिकन वास्तव्य केलेली मानवी जात समजली जाते. *"सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" छोटे लोक नसते तर मोठ्या लोकांचे अस्तित्व शून्य असते "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *प्राणवायू तयार करण्याच्या क्रियेत उत्प्रेरक म्हणून कोणता पदार्थ वापरतात ?* मॅग्नीज डायऑक्साईड 2) *PTI चे विस्तारित रूप काय ?* Press Trust of India 3) *भारताची राष्ट्रीय दूरचित्रवाणी कोणती ?* दूरदर्शन DD National 4) *भारताचे राष्ट्रीय सूचनापत्र कोणते ?* श्वेतपत्र 5) *'राजकवी' म्हणून कोणाला ओळखले जाते ?* भा. रा. तांबे *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤डॉ. सुधीर येलमे, संपादक 👤 श्रीनिवास नरडेवाड, धर्माबाद 👤 केशव कदम 👤 नारायण मुळे, धर्माबाद 👤 प्रतापसिंह मोहिते, बार्शी 👤 दिगंबर बेतीवर, नांदेड 👤 डॉ. प्रदीप आवटे, साहित्यिक 👤 विजय होकर्णे, वृत्तपत्र छायाचित्रकार 👤 जितेंद्र वल्लाकट्टी 👤 रामचंद्र नागनाथराव पाटील बन्नाळीकर *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आपण नेहमी खरं बोलावं, असं म्हणतो. मग माणसं खोटं का बोलतात? स्वार्थासाठी! स्वत:ला लपविण्यासाठी! खरं ते झाकण्यासाठी! जितकं आपण स्वत:ला झाकण्याचा प्रयत्न करू तितकं आपण केव्हा ना केव्हा तरी समाजापुढं चक्क उघडं पडु शकतो. अनेक माणसं बोलताना 'मी म्हणतो तेच खरं' असं ठासून म्हणतात; परंतु 'खरं तेच माझं' म्हणणारी माणसं फारच कमी असतात. दहा वेळा खोटं बोललं की, लोकांना ते खरं वाटतं; पण खरं तेच केव्हातरी उघडकीस येतं. आपण स्वत: जसे असाल तसे समाजपुढे दिसावे हे चांगले असते. परंतु आपण स्वत: जसे नसतो तसं समाजापुढं दिसावं हे काही चांगलं नाही.* *आपण नेहमीच खोटं बोलावं आणि समाजापुढं आपण नेहमीच खरं बोलतो असं भासवावं हे काही भल्या माणसाचं लक्षण नाही. आपण नेहमीच स्वार्थीपणानं जगावं आणि आपण नेहमी नि:स्वार्थीपणानं जगतो असं समाजापुढं भासवावं हे काही सभ्य माणसाचं लक्षण नाही. आपण एकदा का खोटं बोललो की, ते लपविण्यासाठी अनेकदा खोटं बोलावं लागतं. खोट्याला अनेक वाटा असतात. ख-याला मात्र पर्याय नसतो. खोटं बोलणं खोट्या पैशासारखं असतं. खरं बोलणं बंध्या रूपयासारखं असतं. खरं ते खरंच असतं आणि खोटं ते खोटंच असतं, हे काळच उघडकीस आणतो. म्हणून 'सत्य' हाच आपल्या जीवन यशाचा खरा सोबती समजला पाहिजे. 'सत्य' हेच आपल्या जीवनवैभवाचं खरं रहस्य समजलं पाहिजे.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो,* *चूक भूल देणे घेणे हा नियम आयुष्यात ज्यांना जमला त्यांना जीवन कळले अस मी म्हणेन.* *वाधीसाठी म्हैस मारणारी माणस अनेक बघितली पण सगळ्या चुका पोटात घालणारी आईसारखी दुसरी व्यक्ती शोधून सापडणं कठीण आहे.* *माणस समजून घ्यायला शिका.* *एक ताई बटाट्याची भाजी करण्यासाठी बटाटी कापत होती.* *अचानक तिला बटाट्याच्या वरिल बाजुला छिद्र पडलेले दिसले. तिने* *विचार केला की बटाटा खराब झाला आहे तो फेकून द्यावा. पण तिने तो फेकून न देता खराब झालेला तेव्हढा* *भाग कापून फेकून दिला.पुन्हा पाहिले असता अजून* *थोडा भाग खराब दिसला.* *तिने तो भागही कापून फेकून दिला. उरलेला बटाट्याचा अर्धा* *भाग कापून भाजीत टाकला. किती चांगली विचारसरणी आहे, 70* *पैशांचा बटाटा आपण किती ध्यान देऊन* *कापतो. जो भाग खराब आहे तो* *कापून फेकून देतो. उरलेला भाग* *स्विकारतो. खुप चांगलं आहे हे. मात्र* *दुख या गोष्टीचं आहे की,आपण माणसाबाबत एव्हढे कठोर का वागतो ? आपल्या जवळच्या एख्याद्या माणसाबाबत एक चुक दिसली तर त्याच्या पुर्ण व्यक्तीमत्वाला आपण कापून फेकून देतो.* *त्याच्या वर्षानुवर्षाच्या चांगल्या कामांकडे दुर्लक्ष करतो. आपण फक्त आपल्या अहंकारासाठी,मी पणासाठी त्याच्यासोबतचे प्रत्येक नाते तोडतो. मग एकच प्रश्न पडतो की,आपल्या जवळच्या माणसाची किंमत सत्तर पैशांच्या बटाट्यापेक्षाही कमी आहे का ?* *या छोट्याशा गोष्टीचा जरूर विचार करा. आणि आपल्या जवळच्या* *अमुल्य माणसांना लहान लहान चुकांसाठी जीवनातून वेगळे* *करु नका.* *माणूस म्हणुनी जन्मा आलो,माणूस* *म्हणुनी जगेल मी,हे* *तत्व अमलात आणा.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• एखाद्यावेळी माणसाच्या हातून झालेली एखादी चूक कळत नकळत झाली असे समजावे.ती चूक जर दुस-यावेळी झाली तर समजावे की, दुर्लक्ष केल्यामुळे झाली आहे . तिस-यावेळी तीच चूक झाली तर असे समजावे की,तुमचे त्या कामात लक्ष नसल्यामुळे झाली आहे आणि पुन्हा पुन्हा जर तीच चूक झाली तर असे समजावे की,आपण इतरांपेक्षा जास्त चूका करण्याचा जणू संकल्प केला आहे आणि त्यातही तुम्ही महामूर्ख आहात हे सिद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. मग तुम्हीच विचार करा. तुम्हाला तुमच्या जीवनात चूका करायच्या की चूका टाळायच्या ? *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *निस्वार्थी दानधर्म* हजरत उमर आपल्‍या रयतेची खूप काळजी घेत असत. ते स्‍वत:ची व आपल्‍या परिवाराची चिंता नकरता जनतेचे दु:ख निवारणार्थ झोकून देत. एका प्रसंगाची गोष्‍ट आहे, काही कारणाने राजधानीत आग लागली, आग इतक्‍या वेगाने पसरली की तिने शहराचा अर्धा भाग व्‍यापून टाकला. लोकांनी खूप पाणी टाकले पण आग आटोक्‍यात येण्‍याची काही चिन्‍हे दिसेनात. हजारो लोकांची घरे, दारे, पिके सगळे जळून खाक झाले. मनुष्‍यहानीही मोठया प्रमाणावर झाली. लोकांचा आक्रोश वाढत होता. आगीचा वणवा पसरतच चालला. आगीचे लोळ भडकत चालले. शेकडो घरे आगीच्‍या भक्ष्‍यस्‍थानी पडत होती. जनतेला एकाच भयाने ग्रासले होते. आग आटोक्‍यात कशी आणायची कशी, आग विझत नसल्‍याने लोकांनी हजरत उमरला उपाय विचारले, तेसुद्धा आग विझविण्‍यात तनमनधनाने व्‍यग्र होते. उमरनी लोकांना सांगितले, ''ही आग म्‍हणजे खुदाचा कोप असावा, तुम्‍ही लोकांनी आता आग विझविण्‍यासाठी पाणी टाकण्‍याचे काम सोडा, गरिबांना अन्नदान करा. कदाचित खुदा यामुळे प्रसन्न होईल आणि आगीपासून आपली सुटका करेल.'' जनतेतील लोक म्‍हणाले,''हजरत साहेब आपण धर्मादाय संस्‍‍थेचे सर्व दरवाजे सगळ्यांसाठी आधीच उघडे ठेवलेले आहेत. कोणीही गरीब आमच्‍याकडे आला तर आम्‍ही त्‍याला दान करतोच. मग आमच्‍यावर तो नाराज कसा'' हजरत उमरने समजावले,''तुम्‍ही जे दान करता त्‍यामागे निष्‍काम भावना नाही. तुम्‍हाला वाटते दानाचे पुण्‍य तसे मिळत नसते. हजरत उमरच्‍या खुलाशानंतर जनतेने आपली चूक सुधारली अन आश्‍चर्य म्‍हणजे आग पूर्णपणे विझून गेली. जनतेने खुदाचे व हजरत साहेबांचे आभार मानले. तात्‍पर्य :- नि:स्‍वार्थ भावनेने केलेले दान कधीही लोकांच्‍या अंतरआत्‍म्‍यापर्यंत पोहोचते. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

*आभासी जग* (दि.१६-१२-१९) आभासी या जगात कोणी कोणाचे नाही भावनेला एकमेकांच्या थारा देत नाही, अन् माणूसकीला माणूस माञ का? जपत नाही माणुसकीचे जग सारे संपुष्टात येत आहे तहानभूक विसरून माणूस पैशाच्या मागे जात आहे अन् माणूसकीला माणूस माञ का? जपत नाही पैशाने पैसा कमवत आहे भौतिक सुविधा माञ तो सर्वच मिळवत आहे अन् माणुसकीला माणूस माञ का? जपत नाही..... घरदार सर्वच असतात त्यांची छान आणि सुबक आईवडिलांचीच असते त्यांना उबक म्हणूनच दाखवतात ते त्यांना वृद्धाश्रमाची घरे अन् माणसा माणूसकीला तु का ? जपत नाही..... खाण्यापिण्याचा सवयी असतात त्यांच्या निरनिराळ्या चायनीज आणि पिजाने पोट त्यांचे भरते,गरीब माञ भाकरीलाही तरसते अन् माणसा माणूसकीला तु का? जपत नाही.... हाच प्रश्न मला पडते? हाच प्रश्न मला पडते? 〰〰〰〰〰〰〰 श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे. ता.हदगाव जिल्हा नांदेड.

चारोळी *आभासी जग* आभासी या जगात माणूस माणुसकी हरवतो आहे, नातीगोती जपायची सोडून हळूहळू कमी करतो आहे. 〰〰〰〰〰〰〰 श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे ता.हदगाव जिल्हा नांदेड.दि.१६-१२-१९.

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 16/12/2019 वार - सोमवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    बहरैन - राष्ट्रीय दिन. बांगलादेश - विजय दिन. कझाकस्तान - स्वातंत्र्य दिन. 💥 ठळक घडामोडी :-  ● १९९८ - ऑपरेशन डेझर्ट फॉक्स - अमेरिका व युनायटेड किंग्डमने इराकवर बाँबफेक केली. ● १९७१-भारत-पाक युद्ध,पाक सैन्याची शरणागती,बांगलादेश ची निर्मिती. ● १९०३- मुंबईतील ताजमहाल हॉटेल पॅलेस ग्राहकांसाठी खुले करण्यात आले. 💥 जन्म :- ● १७९० - लिओपोल्ड पहिला, बेल्जियमचा राजा. ● १८८२ - सर जॅक हॉब्स, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. ● १९५२ - जोएल गार्नर, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- ● २००४- लक्ष्मीकांत बेर्डे,मराठी चित्रपट अभिनेता ● १९६०-चिंतामण गणेश कर्वे,मराठी कोशकार व लेखक ● १५१५ - अफोन्सो दि आल्बुकर्क, पोर्तुगालचा भ्रमंत. ● १९२२ - गेब्रियेल नारुतोविझ, पोलंडचा पहिला राष्ट्राध्यक्ष *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरुन दिल्लीत आंदोलन पेटलं, विद्यार्थ्यांनी तीन बससह मोटारसायकल पेटवल्या, पोलिस बंदोबस्त तैनात* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आज 8 मोर्चे येणार आहेत, त्यामध्ये सर्वशिक्षा अभियान अंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा मोठा मोर्चा, शिवाय कोतवाल संघटना, सकल धनगर समाज, इंटक, समाजवादी पक्षाचे मोर्चे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *छत्रपती शिवाजी स्मारक याबाबत कोणी घोटाळा केला असेल तर ते निंदाजनक आहे, जो कोणी जबाबदार असेल त्यावर कारवाई करू : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *विधानसभेत भाजपतर्फे आशिष शेलार यांची मुख्य प्रतोद आणि देवयानी फरांदे यांची प्रतोद पदी नियुक्ती निश्चित, तर सुजितसिंह ठाकूर यांचे विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेते पदी नाव ठरले, भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून हिरव्या कंदील दाखवण्याची प्रतिक्षा, अधिकृत घोषणेची औपचारिकता बाकी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *पालघर : पालघरमध्ये भूकंपाच्या धक्क्यांचं सत्र सुरुच, कासा, बोर्डी, धुंदलवाडी, चिंचले भागात पहाटे भूकंपाचे धक्के, पहाटे 4 आणि 6 वाजेच्या सुमारास भूकंपाचे धक्के, नागरिकांची माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *राष्ट्रीय महामार्गावर फास्टटॅग अत्यावश्यक, विनाफास्टटॅग संबंधित मार्गिकेत शिरल्यास दुप्पट टोल आकारणी होणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *टीम इंडियाचा वेस्ट इंडीजकडून आठ विकेट्सने पराभव, हेटमायर, होपच्या शतकाने विंडीजचा शानदार विजय, मालिकेत 1-0 ने आघाडी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••            एक देश, एक ओळखपत्र http://nasayeotikar.blogspot.com/2019/12/blog-post_7.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🐝 *मधमाशा* 🐝 ****************** नैसर्गिकरीत्या माणसाला ज्ञात असलेला गोड पदार्थ म्हणजे मध. साखरेचा वापर सुरू होण्याआधी अनेक ठिकाणी मधाचाच वापर केला जात असे. आजही मध आरोग्यदायी समजला जातो. हा मध मधमाशा गोळ्या करतात. मधमाशा जगभर आढळतात. संख्येने प्रचंड प्रमाणावर आढळणारी ही जात एखाद्या जमातीप्रमाणे वा कुटुंबाप्रमाणे राहते. अर्थातच एका पोळ्यामध्ये आढळणाऱ्या मधमाशा या त्या कुटुंबाच्याच घटक असतात. त्या तेथेच जन्माला येतात व वाढतात. षटकोनी आकाराची, एकात एक गुंतलेली सलग रचना असलेली मधाची पोळी वा स्वतःची वसतिस्थाने बांधण्याचे काम कामकरी माशा करतात, तर या पोळ्यात राहून फक्त अंडी घालून ती वाढविण्याचे काम राणी माशी करत असते. मुंग्या व अन्य किटकांच्या प्रमाणे या बाबतीत खूपच साधर्म्य आढळते. मोजकेच नर या पोळ्यात असू शकतात. नवीन राणीमाशीबरोबर संयोग झाल्यावर हे नर काही काळातच मरूनही जातात व राणीमाशी स्वतःचे घर बांधायला घेते. नवीन पोळे जन्माला येते. ज्या जंगलात ज्या प्रकारची झाडे असतील, फुले असतील, त्यांतील मध गोळा करून तो पोळ्यात साचवण्याचे काम मधमाशा अथकपणे करत असतात. हा मधाचा साठा जसजसा वाढत जातो, तसतसा पोळ्याचा आकार वाढत जातो. पोळे हे मुलत: नैसर्गिक मेणाचे बनलेले असते. मधाची चव फुलांनुसार बदलते. फुलामधील मध स्वतःच्या सोंडेने शोषून घ्यायचा व तो पोळ्यात आणून साठवायचा, ही क्रिया करत असताना मधमाशी आणखीही दोन कामे करते. एका फुलाचे परागकण पंखांना लागतात, ते दुसऱ्या फुलावर नंतर टाकले जाऊन वनस्पतींचे पुंसवन होते. याचवेळी मागील पायांना लागलेले परागकण पोळ्यात आणले जातात व ते नुकत्याच अंड्यांतून बाहेर पडलेल्या अळ्यांना खायला दिले जातात. यांवरच त्यांचे पोषण होते. काही काळातच त्यांचे पूर्ण मधमाशीत रूपांतर होते. मधमाशीचे आयुष्य हे सहसा ऋतूपरतेच मर्यादित असते. त्यातही ती जर कोणाला डसली तर शरीराच्या मागील टोकाला असलेली नांगी काटेदार रचनेमुळे तेथेच रुतून अडकते. नांगी शरीराला जोडणाऱ्या स्नायूंनाही दुखापत होऊन मधमाशी स्वतःचा जीव गमावते. ही वस्तुस्थिती लक्षात घेतली म्हणजे मधमाशी उगाचच हल्ला करून चावणार नाही, याची खात्री पटेल. पोळ्याला धोका आहे, हे कळल्यावर मात्र हजारो माशा आसपासच्या सर्वांवर हल्ला चढवतात. मधमाशांचा मध गोळा करण्याचा गुण लक्षात घेऊनच मधुमक्षिकापालन पेटी तयार केली गेली आहे. यात पोळे तसेच ठेवून सेंट्रीफ्युगल फोर्सने मध फक्त काढून घेतला जातो. रिकाम्या पोळ्यात मधमाशा पुन्हा मध गोळा करू लागतात. मधमाशा व गांधील माशा या दोन जाती तशा पोटजातीच आहेत. फक्त गांधीलमाशा मध गोळा करत नाहीत. त्यांची पोळी लहान असतात. त्या चावल्या तर जास्त त्रास होतो. आकाराने मधमाशीपेक्षा मोठ्या व लालभडक रंगाच्या असतात. मधमाशा एकमेकांना संदेश कसा देतात, हे मोठे विलक्षण आहे. एखादी माशी फुलांचा शोध घेऊन आल्यावर ती एक प्रकारचा नर्तनाचा प्रकार करून तिच्या सहचरींना फुलांची दिशा व अंतर यांची माहिती पुरवते. बघता बघता पोळ्यातील माशा तिकडे जातात. या संदेशव्यवस्थेचे अजूनही नीटसे आकलन झालेले नाही. *'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" चारित्र्यात सूर्याची तेजस्विता अन अंत:करणात चंद्राची शीतलता हवी. "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *रोपांना समतोल आहार कोणते खत पुरवते ?* कंपोस्ट खत 2) *विद्युतधारा मोजण्याचे परिमाण कोणते ?* अँपिअर 3) *शून्य अंश अक्षवृत्त म्हणजे काय ?* विषुववृत्त 4) *'देशबंधु' म्हणून आपण कोणाला ओळखतो ?* चित्तरंजन दास 5) *आगगाडीच्या गुलामध्ये काय वापरले जाते ?* पोटॅशियम क्लोरेट *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 उमेश कोटलवार, सहशिक्षक, रत्नागिरी 👤 योगेश गुजराथी, धर्माबाद 👤 शिवकुमार उपलंचवार, देगलूर 👤 विजय सोनोने, सहशिक्षक, वाशीम 👤 नरेश पांचाळ, धर्माबाद 👤 श्याम पेरेवार *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कोणतेही नाते प्रत्येक क्रियेने उज्ज्वल करता येणे, ही खरी सार्थकता. परंपरेने किंवा संस्कृतीने जी सणावारांची यादी केली, त्या प्रत्येक सणाचा अन्वयार्थ नव्याने शोधायला हवा; तरच आनंद-परमानंद-ब्रम्हानंद या पाय-या चढता येतील. वाद आणि भांडणाच्या प्रकारात जो अडकतो त्याचा फास आधिकाधिक घट्ट होण्याची शक्यता असते. त्यामुळे स्नेहभावनेतून जग जोडले पाहिजे. भारतीय संस्कृतीत प्रत्येक दिवस स्नेहाद्रता पेरत येतो, म्हणून सण हे उत्सवांचे प्रतीक म्हणून साजरे व्हावेत.* *नात्यांचा, घटनांचा अर्थ लावत आपल्याला मनाचा स्वयंविकास जेव्हा साधता येईल, तेव्हाच सगळे सण-उत्सव प्रतीकरूप होतील. रोजचा दिवस येतो आणि जातो. रोजच्या कामात मग्न असणारे आपण काही नवीन करतो का, किंवा जे कुठलेही काम करतो त्याच्यात काही नवीन शोधतो का ? नसल्यास ते जमले पाहिजे. नित्यनूतनतेचा ध्यास जोवर लागत नाही, तोवर आयुष्यातून शिळेपणा जाणार नाही. प्रत्येक क्षणाचा उत्सव करणे हे आपले कर्तव्य आहे. या भावनेने जगण्याच्या अनेकविध अंगांकडे पाहता आले पाहिजे.* *॥ रामकृष्णहरी ॥* 💥💥💥💥💥💥💥💥💥 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल-9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो* *मी काल एक मला आवडलेली पोस्ट फॉरवर्ड केली.काही बंधू-भगिनी तुटून पडले माझ्यावर,मग काय बाबा* *पंढरपूरला जाण सोडून द्यायचे का* *आम्ही?आपली परंपरा काय म्हणते,संस्कृती काय सांगते?काही* *तर म्हटले अहो भाऊ भारत यावरच टिकून आहे,म्हणून आपली* *संस्कृती महान आहे.* *ओके,मला मान्य आहे.शिवाय नाण्याला दोन बाजू असतात.आणि* *श्रद्धा ,अंधश्रद्धा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे हे* *ही बरोबर आहे.* *कुणाच्या भावना दुखवू नये हेही तितकेच खरे आहे.पण ही वास्तव पोस्ट होती.वाचनालये शेवटची घटका* *मोजत आहे.वैज्ञानिक दृष्टिकोन दूर जातांना दिसतोय.मंदिरे मात्र सुसज्ज,रोज बांधली* *जातात,अब्जावधी रुपये दानपेटीत जमा होतात.* *पण मित्रांनो भगिनींना राग येऊ नये ही अपेक्षा ,पण महिला वर्गावर* *अध्यात्म जास्त प्रमाणात छाप पाडते.* *थोडं धाडसाने म्हणेल की* *वास्तविक पुरुषांपेक्षा महिला जास्त* *कर्तबगार ,सहनशील असतात.पण त्यांना उजेडात येऊ दिले नाही हा* *इतिहास आहे. त्यात काही कमी-जास्त पणा असेलही.पण* *इतिहास सांगतो मैत्रेयी व गार्गी या महान स्रिया पूर्वी* *देशावर अधिराज्य गाजवत होत्या.* *मुलं आईच्या नावाने ओळखली जाते होती.* *महिला पूर्णपणे सक्षम असतात यात माझे दुमत नाही त्यांना समाजाने* *दुर्बल केले आणि ठरविले सुद्धा.* *यशोधराचेच बघा ना* *ज्या रात्री गौतम बुद्धांनी घर* *आणि पत्नीला सोडले, त्याच रात्री* *त्यांना पुत्रप्राप्ती झाली.* *पुत्रप्राप्तीचा आनंद असतानाही पतीने घर सोडल्याची बातमी जेव्हा* *तिला समजली तेव्हा ती उध्वस्त झाली. पण तिने कुणाकडे* *ही तक्रार केली नाही.* *आणि जग ज्याच्याकडे अभिमानाने पाहिल, अशा पद्धतीने मुलाला* *वाढविण्याचे तिने ठरवले. सोडून गेलेल्या पतीला* *विसरून तिने नवे आयुष्य सुरु करावे,असे तिला सर्वांनी* *सुचवले. दुसरे लग्न करण्याची गळ घातली, तिने त्यास* *नकार दिला.* *आणि एका सुंदर सकाळी.........* *ते परत आले आणि तिच्या समोर उभे राहिले.* *तिने शांतपणे त्यांना विचारले,* " *आता तुम्हाला लोक 'बुद्ध 'म्हणून ओळखतात ना?"* *त्यांनी ही तितक्याच शांत* *पणे उत्तर दिले, "होय, मी देखील तसे* *ऐकले आहे. "* *तिने पुढे विचारले, "त्याचा अर्थ काय?"* " *जगण्याचा अर्थ कळला आहे,* *अशी व्यक्ती !"ते म्हणाले.* *ती किंचितशी हसली आणि मग शांत बसली.* *काही वेळाने ती म्हणाली,* " *आपण दोघेही काहीतरी नवे* *शिकलो आहोत, असे मला वाटते.* *तुम्ही जे शिकला आहात,* *त्यातून हे जग सम्रुद्ध* *होईल पण मी जे शिकले आहे, ते* *फारसे जगापुढे येणारच नाही."* *बुद्धांनी तिला विचारले, "तू काय* *धडा शिकलीस ?"* *तिचे डोळे चमकले. डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या.* *"तो धडा म्हणजे धैर्य! स्त्रीला उभी* *रहाण्यासाठी कुणाचीही गरज* *लागत नाही. तिचे स्वतःचे* *व्यक्तिमत्व हे परिपूर्ण असते. ती न* *डगमगता कोणत्याही* *परिस्थितीतून खंबीरपणे मार्ग काढू शकते. "* *यशोधरेतील 'स्त्री'ला मनापासून नमस्कार ! आणि तिने विज्ञान आणि* *अध्यात्माला बरोबर घेऊन चालावे ही प्रामाणिक इच्छा.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• हल्ली कुटुंबाची व्याख्याच सिमित झाली आहे.याचे कारणही तसेच आहे.आपापल्या स्वार्थापुरतं क्षेत्र निर्माण करुन तेवढ्यापुरतंच मर्यादित करुन जीवन जगताना दिसत आहे.आई-बाबा,भाऊ-बहीण, आजी-आजोबा आणि इतरही नाते नात्याची असलेली आणि विणलेली घट्ट वीण कुठल्यातरी कमी संस्कारामुळे ,स्वार्थामुळे सैल झाली आहे त्यामुळे आता ही नाती एकमेकांपासून दूर गेली आहेत हे पहायला मिळते.आपल्याच पिढीला नाते काय असते आणि कसे असते कुणाला काय म्हणावे हे सांगताना एखाद्या गोष्टीत सांगितल्याप्रमाणे होत आहे.अशा सर्व गोष्टींमुळे येणा-या पिढीच्या मानसिकतेवर फार मोठा आघात होत आहे.त्यासाठी कुटुंब आणि कुटुंबातील सारे सदस्य आपुलकीने,प्रेमाने, थोरामोठ्यांच्या मार्गदर्शनाखाली टिकवण्याची गरज आहे,प्रत्येकातील असणारा स्वार्थरुपी नाते संपुष्टात आणायला हवे,घरामध्ये कमावणा-या व्यक्तींचा सन्मान आणि न कमावणा-या व्यक्तींचा अपमान आणि तिरस्कार करणे टाळायला हवे.हे जर आपण आपल्यामध्ये प्रथम सुधारणा करून येणा-या पिढीला आदर्श संस्कारांची मात्रा त्यांना अधिक प्रमाणात दिली तर नात्यांची घट्ट वीण तयार होऊन एकमेकांबद्दल प्रेम,आदर,नाती, संबंध अधिक दृढ होण्यास मदत होईल.कुटुंब म्हणजे काय आणि नाते कसे असते हे निश्चितपणे पिढीला समजेल.मग ते कधीही कुणाच्या नात्यापासून दुरावणार नाहीत की,कुणाची मने दुखावणार नाहीत. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🥀🍃🥀🍃🥀🍃🥀🍃🥀🍃🥀 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *राणीने घेतलेली परीक्षा* एकदा शिबा राज्याच्या राणीने राजा सलोमन या प्रसिद्ध आणि चतुर राजाचा चातुर्याची परीक्षा घ्यायचे ठरवले. एके दिवशी ती फुलांचे दोन हार घेऊन राजाकडे गेली. दोन्ही हार दिसायला अगदी सारखे दिसत होते. पण एक हार खरोखरचा फुलांचा होता; तर दुसरा हार कागदी फुलांचा होता. राणीने दोन हातात दोन हार धरले ती राजाच्या समोर उभी राहिली ती राजाला म्हणाली, " हे चतुर, राजा या दोन हारा पैकी कोणता हार खऱ्या फुलांचा आहे हे मला सांग. जागेवरून न उठता तू मला याचे उत्तर दे." दोन्ही हार बारकाईने पाहिले.दोन्ही हार सारखे दिसत होते.कोणता हार खऱ्या फुलांचा आहे हे त्याला ओळखता येईना. हार फक्त पाहून त्यातील फरक ओळखणे अवघड आहे, हे त्याला कळले. राजा विचार करू लागला. त्याला एक नामी युक्ती सुचली. महालाच्या एका बाजूला फुलबाग होती. राजाने सेवकाला महालाच्या त्या बाजूची खिडकी उघडायला सांगितली. सेवकाने खिडकी उघडली. त्या बरोबर बागेतील मधमाश्‍या आत आल्या आणि राणीच्या उजव्या हातातील हाराभोवती फिरू लागल्या. राजाने स्मित केले आणि म्हणाला, " माझ्या बागेतील मधमाशांनी मला तुझ्या प्रश्नाचे उत्तर सांगितले आहे. तुझ्या उजव्या हातातील हार खऱ्या फुलांचा आहे." राणीने राजाला आदराने अभिवादन केले आणि म्हणाली," हे राजा, तुझे उत्तर बरोबर आहे. तू खरोखरच हुशार आहेस." *तात्पर्यः माणसाने योग्यवेळी शक्तीचा, बुद्धीचा, व युक्तीचा वापर केला तर जीवनात कोणतीही परीक्षा, गोष्ट अवघड नाही.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

*हुरहूर* दि.१५-१२-२०१९ मन माझे दुःखी झाले हूरहूर तुझ्या भेटीची आस लागूनी जीवा मला चाहूल तुझ्या येण्याची तुच माझा सखासोबती तुझ्यावीन नाही माझी जीवन जगण्याची गोडी तुला पाहते मी माझा नजरेतूनी आणि विसावते थोडी तुझ्या आठवणीची हुरहूर लागुनी भास होतो मजला येशील काय माझा स्वप्नात देशील काय साथ तु अशी मजला 〰〰〰〰〰〰 प्रमिलाताई सेनकुडे ता.हदगाव जिल्हा नांदेड

चिञचारोळी स्पर्धेसाठी दि.१५-१२-२०१९ १) वृक्ष माझी काया वृक्ष माझी छाया जाणले चिमुकलीने पाणी घालती रोज तया 〰〰〰〰〰〰 २) एक एक झाड जगवूया पाणी तयास देऊया पर्यावरणाचा रक्षणाची जबाबदारी आपण घेऊया 〰〰〰〰〰〰 ३) जीव आहे माझा चिमुकला आॕक्सीजन मिळवूया हवेतला झाडांना पाणी देऊया जीवन त्यांचे जगवूया 〰〰〰〰〰〰 ४) माझा जीव आहे लहान पाणी झाडाला देऊन काम करते मी महान हाच वसा घेऊया सारे वाचवूया आपण वृक्ष सारे 〰〰〰〰〰〰 ५) झारीने पाणी घालीन मी रोजरोज झाडाला सृष्टीचे सौंदर्य खुलवीन साथ देऊ या निसर्गाला 〰〰〰〰〰〰 ✍प्रमिलाताई सेनकुडे ता.हदगाव जिल्हा नांदेड 〰〰〰〰〰〰

चारोळी दि.१५-१२-२०१९ हूरहूर १)शृंगारलेल्या माझा मनाला सोडून गेली तुझी काया हूरहूर लागे माझा जीवाला पडेल काय तुझी ती छाया 〰〰〰〰〰〰 २) हूरहूर लागली मजला दिस हा असा उजाडला खंत माझा मनाची का सख्या नाही तु समजला. 〰〰〰〰〰〰 ३) समजतच नाही मजला हूरहुर ही कशी लागली दाटूनी कंठ अंतरीचा नयनास त्या ओसरू लागली. 〰〰〰〰〰〰 ४) दूर तू गेलास परी सोडून माझी साथ हूरहूर लागते माझा जीवाला परतूनी येऊनी करशील काय मात 〰〰〰〰〰〰 ५) आईवडीलांची लाडाची लेक जाते जेव्हा सासरी हूरहूर होते त्यांचे मन उदासून जाते अंतरी 〰〰〰〰〰〰 प्रमिलाताई सेनकुडे ता.हदगाव जिल्हा नांदेड

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 14/12/2019 वार - शनिवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    *शहीद बुद्धीजीवी दिन - बांगलादेश* *राज्य दिन - अमेरिका-अलाबामा* 💥 ठळक घडामोडी :- ● १२८७ - सेंट लुशियाचा पूर - नेदरलँड्समधील झुइडर झी समुद्री भिंत कोसळली. ५०,००० ठार. ● १९६२ - नासाचे मरिनर २ शुक्राच्या जवळून जाणारे पहिले मानवनिर्मित यान. ● १९८९ - पॅट्रिशियो एल्विन चिली च्या राष्ट्राध्यक्षपदी. 💥 जन्म :- ● १८९५ - जॉर्ज सहावा, इंग्लंडचा राजा. ● १९१८ - बी. के. एस.आय्यंगार, भारतीय योगतज्ञ. 💥 मृत्यू :- ● १९७७ - ग.दि. माडगूळकर, मराठी कवी. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *मुंबई: साधारणपणे आठवड्यातील तीन-चार दिवस चालणारं मंत्रालयाचं कामकाज आता दररोज सुरू राहणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुंबईचेच असल्याने हा निर्णय घेण्यात आला असल्याचं सूत्रांनी सांगितलं* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *नागरिकत्व सुधारणा विधेयकाला महाराष्ट्रातूनही विरोध, काँग्रेस नेत्यांकडून अंमलबजावणी न करण्याची मागणी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भूमिकेकडं राज्याचं लक्ष्य* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *रानकवी पद्मश्री ना. धों. महानोर यांच्या हस्ते त्र्यांनवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन १० जानेवारी २०२० रोजी होणार असल्याची माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष नितीन तावडे यांनी दिली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *इंग्लडमध्ये 364 जागा जिंकत जॉन्सनच्या हुजुर पक्षाला स्पष्ट बहुमत; ब्रेक्झिटचे समर्थन करणारे बोरीस जॉन्सन पुन्हा ब्रिटनच्या पंतप्रधानपदी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *राज्यातील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृतीसह इतर शिष्यवृत्ती योजनांचे ऑनलाइन अर्ज आता १५ डिसेंबरपर्यंत भरता येणार आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *संभाजीनगर की औरंगाबाद नावावरुन महापालिकेत भाजप-सेना नगरसेवक समोरासमोर, भाजप उपमहापौरांचा राजीनामा, पालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारत – वेस्ट इंडिज यांच्यातील एकदिवसीय मालिकेला १५ डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे. भारताचा आघाडीचा अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमार हा दुखापतग्रस्त असल्याने त्याच्या जागेवर आता मुंबईकर शार्दुल ठाकूर याला पर्यायी खेळाडू म्हणून बीसीसीआयकडून संधी देण्यात आल्याचे सांगितलं जातं आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••            *आपली कामे आपणच करावीत* एखाद्या वेळी घरात आई किंवा बहीण नसेल तर आपली पंचाईत होते. जेवण करायचे असेल किंवा घरातील साफसफाईचा प्रश्न असेल, आपण सर्वस्वी आई किंवा बहिणीवर अवलंबून असतो. त्यामुळे आपणावर तसा प्रसंग ओढावतो. ज्यावेळी घरात वडील किंवा भाऊ नसतो, त्यावेळी तशीच काहीशी ......... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_59.html  लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *गॅसेस का होतात ?* 📙 खूप लोकांना गॅसेसचा त्रास होतो. म्हातारपणात तर बऱ्याच लोकांमध्ये हा त्रास आढळून येतो.‍ लहान मुलांमध्येही गॅसेस होऊ शकतात. गॅसेस किंवा वायूविकाराचे मुख्य कारण म्हणजे आपल्याला माहित नसताना हवा गिळण्याची सवय. खूप बोलणाऱ्या लोकांमध्ये (उदा. शिक्षक, राजकीय नेते) अशा प्रकारे जास्त हवा गिळली जाते आणि गॅसेसचा त्रास होतो. लहान मुलेही दूध पिताना हवा गिळतात आणि त्यामुळे गॅसेस होऊन त्यांचे पोट दुखायला लागते. मोठ्या आतड्यात सुक्ष्म जंतूंची अन्नावर क्रिया होऊनही वायू निर्माण होतो. याखेरीज शौचास साफ न झाल्यास किंवा बद्धकोष्ठाचा त्रास असल्यास मल शरीरात साचून राहतो व या मलाचे विघटन होऊनही वायू तयार होतात. वायू तयार झाल्यावर तो आतड्याच्या भिंतीवर ताण आणतो. त्यामुळे पोट दुखते. डोकेही दुखते. गॅसेसचा त्रास होऊ नये यासाठी जेवणाच्या वेळा नियमित असाव्यात. थोडीशी भूक ठेवूनच जेवावे. हरभऱ्याच्या डाळीचे किंवा तेलकट तुपकट पदार्थ कमी खावेत. बैठे काम करणाऱ्यांनी भरपूर व्यायाम करावा. सर्वांनीच निदान जास्तीत जास्त पायी चालण्याचा प्रयत्न करावा. पवनमुक्तासनसारख्या आसनांमुळे गॅसेस बाहेर पडतात. अनावश्यक बडबड टाळावी. हिंग्वाष्टक चूर्ण घेतल्यास गॅसेसवर चांगला उपचार होतो. बैठे काम करणाऱ्यांनी जेवणानंतर दीड दोन तासांनी ताठ बसून बेबी आत ओढून पाच ते पंधरा सेकंद तशीच ठेवण्याचा प्रयत्न करावा. असा उपाय वारंवार केल्याने गॅसेसचा त्रास नक्कीच कमी होतो. चार चौघे जमल्यावर आपल्याला लाज आणणारा हा वायूविकार आहाराच्या सुयोग्य सवयी आणि व्यायाम यामुळे आपण आटोक्यात आणू शकू. *डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित* यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" ज्यांना जास्त गोष्टींची हाव असते त्यांना प्रत्येक गोष्टीची कमतरता असते. "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *राज्यसभेवर निवडून गेलेली पहिली अभिनेत्री कोण ?* नर्गिस दत्त 2) *महाराष्ट्रातील कोणते उद्यान मगरीसाठी प्रसिद्ध आहे ?* ताडोबा ( चंद्रपूर ) 3) *पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात हरीजनांना प्रवेश मिळावा यासाठी कोणी उपोषण केले ?* साने गुरुजी 4) *'भारताची फुलराणी' असे कोणत्या महिला खेळाडूला म्हटले जाते ?* सायना नेहवाल ( बॅडमिंटन ) 5) *'प्रतियोगीता सहकार' ही संकल्पना कोणी मांडली ?* लोकमान्य टिळक *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 सारंग भंडारे *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आपले आयुष्य तसे सामान्यच आणि स्वप्नेही तशीच; पण असामान्य व्यक्तींची 'स्वप्ने' लोकविलक्षणच असतात. संत एकनाथांना ज्ञानेश्वरांनी स्वप्नात येऊन दृष्टांत दिला की,'अजानवृक्षाची मुळी माझ्या गळ्याभोवती वेढली गेली आहे. ' एकनाथांनी मग आळंदीला जाऊन ज्ञानदेवांची समाधी शोधून काढली. तिचा जिर्णोद्धार केला. इतकेच नव्हे, तर ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली. तुकारामांच्या स्वप्नात संत नामदेव आले आणि त्यांनी आपली शतकोटी अभंगाची प्रतिज्ञा पूर्ण करावी, असे तुकोबांना सुचविले. जिजाऊंनी शिवरायांच्या राज्याभिषेकाचे स्वप्न मनोमन पाहून शिवरायांना स्वराज्याचे तोरण बांधण्याची प्रेरणा दिली होती.* *स्वामी विवेकानंदांनी कन्याकुमारी येथे खडकावर, ध्यानमग्न स्थितीत, दैदिप्यमान भारताचे स्वप्न पाहिले. 'देशवासियांच्या जाड्याभरड्या अन्नवस्त्राची तरी सोय व्हावयास हवी.' हे रामकृष्ण परमहंसांचे बोल त्यांच्या मनात गुंजत होते. बोधिवृक्षाखाली ध्यानस्थ बसलेल्या गौतम बुद्धांचे मनही उपेक्षित लोकांसाठी तळमळत होते. स्वत:पलिकडे लोककल्याणाचा ध्यास घेतलेल्यांची स्वप्ने भव्य-दिव्य असतात. संत कबीर यांनी प्रत्येक जीवाने सत्-चित् , आनंदरूप व्हावे, अशी आस बाळगली, तर तुकडोजी महाराजांनी भेदभावरहित सुखी भारताची आकांक्षा धरली.* *॥ रामकृष्णहरी ॥* 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाईल- 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो,* *जगात समस्या नाही असा माणूस नाही.आणि उपाय नाही अशी समस्या नाही.* *मग तुम्हीच ठरवा कण्हत कण्हत जगायचं की गाणं म्हणत.* *रडत रडत जगायचं की लढत जग जिंकायचं तुम्हीच ठरवा.* *भारतात शंभर समस्या आहेत, परंतु अब्जावधी उपायही आहेत...* - *कैलाश सत्यार्थी, नोबेल विजेते* *हव्या त्या वस्तू जगात सापडत नाही.त्या संपादन कराव्या लागतात.* *जसे की पसायदानात प्रार्थना केली जाते-* *दुरितांचे तिमिर जावो,विश्व स्वधर्म सूर्य पाहो.जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणिजात.* *पण त्या अगोदर तुम्हांला स्वत:साठी व आपल्या समस्त मानवजातीसाठी पुढील प्रयत्न करावे लागतील-* “ *मागा म्हणजे तुम्हांला ते देण्यात येईल.* *शोधा आणि तुम्हांला ते सापडेल,* *ठोका आणि तुमच्यासाठी दार उघडले जाईल.* *नोकरी मिळविण्यासाठी अभ्यास करु नका.ती तर अशिक्षित मुलांना ही* *मिळते.गरज म्हणून अभ्यास* *करा,आवड आहे म्हणून नको.* *आपली आवड तर नेहमी बदलत* *राहते.आज पूजा तो कल* *कोई और दूजा.जसे शरीराला* *रोज अन्नाची गरज* *आहे.तसे आपल्याला अभ्यासाची गरज आहे.* *तुम्ही एखाद्या गोष्टीपासून जितके दूर पळाल तितकी की तुमच्या गळ्यात* *पडते.तेव्हा नैराश्याने अथवा आयोगाच्या कारभाराला* *कंटाळून इथेच थांबणार असाल व बस्स झाले आता, पोटापाण्यासाठी व* *समाजात एक पगारी माणूस म्हणून मिरवून* *घ्यायचे.असा पळपुटा विचार सोडून द्या. सावलीतील नोकरी* *मिळविण्यासाठी इकडे येत असाल तर सध्या जिथे आहात तिकडेच* *रहा.कारण ग्लोबल वार्मिंगचा फटका इथेही बसलेला आहे.* *जाळे फेकलेच आहे तर एकतरी मासा गळाला लागलाच पाहिजे.* *रिकाम्याहाती गंगामाईही जात नाही.तुम्ही लढा आमचे हात आहेच* *तुमच्या पाठीशी.* *इंग्रजी कळत नसेल तर मराठीत सांगतो...* *सगळेच अधिकारी झालेत तर झाडू कोण मारणार?* *तेव्हा पहा, ठरवा,निर्णय घ्या व कृती प्रत्यक्षात उतरवा.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते )* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• काल तुम्ही दिवसभरात केलेल्या कामाची थोडी उजळणी करा आणि तुमच्या मनाला थोडं विचारा की,अरे मना माझ्याकडून जे काही घडले त्यात माझ्या कृतीपेक्षा तुझाच जास्त सहभाग आहे.कारण तुझ्या स्थिरतेमुळेच मी एवढे काम चांगले करु शकलो.तू जर चलबिचल झाला असता तर माझ्याकडून ब-याच चूका झाल्या असत्या,पण मला तू माझ्या बुद्धीला आणि हाताला दुसरीकडे कुठेच जाऊ दिले नाही.माझ्या कामात एकाग्रता आणि सातत्य ठेवल्यामुळे मला इतरत्र भटकण्याची संधी दिली नाही.म्हणून तुझे पहिल्यांदा आभार मानले पाहिजे. म्हणजेच काल जी आपल्या चांगल्या दृष्टीकोनातून कामाची तयारी आणि पूर्णत्वाकडे नेण्याची सर्वस्वी जबाबदारी मनाचीच होती.मनाचीच तयारी नसती तर कोणतेही काम पूर्णत्वाकडे गेले नसते. सदैव आपल्या मनाला कसल्याही प्रकारची मरगळ येऊ न देता प्रसन्न ठेवले पाहिजे आणि आजचे ही काम तितकेच जोमाने पार पडावे यासाठी तूच सर्वस्वी जबाबदार आहे आणि राहणार.थोडक्यात सांगायचे झाले तर कोणत्याही कामात यशस्वी होण्यासाठी पहिल्यांदा आपले मन आपल्या ताब्यात असायला हवे. त्यासाठी आपण सदैव तयार असायला हवे मग ते कोणतेही काम करणे सोपे जाईल. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍃🍂🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *गरीब माणूस आणि श्रीमंत माणूस* एक गरीब माणूस आणि एक श्रीमंत माणूस शेजारी शेजारी राहत होते. गरीब माणसाचे चपला जोडे शिवण्याची दुकान होते. काम करता करता तो अगदी आनंदाने गाणे गात असे.तो अगदी निर्धास्त जीवन जगत असे. आपल्या घराची दारे खिडक्या बंद ठेवाव्यात, त्यांना कुलूप कड्या लावाव्यात असे त्याला कधीच वाटत नसे.रोज रात्री तो देवाची प्रार्थना करून झोपी जात असे. शेजारी राहत असलेला श्रीमंत माणूस या गरिब आनंदी माणसाकडे नेहेमी पाहत असे. श्रीमंत माणसाला अनेक चिंता होत्या; स्वतःच्या पैशाची आणि सुरक्षेततेची त्याला नेहमी काळजी वाटत असे. आपल्या घराची दारे खिडक्या घट्ट बंद करत असे. एवढे करूनही त्याला शांत झोप लागत नसे. एके दिवशी श्रीमंत माणसाने गरीब माणसाला घरी बोलावले त्याने त्याला पाच हजार रुपये दिले आणि म्हणाला , " हे पैसे तुझ्याकडे ठेव मला या पैशांची गरज नाही.ते तुझेच पैसे आहेत असे समज.एवढे पैसे मिळाले म्हणून गरीब माणसाला पहिल्यांदा खूप आनंद झाला.पण त्या पैशांमुळे त्याच्या जीवनातील शांतता पार नाहीशी झाली.त्याने आयुष्यात पहिल्यांदाच आपल्या घराचे दार व सर्व खिडक्या बंद केल्या आणि त्यांना कड्या घातल्या आपले पैसे सुरक्षित आहेत ना, हे पाहण्यासाठी रात्री तो कितीतरी वेळा झोपेतून उठला. दुसऱ्याच दिवशी सकाळी तो गरीब माणूस श्रीमंत माणसाकडे आला. त्याने पाच हजार रुपये श्रीमंत माणसाला परत दिले आणि हात जोडून म्हणाला, " साहेब, हे तुमचे पैसे परत घ्या. आपण हे पैसे घेतलेत तरच माझं हसतं-गातं जीवन आणि शांत झोप मला परत मिळेल." *तात्पर्य सर्व सुख समाधान पैशात सामावलेले नसते.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 13/12/2019 वार - शुक्रवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :-  ● २००२ - ज्येष्ठ चित्रपट निर्माते-दिग्दर्शक यश चोप्रा यांना २००१ चा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर. ● २००३ - प्रसिद्ध बंगाली लेखिका महाश्वेता देवी यांना ऑफिसर ऑफ आर्टस ऍन्ड लिटरेचर हा फ्रान्सचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी किताब जाहीर. 💥 जन्म :- ● १८१८ - मेरी टॉड लिंकन, अब्राहम लिंकनची पत्नी. ● १८५४ - थॉमस वॉट्सन, अलेक्झांडर ग्रॅहॅम बेलचा मदतनीस. ● १९२४ - विद्याधर पुंडलिक, साहित्यिक ● १९२८ - सरिता पदकी, बालवाङ्मय लेखिका 💥 मृत्यू :-  ● १९८६ - स्मिता पाटील, हिंदी चित्रपट अभिनेत्री ● १९९४ - विश्‍वनाथ अण्णा ऊर्फ तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक. ● १९९६ - श्रीधर पुरुषोत्तम लिमये ऊर्फ शिरुभाऊ, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व क्रांतिकारक. ● २००५ - रामानंद सागर, हिंदी चित्रपट निर्माता, निर्देशक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *ठाकरे सरकारचं अखेर 15व्या दिवशी खातेवाटप, गृह, नगरविकास, सार्वजनिक बांधकाम, कृषि या महत्वाच्या खात्यासह शिवसेनेकडे तब्बल 22 खाती, राष्ट्रवादीकडे अर्थ, ग्रामविकाससह 13 तर काँग्रेसकडे महसूल, शिक्षणासह 15 खाती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *अयोध्या प्रकरणातील सर्वच्या सर्व 19 फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या, सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाचा निर्णय, राम मंदिराचा मार्ग मोकळा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *नागरिकत्व दुरुस्ती विधेयक देशाच्या इतिहासात मैलाचा दगड ठरेल, गेल्या अनेक वर्षांपासून ज्या लोकांवर अन्याय झाले, त्यांचं दु:ख दूर करणारं हे विधेयक, पंतप्रधान नरेंद्र मोदींची भावना* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *स्वीडनमधील पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गला टाइम मॅगझीनचा 'पर्सन ऑफ द इयर' पुरस्कार, 16 वर्षांच्या ग्रेटावर कौतुकाचा वर्षाव* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *80व्या जन्मदिनानिमित्त मुंबईत शरद पवारांचा भव्य सत्कार, पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, तर वाढदिवसानिमित्त 80 लाख रुपयांचा निधी शेतकऱ्यांसाठी गोळा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *हैदराबाद एन्काऊंटर प्रकरणी सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर झाली सुनावणी, या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने तीन सदस्यांच्या आयोगाची स्थापना केली असून 6 महिन्यात अहवाल येणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *रणजीचा रणसंग्राम - मुंबईचा दणदणीत विजय, महाराष्ट्राची हार, विदर्भ-आंध्र सामना अनिर्णित, मुंबईच्या शम्स मुलानीनं दुसऱ्या डावात सर्वाधिक चार फलंदाजांना माघारी धाडलं. त्यानं या सामन्यात एकूण दहा विकेट्स घेऊन सामनावीराचा मानही मिळावला.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *स्थानिक बातमी - बिलोली तालुक्यातील माचनुर येथे श्री खंडोबा यात्रेनिमित्त भव्य पशु प्रदर्शन, पालकी सोहळा व जंगी कुस्ती संपन्न, यात्रा उत्सवा दरम्यान तेलंगणा, आंध्रप्रदेश येथील भाविकांसह महाराष्ट्रातील हजारो भाविक भक्त मोठ्या संख्येने घेतले दर्शन* •••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••          *कमवा आणि शिका हेच उपयोगी* स्वतःच्या विकासावर कुटुंबाचे विकास अवलंबून असते. कुटुंबाच्या विकासावर गावाचा विकास आणि मग राज्य व देशाचा विकास होतो. या विकासासाठी शिक्षण हे अत्यंत महत्त्वाची बाब आहे. शिक्षणाशिवाय कोणाचेही विकास अशक्य आहे. शिक्षणामुळे दोन डोळ्याचे माणसे तिसऱ्या डोळ्याने डोळस होऊ शकतात. अन्यथा डोळे असून ही आंधळ्याची अवस्था होते. महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाचे महत्त्व सांगताना म्हटले आहे की, विद्येविना मति गेली, मतिविना नीती गेली, नितिविना गती गेली, गतिविना वित्त गेले, एवढे अनर्थ सारे एका अविद्येने केले........ वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/06/blog-post_86.html    लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *'इ' जीवनसत्त्वाच्या गोळ्या दररोज घ्याव्या का ?* 📙 अशक्तपणात वाटतो या कारणासाठी अनेक लोक टॉनिकच्या बाटल्या फस्त करत असतात. बी कॉम्प्लेक्सची इंजेक्शने, तर खेडय़ापाडय़ातील प्रशिक्षण न झालेल्या गावठी डॉक्टरांकडेही असतात. टॉनिक, व्हिटॅमिन्स घेण्याचे हे वेड शहरी भागातील सुशिक्षित लोकांमध्येही आढळते. मागणी तसा पुरवठा हे जरी खरे असले तरी बर्‍याचदा फायदा उकळणारी मंडळी इतरांची दिशाभूल करून निरुपयोगी असे पदार्थ बाजारात आणतात व त्याची गरजही निर्माण करतात. लोकांचे अज्ञान डॉक्टरांची धंदेवाईक वृत्ती व औषधी कंपन्यांनी अधिक नफा मिळवण्याची वृत्ती या सर्वांमुळे टॉनिकचा खप वाढतोच आहे. या व्हिटॅमिन्स / टॉनिकच्या स्पर्धेत गेल्या काही वर्षांत 'इ' जीवनसत्त्वाचा प्रवेश झाला आहे. अनेक जाहिरातीत जीवनसत्त्व 'इ' दररोज वापरल्याने सुदृढपणा येतो शक्ती येते. असे लिहिलेले असते. हे खरे आहे काय ते आता पाहू. जीवनसत्त्व 'इ' म्हणजेच टोकोफेराॅल, वनस्पतीज तेले, सरकी, सूर्यफुलाच्या बिया, अंड्याचे बलक तसेच लोणी या पदार्थांमध्ये जीवनसत्त्व 'इ' विपुल प्रमाणात आढळते. प्रौढ व्यक्तीला दर दिवशी दहा मिलिग्रॅम इतके जीवनसत्त्व 'इ' लागते. प्रत्येकाला जीवनसत्त्व 'इ' ची नितांत गरज असते हे जरी खरे असले तरी या जीवनसत्त्वाची कमतरता कोणाच्याही शरीरात निर्माण झाल्याचा पुरावा आजतागायत आढळलेला नाही. त्यामुळे जीवनसत्त्वाच्या गोळ्या दररोज घेण्याची काही गरज नाही असे म्हणता येते. शिवाय जीवनसत्त्व 'इ' चे प्रमाण खूप जास्त झाल्यास मानवी लिम्फोसाइट या पांढर्‍या रक्तपेशींवर विपरीत परिणाम होतो असे प्रयोगशाळेतील चाचण्यांमध्ये सिद्ध झालेले अाहे. या सर्व बाबींचा विचार करता इ जीवनसत्व दररोज घेऊ नये, हे तुम्हाला पटलेच असेल. *डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित* यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून मनोविकास प्रकाशन ०२० ६५२६२९५० *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" जो स्वत: दु:खातून गेला नाही त्याला दुसऱ्याचे दु:ख कसे कळणार ?"* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *भारताच्या पहिल्या लोकसभेचे अध्यक्षपद कोणी भूषविले ?* ग. वा. मावळणकर 2) *शरीरातील सर्व इंद्रियांवर ताबा ठेवणाऱ्या शरीराअंतर्गत संस्थेस काय म्हणतात ?* चेतासंस्था 3) *विशाखापट्टणम येथे कार्यान्वित केलेली भारताची पहिली आण्विक पाणबुडी कोणती ?* INS चक्र 4) *विदर्भातील राष्ट्रभाषा प्रचार समितीचे मुख्यालय कोठे आहे ?* वर्धा 5) *पाणी कशाच्या संयुगाने तयार होते ?* हायड्रोजन व ऑक्सिजन *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 अनिल गायकवाड, सहशिक्षक, बिलोली 👤 रोहन कुरमुडे, धर्माबाद 👤 उज्वल मस्के, साहित्यिक, बीड 👤 राजेश वाघ, बुलढाणा 👤 विनोद राऊलवार 👤 श्रीनिवास भोसले, नांदेड 👤 राजेश जी गडाख, नाशिक *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *हातात काय आहे? बरेचसे तर हाताबाहेरचे आहे. जन्म-मरण हातात नाही. पुढचा क्षण कसा असावा, ते हातात नाही. भूतकाळ मागे सुटलेला, असल्याच तर ब-या-वाईट आठवणी. भविष्याच्या गर्भात काय दडले, माहित नाही. त्यामुळे त्याची उत्सुकता आणि त्याच्या अनिश्चिततेतून वाटणारी असुरक्षितता. भविष्यातील असुरक्षिततेवर मात करण्यासाठी भविष्याविषयीचे स्वप्नरंजन करणे किंवा कल्पनेचे मनोरे बांधणे हाच काय तो उतारा. हाही उतारा कधी क्षणात उधळला जातो आणि कल्पनेचे मनोरे जमीनदोस्त होऊन जातात आणि उरते ती अगतिकता आणि असहायता.* *थोडाफार हातात म्हटल्यापेक्षा चिमटीत आहे तो आताचा वर्तमानातील क्षण. तोही क्षण चिमटीत आहे म्हणता म्हणता निसटतो आणि भूतकाळाच्या शवागारात जमा होतो. वर्तमान हातात असतो, तेव्हा आपण ब-याच वेळा भूतकाळात रममाण असतो. नाहीतर भविष्यातील स्वप्नरंजनात दंग असतो. त्यामुळे हातात असलेला क्षण तसाच सटकून निसटून जातो. क्षणाक्षणाला प्रवाही असलेला क्षण जगता आला पाहिजे. तोच क्षण माझा; ना भूतकाळ माझा. तो तर मेलेला. ना भविष्य माझे; ते तर स्वप्न. आहे ते वर्तमान. यात जगता आले तरच ते जगणे. यासारखी नितांत सुंदर गोष्ट नाही.* *॥ रामकृष्णहरी ॥* 🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿 *श्री संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल- 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो,* *जीवन एक संघर्ष आहे.* *म्हणतात ना दुनिया पैशावर चालते।* *पण पैसा कमवण्यासाठी कष्टाची गरज आहे आणि कष्ट* *केल्यावर आरामाची गरज आहे.* *कष्ट आणि आराम दोघंही एकमेकांचे जिगरी यार आहेत.पण एकाने जरी मी पणा किंवा अतिरेक केला व एकाला धोका दिला तर जीवन कवडीमोल* *होऊन जाते.* *यार,खूप थकलो ,आरामाची गरज* *आहे,झोपच नाही झाली.* *हे शब्द कानावर नेहमी पडतात.दोन्ही जगायला अत्यंत महत्वाचे असतात.* *कितीही मिळाले तरी कमी असल्यासारखे वाटतात.* *दोन्ही कमी पडले तर जगणे कठीण होते.* *माणसाच्या जगण्याची इतिकर्तव्यता ह्या दोघातच सामावलेली आहे.* *कारण काही* *लोक पैसे मिळवण्यासाठी आणि उरलेले लोक शांत झोप* *मिळवण्यासाठी जगत असतात.* *दोघांपैकी काहीही "उडाले" तर* *भयंकर प्रॉब्लेम होऊ शकतो.* *दोघांचाही स्वप्नाशी गहिरा संबंध* *आहे कारण एक स्वप्न* *दाखवते आणि दुसरे स्वप्न पुरे करते.* *दोघांचाही मेहनतीशी गहिरा संबंध आहे. मेहनत करणा-यांवर बहुतेक वेळा पैसा आणि झोप प्रसन्न असतात* *ह्यातील एकाचा अतिरेक दुसऱ्याच्या अस्तित्वावर आणि वृद्धीवर परिणाम* *करू शकतो.* *दोघांपैकी कोणाचेही सोंग आणता येत नाही!* *दोघांचेही योग्य प्रमाणात असणे आयुष्य सुखकर करते.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्या व्यक्तीच्या मनात संशयाने घर केलेले असेल तर त्याचे जीवन जगणे अवघड होऊन बसते.त्याच्या मनात नेहमी कोणत्याही व्यक्तीबद्दल संशयी दृष्टीनेच पाहतो.अशा पाहण्याने स्वत:च्या जीवनाचे नुकसान तर होतेच पण इतरांच्या जीवनातही संशयाचे विष कालवून त्याचे मनही अस्थिर करुन टाकते.अशा परिस्थितीत मग चांगले जीवन जगायला अवघड जाते.अशा संशयी व्यक्तींच्या सानिध्यात न राहणेच योग्य ठरेल.संशय हा संशयी व्यक्तींचा मित्र असतो तर इतरांचा शत्रू.म्हणून अशा शत्रूला आपल्यापासून चार पाऊले दूरच ठेवायला हवे. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *प्रयत्नांती यश* एकदा दोन राज्यांच्यात युद्ध झाले. त्यात एक राजा पराभव झाला. पराभूत राजा शौर्याने लढला होता. पण त्याचे सैन्य थोडे होते. विजय राजाचे सैनिक पराभूत राजाला शोधत होते. त्यांना त्या राजाला ठार मारायचे होते. म्हणून राजा जीव वाचवण्यासाठी जंगलात पळाला आणि एका गुहेत जाऊन लपला. तो खूप दुःखी झाला होता. त्याचा धीर खचला होता. एके दिवशी राजा गुहेत स्वस्थपणे पहुडला होता. भिंतीवरील एका लहानशा कोळ्याने त्याचे लक्ष वेधले. कोळी गुहेच्या भिंतीवर फार मेहनतीने जाळे विणत होता. तो सरपटत भिंतीवर चढायचा. मधेच एखादा धागा तुटायचा आणि कोळी जमिनीवर पडायचा. असे बरेचदा घडले. पण कोळ्याने आपला प्रयत्न सोडला नाही. तू चिकाटीने झाडे विनतच राहिला. अखेर जाळी विनत विनत तो छतापर्यंत पोहोचला. राजाने विचार केला, " हा सरपटणारा छोटासा प्राणी सुद्धा आपले प्रयत्न सोडत नाही. मी तर राजा आहे. मग मी माझे प्रयत्न का बर सोडले? मला पुन्हा प्रयत्न केलाच पाहिजे." त्याने शत्रु बरोबर पुन्हा युद्ध करण्याचा निश्चय केला. राजा जंगलातून बाहेर पडला आणि आपल्या विश्वासू सहकाऱ्यांना भेटला. त्याने आपल्या राज्यातील शूर माणसे एकत्र केली आणि बलवान सैन्य उभारले. सर्व शक्तीनिशी त्यांनी आपल्या शत्रू बरोबर युद्ध केले. अखेरीस त्याने लढाई जिंकली. त्याला त्याचे राज्य परत मिळाले. एका कोळ्याने आपल्याला धडा शिकवला, हे त्याच्या कायम लक्षात राहिले. *तात्पर्यः जो अपयशाने खचून न जाता सतत प्रयत्न करतो ,त्यालाच यश मिळते.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 12/12/2019 वार - गुरूवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  💥 ठळक घडामोडी :-  ● १९८५ - ऍरो एर फ्लाइट १२८५ हे डी.सी.८ जातीचे विमान न्यू फाउंडलंडमधील गॅन्डर विमानतळावरून उडताच कोसळले. २५६ ठार. मृतांमध्ये अमेरिकेच्या १०१व्या एरबॉर्न डिव्हिजनचे २४८ सैनिक. ● १९९० - पाकिस्तान अंटार्क्टिकाला अभियान पाठविणारा ३७वा देश ठरला. ● २००१ - भारतीय हवाई दलासाठी खास विकसित केलेल्या अधिक मोठ्या पल्ल्याच्या पृथ्वी क्षेपणास्त्राची बालासोर येथे यशस्वी चाचणी. ● २००० - अमेरिकेचे सर्वोच्च न्यायालयने बुश वि. गोर खटल्यात निकाल दिला. ज्यॉर्ज डब्ल्यू. बुश राष्ट्राध्यक्षपदी. 💥 जन्म :- ● १८७२ - बाळकृष्ण शिवराम मुंजे, भारतीय-मराठी राजकारणी, हिंदू महासभेचे संस्थापक. ● १९४० - शरद पवार, माजी मुख्यमंत्री ● १९४९ - स्व. गोपीनाथ मुंडे, माजी उपमुख्यमंत्री ● १९५० - रजनीकांत तथा शिवाजीराव गायकवाड, तामिळ अभिनेता. ● १९८१ - युवराजसिंग, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :-  ● १९३० - बाबू गेनु, पुण्यात परदेशी मालाविरुद्ध निदर्शने करताना. ● १९९२ - पं. महादेव शास्त्री जोशी, भारतीय संस्कृतिकोशाचे लेखक. ● १९९२ - जसु पटेल, भारतीय क्रिकेट खेळाडू. ● २००४ - निरंजन उजगरे, मराठी कवी. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *नागरिकत्व सुधारणा विधेयक राज्यसभेत मंजूर, 117 विरुद्ध 92 च्या फरकानं विधेयक मंजूर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *आरेमधील मेट्रो कारशेडसाठी कापण्यात आलेल्या झाडांच्या चौकशीसाठी समिती गठीत करण्यात आली असून ही समिती वित्त विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली काम करेल. समितीमध्ये चार सदस्य असतील. समिती पुढील 15 दिवसात याबाबतचा अहवाल सादर करेल.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होऊन 14 दिवस उलटले. पण अजूनही खातेवाटपावरुन महाविकास आघाडीत गोंधळ सुरु असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिलीय.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *समृद्धी महामार्गाला हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव, मंत्रीमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव, येत्या तीन वर्षात प्रकल्प पूर्ण करणार शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदें यांनी दिली माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *राज्याची केंद्राकडे 15 हजार 558 कोटी रुपयांची जीएसटी थकबाकी, राज्याच्या विकासासाठी हा निधी लवकर मिळावा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना लिहिलं पत्र.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *तीन दशकांपेक्षा जास्त काळ चेन्नईमध्ये निर्वासितांप्रमाणे राहणाऱ्या तामीळ भाषिक श्रीलंकन नागरिकांना भारताचं नागरिकत्त्व प्रदान करण्याची आध्यात्मिक गुरु श्री श्री रवीशंकर यांनी सरकारकडे केली मागणी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारतीय अवकाश संशोधन संस्थेने म्हणजे इस्रोने रिसॅट - 2BR1 उपग्रहाचं केलं यशस्वी प्रक्षेपण, बालाकोटसारख्या मिशनमध्ये मदत मिळणार, या भारतीय उपग्रहासह इस्रोने इस्त्रायल, इटली, जपान आणि अमेरिका या देशांच्या नऊ उपग्रहांना अवकाशात पाठवलं आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *स्थानिक बातमी - नांदेड जिल्ह्यातील नायगाव विधानसभा अंतर्गत धर्माबाद उमरी आणि नायगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शिक्षकांची एकदिवसीय कार्यप्रेरणा कार्यशाळा शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••     *साहस कथा* सातव्‍या वर्गात शिकत असतानाच सुधाचे लग्‍न मोठ्या थाटामाटात झालं.  अजून तिला खूप काही शिकायच होत, तसं आईला तिने बोलूनही दाखवलं, परंतु बाबांच्‍या रागासमोर दोघांचेही चालले नाही पाच सात एकर जमीन, मोठा वाडा, गोठ्यात दहा-पंधरा जनावरं, एकुलता ...... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://kathamaala.blogspot.com/2017/12/blog-post.html            लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *भौतिकशास्त्र* 📙 ********************** विश्व हे पदार्थांनी (Matter) बनले आहे. या पदार्थाचे स्वरूप, उत्पत्ती, बदल, स्थित्यंतरे, त्यांतून निर्माण होणारी ऊर्जा किंवा ऊर्जेचा त्यांच्यावर होणारा परिणाम याबद्दल अभ्यास करावयाचे शास्त्र म्हणजे पदार्थविज्ञानशास्त्र वा भौतिकशास्त्र. यातील शास्त्रज्ञ (Physisist) नेमके काय करतो, त्याच्या कामाचा जगाला काही उपयोग आहे वा नाही याबद्दलच अनेक शास्त्रज्ञ साशंक असत. ही शास्त्रशाखा दुर्लक्षित होती, त्या परिस्थितीत अल्बर्ट आइन्स्टाइनपासून खूपच बदल घडत गेले. या बदलांना चक्क या शाखेबद्दलच्या आकर्षणाचे स्वरूप निर्माण झाले, ते अणुविभाजन व अणुस्फोटानंतर. यानंतर मात्र या शाखेत काम करतो आहे, हे सांगणेही मानाचे समजले जाऊ लागले. आज घटकेस भौतिकशास्त्र जवळपास आपल्या जीवनाशी संबंधित प्रत्येक बाबीस व्यापुन आहे. पण एक महत्त्वाचा घटक म्हणजे या शास्त्रातील प्राथमिक बाबी या तांत्रिक अभ्यासात (Engineering) जास्त शिकवल्या जातात. व्यवहारात: तो अभ्यास पुरेसा असल्याने केवळ या शास्त्रात रस घेऊन संशोधन करणारे आजही मोजकेच निघतात. उदाहरणार्थ, तेल विहीर खणायची आहे, भूकंपप्रवण भागाचा अभ्यास करावयाचा आहे, अंतराळयान सोडायचे आहे वा रेल्वेमार्ग घालावयचा आहे; तर यांपैकी प्रत्येक प्रकल्पासाठी कित्तेक इंजिनिअर व अन्य तंत्रज्ञ लागतील. पण प्राथमिक पाण्यासाठी जेमतेम एखाद्या भौतिकशास्त्रज्ञास बोलावून त्याचे मत आजमावले की, त्याचे काम कदाचित संपून तो अडगळीत पडेल. नंतरचे सारे काम फक्त तंत्रज्ञ व त्यांची प्रगत यंत्रे यांकरवीच केले जाईल. या स्वरूपाच्या कामाच्या पद्धतीमुळे या जमातीबद्दल सामान्यांच्या मनात खूपच कमी माहिती आढळते. उष्णता, विद्युत, आवाज, प्रकाश, चुंबकीय क्षेत्र, अणुरचना या मुलभुत बाबींचा अभ्यास आजही पुरेसा झाला आहे, असे अनेक शास्त्रज्ञांना वाटत नाही. त्यामुळे याबाबतीत सतत संशोधन चालू असते. पण या संशोधनाचे स्वरूप अत्यंत क्लिष्ट असल्याने व निष्कर्ष लगेच प्रसिद्ध होत नसल्याने सामान्यांना त्याची फारशी कल्पना येत नाही. काही प्रकल्प तर एवढे महाग व अशक्यप्राय खर्चाचे असतात की, अनेक देशांनी मिळून ते हातात घेतलेले असतात. जिनिव्हा येथील 'युरोपियन सेंटर फॉर न्यूक्लियर रिसर्च' ही प्रयोगशाळा असेच एक उद्या उदाहरण सांगता येईल. प्रचंड लांबीच्या निर्वात पोकळीमध्ये भुयारात अणुरचनेवर संशोधन येथे चालू असते. हा खर्च कोणत्याच एका देशाला न परवडणारा असल्याने अनेक देशांनी हा खर्च करून तेथे एकत्रित प्रयोग केले जातात. रसायनशास्त्राचे मुलभूत नियम आता भौतिकशास्त्रातून समजू शकतात. रेणूजीवशास्त्र (Molecular Biology) हे जीवशास्राच्या मुळाशी असलेले शास्त्रादेखील भौतिकशास्त्रातच मोडते. 'जगाच्या उत्पत्तीपासून विनाशापर्यंत प्रत्येक बाबतीतच डोके खुपसून त्याबद्दल छडा लावण्याचा प्रयत्न करणारे शास्त्र,' असेही विनोदाने या शास्त्राचे वर्णन करता येईल. *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" जीवनाचा अर्थ विचारायचा असेल तर तो आकाशाला आणि समुद्राला विचारा. "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *भारतातील कोणत्या केंद्रशासित प्रदेशात केशरचे उत्पादन होते ?* जम्मू काश्मीर 2) *कोणत्या वेदांचे स्वामी दयानंद सरस्वती यांनी हिंदीत रूपांतर केले आहे ?* ऋग्वेद व यजुर्वेद 3) *कोणत्या किरणांमुळे त्वचा काळी पडते ?* अल्ट्राव्हायोलेट 4) *फळे लवकर पिकवण्यासाठी कोणत्या वायूचा वापर केला जातो ?* इथिलीन 5) *'मृत्यूचे चुंबन घेणारा महाकवी' या शब्दात प्र. के. अत्रे यांनी कोणाचे वर्णन केले आहे ?* साने गुरुजी *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 कृष्णजीत केरबा उमाटे, मुखेड 👤 माधव सोनटक्के, सहशिक्षक, करखेली 👤 नागनाथ परसुरे, सहशिक्षक, माचनूर 👤 शुभानन गांगल, पुणे 👤 अशोक पाटील कदम 👤 समीर मुल्ला 👤 वतनदार पवनकुमार नारायण 👤 गजानन हुस्सेकर, सहशिक्षक, धर्माबाद 👤 महेश शिवशेट्टी 👤 माधव पाटील शिंदे 👤 राजकुमार इंगळे 👤 कु. योगेश्वरी बालाजी पेटेकर 👤 विपीन कासलीवाल 👤 डॉ. सुभाष नामदेव पाटील 👤 शुद्धधोन पवार, डोणगावकर 👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *तारूण्य आणि संगत यांचे महत्व विशद करताना जैन मुनीं तरूण सागर महाराज सांगतात, 'आपले मित्र, चित्र आंणि चरित्र नेहमी पवित्र ठेवा; कारण तेच खरे जीवनाचे अस्त्र आहे. तुम्हाला तर हे माहित आहे की., चारित्र्याचे पतन होण्यासाठी बहुधा चुकीचे मित्र आणि चुकीचे चित्र यांचाच हात असतो. चुकीचे मित्र आणि चुकीचे चित्र हेच चारित्र्य नष्ट करण्याचे शस्त्र आहे किंवा असेही म्हणता येईल की, कधीही न चुकणारे ब्रम्हास्त्र आहे.' तारुण्याच्या सळसळत्या उर्जेवर स्वार्थी व्यवस्थांचा डोळा असतो. त्यामुळेच तारूण्याची ऊर्जा सैरभैर करून तिला आपल्या इच्छेप्रमाणे वापरण्याचे धूर्त राजकारण या स्वार्थी व्यवस्था करत असतात. तारुण्याच्या ऐन उमेदीचा कालखंड निरर्थकपणे या स्वार्थी व्यवस्थेच्या नेतृत्वामागे घालविला जातो.* *एखादी पाण्याची बाटली वापरून फेकून द्यावी, त्या पद्धतीने तरुणांच्या ऊर्जेचा वापर करून त्यांना शेवटी फेकून दिले जाते. सर्व बाजूंनी निष्क्रिय केलेल्या तरूणांवर शेवटी पश्चात्तापाची वेळ येते. तारूण्याचे रखरखीत वाळवंट होते. आपले तारूण्य विवेकशून्य व्यवस्थेच्या हाती द्यायचे की, स्वत:वर विश्वास ठेवत स्वकर्तृत्वाच्या बळावर समाज जीवनात उजळवून टाकायचे हे ज्याला समजले, त्याला तारुण्याचा खरा अर्थ कळला. माजी राष्ट्रपती डाॅ. ए.पी.जे. अब्दुल कलाम हे युवकांना देशाची संपत्ती म्हणायचे, ही संपत्ती देशासाठी आपत्ती ठरू नये म्हणून तरूणांनी आपले मित्र विचारपूर्वक निवडावेत.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल- 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो,* *भारतमाते पुत्र शहाणे अमित तुला लाभले,* *तुझ्या कुशीला परी जन्मली ,* *सारी वेडी मुले.* *आज बाबू गेणूंचा स्मृतिदिन* *या भारतमातेच्या सुपुत्रांनी 150 वर्षे* *इंग्रजांच्या जोखडात बंदिस्त असलेल्या माझ्या भारतमातेला मुक्ती* *दिली.* *हे करत असतांना त्यांनी आपल्या घराची,संसाराची राखरांगोळी केली.* *तरुणांना खरा आदर्श वाटावा असे ज्वाजल्य देशप्रेम,रक्ताने भाळी लावलेला स्वातंत्रदेवतेचा टिळा.* *कुठलीही तमा न बाळगता प्राणाला सामोरे जाण्याची तयारी आज* *यत्किंचितही दिसत नाही.अवघ्या 22 व्या वर्षी 12 डिसेंम्बर 1930 रोजी माझ्या बाबू* *गेनू या शूर मर्दाने इंग्रजांच्या परदेशी मालाने भरलेल्या ट्रकला आडवा होऊन प्राणाची आहुती दिली.* *ही निष्ठा,हे देशप्रेम,ही राष्ट्रभक्ती आज खुर्चीसाठी भांडणाऱ्या सत्ताधाऱ्यांना खुणावतेय.* *देशात चाललेल्या अराजकतेला आळा घालण्यासाठी कुणी देशभक्त पुढे येतांना दिसत नाही.बाबू गेनू चे* *गाडीखाली जाणे एव्हढे सोडले तर फारसं कुणाला काही माहीत नाही.* *जिथे माझा हा निष्ठावान साथीदार गेला तिथे कुणी स्तंभ बांधला नाही ना वात पेटवली नाही.* *कुसुमाग्रज यांनी यावर फार उपरोधीत काव्य केले आहे.* *अनामविरा जिथे जाहला , तुझा जीवनअंत , स्तंभ तिथे ना कुणी बांधला,* *पेटली न वात.* *धगधगत्या या समराच्या ज्वाला* *देशकाशी,* *जळावयास्तव संसारातून उठोनिया जाशी।* *मुकपणाने तमी लोपती, संध्येच्या रेशा,* *मरणामध्ये विलीन होशी, ना भय ना आशा।* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• प्रत्येकाला आपल्या जीवनात आनंद मिळवायचा असेल तर प्रथम एकाकी जीवन व एकांतात राहणे सोडून द्यावे.कारण एकाकी जीवनात नको ते विचार मनात येतात आणि त्रस्त करतात.त्याचा परिणाम स्वत:च्या जीवन जगण्याच्या जीवनशैलीवर होतो आणि त्यामुळे सुखासमाधानाने असलेले जीवन दु:खात जगत असल्याचे वाटते.त्यापेक्षा इतरांच्या सानिध्यात राहून त्यांच्या आनंदी जीवनात आपणही राहावे.असे केल्याने आपल्या मनात आणि मनावर असलेले दडपण थोड्याप्रमाणात कमी होण्यास मदत होते.इतर लोक कसे जगतात याचेही अवलोकन करता येते.आपण दु:खी कशामुळे आहोत याचेही कारण शोधता येईल आणि शेवटी जीवन आनंदी जीवन कसे जगता येईल याचेही आपल्याला कौशल्य प्राप्त करता येईल.खरे जीवन जगण्याचा मंत्र आपल्या एकटेपणात मिळणार नाही तर इतरांच्या सानिध्यात राहिल्याने मिळतो हे आपल्याला नक्कीच मिळेल. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *अति तेथे माती* एकदा एक राजहंस एका बगळय़ाला म्हणाला, 'काय रे, तू आधाशी! पाण्यातला कोणताही प्राणी खायला तू मागे-पुढे पाहात नाहीस. बरे-वाईट, नासके-चांगले हा फरकसुद्धा तुला समजत नाही. माझे पाहा, मी फक्त पूर्ण उमललेल्या कमळातले तंतू तेवढे खाईन, दुसरा कसलाही पदार्थ माझ्या घशाखाली जाणार नाही.' आणि मला तसे आवडणार नाही. त्यावर बगळा म्हणाला, 'माझ्या दृष्टीने असा चोखंदळपणा बारकावा असणे बरे नव्हे. ज्यावेळी जे मिळेल ते खावे अन् सुखी राहावे. खाण्याचा पदार्थ दिसला की, तो खावा हेच शहाणपणाचे.' असे म्हणून बगळा उडाला व जवळच्या तलावाकाठी गेला. तेथे कडेला त्याला मासा दिसला. तेव्हा विचार न करता त्याने तो एकदम गिळला, पण आत असलेला गळ घशाला लागून तो जिवास मुकला. राजहंस आपले आवडते खाणे खाण्यासाठी दुसर्‍या कमळे असलेल्या तळय़ात गेला, पण तेथे हंस धरण्यासाठी जाळे असल्यामुळे तेथे तो अडकला. *तात्पर्यः कोणतीही गोष्ट अति केल्यावर त्याचे परिणाम भोगावे लागते म्हणून कोणत्याही गोष्टीचा अतिरेक नको.अति तेथे माती होणारच..* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 11/12/2019 वार - बुधवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  *आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस* *श्री दत्त जयंती* 💥 ठळक घडामोडी :-  १८१६ - इंडियाना अमेरिकेचे १९वे राज्य झाले. १९३०: सी. व्ही. रमण यांना नोबेल पारितोषिक जाहीर. १९४६: युनिसेफ (UNICEF) ची स्थापना 💥 जन्म :- १९६९ - विश्वनाथन आनंद, भारतीय बुद्धिबळ खेळाडू, ग्रँडमास्टर. १९०९ - नारायण गोविंद कालेलकर, भाषाशास्त्रज्ञ. १९२२ - दिलीपकुमार, हिंदी चित्रपट अभिनेता. १९२५: मराठी साहित्यिक राजा मंगळवेढेकर यांचा जन्म. १९३१: आचार्य रजनीश यांचा जन्म 💥 मृत्यू :- १९८७ - जी.ए. तथा गुरुनाथ आबाजी कुलकर्णी, मराठी लेखक. १९९८ - राष्ट्रकवी प्रदीप, हिंदी कवी. २००४ - एम.एस. सुब्बुलक्ष्मी, गायिका आणि भारतरत्न, रेमन मॅगसेसे पुरस्कारविजेत्या. १९६३ - कोवलम माधव पणिक्कर, राजकारणी, इतिहासकार. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *भारतातील पहिले फिरते पोटविकार केंद्र महाराष्ट्रात सुरु, गरीब रुग्णांना लाभ होणार, पद्मश्री डॉ. अमित मायदेव यांची संकल्पना * ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *राज्यात सत्ता स्थापनेच्या 13 दिवसांनंतरही महाराष्ट्र विकास आघाडीचं खातेवाटप जाहीर नाही; गृह, नगरविकास, गृहनिर्माण खात्यावरुन खातेवाटप रखडल्याची सूत्रांची माहिती * ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *आता टू व्हीलरवर बसणाऱ्या चिमुरड्यांनाही हेल्मेटसक्ती, अपघातांच्या पार्श्वभूमीवर मोटार वाहन कायद्यामध्ये सुधारणा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *खराब हवामानामुळे 24 दिवस बंद असलेली शिर्डी विमानसेवा आजपासून होणार पुन्हा सुरु, सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर भाविकांना दिलासा * ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *रखडलेल्या स्व. गोपीनाथ मुंडेंच्या स्मारकासाठी निधी देण्याचं मुख्यमंत्र्यांकडून आश्वासनं : एकनाथ खडसे यांचे प्रतिपादन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाबाबत स्पष्टता येत नाही तोपर्यंत राज्यसभेत पाठिंबा देणार नाही, शिवसेनेची भूमिका, विधेयकाची राज्यसभेतील वाट बिकट* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *रणजीचा रणसंग्राम - स्पर्धेचा पहिला दिवस मुंबईच्या फलंदाजांनी आणि विदर्भाच्या गोलंदाजांनी गाजवला होता. रणजी करंडकाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी विदर्भ आणि मुंबईनं आपापल्या सामन्यात वर्चस्व गाजवलं. तर महाराष्ट्राचा संघ मात्र अडचणीत सापडला आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••              *कळी उमलण्या आधी .....!* लघुकथा वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे https://storymirror.com/read/story/marathi/9fu28ady/klii-umlnnyaa-aadhii/detail कथा वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *भूतलावरची येती पन्नास वर्षे* 📙 ५० वर्षांनी काय घडेल, असा प्रश्न विचारला असता अनेकांचे अनेक उत्तरे येतील. सत्ताधारी स्वतःच्या सत्तेवरच्या पुढच्या पिढीबद्दल बोलेल, ज्योतिषी ग्रहांच्या युत्यांची गणिते मांडेल, शेतकरी कमी पडणाऱ्या पाण्याची चिंता करेल, तर सामान्य वाचक नातवाच्या अॅडमिशनची चिंता व्यक्त करेल ! कोणताही शास्त्रज्ञ मात्र या प्रश्नाकडे अत्यंत गंभीरपणे बघून नक्कीच विचारात गढून जाईल. त्याची कारणे तशीच आहेत. औद्योगिक प्रगतीचा वेग, त्यातून निर्माण होणारे रासायनिक प्रदूषणाचे प्रश्न, शहरातील बदलती राहणीची पद्धती, शेती, पाणीपुरवठा या विविध बाबींनी या प्रश्नाला इतके गंभीर स्वरूप आले आहे की कोणीही शास्त्रज्ञ या प्रश्नाला लगेच काहीच उत्तर देऊ शकणार नाही. एकमेकांत विचित्रपणे गुंतलेले असंख्य प्रश्न या पन्नास वर्षात काय काय घडणार आहे, याचे ठोक स्वरूप समोर येऊ देत नाहीत. प्रथम सध्याचे भीषण स्वरूपाचे प्रश्न कोणते, याची केवळ यादी बघू या - १. पृथ्वीवरील कार्बन डायऑक्साईडचे वाढते प्रमाण. १८५० साली हे प्रमाण २६५ पार्टस पर मिलियन किंवा पीपीएम होते, तर १९८८ साली नासाने केलेल्या मोजणीत ते ३५० पीपीएम इतके वाढले आहे. यामुळे पृथ्वीवरील तापमान १ अंश फॅरनहाइटने वाढ झाली आहे. असेच प्रमाण वाढत गेले, तर ५० वर्षांनी ४ अंश फॅरनहाइटने तापमान वाढेल, असा प्राथमिक अंदाज आहे. २. सीएफसी किंवा क्लोरोफ्लोरोकार्बनमुळे ओझोनचा थर कमी होत आहे. सूर्याच्या अतिनील किरणांना पृथ्वीवर प्रवेश करायला त्यामुळे जास्त संधी मिळणार आहे. ओझोनच्या थराने या किरणांपासून आपल्याला संरक्षण मिळत असते. याखेरीज पृथ्वीवरील तापमान वाढण्यास कार्बन डायऑक्साइडच्या प्रमाणाच्या जोडीला ही बाब मदतच करेल, असे वाटते. ३. एकूण तापमान वाढ झाल्यास ध्रुवीय बर्फसाठा वितळून समुद्र पातळी किमान पाच फुटांनी वाढण्याची शक्यता उद्भवते. मुळात जगातील सर्व बंदरे समुद्रपातळीलाच असल्याने पाच फुटांनी वाढलेली पातळी अनेक मोठ्या औद्योगिक शहरात हलकल्लोळ माजवेल. तसेच जगातील अनेक बेटे व बेटसदृश देश नष्टच होण्याची शक्यता आहे. उदारणार्थ आपल्या जवळची मालदीव बेटे. ४. लोकसंख्यावाढीने सध्याच जगाला हैराण केले आहे. पण हा प्रश्न ५० वर्षांनी वेगळ्या पद्धतीने सुटेल, असा विश्वास शास्त्रज्ञांना वाटतो. एका ठरावीक काळाने म्हणजे अजून चाळीसएक वर्षांनी जगाची लोकसंख्या स्थिरावेल. ५. अन्नधान्य, रोगराई प्रश्न दुय्यम राहून एड्सचा प्रसार हा प्रश्न मात्र भयानकरित्या समोर उभा ठाकणार आहे. अॅक्वायर्ड इम्यूनो डेफिशियन्सी सिंड्रोम हा प्रकार नवनवीन विषाणूंच्या स्वरुपात पृथ्वीवर ठाण मांडून राहणार आहे, असे दिसते. या प्रश्नांच्या अनुषंगाने व सध्याची आपली संशोधनातील गती बघता काय घडेल, याचा एक ओझरता आराखडा समोर येतो. त्यानुसार ५० वर्षांनी : जेनेटिक्समधील संशोधन खूपच प्रगत होत जाईल. सर्व प्रकारची बियाणे ही रोगराईला तोंड देण्यास समर्थ असतील, त्यामुळे रासायनिक औषधे फवारे मारणे बंद होईल. धान्योत्पादन दरवर्षी गरजेप्रमाणे केले जाऊ शकेल. पेट्रोलऐवजी अनेक ठिकाणी अल्कोहोलचा वापर सुरू झालेला असेल. आफ्रिका खंडात दुष्काळ जरी वाढला असला, तरी लोकसंख्यानियंत्रणाने व तेथील पाळीव जनावरांच्या मांसामुळे खाण्याची व अन्नाची टंचाई भासणार नाही. दुष्काळाने मृत्यू बंद झालेले असतील. पाण्याची पातळी वाढल्याने बांगलादेश, गंगेच्या तोंडाजवळील त्रिभुज प्रदेश, कच्छचे रण, केरळ व ओरिसाचा बराच भाग हा कायमचा पाण्याखाली गेलेला असेल. उन्हाळ्यामध्ये गंगेचा पूर हा स्थायी स्वरूपाची गोष्ट होऊ लागेल. वयाची नव्वदी गाठणे ही नित्याची बाब असल्याने हा मजकूर वाचलेले अनेकजण सत्तरी ओलांडलेली असूनही कामामध्ये व्यग्र असतील व त्यांच्या ताब्येतीही अगदी उत्तम असतील. निवृत्तीचे वय त्या वेळी बहुधा पंचाहत्तर असेल. विविध शहरांमध्ये शंभरमजली इमारतीवजा छोटी गावेच उभी असून तेथे राहणाऱ्यांचा 'दुसऱ्या अशाच गावांशी', क्वचित प्रत्यक्ष संबंध येत असेल; तर घर, शाळा, दुकान, पार्क, थिएटर, ऑफिस सर्व काही एकाच 'गावा'त असल्याने फक्त मजले बदलण्याचाच प्रश्न दिवसाकाठी वरचेवर येत राहील. या बहुउद्देशीय प्रचंड इमारतींचा विजेचा पुरवठा सर्वस्वी सूर्यऊर्जेपासून होत असल्याने भल्यामोठय़ा तारांचे जाळे सार्‍या शहरभर पसरवण्याची गरजच राहणार नाही. त्याचप्रमाणे दळणवळणासाठी थेट उपग्रहाद्वारेच दळणवळण साधने जात असल्याने टेलिफोन, टीव्ही केबल टीव्ही इत्यादींच्याही तारांचे जंजाळ कुठे आढळणार नाही. कागदी वृत्तपत्र हा प्रकार बंद झालेला असून आवडीचे वृत्तपत्र आयपॅडच्या पडद्यावरच वाचले जाईल. ५० वर्षांचा काळ मानवी जीवनात फार मोठा आहे. पण शास्त्राच्या प्रगतीच्या दृष्टीने तो अगदीच थोडा कालावधी आहे. त्यातूनही विसाव्या शतकातील प्रगतीचा वेग सर्वांनाच भोवंड आणणारा आहे. ५० वर्षांपूर्वीचा काळ आठवा. त्या काळी आजच्या घडणाऱ्या अनेक गोष्टींची शक्यता तर सोडाच, पण स्वप्नेही कोणी पाहिली नव्हती. मग अजून ५० वर्षांनी होणारी प्रगती कशी असेल, याचा अंदाज बांधायला तर काहीच हरकत नसावी, नाही काय ? *'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" जीवनातला अंध:कार नाहीसा करणारी ज्योत म्हणजे हास्य ! "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *'कर्नल' या नावाने ओळखला जाणारा भारताचा माजी कप्तान कोण ?* दिलीप वेंगसरकर 2) *भारतातील धवलक्रांतीचे जनक कोणाला म्हटले जाते ?* डॉ वर्गीस कुरियन 3) *हिंदी महासागराचा उल्लेख प्राचीन भारतात कोणत्या नावाने केला जाई ?* रत्नाकर 4) *वटवाघूळे अंधारात कशाच्या सहाय्याने मार्गक्रमण करतात ?* प्रतिध्वनी लहरींच्या सहाय्याने 5) *तुंगभद्रा ही कोणत्या नदीची उपनदी आहे ?* कावेरी *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 इलियास शेख, सर्पमित्र व शिक्षक 👤 प्रा. नितीन दारमोड, समाजभूषण संस्थापक व अध्यक्ष, जनसेवा प्रतिष्ठान 👤 दस्तगीर सय्यद शिक्षक व निवेदक 👤 दीपक पाठक, परभणी 👤 आकाश सोनटक्के 👤 👤 👤 👤 👤 👤 👤 👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *काहीही विपरीत घडले की त्याबद्दल इतरांना जबाबदार धरण्याची एक सार्वत्रिक प्रवृत्ती असते. आपली चूक कबूल करण्याऐवजी त्याला इतर लोक कसे दोषी आहेत, हेच बहुतेक जण सांगत असतात. चूक कबूल करण्यात बहुतेकांना कमीपणा वाटतो. त्यामुळे आपले चूक असले, तरी ते योग्य आहे असाच हेका अनेकजण लावतात. सार्वजनिक पातळीवर तर हे चित्र आणखी गडद होते आणि समाजातील सर्वच वाईट गोष्टींसाठी शासन यंत्रणेला दोषी ठरविले जाते. जनकल्याणाचे आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या सरकारकडून मोठ्या अपेक्षा असतात आणि बहुतेकदा अपेक्षाभंग होतो.* *देश आपल्यासाठी काय करणार यापेक्षा आपण देशासाठी काय करणार असे जाॅन. एफ. केनेडी यांनी म्हटले होते. 'मी साधा माणूस, मी काय करणार' असे उत्तर प्रत्येक जण देऊ शकतो. मात्र साधा माणूस खूप काही करू शकतो. सार्वत्रिक नियमांचे पालन करणे, आपला परिसर स्वच्छ ठेवणे, अफवा न पसरविणे अशा अनेक गोष्टी आपण करू शकतो. चांगला नागरिक बनण्याची सुरूवात घरापासून होते. सार्वजनिक नियमांचा आदर राखण्याची प्रवृत्ती मुलांमध्ये विकसित केली तरी पुष्कळ. लहान मुले मोठ्यांचे अनुकरण करतात, याची जाणीव न ठेवता मोठी माणसे गैरवर्तन करतात. त्यामुळे पुढील पिढीही तेच शिकते.* *॥ रामकृष्णहरी ॥* 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल-9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो,* *सायंकाळी कॉटवर जरा आडवा झालो आणि कानी घेताच सकाळ स्मार्ट सोबती मधील 'चिटवूमन' या जिगरबाज लेखावर नजर गेली.* *जो हो गया उसे सोचा नही करते,* *जो मिल गया उसे खोया नही करते,* *हासिल उन्हे होती है सफलता,* *जो वक्त और हालात पर रोया नहीं करते.* *अस जन्मतःच अपंगत्व घेऊन आलेली अमेरिकेची अँमी मलिन्स हिने आपल्या मनात कुठलाही किंतु न ठेवता उत्कृष्ट मॉडेल,नावाजलेली* *अभिनेत्री, जिगरबाज खेळाडू अशी अनेक* *बिरूदे लावून सर्व अशक्य गोष्टी करून जगाला नवा संदेश दिला.* *मलिन्सच्या स्वप्नांना मर्यादाच नव्हत्या.* *वयाच्या पहिल्या वर्षीच आईबापाने तिचे गुडघ्यापासून खालचे पाय कापून टाकले कारण ते वाढणारच नव्हते. आणि मग आयुष्य कस* *जगायचं हा मोठा प्रश्न.पण शक्य नाही ही गोष्ट मलिन्सच्या कानाला आणि मनाला* *तिने कधीच शिवू दिले नाही .* *प्रत्येक क्षेत्रात यशाची नवी शिखरे पादाक्रांत करत राहिली.आणि* *अमेरिकेतच नाही तर जागतिक पातळीवर आयडॉल बनली.* *या जगण्यावर* *सुरेश भटांच्या सुंदर ओळी..* *आठवल्याशिवाय राहत नाही---* *आयुष्य छान आहे थोडे लहान आहे !* *रडतोस काय वेड्या? लढण्यात शान आहे.!* *काट्यातही फुलांची झुलती कमान आहे !* *उचलून घे हवे ते , दुनिया दुकान आहे !* *जगणे निरर्थक म्हणतो तो बेइमान आहे.* *"सुखासाठी कधी हसावं लागंत ,तर कधी रडावं लागतं,* *कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरुन पडावं लागतं"...* *मलिन्स सारख कानाला अशक्य शब्द ऐकू देऊ नका.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• परमेश्वराची प्रार्थना करण्यासाठी फक्त अंत:करण शुद्ध अथवा पवित्र असावे लागते. त्याचबरोबर आपले दोन्ही कर जोडून विनम्रतेने त्याचे नामस्मरण करावे म्हणजे ते परमेश्वरास मान्य होईल.अशी प्रार्थना कोणीही करू शकतो. त्यासाठी कोणतीही जात, कोणताही धर्म , कोणताही राव किंवा रंक हा भेद लागत नाही. परमेश्वर जसा निर्गूण निराकार आहे तसाच तो आपणा सा-यांच्या निस्वार्थपणे करणा-या भक्तीचा भुकेला आहे.तो नक्कीच आपल्याकडे धावून येईल. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *शहरात किती कावळे आहेत?* अकबर बादशाह आपल्या दरबारातील सरदारांना नेहमी निरनिराळे प्रश्न विचारायचा. निराळी कोडी घालायचा. ज्ञान, हुशारी आणि चातुर्य यांची परीक्षा घ्यायचा. एकदा त्याने आपल्या सरदारांना एक चमत्कारिक प्रश्न विचारला, " आपल्या शहरात किती कावळे आहेत?" बादशहा उत्तराच्या अपेक्षेन एकएका सदाराकडे पाहत होता. सरदार एकामागून एक उभे राहत होते आणि निमूटपणे आपली मान खाली घालत होते. एकही सरदार बादशाच्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकला नव्हता. इतक्यात बिरबलाने दरबारात प्रवेश केला. तो दरबारातील सर्वात हुशार सरदार होता. पाहिले की, इतर सरदार माना खाली घालून उभे आहेत. बादशहाने घातलेल्या कोड्याचे उत्तर ते देऊ शकले नाहीत, हे बिरबलाने ताबडतोब ओळखले. वाकुन सलाम केला आणि तो आपल्या जागेवर जाऊन बसला. बादशहाने त्याला विचारले, " बिरबल, शहरात किती कावळे आहेत?" बिरबल लगेच उभा राहिला आणि म्हणाला," महाराज, आपल्या शहरात 50 हजार 378 कावळे आहेत." " बिरबल, तू हे एवढ्या खात्रीने कसं काय सांगू शकतोस?" बादशहाने आश्चर्यचकित होऊन विचारले. बिरबल म्हणाला "महाराज, आपण कृपया कावळे मोजून पहा. जर ते 50 हजार 378 पेक्षा जास्त असले, परगावाहून काही कावळे आपल्या मित्रांना , नातेवाईकांना भेटायला आले आहेत, असे खुशाल समजा. जर ते त्यापेक्षा कमी असतील, तर आपल्या शहरातील कावळे त्यांच्या मित्रांना, नातेवाईकांना भेटायला बाहेरगावी गेले आहेत उघडच आहे." बादशहा बिरबलाच्या चतुराईवर खुश झाला व आनंदून म्हणाला, " शाब्बास बीरबल, शाब्बास."तुझे चातुर्य आणि बुद्धिमत्ता खूप उत्कृष्ट आहे. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 10/12/2019 वार - मंगळवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *अल्फ्रेड नोबेल दिन*  *मानवी हक्क दिन* 💥 ठळक घडामोडी :-  २०१४-भारताचे कैलाश सत्यार्थी आणि पाकिस्थानची युसूफझाई यांना संयुक्तपणे नोबेल शांती पुरस्कार प्रदान करण्यात आला. २००८-प्रा अमर्त्य सेन यांना अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक बहाल करण्यात आले. १९०१-नोबेल पारितोषिक चे प्रथमच वितरण करण्यात आले. 💥 जन्म :- १८७० - सर जदुनाथ सरकार, इतिहासकार. १८७८ - चक्रवर्ती राजगोपालाचारी, स्वतंत्र पक्षाचे संस्थापक. १८८० - श्रीपाद कृष्ण बेलवलकर, प्राच्यविद्यापंडित. १८९२ - व्यंकटेश बळवंत पेंढारकर, मराठी नाट्य-अभिनेते, गायक. १९०८ - हसमुख धीरजलाल सांकलिया, भारतातील उत्खननविषयक संशोधनाचा पाया रचणारे पुरातत्त्ववेत्ते. 💥 मृत्यू :- १९४२ - डॉ. द्वारकानाथ कोटणीस. २००१ - अशोक कुमार गांगुली ऊर्फ दादामुनी, हिंदी चित्रपट अभिनेता. १८९६-अल्फ्रेड नोबेल, स्वीडिश संशोधक आणि नोबेल पुरस्काराचे प्रणेते *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार नको, अशी भूमिका ज्येष्ठ विचारवंत प्रा. एन डी पाटील यांनी घेतली आहे. नामविस्तार झाल्यास विद्यापीठाच्या नावाचा उल्लेख शॉर्ट फॉर्ममध्येच होईल, असंही ते म्हणाले.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रधान सचिव म्हणून विकास खारगे आणि भूषण गगराणी यांची निवड, कोल्हापूर जिल्ह्यातील दोन सुपुत्रांना एकाच वेळी मिळाली संधी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *जिल्हा मुख्यालय असलेल्या पालघर शहरातील रेल्वे स्थानकामध्ये आता कायमस्वरूपी भव्य असा राष्ट्रध्वज दिमाखात फडकत राहणार आहे. हा ध्वज ३० फूट लांब आणि २० फूट रुंदीचा आहे. शंभर फूट उंचीवर हा राष्ट्रध्वज फडकवण्यात आला आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये 1 जानेवारीपासून मोबाईल बंदी, मंदिर बैठक समितीमध्ये निर्णय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *बृहन्मुंबईसह विविध महानगरपालिकांमधील सात रिक्तपदांसाठी 9 जानेवारीला मतदान, बृहन्मुंबई, नाशिक, मालेगाव, नागपूर, लातूर व पनवेल या सहा महानगरपालिकांमधील सात रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीसाठी 9 जानेवारीला मतदान; तर 10 जानेवारी रोजी मतमोजणी, राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांची माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *मुंबईतल्या 120 डबल डेकर बसेसपैकी 72 बसेस 2020 मध्ये स्क्रॅप होणार, मुंबईतल्या निम्म्यापेक्षा जास्त डबलडेकर बसचं आयुर्मान संपलं* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *रणजीचा रणसंग्राम : आदित्य सरवटे आणि रजनीश गुरबानीच्या प्रभावी माऱ्यासमोर विदर्भानं सलामीच्या रणजी सामन्यात आंध्रचा पहिला डाव 211 धावांत गुंडाळला. तर पृथ्वी शॉ आणि अजिंक्य रहाणेनं रणजी करंडकात बडोद्याविरुद्धच्या सामन्यात दमदार अर्धशतकं साजरी केली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *मानवी हक्क दिन* लहानपणी मला सर्वात जवळची आणि चांगली गोष्ट वाटायची ते म्हणजे माझा हक्क. मला माझी हवी असलेली वस्तू मिळायलाच हवे असे वाटायचे. बालपणीच्या वयात प्रत्येक गोष्ट मिळविण्यासाठी रडणे हा एक चांगला पर्याय असायचा. रडून ती वस्तू मिळविताना........... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/12/blog-post_9.html      लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *भूगर्भशास्त्र* 📙 ********************* पृथ्वीच्या अंतरंगाचा, पृथ्वीच्या अंतर्बाह्य घटकांचा अभ्यास भूगर्भशास्त्रात (जिआॅलाॅजी) येतो. पृथ्वीच्या उगमापासून आजपर्यंत झालेल्या निर्मितीप्रक्रियेचा अभ्यास त्यात केला जातो. हे शास्त्र वरवर पाहता निरुपयोगी वाटते. कारण पृथ्वीचे थर, दगडगोटे व त्यांचा अभ्यास यात गुंतलेल्या शास्त्रज्ञाचा व्यवहाराशी काय संबंध, असे अनेकांना वाटते. पण तहान लागली, तर त्याच शास्त्रज्ञाला गाठायची वेळ येते. विहीर कुठे खोंदावी, पाणी किती खोलीवर लागेल, वेळ किती लागेल, याचा सल्ला हाच शास्त्रज्ञ देणार असतो. हीच गोष्ट कोळसा, खनिज तेल, खनिज वायूच्या साठ्यांच्या बाबतीत आहे. पण सध्याच्या जगात यांचे काम याहीपुढे गेले आहे. धरणाची जागा, इमारतीचा पाया, पुलाची रचना, मनोऱ्याची उंची व व वजन आणि त्याखालील जमीन या प्रत्येक बाबतीत यांचा सल्ला मोलाचा असतो. भूगर्भशास्त्राच्या प्रगतीनुसार सध्या अनेक शाखा कार्यरत आहेत. पेट्रोलॉजिस्ट हा भूगर्भशास्त्रज्ञ जमिनीचा कस, थर, बांधणी यांचा विशेष अभ्यास करतो. स्ट्रॅटीग्राफर जमिनीखालचे थर, त्यांची रचना, त्यांचे आयुष्य, त्यांचा परिसर यांबद्दल मोजक्या ठिकाणी उत्खननानंतर निष्कर्षावर येऊ शकतो. पॅलिअँटालाॅजिस्टला जिवाश्म, त्यांचा काळ, पृथ्वीच्या उत्पत्तीपासूनच्या घडामोडी यात रस असतो. जिओफिजिसिस्ट पृथ्वीचे विद्युतचुंबकीय वातावरण, चुंबकीय क्षेत्र, त्यांचे आजच्या जीवनावर होणारे परिणाम यांवर जास्त लक्ष केंद्रित करतो. जिआॅमाॅरफाॅलाॅजी ही त्यातल्या त्यात नवीन शाखा उदयाला येत आहे. दऱ्याखोऱ्यांतील जीवन, त्यांचा एकमेकांशी संबंध व नैसर्गिक स्रोत म्हणजे झरे, खनिज, झाडे यांवर ही शाखा अधिक अभ्यास करते. वर लिहिलेल्या स्वतंत्र शाखा म्हणून जरी अस्तित्वात असल्या, तरी मूलतः भूगर्भशास्त्राचा सुसंगत अभ्यास करताना प्रत्येक शाखेतील माहिती असावी लागते. फक्त पूर्ण शिक्षणोत्तर आवडीचा, संशोधनाचा वा कामाचा विषय या दृष्टीने त्या शाखेवर लक्ष केंद्रित केले जाते आणि त्या शाखेतील ज्ञानात व माहितीत भर घालायचा प्रयत्न होतो. सध्याच्या भूगर्भशास्त्रज्ञांचा सखोल अभ्यासाचा विषय अगदी वेगळ्याच दिशेने चालू आहे. अंटार्क्टिकावर सतत चाललेले संशोधन व सागराच्या तळाशी असलेल्या खनिज द्रव्यांबद्दल चाललेले संशोधन यांत अनेक मोठे व महत्त्वाचे भूगर्भशास्त्रज्ञ गुंतलेले आहेत. यासाठी अद्ययावत प्रयोगशाळा असलेली प्रचंड अवाढव्य बोट कायम समुद्री वास्तव्याला असून ती जगातील अनेक समुद्र सतत हिंदीतच आहे. गरम पाणी भूगर्भात आहे. ज्वालामुखीमुळे तर भूगर्भातील अंतर्भाग गरमच असतो, हेही माहीत आहे. जसजसे खोल जावे, तसतसे तापमान एकेक डिग्री सेंटीग्रेडने वाढत जाते, याचीही नोंद गेली अनेक वर्षे खाणशास्त्रज्ञांनी घेतलेली आहे. या सर्व माहितीचा वापर करून मग भूगर्भातील उष्णतेचा वीजनिर्मितीला का उपयोग करू नये, या दिशेने अनेकांचे प्रयत्न सुरू झाले. जमिनीला खोलवर भोके पाडून तप्त दगडांवर पाणी सोडावयाचे. या पाण्याची वाफ दुसऱ्या पाईपमधून वर घ्यावयाची व तिच्या शक्तीवर जनित्रे चालवून वीज निर्माण करायची, असे या विद्युतनिर्मितीचे स्वरूप आहे. आजमितीला सुमारे वीस देश या पद्धतीने वीजनिर्मिती करत आहेत. अमेरिका, इटली, न्यूझीलंड येथे तर एकापेक्षा जास्त 'जिओथर्मल पॉवर स्टेशन्स' उभारली गेली आहेत. यापुढील प्रगतीची दिशा म्हणजे खोलवरचे बोअरिंगचे पाणी अधिक खोल असलेल्या गरम खडकापर्यंत पोहोचवायची व्यवस्था करायची. जमिनीखाली उभारलेल्या वीजनिर्मिती केंद्रातच वीज निर्माण करावयाची व वर फक्त विजेच्या ताराच आणून विजेचे वाटप करायचे, अशी कल्पना शास्रज्ञ मनात खेळवत आहेत. *'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *ज्याच्या गरजा कमी, त्याला सुख आणि स्वास्थ्य अधिक !* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *भारतातील सर्वात लहान जिल्हा कोणता ?* गारो ( मेघालय ) 2) *नाशिक - मुंबई मार्गावर कोणता घाट आहे ?* कसारा घाट 3) *भारताचा पहिला सम्राट कोणास म्हणतात ?* चंद्रगुप्त मौर्य 4) *'झेंडूची फुले' या विडंबनात्मक कवितासंग्रहाचे लेखक कोण ?* प्र. के. अत्रे 5) *रशियाच्या संसदेस कोणत्या नावाने ओळखले जाते ?* ड्युमा *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 संदीप मस्के, सहशिक्षक 👤 दशरथ एम. शिंदे 👤 अनिल यादव, धर्माबाद 👤 शिवानंद हिंदोले 👤 श्रीकांत म्याकेवार 👤 अमोल पाटील सलगरे 👤 मच्छीन्द्र सपाटे 👤 मिलिंद गायकवाड 👤 स्वप्नील मसाने 👤 दशरथ शिंदे *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *"या जगात अनेक जातीचे प्राणी, अनेक जातीच्या वनस्पती इ. आहेत. (आंब्याची जात गोड चवीची तर कारल्याची जात कडू चवीची.) अशा अनेक जातींचे अनेक वेगवेगळे रंग आहेत. अशा अनेकविध जाती आणि त्यांच्या गुणधर्मानुसार व्यक्त होणारे रंग-ढंग एकत्र येऊन तर 'जग' हे नाव निर्माण झालं आहे." या जगात खूप काही असलं तरी हिताचं जे मोजकंच आहे, त्याला खरी किंमत आहे. 'शब्दज्ञान' किती मर्यादित असतं, याचं बोधक उदाहरण म्हणजे "उजेड काजव्यातूनही निघतो, पण तो फक्त त्याच्या पार्श्वभागापूरताच उजेड देतो, आणि तेही कायम नाही देत; तर चालू-बंद, चालू-बंद असा देतो." शब्दज्ञान हे काजव्याच्या उजेडासारखं आहे. ते देणा-याच्यासुद्धा समोर प्रकाश पाडत नाही. असा उजेड जगाला काय प्रकाश देणार? शब्दज्ञानानं समाजाचं जाऊ द्या, स्वतःचंही भलं होऊ शकत नाही.* *स्वतःसहीत समाजाचंही भलं करायचं असेल, तर कॉपी-पेस्ट बंद झालं पाहिजे. ज्ञान आता शब्दांचं नको तर अनुभवाचं असायला हवं.--* *तुका म्हणे झरा । आहे मुळचाची खरा ।।* *तुकोबा म्हणतात, "माझं ज्ञान हे काही कुठून आयात केलेलं नाही. ते कॉपी केलेलं नाही. माझ्या ज्ञानाचा जो झरा आहे, तो माझ्या अंतःकरणातून प्रकट होतो." याउलट शब्दज्ञानी माणसाचं ज्ञान समुद्राइतकं विशाल दिसत असलं, तरी ते अनेक नद्या, नाले, झरे यांच्यावाटे आलेलं आहे. जरी विशाल असला तरी समुद्राचं पाणी तहानलेल्याची तहान भागू शकत नाही, तसं शब्दज्ञान लोकांचं भलं करू शकत नाही. त्यासाठी आवश्यकता आहे ती अनुभवाच्या झ-याचीच.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल- 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो* *जे चांगले जगी या त्यांचा करा स्वीकार,* *जगी भावानेहुनी त्या कर्तव्य थोर जाणा।* *जगतांना आपला गोल निश्चित करा आणि त्याप्रमाणे मार्गक्रमण करा.* *लसूनकी चटणी, लगे मजेदार* *थोडी थोडी खाना,* *लगे मजेदार।* *कोणती गोष्ट किती प्रमाणात घ्यायची हे ज्याला कळलं योच या जगात टिकू* *शकतो.* *आपलं ध्येय एकदा निश्चित झालं की,* *तेवढ्यापुरतं निश्चित वागायचं. मला चटणी आवडते म्हणजे मी* *चटणी होणार नाहीय. ती* *फक्त नमुन्यापुरती, मसाल्यापुरती* *घ्यायची, त्यात बुडून* *जायचं नाही. चांगल्यातसुद्धा* *तुम्ही बुडून गेलात,* *तर ते बरोबर होणार नाही.* *मला सांगा, दूध हे चांगलं* *असतं की नाही? असतं. ठीक आहे.* *एक पन्नास लिटर दुधाची टाकी आहे, त्यात तुम्हाला बुडवलं,* *आणि पाच मिनिटं वर काढलं नाही तर चालेल का पन्नास* *लिटरच्या टाकीत तुम्हाला उलटं करून बुडवलं, तर चालणार* *नाही! साखर गोड खरी,* *पण साखरेची दोन मोठी पोती* *पाचव्या मजल्यावरून तुमच्या डोक्यावर टाकली; तर चालतील का?* *किंवा तोंड वर करा, आणि एवढी दोन साखरेची पोती* *टाकतो तुमच्या तोंडात; तर* *चालेल का? चालणार नाही.* *नुसती खाल्ली, तरी पचायची नाही,* *एवढी परिस्थिती आहे.* *म्हणून आपण काही एक विवेक केला पाहिजे, की आयुष्याचं* *माझ्या ध्येय काय? हेतू* *काय? मला काय साधायचंय* *त्याच्यापुरतं तेवढं फक्त आवश्यक ते घ्यायचं. आपलं पूर्ण* *चुकलं असं वाटलं, तर बदलावं.* *पण जोपर्यंत आपण* *ज्ञान मार्गाने पुढे पुढे जातो आहोत, तोपर्यंत मनाचा निश्चय म्हणून ढळू देता कामा नये.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते* ) 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• काही माणसे आपल्या जीवनात खूप काही कमवण्याच्या प्रयत्नांमध्ये बरंच काही विसरुन जातात. त्यांना कमवण्याच्या मोह आवरत नाही. त्यांना  वाटते की, आपल्यासारखे दुसरे कोणी पुढे जाऊ नये व या जगात आपल्यासारखे वैभवसंपन्न दुसरे राहू नये पण ह्या मोहापायी तो रक्ताच्या नात्याला, मित्राला आणि इतरांनाही विसरायला लागतो. अशा त्याच्या हावरट वृत्तीमुळे सारं सारं विसरुन एकटाच सुसाट धावायला लागतो, परंतु अशा कृतीमुळे आणि लालची कृतीमुळे तो स्वत:चेही जवळ आलेले सुख दूर करुन नको त्या सुखासाठी मागे लागल्यामुळे जीवनात असमाधानाशिवाय काहीच मिळणार नाही हे त्याला समजायला पाहिजे. कितीही कमावले तरी आपल्यासोबत काहीच घेऊन जाता येत  नाही. माणसाने गरजा भागविण्यापुरते प्रयत्न करावेत. इतरांना तोडून, इतरांची मने कलुषित करुन जीवन जगणे म्हणजे मनुष्य जीवनाला काहीच अर्थ नाही. कोणताही मोह अति केल्याने जीवनाला घातकच असतो हे लक्षात असू द्यावे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जीवन प्रवास* एक महिला एका बसमध्ये बसली होती. पुढच्याच स्टॉपमध्ये एक जाड आणि थोराड वयस्कर बाई आल्या आणि तिच्याजवळ बसल्या. जास्तित जास्त जागा तिने व्यापली आणि तिच्या सोबत तिने मोठमोठ्या पिशव्या पण आणल्या होत्या. त्यांनी पण खूप जागा व्यापली. त्या तरुणीच्या दुसऱ्या बाजूस बसलेला तरुण अस्वस्थ झाला. तो तिला म्हणाला की "तू काहीच का बोलत नाहीस?" तरुणीने स्मित करून प्रतिसाद दिला "अनावश्यक किंवा वायफळ काहीतरी बोलण्यात काहीच अर्थ नाही. आपला एकत्र प्रवास खूपच छोटा आहे. मी पुढच्याच स्टॉपवर उतरणार आहे." ही प्रतिक्रिया सुवर्ण अक्षरांमध्ये लिहिली जाण्यासाठी पात्र आहे. "इतक्या नगण्य गोष्टींवर भांडण करणे आवश्यक नाही, *आपला प्रवास खूपच छोटा आहे"* आपल्यापैकी प्रत्येकाने हे जाणले पाहिजे की, आपल्याला इथे वेळ इतका कमी आहे; की त्या वेळात भांडणे, निरर्थक वादविवाद करणे, इतरांना क्षमा न करणे, असमाधानीपणा आणि दोष शोधण्याची वृत्ती म्हणजे वेळ आणि उर्जेचा अपव्यय आहे. कोणी आपले मन दुखावलंय का? शांत रहा,कारण जीवन प्रवास खूप छोटा आहे. कुणी तुमचा विश्वास घात केला आहे का? तुम्हाला फसवलय का? सोडून द्या, शांत रहा, कारण *जीवन प्रवास खूप छोटा आहे.* कुणीही तुम्हाला त्रास दिला असल्यास, लक्षात ठेवा की, हा प्रवास किती मोठा किंवा छोटा आहे हे कुणालाच माहीत नाही. त्यांचा प्रवास कधी संपणार आहे ते कुणालाही माहीत नाही. आपला प्रवास खूप छोटा आहे. आपण मित्रमंडळी आणि नातेवाईक यांची कदर करूया. आपण एकमेकांचा आदर करू, एकमेकांशी प्रेमाने आणि आदराने वागूया. एकमेकांच्या आनंदात आपण पण आनंदी होऊया. कारण एकच की, *आपला प्रवास खूप छोटा आहे ..!* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

https://youtu.be/dDpJgPGqfpI

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 09/12/2019 वार - सोमवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   टांझानिया (पूर्वीचे टांगानिका) - स्वातंत्र्य दिन 💥 ठळक घडामोडी :-  १९४६ - न्युरेम्बर्ग खटला सुरू. १९६१ - टांगानिकाला ब्रिटनपासून स्वातंत्र्य. 💥 जन्म :- १६०८ - जॉन मिल्टन, इंग्लिश कवी. १९१९- ई. के. नयनार, केरळचा मुख्यमंत्री. १९२३ - बॉब हॉक, ऑस्ट्रेलियाचा तेविसावा पंतप्रधान. 💥 मृत्यू :-  १५६५ - पोप पायस चौथा. १६६९ - पोप क्लेमेंट नववा.  *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी ठाकरे सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार होणार छगन भुजबळ यांची माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील श्री भराडीदेवीचं मंदिर एक जागृत देवस्थान म्हणून ओळखलं जातं. मालवणपासून अवघ्या 15 कि.मी. अंतरावर एका माळरानावर श्री भराडी देवीची यात्रा भरते. मालवणमधील आंगणेवाडी भराडी देवीच्या वार्षिक यात्रोत्सवाची तारीख निश्चित झाली असून देवीने कौल दिल्यानुसार 17 फेब्रुवारी 2020 रोजी यंदाची यात्रा होणार आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *देशातील सर्व राज्यातील पोलीस दलाचे सक्षमीकरण करण्यावर, केंद्र सरकार लक्ष देत आहे. त्यासाठी केंद्र सरकार कुठल्याही प्रकारचा निधी कमी पडू देणार नाही. असे केंद्रीय गृह राज्यमंत्री जी.किशन रेड्डी यांनी सांगितले.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *मुंबई : निमोनिया झाल्यामुळे  गेल्या 28 दिवसांपासून रूग्णालयात असलेल्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर काल आपल्या घरी परतल्या आहेत. लता दीदींनी स्वतः ट्वीटकरून याची माहिती दिली आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, देशात मधुमेहींची संख्या इतक्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे की, येणाऱ्या पाच वर्षात या रोगाच्या रुग्णांच्या संख्या २६६ टक्के इतकी वाढण्याची शक्यता आहे. श्रीपाद येसो नाईक यांनी शुक्रवारी लोकसभेत दिली माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराटने रोहित शर्माला पुन्हा एकदा मागे टाकलं आहे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *लेंडल सिमन्सच्या फटकेबाजीमुळे विंडीज विजयी, मालिकेत १-१ ने बरोबरी, भारतीय गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांची ढिसाळ कामगिरी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    *जनसेवेतच ईश्वराचीही सेवा* माणसाच्या आयुष्यात संकटे आली की, त्याला कुणाचा तरी आधार हवा असतो. हा आधार शारीरिक जरी नसला मानसिक असला तरी त्यांना ते पुरेसे असते. त्यामुळे दुःखी, कष्टी माणसे देवाचा धावा करताना दिसून येतात. सुखाचा वेळी कशाचीही आठवण न करता खा, प्या, मजा करा अशी माणसे दुःखाच्या वेळी, कठीण समयी देवाचे स्मरण करतात. वर्षातून कमीतकमी एकदा.............. वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/12/blog-post_8.html           लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *उलटी का होते ?* 📙 उलटी होण्याची अनेक कारणे आहेत. कधी जास्त खाल्ल्याने अजीर्ण होऊन उलटी होते; तर काही जणांना बस, बोट लागून उलटी होते. हे तुम्ही अनुभवले असेल. पोटाला नको असलेला पदार्थ जठरात आला की मळमळ व्हावयास लागून उलटी होते. विषारी पदार्थ, काही औषधी, जास्तीचे जेवण, अति तेलकट पदार्थ, दारू यामुळे जठरातून हे पदार्थ बाहेर काढून टाकण्यासाठी प्रक्रिया सुरू होते व हे पदार्थ तोंडावाटे बाहेर टाकले जातात. म्हणजे उलटी होते. खराब अन्नातून विषबाधा झाल्यामुळे उलट्या व जुलाब होतात. आंबट पाणी पडण्याची सवय असलेल्या व्यक्तींमध्ये अधिक तिखट मसालेदार पदार्थ खाल्ल्याने उलटी होते. पचनसंस्थेच्या आजारांव्यतिरिक्त मेंदूच्या आवरणाच्या सुजेतही उलट्या होतात. या सुजेमुळे मस्तिष्क जलाचा दाब वाढून मज्जातंतूवर दाब येऊन उलट्या होतात. ती उलटी खूप जोरात होते. पोटात नको असलेला पदार्थ गेलेला असल्यास उलटीचे बाहेर पडतो. अशा वेळेस उलटी होण्यास मदत करावी. उलटी जुलाब होतच राहिले तर मीठ, साखर, पाणी थोडे थोडे सारखे देत राहावे. आम्लपित्तामुळे उलटी होत असल्यास ती अँटासिड गोळ्यांनी थांबते. गरोदर स्त्रियांमध्ये उलटी कोरडे पदार्थ खाल्ल्याने थांबते. थांबत नसल्यास अधिक तपासणी करावी लागते. तसेच जंतूसंसर्गामुळे उलट्या जुलाब होत असतील तर त्याची चिकित्सा करावी लागते. उलटी थांबत नसल्यास उलटीत रक्त किंवा लाल काळा करडा रंग दिसल्यास उलटीसोबत ताप, कावीळ, बेशुद्धी, मानतात ताठरणे अशी लक्षणे असल्यास ताबडतोब डॉक्टरांकडे न्यावे. *डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित* यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून मनोविकास प्रकाशन ०२० ६५२६२९५० *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" जो स्वत: उत्तम वागू शकतो, तोच उपदेश करु शकतो. "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *अशोक चक्राचा अर्थ काय आहे ?* देशाचा विकास व प्रगतीचे प्रतीक 2) *राजमुद्रेमध्ये खालच्या बाजूस असलेला बैल हा कशाचे प्रतीक आहे ?* कष्टाचे 3) *राजमुद्रेमध्ये घोडा हा प्राणी कशाचे प्रतीक आहे ?* गतीचे 4) *भारत मातेचे वाहन कोणता प्राणी आहे ?* सिंह 5) *भारताचे ब्रीदवाक्य कोणते ?* सत्यमेव जयते *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 अक्षय जाधव पाटील 👤 प्रतीक यम्मलवार 👤 सुहास रुक्मिणी दाभाडे 👤 जय सिंग चौहान 👤 आदित्य नलावडे, मुंबई *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *विकार आणि त्यावरील उपाय याचं सूत्रं स्वत:चं स्वत:ला शोधावं लागतं. एकदा ते सापडलं की मनामधील वैषम्य, मत्सर, तिरस्कार गळून पडायला सुरूवात होते. ही प्रक्रिया मन:शुद्धीकडे घेऊन जाणारी असते. एकदा ही अवस्था प्राप्त झाली, की मन गंगेसारखं निर्मळ नि प्रवाही होतं. एका सुंदर व निरामय जीवनानुभूतीकडं ते आपल्याला घेऊन जातं. संत कबीरांनी अतिशय सोप्या शब्दांत ही अवस्था मांडली आहे.*           *" बुरा जो देखन मैं चला,*                   *बुरा न मिलिया कोय,*           *जो दिल खोजा आपना,*                   *मुझसे बुरा न कोय !"* *आपलं मन हरवलं, त्यातील संवेदना संपल्या, तर जगातील सर्वात वाईट मीच आहे, हे चिंतन मनाला वास्तवाची जाणीव करून देणारं असतं. संत कबीर म्हणतात......* *"एकदा मन शुद्ध झालं की जगणं सुंदर होतं नि आम्ही हवेहवेसे वाटायला लागतो."*                  ••●🌼 ‼ *रामकृष्णहरी* ‼ 🌼●••     🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼      *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*          📱 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो,* *काय कधी संपल्या वेदना,* *पुन्हा नवा अवतार कशाला।* *जन्म दिला जर एकटीने,* *मग नेणारे हे चार कशाला।* *असा विचार करणारा एक तर ठार* *वेडा असू शकतो ,नाहीतर एक* *अलौकिक व्यक्तिमत्त्व तरी असू* *शकतो.* *पण मित्रांनो सहजीवनाची गोडी,* *आणि समूहातील आनंद* *काही औरच असतो.* *समूहाच्या वर्तनातून एक गोष्ट जाणवली,ती म्हणजे ,मी एखादा विचार मांडला किंवा कितीही पटवून* *सांगितला तरी त्याचा प्रभाव* *स्वीकारनाराची तयारी* *समोरच्या माणसाची काय* *आहे.त्यावर अवलंबून आहे.* *कारण," एखाद्या माणसावर इतरांच्या* *विचारांचा परिणाम* *तोपर्यंत होत नाही,जोपर्यंत तो स्वतः* *परिणाम होऊ देत नाही"* *आणि हाच खरा निसर्गाचा सिद्धांत* *आहे. so खंबीर* *राहा,आपल्या विचारांची पकड ढिली* *होऊ देऊ नका.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपण आपल्या दररोजच्या जीवनात एक चांगला विचार केला आणि आचरणात आणला तर अनेक चांगल्या गोष्टींवर विजय मिळवू शकतो.तो विचार आपल्यासाठी प्रेरणा व इतरांसाठी प्रेरणादायी ठरु शकते.आपल्या एका चांगल्या विचारांमुळे इतरांच्या जीवनात जे वाईट विचार सदैव घोळत असतात आणि त्या विचारांमुळे त्यांच्या प्रगतीऐवजी दिवसेंदिवस अधोगती व्हायला लागते ती अधोगती आपल्या सानिध्यात आल्यामुळे व आपल्या चांगले विचार ऐकल्यामुळे थांबू शकते.आपल्या एका चांगल्या विचारांमुळे इतरांच्या जीवनात चांगली प्रगती होत असेल तर आपण आपल्यासाठीच नाही तर इतरांसाठी व समाजासाठी काहीतरी चांगले केल्याचे समाधान वाटेल.चांगल्या विचारातून केव्हाही चांगलेच उगवले जाते हे मात्र नक्की आहे. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३ 🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *भली खोड मोडली* एका इसम जवळ एक गाढव होते. तो माणूस मीठ विकण्याचा व्यवसाय करीत असे. दररोज सकाळी मिठविक्या गाढवाच्या पाठीवर मिठाच्या पिशव्या लागत असे. आजूबाजूच्या गावात विकायला नेत असे. त्याला जाताना अनेक ओढे आणि छोट्या नद्या ओलांडाव्या लागत असे. एके दिवशी नदी ओलांडत असताना गाढव अचानक धडपडले. गाढवाच्या पाठीवरील मिठ पाण्यात विरघळले. त्यामुळे गाढवाचे बरेचसे ओझे हलके झाले. मीठविक्या त्यादिवशी गाढवाचं नाराजीने घरी परतला. पण त्यादिवशी गाढवाला चांगलाच आराम मिळाला. दुसऱ्या दिवशी ते नेहमीप्रमाणे मिठी विकायला निघाले. वाटेतील पहिला ओढा ओलांडत असतानाच गाढवाने मुद्दामून पाण्यात डुबकी मारली. गाढवाच्या पाठीवरचे ओझे हलके झाले. मिठी विक्या त्यादिवशी घरी परतला. पण गाढवाने मुद्दामच पाण्यात डुबकी मारली, त्याच्या लक्षात आले. तो गाढव खूप रागावला. त्याने गाढवाला मारले आणि म्हणाला, " हे माझं मूर्ख जनावर मला जादा हुशारी दाखवतयं. याला मी नक्कीच धडा शिकवीन." दुसऱ्या दिवशी मीठविक्याने गाढवाच्या पाठीवर कापसाच्या पिशव्या लादल्या. गाढवाने कालचीच युक्ती करायचे ठरवले. ओढा येताच त्याने पाण्यात डुबकी मारली. पण आज झाले उलटेच! पिशवीतील कापसाने पाणी शोषून घेतले. त्यामुळे गाढवाच्या पाठीवरचे ओझे अधिकच जड झाले. गाढवाला पाण्यातून बाहेर येण्यासाठी त्याला खूप त्रास झाला. त्याला चांगलीच अद्दल घडली. त्या दिवसानंतर गाढवाने कामचुकारपणा केला नाही. पाण्यात मुद्दाम डुबकी मारण्याची खोट त्याने सोडून दिली. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 07/12/2019 वार - शनिवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  *भारतीय लष्कर ध्वज दिन* 💥 ठळक घडामोडी :-  ◆ १९८३ - स्पेनची राजधानी माद्रिदच्या बराहास आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन विमाने एकमेकांवर आदळली. ९३ ठार. ◆ १९८७ - पॅसिफिक साउथवेस्ट एरलाइन्स फ्लाइट १७७१ कॅलिफोर्नियात पासो रोब्लेसजवळ कोसळली. ४३ ठार. विमानातील एका प्रवाश्याने स्वतःच्या वरिष्ठ अधिकाऱ्यास गोळ्या घातल्या व वैमानिकांना मारून स्वतःवरही गोळ्या झाडल्या. ◆ १९८८ - आर्मेनियात स्पिताक प्रांतात रिश्टर मापनपद्धतिनुसार ६.९ तीव्रतेचा भूकंप. २५,००० ठार, १५,००० जखमी, ४,००,००० बेघर. 💥 जन्म :- ◆ १९०२ - जनार्दन नवले, भारतीय क्रिकेट खेळाडू. ◆ १९५७ - रोहन जयसेकरा, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू. ◆ १९५९ - सलीम युसुफ, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- ◆ १२५४ - पोप इनोसंट चौथा. ◆ १२७९ - बॉलेस्लॉ पाचवा, पोलंडचा राजा. ◆ १६३२ - सिसिनॉस, इथियोपियाचा सम्राट. ◆ २००५ - देवन नायर, सिंगापूरचा तिसरा राष्ट्राध्यक्ष. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे परळच्या बीआयटी चाळ इमारतीत दुसर्‍या माळ्यावर राहत होते. २२ वर्षे येथे त्यांचे वास्तव्य होते. हे निवासस्थान देखील राष्ट्रीय स्मारक म्हणून विकसित करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. महापरिनिर्वाण दिवसानिमित्ताने भेट दिली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *बहुचर्चित सिंचन घोटाळाप्रकरणी अजित पवार यांना क्लीनचीट, नियमबाह्य व्यवहार झाले नसल्याचं शपथपत्र मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात एसीबीने सादर केलंय.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *मुंबई - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 63 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवाला अभिवादन करण्यासाठी मुंबईच्या चैत्यभूमीवर भीमसागर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *माथाडी कामगारांच्या ठेवींवर बँक अधिकाऱ्यांचा डल्ला, 100 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप, तब्बल 50 हजार माथाडी कामगारांच्या आयुष्याच्या पुंजीवर बँकांमधील अधिकाऱ्यांनी डल्ला मारल्याचा प्रकार समोर आला आहे. माथाडी कामगारांच्या ठेवी बँकेतील अधिकाऱ्यांन परस्पर इतर खात्यांवर वळवल्याचा आरोप होत आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *हैदराबाद प्रकरणातील चार ही आरोपी पोलिसांच्या एन काउंटर मध्ये ठार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *भारताच्या एकोणवीस वर्षाखालील विश्वचषक संघात निवड झालेल्या मुंबईच्या यशस्वी जैस्वाल आणि दिव्यांश सक्सेना यांचा दादर युनियन स्पोर्टिंग क्लबच्या वतीने भारताचा कसोटी उपकर्णधार अजिंक्य रहाणेच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियम, हैदराबाद येथे वेस्ट इंडिज आणि भारत यातील पहिल्या T-20 सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा सहा विकेटनी केला पराभव* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••            *स्मार्ट बॉय : काळाची गरज* मुलीने स्वतः ला तयार केले पाहिजे. कराटे शिकले पाहिजे, मुलांना प्रतिकार करता येईल असे काही केले पाहिजे, अर्थात स्मार्ट गर्ल व्हायला पाहिजे असा एक सुर सध्या सर्वत्र ऐकायला आणि पाहायला मिळत आहे. त्याऐवजी आपल्या घरातील मुलांना स्मार्ट बॉय करायला पाहिजे यावर कुठे ही चर्चा होतांना दिसत नाही. मुलांना नैतिकतेचे धडे शिकविले तर ........... पूर्ण लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे. http://nasayeotikar.blogspot.com/2019/12/blog-post_35.html  लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌳 *बोन्साय* 🌳 ***************** जपानी माणूस निसर्गप्रिय आहे. साराच निसर्ग घराच्या भिंतीत, आपल्या बागेत साठवता आला, तर या हट्टाने बोन्सायची निर्मिती जपानी कल्पकतेने केली गेली आहे. अनेक जातींची झाडे, वृक्ष, फळझाडे ही छोट्याशा कुंडीत लहान आकार कायम राखत विशिष्ट पद्धतीने जोपासायची, त्यांचे सर्व गुणधर्म मात्र कायम राखायचे अशा तंत्रातून निर्माण झालेल्या झाडाला 'बोन्साय' म्हणतात. वडाचे झाड जेमतेम फूटभर उंचीचे, पण त्याच्या फांद्यांना पारंब्या फुटलेल्या, संत्र्याचे झाड वीतभर उंचीचे, पण त्याला लिंबासारख्या आकाराची संत्री लागलेली, तीही संत्र्याच्या चवीची... असा प्रकार बोन्साय पद्धतीत घडवला जातो. अशा पद्धतीत विविध झाडे तयार करणे हे अत्यंत कौशल्याचे, चिकाटीचे व वनस्पतीशास्त्राची परिपूर्ण जाण असणारे काम आहे. झाडांना पुरेशी पोषण द्रव्ये देताना त्यांची वाढ मात्र कुंठीत ठेवायची, याचे तंत्र म्हणजे बोन्साय. केवळ वाढणार्‍या फांद्या छाटून बोन्साय कधीही तयार होत नाही. विशेषत: झाडाला आलेली फळे परिपूर्ण चवीची असणे हा त्यातील एक क्लिष्ट भाग ठरतो. बोन्साय तयार करण्याची पद्धत दिसायला साधीशीच आहे. प्रत्येक झाडाला दोन प्रकारची मुळे असतात. लांबवर जाणारी, खोल अन्नाच्या शोधात जमिनीत रोवणारी सोटमुळे व केशसंभासारखी तंतूमुळे. तंतूमुळे ही पाणी शोषून घेणे, जमिनीच्या आसपासची पृष्ठभागातील विविध रसायने गोळा करणे या कामात गुंतलेली असतात. त्यांचा झाडाला आधार देणे, वाढीला भक्कम पाठबळ देणे यात सहभाग नसतो. बोन्साय करताना मुख्य मुळे तारांनी बांधणे, वेळच्या वेळी त्यांना छाटणे, त्यांची वाढ न होऊ देणे यावर लक्ष्य केंद्रित केले जाते. ठराविक दिवसांनी ही प्रक्रिया करत राहिल्यास झाडाची वाढ खुंटते, पण झाडाचे मूळ स्वरूप कायम राहते. अर्थातच बोन्साय झाडांच्या कुंडय़ा यासाठी ठरावीक महिन्यांनी बदलत गेल्यावरच हे शक्य होते. बोन्सायचे कौतुक करणारी जशी मंडळी आहेत तशीच त्याला नावे ठेवणारी विरोधक मंडळीही आहेत. निसर्गाला स्वतःच्या मुठीत पकडण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे, असे विरोधकांचे मत पडते. याउलट साराच निसर्ग माझ्या दिवाणखान्यात मी कसा मांडला आहे, असे बोन्सायचे कौतुक करणारी मंडळी म्हणतात. एखाद्या प्रसिद्ध नावाजलेल्या व्यक्तीच्या छायेत कायम दुय्यम भूमिकेत वावरणाऱ्या मंडळींना आपण बोलीभाषेत 'बोन्साय' म्हणूनच संबोधतो, ते का, हे आता कळले ना ? *'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" चारित्र्याचा विकास सुसंगतीत होतो आणि बुध्दीचा विकास एकांतात होतो. "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *शाळा व्यवस्थापन समितीमध्ये पालकांचा किती टक्के समावेश असावा ?* 75 % 2) *शाळा व्यवस्थापन समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतो ?* मुख्याध्यापक 3) *शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष कोणामधून निवडला जातो ?* पालकांमधून 4) *शाळा व्यवस्थापन समितीची महिन्याला किमान किती बैठक होणे आवश्यक आहे ?* 1 5) *शाळा व्यवस्थापन समितीचा ध्येय कोणता ?* शाळेचा सर्वांगीण विकास *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 धनंजय शंकर पाटील, सोलापूर 👤 साईनाथ जायेवाड, येवती 👤 भीमाशंकर बच्चेवार 👤 मनोज मनूरकर 👤 बाळासाहेब तांबे 👤 आश्विन जैस्वाल 👤 संतोष अनालदास *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आपल्या भोवती पसरलेला अथांग निसर्ग शत-शत पावलावर आपणांस आनंदाचे झोके देत असतो. डोंगराळ, खडकाळ प्रदेशातून खळखळ वाहणारा शांत निर्झर काय, सप्तरंगाने आकाशाला गवसणी घालणारा इंद्रधनुष्य काय, आकाशाचे चुंबन घेऊ पाहणारे उंचच उंच वृक्ष काय किंवा काळ्याकुट्ट ढगाला लागलेली रुपेरी किनार काय, हे सर्व पाहून कोणाला वेड लागणार नाही? नव्या तेजाने, नव्या ज्ञानाने , नव्या सौंदर्याने आंणि नव्या चैतन्याने निसर्ग सतत बदलत असतो. तो सतत आम्हांस काही तरी नवीन सांगत असतो. ते आपण नीट समजून घेतले पाहिजे.* *आपण विनाकारण निराश, दु:खी, अशांत, बेचैन, त्रस्त होण्यात काय अर्थ आहे? त्यासाठी निसर्ग हाच आपला गुरू आहे, हे प्रथम ओळखले पाहिजे. अहंकाराचा मोती होऊन कोणा राजाच्या मुकुटात चमकत राहण्यापेक्षा कमल पत्रावरील अस्मितापूर्ण दवबिंदू होऊन एखाद्या तहानलेल्या चिमणीच्या तोंडात पडण्यात केवढा मोठा आनंद आहे ! म्हणून निसर्गातील चैतन्याचा स्फुल्लिंग मनी बाळगावा आणि आपल्या ध्येयपूर्तीची स्फूर्ती मस्तकी धारण करावी. मगच जगण्यात आनंद आहे असे वाटेल. जीवन ही चैनीची वस्तू नसून कर्तव्याची भूमिका आहे हे समजले तरच जीवनातील 'आनंदाचे डोही आनंद तरंग' निर्माण करण्याची इच्छा बळावेल. स्वत: चंदनासारखे झिजत झिजत इतरांना सुगंधित करून सोडण्यात आपल्या जीवनाचे सार्थक आहे.* ‼ *रामकृष्णहरी* ‼ 🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो,* *सायंकाळी कॉटवर जरा आडवा झालो आणि कानी घेताच सकाळ स्मार्ट सोबती मधील 'चिटवूमन' या जिगरबाज लेखावर नजर गेली.* *जो हो गया उसे सोचा नही करते,* *जो मिल गया उसे खोया नही करते,* *हासिल उन्हे होती है सफलता,* *जो वक्त और हालात पर रोया नहीं करते.* *अस जन्मतःच अपंगत्व घेऊन आलेली अमेरिकेची अँमी मलिन्स हिने आपल्या मनात कुठलाही किंतु न ठेवता उत्कृष्ट मॉडेल,नावाजलेली* *अभिनेत्री, जिगरबाज खेळाडू अशी अनेक* *बिरूदे लावून सर्व अशक्य गोष्टी करून जगाला नवा संदेश दिला.* *मलिन्सच्या स्वप्नांना मर्यादाच नव्हत्या.* *वयाच्या पहिल्या वर्षीच आईबापाने तिचे गुडघ्यापासून खालचे पाय कापून टाकले कारण ते वाढणारच नव्हते. आणि मग आयुष्य कस* *जगायचं हा मोठा प्रश्न.पण शक्य नाही ही गोष्ट मलिन्सच्या कानाला आणि मनाला* *तिने कधीच शिवू दिले नाही .* *प्रत्येक क्षेत्रात यशाची नवी शिखरे पादाक्रांत करत राहिली.आणि* *अमेरिकेतच नाही तर जागतिक पातळीवर आयडॉल बनली.* *या जगण्यावर* *सुरेश भटांच्या सुंदर ओळी..* *आठवल्याशिवाय राहत नाही---* *आयुष्य छान आहे थोडे लहान आहे !* *रडतोस काय वेड्या? लढण्यात शान आहे.!* *काट्यातही फुलांची झुलती कमान आहे !* *उचलून घे हवे ते , दुनिया दुकान आहे !* *जगणे निरर्थक म्हणतो तो बेइमान आहे.* *"सुखासाठी कधी हसावं लागंत ,तर कधी रडावं लागतं,* *कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरुन पडावं लागतं"...* *मलिन्स सारख कानाला अशक्य शब्द ऐकू देऊ नका.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• दगडाने कधीच कुणाजवळ हट्ट केला नाही.जिथे आहे मी तिथे चांगलाच आहे.कुठेही ठेवा पायरीवर ठेवा,उंबरठ्यावर ठेवा,घराच्या मुळव्यामध्ये ठेवा, ओट्यावर ठेवा, देवाच्या पायाखाली ठेवा, मूर्तीरुपात ठेवा किंवा स्मारकात ठेवा,पण मला कसल्याही प्रकारचा कमीपणा नाही.माझा सा-यांनीच कुठे ना कुठे उपयोग केला आहे.त्यामुळे माझं अस्तित्व कुठे ना कुठे असल्यामुळे मला सा-यांनीच मान सन्मान केला असल्यामुळे मी दगड जरी असलो तरी माणसांच्या हृदयात माझं कुठं ना कुठं तरी स्थान आहे.माझी किंमत सा-यांनीच केली आहे.जर मी दगड नसलो असतो तर मला देवत्वही प्राप्त झाले नसते.मानवाच्या प्रत्येक गोष्टीसाठी हजर राहून सगळ्यांना आपलेसे झालो आहे.ज्याप्रमाणे एखादा दगडासारखा माणूस जरी असला तरी तो कुठे ना कुठे इतरांच्या मदतीला धावून जातोच.शेवटी माणूसही आपापल्या भावना ओळखून इतरांच्या मदतीला जातच असतो.दगडासारखा दगड भावनाशून्य असतानाही आपण त्याला उपयोगात आणतो तर माणूस म्हणून इतरांच्या मदतीला प्रसंगानुरूप मदतीला धावून जाणे आणि आपले जीवन कारणी लावणे हे देखील दगडाइतकेच कामाला आल्यासारखेच आहे.हा परोपकारी विचार प्रत्येकाने करायला हवा मग कुठे ना कुठे कुणाच्यातरी हृदयात आदराचे निश्चितच स्थान मिळेल यात शंकाच नाही. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद...९४२१८३९५९०. 💠🍃💠🍃💠🍃💠🍃💠 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कुत्रा आणि लांडगा* एक लांडगा फार दिवस उपाशी राहिल्यामुळे रोड झाला होता. काहीतरी खायला मिळाले तर पहावे म्हणून तो चांदण्या रात्री फिरत होता. तेव्हा त्याला एका कुणब्याच्या झोपडीजवळ दारावर एक लठ्ठ कुत्रा बसलेला दिसला. त्याने त्याला रामराम करून त्याचा आदरसत्कार केल्यावर लांडगा त्याला म्हणाला, ''तू फार चांगला दिसतोस, तुझ्यासारखा देखणा व धष्टपुष्ट प्राणी आजपर्यंत मी पाहिला नाही. याचे कारण तरी काय? मी तुझ्यापेक्षा जास्त उद्योग करतो, पण मला पोटभर खायला मिळत नाही.'' कुत्रा म्हणाला, ''अरे, मी करतो ते तू करशील तर माझ्यासारखाच तूही सुखी होशील.''त्यावर लांडग्याने विचारले, ''तू काय करतोस?'' कुत्रा म्हणाला, ''दुसरे काही नाही. रात्रीच्या वेळी मालकाच्या दारापुढे पाहारा करून मी चोराला येऊ देत नाही.'' लांडगा म्हणाला, ''एवढंच ना? ते मी मनापासून करीन बाबा. अरे मी रानात भटकत थंडीवारा सोसतो तर मला घराच्या सावलीत बसून पोटभर अन्न मिळाल्यास दुसरे काय पाहिजे?'' याप्रमाणे दोघांमध्ये बोलणे चालले असता कुत्र्याच्या गळ्याला दोरीचा करकोचा पडलेला लांडग्याने पाहिला. तेव्हा तो कुत्र्याला म्हणाला, ''मित्रा, तुझ्या गळ्यात काय रे हे?'' कुत्रा म्हणाला, ''अं हं. ते काही नाही.'' लांडगा म्हणाला, ''तरी पण काय ते मला कळू देत.'' कुत्रा म्हणाला, ''अरे, मी थोडासा द्वाड आहे, लोकांना चावतो, म्हणून मी दिवसा झोपलो तर रात्री चांगला पहारा करीन म्हणून माझा मालक मला दोरीने बंधून ठेवतो पण दिवस मावळला की तो मला सोडतोच. मग मी वाटेल ते करतो, वाटेल तिकडे फिरतो. खाण्यापिण्याविषयी विचारशील तर माझा मालक आपल्या हाताने मला भाकरी खाऊ घालतो. घरची सगळीच माणसं मला मायेने वागवतात. पानावर उरलेली भाकरी माझ्याशिवाय दुसर्‍या कोणाला देत नाहीत. तेव्हा तू पहा, माझ्यासारखा वागशील तर तही सुखी होशील.'' ते ऐकताच लांडगा मागच्यामागे पळू लागला. त्याला हाका मारीत कुत्रा म्हणाला, ''अरे, असा पळतोस काय?'' लांडगा दुरूनच म्हणाला, ''नको रे बाबा मला ते सुख, ते तुझे तुलाच लाभो. स्वतंत्रपणे वाटेल तसे वागता येत असेल तर तसली गोष्ट मला सांग, तुझ्यासारखे बांधून ठेऊन जर मला कोणी राजा केले तर ते राजेपणदेखील मला नको!'' तात्पर्य : स्वतंत्रपणा असताना गरिबीही चांगली. पण परतंत्रपणा असेल तर श्रीमंतीचाही काही उपयोग नाही. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

आज दिनांक ०६-१२-२०१९ रोजी जि.प.प्रा.शाळा गोजेगाव येथे *📘महामानव ,भारतरत्न,क्रांतीसूर्य,विश्ववंदनीय बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन* साजरा करण्यात आला.👏🙏 📘डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमेचे पूजन करून विनम्र अभिवादन केले . 👏👏💐💐 अशाप्रकारे विद्यार्थी, शिक्षक यांच्या भाषणातून आणि गितातून विनम्र आदरांजली वाहीली. 🙏 〰〰〰〰〰〰

*शिक्षण हे वाघीणीचे दुध आहे आणि जो ते प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही - डॉ. बाबासाहेब आंबेडकर*

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 06/12/2019 वार - शुक्रवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *महापरिनिर्वाण दिन* 💥 ठळक घडामोडी :-  ● २०००-थोर समाजसेवक बाबा आमटे यांना राष्ट्रपती के.आर.नारायणन यांच्या हस्ते केंद्र सरकारचा 'डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीयपुरस्कार' प्रदान करण्यात आला. ● १९९२ - अयोध्येमध्ये कारसेवकांनी बाबरी मशीद पाडली.त्यामध्ये उसळलेल्या दंगलीत सुमारे १५०० लोक ठार झाले ● १९९७ - सायबेरियातील इर्कुट्स्क शहरात रशियाचे ए.एन.१२४ जातीचे विमान रहिवासी भागात कोसळले. ६७ ठार. 💥 जन्म :- ● १९१४ - सिरिल वॉशब्रूक, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. ● १९४६ - फ्रँक हेस, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. ● १९५२ - रिक चार्ल्सवर्थ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू, राजकारणी, हॉकीपटू व मार्गदर्शक. ● १९७७ - फ्रेड फ्लिन्टॉफ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- ● १९७६- क्रांतिसिंह नाना पाटील ● *१९५६ - डॉ. भीमराव रामजी आंबेडकर, भारतीय संविधानकार, कायदेमंत्री व अर्थतज्ज्ञ* ● २००५ - देवन नायर, सिंगापूरचा तिसरा राष्ट्राध्यक्ष. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 फलक लेखन आणि वाचन ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *वाचू आनंदे* http://projectforchild.blogspot.com/2019/12/06-2019.html •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताला जाणार, पुण्यात आजपासून पोलीस महासंचालकाच्या तीन दिवसीय परिषदेला सुरुवात होत आहे. त्यासाठी नरेंद्र मोदी दोन दिवस तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तीन दिवस पुण्यात असणार आहेत.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मुंबई : शहरातील विविध पायाभूत सुविधा, झोपडपट्टी मुक्त मुंबई करणे, मुंबई २०३० दृष्टिक्षेप यात शहराचा सर्वांगीण विकास करण्यावर भर, पूर नियंत्रण आणि हवामान बदल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या महापालिकेतील बैठकीत हे निर्देश देण्यात आले आहेत.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *परभणी रेल्वे स्थानकावरील हेल्थ इन्स्पेक्टर कार्यालयात शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत दोन वेटिंग रुम जळून खाक झाल्या आहेत. सुदैवाने या आगीमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *पीएमसी बँक खातेधारकांना कोणताही दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार, खातेधारकांच्या आरबीआय विरोधातील याचिका हायकोर्टानं फेटाळल्या, भारतीय बँकांशी संबंधित सर्व निर्णय घेण्याचे अधिकार केवळ आरबीआयलाच, तेच सार्वभौम आहेत - हायकोर्ट * ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *सिंधुदुर्ग येथील मालवण तालुक्यातील देवबाग सुनामी बेटावर पर्यटकांची बोट बुडाली, ९ पर्यटक बोटीवर असल्याची माहिती, एका महिलेचा मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *21 हजार मेट्रिक टन कांदा आयात करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यापूर्वी 17 हजार मेट्रिक टन कांदा आयात करण्याचा निर्णय झाला होता* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन त्यानिमित्ताने मुंबईतील चैत्यभूमीत देशभरातून 25 लाखा पेक्षाही अधिक अनुयायी अभिवादन करण्यासाठी होणार दाखल* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन टीमकडून भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रज्ञासूर्य विशेषांक* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्यप्रदेश मधील महू येथे झाला. त्यांचे मूळ नाव भीमराव असॆ होते. परंतु भारतातच नाही तर परदेशात ते बाबासाहेब या नावानेच सुप्रसिध्द आहेत. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी तर आईचे नाव भीमाबाई होते. भीमराव लहान असताना त्यांची आई देवाघरी गेली. तेंव्हा त्यांच्या आत्यानी त्यांचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे वडील उद्योगी, महत्वाकांक्षी आणि शिस्तीने वागणारे होते. लष्कराच्या शाळेत....... खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा व विशेषांक download करून घ्यावे. https://drive.google.com/file/d/1kosTls7MJZs-ZqpbQIfouieMOvY65wbl/view?usp=drivesdk     विशेषांक वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *बाष्पीभवन व उत्कलन* 📙 ****************************** तापमानातील बदल, तापमानातील फरक, द्रव पदार्थांवरील वातावरणातील हवेचा दाब, द्रवपदार्थाचा उत्कलनबिंदू या साऱ्यांचा परिणाम बाष्पीभवन नावाच्या प्रक्रियेवर होत असतो. छोट्या छोट्या उदाहरणांतून हे आपण पाहिले, तर ते समजणे गमतीचे होते. उन्हाळा आल्यावर घरच्या कुत्र्यासाठी ताटलीत घातलेले पाणी संध्याकाळी कदाचित त्याने न पिता देखील नाहीसे झालेले असते. या उलट पावसाळ्यात पाऊस पडायचा थांबला तरीसुद्धा दारातील फरशीवर साचलेले पाणी सुद्धा कित्येक तास तसेच दिसते. कपभर चहा जेमतेम पाच मिनिटात आपण आपल्या गावात बनवतो. पण तोच कपभर चहा बनवायला गिर्यारोहकांना, हिमालयातील आपल्या सैनिकांना किमान पंधरा मिनिटे लागतात. डॉक्टर इंजेक्शन देण्यापूर्वी स्पिरिटचा बोळा फिरवतात; पण इंजेक्शन देऊन होण्यापूर्वीच ती जागा कोरडी झालेली असते. भल्यामोठ्या धरणातील पाणी काटकसरीने वापरूनसुद्धा कमी होत जाते किंवा आपल्याला नियमित पाणी पाऊस मिळतो, याचेही कारण समुद्रातील पाण्याचे, मोठ्या जलाशयांतील पाण्याचे बाष्पीभवन आहे. कोणत्याही द्रवपदार्थाच्या पृष्ठभागावरील कणांचे सतत वायुरूपात रुपांतर होत असते. वातावरणातील आर्द्रता, उष्णता यांचा त्यावर कमी जास्त परिणाम होत राहतो. द्रवाचे तापमान जसे वाढते, तशी ही प्रक्रिया वाढते. मात्र तापमान कमी झाले तरी ती पूर्णत: थांबत नाही, हे लक्षात घ्यायला हवे. थंडीच्या दिवसांत तळ्याच्या किंवा नदीच्या काठी उभे राहिलो तर पाण्यातून निघणाऱ्या या कणांनी बनलेल्या वाफा सहज आपल्या दृष्टीला पडू शकतात, त्याही सकाळच्या कडाक्याच्या थंडीत जेमतेम आठ ते दहा सेंटिग्रेड तापमानाला. द्रवाचा उत्कलनबिंदू कमी असला, तर हे बाष्पीभवन वेगाने होत असते. उदाहरणार्थ, पेट्रोल, स्पिरिट, टर्पेंटाइन ठेवलेली बाटली वा मोठा कॅन खोलीत नुसता उघडा राहिला, तरी त्या पदार्थांचा वास काही सेकंदात आपल्याला येऊ लागतो. प्रत्येक पदार्थाचा एक उत्कलनबिंदू ठरलेला असतो. हे अगदी घनपदार्थ वा धातुंनाही लागू आहे. पण आपण येथे मुख्यतः द्रवपदार्थाबद्दलच विचार करणार आहोत. उदाहरणार्थ, पाणी जेव्हा उत्कलनबिंदूएवढे तापवले जाते, तेव्हा त्यानंतर त्याला मिळणाऱ्या उष्णतेतून त्याचे तापमान वाढत नाही, तर पाण्याचे रूपांतर वाफेत होणे सुरू होते. ही वाफ झपाट्याने पाण्याच्या भांड्यातून बाहेर पडताना आपण पाहतो. उत्कलनबिंदूवर हवेच्या दाबाचा परिणाम होतो. दाब कमी झाल्यास उत्कलनबिंदू कमी झाल्याने तापमान कमी राहते. याउलट दाब वाढविल्यास द्रवाचे तापमान अधिक वाढू शकते. या तत्त्वाचा वापर करूनच घरगुती प्रेशर कुकरमध्ये तापमान सुमारे ५ पौंड दाबाखाली ११५ सेंटिग्रेडपर्यंत वाढवून अन्न लवकर शिजवले जाते. *'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?* 1998 2) *भारताच्या राष्ट्रध्वजाची रचना कोणी केलेली आहे ?* वेंकय्या पिलई 3) *शाळा व्यवस्थापन समितीचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?* 2 वर्ष 4) *शाळा व्यवस्थापन समितीमध्ये किती टक्के महिला सदस्य असाव्यात ?* 50 % 5) *शाळा व्यवस्थापन समितीमध्ये स्वीकृत सदस्य म्हणून किती विद्यार्थ्यांची निवड करावी लागते ?* 2 *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 अमोल सेठ येमुल, पुणे 👤 डी. आर. भोसके, येवती 👤 अशोक हिंगणे 👤 शंकर बोंबले 👤 कैलास सोनकांबळे 👤 बालाजी गैनवार, चिकना 👤 नवनाथ राजीवाडे 👤 भगवान चव्हाण 👤 राजेश जाधव उमरेकर 👤 माधव हालकुडे 👤 प्रा. मंगल सांगळे 👤 दत्ता काशेवार 👤 विवेक क्षीरसागर 👤 देवानंद मुरमुरे 👤 नरेश पांचाळ 👤 राजेश आंपलवाड 👤 कैलास सोनकांबळे 👤 बाबासाहेब घागले 👤 लवकुमार मुळे *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *माणसाच्या स्वभावातील 'मी' पणा हाच त्याचा सर्वात मोठा शत्रू असतो. त्यामुळे 'मी' पणाच्या मगरमिठीतून त्याची सुटका होणे अशक्यप्राय असते. 'मी' पणा म्हणजेच अहंकार. हा अहंकार दगडी भिंतीसारखा असतो. सहज जरी दगडी भिंतीवर आपले डोके आपटले तरी ते रक्तबंबाळ होऊ शकते; परंतु अस्मिता ही खुल्या खिडकीसारखी असते. अशा खिडकीतून स्वच्छ आणि शुद्ध हवा आतून बाहेर खेळत असते. अहंकारी माणसे उगाचच सतत म्हणत असतात की, 'मी हे केले आणि मी ते केले'. 'मी' पणाची अशी वल्गना करण्यापेक्षा अस्मिता बाळगणारी माणसे म्हणत असतात की,'मी देखील हे करू शकतो, मी देखील ते करू शकतो.'* *अस्मितापूर्ण भाषेत सौजन्य असते, नम्रता असते, शहाणपण असते. अहंकार हा एखाद्या महावृक्षासारखा असतो. घोर संकटाच्या वादळात तो मुळासकट जमीनदोस्त होऊ शकतो; परंतु अस्मिता लव्हाळ्यासारखी असते. ती वा-याच्या तालावर आनंदाने डोलत असते. अहंकाराच्या महापुरात मोठ मोठे वृक्ष वाहत जाऊन नाहीसे होतात ; परंतु अस्मितेच्या वाटेवर स्वार होऊन छोटीशी मुंगी पैलतीरावर जाऊन हसत असते. आपले जगणे हसण्यासाठी आहे, रडण्यासाठी नाही. आपल्या जगण्यात आनंद आहे. तो अनुभवायाचा असतो. आपले जगणे आनंदाचे गाणे व्हावे असे वाटत असेल तर अहंकारमुक्त प्रांगणात स्वछंदपणे विहार करायला शिकले पाहिजे. अस्मितापूर्ण आकाशात गरूडभरारी घ्यायला शिकले पाहिजे. आपले जगणे मलयगिरी पर्वतावरील सुगंधित वा-यासारखे व्हावे असे वाटत असेल तर प्रथम आपण अहंकाराचा त्याग केला पाहिजे. कवी बा. भ. बोरकर म्हणतात..."जीवन त्यांना कळले हो । मीपण ज्यांचे पक्व फळापरि गळले हो ॥* ‼ *रामकृष्णहरी*‼ 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो,* *काल सायंकाळी एबीपी माझावर बातमी ऐकली, मन पुन्हा सुन्न झालं.उत्तरप्रदेशात उंननाई येथे एका* *तरुणीला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न झाला.कुठवर चालणार हे मातम?* *रोजचे विविध प्रकारचे करूणादायी मेसेज,वर्तमानपत्रातील लेख वाचून मन उद्विग्न होऊन चाललंय.* *किती दिवस लोकशाहीतील हे विकृत थैमान चालेल कुणास ठाऊक.* *गेली सांगून ज्ञानेश्वरी न* *माणसापरिस मेंढरं बरी।* *हेच मनात घोळवंतय.त्यात उपाय म्हणून नागपूर,बीड,नासिक* *पोलिसांनी होम ड्रॉप, कवच कक्ष,हलो पोलीस हे उपक्रम* *आशादायी, पण* *किती दिवस* *प्रियंका जनावरावर उपचार करायची.त्याचा अंदाज घेऊन एखाद्या* *पशूच्या जवळ जायची.नखे,दात लागतात का? याची काळजी घेऊन* *औषधे,इंजेक्शन द्यायची.कारण ते पशू होते,मात्र त्यांनी तिला माणूस म्हणून कधीच इजा केली नाही.त्या* *काळरात्री माणूस समजून ज्यांच्यावर तिने विश्वास ठेवला ते मात्र कातडे पांघरलेले* *अमानुष लांडगे निघाले.अक्षरशः तिचे लचके तोडले.दिड अब्जांच्या* *जवळपास असलेल्या लोकसंख्येच्या देशात असे चार -सहा सैतान निपजले म्हणजे त्यांचे प्रमाण* *अत्यल्प आहे असे म्हणून स्वतःची समजूत काढूही ,पण त्यांचे उपद्रवमूल्य किती भयंकर आहे* *हे आज सभोवार नजर टाकली तर अनेक* *निष्पाप डोळयांत दाटलेल्या भितीतून दिसून येईल. प्रियांकाने शेवटच्या क्षणी हात जोडून या सैतानांच्या* *नैतिकतेला आवाहन केले असेल,पाया पडली असेल पण ज्या विखारी उन्मादाने त्यांनी क्षणिक* *वासनेपोटी क्रौर्याची परिसीमा गाठली ती क्रूरता त्यांच्यात* *आली कोठून? इतकी अधर्मीवृत्तीअंजना,रिंकू,असिफा,गिता ,ट्विंकल,निर्भया ,इशा* *प्रियंका आणि त्यांच्यासारख्या अनेक* *निष्पापावर झालेल्या अत्याचाराच्या रुपाने का वाढताना दिसत आहे?* *शाळेतून नैतिकतेचे धडे शिकवले जातात,वर्षानुवर्षे पोत्याने पारायणे ऐकली जातात ,तरी* *समाजाचे अधःपतन होताना का दिसतेय?याचे* *एक कारण असे दिसते,मुल्ये सांगून भिनवता येत* *नाहीत.आचरणातूनच बिंबवता येतात.आज असा आचरणशील* *समाज भोवती दिसतोय का? कुठे शोधायचा?आणि कुणी शोधायचा* ? *स्टेजवरुन मूल्यांचे जीभेला न पेलवणारे शब्द ओकले* *जाताहेत.काही नेत्यांच्या आचार विचारातील गैरमेळ* *गाढवालाही लाजवेल असा सर्वांनी बघितलाय .ठराविक सरकारी बाबूंना हरामाच्या पैशांची भूक लागली* *आहे.धान्य सहज उपलब्ध होणार नाही पण दारु मात्र नाक्यानाक्यावर आहे.ग्रंथालये* *शेवटची घटका मोजतांना सगळे डोळसपणे पाहत आहे. इकडे डान्सबार हाऊसफुल्ल* *चाललेत.मैदाने ओस पडत चाललीत.कुशल,मूल्यनिर्धारीत* *खेळाडू तयार होत नाही ,अध्यात्मिक गुरुनींच लैंगिकतेचा बाजार मांडलेला* *उघड डोळ्यांनी बघितला तरी त्यांची पूजा थांबत नाही.विचार जेव्हा* *थांबतत् तेव्हा विकार भडकतात.आज समाजाचे नेमके तेच* *होत चालले आहे.विकार फैलावलेला दिसतोय.* *आज आजी,बाबा,काका,काकू,दादा,ताई* *घराघरातून संपली आहेत.नातवंडावर प्रेम* *करणारे,वर्तनाला वळण लावणारे नाते कुटुंबात उरले नाहीत.* *त्रिकोणी-चौकोनी कुटुंबात पाल्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही.कॉन्व्हेंटचा* *जमाना वाढलाय.पाठीवरचा मायेचा हात लुप्त* *झाला.हातात मोबाईल नावाचा सैतान आला आणि अकाली वयात* *अश्लील व्हिडिओंचे व्यसन अवेळी मुलांना लागले.निसर्ग नियम मोडीत* *काढलाय.काहीही करुन मलाही 'तो'अनुभव घ्यायचा आहे या विकृत भावनेने लोभस मनाचा ताबा* *घेतला.मग एखादी निष्पाप अंजना,रिंकू, प्रियंका,निर्भया,* *असिफा ,ट्विंकल,इशा त्यांना बळी पडली....समाज काही काळ* *हळहळतो,रडतो,मोर्चे काढतो,कोर्टात चेंडू जातो आणि गडद रेषा काही* *काळ पुसट होत जाते .पुन्हा गडद झाली की पुन्हा* *काही काळाने पुसट होते.किती दिवस चालायचं हे पाप.* *पालकांनी ज्याप्रमाणे ते बॅंकेतली रोकड वारंवार चेक करतात त्याप्रमाणे आपल्या पाल्याच्या ही* *बचत डोक्यात ठेवून वेळोवेळी डोकावून,चेक केली* *पाहिजे. एखादीं गोष्ट सडली तर तिचा दुर्गंध पसरतो .इतका* *सैतानी अत्याचार हे काही त्या नराधमांचे तत्कालिन कृत्य नव्हते.मेंदू सडण्याची प्रक्रिया खूप* *अगोदर झाली असली पाहिजे.सजग पालकाला हे सहज जाणवू* *शकते.यासाठी पाल्याशी सुसंवाद ठेवला पाहिजे.मेंदू सडत असलेला दिसला तर वेळीच उपाय केला* *पाहिजे.यासाठी कुटुंबाला वेळ दिला पाहिजे. नाहीतर एखादी निष्पाप (मग* *ती स्वतःच्या घरातीलही असेल) वारंवार बळी* *जाईल.* *समाजात चांगल्या लोकांची संख्या जास्त असली तरी व्यक्तीत लपलेला* *सैतान ओळखणारी 'एक्स-रे व्हिजन 'दृष्टी अजून विकसित झाली नाही.त्यासाठी* *सजगता हाच पर्याय आहे.मुलींनी सावधगिरी बाळगली पाहिजे.* *पालकांनीही दक्ष राहिले पाहिजे.आपल्या घरात ,आप्तांत ,असा गुन्हेगार असेल* *तर त्याला पाठीशी घालता कामा नये.अशा गुन्हेगारांना फाशीच झाली पाहिजे.तरच थोडा वचक* *राहण्याची शक्यता आहे.* *पटलं तर अंमलबजावणी स्वतःपासून करा.किती म्हाताऱ्या मेल्या तरी काळ* *सोकावण्याची वाट बघू नका ही विनंती.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• माझा जसा परमेश्वरावर विश्र्वास आहे तसाच परमेश्वरानंतर पुस्तकावर जास्त विश्वास आहे.आणि परमेश्वराखालोखाल मी पुस्तकालाच मानतो. कारणही तसेच आहे.पुस्तके ही वयाच्या अगदी तिसऱ्या चौथ्यापासून साथ धरली आणि आजही त्यांचीच साथ आहे.पुस्तकामुळेच जीवनाला अर्थ आला,त्यानेच अन्नापाण्याला लावले, संस्कारक्षम बनवले,अज्ञान दूर घालवले,माणूस म्हणून जे काही घडलो ते ह्या पुस्तकामुळेच...! अन्यायाचा प्रतिकार करायला शिकवले त्या पुस्तकांनीच, जीवन कसे जगायचे,जीवनाचा आनंद कसा घ्यायचा,मन स्थिर कसे ठेवायचे,संयम कसा राखायचा,समोरच्या व्यक्तीसमोर आणि जगासमोर कसा व्यवहार करायचा हे पुस्तकांनीच शिकवले.पुस्तकाचा जन्म कधी झाला हे जरी माहीत नसले तरी पुस्तके ही प्रत्येक पिढीला आदर्शच राहून व्यक्तीला,समाजाला आणि राष्ट्राला चांगले आदर्श दिशा देणारे परमेश्र्वरच आहेत.थोरांचे विचार,संतांचे उपदेश,विचारवंतांचे विचार हे पुस्तंकांच्या किंवा ग्रंथांच्या माध्यमातून सामान्य माणसापर्यंत पोहचवण्याचे कार्य पुस्तकातूनच होते.म्हणून ज्ञानप्राप्तीचा मूळ पाया हा पुस्तकांचाच आहे.प्रत्येकांनी पुस्तकाच्या सानिध्यात राहायला तर हवेच.आपल्या ज्ञानाची भूक शमविण्याचे काम ही पुस्तकेच करतात.एकवेळ उपाशी राहिले तरी चालेल पण पुस्तके आपल्या जीवनासाठी आवश्यक आहेत आणि मी त्याच्याशिवाय जगू शकत नाही अशी भूमिका जर प्रत्येकाने घेतली आणि आपल्या घरात एक पुस्तकांसाठी छोटा खाणा किंवा एखादी जागा ठेवावी आणि नित्यनेमाने त्यातील एखाद्या पुस्तकाचे वाचन करावे.असे जर केले तर आपल्या मनावर असलेला ताण कमी तर होतोच पण एखाद्या संकटातून बाहेर जाण्याचा मार्ग निश्चितच सापडतो.माझे ज्या ज्या वेळी मन कोणत्याही कारणाने अस्थिर झाले असले तरी अशावेळी मी हातात एखादे पुस्तक घेऊन एका कोपऱ्यात वाचत बसतो आणि काही काळानंतर आलेला ताण हळूहळू कमी होतो तो केवळ पुस्तकामुळेच. प्रत्येकाच्या जीवनात जर सुख,शांती,समाधान, संस्कार,योग्य दिशा,जगण्याची आशा यांना मिळवण्याचे एकमेव माध्यम फक्त पुस्तकेच आहेत.त्यांच्या सानिध्यात राहायला शिकले पाहिजे. पुस्तकेच माझ्या खरे जीवन जगण्याचे आशाकेंद्र आहे .अशा पुस्तकरुपी परमेश्वराला शेवटच्या क्षणापर्यंत माझ्या हृदयात स्थान आहे हे निर्विवाद सत्य आहे. व्यंकटेश काटकर,नांदेड संवाद..९४२१८३९५९०. 📚📕📚📕📚📕📚📕📚 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मनाची एकाग्रता* पांडुरंग *' मनाची एकाग्रता कशी करावी '* या विषयाचा अभ्यास करत बसला होता. त्याला जो कोणी भेटावयास येई, त्याच्याकडे तो दुर्लक्ष करायचा. आपल्याच चिंतनात मग्न असायचा. एकदा त्याचे गुरु सहदेव महाराज त्याच्याकडे आले. पाहतात तर पांडुरंग शून्यात नजर लावून बसलेला ! पांडुरंगाचे आपल्या गुरुकडे लक्षही नव्हते. सहदेव महाराज मात्र न रागावता तेथेच थांबले. त्यांनी एक वीट आणली आणि दिवसभर ती वीट एका दगडावर घासत बसले. शेवटी न राहवून पांडुरंगाने महाराजांना विचारले, '' महाराज आपण हे काय करता आहात ? '' सहदेव म्हणाले, '' मला या विटेचा आरसा बनवायचा आहे.'' पांडुरंग म्हणाला, '' महाराज, या विटेला घासून कधी आरसा होईल का ? जीवनभर घासत बसले तरीही विटेचा आरसा होणार नाही.'' ते ऐकून सहदेव हसले. म्हणाले, '' मग तू तरी काय करत आहेस ? वीट जर आरसा होत नसेल, तर मनाचे तरी काय ? मनावरील धूळ जोपर्यंत जात नाही, तोपर्यंत साधना करुन तरी काय उपयोग ? मनाची एकाग्रता साधून जे कार्य केले जाते ते सर्वोत्तम असते. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 05/12/2019 वार - गुरूवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      *आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिन* 💥 ठळक घडामोडी :-  १९४५ - फ्लाइट १९, फोर्ट लॉडरडेल, फ्लोरिडा येथून निघालेली अमेरिकन नौदलाच्या ५ टी.बी.एम.ऍव्हेन्जर जातीच्या विमानांची स्क्वॉड्रन बर्म्युडा त्रिकोनात गायब. १९८९ - फ्रांसच्या टीजीव्ही रेल्वेने ताशी ४८२.४ कि.मी.ची गती गाठून विश्वविक्रम रचला. 💥 जन्म :- १३७७ - ज्यान्वेन, चीनी सम्राट. १४४३ - पोप ज्युलियस दुसरा. 💥 मृत्यू :-  १५६० - फ्रांसिस दुसरा, फ्रांसचा राजा. १७९१ - वोल्फगांग आमाडेउस मोझार्ट, मध्यकालीन युरोपियन शास्त्रीय संगीतकार. १९२६ - क्लोद मोने, फ्रेंच चित्रकार. २०१३ - नेल्सन मंडेला, दक्षिण आफ्रिकेचा राष्ट्राध्यक्ष, राष्ट्रपिता, वर्णद्वेषविरोधी नेता. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *नवी दिल्ली: सुदानमध्ये सलुमी येथील फॅक्ट्रीत झालेल्या सिलिंडर स्फोटत २३ लोक ठार झाले असून त्यात १८ भारतीय कामगारांचा समावेश आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *नवी दिल्ली: आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी तिहार तुरुंगात जावं लागलेले माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम  १०६ दिवसानंतर तुरुंगातून जामिनावर बाहेर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *रत्नागिरी : सोबा चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टी भागात नवे संकट घोंघावण्याची शक्यता, पुढील बारा तासात वादळ सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी किनारपट्टीत धडकणार असून ताशी ४५ ते ५५ किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे धोका लक्षात घेऊन कोणीही समुद्रात जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *नवी दिल्ली: खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून मराठा आंदोलनातील गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी केली आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *मागच्या पाच वर्षात जी आंदोलने झाली त्याची व्यवस्थित माहिती घेऊन गुन्हे मागे घेण्यासंबंधीचा निर्णय घेऊ. सरकार सकारात्मक निर्णय घेईल. कुठल्याही निरपराध व्यक्तीला शासन होणार नाही असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने कसोटी फलंदाजांच्या आयसीसी क्रमवारीत पुन्हा नंबर वनवर झेप घेतली आहे. भारतीय कर्णधाराने बांगलादेशविरुद्धच्या डे-नाईट कसोटीत झळकावलेल्या शतकाने त्याला कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत मानाचं स्थान पुन्हा मिळवून दिलं आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारतीय क्रिकेट जगताला धक्का देणारी एक घटना घडली, त्रिपुराची राजधानी आगरतळा येथील मिथुन देवबर्मा या क्रिकेटपटूचा सामना सुरू असताना हृदयविकाराच्या झटक्याने झाला मृत्यू* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 फलक लेखन आणि वाचन ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *वाचू आनंदे* *दिनांक 05 डिसेंबर 2019 गुरुवार ••••••••★••••••••••★••••••••••★••••••••••• http://projectforchild.blogspot.com/2019/12/05-2019.html ••••••••★••••••••••★••••••••••★••••••••••• हा उपक्रम आपणांस कसे वाटले आम्हांला whatsapp करून जरूर कळवावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *पल्स पोलिओ म्हणजे काय ?* 📙 पोलिओ अर्थात बाल पक्षाघात हा सामान्यत: पाच वर्षांपेक्षा लहान वयाच्या मुलांना होणारा एक सांसर्गिक रोग आहे. तीन प्रकारच्या विषाणूंमुळे हा रोग होतो. हा विषाणू दूषित पाण्यामार्फत पसरतो. पोलिओच्या रुग्णाच्या विष्ठेचा पाण्याशी संपर्क येऊन ते दूषित होते. हेच पाणी निरोगी व्यक्ती प्यायल्यास तिला पोलिओ होऊ शकतो. पोलिओ हा रोग ९९% व्यक्तींमध्ये अत्यंत सौम्य स्वरूपाचा असतो. ९५% लोकांमध्ये तर कोणतीही विशिष्ट लक्षणे दिसत नाही. ३ ते ४% लोकांमध्ये ताप आढळून येतो. १% लोकांमध्ये मान व पाठ आखडणे, दुखणे अशी लक्षणे दिसतात. १% हून कमी रुग्णांमध्ये मात्र मज्जासंस्थेवर विषाणू आक्रमण करतो. याची परिणती एकतर श्वसन बंद पडून मृत्यू होण्यात किंवा हात पाय कायमस्वरूपी लुळे पडण्यामध्ये होते. पोलिओ हा गंभीर रोग असला तरी तो टाळणे सहज शक्य आहे. बाळाला जन्मल्यावर लगेच आणि त्यानंतर ते ६, १०,व १४ आठवडय़ांचे तसेच नंतर दीड वर्षांचे झाल्यावर पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन दोन थेंब पाजल्यास या रोगापासुन बाळाचे नक्कीच संरक्षण होऊ शकते. भारतात लसीकरणाचा कार्यक्रम प्रभावीपणे राबवला गेल्याने या रोगाचे प्रमाण अतिशय कमी झाले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने २००५ पर्यंत पोलियोचे जगातून निर्मूलन करण्यासाठी धडक कार्यक्रम हाती घेतला आहे. याला 'पल्स पोलिओ' असे म्हणतात. या कार्यक्रमाअंतर्गत विविध देशातील पाच वर्षांखालील बालकांना विशिष्ट दिवसांना पोलिओची लस दिली जाते. त्यामुळे सर्व बालकांच्या आतड्यांमध्ये लसीतील (रोग निर्माण करू न शकणारा) विषाणू प्रस्थापित होतो. साहजिकच रोगकारक विषाणूला राहण्यासाठी कोणत्याच बालकांचे आतडे मिळत नाही. परिणामी तो पर्यावरणात येतो व काही आठवड्यांनी नष्ट होतो. पल्स पोलिओ मोहीम यशस्वीपणे राबवली गेल्यास जगातून निर्मूलन होणारा देवी नंतरचा दुसरा रोग पोलिओ ठरेल यात शंका नाही. दुर्दैवाने काही व्यक्ती गैरसमजापोटी आपल्या बाळांना पोलिओची लस देण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे त्यांच्या बालकांना पोलिओ होण्याचा धोका निर्माण तर झालाच आहे पण पोलिओ निर्मूलनाच्या अभियानालाही खीळ बसत आहे. म्हणूनच अमिताभ बच्चन तसेच शाहरुख खान सारखे लोकप्रिय अभिनेते तसेच सचिन तेंडुलकरसारखे महान खेळाडू सर्व जनतेला पल्स पोलिओच्या दिवशी सर्व बालकांना 'दो बूंद जिंदगी के' देण्याचे टीव्हीवरून आवाहन करताना दिसत असतात ! *डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित* यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून मनोविकास प्रकाशन ०२० ६५२६२९५० *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" सर्वात अधिक संकटे घेऊन येणारा क्षण आपल्याबरोबर येणार्‍या संकटासोबत विजयश्रीही घेऊन येतो. "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *महाराष्ट्रात पादत्राणे बनविण्याचे प्रसिद्ध ठिकाण कोणते ?* कोल्हापूर 2) *पृथ्वी सूर्याच्या भोवती गोल फिरते हे प्रथम कोणी शोधून काढले ?* कोपर्निकस 3) *महाराष्ट्रात मालवणी ही भाषा प्रामुख्याने कोठे बोलली जाते ?* कोकण 4) *तेजस्विनी सावंत हे नाव कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे ?* नेमबाजी 5) *भारत आणि रशिया या दोन राष्ट्राच्या सहकार्याने विकसित करण्यात आलेल्या क्षेपणास्त्राचे नाव काय ?* ब्राह्मोस *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 विकास गणवीर, नागपूर 👤 साईनाथ कल्याणकर, येवती 👤 सूर्यकांत स्वामी 👤 राज डाकोरे 👤 संतोष रामराव शिंदे 👤 अशोक चिंचलोड, येवती, 👤 राजेश गटालावार 👤 राजू अलमोड 👤 योगेश पडोळे *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *शरीरातून जीव गेल्यानंतर कुठे असतो आपण ?  कुठल्या रूपात मागे उरतो आपण ? माझ्या घरात आज मी आहे.... उद्या मी नसेन....* *माझ्या जागी एक मिणमिणता दिवा असेल. दहा दिवसांनी तो दिवा विझेल. मग त्या जागी माझा एक फोटो असेल, लाकडी चौकट, कोरीव नक्षीकाम केलेला, हसरा चेहरा असलेला एक फोटो...* *काही दिवसांनी माझ्या लटकलेल्या फोटोवर साचलेली धूळ असेल... त्या फोटोची पातळ काच वेडीवाकडी तडकलेली असेल.. काही वर्षांनी माझा तो हसरा फोटो भिंतीवरच्या छिद्रातून खिळ्यासकट निखळलेला असेल... आणि मग त्यानंतर पिढ्यान्- पिढ्या माझ्याच घरात, माझ्या नावाचं फक्त उरलेलं एक छिद्र असेल.....!* *"आपलं रूपांतर अशा छिद्रात होण्यापूर्वी आपल्याला दानांत मिळालेल्या ह्या श्वासांच रूपांतर आपण 'सत्कर्माच्या सप्तरंगी उत्सवात' करायला काय हरकत आहे...?"*    ••●🌻‼ *रामकृष्णहरी* ‼🌻●••     🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃      *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*          📱 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो,* *ज्या लोकांना स्त्री ही उपभोगाची वस्तू* *आहे असे वाटते,ज्यांना ती अबला आहे,स्रियांचे हे काम नाही,* *बाईची बुद्धी हृदयात असते,अशा स्रियांना कमजोर* *समजणाऱ्या बंधुसाठी,आणि ज्या भगिनी स्वतःला स्त्री म्हणून कमजोर* *समजतात त्यांच्यासाठी वाचनात आलेला एक लेख* *पाठवतोय.* *Ad. दीपा चौदीकर यांची ही पोस्ट आहे.खरी गरज स्त्री-पुरुष या दोघांचेही विचार बदलण्याची आहे.* *घाट वळणातली वाघीण ....* . *आज वाघीण भेटली.... कोर्टातुन येत असताना माझ्या पुढे महींद्रा बोलेरो* *पिकअप होती... मला त्या* *गाडीला ओव्हरटेक करायचं होतं म्हणुन थोडं पुढे आले.. तेवढ्यात* *त्या बोलेरो मधुन ड्रायव्हींग सीटच्या बाजुने चक्क हातभर हिरव्या बांगड्यांचा हात* *बाहेर आलां ...... कुतुहलं वाटलं* *म्हणुन अजुन थोडी पुढे आले ....आणी त्या बोलेरोमध्ये नजर* *वळवली तर चक्क एक* *४०/४५ वर्षांची वाघीण महींद्रा पिकअप हाकत होती.....त्यांना* *सांगितलं काकु गाडी साईडला* *घ्या..... मग काय मॅडमनी ट्राफीक* *मधुन गाडी व्यवस्थित बाजुला घेतली.... त्या गाडीतून* *काॅन्फीडन्टली उतरल्या ..... नाव* *सांगितलं नकुसा म्हासाळ......या* *नकुसा काकु कवठेमंहकाळ* *तालुक्यातल्या एका खेडेगावातुन आहेत ज्या रोज कोकणात जातात* *स्वत: ड्राईव्ह करुन रत्नागिरी, लांजा , राजापुर या भागांत चार ते पाच टन भाजी घेऊन जातात* *तिथल्या बाजारात घालतात आणी हे काम त्या गेली वीस वर्ष करतायतं ....कोकणात ते पण* *घाटातुन रोजचा हा प्रवास......... कौतुक वाटलं .... आणी त्याही* *पेक्षा अभिमान जास्त वाटला या वाघीणीचा....कुठलही काम कमी* *दर्जाच कधीच नसतं आपण ज्या मेहनतीने ते करतो ती मेहनत ...... तो* *त्या कामाचा दर्जा वाढवतं* *असतं ......आज त्यांच्या गाडीत मागे* *लोखंडी सळ्या होत्या....म्हंटलं* *मग हे आज काय आहे गाडीत....तर म्हंटल्या गावाकडे बंगला बांधतेय मी त्याचचं सामान* *आहे हे घेऊन चाललीये गावाकडे....आमचीच गाडी* *आहे ही तेव्हा ड्रायव्हर ला पगार देण्यापेक्षा स्वत:च करते मी* *काम म्हणाल्या.......वीस वर्ष घाटवळणातून प्रवास चालुयं* *आयुष्याचा , कष्ट चालुय मग बंगला तो बनेगा ही भाई.....* *नकोशी मुलगी जन्माला आली म्हणुन आई वडीलानी कदाचित नकुसा नावं* *ठेवलं असावं, पण तीच्यात मला आजची सुपरवुमन* *दिसली....जिचं शिक्षण फक्त नववी पर्यंत झालंय पण तिचं कर्तृत्व बघून* *तिला आरटीओ ॲाफीसर नी मोफत लायसन्स काढून* *दिलं.........नकुसा काकू तुमच्या जिद्दीपुढे, तुमच्या* *कर्तुत्वापुढे , तुमच्या आत्मविश्वासापुढे मी खुप तोकडी वाटले मलाच......* *सलाम तुमच्या जिद्दीला आणि घाटवळणाच्या संघंर्षाला* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• पडलेल्या घराच्या भिंतीआत्मविश्वासाने आणि परिश्रमाने उभ्या करतायेतात नि घर उभे करता येते,परंतु चार माणसांची मने जर तुटली तर ती माणसं पुन्हा जोडणेआणि त्यांचे हृदयात घर करणे अतिशय अवघड आहे. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३ 🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जीवनातील तणाव दूर करणे.* एका शिक्षिकेने अर्धा भरलेला पाण्याचा ग्लास हातात धरला आणि सर्व विद्यार्थ्यांवर एक नजर टाकली. प्रत्येकाला वाटले की आता मॅडम विचारतील की हा ग्लास भरलेला आहे की रिकामा ? पण एक स्मित हास्य करुन मॅडमने प्रश्न केला, " या ग्लासचं वजन किती असेल कुणी सांगेल का ?" कुणी म्हणालं 100 ग्रॅम तर कुणी 200 ग्रॅम. एक जण तर म्हणाला - मॅडम, अर्धा किलो ! मॅडमने पुन्हा एकदा स्मितहास्य करुन बोलण्यास सुरुवात केली, " याचं वजन मोजमाप करुन सांगितल्याने फारसा फरक पडणार नाही !मुळात वजन काहिही असो, जर का मी हा ग्लास एक मिनीट असाच धरुन ठेवला तर मला काही त्रास होणार नाही. एक तास धरुन ठेवला तर हात दुखेल आणि दिवस भर असाच ठेवला तर . ? तर हात खुप जड होईल, ईतका की बधीर होउन निकामीच ह्वावा ... आपल्या आयुष्यातील तणाव अन् चिंतांच पण असंच असतं. क्षण भर विचार करा , काही वाटणार नाही. पण मनात धरुन बसाल तर ... तुमचं मन पण असंच जड होत होत बधिर होईल ! ईतकं की तुम्ही काही करुच शकणार नाहीत ! तेव्हा व्यर्थ चिंता करणं सोडा व कायम आनंदी रहा. मनाला हलकं करा आणि निरंतर अल्हाददायक जीवन जगायला शिका ... आयुष्य खुप सुंदर आहे .....! आयुष्य जगण्याच्या दोन पध्दती : १) जे आवडते ते मिळवायला शिका. २) जे मिळवले आहे तेच आवडून घ्यायला शिका. नेहमी इतरांशी स्वतःची तुलना करत बसू नका. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 04/12/2019 वार - बुधवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    *भारतीय नौसेना दिवस* 💥 ठळक घडामोडी :-  १८२९ - भारतीयांचा कट्टर विरोध असूनही लॉर्ड बेंटिंकने जाहीनामा काढून सतीच्या प्रथेला मदत करणार्‍यांना खूनी ठरवले जाईल असा कायदा केला. १९७१ - भारत-पाकिस्तान तिसरे युद्ध) - भारत आणि पाकिस्तानमधील परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून संयुक्त राष्ट्रांनी आणीबाणीची बैठक बोलवली. १९७१ - भारत-पाकिस्तान तिसरे युद्ध)-ऑपरेशन ट्रायडेंट - भारतीय आरमाराने कराचीवर हल्ला केला. 💥 जन्म :- १९१९ - इंद्रकुमार गुजराल, भारताचे पंतप्रधान. १९३२ - रोह तै-वू, दक्षिण कोरियाचा राष्ट्राध्यक्ष. १९४३ - फ्रान्सिस दिब्रिटो, कॅथॉलिक ख्रिस्ती फादर, मराठी लेखक. 💥 मृत्यू :-  १९७५ - हाना आरेंट, जर्मन तत्त्वज्ञ, लेखिका. १९८१ - ज.द. गोंधळेकर, मराठी चित्रकार. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *मुंबई : आम्ही कोणत्याही विकासकामांना स्थगिती दिलेली नाही. तसेच रद्द केलेली नाहीत. उलट ही कामे गतीने कशी पूर्ण होतील, याकडे आम्ही लक्ष देत आहोत, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. * ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मुंबई : दूरसंचार कंपन्यांकडून आता ५० टक्के शुल्कवाढ केली जाणार आहे. एअरटेल, व्होडाफोन-आयडिया कंपनीची कालपासून तर जिओची दरवाढ ६ डिसेंबरपासून* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करुन मोठया उत्साहात किल्ले प्रतापगडावर शिवप्रताप दिन साजरा करण्यात आला.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *श्रीनगर : पाकिस्तानने पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत जम्मू-काश्मीरच्या (Jammu Kashmir) पुंछ सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात दोन भारतीय नागरिक ठार झाले* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *काँग्रेसच्या प्रखर विरोधानंतरही लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही आवाजी मतदानाने सुरक्षा एसपीजी विधेयक मंजूर करण्यात आले. हे विधेयक मंजूर झाल्याने यापुढे केवळ विद्यमान पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबीयांनाच एसपीजी सुरक्षा मिळणार आहे आणि माजी पंतप्रधान तसेच त्यांच्या कुटुंबीयांना ही सुरक्षा मिळणार नाही, हे या नव्या विधेयकामुळे स्पष्ट होत आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *आगामी वर्षातील एक जून पासून एक राष्ट्र एक रेशन कार्ड ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतील महत्वाकांक्षी योजना लागू होणार आहे. यामुळे देशभरात कुठे ही स्वस्त धान्य उपलब्ध होणार आहे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *अर्जेन्टीनाचा स्टार फुटबॉलर लियोनेल मेसीने सहाव्यांदा पटकावला 'बॅलन डी'ओर पुरस्कार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••            *कळी उमलण्याआधी .......* https://storymirror.com/read/story/marathi/9fu28ady/klii-umlnnyaa-aadhii/detail कथावाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *लिंबू पाणी पिल्याने आम्लपित्त कमी होते का ?* 📙 जठरामध्ये हायड्रोक्लोरिक आम्ल तयार होत असते. या आम्लाचा अन्नपचनासाठी खूप उपयोग असतो. जठरातील पेशीमधून हे अाम्ल स्रवत असते. या आम्लाचे प्रमाण कमी झाले तर अजीर्ण होते. अन्नाचे पचन व्यवस्थित होत नाही. या उलट आम्लाचे प्रमाण जास्त झाल्यास आम्लपित्ताचा त्रास होतो. तोंडात आंबट पाणी येते. छातीत जळ जळ होते. पोटात जळजळ होते. जठराचा व्रणही होऊ शकतो. किंवा लहान आतडय़ांच्या पहिल्या भागात व्रण होतो. आम्ल पित्त असणाऱ्या लोकांनी तिखट, तेलकट, आंबट पदार्थ खाऊ नये असा सल्ला दिला जातो. कारण अशा गोष्टींनी आम्ल जास्त प्रमाणात तयार होते. साहजिकच आम्लपित्ताच्या व्यक्तीला अजूनच त्रास होईल. अशा व्यक्तीने खायचा सोडा घेतल्यास त्याची जळजळ कमी होते. कारण आम्लाचा प्रभाव अल्कली मुळे कमी होतो. जेल्युसील सारख्या गोळ्यांनीही रुग्णाला बरे वाटते. लिंबू पाणी पिल्याने आम्लपित्त कमी होते का याचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन पाहा. लिंबात देखील सौम्य असे एक अाम्लच असते. आम्लपित्त कमी होण्याची दोन स्पष्टीकरणे देता येईल. एक म्हणजे हायड्रोजन आयर्न असतील (H+) तर आम्ल निर्मितीची व स्त्रवणाची जठारातील पेशींची क्रिया मंदावते. दुसरे म्हणजे लिंबू आपण पाण्यात टाकूनच पितो. साहजिकच या पाण्यामुळे जठरातील आम्ल सौम्य होते. या दोन गोष्टींमुळे काही लोकांमध्ये लिंबू पाणी पिल्याने आम्लपित्त कमी होत असावे. *डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित* यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून मनोविकास प्रकाशन *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" चांगला स्वभाव हा गणितातल्या शून्यासारखा असतो, ज्याच्या सोबत असतो त्याची किंमत नेहमीच जास्त असते "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा केव्हा अस्तित्वात आला ?* 2 फेब्रुवारी 2007 2) *भारत जागतिक व्यापार संघटनेचा सदस्य कोणत्या वर्षी झाला ?* 1995 3) *अल्कोहोलमध्ये काय असते ?* कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन 4) *पहिली जागतिक वसुंधरा परिषद कोठे पार पडली ?* ब्राझील ( 1992 ) 5) *अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर दहशतवादी हल्ला केव्हा झाला ?* 11 सप्टेंबर 2001 *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 उमाकांत शिंदे, नांदेड 👤 बबन साखरे 👤 शेख आलीम 👤 वैशाली बाळासाहेब भामरे *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *स्वत:वर खुश असणा-यांना लोक खूप घाबरतात. त्यांना या लोकांबद्दल खूप आसूया वाटते. सर्वसामान्य माणसे जगात सर्वाधिक नाराज जर कोणावर असतील, तर ती स्वत:वरच असतात. त्यांच्या हातुन चुका होतात. कधी कधी तर त्याच त्याच चुका परत परत होतात. नियतीचे फासे सततच असे पडत राहतात, की सारखेच हस्यास्पद व्हायची वेळ यावी. इतरांच्या हातात कायम राजे, एक्के आणि यांच्या हातात दुर्री-तिर्री, हे तर नेहमीचेच. यांनी चुका सुधारायच्या ठरविल्या तरी पटापट यांना त्या सुधारता येत नाही. त्याच त्याच बाॅलवर परत परत विकेट जात राहते.* *काय केले म्हणजे आपल्याला प्रतिष्ठा मिळेल ? लोक आपल्याला महत्वाचे आणि सन्माननीय समजतील? याचा विचार करण्यात यांचे तासन् तास जातात. तरीही त्यांना असाच निष्कर्ष काढावा लागतो, की अजून आपल्याला खूपच मेहनत करावी लागेल. आणि मग स्वत:ला दोष देत, स्वत:ला सुधारण्याचा पुन:पुन्हा प्रयत्न करत ते जगत राहतात. अशा खचलेल्या आणि जगाच्या गणितात हुकलेल्या लोकांनी सगळा परिसर भरलेला असताना जर एखादा नखशिखांत स्वत:वर खुश असेल तर जगाला त्रास होणारच.*  *"परंतु जो स्वत:वर प्रेम करीत नाही त्याच्यावर जग प्रेम करीत नाही."*    ••●⚜‼ *रामकृष्णहरी* ‼⚜●••      🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀        *संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*          📱 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो,* *जिच्या उदरातून मानवी देह मिळाला त्या नारीचा सन्मान हा फक्त दिखाऊ* *पणा असल्याची चर्चा सुरू झाली.टी. व्ही.,वर्तमानपत्र, चौका-चौकात,राजकीय,सामाजिक* *बांधिलकी म्हणून सगळ्यांच्या गप्पा रंगतील, सगळे वेगवेगळ्या* *शिक्षा सुचवतील. न्यायालयात याचिका दाखल करण्यात येईल.* *खटला कोपर्डी सारखा 7,8 वर्षे चालेल.सगळे थोड्याच दिवसात विसरून जातात.* *पण कोपर्डीची र्निर्भया,हैद्राबादची डॉ.प्रियांका रेड्डी,उल्लासनगरची रिंकू पाटील,अंजना जाधव अशा अनेक* *निर्भया परत येतील का?* *पुन्हा असे कृत्य घडणार नाही असा न्याय कुणी देईल का?* *त्यांच्या कुटूंबाच्या मनातील दडलेल्या ,आक्रोश करणाऱ्या* *मुलीला कुणी बाहेर काढले का?* *हो हे घडू शकते ,पण त्यासाठी पुन्हा महातम्यांनाच अवतार घ्यावा लागेल.* *कारण आताच्या समाजातील मनात ,मनगटात,मेंदूत ना शिवाजी* *महाराज आहे ना कुणी कृष्ण.* *गीतेतील श्रीकृष्ण द्रौपदीला कौरावांपासून वाचवितो,वस्त्रहरण* *थांबवितो. महावीर वर्धमान इंद्रियांवर विजय मिळवून जितेंद्रिय बनवून* *दाखवितात.अशोकवनात सीता एकटी राहूनही रावण तिला* *स्पर्श करीत नाही.शिवाजी महाराजांच्या* *काळात कल्याणच्या सुभेदाराची सून पळवून आल्यावर* *महाराजांनी तिला आईची उपमा देऊन सत्कार* *केला.* *राज्यातील लेकीबाळीवर हात टाकणाऱ्या रांजाच्या पाटलाचे हात* *कलम केले.* *महात्मा गांधींच्या अंथरुणात सुंदर तरुणींना झोपविले होते तरीही त्यांनी आपले ब्रम्हचर्य व्रत समाजाला पटवून* *दिले,त्यापासून तसूभरही हालले नाहीत.* *स्वामी विवेकानंदांनी त्यांच्या स्वागतासाठी सर्वात सुंदर वेश्या आणली आहे हे समजताच कार्यक्रम* *त्याग केला व सामीलही झाले पण स्वतःचे चारित्र्य सिद्ध करून दाखविले.* *लुधियाना येथील कर्तारसिंह सराबा दरडेखोर गणला गेला पण त्याच्या मुलुखात एखाद्या आई-बहिणीकडे* *कुणाची वाकडी नजर गेली तर तो गोळ्या घालून जागीच यम दाखयायचा.* *आज खऱ्या अर्थाने या भावांची गरज आहे.ही सर्व परिस्थिती बदलायची असेल तर पुन्हा आपल्यातूनच या* *महापुरूषांचा अवतार धारण करावा लागेल.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• प्रत्येकाच्या जीवनात निराशा ही सवतीसारखी नेहमी मनाला छळत असते.ती सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने मनाला विचलीत करते.अशा स्थितीतून तिला हद्दपार करण्यासाठी काही ना काहीतरी करण्यासाठी तो आशेकडे धावतो आणि त्यातुन सुटका करून घेतो.अर्थात जीवनात निराशेने घर केले तर नक्कीच आशेचा शोध घेऊन निराशेला बाजूला सारतो आणि जीवन निराशेतून मुक्त करतो.निराशा जरी जीवनात आली तरी घाबरायचे नाही तिला हिमतीने तोंड देत आशेचा शोध घ्यायला शिकले पाहिजे आणि त्यादृष्टीने प्रयत्न केले पाहिजे.हीच आपल्या जीवनाची खरी परीक्षा आहे. © व्यंकटेश काटकर,नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🥗🥙🥗🥙🥗🥙🥗🥙🥗🥙 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *हेतल चा अनुभव* हेतल दुपारी शाळेतून घरी आली. घराला कुलूप होते. कारण तिचे आई बाबा लग्नाला गेले होते. तिने कुलूप उघडले व घरात आली. खिडक्या उघडल्या. गणवेश बदलला. ती हात पाय धुऊन खाऊ शोधु लागली. अचानक जोरदार पाऊस पडू लागला. तिने पटापट दारे खिडक्या बंद केल्या. तिचे लक्ष घड्याळ कडे गेले. बराच उशीर झाला आहे, असे म्हणून ती जवळच्या खुर्चीत बसली. तिला हळूहळू पावसाचे गाणे आठवू लागले. ती हळूहळू गुणगुणू लागली. आता पावसाचा आवाज कमी झाला व तिने खिडक्या उघडल्या. तरीपण रिमझिम रिमझिम पाऊस पडत होता. हळूहळू पाऊस थांबला. पानाआड लपलेले पक्षी बाहेर आले व त्यांनी आपल्या पंखाना झटकले. बाहेर लख्ख ऊन पडले. बाहेर कसं स्वच्छ सुंदर वाटत होते. आता संध्याकाळ झाली. दारावरची बेल वाजली +डिंग डाँग) आई आली असे म्हणतात हेतल पळत दाराकडे गेली. तिने दार उघडले. आणि आईबाबा तिचा समोर उभे होते. इतक्यावेळ कंटाळलेली हेतल आईला जाऊन बिलगली. हाच होता तिचा अनुभव. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

*आमची शाळा आमचे उपक्रम* 🌸🌸🌸🌸🌸🌸 *उपक्रम क्रमांक (१) 🌹बालसभा🌹* 🌻🌻🌻🌻🌻🌻 आज दि.०२-१२-२०१९ रोजी आमच्या जि.प.प्रा.शा.गोजेगाव शाळेत बालसभा हा उपक्रम घेण्यात आला. *विषयः १)प्लॅस्टिकमुक्ती, आणि २)बेटी बचाओ, बेटी पढाओ* 👉विद्यार्थ्यांनी प्लास्टिक मुक्ती साठी पथनाट्याचे सादरीकरण,तसेच विविध संदेश घोषणा आणि माहिती सांगितले.तसेच अभिनय गीत सादरीकरण करून जनजागृती केली. 👉 मुलींनी 'बेटी बचाओ,बेटी पढाओ' याविषयी माहिती सांगितले व गीत सादरीकरण करून जनजागृती केली. 👨‍👨‍👧‍👦 👨‍👨‍👧‍👦👨‍👨‍👧‍👦👨‍👨‍👧‍👦👨‍👨‍👧‍👦👨‍👨‍👧‍👦 *उपक्रम क्रमांक (२)* *वाढदिवस* 💐🎂💐🎂💐🎂💐 आज वर्ग पाचवीतील कु.मिनाक्षी, कु.तनुजा ह्या दोघींचा वाढदिवस नेहमीप्रमाणे शाळेच्यावतीने पुष्पगुच्छ व पेन देऊन साजरा करण्यात आला. 👉 शेवटी सर्वांना गोड खाऊ वाटप करून बालसभा आटोपली. *बालसभेची काही क्षणचिञे..*👇👇 〰〰〰〰〰〰〰 ✍शब्दांकन श्रीमती प्रमिला सेनकुडे. 〰〰〰〰〰〰

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 03/12/2019 वार - मंगळवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *जागतिक विकलांग दिवस* 💥 ठळक घडामोडी :-  १९७१ - पाकिस्तानने भारतावर हल्ला केला. २००९ - सोमालियाची राजधानी मोगादिशूमधील आत्मघातकी बॉम्बहल्ल्यात तीन मंत्र्यांसह २५ ठार. 💥 जन्म :- १८८४ - डॉ. राजेंद्र प्रसाद, स्वतंत्र भारताचे प्रथम राष्ट्रपती. १९५८ - रिचर्ड रीड, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू. १९६३ - ऍशली डिसिल्व्हा, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू. १९७४ - चार्ल विलोबी, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :-  ११५४ - पोप अनास्तासियस चौथा. १७६५ - लॉर्ड जॉन फिलिप सॅकव्हिल, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. १९१२ - प्रुदेन्ते होजे दि मोरे बारोस, ब्राझिलचा राष्ट्राध्यक्ष. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार रिफायनरी प्रकल्पाविरोधात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. उद्धव ठाकरे यांचा दोन दिवसातील हा दुसरा मोठा निर्णय आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *नवी दिल्ली : पीएमसी बँक खातेदारांपैकी जवळपास ७८ टक्के खातेधारकांना त्यांच्या खात्यातले सर्व पैसे काढायची मुभा देण्यात आली असल्याची माहिती, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी लोकसभेत दिली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *महापोर्टल परीक्षेचा पुण्यात फज्जा, वीज गेल्याने केंद्रावर गोंधळ, वर्ग तीन आणि वर्ग चार पदांच्या भरतीत पारदर्शकता यावी म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2017 मध्ये 'महापोर्टल' सुरु केलं होतं. परंतु वाढीव फी आणि भोंगळ कारभार यामुळे महापोर्टल बंद करण्याची मागणी विद्यार्थी करत आहेत.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *मुंबई : वेतनवाढ आणि विविध मागण्यांवरून एसटी महामंडळाचे कर्मचारी सध्या नाराज आहेत. नव्या सरकारच्या कार्यकाळात एसटी महामंडळाला चांगले दिवस येतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करा अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एसटी कर्मचारी करणार आहेत* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *कोल्हापूर-मुंबई विमानसेवा ७ डिसेंबर ते २७ डिसेंबर दरम्यान बंद राहणार आहे. मुंबई विमानतळावरील धावपट्टीच्या कामाचा परिणाम कोल्हापूर-मुंबई मार्गावरील विमानसेवेवर झालाय. २८ डिसेंबरपासून ही सेवा पूर्ववत केली जाणार असल्याची माहिती ट्रू जेट विमान कंपनीच्यावतीने देण्यात आली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *आंतरराष्ट्रीय टी २० क्रिकेटमध्ये नेपाळच्या अंजली चंद हिने मालदीव्स या संघाविरोधात खेळताना एकही धाव न देता एकूण सहा बळी घेण्याची ऐतिहासिक कामगिरी केली, पुरूष आणि महिला अशा दोन्ही प्रकारच्या टी २० क्रिकेट कारकिर्दीत मिळून सर्वोत्तम कामगिरी ठरली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *अ‍ॅडलेडच्या कसोटी सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानवर १ डाव आणि ४८ धावांनी विजय मिळवत मालिकेत २-० असं निर्भेळ यश संपादन केलं.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••     *सरकारी शाळा बंद करण्याचा घाट * कमी गुणवत्तेमुळे पटसंख्या खालावल्याने सरकारने राज्यातील तेराशे शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याची बातमी वाचण्यात आली आणि शैक्षणिक क्षेत्रात उलटसुलट चर्चेला सुरुवात झाली. राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक सुनिल चौहान यांनी जिल्हा ......... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/12/blog-post.html         लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *रस्त्यांवर फेकलेल्या लिंबू मिरच्यांवर पाय पडला तर काय होते ?* 📙 शाळेत जाताना सकाळच्या वेळी रस्त्यांवर अनेक दुकानांच्या समोर लिंबू मिरच्यांच्या माळा फेकलेल्या तुम्ही पाहिल्या असतील. आई व वडिलांनी या लिंबू मिरच्यांवर पाय देऊ नकोस त्यांना ओलांडून जाऊ नकोस असही तुम्हाला बजावून सांगितले असेल. त्यामुळे तुम्ही त्यापासून दूर राहण्याचा नक्कीच प्रयत्न करत असाल. पण जर लिंबू मिरच्यांवर पाय पडला तर काय होईल हा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल. कोणाची वाईट नजर लागू नये आणि दुष्ट शक्तींपासून संरक्षण व्हावे या समजापायी दुकानदार दुकानांवर लिंबू मिरच्या, काळ्या बाहुल्या टांगून ठेवत असतात. दुसऱ्या दिवशी ते लिंबू मिरची रस्त्यावर फेकून देतात. दिवसभरात त्या लिंबू मिरच्यांमध्ये अनेक दुष्ट शक्तींचा प्रभाव जमा झाल्याविषयी विश्वास ठेवणाऱ्यांना खात्री वाटत असते ! खरे तर जगात भूते खेते नसतात. दुकानदारांना खरी भीती चोरांची, आगीची वैगरे असते. नुकसान टाळण्यासाठी सुरक्षा रक्षक वा आग प्रतिबंधक यंत्रणा या कामाला येतील का टांगलेल्या लिंबू मिरच्यांच्या माळा ? याचे उत्तर अगदी शेंबडा मुलगाही सांगू शकेल. पण तरीही चांगले शिकले सवरलेले लोक अशा अंधश्रद्धांना बळी पडून लिंबू मिरच्यांवर नाहक खर्च करत असतात. देशातील लाखो दुकानांवर दररोज लाखो लिंबे व करोडो मिरच्या टांगल्या जातात व दुसऱ्या दिवशी त्या फेकून दिल्या जातात. यात केवढे मोठे राष्ट्रीय नुकसान आहे याचा विचार सर्वांनी करायला हवा. लिंबू मिरच्यांचे वास्तव तुम्हाला कळले. आता निदान तुमच्या व तुमच्या नातेवाईकांच्या दुकानांवर लिंबू मिरच्यांच्या माळा दिसणार नाहीत आणि त्यावर पाय पडला तरी तुम्ही घाबरणार नाही याची मला खात्री वाटते. *डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित* यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून मनोविकास प्रकाशन ०२० ६५२६२९५० *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" शब्द खोटं बोलू शकतात, मात्र कृती नेहमीच सत्य बोलते "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री कोण आहेत ?* उद्धव ठाकरे 2) *महाराष्ट्र विधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष कोण आहेत ?* नाना पटोले 3) *महाराष्ट्र विधानसभेचे नवनिर्वाचित विरोधी पक्षनेते कोण आहेत ?* देवेंद्र फडणवीस 4) *महाराष्ट्र विधानसभेचे एकूण सदस्य किती आहेत ?* 288 5) *जागतिक दिव्यांग दिन केव्हा साजरा केला जातो ?* 3 डिसेंबर *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 साईप्रसाद पुलकंठवार, धर्माबाद 👤 रघुनाथ टेकुलवार, करखेली 👤 शिवाजी कल्याणकर 👤 सौ. अनुराधा श्यामसुंदर माडेवार 👤 विरेश रोंटे 👤 श्रेयस दिलीप धामणे 👤 पांडुरंग तम्मलवाड *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *"एका चांगल्या गोष्टीबरोबर दुसरी वाईट गोष्ट सोबतच असते. माणूस विद्वान तर आहे, पण त्याला धन आणि मानाची अपेक्षा असेल तर? ही अपेक्षाच त्याचा नाश करत असते, ही सिद्ध झालेली गोष्ट आहे." अपेक्षेसोबत अपेक्षाभंग असतो, हे पटवून देण्यासाठी प्रमाणाची आवश्यकता नाही. "आपण ज्या ज्या इच्छा करतो, जेवढ्या अपेक्षा बाळगतो त्या सर्वच्या सर्वच पूर्ण कशा होऊ शकतील? पण माणूस हे समजून घेत नाही. हे पाहिजे, ते पाहिजे या आणि अशा अनेक वासना माणसाला शेवटी भीक मागायला लावत असतात." हव्यासापोटी भिकेला लागण्याची वेळ आली तरी माणूस शहाणा होत नाही.* *जुगारात मिळण्याची अपेक्षा सर्व घालवून बसते. राज्यच काय पण बायकोला सुद्धा 'डावात' हरून बसल्याची साक्ष महाभारतासारखे ग्रंथ देतात. संत तुकाराम आपल्याला शहाणं करण्याचा प्रयत्न करत आहेत. इच्छेतून अपमानित होण्याची वेळ येणार नाही ही काळजी घेतलीच पाहिजे. "एखाद्या गाढवाचं 'राजहंस' असं अलंकारीक नाव जरी ठेवलं, तरी त्या नावाचं त्या गाढवाला काय भूषण वाटणार आहे?" गाढवाची राजहंस नाव ठेवण्याइतकीसुद्धा पात्रता नसते आणि त्याला त्याचं भूषणही वाटत नसतं.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 💥💥💥💥💥💥💥💥💥 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल- 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो,* *कोपर्डी घटनेनंतर, देशात पुन्हा एकदा विकृत मनोवृत्तीचे विद्रुप दर्शन डॉ.रेड्डी या तरुण युवतीच्या खुनाने* *दाखविले.* *ही सुप्त मनाची विकृत ताकद असते तिला घालवायचे असेल तर सकारात्मक मन तयार करणे गरजेचे आहे.याची ताकद खूप प्रचंड आहे.* *यासाठी काही उदाहरणे बघूया.* *सोलोमन बेटावर आदिवासी जमातीचे वास्तव्य आहे. ते आदिवासी लोक प्रथेनुसार झाडे तोडणे अपशकुनी* *समजतात.* *एखादे झाड तोडायचे असेल तर एकत्र येऊन दररोज झाडाभोवती वर्तुळाकार तास न तास बसून झाडाला नकरात्मक लहरींनी घायाळ* *करतात. आश्चर्याचा भाग* *म्हणजे काही आठवड्यात ते झाड शुष्क होऊन उन्मळून पडते.* *हे उदाहरण कोणालाही पचनी पडणे अवघड आहे.* *तेअविश्वसनीय वाटणे स्वाभाविक आहे. अदृश्य, न दिसणारे,* *नकारात्मक मन, चिन्तन करणारे विचार, एका झाडाचे* *अस्तित्व नष्ट करू शकतात का?* *तुम्हाला जर ब्रुस लिप्टनचे पुस्तक The Biology of Belief वाचण्याची संधी मिळाली तर तुम्ही* *सोलोमन बेटावरील गोष्टच नव्हे तर तुम्ही तुमच्याबद्दल आणि ज्याच्यावर प्रेम करतात त्याच्या* *विषयी नकारात्मक बोलण्यावेळी हजार वेळेस विचार कराल.* *लिप्टन यांनी या पुस्तकात जागृत (conscious) आणि सुप्त मनाच्या* ( *subconscious mind) ताकदीवर विस्तृत विवेचन* *केले आहे.* *सुप्त मनाची ताकद ही जागृत मनाच्या ताकदीपेक्षा दशलक्ष पटीने जास्त असते.* *दैनंदिन जीवनात सुप्त मनाचा नकळत प्रचंड प्रभाव असतो.* *पुष्कळ वेळा आपण आपल्या वाईट सवयी अथक प्रयत्न आणि इच्छाशक्ति असताना सुद्धा सोडू* *शकत नाही. त्याचे मुख्य कारण ह्या वाईट सवयी सुप्त मनामध्ये प्रभावीपणे प्रोग्राम केल्या जातात* *आणि ते आपले सर्व प्रयत्न निष्क्रिय करतात.* *जागृत मन (Conscious mind) ही सुप्त मनाची (Subconscious)* *केवळ सावली असते.* *सोलोमन बेटावरील आदिवासी हे प्रभावीपणे नकारात्मक लहरींनी झाडाच्या संवेदनेवर आघात करतात.* *झाडांना संवेदना असतात हे ही तितकेच खरे आहे.* *काही दिवसांनी त्या आघाताने त्या संवेदना झाडाच्या एक अंगीभूत भाग होऊन जातात आणि त्यामुळे* *झाडाची अणुरचना ढासळते. झाड आतूनच मरणासन्न होते.* *त्या पुस्तकात जागृत पालकत्वावर स्वतंत्र प्रकरण आहे.* *त्यात मुलावर सतत नकारात्मक बोलण्यामुळे, त्याच्या जडणघडणीवर विपरीत परिणाम होतात.* *याउलट सकारात्मक विचार, मुलाचे जीवनात उपयुक्त पडतात.* *तेच तेच सारखं बोलत राहणे सुप्त मनावर पगडा करते आणि तसेच घडत जाते याची प्रचिती दिसून येतेच.* *म्हणूनच रोज असे म्हणा_* " *मी सुखी आहे,* *मी सर्व गुणसंपन्न आहे,* *माझ्याकडे भरपूर पैसा, उत्तम* *आरोग्य, उत्तम नाती, उच्चकोटीचा* *समाज, असे सर्वांगीण सुख समृद्धीने परिपुर्ण* *जीवन मी जगत आहे.* *जे होत आहे आणि होणार आहे ते सर्व चांगलेच होणार आहे!"* *नेहमी असेच विचार मनात सतत असू द्या.* *हाच आपल्या सगळ्यांसाठी समृद्ध जीवनाचा कानमंत्र आहे !* *LAW OF ATTRACTION* *नुसार *आपन जे पॉझिटिव्ह किंवा negative विचार करतो.. त्या त्या* *गोष्टी आपण विचार मार्फत आपल्याकडे आकर्षित करत* *असतो.*चांगला विचार करा,समाजात रुजवा,विकृत मनोवृत्तीला थारा देऊ नका.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• प्रत्येकजण आपल्या जीवनाच्या चित्रशाळेत स्वत:चे एक सुंदर जीवनाचे चित्र काढून रंगवण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतो.जीवनाच्या चित्राचा आकार कसाही असला तरी त्यात रंग मात्र आपल्या कल्पक बुध्दीने भरण्याचा प्रयत्न करतो.त्यात असणारे रंग जरी वेगवेगळे असले तरी भरण्याचे कौशल्य ज्याला आहे तो आपल्या वेगळ्या पद्धतीने,कलेने भरुन जीवनाला आकर्षक बनवण्याचा प्रयत्न करतो.ज्याला ही कला अवगत झाली नाही त्याच्या जीवनचित्रात रंगही भरता येत नसल्यामुळे जीवनचित्र रंगहिन व आकारहिन बनते.म्हणून जीवनाच्या जीवनचित्रशाळेत यशस्वी व्हायचे असेल,जीवनाला रंगरुप आकार द्यायचा असेल तर आपल्यातील कल्पकतेला,कौशल्याला आणि नवनिर्माण शिलतेला जागृत ठेवून जीवन सुंदर आणि आनंददायी निर्माण करायला शिकले पाहिजे.त्यातून स्वत:ला आणि इतरांना जगण्यासाठी एक नाविण्यपूर्ण कला अवगत होईल आणि आनंदाने जीवन जगण्यासाठी प्रेरणा मिळेल यात शंकाच नाही. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🌱🎨🌱🎨🌱🎨🌱🎨🌱 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *लाख मोलाचा देह* एक भिकारी भीक मागता मागता एका श्रीमंत व्यापार्‍याच्या वाडयासमोर उभा राहून भीक मागू लागला. मालकाने सेवकाला त्याला वर बोलावयाला सांगितले. सेवक बोलवायला आलेला पाहून भिकार्‍याला खूप आनंद झाला. त्याच्या मनांत आशा निर्माण झाली की, वर बोलावलं म्हणजे बरच काही देणार असेल. वर गेल्यावर व्यापारी म्हणाला, 'हे बघ तुला मी पाचशे रूपये देतो पण त्याबद्दल देतो पण त्याबद्दल तु मला तुझे डोळे दे' 'छे ! छे ! हे कसं शक्य आहे ? डोळे दिले तर मी काहींच करू शकणार नाही.' भिकारी म्हणाला. 'बरं मग असं कर हात तरी देतोस कां?' व्यापारी म्हणाला. अशाप्रकारे व्यापारी प्रत्येक अवयवाची किंमत वाढवत होता पण भिकारी एकही अवयव द्यायला तयार नव्हता. व्यापारी म्हणाला 'बघ ५००-५०० रूपये म्हटले तरी तुझ्या देहाची किंमत लाखाच्यावर झाली. एवढा लाख मोलाचा धडधाकट देह असतांना भीक कां मागतोस ? कष्ट कर पैसे मिळवं'. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 02/12/2019 वार - सोमवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• राष्ट्र दिन - संयुक्त अरब अमीराती, ब्रिटनपासून स्वातंत्र्य. राष्ट्र दिन - लाओस. 💥 ठळक घडामोडी :-  १९८८ - बेनझीर भुट्टो पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी. १९८९ - भारताच्या पंतप्रधानपदी विश्वनाथ प्रताप सिंग यांचा शपथविधी. 💥 जन्म :- १९३३ - के. वीरमणी, द्रविड मुनेत्र कळघम नेता. १९३७ - मनोहर जोशी, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष. १९४७ - धीरज परसाणा, भारतीय क्रिकेट खेळाडू. १९७२ - सुजीत सोमसुंदर, भारतीय क्रिकेट खेळाडू. १९७९ - अब्दुल रझाक, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :-  १९८० - चौधरी मुहम्मद अली, पाकिस्तानचा पंतप्रधान. १९९३ - पाब्लो एस्कोबार, कोलंबियाचा मादकद्रव्य व्यापारी. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *सातबारा नुसता कोरा करायचा नाही तर शेतकऱ्यांना चिंतामुक्त करायचं आहे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मुंबई आयआयटीच्या प्लेसमेंट सिजनला झाली सुरवात, प्लेसमेंटच्या पहिल्या स्लॉटमध्ये एकूण आंतराष्ट्रीय आणि देशांतर्गत अशा 18 कंपन्या सहभागी होत्या. यामध्ये सर्वाधिक प्लेसमेंट ही मायक्रोसॉफ्ट कंपनीकडून मिळाली असून वार्षिक 1 कोटी 17 लाखांची प्लेसमेंट देण्यात आली आहे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *नाना पटोले यांची विधानसभा अध्यक्षपदी निवडीची घोषणा, पदभार स्वीकारला, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं अभिनंदन आणि स्वागत* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *महाराष्ट्राचं कुलदैवत तुळजाभवानीच्या तिजोरीवर डल्ला, माणिक, दागिने आणि पुरातन नाणी गायब, चौकशी समितीच्या पाहणीनंतर वास्तव उजेडात* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *सरकारी नोकरभरतीसाठी सुरु करण्यात आलेले 'महापोर्टल' बंद करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *औषधांची ऑनलाईन विक्री करणाऱ्या ई-फार्मसी फ्लॅटफॉर्म आता स्वतःकडे औषध जमा करू शकणार नाहीत. छोटे व्यापारी आणि विक्रेत्यांबरोबर भागीदारी करून औषध ग्राहकांपर्यंत पोहचवली जातील. यासाठी आरोग्य मंत्रालयाने ई-फॉर्मसी नियमांमध्ये बदल केले आहेत* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण बैठक मुंबईमध्ये पार पडली. या बैठकीत लोढा कमेटीच्या शिफारसीमध्ये बदल करण्यास मंजूरी देण्यात आली आहे. उच्च पदांवरील अधिकाऱ्यांचा कार्यकाळ वाढवण्यात यावे यासाठी हे बदल करण्यात आले आहेत. हा प्रस्ताव सर्वोच्च न्यायालयाकडे पाठवण्यात आला असून, यास मंजूरी मिळाल्यास बीसीसीआयचे अध्यक्ष सौवर गांगुली यांचा कार्यकाळ वाढवला जावू शकतो.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *बलात्काराचे वाढते प्रमाण कधी थांबणार ?*     http://nasayeotikar.blogspot.com/2018/04/blog-post_15.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *काही मुलांना जन्मानंतर इन्क्युबेटरमध्ये (पेटी) का ठेवतात ?* 📙 काही महिलांना सातव्या महिन्यातच मूल होते. अशी मुले साहजिकच वजनाने कमी असतात. त्यांच्या शरीराची वाढही सामान्य नवजात बालकांपेक्षा कमीच असते. श्वसन व रक्ताभिसरण ही दोन महत्त्वाची कार्ये मात्र ते बालक करू शकते. बालकाला शरीराचे तापमान ठराविक पातळीवर राखण्याचे कार्यही करावे लागते. तसेच जंतूंपासून स्वतःचा बचावही करावा लागतो. ही शेवटची दोन कार्य करणे मात्र सातव्या महिन्यात जन्मलेल्या वजन अत्यंत कमी असलेल्या बाळासाठी खूप अवघड असते. त्यामुळे अशा मुलांना इनक्युबेटरमध्ये विशेष कक्षात ठेवले जाते. इनक्युबेटर ही काचेचे झाकण असलेली एक चौकोनी पेटी असते. यात तापमान शरीराच्या तापमानाशी मिळते जुळते (सुमारे ३७' सेंटिग्रेड) असे ठेवलेले असते. हवेतील रोगजंतूंचाही नायनाट करण्यात आलेला असतो. त्यामुळे असे बाळ, जे इन्क्युबेटर नसल्यास जंतूसंसर्गाने व तापमानाचे नियंत्रण न करता आल्याने मरण पावले असते, ते वाचू शकते. असे हे इनक्युबेटर जणू बालकांसाठी वरदानच होय. *डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित* यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून मनोविकास प्रकाशन ०२० ६५२६२९५० *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा; ज्ञानाचा प्रकाश कुठुन कधी येईल सांगता येत नाही "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *'जागतिक एड्स दिन' कधी साजरा केला जातो ?* 1 डिसेंबर 2) *भारतातील पिकांचे साधारणपणे किती हंगाम असतात ?* 2 3) *इंदिरा गांधी निराधार योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांचे किमान वय किती असावे लागते ?* 65 वर्षे 4) *महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये ग्रामीण लोकसंख्येचे प्रमाण सर्वाधिक आहे ?* अहमदनगर 5) *भारतामध्ये नद्यांचे प्रदूषण रोखण्याचे काम कोणती संस्था करते ?* केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 संजय डाड, नांदेड 👤 सुरज पाटील रोशनगावकर 👤 अभि मामीडवार 👤 वैशाली गर्जेपालवे, सहशिक्षिका 👤 श्रीनिवास अवधुतवार, धर्माबाद 👤 जयानंद मठपती 👤 सूर्यकांत तोकलवाड 👤 शरद पवार, सहशिक्षक 👤 धनराज राखेवार, नांदेड 👤 संतोषकुमार राठोड 👤 दत्ता मुपडे 👤 कोमल पाटील 👤 आदित्य बालाजी धात्रक 👤 शिवराज दासरवार *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आज समाजात खलनायकी आणि नालायकीचे कौतुक, समर्थन केले जाते. दुर्दैवाने आज समाजाची अवस्था अशी झालीय की, लायक नायकांपेक्षा नालायक आणि खलनायकी वृत्तीचे नायक, नेतृत्व आणि वारस निपजत आहेत, पुढे येत आहेत. काळही लायकाला नालायक आणि नालायक खलनायकाला नायक ठरवतोय. ही शोकांतिका सारे गपगुमान बघत आहेत. 'एकेकाळी गुणवत्तेची कदर होती. आता फक्त दर आहेत'. पण गोष्ट फक्त दर आणि कदरपर्यंत राहिली नाहीय, तर पाणी घरात शिरलयं. पदर आणि चादरीपर्यंत आलयं. आम्ही मात्र काही माहितच नाही, असे सोंग पांघरून बसलोय.* *आपण रोजच वर्तमानकाळाचे चरित्र वाचतो. बलात्कार, लैंगिक शोषण, विनयभंग , गैरप्रकार हे आता कायदेशीरच ठरतायत की काय अशी स्थिती आहे. नोकरी, पदव्या, पुरस्कारापर्यंत नको नको ते बघायला मिळतयं. या सा-या खलनायकांना नायक म्हणून, लायक म्हणून नालायक पाठीराखेच पुढे आणतात. ज्यातून या सा-यांची हिमंत दिवसेदिवस वाढते आहे. ज्याला रोजच्या भाषेत बाई, बाटली आणि पैशाची पूजा करणारी व्यवस्था म्हटले जाते. गोष्ट सुन्न करणारी आहे पण वास्तव आहे. 'आपण काहीच करू शकत नाही,' असे म्हणू लागलो आहोत.... हे आपण होऊन स्विकारलेलं षंढत्व😌 सर्वत्र निपजतयं जे समाजाचा घात करणारे आहे..?..?..?* ••●★‼ *रामकृष्णहरी* ‼★●••     🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻     *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*          📱 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो* *जगामध्ये जेवढी गर्दी वाढत आहे तेवढेच लोक एकटे पडत चालले आहेत . कोणीही कोणाच्या जवळ नाही हीच मोठी समस्या आहे . म्हणून जगण्यात पौर्णिमा कमी आणि अमावस्या जास्त आहे.......* *मी मोठा आणि तू छोटा बस हा एकच विचार माणसाला माणूस बनवून देत नसते . माणसं जोडण्यासाठी धनाची नाही तर चांगल्या☘ मनाची गरज असते . परंतु जेथे अहंकार आहे तेथे प्रेमही नाही आणि ज्ञानही नाही ..* *रोज कितीही चांगले शब्द वाचा परंतु जो पर्यंत तुम्ही ते आचरणात आणणार नाही तो पर्यंत काहीही फायदा नाही . ज्ञानाला अर्थ कृती मुळे प्राप्त होतो . कृती नाहीतर ज्ञानाला अर्थ नाही ......* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• सर्वसामान्य माणसाच्या जीवनात मागचे दिवस आठवले की,अंगावर रोमांच उभे राहतात आणि भूतकाळ जसा एखाद्या चित्रपटातील क्रमाक्रमाने प्रसंग आठवायला लागतात.असे प्रसंग पुन्हा आपल्यासमोर उभे राहू नये म्हणून तो मागच्या प्रसंगातून काहीतरी शिकतो आणि म्हणतो पुन्हा असे दिवस माझ्या नशिबाला येऊ नयेत.भूतकाळही आपला एक समर्थ गुरूच असतो.जी झालेली चूक पुन्हा होऊ नये याची वारंवार सूचना करत असतो.विचारी माणूस मागच्या आठवणी जाणून पुढे पाऊल टाकत असतो. जर का असे नाही केले तर पुन्हा येरे मागचे हाल अशी अवस्था होऊन बसते.ती अवस्था ते प्रसंग येऊ नये असे वाटत असेल तर आपल्या प्रयत्नाने ते नक्कीच दूर करता येतात.आपल्याच हाताने आणि अथक परिश्रमाने ते काळोखी ढग दूर करता येतात.केवळ विचार करून चालणार नाही तर त्याला आपल्या आत्मविश्वासाची आणि प्रयत्नांची सांगड घालावी लागते. त्यामुळे नक्कीच आपले जीवन परिपूर्ण होऊन जाईल. भविष्याचा वेध हा भूतकाळातूनच घेता येतो आणि जीवन समृद्ध करता येते. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद ९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मिनूला मोरानी दिलेली भेट* मिनू चे घर शेतात होते. ती खेळता-खेळता घराच्या खूप दूर आली. तिला दोन पिसे दिसली. तीनी ते पिसे निरखून पाहिले. ती लहान होती म्हणून तिला ते पिसे कोणाची आहे हे कळाले नाही. पण तिला असे वाटले हे पिसे ज्याची असन ते त्या पिसाला शोधत असन . म्हणून तिने ठरवले की ही पिसे ज्याची असन मी त्याला शोधून त्याची पिसे वापस देऊन टाकीन. तिला रस्त्यात कोंबडी दिसली. तिने त्या कोंबडीला प्रेमाने विचारले, कोंबडीताई कोंबडीताई ही पिसे तुझी आहेत का? कोंबडी म्हणाली, नाही ही पिसे माझी नाहीत पण मला माहित आहेस की, ही पिसे कोणाची आहे? मिनू म्हणाली, सांगा सांगा ही पिसे कोणाची आहे? कोंबडी म्हणाली ही पिसे मोराची आहे. मिनू धन्यवाद म्हणून समोर निघाली. तिला रस्त्यात कबूतर दिसले. तिने मोराचा पत्ता कबुतराला विचारले . मिनू पळतच त्या पत्त्यावर गेली. तिने मोराला हाक मारली . मोर त्याच्या घरातून बाहेर आला. मिनू ने त्याची पिसे त्याला वापस दिली. पण मोरानी ती पिसे घेतली नाही तिला समजावले एकदा माझी पिसे पडली तर ती डबल मला जोडू शकत नाही व त्यांनी तिला ते पिसे भेट म्हणून दिली. मिनू ने आनंदाने पिसे आपल्याजवळ धन्यवाद म्हणून ठेवली. व ती पळतच घरी गेली मिनूने आईला घडलेली सर्व हकीकत सांगितली आणि ती पिसे पुस्तकात जपून ठेवली. बोधः कधी पण कोणी दिलेली भेट जपून ठेवावी. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 30/11/2019 वार - शनिवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    💥 ठळक घडामोडी :-  १८७२ - पहिला आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामना स्कॉटलंड वि. इंग्लंड हा हॅमिल्टन क्रेसेंट, ग्लासगो येथे खेळला गेला. 💥 जन्म :- १८१७ - थियोडोर मोम्सेन, नोबेल पारितोषिक विजेता जर्मन लेखक. १८५८ - जगदीशचंद्र बोस, भारतीय भौतिकशास्त्रज्ञ. १८६९ - गुस्ताफ डालेन, नोबेल पारितोषिक विजेता स्वीडिश भौतिकशास्त्रज्ञ. १९१५ - हेन्री टॉब, नोबेल पारितोषिक विजेता कॅनडाचा रसायनशास्त्रज्ञ. १९३५ - आनंद यादव, मराठी लेखक. 💥 मृत्यू :-  २०१२ - विजय देवधर, मराठी लेखक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *आरेतील वृक्षतोड आणि या कारशेडला शिवसेनेने पहिल्यापासून विरोध केला आहे. आता या कारशेडच्या कामाला स्थगिती देऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या सरकारच्या निर्णयाला पहिला दणका दिला आहे. मेट्रोला स्थगिती नाही, पण कारशेडला स्थगिती दिली असल्याचे ठाकरे यावेळी म्हणाले.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील विधानसभेचे नवे हंगामी अध्यक्ष बनले आहेत. कालिदास कोळंबकर यांच्या जागी वळसे पाटील यांची विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात विकासदर पुन्हा घसरला, भारताचा जीडीपी गेल्या सात वर्षातील सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचला * ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *विधानसभेचे कामकाज दोन दिवस चालणार, आज बहुमत चाचणी तर उद्या अध्यक्ष आणि विरोधी पक्ष नेता निवड* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *देशातील सर्वात भ्रष्ट राज्यांची यादी जाहीर,  देशातील सर्वात जास्त भ्रष्टाचारी राज्यांमध्ये राजस्थान, बिहार, झारखंड, उत्तरप्रदेश, तेलंगणा, पंजाब, कर्नाटक, तमिळनाडूचा समावेश आहे. या भ्रष्ट राज्यांच्या यादीत महाराष्ट्राचा समावेश नाही* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *नवी दिल्ली: मोदी सरकारकडून सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदी-विक्री संदर्भात घेण्यात आला मोठा निर्णय, या निर्णयानुसार आता हॉलमार्कशिवाय सोन्याच्या दागिन्यांची विक्री होऊ शकणार नाही. १५ जानेवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी होईल, अशी माहिती केंद्रीय उपभोक्ता मंत्री रामविलास पासवान यांनी दिली. * ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *मुंबई : एमएस धोनीने त्याच्या निवृत्तीच्या चर्चांवर अखेर भाष्यं केलं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याबाबत जानेवारी महिन्यापर्यंत बोलणार नाही, असं धोनीने सांगितलं आहे. मुंबईतल्या एका कार्यक्रमात धोनीला हा प्रश्न विचारण्यात आला होता* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• प्रतिलिपी डॉट कॉम वरील गत आठवणीचा हिंदोळा मधील लघूकथा              *सोन्याचे बिस्कीट* माधवराव आज खूप खुश दिसत होते. त्यांच्या चेहऱ्यावर ती खुशी स्पष्ट दिसत होती. कारण काल रात्री शेतात विहीर खणत असताना एक पेटी मिळाली होती आणि त्यात एक चमकदार अशी बिस्किटच्या आकाराची वस्तू दिसली. तसे त्यांचे डोळे दिपुन गेले. होय...ते सोन्याचेच बिस्किट होते ! हे मनाशी समजून घेतल्यावर त्यांचे पाय जमिनीवर नव्हतेच. कधी एकदा घरी जातो आणि पत्नी माधवीला सांगतो, असे झाले होते. तसा तो तडक घराकडे जायला निघाला. दोन कि.मी. चा रस्ता कधी........ http://nasayeotikar.blogspot.com/2019/11/blog-post_81.html  लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *मद्यपानामुळे काय दुष्परिणाम होतात ?* 📙 'बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले' हे खरे असले तरी बोलताना व चालताना सारखेच अडखळणाऱ्या दारुड्याच्या बाबतीत मात्र हे सपशेल खोटे ठरते. मद्यपान करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. तरुण वयातच या दारूचे व्यसन लागते. पिक्चरमधील हिरोचे अनुकरण, मित्रांचा प्रभाव, कुतूहल, नाविन्याची आवड, साहसी वृत्ती, मानसिक अस्थिरता अशा अनेक कारणांमुळे लोक मद्यपानाला सुरुवात करतात. एकदा सुरुवात केली कि मग त्याला मर्यादा राहत नाही. आरोग्यावर मद्यपानाचे अनेक दुष्परिणाम होतात. यात यकृताचा कर्करोग, मधुमेहासारखा रोग लवकर होणे, रक्तवाहिन्यांची लवचिकता कमी होऊन हृदयाला रक्त पुरवठा होण्यात अडथळा निर्माण होणे व हृदयविकाराचा झटका येणे हे रोग दिसून येतात. मद्यपान केलेल्या व्यक्तीचे स्वत:वर नियंत्रण नसते. त्यामुळे असे लोक अपघातात सापडतात व मृत्युमुखीही पडतात. मद्यपानाचे आरोग्याखेरीच सामाजिक व आर्थिक परिणामही फार होतात. घरे उद्ध्वस्त होतात. नातीगोती तुटतात. आर्थिक विपन्नावस्था येते. दारू पिऊन व्यक्ती पत्नीला मुलांना मारहाण करते. घराकडे त्या व्यक्तीचे दुर्लक्ष झाल्याने मुलांचे शिक्षण नीट होत नाही. साहजिकच मुले अशिक्षित राहतात. समाजात बेरोजगारी वाढते व गुन्हेगारीच्या प्रमाणातही वाढ होते. दारूमुळे यकृत खराब होते आता पायांवर सूज येते पोटात पाणी होते. मेंदूवर परिणाम होऊन मानसिक रोग होतात. अशी ही सर्वनाशक दारू. आधी माणूस दारू पितो व नंतर हळूहळू ती त्याला त्याच्या घरादाराला पिऊन टाकते (संपवते); हे म्हणतात, ते खरेच आहे. त्यामुळे मद्यपानाच्या सवयीपासून दूर राहिलेले चांगले. *डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित* यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून मनोविकास प्रकाशन ०२० ६५२६२९५० *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आयुष्यात काय गमावलंत ह्यापेक्षा काय कमावलंत ह्याचा विचार करा.* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *'सत्यमेव जयते' हे कशातून घेतलेले आहे ?* मुंडक उपनिषदातून 2) *'क्रांतिकारकांचे बायबल' असे कोणत्या कादंबरीला म्हटल्या जाते ?* आनंदमठ 3) *हरिजन संघाची स्थापना कोणी केली ?* महात्मा गांधी 4) *महाराष्ट्रातील पहिले वायफाय शहर कोणते ?* पुणे 5) *स्वामी दयानंद सरस्वती यांचा कोणता वेदावरील ग्रंथ आर्य समाजाचा प्रमाण आहे ?* सत्यार्थ प्रकाश *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 👤 राजेश दरेकर, सहशिक्षक, गडचिरोली 👤 राजेश्वर येवतीकर, येवती 👤 विलास वाघमारे, भैसा, तेलंगणा 👤 रवी बुगावार, धर्माबाद 👤 देविराज पिंगलवार, भोकर 👤 उमेश खोकले *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *तुम्ही दु:खाचा स्विकार कराल तेंव्हाच सुखाच्या निकट पोहचाल. आयुष्याचा खरा अर्थ कळेल. राजपुत्र सिद्धार्थ दु:खाचा शोध घेतो, म्हणून ते तथागत गौतम बुद्ध होतात. हेच फार मोठं उदाहरण जगाच्या पाठीवर लिहून ठेवलं गेलंय, ते कुणीच पुसून टाकू शकत नाही. संकटातून, समस्यांतून बाहेर कसे पडायचे, हे विद्यापीठात शिकविले जात नाही. माणसाने स्वयंअध्ययनातून खूप काही शिकायचे असते. आजच्या नव्या पिढीला हे अध्ययन करू द्यायला हवे. मात्र, तसे होताना दिसत नाही. खुशी काही सेकंदांची असते. समाधान हे काही दिवसांचं असतं आणि ज्ञान अर्थात जीवन-जाणिवा ह्या आयुष्यभरासाठी असतात.* *दुर्दैवाने मुलांना पाच रूपयांची कॅडबरी देऊन किंवा पाच-पन्नास पैशांचं चाॅकलेट देऊन खुश करण्याचं काम घरादारातून जोरकसपणे सुरू आहे. दु:खापासून त्यांना दूर ठेवण्यात येत आहे. त्यांना दु:खाची तोंडओळख करून दिली जात नाही. एक सुरक्षाकवच त्यांच्याभोवती पालक उभे करताहेत. सहाजिकच मुलांना दु:खाचा सराव होत नाही. मग जराशा दु:खाने ही मुले हडबडून जातात अन् आत्महत्येचे अर्थही माहीत नसलेले हे कोवळे जीव मारणारा कवटाळून बसताहेत. म्हणून दु:ख कळण्यासाठी दु:खाची उदाहरणे त्यांच्यासमोर ठेवणे गरजेचे आहे. टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देवपण येत नाही, हे आपणांस ठाऊक, पण त्यांच्यापर्यंत ते पोहचत नाही. माणूस दु:खातून उभा राहून स्वत:चे अस्तित्व सिद्ध करतो. हीच दु:खाच्या रियाजाची सामुग्री आहे. तिचा अवलंब करणे म्हणजे दु:खाचा रियाज करणे होय.* *॥ रामकृष्णहरी ॥* 🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो* *जशी टाळी दोन्ही हातांनी वाजत नाही, तसा संवाद दोन्ही बाजुंनी झाला नाही तर व्यर्थ.* *चांगली आंतरक्रिया व्हावी असे वाटत असेल तर काही नियम लागू होतात.* *वक्ता आणि श्रोता याची कर्तव्य* *वक्ता जर श्रोत्याला म्हणत असेल अवधान देऊन माझे म्हणणे ऐका सुखाला पात्र व्हाल तर वक्त्याचे कर्तव्य आहे की तसे म्हणण्यात त्याची शेखी दीसू नये. तसे म्हणतांना त्याची विणवणी दीसली पाहीजे व श्रोत्यांना त्याने सर्वज्ञ समजले पाहीजे. ते सर्वज्ञ आहेत म्हणजे त्यांना आपले बोलणे कळेल ही जबाबदारी धरावी. बोलण्यात श्रोत्याप्रती लळा असला पाहीजे. आपले बोलणे त्याचे मनोरथ पूरविणारे आहे ही त्यांना खात्री वाटली पाहीजे.* *सासरवासीनीकडे माहेरचं कोणी आलं तर तीला आनंदाचे भरते येते व वाटते माझ्यासाठी याने माहेरची श्रीमंती आणली असावी. तसे श्रोत्यांसाठी माहेरच्या लाडक्या गोष्टी आणल्यात असे वक्त्याचे बोलण्यात वाटले पाहिजे.* *तुम्ही श्रोत्याना म्हणावं, तुमच्या कृपादृष्टिने माझी प्रसन्नता आहे. तुम्ही म्हणजे माझे संसाराची सावली तुम्ही अमृत सुखाच डोह आहात.* *वक्त्याने म्हणावं मी आपल्या ईच्छेने यां अमृत डोहात बूडी घेणार. आपण वक्ता असलो तरी बोबडे बोल बोलणारे बालक आहोत बालकाचे बोल वाकडे असले तरी तुम्ही माय बाप कौतूक करणार याची खात्री आहे, असं वक्त्याच्या बोलण्यात प्रतीबिंबीत व्हावं.* *बोलण्यातून सलगी आहे हे श्रोत्यांला वाटावं. तुम्हा सर्वज्ञाना मी उपदेश काय करणार असं आपलं निरागसपण श्रोत्यांना दीसाव.काजवा वा टेंभा जसा सूर्याला उजळुशकत नाही वा चंद्राला थंड करायला पाणी लागत नाही वा सूस्वराला सूरेख आवाजाची साथ लागत नाही,अलंकाराची शोभा वाढवायला अलंकार घालावा लागत नाही, सुगंधाला सूगंध देउन सुगंधी करावे लागत नाही, समूद्राला कोठे जाउन आंघोळ करावी लागत नाही, आकाशाला व्यापणारी वस्तू आणता येत नाही, अशा अवधान असणाऱ्या तूम्हाला जाणीव मी काय करून देणार? ही भावना वक्त्यात सदैव असावी.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• संकल्प करा अथवा करु नका शेवटी निर्णय तुम्ही तुमच्या मनावर नियंत्रण ठेवण्यासाठी सज्ज रहा.कारण ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्या गोष्टीसाठी सातत्याने प्रयत्न करा म्हणजे तुमचे तुम्हाला निश्चितच मिळेल.मी असे करणार आहे मी तसे करणार आहे असे जगाला सांगत सुटू नका.जग काही म्हणतील त्यांच्या म्हणण्यानुसार तुम्ही किती दिवस चालणार ?चार दिवस तुम्ही त्यांच्यासमोर करणार आणि काही दिवस निघून गेले की, पुन्हा तेच करणार.म्हणजे तुमचा तुमच्यावर विश्वास नाही असेच होईल ना ! संकल्प असे करा की,ते आयुष्यभर आपल्या जीवनासाठीच आहेत.मग तुम्हाला वर्षाची किंवा वर्ष संपल्यानंतर नवीन वर्षाच्या प्रारंभी करायची काही गरजच नाही.दिवस,महिने,वर्ष येतात जातात याकडे लक्ष देऊ नका,पण आयुष्य हे एकदाच येते आणि ते अमर्यादित म्हणजेच आयुष्याच्या शेवटपर्यंत असेल.आपण केलेले संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी आपल्या मनाचा ठाम निर्धार असला की,काही दर वर्षी शेवटी सोडायचे आणि नवीन धरायचे किंवा करायचे असेही करायचे नाही.काळ आणि वेळ कुणासाठी थांबत नाही तर आपण काळाची पावले ओळखून आपण आपले जीवन आनंदमय आणि सुखमय कसे जाईल याकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे.तुम्ही निर्माण केलेले आणि प्रत्यक्ष जीवनात अनुसरलेले संकल्प हे इतर लोक आपोआपच अनुकरण करतील आणि करायलाही लागतील.हा तुमचा तुम्ही सुरवातीपासून केलेला आदर्श संकल्प नवीन वर्षासाठी इतरांना अनुकरणीय ठरेल यात शंकाच नाही. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद.९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सिंह व बेडूक* एका जंगलात एक सिंह राहायचा.त्याला त्या जंगलात कंटाळा आला तो दुसऱ्या जंगलात राहायला गेला .एकदा सिंह मोठया ने गरजला.त्या जंगलात अनेक पशु-पक्षी तसेच काही बेडूक ही राहत होते .त्यांनी यापुर्वी सिंह पाहिले नव्हते .त्यांचा बेडूक पुढारी म्हणाला ,"कोणीतरी मोठा आवाज काढत आहे .आता मीही मोठा आवाज काढतो ."बेडकानी मोठा आवाज काढला . सिंहासाठी हा आवाज नवीन होता. सिंहाला वाटले , कोणीतरी आपल्याला आव्हान देत आहे, आपण सावध राहिले पाहिजे.' सिंहाने आपली गर्जना थांबवली. तो शांत उभा राहिला. बेडूक मोठ्या मोठ्याने ओरडत पुढे पुढे सरकू लागला. सिंहाने त्याला पहिले व त्याचा आवाज ऐकला. सिंह वेगाने पुढे सरकला. सिंहाने बेडकाचे डोक्यावर पाय दिला. बेडूक गयावया करू लागला. सिंहाने त्याला सोडून दिल. बेडूक आनंदाने पाण्यात गेला. बोध: आव्हान पेलण्याची ताकद असावी मग कोणी कितीही सामर्थ्यशाली असले तरी. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 29/11/2019 वार - शुक्रवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    💥 ठळक घडामोडी :-  १९९६: नोबेल पारितोषिक विजेत्या समाजसेविका मदर तेरेसा यांना त्यांची मायभूमी अल्बानियाचा सर्वोच्‍च नागरी पुरस्कार गोल्डन ऑनर जाहीर. २०००: शास्त्रीय गायक गुलाम मुस्तफा खाँ आणि घटमवादक टी. एच. विक्‍कू विनायक राम यांना उस्ताद हफीज अली खाँ स्मृती पुरस्कार जाहीर. २०००: दक्षिण अफ्रिकेचे माजी अध्यक्ष डॉ. नेल्सन मंडेला व बांगलादेशच्या ग्रामीण बँकेस गांधी शांतता पुरस्कार जाहीर. 💥 जन्म :- १९०७: प्रसिद्ध लेखक गोपीनाथ तळवलकर यांचा जन्म.  १९०८ - एन.एस. क्रिश्नन, तमिळ चित्रपट अभिनेता. १९३२ - जाक शिराक, फ्रांसचा राष्ट्राध्यक्ष. १९७७ - युनिस खान, पाकिस्तानचा क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :-  १९५९ - गोविंद सखाराम सरदेसाई - मराठी इतिहासकार १९९३: जे. आर. डी. टाटा तथा जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा यांचे निधन. भारतीय उद्योजग तसेच ते भारताचे पहिले वैमानिक व भारतीय विमान वाहतुकीचे जनक होते.  २०११ - इंदिरा गोस्वामी, आसामी साहित्यिक, कवयित्री, संपादिका. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *राज्याचे 29 वे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली शपथ घेतली. शिवतीर्थावर मोठ्या थाटामाटात झालेल्या शपथविधी सोहळा, अनेक दिग्गजांची होती उपस्थिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *शिवसेनेचे एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, राष्ट्रवादीचे जयंत पाटील, छगन भुजबळ, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि डॉ. नितीन राऊत यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिल्या शुभेच्छा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *मुंबई: शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यातील युतीचा आधार ठरलेला महाविकासआघाडीचा 'समान किमान कार्यक्रमाचा' मसुदा जाहीर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *पेट्रोलियम कंपन्यांच्या खाजगीकरणाला विरोध, खाजगीकरणामुळे 14 हजार पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांचे भविष्य संकटात, बीपीसीएल कर्मचाऱ्यांचा संप, इंधन टंचाईची शक्यता* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *सुवर्ण महोत्सवी इफ्फीचा सुवर्ण मयूर पुरस्कार ‘पार्टीकल्स’ चित्रपटाला, मराठमोळी उषा जाधव सर्वोत्कृष्ट अभिनेत्री* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *2010 मध्ये कसोटी सामन्यातून निवृत्ती घेतलेला जगप्रसिद्ध फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनची श्रीलंकेच्या उत्तर प्रांताच्या राज्यपालपदी नियुक्ती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••               *शिक्षकांना शिकवू द्या ...* शाळाबाह्य कामावर बहिष्कार टाकल्यामुळे 27 शिक्षकांवर निलंबनाची कारवाई झाल्याची बातमी वाचण्यात आली. राज्यातील बहुउद्देशीय कर्मचारी म्हणजे शिक्षक. कोणत्याही सरकारी कामासाठी सहज उपलब्ध होणारा आणि सांगितलेले काम मुकाट्याने करणारा कर्मचारी म्हणजे शिक्षक. वास्तविक पाहता शिक्षकांचे........... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_27.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *म्हाताऱ्या लोकांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या का पडतात ?* 📙 वृद्धावस्था आली की माणसात अनेक बदल होतात. डोक्यावरचे केस गळायला लागतात व टक्कल पडते. तोंडातील दात हलायला लागतात व नंतर तोंडाचे बोळके होते. बोटांना कंप सुटतो, दृष्टी अधू होते, उत्साह कमी होतो. अशा या बदलांमुळे व्यक्ती चिडचिडी होते. त्यात भर म्हणजे विस्मरणही व्हायला लागते. त्यामुळे वृद्धत्व म्हणजे एक रोग असे वाटायला लागते. चेहऱ्यावर सुरकुत्या का पडतात, याविषयी माहिती घेऊ. त्वचेखाली स्नायूंच्या आकुंचन व प्रसरणाच्या दिशेने काटकोनात त्वचेची हालचाल होत असल्याने त्वचेच्या वारंवार घड्या पडतात. व तेथे नंतर सुरकुत्या पडतात. चेहऱ्याच्या त्वचेखाली इतर शरीराच्या त्वचेखाली असणारा जाडसर थर (deep fascia) नसतो व स्नायू व त्वचेचे थर एकमेकांत जखडलेले असतात. त्यामुळेही त्वचेवर जास्त ताण येतो व सुरकुत्या पडतात. दुसरे म्हणजे त्वचेखालील मेद पदार्थांचे प्रमाण कमी होते. साहजिकच त्वचा सैल व ढिली होते. तिसरे म्हणजे स्नायूंमधील ताण वयोमानानुसार कमी होतो. त्यामुळे त्वचेमध्ये खोवले जाणारे स्नायू शिथिल होतात व त्वचाही सैल होते. सर्व इंद्रियांवर त्वचेची जीवनशक्ती कमी झालेली असते. त्यामुळे या त्वचेची लवचिकता कमी होऊन ती सैल पडते. या सर्व गोष्टींमुळे सैल पडलेल्या त्वचेवर सुरकुत्या पडतात. तोंडातील दात पडल्याने जबड्याच्या हाडाची झीज झाल्याने चेहऱ्याचा आकारही बदलतो व त्वचा आणखीनच सैल होते. परिणामी वृद्ध व्यक्तींच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात. सुरकुत्या सर्व शरीरावर पडतात परंतु चेहऱ्यावर ती बाब जास्त प्रकर्षाने जाणवते. *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• "अनेक वेळा चांगले क्षण/ आशीर्वाद हे कठोर प्रसंगांच्या वेशभूषेत येतात." *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *संसदेच्या दोन अधिवेशनामध्ये जास्तीत जास्त किती कालावधीचे अंतर असते ?* 6 महिने 2) *जागतिक वनदिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?* 21 मार्च 3) *भारताने सर्वात पहिला कोणता सुपर कम्प्युटर तयार केला ?* परम 4) *माहिती अधिकार अधिनियमांची एकूण किती कलमे आहेत ?* 30 कलमे 5) *भारताची विशेषता कशात आहे ?* विविधतेत एकता *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 👤 साईनाथ बोईनवाड 👤 योगेश खवसे 👤 पोतन्ना गुंटोड 👤 प्रमोद पाटील बोमले 👤 👤 👤 👤 👤 *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *संत तुकाराम महाराज यांचा अतिशय सोपा दिसणारा अभंग आहे,'बोले तैसा चाले । त्याची वंदीन पाऊले ॥' येथे तुकोबा एक खूप मोठं मानसशास्त्रीय गूढ कमीत कमी शब्दांत उकलून देत आहेत. जसे बोलतो तसेच वागणारा माणूस भेटला तर त्याला मी वंदन करीन, असे तुकोबा म्हणतात. म्हणजे अशी माणसे दुर्मिळ आहेत का ? असा प्रश्न पडतो. माणसाचे आचरण त्याच्या चारित्र्याशी विसंगत असेल तर असण्यात आणि भासवण्यात एक दरी निर्माण होते. आपण ज्यांना चांगली माणसं म्हणतो त्यांच्याही असण्यात आणि दाखवण्यात व्यक्तिमत्वात दरी असतेच.* *असण्याच्या आणि भासवण्याच्या मध्ये केवढी दरी आहे हे पाहिले पाहिजे. ती जेवढी मोठी तेवढा माणूस लहान आणि ती जेवढी लहान तेवढा माणूस मोठा, असे एक समीकरण मांडता येईल. असे होण्याच्या मागे एक बाह्य कारण आहे. आपल्या कृतीचे समर्थन करणे ही मानवाची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. अगदी गुन्हेगारही गुन्हा का करावा लागला याचं समर्थन करत असतो. म्हणूनच मग 'बोले तैसा चाले' अशी व्यक्ती दुर्मिळ असते. आणि अशी व्यक्ती सापडलीच तर तो परीस असतो, तो इतरांचेही सोने करू शकतो.* *॥ रामकृष्णहरी ॥* 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो,* *एक मराठी सिनेमातील छान बोधपर गीत आठवले.-----* *कोण होतास तू,काय झालास तू।अरे वेड्या कसा वाया गेलास तू.* *आणि दुसरे म्हणजे---कशी नशिबाने* *थट्टा आज मांडली,* *कुत्र्या मांजराची दशा हिने आणली.* *जगात प्रचंड विविधता आहे. किंबहुना, विविधता हेच जगाचे सौंदर्य आहे. तीच मानवतेची ताकद आहे;* *परंतु दुर्दैवाने विविधता आणि विषमता यातील फरक लक्षात* न *घेतल्यामुळे मानवा-मानवांत जात, पात, धर्म, पंथ* *यावरून गटतट पडले आहेत.* *समाजाला एकत्र ठेवण्याऐवजी, मतलबी मंडळींनी* *स्वार्थासाठी समाजात भांडणे लावून दिली आहेत. त्यातून अतिरेकी* *विचाराची माणसे निर्माण झाली आहेत. त्यातून हिंसाचार* *वाढीला लागला आहे. विवेकाचा आवाज दाबला जात आहे.* *सज्जनांची पीछेहाट आणि दुर्जनांचा विजय होताना दिसत आहे.** *भारताला साधुसंतांचा देश म्हटले जाते. प्रचंड मोठी सांस्कृतिक परंपरा असलेला भारतीय माणूस मूलत: विचारी आहे. त्यामुळे फोलपट बाजूला ठेवून सार ग्रहण करणे त्याला सहज शक्य आहे. दोन धर्मांच्या तत्वज्ञानात अंतर असू शकते. धर्माच्या भाषा वेगवेगळ्या असू शकतात; परंतु कोणत्याही धर्माचा हेतू वाईट असू शकत नाही. रजनीश एकदा म्हटले होते, की, इश्क, प्रेम आणि अहिंसा हे एकाच मनोवृत्तीसाठी वापरलेले वेगवेगळे शब्द आहेत. वरवर विचार करणा-याला ते पटत नाही; पण खोलवर विचार केला असता हे पटायला लागते. आपल्या शरीराची ठेवण अलग अलग असू शकते, भाषा वेगवेगळ्या असू शकतात, परंतु आपल्या ह्रदयाची ठेवण, रक्ताचा रंग हे मात्र एकच असते. हे आपण पक्के ध्यानात ठेवायला हवे. मनुष्यजन्म दुर्मिळ आहे, त्याचा सदुपयोग करायला हवा.* *माणूस माणूसच व्हायला हवा.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• घर जेव्हा बांधलं जातं तेव्हा मुख्यत: पायाभरणीचा विचार केला जातो, नंतर भिंतीचा आणि त्यानंतर डोक्यावर असणा-या छताचा.हे जरी खरं असलं तरी यात प्रामुख्याने रेती, सिमेंट,वीटा,गजाळी आणि बांधकाम करणा-या कारागिरांचे कौशल्य लागते.केवळ कोणत्याही एका घटकावर घर पूर्ण होत नाही. त्याचप्रमाणे माणसांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचे आहे.जर व्यक्तिमत्त्व विकासाचे पहायचे झाले तर लहानपणी घरात असणा-या आईवडिलांचे संस्कार, नंतर घरातल्या इतर रक्तातल्या नात्यातील लोकांचे संस्कार,परिसरातील मित्र,शेजारी यांच्या सहवासातून घडलेले संस्कार,शाळेतील शिक्षकांकडून घडवल्या गेलेले संस्कार आणि पुस्तकांच्या माध्यमातून वाचनातून मनावर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष घडल्या गेलेले संस्कार या सर्व घटकातून मिळालेली उत्तम संस्कारांची पायाभरणी हीच खरी माणसांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी लागणारे घटक आहेत.यातील एखाद्या जरी घटकांकडून कमतरता भासली तर व्यक्तिमत्त्व विकास व्हावा तितका होऊ शकत नाही.हे सारे घटक माणसांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी लागणारे पायाभूत घटक आहेत.ज्याप्रमाणे घर मजबूत करण्यासाठी पायाभरणी आणि त्यासाठी लागणारे बांधकाम साहित्य उत्कृष्ट दर्जाचे असायला हवे तेव्हाच घर कुठे चांगले सुंदर बनू शकते त्याचप्रमाणे व्यक्तिमत्त्व विकासासाठी लागणारे वरील उल्लेखिलेल्या घटकांची नितांत गरज आहे.यातला एकजरी घटक कमी पडला तर माणसांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचा पाया कच्चा राहू शकतो.म्हणून यांना आपल्या जीवनात महत्त्वाचे खरे स्थान आहे हे विसरून चालणार नाही. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🏠🏕🏠🏕🏠🏕🏠🏕🏠🏕 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कासवाची चतुराई* एकदा एक कासव जंगलाकडे जायला निघाला. त्याला कोल्हा दिसला. कोल्हा त्याच्या दिशेनेच येत होता. कासव घाबरला. कासवाने आपली मान व पाय कवचात ओढून घेतले. कोल्ह्याने कवच पाहिले. आपल्या पायाने कवचाला ओरखडले. कोल्ह्याला वाटले," हा तर दगड आहे. “कोल्हा पुढे निघून गेला. कासवाने हळूच मान बाहेर काढली. ते पाण्यात शिरले. कासवाने कोल्ह्याला आवाज दिला.. कोल्ह्याने मागे वळून पाहिले. तो स्वतःशीच म्हणाला अरे! शिकार हातची गेली.. *बोध: चतुराईने केलेले काम चांगलेच व उपयोगी असते.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 28/11/2019 वार - गुरूवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :-  ● १०९५ - क्लेमोंटच्या सभेच्या शेवटच्या दिवशी पोप अर्बन दुसरा याने ले पो चा बिशप अधेमर व तुलुचा काउन्ट रेमंड चौथा यांना पहिल्या क्रुसेडचे नेता केले. ● १५२० - फर्डिनांड मॅगेलनने दक्षिण अमेरिकेची सामुद्रधुनी पार केली व अटलांटिक महासागरातून पॅसिफिक महासागरात जहाज नेणारा पहिला युरोपियन ठरला ● २०००: तेलगू भाषेतील महाकवी गुर्रम जाशुवा यांच्या नावाने दिला जाणारा साहित्य पुरस्कार कवी नारायण सुर्वे यांना जाहीर. 💥 जन्म :- ● १८५३ - हेलेन मॅगिल व्हाइट, पी.एच.डी.ची पदवी मिळवणारी पहिली अमेरिकन स्त्री. ● १९११ - वाक्लाव रेंच, चेक कवी. ● १९५० - एड हॅरिस, अमेरिकन अभिनेता. ● १९५० - रसेल ऍलन हल्स, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ. 💥 मृत्यू :-  ● १८९० - महात्मा जोतीराव फुले, भारतीय समाजसुधारक. ● १९६७ - सशस्त्र क्रांतिकारक पांडुरंग महादेव तथा सेनापती बापट  *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *उद्धव ठाकरे यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना निमंत्रण, विविध जिल्ह्यातील ४०० शेतकऱ्यांना देखील बोलावण्यात आले आहे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *विधानभवनात महाराष्ट्रातील २८८ नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रीया सुळे यांनी एखाद्या 'यजमाना'प्रमाणे सर्वांचं स्वागत केलं.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *कार्टोसॅट-3 या उपग्रहाचे श्रीहरिकोटा इथून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलंय. पीएसएलव्ही-सी 47' या प्रक्षेपकाद्वारे कार्टोसॅट-3 अवकाशात झेपावलंय. कार्टोसॅट-3 हे पृथ्वीची छायाचित्रं घेणं आणि मॅपिंगसाठी उपयोगी ठरणार आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *सत्ता स्थापनेच्या घडामोडीत महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी चर्चेचा केंद्रस्थानी, त्याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकार त्यांची उचलबांगडी करून राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्रांची वर्णी लागण्याची शक्यता* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *राज्यात भाजप विरोधी बाकावर; देवेंद्र फडणवीस यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *एएनआय' वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेच्या वाट्याला मुख्यमंत्रीपदासह १५ मंत्रिपदे, राष्ट्रवादी काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपदासह १३ खाती तर काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद न देता विधानसभेचे अध्यक्षपद सोडण्यात आले आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये मुंबईत होणारा ट्वेंटी-२० चा आंतरराष्ट्रीय सामना मुंबईवरुन हैदराबाद येथे हलवण्यात आला असून मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर ११ डिसेंबरला मालिकेतील तिसरा आणि अखेरचा वनडे सामना होईल.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *गोरगरीबांचे कैवारी : महात्मा फुले* भारतीय समाजसुधारणेत व स्वातंत्र्य चळवळीत ज्यांचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते ती व्यक्ती म्हणजे जोतीराव गोविंदराव फुले. जोतिबा फुले यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन लोकांनी त्याना ‘महात्मा’ ही उपाधी दिली. त्यामुळे ज्योतिबा फुले हे महात्मा फुले या नावाने सर्वत्र ओळखले जाऊ लागले. महात्मा फुले यांच्या वडिलांचे नाव.......... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_26.html  लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *चिखलदरा* चिखलदरा हा भारतातील महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्यातील एक हिल स्टेशन व एक नगर परिषद आहे. महाभारतच्या महाकाव्यात वैशिष्ट्यपूर्ण, या ठिकाणी अशी भीती होती की भीमा यांनी एका भयंकर चढाओवातील खलनायक किचकचा वध केला आणि नंतर त्याला खोऱ्यात फेकून दिले. अशा प्रकारे कोच्चरदा-चिखलदरा हे त्याचे भ्रष्टाचार आहे म्हणून ओळखले जाऊ लागले. परंतु चिखलदराला अजून बरेच काही आहे. विदर्भातील एकमात्र हिल रिसॉर्ट, हे 1118 मीटरच्या उंचावर सर्वोच्च व्हॅरेट पॉईंट 1188 मीटर असून हे महाराष्ट्रातील एकमात्र कॉफ़ी-वाढविणारे क्षेत्र असण्याचे जोडलेले आहे. चिखलदराचे वार्षिक पाऊस 154 सेंमी आहे. उन्हाळ्यात तापमान 39 से हिवाळ्यात 5 से बदलते. भेट सर्वोत्तम महिने ऑक्टोबर ते जून पर्यंत आहेत हे वन्यजीवन-व्याघ्र, पेंटर, आळशीपणा अस्वल, सांबर, जंगली डुक्कर आणि अगदी क्वचितच पाहिलेले जंगली कुत्री आहे. जवळील प्रसिद्ध मेळघाट टायगर प्रकल्प आहे ज्यामध्ये 82 वाघ आहेत. चिखलदराचे निसर्गरम्य सौंदर्य चक्रीवादळ, प्रॉस्पेक्ट पॉईंट, आणि देवी पॉईंट मधून आनंद घेऊ शकतात. इतर मनोरंजक मोहिमा गव्हिल्गड आणि नारनला किल्ला, पंडित नेहरू बोटॅनिकल गार्डन्स, आदिवासी संग्रहालय आणि सेमादोह लेक यांचा समावेश आहे. *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *केवळ ज्ञान असून उपयोग नाही, ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं.* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *'प्रकाशवाटा' हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?* प्रकाश आमटे 2) *ऑस्कर पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो ?* चित्रपट 3) *टाटा कंपनीचा 'नॅनो कार प्रकल्प' कोठे आहे ?* सानंद ( गुजरात ) 4) *भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती ?* SBI 5) *कोणत्या घटनादुरुस्ती अन्वये 6 ते 14 वयोगटातील बालकांना मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण हा मूलभूत हक्क मानला गेला आहे ?* 86 वी *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 👤 राम चव्हाण, नांदेड 👤 👤 👤 👤 👤 👤 👤 👤 *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *हसत दु:खाचा केला मी स्विकार,* *वर्षिले चांदणे पिऊन अंधार..* *प्रकाशाचे गाणे अवसेच्या रात्री,* *आनंदयात्री, मी आनंदयात्री !* *दु:खाचा स्विकारही हसत करायचा असतो. दु:खाला धैर्यानं सामोरे जायचे असते. दु:ख सत्वपरीक्षा घेतात. ज्याच्या त्याच्या क्षमतेप्रमाणे ज्याच्या त्याच्या भाळी दु:ख असते. अशा दु:खाचा बागुलबुवा करून अंधारयात्री व्हायचे, की या दु:खातून माझे आयुष्य तावून सुलाखून पुन्हा झळाळायचे आहे असं म्हणत प्रकाशाचे गाणे गात आनंदयात्री व्हायचे?* *दु:खे समृद्ध अनुभवांची अनुभूती देतात.त्यामुळे खरं तर त्यांच्याबद्दल कृतज्ञ असायला हवे. कारण दु:खानंतरचे सुख आनंदाचा पारिजात फुलवते. जेवनातही विविध चवी हव्यात. चित्रातही अनेक रंग लागतात. गाण्यातही सप्तसूर. मग आयुष्य तरी एका चवीचे, एका रंगाचे, एका सुराचे का हवे? आपल्यात विश्व पाहणे आणि आपणच विश्व होणे. मग अणूरेणसारखे दु:ख आकाशाएवढे का करायचे? नसलेले दु:ख घेऊन का ऊर बडवायचे? वेदनेच्या कल्पनेने का हाय खायची? पायात वहाण नाही म्हणून शोक करणारी व्यक्ती जेंव्हा पाय नसलेल्या व्यक्तीला पाहते तेंव्हा तीचा शोक अनाठायी ठरतो. पाय गमावलेला सैनिक जेंव्हा सहजवानाचा मृतदेह पाहतो तेंव्हा त्याचे दु:ख कमी क्लेशदायी ठरते. जेंव्हा बागडायच्या वयातील छोटी मुले रूग्णालयात व्याधीग्रस्त होऊन मरणयातना भोगताना दिसतात, तेंव्हा वयाने वाढलेल्या आपल्या शरीराला आलेल्या सर्दी, ताप, खोकल्याचे दु:ख ते काय?* *॥ रामकृष्णहरी ॥* 🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो* *ज्ञान ही अशी शिदोरी आहे* *की ती माणसाला नेहमीच* *प्रत्येक क्षेत्रात एका ठराविक उंचीवर* *नेऊन ठेवते.* *अजून अस गुरुत्वाकर्षण तयार झालं* *नाही की ते ज्ञानाला* *नैसर्गिकरित्या आपल्याकडे खेचून* *घेईल.* *त्याला मिळविण्यासाठी प्रयत्न* *करावेच लागतात. एकदा मिळविले* *की कोणत्याही ब्रम्ह* *पंडितांची ताकद नाही की तो* *तुमच्याकडून हिसकावून घेईन.* *ह, एक मात्र नक्की की आता* *एकलव्य बनू नका.* *धर्माचा ,ज्ञानाचा ठेका घेतलेली* *मंडळी तुमच्या मार्गात अनंत अडचणी उभ्या करतात.* *स्वामी विवेकानंद यांना शिकागो येथे बोलण्यासाठीचे प्रमाणपत्र भारतीय* *शंकराचार्य यांनी दिले* *नाही,ते श्रीलंकेच्या बौध्द* *धर्मप्रसारक विद्वानांनी दिले.* *त्यांचे 5 मिनिटे कमी करून* *विवेकानंदांना दिले,आणि त्याच 5* *मिनिटांनी 1893 साली स्वामींनी* *जगभरात नावलौकिक* *मिळवला व आपली* *धर्म पताका जगभर* *फडकावली.* *अजूनही तो दैत्य* *उरात धडधड करतो.* *विनंती-ज्ञानाची भूक प्रचंड* *असुद्या। कुठेही, केव्हाही,कसेही* *फक्त रुचकर ज्ञान मिळेल त्याचे सेवन* *करा,नक्की सुदृढ व्हाल.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जेव्हा रोज सकाळ ही नवीन सकाळ होऊन या जगात प्रवेश करते तेव्हा प्रत्येक सजीवांसाठी नवीन आशा पल्लवित करण्यासाठी. ती म्हणते काल जे काही चांगले-वाईट झाले त्यातील चांगले लक्षात ठेऊन त्याला सोबत घेऊन पुढे अधिक चांगले करण्याचा प्रयत्न करा आणि जे काही तुमच्या जीवनात वाईट घडून गेले त्याला विसरुन जा.त्याची पुनरावृत्ती होणार नाही याची दक्षता घ्या आणि आनंदाने जीवन जगा.ती म्हणते मी कधीच भूतकाळाला धरुन वर्तमानात जगत नाही आणि वर्तमानात जे काही जगते ते भविष्यकाळातही त्याचा विचार करत नाही.त्यामुळेच मी रोजच्यारोज टवटवीत, प्रसन्न आणि प्रफुल्लीत असते.असा जर मी तुमच्यासारखा विचार करायला लागले असते तर सगळ्या जीवसृष्टीला आवडले असते का ? नाही. म्हणून झाले गेले विसरा नि रोज तेवढ्याच प्रसन्न मनाने,प्रसन्न मुद्रेने माझ्यासारखं आनंदी रहायला शिका मग माझ्याप्रमाणेच रोज तुमचंही स्वागत करतील, तुमच्याबद्दल इतरांना आवड निर्माण होऊन तुमच्यावर प्रेम करायला लागतील. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🌄🏞🌄🏞🌄🏞🌄🏞🌄🏞 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रता* राम ,माझा (सिमा) व सुमनचा मित्र आहे. तो आजारी पडला. म्हणून त्याला भेटायला आम्ही निघालो. आम्ही त्याच्या घरी पोहोचलो आणि त्याला फळे दिली. “काळजी घे. वेळेवर जेवण कर, औषध घे लवकर बरा हो ”अशी तिकडे सुमन म्हणाली. तू लवकर बरा हो मग आपण खूप खूप खेळू, मजा करू” असे सिमा म्हणाली राम म्हणाला “सीमा ,सुमन तुम्हाला भेटून मला आनंद झाला. आता मला बरं वाटतंय.” रामने आमचे आभार मानले. निघताना रामचा चेहरा हसरा दिसत होता. हे पाहून आम्हालाही आनंद झाला. *तात्पर्य : कधी पण मित्राच्या सुखदुःखात सहभागी व्हावे. हीच खरी मिञता असते.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

!.........📘 *संविधान दिन*📘........! *२६ नोव्हेंबर २०१९* *"आपले संविधान आपला आत्मसन्मान".* 💐💐💐💐💐💐 आज दि.२६/११/२०१९ रोजी *जि.प.प्रा.शाळा गोजेगाव* येथे संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त सकाळी *घोषवाक्य, संविधानाचे वाचन घेण्यात आले.*📘 त्यानंतर शाळेचे मु.अ. आ.श्री पतंगे सर यांनी संविधानाविषयी विद्यार्थ्यांना माहिती सांगितली.त्यानंतर विद्यार्थ्यांची 🎤भाषणे झाली. आजच्या कार्यक्रमात श्रीमती सेनकुडे मॕडम यांनी गीत सादर केले. 🎤 तसेच शाळेतील श्री ढगे दादांनीही गित गायले. त्यानंतर शाळेतील श्री वनसागर सरांनीही आपले विचार व्यक्त केले. त्यानंतर विद्यार्थ्यांना पूरक आहार म्हणून (बिस्किटे) गोदावरी ताई यांच्याकडून खाऊ वाटप करण्यात आला. तसेच आजच्या संविधान दिना निमित्य शाळा स्तरावर दुपार सञात 🔅 *विविध स्पर्धां आयोजन करण्यात आले होते.👇👇 प्रश्नमंजुषा, चिञकला इत्यादी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.* आजच्या या कार्यक्रमासाठी सहकार्य सौ.हिवराळे मॕडम यांचे लाभले तर सूञसंचलन श्रीमती सेनकुडे मॕडमने केले व आभार श्री वनसागर सरांनी मानले. *कार्यक्रमाची काही क्षणचिञे.* 👇👇👇👇 〰〰〰〰〰〰 *✍वृत्तांत लेखन* श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे जि.प.प्रा.शाळा गोजेगाव ता.हदगाव जिल्हा नांदेड.

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 27/11/2019 वार - बुधवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    💥 ठळक घडामोडी :-  ● १९९५: गझलांच्या दुनियेतील स्वामी तलत महमूद यांना मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेशकर राष्ट्रीय पुरस्कार जाहीर. ● २०१६: निको रोसबर्ग २०१६ फोर्मुला १ चा चाम्पियान बनला. 💥 जन्म :- ● १८८८: भारतीय लोकसभेचे पहिले सभापती गणेश वासुदेव मावळंकर यांचा जन्म. ● १८४३ - कॉर्नेलियस व्हान्डरबिल्ट तिसरा, अमेरिकन उद्योगपती. ● १९०३ - लार्स ऑन्सेगर, नोबेल पारितोषिक विजेता नोर्वेचा रसायनशास्त्रज्ञ. ● १९८६ - सुरेश रैना, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :-  ● १९७८ - लक्ष्मीबाई केळकर, भारतीय समाजसेविका, राष्ट्रसेविका समितीच्या संस्थापिका. ● २००८: भारताचे ७ वे पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग यांचे निधन *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *भाजपाला पाठिंबा देत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेल्या अजित पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यामुळं बहुमत चाचणी आधीच अल्पमतात आलेलं फडणवीस सरकार अवघ्या साडेतीन दिवसात कोसळलं, अखेर देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *येत्या एक डिसेंबरला शिवाजी पार्क येथे उद्धव ठाकरे यांचा शपथविधी होणार आहे. ठाकरे घराण्यातील या पदावर विराजमान होणारे उद्धव ठाकरे पहिले नेते ठरणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसने मिळून तयार केलेल्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्याचा निर्णय या तिन्ही पक्षांनी घेतला आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *भाजपा आमदार कालिदास कोळंबकर यांची विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कालिदास कोळंबकर यांची नियुक्ती केली आहे. राजभवनात त्यांचा शपथविधी पार पडणार आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *पुणे : अजिंठा लेण्यांसंदर्भात संशोधन करून लेखनाद्वारे भारतीय कला आणि वास्तुशिल्पकलेतील अजोड कलाकृती असलेल्या अजिंठा लेण्याची जगभराला ओळख करून देणारे ज्येष्ठ अभ्यासक वॉल्टर एम. स्पिंक (वय ९१) यांचे अमेरिकेमध्ये नुकतेच निधन झाले.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *मुंबई: राज्याच्या नव्या विधानसभेचे आज होणार गठन, त्यासाठी आज सकाळी ८ वाजता आमदारांना विधानसभेत हजर राहण्याच्या सूचना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिल्या असून नवनिर्वाचित आमदारांचाही शपथविधी होणार आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *फिरकीपटू रविचंद्रन आश्विनने नुकत्याच झालेल्या मालिकेत चांगली कामगिरी केल्यामुळे आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत बढत मिळाली असून तो नवव्या क्रमांकावर आला आहे. ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *निवृत्तीबद्दल महेंद्रसिंग धोनीने घेतला अंतिम निर्णय, IPL नंतर क्रिकेटला रामराम करण्याची शक्यता क्रिकेट वर्तुळात व्यक्त केली जात आहे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••          *कथा -  सुंदर* त्‍याचं नाव सुंदर, तसं त्‍याचं कामही सुंदर त्‍याप्रमाणेच मन ही सुंदरच होतं.  परंतु सारेच जण त्‍याला बंदर म्‍हणायचे.  कारण ही तसेच होते, मूळात तो दिसायचा आफ्रिका देशातील निग्रो लोकांसारखा एकदम काळाकुट्ट, अगदी बारीक नाक आणि गरगरीत लहान डोळे गालात खोल........ वरील कथा पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://kathamaala.blogspot.com/2017/05/blog-post_90.html    कथा वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🐤गोष्ट नव्या कावळा चिमणीची 🐧 कावळा चिमणीचा शेजारी .कावळ्याचं घरं शेणाचं , चिमणीचू घर मेनाचं.पाऊस झाला .कावळ्याचं घर गेलं वाहून, तो गेला चिमणीकडे धावून .चिमणी पिलातचं होती व्यस्त, कावळा भिजभिजला मस्त . दिवस गेला , महिने गेले , वर्षे गेली .चिमणीचे पिलू भरारी घेऊन गेलं परदेशी .त्याच्या आठवणीनं चिमणी रोज रडे, फोटो त्याच्या घेऊन उशाशी . पिल्लू परदेशातून पैसे पाठवी , चिमणीला पिलूचं हवे होतं , पैसे नको म्हणून खर्च न करता नुसतेच साठवी ...! चिमणी अखेर आजारी पडली , तेव्हा कोणी नाही आले धावून .शेवटी कावळ्यानेच मदत केली , तर चिमणीचे डोळे गेले अश्रूंनी वाहून . कावळा म्हणाला चिमणीला , "विचार करु नको फार, लक्षात ठेव मात्र, घरासोबत जोडावे मित्रही चार . मित्र जर असतील पक्के ,त्यांच्यासोबत काढता येते, आपले आयुष्य अख्खे .....! *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *ज्यांचे डोळे चांगले ते जगाच्या प्रेमात पडतात, पण ज्यांची जीभ गोड असेल तर जग त्यांच्या प्रेमात पडते* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *राष्ट्रीय कांग्रेसचे पहिले अधिवेशन कोठे भरले होते ?* मुंबई 2) *महाराष्ट्रात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मागणी आधारित कोणता प्रकल्प राबविण्यात आला ?* जल स्वराज्य प्रकल्प 3) *डॉ अभय बंग व राणी बंग आदिवासीकरिता कोणत्या जिल्ह्यात आरोग्य विषयक कार्य करीत आहेत ?* गडचिरोली 4) *नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना ही केव्हापासून नियुक्त झालेल्या महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना लागू आहे ?* 1 नोव्हेंबर 2005 5) *कवी कुलगुरू कालिदास विद्यापीठ कोठे आहे ?* रामटेक ( नागपूर ) *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 👤 डॉ. बबन जोगदंड, यशदा पुणे 👤 गायत्री सोनाजे, साहित्यिक 👤 राहुल कुमार 👤 पंकज सेठिया 👤 ओंकार बच्चुवार 👤 ऍड. निलेश भाऊ पावडे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जगात प्रचंड विविधता आहे. किंबहुना, विविधता हेच जगाचे सौंदर्य आहे. तीच मानवतेची ताकद आहे; परंतु दुर्दैवाने विविधता आणि विषमता यातील फरक लक्षात न घेतल्यामुळे मानवा-मानवांत जात, पात, धर्म, पंथ यावरून गटतट पडले आहेत. समाजाला एकत्र ठेवण्याऐवजी, मतलबी मंडळींनी स्वार्थासाठी समाजात भांडणे लावून दिली आहेत. त्यातून अतिरेकी विचाराची माणसे निर्माण झाली आहेत. त्यातून हिंसाचार वाढीला लागला आहे. विवेकाचा आवाज दाबला जात आहे. सज्जनांची पीछेहाट आणि दुर्जनांचा विजय होताना दिसत आहे.* *भारताला साधुसंतांचा देश म्हटले जाते. प्रचंड मोठी सांस्कृतिक परंपरा असलेला भारतीय माणूस मूलत: विचारी आहे. त्यामुळे फोलपट बाजूला ठेवून सार ग्रहण करणे त्याला सहज शक्य आहे. दोन धर्मांच्या तत्वज्ञानात अंतर असू शकते. धर्माच्या भाषा वेगवेगळ्या असू शकतात; परंतु कोणत्याही धर्माचा हेतू वाईट असू शकत नाही. रजनीश एकदा म्हटले होते, की, इश्क, प्रेम आणि अहिंसा हे एकाच मनोवृत्तीसाठी वापरलेले वेगवेगळे शब्द आहेत. वरवर विचार करणा-याला ते पटत नाही; पण खोलवर विचार केला असता हे पटायला लागते. आपल्या शरीराची ठेवण अलग अलग असू शकते, भाषा वेगवेगळ्या असू शकतात, परंतु आपल्या ह्रदयाची ठेवण, रक्ताचा रंग हे मात्र एकच असते. हे आपण पक्के ध्यानात ठेवायला हवे. मनुष्यजन्म दुर्मिळ आहे, त्याचा सदुपयोग करायला हवा.* *॥ रामकृष्णहरी ॥* 🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो,* *नवीन वर्षाला एक महिना अवधी उरलाय.* *जीवनात नवे संकल्प करण्याची वेळ आली. काहीतरी नवीन वर्षाच्या सुरुवातीला संकल्प करा.* *तुम्ही केलेला संकल्प आणि संकल्पाच्या दिशेने जाणारी वाट ही नक्कीच तुमच्या यशाकडे जाणारी* *असली पाहिजे.कारण तुमचे संकल्प हे तुमच्या* *ध्येयपूर्तीसाठीच असतात.तुमच्या इच्छा, आकांक्षा,तुमचे कार्य आणि* *तुमचा विश्वास त्यात दडलेला असतो.तुमच्या संकल्पामुळे तुमच्या* *जीवनाचे तर कल्याण होईलच त्याचबरोबर इतरांना संकल्प करण्याची प्रेरणा सुध्दा* *मिळेल.* *आखताय ना मग योजना,* *आणि सफलतेच्या दृष्टीने वाटचाल सुध्दा करा.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्यांच्या मुखावाटे निघणारे शब्द जर अडखळत असतील तर त्या शब्दांमध्ये ठाम विश्वास नसतो किंवा मनातले विचार स्पष्टपणे मांडता येत नाहीत.अशी ज्यांची परिस्थिती झालेली असते तेव्हा एकतर मनातून खचलेला असेल किंवा कुणाच्यातरी दडपणाखाली असेल.अशा परिस्थितीतून बाहेर पडायचे असेल तर पहिल्यांदा आपल्या मनातली जी काही भीती असेल किंवा दडपण असेल ते काढून टाकायला हवे.अशावेळी आपला आत्मविश्वास आपणच वाढवला पाहिजे.माझ्या मनावर कुणाचेही दडपण नाही किंवा जरी असले तरी ते काहीच करु शकत नाही.आपण त्याला खंबीरपणे प्रत्युत्तर देऊ आणि आपण पूवस्थितीत येऊ अशी धारणा मनामध्ये उत्पन्न करुन पूर्वीसारखे जीवन जगू असा विश्वास जागृत करायला हवा तरच मग आपल्या मुखावाटे निघणारे शब्द स्पष्टपणे यायला लागतील आणि आपले जे काही विचार असतील ते समोरच्या व्यक्तीला समजायला लागतील यात काही संशय नाही.जर आपणच घाबरायला लागलो तर समोरची व्यक्तीही आपल्याला जास्तच घाबरून टाकेल आणि आपला जो काही आत्मविश्वास आहे तोही कमी करुन टाकेल.म्हणून परिस्थिती कशीही असो त्या परिस्थितीला घाबरुन न जाता त्याला तोंड द्यायला शिकले पाहिजे. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍀🌸🍀🌸🍀🌸🍀🌸🍀 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जीवन* *समुद्राच्या किना-यावर जेव्हा एक लाट आली तेव्हा जाताना एका लहान मुलाची एक चप्पल आपल्या सोबत घेऊन गेली*... *तो मुलगा वाळुवर बोटाने लिहीतो कि* *"समुद्र चोर आहे".* *त्याच समुद्राच्या दुस-या तटावर मासे पकडणारा खुप मासे पकडतो तो वाळुवर लिहीतो कि* *"समुद्र पालनकर्ता आहे".* *एक युवक समुद्रात बुडून मरतो तेव्हा त्याची आई वाळुवर लिहीते* *"समुद्र खुनी आहे".* *एका दूस-या किना-यावर एक गरीब वृध्द वाकड्या कंबरेने फिरत असतो त्याला एका मोठ्या सीपमध्ये एक अनमोल मोती सापडतो तर तो वाळुवर कसा लिहीतो* *"समुद्र दाता है".* *अचानक एक विशाल लाट येते आणि सर्व लिहीलेले पुसले जाते* *लोकं काही म्हणू द्या*... *परंतु अथांग, विशाल समुद्र आपल्या लाटांमध्ये मस्त राहतो*... *आपली भरती आणि ओहोटी तो आपल्या पध्दतीने सिध्द करीत असतो* *जर अथांग समुद्र बनायचे असेल तर कोणाच्या निर्णयावर लक्ष न देता जे करायचे ते आपल्या पद्धतीने करायचे...* *भूतकाळातील विचार करत बसू नये*. *यश अपयश, मिळणे न मिळणे, सुख-दुख, या सगळ्यात मन विचलित होऊ देऊ नये*. *जर जीवन सुख शांति ने भरलेले असते तर मनुष्य जन्माला येताना रडला नसता* *जन्माला येताना रडणे आणि मेल्यानंतर रडवणे यामधील संघर्षमय वेळेलाच कदाचित जीवन म्हणतात...* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 26/11/2019 वार - मंगळवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    *भारतीय संविधान दिन* 💥 ठळक घडामोडी :-  ● १८६३: अमेरिकेचे अध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी नोव्हेंबर २६ हा थँक्सगिव्हिंग डे म्हणून घोषित केला. ● १९४९: भारताची घटना मंजूर झाली. ● १९४९: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सादर केलेल्या संविधानास मान्यता मिळाली. ● १९८२: दिल्ली येथे ९वी आशियाई क्रीडा स्पर्धा संपन्न झाली. ● १९९७: शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना भारतरत्‍न हा सर्वोच्‍च नागरी सन्मान जाहीर. 💥 जन्म :- ● १९२१: भारतीय दुग्धोत्पादनातील धवल क्रांतीचे जनक, अमूलचे संस्थापक, राष्ट्रीय दुग्धोद्योग विकास महामंडळाचे (NDDB) संस्थापक अध्यक्ष व्हर्गिस कुरियन यांचा जन्म.  💥 मृत्यू :-  ● १९८५: कवी यशवंत तथा दिनकर पेंढारकर यांचे निधन. ● १९९४: चित्रपट महर्षी भालजी पेंढारकर यांचे निधन.  ● २००८ - विजय साळसकर, मुंबईचे पोलिस अधिकारी ● २००८ - हेमंत करकरे, मुंबईचे पोलिस अधिकारी ● २००८ - अशोक कामटे, मुंबईचे पोलिस अधिकारी *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *महाराष्ट्रात सुरु असलेल्या राजकीय पेचावर सर्वोच्च न्यायालयात सरकारी पक्ष आणि विरोधी पक्षाच्या वकिलांनी यावर सुमारे दीड तास युक्तिवाद केला. या दरम्यान सुप्रीम कोर्टाने सर्व पक्षकारांची बाजू ऐकल्यानंतर, आज सकाळी साडे दहा वाजता देणार आदेश* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *विश्वासदर्शक ठरावासाठी 14 दिवसांची मुदत, बहुमत सिद्ध करण्यासाठी आता सात डिसेंबरपर्यंत मुदत ?* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *महाराष्ट्रात घडत असलेल्या वेगवान राजकीय घडामोडींकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले असताना याच धामधुमीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आणखी ५ हजार ३८० कोटींची आर्थिक मदत देण्याची केली घोषणा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *पुणे: एसटी महामंडळाची शिवशाही बस कात्रज घाटातील ५० फूट खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन प्रवासी ठार झाले असून २६ जण जखमी झाले आहेत.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *पुणे : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना 'आविष्कार' या राज्यस्तरीय संशोधन स्पर्धेत या संशोधन संकल्पना सादर करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने मुदतवाढ दिली असून, संशोधन विद्यार्थी, प्राध्यापकांना आता ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *'नगर : शिक्षकांना गुणवत्ता शोधता यायला हवी. शिक्षक केवळ विद्यार्थी घडवत नाहीत तर समाज आणि राष्ट्र देखील घडवत असतात,' असे मत शिक्षणतज्ज्ञ डॉ. स्मिता देशमुख यांनी व्यक्त केले. नगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या शताब्दी वर्षानिमित्त बँकेतर्फे १०० सभासद शिक्षिकांचा 'सावित्रीची लेक' पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारताने बांगलादेश ला कसोटी क्रिकेटमध्ये 2 - 0 ने मालिका जिंकल्यामुळे आयसीसीच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील गुणतालिकेत भक्कम स्थितीमध्ये, भारत सध्या 360 गुणासह पहिल्या स्थानावर आहे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *भारतीय संविधान दिवस* देशाचा राज्य कारभार सुरळीत चालण्यासाठी तयार करण्यात आलेले कायदे ज्या ग्रंथात एकत्रित करण्यात आले त्यास भारताचे संविधान असे म्हणतात. संविधानास राज्यघटना असे सुध्दा म्हटले जाते. संविधानातील तरतुदी लेखी स्वरूपात आहेत. याच आधारावर देशांतील लोकप्रतिनिधी नियमांच्या चौकटीत राहून आपला कारभार करीत असतात. नागरिकांचे हक्क, शासन संस्थेची............ वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_24.html             लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *भारतात नोटा कश्या तयार होतात ? खराब नोटांचं काय करतात ?* रुपया शब्दाचा प्रयोग सर्वप्रथम शेर शाह सुरीने भारतावर राज्य करीत असताना १५४०-१५४५ च्या कालखंडातकेला होता. सध्या भारतासमवेत इतर ८ देशांमधील चलनाला रुपया म्हटले जाते. भारतात नोटा आणि नाणी बनवण्याचे काम भारतीय रिजर्व बँकच्या अखत्यारीत येते. भारतात सर्वात पहिली वॉटरमार्क असलेली नोट १८६१ मध्ये छापण्यात आली होती. हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त भारतीय नोटांमध्ये इतर १५ भाषांचा वापर केला जातो. *.भारतात नोटा कुठे छापल्या जातात?.* देशात चार नोट प्रेस आणि एक पेपरमिल आहे. देवास (मध्य प्रदेश), नाशिक (महाराष्ट्र), सालबोनी (पश्चिम बंगाल) आणि म्हैसूर (कर्नाटक) या चार ठिकाणी नोटा छापल्या जातात. देवास येथील नोट प्रेस मध्ये एका वर्षात २६५ कोटी नोटा छापले जातात. इथे २०, ५०, १००, ५०० किंमतीच्या च्या नोटा छापल्या जातात नोटा छापण्यासाठी वापरण्यात येणारी शाईसुद्धा इथेच बनते. नाशिक नोट प्रेस मध्ये १९९१ सालापासून इथे १, २, ५, १०, ५०,१०० किंमतीच्या नोटा छापल्या जातात. सुरवातीला इथे ५० आणि १०० च्या नोटा छापल्या जात नव्हत्या. *.भारतात नाणी कुठे बनवली जातात?.* १. मुंबई २. कोलकत्ता ३. हैदराबाद ४.नोएडा *.नाण्यांच्या चिन्हावरून समजते की ते कुठे बनवले आहेत :.* प्रत्येक नाण्यावर असलेल्या चिन्हावरून समजते की ते नाणं कुठे बनवलं गेलं आहे. नाण्यावर छापलेल्या वर्षाच्या खाली जर स्टारचे चिन्ह असल्यास ते हैदराबादला बनवलं गेलं आहे. जर वर्षाच्या खाली टिंब असेल तर ते नाणं नोएडाला बनवण्यात आलं आहे. वर्षाच्या खाली डायमंड असल्यास ते नाणं मुंबईत बनवलं आहे. कोलकत्ता मध्ये बनवलेल्या नाण्यावर कोणतेच चिन्ह नसते. *.नोटा कोणत्या वस्तूने बनले जातात?.* रिजर्व बँक ऑफ इंडिया नोट बनवण्यासाठी कापसाच्या कागदाचा आणि विशिष्ट प्रकारच्या शाईचा वापर करते. या प्रकारच्या कागदाचे उत्पादन काही प्रमाणात महाराष्ट्रात (सीएनपी) होते, तर मोठ्या प्रमाणात मध्यप्रदेश मधील होशंगाबाद मध्ये होते. काही पेपर आयत सुद्धा केले जातात. *.भारतात प्रत्येक वर्षी किती नोटा छापल्या जातात?.* रिजर्व बँकेच्या एका अहवालानुसार भारत प्रत्येकवर्षी २००० कोटी नोटा छापतो .यामधील ४० टक्के खर्च कागद आणि शाई आयात करण्यामध्ये जातो. हा कागद जपान, जर्मनी आणि ब्रिटन सारख्या देशांमधून आयात केला जातो. नोटा किती छापल्या पाहिजेत, याविषयीचा निर्णय घेण्याचा अधिकार भारतीय रिजर्व बँकेला आहे. नाणी किती तयार केली जावीत याचा निर्णय पूर्णतः सरकार घेते. *.नोटा कशा छापल्या जातात?.* विदेशातून आयात होणाऱ्या आणि होशंगाबाद मधून येणाऱ्या पेपरशीटला एका खास मशिन सायमंटन मध्ये टाकले जाते आणि नंतर इंटाब्यू नावाच्या मशीनने त्यावर कलर केले जाते. याप्रकारे नोट तयार होतात. त्यानंतर चांगल्या आणि खराब नोटा वेगळ्या केल्या जातात. एका वेळेस एका शीट मध्ये ३२ ते ४८ नोटा छापण्यात येतात. *.खराब झालेल्या नोटांना कुठे जमा केले जाते?.* नोटा तयार करतानाच त्यांची ‘सेल्फ लाइफ’ (नोटा योग्य प्रकारे बनण्याचा अवधी) ठरवण्यात येते. हा अवधी संपल्यानंतर किंवा सारख्या वापरणे खराब झालेल्या नोटांना रिजर्व बँक परत घेते. *.फाटलेल्या जुना नोटांचे काय केले जाते?.* खराब झालेल्या आणि फाटलेल्या नोटा रिजर्व बँक परत चलनात आणत नाही, कारण तसे करणे योग्य नसते. रिजर्व बँक सर्व व्यावसायिक बँकांकडून फाटलेल्या आणि खराब नोटा मागवून एकत्र जमा करते. सुरवातीला या नोटा जाळल्या जात असतं, परंतु आता RBI ने पर्यावरणासंवर्धनाच्या दृष्टीने ह्या नोटा जाळणे बंद केले आहे. RBI ने एक ९ कोटींची मशीन आयत केली आहे, ही मशीन जुन्या नोटांचे छोटे तुकडे करते. त्यातून मजबूत अशी विट बनवली जाते .ह्या विटा खूप कामांमध्ये उपयोगी येतात. *भारतात प्रत्येक वर्षी ५ दशलक्ष नोटा चलनातून बाद होतात, ज्यांचे एकूण वजन ४५००० टन एवढे असते.—.* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *दुसऱ्याला आनंदी बघायला आवडणं हें अतिशय निरोगी मनाचे लक्षण आहे* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *भारतातील पहिले 'पुस्तकाचे गाव' कोणते ?* भिल्लार ( सातारा ) 2) *'संविधान दिवस' केव्हा साजरा केला जातो ?* 26 नोव्हेंबर 3) *'संविधानाचे शिल्पकार' कोणाला म्हटले जाते ?* डॉ बाबासाहेब आंबेडकर 4) *संविधान निर्माण करण्यासाठी किती कालावधी लागला ?* 2 वर्ष ,11 महिने , 18 दिवस 5) *संविधान सभेची पहिली बैठक केव्हा झाली ?* 9 डिसेंबर 1946 *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 👤 संतोष लक्ष्मणराव सज्जन 👤 अर्जुन यनगंटीवार 👤 मुरलीधर हंबर्डे पाटील 👤 संजय बोंटावार *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कोणतेही नाते प्रत्येक क्रियेने उज्ज्वल करता येणे, ही खरी सार्थकता. परंपरेने किंवा संस्कृतीने जी सणावारांची यादी केली, त्या प्रत्येक सणाचा अन्वयार्थ नव्याने शोधायला हवा; तरच आनंद-परमानंद-ब्रम्हानंद या पाय-या चढता येतील. वाद आणि भांडणाच्या प्रकारात जो अडकतो त्याचा फास आधिकाधिक घट्ट होण्याची शक्यता असते. त्यामुळे स्नेहभावनेतून जग जोडले पाहिजे. भारतीय संस्कृतीत प्रत्येक दिवस स्नेहाद्रता पेरत येतो, म्हणून सण हे उत्सवांचे प्रतीक म्हणून साजरे व्हावेत.* *नात्यांचा, घटनांचा अर्थ लावत आपल्याला मनाचा स्वयंविकास जेव्हा साधता येईल, तेव्हाच सगळे सण-उत्सव प्रतीकरूप होतील. रोजचा दिवस येतो आणि जातो. रोजच्या कामात मग्न असणारे आपण काही नवीन करतो का, किंवा जे कुठलेही काम करतो त्याच्यात काही नवीन शोधतो का ? नसल्यास ते जमले पाहिजे. नित्यनूतनतेचा ध्यास जोवर लागत नाही, तोवर आयुष्यातून शिळेपणा जाणार नाही. प्रत्येक क्षणाचा उत्सव करणे हे आपले कर्तव्य आहे. या भावनेने जगण्याच्या अनेकविध अंगांकडे पाहता आले पाहिजे.* *॥ रामकृष्णहरी ॥* 💥💥💥💥💥💥💥💥 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो* *ज्ञान ही अशी शिदोरी आहे* *की ती माणसाला नेहमीच* *प्रत्येक क्षेत्रात एका ठराविक उंचीवर* *नेऊन ठेवते.* *अजून अस गुरुत्वाकर्षण तयार झालं* *नाही की ते ज्ञानाला* *नैसर्गिकरित्या आपल्याकडे खेचून* *घेईल.* *त्याला मिळविण्यासाठी प्रयत्न* *करावेच लागतात. एकदा मिळविले* *की कोणत्याही ब्रम्ह* *पंडितांची ताकद नाही की तो* *तुमच्याकडून हिसकावून घेईन.* *ह, एक मात्र नक्की की आता* *एकलव्य बनू नका.* *धर्माचा ,ज्ञानाचा ठेका घेतलेली* *मंडळी तुमच्या मार्गात अनंत अडचणी उभ्या करतात.* *स्वामी विवेकानंद यांना शिकागो येथे बोलण्यासाठीचे प्रमाणपत्र भारतीय* *शंकराचार्य यांनी दिले* *नाही,ते श्रीलंकेच्या बौध्द* *धर्मप्रसारक विद्वानांनी दिले.* *त्यांचे 5 मिनिटे कमी करून* *विवेकानंदांना दिले,आणि त्याच 5* *मिनिटांनी 1893 साली स्वामींनी* *जगभरात नावलौकिक* *मिळवला व आपली* *धर्म पताका जगभर* *फडकावली.* *अजूनही तो दैत्य* *उरात धडधड करतो.* *विनंती-ज्ञानाची भूक प्रचंड* *असुद्या। कुठेही, केव्हाही,कसेही* *फक्त रुचकर ज्ञान मिळेल त्याचे सेवन* *करा,नक्की सुदृढ व्हाल.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• तुम्ही केलेला संकल्प आणि संकल्पाच्या दिशेने जाणारी वाट ही नक्कीच तुमच्या यशाकडे जाणारी असली पाहिजे.कारण तुमचे संकल्प हे तुमच्या ध्येयपूर्तीसाठीच असतात.तुमच्या इच्छा, आकांक्षा,तुमचे कार्य आणि तुमचा विश्वास त्यात दडलेला असतो.तुमच्या संकल्पामुळे तुमच्या जीवनाचे तर कल्याण होईलच त्याचबरोबर इतरांना संकल्प करण्याची प्रेरणा सुध्दा मिळेल. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०. 🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *धाडसी गीता* गीता नऊ दहा वर्षाची मुलगी होती. ती आणि तिचे आई बाबा शेतातील झोपडीत रहायचे. तिची आई बाबा शेतात काम करत होते. संध्याकाळ झाली. गीता अभ्यास करत होती. एक कोकरू बांधली होते. झोपडीत येऊन आईने चुलीवर भात शिजायला ठेवला. आणि गीताला भाताकडे लक्ष ठेवायला सांगितले. आणि विहिरीजवळ पाणी भरायला गेली. देवळात कोकराचा बँs बँs ओरडण्याचा आवाज आला. तशी गीता धावतच झोपडीबाहेर आली, एक लांडगा दिसला. तो कोकरा कडे येत होता. गीता घाबरली. क्षणभर विचार केला आला आला. ते झटकन झोपडीत गेली. चुलीतील जळते लाकूड घेऊन बाहेर आली. लांडगा कोकरा वर धडक घालणार होता इतक्या गीता ने जळते लाकूड लांडग्याच्या दिशेने फेकले. आगीला पाहून लांडगा घाबरला. तो पळाला. कोकराचा जीव वाचला. “पळापळा लांडगा आला, ” गीता जोरात जोरात ओरडू लागली. तिच्या आवाजाने शेतात काम करणारे आई बाबा धावत आले. गीताने त्यांना घडलेला प्रसंग सांगितला. आईने तिला जवळ घेतले. बाबांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला. गीताच्या धाडसी पणाची बातमी गावात पसरली. गावच्या सरपंचानी तिची पाठ थोपटली. शाळेतील शिक्षकांनी, मुख्याध्यापकांनी तिच्या धाडसा चे कौतुक केले. बोध: आपण कधीही धाडसी राहिले पाहिजे. तरच आपण कोणाला भिणार नाही. समयसूचकता व धाडसीपणा हे दोन महत्त्वाचे गूण आहेत. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 25/11/2019 वार - सोमवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *यशवंतराव चव्हाण पुण्यतिथी* *आंतरराष्ट्रीय महिलाविरुद्ध हिंसा निर्मूलन दिन* *शाकाहार दिन*   💥 ठळक घडामोडी :-  ● २०१२ - बांगलादेशच्या ढाका शहरात कपडे बनविणाऱ्या कारखान्यात आग लागून ११७ ठार. ● १९९१-कमल नारायण सिंग यांनी भारताचे २२ वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळले 💥 जन्म :- ● १८४४ - कार्ल बेंझ, जर्मन उद्योजक आणि अभियंता. ● १८८२ - सावळाराम लक्ष्मण हळदणकर, मराठी चित्रकार. ● १९५३ - जेफ्री स्किलिंग, एन्रॉनचा मुख्याधिकारी. ● १९५२-इम्रान खान ,पाकिस्तान चे प्रधानमंत्री. ● १९२६- रंगनाथ मिश्रा ,भारताचे २१ सरन्यायाधीश. 💥 मृत्यू :-  ● १९७४ - उ थांट, संयुक्त राष्ट्रांचा सरचिटणीस. ● १९८४ - यशवंतराव चव्हाण, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *बहुमताचा दावा करणारं आणि सरकारस्थापनेचं निमंत्रण पत्र सादर करा ; सर्वोच्च न्यायालयाचे महाधिवक्त्यांना आदेश,आज होणार उद्या सुनावणी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *खाजगी नोकरधारकांसाठी मोठी बातमी, नोकरी गेल्यास सरकार 2 वर्ष उचलणार खर्च, खाजगी नोकरधारकांसाठी मोदी सरकारनं एक मोठा निर्णय घेतला आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *पुणे : शैक्षणिक गुणवत्तेच्या दर्जाची माहिती होण्यासोबतच, तो सुधारण्यासाठी राज्यातील सर्व शाळांनी स्वयंमूल्यमापन आणि बाह्यमूल्यमापनाची प्रक्रिया तातडीने अंमलात आणण्यासाठी कार्यवाही करावी, असे आदेश शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनी दिले* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *कोल्हापूर : विधापरिषदेच्या पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची प्रारुप मतदार यादी शनिवारी (ता. २३) प्रसिद्ध करण्यात आली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय युवा महोत्सवाचा रंगमंच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आत्मविश्वास देणारा ठरला* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कैलाश जोशी यांचं निधन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *टीम इंडियाने बांगलादेशविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत बांगलादेशचा एक डाव आणि 46 धावांनी पराभव करून 2-0 ने मालिका जिंकली, रचले नवे विश्वविक्रम, मायदेशात सलग बारावा कसोटी मालिका विजय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *लघुकथा - भूक* आभाळ गच्च भरून आलं म्हणून रेल्वे स्टेशनला जाण्याच्या घाईत तो ऑटो पाहू लागला. पावसाच्या धास्तीने प्रत्येकजण मिळेल त्या ऑटोमध्ये बसून जात होते थोड्याच वेळांत त्याला देखील ऑटो मिळालं. तसं तो रेल्वे स्टेशनला चला म्हणून ऑटोमध्ये बसून घेतलं. ऑटोत बसल्याबरोबर जोराचा पाऊस सुरू झाला. ऑटोमध्ये बसून देखील त्याच्या अंगावर पावसाचे पाणी पडतच होतं. पाऊस तसं खूप जोरदार पडत होता. ...........….. https://storymirror.com/read/story/marathi/yk8b6w78/bhuuk/detail             कथा वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *तापाने फणफणलेल्या मुलाला पांघरून द्यावे का ?* 📙 एकदा घरी एक व्यक्ती बोलवायला आली. तिच्या मुलाला ताप होता. त्यांच्यासोबत घरी गेलो. पाहतो तो काय घराची दारे खिडक्या बंद होत्या, पंखा बंद होता, भर उन्हाळ्यात घरातील सर्व लोक घामाघूम होऊन मुलाकडे चिंताक्रांत नजरेने पाहत बसले होते. मुलाकडे बघितले तर त्याला कानटोपी स्वेटर घातला होता. अंगावर उबदार शाल घातली होती. मुलगा अंथरुणावर तळमळत होता. गेल्या गेल्या सर्वप्रथम मी आई वडिलांना जवळ बोलावून पंखा लावायला सांगितला. नंतर मुलांचे स्वेटर कानटोपी काढली. शाल काढून टाकली. माठातील गार पाणी आणायला सांगितले. एक स्वच्छ फडके आणले. ते ओले करून मुलाची पाठ, छाती, हात पाय कपाळ वारंवार ओल्या फडक्याने पुसले. नंतर मुलाला पातळसर कपडे घातले. एवढे झाल्यावर आईला थर्मामीटरने मुलाचा ताप पाहायला सांगितला. तिला आश्चर्याचा धक्काच बसला वीस मिनिटात ताप १०३ वरून १०० पर्यंत खाली उतरला होता. असा प्रसंग तुमच्याही घरात होऊ शकतो! ताप आल्यावर शरीरात जास्तीची उष्णता निर्माण झालेली असते. ती शरीराबाहेर टाकणे आवश्यक असते. त्यामुळे अशा मुलाला स्वेटर वा उबदार कपडे घातल्याने ताप कमी होणार नाही. याउलट गार पाण्याच्या पट्ट्या ठेवल्याने व पाण्याने पुसल्याने ताप कमी होतो. त्यामुळे ताप आलेल्या मुलाला पांघरूण देखील घालू नये. पंख्यांमुळेही गारवा निर्माण होऊन ताप कमी व्हायला मदत होते. या उपायांमुळे तापामुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम टाळता येतात. येथे एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. ती म्हणजे ताप हा रोग नाही. ते एक लक्षण आहे. वर सांगितलेल्या उपायाने ताप तात्पुरता उतरेल. पण रोग बरा होणार नाही. त्यासाठी त्या त्या रोगाचा विशिष्ट उपचारच घ्यायला हवा. *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• सकाळच्या वेळी तुम्ही झोपाल तर तुम्हाला बरे वाटेल, पण तुमचे यश देखील कायमचे झोपेल - कर्मवीर भाऊराव पाटील *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *नगरपरिषद व महानगरपालिका यांच्या निवडणुकांचे नियंत्रण कोण करते ?* राज्य निवडणूक आयोग 2) *महेंद्र व संघमित्रा यांना श्रीलंकेत बौद्ध धर्म प्रचारासाठी कोणी पाठवले होते ?* सम्राट अशोक 3) *भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार कोण ?* पं जवाहरलाल नेहरू 4) *माहितीच्या अधिकाराचा कायदा सर्वप्रथम कोणत्या देशात अस्तित्वात आला ?* स्वीडन 5) *भारताचा पहिला व्हाइसरॉय कोण ?* लॉर्ड कॅनिंग *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 👤विलास ढवळे, कार्यक्रमाधिकारी       सर्व शिक्षा अभियान, नांदेड 👤 नितीन देशमुख, पत्रकार, धर्माबाद 👤 शिवाजी पाटील कदम 👤 अंकुश बल्लेवार 👤 नरसिंग येनद्रलवार 👤 शिवलिंग गंटोड 👤 महेश मुधोळकर 👤 विनोद महाबळे, वृत्तपत्र छायाचित्रकार *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *'मैत्री' विषयीच्या अनेक कल्पना आपल्या मनात असतात. मैत्रीची वेगवेगळी रूपे आपण अनुभवत असतो. अनेकांना सगळे मिळते पण मित्र मिळत नाहीत व अनेकांना ते मिळतात पण लाभत नाहीत.* *कधी कधी मैत्रीत 'आपेक्षा' निर्माण होते व तिथेच घोटाळा होऊन मैत्रीला तडा जातो. आपण ज्याच्याशी मैत्री करतो तो माणूस 'एक स्वतंत्र व्यक्तिमत्व' आहे, हे आपण लक्षातच घेत नाही. आपल्या वाट्याला जे येते तेवढेच आपण महत्वाचे मानत नाही, त्याही पलिकडे आपल्याला हवे असते.* *'मैत्री' ही संकल्पना कुठल्याही नात्यापेक्षा महत्वाची असते. असे म्हणतात... मैत्रीकडे विधायक वृत्तीने पाहिले तर आपला मित्र हाच आपल्या घराचा पत्ता असतो.* *॥ रामकृष्णहरी ॥* 🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो,* *दगडाचं तर ठिक आहे हो* *थोडा शेंदुर फासला* *म्हणजे* *" एकदा देव तरी तयार* *करता येईल* *पन "* *माणसाला असा कोणता* *रंग द्यावा* *म्हणजे माणसाचा* *" माणुस " बनवता येईन* *एक पत्थर बेचने वाले से पचास हजार का बड़ा पत्थर लेकर, एक* *मूर्तिकार ने उसे कांट-छांट कर, तराश कर, एक मूर्ति बना दी और वो पाँच लाख में बिकी।* *पत्थर वाले ने उससे पूछा कि, पहले तो पत्थर भी बड़ा था व् वजन भी* *ज्यादा था और मूर्ति बनने के बाद वजन भी कम हो गया व्* *साईज भी बहुत छोटा हो गया। फिर भी पत्थर की कीमत पचास हजार और मूर्ति की कीमत* *पाँच लाख कैसे हो गई ? तो मूर्तिकार ने बहुत सुन्दर जवाब दिया कि, "अब उस पत्थर में जो वेस्टेज था, जो काम* *का* *नहीं था, उसे निकाल कर फेंक दिया गया है।* *अब सार बचा है। तभी वो मूल्यवान है।"* *जीवन को भी हमने तमाम फिजूल उपाधियों व् बिना सार वाली बातों को* *ढ़ोते हुये, इसका मूल्य कम कर दिया है। अगर हम* *इसमें से ईर्ष्या, द्वेष, कामनायें तथा फिजूल उपाधियों जैसे अमीरी, ज्ञान,* *सुन्दरता, देखा-देखी के आराध्य, मनगढ़ंत पुजा-पद्धतियों* *आदि से मुक्त करके अपनी वास्तविक मूल स्थिति में आ* *जायेंगे, तभी हमारी कीमत है।* *और हमारी मूल स्थिति यह है कि, हम सभी परम भगवान् श्रीविष्णु के अंश* *हैं, उनके दास हैं और हमारा एकमात्र कार्य है, उनकी* *निष्काम और निःस्वार्थ भाव से भक्ति और सेवा करना। अगर हम* *तमाम झूठी उपाधियों से मुक्त होकर हमारी इस सच्ची पहचान* *_को समझ जायेंगे, तभी हमारी कीमत है।_* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते* ) 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• प्रत्येकालाच वाटते की,जीवनात सुख,शांती,समाधान असावे.ह्या तीनही गोष्टी आपल्या जवळच असतात पण आपण उगीचच ओरडत असतो की, जीवनात कधीही सुख नाही,शांती नाही आणि समाधानही नाही.असे म्हणण्यामागे आपणच कारणीभूत आहोत आणि त्यामागचे मूळ कारण आहे म्हणजे ती मनाची अस्वस्थता.या अस्वस्थ मनामुळेच तर आपल्या स्थिर जीवनाला अस्थिर करुन टाकले आहे.मनाच्या खूप अपेक्षा असतात त्या पूर्ण नाही झाल्या की,जीवनातल्या सगळ्याच गोष्टींना अस्थिर करतात आणि आहे त्या गोष्टींना मुकावे लागते.माणसाजळ सुख आहे त्या सुखासाठी मनातून परिश्रम करावे लागते.मन लावून परिश्रम केले आणि कसल्याही प्रकारचा कामामध्ये कामचुकारपणा केला नाही तर मनाला समाधान वाटते आणि कोणत्याही कामात मन स्थिर ठेवून जीवन जगण्यासाठी प्रयत्न केले आणि कसल्याही प्रकारची जास्त अपेक्षा न ठेवता समाधानाने जीवन जगले तर जीवनात शांती टिकून राहील.शेवटी खेळ तर आपल्या मनाचाच आहे ना.आपल्या जीवनाची तुलना इतर लोकांच्या जीवनाशी करायला लागलो तर आपल्या जीवनातले सुख, शांती आणि समाधान हे हळूहळू पाय काढतात आणि नैराश्यमय जीवन जगण्यासाठी प्रवृत्त करतात.म्हणून आपल्या मनाला कुणाच्याही गोष्टींची तुलना करण्यासाठी प्रेरणा देऊ नका.आपण आपल्या जीवनात जे आपल्याने शक्य आहे त्यासाठी करायला तयार रहा आणि जे काही प्रयत्नाने,परिश्रमाने आणि स्थिर मन ठेवून समाधानाने मिळेल त्यात आनंदात जीवन जगण्याचा मंत्र स्वीकारा यातच आपले खरे जीवन जगणे आहे. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍁🍀🍁🍀🍁🍀🍁🍀🍁                ८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *खरी आई* एकदा दोन बायका एका लहान मुलावरून भांडत होत्या. “मीच या मुलाची खरी आई आहे” असे त्या दोघीही सांगत होत्या. त्या दोघींना न्यायाधीशांसमोर आणले गेले. त्या दोन्ही बायकांचे म्हणे न्यायाधीशाने लक्षपूर्वक ऐकले खरीआई नक्की कोणती? हे ठरवण खरोखरचे अवघड होते. न्यायाधीशाने खूप विचार केला. अखेर त्याला एक युक्ती सुचली. सेवकाला आज्ञा केली, “या मुलाचे दोन भाग करा आणि प्रत्येकीला एक एक भाग द्या.” न्यायाधीशाची ही आज्ञा ऐकताच त्यातील एका बाईने हंबरडा फोडून म्हटले, “नको, नको. न्यायाधीश महाराज दया करा. या मुलाला त्या बाई जवळ राहू द्या. मी मुलावर चा माझा हक्क सोडते .” दुसरी आई मात्र काहीही बोलली नाही. न्यायाधीशाने खरी आई कोण हे ओळखले. मुलाचे तुकडे होण्याऐवजी हक्क सोडायला जी बाई तयार होती, न्यायाधीशाने ते मूल त्या बाईस दिले. दुसऱ्या बाईला मात्र तुरंग वासाची शिक्षा ठोठावली. *बोध: सत्याचानेहमी विजय होतो.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 23/11/2019 वार - शनिवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    💥 ठळक घडामोडी :-  १९९२: आयबीएम सायमन हा पहिला स्मार्टफोन प्रकाशित करण्यात आला. १९९९: नागपूरचे संस्कृत महाकवी व संस्कृत पत्रकार डॉ. श्रीधर भास्कर वर्णेकर यांना या क्षेत्रातील कठोर तपश्चर्येबद्दल अप्पाशास्त्री राशिवडेकर पुरस्कार प्रदान. 💥 जन्म :- १७५५: लॉर्डस क्रिकेट ग्राउंडचे संस्थापक थॉमस लॉर्ड १८८२: उद्योगपती वालचंद हिराचंद दोशी १८९७: साहित्य अकादमी पुरस्कार विजेते बंगाली/इंग्लिश लेखक निराद सी. चौधरी १९२३: लेखक नागनाथ संतराम तथा ना. सं. इनामदार 💥 मृत्यू :-  १९३७: नोबेल पारितोषिक विजेते भारतीय वनस्पतीशास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस १९५९: अभिनेते व निर्माते नटवर्य चिंतामणराव कोल्हटकर *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *बैठकीत मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी टेबल वाजवून निर्णयाचं केलं स्वागत* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *यवतमाळ : अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची केंद्रीय पथकाकडून पाहणी, नेर तालुक्यात सोयाबिन, कापूस, उडीद, मूग, ज्वारी, तूर या पिकांची कृषी अधिकाऱ्यांकडून पाहणी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *महापौरपदाच्या निवडणुकीत मुंबई महानगरपालिकेवर पुन्हा एकदा भगवा फडकला असून महापौरपदी शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर तर उपमहापौरपदी सुहास वाडकर यांची बिनविरोध निवड* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *नवी दिल्ली – नेहमीच डिलरच्या मनमानीचा त्रास गॅस सिलेंडरच्या ग्राहकांना सहन करावा लागतो. पण ग्राहकांना आता डिलरने वेळेत एलपीजी गॅस सिलेंडरचा पुरवठा केला नाही तर त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात येणार असून कमिशन कापले जाणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *नागपूर करारानुसार वर्षातील एक अधिवेशन उपराजधानी नागपूरमध्ये घेण्याची परंपरा आहे. पण सध्याची महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती पाहता यंदा नागपूरमध्ये अधिवेशन होण्याची शक्यता कमीच आहे, अधिकृत सूत्रांची माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *एअरटेल, जिओ, व्होडाफोन-आयडिया आणि बीएसएनएलने लवकरच आपल्या मोबाइल डाटाचे दर वाढवण्याची घोषणा केल्याने मोबाइल इंटरनेट सेवा महागणार आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *ऐतिहासिक डे-नाईट कसोटीच्या पहिल्या दिवशीच्या पहिल्याच सत्रात बांगलादेशची दाणादाण, 106 धावा मध्ये सर्व टीम बाद, इशांत शर्माने घेतले पाच विकेट* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *दुःखद बातमी - दैनिक नवाकाळचे संपादक,'अग्रलेखांचे बादशाह' नीलकंठ खाडिलकर यांचे दुःखद निधन, ते 86 वर्षाचे होते. आपले धारदार वक्तृत्व आणि समर्थ लेखणीच्या माध्यमातून खाडिलकरांनी सातत्याने अन्यायाविरुद्ध वाचा फोडली आणि वाचकांचे प्रबोधनही केले. त्यांना फ्रेश मॉर्निंग बुलेटीनकडून भावपूर्ण श्रद्धांजली !* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *स्मार्टफोनचा विळखा, वेळीच ओळखा* अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. पण कालांतराने या मूलभूत गरजामध्ये अजून कांही वस्तूची वाढ होत गेली त्यात प्रामुख्याने मोबाईलचा समावेश करणे अगत्याचे आहे. आज माणसाला एक वेळ अन्न, वस्त्र किंवा निवारा यांची कमतरता असेल तर चालून जाईल मात्र खिशात मोबाईल नसेल तर ती व्यक्ती जिवंत राहू शकत नाही, अशी परिस्थिती सर्वत्र निर्माण झाल्याचे............ वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_22.html             लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *नागीण का होते ?* 📙 तुमच्या घरात किंवा शेजारीपाजारी कोणालाही 'नागीण' झाल्याचे तुम्हाला समजले असेल, तेव्हा सुरुवातीला तुम्हाला आश्चर्य वाटले असेल. पण नंतर नागिन म्हणजे त्वचेवर येणारे विशिष्ट प्रकारचे पुरळ हे पाहिल्यावरच कळले असेल. कांजण्या हा रोग विषाणूंमुळे होतो. या विषाणूंसारख्या दुसर्या विषाणूंमुळे नागिन हा रोग होतो. कांजण्या होऊन गेल्यानंतर काही जणांच्या शरीरात हे विषाणू सुप्तावस्थेत राहतात व कित्येक वर्षांनी मज्जारज्जुतून एखाद्या नसेमार्फत त्वचेवर फोड निर्माण करतात. नागिनीची तीव्रता वयाबरोबर वाढते. मोठ्या वयात जास्त त्रास होतो. हे विषाणू मज्जापेशी व त्यांच्यामधून मज्जातंतुतुच्या रेषेवर वाढतात. आजाराची सुरुवात त्या मज्जातंतूंच्या मार्गावर खूप दुखणे सुरू होऊन होते. तीन चार दिवसांत तेथील त्वचेवर लालपणा येतो व पाठोपाठ पाण्याने भरलेले दुखरे फोड येतात. पाच सहा दिवस हे फोड वाळायला लागतात व खपली धरते. फोड गेले की दुखणे थांबते. काही वेळा सहा महिन्यांपर्यंत दुखरेपणा टिकतो. सामान्यतः बरगड्यांमधील नसांच्या रेषेवर फोड येतात. नागिन हा रोग त्रासदायक असला तरी सहसा फारसे गंभीर परिणाम होत नाहीत; पण डोळ्यात जर फोड आले तर मात्र दृष्टी जाऊ शकते. असायक्लोव्हीर या महागड्या औषधाने पुरळ लवकर बरे होते. पण आग होणे मात्र कमी होत नाही. एक गोष्ट लक्षात ठेवणे महत्त्वाचे ती म्हणजे इतर विषाणूजन्य रागांप्रमाणेच हाही रोग काही दिवसांत आपोआप बरा होतो. वेदना कमी होण्यासाठी ऍस्पिरिन, पॅरासिटेमॉल या औषधांचा वापर करता येतो. वेदना खूप दिवस होऊनही बंद न झाल्यास संबंधित नस मारून टाकतात. अर्थात यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन त्यानुसार उपचार घ्यावे. *डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित* यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून मनोविकास प्रकाशन ०२० ६५२६२९५० *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• " काळजी केल्याने उद्याचे दुख: कमी होत नाही , तर आजच्या दिवसाची ताकत कमी होते." *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *भीमा ही कोणत्या नदीची उपनदी आहे ?* कृष्णा 2) *शहरीकरणामध्ये भारतात महाराष्ट्र हे राज्य कोणत्या क्रमांकावर आहे ?* 2 3) *महाराष्ट्र शासन 'नवसंजीवन योजना' कोणासाठी राबवते ?* आदिवासी 4) *स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री कोण होते ?* डॉ पंजाबराव देशमुख 5) *भारत-नेपाळ यांना जोडणाऱ्या राजपथाचे नाव काय ?* त्रिभुवन राजपथ *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 👤 जुगलकिशोर बोरकर 👤 सुनील बंडेवार, धर्माबाद 👤 जगन्नाथ भगत 👤 आदित्य खांडरे 👤 कपिल दगडे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *भारतभूमी संत-महंतानी, समाजसुधारकांनी पावन केली आहे. लोककल्याणासाठी चंदनासारखा देह झिजवत त्यांनी मानवता समृद्ध केली. काही अलौकिक प्रलोभनांमध्ये भोळ्याभाबड्या लोकांना अडकवून स्वत:ची वैभवी दुकानं थाटणं हे संतांचं ध्येय नसतं. त्यांच्या माणूसधर्माच्या शिकवणूकीचं आपल्याला मोल नसतं. संतांच्या जीवनात कुठलाच झगमगाट नसतो, चमत्कार नसतात. 'माणूस' घडवणं हेच त्यांचं ध्येय असतं. संतांना ना स्वत:ची जात असते, ना कोणता धर्म! कुठल्या विशिष्ठ विचारांचा त्यांच्यावर पगडा नसतो. ते स्वत:च्या वाटेवरुन स्वतंत्रपणे चालत राहतात.* *स्वर्ग-नरकाच्या जटील जाळ्यात संत अडकत नाहीत. कुणाला अडकवत नाहीत. जमिनीवरल्या सहज जगण्याचे व अंतरीच्या शाश्वत सुखाचे मंत्र ते देत राहतात. त्यांचं नातं केवळ सत्याशी असतं, सत्य कटू असतं. म्हणून आपण दगड मारतो सत्याच्या पुजा-यांना. यात संत असतात तसे वैज्ञानिक-विचारवंतही असतात. खरंतर या महामानवांच्या निमीत्तानं आपण सत्यालाच दगड मारत असतो. सत्याचा मार्ग गर्दीचा नसतो, पण खडतर असतो. म्हणूनच येशूला आपण क्रूसावर चढवलं. बुद्ध-महावीर यांना दगड मारले. एडिसनला मंदबुध्दी ठरवलं आणि गॅलिलिओला वेड्यात काढलं. विचारवंताना गोळ्या झाडणारेही आपणच. किती निष्ठुर आहोत आपण ! इमानाला सजा व दांभिकाची पूजा ! सत्याच्या मुखवट्यांना हार घालायचे, महानतेचे मुकुट चढवायचे ही आपली व्यवस्था, हे आपले करंटेपण.* *॥ रामकृष्णहरी ॥* ☀☀☀☀☀☀☀☀☀ *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल- 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो,* *अन्यायाची जाळत पाने* *सत्य आता जळते आहे* *भुपुत्रांचे अज्ञान आता* *त्यांनाही कळते आहे।* *जाळून टाकीन अज्ञानाला* *आतून जरी तो निजलेला* *लढवण्यास सिध्द मी* *जरी आहे पिचलेला।* *मी चूक केली हे पाप नव्हे; पण ती नाकबूल करतो ते पाप आहे.* *एवढ्या भूमिकेवर मी आलो, चांगलं झालं. एवढं पुरेसं आहे मला. एवढं* *देवालाही पुरतं. निसर्गालाही पुरतं. कारण एकदा* *कबूल केल्यावर, तो निराळ्या मार्गाने जायला लागतो. मी सांगतो त्या* *पद्धतीने वागलात, तर आपण अधिक बळकट होत जाऊ. मी* *तुम्हाला बंधनात टाकूच इच्छित नाही. मी तुम्हाला बंधनातून* *सोडवायची इच्छा करतोय. कसलीही भीती बाळगू* *नका. असत्याची भीती बाळगा, अप्रयत्नाची भीती बाळगा, अज्ञानाची* *भीती बाळगा. या तीन 'अ'कारांची भीती बाळगा. कुठेही* *कमीपणा येणार नाही. सत्य बोला. एखादी इच्छा निर्माण होणं* *चुकीचं नाही. त्या इच्छेच्या आहारी जाणं चुकीचं आहे. मी साखरेला खाणं आणि साखरेनेच* *मला खाणं यात फरक आहे. तुम्हाला बासुंदी आवडते, म्हणून जर मी बासुंदीने भरलेल्या पिंपात तुम्हाला* *बुचकाळलं तर चालेल का? नाही चालणार. जे आवडतं, त्याचा अतिरेक झाला, तर काय उपयोग* *आहे? तेच तुम्हाला मारतं. मग योग्य तर्‍हेने घेतलेलं पाप हेच पुण्य आहे. अशा व्यावहारिक गोष्टी* *आपण पत्करलेल्या आहेत. 'गीते'ने सांगितलं आहे की, प्रत्येक विषाचं अमृत होतं.* *सतरावा, अठरावा अध्याय नीट वाचा. 'विषाचं अमृत होतं; आणि अमृताचंही विष होतं'.* *याचं कारण, परस्परविरोधाचा नियम हाच सृष्टीचा पाया आहे. तर तुम्ही भीता कशाला? भिऊ नका.* *अधिक मोकळेपणा बाळगा.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्याकडे एक श्रद्धा अशी आहे की,घरात एखादा पाहुणा किंवा एखादी पाहुणी आली की,तुमच्या पायगुणाने आमचे खूप चांगले झाले आहे असे म्हणतो.हे कितपत योग्य आहे ? मला तरी ते मान्य नाही.जर असे काही होत असेल तर आपण रोजच पाहुण्यांना येण्याबद्दल आग्रहाचे निमंत्रण दिले असते.काहीच न करता असे जर होत असेल तर खुप काही आपण झालो असतो.विचार करायची गरज नाही,काम करायची गरज नाही किंवा प्रयत्नही करायची गरजही नाही.आपण चांगले विचार मनात आणले आणि मन लावून काम केले तर घरातही प्रसन्न वातावरण निर्माण होते.अशा परिस्थितीत बाहेरच्यांचे येणे हा निव्वळ योगायोग आहे असेच समजायचे.आपण आपल्या सद्सद्विवेक बुद्धीला विचारुन पाहिले तर ते आपल्याला खरेही वाटणार नाही.अशी श्रद्धा ठेवणे म्हणजे एक कल्पनाच आहे असे समजावे.ही डोळस श्रद्धा नसून एक अंधश्रद्धा समजावी.अशा प्रकारच्या कितीतरी श्रद्धा आहेत त्या आपण ज्ञानाच्या माध्यमातून,कर्तृत्वाच्या माध्यमातून आणि चांगल्या विचारांच्या माध्यमातून सिध्द करता येते.त्यासाठी ' केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे.' ह्याप्रमाणे जीवन जगायला शिकले पाहिजे. © व्यंकटेश काटकर,नांदेड संवाद..९४२१८३९५९०. 🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    *आमचे चुकले* एकदा सानेगुरुजी रेल्वेने प्रवास करत होते. त्यांच्या शेजारचे प्रवासी शेंगा ,संत्री खात होते .टरफले, साली खाली टाकत होते. त्यांचे खाऊन झाल्यावर गुरुजी उठले. साली गोळा केल्या कागदात बांधून ठेवल्या. प्रवाशाला खंत वाटली नाही.आणखी टरफले साली गोळा केल्या. कागदात बांधून ठेवल्या गुरुजी आपल्या जागेवर बसले. शेंगा खाणारा प्रवाशांना खंत वाटली नाही. नंतर पुढच्या स्टेशनवर एक प्रवासी त्या डब्यात चढला. साने गुरुजींना पहातात त्यांनी वाकून नमस्कार केला. तेव्हा शेजारी ची प्रवासी मंडळी चमकली. त्यांनी चौकशी केली. चौकशी करतात सानेगुरुजी आहेत हे त्यांना कळले. ते सर्वच खजील झाले व म्हणाले गुरुजी आमचे चुकले क्षमा करा” गुरूजी नम्रपणे म्हणाले “, मी कोण तुम्हाला क्षमा करणार? गाडीमध्ये आपण सर्वजण बसतो. प्रवास करतो गाडी स्वच्छ ठेवणे ही सर्वांची जबाबदारी आहे गाडी घाण होऊ नये म्हणून मी ती स्वच्छ केली. अशी गुरुजींची वृत्ती! आपल्या जीवनात कोणतीही काम कधीच हलके मानले नाही. *बोध: आपण कोठेही कचरा करु नये. आणि जर का झाला असेल तर तर त्याला व्यवस्थितपणे टाकावे. स्वच्छता ठेवणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे ,कर्तव्य आहे.आपली चूक आपण मान्य करावी आणि नंतर अशी चूक होणार नाही ही दक्षता घ्यावी.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 22/11/2019 वार - शुक्रवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    💥 ठळक घडामोडी :-  १९५६: ऑस्ट्रेलियातील मेलबोर्न येथे १६ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली. १९६३: थुंबा या भारतीय अग्निबाण प्रक्षेपण केंद्राचे उद्‍घाटन. १९६३: अमेरिकेचे अध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांची हत्या. 💥 जन्म :- १९३९: उत्तर प्रदेशचे ज्येष्ठ नेते मुलामसिंह यादव यांचा जन्म. १९४३: अमेरिकन लॉनटेनिस पटू बिली जीन किंग यांचा जन्म. १९६७: टेनिसपटू बोरिस बेकर यांचा जन्म. 💥 मृत्यू :-  १९६३: अमेरिकेचे ३५ वे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांची हत्या. २००२: हैदराबाद मुक्तिसंग्रामचे अध्वर्यू गोविंदभाई श्रॉफ यांचे निधन. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते पुढील 48 तासांत सत्तास्थापनेचा दावा करण्याची शक्यता, महाविकासआघाडीत आता अडचणीचे मुद्दे नाहीत* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *देशात इलेक्ट्रॉनिक टोलला प्रोत्साहन देण्यासाठी १ डिसेंबरपासून सर्व राष्ट्रीय महामार्गावर फास्ट टॅग म्हणजेच आरएफआयडी RFID सक्तीचा करण्यात येणार आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गेल्या तीन वर्षातील परदेश दौऱ्यात 255 कोटींचा विमानखर्च, सरकारची संसदेत माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *जेएनयूमध्ये सुरु असलेल्या आंदोलनाचे पुण्यात पडसाद; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात फीवाढ विरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *शिरोळ, हातकणंगलेमध्ये ऊसदराचं आंदोलन चिघळलं, ट्रॅक्टर पेटवून दिला, हमीभाव जाहीर झाला नसल्यानं ऊस उत्पादक आक्रमक* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *चीनमध्ये सुरु असलेल्या आयएसएसएफ विश्वकप नेमबाजी स्पर्धेत भारताची तीन सुवर्णपदकांची कमाई, दिव्यांश पनवर, एलावेनील वेलारिवन आणि मनु भाकरने पटकावलं सुवर्णपदक* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *वेस्ट इंडिजच्या आगामी भारत दौऱ्यासाठी एम.एस.के. प्रसाद यांच्या निवड समितीने भारतीय संघाची केली घोषणा, विराट कोहलीचे कर्णधारपदी पुनरागमन केलेलं आहे. ६ डिसेंबरपासून वेस्ट इंडिजच्या भारत दौऱ्याला होणार सुरुवात, या दौऱ्यात दोन्ही संघ ३ टी-२० आणि ३ वन-डे सामने खेळणार आहेत.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••     *आपली कामे आपणच करावीत* मुलांनो, एखाद्या वेळी घरात आई किंवा बहीण नसेल तर आपली पंचाईत होते. जेवण करायचे असेल किंवा घरातील साफसफाईचा प्रश्न असेल, आपण सर्वस्वी आई किंवा बहिणीवर अवलंबून असतो. त्यामुळे आपणावर .................. वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_59.html         लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• " जर तुम्ही स्वतःमध्ये बदल घडवून आणणारा व्यक्ती शोधत असाल, तर स्वतःला आरशापुढे उभे करा तुम्हाला व्यक्ती शोधण्याची गरजच पडणार नाही. " *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *LPG चे विस्तारित रूप काय आहे ?* Liquified Petrolium Gas 2) *LBW ही संकल्पना कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?* क्रिकेट 3) *रमण विज्ञान केंद्र कोठे आहे ?* नागपूर 4) *कवी 'बी' हे टोपणनाव कोणाचे आहे ?* नारायण गुप्ते 5) *कोणत्या वेदामध्ये गायत्री मंत्राचा उल्लेख आहे ?* ऋग्वेद *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 👤 अरुण पवार, सहशिक्षक  👤 पांडुरंग पुठ्ठेवाड, संपादक 👤 श्रीकृष्ण निहाळ, सहशिक्षक 👤 साईप्रसाद यनगंदेवार, सहशिक्षक  👤 मधू कांबळे 👤 विकास चव्हाण *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *तरूणपणी आईवडिलांचा, पुढे पत्नीचा आणि त्यानंतर पुत्रांचा विरह भगवान रामाला सहन करावा लागला. यात काय दु:ख नव्हते? इच्छामरणी असूनही आणि आयुष्यभर दु:खाशी संग्राम करूनही भीष्मांना अखेरीस शरपंजरी व्हावे लागले. कुटुंबातील यादवी आणि एकमेकांचे जीव घेणारे सोयरे पाहण्याची वेळ युगंधर कृष्णावर येते, आणि पारध्याच्या बाणाने आयुष्याची अखेर होते. रामायण आणि महाभारत यामधील अनेक पात्रे दु:खाने आणि वेदनेने वाहताना दिसतात. तरीही ही महाकाव्य जीवनाच्या विविध अंगाना स्पर्श करून दिव्यत्व जगविण्याची आणि जागविण्याची प्रेरणा देतात.* *लहानसहान गोष्टींपासून आपला त्रागा सुरू होतो आणि माझ्याच नशीबी हे का? हा प्रश्न पडतो. तुम्हाला जशा समस्या आहेत तशा दुस-यांनाही आहेत. त्यांचे स्वरूप वेगळे आहे. 'जगी सर्व सुखी असा कोण आहे' या समर्थ रामदासांच्या प्रश्नाला उत्तर मिळत नाही. त्या उत्तरासाठी सुखाचा सदरा आपणच तयार करायला हवा, आणि तो जसा परिधान करायला हवा तसा अंतर्मनातील दु:खाच्या अंधारावर चांदण्यांचा वर्षावही करायला हवा. आपणही दु:खाचे शंभर धागे मोजत बसणार की सुखाचा धागा धागा विणत जाणार? व्यक्तीगत दु:खापासून सार्वजनिक दुराचारापर्यंत आपण भ्रष्टतेचे, नष्टतेचे पोकळ शंख फुंकणे थांबविले पाहिजे आणि दिव्याने दिवा पेटणारा प्रकाश पेरला पाहिजे.* *॥ रामकृष्णहरी ॥* 🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल-9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *विचार अगर अच्छे है तो अपना* *मन-ही मंदिर है,* *आचरण अगर अच्छा है तो अपना* *तन-ही मंदिर है,* *व्यवहार अगर अच्छा है तो अपना* *धन-ही मंदिर है,* *और* *यह तीनों अगर अच्छे है* *तो...अपना* *जीवन-ही मंदिर है.!!* *ज़िंदगी उसी को आज़माती है* *जो हर मोड़ पर चलना जानता है....!!* *कुछ "पाकर" तो हर कोई मुस्कुराता है,* *ज़िंदगी शायद उनकी ही होती है जो बहुत कुछ "खोकर" भी मुस्कुराना जानता है..* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* *जि.प.शाळा-माणिकखांब,* *ता.इगतपुरी, जिल्हा-नासिक* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• माणसाचे मन हे नेहमी उमलणा-या फुलाप्रमाणे प्रसन्न ठेवायला हवे.फुले ही स्वत: उमलतात ती दुसऱ्यांच्या दु:खाला दूर करून सुखाचा नि आनंदाचा क्षण निर्माण करण्यासाठी.फुलांचे जीवन अल्पायुषी जरी असले तरी माणसांच्या मनावर जास्त काळ राज्य करुन जातात हे मात्र खरे आहे. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद. ९४२१८३९५९० 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *इमानदार सखाराम* शिवानी नावाची मुलगी होती. तिच्या कुटुंबामध्ये तिचे आई-बाबा, ती व तिचा भाऊ राहायचा. शिवानी ची आई घरचे काम स्वतः करायची. शिवानी पण तिच्या आईला कामांमध्ये मदत करत होती. आईने एकदा कपडे धुतले व वाळायला टाकले. सायंकाळी पाच वाजता बाबा बाहेरून आले. बाबांनी आईजवळ पैसे दिले. आई घाईत होती. आईने ते पैसे घाईगडबडीने कपड्याच्या घड्यामध्ये ठेवून दिले. संध्याकाळी इस्त्री वाले काका म्हणजे सुखाराम आले मी त्यांना कपडे इस्त्री करायचा साठी कपडे देऊन दिले. ते निघून गेले. बाबांनी थोड्या वेळानंतर आईला पैसे मागितले. आई रोजच्यासारखी कपाट मध्ये पैसे शोधत होती. परंतु तिला पैसे सापडले नाही. तिला खूप घाबरण्यासारखं झालं. ती गोंधळून गेली. “आता मी काय करू यांना काय उत्तर देऊ”, तिला विचार पडला. तेवढ्यातच इस्त्री वाले काका कपडे प्रेस करून आम्हाला देण्यासाठी आले. ते म्हणाले “तुमचे पैसे माझ्याकडे आहे मी जेव्हा कपडे इस्त्री करण्यासाठी कपड्याच्या घड्या मोडल्या तेव्हा मला हे पैसे दिसले, हे घ्या तुमचे पैसे”. बाबांनी ते पैसे घेतले व त्यांना भेट म्हणून शंभर रुपये देण्याची प्रयत्न केला पण इस्त्रीवाला काकांनी पैसे घेतले नाही. ते म्हणाले, “मी भलेही गरीब असेल पण मला मेहनतीचेच पैसे हवे.” असे म्हणून ते निघून गेले. आई बाबा त्यांच्या पाठीमागे त्यांचे कौतुकच करत होते. *बोध: माणसाने कष्टाची कमाई मोठी असते हे जाणले पाहिजे.कारण मेहनतीचे फळ हे श्रेष्ठ असते. आणि कधीच दुसऱ्याची चोरी करु नये.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 21/11/2019 वार - गुरूवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *महाराष्ट्र राज्य हुतात्मा दिन* *जागतिक टेलिव्हिजन दिन*    💥 ठळक घडामोडी :-  ● १९७१ - भारतीय वायु सैन्याची पाकिस्तानी सैन्याशी बांगलादेश मुक्ती युद्धांतील गरीबपुरच्या लढाईत पहिली चकमक. पाकिस्तानचा सपशेल पराभव. 💥 जन्म :- ● १६९४ - व्हॉल्तेर, फ्रेंच तत्त्वज्ञानी. ● १८५४ - पोप बेनेडिक्ट पंधरावा. ● १९१० - छ्यान चोंग्शू, चिनी भाषेमधील लेखक, अनुवादक. ● १९४३ - लॅरी महान, अमेरिकन काउबॉय. ● १९२७: नाटककार शं. ना. नवरे यांचा जन्म. 💥 मृत्यू :-  ● १८९९ - गॅरेट हॉबार्ट, अमेरिकेचा उपराष्ट्राध्यक्ष. ● १९७० - सर सी.व्ही. रमण, भारतीय शास्त्रज्ञ. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *१०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांची निवड करण्यात आली असल्याचे परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी केली घोषणा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा, महाशिवआघाडीला सोनिया गांधींची मंजुरी, सूत्रांची माहिती, तर शरद पवारांच्या निवासस्थानी आघाडीच्या नेत्यांमध्ये बैठक* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात पाऊण तास चर्चा, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याची पवारांची मागणी, तर पवारांच्या भेटीनंतर नरेंद्र मोदी आणि अमित शाहांमध्ये बैठक* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी केंद्राचं पथक आज महाराष्ट्रात, पाच सदस्यीय पथक तीन दिवस विभागवार पाहणी करणार, पंचनामे पूर्ण झाल्यावर केंद्राला देणार मदतीचा प्रस्ताव* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *नाशिकमध्ये आरबीएल बँकेच्या क्रेडिट कार्ड धारकांना 16 लाख रुपयांचा गंडा, कार्ड अॅक्टिवेशनसाठी ओटीपी मागून 32 ग्राहकांची केली फसवणूक, सायबर पोलिसांकडे गुन्हा दाखल* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *जळगाव घरकुल घोटाळ्याप्रकरणी कारागृहात असलेले माजी मंत्री सुरेश जैन यांना तात्पुरता जामीन, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारतीय संघासाठी ऐतिहासिक क्षण, 22 ते 26 नोव्हेंबरला होणाऱ्या बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्यात पहिल्यांदाच गुलाबी चेंडूवर कसोटी खेळवणार, सामन्याबाबत क्रिकेटरसिकांमध्ये उत्सुकता* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *विशेष बातमी :- नांदेड जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षिका श्रीमती प्रमिला सेनकुडे यांना बोधी ट्री एज्युकेशन फाउंडेशनचा राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार जाहीर, फ्रेश मॉर्निंग बुलेटीनटीम कडून मन:पूर्वक शुभेच्छा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        *प्रसिध्दीचे वलय*       माणसांच्या जीवनात प्रसिद्धी खूप महत्वाचा भाग आहे. प्रत्येकांना वाटतं की आपण प्रसिद्ध व्हावं. त्यासाठी नाना प्रकारचे कार्य केल्या जाते. आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्रात सर्वोत्कृष्ट ठरावे, यासाठी प्रत्येकाची धडपड चालू असते. पण काही लोकं समाजात असे ही आढळून येतात की, ते प्रसिद्धीपासून चार हात दूर राहतात. तरी देखील ते एक ना एक दिवस प्रसिद्धीस येतात. कारण त्यांच्यामध्ये ती प्रतिभा असते. ......... लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करावे http://tiny.cc/xnukgz लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *पोटात उठणे म्हणजे काय ?* 📙 पोट फुगणे, दम लागणे वा पोट जास्त वेळा वर खाली होणे, या सर्वांनाच खेड्यात 'पोटात उठणे' असे म्हणतात. मग गंडेदोरे, मंत्रतंत्र, पोटावर डागणे असे अनेक उपाय केले जातात. अर्थात यांचा काहीही उपयोग होत नाही. पोटात का उठते याची अनेक कारणे आहेत. 'ड' जीवनसत्वाच्या अभावाने मुडदूस नावाचा रोग होतो. यात हातापायाच्या काड्या व पोटाचा नगारा होतो. पोटात जंत असले व यकृताचा आकार मलेरिया सारख्या रोगाने वाढलेला असल्यास पोट फुगते. दमा झाल्यास श्वासाची गती वाढते व पोट जास्त वेळा वर खाली होते. न्युमोनियामध्येही श्वासाचा दर खूप वाढून पोट जास्त प्रमाणात व वर खाली होते. पोटातील मूत्रपिंड, आतडे यांचा कर्करोग झाल्यास आतड्यांमध्ये अडथळा येऊन अन्न पाणी अडकून पडल्यास किंवा अांत्रपुच्छाचा दाह होऊन सूज आल्यास पोट फुगते. मुत्रपिंडाच्या रोगांमध्ये व पोटाच्या आतील आवरणात पाणी साठल्याने ही पोट फुगते. पोट फुगण्याची अशी अनेक कारणे आहेत. त्यामुळे नेमक्या कोणत्या कारणाने असे होत आहे हे ओळखून त्यावर उपचार करणे अगत्याचे ठरते. तरच पोटात उठणे कमी होऊ शकते. अन्यथा नाही. *डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित* यांच्या पुस्तकातून *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• " जगातील सर्वात सुंदर रोपटे विश्वासाचे असते आणि ते कोठे जमिनीवर नाहीं तर आपल्या मनात रुजवावे  लागते.*    *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *'गीतांजली' या पुस्तकाचे लेखक कोण ?* रवींद्रनाथ टागोर 2) *पाकिस्तानच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण ?* बेनझीर भुट्टो 3) *ध्वजदिन केव्हा साजरा केला जातो ?* 7 डिसेंबर 4) *सर्वोच्च न्यायालयाचे वर्तमान सरन्यायाधीश कोण आहेत ?* न्या. शरद अरविंद बोबडे ( 47 वे ) 5) *'झोम्बी' या कादंबरीचे लेखक कोण ?* आनंद यादव *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 👤 प्रशांत शास्त्री, सेवानिवृत्त बँक अधिकारी 👤 आबासाहेब विश्वनाथ पाटील, धर्माबाद 👤 इलियास बावानी, पत्रकार, माहूर 👤 विठ्ठल शिंदे 👤 शुभम सुर्या पाटील 👤 गंगाधर धुळेकर 👤 माधव हर्ष 👤 संगीताताई देशमुख, नांदेड 👤 सोनू कुलकर्णी *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *हातात काय आहे? बरेचसे तर हाताबाहेरचे आहे. जन्म-मरण हातात नाही. पुढचा क्षण कसा असावा, ते हातात नाही. भूतकाळ मागे सुटलेला, असल्याच तर ब-या-वाईट आठवणी. भविष्याच्या गर्भात काय दडले, माहित नाही. त्यामुळे त्याची उत्सुकता आणि त्याच्या अनिश्चिततेतून वाटणारी असुरक्षितता. भविष्यातील असुरक्षिततेवर मात करण्यासाठी भविष्याविषयीचे स्वप्नरंजन करणे किंवा कल्पनेचे मनोरे बांधणे हाच काय तो उतारा. हाही उतारा कधी क्षणात उधळला जातो आणि कल्पनेचे मनोरे जमीनदोस्त होऊन जातात आणि उरते ती अगतिकता आणि असहायता.* *थोडाफार हातात म्हटल्यापेक्षा चिमटीत आहे तो आताचा वर्तमानातील क्षण. तोही क्षण चिमटीत आहे म्हणता म्हणता निसटतो आणि भूतकाळाच्या शवागारात जमा होतो. वर्तमान हातात असतो, तेव्हा आपण ब-याच वेळा भूतकाळात रममाण असतो. नाहीतर भविष्यातील स्वप्नरंजनात दंग असतो. त्यामुळे हातात असलेला क्षण तसाच सटकून निसटून जातो. क्षणाक्षणाला प्रवाही असलेला क्षण जगता आला पाहिजे. तोच क्षण माझा; ना भूतकाळ माझा. तो तर मेलेला. ना भविष्य माझे; ते तर स्वप्न. आहे ते वर्तमान. यात जगता आले तरच ते जगणे. यासारखी नितांत सुंदर गोष्ट नाही.* *॥ रामकृष्णहरी ॥* 🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿 *श्री संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल- 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो,* *ज्याला जन्म मिळाला त्याचा मृत्यू अटळ आहे.* *जो डर गया, वो मर गया।* *मरणाला आनंदाने मिठी मारता आली पाहिजे.* *मृत्यू हा अटळ असला तरी काही लोकांना त्याची खूप भीती* *वाटते.मृत्यूची भीती वाटते म्हणून तो काही चुकणार आहे का ? तो तर* *कधी ना कधी येणारच.त्याच्या* *भीतीने काही लोक खाणे-पीने,काम न करणे,आपल्याच* *विचारात गढून जाणे, कुणाशीही नीट वागायचे नाही,कुणाला व्यवस्थित बोलायचे* *नाही.स्वत:चेच स्वत:ला चिडचिडेपणा करुन घ्यायचा असे* *कितीतरी प्रकार मनावर ताण आणून जीवन जगत* *असतात.असे केल्याने काही फरक पडतो का ? विनाकारण आपणही* *दुःखी व्हायचे आणि इतरांनाही दुःखी करायचे.यातून काही* *मृत्यू टाळण्याचा मार्ग सापडतो का ? नाही ना.* *मग मृत्यूला तर हसत हसत स्वीकारावे.त्याचे भय बाळगायचे तरी* *कशाला ? तो आजही येणार आणि उद्याही येणार.पण आपण* *आपल्या मनाला विचारात, दुःखात टाकून आहे त्या जीवनसुखापासून दूर रहायचे का ? अशामुळे आपण* *आपला आनंद मिळवायचा नाही आणि इतरांनाही आनंद मिळवू द्यायचा नाही असेच* *ना* *! असा विचार कधीही मनात येऊ द्यायचा नाही.तुम्ही ही आनंदाने जगा आणि इतरांनाही* *आनंदाने जगू द्या.हीच तर खरी जीवनाची गुरुकिल्ली आहे.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• प्रत्येकजण आपल्या जीवनाबद्दल काही ना काही बोलत असतो.जेव्हा तो बोलत असतो तेव्हा त्याच्या जीवनात नव्वद टक्के नकारात्मक भूमिका असते.या जीवनात असे जीवन जगण्यात काय अर्थ आहे ? त्यापेक्षा न दिलेलेच बरे.आता जीवन जगणे असह्य आहे.असा जेव्हा विचार करतात त्यांनी जगण्याला आत्मविश्वास गमावलेला असतो.कोणतीही कृती न करता किंवा हातपाय न हलवता जीवन कसे सुखी बनेल ? हा विचार कधीच ते विसरुन बसले असणार आणि त्यामुळेच त्यांच्या जीवनात सदैव नैराश्याचे डोळ्यांसमोर काळे ढग दिसतात.अशी माणसे स्वत:ही जीवनाचा आनंद घेत नाहीत आणि इतरांच्या जीवनातला आनंदही त्यांना पाहवत नाही.अशा नैराश्ययुक्त व नकारात्मक विचार करणा-या माणसांनी थोडी डोळसपणे दुस-याच्या आनंदाने जीवन जगणाऱ्या माणसाकडे थोडा विचार करून पहायला हवे.त्यांची आत्मविश्वासाने व कृतीयुक्त शैलीने व आपल्यासमोर कितीही आणि कोणताही कठीण प्रसंग असो तो हसत हसत सामोरे जाऊन कसे जीवन जगतात याचे थोडे सूक्ष्म निरीक्षण करायला हवे.तसेच त्यांच्या जगण्याची जीवनशैली कशी आणि आपली जगण्याची जीवनशैली कशी हा प्रश्न स्वत:ला विचारुन पाहिला तर नक्कीच कळेल की,आपल्यामध्येच खरी त्रुटी आहे.आपणही त्यांच्यासारखे जीवन जगायला हवे.इतरांच्या जगण्यापेक्षा आपणही चांगले जीवन आपल्या कर्तृत्वाने, आत्मविश्वासाने जगू शकतो अशी शिकवण मिळाल्याशिवाय राहत नाही.नक्कीच चांगले बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करेल.मग तो नैराश्यमय जीवन जगणारे नाही अशी प्रेरणा घेऊन व कर्तृत्ववान लोकांचे नक्कीच चांगले जीवन जगण्यासाठी प्रेरणा मिळेल.मग तोच जगाला जीवन कसे जगायचे याचे ज्ञान देण्यासाठी तयार होई.म्हणून इतरांच्या लोकांचे चांगले अनुकरण घ्यायला काय हरकत असा सकारात्मक विचार निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *ज्वारीचे तीन पोते.* ही तीन भावाची कथा आहे. तिघेही भाऊ प्रेमाने राहायचे. तिघेही चतुर ,हुशार व इमानदार होते. मोठा भाऊ किराणा दुकान मध्ये काम करायचा. सगळ्यात छोटा भावाने आता फक्त शिक्षण पूर्ण केलं होतं. आणि तिसरा भाऊ पुजारी होता. त्यांच्या बाबाचा मृत्यू झाला होता . एक दिवस त्यांच्या बाबाचे मित्र त्यांच्या घरी आले. ते त्या तिघांचाही आईला म्हणाले, “माझ्या मुलीचे लग्नाचे वय झाले आहे. मला एक छान मुलगा हवा जो माझ्या मुलीला चांगले ठेवण व माझ्या कामाला मदत चांगली करेन.मला तुमचे तिन्ही मुलं चांगले वाटते. म्हणून मी तुमच्या तिनही मुलाची परीक्षा घेणार आहे.” त्यांनी पूर्णपणे परीक्षा चा विचार करून निर्णय घेतला. नंतर च्या दिवशी, त्यांनी सगळ्यांना एक एक ज्वारी चे पोते दिले. आणी म्हणाले, “मी काही कामासाठी बाहेरगावी चाललो. मी दोन-तीन महिन्यांनी येणार. आणि मी बघणार तुम्ही या त्याचे काय केले. नंतर दोन-तीन महिने झाले तरीपण मित्र वापस नाही आला. कमीत कमी एक दीड वर्ष गेले. मग ते परत आले. ते सगळ्यात पहिले पहिल्या भावाजवळ गेले. पहिला भाऊ म्हणाला , “या मी तुमचे स्वागत करत आहे. तुम्हाला आठवण आहे तुम्ही मला दीड वर्षाखाली एक ज्वारीचे पोते दिले होते मी त्या पोत्याला माझ्या दुकान मध्ये विकून टाकले. हे घ्या त्याचे पैसे”. त्याच्यानंतर मित्र दुसऱ्या भावाजवळ गेले. तो म्हणाला “, मी एक पुजारी आहे. माझ्या मंदिरामध्ये खूप सारे गरीब आले होते मी त्यांना ती ज्वारी त्यांच्यात वाटली . आणि मला हे खात्री आहे की त्याचा आशीर्वाद तुम्हालाच भेटेन.” मित्र सगळ्यात शेवटी तिसऱ्या भाऊ कडे गेले. तो भाऊ म्हणाला “, तुम्हाला आठवण आहे तुम्ही मला दीड वर्षाखाली एक ज्वारीचं पोत दिलं होतं. माझ्या शेजारच्या येथे शेत आहे. मी त्याच्या घरी गेलो. त्याला विनंती केली की मी तुमचं अर्ध शेत वाहू शकतो का? तो म्हणाला, “हो”. मि त्या अर्ध्या शेतात एका पोत्याच्या ज्वारीचे 25 पोते बनवले. त्याच्यातले 25 पैकी 5 पोते मी त्यांना विकले.” “हे घ्या पैसे आणि ही 20 पोते”. आता तुम्हाला तर माहीतच असेल की मित्राने आपला कोणता जावई निवडला असेन? अर्थातच तिसरा भाऊ. बोध: मेहनतीचे फळ कधी पण गोडच असते.विचार करून केलेल्या कार्याचे सुयोग्य सुयश नक्कीच दडलेले असते. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 20/11/2019 वार - बुधवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    *आंतरराष्ट्रीय बालदिन* 💥 ठळक घडामोडी :-  ◆ १९९८-इंटरनॅशनल स्पेस स्टेशन चे (ISS) प्रक्षेपण झाले. ◆ १९९७-अमेरिकेच्या कोलंबिया या अंतराळयानातून कल्पना चावला ही पहिली भारतीय महिला अंतराळयात्री आपल्या पहिल्या अवकाशमोहिमेवर रवाना झाली. ◆ १९८४ - सेटीची स्थापना. ◆ १९८५ - मायक्रोसॉफ्टने मायक्रोसॉफ्ट विन्डोज १.० ही संगणक-प्रणाली प्रसिद्ध केली. 💥 जन्म :- ◆ १८५४ - मराठी कवी, निबंधकार व नाटककार मोरो गणेश लोंढे ◆ १९१० - विलेम जेकब व्हान स्टॉकम, डच भौतिकशास्त्रज्ञ. ◆ १९२४ - बेनुवा मँडेलब्रॉट, फ्रेंच गणितज्ञ. ◆ १९२५ - रॉबर्ट एफ. केनेडी, अमेरिकेचा सेनेटर. 💥 मृत्यू :- ◆ १९१० - रशियन साहित्यिक लिओ टॉल्स्टॉय ◆ १९७३ - केशव सीताराम ठाकरे *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *राज्यातील 34 जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाची आरक्षण सोडत जाहीर, नांदेड जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी राखीव* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *धुक्यामुळे शिर्डी विमानसेवा मागील पाच दिवससा पासून ठप्प आहे. मुंबई, नवी दिल्ली, चेन्नई, हैदराबाद, बंगळुरु, कोलकाता, इंदूर या शहरांमधून रोज 28 विमानांद्वारे साईंच्या दर्शनासाठी येणाऱ्या दोन हजार प्रवाशांना बसत आहे त्याचा फटका* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *पीएमसी खातेदारकांच्या प्रश्नासाठी काँग्रेसचं शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीला, एकनाथ गायकवाड, भाई जगताप आणि जिशान सिद्दीकी राजभवनात दाखल. खातेदारकांना न्याय देण्यासाठी राज्यपालांनी लक्ष घालण्याची मागणी करणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *पुण्यातील दिवे घाटात वारकरी दिंडीत जेसीबी घुसल्याने झाला अपघात, नामदेव महाराज पालखी सोहळा पंढरपूरवरुन आळंदीला जात असताना अपघात, तर संत नामदेव महाराजांचे 17 वे वंशज सोपान महाराज नामदास यांचा मृत्यू* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *मुंबईतील वाहनतळांची टंचाई दूर करण्यासाठी शहरातील 13 मॉलमधील वाहनतळ यापुढे बाहेरील वाहनांसाठी खुले करण्याचा निर्णय मुंबई वाहनतळ प्राधिकरणाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *एअरटेल आणि व्होडाफोन आयडियानंतर आता रिलायन्सच्या जिओने देखील मोबाईल सेवांचे दर वाढवणार असल्याची मंगळवारी घोषणा केली. कंपनीच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. पीटीआयने याबाबत माहिती दिली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *शुक्रवारी 22 नोव्हेंबर रोजी कोलकाता इथल्या इडन गार्डन्स स्टेडियमवर पहिल्यावहिल्या डे-नाईट टेस्टच्या निमित्ताने पिंक बॉलमुळे भारतीय क्रिकेटमधला नवा अध्याय लिहिला जाणार आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *विशेष बातमी - दिल्ली येथे 27 ते 30 नोव्हेंबर या दरम्यान होणाऱ्या फिल्म फेस्टिव्हलसाठी नांदेड येथील संतोष केंद्रे यांच्या ऑक्सिजन टेलीफिल्मची देशपातळीवर निवड* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *शून्यातून विश्व साकारणाऱ्या सरकारी शाळा* जिल्हा परिषदेच्या सरकारी शाळा म्हटले की, प्रत्येकांच्या डोळ्यासमोर एक वेगळेच चित्र उभे राहते. ज्या चित्रात त्या शाळाची, तेथील परिसराची, शिक्षकांची आणि विद्यार्थ्याच्या बाबतीतचे चित्रण भयानक दिसून येते. या शाळांची स्थिती कधीच सुधारणार नाही, अशी धारणा प्रत्येकाची बनलेली आहे. या शाळांत फक्त गरिबांची मुलेच शिकतात म्हणून यास गरिबांची शाळा असे सुध्दा संबोधले जाते. सरकारी यंत्रणेमार्फत चालविण्यात येणारी ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नियंत्रणाखालील............. वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_15.html www.nasayeotikar.blogspot.com             लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *मूत्रपिंडाचे (किडनीचे) कार्य कसे चालते ?* 📙 बर्‍याच जणांना मुत्रपिंड म्हणजेच जननेंद्रिय असे वाटते. हे चुकीचे आहे. मूत्रपिंडाचा संबंध शरीरातील टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर टाकण्यासाठी आहे. तर जननेंद्रियांचा संबंध पुनरुत्पादनाशी आहे. माणसाच्या शरीरात घेवड्याच्या 'बी'च्या आकाराची दोन मूत्रपिंडे असतात. ३ x २ x १ इंच असा त्यांचा आकार असतो. मूत्रपिंडाचे कार्य गाळणीसारखे असते. शरीरात चयापचयामुळे अनेक टाकाऊ पदार्थ तयार होतात. यात युरिया, युरोबिलीनोजेन, मृत पेशीतील घटक आदींचा समावेश होतो. मूत्रपिंडामध्ये रक्त गाळले जाते. शरीराला आवश्यक असणाऱ्या गोष्टी रक्तातच राहतात; पण अतिरिक्त पाणी, क्षार व टाकाऊ किंवा विषारी पदार्थ रक्ताबाहेर काढले जातात. यालाच आपण लघवी म्हणतो. मूत्रपिंडातून मूत्रवहिन्यांद्वारे लघवी मूत्राशयात गोळा होते. मुत्रसंचयानंतर लघवी करण्याची इच्छा निर्माण होते व मूत्रमार्गाद्वारे लगेच शरीराबाहेर पडते. विषारी, टाकाऊ पदार्थ शरीराबाहेरील टाकण्याखेरीज शरीरात पाणी व क्षार यांचे संतुलन राखण्याचे महत्त्वाचे कार्य मूत्रपिंडे करतात. मधुमेह, उच्च रक्तदाब अशा रोगात मूत्रपिंडावर परिणाम होऊन ती अकार्यक्षम बनतात. काही सांसर्गिक रोगांमुळेही त्यांचे कार्य बंद पडू शकते. असे झाल्यास रक्तातील विषारी पदार्थांचे (जसे युरिया, अमोनिया) प्रमाण वाढते व यांचा मेंदू तसेच इतर इंद्रियांवर परिणाम होतो. त्यामुळे व्यक्ती कोमात जाते व मरण पावते. जिवंत राहण्यासाठी मूत्रपिंडे कार्यरत असणे अत्यंत आवश्यक आहे. एक निरोगी मूत्रपिंडदेखील दोन मूत्रपिंडांचे कार्य करू शकते. मूत्रपिंडांच्या कायमस्वरूपी रोगांमध्ये ज्यात त्यांचे कार्य पूर्णपणे बंद पडते. डायलिसिस वा मूत्रपिंडावरोपण हे दोन उपचार करता येतात. या दोन्ही पद्धतीत काही धोके असले तरी त्यामुळे रुग्णाचे आयुष्य आणि काही वर्षांनी वाढण्याची शक्यता असते. *डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित* यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून मनोविकास प्रकाशन *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *बुडणाऱ्यांना किनाऱ्यावरुन सूचना देतात ते सामान्य आणि स्वत:चा जीव धोक्यात घालून त्यांना वाचवतात ते असामान्य !* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आजची प्रश्नमंजुषा* 1) *'केशवसुत' हे टोपण नाव कोणाचे आहे ?* कृष्णाजी केशव दामले 2) *'केशवकुमार' हे टोपण नाव कोणाचे आहे ?* प्रल्हाद केशव अत्रे 3) *'श्यामची आई' या पुस्तकाचे लेखक कोण ?* साने गुरुजी 4) *'वायुसेना दिवस' केव्हा साजरा करतात ?* 8 ऑक्टोबर 5) *'राष्ट्रीय एकता दिन' केव्हा पाळला जातो ?* 31 ऑक्टोबर *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 👤 डॉ. शैलेश उमाटे, मानसोपचार तज्ञ, मुंबई 👤 चंद्रकांत पाटील पांगरीकर  👤 डी. वाय. शिंदे, मुख्याध्यापक       के.एम. पाटील विद्यालय, पाटोदा बु. 👤 संदीप पटकोटवार, प्राथमिक शिक्षक 👤 परमेश्वर कोरनुळे 👤 सदा पाटील पुयड 👤 सुधीर गोरे 👤 पवनकल्याण पानदवार 👤 लक्ष्मण जोंधळे 👤 वाजीद अली 👤 विशाल स्वामी 👤 शुभदा सुभाष दरबस्तेवार *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *'मनुष्यस्वभाव' अगदी विपरित असतो. तो कायम दुस-याचे अनुकरण करण्यात मग्न असतो. त्याला 'स्वधर्म' पाळण्यापेक्षा परधर्माचे आकर्षण जास्त असते. जसे गुलाबाच्या झाडाने कमळाचे फूल उगवण्याचा अट्टहास करणे. परंतु अशा प्रयत्नात अपयश हे ठरलेले असते. खरं म्हणजे गुलाबाच्या झाडाने उत्तम गुलाबाचे फूल उगवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तोच त्याचा 'स्वधर्म' असतो. कमळाचे फूल उगवण्याचा प्रयत्न करणे म्हणजे केवळ परधर्माचे अनुकरण करणे होय. स्वत:ची फूले लहान निपजली तरी चालतील, परंतु दुस-याची मोठी फुले आपली मानणे हा अधर्म होय.* *मनुष्याने आपला धर्म ओळखून, सारी क्षमता पणास लावून कार्य केले तर त्याचे 'कल्याणच' होईल. अन्यथा स्वधर्म सोडून नको त्या गोष्टींच्या मागे लागत राहिले तर वाट्याला केवळ दु:ख येईल. "दिवा मातीचा आहे की सोन्याचा हे महत्वाचे नसून त्याचा स्वधर्म आहे प्रकाश देणे !"* *॥ रामकृष्णहरी ॥* 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 *संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो,* *काल, एफ.एम.वर 'अनोखी रात'* *सिनेमातील एक सुंदर गीत ऐकले.मन भारावून गेले.गीत असे* *होते--* *ओह रे ताल मिले नदी की जल मे।* *नदी मिले सागर से,* *सागर मिले कौनसी जल मे,* *कोई जाने ना।* *किती मोठा अर्थ सामावला आहे.* *माणूस छोटा आहे की मोठा त्याची किंमत कुणीच करू शकत नाही.* *झरे लहान असतात,पण हाहाकार माजवणाऱ्या, प्रचंड मोठ्या नद्यांचा* *उगम त्यातूनच होतो.* *वाळूचा कण किती छोटा ,नाही का* ? *पण हेच कण समुद्राच्या किनाऱ्यावर महासागराच्या प्रचंड* *लाटा अडवतात.* *छोटी खिळे आणि खुंट्या किती लहान दिसतात ना?पण त्यांनीच मोठं* - *मोठ्या इमारती, जहाजे आणि* *पुल जोडली जातात. स्क्रू* *अन पिना किती-किती लहान पण ते जर नसतील तर मोठाली यंत्र* *कशी बनणार.* *बघा छोट्याशा गोष्टी पण किती मोठा सहभाग.* *तसेच मित्रांनो आयुष्यात घडणाऱ्या छोट्या घटना,छोटी -छोटी माणस* *खूप काही देऊन जातात.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपण जर आपल्या हाताने मुठभर रेती घेतली तर ती मुठभर रेती काही वेळच राहील.त्यानंतर मुठीत असलेली रेती हळूहळू मुठीतून बाहेर निसटून जाईल आणि त्यानंतर बाकीची हाताला चिकटून राहील.जी चिकटून राहते ते माणसाच्या दु:खासारखी समजायची.कारण सुखाचे दिवस मुठीतल्या रेतीसारखे निसटून जाणारे असतात तर दु:ख मुठीत चिकटून राहणा-या रेतीसारखे हृदयाच्या कप्प्यात घट्ट घर करून राहतात आणि सतत ते आपल्या मनाला आठवण करून देतात.मग त्यांचे पडसाद आपल्या दैनंदिन जीवनावर होत असतात.अशावेळी झालेल्या दु:खाचे मंथन करुन त्यातून सुख शोधले पाहिजे आणि सुख शोधून काढून जीवनाला आनंदाने जगण्यासाठी प्रोत्साहन द्यायला शिकले पाहिजे.दु:खाची कारणे शोधून पुन्हा दु:खाची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. © व्यंकटेश काटकर,नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍂🍃🍂🍃🍂🍃🍃🍂🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मोहित चा अनुभव* मोहित ची शाळा सुटली. तो घरी निघाला. वाटेत त्याला आई दिसली. तिच्या हातात दोन मोठ्या पिशव्या होत्या त्या खूप जाड असाव्यात, असे तिच्याकडे पाहून जाणवले. मी धावतच आईला गाठले. “अग आई, काय घेऊन चाललीस एवढं? ” मी आईला विचारले. तिच्या हातातील एक पिशवीघेऊ लागलो. “अरे हळू सामान सांडेल त्यातलं.” ती म्हणाली. “अगं आई, किती जड आहे पिशवी! काय आहे एवढ्यात ? मी म्हणालो. “हे आपल्या महिन्याभरच्या किराणा आहे ” आई म्हणाली. एक पिशवी हातात धरल्यावर मला समजले, तीही किती जाड होते, आणि त्याने आईचे हात लालेलाल झाले होते. “एवढ्या सामानाला किती रुपये लागले ग आई?” किती लागले असावेत? असे आईच मला उलटून प्रश्न विचारून राहिली. मी सांगितले रक्कम एकूण आई हसू लागली आणि म्हणाली “, वा रे वा, तुझं ध्यान! वस्तूचे भाव गगनाला भिडले कुठे आहेस तू? बाजारात फिरत जा, मग तुला समजेल. मग महेश म्हणाला “आई जेव्हा माझ्या शाळेला सुट्टी असते तेव्हा आपण किराणा दुकान मध्ये जाऊ म्हणजे मला तुला मदत करता येते व माझे व्यवहार ज्ञान ही वाढते. *तात्पर्यः वेळेचा सदउपयोग करून अनुभव मिळवणे व ज्ञान वाढविणे,कामात मदत होणे.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 19/11/2019 वार - मंगळवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    *जागतिक शौचालय दिन* *आंतरराष्ट्रीय पुरूष दिन* *महिला उद्योजकता दिन* 💥 ठळक घडामोडी :-  ● १९६९ - अपोलो १२तून चांद्रमोहिमेवर गेलेल्या पीट कॉन्राड आणि आणि ऍलन बीनचे चंद्रावतरण. ● १९९८ - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटनवर महाभियोग सुरू. 💥 जन्म :- ● १८२८ - मणिकर्णिका तांबे तथा राणी लक्ष्मीबाई. ● १९१७ - इंदिरा गांधी, भारतीय पंतप्रधान. ● १९७५-सुष्मीता सेन ,अभिनेत्री ● १९२८- दारा सिंग ,मुष्टियोद्धदा व अभिनेता 💥 मृत्यू :- ● १९३१ - शू चीमो, चिनी भाषेमधील कवी. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संसद परिसरात शिवसेनेचं आंदोलन, शेतकऱ्यांसाठी मदतीची मागणी, तर मुंबईत वाहतूक कोंडीला जबाबदार मेट्रोविरोधात आंदोलन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष अद्यापही बंदच, रुग्णाच्या नातेवाईकांची कक्षाबाहेर गर्दी, निधी कक्ष तातडीने सुरु करण्याची मागणी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *माझ्यासह सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून काहीतरी शिकावं, संसदेच्या नियमांचं पालन करण्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून राष्ट्रवादीचे कौतुक, राज्यसभेच्या 250 व्या सत्रानिमित्त नरेंद्र मोदीं यांचं सभागृहात संबोधन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *मुंबई महापौरपदासाठी शिवसेनेकडून किशोरी पेडणेकर यांनी अर्ज दाखल, भाजपचा उमेदवार न देण्याचा निर्णय, तर पुण्यात भाजपचे मुरलीधर मोहोळ, नागपूरला अडीच वर्षात दोन महापौर मिळणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *हमालांनी कामबंद आंदोलन केल्याने कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतले गूळ सौदे बंद, संतप्त शेतकऱ्यांचं चक्काजाम आंदोलन, दीड कोटींची उलाढाल ठप्प* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *दहावी आणि बारावीच्या परीक्षेचं अंतिम वेळापत्रक जाहीर, दहावीची परीक्षा 3 मार्चला तर बारावीची परीक्षा 18 फेब्रुवारीपासून होणार सुरू, सविस्तर वेळापत्रक बोर्डाच्या वेबसाईटवर प्रकाशित* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *देशातल्या न्यायव्यस्थेच्या सर्वोच्चपदी मराठी माणूस विराजमान, शरद बोबडे भारताचे नवे सरन्यायाधीश, 47 वे सरन्यायाधीश म्हणून घेतली शपथ* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 8️⃣ *तरुणाईला वेड लावणाऱ्या टिकटॉक अॅपविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका, मुलांवर वाईट परिणाम होत असल्याने बंदी घालण्याची एका आईची मागणी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• दुःखद बातमी :- मोटारसायकलच्या अपघातात शिक्षक बाबाराव पडलवार यांचे निधन, ते मूळ एकलारा ता. मुखेड जि. नांदेड येथील रहिवासी तर बीड जिल्ह्यात कार्यरत होते. फ्रेश मॉर्निंग बुलेटीन कडून त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जागतिक शौचालय दिनानिमित्त प्रासंगिक लेख *मोबाईल महत्वाचे की शौचालय* जगभरातील सुमारे एक अब्ज जनता आज ही उघड्यावर शौचास जाते आणि भारत देश यात अव्वलस्थानी असल्याचे मत संयुक्त राष्ट्राच्या तज्ञानी पिण्याचे पाणी व स्वच्छतेसंबंधीच्या एका अभ्यासाचा शुभारंभ करताना नुकतेच व्यक्त केले आहे. उघड्यावर मलमूत्र विसर्जन करण्याच्या बाबतीत......... पूर्ण लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे https://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_49.html?m=1             लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *फेफरे किंवा फीट येणे* 📙 ***************************** एखाद्या शाळेचा वर्ग चालू असतो किंवा मैदानावर खेळाचा तास चाललेला असताना एखादा मुलगा बघता बघता उभ्याचा आडवा पडतो. नुसता तो आडवाच पडतो असे नव्हे तर त्याच्या तोंडातून फेस येतो, तो डोळे फिरवतो, क्वचित दातखीळ बसते व त्याच वेळी त्याचे हातपायपण पिळवटले जातात, ताठ होतात. काही वेळा त्याची बेशुद्धी काही क्षणच टिकते, तर काही वेळा विशेष औषधोपचार करून त्याला शुद्धीवर आणायला लागते. यालाच फेफरे येणे, फिट येणे असे म्हणतात. एपिलेप्टिक सीझर असे या आजाराचे स्वरूप सांगितले जाते; पण वस्तुतः हा आजार नव्हे, तर ही एक शारीरिक स्थिती आहे. मेंदूचे कामकाज चालू असताना तेथे सतत विद्युत संवेदना निर्माण होऊन शरीरभर पाठविल्या जात असतात. या संवेदनांच्या स्वरूपात तीव्र बदल झाल्यास फेफरे येते. फेफरे येण्याच्या काळात मेंदूच्या कामाचा आलेख (Electro-Encephalo Graph) काढला, तर त्यावरून ही स्थिती नीट समजते. एखाद्याला फेफरे येते म्हणून त्याच्या आयुष्यातील अन्य गोष्टींवर काही विपरीत परिणाम झालेला असतोच, असे मात्र नाही. काही वेळा याउलट मात्र असू शकते. मेंदूच्या गंभीर आजाराचे दृश्य स्वरूप म्हणून प्रथम फेफरे येणे ही स्थिती उद्भवलेली आढळून येते. उदाहरणार्थ मेंदूमध्ये उद्भवणाऱ्या कॅन्सरमध्ये, ब्रेनट्युमरमध्ये फेफरे ही पहिली तक्रार असू शकते. फेफरे येते, त्यावेळी अशा माणसाभोवती गर्दी न करता त्याला आहे तेथेच नीट कुशीवर वळवून झोपवावे. मान मागे करावी म्हणजे श्वास घ्यायला अडचण होत नाही. घशात लाळ साचून अडथळा येत नाही. दातखीळ बसत आहे. असे वाटल्यास एखादी लाकडी वस्तू दातात धरायला द्यावी व दोन दातांमध्ये ठेवावी. त्यांचे कपडे, पट्टा सैल करावा. त्याला कधीही पाणी पाजण्याचा प्रयत्न करू नये. बहुधा काही मिनिटांतच फेफरे जाते. त्यामुळे तात्काळ धावपळ करून डॉक्टर गाठण्याची गरज पडत नाही. फेफरे येण्यावर अलीकडे चांगली औषधे उपलब्ध असून या स्थितीवर खुपसे नियंत्रण मिळवण्यात यश मिळत आहे. सामान्यपणे लोकसंख्येच्या एक टक्क्यापेक्षा थोड्या कमी लोकांत हा प्रकार आढळतो. वाहन चालवणे, विस्तवाजवळ वा धोक्याच्या जागी काम करणे व पोहणे या गोष्टी मात्र फेफरे येणाऱ्यांनी कायम टाळाव्यात; कारण या तिन्हींमध्ये त्यांच्या जीवाला धोका उद्भवतो. *'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• " जीवनात दोनच गोष्टी मागा आईशिवाय घर नको आणि कोणातीही आई बेघर नको. " *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *'बालकवी' हे टोपण नाव कोणाचे आहे ?* त्र्यंबक बापूजी ठोंबरे 2) *पहिले मराठी कादंबरीकार कोणाला म्हटले जाते ?* बाबा पद्यजी 3) *'मृत्युंजय' या कादंबरीचे लेखक कोण ?* शिवाजी सावंत 4) *'बलुतं' या पुस्तकाचे लेखक कोण ?* दया पवार 5) *'नेपच्यून' या ग्रहाचा शोध केव्हा लागला ?* 23 सप्टेंबर 1845 *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 👤 लक्ष्मणराव ठक्करवाड, नांदेड जि प सदस्य 👤 सिध्देश घोले, माणगाव जि. रायगड 👤 डॉ. विनायक माराले 👤 संजय येरणे 👤 श्वेता नरसुडे 👤 कैलास पाटील खरबाळे 👤 वैभव धुप्पे 👤 शैलजाताई गुंटूक, मुंबई 👤 राजेश श्रीपत *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सारा अंधारच प्यावा* *अशी लागावी तहान ॥* *एका साध्या सत्यासाठी* *देता यावे पंचप्राण ॥* *असं जगावेगळ पसायदान कवी म.म.देशपांडे यांनी 'तहान' या कवितेत मागितलं आहे. त्याचं तीव्रतेने स्मरण व्हावं अशी परिस्थिती आज आपल्या देशात आहे. कोणत्याही क्षेत्राकडे जा सारा अंधार आहे. अपवाद वगळले तर वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनातून सत्य हद्दपार झालेलं आहे. असत्याच्या अंधारात संवेदनशील मनाची घुसमट होत आहे. 'सत्यमेव जयते' ही या देशाची घोषमुद्रा आहे. तथापि समाजाचं, देशाचं नेतृत्व करणा-यांपासून तर रूग्णांची सेवा करण्याची शपथ घेतलेल्या डाॅक्टरांपर्यत सर्वांनी तिचे पदोपदी धिंडवडे काढले आहेत. सर्वच क्षेत्रात असत्यानं, अप्रमाणिक वृत्तीनं थैमान घातलं आहे. स्वातंत्र्योत्तर काळात भारतमातेची दु:स्थिती आधिकच चिंतनीय झाली आहे. 'सत्य हे जीवनमूल्य लोप पावत आहे. 'असत्य' उजळ माथ्यानं वावरत आहे.* *खरंतर सत्य, सत्याचा शोध, सत्याचा उद्धार आणि आचरण, सत्याचा पुरस्कार याला वैभवशाली परंपरा आहे. भीष्मनिती सांगते, 'सत्य हे प्रत्येक माणसाचं कर्तव्य आहे. माणसाचा सर्वश्रेष्ठ आधार आहे. शाश्वत कर्तव्य आहे. आसक्तीचं जाळ फक्त सत्यच तोडू शकतं. सत्य म्हणजेच अमरत्व. सत्यासाठी केलेला त्याग मानवी जीवनात सर्वश्रेष्ठ आनंदाचा उगम असतो. सदाचरणी माणूसच इतरांच्या हितासाठी दक्ष असतो आणि या मार्गानंच त्याचं स्वत:चही हित साधलं जातं. सत्यासारखं तप, पुण्य नाही. असत्यासारखं पाप नाही. ज्याच्या ह्रदयात सत्य असतं त्याच्या ह्रदयात परमशक्ती वास करते.* *॥ रामकृष्णहरी ॥* 🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो,* *रवी गेला रे सोडून आकाशाला* *धन कैसे दुर्भाग्यला।* *किंवा* *बाई मी धरण ,धरण बांधिते* *माझे मरण मरण कांडीते।* *असे मनाला चटका लावून जाणारे शब्द किंवा भावना दुःखी कष्टी* *जीवनाचे वर्णन करतात.* *पण जीवन कितीही कष्टमय असो ही नैया आपणाला पार करायचीच आहे.* *मग ती आनंदाचे गाणे गाऊन करता आली तर।* *आनंदी आनंद गडे,इकडे-तिकडे चोहीकडे।* *मानवी जीवन म्हणजे नंदनवनच.* *त्यात श्रमाचं बीज पेरून घामाच्या धारांनी सिंचन केलं* *पाहिजे. तरच त्याला यशाची* *सुंदर फळं लागतात. माणूस* *किती वर्ष जगला यापेक्षा तो कसा जगला आणि कोणासाठी* *जगला यालाच आधिक* *महत्व. शंभर वर्ष* *स्वत:साठी जगला तर तो मेल्यासारखाच असतो. पण* *इतरांसाठी जगण्याचा आनंद काही* *वेगळाच. माणसाला चांगल्या* *कामाचं फळ चांगलं* *मिळतं. वाईट कामाचं फळ वाईटंच* *मिळतं. 'जसं करावं तसं* *भरावं'! या संदर्भात संत* *कबिरांचा एक दोहा लक्षात* *ठेवण्यासारखा आहे.* *"क्या खूब सौदा नकद है,* *इक हाथसे दे, इक हाथसे ले!"* *चांगलं काम करता करता मृत्यूचं चुंबन घेण्यात मजा आहे. नाही तर मरत नाही म्हणून जगण्यात काय अर्थ आहे. माणसानं जगावं तर प्रतिष्ठेनं! त्यासाठी जीवनाचा क्षण आणि क्षण परिश्रमानं सजविला पाहिजे. तरच जगण्यात आनंद. ती बाजारात विकत मिळणारी वस्तू नाही. मनाच्या गाभा-यातून आनंदाच्या उर्मी उसळतात. मनाला सतत आनंदी ठेवण्यासाठी काय करावं? कामाच्या वेळी काम करावं आणि खेळाच्या वेळी खेळावं, हाच आनंदाचा खरा मार्ग. मग आनंदी जीवन म्हणायचं तरी कशाला? जे प्रेमानं ओथंबलेलं, ज्ञानानं भारावलेलं आणि विश्वासानं परिपूर्ण असतं ते 'आनंदी जीवन'.* *आलोच आहे या ,जगायचेच आहे.* *मग जगा कधी दोन देत,कधी दोन* *घेत.पण खुश रहा।* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• वर्तमान स्थितीमध्ये आपण कोणत्याही छोट्या छोट्या गोष्टीसाठी खूप विचार करतो.हे माझ्या हातून पूर्ण होईल का ? पूर्ण होईल का असा जेव्हा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो तेव्हा नक्कीच समजून घ्यायचे की,आपला आत्मविश्वास डळमळीत झाला आहे.हा आत्मविश्वास जर आपल्याला मजबूत किंवा ठाम ठेवायचा असेल तर आपल्या मनाची कामातली एकाग्रता सातत्याने ठेवायला हवी.सद्यस्थितीत मला हे काम पूर्ण करायचे आहे आणि ते करावेच लागणार त्यांच्याशिवाय दुसरा पर्यायच नाही अशी मनाची धारणा ठेवली आणि काम केले तर नक्कीच तुमचे काम पूर्ण होईल.त्या कामातून आलेले यश हे तुमच्या पुढच्या कामासाठी आणि पूर्णतेसाठी शुभसंकेत आहेत.त्यामुळे अजून पुन्हा जोमाने काम करण्यासाठी प्रेरणा मिळते.मग ते वर्तमानातील असो की भविष्यातील असो.तुमचा आत्मविश्वास आणि तुमच्या कामातील सातत्य हेच तुमच्या यशाचे खरे रहस्य आहे. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *अपमान आणि उपकार* एकदा दोन मित्र वाळवंटातून चाललेले असतात, रस्त्यात त्यांच्यात काहीतरी बाचाबाची होते आणि बाचाबाचीचे रुपांतर भांडणात होते. इतके कडाक्याचे भांडण होते कि एक मित्र दुसऱ्या मित्राच्या थोबाडीत ठेवून देतो. ज्याला थोबाडीत बसते तो दुसरा मित्र खूप दुःखी होतो, गप्प बसतो आणि वाळूमध्ये बोटाने लिहितो," आज माझ्या प्राणप्रिय मित्राने मला थोबाडीत दिली, ज्याला मी जीवापाड मैत्री करतो त्याने मला आज मारले." ज्याने थोबाडीत मारलेली असते तो हे पाहतो पण काहीच न बोलता दोघेही पुढे चालत राहतात. पुढे गेल्यावर त्यांना एक तलाव दिसतो, दोघेही जण पाण्यात उतरून स्नान करायचे ठरवतात, अंघोळ करता करता थोबाडीत खाल्लेला मित्र अचानक पाण्यात घसरतो, तिथे नेमकी दलदल असते, तो जोरजोराने ओरडायला सुरुवात करतो. ज्याने थोबाडीत मारलेली असते तो मित्र क्षणाचाही विचार न करता आपल्या मित्राच्या सहाय्याला धावतो आणि त्याला त्या दलदलीतून बाहेर ओढून काढतो. जेंव्हा तो बुडणारा मित्र पाण्याबाहेर येतो, अंग कोरडे करतो तेंव्हा तो एका दगडाने दगडावर कोरून लिहितो,"आज माझ्या प्राणप्रिय मित्राने मला मरणाच्या दारातून ओढून परत आणले, मी आज मेलोच असतो पण त्याने स्वतःचा जीव धोक्यात घालून मला वाचविले." हे पण तो थोबाडीत देणारा वाचतो आणि त्याला राहवत नाही तो त्या मित्राला विचारतो कि,"पहिले मी तुला मारले तर ते तू वाळूत लिहिले आणि आता तुला पाण्यातून वाचविले तर ते तू दगडावर कोरून लिहिले हे असे का?" लिहिणारा मित्र म्हणाला," जेंव्हा कोणी आपल्या हृदयाला, मनाला, भावनेला ठेच लावेल तेंव्हा ते सर्व काही वाळूत लिहावे कारण काही काळानंतर वाळू हि विस्कळीत होऊन जाते आणि मनातील भावनाही फार काळ एकसारख्या राहत नाहीत. पण जर कुणी उपकार केले तर ते मात्र दगडावर कोरून लिहिले कारण दगडावर कोरलेले जसे कायमस्वरूपी टिकून राहते तसे उपकार हे कायम लक्षात ठेवले जावेत. तात्पर्य :-"माणसाने अपमान तत्काळ विसरून जावा आणि उपकार आजन्म लक्षात ठेवावे." *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 18/11/2019 वार - सोमवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    💥 ठळक घडामोडी :-  ● १९२८: वॉल्ट डिस्‍ने यांच्या मिकीमाऊस या प्रसिद्ध कार्टूनचा स्टीमबोट विली या चित्रपटाद्वारे जन्म. ● १९३३: प्रभात चा पहिलाच रंगीत चित्रपट सैरंध्री प्रदर्शित झाला. ● १९५५: भाक्रा-नांगल धरणाच्या बांधकामास सुरूवात झाली. ● १९६२: डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते शिवाजी विद्यापीठाचे उद्‍घाटन झाले. 💥 जन्म :- ● १९०१: चित्रपटनिर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते, पद्मश्री, दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते व्ही. शांताराम यांचा जन्म. ● १९१०: क्रांतिकारक बटुकेश्वर दत्त यांचा जन्म 💥 मृत्यू :- ● १९९८: सातार्‍याच्या सामाजिक समाजसेवक रामकृष्ण नारायण तथा बन्याबापू गोडबोले यांचे निधन. ● १९९९: स्वातंत्र्यसैनिक रामसिंह रतनसिंह परदेशी यांचे निधन. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *आजपासून संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरु, मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधलं दुसरं अधिवेशन, वादग्रस्त नागरिकत्व सुधारणा विधेयकाकडे लक्ष* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *शिवसेना अधिकृतरित्या एनडीएतून बाहेर, भाजपची घोषणा, दोन्ही सभागृहात सेना खासदार विरोधी बाकांवर बसणार, भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *अयोध्येतील वादग्रस्त जागेबाबतच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणार, मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाच्या बैठकीत निर्णय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *नागपूर-अमरावती महामार्गावर पेट्रोलियम पदार्थाचा टँकर पेटला, ड्रायव्हरचा होरपळून मृत्यू, आगीच्या ज्वाळांमुळं महामार्ग काहीकाळ ठप्प* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *देशातील 425 पुलांपैकी 281 पुलांची अवस्था वाईट, अशी माहिती एका अहवालातून समोर आली आहे. सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूटने हा सर्व्हे केला असून देशात गुजरातमध्ये सर्वाधिक पुलांची स्थिती वाईट असल्याचे नमूद केले आहे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *श्रीलंकेतील राष्ट्रपती निवडणुकीत श्रीलंका पोडुजाना पेरमुना पक्षाचे उमेदवार गोताबेया राजपक्षे हे विजयी झाले आहेत.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि सलामीचा फलंदाज मयांक अग्रवाल यांनी आयसीसीच्या अद्ययावत कसोटी क्रमवारीत आपले आजवरचे सर्वोत्कृष्ट स्थान पटकावले.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मरावे परी अवयवरूपी उरावे* जन पळभर म्हणतील हाय हाय !  मी जाता राहील कार्य काय ? गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या आवाजातील कविवर्य भा. रा. तांबे यांची कविता रेडियोवर ऐकताना मन एकदम भूतकाळात गेले. इयत्ता दहाव्या वर्गात शिकत असताना ............. वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_17.html             लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *फुप्फुसे* 📙 डावे व उजवे अशी दोन फुप्फुसे छातीच्या पोकळीत असतात. हृदयापूरती जागा सोडून अन्य सारी छातीची पोकळी त्यांनीच व्यापलेली असते. प्रत्येक फुप्फुसावर दुपदरी पातळ पिशवीसारखे आवरण असते. त्यालाच 'प्लुरा' असे म्हटले जाते. या आवरणाच्या आत दोन पदरांमध्ये बुळबुळीत पदार्थ असतो. त्यामुळे फुफ्फुसे आकुंचन प्रसरण पावताना घर्षण होत नाही. मात्र या दोन पदरांमध्ये निर्वात पोकळी अस्तित्वात असते. वातावरणातील हवा आपण फुप्फुसांत ओढून घेतो, त्याला त्याची मदत होते. नाकाने आत घेतलेली हवा प्रथम श्वसननलिकेद्वारे व त्यानंतर तिच्या झालेल्या असंख्य शाखांतून फुप्फुसांत पोहोचते. फुप्फुसांचा रंग भुरा करडा असतो. असंख्य वायूकोशांनी फुप्फुस बनते. प्रत्येक वायूकोशाला वेढणारी एक रक्तवाहिनी असते. प्रत्येक वायूकोशापर्यंत श्वासनलिकेची एक अत्यंत सूक्ष्म शाखा पोहोचलेली असते. वायूकोशाभोवती केशवाहिन्यांचे जाळे असते. त्यातील रक्तातील लाल पेशी प्राणवायू शोषून घेतात. कार्बन डायॉक्साइड किंवा कर्बद्विप्राणिल वायू व पाण्याची वाफ वायुकोशात सोडले जातात व उच्छवासाद्वारे ते बाहेर टाकले जातात. आपल्या श्वासातून वाफ बाहेर पडताना जाणवते, त्याचे हेच मूळ होय. वायूकोशांमधील स्थितीस्थापक तंतूंमुळे ते श्वास आत घेताना सहज फुगतात व पूर्वस्थितीला येताना उच्छ्वास बाहेर टाकतात. यामध्ये होणाऱ्या क्रियेलाच आपण प्राणवायू प्रदान असे म्हणतो. श्वास घेतला, तर सुमारे ५०० घन सेंटीमीटर हवा आपण आत ओढतो. त्यातील फक्त ३५० घन सेंटीमीटर हवाच वायूकोशात पोहोचते. अन्य हवा घसा, श्वासनलिका येथेच राहते. श्वास सोडल्यावरसुद्धा ३०० घनसेंटीमीटर हवा फुप्फुसांतच शिल्लक असते. दीर्घ श्वसन, प्राणायाम, भस्त्रिका यांच्या अभ्यासात या साचून असलेल्या हवेला आपण मुद्दाम बाहेर फेकतो. तसेच फुप्फुसांची स्थितीस्थापक क्षमताही या क्रियेत वाढते. म्हणून श्वसनाच्या आजारात त्यांचा उपयोग होऊ शकतो. निरोगी माणसाची श्वसनाची क्षमता वाढते. पाणबुडे, ऍथलेट, खेळाडू यांनी ही क्षमता कमावलेली असते. फुप्फुसांमध्ये जंतूंचा शिरकाव झाल्यास रुग्ण गंभीररित्या आजारी होतो. कारण फुप्फुस व फुप्फुसावरण दाहामध्ये शरीराचा प्राणवायू पुरवठा खंडित होऊ लागतो. अशा वेळी कृत्रिमरीत्या प्राणवायू देऊन किंवा तीव्र आजारात कृत्रिम श्वासोच्छ्वासाच्या यंत्राचा (व्हेंटिलेटर) वापर करून रुग्णाला मदत करणे आवश्यक ठरते. *'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपण चंदन असल्याची घोषणा चंदनाला कधीच करावी लागत नाही. त्याचा गंध वाऱ्याबरोबर आपोआप पसरत जातो. *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची स्थापना केव्हा झाली ?* 1 जुलै 1961 2) *'चले जाव'ची घोषणा कोणी केली ?* महात्मा गांधी 3) *'लोकशाहीर' , 'फकिराकार' कोणाला संबोधले जाते ?* अण्णाभाऊ साठे 4) *महात्मा फुले यांनी अस्पृश्याच्या मुलांसाठी पहिली शाळा केव्हा उघडली ?* 3 जुलै 1886 5) *महाराष्ट्र कृषी दिन केव्हा साजरा केला जातो ?* 1 जुलै *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 👤 अरविंद काळे, सहशिक्षक        पीपल्स हायस्कूल, नांदेड 👤 नितीन रायपुरे, अकोला 👤 पिराजी भूमन्ना, धर्माबाद 👤 दत्ताहारी पाटील पवार 👤 अनुराधा ताल्लू 👤 धनंजय पापनवार, नांदेड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मानवी जीवन म्हणजे नंदनवनच. त्यात श्रमाचं बीज पेरून घामाच्या धारांनी सिंचन केलं पाहिजे. तरच त्याला यशाची सुंदर फळं लागतात. माणूस किती वर्ष जगला यापेक्षा तो कसा जगला आणि कोणासाठी जगला यालाच आधिक महत्व. शंभर वर्ष स्वत:साठी जगला तर तो मेल्यासारखाच असतो. पण इतरांसाठी जगण्याचा आनंद काही वेगळाच. माणसाला चांगल्या कामाचं फळ चांगलं मिळतं. वाईट कामाचं फळ वाईटंच मिळतं. 'जसं करावं तसं भोगावं'! या संदर्भात संत कबिरांचा एक दोहा लक्षात ठेवण्यासारखा आहे.* *"क्या खूब सौदा नकद है,* *इक हाथसे दे, इक हाथसे ले!"* *चांगलं काम करता करता मृत्यूचं चुंबन घेण्यात मजा आहे. नाही तर मरत नाही म्हणून जगण्यात काय अर्थ आहे. माणसानं जगावं तर प्रतिष्ठेनं! त्यासाठी जीवनाचा क्षण आणि क्षण परिश्रमानं सजविला पाहिजे. तरच जगण्यात आनंद. ती बाजारात विकत मिळणारी वस्तू नाही. मनाच्या गाभा-यातून आनंदाच्या उर्मी उसळतात. मनाला सतत आनंदी ठेवण्यासाठी काय करावं? कामाच्या वेळी काम करावं आणि खेळाच्या वेळी खेळावं, हाच आनंदाचा खरा मार्ग. मग आनंदी जीवन म्हणायचं तरी कशाला? जे प्रेमानं ओथंबलेलं, ज्ञानानं भारावलेलं आणि विश्वासानं परिपूर्ण असतं ते 'आनंदी जीवन'.* ••●‼ *रामकृष्णहरी*‼●•• 🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल-9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो,* *एक फिल्मीगीत मनाला खूप भावलं* *होत.ते अस,* ----- *जिना है तो, हसके जियो,* *जीवन मे एक पल भी खोना ना।* *हसना ही तो, है जिंदगी,* *रो रोके* *जीवन बिताना ना।* *खरच आहे,जीवन क्षणभंगुर आहे,* *म्हणतात ना पाण्याचा बुडबुडा आहे.* *मग जगताय ना?* *हसत राहिलात तर संपूर्ण जग*. *तुमच्या जवळ आहे*, *तस नाही* *केलं तर डोळ्यातील अश्रुंना** *देखील डोळ्यात जागा राहत नाही*. | *जीवन जगताना जगाचा जास्त* *विचार करू नका..* *कारण जग ज्याच्याकडे काही नाही* *त्याला हसत आणि* *ज्याच्याकडे सर्व काही आहे* *त्याच्यावर जळतं...हाच तर सृष्टीचा* *नियम आहे, मग या* *लोकांसाठी आपण का कुढायचं, घ्या* *जगून.* *तर मग हसा ,हसवत रहा,* *जगा आणि जगुदया।* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• मृत्यू हा अटळ असला तरी काही लोकांना त्याची खूप भीती वाटते.मृत्यूची भीती वाटते म्हणून तो काही चुकणार आहे का ? तो तर कधी ना कधी येणारच.त्याच्या भीतीने काही लोक खाणेपिणे,काम न करणे,आपल्याच विचारात गढून जाणे, कुणाशीही नीट वागायचे नाही,कुणाला व्यवस्थित बोलायचे नाही.स्वत:चेच स्वत:ला चिडचिडेपणा करुन घ्यायचा असे कितीतरी प्रकार मनावर ताण आणून जीवन जगत असतात.असे केल्याने काही फरक पडतो का ? विनाकारण आपणही दुःखी व्हायचे आणि इतरांनाही दुःखी करायचे.यातून काही मृत्यू टाळण्याचा मार्ग सापडतो का ? नाही ना. मग मृत्यूला तर हसत हसत स्वीकारावे.त्याचे भय बाळगायचे तरी कशाला ? तो आजही येणार आणि उद्याही येणार.पण आपण आपल्या मनाला विचारात, दुःखात टाकून आहे त्या जीवनसुखापासून दूर रहायचे का ? अशामुळे आपण आपला आनंद मिळवायचा नाही आणि इतरांनाही आनंद मिळवू द्यायचा नाही असेच ना ! असा विचार कधीही मनात येऊ द्यायचा नाही.तुम्ही ही आनंदाने जगा आणि इतरांनाही आनंदाने जगू द्या.हीच तर खरी जीवनाची गुरुकिल्ली आहे. © व्यंकटेश काटकर,नांदेड संवाद..९४२१८३९५९०. 🦋🍂🦋🍂🦋🍂🦋🍂🦋 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आयुष्याचा शेवट* एका व्यापाऱ्याला वाईट सवयी होत्या. त्याला या सवयींपासून सुटका करून घ्यावयाची होती. मात्र अनेक प्रयत्नानंतरही तसे होवू शकले नाही. त्याला कुणीतरी संत फरीद यांचे नाव सुचविले, तो तत्काळ त्यांच्याकडे गेला. आणि आपल्याविषयीची सर्व माहिती सांगून विचारू लागला, "माझ्या वाईट सवयी कशा सुटतील?" संतानी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. तरी तो व्यापारी हट्टाला पोहोचला. त्याने रोजच येवून संताना विचारणे चालू केले. संत फरीद यांनीही त्याला रोजच टाळले. एके दिवशी व्यापारी अटटहासाला पेटला तेंव्हा फरीद म्हणाले,"मी तुला काय मार्ग दाखवू? तुझे जीवन आता ४० दिवसांचे उरले आहे. इतक्या कमी दिवसात तू कसा सुधारशील? तुझ्या वाईट सवयी कशा काय सुटतील?" हे ऐकताच व्यापारी तणावात आला. त्यानंतर त्याच्या वागण्यात फरक पडू लागला. इतके दिवस केलेल्या वाईट कर्मांची त्याला लाज वाटू लागली, सारखा पश्चाताप करू लागला. संत सहवासात राहणे, भजन पूजन करणे, सात्विक खाणे पिणे, शुद्ध आचरण करणे इत्यादी क्रिया तो करू लागला. शेवटी ४० वा दिवस उजाडला, व्यापारी मरणाची वाट पाहत होता. अचानक त्याला संत फरीद यांनी बोलावले व सांगितले," मुला, या ३९ दिवसांचा विचार करता तूच मला सांग कि या ३९ दिवसात तू किती वेळेला दुष्टपणे वागला, खोटे बोलला, वाईट कर्म केले?" व्यापारी म्हणाला," हे जे तुम्ही म्हणता ते एकदाही केले नाही. पण त्याचा माझ्या मरणाशी काय संबंध?" संत म्हणाले, " यालाच मरणाची भीती म्हणतात, कि रोजचा दिवस हाच जर आयुष्याचा शेवटचा दिवस म्हणून घालविला तर वाईट कृत्ये माणसाकडून होत नाहीत. माणसाने असे काम केले पाहिजे कि त्याच्या मागेसुद्धा त्याचे नाव निघाले पाहिजे." यानंतर व्यापारी सुधारला व त्याच्यातील वाईट सवयी निघून गेल्या. त्याच्यातील चांगल्या गुणांना संतानी वेगळ्या पद्धतीने जागृत केले. *तात्पर्य- मानवी जीवनाचा भरवसा नाही. तेंव्हा आता मिळालेल्या क्षणातुनच सदवर्तन आणि सत्कर्म केले जावू शकते.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 16/11/2019 वार - शनिवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    *जागतिक सहनशीलता दिवस* *राष्ट्रीय पत्रकार दिवस* 💥 ठळक घडामोडी :-  ● २०१३- क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांची क्रिकेट मधून निवृत्ती . 💥 जन्म :- ● १९६३-मिनाक्षी शेषाद्री,अभिनेत्री ● १९७३-पुलेंल्ला गोपीचंद,बॅडमिंटनपटू ● १९२२ - जीन ऍमडाल, अमेरिकन संगणकशास्त्रज्ञ. ● १९४० - क्रिस बाल्डरस्टोन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. ● १९७१ - वकार युनिस, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- ● १२७२ - हेन्री तिसरा, इंग्लंडचा राजा. ● २००६ - मिल्टन फ्रीडमन, अमेरिकन अर्थतज्ञ. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष बंद असल्याचा फलक काढला, ऑफिसला मात्र टाळं, कामकाज अजूनही सुरु नाही, रुग्ण मदतीच्या प्रतीक्षेत* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचं राज्यपालांनी संचालन करावं, देवेंद्र फडणवीस यांची विनंती, शिवसेना-राष्ट्रवादीकडूनही मुख्य सचिवांना निवेदन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *पाच वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री, काँग्रेस-राष्ट्रवादीला अडीच वर्षे उपमुख्यमंत्रीपद, शिवसेनेने प्रस्ताव दिल्याची सूत्रांची माहिती, तर महाशिवआघाडीचे नेते उद्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्यपालांना भेटणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *मनसे अध्यक्ष राज ठाकरे गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या भेटीसाठी ब्रीच कॅण्डी रुग्णालयात, प्रकृती स्थिर असल्याची राज यांची माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *रेल्वेतून प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेच्या उपाययोजनांचा अहवाल सादर करा, हायकोर्टाचे रेल्वेला निर्देश* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *दिल्लीत प्रदूषणाने गाठली कमाल पातळी; जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर, प्रदूषण आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकारकडून युद्धपातळीवर उपाययोजन राबवल्या जात आहेत.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *इंदूर : मयांक अगरवालच्या खणखणीत द्विशतकाच्या जोरावर टीम इंडियानं इंदूर कसोटीच्या पहिल्या डावात 343 धावांची मजबूत आघाडी घेतली आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••              *सायकल ...........!* लहानपणी सर्वांचीच आवडती अशी सायकल. आपल्या वयाचा कोणी सायकल चालवत असे तर आपल्या मनात देखील सायकल चालविण्याची उत्कट इच्छा निर्माण व्हायची. पण सायकल खरेदी करण्याऐवढं पैसे जवळ असायचे नाही म्हणून एक तर त्या सायकलवाल्या मुलांशी मैत्री करायची आणि एखादं चक्कर मिळवायची. गावात काही दुकानदार छोटी छोटी चार पाच सायकल ठेवायची आणि घंटाच्या हिशोबाने सायकल फिरविण्यास किरायाने द्यायचे. खाऊसाठी दिलेला पैसा ........... पूर्ण लेख खलील लिंक वर वाचता येईल http://nasayeotikar.blogspot.com/2019/10/blog-post_30.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *आंधळे लोक कसे परीक्षा देतात ?* 📙 अंध व्यक्ती आजकाल उच्च शिक्षण घेताना आपल्याला दिसतात. पूर्वी मात्र ते शक्य नव्हते. कारण बघता येत नसल्याने अंध लोकांना ज्ञानाची सर्वा दालने बंद होती. सहाजिकच त्यांच्या जीवनात खर्या अर्थाने अंधार होता. अंध व्यक्ती दुसऱयांच्या उपकारावर, सहानुभूतीवर अवलंबून होत्या. त्यांना स्वतःचे कर्तृत्व दाखवायला, स्वतःच्या पायावर उभे राहायला संधी मिळत नव्हती. ब्रेलच्या संशोधनामुळे मात्र अंधांच्या जीवनात आशेच्या किरणांनी शिरकाव केला. अंध व्यक्तीचे स्पर्शज्ञान खूपच चांगले असते. या स्पर्श ज्ञानाच्या कौशल्याचा वापरच ब्रेल लिपीत केला जातो. यात प्रत्येक अक्षर हे कागदावर उंचवट्याच्या (सुई टोचून केलेल्या) स्वरूपात लिहिले जाते. या उंचवट्यांची संख्या, रचना स्पर्शाने लक्षात घेऊन अंधांना अक्षर ओळख करून घेता येते. याला ब्रेल लिपी असे म्हणतात. ब्रेल लिपीत लिहिलेल्या पुस्तकांच्या साहाय्याने अंधांना ज्ञानाच्या विविध दालनात प्रवेश करणे शक्य झाले आहे. त्यामुळेच आता आपल्याला पदवी वा पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या अंध व्यक्ती दिसतात. अंध व्यक्तींना सहानुभूती वा दयेपेक्षा संधी मिळण्याची गरज आहे. त्यांची गुणवत्ता व कौशल्य वाढवण्याचे काम ब्रेल लिपीने केलेले आहे. साहजिकच अंध लोक इतरांच्या बरोबरीने विकास साधू शकत आहेत. ब्रेल लिपीच्या आधारेच अंध व्यक्ती परीक्षा देतात. अशी ही ब्रेल लिपी जणू अंधांसाठी वरदानच ठरली आहे. *डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित* यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून मनोविकास प्रकाशन ०२० ६५२६२९५० *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आत्मविश्वासाने केलेल्या कार्याला कोणत्याही संकटाची भिती नसते* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आजची प्रश्नमंजुषा* 1) *'गोविंदाग्रज' हे टोपण नाव कोणाचे ?* राम गणेश गडकरी 2) *'जागतिक तंबाखूविरोधी दिन' केव्हा साजरा करतात ?* 31 मे 3) *पहिल्या भारतीय महिला शास्त्रज्ञ कोण ?* कमला सोहनी 4) *राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक कोण ?* डॉ केशव बळीराम हेडगेवार 5) *उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस कोणता ?* 21 जून *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 👤 संतोष पेटेकर, धर्माबाद 👤 छोटू पाटील बाभळीकर 👤 मोहन कानगुलवार 👤 सदानंद बदलवाड 👤 महेश देबडवार *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *एका मुलाने काहीतरी खोडी केली म्हणून शेजारच्या बाईने त्याला एक चापट मारली. त्याबरोबर त्या मुलाने मोठे भोकाड पसरले आणि त्या बाईला शिव्या देऊ लागला. ते ऐकून त्याची आई बाहेर आली आणि तिने त्याला चांगलाच झोडपला. परंतु आईच्या हातचा इतका मार खाऊनसुद्धा तो मुलगा फारसा ओरडला नाही किंवा त्याने आईला उलट शिव्यापण दिल्या नाहीत.* *तसेच आपल्यावर येणारी संकटे ही भगवंताने आणली आहेत अशी निष्ठा असेल, तर आपल्याला त्यांचा त्रास होईल, पण त्यांनी आपली शांती बिघडणार नाही. भगवंताचा विसर आपल्याला पडला की आपली शांती बिघडते.* *ज्या दातांनी सिंह मोठ-मोठे प्राणी मारतो त्याच दातांनी तो आपल्या पिल्लांना इजा न करता उचलून एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी नेतो, हे लक्षात असू द्यावे.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁 *संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो,* *काल आपण जननायक बिरसा मुंडा यांची 144 वी जयंती साजरी केली.* *काय होत या माणसाकडे, अवघे 25 वर्ष आयुष्य, एकटा इंग्रजांशी लढला.* *म्हणूनच आज अजरामर आहे.* *हे जगणे अवघड झाले आता* *सोन्याचा होता धूर,* *आता नुसत्याच उरल्या बाता।* *चकाकत्या खोट्याला कवटाळीती* *सगळे।* *सत्याला इथे वाली न कुणी आता।* *हे विदारक दृश्य आपल्याला समाजात* *पदोपदी अनुभवायला* *मिळते.* *पण अंतिम सत्य काही वेगळेच* *असते.24 कॅरेट लाच नेहमी कस* *लागतो.* *बिरसा मुंडा 24 कॅरेट होते.* *समाजात जो सरळ व सत्याने वागतो* *त्याला नेहमीच अन्यायाचे* *घाव सोसावे लागतात.* *कारण....* *जंगलात लहान मोठी,* *वाकडी तिकडी* *अशी अनेक प्रकारची झाडे* *वाढलेली असतात.* *परंतु अशी झाडे कोणीच* *तोडत नाही.* *पण जी सरळ वाढलेली असतात* *त्यांना मात्र कुऱ्हाडीचे घाव* *सोसावे लागतात.* *रस्ता जर खड्डयांचा आणि कच्चा असला ना तर त्यावर लोड कमी* *असतो.पण तोच प्लेन आणि सुपर असुद्या सगळ्या गाड्या त्याच* *रोडवरून धावतील, त्याच्यावरच जोरजोराने आदळतील.* *तरीही निवड सत्याचीच करा.* *सगळ्यात महत्वाचे म्हणजे* *सत्य मेव जयते।* *सत्य परेशान होता है,पराजित नही।* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• वर्तमान स्थितीमध्ये आपण कोणत्याही छोट्या छोट्या गोष्टीसाठी खूप विचार करतो.हे माझ्या हातून पूर्ण होईल का ? पूर्ण होईल का असा जेव्हा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो तेव्हा नक्कीच समजून घ्यायचे की,आपला आत्मविश्वास डळमळीत झाला आहे.हा आत्मविश्वास जर आपल्याला मजबूत किंवा ठाम ठेवायचा असेल तर आपल्या मनाची कामातली एकाग्रता सातत्याने ठेवायला हवी.सद्यस्थितीत मला हे काम पूर्ण करायचे आहे आणि ते करावेच लागणार त्यांच्याशिवाय दुसरा पर्यायच नाही अशी मनाची धारणा ठेवली आणि काम केले तर नक्कीच तुमचे काम पूर्ण होईल.त्या कामातून आलेले यश हे तुमच्या पुढच्या कामासाठी आणि पूर्णतेसाठी शुभसंकेत आहेत.त्यामुळे अजून पुन्हा जोमाने काम करण्यासाठी प्रेरणा मिळते.मग ते वर्तमानातील असो की भविष्यातील असो.तुमचा आत्मविश्वास आणि तुमच्या कामातील सातत्य हेच तुमच्या यशाचे खरे रहस्य आहे. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *धनाची लालसा* सुंदरपुर गावात शामराव नावाचा एक शेतकरी राहत होता. त्याला चार मुले होती . त्याचे चारीही मुलं खूप आळशी आणि खोटे बोलणारे होते. शामराव त्याच्या चारीही मुलाशी खूप परेशान झाला होता. त्याचे मुलं इकडे तिकडे बसून एकमेकांशी गप्पा गोष्टी करायचे. म्हणून आता शामरावांनी ठरवलं होतं, की मी यांचा अल्लडपणा आळशीपणा दूरच करून राहील. त्याच्यासाठी त्यांनी त्यांच्या बायको ची मदत घेतली. त्यांच्या बायकोने एक उपाय सांगितला. त्याच्यासाठी तो तयार झाला. ते सकाळी तिर्थयात्रेला निघाले त्यांनी त्या चारही भावांना सांगितलं “,, तुम्हाला जर धनाची आवश्यकता राहिली तर तुम्ही शेतामधून पुरलेले धन घेऊन घ्या. ते तीर्थयात्रा निघाले. तसेच पळत असते चारही भाऊ शेतात गेले, त्यांनी खड्डा खोदला तर त्यांना काहीच नाही मिळाले. ते घरी डबल वापस गेले. तेव्हा त्यांच्या मित्र हरिनाथ आले होते. “, ते म्हणाले, तुम्ही खड्ड्यात खोदून घेतला आता त्यामध्ये छोटे छोटे बिया टाकून द्या. त्या चारही भावांनी असेच केले. त्यांच्या शेतातून अंकुर (पिके) निघू लागली. ते आश्चर्यचकित झाले . त्यांना खूप आनंद झाला. बोध: कधीही धनाची लालसा करु नये. परिश्रमाचेच फळ गोड असते. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 15/11/2019 वार - शुक्रवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *क्रांतिसूर्य बिरसा मुंडा जयंती* 💥 ठळक घडामोडी :-  ● १९८९ - सचिन तेंडुलकरने भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. 💥 जन्म :- ● १९५४ - आलेक्सांदेर क्वाशन्येफ्स्की, पोलंडचा तिसरा राष्ट्राध्यक्ष. ● १९६१ - झहीद अहमद, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू. ● १९६८ - पीटर मार्टिन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- ● १९८२ - आचार्य विनोबा भावे (महाराष्ट्र) भारत *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दर हेक्टरी मदतीसह सर्व शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्ज माफीचे केले सूतोवाच* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *राष्ट्रपती राजवटीमुळे मंत्रालयातील वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाला टाळं, नातेवाईकांवर रिकाम्या हाताने परतण्याची वेळ, राज्यभरात साडे पाच हजार रुग्ण मृत्यूच्या छायेत* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा राजभवनावर धडक देण्याचा प्रयत्न, बच्चू कडूंच्या नेतृत्वात आंदोलन, नरिमन पॉईंटवर मोर्चा अडवून आमदार बच्चू कडूंना पोलिसांनी घेतलं ताब्यात* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *हवामानातील बदलाचा सिंधुदुर्गच्या हापूसला फटका, हापूसचा हंगाम 40 दिवसांनी लांबणार, तर आफ्रिकेच्या मालावीतील हापूस पुण्यात दाखल* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *राफेलच्या कथित घोटाळ्याच्या चौकशीची गरज नाही, राफेलविरोधी सर्व याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळल्या तर प्रकरणाची नव्याने चौकशीची राहुल गांधींची मागणी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *नाशिकच्या प्रसिद्ध गायिका गीता माळी मुंबईहून नाशिककडे जात असताना शहापूर येथे गॅस टँकर आणि कारची जोरदार धडक झाली. या अपघातात गीता माळी यांचे निधन झाले.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारत विरुद्ध बांगलादेश पहिल्या कसोटीत बांगलादेशचा पहिला डाव अवघ्या 150 धावांमध्ये आटोपला, टीम इंडियाची सावध सुरुवात* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    *हेडफोनपासून दूर रहा* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2016/12/blog-post.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *प्लॅस्टिक सर्जरी* 📙 सर्जरी किंवा शस्त्रक्रिया याचे कितीतरी पोटविभाग गेल्या ३०-४० वर्षात प्रगत होत गेले आहेत. कान नाक घसा यांसाठीचे तज्ज्ञ, पोटाच्या व आतडय़ाच्या विकाराचे तज्ज्ञ, मूत्रशल्यविशारद, मेंदू व मज्जारज्जू शल्यविशारद, अस्थिरोगतज्ञ अशा विविध अवयवांनुसार त्यांची विभागणी होत गेली आहे. मात्र गेली साठएक वर्षे जनरल सर्जरीच्या बरोबरीने, पण स्वतःचे वेगळेपण राखणारी शाखा म्हणजे प्लॅस्टिक सर्जरी होय. भारतीय शल्यकर्म परंपरेतील सुश्रुतसंहितेमध्ये सुद्धा प्लास्टिक सर्जरीच्या आज केल्या जाणाऱ्या चेहऱ्यावरच्या नाकाच्या ठेवणीबद्दलच्या शस्त्रक्रियेसंदर्भात उल्लेख सापडतात. अर्थातच तंत्रांमध्ये खूप बदल होत गेला आहे. प्लॅस्टिक सर्जरी असे विचित्र नाव पडण्याचे कारण म्हणजे विद्रुप झालेला शरीराचा भाग वळूवून लवचिकपणे त्यात बदल करून त्याला आकार देण्याचे अवघड काम या शस्त्रक्रियेत अपेक्षित असते. आजकाल जरी प्लास्टिक सर्जरी ही खूपदा सौंदर्य वाढवण्याकरता केली जात असली तरी तिचा मूळ गाभा विद्रूपता दूर करणे व शरीररक्षणाला उपयुक्त ठरणे हाच आहे. जन्मत: दुभंगलेला वरचा ओठ व टाळू, बसके व अपरे नाक, पुरुषांच्या मूत्रमार्गातील जन्मतः असलेले दोष, हाताची पायाची सहा वा जास्त बोटे यांसारख्या जन्मजात दोषांवर शस्त्रक्रिया करून त्या व्यक्तीला सामान्यपण देऊ करणे हा प्लास्टिक सर्जरीच्या कामाचा मोठा भाग. पण अनेकदा भाजल्यामुळे काही मोठ्या भागातील त्वचा जळून जाते किंवा अाकसून त्या अवयवाची हालचाल कमी होते. (उदारणार्थ मान वळवणे, कोपरामधील त्वचा जळल्याने हात लांब न होणे इत्यादी) त्यावेळी अन्य भागातून त्वचा काढून त्या जागी तिचे रोपण करण्याचे काम प्लॅस्टिक सर्जन करतात. प्लास्टिक सर्जरीचा वापर १९५० नंतरच्या दशकात गुप्त हेरगिरीसाठी चेहरेपट्टी बदलून घेण्यासाठीही केला गेला आहे. असाच उपयोग वृद्धत्वाच्या खुणा झाकून चेहर्यावरील नको त्या सुरकुत्या काढण्यासाठी अनेक व्यक्तींनी, नटनट्यांनी केला आहे. डोक्यावरचे टक्कल कमी करण्यासाठी केशारोपण करून तेथे केस वाढवणे हा सुद्धा या शस्त्रक्रियेचाच एक भाग समजला जातो. सूक्ष्मदर्शक यंत्राचा सरसहा वापर अतिशय नाजूक सुया, अगदी पातळ तंतूवजा रेशमी धागे आणि तासनतास चिकाटीने चालणारे काम हा प्लास्टिक सर्जरीचा अत्यावश्यक भाग. प्रत्यक्ष शस्त्रक्रिया करताना शरीराची ठेवण बदलताना, त्वचेची अदलाबदल करताना त्या भागात होणारा रक्तपुरवठा अबाधित राखणे हा नियोजनाचा, आरेखनाचा अत्यंत कौशल्याचा भाग असतो. यामध्ये जरा जरी चूक झाली तरी आरोपण केलेली त्वचा निरुपयोगी ठरते. कॅन्सरसंदर्भातील विविध शस्त्रकर्मे केल्यावर काही भाग काढून टाकणे अत्यावश्यक ठरते. उदारणार्थ, चेहऱ्याच्या जबड्याचा निम्मा भाग, छातीच्या काही फासळ्या. अशा वेळी प्लॅस्टिक सर्जरीने अशा रुग्णाला शक्यतो नेहमीचे रूप देण्यासाठी कित्येक महिने प्रयत्न करावे लागतात. प्लॅस्टिक सर्जनचे कामाचे स्वरूप त्यामुळे सध्याच्या काळात प्लास्टिक, रिकन्स्ट्रक्टिव्ह व कॉस्मेटिक असे तिहेरी झाले आहे. *'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• समता ही आजची हाक आहे. ती आपणास आवडो वा ना आवडो, समता आजचा युगधर्म आहे याची जाणीव ठेवली पाहिजे - विनोबा भावे *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *बिरसा मुंडा यांचा जन्म केव्हा झाला ?* 15 नोव्हेंबर 1875 2) *बिरसा मुंडा यांचा जन्म कोठे झाला ?* उलिहातु , झारखंड 3) *बिरसा मुंडा यांना लोकांनी कोणता किताब बहाल केला ?* जननायक 4) *भारतातील राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप कोण करते ?* केंद्रीय सांख्यिकी संस्था 5) *'डिस्कव्हरी ऑफ इंडिया' हा ग्रंथ कोणी लिहिला ?* पं जवाहरलाल नेहरू ( अहमदनगरच्या तुरुंगात ) *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 👤 माधव गुरुपवार, नांदेड 👤 व्यंकटेश विरेश पाटील, येवती 👤 सुनील शिंदे, पांगरी 👤 राहुलकुमार सातव, कुपटी, माहूर 👤 भगवान भूमे, देगलुर 👤 अशोक चिंचोलीकर, धर्माबाद 👤 दिनेश येवतीकर, येवती 👤 कमलेश परब 👤 मारोती कानगुलवार, येवती 👤 गंगाधर मरकंठवाड, येवती 👤 सोनाली कडवईकर, रत्नागिरी 👤 इरवंत धुंडापुरे, चिरली 👤 शंकर जाजेवार, येताळा *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *ग्रंथपारायणात रस नसलेलो आम्ही पुस्तकांची पानं फाडून, होड्या बनवून पावसात सोडायचो. काही दु:ख वाटायचं नाही उलट मौज वाटायची. पुस्तकाची किती पानं फाडलीत हे कुठं कळायचं, आई-बापांना ! अशा पुरात सोडलेल्या होड्या वाहुन समुद्राला गेल्या; पण डोळ्यातील स्वप्नांना मात्र त्यांनी बुडू दिलं नाही. पुस्तकांच्या पानांच्या होड्या, विमानं, पतंग बनवायला मिळतात म्हणून शाळेची वाट गोड. मजबुरीने धरलेल्या वाटेवर याच ग्रंथाच्या होडीने अथांग दर्यावर हुकूमत गाजवणारा नावाडी बघता बघता कधी बनवून टाकले, कळलेच नाही. तेंव्हा वाटले नव्हते, की या कागदी नावेला स्वप्नांची वल्हं आणि स्वप्नांचा अमर्याद धागा जोडला आहे ते.!* *आज ग्रंथांविषयी निराशापूर्ण वातावरण दिसते. ग्रंथांकडे समाज दुर्लक्ष करतोय, पण "किताबों पर धूल जम जाने से, कहानी थोडेही खत्म हो जाती है!" कुठल्याही काळात ही धूळ झटका, पुस्तकं पुन्हा भरभरून बोलतील. प्रत्येकाला ही कागदाची नाव आणि शाईचं इंधन पुरेसं आहे ; हा जीवनाचा अथांग दर्या तरून जायला.*   ••●🌸 ‼ *रामकृष्णहरी* ‼🌸●••             🌸🌸🌸🌸🌸🌸          *संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*                📱 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो,* *बिनधास्त म्हणा---* *मी पुन्हा उभा राहील,* *मी पुन्हा लढा देईन,* *मी पुन्हा यशस्वी होईल,* *हा मी स्वतःजवळ असुद्या पण तो* *फक्त आणि फक्त जीवनातील* *समस्या दूर* *करण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यासाठी पाहिजे.* *कारण मी च्या पुढे खूप काही दडलेले असते आणि मागेही खूप काही असते.* *विल्मा रुडाल्फ मी उभी राहणार अशीच म्हणत होती तीने अपंग असूनही 4 वेळा ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळविले.* *अरुनिमा सिन्हा पाय गेल्यानंतर सुद्धा मी पुन्हा लढा देईन म्हणाली आणि एव्हरेस्ट शिखर सर केले.* *अब्राहम लिंकन नेहमी म्हणत आले मी यशस्वी होईल ते 9 वेळा बेसुमार आपटी खाऊन 10 व्यादा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले, तेव्हा वरील मी ला सोडू नका.* *पायाचं दुखणं आणि संकुचित विचार माणसाला कधीच पुढे जाऊ देत नाहीत,* *तूटलेली लेखणी आणि इतरांशी ईर्ष्या स्वतःच भाग्य लिहू देत नाही,* *कामाचा आळस पणा आणि पैशाचा लोभ माणसाला मोठ होऊ देत नाही,* *आपणच खरे आहोत बाकी सर्व खोटे हा विचार माणसाला माणूस होऊ देत नाही.* *ज्या व्यक्ती अश्रूंचा सहारा घेऊन जगतात त्या जीवनात कुठेतरी पराभव पत्करलेल्या असतात किंवा* *त्यांच्या मनावर कुठेतरी आघात झालेला असतो किंवा कुणीतरी मनाविरुद्ध करण्यासाठी प्रवृत्त केलेले असते.हे जरी खरे* *असले तरी अशा व्यक्ती शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या कमकुवत झाल्याने त्यांना जीवनात जगण्याची काही अपेक्षा उरली नाही* *किंवा आता आपण जगून तरी काय करावे असा सतत विचार करत आणि डोळ्यांत अश्रू* *आणून कसेबसे जीवन जगतात.अशा दुबळ्या मनाने जीवन जगण्यापासून जीवनाला परावृत्त करायचे असेल तर* *जीवनात आणि आपल्यासमोर चांगले जीवन जगण्याची उमेद प्रथमत:* *नजरेसमोर ठेवायला हवी, नेहमी आपण काहीतरी असले तरी मी कोणत्याही कठीण प्रसंगाला* *सामोरे जाण्यासाठी सक्षम आहे असा उदात्त विचार करून जगायला शिकले पाहिजे,कुणीजरी* *आपले मन दुखवण्याचा प्रयत्न केलातरी मी त्याकडे दुर्लक्ष करीन असाही* *सकारात्मक विचार केला आणि मन घट्ट करून जगायला शिकले तर अश्रूंचा आधार घेऊन जगायची काही* *गरजच भासणार नाही.जीवन तर सुखदु:खाने भरलेले आहे ते कुणाच्या वाट्याला कमी-जास्त* *असणारच.सुख जास्त झाले म्हणून जास्तही त्या सुखाचा अतिरेक होऊ द्यायचा नाही आणि* *दु:ख झाले म्हणून अति दु:खी व्हायचे नाही.आपण सारेजण सुखदु:खाच्या चक्रव्युहात* *अडकलेलोच आहोत आणि त्या चक्रव्युहाला भेदूनच चांगले जीवन जगायचे आहे हे लक्षात ठेवायला हवे.* *स्वतःमधील मने जिंकणारा आणि मनाला जिंकणारा मी नेहमी जिवंत ठेवा.यामध्ये अहंकाराचा मी कधीही आड येऊ देऊ नका.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• वर्तमान स्थितीमध्ये आपण कोणत्याही छोट्या छोट्या गोष्टीसाठी खूप विचार करतो.हे माझ्या हातून पूर्ण होईल का ? पूर्ण होईल का असा जेव्हा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो तेव्हा नक्कीच समजून घ्यायचे की,आपला आत्मविश्वास डळमळीत झाला आहे.हा आत्मविश्वास जर आपल्याला मजबूत किंवा ठाम ठेवायचा असेल तर आपल्या मनाची कामातली एकाग्रता सातत्याने ठेवायला हवी.सद्यस्थितीत मला हे काम पूर्ण करायचे आहे आणि ते करावेच लागणार त्यांच्याशिवाय दुसरा पर्यायच नाही अशी मनाची धारणा ठेवली आणि काम केले तर नक्कीच तुमचे काम पूर्ण होईल.त्या कामातून आलेले यश हे तुमच्या पुढच्या कामासाठी आणि पूर्णतेसाठी शुभसंकेत आहेत.त्यामुळे अजून पुन्हा जोमाने काम करण्यासाठी प्रेरणा मिळते.मग ते वर्तमानातील असो की भविष्यातील असो.तुमचा आत्मविश्वास आणि तुमच्या कामातील सातत्य हेच तुमच्या यशाचे खरे रहस्य आहे. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *गरुड व घुबड* एक गरुड आणि घुबड फार दिवस एकमेकांशी भांडत असत. परंतु, एक दिवस, त्यांनी एकमेकांशी मैत्रीने वागण्याचे ठरविले, तसेच एकमेकांची पिल्ले खाऊ नये असेही ठरवले. तेव्हा घुबड गरुडाला म्हणाले, ''मित्रा! परंतु, माझी पिल्ले कशी आहेत ते तुला माहीत आहे का? नाहीतर दुसर्‍याचीच आहेत असे म्हणून तू त्यांना खाऊन टाकशील.'' गरुड म्हणाला, ''माझी पिल्ले खूप सुंदर आहेत. त्यांचे डोळे, पिसे, आवाज सगळेच खूप सुंदर आहे. आता येईल ना तुला ओळखता?'' पुढे एके दिवशी, झाडाच्या ढोलीत गरुडाला घुबडाची पिल्ले सापडली. ती पाहून तो म्हणाला, ''किती घाणेरडी आणि कुरूप पिल्ले आहेत ही. घुबडाची पिल्ले तर खूप सुंदर आहेत. म्हणजे ही काही घुबडाची पिल्ले नसणार. यांना मारून टाकावे. असे म्हणून त्याने सगळ्या पिलांचा फडशा उडवला.'' नंतर घुबडाने येऊन पाहिले तो ढोलीत पिल्ले नाहीत. ते गरुडास म्हणाले, ''मित्रा, तूच माझी पिल्ले खाल्लीस.'' गरुड म्हणाला, ''हो, मी खाल्ली; पण मला काय माहीत की ही कुरूप पिल्ले तुझी आहेत म्हणून ? तू तर म्हणालास की, माझी पिल्ले खूप सुंदर आहेत. मला वाटले ती दुसर्‍याच पक्ष्याची आहेत. आता यात माझी काय चूक? तात्पर्य: स्वत:ची खरी माहिती लपवून खोटी माहिती सांगितली असता मनुष्य संकटात सापडतो *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 14/11/2019 वार - गुरूवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    *बालदिन* 💥 ठळक घडामोडी :-  १९७१ - मरीनर ९ हे अंतराळयान मंगळाच्या कक्षेत पोचले. १९७५ - स्पेनने पश्चिम सहारातून पळ काढला. 💥 जन्म :- १८८९ - जवाहरलाल नेहरू, प्रथम भारतीय पंतप्रधान १९२४ - रोहिणी भाटे, मराठी कथकनर्तिका. १९४२ - इंदिरा गोस्वामी, आसामी साहित्यिक, कवयित्री, संपादिका. 💥 मृत्यू :- १९१४ - वेंगायिल कुन्हीरामन नयनार, मल्याळम लेखक, पत्रकार. १९७७ - ए.सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद, भारतीय तत्त्वज्ञानी. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *राष्ट्रपती राजवटीचा पहिला फटका शेतकऱ्यांना, राज्यात सरकार अस्तित्वात नसल्यामुळे पीक विम्यासाठी विमा कंपन्यांची नकारघंटा, शेतकरी संकटात* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मुंबई, पुणे, नाशिकसह ठाण्याचं महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी, अनेकांच्या इच्छा जागृत तर नवी मुंबई आणि औरंगाबादचं महापौरपद महिलांसाठी राखीव* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *कर्नाटकातील 17 पक्षबदलू आमदारांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा, पोटनिवडणूक लढवता येणार, विधानसभा अध्यक्षांचा अपात्रतेचा निर्णय योग्य असल्याचा सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *आता सरन्यायाधीशांचं कार्यालयही माहिती अधिकाराच्या कक्षेत, दिल्ली हायकोर्टाचा 2010 चा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *राष्ट्रपती राजवटीचा 100 व्या नाट्यसंमेलनाला फटका, सरकार आणि सांस्कृतिक मंत्री नसल्याने संमेलन लांबणीवर पडण्याची चिन्ह* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *राष्ट्रपती राजवट लागू होताच मंत्रालयात शुकशुकाट, मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांच्या फाईल्सची बांधाबांध, सामान्य प्रशासन विभागाचं परिपत्रक जारी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि जसप्रीत बुमराने आयसीसीच्या वन डे क्रमवारीत फलंदाज आणि गोलंदाजांच्या यादीत आपलं अव्वल स्थान कायम राखलं आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• आजपासून महाराष्ट्रात द्वितीय शैक्षणिक सत्रास प्रारंभ, वीस दिवसाच्या दिवाळी सुट्टीनंतर पुन्हा शाळेत मुलांचा किलबिलाट सुरू सर्वाना द्वितीय शैक्षणिक वर्षाच्या फ्रेश मॉर्निंग बुलेटीन टीमकडून मन:पूर्वक शुभेच्छा ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••              *भारताचे शिल्पकार आणि जगाचे शांतीदूत - पंडीत जवाहरलाल नेहरू*   http://nasayeotikar.blogspot.com/2017/10/blog-post_27.html वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. _चित्रांकन :- विनायक काकुळते, नाशिक_ लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *रांजणवाडी म्हणजे काय ?* 📙 रांजणवाडी होण्याचा अनुभव आपण कधी ना कधी तरी घेतलेला असतोच. 'काहीतरी चोरून खाल्ल्यावर रांजणवाडी होते बरं का !' असंही कोणी आपल्याला गमतीने म्हटलेले असते. रांजणवाडी हा डोळ्यांचा आजार आहे. पापण्यांच्या मुळाशी पू साठायला लागून हा रोग होतो. आपल्या पापण्यांच्या मुळाशी तैलग्रंथी असतात. त्यांना 'झीज' ग्रंथी असे म्हणतात. या ग्रंथीचे तोंड बंद होऊन आता ग्रंथीतील स्राव साठून त्यामध्ये जंतुसंसर्ग होतो व त्यामुळे या ठिकाणी पूर साठावयास लागतो. पापणी लाल, सोडलेली दिसते. डोळ्यांची उघडझाप करताना दुखते. स्पर्शाने वेदना होतात यालाच रांजणवाडी असे आपण म्हणतो. रांजणवाडी पिकल्यावर आपोआप फुटते व पू निघून गेल्यावर पापणी पूर्ण बरी होते. रांजणवाडीची नुसती सुरुवात असल्यास गरम पाण्यात कपडा बुडवून त्याने शिकल्याने रांजणवाडी एक दोन दिवसांत जिरू शकते. जिरली नाही तर तरी पिकण्यासाठी शेकल्याने मदत होते व ती लवकर फुगून फुटते. सुजेच्या सुरुवातीस पू निघण्यासाठी पापणी दाबून प्रयत्न करू नये. त्यामुळे कधी कधी तेथील जंतुसंसर्ग रक्तवाहिन्यांद्वारे मेंदूमध्ये नेला जाऊन मेंदूमध्ये संसर्ग होऊ शकतो. शेकणे या उपायांसोबतच आणखी एक उपाय घरच्या घरी करता येतो. लसणाच्या पाकळीचा रस सकाळ संध्याकाळ दोन दिवस लावला तर रांजणवाडी जिरते. वारंवार रांजणवाडी होणे हे शरीराची रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्याचे लक्षण असू शकते. त्यामुळे असे होणार्‍या व्यक्तींनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. एखादे वेळी त्यांना मधुमेहही झालेला असू शकतो. *डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित* यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून मनोविकास प्रकाशन *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• " खोटारडा जेव्हा खर बोलतो, तेव्हा कुणीही त्याच्यावर विश्वास ठेवत नाही.” *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *'बालक दिवस' केव्हा साजरा केला जातो ?* 14 नोव्हेंबर 2) *भारतीय पक्षीनिरीक्षण शास्त्राचे पितामह कोणाला म्हटले जाते ?* डॉ. सलीम अली 3) *'द फॉल ऑफ स्परो' हे आत्मचरित्र कोणाचे ?* डॉ. सलीम अली 4) *33 वे राज्य पक्षीमित्र संमेलन कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे ?* रेवदंडा ( रायगड ) 5) *महाराष्ट्र राज्य पक्षीमित्र संघटनेचे अध्यक्ष कोण आहेत ?* डॉ. जयंत वडतकर *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 👤 सुहास चटने 👤 सुभाष चंदने 👤 शीतल चौगुले 👤 खंडू सोळंखे 👤 योगेश पाटील बादलगावकर 👤 विनोद पांचाळ 👤 मोहन लंगडापुरे 👤 भारत शेळके 👤 रितेश जाधव 👤 निखिल थोरमोठे 👤 विजय सदानंद 👤 सुनील नामेवार 👤 वसंत यशवंतकर *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *रोज सकाळी देवपूजा करून आपल्या कामाला लागणारी अगणित माणसे आपल्या अवतीभवती असतात. आपणही देवपूजा करीत रोजचे एक कर्म उरकत असतो. या सगळ्या क्रियेमध्ये भाव किती ?  हा खरा आजचा प्रश्न आहे. संत ज्ञानेश्वरांनी असे म्हटले आहे की,*          *भावेविण भक्ती। भक्तिविण मुक्ती।*           *बळेविण शक्ती। बोलू नये॥* *या सगळ्या मुळाशी भाव ही गोष्ट मोलाची आहे. ती नसेल तर देवपूजा ही फक्त रोजच्या अनेकविध घटनांपैकी एक होऊन राहते. मन जर विकारांनी भरलेले असेल, तर तिथे भावशक्ती बळ धरू शकत नाही.* *संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम, रामदास अथवा अलिकडचे संत गाडगेबाबा, तुकडोजी महाराज या सर्वांनाच समाजाने तत्कालीन कालखंडात जी वागणूक दिली ती  बहुतांश नकारात्मकच होती, असे आपल्या लक्षात येईल. पण तरीही कोणत्याही परिस्थितीत या सर्वांनी आपल्या मनातला देवाबद्दलचा स्थायीभाव ढळू दिला नाही. आपल्या मनात असलेले कार्य भावनांच्या बळावर ते करीत राहिले, त्यामुळे ते संतत्वाला पोहचले. हे संतत्व आपल्याला आयुष्यात कळले पाहिजे. ते एकदा कळले, की समस्याग्रस्त आयुष्यही सुलभ वाटू लागते. हे सगळे वाटणे आयुष्यात उतरण्यासाठी आपली पहिली पायरी आपल्या हातुन रोज होणा-या 'देवपूजे'ची आहे. ती देवपूजा आपण मनोभावे करू या..!*   ••●🌼‼ *रामकृष्णहरी* ‼🌼●••               🌼🌼🌼🌼🌼🌼       *संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*               📱 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो,* *आज परिस्थिती खूपच विदारक झाली आहे.* *माणस भेटणं, मिळवणं आणि* *जुळवणे कठीण होऊन बसलंय.* *करणार तरी काय?* ????? *काही शब्द आठवतात----* *आर्त मी मारीन हाक* *वारा मुरळी धाडीन* *झाड हिरवा नेसून शालू* *त्याला भुरळ पाडीन।* *कोणी केली माझी कळ* *मन त्याचे का गढूळ।।* *मानवाने खरच अनेक क्षेत्रात खूप* *प्रचंड प्रगती केली पण काही* *गोष्टी खटकताय त्या मांडत आहे.* *माणूस मोठ्या फ्लॅट मध्ये ब्लॉक झाला अन भौतिक वर्तुळातच लॉक* *झाला.* *आता इमारती खूप उंच गेल्या पण वृत्ती संकुचित झाली.* *जिकडे पहावे तिकडे रस्ते रुंदीकरण चालू पण दृष्टिकोन मात्र अरुंद.* *घरे भली मोठी दिसतात मात्र त्यात तू,मै और वो बस.* *सुख-सुविधा अपार पण उपभोगायला वेळ नाही.पदव्यांचा ढीग झाला पण* *शहाणपण कुठे दिसत नाही.* *ज्ञानाच भांडार भरलंय पण वागण्या, बोलण्याच भान नाही.* *औषधोपचार खूप मोठा पण तंदुरुस्ती अजिबात नाही.मद्य-धूम्रपान भरपूर प्रमाणात पण आनंद क्वचितच.* *रात्र रात्र जागरण पण वाचन हरवले.* *दिवसभर टी.व्ही.,मोबाईल वर पण खेळ लुप्त झाला.* *चॅटिंग खूप चालते पण जिव्हाळा हरवला.चरितार्थ सगळे चालवितात मात्र जीवन जगायला शिकले नाही.* *मालमत्तेची रोज वाढ होते पण मूल्ये कमी कमी होत चालली.* *अंतराळात पोहचलो पण शेजाऱ्याला विसरत चाललो.* *अवकाश जिंकून घेतले पण अंतरंगातील चलबिचल ओळखू शकत नाही.पाणी शुद्ध पितो पण* *आत्मा तसाच राहतो.धावपळ खूप चालली पण क्षणभर विसावा नाही.* *बघा या गोष्टी लक्षात घेऊन आपल्याशी कुठं जुळतात का , की* *यांचा आणि आपला काही संबंध नाही असं वाटत.मनाला चटका* *बसला आणि परिस्थिती लक्षात घेऊन लिहिलं.यात कुठे कमी* *पडत असाल तर वेळीच भर घाला.जीवनात भरभराट होईल.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• क्षणाचे किती मोल असते हे आपल्याला कधी कळतच नाही.जेव्हा कळते तेव्हा तो क्षण आपल्या हातून निसटून गेलेला असतो.मग आपण पश्चातापात पडतो.पश्चातापात पडण्यापेक्षा येणारा प्रत्येक क्षण आपल्यासाठी काहीतरी घेऊन येतो आणि तो आपल्याला काहीतरी करण्याची प्रेरणा देतो.हे लक्षात ठेऊन आपल्या आनंदी जीवनाला दुःखी करण्यापेक्षा तो क्षण आनंदात कसा घालवता येईल यासाठी प्रयत्न करायला शिकले पाहिजे.हीच तर खरी कसोटी आपल्या जीवनाची आहे.आपण कर्तव्यदक्ष रहायला शिकले पाहिजे.आपल्यातला आळशीपणा आणि कामचुकारपणा टाळायला शिकले पाहिजे.येणारा प्रत्येक क्षण आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे हे समजून घ्यायला हवे. एका क्षणाने काय होतं नाही.वेळेवर रेल्वेस्थानकावर पोहोचलो नाही तर रेल्वे आपल्यासमोरुन निघून जाते.क्षणाचा विचार केला नाहीतर एखादा क्षण असा आपल्यासमोर येतो की,आपण गाडीला ब्रेक नाही लावले तर होत्याचे नव्हते ही होऊ शकते.एखादा क्षण अपघातात सापडलेल्या व्यक्तीला हाॅस्पिटलमध्ये नेण्यासाठी विलंब केला तर प्राणही जाऊ शकेल.ह्या सगळ्या घटना क्षणातच होत असतात आणि घडतही असतात.आपण विलंब करणे, दुर्लक्ष करणे किंवा आळस करणे हे किती आपल्याला महागात पडते याची जाणीव ठेवायला हवी.आपले जीवन अनमोल आहे आणि या अनमोल जीवनासाठी क्षण किती महत्त्वाचे हे जर आपल्याला समजायला लागले तर या आणि अन्य घटनांना वेळीच पायबंद घालता येऊ शकतो.त्यासाठी कोणत्याही क्षणी सतर्क राहणे आणि जीवन आनंदमय जगणे यातच खरे आपल्या जीवनाचे मोल अन्यथा जीवनाला काहीच अर्थ प्राप्त होत नाही. © व्यंकटेश काटकर,नांदेड. 🦋🍃🦋🍃🦋🍃🦋🍃🦋 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कोळ्याने राजाला धडा शिकवला* एकदा दोन राज्यात युद्ध झाल. त्यात एका राजाचा पराभव झाला .पराभुत राजा शोध घेत होता .त्यांनी त्या राजाला ठार मारायचे होते, म्हणून तो राजा जीव वाचवण्यासाठी जंगलात पळाला .आणि एका गुहेत जाऊन लपला. तो खूप दुःखी झाला होता. त्याच्या धीर खचला होता. एके दिवशी राजा गुहेत स्वस्थपणे पहुडला होता. भिंतीवरी सरपटणारा एका लहानशा कोळ्याने त्याचे लक्ष वेधले. तो सरपटत भिंतीवर चढायचा. असे बऱ्याचदा घडले. पण कोळ्याने आपला प्रयत्न सोडला नाही राजाने विचार केला. हा सरपटणारा छोटा प्राणीसुद्धा आपले प्रयत्न सोडत नाही. मी तर राजा आहे. मग मी माझा प्रयत्न का बरे सोडले? मला पुन्हा प्रयत्न केलाच पाहिजे. त्याने शत्रु बरोबर पुन्हा युद्ध करण्याचा निश्चय केला. राजा जंगलातून बाहेर पडला आणि आपल्या विश्वासू सहकाऱ्यांना भेटला. त्यांनी आपल्या राज्यातील शूर माणसे एकत्र केली. सर्व शक्तीनिशी त्यांनी आपल्या शत्रु बरोबर युद्ध केले. अखेरीस त्यांनी लढाई जिंकली. त्याला त्याचे राज्य परत मिळाले. एका कोळ्याने आपल्याला धङा शिकविले,हेत्याच्या कायम लक्षात राहिला. *तात्पर्यः जो अपयशाने खचून न जाता सतत प्रयत्न करतो, त्यालाच यश मिळते.*              *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 14/10/2019 वार - सोमवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जागतिक प्रमाण(मानक) दिन* *जागतिक दृष्टी दिन* 💥 ठळक घडामोडी :- ◆१९५६ - डॉ. भीमराव रामजी आंबेडकर (बाबासाहेब आंबेडकर) यांचा आपल्या सुमारे ३,८०,००० अनुयायांसह दीक्षाभूमी, नागपूर येथे बौद्ध धर्मात प्रवेश. ◆१९९८-विख्यात अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांना नोबेल पुरस्कार जाहीर. 💥 जन्म :- ◆ १९३१ - निखिल बॅनरजी, भारतीय शास्त्रीय संगीतकार. ◆१६४३-बहाद्दूरशाह जफर(पहिला) मुघल सम्राट 💥 मृत्यू :- ★२०१३- मोहन धारिया ,माजी केंद्रीय मंत्री व सामाजिक कार्यकर्ते* *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *वादग्रस्त प्रश्नांवर संवादातून मार्ग काढणार, भारतभेटीवर आलेल्या चीनचे पंतप्रधान शी जिनपिंग यांचं वक्तव्य, व्यापार, गुंतवणूक, सेवा क्षेत्रातील प्रश्न सोडवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था निर्माण करणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *सलग बाराव्या वर्षी मुकेश अंबानी भारतातले सर्वात श्रीमंत व्यक्ती, फोर्ब्जकडून भारतातल्या कुबेरांची यादी जाहीर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *अपघातात डॉ. नेहा शेख या तरुणीच्या मृत्यूनंतर झालेल्या जनआंदोलनानंतर भिवंडी-वाडा-मनोर महामार्गावरील टोल बंद, कंपनीबरोबरचा रस्त्याचा करारही रद्द* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *जीएसटी मध्ये कमतरता असू शकतात पण टीकेपेक्षा सूचना करा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे प्रतिपादन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *राज्यात बी एस एन एल कडून सहाशे पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना सक्तीची व्ही आर एस* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *PMC नंतर महाराष्ट्रात आणखी एका बँकेत कोटींचा घोटाळा, 1 लाख खातेदार पैसे काढू शकणार नाहीत !* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *पुणे : टीम इंडियाने रचला इतिहास, दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर एक डाव आणि 137 धावांनी विजय, द्विशतक ठोकणाऱ्या विराट कोहलीला सामनावीराचा पुरस्कार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आपले नशीब आपल्या हाती* https://nasayeotikar.blogspot.com/2018/03/12.html काय करू राव, माझं नशिबच ख़राब आहे असे वाक्य नेहमी ऐकायला मिळते. ज्याना जीवनात कोणत्याही कामात यश मिळाले नाही किंवा मनासारखे काही मिळाले नाही की, हे वाक्य ठरलेले असते. नशिबात जे असेल ते नक्की मिळणारच असे ही बोलले जाते. परंतु नशीब म्हणजे काय असते आणि नशीब आपल्या हातात आहे की परमेश्वराच्या हातात याविषयी विचार केले असता, नशीब परमेश्वराच्या हाती आहे असे समाजल्या जाते. मात्र खरोखर नशीब कोणाच्या हातात आहे ? याविषयी कधी विचार केले आहे काय ? आपले नशीब आपल्या सवयीवर अवलंबून आहे. चांगल्या सवयी असतील तर आपले नशिब देखील चांगलेच असणार आहे. आपल्याला वाईट सवयी असतील आणि त्यात काही वाईट झाले की आपण नशिबाला दोष देऊन मोकळे होतो. तुम्हाला धोक्याची कल्पना असुनदेखील जीवाची काळजी करत नसाल तर तेथे नाशिबी काय करणार ? सवय चांगली लागण्यासाठी संगत म्हणजे सोबत चांगली असावी लागते. बहुतांश वेळा आपण सोबत निवड करणे चूकतो म्हणूनच आपल्या सवयी बिघडतात. शालेय जीवनापासून कोणत्या प्रकारच्या मित्रांची संगत लाभली यावर आपले नशीब अवलंबून असते. संगतीमधून संस्कार मिळतात जे की आजीवन आपल्या सोबत राहते. त्या संस्कारावरच आपले सर्व जीवन अवलंबून असते. मात्र आपण या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देत नाही. तेवढं मनावर देखील घेत नाहीत. त्यामुळे जीवनात काही तरी विपरीत घडत असते. घरातील वातावरण मुलांना पोषक असावे. घरात जर दूषित वातावरण असेल तर त्याचा परिणाम घरातील लहान मंडळीवर नक्की होतो. जेंव्हा परिणाम दिसायला लागतात तेंव्हा वेळ गेलेली असते. मग नशिबावर खापर फोडून मोकळे होतो. मात्र तसे नाही. आपले नशीब आपल्या हातात आहे फक्त त्यासाठी आपणास चांगली संगत मिळावी म्हणजे चांगले संस्कार होतील आणि चांगल्या सवयी देखील लागतात. यावरून आपले नशीब देखील चांगले आहे असे वाटते. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *धुके कसे तयार होतात ?* 📙 थंडीची चाहूल धुक्याने लागते. धुळे पांघरलेली पहाट उजाडली म्हणजे पावसाळा संपला. असे मानले जाते. दाट धुके पडले की पहाटेपर्यंत त्याचे दवाबिंदूत रूपांतर होते. धुक्यामुळे गव्हाची पेरणी केलेला शेतकरी आनंदीत होतो; कारण दवामुळे पीक चांगले येणार अशी त्याची खात्री पटलेली असते. धुक्यामध्ये आपण कधी प्रवास केला तर काही अंतर गेल्यावर असे लक्षात येते की आपले कपडे ओलसर झाले आहेत. याचे कारण म्हणजे हवेतील बाष्पाचे घनरूप म्हणजेच धुके. पाण्यातून निघणारी वाफ आपण नेहमीच बघत असतो. पण ही वाफ ढगांपर्यंत पोहोचेतोवर सहसा घनरूप होत नाही. थंडीच्या दिवसांत जेव्हा तापमान खाली येते तेव्हा मात्र हवेतील या वाफेचे लहान लहान पाण्याचे थेंब बनतात. थेंब म्हणायचे, पण असतात अगदी सूक्ष्मकणच. हे सूक्ष्मकण म्हणजेच धुके. उत्तर भारतात याला कोहरा म्हणतात. या धुक्याचा म्हणजेच सूक्ष्म कणांचा थर सभोवताली पसरला की आसपासचे कमी दिसू लागते. जे दिसते ते अस्पष्ट असते. दाट धुक्याच्या थरांमध्ये अनेकदा दृश्यमानता चार पाच फुटांपर्यंतही कमी होते. यामुळे रस्त्यांवर वाहने चालवणे, विमानतळावर विमान उतरवणे, उघड्यावरील नेहमीची कामे करणे अशक्य होऊन बसते. अपघातांचे प्रमाण यामुळे खूपच वाढू शकते. भारतात धुके हा प्रश्न काही दिवसांपुरताच असतो. फारतर उत्तर भारतातील हिमालयाचा उतार व काश्मीरचे खोरे येथे धुक्याची शाल पांघरल्याने जनजीवन ठप्प होऊ शकते; पण परदेशात धुके हा नित्याचा त्रासदायक भाग ठरतो. उपनगरांतून पन्नास किलोमीटरवर कामाच्या जागी पोहोचताना वर्षांचे सहा महिने जर धुके त्रास देणार असेल, तर पंचाईतच. पण यावर निसर्गत:च एक उतारा दिला आहे गेला आहे. वारा पडला असला, सूर्यप्रकाश नसला, तर धुके टिकून राहते, नाहीतर वाऱ्याबरोबर धुकेही जाते व सूर्यप्रकाशाच्या उष्णतेने हे घनीभूत बाष्प पुन्हा वायुरूप होऊ लागते. धुक्याला मानवी हातभार मात्र काही ठिकाणी लागतो. चहूबाजूंना डोंगर, वाऱ्याला अटकाव, शहरांतील असंख्य वाहनांचा धूर व कारखान्यांच्या धुराड्यांतील रासायनिक धुर यांचे एकत्रित मिश्रण खरोखरच त्रासदायक ठरू लागते. यालाच स्माॅग (स्मोक व फॉग मिळून बनलेले) असाही शब्द तेथे वापरला जातो. दिल्लीमध्ये थंडीच्या दिवसात या स्माॅगचा फटका गेली अनेक वर्षे दिल्लीकर खात आहेत. या स्माॅगचे वजन धुक्यापेक्षा थोडे जास्त असल्याने याचा ढग स्थिरावल्यासारखा शहरावर तरंगत राहतो. युरोपमध्ये व अमेरिकेत जेथे मोठ्या प्रमाणावर वाहने वापरली जातात अशा अनेक शहरांतून सायंकाळच्या वेळी स्मॉगचा थर शहरावर पसरणे हे नवीन राहिलेले नाही. या बाबतीत मेक्सिको सिटी व लॉस एंजेलिस या दोन शहरांचा उल्लेख नेहमीच केला गेला आहे. १९६० च्या दशकापर्यंत लंडनसुद्धा यात सामील होते. पण कोळशाचा वापर खाण कारखान्यांनी बंद केला व लंडनच्या वातावरणात फरक पडला आहे. धुक्यात अपघात घडू नयेत म्हणून खास प्रकारचे हॅलोजन लॅम्प्स वापरले जातात. या दिव्यांचा प्रकाश पिवळसर असल्याने त्यांचे वेगळेपण धुक्यातून जाणवते. विमानांच्या बाबतीत रडारच्या सहाय्याने ऑटो पायलट इन्स्ट्रक्शन्स घेऊनच आता सरसकट विमाने उतरवली जातात. तरीही अनेकदा दाट धुक्यामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत, अशी बातमी वाचायला मिळतेच ! *'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" चांगली सुरूवात म्हणजे अर्धे काम झाल्यासारखे आहे. "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *'गुरू' या ग्रहाचा शोध कोणी लावला ?* गॅलिलिओ , (1610) 2) *रेड्याच्या तोंडून वेद कोणत्या संताने वदवला ?* संत ज्ञानेश्वर , (1288 ला पैठण येथे) 3) *'भूगोल दिन' केव्हा साजरा केला जातो ?* 14 जानेवारी 4) *'शारीरिक शिक्षण दिन' केव्हा साजरा करतात ?* 24 जानेवारी 5) *स्काऊट गाईड चळवळीचे जनक कोण ?* लॉर्ड बेडन पॉवेल *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ●  डॉ. भास्कर पेरके ● गणेश सिरमेवार ●  मिलिंद जाधव ●  मुरली थोटे ●  अमोल मोरे ●  शिवशंकर संगमवार ● सतीश उशलवार ●  रत्नाकर सोनवणे ●  स्वप्नील वाघमारे ● निखिल थोरमोठे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *दोन पायांवर उभं राहून काटेरी बाभळीची छोटी छोटी पानं लुसूलुसू खाणारी बकरी पाहिलीत का तुम्ही? समोरचे दोन पाय बाभळीच्या झाडाला लावून मागच्या दोन पायांवर अवघड आसनात उभी असते. पोटातल्या भुकेमुळं त्या आसनावरची पकड मजबूत असते. त्यामुळं तोल जात नाही. उलट एक आकर्षक डौल तयार होतो. शिवाय काटे टाळून छोटी छोटी पानं खाण्याचं कसब खासच. एखाद्या योग्याला ध्यान लागावं तसं बकरीने या आसनात मन एकाग्र केलेलं असतं. डोंगराच्या अवघड कपारीत बरेचदा बकरी दिसते. त्या अवघड कपारीत बकरी जाते कशी? हा गहन प्रश्न आहे. त्या कपारीतून पाय घसरला तर खाली खोल दरी असते. म्हणजे त्या बकरीची शेवटची ब्या-ब्या ही कुणाला ऐकू येणार नाही. पण त्या जीवघेण्या कपारीत बकरी जाते, यामागे असते फक्त भूक !* *भक्ष्यावर झेप मारणारा पक्षी किंवा वाळक्या पानांवर पायाचा आवाज न करता दबक्या पावलांनी चालणारा चित्ता डिस्कव्हरी चॅनलवर हमखास दिसतो. आभाळातून नेमकेपणानं भक्ष्य हेरून त्यावर झाप मारून भक्ष्याला अलगद उचललं जातं, यातलं वेळेचं नियोजन कमाल असतं. एक क्षण जरी इकडचा तिकडं झाला तरी शिकार निसटू शकते. पाण्यावर झाप मारून पाण्यातला मासा अलगद उचलणारा पक्षी तर अद्भूत असतो. जेंव्हा पोपट राघू गाभूळ्या कैरीवर उलटा होऊन कैरी टोकरतो..उलटं टांगून घेणा-या राघूची झेंड्यासारखी हलणारी शेपूट भुकेची पताका होऊन फडकत असते.* *"जेंव्हा जेंव्हा कोणी भुकेविरूद्ध संघर्ष करायला पाय रोवून उभा राहतो..तेंव्हा तेंव्हा तो सुंदर दिसू लागतो."* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🦆🦆🦆🦆🦆🦆*श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो,* *Listen to your heart* *and take decision,,* *Dont be confused,,* *by other s advice,* *Your heart s voise,* *is my voice.* *हृदयाची भाषा आपापली स्वतःचीच असावी.नाहक उसना आव आणून त्रास करुन घेऊ नये.* *त्यासाठी आपल्याजवळ निस्वार्थी वृत्ती व धाडस असायला हवं.* *फुलोंकी की सुगंध केवल वायू की दिशा मै फैलती है।* *लेकिन एक व्यक्ती की अच्छाई हर दिशा मै फैलती है।* *माणसाने ही त्यांचा आदर्श घेतला पाहिजे.* *जसा दगडातील नको असलेला भाग काढला की देवाची मूर्ती तयार होते.* *आणि आपण सदैव नतमस्तक होतो.* *तसेच माणसातील स्वार्थीपणा व ढोंग* *बाजूला झाले आणि त्याग जिवंत ठेवला तर मोठं मोठी राष्ट्र भक्कमपणे उभी राहतात.* *1945 मध्ये जपान बेचिराख झाला होता आणि 1947 ला भारत स्वतंत्र झाला. आज जपान विकसित देशांच्या यादीत आहे.आपण अजून प्रगतिशील देशात आहोत.* *यासाठी हिरोजी इंदोलकर यांच्या सारखी माणस प्रत्येक व्यक्तीच्या हृदयात असायला हवी.* *माझ्या राजाने हिरोजीवर रायगडाच्या उभारणीची जबाबदारी दिली* *होती.राज्याभिषेक जवळ आला होता . राजे परत येईपर्यंत काम पूर्ण करणे गरजेचे होते. हिरोजींना दिलेले पैसे संपले होते.* *काय करावे हा प्रश्न निर्माण झाला. हिरोजींनी गावाकडचे घर आणि जमीन विकून काम पूर्ण केले.राजांना खबर मिळाली, खुश होऊन राजांनी हिरोजींना विचारले* *आम्ही खुश आहोत मागा काय पाहिजे ते। हिरोजींनी रायगडाच्या मंदिराच्या पायरीवर माझे नाव टाका ,एव्हढच मागितलं. अमर* *झाले. निस्वार्थी प्रेम,धाडस,मनाचा मोठेपणा,स्व ची ताकद या ठिकाणी व्यक्त होते.प्रयत्न करूया यातील काय आचरता येईल ते.* *अशोक कुमावत, नासिक.* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• एखाद्या वाईट विचारासाठी जेवढा वेळ द्यावा लागतो तेवढा वेळ चांगल्या विचारासाठी दिला तर त्यातून स्वत:चे आणि इतरांचेही कल्याण होते.चांगल्या विचारांमुळे आपण काहीतरी चांगले केल्याचे समाधान तर होतेच त्याचबरोबर इतरांनाही काही चांगले दिल्यामुळे मनाला आनंद मिळतो.आपण दिलेला वेळ सत्कार्यासाठी लावल्याचेही आत्मिक समाधान मिळते.पण वाईट विचार केला तर आपले स्वत:चेही समाधान होत नाही आणि इतरांचेही समाधान होत नाही याचे शल्य नेहमी सलत राहते. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३ 🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *लहानसे घर* सुप्रसिद्ध तत्ववेत्ता सॉक्रेटीस याने आपल्यासाठी एक अतिशय लहान घर बांधले.त्या घराचा तो लहान आकार पाहून त्याच्या एका ओळखीच्या माणसाने त्याला विचारले, "काय हो सॉक्रेटीस ? तुमचा मित्रपरिवार तर बराच मोठा आहे; मग तुम्ही एवढं छोटंसं का बांधलत ?' सॉक्रेटीस म्हणाला, 'बाबा रे ! माझे मित्र दिसायला बरेच असले, तरी प्रत्यक्षात ज्यांना सच्चे मित्र म्हणता येतील असे मित्र मला फारच थोडे आहेत. मी मोठं घर बांधलं असतं तर काय झालं असतं ? माझे सगळे सच्चे मित्र जरी एकाच वेळी घरात आले असते, तरी ते बरंचसं रिकामं राहिलं असतं. मग तूच मला विचारलं असतंस, 'हे काय ? तुमचे एवढेच मित्र ? सगळे मित्र येऊनही, तुमचं घर रिकामंच राहिलेलं दिसतयं !''पण आता मी घर एकदम लहान बांधल्यामुळं, त्या माझ्या थोडया मित्रांच्या येण्यानंही माझं घर पूर्णपणे भरुन जाईल, आणि तसं ते भरलेलं पाहून, तू मला म्हणशील, 'अरे वा !तुमचे मित्र बरेच आहेत की हो, तुमचं घर कसं अगदी भरुन गेलंय !' आणि बर घर जरी लहान असले तरी मन माञ मोठ असाव हे ही तितकेच खरयं. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 21/09/2019 वार - शनिवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आंतरराष्ट्रीय शांति दिन* 💥 ठळक घडामोडी :- ◆ १९९५ - भारतात अनेक व्यक्तिंनी दावा केला की गणपतीच्या मूर्तीसमोर दूध ठेवले असता त्याने ते दूध प्यायले. ◆ २००३ - गॅलेलियो या अंतराळयानाने मुद्दामहून गुरूच्या वातावरणात प्रवेश केला. अत्यंत दाबामुळे यान नाश पावले. 💥 जन्म :- ●१९३२ - पंडित जितेंद्र अभिषेकी, भारतीय-मराठी गायक, मराठी संगीतकार. ●१९८० - करीना कपूर, भारतीय अभिनेत्री. 💥 मृत्यू :- ◆ १९९९ - पुरुषोत्तम दारव्हेकर, मराठी नाटककार, मराठी नाट्यदिग्दर्शक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मंदीवर उतारा म्हणून केंद्रीय अर्थमंत्र्यांकडून कॉर्पोरेट टॅक्समध्ये जवळपास 10 टक्क्यांची कपात, शेअर बाजारात विक्रमी उसळी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *10 दिवसांत खड्डे बुजवले नाही तर कारवाई अटळ, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदेंचा इशारा, खड्डे बुजवायला सुरुवात* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *किरकोळ बाजारात कांद्यानं साठी गाठली, नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये कांद्याची आवक मंदावली, शेतकरी समाधानी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *साडेचार वर्षात सवर्ण आणि अनुसूचित जातींमधला तणाव वाढला, महाराष्ट्र पोलिसांचा निवडणूक आयोगाकडे अहवाल सादर, 14 जिल्हे संवेदनशील म्हणून घोषित* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *रोहित शर्मा आणि महेंद्रसिंह धोनीची साथ मिळाल्यामुळेच विराट कोहली सर्वोत्तम कर्णधार ठरला, माजी सलामीवीर गौतम गंभीरने विराटचे कान टोचले* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *नूर सुलतान (कझाकस्तान) : भारताचा अव्वल पैलवान बजरंग पुनियाने जागतिक कुस्ती विजेतेपद स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *लघुकथा - चोरी* https://nasayeotikar.blogspot.com/2019/09/blog-post_20.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *टिश्यू कल्चर म्हणजे काय ?* 📙 टिश्यू कल्चर हा शब्द अलीकडे वरचेवर कानावर पडत असला व त्याचा वापर सरसहा सुरू झाला असला तरीही १९०२ साली म्हणजे शंभरापेक्षा जास्त वर्षांपूर्वी *जी. हाबरलँड* यांनी टिश्यू कल्चरची पद्धत शोधून ती यशस्वी करून दाखवली होती. त्यांनाच या शास्त्राचा प्रणेता मानले जाते. एका पेशीपासून संपूर्ण वनस्पतीची, झाडाची, रोपाची निर्मिती करणे म्हणजे 'टिशू कल्चर' असे म्हणता येईल. ही निर्मिती कृत्रिमरीत्या तयार केलेल्या वातावरणात वा प्रयोगशाळेत केली जाते. याला टोटी पोटन्सी असा शब्द वापरला जातो. प्राण्यांच्या एकाच पेशीपासून असे बनत नाही म्हणून त्यांना 'प्युरोपोटंट' असे समजले जाते. त्यासाठी क्लोनिंगची पद्धत वापरली जाते. टिशू कल्चरमध्ये पेशीसंवर्धन करण्यासाठी विविध पूरक माध्यमांचा वापर केला जातो. या माध्यमांतून वाढीला अावश्यक सर्व घटकांचा पुरवठा होतो. एकपशीयपासून छोट्या रोपापर्यंतचा प्रवास अत्यंत नाजूकपणे जपावा लागतो. त्यानंतर ही रोपे लागवडीयोग्य झाल्यावर प्रयोगशाळेतून बाहेर नेतात. मुराशिगे स्कूग यांनी १९६२ मध्ये वापरलेले माध्यम, गँबर्ग यांचे १९६८ चे माध्यम, शेंक व हिल्डर ब्रॅण्ड यांचे १९७२ चे माध्यम अशा काही माध्यमे या वृद्धीसाठी वापरली जातात. नियंत्रित तापमानात, जंतूविरहित अवस्थेत प्रयोगशाळेतच ही वाढ होत असते. या साऱ्या प्रक्रियेदरम्यान तयार होणारी सर्व रोपे पूर्णतः एकसारखी असतात. त्यामुळे एकाच प्रकारची, एकाच रंगाची फुले देणारी, एकाच दिवशी फुलणारी अशी रोपे तयार करणे शक्य झाले आहे. शोभिवंत रोपवाटीकांसाठीची रोपटी, केळीच्या बागांसाठीची छोटी रोपे अशांसाठी टिश्यू कल्चरचा वापर फार मोठ्या प्रमाणावर केला जातो. काही आठवड्यांत काही लाख रोपे तयार करणे, त्यांची निर्यात करणे हे केवळ या पद्धतीमुळेच शक्य होते. टिशू कल्चरमुळे दुर्मिळ वनस्पतींचे जतन व वृद्धी, फलोद्यान व उद्यानवृक्षांसाठीची एकसारखी निर्मिती, संशोधन यासाठी अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. महत्त्वाची व व्यवहारातील अत्यंत उपयुक्त गोष्ट म्हणजे खतांचा कमी वापर करून, किडीला सक्षमपणे तोंड देऊ शकणारी, अल्पकाळात पिके देणारी, भरघोस उत्पन्न देणारी वा दुष्काळी वातावरणातही तग धरणारी अशी वनस्पती निर्माण करणे शक्य झाले आहे. या साऱ्या प्रक्रियेतून दुय्यम उत्पादन म्हणूनही काही गोष्टी संशोधकांच्या हाती लागत गेल्या आहेत. काही प्रतिजैविके, रोगनाशके, अल्कलाॅइड्स, हार्मोन्स यांची निर्मिती शक्य होते. एकंदरीतच फार मोठे भांडवल, तज्ज्ञांची देखरेख व अद्ययावत प्रयोगशाळांची आवश्यकता असलेला हा टिश्यू कल्चरचा पसारा व आवाका आपल्या दैनंदिन जीवनाला वेढत चालला आहे. *'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *“ चांगले पुस्तक म्हणजे मानवी आत्म्याचे अतिशुद्धी सार असते. ”* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *चोवीस तास ऑक्सिजन पुरवठा करणारा वृक्ष कोणता ?* पिंपळ 2) *गावातील कोतवालांची संख्या कशावरून ठरते ?* लोकसंख्या 3) *महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला 'उद्योग जिल्हा' म्हणून घोषित करण्यात आले ?* रायगड 4) *'राज्यात प्रत्येक गावात एकतरी शाळा असली पाहिजे' ही आज्ञा कोणी काढली ?* छत्रपती शाहू महाराज 5) *भारतीय साहित्य क्षेत्रातील सर्वात मोठा पुरस्कार कोणता ?* ज्ञानपीठ पुरस्कार *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● जिग्नेश क्रांती बुद्धेवार ●  कु. आद्या साईनाथ लखमावाड ●  सौ. वर्षाराणी मारोती होनशेट्टे ● सचिन तोटावाड ●  विष्णू गंभीरे ●  निशांत जिंदमवार ●  प्रकाश जाधव ●  स्मिता मिरजकर वडजे ●  आकाश कोलपकर ● गोविंद पाटील *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *श्रीपूर येथील राजा यांच्‍या निधनानंतर त्‍यांचा मुलगा राजवीरसिंह याला राज्‍यपदी बसविण्‍यात आले. राजवीर वडिलांसारखाच साहसी होता पण अनुभव पाठीशी कमी असल्‍यामुळे अनेकदा संकटात तो घाबरत असे. अशावेळी त्‍याची माता त्‍याला हिंमत देत असे व योग्‍य मार्गदर्शन करून संकटातून बाहेर काढत असे. शेजारच्‍या राज्‍यातील गंगानगरमधील राजा भीमसेन याची श्रीपूरवर नजर होती. एके दिवशी भीमसेनने श्रीपूरवर आक्रमण केले. दोन्‍ही सैन्‍ये एकमेकांना भिडली, तुंबळ युद्ध झाले. भीमसेनकडे सैनिक खूप प्रमाणात होते. दोनच दिवसात भीमसेन यांनी चार मैल भागावर आपला ताबा मिळविला. राजवीरच्‍या तोंडून कमी सैनिकांमुळे आपल्‍याला हार पत्‍करावी लागली हे ऐकले तेव्‍हा राजमातेने मनातल्‍या मनात काही ठरवले.* *राजवीर झोपण्‍याआधी राजमातेचे दर्शन घेण्‍यासाठी आला तेव्‍हा राजमाता लहान लहान सहा लाकडाच्‍या काड्या एकत्र बांधून लोखंडाच्‍या मोठ्या तुकड्याला तोडण्‍याचा प्रयत्‍न करीत असलेली पाहिली. राजवीरने मातेला विचारले,’’आई, सहा लाकडाच्‍या काड्या एकत्र करूनही लोखंडाला तोडू शकत नाही’’ राजमाता म्‍हणाली,’’खरं बोललास, संख्‍येने मजबुतीला पराजित केले जाऊ शकत नाही त्‍याप्रमाणे आपले वीर सैनिक आणि तू या लोखंडासारखे मजबूत व्‍हा. शत्रूची कितीही संख्‍या तुम्‍हाला तोडू शकणार नाही अशी ताकद तुमच्‍यात आहे ती जागृत करा. तुमच्‍या मजबुतीसमोर शत्रू गुडघे टेकेल.’’ राजवीरने याप्रमाणे केले व त्‍याने भीमसेनाला हरवून युद्धात विजय संपादन केला. दृढ मनोबलाने हारलेले युद्धही जिंकता येते. काही वेळेला दृढनिश्‍चय, ठाम मनोबल हेच यशाचे इंगित असते.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो,* *काय कधी संपल्या वेदना,* *पुन्हा नवा अवतार कशाला।* *जन्म दिला जर एकटीने,* *मग नेणारे हे चार कशाला।* *असा विचार करणारा एक तर ठार* *वेडा असू शकतो ,नाहीतर एक* *अलौकिक व्यक्तिमत्त्व तरी असू* *शकतो.* *पण मित्रांनो सहजीवनाची गोडी,* *आणि समूहातील आनंद* *काही औरच असतो.* *समूहाच्या वर्तनातून एक गोष्ट जाणवली,ती म्हणजे ,मी एखादा विचार मांडला किंवा कितीही पटवून* *सांगितला तरी त्याचा प्रभाव* *स्वीकारनाराची तयारी* *समोरच्या माणसाची काय* *आहे.त्यावर अवलंबून आहे.* *कारण," एखाद्या माणसावर इतरांच्या* *विचारांचा परिणाम* *तोपर्यंत होत नाही,जोपर्यंत तो स्वतः* *परिणाम होऊ देत नाही"* *आणि हाच खरा निसर्गाचा सिद्धांत* *आहे. so खंबीर* *राहा,आपल्या विचारांची पकड ढिली* *होऊ देऊ नका.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• शोध घ्यायचा असतो तो चांगल्या विचारांचा,बोध घ्यायचा असतो तो गोष्टींचा,सहवास मिळवायचा असतो तो सर्जनशील व्यक्तींचा ज्यामुळे आपल्या जीवनात महत्वाचे बदल होण्यास अनुकूल ठरेल.जेव्हा केव्हा आपण विचार करायचा तर यावेळी वरील तीन गोष्टींबाबत नक्कीच करावा अन्यथा आपल्या जीवनाचे नक्कीच नुकसान होऊ शकेल की,जे आपल्या जीवनासाठी बाधक ठरेल.आपली आपल्या माणसांत आणि इतर लोकांत कवडीचीही किंमत राहणार नाही. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०. 🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *गैरसमज आणि अनुमान* *एक छोटा मुलगा आपल्या दोन हातात दोन पेरू घेऊन उभा असतो ,त्याची ताई हसतहसत म्हणाली,"दादा एक पेरु मला दे". तेवढ्यात त्याने तो पेरू दाताने कुरतडला.त्याची ताई काहीच बोलली नाही. मुलाने दुसरा पेरूही दाताने कुरतडला. आपल्या भावाची ही कृती बघून त्याची ताई नुसती बघतच राहिली व तिच्या चेहऱ्यावरील हसू गायब झाले*. *तेव्हा तिच्या लहानग्या भावानेे चिमुकले हात पुढे करुन कुरतडलेल्या दोन्ही पेरूंपैकी एक पुढे केला व म्हणाला "ताई , हा घे.हा जास्त गोड आहे." ताईच्या डोळ्यात पाणी आले...* *प्रत्येक वेळी आपले निष्कर्ष बरोबर असतीलच, अस नाही*... *एखाद्याची कृती पूर्ण होईपर्यंत घाईघाईत निष्कर्ष काढून गैरसमज करून घेण्यापेक्षा ते गैरसमज दूर करण्यात आणि समोरच्याला समजून घेण्यातच मनुष्याचे हित असते.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

*भाषिक उपक्रम* (दिनांक २०-०९-२०१९) उपक्रमाचे नावः रंगाची ओळख व त्या रंगाची वस्तूचीं ओळख *इयत्ताः पहिली /दुसरी* उपक्रमात समाविष्ट रंगाची नावे - १)पांढरा २) निळा ३) हिरवा ४) लाल ५) काळा ६) पिवळा *उद्दिष्टः* रंगाची ओळख होणे, विविध वस्तूंच्या नावाची रंगासहित माहिती होणे, शब्दसंपत्ती वाढणे, आनंद निर्मिती होणे. *कृतीः* वर्ग पहिलीतील विद्यार्थ्यांना वरील विविध रंगाच्या कार्डस दाखवणे ते त्या रंगाची नावं सांगतील अश्याच रंगाची त्यांनी काय पाहिले त्या वस्तूंची नावे तोंडी सांगतील वर्ग दुसरीतील विद्यार्थ्यांनी तोंडी सांगून ते वहीत लेखनही करतील. *फलितः* विद्यार्थ्यांना आनंददायी वाटते, वर्गात चर्चा होते, विद्यार्थ्यांच्या, विचारशक्तीला चालना मिळते. 〰〰〰〰〰〰〰 ✍ प्रमिला सेनकुडे जि.प.प्रा.शाळा गोजेगाव ता.हदगाव जिल्हा नांदेड. 〰〰〰〰〰〰〰

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 20/09/2019 वार - शुक्रवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- ◆१६३३ - पृथ्वी सूर्याभोवती फिरत असल्याचे प्रतिपादन केल्या बद्दल गॅलेलियोवर खटला चालवण्यात आला. 💥 जन्म :- ● १८५४ - नारायण गुरु, केरळमधील समाजसुधारक . ●१८९७ - नारायण भिकाजी परुळेकर ऊर्फ नानासाहेब परुळेकर, मराठी पत्रकार. ● १९२१ - पनानमल पंजाबी, भारतीय क्रिकेट खेळाडू. ●१९२२ - द. न. गोखले, चरित्र वाङ्मयाचे संशोधक व मराठी शुद्धलेखनाचे ज्येष्ठ अभ्यासक. ●१९२५ - राम सातवा तथा आनंद माहिडोल, थायलंडचा राजा. ● १९४४ - रमेश सक्सेना, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- ◆ १९९६ - दया पवार, मराठी साहित्यिक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *हवामान विभागाकडून आज मुंबईसह परिसरात पावसाचा रेड अलर्ट जारी; समु्द्रात 3.85 मीटर उंच लाटा येण्याची शक्यता, मुसळधार पावसामुळे मुंबईसह आसपासच्या शहरांतील शाळा, महाविद्यालयांना सुटी जाहीर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचं स्वदेशी 'तेजस' विमानातून उड्डाण, तेजसमधून भरारी घेणारे पहिले संरक्षणमंत्री* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *मुंबई महापालिका कर्मचार्‍यांना खुशखबर, दिवाळीआधीच बोनस मंजूर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *परळी-वैद्यनाथ देवस्थानचा रेल्वेच्या राष्ट्रीय तीर्थस्थळांच्या यादीत समावेश, रेल्वे मंत्रालयाचं मुंडे भगिनींना पत्र* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *राजू शेट्टी विधानसभा निवडणूक लढवणार, शिरोळ मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा घटक पक्षांचा आग्रह* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *एअर मार्शल आरकेएस भदौरिया असतील भारताचे नवीन एअर चीफ मार्शल, बीएस धनोओ 30 सप्टेंबरला होत आहेत निवृत्त* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *मोहाली : क्रिकेटपटू विराट कोहलीच्या खणखणीत अर्धशतकाच्या जोरावर टीम इंडियाने मोहालीच्या दुसऱ्या ट्वेन्टी ट्वेन्टीत दक्षिण आफ्रिकेचा सात विकेट्सनी धुव्वा उडवला.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बुलेटीनची audio clip ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे https://sharechat.com/post/d0W3GwE ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *उद्याची काळजी आज कशाला* https://nasayeotikar.blogspot.com/2018/08/blog-post_8.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *जायरोस्कोप म्हणजे काय ?* 📙 होकायंत्र ज्यावेळी स्थिर राहू शकत नाही, हेलकावे, वळणे, हिंदकळणे यांमुळे त्याचा लोहचुंबक दिशा नीट दाखवायला जेव्हा असमर्थ ठरू लागतो, त्या वेळी जाइरोस्कोप वापरावा लागतो. जमिनीला समांतर स्वरूपात होकायंत्र स्थिर असेल, तेव्हा त्यावरून नेमकी दिशा ज्ञात करून घेता येते. पण पाण्यावर जेव्हा एखादे जहाज वादळात सापडून सतत हेलकावू लागते, तेव्हा आपण पकडलेली दिशा कोणती, असा प्रश्न उद्भवतो. अशीच काहीशी स्थिती विमानात येते. जायरोस्कोप म्हणजे एक जड, स्वतःभोवती फिरणारे चक्रच असते. एका विशिष्ट अक्षाभोवती हे चक्र अत्यंत वेगाने फिरू शकते. या अक्षाची दिशा त्याभोवती असलेल्या मोजपट्टीवर पाहिजे त्या ठिकाणी स्थिर करून मग हे चक्र फिरवायला सुरुवात करतात. थोडक्यात म्हणजे होकायंत्रावरून प्रवासाचे अक्षांश रेखांश पक्के ठरले की सुकाणूची दिशा पकडण्यासाठी जायरोस्कोप स्थिर करून त्याचे चक्र फिरवायला सुरुवात केली जाते. एकदा का चक्र वेगाने फिरू लागले की, याची दिशा हलवणे व त्याचा फिरणारा चक्राचा पृष्ठभाग अक्ष बदलून फिरणे ही जवळपास न होणारी गोष्ट बनते. चक्राने घेतलेला स्वतः भोवतीचा वेग केंद्रीभूत होऊन अशी काही अक्षाभोवती पकड घेतो की ती पकड हलणे व्यवहारत: अशक्य असते. यालाच जायरोस्कोपिक इनर्शिया' किंवा 'जडत्व' असे म्हणतात. यासाठी एकाच गोष्टीची आवश्यकता असते, ती म्हणजे चक्राचा फिरण्याचा वेग अबाधित राखणे. हा वेग जर काही कारणाने कमी होऊ लागला, तर मात्र ज्या आधारावर जायरोस्कोप उभा केलेला, आधारलेला असतो, त्यालाच तो संथपणे गोलाकार फेरी घालू लागतो. जायरोस्कोपचा वापर होकायंत्राच्या जोडीला सर्व प्रकारच्या लांब पल्ल्याच्या जल व हवेतील प्रवासासाठी केला जातो. होकायंत्र वाचणे व त्याचा वापर करणे हे तल्लख खलाशाचे व अधिकाऱ्याचे काम; पण या ऐवजी जाइरोस्कोप दाखवेल ती दिशा पकडणे ही मात्र कोणाही माणसाला जमणारी गोष्ट असू शकते. हाही महत्त्वाचा उपयोग नाही काय ? अंतराळ प्रवासात होकायंत्र बिनकामी ठरते; पण जाइरोस्कोप वापरता येतो. *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *“ विश्वास ठेवा चुकीतुनही चांगले निष्पन्न होते. ”* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *रयत शिक्षण संस्थेचे बोधचिन्ह कोणते ?* वटवृक्ष 2) *भावी पिढीचा शिल्पकार कोणाला म्हटले जाते ?* शिक्षक 3) *'खेड्याकडे चला' अशी हाक कोणी दिली ?* महात्मा गांधी 4) *ऑलिम्पिक ध्वज सर्वात प्रथम कोणत्या वर्षी फडकविण्यात आले ?* 1920 ( बेल्जियम ) 5) *1 एकर म्हणजे किती आर ?* 40 आर *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● जिग्नेश क्रांती बुद्धेवार ( सिम्बॅा ) ●  शीतल प्रभू ●  पांडुरंग कोकरे ●  धम्मकीर्ती कांबळे ●  संगीता देशमुख, वसमत ●  उमेश वडजे पाटील ●  गणेश भोसले ●  सुरेश जमपंनगिरे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *एखादा रिक्षावाला प्रवाशाची चुकून राहिलेली सोन्या-नाण्यांची थैली घर शोधत त्याच्या घरी पोहचवून देतो, आणि मोबदल्यात बक्षिसी नाकारतो. ही प्रामाणिकता थक्क करते! जगण्यासाठी ज्यांचा संघर्ष असतो...आपल्या पायावर जे धड उभेही नसतात, अशा लोकांचे देणारे हात मागे येत नाहीत. कारण माणुसकीवरील त्यांची निष्ठा कुठल्या अपेक्षांची मोहताज नसते. वाट्याला अंधार असला तरी हे लोक उजेड वाटत राहतात जगाला. लौकिक अर्थाचं यश त्यांच्याकडे नसतं, पण त्यांचं निर्मळ जगणं अंतर्मुख करतं माणसाला. फाटक्या आयुष्याला ठिगळ लावत राहयची आणि मूल्य जपत राहायची, हा त्यांचा जीवनधर्म असतो. चांगुलपणाची व सत्याची प्रेरणा देणा-या अशा घटना अंत:करणाचे डोळे करून बघायच्या असतात.* *'सच काम किया जग मे जिसने, उसने प्रभुनाम लिया न लिया' असं राष्ट्रसंत तुकडोजींनी सांगितलं. पण आपण उलट जगतो. 'प्रभुनाम लिया जग मे जिसने, उसने सच काम किया न किया' ही आपली धार्मिकता असते. आपले भक्तीचे, प्रतिष्ठेचे शिक्षक विचित्र असतात. आपल्या पायांवर उभं रहाताना ज्यांचे पाय थरथरतात आणि तरीही समाजाला जे इमान देतात, त्यांच्या दातृत्वाच्या हातांना आपणही कृतज्ञतेची फुलं दिली तर? असं लहान होऊन... हाताला हात देऊन निरपेक्ष जगता आलं तर आपसुकच जगणं सुगंधित होते. किती अनोखा आहे माणूस !* *॥ रामकृष्णहरी ॥* 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो,* *माणूस पेरायला शिकलं पाहिजे.* *ऊबंटू चित्रपटात खूप छान प्रार्थना* *आहे.* *हीच आमुची प्रार्थना अन हेच आमचे* *मागणे.* *माणसाने माणसाशी माणसासम* *वागणे।* *बहिणाबाई म्हणतात , अरे माणसा* *माणसा कधी होशील* *माणूस।* *माणसाचा असा कसा झाला रे* *कानुस।* *माणसा इथे मी तुझे गीत गावे।* *असे गीत गावे तुझे हिट व्हावे।* *माणूस घडविणे आणि जपणे फार* *महत्वाचे आहे.* *खरचं काही माणसं आपल्या* *आयुष्यात नशिबाने येतात . आणि* *यासारखी श्रीमंतीही नाही.* *मोगऱ्याच फूल ओंजळीत* *घेतलं की त्याचा गंध* *मनाला, शरीराला प्रसन्न करून* *जातो.. सहवासातील माणसाचं* *देखील असंच असतं... काही माणसं काही क्षणातच मनाला खूप* *आवडतात...आपली होऊन* *जातात ...तर काही कितीही* *सहवासात राहिली तरी* *आतून ओढ नसतेच...* *चेहरा बघण्यापेक्षा नेहमीच समोरच्याच्या मनात उतरून* *बघावं ...शोधूनही तिथं माणूसपण सापडत नसेल तर त्याच सुंदर* *दिसनही मग ओंगळवाणे वाटतं.... शरीराची* *सुंदरता वया बरोबर संपते तर मनाची सुंदरता शेवटपर्यंत टिकून* *राहते...शरीराला वय असतं ....मनाला ते कधीच नसतं...शेवटी काय आपण* *व्यक्तीच्या स्वभावाच्या प्रेमात असतो... शरीर तर निमित्त मात्र* *असतं... माणसाच्या स्वभावात गोडवा, शालिनता,प्रामाणिकपणा* *आणि विनयशिलता असेल तर त्याची काही क्षण जरी सोबत मिळाली तरी* *ती हवीहवीशी वाटते... म्हणूनच बाहेर लक्ष दिव्याची* *सुंदर आरास असूनही देवघरातील समईच्या तेजापुढं आपण* *नतमस्तक होतो...आयुष्यात अशी माणसं कधी भेटली तर* *त्यांच्यावर जीवापाड प्रेम करावं...!* *आपल्या आवडत्या माणसाचं आपल्या सोबत असणं ही* *आयुष्यातील सगळ्यात मोठी कमाई... ती प्रत्येकाच्या वाट्याला* *येतेच असं नाही...माणुस टिकवण आपल्या हातात असतं काही क्षणिक* *सुखासाठी नातं विसरतात .काही विश्वास गमावून* *बसतात . काही केसाने गळा कापायला मागे पुढे पहात* *नाही .शेवटी पश्चाताप च हाती येणार हे विधिलिखित आहे माझं काय किंवा* *कोणाचेही फक्त जो माणुस तुम्हाला समजला जो तुमच्या* *वर खुप निष्ठा ठेवून प्रेम करतो त्याचा तिरस्कार करु* *नका .कारण तो प्रत्येक वळणावर तुम्हाला भेटणार आहे. मग अशा* *माणसाप्रती भळभळणाऱ्या जखमाचे घाव देऊ नका. पण आजकाल अशी* *माणसं भेटतात तरी कुठे ? नशिबानं कधी भेटलीच* *तर हळुवार जतन करून ठेवावीत.... कदाचित पुन्हा भेटतील न* *भेटतील ?* *मला माणूस हवाय,मला माणूस* *हवाय।* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्या व्यक्ती अश्रूंचा सहारा घेऊन जगतात त्या जीवनात कुठेतरी पराभव पत्करलेल्या असतात किंवा त्यांच्या मनावर कुठेतरी आघात झालेला असतो किंवा कुणीतरी मनाविरुद्ध करण्यासाठी प्रवृत्त केलेले असते.हे जरी खरे असले तरी अशा व्यक्ती शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या कमकुवत झाल्याने त्यांना जीवनात जगण्याची काही अपेक्षा उरली नाही किंवा आता आपण जगून तरी काय करावे असा सतत विचार करत आणि डोळ्यांत अश्रू आणून कसेबसे जीवन जगतात.अशा दुबळ्या मनाने जीवन जगण्यापासून जीवनाला परावृत्त करायचे असेल तर जीवनात आणि आपल्यासमोर चांगले जीवन जगण्याची उमेद प्रथमत: नजरेसमोर ठेवायला हवी, नेहमी आपण काहीतरी असले तरी मी कोणत्याही कठीण प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी सक्षम आहे असा उदात्त विचार करून जगायला शिकले पाहिजे,कुणीजरी आपले मन दुखवण्याचा प्रयत्न केलातरी मी त्याकडे दुर्लक्ष करीन असाही सकारात्मक विचार केला आणि मन घट्ट करून जगायला शिकले तर अश्रूंचा आधार घेऊन जगायची काही गरजच भासणार नाही.जीवन तर सुखदु:खाने भरलेले आहे ते कुणाच्या वाट्याला कमी-जास्त असणारच.सुख जास्त झाले म्हणून जास्तही त्या सुखाचा अतिरेक होऊ द्यायचा नाही आणि दु:ख झाले म्हणून अति दु:खी व्हायचे नाही.आपण सारेजण सुखदु:खाच्या चक्रव्युहात अडकलेलोच आहोत आणि त्या चक्रव्युहाला भेदूनच चांगले जीवन जगायचे आहे हे लक्षात ठेवायला हवे. व्यंकटेश काटकर,नांदेड संवाद..९४२१८३९५९० 🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *खरी आई कि खोटी आई* एका आठ वर्षाच्‍या मुलाची आई देवाघरी जाते. मुलाच्‍या संगोपनात काही अडचण येऊ नये म्‍हणून वडील दुसरे लग्‍न करून त्‍या मुलासाठी नवीन आई घरी घेऊन येतात. एक महिन्‍यानंतर वडील मुलाला विचारतात,''बेटा, तुला ही नवीन आई कशी काय वाटते?तुझी देवाघरी गेलेली आई चांगली की ही नवीन आई चांगली आहे?'' यावर मुलगा उत्तर देतो,'' बाबा, ही नवीन आलेली आईच खरी आहे आणि देवाघरी गेलेली आई खोटी होती.'' हे अचानक आलेले उत्तर पाहून वडील संभ्रमात पडतात. त्‍यांना समजत नाही की मुलगा काय बोलतो आहे? म्‍हणून पुन्‍हा त्‍या मुलाला विचारतात,'' अरे तुला असे का वाटते ते मला सांग? जिने तुला नऊ महिने पोटात सांभाळले, प्रसुतीवेदना सहन करून जन्‍म दिला ती आई तुला खोटी कशी काय वाटते? आणि ही काल आलेली नवीन आई मात्र तुला खरी कशी काय वाटते?'' मुलगा म्‍हणतो,'' बाबा, मी खूप खोडकर आहे हे तुम्‍हाला माहितीच आहे. देवाघरी गेलेली माझी आई माझ्या खोड्यांना कंटाळून नेहमी मला '' जर तु खोड्या केल्‍या तर तुला मी खायला देणार नाही'' असे म्‍हणत असे. पण तिचे न ऐकता मी सतत खोड्या करत असे. पण ती मात्र मला जेवण देण्‍यासाठी उन्‍हातान्‍हात पूर्ण गावात मला शोधत असे व मला वेळप्रसंगी रागवून, मारून घरी आणत असे व मला स्‍वत:च्‍या मांडीवर बसवून खाऊपिऊ घालत असे आणि ही नवीन आईही पण '' जर तु खोड्या केल्‍या तर तुला मी खायला देणार नाही'' असेच म्‍हणते आणि खरं सांगू का बाबा तुम्‍हाला? गेल्‍या तीन दिवसात खरेच तिने मला खायला दिलेले नाही. म्‍हणूनच मी तिला खरी आई असे म्‍हणत आहे.'' तात्‍पर्य :- आपली आई ही देवाने दिलेली सर्वात मोठी देणगी आहे. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 19/09/2019 वार - गुरूवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- ◆२००७ - ट्‌वेंटी-२० क्रिकेटमध्ये एकाच षटकात सहा षटकार मारण्याची कामगिरी करणारा युवराज सिंग पहिलाच क्रिकेटपटू ठरला. त्याने क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक वेगवान अर्धशतक नोंदविताना पन्नास धावा करण्यासाठी फक्त १२ चेंडू घेतले. 💥 जन्म :- ◆१८६७ - पंडित श्रीपाद दामोदर सातवळेकर, मराठी चित्रकार, वेदाभ्यासक. 💥 मृत्यू :- "●१९३६ - पंडित विष्णू नारायण भातखंडे, भारतीय संगीतकार, संगीतज्ञ. ●२००१ - अनंतराव दामले, प्रभात फिल्म कंपनीचे संचालक. ●२००२ - प्रिया तेंडुलकर, अभिनेत्री . ● २००७ - दत्ता डावजेकर ऊर्फ डीडी, संगीतकार. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *मुंबई :  येणाऱ्या विधानसभेची निवडणूक ईव्हीएम मशीनवर होणार असून बॅलेट पेपर आता इतिहास जमा होताहेत, असं मत देशाचे मुख्य निवडणूक अधिकारी सुनील अरोरा यांनी मुंबईत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारताच्या नियंत्रणाखाली, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचं मोठं विधान, दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकलाही खडेबोल* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *राज्यात पाऊस पुन्हा सक्रीय होणार, हवामान खात्याचा अंदाज, येत्या 48 तासात मुंबईसह पुण्यात मुसळधार पावसाचा इशारा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *17 नोव्हेंबरला सरन्यायधीशांच्या निवृत्तीपूर्वी अयोध्या प्रकरणी निकाली काढण्याचे सुप्रीम कोर्टाचे संकेत, वकिलांना महत्त्वाच्या सूचना* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *नांदेड, औरंगाबादेत खासगी कोचिंग क्लासेसवर आयकर विभागाच्या धाडी; कर चुकवल्याचा संशय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *नवी दिल्ली: देशातील ११ लाख रेल्वे कर्मचाऱ्यांना या वर्षी ७८ दिवसांचे वेतन बोनस म्हणून देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारताची दक्षिण आफ्रिकेवर सात विकेटनी मात, कर्णधार विराट कोहलीचे शानदार अर्धशतक* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ या बुलेटीनची audioclip ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे. https://sharechat.com/post/n1P5Oqa ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *परावलंबी जीवन* https://nasayeotikar.blogspot.com/2017/10/blog-post_28.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *जाडेपणा म्हणजे नेमके काय ?* 📙 शरीरातील चरबीचे प्रमाण नको एवढे वाढत गेले, तर जाडी व वजन वाढते. चरबी प्रत्येकाच्या शरीरात असतेच, पण तिचे सर्व शरीरभर योग्य त्या पद्धतीत विवरण करण्याची व्यवस्था निसर्गानेच केलेली असते. जेव्हा आपण गरजेपेक्षा जास्त खाऊ लागतो, तेव्हा ही व्यवस्था बिघडायला सुरुवात होते. खाण्यात आलेल्या अन्नातून उष्मांक मिळतात. हे उष्मांक जेव्हा रोजच्या रोज खर्च होत नाहीत, तेव्हा शरीर ते साठवू लागते. ही साठवण्याची शरीराची पद्धत म्हणजे चरबीचा साठा वाढवणे. पोटावर, मांड्यांमधील जागेत, नितंबांवरील व हातांच्या दंडामागील भागात प्रथम चरबी साठू लागते. पुरुषांमध्ये जाड माणसाला सफरचंदाचा, तर स्त्रियांमध्ये पीअर या फळाचा आकार प्राप्त होऊ लागतो. सर्वसाधारण आकडेवारीनुसार उंची, वय व वजन यांचे जेवढे प्रमाण असायला हवे, त्यापेक्षा वजन जास्त असेल, तर माणूस जात आहे, त्याने चरबी साठवायला सुरुवात केली आहे, असे समजावे. याखेरीज कातडीमधील चरबीचा साठा रास्त व जास्त आहे, हे ठरवण्यासाठी विशिष्ट पद्धतीचे चिमटेही मिळतात. या बाबतीत सोपा घरगुती अंदाज म्हणजे दंडामागील कातडी छोट्या चिमटीत पकडता आली तर चरबीचा साठा रास्त व न आली तर जास्त, असे समजावे ! प्रत्येक प्राण्यामध्ये चरबीचा साठा करणे व वापरणे यांवर निसर्ग नियंत्रण ठेवतो. पण माणूस त्याच्या अति खाण्याने व ऐदी वागणुकीने हे नियंत्रण झुगारू पाहतो. साखर, लोणी व मोटार वाहन वापर यांमुळे मानवाने स्वतःचे संतुलन घालवले आहे, असे डॉक्टर मंडळी म्हणतात. वाहनांमुळे हालचाल संपली, साखरेने नको असलेले उष्मांक पोटात वाढू लागले, तर लोण्यामुळे चक्क चरबीच पोटात वाढू लागली. विसाव्या शतकात जाड माणसांचे प्रमाण व त्यातून उद्भवणाऱ्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. जाड माणसाला जास्त घाम येतो. घामाला वास येत राहतो. थकवा जाणवतो, धाप लागते, जास्त तहान लागते, सतत खावेसे वाटते, खाऊनही समाधान होत नाही. या साध्या साध्या लक्षणानंतरही लक्ष दिले नाही, तर हळूहळू जाड माणसाच्या शरीरात मधुमेह, रक्तदाब, रक्तवाहिन्यांचे विकार व त्यांतूनच उद्भवणारा हृदयविकार यांचा शिरकाव होतो. वजन जास्त वाढल्याने सांध्यांची झीज होत जाऊन सांधेदुखी, तर पायांतील रक्तवाहिन्यांना शिथिलपणा आल्याने पायांत रक्त साचून पाय दुखणे, सूज येणे सुरू होते. जाड माणसे अपघाताला जास्त निमंत्रण देतात. रस्ता ओलांडताना अचानक आलेले वाहन धडकणे, जिन्यावर तोल न सावरता येणे यांतून हे अपघात घडतात. पूर्ण उपवासाने जाडी कमी करणे हे सोपे आहे. पण कमी केलेली जाडी तशीच टिकवणे हे मात्र अत्यंत कठीण काम आहे. एका आकडेवारीनुसार जाडी कमी केलेल्यांतील जेमतेम ५ टक्के लोकच ती तशीच टिकवण्यात यशस्वी होतात. एकंदरीत खाण्यापिण्याच्या पद्धतीत व जीवनपद्धतीत अत्यंत नियमितपणा आणून सुयोग्य व्यायाम केला, तरच जाडी आटोक्यात राहू शकते. स्त्रियांमध्ये प्रसूतीनंतर, विद्यार्थ्यांत बैठे काम सुरू झाल्यावर, मध्यम वयात म्हणजे चाळीस ते पन्नास या दरम्यान वजन वाढू लागते. नियमित व्यायाम केल्यास आणि तेलकट, तळकट व गोड खाणे मोजकेच ठेवल्यास जाड होण्याची भीती बाळगायची गरज नाही. हजारभर जाड माणसात एखाद्याचीच जाडी अनुवांशिक असते. ती आटोक्यात आणणे मात्र डॉक्टरांनाच शक्य असते. पण उरलेले सर्वजण मात्र 'हे कोणालाच शक्य नाही', अशा समजुतीत वावरतात. जगातील सर्वात जाड इसम 'जॉन मुनाॅक' याचे वजन होते सहाशे पस्तीस किलोग्रॅम. १९८३ साली त्याचे जेमतेम बेचाळीसाव्या वर्षी निधन झाले. हा विक्रम आजही अबाधित आहे. *'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *“विचार करा निर्णय घ्या, आणि तुम्हाला जे योग्य वाटत तेच करा.”* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *भारताची राष्ट्रीय लिपी कोणती ?* देवनागरी 2) *भारताचा जगप्रसिद्ध बुद्धीबळपटू कोण ?* विश्वनाथन आनंद 3) *1 टन म्हणजे किती क्विंटल ?* 10 क्विंटल 4) *पहिली ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या वर्षी झाल्या ?* इ स 1896 5) *आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचा मुख्यालय कोठे आहे ?* लुसाने ( स्वित्झर्लंड ) *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● सुरज आर बोम्मावार ●  ठाकूर रविंदसिंह परिहार ●  अभय कुळकजाईकर ●  प्रवीण साधू ●  आनंद पाटील, नाशिक ●  मनीष बिरादार ●  सचिन कौठवाड ●  तृषा गंगाधर तिपनोड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] ~~~~~~~~~~~~~~~~~~~ या समुहात join होण्यासाठी खालील लिंकद्वारे join होता येईल. https://chat.whatsapp.com/DaK0QvLfzbe6E1coFTHAsC •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *एक भिकारी आयुष्यभर भीक मागत राहिला. भीक मागून मागून जमा करत राहिला. हे नाही ते नाही करत करत आधिक मागत राहिला. देवाला त्याची दया यायची. त्याने कधी कोणाला आयुष्यात काही दिले नाही तर त्याला आनंद व समाधान कसे मिळणार? देवही चिंतेत पडला. देण्याचा आनंद काय असतो हे प्रत्यक्ष समजावून सांगण्यासाठी देवच एक दिवस भिका-याच्या दारावर भीक मागायला उभा राहिला. त्याने आरोळी ठोकली. 'देssरे बाssबाss भिका-याला काहीतरी.' भिका-याच्याच घरी भीक मागायला भिकारी? त्याने कानाडोळा केला, नंतर त्याला समजावण्याचा व धमकावण्याचाही प्रयत्न केला. पण दारावरचा भिकारी हटला नाही. देssरे बाssबा च्या आरोळ्या काही थांबत नव्हत्या.* *भिका-याचीही भीक मागायला निघायची वेळ झालेली. परंतु दारावरचा भिकारी हटायला तयार नव्हता. त्यापासून सुटका व्हावी म्हणून शेवटी भीक मागून जमा केलेल्या धान्याच्या ढिगातील एक दाणा उचलून तो भिका-याच्या कटो-यात टाकतो. एक दाणा का होईना भीक मिळाली म्हणून दारातील भिकारी निघून जातो. एक दाणा कमी झाला म्हणून भिकारी हळहळत ढिगा-याकडे बघतो. ढिगा-यावर काहीतरी चमकत आहे हे पाहून तो जवळ जातो. ती चमकणारी वस्तू सोन्याचा दाणा असतो. भीक दिलेला ढिगावरचा एक दाणा कमी न होता सोन्याचा झाला. संपूर्ण धान्याचा ढिगच भिका-याच्या कटो-यात टाकला असता तर..? आता भिका-याने संपूर्ण आयुष्यच देऊन टाकले आहे. पण माझ्यातल्या भिका-याचे काय? त्याला कळले आहे पण अजूनही 'वळले' मात्र नाही.* *॥ रामकृष्णहरी ॥* 🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀 *श्री संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल- 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो* *कर्तृत्ववान माणसाचे लक्षण वर्णन* *करतांना मंगेश* *पाडगावकरांनी खूप छान लिहिलं* *आहे,* *ते म्हणतात,* *आयुष्य विधात्याच्या वहीतलं पान* *असत।* *रिकामं तर रिकामं ,लिहिलं तर छान* *असत।* *शेवटचं पान मृत्यू अन पहिलं पान* *जन्म असत।* *पाने आपणच भरायची, कारण ते* *आपलंच कर्म असत।* *हे करत असतांना काही माणसं* *कोल्ह्याला द्राक्ष आंबट सारखी* *वागतात, पण प्रत्यक्षात वास्तव मात्र वेगळं असत. आपल्याला शरीरूपी* *मिळालेल्या अनमोल देणगीचा वापर जर खुबीने केला तर* *कोळश्याच्या खाणीतूनही हिरा जन्माला आल्याशिवाय राहत नाही.* *दाखलाच द्यायचा झाला तर मी बालाजी मंजुळे यांचा देईन.*नागराज तर सगळ्यांनाच सैराट ने माहीत केला,पण त्यांच्याच घरातला भाऊबंधकीतला बालाजी .दगडफोडी जमात, आईवडील दगड फोडणारे, सतत भटकंती,* *भाऊबहीणी,खाणारी तोंड जास्त, कमवणारी कमी सगळं* *बिऱ्हाड पाठीवर, कधी कौतुक झालं तरी गर्व झाला* *नाही. अनेक वेळेस अपमानाची वेळ आली पण राग नावाची चीज* *नाही. राग आलाच तर दोन घाव दगडावर जास्त पडायचे पण कुणाला* *उलट बोलणे नाही. परिणाम* *काय झाला.* " *जैसा बोया वैसा पाया"* *सुसंस्कृत ,मेहनती संततीची पेरणी केली. बालाजीला डावा डोळा* *नाही,उजव्या डोळ्याने 15 % * *दिसते,अठराविश्व दारिद्र्य,* *अज्ञान, तरीही ध्येय आणि स्वप्न साकार केले.2008 ची बॅच, देशात* *राज्यशास्रात पहिला, महाराष्ट्रात 8 व्या रँकने पठ्ठा* *आय.ए. एस.झाला,अख्खा तामिळनाडू डोक्यावर घेऊन* *नाचतोय.* *रडणे सोडावे,लढणे शिकावे ,बस* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• सुखदु:खाच्या सागरातून जीवनरुपी नौका जो मानव चांगल्या प्रकारे जो चालवतो आणि तरुन जातो त्यालाच जीवन म्हणजे काय हे नक्कीच कळलेले असते.अशा सुंदर जीवनाला अधिक सुंदर कसे बनवता येईल त्यासाठी जो सुखातही आणि दु:खातही निरंतर प्रयत्न करतो आणि सुखदुःखाला समान मानतो तोच जीवनात यशस्वी होतो. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद.९४२१८३९५९०. 🚣🏼‍♀🚣🏻🚣🏼‍♀🚣🏻🚣🏼‍♀🚣🏻🚣🏼‍♀🚣🏻🚣🏼‍♀ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *अति तेथे माती* एकदा एक राजहंस एका बगळय़ाला म्हणाला, 'काय रे, तू आधाशी! पाण्यातला कोणताही प्राणी खायला तू मागे-पुढे पाहात नाहीस. बरे-वाईट, नासके-चांगले हा फरकसुद्धा तुला समजत नाही. माझे पाहा, मी फक्त पूर्ण उमललेल्या कमळातले तंतू तेवढे खाईन, दुसरा कसलाही पदार्थ माझ्या घशाखाली जाणार नाही.' आणि मला तसे आवडणार नाही. त्यावर बगळा म्हणाला, 'माझ्या दृष्टीने असा चोखंदळपणा बारकावा असणे बरे नव्हे. ज्यावेळी जे मिळेल ते खावे अन् सुखी राहावे. खाण्याचा पदार्थ दिसला की, तो खावा हेच शहाणपणाचे.' असे म्हणून बगळा उडाला व जवळच्या तलावाकाठी गेला. तेथे कडेला त्याला मासा दिसला. तेव्हा विचार न करता त्याने तो एकदम गिळला, पण आत असलेला गळ घशाला लागून तो जिवास मुकला. राजहंस आपले आवडते खाणे खाण्यासाठी दुसर्‍या कमळे असलेल्या तळय़ात गेला, पण तेथे हंस धरण्यासाठी जाळे असल्यामुळे तेथे तो अडकला. *तात्पर्यः कोणतीही गोष्ट अति केल्यावर त्याचे परिणाम भोगावे लागते म्हणून कोणत्याही गोष्टीचा अतिरेक नको.अति तेथे माती होणारच.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 18/09/2019 वार - बुधवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- ◆१९०६ - चक्रीवादळ व त्यानंतर आलेल्या त्सुनामीने हाँगकाँगमध्ये १०,००० बळी घेतले. ◆१९९८ - आयकानची स्थापना. 💥 जन्म :- ◆१७०९ - सॅम्युएल जॉन्सन, इंग्लिश कवी, पत्रकार, समीक्षक. 💥 मृत्यू :- ◆१९९३ - असित सेन, विनोदी अभिनेते व दिग्दर्शक. ◆१९९५ - काका हाथरसी उर्फ प्रभुलाल गर्ग, हिंदी कवी. ◆१९९९ - अरुण वासुदेव कर्नाटकी, चित्रपट दिग्दर्शक. ◆२००२ - शिवाजी सावंत, मराठी साहित्यिक. ◆२००४ - डॉ. भालचंद्र दिनकर फडके, मराठी समीक्षक, साहित्यिक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *पेट्रोल-डिझेलचे दर 5 ते 6 रुपयाने वाढण्याची शक्यता, सौदी अरेबियातील अराम्को कंपनीच्या तेल विहिरींवरच्या ड्रोन हल्ल्यानंतर इंधन टंचाईचं संकट* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *नाशिक जिल्ह्यातील गिरणा धरण 100 टक्के भरले, धरणाचे 2 दरवाजे उघडण्यात आले असून गिरणा नदीत पाण्याचा विसर्ग सुरु* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *30 सप्टेंबरपर्यंत आरेतील वृक्षतोड करणार नाही, राज्य सरकारची हायकोर्टात माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *केंद्रीय निवडणूक आयुक्तांची आज पत्रकार परिषद, राज्यातील निवडणुकीची माहिती देणार, मात्र निवडणूक जाहीर होणार नाही* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *अहमदनगर : आरक्षणाच्या मागणीसाठी वंजारी समाज आक्रमक, संगमनेर प्रांत कार्यालयावर भव्य मोर्चा, हजारोंच्या संख्येने समाज बांधव एकवटले, अहमदनगर शहरातून काढला भव्य मोर्चा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *सोलापूर : शरद पवार यांचे सोलापुरात आगमन, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा दौऱ्याला सुरुवात, शरद पवारांचे चार पुतळा चौकात जल्लोषात स्वागत* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारतीय क्रिकेटवर पुन्हा मॅचफिक्सिंगचे सावट, महिला क्रिकेटपटूची तक्रार, याप्रकरणी बंगळुरु पोलीस ठाण्यात राकेश बाफना व जितेंद्र कोठारी यांच्याविरुद्ध तक्रार नोंदवली आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *बुडती हे जन न देखवे डोळा* https://nasayeotikar.blogspot.com/2018/05/35.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *‘ओझोन डे’* जीवसृष्टीच्या संरक्षणासाठी निसर्गाने दोन महत्त्वाच्या उपाययोजना करून ठेवल्या आहेत. त्या म्हणजे पृथ्वीभोवती चुंबकीय गोल आणि ओझोनचा थर. यातील चुंबकीय गोल अत्यंत ऊर्जस्व कणांपासून जीवसृष्टीचे रक्षण करतो, तर ओझोनचा थर जीवसृष्टीला धोकादायक असणाऱ्या अतिनील किरणांना भूपृष्ठापर्यंत येऊ देत नाही. हा ओझोनचा थर नसता तर कदाचित पृथ्वीवर जीवसृष्टीच झाली नसती. मात्र, या ओझोनच्या थरालाच वाढत्या प्रदूषणामुळे भगदाड पडले असून, ते दिवसेंदिवस आणखी मोठे होत आहे. त्यामुळे तज्ज्ञांच्या मते, जीवसृष्टीच्या संरक्षणासाठी आता रोजच ‘ओझोन डे’ साजरा करण्याची वेळ आली आहे. भूपृष्ठापासून दहा किलोमीटर अंतरापर्यंतच्या वातावरणाला तपांबर (ट्रोपोस्फिअर) असे नाव आहे. मेघ, वारे, पाऊस, विजांचा चमचमाट, चक्रीवादळे, वगैरे नैसर्गिक घटना याच स्तरात घडतात. तपांबराच्या पुढे ५० कि.मी.अंतरापर्यंतच्या वातावरणाच्या विभागाला स्थितांबर (स्ट्रॅटोस्फिअर) असे म्हणतात. वातावरणातील एकंदर ओझोनपैकी १० टक्के तपांबरात आहे, तर ९० टक्के स्थितांबरात आहे. त्यातही भूपृष्ठापासून १५-३० कि.मी. पट्ट्यात ओझोनचे प्रमाण जास्त आहे. या पट्ट्यात हवेच्या दशलक्ष रेणूंमागे २६८ रेणू ओझोनचे असतात. या ओझोनच्या स्तरामुळेच आपल्या सर्वांचे अतिनील किरणांपासून संरक्षण होते. पारंपरिक स्थितांबर (ओझोन स्तर)ला छिद्र पडण्यास कारणीभूत असणाऱ्या सीएफसी वायूचा वापर वाढला म्हणून हायड्रोफ्लोरोकार्बन (एचएफसी)चा वापर होऊ लागला. त्यातही वेगवेगळे प्रकार असल्याने जागतिक तापमानात वाढ वार्षिक सात टक्क्यांनी वाढली. जागतिक तापमानाचा धोका आणखी वाढला आहे. त्याचीच काळजी घेणे अनिवार्य बनले आहे. त्यामुळे ३६५ दिवसांमध्ये एकदाच ‘ओझोन डे’ साजरा करून हा प्रश्न सुटणार नाही. रोजच हा दिवस साजरा करावा.. संदर्भ. डॉ. पी. डी. राऊत. *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *Actions speaks louder than words.* *( कृती ही शब्दांपेक्षा/गोष्टी हाकण्यापेक्षा जास्त सांगून जाते. )* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *मौर्य साम्राज्याचा संस्थापक कोण होता ?* चंद्रगुप्त मौर्य 2) *प्रसिद्ध लाल किल्ला कोठे आहे ?* दिल्ली 3) *शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी काशीहून कोणाला बोलावण्यात आले होते ?* गागाभट्ट 4) *शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचा प्रमुख कोण होता ?* बहिर्जी नाईक 5) *ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केव्हा झाली ?* इ स 1600 *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● किरण इंदू केंद्रे, संपादक, किशोर मासिक ● ठाकूर रविसिंह परिहार ●  सुदर्शन वाघमारे ●  सचिन महाजन ●  रामकृष्ण काकाणी ●  योगेश सुधाकर मुक्कावार ●  देवेंद्र रेड्डी गडमोड ●  योगेश शंकरोड ●  सुनील पाटील बोमले *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सर सी.व्ही.रमण एकदा भौतिकशास्त्राच्या संशोधक पदासाठी मुलाखती घेत होते. मुलाखती संपवून निघताना एक विद्यार्थी त्यांना तिथंच घुटमळताना दिसला. नोकरीसाठी नाकारला गेलेला तो तरूण येरझारा मारताना पाहून सर रमण रागावले. त्याच्या हेतूबद्दल शंका येऊन रमण यांनी त्याला फटकारलं. तो तरूण नम्रतेने म्हणाला,'सर, गैरसमज करून घेऊ नका. नोकरी मिळावी म्हणून वशिला लावण्यासाठी मी थांबलो नाही. आपल्या कार्यालयाकडून येण्या-जाण्याचं भाडं चुकून आधिक मिळालं आहे. ते परत करण्यासाठी मी संबंधीत बाबूला शोधत आहे.* *त्याचे हे विचार ऐकून सर रमण प्रभावित झाले. त्यांना सुखद धक्का बसला आणि ते म्हणाले,'मित्रा, तुझं भौतिकचं ज्ञान कमी आहे. प्रयत्नानं ते वाढवता येईल. पण तुझ्या अंतरीचा प्रामाणिकपणा दुर्लभ आहे. पुस्तकी ज्ञानापेक्षा ही मूल्य कितीतरी मोठी आहेत. संशोधक म्हणून तुझी निवड झाली, असं समज.' हा निवडीनंतरचा आकस्मिक आनंद त्याच्या डोळ्यात मावला नाही. निर्णय ऐकताक्षणीच तरूणाच्या डोळ्यांना धारा लागल्या. कृतज्ञतेच्या धारा! संघर्षाच्या वादळातही त्यानं अंतरीचा सत्याचा दिवा विझू दिला नव्हता. परीक्षेच्या व ज्ञानाच्या पलिकडे काही जीवनमूल्यं असतात, हे समजून घेत कुण्या गरजवंताच्या गुणांची कदर करणारे 'रमण' असतात जगात, आणि निवड झाली नसतानाही कुणाचे पैसे परत करण्यासाठी अस्वस्थ होणारे इमानदार तरूणही!* *॥ रामकृष्णहरी ॥* 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *दोस्तांनो,* *🏻नसीब तो उनका भी होता है,जिनके* *हात नहीं होते।* *ऊस डोंगा परी रस नाही डोंगा,हे चोखामेळा सांगतो.* *कर्तव्य हीच आपली काशी वि. द.घाटे सांगतात.* *✍तुकाराम महाराज अभ्यासाचेच उदाहरण देतात.* *ज्ञानदेवांनी कर्मानेच चांगदेवाना हताश केले.🏻तुकडोजी महाराज कष्टालाच देव* *मानत.* *गाडगेबाबा तर आळश्याच्या डोक्यात काठी घालत.* *सांगायच हेच की कामावर निष्ठा ठेवा,यश मागोमाग चालेल.* *विधाता चित्रपट आठवत असेल तर नक्कीच तुम्हीपण तकदिर आणि* *तसबीर यात थोडावेळ का होईना गुरफटून जाल. तसे* *अमर,अकबर,अँथोनी,स्वामी समर्थ यांचेवर देऊळबंद असे चित्रपट येऊन* *गेले.आपली मती* *भरकटते,आपल्या* *🏻मनगटावरचा आपलाच विश्वास डळमळीत होतो.कारण आपल्या* *समोर अशी काही उदाहरणे दिली जातात की विचारशक्ती कुंठित होते.* *⚫हे *वाचून तुम्ही मला नक्की नास्तिक म्हणाल पण आजवर मी जे जे धर्मग्रंथ वाचले,ऐकले ,अनुभवले त्यात कुठेही* *माझे नाव घ्या,माझे पूजन करा,नारळ चढवा,नैवद्य द्या हा* *उल्लेख नाही.उल्लेख आहे तो* *फक्त आणि फक्त कर्माचा.🤝🏻काम* *करत जा, मी* *तुमच्यात आहे हेच भगवंत सांगत* *आलेले दिसेल.* *म्हणून ध्यानात घ्या----* *जर हातावरच्या रेषेवर भाग्य आणि* *पैसा लिहिलेला असता तर कष्ट कुणीच* *केले नसते,* *मित्रांनो आपले नशीब कुणीही दुसरा* *घडवू शकत* *नाही,प्रामाणिकपणे कष्ट आणि कष्ट* *करत रहा, तो दिवस लांब* *नसणार जेव्हा दुनिया तुम्हाला सलाम* *करेल.* *अशोक कुमावत* *(राष्ट्रपती पुरस्कार विजेते*) 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्याप्रमाणे सोन्याचा व्यापार करणारा व्यापारी किंवा सोन्याचे दागिने बनवणारा सोनार सोने पाहिल्याबरोबर किती चांगले आहे हे आपल्या नजरेने,हातात घेऊन आणि एका विशिष्ट दगडाच्या कसोटीवर घासून ओळखतो त्याचप्रमाणे चतुर,चाणाक्ष आणि मनकवड्या व्यक्ती समोर असणा-या आणि समोर आलेल्या व्यक्तींना आपल्या नजरेंनी तेव्हाच ओळखतात.कोण चांगल्या विचारांची,कोणत्या कारणासाठी आपल्याकडे आली आहेत,ती कोणत्या हेतूने आली आहेत,कोणत्या स्वभावधर्माची आहेत,आपण त्यांना कशाप्रकारे उत्तर द्यायचे किंवा आपण त्याला मदत करायची का नाही याचे ज्ञान नक्कीच असते.यावरुनच माणसे आपल्या नजरेने पहायला,वाचायला आणि शिकायला पाहिजे.यासाठी आपल्याला माणसांच्या मनाचे थोडे शास्त्र आपणही शिकले तर भविष्यात होणारे संभाव्य धोके टळू शकतील आणि आपले जीवन सुखावह होऊ शकेल. © व्यंकटेश काटकर,नांदेड संवाद.९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🌱🌹🌱🌹🌱🌹🌱🌹🌱 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *साप आणि खेकडा* एक साप आणि एक खेकडा एकमेकांचे मित्र होते. खेकडा सरळ वागणारा होता. त्याने सापाला चांगल्या रीतीने वागण्याचा खूप वेळा उपदेश केला, परंतु सापाने तिकडे लक्ष दिले नाही. एके दिवशीसाप अंग ताणून विश्रांती घेत असताना खेकड्याने त्याला मारून टाकले व त्याच्याकडे बघून तो म्हणाला, 'तू आता जसा सरळ आहेस तसाच नेहमी राहिला असतास तर ही स्थिती कशाला झाली असती ? *तात्पर्य - राजमार्ग सोडून वाकड्या मार्गाने जाणारा मनुष्य नेहमीच संकटात सापडतो.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 17/09/2019 वार - मंगळवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *राष्ट्रीय श्रम दिवस* *विश्वकर्मा जयंती* *मराठवाडा मुक्ती संग्राम दिन* 💥 ठळक घडामोडी :- ◆२००४ - हरिकेन आयव्हनने अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यातील पेन्साकोला शहराजवळ किनारा गाठला व संपत्तीची अमाप हानी केली. 💥 जन्म :- ●१८७९ - पेरियार ई.व्ही. रामसामी, भारतीय समाजसुधारक. ●१८८५ - प्रबोधनकार ठाकरे उर्फ केशव सीताराम ठाकरे - पत्रकार, समाजसुधारक, वक्ते. 💥 मृत्यू :- ◆१९९९ - हसरत जयपुरी, गीतकार. ◆ २००२ - वसंत बापट, कवी. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *विधानसभेसाठी आघाडीचा फॉर्म्युला ठरला, काँग्रेस-राष्ट्रवादी 125-125 जागांवर लढणार तर 38 जागा मित्रपक्षांना, युतीच्या जागावाटपाचं घोंगडं भिजतंच* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *शिवसेना-भाजपची स्वबळावर निवडणूक लढण्याची चाचपणी, युती न झाल्यास नारायण राणे भाजपमध्ये तर छगन भुजबळ शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चा* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *प्रत्येक गोष्ट कोर्टानेच बघायची का?, फूड सेफ्टी कायद्यावरुन हायकोर्टाचा राज्य सरकारला उद्विग्न सवाल, अधिकाऱ्यांचीही कानउघाडणी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीचा सुप्रीम कोर्टाने अहवाल मागवला, गरज पडल्यास सरन्यायाधीश स्वत: काश्मीरला जाणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *आयुष्मान खुरानाच्या 'ड्रीम गर्ल'चं बॉक्स ऑफिसवर धुमशान, राझी, उरीसह अनेक चित्रपटांच्या कमाईचे विक्रम मोडले, तीन दिवसात साडे चव्वेचाळीस कोटींची कमाई * ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आज केंद्रीय निवडणूक आयुक्त आणि इतर दोन वरिष्ठ अधिकारी येणार मुंबईत, त्यामुळे येत्या 2 दिवसांत विधानसभा निवडणुकांचं बिगूल वाजण्याची शक्यता आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *इंग्लंडची ऑस्ट्रेलियावर 135 धावांनी मात, 1972 नंतर पहिल्यांदाच अॅशेस मालिका अनिर्णित* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बुलेटीनची audioclip ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे. https://sharechat.com/post/q1OWE57 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मराठवाडा मुक्तीसंग्राम दिवस* https://nasayeotikar.blogspot.com/2016/09/17-september.html?m=1 लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *जलविद्युतनिर्मिती म्हणजे काय ?* 📙 पाणी उंचावरून नेहमीच समुद्रपातळीकडे झेपावत असते. मग हा वेग पातळीनुसार वाढतो वा मंदावतो. जेव्हा ही पातळी खूप उंच असेल तेव्हा या वाहणाऱ्या पाण्याच्या जोराचा वापर करून जलविद्युतनिर्मिती केली जाते. उंच डोंगरमाथ्यावर असलेले धरणाचे पाणी प्रचंड आकाराच्या पाइपमधून बांधलेल्या जलविद्युतगृहातील जनित्रावर सोडले जाते. या पाण्याच्या ताकदीने ही अवाढव्य जनित्रे फिरतात व विद्युतनिर्मिती होते. संपूर्ण भारतात अशा स्वरूपाचे प्रकल्प एकूण विजेच्या ६ टक्के वीज निर्माण करून आपली गरज भागवतात. कोयना प्रकल्प हा त्यातीलच एक आहे. कोयनानगर येथे धरण बांधून तेथील पाणी पाईपमधून वीस किमी दूरवरील पोफळी येथे वाहून नेले जाते. या दरम्यान असलेल्या जवळजवळ सरळ उताराचा परिणाम म्हणून या पाण्याचा वेग व ताकद गुरुत्वाकर्षणाने वाढते व त्यापासून खूपच मोठय़ा प्रमाणात वीज निर्माण होते. मुळशी येथे धरण बांधून तेथील पाणी खोपोली येथेपर्यंत असेच खोलवर वाहून आणले जाते व तेथील विद्युतनिर्मिती केंद्र चालवले जाते. पाण्याच्या साठ्याची पातळी व जनित्राची पातळी यात फरक जितका जास्त तितकी वीजनिर्मिती अधिक करता येऊ शकते. यात आणखीही एक बाब ध्यानात ठेवावी लागते. वीज ही बाराही महिने लागणारी गोष्ट आहे. तिचा वापरपण रोज दिवसा जास्त व रात्री कमी होत जातो. पाण्याचा साठा मात्र फक्त पावसाळ्यातच होणार असतो. पाण्याचा सर्वच साठा वापरण्यायुक्त नसतो तर धरणात साठत जाणारा गाळ लक्षात घेऊन पाणी घेण्याची जागा ठरवावी लागते. यामुळे जलविद्युतनिर्मितीचे गणित फार थोड्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उपयुक्त ठरू शकते. अन्य ठिकाणी तिचा वापर पूरक म्हणून वा साखळीयंत्रणेचा (Grid) भाग म्हणूनच करावा लागतो. पूरक वापर म्हणून, साखळीयंत्रणेचा भाग म्हणून जेव्हा जलविद्युत वापरली जाते, तेव्हा जगात काही ठिकाणी एक गमतीदार योजना वापरली जाते. पाण्याच्या साठय़ातून जनित्रावर कोसळणारे पाणी पुन्हा साठवले जाते. रात्रीच्या वेळी जेव्हा अन्यत्र विजेचा वापर अगदी कमी असतो, तेव्हा इतरत्र निर्माण झालेली, पण न वापरली जाणारी वीज वापरून हेच पाणी याच जनित्रांचा पंपासारखे उलटा वापर करून मूळ साठ्यात पाठवले जाते. वीज साठवून ठेवता येणे अवघड असल्याने रात्रीच्या वेळी नको असलेली, वाया जाणारी, स्वस्त उपलब्ध असणारी वीज वापरण्याची ही पद्धत आहे. यासाठी फार मोठे तांत्रिक बदल करण्याची गरज पडत नाही, तर फक्त योग्य वेळी व योग्य तितका वेळ यंत्रणेच्या वीजपुरवठा नियंत्रणाची दिशा बदलण्याची गरज असते. याखेरीज खूप उंचावरून पाण्याचा वा नदीचा प्रवाह लांबवर वाहत जाणार असेल, तर विविध पातळ्यांवर जलविद्युतनिर्मिती केंद्रे उभारता येतात. भाक्रानांगल येथे किंवा सरदार सरोवर या प्रकल्पात ही योजना राबवली जाईल. टेनेसी व्हॅली योजना या पद्धतीतच काम करते. लांबवरचा विचार करता जलविद्युत ही स्वस्त पडते. देखभाल कमी लागते. पण सुरुवातीचा भांडवली खर्च खूपच मोठा असतो. जलविद्युत केंद्र उभारताना बांधाव्या लागणाऱ्या धरणांमुळे विस्थापितांची संख्या नेहमीच मोठी असते. त्यामुळे त्याला समाजाचा विरोध होतोच; पण औष्णिक विद्युतनिर्मितीमुळे होणारे वातावरणातील प्रदूषण आसपासच्या गावांवर विपरीत परिणाम करत असतेच. त्यातून निर्माण होणारी प्रचंड प्रमाणावरची राख, काजळी, धुर यांची विल्हेवाट लावणे हाही एक फार मोठा प्रश्न म्हणून काही वर्षांनी उभा राहतो. दूरगामी विचार करून कशाला सामोरे जायचे हे ठरवणे सोपे मात्र नक्कीच नाही. *'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *“ इतिहास हा काळाचा साक्षीदार असतो आणि सत्याचा प्रकाश असतो. ”* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *पंचायत राजची व्यवस्था कोणत्या साली अस्तित्वात आली ?* 1962 2) *शेतकऱ्यांना 7/12 व 8-अ चे उतारे कोण देतो ?* तलाठी 3) *महसूल खाताचा वर्ग-2 चा अधिकारी कोण असतो ?* तहसीलदार 4) *'तालुका दंडाधिकारी' म्हणून कोण काम पाहतो ?* तहसीलदार 5) *'ऑस्कर' या पुरस्कारासाठी नामांकन झालेला पहिला मराठी चित्रपट कोणता ?* श्वास ( 2004 ) *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● मा. नरेंद्र मोदी, पंतप्रधान ● कु.स्वराज्ञा चंद्रकांत इंद्राक्षे ●  बालाजी गाडेवाड ●  जितेंद्र टेकाळे ●  ज्ञानेश्वर पाटील ●  श्रीनिवास वंगल ●  दयाकर रेड्डी ●  किसन कोनापुरे ●  अक्षय वानोले *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *ज्या महापुरूषांनी आपलं कर्तृत्व सिद्ध केले आहे, ज्यांनी समाजासमोर आपले आदर्श उभे केले आहेत, ज्यांच्या विचारांनी समाजाला दिशा आणि गती मिळाली. अशा महापुरूषांचे पुतळे आपण उभे करतो किंवा केले आहेत. त्यांच्या विचारांची एक रेष पुसण्यासाठी ताकद न काळात असते न व्यवस्थेत. अर्थात, या पदापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी त्यांच्या आयुष्याची पुरेपूर किमंत मोजलेली असते. शाळा-महाविद्यालय तथा विद्यापीठीय पदव्यांची भेंडोळी त्यांनी मिळवलेली नसते. त्यांनी ज्या परिक्षा दिलेल्या असतात; जे पेपर सोडवलेले असतात; ते सामान्यांच्या आवाक्याबाहेरचे असतात.* *त्यांचा व्यासंग, त्यांची साधना, त्यांचा त्याग, त्यांची सेवा, त्याचं कर्तृत्व यामुळे त्यांनी गगनाएवढी उंची गाठलेली असते. मात्र, त्यांना एका झटक्यात आपण दगडाचा पुतळा करून खुजं करून टाकतो. याचं भान जसं आपल्याला नसतं, तसंच त्यांनी उभ्या केलेल्या मूल्यांचा न आपला अभ्यास असतो न तपास केलेला असतो. जयंती-पुण्यतिथीत मिरवणूक काढून डीजेच्या तालावर नाचून घेणे. ही त्यांच्या कार्याप्रती आपण परत केलेली पावती आपल्या स्वत:लाच वाटत असते. हाच मोठा विनोद आहे. ज्यांनी समाजाच्या उद्धारासाठी आपली संपूर्ण हयात खर्ची घातली, अशा महापुरूषांचे विचार आपल्या मनात रूजविण्याऐवजी आपण अतिशय उथळ कृतीत रममाण झालो आहोत. त्यांनी त्यांचे जे विचार इथल्या मातीत पेरलेले असतात, त्यांचे दरसाल उगवून येणे महत्वाचे असते. आपण थेट कोंभानाच खुरपं लावतो.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱 *संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल- 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो,* *आपल्याला जुन्या अभ्यासात एक* *कविता होती,* *अरे अरे कळसा नको वळून तू पाहू,* *पायरीचा मी दगड ,अरे तुझाच की* *भाऊ।* *खरंय आज क्षणाक्षणाला माणुसकी* *हरवत चालल्याची* *उदाहरणे आपण पावलो पावली* *अनुभवतो आहे.* *माणूस म्हणून जन्मा आलो,माणूस* *म्हणून जगेन मी । ही* *भावना प्रत्येकाच्या ठाई असणं* *आवश्यक आहे.* *यावर कबीरजी खूप छान भाष्य* *करतात.👉* *प्रेमभाव  एक  चाहिए ,*  *भेष  अनेक  बनाय  |* *चाहे  घर  में  वास  कर ,*  *चाहे  बन  को  जाए  |*        *मानवाचा धर्म मानवता .* *मानवता जपायची तर मानवाच्या* *अंतरात प्रेमभावनेचे* *अधिष्ठान महत्वाचे आहे. त्या शिवाय* *मानवता व मानव्य कसं* *प्रवाहित होणार ?  भौगोलिक व* *भौतिक परिस्थितीशी समायोजन* *साधण्यासाठी भिन्न वेष* *परिधान करा .   विभिन्न प्रकारच्या वास्तूत  किवा वनात वास्तव्य करा ते परिस्थितीनुरूप* *स्वाभाविक आहे. परंतु त्यात अवडंबर असता कामा नये. सत्य  व प्रेमभाव हाच खर्‍या जीवनाचा मुलाधार आहे.* *त्यामुळे जीवनाची गोडी व सुंदरता वाढते  म्हणून* *माणसाने  अशाश्वत अवडंबराच्या व बुवाबाजीच्या नादी* *लागून जगण्याला  विनाकारणच अंधानुकरणी व भंपक* *बनवू नये . ते मानवतेला* *पूरक असू शकत नाही.* *आणि* *शोभतही नाही.*        *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• घर जेव्हा बांधलं जातं तेव्हा मुख्यत: पायाभरणीचा विचार केला जातो, नंतर भिंतीचा आणि त्यानंतर डोक्यावर असणा-या छताचा.हे जरी खरं असलं तरी यात प्रामुख्याने रेती, सिमेंट,वीटा,गजाळी आणि बांधकाम करणा-या कारागिरांचे कौशल्य लागते.केवळ कोणत्याही एका घटकावर घर पूर्ण होत नाही. त्याचप्रमाणे माणसांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचे आहे.जर व्यक्तिमत्त्व विकासाचे पहायचे झाले तर लहानपणी घरात असणा-या आईवडिलांचे संस्कार, नंतर घरातल्या इतर रक्तातल्या नात्यातील लोकांचे संस्कार,परिसरातील मित्र,शेजारी यांच्या सहवासातून घडलेले संस्कार,शाळेतील शिक्षकांकडून घडवल्या गेलेले संस्कार आणि पुस्तकांच्या माध्यमातून वाचनातून मनावर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष घडल्या गेलेले संस्कार या सर्व घटकातून मिळालेली उत्तम संस्कारांची पायाभरणी हीच खरी माणसांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी लागणारे घटक आहेत.यातील एखाद्या जरी घटकांकडून कमतरता भासली तर व्यक्तिमत्त्व विकास व्हावा तितका होऊ शकत नाही.हे सारे घटक माणसांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी लागणारे पायाभूत घटक आहेत.ज्याप्रमाणे घर मजबूत करण्यासाठी पायाभरणी आणि त्यासाठी लागणारे बांधकाम साहित्य उत्कृष्ट दर्जाचे असायला हवे तेव्हाच घर कुठे चांगले सुंदर बनू शकते त्याचप्रमाणे व्यक्तिमत्त्व विकासासाठी लागणारे वरील उल्लेखिलेल्या घटकांची नितांत गरज आहे.यातला एकजरी घटक कमी पडला तर माणसांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचा पाया कच्चा राहू शकतो.म्हणून यांना आपल्या जीवनात महत्त्वाचे खरे स्थान आहे हे विसरून चालणार नाही. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🏠🏕🏠🏕🏠🏕🏠🏕🏠🏕🏠 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आजी आणि दरोडेखोर* एका जंगलामध्ये *एक म्हतारी* आणि तिची नात राहत होती आणि त्याच जंगलामध्ये *चार दरोडेखोर* लुटमार करण्यासाठी येत असंत . एके दिवशी लुटमार करता करता संध्याकाळ झाली आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची सुरुवात झाली . ते चार दरोडेखोर जंगलामध्ये *आश्रयासाठी* सैरभैर पळु लागले . अचानक त्यांना म्हतारीची *झोपडी* दिसली .आणि ते म्हतारीच्या झोपडीकडे गेले. म्हतारीने त्यांना रात्री साठी आश्रय दिला. म्हतारीने जेवण बनवले सर्वजन जेवायला बसले आणि जेवता जेवता *पाप पुण्याचा विषय* निघाला. प्रत्येकजण आपल्या परीने विषय मांडत होता. शेवटी म्हतारीने *पैज लावली*. बाहेर विजा पडत आहेत प्रत्येकाने त्या समोरच्या झाडाला शिवुन पुन्हा झोपडीमध्ये यायचे *ज्याच्या अंगावर विज पडेल तो पापी आणि जो सुखरुप पुन्हा झोपडीत येईल तो पुण्यवान.* प्रथम १ ला दरोडेखोर गेला झाडाला शिवुन सुखरुप झोपडीत आला. असे दुसरा गेला ,तिसरा गेला, चौथा गेला. आणि सर्वजण सुखरुप झोपडीत आले. आता पाळी आली म्हतारी आणि तिच्या नातीवर म्हतारीला मनामध्ये प्रश्न पडला की हे चारही दरोडेखोर पुण्यवान निघाले आपण नक्कीच पापी आहोत, विज आपल्याच अंगावर पडणार असा विचार करत असताना तिने नातीला कडेवर घेतले आणी झोपडीच्या बाहेर पाऊल टाकले. त्याचक्षणी *विजेचा कडकडाट* होऊन विज त्या झोपडीवर पडली आणि क्षणार्धात ते चारही दरोडेखोर जागीच *भस्मसात* झाले. *तात्पर्य * *एका पुण्यवान माणसाच्या आश्रयामूळे* आजही चार पापी माणसं जगु शकतात. पण त्याने *साथ* सोडली तर ते चारही भस्मसात होऊ शकतात. म्हणून *पुण्याचा वाटा* नेहमी घेत रहा. ते कधी संकटाच्या वेळी आडवे येइल हे आपल्याला ही नाही समजनार. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 16/09/2019 वार - सोमवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जागतिक ओझोन संरक्षण दिन* 💥 ठळक घडामोडी :- ●१९६३ - झेरॉक्स ९१४ या प्रतिमुद्रक यंत्राचे पहिले प्रात्यक्षिक. ●१९६३- मलायाला स्वातंत्र्य.या देशाने मलेशिया हे नाव स्वीकारले. 💥 जन्म :- ◆१९१६ - एम.एस. सुब्बलक्ष्मी, कर्नाटक शैलीतील गायिका. ◆ १९४२ - ना. धों. महानोर, निसर्ग कवी, शेतकरी, आमदार. 💥 मृत्यू :- ●१९८९ - हेमंत कुमार मुखोपाध्याय, प्रसिद्ध गायक, संगीतकार. ● १९९४ - जयवंत दळवी, मराठी साहित्यिक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *पाकिस्तानने दहशतवादास खतपाणी घालणे थांबवावे अन्यथा पाकिस्तानचे तुकडे होणे अटळ, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला सुनावले* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *अमरावती ( आंध्रप्रदेश ) :- गोदावरीत पर्यटकांनी भरलेली नाव उलटली ; 11 जणांचा मृत्यू तर 27 जण बेपत्ता, एनडीआरएफचे युद्धपातळीवर बचावकार्य सुरू* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप युतीवर 19 सप्टेंबरला शिक्कामोर्तब, नाशिकमधील महाजनादेश यात्रेच्या समारोप कार्यक्रमात घोषणेची शक्यता* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *बंडखोरांनी अबाकिक आणि खुराइस येथील तेल क्षेत्रांवर हवाई हल्ले केल्यानंतर सौदी अरेबियाने ५० टक्के अर्थात निम्मं तेल उत्पादन थांबण्याचा घेतला निर्णय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *निवडणूक लढवायला सज्ज, जनआशीर्वाद यात्रेत आदित्य ठाकरे यांचं सूचक विधान* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *मुंबई : भारतीय अंडर नाईन्टिन संघानं बांगलादेशवर निसटती मात करुन सातव्यांदा आशिया चषकावर आपलं नाव कोरलं* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणारा पहिला टी-२० सामना सतत कोसळणाऱ्या पावसामुळे रद्द* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बुलेटीनची audio clip ऐकण्यासाठीखालील लिंक वर क्लीक करावे. https://sharechat.com/post/rgAWllK ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *गरज तेथे मदत करा* https://nasayeotikar.blogspot.com/2018/05/blog-post_8.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *दूरदर्शन* १५ सप्टेंबर ‘दूरदर्शन’ या केंद्र सरकारने सुरू केलेल्या देशातील पहिल्या दूरचित्रवाणी वाहिनीचा वाढदिवस. १५ सप्टेंबर, १९५९ रोजी एक छोटासा ट्रान्समीटर व स्टुडिओ यांच्या साह्याने दूरदर्शनचे काम चालू झाले. राजधानीत दूरदर्शनची ही मुहूर्तमेढ रोवली जाताना ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांचा त्यात मोलाचा वाटा होता. दुरदर्शनचे पहिले संचालक होते प्रत्येक मराठी माणसाचे लाडके व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे! पु. लं. देशपांडेनीच "दुरदर्शन" हे नाव सुचवले. दूरदर्शनवरुन बातमीपत्राची नियमित सेवा १९६५ पासून सुरु झाली. १९७२ मध्ये दूरदर्शन सेवा मुंबईत आली. १९७५ मध्ये चेन्नई, श्रीनगर, अमृतसर व लखनौ या शहरांमध्ये दूरदर्शनचे प्रसारण सुरु झाले. उपग्रहाद्वारे सामाजिक शिक्षण अथवा अत्याधुनिक तंत्रज्ञानातून सामाजिक शिक्षण देण्याचा पहिला प्रयोग भारतात केला गेला. सॅटेलाईट इंस्ट्रक्शनल टेलेव्हिजन एक्सपरीमेंटची चाचणी १९७५-७६ या वर्षी घेण्यात आली. याद्वारेच जगात प्रथमच सामाजिक शिक्षणाचा प्रचार घरोघरी करण्यात आला. १९८२ मध्ये दिल्ली आणि अन्य ट्रान्समिटर्स दरम्यान उपग्रहांमार्फ़त प्रसारण सुरु करण्यात आले. १९८२ मध्ये टीव्ही रंगीत झाला. पंतप्रधानांचे लाल किल्ल्यावरचे भाषण देश पाहू लागला आणि ‘नॅशनल ब्रॉडकास्टर’ ही दूरदर्शनची ओळख रुजली. ‘ऑल इंडिया रेडिओ’च्या सावलीतून दूरदर्शन बाहेर आले. १९८५ नंतर घरोघरी दूरचित्रवाणी संच दिसू लागले आणि मालिकांविषयीच्या चर्चा रंगू लागल्या. चिमणराव आणि गुंड्याभाऊ, चाळ नावाची वाचाळ वस्ती, गोट्या, बंदिनी, एक शुन्य शुन्य, सर्जा राजा, प्रतिभा आणि प्रतिमा, ज्ञानदीप, आमची माती आमची माणसं या मालिका ज्ञान, माहिती आणि निखळ मनोरंजन देण्याचं काम करीत होत्या. व्यत्यय नावाची पाटीही चांगलीच भाव खावून जायची. हिंदीतल्या बुनियाद, हमलोग, ये जो है जिंदगी, रजनी, तमस, रामायण, महाभारत, द वर्ल्ड धिस वीक, दर्पण या मालिकांनी तर मनोरंजनाच्या विश्वात अफाट प्रेक्षक वर्ग मिळवला. अनंत भावे, प्रदीप भिडे, शम्मी नारंग, अविनाश कौर सरीन यांचे आत्मविश्वासाने परिपूर्ण असलेले वृत्तनिवेदन प्रेक्षकांना भारावणारे असेच होते. गेल्या दोन दशकांत झालेल्या संज्ञापन क्रांतीमुळे दूरदर्शनचा भारतातला एकाधिकार संपत गेला. *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *“ उपाशी पोटी साधे अन्न देखील रुचकर लागते. ”* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *आशिया खंडातील सर्वात मोठा खत कारखाना कोठे आहे ?* सिंद्री ( झारखंड ) 2) *मुंग्यांच्या निवाऱ्याला काय म्हणतात ?* वारूळ 3) *पक्ष्याच्या निवाऱ्याला काय म्हणतात ?* घरटे 4) *बाबा आमटे यांचे पूर्ण नाव काय ?* मुरलीधर देविदास आमटे 5) *अण्णा हजारे यांचे पूर्ण नाव काय ?* किसन बाबुराव हजारे *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● प्रसाद मुतनवाड ●  लक्ष्मणराव भवरे ●  साईराम पिंगळे ● मंगेश यादव ● संतोषभाई ओझा ● विठ्ठल आढाव ● कृष्णा डाफने *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *"एका चांगल्या गोष्टीबरोबर दुसरी वाईट गोष्ट सोबतच असते. माणूस विद्वान तर आहे, पण त्याला धन आणि मानाची अपेक्षा असेल तर? ही अपेक्षाच त्याचा नाश करत असते, ही सिद्ध झालेली गोष्ट आहे." अपेक्षेसोबत अपेक्षाभंग असतो, हे पटवून देण्यासाठी प्रमाणाची आवश्यकता नाही. "आपण ज्या ज्या इच्छा करतो, जेवढ्या अपेक्षा बाळगतो त्या सर्वच्या सर्वच पूर्ण कशा होऊ शकतील? पण माणूस हे समजून घेत नाही. हे पाहिजे, ते पाहिजे या आणि अशा अनेक वासना माणसाला शेवटी भीक मागायला लावत असतात." हव्यासापोटी भिकेला लागण्याची वेळ आली तरी माणूस शहाणा होत नाही.* *जुगारात मिळण्याची अपेक्षा सर्व घालवून बसते. राज्यच काय पण बायकोला सुद्धा 'डावात' हरून बसल्याची साक्ष महाभारतासारखे ग्रंथ देतात. संत तुकाराम आपल्याला शहाणं करण्याचा प्रयत्न करत आहेत. इच्छेतून अपमानित होण्याची वेळ येणार नाही ही काळजी घेतलीच पाहिजे. "एखाद्या गाढवाचं 'राजहंस' असं अलंकारीक नाव जरी ठेवलं, तरी त्या नावाचं त्या गाढवाला काय भूषण वाटणार आहे?" गाढवाची राजहंस नाव ठेवण्याइतकीसुद्धा पात्रता नसते आणि त्याला त्याचं भूषणही वाटत नसतं.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 💥💥💥💥💥💥💥💥💥 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल- 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *छोटा प्रयोग करून बघा,* *कोणत्याही परिस्थितीत विचारांमध्ये* *सकारात्मकता* *ठेवा,प्रसंग कितीही छोटा असुद्या* *आपण मात्र मनाला नकारात्मक* *विचाराचा स्पर्श होऊ देऊ* *नका,आपण अलगद संकटातून बाहेर* *पडतो.* *एक लक्षात ठेवा जहरी विषापेक्षाही* *नकारात्मक विचार* *भयंकर विषारी असतात. *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• कोणत्याही परिस्थितीची जाणीव असलेली व्यक्ती कितीही आणि कोणत्याही परिस्थितीला तोंड द्यायला घाबरत नाही.कारण त्याला माहित असते की,आपण घाबरलो तर समोर असलेली परिस्थिती आपल्या पाठीमागे भूतासारखी मागेच लागते आणि जर नाही घाबरलो तर ती तशीच माघारी फिरते.अशा व्यक्तीला परिस्थितीच जगण्याची जाणीव करून देते आणि त्यातून मार्गही दाखवते.त्यामुळे जीवन जगण्याची आशा पल्लवित करते. ज्या व्यक्तीला कोणत्याही परिस्थितीची जाणीव नाही किंवा कोणतीही त्यातून मार्ग काढण्याची कल्पना नाही अशा व्यक्तीच्या जीवनात कोणतीही परिस्थिती क्षुल्लक असली तरी ती भित्र्या सशासारखीच असते. अशी व्यक्ती कोणत्याही परिस्थितीवर मात करु शकत नाही किंवा जीवनात यशस्वी होऊ शकत नाही.कोणत्या परिस्थितीला कसे आणि कोणत्या प्रकारे तोंड द्यायचे याचे थोडेही ज्ञान अवगत नाही किंवा जाणीवही नाही अशा व्यक्तीकडून कोणताही गुण इतरांना घेण्यासाठी मिळणार नाही.समोर असलेल्या परिस्थितीला निभावून नेण्यासाठी आपल्या मनामध्ये परिस्थितीनुरुप जाणीव निर्माण व्हायला हवी.अशी जाणीव प्रत्येकाच्या मनामध्ये उपजतच असते फक्त थोडा विचार करायला शिकले पाहिजे.जाणीव ही एक आपल्याला चांगले जीवन जगण्यासाठी बळ आणि प्रेरणाच देते.त्यामुळे आपल्यातील जाणीवेला नेहमी जीवंत ठेवायला शिकले पाहिजे. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०. 🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂 🥙•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *लोभाची शिक्षा* एक इसम यजमानाकडे पूजाअर्चा करून आपला चरितार्थ चालवत होता. दुर्दैवाने देशात दुष्‍काळ पडला. त्‍यामुळे इसमला रोजच्‍या जेवणाची भ्रांत पडली, यापेक्षा मरण पत्‍करलेले परवडले असा विचार करून तो जंगलात गेला. तेथे वाघाला पाहिले. इसमाने विचार केला, या वाघाने मला जर खाल्‍ले तर तर त्‍याची भूक भागेल व माझीही मृत्‍यूची इच्‍छा पूर्ण होईल. तसा तो वाघासमोर उभा राहिला. वाघ मनुष्‍यवाणीत बोलू लागला,''तू असा माझ्यासमोर का उभा आहेस'' इसमाने आपली कर्मकहाणी त्‍याला सांगितली. तेव्‍हा वाघाला त्‍याची दया आली. तो प्रत्‍यक्षात वाघ नसून वाघाचे रूप घेतलेली वनदेवता होती. वनदेवतेने आपले खरे रूप प्रगट करून त्‍याला एक हजार सुवर्णमुद्रा व धान्‍य दिले व भविष्‍यात कधीही आत्‍महत्‍येचा विचार करू नकोस असे बजावून त्‍याला परत पाठविले. इसम अत्‍यानंदाने घरी परतला. दुस-या दिवशी एक सुवर्णमुद्रा घेऊन तो दुकानदाराकडे सामान खरेदी करण्‍यासाठी गेला तेव्‍हा दुकानदाराने या सुवर्णमुद्रा तुला कोठे मिळाल्‍या असे विचारले असता भाबडेपणाने त्या इसमाने खरेखरे सर्व सांगून टाकले. लोभी दुकानदाराला तोंडाला पाणी सुटले. त्‍यानेही तसेच वागण्‍याचे ठरविले. दुस-याच दिवशी त्‍याने जंगलात जाऊन त्‍याच ठिकाणी ठिय्या मांडला. वाघ त्‍याच्‍यासमोर प्रगटला. त्‍याला व्‍यापा-याने खोटी कर्मकहाणी सांगितली. वाघाला तत्‍काळ समजले, हा खोटे बोलत आहे, त्‍याने त्‍याच्‍यावर हल्‍ला चढवला आणि जखमी व्‍यापा-याला सुनावले, आज तुला जिवंत सोडत आहे ज्‍यायोगे तू असे धाडस पुन्‍हा करणार नाहीस तात्‍पर्य – लोभाने माणसाच्‍या जीवावरही बेतू शकते, लोभ माणसाचे नुकसान करतो. लोभ टाळणे आवश्‍यक आहे. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 14/09/2019 वार - शनिवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~ https://fmbuletin2019.blogspot.com/2019/09/4-0650-0700.html •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *राष्ट्रीय हिंदी दिवस* 💥 ठळक घडामोडी :- ◆२००० - मायक्रोसॉफ्टने आपल्या एम.एस.-डॉस या संगणकप्रणालीची शेवटची आवृत्ती (८.०) प्रकाशित केली. याचबरोबर विंडोज एम.ई. या प्रणालीचेही वितरण सुरू केले. ◆१९६०- OPEC ( Organisation Of The Petroleum Exporting Countries) ची स्थापना . ◆१९५९-सोव्हिएत संघाचे लुना २ हे अंतरिक्षयान चंद्रावर कोसळले.चंद्रावर पोहोचणारी ही पहिली मानवनिर्मित वस्तू होती. 💥 जन्म :- ●१९२३- स्व. राम जेठमलानी , माजी केंद्रीय कायदामंत्री,कायदेपंडित. ●१९१९ - न्यालचंद शाह, भारतीय क्रिकेट खेळाडू. ● १९६३ - रॉबिन सिंग, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- ●२०११ - हरिश्चंद्र माधव बिराजदार, मराठी पहिलवानी कुस्तीगीर व प्रशिक्षक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला सुरूवात, 19 सप्टेंबरला नाशिकमध्ये होणार समारोप* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजेंचा उद्या दिल्लीत भाजप प्रवेश, राजेंची ट्विटरद्वारे माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *मंत्रिमंडळ विस्तारप्रकरणी राज्य सरकारला अखेर मोठा दिलासा, मंत्रिमंडळ विस्ताराला आव्हान देणारी याचिका हायकोर्टानं फेटाळली, पक्ष बदलणाऱ्या नेत्यांचा फैसला आगामी निवडणुकीत मतदारच करतील, सुनावणीदरम्यान हायकोर्टाचं* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *निवड रद्द झालेल्या 118 सहायक मोटार वाहन निरीक्षकांची अतिरिक्त पदावर नियुक्ती करणार, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *येत्या 31 डिसेंबरपर्यंत बांद्रा स्कायवॉकची दुरुस्ती करुन तो पुन्हा खुला करणार, मुंबई महापालिका प्रशासनाची उच्च न्यायालयात ग्वाही* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *भोपाळमध्ये गणपती विसर्जनादरम्यान मोठी दुर्घटना, बोट उलटून 11 जणांचा मृत्यू* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *10 सरकारी बँकांच्या विलिनिकरणाच्या निर्णयाविरोधात बँक कर्मचाऱ्यांच्या चार संघटनांनी 26 आणि 27 सप्टेंबर रोजी संपाचा दिला इशारा, चौथा शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवसांना जोडून हा संप पुकारण्यात आल्यानं बँकेचे कामकाज चार दिवस ठप्प राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *राष्ट्रीय हिंदी दिवस* देश में 14 सितंबर 1953 को पहली बार हिंदी दिवस मनाया गया और उसके बाद से ही हर साल 14 सितंबर को पूरे देश में हिंदी दिवस बड़े ही उत्साह के साथ मनाया जाने लगा.  हिंदी ने हमें दुनियाभर में पहचान दिलाई है. भारत ही नहीं बल्कि दुनिया भर के कई देशों में हिंदी बोली जाती है. हिंदी विश्व की प्राचीन, समृद्ध और सरल भाषा है. राष्‍ट्रपिता महात्‍मा गांधी ने हिंदी को जनमानस की भाषा कहा था. उन्‍होंने 1918 में आयोजित हिंदी साहित्‍य सम्‍मेलन में हिंदी को राष्‍ट्र भाषा बनाने के लिए कहा था. भारत सालों तक अंग्रेजों का गुलाम  रहा. इसी वजह से उस गुलामी का असर लंबे समय तक देखने को मिला. यहां तक कि इसका प्रभाव भाषा में भी पड़ा. वैसे तो हिंदी दुनिया की तीसरी ऐसी भाषा है जिसे सबसे ज्‍यादा लोग बोलते हैं लेकिन इसके बावजूद हिंदी को अपने ही देश में हीन भावना से देखा जाता है. आमतौर पर हिंदी बोलने वाले को पिछड़ा और अंग्रेजी में अपनी बात कहने वाले को आधुनिक कहा जाता है. इसे हिंदी का दुर्भाग्‍य ही कहा जाएगा कि इतनी समृद्ध भाषा कोष होने के बावजूद आज हिंदी लिखते और बोलते वक्‍त ज्‍यादातर अंग्रेजी भाषा के शब्‍दों का इस्‍तेमाल किया जाता है. और तो और हिंदी के कई शब्‍द चलन से ही हट गए. ऐसे में हिंदी दिवस को मनाना जरूरी है ताकि लोगों को यह याद रहे कि हिंदी उनकी राजभाषा है और उसका सम्‍मान व प्रचार-प्रसार करना उनका कर्तव्‍य है. हिंदी दिवस मनाने के पीछे मंशा यही है कि लोगों को एहसास दिलाया जा सके कि जब तक वे इसका इस्‍तेमाल नहीं करेंगे तब तक इस भाषा का विकास नहीं होगा.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ संकलन :- *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *मेहंदीने हात कसे रंगतात ?* 📙 मुलीचे हात पिवळे केले की सुटलो. असं पूर्वीचे वधुपिते म्हणत असत. कारण पारंपारिकरित्या लग्नाच्या आधी नवऱ्या मुलीला आणि मुलालाही हळद लावून स्नान घालण्याचा प्रघात आहे. अजूनही तो चालू आहे. पण आजकालच्या लग्नात नवर्या मुलीचे आणि तिच्या बरोबर इतर महिलांचेही हातपाय मेहंदीने रंगून काढण्याची प्रथा वाढीला आलेली आहे. अनेक बारीक बारीक नक्षीदार मेहंदींनं हात पावलं आणि कपाळ किंवा गालही रंगवण्यासाठी खास कलाकारांना आमंत्रण दिलं जातं. या मेंदीचा लालसर रंग गोऱ्या आणि सावळ्याही कातडीवर खुलून दिसतो. पण ही किमया नेमकी साध्य होते कशी? लाॅसोनिया इनर्मिस या वैज्ञानिक नावांनं ओळखल्या जाणाऱ्या झुडपांची पानं यासाठी वापरली जातात. मध्यपूर्वेत याला हिना म्हणतात आणि भारत उपखंड वगळल्यास इतरत्र हेच नाव जास्त प्रचलित आहे. ही पानं इतर पत्री सारखी हिरवी असली तरी त्यांच्यामध्ये लाॅसोनिया या नावाचं लाल शेंदरी रंगाचं रंगद्रव्य असतं. नेपाळच्या जातकुळीतला या रसायनाचा रेणू अमिनो आम्लापेक्षा थोडासा मोठा आणि ग्लुकोज सारख्या प्राथमिक शर्करेच्या रेणूपेक्षा थोडासा लहान असतो. मेहंदीच्या झुडपांच्याही वेगवेगळ्या जाती आहेत. प्रत्येक जातीतील रंगद्रव्यात थोडाफार फरक असल्याने त्या रंगांचा छटेमध्येही फरक आढळतो. सामान्यत: हा रंग लाल नारिंगी असला तरी बुर्गुडी मद्दयासारखा दालचिनी सारखा तपकिरी, काळसर चॉकलेटी चेरी सारखा गडद लाल, अशा वेगवेगळ्या रंगांची मेंदी मिळते. आपल्या कातडीच्या वरच्या थरातल्या पेशींच्या बाह्य आवरणामधील फाॅस्फोलिपीड रसायनाच्या किंवा त्या पेशीला प्रथिनांच्या रेणूपेक्षा या रसायनाचे रेणू लहान असतात. व सहजगत्या त्यांच्यात मिसळून जातात. प्रथिनांच्या रेणूंना ते मिठी मारून बसतात. केसांमधल्या कॅरॅटीन या प्रथिनाशी त्यांची प्रक्रिया होते. जर केसांमध्ये कॅरेटीनचं प्रमाण जास्त असेल तर लाॅसोनियाही जास्त प्रमाणात तिथं रुतून बसतो व केसांचा रंग लक्षणीयरित्या पालटतो. साधारणत: अठ्ठेचाळीस तासानंतर तो काळसर होऊ लागतो. पानांमधला रंग उतरून कातडी मध्ये किंवा केसांमध्ये जिरावा यासाठी त्या पानांच्या वाटण्यात लिंबाचा रंग मिसळला जातो. त्यातला सायट्रिक आम्ल रंग अधिक गडद करतं. तळहातावरच्या किंवा तळपायावरच्या कातडीत शिरलेल्याल्या लाॅसोनियाला जर वाफेचा स्पर्श झाला तर त्याचा रंग गडद तपकिरी किंवा काळसर बनतो. *बाळ फोंडके यांच्या 'कसं' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *“ खोटारडा जेव्हा खर बोलतो, तेव्हा कुणीही त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. ”* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *हिंदी दिवस केव्हा साजरा केला जातो ?* 14 सप्टेंबर 2) *केळीचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होते ?* तामिळनाडू 3) *भारतातील सर्वात लांब धरण कोणते ?* हिराकुंड 4) *कोणत्या प्राण्याचे ह्रदय सर्वात मोठे असते ?* जिराफ 5) *आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्यालय कोठे आहे ?* वाशिंग्टन *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● सायन्ना गुरुजी येवतीकर ●  विवेक जैपाल ठाकूर ●  मेधा पुराणिक देसाई ●  अशोक चव्हाण, माहूर ●  सदाशिव जाधव ●  अनिल लांडगे ●  नितीन भोसले ●  सतीश कोटगीरे ● बालाजी कुदाळे ● उषा नळगीरे ● मधुसूदन कुलकर्णी *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*    [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मृत्यूपूर्वी आपण आपला मृत्यूदिन जाणू शकत नाही. मरण पावल्यानंतर आपली पुण्यतिथी, आपल्याकडे पाप्याचीही मेल्यावर पापतिथी नव्हे, पुण्यतिथीच कशी पार पडेल, हा प्रश्नच अर्थशून्य आहे. आप मर गये, दुनिया डुब गयी ॥ मृत्यू झाल्यानंतर मुक्ती मिळावी अशी तीव्र इच्छा असते. मरणापूर्वी एकदातरी देवाचे दर्शन व्हावे अशी भक्तांची आंतरिक ओढ असते. परंतु संत तुकारामांप्रमाणे सदेह स्वर्गात जाण्यासाठीचा स्वर्गाचा व्हिसा इतर कुणासही लागू नाही.* *पुण्यकर्मे केल्याने मोक्ष मिळतो का? अहो, एकदाचा सोक्षमोक्ष झाल्यावर कसला मोक्ष? भक्तिभावे सतत नामस्मरण केल्यानेही मृत्यू सुखद होतो काय? नाही...! तुम्ही देवभक्त आहात की दैत्यभक्त याच्याशी मृत्यूला कर्तव्य नाही. मृत्यू स्थितप्रज्ञ आहे. पापपुण्य, सुख-दु:ख, खरे-खोटे, राव-रंक सर्व मनुष्यनिर्मित आहेत. भूकंप आस्तिक-नास्तिक पाहात नाही. सर्वांना एकाच वेळी भुईत दफन करतो. तुफान सज्जन-दुर्जन असा भेद मुळीच ठेवत नाही. मृत्यू हाच एकमेव पूर्ण आणि अंतिम सत्य आहे. पण हा मृत्यू कसा अनुभवायचा? मृत्यूचा अनुभव सांगायला मृत व्यक्ति कुठे उपलब्ध असते. परंतु मृत्यू अनुभवत मृत्यूच्या सर्वोच्च परमानंदासह विश्वरूपाशी एकरूप होता येते, संत ज्ञानेश्वर, संत विनोबा भावे, स्वा. सावरकर हे या अनुभवांसह शून्यरूप झालेत.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• ☀☀🌟☀☀☀☀☀☀ *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल- 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो* *दोस्त दोस्त ना रहा,प्यार प्यार ना रहा।* *जिंदगी हमे तेरा एतबार ना रहा।* *🕺असे उदास चेहरे रस्त्या-रस्त्यावर* *हल्ली बघायला* *मिळतात.सन्मार्ग* *दाखवणारे वाटाडे कुठे दिसत नाही.* *आज, साधू साधनेत कमी आणि* *साधनात जास्त प्रमाणात* *वावरतांना आपण* *पाहतो.फक्त पाहत नाही तर त्याच्या* *अंधश्रधारूपी विषारी* *वृक्षांना खत पाणी घालतो आणि* *आपल्याच विनाशासाठी* *वाढवतो.तारूण्य आणि संगत यांचे* *महत्व विशद करताना* *डॉ* *.कलाम 'आपले मित्र, चित्र आंणि* *चरित्र नेहमी पवित्र ठेवा; असे सांगतात.कारण तेच खरे जीवनाचे* *अस्त्र आहे. तुम्हाला तर हे माहित आहे की., चारित्र्याचे पतन* *होण्यासाठी बहुधा चुकीचे मित्र आणि चुकीचे चित्र यांचाच हात* *असतो. चुकीचे मित्र आणि चुकीचे चित्र हेच चारित्र्य नष्ट* *करण्याचे शस्त्र आहे किंवा असेही म्हणता येईल की, कधीही न चुकणारे* *ब्रम्हास्त्र आहे.' तारुण्याच्या सळसळत्या उर्जेवर* *स्वार्थी व्यवस्थांचा डोळा असतो. त्यामुळेच तारूण्याची ऊर्जा सैरभैर* *करून तिला आपल्या इच्छेप्रमाणे वापरण्याचे धूर्त* *राजकारण या स्वार्थी व्यवस्था करत असतात. तारुण्याच्या ऐन उमेदीचा* *कालखंड निरर्थकपणे या स्वार्थी व्यवस्थेच्या नेतृत्वामागे* *घालविला जातो.** *एखादी पाण्याची बाटली वापरून फेकून द्यावी, त्या पद्धतीने तरुणांच्या ऊर्जेचा वापर करून त्यांना शेवटी फेकून दिले जाते. सर्व बाजूंनी निष्क्रिय केलेल्या तरूणांवर शेवटी पश्चात्तापाची वेळ येते. तारूण्याचे रखरखीत वाळवंट होते. आपले तारूण्य विवेकशून्य व्यवस्थेच्या हाती द्यायचे की, स्वत:वर विश्वास ठेवत स्वकर्तृत्वाच्या बळावर समाज जीवनात उजळवून टाकायचे हे ज्याला समजले, त्याला तारुण्याचा खरा अर्थ कळला. माजी राष्ट्रपती डाॅ. ए.पी.जे. अब्दुल कलाम हे युवकांना देशाची संपत्ती म्हणायचे, ही संपत्ती देशासाठी आपत्ती ठरू नये म्हणून तरूणांनी आपले मित्र विचारपूर्वक निवडावेत.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• प्रत्येकाच्या जीवनात निराशा ही सवतीसारखी नेहमी मनाला छळत असते.ती सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने मनाला विचलीत करते.अशा स्थितीतून तिला हद्दपार करण्यासाठी काही ना काहीतरी करण्यासाठी तो आशेकडे धावतो आणि त्यातुन सुटका करून घेतो.अर्थात जीवनात निराशेने घर केले तर नक्कीच आशेचा शोध घेऊन निराशेला बाजूला सारतो आणि जीवन निराशेतून मुक्त करतो.निराशा जरी जीवनात आली तरी घाबरायचे नाही तिला हिमतीने तोंड देत आशेचा शोध घ्यायला शिकले पाहिजे आणि त्यादृष्टीने प्रयत्न केले पाहिजे.हीच आपल्या जीवनाची खरी परीक्षा आहे. © व्यंकटेश काटकर,नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🥗•••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *विद्या विनियेन शोभते* राजा ज्ञानसेनच्‍या दरबारात दररोज शास्‍त्रार्थ केला जात असे. विद्वान लोक तेथे शास्‍त्रासंबंधी चर्चा करण्‍यासाठी येत असत. जे विद्वान लोक शास्‍त्रात पारंगत किंवा वादविवादात जिंकत असत ते विजयी म्‍हणून घोषित केले जात असत त्‍यांना राजा धन आणि मान देऊन सन्‍मानित करत असे. एक दिवस राजा ज्ञानसेनाच्‍या दरबारात असाच शास्‍त्रार्थ चालला होता. त्‍या सभेत पंडित भारवी याला विजयी घोषित करण्‍यात आले. राजाने त्‍याचा भरसभेत सत्‍कार केला व मान देण्‍यासाठी त्‍याची हत्तीवरून मिरवणूक काढली. त्‍याच्‍या विद्वत्तेच्‍या सन्‍मानार्थ राजा स्‍वत: त्‍याला चव-या ढाळत त्‍याला घरापर्यंत सोडण्‍यास आला. भारवी एवढ्या मोठ्या सन्‍मानाने घरी आला हे पाहून भारवीच्‍या आईवडीलांना आकाश ठेंगणे झाले. घरी आल्‍याबरोबर भारवीने मातेला साष्‍टांग नमस्‍कार केला पण पित्‍याला मात्र उपेक्षेने उभ्‍याउभ्‍याच नमस्‍कार केला. त्‍याच्‍या वर्तनात हे साफ दिसून येत होते की जणू काही पित्‍याला हे सुचवित होता बघा माझा किती सन्‍मान झाला आहे, माझ्या ज्ञानाला किती किंमत मिळते आहे, स्‍वत: राजा हत्तीवर चव-या ढाळत मला सोडायला घरी आला आहे. पित्‍याने त्‍याच्‍या त्‍याही नमस्‍काराचा स्‍वीकार केला आणि त्‍याला चिरंजीवी भव असे म्‍हटले. गोष्‍ट इथेच संपली असे नाही. मात्‍यापित्‍यांला हे भारवीचे वागणे खटकले. ते दोघेही उदास राहू लागले. भारवीच्‍या यशाने ते जेवढे आनंदी राहायला पाहिजे होते तितके ते आनंदी नव्‍हते. याचे कारणही स्‍पष्‍ट होते की भारवीला यश पचविता आले नव्‍हते व तो ते आईवडीलांना दर्शवित होता. तो यशाच्‍या धुंदीत शिष्‍टाचार आणि विनम्रतेला विसरून गेला होता. थोड्या दिवसांनी माता आणि पित्‍याला उदास पाहून भारवीने मातेला याचे कारण विचारले असता माता म्‍हणाली,’’ तू विजयी होऊन आलास हे ठीक आहे, पण तू विजयी होण्‍यासाठी तुझ्या वडीलांनी घेतलेले परिश्रम तू विसरलास. तू शास्‍त्रार्थ करायला जाणार होतास त्‍याआधी दहा दिवस तुझ्यासाठी निर्जळी उपवास केले होते व त्‍या काळात ते परमेश्‍वराकडे एकच मागणे मागत होते माझ्या मुलाला यश मिळवून दे. लहानपणापासून केवळ तुझ्या यशासाठी त्‍यांनी कितीतरी स्‍वत:च्‍या इच्‍छा दाबून ठेवल्‍या व तुला शास्‍त्रपंडीत बनविले आणि केवळ एकाच यशाने उन्‍मत्त होऊन तू त्‍यांची उपेक्षा केलीस हेच आम्‍हा दोघांच्‍या खिन्नतेचे कारण आहे.’’ हे ऐकताच भारवीला आपली चूक समजली त्‍याने मातापित्‍याच्‍या चरणावर अक्षरश: लोळण घेतली. अनेकवेळा क्षमायाचना केली व आयुष्‍यात पुन्‍हा कधीही त्‍याने मातापित्‍यांची सेवा करण्‍यात कसूर केली नाही. तात्‍पर्य :- आयुष्‍यात आपल्‍याला कितीही मोठी यशाची शिखरे पादाक्रांत करण्‍यास मिळाली तरी त्‍यापाठीमागे आपल्‍या आईवडीलांची पुण्‍याई असते हे प्रत्‍येकानेच समजून घेतले पाहिजे. यश कितीही मिळाले तरी उन्‍मत्त होऊ नये कारण विद्या ही नेहमी विनय असणा-यांकडेच शोभून दिसते. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 13/09/2019 वार - शुक्रवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- ◆२००८- दिल्ली येथे झालेल्या बॉम्बस्फोटाच्या मालिकेत ३० जण ठार तर सुमारे १३० जण जखमी झाले. ◆२००३ - ज्येष्ठ गायक पं. दिनकर कैकिणी यांना तानसेन पुरस्कार, तर मेंडोलिन वादक यू. श्रीनिवास यांना राष्ट्रीय कुमार गंधर्व पुरस्कार जाहीर. ● १९४८- *ऑपरेशन पोलो*- विलीनीकरणासाठी भारतीय सैन्याने हैदराबाद वर चढाई केली. 💥 जन्म :- ●१९६९- शेन वार्न ,ऑस्ट्रेलियन लेग स्पिनर ●१९८० - वीरेन रास्किन्हा, भारतीय हॉकी खेळाडू. 💥 मृत्यू :- ●२०१२- रंगनाथ मिश्रा,भारताचे २१ वे सरन्यायाधीश. ●१९२८ - श्रीधर पाठक, हिंदी कवी. ●१९७१ - केशवराव दाते, रंगभूमीवरील अभिनेते. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *कुलभूषण जाधवांच्या काऊन्सलर अॅक्सेससाठी भारत पुन्हा आंतरराष्ट्रीय कोर्टात जाणार, पाकिस्ताननं दुसऱ्यांदा काऊन्सलर अॅक्सेसला नकार दिल्यानं भारत आक्रमक* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *पुढच्या वर्षी लवकर या म्हणत लाडक्या गणरायाला निरोप, चांद्यापासून बांद्यापर्यंत वाजत-गाजत बाप्पाच्या विसर्जन मिरवणुका, नागपूर, कोल्हापूर, नाशिक, पुण्यासह राज्यातील अनेक शहरांमध्ये विघ्नहर्त्याला निरोप* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशाचा अखेर मुहूर्त ठरला; 14 तारखेला पंतप्रधानांच्या उपस्थितीत हाती घेणार कमळ* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *नितीन गडकरींच्या कायद्याला भाजपशासित राज्य सरकारांकडून खो, दिवाकर रावतेंकडूनही मोटार वाहन कायद्याबद्दल पुनर्विचार करण्याचं पत्र* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *महाराष्ट्रासह तीन राज्यांच्या निवडणुकांचा दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आढावा, लवकरच निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, लोकेश राहुलला डच्चू तर शुभमन गिलला संधी ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *मेरी कोमसह यंदा 9 महिला खेळाडूंची पद्म पुरस्कारांसाठी शिफारस करण्यात आली आहे. त्यात जागतिक सुवर्णविजेती बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूचं नाव पद्मभूषण पुरस्कारासाठी सुचवण्यात आलं आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *रक्तदान : सर्वश्रेष्ठ दान* https://nasayeotikar.blogspot.com/2017/05/blog-post_7.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *चक्रीवादळे का येतात ?* 📙 उन्हाळ्याचे दिवस चालू असतात. भर दुपारी उन्हाचा कडाका अंगाची लाहीलाही करत असतो. जमीन अगदी चटके बसतील, अशी तापलेली व हवा अजिबात पडलेली. झाडाचे तर पानही हलत नाही आणि बघता बघता लांबवर कुठेतरी जमिनीवरची पडलेली पाने वाऱ्याने गोलगोल भिरभिरताना दिसू लागतात. बघता बघता तीच पाने उंचावर उचलली जातात. त्यांच्याबरोबरच धुळीचा लोटही उफाळताना, गरगरताना दिसतो. काही सेकंदातच वाऱ्याची वावटळ आपल्यालाही घेरून टाकते. हेलकावणारी झाडे, वाऱ्याचा सोसाट्याचा आवाज, नाकातोंडात जाणारी धूळमाती यांमुळे सारेच कसे भीषण वाटत असते. ही असते चक्रीवादळाची सुरुवात. चक्रीवादळ म्हणजे वातावरणातील एखाद्या विवक्षित ठिकाणी हवेचा दाब आसपासच्या काही मैलांच्या परिसरापेक्षा कमी अथवा जास्त झाल्याने दिसून येणारे वातावरणातील बदल. हे बदल फार मोठ्या वेगाने घडतात, त्यात वाऱ्याची फार मोठी ताकद सामावलेली असते. त्या विवक्षित ठिकाणी हवेचा दाब कमी होतो वाह वाढतो. तो चक्रीवादळाचा केंद्रबिंदूच असतो. दाब कमी झाल्यास तेथील हवेची पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न म्हणून वातावरणातील हवेत एक प्रकारचे भोवरे तयार होतात. याउलट दाब वाढला असल्यास त्या पट्टय़ातील हवा दाबामुळे केंद्राकडे खाली दाबली जात असते. याही क्रियेमध्ये वारे वाहणे वेगाने सुरू होते, पण त्यांची तीव्रता खूपच कमी असते. बहुतेक चक्रीवादळांचा केंद्रबिंदू समुद्रावरच सुरू होतो. कसलाही अडथळा वाटेत नसल्याने हे वादळ स्वतःभोवती फिरत वेगाने घोंगावत इकडे तिकडे हेलकावत राहते. पण समुद्री वार्‍यांमुळे हलके हलके जमिनीकडे येऊ लागते. सुरुवातीला जमिनीवरचा मोठा पट्टा त्यामुळे त्याच्या तडाख्यात सापडतो, पण त्याचबरोबर त्याचा वेग हळूहळू कमी होत पसरत जातो व काही काळाने ते संपूनही जाते. समुद्रपातळीपेक्षा जमिनीची वाढलेली उंची, वाटेत येणारे अडथळे व जमिनीवरील बरेचसे स्थिर तापमान यांमुळे या चक्रीवादळांचा वेग मंदावतो. चक्रीवादळ बहुधा स्वतःबरोबर सोसाटयाचा पाऊसही आणते. खूप मोठ्या आकारमानात हे पसरलेले असल्याने (चारशे ते सहाशे किलोमीटर) या सर्व भागातील निरनिराळे ढग यात ओढले गेलेले असतात. या ढगांचे एकत्रीकरण होताच त्यातील बाष्पही एकत्र येऊन त्यापासून पाऊस पडेल, असे मोठे बाष्पकण तयार होतात. सुरुवातीला प्रचंड वेगाने वाहणारे वारे, धुळीचे वातावरण व नंतरच्या पावसाचे तडाखे ही चक्रीवादळाची खासियतच म्हणायला हवी. चक्रीवादळांचा वेग जमिनीवर पोहोचल्यावर अनेकदा ताशी साठ ते ऐंशी किलोमीटर इतका असतो. समुद्रावरील वेग मोजण्याची पद्धत नाही, पण तो कदाचित यापेक्षाही जास्त असू शकतो. समुद्रावरील बोटी या वादळात सापडल्यास अनेकदा त्यांचे गंभीर नुकसान होण्याइतका त्यांना तडाखा बसलेला असतो. वादळाचा पट्टा ओलांडण्यास त्यांना एक ते चार दिवस लागत असल्याने तोवर राक्षसी लाटांचे तांडव असहाय्यपणे बघणे एवढेच त्यांच्या हातात असते. अनेकदा या लाटांची उंची तीस ते पस्तीस फुटांपर्यंतही असू शकते. ही वादळे सागरी अपघात व दुर्घटना यांचे एक मुख्य कारण असल्याने या वादळी टापूंची सतत माहिती घेऊन त्याप्रमाणे मार्ग आखणे, बदलणे बोटीच्या कप्तानाने कामच राहते. किनाऱ्यावर जेव्हा ही वादळे येतात, तेव्हा उंच झाडे उन्मळून पडणे, सागरी लाटा खोलवर घुसून त्यामुळे नुकसान होणे, घरांचे पत्रे उडणे या गोष्टी होतात. चक्रीवादळांची सूचना हल्ली उपग्रहांमुळे खूपच लवकर मिळू शकते. उपग्रहांमधून या सर्व वादळांचा नेमका प्रवास, हवेतील घडत जाणारे बदल यांचे फोटो मिळतात. या खेरीच एक मोठी विलक्षण पद्धत चक्रीवादळांच्या अभ्यासासाठी गेली २० वर्षे वापरली जात आहे. अत्यंत धोकादायक अशा पद्धतीत लष्करी जेट विमानातून संशोधक या चक्रीवादळाच्या केंद्रबिंदूकडेच प्रवास सुरू करतात. थेट केंद्रबिंदूचा वेध घेऊन विमान वर न्यावयाचे व त्या दरम्यान विविध शास्त्रीय निरीक्षणे करायची, अशी ही पद्धत आहे. निष्णात वैमानिक व जिवावर उदार झालेले संशोधक यांचा चमू हे काम करतो. या प्रकारात विमान पार वेडेवाकडे होऊन दोन तीन हजार फूट लांबवर एखाद्या खेळण्याप्रमाणे भिरकावलेही गेले आहे. तरीही सुखरूप उतरल्यावर नवीन चक्रीवादळाची सूचना कधी मिळते, इकडेच या चमूचे लक्ष असते. धाडस व जिज्ञासा यांचा संगम काय करू शकतो, याचे हे एक थरारक उदाहरण आहे. *'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *“ वाईट बातमीला पंख असतात तर शुभ बातमीला पायच नसतात. ”* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *विधानपरिषदेच्या सभासदांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?* 6 वर्ष 2) *मुंबई उच्च न्यायालयाची खंडपीठे कोणती ?* औरंगाबाद, नागपूर, पणजी 3) *उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक कोण करतो ?* राष्ट्रपती 4) *राज्य पोलीस यंत्रणेतील सर्वोच्च अधिकारी कोण असतो ?* पोलीस महासंचालक 5) *जिल्हा पातळीवर कायदा व सुव्यवस्था कोण पाहतो ?* जिल्हा पोलीस अधीक्षक *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● योगेश वाघ ●  दिपश्री वाणी ●  कबीरदास गंगासागरे ●  नवीन रेड्डी ●  हरीश दादा बल्लाल *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कळायला लागल्यापासून जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर कोणत्या ना कोणत्या कारणाने अनेक गोष्टी कराव्या लागतात. वयाचा काही काळ त्यांना संस्कार, संस्कृती या नावाने ओळखले जाते. तर एका विशिष्ट वयानंतर त्याला 'कर्तव्य' ही संज्ञा प्राप्त होते. मग कुटुंबात, नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी केले जाणारे काम हेही कर्तव्यात मोडते. 'कामात देव शोधा' हे जीवनाचे खरे तत्वज्ञान मानले पाहिजे. "कर्तव्याला मुकता माणूस, माणूस ना उरतो।" हे ज्याला कळले, तोच पुढे जातो.* *कामाशी साधली जाणारी एकरूपता, त्यातून दिसणारी तादात्म्यता हाही 'उपासना' मार्गच आहे.* *जो करी कर्म अहेतु निरंतर,* *देव तयास मिळो न मिळो रे।* *यातून कवीला जे सांगायच आहे, त्याचे चिंतन करूया. त्यासाठी 'मोहाच्या फुलबागा' दूर सारायला हव्यात. त्यासाठी मनाची अवस्था कोती असून चालणार नाही. आकाशाएवढे मन झाले, तरच नव्या पिढीसमोर आदर्श उभे राहतील. जन्मलेल्या प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या वेदनेला सामोरे जावे लागते. कुणीही त्यातून सुटत नाही. हे टाळून पुढे जाऊया, मनाचा विकास साधूया....* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो,* *बहिणाबाई यांनी मनाचे कंगोरे* *उलगडून दाखवतांना खूप सुंदर रचना* *केली.* *त्या म्हणतात* *मन वढाय वढाय उभ्या पिकातलं* *ढोर।* *किती हाकला हाकला फिरी येत* *पिकावर।असे असले तरी* *हे मन नदीसारखे असायला आणि* *करायला काही हरकत नाही.* *नदी म्हणते ,* *🤝🏻मी कोणाची , मी सर्वांची , बंधुनिया मज नेणाराची।* *जेथे जाईल तेथे फुलवीन बाग मनोहर* *आनंदाची।* *मानवी शरीर हे अनेक जडद्रव्यांचा* *नित्य असलेला प्रवाह* *आहे. नदी सारखे प्रत्येक* *क्षणी आपण त्यात नवनवीन द्रव्य* *टाकत असतो,भरत* *असतो.तसेच ते बाहेरही टाकत* *असतो.म्हणून शरीरासारखे मनाचे ही* *कार्य चालत असते,ते काही घेते* *काही देते.नदी जसे काहीही* *मिळो त्याचा स्वीकार* *करून त्याला निर्मळ करते तसे मनाने* *करावे.वाईटाचा अंत करून* *शुद्ध अमृत सर्वांना द्यावे.* *नदीतून पाण्याचे लोट सारखे एका* *ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असतात. पाणी क्षणाक्षणाला* *बदलत* *असते,किनाराही बदलत* *असतो,परिसरही सारखा बदलत असतो,तरीही नदी पवित्र* *राहते.परिवर्तनाच्या या मालिकेत मनाचे कार्य असे चालवता येते का ते* *बघा। जमले ना ,तर तुम्ही सुद्धा एक अलौकिक महात्मा बनू शकतात.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्यामध्ये कमी असलेली बाजू इतरांसमोर कधीही मांडू नका कारण हेच लोक तुमच्यातल्या कमी असलेल्या बाजूचा फायदा उचलून तुम्हाला अजून कमकुवत करायला पाहतात.त्यामुळे आपण अधिक कमकुवत बनत जातो.त्यापेक्षा आपल्यात काय कमी आहे याचा शोध घेऊन आपली कमी असलेली बाजू अधिक भक्कम कशी करता येईल यासाठी प्रयत्न करायला हवे आणि तेही सातत्याने.मग तेच लोक आपला फायदा घेत होते आणि हसत होते आता त्यांना फायदा घेण्याची,हसण्याची संधी मिळणार नाही हे निश्चित. © व्यंकटेश काटकर,नांदेड 📲 ९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• . *आयुष्यभराची प्रतिष्ठा* महाभारतातील युध्द संपवून कृष्ण घरी परतल्यावर पत्नी रुक्मिणीने त्याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. गुरु द्रोणाचार्य आणि पितामह भीष्म यांना ठार मारणाऱ्याच्या बाजुने तुम्ही कसे काय उभे राहिलात.? कृष्णाने उत्तर दिले. ते आयुष्यभर सत्याच्या मार्गावर चालत होते यात कुठलीच शंका नाही पण त्या दोघांकडून आयुष्यात एक पाप घडले. आणि त्यामुळे त्याच्या जीवनभराच्या सत्यमार्गावर पाणी फिरले. *रुक्मिणीने विचारले..* *कोणते पाप.?* कृष्ण म्हणाला. जेव्हा भर दरबारात द्रौपदीचे वस्त्रहरण होत होते तेव्हा ते दोघेही दरबारात उपस्थित होते. दरबारातील जेष्ठ व्यक्ति म्हणून ते हा प्रकार रोखू शकत होते. पण त्यांनी तसे केले नाही. त्यांचा हा एकच गुन्हा त्यांच्या सगळ्या सत्यमार्ग जगणे अर्थहीन करण्यास पुरेसा आहे. *रुक्मिणीने विचारले.* *मग कर्णाचे काय.?* कृष्ण म्हणाला, कर्ण दानशूर होता, यात कुठलीच शंका नाही. त्याच्याकडे कुणी काही मागितले तर त्याच्या तोंडून कधीही 'नाही' असा शब्द बाहेर पडला नाही. पण बलाढ्य सैन्यासमोर यशस्वीपणे लढताना अभिमन्यू जेव्हा जखमी झाला व रणांगणावर मृत्युची वाट पाहत पडला होता, तेव्हा त्याने शेजारी उभ्या असलेल्या कर्णाकडे पाणी मागितले. तिथेच स्वच्छ पाण्याचे डबके होते.पण अभिमन्युला पाणी देऊन आपल्या मित्राला म्हणजेच दुर्योधनाला दुखवायचे नाही, म्हणून कर्णाने मरण पंथाला लागलेल्या वीराला पाणी दिले नाही.नंतर त्याच डबक्यात कर्णाच्या रथाचे चाक अडकून पडले आणि त्याचा शेवट झाला. *तात्पर्य :-* तुमच्या एका अन्यायकारक कृत्याने तुमच्या आयुष्यभराच्या प्रामाणिकपणाची किंमत एका क्षणात शून्य होवून जाते.!! *चांगले कर्म, निस्वार्थी सेवा, स्वच्छ प्रतिमा आणि प्रामाणिकपणाच शेवटपर्यंत माणसाला अमर ठेवते यात तिळमात्र शंका नाही.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 12/09/2019 वार - गुरूवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *अनंत चतुर्दशी गणेश विसर्जन* 💥 ठळक घडामोडी :- ◆१९९८- डॉ जयंत नारळीकर यांना 'पुण्यभूषण'पुरस्कार प्रदान. ◆ २००५-हॉंगकॉंग मधील disney Land सुरू झाले. ◆२००२ - 'मेटसॅट' या भारताच्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण. ◆ १९४८-भारतीय सैन्य हैदराबाद संस्थानच्या हद्दीत घुसले. 💥 जन्म :- ●१५७५ - हेन्री हडसन, इंग्लिश शोधक. ●१९१३ - जेसी जेम्स, अमेरिकन धावपटू. ● १९१२- फिरोज गांधी, इंदिरा गांधी यांचे पती, पत्रकार व राजकारणी. 💥 मृत्यू :- ● १९५२ - सवाई गंधर्व उर्फ रामभाऊ कुंदगोळकर ●१९८० - सतीश दुभाषी रंगभूमी, चित्रपटसृष्टीतील अभिनेते. ● १९९२ - पंडित मल्लिकार्जुन मन्सूर, गायक. ● १९९६ - श्रीमती पद्मा चव्हाण नाट्य, चित्रपट अभिनेत्री. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *इस्रो ब्यालालु येथील ३२ मीटर अँटेनाचा वापर करुन विक्रम लँडरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे. ब्यालालु हे बंगळुरु जवळ असलेले इस्रोचे डीप स्पेस नेटवर्क सेंटर आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे देण्यात येणारा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जेष्ठ संगीतकार उषा खन्ना यांना जाहीर, ५ लाख रुपये, मानपत्र, स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी प्रसिध्दी पत्रकाच्या माध्यमातून या पुरस्काराची केली घोषणा* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *लातूरमध्ये गणेश विसर्जनाला दुष्काळाचा फटका, गणेशमूर्ती विसर्जित न करता दान करण्याचा गणेश मंडळांचा निर्णय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *मुंबई - केंद्र सरकारने लागू केलेला नवीन मोटार वाहन कायदा तुर्तास महाराष्ट्रात लागू होणार नसल्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी पत्रकार परिषदेत सांगितले* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इव्हीएम, मनुष्यबळासह सर्व पूर्वयारी पूर्ण - मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंग* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *नांदेड : देगलूर येथे अक्षर मानव कडून प्रसिद्ध साहित्यिक रामदास फुटाणे यांचा आज आणि उद्या दोन दिवसीय संवाद सहवास कार्यक्रम* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *धर्मशाळा : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला टी-२० सामना हिमाचल प्रदेशच्या धर्मशाळा मैदानावर खेळवला जाणार आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार रविवारी धर्मशाळेत ढगाळ वातावरण असेल, त्यामुळे संध्याकाळी पावसामुळे सामन्यात व्यत्यय येण्याची शक्यता* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ही बुलेटीन audioमध्ये ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे. https://b.sharechat.com/aBzlVb3tUZ ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *एकच ध्यास ; वाचन विकास* https://nasayeotikar.blogspot.com/2018/01/blog-post_6.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *गुरुत्वाकर्षण म्हणजे काय ?* 📙 गुरुत्वाकर्षण सर्वत्र असते. गुरुत्वाकर्षणाची ताकद वस्तूमानाप्रमाणे बदलत जाते, पण प्रत्येक गोष्ट स्वतःचे गुरुत्वाकर्षण राखून असते. त्याचा प्रभाव कदाचित लक्षात येईल, जाणवेल किंवा नाही, ही गोष्ट वेगळी. व्यवहारत: प्रत्येक वस्तू दुसऱ्या वस्तूवर गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव राखून असते, हे विधान समजावुन देणे अशक्य आहे. पण जरा वेगळ्या पद्धतीने हे पटू शकते. चंद्रावर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव आहे म्हणून तो तिच्या कक्षेत फिरतो, तर पृथ्वीवर सूर्याचे गुरुत्वाकर्षण प्रभाव ठेवून आहे. सूर्य आपल्या सर्व ग्रहांसह आकाशगंगेत आहे; कारण आकाशगंगेतील सुमारे लाखभर तारे एकमेकांवर गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव राखून आहेत. यात आपल्याला गुरुत्वाकर्षण जाणवते, ते फक्त पृथ्वीचे. याचा शोध न्यूटन यांनी लावला, हे ज्ञात आहेच. १६६५ साली वयाच्या केवळ २३ व्या वर्षी झाडाखाली बसलेले असताना सफरचंद खाली का पडते, या विचारातून गुरुत्वाकर्षणाबद्दलचा विचार त्यांनी पुढे मांडला. चालता चालता पाय घसरला, तर आपला तोल जातो. खुर्ची एका मर्यादेपलीकडे कलंडली, तर पडते. याचे कारण म्हणजे प्रत्येक वस्तूचा गुरुत्वाकर्षणामुळे निर्माण झालेला गुरुत्वमध्य एका मर्यादेपलीकडे ढळतो आहे, हेच आहे; कारण जणू काही त्या वस्तूचे वजन त्या बिंदूतच एकवटलेले असते. एखाद्या वस्तूच्या उंचीतील ओळंबा जेव्हा तिच्या पायाबाहेर जातो, तेव्हा हे घडते. आकाशगंगाच काय, पण विश्वातील अनेक वस्तू गुरुत्वाकर्षणामुळेच टिकून आहेत. ही प्रत्येक गोष्टीची मध्याकडे ओढ नसती, तर ज्या वस्तूमानाने, कणांनी प्रत्येक ग्रह, तारे बनले आहेत, ते वस्तुमान एकत्रच राहिले नसते. पृथ्वी विलक्षण वेगाने स्वतःभोवती फिरते, पण एवढे अवाढव्य समुद्राचे पाणी मात्र स्वतःच्या जागीच असते. इतकी उंच डोंगरशिखरे स्थिरच राहतात. पृथ्वीचे वातावरणही तिच्या वेगानेच फिरत राहते. याचेच कारण पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण. वस्तुमान व आकारमानाप्रमाणे गुरुत्वाकर्षणाची ताकद बदलते, हे तर प्रत्यक्षच सिद्ध झाले आहे. चंद्रावर गेलेल्यांचे वजन पृथ्वीवरच्यापेक्षा जेमतेम एकषष्ठांशच भरले होते. याउलट, पृथ्वीपेक्षा मोठ्या ग्रहावर जर यदाकदाचित माणूस पोहोचला, तर त्याचे वजन कितीतरी जास्त भरेल. ग्रहाच्या आकारमानाप्रमाणे तेथील वस्तूंचे वजन बदलेल. अवकाशात केल्यावर गुरुत्वाकर्षणरहीत अवस्थेत आपण असतो, असे अनेक वेळा म्हटले जाते. पृथ्वीभोवती कक्षेत फिरणार्‍या कोणत्याही वस्तूच्या बाबतीत ते खरे आहे. ज्याप्रमाणे उंचावरून पृथ्वीकडे झेपावतानासुद्धा पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण जाणवेनासे होते, वर वजनरहित अवस्था आहे, असे वाटत राहते, तशीच ही थोडीफार जाणीव असते. त्यालाच मायक्रोग्रॅव्हिटी म्हणता येईल. मायक्रोग्रॅव्हिटीत दैनंदिन व्यवहार किती कठीण असतात, ते अंतराळयानात वावरणाऱ्या अनेकांनी वर्णन केलेले आहेच. अन्न गिळणे, अंघोळ करणे, तोल राखणे, पाय जमिनीवर ठेवणे हेसुद्धा अंतराळात वावरताना अत्यंत कटकटीचे ठरते. अंघोळीसाठी विशिष्ट सूट घालून त्यातून पाणी शोषून घ्यावे लागते, तर अन्न पेस्टच्या स्वरुपात तोंडात कसेबसे गिळावे लागले. पाय तर जमिनीवर कधीच ठरत नाहीत. आणि हे सारे सांभाळत विविध कामे व प्रयोग पार पाडायचे असतातच. *'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *If you act to be happy, you will be happy.* *(जर तुम्ही आनंदी असण्याचा देखावा केला तर तुम्ही नक्कीच आनंदी व्हाल.)* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *जागतिक जलदिन केव्हा साजरा केला जातो ?* 22 मार्च 2) *भारतातील सर्वात मोठा व्याघ्र अभयारण्य कोणता ?* कार्बेट 3) *हिवताप कोणत्या डासांमुळे होतो ?* अनाफेलीस डास ( मादी ) 4) *चंद्रपूर जिल्ह्यात सर्वात जास्त आदिवासी जमात कोणती ?* गोंड 5) *लिएण्डर पेस हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?* टेनिस *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● शिवकन्या शशी ●  श्रीपाद चंद्रकांत कुलकर्णी ●  स्वप्नील पुलकंठवार ●  विकास पाटील जाधव ●  साईनाथ बोधूलवार ●  श्याम कांबळे ●  पुंडलिक बिरगले ●  शिवा शिवशेट्टी ●  साहिल सुगुरवाड ●  केतन जोशी *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जगात प्रचंड विविधता आहे. किंबहुना, विविधता हेच जगाचे सौंदर्य आहे. तीच मानवतेची ताकद आहे; परंतु दुर्दैवाने विविधता आणि विषमता यातील फरक लक्षात न घेतल्यामुळे मानवा-मानवांत जात, पात, धर्म, पंथ यावरून गटतट पडले आहेत. समाजाला एकत्र ठेवण्याऐवजी, मतलबी मंडळींनी स्वार्थासाठी समाजात भांडणे लावून दिली आहेत. त्यातून अतिरेकी विचाराची माणसे निर्माण झाली आहेत. त्यातून हिंसाचार वाढीला लागला आहे. विवेकाचा आवाज दाबला जात आहे. सज्जनांची पीछेहाट आणि दुर्जनांचा विजय होताना दिसत आहे.* *भारताला साधुसंतांचा देश म्हटले जाते. प्रचंड मोठी सांस्कृतिक परंपरा असलेला भारतीय माणूस मूलत: विचारी आहे. त्यामुळे फोलपट बाजूला ठेवून सार ग्रहण करणे त्याला सहज शक्य आहे. दोन धर्मांच्या तत्वज्ञानात अंतर असू शकते. धर्माच्या भाषा वेगवेगळ्या असू शकतात; परंतु कोणत्याही धर्माचा हेतू वाईट असू शकत नाही. रजनीश एकदा म्हटले होते, की, इश्क, प्रेम आणि अहिंसा हे एकाच मनोवृत्तीसाठी वापरलेले वेगवेगळे शब्द आहेत. वरवर विचार करणा-याला ते पटत नाही; पण खोलवर विचार केला असता हे पटायला लागते. आपल्या शरीराची ठेवण अलग अलग असू शकते, भाषा वेगवेगळ्या असू शकतात, परंतु आपल्या ह्रदयाची ठेवण, रक्ताचा रंग हे मात्र एकच असते. हे आपण पक्के ध्यानात ठेवायला हवे. मनुष्यजन्म दुर्मिळ आहे, त्याचा सदुपयोग करायला हवा.* *॥ रामकृष्णहरी ॥* 🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो* *दोस्त दोस्त ना रहा,प्यार प्यार ना रहा।* *जिंदगी हमे तेरा एतबार ना रहा।* *असे उदास चेहरे रस्त्या-रस्त्यावर* *हल्ली बघायला* *मिळतात.सन्मार्ग* *दाखवणारे वाटाडे कुठे दिसत नाही.* *आज, साधू साधनेत कमी आणि* *साधनात जास्त प्रमाणात* *वावरतांना आपण* *पाहतो.फक्त पाहत नाही तर त्याच्या* *अंधश्रधारूपी विषारी* *वृक्षांना खत पाणी घालतो आणि* *आपल्याच विनाशासाठी* *वाढवतो.तारूण्य आणि संगत यांचे* *महत्व विशद करताना* *डॉ* *.कलाम 'आपले मित्र, चित्र आंणि* *चरित्र नेहमी पवित्र ठेवा; असे सांगतात.कारण तेच खरे जीवनाचे* *अस्त्र आहे. तुम्हाला तर हे माहित आहे की., चारित्र्याचे पतन* *होण्यासाठी बहुधा चुकीचे मित्र आणि चुकीचे चित्र यांचाच हात* *असतो. चुकीचे मित्र आणि चुकीचे चित्र हेच चारित्र्य नष्ट* *करण्याचे शस्त्र आहे किंवा असेही म्हणता येईल की, कधीही न चुकणारे* *ब्रम्हास्त्र आहे.' तारुण्याच्या सळसळत्या उर्जेवर* *स्वार्थी व्यवस्थांचा डोळा असतो. त्यामुळेच तारूण्याची ऊर्जा सैरभैर* *करून तिला आपल्या इच्छेप्रमाणे वापरण्याचे धूर्त* *राजकारण या स्वार्थी व्यवस्था करत असतात. तारुण्याच्या ऐन उमेदीचा* *कालखंड निरर्थकपणे या स्वार्थी व्यवस्थेच्या नेतृत्वामागे* *घालविला जातो.** *एखादी पाण्याची बाटली वापरून फेकून द्यावी, त्या पद्धतीने तरुणांच्या ऊर्जेचा वापर करून त्यांना शेवटी फेकून दिले जाते. सर्व बाजूंनी निष्क्रिय केलेल्या तरूणांवर शेवटी पश्चात्तापाची वेळ येते. तारूण्याचे रखरखीत वाळवंट होते. आपले तारूण्य विवेकशून्य व्यवस्थेच्या हाती द्यायचे की, स्वत:वर विश्वास ठेवत स्वकर्तृत्वाच्या बळावर समाज जीवनात उजळवून टाकायचे हे ज्याला समजले, त्याला तारुण्याचा खरा अर्थ कळला. माजी राष्ट्रपती डाॅ. ए.पी.जे. अब्दुल कलाम हे युवकांना देशाची संपत्ती म्हणायचे, ही संपत्ती देशासाठी आपत्ती ठरू नये म्हणून तरूणांनी आपले मित्र विचारपूर्वक निवडावेत.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्यांच्याकडे धन,संपत्ती,ऐश्वर्य,नोकरचाकर आणि अभिमान आहे तो फार श्रीमंत आहे असे काहींना वाटत असेल तर ते चुकीचे आहे त्यापेक्षा ज्यांच्याकडे आई-वडील आहेत,तो निरंतर त्यांची सेवा करतो,त्यांचे मन कधीही दुखवत नाही,त्यांना वंदन करुन दैनंदिन कामाला लागतो,रक्ताच्या नात्याबरोबरच इतरांसोबत माणुसकीची नाती ही जपतो, इतरांच्या सुखदु:खात सहभागी होतो, वेळप्रसंगी मदतीचा हातही पुढे करतो आणि त्याला कशाचाही गर्व नाही अशी व्यक्ती या जगात फार श्रीमंत आहे आणि भाग्यवानदेखील आहे. ©व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आचार्य विनोबा भावे* भूदान चळवळीच्‍या काळातील ही गोष्‍ट आहे. या चळवळीचे प्रणेते आचार्य विनोबा भावे होते. त्‍यांची पदयात्रा सुरु होती. आपल्‍या काही शिष्‍यांसह विनोबाजी मीराजींच्‍या आश्रमात थांबले होते. अल्‍पशा विश्रांतीनंतर त्‍यांची पदयात्रा पुन्‍हा सुरु झाली. त्यावेळी ते हरिद्वारकडे चालले होते. विनोबाजींची प्रकृती थोडी ठीक नव्‍हती. त्‍यांची कंबर आणि पाय दुखत होते. त्‍यामुळे त्‍यांना खुर्चीत बसवून नेण्‍यात येत होते. मध्‍ये मध्‍ये खुर्चीतून उतरून पायी चालायचे. तेव्‍हा एक शिष्‍य त्‍यांच्‍याजवळ येऊन म्‍हणाला,'' बाबा, मला खूप राग येतो, मी काय करावे'' विनोबाजी म्‍हणाले,'' मी लहान असताना मलाही खूप राग यायचा, मग माझ्याजवळ मिश्री असायची ती मी तोंडात ठेवायचो, परंतु कधीकधी ती ही नसायची'' मग तुम्‍ही काय करत होता असे त्‍या व्‍यक्तीने विचारले. विनोबाजी म्‍हणाले,'' मी यावर खूप विचार केला, मग माझ्या मनात एक गोष्‍ट आली. जेव्‍हा आपल्‍या मनाविरूद्ध एखादी गोष्‍ट आली जेव्‍हा आपल्‍या मनाविरूद्ध गोष्‍ट घडली तर लगेच नाराज होतो जर तो क्षणच आपण टाळला तर रागावर विजय मिळवू शकतो. आनंद आणि नाराजी यावर आपण तेव्‍हाच प्रकट करतो तो पहिलाच क्षण आपल्‍यावर वरचढ ठरू पाहतो. तो क्षण टाळणे कठीण आहे. पण मनन करून तो टाळता येतो. मी यावर खूप मनन केले, यामुळेच जीवनात कितीही मोठी आपत्ती आली तरी मी संयम ढळू दिला नाही.'' *तात्‍पर्य :- विचारपूर्वक उचललेले पाऊल आयुष्‍याला योग्‍य दिशा देते.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

*माझी शाळा माझे उपक्रम* *हस्ताक्षर स्पर्धा* ✍ आज दिनांक ११-०९-२०१९ रोजी इयत्ता दुसरीतील विद्यार्थ्यांची (वर्गपातळीवर) हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धा घेताना विद्यार्थ्यांना वेळ देण्यात आली. व त्यानुसार विद्यार्थ्यांनी लेखन केले. स्पर्धेत सर्व सहभागी विद्यार्थ्यांच्यापैकी प्रथम व व्दितीय क्रमांक देऊन त्यांना बक्षिसही लगेचच देण्यात आले. प्रथम क्रमांकः कु.सोजल ढगे प्रथम क्रमांकः युवराज चंद्रवंशी व्दितीय क्रमांकः आनंद वाघमारे. या विद्यार्थ्यांनी पटकावले. *✍उद्दिष्ट* 👉विद्यार्थ्यांना लेखनाची आवड निर्माण व्हावी, 👉 व्याकरण चुका होऊ नये. 👉 अक्षर सुधारणा. 〰〰〰〰〰〰〰 *शब्दांकन* प्रमिला सेनकुडे (स.शि.) जि.प.प्रा.शा.गोजेगाव ता.हदगाव जि.नांदेड. 〰〰〰〰〰〰

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 11/09/2019 वार - बुधवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १९४८ - आदल्या दिवशी झालेल्या मोहम्मद अली झीणाच्या मृत्यूचा फायदा घेउन भारतीय लष्कराने हैदराबाद संस्थानावर चाल केली व हैदराबाद मुक्त केले २००२ - 'मेटसॅट' या भारताच्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण 💥 जन्म :- १८९५ - आचार्य विनोबा भावे १९१३ - जेसी ओवेन्स, अमेरिकन धावपटू 💥 मृत्यू :- १९५२ - सवाई गंधर्व उर्फ रामभाऊ कुंदगोळकर १९८० - सतीश दुभाषी रंगभूमी, चित्रपटसृष्टीतील अभिनेते. १९९२ - पंडित मल्लिकार्जुन मन्सूर, गायक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *बेंगळुरू : भारताच्या चांद्रयान मोहिमेतील लँडर विक्रम चंद्रापासून 2 किमी अंतरावर असताना संपर्क तुटला. लँडर विक्रमशी संपर्क साधण्यासाठी इस्त्रो घेणार अमेरिकन अंतराळ संस्था नासाची मदत * ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *नवी दिल्ली - स्वित्झर्लंडच्या जिनिव्हा येथील संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेच्या बैठकीत भारताने पाकिस्तानकडून काश्मीरबाबत करण्यात आलेल्या आरोपांचे केले खंडन* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *मुंबई - मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाच्या 100 दिवसांत शेअर बाजारातील गुंतवणुकदारांना साडे बारा लाख कोटी रुपयांचे झाले नुकसान* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *वाशीम जिल्ह्यातल्या दुर्गम आठ गावांमध्ये तब्बल 72 वर्षींनी पोहोचली वीज* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *पुणे शहर आणि परिसरात आजपासून तीन दिवस हलक्या सरींच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *पणजी : दक्षिण गोव्यातील रिवण येथील 16 वर्षीय प्रियव्रत पाटीलने सर्वात कमी वयात 'महापरीक्षा' उत्तीर्ण होत इतिहास रचला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचं ट्विटरद्वारे अभिनंदन करत पाठ थोपटली आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *न्यूयॉर्क : रफाल नदालने अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा जिंकत कारकिर्दीतील १९वे ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावले आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ या बुलेटीनची audioऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे. https://sharechat.com/post/Mv85XrK ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *प्रत्येक शाळेला संरक्षण भिंत हवे* https://nasayeotikar.blogspot.com/2018/01/blog-post_15.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *गरम पाण्याचे झरे* 📙 हिमालयात प्रवासाला जाणारे परतल्यावर नेहमीच एक आश्चर्याचा किस्सा सांगतात. गंगोत्रीच्या वाटेवर वाटेत काही कुंडे लागतात. कुडकुडणारी थंडी, दूरवर डोंगरमाथ्यावर सफेद बर्फाचे थर आणि या कुंडातून मात्र पाण्यातून चक्क वाफा निघत असतात. हात बुडवला तर चटका बसतो. एवढेच नवे अनेक जण जवळचे तांदूळ त्या पाण्यात काहीवेळा कापडी पुरचुंडी बांधून धरतात व आयता शिजलेला भात खातात. हे पाणी काढून मनसोक्त आंघोळ करण्याचा मोहही कोणी आवरून धरत नाही. असाच पण जरा वेगळा अनुभव वज्रेश्वरीला महाराष्ट्रात येतो. पण येथील झऱ्यांचे पाणी गंधक मिश्रित उग्र वासाचे आहे. येथील उष्ण पाण्यात अंघोळ करून निसर्गोपचार करून घेणाऱ्यांचीही कायम गर्दी उसळलेली असते. जगात असे गरम पाण्याचे कित्येक झरे आहेत. तसेच फक्त वाफेचेही झरे आहेत. वाफेच्या झर्‍यातून फक्त जोरात वाफ उसळून एखाद्या प्रेशरकुकरप्रमाणे तेथे शिट्टीचा आवाजही येत राहतो. या सगळ्या प्रकाराचे मूळ भूगर्भात खोलवर घडणाऱ्या घडामोडीत आहे. सुमारे तीस एक किलोमीटर खोलीवर तप्त मध्यावरणाचा पाण्याच्या वाहत्या साठ्याशी संबंध येतो. तिथे वाफ कोंडू लागते. या वाफेच्या दाबाने जमिनीतील खडकातील काही भेगांतून मार्ग काढला जाऊ शकतो. त्यातूनच हे झरे निर्माण होतात. काही ठिकाणी ज्वालामुखीच्या मुखापासून काही ठराविक अंतरावर प्रथम वाफेचे व नंतर गरम पाण्याचे झरे सलगपणे आढळतात. पण अनेक ठिकाणी ज्वालामुखीचा अलीकडच्या ज्ञात काळात कधीच संबंध आलेला नसतो. हेही लक्षात घ्यायला लागेल. यातही एक मोठा फरक आहे. वाफेचे झरे मधूनमधून नाहीसे होतात, पण गरम पाण्याचे झरे मात्र सलगपणे वर्षानुवर्षे उकळताना दिसतात. काही झर्‍यांत गंधकाचा अंश सापडतो. ते नक्कीच ज्वालामुखीच्या उगमाशी संबंधित असावेत असा संशय घ्यायला जागा आहे. पृथ्वीचा गाभा अत्यंत गरम आहे मध्यावरणही अतितप्त आहे. पण बाह्यावरणाचा काही भाग बऱ्याच ठिकाणी भरपूर गरम आहे असेही लक्षात आले आहे. आईसलँड, न्यूझीलंड येथील काही भागात जेमतेम एक ते तीन किलोमीटर अंतर खोलवर बोअरिंगचे छिद्र पाडले असता भूगर्भातील गरम पाणी व वाफ मिळवता येते असा अनुभव आहे. जरी एवढे खोल छिद्र पाडणे अत्यंत महागडे असले तरी यातून मिळणारी ऊर्जा ही अनेक वर्षे पुरणार असल्याने हा खर्च परवडतो. हे गरम पाणी वा वाफ वापरून घरे उष्ण ठेवण्याचा वा विद्युतनिर्मिती उद्योग यातूनच केला जातो. येथेही गमतीचा भाग कसा आहे बघा. आइसलँड व न्यूझीलंडसारख्या थंड प्रदेशातही निसर्गाने ही सोय करून ठेवली आहे. *'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *“ एक चागंली माता शंभर शिक्षकांच्या मोलाची असते. ”* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *'राष्ट्रीय युवक दिन' केव्हा साजरा केला जातो ?* 12 जानेवारी 2) *विधानसभेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?* 5 वर्ष 3) *विधानसभेच्या सदस्याला काय म्हणतात ?* आमदार 4) *महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोठे होते ?* नागपूर 5) *राज्याचा प्रमुख कोण असतो ?* राज्यपाल *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● प्रशांत करखेलीकर ●  सुनील महामुनी ●  प्रशांत कोकाटे ●  कांचन जोशी ●  दिगंबर वंगरवार ●  ऋषीकेश बच्छाव ●  अमोल पाटील ●  गणेश यादव ● भगवान वाघमारे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *एक छोटी कथा सांगितली जाते. एका दुष्काळी प्रदेशातील एक दुष्काळी गाव. नद्या, विहिरी आटलेल्या, पाण्यासाठी दशदिशा, आम्हा फिरविशी जगदीशा...अशी अवस्था. पावसाळा सुरू होतो. पाऊस काही येईना. शेवटी सगळा गाव एकत्र येतो. गंभीर परिस्थितीवर गंभीर चर्चा होते. उपाय सुचविले जातात. शेवटचा प्रयत्न म्हणून गावालगतच्या डोंगरावर जाऊन पावसासाठी देवाची प्रार्थना करायचे ठरते. सारा गाव ठरल्याप्रमाणे एकत्र येतो. थकलेली, तहानलेली पावलं नव्या उमेदीनं डोंगराकडे चालायला लागतात.* *या सर्व मोठ्या माणसांमध्ये एक मुलगा हातात छत्री घेऊन चालत असतो. या मुलाकडे बघून सर्वांना आश्चर्य वाटते. पावसाचा टिपूस नाही. येण्याची शक्यताही नाही आणि हा चिमुरडा सोबत छत्री घेऊन आलाय. शेवटी एकजण त्या चिमुरड्याला विचारतो..'बाळा, तू ही छत्री सोबत आणलीस?' छोटा मुलगा उत्तरतो. 'पावसासाठी प्रार्थना करायला आपण डोंगरावर जात आहोत आणि मी प्रार्थना केल्यावर पाऊस येणारच आहे. म्हणून मी छत्री सोबत घेतलीय.' हा स्वत:च्या प्रार्थनेवरचा ठाम विश्वास! एकूण दुसरं पाऊल पडणार आहे. या विश्वासावरच पहिलं पाऊल उचलावं लागतं.* 〰 ‼ *रामकृष्णहरी* ‼ 〰 🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻 *संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो,* *संत कबीर वृत्तीने फकीर पण* *सामान्यांची बनवून गेले तकदीर।* *ते म्हणत--* *कबीर गाफील क्यों फिरय,* *क्या सोता घनघोर* *तेरे सिराने जाम खड़ा,* *ज्यों अंधियारे चोर ।* *महात्मा कबीर मृत्यूची आठवण* *करून देतात. हे मानवा* *तुला असा दुर्मिळ मनुष्य* *जन्म मिळालेला असताना तू असा गाफिलासारखा का फिरत* *आहेस ? कोणत्या* *घणघोर अंधार्‍या काळ कोठडीत तू* *स्वतःला जखडून घेत आहेस ?* *कुठल्याही संपत्तीच मोल* *देवूनही हा जन्म परत* *मिळणारा नाही . तुला मिळालेले* *ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रिये तुझ्या* *मुक्तीसाठीच विधात्याने दिलेली सर्वात* *महान भेट आहे. इत्तर* *प्राण्यांपेक्षा तू विधात्याला अधिक* *प्रिय म्हणून बुद्धी व बोलीचं* *अधिकचं वरदान तुला दिलं* *तर तू त्या वैभवाचा वापर* *करून या सृष्टीचा स्वर्ग करण्यासाठी* *धडपडायला* *पाहिजेस ! स्वर्ग निर्माणाचं जाऊ दे ,* *किमान या सृष्टीला तरी विद्रुप* *करण्याचं कुकर्म करू* *नकोस ! हे वैविध्याने भरलेले जग* *तुझ्याचसाठी आहे .याच्याकडे* *डोळे उघडे ठेवून* *पाहिलेस. त्याच्या रचनेला* *धक्का न देता त्याचा मानव* *कल्याणासाठी वापर करून घेतलास* *तर भविष्य सुंदर, नाही तर* *निसर्ग प्रकोप ठरलेलाच.* *तू* *कितीही सावध वागण्याचा* *प्रयत्न करीत असलास* *तरी हा मृत्यू रूपी चोर* *तुझ्यावर सारखी पाळत ठेवून* *आहे. तू भौतिक सुखसोयींचा* *कितीही आधार* *घेतलास तरी काचेच्या बंदिस्त* *महालातूनही तुझ्यातल्या चैतन्यरूपी* *आत्म्याला तो* *कोणत्याही क्षणी उचलल्याशिवाय* *राहाणार नाही.* *तेव्हा तू ज्या शरीर व रूपाला* *मोहवून हुरळून जातोस* *त्यापेक्षा सृष्टीकडं पाहाण्याची दिव्य* *दृष्टी देणार्‍या आत्मदृष्टीची* *जडणघडण चांगली* *होण्यासाठी मनाचा निकोप* *विकास होणे गरजेचे आहे.* *सुंदर मनेच सुंदर सुष्टी देवू* *शकतात. तेव्हा अज्ञानाचा* *अंधःकार दूर करून सत्यरूपी ज्ञान* *जाणून घे.* *या मधुर रचनेत कुठेही अंधश्रद्धा नाही* *तर कर्म व ज्ञान यांचा संयोग* *कबिरांनी दोन ओळीत* *सांगितला. समजून आचरणात* *आणता आले तर बघा।* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्यांनी आपल्या जीवनात कधीही असत्याला थारा दिला नाही,मनात कुणाचेही वाईट चिंतले नाही, इतरांकडे कधी वक्रदृष्टीने पाहिले नाही,दुस-या चे ते माझे कधी म्हटले नाही,कधीही कशाची मनात लालसा ठेवली नाही,कधीही कुणासोबत स्पर्धा केली नाही,जीवनात जे काही करायचे ते आपल्या प्रयत्नाने करायचे,जे काही शक्य आहे ते आपण मन लावून करायचे,जे काही मिळेल त्यात समाधानाने स्वीकारायचे असे गुण ज्यांच्या जीवनात परिपूर्ण आहेत तीच माणसे आपल्या जीवनात सुखी व समृद्ध होऊ शकतात आणि तीच माणसे इतरांना आपल्या जीवनासारखे जीवन जगण्यासाठी प्रेरीत करतात आणि आपणही त्यांचे गुण आत्मसात करून चांगले जीवन जगण्याचा मार्ग स्वीकारला पाहिजे तरच आपल्या जीवनाचे खरे कल्याण होईल. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🌾🌹🌾🌹🌾🌹🌾🌹🌾🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *एक गुरूंच्‍या घरी एक शिष्‍य मनोभावे गुरुंची सेवा करून शिक्षण घेत होता. त्‍याच्‍या या सेवेमुळे गुरु त्‍याच्‍यावर प्रसन्न होते. शिक्षण् पूर्ण झाल्‍यावर विद्यार्थी घरी जाण्‍यासाठी निघाला तेव्‍हा गुरुंकडे त्‍याने जाण्‍याची आज्ञा मागितली तेव्‍हा गुरुंनी त्‍याला आशीर्वाद म्‍हणून एक आरसा भेट दिला व सांगितले की, हा दिव्‍य आरसा (दर्पण) असून यात मानवी मनात चालणारे विचार प्रगट होऊन दिसतात. विद्यार्थी मोठा आनंदीत झाला. हा आरसा खरेच कार्य करतो की नाही याची शहानिशा करण्‍यासाठी त्‍याने लगेच आपल्‍या गुरुंसमोर हा आरसा धरला व गुरुंच्‍या मनात कोणते भाव आहेत, दुर्गुण आहेत हे पाहू लागला आणि गुरुंच्‍या समोर आरसा धरताच त्‍याच्‍या चेह-यावरचा रंग पार उडाला कारण तो आरसा गुरुंच्‍या अंतकरणात मोह, अहंकार, क्रोध आदि विकार दाखवित होता. त्‍याला याचे फारच दु:ख झाले की आपण ज्‍या गुरुची मनोभावे पूजा केली, ज्‍यांना पूर्ण ईश्र्वराचा दर्जा दिला त्‍यांच्‍या मनातही विकार आहेत, ते सुद्धा मानवी विकारापासून अजून सुटलेले नाहीत याचे त्‍याला वैषम्‍य वाटले. तो गुरुंना काहीच न बोलता तो आरसा घेवून गुरुकुलातून निघाला, रस्‍त्‍यात भेटणा-या प्रत्‍येकाच्‍या मनातील भाव पाहणे हे त्‍याचे कामच झाले होते. गावी परत जाताच त्‍याने आपल्‍या प्रत्‍येक परिचिताबरोबर हा प्रयोग करून पाहिला. त्‍याला प्रत्‍येकाच्‍या हृदयात कोणता ना कोणता दुर्गुण दिसून आला. शेवट त्‍याने आपल्‍या जन्‍मदात्‍या आई वडीलांच्‍या समोरही हा आरसा ठेवला. ते दोघेही पण त्‍यातून सुटले नाहीत. त्‍यांच्‍या हृदयात पण त्‍याला काही ना काही दुर्गुण दिसले. शेवटी या गोष्‍टीचा त्‍याला मनोमन राग आला व तो गुरुकुलातील गुरुंकडे धावला. गुरुंपाशी जाऊन मोठ्या विनम्रपणे तो म्‍हणाला,’’ गुरुदेव, मी आपण दिलेल्‍या या आरशातून प्रत्‍येकाच्‍या मनात, हृदयात, अंत:करणात डोकावून पाहिले आणि मला असे जाणवले की प्रत्‍येकाच्‍याच मनात काही ना काही विकार आहेच, काही ना काही दोष आहे. एखाद्याच्‍या मनात कमी तर कुणाच्‍या मनात जास्‍त असे विकार, दोष भरून राहिले आहेत. हे पाहून मी फार दु:खी झालो आहे, कृपया मला मार्गदर्शन करा.’’ गुरुंनी काहीच न बोलता तो आरसा फक्त त्‍याच्‍याकडे केला आणि काय आश्र्चर्य त्‍याला त्‍याच्‍या मनाच्‍या प्रत्‍येक कोप-यात राग, द्वेष, अहंकार, क्रोध, माया आदि दुर्गुण भरून राहिलेले दिसले. गुरुजी म्‍हणाले,’’ वत्‍सा, हा आरसा मी तुला तुझे दुर्गुण पाहून ते कमी करण्‍यासाठी दिला होता पण तू दुस-यांचे दुर्गुण पाहत बसलास आणि नको तितका वेळ खर्च केलास, अरे याच कालात जर तू जर स्‍वत:चे अवलोकन केले असते तर तुला तुझ्यातील दुर्गुण सुधारता आले असते. याच काळात तु एक असामान्‍य व्‍यक्ती झाला असता. मानवाची ही कमतरता आहे, कमजोरी आहे की तो दुस-यातील दुर्गुण पाहत बसतो आणि स्‍वत:ला सुधारण्‍याचा प्रयत्‍नही करत नाही. हेच या आरशातून मला तुला शिकवायचे होते. जे तुला शिकता आले नाही.’’* *तात्‍पर्य – आपण नेहमीच दुस-या व्‍यक्तीचे दुर्गुण बघतो, त्‍यावर टीका करतो पण आपल्‍यातील दुर्गुणांवर आपले कधीच लक्ष जात....* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 09/09/2019 वार - सोमवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- ◆१९९४ - सचिन तेंडुलकरने श्रीलंकेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपल्या एकदिवसीय क्रिकेटमधील कारकिर्दीतले पहिले शतक ठोकले 💥 जन्म :- ◆१९४१ - डेनिस रिची, अमेरिकन संगणकशास्त्रज्ञ. ◆ १९६७ - अक्षय कुमार, हिंदी चित्रपट अभिनेता. ◆ १९७४ - विक्रम बात्रा, भारतीय थलसेना अधिकारी. 💥 मृत्यू :- ◆२०१० - वसंत नीलकंठ गुप्ते, मराठी कामगार चळवळ कार्यकर्ते, लेखक. ◆ २०१५ - दत्तात्रय हेलसकर, जालना *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *बंगळुरू : भारताच्या चांद्रयान मोहिमेत अखेरच्या क्षणी संपर्क तुटलेल्या लँडर विक्रम सापडले असल्याची माहिती इस्रो प्रमुख के सिवन यांनी दिली आहे. * ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *महाबळेश्वर ठरले देशातील सर्वांत जलमय स्थान, तब्बल 7 हजार 631 मिमी पावसाची नोंद, चेरापुंजी आणि मॉसिनरामलाही टाकले मागे* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *इस्लामाबाद : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना आइसलॅंड दौऱ्यावर जाण्यासाठी पाकिस्तानच्या एअरस्पेसमधून जाण्यासाठी परवानगी मागण्यात आली पण पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने ही मागणी फेटाळली आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी याबद्दल दिली माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *मुंबई: शिक्षक-शिक्षकेतर तसेच, शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसह विविध प्रलंबित प्रश्‍नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी विविध शिक्षक संघटनांनी आज एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला आहे. यामुळे राज्यातील शाळा बंद राहण्याची शक्‍यता आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *वैद्यकीय शिक्षकाना रडारवर आणण्यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सर्व वैद्यकीय महाविद्यालयातील शिक्षकांना व विद्यार्थ्यांनाही बायोमेट्रिक हजेरी केली सक्तीची* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *नवी दिल्ली - ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांचे निधन, दिल्लीतील राहत्या घरी त्यांनी घेतला अखेरचा श्वास, मृत्यूसमयी ते 95 वर्षाचे होते.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारत ‘अ’ आणि दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघांमधील पहिल्या कसोटी सामन्यास आजपासून प्रारंभ होत असून, सातत्यपूर्ण धावा करणाऱ्या शुभमन गिलला निवड समितीचे लक्ष वेधण्याची संधी मिळेल.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बुलेटीन audio स्वरूपात ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे. https://b.sharechat.com/ID2NLkIuPZ ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *एक पाऊल स्वच्छतेसाठी ......!* भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी म्हणत, ' प्रत्येक कामाची सुरुवात स्वच्छतेपासून करावी. ' ......... https://nasayeotikar.blogspot.com/2018/03/blog-post_25.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *क्लोरीन म्हणजे काय ?* 📙 खाण्याचे मीठ व पिण्याच्या पाण्याची शुद्धता या दोन महत्वाच्या गोष्टी क्लोरीनमुळेच शक्य झाल्या आहेत. क्लोरीन हा वायू स्वरूपात मिळवला व साठवला जातो. मात्र नैसर्गिकरित्या क्लोरीन आढळत नाही. सोडियम बरोबर त्याचे संयुग पटकन बनते. त्यालाच आपण मीठ म्हणतो. ‍१७७४ साली शील यांनी त्याचा शोध लावला. फिकट हिरव्या रंगावरून ग्रीक भाषेतील क्लोराॅस या शब्दावरून त्याचे नाव पडले आहे. क्लोरीन हा वायू मुख्यतः पाणी शुद्ध करण्याच्या ब्लिचिंग पावडरमध्ये वापरला जातो. त्याच्यामुळे पाण्यातील जंतू मरतात व मुक्त झालेला क्लोरिन हवेत मिसळतो. अगदी सहज पूर्ण झालेल्या या प्रक्रियेमुळेच आपण मोठ्या प्रमाणावर पाण्याचे शुद्धीकरण करून गावे, शहरे, महानगरे यांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करू शकतो. क्लोरिनचे अनेक औद्योगिक उपयोगही आहेत. क्लोरीनचा गैरवापर करून पहिल्या महायुद्धात शत्रूच्या सैनिकांवर त्या वायूचा मारा केला गेला होता. फुप्फुसदाहाने त्यांचा त्यात मृत्यू ओढवला. कोणत्याही जिवंत प्राण्यांसाठी क्लोरीन हा अतिशय घातक वायू आहे. मात्र संयुग स्वरूपातील त्याची उपयुक्तता वादातीत ठरावी. माणसाच्या खाण्यातील एक अत्यावश्यक घटक म्हणजे मीठ. शरीरातील सोडीयमचा साठा अनेक शरीरातील क्रियांना मदत करतो. असा हा घटक म्हणजे सोडियम व क्लोरीनचे संयुग होय. भूल देण्यासाठी कित्येक दशके वापरले गेलेले क्लोरोफार्म हे द्रव्यही क्लोरीनचेच संयुग. क्लोरिनमुळे अनेक पदार्थांचे ऑक्सिडेशन होते. त्यामुळे अनेक रंग, डाग यांचा रंगीतपणा जातो. कपड्यांना नवीन रंग देण्यापूर्वी, कपडे स्वच्छ करण्यासाठी ब्लिचिंग पद्धतीच्या प्रक्रियेत याचा वापर केला जातो. हायड्रोक्लोरिक अॅसिड मध्ये क्लोरिन असतो व विद्राव्य म्हणून त्याचा वापर अनेक उद्योगांत केला जातो. कार्बनबरोबरचे त्याचे संयुग कार्बनटेट्राक्लोराईड एक उत्तम विद्राव्य आहे. त्याचा वापर आग विझवण्यासाठी केला जातो. क्लोरीनची निर्मिती इलेक्ट्रोलायसिस पद्धतीने केली जाते. समुद्राचे पाणी किंवा पोटॅशियमबरोबरची त्याची निसर्गात सापडणारी संयुगे यांचा वापर त्यासाठी केला जातो. एका परीने या वायूचा शोध हा मानवी प्रगतीला लागलेला मोठा हातभारच आहे, यात शंका नाही. *'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *“ जो माणूस स्वतःला सुखी समजत नाही तो कधीच सुखी नसतो. ”* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *'जागतिक साक्षरता दिवस' केव्हा साजरा केला जातो ?* 8 सप्टेंबर 2) *'जागतिक साक्षरता दिवस' कोणत्या वर्षीपासून साजरा केला जातो ?* 1966 3) *रयत शिक्षण संस्थेचे ब्रीदवाक्य कोणते ?* स्वावलंबी शिक्षण 4) *स्वामी विवेकानंद यांच्या गुरुचे नाव काय ?* रामकृष्ण परमहंस 5) *गगन नारंग हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?* शुटींग *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● गणेश कल्याणकर, नांदेड ●  महेश ठाकरे ●  पंढरीनाथ डोईफोडे येवतीकर ●  श्रीकांत पाटील ●  उमाकांत कोटूरवार ●  गंगाधर गुरलोड ●  मारोती ताकलोर ●  अर्षद खान ● किशन माटकर ● रमेश पेंडकर *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *यज्ञ, विवाह, ई. धार्मिक विधींचे वेळी अग्रपूजेचा-म्हणजे प्रथम -पूजेचा मान कोणत्या देवाला द्यावा, याबद्दल एकदा देवांमध्ये वाद सुरु झाला. प्रत्येकाला हा मान आपल्याला मिळावा असे वाटू लागले.अखेर हा तंटा ब्रम्हदेवांकडे गेला असता, ते म्हणाले, 'आपण कुणाही एका देवाला अग्रपूजेचा मान दिला, तर इतर देव नाराज होतील. तेव्हा हा निर्णय कसा घ्यावा, याचा मी एक मार्ग सुचवतो. जो देव या पृथ्वीला प्रदक्षिणा घालून सर्वात अगोदर माझ्याकडे येईल, त्याला हा अग्रपूजेचा मान बहाल केला जावा.'सर्वच देवांना हा तोडगा मान्य करावा लागला. मग प्रत्येकजण आपापल्या वाहनांवर स्वार होऊन, पृथ्वी प्रदक्षिणेला निघाला. कुणी वाघावर, कुणी गरुडावर तर कुणी मोरावर.* *श्रीगणेशाने विचार केला 'आपलं वाहन उंदीर, एकतर त्यावर बसून पृथ्वी प्रदक्षिणा करणं अशक्य आणि दुसरं म्हणजे ते शक्य झालंच, तरी या स्पर्धेत विजयी होणं हे त्याहूनही अशक्य!' हा विचार मनात येताच त्याला एक युक्ती सुचली. त्याबरोबर तो घरी गेला व पार्वतीला म्हणाला, 'आई, तू थोडा वेळ बाबांजवळ जाऊन बसतेस का? 'पार्वती म्हणाली, 'ही रे काय थट्टा आरंभलीस? 'यावर शंकर म्हणाले,'तो सांगतोय तर येऊन बैस ना तू माझ्याजवळ. पार्वती शंकराजवळ जाऊन बसताच, गणेश त्या दोघांना सात प्रदक्षिणा घालून पुन्हा ब्रम्हदेवाकडे आला, हा स्थूलदेही गणपती पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करुन एवढ्या लवकर कसा परत आला, असा ब्रम्हदेवांना प्रश्न पडला, पण गणेशाने आपण योजलेल्या युक्तीची माहिती देताच ब्रम्हदेवांना त्यांच॔ म्हणणं मान्य करावं लागलं. सर्व देवांपुढे उभे राहून ब्रम्हदेव म्हणाले, 'आई ही पृथ्वीस्वरुप असून, वडील नारायणस्वरुप आहेत. त्यामुळे त्यांना घातलेली प्रदक्षिणा ही पृथ्वीप्रदक्षिणेपेक्षाही श्रेष्ठ आहे. महाबुध्दीवान गणेशाने त्याच्या आई-वडिलांना एकच नव्हे, तर सात प्रदक्षिणा घातल्या व तो सर्वांच्या आधी मजकडे आला; म्हणून अग्रपूजेचा अधिकारी 'श्रीगणेश' असल्याचा निर्णय मी देत आहे.'* ••●‼ *श्रीगणेशाय नम:*‼●•• ☘☘☘☘☘☘☘☘☘ *संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल- 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रानो,* *काल चांद्रयान मोहिमेच्या निमित्ताने भारताच्या इतिहासात पुन्हा एक* *सोनेरी मुकुट खोवतांना नियतीने घात केला.* *परंतु म्हणावेसे वाटते ,भारतमाते पुत्र* *शहाणे अमित तुला लाभले।* *तुझ्या कुशीत परि जन्मली सारी* *वेडी मुले।* *खरंय ,आजपर्यंत माझ्या देशाला* *अभिमानाने उंचीवर नेऊन* *ठेवणारे प्रत्येक क्षेत्रातील* *महामानव लाभले.* *स्वामी विवेकानंदानी भारताच्या संस्कृतीचे दर्शन जगाला घडविले.* *तसेच मा.मोदीजींनी कालचा दिवस संपूर्ण भारतीयांच्या मनात एक* *अविस्मरणीय जागा ध्रुवताऱ्या* *सारखी करून ठेवली.* *बंधू-भगिनींनो--हार-जीत तो* *बहादूरके किस्मत को दो सितारे होते* *है।* *हे 56 इंच छातीच्या माणूस* *उभा* *करणाऱ्या अवलियाने* *काल आपल्या उक्ती* *आणि कृतीतून दाखवून दिले.* *मोदींचे संपूर्ण प्रेरणादायी भाषण* *अपयशी मनाला उभारी* *देण्याचा उत्तम वस्तुपाठ आहे .* *नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले, ‘‘जीवनात* *चढ उतार येतच* *असतात. प्रत्येक संघर्ष, प्रत्येक नवे* *आव्हान आपल्याला नवे काही* *शिकवून जाते. नव्या* *गोष्टींसाठी पुन्हा प्रवृत्त करते. त्यामुळे* *आपले चंद्रावर जाण्याचे* *स्वप्न आणखी प्रबळ झाले* *आहे. त्यामुळे इस्रोमधील* *शास्त्रज्ञांनी खचून जाण्याची गरज* *नाही.* *इस्रोमधील शास्त्रज्ञांच्या कामाचा* *गौरव करताना ते म्हणाले,* *मंगळावर प्रथमत: यान* *पाठवणारे आपणच आहोत.* *विविध मोहिमा यशस्वी* *करणारे आपणच आहोत.* *कधीही हार न* *मानणाऱ्या भारतीय संस्कृतीचे* *उदाहरण म्हणजे इस्रो आहे.* *तुम्ही प्रेरणेचा जिवंत सागर आहात.* *इतिहास घडवणारे आहात.* *तुमच्यात निराशेला स्थान नाही.* *वैज्ञानिक माणूस निराशेला आशेत* *परावर्तित करतो. त्यामुळे* *_शेवटच्या क्षणाच्या_* *अपयशानं तुमचं यश झाकोळून जात* *नाही. तुम्ही देशासाठी अमूल्य* *योगदान दिलंय.’’* *यातील काही अमृतथेंब ग्रहण करता* *आले तर बघा।* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• कोणत्याही क्षेत्रात यश आणि प्रगती व्हायची असेल तर त्यासाठी ठराविक कालावधी,वेळ, जिद्द,सातत्य,परिश्रम,ज्ञान, तंत्रज्ञान आणि कौशल्य हवे असते तर याशिवाय प्रगती होत नाही.याउलट अधोगतीचे आहे.अधोगतीला कोणतीही अट नाही.कोणत्याही क्षणी माणसाच्या डोक्यात कोणतेही विध्वंसक वाईट विचार आले की,अधोगती ही क्रांतीरुपाने होते आणि त्यांचे परिणाम सर्वांनाच भोगावे लागतात. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *घोडा आणि नदी* एकदा एका माणसाला त्याच्या घोड्यासमवेत एक नदी पार करायची असते. परंतु त्याला नदीची खोली माहीत नसल्याने तो तिथेच काठावर विचार करत बसतो. मदतीसाठी आजुबाजुला पाहत असताना त्याला तेथे एक लहान मुलगा दिसतो. तेव्हा त्या माणसाने लहान मुलाला नदीच्या खोलीबद्दल विचारले. मुलाने घोड्याकडे एकदा पाहीले आणि क्षणभर थांबुन तो विश्वासाने म्हणाला, " निश्चींतपणे जा, तुमचा घोडा नदी सहज पार करु शकेल". मुलाचा सल्ला मानुन त्या माणसाने नदी पार करण्यास सुरुवात केली. परंतु नदीच्या मध्यावर पोहोचल्यावर त्याच्या लक्षात आले की नदी खुप खोल आहे. आणि तो जवळ जवळ बुडायलाच आला. कसाबसा तो त्यातून सावरला आणि बाहेर येउन त्या मुलावर जोरात खेकसला. मुलगा पुरता घाबरला होता आणि घाबरत घाबरतच बोलला, "पण माझी बदके तर खुप लहान आहेत आणि ते दररोज नदी पार करतात. त्यांचे पाय तर तुमच्या घोड्यापेक्षा खुप लहान आहेत." उगाच कोणाचाही सल्ला ऐकण्याआधी त्यांना खरोखरच काही माहीती आहे का ते जाणुन घ्या.... प्रत्येकजण आपआपल्या अनुभवाने सल्ला देतात. तो सल्ला कितपत योग्य आणि बरोबर आहे ते जाणून घेणे महत्त्वाचे आहे. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 07/09/2019 वार - शनिवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *वेद दिन* 💥 ठळक घडामोडी :- ●१९५३ - निकिता ख्रुश्चेव सोवियेत संघाच्या सर्वेसर्वापदी. ● १९०६- बँक आफ इंडिया ची स्थापना झाली. 💥 जन्म :- ◆ १९३६ - बडी हॉली, अमेरिकन गायक, संगीतकार. ◆ १९५५ - अझहर खान, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- ●१५५२ - गुरु अनंग देव, दुसरे शीख गुरु. ● १९५३ - भगवान रघुनाथ कुळकर्णी, मराठी कवी, लेखक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *पुणे : एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होऊनही नियुक्ती न मिळालेले 1300 उमेदवार पुण्यातील सेंट्रल बिल्डिंगसमोर आंदोलनासाठी उतरले, जर तात्काळ नियुक्ती मिळाली नाही तर बेमुदत उपोषण करण्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *बॉलीवूड डेस्क - भारतीय चित्रपट संगीतात सात दशकांच्या अभूतपूर्व योगदानासाठी गान कोकिळा लता मंगेशकर यांना 'डॉटर ऑफ द नेशन'ची उपाधी बहाल करण्यात येणार आहे. त्यांच्या नव्वदाव्या वाढदिवशी (28 सप्टेंबर) त्यांना हा किताब प्रदान करण्यात येणार आहे.* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *मुंबई : काँग्रेसचे नेते, माजी खासदार एकनाथ गायकवाड यांची मुंबई अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याची माहिती काँग्रेसचे महासचिव के सी वेणुगोपाल यांनी पत्रकाद्वारे दिली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *गडकिल्ले लग्न, हॉटेलिंगसाठी भाडेतत्वावर देणार नाही, अशी माहिती पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली, गडकिल्ल्यांच्या बाबतीत ही चुकीची अफवा पसरविण्यात आली, असल्याचेही ते म्हणाले.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *अनुसूचित जमातींच्या 13 योजना धनगर समाजाला लागू, राज्य सरकारचा शासन निर्णय जाहीर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *हवामान खात्याने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशारामुळे नागपूर जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नियोजित दौराही रद्द करण्यात आल्याचे नागपूर जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *मँचेस्टर : अॅशेस कसोटीतील इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या सामन्यात स्टीव्ह स्मिथने आपल्या कारकिर्दीतलं तिसरं दमदार द्विशतक झळकावलं. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने स्मिथच्या या खेळाचं केलं तोंडभरुन कौतुक* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *बुलेटीन audio मध्ये ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे* https://sharechat.com/post/6RGpy39 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जागरूक पालकच खरे मालक* वास्तविक पाहता शिक्षण प्रक्रियेत विद्यार्थ्यासोबत त्यास शिकविणारे शिक्षक जेवढे जबाबदार आहेत त्याच्याच तुलनेत त्यांचे पालक सुद्धा विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत कारणीभूत घटक आहेत. शाळेतील शिक्षक मुलांवर चांगले संस्कार होण्यासाठी विविध उपक्रम राबवत जीवाचे रान करतांना, विद्यार्थ्यांच्या घरात मात्र दूषित वातावरण असेल तर पालथ्या घागरीवर पाणी नव्हे का ? ज्या ठिकाणी शिक्षक व पालक यांच्यात विद्यार्थ्यांच्या प्रगतीबाबत संवाद घडून येतो त्याच ठिकाणी आपणाला विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि प्रगती आढळून येते....... https://nasayeotikar.blogspot.com/2018/05/blog-post_61.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *संस्कारक्षम जीवन* *जीवनात संस्काराचे खूप महत्त्व आहे.* संस्काराशिवाय जीवन शून्य असते. संस्कारच मनुष्याला श्रेष्ठ बनवितात व उत्तरम आकार देतात. सर्वोत्तम जीवनाचा पाया उत्तम संस्कारांवरच अवलंबून असतो. संस्काराशिवाय जीवन म्हणजे ब्रेक नसलेल्या गाडीप्रमाणे असते. आदर्श जीवनाचा पाया म्हणजे संस्कारच आहेत. संस्कारक्षमतेविना जीवन म्हणजे पाण्याविणा मासा. कारण माशाच्या अस्तित्वासाठी पाणी हवेच तसेच मनुष्याच्या या जीवनाला उत्तम आकार हे संस्कारच देऊ शकतात. संस्कार म्हणजे मनुष्याच्या अंगी असणारे सद्विचार, सद्गुण. संस्कारशिल व्यक्‍तीच स्वतःची व समाजाची उन्नती करू शकतो हे आपणाला पाहिला मिळते आणि हेच संस्कार व्यवहारिक जीवनाबरोबर पारमार्थिक उन्नतीदेखील करून देते. त्यामुळेच एक चांगला व्यक्‍ती बनण्याची सुरुवात ही प्रत्येकाची आपल्या घरापासून सुरु होते. त्यामुळे ज्याच्या अंगी संस्कारयुक्‍त आचार विचार असतील त्याच्याद्वारे सर्व व्यवहार नियमबद्ध चाकोरीत चालतात. प्रकृतीही आपल्या नियमाने चालते. जसे कि, दिवस-रात्र, महिने, ऋतु सर्वकाही नियमाने चालतात. हिवाळा आणि उन्हाळा पण निसर्गनियमांप्रमाणे येतात व जातात. यामुळेच जगातील सर्व व्यवहार व्यवस्थितरितीने पार पाडतात. हे सर्व जगाच्या कल्याणासाठी घडत असते. असेच संस्कारित असणाऱ्या व्यक्‍तीकडूनही अशाप्रकार सर्वकाही नियमावलीनेच घडते. म्हणून मानवसमाजाने देखील आपले जीवन सुखी होण्यासाठी चांगले संस्कार स्वतःमध्ये रूजविले पाहिजे. या सर्व गोष्टींची सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे घरातूनच व्हायला पाहिजे. एक चांगला मनुष्य व आदर्श नागरिक बनविण्याची सुरुवात घरातूनच व्हायला हवी. *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *“ जो माणूस स्वतःला सुखी समजत नाही तो कधीच सुखी नसतो. ”* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *भारताच्या एकीकरणाचे शिल्पकार कोणाला म्हणतात ?* सरदार पटेल 2) *'सामाजिक न्याय दिन' केव्हा साजरा केला जातो ?* 26 जून 3) *'कमवा व शिका' या संकल्पनेचे जनक कोण ?* कर्मवीर भाऊराव पाटील 4) *जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक कोण करतो ?* राज्यपाल 5) *कोणत्या क्रिकेटपटूने एकदिवसीय सामन्यात तीन वेळा द्विशतक झळकविण्याचा पराक्रम केला ?* रोहित शर्मा *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● प्र. श्री. जाधव ●  त्र्यंबक स्वामी ●  गजानन जाधव ●  भारत पाटील ●  सुमीत पेटेकर ●  हणमंत गायकवाड ●  गोविंद पटेल ●  सिद्धू पुरी ● भास्कर चटलोड ● दशरथ याटलवार ● प्रवीण कुमार ● पवन धनडु *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *"या जगात अनेक जातीचे प्राणी, अनेक जातीच्या वनस्पती इ. आहेत. (आंब्याची जात गोड चवीची तर कारल्याची जात कडू चवीची.) अशा अनेक जातींचे अनेक वेगवेगळे रंग आहेत. अशा अनेकविध जाती आणि त्यांच्या गुणधर्मानुसार व्यक्त होणारे रंग-ढंग एकत्र येऊन तर 'जग' हे नाव निर्माण झालं आहे." या जगात खूप काही असलं तरी हिताचं जे मोजकंच आहे, त्याला खरी किंमत आहे. 'शब्दज्ञान' किती मर्यादित असतं, याचं बोधक उदाहरण म्हणजे "उजेड काजव्यातूनही निघतो, पण तो फक्त त्याच्या पार्श्वभागापूरताच उजेड देतो, आणि तेही कायम नाही देत; तर चालू-बंद, चालू-बंद असा देतो." शब्दज्ञान हे काजव्याच्या उजेडासारखं आहे. ते देणा-याच्यासुद्धा समोर प्रकाश पाडत नाही. असा उजेड जगाला काय प्रकाश देणार? शब्दज्ञानानं समाजाचं जाऊ द्या, स्वतःचंही भलं होऊ शकत नाही.* *स्वतःसहीत समाजाचंही भलं करायचं असेल, तर कॉपी-पेस्ट बंद झालं पाहिजे. ज्ञान आता शब्दांचं नको तर अनुभवाचं असायला हवं.--* *तुका म्हणे झरा । आहे मुळचाची खरा ।।* *तुकोबा म्हणतात, "माझं ज्ञान हे काही कुठून आयात केलेलं नाही. ते कॉपी केलेलं नाही. माझ्या ज्ञानाचा जो झरा आहे, तो माझ्या अंतःकरणातून प्रकट होतो." याउलट शब्दज्ञानी माणसाचं ज्ञान समुद्राइतकं विशाल दिसत असलं, तरी ते अनेक नद्या, नाले, झरे यांच्यावाटे आलेलं आहे. जरी विशाल असला तरी समुद्राचं पाणी तहानलेल्याची तहान भागू शकत नाही, तसं शब्दज्ञान लोकांचं भलं करू शकत नाही. त्यासाठी आवश्यकता आहे ती अनुभवाच्या झ-याचीच.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल- 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो* *पहाट वारा अंगाला झोंबला,* *तसा उठून हातात पेपर पडला।* *नित्याचच हे रहाटगाडग।* *पण मस्तकात जोरात सनकी भरते ती* *बांडगुळा सारखे ,व पळकुटे पणाने* *जगणाऱ्याची.* *मध्येच भयानक चीड येते ती* *जीवनाला कंटाळून आत्महत्या* *करणाऱ्यांची.* *आणि नेमक्या ह्याच* *बातम्या फ्रंटला ,मोठया* *हेडिंगमध्ये येतात.* *लाख मोलाचे जीवन संपवतांना या* *पळकुट्याना आपण मागे काय* *टाकून जातो याची जराशीही* *भ्रांत पडत नाही.* *परिस्थिती बदलत असते,दोन हात* *करण्याची तयारी ठेवली* *पाहिजे.* *त्यांना सांगावं वाटत* *सुखदुःखाची उनसावली येते,जाते,राग* *नको.* *संकटास लीलया भिडावे, आयुष्याचा* *त्याग नको।* *बहुमोलाचे जीवन वेड्या कुणास* *फिरुनी मिळते का?* *मनासारखे सारे काही जीवनात या* *घडते का?* *मित्रांनो, जगात आलोच ना ,मग लढा* *ना ,कधी दोन* *देत,कधी दोन घेत.* *यातून कुणाचीही सुटका झालेली* *नाही.संत तुकारामांनी सांगितले* *आहे की--आपुली आपण* *करा सोडवणं।* *🤝🏻विचार करा, आम्हीबी घडलो,तुम्हींबी* *घडा।* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्या व्यक्ती अश्रूंचा सहारा घेऊन जगतात त्या जीवनात कुठेतरी पराभव पत्करलेल्या असतात किंवा त्यांच्या मनावर कुठेतरी आघात झालेला असतो किंवा कुणीतरी मनाविरुद्ध करण्यासाठी प्रवृत्त केलेले असते.हे जरी खरे असले तरी अशा व्यक्ती शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या कमकुवत झाल्याने त्यांना जीवनात जगण्याची काही अपेक्षा उरली नाही किंवा आता आपण जगून तरी काय करावे असा सतत विचार करत आणि डोळ्यांत अश्रू आणून कसेबसे जीवन जगतात.अशा दुबळ्या मनाने जीवन जगण्यापासून जीवनाला परावृत्त करायचे असेल तर जीवनात आणि आपल्यासमोर चांगले जीवन जगण्याची उमेद प्रथमत: नजरेसमोर ठेवायला हवी, नेहमी आपण काहीतरी असले तरी मी कोणत्याही कठीण प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी सक्षम आहे असा उदात्त विचार करून जगायला शिकले पाहिजे,कुणीजरी आपले मन दुखवण्याचा प्रयत्न केलातरी मी त्याकडे दुर्लक्ष करीन असाही सकारात्मक विचार केला आणि मन घट्ट करून जगायला शिकले तर अश्रूंचा आधार घेऊन जगायची काही गरजच भासणार नाही.जीवन तर सुखदु:खाने भरलेले आहे ते कुणाच्या वाट्याला कमी-जास्त असणारच.सुख जास्त झाले म्हणून जास्तही त्या सुखाचा अतिरेक होऊ द्यायचा नाही आणि दु:ख झाले म्हणून अति दु:खी व्हायचे नाही.आपण सारेजण सुखदु:खाच्या चक्रव्युहात अडकलेलोच आहोत आणि त्या चक्रव्युहाला भेदूनच चांगले जीवन जगायचे आहे हे लक्षात ठेवायला हवे. व्यंकटेश काटकर,नांदेड संवाद..९४२१८३९५९० 🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मनाची एकाग्रता* एकेकाळी एक वृद्ध योद्धा होता. त्‍याच्‍या काळातील तो सर्वत्र प्रसिद्ध असा योद्धा होता. त्‍याला कोणत्‍याही प्रकारच्‍या युद्धात कुणीच हरवू शकत नसे. त्‍याची ख्‍याती सर्वत्र पसरली होती. त्‍याने त्‍याच्‍या शिष्‍यांना व मुलांना युद्धकलेचे शिक्षण देण्‍यास सुरुवात केली होती. त्‍याचवेळी एक तरूण योद्धाही प्रसिद्ध होत होता. दिग्‍गज योद्धेही तरूण योद्ध्यासमोर हार मानत असत. प्रतिस्‍पर्ध्‍याचे कच्‍चे दुवे ओळखून त्‍याला सहज पराभूत करण्‍यात त्‍याचा हातखंडा होता. अतिशय कमी कालावधीत त्‍याने वृद्ध योद्धा सोडल्‍यास सर्व योद्ध्यांना पराभूत केले होते. त्‍याचे नाव सर्वत्र गाजू लागले. मिळणारी प्रसिद्धीचा आता त्‍याच्‍या मनात अहंकार जागृत झाला. त्‍याने विचार केला की या वृद्धालाही हरवून 'अजिंक्‍य' हे बिरूद लावून मिरवू. त्‍याने वृद्ध योद्ध्याला आव्‍हान दिले. शिष्‍यांनी मनाई केली तरी वृद्धाने त्‍याचे आव्‍हान स्‍वीकारले. तरूण योद्धा ठरलेल्‍या दिवशी वेळेवर रणांगणात येऊन उभा राहिला. भविष्‍यातील विजयाची कल्‍पना मनात धरून तो आनंदी होत होता. पण वृद्ध मात्र शांत आणि संयमित स्थितीमध्‍ये त्‍याच्‍यासमोर उभा होता. युद्ध सुरु झाले. तरूणाच्‍या प्रत्‍येक वाराला वृद्धाकडे प्रतिवार तयार होता.तरूण योद्धा हळूहळू का होईना दमू लागला आणि आपण युद्ध हरतो आहे हे लक्षात येताच त्‍याने वृद्धाला अपशब्‍द वापरण्‍यास सुरुवात केली. जेणेकरून वृद्धाचे लक्ष विचलित होईल पण त्‍याचा उपयोग झाला नाही. वृद्ध अविचल राहिला त्‍याचा संयम ढळला नाही. अखेरीस तरूण योद्धा पराजित झाला. त्‍याने स्‍वत:हून हार पत्‍करली व तेथून पराजित होऊन निघून गेला. तो गेल्‍यावर शिष्‍यांनी व वृद्धाच्‍या मुलांनी वृद्धाला विचारले,''बाबा, तो तरूण तुम्‍हाला अपशब्‍द वापरत होता तरी तुम्‍ही शांत कसे राहिलात'' तेव्‍हा वृद्ध गुरु म्‍हणाला,'' मुलांनो कोणत्‍याही युद्धात शारीरिक बळाबरोबरच मनाची एकाग्रता महत्‍वाची असते. कोणत्‍याही परिस्थितीत मन कणखर असेल तर तुमचा विजय निश्चित आहे.'' *तात्‍पर्य : मनाची एकाग्रता साधल्‍याने बरेचशी कामे साध्‍य होतात. मन एकाग्र करून कोणतेही काम केल्‍यास हमखास यश मिळतेच.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 06/09/2019 वार - शुक्रवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *गौरी गणपतीच्या सर्वाना हार्दीक शुभेच्छा* 💥 ठळक घडामोडी :- ●१९६५ - भारत-पाकिस्तान दुसरे युद्ध-भारताने पाकिस्तानवर हल्ला केला. ●१९६६ - दक्षिण आफ्रिकेच्या पंतप्रधान हेन्ड्रिक व्हेरवोर्डची संसदेत भोसकून हत्या. 💥 जन्म :- ◆ १९२९ - यश जोहर, भारतीय चित्रपट निर्माता. ◆ १९७१ - देवांग गांधी, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- ●१९६६ - हेन्ड्रिक व्हेरवोर्ड, दक्षिण आफ्रिकेचा पंतप्रधान. ●१९९० - लेन हटन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *महाराष्ट्राचे नवनिर्वाचित राज्यपाल म्हणून भगतसिंग कोश्यारी यांनी घेतली शपथ, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंद्रजोग यांनी राज्यपालपदाची दिली शपथ, यावेळी भगतसिंग कोश्यारी यांनी मराठीतून घेतली राज्यपाल पदाची शपथ* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *रिलायन्स 'जियो गीगा फायबर' सेवा सुरू: 700 रुपयांत इंटरनेट, मोफत कॉलिंग, एचडी टीव्हीसह डिश तर काही ग्राहकांना टीव्ही देखील मोफत* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *मुंबई- राज्यातील वीज कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील वीज कर्मचाऱ्यांना भरघोस पगारवाढ देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला, या नव्या निर्णयामुळे राज्यातील वीज कर्मचाऱ्यांना पूर्वीच्या मूळ वेतनाच्या 32.50 टक्के वेतनवाढ दिली जाणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *'नागरिकांनी नियमांचे पालन करावे म्हणून दंड वाढवला, पेट्रोल-डीझेल गाड्यांवर बंदी घालण्याचा आमचा विचार नाही'-  रस्ते आणि परिवहनमंत्री नितीन गडकरी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *'भाजप-शिवसेनेचा 135-135 चा फॉर्म्युला ठरला असून मित्रपक्षाला 18 जागा देणार', केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांची माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *मुंबई: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सर्व बँकांना सर्व प्रकारची कर्जे येत्या एक ऑक्टोबरपासून रेपो रेटशी जोडण्याचे दिले आदेश, यामुळे गृह, वाहन कर्जदार तसेच लघूउद्योगांना स्वस्तातील कर्ज होणार उपलब्ध* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *ढाका: अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशीद खानच्या नावावर एका नव्या विक्रमाची झाली नोंद, तो कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात लहान कर्णधार ठरला.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बुलेटीन audio मध्ये ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे. https://b.sharechat.com/d2atmKNwKZ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *बलात्काराचे वाढते प्रमाण कधी थांबणार ?* https://nasayeotikar.blogspot.com/2018/04/blog-post_15.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *कुष्ठरोग म्हणजे काय ?* 📙 कुष्ठरोग हा एक संसर्गजन्य आजार आहे. यावर प्रतिबंधक लस तयार झाली आहे, पण ती अद्याप प्रयोगावस्थेत आहे. याखेरीज तिचा वापर कसा करावा, याविषयी शास्त्रज्ञ व डॉक्टर यांच्यामध्येच अजून एकमत नाही. मात्र विविध प्रकारच्या औषधांचा वापर करून कुष्ठरोग निर्मूलन आता आवाक्यात आले आहे. असे जागतिक आरोग्य संघटनेला वाटते. दर दहा हजार व्यक्तींमागे एक रुग्ण असे प्रमाण सध्या भारतात आढळते. अगदी प्रारंभिक अवस्थेतील रोगाचे निदान करून त्यावर औषधांचा उपयोग केल्यास कुष्ठरोग पूर्णपणे बरा करता येतो. कुष्ठरोग काटकीसारख्या दिसणाऱ्या सूक्ष्मजंतूंमुळे होतो. त्यांची कृत्रिम वाढ करणे शक्य झालेले नाही. या रोगाचे जंतू मानवी शरीरात जेव्हा प्रवेश करतात, तेव्हा त्यांचा पेशीजालाशी संघर्ष होतो. एका प्रकारात या संघर्षात जंतू व पेशीजाल या दोन्हींचा नाश घडतो. या प्रकाराला 'नॉन लेप्रोमॅटस' किंवा 'असंसर्गिक' समजतात. म्हणजे रोगाचे परिणाम जरी शरीरावर दिसत असले, तरी त्यात जंतू नसल्याने ही व्यक्ती संसर्ग देऊ शकत नाही. दुसऱ्या प्रकारात मात्र जंतूंची अनिर्बंध वाढ होत राहते. तेथे रुग्णाची प्रतिकारशक्ती कमी असते. मात्र जंतुंची संख्या वाढत गेल्यामुळे सर्व शरीरभर रोग पसरत राहतो. प्राथमिक अवस्थेत पेशीजाल फारसे नष्ट होत नाही. विकोपाला गेल्यावर मात्र ढोबळ चिन्हे दिसून येतात. हा प्रकार सांसर्गिक असतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुष्ठरोग अत्यंत मंदगतीने वाढणारा आजार आहे. सुरुवातीची लक्षणे व प्रगत अवस्थेतील चिन्हे यात फारच फरक आहे. समाजासमोर प्रगत अवस्थाच येत असल्याने या रुग्णांबद्दल एक प्रचंड भीती व तिरस्कार अनेक शतके समाजात घट्ट गैरसमजुती निर्माण करत आहे. शारीरिक विद्रुपता व त्यापासून होणारे सामाजिक व आर्थिक परिणाम टाळण्यासाठी रोगाची सुरुवातीची लक्षणे ओळखून इलाज सुरू करणे महत्त्वाचे ठरते. शरीराच्या कोणत्याही भागावर त्वचेच्या रंगापेक्षा वेगळ्या रंगाचा लालसर चट्टा व डाग दिसून या रोगाची सुरुवात होते. कोडाप्रमाणे हे डाग पांढरे नसतात. अतिगडद त्वचेवरील डाग लक्षात यायला वेळही लागतो. मात्र महत्त्वाची गोष्ट म्हणजे या जागीच्या त्वचेचे स्पर्श, उष्णता व वेदना या तिन्हींचे ज्ञान गेलेले असते. अशा जागीची त्वचा किंचित खरवडून तिची सूक्ष्मदर्शक यंत्राखाली तपासणी करतात. त्यात रोगाचे जंतू असतील, तर तो सांसर्गिक प्रकार ठरवला जातो. जंतू नसतील, तो असांसर्गिक असतो. भारतातील सुमारे ८० टक्के रूग्ण असांसर्गिक प्रकारात असतात. जेमतेम २० टक्के रुग्णांचाच इतरांना संसर्ग होऊ शकतो. मुख्य गोष्ट म्हणजे दोन्ही प्रकारच्या रुग्णांना एक ते दोन वर्षे औषधयोजनेची गरज असते. अन्यथा अतिसंथपणे वाढणाऱ्या या रोगाचे चट्टे अनेक ठिकाणी दिसू लागतात. हातापायांची बोटे वाकडी होणे, क्षते पडणे, जखमा चिघळणे हे मुख्यतः संवेदना नष्ट झाल्याने वाढत जाते. रोगाचा उद्भव झाल्याने चेहऱ्यावरच्या गाठी, कानाच्या पाळ्यांवर व नाकावर येणारी विद्रुपता, भुवयांचे केस जाणे यांमुळे प्रगत अवस्थेतील रुग्ण हा समाजातून बाहेर फेकला जायला सुरुवात होते. पण ही अवस्था न आलेली किमान ९० टक्के कुष्ठरोगी समाजातच वावरत असतात. त्यांच्यामुळे होणारा संसर्ग टाळण्यासाठी त्यांच्यावर निदान व उपचार करणे हाच एकमेव प्रतिबंधाचा उपाय राहतो. कुष्ठरोग हाही एक जंतुजन्य रोग असून तो पूर्ण बरा होऊ शकतो, ही महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायलाच हवी. *'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *“ सर्वांनी एकत्र श्रम केल्याने कठीण काम हलके होते. ”* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *स्थानिक स्वराज्य संस्थांचे जनक कोणाला म्हटले जाते ?* लॉर्ड रिपन 2) *भारतीय भूदान चळवळीचे जनक कोणाला म्हणतात ?* आचार्य विनोबा भावे 3) *1983 च्या क्रिकेट वर्ल्ड कपचे भारतीय कप्तान कोण होते ?* कपिल देव 4) *'Golden Girl of India' असे कोणत्या खेळाडूला म्हटले जाते ?* पी टी उषा 5) *अभिनव बिंद्रा हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?* शुटींग *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● सुनील ठाणेकर ● गणेश शिंदे, शहापूर, ठाणे ●  महेश वडजे ●  विठ्ठल तुकडेकर ●  रितेश पोकलवार ●  प्रशिक कैवारे ●  विकास डुमणे ●  अनिल सोनकांबळे ●  आनंद गायकवाड ● सचिन पाटील *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• *तारूण्य आणि संगत यांचे महत्व विशद करताना जैन मुनीं तरूण सागर महाराज सांगतात, 'आपले मित्र, चित्र आंणि चरित्र नेहमी पवित्र ठेवा; कारण तेच खरे जीवनाचे अस्त्र आहे. तुम्हाला तर हे माहित आहे की., चारित्र्याचे पतन होण्यासाठी बहुधा चुकीचे मित्र आणि चुकीचे चित्र यांचाच हात असतो. चुकीचे मित्र आणि चुकीचे चित्र हेच चारित्र्य नष्ट करण्याचे शस्त्र आहे किंवा असेही म्हणता येईल की, कधीही न चुकणारे ब्रम्हास्त्र आहे.' तारुण्याच्या सळसळत्या उर्जेवर स्वार्थी व्यवस्थांचा डोळा असतो. त्यामुळेच तारूण्याची ऊर्जा सैरभैर करून तिला आपल्या इच्छेप्रमाणे वापरण्याचे धूर्त राजकारण या स्वार्थी व्यवस्था करत असतात. तारुण्याच्या ऐन उमेदीचा कालखंड निरर्थकपणे या स्वार्थी व्यवस्थेच्या नेतृत्वामागे घालविला जातो.* *एखादी पाण्याची बाटली वापरून फेकून द्यावी, त्या पद्धतीने तरुणांच्या ऊर्जेचा वापर करून त्यांना शेवटी फेकून दिले जाते. सर्व बाजूंनी निष्क्रिय केलेल्या तरूणांवर शेवटी पश्चात्तापाची वेळ येते. तारूण्याचे रखरखीत वाळवंट होते. आपले तारूण्य विवेकशून्य व्यवस्थेच्या हाती द्यायचे की, स्वत:वर विश्वास ठेवत स्वकर्तृत्वाच्या बळावर समाज जीवनात उजळवून टाकायचे हे ज्याला समजले, त्याला तारुण्याचा खरा अर्थ कळला. माजी राष्ट्रपती डाॅ. ए.पी.जे. अब्दुल कलाम हे युवकांना देशाची संपत्ती म्हणायचे, ही संपत्ती देशासाठी आपत्ती ठरू नये म्हणून तरूणांनी आपले मित्र विचारपूर्वक निवडावेत.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल- 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो,* *आज अवतार सिनेमातील गाणे,जिंदगी* *मौज* *उडानेका नाम है,कयाम है।अशी* *स्थिती तरुणांची बघायला मिळतेय.* *जीवन एक संघर्षयात्रा आहे.* *जंग सिनेमात एक गाणं आहे,* *जिंदगी हर कदम एक नई जंग है।* *याचप्रमाणे अगदी* *लहानपणातच एकदा संकट झेलायची* *सवय लागली की* *मोठेपणी कितीही वादळे येवु* *द्या .माणसं टक्कर घ्यायला सज्य* *असतात. स्वतःच्या* *आयुष्याची स्वतः वाट निर्माण* *करणारेच यशश्वी होत असतात.संकट* *आपल्याला* *अडवायला कधीच येत नाहीत तर* *संकट आपली उंची वाढवायला* *येत असतात.* *परंतु* *तरुणाई कुठंतरी* *भटकतेय,दिशाहीन अवस्था काही* *ठिकाणी बघायला* *मिळते.जीवनाची आशा सोडता कामा* *नये.* *आशा नावाची साखळी पायात* *घातली की तिच्या आवजानेच यशाचा* *राजमार्ग सापडतो.* *आणि हो , हा राजमार्ग मिळण्यासाठी* *तिला निराशेचे* *अनेक खडतर डोंगर पार करावे* *लागतात.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्याप्रमाणे सुगंधीत असलेल्या फुलांना आम्ही सुगंधीत आहोत म्हणून तुम्ही आमच्याकडे या आणि सुगंध घ्या असं कधीच म्हणावं लागतं नाही.आपोआपच सुगंध असणा-या फुलांकडे लोक आकर्षित होतात. त्याचप्रमाणे सज्जन माणसे कधीच कुणाला म्हणत नाहीत की,तुम्हीआमच्याकडे आमच्या सहवासात या आणि आमचे सद्गुण घ्या. आपोआपच सर्वसामान्य माणसे सज्जनांच्या सहवासात जाऊन आपल्यातील असलेल्या दुर्गुणावर मात करुन सद्गुणी होण्याचा प्रयत्न करतात. तात्पर्य असा की सद्गुणांचा सहवास हाच दुर्गुणावर मात करु शकतो.त्यासाठी  आपली मानसिकता असावी  लागते. © व्यंकटेश काटकर,नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *त्‍यागाचे महत्‍व* फार वर्षापूर्वी एक स्‍वाभिमानी राजा होऊन गेला. त्‍याचे राज्‍य मोठे होते आणि अपार संपत्तीने खजिना भरलेला होता. त्‍याचे महाल सोन्‍यापासून बनलेले होते. नोकरचाकरांची रेलचेल होती. मात्र त्‍याचे सल्‍लागार त्‍याच्‍या अहंकाराला प्रोत्‍साहन देत होते. एकदा त्‍याच्‍या दरबारात एक तेज:पुंज साधू आला. राजाला पाहूनच त्‍याने ओळखले की राजाला फार गर्व चढला आहे. राजाने मोठ्या तो-यात विचारले,''तुला काय पाहिजे?'' साधू म्‍हणाला,'' राजन, मला तुझ्याकडून काहीच नको आहे. उलट मीच तुला काहीतरी देण्‍यास आलो आहे.'' राजाचा अहंकार दुखावला व राजा मोठ्याने ओरडला,''लहान तोंडी मोठा घास घेतोस. लाज वाटते का नाही. तुझ्याजवळ फुटकी कवडी नाही अन तू मला काय देणार?'' साधू मंद स्मित करत म्‍हणाला,''राजन, त्‍यागाशिवाय भोगाला चव येत नाही. वैभवात जेव्‍हा त्‍याग समाविष्‍ट होते तेव्‍हा तो वंदनीय आणि प्रशंसनीय ठरतो. त्‍याग येताच अहंकार दूर होतो. आसक्ती दूर होते आणि मन परमात्‍म्‍याकडे पोहोचण्‍यासाठी तयार होते.'' फकीराच्‍या राजा खजील झाला आणि त्‍याचे डोळे उघडले. त्‍याने गर्वाचा त्‍याग केला. तात्‍पर्य :- त्‍यागाने अहंकाराचा नाश होतो. अहंकार हा मनुष्‍याचे नुकसान करतो. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 05/09/2019 वार - गुरूवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *शिक्षक दिन* 💥 ठळक घडामोडी :- ◆२००५ - मंडाला एरलाइन्स फ्लाइट ०९१ हे बोईंग ७३७-२०० प्रकारचे विमान इंडोनेशियातील सुमात्रा बेटावरील दाट वस्तीच्या भागात कोसळले. विमानातील १०४ व जमीनीवरील ३९ व्यक्ती ठार. 💥 जन्म :- ◆१८८८ - डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, भारताचे दुसरे राष्ट्रपती. ◆१९१० - फिरोझ पालिया, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- ●१९९७ - मदर तेरेसा, समाजसेविका. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *अण्णा हजारे रुग्णालयात दाखल, प्रकृती स्थिर, आण्णा हजारे यांना किमान आठ दिवस संपूर्ण विश्रांतीचा डॉक्टरांनी दिला सल्ला* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *राज्यात प्रथमच ऑनलाईन परीक्षा होणार असून या प्रक्रियेत पोलीस शिपाई पदाच्या ३ हजार ४५० जागा भरल्या जाणार* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *पुढील 48 तासांत मराठवाड्यात पावसाचे आगमन तर मुंबई आणि कोकणमध्ये अतिवृष्टीचा, हवामान खात्याचा अंदाज* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *पंजाबच्या गुरुदासपूरमध्ये फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट; 13 जणांचा मृत्यू तर अनेकजण गंभीर जखमी, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *आर्थिक मंदीमुळे बेरोजगारी वाढली, काँग्रेसने त्यांच्या काळात उत्तम काम करून मंदीतून बाहेर काढलं होतं, खासदार संजय राऊतांचा सरकारला घरचा आहेर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *गडचिरोलीत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत, शंभरहून अधिक गावांचा संपर्क तुटला* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *लेफ्टनंट अनिल पुरी १ हजार २०० किमी लांब सायकल स्पर्धा ९० तासांत पूर्ण करणारे ठरले पहिले भारतीय, साहस फ्रान्समधील सर्वात जुन्या स्पर्धेत ६० देशांतील ६ हजार ५०० खेळाडूंनी घेतला होता सहभाग* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *शिक्षक दिनानिमित्त सर्व शिक्षक बंधू भगिनींना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• ऑडिओ ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे. https://b.sharechat.com/EV65u2FRIZ ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *शिक्षकदिन विशेष लेख* *बदलत्या काळात शिक्षकांची भूमिका* https://bit.ly/2kiaD5G लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *काँक्रिट म्हणजे काय ?* 📙 एखादी चर्चा चालू आहे. विविध सूचना केल्या जात आहेत. त्यावर फक्त चर्चाच होते आहे. पुन्हा सूचना येतात. पुन्हा चर्चा. अशा वेळी कोणीतरी वैतागून म्हणते, 'काहीतरी काँक्रीट घडू द्या ना !' म्हणजेच मूर्त किंवा साकार असे त्याला सुचवायचे असते. एखादी अत्यंत पक्की, नीट साधलेली, एकत्र बांधलेली गोष्ट म्हणजे काँक्रीट. व्यवहारात गेली सत्तर एक वर्षे काँक्रिट म्हणजे सिमेंट काँक्रिटच होय. सिमेंटचा शोध लागून वापर सुरू झाल्यावर त्यापासून विविध मिश्रणे वापरली गेली. सिमेंट व वाळूचे मिश्रण कायम पक्के राहत नाही. सिमेंट व खडी एकमेकांना बांधून राहत नाहीत. पण सिमेंट, बारीक वाळू, जाड वाळू, खडी यांचे मिश्रण करून त्यात योग्य प्रमाणात पाणी घालून कालवले, तर ते हवे तेवढे पक्के होते. अगदी दगडच म्हणा ना ! याला काँक्रिट किंवा शास्त्रीय भाषेत प्लेन सिमेंट काँक्रीट (PCC) म्हणतात. खूप मोठा भार सहन करण्याचा या काँक्रेटचा गुण बघून त्याचा वापर सुरू झाला. रस्ते बनवणे, विमानांच्या धावपट्टय़ा तयार करणे यांसाठी सिमेंट वापर वापरतात व धरणे बांधताना भिंतीसाठी काँक्रिटचे प्रचंड ठोकळेच वापरतात. एवढेच काय, पण समुद्र हटवण्यासाठीसुद्धा काँक्रिटचे मोठे आकाराचे विविध ठोकळे वापरून फुटणाऱ्या लाटांचा जोर त्यावर येईल, अशी व्यवस्था केली जाते. रेल्वेसाठी रूळ टाकताना जमिनीत जे स्लिपर्स आडवे घातले जातात, तेही गेली काही वर्षे काँक्रिटचेच वापरले जातात. एखाद्या पुलाचा पाया वा एखाद्या अतिउंच इमारतीचा पाया खोदून झाला की, प्रथम त्या खड्ड्यांमध्ये जवळपास फूटभर जाडीचे पीसीसीच ओतले जाते. ते पक्के झाले की मग त्यावर पुढचे काम सुरू होते. आपल्या देशात जवळपास न वापरला गेलेला पण अनेक देशांत उपयोगात आणलेला पीसीसीचा एक वापर म्हणजे अणुबाँब स्फोटापासून वाचवण्यासाठी तयार केलेली सुरक्षाघरे. या सुरक्षाघरांच्या भिंती दोन ते तीन फूट जाडीच्या पीसीसीने बनवतात. छतासाठी व पिलर्ससाठी सुद्धा खास रिएन्फोर्स्ड काँक्रीट (म्हणजे सळ्या घालून ताकद वाढवलेले, ताण सोसू शकणारे) वापरलेले असते. या काँक्रिटच्या जाडीतून रेडिओ उत्सर्जन आत पोहोचू शकत नाही. यासारखा दुसरा एक महत्त्वाचा उपयोग म्हणजे महासत्तांनी तयार केलेली आंतरखंडीय क्षेपणास्त्रे व त्यांवर बसवलेले अण्वस्त्रे सुरक्षित ठेवायला तयार केलेली महाप्रचंड तळघरे. यांना 'सिलो' म्हणतात. यांची बांधणीसुद्धा अशीच तीन तीन फूट जाडीच्या काँक्रिटने केलेली असते. शत्रूच्या क्षेपणास्त्रानेसुद्धा विध्वंस होणार नाही, इतकी पक्की रचना या सिलोंची असते. काँक्रिटच्या पक्केपणाचा महिमा हा असा आहे. *'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *“ दुसऱ्याला शिकवीत असतांना माणूस स्वतःला शिकवीत असतो. ”* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *'शिक्षक दिन' केव्हा साजरा केला जातो ?* 5 सप्टेंबर 2) *शिक्षक दिन कोणाच्या जन्म दिवसानिमित्त साजरा केला जातो ?* डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन 3) *जगात किती देशात शिक्षक दिवस साजरा केला जातो ?* 100 4) *भारतात कोणत्या वर्षी प्रथम शिक्षक दिवस साजरा केला गेला ?* 1962 5) *डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म केव्हा झाला ?* 5 सप्टेंबर 1888 *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● सौरभ सुरेश सावंत, नांदेड ●  नितीन शिंदे ●  रत्नाकर चिखले ●  राजकुमार काळे ●  रत्नजित पाटील पटारे ●  धोंडोपंत मानवतकर ●  लक्ष्मीनारायण येरकलवार ●  नरेश रेड्डी ● पांडुरंग बोमले *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *गरीब माणसाला घरापासून दूर राहून पोटाच्या चार घासासाठी प्रचंड मरमर करावी लागते. पण पैशावाल्याच्या बाबतीत हे होत नाही. "एका बसल्या ठिकाणी त्याचा व्यापार चालतो. त्याला घर सोडून कुठेही जावं लागत नाही." गरीबाला एका वस्तूसाठी पैशाअभावी कुढत मरावं लागतं. शेवटपर्यंत ती वस्तू मिळेलच असं होतं नाही. पण "श्रीमंताला मात्र पाहिजे असणारी कोणतीही वस्तू रानावनातच काय या पृथ्वीतलावर कुठंही असली तरी पैशाच्या जोरावर मिळवणं सोपं असतं आणि वस्तू कोणतीही असू द्या, कितीही अनमोल असू द्या, कितीही महत्वाची असू द्या, शक्यतो जास्तीचे पैसे देऊन मिळवता येणार नाही, इतकी ती अवघड नसतेच." थोडे जास्त पैसे देऊन अति मौल्यवान वस्तुसुद्धा पैश्यावाल्याला सहज मिळवता येते.* *म्हणून, पैसा माणसाच्या आयुष्यात यासाठी महत्वाचा आहे. पैसा वाईट मार्गाने कमवायचा तर नाहीच, पण चांगल्या मार्गाने खूप पैसा कमवून तो वाईट मार्गावर खर्च सुद्धा नाही करायचा. चांगल्या मार्गाने कमावलेला खूप पैसा 'आनंदी आणि सुखकर आयुष्य' जगण्यासाठी खर्च करायचा आहे. पैशाचा लोभ नाही आणि तिरस्कारही नाही. त्याची हाव नको आणि त्याच्याविषयी विरक्ती नको. पैसा कमवताना आनंदाने कमवायचा तसाच तो खर्च करतानासुद्धा जीवनात आनंदच असला पाहिजे. एवढा सुंदर असा 'मध्यम मार्ग' संतानी आपल्याला दिला आहे..* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱 *संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल- 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सज्जनहो,* *मंजिले उन्हीको मिलती है,* *जिनके सपनोमे जान होती है।* *पंखोसे उडान नही होती,* *होसले बुलंद होने चाहीए।* *तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार.* *जीवनात येणारे प्रत्येक उदाहरण* *सोडवण्याचा प्रयत्न करा* *पण एका ठराविक वळणावर ते* *सोडून पण द्या.* *मात्र* *न थांबता मार्ग बदलून ध्येय साध्य* *करण्यासाठी पुढे चालत रहा,भले कितीही अडथळे येवोत. नदीचे ध्यान करा ती* *अडथळे अनेक येऊनही* *समुद्राला मिळाल्याशिवाय राहत* *नाही.* *सूर्याचे ध्यान करा तो रोज* *उगवल्याशिवाय राहत नाही.* *वाऱ्याचे ध्यान करा तो कुणाच्यानेही* *अडवला जात नाही.* *गवताचे ध्यान करा तर कितीही काढून* *टाकले तरी पुन्हा पुन्हा* *उगवते.* *हे सगळं करण्यासाठी स्वतःच्या* *विचारावर, भाषेवर,मनावर विश्वास* *ठेवा.* *प्रगतीचे विचार आणि वैज्ञानिक* *दृष्टिकोन बाळगा.* *अंतिम सत्य तेच आहे, कामात आहे राम नाहीतर आहेच देवाचे धाम।* *फक्त देवच रक्षण करीत असत तर मोठमोठाल्या मंदिरात सी.सी.कॅमेरे* *बसवण्याची वेळ* *कधीच आली नसती.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• सर्वसामान्य माणसाच्या जीवनात मागचे दिवस आठवले की,अंगावर रोमांच उभे राहतात आणि भूतकाळ जसा एखाद्या चित्रपटातील क्रमाक्रमाने प्रसंग आठवायला लागतात.असे प्रसंग पुन्हा आपल्यासमोर उभे राहू नये म्हणून तो मागच्या प्रसंगातून काहीतरी शिकतो आणि म्हणतो पुन्हा असे दिवस माझ्या नशिबाला येऊ नयेत.भूतकाळही आपला एक समर्थ गुरूच असतो.जी झालेली चूक पुन्हा होऊ नये याची वारंवार सूचना करत असतो.विचारी माणूस मागच्या आठवणी जाणून पुढे पाऊल टाकत असतो. जर का असे नाही केले तर पुन्हा येरे मागचे हाल अशी अवस्था होऊन बसते.ती अवस्था ते प्रसंग येऊ नये असे वाटत असेल तर आपल्या प्रयत्नाने ते नक्कीच दूर करता येतात.आपल्याच हाताने आणि अथक परिश्रमाने ते काळोखी ढग दूर करता येतात.केवळ विचार करून चालणार नाही तर त्याला आपल्या आत्मविश्वासाची आणि प्रयत्नांची सांगड घालावी लागते. त्यामुळे नक्कीच आपले जीवन परिपूर्ण होऊन जाईल. भविष्याचा वेध हा भूतकाळातूनच घेता येतो आणि जीवन समृद्ध करता येते. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद ९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *ज्ञानाचा दिवा सतत तेवत ठेवा* द्रोणाचार्य जेंव्हा गुरुकुलामध्ये वर्गात कौरव आणि पांडवांना शिकविण्यासाठी गेले तेंव्हा ते अत्यंत प्रसन्न होते. द्रोणाचार्य स्वतः परम गुरु होते. मात्र त्यांना एका दिव्य ज्ञानाचा अनुभव आला होता. आणि तोच त्यांच्या सर्व अस्तित्वातून अभिव्यक्त होत होता. वर्गात गुरुदेव आल्याबरोबर त्यांनी तोच अनुभव विद्यार्थ्यांना सांगितला. त्यांनी सांगितले कि काल रात्री एक अशी घटना घडली कि, अर्जुन आश्रमात भोजन करीत होता. बाकी विद्यार्थ्यांचे भोजन आटोपले होते. रात्र बरीच झाली होती. अर्जुन एका दिव्याच्या प्रकाशात भोजन करत होता. अचानक हवेची झुळूक आली आणि दिवा विझला. मात्र त्यानंतरही अर्जुन भोजन करत राहिला.अंधारातही त्याला भोजन करण्यास बाधा वाटली नाही. भोजन पूर्ण झाले आणि अर्जुन उठला आणि धनुर्भ्यास करू लागला. गुरुनी पुढे सांगितले, बाणांचा आवाज ऐकून मी बाहेर आलो तेंव्हा अर्जुनाने मला सांगितले कि भोजनादरम्यान मला अंधाराचे काही वाटले नाही तसेच बाण चालवितानाही मला अंधाराचा अडसर आला नाही. बघा गुरुवर्य ! आपल्या कृपेमुळे मला अंधारातही बाण लक्ष्यापर्यंत पोहोचविता येत आहेत. गुरुजी म्हणाले,"अर्जुनाचा हा प्रयत्न अनुकरणीय आहे. दिवा फक्त उजेडाचा प्रसार करतो पण अंधारात मात्र ज्ञानाच्या दिव्याने, हृदयातील आत्मज्योतीने जर सराव केला तर कोणतेच काम अशक्य नाही." तात्पर्य :- सरावानेच माणूस लक्ष्य प्राप्त करू शकतो. एक विशिष्ट उंची गाठण्यासाठी, यश प्राप्तीसाठी अंतरीच्या ज्ञान ज्योतीला जागृत करणे गरजेचे आहे.ज्ञानारुपी दिवा नेहमी तेवत ठेवत राहणे. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 04/09/2019 वार - बुधवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- ◆ २०१३-रघुराम राजन यांनी 'रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया' चे २३ वे गव्हर्नर म्हणून पदभार स्वीकारला. ◆१९९८- स्टॅनफोर्ड विद्यापीठातील लॅरी पेज व सर्गेई ब्रिन या दोन विद्यार्थ्यांनी 'गुगल'ची स्थापना केली. 💥 जन्म :- ●१९६२-किरण मोरे,भारतीय यष्टिरक्षक. ●१९५२-ऋषी कपूर,चित्रपट अभिनेता. ●१९४१-सुशीलकुमार शिंदे,माजी केंद्रीय मंत्री. 💥 मृत्यू :- २०१३ - सुश्मिता बॅनर्जी, भारतीय लेखिका. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *मुंबई: जम्मू-काश्मीरला विशेषाधिकार देणारा अनुच्छेद ३७० रद्द झाल्यानंतर आता महाराष्ट्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला, लवकरच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून (एमटीडीसी) काश्मीरमध्ये दोन रिसॉर्ट बांधण्यात येणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मुंबई: आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप स्वबळावर लढल्यास पक्षाला १६० जागांवर विजय मिळेल, असे भाकीत राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी वर्तविले आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *पूरग्रस्त भागातील मुलींच्या विवाहासाठी मदत करणार, महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली मोठी घोषणा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *कृष्णेच्या पाण्यासाठी महाराष्ट्र-कर्नाटक सरकार एकत्र, लवादाला आव्हान देणाऱ्या आंध्रच्या याचिकेला संयुक्तपणे विरोध* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ * येत्या ४८ तासांत मुंबई, कोकणसह राज्यात मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे., पाणीटंचाईग्रस्त मराठवाड्यात चांगला पाऊस झाला, नांदेडमधील धरण १०० टक्के भरले आहे. त्यामुळे येथील पाण्याचा मोठा प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *राज्यपाल सी विद्यासागर राव यांचा कार्यकाळ पूर्ण, शासनातर्फे राजभवनात भावपूर्ण निरोप, राज्याचे नवे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा शपथविधी उद्या होणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *मिताली राजने आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधून घेतला संन्यास, सर्वाधिक धावा करणारी भारतीय महिला क्रिकेटर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *या बुलेटीनची audio ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे.* https://sharechat.com/post/Bga1VrN ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सुरक्षित प्रवास करू या* https://nasayeotikar.blogspot.com/2018/04/blog-post_26.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *कावीळ म्हणजे काय ?* 📙 कावीळ किंवा कामला हा एक स्वतंत्र विकार मानण्यापेक्षा ते एक रोगलक्षण मानणे सयुक्तिक आहे. यकृतातून बाहेर जाणाऱ्या पित्तरसापेक्षा अधिक पित्तरस यकृतात तयार होऊ लागला म्हणजे कावीळ होते. जास्तीचा शिल्लक राहिलेला पित्ताचा भाग रक्तात मिसळला जातो व सर्व शरीरभर पसरतो. यातूनच डोळ्यांचा पांढरा भाग पिवळा दिसू लागतो. त्वचेचा रंग पिवळसर होऊ लागतो. लघवी पिवळी होते व तीव्र काविळीत लालसर पिवळी दिसते. पित्त यकृतातून बाहेर पडताना पित्तनलिकेत किंवा प्रत्यक्ष यकृतांतर्गत अडथळा निर्माण झाला, तर शौचास पांढरेफिके होऊ लागते. कावीळ हे यकृतविकृतीचे किंवा रक्तातील तांबड्यापेशी जास्त नाश पावत असल्याचे चिन्ह होय. या रोगाचे निदान मुत्रपरीक्षेतून व रक्ताच्या चाचण्यांतून होते. नवजात बालकाला रक्तपेशींचे दान निसर्गाने जरा सढळपणे दिलेले असते. त्यामुळे जन्मानंतर काही दिवसांतच या जास्तीच्या पेशी नाश पावतात व मंद स्वरूपात कावीळ उद्भवते. पण ती आपोआपच थोड्याच दिवसांत नाहीशी होते. क्वचित ती तीव्र स्वरूपात व अगदी पहिल्या दुसऱ्या दिवशीच दिसल्यास त्या बालकाला फोटोथेरपी हा अल्ट्राव्हाॅयलेट किरणांचा उपचार दिला जातो. हिमोलायटिक ऍनिमिया या रक्तक्षयाच्या आजारातही रक्तपेशींचा नाश होत असल्याने कावीळ होते. मूळ कारण दूर झाल्यास ती बरी होते. आपण सहसा काविळीचा रुग्ण पाहतो, तो विषाणूजन्य पाण्यातून झालेल्या संसर्गाचा बळी असतो. तोंडावाटे पाण्यातून हे विषाणू शरीरात प्रवेश करतात व त्यामुळे यकृताला सूज येते, कार्यात अडथळा होतो. यकृताचे तांबड्या रक्तपेशी नष्ट करण्याचे काम नीट न झाल्याने कावीळ दिसू लागते. मळमळ, ओकारी, भूक मंदावणे, गुबारा धरणे, शरीराला कंड सुटणे, मलावरोध ही लक्षणे प्राधान्याने सर्वच रुग्णांत दिसतात. डोळ्यांचा, त्वचेचा व मूत्राचा रंग पिवळा होतो, तर शौचास पांढरट चिकणमातीसारखे होऊ लागते. पचनास आवश्यक पित्तरसाचा अभाव झाल्याने ही लक्षणे दिसतात. सामान्यपणे पाच ते दहा दिवसांत हा आजार बरा होतो. दुसऱ्या प्रकारच्या काविळीत म्हणजे रक्ताद्वारे संसर्ग होणाऱ्या काविळीत विषाणू एकाच्या रक्तातून दुसऱ्याच्या शरीरात प्रवेश करतात. इंजेक्शनच्या सुया, शस्त्रक्रियेच्या सुया वा रक्त यांच्याशी सतत संपर्क येणाऱ्या सिस्टर, डॉक्टर यांसारखी व्यक्ती, सर्जन यांना हा संसर्ग होण्याची शक्यता असते. ही कावीळ तीव्र स्वरूपाची असून बरी व्हायला खूप वेळ लागतो. काही वेळा यकृतदाह होऊन यकृताचे काम कायमचेच मंदावत जाते. यालाच 'लिव्हर सिर्‍हाॅसिस' असे म्हणतात. सिर्‍हाॅसिसमध्ये यकृत आक्रसत जाऊन त्याचे काम बंद पडत जाते. हा एक गंभीर रोग आहे. सध्या काविळीची लस (हेपॅटायटिस बी) टोचली जाते, ती या प्रकारच्या काविळीला प्रतिबंध करते. या प्रकारच्या काविळीवर उपचार नसल्याने प्रतिबंध हाच योग्य उपाय तर ठरतो. अंथरुणात पडून पूर्ण विश्रांती, तोंडावाटे भरपूर शर्करायुक्त पेयद्रव्ये, हलका कर्बयुक्त आहार घेतल्यास सर्वसामान्य कावीळ आपोआप नियंत्रणात येते. तीव्र लक्षणांत शिरेवाटे ग्लुकोज सलाईन देऊन रुग्णाच्या पचनसंस्थेला आराम देऊन मदत केली जाते. कावीळ हा विषाणूजन्य आजार असल्याने रुग्णाशी संपर्क आल्यास हात स्वच्छ धुणे, त्याची भांडी, अंथरूण, कपडे यांची वेगळी व्यवस्था करणे व अन्य लोकांनी पाणी उकळून पिणे हा प्रतिबंधाचा महत्त्वाचा मार्ग असतो. शेवटी पण महत्त्वाचे, काविळीची लक्षणे व प्रत्यक्ष संसर्ग होण्याची कारणे जरी दूर झाली, तरी रुग्णाच्या डोळ्यांचा रंग काही आठवडे पिवळसर राहतो व हळूहळू नेहमीसारखा होतो. *'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *A positive attitude can overcome a negative situation.* * ( सकारात्मक दृष्टीकोनाने नकारात्मक परिस्थितीवर मात करू शकते. )* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *'होमरुल लीग' ची स्थापना कोणी केली ?* डॉ अँनी बेझंट 2) *शिवसेनेचे पक्षप्रमुख कोण आहेत ?* उद्धव ठाकरे 3) *वनस्पती प्रकाश संश्लेषण क्रियेत हवेतील कोणता वायू शोषून घेतात ?* कार्बन डायआक्साईड 4) *भारतात सर्वप्रथम सूर्योदय व सूर्यास्त कोणत्या राज्यात होते ?* अरुणाचल प्रदेश 5) *'द वाल' असे कोणत्या क्रिकेट खेळाडूला म्हटले जाते ?* राहुल द्रविड *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● मुकेश धर्मले, नांदेड ●  जयेंद्र कुणे ●  श्रीपाद जोशी ● संतोष पेंडकर ●  सुनील अस्वले, कोल्हापूर ●  संगमेश्वर नलगिरे ●  सायारेड्डी सामोड ●  मुकेश पाटील ●  विशाल गंगुलवार ● कांचन कानतोडे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *"जो घाबरतो तो वाया जातो. पाण्यात पडल्यावर जो संयम ठेवत नाही, तो शेवटी गटांगळ्या खातो." 'बी' पेरलं की लगेचंच त्याचं झाड तयार होऊन त्याची फळं खायला मिळावीत, एवढा उतावीळपणा असणारी काही माणसं पाहायला मिळतात. पण असं होत नाही, उलट असं न झाल्याचं दुःखं मात्र नक्की होत असतं. म्हणून कोणत्याही कामात माणसानं संयम राखणं आवश्यक आहे. दुःखं कितीही मोठं असलं तरी 'काळ' हा त्यावर इलाज आहे. पण त्यासाठी काही वेळ जाऊ देण्याची वाट मात्र पहावी लागते. तेवढी वेळ जाऊ देण्याइतका संयम माणसाला ठेवावा लागतो. दुःखात व्यसनाच्या आहारी जाणे किंवा आत्महत्या करून घेणे, या गोष्टी माणसाच्या हातून घडतात.* *याबरोबरच कामात प्रचंड घाई करणारी माणसंसुद्धा पाहायला मिळतात. 'अति घाई, संकटात नेई' असं रस्त्यावरील फलकांवर वाचायलाही मिळते. विशाल वटवृक्षाची सुरुवात एका छोट्याशा कोंबापासून होते. जर हे "उगवलेलं कोंब मध्यातच वाळून गेलं तर ते वाया जातं. त्याप्रमाणं 'उतावीळ' माणसाची बुद्धी वाया जाणारीच समजावी. "कोंब वाळल्यावर जसं त्याचा वटवृक्ष बनणार नाही हे आपल्याला कळतं, तसं उतावीळपणा केल्यानं काम पूर्ण होणार नाही, हेही आपण समजून घेतलं पाहिजे.* ••● ‼ *रामकृष्णहरी* ‼ ●•• 🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो* , *देरे हरी * खाटल्यावरी ,हे कधी घडलं* *नाही आणि घडणारही नाही.* *आपले कर्तृत्व हीच आपली काशी.* *संत तुकारामांनी सांगितले आहे की* *असाध्य ते साध्य करिता सायास।* *कबीर म्हणतात, ** *एकही साधे सब साधे।* *श्रीकृष्ण म्हणतात,* *कर्मन्यवाधिकारस्ये मा फलेशु* *कदाचनम।* *जनार्धन स्वामी म्हणतात* , *चला उठा कामाला लागा।* *याचा अर्थ कुणीही खाटल्यावर देणार* *नाही ,आणि काम व सराव * या शिवाय पर्याय नाही.* *सचिनची बॅट फिरली सर्व सुख* *त्याच्या पुढ्यात उभी ठाकली. लता* *दीदीच्या फक्त गाण्याने जगाला* *वेड लावलं,आजही त्या* *गाणं गाण्यापूर्वी रियाज* *करतात.* *बहिणाबाई फक्त दिसलं त्यात वास्तव* *शोधून बोलत गेल्या गाणी* *कविता अजरामर झाल्या.* *गाडगेबाबा फक्त गल्लीबोल आणि* *माणसांची मने साफ* *करत ,राष्ट्रसंत झाले.* *बाबा आमटेनी कुष्ठरोग्यांच्या जीवनात* *प्रकाश पेरला, जगात* *किर्ती मिळाली.* *नीलिमा मिस्रांच्या गोधड्या* *सातासमुद्रापार गेल्या,सुरेखा* *पुणेकरांनी लावणीवर प्रेम केलं आणि* *लावणीसम्राज्ञी अस नाव* *मिळवलं.* *अशी कितीतरी मोठी यादी तयार* *होईल.* *ज्यांना एखादी गोष्ट कळली व त्यावर* *त्यांनी जीवापाड मेहनत* *घेतली तर नक्की त्या क्षेत्रात आपण* *शेहनशहा झाल्याशिवाय* *राहत नाही.* *नको अजरामर पण प्रयत्न करायला* *काय हरकत आहे.* *आखिर कोशिश करने वालोकी कभी* *हार नही होती।* *अशोक लक्ष्मण कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• सर्वसामान्य माणसाच्या जीवनात मागचे दिवस आठवले की,अंगावर रोमांच उभे राहतात आणि भूतकाळ जसा एखाद्या चित्रपटातील क्रमाक्रमाने प्रसंग आठवायला लागतात.असे प्रसंग पुन्हा आपल्यासमोर उभे राहू नये म्हणून तो मागच्या प्रसंगातून काहीतरी शिकतो आणि म्हणतो पुन्हा असे दिवस माझ्या नशिबाला येऊ नयेत.भूतकाळही आपला एक समर्थ गुरूच असतो.जी झालेली चूक पुन्हा होऊ नये याची वारंवार सूचना करत असतो.विचारी माणूस मागच्या आठवणी जाणून पुढे पाऊल टाकत असतो. जर का असे नाही केले तर पुन्हा येरे मागचे हाल अशी अवस्था होऊन बसते.ती अवस्था ते प्रसंग येऊ नये असे वाटत असेल तर आपल्या प्रयत्नाने ते नक्कीच दूर करता येतात.आपल्याच हाताने आणि अथक परिश्रमाने ते काळोखी ढग दूर करता येतात.केवळ विचार करून चालणार नाही तर त्याला आपल्या आत्मविश्वासाची आणि प्रयत्नांची सांगड घालावी लागते. त्यामुळे नक्कीच आपले जीवन परिपूर्ण होऊन जाईल. भविष्याचा वेध हा भूतकाळातूनच घेता येतो आणि जीवन समृद्ध करता येते. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद ९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *लोभी माणूस* एका लोभी माणसाने आपला सगळा पैसा शेतात पुरून ठेवला होता. तेथे दिवसातून दोन वेळा जाऊन त्या पुरलेल्या जागेकडे पाहून तो मोठे समाधान मानीत असे. ते त्याचे वागणे त्याच्या नोकराने पाहिले व त्याने तर्क केला की, आपला मालक या जागेकडे नेहमी पाहतो, तेव्हा तेथे काहीतरी पुरलेले असावे. रात्री त्याने तेथे जावून खणून पाहिले तर आत बरेच धन त्याला दिसले. ते घेऊन तो पळून गेला. दुसर्‍या दिवशी तो लोभी माणूस नेहमीप्रमाणे तेथे येऊन पाहतो तर सगळे धन चोरीला गेलेले त्याला दिसले. मग तो डोके बडवून घेत रडू लागला. तेव्हा त्याचा शेजारी त्याच्याजवळ येऊन रडण्याचे कारण विचारू लागला. लोभी माणसाने घडलेली हकीकत त्याला सांगितली. ते ऐकून शेजारी म्हणाला, ''अरे मला वाटते की तसे तुझे काहीच गेले नाही. आपला पैसा येथेच आहे, असे समजून तू पूर्वीप्रमाणेच या जागेकडे पहात जा म्हणजे झाले.'' तात्पर्य : लोभी माणसे पैसे असून दारिद्र्यी व अशांना पैश्यांचा उपयोग न होता दुसरेच कोणीतरी त्याचा उपयोग करून घेतात. जवळ असलेला पैसा वापरायचा नाही तर तो चोरीला गेल्यावर शोक करण्यात काय अर्थ? *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 03/09/2019 वार - मंगळवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- ◆ १९७१-कतारला स्वातंत्र्य मिळाले. ◆ १९१६-अँनी बेझंट यांनी 'होमरूल लीग 'ची स्थापना केली. 💥 जन्म :- ● १९६५ - चार्ली शीन, अमेरिकन अभिनेता. ● १९७६ - विवेक ओबेरॉय, हिंदी चित्रपट अभिनेता. 💥 मृत्यू :- ● १९६७ - अनंत हरी गद्रे, मराठी समाजसुधारक. ● १९९१ - फ्रँक काप्रा, अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वच्छ भारत अभियान  राबविल्याबद्दल बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनकडून पुरस्कार जाहीर, त्यांना मिळणारा हा जागतिक स्तरावरील दुसरा पुरस्कार आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *नवी दिल्ली - चंद्रयान-2 च्या ऑर्बिटरपासून लँडर विक्रम काल दुपारी सव्वा एक वाजता यशस्वीरित्या वेगळे झाले,7 सप्टेंबर 2019 रोजी विक्रम चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे.* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *मुंबई, पुणेसह राज्यभरात गणेशोत्सवाची धूम, घरोघरी विराजमान झाले बाप्पा, देशातील अनेक शहरांमध्ये बाप्पाच्या भव्य आणि मनमोहक मूर्त्यांची स्थापना करण्यात आली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *मुंबई : काँग्रेसचे माजी खासदार अब्दुल सत्तार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत केला प्रवेश* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचा हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम, त्यामुळे बँकेच्या संचालक मंडळावर असलेले राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, विजयसिंह मोहिते-पाटील, आनंदराव अडसूळ, शिवाजीराव नलावडे आदींसह जवळपास 70 नेते अडचणीत* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *वायुसेनेत 3 सप्टेंबरला दाखल होणार 8 अपाचे लढाऊ हेलिकॉप्टर, भारत हे हेलिकॉप्टर वापरणारा 14 वा देश, 2015 मध्ये भारताने अमेरिकेच्या सरकारसोबत 22 अपाचे हेलिकॉप्टर खरेदीचा करार केला होता* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *मोहम्मद शमीने वेस्ट इंडीज विरुद्ध भारत कसोटी क्रिकेटमध्ये बळींचं दीड शतक साजरं केलं. शमीने आपल्या ४२ व्या कसोटी सामन्यात ही कामगिरी करुन दाखवली आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎙👆🏻📡 *"शालेय संस्कार"* ..कार्यक्रमांतर्गत विशेष सदर... *_बगळ्याची गोष्ट_* खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा आणि ▶यास टच करून ऐका..👉🏻📻 http://shaleyvrutta.blogspot.com/ 🎧 वाचकस्वर: *ना. सा. येवतीकर* शिक्षक - बिलोली *.. ऐका & शेअर करा..* ________________________ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *कार्बनचक्र म्हणजे काय ?* 📙 पृथ्वीवरील प्रत्येक सजीवामध्ये कार्बनचे अस्तित्व आहे. मात्र वातावरणातील कार्बन डायऑक्साइड वायूचे प्रमाण अत्यल्प आहे. प्राणवायूशिवाय कोणताच सजीव जगात नाही, हे आपल्याला माहीत आहेच. हवेतील प्राणवायू कायम राखण्याचे महत्त्वाचे काम वनस्पती करत असतात. हे काम जर झाले नसते, तर वातावरणातील प्राणवायू कधीच संपला असता. रात्रंदिवस वनस्पती हे जे काम करत असतात, त्यातून कार्बनचक्र अव्याहत चालू राहते. क्लोरोफिल या हिरव्या द्रव्याचा या प्रक्रियेत महत्त्वाचा भाग असतो. बहुतांश वनस्पती क्लोरोफिलचा वापर करून स्वतःचे अन्न तयार करतात. जमिनीतून मिळवलेले पाणी व अन्य अनेक रसायने यांचा यासाठी वापर होतो. मुख्यत: शर्करा तयार करताना वनस्पती सूर्यप्रकाशाचा दिवसा उपयोग करून घेतात. या क्रियेत वनस्पती हवेतील कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात. ही क्रिया पुढील प्रमाणे होते - Energy + 6H2O ⬆ 6CO2 »» C6H12O6 + 6O2 ⬆ यातून ग्लुकोज तयार होऊन तिचा वनस्पती वापर करतात व हवेमध्ये ऑक्सिजन बाहेर टाकला जातो. रात्रीच्या वेळी मात्र सूर्यप्रकाशाचा अभाव असल्याने ही क्रिया घडत नाही. फक्त वनस्पतींचे श्वसन चालू राहते. त्यात प्राणवायू आत घेतला जाऊन कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो. वनस्पतींच्या वाढीसाठी लागणारा कार्बन प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारेच मिळवला जातो. वनस्पतींच्या फांद्या, खोड, पाने बनवण्यात कार्बनचा मोठा वाटा असतो. वनस्पतीचे आयुष्य संपल्यावर शिल्लक राहतो, तो कार्बनचाच मोठा भाग असतो. मात्र हवेतील प्राणवायूचे प्रमाण कायम राखण्यात या सार्‍या प्रक्रियेचा मोठा वाटा असतो. *'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *“ इतिहास हा काळाचा साक्षीदार असतो आणि सत्याचा प्रकाश असतो. ”* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल कोण आहेत ?* भगत सिंह कोश्यारी 2) *'अँटीरेबीज लस' कोणी शोधून काढली ?* लुई पाश्चर 3) *ह्रदयरोपणाचे जनक कोणाला म्हटले जाते ?* ख्रिश्चन बर्नाड 4) *आधुनिक भारताचे जनक कोणाला म्हटले जाते ?* राजाराममोहन राय 5) *आधुनिक मराठी कवितेचे जनक कोणाला म्हणतात ?* केशवसुत *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● आशिष हातोडे ●  राज कुमारे ●  प्रदीप पंदिलवाड ●  भिमराव सोनटक्के *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *"जो घाबरतो तो वाया जातो. पाण्यात पडल्यावर जो संयम ठेवत नाही, तो शेवटी गटांगळ्या खातो." 'बी' पेरलं की लगेचंच त्याचं झाड तयार होऊन त्याची फळं खायला मिळावीत, एवढा उतावीळपणा असणारी काही माणसं पाहायला मिळतात. पण असं होत नाही, उलट असं न झाल्याचं दुःखं मात्र नक्की होत असतं. म्हणून कोणत्याही कामात माणसानं संयम राखणं आवश्यक आहे. दुःखं कितीही मोठं असलं तरी 'काळ' हा त्यावर इलाज आहे. पण त्यासाठी काही वेळ जाऊ देण्याची वाट मात्र पहावी लागते. तेवढी वेळ जाऊ देण्याइतका संयम माणसाला ठेवावा लागतो. दुःखात व्यसनाच्या आहारी जाणे किंवा आत्महत्या करून घेणे, या गोष्टी माणसाच्या हातून घडतात.* *याबरोबरच कामात प्रचंड घाई करणारी माणसंसुद्धा पाहायला मिळतात. 'अति घाई, संकटात नेई' असं रस्त्यावरील फलकांवर वाचायलाही मिळते. विशाल वटवृक्षाची सुरुवात एका छोट्याशा कोंबापासून होते. जर हे "उगवलेलं कोंब मध्यातच वाळून गेलं तर ते वाया जातं. त्याप्रमाणं 'उतावीळ' माणसाची बुद्धी वाया जाणारीच समजावी. "कोंब वाळल्यावर जसं त्याचा वटवृक्ष बनणार नाही हे आपल्याला कळतं, तसं उतावीळपणा केल्यानं काम पूर्ण होणार नाही, हेही आपण समजून घेतलं पाहिजे.* ••● ‼ *रामकृष्णहरी* ‼ ●•• 🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो,* *रोज सकाळी सकाळी उठल्यावर पेपरमध्ये डोकावतो तेव्हा एक* *जोराची सनक मेंदूला चिरून जाते.* *खून,दरोडा,बलात्कार,* *अपघात,हाणामारी, विनयभंग,* *बालके आणि वृद्धावस्थेत* *जनावरासारखी रस्त्यात फेकलेली* *जिवंत* *माणसे,लुटालूट,फरारी,हल्ला,* *यापेक्षा वेगळं काही भडक ,पेपरमध्ये* *क्वचितच दिसते.* *मन अगदी सुन्न होते आणि* *पुन्हा एकदा सानेगुरुजी आणि त्यांच्या* *आईची आवर्जून आठवण* *होते.* *श्यामला आई म्हणते श्याम पायाला* *घाण लागू नये म्हणून* *जपतोस तस मनाला घाण लागू नये म्हणून जप हं।* *आजच्या भयाण बाह्य* *वातावरणात ह्या संस्काराची गरज* *पदोपदी जाणवते.बाहेर काही* *असो--आजच्या धुळवडीच्या* *दिनी प्रयत्न करूया* *की आपली मुलं, त्यांचे* *मित्र-मैत्रणीचे, शेजारील* *बालके,अवती भवतीचे मुलं, यांच्या* *वरील बाह्य विघातक शक्ती* *कशा थांबवता येतील व श्याम* *तयार करण्याचा छोटासा* *प्रयत्न आपापल्या परीने करूया।* *एक त्रिकालवादी सत्य आहे, सर्वत्र* *अंधार असतांना कुठेतरी* *छोटीशी पणती प्रकाशाची वाट दाखवतेच ना।* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• काही लोकांच्या बाबतीत पैसा म्हणजे सर्वस्व आहे आणि पैशामुळे काहीही मिळवता येते. पैशामुळे तुम्हाला तुमच्या भौतिक सुविधा मिळवता येतात परंतु इतरांचे मन मिळवता येत नाही.इतरांचे मन जिंकायचे असेल तर या ठिकाणी पैसा चालत नाही.त्यासाठी हवे तुमचे उदार अंतःकरण,तुमची दुस-याबद्दलची आत्मियता,प्रेम इतरांना दिलात तर तेही तुमच्यावर अधिक प्रेम करायला लागतील.यासाठी तुमच्या जवळ असलेल्या पैशाची गरज नाही.एवढे सत्य आहे पैशाने सारे काही खरेदी करता येईल पण जगात असलेल्या सर्व जीवांचे मन आणि प्रेम कधीच खरेदी करता येत नाही.मग तुमच्या जगण्याला काय अर्थ आहे ? © व्यंकटेश काटकर, नांदेड ९४२१८३९५९०/८०८७९१७०६३ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *योग्य निर्णय* एक कुंभार मातीची चिलम बनवित होता. चिलमचा आकार केला सुध्दा ... पण थोड्याच वेळात त्याने तो आकार बदलला.. मातीने विचारले, अरे कुंभार दादा, तु छान चिलीम बनविली होती. मग का परत बदल केला? कुंभार म्हणाला, मी चिलम बनवत असताना माझी मति बदलली आणि घागर बनविण्याचा निर्णय घेतला. मातीने म्हणाली, कुंभार दादा, तुमची मति बदलल्या मुळे, माझे जीवनपण बदलले, मी चिलम झाले असते तर मी ही जळाले असते आणि दुसऱ्यांना ही जाळले असते ! आता मी घागर झाल्यावर मी ही शीतल राहिल आणि इतरांना ही शीतलता देइल. *तात्पर्य : जीवनात सुयोग्य निर्णय घेतल्यास, आपल्याला ही आनंद मिळतो आणि आपल्या मुळे इतरांना ही आनंद मिळतो.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 31/08/2019 वार - शनिवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १९२० - डेट्रॉइटमध्ये पहिल्यांदा रेडियोवरुन बातम्या प्रसारित झाल्या. १९६८ - सर गारफील्ड सोबर्सने एका षटकात ६ षटकार फटकावले 💥 जन्म :- १५६९ - जहांगीर, मुघल सम्राट १९६९ - जवागल श्रीनाथ,भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- १९९७ - प्रिन्सेस डायना, ब्रिटीश राजकुमारी *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *नवी दिल्ली – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दहा सरकारी बँकांच्या विलिनीकरणाची पत्रकार परिषदेत केली घोषणा, 27 बँकाऐवजी आता राहतील.12 सरकारी बँका.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *आगामी दोन वर्षात भारत बनणार प्रमुख डिजीटल सोसायटी असणारा देश – पंडित दीनदयाळ पेट्रोलियम युनिवर्सिटीच्या दीक्षांत समारोहात मुकेश अंबानी बोलत होते* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *पुढील काही दिवसांमध्ये पाऊस पुन्हा सक्रिय होणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. गणपती बाप्पाच्या आगमनासह पाऊसही राज्यभरात विविध भागात दमदार हजेरी लावणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *आय टी रिटर्न भरण्याची तारीख वाढविण्यात आली असून ती ३० सप्टेंबरपर्यंत आहे, हा मेसेज अफवा आहे, असे केंद्रीय आयकर विभागाकडून स्पष्ट करण्यात आले असून रिटर्न भरण्याची आज शेवटची तारीख आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *यंदा बजेट जुलै महिन्यात सादर झाल्याने काही नियम हे 1 सप्टेंबरपासून लागू होणार आहेत. हे नियम टीडीएस, पॅनकार्ड आणि आधारकार्डाशी संबंधीत असल्याने सामान्य लोकांवर याचा परिणाम होणार आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *आर्थिक वर्षातील पहिल्या त्रैमासिकात जीडीपी 5 टक्क्यांवर घसरला, देशाची अर्थव्यवस्था कोलमडली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *वेस्ट विंडीजचा बाहुबली रहकीम कॉर्नवॉलचे कसोटी सामन्यात पदार्पण, दुसऱ्या कसोटीत नाणेफेक जिंकत वेस्ट विंडीजची प्रथम गोलंदाजी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बुलेटीन audioमध्ये ऐका खालील लिंकवर https://b.sharechat.com/y83PmqLzAZ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *नजर हटी, दुर्घटना घटी* https://nasayeotikar.blogspot.com/2018/07/blog-post_29.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सिद्धेश्वर मंदीर - बारामती* बारामती (पुणे) : बारामतीचे ग्रामदैवत असलेल्या श्री सिध्देश्वर मंदिरास नुकतीच 840 वर्षे पूर्ण झाली. शहाजी राजे, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांपासून ते कविवर्य मोरोपंतापर्यंत अनेक युगपुरुषांच्या पावनस्पर्शाने पुनित झालेले हे मंदिर बारामतीच्या वैभवशाली ऐतिहासिक परंपरेचे आजही साक्षीदार बनलेले आहे. इ.स.पूर्व 1137 मध्ये राज रामदेवराव यादव यांनी या मंदिराच्या उभारणीचे काम हाती घेतले, चाळीस वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर महादेवाचे श्री सिध्देश्वर मंदिर साकारले. अखंड लिंग व अखंड दगडातील अत्यंत सुंदर नंदी हे या मंदीराचे वैशिष्टय. नंदीचे सर्व दागिनेही दगडातच कोरलेले आहेत, समोरुन नंदीकडे पाहिले तर त्याचा एक कान तुमच म्हणण ऐकतो आणि दुसरा कान महादेवाकडे आहे, जणू तुमच्या मनातील इच्छा महादेवापर्यंत पोहोचविण्याचे कामच तो करतो असा भास होतो. या मंदिराच्या कळसामध्ये एक गुप्त लिंग होते व एक पाण्याच्या टाकीची सोय आहे. गुप्त लिंग आता तेथून काढून ठेवण्यात आले आहे, मात्र त्या काळातही वास्तूकला किती आधुनिक होती हे मंदीराकडे पाहिल्यावर जाणवते. औरंगजेबाच्या काळात शहाजी महाराजांकडे व त्यांच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केल्यानंतर त्यांच्याकडे हे मंदिर होते. त्या नंतर पहिले बाजीराव पेशवे यांनी पांडुरंग दाते यांच्याकडे या मंदिराची व्यवस्था सुपूर्द केली. तेव्हापासून दाते कुटुंबिय आजतागायत सिध्देश्वर मंदिराची दैनंदिन व्यवस्था पाहतात. सन 1723 मध्ये बाळाजी विश्वनाथ भट यांनी मोडी भाषेत एक सनद लिहून ठेवली होती, जी आजही उपलब्ध आहे. त्यात मंदिराचा इतिहास नमूद आहे. संत ज्ञानेश्वर या मंदीरात नेहमी येत असत. त्यांनी येथे एका गणपती मूर्तीची स्थापना केली, त्यांच्या हातांचे व बोटांचे ठसे असलेला एकमेव दगड या मंदीरात आजही आहे. संत तुकाराम महाराजांचेही वास्तव्य येथे होते, या शिवाय कविवर्य मोरोपंत व श्रीधरस्वामींनी या मंदीराच्या आवारात बसून विपुल लेखन केलेले आहे. पूर्वी तुकाराम महाराजांच्या पालखीचे वास्तव्य याच मंदीरात असे. मंदिराची वैभवशाली परंपरा... बारामतीचे श्री सिध्देश्वर मंदीर ही वैभवशाली ऐतिहासिक परंपरा आहे, याचे जतन करण्याचा आम्ही प्रयत्न सातत्याने करतो. सर्वांची यात आम्हाला साथ मिळते आहे. .. विश्वस्त, श्री सिध्देश्वर मंदीर, बारामती. *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *“ आरोग्य आणि आनंदीपणा एकमेकास पूरक असतात. ”* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● रत्नाकर कदम चोळखेकर ●  सुभाष जाधव ●  संतोष पाटील साखरे ●  सचिन वाघ ●  उदय मोहिते ●  अशोक जायवाड ●  साईनाथ वाघमारे ●  अशोक मुदलोड ● प्रकाश कल्याणकर *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *'स्तुती' कोणाला आवडत नाही? सर्वांना आवडते, देवांनाही आवडते. म्हणून तर 'आरती' हा प्रकार जन्माला आला. देवाची स्तुती सामुदायिक, एकत्रीत, तालासुरात करता यावी म्हणून तर संगीतमय आरतीचा शोध लागला असावा. त्या म्हणताना उच्चारांपेक्षा त्यातली भावना आधिक महत्वाची. आरत्यांना आरती म्हणण्याचे कारण म्हणजे, देवाची शब्दातून केलेली आर्त प्रार्थना हेच आहे. या आर्ततेमुळे त्या स्थितप्रज्ञ परमेश्वरास पाझर फुटून तो आपल्यावर कृपा करील, ही एकमेव आशा भक्ताला असते.* *माणसांबाबत या आरतीला तालासुरांची गरज नाही. चार मोजक्या शब्दांत केलेली स्तुती समोरच्या व्यक्तीला हरभ-याच्या झाडावर चढवायला खूप होते. ही झाडे स्तुतीच्या रूपाने विविध क्षेत्रात फोफावलेली जाणवतात. राजकारणात तर त्यांचे वटवृक्ष झाले आहेत. 'साहेब, तुम्ही आहात म्हणून सर्वकाही आहे.' ही आरती तर 'सुखकर्ता दुखहर्ता' यापेक्षाही लोकप्रिय आहे. शिवाय जोडीला 'घालीन लोटांगण, वंदिन चरण' ही समारोपाची प्रार्थना तर राजकारणात सुरूवातीलाच म्हटली जाते. कधी कमी तर कधी अमाप स्तुतीने या आरत्या आपले काम चोख करीत असतात.* *"आरतीसमोर सहजी प्रसन्न होत नाही तो 'देव' आणि अगदी स्वस्तात पटतो तो 'माणूस' हा फरक आहे."* *~~‼॥ रामकृष्णहरी ॥‼~~* 🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो,* *जो हात हालवणार नाही तो पाण्यात* *कधीच पोहू शकणार नाही.* *जो पाय उचलू शकत नाही तो कधीच* *चालू शकणार नाही.* *ज्याच्या डोक्यात नाही हा शब्द घर* *करतो तो कधीच कुठलंही आव्हानात्मक काम करूच शकत नाही.* *चुकी त्यांच्या हातूनच होते* *जे काम करतात* *बिना कामाचे लोकांचे जीवन तर* *दुसऱ्यांच्या चुका* *काढण्यातच संपून जातात....!* *एखादी वस्तू वापरली नाही की ती गंजते,* *आणि जास्त वापरली तर झिजते..* *काहीही झालं तरी शेवट तर ठरलेलाच आहे..* *मग कोणाच्याही उपयोगात न येता,* *गंजण्यापेक्षा*, *इतरांच्या सुखासाठी झिजणे* *केव्हाही उत्तमच…!!* *तर मग उठा आणि कामाला लागा।* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• वाहत जाणा-या  पाण्याच्या प्रवाहाबरोबर अनेक जीवजंतू,केरकचरा आणि इतर अनावश्यक वस्तूंना पाणी सोबत घेऊन जाते असे पाहणा-यांना वाटते. परंतू पाणी ह्या सा-यांना जेव्हा सोबत घेऊन जाते तेव्हा काही काळापर्यंतच.कारण हे सारे सतत वाहणा-या प्रवाहाबरोबर तग धरु शकत नाहीत.त्यांना माहित असते की,आपण निकामी आहोत आपला काही उपयोग नाही आणि इतरांच्या फायद्याचे आपण नाहीत.त्यामुळे काही अंतरावर गेल्यानंतर तोच प्रवाह आपल्याला बाजूला टाकून पुढे पुढे जाणार आहे.अर्थात पाण्याचा प्रवाह हाच इतरांच्या जीवनासाठी उपयोगी येणार आहे.जे इतरांच्या उपयोगी येणार आहे तेच शेवटपर्यंत टिकून राहू शकते.पाणीजसे सर्वांसाठी संजीवन आहे त्याचप्रमाणे चांगली सज्जन माणसे देखील समाजातील आपल्या चांगल्या विचारांबरोबर इतरांना घेऊन जीवनाचा प्रवास सुखकर करत असतात.जी कच-याप्रमाणे अर्थात वाईट वर्तन असणारी माणसे सज्जनांच्या सहवासात मिळण्याचा प्रयत्न करतात पण त्यांना ते जमत नाही आणि जुळवूनही घेत नाहीत ती माणसे आपोआपच बाहेर पडतात.अशा कचरारुपी वाईट माणसांना आपल्या प्रवाहात घेऊनही जर सुधारत नसतील तर त्यांना बाजूलाच ठेवून पुढे जाणे हे केव्हाही चांगले. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद...९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *माणुसकीचे फळ* एका बर्फाच्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीची ही गोष्ट आहे. कामाचा वेळ संपत आला होता सगळे घरी जाण्यासाठी तयार होते. तेवढ्यात कंपनीमध्ये थोडा तांत्रिक बिघाड झाला. म्हणून तो व्यक्ति तो बिघाड दुरुस्त करायला गेला. त्याला काम करण्यात खुप उशीर लागला. तोपर्यंत प्लांट बंद झाला. लाइट बंद करून दरवाजे सील करण्यात आले. अशा परस्थितित त्याचा बर्फ आणि थंडी ने जिव जाणे, निश्चित होते. त्या माणसाला काही सुचेनासं झालं, पण तासा भरात एक चमत्कार झाला. आणि कोणी तरी दरवाजा उघडला. तो समोर पाहतो तर सुरक्षा रक्षक हातात टॉर्च घेऊन उभा होता. त्याने त्याला बाहेर काढून त्याचा जिव वाचवला. प्लांट बाहेर आल्यावर त्याने सुरक्षा रक्षकाला विचारले, “तुम्हाला कसे कळले की मी आत अडकलोय.” सुरक्षा रक्षक म्हणाला, “या प्लांट मध्ये जेवढे लोक काम करतात त्यात तुम्ही एकटेच असे आहात की जे रोज मला येताना नमस्कार आणि जाताना राम राम बोलता आणि आज सकाळी तुम्ही कामावर आलात पण संध्याकाळी गेला नाहीत. म्हणून माझ्या मनात शंका आली आणि मी पाहायला आलो.” त्या व्यक्तीला कधी वाटले देखील नव्हते की त्याचे एखाद्याला एवढा छोटा सन्मान देणे, एक दिवस त्याचा जिव वाचवेल. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा कधीही कोणाला भेटाल तेव्हा त्याच्या सोबत हसून सन्मान पूर्वक बोलून मग पुढे जा. माणूसकीच तुम्हांला शेवट पर्यंत साथ देईल… म्हणून सर्वांबरोबर माणूसकीने वागा… *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

*प्रमिला ताई सेनकुडे यांना मानव विकास राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर https://vicharsanghasharvindkumar1111blogspo.blogspot.com/2019/08/blog-post_19.html#.XVp499s64_s.whatsappXVlqvYTfwuw.whatsapp👆🏻 *वरील बातमी वाचण्यासाठी दिलेल्या लिंक ला टच करा अधिक बातम्या वाचण्यासाठीwww.vicharsangharsh. com या या वेबसाईटला भेट द्या जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क करा 91 30 73 10 28 विचार संघर्ष ऑनलाईन न्यूज पोर्टल मुख्य संपादक अरविंद कुमार भोरे*

*प्रमिलाताई सेनकुडे यांना मानव विकास राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर* - http://missionindiatv.com/pramilatai-senkude/

*💐आमची शाळा आमचे उपक्रम💐* अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांमधील कौशल्यांचाही विकास होणे गरजेचे असते त्यावर आधारीत *जि.प. प्रा.शाळा गोजेगाव ता.हदगाव जिल्हा नांदेड येथे* प्लॅस्टर आॅफ पॅरीसचे गणपती पर्यावरणास घातक असून मातीपासून बनवलेले गणपती पर्यावरणास पूरक आहेत हे पटवून देण्यात आले. 🌳🌳🌳🌳🌳🌳 या उपक्रमात विद्यार्थ्यांनी हिरीरीने भाग घेऊन कौशल्य वाढवण्याचा प्रयत्न केला व अतिशय सुंदर बैलजोडी तसेच गणपती बाप्पा च्या मूर्ती बनवल्या. 🌸🌸🌸🌸🌸🌸 आमच्या चिमुकल्यांचा छोटासा प्रयत्न...(30-08-2019)👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 30/08/2019 वार - शुक्रवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- ● १५७४ - गुरू रामदास सर्वोच्च शीख गुरू पदी. 💥 जन्म :- ● १९३० - दशरथ पुजारी, मराठी संगीतकार. ● १९३४ - बाळु गुप्ते, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- ● १९४७- नारायण मुरलीधर गुप्ते उर्फ कवी 'बी' ● १४८३ - लुई अकरावा, फ्रांसचा राजा. ● १६१९ - शिमाझु योशिहिरो, जपानी सामुराई. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 *9604481084* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी. येत्या काळात पोटखराबा आणि जिरायत असलेले हजारो हेक्टर क्षेत्र आता बागायती खाली येणार, राज्य सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला असून राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आता याचा फायदा होणार आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे १७ जुलै ते ३० जुलै २०१९ या कालावधीत घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल आज एक वाजता जाहीर करण्यात येणार आहे.* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 'फिट इंडिया' मोहिमेचा शुभारंभ; दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियमवर पार पडला सोहळा, 'फिट इंडिया' अभियानात उद्योग, चित्रपटसृष्टी आणि क्रीडाविश्वासह इतर क्षेत्रातील दिग्गजांचा समावेश* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *पाकिस्तानची कोंडी करण्यासाठी सुब्रमण्यम स्वामींनी सुचवला उपाय, म्हणाले- 'पाककडे जाणारी जहाजं थांबवून, व्यापार बंद करावा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *मुंबई : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री नारायण राणे करणार भाजपमध्ये प्रवेश, तसेच ते आपला महाराष्ट्र स्वाभिमान पक्षही भाजपमध्ये विलिन करणार असल्याची माहिती खुद्द स्वत: राणे यांनीच दिली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *पॅरालिम्पियन दीपा मलिकला राजीव गांधी खेलरत्न तर क्रिकेटर रवींद्र जडेजा आणि रेसलर पुजा ढांडालासहित 19 जणांना अर्जुन अवॉर्ड पुरस्कार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *मुंबई :  15 सप्टेंबरपासून दक्षिण आफ्रिके आणि भारत यांच्यात सुरू होणाऱ्या तीन टी-20 सामन्यांसाठी भारतीय संघाची करण्यात आली घोषणा, महेंद्रसिंग धोनी, जलद गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह यांचा समावेश नाही.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *बैलांचा सण : पोळा* बैलाच्या ताकदीवर तो शेतातील सर्व कामे करून घेतो. शेताची नांगरणी, वखरणी, पेरणी किंवा शेतातून घराकडे मालाची ने-आण करण्यासाठी या बैलांचा वापर केला जातो. पूर्वी दळणवळणाची सुविधा एवढी विकसीत झाली नव्हती तेव्हा शहरात जाण्या-येण्यासाठी बैलगाडीतून प्रवास करावा लागायचा. सायकल नावाची........ पूर्ण खालील लिंकवर मिळेल.....! https://nasayeotikar.blogspot.com/2019/08/blog-post_29.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *कर्करोग / कॅन्सर म्हणजे काय ?* 📙 कर्करोग किंवा कॅन्सर हा शब्द अंगावर शहारे आणतो. कॅन्सरचा आणि मृत्यूचा कोठेतरी संबंध आहे, हे मनात दडलेले असते हे याचे कारण. कर्करोगापेक्षा कॅन्सर हाच शब्द सहजगत्या वापरला जातो, नाही का ? कॅन्सरविरोधी लढाई ही खरे म्हणजे हरणारी लढाई असते, असा प्रचलित समज आहे. रक्ताचे काही कॅन्सर, कातडीचे काही कॅन्सर, स्तनाचे व गर्भाशयमुखाचे काही कॅन्सर लवकर लक्षात आले तर ही लढाई जिंकता येते, हे अलीकडे आकडेवारीने सिद्ध झाले आहे. पण अन्यथा या बाबतीत डॉक्टर शब्द वापरतात 'सर्व्हायवल रेट' हा म्हणजेच ते रोगाच्या राहिलेल्या वर्षांचा हिशोबच उलगडत असतात. आपल्या शरीरातील असंख्य प्रकारच्या पेशी त्यांना दिलेली कामे निमूटपणे करत असतात. पण अचानक त्यांतील काही बंड करतात. त्यांचा आकार वेडावाकडा वाढू लागतो. त्यांना नेमून दिलेली कामे होईनाहीशी होतात. त्यांची शरीराला अडचण होऊ लागते. अन्य अवयवांचे काम करायला त्यांचा अडथळा येऊ लागतो. या अडथळ्यांचाच एक परिणाम म्हणजे वेदना. जसजसे विविध प्रमुख अवयवांचे अडथळे वाढतात, तसतसे शरीर साथ देईनासे होते. यातुनच मृत्यू ओढवतो. आपल्या शरीरात रक्तरस म्हणजे लिम्फ नावाचा रस सर्वत्र रक्तरसवाहिन्यांतून वाहत असतो. कॅन्सरच्या पेशींचा या वाहिन्यांतून फैलाव सगळ्या शरीरभर होऊ शकतो. जेथे फैलाव होईल, तेथे त्यांची पुन्हा वाढ होऊ लागते. ज्यावेळी यकृत, फुप्फुस, प्लीहा, मेंदू या जागा या पेशींनी व्यापल्या जातात, तेव्हा संपूर्ण शरीराचेच कार्य बंद पडू लागते. शरीरातील पेशी अशा का बंड करून उठतात, याचा अजून आपल्याला पत्ता नाही. पण त्यांना बंड करायला प्रवृत्त करणाऱ्या वस्तूंना आपण कार्सिनोजन्स व कॅन्सरकडे प्रवृत्त करणाऱ्या गोष्टी म्हणून संबोधतो. उदारणार्थ, डांबर व त्यापासून बनणाऱ्या पदार्थाने कातडीचे कॅन्सर होतात, क्ष-किरणांमुळे कातडीचे व रक्तातील पेशींचे कॅन्सर होतात, तंबाखूमुळे तोंडातील कॅन्सर होतात, तर धूम्रपानामुळे फुप्फुसाचा कॅन्सर होण्याची शक्यता असते. पण येथे एक गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे. सारख्याच वातावरणात त्याच वस्तूच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला कॅन्सर होतोच, असे नव्हे; तर त्या वातावरणात न येणाऱ्यांपेक्षा या गटातील लोकांना कॅन्सर होण्याचे प्रमाण जास्त असते. आज घटकेला जगातील अनेक प्रमुख संशोधन संस्थांतून कॅन्सरविरोधी औषधांबद्दल संशोधन केले जात आहे. त्यासाठी अक्षरश: पाण्यासारखा पैसाही ओतला जात आहे. पण नेमका प्रतिबंध व नेमका इलाज सापडणे खूपच दूर आहे. सध्या उपलब्ध असलेल्या व वापरात असलेल्या इलाजांमध्ये मुख्यत: बंड करणाऱ्या पेशींवर औषधाचा मारा करून त्यांचा नाश करण्याची उपाययोजना आखली जाते. पण अनेकदा या इलाजामध्ये निरोगी पेशीही नष्ट होतात. त्यामुळे रुग्णाची तब्येत अधिकच त्रास देऊ लागते. कॅन्सरविरोधी इलाज म्हणून एका औषधाकडे आशेने पाहिले जाते. ते म्हणजे इंटरफेराॅन. रक्तातील गॅमाग्लोब्युलिनपासून हे औषध तयार करून वापरले जाते. पण त्याची किंमत व निर्मिती हा त्याच्या वापरातील प्रमुख अडथळा आहे. काही वर्षांपूर्वी फक्त कॅन्सरच्या पेशी टाकू काढून टाकण्याची शस्त्रक्रिया करणे एवढाच इलाज होता. त्यानंतरचा इलाज म्हणजे क्ष किरणांचा एकत्रित मारा ठराविक डोसमध्ये करणे. यानंतर कोबाल्ट किरणांचा मारा करण्याची पद्धत सुरू झाली. पण नंतर प्रगत औषधे जशी उपलब्ध झाली आहेत, तसे शरीरभर पसरत गेलेल्या कॅन्सरपेशींवर नियंत्रण घालणे शक्य होऊ लागले. विशेषत: रक्ताचा कॅन्सर, रक्तामार्फत पसरणारे कॅन्सर यांवर ही औषधे वापरणे आता सुरू झाले आहे. कॅन्सरच्या संदर्भात नवनवीन औषधांचा वापर करताना त्याच्या दुष्परिणामांची माहिती रुग्णांना दिली जाते. त्यांची परवानगी घेतली जाते व मगच इलाज केले जातात. यामध्ये अनेकदा औषधांचा वापर प्रथम करण्याची वेळ येते व रुग्णांना प्रथमच वापरले जाणारे औषध त्याचे दुष्परिणाम किंवा मृत्यू यातील एकाची निवड करावयाची असते. *'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *“ साधे जीवन जगणे ही जगातील सर्वात चांगली गोष्ट आहे. ”* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *भारताचे कृषिमंत्री कोण आहेत ?* मा. राधामोहन सिंह 2) *'देवीची लस' कोणी शोधून काढली ?* एडवर्ड जेन्नर 3) *रक्तगट कोणी शोधून काढले ?* कार्ल लँडस्टेनर 4) *भारतीय असंतोषाचे जनक कोणाला म्हणतात ?* लोकमान्य टिळक 5) *पी व्ही सिंधू ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?* बॅडमिंटन *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● नागभूषण मॅकावाड ●  अरुण चव्हाण ●  गणेश बोळसेकर ●  दिलीप झरेकर ●  कृष्णा श्याम दाभडकर ●  माधुरी हातनुरे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *"सहजीवन म्हणजे काय? खरंच काय लिहायचं सहजीवनाबद्दल? आणि कोणा-कोणाबद्दल लिहायचं? फक्त पती आणि पत्नीचंच सहजीवन असतं का? आई-वडील, बहीण, भाऊ, काका, मामा, आत्या यांच्याबरोबर घालवलेले लहानपणीचे सोन्यासारखे दिवस हे सहजीवन नाही का ? मला तरी एकाबरोबर घालवलेलं ते सहजीवन असं मर्यादित स्वरूपात नाही मांडता येणार. ज्या ज्या माणसांनी मला भले आणि बुरेही अनुभव देऊ केले त्या सगळ्यांबरोबर जीवन जगलो ते सहजीवनच वाटतं.’’सहजीवन म्हणजे नेमकं काय? बरोबर राहणं की जोडीनं राहणं? एकत्र एका घरात राहणं की कुठेही असलं तरी जवळ असल्याची भावना वारंवार उचंबळून येणं? माणूस कंपू करून, टोळी बनवून किंवा गर्दी करून राहतो त्याला सहजीवन म्हणायचं की प्राणी एकत्र कळपानं किंवा झुंडीनं राहतात त्याला सहजीवन म्हणायचं?* *आजकालच्या धकाधकीच्या आणि न संपणाऱ्या प्रवासानंतर घरी जाऊन बोलायला वेळ नाही म्हणून एकमेकांशी दूरध्वनीवरून किंवा संदेश पाठवून सगळ्या भावना व्यक्त करतो त्याला सहजीवन म्हणायचं? काहीच कळत नाही, की काही कळून घ्यायचं नाही आणि जोपर्यंत काही होत नाही, घडत नाही तोपर्यंत आपलं मस्त चाललंय.. म्हणून खोटय़ा निर्धास्त भावनेनं आला दिवस गेल्या दिवसापेक्षा बरा निघेल म्हणून एकाच छपराखाली राहायचं, त्याला कुटुंब असं नाव द्यायचं आणि जगण्याचं एक चोवीस तास चालणारं आणि हमखास बेरंग करणारं नाटक आपण प्रमुख पात्र म्हणून अभिनय करून पुढे चालू ठेवायचं?* *"कोणत्याही दोन नात्यांमधील सहजीवन हे व्यवहारीक असू शकते तसेच भावनिक सुध्दा असू शकते परंतु एखाद्या पती-पत्नीचे सहजीवन हे भावनिकच असावयास हवे अन्यथा तेथे राग, द्वेष, तिरस्कार, घृणा, मत्सर हे जरूर असणार जे त्या सहजीवनाला सुरुंग लावल्याशिवाय राहणार नाही ...म्हणूनच पती-पत्नीच्या सहजीवनाला वेगळा अर्थ आहे."* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 *श्री संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सज्जनहो,* *राष्ट्रसंत तुकडोजी महाराज* *काय होत या माणसाकडे,* *फक्त वाटणे,देण्यापलीकडे काहीच* *नव्हतं.* *म्हणून ते राष्ट्रसंत* *झाले.* *ते म्हणत* * *राजा सजी महाली,सौख्य कधी* *मिळाली।* *ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत* *माझ्या।* *जाता तरी सुखे जा, येता तरी सुखे* *या।* *कोणावरी ना बोझा, या झोपडीत* *माझ्या।* *अरे बाबांनो आलोच ना भूमीवर ,मग* *सगळं तिचच आहे,सांभाळून काय करता, वाटून बघा किती पटीने वाढत ते* *सांगा,मोजदाद करता येणार नाही.* *या सृष्टीने एक नियम केला आहे, अलिखित आणि चिरंतन---* *जे वाटले ते शेकडो पटीने पुन्हा परत मिळत, मग वाटायला काय हरकत आहे.* *अन्न द्या ,कधी भुकेले राहणार नाही.* *सन्मान करा, कधी मान खाली घालायची वेळ येणार नाही.* *तिरस्कार करा,आयुष्यात कधी कुणी जवळ येणार नाही.* *अपमान करा,करोडो रुपये खर्चूनही कुणी चांगलं म्हणणार नाही.* *धन वाटा, कधी कुणाकडे हात पसरावा लागणार नाही, सदैव मदत तयारच.* *ज्ञान वाटा, जगात तुमच्यासारखा ज्ञानीच प्रत्येकाच्या मनात घर करून* *बसेल,व तुम्ही किर्तीवंत व्हाल* *प्रेम करा,अवघी सृष्टी तुमचीच* *असेल, जगण्याची मजा काही औरच मिळेल.* 🤝🏻 *चला मग वाटताय ना ,शक्य होईल ते तरी *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• तुम्ही कुणावर विश्वास ठेवा अथवा ठेऊ नका पण तुम्ही तुमच्या मनातून काम करत असलेल्या कामावर विश्वास ठेवा.कारण मनातून केलेले काम हेच तुमच्या विश्वासाचे खरे प्रतिक आहे.तीच तुमच्या विश्वासाने केलेल्या कामाची पावती आहे.या तुमच्या कामावरच लोक विश्वास ठेवतात.तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवतीलच असे नाही परंतु तुम्ही मनातून केलेल्या तुमच्या कामावर नक्कीच विश्वास ठेवतील.हीच तुमची खरी ओळख व विश्वासाने केलेल्या  कामाची पावती आहे. - व्यंकटेश काटकर,नांदेड.   संवाद.9421839590/           8087917063. 🍃🌷🍃🌷🍃🌷🍃🌷🍃🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *भेटवस्तू न स्वीकारणे* अब्दुल कलाम यांचा वडिलांची शिकवण स्वातंत्र्यानंतर अब्दुल कलाम यांच्या वडिलांना ग्रामसभेचे अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. त्यांनतर एके दिवशी एक व्यक्ती त्यांना भेटायला आले. त्यावेळी कलामांचे वडील घरी नव्हते आणि कलाम अभ्यास करत होते. कलामांचे वडील घरी नसल्याचे पाहून तो इसम म्हणाला, ‘मी तुझ्या बाबांसाठी भेटवस्तू आणली आहे. ते जेव्हा येतील तेव्हा ही भेटवस्तू त्यांना दे.’ काही वेळाने कलामांचे वडील घरी आल्यावर त्यांना ती भेटवस्तू दिसली. चांदीच्या ताटात ठेवलेल्या त्या भेटवस्तू पाहून त्यांनी कलामांना विचारले, ‘बेटा या भेट वस्तू कुठून आल्या.’ तेव्हा कलाम म्हणाले, ‘तुम्ही घरी नसताना एक व्यक्ती घरी आला होता, त्यानेच हे दिले.’ त्यांच्या वडिलांनी त्या भेटवस्तू उघडून पाहिल्या तर त्यात, महागडे कपडे, चांदीचे पेले आणि मिठाई होती. हे पाहिल्यावर ते रागवले. कलाम घरी असूनही त्या व्यक्तीने या भेटवस्तू घरी ठेवल्या आणि कलामांनी त्याला नाकारले नाही, या गोष्टींचा त्यांना राग आला. रागावर अनावर झाल्याने त्यांनी कलामानां जोरात चापट दिली आणि घरात येर-झऱ्या घालू लागले. थोड्यावेळाने कलामांच्या वडिलांना लक्षात आले की आपण रागाच्याभरात कलामवर जास्त ओरडलो आणि उदास झालेल्या कलामांना जवळ बोलवून त्यांच्या डोक्यावर हात फिरवत समजावले. ते म्हणाले, ‘बाळ इथून पुढे माझ्या परवानगीशिवाय कोणतीही भेटवस्तू स्वीकारु नकोस. देव जेव्हा एखाद्याला पद देतो तेव्हा त्यासोबत येणाऱ्या गरजाही पूर्ण करतो. देवाने दिलेल्या गोष्टींपेक्षा जास्त घेणे चुकीचे असते.’ अगदी प्रेमाने समजवत कलामांचे वडील त्यांना म्हणाले, भेटवस्तू स्वीकारणे चांगले लक्षण नाही. भेटवस्तू देण्याच्या मागे देणाऱ्याचा काही हेतू नक्कीच असतो. भेटवस्तू स्वीकारताना काळजी घेतली पाहिजे, अन्यथा त्यावरुन विषाची परीक्षा देण्याची वेळ येऊ शकते. वडिलांनी सांगितलेली ही गोष्ट कलामांच्या डोक्यात पक्की बसली आणि त्यानंतर ते भेटवस्तूच्या मोहात पडले नाहीत. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 29/08/2019 वार - गुरूवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *राष्ट्रीय क्रीडा दिन* 💥 ठळक घडामोडी :- ◆ १८९८ - गुड इयर कंपनीची स्थापना ◆ १९४७ - डॉ. बाबासाहेबआंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली घटना समितीची स्थापना करण्यात आली ◆ १९७४ - चौधरी चरणशिंग यांनी भारतीय लोक दल या राजकीय पक्षाची स्थापना केली 💥 जन्म :- ◆१८८० - लोकनायक बापूजी अणे (माधव श्रीहरी अणे), भारतीय स्वातंत्र्यसैनिक. ◆१९०१ - सहकार महर्षी विठ्ठलराव विखे पाटील, भारतातील सहकार चळवळीतील अग्रणी. ◆१९०५ - भारतीय हॉकीपटू मेजर ध्यानचंद ◆१९२३ - हिरालाल गायकवाड, भारतीय क्रिकेट खेळाडू. ◆१९५८ - मायकेल जॅक्सन, अमेरिकन गायक, संगीतकार. ◆१९५९ - अक्किनेनी नागार्जुन, दक्षिण भारतीय चित्रपट अभिनेता. 💥 मृत्यू :- ◆१९०६ - बाबा पदमनजी (बाबा पदमनजी मुळे), मराठीतील ख्रिस्ती साहित्यिक. ◆१९५१ - अण्णासाहेब चिरमुले, भारतीय विमा उद्योजक. ◆१९६९ - शाहीर अमर शेख, मराठी शाहीर. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 *9604481084* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *'स्टॅचू ऑफ युनिटी' या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या सर्वात उंच ( 597 फुट ) पुतळ्याचा जगातील 100 महान ठिकाणामध्ये झाला समावेश* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *भारत पाच ट्रिलिअन डॉलरची अर्थव्यवस्था तेव्हाच बनू शकतो जेव्हा देशाची राष्ट्रीय सुरक्षा अबाधित राहील, असे मत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केले* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ **मुंबई : विनाअनुदानित शाळा, महाविद्यालयांना २० टक्के अनुदान ; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय, २० टक्के अनुदान असणाऱ्या शाळा, महाविद्यालयांना ४० टक्के अनुदान देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय ; शिक्षक आंदोलनानंतर सरकारचा निर्णय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *नवी दिल्ली : चंद्राच्या जवळ पोहोचले चांद्रयान-२, इस्रोकडून आणखी एक कठीण ऑपरेशन यशस्वी, भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोने बुधवारी चांद्रयान-२ ला चंद्राभोवतीच्या नव्या कक्षेत स्थापित केले.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *महाराष्ट्र शासनाने यावर्षीचे आदर्श शिक्षक राज्यपुरस्कार केले जाहीर, नांदेड जिल्ह्यातून सावित्रीबाई फुले पुरस्कार फारुकी आखेला नदीम - जि.प.हा. अर्धापूर, मुख्याध्यापक म्हणून चव्हाण गोविंद चंदर - जि.प.हा.कन्या, मुखेड, प्राथमिक शिक्षकातून सिराज अन्वर- जि.प.हा.तामसा, आणि आदिवासी विभागातून रमेश मुनेश्वर - किनवट यांना जाहीर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *पॅरा बॅडमिंटनपटू मानसी ही जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. तिने एसएल ३ गटाच्या अंतिम सामन्यात तीन वेळच्या विश्‍वविजेत्या पारुल परमारचा २१-१२, २१-७ असा पराभव केला.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *अनोख्या शैलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फलंदाजांना जाळ्यात पकडणार्‍या श्रीलंकन फिरकीपटू अजंथा मेंडीसने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून नवृत्ती स्विकारली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *भारतीय क्रीडा दिवस त्यानिमित्ताने प्रासंगिक लेख* *खेळाकडे ही लक्ष द्यायला हवे* मैदाने ही मुलांच्या खेळासाठीच असावेत, खेळाचे महत्व शाळेपासूनच विद्यार्थ्यांच्या मनात बिंबवले पाहिजे. अभ्यासक्रमामध्ये खेळ या विषयाचा समावेश करायला हवा त्यामुळे खेळाचा चांगल्याप्रकारे प्रसार होऊ शकेल. सध्याची पिढी मैदानाऐवजी मोबाईलवर जास्त दिसत आहे........... पूर्ण लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे. https://nasayeotikar.blogspot.com/2018/05/28.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *एन्डोस्कोपी म्हणजे काय ?* 📙 मानवी शरीराची बाह्यत: तपासणी सहज शक्य असते. काही भागांत छोटेसे उपकरण घालून अंतर्भागातील काही गोष्टी तपासणेही गेली अनेक दशके प्रचारात होतेच. उदाहरणार्थ, घशामध्ये लॅरिंगोस्कोप घालून स्वरयंत्रापर्यंतचा भाग बघणे वा गुदद्वारातून प्रोक्टोस्कोप घालून पाइल्सची तपासणी, योनिमार्गात व्हजायनोस्कोप घालून गर्भाशयमुखापर्यंतच्या भागाची तपासणी करून आजाराचे निदान वा इलाज करणे चालूच होते. संपूर्ण शरीराच्या आतील भागाची क्ष किरण वा अल्ट्रा साऊंडद्वाराही तपासणी करणे काही दशके डॉक्टर्स करीत होतेच. पण या साऱ्यामध्ये एक उणीव कायम जाणवत होती, ती म्हणजे प्रत्यक्ष अवयवाचा तपासायचा भाग डोळ्यांनी पाहता येत नव्हता. त्या जागेपर्यंत पोहोचून त्याचा छोटासा भाग तपासणीसाठी बाहेर काढता येत नव्हता. या अडचणीमागचे महत्त्वाचे कारण होते, प्रकाश हा फक्त सरळ रेषेतच प्रवास करीत असल्याने दृश्यमान करण्याच्या भागात पोहोचताना आलेले कोणतेही वळण, बाक हा अडथळा ठरत होता. या सार्‍यावर उपाय सापडला, तो फायबरऑप्टिक तंत्रज्ञानाचा सरसकट वापर सुरू झाला त्यावेळी. कोठेही कशीही वळू शकणारी, शरीरातील प्रमुख रंध्रातून वा भोकातून प्रवेश करू शकणारी फायबर ऑप्टिक वायर, तिच्या तोंडाशी असणारा प्रखर उजेड टाकणारा दिवा व या साऱ्यांच्या मदतीने दृश्यमान होणाऱ्या प्रतिमा फायबर ऑप्टिकमुळे दुसऱ्या टोकापर्यंत सहज पोहोचू लागल्या. त्यांना भिंगाद्वारे मोठे करून साध्या डोळ्यांनी तर पाहता येऊ लागलेच, पण आता डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे याच सर्व प्रतिमा शेजारी ठेवलेल्या टीव्हीच्या पडद्यावर प्रत्यक्ष रुग्ण व त्याचे सर्व डॉक्टर्सही पाहू लागले आहेत. गरजेनुसार याचे कॉम्पॅक्ट डिस्कवर आरेखन करून ठेवता येते व दुसर्‍या कोण्या तज्ज्ञाचे मत घ्यायचे असेल, तर त्यालाही पाठवता येते. याचा महत्त्वाचा फायदा झाला, तो म्हणजे तोंडापासून गुदद्वारापर्यंत लांबलचक असलेल्या काही मीटरच्या अन्नमार्गाचे संपूर्ण परीक्षण आता शक्य झाले आहे. अन्ननलिकेची सूज, जठरातील व्रण, छोट्या आतड्यातील अंतस्त्वचेतीलन बदल, मोठ्या आतड्यातील अडथळे एवढेच नव्हे, तर पित्ताशयाची तपासणीही यामुळे शक्य झाली. फुफ्फुसांकडे हवा पोहोचवणाऱ्या नलिकांची तपासणी, तेथे साचलेल्या कफाची विल्हेवाट लावणेही या पद्धतीने शक्य झाले आहे. या तंत्रज्ञानात भर पडली, ती लॅप्रोस्कोपी या शल्यप्रकाराची. फायबर ऑप्टिक प्रकाशाचा वापर करून शरीरातील विविध पोकळ्यांमधील कोणत्याही अवयवावर शस्त्रक्रिया करणे आज सहज शक्य झाले आहे. आत घातलेल्या नळीतूनच कात्री, चिमटा, रक्त थांबवणारी इलेक्ट्रिक कॉटरी - जिचा वापर करून तीव्र उष्णतेने रक्तवाहिन्यांची तोंडे बंद केली जातात - इत्यादी उपकरणे थेट अवयवांपर्यंत पोहोचतात. शरीरावर म्हणजेच मुख्यत्वे पोटावर पूर्वी चार ते पाच इंचाचा छेद घेऊन करावी लागणारी अनेक शस्त्रकर्मे आता केवळ दोन वा तीन करंगळीच्या आकाराच्या नळ्या आत सारुन केली जातात. अर्थातच रुग्णाचा बरे होण्याचा काळ जखमा मोठ्या नसल्याने खूपच कमी होतो. पूर्वी ज्या शस्त्रकर्मानंतर किमान पंधरा दिवस रुग्णालयात खाटेवर राहणे गरजेचे होते, तो काळ आता या पद्धतीने जेमतेम एक ते तीन दिवसांपर्यंत येऊन पोहोचला आहे. याही पुढचा टप्पा म्हणजे छोट्या कॅप्सूलच्या आकाराचा 'बग' म्हणजे छुपा कॅमेरा रुग्ण गिळतो. त्याद्वारे पाठवल्या जाणाऱ्या चित्रणाच्या संदेशांचे टीव्हीवर वर मोठ्या पडद्यावर सतत प्रक्षेपण होत राहते. सोळा ते अठरा तासांनंतर हा 'बग' शरीराबाहेर टाकला जातो. आज जरी महागडी व प्रयोगाव्यवस्थेतील ही तपासणी असली, तरी काही वर्षात जगभर तिचा वापर जरूर सुरू होईल. साधी डॉक्टरी तपासणी जर दोन तीनशे रुपयात होत असेल, क्ष किरण व अल्ट्रासाऊंडसाठी चार पाचशे रुपये पडत असतील तर एन्डोस्कोपीसाठी मात्र दोन ते तीन हजार रुपये खर्च येतो. त्याचे कारण सरळच आहे. वापराव्या लागणाऱ्या सामग्रीची किंमत काही लाखांच्या घरात असते. *'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• Good handwriting is the mirror of good learning.* *( चांगले हस्ताक्षर हा चांगल्या शिक्षणाचा आरसा आहे. )* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *महाराष्ट्राचे कृषिमंत्री कोण आहेत ?* मा. सदाशिव खोत 2) *आनंदवनाची स्थापना कोणी केली ?* बाबा आमटे 3) *मुलींची पहिली शाळा कोणी काढली ?* महात्मा फुले 4) *'पोलिओची लस कोणी शोधून काढली ?* साल्क 5) *कर्नाटक या राज्याचा राज्यपक्षी कोणता ?* नीलकंठ *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● योगिता सुरेश येवतीकर ●  रवी शिंदे, कुंडलवाडी ●  शिवराज पाटील चोळाखेकर ●  गणेश राऊत ●  रवींद्र केंचे ●  गणेश येडमे ●  ईश्वर शेटीये ●  सचिन बावणे ● विनायक कुंटेवाड ● अनिरुद्ध खांडरे ● योगेश पाटील ढगे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आपण चंद्र सूर्य यांच्या आकाराचे चित्र पटकन काढू शकू; पण त्यांच्यातल्या प्रकाशाचे अंग, म्हणजेच त्यांचे प्राणतत्व, आपल्या हाती लागत नाही. 'प्रकाशाचे अंग' हाती यावे, अशी इच्छा बाळगणा-यांना प्रकाशाचे चटके सोसण्याची तयारी ठेवावीच लागते. प्रकाशाची संजीवकता अनुभवताना त्यातली दाहकताही अनुभवावीच लागते. कोणत्याही कलेत ' प्रकाशाचे अंग' हाती लागावे, म्हणून मोठी साधना करावी लागते. ना.ग.गोरे यांनी 'दिगंबर' कथेमध्ये एका मूर्तिकाराच्या निर्मितीप्रक्रियेचा प्रवास रेखाटला आहे.* *कथानायक अरिशिनेमी हा एक कसबी पाथरवट असतो. त्याने अनेक मंदिरे, प्रासाद घडवलेले असतात. मात्र एकाच प्रकारच्या कामामुळे तो अस्वस्थ झालेला असतो. बारा वर्षे तो काम न करता घालवतो. नंतर जेव्हा त्याला देऊळ बांधायचे बोलावणे येते, तेव्हा ते मंदिर 'बिनखांबाचं, बिनदाराचं, बिनमंडपाचं असणार!' असं तो ठरवतो. तो खूप भटकतो. खूप मंदिरे पाहतो. तो परत येतो, तेव्हा एका प्रचंड विजेच्या लोळामुळे एक शिलाखंड उजळून निघालेला तो पाहतो. तेव्हा तो ठरवतो की मूर्तीला टेकडी हेच आसन असेल आणि दिशांचा मंडप असेल ! त्यानंतर काही काळानंतर त्याच्याकडून जगप्रसिद्ध अशी श्रवणबेळगोळ येथील गोमटेश्वराची मूर्ती उभी राहिली. या कथेतून कलावंतांच्या आयुष्यात चाकोरीबाहेरच्या निर्मितीचे बीज सुचण्याचा, स्फूर्तीचा, क्षण किती ताणलेल्या प्रतीक्षेनंतर उगवू शकतो, कलावंतासाठी अस्वस्थता हे वरदान का ठरते, हे कळते.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• ⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡ *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल- 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो* *हम होंगे कामयाब,* *हम होंगे कामयाब,* *एक दिन* । *हो मनमे है,विश्वास,* *पुरा है विश्वास,* *हम होंगे कामयाब, एक दिन।* *खर आहे,---* - *म्हणतात ना मनी वसे ते स्वप्नी दिसे।* *आणि या मनाला सुद्धा सुंदर स्वप्न* *पडू द्या. जे मन सतत काहीतरी* *नाविन्याचा शोध घेते तेच नाविन्याची निर्मिती सुद्धा करते.* *"ज्या माणसाला सतत शुभ आणि आशावादी विचार करण्याची सवय असते त्याचे मन नेहमी आनंदाने व उत्साहाने भरलेले राहते* *आणि* *उत्साही मनाच्या माणसाला नेहमीच यशप्राप्ती होते..* *म्हणून सकारात्मक , आशावादी आणि आनंदी विचार हीच यशस्वी होण्याची गुरुकिल्ली आहे."* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• प्रत्येकाने प्रत्येकाच्या जीवनात आपल्या जीवनाचे सुंदर स्वप्न पाहू शकतो आणि तसा पाहण्याचा हक्कही आहे.पण जे काही सुंदर स्वप्न पाहतो ते प्रत्यक्षात साकारण्यासाठी खूप काही मेहनत घ्यावी लागते तेव्हा कुठे ते स्वप्न पूर्ण होऊ शकते.केवळ स्वप्न पाहणे आणि प्रत्यक्षात काहीच न करणे म्हणजे जीवनात आपल्याच हाताने नैराश्य आणून घेणे होय. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..9421839590. 🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जोपासना चांगल्या विचारांचा एकनिष्ठतेची* ========================= एकदा तथागत गौतम बुद्ध एका ठिकाणी धम्म देसना देण्यासाठी गेले.समोर हजारो लोक बसलेले होते,तथागत काहीच न बोलता काही वेळ बसून राहिले व थोड्या वेळाने निघुन गेले. दुसऱ्या दिवशी परत धम्म देसना देण्यासाठी आले समोर पाचशे लोक बसलेले होते. परत तथागत काही वेळ काहीच न बोलता बसून राहिले व थोड्या वेळाने निघुन गेले. परत तिसऱ्या दिवशी जेंव्हा ते धम्म देसना देण्या साठी आले तेंव्हा फक्त वीस लोक समोर बसलेले होते,आणि त्या दिवशी तथागतांनी धम्म देसना दिली. जेंव्हा त्यांच्या शिष्याने त्यांना विचारले की पहिले दोन दिवस जास्त लोक असतांना तुम्ही धम्म देसना न देता तिसऱ्या दिवशी फक्त वीस लोक असतांना का दिली? तथागतांनी खुप छान उत्तर दिले,"ज्या लोकांना खरच धम्म ऐकायचा होता ते तिसऱ्या दिवसा पर्यन्त आपल्या निश्चयावर ठाम राहिले व तिसऱ्या दिवशी उपस्थित राहिले.परन्तु जे मला फक्त बघण्या साठी आले होते व जे आपल्या निश्चयावर ठाम नव्हते ते अपोआपच कमी होत गेले.मला फक्त धम्म ऐकून घेणारे नकोत तर आचरणात आनणारे अनुयायी हवेत.म्हणून मी तिसऱ्या दिवशी योग्य अशाच अनुयायांना धम्म दिला." *बोधःजो पर्यन्त चांगल्या विचारांशी एकनिष्ठ राहण्यावर आपण ठाम नसतो तो पर्यन्त आपल्याला त्यापासून मिळणारा लाभ मिळत नाही.किती आहेत यापेक्षा कसे आहेत हे महत्वाचे.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 28/08/2019 वार - बुधवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- *१९३७-'टोयोटा मोटर्स' ही स्वतंत्र कंपनी बनली* 💥 जन्म :- ◆१९६६-प्रिया दत्त,लोकसभा खासदार. ◆ १९२८ - एम. जी. के. मेनन, भारतीय पदार्थवैज्ञानिक. 💥 मृत्यू :- ◆१९६९ - रावसाहेब पटवर्धन, भारतीय स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत. ◆ २००१ - व्यंकटेश माडगूळकर, मराठी लेखक, चित्रकार, शिकारी, पटकथाकार. ◆१६६७-मिर्झा राजे जयसिंग *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *मोदी सरकारचा बिग प्लॅन, पुढील 10 वर्षात देशातील 50 लाख हेक्टर नापीक जमीन होणार सुपीक* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *ट्रॅफिकचे नवीन नियम 01 सप्टेंबरपासून होणार लागू, हेल्मेट न वापरल्यास रद्द होणार लायसन्स* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर मुंबई पोलिस आयुक्त संजय बर्वे यांना तीन महिन्यांची मुदतवाढ* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *भारतीय वायुसेनेच्या विंग कमांडर एस धामी यांनी फ्लाइंग युनिटच्या पहिल्या महिला फ्लाइट कमांडर ठरण्याचा मिळविला मान, महत्वाची जबाबदारी मिळालेल्या देशातील पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *मुंबई- विनाअनुदानित शिक्षकांचे सुरू असलेल्या आझाद मैदानावरील आंदोलनाला सोमवारी हिंसक वळण मिळालं. मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आक्रमक झालेल्या शिक्षकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यानंतर आमदार विक्रम काळे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आंदोलनस्थळी जाऊन शिक्षकांना दिला पाठिंबा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *डेहराडून : देशाच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक कंचन चौधरी भट्टाचार्य यांचे निधन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *नवी दिल्ली : येथील फिरोजशहा कोटला मैदान आत्ता अरुण जेटली स्टेडियम या नावाने ओळखले जाणार, दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशनने घेतला निर्णय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ वरील बुलेटीनची ऑडिओ 📢* ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करावे. https://b.sharechat.com/uKQAMkRzvZ ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *भारतीय क्रीडा दिवस - 29 ऑगस्ट* https://nasayeotikar.blogspot.com/2019/08/blog-post_27.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *एन्फ्लुएंझा (फ्लू, बर्डफ्लू, स्वाइन फ्लू) म्हणजे काय ?* 📙 'फ्लू' या नावाने आपण याला ओळखतो. हा अति-संसर्गजन्य असा आजार आहे. जगाच्या पाठीवर अनेकवेळा या आजाराने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. गेली काही दशके प्रतिजैवक औषधे उपलब्ध झाल्याने या आजारातून गंभीर स्वरूप धारण करणाऱ्या अन्य उपद्रवांवर जरासा ताबा आपण मिळवला आहे, एवढेच. मात्र फ्लूवर आजही नेमके औषध उपलब्ध नाही. त्याचा प्रतिबंध करणारी लस शोधण्याचे अनेक प्रयत्न निरुपयोगी ठरलेले आहेत; कारण ज्या विषाणूमुळे हा आजार होतो, त्याच्या असंख्य प्रजाती अस्तित्वात असल्याने व त्यांतही सतत नवीन भर पडत असल्याने प्रतिबंधक लस तयार करून तिचा उपयोग होत नाही. फ्लूची साथ एखाद्या प्रदेशात पसरली की, अक्षरश: घराघरांतून आलटूनपालटून प्रत्येकाचा आजाराशी संबंध येतोच. सारे घर फ्लूने भेटले आहे, अशीही उदाहरणे जुन्या काळात भरपूर आहेत. सर्दी, पडसे, नाक गळणे, खोकला, तीव्र डोकेदुखी, सर्वांग दुखणे, अतिशय थकवा, भूक मंदावणे, ताप ही प्रमुख लक्षणे या आजारात दिसतात. मात्र सर्दी, पडसे जसे पटकन बरे होते तसे न होता आजार गेला तरी थकवा खूप दिवस राहतो. प्रत्यक्ष फ्लू धोकादायक नसून त्या विषाणूंच्या प्रादुर्भावानंतर श्वासनलिका, फुप्फुसे, त्यांची आवरणे यांमध्ये आलेल्या दुर्बलतेचा फायदा घेऊन अन्य जंतूंचा प्रवेश होतो. त्यातून न्युमोनिया, ब्राँकायटिस, प्लुरसी यांसारख्या गंभीर आजारात रूपांतर होते. गेल्या शतकात १९१८ साली सुरू झालेल्या फ्लूच्या साथीमध्ये अनेकांचा मृत्यू झालेला आहे. भारतात १९५७ साली फ्लूची शेवटची मोठी साथ येऊन गेली. फ्लुवरचे उपचार व निदान यांसाठी शक्यतो डॉक्टरी सल्ला घेतलेला बरा. महत्त्वाची गोष्ट म्हणजे साथ नसताना फ्लूचे निदान करणे तज्ज्ञ डॉक्टरांचे काम बनते. साथीच्या वेळी रुग्ण पटकन लक्षात येतो. पण अन्यथा किरकोळ लक्षणांमुळे आजाराकडे दुर्लक्ष होऊ शकते. विश्रांती, पोषक आहार, वेदनाशामक औषधे, भरपूर पेयद्रव्ये यांचा वापर या आजाराच्या उपचारात आवश्यक ठरतो. नंतरचा थकवा व दौर्बल्यावर शक्तिवर्धक औषधे, प्रथिनांचा पूरक वापर उपयोगी पडतो. सध्या गेली काही वर्षे आपण ऐकत असलेला 'बर्ड फ्लू' हा आजार नामसाधर्म्याने सारखाच असला व तोही विषाणूजन्य असला, तरी त्याचा प्रादुर्भाव मुख्यतः कोंबड्या व पक्षी यांच्यात होतो. क्वचितच माणसांना त्याची लागण होते. त्यावेळी फुप्फुसदाह व तीव्र ताप ही लक्षणे माणसात दिसतात. अर्थात पक्षी हाताळताना वा त्यांची विल्हेवाट लावताना प्रतिबंधक काळजी आवश्यक ठरते. नाक तोंड झाकणारे मास्क व हातमोजे गरजेचे ठरतात. पक्षांमध्ये होणारा हा आजार फार झपाट्याने पसरतो. खुराड्यातील सर्व पक्षी याला पटकन बळी पडू शकतात. मात्र अशी कोंबडी वा पक्षी खाण्यायोग्य राहत नाहीत. त्यामुळे बर्डफ्लुचा प्रादुर्भाव झाल्यास त्या भागातील सर्व पक्षी नष्ट करणे - मुख्यतः खुराड्यातील व पाळीव - हाच एक प्रतिबंधक उपाय ठरतो. त्यांची जाळून वा खोल जमिनीत गाडून विल्हेवाट लावावी लागते. भारतात २००६ साली या रोगाने कुक्कुट- पालनाच्या व्यवसायाला फार मोठा तडाखा दिला आहे. मात्र याच काळात बर्डफ्ल्यूने आजारी झालेल्या माणसांची संख्या जेमतेम हाताच्या बोटांवर मोजण्याइतकीच आहे, हेही ध्यानात ठेवायला हरकत नाही. 'स्वाईन फ्ल्यू' या नावाने २००९ साली जगभर धुमाकूळ घातलेल्या आजाराची मेक्सिकोमध्ये सुरुवात झाली. साऱ्या जगभर त्याचा विलक्षण वेगाने प्रसार झाला. फ्लुच्या विषाणूतील H1N1 या एका जातीने हा आजार होतो. फ्लूसारखी अन्य लक्षणे असली, तरी सुमारे एक टक्का रुग्णांत जुलाब, उलट्या याही सुरू होतात. एक हजारांत चार रुग्ण दगावत असल्याने ही साथ गंभीर मानली गेली आहे. मात्र टॅमिफ्लू औषधाचा वापर केल्यास स्वाईन फ्लूची तीव्रता खूप कमी होते, असेही लक्षात आले आहे. *'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *“ चिंता पाहुणा म्हणून येते आणि लवकरच मालक बनून राहते. "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *श्वसनासाठी आपण कोणता वायू घेतो ?* ऑक्सिजन 2) *ऑलिम्पिक खेळ दर किती वर्षांनी होतात ?* 4 3) *शरीराच्या हालचालीवर कोण नियंत्रण ठेवतो ?* मेंदू 4) *कथकली हे कोणत्या राज्याचा नृत्यप्रकार आहे ?* केरळ 5) *गौतम बुद्धाची जन्मभूमी कोणती ?* लुम्बिनी ( नेपाळ ) *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● सुनीता महाडिक, मुंबई ● डी एस पी पाटील ●  गणेश घुले ●  संजय बंटी पाटील ●  चंद्रकांत रामदिनवार ●  अशोक मामीडवार ●  लक्ष्मण कामशेट्टी ●  तिरुपती अंगरोड ●  साईनाथ गोणारकर ● आनंद आवरे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *चित्ताचं चैतन्य चेतलं की ज्ञानसूर्याचा साक्षात्कार होतो. तो काही विवेकी संतासह विचारवंतानाही होतो. विवेकी संत माणसा-माणसात माणुसकीचे अर्थात दया-प्रेम-करूणेचे पूल बांधत असतात. परोपकारातून परमेश्वराशी त्यांचं नातं जुळवत असतात. दुसरा एक संत प्रकार आहे लहरीबाबांचा, सतत मौनाचं नाटक करून हजारोंना नादी लावण्यात कुशल असलेल्या बुवांचा, प्रवचनाचं संमोहन वापरून जणू तो ईश्वर मलाच कळला आणि माझ्यावरच भाळला असा बनाव निर्माण करणा-यांचा. या लोकांच्या चरणांशी सर्व सुखं शयण असतात. तिथं कनक-कांतांचा सुकाळ असतो. कित्येक मती मारलेले भक्त आपल्या लेकीसुना या 'पहुंचे हुए' लोकांच्या नादी लावतात. सत्तेतील 'सत्ते' आणि राजकारणातील 'पत्ते'ही त्यांच्या आशीर्वादासाठी टपून असतात.* *कृष्णकथा-रामकथा कानाशी बिलगल्यानं आपण ईश्वरप्रिय होतो असा कुणाचा गोड गैरसमज असेल तर तो भाबडेपणा आहे. ईश्वर समजण्यासाठी पराकोटीचा त्याग आणि कष्ट उपसावे लागतात. कबीर-ज्ञानोबा-तुकोबाइतकं आत्मबोधन अनुभवावं लागतं. हा मार्ग जनसामान्यांना परवडण्यासारखा नाही. म्हणूनच ते कर्मकांडांच्या थोतांडाला ब्रम्हांडाचा साक्षात्कार समजतात. ईश्वर कुणालाही दर्शन देत नाही. सूर्यकिरणांनी सूर्याचाच शोध घेण्यासारखा तो अज्ञानी प्रकार आहे. म्हणूनच रोज काही क्षण आत्मशोधात व्यतीत करीत राहिल्यानं कुठल्या तरी क्षणी आपण आपल्या सत्य-असत्यासह आत्मदर्पणापुढे येतोच!* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल- 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *विंदा करंदीकर लढवय्या जीवनाचं* *चित्र रंगावतांना म्हणतात,* *असे जगावे छाताडावर,आव्हानांचे लावून अत्तर।* *नजर रोखुनी नजरेमध्ये,आयुष्याला* *द्यावे उत्तर* । *खरंच आहे,जीवन जगतांना अनेक* *संकटे येत असतात,त्यांना* *जर घाबरलं तर ते* *पिच्छा सोडत नाही.ते* *रडणाऱ्याला भीक घालत नाहीत,तर* *ती लढणाऱ्याला* *घाबरून पळून जातात हेच विंदा* *सांगतात.* *आजपर्यंत आपण तेच केले,भूत* *म्हटलं की पळालो,पण* *एकदा तरी त्या* *समस्यारूपी भूताकडे वळून डोळे* *वटारून बघा तर ,काय* *चमत्कार होतो, अहो भूत तर* *जाऊद्या, साक्षात यशश्री खेचून* *आणल्याचा अनुभव आल्याशिवाय* *राहणार नाही,ही* *खात्री देतो.* N *मग बघताय ना संकटाकडे डोळे* *वटारून,बघाच* *एकदा,जगण्यात मजा येईल.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* *इगतपुरी, नाशिक* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपण जर आपल्या हाताने मुठभर रेती घेतली तर ती मुठभर रेती काही वेळच राहील.त्यानंतर मुठीत असलेली रेती हळूहळू मुठीतून बाहेर निसटून जाईल आणि त्यानंतर बाकीची हाताला चिकटून राहील.जी चिकटून राहते ते माणसाच्या दु:खासारखे समजायचे.कारण सुखाचे दिवस मुठीतल्या रेतीसारखे निसटून जाणारे असतात तर दु:ख मुठीत चिकटून राहणा-या रेतीसारखे हृदयाच्या कप्प्यात घट्ट करून राहतात आणि सतत ते आपल्या मनाला आठवण करून देतात.मग त्यांचे पडसाद आपल्या दैनंदिन जीवनावर होत असतात.अशावेळी झालेल्या दु:खाचे मंथन करुन त्यातून सुख शोधून काढून जीवनाला आनंदाने जगण्यासाठी प्रोत्साहन द्यायला शिकले पाहिजे.दु:खाची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. © व्यंकटेश काटकर,नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍂🍃🍂🍃🍂🍃🍃🍂🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आयुष्याची खरी किंमत* *एका नातवाने आपल्या आजोबांना प्रश्न विचारला " आयुष्याची खरी किंमत काय असते हो?"* *आजोबांनी त्याला एक दगड दिला आणि म्हणाले "ह्या अगोदर तू ह्या दगडाची खरी किंमत कळावी अशी माझी इच्छा आहे. दगडाची फक्त किंमत काढून ये , विकू नकोस . " सर्वप्रथम नातवाने एका फळवाल्याला त्या दगडाची किंमत विचारली. तो त्या चकाकणाऱ्या दगडाला बघून म्हणाला - ".या दगडाचा मोबदला म्हणून मी तुला एक डझन सफरचंदे देऊ शकतो." नातवाने आजोबांच्या आज्ञेमुळे दगड विकू शकत नसल्याबद्दल त्याची माफी मागितली व निघाला . वाटेत त्याला एक भाजीवाला दिसला आणि त्याने त्याला त्या चकाकणाऱ्या दगडाची किंमत विचारली - " मी तुम्हाला याच्या बदल्यात एक पूर्ण पोते भरून बटाटे देऊ शकतो. " पुन्हा एकदा नातवाने आजोबांच्या आज्ञेमुळे दगड विकू शकत नसल्याबद्दल त्याची माफी मागितली व निघाला. आता त्याला एका सराफाचे दुकान लागले. आत जाऊन त्याने तो चमकणारा दगड सराफाला दाखवून त्याची किंमत विचारली. आपल्या भिंगातून त्या खड्याचे निरीक्षण करताच तो सराफ उत्तरला - " या खड्यासाठी मी तुम्हाला दश लक्ष रुपये देऊ शकतो." नातवंडाला फार आश्चर्य वाटले पण नातवाने आजोबांच्या आज्ञेमुळे दगड विकू शकत नसल्याबद्दल त्याची माफी मागितली व निघाला. थोडे पुढे आल्यावर त्याला अतिशय दुर्मिळ रत्न आणि मणी विकणारे दुकान दिसले. त्याने तो दगड तिथल्या रत्नपारख्यास दाखवला. तो रत्नपारखी ह्या विषयात अतिशय निष्णात होता.त्याने अलगद तो दगड एका मखमली कापडावर ठेवला. त्या दगडाच्या अवती भोवती प्रदक्षिणा घालत तो म्हणाला - " अहो, एवढा अमूल्य दुर्मिळ अनघड हिरा तुम्ही कुठून बरे आणला? मी माझे अख्खे दुकान जरी विकले तरी सुध्दा ह्या हिऱ्याची किंमत तुम्हाला देऊ नाही शकणार ." आता मात्र नातू अतिशय चकित झाला आणि गोंधळलेल्या मनःस्तिथीत तो आजोबांकडे परतला . त्याचे सर्व अनुभव ऐकून आजोबा म्हणाले - *"मला वाटते फळवाला, भाजीवाला, सराफ आणि रत्नपारखी ह्यांच्या उत्तरावरून तुला आयुष्याच्या मोलाविषयी कळले असेल. तुम्ही जरी अतिशय दुर्मिळ अमूल्य हिरा असलात तरी सुध्दा लोक तुमची किंमत त्यांच्या सीमित समजुती, आकलनशक्ती, हेतू आणि कुवतीनुसारच करणार."* *त्यामुळे आयुष्यात स्वतःची किंमत जाणून घेणे सर्वात महत्वाचे असते.* *स्वतःचा आदर करा.* *इतरांबरोबर कोण्यात्याही निरर्थक तुलने मध्ये गुंतू नका.कारण तुम्ही या विश्वातील एक अभिनव आणि अद्वितीय निर्मिती आहेत.* *तुमच्या सारखे फक्त तुम्हीच आहात. हीच तुमच्या आयुष्याची खरी किंमत आहे.* *आपल्या सर्वांनाही स्वतःची खरी किंमत कळून स्वतःवर प्रेम करायला शिकू....* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 27/08/2019 वार - मंगळवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- ◆ १९६२ - नासा चे मानव-विरहित यान मरिनर २ चे शुक्राकडे प्रस्थान 💥 जन्म :- ◆१९२५ - नारायण धारप, मराठी लेखक ◆ १९७२ - दिलीप सिंग राणा उर्फ द ग्रेट खली, भारतीय मल्ल. ◆ १९७४ - मोहम्मद युसुफ, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू ◆१९८० - नेहा धुपिया, भारतीय अभिनेत्री 💥 मृत्यू :- ●१९७६ - मुकेश, भारतीय पार्श्वगायक *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून लोकशाहीचा पाया अधिकाधिक मजबूत करून खेड्यांचा विकास झाल्यास आपोआप देशाच्या विकासाला हातभार लाभेल, असे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी कॉफी टेबल बूक प्रकाशन करतानाबोलत होते.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *दोन्ही देशांकडे आण्विक शक्ती, त्याचा वापर केल्यास जगात हाहाकार माजेल- इम्रान खान यांचे प्रतिपादन* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *नवी दिल्ली - माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या सीबीआय कोठडीत 4 दिवसांची वाढ, चिदंबरम यांना दिलासा नाही* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *ठाणे : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी शिवसेनेच्या दिपाली दिलीप पाटील यांची बिनविरोध निवड* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *सोन्याच्या दराने गाठला ऐतिहासिक उच्चांक ; प्रतितोळा सोन्याचा दर 40 हजारांच्या पुढे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *पालघरचे सहाय्यक फौजदार  सुरेश सुभाष शिवदे यांनी दाखविले औदार्य, पूरग्रस्तांसाठी दिले एक महिन्याचे वेतन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *वेस्ट इंडीज विरुद्ध मिळविलेल्या विजयामुळे भारतीय संघाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी घेतली झेप* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ AUdio ऐकण्यासाठीयेथे क्लिक करावे https://b.sharechat.com/PK0GpvIVtZ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *तुम्ही आम्ही पालक* अतिशय दर्जेदार आणि वाचनीय असा  *तुम्ही आम्ही पालक* मासिकाचा सप्टेंबरचा 2019 चा अंक *निसर्गाचा प्रकोप* प्रकाशित झाला. कोल्हापूर सांगलीच्या महापुराच्या आणि महापालक सन्मान सोहळ्यानिमित्त झालेल्या कार्यक्रमाची माहिती असलेला अंक जरूर वाचा. https://saadmanuski.blogspot.com/2019/08/2019.html अंकाची वार्षिक वर्गणी 700 रुपये असून मासिकाचे वर्गणीदार आणि अधिक माहितीसाठी संपर्क :- ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ संपादक हरीश बुटले 9422001560 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *ऊर्जा म्हणजे काय ?* 📙 ऊर्जा म्हणजे सजीवाच्या प्रत्येक गोष्टीकरता लागणारी मूलभूत गरज आहे. ऊर्जेलाच एनर्जी असे म्हणतात. अचल वा अचेतन वस्तूची कोणतीही हालचाल घडवण्यासाठीसुद्धा उर्जा लागतेच. पृथ्वीवर कोणतीही ऊर्जा तयार होत नाही वा कोणतीही ऊर्जा पूर्णत: नष्ट होऊ शकत नाही. फक्त ऊर्जेचे नेहमीच रूपांतर होत असते. हे झाले ऊर्जेबद्दलचे थोडक्यात ज्ञान. व्यवहारात ऊर्जेबद्दलचे गैरसमज शास्त्रीय प्रगतीला फार मोठी खीळ घालण्याची शक्यता अनेकदा निर्माण झाली आहे. त्यांतील आपल्या देशातील मोजक्या काहींचा येथे उल्लेख करून प्रत्यक्ष स्थिती काय आहे, हे जाणून घेऊ या. धरणाचे पाणी वीजनिर्मितीकेंद्राने वापरून नदीत सोडले तर ते शेतीला उपयुक्त ठरत नाही, हा गैरसमज; कारण पाण्याची 'पॉवर' गेलेली असते, हे त्यामागच्या प्रचाराचे कारण. पाण्याचा वापर फक्त गुरुत्वाकर्षणाच्या वेगाने मिळणाऱ्या ताकदीचा वापर करून जनित्राचे टर्बाइन फिरवणे एवढाच केलेला असतो. यात पॉवरचा दुरान्वयानेही संबंध येत नाही. एखाद्या खडकावर पाणी आदळावे तसेच येथे टर्बाईनवर आदळते व पुढे जाते. या गोष्टी अगदी सरळ वाटल्या तरीही किमान पंचवीस ते तीस वर्षे आपल्या देशात असे पाणी शेतकऱ्यांनी नाकारले आहे, ही सत्यस्थिती आहे. गोबरगॅस वापरला असता स्वयंपाकघरात वास सुटुन हवा दूषित होते हा गैरसमज. गॅस जळतो, तेव्हा फक्त कार्बन डाय ऑक्साइड हवेत राहतो. गोबर गॅस फक्त जळण्यापुरताच स्वयंपाकघरात येतो व ज्वलनानंतर त्याचा कसलाही वास सुटणे, हवा दूषित होणे यांचे कारणच राहत नाही. प्रदूषणाचे तर कारणच नसते. शेगडी वा लाकडे जाळल्यावर जितका कार्बन डायाक्साईड पसरतो, त्याचा दहा टक्केही गोबरगॅस ज्वलनाने निर्माण होत नाही. धूर तर नसतोच. ज्वलनाला आच उत्तम मिळते, हे वेगळेच. तेव्हा गोबरगॅस वापरावा, हे उत्तम. 'अधिक चरबी, तेल तूप असलेले पदार्थ खाऊन ऊर्जा मिळते, ती जास्त पौष्टिक असते,' हा गैरसमज पसरण्याचे कारण तसेच आहे. पहेलवान मंडळी खुराक म्हणून अनेकदा भरपूर तूप, लोणी व चरबीयुक्त पदार्थ खात असतात. सामान्य माणूस त्याचेच आंधळे अनुकरण करू बघतो. स्निग्ध पदार्थातून जास्त ऊर्जा मिळते, हे अर्धेच बरोबर; कारण ही ऊर्जा लगेच उपलब्ध कधीच होत नाही, तर शरीरात चरबीच्या रूपात साठवली जाते. पहेलवान मंडळी अनेकदा थुलथुलीत दिसतात, त्याचे हेच कारण. संतुलित आहार प्रथिनयुक्त ऊर्जा घेतली, तर तिचा वापर लगेच केला जातो. जागतिक कीर्तीचे मल्ल बघितले तर त्यांच्या अंगावर चरबीचा कणही दिसत नाही, हे त्यामुळेच. ग्लुकोजची साखर खाल्ल्यामुळे तात्काळ खूप ऊर्जा मिळून तरतरी येते, हा एक गोड गैरसमज मुद्दाम पसरवला गेला आहे. ग्लुकोज, शुक्रोज, फ्रुक्टोज, माल्टोज या विविध साखरेच्या प्रकारांचे ग्लुकोजमध्येच रूपांतर होते. शिरेतून ग्लूकोज भरल्याने ताकद मिळते, हा एक भल्याभल्या शिकलेल्यांचाही गैरसमज आहे. पोटभर चौरस आहार हेच खरे ऊर्जेचे साधन होय. असे काही गैरसमज व ते दूर करायचा हा अल्पसा प्रयत्न. *'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *“ मोठेपणा आणि चांगुलपणा एका व्यक्तीत क्वचितच एकत्र दिसतात. ”* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *चंद्रावर पाऊल ठेवणारी पहिली व्यक्ती कोण ?* नील आर्मस्ट्राँग 2) *भारतात सर्वात शेवटी तयार झालेले राज्य कोणते ?* तेलंगाणा 3) *सर्वात जास्त लोकसंख्येचा देश कोणता ?* चीन 4) *सूर्य किरणांपासून कोणते जीवनसत्त्व मिळते ?* 'ड' 5) *लीप वर्षात किती दिवस असतात ?* 366 *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● संतोषजी बदरखे ●  अतुल वैद्य ●  दत्तप्रसाद सुरुकुटवार ●  प्रशांत वीरभद्र रुईकर ●  दिगंबर सोळंके *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आपण चंद्र सूर्य यांच्या आकाराचे चित्र पटकन काढू शकू; पण त्यांच्यातल्या प्रकाशाचे अंग, म्हणजेच त्यांचे प्राणतत्व, आपल्या हाती लागत नाही. 'प्रकाशाचे अंग' हाती यावे, अशी इच्छा बाळगणा-यांना प्रकाशाचे चटके सोसण्याची तयारी ठेवावीच लागते. प्रकाशाची संजीवकता अनुभवताना त्यातली दाहकताही अनुभवावीच लागते. कोणत्याही कलेत ' प्रकाशाचे अंग' हाती लागावे, म्हणून मोठी साधना करावी लागते. ना.ग.गोरे यांनी 'दिगंबर' कथेमध्ये एका मूर्तिकाराच्या निर्मितीप्रक्रियेचा प्रवास रेखाटला आहे.* *कथानायक अरिशिनेमी हा एक कसबी पाथरवट असतो. त्याने अनेक मंदिरे, प्रासाद घडवलेले असतात. मात्र एकाच प्रकारच्या कामामुळे तो अस्वस्थ झालेला असतो. बारा वर्षे तो काम न करता घालवतो. नंतर जेव्हा त्याला देऊळ बांधायचे बोलावणे येते, तेव्हा ते मंदिर 'बिनखांबाचं, बिनदाराचं, बिनमंडपाचं असणार!' असं तो ठरवतो. तो खूप भटकतो. खूप मंदिरे पाहतो. तो परत येतो, तेव्हा एका प्रचंड विजेच्या लोळामुळे एक शिलाखंड उजळून निघालेला तो पाहतो. तेव्हा तो ठरवतो की मूर्तीला टेकडी हेच आसन असेल आणि दिशांचा मंडप असेल ! त्यानंतर काही काळानंतर त्याच्याकडून जगप्रसिद्ध अशी श्रवणबेळगोळ येथील गोमटेश्वराची मूर्ती उभी राहिली. या कथेतून कलावंतांच्या आयुष्यात चाकोरीबाहेरच्या निर्मितीचे बीज सुचण्याचा, स्फूर्तीचा, क्षण किती ताणलेल्या प्रतीक्षेनंतर उगवू शकतो, कलावंतासाठी अस्वस्थता हे वरदान का ठरते, हे कळते.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• ⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡ *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल- 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *हम होंगे कामयाब,* *हम होंगे कामयाब,* *एक दिन* । *हो मनमे है,विश्वास,* *पुरा है विश्वास,* *हम होंगे कामयाब, एक दिन।* *खर आहे,---* - *म्हणतात ना मनी वसे ते स्वप्नी दिसे।* *आणि या मनाला सुद्धा सुंदर स्वप्न* *पडूदया.जे मन सतत काहीतरी* *नाविन्याचा शोध घेते तेच* *नाविन्याची निर्मिती सुद्धा करते.* *"ज्या माणसाला सतत शुभ आणि आशावादी विचार करण्याची सवय असते त्याचे मन नेहमी आनंदाने व उत्साहाने भरलेले राहते* *आणि* *उत्साही मनाच्या माणसाला नेहमीच यशप्राप्ती होते..* *म्हणून सकारात्मक , आशावादी आणि आनंदी विचार हीच यशस्वी होण्याची गुरुकिल्ली आहे."* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* *जि.प.शाळा--माणिकखांब* *ता.इगतपुरी, जि.नाशिक.* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• घर जेव्हा बांधलं जातं तेव्हा मुख्यत: पायाभरणीचा विचार केला जातो, नंतर भिंतीचा आणि त्यानंतर डोक्यावर असणा-या छताचा.हे जरी खरं असलं तरी यात प्रामुख्याने रेती, सिमेंट,वीटा,गजाळी आणि बांधकाम करणा-या कारागिरांचे कौशल्य लागते.केवळ कोणत्याही एका घटकावर घर पूर्ण होत नाही. त्याचप्रमाणे माणसांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचे आहे.जर व्यक्तिमत्त्व विकासाचे पहायचे झाले तर लहानपणी घरात असणा-या आईवडिलांचे संस्कार, नंतर घरातल्या इतर रक्तातल्या नात्यातील लोकांचे संस्कार,परिसरातील मित्र,शेजारी यांच्या सहवासातून घडलेले संस्कार,शाळेतील शिक्षकांकडून घडवल्या गेलेले संस्कार आणि पुस्तकांच्या माध्यमातून वाचनातून मनावर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष घडल्या गेलेले संस्कार या सर्व घटकातून मिळालेली उत्तम संस्कारांची पायाभरणी हीच खरी माणसांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी लागणारे घटक आहेत.यातील एखाद्या जरी घटकांकडून कमतरता भासली तर व्यक्तिमत्त्व विकास व्हावा तितका होऊ शकत नाही.हे सारे घटक माणसांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी लागणारे पायाभूत घटक आहेत.ज्याप्रमाणे घर मजबूत करण्यासाठी पायाभरणी आणि त्यासाठी लागणारे बांधकाम साहित्य उत्कृष्ट दर्जाचे असायला हवे तेव्हाच घर कुठे चांगले सुंदर बनू शकते त्याचप्रमाणे व्यक्तिमत्त्व विकासासाठी लागणारे वरील उल्लेखिलेल्या घटकांची नितांत गरज आहे.यातला एकजरी घटक कमी पडला तर माणसांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचा पाया कच्चा राहू शकतो.म्हणून यांना आपल्या जीवनात महत्त्वाचे खरे स्थान आहे हे विसरून चालणार नाही. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🏠🏕🏠🏕🏠🏕🏠🏕🏠🏕🏠 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *समर्पण* एक साधू भिक्षा मागत दारोदार फिरत होता. वृद्ध, असहाय अशा त्या साधूची दृष्टीही थोडी अधू होती. त्याने एका मंदिरासमोर जाऊन भिक्षेसाठी आवाज देण्यास सुरुवात केली. हे पाहून पांडुरंगाने त्याला म्हटले, '' महाराज, पुढे व्हा. तुम्हाला भिक्षा देईल अशा व्यक्तीचे हे घर नव्हे.'' साधू म्हणाला, '' जो कोणास काही देत नाही, असा या घराचा मालक आहे तरी कोण ?'' पांडुरंग म्हणाला, '' अहो, हे घरच नाही. हे मंदिर आहे. याचा मालक साक्षात परमेश्वर आहे. '' हे ऐकून त्या साधूने एकवार आकाशाकडे पाहिले. त्याचे हदय भरुन आले. त्याने आकाशाकडे पाहात हात पसरले. तेथेच उभा राहिला. पुढे मंदिराच्या दारात त्याला नाचतानाही पांडुरंगाने पाहिले. त्याचे डोळे अलौकिक तेजाने लकाकत होते. त्याच्या वृद्ध शरीरातून दिव्य प्रकाश पसरत होता. पांडुरंगाने त्याला आनंदाचे कारण विचारले. साधू म्हणाला, '' जो मागतो, त्याला मिळते. फक्त समर्पण करण्याची वृत्ती पाहिजे.'' *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 26/08/2019 वार - सोमवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- ◆१९९४ : लोन टेनिसपटू रमेश कृष्णन आणि मध्यम पल्ल्याचा धावपटू बहादूर प्रसाद यांना के. के. बिर्ला फांउंडेशनचा पुरस्कार जाहीर 💥 जन्म :- ◆१९१० - मदर तेरेसा, समाजसेविका; 'नोबेल पारितोषिक' आणि 'भारतरत्न' पुरस्काराने सन्मानित ◆१९२२ - गणेश प्रभाकर प्रधान, भारतीय स्वातंत्र्यसैनिक, मराठी विचारवंत, पत्रकार व शिक्षणतज्ञ ◆ १९४४ : अनिल अवचट लेखक व सामाजिक कार्यकर्ते 💥 मृत्यू :- ◆१९४८ - कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, मराठी नाटककार, 'केसरी'चे संपादक ◆१९५५ - अ. ना. भालेराव, मुंबई मराठी साहित्य संघाचे संस्थापक ◆१९९९ - नरेंद्रनाथ, भारतीय टेनिसपटू ◆१९५५ - बालन के. नायर, मल्याळी चित्रपट अभिनेते ◆ २०१२ : ए. के. हंगल चित्रपट अभिनेते व स्वातंत्र्यसैनिक संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *मुंबई : मध्य महाराष्ट्राला झोडपून काढल्यानंतर विश्रांतीवर गेलेला मान्सून आजपासून पुन्हा सक्रिय होणार आहे. २६ ते ३० आॅगस्टदरम्यान मध्य प्रदेश, उत्तर महाराष्ट्र, अहमदाबाद, केरळच्या काही भागांत पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *फ्रान्स- जी-7 ची बैठक कालपासून सुरू, सर्व सदस्य देशांचे राष्ट्राध्यक्ष उपस्थित* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *नवी दिल्ली :- केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचे निधन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *चिखलदरा (अमरावती) : मुसळधार पावसामुळे रविवारी सकाळी 10 वाजता सेमाडोह ते माखला मार्गावर मोठ्या दगडासह दरड कोसळल्याने सहा गावांचा संपर्क तुटला. दरड कोसळताना वाहतूक नसल्याने मोठा अनर्थ टळला.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *वेस्ट इंडिज दारूण पराभव; भारताने 100 वर केले ऑलआऊट, वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने दूसरा डाव अखेर 7 बाद 343 धावांवर घोषित केला.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *अ‍ॅशेस 2019 : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अ‍ॅशेस कसोटी मालिकेतील तिसरा सामना इंग्लंडने एक विकेटने जिंकला. बेन स्टोक्सने शतकी झुंज देत 135  धावा केल्या आणि ऑस्ट्रेलिच्या तोंडातून विजयाचा घास खेचून आणला* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धा : भारताच्या पी. व्ही. सिंधूने अखेरीस अंतिम फेरीत तिने जपानच्या नोझोमी ओकुहाराला नमवून सुवर्णपदक आपल्या नावावर केले. जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी पी व्ही सिंधू ठरली पहिली भारतीय खेळाडू* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *माझा फळा-माझी लेखणी* हा उपक्रम राबविलेल्या शाळांच्या उपक्रमशील शिक्षकांच्या काही बोलक्या प्रतिक्रिया. ......... https://nasayeotikar.blogspot.com/2019/08/blog-post_25.html *संकल्पना - नासा येवतीकर* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग* -------------------------------------- सह्याद्रीच्या पूर्व पायथ्याशी असणारे हे तीर्थक्षेत्र नाशिक पासून २९ कि. मी. वर आहे. त्र्यंबकेश्वराचे मंदीर हे श्रीमंत बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे यांनी १७५५ ते १७८६ च्या दरम्यान बांधले. त्याकाळी हे मंदीर बांधण्यासाठी १६ लाख रूपये खर्च आला, आणि साधारणत: ३१ वर्षे मंदिराचे बांधकाम सुरू होते. चार प्रवेशद्वारे असलेल्या, फरसबंदी घातलेल्या एका भव्य आवारामधे ते दिमाखाने उभे आहे. उत्तरेच्या प्रवेशद्वारावर नगारखाना असून पश्चिम प्रवेशाजवळ (साठवणीची) कोठी आहे. मंदिराच्या महाद्वारा समोरच मोठी दीपमाळ आहे. प्रवेशानजिकच असलेल्या, सुबक कोरीव काम केलेल्या खाबांच्या घुमटामधे महानंदी विराजमान झाले आहेत. गर्भगृहासमोर चौसोपी मंडप आहे. *या मंदिरातील शिवलिंगाचे वैशिष्टय म्हणजे हे शिवलिंग बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग मानले जाते तसेच या लिंगाच्या शीर्षामधे सुपारीएवढया आकाराची तीन लिंगे आहेत.* ही लिंगे, ब्रह्मा, विष्णु आणि शिव, म्हणजे, विश्वाच्या उत्पत्ती, स्थिती आणि लय ह्या शक्तींची प्रतिके आहेत. ही लिंगे स्वयंभू असून पवित्र गंगा त्यांना अभिषेक करताना दिसते. हे पंचमुखी आराध्य दैवत इथे दिवसातून तीन वेळा पूजिले जाते. मुघलांकडून मिळवलेला पाचू-हिरे जडित मुकूट भाऊसाहेब पेशवे यांनी श्रीं चे चरणी अर्पण केला आहे. हा मुकूट मोघलांनी म्हैसूरच्या राजाकडून बळकावला होता. रुद्र, रुद्री, लघुरुद्र, महारुद्र किंवा अतिरुद्र यांचे पठन करुन त्र्यंबकेश्वरीचा हा शिव पूजला जातो. रुद्राक्षाला धार्मिक महत्व असून भगवान शिवाच्या गळयात रुद्राक्षांची माळ असते. रूद्राक्ष हे फळ असून त्याची झाडे त्र्यंबकेश्वर येथे आढळतात. *त्र्यंबकेश्वर येथील धार्मिक उत्सव :* १) सिंहस्थ कुंभमेळा : सर्वसाधारणपणे १२ वर्षांतून एकदा, जेंव्हा गुरू हा ग्रह सिंहराशीमधे, (लिओ) असतो. २) गोदावरी दिन : माघ (फेब्रुवारी) महिन्यातील शुध्द पक्षातील तेजस्वी चंद्रप्रकाशाचे, पहिले बारा दिवस. ३) निवृत्तीनाथ उत्सव : पौष मासातील तीन दिवस, सर्वसाधारणपणे, जानेवारीमधे हा उत्सव येतो. ४) त्र्यंबकश्वरची रथयात्रा : कार्तिक पौर्णिमेस, म्हणजेच त्रिपुरी पौर्णिमेस येणारी यात्रा. ५) महाशिवरात्री : माघ कृष्ण त्रयोदशीस. साधारणपणे मार्च महिन्यात येते. ---------------------------------- *त्र्यंबकेश्वरला कसे जाल?* ----------------------------------- हवाईमार्ग - जवळचे विमानतळ नाशिक. ३९ कि.मी. रेल्वेमार्ग - जवळचे रेल्वेस्थानक नाशिकरोड, मध्यरेल्वे पासून ४० कि.मी. अंतरावर. बसमार्ग - मुंबई- त्र्यंबकेश्वर १८० कि.मी, पुणे - त्र्यंबकेश्वर २०० कि.मी नाशिक-त्र्यंबकेश्वर २९ कि.मी. नाशिकच्या मध्यवर्ती बसस्थानकापासून नाशिक-त्र्यंबकेश्वर अशा एस. टी. महामंडळाच्या गाडया दर अर्ध्या तासाने चालू असतात. त्र्यंबकेश्वर हे नाशिकरोड रेल्वे स्टेशनपासून ४० कि.मी अंतरावर आहे. त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी बस व टॅक्सी उपलब्ध असतात. तेथे सोयी सुविधांनी युक्त अशा धर्मशाळा मिळतात. तसेच तेथील क्षेत्रोपाध्याय आवश्यकतेनुसार रहाण्याची व खाण्याची सोय करतात. *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *“ज्या माणसाजवळ संयम आहे तो प्रत्येक गोष्टीचा धनी असतो.”* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *उडीसा या राज्याचा राज्यपक्षी कोणता ?* मोर 2) *शिवाजी महाराजाची समाधी स्थळ कोठे आहे ?* रायगड 3) *तापमापकामध्ये कशाचा वापर करतात ?* पारा 4) *तंबाखूमध्ये सर्वात जास्त विषारी पदार्थ कोणता ?* निकोटिन 5) *भारतीय खेळातील सर्वात मोठा पुरस्कार कोणता ?* राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● दिगंबर खपाटे बन्नाळीकर ● प्रशांत इबितवार येवती ● संदीप आवरे चिकना ● विशाल कन्हेरकर अमरावती ●  नारायण शिंदे, रत्नागिरी ●  प्रशांत कोकणे ●  मधुकर बोईनवाड ●  संदीप सोनकांबळे ●  सुमेध वाघमारे ●  मारोती ताकलोर ●  दत्ता बोंदलवाड ● अभय रन्नावरे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आपल्या लहानपणी मुलांचं रडणं थांबविण्यासाठी कचकडी खुळखुळा होता. तो बाळाचे रडणे थांबवून त्याला हसरा करायचा. आता त्या खुळखुळ्याची जागा मोबाइलने घेतली आहे. कचकडी खुळखुळा बाळ लहान असेपर्यंत उपयोगी होता, मात्र हा नवा खुळखुळा माणसाच्या जन्मापासून मरेपर्यंत हाती राहतोय, असं दिसतयं. कचकडी खुळखुळ्यात नाद निर्माण करणारे खडे भरलेले असायचे. मोबाइलनामक खुळखुळ्यात नादाला लावणारे अॅप्स भरलेले असतात. हा खुळखुळा व्हिडीओ गेमचा नाद लावतो. हळूहळू फोन करायला शिकवतो, व्हाॅटस् अॅप शिकवतो, आठवीला गेला की 'मिस् काॅल' देऊ लागतो. युवापिढी रात्र-रात्र जागून चॅट करू लागते.* *माणूस कमवायला लागला की, मग तोंड लपवून 'फेसबुक' वर बाता मारू लागतो. लग्न झाले की, फेक अकाउंटवरून ह्रदय आणि मन मोकळं करत राहतो. कधी लाईक, कधी कमिंट, असं व्यक्त-अव्यक्त अभासी जगात जगू लागतो. गुड माॅर्निंग, गुड इव्हिनिंग, स्वीट ड्रीम, काँग्रॅट्स करत लक्षात येतं की, हे सारं झूट ! अवतीभवती संदेश, शुभेच्छा, सहवेदनांचा पाऊस; पण प्रत्यक्ष नक्षत्र मात्र कोरडंच ! अभासी जगात वाढलेली पिढी कोरडे जग जगताना आपण अनेकदा पाहतो. खरे पाहिले तर खुळखुळा, मोबाइल हे सारे त्या त्या काळातील अभासी भावच ! माणूस भावाचा भुकेला असतो. अभासी, भोगी संस्कृतीच्या जागी वास्तव, संवेदी, जीवाभावाची संस्कृती जपायची तर प्रसंगी जीव देऊन भाव, संबंध, नाते जपणे, जोपासणे म्हणजेच खरं जगणं !!!* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• ☀☀ ☀ ☀ ☀ ☀☀☀ *श्री. संजय नलावडे,मुंबई* *मोबाइल- 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *लहान मुले खरच निरागस असतात.* *आईला म्हणतात,* *रोज चांगली बुद्धी दे,* *सांगतो आपण ज्याला।* *सांग ना ग आई,* *कुणी पाहिलंय का देवाला.* *अशा वेळी निरागस बाळाला असे* *सांगा की--* *देवाने तर पहिलेच सांगून ठेवले* *आहे. माझ्याकडे मागून* *मिळालं असतं.* *तर, भिकाऱ्याला "भिक" आणि* *शेतकऱ्याला "पीक"* *कधीच कमी पडू दिलं नसतं.* *आणि बेरोजगाराना "नोकऱ्या" कमी पडू दिल्या नसत्या.* *निसर्गाचा नियम आहे जे पेरणार तेच उगवणार* *त्यासाठी माणसाने श्रमाने कष्ट करणे हेच कर्म आहे..!* *फक्त निवडलेला "रस्ता" जर "इमानदारीचा" व सुंदर विचाराने मंतरलेला असेल* *तर,"थकुन" जाण्याचा प्रश्नच "उरत" नाही.* *भले "सोबत" कुणी असो वा नसो..!* **पण... एक नक्की मनापासून* *कुठलही काम* *करण्यापूर्वी, आपल्या चांगल्या* " *कर्माची" आठवण काढा, प्रत्यक्षात* *निसर्ग तुमच्या पाठीशी** *असेल...!* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* *जि.प.शाळा--माणिकखांब,* *ता.इगतपुरी, जि. नासिक* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जीवनात दुःख किती जरी असले तरी ज्याच्यामध्ये सहन करण्याची क्षमता आहे तोच आपल्या जीवनात दुःखावर मात करुन यशस्वी होऊ शकतो . © व्यंकटेश काटकर,नांदेड संवाद - ९४२१८३९५९० 🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *क्रोधाला संयमाने जिंका* एकदा भगवान श्रीकृष्‍ण, बलराम आणि सात्‍यकी हे तिघे जंगलातून जात असताना रात्रीच्‍या वेळी काहीच न कळाल्‍याने रस्‍ता चुकले. जंगल घनदाट होते, तेथे न पुढे जाण्‍याचा मार्ग दिसत होता ना मागे येण्‍याचा. तेव्‍हा तिघांनीही असा निर्णय घेतला आता येथेच एखादी सुरक्षित जागा पाहून विश्राम करायचा आणि सकाळी उठून मार्गस्‍थ व्‍हायचे. तिघेही दमलेले होते पण प्रत्‍येकाने थोडा थोडा वेळ पहारा देण्‍याचे ठरवले. पहिली पाळी सात्‍यकीची होती. सात्‍यकी पहारा करू लागला तेव्‍हाच झाडावरून एका पिशाच्‍चाने हे पाहिले की एक माणूस पहारा करतो आहे आणि दोनजण झोपले आहेत. पिशाच्‍च झाडावरून खाली उतरले व सात्‍यकीला मल्‍लयुद्धासाठी बोलावू लागले. पिशाच्‍चाने बोलावलेले पाहून सात्‍यकी संतापला व क्रोधाने पिशाच्‍चावर धावून गेला. त्‍याक्षणी पिशाच्‍चाचा आकार बदलला व तो मोठा झाला. दोघांत तुंबळ मल्‍लयुद्ध झाले. पण जेव्‍हा जेव्‍हा सात्‍यकीला क्रोध येई तेव्‍हा तेव्‍हा पिशाच्‍चाचा आकार मोठा होई व ते सात्‍यकीला अजूनच जास्‍त जखमा करत असे. एका प्रहरानंतर बलराम जागे झाले व त्‍यांनी सात्‍यकीला झोपण्‍यास सांगितले. सात्‍यकिने त्‍यांना पिशाच्‍चाबदल काहीच सांगितले नाही. बलरामांनाही पिशाच्‍चाने मल्‍लयुद्धास निमंत्रण दिले. बलराम पण क्रोधाने पिशाच्‍चाशी लढायला गेले तर त्‍याचा आकार हा वाढलेला त्‍यांना दिसून आला. ते जितक्‍या क्रोधाने त्‍याला मारायला जात तितका त्‍या पिशाच्‍चाचा आकार मोठा होत असे. शेवटी तोही प्रहर संपला व आता पहा-याची पाळी भगवान श्रीकृष्‍णाची होती. पिशाच्‍चाने मोठ्या क्रोधाने श्रीकृष्‍णांना आव्‍हान दिले पण श्रीकृष्‍ण शांतपणे मंदस्मित करत त्‍याच्‍याकडे पहात राहिले. पिशाच्‍च अजून संतापले व मोठमोठ्याने ओरडून श्रीकृष्‍णांना बोलावू लागले पण श्रीकृष्‍ण मंदस्मित करत शांत भाव जपत राहिले व एक आश्‍चर्य झाले ते म्‍हणजे जसे जसे पिशाच्‍चाला क्रोध येऊ लागला तसतसा त्‍याचा आकार लहान होत गेला. रात्र संपत गेली अन पहाट झाली शेवटी आकार लहान होत होत पिशाच्‍चाचा एक छोटासा किडा झाला व श्रीकृष्‍णांनी अलगद त्‍याला आपल्‍या उपरण्‍यात बांधून ठेवले. सकाळी सात्‍यकी व बलरामांनी रात्रीची कहाणी सांगताच श्रीकृष्‍णांनी तो किडा त्‍यांना दाखविला व म्‍हणाले,’’ तुम्‍ही क्रोधाने याला कधीच जिंकू शकत नव्‍हता कारण हे क्रोधाचे पिशाच्‍च होते. त्‍याला शांती हेच औषध आहे. क्रोधाने क्रोध वाढतो मात्र त्‍याचा प्रतिकार हा केवळ शांतभाव प्रकटीकरणाने होतो. मी शांत राहिलो म्‍हणून हे पिशाच्‍च बघा कसे आता या किड्यासारखे लहान होऊन बसले आहे.’’ तात्‍पर्य : क्रोधावर संयमानेच विजय मिळविता येतो. क्रोधाला क्रोधाने मारता येऊ शकत नाही तर शांतपणे, प्रेमानेच कमी करता येते. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 24/08/2019 वार - शनिवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- ◆१९६६ - विक्रमवीर भारतीय जलतरणपटू मिहीर सेन यांनी जिब्राल्टरची सामुद्रधुनी पोहून पार केली. ◆१९९५ - मायक्रोसॉफ्टने विन्डोज ९५ ही संगणकप्रणाली प्रकाशित केली. 💥 जन्म :- ◆१८३३ - नर्मदाशंकर दवे, गुजराती साहित्यिक व समाजसुधारक. ◆१८७२ - न. चिं. केळकर (नरसिंह चिंतामण केळकर), मराठी साहित्यिक; 'मराठा', केसरी वृत्तपत्रांचे संपादक. ◆ १९०८ - हुतात्मा शिवराम हरी राजगुरु, भारतीय क्रांतिकारक. 💥 मृत्यू :- ◆१९२५ - डॉ. रा. गो. भांडारकर (रामकृष्ण गोपाळ भांडारकर), प्राच्यविद्या संशोधक, शिक्षणतज्ज्ञ ◆ १९९३ - प्रा. दि. ब. देवधर, भारतीय क्रिकेट खेळाडू ◆ २००८ - वै वै, चिनी भाषेमधील कवी, लेखक, पत्रकार. अहिल्याबाई होळकर , होळकर घराण्यातील राज्यकर्ती, परम शिवभक्त *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *भिवंडी : इरानी पाडा येथीच चार मजली इमारत कोसळली, ढिगाऱ्याखाली 10-15 जण अडकल्याची शक्यता, घटनास्थळी बचाव पथक दाखल.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *गोव्यात किमान दहा हजार ग्राहकांना सौर ऊर्जेकडे वळविण्याचे उद्दिष्ट असल्याचे गोव्याचे पर्यावरणमंत्री निलेश काब्राल यांनी सांगितले* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *अनेक मोठ्या कंपन्यांना मंदीचं ग्रहण लागताना दिसतंय. हजारो कर्मचाऱ्यांची कपात केली जातेय. त्यामुळे जनताही धास्तावलीय, देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या १२ घोषणा!* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *अहमदनगर : पाथर्डी तालुक्यातील पूर्व, दक्षिण भागात कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोग झाला यशस्वी, सायंकाळी चार वाजता कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी विमानांनी ढगांवर रसायनाची फवारणी केली. त्यानंतर दमदार पावसाने हजेरी लावली आहे. दीड तास झालेल्या या पावसाने तालुक्यातील बंधारे ओसंडून वाहिले आहेत.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *अनाथ मुलांच्या नोंदणीसाठी 'सरल पोर्टल' वर नवा पर्याय उपलब्ध; शासनाने काढलं परिपत्रक, सरल पोर्टलमध्ये अनाथ विद्यार्थ्यांसाठी आईवडील यांचे नाव माहित नसल्याने मधले नाव Not known अशी सुविधा होणार उपलब्ध* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *लंडन, अ‍ॅशेस 2019 : ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत तिसऱ्या कसोटीत इंग्लंडचा पहिल्या डावात फक्त 67 धावांत उडविला खुर्दा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *अँटिग्वा, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज पहिल्या कसोटी सामन्यात अजिंक्य रहाणे पाठोपाठ अष्टपैलू रवींद्र जडेजाने अर्धशतक झळकावल्यामुळे भारताच्या पहिल्या डावात 297 धावा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सोशल मीडिया आणि आधार* https://nasayeotikar.blogspot.com/2019/08/blog-post_23.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया खालील क्रमांकवर जरूर द्यावे ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *उल्कापात म्हणजे काय ?* 📙 रात्रीच्या वेळी शिळोप्याच्या गप्पा रंगल्या असताना निरभ्र आकाशात अचानक एखादा चमकदार पदार्थ झळाळत निखळताना दिसतो. सगळ्यांचेच लक्ष तिकडे वळते. पण हा झळाळणारा पांढराशुभ्र चमकदार पदार्थ पृथ्वीच्या नजीक आल्यावर दिसेनासाही होतो. हा असतो उल्कापातातला एक छोटासा तुकडा. पृथ्वीवर दरवर्षीच अनेक वेळा लहान मोठ्या उल्का कोसळत असतात. त्यांच्याबद्दल विविध अंदाज व्यक्त होतात. पृथ्वीपर्यंत पोहोचणाऱ्या उल्कांचा आकडा लक्षात घेतला तर रोज एखाद दुसरी उल्का जमिनीपर्यंत पोहोचते. पण न पोहोचणाऱ्या त्यापेक्षा कितीतरी जास्त असतात. त्या वातावरणात होणाऱ्या घर्षणाने तापून प्रकाशमान होतात, वितळतात व नंतर त्यांची वाफ होऊन वातावरणातच नष्ट पावतात. खऱ्या अर्थाने एखादी मोठी उल्का येथे येऊन आदळण्याचे प्रकारही अनेकदा घडले आहेत. असा सर्वात मोठा ज्ञात प्रकार अॅरिझोना या अमेरिकेतील राज्यात घडला असावा. किमान पंचवीस हजार वर्षांपूर्वी घडलेल्या या उल्कापातातील उल्केचे वजन पन्नास हजार टन असावे. यामुळे निर्माण झालेला खळगाच मुळी सव्वा किलोमीटर व्यासाचा आहे. भारतात लोणारचे तळे याच पद्धतीने तयार झाले असावे, असा अंदाज व्यक्त केला जातो. उल्कापाताने निर्माण झालेले खड्डे हे चंद्रावर तर ठायीठायी आढळतात. ऑस्ट्रेलिया व ब्राझीलमध्ये असे मोठाले उल्कापात अलीकडच्या शतकात झाले आहेत. उल्कापातातील दगड हे पृथ्वीवरच्या दगडांपेक्षा एकदम वेगळे असल्याने त्याबद्दल शास्त्रज्ञांना कुतूहल वाटत आले आहे. काही पूर्णत: लोहाचे काही पूर्णत: शिलांचे तर काहींमध्ये मिश्रा असे हे दगड असतात. सूर्य व ग्रहमालिका तयार झाली त्या वेळी काही अवशेष अवकाशातच भिरभिरत राहिले. त्यांतील काही शिळा, काही धूर, तर काही वायूरूप अवस्थेत आहेत. ग्रहांच्या आकर्षणाने ते ज्यावेळी कक्षेत खेचले जातात तेव्हा उल्कापात घडतात. पृथ्वीचे परिभ्रमण चालू असताना काही वेळा एखाद्या अशा धुळीच्या लोटातून पृथ्वी जाते. अनेक छोटेमोठे उल्कापात या वेळी होतात. गारांचा सडा पडावा तशा या छोट्यामोठ्या उल्का वातावरणात येतात; पण त्यांतील बहुसंख्य तेथेच वितळून चकाकत नष्ट होऊन जातात. पृथ्वीवर समुद्रात कोसळणाऱ्या उल्कांचा तर पत्ताच लागत नाही व अशांचा आकडा फार मोठा असणार आहे. उल्कांचा संग्रह करणारे अनेकजण आहेत. हा एक तेजीत चालणारा व्यवसाय आहे. उल्का वा पृथ्वीवरच्या दगड ही जाण त्यासाठी असणे ही प्रमुख अट. येथेच बरेचजण गळतात. त्यानंतर यासाठी करावी लागणारी वणवण व त्याला लागणारा अफाट पैसा ही दुसरी अडचण. तिसरी अडचण विविध देशांचे कायदे. पण यावरही मात करून अनेकजण ही हौस भागवतात, तर काहीजण यातूनच पैसा करतात. मोठ्या आकाराच्या उल्केला कित्येक हजार रुपयांची मागणी सतत असते, हे विशेष. उल्कापाताचा एक मोठा अंदाज फार पुरातन काळी झालेल्या उलथापालथीशी नेहमीच जोडला जातो. या महाप्रचंड उल्कापातानेच पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात धूर, धूळ साचून सूर्यप्रकाश पोहोचायला अडथळा झाला असावा व येथील प्राणीजीवन खूपसे नष्ट झाले असावे, असे काहींचे म्हणणे आहे. डायनॉसॉर जातीचे महाकाय प्राणी किंवा सरपटणाऱ्या जाती यातच उपासमार होऊन नष्ट झाल्या असाव्यात, असे मानले जाते. या अंदाजाला पुष्टी देणारा त्या उल्कापाताचा मोठ्या आकाराचा पुरावा मात्र मिळत नाही, ही या अंदाजातील कमतरता म्हणावी लागते. तुम्ही राहता त्या गावातील संग्रहालयात एखादी उल्का आहे का याची चौकशी करा. नसल्यास कुठे बघायला मिळेल, याची माहिती संग्रहालयाच्या प्रमुखांना विचारा. चंद्रावरील आणलेले काही दगड नील आर्मस्ट्राँग यांनी आपल्या देशाला भेट दिले आहेत, हे ज्ञात आहे का ? *'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *“ विश्वास हा जबरदस्तीने निर्माण करण्यासारखी गोष्ट नाही. ”* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *भारतात केंद्रशासित प्रदेशांची संख्या किती आहे ?* 9 2) *'दासबोध' हा ग्रंथ कोणी लिहिला ?* समर्थ रामदास 3) *शिवाजीने स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा कोणत्या मंदिरात घेतली ?* रायरेश्वर मंदिर 4) *महाराष्ट्रातील शैक्षणिक शहर कोणते ?* पुणे 5) *पहिले सजीव कोठे निर्माण झाले ?* पाण्यात *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● श्याम ठाणेदार, पुणे ●  श्रीकांत भुजबळ साहेब ●  हणमंत बोलचेटवार ●  संजय पाटील, पुणे ●  ऋषिकेश शिंदे ●  गोपाल ऐनवाले ●  सुनीलकुमार बावसकर ●  प्रितिष पाटील ● भाऊराव शिंदे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सारा अंधारच प्यावा* *अशी लागावी तहान ॥* *एका साध्या सत्यासाठी* *देता यावे पंचप्राण ॥* *असं जगावेगळ पसायदान कवी म.म.देशपांडे यांनी 'तहान' या कवितेत मागितलं आहे. त्याचं तीव्रतेने स्मरण व्हावं अशी परिस्थिती आज आपल्या देशात आहे. कोणत्याही क्षेत्राकडे जा सारा अंधार आहे. अपवाद वगळले तर वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनातून सत्य हद्दपार झालेलं आहे. असत्याच्या अंधारात संवेदनशील मनाची घुसमट होत आहे. 'सत्यमेव जयते' ही या देशाची घोषमुद्रा आहे. तथापि समाजाचं, देशाचं नेतृत्व करणा-यांपासून तर रूग्णांची सेवा करण्याची शपथ घेतलेल्या डाॅक्टरांपर्यत सर्वांनी तिचे पदोपदी धिंडवडे काढले आहेत. सर्वच क्षेत्रात असत्यानं, अप्रमाणिक वृत्तीनं थैमान घातलं आहे. स्वातंत्र्योत्तर काळात भारतमातेची दु:स्थिती आधिकच चिंतनीय झाली आहे. 'सत्य हे जीवनमूल्य लोप पावत आहे. 'असत्य' उजळ माथ्यानं वावरत आहे.* *खरंतर सत्य, सत्याचा शोध, सत्याचा उद्धार आणि आचरण, सत्याचा पुरस्कार याला वैभवशाली परंपरा आहे. भीष्मनिती सांगते, 'सत्य हे प्रत्येक माणसाचं कर्तव्य आहे. माणसाचा सर्वश्रेष्ठ आधार आहे. शाश्वत कर्तव्य आहे. आसक्तीचं जाळ फक्त सत्यच तोडू शकतं. सत्य म्हणजेच अमरत्व. सत्यासाठी केलेला त्याग मानवी जीवनात सर्वश्रेष्ठ आनंदाचा उगम असतो. सदाचरणी माणूसच इतरांच्या हितासाठी दक्ष असतो आणि या मार्गानंच त्याचं स्वत:चही हित साधलं जातं. सत्यासारखं तप, पुण्य नाही. असत्यासारखं पाप नाही. ज्याच्या ह्रदयात सत्य असतं त्याच्या ह्रदयात परमशक्ती वास करते.* *॥ रामकृष्णहरी ॥* 🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो* *काही जण म्हणतात* *काय कुठे संपल्या वेदना।* *पुन्हा नवा अवतार कशाला,* *जन्म दिला जर एकटीने मग ,* *नेणारे हे चार कशाला।* *खर वाटत नेहमी-----* *_जन्मापासुन शेवटच्या क्षणापर्यंत नुसते राबराब राबणे म्हणजे आयुष्य नाही ..._* *_स्वतःच्या समाधानासाठी आनंदाने जगणे म्हणजे खऱ्या अर्थाने आयुष्य होय ..._* *_वयाला हरवायचे असेल तर आपले छंद जिवंत ठेवले पाहिजेत ..._* *_मानलं तर मौज ..._* *_नाहीतर समस्या रोज ...!!!_* *स्वप्ने अशी बघा की पंखांना बळ* *येईल* *मैत्री अशी करा की जग आपले* *होईल* *अपयश असे स्वीकारा की विजेता* *भारावून जाईल* *माणुस असे बना की माणुसकी* *नतमस्तक* *होईल..!* ! *वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार** *आणि पिके जळून गेल्यावर पडलेला* *पाऊस यांची किंमत सारखीच असते*. *डोळे बंद केले म्हणून*......... *संकट जात नाही .* *आणि संकट आल्या शिवाय ,..* *डोळे उघडत नाहीत.* *राग आल्यावर थोडं थांबलं,..* *आणि चूक झाल्यावर थोडं नमलं,..........* *तर जगातल्या सर्व समस्या दूर होतात .....* *🙏अशोक कुमावत🙏* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• नाते असे तयार करा की,ती शेवटपर्यंत कायम टिकून राहिली पाहिजे.जर असे नाते बनवायचे असतील तर पहिल्यांदा आपल्या मनातील स्वार्थीपणाला तिलांजली द्यायला हवी आणि त्याबरोबरच प्रेम,जिव्हाळा,मैत्री, आपुलकी इ.गुणांना प्राधान्य देऊन खरे माणुसकीचे दर्शन निर्माण करुन जो काही एकमेकांतला असलेला दूरावा दूर करून एक अजोड आणि अतूट नाते निर्माण करायला शिकले पाहिजे तरच आपल्या मानवी जीवनाला खरा अर्थ प्राप्त होईल यात शंकाच नाही. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मानवता* जगाच्‍या मोहपाशातून विरक्त होऊन एक संत आपल्‍या कुटीत ईश्‍वराचे चिंतन करत कंदमुळे खाऊन आनंदात जगत होते. ते कुणालाही भेटत नसत किंवा त्‍यांच्‍याकडेही कुणी येत जात नसे. एके दिवशी संत खूप आजारी पडले लोकांनी त्‍यांच्‍यावर बरेच उपचार केले परंतु यश आले नाही. अखेरीस संतांनी देह ठेवला. मृत्‍यूनंतर ते जेव्‍हा स्‍वर्गात पोहोचले तेव्‍हा त्‍यांना सोन्‍याचा मुकुट घालण्‍यात आला. तसेच तेथे दुसरेही एक संत आले होते त्‍यांच्‍या डोक्‍यावर हिरेजडीत मुकुट होता. हे पाहून सोन्‍याचा मुकुट घालणा-या संताना खूप दु:ख झाले. त्‍यांनी देवदूताला विचारले की, मी संतत्‍वात कोणत्‍याच दृष्‍टीकोनातून कमी नाही तरीही मला सोन्‍याचा मुकुट व त्‍या संतांना हि-याचा मुकुट असा भेदभाव का? असा भेदभाव स्‍वर्गात तरी अभिप्रेत नाही. त्‍यांचे बोलून झाल्‍यावर देवदूत म्‍हणाला,’’ तुम्‍ही पृथ्‍वीवर हिरे माणके दिलेली नव्‍हती तेव्‍हा तुम्‍हाला इथे ती कुठून मिळतील?’’ संतांनी विचारले,’’त्‍या संतानी दिली होती काय?’’ देवदूताने होय असे उत्तर दिले. देवदूत पुढे म्‍हणाला,’’वास्तवात हिरे-माणकं म्‍हणजे अश्रू होते. जे त्‍यांनी संसार करताना गाळले होते. जगात घडणा-या प्रत्‍येक वाईट गोष्‍टीबद्दल त्‍यांना वाईट वाटले व त्‍याबद्दल त्‍यांच्‍या डोळ्यातून अश्रू ढळले होते. मात्र तुम्‍ही एक टिपूसही गाळला नाही.’’ संत म्‍हणाले,’’ मी कशाला अश्रू गाळू? मी तर ईश्‍वरभक्ती आणि स्‍नेह यातच खूप आनंदी होतो म्‍हणून मला कधी दु:ख जाणवलेच नाही.’’ देवदूत म्‍हणाला,’’ तुम्‍हाला ईश्‍वराचा स्‍नेह मिळाला म्‍हणूनच तुम्‍हाला ईश्‍वराचा सोन्‍याचा मुकुट देण्‍यात आला आहे.’’संताना स्‍वत:ची चुक समजली. ते स्‍वत:मध्‍येच मशगुल राहिले. त्‍यांना सभोवतालचे दु:ख कधीच दिसले नाही. *तात्‍पर्य :- ईश्‍वरभक्तीबरोबरच दु:खात इतरांना मदत करणे हीच मानवता होय.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 23/08/2019 वार - शुक्रवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- ◆ २०१२- राजस्थानात अतिवृष्टीमुळे ३० जण ठार. ◆ १९६६- 'लुनार ऑरबिटर -१' या मानवरहीत अंतराळ यानाने चंद्रावरून पहिल्यांदाच पृथ्वीची छायाचित्रे पाठविले. ◆ १९१४ - पहिले महायुद्ध - जपानने जर्मनी विरुद्ध युद्ध पुकारले व चीनच्या किंग्दाओ शहरावर बॉम्बफेक केली. ◆१९२९ - हेब्रॉन हत्याकांड - हेब्रॉन शहरात अरब दहशतवाद्यांनी सुमारे ६५ ज्यू व्यक्तींना ठार मारले व उरलेल्यांची हकालपट्टी केली. 💥 जन्म :- ◆१९७३ - मलाइका अरोरा, हिंदी चित्रपट अभिनेत्री. ◆ १९४४- सायरा बानू ,हिन्दी चित्रपट अभिनेत्री. ◆ १९१८- विदा करंदीकर, लेखक,कवी. 💥 मृत्यू :- ◆१९९४- आरती साहा, इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली भारतीय महिला जलतरण पटू. ◆ १३८७ - ओलाफ चौथा, नॉर्वेचा राजा. ◆१८०६ - चार्ल्स ऑगुस्तिन दि कूलंब, फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *सोलापूर : शहर पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांची नांदेड पोलीस अधीक्षकपदी बदली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *अॅमेझॉनच्या जंगलातील आग धुमसतीच, ब्राझीलमध्ये भरदिवसा अंधार, 2700 चौरस किमी क्षेत्र प्रभावित* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आदित्य ठाकरेंनंतर आता खासदार सुप्रिया सुळे यांची यात्रा, 23 ऑगस्टपासून सुप्रिया यांचा राज्यव्यापी संवाद दौरा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *माजी पंतप्रधान मोरारजी देसाईंना दिलेला 'भारतरत्न' काढून घेण्याची मागणी करणारी याचिका 'अर्थहीन', मुंबई उच्च न्यायालयाने याचिका दाखल करणाऱ्या वकिलाला 50 हजारांचा ठोठावला दंड* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *औरंगाबाद-जालना विधानपरिषद निवडणुकीत शिवसेनेचे अंबादास दानवे विजयी, आघाडीच्या बाबूराव कुलकर्णी यांचा 418 मतांनी पराभव* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *पुणे - बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल आज हाेणार जाहीर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *विक्रम राठोड होणार भारताचे नवीन फलंदाजी प्रशिक्षक, त्याबरोबर गोलंदाजी प्रशिक्षपदी भारत अरुण आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षकपदी श्रीधर यांना कायम ठेवण्यात आले आहे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *एक रविवार : एक चित्रकार* अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लीक करावे. https://aksharmaanav.blogspot.com/2019/08/blog-post_22.html?m=1 *अक्षर मानव* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *ऊती किंवा पेशीजाल म्हणजे काय ?* 📙 जगातील सर्व सजीवांचे शरीर अतिशय सूक्ष्म अशा पेशींनी तयार झालेले असते. केवळ सूक्ष्मदर्शक यंत्राच्या साहाय्याने या पेशी आपण पाहू शकतो. एखादे घर जसे असंख्य चिरेबंदी दगड किंवा विटांनी बांधले जाते तसेच कार्य येथे पेशी करत असतात. प्रत्येक पेशी ही तीन घटकांनी संपन्न होते. पेशीचे आवरण, पेशीद्रव, केंद्रक हे ते घटक. वनस्पतीपेशीत आवरण जास्त घट्ट असलेल्या पेशीद्रवाचे बनते. तसे प्राणिजपेशीत आढळत नाही. प्रत्येक पेशीला अन्न, प्राणी व प्राणवायू लागतो. तसेच जन्म, वाढ, कार्य व ठरावीक काळाने मृत्यू हे चक्र ठरलेलेच असते. पेशींची पूर्ण वाढ झाली की केंद्रकाचे दोन भाग होतात व पेशींचे द्विभाजन सुरू होते. पेशीद्रव प्रत्येक तुकड्याभोवती गोळा होऊन ही क्रिया पूर्ण होते. पेशीविभाजन सतत चालू असल्याने प्राण्याच्या शरीराला पेशींचा सतत पुरवठा चालू राहतो. या पेशी विभाजनाला एकच अपवाद आहे. तो म्हणजे मेंदूच्या पेशी. त्यांची संख्या जन्मत:च निश्चित असते. त्यात वयानुसार फक्त घटच होत जाते. जरी प्राणी व मानव एकाच बीजाच्या फलितातुन जन्माला येत असला तरी बीजांडफलनाच्या क्षणी मूळ पेशी (स्टेम सेल) फलित अंड्याच्या अंतर्भागात अस्तित्वात असतात. त्यातून शरीरात निरनिराळी कार्य करणाऱ्या निरनिराळ्या आकारांच्या पेशींची निर्मिती केली जाते. अशा पेशींच्या विशिष्ट कार्य करणाऱ्या समूहाला ऊती किंवा 'पेशीजाल' असे म्हटले जाते. अस्थिपेशी, ग्रंथीपेशी, स्नायूपेशी, रक्तातील पांढऱ्या व तांबड्या पेशी, चरबीच्या पेशी, आच्छादक पेशी, संयोगी पांढरे तंतू, संयोगी लवचिक तंतू व मज्जापेशी अशी नावाप्रमाणेच विशिष्ट कार्ये या विशिष्ट पेशीजालाकडून पार पडतात. याखेरीज शरीरातील महत्त्वाचा अवयव म्हणजे डोळा, हृदय, यकृत, मूत्रपिंड, फुप्फुसे, त्वचा यांची निर्मिती त्यांच्या कार्याला अनुरूप अशा पेशीजालातून केली जाते. उदाहरणार्थ, यकृतपेशी फक्त पित्तनिर्मिती करतात. मूत्रपिंडात नेफ्रॉन समूह मूत्रनिर्मिती करतो, हृदयाचे स्नायू जन्मापासून अखेरपर्यंत सतत कार्यरत राहतात. ऊती वा पेशीजालाच्या पुनर्निर्माणावर दोन पद्धतीत नियंत्रण असते. कुठेही इजा झाली, कापले व अंतर्गत इंद्रियांमध्ये बिघाड झाला, तर तेथील रक्तपुरवठ्याद्वारे यावर तातडीने मदतीला सुरुवात होते. कापल्याजागी खपली धरणे हे यांचे पहिले स्वरूप. नंतर यथावकाश त्वचेचा थर पुन्हा आच्छादला जातो. यकृताचे व त्वचेचे पेशीजाल या बाबतीत अत्यंत जागरूक असते. याउलट अस्थिपेशीजाल या पुनर्निर्मितीसाठी काही आठवडे घेतात. तुटलेली हाडे जोडायला शरीर सहा ते दहा आठवडे घेते, मात्र शस्त्रक्रियेनंतरचे टाके सातव्या दिवशीही काढता येतात. एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायलाच हवी. फार मोठ्या पेशीजालाचा नाश झाल्यास त्यांची जागा तशाच ऊती वा पेशीजाल्याने कधीच भरली जात नाही. यावेळी फक्त अच्छादनाचे वा मुत्रपेशींची जागा भरून काढण्याचे काम विशिष्ट प्रकारचा तंतुयुक्त पेशींद्वारे केले जाते. शरीरावरचे मोठे कायम राहणारे व्रण, शरीरातील मोठा अवयव काढला तर त्या जागी भरून येणारे पेशीजाल हे विशिष्ट कार्य करीत नाही, तर फक्त जागा भरून काढते. एकाच प्रकारचे कार्य करणाऱ्या ऊतींचा संचय इंद्रियाचे कार्य करतो. संपूर्ण शरीरातील गुंतागुंतीची अनेक कार्ये विशिष्ट प्रकारच्या ऊती वा पेशीजालांनी सहजपणे पार पडतात; पण या साऱ्यांची निर्मिती मात्र काही मोजक्या मूळ पेशींतून होते, हे निसर्गाचेच एक गुपित आहे. *'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *“ ज्याला आवडीचे कार्य करायला मिळते तो भाग्यवान होय. ”* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *समर्थ रामदासाचे मूळनाव काय होते ?* नारायण 2) *शिवाजीचे 'शिवाजी' हे नाव कशावरून ठेवले ?* शिवनेरी किल्यावर जन्म झाला म्हणून 3) *राष्ट्रध्वजावरील कोणता रंग त्यागाचे प्रतीक आहे ?* केशरी 4) *महाराष्ट्रातील सर्वात मोठा उद्योग कोणता ?* कापड 5) *भारतातील मानव निर्मित सर्वात मोठी वास्तू कोणती ?* ताजमहाल *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● सचिन बोरसे ●  आनंद यादव ●  अनिलकुमार शिंदे ●  रामदास पेंडपवार, ●  सुनील बेंडे ●  भारत सर्वे ●  भोजन्ना चिंचलोड ●  बाबुराव पिराईवाड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *खरंतर मनाच्या कुपीत अत्तरासारखा जपून ठेवावा, असा अनमोल ठेवा असतो 'घर.' परस्परांशी लळा लागला की जुळून आलेले जन्माचे ऋणानुबंध घराला घरपण देतात. मग घरच मंदिर होऊन जातं. एकमेकांच्या स्वप्नांसाठी प्रार्थनेच्या स्वरांनी भरलेली घरं कुणालाही हवीहवीशी वाटतात. काही घरांची दारं मात्र सदैव बंद असतात. मनाची कवाडं जिथं बंद असतील, तिथं घराची कवाडं कशी उघडतील? अशा घरांच्या उंचीवरून घरातल्या रास्त आनंदाची मोजदाद होत नसते. तर आनंद हाच घरांचा, तिथल्या माणसांच्या उंचीचा मापदंड असतो. ज्या घरात कटुतेच्या भारानं मनं गुदमरलेली असतात, त्या घरातला प्रपंच सुखाचा कसा होईल?* *कृत्रिम वस्तूंच्या, बेगडी जगण्याच्या मायावी जाळ्यात अडकत चाललो आहोत का आपण? हे जाळं भल्याभल्यांना मोहवतं. घर जर आपुलकीवर, माया-ममतेच्या भिंतींवर उभं असेल तर येत्या जात्या वाटसरूंनाही ते आपलं वाटतं. जिथं तृप्तीची वीणा झंकारत असते. माझ्या घरातली सारी माणसं माझी आहेत ही भावनाच सा-यांना जोडून ठेवते. अशा मनस्वी माणसांच्या अस्तित्वाचं सर्वांना आकर्षण असतं, चुंबकासारखं. सुखी संसार त्याचीच परिणती असते. ही अथांग तृप्तीची गोळाबेरीज संपत्तीच्या पलिकडची असते."साधे गवत फुलण्याला सुख म्हटले मी, सहज भेटलेल्या जगण्याला सुख म्हटले मी, अवती भवती झगमगती नक्षत्रे होती, पण वातीच्या जळण्याला सुख म्हटले मी"* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• ☀☀☀☀☀☀☀☀☀ संजय नलावडे, मुंबई •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो,* *जीवन तर युद्धभूमी आहेच हे* *सर्वानाच माहीत आहे .* *पण एक लक्षात ठेवा,* *जीवनात हजारो,लाखो, युद्ध जिंकून* *मजा नाही,विजय प्राप्त* *दुसऱ्यावर करण्यापेक्षा स्वतःवर प्राप्त* *करा, हे सर्वोत्तम ठरेल.* *आणि ही मिळवलेली जीत फक्त* *तुमचीच राहील.ही जीत* *तुमच्यापासून कुणीही हिरावून घेऊ* *शकत नाही.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• रस्ता कितीही अरुंद असला तरीही माणूस तो रस्ता पार करुन जातो त्याप्रमाणे जीवनात कितीही अडचण असली तरीही त्या अडचणीवर मात करुन जीवन जगण्याचा प्रयत्न करायला हवा.कारण जीवन हे सहजासहजी जगणे सामान्य माणसासाठी अवघडच आहे.अवघड आहे म्हणून सोडता येणार नाही किंवा निराश आणि हताशही होऊन बसता येणार नाही.स्तब्धपणे बसलात तर मार्ग काढणेही अवघड आहे.त्यातून काही ना काहीतरी युक्ती सुचता आली पाहिजे अन्यथा संकटं अंगावर झेलून लाखमोलाचे जीवन जगण्यात काही अर्थ राहणार नाही.प्रयत्न,सातत्य,सकारात्मक विचार ह्यातूनच जीवन जगण्याची आशा पल्लवीत होते. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०. 🍂🌹🍂🌹🍂🌹🍂🌹🍂🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *निर्मळता* गुरु शिष्य भ्रमंतीला निघाले होते. फिरता फिरता ते एका जंगलात येऊन पोहोचले. जंगलात काही अंतरावर एक झरा वाहत होता. गुरुजींना तहान लागली होती. त्यांनी शिष्याच्या हाती कमंडलू दिले आणि त्याला पाणी घेऊन येण्यास सांगितले. शिष्य झऱ्या पाशी गेला आणि त्याला असे दिसले कि तेथून नुकतेच बैल गाड्या गेल्या आहेत, बैल पाण्यातून गेल्याने पाणी खूप गढूळ झाले आहे. पाण्यात झाडाची पाने पडलेली आहेत. त्याने विचार केला असे घाण झालेले पाणी गुरूंसाठी नेणे योग्य नाही. तो तसाच परत गुरूंकडे गेला आणि म्हणाला,"गुरुजी, पाणी खूप गढूळ आहे, आपल्याला दुसरी काही तरी व्यवस्था पहावी लागेल." गुरुजी म्हणाले," अरे त्यापेक्षा तू असे कर पुन्हा त्या झऱ्यापाशी जा आणि पुन्हा पाणी आणण्याचा प्रयत्न कर." शिष्य गेला, त्याला पुन्हा पाणी गढूळ दिसले, तो परत आला, गुरूंनी त्याला परत पाठवले, असे चार पाच वेळेला झाले. शेवटी शिष्य कंटाळला, त्याच्या चेहऱ्यावर नाराजीचे आणि कंटाळलेले भाव दिसू लागले पण शिष्य गुरुज्ञा मोडायला तयार नव्हता. गुरूंनी त्याला परत पाणी आणायला पाठवले. आताच्या वेळी त्याला मात्र आश्चर्य वाटले कारण या वेळी पाणी अगदी नितळ, स्वछ नि निर्मळ होते. त्याने ते पाणी कमंडलू मध्ये भरले आणि गुरूंसाठी घेऊन आला. गुरूंनी पाणी प्राशन केले आणि शिष्याला म्हणाले,"वत्सा ! आपल्या मनात सुद्धा असेच कुविचारांचे बैल धिंगाणा घालत असतात. ते मनाची निर्मळता कमी करून मनाला मलिन करण्याचा प्रयत्न करतात. पण आपण त्यापासून सावध राहिले पाहिजे. कुविचारांचा प्रभाव आपल्या मनावर होणार नाही याची दक्षता आपण घेतली पाहिजे. मनाच्या झऱ्यातील पाणी शांत होण्याची प्रतिक्षा जर आपण केली तर मनात कायम स्वच्छ, चांगले विचार येतील. भावनेच्या भरात कधीही निर्णय घेऊ नये." तात्पर्य :- भावनेच्‍या भरात कोणतेही निर्णय घेऊ नयेत. मनात कायम स्‍वच्‍छ, चांगले विचार कसे येतील हेच पाहवे. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 22/08/2019 वार - गुरूवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- ◆ १९४४- दुसरे महायुद्ध,सोवियत युनियन ने रोमानिया जिंकले. 💥 जन्म :- ◆१९२० - डेंटन कूली, अमेरिकन डॉक्टर. ◆१९५५ - चिरंजीवी, तेलुगू चित्रपट अभिनेता. ◆१९६४ - मॅट्स विलँडर, स्वीडनचा टेनिस खेळाडू. 💥 मृत्यू :- ◆ १९९९-सूर्यकांत मांडरे,मराठी चित्रपट अभिनेता. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* *जि प शाळा बिरसी,जि गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा काश्मीरप्रश्नी भारत आणि पाकिस्तान यांच्यात मध्यस्थी करण्याचा दिला प्रस्ताव* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *आता डीजे वाजविल्यास होणार 5 वर्ष तुरुंवासाची शिक्षा, उत्तरप्रदेशमधील इलाहाबाद उच्च न्यायालयाने ध्वनी प्रदूषणासंदर्भात दिला एक मोठा निर्णय* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *नवी दिल्ली - INX घोटाळ्याप्रकरणी माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना सीबीआयने अखेर घेतले ताब्यात* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *महापुरानंतर पंचगंगेची पूररेषा नव्यानं निश्चित करण्याचं काम सुरु, पूरबाधित क्षेत्रात नव्यानं बांधकामांना मंजुरी नाही, चालू बांधकामांवरही निर्बंध* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *सार्वजनिक गणेश मंडळांनी अधिकृत वीजजोडणी केल्यास कमी दरात वीज देण्यात येत असून मंडळांनी अधिकृत वीजजोडणी घ्यावी तसेच गणेशोत्सवासाठी वीजसुरक्षेबाबत गांभिर्याने उपाययोजना कराव्यात, असे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात पहिल्या कसोटी सामन्यास होणार आजपासून सुरू* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *बुलडाण्याच्या महिला पोलीस मोनाली जाधवचा चीनमध्ये विक्रम, जागतिक क्रीडा स्पर्धेत दोन सुवर्ण पदकांसह तीन पदकं जिंकली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *अक्षर मानव आयोजित* *नवोदित पटकथा लेखक व चित्रपट कथा लेखक यांच्यासाठी सुवर्णसंधी* || पटकथा कार्यशाळा || नावनोंदणी आणि प्रवेश फीच्या माहितीसाठी खालील लिंकवर क्लीक करावे. https://aksharmaanav.blogspot.com/2019/08/blog-post_21.html?m=1 अधिक माहितीसाठी संपर्क : सतीश इंदापूरकर, इंदापूरकर भवन, सुरभी हॉटेलशेजारी, जंगली महाराज मंदिराजवळ, जंगली महाराज रस्ता, शिवाजीनगर, पुणे. फोन : 9623114393 / 9552516513 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌈 *इंद्रधनुष्य म्हणजे काय ?* 🌈 पावसाळ्याच्या दिवसांत जेव्हा ऊन पावसाचा खेळ चालू असतो, तेव्हा अनेकदा इंद्रधनुष्य दिसते. खरे म्हणजे हा सप्तरंगांचा खेळ असतो. पण तो आकाशात प्रचंड धनुष्य कृतीच्या आकारात समोर उभा ठाकतो. एक टोक लांबवर जमिनीला भिडलेले तर दुसरे आकाशात उंच कुठेतरी अज्ञातात गेलेले. एवढे मोठे धनुष्य इंद्राशिवाय कोणाचे असणार ? म्हणूनच बहुधा याचे नाव इंद्रधनुष्य पडले असावे. जसजसा सूर्य मावळत जातो, तसे इंद्रधनुष्य दिसेनासे होत जाते किंवा समोर पडणारा पाऊस जसा थांबतो, तसे तेही अदृश्य होते. इंद्रधनुष्य दिसण्यासाठी उन्हाची तिरीप पाहिजे. सूर्य माथ्यावर असून उपयोग नाही. पाऊस कोसळत असून उपयोग नाही. तर त्याची भुरभुर पाहिजे. सूर्यकिरण आपल्यामागून येत असणे महत्त्वाचे, तर पाऊस आपल्यापासून पुढे लांबवर पडत असला पाहिजे. हे सगळे जर जमले तर मग इंद्रधनुष्याची रंगत जमली व बराच काळ टिकली असे नक्की समजावे. स्वच्छ प्रकाश हा सप्तरंगांचे मिश्रण असते. तेव्हा एखाद्या पाणी वा काच यांसारख्या माध्यमातून ते किरण प्रवास करतात. तेव्हा वक्रीभवनाची प्रक्रिया घडते. ही प्रक्रिया घडताना जांभळ्या व निळ्या रंगाच्या प्रकाशकिरणांचा, वक्रीभवनाचा कोन जास्त असतो, तर लाल रंगांचे किरण त्या मानाने कमी वक्र पावतात. किरणांचा वेग मंदावण्याने ही क्रिया घडते. ही गोष्ट जशी एखाद्या लोलकाच्या साहाय्याने आपण एखाद्या प्रकाशझोतात बघू शकतो, तशीच पावसाच्या थेंबाच्या रूपाने ही आकाशात घडते. पावसाचे थेंब असंख्य असल्याने प्रकाशकिरणांच्या वक्रीभवनातून हा एक सलग रंगपट्टाच तयार होतो व त्यालाच आपण इंद्रधनुष्याची उपमा देतो. इंद्रधनुष्य केवळ पावसात दिसते, असेच नव्हे, तर विरणाऱ्या धुक्यामध्येसुद्धा एखाद्या दरीच्या पोटातून निघून थेट पर्वतशिखरांना ओलांडून वर जाताना दिसते. किंबहुना अनेक वेळा इंद्रधनुष्य दिसण्याची जागा म्हणजे खोल दऱ्या व त्यांच्या आसपासची गिरीशिखरे होय. दरीतून वरवर जाणारे बाष्पकण व त्यांवर उतरणारे तिरके सूर्यकिरण हे सहजपणे इंद्रधनूचा खेळ दाखवून जातात. विमानातून खाली ढगांवर दिसणारे गोल चक्राकार इंद्रधनुष्य हाही एक अद्भुत प्रकार आहे. *'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" Hard times are the moments of reflection. "* *(कठीण परिस्थिती ही तुमच्यातील धैर्य/चिकाटी दाखवण्याची खरी वेळ आहे.)* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *गुजरात या राज्याचा राज्यपक्षी कोणता ?* रोहित 2) *फुलपाखराच्या अळीला काय म्हणतात ?* सुरवंट 3) *वाघाच्या निवाऱ्याला काय म्हणतात ?* गुहा 4) *वर्षातील कोणत्या दिवशी दिवस व रात्र सारखेच असते ?* 22 मार्च व 22 सप्टेंबर 5) *महानुभाव पंथाची स्थापना कोणी केली ?* श्री चक्रधर स्वामी *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ●  गजानन पाटील, हिंगोली ● शिवा गैनवार ●  नागराज यंबरवार ●  आशिष देशपांडे ●  गुरुदास आकेमवाड, बरबडेकर ●  शंकर गंगुलवार ● मुजीब शेख ● आकांक्षा नागेश तांबोळी *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *देवाचे खरे मंदिर कोणते - जेथे त्याला बंद दरवाज्यामागे कडी-कुलपात सुरक्षित ठेवले जाते ते ? जेथे प्रवेशासाठी तिकीट काढावे लागते ते ? जेथे आधिक पैसे देऊन लवकर दर्शन घेता येते ते ? की आपल्या घरातलाच तो पवित्र राखलेला एक कोपरा, जेथे आरती म्हटली जाते ? ज्या परमेश्वराने आकाश व पृथ्वी निर्माण केली तो मानवी हातांनी बांधलेल्या मंदिरात रहात नाही. त्याला तशा मंदिरांची गरज नाही.* *परमेश्वराचे खरे मंदिर आपणच आहोत; कारण त्याचा पवित्र आत्मा आपल्यात राहतो. आपल्या ह्रदयातील भव्य उपासना- मंदिराच्या परमपवित्र स्थानांत सर्वांना, अगदी अनिर्बंधितपणे जाता यावे ही एक सुंदर कल्पना आहे आणि ती लवकर साकार व्हावी. पण त्याआधी आपल्या अंत:करणावर आपण काय लिहिले आहे तेही बघितले पाहिजे. असे न होवो की, आपल्या अंत:करणावरची 'प्रवेश बंद' ची पाटी वाचुन परमेश्वर बाहेरच उभा राहिला असेल.* •• ● ‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो,* *स्वामी तिन्ही जगाचा आई विना* *भिकारी,* *जन्मदात्याले भोवला त्याले लेक* *म्हणू नही,* *पुत्र देई ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही* *लोकी झेंडा,* *_कुठे लागता पिलांना* *मांजरीचे___ दात,* *अशा अनेक रचना हृदयाला* *भिडतात,हृदय पिळवटून टाकतात.* *हे कितीही सत्य असलं तरी* *संतती लायक असेल तर कमवून ठेवण्याची काहीच गरज नाही, कारण ते स्वतः कमविल्या शिवाय रहाणार नाहीत. आणि संतती नालायक असेल, तर अजिबात कमवून ठेवण्याची गरज नाही. कारण आपल्या समोरच त्या संपत्तीला काडी लागल्याशिवाय रहाणार नाहीत. विठ्ठलपंत आणि रूक्मिणी मातेने देहांत शिक्षा घेतली, त्यावेळी निवृत्ती , ज्ञानदेव, सोपान व मुक्ताई यांचे वय काय होते ? त्या वयात निर्माण झालेली जबाबदारी विश्वाचे कल्याण करणारी ठरली. छत्रपती शिवरायांच्या हातात त्यांच्या चौदाव्या वर्षी पुणे जहांगीर सोपवली गेली . शहाजी राजांनी वयाच्या पाचव्या वर्षी इंदापूर जहांगीर सांभाळली. जबाबदारी जेवढ्या लहान वयात अंगावर पडते, तेवढे कर्तृत्व महान होते. म्हणून आपल्या मुलांना जबाबदारी घ्यायला शिकवा आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभे करा.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्या सागरातून उसळणाऱ्या लाटा तीव्र गतीने किना-याकडे झेपावत येतात तेव्हा असे समजायचे की, नक्कीच किना-याचे नुकसान होणार आहे.त्यापासून सावध होण्याचा इशाराही दिला जातो.पण ज्या लाटा सागरातून किना-याकडे हळूहळू मार्गक्रमण करत येतात तेव्हा त्याच लाटा किना-याचे सौंदर्य वाढवतात आणि मानवी मनाला आल्हादकारक वाटतात. अशाच पध्दतीने मानवी मनाचेही लाटासारखेच आहे.काहीच विचार न करता अचानक एकाएकी घेतलेले निर्णय कधीकधी चालत असलेल्या चांगल्या जीवनाला नुकसान करु शकतात.असे निर्णय घेताना शांत चित्ताने आणि सारासार विचारपूर्वक घेतले तर सर्वांनाच फायदा होईल.असेच जीवनात सागरातल्या शांत लाटाप्रमाणे राहून जीवनालाही किना-यासारखे सुंदर बनवता येईल. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०. 🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *नदी,मासा,युक्ती* एका नदीच्या तिरावर एक कोळी मासे धरायला गेला. फार मोठे मासे नदीत सापडतील असे त्याला वाटले नाही 🕸म्हणून त्याने मोठे जाळे बरोबर घेतले नाही. त्याच्या मनात एक विचार आला आणि त्याने एका काठीच्या टोकाला एक बारीक दोरी बांधून गळ वर ओढू लागला, पण मासा बराच मोठा असल्याने गळ लवकर ओढला जाईना. कोळी बराच वेळ विचारात पडला.त्यानंतर त्याला सूचले की, गळ लवकर ओढला तर मासा आपल्या वजनाने व चळवळीने आपली बारीक दोरी तोडून पळून जाईल तेव्हा त्याने बराच वेळपर्यंत गळ पाण्यात राहू दिला व नंतर अगदी हळूहळू तो पाण्याच्या बाहेर काढला. तोपर्यंत मासा धडपड करून अगदी निर्बळ झाला होता. त्यामुळे दोरी तोडण्याची शक्ती त्यात उरली नव्हती. कोळ्याची ही युक्ती कामी आली. तात्पर्य :- युक्तीने सर्व प्रकारच्या अडचणीतून पार पडता येते.काही बाबीसाठी शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते.आणि कमी वेळेत कार्य सार्थकी लागते. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 21/08/2019 वार - बुधवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- ◆ १९९३-मंगळाच्या शोधमोहिमेसाठी पाठविण्यात आलेल्या 'मार्स आब्झर्व्हर'या यानाचा पृथ्वीशी (NASA)संपर्क तुटला. 💥 जन्म :- ◆ १९३४-सुधाकरराव नाईक,महाराष्ट्राचे १३ वे मुख्यमंत्री ◆१९८६- उसेन बोल्ट , जमैकाचा धावपटू ◆१७८९ - नारायण श्रीधर बेंद्रे, भारतीय/मराठी चित्रकार. ◆१९७३ - सर्गेइ ब्रिन, गूगलचा संस्थापक. 💥 मृत्यू :- ◆ १९७८ - विनू मांकड, भारतीय क्रिकेट खेळाडू ◆१९३१ - विष्णू दिगंबर पलुसकर, मराठी हिंदुस्तानी गायक. ◆ २००१ - शरद तळवलकर, मराठी चित्रपटअभिनेता ◆ २००६ - उस्ताद बिस्मिल्ला खाँ, ख्यातनाम भारतीय सनईवादक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* *जि प शाळा बिरसी ,जि गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्टला लाल किल्ल्यावर झालेल्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात प्लॅस्टिक वापरावर बंदी घालण्याची घोषणा केली होती.त्या अनुषंगाने लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *चांद्रयान - 2 चा चंद्राच्या कक्षेत प्रवेश, मोहिमेतील दुसरा महत्वाचा आणि कठीण टप्पा पार, 7 सप्टेंबरला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार * •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *नवी दिल्ली : स्टेट बँक आॅफ इंडियाने पुढील पाच वर्षांत डेबिट कार्ड बंद करण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. प्रत्येक आर्थिक व्यवहार डिजिटल व्हावा, यासाठी बँकने ही तयारी केल्याचे बँकेचे अध्यक्ष रजनीश कुमार यांनी दिली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा आता 21 ऑगस्ट ऐवजी 22 तारखेला सुरू होणार, एक सप्टेंबरला होणार समारोप* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *मुंबई - काल मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला, २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *देशाची अर्थव्यवस्था अत्यंत चिंताजनक; वर्षभरात १.१० कोटी व्यक्तींचा गेला रोजगार, दुचाकी वाहनांची विक्री १७ टक्क्याने व चारचाकी वाहनांची विक्री २३ टक्याने घटली, तर पाच लाख व्यक्ती बेरोजगार झाल्या.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *महाराष्ट्राचा कुस्तीपटू राहुल आवारेची जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय संघात झाली निवड* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *अक्षर मानव संवाद बारा* *अतिथी : रामदास फुटाणे* *दिनांक : १२ व १३ सप्टेंबर 2019* अधिक माहितीसाठी खालील लिंकवर भेट द्यावे. https://nasayeotikar.blogspot.com/2019/08/blog-post_20.html उपक्रम : संवाद सहवास •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🔭 *वैज्ञानिक दृष्टिकोण* 🔬 *प्रश्न - संमोहनाच्या प्रभावाखाली एखाद्या व्यक्तीस चोरी करावयास लावणे शक्य आहे काय?* *उत्तर-* ज्या व्यक्तीने पूर्व - आयुष्यात कधीही चोरी केलेली नाही वा चोरी करणे पाप आहे असा पक्का समज ज्या व्यक्तीचा आहे, अशा व्यक्तींकडून संमोहित अवस्थेत चोरी करून घेणे अशक्य आहे. संमोहन अवस्थेत व्यक्ती स्वतःला अनैतिक वाटणाऱ्या सूचना स्वीकारत नाही. अशा सूचना मिळाल्यास एकतर संमोहन अवस्थेतून ती जागृत अवस्थेत येते अथवा त्या अवस्थेत राहूनही त्या विशिष्ट सूचनांप्रमाणे वर्तन करणे नाकारते.समजा एखादा चोर आहे – त्याला संमोहन अवस्थेमध्ये नेल्यानंतर चोरी करण्याची सूचना दिली तर तो ती सूचना अमलात आणेल. कारण चोरी करणे अनैतिक आहे असे त्याला वाटत नसते. (परंतु याचाच अर्थ असा की, चोरी करण्यासाठी त्याला संमोहन अवस्थेत नेण्याची गरज नाही. जागृत अवस्थेमध्येही तो न ओशाळता, न घाबरता चोरी करेल. तीच गोष्ट तो संमोहन अवस्थेत करेल एवढेच.) संमोहनाच्या प्रभावाखाली हे दुष्कृत्य करण्यास तो धजावला, असा त्याचा अर्थ नाही. *डॉ. नरेंद्र दाभोलकर व प्रा. प. रा. आर्डे* *'अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *“जाळणाऱ्या मोठ्या अग्नीपेक्षा उब देणारा लहान अग्नी चांगला असतो.”* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *'टायगर स्टेट' असे कोणत्या राज्याला म्हणतात ?* मध्यप्रदेश 2) *शुद्ध हवेला काय नसते ?* रंग,वास,चव 3) *ज्ञानेंद्रिये किती व कोणते ?* 5 (डोळे,कान, नाक,जीभ,व त्वचा) 4) *'गुलामगिरी' हा ग्रंथ कोणी लिहिला ?* महात्मा फुले 5) *'राष्ट्रीय शिक्षण दिन' केव्हा साजरा केला जातो ?* 11 नोव्हेंबर *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● भूषण परळकर ●  विश्वास बदापूरकर ●  भीमाशंकर जुजगार ● साईनाथ राचेवाड ●  दत्ता नरवाडे ●  साईनाथ हवालदार ● संतोष गुम्मलवार *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *खरेपणा, प्रामाणिकपणा, वास्तवता, अस्सलपणा आणि यथार्थपणा अशी आपल्या व्यक्तिमत्वाची ओळख ठेवणं चांगलं. हीच तर आपल्या जीवनाची खरीखुरी गुणसंपदा असते. माणसाने आपल्या ठायी असलेल्या गुणांची जाणीव विसरली तरी चालेल; परंतु आपल्या ठायी असलेल्या दोषांची चांगली जाणीव ठेवावी. जसं दगडातील नको असलेला भाग काढून टाकला की, सुंदर मूर्ती तयार होते, तसं आपल्या स्वभावातील दोष काढून टाकले की, निखळ आणि सुंदर व्यक्तिमत्व झळकत असतं. खरंतर गुणी माणसं लोखंडाचं सोनं बनविणा-या परिसासारखी असतात, ओसाड जमिनीचं नंदनवन करणारी असतात. म्हणून जीवनात यश मिळविण्यासाठी सत्य, पामाणिकपणा, कठोर परिश्रम, न्याय आणि चारित्र्याची गरज असते हे विसरता येणार नाही.* *सत्य म्हणजे सत्यवाणी, सत्य विचार, सत्य आचार आणि सत्य उच्चार होय. सत्य म्हणजे जीवन. असत्य म्हणजे मरण. अनेक माणसं अशी जगता जगता मरत असतात आणि अनेक माणसं मरूनदेखील जगत असतात. यासाठी आपण स्वत: सत्यभाषी झाले पाहिजे. समाज सत्याचा आदर करतो. प्रामाणिकपणाची कदर करतो. न्यायची चाड बाळगतो. श्रमाची महती गातो आणि चारित्र्याची पूजा करतो. आज 'सत्यमेव जयते' हाच आपल्या जीवनाचा मंत्र बनला पाहिजे. यासाठी सत्याचे महत्व आपल्या मनाच्या पाटीवर कायमचे कोरून ठेवले पाहिजे.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟 *संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल- 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो,* *आजकी मनकी बात* *सूनलो,समज जाओ,* *जेव्हा मन कमकुवत असतं,* *तेव्हा परिस्थिती धोका निर्माण करते,* *जेव्हा मन संतुलित असतं,* *तेव्हा परिस्थिती आव्हान निर्माण* *करते,* *जेव्हा मन मजबूत असतं,* *तेव्हा परिस्थिती संधी निर्माण करते,* *म्हणूनच मन आनंदी व खंबीर असेल,* *तर परिस्थितीवर निश्चित विजय* *मिळवता येतो.या सर्व* *अवस्थेत* *मनाला सांगा.* *माझ्या मना बन दगड.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्याप्रमाणे काट्यातून गुलाबाला फुलण्यासाठी काट्याशी टक्कर द्यावीच लागते तेव्हा कुठे गुलाबाला इतरांना आनंदी पाहता येते.जर इतरांना आनंद द्यायचा असेल तर आपले दुःख त्यांच्यासमोर मांडून चालणार नाही.जर मांडलेत तर त्यांना आनंदाने आपण पाहू शकणार नाही.उलट त्यांच्या आनंदावर विरजण टाकल्यासारखे होईल.इतरांना सुखात आणि आनंदात पहावयाचे असेल तर आपल्याला होत असलेले दु:ख बाजूला सारून त्यांना होणा-या दु:खावर फुंकर घालून सुखाचे काही क्षण देऊ शकतो आणि एवढी तयारी जर आपण ठेवली तर इतरांना जसा आनंद देता येईल त्या आनंदाबरोबरच आपल्या जीवनात आनंद लुटता येईल.नाही तर त्यांच्या डोक्यावर दु:खाचे ढग जसे दाटलेले पहायला मिळतील तसेच आपल्याही डोक्यावर दु:खाणे ढग अधिक गर्दी करुन राहतील.मग आपल्या सुखी जीवनाचे कोणतेही इप्सित साध्य होणार नाही.इतरांना दु:ख देण्यापेक्षा,मन दुखवण्यापेक्षा त्यांच्या चेहऱ्यावर हसू कसे फुलवता येईल याचा प्रयत्न करायला शिकले पाहिजे. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जबाबदारीने कार्य करणे.* राज्यकारभारापेक्षा इतर अवांतर गोष्टीत रस घेणाऱ्या एका राजाने आपल्या सेनापतीला दोन प्रश्न विचारले व उत्तरे देण्यासाठी त्याला एका आठवड्याची मुदत दिली. सेनापतीने आपल्याच चेहऱ्य मोहोऱ्याच्या आपल्या एका सेवकाला आपला पोषाख घालायला देऊन, आणि त्या प्रश्नांची उत्तरे पढवून, राजाकडे पाठविले. ‘हा आपला सेनापतीच आहे’ अशा समजुतीनं राजानं त्याला विचारलं, ‘काय सेनापतीसाहेब ? मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे तयार आहेत का ?’ नकली सेनापती म्हणाला, ‘महाराज ! ते प्रश्न आपण पुन्हा विचारलेत तर बरे होईल.’ राजा – समोरच्या पर्वताची माती एकूण किती टोपल्या होईल ? नकली सेनापती – त्या पर्वताच्या एकूण क्षेत्रफ़ळाच्या एक दशांश आकाराची जर एक टोपली बनवली, तर त्या पर्वताची एकूण माती दहा टोपल्या होईल. राजा – वा: ! अगदी बरोबर आहे उत्तर. सेनापतीसाहेब ! आता माझ्या मनात काय आहे ते सांगा. नकली सेनापती – सध्या तुमच्या मनात तुम्ही सेनापतीशी बोलत आहात असं आहे; पण मी खरा सेनापती नसून, सेनापतीच्या सोंगात तुमच्याकडे आलेला सेनापतीसाहेबांचा नोकर आहे. राजा – मग तुम्ही दोघांनी मला असं का फ़सवलं ? नकली सेनापती – माझ्या धन्याचं असं म्हणणं आहे की, जे माणसं मोठ्या पदांवर आहेत, त्यांनी मनोरंजनाच्या भलत्यासलत्या गोष्टीत वेळ वाया घालवू नये. राजाचं कर्तव्य राज्य उत्तम त-हेनं चालविण हे आहे, तर सेनापतीचं कर्तव्य राज्याचं उत्तम त-हेनं रक्षण करणे हे आहे. अशा अशा स्थितीत आपण त्यांना नसते प्रश्न विचारुन त्यांच मन त्यांच्यापुढे असलेल्या मुख्य प्रश्नांवरुन उडवून भलत्याच प्रश्नांकडे वेधता. त्यांना आपलं हे वागणं मान्य नसल्यामुळे, त्यांनी आपल्या मामुली प्रश्नांची उत्तर देण्यासाठी माझ्यासारख्या मामुली सेवकाला सेनापतीचं सोंग घेऊन पाठविलं.’ नकली सेनापतीच्या या खुलाशानं राजा वरमला आणि मनोरंजनाच्या बाबींतून लक्ष काढून त्याने ते राज्यकारभारात घातले. साभार - इंटरनेट *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 20/08/2019 वार - मंगळवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ◆ *भारतीय अक्षय ऊर्जा दिन* ◆ *सद्भावना दिन* ◆ *जागतिक डास दिन* 💥 ठळक घडामोडी :- ◆ २००८- कुस्तीगीर सुशीलकुमार याला बीजिंग ओलीम्पिक मध्ये ब्रॉंझ पदक मिळाले. ◆१९९७ - सूहाने हत्याकांड - अल्जिरियामध्ये ६० व्यक्ती ठार. १५ अधिक व्यक्तींचे अपहरण. 💥 जन्म :- ◆१९४४ - राजीव गांधी, भारताचे माजी पंतप्रधान. ◆ १९४६ - एन.आर. नारायण मुर्ती, भारतीय उद्योगपती. 💥 मृत्यू :- ◆ २०१३-नरेंद्र दाभोळकर ,अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक व थोर समाजसुधारक,विचारवंत यांची पुणे येथे गोळ्या घालून हत्या करण्यात आली. ◆ २०१३- जयंत साळगावकर, ज्योतिर्भास्कार,लेखक व उद्योजक. ◆१९९७ - प्रागजी डोसा, गुजराती नाटककार, लेखक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* *जि प शाळा बिरसी,जि गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *नवी दिल्ली - जम्मू काश्मीर मुद्द्यावरुन भारत-पाक यांच्यातील संबंध ताणले असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये जवळपास ३० मिनिटे झाली चर्चा, त्यात द्विपक्षीय संबंध आणि सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादाच्या मुद्द्यावर करण्यात आली चर्चा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *पूरग्रस्तांना दिलासा, एक हेक्टरवरील पूरग्रस्त शेतीचं पीककर्ज माफ, कोसळलेल्या घरांचीही पुनर्बांधणी करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा * •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत 98 टक्के मतदान, शिवसेनेचे अंबादास दानवे तर आघाडीचे बाबुराव कुलकर्णी रिंगणात* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना अमिताभ बच्चन यांच्याकडून 51 लाखांची, तर रिलायन्स इंडस्ट्रीजकडून 5 कोटींची मदत, मुख्यमंत्र्यांकडून बिग बींना धन्यवाद * ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *मुंबई-पुणे रेल्वे सेवा कालपासून पूर्ववत, सर्व गाड्या वेळापत्रकानुसार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थांकडून जम्मू-काश्मीरमध्ये विद्येचा प्रसार होण्याची शक्यता, पुण्यातील शैक्षणिक संस्थांचा पुढाकार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *बॉलिवूडचे सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक मोहम्मद जहूर खय्याम यांचे वयाच्या 92 व्या वर्षी झाले निधन, त्यांना फ्रेश मॉर्निंग बुलेटीन कडून भावपुर्ण श्रद्धांजली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जागतिक फोटोग्राफी दिन - 19 ऑगस्ट* https://nasayeotikar.blogspot.com/2019/08/blog-post_19.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप म्हणजे काय ?* 📙 सूक्ष्मदर्शक भिंगाचा वापर प्रथम लहान वस्तू बघण्यासाठी केला गेला. मग जिवाणूंचा शोध लावला गेला. त्यांच्याबद्दलचे संशोधन चालू असतानाच पेशींच्या अंतर्गत हालचालींबद्दल औत्सुक्य निर्माण झाले होते. पण सूक्ष्मदर्शक यंत्रांची ताकद कमी पडू लागली होती. पेशीतील न्युक्लियस दिसत होता; पण त्याच्या पुढे फारसे जाता येत नव्हते. याच सुमाराला इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचा शोध लागला. हा काम कसा करतो ? अतिशय काळजीपूर्वक व जास्तीत जास्त पातळ गोष्टींचे निरीक्षण करण्यासाठी याचा वापर करतात. अगदी पातळ असा केस या मायक्रोस्कोपखाली बघितल्यास जाड मनगटाएवढ्या दोरखंडासारखा दिसतो. सर्वसाधारणपणे १०,००० ते ५०,००० पट मोठी प्रतिमा करण्याची याची शक्ती असते. एका तीव्र स्रोतातून इलेक्ट्रॉनचा झोत चुंबकीय क्षेत्रातून एकवटून पाहावयाच्या गोष्टींवर सोडला जातो. तपासणी करावयाच्या वस्तूंमधील प्रत्येक अणूची दखल हा झोत घेतो व त्याचा एक आराखडा समोरच असलेल्या इलेक्ट्रॉन शोधकातर्फे टीव्हीच्या पडद्यावर दिसू लागतो. योग्य त्या पद्धतीत झोताचे केंद्रीकरण झाल्यावर गरजेप्रमाणे त्याचे फोटो घेता येतात. झोतातले इलेक्ट्रॉन्स नेमके काय करतात ? प्रकाश लहरींपेक्षा यांची पृथक्करण शक्ती कितीतरी पटींनी जास्त असल्याने वस्तूची प्रतिमा जवळपास एक लक्ष पट मोठी दिसू शकते. मुख्यत्वेकरून जेनेटिक्समधील संशोधन, डीएनए व आरएनए या संदर्भातील प्रयोग, विषाणूंचा शोध यांसाठी या मायक्रोस्कोपचा वापर केला जातो. भारतातील फार मोठय़ा शहरांतील मोजक्या प्रयोगशाळांत अत्यंत कुशल वैज्ञानिक यांचा उपयोग करतात. HIV वरचे संशोधन, H1 N1 या विषाणूने होणाऱ्या स्वाइन फ्लू बद्दलचे संशोधन हे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपशिवाय शक्य नव्हते. बायोटेक्नॉलॉजी संदर्भातही अनेक बाबतीत याचा वापर अत्यावश्यक ठरतो. *'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *“ चांगले पुस्तक म्हणजे मानवी आत्म्याचे अतिशुद्धी सार असते.”* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *महाराष्ट्राचे राज्यफुलपाखरू कोणते ?* राणी पाकोळी 2) *घोड्याच्या निवाऱ्याला काय म्हणतात ?* तबेला 3) *जगातील सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण कोणते ?* मौसीनराम व चेरापुंजी (भारत) 4) *शुद्ध पाण्याला काय नसते ?* रंग,वास,चव 5) *पाण्याच्या अवस्था किती व कोणत्या ?* 3 ( स्थायू,द्रव, वायू ) *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● हरीश बुटले, पुणे ● इरेश्याम झंपलकर, कुंडलवाडी ● विजय दिंडे, हुनगुंदा ● गणेश येवतीकर ● शशांक बामनपल्ले, नायगाव ●  दीपक पाटील ●  सतीश दिंडे ●  जयपाल दावनगीरकर ●  विवेक सारडे ●  प्रमोद मुधोळकर ●  आदित्य रावजीवार ●  कांतीलाल घोडके *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *भारतभूमी संत-महंतानी, समाजसुधारकांनी पावन केली आहे. लोककल्याणासाठी चंदनासारखा देह झिजवत त्यांनी मानवता समृद्ध केली. काही अलौकिक प्रलोभनांमध्ये भोळ्याभाबड्या लोकांना अडकवून स्वत:ची वैभवी दुकानं थाटणं हे संतांचं ध्येय नसतं. त्यांच्या माणूसधर्माच्या शिकवणूकीचं आपल्याला मोल नसतं. संतांच्या जीवनात कुठलाच झगमगाट नसतो, चमत्कार नसतात. 'माणूस' घडवणं हेच त्यांचं ध्येय असतं. संतांना ना स्वत:ची जात असते, ना कोणता धर्म! कुठल्या विशिष्ठ विचारांचा त्यांच्यावर पगडा नसतो. ते स्वत:च्या वाटेवरुन स्वतंत्रपणे चालत राहतात.* *स्वर्ग-नरकाच्या जटील जाळ्यात संत अडकत नाहीत. कुणाला अडकवत नाहीत. जमिनीवरल्या सहज जगण्याचे व अंतरीच्या शाश्वत सुखाचे मंत्र ते देत राहतात. त्यांचं नातं केवळ सत्याशी असतं, सत्य कटू असतं. म्हणून आपण दगड मारतो सत्याच्या पुजा-यांना. यात संत असतात तसे वैज्ञानिक-विचारवंतही असतात. खरंतर या महामानवांच्या निमीत्तानं आपण सत्यालाच दगड मारत असतो. सत्याचा मार्ग गर्दीचा नसतो, पण खडतर असतो. म्हणूनच येशूला आपण क्रूसावर चढवलं. बुद्ध-महावीर यांना दगड मारले. एडिसनला मंदबुध्दी ठरवलं आणि गॅलिलिओला वेड्यात काढलं. विचारवंताना गोळ्या झाडणारेही आपणच. किती निष्ठुर आहोत आपण ! इमानाला सजा व दांभिकाची पूजा ! सत्याच्या मुखवट्यांना हार घालायचे, महानतेचे मुकुट चढवायचे ही आपली व्यवस्था, हे आपले करंटेपण.* *॥ रामकृष्णहरी ॥* ☀☀☀☀☀☀☀☀☀ *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल- 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो,* *🏻संतांनी म्हटले आहे की ,* *निंदकाचे घर असावे शेजारी।* *तरीही आपण एक गोष्ट मनावर* *पक्की कोरून ठेवा की* *आईना बदलनेसे चेहरा नही बदलता।* *चेहरा बदलो आईना खुदही बदल* *जायेगा।* *यश पचविणे एक वेळ सोपे; पण* *आरोप रिचवणे खूप कठीण. '* *हेचि फल काय मम* *तपाला ' ? याचा वारंवार मनाच्या* *खिडकीत येणारा प्रत्यय सहन करणे* *सोपे नाही.* *कोणत्याही मॅनेजमेन्ट स्कूलमध्ये हे शिकविले जात नाही. मग हे शिकायचे कसे? वेळ आणि अनुभव यापेक्षा मोठे गुरू नाहीत. आरडा ओरड करायला शक्ती लागत नाही, ती शांत राहायला लागते. 🤭अशावेळी बाळगलेले मौन हे तुमच्या दुर्बलतेची निशाणी नसून तुमच्या आत्मिक शक्तीचा तो साक्षात्कार आहे. आणि ही शक्ती एका दिवसात येत नाही. तिचा 'थेंबे, थेंबे' संचयच करावा लागतो. तुमच्या निघून जाण्यात तुमचा पराभव नसतो, तर ती तुमची प्रगल्भता असते.* *आरोप करणाऱ्यांचे पितळ उघडे पडतेच, आणि कालांतराने इतरांनाही सत्य समजते. तोपर्यंत तुम्ही बरीच प्रगती केलेली असते. शेवटी काय तर ''आपण प्रत्येकाच्या दृष्टीने चांगले असू शकत नाही,, ''पण आपण त्यांच्यासाठी उत्कृष्ट आहोत जे आपल्याला समजतात,, ''माणसाने स्वत:च्या नजरेत चांगलं असलं पाहीजे,, ''लोक तर निसर्गाला पण नाव ठेवतात.* * *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जेव्हा एकाच बिंदूतून कितीतरी रेषा काढलेल्या आपण पाहिलेल्या आहेत तरीही त्या एकमेकांना एकाच बिंदूत छेदून पुढे सरळ मार्गाने निघून जातात आणि त्याच रेषा परत एकाच बिंदूत एकत्रीत येऊन मिळतानाही पाहिले आहे.असा जर आपण विचार केला तर आपले हृदय आणि मनही एकच आहे.आपणच आपल्या हृदयातून आणि मनातून अनेक माणसांना जोडण्याचे काम करत असतो.त्यात काहींना काही कारणाने जवळ करतो तर काही माणसे आपल्यापासूनच जवळ येऊन दूर जातात.जे दूर जातात त्यांचा विचार करु नका,कारण त्यांना स्वातंत्र्य आहे.परंतु जी माणसे तुमच्याजवळ येण्याचा प्रयत्न करतात त्यांना दूर करुन नका कारण त्यांना तुमचे मन आणि हृदय कळलेले असते.कारण तुम्ही त्यांचे केंद्रस्थानी बिंदूस्थानी आहात.तुम्हीच त्यांचे आधारही आहात आणि त्यांची प्रेरणाही आहात.सा-यांना जवळ करण्याचे बिंदूसारखेच काम करायला शिकले पाहिजे तरच जीवन समृद्ध होईल. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०./८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *एकीचे बळ* एका वृद्धाने सदान्- कदा भांडणार्‍या आपल्या मुलांना हातभर लांबीची एकेक काठी मोडायला सांगणे एक गृहस्थ म्हातारपणामुळे बराच थकला होता. आयुष्यात चांगली कमाई करून आणि स्वत: चांगले जीवन जगूनसुद्धा त्याच्या पाच मुलांमध्ये सदान्-कदा चालणार्‍या भांडणांमुळे तो दु:खी होई. त्याने आपल्या मुलांना बराच उपदेश केला; पण पालथ्या घडावर पाणी. एके दिवशी त्याने आपल्या पाचही मुलांना प्रत्येकी हातभर लांबीची एकेक काठी घेऊन यायला सांगितले. त्याप्रमाणे ती मुले एकेक काठी घेऊन आली. त्या गृहस्थाने त्यांच्यापैकी प्रत्येकाला आपापली काठी मोडण्यास सांगितले. वडिलांनी सांगितलेली ती गोष्ट प्रत्येक मुलाने लगेचच करून दाखवली. वडिलांनी पाच काठ्यांची जुडी करून प्रत्येकाला ती मोडायला सांगितल्यावर एकालाही ती मोडता न येणे पुन्हा त्या गृहस्थाने त्या मुलांना तशाच प्रकारची एकेक काठी घेऊन यायला सांगितले. पाच जणांनी पाच काठ्या आणून वडिलांपुढे ठेवल्या. वडिलांनी त्या पाच काठ्यांची एका दोरीने मोळी बांधली आणि प्रत्येकाला ती मोडायला सांगितली. पाच काठ्या एकत्र असलेली ती मोळी आपल्या पाच मुलांपैकी कुणालाच मोडता येत नसल्याचे पाहून तो गृहस्थ त्यांना म्हणाला, बघितलंत ना ? एकीचे बळ किती असते ते ? वडील एवढेच बोलले; पण ते सूज्ञ मुलगे समजायचे ते समजले. तेव्हापासून एकजुटीने वागू लागले.संघटित राहून केलेल्या कार्यास यश नक्कीच प्राप्त होते. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 19/08/2019 वार - सोमवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📷 *जागतिक छायाचित्रण दिन* 💥 ठळक घडामोडी :- ◆ १९८७ - युनायटेड किंग्डमच्या हंगरफोर्ड शहरात मायकेल रायनने सोळा व्यक्तींना गोळ्या घालून नंतर स्वतःचा जीव घेतला. ◆ १९९१ - सोवियेत संघाच्या राष्ट्राध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्हला फोरोस येथे सुट्टीवर असताना नजरकैदेत घातले गेले. 💥 जन्म :- ◆१९०३ - गंगाधर देवराव खानोलकर, मराठी लेखक. ◆ १९२२ - बबनराव नावडीकर, मराठी गायक. ◆ १९८७ - आयलीना डिक्रुझ, हिंदी चित्रपट अभिनेत्री. 💥 मृत्यू :- ◆ १६६२ - ब्लेस पास्कल, फ्रेंच गणितज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञानी. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *जम्मू- काश्मीर - पाकिस्तानकडून पुन्हा एकदा कालसायंकाळी शस्त्रसंधीचे उल्लंघन ; भारतीय लष्कराकडून चाेख प्रतिउत्तर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *संत साहित्यांच्या अभ्यासकांनी आपल्या संशोधनांना आणि संत साहित्यांना माहिती तंत्रज्ञानाची जोड द्यावी. सरकार सहकार्य करेल असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर येथे केले.* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *उत्तराखंड : उत्तरकाशी जिल्ह्यात पावसाचे थैमान ; आज सर्व सरकारी शाळांना सुट्टी जाहीर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *अमरावती : चांदूरबाजार तालुक्यातील बेलोरा येथील प्रख्यात कवी, गजलकार व साहित्यिक नितीन देशमुख यांना साहित्यक्षेत्रात अतिशय सन्मानाचा महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ग.दि. माडगूळकर काव्यप्रतिभा पुरस्कार मिळाला आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *जुलै, पृथ्वीवरील सर्वाधिक ‘ताप’दायक महिना ; जानेवारी ते जुलै २०१९ हा काळ तिसरा उष्ण काळ म्हणून नोंदविण्यात आला आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ * मराठी, तामिळ, बंगाली यांना प्रादेशिक भाषा म्हणणे योग्य नाही. त्या राष्ट्रीय भाषाच आहेत, असे स्पष्ट मत प्रख्यात विचारवंत व हिंदी कवी अशोक वाजपेयी यांनी एका मुलाखतीत व्यक्त केले* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *आशियाई व राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि पॅरा अॅथलिट दीपा मलिक यांना यंदाचा राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार तर रवींद्र जडेजाला अर्जुन पुरस्कार जाहीर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *लघुकथा - कुलदीपक* शिल्पाला मुलगा झाला ही बातमी तिच्या सासूच्या कानावर गेली तशी तिची सासू कमलाबाई खूपच आनंदून गेली. वंशाला दिवा मिळाला म्हणून शेजारी पाजारी आनंदाने सांगत सुटली. शिल्पा सरकारी दवाखान्यात होती, सोबत तिचा नवरा दीपक देखील हजर होता. घरातील काम आटोपून कमलाबाई लगेच दवाखान्यात......... लघुकथा पूर्ण वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करावे. https://nasayeotikar.blogspot.com/2019/08/blog-post_16.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *पिटूनिया* फुलझाडांपैकी (आवृतबीज, द्विदलिकित) या शास्त्रीय नावाच्या वंशातील काही जाती बागेत शोभेकरिता विशेषेकरून लावलेल्या आढळतात. एकूण जाती सु. ४० (ए.बी. रेंडेल यांच्या मते १४) असून त्यांचा प्रसार द. आणि उ. अमेरिकेतील उष्ण प्रदेशांत आहे. भारतात काही जाती बाहेरून आणून लावल्या आहेत. बागेतील शोभा वाढविण्यासाठी अनेक संकरज प्रकार आज उपलब्ध आहेत; तथापि त्या सर्वांचा उगम अर्जेंटिनातील पिटूनियाच्या निक्टॅजिनिफ्योरा, व्हायोलॅशिया, अक्सिलॅरिस व इंटिग्रिफोलिया या जातींच्या संकरात आहे. दुहेरी पाकळ्यांचे व अनेक भडक रंगांचे आधुनिक प्रकार संकरातून व निवडीने काढले गेले आहेत. मूळच्या जाती सु. ३०-४५ सेंमी. उंच, सरळ वाढणार्‍या, वर्षायू (एक वर्षपर्यंत जगणार्‍या) ओषधी [ ® ओषधि ] असून पाने साधी, मध्यम आकारमानाची, आयत, समोरासमोर आणि खोडाच्या टोकाकडे बिनदेठाची तर बुंध्याकडे लांब देठाची, कधी सर्वच आखूड किंवा बिनदेठाची असतात. सर्व भागांवर प्रपिंडीय (ग्रंथियुक्त) केस असतात. फुले एकेकटी, विविध रंगांची, तुतारीसारखी व कक्षास्थ (पानांच्याबगलेत) असतात; केसरदले पाच असून इतर सामान्य शारीरिक लक्षणे ð सोलॅनेसी कुलात (धोतरा कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात. नवीन लागवड बिया अथवा दाब कलमांनी करतात. बी ऑगस्ट ते ऑक्टोबरात किंवा मैदानी प्रदेशात मार्च ते जूनमध्ये व डोंगराळ भागात मार्च ते एप्रिलमध्ये पेरतात; महिन्याने रोपे दुसरीकडे वाफ्यात (कडेने किंवा मध्ये) लावतात. दुहेरी पाकळ्यांच्या जातींची लागवड कलमांनी करतात. लावल्यापासून तीन ते चार महिन्यांनी फुले येऊ लागतात व ती बराच काळ येत राहतात. खिडकीजवळ केलेल्या वाफ्यांत ही झाडे अधिक शोभिवंत दिसतात; कुंड्यांतूनही लावतात. पिटूनिया हायब्रिडा हा संकरज प्रकार लोकप्रिय आहे. टोमॅटो व बटाट्याजवळ ही झाडे लावू नयेत कारण उपद्रवकारक अशा कीटकांपासून त्यांना इजा पोहोचणे शक्य असते *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" उत्तम चरित्र आणि प्रामाणिकपणा हे माणसाचे कधीच न संपणारे धन असते..! "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *मध्यप्रदेश या राज्याचा राज्यपक्षी कोणता ?* स्वर्गीय नर्तक 2) *कीटकाला किती पाय असतात ?* 6 ( डास, माश्या,झुरळ etc) 3) *गाईच्या निवाऱ्याला काय म्हणतात ?* गोठा 4) *जागतिक वारसा दिन केव्हा साजरा केला जातो ?* 18 एप्रिल 5) *महाराष्ट्राची राजभाषा कोणती ?* मराठी *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● उत्तम सदाकाळ, साहित्यिक ●  संभाजी पाटील ●  महेश हातझडे, गोंदिया ●  शिवा टाले, नांदेड ●  संदीपराजे गायकवाड, बिलोली ●  योगेश मठपती ● प्रीती माडेकर, यवतमाळ ● संतोष कडवाईकर ● मन्मथ चपळे ●  मोहन शिंदे ●  विलास वाघमारे ● अमोल चव्हाण ● आकाश बोर्डे ● मोहनराव पाठक, पुणे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *तरूणपणी आईवडिलांचा, पुढे पत्नीचा आणि त्यानंतर पुत्रांचा विरह भगवान रामाला सहन करावा लागला. यात काय दु:ख नव्हते? इच्छामरणी असूनही आणि आयुष्यभर दु:खाशी संग्राम करूनही भीष्मांना अखेरीस शरपंजरी व्हावे लागले. कुटुंबातील यादवी आणि एकमेकांचे जीव घेणारे सोयरे पाहण्याची वेळ युगंधर कृष्णावर येते, आणि पारध्याच्या बाणाने आयुष्याची अखेर होते. रामायण आणि महाभारत यामधील अनेक पात्रे दु:खाने आणि वेदनेने वाहताना दिसतात. तरीही ही महाकाव्य जीवनाच्या विविध अंगाना स्पर्श करून दिव्यत्व जगविण्याची आणि जागविण्याची प्रेरणा देतात.* *लहानसहान गोष्टींपासून आपला त्रागा सुरू होतो आणि माझ्याच नशीबी हे का? हा प्रश्न पडतो. तुम्हाला जशा समस्या आहेत तशा दुस-यांनाही आहेत. त्यांचे स्वरूप वेगळे आहे. 'जगी सर्व सुखी असा कोण आहे' या समर्थ रामदासांच्या प्रश्नाला उत्तर मिळत नाही. त्या उत्तरासाठी सुखाचा सदरा आपणच तयार करायला हवा, आणि तो जसा परिधान करायला हवा तसा अंतर्मनातील दु:खाच्या अंधारावर चांदण्यांचा वर्षावही करायला हवा. आपणही दु:खाचे शंभर धागे मोजत बसणार की सुखाचा धागा धागा विणत जाणार? व्यक्तीगत दु:खापासून सार्वजनिक दुराचारापर्यंत आपण भ्रष्टतेचे, नष्टतेचे पोकळ शंख फुंकणे थांबविले पाहिजे आणि दिव्याने दिवा पेटणारा प्रकाश पेरला पाहिजे.* *॥ रामकृष्णहरी ॥* 🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल-9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जीने की राह,या सिनेमातील एक छान गीत खूप काही सांगून जाते.* *एक बंजारा गाये।* *जीवनके गीत सुनाए।* *हम सब जीने वालोको, जीनेकीं राह बताए।* *गाण्यातच खूप सारा जीवनाचा अर्थ भरला आहे. माणसाच नेमकं उलट होत.* *त्याला खालील प्रमाणे करा।* *आयुष्य असावे *vvpat* सारखे* *सर्वाना मनमोकळे करून दाखवणारे* *माझ्या मनात काही नाही असे दाखवणारे....* *कुटुंब असावे ballet युनिट प्रमाणे* *कितीही असतील तरीही एकमेकांना जोडून असलेले.......* *आणि जीवन जगावे कंट्रोल युनिट प्रमाणे सर्व चांगल्या गोष्टीची सुरुवात आपल्यापासून करणारे.....* *आणि आपल्या मनातील दुःख* *असावे↑ * कंपार्टमेंट प्रमाणे कितीही दुस-याने पाहण्याचा प्रयत्न केला तरी नं दिसणारे.....* *🙏अशोक कुमावत🙏* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* *जि. प. शाळा--माणिकखांब* *ता.इगतपुरी, जि. नाशिक* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्या व्यक्ती अश्रूंचा सहारा घेऊन जगतात त्या जीवनात कुठेतरी पराभव पत्करलेल्या असतात किंवा त्यांच्या मनावर कुठेतरी आघात झालेला असतो किंवा कुणीतरी मनाविरुद्ध करण्यासाठी प्रवृत्त केलेले असते.हे जरी खरे असले तरी अशा व्यक्ती शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या कमकुवत झाल्याने त्यांना जीवनात जगण्याची काही अपेक्षा उरली नाही किंवा आता आपण जगून तरी काय करावे असा सतत विचार करत आणि डोळ्यांत अश्रू आणून कसेबसे जीवन जगतात.अशा दुबळ्या मनाने जीवन जगण्यापासून जीवनाला परावृत्त करायचे असेल तर जीवनात आणि आपल्यासमोर चांगले जीवन जगण्याची उमेद प्रथमत: नजरेसमोर ठेवायला हवी, नेहमी आपण काहीतरी असले तरी मी कोणत्याही कठीण प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी सक्षम आहे असा उदात्त विचार करून जगायला शिकले पाहिजे,कुणीजरी आपले मन दुखवण्याचा प्रयत्न केलातरी मी त्याकडे दुर्लक्ष करीन असाही सकारात्मक विचार केला आणि मन घट्ट करून जगायला शिकले तर अश्रूंचा आधार घेऊन जगायची काही गरजच भासणार नाही.जीवन तर सुखदु:खाने भरलेले आहे ते कुणाच्या वाट्याला कमी-जास्त असणारच.सुख जास्त झाले म्हणून जास्तही त्या सुखाचा अतिरेक होऊ द्यायचा नाही आणि दु:ख झाले म्हणून अति दु:खी व्हायचे नाही.आपण सारेजण सुखदु:खाच्या चक्रव्युहात अडकलेलोच आहोत आणि त्या चक्रव्युहाला भेदूनच चांगले जीवन जगायचे आहे हे लक्षात ठेवायला हवे. व्यंकटेश काटकर,नांदेड संवाद..९४२१८३९५९० 🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *अधिकचा मोठेपणा सांगणे* एक इसम फार वर्षे प्रवास करून आपल्या घरी आला. व आपण परदेशात असताना काय मौजा पाहिल्या हे त्याने आपल्या शेजार्‍यापाजार्‍यांना तिखट मीठ लावून आणि अधिकाधिक मोठेपणा करून सांगितले. आणि अगदी शेवटी एक थाप ठोकून दिली की, 'मी अलकावतीला गेलो असता तेथील लोक पंधरा पंधरा हात उंच उड्या मारतात पण त्यांनी माझ्याशी पैज लावली असता माझ्याइतकी उंच उडी एकालाही मारता आली नाही.' ऐकणार्‍या कोणालाही ही गोष्ट खरी वाटली नाही. तेव्हा त्यांची खात्री करण्यासाठी तो नाना प्रकारच्या शपथा घेऊन लागला. त्या वेळी त्या लोकातील एक माणूस त्याला म्हणाला, 'अहो, अशा शपथा कशाला घेता. हातच्या कंकणाला आरसा कशाला ? या वेळी तुम्ही अलकावतीला आहात असं समजून तिथे जशी उडी मारली तशी इथंही मारून दाखवा म्हणजे झालं.' हे ऐकताच त्या बढाईखोर माणसाचे तोंड ताबडतोब बंद झाले. तात्पर्य - आपण प्रवासात पाहिलेल्या गोष्टी फुगवून सांगण्याची काही लोकांना सवय असते, पण एखादेवेळी त्यांचेच बोलणे त्यांच्या गळ्यात येऊन त्यांची फजिती झाल्याशिवाय राहात नाही. म्हणून माणसाने मोठेपणाचा जास्त आव आणून वागू नये आणि बोलू नये. वाजवीपेक्षा जास्त बढायी करणे म्हणजे फजीती करणे. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 16/08/2019 वार - शुक्रवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- ◆ २०१०-जपानला मागे टाकून चीन ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली. ◆१९८७ - नॉर्थवेस्ट एरलाइन्स फ्लाइट २५५ हे एम.डी. ८२ प्रकारचे विमान डेट्रोइट विमानतळावर कोसळले. १५५ ठार. चार वर्षांची बालिका वाचली. 💥 जन्म :- ◆१९७०-मनिषा कोईराला, अभिनेत्री. ◆ १९७०-सैफ अली खान,चित्रपट अभिनेता. ◆१९५७ - रणधीरसिंग, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- ◆ २०१०-नारायण गंगाराम सुर्वे,कवी ◆ १९९७ - नुसरत फतेह अली खान,पाकिस्तानी सुफी गायक. ◆ १८८६ - श्री रामकृष्ण परमहंस, भारतीय तत्त्वज्ञानी. ◆ २०१८ - अटलबिहारी वाजपेयी, माजी पंतप्रधान *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* *जि प शाळा बिरसी,जि गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *कुटुंब नियोजन करणं म्हणजे देशाच्या विकासात योगदान देणं, छोटं कुटुंब असणं ही सुद्धा एका प्रकारची देशभक्तीच आहे' स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित केलं.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *समुद्राला मिळणारं पाणी गोदावरी खोऱ्यात; तेलंगणात जाणारं पाणी नळगंगेत - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा निर्धार* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *29 ऑक्टोबरपासून सरकारी बसमधून महिलांना मोफत प्रवास, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी रक्षाबंधनाच्या दिवशीच दिलं महिलांना मोठं गिफ्ट* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *चीफ ऑफ डिफेन्स' पदाची घोषणा ; तिन्ही दलांचं नेतृत्त्व करणार, संरक्षण दलांच्या बळकटीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मोठा निर्णय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *कोल्हापूर : शिरोली मदरशात घडले माणुसकीचे दर्शन, गेली दहा दिवस 400 हून अधिक पूरग्रस्तांच्या राहण्याची केली व्यवस्था* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *नवी दिल्ली - देशभरात 73 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *पोर्ट ऑफ स्पेन - विराटसेनेकडून देशवासियांना स्वातंत्र्य दिनाची विजयी भेट, भारताने वेस्ट विंडीजविरुद्धची एकदिवसीय मालिका जिंकली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *पौर्णिमा - अमावस्या* https://nasayeotikar.blogspot.com/2019/08/blog-post_15.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *आम्ल म्हणजे काय ?* 📙 चिंच कशी आंबट असते ? हिरवीगार चिंच खाल्ली, तर दात अगदी आंबून जातात. लिंबाचा आंबटपणा मात्र काही वेळा हवाहवासा वाटतो. विशेषतः उन्हाळ्यात तर तो आवडतोच. ताकाचा आंबटगोडपणा तर पाहिजेच असतो. अगदी मधुर ताक समोर आले, तर पिववत नाही. या सर्व आंबटपणाचे कारण काय असते ? या प्रत्येकात एक अाम्ल असते. आम्लाचे (Acid) विविध प्रकार आहेत. आज जगात शेकडो प्रकारची आम्ले शोधली गेली आहेत, वापरातही आहेत. आपल्या पोटातही एक प्रमुख अाम्ल सतत स्रवत असते. पोटातल्या आम्लाचे नाव हायड्रोक्लोरिक अॅसिड. फळांमध्ये असते ते सायट्रिक अॅसिड, तर दुग्धजन्य खाद्यपदार्थात तयार होते ते लॅक्टिक अॅसिड. या आम्लांची चव आंबटसर लागते. अर्थातच त्यांची तीव्रता जेव्हा कमी असते, तेव्हाच. अन्यथा चक्क जीभ भाजली जाते. जीभच काय पण एखादे तीव्र अंमल म्हणजे ज्यामध्ये पाण्याचे प्रमाण अगदी अत्यल्प आहे, असे आम्ल जेव्हा कातडीच्या, कापडाच्या, लाकडाच्या किंवा लोकरीच्या संपर्कात येते, तेव्हा ती वस्तू चक्क त्यात विरघळून नष्ट होऊ लागते. तीव्र सल्फ्युरिक अॅसिडमुळे तर कातडी चक्क जळते. म्हणूनच त्याला तेजाब असे म्हणतात. सल्फ्यूरिक, नायट्रिक व हायड्रोक्लोरिक अशी तीन प्रमुख तीव्र आम्ले आहेत. आम्लपदार्थ म्हटल्यावर डोळ्यांसमोर फक्त द्रवच येतो. पण ते खरे नव्हे. कित्येक आम्ले घनरूपही असतात. मात्र एक गोष्ट महत्त्वाची - सर्व आम्लांमध्ये हायड्रोजनचा अणू असतोच. एखादे आम्ल जेव्हा धातूबरोबर संयुक्त पावते, तेव्हा हायड्रोजनचा अणू सुटा होऊन वायूरूप धारण करतो. एखादी वस्तू वा द्रव हा आम्लधर्मी असेल, तर लिटमसच्या कागदाच्या सहाय्याने तो पारखून बघता येतो. द्रवामध्ये लिटमस कागद बुडवला, तर निळा लिटमस लाल होतो. घन आम्ल असेल, तर कागद ओला करून वापरला जातो. आम्लाची तीव्रता ठरवण्यासाठी pH हे परिमाण ठरवले गेले आहे. ० ते ७ च्या दरम्यान सर्व आम्ल व ७ ते ‍१४ या दरम्यान सर्व अल्क पदार्थ मोडतात. शुद्ध पाणी हे सात pH चे असते. सर्वात तीव्र आम्ल ० परिमाण दाखवते, तर अतितीव्र अल्क १४ परिमाणात मोडते. दोन्ही एकमेकांच्या विरुद्धगुणी असतात. उद्योगधंद्यांमध्ये सल्फ्युरिक अॅसिड प्रचंड प्रमाणावर वापरले जाते. खते, रंग, बॅटरीमधील पाणी, स्फोटके, साबण, प्लॅस्टिक या सर्वांसाठी त्याचा उपयोग होतो. नायट्रिक अॅसिडचा विविध स्फोटकांत वापर करतात. हायड्रोक्लोरिक अॅसिड तर पोटात सतत काम करतच असते. त्याचा साठा पोटात गरजेपेक्षा जास्त होऊ लागल्यास घशाशी जळजळते व आंबट व ढेकरा येतात. पण याच अाम्लामुळे खाल्लेल्या अन्नातील सर्व जंतूंचा प्रथम नाश होतो. अर्थातच शरीराला त्रास देऊ शकणारे सर्व अपायकारक घटक इथेच नष्ट केले जातात. मानवाला आम्ल पदार्थ अनेक वर्षांपासून माहित आहेत. कृत्रिमरीत्या तयार केलेली आम्ले जरी फक्त गेली काही शतकेच ज्ञात असली तरी पुरातन धातूयुगापासूनच नैसर्गिक आम्लपदार्थांंचे ज्ञान मानवाला असावे. तांबे, पितळ, लोखंड, ब्राँझ इत्यादी विविध धातूंच्या वस्तू चकचकीत ठेवणे, आकर्षक ठेवणे त्याशिवाय शक्यच झाले नसते. चांदीच्या वस्तूंना झळाळी देणे, सोन्याला चकाकी आणणे या प्रकारासाठीसुद्धा आम्लांचा उपयोग चालूच राहील. *'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *“ संभाषणाचा सर्वात वाईट प्रकार म्हणजे वादविवाद. ”* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *पश्चिम बंगाल या राज्याचा राज्यपक्षी कोणता ?* खंड्या 2) *मुख्य निवडणूक आयुक्ताची नेमणूक कोण करतो ?* राष्ट्रपती 3) *महाराष्ट्रातील ऊसतोडणी कामगारांचा जिल्हा कोणता ?* बीड 4) *रेडिओचा शोध कोणी लावला ?* मार्कोनी 5) *सजीवांचे दोन गट कोणते ?* प्राणी व वनस्पती *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● निखीलदेवेंद्र खराबे, नागपूर ●  नरेंद्र नाईक ●  सुभाष पालदेवार ●  सदानंद वतपालवाड ●  जी के प्रसाद ●  अशपाक सय्यद ●  रमेश बारसमवार, ●  मिथुन बिजलीकर ● के. राममोहन *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *हसत दु:खाचा केला मी स्विकार,* *वर्षिले चांदणे पिऊन अंधार..* *प्रकाशाचे गाणे अवसेच्या रात्री,* *आनंदयात्री, मी आनंदयात्री !* *दु:खाचा स्विकारही हसत करायचा असतो. दु:खाला धैर्यानं सामोरे जायचे असते. दु:ख सत्वपरीक्षा घेतात. ज्याच्या त्याच्या क्षमतेप्रमाणे ज्याच्या त्याच्या भाळी दु:ख असते. अशा दु:खाचा बागुलबुवा करून अंधारयात्री व्हायचे, की या दु:खातून माझे आयुष्य तावून सुलाखून पुन्हा झळाळायचे आहे असं म्हणत प्रकाशाचे गाणे गात आनंदयात्री व्हायचे?* *दु:खे समृद्ध अनुभवांची अनुभूती देतात.त्यामुळे खरं तर त्यांच्याबद्दल कृतज्ञ असायला हवे. कारण दु:खानंतरचे सुख आनंदाचा पारिजात फुलवते. जेवनातही विविध चवी हव्यात. चित्रातही अनेक रंग लागतात. गाण्यातही सप्तसूर. मग आयुष्य तरी एका चवीचे, एका रंगाचे, एका सुराचे का हवे? आपल्यात विश्व पाहणे आणि आपणच विश्व होणे. मग अणूरेणसारखे दु:ख आकाशाएवढे का करायचे? नसलेले दु:ख घेऊन का ऊर बडवायचे? वेदनेच्या कल्पनेने का हाय खायची? पायात वहाण नाही म्हणून शोक करणारी व्यक्ती जेंव्हा पाय नसलेल्या व्यक्तीला पाहते तेंव्हा तीचा शोक अनाठायी ठरतो. पाय गमावलेला सैनिक जेंव्हा सहजवानाचा मृतदेह पाहतो तेंव्हा त्याचे दु:ख कमी क्लेशदायी ठरते. जेंव्हा बागडायच्या वयातील छोटी मुले रूग्णालयात व्याधीग्रस्त होऊन मरणयातना भोगताना दिसतात, तेंव्हा वयाने वाढलेल्या आपल्या शरीराला आलेल्या सर्दी, ताप, खोकल्याचे दु:ख ते काय?* *॥ रामकृष्णहरी ॥* 🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सुसंगती सदा घडो ,सुजन वाक्य* *कानी पडो।* *सहवासाचा परिणाम किती होऊ शकतो याचं सुरेख उदाहरण*... *आचार्य विनोबा म्हणतात की*, *आकाशातुन पडणारा पावसाचा थेबं हातावर झेलला तर तो पिण्यायोग्य असतो*. *मात्र तोच गटारात पडला तर मात्र त्याची प्रतिष्ठा इतकी ढासळते की तो पाय धुण्याच्याही लायकीचा राहत नाही*. *तोच थेबं गरम तव्यावर पडला तर त्यांच अस्तित्वच संपुन जाते*. *कमळाच्या पानावर पडला तर मोत्यासारखा चमचम करतो आणि शिंपल्यात पडला तर प्रत्यक्ष मोतीच बनतो*... *पहा गंमत, थेंब तोच परंतु कुणाच्या सहवासात येणार यावर त्याचं अस्तित्व व त्याची पतप्रतिष्ठा अवलंबुन असते*. *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* *जि. प.शाळा-माणिकखांब,* *ता.इगतपुरी, जि. नाशिक* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ईश्वराच्या नामस्मरणाने आपल्या चलबिचल झालेल्या मनाला स्थैर्य लाभते आणि नित्य चांगल्या कामामध्ये हात गुंतून राहिले तर तन आणि मन समाधानी होते.या दोन्ही मधून माणसाला सुखाने जीवन जगण्याचा खरा मार्ग सापडतो. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *अंधारात कसा चढणार डोंगर* तरुण शेतकरी डोंगरावरच्या देवाच्या दर्शनासाठी निघाला होता. डोंगर त्याच्या खेडय़ापासून तसा फार लांब नव्हता. पण शेतीच्या कामांमुळे अनेक दिवस जाऊजाऊम्हणत जाणं काही झालं नव्हतं. दिवसभराचं काम संपलं. त्यानं भाकरीचं गाठोडं बांधून घेतलं. एका मित्राकडून कंदील उसना घेऊन निघाला डोंगराच्या दिशेने.... रात्रीच गावाची सीमा ओलांडली. अमावास्येची रात्र, अगदी गडद अंधार होता. तो डोंगराच्या पायथ्याशी जाऊन थांबला. हातात कंदील होता खरा, पण त्याचा प्रकाश तो किती? जेमतेम दहा पावले जाता येईल एवढाच! अशा परिस्थितीत तो मोठा डोंगर कसा बरं चढायचा? किऽर्रऽऽर्र अंधारात एवढासा कंदील घेऊन चढणे वेडेपणाचे होईल, असा विचार त्याने केला आणि मिणमिणणारा कंदील घेऊन उजाडायची वाट पाहात तो पायथ्याला बसून राहिला. बसून कंटाळा आला तसा उशाला एक दगड घेऊन मुंडासं पांघरून आभाळातल्या चांदण्या पाहात तो पडून राहिला. तांबडं फुटायची वाट पाहू लागला. कुणाच्या तरी पावलांची चाहूल लागली तसा शेतकरी चट्शिरी उठून बसला आणि अंधाराकडे डोळे ताणून पाहू लागला.... इतक्या अवेळी या आडवाटेला कोण बरं आलं? तेवढय़ात कानावर आवाज आला. 'राम राम पाव्हनं का असं निजलात?' म्हातारा आवाज होता. शेतकऱ्याने पाहिलं तो एक म्हातारा त्याच्याच दिशेने येत होता. त्याच्या हातात लहानसा कंदील होता. शेतकरी म्हणाला, ''राम राम बाबा, उजाडायची वाट पाहतोय. म्हणजे डोंगर चढून दर्शनाला देवळात जाईन.'' म्हातारा हसला.... म्हणाला, ''अरे जर डोंगर चढायचं ठरवलं आहेस तर मग उजाडायची वाट का पाहतोस. कंदील तर आहे की तुझ्यापाशी. मग कशासाठी इथं पायथ्यालाच आडून बसला आहेस?'' ''एवढय़ा अंधारात कसा चढायचा डोंगर. काय वेड लागलंय का तुम्हाला आणि हा कंदील केवढासा! अहो, कसंबसं आठदहा पावलं पुढचं फक्त दिसतंय याच्या प्रकाशात.'' तरुण शेतकरी म्हणाला. म्हातारा हसायला लागला आणि म्हणाला, ''अरे तू पहिली दहा पावलं तरी टाक. जितकं तुला दिसेल तेवढा तरी पुढे जा. जसा चालायला लागशील तसे तुला पुढचे पुढचे दिसायला लागेल. फक्त एक पाऊल टाकण्याएवढा जरी प्रकाश असला तरी त्या एकेका पावलाने पृथ्वीला प्रदक्षिणा घालता येते.'' म्हाताऱ्याचं बोलणं तरुण शेतकऱ्याला पटलं. तो उठला आणि चालायला लागला आणि कंदिलाच्या प्रकाशात सूर्योदयापूर्वी देवळात जाऊन पोहोचलासुद्धा! वाट पाहात बसून कशाला राहायचं? जो थांबतो तो संपतो. जो चालतो तो ध्येय गाठतो, कारण चालणाऱ्यालाच पुढचा रस्ता दिसतो. प्रत्येकाजवळ किमान दहा पावले चालण्याइतके शहाणपण आणि प्रकाश असतो आणि तो ध्येयपूर्तीसाठी पुरेसा असतो. फक्त जिद्द असावी लागते ध्येयापर्यंत पोहचण्याची. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 15/08/2019 वार - गुरूवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *भारतीय स्वातंत्र्य दिन* 💥 ठळक घडामोडी :- ◆१९४७ - भारताला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य. 💥 जन्म :- ◆ १८७२ - श्री ऑरोबिंदो, भारतीय तत्त्वज्ञानी. ◆१९४७ - राखी गुलझार, भारतीय अभिनेत्री. ◆ १९७५ - विजय भारद्वाज, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- ◆ २००४ - अमरसिंह चौधरी, गुजरातचे मुख्यमंत्री. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* *जि व शाळा बिरसी,जि गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *कलम 370 हटवल्यामुळे जम्मू-काश्मीरला फायदाच होणार - स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला देशाला संबोधित करताना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केलं मत* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *गेल्या 19 वर्षांत पहिल्यांदाच ऑटोमोबाईल क्षेत्रात आली मंदी, परंतु ऑटोमोबाईल कंपन्यांनी घाबरून जाण्याची गरज नाही, कारण लवकरच वाहनाची मागणी वाढेल असा विश्वास पंतप्रधान मोदींनी एका मुलाखतीत व्यक्त केले.* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *Maharashtra Flood: पूरग्रस्तांच्या मदतीला धावला मुंबईचा बाप्पा ; लालबागच्या राजाकडून 25 लाखांची मदत* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ * एक सप्टेंबरपासून आठवड्यातील पाच दिवस मुंबई-कोल्हापूर विमानसेवा राहणार सुरु* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *बालभारतीच्या कवितांचा धमाल आविष्कार; शिवाजी मंदिरात 17 ऑगस्ट पासून रंगणार कार्यक्रम, कार्यक्रमातील निवेदन, गायन, वाचन, नृत्य इथपासून ते वाद्यवृंदाची जबाबदारही 30 मुलांनी घेतली आहे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *नवी दिल्ली: एअर स्ट्राइक करणाऱ्या पाच जिगरबाज वैमानिकांना शौर्य पुरस्कार तर बालाकोट एअर स्ट्राइकचे हिरो अभिनंदन वर्धमान यांचा वीर चक्रानं आज करण्यात येणार सन्मान* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *लंडन : भारतीय संघाने दिव्यांगांसाठीच्या वर्ल्ड सीरिज क्रिकेट स्पर्धेचे जेतेपद पटकावले. वॉसेस्टर येथील न्यू रोड स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात भारताने यजमान इंग्लंडवर 36 धावांनी मिळवला विजय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• प्रतिक्रियासह शुभेच्छा संदेश ----- *फ्रेश मॉर्निंग बुलेटीनचे संघनायक ना.सा . येवतीकर यांचा स्तुत्य उपक्रम.* -डॉ हनुमंत भोपाळे https://fmbuletin2019.blogspot.com/2019/08/blog-post_13.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ *प्राचार्य डॉ. हनुमंत भोपाळे* शंकरराव चव्हाण महाविद्यालय, अर्धापूर 9767704604 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *भारतीय राष्ट्रध्वज* भारतीय राष्ट्रध्वजात गडद भगवा , पांढरा व हिरवा ह्या तीन रंगांचे आडवे पट्टे आहेत. यामुळे या झेंड्याला पुष्कळदा तिरंगा असेही संबोधले जाते. मधल्या पांढर्या रंगात निळ्या रंगाचे २४ आर्यांचे अशोक चक्र आहे. मच्छलीपट्टणम जवळ जन्मलेल्या पिंगली वेंकय्या ह्यांनी तिरंग्याची रचना केली आहे. भारतीय 🇮🇳 राष्ट्रध्वजाच्या लांबी व उंचीचे प्रमाण ३:२ असे आहे, तसेच राष्ट्रध्वज खादीच्या अथवा रेशमाच्या कापडाचाच बनवला जावा असा सरकारी नियम आहे. 🇮🇳 २२ जुलै १९४७ रोजी घटना समितीच्या बैठकीत 'तिरंगी ध्वज' भारताचा अधिकृत राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकृत करण्यात आला. त्या संबंधीचा ठराव पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडला. एकाला एक लागून असलेल्या आडव्या समान प्रमाणाच्या तीन पट्ट्यांचा तो आहे. वरती गर्द केशरी, मध्यभागी पांढरा आणि खालच्या बाजूला गर्द हिरवा, अशा क्रमाने हे तीन रंग आहेत. मधल्या पांढर्या पट्ट्यावर निळ्या रंगाचे धम्मचक्र असून ते सारनाथ येथे असलेल्य सिंहमुद्रेवर असलेल्या अशोकचक्रासारखे आहे. चक्राला २४ आरे आहेत. डॉ. एस्. राधाकृष्णन् यांनी भारतीय राष्ट्रध्वजाच्या एकूण रचनेचे महत्त्व चांगल्या प्रकारे विशद केले आहे ध्वजात तीन समान आडव्या पट्ट्यांची रचना करण्यात आली आहे. - वरच्या भागात गडद केशरी रंग आहे.या रंगातून त्याग, धैर्य याचा बोध होतो. - मधल्या भागात पांढरा रंग आहे.या रंगातून प्रकाशाचा आणि सत्यमार्गाचा शांती, सत्य, व पावित्र्याचा बोध होतो. - खालील भागात गडद हिरवा रंग आहे. हा रंगातून निसर्गाशी वा भूमीशी असलेले नाते दर्शवितो, निष्ठा व समृध्दीोचा बोध होतो.🇮🇳 - निळ्या रंगाचे अशोक चक्र हे सागराप्रमाणे अथांगता व कालचक्राच व त्यासोबत बदलत जाणारे जग सूचित करतो. जीवन गतिमान असावे व भारतीयांनी शांततापूर्ण आगेकूच करावी असे धम्मचक्र दर्शविते. मूलतः हे चक्र विश्वशांतीचा संदेश देणार्या बौद्ध धर्माचे धम्मचक्र आहे. त्याला ‘अशोकचक्र' या नावाने ओळखले जाते.त्यात भारतीय कला, तत्त्वज्ञान, इतिहास व संस्कृती यांचा सुरेख संगम झालेला दिसतो. *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• “जेथे स्वातंत्र्याचा वास असेल, तोच माझा देश.” *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *भारताला स्वातंत्र्य केव्हा मिळाले ?* 15 ऑगस्ट 1947 2) *आद्य क्रांतिकारक म्हणून कोणाला ओळखले जाते ?* वासुदेव बळवंत फडके 3) *आझाद हिंद फौजेची स्थापना कोणी केली ?* सुभाषचंद्र बोस 4) *संपूर्ण स्वराज्याची घोषणा केव्हा करण्यात आली ?* 1929 ( लाहोरच्या सत्रात ) 5) *दरवर्षी 15 ऑगस्टला लाल किल्यावर कोणाच्या हस्ते ध्वजारोहण होते ?* पंतप्रधान *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● मा. वसंतराव चव्हाण, आमदार, नायगाव ● अरविंद कुलकर्णी, अहमदनगर ●  रामकिशन यंगलोड, माजी सभापती ●  जगन्नाथ पांडुरंग गवळे ●  भगवान शिवराम चिखले ●  स्वराज ज्ञानेश्वर सोज्वळ  ● शिवानंद सुरकूटवार, नांदेड ●  आर. एन. मोरे, मुखेड ●  कलीम खान ● लक्ष्मण मोळे ● लक्ष्मण बनवाड ● अन्सार शेख ● लक्ष्मण हंगिरगे ● रवी यादव ● दर्शन मुदलोड ● धम्मदीप कांबळे ● संतोष शिलेवाड ● बळवंत भुतावळे ● सत्यनारायण वाडे ● अशोक ढवळे ● राजवीर पाटील ●  साईनाथ चपळे ● अच्युत रुद्रावार ● कमल पवार ● भारत शिंदे ● किशोर पायरे ● अक्षय मंडगे ● महादलिंग मठपती ● किरणकुमार नामेवार ● गजानन हुंडे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *तसे आयुष्यभर मागतच असतो या अर्थाने आपण भिकारीच असतो. हातात भिकेचा कटोरा दिसत नाही, म्हणून तो नसतोच असे नाही. अपेक्षेचे छोटे-मोठे कटोरे घेऊनच आपण फिरत असतो. या अपेक्षेचा कटोरा घेऊन भीक मागण्याची सुरूवात होते घरापासून, घराकडून अपेक्षा असते. आई-वडिल, बायको, मूल, बहिण, भाऊ सर्वांकडून अपेक्षा आहेत. उलटपक्षी त्यांनाही माझ्याकडून तेवढ्याच अपेक्षा आहेत. म्हणजे चित्र दिसत नसले, तरीही अपेक्षेच्या भिकेचे कटोरे घेऊन परस्परांसमोर उभे आहोत. एक भिकारी दुस-या भिका-यासमोर उभा आहे आणि दोघेही आरोळ्या ठोकताहेत,'देssरेss...बाssबा... काहीतरी.* *मला त्यांच्याकडून प्रेम हवे आहे. स्नेह, विश्वास, माझ्या दुखल्या-खुपल्याबद्दलची विचारपुस हवी आहे. आस्था हवी आहे. सर्वच हवे आहे. ज्यांच्याकडून मला हे सर्व पाहिजे आहे, त्यांनाही माझ्याकडून हेच हवे आहे. अपेक्षेच्या कटो-यात त्यापैकी काही पडतही आहे. त्याने मी आनंदी नाही उलट जे नेमके त्यात पडले नाही त्यानेच आधिक दु:खी आहे. जे मिळाले त्याचा आनंद नाही पण जे मिळाले नाही त्याचा दु:खभारच आधिक आहे. मी फक्त मागतोच आहे. याच्याकडून, त्याच्याकडून, घराकडून-दाराकडून, नात्यांकडून-नात्याबाहेरच्या गणगोतांकडून, ओळखी-पाळखीकडून, एवढेच काय अनोळख्यांकडूनसुद्धा.* *॥ रामकृष्णहरी ॥* 🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀 *श्री संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल- 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो,* *🕺आपण एक छान गाणं नेहमी ऐकतो* *की ---झाले गेले विसरुनी* *जावे,* *🏃🏼‍♂पुढे पुढे चालावे जीवन गाणे गातच* *रहावे।* *😁खरे आहे,ज्याला आनंदी जगायचे* *त्याने काही पथ्य* *पाळावीत.* *💪🏻तात्वीक भांडण सर्वांशी होते ,पण "शत्रुत्व" कुणाशीचं ठेवू नये...* *खरं तर मतभेद एकमेकांशी असू शकतात, जरूर असावे, पण मनात कायम "भेद" ठेवू नये..* *🤝🏻एखाद्याशी वाद घालावा, पण वादावादी न करता क्षणात "सुसंवाद" साधवा.* *"अहंकार" हाच या सर्वाच मुळ आहे, तो विनाकारण "बाळगुन जगू" नये..* *शेवटी "मृत्यू" हे "सुंदर,शाश्वत वास्तव" आहे, त्याचे "स्मरण" असावे भय नसावे.* *👉आपण जन्माला आलोय ते गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर "उरलेल्या दिवसांचा "आनंद " उपभोग घेण्यासाठी याचे "स्मरण" ठेवू या.* *😁आपण किती आनंदात आहोत त्यापेक्षा आपल्यामुळे किती "जण आनंदात" आहेत याला खूप महत्व आहे.* *✌✌"एक हृदय" घेऊन आलोय जाताना "लाखो हृदयात" जागा करुन जाता आलं पाहिजे* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ईश्वर हा कुठे आहे हे मला माहीत नाही,पण त्याचे अस्तित्व मात्र कुठे ना कुठे आहे हे आपण आपल्या अंतःकरणात थोडे डोकावून पाहिले तर असे लक्षात येईल की,तो कुठेतरी,कोणत्यातरी माणसाच्या अंतरंगात स्थित आहे.म्हणूनच संकटाच्या वेळी नाव आपण ईश्वराचे घेतो पण तो काही येत नाही आणि येतो तो धावून माणूसच.मग ईश्वराच्या स्थानी संकटाच्यावेळी धावून येणा-या माणसालाच आपण म्हणतो की,बाबारे तू माझ्यासाठी देव म्हणून आलास.देव जरी नसला तरी देवरुपी माणसाला माणूसरुपी देव म्हटले तर वावगे ठरणार नाही.जो संकटाच्या वेळी धावून येतो तोच आपल्यासाठी देव असतो. तोच आपला ईश्वर असतो.तोच आपला तारणहार विधाता असतो.ईश्वराचे अस्तित्व माणसात आहे.ईश्वरानेच त्याला आपला प्रतिनिधी म्हणून आपल्याकडे मनुष्यरुपाने पाठवलेला असतो असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद..९४२१८३९५९०. 🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *डॉ. एम. विश्र्वेश्‍वरैय्या* खूप वर्षापूर्वीची गोष्‍ट आहे. भारतावर इंग्रजांचे राज्‍य होते. माणसांनी खच्‍चून भरलेली एक रेल्‍वे प्रवास करत होती. प्रवाशांमध्‍ये जास्‍तीत जास्‍त भरणा हा इंग्रजांचाच होता. एका डब्‍यात एक भारतीय गंभीर चेहरा करून बसलेला होता. सावळ्या रंगाचा, मध्‍यम उंचीचा हा मनुष्‍य साधारणप्रतीचे कपडे घालून प्रवास करत होता. त्‍याच्‍या रंगाकडे आणि एकूणच अवताराकडे बघून डब्‍यातील बहुतांश इंग्रज त्‍याची चेष्‍टामस्‍करी करत होते. त्‍याला खेडूत, अडाणी समजून त्‍याच्‍या अवताराची ते टिंगल करत होते. पण त्‍यांच्‍या त्‍या चेष्‍टामस्‍करीकडे, टिंगल करण्‍याकडे त्‍या भारतीयाचे लक्ष नव्‍हते. तो त्‍याच्‍या नादात मग्‍न होता. अचानक तो भारतीय उठला आणि त्‍याने रेल्‍वेची साखळी ओढली. वेगात धावणारी ती आगगाडी तात्‍काळ थांबली. गाडीतले प्रवासी त्‍याला काहीबाही बोलू लागले. थोड्याच वेळात गार्डही तेथे आला व त्‍याने विचारले,’’ कोणी साखळी ओढून ही रेल्‍वे थांबविली’’ त्‍या सावऴया रंगाच्‍या व्‍यक्तिने उत्तर दिले,’’ मी ओढली साखळी, मी थांबवली रेल्‍वे’’ गार्डने या कृतीचे कारण विचारले असता ती व्‍यक्ति उत्‍तरली,’’ माझ्या अंदाजानुसार इथून काही अंतरावर रेल्‍वे पट्ट्या खराब झाल्‍या आहेत.’’ गार्डने विचारले,’’ हे तुला कसे कळले’’ ती व्‍यक्ति म्‍हणाली,’’ माझ्या अनुभवानुसार रेल्‍वेच्‍या गतीमध्‍ये काही फरक पडला आहे आणि त्‍यामुळे रेल्‍वेचा जो विशिष्‍ट आवाज येतो तो न येता आवाज न येता वेगळा आवाज येऊ लागला आहे. असा आवाज फक्त रेल्‍वे पट्ट्या खराब असतानाच येतो हे माझे गणित आहे. आपण याची खात्री करून बघू शकता.’’ गार्डने याची खातरजमा करून बघण्‍यासाठी त्‍या व्‍यक्तिला बरोबर घेतले व पुढे जाऊन पाहतात तो काय, एका ठिकाणी खरोखरीच रूळाच्‍या पट्ट्या निसटून रूळ सटकले होते. तेथील नटबोल्‍टही तेथूनच बाहेर पडलेले दिसून येत होते. हे सर्व होत असतानाच रेल्‍वेत त्‍या माणसाची टिंगल करणारे प्रवासीही तेथे येऊन पोहोचले व हे सर्व पाहून ते आश्‍चर्यचकित झाले. केवळ त्‍या माणसाच्‍या ज्ञानामुळे आज त्‍यांचे प्राण वाचले होते हे जाणवून ते सर्व आता त्‍या माणसाची प्रशंसा व स्‍तुती करू लागले. गार्डने त्‍यांचे आभार मानले व विचारले,’’ सर, मी तुमचे नाव व हुद्दा जाणू शकतो काय’’ त्‍या माणसाने शांतपणे उत्तर दिले,’’ माझे नाव डॉ.एम. विश्र्वेश्‍वरैय्या असून मी व्‍यवसायाने इंजिनियर आहे.’’ त्‍यांचे नाव ऐकताच सगळेचजण स्‍तब्‍ध झाले. कारण त्‍याकाळात विश्र्वेश्‍वरैय्या यांना संपूर्ण देश एक हुशार इंजिनिअर म्‍हणून ओळखत होता. टिंगल करणा-या लोकांनी त्‍यांची क्षमा मागितली. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) *या बुलेटीनला आज चार वर्षे पूर्ण होत आहेत* 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 14/08/2019 वार - बुधवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- ◆ १९२१ - तन्नु तुव्हा या राष्ट्राची रचना. ◆ १९४७ - पाकिस्तानची निर्मिती 💥 जन्म :- ◆ १९११ - वेदतिरी महारिषी, भारतीय तत्त्वज्ञानी. ◆ १८९७ - विठ्ठलराव एकनाथराव विखे पाटील ◆ १९२५ - जयवंत दळवी, मराठी लेखक, नाटककार. ◆ १९६८ - प्रवीण आम्रे, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- ◆ १९८४ - खाशाबा जाधव, भारतीय कुस्तीगीर. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *नवी दिल्ली : परराष्ट्र मंत्रालयात प्रोटोकॉलला खूप महत्त्व आहे. मात्र, त्यांनी प्रोटोकॉलची परिभाषा बदलून ती पीपल्स कॉल अशी केली. त्यांनी जगभरातील भारतीय समुदायाला मदत केली - पंतप्रधान नरेंद्र मोदी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांसह जिल्ह्यामधील पूरग्रस्तांसाठी राज्य सरकारने दिलेल्या पाच कोटी रुपयांच्या निधीचे वाटप* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *नवी दिल्ली: दिल्लीतील आम आदमी सरकारने फ्री इंटरनेटची घोषणा केली होती. त्यातच आता पुन्हा मोठी घोषणा केली आहे. त्यांनी रिक्षा फिटनेस फी माफ करण्याचा घेतला निर्णय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री एक महिन्याचा पगार पूरग्रस्तांना देणार, औरंगाबाद जिल्ह्यातील दूध उत्पादक संघानं पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केले 25 लाख रुपये* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *औरंगाबाद : डीएड प्रमाणपत्र पडताळणीसाठी राज्यभरातून निवड झालेल्या टीईटी धारकांची औरंगाबाद जिल्हा परिषदेत गर्दी; तपासणी अधिकारी उपस्थित नसल्यामुळे त्यांच्यावर ताटकळत बसण्याची वेळ* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *राष्ट्रकुल स्पर्धेत 24 वर्षांनंतर क्रिकेटची एन्ट्री ; बर्मिंगहॅम येथे 2022 मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिला क्रिकेटचा समावेश* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *23 वर्षीय ऐश्वर्या पिस्सायची ऐतिहासिक कामगिरी ; मोटरस्पोर्टमध्ये वर्ल्ड कप जिंकणारी ही पहिलीच भारतीय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *डॉ विठ्ठलराव विखे पाटील जयंती विशेष* https://shikshakmitr.blogspot.com/2019/08/blog-post_13.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ संकलन  *रवी ढगे, नांदेड* 9049931555 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *अनुवांशिकता म्हणजे काय ?* 📙 आमची वंशावळ' आमची जमात, अनुवांशिक रंगरूप व अनुवांशिक रोग इत्यादी गोष्टी सतत कानावर पडत असतात. काही वेळा चर्चेत येत असतात. अनुवांशिकी किंवा हेरिडिटी या संदर्भात महत्त्वपूर्ण संशोधन अॅबेट ग्रेगर जोहनान मेंडेल यांनी केले. मेंडलचे नियम म्हणून त्यांनी केलेले संशोधन जनुकशास्त्रात आजही आधारभूत मानले जाते. मेंडलचा पहिला नियम सांगतो की, विरुद्धगुणी शुद्ध बीजांचा संकर घडवला, तर त्यातील आक्रमक बीजाचे गुणधर्म पुढच्या पिढीत उतरतात. दुसऱ्या नियमानुसार एकापेक्षा जास्त जनुकांच्या जोडय़ा जर यात सामील असतील तर प्रत्येक जोडीतील आक्रमक जोडीचे संयुक्त गुणधर्म प्राधान्याने पुढच्या पिढीत दिसतात. याचाच एक सोपा अर्थ म्हणजे जसेच्या तसे संक्रमण होत नाही, तर त्यात प्राधान्यक्रम ठरवला जातो. या साऱ्या गोष्टी विविध वनस्पतींच्या रंगसंकरातून, उंच बुटक्या जातींतून मेंडेल यांनी सिद्ध केल्या. यानुसार अनुवंशिकीचा विचार माणसाच्या संदर्भात करायचा झाला तर एकाच बीजांडांचे विभाजन होऊन झालेली जुळी भावंडेच फक्त सारखी असू शकतात. अन्यथा पहिल्या पिढीतील सर्व गुणधर्म दुसऱ्या पिढीत कधीही आढळणार नाहीत. स्त्रीबीजांडात व पुरुष शुक्रजंतुत जर प्रत्येक २३ क्रोमोसोमच्या जोड्या असतील, तर विविध गुणोत्तरातून २^२३ म्हणजेच ८३,८८,६०८ इतक्या विविध प्रकारे (पणजोबा, आजोबा, वडील, मुलगा यांच्यात अनुवांशिकी गुणधर्म जसेच्या तसे येण्याची शक्यता ८३,८८,६०८ मध्ये एक एवढीच राहते.) अनुवंशिकी संक्रमण होऊ शकते. जगभरची सर्व माणसे जरी मूलतः आफ्रिकेत निवास करीत होती, तरीही चेहरेपट्टी, उंची, डोळ्यांचे रंग यात असंख्य बदल याच कारणाने विविध जाती जमाती आढळतात. याशिवाय हवामान, रहाणीमान, सूर्यप्रकाश यांचा परिणाम कातडीच्या रंगावर होत असतो, तो वेगळाच. त्यामुळेच जगातील असंख्य प्राणी, साडेसहाशे कोटी माणसे, विविध वनस्पती यांत विविध प्रकार आपल्याला सहजगत्या पाहावयास मिळतात. *'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *“ ज्या माणसाजवळ संयम आहे तो प्रत्येक गोष्टीचा धनी असतो. ”* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *पेंच राष्ट्रीय उद्यान कोठे आहे ?* नागपूर 2) *शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केव्हा झाला ?* 6 जुन 1674 3) *'मराठी भाषेचे पाणिनी' म्हणून कोणाला ओळखले जाते ?* दादोबा पांडुरंग तर्खडकर 4) *सावित्रीबाई फुले यांचा जन्म केव्हा झाला ?* 3 जानेवारी 1831 5) *उत्तरप्रदेश राज्याचा राज्यपक्षी कोणता ?* सारस *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ●  गजानन रामोड ●  राजू टोम्पे ●  सुनील गुडेवार ●  गजानन पाटील ●  मुनेश्वर सुतार ●  गणेश ईबीतवार ●  किरण मुधोळकर ●  राहुल तलाठी ● राम होले ● पवन लिंगायत *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कोणतेही नाते प्रत्येक क्रियेने उज्ज्वल करता येणे, ही खरी सार्थकता. परंपरेने किंवा संस्कृतीने जी सणावारांची यादी केली, त्या प्रत्येक सणाचा अन्वयार्थ नव्याने शोधायला हवा; तरच आनंद-परमानंद-ब्रम्हानंद या पाय-या चढता येतील. वाद आणि भांडणाच्या प्रकारात जो अडकतो त्याचा फास आधिकाधिक घट्ट होण्याची शक्यता असते. त्यामुळे स्नेहभावनेतून जग जोडले पाहिजे. भारतीय संस्कृतीत प्रत्येक दिवस स्नेहाद्रता पेरत येतो, म्हणून सण हे उत्सवांचे प्रतीक म्हणून साजरे व्हावेत.* *नात्यांचा, घटनांचा अर्थ लावत आपल्याला मनाचा स्वयंविकास जेव्हा साधता येईल, तेव्हाच सगळे सण-उत्सव प्रतीकरूप होतील. रोजचा दिवस येतो आणि जातो. रोजच्या कामात मग्न असणारे आपण काही नवीन करतो का, किंवा जे कुठलेही काम करतो त्याच्यात काही नवीन शोधतो का ? नसल्यास ते जमले पाहिजे. नित्यनूतनतेचा ध्यास जोवर लागत नाही, तोवर आयुष्यातून शिळेपणा जाणार नाही. प्रत्येक क्षणाचा उत्सव करणे हे आपले कर्तव्य आहे. या भावनेने जगण्याच्या अनेकविध अंगांकडे पाहता आले पाहिजे.* *॥ रामकृष्णहरी ॥* 💥💥💥💥💥💥💥💥 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *एक फिल्मी गीत ऐकलं की डोक्यात सणक निघायची। वाटायचं एव्हढा* *अलौकिक जन्म* *मिळाला तो काय रडायला* *मिळाला का?* *ते अस,* " *दुनिया बनाने वाले ,काहेको दुनिया बनाई। तुने काहेको दुनिया बनाई।"* *मग लक्षात आलं।की अरे हा-- तुम्ही हारलात किंवा अपयशी झालात तर* *जवळचे सुद्धा लांब रहाण्याचा प्रयत्न करतात.जवळचा* *असूनही* *चुलत-चुलत वगैरे सांगतात.* *पण या उलट तुम्ही कुठल्याही क्षेत्रात* *उत्तुंग शिखर गाठा. मग* *कमाल बघा---अहो नाती नसतांना* *_सुध्दा संबंध जोडला_* *जातो,आहो माझा खूप* *क्लोज नातेवाईक आहे,मित्र* *आहे असं सांगितलं* *जातं.* *दुनियाच अशी आहे दोस्तो,तुम्ही गुणवान असलात की सगळे मूग* *गिळून बसणार। अन थोडका चुकीचं घडूद्या किंवा व्यंग सापडुदया की मुका सुद्धा* *बोलायला लागतो.* *म्हणून जगून घ्या, जग दोनही बाजू तपासत आणि त्यांच्या प्रमाणे विचार करत* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* *जि. प. शाळा.---माणिकखांब,* *ता.इगतपुरी, जि.नासिक* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹शुभेच्छा संदेश...🌹 ------------------- फ्रेश माॅर्निंग बुलेटिनचे चार वर्षे पूर्ण झाली असून पाचव्या वर्षात दमदार पदार्पण.... ------------------- एक चिंतनशिल व्यक्तिमत्व, अष्टपैलू आणि दमदार कोणत्याही विषयावर शिघ्र लेखन करणारे फ्रेश माॅर्निंग बुलेटिनचे संचालक माझे मित्र ना.सा.येवतीकर यांचे मनापासून अभिनंदन. या बुलेटिनच्या माध्यमातून शाळा,शिक्षक आणि विद्यार्थी यांना जोडणारे व विद्यार्थ्यांना सातत्याने शिक्षणप्रवाहात प्रवाहीत करण्याचे मनापासून प्रयत्न करण्याचे काम ना.सा.सरांनी केले. विद्यार्थी हा विद्यार्थी न राहता त्याला पुस्तकी ज्ञानाबरोबरच जनरल नॉलेजची आवड निर्माण व्हावी,जगात काय चाललंय यांचेही ज्ञान मिळावे, दिनविशेष,बोधकथा, विचार सुविचार, दैनिक वार्ता, व्यक्तीविशेष,वाढदिवस शुभेच्छा इ.चे स्वतंत्र टप्प्यात इत्यंभूत माहिती सदरील बुलेटिनमध्ये सातत्याने सादरीकरण करण्याचे उत्कृष्ट कौशल्य आणि आॅडिओ स्वरुपात बातमीपत्र सादरीकरण हे ना.सा.चे विशेष व्यक्तिमत्व त्यांच्यात आहे.त्या अख्या महाराष्ट्रात नावलौकिक मिळविला आणि ते ही न थकता,न थांबता अविरत ज्ञानाचा यज्ञ चालू आहे आणि असाच चालत राहणार आहे.यासाठी त्यांनी अनेक शब्द प्रभूंची साथ घेतली.काहींना माणसे तोडण्यात आनंद असतो तर काहींना माणसे जोडण्यात खूप आनंद वाटतो.तसेच ना.सा.हे अवलिया दुसऱ्या फळीचे आहेत.मी नेहमी संपर्कात राहतो मला आनंद वाटतो.आमच्या सारख्या छोट्या माणसांना जवळ केले आणि विद्यार्थ्यापर्यंत पोहचवले याचा आनंद खूप वाटतो.माझ्या विचारवेधला त्यांनी खूप दूरपर्यंत पोहोचवले यांचा आनंद आहे.मला सातत्याने लिहिण्याची प्रेरणा दिली.एखाद्या दिवशी मला जरी काही कारणास्तव विचार लिहिले नसलेतरी माझ्या विचारवेध या संग्रहीत पुस्तकातून ते बुलेटिन मध्ये घेत असतात.असा हा सगळ्यांना घेऊन जाणारा जिद्दी माणूस..! त्यांच्याकडून खूप काही घेण्यासारखे आहे.तो सदैव ज्ञानदानाचे कार्य करत असतो.अशा माझ्या मित्राला खूप यश मिळो आणि या बुलेटिन चे सातत्याने प्रगती होवो.पाच वर्षच काय पण अखंड प्रवास चालू राहण्यासाठी बळ मिळो हीच मनस्वी प्रार्थना.सगळ्यांनीच अशी साथ द्यावी व अधिक नावारुपाला यावे ही मनस्वी शुभेच्छा... शुभेच्छूक, व्यंकटेश काटकर,नांदेड ' विचारवेध ' संवाद..९४२१८३९५९०. 🌹🌹🙏🏻🙏🏻🌹🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• वस्तूचे मोल एके ठिकाणी एक रेशमाचा किडा होता. तो एके दिवशी आपला रेशमी कोश विणत होता. त्यावेळी शेजारी एक कोळी होता. तो मोठय़ा चपळतेने आपले जाळे विणत होता. तो कोळी त्या किड्याकडे तिरस्काराने पाहून त्याला म्हणाला, 'अरे, माझ्या जाळ्यासंबंधी तुझे काय मत आहे? हे जाळे मी आज सकाळी प्रारंभ केले व आता ते अर्धेअधिक पुरेसुद्धा झाले. एवढे मोठे व इतके सुंदर जाळे मी इतक्या थोड्या वेळात विणले तरी तू आपला रेंगाळतच बसला आहेस.' त्यावर रेशमाचा किडा शांतपणे उत्तरला, 'अरे, तू वाटेल तेवढी बढाई मारलीस तरी तुझ्या व माझ्या जाळ्यातील अंतर सगळ्यांना माहीत आहे. गरीब बिचार्‍या निरपराधी प्राण्यांना पकडण्यासाठी तू ते जाळे पसरले आहेस, त्याचे आयुष्य किती क्षणिक आहे बरे? एखाद्या मुलाने हे जाळे पाहिले तर तो एका क्षणात याचा नाश करून टाकेल. उलट माझ्या जाळ्यापासून जे रेशीम निघेल, त्याची वस्त्रं पुढे एखाद्या राजाच्याही अंगावर बघावयास मिळतील. तात्पर्य : कोणत्याही वस्तूची किंमत मोठ्या आकारावरून न ठरवता लहानशी वस्तू देखील अतिशय उपयुक्त आणि मौल्यवान असते. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 13/08/2019 वार - मंगळवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- ◆ २००४ - नागपूरमध्ये संतापलेल्या स्त्रियांनी अक्कू यादव या गुंडाला न्यायालयाच्या आवारात घेरुन ठार मारले. ◆ २००४ - जगातील एक सर्वात पुरातन संस्कृती असलेल्या ग्रीसच्या राजधानी अथेन्समध्ये शतकातील पहिल्या ऑलिंपिकला जल्लोषात प्रारंभ झाला. 💥 जन्म :- ◆ १८९० - त्र्यंबक बापूजी ठोंबरे तथा बालकवी, मराठी कवी. ◆ १८९८ - आचार्य प्रल्हाद केशव अत्रे, मराठी साहित्यिक. ◆ १८९८ - विश्राम बेडेकर, मराठी साहित्यिक. ◆ १९२३ - पंडित काशिनाथशास्त्री जोशी, भागवत अभ्यासक, प्रवचनकार. 💥 मृत्यू :- ◆१७९५ - अहिल्याबाई होळकर. ◆ १९८० - लेखक पुरुषोत्तम भास्कर भावे यांचे निधन. 'प्रथमपुरुषी एकवचनी' हे त्यांचे आत्मचरित्र. 'रक्त आणि अश्रू' हा लेखसंग्रह, 'विषकन्या', 'स्वामीनी', 'महाराणी पह्यिमी' ही त्यांची नाटके गाजली. ◆१९८८ - व दिग्दर्शक गजानन जागीरदार यांचे निधन. पुण्याच्या चित्रपट आणि दूरदर्शन प्रशिक्षण संस्थेचे ते पहिले प्राचार्य होते. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *कोल्हापूर आणि सांगलीतील पूर ओसरण्यास सुरुवात, आठवड्याभराने पुणे-बंगळुरु महामार्ग सुरु, पेट्रोल पंपावर कोल्हापूरकरांची भलीमोठी रांग* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *देशभरात बकरी ईद उत्साहात, सांगली-कोल्हापुरातील मुस्लीम बांधवांकडूव साध्या पद्धतीने ईद साजरी* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *काश्मीरातील कलम 370 रद्द झाल्यानंतर वाघा-अटारी सीमेवर आज ईदच्या दिवशी पाकिस्तानी सैनिकांनी भारतीय जवानांकडील मिठाई नाकारली, भारत-बांग्लादेश सीमेवर मात्र जल्लोष* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *रेल्वे रुळावर दरड कोसळल्याने बंद करण्यात आलेली मुंबई-पुणे रेल्वे सेवा पूर्ववत होईपर्यंत या मार्गावर एसटीच्या ज्यादा बसेस धावणार, प्रवाशांची गैरसौय टाळण्यासाठी एसटी महामंडळाचा निर्णय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *येत्या 5 सप्टेंबर पासून जिओ गिगा फायबर सेवा होणार लाँच, ब्रॉडबँड इंटरनेट सोबतच सेट टॉप बॉक्सद्वारे टीव्ही चॅनलचाही आनंद घेता येणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *चांद्रयान-2 14 ऑगस्टला पहाटे साडे तीन वाजता पृथ्वीच्या कक्षेतून चंद्राकडे झेपावणार; इस्त्रोची माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारतीय संघाने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजवर डकवर्थ लुईसनुसार 59 धावांनी विजय मिळवून तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या सामन्यात कर्णधार विराट कोहलीनं कारकिर्दीतले 42 वे शतक हे आजच्या खेळाचे वैशिष्ट्य* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *वेळेचे नियोजन* वेळ ही एक अशी वस्तू आहे जे की कोणासाठी ही थांबत नाही. मग तो श्रीमंत असो की गरीब सर्वांसाठी वेळ सारखाच असतो. जो वेळेची कदर करतो वेळ त्याची कदर करते. जो वेळेला ओळखतो त्याला नंतर वेळ ओळखते. गेलेली वेळ किती ही पैसा खर्च केला तरी परत मिळत नाही. म्हणून...... पूर्ण लेख वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर क्लीक करावे. https://nasayeotikar.blogspot.com/2019/08/blog-post.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *अँपिअर म्हणजे काय ?* 📙 विद्युतप्रवाह तारेतून वाहत असताना तो मोजण्याचे माप म्हणजे अॅम्पिअर (Ampere) होय. हे मोजण्याच्या साधनाला अॅमिटर (Ammeter) असे म्हणतात. फ्रेंच शास्त्रज्ञ आंद्रे ऍम्पीअर याने वीजप्रवाह कसा मोजायचा, ते शोधून काढले. त्याच्याच नावाने हे मोजमाप मग प्रचलित झाले आहे. विद्युत प्रवाह वाहतो म्हणजे तारेतील इलेक्ट्रॉन एका दिशेने वाहत असतात. विजेचा दिवा लावला असताना त्याच्या तारेतून एका सेकंदाला तीन मिलियन मिलियन मिलियन इतके इलेक्ट्रॉन वाहतात. एक मिलियन म्हणजे एक दशलक्ष. आकडा बरोबर लिहिण्यासाठीसुद्धा मिनिटभर लागेल. मग हे सारे सोप्या शब्दात व्यक्त करण्यासाठी आपण विद्युतप्रवाह अँपिअरध्ये मोजतो. याचा उच्चार थोडक्यात अँप असाही करतात. एक अँपिअर म्हणजे दर सेकंदाला ६ मिलियन मिलियन मिलियन इलेक्ट्रॉनचा प्रवाह होय. अॅमिटरने जेव्हा विद्युतप्रवाह मोजतात, तेव्हा हा अॅमिटर विजेच्या 'सर्किट'मध्ये जोडला जातो. त्यावरचा काटा किती वीजप्रवाह वापरला जात आहे, हे तात्काळ दर्शवतो. घरगुती वापरासाठी आपण अर्धा ते पाच अँपिअरचा वीजप्रवाह वापरत असतो. इस्त्री, विजेची शेगडी, पाणी तापवायचा गिझर यांन जास्त वीजप्रवाह लागतो. तर विजेचे दिवे, ट्यूबलाइट, पंखे यांना जेमतेम अर्धा ते एक अँपिअरचा प्रवाह लागतो. विजेचा प्रवाह जितका जास्त लागणार असेल तितकी विजेच्या तारांची जाडी वाढवावी लागते. एखाद्या कारखान्याच्या विजेच्या तारा घरातील तारांपेक्षा किती जाड असतात, ते लक्ष देऊन बघण्यासारखे असते. वीजप्रवाहाचा एक महत्त्वाचा गुणधर्म हा की त्यामुळे चुंबकसूची हलते म्हणजे चुंबक क्षेत्र निर्माण होते. दुसरा महत्त्वाचा गुणधर्म हा की वीजप्रवाहाने उष्णता निर्माण होते. जितका वीजप्रवाह जास्त तितकी त्याची उष्णता निर्माण करण्याची शक्ती वाढत जाते. वेल्डिंग मशीनमधील पन्नास ते तीनशे ॲम्पिअरचा प्रवाह धातु वितळवण्याइतकी सुद्धा उष्णता निर्माण करू शकतो. *'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *“ मरण सोपे असते, जगण्यासाठी मात्र धैर्य लागते. ”* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *नांदूर-मधमेश्वर पक्षी अभयारण्य कोठे आहे ?* नाशिक 2) *माळढोक पक्षी अभयारण्य कोठे आहे ?* सोलापूर 3) *प्रसिध्द समाजसेवक अण्णा हजारे यांचे जन्मगाव कोणते ?* राळेगणसिद्धी ( अहमदनगर ) 4) *राजमाता जिजाऊ यांचे जन्मगाव कोणते ?* सिंदखेडराजा ( बुलढाणा ) 5) *शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ केव्हा घेतली ?* 1646 *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ●  सुयोग पेनकर ●  प्रशांत सब्बनवार ●  योगेश येवतीकर ●  नरेंदर रेड्डी ●  गणेश धाकतोडे ●  नागेश गुर्जलवार *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *स्वत:वर विश्वास असणे फार महत्वाचे आहे. तो नसल्यास न्यूनगंड निर्माण होतो. मानवी जीवन सुंदर आहे, यावर विश्वास ठेवल्यास मनात जगण्यासाठी नवी उमेद निर्माण होते. आशावदी दृष्टीकोन हा विश्वासाचाच अविभाज्य भाग आहे. आशावाद मानवी मनाला प्रेरणा देऊन कर्तव्य पार पाडण्यासाठी लागणारी ऊर्जा पुरवतो. विश्वासाचा संबंध व्यक्तीच्या ह्रदयाशी, मनाशी असतो. तो दृश्य स्वरूपात नसून अदृश्य स्वरूपाचा असतो. तो समजून घ्यायचा असेल, तर आपल्या आत डोकवावे लागेल.* *याच विश्वासाची गळचेपी होत असल्याचे आज पावलोपावली जाणवते. मुलांचा आईवडिलांवरील, आई-वडिलांचा मुलांवरील, पती-पत्नीच्या नात्यातील, विद्यार्थ्यांचा गुरूजनांवरील, रूग्णांचा डाॅक्टरांवरील, मित्र-मैत्रिणींचा एकमेकावरील, जनतेचा राजकारण्यांवरील विश्वास कमी होत चाललाय...त्याला तडा जात असल्याचे आपल्याला दिसते. याचे कारण स्वार्थधुंदीत आपण माणूसपण विसरू लागलो. औपचारिकता आणि आधुनिकतेच्या नावाखाली विश्वासाला नख लावणे सुरू झाले. मॅथ्यू अरनाॅल्ड हा कवी मानवी जीवनातील विश्वासाची व्याप्ती व खोली स्पष्ट करण्यासाठी समुद्राची प्रतिमा वापरतो. भूतकाळात विश्वासाची व्याप्ती समुद्राएवढी होती. प्रत्येकाच्या ह्रदयात विश्वासाला महत्वाचे स्थान होते. अशीच परिस्थिती चालत राहिली, तर भविष्यात विश्वासाची अवस्था केविलवाणी होईल. मानवी समाजात विश्वासाची जागा संशय घेईल व सर्वत्र सावळागोंधळ निर्माण होईल. चला तर..अंतस्थ विचार बदलून विश्वासाला पात्र बनू या..* *॥ रामकृष्णहरी ॥* 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रानो* *अाकाशातील ग्रह पृथ्वीवरील माणसावर परिणाम करतात की नाही ते माहीत नाही... परंतु* *पृथ्वीवरील माणसे एकमेकांबद्दल जे ग्रह करून घेतात ते मात्र माणसाच्या जीवनावर निश्चित परिणाम करतात... *जे लोक स्वतःच्या स्वार्थासाठी* *किंवा मोठेपणा साठी* *जवळची माणसे तोडतात*... *असे लोक छोट्या छोटया लुटूपुटूच्या लढाया जिंकतील* .... *पण अंतिम युद्ध कधीच जिंकू शकत नाहीत*. *कारण ..घरातच शत्रू निर्माण केल्यामुळे* *बाहेरचा शत्रू न लढताही जिंकतो*.. *म्हणून* *जोडता नाही आले तर जोडू* *नका*. **पण आपल्या लोकांना तोडू नका* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• शिक्षणामुळे केवळ माणूस शहाणा होत नाही तर त्याच्यामध्ये असणारा अज्ञानपणा,अयोग्य दिशेने जाणारे पाऊल,आपल्यात असलेला कमीपणा दूर करण्याचा मार्ग आणि जीवनात कसे जगायचे याचे शास्त्रशुध्द ज्ञान शिक्षणामुळे मिळते.तसेच सुखी व समृद्ध जीवन म्हणजे काय याबद्दलचीही जाणीव शिक्षणामुळे मिळते.म्हणून शिक्षणाचा खरा मार्ग आपल्या जीवनासाठी आपल्या प्रगतीचे केंद्र मानून स्वीकारणे काळाची गरज आहे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कर्णाची दानशुरता*   कर्ण दुर्योधनाचा खास मित्र होता. तो दानशूर म्हणून प्रसिद्ध होता. आपल्याकडे आलेल्या याचकाला तो कधीही रिकाम्या हाताने जाऊ देत नव्हता. एकदाचा हा प्रसंग         एकदा भगवान श्रीकृष्ण अणि अर्जुन  गप्पा मारत बसले होते. बोलता बोलता  कर्णाच्या दानशूरपणाविषयी  बोलणे चालू झाले. कृष्णाने कर्णाच्या दानशूरतेचे कौतुक केले. श्रीकृष्ण म्हणाला, ''कर्णाइतकी उदार व्यक्ती दुसरी कुणीही नाही.'' या बोलण्याचे अर्जुनाला जरा आश्चर्यच वाटले. अर्जुन म्हणाला, ''श्रीकृष्णा, धर्मराजही दानशूर आहे.'' सर्वांत अधिक दानशूर कोण आहे ? यावर मग त्यांची चर्चा चालू झाली. श्रीकृष्ण नेहमीप्रमाणेच याही गोष्टीची प्रचीती आणून देण्यासाठी सिद्ध होता. श्रीकृष्ण म्हणाला, ''ठीक आहे, उद्याच आपण धर्मराज आणि कर्ण दोघांकडे जाऊन या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावून टाकू.''         पावसाळयाचे दिवस होते. दुसऱ्या दिवशी उजाडताच श्रीकृष्ण आणि अर्जुन धर्मराजाकडे गेले. धर्मराजाला आनंद झाला. त्याने त्या दोघांचे स्वागत केले. त्यांच्या येण्याचे कारण विचारले. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाला, ''राजधानीत एक महत्त्वाचे बांधकाम अचानक करावयाचे आहे. त्यासाठी लाकडे हवी आहेत.'' धर्मराजाने आपल्या सेवकांना बोलावले आणि बांधकामासाठी उत्तम प्रतीचे लाकूड आणण्याची आज्ञा केली. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. बराच वेळ झाला, तरी सेवक काही परतले नाहीत. बऱ्याच वेळाने सेवक परत आले, तेही खाली मान घालून. धर्मराज म्हणाला, ''काय झाले ? लाकडे मिळाली नाहीत का ?'' सगळीकडे पाऊस पडत असल्याने सारी लाकडे भिजलेलीी होती आणि त्यामुळे सेवक लाकडे आणू शकले नव्हते. नाईलाजाने धर्मराजाने अर्जुन आणि श्रीकृष्णाला लाकडे न मिळाल्याचे कारण सांगितले. श्रीकृष्ण आणि अर्जुन परत फिरले.         त्यानंतर श्रीकृष्णाने अर्जुनाला कर्णाकडे येण्यास सांगितले. त्याच्याकडे गेल्यावर कर्णाने त्यांना आदराने आसनावर बसवले. त्यांचे क्षेमकुशल विचारले. त्यावर अर्जुनाने लाकडांची तातडीने आवश्यकता असल्याचे सांगितले. कर्ण म्हणाला, "एवढेच ना, मग त्यात एवढी चिंता करण्यासारखे काय आहे ?'' असे म्हणून त्याने आपल्या सेवकांना लाकडे आणण्यासाठी पाठवले. थोड्या वेळाने परत आलेले सेवक त्याला म्हणाले की, पावसाच्या पाण्याने सारी लाकडे ओली झाल्याने लाकडे मिळू शकली नाहीत. सेवकांचे बोलणे ऐकताक्षणी कर्ण आत गेला. बराच वेळ होऊनही कर्ण बाहेर येत नाही, असे पाहून अर्जुन श्रीकृष्णाकडे बघायला लागला. श्रीकृष्ण त्याला समवेत घेऊन कर्णाच्या दालनात गेला. बघतो तर काय, कर्ण आपल्या पलंगाचे पाय कापत होता. आजूबाजूला इतर लाकडी सामान तोडून ठेवलेले होते. आता त्यांना कर्णाला वेळ का लागला, याचे कारण उमगले. अर्जुनाने विचारले, ''कर्णा, एवढ्यासाठी तू तुझे चंदनाचे कलात्मक लाकडी पलंग कशाला तोडलेस ?'' त्यावर कर्ण उद्गारला, '' या वस्तू काय पुन्हा बनवता येतील; पण कुणाला आपल्याला काही देण्याची वेळ यावी आणि आपण तो क्षण गमवावा, यासारखे दु:ख कोणते असेल ?''         पुढे याच कर्णाने आपली वरदान मिळालेली अंगभूत कवचकुंडलेही दान केली आणि आपल्या त्यागाचे मूर्तीमंत उदाहरण इतिहासात ठेवले.         मुलांनो, दानशूर कर्णाची गोष्ट आपण पाहिली. आपल्याला आपली छोटीशी वस्तूही देण्याची इच्छा नसते. येथे तर त्याने आपली वरदान मिळालेली अंगभूत कवचकुंडलेही दान केली.केवढी ही महानता दानशुरता. आपल्यालाही आपल्या वस्तूंचा त्याग करता आला पाहिजे. आपणही समाजाचे देणे लागतो ह्या हेतूने जगावे.. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 10/08/2019 वार - शनिवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- ◆१९९९-औषधांच्या दुकानांवर विकल्या जाणाऱ्या औषधात प्राणिज पदार्थ असल्यास त्याचा उल्लेख वेष्टणावर करणे अनिवार्य असल्याचा केंद्रसरकारच्या सामाजिक न्याय खात्याचा निर्णय. ◆१९८८ - दुसर्‍या महायुद्धात बेकायदेशीरपणे बंदिवासात टाकलेल्या जपानी वंशाच्या अमेरिकन नागरिकांना अमेरिकेने प्रत्येकी २०,००० डॉलर देण्याचे कबूल केले. ◆ १९९० - मॅगेलन अंतराळयान शुक्र ग्रहावर पोचले. 💥 जन्म :- ◆ १८९४- व्ही.व्ही. गिरी भारताचे चौथे राष्ट्रपती ◆१८६० - पंडित विष्णू नारायण भातखंडे, भारतीय संगीतकार, संगीततज्ञ. ◆१९६०-देवांग मेहता,भारतीय तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी व्यक्तिमत्त्व. 💥 मृत्यू :- ◆१९४२-हुतात्मा शिरीषकुमार. ◆ १९४५ - रॉबर्ट गॉडार्ड, अमेरिकन रॉकेटतज्ञ. ◆१९७६ - बर्ट ओल्डफील्ड, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *मुंबई : पूरपरिस्थितीमुळे सर्व शासकीय अधिकाऱ्यांच्या 10, 11 आणि 12 ऑगस्टच्या सुट्ट्या करण्यात आल्या रद्द* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाच्या नायब राज्यपालपदी विजयकुमार यांची नियुक्ती* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *नवी दिल्ली - राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2019 जाहीर, 'भोंगा' चित्रपटाला सर्वोकृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *मुंबई : राजपत्रित अधिकाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन पूरग्रस्तांना, साठ कोटी रुपये जमा होणार, मुख्यमंत्री सहायता निधी देणार रक्कम* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *मुंबई- एमपीएससी परीक्षा देणाऱ्यांसाठी दिलासा, परीक्षा 11 ऑगस्टऐवजी 24 ऑगस्ट रोजी होणार, पुरामुळे घेतला निर्णय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *नवी दिल्ली - माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात केले दाखल* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *India vs West Indies ODI : भारताचा वेस्ट इंडिज विरुद्धचा पहिला सामना पावसामुळे सामना रद्द* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कमवा आणि शिका* सुमारे 60-70 दशकातील शिक्षणाचा विचार केला तर लक्षात येते की गावोगावी प्राथमिक शिक्षणाची देखील सोय नव्हती. उच्च शिक्षण घेणे तर दुरची गोष्ट. ज्याला शिक्षणाची गोडी लागली किंवा महत्त्व कळले असेल ते घरापासून कोसो दूर असलेल्या शाळेत घरदार सोडून शिक्षण घेतले त्यांचे जीवन खरोखरच सफल झाले. त्या काळातील शिक्षण पध्दतीचा विचार केल्यास आज ही अंगावर शहारे येतात......... पूर्ण लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर clik करावे. https://nasayeotikar.blogspot.com/2017/06/blog-post_86.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *अमीबा म्हणजे काय ?* 📙 साऱ्या जगात किमान दहा लाख प्रकारचे प्राणी सापडतात. पण प्राणीशास्त्राबद्दल चर्चा सुरू झाली किंवा अभ्यास करायचे ठरवले की सर्वप्रथम नाव निघते ते अमीबाचेच. एकपेशीय प्राणी हे त्याचे वैशिष्ट्य. १६६५ साली रॉबर्ट हुक या इंग्लिश निसर्गप्रेमी शास्त्रज्ञाने पेशी (Cell) हा शब्द प्रथम वापरला. बुचाच्या अभ्यासामध्ये त्याला आढळलेल्या पेशींचे वर्णन त्याने त्यावेळी करून ठेवले आहे. त्यानंतर मायक्रोस्कोपखाली सर्वच गोष्टी न्याहाळल्या जाऊ लागल्या. स्वतंत्रपणे जगू शकणारा. पुनरुत्पादनाची क्रिया स्वतंत्रपणेच करणारा एकपेशीय असा हा अमीबा त्यानंतर प्रसिद्ध पावला. अमीबा दिसण्यासाठी मायक्रोस्कोपची तशी गरज नसते. काही प्रकारचे अमीबा अर्धा मिलिमीटरएवढे मोठे असतात. ते नुसत्या डोळ्यांनीही पाण्याच्या थेंबात दिसतात. साधे भिंग वापरले, तर त्यांची हालचालही न्याहाळता येऊ शकते. काही जाती मात्र अगदी सूक्ष्मदर्शक यंत्राखाली पाहाव्या लागतात. जेलीचा एखादा गोळा कसा असावा, तसा हा प्राणी सतत स्वतःचा आकार पालटत हालचाल करत असतो. भक्षाच्या शोधात भटकंती करताना अंगाची वेटोळी लांबुडकी पसरत हा भक्षाच्या दिशेने सरकतो. भक्ष्य आवाक्यात आले की त्याला चहूबाजूंनी प्रथम तो गुरफटून टाकतो. अर्थातच याचे भक्ष्य म्हणजे त्याच्या जीवाच्या आकारास साजेसेच असते. छोटे जीवाणू, प्राणिज व वनस्पती शैवाळ सतत गट्टम करत जाणे हा त्याचा नित्यक्रम. भक्ष्य गुरफटून मग पेशीतील पेशीद्रव्यामध्ये विरघळवण्याची क्रिया सुरू होते. यावर नियंत्रण असते पेशीकेंद्राचे. गरजेप्रमाणे पाणीपण शोषले जात असतेच. पचन पूर्ण झाल्यावर नको असलेला भाग व तत्सम द्रव्ये बाहेर टाकली जातात. साध्या पेशीविभाजन पद्धतीने यांची वाढ होत असल्याने यांची संख्या फार मोठ्या प्रमाणावर वाढत असते. पाणी, मग ते कसलेही असो, अमीबाचा वावर तेथे आढळणारच. त्यातल्या त्यात साचलेले पाणी, डबकी, चिखल यांमध्ये यांची वाढ चांगली होते. वाहत्या पाण्यात त्या मानाने अमीबा कमी सापडतात. अमीबा या प्राण्याबद्दल माणसाला सतत जागरूक राहावे लागते. पिण्याच्या पाण्यातून माणसाच्या शरीरात अमीबाचा एकदा का प्रवेश झाला की त्याच्या शरीरात सर्वत्र संचार सुरू होतो. वाढही छान होते. सर्व पचनसंस्था पोखरून काढण्याची ताकद या एकपेशीय प्राण्यात आहे. पोटाचे विविध आजार, पोटदुखी, मोठ्या आतड्याचे आजार, यकृताची गंभीर दुखणी या अगदी लहान प्राण्यामुळे होतात. जेमतेम ३० वर्षांपूर्वी या दुखण्यांसाठी फारसे खात्रीचे उपायही नव्हते. आजकाल मात्र यांवर खात्रीची औषध उपलब्ध आहेत. जगाच्या पाठीवर सर्वत्र आढळ असलेला हा अमीबा भारतीय हवामानात सर्व प्रांतांत त्याचे राज्य पसरून आहे. *'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *“ रागाच्या भारत माणूस जसे वागतो ते शेवटी लाजिरवाणे ठरते. ”* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *जिल्हा परिषदेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?* 5 2) *जिल्हा परिषदेत कमीत कमी व जास्तीत जास्त सदस्य संख्या किती असते ?* 50 ते 75 3) *भारतरत्न पुरस्कार मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण ?* महर्षी कर्वे 4) *महाराष्ट्रातील द्राक्षांचा जिल्हा कोणता ?* नाशिक 5) *पन्हाळा हे थंड हवेचे ठिकाण कोठे आहे ?* कोल्हापूर *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ●  हेमंत पापळे, अकोला ●  गणेश मोहिते ●  राहुल मगरे ●  रामदास देशमुख ●  तुकाराम यनगंदलवार ●  अशोक मगरे ●  व्यंकटेश पुलकंठवार ●  माधव परसुरे ● अविनाश गायकवाड ● सचिन सुरबुलवाड ● दिगंबर भीमराव सावंत ● गोविंदराव शिवशेट्टे ● संतोष येवतीकर ● डॉ. चंद्रकांत पांचाळ ● नागराज आहिरे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *निराशावादी लोक टोकाचा नकारात्मक विचार करतात. छोट्या संकटाला आकाश कोसळले समजले जाणारे भित्र्या सशासारखे असतात. झाडाचं पान पडलं तरी आकाश कोसळल्याच्या भ्रमाने जीव मुठीत घेऊन पळतात. हताश, निराश, उदास माणसं स्वत: निष्क्रिय होतात व दुस-याला काळजीच्या दरीत लोटत राहतात. अशांना सहानुभूती देण्यापेक्षा धैर्य देणं महत्वाचं. उलटपक्षी वस्तुनिष्ठ माणसं ! 'जीवन त्यांना कळले हो' पठडीतील असतात. ती आशेने हुरळत नाहीत नि निराशेने हताश होत नाहीत. ती व्यक्तिगत भावभावनांच्या कल्लोळात स्वत:स ना विसर्जित करतात, ना हारतात. 'अत दीप भव' म्हणत ती स्वत: अंधा-या वाटेवर पणतीच्या उजेडात चालतात. त्यांच्या हातातल्या मेणबत्तीची मशाल कधी झाली हे त्यांचे त्यांनाही कळत नाही.* *अशी माणसं सतत अंतर्मुख होऊन सिंहावलोकन करत विहंगमावलोकनाने नवी स्वप्न कवटाळत ती सत्यात उतरवत राहतात. ते पूर्वग्रहदूषित असत नाहीत नि दुस-यावर विसंबतही नाहीत. वास्तवाचं भान हा त्यांच्या जगण्याचा आधार असतो. भावनेपेक्षा तर्कावर जगणारी ही माणसं खाली जमीन न वर आकाशाचं भान ठेवून जीवन घडवतात. 'मी' आणि 'तू' याच्या पलिकडे आपण असा सामूहिक सद्-भाव व सभ्यता जोपासणारी ही तटस्थ माणसं. त्यांच्या वेदना नि संवेदना दोन्ही क्षितिजे विश्वव्यापी. अशा माणसांना मग दगडातल्या देवापेक्षा माणसातली माणुसकी महत्वाची वाटते. 'जे जे आपणांसी ठावे, ते ते इतरांसी सांगावे, शहाणे करूनि सोडावे सकलजन' असा त्यांचा सार्वजनिक सत्यधर्म असतो.* *॥ रामकृष्णहरी ॥* 🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼🌸 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो* *बहिणाबाई नात्याबद्दल खूप छान* *सांगतात---जीची माया गेली* *सरी, तिले माय म्हणू नये,* *जन्मदात्याले भोवला त्याले लेक म्हणू* *नये।तसेच सुगरणीच आहे,* *खोपा इनला इनला जसा गिलक्याचा* *कोसा,* *पाखराची कारागिरी जरा देखरे* *माणसा।* *माणसाने माणसाजवळ यावं हे* *धर्म शिकवतो.* *ही* *माणसं जवळ आली की वेगवेगळी* *नाती तयार होतात.* *माझी एकच विनंती आहे, हे नाते* *विणतांना सुगरणी सारखी* *मायेची गुंफण घाला बघा मग त्याला* *काळालाही उसवण* *सहजासहजी जमणार नाही,मग ते* *नाते कोणतेही असूदया,* *एक गोष्ट नक्की ते फक्त तुमच्या* *आणि तुमच्याच स्वतःच्या* *हाती आहे.* *अशोक कुमावत* *(राष्ट्रपती पुरस्कार विजेते*) 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जी एक गोष्ट तुम्हाला तुमच्या जीवनात पुढे जाण्यासाठी प्रवृत्त करते आणि तीच गोष्ट तुमच्या जीवनात मागे खेचण्यासाठी सतत प्रयत्नशील असते.ती म्हणजे तुमचे मन. जर तुमचे मन सतत चिंतनशील,प्रयत्नशील, कृतीशील आणि येणाऱ्या प्रत्येक वेळेला तुम्हाला धैर्य देऊन पुढे जाण्यासाठी प्रयत्न करते तसेच तुमच्या जीवनात नवे चैतन्य निर्माण करुन चांगले जीवन जगण्याची प्रेरणा देते त्या मनाची सकारात्मक बाजू बळकट करणे ही एक तुमच्या जीवनातल्या जमेची गोष्ट आहे.ही ऊर्जा जोपर्यंत तुमच्या जीवनात आहे तोपर्यंत तुम्हाला कधीच मागे खेचनार नाही.जर का तुमची काहीच काम करण्याची इच्छा होत नाही,काम करण्याची इच्छा असूनही तुम्हाला करावेसे वाटत नाही,आजचे काम उद्याला करु,आज नाही केले तर काय बिघडले अशी जेव्हा तुमच्या नकारात्मकतेची उर्जा तुमच्या जीवनात बळावते तेव्हा तुम्ही तुमच्या जीवनाला एका अधोगतीकडे घेऊन जात आहात हे सिद्ध होते.अशी जेव्हा तुमच्या जीवनात एकाच मनातल्या दोन बाजू जेव्हा तुमच्या जीवनात घालमेल करुन तुमची मानसिकता बदलून टाकतात अशावेळी आपण काही वेळ शांत रहावे आणि आपल्या हातून काही अनुचित घटना होणार नाही याचीही दक्षता घ्यावी.आपल्या जीवनाला कोणते मन चांगल्या प्रवाहाकडे घेऊन जाणार आहे त्याचा विचार करावा.मग आपल्या जीवनाचे जेथे कल्याण होईल त्या चांगल्या सशक्त मनाच्या गोष्टींचा जरुर विचार करावा आणि जीवन समृद्ध करावे.एखादी गोष्ट जरी नकारात्मक विचार करत असेल तर तुमच्या चांगल्या विचारांमुळे ती टिकून शकत नाही आणि मग तुम्ही सातत्याने चांगल्याच गोष्टींचा विचार जीवनात अमलात आणाल हे खात्रीने तुम्ही सांगू शकताल यात शंकाच नाही. © व्यंकटेश काटकर,नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🌱🌸🌱🌸🌱🌸🌱🌸 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *लहानसे घर* सुप्रसिद्ध तत्ववेत्ता सॉक्रेटीस याने आपल्यासाठी एक अतिशय लहान घर बांधले.त्या घराचा तो लहान आकार पाहून त्याच्या एका ओळखीच्या माणसाने त्याला विचारले, "काय हो सॉक्रेटीस ? तुमचा मित्रपरिवार तर बराच मोठा आहे; मग तुम्ही एवढं छोटंसं का बांधलत ?' सॉक्रेटीस म्हणाला, 'बाबा रे ! माझे मित्र दिसायला बरेच असले, तरी प्रत्यक्षात ज्यांना सच्चे मित्र म्हणता येतील असे मित्र मला फारच थोडे आहेत. मी मोठं घर बांधलं असतं तर काय झालं असतं ? माझे सगळे सच्चे मित्र जरी एकाच वेळी घरात आले असते, तरी ते बरंचसं रिकामं राहिलं असतं. मग तूच मला विचारलं असतंस, 'हे काय ? तुमचे एवढेच मित्र ? सगळे मित्र येऊनही, तुमचं घर रिकामंच राहिलेलं दिसतयं !''पण आता मी घर एकदम लहान बांधल्यामुळं, त्या माझ्या थोडया मित्रांच्या येण्यानंही माझं घर पूर्णपणे भरुन जाईल, आणि तसं ते भरलेलं पाहून, तू मला म्हणशील, 'अरे वा !तुमचे मित्र बरेच आहेत की हो, तुमचं घर कसं अगदी भरुन गेलंय !' आणि बर घर जरी लहान असले तरी मन मात्र मोठ असाव हे ही तितकेच खरयं. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 09/08/2019 वार - शुक्रवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ★ *क्रांती दिन* ★ *आदिवासी दिन* ★ 💥 ठळक घडामोडी :- ◆१९२५ - भारतीय स्वातंत्र्यलढ्यातल खनौजवळ काकोरी येथे रेल्वेगाडीची लूट 💥 जन्म :- ◆१९०९ - विनायक कृष्ण (व्ही.के.) गोकाक, कानडीभाषेतील लेखक ◆१९११ - खुरशेद मेहेरहोमजी, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- ◆१९६२ - हर्मान हेस, नोबेल पारितोषिक विजेता जर्मन लेखक. ◆१९६७ - ज्यो ऑर्टन, इंग्लिश लेखक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *नव्या उपायांनी काश्मीर पुन्हा नंदनवन होईल; अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी दिली तसेच एकजुटीने साथ देण्याचे देशवासीयांना केले आवाहन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *पुणे : पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे पाच जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली असून कोल्हापूर आणि सांगलीतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर मराठवाड्यातील औरंगाबाद, अमरावती विभागात पाण्याचा ठणठणाट* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *मुंबई : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम म्हणून आज पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात अतिवृष्टी होईल, असा इशारा भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिला आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *विदर्भालाही पावसानं झोडपलं, गडचिरोलीतील भामरागडला पुराचा वेढा तर अमरावतीतील दोन नद्या पात्राबाहेर, बैरागढ परिसरातील 27 गावांचा संपर्क तुटला* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी ‘भारतरत्न’ने सन्मानित; नानाजी देशभुख, भूपेन हजारिका यांचाही मरणोत्तर गौरव* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *निवृत्तीच्या उंबरठ्यावरील अधिकाऱ्यांना निवडणुकीसंबंधी नियुक्ती नाही; निवडणूक आयोगाचे आदेश, तीन वर्षे पूर्ण झालेल्यां अधिकाऱ्यांच्या होणार बदल्या* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣*मुंबई : गणेशोत्सव काळात शाळांना पाच दिवसांची सुट्टी जाहीर करावी आणि या काळात विद्यार्थ्यांच्या कोणत्याही लेखी अथवा तोंडी परीक्षा घेण्यात येऊ नयेत, असे निर्देश शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी मुंबई उपसंचालकांना दिले आहेत.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *बोधकथा : बगळ्याचा ढोंगीपणा* ही कथा audio मध्ये ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे. https://b.sharechat.com/dNhXP0z2ZY बोधकथा ऐकून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ निवेदक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *अणू म्हणजे काय ?* 📙 अणू म्हणजे मूलतत्त्वाचा सर्वात लहान कण. अणुबद्दल अनेक पुस्तकातून, अनेक अभ्यासक्रमांतून, अनेक वेळा आपण शिकत आलो आहोतच. मग येथे वेगळे ते काय वाचायचे ? अणूचे अंतरंग केंद्रकाने बनलेले असते, हे माहित आहेच, पण हे केंद्र किती छोटे असावे ? एखाद्या शाळेच्या हॉलमध्ये मध्यभागी एखाद्या साखरेचा दाणा तरंगत ठेवला तर तो म्हणजे केंद्रक व हॉलचा बाह्यभाग व भिंती म्हणजे इलेक्ट्रॉनचा फिरण्याचा परीघ होय. एवढ्यावरच ही तुलना थांबत नाही. बॉलपेनचा शाईचा एक ठिपका कागदावर उमटवा. या ठिपक्यामध्ये किती अणू मावतील, असे बघितले तर आकडा येतो चार अब्जाचा. म्हणजेच या चार अब्जांतील एकाचे केंद्र किती छोटे असेल ? पण या अणूचे सर्व वजन मात्र या केंद्रकातच सामावलेले असते. इलेक्ट्रॉन प्रचंड गतीने फिरत असतात. या केंद्रकातील प्रोटॉनची संख्या आणि केंद्रकाभोवती घिरट्या घालणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या समान असल्याने विजेने भारलेल्या कणांचा बनलेला असूनही एकूण भार शून्य असल्याने अणु विद्युतदृष्ट्या उदासीन असतो. निसर्गात दिसणारी विविधता विविध प्रकारच्या अणूंच्या संयोगाने येते. उण्यापुऱ्या पन्नास मूळ अक्षरांतून सारे साहित्य निर्माण होते, तसेच हे अणू किती गतिमान आहेत, यावर पदार्थाची घन, द्रव, वायू वैगरे अवस्था ठरते. हायड्रोजन सर्वात हलका, युरेनियम खूपच जड; पण या दोघांचे अणूचे आकार मात्र सारखेच असतात. खरे म्हणजे जगातील जी काही शंभरच्या आसपास आढळणारी मुलद्रव्ये आहेत, त्या सर्वांच्या अणूचे आकार सारखेच असतात. फरक असतो तो त्यांच्या केंद्रकात असलेल्या न्यूट्रॉनचा व प्रोटाॅनच्या संख्येत. प्रोटॉनच्या संख्येएवढी त्यांच्याभोवती फिरणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या असते. पण हे प्रोटॉन व न्यूट्रॉन इलेक्ट्रॉनपेक्षा प्रत्येकी जवळजवळ दोन हजार पटींनी जास्त जड असतात. हायड्रोजनचा अणू सर्वात हलका, पण त्यात फक्त एक प्रोटॉनच असतो. पण नेमका त्याच आकाराचा युरेनियम घेतला तर त्यात ९२ प्रोटॉन व ९२ न्यूट्रॉन असतात. म्हणून तो विलक्षण जड होतो. मुलद्रव्ये मोजकीच आहेत. पण मग अनेकदा युरेनियमसारख्या मूलद्रव्याच्या संज्ञेपुढे विविध आकडे असलेले वाचायला मिळतात. मूलद्रव्यातील प्रोटाॅनचा आकडा हा त्याचा अणुक्रमांक सांगतो. पण एकाच मूलद्रव्याच्या अणूच्या प्रोटाॅनची संख्या तीच राहून न्यूट्रॉनची संख्या वेगवेगळी असलेले प्रवाह असू शकतात. त्यांना 'आयसोटोप' असे म्हटले जाते. प्रोटॉन व न्यूट्रॉनची बेरीज म्हणजे आयसोटोप्सचा आकडा येतो. असाच प्रकार रेडियम, क्लोरिन, आयोडिन इत्यादी बहुसंख्य मुलद्रव्यांबाबत आढळतो. सारे जग अशा या अणूंपासूनच बनलेले आहे. अगदी आपले सारे शरीरसुद्धा ! *सृष्टी विज्ञानगाथा या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *“ कामात मग्न असणाऱ्यांना अश्रू ढाळायला वेळ मिळत नाही. ”* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *ग्रामसेवकाची नेमणूक कोण करतो ?* मुख्य कार्यकारी अधिकारी ( C E O ) 2) *पंचायत समिती सदस्यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?* 5 3) *जिल्हा परिषदेच्या लोकनियुक्त प्रमुखास काय म्हणतात ?* अध्यक्ष 4) *महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते ?* गंगापूर ( नाशिक ) 5) *राष्ट्रपतीपद भूषवणारी पहिली महाराष्ट्रीय व्यक्ती कोण ?* मा. प्रतिभाताई पाटील *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ●  शिवाजी अंबुलगेकर ●  विलास कोळनूरकर ●  व्यंकटेश पुलकंठवार ● उषाताई रहांगडाले तिरोडा ●  पल्लवी साईनाथ यम्मेवार ●  बालाजी तेलंग ●  समाधान बोरुडे ●  जयदीप पैठणे ●  अशोक ईबीतवार ● राहुलराज वाघमारे ● सुशीलकुमार भालके ● ऋषिकेश जाधव ● सुरज कोकुलवार ● विलास पाटील करखेलीकर ● महेश सैद ● विनायक कुंटेवाड ● गणेश पांचाळ *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जगात प्रचंड विविधता आहे. किंबहुना, विविधता हेच जगाचे सौंदर्य आहे. तीच मानवतेची ताकद आहे; परंतु दुर्दैवाने विविधता आणि विषमता यातील फरक लक्षात न घेतल्यामुळे मानवा-मानवांत जात, पात, धर्म, पंथ यावरून गटतट पडले आहेत. समाजाला एकत्र ठेवण्याऐवजी, मतलबी मंडळींनी स्वार्थासाठी समाजात भांडणे लावून दिली आहेत. त्यातून अतिरेकी विचाराची माणसे निर्माण झाली आहेत. त्यातून हिंसाचार वाढीला लागला आहे. विवेकाचा आवाज दाबला जात आहे. सज्जनांची पीछेहाट आणि दुर्जनांचा विजय होताना दिसत आहे.* *भारताला साधुसंतांचा देश म्हटले जाते. प्रचंड मोठी सांस्कृतिक परंपरा असलेला भारतीय माणूस मूलत: विचारी आहे. त्यामुळे फोलपट बाजूला ठेवून सार ग्रहण करणे त्याला सहज शक्य आहे. दोन धर्मांच्या तत्वज्ञानात अंतर असू शकते. धर्माच्या भाषा वेगवेगळ्या असू शकतात; परंतु कोणत्याही धर्माचा हेतू वाईट असू शकत नाही. रजनीश एकदा म्हटले होते, की, इश्क, प्रेम आणि अहिंसा हे एकाच मनोवृत्तीसाठी वापरलेले वेगवेगळे शब्द आहेत. वरवर विचार करणा-याला ते पटत नाही; पण खोलवर विचार केला असता हे पटायला लागते. आपल्या शरीराची ठेवण अलग अलग असू शकते, भाषा वेगवेगळ्या असू शकतात, परंतु आपल्या ह्रदयाची ठेवण, रक्ताचा रंग हे मात्र एकच असते. हे आपण पक्के ध्यानात ठेवायला हवे. मनुष्यजन्म दुर्मिळ आहे, त्याचा सदुपयोग करायला हवा.* *॥ रामकृष्णहरी ॥* 🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो,* *समस्या आहे म्हणून उपाय सुचतात,* *उपाय आहे म्हणून मनुष्य जीवन* *सुखी आहे.मग संघर्ष *करून* *उपाय करायचा की गप्प** *बसून अपाय करून घ्यायचा* *ते आपल्या हाती आहे.* *बच्चनचे एक गाणे आहे--घरमे है* *प्रॉब्लेम, बाहरभी प्रॉब्लेम,* *अंदर,बाहर,आजू ,बाजू प्रॉब्लेम ही* *प्रॉब्लेम, मग चलातर* *आज एक नवीन धडा शिकूया.* *आपल्याला कुणी काहीही देऊद्या, शिव्या,शाप, दुवा,तिरस्कार ,चुपचाप स्वीकार करा, भले तो दगड* *विटा फेकून मारत* *असला तरी,* *🤝🏻प्रत्येक गोष्टीपासून एक सकारात्मक* *ऊर्जा घेऊन* *आयुष्याची भक्कम इमारत त्यातून* *उभी करूया,* *प्रत्येक गोष्टींचा कलेने वापर असा* *करा की मारून फेकणारा* *ही* *एक दिवस तुम्हालाच मुजरा करेल,* *अशोक कुमावत* *(राष्ट्रपती पुरस्कार विजेते*) *इगतपुरी,मो नं 9881856327* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• तुमची वाणी स्पष्ट, चारित्र्य पवित्र , जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आणि जीवन व्यवहार चोख असतील तर तुम्ही इतरांच्या हृदयावर साम्राज्य सहजपणे करु शकाल. अन्यथा ह्या गोष्टी तुमच्या जीवनात नसतील तर तुम्हाला मनुष्य म्हणून जगण्याचा अधिकारही राहणार नाही.आपण मनुष्य म्हणून जन्माला आलो आणि मनुष्य म्हणूनच जगणार आहोत हा विचार समोर ठेवून जगण्यासाठी वरील महत्वाच्या चार गोष्टींना जीवनात प्राधान्य द्यायलाच हवे आणि त्या गोष्टी सहज करता येऊ शकतात. सुरुवातीला कठीण जाईल एकदा का सराव झाला की,मग आपोआपच व्हायला लागतात. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *बगळ्याचा ढोंगीपणा* उन्हाळा वाढत चालला होता. नद्या, नाले, ओढे, डोंगरावरून पडणारे ओहोळ कोरडे पडू लागले. रानातील गवत सुकले. पाणथळ जागेच्या आश्रयाने पक्षी घरटी बांधू लागले. एक बगळा झाडाच्या शेंड्यावर बसला होता. सूर्य मावळत होता. बगळ्याची नजर दूरवर असलेल्या एका तळ्याकडे लागली होती. तळ्यात खूप मासे फिरत असलेले त्याला दिसत होते. आपल्याला ते कसे मिळतील या विचारात असता सूर्यास्त झाला. झाडावरच तो झोपी गेला. सकाळ झाली तशी बगळा उठला. पंख पसरून उडत उडत तो तळ्याकाठी आला. एकेक पाऊल टाकीत तो तळ्यात उतरला. एक पाय उचलून, चोच वर करून त्याने डोळे मिटले व "राम राम" म्हणू लागला. तळ्यात शिरता क्षणी काठावरचे मासे सुळकन तळ्यात गेले. थोड्यावेळाने एक बारीक मासा त्याच्याजवळ आला व धिटाईने त्याला म्हणाला, " अहो बगळेबुवा, तुम्ही आम्हाला खात कसे नाही?" त्यावर बगळा म्हणाला, "अरे, आता मी मासे खाणे सोडून दिले. मी फक्त पाण्यात उभे राहून ध्यान करतो व तोंडाने "राम राम" म्हणतो. बगळा आपल्याला खात नाही असे बघून मासे धीट झाले. ते त्याच्याजवळून पोहू लागले. काही दिवसांनी तो माश्यांना म्हणाला, "तुम्हाला माहीत आहे का? उन्हाळा वाढतो आहे. या तळ्याचे पाणी आटणार, मग तुमचे कसे होणार?" मग आम्ही जायचे कोठे? एक मासा म्हणाला. त्यावर बगळा म्हणाला, " माझे लक्ष आहे. या डोंगरापलीकडे एक मोठे तळे आहे. त्यात खूप पाणी आहे. लाटांवर लाटा उसळत असतात. त्यात मासे आहेत, कासवे आहेत, बेडूक आहेत. पण! "पण म्हणजे?" मासे म्हणाले. "तुम्ही त्या तळ्यात कसे जाणार? मी तुम्हाला तिकडे नेऊ शकेन, पण एका वेळी फक्त चौघांना. याल तुम्ही?" बगळा म्हणाला. "हो हो. आम्ही नक्की येऊ." मासे म्हणाले. दुसरे दिवशी बगळा तळ्यात उतरला. त्याच्या भोवती मासे जमले. त्याने आपल्या चोचीत चार मासे घेतले व तो आकाशातून उडत उडत जाऊ लागला. गाव ओलांडले, ओढा पार केला व डोंगर माथ्यावर आला. तो हळूहळू खाली उतरू लागला. मासे म्हणाले , "बगळेबुवा, आपले तळे कुठे आहे?" तशी बगळा म्हणाला, "कुठचे तळे, आणी कुठचे पाणी. मी आता तुम्हाला खाणार आहे." असे म्हणून त्याने एकेक मासा खडकावर आपटून खाऊन टाकला. उंच झाडावर बसून फांदीला आपली चोच पुसली व सायंकाळी त्याच झाडावर झोपला. दुसऱ्या दिवशी परत चार मासे खाल्ले. असे बरेच दिवस चालले. हे सर्व एक खेकडा गवतावर बसून पाहत होता. तिरका तिरका चालत तो त्याच्या जवळ आला व त्याचा पाय पकडून म्हणाला, " बगळेबुवा, मला केंव्हा नेणार मोठ्या तळ्यात?" बगळा मनात म्हणाला, "मी रोज मासे खातो आहे. चला आज खेकडा खाऊ." खेकडा म्हणाला नेणार ना? "चल, आज तुला नेतो." बगळा म्हणाला. खेकडा त्याच्या पायावरून चढत जाऊन त्याच्या पाठीवर बसला. त्याला घेऊन बगळा उडाला व नेहमीप्रमाणे डोंगरावर उतरू लागला. खेकड्याने खाली पाहिले. खेकड्याला त्याचा डाव कळला व म्हणाला, " बगळेबुवा, हा तर डोंगर आहे." त्यावर बगळा हसला व म्हणाला," कुठचे तळे व कुठचे पाणी. आता मी तुला खाणार आहे." खेकडा त्याच्या मानेवर उतरला व म्हणाला, "बऱ्या बोलानं मला माझ्या तळ्यात नेऊन सोड. नाहीतर तुझी मान कापीन." बगळा व खेकड्यामध्ये झटापट सुरू झाली. खेकडा त्याच्या मानेवर बसल्याने त्याला काहीच करता आले नाही. खेकड्याने आपल्या नांग्या त्याच्या मानेत रुतवल्या व त्याची मान कापली. दोघेही डोंगरावर आपटले. खेकडा तिरका तिरका चालत डोंगऱ्याच्या पायथ्याशी आला व रानातून चालत चालत परत आपल्या तळ्याच्या काठापाशी आला व डुबकन पाण्यात उतरला. त्याला पाहून मासे त्याच्या भोवती गोळा झाले. खेकडा माशांना म्हणाला, "अरे, तो बगळा पक्का ढोंगी होता. मी त्याला ठार मारले आहे. कितीही उन्हाळा वाढला तरी या तळ्यातील पाणी आटणार नाही. या तळ्यात भरपूर पाणी आहे." अशा रितीने बाकीचे मासे त्या तळ्यात पुन्हा आनंदाने नांदू लागले.तळ्यात माशांचा आनंद पाहून खेकडाही खूप आनंदी झाला आणि मनात म्हणाला बर झाल तो ढोंगी बगळा मेला नाहीतर त्याने तळ्यात हे ही मासे ठेवले नसते. सर्व खाऊन फस्त केले असते. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 08/08/2019 वार - गुरूवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- ◆२००८- चीन मधील बीजिंग येथे २९ व्या ओलीम्पिक स्पर्धांना सुरुवात. ◆१९९८-संरक्षण संशोधन आणि विकाससंस्थेच्या (DRDO)सात प्रयोगशाळा औद्योगीक क्षेत्रासाठी खुल्या झाल्या. ◆१९४९ - भुतानच्या राष्ट्राची स्थापना. ◆१९६३ - इंग्लंडच्या बकिंगहॅमशायर काउंटीत दरोडेखोरांनी रेल्वेतून २६,००,००० ब्रिटीश पाउंड लुटले. 💥 जन्म :- ◆१९३२-दादा कोंडके,अभिनेते,निर्माते. ◆ १९२१ - वुलिमिरी रामलिंगस्वामी, भारतीय वैद्यकीयशास्त्रज्ञ. ◆ १९४० - दिलीप सरदेसाई, भारतीय क्रिकेट खेळाडू. ◆१९५२ - सुधाकर राव, भारतीय क्रिकेट खेळाडू. ◆१९६८ - अबेय कुरूविला, भारतीय क्रिकेट खेळाडू. ◆ १९८१-रॉजर फेडरर ,स्विस लान टेनिस खिलाळू. 💥 मृत्यू :- ●१९९९-गजानन नरहर सरपोतदार ,चित्रपट निर्माते व दिग्दर्शक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *राज्यातील पूरग्रस्तांना तातडीनं मदत करा, मुख्यमंत्र्यांच्या सूचना, महाजनादेश यात्रा सोडून मंत्रिमंडळ बैठकीला हजेरी, एनडीआरएफ आणि नौदल-लष्कराकडून युद्धपातळीवर बचावकार्य* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *तब्बल 28 वर्षांनंतर होऊ घातलेल्या महाविद्यालयीन निवडणुका पुढे ढकलण्याचा राज्य सरकारचा निर्णय, विधानसभा निवडणुकीनंतर होणार निवडणुका* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *अयोध्येतील वादग्रस्त जमिनीच्या दस्तावेजाची सर्वोच्च न्यायालयाकडून मागणी, तर 1982तील दरोड्यात सर्व दस्तावेज चोरीला गेल्याचा निर्मोही आखाड्याचा दावा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *विद्यावेतन वाढीच्या मागणीसाठी मार्डचे डॉक्टर संपावर, 16 वैद्यकीय महाविद्यालयातील, साडेचार हजार डॉक्टर संपात सहभागी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *सलग चौथ्यांदा रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात 0.35 टक्क्यांपर्यंत कपात, कर्जावरील हफ्ते स्वस्त होणार, कर्जदारांना मोठा दिलासा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *कोल्हापूर आणि सांगलीतील पुराचा मुंबईकरांना फटका, पुरामुळे ठप्प झालेल्या वाहतुकीमुळे मुंबईकरांना मिळणार नाही दूध* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज अनंतात विलीन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, लालकृष्ण अडवाणींसह दिग्गज नेते गहिवरले* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जय जवान, जय किसान* शेतीमध्ये काम करणाऱ्या लोकांची संख्या देखील भरमसाठ होती. त्या काळी उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी समजल्या जायचे. कामाच्या मोबदल्यात धान्य देण्याची त्या काळाची प्रथा सर्वाना सोईस्कर होती. म्हणूनच शेतीकाम करणाऱ्या लोकांना मान सन्मान मिळत होता. आत्महत्या म्हणजे काय असते हे तेंव्हाच्या शेतकऱ्यांना मुळी ओळखीचे नव्हते. यावरून आपण अंदाज बांधू शकतो की, किती चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना अच्छे दिन होते. .......... खालील ब्लॉगवर पूर्ण लेख वाचन करता येईल. https://nasayeotikar.blogspot.com/2018/03/blog-post_24.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया whatsapp करावे ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ संकलन  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *आपल्या शरीरात किती हाडे आहेत ?* 📙 या प्रश्नाचं उत्तर कोणताही शाळकरी विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी देऊ शकेल. कारण त्यांच्या पाठ्यपुस्तकात शरीरातल्या एकूण हाडांची संख्या दिलेली असते. ती आहे २०६. ते उत्तर तसं बरोबरही आहे. ते संपूर्णतया अचूक आहे असं मात्र म्हणता येणार नाही. कारण आपण जन्मतो तेव्हाची संख्या मोजली तर त ती सहज ३०० ते ३५० भरेल. जसजसं मूल वाढू लागतं तसतशी यातली काही हाडं एकमेकांमध्ये मिसळून जातात. ती अशी जोडली जातात, की त्यांचं आता एकच एक एकसंध हाड बनतं. आपल्या कवटीच्या हाडांमध्ये ही प्रक्रिया मोठ्या प्रमाणात दिसून येते. मेंदूला संरक्षण देणारा जो कवटीचा भाग असतो त्यात जन्मतः २२ हाडं असतात. मूल चार वर्षांचं होईपर्यंत यातली बरीचशी एकमेकांशी सांधली जाऊन प्रौढ व्यक्तीच्या डोक्याच्या कवटीत फक्त आठ हाडं राहतात. आपल्या कंबरेच्या हातातही अशी सांधेजोड होत राहते. सरासरीने चार वर्षांवरील व्यक्तीच्या शरीरात २०६ हाडं राहतात. याला अर्थात काही अपवाद जरूर आहेत. काहीजणांच्या शरीरात अतिरिक्त फासळ्या असतात. त्याच्या छातीतला पिंजरा अधिक हाडांचा बनलेला असतो. काहीजणांच्या हाताला किंवा पायाला किंवा दोन्हींनाही सहा सहा बोटं असतात. त्यांच्या हाडांची संख्या साहजिकच जास्त भरते. काही जणांच्या मणक्यातही जास्त हाडं असतात. आपल्या हातांमध्ये आणि पायांमध्ये सर्वात जास्त हाडं असतात. एका बोटामध्ये तीन हाडं असतात आणि ती बोटं तळहाताला ज्या सांध्यानं जोडली जातात त्यात आणखी. त्यामुळे एका हातात किंवा पायात ३०-३० हाडं असतात. म्हणजे या चार अवयवांचीच मिळून १२० हाडं होतात. छातीच्या पिंजऱ्यातल्या २४ फासळ्या आणि त्यांना जोडणारं मधलं छातीचं हाड मिळून २५ होतात. तीच गत मणक्याची. माकडहाडापासून ते मानेपर्यंत एकूण २६ मणके असतात. म्हणजे यांचीच मिळून बहुतेक संख्या होते. बाकी मग फुटकळ पण महत्त्वाची हाडं आहेत. शरीरातलं सर्वात जास्त लांब हाड असतं मांडीचं. ते आपल्या एकूण उंचीच्या पावपट असतं. सर्वात लहान हाड आपल्या कानातलं. ते असतं केवळ २.५ मिलीमीटर लांबीचं; पण आपल्या कानाच्या पडद्यांवर तरंग उमटवण्याची फार मोठी भूमिका ते पार पाडतं. त्याच्याशिवाय आपल्याला ऐकूच येणार नाही. गंमत म्हणजे जिराफाची मान आपल्या मानेच्या दसपट लांब असली तरी दोन्हींमध्ये हाडांची एकूण संख्या सारखीच आहे. *डाॅ. बाळ फोंडके यांच्या 'किती ?' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" यशाची गुरुकिल्ली म्हणजे स्वतःला ओळखणे "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *राष्ट्रगीतात एकूण शब्द किती आहेत ?* 47 2) *भारतातील सर्वात जास्त साक्षरता असलेले राज्य कोणते ?* केरळ 3) *ग्रामपंचायतीचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?* 5 4) *ग्रामपंचायतीचा सभांचा अध्यक्ष कोण असतो ?* सरपंच 5) *पंचायत समितीचा प्रमुख प्रशासकीय अधिकारी कोण असतो ?* गट विकास अधिकारी ( B D O ) *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ●  अरुण वि. देशपांडे, पुणे ●  गजानन सावंत ●  संतोष हसगुंडे ●  चंदू नागुल ●  अवधूत पाटील सालेगावकर ●  बळीराम शिवाजी खांडरे ●  शिलानंद बुद्धेवार ●  बालाप्रसाद सूर्यवंशी ● रावजी मारोती बोडके ● रवी वाघमारे ● संतोष वाधवे ● लक्ष्मण कामशेट्टी ● नागेश कानगुलवार ● ऋषिकेश सोनकांबळे ● देवण्णा पाशावार ● अतुल उदाडे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *संत तुकाराम महाराज यांचा अतिशय सोपा दिसणारा अभंग आहे,'बोले तैसा चाले । त्याची वंदीन पाऊले ॥' येथे तुकोबा एक खूप मोठं मानसशास्त्रीय गूढ कमीत कमी शब्दांत उकलून देत आहेत. जसे बोलतो तसेच वागणारा माणूस भेटला तर त्याला मी वंदन करीन, असे तुकोबा म्हणतात. म्हणजे अशी माणसे दुर्मिळ आहेत का ? असा प्रश्न पडतो. माणसाचे आचरण त्याच्या चारित्र्याशी विसंगत असेल तर असण्यात आणि भासवण्यात एक दरी निर्माण होते. आपण ज्यांना चांगली माणसं म्हणतो त्यांच्याही असण्यात आणि दाखवण्यात व्यक्तिमत्वात दरी असतेच.* *असण्याच्या आणि भासवण्याच्या मध्ये केवढी दरी आहे हे पाहिले पाहिजे. ती जेवढी मोठी तेवढा माणूस लहान आणि ती जेवढी लहान तेवढा माणूस मोठा, असे एक समीकरण मांडता येईल. असे होण्याच्या मागे एक बाह्य कारण आहे. आपल्या कृतीचे समर्थन करणे ही मानवाची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. अगदी गुन्हेगारही गुन्हा का करावा लागला याचं समर्थन करत असतो. म्हणूनच मग 'बोले तैसा चाले' अशी व्यक्ती दुर्मिळ असते. आणि अशी व्यक्ती सापडलीच तर तो परीस असतो, तो इतरांचेही सोने करू शकतो.* *॥ रामकृष्णहरी ॥* 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो* *बहिणाबाई नात्याबद्दल खूप छान* *सांगतात---जीची माया गेली* *सरी, तिले माय म्हणू नये,* *जन्मदात्याले भोवला त्याले लेक म्हणू* *नये।तसेच सुगरणीच आहे,* *खोपा इनला इनला जसा गिलक्याचा* *कोसा,* *पाखराची कारागिरी जरा देखरे* *माणसा।* *माणसाने माणसाजवळ यावं हे* *धर्म शिकवतो.* *ही* *माणसं जवळ आली की वेगवेगळी* *नाती तयार होतात.* *माझी एकच विनंती आहे, हे नाते* *विणतांना सुगरणी सारखी* *मायेची गुंफण घाला बघा मग त्याला* *काळालाही उसवण* *सहजासहजी जमणार नाही,मग ते* *नाते कोणतेही असूदया,* *एक गोष्ट नक्की ते फक्त तुमच्या* *आणि तुमच्याच स्वतःच्या* *हाती आहे.* *अशोक कुमावत* *(राष्ट्रपती पुरस्कार विजेते*) 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• या जगात आतापर्यंत विद्वान माणसे शरीराने जरी या जगातून गेली असली तरी ती आपल्या विचारांनी अमरच झालेली आहेत.कारण त्यांचे विचार हे सर्वसामान्य माणसेही आपल्या जीवनात आदर्श विचार मानून त्या विचारांच्या मार्गावरुन चालतात म्हणजे विचार रुपाने ते सदैव आपल्या जीवनात पाठराखण करत असतात.म्हणतात ना ' मरावे परी कीर्तीरुपी उरावे ' म्हणजेच विद्वान माणसे आपल्या जीवनात सदैव आपल्या विचारांच्या,कार्याच्यारुपाने आपल्यामध्येच असतात हे ध्यानात ठेवून आपणही त्यांचा मार्ग अनुसरावा म्हणजे आपणासही विचाररुपी अमरत्व प्राप्त होईल. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद..9421839590/ 8087917063. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *प्रयत्नांची मर्यादा* एका शिकारी कुत्र्याने एका सशाचा पाठलाग सुरू केला. पण अखेर ससा पळून जाण्यात यशस्वी झाला. ते पाहून त्या कुत्र्याच्या मालकाने त्याला विचारले, ' एका सशाने पळण्यात तुला हरवावे?' यावर तो कुत्रा म्हणाला, " धनी , माझे धावणे हे पोटासाठी शिकार मिळविण्याकरिता होते, तर त्या सशाचे धावणे हे स्वतःचा जीव वाचविण्यासाठी होते. तेव्हा त्याची गती माझ्या गतीपेक्षा अधिक असणे हे सहाजिकच नाही का?" तो ससा त्याचा जीव वाचविण्यासाठी धावणारच हा त्याचा जीवाचा प्रश्न आहे हे त्याला कळून चुकले आणि तो अतोनात प्रयत्न करणार. *तात्पर्यः जेव्हा एखाद्याच्या जीवावर बेतते तेव्हा आलेल्या प्रसंगातून स्वतःला वाचविण्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांना मर्यादा नसते.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 07/08/2019 वार - बुधवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- ◆ *राष्ट्रीय हातमाग उद्योग दिन* ◆ *स्वातंत्र्य दिन - कोट दि आयव्होर* ◆ *मुक्ती दिन - टर्क्स व कैकोस द्वीप* ● १९७६ - व्हायकिंग २ हे अंतराळयान मंगळाच्या कक्षेत आले. ● १९९१ - सामान्य माणसांना वर्ल्ड वाइड वेब उपलब्ध. 💥 जन्म :- ●१९२५ - एम.एस. स्वामीनाथन, भारतीय शेतीतज्ञ. ●१९६६ - जिमी वेल्स, विकिपिडीयाचा स्थापक. 💥 *मृत्यू* :- ●१९४१ - रवींद्रनाथ टागोर, बंगाली कवी, लेखक, नोबेल पारितोषिक विजेता. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *मुसळधार पावसामुळे कोल्हापूरमध्ये पूरस्थिती, कुठे वीजपुरवठा तर कुठे पाणीपुरवठा बंद, पंचगंगा नदीची पाणीपातळी 50 फूट 9 इंचांवर, सांगलीमध्ये कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ, कराडमध्ये जमावबंदी तर साताऱ्यात सलग तिसऱ्या दिवशी शाळांना सुट्टी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटविण्याचे प्रस्तावित विधेयक सोमवारी राज्यसभेत करण्यात आले मंजूर* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांचे दिल्लीत झाले निधन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेला किल्ले शिवनेरीवरुन सुरुवात, पहिल्याच दिवशी 'शिवस्वराज्य' यात्रेत गटबाजीचं राजकारण असल्याचं चित्र* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *बाळासाहेब ठाकरेंच्या राष्ट्रीय स्मारकासाठी महापौर निवासस्थानापाठोपाठ 362 चौरस मीटरचा आणखी एक भूखंड आंदण, महापालिका सुधार समितीचं शिक्कामोर्तब* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *श्रीनगर - राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी घेतली जम्मू-काश्मीरचे राज्यपाल व्ही. पी. मलिक यांची भेट* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *नवी दिल्ली : भारताच्या प्रशिक्षकपदी रवी शास्त्री हेच कायम राहणार असल्याचे वृत्त पुढे येत आहे. काही प्रसारमाध्यमांना सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयची सल्लागार समिती शास्त्री यांच्याकडेच प्रशिक्षकपदाची धुरा सोपवणार असल्याचे म्हटले जात आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *राष्ट्रीय हातमाग दिवस* ज्याचे काम त्या॑नी करावे जसे की वारकांनी केस कापावी, वरटी लोकानी कपडे धूवावी ,चांभारानी चपला शिवाव्यात ,गुरवानी मंदिरांची देखभाल करावी, कुनब्यानी शेती करावी,  साळयानी कपडे विणावी आणि रंगारी लोकानी त्यास रंग लावावी ही पद्धत लोकाना स्वावलंबी जीवन जगवायला शिकवायचे . मात्र इंग्रजानी भारतात व्यापार करण्यासाठी म्हणून आले आणि हळूहळू पाय पसरवीत संपूर्ण देशावर आपले वर्चस्व निर्माण केले. कपड्यांचा बाबतीत भारत हा स्वयंपूर्ण व संपन्न देश होता कारण येथील लोक फारच सुंदर कलाकूसर करून कपडे तयार करीत असत. आजही खादीचा कापड भारतात प्रसिद्ध आहे ......... पूर्ण लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे. https://nasayeotikar.blogspot.com/2018/08/blog-post.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌎 *पृथ्वीवर एकूण किती पाणी आहे ?* 🌎 ऊर्जेच्या बाबतीत विज्ञान आपल्याला सांगतं की ती कायमस्वरूपी आहे. तिचा नाशही होत नाही की ती निर्माणही केली जाऊ शकत नाही. फक्त तिचं स्वरूप तेवढं बदलत राहतं. जगातल्या पाण्याच्या साठ्याबाबतही तेच म्हणता येईल. तोही कायमस्वरूपी आहे. तो नव्यानं निर्माण केला जाऊ शकत नाही की त्याचा नाशही होत नाही. फक्त त्याचं स्वरूप बदलत राहतं; आणि हे सतत बदलत असतं. त्यामुळे जगात पाण्याचं एक चक्र निर्माण झालेलं आहे. ते या धरतीवर सजीवसृष्टी तगून राहायला मदत करत आहे. हा साठा किती आहे याचा विचार केला तर भोवंडून जायला होतं. धरतीवर भूभागापेक्षा जास्त भाग पाण्याने व्यापलेला आहे. जगात एकूण १२६ कोटी अब्ज लिटर पाणी आहे. म्हणजेच कितीतरी आहे. यातला जवळजवळ ७० टक्के हिस्सा महासागरांमध्ये आहे. ध्रुवप्रदेश तसंच उंचावरच्या हिमनद्यांमध्ये गोठलेल्या स्वरूपातही पुष्कळ पाणी आहे. तरीही आपण नेहमी पाण्याची चणचण आहे, टंचाई आहे, पाणी कपात करावी लागणार आहे, असं का ऐकत असतो ? त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे, या एकूण पाण्यापैकी केवळ ३ टक्के पाणीच गोडं आहे. म्हणजेच साडेतीन चार कोटी अब्ज पाणी गोडं आहे. तेही पुष्कळ आहे; पण गोडं आहे याचा अर्थ ते सरळंच पिण्यायोग्य आहे असं नाही. कारण आपण हे नदी, तलाव यांच्यामधलं गोडं पाणी सतत प्रदूषित करत असतो, त्यामुळे ते पिण्यायोग्य राहत नाही. निसर्ग हे प्रदूषित पाणी परत शुद्ध करून पिण्यायोग्य कर करतच असतो. त्यालाच आपण जलचक्र म्हणतो. म्हणजे या पाण्याची वाफ होऊन ती आकाशात जाते. ती परत पावसाच्या रूपात शुद्ध पाणी होऊन जमिनीवर येते; पण हे पावसाचं पाणीही आपण व्यवस्थित साठवून ठेवण्याचा प्रयत्न करत नाही. जे साठवलं जातं तेही निष्काळजीपणे वापरून परत प्रदूषित करत असतो. केवळ निसर्गावर अवलंबून न राहता हे प्रदूषित पाणी शुद्ध करून पिण्यायोग्य करण्याचे खंबीर उपाय आपण करत नाही. ते केल्यास पिण्यायोग्य गोड्या पाण्याचा साठा वाढेल. निसर्गानं जेवढं गोडं पाणी उपलब्ध करून दिलं आहे तेवढेही आपण परत पूर्ण केलं तरी आपली पाण्याची गरज नीट भागू शकेल. *डाॅ. बाळ फोंडके यांच्या 'किती ?' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *Prayer is the voice of faith.* *( प्रार्थना हे श्रद्धेचा आवाज आहे. )* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *गंगा नदीचा उगम कोठे झाला ?* गंगोत्री 2) *महाराष्ट्रातील पहिला साक्षर जिल्हा कोणता ?* सिंधुदुर्ग 3) *एव्हरेस्ट शिखर सर करणारा पहिला महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण ?* सुरेंद्र चव्हाण 4) *तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोठे आहे ?* नंदूरबार 5) *उत्तरप्रदेश या राज्याची राजधानी कोणती ?* लखनऊ *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ●  श्रीनिवास मस्के, साहित्यिक ●  दत्ता डांगे, प्रकाशक ●  मनोज रापतवार ●  रवींद्र चातरमल ●  सिद्धार्थ शिरसे ●  मोहन हडोळे ●  मंगेश पेटेकर ●  सतीश कदम ● तुकडेदास धुमलवाड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• काहीवेळा काहींच्या बाबतीत मनुष्याचा स्वभाव समोरची परिस्थिती पाहून बदलत असतो.कधी कधी असेही वाटते की,आपण कमी वेळेत खूप काही करुन धनाढ्य व्हावे आणि आनंदाने जीवन जगावे.या वाईट मोहासाठी तो वेगवेगळ्या गैरमार्गाचा अवलंब करतो आणि संपत्ती अर्थात माया जमवण्याच्या मोहात पडतो.जी माया जमवली त्यात त्याला समाधान तर नसतेच अजूनही त्याच्यापेक्षा अधिक माया जमवण्यात वेळ खर्च करतो.परंतु हे त्याच्या लक्षात येत नाही की,आपण वाममार्गाला लागलो आहोत, दुस-याला लुटलो आहोत ही जी काही वाईट सवय लागली आहे ती आपल्या मनाला समाधान देणारी नाही.केवळ आपल्या मोहापायी, आपल्या स्वार्थासाठी इतरांच्या जीवाला त्रास देऊन आपल्या नको त्या गोष्टीच्या नादाला लागलो आणि हावरटपणाचा कहर केला. त्यामुळे आपले जीवन हे जीवन राहिले नसून आपण इतरांच्या नजरेत एक गुन्हेगार ठरलो आहोत आणि ते ही आपल्या स्वार्थी मोहापायी ? हा मोह काहीच कामाचा नाही.ज्यामुळे माणसातील माणुसकी नष्ट झाली.त्यापेक्षा मनाचा हावरटपणा सोडून द्यावा, भरपूर मेहनत करावी,आपल्या कृत्यामुळे इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी आणि आपले जीवन सुखासमाधात जावे.यापेक्षा आपल्या कोणत्याही अपेक्षा असू नयेत.हाच मंत्र चांगले जीवन जगण्यासाठी पुरेसा आहे.नाही तर नको त्या मोहात जाणे आणि आपल्याच हाताने  जीवन दु:खमय जगणे यापेक्षा जीवनाचे वाईट चित्र काय असू शकेल ? © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद.९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🏻🏻 *ज्ञान ही अशी शिदोरी आहे* *की ती माणसाला नेहमीच* *प्रत्येक क्षेत्रात एका ठराविक उंचीवर* *नेऊन ठेवते.* *अजून अस गुरुत्वाकर्षण तयार झालं* *नाही की ते ज्ञानाला* *नैसर्गिकरित्या आपल्याकडे खेचून* *घेईल.* *त्याला मिळविण्यासाठी प्रयत्न* *करावेच लागतात. एकदा मिळविले* *की कोणत्याही ब्रम्ह* *पंडितांची ताकद नाही की तो* *तुमच्याकडून हिसकावून घेईन.* *ह, एक मात्र नक्की की आता* *एकलव्य बनू नका.* *धर्माचा ,ज्ञानाचा ठेका घेतलेली* *मंडळी तुमच्या मार्गात अनंत अडचणी उभ्या करतात.* *स्वामी विवेकानंद यांना शिकागो येथे बोलण्यासाठीचे प्रमाणपत्र भारतीय* *शंकराचार्य यांनी दिले* *नाही,ते श्रीलंकेच्या बौध्द* *धर्मप्रसारक विद्वानांनी दिले.* *त्यांचे 5 मिनिटे कमी करून* *विवेकानंदांना दिले,आणि त्याच 5* *मिनिटांनी 1893 साली स्वामींनी* *जगभरात नावलौकिक* *मिळवला व आपली* *धर्म पताका जगभर* *फडकावली.* *अजूनही तो दैत्य* *उरात धडधड करतो.* *विनंती-ज्ञानाची भूक प्रचंड* *असुद्या। कुठेही, केव्हाही,कसेही* *फक्त रुचकर ज्ञान मिळेल त्याचे सेवन* *करा,नक्की सुदृढ व्हाल.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* *जि. प.शाळा--माणिकखांब,* *ता.इगतपुरी, जि. नाशिक* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *बुद्धीला व्यवहाराची जोड हवी* पाणिनि हे संस्कृतचे महान व्याकरणकार. २००० वर्षापूर्वी त्यांनी हे आश्चर्यकारक काम केले. एकदा ते शिष्यांना व्युत्पत्तिविषयी शिकवीत होते. त्यावेळी एक वाघ माणसाच्या वासाने तिथे येत होता. शिष्य घाबरून झाडावर जाऊन बसले व आचार्यांनाही ते झाडावर चढायला सांगू लागले.पण 'व्याघ्र' या शब्दाची व्युत्पत्ति शोधण्यात ते गढून गेले होते. त्यांना व्युत्पत्ती सुचलीही. *'व्या जीघ्रति इती व्याघ्रः'* म्हणजे वास घेत चालतो तो वाघ........पण झाले काय वाघाने त्यांचीच शिकार केली. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 06/08/2019 वार - मंगळवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- ◆ १९६२ - जमैकाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य. ◆ १९६६ - ब्रॅनिफ एरलाइन्स फ्लाइट २५० हे विमान नेब्रास्कातील फॉल्स सिटीजवळ पडले. ४२ ठार. 💥 जन्म :- ◆ १९७० - एम. नाइट श्यामलन, अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक. ◆ १९९० - जॉनबेनेट रामसे, अमेरिकन बालकलाकार. 💥 मृत्यू :- ◆ १९९१ - शापूर बख्तियार, इराणचा पंतप्रधान. ◆ २००२ - एड्सगर डिक्स्ट्रा, डच संगणकशास्त्रज्ञ. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *अखेर जम्मू काश्मीर, लडाख यांना केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळाला, 370 कलम रद्द* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *इजिप्तमध्ये वाहनांचा भीषण अपघात; स्फोटामुळे हॉस्पिटलला लागली आग; 20 ठार, अपघातानंतर स्फोट झाल्याने हॉस्पिटलला बसल्या झळा* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *मुंबई - राज्याची आर्थिक स्थिती खालावल्याचा पहिला फटका बसला होमगार्ड विभागाला, तब्बल ५७ पदे करण्यात आली रद्द, वित्त विभागाने काटकसरीबाबत सुचविलेल्या धोरणानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे गृह विभागातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *श्रीनगर - कलम 370 ला मंजुरी मिळताच काश्मीर खोऱ्यात मोठ्या कारवाईला झाली सुरुवात, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांना अटक करण्यात आली असून महेबूबा मुफ्ती यांच्यावरही अटकेची कारवाई करण्यात आली आहे, कायदा व सुव्यवस्था कायम राहण्यासाठी करण्यात आली कारवाई* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ * येत्या ७ व ८ ऑगस्टला कोल्हापूर, सातारा, नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा हवामान विभागाने दिला इशारा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *अ‍ॅशेस मालिका : इंग्लंडच्या दुसऱ्या डावाला नॅथन लिऑनने सहा विकेट्स घेत खिंडार पाडले आणि ऑस्ट्रेलियाने 251 धावांनी हा सामना जिंकला, स्टीव्हन स्मिथ ठरला शिल्पकार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *फलंदाजांचा कर्दनकाळ समजला जाणारा दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनने कसोटी क्रिकेटमधून जाहीर केली निवृत्ती, स्टेनने 93 कसोटी सामन्यांमध्ये 439 बळी मिळवले होते.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *एक पाऊल स्वच्छतेसाठी ......!* स्वच्छता आणि आरोग्य या दोन गोष्टी एकमेकांस पूरक आहेत. जेथे स्वच्छता असेल तेथे राहणाऱ्या लोकांचे आरोग्य देखील चांगलेच असते. मात्र आपण पाहतो की आजूबाजूला किती अस्वच्छता केली जाते. हे लोक असे का बरे वागत असतील ? याचा शोध घेतले असते असे दिसून येते की यांना शालेय जीवनात स्वच्छतेचे महत्व कोणी सांगितले नाहीत त्यामुळे ही मंडळी अशी गैरवर्तणुक करीत असतील कदाचित. म्हणून भविष्यात भारत स्वच्छ दिसावा यासाठी आजच्या शालेय मुलांना याबाबतीत माहिती देणे आवश्यक वाटते............ पूर्ण लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे......... https://nasayeotikar.blogspot.com/2018/03/blog-post_25.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌞 *सूर्याचं उर्वरित आयुष्य किती आहे ?* 🌞 सूर्य हा एक तारा असला तरी तो चिरंजीव नाही. त्याचाही एक ना एक दिवस मृत्यू होणार आहे. सूर्याचा जन्म अवकाशातील पोकळीत तयार झालेल्या एका धुलीकण आणि वायू यांच्या ढगातून - नेब्युलामधून झाला. त्याला आता जवळजवळ साडेचार अब्ज वर्षं झाली. सुरुवातीला या ढगाला रूप आकार का काहीही नव्हतं. काही लाख वर्षं उलटल्यानंतर त्या ढगामधल्या हायड्रोजन वायूनं पेट घेतला. त्याच्या अणूंचं मिलन होत त्यातून हेलियम अणूंची निर्मिती होऊ लागली. या नाभिकीय प्रक्रियेपायी सूर्य प्रचंड प्रमाणात ऊर्जा उत्सर्जित करू लागला. तो स्वयंप्रकाशित झाला. त्याचा तारा बनला. तेव्हापासून ही अणूसंमीलनाची प्रक्रिया सूर्याच्या अंतरंगात चालूच आहे. त्या ऊर्जा उत्सर्जनापायी सूर्याकडे केंद्रापसारी बल प्राप्त झाल्यामुळं ते त्याच्या केंद्रभागाकडे खेचणाऱ्या गुरुत्वाकर्षणाच्या बलाला विरोध करत सूर्याला स्थिर बनवत राहिलं आहे. सूर्याच्या अंतरंगातील हायड्रोजन वायूचा साठा अमर्यादित नाही. एक ना एक दिवस तो संपून जाईल. तसं झालं की त्याच्या अंतरंगातल्या अणुभट्ट्या विझतील. त्यानंतर त्यात साचून राहिलेलं हेलियम हे इंधन बनून त्याच्या अणूसंमीलनाची प्रक्रिया सुरू होईल. त्या वेळी सूर्याचं प्रसरण होईल. तो लाल राक्षसी तारा रेड जायंट बनेल. त्यावेळी त्याचा व्यास वाढल्यामुळे तो बुध आणि शुक्र यांना आपल्या कवेत घेईल. ते ग्रह जळून जातील. काही खगोलशास्त्रज्ञांच्या मते कदाचित आपल्या पृथ्वीचीही तीच गत होईल. हेलियमचा साठा ही कालांतराने संपुष्टात येईल. तसं झालं की परत एकदा अणूसंमीलनाच्या भट्ट्या बंद पडतील. त्या वेळी सूर्याच्या बाहेरच्या कडेवरचे पदार्थ उडून जातील आणि सूर्याचं श्वेतबटूत रूपांतर होईल. त्याच्या अंतरंगात फक्त कार्बनच असेल. एखाद्या हिर्यासारखं त्याचं स्वरूप होईल. त्यावेळी त्याचं आक्रमण आजच्या पृथ्वीइतकंच राहील. त्याच्या अंतरंगातली उष्णता त्याचा प्रकाश टिकवून ठेवील; पण अणुभट्ट्या बंद पडल्यामुळे ही उष्णता टिकून राहणार नाही. हळूहळू सूर्याचं तापमान कमी कमी होत जाईल आणि तो विझून जाईल. एक आकाशस्थ गोल म्हणून ही त्याची अखेर असेल. स्वयंप्रकाशित गोल म्हणजे तारा ही व्याख्या आपण प्रमाण मानली, तर ज्या क्षणी त्याचं श्वेतबटूत रूपांतर होईल त्याच क्षणी त्याची तारा म्हणून अखेर होईल. ही वेळ आजपासून साधारण पाच ते सात अब्ज वर्षांमध्ये येईल. अशी खगोलशास्त्रज्ञांची अटकळ आहे; पण तो संपूर्ण विझून जाईपर्यंतचा काळ ध्यानात घ्यायचा म्हटलं तर त्याची अखेर काही हजार अब्ज वर्षांनंतर होईल. *डाॅ. बाळ फोंडके यांच्या 'किती ?' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *“ श्रमातून जे फळ मिळते ते सर्व प्रकारच्या सुखात अत्यंत मधुर असते. ”* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *जगातील सर्वात उंच पर्वत कोणते ?* हिमालय 2) *जगाचे नंदनवन कोणते ?* स्वित्झर्लंड 3) *इंग्रजीत स्वर किती आहेत ?* 5 4) *कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?* रायगड 5) *बिहार राज्याची राजधानी कोणती ?* पाटणा *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ●  नरसिंह पावडे देशमुख ●  सुदर्शन पा. जोगदंड ●  शंकरलाल जैस्वाल ●  राजेंद्र पोकलवार ●  गंगाधर दगडे ●  दीपक पा. हिवराळे ●  हर्ष पाटील ●  इरेश वंचेवाड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *तुम्ही दु:खाचा स्विकार कराल तेंव्हाच सुखाच्या निकट पोहचाल. आयुष्याचा खरा अर्थ कळेल. राजपुत्र सिद्धार्थ दु:खाचा शोध घेतो, म्हणून ते तथागत गौतम बुद्ध होतात. हेच फार मोठं उदाहरण जगाच्या पाठीवर लिहून ठेवलं गेलंय, ते कुणीच पुसून टाकू शकत नाही. संकटातून, समस्यांतून बाहेर कसे पडायचे, हे विद्यापीठात शिकविले जात नाही. माणसाने स्वयंअध्ययनातून खूप काही शिकायचे असते. आजच्या नव्या पिढीला हे अध्ययन करू द्यायला हवे. मात्र, तसे होताना दिसत नाही. खुशी काही सेकंदांची असते. समाधान हे काही दिवसांचं असतं आणि ज्ञान अर्थात जीवन-जाणिवा ह्या आयुष्यभरासाठी असतात.* *दुर्दैवाने मुलांना पाच रूपयांची कॅडबरी देऊन किंवा पाच-पन्नास पैशांचं चाॅकलेट देऊन खुश करण्याचं काम घरादारातून जोरकसपणे सुरू आहे. दु:खापासून त्यांना दूर ठेवण्यात येत आहे. त्यांना दु:खाची तोंडओळख करून दिली जात नाही. एक सुरक्षाकवच त्यांच्याभोवती पालक उभे करताहेत. सहाजिकच मुलांना दु:खाचा सराव होत नाही. मग जराशा दु:खाने ही मुले हडबडून जातात अन् आत्महत्येचे अर्थही माहीत नसलेले हे कोवळे जीव मारणारा कवटाळून बसताहेत. म्हणून दु:ख कळण्यासाठी दु:खाची उदाहरणे त्यांच्यासमोर ठेवणे गरजेचे आहे. टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देवपण येत नाही, हे आपणांस ठाऊक, पण त्यांच्यापर्यंत ते पोहचत नाही. माणूस दु:खातून उभा राहून स्वत:चे अस्तित्व सिद्ध करतो. हीच दु:खाच्या रियाजाची सामुग्री आहे. तिचा अवलंब करणे म्हणजे दु:खाचा रियाज करणे होय.* *॥ रामकृष्णहरी ॥* 🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *म्हणतात ना मनी वसे ते स्वप्नी दिसे।* *आणि या मनाला सुद्धा सुंदर स्वप्न* *पडूंदया.जे मन सतत काहीतरी* *नाविन्याचा शोध घेते तेच* *नाविन्याची निर्मिती सुद्धा करते.* *"ज्या माणसाला सतत शुभ आणि आशावादी विचार करण्याची सवय असते त्याचे मन नेहमी आनंदाने व उत्साहाने भरलेले राहते* *आणि* *उत्साही मनाच्या माणसाला नेहमीच यशप्राप्ती होते..* *म्हणून सकारात्मक , आशावादी आणि आनंदी विचार हीच यशस्वी होण्याची गुरुकिल्ली आहे."* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* *जि. प.शाळा--माणिकखांब,* *ता.इगतपुरी, जि. नाशिक* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• लोक तुम्ही तुमच्या जात असलेल्या चांगल्या ध्येयाकडेही वेगळ्या दृष्टीने पाहत असतात आणि आपल्यामध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्नही करतात,परंतु त्यांच्या अशा वृत्तीमुळे आपण आपले चांगले ध्येय सोडायचे नाही.लोक तर या जगात चांगल्यालाही नाव ठेवतात आणि वाईटालाही नाव ठेवतात.त्यांच्याकडे पाहून आपण काहीही करायचे नाही जे आपणास आणि आपल्या मनास योग्य आहे आणि लोकांना फायद्याचे आहे आपण निश्चित केलेल्या ध्येयापासून त्रास होणारे नसेल तर नक्कीच त्या ध्येयाकडे मार्गक्रमण करावे. तरच आपले आणि इतरांचे कल्याण होईल. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मासा आणि हंस* एका सरोवरात एक मासा राहत होता. तिथेच एक हंस येत असे. त्या दोघांची घनिष्ट मैत्री होती. दोघेही एकमेकांशी भरपूर गप्पा मारत असत. रात्र झाल्यावर मासा सरोवराच्या तळाला जात असे तर हंस जवळच्या झाडावर झोपत असे. सकाळ झाल्यावर हंस कुठेतरी जात असे आणि परत माशाला भेटावयास येत असे. एकेदिवशी माशाने हंसाला विचारले,"तू रोज सकाळी इथून उडून जातो हे मी पाहतो. पण तू कुठे जातो हे तू मला कधीच सांगितले नाहीस" हंस म्हणाला,"अरे मित्रा ! मी समुद्राकडे जात असतो. कारण समुद्रात भरपूर शिंपले असतात. त्या शिंपल्यातून निघणारे मोती मला हवे असतात. कारण माझे अन्नच मोती आहे. मी हंस आहे मी फक्त मोतीच खातो. त्यामुळे मला रोजच समुद्रावर जावे लागते." हे ऐकून मासा म्हणाला,"मित्रा ! मलाही एकदा समुद्र बघायचा आहे." मित्राची अशी इच्छा पाहून हंस म्हणाला,"येथून थोडे पुढे गेल्यावर एक नदी आहे, ती समुद्राला मिळते, तू त्या पोहोच." त्यावर्षी प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, सरोवराचे पाणी जावून नदीला मिळाले तसा मासाही नदीच्या पाण्यात पोहोचला. नदीचा प्रवाह फार जोरात असल्याने मासा अतिशय वेगाने समुद्राकडे वाहून गेला. माशाला समुद्रात त्याच्यासारखेच लाखो मासे दिसले, पण कुणीच तो आल्याची न दखल घेतली न कुणी बोलले. तो त्या समुद्रात एकटा पडला.त्याला राहून राहून आपल्या हंस मित्राची आठवण येत होती. पण आता पर्याय नव्हता. तेथून परतणे शक्यच नव्हते आणि आलेल्या प्रसंगाला तोंड देणे हेच त्याच्या प्रारब्धात लिहिले होते. *तात्पर्य :-* मोठ्या गोष्टी मिळवण्याच्या नादात आपण आपल्याला आनंद देणाऱ्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. त्याने आपल्याला मोठ्या गोष्टीही मिळत नाहीत आणि छोट्या गोष्टी आपण सोडलेल्या असतात. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 05/08/2019 वार - सोमवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *नागपंचमी* 💥 ठळक घडामोडी :- १९१४ - जगातील पहिला विद्युतचलित वाहतूक नियंत्रक दिवा  अमेरिकेच्या  क्लीव्हलँड  शहरात सुरू झाला १९८१ - अमेरिकेन राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगनने संपावर असलेल्या ११,३८१ हवाई वाहतूक नियंत्रकांना नोकरीतून काढून टाकले 💥 जन्म :- १८९० - दत्तो वामन पोतदार, मराठी इतिहाससंशोधक, लेखक. १९६९ - वेंकटेश प्रसाद, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- ८८२ - लुई तिसरा, फ्रांसचा राजा *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *प्रधानमंत्री आवास योजनेची ४ लाख २१ हजार घरे पूर्ण, राज्य सरकारची माहिती; १० लाख ५१ हजार ९० जणांनी केली होती नोंदणी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *ओमर अब्दुल्ला, मेहबूबा मुफ्ती नजरकैदेत; श्रीनगरमध्ये कलम १४४ लागू, जम्मू-काश्मीरमध्ये वेगवान हालचाली* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *दोन लाख नोकऱ्यांवर गदा; वाहन क्षेत्रात दोन दशकांतील सर्वात मोठी मंदी, प्रवासी वाहनांच्या विक्रीत आठ महिन्यांत मोठी घसरण* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *कोल्हा'पूर' ! कोयना, राधानगरी, अलमट्टीमधून विसर्ग सुरू; शाळा, महाविद्यालयांना सुट्टी, कोल्हापूर जिल्ह्यात आपत्कालीन परिस्थिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *दादासाहेब फाळके चित्रनगरी महामंडळातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना आता लागू होणार सातवा वेतन आयोग* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *सरकारी रुग्णालयांतील कर्मचारी १९ ऑगस्ट रोजी खासगीकरण विरोधात राज्यव्यापी संपावर जाण्याचा इशारा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *India vs West Indies: भारताचा वेस्ट इंडिजवर २२ धावांनी विजय; मालिकाही खिशात, तीन सामन्यांच्या मालिकेत भारताला २-० अशी आघाडी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सुरक्षित प्रवास करू या*  आजकाल प्रत्येकजण जीव मुठीत घेऊन प्रवास करीत आहेत. प्रवासाला निघलेला व्यक्ती सुखरूप घरी परत आल्यावर घरातले सर्व सदस्याचे जीव भांड्यात पडल्यासारखे होते. हायवेचे रस्ते तर जणू अपघाताचे माहेरघरच बनले आहेत. दररोज किती तरी अपघात होतात आणि कित्येक लोकांचे जीव जातात याची काही गिनती नसते. इकडे छोट्या रस्त्यावर सुध्दा अपघात......... https://nasayeotikar.blogspot.com/2018/04/blog-post_26.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *खडकाचं वय कसं मोजतात ?* 📙 जगातली सजीवसृष्टी कार्बनच्या मेरूदंडावर उभी राहिलेली आहे. त्यामुळे प्रत्येक सजीवाच्या प्रत्येक अवयवात कार्बनची रसायनं उपस्थित असतात. याचाच आधार घेऊन विलार्ड लिबी यांनी सजीवांच्या पुरातन अवशेषांचं वय शोधण्याची एक प्रक्रिया विकसित केली. त्याबद्दल त्यांना नोबेल पुरस्कारही प्राप्त झाला. हवेतला कार्बन डायऑक्साइड शोषून घेऊन प्रकाशसंश्लेषणाच्या प्रक्रियेतून वनस्पती कार्बोदकं तयार करतात. प्रत्येक सजीवांच्या अन्नसाखळीची सुरुवात तिथूनच होते. हवेत कार्बनची दोन रूपं उपस्थित असतात. एक स्थिर आणि बहुसंख्य असलेलं बारा अणुभाराचं समस्थानिक आणि दुसरं अस्थिर व किरणोत्सर्गी असलेलं चौदा अणुभाराचं समस्थानिक. या दोन्हींच्या वस्तुमानात फरक असल्यामुळे त्यांची वेगवेगळी ओळख पटवणं सोपं जातं; पण त्यात दोन्हींचेही रासायनिक गुणधर्म सारखेच असल्याने हवेतून कार्बन डायऑक्साइड शोषून घेताना वनस्पती त्यांच्यात भेदभाव करत नाहीत. त्यामुळे हवेत या दोन रुपांचं आपापसात जे गुणोत्तर असतं तेच जिवंत वनस्पतींमध्येही दिसून येतं. कारण किरणोत्सर्गामुळे जरी त्यातल्या चौदा अणुभाराच्या रूपाचा थोडासा र्‍हास होत असला तरी सतत हवेतून त्याची भरपाई होत असल्यामुळे जोवर ती वनस्पती जिवंत आहे तोवर त्यांच्या अंगचं या दोन रूपांचं आपापसातलं गुणोत्तर हवेतल्या त्यांच्या गुणोत्तराइतकंच राहतं. ती वनस्पती मृत पावली की परिस्थिती बदलते. आता हवेतून नव्यानं कार्बनडायऑक्साइड अंगात शिरत नसल्याने त्यातल्या १४ अणुभाराच्या रूपाच्या र्‍हासाची भरपाई होत नाही. ज्या वेगानं तो क्षय होतो त्याच वेगानं त्यांचं गुणोत्तरही बदलत जातं. किरणोत्सर्गी रूपाचा र्‍हास त्याच्या अर्धायनात मोजला जातो. जेवढ्या काळात मूळ राशीतला पन्नास टक्के भागाचा र्‍हास होतो त्या कालावधीला त्या रूपाचं अर्धायन असं म्हणतात. चौदा अणुभाराच्या कार्बनचं अर्धायन ५७६० वर्ष आहे. म्हणजेच तेवढा कालावधी उलटला की त्या वनस्पतीच्या अवशेषातील बारा अणुभाराच्या रूपाची मात्रा तेवढीच राहते; पण चौदा अणुभाराच्या रूपाची मात्रा निम्मी होते. म्हणजेच गुणोत्तर दुपटीनं वाढतं. तसं झाल्यास त्या अवशेषाचं वय ५७६० वर्षे आहे, असं निदान करता येतं. या पद्धतीलाच रेडिओकार्बन डेटिंग असे म्हणतात. सर्वच पुरातन अवशेषांमध्ये कार्बन असतोच असं नाही. उदारणार्थ, खडकांसारख्या असेंद्रिय निर्जीव पदार्थांमध्ये कार्बन नसतो. शिवाय किरणोत्सारी कार्बनचं अर्धायन तेवढंसं जास्त नसल्यामुळे त्याच्या दसपटीने म्हणजेच साधारण ५० हजार वर्षांपूर्वीच्या अवशेषांच्या वयाचं निदान अचूकपणे करता येतं. त्याहून पुरातन असलेल्या पदार्थांबाबतच्या निदानात संदेह निर्माण होतो. एक स्थिर आणि एक किरणोत्सारी अशा दोन मूलद्रव्यांच्या जोड्या मिळाल्या तर हीच पद्धत अवलंबली जाऊ शकते. अशा अनेक जोड्या आता शोधून काढल्या गेल्या आहेत. युरेनियमची खनिजं खडकांमध्ये असतात. त्याच्या क्षयमालिकेत अशा जोड्या सापडतात. त्यांचा आधार घेऊन खडकांचं वय मोजण्याची रेडिओमेट्रिक डेटिंग पद्धत विकसित केली गेली आहे. तिची मदत घेऊन कोणत्याही खडकाचं वय किती हे आता अचूकपणे सांगता येणं शक्य झालं आहे. - *डाॅ. बाळ फोंडके यांच्या 'किती ?' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *“ साधे जीवन जगणे ही जगातील सर्वात चांगली गोष्ट आहे.”* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आजची प्रश्नमंजुषा* 1) *उटी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?* तामिळनाडू 2) *शिवाजी महाराज यांच्या आईचे नाव काय होते ?* राजमाता जिजाऊ 3) *भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण ?* श्रीमती इंदिरा गांधी 4) *'जागतिक महिला दिन' केव्हा पाळला जातो ?* 08 मार्च 5) *भारतात डमडम हे राष्ट्रीय विमानतळ कोठे आहे ?* कलकत्ता *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ●  श्रीराम पा. जगदंबे ●  सय्यद जाफर ●  दत्तात्रय सितावार ●  किरण सोनकांबळे ●  साईनाथ जायेवाड ●  देवराव कोलावाड ●  मनोज मानधनी ●  सचिन वसरणीकर ● शेख वाजीद ● विकास कांबळे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आपण जे बोलायला हवे ते बोलत नाही. जे बोलू नये ते बोलून जातो. जे पोटी असते ते ओठी येते असे म्हणतात. काही वेळा पोटी काही नसताना भलतेच ओठी येते. अनवधानाचे ते बोलणे सावरण्यासाठी मग खूपच बोलणे सोसावे लागते. काही लोक खूपच बडबडतात. काहींचे मौन बोलके असते. शांतपणे अविरत श्रमाची कास धरणा-यांचे यशच खूप काही बोलून जाते. नाहीतर बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात असणा-यांची संख्या बरीच आहे. न्यायालयातील उलटतपासात साक्षीदाराने काय बोलावे यापेक्षा काय बोलू नये याला खूप महत्व आहे.* *रामदासांनी शिवरायांचे मोठेपण सांगताना 'शिवरायांचे कैसे बोलणे' असा शब्दप्रयोग करून, त्यांच्या पदपथावर चालण्यास सांगितले. संतांच्या बोलण्याला अनुभूतीचा आधार असतो. महापुरूषांच्या बोलण्याला त्यांच्या जीवनकार्याची धार असते. चर्चिलच्या प्रभावी बोलण्याने दुस-या महायुद्धात ब्रिटनच्या लोकांना लढण्याचे धैर्य वाढले. अब्राहम लिंकनच्या बोलण्याने अमेरिकेची फाळणी टाळली गेली. मार्टिन ल्यूथर किंगच्या ''गुणवत्ता त्वचेच्या रंगावर नाही तर चारित्र्यावर ठरेल' या वक्तव्याने जगभर प्रभाव पाडला. गांधीजीचा 'चले जाव' , सुभाषबाबूंचा 'जयहिंद' आणि क्रांतीकारकांचा 'वंदे मातरम' ह्या एकाच शब्दाने इंग्रजांना पळता भुई थोडी झाली. नाहीतर,'बालिश बहु बायकात बडबडला' असे बडबडणारे तर अनेक असतात.* *॥ रामकृष्णहरी ॥* 🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀 *श्री संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• प्रेरणादायी विचार *माणूस म्हणुनी जन्मा आलो,* *माणूस म्हणुनी जगेन मी।* *खर आहे,एक हिंदी गीत मला भावले.* *तू *हिंदू बनेगा ,न मुसलमान बनेगा।* *इन्सान की औलाद है।* *इन्सान बनेगा।* *बघा जमलं तर माणूसच बना.* *खूबसूरत चेहरा भी* *बूढ़ा हो जाता है* *ताकतवर जिस्म भी* *एक दिन ढल जाता है* *🤴ओहदा और पद भी* *एक दिन खत्म होता है।* *लेकिन एक अच्छा इंसान* *हमेशा अच्छा इंसान ही रहता है।* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते )* *जि. प.शाळा--माणिकखांब,* *ता.इगतपुरी, जि. नाशिक.* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• काही लोकांच्या बाबतीत पैसा म्हणजे सर्वस्व आहे आणि पैशामुळे काहीही मिळवता येते. पैशामुळे तुम्हाला तुमच्या भौतिक सुविधा मिळवता येतात परंतु इतरांचे मन मिळवता येत नाही.इतरांचे मन जिंकायचे असेल तर या ठिकाणी पैसा चालत नाही.त्यासाठी हवे तुमचे उदार अंतःकरण,तुमची दुस-याबद्दलची आत्मियता,प्रेम इतरांना दिलात तर तेही तुमच्यावर अधिक प्रेम करायला लागतील.यासाठी तुमच्या जवळ असलेल्या पैशाची गरज नाही.एवढे सत्य आहे पैशाने सारे काही खरेदी करता येईल पण जगात असलेल्या सर्व जीवांचे मन आणि प्रेम कधीच खरेदी करता येत नाही.मग तुमच्या जगण्याला काय अर्थ आहे ? © व्यंकटेश काटकर, नांदेड ९४२१८३९५९०/८०८७९१७०६३ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कर्म हीच पूजा* एकदा एक बाई रामकृष्ण परमहंसाकडे आल्या आणि म्हणाल्या , " मला या संसाराचा विट आला आहे . मुलं मोठी झाली. आता प्रपंच सुटेल असे वाटले . पण नातवंडांच्या प्रेमात पडले . रोज त्याला सांभाळावे लागते . तेव्हा आता घर सोडायचा विचार आहे . " रामकृष्णांनी विचारले , " घर सोडून तुम्ही काय करणार ? " त्या बाई म्हणाल्या , " गंगेच्या तीरावर एक झोपडी बांधणार . त्यात श्रीकृष्णाची मूर्ती बसविणार . रोज त्या मूर्तीची पूजा करणार . कृष्णाला नेवैद्याने जेवू घालणार . कृष्णाला झोपेतून उठविणार, आंघोळ घालणार . " परमहंसांनी विचारले , " श्रीकृष्णाची मूर्ती दगडाची असणार न ? " तेव्हा त्याबाई ' हो ' म्हणाल्या . रामकृष्णांनी विचारले , " आपण दगडाच्या मूर्तीत श्रीकृष्ण पाहणार ? " त्या बाई ' हो ' म्हणाल्या . त्यावर रामकृष्ण म्हणाले . " आपण दगडाच्या मूर्तीत श्रीकृष्ण पाहणार , मग नातवंडामध्ये श्रीकृष्ण का पाहत नाहीत ? श्रीकृष्ण समजून नातवंडाला जेवू घाला. श्रीकृष्ण म्हणून आंघोळ घाला. श्रीकृष्ण म्हणून त्याला झोपवा. " तुम्ही तुमच्या नातवंडानाच तुमचा श्रीकृष्ण समजून वागा. मनातला भाव चांगला ठेवा म्हणजे तुम्हाला सर्वत्रच भगवंत दिसेल आवश्यक नाही मुर्तीतच देव पाहणे.तुम्ही तुमच्या नित्यकर्मात पण देवाचे दर्शन घेऊ शकता. *तात्पर्य : नित्य कर्मामध्ये भगवतभाव ओतला की ते कर्म नाम साधनेच्या दर्जाचे होते व तेच कर्म पूजा ठरते.* *'कर्मे ईशू भजावा.'* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

*स्पर्धा चारोळी* *मैत्रीच रोपट म्हणजे एक आधार असत.* *एक विश्वास असत* *एक आपूलकीच* *अनमोल साथ* *देणार नात असत.* 〰〰〰〰〰〰 प्रमिलाताई सेनकुडे नांदेड

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 03/08/2019 वार - शनिवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ◆ *क्रांतिसिंह नाना पाटील जयंती* 💥 ठळक घडामोडी :- ■२००४-राज्यपाल महमंद फजल यांच्या हस्ते सोलापूर विद्यापीठाचे औपचारिक उद्घाटन झाले. ■ १९६० - नायजरला फ्रांसपासून स्वातंत्र्य. ■ १९७५ - बोईंग ७०७ प्रकारचे खाजगी विमान मोरोक्कोच्या अगादिर शहराजवळ कोसळले. १८८ ठार. ■ १९४८-भारतीय अणू ऊर्जा आयोगाची स्थापना झाली.(Indian Atomic Energy Commission) 💥 *जन्म* :- ●१९००-क्रांतिसिंह नाना पाटील,स्वातंत्र्य सैनिक ,समाजसुधारक. ● १९३९ - अपूर्व सेनगुप्ता, भारतीय क्रिकेट खेळाडू. ● १९५६ - बलविंदरसिंग संधू, भारतीय क्रिकेट खेळाडू. ● १९५७ - मणी शंकर, भारतीय चित्रपट दिग्दर्शक. ● १९६० - गोपाल शर्मा, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 *मृत्यू* :- ◆ १९९३ - स्वामी चिन्मयानंद, भारतीय तत्त्वज्ञानी. ◆ २००७ - सरोजिनी वैद्य, मराठी लेखिका, समीक्षिका. ◆ १९५७-देवदास गांधी,पत्रकार,हिंदुस्थान टाईम्स चे संस्थापक,महात्मा गांधींचे पुत्र. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *पत्रकार रवीश कुमार यांना यंदाचा 'रॅमन मॅगसेसे' पुरस्कार जाहीर, हिंदी टीव्ही पत्रकारितेतील योगदानाबद्दल गौरव* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये राज्यात 100 टक्के पाऊस पडणार, हवामान विभागाचा अंदाज* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्याचा राज्य शासनाने घेतला निर्णय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *महाराष्ट्रातील उद्योगात भूमिपुत्रांना नोकऱ्यांमध्ये 80 टक्के प्राधान्य न दिल्यास कारवाई करणार, उद्योगमंत्री सुभाष देसाई आक्रमक* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *ओबीसींच्या राजकीय आरक्षणात कपात, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळणार, सरकारच्या अध्यादेशामुळे नवा वाद* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *ईव्हीएम-व्हीव्हीपॅट हटवा, लोकशाही वाचवा, असे म्हणत विरोधी पक्ष एकवटले, 21 ऑगस्टला मुंबईत विरोधकांचा सर्वपक्षीय मोर्चा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *IAAF World Race Walking Cup : सात वर्षानंतर भारताला जागतिक २० किमी चालण्याच्या शर्यतीच मिळालेे कांस्यपदक* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सर सलामत तो ......* हिंदीत एक म्हण आहे सर सलामत तो पगडी पचास, त्यानुसार गाडी चालवताना आपल्या डोक्यावर हेल्मेट असेल तर यदाकदाचित अपघात झालाच तर डोक्याला मार लागत नाही. उपचाराच्या खर्चापेक्षा काळजीसाठी लागणारा खर्च खूप कमी असतो. आपल्या शरीराचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे डोकं. कारण त्या डोक्यात मेंदू सुरक्षित असतो........ पूर्ण लेख वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करावे.... https://nasayeotikar.blogspot.com/2019/02/blog-post_24.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *आपल्या शरीरात एकूण किती जनुकं आहेत ?* 📙 आपल्या यच्चयावत अनुवांशिक गुणधर्मांचा आराखडा डीएनए या रसायनाच्या रेणूंमध्ये सांकेतिक रूपात साठवलेला असतो. शरीरातल्या प्रत्येक पेशीच्या केंद्रात असलेल्या डीएनएमध्ये ही माहिती साठवलेली असते. या डीएनएची रचना दुहेरी गोफासारखी किंवा गोल गोल जिन्यांसारखी असते. या जिन्याच्या पायऱ्या समोरासमोरच्या कठड्यांना जोडलेल्या नायट्रोजनयुक्त घटक रेणूंच्या बनलेल्या असतात. प्रत्येक पायरी ही समोरासमोरच्या दोन रेणूंच्या जोडगोळीची बनलेली असते. या घटक रेणूंच्या अनुक्रमाक अनुवांशिक गुणधर्मांची माहिती साठवलेली असते. या माहितीचा एकक म्हणजे एक जनुक. आपल्या शरीरातल्या डीएनएमध्ये एकूण तीन अब्ज पायऱ्या म्हणजेच नायट्रोजनयुक्त घटक असतात. तीन पायऱ्या मिळून जो एक कोडाॅन होतो तो प्रथिनांच्या साखळीतील एका घटकाविषयीचा आराखडा सांकेतिक रूपात आपल्यात दडवून ठेवतो. याचा अर्थ झाला की असे किमान एक अब्ज कोडाॅनं आपल्या शरीरात असतात. जनुकं अशा काही कोडाॅनची बनलेली असतात. काही जनुकं थोड्याच कोडाॅनची असतात, तर काहींची लांबी त्याच्या कितीतरी पट असते. त्यामुळे शरीरात एकूण नक्की किती कोडाॅन आहेत याची माहिती नव्हती; पण एकूण कोडाॅनच्या संख्येवरून किमान एक लाख तरी जनुकं शरीरात असावीत, असा अंदाज केला गेला होता. मानवाच्या यच्चयावत जनुकसंचयाचं वाचन करण्याचा 'ह्युमन जीनोम' हा अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला. त्यापूर्वी मूषक वगैरेसारख्या काही प्राण्यांच्या जीनोमचं वाचन करण्यात आलं होतं. त्यातून त्या प्राण्यांच्या शरीरातल्या एकूण जनुकांच्या संख्येची माहिती मिळाली होती. त्यावरूनही हा अंदाज योग्य वाटत होता. पण प्रत्यक्षात जेव्हा मानवी जनुकसंचयाचं वाचन सुरू झालं आणि ते पूर्णत्वाकडे झुकू लागलं तसा वैज्ञानिकांना आश्चर्याचा धक्काच बसला. कारण ही संख्या अपेक्षेपेक्षा फारच कमी असल्याचं दिसून आलं. आजमितीला अशी चाळीस हजार जनुक असावीत असं या प्रकल्पात सहभागी झालेल्या बहुतेक वैज्ञानिकांचे मत आहे. ते सर्व मान्य आहे असं नाही. कारण ऐकून डीएनएपैकी कितीतरी भाग कोणत्याच प्रथिनाच्या उत्पादनात सहभागी नसल्याचं दिसून आलं आहे. याला जंक डीएनए किंवा इन्ट्राॅन असं म्हणतात. प्रथिनांच्या उत्पादनात सहभागी असलेल्या डीएनएला एक्झॉन असे म्हणतात. या दोन्हींची एकमेकांमध्ये गुंफण झालेली आहे. म्हणजे दोन एक्झॉनच्यामध्ये काही इन्ट्राॅन आहेत. तसंच एका जनुकामध्ये एकाहून अधिक एक्झॉन असतात आणि ते काही इन्ट्राॅनमुळे एकमेकांपासून अलग झालेले असतात, हेही दिसून आलं आहे. म्हणूनच काही वैज्ञानिक या ४० हजारांच्या आकड्याला मान्यता द्यायला तयार नाहीत. त्यांच्या मते खरी संख्या त्याहून कितीतरी अधिक असावी; आणि ७० ते ८० हजार जनुकं शरीरात असावीत, असा त्यांचा दावा आहे. जसजशी हय़ुमन जिनोमची अधिक तपशीलवार माहिती हाती येत आहे तसतसा यापैकी कोणता दावा खरा आहे यावर अधिक प्रकाश पडणार आहे. *डाॅ. बाळ फोंडके यांच्या 'किती ?' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" मोठेपणा आणि चांगुलपणा एका व्यक्तीत क्वचितच एकत्र दिसतात."* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *भारतात चंदनासाठी प्रसिद्ध असलेला राज्य कोणता ?* कर्नाटक 2) *हॉलीवूड ही जगप्रसिद्ध फिल्म इंडस्ट्री कोठे आहे ?* कॅलिफोर्निया 3) *भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता ?* डॉल्फिन 4) *नोबेल पारितोषिक मिळविणारे पहिले भारतीय कोण ?* रविंद्रनाथ टागोर 5) *भारतीय रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर कोण ?* चिंतामणराव देशमुख *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ●  अजय बिरारी ●  पोतन्ना चिंचलोड ●  प्रदीप कार्ले ●  उत्तमराव नरवाडे ●  भवरसिंग *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *काहीही विपरीत घडले की त्याबद्दल इतरांना जबाबदार धरण्याची एक सार्वत्रिक प्रवृत्ती असते. आपली चूक कबूल करण्याऐवजी त्याला इतर लोक कसे दोषी आहेत, हेच बहुतेक जण सांगत असतात. चूक कबूल करण्यात बहुतेकांना कमीपणा वाटतो. त्यामुळे आपले चूक असले, तरी ते योग्य आहे असाच हेका अनेकजण लावतात. सार्वजनिक पातळीवर तर हे चित्र आणखी गडद होते आणि समाजातील सर्वच वाईट गोष्टींसाठी शासन यंत्रणेला दोषी ठरविले जाते. जनकल्याणाचे आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या सरकारकडून मोठ्या अपेक्षा असतात आणि बहुतेकदा अपेक्षाभंग होतो.* *देश आपल्यासाठी काय करणार यापेक्षा आपण देशासाठी काय करणार असे जाॅन. एफ. केनेडी यांनी म्हटले होते. 'मी साधा माणूस, मी काय करणार' असे उत्तर प्रत्येक जण देऊ शकतो. मात्र साधा माणूस खूप काही करू शकतो. सार्वत्रिक नियमांचे पालन करणे, आपला परिसर स्वच्छ ठेवणे, अफवा न पसरविणे अशा अनेक गोष्टी आपण करू शकतो. चांगला नागरिक बनण्याची सुरूवात घरापासून होते. सार्वजनिक नियमांचा आदर राखण्याची प्रवृत्ती मुलांमध्ये विकसित केली तरी पुष्कळ. लहान मुले मोठ्यांचे अनुकरण करतात, याची जाणीव न ठेवता मोठी माणसे गैरवर्तन करतात. त्यामुळे पुढील पिढीही तेच शिकते.* *॥ रामकृष्णहरी ॥* 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल-9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो,* *हल्ली आपण गल्लीबोळात एक आवाज ऐकतो.-----काय, तर नाद करायचा नाय,नाहीतर --आमचा* *नादच खुळा।* *काय करणार हल्ली छंदाला मर्यादाच राहिल्या नाहीत.* *माणसाने छंद जरूर बाळगावा,पण छंदीफंदी असू नये ,अस सगळेच* *मानतात.पण* *मला मात्र वेगळे वाटते,* *मातीत खेळायचे पण अंगाला* *डाग लागू द्यायचा नाही.* *होळीचा रंग खेळायचा नाही,पण* *रंगीबेरंगी भावनांनी* *मोहरून यायचं.* *🧜‍♀पहिल्या पावसात भिजायचं,* *पण अंग ओल होता* *कामा नये.अशा सगळ्या अटी* *घातल्यासारखे आहे बघा।* *ज्यांना छंद होते, किंवा छंद वेडे होते तेच जगात नवीन काहीतरी घडवू* *शकले.* *🕺तर मग लागताय ना* **नादी एखादया* *छंदाच्या----सचिन बॅटींच्या नादी लागला जगविख्यात क्रिकेटर* **बनला,* *गाडगेबाबा** *सफाईच्या नादी लागले राष्ट्रसंत* *झाले.निलिमा मिश्रा गोधडीच्या नादी* *लागली रेमन मॅगेसेसे पुरस्कार* *मिळाला. सुरेखा पुणेकर* *लावणीच्या नादी लागून* *साता-समुद्रापार पोहचली.✈✈राईट बंधू विमानाच्या नादी लागले आणि शोध* *लावला.संत तुकाराम भक्तीच्या* *नादी लागले आणि भक्ती* *मंदिराचा कळस झाले.* *चला छंद जोपासूया।* *अशोक कुमावत, नाशिक* *(राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जीवनव्यवहारासाठी जसा सुखदुःखाचा,कामाचा आणि वेळेचा अनुभव पाठीशी असावा लागतो तसा आपल्या सर्वांगीण विकासासाठी ज्ञानाचा अनुभव पाठीशी असावा लागतो.ते ज्ञान मिळविण्यासाठी मनाची तयारी असायला पाहिजे. मनाच्या परिपक्वतेसाठी व माणूस म्हणून चांगले आणि संस्कारीत जीवन फुलवण्यासाठी ज्ञानाची कास धरायलाच हवी.ज्ञान हे जीवनाला योग्य दिशा देण्याचे आणि मानव कल्याणाच्या  प्रगतीकडे नेण्याचे काम करते. - व्यंकटेश काटकर,नांदेड. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *भेट* *एकदा एका राजाने खुश होऊन लोहाराला चंदनाची बाग भेट दिली. लोहाराला चंदनाच्या झाडांच्या किंमतीचे ज्ञान नव्हते त्यामुळे त्याने त्याचा कोळसा करून विकला. हळू हळू सम्पूर्ण बाग रिकामी झाली.* *एक दिवस असेच राजा त्याच्या घरा जवळून जात होता, राजाला वाटले लोहार आता खुप श्रीमंत झाला असेल. परंतु प्रत्यक्ष पाहिल्यावर लोहाराची परिस्थिति पहिल्या सारखीच आहे असे दिसले राजाला आश्चर्य वाटले.* *सत्य समजल्यानंतर राजाने त्याला विचारले तुझ्याकडे एखादे लाकुड़ शिल्लक आहे का ? तेव्हा लोहारने कुऱ्हाडीचा दांडा दाखविला.* *राजाने त्याला चंदनाच्या व्यापाऱ्या कडे पाठवले. तेंव्हां त्या छोटयाश्या तुकडयाचे त्याला खुप पैसे मिळाले. लोहार खुप रड़ू लागला, त्याने राजाला अजुन एक बाग देण्याची विनंती केली तेव्हा राजा म्हटला "अशी भेट वारंवार भेटत नाही."* *मित्रांनो आपले आयुष्य त्या लोहारा सारखेच आहे मानवी जीवनाच्या मुल्यांचे महत्व, आपल्याला जीवनाचे शेवटचे श्वास चालू असताना समजते.पण...* *त्यावेळेस आपण म्हणतो देवा मला अजुन थोड़ा वेळ दे, परंतु त्यावेळी वेळ मिळणे अशक्य असते.* *मानवी जीवन अनमोल आहे.* *असे जीवन परत मिळणार नाही.* *बोध* *या जगात दुर्लभ गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे, मनुष्य देह. हा देह ही आपल्या जीवनाची अमूल्य भेट आहे या देहाचा कोळसा करायचा की, चंदन हे आपले आपण ठरवायचे.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *बुलेटीन बाबत प्रतिक्रिया*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💐 *_फ्रेश मॉर्निंग बुलेटीनच्या ४ थ्या वर्धापन दिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा_* 🌹 वाचनाला पर्याय नाही. समाज अप्रगल्भ राहू द्यायचा नसेल तर सातत्याने वाचन लेखन व्हायला पाहिजे. त्यावर चर्चा व्हायला पाहिजे. आजकाल फेसबुक वगैरे मुळे लोक पटकन कशावरही विश्वास ठेवतात व कमी कालावधीत अनेकापर्यंत पोहोचण्याचा उत्तम माध्यम आहे. आणि हे सर्व आपल्या ग्रुपच्या माध्यमातून होत आहे आणि मी ते दररोज वाचतो व हजारो मित्रांना शेअर करीत असताना मनस्वी आनंद होतो. महत्त्वाचे म्हणजे अनेकांचे अंधकारमय जीवन पुन्हा प्रकाशमय झाल्याचे उदाहरणे आहेत. एकंदरीत आपल्या समुहाच्या माध्यमातून एक उत्तम समाजसेवा करण्याची संधी प्राप्त झाली त्यामुळे श्री येवतीकर सरांसह सर्वांचे मनःपूर्वक आभार. पुढील वाटचलीस मंगलमय शुभेच्छा...🙏 ✍ _श्री शिवानंद चौगुले,चिंचवड_ _विशेष कार्यकारी अधिकारी_ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 02/08/2019 वार - शुक्रवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ◆ *वायु सेना दिन - रशिया*◆ 💥 ठळक घडामोडी :- ■ १७९०- अमेरिकेत पहिली जनगणना सुरू. ■ १९८५ - डेल्टा एरलाइन्सचे एल.१०११ प्रकारचे विमान अमेरिकेतील डॅलस आंतरराष्ट्रीय विमानतळावर कोसळले. १३७ ठार. ■ १९९० - इराकने कुवैतवर आक्रमण केले. 💥 *जन्म* :- ◆१८६१-प्रफुल्लचंद्र रे,बंगालमधील प्रसिध्द रसायनशास्त्रज्ञ, ◆ १९३२ - पीटर ओटूल, आयरिश अभिनेता. ◆१९५८ - अर्शद अय्युब, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 *मृत्यू* :- ● १५८९ - तिसरा हेन्री, फ्रान्सचा राजा. ● १६११ - केटो कियोमासा, जपानी सामुराई. ● १९२३ - वॉरेन हार्डिंग, अमेरिकेचा २९वा राष्ट्राध्यक्ष. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *दुष्काळी भागातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची संपूर्ण परीक्षा फी माफ, शालेय शिक्षणमंत्र्यांचा निर्णय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *शेतकरी जगवायचा असेल तर एमएसपी उत्पादन खर्चाच्या तिप्पटच हवा, पंजाब हायकोर्टनं ठणकावलं* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *आदित्य ठाकरेंची जन आशीर्वाद यात्रा आज लातूरमध्ये, उदगीरला जाताना शेतकऱ्यांसोबत पेरणीचा अनुभव* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *शरद पवार हृदयात आहेत असं बोलणाऱ्यांचं हृदय तपासावं, शरद पवारांचा पक्षांतर केलेल्या नेत्यांना टोला* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पुन्हा भोवळ, सोलापुरातल्या कार्यक्रमातील घटना, डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर नियोजित दौरा रद्द* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *अण्णाभाऊ साठेंवरील चित्रपटासाठी पुढाकार घेणार, मातंग समाजासाठी एक लाख घरे - मुख्यमंत्री* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *थायलंड ओपन बॅडमिंटन : साई प्रणीत उपांत्यपूर्व फेरीत, सायना नेहवाल, के. श्रीकांत पराभूत* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *प्रदूषण एक समस्या* मनुष्याचे सरासरी आयुष्य जे की पूर्वी शतकाची होती. ती आता हळूहळू कमी होत आहे. आत्ता माणसाचे आयुष्य सरासरी सत्तरच्या आसपास झाले आहे. विविध कारणामुळे मनुष्य आजारी पडत आहे आणि मृत्युमुखीदेखील पडत आहे. डॉक्टराना देखील निदान होणार नाहीत असे रोग जडत आहेत. एशोआरामच्या जिंदगीमुळे देखील माणसाचे आयुष्य घटत चालले आहे. यातच प्रदूषण ही एक महत्वपूर्ण समस्या जाणवत आहे. ....... पूर्ण लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे. https://nasayeotikar.blogspot.com/2018/12/blog-post_10.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *मूलभूत बलं किती आहेत ?* 📙 हे विश्व जेव्हा उदयाला आलं तेव्हा झालेल्या महाविस्फोटातून केवळ ऊर्जा रोंरावत बाहेर पडली; पण त्यानंतरच्या काही सेकंदांमध्येच त्या ऊर्जेनं कणांचं रूप धारण केलं. त्यातून जे मूलभूत कण बाहेर पडले त्यांच्या एकमेकांमध्ये काही प्रक्रिया करण्यासाठी त्यांना बांधून ठेवण्यासाठी त्यांच्यावर काही बलांचा प्रभाव पडला. त्या बलांनाच मूलभूत बलं असं म्हटलं जातं. अठराव्या शतकापर्यंत अशा तीन बलांचीच माहिती होती. विद्युतभारांना एकमेकांकडे आकर्षित करणारं विद्युतबल, चुंबकीय प्रभावाचा आविष्कार करणारं चुंबकीय बल आणि विश्वाच्या उदयाला कारणीभूत झालेल्या गुरुत्वाकर्षणाचं बल. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीअखेरीस आणि खरं तर विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात जेव्हा अणूंच्या अंतर्गत रचनेचा उलगडा झाला तेव्हा मग त्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सबल आणि दुर्बल, स्ट्राँग आणि वीक या बलांची माहिती मिळाली. एकूण मूलभूत बलांची संख्या पाच झाली. ऋण आणि धन विद्युतभारांना एकमेकांकडे आकर्षित करणारं विद्युतबल अनेक पदार्थांच्या रचनेत भाग घेऊन त्यांना आकार देतं, याची माहिती मिळाली होती. तसंच अवकाशात चमकणाऱ्या विद्युल्लतेच्या आविष्कारातही त्या बलाचा मोठाच सहभाग असतो, हेही माहीती झालं होतं; पण जेम्स क्लार्क मॅक्सवेल यानं त्या बलाची सांगड चुंबकीय बलाशी घालून दिली. एकाच बलाची ही दोन रूप आहेत. हे सिद्ध करणारी समीकरणं त्यांनी मांडली. आपल्याला दिसणारा प्रकाश त्याच्या दोन्ही बाजूंना असणारे अवरक्त आणि जंबुपार किरण आणि त्यांच्याही अलीकडे पलीकडे पसरलेल्या रेडिओलहरी, सूक्ष्मलहरी, क्ष- किरण, गामा किरण ही सारी विद्युत चुंबकीय लहरींची वेगवेगळी रूपे आहेत हेही दाखवून दिलं गेलं. त्यामुळे एकूण मूलभूत बलांची संख्या चारावर आली. एकोणिसशे सत्तरच्या दशकात स्टीवन वाईनबर्ग, शेल्डन ग्लॅशो आणि अब्दुस सलाम यांनी सैद्धांतिक भौतिकीतल्या काही समीकरणांद्वारे अणूंच्या अंतरंगातच कार्यक्षेत्र मर्यादित असलेल्या दुर्बल बलाची सांगड विद्युतचुंबकीय बलाशी घालून मुलभूत बलांची संख्या तीनवर आणून ठेवली आहे. तरीही ही सारी बलं एकाच महाबलाची वेगवेगळी रूपं आहेत, अशी भौतिकशास्त्रज्ञांची श्रद्धा आहे. त्या तिन्ही मुलभूत बलांची सांगड घालून त्या महाबलाची ओळख पटविण्याची धडपड गेले शतकभर चालूच आहे. आईनस्टाईननंही आपलं उत्तरआयुष्य या महाबलाचा वेध घेण्यात व्यतीत केलं होतं. त्यात त्याला यश मिळालं नसलं तरी भौतिकशास्त्रज्ञांनी आपले प्रयास चालूच ठेवले आहेत. त्यात ते यशस्वी होईपर्यंत तरी मूलभूत बलांची संख्या तीनच राहील. - *डाॅ. बाळ फोंडके यांच्या 'किती ?' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• “विश्रांती देणारे एकमेव औषध म्हणजे झोप.” *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *जगातील सर्वात लांब भिंत कोणती ?* चीनची भिंत (2415 km) 2) *स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना केव्हा झाली ?* 1जुलै 1955 3) *साने गुरुजी यांचा जन्म कोठे झाला ?* पालगड (रत्नागिरी) 4) *माउंट एव्हरेस्टची उंची सर्वप्रथम कोणी मोजली ?* सर जॉर्ज एव्हरेस्ट 5) *कोणताही हिंदी चित्रपट कोणत्या दिवशी प्रदर्शित होतो ?* शुक्रवार *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ●  दयानंद भुत्ते ●  रवींद्र वाघमारे ●  दिगंबर वाघमारे ●  कैलाश चंदोड ●  काशीनाथ उशकलवार ●  जी. पी. मिसाळे ●  आनंद पाटील धानोरकर ●  शिलानंद गायकवाड ● प्रतीक गाडे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *गाण्याचा रियाज करावा तसा दु:खाचा रियाज करता येईल का? गाण्याच्या रियाजाने गायकांस त्याचा आवाज टिकवून धरता येतो. आवाजाची धार शाबूत राहते. त्याचं गाणं दिवसेंदिवस खुलत जातं. दु:खाच्या रियाजाने असं काही होईल का? दु:ख जर आणखीनच टोकदार होणार असेल तर दु:खाचा रियाज करायला कुणी धजणार नाही. कुणाला हवं आहे दु:खं ! नकोच आहे दु:खं. त्याच्यापासून सुटका व्हावी म्हणून पृथ्वीभर जेवढे काही देव आहे, त्यांना साकडे घालून होते. खुद्द देवालाच दु:खाच्या संदर्भात जाब विचारणा-या माणसाची कथा आपण ऐकलीच आहे.* *माणूस देवाला म्हणतो की, 'देवा तू सुखात माझ्याबरोबर असतो. कारण तेंव्हा दोन माझी अन् दोन तुझी पावलं उमटलेली असतात. मात्र दु:खात तू माझ्यासोबत नसतोस, कारण तेंव्हा माझी एकट्याचीच पावलं उमटलेली असतात !' तेंव्हा देव त्यास म्हणतो,'अरे दु:खातही मी तुझ्याबरोबरच होतो! ज्या दोन पावलांची गोष्ट तू करतो आहेस, ती पावलं तुझी नसून माझीच आहे. मी तुला कडेवर उचलून घेतलं होतं.' तरी माणूस मान्य करणार नाही. हीच माणसाची मोठी समस्या आहे. माणूस दु:खाचा बाऊ फार करतो. दु:खाची सवय करून घ्यायची ..ही गोष्ट फार लांब राहिली. सुख पाहता जवापाडे । दु:ख पर्वताएवढे ॥ तुकाराम महाराजांनी सुखाचे आणि दु:खाचे माप आपल्यासमोर ठेवले आहे. सुख जवसाच्या 'बी' इतके लहान, तर दु:ख पर्वताएवढे विशाल आहे. जवसाच्या बी इतक्या छोट्या असलेल्या सुखाचे व्यवस्थापण आपण करीत असतो. मात्र, पर्वताएवढ्या दु:खाचे व्यवस्थापण आपण बिलकुलही करीत नाही. म्हणून ते कमी व्हायच्या ऐवजी वाढत जाते..इतके की जवसा एवढ्या सुखाचाही तेच चट्टामट्टा करून टाकते.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• ⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡ *श्री संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सुख आणि दुःख ही मानवी जीवनाची नैसर्गिक प्रयोगशाळा आहे.* *जो सातत्याने प्रयत्न व पाठपुरावा* *करत राहील त्याचा* *प्रयोग यशस्वी होईल.* *संतानी म्हटले आहे, सुख जवापाडे,दुःख पर्वताएवढे।* *प्रत्येकाला आपले दुःख दुसऱ्यापेक्षा मोठे वाटते, दुःखाला आपला सच्चा मित्र बनवून* *बघा मग खरी जीवनाची मजा चाखायला मिळेल.* *जेव्हा जेव्हा दुःख जवळ येण्याचा प्रयत्न करीन तेंव्हा तेंव्हा त्याच्या समोरच तुम्ही प्रतिआव्हान म्हणून पाय रोवून उभे रहा.* *आणि जमलं तर एक सुंदर गीत गुणगुणत रहा* . *दुनिया मे कितना गम है।* *मेरा गम कितना कम है।* *लोगोका गम देखा तो,* *मैं अपना गम भूल गया।* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते* ) 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• प्रत्येकजण आपल्या जीवनाबद्दल काही ना काही बोलत असतो.जेव्हा तो बोलत असतो तेव्हा त्याच्या जीवनात नव्वद टक्के नकारात्मक भूमिका असते.या जीवनात असे जीवन जगण्यात काय अर्थ आहे ? त्यापेक्षा न दिलेलेच बरे.आता जीवन जगणे असह्य आहे.असा जेव्हा विचार करतात त्यांनी जगण्याला आत्मविश्वास गमावलेला असतो.कोणतीही कृती न करता किंवा हातपाय न हलवता जीवन कसे सुखी बनेल ? हा विचार कधीच ते विसरुन बसले असणार आणि त्यामुळेच त्यांच्या जीवनात सदैव नैराश्याचे डोळ्यांसमोर काळे ढग दिसतात.अशी माणसे स्वत:ही जीवनाचा आनंद घेत नाहीत आणि इतरांच्या जीवनातला आनंदही त्यांना पाहवत नाही.अशा नैराश्ययुक्त व नकारात्मक विचार करणा-या माणसांनी थोडी डोळसपणे दुस-याच्या आनंदाने जीवन जगणाऱ्या माणसाकडे थोडा विचार करून पहायला हवे.त्यांची आत्मविश्वासाने व कृतीयुक्त शैलीने व आपल्यासमोर कितीही आणि कोणताही कठीण प्रसंग असो तो हसत हसत सामोरे जाऊन कसे जीवन जगतात याचे थोडे सूक्ष्म निरीक्षण करायला हवे.तसेच त्यांच्या जगण्याची जीवनशैली कशी आणि आपली जगण्याची जीवनशैली कशी हा प्रश्न स्वत:ला विचारुन पाहिला तर नक्कीच कळेल की,आपल्यामध्येच खरी त्रुटी आहे.आपणही त्यांच्यासारखे जीवन जगायला हवे.इतरांच्या जगण्यापेक्षा आपणही चांगले जीवन आपल्या कर्तृत्वाने, आत्मविश्वासाने जगू शकतो अशी शिकवण मिळाल्याशिवाय राहत नाही.नक्कीच चांगले बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करेल.मग तो नैराश्यमय जीवन जगणारे नाही अशी प्रेरणा घेऊन व कर्तृत्ववान लोकांचे नक्कीच चांगले जीवन जगण्यासाठी प्रेरणा मिळेल.मग तोच जगाला जीवन कसे जगायचे याचे ज्ञान देण्यासाठी तयार होई.म्हणून इतरांच्या लोकांचे चांगले अनुकरण घ्यायला काय हरकत असा सकारात्मक विचार निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *संधी* एक दानशूर राजा होता.त्यानं एक दिवस जाहिर केलं की,उद्ध्या माझ्या महालाचा मुख्य दरवाजा उघडला जाईल.त्या . नंतर ज्याला जी वस्तू हवी असेल,त्यानं फक्त त्या वस्तूला हात लावायचा. दुसरा दिवस उजाडला,सर्व लोक राजवाड्यात शिरले,गर्दी जमली.प्रत्येकजण आपल्याला हवी असलेली वस्तू शोधायचा, कुणी सोने घेतले,कुणी पैसे,कुणी घोडा तर कुणी दुभती जनावरे. राजा एका कोप-यात थांबून हा सर्व प्रकार पाहात होता.अचानक,त्याचं लक्ष एका चिमुकलीवर गेलं.ती गर्दीतून वाट काढत हळूहळू राजाच्या दिशेने येत होती.राजा पहात असतानाच ती त्याच्याजवळ पोहोचली आणि तिने आपल्या नाजूक हातांनी राजाला स्पर्श केला.क्षणार्धात राजा तिचा झाला.राजाच तिचा झाल्यामुळे तिथल्या सर्व वस्तूदेखील तिच्या मालकीच्या झाल्या. 💐विचार करा💐 ज्या पध्दतीने राजाने लोकांना संधी दिली होती त्याच पध्दतीने परमेश्वर आपल्या प्रत्येकाला रोज संधी देतो.पण,त्या लोकांसारखीच आपली चूक होते,परमेश्वराऐवजी आपण,त्याने निर्मिलेल्या प्रापंचिक वस्तू निवडतो.पण,देवच जर आपला झाला तर संपूर्ण जगच आपले होईल, खरंय ना !!! *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 01/08/2019 वार - गुरूवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती* *लोकमान्य टिळक पुण्यतिथी* 💥 ठळक घडामोडी :- ■ १९९४- भारतातील रेल्वे प्रवाशांसाठी विमा योजना लागू झाली.जगातील अशा तऱ्हेची पहिली योजना. ■ २००१-सोलापूर विद्यापीठाची स्थापना. ■१९९६ - मायकेल जॉन्सनने २०० मीटर अंतर १९.३२ सेकंदात धावून विश्वविक्रम रचला. 💥 *जन्म* :- ◆ १८९९-कमला नेहरू, जवाहरलाल नेहरू यांच्या पत्नी. ◆ १९१० - मोहम्मद निसार, भारतीय क्रिकेट खेळाडू. १९२० - लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ◆ १९५२ - यजुर्वेन्द्रसिंग, भारतीय क्रिकेट खेळाडू. ◆ १९५५ - अरूणलाल, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 *मृत्यू* :- ● १९२० - बाळ गंगाधर टिळक, भारतीय स्वातंत्र्यसैनिक, साहित्यिक, वृत्तपत्र संपादक. ●२००८-हर किशन सिंग सुरजित, मार्क्सवादी नेते. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *मुंबई - महाविद्यालयीन निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर; मुंबई विद्यापीठाच्या निवडणूक प्रक्रियेला 19 ऑगस्टपासून सुरुवात* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मोदी सरकारचे मोठे निर्णय, जम्मू-काश्मीरमध्येही 10 टक्के आरक्षण लागू, सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांच्या संख्येत वाढ, 31 वरुन 34 होणार* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *शेतकऱ्यांच्या खात्यात आता थेट पोहोचणार भरघोस सबसिडीचा फायदा; पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *जिल्हा नियोजन समितीअंतर्गत नाविन्यपूर्ण योजनेसाठी नागपूर जिल्ह्यातील विविध शासकीय विभागांना ६२ कोटी ४६ लक्ष रुपयांचा निधी वितरित* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *मुंबई : मुंबई विद्यापीठाचा दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या अभ्याक्रमास विद्यापीठ अनुदान आयोगाने दिली मान्यता काल जाहीर झालेल्या यूजीसीच्या यावर्षीच्या दुसऱ्या यादीत मुंबई विद्यापीठाच्या आयडॉलचे नाव समाविष्ट* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *पीक विम्याची नुकसान भरपाई न मिळाल्याच्या बहुसंख्य शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी राज्य सरकारने गावोगावी शिबिरांचे आयोजन करावे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची मागणी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारतीय संघाचा माजी फलंदाज आणि आंध्र प्रदेश संघाचा कर्णधार वेणुगोपाळ राव याने मंगळवारी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• श्रावण मासारंभ निमित्ताने प्रासंगिक लेख *श्रावण पाळा ; आजार टाळा* हिंदू धर्मात श्रावण महिन्याला अनन्यसाधारण असे महत्व आहे. या महिन्यात बहुतांश लोकं देव देव करण्याकडे वळतात. मांसाहार खाणारे ह्या महिन्यात वर्ज्य करतात. काही लोकं या महिन्यात केस कापणे देखील टाळतात. पूर्ण महिनाभर हिंदू धर्मातील मंडळी कोणतेही अधर्म होऊ नये याची काळजी घेतात. यामागे धार्मिकसोबत काही वैज्ञानिक कारणे आहेत. जसे की या महिन्यात मांसाहार वर्ज्य करणे........ https://nasayeotikar.blogspot.com/2019/07/blog-post_31.html वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ कथालेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *औषधांनी स्मरणशक्ती वाढते का ?* 📙 आजकाल अनेक वृत्तपत्रांमध्ये व केबल चॅनल्सवर स्मरणशक्ती / बुद्धी वाढवणाऱ्या औषधांचे पेव फुटले आहे. आमचे औषध घेतल्याने नापास होणारा मुलगा मेरिटमध्ये आला असे दाखलेही दिलेले असतात. साहजिकच मुले व त्यांचे पालक या दोहोंनाही अशा औषधांचे आकर्षण वाटू लागते. स्मरणशक्ती तसेच बुद्धिमत्ता हे मोठ्या मेंदूचे कार्य आहे. सर्व व्यक्तींच्या मेंदूचा आकार व वजन जवळपास सारखेच असतात. तरीही काही व्यक्ती हुशार तर काही मठ्ठ का बरे असाव्यात ? बुद्धिमत्ता म्हणजे एखाद्या विशिष्ट परिस्थितीचे यथायोग्य आकलन करून, प्राप्त परिस्थितीत जास्तीत जास्त प्रभावी, उपयुक्त असा निर्णय घेण्याची क्षमता. म्हणूनच औपचारिक शिक्षण न घेतलेला निरीक्षर शेतकरीही पढीक पंडितापेक्षा बुद्धिवान असू शकतो. माहिती व ज्ञान मिळवणे, जीवनात विविध अनुभव घेता येणे, मार्गदर्शन मिळणे या सर्वांवर बुद्धिमत्ता अवलंबून असते. मेंदू हा एखाद्या संगणकाप्रमाणे काम करतो. खरे तर संगणक मेंदूप्रमाणे काम करण्याचा प्रयत्न करतो असे म्हणायला हवे ! दोन वस्तूंचा परस्पर संबंध जोडून तर्काद्वारे मेंदू त्या लक्षात ठेवतो. दोन असंबद्ध गोष्टी लक्षात राहत नाहीत ते याचमुळे. त्यामुळे स्मरणशक्ती वाढवायची असेल, तर दोन गोष्टीत संबंध तर्क लढवून निर्माण करावा लागेल व एकात एक अशी त्यांची साखळी तयार करून कोणतीही क्लिष्ट गोष्ट लक्षात ठेवता येईल. म्हणजे स्मरणशक्ती वाढवणे आपल्या हातात आहे. वाचन वाढवणेही आपल्या हातात आहे. मग दररोज २५० मिलिग्रॅम गोळी वा औषधे खाऊन एखाद्या शॉर्टकटने बुद्धी वा स्मरणशक्ती वाढवणे शक्य आहे का याचा विचार तुम्हीच करायचा आहे ! *डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित* यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" एक मिनिट उशिरा येण्यापेक्षा तीन तास लवकर येणे चांगले.”* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *राज्यपालाची नेमणूक कोण करतो ?* राष्ट्रपती 2) *ग्रामपंचायतीमध्ये कमीत कमी व जास्तीत जास्त सदस्य संख्या किती असते ?* 7 ते 17 3) *ग्रामपंचायतीचा सचिव कोणाला म्हणतात ?* ग्रामसेवक 4) *तलाठयाच्या कार्यालयास काय म्हणतात ?* सज्जा / साजा 5) *गावात शांतता व सुव्यवस्था राखण्याचे कार्य कोण करतो ?* पोलीस पाटील *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ●  सौ.कुसुम कवठाळे मॅडम कै.गं.पो.सब्बनवार मा.विद्यालय. ●  गोविंद पाटील जाधव रोशनगावकर ●  एकनाथ डुमणे, मुखेड ●  मंगेश हनवत्ते, नरसी ●  साईनाथ पाटील मोकलीकर ●  दिलीप साळुंके ●  नागेश टिपरे ●  विश्वनाथ चन्ने, कळमनुरी ● बालाजी गायकवाड ● शिवसांब गणाचार्य, नांदेड ● यादव एकाले ● पवनकुमार भाले, धर्माबाद ● आनंद पेंडकर, माहूर ● बंडू पाटील मोरे ● संजीवकुमार हामंद, करखेली ● मुखीत अहमद, नांदेड ● सतीश दरबस्तेवार, कुंडलवाडी ● शिनू दर्शनवाड, येवती *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *'दिवा' हा अशी एक शक्ती आहे ज्याशिवाय जग उजळून निघूच शकत नाही आणि उजाडल्याशिवाय वास्तवाचा प्रकाश पडत नाही. 'दिवा' हा वास्तवाची लख्ख जाणीव करून देणारा दृष्टीदाता, घनघोर अंधारातला विश्वासाचा सोबती असतो. तो प्रकाश देऊन सत्य उजागर करीत असतो. उजेडालाच एकमेव सत्याचा चेहरा लाभलेला आहे म्हणून प्रत्येकजण त्याचा याचक बनून आराधना करतो. सर्वच चांगल्या कार्याचा आरंभ करताना दिवे लावले जातात. ही गोष्ट हेच प्रतीत करते की, अजूनही आमच्या जगण्यातला अंधार पूर्णत्वाने नाहीसा झालेला नाहीये.., पण तो आम्हाला निश्चितपणे दूर करायचा आहे, या निश्चयाचे हे प्रतीक.* *प्रत्येकाच्या मनातही असा उजेड निर्माण होण्यासाठी म्हणून माणुसकीचा दिप लावायला मात्र आम्ही सपशेल विसरून जातो. तशी तर प्रत्येकाला उजेडाची आस असते, पण डोक्यात कुठल्या न कुठल्या प्रकारचा अंधार असतो. जेव्हा हा अंधार पूर्णत्वाने दूर होतो, त्यावेळी ती व्यक्ती तेजाने उजळते आणि अनेक पिढ्यांना प्रकाशमान करते..आपल्या मेंदूतले असे सारे अंधारकोपरे उजळून निघावेत नि आपल्यातला माणूस तेजाने तळपू लागावा, यासाठी आपण 'दिपपूजन' का करू नये? जळणं वा तेवणं हे जिवंत असल्याचं द्योतक, परंतु दिव्याचं जळणं हे कधी स्वत:साठी नसतं. ते इतरांना प्रकाश देण्यासाठीच जळत असतात. इतरांना उजाळण्यातच त्यांच्या जळण्याची सार्थकता असते. आज-उद्या 'दिप अमावस्या आहे. व्यसनाधीन होऊन बेशुद्ध होण्यापलीकडेही आयुष्य असतं हे ठळकपणे दर्शवणारी 'दर्श-अमावस्या'! आपल्या ह्रदयात निरंतर ज्ञानाचा दिवा तेवत ठेवायला याहून उत्तम दिवस नाही..शुभेच्छा!* *॥ रामकृष्णहरी ॥* 💡💡💡💡💡💡💡💡💡 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाईल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सज्जनहो,* *तुम्हीच ठरवा, कसं जगायचं।* *कण्हत कण्हत की गाणं म्हणत।* *त्यासाठी* *मनात काही भरून* *जगू नका* *नाहीतर मन भरून जगता* *येणार नाही...!* *वळून कुणी पाहिलं नाही म्हणून* *माळरानावरच्या चाफ्याचं अडलं नाही* *शेवटी पानांनीही साथ सोडली* *पण पठ्ठ्यानं बहरणं सोडलं नाही !* *तुमच्या आयुष्यातही असेच बळ* *साठवा जेणे करून एक दिवस तुम्ही* *जगाचे आकर्षण व्हाल.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते* ) 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जी व्यक्ती सातत्याने कष्ट करते त्या व्यक्तीमध्ये प्रामाणिकपणा, जिद्द, चिकाटी, नम्रता, आपल्या माणसांविषयी व इतराविषयी आत्मियता हे गुण नक्कीच असतात. तो कधीही इतरांची बरोबरी करत नाही. ती आपली सारी स्वप्ने आपल्या हातातच आहेत आणि त्या हातातून जे काही घडते तेच आपले प्रारब्ध आणि तेच आपले विश्व समजते. अशा व्यक्तीच्या मनामध्ये कधीही कुणाचे वाईट व्हावे आणि आपलेच चांगले व्हावे असे विचार आणत नाही. म्हणून अशा व्यक्ती जीवनात पूर्णतः समाधानी असतात. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०. 🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃 ••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *तिहेरी फिल्टर* एके दिवशी एक व्यक्ती महान चाणक्याला भेटली आणि म्हणाली, 'मी तुमच्या मित्राबद्दल जे काय ऐकले ते तुम्हाला मी सांगूं का? 'एक मिनिट थांबा' चाणक्यने उत्तर दिले. 'काही सांगण्यापूर्वी मी थोडीशी तुमची परीक्षा घेतो, परीक्षेत उत्तीर्ण झालात तरच सांगा, आपण याला.' ट्रिपल फिल्टर चाचणी असे म्हणू...... चालेल? ती व्यक्ती म्हणाली, 'तिहेरी फिल्टर?'ठीक आहे. चाणक्य पुढे म्हणाला. 'माझ्या मित्राबद्दल माझ्याशी बोलण्यापूर्वी, तुम्ही जे काय म्हणणार आहात, ते फिल्टर करणे चांगले आहे, म्हणूनच मी त्याला तिहेरी फिल्टर चाचणी म्हणतो, आता पहिला फिल्टर, तुम्ही जे सांगणार आहात, ते सत्य आहे का? ' थोडस थांबून ती व्यक्ती म्हणाली 'नाही,' 'खरंच मी त्याबद्दल ऐकले आणि .......' 'ठीक आहे,' चाणक्य म्हणाले तुम्ही जे मला सांगणार आहात ते खर आहे, याची खात्री नाही तुम्हाला?, आता दुसरा फिल्टर, आता चांगुलपणाचे फिल्टर वापरून पाहूया. आपण माझ्या मित्राबद्दल काहीतरी सांगणार आहात ते त्याच्या बद्दलचे चांगले विचार आहेत काय?' ती व्यक्ती म्हणाली 'नाही, उलट ........' 'मग, मधेच तोडत चाणक्य पुढे म्हणाले,' तू मला त्याच्याबद्दल काहीतरी वाईट सांगू इच्छित आहेस आणि ते खरे आहे की नाही याची शाश्वती नाही, ठीक आहे, आता उपयुक्तता फिल्टर हा शेवटचा फिल्टर..... जे तू मला माझ्या मित्राबद्दल सांगणार आहेस ती माहिती मला उपयोगी असणार आहे काय?' 'नाही, तशी तुम्हाला ती उपयुक्त खरंच नाही' ती व्यक्ती ओशाळत म्हणाली. 'ठीक आहे,' म्हणजे 'जर तुम्ही मला सांगू इच्छिता, ते ना सत्य आहे,ना चांगले आहे , ना मला उपयोगी देखील आहे, तर मला ते का सांगता आहात?' प्रत्येक वेळी आपल्या जवळच्या प्रिय जनाबद्दल, मित्रा बद्दल ऐकताना या तिहेरी फिल्टरचा वापर करा. मैत्रीवर भरवसा ठेवा, हे तिहेरी फिल्टरचे शास्त्र खरोखर खूप उपयुक्त आहे. आपसातील गैरसमज दूर ठेवायचे असतील तर प्रत्येक व्यक्तीने हे तिहेरी फिल्टर आचरणात आणायला पाहिजे . हीच आहे चाणक्य-नीती. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *बुलेटीन विषयी वाचकांची प्रतिक्रिया* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• सप्रेम नमस्कार, मी मधुकर चिंतामण पवार, प्रेरणा विद्यालय सोनावळे, ता.मुरबाड, जिल्हा ठाणे. सर्वप्रथम चार वर्षांचा प्रवास अविरत पूर्ण केल्या बद्दल "फ्रेश मॉर्निंग बुलेटीन "टिमचे मनपुर्वक अभिनंदन 🌹🌹 2 सप्टेंबर 2018 रोजी "फ्रेश मॉर्निंग बुलेटीन "गृपला जोडलो गेलो आणि वाचक बनलो."सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट".या वाक्याच्या अक्षरशः प्रेमात पडलो.शालेय परिपाठासाठी वाहून घेतलेल्या या गृपच्या सहवासात परिपाठाचं महत्व खर्या अर्थाने कळलं.गृपमधलं सर्व संकलन,निवेदन अगदी प्रमाणबद्ध व अर्थपुर्ण. नासाजिंच वृत्त निवेदन व स्तंभलेखन अप्रतीम. संतोषजिंच दिनविशेष संकलन, कुणालजिंच्या बातम्या संकलन, राजेंद्रजींची विशेष माहिती. सौ.भारतीजींचा फ्रेश सुविचार. संगीताजींची प्रश्नमंजुषा , वाढदिवसाच्या शुभेच्छा.. एकनाथजींच कबिरांचे बोल, व्यंकटेशजिंच विचारधन, प्रमिलाताईंची बोधकथा सारं सारं अप्रतीम.माझं महतभाग्य मी आपल्या गृपचा सदस्य आहे. पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा 🙏💐🍫❤🌹🌷💛💚🧡👍 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 31/07/2019 वार - बुधवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- ■ १९७५ - अमेरिकेतील टीम्स्टर युनियन चा नेता जिमी हॉफा गायब. ■ १९८१ - पनामाचा हुकुमशहा ओमर तोरिहोसचा विमान अपघातात मृत्यू. ■ १९८७ - कॅनडातील एडमंटन शहरात एफ.४ टोर्नेडो. २७ ठार, ३३ कोटी डॉलरपेक्षा जास्त मिळकतीचे नुकसान. 💥 *जन्म* :- ◆ १९१२ - मिल्टन फ्रीडमन, अमेरिकन अर्थतज्ञ. ◆ १९१९ - लेफ्टनंट कर्नल हेमु अधिकारी, भारतीय क्रिकेट खेळाडू. ◆ १९५३ - जिमी कूक, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू. ◆ १९४१ - अमरसिंह चौधरी, गुजरातचे मुख्यमंत्री. 💥 *मृत्यू* :- ● १९७२ - पॉल-हेन्री स्पाक, बेल्जियमचा पंतप्रधान. ● १९८० - मोहम्मद रफी, भारतीय पार्श्वगायक. ● १९९३ - बॉद्वां पहिला, बेल्जियमचा राजा. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *मुंबई : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा चौथा विशेष पदवी प्रदान समारंभ; डॉ. अभय बंग, डॉ. राणी बंग यांना राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते डी. लिट पदवी प्रदान* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *इस्रोच्या मंगळयान, चांद्रयान आणि गगनयान यांसारख्या एकामोगामाग एक यशस्वी मोहीमा, तरीही सरकारकडून वैज्ञानिक, इंजिनीअर्सच्या पगारात कपात * •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *तात्काळ तिहेरी तलाक विधेयक लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही मंजूर, मुस्लिम महिलांना न्याय, शरद पवार, प्रफुल्ल पटेल अनुपस्थित तर AIDMK चा सभात्याग* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारचा धनगर समाजाला खूश करण्याचा प्रयत्न, एसटी प्रवर्गाच्या सर्व सवलती धनगर समाजालाही लागू होणार, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात सर्वत्र मुसळधार पावसाची हजेरी, पुणे, नाशिकमध्ये नद्यांना पूर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *कृत्रिम पावसासाठी सुकाणू समिती स्थापन; १ ऑगस्टपासून मराठवाड्यात प्रयोग शक्य, विभागीय महसूल उपायुक्त हे प्रयोगासाठी नोडल अधिकारी म्हणून काम पाहतील* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *नागपूर : आर्थिक दुर्बलांना मिळणार थेट अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या थेट द्वितीय वर्षात प्रवेश, 10 टक्के आरक्षण लागू करण्याचा हायकोर्टाचा आदेश* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *अन्न म्हणजे पूर्णब्रह्म* अन्न , वस्त्र आणि निवारा या माणसाच्या तीन मूलभूत गरजा आहेत. यातील अन्नाची गरज पूर्ण करण्यासाठी प्रत्येक सजीव धडपडत असतो. अश्मयुगीन काळातील लोक अन्नाच्या भटकंतीत अनेक वर्षे घातली. या अन्नाच्या शोधातच त्यांनी अग्निचा शोध लावला असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही......... पूर्ण लेख खालील लिंकवर वाचण्यास मिळेल. https://nasayeotikar.blogspot.com/2019/05/blog-post_69.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ कथालेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *अन्नाशिवाय माणूस किती काळ जगेल ?* 📙 या प्रश्नाचं एकच एक असं उत्तर देता येणं कठीण आहे. व्यक्ती व्यक्तीनुसार त्यात फरक पडू शकतो. कारण मुळात त्या व्यक्तीचं वजन किती होतं, त्याचं सर्वसाधारण आरोग्य कसं होतं, मधुमेह, रक्तदाब यांसारख्या विकारांचा प्रादुर्भाव होता की काय व मुख्य म्हणजे शरीरात कितपत पाणी होतं यावर हा काळ अवलंबून असतो. जोवर शरीरातील पाण्याचं प्रमाण योग्य राखलं जात आहे तोवर केवळ अन्नत्यागापोटी किती काळ काढता येईल, याविषयीची विश्वासार्ह आकडेवारी उपलब्ध नाही. वयाच्या ७४ व्या वर्षी महात्मा गांधींनी केवळ पाणी घेऊन २१ दिवस उपोषण केलं होतं. त्यापायी त्यांचं वजन जरी घटलं तरी आरोग्यावर तितकासा अनिष्ट परिणाम झाला नव्हता. मायकेल पील यांनी १९९७ साली 'ब्रिटिश मेडिकल जर्नल' मध्ये प्रकाशित केलेल्या एका शोधनिबंधात आणि २८,३६,३८ आणि ४० दिवस अन्नावाचून काढलेल्या व्यक्तींविषयीचा विश्वासार्ह अहवाल दिला होता. एवढे दिवस शरीर अन्नावाचून कसं काढू शकतं, याचं कारणही त्यात त्यांनी नमूद केलं होतं. शरीराचं नेहमीचं कार्य चालतं त्याला चयापचय म्हणतात. त्याचा कार्यवेग राखण्यासाठी आपल्याला पोषणाची म्हणजेच अन्नाची गरज भासते; पण जेव्हा या पोषणाची कमतरता भासते तेव्हा शरीर चयापचयाच्या कार्यवेगातही योग्य ते बदल करतं असं दिसून आलं आहे. थायरॉईड ग्रंथीतून होणार्‍या स्रावांचा वापर करून शरीर हे साध्य करतं. या बदलाचं प्रमाण प्रत्येक व्यक्तीनुसार वेगवेगळं असू शकतं. साहजिकच अन्नावाचून किती काळ काढता येईल हे या घटकावरही अवलंबून असतं. जोवर पाण्याच्या प्रमाणात लक्षणीय फरक पडलेला नाही तोवर अतिशय अल्प अन्नसेवनावर दीर्घकाळ काढल्याची कितीतरी उदाहरणं आहेत. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हिटलरच्या छळछावणीतील कित्येक जणांना जवळजवळ उपाशी अवस्थेत दिवस काढावे लागले होते. हा काळ काही महिन्यांपासून तीन चार वर्षांपर्यंतही होता. त्यापायी त्यांच्या शरीराचा जवळजवळ हाडांचा सापळा झाला होता. तरीही त्या स्थितीत त्यांच्या अंतर्गत अवयवांचं काम व्यवस्थित चालून ती मंडळी जिवंत राहिली होती. एवढेच नाही तर तिथून सुटका झाल्यानंतर ती पूर्वावस्थेत येऊ शकली होती. 'अॅनोरेक्सिया नर्वोसा' या रोगानं पछाडलेल्या व्यक्ती जाणूनबुजून स्वतःची उपासमार करून घेतात. आपलं वजन कमी करण्याच्या अतिरेकी हट्टापायी काहीजणांना ही व्याधी जडते. अशा मंडळींचं वजन तब्बल ४० टक्क्यांनी घटतं. त्याहून अधिक घट मात्र ते सहन करू शकत नाहीत. कर्करोगाची बाधा झालेल्या व्यक्तींनी नेहमीइतकंच अन्नसेवन केलं तरी त्यातलं पोषण कर्करोगग्रस्त पेशी पळवत असल्यामुळे इतर शरीराला योग्य तितके उष्मांक मिळत नाहीत. त्यांच्याही बाबतीत वजन ४० टक्क्यांहून अधिक घटलं तर मृत्यू ओढवतो. वजनात तितकी घट होण्यास किती वेळ लागेल हे अर्थात व्यक्ती व्यक्तीवर अवलंबून असतं. *बाळ फोंडके यांच्या 'किती ?' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *Well beginning is the half done.* *( चांगली सुरूवात म्हणजे अर्धे काम झाल्यासारखे आहे. )* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *संत तुकाराम महाराज यांचे जन्मस्थळ व समाधी स्थळ कोठे आहे ?* देहू 2) *मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे ?* अमरावती 3) *मराठीचे आद्यकवी कोण ?* मुकुंदराज 4) *साने गुरुजीचे पूर्ण नाव काय ?* पांडुरंग सदाशिव साने 5) *'श्यामची आई' या ग्रंथाचे लेखक कोण ?* साने गुरुजी *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ●  बालासाहेब कच्छवे, नांदेड ●  प्रशिक नंदुरकर, उमरखेड ●  प्रीतम नावंदीकर, नांदेड ●  मनोज बुंदेले, धर्माबाद ●  कैलाश गायकवाड, तेलंगणा ●  दिलीप सोळंखे, भोकर ●  नागनाथ इळेगावे, बिलोली *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *माणूस बर्‍याचदा ऐकीव आणि भ्रामक बाबींच्या मागे लागून जीवनातला अनमोल वेळ वाया घालवत असतो. अमृत प्राशन करणे, अमर होणे, संजीवनी अशा काही बाबी वारंवार चर्चेत येतात. या सर्व बाबींचा भौतिक विचार करून माणूस दमछाक करून घेतो. सर्व काही आपल्याच ठायी असणार्‍या कर्तृत्त्व, चिंतन, शांती व समाधानातून प्राप्त होणार्‍या या लौकिक  बाबी ! मात्र माणूस वरवरचा विचार करून स्वतःची दमछाक करून घेतो. 'तुझं आहे तुजपाशी परि जागा चुकलाशी.' अशीच ही गत म्हणावी लागेल. कस्तुरी मृग कस्तुरीच्या सुगंधाने ऊर फुटेतो धाव धाव धावतो. 'कस्तुरी' स्वतःजवळ असूनही त्याचा अंत मात्र तिच्याच शोधात  होतो. तसंच माणसाचं झालंय.* *थोडसं पूर्वजांकडं डोकावून पाहिलं तर कोणीही अमरत्व गाठू शकले नाहीत. ज्यांनी ध्येयासाठी झपाटून आपल्या कर्तृत्तवाचा ठसा उमटवला. खरं तर त्यांनाच अमृताचा खर्‍या अर्थानं कुंभ सापडला! त्यांनी तो कर्माच्या रूपानं प्राशन केला. आज हजारो-शेकडो वर्षे लोटली. ते देहाने नसले तरी कार्य रूपानं अमर आहेत. त्यांच्या हयातीत कधी त्यांनी भ्रामक अमृताचा शोध घेतला नाही. त्यांनी कधी वेगळ्या स्वर्गाचा विचार केल्याचे ऐकीवात नाही. आपल्या कार्य क्षेत्रातच मनोभावे स्वर्ग निर्माण केला. ज्यांनी लौकिकता व नैसर्गिकपण नाकारलं. ते सर्व अवहेलनेचे धनी ठरले आहेत. प्रतिकांचा उथळ अर्थ घेवून धावपळ करून चालत नाही. चिंतन व मननातून शाश्वत सत्ये बाहेर पडतात. ती शोधली की माणूस अजरामर होतो. हे त्या मागचं रहस्य सांगताना संत कबीर म्हणतात, पर्वता पर्वतावर फिरून थकलो, दमलो, प्रसंगी रडलोही परंतु सहज अमर करणारी संजीवनी काही प्राप्त झालीच नाही. कर्मच माणसाला अमर करते. हे जीवनाचे फलित आहे. कर्मभूमीत हृदय आणि हृदयात कर्मभूमीला  आसरा दिला की जीवनाचं नंदनवन होवून जातं.*  *॥ रामकृष्णहरी ॥* 🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाईल- 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *खरे जीवन समजून घ्या.* *एकदा एक काम करा, स्वतःलाच फोन लावून बघा, स्विच ऑफ, नो रेंज, व्यस्त असे अनेक प्रकार होतील पण फोन लागणार नाही.* *या जगात आपण सगळ्यांसाठी आहोत, वेळ पण देतो आणि स्वतःसाठी, बघा स्वतःसाठी आपण नेहमी व्यस्त आहोत, जगून घ्या,* *वागणं चांगल नसेल तर, साधी उचकीही लागत नाही. बोलणं गोड़ नसेल तर, महागडया मोबाइलवर घंटी पण वाजत नाही.* *आणि घर मोठ असो वा लहान जर गोड़वा नसेल तर, माणूसच काय, मुंगीसुद्धा जवळ येत नाही. मग एवढा अभिमान कशापायी, खरे जीवन जगा ।* *अशोक कुमावत* *(राष्ट्रपती पुरस्कार विजेते*) 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• प्रत्येकाच्या जीवनात निराशा ही सवतीसारखी नेहमी मनाला छळत असते.ती सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने मनाला विचलीत करते.अशा स्थितीतून तिला हद्दपार करण्यासाठी काही ना काहीतरी करण्यासाठी तो आशेकडे धावतो आणि त्यातुन सुटका करून घेतो.अर्थात जीवनात निराशेने घर केले तर नक्कीच आशेचा शोध घेऊन निराशेला बाजूला सारतो आणि जीवन निराशेतून मुक्त करतो.निराशा जरी जीवनात आली तरी घाबरायचे नाही तिला हिमतीने तोंड देत आशेचा शोध घ्यायला शिकले पाहिजे आणि त्यादृष्टीने प्रयत्न केले पाहिजे.हीच आपल्या जीवनाची खरी परीक्षा आहे. © व्यंकटेश काटकर,नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *प्रलोभनापासुन सावधपणे वागणे.* एका जंगलात मोठ्या संख्‍येने हरणांचा वावर होता. परंतु आपल्‍या सहका-यांची संख्‍या कमी होत चालल्‍याचे एका हरणाच्‍या लक्षात आले. त्‍याने आपल्‍या इतर सहका-यांना सावध केले परंतु कोणीच त्‍याच्‍याकडे लक्ष दिले नाही. त्‍या हरणाने आपल्‍या मित्राला सांगितले की डेरेदार व गच्च पानांनी भरलेल्‍या वृक्षांच्‍या फांद्यावर दडून शिकारी मचाण बांधतात. यासाठी आपण या वृक्षाखाली जाणेच न बरे. त्‍याचा मित्र त्‍याची गोष्‍ट ऐकून तेथेच थांबला. तिकडे त्‍या पानाआड दडलेल्‍या शिका-याने दोघांकडे फळे फेकण्‍यास सुरुवात केली. चतुर हरणास समजले की, झाडावर शिकारी बसलेला आहे. त्‍याने मित्राला सावध केले पण मित्र हरीण लोभाच्‍या बळी पडून फळे खाण्‍यासाठी पुढे गेला आणि शिका-याने त्‍याची लगेचच शिकार केली. चतुर हरणाला वाईट वाटले. पण मित्राने त्‍याचे म्‍हणणे ऐकायला हवे होते हे ही खरेच की नाही. *तात्‍पर्य :- आजच्‍या काळात कोणी जर आपल्‍याला प्रलोभन दाखवून जर फसवत असेल तर आपण सावध राहायला हवे किंवा कोणी जर सावध करत असेल तर त्‍याचे ऐकायला हवे.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 30/07/2019 वार - मंगळवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- ■ २०१४ - पुणे जिल्ह्यातील माळीण गावावर दरड कोसळून ५० पेक्षा अधिक ठार. ■ २००१- राजस्थानातील अलवर येथील राजेंद्रसिंग यांना 'रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.छोटे बंधारे बांधून पाणी साठवण्यासाठी त्यांनी लोकसहभागातून काम केले आहे. ■ २०००-चंदन तस्कर वीरप्पनने डॉ राजकुमार यांचे अपहरण केले. ■ १९९७- गानकोकिळा लता मंगेशकर यांना 'राजीव गांधी राष्ट्रीय सदभावना पुरस्कार' जाहीर. 💥 *जन्म* :- ● १९४७ - आर्नोल्ड श्वार्झनेगर, ऑस्ट्रियाचा अभिनेता व कॅलिफोर्नियाचा गव्हर्नर. ● १९७३ - सोनू निगम, पार्श्वगायक. 💥 *मृत्यू* :- ● १९४७ - जोसेफ कूक, ऑस्ट्रेलियाचा सहावा पंतप्रधान. ● १९९४ - शंकर पाटील, मराठी लेखक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *कर्नाटकातील राजकीय नाट्य संपलं, येडियुरप्पा यांनी केलं बहुमत सिद्ध, सरकारला 106 आमदारांचा पाठिंबा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मुंबई : आषाढ संपत असताना संपूर्ण राज्यात पावसाने धरला जोर, मुंबईसह कोकण, पश्चिम महाराष्ट्र, नाशिक, खान्देश, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. अनेक ठिकाणी नद्यांना पूर, धरणांंमधील साठ्यात समाधानकारक वाढ होत असून खोळंबलेल्या पेरण्यांना आला वेग* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *नवी दिल्ली : ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काँग्रेस करणार नवीन अध्यक्षांची निवड. नवीन अध्यक्ष गांधी घराण्याबाहेरची व्यक्ती असेल, असे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात दाेन सीएनजी बसेस सुरु करण्यात आल्या असून त्याचा विद्यार्थ्यांना फायदा हाेणार आहे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *दिल्लीः लोकसभेत राष्ट्रीय चिकित्सा आयोग विधेयक मंजूर करण्यात आले.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *नांदेड : येथील राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब गोरठेकर यांनी पक्ष सोडल्याची केली घोषणा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *बुलडाण्याच्या अनंता चोपडेला इंडोनेशियातील प्रेसिडेंट कप बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक, 52 किलो गटात अफगाणिस्तानच्या रेहमानी रमीशचा केला पराभव* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *ऑफरचा भुलभुलैय्या* * कमी श्रमात जास्त संपत्ती मिळावी असे प्रत्येक मनुष्याला वाटणे म्हणजे आपल्या अंगात असलेल्या आळशीपणाला उत्तेजन देणे होय. ज्या ज्या वेळी मनुष्य असे प्रयत्न करत आला आहे त्या त्यावेळी त्याला उदासीनते शिवाय काहीही मिळाले नाही. तरी सुद्धा माणूस अश्या घटनेतून काही बोध न घेता पुन्हा तश्याच काही बाबीच्या शोधात राहतो. मी गोष्ट करतोय ऑफरची.......... पूर्ण लेख वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करावे. https://nasayeotikar.blogspot.com/2019/01/blog-post_28.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *कृष्णविवराचा शोध कोणी लावला ?* 📙 तारे अमर नाहीत, त्यांचीही जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटका होत नाही. अर्थातच तार्‍यांची अखेर झाल्यानंतर त्यांची काय अवस्था होते, याविषयीच्या संशोधनाला चालना मिळाली. अंतरंगात धडधडत असणाऱ्या अणुमीलनाच्या भट्ट्यांपायी तारे स्वयंप्रकाशित होतात. हायड्रोजनच्या अणुंचं मीलन होऊन त्यापासून हेलियमचे अणू तयार होत असताना फार मोठ्या प्रमाणावर ऊर्जा बाहेर पडते. तीच प्रकाशाच्या रूपाने आपल्या नजरेला पडते. पण हायड्रोजनचं इंधन अमर्यादित नसतं. ते संपल्यावर हेलियम त्याचं स्थान घेतं. ते संपल्यानंतर चढत्या भाजणीनं कार्बन, नायट्रोजन यासारख्या अधिकाधिक जड मूलतत्त्वांचा इंधन म्हणून वापर होतो. एकदा का या प्रक्रियेतून लोहाची निर्मिती झाली, की ही प्रक्रिया थंडावते. आता कोणतंच इंधन शिल्लक राहिलेलं नसतं. त्यामुळे त्या ताऱ्यांच्या अंतरंगातून ऊर्जा बाहेर पडत नाही. सहाजिकच त्या ताऱ्यावर आतल्या दिशेनं आकुंचन पावायला लावणाऱ्या गुरुत्वाकर्षणाच्या बलाचा पगडा बसतो आणि तारा आकसायला सुरुवात होते. त्याचीच परिणती त्या ताऱ्यांचं अतिशय फिकुटलेला प्रकाश असणाऱ्या श्वेतबटूंमध्ये रूपांतर होतं, याची प्रचिती काही प्रमाणात मिळाली होती. कारण अवकाशात अशा प्रकारच्या श्वेतबटूंच्या अस्तित्वाचा पुरावा मिळालेला होता. त्यानंतर काय होतं याविषयी मात्र निश्चित सांगता येणे शक्य होत नव्हतं. पण ज्या अर्थी हे श्वेतबटू ताऱ्यांसारखेच स्थिर असल्याचं दिसतं त्यावरून हीच तार्‍यांची अंतिम अवस्था असावी, असा तर्क केला जात होता. मृत तार्‍यांचं कलेवर म्हणजेच श्वेतबटू, असाच समज प्रचलित होत होता. तरीही ते स्थिर कसे होतात ? हा प्रश्न अनुत्तरितच होता. कारण जर अंतरंगातल्या भट्ट्या थंड पडल्या असतील तर मग गुरुत्वाकर्षणाच्या ओढीला विरोध करणारं दुसरं बल असण्याची शक्यताच मावळते. पण क्वांटम मेकॅनिक्सच्या सूत्रांचा अवलंब करून डॉ. राल्फ फाउलर यांनी त्याचं तर्कसंगत स्पष्टीकरण दिलं होतं; पण ते पर्याप्त नाही, अशी भूमिका एका विशीतल्या भारतीय तरुणानं घेतली. त्यानं त्यावेळी नुकत्याच प्रकाशात आलेल्या आईन्स्टाइनच्या सापेक्षतावादाचा अवलंब करत, जर श्वेतबटू बनलेला तारा महाकाय असेल, म्हणजेच त्याचं वस्तुमान आपल्या सूर्याच्या दीडपटीहून जास्त असेल, तर श्वेतबटूही आतल्या आत कोसळतच राहील आणि त्याचं रूपांतर अपरिमित गुरुत्वाकर्षणाची ओढ असलेल्या एका सूक्ष्म अवस्थेत होईल, असं भाकीत केलं. त्या अवस्थेत गुरुत्वाकर्षणाची ओढ इतकी प्रचंड असेल की त्यातून प्रकाशकिरणही बाहेर पडू शकणार नाहीत, असा दावा त्यानं केला होता. त्यावेळचे खगोलमहर्षी त्या तरुणाचे गुरू अार्थर एडिन्गटन यांनी त्या प्रबंधाची जाहीर टिंगल केली. त्या तरुणाची हेटाळणीही केली. पण कालांतराने इतर प्रख्यात खगोलविदांनी त्या तरुणाचा सिद्धांतच बरोबर असल्याचं सप्रमाण दाखवून दिलं. त्या अवस्थेला मग इतर काहीजणांनी कृष्णविवर असं नाव दिलं. कृष्णविवरांच्या अस्तित्वाची प्रचिती देणारे असंख्य अप्रत्यक्ष पुरावे आता मिळाले आहेत. त्यामुळे कृष्णविवर केवळ कल्पनेचा खेळ नसून आपल्या विश्वातील एक सत्य घटक आहे हे सिद्ध झालं. कृष्णविवराचं भाकीत करणारा तो तरुण होता सुब्रह्मण्यम चंद्रशेखर. त्यांना या शोधाबद्दल १९८३ सालचा नोबेल पुरस्कार दिला गेला. *बाळ फोंडके यांच्या 'कोण ?' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• “संभाषणाचा सर्वात वाईट प्रकार म्हणजे वादविवाद.” *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *छत्तीसगड राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत ?* श्री भुपेश बघेल 2) *संत गाडगेबाबा यांचे आवडते भजन कोणते ?* गोपाला गोपाला , देवकी नंदन गोपाला 3) *स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव काय होते ?* नरेंद्रनाथ दत्त 4) *आंबोली हे थंड हवेचे ठिकाण कोठे आहे ?* सिंधुदुर्ग 5) *संत ज्ञानेश्वर महाराज यांचे समाधी स्थळ कोठे आहे ?* आळंदी *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ●  नागनाथ इळेगावे ●  सचिन गादेवार ●  प्रवीण चातरवाड ●  विजय कुऱ्हाडे ●  प्रियंका घुमडे ●  शेख नवाज ●  निलेश कोरडे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *प्रत्येक अस्वस्थ माणसाने थोड आत डोकावून पहावं. तिथं त्याला एक अतृप्त जीव येरझारा घालतांना सापडेल. माणूस लहान असो, मोठा असो, त्याला जे काही हवं आहे, ते मिळत नसल्याची नांगी सतत डंख मारीत असते. जी काही आपली पात्रता आहे, त्यानुसार आपल्याला जे हवं आहे, ते मिळत नाहीये, ही भावना त्याला छळत असते. शांतपणे जगू देत नाही. प्रत्येक छोट्यामोठ्या गोष्टींमागे एक सुप्त अहंकार असतो आणि जोपर्यंत हा असा अहंकाराचा जागता पहारा आहे, तोपर्यंत कुणाच्याही आशीर्वादाने कोणतीही शांती मिळणार नाही? औदासीन्य नाहीसं कसं होणार? अहंकारानं मन काठोकाठ भरलेलं असलं, तर आशीर्वादानं आत उतरायचं कसं? भांड रिकाम हवं, तरच ते भरता येईल.* *कवी शांताराम आठवले यांनी एका ओळीत जे सांगितलंय, “जो हसला, तो अमृत प्याला” हे अत्यंत सार्थ आहे. अहंकार संपला रे.. संपला की स्वास्थ्य आणि आनंदा व्यतिरिक्त उरतं काय? आपल्या शांततेच्या आड आपण स्वतः च येतो. हा अडथळा दूर होणं महत्वाचं. कबीर यालाच 'सहजयोग' म्हणतात. हा अहंकार मिटला, तर जीवन प्रतिक्षणी पूज्य भावाने व्यापून जाईल. राहत्या वास्तूत प्रतिदिन गंगास्नान घडेल. तुम्ही जिथं जिथं विहार कराल, ते ते तीर्थस्थळ घडेल. अर्थात ही प्रचिती येण्यासाठी मुळ अहंकार गेला नाही तर.. प्रार्थना, पूजा, तीर्थयात्रा सगळं व्यर्थ आहे!* *॥ रामकृष्णहरी ॥* 🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाईल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  🌟! !  *कबिराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• प्रेमभाव  एक  चाहिए ,  भेष  अनेक  बनाय  | चाहे  घर  में  वास  कर ,  चाहे  बन  को  जाए  ||   अर्थ        मानवाचा धर्म मानवता . मानवता जपायची तर मानवाच्या अंतरात प्रेमभावनेचे अधिष्ठान महत्वाचे आहे. त्या शिवाय मानवता व मानव्य कसं प्रवाहित होणार ?  भौगोलिक व भौतिक परिस्थितीशी समायोजन साधण्यासाठी भिन्न वेष परिधान करा .   विभिन्र प्रकारच्या (उपलब्धतेनुसार महालापासून झोपडीपर्यंत) वास्तूत  किवा वनात वास्तव्य करा ते परिस्थितीनुरूप स्वाभाविक आहे. परंतु त्यात अवडंबर असता कामा नये. सत्य  व प्रेमभाव हाच खर्‍या जीवनाचा मुलाधार आहे. त्यामुळे जीवनाची गोडी व सुंदरता वाढते  म्हणून माणसाने  अशाश्वत अवडंबराच्या व बुवाबाजीच्या नादी लागून जगण्याला  विनाकारणच अंधानुकरणी व भंपक बणवू नये . ते मानवतेला पूरक असू शकत नाही.      एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जिद्द,मेहनत आणि प्रयत्न हे तुमच्या हाती घेतलेल्या कामासाठी वापरलेले कौशल्य आहे.यामुळे तुमचे काम अधिक चांगले व उत्कृष्ट दर्जाचे होण्यास मदत करते. कोणतेही काम जेव्हा हाती घ्याल तेव्हा  ह्या तीन गोष्टी आपल्या अंगी बाळगणे अत्यंत महत्वाचे आहे. त्यामध्येच आपली प्रगती  सामावलेली असेल. - व्यंकटेश काटकर,नांदेड.   संवाद..9421839590. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *अनमोल क्षण* प्रसिध्द लेखक कै. वि. स. खांडेकरांकडे अलोट गर्दी जमली होती. लोक हार घेऊन अभिनंदनासाठी तिष्ठत उभे होते. कॅमेरे सरसावुन फोटोग्राफर धावपळ करत होते. खांडेकरांना साहित्य ऍकेडमीचे पारितोषिक मिळाले तेव्हांचा प्रसंग. एका पत्रकाराने विचारले, 'आपल्या जीवनातील सर्वोच्च आनंदाचा क्षण कोणता ?' खांडेकरांनी दोन क्षण डोळे मिटले. प्रसंग त्यांच्या डोळयासमोर दिसु लागला. ते म्हणाले, 'आज सकाळीच एका अपरिचिताने येऊन माझ्या गळयात हार घातला. माझ्या पायावर डोकं ठेवलं मी विचारलं, 'कोण आपण? मी ओळखलं नाही'. 'साहेब, आज मी आहे तो आपल्यामुळेच. फार फार वार्षापुर्वी मी एका तळयाच्या शेजारून फिरत असता अचानक तोल जाऊन मी पाण्यात पडलो. मला पोहता येत नव्हतं, मी गटांगळया खाऊ लागलो. माझी ती अवस्था आपण पाहिलीत आणि ताबडतोब पाण्यात उडी घेतलीत. घाबरलेला मी गळयाला मिठी मारली. आपण जोरात हिसका देऊन मिठी सोडवलीत व ओढतच मला पाण्याबाहेर काढलंत. कुठलीही ओळख न देता उपकाराची भावना प्रगट न करता आपण निघून गेलात. मागून मला कळले मला वाचवणारे सुप्रसिध्द लेखक खांडेकर होते. तेव्हांपासुन आपल्याकडे यायचे होते तो योग आज आला'. खांडेकर म्हणाले, 'कोणालातरी जगायला आपण मदत करू शकतो ही गोष्ट माझ्या दृष्टीने फार मोठी आहे. तोच क्षण माझ्या जीवनातला अनमोल क्षण होय'. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 29/07/2019 वार - सोमवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- ◆ १९८७- भारताचे पंतप्रधान राजीव गांधी व श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष जे.आर.जयवर्धने यांनी भारत-श्रीलंका करारावर सह्या केल्या. ◆ १९८५-मल्याळम लेखक टी. एस. यांना ज्ञानपीठ पुरस्कार. ◆ १९५७- 'इंटरनॅशनल अँटॉमिक एनर्जी एजन्सी(IAEA) ची स्थापना. ◆ १९४६-टाटा एयरलाइन्सचे 'एयर इंडिया' असे नामकरण करण्यात आले. 💥 *जन्म* :- ● १९२२ - बळवंत मोरेश्वर पुरंदरे, मराठी इतिहाससंशोधक, लेखक. ● १९२५ - शिवराम दत्तात्रेय फडणीस, मराठी व्यंगचित्रकार. ● १९५९ - संजय दत्त, हिंदी चित्रपट अभिनेता. 💥 *मृत्यू* :- ● २००८ - इश्मीत सिंग सोधी, भारतीय पार्श्वगायक. ● २००९- महाराणी गायत्री देवी ,जयपूरच्या राजमाता *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *नवी दिल्ली - राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे बेनीन येथील विमानतळावर आगमन, पश्चिम आफ्रिकेतील 3 देशांचा दौरा.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *१७ आमदार अपात्र; कर्नाटकात आज दुसऱ्यांदा होणार शक्तिप्रदर्शन* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *उत्तर प्रदेश बनणार देशातील पहिले ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे राज्य, फ्लिपकार्टच्या सीईओंचे प्रतिपादन : ६५ हजार कोटींच्या प्रकल्पांची पायाभरणी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *श्रीनगर - जम्मू आणि काश्मीर येथे मध्यरात्री 12.54 वाजता भूकंपाचा सौम्य धक्का, 3.2 एवढ्या रिश्टर स्केलची तीव्रता* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *पुणे - मराठा क्रांती सेना विधानसभा निवडणुकीत राज्यात 100 जागा लढवणार, पुण्यातील बैठकीत झाला निर्णय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *सोलापूर : कामिका एकादशी निमित्त पंढरपुरात भाविकांची गर्दी, आषाढी नंतरची पहिली १५ दिवसाची एकादशी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ * दिल्ली : बॅँकॉक येथे सुरू असलेल्या थायलंड ओपन मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताच्या आशिष कुमारने ७५ किलो गटात मिळविले सुवर्णपदक, आशिषचे हे पहिलेच आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक आहे. या स्पर्धेत भारताने एक सुवर्ण, चार रौप्य व तीन कांस्यपदकांसह आठ पदके पटकावली आहेत* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मृत्यू : एक अटळ सत्य* मृत्यू हे कोणाच्या हातात नाही आणि ते कोणाला सांगून देखील येत नाही. म्हणून मानवाला सर्वात जास्त भीती कोणाची वाटत असेल तर ते मृत्यूची. प्रत्येकाला वाटते की मृत्यू येऊच नये मात्र जन्म घेतलेल्या प्रत्येकाचा मृत्यू अटळ आहे. त्यात काही बदल करता येत नाही. स्त्री असो पुरुष असो, गरीब असो असो श्रीमंत असो, राजा असो वा रंक असो प्रत्येकांचा एक ना एक दिवस मृत्यू होणार हे निश्चित........... पूर्ण लेख खालील लिंकवर वाचन करता येईल. https://nasayeotikar.blogspot.com/2019/03/blog-post_12.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *ढगांचं बारसं कोणी केलं ?* 📙 मे १७८३ पासून त्या वर्षाच्या ऑगस्ट महिन्यापर्यंत बहुसंख्य युरोपीय देशांच्या आकाशात एक विलक्षण दृश्य पाहायला मिळत होतं. आईसलँडमधील एल्डेयार इथं तसंच जपानमधील असामा यामा इथं ज्वालामुखींचे उद्रेक झाले होते. त्यातून बाहेर पडलेली राख आणि राळ यांचं मिश्रण साऱ्या उत्तर गोलार्धामधील आकाशात पसरलेलं होतं. त्या दृश्यानं अनेकांना विस्मयचकित केलं होतं. कलाकारांनी त्याची चित्रं रंगवली होती. नियमित रोजनिशी लिहिणाऱ्यांनी त्याची तपशीलवार वर्णनं नोंदवून ठेवली होती. साहित्यिकांनी आपल्या कथा कादंबऱ्यांसाठी त्या आकाशदर्शनाची पार्श्वभूमी वापरली होती. त्यात भर पडली ती १८ ऑगस्टच्या रात्री एक धगधगता तेजस्वी अशनी त्या आकाशात चमकून गेला तेव्हा. सर्वांच्याच डोळ्यांचं पारणं फेडणाऱ्या त्या दृश्यानं एका अकरा वर्षांच्या मुलाच्या मनावर कायमची मोहिनी घातली नसती तरच नवल. त्या दिवसांपासून ल्युक हार्वर्डला आकाशदर्शनाचा छंद जडला. वास्तविक पुढील आयुष्यात त्यानं खगोलशास्त्राचा व्यवसाय म्हणून स्वीकार केला नव्हता वा त्या विषयाचा अभ्यासही केला नव्हता. वनस्पतीशास्त्रातली पदवी त्यानं मिळवली होती. तरीही आकाशदर्शनाचं त्याचं वेड काही कमी झालं नाही. त्याच सुमारास डेन्मार्कमधील वनस्पतीशास्त्रज्ञ कार्ल लिनायस यानं वनस्पतीचं वर्गीकरण करणारी एक प्रणाली विकसित केली होती. ती सर्वत्र गाजली होती. आजतागायत त्याच प्रणालीचा वापर होतो आहे. तरुण ल्युकवरही त्याचा प्रभाव पडला होता. त्या भरात त्यानंही त्या वर्गीकरणामध्ये आपल्या परीनं थोडी भरही घातली होती. वनस्पतीचं वर्गीकरण करता येतं, तर मग आकाशात नेहमीच दिसून येणाऱ्या ढगांचं वर्गीकरण का करता येऊ नये, असा विचार त्याच्या मनात घोळू लागला होता. त्याच सुमारास फ्रेंच वैज्ञानिक ज्याँ बातिस्त लमार्क यानं आकाशात दिसणाऱ्या ढगांची पाच ढोबळ वर्गांमध्ये विभागणी केली होती. तशी ती जुजबीच होती; पण तोवर तसा प्रयत्न कोणीच केला नसल्यानं लमार्कच्या वर्गीकरणालाही मान्यता मिळाली. त्यामुळे ल्युक हाॅवर्डला अधिक प्रोत्साहन मिळालं आहे आणि मग त्यानं अधिक तर्कसंगत अशी आपली प्रणाली सादर केली. त्याने एकंदरीत चार मार्ग प्रतिपादित केले होते. एक *क्युम्युलस* म्हणजे एखाद्या ढिगासारखे दिसणारे, दोन *स्ट्रॅटस* म्हणजे एकावर एक थर असणारे, तीन *सिर्रस* म्हणजे कुरळ्या केसांसारखे वेटोळेदार आणि लांबलचक असणारे आणि चौथे *निम्बस* म्हणजे पाण्याचा साठा असणारे पावसाळी ढग. या चार वर्गांमध्ये संकर होण्याची शक्यताही त्यानं वर्तवली होती. त्यानुसार पावसाळी पण ढिगासारखे असणारे ते *क्युम्युलोनिम्बस* कुरळ्या केसांचे थरावर थर असणारे सिर्रोस्ट्रॅटस वगैरे. अठराव्या शतकाची अखेर होता होता हाॅवर्डच्या या वर्गीकरणाला सर्व स्तरांमधून विस्तृत मान्यता मिळत गेली. आजही यांच वर्गीकरणाचा वापर केला जात आहे. ढगांचे गुणधर्मही या वर्गीकरणातून प्रतीत होतात याचीही प्रचिती आता मिळालेली असल्यामुळे तर या वर्गीकरणावर शिक्कामोर्तबच झाले आहे. म्हणून ल्युक हॉवर्डलाच ढगांचं बारसं केल्याचं श्रेय द्यायला हवं. *बाळ फोंडके यांच्या 'कोण ?' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• “संकटात सापडल्यावरच माणूस स्वतःला ओळखतो.” *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *जंगलातला सर्वात मोठा प्राणी कोणता ?* हत्ती 2) *सर्वात वेगवान प्राणी कोणता ?* चित्ता 3) *मध्यप्रदेश राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत ?* श्री कमलनाथ 4) *संत गाडगेबाबा यांचे पूर्ण नाव काय होते ?* डेबूजी झिंगराजी जानोरकर 5) *राजस्थान राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत ?* श्री अशोक गहलोत *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ●  सुनील कोल्हे ●  सुदीप दहीफळे ●  दलित सोनकांबळे ●  माधव मुस्तापुरे ●  संजय पंचलिंग *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *'घराच्या, शहराच्या आणि देशाच्या दुरवस्थेला दुसरा-तिसरा कोणी जबाबदार नसून, माझ्यातल्या 'मी' जबाबदार आहे. ' असे बाबासाहेब पुरंदरे एकदा म्हणाले होते. 'मी' हा एवढा मोठा असतो, की त्याचे सहजासहजी समाधान होत नाही. त्याला अहंकाराचा स्पर्श असतो. तो दुखावू नये, म्हणून काळजी घेतली जाते. 'मी हे का करावे','माझा याच्याशी काय संबंध' यासारखे प्रश्न विचारून आपल्यातला 'मी' अनेक सामाजिक कर्तव्यांपासून दूर जातो. एकदा का होईना 'मी'ने 'मी'चे ऐकले, तर व्यक्तीमत्वात सकारात्मक बदल होईल.* *वाल्याने 'मी'चा खरा आवाज ऐकला. वाटमारी सोडली आणि तो वाल्याचा वाल्मिकी झाला. वाटमारी करणारा वाल्या पुढे भारतीय संस्कृतीचा वाटाड्या बनला. मी कोणाला दोष देणार नाही. माझ्याकडून होईल तेवढे सत्कार्य मी करेन माझ्या हातून चांगले होण्याची शक्यता नसेल, तेंव्हा मी कोणाचे वाईट करणार नाही. यासारखी छोटी छोटी सूत्रे प्रत्येकाने आचरणात आणली, तर समाजस्वास्थ्य सुधारेल. यात शंका नाही. 'मी' चूक करतो म्हणून 'आम्ही' चूक करायला धजावतो. 'मी' सुधारलो तर जग सुधारेल. सकल जीवन समृद्ध करण्यासाठी 'मी'वर चांगले संस्कार होणे आवश्यक आहे.* *॥ रामकृष्णहरी ॥* 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 *श्री संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *माणूस हा परिवर्तनशील जीव आहे. त्याच्यावर जेव्हढ्या लवकर परिणाम होईल तेव्हढा कुणावरही होणार नाही. म्हणून फक्त सकारात्मक विचार करावा. त्यातून 100% परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही.* *बाणभट्ट गुरुकुल आश्रमात शिक्षण घेतांना त्याला काहीच येत नव्हते, तो अभ्यासात सर्वात मागे असायचा, त्यामुळे एक दिवस तो आत्महत्या करायला निघाला.* *एका विहिरीजवळ आल्यावर त्याच्या असे लक्षात आले की पाण्याची बादली जिथून खाली वर येते तिथे एक चरा म्हणजे खोल जागा तयार झालेली दिसली.चमत्कार झाला--जर दगड साध्या दोराच्या सततच्या घर्षणाने झिजू शकतो तर जिवंत माणूस का नाही? आणि या प्रश्नाने हर्षाच्या राजवटीत बाणभट्ट हा प्रसिध्द कादंबरीकार जन्माला आला.* *ज्याला त्यावेळचा आणि आजचा समाज विद्वान म्हणून संबोधतो.* *आपणही जरा विचार करा जर सातत्याने एखादी अशक्य गोष्ट घडू शकते मग आपण प्रयत्न का सोडायचे?* *शेवटी म्हणतात ना ,प्रयत्ने वाळूचे कण रगडीता ,तेलही गळे* *अशोक कुमावत* *( राष्ट्रपती पुरस्कार विजेते )* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जीवनातले सगळेच प्रश्न सहज मिटतील असे नाही.काही प्रश्न सहज प्रयत्न केल्यावर मिटतात तर काही अथक प्रयत्न करुनही मिटत नाहीत.अशावेळी मनुष्य आपला स्वत:चा आत्मविश्वास गमावून बसतो आणि आपलं नशिबच तसे आहे आता आपण काय करू शकतो अशा नकारात्मक विचारावर विश्वास ठेवतो.असे केल्याने प्रश्न मिटत नाहीत तर त्या प्रश्नांना ठामपणे समोर उभे राहून मनामध्ये आत्मविश्वास निर्माण करुन जे काही आपल्यासमोर संकटं किंवा प्रश्न उभे राहतील त्याला तोंड देऊ आणि समर्थपणे जीवन जगू.असे विचार आणले तर जीवनाचा कोणताही प्रवास आनंदाने करु शकतो.कारण जीवनच संघर्ष आहे त्याला सामोरे गेलेच पाहिजे.हतबल होऊन किंवा विश्र्वास गमावून चालणार नाही. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *महती आईची* एकदा एका व्‍यक्तीने स्‍वामी विवेकानंदांना प्रश्‍न विचारला,'' स्‍वामीजी, संसारामध्‍ये जेवढी आईची महती गायली जाते तेवढे महत्व पित्‍याला का दिले जात नाही?मातेइतकाच पितासुद्धा महत्‍वाचा असूनसुद्धा पित्‍याला फारसे का महत्‍व दिले जात नाही याचा कृपया उलगडा करावा.'' स्‍वामीजी यावर काहीच बोलले नाही. ते त्‍या व्‍यक्तिपासून थोडे दूर गेले आणि एक मोठा दगड त्‍यांनी उचलला व त्‍या व्‍यक्तिच्‍या हाती देत ते म्‍हणाले,'' बंधू, हा दगड उद्या सकाळपासून तू पोटाला बांध आणि तुझी नित्‍यनेमाची सर्व कामे करत जा. तुझ्या प्रश्‍नाचे उत्तर तुला मिळून जाईल.'' दुस-या दिवशी सकाळी ओरडतच तो माणूस स्‍वामी विवेकानंदांकडे आला,'' स्‍वामीजी माझी कंबर, पोट दोन्‍हीही खूप दुखत आहे. एक प्रश्‍न काय विचारला मी, तुम्‍ही असे काय विचित्र उत्तर दिले त्‍याचे. माझी कंबर, पोट अगदी दुखून मी हैराण झालो आहे.'' स्‍वामी मंद स्मित करत म्‍हणाले,'' बंधू, तुझ्या प्रश्‍नाचे उत्तर तुला मिळाले नाही काय? अरे जिने नऊ महिने तुला पोटात घेऊन तुला वाढवले, तुझे कधीही तिला ओझे झाले नाही, तिने कधीही कंटाळा केला नाही. त्‍या मातेची महती ही तिन्‍ही लोकांत सर्वश्रेष्‍ठच आहे. '' *तात्‍पर्य :-* *आईसारखे दैवत सा-या जगतामध्‍ये नाही.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 27/07/2019 वार - शनिवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- ■ १९९९- द्रव खनिज तेल वायूचा (LPG)वाहनांसाठी इंधन म्हणून वापर करण्याचा प्रस्ताव पेट्रोलियम मंत्रालयाने मंजूर केला. ■ २००१- सार्वजनिक ठिकाणी सिगारेट, तंबाखू व गुटखा सेवनावर व जाहिरातीवर बंदी चा महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा निर्णय. ■ २०१२-लंडन येथे ३० व्या ओलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली. 💥 *जन्म* ● १८९९- पर्सी हॉर्नीब्रूक, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू. ● १९१५- जॅक आयव्हरसन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू. 💥 *मृत्यू°* ● २००२ - कृष्णकांत, भारताचे उपराष्ट्रपती. ● २००३ - बॉब होप, इंग्लिश अभिनेता. ● २०१५ - डॉ. अब्दुल कलाम यांचा स्मृतिदिन *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *कल्याण - मुंबईसह उपनगरात जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर परिसरात पावसानं थैमान घातलं आहे. अनेक सखल भागात पाणी साचलं असून बदलापूर स्टेशन येथील रेल्वे रुळ पाण्याखाली गेल्याने लोकल सेवा ठप्प झाली आहे, पुन्हा एकदा 26 जुलैची आठवण झाली ताजी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *बंगळुरु: प्रचंड राजकीय उलथापालथीनंतर भाजपाचेवरिष्ठ नेते बी. एस. येडियुरप्पा यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *मुंबई - मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत, शाळेला सुट्टी देण्याचा निर्णय मुख्याध्यापकांनी ठरवावा, शालेय शिक्षण मंत्र्याची माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *घोट येथील जवाहर नवोदय विद्यालयात शैक्षणिक व भौतिक सोयीसुविधा पुरवाव्यात, अशी मागणी खासदार अशोक नेते यांनी केंद्रीय मानव संसाधन विभागाचे सचिव बी. के. सिंग यांच्याकडे केली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *आरक्षणाचा अध्यादेश काढा, नाहीतर आधीच्या आरक्षणानुसार निवडणूक घ्या, सुप्रीम कोर्टाचा आदेश : नागपूर, अकोला, वाशिम, नंदुरबार, धुळे जि.प. निवडणूक अटळ* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *लंडन : इंग्लंडचे 182 धावांचे माफक लक्ष्य आयर्लंड संघाला पेलवले नाही आणि त्यांचा संपूर्ण संघ 38 धावांत तंबूत परतला, इंग्लंडने हा सामना 143 धावांनी जिंकला* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *अमरावती : राज्यस्तरीय रायफल व पिस्टल स्पर्धेमध्ये एअर रायफल शूटिंग या क्रीडाप्रकारात १४ वर्षे वयोगटातून अमरावतीची मुनमुन राजेश तायडे हिने अव्वल स्थान पटकावले.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *प्रश्न कमी पटसंख्येच्या शाळेचा ...* दोन वर्षाखाली दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या जवळपास एक हजार चारशे शाळा बंद करण्यात आल्या होत्या आणि त्यात जास्तीत जास्त सरकारी शाळांचा समावेश होता. या शाळा बंद झाल्यामुळे या शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी यांचे जवळच्या शाळेत समायोजन करण्यात आले. शिक्षक काय कोठे ही जाऊन नोकरी करू शकतो ? त्याला त्याचे तेवढे दुःख नाही मात्र इयत्ता पहिली ते चौथी वर्गात शिकणाऱ्या सहा ते दहा वयोगटातील मुलांचे काय हाल होतात ? याचा जरा देखील विचार केला जात नाही याचे फार मोठे दुःख आहे. ...... पूर्ण लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे. https://nasayeotikar.blogspot.com/2019/05/blog-post.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *इंटरनेटची मालकी कोणाकडे आहे ?* 📙 अमेरिकेच्या संरक्षण खात्यासाठी संशोधन करणाऱ्या काही वैज्ञानिकांना सतत संपर्कात राहणं आणि एकमेकांना आपण वाचलेल्या किंवा लिहिलेल्या लेखांची, अहवालांची साद्यंत माहिती सतत देणं आवश्यक वाटलं. त्यावेळी उपलब्ध असलेल्या साधनांनी त्यांना समाधान मिळत नव्हतं, म्हणून त्यांनी आपापले संगणक एकमेकांना बिनतारी पद्धतीनं जोडून एक जाळं निर्माण केलं. याला त्यांनी 'अर्पानेट' असं नाव दिलं. त्याचा वापर त्यावेळी तरी मर्यादित होता; पण ती संकल्पना एका क्रांतीची उद्गाती ठरली. ही संकल्पनाच आजच्या इंटरनेटचा आत्मा आहे. त्यावेळी फक्त त्या संशोधकांचेच संगणक एकमेकांशी जोडले गेले होते. ते संशोधकही एकमेकांपासून फार दूर नव्हते; पण एकदा अशा प्रकारे बिनतारी पद्धतीने संगणक एकमेकांशी जोडता येतात हे समजल्यावर त्याचं एक जगड्व्याळ जाळं तयार व्हायला फार वेळ लागला नाही. ते जाळ बांधण्यासाठीच्या पायाभूत सुविधा प्रस्थापित करायला काय वेळ लागला असेल तेवढाच. त्या पायाभूत सुविधांमध्ये अनेक प्रणालींचा समावेश आहे. संगणक एकमेकांशी जोडता येण्यासाठी संगणकांमध्ये काही विशिष्ट इलेक्ट्रॉनिक घटकांचा अंतर्भाव करावा लागला. यांना इथरनेट कार्ड म्हणतात. पूर्वी ते स्वतंत्रपणे घेऊन संगणकाशी जोडावं लागत असे. आता ते संगणकातच अंतर्भुत केलेलं असतं. टेलिफोनद्वारे संगणकांची जोडणी करण्यासाठी काही व्यवस्था करावी लागते. आता तर राऊटर वापरून संपूर्ण घरात किंवा मोठ्या परिसरात इंटरनेट प्रमाण उपलब्ध होण्यात होईल अशी 'वायफाय' प्रणाली विकसित केली गेली आहे. संगणकातले संदेश एका ठिकाणाहून दुसरीकडे नेण्यासाठी उपग्रहांचा वापर होतो. आणि या सर्व प्रणाली व्यवस्थित आपापलं काम करतील यासाठी काही खास मंत्रावळी म्हणजेच सॉफ्टवेअरचीही निर्मिती केली गेली आहे. ही मंत्रावली वापराच्या दृष्टीने अधिकाधिक सुलभ व्हावी सर्व गरजांसाठी ती उपयोगी पडावी आणि संदेशवहन वेगवान व्हावं यासाठी नवनव्या सुधारित मंत्रावलीही सतत तयार होत असतात. त्याशिवाय जगभरची विविध प्रकारची माहिती साठवून ठेवण्यासाठीची व्यवस्थाही करावी लागते. पूर्वी अशा प्रकारची माहिती कागदावर लिहिली जाऊन त्याचं दप्तर कपाटांमध्ये साठवून ठेवलं जात असे. आता ते संगणकाद्वारे दृकश्राव्य फितींवर साठवून ठेवलं जातं. 'क्लाऊड कॉम्प्युटिंग' या नव्या संकल्पनाद्वारे तर ते आभासी साठवणुकीद्वारे सुरक्षित ठेवलं जातं. यापैकी प्रत्येक सुविधा महत्त्वाची असली तरी ती संपूर्ण जाळ्याचा एक छोटासा भागच आहे. त्या त्या भागांपुरती मालकी निरनिराळ्या व्यक्ती, उद्योग, संस्था, सेवाभावी संस्था, सरकारी यंत्रणा यांच्याकडे असली तरी संपूर्ण इंटरनेटवर कोणाचीही मालकी नाही. कोणी एक संस्था वा उद्योग इंटरनेटचा मालक नाही. त्यामुळे बलवान राष्ट्रांनाही इंटरनेट संपूर्णपणे बंद करण्यात यश मिळत नाही. इंटरनेट सुविधा आपल्याला पुरवणाऱ्या संस्थांवर बंदी घालून आपापल्या राज्यापुरती ती यंत्रणा बंद केली जाऊ शकते. इंटरनेटच्या वापरात सुसूत्रता आणणाऱ्या काही नियंत्रक संस्था आहेत. त्या आपल्याला निरनिराळे पत्ते किंवा ओळखपत्र मिळवून देण्याची व्यवस्था करतात; पण त्यांच्याकडेही संपूर्ण इंटरनेटची मालकी नाही. कोणीही मालक नसलेली आणि तरीही सुरळीत चाललेली 'इंटरनेट' ही एकमेव बहुपयोगी यंत्रणा आज अस्तित्वात आहे. *बाळ फोंडके यांचा 'कोण ?' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• “ज्या माणसाजवळ संयम आहे तो प्रत्येक गोष्टीचा धनी असतो.” *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *भारताचा पहिला हिंदी बोलपट कोणता ?* आलमआरा 2) *पृथ्वीवर सूर्याचा प्रकाश पोहचण्यासाठी किती वेळ लागतो ?* 8 मिनिटे 3) *कोणत्या ग्रहावर सजीवसृष्टी आहे ?* पृथ्वी 4) *सर्वात मोठा ग्रह कोणता ?* गुरू 5) *सर्वात उंच प्राणी कोणता ?* जिराफ *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ●  हणमंत पडवळ, उस्मानाबाद ●  उत्कर्ष मादसवार ●  शशिकला बनकर ●  मारोती ताकलोर ●  श्रीकांत क्यादरवाड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आपला चालताना तोल जातो, उठताना तोल जातो, बसताना तोल जातो, बोलताना तोल जातो, वागताना तर नेहमीच तोल जातो. कोणताही ताल नसताना तोल जातो. तोल सांभाळत जगण्याच्या प्रयत्नात आपण कधी बेताल होतो समजत नाही. खोटे आणि दिखाऊ वागणे नेहमीच धडपडते. खरे आणि अस्सल राहणे ठामपणे चालत जाते. कळपातील मेंढी वाघाचे कातडे अंगावर पडल्याने वाघासोबत चालू लागते, पण जेंव्हा डरकाळी फोडण्याची वेळ येते तेंव्हा ती मेंढी बें बें असाच आवाज करते. मग वाघांना तिचा फडशा पाडायला वेळ लागत नाही. तोलहीन आणि खोटेनाटे व्यवहार आपला केंव्हा फडशा पाडतील हे सांगता येत नाही.* *माणसाच्या खोट्यानाट्या व्यवहारांनी बोरी-बाभळीच्या अंगावरसुद्धा काटे येतात,असे बहिणाबाई चौधरी लिहितात. 'जगण्यात हरवलेले जीवन कुठे आहे?' हे जीवन स्वत:शी प्रतारणा करून खोटेनाटे वागण्यात, स्वत:चा खोटा अहंभाव जपण्यात हरवून गेले आहे. दुस-याच्या समस्यांमध्ये स्वत:ला नि:स्वार्थीपणे गुंतवून घेणारा आणि त्या सोडविण्याची धडपड करणारा साहित्यिक असे कुसुमाग्रजांनी वि.स. खांडेकरांबद्दल लिहिले होते. आपण दुस-याच्या समस्यांमध्ये स्वत:ला गुंतवून घेतो का? ते करत असू तर जगण्यातले जीवन हरवले जाणार नाही. 'बुडती हे जन, न देखावे डोळा, येतो कळवळा म्हणवुनी' असा तुकारामांनी सांगितलेला कळवळा जेंव्हा ह्रदयातून वाहत राहील तेव्हा जीवन जगण्यात हरवले जाणार नाही.* *॥ रामकृष्णहरी ॥* 🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁 *श्री. संजय नलावडे, मुंबई* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  🌟! !  *कबिराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• हरिया जांणे रूखड़ा,  उस पाणी का नेह । सूका काठ न जानई, कबहूँ बरसा मेंह ॥ सारांश      वृक्षास कळे सिंचन      जया प्रिय ते जीवन      शुष्क काष्ठ काय जाणे ?       थेंब मोतिया समान महात्मा कबीर पटवून देतात की मनाच्या तयारीवर सर्वकाही अवलंबून असतं.  पाण्याचं महत्त्व , त्याचा स्नेह व सिंचन केवळ हिरव्या वृक्षाला समजू शकतात. वाळलेल्या लाकडाला जवळून जाणारा जल प्रवाह किवा अमृतरूपी जलधारांच्या वर्षावाचं काय अप्रुप वाटणार आहे बरं ! मोत्यासम थेंबाचं त्याला काहीच महत्व नसतं. कारण त्याच्या ठायी असणारं भावनाशिल मन कधीच मेलेलं असतं. मुर्दाड मनाच्या माणसाला बाग, हिरवळ, प्रेम, आपुलकी, सहानुभुती संवेदना आदि भावना काय कळणार ? ते खरं तर दगडा समान निगर गट्ठ बनलेले असतं. त्याच्यावर कितीही जलधारांचा अभिषेक केला तरी दगड द्रवत नाही. तसे दगणडासमान निष्ठूर निर्दयी माणसासोबत एकतर्फी कितीही प्रेमळ वागलात तरी त्याच्या मुळ स्वभावात तीळमात्र स्नेहार्द्र भाव निर्माण होण्याची सुतराम शक्यता नसते. . त्यांचा स्वार्थ साधला की संपलं . खरं तर यांचं असणं नसणं नसण्यातंच जमा असतं. ओसाड निर्दयी मनामध्ये दयेचे निर्झर प्रवाहित होणं अशक्य आहे.      एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• काहीवेळा काहींच्या बाबतीत मनुष्याचा स्वभाव समोरची परिस्थिती पाहून बदलत असतो.कधी कधी असेही वाटते की,आपण कमी वेळेत खूप काही करुन धनाढ्य व्हावे आणि आनंदाने जीवन जगावे.या वाईट मोहासाठी तो वेगवेगळ्या गैरमार्गाचा अवलंब करतो आणि संपत्ती अर्थात माया जमवण्याच्या मोहात पडतो.जी माया जमवली त्यात त्याला समाधान तर नसतेच अजूनही त्याच्यापेक्षा अधिक माया जमवण्यात वेळ खर्च करतो.परंतु हे त्याच्या लक्षात येत नाही की,आपण वाममार्गाला लागलो आहोत, दुस-याला लुटलो आहोत ही जी काही वाईट सवय लागली आहे ती आपल्या मनाला समाधान देणारी नाही.केवळ आपल्या मोहापायी, आपल्या स्वार्थासाठी इतरांच्या जीवाला त्रास देऊन आपल्या नको त्या गोष्टीच्या नादाला लागलो आणि हावरटपणाचा कहर केला. त्यामुळे आपले जीवन हे जीवन राहिले नसून आपण इतरांच्या नजरेत एक गुन्हेगार ठरलो आहोत आणि ते ही आपल्या स्वार्थी मोहापायी ? हा मोह काहीच कामाचा नाही.ज्यामुळे माणसातील माणुसकी नष्ट झाली.त्यापेक्षा मनाचा हावरटपणा सोडून द्यावा, भरपूर मेहनत करावी,आपल्या कृत्यामुळे इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी आणि आपले जीवन सुखासमाधात जावे.यापेक्षा आपल्या कोणत्याही अपेक्षा असू नयेत.हाच मंत्र चांगले जीवन जगण्यासाठी पुरेसा आहे.नाही तर नको त्या मोहात जाणे आणि आपल्याच हाताने  जीवन दु:खमय जगणे यापेक्षा जीवनाचे वाईट चित्र काय असू शकेल ? © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद.९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कुत्रा आणि लांडगा* एक लांडगा फार दिवस उपाशी राहिल्यामुळे रोड झाला होता. काहीतरी खायला मिळाले तर पहावे म्हणून तो चांदण्या रात्री फिरत होता. तेव्हा त्याला एका झोपडीजवळ दारावर एक लठ्ठ कुत्रा बसलेला दिसला. त्याने त्याला रामराम करून त्याचा आदरसत्कार केल्यावर लांडगा त्याला म्हणाला, ''तू फार चांगला दिसतोस, तुझ्यासारखा देखणा व धष्टपुष्ट प्राणी आजपर्यंत मी पाहिला नाही. याचे कारण तरी काय? मी तुझ्यापेक्षा जास्त उद्योग करतो, पण मला पोटभर खायला मिळत नाही.'' कुत्रा म्हणाला, ''अरे, मी करतो ते तू करशील तर माझ्यासारखाच तूही सुखी होशील.''त्यावर लांडग्याने विचारले, ''तू काय करतोस?'' कुत्रा म्हणाला, ''दुसरे काही नाही. रात्रीच्या वेळी मालकाच्या दारापुढे पाहारा करून मी चोराला येऊ देत नाही.'' लांडगा म्हणाला, ''एवढंच ना? ते मी मनापासून करीन बाबा. अरे मी रानात भटकत थंडीवारा सोसतो तर मला घराच्या सावलीत बसून पोटभर अन्न मिळाल्यास दुसरे काय पाहिजे?'' याप्रमाणे दोघांमध्ये बोलणे चालले असता कुत्र्याच्या गळ्याला दोरीचा करकोचा पडलेला लांडग्याने पाहिला. तेव्हा तो कुत्र्याला म्हणाला, ''मित्रा, तुझ्या गळ्यात काय रे हे?'' कुत्रा म्हणाला, ''अं हं. ते काही नाही.'' लांडगा म्हणाला, ''तरी पण काय ते मला कळू देत.'' कुत्रा म्हणाला, ''अरे, मी थोडासा द्वाड आहे, लोकांना चावतो, म्हणून मी दिवसा झोपलो तर रात्री चांगला पहारा करीन म्हणून माझा मालक मला दोरीने बंधून ठेवतो पण दिवस मावळला की तो मला सोडतोच. मग मी वाटेल ते करतो, वाटेल तिकडे फिरतो. खाण्यापिण्याविषयी विचारशील तर माझा मालक आपल्या हाताने मला भाकरी खाऊ घालतो. घरची सगळीच माणसं मला मायेने वागवतात. पानावर उरलेली भाकरी माझ्याशिवाय दुसर्‍या कोणाला देत नाहीत. तेव्हा तू पहा, माझ्यासारखा वागशील तर तही सुखी होशील.'' ते ऐकताच लांडगा मागच्यामागे पळू लागला. त्याला हाका मारीत कुत्रा म्हणाला, ''अरे, असा पळतोस काय?'' लांडगा दुरूनच म्हणाला, ''नको रे बाबा मला ते सुख, ते तुझे तुलाच लाभो. स्वतंत्रपणे वाटेल तसे वागता येत असेल तर तसली गोष्ट मला सांग, तुझ्यासारखे बांधून ठेऊन जर मला कोणी राजा केले तर ते राजेपणदेखील मला नको!'' तात्पर्य : स्वतंत्रपणा असताना गरिबीही चांगली. पण परतंत्रपणा असेल तर श्रीमंतीचाही काही उपयोग नाही. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

*सहशालेय उपक्रम* *👭👬बालसभा👬👭* 〰〰〰〰〰〰〰 आज दिनांक २५-०७-२०१९ रोजी जि.प.प्रा.शाळा गोजेगाव येथे बालसभा घेण्यात आली. 👉 बालसभेचा विषयः *माझी सृष्टी* 🌳🌴☘🌸🌴☘🌸 💐💐💐💐💐💐 आजच्या बालसभेतुन विद्यार्थ्यांनी आपल्या सादरीकरणातुन कविता गायन ,पाऊस पाणी,वृक्ष लागवड संदेश ,आरोग्याचे संदेश व स्वच्छतेचे महत्त्व सांगण्यात आले.विद्यार्थ्यांनी माझी सृष्टी स्वच्छ , हिरवळ कशी राहील याबद्दल माहिती बालसभेत सांगितली. 〰〰〰〰〰〰〰

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 26/07/2019 वार - शुक्रवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *विजय दिन - भारत* (कारगिल युद्धाची समाप्ती) 💥 ठळक घडामोडी :- ◆ १९६५ - मालदीवला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य. ◆ २००५ - मुंबई व परिसरात २४ तासात जवळजवळ १ मीटर (९९५ मिलीमीटर) पाउस. महापूरात शेकडो मृत्युमुखी. ◆ २००८-अहमदाबाद शहरात २१ बॉम्बस्फोटात ५६ मृत्युमुखी तर २०० जखमी. ◆ २०११ - मोरोक्कोमध्ये सी.१३० प्रकारचे विमान कोसळले. ७८ ठार. 💥 *जन्म* ◆१८८५-मुग्धा गोडसे,अभिनेत्री व मॉडेल. ◆ १९२७ - जी.एस. रामचंद, भारतीय क्रिकेट खेळाडू. ◆ १९४३ - मिक जॅगर, इंग्लिश संगीतकार, गायक. ◆ १९४९ - थक्शिन शिनावत्र, थायलंडचा पंतप्रधान. 💥 *मृत्यू* ◆ १८६७ - ओट्टो, ग्रीसचा राजा. ◆ १९५२ - एव्हा पेरोन, आर्जेन्टिनाची गायिका. ◆ २००९ - भास्कर चंदावरकर, मराठी संगीतकार. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *नवी दिल्ली : काश्मीरच्या कारगिल भागात पाकिस्तानी लष्कराने केलेली घुसखोरी उधळून लावताना पाकिस्तानला धूळ चारणाऱ्या युद्धाला आज २० वर्षे पूर्ण होत असून, त्याच्या आदल्याच दिवशी पुन्हा ‘कारगिल’सारखी घुसखोरी करण्याची हिम्मत करू नका असे लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी पाकला ठणकावले* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *तिहेरी तलाक विधेयक लोकसभेत तिसऱ्यांदा मंजूर; काँग्रेसचा सभात्याग, तिहेरी तलाक विधेयकाच्या बाजूनं ३०३ मतं* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात काल ठिकठिकाणी मुसळधार पावसाचा मारा सुरूच होता. कुलाबा येथे ५२.२ तर सांताक्रुझ येथे ३८.३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली, आज कोकणात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होईल, असा इशारा हवामान खात्याने दिला असून, मुंबई शहर आणि उपनगरात जोरदार पावसाच्या सरी कोसळतील, अशी शक्यता वर्तवली आहे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *औरंगाबादमधील सुमारे २ हजार उद्योगांवर मंदीचे संकट, जीएसटीचा फटका, दुष्काळाची छाया : लाखांहून अधिक कामगार, कर्मचाऱ्यांवर गंडांतराची भीती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *किन्हवली : शहापूर तालुक्यातील दुर्गम गाव असलेल्या वाऱ्याचापाडा येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक प्रमोद आणि शर्मिला पाटोळे यांनी स्वखर्चाने एका वर्गात बसवल्या दोन एसी.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *विद्यार्थी निवडणुकांच्या खर्चाचा भार पडणार महाविद्यालयांवर ? नवीन विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार तब्बल २५ वर्षांनंतर विद्यापीठ व महाविद्यालयात विद्यार्थी निवडणुका घेतल्या जाणार आहेत.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *हैदराबाद : अखेरच्या चार मिनिटांमध्ये भक्कम बचाव करतानाच निर्णायक चढाया करत दबंग दिल्लीने गमावलेल्या सामन्यात पुनरागमन करत तामिळ थलाइवासचा प्रो कबड्डी लीगमध्ये अवघ्या एका गुणाने ३०-२९ असा केला थरारक पराभव* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *लघुकथा - भूक* https://storymirror.com/read/story/marathi/yk8b6w78/bhuuk/detail वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ कथालेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *रक्तदान कोण करू शकत नाही ?* 📙 रक्तदान हे श्रेष्ठदान आहे यात शंकाच नाही. त्यामुळे रक्तदान करणाऱ्या कोणाचंही कौतुक करायला हवं. पण आपण एखादं दान देतो ते तेव्हा ते सत्पात्री असावं अशी खबरदारी जशी आपण घेतो तशीच ते दानही 'योग्य' आहे याचीही खातरजमा करून घेणं आवश्यक असतं. त्यामुळेच इच्छा असली तरी काही जणांना तात्पुरत्या काळाकरता तसंच इतर काही जणांना कायमचं रक्तदान करण्यापासून रोखलं जातं. ही नकारघंटा वाजवली जाणार्यांची यादी दात्याच्या आरोग्याची काळजी वाहण्यासाठी जशी बनवली जाते तशीच घेत्याच्याही आरोग्यावर लक्ष ठेवून बनवली जाते. म्हणूनच रक्तदान केल्यामुळे दात्याला कोणत्याही प्रकारच्या आरोग्यविषयक अडचणींचा सामना करावा लागू नये, याची काळजी घेणं आवश्यक ठरतं. त्या तत्त्वानुसारच, ज्यांच्यामध्ये सर्दी, पडसे, खोकला किंवा ताप यासारख्या कोणत्यातरी रोगजंतूचा उपसर्गाची लक्षणं दिसत आहेत त्यांना ती लक्षणं नाहीशी होईपर्यंत रक्तदान करता येत नाही. त्या रोगावर उपचारासाठी प्रतिजैविकांसारखी काही औषध दिली असतील तर त्यांचा असर नाहीसा होईपर्यंत रक्तदानाला मनाई करण्यात येते. एखाद्याला स्वतःलाच जर रक्त दिलं गेलं असेल तर त्या दानापासून एक वर्षांपर्यंत त्याला रक्तदान करता येत नाही. बाळंत झालेल्या स्त्रीला पुढचे सहा आठवडे रक्त देता येत नाही. ज्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली आहे, ज्या स्त्रीला पाळी आलेली आहे, ज्या व्यक्तीने पुरुष अथवा स्त्री वेश्येशी समागम केला आहे, जिचा गर्भपात झाला आहे, अशांनाही काही काळापुरतं रक्तदानावरच्या बंदीला सामोरं जावं लागतं. पण ही झाली तात्पुरती बंदी. बंदीचा काळ उलटून गेल्यावर त्यांना रक्तदान करता येतं; पण काही व्यक्तींना तर रक्तदानापासून कायमचं दूर ठेवण्यात येतं. यात ज्यांनी रक्तवाहिनीवाटे नशील्या पदार्थांचं सेवन केलं आहे अशांचा समावेश होतो. मग ते त्यांनी एकदाच का केलेलं असेना. तसंच ज्यांना एड्सला कारक असलेल्या एचआयव्ही या विषाणूंची बाधा झालेली आहे, अशांचंही रक्त घेतलं जात नाही. हिमोफेलिया, थॅलेसेमियासारख्या रक्ताच्याच रोगांची लागण ज्यांना झालेली आहे अशांनाही रक्तदान करता येत नाही. वयाच्या अकराव्या वर्षांनंतर ज्यांना विशिष्ट प्रकारची कावीळ झालेली आहे, कर्करोग किंवा मल्टिपल स्क्लेरॉसिस या रोगांनी ग्रासले आहे, अशांनाही रक्तदान करण्यापासून परावृत्त केलं जातं. वेश्याव्यवसाय करणाऱ्या कोणालाही मग ती व्यक्ती स्त्री असो वा पुरुष रक्तदान करता येत नाही. ज्यांना हृदयविकाराचा झटका येऊन गेलेला आहे किंवा तो येऊ नये यासाठी ज्यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली आहे, अशांनाही रक्तदान करता येत नाही. तीच बाब पक्षाघाताचा झटका येऊन गेलेल्यांनाही लागू होते. ही बंदी दात्यापेक्षा हे रक्त ज्याला दिलं जाण्याची शक्यता आहे अशा व्यक्तीच्या आरोग्याच्या काळजीतून घेतली जाते. कारण त्या व्यक्तीवर हे दान घेतल्यानंतर अनवस्था प्रसंग ओढवू शकतो. 'भीक नको पण कुत्रा आवर' अशी त्यांची परिस्थिती होऊन जाते. ही एवढी लांबलचक यादी असली तरी रक्तदानास पात्र असतात अशांची यादी याच्या कितीतरी पटींनी मोठी आहे. म्हणून रक्तपेढ्यांमध्ये सहसा रक्ताचा तुटवडा नसतो. *बाळ फोंडके यांच्या 'कोण ?' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• एका चुकीच्या शब्दाकडे लक्ष देण्याऐवजी केलेल्या हजार चांगल्या गोष्टींकडे लक्ष द्या. नात्यामध्ये आणि मैत्रीमध्ये कधीच दुरावा येणार नाही. *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *विद्युत बल्बमध्ये भरला जाणारा वायू कोणता ?* नायट्रोजन 2) *इंद्र धनुष्यात किती रंग असतात ?* 7 3) *वर्षातील सर्वात लहान दिवस कोणता ?* 22 डिसेंबर 4) *भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक कोण ?* दादासाहेब फाळके 5) *पहिला भारतीय चित्रपट ( मुकपट ) कोणता ?* राजा हरिश्चंद्र (1913) *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ●  वैभव पाटील भोसले ●  रमेश मस्के ●  उदयकुमार केंद्रे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *डाॅ. राधाकृष्णन् यांनी आपल्या बोलण्यातून जगभर ख-या आणि शाश्वत धर्माची मूल्ये सांगितली. या निमित्ताने ते बोलत राहिले आणि सरोवरात कमलपुष्पे फुलत जावीत तसे त्यांचे बोलणे फुलत गेले. सत्ताधीशांचे स्तुतीपाठक खूप असतात. पण राजा तू चुकतो आहेस, असे बोलण्याची धमक असणारे क्वचित असतात. इष्ट असेल ते बोलणार, शक्य असेल ते करणार, असे म्हणणा-या गोपाळ गणेश आगरकरांना केवळ ३९ वर्षांचे आयुष्य लाभले. दारिद्र्य, दमा यांच्याशी झुंज देत धिक्कार व अपमान सोसूनही त्यांनी प्रबोधनाचा ध्यास घेतला आणि त्यासाठी काम केले.* *ज्ञानी माणसाने जगाला मार्ग दाखवावा. आपण वेगळे आहोत असे वागू नये. आपले अलौकिकत्व लोकांसाठी असावे. असा मार्ग दाखिवण्याचे काम जसे संतांच्या लेखनातून होते, वर्तनातून होते तसे बोलण्यातूनही होते. मूर्ख व कृतिहीनांचा वाचाळपणा आणि शहाण्या व कर्मवीरांचे मौन समाजाला घातक असते. रामदासांनी मूर्खांची लक्षणे सांगितली आहेत. त्यामध्ये 'दुर्जनांचेनि बोलणारा, मर्यादा सांडून चालणारा' त्याचप्रमाणे 'आदरेविण बोलणारा, न पुसता साक्ष देणारा' मूर्ख म्हटला आहे. तर उत्तम लक्षणांमध्ये 'विचारेविण बोलो नये, विवंचणेविण चालो नये' हेही सांगितले आहे. आपल्याला आयुष्यात गोडी निर्माण करायची असेल तर आपले बोलणे मधुर हवे. त्यासाठी आपले अंतरंग मधुर हवे. मग सर्वच मधुर होऊन जाईल.* *॥ रामकृष्णहरी ॥* 🐚🐚🐚🐚🐚🐚🐚🐚🐚 *श्री संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल -9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  🌟! !  *कबिराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• पत्ता  बोला  वृक्ष  से , सुनो  वृक्ष  बनराय  | अब  के  बिछड़े  न  मिले ,  दूर  पड़ेंगे  जाय  || अर्थ :      संघटनेचं विघटन झालं की उभारी घेणं अवघडच असतं. हे पटवून देताना महात्मा कबीरांनी निसर्गातला किती समर्पक दृष्टांत दिलेला आहे.  पान झाडाला म्हणतं, ' हे तरूवर  वृक्षराज तुम्ही ऐका तर खरं ! आज तुम्ही  भक्कमपणे उभे आहात. या तुमच्या भक्कम पणासाठी आम्ही लक्षावधी पानांनी स्वतःला ऊन्हात सूर्यासोबत टक्कर देत  त्याला न घाबरता अंगावर घेतलं. ऊन्हात राबून स्वतःचं नाजूकपण तुझ्या संगोपणात साकारण्यात विसरूनच गेलो. अन राठ होवून पिकत गेलो. आम्ही जुन्या दमाची परंतु अनुभवी तुझ्या स्वछंद बागडण्याला मुरड घालून ताळ्यावर आणू पाहाणारी तुला नकोशे वाटतोय. नव्या दमाची फौज तुला हवी. तिला जशी फुस दिली तशी ती उधळते. भूत भविष्याचा विचार न करता वर्तमानाच्या क्षणिक फसव्या मोहात पाडून तू त्या नव्या नाजूक पात्यांना फसवून स्वतःच वैभव आभाळी मिरवू पाहात आहेस. तुझे पाय त्या वटवृक्षावाणी मजबुतीनं कुठं घट्ट रोवलेले आहेत ? त्याच्या सोबतीला जुने नवे असे पानाचे अक्षौहिनी सैन्य खोडाआधी भक्कमपणे ऊन, वारा थंडीशी टकरायला तयार आहे. म्हणून तर वडाचं राज्य दीर्घकाल चालतं. तो आधार असणार्‍या पान अन  मातीची नाळ वड तुटू देत नाही. तू मात्र "विद्या आली हाता  अन गुरूला लाथा" असं वागून नवीन पिढी बिघडवत आहेस. ती पिढी बायका पोरं झाली की मायबापा पासून दुरावून स्वतःचा अधःपात करून ऊर फोडून घेत आहेत. तुला वैभव उंच आभाळी नेल्यासारखं वाटत असलं तरी वादळं वावटळी मध्ये सर्वात आधी ताडमाड उंचीची  दिखाऊपणा करणारी भक्कम आधार नसलेलीच झाडंच आधी आडवी होतात. दुरावलेलं गळालेलं पान पुन्हा आधाराला कधीच जवळ येत नाही. ते नव निर्माणासाठी मातीशीच एकरूप होवून जातं ! सोबत्यांना (जनतेला) मारून नव्हे तर सोबत घेवून मोठं होता येतं. हे झाडांनी विसरता कामा नये.      एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जेव्हा एकाच बिंदूतून कितीतरी रेषा काढलेल्या आपण पाहिलेल्या आहेत तरीही त्या एकमेकांना एकाच बिंदूत छेदून पुढे सरळ मार्गाने निघून जातात आणि त्याच रेषा परत एकाच बिंदूत एकत्रीत येऊन मिळतानाही पाहिले आहे.असा जर आपण विचार केला तर आपले हृदय आणि मनही एकच आहे.आपणच आपल्या हृदयातून आणि मनातून अनेक माणसांना जोडण्याचे काम करत असतो.त्यात काहींना काही कारणाने जवळ करतो तर काही माणसे आपल्यापासूनच जवळ येऊन दूर जातात.जे दूर जातात त्यांचा विचार करु नका,कारण त्यांना स्वातंत्र्य आहे.परंतु जी माणसे तुमच्याजवळ येण्याचा प्रयत्न करतात त्यांना दूर करु नका कारण त्यांना तुमचे मन आणि हृदय कळलेले असते.तुम्ही त्यांचे केंद्रस्थानी आणि बिंदूस्थानी आहात.तुम्हीच त्यांचे आधारही आहात आणि त्यांची प्रेरणाही.सा-यांना जवळ करण्याचे बिंदूसारखेच काम करायला शिकले पाहिजे तरच जीवन समृद्ध होईल. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०./८०८७९१७०६३. 🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आपल्या माणसाकडून मिळालेले दुःख* एक सोनार होता. त्याच्या दुकानासमोरच एका लोहाराचे दुकान होते. सोनार जेव्हा काम करत असे तेंव्हा सोनाराच्या दुकानातून हळू आवाज होत असे पण जेंव्हा लोहार काम करत असे तेंव्हा मात्र लोखंडाचे काम होत असल्याने मोठा आवाज होत असे. तो आवाज मोठा कर्णकर्कश असे. एके दिवशी सोनाराच्या दुकानातील एक सोन्याचा कण कसा कोण जाणे पण लोहाराच्या दुकानात जावून पडला. त्या सोन्याच्या कणाची भेट एका लोखंडाच्या कणाशी झाली. खूप दिवसांची ओळख असल्यासारखे ते एकमेकांशी बोलू लागले. सोन्याच्या कणाने लोखंडाच्या कणाला म्हंटले,"दादा, आपले दुःख तर खरे एकसमान आहे. दोघानाही आगीत तापवले जाते आणि हातोड्याने ठोकले जाते. मी तर बाबा चुपचाप हे सहन करतो, पण तुझे काय?" लोखंडाचा कण सोन्याच्या कणाकडे पाहून दुःखी स्वरात म्हणाला,"अरे ! तुझे म्हणणे अगदी बरोबर आहे. दोघानाही तापवणारी आग एकच आहे आणि ठोकणारा हातोडाहि एकाच धातूचा आहे. पण खरे दुःख याचे आहे कि तुला ठोकणारा हातोडा हा तुझा कोणीच लागत नाही पण मला ठोकणारा लोखंडाचा हातोडा हा नात्याने माझा भाऊच लागतो. दुसऱ्याने दिलेल्या दुःखापेक्षा स्वकीयांनी दिलेला त्रास हा अगदी हृदयात वार करून जातो." *तात्पर्य- आपल्या माणसांकडून होणारा त्रास हा कायमच दुःखदायक वाटतो.*  *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 25/07/2019 वार - गुरूवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ★ *गॅलिशिया दिन - गॅलिशिया(स्पेन)* ★ *संविधान दिन - पोर्तोरिको* ★ *प्रजासत्ताक दिन - ट्युनिसीया* 💥 ठळक घडामोडी :- ◆ १९७८ - जगातील प्रथम टेस्ट ट्यूब बेबी लुईझ जॉय ब्राऊन चा इंग्लंडमधील लँकेशायर येथे जन्म. ◆ १९९७ - के.आर. नारायणन भारताच्या राष्ट्राध्यक्षपदी. ◆ २००७ - प्रतिभा पाटील भारताच्या राष्ट्रपतीपदी. 💥 *जन्म* ◆ १९२९ - सोमनाथ चटर्जी, भारतीय राजकारणी. ◆ १९७८ - लुईस ब्राऊन, पहिली मानव टेस्टट्यूब बेबी 💥 *मृत्यू* ◆ १८८०-गणेश वासुदेव जोशी उर्फ 'सार्वजनिक काका' समाजसुधारक *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *अभिनव देशमुख यांना राज्य निवडणूक आयोगाचा "लोकशाही पुरस्कार"* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *व्यक्तीलाही दहशतवादी घोषित करण्याची कायदादुरुस्ती मंजूर, लोकसभेची संमती : विरोधकांच्या टीकेला गृहमंत्र्यांचे उत्तर* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *महाजनादेश यात्रेनिमित्त मुख्यमंत्री करणार ४,३८४ किमीचा प्रवास, अमरावती येथून प्रारंभ : पाच वर्षांतील कामांचा हिशोब जनतेसमोर ठेवणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *राज्यातील २४ जिल्ह्यांमध्ये भीषण दुष्काळाचे संकट, ५४ टक्के पावसाची तूट जलसाठे अद्याप कोरडे, पेरण्यांवरही संक्रांत* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *एसटी बसचे आरक्षण ३० ऐवजी आता ६० दिवस आधीच मिळणार असल्याची घोषणा परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केली, गणेशोत्सवात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी २,२०० जादा गाड्या* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *पोलिसांच्या गणवेश भत्त्याचा प्रस्ताव अडकला लालफितीत, अधिकाऱ्यांत नाराजीचा सूर : गृहविभागाकडे फाइल सहा महिने धूळखात* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *प्रो कबड्डी : बेंगाल वॉरियर्स संघाची विजयी कामगिरी, यूपी योद्धाचा ४८-१७ असा पराभव* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *लघुकथा - लिफ्ट* https://storymirror.com/read/story/marathi/rlufif6t/liphtt/detail वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ कथालेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *पृथ्वीवरून पाठविलेला संदेश मंगळावर पोहोचायला किती वेळ लागेल ?* 📙 भारताने चंद्राभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी पाठवलेल्या 'चंद्रयान' या अवकाशयानाशी संपर्क तुटल्यामुळे तो प्रकल्प अर्धवट सोडून द्यावा लागला होता. तरीही जे नऊ महिने ते यान आपलं आखून दिलेलं काम इमानेइतबारे पार पाडत होतं, त्या काळात निर्धारित कामापैकी ९० टक्के काम पार पडल्याचं आपल्या अंतराळविज्ञान विभागानं जाहीर केलं आहे. साहजिकच त्या यानाशी संपर्क साधण्याची, दळणवळणाची व्यवस्था कार्यक्षम होती यात शंका नाही. तरीही अशा यानाला जमिनीवरच्या नियंत्रण कक्षातून विशिष्ट कामगिरी पार पाडायचा आदेश त्याला मिळायला किती वेळ लागत असेल, हा एक उत्कंठा लावणारा प्रश्न मनात उभा राहतो. कारण एखादी कामगिरी त्या यानानं तात्काळ पार पाडावी असं वाटत असेल तर हा संदेश किती वेगाने त्याच्यापर्यंत पोहोचतो याला महत्त्व येतं. चंद्र त्या मानाने पृथ्वीच्या जवळ आहे. पण मानवांनं आता मंगळ, शुक्र, गुरू, शनी एवढंच काय, पण नेपच्यूनसारख्या अतिदूर असणाऱ्या ग्रहांवरसुद्धा यानं पाठवली आहेत. त्यांचं नियंत्रण जमिनीवरूनच केलं जात आहे आणि त्या यानांनी मिळवलेली माहिती नियंत्रण कक्षाकडे संग्रहितही होत आहे. या साऱ्या दळणवळणाला किती वेळ लागतो ? या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आपल्याला दोन बाबींची माहिती हवी. या संदेशांच्या प्रवासाचा वेग आणि त्या याना किंवा ग्रहापर्यंतच अंतर. जमिनीवरून संदेश पाठवले जातात ते रेडिओलहरींच्या माध्यमातून. उलट दिशेने येणारी माहितीही त्याच रूपात मिळवली जाते. आपल्या नजरेला भावणारा 'तानापिहिनिपाजा' या पट्टय़ातला दृश्य प्रकाश किंवा क्ष-किरणं किंवा मोबाइल फोनच्या दळणवळणासाठी वापरलं जाणारं मायक्रोवेव्ह प्रारण ही सर्व विद्युतचुंबकीय वर्णपटाचाच एक भाग आहेत. रेडिओलहरीही याच वर्णपटात मोडतात. त्यामुळे या सर्वांचा वेग सारखाच आहे. प्रकाशाचा वेग अचूक मोजला गेला आहे. तोच मग रेडिओलहरींचाही वेग ठरेल. तो आहे एका सेकंदाला तीन लाख किलोमीटर. त्या वेगाने हे संदेश आपली वाटचाल करत असतात. पृथ्वी आणि मंगळ दोन्हीही सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत असतात. या भ्रमणाचा दोन्हींचा वेगही वेगवेगळा आहे. त्यामुळे कधी हे दोन ग्रह सूर्याच्या दोन बाजूंना असतात, त्या वेळी त्यांच्यामधलं अंतर सर्वात जास्त असतं. इतर वेळेला तो ते सूर्याच्या एकाच बाजूला असतात, त्या वेळी त्यांच्यामधलं अंतर किमान असतं. मंगळ आणि पृथ्वी यांच्यामधलं किमान अंतर आहे ७.८ कोटी किलोमीटर. प्रकाशाच्या वेगाने पार करायला केवळ ४.३ मिनिटं लागतात; पण त्या दोघांमधलं कमाल अंतर आहे ३७.८ कोटी किलोमीटर. ते पार करायला मात्र रेडिओसंदेशांना तब्बल २१ मिनिटं लागतात. *बाळ फोंडके यांच्या 'किती ?' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• सूर्याच्या किरणांनी जशा बर्फाच्या राशी कोसळतात, तशाअहंकाराच्या राशी प्रेमाच्या ओलाव्याने विरघळतात. *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *C M चे विस्तारित रूप लिहा ?* Chief Minister 2) *रिझर्व बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर कोण आहेत ?* शक्तीकांत दास 3) *जंगलाचा राजा कोणाला म्हणतात ?* सिंह 4) *भारताचे नंदनवन कोणते ?* काश्मीर 5) *पृथ्वीच्या सर्वात जवळ असलेला ग्रह कोणता ?* शुक्र *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ●  संगीता भालसिंग ●  साईनाथ कामीनवर ●  रामकुमारचिलकेवार ●  श्यामकुमार चिलकेवार ● श्रीधर चिंचोलकर ●  अभिषेक येरावार ●  नरेंद्र राठोड ●  गजानन महाजन ●  रुचली चंदेल बायस ● ज्ञानेश्वर पाटील ● साईनाथ भोरे ● गंगाधर मानगुर्ले ● नागेश कोलोड ● लक्ष्मण सुरकार ● संतोष श्रीखंडी ● गोविंद मानेमोड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आपण जे बोलायला हवे ते बोलत नाही. जे बोलू नये ते बोलून जातो. जे पोटी असते ते ओठी येते असे म्हणतात. काही वेळा पोटी काही नसताना भलतेच ओठी येते. अनवधानाचे ते बोलणे सावरण्यासाठी मग खूपच बोलणे सोसावे लागते. काही लोक खूपच बडबडतात. काहींचे मौन बोलके असते. शांतपणे अविरत श्रमाची कास धरणा-यांचे यशच खूप काही बोलून जाते. नाहीतर बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात असणा-यांची संख्या बरीच आहे. न्यायालयातील उलटतपासात साक्षीदाराने काय बोलावे यापेक्षा काय बोलू नये याला खूप महत्व आहे.* *रामदासांनी शिवरायांचे मोठेपण सांगताना 'शिवरायांचे कैसे बोलणे' असा शब्दप्रयोग करून, त्यांच्या पदपथावर चालण्यास सांगितले. संतांच्या बोलण्याला अनुभूतीचा आधार असतो. महापुरूषांच्या बोलण्याला त्यांच्या जीवनकार्याची धार असते. चर्चिलच्या प्रभावी बोलण्याने दुस-या महायुद्धात ब्रिटनच्या लोकांना लढण्याचे धैर्य वाढले. अब्राहम लिंकनच्या बोलण्याने अमेरिकेची फाळणी टाळली गेली. मार्टिन ल्यूथर किंगच्या ''गुणवत्ता त्वचेच्या रंगावर नाही तर चारित्र्यावर ठरेल' या वक्तव्याने जगभर प्रभाव पाडला. गांधीजीचा 'चले जाव' , सुभाषबाबूंचा 'जयहिंद' आणि क्रांतीकारकांचा 'वंदे मातरम' ह्या एकाच शब्दाने इंग्रजांना पळता भुई थोडी झाली. नाहीतर,'बालिश बहु बायकात बडबडला' असे बडबडणारे तर अनेक असतात.* *॥ रामकृष्णहरी ॥* 🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀 *श्री संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  🌟! !  *कबिराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• नहाये  धोये  क्या  हुआ ,  जो  मन  मेल  न  जाय  | मीन  सदा  जल  में  रही ,  धोये  बॉस  न  जाय  || अर्थ :  नहाणे धुणे देखावा गेला न मनीचा मळ सदा पाण्यात मासळी दुर्गंध न काढी जळ       महात्मा कबीर दिखाऊ पणाला फटकारतात. नहाणे , धुणे  व सुंगधाने सजणे हा  तर केवळ बाह्य देखावा आहे. जर मनाचीच सफाई झाली नाही तर विवेकी व  निरामय जीवनशैली  विकसित होणार नाही व त्याशिवाय विश्वात्मक भाव दृढ कसा होणार ? मासा सदा सर्वकाळ पाण्यात राहूनही अंगीचा दुर्गंध त्यागीत नाही. तिथे पाण्याचा काय दोष असणार आहे. बाह्य बदलापेक्षा आंतरिक बदल महत्त्वाचा असतो. तो अवगुण कायमचे दूर करतो.       एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• दररोज एक चांगला विचार मनात आणला तर जीवनाला एका नव्या विचारांची संजीवनी भेटते.त्या एका चांगल्या विचारांमुळे आयुष्यात होणा-या चुका तर टळतीलच पण चांगला विचार केल्यामुळे वाईट विचारांची पुनरावृत्ती होणार नाही.जीवन चांगल्या विचारांमुळे अधिक समृद्ध बनते आणि त्यामुळेच ख-या जीवनाचे सार काय आहे ते कळते.आचार आणि विचारांमध्येही स्वत:च्या माणसातला माणूस घडवताना सतत प्रयत्न करताना दिसतो.म्हणून रोजच्या जीवनात एका चांगल्या विचारांची माणसाला भूक आणि गरजही असायला हवी.ती गरज सज्जनांच्या सहवासातून,ग्रंथ आणि पुस्तकांच्या सहवासातून पूर्ण करता येते. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९० 🍃🌷🍃🌷🍃🌷🍃🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आशेची थोरवी* एक भुकेलेला डोमकावळा एका उंबराच्या झाडावर बसला होता. तो वाट पाहात होता. उंबराची फळे अजून पिकली नाहीत. ती कधीतरी पिकतील याची वाट पाहात तो तिथेच बसून होता. हा डोमकावळा बराच काळ तिथेच बसला आहे, असे एका कोल्ह्याच्या लक्षात आले. तेंव्हा त्याने त्याला कारण विचारले. डोमकावळयाने कारण सांगितल्यावर कोल्हा त्याला म्हणाला, 'अरे वेडया, आशेने असा वाहून जाऊ नकोस. आशेमुळे माणसाला भ्रम तेवढा होतो. अशाने वाट पाहून कुणाचेच पोट भरत नाही. तात्पर्य - केवळ आशा करणे व्यर्थ आहे. प्रयत्न हवा. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 24/07/2019 वार - बुधवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- ■ १९९७- माजी हंगामी प्रधानमंत्री गुलजारीलाल नंदा व स्वातंत्र सैनिक अरुणा असफ अली यांना 'भारतरत्न' हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान. ●१९४३ - दुसरे महायुद्ध - दोस्त राष्ट्रांच्या विमानांनी जर्मनीतील हांबुर्ग शहरावर तुफान बॉम्बफेक सुरू केली. ● १९६५ - व्हियेतनाम युद्ध - उत्तर व्हियेतनामने अमेरिकेचे लढाउ विमान पाडले. 💥 जन्म :- ◆१९१७ - जॅक मोरोनी, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू. ◆ १९४५ - अझीम प्रेमजी, भारतीय उद्योगपती. 💥 मृत्यू :- ◆१९७० - पीटर दि नरोन्हा, भारतीय उद्योगपती. ◆१९८० - पीटर सेलर्स, ब्रिटीश अभिनेता. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *आंध्रप्रदेशात भूमिपुत्रांना खासगी क्षेत्रात 75% आरक्षण, जगनमोहन रेड्डी सरकारचा निर्णय, देशातील पहिली घटना* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *बंगळुरु: कर्नाटकमधील एच. डी. कुमारस्वामी यांचं सरकार कोसळलं, यामुळे काँग्रेस, जेडीएसला बसला मोठा धक्का, कुमारस्वामी यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांनी स्वीकारला* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *आता महापालिका, नगरपरिषदा, नगर पंचायत कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू, मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय, 2 सप्टेंबरपासून सातवा वेतन आयोग होणार लागू* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *सोलापुरात कृत्रिम पावसासाठी पहिलं विमान झेपावलं, पावसासाठी अनुकूल ढगांचा शोध सुरु, पुढचे काही दिवस विमानाद्वारे निरीक्षण सुरुच राहणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाची माळ पुन्हा मिलिंद देवरांच्या गळ्यात पडण्याची शक्यता, तर दोन कार्याध्यक्ष म्हणून हुसेन दलवाई आणि एकनाथ गायकवाडांची चर्चा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *इन्कम टॅक्स रिटर्न्स भरण्यासाठी सरकारकडून 31 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ, केंद्र सरकारने आयकर कायद्यात २३४ F या नव्या नियमाची घातली भर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच पांढऱ्या जर्सीवर खेळाडूंची नावं आणि क्रमांक पाहायला मिळणार, इंग्लंडविरुद्ध ऑस्ट्रेलियांच्या अ‍ॅशेस मालिकेपासून सुरुवात* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *लघुकथा - भिजवणारा पाऊस* https://storymirror.com/read/story/marathi/y4627myp/bhijvnnaaraa-paauus/detail वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ कथालेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *फ्ल्यू म्हणजे काय ?* 📙 कोणी शिंकले, खोकले, ताप आला की 'फ्ल्यू' झाला असेल, असा सरसकट निष्कर्ष काढला जातो; पण तो खरोखर फ्ल्यू नसतोच. फ्ल्यू म्हणजे एन्फ्ल्युएंझा हा भयंकर रोग. एन्फ्लूएन्झा विषाणूंमुळे होतो. या विषाणूंचे तीन प्रकार असतात. दर काही वर्षांनी या रोगाच्या साथी येतात व त्या जगभर पसरतात. १९१८ मध्ये या रोगाने २ कोटींहून जास्त लोकांचे बळी घेतले. याच काळात भारतात ६० लाख लोक मृत्यूमुखी पडले. विषाणूच्या संरचनेत सदोदित होणाऱ्या बदलांमुळे या विषाणूसाठी प्रतिबंधक लस तयार करता येत नाही वा केलीच तर ती फार काळ उपयुक्त ठरत नाही. या रोगात थंडी वाजून ताप येणे, हातपाय दुखणे व खोकला अशी लक्षणे दिसतात. न्यूमोनिया नावाचा भयानक गुंतागुंतीमुळे अनेकजण मृत्युमुखी पडतात. या विषाणूवर औषधे उपलब्ध नाहीत व जी आहेत ती प्रभावी नाहीत. लस उपलब्ध आहेत, पण त्या वापरात येण्यापूर्वीच बऱ्याचदा बऱ्याच जणांना हा रोग झालेला असतो. श्वसनाच्या मार्गाने हा रोग एकापासून दुसऱ्याला होतो. एन्फ्लूएन्झाचा प्रतिबंध करण्याच्या उपायांना आजवर फार मर्यादित यश मिळाले आहे. लसीकरण हे सर्वात प्रभावी शस्त्र असले तरी प्रत्यक्षात त्याचा परिणामकारक उपयोग करण्यातच अडचणी येतात. त्यामुळे साथीच्या काळात घरातील वायूवीजन चांगले राखणे, गर्दीच्या ठिकाणी न जाणे, रुग्णांना रुमालाने चेहरा झाकण्यास सांगणे व घराबाहेर न पडण्याचा सल्ला देणे, हे उपाय करावे लागतात. असा हा महाभयंकर एन्फ्लूएन्झा. तुम्ही ज्याला चुकून फ्ल्यू म्हणता ते असते साधे सर्दी पडसे. उपचार घेतल्यास आठवड्यात व न घेतल्यास सात दिवसांत बरे होते ते ! *डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित* यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून, मनोविकास प्रकाशन *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *Confidence is a key to success.* *( आत्मविश्वास ही यशाची गुरूकिल्ली आहे. )* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते ?* डॉ बाबासाहेब आंबेडकर 2) *विदर्भातील एकूण जिल्हे किती ?* 11 3) *संत ज्ञानेश्वर महाराज यांनी 'ज्ञानेश्वरी' हा ग्रंथ कोठे लिहिला ?* नेवासे ( अहमदनगर ) 4) *'चंदीगड' ही कोणत्या दोन राज्यांची राजधानी आहे ?* पंजाब व हरियाणा 5) *P M चे विस्तारित रूप सांगा ?* Prime Minister *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ●  गोविंद तुळशीराम कोकुलवार ●  सचिन सुरेश टेकाळे ●  विष्णू रामोड ●  संतोष लवांडे ●  राजेश पाटील मनूरकर ●  संतोष मुलकोड ●  धीरजसिंह चौहान ●  मारोती गुंटूकवार *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *उद्योगी पुरूषालाच लक्ष्मी पसंत करते. दुबळी माणसे दैवात नाही असे म्हणत राहतात. नशीबात नव्हते असे रडगाणे गात राहतात. दैवावर, नशीबावर मात करून आपल्या स्वकर्तृत्वाने सामर्थ्य गाजविणे त्यांना कधीच जमत नाही. प्रयत्न करूनही जर काहीही यश मिळाले नाही तर दोष कुणाचा ? अशावेळी तो तुझा दोष नाही असे संस्कृत सुभाषितकार सांगतात. बरेच लोक अपयशाचे खापर दुस-यावर फोडतात. स्वत:च्या चुकांकडे पहात नाही. प्रत्येकाने रोज आत्मपरीक्षण करावे. प्रत्येक दिवशी आपले वर्तन कसे झाले याचा विचार करावा. आज मी पशूसारखा तर वागलो नाही ना? आज माझे वर्तन सज्जन माणसासारखे झाले आहे ना? हे तपासून पहावे.* *प्रत्येकाचे हातून कळत-नकळत चुका होत असतात. पण तारुण्याच्या उन्मादात, सत्तेच्या-पैशाच्या कैफात माणसाला त्याची जाणीव होत नाही. तसेच माणसाला आपल्यातील अवगुणांचीही जाणीव होत नाही. "कासया वर्णू इतरांचे दोष, माझे ठायी काय वाण असे?"असे संत तुकारामांनीही म्हटले आहे. वाईट माणसांच्या संगतीमुळे चांगली माणसे बिघडल्याची अनेक उदाहरणे आपणांस सांगता येतील. वाईट संगतीमुळे काही व्यसनाधीन होतात तर कधी कधी नैराश्याने आपले जीवनच संपवितात. धोक्याच्या वळणावर जागं करणारे फार क्वचितच भेटतात. 'जीवन कसं जगावं' याचं मार्गदर्शन करणारे 'दिपस्तंभ'सारखे असतात.* *॥ रामकृष्णहरी ॥* 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *श्री संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  🌟! !  *कबिराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• प्रेमभाव  एक  चाहिए ,  भेष  अनेक  बनाय  | चाहे  घर  में  वास  कर ,  चाहे  बन  को  जाए  ||   अर्थ        मानवाचा धर्म मानवता . मानवता जपायची तर मानवाच्या अंतरात प्रेमभावनेचे अधिष्ठान महत्वाचे आहे. त्या शिवाय मानवता व मानव्य कसं प्रवाहित होणार ?  भौगोलिक व भौतिक परिस्थितीशी समायोजन साधण्यासाठी भिन्न वेष परिधान करा .   विभिन्र प्रकारच्या (उपलब्धतेनुसार महालापासून झोपडीपर्यंत) वास्तूत  किवा वनात वास्तव्य करा ते परिस्थितीनुरूप स्वाभाविक आहे. परंतु त्यात अवडंबर असता कामा नये. सत्य  व प्रेमभाव हाच खर्‍या जीवनाचा मुलाधार आहे. त्यामुळे जीवनाची गोडी व सुंदरता वाढते  म्हणून माणसाने  अशाश्वत अवडंबराच्या व बुवाबाजीच्या नादी लागून जगण्याला  विनाकारणच अंधानुकरणी व भंपक बणवू नये . ते मानवतेला पूरक असू शकत नाही.      एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जिद्द,मेहनत आणि प्रयत्न हे तुमच्या हाती घेतलेल्या कामासाठी वापरलेले कौशल्य आहे.यामुळे तुमचे काम अधिक चांगले व उत्कृष्ट दर्जाचे होण्यास मदत करते. कोणतेही काम जेव्हा हाती घ्याल तेव्हा  ह्या तीन गोष्टी आपल्या अंगी बाळगणे अत्यंत महत्वाचे आहे. त्यामध्येच आपली प्रगती  सामावलेली असेल. - व्यंकटेश काटकर,नांदेड.   संवाद..9421839590. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मदतीचा हात* भगवान बुद्ध त्या काळात आपल्या शिष्यगणांसह गावोगावी जात होते. एका गावाच्या वेशीवर एक वृद्ध आपल्या मोठ्या टोपलीतून भाजी विकण्यास बसला होता. ती टोपली जड होती व त्याला तेथून दुसरीकडे जायचे होते म्हणून येणार्‍या - जाणार्‍या वाटसरुंना तो आपल्या डोक्यावर टोपली ठेवण्यास मदत करण्याची याचना करत होता. पण कोणीही त्याच्याकडे लक्ष देत नव्हते. ते शिष्यगणही मजा बघत होते. हे पाहताच भगवान बुद्ध स्वतः पुढे झाले व त्यांनी वृद्धाच्या डोक्यावर टोपली उचलून दिली. त्या वृद्धाने त्यांना ओळखले होते. तो म्हणाला, सार्‍या जगाच्या दृष्टीने ते कोणीही असोत, पण माझ्या दृष्टीने माझ्या मुलासारखे आहेत ! त्याचे बोलणे ऐकून शिष्य आश्चर्यचकित झाले. त्यांनी विचारले, हे कसे शक्य आहे ? तो वृद्ध उत्तरला, जगात प्रत्येक मुलगा हा आपल्या मातापित्यांचा आधार असतो. त्यांचे कष्ट उपसण्यास नेहमीच मदत करत असतो. आज त्यांनीही मला मदत केली आहे. माझे कष्ट हलके केले आहेत. मग ते माझ्या मुलासमानच नाहीत का ? सार्‍या शिष्यांनी त्या वृद्धाचे पाय धरले व क्षमा मागितली.  *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 23/07/2019 वार - मंगळवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *लोकमान्य टिळक जयंती* 💥 ठळक घडामोडी :- ● १९६८ - अल ऍलच्या बोईंग ७०७ प्रकारच्या विमानाचे रोममधून अपहरण. ●१९७० - ओमानमध्ये राजकुमार काबूस इब्न सैदने आपल्या वडिल, सैद इब्न तैमूरला पदच्युत करून सत्ता बळकावली. 💥 जन्म :- ◆१८५६ - बाळ गंगाधर टिळक, भारतीय स्वातंत्र्यसेनानी, राजकारणी. ◆१९०६ - चंद्रशेखर आझाद, भारतीय क्रांतिकारक. ◆ १९१७ - लक्ष्मीबाई यशवंत भिडे (ऊर्फ माई भिडे), मराठी नाट्य-चित्रपट अभिनेत्री. ◆१९७३ - मोनिका लेविन्स्की, व्हाइट हाउसमध्ये काम करणारी स्त्री. ◆ १९७५ - सूर्य शिवकुमार, तमिळ अभिनेता. 💥 मृत्यू :- ■ १९९७ - वसुंधरा पंडित, भारतीय गायिका. ■ २००४ - मेहमूद, हिंदी चित्रपट अभिनेता. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *कर्नाटक विधानसभेत आज बहुमत चाचणी होण्याची शक्यता* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मुंबई : उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या लवादाच्या मध्यस्थीनंतरही बेस्ट कामगारांच्या मागण्यांवरील वाटाघाटी अयशस्वी ठरल्या आहेत म्हणून बेस्टकामगार संघटनांनी ६ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून पुन्हा एकदा संपावर जाण्याचा घेतला निर्णय* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *मुंबईत २६ जुलैला होणार अतिवृष्टी; स्कायमेटचा अंदाज, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी होणार जोरदार पाऊस* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *130 कोटी देशवासीयांसह संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या इस्रोच्या चांद्रयान-2 ने काल दुपारी 2.43 मिनिटांनी चंद्राच्या दिशेने झेपावले.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *औरंगाबाद - 93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे रंगणार, साहित्य परिषदेची माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *कटक : हरमीत देसाई आणि आहिका मुखर्जी यांनी ऐतिहासिक कामगिरी करताना २१व्या राष्ट्रकुल टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत अनुक्रमे पुरुष व महिला एकेरीचे सुवर्ण पदक पटकावले.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *मुंबई: भारतीय क्रिकेट संघाच्या 'अ' संघाने वेस्टइंडीज 'अ' संघाचा पाच सामनांच्या मालिकेत ४-१ अशा फरकाने धुव्वा उडवला* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *लघुकथा - ब्लू व्हेल* https://storymirror.com/read/story/marathi/p5b2dmy2/blu-vhel/detail वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ कथालेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌍 *पृथ्वीच्या पोटात किती उष्णता असते ?* 🌍 पृथ्वीचा जन्म झाला तेव्हा तो एक धगधगता तापलेला वायूचा गोळा होता, असं आपण नेहमी ऐकतो. ते खरंही आहे. वैज्ञानिकांच्या मनात त्याबद्दल दुमत नाही. जोवर तो असा तापलेल्या वायूंचा गोळा होता तोवर त्याला कोणतंही ठोस रूप नव्हतं ; पण जसजसा काळ उलटत गेला तो तापलेला गोळा थंड होत गेला. त्या गोळ्याला रूप येऊ लागलं. उंच सखल भूप्रदेश तयार झाले. सतत वाफेच्या रूपात असलेलं पाणी द्रवरूप झालं. त्याचे सागर झाले. हळूहळू पृथ्वीचा पृष्ठभाग निवला. इतका की सजीव सृष्टी त्यावर अवतरली, रुजली, फोफावली. तरीही पृथ्वीचा गाभा मात्र तापलेला राहिला आहे. तिथं असले उष्णता अजूनही कायम आहे. उन्हाळ्यात धरती तापते तेव्हा उन्हाच्या काहिलीपासून आपलं रक्षण करण्यासाठी काही प्राणी बिळात जाऊन बसतात. विशेषत: वाळवंटी प्रदेशात हे दिसून येतं. त्यामुळे पृथ्वीच्या पोटात थंडावा आहे असा समज होतो. पण तो खरा नाही. पृष्ठभागाला तापवणारा सूर्यप्रकाश मातीच्या काही थरांमुळे झाकला गेला की तापमान काहीसं घसरतं. पृथ्वीच्या पोटात जसजसे आपण शिरत जाऊ तसतसा तो भाग उष्णच असल्याचं स्पष्ट होतं. पृथ्वीच्या पोटात किती उष्णता आहे, याची माहिती वैज्ञानिकांनी मिळवलेली आहे. त्यानुसार पृथ्वीच्या गाभ्याचं तापमान ४०००अंश सेल्सिअस आहे. याचं नीट आकलन होण्यासाठी आपण काही तुलनात्मक आकड्यांचा विचार करू शकतो. सूर्याच्या पृष्ठभागाचं तापमान ५००० अंश सेल्सिअस आहे. म्हणजे पृथ्वीचा गाभाही साधारण तेवढाच तापलेला आहे. आपल्या नेहमीच्या अनुभवातले आकडे सांगायचे तर पाणी समुद्रसपाटीवर १०० अंश सेल्सिअसला उकळतं. साठ अंश सेल्सियसपेक्षा जास्त गरम असलेल्या पाण्यानं अंग भाजून निघू शकतं. आजवर पृथ्वीवर सर्वात जास्त नोंद झालेलं तापमान ५८ अंश सेल्सिअस आहे. १९२२ मध्ये लिबियामध्ये त्याची नोंद झाली होती. पृथ्वीचा गाभा लोह आणि निकेल या धातूंचा बनलेला आहे. लोहही साधारण १५३५ अंश सेल्सियसला वितळतं. मग पृथ्वीचा गाभा संपूर्णपणे द्रवरूप लोहाचा आहे, असा समज होईल; पण त्या लोहाला प्रचंड दाबही सहन करावा लागतो. जसजसा दाब वाढत जातो तसतसा कोणत्याही पदार्थाचा उत्कलनबिंदू चढत जातो, त्यामुळे ४००० अंश तापमान असूनही लोह वितळत नाही. मात्र ते अतिशय तापलेलं असतं. त्या गाभ्याच्या वरच्या थरातलं तापमान तुलनेने कमी असतं. त्यामुळे ४००० अंश तापमान हे सरासरी तापमान असावं आणि अगदी केंद्रबिंदूजवळ गेल्यास ते त्याहूनही अधिक असावं असं काही वैज्ञानिकांचं मत आहे. *बाळ फोंडके यांच्या 'किती ?' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• दुसऱ्याच्या चुकामधुन शिका, कारण स्वत:च्या चुकांमधुन शिकायला आयुष्य फार थोड असत - आर्य चाणक्य *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळनाव काय होते ?* भीमराव 2) *डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोठे झाला ?* महू (मध्यप्रदेश) 3) *स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री कोण होते ?* डॉ बाबासाहेब आंबेडकर 4) *डॉ बाबासाहेब आंबेडकर हे कितवे अपत्य होते ?* 14 वे 5) *डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ आडनाव काय होते ?* सकपाळ *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ●  उदयकुमार शिल्लारे ●  प्रदीप दळवी ●  संतोषसुवर्णकार ●  लक्ष्मण मलगिरे ●  जितेंद्र पाटील ●  वैभव पाटील ●  विक्की पाटील ●  अविनाश धुप्पे ● शंकर बोईनवाड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *माणूस जोवर जिवंत असतो, तेंव्हा त्याच्या अपेक्षा असतात. इच्छा असतात. त्या कुणाच्या गावाला पोहचत नाहीत. त्याच्या आकान्तहाका कुणाला ऐकू येत नाहीत. नंतर मात्र त्याच्या कौतुकाचे पाढे सुरू होतात, पोवाडे गायले जातात. जिवंतपणी त्याच्या हाकांचा कानोसा घेतला असता, तर नक्कीच त्याच्या जगण्याचे काही दिवस वाढले असते. भुकेल्याची अपेक्षा फार नसते, त्यास भाकर हवी असते, तहानलेल्याला पाणी, कष्टक-याला त्याच्या घामाचा मोबदला, कलाकाराला त्याच्या कलेची दाद, एवढीच तर अपेक्षा असते... फक्त एक सेकंद जगण्याची... पण त्याच्या हयातीत आपल्याला पकडता येत नाही त्याचा जिवंत सेकंद..* *सोनं तोळ्यात मापतात. मात्र, त्याहीपेक्षा माणसाचा माणसासाठीचा कौतुकाचा, जिव्हाळ्याचा शब्द महागला आहे. माणसाचं अपयश हे की तो पैसे मिळविण्याचं तंत्र तर शिकलाच; तंत्रज्ञानालाही त्याने असे आत्मसात केले की तंत्रमानव म्हणून कुशल झाला. पृथ्वीवर तर त्याने सत्ता काबीज केलीच, पण आज तो इतर ग्रहावरही चढाई करतोय. मात्र जिवंत राहण्याचं तंत्र तो शिकू शकला नाही. जगण्या-मरण्यातल्या एका श्वासांचं अंतर जेव्हा माणसास कळेल तेव्हा त्याच्या आत माणुसकीचा दीप तेवून उठेल.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁 *श्री संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  🌟! !  *कबिराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• कबीर हरि सो हेत कर, कोरै चित ना लाये बंधियो बारि खटीक के, ता पशु केतिक आये। सारांश कबीरा हरी स्मरण कर नको मनी कचर्‍याचा भर कसाया दारी बांधला पशू तया आयुष्याचा विचार कर          महात्मा कबीर म्हणतात की ईश्वराशी नाते जोड. जो सर्वत्र भरून उरला आहे. तो वार्‍याच्या रूपाने तुझ्याशी संवाद साधतो. पाण्याच्या रूपाने तुझे तन मन शितल करतो. प्रकाशाच्या रुपाने तुझं अंतरंग उजळून टाकतो. मात्र तू तर वरवरच्या बाह्य प्रतिक रुपालाच भुलतो आहेस. तू स्वार्थाने अंध होऊन ईश्वराचं सर्वव्यापी रूपंच विसरून गेला आहेस. अशा वरवरच्या ढोंगी भक्तीने तुला ईश्वराचं सत्य स्वरूप कसं काय कळणार आहे? शिवरूप तर सर्वत्र भरून आहे. निसर्गाच्या आविष्कारात ते सामावलेलं आहे. ते कळलंच नाही तर  सुंदराचा कसा साक्षात्कार होईल बरे ! पळापळाने आयुष्य मृत्यूकडे धाव घेत आहे. मानवी जन्म जणू कसायाच्या दारी बांधलेल्या पशूसमान आहे. त्या पशूवर कसाई कोणत्या क्षणी सुरी चालवील काय माहित ? आयुष्याची क्षणभंगुरताही तशीच आहे. तुझ्याकडे उपलब्ध वेळेचा सदुपयोग करून घे. तो सत्कारणी लाव. से प्रेम करो। अपने चित्तात भरलेला विकारांचा कचरा भिरकावून दे. शिवस्वरूप सत्याचा अंगिकार कर. जीवनातल्या सुंदरतेच्या जागा परमानंदाने भरून  घे .      एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• तुम्ही हाती घेतलेल्या कोणत्याही कामात सातत्याने करत असलेले प्रयत्न आणि त्यात मिळालेले यश हे तुमच्या मनाला समाधान देणारे आहे.प्रयत्नातून मिळालेला आनंद हा तुमच्या जीवनात अधिक महत्वाचा आहे. - व्यंकटेश काटकर,नांदेड.   संवाद.9421839590 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मनशांती* एकदा संत एकनाथांना कोणी दोन प्रश्न विचारले. एक, त्याच्या स्वत:च्या भविष्याबध्दल, आणि दुसरा, एकनाथ स्वभावाने एवढे शांत आणि निर्द्वेषी कसे राहू शकतात याच्याबद्दल . एकनाथ हसले; आणि, 'केंव्हातरी याची उत्तरे देईन', म्हणून त्यांनी सांगीतले. काही दिवसांनी, एकनाथांची त्या गृहस्थाशी भेट झाली. तेंव्हा त्याला बाजूला नेऊन एकनाथ म्हणाले, "तुझ्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर देण्याची वेळ आली आहे, कारण, दुर्दैवाने, तू आता आठ दिवसांच्या आत मरणार आहेस." तो गृहस्थ सुन्न झाला, गोठला ! एकनाथ समोरून निघून गेले, तेंव्हा तो बधीर मनाने परतला.  जगलो तर एकनाथांसारख्या संतांच्या सदिच्छेने जगू, अशी त्याला भावना निर्माण झाली. ती त्याने सार्थ केली. आयुष्यातले आठ दिवस पूर्ण करून नवव्या दिवशी, एकनाथांच्या दर्शनाला तो गेला. एकनाथांना हात जोडून म्हणाला, "तुमच्या कृपेने वाचलो." एकनाथ मान डोलवित म्हणाले, "आता मी तुम्हाला दुस-या प्रश्नाचे उत्तर देणार आहे. गेले आठ दिवस तुम्ही कसे वागलात ? इतरांच्यावर किती रागावलात?" तो गृहस्थ उत्साहाने म्हणाला, "कसला हो रागावतो? अगदी छान, शांत आठ दिवस गेले. शांत म्हणजे, मरणाच्या भितीने बेचैन होतो, पण दुस-यावर रागावण्यासाठी ती बेचैनी नव्हती. घरात बायकोशी कधी भांडलो नाही. मुलांना मारले नाही. वाटायचे की, आता अखेरचे आठ दिवस उरले. बायका-मुले पुन्हा दिसणार नाहीत; त्यांना का दुखवावे? अहो, शेजा-याचे जमिनीवरून चार पिढयांचे भांडण होते. त्याला स्वत:च्या हाताने हवा तो तुकडा तोडून दिला. देणे होते ते देऊन टाकले. ज्यांच्याकडून येणे होते, त्यांच्यापैकी जे गरीब होते, त्यांचे येणे सोडून दिले. काही पैसे गमावले, पण शांती कमावली. खूप खूप शांत असे आठ दिवस त्या दृष्टीने गेले." एकनाथ समोरच्या माणसाच्या पाठीवर हात थोपटून म्हणाले,  "हे तुझ्या दुस-या प्रश्नाचे उत्तर. आठ दिवसांत जग सोडून जायचे आहे, अशा कल्पनेने मी सदाच वावरतो. म्हणून मी शांत वाटतो."  *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 22/07/2019 वार - सोमवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *पाय दिन (२२/७ =पाय π)* 💥 ठळक घडामोडी :- १९४२ - दुसरे महायुद्ध - अमेरिकेत पेट्रोलचे रेशनिंग सुरू करावे लागले. १९४२ - ज्यूंचे शिरकाण - वॉर्सोतून ज्यूंना तडीपार करणे सुरू झाले. १९४३ - दोस्त राष्ट्रांनी इटलीचे पालेर्मो शहर जिंकले. 💥 जन्म :- १९१८ - गोपाळराव बळवंतराव कांबळे, मराठी चित्रकार. १९२३ - मुकेश, पार्श्वगायक. १९३७ - वसंत रांजणे, भारताचा कसोटी क्रिकेट खेळाडू. *१९७० - देवेंद्र गंगाधर फडणवीस, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री* 💥 मृत्यू :- १९१८ - ईंद्रलाल रॉय, भारतीय वैमानिक. २००३- उदय हुसेन,कुसे हुसेन ,सद्दाम हुसेन ची मुले. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *श्रीहरीकोटा : भारताची ‘चांद्रयान-२’ ही महत्त्वाकांक्षी अंतराळ मोहीम आज दुपारी होणाऱ्या प्रक्षेपणासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) केले जाहीर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *राज्यात मान्सून आठवडाभर सक्रिय राहणार; हवामान विभागाचा अंदाज, कोकण, गोव्यात मुसळधार; मराठवाड्यात समाधानकारक* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *मराठी अनिवार्य नसणाऱ्या शाळांवर दंडात्मक कारवाई! मराठी शिक्षण कायद्याचा मसुदा तयार : हरकती, सूचना नोंदविण्याचे आवाहन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *महामार्गासाठी एलआयसी देणार १.२५ लाख कोटी रुपयांचे कर्ज, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी दिली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *टीम इंडियाचे नेतृत्व विराट कोहलीकडेच! शिखर धवनचे पुनरागमन, आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित अनंतात विलीन, अंत्यसंस्काराला अनेक नेत्यांची उपस्थिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *जकार्ता - भारताच्या पी.व्ही. सिंधूचे इंडोनेशियन ओपन स्पर्धेचे विजेतेपद पटकावण्याचे स्वप्न भंगले. एकतर्फी झालेल्या अंतिम लढतीत सिंधूला जपानच्या अकाने यामागुचीकडून 15-21, 16-21 असा सरळ गेममध्ये पराभव पत्करावा लागला* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *लघुकथा - सरपंच* https://storymirror.com/read/story/marathi/baeglro2/srpnc/detail वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ कथालेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🐝 *मधमाशा गुंजारव का करतात ?* 🐝 मधमाशा अवतीभवती घोंघावयाला लागल्या की त्यांचा गूं गूं असा आवाज येत राहतो. इंग्रजीत यालाच 'बझिंग साऊंड' असं म्हणतात. जणू त्या तोंडानेच तसा आवाज करत राहतात, असं आपल्याला वाटतं. पक्षीही तोंडांनं आवाज करतात. प्रत्येक पक्ष्याचा आवाज वेगवेगळा असतो. त्या आवाजावरून पक्ष्याची ओळखही पटते; आणि तसा आवाज पक्षी का काढतात, याचीही माहिती आता मिळालेली आहे. एकमेकांशी दळणवळण साधण्यासाठी, संवादासाठी पक्षी आवाज काढतात. मधमाशाही तसाच एकमेकींशी संवाद साधण्यासाठी हा गुंजारव करत असतील, अशीच समजूत झाल्यास मग नवल नाही. प्रत्यक्षात मात्र मधमाशांचा हा आवाज त्यांच्या तोंडातून येत नाही. तो त्यांच्या पंखांचा फडफडाट असतो. त्या एकाच जागी स्थिर असताना, मोहोळात राहुन आपापलं काम करत असताना हा गुंजारव आपल्याला ऐकू येत नाही. त्या जेव्हा मोहोळातून बाहेर पडून उडायला लागतात तेव्हाच त्यांचा गुंजारव ऐकू येतो. त्यावरून हा त्यांच्या पंखांचा फडफडाट असावा, हे ध्यानात यायला हवं. उडणाऱ्या सर्वच कीटकांना आपले पंख फडफडावे लागतात. त्यामुळे तिथल्या हवेत कंपनं सुरू होतात. हवेच्या कंपन्यांमुळेच ध्वनी निर्माण होत असल्याने पंखांच्या या फडफडाटाचं रुपांतर आवाजात होत असतं. मात्र, तो आवाज आपल्याला ऐकू येणं हे त्या कंपनांच्या वेगावर आणि त्यात असलेल्या ऊर्जेवर अवलंबून असतं. निरनिराळ्या कीटकांच्या पंखांच्या फडफडण्याचा वेग मात्र वेगवेगळा असतो. फुलपाखरंही उडताना आपले पंख फडफडवत असतात. मात्र त्यांचा वेग मंद असतो. एका सेकंदाला फार फार तर सहा ते दहा वेळा त्यांचे पंख फडफडतात. त्यामुळे होणाऱ्या हवेच्या कंपनापोटी आपल्याला ऐकू येईल एवढा आवाज निर्माण होत नाही. डासांच्या पंखांचं फडफडणं मात्र वेगात होतं; पण ते अतिशय लहान असल्यामुळे त्यापोटी निर्माण होणाऱ्या हवेच्या कंपनांचा आवाज जर ते डास आपल्या कानाच्या अगदी जवळ असतील तरच ऐकू येतो. मधमाश्यांचे पंख त्या मानाने मोठे असतात आणि त्यांच्या फडफडण्याचा वेगही जास्त असतो. एका सेकंदात ३०० ते ४०० वेळा हे पंख फडफडतात. साहजिकच त्यापोटी हवेत उठणारी कंपनंही जोमदार असतात. त्यांचाच आवाज गुंजारवाच्या स्वरूपात आपल्या कानी पडतो. *डाॅ. बाळ फोंडके यांच्या 'का ?' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• “आयुष्य सहज सोप जगायला शिका, तरच ते सुंदर होईल.” *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *1 सेमी म्हणजे किती मिमी ?* 10 मिमी 2) *आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी कोणती ?* धारावी, मुंबई 3) *आंतरराष्ट्रीय भाषा कोणती ?* इंग्रजी 4) *मानवी मेंदूचे वजन किती असते ?* 1350 ग्रॅम(1300 ते 1400 ग्रॅम) 5) *शिक्षकाला संस्कृत भाषेत काय म्हणतात ?* गुरू *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ●  मा. श्री सुमंत भांगे, ●  प्रल्हाद तुमेदवार ●  दामोदर साळुंखे ●  संजय कदम ●  अनुराधा हवेलीकर ●  धनराज वाघ ●  विश्वनाथ चित्रलवार ●  संतोषकुमार दुरगुडे ● पद्माकर मुळे ● अमोल गायकवाड ● अल्ताफ शेख ● श्रीनिवास वाघमारे ● संतोष जाधव *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *या जगात संपूर्ण निष्पाप कोण? तर एकही नाही. या पृथ्वीवर कोणीही नाही. उलट, पापालाच सुखाचे साधन मानणारे सर्वत्र आहेत. सर्व प्रार्थना मंदिरात रोज तथाकथित पुण्यचिंतनात वेळ घालवणारे किंवा भक्तीचे भस्म अंगाला फासणारे यापैकी कुणीही पूर्ण शुद्ध नाही. म्हणूनच की काय गीतापुरूष कृष्ण म्हणतात..... ब-या-वाईटासह अर्थात शिव-अशिवासह जो असतो तो पुर्ण पुरूष. प्रत्येकामध्ये काही ना काही दोष आहेतच, संपूर्ण निर्दोष असा माणूस सापडणे शक्य नाही. या दोषांनाच आपण पाप समजतो. बहुजनांच्या हितासाठी प्रसंगी खोटं बोलावं लागत असेल तर ते पाप नाही, असं सांगितलं जातं.* *राष्ट्रभक्त सैनिकालाही शत्रूच्या तावडीत असताना सतत खोटं बोलून खरी माहिती लपवायची असते. त्यासाठी तो वाट्टेल ते हाल भोगायला सिद्ध असतो. पांडव ज्येष्ठ बंधू धर्मराजाला 'नरो वा कुंजरो वा' असे मोघम उत्तर हेतुपूर्वक द्यावे लागले. युद्धात आणि प्रेमात सारं काही माफ असतं म्हणतात. असो, आपला मुद्दा आहे जगी सर्व निर्दोष असा कोण आहे? कुणीही नाही. काही अतिजागृत देवस्थाने संपत्तीने तुडुंब भरत आहेत. दानातील नोटा आणि सुवर्ण मोजायला यंत्रे लावावी लागत आहेत. कुठून आला हा पैसा, देवळाबाहेर भुकेलं तान्हं घेऊन माय पेलाभर दूधासाठी लोकांच्या पायापोटी पडत आहे. तिला बाजूला हाकलून दगडाच्या देवाचे शुद्ध दूधाने अभिषेकांवर अभिषेक होत आहेत. माझ्या मते हेच महापाप आहे..*   ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 💥💥💥💥💥💥💥💥💥 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई         9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• हिन्दू कहें मोहि राम पियारा, तुर्क कहें रहमाना,  आपस में दोउ लड़ी-लड़ी मुए,  मरम न कोउ जाना। सारांश         महात्मा कबीर चराचरात ईश्वर पाहतात. सर्वांठायी परमात्म्याचा अधिवास असतो. मानवाठायी असणारं चैतन्य म्हणजेच परमात्म्याचं रूप नाही का ? आमच्या उपासनेच्या पद्धती भिन्न आहेत. कोणत्याही धर्म पंथाचा माणूस असो त्याचा जन्म आणि मृत्यू भिन्न असतो का ? माणूस जन्माला आल्यानंतर त्याच्यावर त्या त्या धर्म पंथाचे संस्कार बिंबवले जातात. खरे तर माणूस जन्माला येतो माणूस म्हणूनच परंतु त्याच्यावर जाती, धर्माचे,  पंथाचे जे संस्कार केले जातात ती सर्व कृत्रिमता आहे. ती कुठल्या तरी भितीपोटी,  समुहाच्या वेगळेपणासाठी निर्माण केलेली ही वरवरची व्यवस्था आहे. तिला कुठलाही शाश्वत आधार नाही आहे. शाश्वत व अंतिम सत्य माणूस हा माणूस व मानवता हाच त्याचा धर्म आहे. सर्वांच्या निर्मिती पासून विसर्जनापर्यंत त्याचा माती हाच आधार आहे. हे   शाश्वत सत्य सर्वांना कळतंय पण वळत नाही. अशी वास्तविकता आहे.          जे स्वतःला हिंदू  म्हणवून घेतात त्यांना राम प्रिय आहे. जे स्वतःस मुसलमान मानतात त्यांना रहिम प्यारा आहे. राम आणि रहिम हे दोन्ही मानव कल्याणासाठी झिजले. त्यांच्या  कृर्तृत्वातून आदर्श जीवनाचा बोध मिळतो. त्यांनी माणसामाणसात भेदभाव केल्याचे इतिहास सांगत नाही. तरी त्यांच्या नावावरून दंगली घडणे मानवतेला अशोभनीय आहे. त्यांची नावं घेवून लढाया करणार्‍यांना विशाल अशा मानवता धर्माचं खरं स्वरूप व मानव कल्याणाचं मर्मच कळलेलं नाही. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• धनाच्या श्रीमंतीपेक्षा मनाची श्रीमंती अधिक महत्वाची आहे.कारण धनाच्या श्रीमंतीने त्याच्यामध्ये जगातल्या उपभोग्य वस्तू खरेदी करुन तात्पुरता आनंद मिळवता येतो आणि तोही स्वत:साठी.दुसरे असे की,माणसे जोडण्याऐवजी तोडण्यातच तो यशस्वी होतो.एखादी कुणीजरी व्यक्ती आली तरी त्यांच्या मनात फक्त पैसे मागण्यासाठीच आला आहे अशी शंका निर्माण होते.त्यामुळे नातेसंबंध जोडण्याऐवजी तोडण्याचीच भूमिका त्यांच्या अंगी असते. अशा श्रीमंतीपेक्षा मनाची श्रीमंती ही सदैव इतरांच्या मनावर राज्य करत जीवन व्यवहार करण्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण काम करते.एकमेकांची मने ओळखण्याचे काम, सुखदुःख जाणणे, संकटकाळी धाऊन जाणे,आपले मन कुठेतरी मोकळे करणे, नातेसंबंध दृढ करणे ह्या सा-या गोष्टी मनाच्या श्रीमंती असणा-यामध्ये सदैव वास करत असतात.अशी माणसे सदैव नवीन काहीतरी शोधत असतात की जे आपले आणि इतरांचे नाते दृढ करतात.अशा माणसांमध्ये स्वार्थ,मतभेद,दुरावा,गर्व,अशा प्रवृत्ती कधीही वास करत नाहीत.म्हणून मनाची श्रीमंती ही सर्वमान्य असून एक सशक्त समाज घडविण्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *चतुर बिरबल* बिरबलच्या चातुर्याची कीर्ती सर्वदूर पसरली होती. तेव्हा त्याला पाहण्यासाठी दरबारात एक पंडित आला होता. बादशहाच्या परवानगीने त्याने दोन प्रश्न बिरबलाला विचारले पंडित : खरा ज्ञानी कोण व अज्ञानी कोण? बिरबल : ज्याच्याशी केलेली चर्चा फलदायी ठरते, तो ज्ञानी आणि निरर्थक ठरते तो अज्ञानी असतो. पंडित : सर्वांत उत्तम ऋतू आणि सर्वात वाईट ऋतू कोणती? बिरबल : पोटभर खायला, अंगभर ल्यायला आणि आपली जवळची माणसे प्रेम करायला असतील, तर सर्वच ऋतू उत्तम असतात. परंतु खायला अन्न नाही, ल्यायला वस्त्र नाही आणि कोणी प्रेम करणारेही नाही, अशी ज्याची स्थिती असेल, त्याला सर्वच ऋतू वाईट असतात. बिरबलाने दिलेली अशी उत्तरे ऐकताच तो पंडित बादशहाला म्हणाला, ''खाविंद, मला वाटले होते, त्यापेक्षा कितीतरी पटींनी बिरबलजी अधिक चतुर आहेत.'' *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🌹जीवन विचार*🌹 〰〰〰〰〰〰〰 http://www. pramilasenkude.blogspot.in ➖➖➖➖➖➖➖ *जो मनन करु शकतो त्याला मनुष्य म्हणतात.आपल्याला मननामुळेच सर्व ज्ञान प्राप्त होते.मनन हा जसा मनाचा गुण आहे.त्याप्रमाणेच माणसाच्या जीवनात प्रसन्नता ही मानवाला मिळालेली दैवी देणगी आहे.ज्या मानवात प्रसन्न वृत्ती आहे अशा प्रसन्न असणाऱ्या व्यक्तीची बुद्धी लवकर स्थिर होत असते.प्रसन्नतेमुळे आत्म्याला शक्ती मिळते.म्हणूनच कोणतेही कार्य हाती घेतले असता त्यात प्रसन्नता असले की ते कार्य हलके वाटते.* *प्रसन्नता ही माणसाच्या मनातून निर्माण होणारी क्रिया आहे.जसा दिव्यान दिवा लावता येतो तशी एका माणसाच्या मनातील प्रसन्नता अनेकांना हर्षउल्हासित करते.* smt.pramila senkude *यशस्वी जीवनासाठी प्रथमतः आपले मन आनंदी व प्रसन्न असायला हवे.ज्याप्रमाणे पारिजातक आपल्या फुलांच्या पडलेल्या सडा सुगंधाने सुगंधीत करून दुसऱ्याला आनंदी करतो त्याप्रमाणे माणसाच्या चेहऱ्यावरील झळकणार निर्मळ हास्य हे मन जिंकून घेत.* *म्हणूनच आपल्या जीवनातील जीवन जगण्यासाठीच ध्येयवाक्य असाव.' प्रसन्नतेचा एक एक क्षण पुरेसा,जोपासावा '.* *〰〰〰〰〰〰〰* ✍ शब्दांकन / संकलन श्रीमती प्रमिला सेनकुडे. जि.प.प्रा.शाळा गोजेगाव ता.हदगाव जिल्हा नांदेड. 〰〰〰〰〰〰〰

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 20/07/2019 वार - शनिवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन* 💥 ठळक घडामोडी :- २०००-अभिनेते दिलीपकुमार यांना 'राजीव गांधी राष्ट्रीय सदभावना पुरस्कार' जाहीर. १९०३ - फोर्ड मोटर कंपनीने आपली पहिली कार विकायला पाठवली. १९६९-अपोलो -११या अंतराळयानातून गेलेला नील आर्मस्ट्राँग हा चंद्रावर पाऊल ठेवलेला पहिला मानव बनला. १९४७ - भारतीय व्हाइसरॉय लुई माउंटबॅटनने जाहीर वक्तव्य दिले की वायव्य सरहद्दी प्रांतातील निवडणुकीत जनतेने पाकिस्तानात विलीन होण्याचा कौल दिला आहे. १९९२ - टी.यु. १५४ प्रकारचे विमान त्ब्लिसीजवळ कोसळले. ४० ठार. १९९६ - स्पेनमध्ये विमानतळावर दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणला. ३५ ठार. 💥 जन्म :- १९११ - बाका जिलानी, भारतीय क्रिकेट खेळाडू. १९१९ - सर एडमंड हिलरी, गिर्यारोहक. १९२९ - राजेंद्र कुमार, भारतीय अभिनेता. १९५० - नसीरुद्दीन शाह, भारतीय अभिनेता. १९७६ - देबाशिष मोहंती, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- १९२३ - पांचो व्हिया, मेक्सिकन क्रांतीकारी. १९२७ - फर्डिनांड, रोमेनियाचा राजा. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *केरळात ८ जून रोजी दाखल झालेल्या मान्सूनने १९ जुलै रोजी संपूर्ण देश व्यापल्याची घोषणा भारतीय हवामान शास्त्र विभागाने केली आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला यांनी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांना पत्र लिहून संध्याकाळी सहापर्यंत बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे.* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *रात्र गस्त घालणार्‍या पोलीसांच्या खांद्यावर एलईडी दिवे लावण्याचा अनोखा प्रयोग लोणावळा शहरात करण्यात येणार आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *गणेशोत्सवासाठी एसटीच्या २२०० जादा बसेस, २७ जुलैपासून आरक्षणाला सुरुवात, यंदा मुंबई व उपनगरातील चाकरमान्यांना त्यांच्या थेट कोकणातील घराच्या दारात सुखरूप सोडण्यासाठी एसटीने तब्बल २२०० जादा बसेसची केली सोय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *यवतमाळ : वणी पोलीस ठाण्यातील खांबावर गुरुवारी रात्री कोसळली वीज, तीन संगणक निकामी, महिला पोलीस शिपायाला बसला विजेचा धक्का.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा रविवारी होणार असल्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) जाहीर केले* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *लंडन : महिला क्रिकेटच्या इतिहासात ऑस्ट्रेलियाच्या एलिसे पेरीनं इतिहास रचला. ऑस्ट्रेलियाची ही खेळाडू जवळपास चार वर्षांनंतर बाद झाली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *लघुकथा - साहस* https://storymirror.com/read/story/marathi/0gnisi1w/saahs/detail वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ कथालेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ⏰ *एक सेकंद म्हणजे किती काळ ?* ⏰ काळ मोठी अजब चीज आहे. ती एक अमूर्त कल्पना आहे. तरीही आपण तिचं मोजमाप करत असतो. वास्तविक दोन निरनिराळ्या घटनांमध्ये काही अवधी जावा लागतो आणि हा नेहमीच एकसारखा नसतो, हे ध्यानात आल्यानंतर त्या अवधीचं मोजमाप करण्याचं काहीतरी साधन असावं, असं वाटायला लागतं. त्यातूनच काळ या संकल्पनेचा उगम झाला. आपण मोजतो तो दोन नैसर्गिक घटनांमधला अवधी. त्या मोजमापाला काळ म्हणतो. म्हणजे मोजमाप होतं ते त्या अवधीचं, काळाचं नाही. तरीही काळ नावाची एक मोजपट्टी अमलात आणल्यानंतर त्याचं प्रमाणीकरण करणं आवश्यक झालं. दोन अवधीतल्या काळाची मात्रा किती हे समजणं आवश्यक होतं. त्यासाठी मग वरचेवर होणाऱ्या एका आवर्तनातून जाणाऱ्या घटनेची निवड करण्यात आली. त्या दोन आवर्तनातील अवधीला काळाचं एकक मानण्यात आलं. त्यातून मग सूर्योदयापासून सूर्यास्तपर्यंतच्या अवधीला एक दिवस मानण्यात येऊ लागलं. एकदा पूर्णचंद्र दिसल्यानंतर परत त्याचं दर्शन होईपर्यंत असे कितीतरी दिवस जावे लागतात, हे समजल्यानंतर त्या दिवसांचा एक महिना मानण्यात आला. त्याच सुत्राचं बोट धरत वर्ष या एककाची मात्रा ठरवण्यात आली. नंतर असं दिसून आलं, की आपल्या नेहमीच्या आयुष्यात अशा काही घटना घडतात, की त्यांच्यामधल्या अवधीचं मोजमाप करण्यासाठी दिवस हे एकक फार मोठं होतं. त्यापेक्षा लहान एककाची त्यासाठी गरज आहे. मग दिवसाचे लहान लहान भाग करून त्यांची एककं करण्याची कल्पना पुढे आली. त्यातूनच मग घटिका, तास, पळं किंवा तास, मिनिटं आणि सेकंद वगैरे एककांची निश्चिती करण्यात आली. तरीही एक तास म्हणजे नेमका किती अवधी किंवा एक सेकंद म्हणजे नेमका किती काळ, हे प्रमाणित करणं गरजेचं होतंच. तसं करायचं तर मग वरचेवर चक्राकार रितीनं होणाऱ्या घटनेचा शोध घ्यायला हवा होता. दिवसाचं प्रमाण ठरवताना पृथ्वीचं स्वतःभोवती होणारं चक्राकार परिभ्रमण विचारात घेण्यात आलं होतं. अशीच काही दिवसांत कितीतरी वेळा होणारी आवर्तनं आहेत काय, याचा शोध सुरू झाला. अणूंच्या अंतरंगातल्या रचनेचा उलगडा झाल्यानंतर त्यांची रचनाही सौरमालिकेसारखी असल्याचं स्पष्ट झालं. अणुकेंद्रकाभोवती इलेक्ट्रॉन प्रदक्षिणा घालत असतात, हे दिसून आलं. त्यामुळे मग अणूंमधील आवर्तनांचा विचार होऊ लागला. त्यातूनच हे दिसून आलं की काही अणू आपल्या निरनिराळय़ा ऊर्जापातळींमध्ये सतत वर खाली जात असतात. एखाद्या नटखट मुलानं एक पायरी चढावं मग एक पायरी उतरावं, परत एक पायरी चढावं असा खेळ खेळावा तसे हे अणू एका ऊर्जा पातळीतून वरच्या पातळीत उडी घेतात आणि परत खालच्या पातळीत येतात. त्यांची ही आवर्तनं अविरत चालू असतात. त्या आवर्तनांवर थंडीवार्‍याचा हवेच्या दाबाचा कशाचाही परिणाम होत नाही. त्यामुळे मग त्यांचाच आधार सेकंदाचं प्रमाणीकरण करण्यासाठी घेण्यात आला. सिझियम या मूलद्रव्याचे अणू एका सेकंदात ९ अब्ज आवर्तनं पूरी करतात आणि त्यात काहीही बदल होत नाही, हे दिसून आल्यानंतर सेकंदाची व्याख्या त्या संदर्भातच करण्यात आली. अचूकपणे बोलायचं तर सीझियमच्या अणूची ९,१९२,६३१,७७० आवर्तनं पूर्ण होण्यासाठी लागणारा काळ म्हणजे एक सेकंद, हे आता जगभर मान्य झालं आहे. *बाळ फोंडके यांच्या 'किती ?' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• दुसऱ्याचे ओझे उतरविण्यासाठी जेव्हा तुम्ही पुढे होता तेव्हा तुमचे ओझे पुर्वीपेक्षा हलके होईल हे नक्की. *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *माणसाच्या शरीरात एकूण हाडे किती ?* 206 2) *माणसाच्या शरीरातील सर्वात मोठा हाड कोणता ?* फिमर (मांडीचे हाड) 3) *माणसाच्या शरीरातील सर्वात लहान हाड कोणता ?* स्टेप्स (कानातील हाड) 4) *1 मीटर म्हणजे किती सेमी ?* 100 सेमी 5) *'ज्ञानेश्वरी' हा ग्रंथ कोणी लिहिला ?* संत ज्ञानेश्वर महाराज *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● साईनाथ माळगे ● गंगाधर पालकृतवार ●  लक्ष्मण दावणकर ●  मोहन कुलकर्णी ●  दत्तात्रय तोटावाड ●  व्यंकट चिलवरवार ●  श्रीराम भंडारे ●  राहूल लोखंडे ●  दिनेश राठोड ●  सचिन पिसाळ ● साईकुमार ईबीतवार ● बजरंग अरगेलू ● करुणा खंडेलोटे ● ज्ञानेश्वर कोकरे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *'नकार' साधा नसतो. त्याची एक किमंत असते. ती कधी अत्यंत स्वस्त असते तर कधी अत्यंत महाग. रामायण आणि महाभारताने असे अनेक नकार आपल्यासाठी उदाहरणे म्हणून ठेवले आहेत. रामायणात न दिलेले 'नकार' आदर्श निर्माण करतात. तर महाभारतात 'नकार' दु:ख आणि विध्वंस घडवतात.* *रामाने वनवासात जाण्यास नकार दिला असता तर पितृवचनी राम असा आदर्श राहिला नसता. एका धोब्याच्या टिकेवर रामाने विश्वास ठेवण्यास नकार दिला असता, तर जनहित जपणारा 'राजा' म्हणून रामाचे नाव झाले नसते. या प्रत्येक नकाराने पुढे अनंत यातनांना जन्म दिला, पण शेकडो वर्ष टिकणारे 'आदर्श' जन्माला घातले.* *महाभारतात पावलोपावली शक्तिशाली नकार दिसतात व सामान्यांना आधार देणारे आदर्श निर्माण करतात. कुंतीचा कर्णाला स्विकारण्यास नकार, दुर्योधनाचा पांडवांना राज्य देण्यास नकार, द्रौपदीचा दुर्योधनास नकार हे सर्व विध्वंसक ठरले.* *"अर्जुनाने युद्धाला नकार दिला नसता तर 'भगवद्-गीता' जन्माला आली नसती. आम्ही 'गीते'ला मुकलो असतो."*     ••●🔻‼ *रामकृष्णहरी* ‼🔻●••               ⚜⚜⚜⚜⚜ संजय नलावडे, चांदीवली, मुंबई         9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    ज्ञान भक्ति वैराग्य सुख पीव ब्रह्म लौ ध़ाये आतम अनुभव सेज सुख, तहन ना दूजा जाये।      ज्ञान भक्ति वैराग्य सुख जलद ब्रम्हानंद दायी आत्मानुभव प्राप्तीची सर अन्यत्र कुणा न येई         महात्मा कबीर अनुभव ज्ञानाची महत्ती विषद करताना म्हणतात , 'ज्ञान,भक्ति,वैराग्य सुख प्राप्तीद्वारे जलद गतीने ईश्वराचा साक्षात्कार होईल. ईश्वराची दिव्यताही अनुभवता येईल. हा मार्ग ईश्वरी लिला जाणून घेण्यासाठी महत्वपूर्ण ठरणारा आहे.  मात्र आत्मानुभव आत्मा आणि परमात्म्याचंं  मिलन घडवून आणतो.  जेव्हा आत्माच परमात्म्याच्या रुपाशी एकरूप होऊन जातो. तिथे अन्य कुणाला प्रवेश कसा मिळणार बरे ! जीव आणि शिवाच्या एकरूपतेत मनाचाच मनाशी संवाद घडून येतो. विश्वातील नश्वरता व विकारांना त्याठायी यत्किंचितही स्थान उरत नाही. निसर्गाची सर्वव्यापकता व समदृष्टी त्या जीवात्म्याच्या ठायी स्थापित होते. हा स्थितप्रज्ञतेचा सर्वोत्कट आविष्कार असतो. त्याच्यावर कोणत्याही प्रलोभनाचा प्रभाव पडत नाही . कारण तो स्वतःच अविनाशी विश्वरूपाशी तादात्म्य पावलेला असतो.       एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जो माणूस जसा विचार करतो त्याच विचारानुसार जीवनात वागतो. जर चांगले विचार असतील तर त्यांचे परिणाम त्याच्या जीवनात आणि इतरांराच्याही जीवनात चांगलेच होतील. आपल्याला आणि इतरांना त्रास होणार नसतील, उपदेशात्मक असतील तर ते नक्कीच जीवनात फलदायी ठरु शकते.अशी माणसे स्वत:च्या आणि इतरांच्याही जीवनात नवे चैतन्य आणू शकतात.ते कधीही वाईट विचारांना आपल्या जीवनात थारा देत नाहीत,त्यांना कुणाचेही नुकसान होऊ नये असेच वाटते. परंतू वाईट विचार करणारी माणसे कधीच आपल्या जीवनात यशस्वी होत नाहीत आणि इतरांच्या चांगल्या चाललेल्या जीवनात बाधा आणल्याशिवाय राहत नाहीत.अशी माणसे दुष्ट प्रवृतीची असतात.त्यांना स्वत:चे आणि इतरांचे काय आणि किती नुकसान होत आहे याचे भान देखील राहत नाही.अशावृत्तीच्या माणसांपासून केव्हाही दूरच राहिलेले बरे. © व्यंकटेश काटकर,नांदेड. 📲 9421839590 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *परोपकारी वृत्ती अंगी बाळगणे* एका गावात एक निर्धन मनुष्‍य राहत होता. परिस्थिती गरीबीची असूनही तो मनाने उदार होता. आपल्‍या घासातील घास देण्‍यासही तो कमी पडत नसे. एकदा एका शेठजीकडे तो जेवावयास गेला असताना त्‍या शेठजीने त्‍याला पंचपक्‍वान्‍नाचे ताट वाढून दिले. ती भरगच्‍च पदार्थांनी भरलेली थाळी बघून त्‍या गरीबाला वाटले की यातून किमान तीन माणसांची भूक भागू शकेल. त्‍याने शेठजीची परवानगी मागितली व त्‍यातील अन्‍न त्‍याने बरोबर घेतले व घराकडे जाण्‍यास निघाला. रस्‍त्‍यात त्‍याला एक भिकारी भेटला त्‍याला त्‍याने खायला दिले. त्‍यातून उरलेले अन्‍न घेऊन तो घरी आला, तो जेवायला बसणार इतक्‍यात एक भिक्षुक या माणसाच्‍या घरी आला व त्‍याने त्‍याला अन्‍नदान करण्‍याची विनंती केली. गरीबाने त्‍याच्‍यासमोरील ताट त्‍या भिक्षुकाच्‍या स्‍वाधीन केले. त्‍यानंतर अजून एक अपंग व्‍यक्ती दाराशी आली त्‍यानेही या गरीबाकडे अन्न मागितले त्‍यालाही याने आपल्‍या थाळीतील अन्न खायला दिले. आता याच्‍याकडे देण्‍यासारखे काहीच शिल्लक राहिले नाही तेव्‍हा याने स्‍वत:ची भूक भागविण्‍यासाठी एक भांडेभर पाणी घेतले तर समोरून एक वृद्ध व्‍यक्ती आली व तिने ते पाणी पिण्‍यासाठी मागितले. याला आता खाण्‍यापिण्‍यासारखे काहीच उरले नाही तरीही ही व्‍यक्ती समाधानात होती आजचा दिवस आपल्‍यामुळे किमान चार लोकांना तरी खाण्‍यापिण्‍यास मिळाले. तो ह्याच विचारात असताना तेथे देव प्रगटले व म्‍हणाले,'मी तुझी परीक्षा घेण्‍यासाठीच भिकारी, भिक्षुक, अपंग आणि वृद्ध व्यक्तिचे रूप घेतले होते व तुझ्याकडून काही ना काही मिळते का नाही हे पाहिले आणि तु स्‍वत:चा विचार न करता दुस-याचा जीव जाणून घेतलास व देत राहिलास. आता या पुढे तुला काहीच कमी पडणार नाही असा मी तुला वर देतो.'' इतके बोलून देव अंतर्धान पावले. *तात्‍पर्य: देण्‍यातच खरे सुख लपलेले आहे. कुणाचाही घास हिरावून घेण्‍यापेक्षा कुणाला तरी एखादा घास देता कसा येईल याचा विचार करणे यातच खरे सुख लपलेले आहे.* *माणसाने आपला जन्म घेण्यासाठी नाहीतर देण्यासाठी झाला ही सदभावना बाळगून परोपकार करीत जावे यातच खरा आनंद आहे.समाधान आहे.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 19/07/2019 वार - शुक्रवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *शहीद दिन - म्यानमार* 💥 ठळक घडामोडी :- १९९९-'मैत्रेयी एक्सप्रेस' या कोलकाता ते ढाका बससेवेचे तत्कालीन प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांनी उदघाटन केले. १९६६-'शिवसेना'या राजकीय पक्षाची स्थापना झाली. १९८५ - ईटलीतील व्हाल दि स्लाव्हा धरण फुटले. पुरात २६८ ठार. १९८९ - युनायटेड एरलाइन्स फ्लाइट २३२ हे डी.सी. १० प्रकारचे विमान अमेरिकेतील सू सिटी शहराजवळ कोसळले. वैमानिकांच्या कौशल्यामुळे १८४ प्रवासी वाचले परंतु ११२ अन्य प्रवासी मृत्युमुखी. 💥 जन्म :- १८९६ - ए.जे. क्रोनिन, स्कॉटिश लेखक. १९३४ - फ्रांसिस्को से कमेरो, पोर्तुगालचा पंतप्रधान. १९३८ - डॉ. जयंत विष्णू नारळीकर, भारतीय अंतराळ-भौतिकशास्त्रज्ञ. १९४७-सलमान रश्दी ,ब्रिटिश लेखक 💥 मृत्यू :- १९४७ - ऑँग सान, म्यानमारचा स्वातंत्र्यसैनिक. १९६५ - सिंगमन र्‍ही, दक्षिण कोरियाचा पहिला राष्ट्राध्यक्ष. १९८० - निहात एरिम, तुर्कस्तानचा पंतप्रधान. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानने फाशीची शिक्षा सुनावलेले भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांची तात्काळ मुक्तता करावी, अशी मागणी भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी पाकिस्तानकडे केली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *आजपासून मान्सूनचा मध्य-महाराष्ट्र, विदर्भात जोर, मुंबई, ठाण्यातही वाढणार तीव्रता, देश व्यापत चाललेला मान्सून ठिकठिकाणी मनसोक्त बरसत असतानाच मराठवाडा आणि विदर्भाकडे मात्र वरुण राजाने फिरवली आहे पाठ.* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *सर्वोच्च न्यायालयाची निवडक निकालपत्रे मराठीसह सात प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध करण्याची सोय कालपासून झाली सुरू* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *समृद्धी महामार्गावर वन्यजीवांसाठी विशेष उपाययोजना, प्रस्तावित असलेल्या मुंबई-नागपूर महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर वन्यजीवांसाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे विशेष उपाययोजना करण्यात येणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *३१ जुलै रोजी शिर्डी येथे राज्यातील ४० हजार सरपंच, उपसरपंचांचा जंगी मेळावा आयोजित करण्यात आला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि भाजपचे अन्य काही मंत्री प्रामुख्याने उपस्थित राहणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *श्रीमंतांच्या यादीत मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांना मागे टाकत अरनॉल्ट दुसऱ्या क्रमांकावर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *नवी दिल्ली : भारताची आघाडीची धावपटू हिमा दास हिने आपली सुवर्ण धाव कायम राखताना गेल्या १५ दिवसांत तब्बल चौथे सुवर्ण पदक जिंकण्याचा केला पराक्रम* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *लघुकथा - जादूची पिशवी* https://storymirror.com/read/story/marathi/epuemarh/jaaduucii-pishvii/detail वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ कथालेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *वादळाचं बारसं कोण करतं ?* 📙 २००९ हे वर्ष सरता सरता महाराष्ट्राच्या किनारपट्टीला उद्ध्वस्त करणारं वादळ आठवतं ? त्यानं केलेल्या विध्वंसाच्या खुणा आजही तिथं जागोजागी दिसतात. त्या वादळाचं 'फयान' हे नाव तर तिथल्या नागरिकांच्या मनावर कायमचं कोरलेलं आहे. तीच गत अमेरिकेच्या दक्षिण किनाऱ्यावरील न्यू आॅर्लियान्स या शहराची. 'कत्रिना' हे नाव उच्चारलं तरी मंडळी चळाचळा कापायला लागतात. कारण २००५ साली त्या तुफानानं त्या शहराची केविलवाणी अवस्था करून सोडली होती. वादळ, तुफान, झंझावात, चक्रावर्त अशा अनेक नावांनी ही वादळं ओळखली जातात. इंग्रजीतही सायक्लॉन, टायफून, हरिकेन, स्टाॅर्म अशी नावं आहेत. तरीही त्यांना 'फयान' किंवा 'कत्रिना' याच्यासारखी विलक्षण नावं देतं कोण ? असा प्रश्न मनात येतोच. भूकंप हाही एक नैसर्गिक प्रकोपच आहे; पण भूकंपांना कधी अशी नावे दिलेली आढळत नाहीत. तर मग वादळांचंच असं बारसं कोण करतं ? जसजशी हवामान अंदाजाची यंत्रणा अधिक कार्यक्षम होत गेली, तसतशी वादळांची पूर्वसूचना मिळणे अधिक शक्य होत गेलं. त्यात हंगामामध्ये एकाहून अधिक वादळं एकाच प्रदेशात एकापाठोपाठ येऊन थडकत असतात. अशा वेळी त्यांची वेगवेगळी ओळख पटवण्याची गरज भासू लागली. त्यातूनच मग त्यांचं नामकरण करण्याची प्रथा अस्तित्वात आली. त्याची जबाबदारी मुख्यत्वे 'वर्ल्ड मीटिआॅराॅलॉजिकल ऑर्गनायझेशन' या संस्थेने उचललेली आहे. त्या संस्थेने जगातील तीन वेगवेगळ्या वादळप्रवण क्षेत्रांमध्ये विभागणी केली आहे. उत्तर हिंदी महासागर, उत्तर अटलांटिक महासागर आणि ईशान्य पॅसिफिक महासागर अशी ही ढोबळ विभागणी आहे. उत्तर हिंदी महासागरात उठणाऱ्या वादळांचं बारसं करण्याची जबाबदारी आठ देशांनी उचलेली आहे. यात भारत, पाकिस्तान, म्यानमार, बांगलादेश, मालदीव, श्रीलंका, थायलंड आणि ओमान हे देश येतात. त्यांनी सर्वांनी मिळून प्रत्येक देशाने आठ अशी चौसष्ट नावांची यादी बनवलेली आहे. त्यातून अनुक्रमाने भारतीय हवामान खाते या वादळाचे नामकरण करतं. 'फयान' हे नाव म्यानमारने सुचवलेलं होतं. यानंतर येणाऱ्या वादळाला ओमानने सुचवलेले 'वार्द' त्यानंतरच्या वादळाला पाकिस्ताननं सुचवलेलं 'लैला' अशी नावं यादीवर आहेत. यापूर्वीच्या वादळांना दिलेली नर्गिस (पाकिस्तान), रश्मी (श्रीलंका), कायमुख (थायलंड), बिजली (भारत), निशा (बांगलादेश) व ऐला (मालदीव) ही नावे होती. कोणाही व्यक्तीवरून ही नावे दिली जात नाहीत. एकदा एक नाव वापरल्यावर त्याचा परत वापर केला जात नाही. ही यादी संपायच्या आधी पुढची यादी तयार केली जाईल. इतर क्षेत्रांसाठी काही तपशील वगळता अशाच प्रकारची पद्धत वापर अवलंबली जाते. उदाहरणार्थ उत्तर अटलांटिक प्रदेशासाठी तीन वेगवेगळ्या याद्या तयार करण्यात आलेल्या आहेत. अनुक्रमाने त्यांच्यामधील नावं वापरली जातात. तिथे एकाआड एक पुरुषी नाव तर एका आड एक बायकी नाव दिले जाते. पॅसिफिक महासागरातल्या वादळांना नावं देण्यासाठीही संबंधित राष्ट्रांनी अशाच प्रकारची यादी तयार केलेली आहे. तेव्हा वादळांचं बारसं मुख्यत्वे 'वर्ल्ड मीटियोरोलॉजिकल ऑर्गनायझेशन' संबंधित देशांच्या हवामान खात्यांच्या सहकार्यानं करत असते. *बाळ फोंडके यांच्या 'कोण ?' या पुस्तकातुन* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• संकटांना भिऊ नका, संकटांना संधी मानून त्यावर मात करा. *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *राष्ट्रसंत तुकडोजीला 'तुकड्या' हे नाव कोणी दिले ?* आडकोजी महाराज 2) *'ग्रामगिता' हा ग्रंथ कोणी लिहिला ?* राष्ट्रसंत तुकडोजी महाराज 3) *तुकडोजीचा 'राष्ट्रसंत' या पदवीने कोणी गौरव केला ?* डॉ राजेंद्र प्रसाद 4) *राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्म कोठे झाला ?* मोझरी 5) *श्री गुरुदेव मंडळाची स्थापना कोणी केली ?* राष्ट्रसंत तुकडोजी महाराज *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ●  रविकिरण बलूले ●  मनोज बडे ●  अमोल पाटील सावंत ●  अनिकेत पडघन ●  गजानन शिराळे ●  श्रीनिवास मुरके *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत संघर्ष आहे. हा संघर्ष आतल्या श्वासांबरोबर सुरू होतो आणि श्वासांबरोबरच संपतो. मी खूप दगदग केली आहे. तेलाच्या घाण्याला बैलाला जुंपावे तसे आयुष्याला जुंपलो आहे. आता थोडे आरामाचे क्षण आले आहेत. थोडा विश्राम करतो असे जर कुणी म्हणाले, तर हा विचार आयुष्याला पूर्णविरामाकडे नेतो. माणूस उद्यमशिल राहिला नाही तर त्याचे अस्तित्व संपते. बुद्धिने श्रमाचा ठेका धरला तर आयुष्याचे सप्तसुरात न्हाणे होईल.* *कु-हाडीने लाकडे फोडणारा प्रचंड शारीरीक श्रम करीत असतो. रस्त्याकडेला झाडाखाली बसलेला चर्मकार दिवसभर अखंड कामात असतो. या कामाला बुद्धीची जोड मिळाली, तर श्रम कमी होतील, उत्पन्न वाढेल आणि कामात आनंद निर्माण करता येईल. त्यामुळे उद्योगशिल राहणे जितके गरजेचे असते तितकेच त्या उद्योगशिलतेला बुद्धिने दिशादर्शन करणेही आवश्यक असते. प्रतिकूलतेचे आव्हान स्विकारून ते अनुकूल करणारे श्रमर्षि थेट ब्रम्हांडनायक भास्करांनी नाते सांगतात. प्रतिभेला परिश्रमाची साथ मिळाली तर वाळवंटातही नंदनवन फुलत असेल, तर ही साथ घेऊन नंदनवनी असणारे आपण बहरून यायलाच हवे ना !* *॥ रामकृष्णहरी ॥* 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 *श्री संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल-9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  🌟! !  *कबिराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• परबत परबत मै फिरया,  नैन गवाए रोई | सो  बूटी पौ नहीं ,  जताई जीवनी होई  ||      अर्थ           माणूस बर्‍याचशा ऐकीव आणि भ्रामक बाबींच्या मागे लागून जीवनातला अनमोल वेळ वाया घालवत असतो. अमृत प्राशन करणे, अमर होणे, संजीवनी व बर्‍याच  अशा काही बाबी वारंवार चर्चेत येतात. या सर्व बाबींचा भौतिक विचार करून माणूस दमछाक करून घेतो. सर्व काही आपल्याच ठायी असणार्‍या कर्तृत्त्व , चिंतन ,  शांती व समाधानातून प्राप्त होणार्‍या या लौकिक  बाबी ! मात्र माणूस वरवरचा विचार  करून स्वतःची दमछाक करून घेतो. 'तुझं आहे तुजपाशी पण जागा विसरलाशी.' अशीच ही गत म्हणावी लागेल. कस्तुरी मृग कस्तुरीच्या सुगंधानं ऊर फुटेतो धाव धाव धावतो. कस्तुरी स्वतःजवळ असूनही त्याचा अंत मात्र तिच्याच शोधात  होतो.  तसंच माणसाचं झालंय. थोडसं पूर्वजांकडं डोकावून पाहिलं तर सर्वच जण अमरत्व गाठू शकले नाहीत. ज्यांनी ध्येयासाठी झपाटून आपल्या कर्तृत्तवाचा ठसा उमटवला. खरं तर त्यांनाच अमृताचा खर्‍या अर्थानं कुंभ सापडलेला ! त्यांनी तो कर्माच्या रूपानं प्राशन केला. आज हजारो शेकडो वर्षे लोटली.  ते देहाने नसले तरी कार्य रूपानं अमर आहेत. त्यांच्या हयातीत कधी त्यांनी भ्रामक अमृताचा शोध घेतला नाही. त्यांनी कधी वेगळ्या स्वर्गाचा विचार केल्याचे ऐकिवात नाही. आपल्या कार्य क्षेत्रातंच मनोभावे स्वर्ग निर्माण केला. 'नर करणी करे सो नारायण होय ।' याची प्रचिती दिली. ज्यांनी लौकिकता व नैसर्गिकपण नाकारलं. ते सर्व अवहेलनेचे धनी ठरले आहेत. प्रतिकांचा उथळ अर्थ घेवून धावपळ करून चालत नाही. चिंतन व मननातून शाश्वत सत्ये बाहेर पडतात. ती शोधली की माणूस अजरामर होतो. हे त्या मागचं रहस्य सांगताना महात्मा कबीर म्हणतात, पर्वता पर्वतावर फिरून थकलो , दमलो, प्रसंगी रडलोही परंतु सहज अमर करणारी संजीवनी काही प्राप्त झालीच नाही. कर्म गुटिकाच माणसाला अमर करते. हे जीवनातून  फलित निघालं.       कर्मभूमीत हृदय आणि हृदयात कर्मभूमीला  आसरा दिला की जीवनच नंदनवन होवून जातं.  एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• चांगल्या विचाराने आणि चांगल्या संगतीने खरा माणूस घडतो. आपल्या जीवनात नेहमी चांगला विचार करत राहिल्यास आपल्या प्रत्येक कामात यश मिळते आणि मनस्वी आनंद मिळतो.तो आनंद इतरांचे वाईट व्हावे आणि माझेच भले व्हावे असे विचार सतत आपल्या मनात असतील तर आपणच आपल्या पायावर दगड पाडून घेतल्यासारखे होईल.त्यात आपली प्रगती होण्यापेक्षा अधोगतीच होईल. तसेच चांगल्यांच्या सहवासात राहिले तर आपल्या मनातील वाईट विचारांना कधीच संधी मिळणार नाही.चांगली माणसे स्वत:साठी आणि इतरांसाठी नेहमी चांगलाच विचार करत असतात.सुसंगती सदा जोडावी ती म्हणजे चांगल्या सज्जनांची आणि पुस्तकांची तसेच ग्रंथांची.यांच्या सानिध्यात राहिल्यावर देखील आपले जीवन सुखी व समृद्ध बनेल.त्यामुळे आपण इतरांसमोर एक आदर्श म्हणून उभे राहू. © व्यंकटेश काटकर, नांदेड. 📱९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 📚🌱📚🌱📚🌱📚🌱📚 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *खोड मोडली* सखाराम नावाचा एक ‍मीठाचा व्यापारी होता. त्याच्याजवळ एक गाढव होते. ते फार आळशी होते. रोज सकाळी सखाराम गाढवाच्या पाठीवर मीठाच्या पिशव्या लादत असे. मग तो गाढवाला घेऊन शेजारच्या गावात मीठ विकायला जात असे. जाताना एक ओढा लागत असे. एके दिवशी ओढा ओलांडत असताना गाढवाचा पाय अचानक घसरला व ते पाण्यात पडले. त्यामुळे त्याच्या पाठीवरचे मीठाचे पोते पाण्यात भिजले. त्यातील मीठ विरघळल्याने ते हलके झाले. त्यामुळे गाढवाचे ओझे कमी झाले. त्याला चांगलाच आराम मिळाला. दुसर्‍या दिवशी गाढवाने मुद्दाम पाण्यात पडल्याचे नाटक केले. मीठ पुन्हा पाण्यात भिजल्याने त्यादिवशीही गाढवाला आराम मिळाला. मग तो सारखेच असे करू लागला. पण लवकरच सखारामला ही युक्ती लक्षात आली. त्याची खोड मोडण्यासाठी मग त्याने एके दिवशी त्याच्या पाठीवर कापसाचे ओझे ठेवले. ओढा लागताच गाढवाने पुन्हा पडल्याचे नाटक केले. मात्र, या वेळी पाटीवर मीठाऐवजी कापूस असल्याने तो भिजल्यावर चांगलाच जड झाला. त्यामुळे गाढवाला लवकर उठता येईना. त्याला त्या दिवशी अधिकच ओझे वाहावे लागले. त्याला चांगलीच अद्दल घडली. तेव्हापासून गाढवाने कधीच पाण्यात पडल्याचे नाटक केले नाही व कामचुकारपणा केला नाही. *तात्‍पर्य: कामातून पळवाट शोधणे केव्हाही वाईट.आळस,कामचुकारपणा केल्यास स्वतःचेच नुकसान होते.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

माझा परिचय नावः श्रीमती प्रमिला कुंडलीक सेनकुडे पदः सहशिक्षिका कार्यरत शाळाः जि.प.गोजेगाव ता.हदगाव जिल्हा नांदेड. शिक्षणः B.A.(Ded ) छंद व आवडः सामाजिक कार्याची आवड,वाचणाची आवड, संघटणात्मक कार्याची आवड, (काव्य , चारोळी, लेख) लिखाणाचीआवड, शालेय स्तरावर शैक्षणिक विविध नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्याची आवड. रोटरी क्लब हदगाव तर्फे विविध सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबविणे. (वैयक्तिक पातळीवर सामाजिक उपक्रम राबविते दरवर्षी.आई-बाबाची पुण्यतिथी) 〰〰〰〰〰〰〰 *तंत्रज्ञानात्मक वाटचाल* *ब्लाॕग निर्मितीतुन , आणि युटुब चॕनल च्या माध्यमातून शैक्षणिक माहिती व उपक्रम राबविणे.* *प्रकाशित साहीत्य* *'वास्तव एक......सत्य' काव्यसंग्रह* विविध मासिके आणि वृतपञात कविता ,लेख प्रकाशित. *भुषवित असलेले पदः* १) म.रा.प्रा.शिक्षक महिला आघाडी संघ जिल्हासरचिटणीस नांदेड. २) रोटरी क्लब सदस्या हदगाव. ३) जिजाऊ ब्रिगेड कार्याध्यक्षा (ता.हदगाव जिल्हा नांदेड) ४) काव्यप्रेमी शिक्षकमंच जिल्हाध्यक्षा नांदेड. 〰〰〰〰〰〰 *मिळालेले पुरस्कार व सन्मानः* १) प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम शिक्षणाची वारी सन्मानपञ २) तालुकास्तरीय 'गुणी' शिक्षक गौरव पुरस्कार ३) आई गौरव पुरस्कार ४)कै.देवराव प्रभुजी पाटील सेवाभावी संस्था तर्फे शिष्यवृत्ती पुरस्कार ५) 'गौरव गुणवंताचा' पुरस्कार (सहकारी पतपेढी शिक्षण विभाग मर्यादित जिल्हा परिषद नांदेड.) ६) मुलींची १००% पटनोंदणी पुरस्कार ७) कुसुमताई चव्हाण 'महिला भूषण' पुरस्कार ८) म.अॕ.पॕनल(MAP) तर्फे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार (संमेलन नाशीक) ९) रोटरी क्लब, हदगाव तर्फे (Nation Builder Award) १०) गुरुकुल महाराष्ट्र समूहातर्फे सन्मानपञक व गौरवचिन्ह ११) मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था नागपूर तर्फे राज्यस्तरीय काव्य पुरस्कार १२) 'आम्ही सावित्रीचा लेकी' आयोजित राज्यस्तरीय उपक्रमशिल शिक्षिका पुरस्कार १३) 'माझी शाळा माझे उपक्रम' शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती सहभाग प्रमाणपत्र १४) स्वामी विवेकानंद शिक्षक पतसंस्था हदगाव/हिमायतनगर तर्फे दोनवेळेस सत्कार व सन्मानचिन्ह (२०१७ तसेच २०१८ ला) १५) मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था नागपूर तर्फे 'गुरू गौरव' पुरस्कार १६) 'आस शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना' तर्फे ' राज्यस्तरीय अध्यापक पुरस्कार' १७) नांदेड भारत स्काऊटस आणि गाईडस सन्मानचिन्ह १८) गुरुगोविंदसिंघजी प्रेरणा पुरस्कार नांदेड १९) राज्यस्तरीय हिरकणी साहित्यगौरव पुरस्कार जालना २०) महाराष्ट्र शिक्षक पॕनल तर्फे 'राज्यस्तरीय सेवासन्मान आदर्श शिक्षिका'पुरस्कार. 〰〰〰〰〰〰〰 मो.नं 9403046894. 〰〰〰〰〰〰

*लालपरी* तुझ्या उदरी जन्माला मी येईन लालपरी तुझी ग मी होईन तुझ्या सुखदुखाःची साथी मी होईन आनंदात तुझ्या भारावून मी जाईन 〰〰〰〰〰〰 प्रमिलाताई सेनकुडे ता.हदगाव जिल्हा नांदेड.

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 18/07/2019 वार - गुरूवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिन* 💥 ठळक घडामोडी :- १९९६-उद्योगपती गोदरेज यांना जापान सरकार तर्फे 'ऑर्डर ऑफ रायझिंग सन' पुरस्कार प्रदान. १९६८ - इंटेल कंपनीची स्थापना. १९२५-अडाल्फ हिटलर ने 'माईन काम्फ'हे आत्म चरित्रात्मक पुस्तक प्रकाशित केले. १८५७-मुंबई विद्यापीठाची स्थापना 💥 जन्म :- १९१८-नेल्सन मंडेला तथा 'मदीबा' ,दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष, नोबेल पारितोषिक विजेते. १९६७ - व्हिन डीझेल, अमेरिकन अभिनेता. १९८२ - प्रियांका चोप्रा, भारतीय अभिनेत्री. 💥 मृत्यू :- १९६९- 'लोकशाहीर' अण्णाभाऊ साठे,लेखक,कवी व समाजसुधारक २०१२ - सुपरस्टार राजेश खन्ना, हिंदी चित्रपट अभिनेते. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *मुंबई - डोंगरी इमारत दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत तर जखमींना 50 हजार रुपये देणार - मुख्यमंत्री* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *चांद्रयान-२ या अवकाशयानाचे २१ जुलै रोजी दुपारी किंवा २२ जुलै पहाटे पुनर्प्रक्षेपण करण्याचा विचार भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) करत आहे.* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *नागपूरसह अकोला, वाशीम, धुळे आणि नंदूरबार जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *कुलभूषण जाधव प्रकरणी भारताला मोठं यश ; पाकिस्तानला चपराक - विशेष सरकारी वकील उज्वल निकम* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *गोव्यात विरोधी पक्षनेतेपदी दिगंबर कामतनिवड, मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या दिगंबर कामत यांना पहिल्यांदाच विरोधी पक्षनेतेपद* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *'मेड इन इंडिया' कादंबरीफेम साहित्यिक पुरुषोत्तम बोरकर यांचे निधन, खामगाव येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलनात त्यांनी पूर्णवेळ उपस्थिती दर्शविली होती.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *१६ वर्षीय अनिष बनवालाने जर्मनीत सुरू असलेल्या कनिष्ठ वर्ल्ड कप स्पर्धेत 25 मीटर रॅपिड फायर पिस्तुल प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *लघुकथा - अमर रहे* https://storymirror.com/read/story/marathi/re186hy4/amr-rhe/detail वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ कथालेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *ज्वालामुखीचा उद्रेक केव्हा होतो ?* 📙 आपल्या पृथ्वीचा पृष्ठभाग टणक आणि स्थिर वाटला तरी हे धरतीचं कवच अनेक खंडांमध्ये विभागलं गेलेलं आहे. हे खंड पृथ्वीच्या पोटात असलेल्या द्रव पदार्थावर तरंगत असतात. पृथ्वीच्या गाभ्यामधलं तापमान अतिशय चढं असतं. त्यापायी तिथले कातळ, दगड वितळतात आणि त्यांचं द्रवरूप मॅग्मामध्ये रूपांतर होतं. हा मॅग्माही अतिशय तप्त अवस्थेत असतो. त्यापायी त्याचा दबाव वरच्या खंडांवर पडत असतो. ज्या वेळी हा दबाव एका मर्यादेपलीकडे जातो तेव्हा तो मॅग्मा वरवर चढू लागतो. ज्वालामुखीच्या पोटातल्या या मॅग्माला वर चढण्यासाठी एक नळीसारखी मोकळी जागा सापडते. हिलाच व्हेन्ट म्हणतात. व्हेंटचं वरचं टोक ज्वालामुखीच्या उघड्या तोंडाशी जोडलेलं असतं. हा तापलेला मॅग्मा वरवर चढत असताना वाटेत आलेल्या खडकांनाही वितळवतो. त्यामुळे त्यांचं प्रमाण व दबाव वाढत जातो. वरवर जातानाच त्याचं लाव्हामध्ये रूपांतर होतं. हा लाव्हा त्या मुखाशी पोचला की जोराने बाहेर फेकला जातो. यालाच ज्वालामुखीचा उद्रेक म्हणतात. असा स्फोट झाल्यासारखा उद्रेक झाला की राख, धूळ आणि न वितळलेले खडकांचे तुकडे वातावरणात उंच फेकले जातात. राख व खडक परत जमिनीकडे ओढले जातात. पण बाहेर पडलेला लाव्हा मात्र द्रवरूप असल्यामुळे बहुतेक वेळा ज्वालामुखीच्या बाहेरच्या बाजुवरून ओघळत खाली उतरतो. त्याचा वेग जास्त असला तर तो झपाट्याने आसपासच्या प्रदेशात पसरतो. वाटेत आलेल्या सगळ्यालाच वितळवत, जाळत तो दूरदूरवर पसरत जातो. पुरातन पॉम्पे शहराजवळच्या व्हेसुव्हियस या ज्वालामुखीचा उद्रेक झाला तेव्हा ते सर्व शहर बेचिराख होऊन त्या लाव्हाखाली गाडलं गेलं होतं. हा लाव्हा जसा थंड होतो तसं त्याचं अग्निजन्य खडकांमध्ये रूपांतर होतं. जर उद्रेक झालेला ज्वालामुखी सागराच्या पोटात असेल तर अशा थंड झालेल्या लाव्हापासून बेटं तयार होतात. हवाई बेटांचा उगम असा झाला आहे. ज्वालामुखीचा उद्रेक एकाएकी काहीही पूर्वसूचना न देता होऊ शकतो. पण उद्रेक होण्यासाठी पुरेसा मॅग्मा तयार होऊन व्हेन्टवाटे वरवर चढत जाण्याची आवश्यकता असते. ते होण्यासाठी काही कालावधी निश्चितच जातो. त्यामुळे काही पूर्वसूचना मिळू शकतात. त्यातल्या बहुतेक भूकंपाच्या छोट्या छोट्या धक्क्यांच्या स्वरूपातल्या असतात. तर काही वेळा तापलेल्या मॅग्माच्या हालचालीमुळे जमिनीचं तापमान वाढत जातं किंवा तिथं असलेल्या तसेच गरम पाण्याच्या झऱ्यांचं तापमानही वाढत जातं. काही वेळा जमिनीला फुगवटाही येतो. पण या सर्वांवर लक्ष ठेवण्यासाठी संवेदनशील उपकरणांची गरज असते. सुप्त ज्वालामुखींच्या आसपासच्या प्रदेशात ठेवलेल्या अशा उपकरणांद्वारे पूर्वसूचना मिळाल्यास तेथील नागरिकांचं स्थलांतर करून जीवितहानी टाळता येते. *बाळ फोंडके यांच्या 'केव्हा ?' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• अनुभवाने आलेले शहाणपण हे हजारो पुस्तकं वाचुन आलेल्या शहाणपणापेक्षा किती तरी पटीने श्रेष्ठ असते. *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *भारतात सहारा हे राष्ट्रीय विमानतळ कोठे आहे ?* मुंबई 2) *लांबी मोजण्याचे प्रमाणित एकक कोणते ?* मीटर 3) *दिल्लीचे मुख्यमंत्री कोण आहेत ?* अरविंद केजरीवाल 4) *तुकडोजी महाराज यांचे नाव काय होते ?* माणिक बंडोजी ठाकूर 5) *राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या गुरुचे नाव काय होते ?* आडकोजी महाराज *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ●  श्रीनिवास पुसा ●  राज राठोड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *संपर्क, नातं व संबंध या गोष्टी नीट समजून घ्यायला हव्यात. संपर्कात असणे म्हणजे संबंधात असणे. हा संबंध कधी इतर नात्यांतून निर्माण झालेला असतो, कधी वैचारिक असतो, कधी भावनिक असतो. ते प्रेम आणि आदरातून निर्माण झालेलं असतं. सामाजिक संबंध हे घालून दिलेल्या मानदंडातून निर्माण झालेले असतात. पती आणि पत्नी यांच्यात भावनिक, बौद्धिक, आत्मिक संबंध असतोच का ? फार कमी 'आहे' असे उत्तर येऊ शकेल, कधी कधी नसतो देखील ! केवळ सामाजिक व्यवस्थेप्रमाणे तो संपर्क किंवा संबंध असतो.* *एखाद्या व्यक्तिविषयी आपण जेंव्हा विचार करतो तो ती व्यक्ती कालपर्यंत कशी होती, यावरून तिच्याबाबत आपल्या मनात एक प्रतिमा तयार झालेली असते. त्यातूनच आपण त्या व्यक्तिकडे बघत असतो. पण, आज ती व्यक्ती वेगळी असू शकते. म्हणून केवळ भूतकाळाच्या प्रतिमेवरून विचार करून चालणार नाही. खरा संपर्क, संबंध, प्रेम असणार असेल तर ते भूतकाळात आणि भविष्यकाळात असत नाही; ते असतं वर्तमानकाळात..या क्षणात आणि आता ! जेंव्हा आपल्यातलं मनुष्यत्व वाढत राहतं, पुढे जात राहतं आणि असं होत राहिलं की मग कालचा मनुष्य आणि आजचा मनुष्य यात तफावत आढळते.* *॥ रामकृष्णहरी ॥* 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 *श्री संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल- 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  🌟! !  *कबिराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• कबीर  सतगुर  ना  मिल्या , रही  अधूरी  सीश  | स्वांग जाति का पहरी कर ,  घरी  घरी  मांगे  भीष  || अर्थ :       महात्मा कबीर गुरूचे जीवनातील अनन्य साधारण असणारे महत्त्व सांगताना म्हणतात की, जीवन जगताना असो की शिक्षण घेताना असो गुरू असलाच पाहिजे.  गुरू (मार्गदर्शक) भेटला नाही ज्ञानाची अर्धवट प्राप्ती होते. अर्धवट ज्ञान  आत्मघातकी ठरतं.  ते जीवनाच्या वाटेवर सर्वात घातक ठरू शकते. महाभारतातील अभिमन्यूचा प्रसंग समजून घेतला तरी अर्धवट ज्ञान किती धोकादायक ठरतं हे पुढील पिढ्यांच्या ध्यानी यायला वेळ लागणार नाही. अभिमन्यू कुशल योद्धा होता. चक्रव्युहात घुसणे जाणत होता परंतु चक्रव्पुह भेदण्याची कला त्याला जमत नव्हती. त्यातच त्याला प्राण गमवावा लागला.        अर्धवट ज्ञानी पारंगत असल्याचं ढोंग करतो. या ढोंगापायी त्याला नकल करावी लागते. नकल करणारा परिपूर्ण असत नाही. अशा व्यक्तींच्या माध्यमातूनच अंधश्रद्धा व चुकीच्या रुढी समाजात पसरवल्या जातात. ही अर्धशिक्षित फौजच समाजाला चुकीच्या दिशेनं नेते. संभ्रम निर्माण करीत असतात. स्वतःच्या मार्गाला विवेकाची जोड नसल्याने स्वतःचीच फसगत करून घेतात.  प्रसंगी पथ भरकटून भीक मागण्याचेही त्यांच्या नशिबी येते. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपण आपल्या दररोजच्या जीवनात एक चांगला विचार केला आणि आचरणात आणला तर अनेक चांगल्या गोष्टींवर विजय मिळवू शकतो.तो विचार आपल्यासाठी प्रेरणा व इतरांसाठी प्रेरणादायी ठरु शकते.आपल्या एका चांगल्या विचारांमुळे इतरांच्या जीवनात जे वाईट विचार सदैव घोळत असतात आणि त्या विचारांमुळे त्यांच्या प्रगतीऐवजी दिवसेंदिवस अधोगती व्हायला लागते ती अधोगती आपल्या सानिध्यात आल्यामुळे व आपल्या चांगले विचार ऐकल्यामुळे थांबू शकते.आपल्या एका चांगल्या विचारांमुळे इतरांच्या जीवनात चांगली प्रगती होत असेल तर आपण आपल्यासाठीच नाही तर इतरांसाठी व समाजासाठी काहीतरी चांगले केल्याचे समाधान वाटेल.चांगल्या विचारातून केव्हाही चांगलेच उगवले जाते हे मात्र नक्की आहे. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🌱🍃🌱🍃🌱🍃🌱🍃🌱 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *गरुड आणि डोमकावळा* एका गरूडाने कुरणात चरत असलेल्‍या मेंढ्यांच्‍या कळपातील एका कोकरावर झडप घातली व त्‍या कोकराला पळवून नेले. त्‍याचे हे धाडस आणि सामर्थ्‍य पाहून रानातले सर्व पशुपक्षी त्‍या गरूडाकडे भीतीयुक्‍त आदराने पाहू लागले. 'गरूडाने पळवले त्‍यापेक्षाही मोठे कोकरू जर आपण पळवले तर गरूडापेक्षाही आपला मानसन्‍मान वाढेल, त्‍याच्‍याइतकीच प्रतिष्‍ठा आपल्‍याला लाभेल असे एका डोमकावळ्याला वाटले.  त्‍यासाठी त्‍याने नजर ठेवून एका मोठ्या थोराड अशा कोकराच्‍या पाठीवर बसून त्‍याला उचलण्‍याचा प्रयत्‍न केला पण ते कोकरू उचलले जाण्‍याऐवजी, डोमकावळ्याचेच पाय कोकराच्‍या पाठीवरील लोकरीमध्‍ये अडकले व तिथून सुटण्‍यासाठी त्‍याने पंखांची केलेली फडफड व आरडाओरड मेंढपाळाच्‍या कानी गेली. तो तिथे आला व त्‍याने डोमकावळ्याला सोडविले व पिंज-यात कैद केले व त्‍याला स्‍वत:च्‍या मुलांच्‍या स्‍वाधीन केले. मुलांनी मेंढपाळाला विचारले,''बाबा या पक्ष्‍याचे नाव काय हो'' यावर तो मेंढपाळ हसून म्‍हणाला,'' या मूर्ख पक्ष्‍याला जर तुम्‍ही याचे नाव विचारले तर हा स्‍वत:ला गरूडापेक्षाही श्रेष्‍ठ असा पक्षी म्‍हणून स्‍वत:ची ओळख करून देईल पण प्रत्‍यक्षात हा मोठेपणाचा आव आणणारा एक भिकार डोमकावळा आहे.''  *तात्पर्यः प्रत्यक्षात वेगळे आणि अप्रत्यक्षपणे वेगळा मोठेपणाचा आव काही लोक आणत असतात.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~

🌹 *जीवन विचार*🌹 〰〰〰〰〰〰〰 माणसाने आपल्या बाह्य सौंदर्यापेक्षा त्याच्या आंतरिक सौंदर्यावर लुब्ध झालेले अतिउत्तम. कारण सौंदर्य हे सत्य शोधण्याच्या दृष्टीत असते. आणि ही सौंदर्यात सत्य शोधण्याची दृष्टी आपण सामान्य माणसात उपजत करू शकत नाही. म्हणून त्यांना सत्य दाखवावे; म्हणजे सौंदर्याची परिभाषा आपोआपच समजेल, दिसेल. मानवी जीवन सामर्थ्यानं आणि सौंदर्यानं पुलकित झालेलं आहे. या सामर्थ्यमय जीवनाच्या वाटेवर संकटाचे आभाळ कोसळले तर ते मोठ्या हिंमतीने सामर्थ्यशालीपणाने दूर सारावे. आणि सौंदर्याचे क्षण आले तर ते आनंदानं हर्षमय मनाने उल्हासीतपणे जगावेत, अनुभवावेत. असे म्हणतात "सौंदर्य हे स्त्रीचे सामर्थ्य आहे, तर सामर्थ्य हे पुरुषाचे सौंदर्य आहे." या जगातील सर्वश्रेष्ठ प्राणी मानव आहे. स्त्री आणि पुरुष ही त्याची दोन भाग आहेत, रुपं आहे. माणसाने फुलासारखे आपले जीवन जगावे या smt.pramila senkude 'या जगण्यावर या जन्मावर शतदः प्रेम करावे'........ *"सौंदर्य ही परमेश्वराने निर्माण केलेल्या सृष्टीतील श्रेष्ठ सर्जन आहे."* असे मनू ह्या विचारवंताने आपल्या विचारातून स्पष्ट केले आहे. गवताच्या पात्यावर पडलेल्या मोत्यासारखं दवबिंदू हे सौंदर्याचं लेणं आहे.श्रावणातील सौंदर्य मनाला खुदकन हसवत असत. कितीही झालं तरी सौंदर्य हे पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते. 'जशी दृष्टी तशी 'सृष्टी. *तरीही आणखी पुन्हा एकदा सांगावस वाटतं...* माणसाने बाह्य सौंदर्य पाहण्यापेक्षा त्याचे आंतरिक सौंदर्य पाहणे आवश्यक आहे. 〰〰〰〰〰〰 शब्दांकन / संकलन ✍ प्रमिलाताई सेनकुडे जि.प.प्रा.शाळा गोजेगाव ता.हदगाव जिल्हा नांदेड.

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 17/07/2019 वार - बुधवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आंतराष्ट्रीय न्यायासाठी दिन* *बाथ क्रांती दिन - इराक* *लुइस मुनोझ रिव्हेरा जन्मदिन - पोर्तो रिको* संविधान दिन - दक्षिण कोरिया. 💥 ठळक घडामोडी :- २०००-अभिनेत्री व नृत्यांगना वैजयंतीमाला बाली यांना 'भरतनाट्यम शिखरमणी'पुरस्कार जाहीर १९८४ - लॉरें फाबियस फ्रांसच्या पंतप्रधानपदी. १९९४ - फुटबॉल विश्वकप अंतिम सामन्यात ब्राझिलने इटलीला पेनल्टी शूट-आउटमध्ये हरवले. २००४ - भारतातील तामिळनाडू राज्यातील कुंभकोणम शहरात शाळेला आग लागली. ९० विद्यार्थी ठार. 💥 जन्म :- १९५४-अँजेला मेर्केल,जर्मनीच्या चान्सलर १९२० - हुआन अँतोनियो समारांच, आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचा अध्यक्ष. १९३०-बाबुराव बागुल,दलित साहित्यिक १९४१ - बॉब टेलर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. १९४९ - स्नायडर रिनी, सोलोमन द्वीपांचा राष्ट्राध्यक्ष. 💥 मृत्यू :- २००५ - सर एडवर्ड हीथ, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान. २०१२ - मृणाल गोरे, सहाव्या लोकसभेच्या सदस्य, समाजवादी कार्यकर्त्या *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *नवी दिल्ली - राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून आंध्र प्रदेशच्या राज्यपालपदी विश्वभुषण हरिचंदन तर छत्तीसगडच्या राज्यपालपदी अनुसया उकी यांची नियुक्ती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मुंबई - आदित्य ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, मुंबईतील जीर्ण इमारतींबाबत कायदा करण्याची मागणी* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांची नंदुरबारच्या जिल्हाधिकारीपदी बदली, त्यांच्या जागी प्रकाश वायचळ यांची नियुक्ती, वायचळ हे अहमदनगर येथे जात पडताळणी समितीचे अध्यक्ष म्हणून काम पहात होते.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *नाशिक : पावसाने दडी मारल्यामुळे कोथिंबीरची आवक घटल्याने बाजारसमितीत कोथिंबीर च्या भावाने गाठला ऐतिहासिक उच्चांक* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *लंडन - केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी घेतली ब्रिटनच्या पंतप्रधान टेरेसा मे याची भेट* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *येत्या महिन्यात 1 हजार 300 पोलिसांची भरती करण्यासाठी जाहिरात दिली जाईल, भरतीवेळी वयाची अटही थोडी शिथिल केली जाईल, असे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले जाहीर.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *नवी दिल्ली : भारताची आघाडीची महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि टेनिसपटू रोहन बोपण्णा यांना भारताचे क्रीडा मंत्रा किरेन रिजिजू यांच्या हस्ते अर्जुन पुरस्कार प्रदान* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *लघुकथा - कुस्ती* https://storymirror.com/read/story/marathi/iaysl897/kustii/detail वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ कथालेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ⛈ *गार किती मोठी असते ?* ⛈ 'वज्रादपि कठोराणि मृदूनि कुसुमादपि' ही कवीकल्पना जरूर आहे; पण प्रत्यक्षात असे परस्परविरोधी गुणधर्म असणारा कोणताही पदार्थ नाही, असं मानण्याचं कारण नाही. आपल्या अतिशय परिचयाच्या, ज्याचं दुसरं नावच मुळी जीवन आहे अशा, पाण्याकडे पाहा ना ! अधिक नेमकेपणाने बोलायचं तर या पाण्याच्या घनरुपाकडे लक्ष केंद्रित करा ना ! हिवाळ्याच्या ऐन भरात जेव्हा हिमपाताच्या रूपात हे घन पाणी सामोर येतं, तेव्हा अतिशय हलक्या वाऱ्याच्या मंद झुळकीनंही इतस्तत: फेकल्या जाणाऱ्या हिमाच्या त्या पात्यांनी मन मोहरून येतं. अंगावर संक्रांतीच्या हलव्यासारखा सुखद काटा उभा राहतो; पण सरत्या हिवाळ्यात किंवा त्यानंतरही जेव्हा हेच घन पाणी गारांच्या रुपात वर्षाव करतं तेव्हा अक्षरश: ब्रह्मांड आठवतं. उघड्यावर जर गारपीटीच्या मारत सापडला तर हेच 'जीवन' अक्षरश: जीवावर उठतं. हिमाची हलकी पाती अाणि गारांचे वजनदार गोळे यात एक साम्य जरूर आहे. त्यांचा नेमका आकार कोणता आणि तो त्यांना कसा मिळतो, हे एक न सुटलेलं कोडं आहे. साधारण गारा आपण पाहतो त्या सामान्य गोलाकार किंवा फार फार तर अंड्याच्या आकाराच्या असतात. वाटाण्यापेक्षा त्यांचं आकारमान सहसा मोठं नसतं. म्हणजेच साधारणत: दीड ते दोन सेंटिमीटर व्यासाच्या या गारांचं वजन असतं दहा बारा ग्रॅम. वरून ओबडधोबड दिसणाऱ्या या गाराची अंतर्गत रचना तशी आतल्या गाठीची नसते. हळुवारपणे एखादी गार उभी कापली तर आता एखाद्या कांद्याप्रमाणे एकाआड एक पापुद्र्यांचे थर दिसतील. एक पापुद्रा स्वच्छ, नितळ बर्फाचा, त्यावर एक पापुद्रा धुसर दुधी बर्फाचा, परत एक स्वच्छ नितळ पापुद्रा. असे एकावर एक थर. तरीही ९ जून १८६७ साली ४५०० मीटर उंचीवरच्या बेलाईक्लिच गावात झालेल्या गारांच्या वर्षावात प्रा. अाबिच यांना एक गार मिळाली होती. तिचा आकार चक्क एखाद्या तार्यासारखा किंवा हिऱ्यामाणकांच्या हारातलं मध्यवर्ती पदकच जणू असा होता. ज्यांनी या गारांचा साग्रसंगीत अभ्यास केला आहे, त्यांना शंकूच्या, लाटण्याच्या, इतरही अनेक आकारांच्या गारा पाहावयास मिळाल्या आहेत. आकारमानही चक्क पंधरा सेंटिमीटर व्यासपर्यंत आढळलं आहे. अमेरिकेतील नेब्रास्का या मध्यवर्ती राज्यातील वॉटर या समर्पक नावाच्या गावात ६ जुलै १९२८ रोजी गारपीट झाली. त्यातल्या एका गारेचं वजन तब्बल साडेसहाशे ग्रॅम होतं. त्या गोलाकार गारेचा व्यास होता १५ सेंटीमीटर; पण उच्चांक वगैरेच्या गोष्टी करायच्या तर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये एक नोंद आढळते. अमेरिकेतील तिथल्या कॉफव्हील नामक गावात तीन सप्टेंबर १९७० या दिवशी एक गार पडली होती. एकोणीस सेंटिमीटर व्यास आणि ४५ सेंटीमीटर परीघ असलेल्या या गारेचं वजन होतं साडेसातशे ग्रॅम. पाऊण किलो ! *बाळ फोंडके यांच्या 'किती ?' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *Confidence is a key to success.* ( आत्मविश्वास ही यशाची गुरूकिल्ली आहे. ) *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?* पुणे 2) *शिवाजी महाराज यांच्या वडिलाचे नाव काय होते ?* शहाजी राजे 3) *भारताच्या पहिल्या स्त्री शिक्षिका कोण ?* सावित्रीबाई फुले 4) *'स्त्री मुक्ती दिन' केव्हा पाळला जातो ?* 3 जानेवारी 5) *भारतात पालम हे राष्ट्रीय विमानतळ कोठे आहे ?* दिल्ली *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ●  माधव गैनवार ●  अनिलकुमार बिंगेवार ●  पुरुषोत्तम केसरे ●  मधुकर फुलारी ●  अरिफा शेख ●  आनंद पंगेवाड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *खरेपणा, प्रामाणिकपणा, वास्तवता, अस्सलपणा आणि यथार्थपणा अशी आपल्या व्यक्तिमत्वाची ओळख ठेवणं चांगलं. हीच तर आपल्या जीवनाची खरीखुरी गुणसंपदा असते. माणसाने आपल्या ठायी असलेल्या गुणांची जाणीव विसरली तरी चालेल; परंतु आपल्या ठायी असलेल्या दोषांची चांगली जाणीव ठेवावी. जसं दगडातील नको असलेला भाग काढून टाकला की, सुंदर मूर्ती तयार होते, तसं आपल्या स्वभावातील दोष काढून टाकले की, निखळ आणि सुंदर व्यक्तिमत्व झळकत असतं. खरंतर गुणी माणसं लोखंडाचं सोनं बनविणा-या परिसासारखी असतात, ओसाड जमिनीचं नंदनवन करणारी असतात. म्हणून जीवनात यश मिळविण्यासाठी सत्य, पामाणिकपणा, कठोर परिश्रम, न्याय आणि चारित्र्याची गरज असते हे विसरता येणार नाही.* *सत्य म्हणजे सत्यवाणी, सत्य विचार, सत्य आचार आणि सत्य उच्चार होय. सत्य म्हणजे जीवन. असत्य म्हणजे मरण. अनेक माणसं अशी जगता जगता मरत असतात आणि अनेक माणसं मरूनदेखील जगत असतात. यासाठी आपण स्वत: सत्यभाषी झाले पाहिजे. समाज सत्याचा आदर करतो. प्रामाणिकपणाची कदर करतो. न्यायची चाड बाळगतो. श्रमाची महती गातो आणि चारित्र्याची पूजा करतो. आज 'सत्यमेव जयते' हाच आपल्या जीवनाचा मंत्र बनला पाहिजे. यासाठी सत्याचे महत्व आपल्या मनाच्या पाटीवर कायमचे कोरून ठेवले पाहिजे.*   ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई         9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• राम  पियारा  छड़ी  करी ,  करे  आन   का  जाप  | बेस्या  कर  पूत  ज्यू , कहै  कौन  सू  बाप  || अर्थ       महात्मा कबीर जीवनात कृतज्ञतेवर भर देतात. आपल्यावर ज्यांनी ज्यांनी उपकार केले त्यांना माणसानं कधीच विसरू नये. आई, वडिल, गुरूंसह अवतीभोवतीच्या सर्व घटकांनी आपल्या जडणघडणीत योगदान दिलेलंच असतं. त्यामुळे त्यांना विसरून कसं चालणार बरं ! वरील बाबी  मानवी कक्षेतल्या आहेत. त्याही पलीकडील काही अलौकिक , अमानवीय शक्ती आपल्या जीवनाला साकारण्यामध्ये फार मोठ्या सहभागी आहेत. त्यांना पंचमहाभूते म्हणतात. पृथ्वी, आप, तेज , आकाश व वायू या पाच महाशक्तींना विश्वचालक शक्ती माणले गेले आहे. या शक्ती नसत्या तर सजीवांचं अस्तित्वंच राहिलं नसतं. या सर्वांचं नियंत्रण करणारी जी शक्ती आहे तिलाच आपण विधाता किवा ईश्वर माणतो. अलिकडे स्वार्थापायी दगडधोंडे पुजणे. पशू पक्ष्यांची देवाच्या नावावर हत्त्या करणे. हे सारं कळत्यांचं ढोंगीपण अज्ञानी लोकांच्या अज्ञानाचा गैरफायदा उठवणारं असतं. अंधरूढी व अंधश्रद्भा वाढवतात. अशा लोकांबाबत कबीरजीच सांगतात,  'जत्रा में बिठाया फतरा,  तीरथ बनाया पानी।  दुनिया भयी दीवानी,  ये सब है पैसे की धुलधानी॥'      अशा ढोंगांच्या मागं न लागता खर्‍या विधात्याप्रति कृतज्ञभाव जपला पाहिजे. खर्‍या विधात्याला सोडून जे इत्तरांना त्या मार्गावरून भरकटवतात व नको त्याच ढोंगाच्या मागे लागतात. त्यांबाबतीत कबीर म्हणतात , वेस्येच्या लेकानं खर्‍या बापाला विसरावं. तशी  त्यांची गत झालेली असते.      एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••• तुमच्याजवळ जे आहे ते इतराजवळ नाही किंवा इतरांजवळ जे आहे ते तुमच्याजवळ नाही. असे जेव्हा तुम्हाला समजेल तेव्हा तुम्हाला कदाचित वाटेलही आपल्या जीवनात असं का बरं होतं आणि त्याबाबतीत नसल्याचीही मनाला खंत वाटते. खंत वाटून घ्यायचेही कारण नाही. पहिल्यांदा तुम्ही थोडा विचार करा असे जर सगळ्यांना सारखेच मिळाले असते तर आपण काहीच प्रयत्नही केले नसते. इतरांच्यासोबतही आपण तुलना करु नये. ज्याच्या त्याच्या कर्माचा आणि ज्याला आपण कधी कधी नशिब म्हणतो कदाचित नशिबाचाही भाग असू शकते. पण एक लक्षात असू द्यावे पहिल्यांदा आपण इतरांची बरोबरी करु नये आणि जर करायचीच असेल तर आपण आपल्या कामात आणि प्रयत्नात कसूर करायची नाही. इतर जर पुढे जात असतील तर आपण त्यांना प्रोत्साहन द्यावे आणि आपणही आपल्या प्रयत्नाने कसल्याही प्रकारचे मन खचून जाऊ न देता समोरच्या परिस्थितीला सामोरे जाऊन यशस्वी होण्याचा संकल्प करायचा. अशा कृतीमुळे आपलेही जीवन इतरांपेक्षा सुखी व समाधानी होऊ शकेल. इतरांबरोबर स्पर्धा करायची काही गरज नाही किंवा इतरांसोबत तुलनाही करायची गरज नाही. आपल्यालाही आपल्या कर्माने आणि आत्मविश्वासाने प्रयत्न केल्यामुळे आपणही आपल्या जीवनात खूप पुढे जाऊ शकतो हे निश्चित. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मनाची एकाग्रता* पांडुरंग *' मनाची एकाग्रता कशी करावी '* या विषयाचा अभ्यास करत बसला होता. त्याला जो कोणी भेटावयास येई, त्याच्याकडे तो दुर्लक्ष करायचा. आपल्याच चिंतनात मग्न असायचा. एकदा त्याचे गुरु सहदेव महाराज त्याच्याकडे आले. पाहतात तर पांडुरंग शून्यात नजर लावून बसलेला ! पांडुरंगाचे आपल्या गुरुकडे लक्षही नव्हते. सहदेव महाराज मात्र न रागावता तेथेच थांबले. त्यांनी एक वीट आणली आणि दिवसभर ती वीट एका दगडावर घासत बसले. शेवटी न राहवून पांडुरंगाने महाराजांना विचारले, '' महाराज आपण हे काय करता आहात ? '' सहदेव म्हणाले, '' मला या विटेचा आरसा बनवायचा आहे.'' पांडुरंग म्हणाला, '' महाराज, या विटेला घासून कधी आरसा होईल का ? जीवनभर घासत बसले तरीही विटेचा आरसा होणार नाही.'' ते ऐकून सहदेव हसले. म्हणाले, '' मग तू तरी काय करत आहेस ? वीट जर आरसा होत नसेल, तर मनाचे तरी काय ? मनावरील धूळ जोपर्यंत जात नाही, तोपर्यंत साधना करुन तरी काय उपयोग? मनाची एकाग्रता साधून जे कार्य केले जाते ते सर्वोत्तम असते. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 〰〰〰〰〰〰〰 🌺🍁जीवन विचार🍁🌺 〰〰〰〰〰〰〰 ज्ञान आणि कर्म हे जीवनाचे पंख आहेत.त्यामुळे सुखरुपी आकाशात मनुष्य सहजतेने उडू शकतो. जो आपणास ज्ञानाशी एकरुप करून टाकतो त्यास गुरू म्हणतात.गुरू म्हणजे सतत उचंबळणारा ज्ञानसागर होय. नम्रता आणि सेवा हे ज्ञानप्राप्तीचे खरे मार्ग आहेत. जो सर्व भूतकाळ दाखवितो वर्तमानकाळाची ओळख करून देतो, भविष्यकाळाची दिशा सांगतो, 🙏गुरू म्हणजे संपूर्ण ज्ञानाचं आगरच होय. आपल्या जीवनाचे भांडे जेवढं मोठं असेल त्या मानानं गुरूकडून ज्ञान घेता येईल. ज्ञान अनंत असतं हे ओळखूनच न्यूटन म्हणतो , ' माझ ज्ञान सिंधूत बिंदू आहे .' सॉक्रेटिस म्हणतो , ' मला काय समजत नाही एवढच मला समजतं.' 🙏 गुरू म्हणजे अनंत ज्ञानाची मूर्तीच , तळमळ , सत्याचा प्रयोगाची उत्कटता असते.ज्ञानाशिवाय बुद्धीचे समाधान होत नाही.ज्ञान हे मानवी जीवनाचे सार आहे व हेच खरे सुवर्णरत्न आहे.विनम्र होऊन येणाऱ्या ज्ञानोपासकास गुरू ज्ञान देतो.अशा सर्व गुरूजणांस शतशः वंदन शतशः नमन! 🙏🙏 ================== 🙏🏼शब्दांकन /संकलन🙏🏼 ✍ प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे) जि.प.प्रा.शा. गोजेगाव, ता.हदगाव, जिल्हा नांदेड. 〰〰〰〰〰〰〰

🔸📚 *शिक्षण परिषद व* *निरोप समारंभ सोहळा*🎁💐 केंद्र: भानेगाव ता.हदगाव जि.नांदेड *-:स्थळ: जि.प.प्रा.शाळा गोजेगाव:-* आज दि १६.०७.२०१९ रोजी भानेगाव केंद्राची शिक्षण परिषद जि.प.प्रा.शाळा गोजेगाव येथे संपन्न झाली. आजच्या या खास *गुरुपौर्णिमा* दिवशी दुहेरी संगमच या परिषदेत पार पडला. आजच्या या कार्यक्रमाचे *अध्यक्ष* : मा.लोणे सर कें.मु.अ. *प्रमुख पाहुणे :* मा.सोनटक्के साहेब कें.प्र.,मा.जामगडे साहेब,व गोजेगाव व वाकोडा शाळेचे शा.व्य.स.अध्यक्ष *निरोपमूर्ती*: श्रीमती कुलकर्णी मॅडम 🔸कार्यक्रमाची सुरुवात *श्रीमती सेनकुडे मॅडम* यांनी आपल्या उत्तम सूत्र संचलनाने केली. प्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले व शालेय मुलांनी छान असे स्वागत गीत सादर केले व त्यानंतर श्रीमती कुलकर्णी मॅडम यांना निरोप देण्यात आला त्या प्रसंगी गोजेगाव, रुई, करोडी शाळे तर्फे सत्कार करण्यात आले. 🔸त्या प्रसंगी शाळेचे *मुख्याध्यापक श्री कर्जतकर सर, श्री पतंगे सर यांनी मनोगत व्यक्त करत असतांना त्यांचा कंठ दाटून आला...व सेनकुडे मॅडम नी स्वयंलिखित 'निरोप' ही कविता सादर केली व त्याद्वारे त्यांनी आपले मनोगत सादर केले..* 🔸त्या नंतर सर्व शाळेतर्फे मॅडम चे सत्कार करून निरोप देण्यात आले व प्रमुख पाहुणे व अध्यक्षांनी आपले मनोगत व्यक्त केले. व निरोपमुर्ती कुलकर्णी मॅडमनी जुन्या आठवणीला उजाळा देत आपले मनोगत व्यक्त केलं.. त्या नंतर वेळापत्रकाप्रमाणे शिक्षण परिषद पार पाडण्यात आली.. 🖥 श्री कुंवर सरांनी अध्ययन निष्पती वर आधारित सर्व विषयांचे pdf कृतीपुस्तिका या बद्दल माहिती दिली व QR code स्कॅनिंग, व youtube links बद्दल सविस्तर माहिती दिली..📱 ✒ *शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती आडगावकर मॅडम यांनी प्रशासकीय सूचना दिल्या व विविध उपक्रम यांचा आढावा घेतला.*🗒 😋मध्यान्ह वेळेत छान असे सुरुची जेवणाचा आनंद सर्वांनी घेतला.. त्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक *श्री कर्जतकर सर व सर्व टीमचे विशेष आभार..🙏🏻* व नंतर दुपारच्या सत्रात विविध विषयावर अध्यापनात येणाऱ्या विविध कल्पना, समस्या, व उपाय यावर चर्चा घेण्यात आली.. अश्या प्रकारे आनंददायी वातावरणात शिक्षण परिषद संपन्न झाली.🙏🏻 ✒ *वृत्त संकलन* *श्रीमती सेनकुडे मॅडम*

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 16/07/2019 वार - मंगळवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जागतिक सर्प दिन* *गुरुपौर्णिमा* 💥 ठळक घडामोडी :- १९९८- गुजरातमध्ये शाळा प्रवेश करताना पाल्याच्या नावानंतर आईचे नाव लावण्याचा अधिकार असल्याचे शिक्षणमंत्री आनंदीबेन पटेल यांनी विधानसभेत माहिती दिली. १९९२-भारताचे ९वे राष्ट्रपती म्हणून डॉ शंकरदयाल शर्मा यांनी निवड ,झाली. १९६९-चंद्रावर पहिला मानव उतरवणाऱ्या'अपोलो-११'अंतराळायानाचे फ्लोरिडा येथून प्रक्षेपण. 💥 जन्म :- १९०९ - अरुणा असफ अली,स्वातंत्रसेनानी १९६८ - लॅरी सँगर, विकिपीडियाचा सह-संस्थापक. १९७१ - महमद मकसूद् इनामदार नान्देड १९७३ - शॉन पोलॉक, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू. १९८४ - कॅटरिना कैफ, हिंदी चित्रपट अभिनेत्री. 💥 मृत्यू :- १८८२ - मेरी टॉड लिंकन, अब्राहम लिंकनची पत्नी. १९१६ - इल्या मेक्निकोव, नोबेल पारितोषिक विजेता रशियन जीवशास्त्रज्ञ. १९९३-उस्ताद निसार हुसेन खां-पदमभूषण *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *रस्ते अपघात रोखण्यासाठी केंद्राचे कडक पाऊल, लोकसभेत मोटार वाहन दुरुस्ती विधेयक सादर, वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास अधिक कठोर शिक्षेची तरतूद* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *शिर्डीतल्या साईबाबा मंदिरात कालपासून तीन दिवसीय गुरूपौर्णिमा उत्सवाला सुरूवात, खंडग्रास चंद्रग्रहणामुळे आज रात्री मंदिर बंद* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *पावसाळ्याचा दीड महिना उलटून गेल्यानंतरही कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील चार जिल्हे व नाशिक वगळता राज्यातील तब्बल २४ जिल्ह्यांमध्ये पाऊस कमी झालेला आहे़* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी 'नीट' नको, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा नवा प्रस्ताव* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *तळकोकणाला पावसानं झोडपलं, रस्ते-बाजारपेठा बंद, 18 जुलैदरम्यान विदर्भ-मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता * ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *औरंगाबाद : लाचलुचपत प्रतिबंधक औरंगाबाद परीक्षेत्राच्या विभागाच्या अधीक्षकपदी अरविंद चावरिया यांची नियुक्ती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *विश्वचषकातील पराभवानंतर आता भारतीय संघामध्ये होऊ शकतात काही बदल, विश्वचषक उपांत्य फेरीत न्यूझीलंडकडून पराभूत झाल्यानंतर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी भारतीय संघात समाविष्ट होणार की नाही, ही गोष्ट येत्या शुक्रवारी साऱ्यांना समजू शकेल* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *लघुकथा - एक मत* https://storymirror.com/read/story/marathi/kpeg22xr/ek-mt/detail वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ कथालेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌊 *भरती केव्हा येते ?* 🌊 खरं तर प्रत्येक क्षणी जगात कुठे ना कुठे भरती येतच असते. आणि त्याच वेळेला दुसरीकडे कुठेतरी ओहोटीचा खेळ चालू असतो. त्यामुळे प्रश्न विचारायचाच झाला तर कोणत्याही एका विवक्षित ठिकाणी भरती केव्हा येते असा विचारायला हवा. म्हणजे मुंबईला किंवा रत्नागिरीला किंवा चेन्नईला भरती केव्हा येते असा. पण त्याआधी हे भरती ओहोटीचं चक्र का चालू असतं याचा विचार करायला हवा. जर आपल्याला चंद्र हा उपग्रह नसता तर भरती ओहोटी आली नसती. निदान आज जसा जाणवण्याइतका समुद्राच्या पातळीत जो चढउतार होतो तो झाला नसता. चंद्र पृथ्वीच्या मानानं आकारमानाने लहान आहे. पण तो सूर्यापेक्षा कितीतरी जवळ आहे. न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाच्या नियमाप्रमाणे कोणत्याही दोन वस्तूंमध्ये गुरुत्वाकर्षणाचं बल असतं. ते त्या वस्तूंच्या वस्तुमानाच्या गुणाकाराच्या समप्रमाणात आणि त्यांच्यामध्ये असणाऱ्या अंतराच्या वर्गाच्या विषम प्रमाणात असतं. म्हणजेच जेवढं वस्तुमान जास्त तेवढं हे बलही जास्त. आणि जवळ अंतर कमी तेवढंही आकर्षण जास्त. पृथ्वीचं आकर्षण चंद्राला जाणवतं. आणि म्हणून तो पृथ्वीभोवती एका ठराविक कक्षेत प्रदक्षिणा घालत राहतो. तसंच चंद्राच्या आकर्षणाचाही प्रभाव पृथ्वीवर पडतो. पण चंद्राचं वस्तुमान पृथ्वीपेक्षा कमी असल्यामुळे पृथ्वीची भूमी तेवढी चंद्राकडे खेचली जात नाही. पृथ्वीवरचं पाणी मात्र द्रवरूप असल्यामुळे चंद्राच्या दिशेने खेचले जाते. साहजिकच त्या बाजूला समुद्राची पातळी वाढते. त्याचवेळी त्याच्या विरुद्ध बाजूला म्हणजेच १८० अंशावरच्या ठिकाणचे पाणी चंद्रापासून दूर असते. त्यामुळे चंद्राच्या आकर्षणाचे बल कमी होते. तिथले पाणी चंद्राकडे तसं खेचलं जात नाही. पण जमीन थोडीशी का होईना खेचली जाते. त्यामुळे तिथल्या समुद्राचीही पातळी वाढते. या दोन्ही ठिकाणी समुद्राच्या पाण्याला आलेल्या फुगवट्यामुळे त्याच्या काटकोनात म्हणजेच त्यापासून ९० अंशांवर असणाऱ्या ठिकाणचे पाणी किनाऱ्याच्या दिशेने खेचले जाते. सहाजिकच तिथे समुद्राच्या पाण्याची पातळी घटते. ओहोटीचा अंमल सुरू होतो. अशा रीतीने कोणत्याही क्षणी जगाच्या पाठीवर दोन ठिकाणी भरती तर दोन ठिकाणी ओहोटी येत असते. पण पृथ्वी स्वतःभोवती गिरकी मारत असते. त्यामुळे तिच्या पृष्ठभागावरचे वेगवेगळे प्रदेश चंद्राकडे मोहरा फिरवुन राहत असतात. साहजिकच भरती, आणि अर्थातच ओहोटी, येण्याच्या ठिकाणात बदल होत जातो. पृथ्वीची स्वतःभोवतीची गिरकी चोवीस तासात पूर्ण होत असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी दिवसातून दोन वेळा भरती येते, तर दोन वेळा ओहोटी येते. *बाळ फोंडके यांच्या 'केव्हा ?' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• यशाचे शिखर गाठण्यासाठी काही वेळेला अपयशाच्या पायऱ्या चढाव्या लागतात. *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *1 ते 10 पर्यंतच्या अंकाची बेरीज किती ?* 55 2) *डोंगरी किल्ह्यांचा जिल्हा कोणता ?* रायगड 3) *माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोठे आहे ?* रायगड 4) *संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोठे आहे ?* बोरिवली , मुंबई 5) *जागतिक एड्स दिन केव्हा साजरा केला जातो ?* 1 डिसेंबर *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ●  जयवंत हंगरगे ●  मारोती गाडेकर ●  सुरेश भाग्यवंत *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *एक भिकारी आयुष्यभर भीक मागत राहिला. भीक मागून मागून जमा करत राहिला. हे नाही ते नाही करत करत आधिक मागत राहिला. देवाला त्याची दया यायची. त्याने कधी कोणाला आयुष्यात काही दिले नाही तर त्याला आनंद व समाधान कसे मिळणार? देवही चिंतेत पडला. देण्याचा आनंद काय असतो हे प्रत्यक्ष समजावून सांगण्यासाठी देवच एक दिवस भिका-याच्या दारावर भीक मागायला उभा राहिला. त्याने आरोळी ठोकली. 'देssरे बाssबाss भिका-याला काहीतरी.' भिका-याच्याच घरी भीक मागायला भिकारी? त्याने कानाडोळा केला, नंतर त्याला समजावण्याचा व धमकावण्याचाही प्रयत्न केला. पण दारावरचा भिकारी हटला नाही. देssरे बाssबा च्या आरोळ्या काही थांबत नव्हत्या.* *भिका-याचीही भीक मागायला निघायची वेळ झालेली. परंतु दारावरचा भिकारी हटायला तयार नव्हता. त्यापासून सुटका व्हावी म्हणून शेवटी भीक मागून जमा केलेल्या धान्याच्या ढिगातील एक दाणा उचलून तो भिका-याच्या कटो-यात टाकतो. एक दाणा का होईना भीक मिळाली म्हणून दारातील भिकारी निघून जातो. एक दाणा कमी झाला म्हणून भिकारी हळहळत ढिगा-याकडे बघतो. ढिगा-यावर काहीतरी चमकत आहे हे पाहून तो जवळ जातो. ती चमकणारी वस्तू सोन्याचा दाणा असतो. भीक दिलेला ढिगावरचा एक दाणा कमी न होता सोन्याचा झाला. संपूर्ण धान्याचा ढिगच भिका-याच्या कटो-यात टाकला असता तर..? आता भिका-याने संपूर्ण आयुष्यच देऊन टाकले आहे. पण माझ्यातल्या भिका-याचे काय? त्याला कळले आहे पण अजूनही 'वळले' मात्र नाही.* *॥ रामकृष्णहरी ॥* 🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀 *श्री संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल- 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••     कबीर  कलि  खोटी  भाई ,  मुनियर  मिली  न  कोय  |  लालच  लोभी  मस्कारा ,  टिंकू  आदर  होई  ||      अर्थ :           हल्लीच्या सामाजिक भानाचं वर्णन करताना  महात्मा कबीर   ढोंगाला भुलणार्‍या अर्थात वास्तव न पाहता वरवरच्या सोंगालाच सत्य मानणार्‍या समाजमनाचं निरीक्षण नोंदवतात.        भूगोल सांगतं पृथ्वीचं वय साडे चार अब्ज वर्षापेक्षा जास्त जास्त.  भारतीयांच्या मानण्याप्रमाणे गतकाळ ते सांप्रत असे चार युग . १ कृत युग, २ त्रेता युग , ३ द्वापार युग, व  ४ कली युग अशी काल विभागणी सांगितली जाते.  हल्ली म्हणजे कलीयुगी पूर्वीपेक्षा खोटारडेपणा खूपच वाढलाय. हे युग महाभारताच्या लढाईपासून ते सांप्रतपर्यंत चालूच आहे. या युगी खरे खुरे मुनी , ऋषी , संत भेटणे कठीण झाले आहे. स्वार्थासाठी त्यांची नाटकं करणारे अनेक जण भेटतील. लालचीपणा, मोह यांनी ग्रासलेल्यांना हेच ढोंगी , पाखंडी , खरंं अध्यात्म सोडून थट्टा मस्करी करणारे, द्रव्य लुटणारे, वासनांधच साधू, मुनी म्हणून मिरवत आहेत. अन भक्तजण त्यांनाच डोक्यावर घेवून मिरवतात अन फसगत झाली की वैफल्यग्रस्त होतात. तेव्हा खरा साधून ओळखून त्याच्या ठायी लिन व्हायला सांगितलेला संतांचा कानमंत्र विसरू नये. म्हणजे झालं.      एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• तुमची वाणी स्पष्ट, चारित्र्य पवित्र ,जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आणि जीवन व्यवहार चोख असतील तर तुम्ही इतरांच्या हृदयावर साम्राज्य सहजपणे करु शकाल. अन्यथा ह्या गोष्टी तुमच्या जीवनात नसतील तर तुम्हाला मनुष्य म्हणून जगण्याचा अधिकारही राहणार नाही.आपण मनुष्य म्हणून जन्माला आलो आणि मनुष्य म्हणूनच जगणार आहोत हा विचार समोर ठेवून जगण्यासाठी वरील महत्वाच्या चार गोष्टींना जीवनात प्राधान्य द्यायलाच हवे आणि त्या गोष्टी सहज करता येऊ शकतात. सुरुवातीला कठीण जाईल एकदा का सराव झाला की,मग आपोआपच व्हायला लागतात. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *नैतिकतेचा आदर्श* आयुर्वेदाचे प्रणेते महर्षी चरक औषधी वनस्पतींच्या शोधात आपल्या शिष्यासह रानावनांत, जंगलात च दर्‍या डोंगरावरुन हिंडत चालले होते. चालता चालता अचानक त्यांची दृष्टी समोर हिरव्यागार शेतात उगवलेल्या एका सुंदर फुलाकडे गेली. आजपर्यंत त्यांनी असे आगळेवेगळे अनुपमेय सुंदर फूल कधी पाहिलेच नव्हते. त्यांना फूल स्वतःजवळ हवेसे वाटू लागले. पण संस्कारामुळे मन तसे करण्यास धजावत नव्हते. मनात चलबिचल होत होती. त्यांची ही अवस्था शिष्याच्या लक्षात आली. शिष्य त्यामना विनम्रपणे म्हणाला, गुरुवर्य आपली आज्ञा झाली तर ते फूल मी आपल्या सेवेस अर्पण करु? महर्षी चरक म्हणाले, वत्सा ! त्या फुलाची मला निश्चितच गरज आहे. पण या शेताच्या मालकाच्या परवानगीशिवाय ते घेणे म्हणजे चोरी करणे ठरेल. महर्षीच्या या उच्च आदर्शवाद व नैतिकतेपुढे शिष्यांनी मान खाली घातली. ते पुढे म्हणाले, शिष्यांनो, नैतिक जीवन व राजाज्ञा यात कोणतेच साम्य नाही. जर त्याने आपल्या प्रजाजनांची संपत्ती स्वच्छंदपणे व मनमानी करुन स्वतःकरता वापरली तर नैतिकतेचा आदर्श तो काय राहणार ? यानंतर महर्षी आपल्या शिष्यांसह तेथून तीन मैल अंतरावरील त्या शेतकर्‍याच्या घरी पायी गेले व त्याची परवानगी घेऊनच त्यांनी ते फूल तोडले. *तात्पर्यः नैतिकतेचा आदर्श ठेवून जीवन जगले तर हे जीवन खूप सुंदर आहे.* *आज गुरुपौर्णिमा त्यानिमित्ताने समस्त गुरू मंडळींना सादर प्रणाम* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 15/07/2019 वार - सोमवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १९९७-पर्यावरणवादी कार्यकर्ते महेशचंद्र मेहता यांची रॅमन मॅगॅसेसे पुरस्कारासाठी निवड. १९५५-भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांना 'भारतरत्न'हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर. 💥 जन्म :- १९४९-माधव कोंडविलकर,दलित साहित्यिक. १९३२-नरहर कुरुंदकर,विद्वान,टीकाकार आणि लेखक. १९२७-प्रा.शिवाजीरावभोसले, विचारवंत,कुलगुरू (डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ) १९०३-के.कामराज, स्वातंत्रसैनिक,खासदार व तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री. १६११-मिर्झा राजे जयसिंग. 💥 मृत्यू :- २००४-डॉ बानू कोयाजी, सामाजिक कार्यकर्त्या. १९९९-इंदूताई टिळक,सामाजिक कार्यकर्त्या. १९९९-जगदीश गोडबोले,पर्यावरणवादी लेखकव सामाजिक कार्यकर्ते. १९७९ - गुस्तावो दियाझ ओर्दाझ, मेक्सिकोचा राष्ट्राध्यक्ष. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *नवी दिल्लीः इस्रोनं चांद्रयान-2 ही मोहीम तात्पुरती केली स्थगित, तांत्रिक कारणास्तव आता नियोजित वेळेत चांद्रयान 2चे उड्डाण करणार नाही. आंध्र प्रदेशातील श्रीहरी कोटा येथील धवन स्पेस सेंटरमधून चांद्रयान 2चे उड्डाण होणार होते. इस्रोनं पत्रकार परिषद घेऊन या संदर्भात दिली माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *पाऊस बेपत्ता झाल्याने वृक्षलागवडीला ‘ब्रेक’, 33 कोटी वृक्षलागवड कार्यक्रमावर संकट, रोपांना टँकरने पाणीपुरवठा* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *चांद्रयान-2 मोहिमेला हॉलिवूड चित्रपटापेक्षाही कमी खर्च, जगभरातून भारताचे कौतुक* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *जम्मू-काश्मीरला रात्री 9.56 वाजता 3.6 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *औरंगाबाद : विधानसभेला एमआयएम 100 जागा लढवण्यास इच्छुक, जागा वाटपाबाबत प्रकाश आंबेडकर लवकरच बैठक घेऊन निर्णय घेणार, सूत्रांची माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *भारताची सुपरस्टार धावपटून हिमा दासनं झेक प्रजासत्ताक येथे सुरु असलेल्या क्लांदो स्मृती अॅथलेटिक्स स्पर्धेत 200 मीटर शर्यतीत सुवर्णपदकाची केली कमाई* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *ICC World Cup - इंग्लंड ठरला 2019 चा विश्वविजेता. अंतीम सामन्यात न्यूझीलंडचा सुपर ओव्हर मध्ये पराभव करत इंग्लंड ठरला पहिल्यांदाच विश्वविजेता* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *लघुकथा - आईचे घर* https://storymirror.com/read/story/marathi/zv24dxqu/aaiice-ghr/detail वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ कथालेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *इसीजी म्हणजे काय ?* 📙 ईसीजी म्हणजे इलेक्ट्रोकार्डिओग्राम, याला आपण 'हृदयस्पंदनालेख' असेही म्हणू शकू. आजकाल एखाद्या व्यक्तीला अचानक चक्कर आली, डोळ्यासमोर अंधारी आली वा छातीत धडधडले, तर इसीजी काढून घेण्याचा सल्ला दिला जातो. चाळीशी ओलांडल्यानंतर दर दोन वर्षांनी इसीजी काढून घेणे श्रेयस्कर, असेही म्हणतात. इसीजी काढण्याच्या या वाढत्या प्रमाणामुळे, हृदयाबद्दलच्या जिज्ञासेमुळे, हृदयविकाराच्या भीतीमुळे आपल्याला इसीजी म्हणजे नेमके काय प्रकरण आहे, हे जाणून घेण्याची जिज्ञासा असेल. इसीजी म्हणजे काय हे आता पाहू. हृदयाच्या स्नायूंच्या आकुंचन प्रसारणात विद्युतलाटा व विद्युत प्रवाह तयार होतात. याची नोंद शरीराच्या विविध भागांवर (छाती, पाय इ.) संवेदनशील असे इलेक्ट्रोड ठेवून करता येते. कारण हे विद्युतप्रवाह हृदयापासून सर्व ठिकाणी पसरवले जातात. या विद्युतप्रवाहाच्या शक्तीनुसार एका यांत्रिक उपकरणांच्या सहाय्याने हृदयाच्या स्पंदनाचा आलेख काढता येतो. इसीजी हे डॉक्टरांसाठी वरदानच ठरले आहे. सर्वसामान्यपणे व्यक्तीच्या हृदयस्पंदनालेखात P,Q,R,S व T या विद्युतलाटा (Waves) असतात. त्यांचे निरोगी लोकांसाठीचे आकार (उंची, रुंदी इ.) तसेच एकमेकांतील (त्या लाटांचे) अंतर ठरलेले असते. हृदयाच्या वेगवेगळ्या विकारांवरून या आलेखात बदल घडून येतात व त्यावरून रोगाचे निदान करता येते. हृदयाचा आकार, हृदयाची गती, जास्तीचे ठोके वा न पडणारे ठोके, हृदयातील जवनिका, कर्णिका या कप्प्यांमधील सुसंवाद, हृदयाच्या स्नायूंचा रक्तपुरवठा इत्यादी अनेक गोष्टींची माहिती यामुळे मिळू शकते. हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी काही बदल इसीजीमध्ये सापडू शकतात. अशा व्यक्तींनी वेळीच आहार, विहार यावर नियंत्रण ठेवले; तर पुढील अनर्थ टाळता येऊ शकेल. यावरून इसीजीचे महत्त्व आपल्या लक्षात येईल. इसीजी काढण्यासाठी येणारा खर्च लक्षात घेता तो काढण्यापूर्वी खरेच तो काढण्याची गरज आहे काय, याचा साधकबाधक विचार तज्ज्ञांच्या सल्ल्याने करणे श्रेयस्कर ठरते. *डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित* यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून मनोविकास प्रकाशन *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्ञानी डोळ्याने जगतो, तर अज्ञानी कानाने जगतो. *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *गोवर रुबेला ही लस कोणत्या वयोगटातील बालकांना दिली जाते ?* 9 महिने ते 15 वर्ष 2) *महाराष्ट्रात सर्वाधिक साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत ?* अहमदनगर 3) *चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोठे आहे ?* अमरावती 4) *पाच अंकी सर्वात लहान संख्या कोणती ?* 10,000 5) *1 तास म्हणजे किती सेकंद ?* 3600 *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● श्रीकांत जोशी ● राजेश्वर डोमशेर ● गंगाधर बिजेवार ●  बालाजी हिवराळे ●  शुभम बतुलवार ●  शंकर हांड्रे ●  संतोष ईबीतवार ●  आनंद गाजेवार ●  विष्णू शिंदे ●  नवाज शेख ●  वसंत सिरसाट ● राजू कदम ● उत्तम पाटील चोळाखेकर ● विष्णुराज कदम ● विजयकुमार पाटील घुळेकर ● सचिन खंडगावे ● पांडुरंग चंदवाड ● प्रणित राखोंडे ● वसंत बोनगिरे ● सुनील बेंडे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सारा अंधारच प्यावा* *अशी लागावी तहान ॥* *एका साध्या सत्यासाठी* *देता यावे पंचप्राण ॥* *असं जगावेगळ पसायदान कवी म.म.देशपांडे यांनी 'तहान' या कवितेत मागितलं आहे. त्याचं तीव्रतेने स्मरण व्हावं अशी परिस्थिती आज आपल्या देशात आहे. कोणत्याही क्षेत्राकडे जा सारा अंधार आहे. अपवाद वगळले तर वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनातून सत्य हद्दपार झालेलं आहे. असत्याच्या अंधारात संवेदनशील मनाची घुसमट होत आहे. 'सत्यमेव जयते' ही या देशाची घोषमुद्रा आहे. तथापि समाजाचं, देशाचं नेतृत्व करणा-यांपासून तर रूग्णांची सेवा करण्याची शपथ घेतलेल्या डाॅक्टरांपर्यत सर्वांनी तिचे पदोपदी धिंडवडे काढले आहेत. सर्वच क्षेत्रात असत्यानं, अप्रमाणिक वृत्तीनं थैमान घातलं आहे. स्वातंत्र्योत्तर काळात भारतमातेची दु:स्थिती आधिकच चिंतनीय झाली आहे. 'सत्य हे जीवनमूल्य लोप पावत आहे. 'असत्य' उजळ माथ्यानं वावरत आहे.* *खरंतर सत्य, सत्याचा शोध, सत्याचा उद्धार आणि आचरण, सत्याचा पुरस्कार याला वैभवशाली परंपरा आहे. भीष्मनिती सांगते, 'सत्य हे प्रत्येक माणसाचं कर्तव्य आहे. माणसाचा सर्वश्रेष्ठ आधार आहे. शाश्वत कर्तव्य आहे. आसक्तीचं जाळ फक्त सत्यच तोडू शकतं. सत्य म्हणजेच अमरत्व. सत्यासाठी केलेला त्याग मानवी जीवनात सर्वश्रेष्ठ आनंदाचा उगम असतो. सदाचरणी माणूसच इतरांच्या हितासाठी दक्ष असतो आणि या मार्गानंच त्याचं स्वत:चही हित साधलं जातं. सत्यासारखं तप, पुण्य नाही. असत्यासारखं पाप नाही. ज्याच्या ह्रदयात सत्य असतं त्याच्या ह्रदयात परमशक्ती वास करते.* ••● ‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆 संजय नलावडे, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  🌟! !  *कबिराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• कबीर जीवन कुछ नहीं, खिन खारा खिन मीठ कलहि अलहजा मारिया, आज मसाना ठीठ। सारांश जीवन क्षणभंगूर आहे. क्षणापूर्वी ते होते अन क्षणानंतर ते असेल अशी कोणीही खात्री देवू शकत नाही. जीवनाची नश्वरता पटवून देताना महात्मा कबीर म्हणतात, जीवन म्हणजे काहीही नाही. या क्षणाला ते खारट अनुभव देत असेल तर दुसर्‍या क्षणी ते कडवटपणाला गोडीमध्ये बदलू शकते. जीवनाचा मधूर अनुभव देवु शकतं. जो वीरयोद्भा काल युद्धामध्वे आपलं नैपुण्य पणाला लावून बाजी प्राणपणाने लढून आपल्या बाजूने ओढून आणण्यामध्ये यशस्वी झाला म्हणून त्याचे सर्वत्र कौतुक सोहळे साजरे झाले. सर्वांनी जयमाला गळ्यात घालून त्याचा जय जयकार केला गेला. ज्याने काल मैदान मारले तो स्वतःच आज चितेवर स्मशानी निपचित अचेतन पडला आहे. मृत्यूने भल्याभल्यांना सोडलेले नाही. तिथे सामान्य जीवांचं काय खरं आहे. घारीने भक्ष्यावर झडप घालावी तशी काळ कोणत्याही क्षणी झडप घालू शकतो, म्हणून माणसानं आपल्या हाती जे काही आयुष्य शिल्तक राहिले आहे. त्याचा सदुपयोग करून घ्यायला हवा व जीवन सत्कारणी लावायला हवे , म्हणजे सत्कर्माच्या किर्तीने मृत्यू पश्चातही जीवनाचा परिमल दरवळत राहातो. मृत्यू साक्षात पुढ्यात उभा राहिला तरी त्याचे भय राहात नाही एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• काळजी केल्याने कोणतेच प्रश्न मिटत नसतात तर अनेक प्रश्न तुमच्यासमोर उभे टाकतात.त्या काळजीमध्ये तुमच्या आजच्या कामावर लक्ष नसल्यामुळे तुमचे काम निकृष्ट दर्जाचे होऊ शकेल.त्यामुळे तुम्ही अधिक काळजी करायला लागाल.त्यापेक्षा काळजी न करणे सर्वात मोठा शहाणपणा आहे.ज्याची तुम्हाला काळजी वाटते त्याकडे लक्ष न घालणे सगळ्यात चांगले.आजच्या कामात अधिक लक्ष घातले आणि मन लावून काम केले तर त्या कामात गढून जाल.चांगले काम झाल्याचे समाधान तर वाटेलच आणि काळजी पण दूर होईल.काळजी कोणतीही असो.आजची असो की उद्याची.तो काळ तुमच्या काळजीमुळे थांबणार का ? नाही ना.मग आपले मन प्रसन्न ठेवा.येणा-या आणि हाती असलेल्या कामात अधिक लक्ष घाला मग तुम्हाला तुमचे समाधान मिळेल.समाधान हे काळजीला उत्तम पर्याय आहे हे कधीही विसरु नका. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०. 💠🌹💠🌹💠🌹💠🌹💠 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *हे विश्वची माझे घर, प्रेमातील व्यापकता* ‘संत तुकाराम महाराजांनी देहू गावाबाहेरच्या एका ऊसाच्या मळ्याची काही दिवस राखण केली; म्हणून त्या मळ्याच्या मालकाने त्यांना पंचवीस-तीस उसांची एक मोळी दिली. दोरखंडाने बांधलेली ती मोळी खांद्यावर घेऊन संत तुकाराम महाराज घराकडे चालले असता वाटेत खेळणारी मुले त्यांना विचारू लागली, ‘‘तुकोबा, एवढे ऊस तुम्ही कोणासाठी घेतले हो ?’’ ते म्हणाले, ‘‘बाळांनो, अरे तुमच्यासाठीच. बंडू हा ऊस घे तुला, गुंडू हा तुला, धोंडू हा घे, तू पण.. हा, तू घे… हा, तू घे.’’ असे म्हणत तुकोबा ज्या वेळी त्यांच्या घरी पोहोचले, त्या वेळी त्यांच्या खांद्यावर एकच ऊस आणि त्याच्या भोवतीचे दोरखंडाचे भले मोठे वेटोळे एवढेच काय ते शिल्लक राहिले होते. तो प्रकार पाहून तुकाराम महाराजांची पत्नी आवळी भरपूर रागावली. आपल्याला मिळालेला सर्व ऊस लोकांच्या मुलांना देऊन आपल्या मुलांना काही आणले नाही; म्हणून ती तुकाराम महाराजांना नको नको, ते बोलली आणि रागाच्या झपाट्यात तिने तो उसाचा तुकडा खाली आपटला. त्यावेळी त्याचे तीन तुकडे होऊन एक तुकडा तिच्या हातात राहिला आणि दोन तुकडे जमिनीवर पडले. तेव्हा संत तुकाराम महाराज शांतपणे तिला म्हणाले, ‘‘आवळे, किती ग धोरणी तू ? आता तू सारखे वाटे केलेस. जो तुकडा तुझ्या हातात राहिला, तो तुझा आणि खाली जे पडले त्यांतील एक माझा अन् दुसरा मुलांचा !’’ ही त्यांची शांत वृत्ती पाहून बायकोला फार पश्चात्ताप झाला. तात्पर्य :- ‘हे विश्वची माझे घर’, असे वाटत असल्यामुळे संत तुकाराम महाराजांनी आपली आणि लोकांची मुले असा भेदभाव कधीच केला नाही *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 13/07/2019 वार - शनिवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- २०११-मुंबई शहरात झालेल्या ३ बॉम्बस्फोटात २६ ठार १३० जण जखमी १९८३ - श्रीलंकेत वांशिक हत्याकांड. ३,००० तमिळ व्यक्तींची हत्या. ४,००,०००हून अधिक तमिळ व्यक्तींचे युरोप व कॅनडा व भारतात पलायन. २००५ - पाकिस्तानच्या घोट्की रेल्वे स्थानकात तीन रेल्वे गाड्या एकमेकांवर आदळल्या. १५० ठार. २००६ - इस्रायेलने बैरुत विमानतळावर हल्ला चढवला. 💥 जन्म :- १९०४ - जे.आर.डी. टाटा, भारतीय उद्योगपती. १९६४ - उत्पल चटर्जी, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- २००९-निळू फुले,मराठी चित्रपट अभिनेता १६६० - बाजीप्रभू देशपांडे. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *मराठा आरक्षणाला तूर्त स्थगिती नाही; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा, दोन आठवड्यांनी सुनावणी : मात्र, पूर्वलक्षी प्रभावाने लागू करू नये; न्यायालयाचे मत* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *पुणे/मुंबई : मराठवाडा, विदर्भ, खान्देशात पुरेशा पावसाअभावी चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली असताना राज्यात १७ जुलैपर्यंत म्हणजे पाच दिवस पाऊस हुलकावणीच देईल, असा इशारा हवामान तज्ज्ञांनी दिला आहे.* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *अकरावी प्रवेशाची पहिली यादी नव्वदीपार, वाणिज्य, कलेकडे विद्यार्थ्यांचा ओढा : विज्ञानाकडे फिरवली पाठ, विज्ञान शाखेच्या कट आॅफमध्ये घसरण* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *नवी दिल्ली : सरकारी कर्मचाऱ्यांनी समाजमाध्यमे व इंटरनेटचा कसा वापर करावा यासंदर्भात केंद्र सरकारने पहिलेवहिले धोरण तयार केले त्यानुसार कार्यालयीन कामासाठी सरकारने कर्मचाऱ्यांना दिलेले मोबाईल, संगणक यांचा समाजमाध्यमांकरिता पूर्वपरवानगी असल्याशिवाय वापर करू नये असे केंद्रीय गृह मंत्रालयाने बजावले आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *नवव्या विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ मूर्तिशास्त्र अभ्यासक डॉ गो. बं देगलूरकर यांची निवड.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *लंडन : राफेल नदालला नमवत रॉजर फेडररची विंम्बल्डनच्या फायनलमध्ये धडक; नोवाक ज्योकोवीचसोबत होणार सामना* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *मुंबई : विराटच्या अनुपस्थितीत वन डे संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे, तर कसोटी संघाचे नेतृत्व अजिंक्य रहाणेकडे सोपविण्याची शक्यता.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *लघुकथा - काटकसर* https://storymirror.com/read/story/marathi/6ffavxie/kaattksr/detail वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ कथालेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 😵 *जांभई केव्हा येते ?* 😵 झोप आली की जांभई येते अशी सर्वसाधारण समजूत आहे. पण ती खरी नाही. कारण दिवसाढवळ्याही एखादं व्याख्यान ऐकत असताना किंवा चक्क एखादा सिनेमा पाहत असतानाही जांभई येते. त्यामुळेच जेव्हा थकवा येतो किंवा कंटाळा येतो तेव्हा जांभई येते असं म्हटलं तर ते अधिक संयुक्तिक होईल. जांभई येते तेव्हा आपला जबडा सताड उघडा पडतो. त्याच्याशी जोडलेले स्नायू ताणले जातात आणि हवा जोराने आत खेचली जाते. या सर्वांशी जांभई येण्याचा संबंध आहे. जांभई सर्वांनाच येते. लहान मुलांना येते, मोठ्या माणसांना येते, जनावरांना येते आणि पक्षांनाही येते. एवढंच काय पण अजून न जन्मलेल्या आईच्या पोटात वाढणाऱ्या मुलालाही जांभई येते. ती का येते हे जरी अजून कोडंच असलं तरी तिच्यासंबंधी पुष्कळ माहिती मिळालेली आहे. जांभई साधारणपणे ६ सेकंद टिकते. मनुष्यप्राण्यामध्ये बीजफलन होऊन नव्या जीवाची नांदी म्हटली गेल्यानंतर जेमतेम ११ आठवडे होतात न होतात तो जांभई येते. आपल्या मेंदूमधील हायपोथॅलॅमसमध्ये जांभईचं नियंत्रण केंद्र आहे. थकवा किंवा कंटाळा आल्यानंतर जांभई येते याचा शोध एका अनोख्या प्रयोगातून लागला. वैज्ञानिकांनी १७ ते १९ वर्षे वयाच्या मुलामुलींची दोन गटांमध्ये विभागणी केली. एका गटाला त्यांनी एमटीव्हीवर दाखवतात तसे गाण्यांचे व्हिडीओ दाखवले. तर दुसऱ्या गटाला निरनिराळ्या रंगांचे बारकोड्स दाखवले. एकूण तीस मिनिटं हा कार्यक्रम चालला होता. त्या दरम्यान त्या दोन्ही गटातल्या मुलांनी किती जांभया दिल्या याची मोजदात केली गेली. त्यावरून असं दिसून आलं की पहिल्या म्हणजे गाण्याचे व्हिडिओ पाहणाऱ्या गटातल्या मुलांनी सरासरी ३.४ जांभया दिल्या तर दुसऱ्या म्हणजे कंटाळवाणे बारकोड्स पाहणाऱ्या गटातल्या मुलांना त्याच वेळात ५.८ जांभया आल्या. असा कंटाळा आला की हायपोथॅलॅमसमध्ये मेंदूतल्या संदेशवाहक रसायनांचा तसंच काही संप्रेरकांचा पाझर सुरू होतो. त्याचा प्रभाव पडून जांभयांचं नियंत्रण करणारं केंद्र कार्यान्वित होतं. येणारी जांभई दाबुन टाकण्याचा प्रयत्न केला तर त्यातून समाधान मिळत नाही. उलट आणखी जांभया येतात. कारण जांभई येताना जबडय़ाचे स्नायू जोवर पूर्णपणे ताणले जात नाहीत तोवर जांभईच्या कारणाचं समाधान होत नाही. थकवा येतो तेव्हा आपला श्वासोच्छवास मंद गतीने होत असतो. त्यामुळे शरीरातल्या ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं. त्याची नोंद घेऊन हायपोथॅलॅमस कार्यान्वित होतो असाही दावा काही वैज्ञानिकांनी केला आहे. या उलट शरीरात कार्बनडाय ऑक्साइडचं प्रमाण वाढलं म्हणजेही जांभई येते असंही मत प्रदर्शित केलं गेलं आहे. पण यालाही वैज्ञानिक प्रमाण मिळालेले नाही. त्यामुळे थकवा किंवा कंटाळा आला की जांभई येते हे मान्य असलं तरी त्यामुळे नेमकं काय साधलं जातं हे अजूनही कोडंच आहे. *बाळ फोंडके यांच्या 'केव्हा ?' या पुस्तकातून *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• सुखाला सोबत असते पण दु:खाला एकटेपणाने जगावे लागते. *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?* सातारा 2) *महाराष्ट्रात सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे कोणती ?* महाराष्ट्र एक्सप्रेस 3) *महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते ?* आंबोली (सिंधुदुर्ग) 4) *भाताचे कोठार असे कोणत्या जिल्ह्याला म्हणतात ?* गोंदिया 5) *भारताचे प्रवेशद्वार कोणते ?* मुंबई *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ●  अनुराधा पहाडे राजूरकर ●  रवी यलमोड ●  शेख अहमद ●  सुनील जवंजाल *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼🚩 *विचार धन*‼ 🚩● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *तुळस, तुळशीची माळ, गोपीचंदन, टाळ, भगवी पताका आणि एकादशी या गोष्टींना वारक-यांमध्ये अतिशय महत्व आहे. भागवत संप्रदायात तुळशीला फार महत्व आहे. गळ्यात तुळशीची माळ घातल्यानंतर दारू आणि मासांहार सोडून निर्व्यसनी झालेली लाखो माणसं सापडतील. वैष्णवांचा जत्था टाळ मृदंगाच्या निनादात व हरीनामाच्या गजरात चालू लागला की तो पंढरपुरलाच चालला आहे हे ओळखण्याची खूण म्हणजे महिलांच्या डोईवरील लहानसे 'तुळशी वृंदावन.'* *वारक-याच्या गळ्यात तुळशी माळ व दारी तुळशी वृंदावन. 'तुळस' म्हणजे मुर्तिमंत सात्विकता, तिचे दर्शनही सुखावह असते. तुळशीची माळ ही समर्पित आणि प्रासादिक जीवनाचे प्रतीक आहे. पवित्र तुळशी वृंदावनाला डोक्यावर घेऊन पंढरीच्या वारीत महिला सहभागी होतात. सावळ्या पांडुरंग परब्रम्हाला तुळस अतिप्रिय आहे. गळ्यात तुळशीहार घालून तो उभा आहे.* *होईन भिकारी। पंढरीचा वारकरी ॥* *हाचि माझा नेमधर्म। अवघे विठोबाचे नांव॥* 💥 *॥ रामकृष्णहरी ॥* 💥 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 *श्री संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल- 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  🌟! !  *कबिराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• कोइ एक राखै सावधां, चेतनि पहरै जागि । बस्तर बासन सूं खिसै, चोर न सकई लागि ॥ भौतिकाच्या नादे काढी जागुनिया सारी रात जे देई परमानंद त्याची सांग काय बात अर्थ : जो सर्वकाळ दक्ष व तत्पर म्हणजेच जागा असतो. त्याच्या घरी चोरी होणे. कपडे भांडी कुंडी चोरीला जाणे असा प्रकार घडत नाही. माणूस भौतिक क्षणिक बाबींना जपण्याचा किती आटापिटा करत असतो. नाशीवंत वस्तुंच्या मोहासाठी माणसाची केवढी मोठी धडपड चाललेली असते. मानसाचं जीवन व शरीरही नश्वर व क्षणभंगूर आहे. कोणत्याही क्षणी ते नष्ट होऊ शकतं. म्हणून माणसानं तत्पर असावं. सत्कर्म व सन्मार्ग सोडू नये. विकारांपासून अलिप्त राहण्यासाठी वाईट संगती, वाईट विचार व वाईट प्रवृत्तीं सोडून दिल्या पाहिजेत व सदैव दक्षता बाळगली पाहिजे. सद्गुण व सत्संगतीचा मार्ग अाचरावा लागेल - एकनाथ डुमणे, मुखेड ९०९६७१४३१७ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जीवनातील कोणत्याही व्यवहारात दोन बाजू असतात आणि जेव्हा मनुष्य दोन्ही बाजूंचा विचार करतो तेव्हा त्याला ख-या व्यवहाराचे ज्ञान अवगत झाले आहे असे समजावे.जर एकाच बाजूने विचार करायला लागला तर कधी कधी कमी फायदा होतो तर जास्त नुकसान.नुकसान जेव्हा व्हायला लागते तेव्हा त्याला ख-या व्यवहाराचे ज्ञान अत्यल्प आहे असे समजावे.कुठेतरी त्याची बाजू कमी आहे.अशावेळी त्याच्या मनात नकाराची,नैराश्याची,परिस्थितीशी टक्कर देण्याची क्षमता अधिक वृद्धिंगत झाली आहे.त्यामुळेच वेळोवेळी अपयशाला सामोरे जाण्याची वेळ येत आहे.ह्या अशा नकारात्मक उर्जेचा त्याग करायचा असेल तर उलट विचार करायला हवे.जीवनात येणा-या कोणत्याही प्रसंगाला तोंड देण्याची तयारी ठेवायला हवी.मन स्थिर ठेवून कृती करण्याची तयारी,ठाम विश्वास, कामात एकाग्रता आणि सातत्य ह्यावर जर अधिक भर दिला तर कोणतेही जीवनव्यवहारातले प्रश्र्न सोडवायला तत्पर व्हाल.तुमच्या मनातला नकार हा तुमच्या जीवनातला सदैव अपयशाकडे घेऊन जाणारा आहे की,त्यातून काहीच साध्य होणार नाही.त्यापेक्षा सकारात्मक बाजूने जर नेहमी जीवनात विचार करून मार्गक्रमण केले तर जीवनातले कितिही बिकट प्रश्न असले तरी सहजपणे सोडवता येतील.तेव्हा जीवनात ह्या दोन्ही बाजूने विचार करुन योग्य अयोग्य, चांगले वाईट ह्याचे ज्ञान असणे केव्हाही चांगले. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद...९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *लोभी प्रवृत्ती* एक भिकारी दिवसभर पुष्कळ नामजप करायचा. देवाला त्याची दया आली. एक दिवस देव प्रगट झाला आणि त्याने भिका-याला ‘काय हवे ते माग’, असे सांगितले.  भिका-याने सोन्याच्या मोहरा मागितल्या. देव म्हणाला, ‘‘मोहरा कशात घेणार ?’’ भिका-याने झोळी पुढे केली. मोहरा ओतण्यापूर्वी देव म्हणाला, ‘‘तू ‘पुरे’म्हणेपर्यंत मी मोहरा ओतत राहीन; पण एक अट – मोहरा झोळीतून भूमीवर पडता कामा नयेत. भूमीवर पडलेल्या मोहरेची माती होईल.’’ भिका-याने अट मान्य केली. देव भिका-याच्या झोळीत मोहरा ओतू लागला. हळूहळू झोळी भरत आली. भिका-याला सोन्याचा मोह आवरेनासा झाला. मोह-यांच्या भाराने आता झोळी फाटू शकते, हे लक्षात येऊनही भिकारी ‘पुरे’ म्हणेना. शेवटी व्हायचे तेच झाले. झोळी फाटली आणि सर्व मोहरा मातीमोल झाल्या !समाधानी वृत्ती नसलेला भिकारी दुर्दैवी ठरला. हावरटपणामुळे नुकसानच होते.लोभी प्रवृत्ती अंगी बाळगणे चांगली नसते. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

*दवबिंदू* खुलली वसुंधरा चमकले पर्ण दवबिंदूचा सड्यांनी सृष्टी हिरवी सजली जशी हिरव्या हिरव्या गालीच्यांनी. 🌱☘🌱☘🌱☘ 〰〰〰〰〰〰 ✍ प्रमिला सेनकुडे नांदेड

🌳झाडांची लागवड करूया🌳 🌱 झाडांची लागवड करूया लावली झाडे वाढवूया 🌱 पर्यावरणाचे रक्षण करूया झाडेच झाडे लावूया 🌱झाडांची लागवड करूया लावली झाडे वाढवूया🌱 जिकडे तिकडे झाडेच झाडे जंगल सारे सजवूया 🌱झाडांची लागवड करूया लावली झाडे वाढवूया🌱 फुला फळांनी झाडे बहरूया हिरवी शेते पाहूया 🌱झाडांची लागवड करूया लावली झाडे वाढवूया🌱 पावसाचे पाणी अडवू या नाल्यांना बंधारे घालू या 🌱झाडांची लागवड करूया लावली झाडे वाढवूया🌱 निसर्ग सहल काढूया मज्जाच मज्जा करूया 🌱झाडांची लागवड करूया लावली झाडे वाढवूया🌱 🌳🌴🌲🌱☘🌴🌳 〰〰〰〰〰〰〰 ✍श्रीमती प्रमिला सेनकुडे. ता.हदगाव जिल्हा नांदेड. 〰〰〰〰〰〰〰

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 12/07/2019 वार - शुक्रवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जागतिक बाल कामगार निषेध दिन *आषाढी एकादशी निमित्ताने सर्वाना हार्दीक शुभेच्छा* 💥 ठळक घडामोडी :- १९८२-NABARD ची स्थापना १९९९- 'महाराष्ट्र भूषण 'हा महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च पुरस्कार सुनील गावस्कर यांना प्रदान २००१-कृषीशास्त्रज्ञ डॉ एम एस स्वामिनाथन यांना 'टिळक पुरस्कार'जाहीर २००५ - आल्बर्ट दुसरा मोनॅकोच्या राजेपदी. 💥 जन्म :- १८६४ - इतिहासाचार्य वि.का.राजवाडे, मराठी इतिहास संशोधक १८६४ - जॉर्ज वॉशिंगटन कार्व्हर, अमेरिकन शास्त्रज्ञ. (चित्रीत) १९२० - यशवंत विष्णू चंद्रचूड, भारताचे माजी सरन्यायाधीश. १९४७ - पूचिया कृष्णमुर्ती, भारतीय क्रिकेट खेळाडू. १९६५ - संजय मांजरेकर, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- २००० - इंदिरा संत , मराठी कवयित्री. २०१२-दारा सिंग ,मुष्टियोद्द्धा व अभिनेता २०१३-प्राण ,हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेता *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *चंद्रभागेच्या काठी जमला वैष्णवांचा मेळा; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न, विठ्ठलाच्या मूर्तीला चंदनाचा लेप लावून अभिषेक घालण्यात आला.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मुंबई : यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी मराठा आरक्षण लागू करण्यास विरोध करणारी याचिका उच्च न्यायालयाने काल फेटाळून लावली. या निर्णयामुळे एमबीबीएससाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मराठा विद्यार्थ्यांना मिळाला मोठा दिलासा* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *कर्करोगाला प्रतिकार करणाऱ्या औषधांचा अत्यावश्यक औषधांच्या यादीत समावेश, जागतिक आरोग्य संघटनेने केली यादी जाहीर, कर्करोगाचे उपचार सुरू असताना रुग्णांची प्रतिकारकशक्ती वाढविण्याच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेतल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *अहमदाबाद : माहिती अधिकार कार्यकर्ते अमित जेठवा यांच्या हत्येप्रकरणी भाजपचे माजी खासदार दिनू बोघा सोळंकी आणि सहा अन्य जणांना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने गुरुवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *20 जुलै ते सप्टेंबर अखेरपर्यंत राज्यात पुन्हा एकदा कृत्रिम पावसाचे प्रयोग* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *युवा राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग चॅम्पियनशीप स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी १६ वर्षीय जेरेमीने सुरेख कामगिरी करताना ६७ किलो वजन गटात स्नॅचमध्ये १३६ किलो वजन उचलताना युवा विश्व, आशियाई आणि राष्ट्रकुल स्पर्धेतील विक्रम मोडला.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *ICC World Cup 2019 : ऑस्ट्रेलियाची दाणादाण उडवत इंग्लंड अंतिम फेरीत; आता अंतिम फेरीत रविवारी इंग्लंड व न्यूझीलंड यांच्यात सामना* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *लघुकथा - फेसबुक मैत्री* https://storymirror.com/read/story/marathi/fn07z43i/phesbuk-maitrii/detail वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ कथालेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌺 *फुल केव्हा फुलतं ?* 🌺 ************************** फुलांनी केवळ कवींनाच वेड लावलंय असं नाही; आपल्या सर्वांच्याच चित्तवृत्ती फुलांना पाहून फुलतात. त्यांचे मनमोहक रंग, त्यांचे आकार, त्यांची रचना, त्यांचा डौल खरोखरंच मोहून टाकणारे असतात. म्हणूनच असावं कदाचित, पण आपल्या आयुष्याच्या प्रत्यक क्षणाची साथ फुलं करतात. जन्म झाला म्हणून जशी फुलांची उधळण होते तशीच शेवटच्या प्रवासाला निघतानाही फुलांच्या माळांनी निरोप दिला जातो. प्रेयसीला भेट म्हणून गुलाब देता देताच त्या प्रणयाचं आयुष्याच्या साथीत रुपांतर करतानाही फुलांच्या माळांची देवाणघेवाण करून त्यावर शिक्कामोर्तब करण्यात येतं. हे असे आनंदाचे दिवस वर्षात केव्हाही येऊ शकतात. तरीही प्रत्येक वेळी आपल्याला फुलं मिळत राहतात. म्हणजे ती सदासर्वकाळ फुलतात असं समजायचं का ? तसं नाही. कारण काही फुलं ठराविक हंगामातच मिळतात. काही दिवसाउजेडीच उमलतात तर रातराणीसारखी काही रात्रीच्या वेळीच आपल्या सुगंधाने आसमंत दरवळून टाकतात. ब्रह्मकमळ तर एकदाच आणि तेही मध्यरात्रीच फुलतं. मग हे फुलं नेमकी फुलतात तरी कधी ? हे समजून घ्यायचं असेल तर आधी ती फुलतातच का, हे ध्यानात घ्यायला हवं. ती फुलतात ते आपल्याला आनंद देण्यासाठी नाही, तर वनस्पतींच्या पुनरुत्पादनाच्या प्रक्रियेत फुलांचं उमलणं एक कळीची भूमिका बजावत असतं. फुलांमध्ये पुंकेसर आणि स्त्रीकेसर असे परागकण असतात. त्यांच्या मिलनातूनच बी तयार होतं आणि पुढच्या पिढीची नांदी म्हटली जाते. हे मिलन होण्यात कीटक आणि पक्षी मोलाची मदत करतात. त्या मदतगारांना त्यांचं काम करण्यासाठी प्रवृत्त करायचं तर काही आमिष दाखवायला हवं. त्यांना आधी आकर्षित करायला हवं. ते करण्यासाठीच फुलं फुलत असतात. त्यांची ती रंगीबेरंगी छबीही तेच काम करत असते. त्यामुळे ते जेव्हा आकर्षित होतील तेव्हा फुलण्यानेच कार्यभाग साधत असतो. तरीही निरनिराळ्या वनस्पतींची वर्गवारी करणाऱ्या कार्ल लिनैस यानं फुलांचीही त्यांच्या उमलण्यावरून तीन गटात विभागणी केली आहे. काही फुलं हवामानानुसार उमलतात काही कोमेजतात. त्यांना लिनैसनं 'मिटिअाॅरिची' असं म्हटलं आहे. काही दिवसाच्या लांबीनुसार आणि कार्यक्रम आखतात. म्हणजे हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात या वेळा बदलतात. त्यांना त्यानं 'ट्रॉपिची' हे नाव दिले आहे. उरलेली सगळी तिसऱ्या म्हणजेच इक्निनोक्टेल्स या गटात घातलेली आहेत. ती हवामानाची किंवा दिवसरात्रीच्या लांबीची पर्वा न करता दिवसाच्या ठरावीक वेळी फुलतात आणि ठरावीक वेळी कोमेजतात. ज्याँ बातिस्त लमार्क या फ्रेंच वैज्ञानिकाला असं दिसून आलं की फुलण्याच्या वेळी फुलांची उष्णता वाढलेली असते. आपल्या गंधाचा दूरदूरवर फैलाव करण्यासाठी ही वाढीव उष्णता कामी येते, असे त्यानं दाखवलं आहे. काही फुलं तर आसमंताच्या तापमानापेक्षा आपलं तापमान ३५-४० अंशांनीही वाढवू शकतात. तेव्हा फुलांचं तापमान वाढू लागलं की ती फुलतात असंही म्हणता येईल. *बाळ फोंडके यांचा 'केव्हा ?' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• प्रार्थना करणाऱ्या हातापेक्षा मदत करणारे हात जास्त पवित्र असतात. *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र कोणते ?* मुंबई (1972) 2) *महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ कोणते ?* मुंबई (1857) 3) *महाराष्ट्रात पहिली कापड गिरणी कोठे सुरू झाली ?* मुंबई 4) *महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती ?* मुंबई 5) *भारतातील सात बेटांचे शहर कोणते ?* मुंबई *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● दिलीप इंगळे ●  हरिहर धुतमल ●  हितेश माधवी ●  साई गाडगे ●  प्रवीण दबडे पाटील ●  शिल्पा जोशी ●  नागेश पडकूटलावार ●  अविनाश पांडे ●  नमन यादव ● सुनील देवकरे ● अमरजुल हुसैन ● दादाराव जाधव ● नंदकुमार कौठकर ● अभिजित राजपूत ● माधव उमरे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ●🚩🚩 ‼ *विचार धन*‼ ● 🚩🚩••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *टाळ वाजे....मृदंग वाजे..* *वाजे हरीची वीणा.....!* *माऊली निघाले पंढरपुरा..* *मुखाने विठ्ठल- विठ्ठल म्हणा.!* *हा सगळा भक्तीसागर, विठु नामाच्या गजरात तल्लीन होऊन, नाचत-गाजत एकजीव होऊन माऊलीं सोबत दिवसभर पायी चालत संत स्वरूप वारकरी, आपल्या विठुच्या दर्शनाला पंढरीकडे चालत असतात. क्षणभर वाटतं की अथांग सागर संथ झाला. ज्ञानोबा-तुकारामांचा जयघोष करीत हा आषाढी वारी पालखी सोहळा पुढे सरकत असतो.* *या वारीमध्ये असेही काही क्षण असतात जे मनाला सुखद प्रसन्नता देतात. विठ्ठल-विठ्ठल नामाचा अखंड गजर...भागवत धर्माचे प्रतीक असलेली आसमंतात फडकणारी पताका...चहूबाजूंनी उत्साहीत वैष्णवांचा भक्तीसागर... आणि वायुवेगाने धावणारा अश्व...अशा भक्तीमय वातावरणात लक्षावधी भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा एक क्षण म्हणजे...' रिंगण ' सोहळा..!* *दिंड्या गरूड टके पताकांचे भार ।* *होतो जयजयकार.... नामघोष ॥* 🚩 *॥ रामकृष्णहरी ॥*🚩 *विठ्ठल ॥ विठ्ठल ॥ विठ्ठल ॥* 🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂 *श्री संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल-9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  🌟! !  *कबिराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• पाहन पूजै हरि मिलै तो मै पूजूँ पहार । ताते तो चक्की भली पीसि खाय संसार । सारांश : दगड-धोंडे पूजणार्‍यांचा समाचार घेताना महात्मा कबीर म्हणतात की दगाड-धोंडे पूजल्यामुळे इच्छित साध्य झालं असं होईल, मनोकामना पूर्ण होतील किवा देवाची प्राप्ती होणार असेल तर मी अख्खा पर्वतच पूजायला तयार आहे. त्यापेक्षा दगडापासून बनलेल्या जात्याची काळजी घ्यायला मला आवडेल. कारण हे जातं धान्य भरडण्याच्या कामी येतं. त्यापासून पीठ मिळतं. त्यामुळे जगातील जीवांची भूक तरी भागते. श्रद्धेच्या नावाखाली लोक दगडा-धोंड्याला पूजत राहातात. काही जण रंग फासलेले किंवा हळदी-कुंकू लावलेले दगड दिसताच हात जोडतात. गाडीवरून जाताना मंदिर येताच गाडीचा भोंगा वाजवतात. जसा काही मंदिरातला देव झोपलाय अन आवाज देवून हे त्याला जागं करित आहेत. पहावं ते नवलंच ! एकाचं बघून दुसरा करणार अन ती प्रथाच होणार. आज संगणक युगात वावरताना आंतरजालात दडलेलं जगाचं ज्ञान संगणकावर एका क्लिक मध्ये आपल्यासमोर येतं. संगणक माहिती आदान प्रदानाचं यंत्र आहे. .हे माहित असून सुद्धा त्याला चालू करण्यापूर्वी त्याची पूजा अर्चा करणारे . त्यावर धर्माचे सांकेतिक ठसे उमटवणारे, अज्ञानाचं जोखड वाहणारे ढोंगी बुवा, मौलवी यांचं विज्ञानानंच बणवलेल्या माईकवरून 'ये विज्ञान फिज्ञान सब झुट है । म्हणनं अन विज्ञान शिकलेल्या श्रोतृ समुदायाकडून माना हलवून प्रतिसाद देणं किती ढोंगी व भंकस पणाचा कळस आहे बरं हा ! अशी मानसिकता पाहिली की दया यायला लागते. कोणता संस्कार व शिकवण देत आहेत बरं आपल्या वर्तन अन करणीतून भावी पिढ्यांसाठी ! खरंच का जगू शकत नाही माणूस ढोंगाशिवाय ! का झिडकारत नाही अज्ञानाची काजळी ? विज्ञान आणि मानवतावादाचा मेळ घालत विचारचनं विवेकाचे दीप प्रज्वलित करता आले तर जीवनात दररोजच दिवाळी साजरी होईल. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपण आपले सुखी जीवन जगण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतो आणि सुखी जीवन जगण्यासाठी पैसा कमवतो.तो पैसा एवढा कमवतो की,त्या पैशापायी आपण काय करत आहोत हा समजायला मार्ग सापडत नाही.ज्या गोष्टींसाठी आपण पैसा मिळवला आहे त्यासाठी तर जरुर वापरायला पाहिजे.आपल्या सुखासाठी तर आपण कमवतोच पण आपल्यासारखे सुख इतरांनाही मिळावे असे वाटत असेल तर आपल्या कर्तृत्वाचे हात अशांसाठी पुढे करा की, त्यातून तुमम्हालाही समाधान वाटले पाहिजे.जे अनाथ,अपंग,अंध,निराधार,वृध्द आहेत त्यांना तुमच्याकडून कशाची तरी अपेक्षा आहे अशांना आपण आपल्या केलेल्या कमाईतून काहीतरी मदत करुन जीवनाचे सार्थक करावे.याही व्यतिरिक्त समाजकार्य, देशकार्यासाठीही जे शक्य आहे ते आपल्या परीने करण्याचा प्रयत्न केला तर आपल्या आपण कमवलेल्या कमाईचे सार्थक होईल.केवळ आपण आपलाच स्वार्थ साधण्यासाठी पैसा कमावला तर त्यात आत्मिक समाधान लाभणार नाही.वेळ निघून गेल्यावर असे होऊ नये की,आपण एवढे कमावले आहे त्यातून आपण आपल्या स्वार्थासाठीच केले आहे पण इतरांसाठी काहीच केले नाही.अशा पश्चातापात पडण्यापेक्षा आपला हात अशांसाठी साठी पुढे करा की,खरी गरज त्यांना आहे.एक आपला हात पुढे केला तर अनेक तीर्थयात्रा करुनही पुण्य मिळणार नाही तेवढे पुण्य आणि समाधान मिळेल. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद.९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🌹🌱🌹🌱🌹🌱🌹🌱 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *गरुडाने घुबडाशी केलेली मैत्री* एक गरुड आणि एक घुबड, फार दिवस एकमेकांशी भांडत असत. शेवटी त्यांनी परस्परांशी मित्रत्वाने वागण्याची शपथ घेतली व एकमेकांच्या पिल्लांस खाऊ नये असे ठरविले. घुबड गरुडास म्हणाले, ‘गडया ! पण माझी पिल्ले कशी असतात, हे तुला ठाऊक आहे ना? ठाऊक नसेल, तर ती दुसऱ्या एखादया पक्ष्याची आहेत असे समजून तू त्यांना गट्ट करशील, अशी मला भीति वाटते,’ गरुड म्हणाला, ‘खरेच, तुझी पिल्ले कशी असतात, हे मला मुळीच ठाऊक नाही.’ घुबड म्हणाले, ‘ऐक तर. माझी पिल्ले फार सुंदर असतात. त्यांचे डोळे सुंदर, पिसे सुंदर, सगळेच काही सुंदर असते. या वर्णनावरून माझी पिल्ले कोणती हे तुला सहज समजेल.’ पुढे एके दिवशी, एका झाडाच्या ढोलीत, गरुडास घुबडाची पिल्ले सापडली. त्यांजकडे पाहून तो म्हणाला, ‘किती घाणेरडी, कंटाळवाणी आणि कुरूप पिल्ले ही ! आपली पिल्ले फार सुंदर असतात, म्हणून घुबडाने सांगितले आहे. तेव्हा, ही घुबडाची पिल्ले खास नव्हते. यास मारून खाण्यास काही हरकत नाही.’ असे म्हणून त्याने त्या पिलांचा फडशा उडविला ! आपली पिल्ले नाहीशी झालेली पाहून घुबड गरुडाला म्हणाले, ‘गडया ! माझी पिल्ले तूच मारून खाल्लीस, असे मला वाटते.’ गरुड म्हणाला, ‘मी खाल्ली खरी, पण तो माझा दोष नव्हे.  तू आपल्या पिल्लाचे जे खोटेचे वर्णन केलेस, त्यामुळे ती मला ओळखिता आली नाहीत. इतकी कुरूप पिल्ले घुबडाची नसतील, दुसऱ्या एखादया पक्ष्याची असतील, असे समजून मी ती मारून खाल्ली, यात माझा काय अपराध आहे बरे?’  तात्पर्य - स्वतःसंबंधाची खरी हकीकत लपवून ठेवून, भलतीच हकीकत सांगणारा मनुष्य शेवटी आपणास संकटात पाडून घेतो. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 11/07/2019 वार - गुरूवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जागतिक लोकसंख्या दिन* 💥 ठळक घडामोडी :- १९९४- दिल्लीच्या माजी पोलीस महानिरीक्षक किरण बेदी (तुरुंग) यांना ' रॅमन मॅगॅसेसे पुरस्कार' जाहीर. २००१-आगरताळा ते ढाका या शहरादरम्यान बससेवा सुरू झाली. २००३ - १८ महिने बंद असलेली लाहोर-दिल्ली बस सेवा पुनः सुरू. २००४ - सी.आय.ए.च्या निदेशक जॉर्ज टेनेटने राजीनामा दिला. २००६ - मुंबईत उपनगरी रेल्वे गाड्यांमध्ये स्फोट. १००हून अधिक ठार. 💥 जन्म :- १९२२-शंकरराव खरात, दलित साहित्यिक, डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू. १९१६ - गॉफ व्हिटलॅम, ऑस्ट्रेलियाचा २१वा पंतप्रधान. १९३० - जॅक अलाबास्टर, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू. १९५० - जिम हिग्स, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू. १९५३-सुरेश प्रभू, माजी केंद्रीय मंत्री 💥 मृत्यू :- १८०४ - अलेक्झांडर हॅमिल्टन, अमेरिकेचा अर्थमंत्री. १९५९ - चार्ली पार्कर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. १९८९ - सर लॉरेंस ऑलिव्हिये, ब्रिटीश अभिनेता. २००९-शांताराम नांदगावकर-गीतकार *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने पाच वर्षांपूर्वी सुरू केलेल्या प्रधानमंत्री जनधन योजनेंतर्गत उघडण्यात आलेल्या बँक खात्यांतील ठेवींचा आकडा आता १ लाख कोटी रुपयांपेक्षा झाला अधिक* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मध्यान्ह भोजनात विद्यार्थ्यांना आता स्थानिक पौष्टिक आहार, ज्वारी, बाजरी, नाचणीच्या पदार्थांचा समावेश : तांदूळ २५ टक्क्यांनी कमी* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *नवी दिल्ली : यंदाच्या १ जून रोजीच्या आकडेवारीनुसार, रेल्वेमधील २.९८ लाख पदे रिक्त असून, त्यातील २.९४ लाख पदांच्या भरतीची प्रक्रिया रेल्वेने सुरू केली आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *पुणे : सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची करावी, याबाबतच्या कायद्याचा मसुदा १५ जुलै रोजी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या संकेतस्थळावर खुला करण्यात येणार आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *नेपोली : राष्ट्रीय विक्रमाची मानकरी असलेली धावपटू द्युतीचंदने इटलीमध्ये सुवर्णपदक पटकवून ऐतिहासिक कामगिरी केली. नेपोली शहरात सुरू असलेल्या विश्व विद्यापीठ स्पर्धेच्या शंभर मीटर शर्यतीत २३ वर्षांच्या द्युतीचंदने ११.३२ सेकंद वेळेची नोंद करीत भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *लंडन : सर्बियाच्या अग्रमानांकित टेनिसपटू नोवाक जोकोविच याने बेल्जियमच्या डेव्हिड गॉफीन याला पराभूत करत बुधवारी विम्बल्डन ग्रँडस्लॅम स्पर्धेची उपांत्यफेरी गाठली. जोकोविच नवव्यांदा विम्बल्डनच्या उपांत्य फेरीत पोहचला आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारत विश्वकप स्पर्धेच्याबाहेर, काल झालेल्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडने भारताचा 18 धावांनी केला पराभव* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *लघुकथा - कानमंत्र* https://storymirror.com/read/story/marathi/ohy3fxfi/kaanmntr/detail वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ कथालेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌍 *पृथ्वीचा परीघ किती आहे ?* 🌍 या प्रश्नाचं उत्तर देण्याआधी आपल्याला आपली पृथ्वी एखाद्या चेंडूसारखी गोल, गरगरीत, वाटोळी आहे हे गृहित धरायला हवं. वास्तवात ती तशी नाही. दोन्ही ध्रुवांच्या इथे ती जराशी दबल्यासारखी आहे. उलट विषुववृत्ताच्या ठिकाणी ती जराशी फुगल्यासारखी आहे. स्वतःभोवती सतत ती गरगर फिरत असते, त्यामुळे तिच्या आकारात हा फरक झालेला आहे. तरीही तिचा परीघ किती आहे हे समजून घेण्यासाठी आपण ती गरगरीत आहे, असं समजल्यास फारसा फरक पडणार नाही. आता परीघ म्हणजे कोणत्याही एका ठिकाणाहून आपण पृथ्वीच्या पृष्ठभागाला धरून सरळ प्रवास करत निघालो तर परत त्याच ठिकाणी पोहोचेपर्यंत आपण किती मजल मारली असेल, याचं गणित आहे. तेव्हा अशा प्रवासासाठी असलेल्या साधनांवरूनच आपण या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू शकतो. पृथ्वीच्या काळी समुद्रावर प्रवास करणाऱ्या नावाड्यांना आपण कुठे आहोत, कुठे चाललो आहोत हे समजण्यासाठी फारशी साधने नव्हती. त्यामुळे आकाशातल्या ग्रहगोलांनाच विचारात त्यांची वाटचाल होत असे. उत्तर गोलार्धात ध्रुवतारा उत्तर दिशा दाखवत असे. त्याच्यानुसार मग इतर दिशा ओळखल्या जात. तसंच आपण किती मजल मारली आहे हे समजण्यासाठीही अशाच गणताची मदत घेतली जात असे. त्यातूनच नॉटिकल माईल म्हणजेच 'नौकायानातला मैल' मैल ही संकल्पना पुढे आली. याचंच संक्षिप्तीकरण होऊन 'नाॅट' हे एकक रूढ झालं आहे. त्यामुळे जहाजांचा वेग हा दर ताशी अमुक इतके नाॅट असा मोजला जातो. जमिनीवरून प्रवास करत असतानाही आपण मैल हे अंतर मोजण्याचे एक एकक पाळतो; पण नॉटिकल माईल आणि आपल्या नेहमीच्या ओळखीचा मैल यांच्यात फरक आहे, कारण त्या एककांची व्याख्याच वेगळी आहे. पृथ्वी गोलाकार असल्यामुळे त्या गोलाचे ३६० अंश संभवतात. या वर्तुळापैकी एक मिनिटाची आर्क म्हणजे एक नॉटिकल माईल अशी त्याची व्याख्या केली गेली आहे. म्हणजेच या वर्तुळाच्या एक अंशाच्या एक-साठांश इतक्या भागाचा प्रवास केल्यास एक नॉटिकल माईल अंतर कापलं जातं. तेव्हा संपूर्ण ३६० अंशांचा प्रवास करायचा झाल्यास ६० x ३६० म्हणजेच २१६०० नॉटिकल माईल इतकं अंतर होतं ; पण एक नॉटिकल मैल हा आपल्या जमिनीवरच्या मैलापेक्षा मोठा असल्यामुळे हेच अंतर २४८५७ मैल किंवा ४०००३ किलोमीटर इतकं भरतं. *डाॅ. बाळ फोंडके यांच्या 'किती ?' या पुस्तकातुन* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जगात दुसऱ्याला हसणे सोपे पण, दुसऱ्यासाठी रडणे फार कठीण. *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *भारताचे पहिले शिक्षणमंत्री कोण होते ?* मौलाना आझाद 2) *दोन अंकी सर्वात मोठी संख्या कोणती ?* 99 3) *'सत्याचे प्रयोग' या पुस्तकाचे लेखक कोण ?* महात्मा गांधी 4) *महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते ?* श्री प्रकाश 5) *महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र कोणते ?* मुंबई (1927) *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ●  शिवाजी सूर्यवंशी ●  अनुपमा अजय मुंजे ●  प्रभुनाथ देशमुख ●  प्रमोद मंगनाळे ●  संतोष चव्हाण ●  नरेश गोट्टम ●  साईकिरण अवधूतवार ●  प्रकाश नाईक *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *गाण्याचा रियाज करावा तसा दु:खाचा रियाज करता येईल का? गाण्याच्या रियाजाने गायकांस त्याचा आवाज टिकवून धरता येतो. आवाजाची धार शाबूत राहते. त्याचं गाणं दिवसेंदिवस खुलत जातं. दु:खाच्या रियाजाने असं काही होईल का? दु:ख जर आणखीनच टोकदार होणार असेल तर दु:खाचा रियाज करायला कुणी धजणार नाही. कुणाला हवं आहे दु:खं ! नकोच आहे दु:खं. त्याच्यापासून सुटका व्हावी म्हणून पृथ्वीभर जेवढे काही देव आहे, त्यांना साकडे घालून होते. खुद्द देवालाच दु:खाच्या संदर्भात जाब विचारणा-या माणसाची कथा आपण ऐकलीच आहे.* *माणूस देवाला म्हणतो की, 'देवा तू सुखात माझ्याबरोबर असतो. कारण तेंव्हा दोन माझी अन् दोन तुझी पावलं उमटलेली असतात. मात्र दु:खात तू माझ्यासोबत नसतोस, कारण तेंव्हा माझी एकट्याचीच पावलं उमटलेली असतात !' तेंव्हा देव त्यास म्हणतो,'अरे दु:खातही मी तुझ्याबरोबरच होतो! ज्या दोन पावलांची गोष्ट तू करतो आहेस, ती पावलं तुझी नसून माझीच आहे. मी तुला कडेवर उचलून घेतलं होतं.' तरी माणूस मान्य करणार नाही. हीच माणसाची मोठी समस्या आहे. माणूस दु:खाचा बाऊ फार करतो. दु:खाची सवय करून घ्यायची ..ही गोष्ट फार लांब राहिली. सुख पाहता जवापाडे । दु:ख पर्वताएवढे ॥ तुकाराम महाराजांनी सुखाचे आणि दु:खाचे माप आपल्यासमोर ठेवले आहे. सुख जवसाच्या 'बी' इतके लहान, तर दु:ख पर्वताएवढे विशाल आहे. जवसाच्या बी इतक्या छोट्या असलेल्या सुखाचे व्यवस्थापण आपण करीत असतो. मात्र, पर्वताएवढ्या दु:खाचे व्यवस्थापण आपण बिलकुलही करीत नाही. म्हणून ते कमी व्हायच्या ऐवजी वाढत जाते..इतके की जवसा एवढ्या सुखाचाही तेच चट्टामट्टा करून टाकते.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• ⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡ *श्री संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  🌟! !  *कबिराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• नागिन के तो दोये फन, नारी के फन बीस जाका डसा ना फिर जीये, मरि है बिसबा बीस। सारांश महात्मा कबीर व्यभिचारी व दुराचारी स्त्री-लंपटाना वरील दोह्यातून सचेत करतात. सापिनीला तर केवळ दोनच दात असतात. तिचा दंश झाला तर वैद्याकडून विष उतरवून टाकता येईल. परंतु स्त्रिला वीस दात असतात. तिचा दंश ज्याला झाला त्यातला कोणीही जीवित सुरक्षित राहू शकत नाही. तिचा दंश जर वीस लोकांना झाला तर वीसचे वीस मरून जातील. काम भावना सीमित असली पाहिजे. तिचं संतुलन राखता आलं पाहिजे. काम भावनेचं संतुलन बिघडलं की ती माणसाच्या आवाक्यात राहात नाही. ती त्याला मन मानेल तशी नाचवते. परिणाम स्वरूप माणूस अधःपतित होतो. लोक लज्जेचा , हेटाळणीचा विषय होतो. मग ती ईश्वरांची रूप मानलेली पात्र असोत की सामान्य जण साबुत राहात नाहीत. शंकर , इंद्र, चंद्र, रावणाचे चारित्र्य या माया मोहिणीने डागाळून टाकले. तिथं सामान्यांची काय बात घेऊन बसला आहात. यावर चांगदेवांच्या पुढील ओळी फारच बोलक्या आहेत. वासनेच्या मागे नको धावू मना पहा त्या रावणा काय झाले चंद्रा पडली भगे इंद्र झाला काळा नारद चुकला चाळा भजनाचा अगदी अलीकडे समाजानं ज्यांना डोक्यावर घेतलं होतं अशा संत म्हणवून घेणार्‍यांनी स्व-संतुलन हरवून वासनेच्या आहारी जावून आज ते गजाआड दुर्दशेचे भोग भोगत आहेत. भल्या भल्यांची मायेनं अशी वासलात लावून टाकलीय. मात्र ज्यांनी स्वतः वरील नियंत्रण ढळू दिलं नाही. अशी पात्रंही कमी नाहीत की जी अनुकरणास पात्र ठरलीत. शुक, भीष्म हे निश्चयाचे महामेरूच होते. जगद्गुरू तुकोबारायही माया मोहात गुरफटलेल्या जीवांना पाहून हताश होवून म्हणतात बुडती हे जण न देखवे डोळा । येतो कळवळा म्हणोनिया । तेव्हा माणसानं आपण अवहेलनेचे धनी होणार नाहीत . याची जाणीव ठेवून वागण्याचा प्रयत्न करावयास हवा. तुकोबांनी सांगितलेलं 'पराविया नारी माऊली समान...' हे सुत्र कायम जपलं जपायला हवं. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्याप्रमाणे विद्यार्थीजीवनात विद्यार्थी मन लावून जिद्दीने आणि अभ्यासात सातत्य ठेवून परीक्षेत यश मिळवतो.त्याचप्रमाणे माणसाने जीवनात कोणत्याही कठीण प्रसंगावर विजय मिळवायचा असेल तर आपल्या मनाची तयारी,त्यासाठी लागणारी मनातून जिद्द आणि यश मिळेपर्यंत सातत्य ठेवायला हवे.समजा पहिल्याच प्रयत्नात अयशस्वी झाले तर तिथेच माघार न घेता आपण त्यात कुठे कमी पडलो याचा शोध घेऊन त्यात सुधारणा करण्याची तयारी करावी आणि आपले मन खचू न देता तेवढ्याच जोमाने तोंड देण्यासाठी सज्ज रहावे मग तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. मग तुमच्यासमोर कितीही आणि कोणताही कठीण प्रसंग असला तरी तुम्ही माघार घेणार नाहीत. ©व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद...९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मनोरथ पूर्ण करण्याचा कल्पना* देशातील सर्वात मोठ्या वेड्यांच्या दवाखान्याला देशमुखांनी भेट दिली. तेव्हा एका खोलीकडे हात करुन डॉक्टर म्हणाले, '' साहेब, येथे या खोलीत विमान चालविण्याचे, ते वेगाने पळविण्याचे स्वप्न पाहणारे वेडे आहेत.'' देशमुखांनी उत्सुकतेने खिडकीतून आत पाहिले तर त्यांना तेथे कोणीही दिसेना. तसे त्यांनी डॉक्टरांना विचारले. तेव्हा डॉक्टर म्हणाले, '' साहेब, ते सर्व वेडे खोलीतच आहेत. कदाचित पलंगाखाली झोपून, आपण विमानाच्या खालीच झोपलो आहोत, अशी कल्पना करुन विमान दुरुस्त करत असतील.'' आपण सामान्य माणसेही असेच कल्पनांचे, मनोरथांचे विमान पळविण्याच्या आहारी गेलो आहोत. परंतु त्या खोलीत जसे वेडे दिसत नव्हते, तसाच स्वतःचा वेडेपणाही आपल्याला दिसत नाही. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

https://youtu.be/AUeIRzyWN-Y

वर्गः पहिली

https://youtu.be/xo-AOlwXzrI

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 10/07/2019 वार - बुधवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १८०० - कोलकाता येथे फोर्ट विल्यम कॉलेजची स्थापना. १९९२-आर्वी येथील 'विक्रम इनसट भू-केंद्र' राष्ट्राला अर्पण २००० - नायजेरियात फुटलेल्या तेलवाहिकेत स्फोट. त्यातून गळणारे पेट्रोल भरण्यासाठी जमलेल्यांपैकी २५० व्यक्ती ठार. 💥 जन्म :- १९१३ - पद्मा गोळे, आधुनिक मराठी कवियत्री. १९२३ - गुरूनाथ आबाजी कुलकर्णी, कथाकार. १९४९ - सुनील गावसकर, विक्रमवीर, माजी कर्णधार 💥 मृत्यू :- १९६९ - डॉ. पांडुरंग सखाराम पिसुर्लेकर, गोव्याचे इतिहास संशोधक. २००५ - जयवंत कुलकर्णी, मराठी पार्श्वगायक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ * राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन बंद करण्यावर पुनर्विचार करण्यासाठी शासनाची समिती गठीत. 10 दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *नोकरीत स्थानिक युवकांना 70 टक्के आरक्षण, देणार असल्याचं राज्याचे जनसंपर्क मंत्री पीसी शर्मा यांनी केलं स्पष्ट* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बीए द्वितीय वर्षाच्या इतिहासाच्या अभ्यासक्रमात देश उभारणीत संघाचे स्थान यावर विद्यार्थ्यांना चौथ्या सत्रात धडे शिकविण्यात येणार आहे. त्यावरून उफाळला वाद* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात तीन टक्के वाढ, महागाई भत्ता नऊ टक्यावरून बारा टक्यावर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *खूशखबर! राज्यभरात म्हाडाच्या १४,६२१ घरांची लॉटरी लवकरच, मुंबईकरांच्या पदरी मात्र निराशा; गिरणी कामगारांसाठी ५ हजार ९० घरे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *आता खातेधारकाच्या परवानगीशिवाय त्याच्या बँक खात्यात पैसे जमा करता येणार नाहीत!* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भुवनेश्वर-बुमराह यांनी किवींना रोखले, पण पावसाने सर्वांना लटकवले, उर्वरीत सामना आज खेळविणार : न्यूझीलंडच्या संथ वाटचालीत विलियम्सन व टेलर यांचे अर्धशतक* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *लघुकथा - सायकल* https://storymirror.com/read/story/marathi/3xqk1aq5/saaykl/detail वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ कथालेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *केस का गळतात ?* 📙 दररोज थोड्या प्रमाणात केस गळणे नैसर्गिक आहे ; परंतु काही वेळेस अचानक केस गळावयास लागतात. आजारपणानंतर स्त्रियांमध्ये प्रसूतीनंतर असे केस गळायला लागतात. पुरुषांमध्ये प्रौढावस्थेत केस विरळ होत जाऊन टक्कल पडण्याचे प्रमाण जास्त असते. केस गळण्याची अनेक कारणे आहेत. लहान मुलांमध्ये कुपोषणामुळे केस गळतात. केसांच्या व केस ज्या त्वचेत असतात तेथील त्वचेच्या पोषणासाठी प्रथिने, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्व अ, इ यांची आवश्यकता असते. लहान मुलात प्रथिनांच्या अभावामुळे प्रथम केसांचा रंग भुरकट होतो. कुपोषण होतच राहिल्यास असे केस थोडे ओढल्यास लगेच उपटले जातात. यात केसांची मुळे कमकुवत झाल्याने असे होते. मोठ्या आजारांमध्ये आहार नीट घेतला जात नाही, तसेच रोगांच्या प्रतिकारासाठी शरीरातील पोषक घटक वापरले जातात. यामुळे केसांचे पोषण होत नाही व आजारानंतर केस गळावयास लागतात. त्वचेचे आजार झाल्यास असे जसे खूप कोंडा होणे, चाई लागणे, उवा होणे यामुळेही केस गळतात. केस विंचरताना खूप ओढाताण झाल्यासही केस गळतात. यकृताच्या आजारांमध्ये गलगंड या आजारात केस गळतात. पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन या संप्रेरकामुळे व अनुवंशिकतेमुळे टक्कल पडण्याचे प्रमाण स्त्रियांपेक्षा अधिक असते. स्त्रियांमध्ये इस्ट्रोजन हे संप्रेरक अधिक असल्याने व या संप्रेरकांवर केसांची वाढ अवलंबून असल्याने टक्कल पडण्याचे प्रमाण कमी असते. जसे वय वाढते तसे चयापेक्षा अपचयाचे प्रमाण वाढत जाते. साहजिकच पेशींच्या निर्मितीपेक्षा नाशाची प्रक्रिया वाढते. केसांचे पोषणही कमी होते. ते लवकर गळतात व नवीन केस येण्याची प्रक्रिया मंदावते यामुळे प्रौढावस्थेनंतर केस विरळ होत जातात. *डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित* यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून मनोविकास प्रकाशन *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  🌹 *" फ्रेश मराठी - इंग्रजी सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *Haste makes waste* ( घाईने कामात चुका होतात. ) *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *'राष्ट्रीय एकता दिन' केव्हा साजरा केला जातो ?* 31 ऑक्टोबर 2) *जगातील सर्वात उंच पुतळा कोणत्या देशात आहे ?* भारत 3) *महात्मा गांधी यांना कोणत्या नावाने ओळखले जाते ?* बापूजी 4) *'गुरुदेव' ही उपाधी कोणास दिलेली आहे ?* रविंद्रनाथ टागोर 5) *'नेताजी' या नावाने कोणास ओळखले जाते ?* सुभाषचंद्र बोस *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ●  महेश पांडुरंग लबडे ●  मिलिंद चवरे ● नागनाथ वाढवणे ●  डी बी जगताप ● लक्ष्मण मुंडकर ●  प्रकाश एलमे ●  संतोषकुमार यशवंतकर ●  शिवाजी वासरे ●  चरणसिंग चौहाण ●  विठ्ठल रामलू चिंचलोड ● साईनाथ गायकवाड ● गणेश अंगरवार ● कृष्णा चिंचलोड ● बालाजी दुसेवार ● युवराज माने ● पिराजी चन्नावर ● प्रियंका घुमडे ● लक्ष्मीकांत पोलादे ● अभिजित वऱ्हाडे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *स्वत:वर खुश असणा-यांना लोक खूप घाबरतात. त्यांना या लोकांबद्दल खूप आसूया वाटते. सर्वसामान्य माणसे जगात सर्वाधिक नाराज जर कोणावर असतील, तर ती स्वत:वरच असतात. त्यांच्या हातुन चुका होतात. कधी कधी तर त्याच त्याच चुका परत परत होतात. नियतीचे फासे सततच असे पडत राहतात, की सारखेच हस्यास्पद व्हायची वेळ यावी. इतरांच्या हातात कायम राजे, एक्के आणि यांच्या हातात दुर्री-तिर्री, हे तर नेहमीचेच. यांनी चुका सुधारायच्या ठरविल्या तरी पटापट यांना त्या सुधारता येत नाही. त्याच त्याच बाॅलवर परत परत विकेट जात राहते.* *काय केले म्हणजे आपल्याला प्रतिष्ठा मिळेल ? लोक आपल्याला महत्वाचे आणि सन्माननीय समजतील? याचा विचार करण्यात यांचे तासन् तास जातात. तरीही त्यांना असाच निष्कर्ष काढावा लागतो, की अजून आपल्याला खूपच मेहनत करावी लागेल. आणि मग स्वत:ला दोष देत, स्वत:ला सुधारण्याचा पुन:पुन्हा प्रयत्न करत ते जगत राहतात. अशा खचलेल्या आणि जगाच्या गणितात हुकलेल्या लोकांनी सगळा परिसर भरलेला असताना जर एखादा नखशिखांत स्वत:वर खुश असेल तर जगाला त्रास होणारच.* *"परंतु जो स्वत:वर प्रेम करीत नाही, त्याच्यावर जग प्रेम करीत नाही."* संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• नागिन के तो दोये फन, नारी के फन बीस जाका डसा ना फिर जीये, मरि है बिसबा बीस। सारांश महात्मा कबीर व्यभिचारी व दुराचारी स्त्री-लंपटाना वरील दोह्यातून सचेत करतात. सापिनीला तर केवळ दोनच दात असतात. तिचा दंश झाला तर वैद्याकडून विष उतरवून टाकता येईल. परंतु स्त्रिला वीस दात असतात. तिचा दंश ज्याला झाला त्यातला कोणीही जीवित सुरक्षित राहू शकत नाही. तिचा दंश जर वीस लोकांना झाला तर वीसचे वीस मरून जातील. काम भावना सीमित असली पाहिजे. तिचं संतुलन राखता आलं पाहिजे. काम भावनेचं संतुलन बिघडलं की ती माणसाच्या आवाक्यात राहात नाही. ती त्याला मन मानेल तशी नाचवते. परिणाम स्वरूप माणूस अधःपतित होतो. लोक लज्जेचा , हेटाळणीचा विषय होतो. मग ती ईश्वरांची रूप मानलेली पात्र असोत की सामान्य जण साबुत राहात नाहीत. शंकर , इंद्र, चंद्र, रावणाचे चारित्र्य या माया मोहिणीने डागाळून टाकले. तिथं सामान्यांची काय बात घेऊन बसला आहात. यावर चांगदेवांच्या पुढील ओळी फारच बोलक्या आहेत. वासनेच्या मागे नको धावू मना पहा त्या रावणा काय झाले चंद्रा पडली भगे इंद्र झाला काळा नारद चुकला चाळा भजनाचा अगदी अलीकडे समाजानं ज्यांना डोक्यावर घेतलं होतं अशा संत म्हणवून घेणार्‍यांनी स्व-संतुलन हरवून वासनेच्या आहारी जावून आज ते गजाआड दुर्दशेचे भोग भोगत आहेत. भल्या भल्यांची मायेनं अशी वासलात लावून टाकलीय. मात्र ज्यांनी स्वतः वरील नियंत्रण ढळू दिलं नाही. अशी पात्रंही कमी नाहीत की जी अनुकरणास पात्र ठरलीत. शुक, भीष्म हे निश्चयाचे महामेरूच होते. जगद्गुरू तुकोबारायही माया मोहात गुरफटलेल्या जीवांना पाहून हताश होवून म्हणतात बुडती हे जण न देखवे डोळा । येतो कळवळा म्हणोनिया । तेव्हा माणसानं आपण अवहेलनेचे धनी होणार नाहीत . याची जाणीव ठेवून वागण्याचा प्रयत्न करावयास हवा. तुकोबांनी सांगितलेलं 'पराविया नारी माऊली समान...' हे सुत्र कायम जपलं जपायला हवं. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• प्रत्येकजण आपल्या जीवनाच्या चित्रशाळेत स्वत:चे एक सुंदर जीवनाचे चित्र काढून रंगवण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतो.जीवनाच्या चित्राचा आकार कसाही असला तरी त्यात रंग मात्र आपल्या कल्पक बुध्दीने भरण्याचा प्रयत्न करतो.त्यात असणारे रंग जरी वेगवेगळे असले तरी भरण्याचे कौशल्य ज्याला आहे तो आपल्या वेगळ्या पद्धतीने,कलेने भरुन जीवनाला आकर्षक बनवण्याचा प्रयत्न करतो.ज्याला ही कला अवगत झाली नाही त्याच्या जीवनचित्रात रंगही भरता येत नसल्यामुळे जीवनचित्र रंगहिन व आकारहिन बनते.म्हणून जीवनाच्या जीवनचित्रशाळेत यशस्वी व्हायचे असेल,जीवनाला रंगरुप आकार द्यायचा असेल तर आपल्यातील कल्पकतेला,कौशल्याला आणि नवनिर्माण शिलतेला जागृत ठेवून जीवन सुंदर आणि आनंददायी निर्माण करायला शिकले पाहिजे.त्यातून स्वत:ला आणि इतरांना जगण्यासाठी एक नाविण्यपूर्ण कला अवगत होईल आणि आनंदाने जीवन जगण्यासाठी प्रेरणा मिळेल यात शंकाच नाही. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🌱🎨🌱🎨🌱🎨🌱🎨🌱 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सवयीचा परिणाम* एका माणसाने त्‍याच्‍या घरी एक पोपट पाळला होता. पिंज-यात ठेवलेल्‍या पोपटाला चांगले खायलाप्‍यायला मिळत असे व पोपट बोलका असल्‍याने घरातील लोकांकडून त्‍याचे फार कौतुकही केले जाई. पण पोपटाच्‍या मनात मात्र पारतंत्र्याचे शल्‍य दाटून येई. अखेर एकेदिवशी पोपटाला संधी चालून आली. त्‍या माणसाने पोपटाला खाणे देण्‍यासाठी पिंज-याचे दार उघडले होते व त्‍याच्‍याहातून ते तसेच उघडे राहिले होते. माणसाला अचानक काही काम आल्‍याने तो ते दार उघडे टाकून निघून गेला असता पोपट पिंज-याच्‍या बाहेर निघून गेला. पण लहानपणापासूनच पिंज-यात राहिला असल्‍याने त्‍याला फारसे नीट उडताच येत नव्‍हते. एका झाडावर गेला असता त्‍याला इतर पोपटांशी बोलता येईना कारण लहानपणापासूनच तो परकी भाषा शिकत असल्‍याने त्‍याला पोपटांची भाषा येत नव्‍हती म्‍हणून इतर पोपटही त्‍याला सहकारी मानत नव्‍हते.  पिंज-यात आयते खायची सवय असल्‍याने त्‍याला अन्न मिळवणे अवघड जाऊ लागले व ऊन वारा पाऊस यांची कधीच सवय नसल्‍याने तो आजारी पडला व मरून गेला. तात्‍पर्य: जास्‍त काळ पारतंत्र्यात(गुलामगिरीत) राहिल्‍याने तशीच गुलामगिरीची सवय अंगात मुरुन राहते. मग परक्याची भाषा, संस्‍कृतीच आपली वाटू लागते आणि मिळालेले स्‍वातंत्र्य टिकवण्‍यासाठीची जिद्द अंगी राहत नाही. परक्‍या संस्‍कृतीचे चांगले काही घेताना आपल्‍या संस्‍कृतीचे विस्‍मरण होऊ न देणे हाच खरा शहाणपणा. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 09/07/2019 वार - मंगळवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १८७३ - मुंबई शेअर बाजार एका वडाच्या झाडाखाली सुरू झाला. १९५१ - भारताची पहिली पंचवार्षिक योजना प्रसिद्ध करण्यात आली १९६९ - वाघाला भारताचा राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करण्यात आले. 💥 जन्म :- १९२५ - गुरू दत्त, हिंदी चित्रपट अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक. १९३८ - संजीव कुमार, हिंदी चित्रपट अभिनेता. 💥 मृत्यू :- २००५-डॉ रफिक झकारिया, महाराष्ट्राचे माजी नगरविकास मंत्री आणि लोकसभा सदस्य *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *नवी मुंबई : मुसळधार पावसामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक घटली. फक्त 253 वाहनांची आवक. शनिवारच्या तुलनेत 50 % आवक घटली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मुंबई - येत्या 24 तासांत मुंबईमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटवर ५,४00 कोटींचा खर्च* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *मुंबई - आज रिक्षाचालकांच्या होणाऱ्या संपाच्या पार्श्वभूमीवर बेस्ट चालवणार अतिरिक्त बस, बेस्ट प्रशासनाची माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *कन्येच्या विवाहावरील अनावश्यक खर्च टाळत राज्याचे माजी मुख्य सचिव तथा लोकपाल सदस्य दिनेश कुमार जैन यांनी मुख्यमंत्री मदत निधीला दिली पाच लाखांची रक्कम* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *मुंबई : विलेपार्लेच्या सिया देवरुखकर हिने नुकत्याच राजकोट येथे झालेल्या ज्युनिअर राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई केली. राष्ट्रीय स्तरावरील सियाचे हे पहिले पदक ठरले* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *आय सी सी विश्वकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज होणाऱ्या सामन्यावर पावसाचे सावट आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *लघुकथा - रेल्वेतील शाळा* https://storymirror.com/read/story/marathi/n96hoqhe/relvetiil-shaalaa/detail वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ कथालेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *माणूस जास्तीत जास्त किती जगू शकतो ?* 📙 'जीवेत शरद: शतम्' असा आशीर्वाद किंवा शुभेच्छा कोणालाही दिल्या जातात. माणसाचं आयुष्य शंभर वर्षांचं आहे अशी जी एक सर्वसाधारण समजूत आहे त्याचीच ही परिणती आहे; पण माणूस जास्तीत जास्त शंभर वर्षे जगू शकतो या समजुतीला कोणता आधार आहे ? कारण आजही शंभरी गाठलेल्या व्यक्तींची संख्या पूर्वीपेक्षा जास्त असली तरी एकूण लोकसंख्येच्या मानाने नगण्यच आहे. म्हणून तर शंभरी ओलांडलेल्या आलेल्या व्यक्तीकडे नवलाईने पाहिलं जातं. तेव्हा खरा प्रश्न हा आहे की माणसाचं सरासरी आयुर्मान किती आहे ? त्याला काही नैसर्गिक मर्यादा आहेत की नाही ? इतिहास पाहिला तर याचं उत्तर दे़ सोपं होत नाही. कारण माणसाचं सरासरी आयुर्मान वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळ्या भौगोलिक स्थानी वेगवेगळं राहिलं आहे. अश्मयुगात ते जेमतेम २५ ते ३० वर्षांचं होतं. ब्राँझयुगात तर ते अठरापर्यंत घसरलं होतं. पण त्याच युगात स्वीडनसारख्या ठिकाणी ते त्याहून दुप्पट ते तिप्पट होतं. सिकंदर वयाच्या बत्तिसाव्या वर्षी निधन पावल्याचं इतिहास सांगतो; आणि आपण त्याला अल्पवयातच मृत्यू आल्याचं निदान करतो. पण ग्रीक संस्कृतीत काय किंवा रोमन संस्कृतीत काय सरासरी आयुर्मानच तिशीपेक्षा जास्त नव्हतं. विसाव्या शतकाच्या सुरुवातीलाही पंचवीस ते तीस हीच सीमा त्यानं गाठली होती. आज जगातलं सरासरी आयुर्मान ७० वर्षांचं आहे. आपल्या देशातही परिस्थिती वेगळी नाही. स्वातंत्र्य मिळालं तेव्हा म्हणजेच उण्यापुऱ्या साठ वर्षांपूर्वी देशातलं सरासरी आयुर्मान ३५ वर्षांचं होतं. आज ते ६७ झालं आहे. याचं कारणही स्पष्ट आहे. मृत्यूदरात झालेली लक्षणीय घट. ती तशी झाली कारण सार्वजनिक आरोग्यसुविधांमध्ये फार मोठा फरक पडला आहे. ज्या सांसर्गिक रोगाला माणूस बळी पडत असे त्यापैकी बहुतेक रोगांना आळा घालण्यात आपण यशस्वी झालो आहोत. त्या रोगांचा उपसर्ग होण्यास अटकाव करणाऱ्या प्रभावी लसी उपलब्ध झाल्या आहेत, तसंच लागण झाल्यानंतरही त्यावर मात करणारी शक्तिशाली औषधंही सहजगत्या मिळत आहेत. आहारात आणि त्यामुळे उपोषणातही वेगाने प्रगती झाली आहे. वाढत्या वयात मिळणाऱ्या सकस आणि पर्याप्त अन्नापायी माणूस सुदृढ बनत चालला आहे. उतारवयातही त्याचं स्वास्थ्य टिकून रहत आहे. ही जी वाढ झालेली आहे ती नैसर्गिक मर्यादा गाठण्यात ज्या काही अडचणी येत होत्या त्यांचं निराकरण झाल्यामुळे आलेली आहे. माणसाच्या जनुकीय साठय़ामध्येच त्याच्या एकंदर आयुर्मर्यादेचं इंगित दडलेलं आहे. २००९ सालचं नोबेल पारितोषिक मिळवणाऱ्या वैज्ञानिकांनी केलेले संशोधन या विषयाशीच निगडित आहे. त्यानुसार आपल्या यच्चयावत शारीरिक, शरीरक्रियाविषयक तसंच वर्तणुकीबाबतचेही गुणधर्म निर्धारित करणारी जनुकं च्या गुणसूत्रांमध्ये लपलेली असतात, त्या गुणसूत्रांच्या एका टोकाला असलेल्या टोपीमध्ये, टेलोमिअरमध्ये, आयुर्मर्यादा निश्चित करणाऱ्या जनुकांचा साठा असतो. ती जनुकं कार्यान्वित करणारं एक विकरही, टेलोमरेझ शोधुन काढलं गेलेलं आहे. तेच आयुर्मर्यादेची निश्चिती करत असतं. त्याचं कार्य नेमकं कसं चालतं याचं गुढ उकललं की मग माणूस जास्तीत जास्त किती जगू शकतो ? या प्रश्नाचं नेटकं उत्तर देणं शक्य होईल. *बाळ फोंडके यांच्या 'किती ?' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• वेळ आल्यावर आपल्या गरजा बदला पण आपल्या गरजेसाठी आपली माणसं बदलू नका. *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *'गरबा' कोणत्या राज्याचा नृत्यप्रकार आहे ?* गुजरात 2) *'पोंगल' उत्सव कोणत्या राज्यात साजरा करतात ?* तामिळनाडू 3) *महाराष्ट्रात कुंभमेळ्याचे आयोजन कोठे केले जाते ?* नाशिक 4) *भारताचे पितामह असे कोणाला म्हटले जाते ?* दादाभाई नौरोजी 5) *भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते ?* सरदार पटेल *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ●  श्रीकृष्ण राचमाळे ●  पंडीत पवळे ●  बालाजी अनमूलवाड बेळकोणीकर ●  घनश्याम सोनवणे ●  महेश जाधव ●  साईनाथ विश्वब्रम्ह *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *एकदा पंक्चर काढणा-याकडे उभा असताना एका टायरमधली हवा फस्सकन गेली. वाटले 'मृत्यू' असाच होत असणार. मृत्यूविषयी एक ऑब्सेशन अनेकांच्या मनात खोल असते. एका मित्राला सतत एक विचित्र समस्या छळत असते. त्याच्या अंत्यदर्शनाला येणारे लोक गाड्या कुठे लावतील ? त्या दिवशी पाऊस असेल का ? आता याची काळजी मागे राहिलेले घेतील की ! अशी सत्वहीन माणसं जगण्याला काही देत नाहीत आणि घेतही नाहीत.* *दु:ख घेता येत नाही तर देऊ नये. 'सुख द्यावे आणि घ्यावे' हे सूत्र जगण्याचा 'तोल आणि ताल' संभाळते. कविराज विंदा करंदीकर यांनी कुणाकडून काय घ्यावे याची यादी दिलीय, पण.... असे घेता येते का ? काही जिंदादिल माणसे सतत देत राहतात, घेणे त्यांच्या गावी नसते. जिंदगी घोटा-घोटाने पिण्याचा 'अमृतरस' आहे. या रसाचे भोक्ते किती राहिलयं ते चुकूनही पहात नसले तरी त्यामुळे त्यांचे 'अक्षयपात्र' भरलेले राहते. तसे तुमचेही राहो, हिच आज 'अक्षयतृतीया'ची सर्वांना शुभेच्छा !* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• ☀☀☀☀☀☀☀☀☀ *श्री संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल- 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  🌟! !  *कबिराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जहाँ न जाको गुन लहै, तहाँ न ताको ठाँव । धोबी बसके क्या करे, दीगम्बर के गाँव ॥ अर्थ : जिथे आपल्याला पात्रता व योग्यतेनुसार गुण व कौशल्य दाखवण्यासाठी कार्य कर्तृत्त्व करण्यास वावच नसेल तिथे राहून काय हशील होणार आहे ? तिथे राहाणे व्यर्थच आहे. ही बाब पटवून देताना महात्मा कबीर म्हणतात की, ज्या गावात सर्व दिगंबरच (कपडे विरहित लोक) राहातात तिथे राहून धोब्याला काय उपयोग होणार आहे ? कला ही जीवनाची सावली मानली जाते. 'कलेनेच माणसाची ओळख । एरव्ही कोण पुसतो आणिक ? तुम्ही आहात राव की रंक । आता कोणी पुसेना ।' असे राष्ट्रसंत तुकडोजी ग्रामगीतेत म्हणतात. कलावंतानं आपली कला जीवनाचा आधार केली व कलेचा अहंकार अंगी न बाळगता तिला विनयशीलतेची जोड दिली की सर्व जग आपलंस होवून जातं. आपलं कसब व कौशल्य अशा ठिकाणी दाखवायला हवं की ते आपल्या जीवनाला स्वावलंबनाकडे नेईल. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जेव्हा आपली वेळ वाईट असते तेव्हा आपल्याकडे लोक पाठ फिरवतात आणि जेव्हा आपली वेळ चांगली असते तेव्हा सगळेच जवळ येतात. परिस्थिती कशीही असली तरी प्रत्येकवेळी सुखदुःखात जे आपल्या पाठीशी असतात आणि आपण प्रत्येकवेळी कोणत्याही गोष्टीचा विचार न करता पाठीशी असतो तीच खरी माणुसकी असते आणि तीच खरी अंत:करणातून एकमेकांबद्दलची खरी आत्मियता असते. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *प्राप्त ज्ञानास आत्मसात करणे* राजा जनक राजा असूनही त्‍यांना राज वैभवात आसक्ती नव्‍हती. लोभ मोहापासून ते सदैव दूर राहत. विनम्रता त्‍यांच्‍या स्‍वभावात होती. त्‍यामुळे ते आपले दोष दूर करण्‍याचा प्रयत्‍न करत असत. आत्‍मशोध घेण्‍याचा त्‍यांचा सदैव प्रयत्‍न सुरुच असे.  एकदा ते नदीकाठावर एकांतात बसून ‘सोऽहम’ चा जप करत होते. मोठ्या आवाजात त्‍यांचा जप सुरु होता.  तेवढ्यात तेथून अष्‍टावक्र ऋषि चालले होते. ते परमज्ञानी असल्‍याने त्‍यांना राजा जनकाचा जप ऐकून ते जागेवरच थांबले व एका हातात छडी घेऊन थोडे दूर अंतरावर उभे राहिले. मग मोठ्या आवाजात तेही बोलू लागले,’’माझ्या हातात कमंडलू आहे आणि माझ्या हातात छडी आहे’’ राजा जनकाच्‍या कानात ऋषींच्‍या बोलण्‍याचा आवाज गेला पण त्‍याने आपला जप सुरुच ठेवला.  अष्‍टावक्रही ही गोष्‍ट जोरजोरात बोलत राहिले. शेवटी जनकाने जप थांबवून विचारले,’’मुनिवर, हे तुम्‍ही मोठमोठ्याने काय सांगत आहात’’ अष्‍टावक्र जनकाकडे पाहून हसले आणि म्‍हणाले,’’माझ्या हातात पाण्‍याचा कमंडलू आहे, माझ्या हातात छडी आहे’’  राजा जनक आश्‍चर्यात पडला व विचारू लागला,’’ महाराज अहो हे तर मलाही दिसत आहे की तुमच्‍याजवळ छडी आणि कमंडलू आहे पण हे दिसत असतानासुद्धा तुम्‍ही मोठ्याने ओरडून का सांगत आहात.’’  तेव्‍हा अष्‍टावक्रांनी जनक राजांना समजाविले,’’ राजन, माझ्याजवळ असणारा कमंडलू आणि छडी दिसत असतानासुद्धा ओरडून सांगणे हे जसे मूर्खपणाचे आहे तसेच तुमचे सोऽहम उंच आवाजात म्‍हणणे आहे.  मंत्राला घोकण्‍याने काहीच फळ मिळत नाही. मंत्र आत्‍मसात करणे किंवा त्‍याला आतल्‍या चेतनेशी जोडल्‍यावरच त्‍याचे फळ मिळते.’’  तात्‍पर्य: कोणतेही ज्ञान घोकंपट्टी करून मिळवण्‍यापेक्षा ते आत्‍मसात करण्‍याचा प्रयत्‍न झाला पाहिजे. कोरडे पाठांतर काहीच कामाचे नसते. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 08/07/2019 वार - सोमवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- २०११-रुपयाचे नवीन चिन्ह (Rs.)असलेली नाणी प्रथमच चलनात आली. २००६-मुख्य निवडणूक आयुक्त असतांना केलेल्या कामगिरीबद्दल टी. एन.शेषन यांना" रॅमन मॅगॅसेसे पुरस्कार" जाहीर. १९९७-बीजिंग आशियाई महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेत ४६किलो वजनी गटात कुंजुरांनी देवीने रौप्य पदक पटकावले १४९७ - वास्को दा गामाने भारताकडे समुद्रमार्गे प्रयाण केले. 💥 जन्म :- १९०८ - वी. के. आर. वी. राव, भारतीय अर्थशास्त्रज्ञ. १९१६ - गोपाळ नीळकंठ दांडेकर, मराठी कादंबरीकार, चरित्रकार. १९५८ - नीतू सिंग, हिंदी चित्रपट अभिनेत्री. १९७२ - सौरव गांगुली, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- २००६-प्रा.राजा राव,तत्वज्ञानाचे प्राध्यापक. २००१ - उस्ताद बाळासाहेब मिरजकर, तबला विभूषण. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *मुंबईत पावसाने विश्रांती घेतल्यानंतर राज्यात नाशिक, नगर, कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात दमदार पाऊस, यंदा पहिल्यांदाच गोदावरी नदीला आला पूर, गोदावरी नदीपात्रात ८ हजार क्सुसेसने पाणी सोडण्यात येत असून ते पाणी मराठवाड्याकडे झेपावले आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *नवी दिल्ली : संपूर्ण देशात पोलिसांच्या ५ लाख जागा रिक्त आहेत व त्यातील जवळपास सवा लाख जागा एकट्या उत्तर प्रदेशात, बिहारमध्ये ५० हजार आणि पश्चिम बंगालमध्ये ४९ हजार तर महाराष्ट्रात २६ हजार जागा रिक्त आहेत.असे गृह मंत्रालयाकडील आकडेवारीत म्हटले आहे.* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *इंडोनेशिया - इंडोनेशियामध्ये जाणवले 6.9 मॅग्निट्युट तीव्रतेचे भूकंपाचे धक्के, किनारी भागात त्सुनामीचा इशारा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *नवी दिल्ली - काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिला पक्षाच्या महासचिव पदाचा राजीनामा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *मुंबई : राज्यातील रिक्षाचालक मंगळवारपासून संपावर, ओला, उबेरची बेकायदेशीर टॅक्सी सेवा बंद करण्याची मागणी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *लंडन : आठ वेळेसचा विम्बल्डन पुरुष एकेरीतील चॅम्पियन रॉजर फेडरर याने विजयासह रचला आणखी एक विक्रम* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *मॅन्चेस्टर : आयसीसी विश्वकप स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य लढतीत टीम इंडिया उद्या न्यूझीलंडविरुद्ध खेळेल, तर यजमान इंग्लंडची लढत गुरुवारी गत चॅम्पियन आॅस्ट्रेलियाविरुद्ध होणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *लघुकथा - हाताची जादू ओळखणारा शिक्षक* Audio ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करावे. https://youtu.be/-R9ZpCSvOok लघुकथा वाचण्या साठी खालील लिंक वर क्लीक करावे https://storymirror.com/read/story/marathi/19r6650g/haataacii-jaaduu/detail वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ कथालेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *सलाईन लावण्याचे काय फायदे होतात ?* 'डागदर साहेब, दोन तरी सलाईन लावा बघा' किंवा 'एक बाटली सलाईन तरी लावावीच लागेल' अशी रुग्ण डॉक्टरांची वाक्ये नेहमीच ऐकायला मिळतात. सामान्य लोकांना सलाईन म्हणजे जणू संजीवनीच आहे असे वाटायला लागले आहे आणि साध्या इंजेक्शनपेक्षा सलाईन लावल्यावर जास्त पैसे मिळत असल्याने वैद्यक व्यावसायिकही सलाईनचा वापर सढळ हाताने करू लागले आहेत. सलाईन लावावे असे रुग्णांना व डॉक्टरांना दोघांनाही वाटत असले, तरी पण खरेच का सलाईन आवश्यक असते ? सलाईन म्हणजे सोडियम क्लोराइडचे मिठाचे पाण्यातील द्रावण ! हे शिरेतून द्यावे लागते. त्यामुळे ते लगेच रक्तात मिसळले जाते, एवढ्यात त्याचा फायदा. याउलट ते पोटातून दिले, तर रक्तात शोषण व्हायला एक ते दीड तास लागतो. मग सलाईन केव्हा द्यावे लागते ? संडास वा उलट्या जास्त झाल्यास शरीरातील पाणी खूप कमी होते. व्यक्ती बेशुद्धही होतो. अशा काही वेळेला सततच्या मळमळ व उलट्यांमुळे तोंडाने काहीच देता येत नाही. पोटाच्या शस्त्रक्रियेनंतरही तोंडावाटे काही काळ काहीच देता येत नाही. अशा काही विशिष्ट परिस्थितीमध्येच सलाइन लावणे आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असते. इतर वेळी मात्र तोंडावाटे द्रवपदार्थ देणेच चांगले. कारण शिरेतून काहीही दिल्यास काही जणांना ताप येऊ शकतो. गंभीर वावड्याने रिअॅक्शन येऊ शकते. तसेच सुई वगैरे निर्जंतुक केलेली नसल्यास कावीळ, एड्स यासारखे रोगही होऊ शकतात. त्यामुळे होता होईस्तोवर सलाईन न घेणेच चांगले. सलाईन म्हणजे शिरेतून दिली जाणारी कोणतेही द्रवरूपातील औषधे असा साधारणत: अर्थ लोक घेतात पण प्रत्यक्षात सलाईनचा अर्थ मिठाचे पाणी असाच आहे ! सलाईन लावणे काही अवस्थांमध्ये प्राण वाचवू शकते, हे जरी खरे असले तरी उठसूट सलाईन लावणे आर्थिक दृष्ट्या पडण्याजोगी नसते व कधी कधी ते जीवावरही बेतू शकते. *डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित* यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून मनोविकास प्रकाशन *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• कुणाच्या नादात किंवा वादात पडण्यापेक्षा उद्योगात पडा, खुप प्रगती होईल *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *प्रदीप नरवाल हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?* कबड्डी 2) *नोबेल पुरस्कार कोणाच्या स्मरणार्थ दिला जातो ?* वैज्ञानिक आल्फ्रेड बर्नहार्ड नोबेल 3) *भारताची प्रथम महिला IPS अधिकारी कोण ?* किरण बेदी 4) *वैशाखी कोणत्या राज्याचा उत्सव आहे ?* पंजाब 5) *ओणम कोणत्या राज्याचा उत्सव आहे ?* केरळ *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ●  सुरेश तायडे ●  अनिल बेद्रे ●  मलेश भूमन्ना बियानवाड ●  आनंदराव नारायणराव सूर्यवंशी ●  लालू शिरगिरे ●  श्रद्धा कळसकर ●  अशोक पवार ●  दीपक वानखेडे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *तसे आयुष्यभर मागतच असतो या अर्थाने आपण भिकारीच असतो. हातात भिकेचा कटोरा दिसत नाही, म्हणून तो नसतोच असे नाही. अपेक्षेचे छोटे-मोठे कटोरे घेऊनच आपण फिरत असतो. या अपेक्षेचा कटोरा घेऊन भीक मागण्याची सुरूवात होते घरापासून, घराकडून अपेक्षा असते. आई-वडिल, बायको, मूल, बहिण, भाऊ सर्वांकडून अपेक्षा आहेत. उलटपक्षी त्यांनाही माझ्याकडून तेवढ्याच अपेक्षा आहेत. म्हणजे चित्र दिसत नसले, तरीही अपेक्षेच्या भिकेचे कटोरे घेऊन परस्परांसमोर उभे आहोत. एक भिकारी दुस-या भिका-यासमोर उभा आहे आणि दोघेही आरोळ्या ठोकताहेत,'देssरेss...बाssबा... काहीतरी.* *मला त्यांच्याकडून प्रेम हवे आहे. स्नेह, विश्वास, माझ्या दुखल्या-खुपल्याबद्दलची विचारपुस हवी आहे. आस्था हवी आहे. सर्वच हवे आहे. ज्यांच्याकडून मला हे सर्व पाहिजे आहे, त्यांनाही माझ्याकडून हेच हवे आहे. अपेक्षेच्या कटो-यात त्यापैकी काही पडतही आहे. त्याने मी आनंदी नाही उलट जे नेमके त्यात पडले नाही त्यानेच आधिक दु:खी आहे. जे मिळाले त्याचा आनंद नाही पण जे मिळाले नाही त्याचा दु:खभारच आधिक आहे. मी फक्त मागतोच आहे. याच्याकडून, त्याच्याकडून, घराकडून-दाराकडून, नात्यांकडून-नात्याबाहेरच्या गणगोतांकडून, ओळखी-पाळखीकडून, एवढेच काय अनोळख्यांकडूनसुद्धा.* *॥ रामकृष्णहरी ॥* 🥀🥀🥀🥀 *श्री संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल- 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  🌟! !  *कबिराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• कलि मंह कनक कामिनि, ये दौ बार फांद इनते जो ना बंधा बहि, तिनका हूॅ अमै बंद । सारांश महात्मा कबीर सांगतात कलीयुगात जो माया मोहात अडकणार नाही. स्त्रियांच्या फंदात पडून जो स्वतःला बिघडवून घेणार नाही तोच या मायावी जगातून सुखरूप सुटेल. तो सर्वांच्या आदरास पात्र होईल. अन्यथा लोक टिकेला सामोरे जावे लागणार. अपमानाचे बोल सहन करावे लागणार. हे ठरलेलेच. म्हणून सन्मार्गावर चालणार्‍या माणसानं माया आणि कामिनी यांच्या मोहात पडणं म्हणजे स्वतःला अधोगतिच्या मार्गाला नेणं होय. रामायण घडण्यामागील मुख्य कारण स्त्री लालसेत सापडते, आर्य अनार्य संघर्षाच्या काळात आर्य पुत्र लक्ष्मणाकडून अनार्य कन्या शुर्पनखा या महाबली राजा रावनाच्या बहिणीला तपमानित केलं जाणं. तिला विद्रुप केलं जाणं. दुर्लक्षित कसं होणार ? ती काय गोरगरीबा घरची पोर थोडीच होती ? फूल हुंगून फेकून दिलं किवा तसाच त्याचा चोळामोळा केला तरी त्याची दखल कोण घेतंय ! मात्र इथ राज कुलाच्या इज्जतीचा पेच. सुडाग्निनं पेटलेल्या एका मानिनीनं दुसरीला संघर्षात ओढलं नाही तरंच नवल ! तिथं दोन्ही पैकी एका बाजुची राख रांगोळी होणं स्वाभाविकंच होतं. नेमकी न्यायाची बाजू कोणाची ? चिकित्सा करणारे करत राहतील .मात्र दोन स्त्रियांच्या पात्राभोवतीच हा महासंग्राम फिरत राहतो. महाभारत म्हणजे सत्ता, संपत्ती आणि सुंदरी यांच्या भोवती फिरणारी भावबंदकीच नव्हती का ! त्यातही अपरीमित हानी झालेली. महारती योद्धे माया, मोहिनीतच गारद केल्या गेलेले. आजही जागोजागी त्या बाबींची पूनरावर्त्ती होताना दिसते. अशा प्रकारापासून सावध व्हायला हवे. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्यांना जीवन जगण्याची कला अवगत झाली तो कधीच कुणासमोर जीवन कसे जगावे असं विचारत नाही किंवा कोणतीच तक्रार कुणाकडे करीत नाही.तो कसेही आणि कोणतेही संकट असो त्याला तो आपल्या कलेने तोंड देऊन यशस्वी होतो.परंतु ज्यांना जीवन कसे जगावे किंवा जीवनात आलेल्या प्रसंगाला कसे आणि कोणत्या पध्दतीने तोंड द्यावे हे जमत नाही तो कधीच जीवनात यशस्वी होत नाही आणि होणारही नाही.तो दरवेळी काहीना काही बहाणे करुन आपल्या जीवनाला व जगण्याला दोष देत बसतो. आपल्या नशीबाला दोष देण्यापेक्षा हातपाय हलवून जीवन जगायला शिकले पाहिजे हा सकारात्मक विचार आपल्या डोळ्यांसमोर नेहमी ठेवायला शिकले पाहिजे तरच जीवन जगणे आनंददायी होईल अन्यथा दु:खच भोगावे लागतील यांत तीळमात्र शंकाच नाही . © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद ...‌9421839590/8087917063. 🌹🌱🌹🌱🌹🌱🌹🌱🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *इसापची समयसुचकता* ग्रीस देशात झांथस या नावाचा एक मोठा माणूस होऊन गेला. त्याच्या घरी इसाप स्वैपाकी होता. एके दिवशी झांथसच्या घरी मेजवानी होती. म्हणून त्याने इसापला आज्ञा केली की, ‘सर्वांत उत्तम असे जे पक्वान्न असेल ते आज पाहुण्यांसाठी कर !’ रात्री ठरलेल्या वेळी पाहुणे जमल्यावर सर्वजण जेवावयास बसले. इसापने नुसत्या बोकडाच्या जीभांचे निरनिराळे पुष्कळ पदार्थ तयार केले होते. ते खाऊन पाहुणे फार खूष झाले. तरीही जिभांशिवाय दुसरा कोणताही पदार्थ ताटात नसल्यामुळे झांथस यास थोडेसे आश्चर्य वाटले व रागही आला. तो इसापला म्हणाला, ‘अरे, सर्वांत उत्तम असं पक्वान्न तयार करायला सांगितलं असता तू नुसत्या जिभेचेच निरनिराळे पदार्थ काय तयार करून ठेवलेस ?’ त्यावर इसापने उत्तर दिले, ‘जिभेपेक्षा चांगला असा दुसरा पदार्थ आहे का?’विद्या, तत्त्वज्ञान यांचा उगम जिभेपासून झाला आहे. व्याख्यान, अभिनंदन, लग्न, व्यापार इत्यादी मोठमोठ्या घडामोडी, प्रतिज्ञा या सर्वांचे मुख्य साधन जीभच होय, तिची बरोबरी करणारा दुसरा पदार्थ नाही.’ इसापचे हे समयसूचक भाषण लोकांना इतके आवडले की, त्यांनी त्याची फारच तारीफ केली. त्यावेळी झांथस पाहूण्यास म्हणाला, ‘अहो, आजच्याप्रमाणे उद्यासुद्धा रात्री तुम्ही माझ्याकडे जेवावयास यावं, अशी माझी विनंती आहे.’ मग तो इसापकडे पाहून म्हणाला, ‘अरे, आज जसे तू सर्वात उत्तम पक्वान्न तयार केलेस, तसे उद्या तुझ्या मते जे सर्वात वाईट पक्वान्न असेल ते तयार कर.’ दुसरे दिवशी सर्वजण जेवायला बसले असता आदल्या दिवशीचेच सर्व पदार्थ जेवणात होते. तेच पदार्थ पाहून पाहुण्यास व झांथस यांना फार आश्चर्य वाटले. मग झांथस इसापला रागाने म्हणाला, ‘अरे, काल जे पदार्थ चांगले होते तेच आज सर्वात वाईट कसे काय झाले?’ त्यावर इसाप उत्तरला, ‘जिभांपेक्षा वाईट असा दुसरा कोणता पदार्थ आहे ? जगात तितकी म्हणून नीचपणाची कृत्ये होतात, त्या सर्वांच्या मुळाशी जीभच कारणीभूत असते. बंड, मारामारी, लबाड्या नि अन्याय यांच्या संबंधाच्या गुप्त बोलाचाली जिभेनेच होतात. त्याचे इशारेही जिभेनेच दिले जातात. मोठमोठी राज्यं, प्रचंड नगरं इतकं नव्हे तर फार दिवसांचे मित्रत्वाचे संबंधसुद्धा जिभेमुळेच नाश पावतात.’ इसापचे हे चातुर्याचे बोलणे ऐकून लोक अगदी चकित झाले. तात्पर्य: कोणत्याही वस्तूकडे निरनिराळ्या दृष्टीने पाहिले असता ती निरनिराळ्या प्रकारची दिसू लागते. त्याचप्रमाणे कोणत्याही वस्तूचा उपयोग जसा चांगल्या कामास होतो तसाच वाईट कामातही करता येतो. चांगले शोधून काढणे ही आपली सचोटी. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 06/07/2019 वार - शनिवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १८८५-लुई पाश्चर याने रेबीज या रोगावरील लसीची यशस्वी चाचणी केली १८९२ - दादाभाई नौरोजींची ब्रिटीश संसदेचे सर्वप्रथम भारतीय सभासद म्हणून निवड. १९४७-रशियात ए के ४७ या बंदुकीच्या उत्पादनास सुरुवात झाले २००६- चीन युद्धापासून बंद असलेली भारत व तिबेट यांना जोडणारी 'नाथु ला' खिंड ४४ वर्षानंतर व्यापारासाठी खुली करण्यात आली. 💥 जन्म :- १८३७ - डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर, थोर प्राच्यविद्या संशोधक, संस्कृत पंडित भाषाशास्त्रज्ञ, इतिहास संशोधक. १८८१ - गुलाबराव महाराज, विदर्भातील संतपुरूष. १८९७ - व्यंकटेश दिगंबर माडगूळकर, मराठी कथाकार आणि कादंबरीकार. १९०१ - डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, भारतीय जनसंघाचे पहिले नेते . १९०५ - लक्ष्मीबाई केळकर, भारतीय समाजसेविका, राष्ट्रसेविका समितीच्या संस्थापिका. १९३९ - मन सूद, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- १९८६ - जगजीवनराम, भारतीय राजकारणी. २००२ - धीरूभाई अंबानी, भारतीय उद्योगपती. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *गरिबांचे सबलीकरण, युवकांना उज्ज्वल भविष्य देणारा, या अर्थसंकल्पामुळे उद्योग व उद्योजक या दोघांनाही बळ मिळेल आणि देशाच्या विकासात महिलांचा सहभागही वाढेल - पंतप्रधान मोदी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *Budget नवी दिल्ली - नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण राबवणार, उच्च शिक्षणासाठी परदेशी विद्यार्थ्यांना भारतात संधी उपलब्ध करणार* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *Union Budget: पेट्रोल-डिझेलची दरवाढ मध्यरात्रीपासून लागू; बजेटमधील करवाढीचा पहिला झटका* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *पाच लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची घोषणा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *आधार कार्डच्या मदतीनं आयकर भरता येणार; पॅन कार्डची सक्ती नाही* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *ICC World Cup 2019 : पाकिस्तानचा विजयी निरोप; बांगलादेशवर 94 धावांनी मात* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *आज भारताची लढत श्रीलंकेसोबत, भारत यापूर्वीच उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *लघुकथा - संशय* https://storymirror.com/read/story/marathi/4yp3ta6e/snshy/detail वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ कथालेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *निरनिराळ्या रोगांचे जंतू कसे ओळखतात ?* 📙 अनेक प्रकारचे जीवजंतू आपल्या स्वभोवतालच्या पर्यावरणात असतात. काही आपल्या शरीरातही असतात. यात काही रोगकारक तर काही अपाय न करणारे असतात. जीवजंतूंचे जीवाणू, विषाणू, एकपेशीय व बहुपेशीय परजीवी जंतु, रिकेटशीये असे अनेक प्रकार असतात. या जंतूंमुळे अनेक रोग होतात. कोणत्या जंतूपासून रोग झाला आहे हे ओळखण्यासाठी प्रयोगशाळेत तपासण्या उपलब्ध आहेत. जंतूंचा आकार, त्याच्या पेशीतील व पेशीच्या आवरणातील घटक, पेशीची रंग स्वीकारण्याची प्रवृत्ती, कृत्रिम माध्यमात त्यांची होणारी वाढ व या वाढीची वैशिष्ट्ये इत्यादी अनेक बाबींवरून वेगवेगळे जंतू ओळखू येतात. संडासवाटे बाहेर येणारे कृमी साध्या डोळ्यांनाही दिसतात व ओळखता येतात. जीवाणू सूक्ष्मदर्शक यंत्राखाली तर विषाणू इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाखाली बघावे लागतात. जंतूंच्या हालचाल करण्याच्या पद्धतीवरूनही ते ओळखता येतात. रोग झाल्यानंतर रुग्णाची थुंकी (बेडका), लघवी, विष्ठा, रक्त, त्वचा इत्यादींची (रोगानुसार) तपासणी करतात व त्यातील जंतूंचा शोध घेतात. या नमुन्याचा सुरुवातीला काचपट्टीवर थर तयार करतात व नंतर या थरावर इओसीन, मेथीलीन ब्लू वा इतर रंगद्रव्याची क्रिया करतात. यामुळे जंतूंना त्यांच्या गुणधर्मानुसार रंग येतात. या काचपट्ट्यांची सूक्ष्मदर्शकाखाली तपासणी करून जंतू ओळखतात. काही वेळा कृत्रिम माध्यमांमध्ये जंतू वाढवतात व नंतर काचपट्टीवर उपरोक्त पद्धतीने तपासणी करतात. विषाणूंची तपासणी इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाखाली करावी लागते. कारण ते फार सूक्ष्म असतात. काही वेळा जंतू सापडत नाहीत. त्यामुळे त्यांच्या विरोधात शरीराने तयार केलेली प्रतिद्रव्ये शोधून त्यांच्यानुसार जंतुसंसर्ग झाला होता वा नाही हे अनुमानाने ठरवले जाते. यासाठी रक्ताची तपासणी करतात. जंतू ओळखणे हे रोगनिदानासाठी, परिणामकारक उपचारासाठी अत्यंत आवश्यक असते; त्यामुळे वर सांगितलेल्या पद्धतींचे महत्त्व अजूनच वाढते. *डॉ. जगन्नाथ दीक्षितव डाॅ. अंजली दीक्षित* यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून मनोविकास प्रकाशन *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• पाहिलेल्या पावसाळ्यापेक्षा अनुभवलेला पावसाळा जास्त महत्वाचा असतो *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *शिवाजी महाराजाच्या आईचे नाव काय होते ?* जिजाबाई 2) *भारताची प्रथम महिला लोकसभा अध्यक्ष कोण ?* मीरा कुमार 3) *भारताची प्रथम महिला राज्यपाल कोण ?* सरोजिनी नायडू 4) *भारताची प्रथम महिला IAS अधिकारी कोण ?* अण्णा जार्ज 5) *बांगलादेशचे चलन कोणते ?* टका *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ●  संतोष मानेलू ● मोहन भूमकर ●  साजिद शेख ●  अतुल बागडे ● अशोक इमनेलू ●  शंकर सोनटक्के ●  आबासाहेब उसकलवार ●  श्रीकांत पुलकंठवार ●  शिवाजी जिंदमवार ● मधुकर कांबळे ●  शंकर स्वामी ● व्यंकट चन्नावार ● नारायण वानोळे ● सुभाष इमनेलू ● अर्फत इनामदार *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *शिका-याने टाकलेल्या जाळ्यात पक्षांचा थवा सापडतो. प्रत्येक पक्षी त्यातून सुटका करण्याचा प्रयत्न करू लागतो. प्रत्येकाचे प्रयत्न त्या जाळ्याची पकड आधिक घट्ट करत जातात. परंतु सर्वच पक्षी एकत्रितपणे उडण्याचा प्रयत्न करतात तेंव्हा त्या जाळ्यासह उडून जातात. आपल्या आजूबाजूला संकटात सापडलेल्या मंडळींकडे न पाहता आपण आपल्या संकटापुरता विचार करू लागतो. तेंव्हा सारेच संकटाच्या गर्तेत जातो. पण सर्वांच्या हिताचा दृष्टीकोन ठेवून एकसंधपणे एकविचाराने जेंव्हा संकटाचा सामना करतो तेंव्हा संकटे पळून जातात. त्यामुळे माणसांनी एकत्र येणे, एका मंगल विचारांनी राहणे, एका महन्मधुर विचारांनी कार्यरत होणे हा यशामागचा मोठा मंत्र असतो.* *रामकृष्णांचा सहवास मिळाल्यावर नरेंद्राचे विवेकानंद होतात. विवेकानंदांच्या सानिध्यामुळे लंडनमधील एका शाळेची संचालिका असणारी मार्गारेट नोबेल ही भगिनी निवेदिता होते. गोपाळकृष्ण गोखले यांच्या सहवासामुळे मोहनदास गांधी यांचा महात्मा गांधी होण्याकडे प्रवास सुरू होतो. संतांचा म्हणजे चांगल्या माणसांचा सहवास आपले भ्रम दूर करून मन निर्मळ करतो. 'परिसाच्या संगे सोने झाला विळा' असे तुकाराम महाराजांनी म्हटले आहे. नाही तर तुकारामांनीच म्हटले आहे,'कर्कशे संगती, दु:ख उदंड फजिती.'* *॥ रामकृष्णहरी ॥* 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 *संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल- 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  🌟! !  *कबिराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• कबीर जीवन कुछ नहीं, खिन खारा खिन मीठ कलहि अलहजा मारिया, आज मसाना ठीठ। सारांश जीवन क्षणभंगूर आहे. क्षणापूर्वी ते होते अन क्षणानंतर ते असेल अशी कोणीही खात्री देवू शकत नाही. जीवनाची नश्वरता पटवून देताना महात्मा कबीर म्हणतात, जीवन म्हणजे काहीही नाही. या क्षणाला ते खारट अनुभव देत असेल तर दुसर्‍या क्षणी ते कडवटपणाला गोडीमध्ये बदलू शकते. जीवनाचा मधूर अनुभव देवु शकतं. जो वीरयोद्भा काल युद्धामध्वे आपलं नैपुण्य पणाला लावून बाजी प्राणपणाने लढून आपल्या बाजूने ओढून आणण्यामध्ये यशस्वी झाला म्हणून त्याचे सर्वत्र कौतुक सोहळे साजरे झाले. सर्वांनी जयमाला गळ्यात घालून त्याचा जय जयकार केला गेला. ज्याने काल मैदान मारले तो स्वतःच आज चितेवर स्मशानी निपचित अचेतन पडला आहे. मृत्यूने भल्याभल्यांना सोडलेले नाही. तिथे सामान्य जीवांचं काय खरं आहे. घारीने भक्ष्यावर झडप घालावी तशी काळ कोणत्याही क्षणी झडप घालू शकतो, म्हणून माणसानं आपल्या हाती जे काही आयुष्य शिल्तक राहिले आहे. त्याचा सदुपयोग करून घ्यायला हवा व जीवन सत्कारणी लावायला हवे , म्हणजे सत्कर्माच्या किर्तीने मृत्यू पश्चातही जीवनाचा परिमल दरवळत राहातो. मृत्यू साक्षात पुढ्यात उभा राहिला तरी त्याचे भय राहात नाही एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• काळजी केल्याने कोणतेच प्रश्न मिटत नसतात तर अनेक प्रश्न तुमच्यासमोर उभे टाकतात.त्या काळजीमध्ये तुमच्या आजच्या कामावर लक्ष नसल्यामुळे तुमचे काम निकृष्ट दर्जाचे होऊ शकेल.त्यामुळे तुम्ही अधिक काळजी करायला लागाल.त्यापेक्षा काळजी न करणे सर्वात मोठा शहाणपणा आहे.ज्याची तुम्हाला काळजी वाटते त्याकडे लक्ष न घालणे सगळ्यात चांगले.आजच्या कामात अधिक लक्ष घातले आणि मन लावून काम केले तर त्या कामात गढून जाल.चांगले काम झाल्याचे समाधान तर वाटेलच आणि काळजी पण दूर होईल.काळजी कोणतीही असो.आजची असो की उद्याची.तो काळ तुमच्या काळजीमुळे थांबणार का ? नाही ना.मग आपले मन प्रसन्न ठेवा.येणा-या आणि हाती असलेल्या कामात अधिक लक्ष घाला मग तुम्हाला तुमचे समाधान मिळेल.समाधान हे काळजीला उत्तम पर्याय आहे हे कधीही विसरु नका. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०. 💠🌹💠🌹💠🌹💠🌹💠 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मानवता हाच धर्म* एकदा *एका उंदराने हिरा* गिळला. हिऱ्याच्या मालकाने त्या *उंदिराला मारण्यासाठी* एका शिकाऱ्याला कंत्राट दिले. शिकारी जेव्हा त्या उंदिराला मारण्यास पोहचला तेव्हा *सगळे उंदिर एक घोळका* करून एका दुसऱ्यावर *चढून दाटीवाटीने* बसले होते, पण एक उंदिर त्यांच्यापासून *वेगळा बसला* होता. शिकाऱ्याने सरळ जाऊन त्या वेगळ्या बसलेल्या त्याच *उंदिराला पकडले ज्याने हिरा गिळला होता.* हिरामालक आश्चर्यचकित झाला त्याने शिकाऱ्यास विचारले, तुम्ही हजारो उंदरातून ज्याने हिरा गिळलाय त्याच *उंदराला कसे काय ओळखले?* शिकाऱ्याने उत्तर दिले खूप सोपं काम होत, *जेव्हा मूर्ख धनवान बनतो तेव्हा तो इतरांशी संपर्क तोडतो..!* आयुष्यात *धन, दौलत, ऐश्वर्य, संपत्ती,नाव आणि सगळं काही कमवा* पण *आपण ज्या समाजात वाढलो, जगलो, मोठे झालो, त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो.* *आपण ह्या* *समाजामुळेच मोठे झालो हे कधीच विसरू नका..* *माणसे जोडा🏻मानवता हाच धर्म* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 05/07/2019 वार - शुक्रवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १९७५- 'देवी' या रोगाचे भारतातून समूळ उच्चाटन झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जाहीर केले. १९९६- संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार डॉ ए पी जे अब्दुल कलाम व अवकाश आयोगाचे सदस्य एन. पंत यांना 'आर्यभट्ट पुरस्कार'जाहीर २००४ - इंडोनेशियात प्रथमतः राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणुका. २००६ - उत्तर कोरियाने प्रतिबंधांना न जुमानता नोडाँग-२, स्कड व तेपोडाँग-२ ही क्षेपणास्त्रे प्रक्षेपित केली 💥 जन्म :- १८८२ - हजरत इनायत खान, शास्त्रीय गायक. १९१६ - आर्चिक वेंकटेश गोपाळकृष्ण, कवि, वक्ते. धारवाड मध्ये. १९१६-के. करूणाकरन,केरळचे माजी माजी मुख्यमंत्री १९४६-रामविलास पासवान,केंद्रीय मंत्री 💥 मृत्यू :- १६६६ - आल्बर्ट सहावा, बव्हारियाचा राजा. १९४५ - जॉन कर्टीन, ऑस्ट्रेलियाचा १४वा पंतप्रधान. २००४ - ह्यू शियरर, जमैकाचा पंतप्रधान. २००५-बाळू गुप्ते,लेग स्पिन गोलंदाज *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *निर्मला सीतारामन आज मांडणार अर्थसंकल्प, आर्थिक सर्वेक्षणात विदेश व्यापार तोटा जीडीपीच्या २.६ टक्के म्हणजे ४.९४ लाख कोटी असल्याचे नमूद आहे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *पावसाळा सुरू झाल्यानंतरही अर्धा महाराष्ट्र तहानलेलाच; अनेक ठिकाणी तीव्र पाणीटंचाई* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *जीवन सरल’ पॉलिसीची विक्री बंद करा, सुप्रीम कोर्टात याचिका, ग्राहकांची लूट होत असल्याचा आरोप, गुंतवणुकदारांना सुजाण करण्याचे काम करणाऱ्या मुंबईतील ‘मनीलाईफ फौंडेशन’ने केलेली ही याचिका* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *बोरीवली पश्चिमेतील शिपोली येथे एकेकाळी डम्पिंग ग्राउंड असलेल्या मैदानावर तब्बल साडेचार एकर परिसरातील अटल स्मृती उद्यानाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत उद्घाटन.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *वैद्यकीय पदवी प्रवेशाच्या मूळ कागदपत्र पडताळणीची मुदत वाढविली; नोंदणी न केलेल्या विद्यार्थ्यांनाही आणखी एक संधी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *मुंबई : राज्यात सध्या आठ अनुसूचित जमाती जात पडताळणी प्रमाणपत्र कार्यालये असून आणखी पाच कार्यालये निर्माण करण्यासाठी विभागाने मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी दिल्या.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *ICC World Cup 2019 : पाकिस्तानपुढे अशक्यला शक्य करण्याचे आव्हान, आज बांगलादेशविरुद्ध निर्णायक लढत* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *विशेष सूचना - चिखलवाडी नांदेड येथील सुप्रसिद्ध आयुर्वेद तज्ञ अविनाश अमृतवाड यांची निरोगी राहण्यासाठी दिनचर्या या विषयावर आज डी. डी. सह्याद्री वाहिनीवर सकाळी 08 ते 09:30 या वेळांत मुलाखत प्रसारित होणार आहे. या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *लघुकथा - आठवण गावाची* https://storymirror.com/read/story/marathi/li2r4x05/aatthvnn-gaavaacii/detail वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ कथालेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🦅 *पक्षी केव्हा स्थलांतर करतात ?* 🦅 रोटी, कपडा और मकान या मनुष्यप्राण्याच्या मूलभूत गरजा मानल्या जातात. यातला कपडा ही केवळ मनुष्यप्राण्याचीच गरज आहे. पण रोटी व मकान यांच्या गरजा मात्र प्राणिसृष्टीच्या प्रत्येक सदस्याला भासतात. त्यामुळे त्यांची जिथे चांगली सोय होईल तिथेच जास्तीत जास्त वास्तव्य करण्याकडे प्रत्येक प्राण्याचा कल असतो. तो प्रदेश हा त्या प्राण्याचा नैसर्गिक अधिवास बनतो. त्या क्षेत्रात त्याला मुबलक अन्न मिळतं, पाण्याची सोय होते, राहण्याची गुहा मिळतात किंवा घरटी बांधता येतात. आपलं पुनरूत्पादन करून पुढची पिढी जन्माला घालण्यासाठी सर्व प्रकारे योग्य वातावरण लाभतं. आपला कळप वाढवता येतो. पक्षी हे प्राणीसृष्टीचाच अविभाज्य भाग असल्यामुळे त्यांनाही हे लागू पडतं. परंतु या अधिवासातील पर्यावरण सतत तसंच राहत नाही. ऋतुमानानुसार त्यात फरक पडत जातो. तापमान बदलतं. पावसाचं प्रमाण कमी जास्त होतं. फळांचाही हंगाम असतो. तो ओसरला की तीही मिळेनाशी होतात. किडामुंगीही या बदलत्या पर्यावरणाला अनुसरुन आपल्या बिळात गडप होण्याची धडपड करतात. अन्नाची चणचण भासू लागते. तापमानही सुसह्य राहत नाही. अशा परिस्थितीला तोंड देत तगून राहण्यासाठी काही व्यवस्था करावी लागते. अशा वेळी ते स्थलांतर करतात. तरीही या स्थलांतरासाठी इतर काही घटना घडण्याची आवश्यकता भासते. पर्यावरण प्रतिकूल होत चाललं की पक्ष्यांच्या शरीरात काही विशिष्ट संप्रेरकांचा स्त्राव होऊ लागतो. तो त्यांना उडत जात दूरचा पल्ला गाठण्यासाठी आवश्यक ती प्रेरणा आणि ताकद देतो. तसंच हा दूरचा पल्ला गाठण्यासाठी शरीरही बळकट करावं लागतं. दीर्घ काळपर्यंत उडत राहण्यासाठी स्नायूंना बळकटी यावी लागते. त्यासाठी जेव्हा अन्न मुबलक प्रमाणात मिळत असतं तेव्हा ते खाउन शरीर लठ्ठ करावं लागतं. चरबीचा साठा करावा लागतो. तो पर्याप्त झाल्याशिवाय स्थलांतर करता येत नाही. बहुतांश पक्षी स्थलांतर करताना सहा ते आठ हजार मीटर उंचीवरुन उडत राहणं पसंत करतात. कारण त्या उंचीवरचं घसरलेलं तापमान सतत उडत राहण्यामुळं शरीरात जी उष्णता निर्माण होते तिचा निचरा करण्यासाठी उपयोगी पडतं. तसंच पक्षी एकेकटे कधीच स्थलांतर करत नाहीत. त्यांचा कळपच्या कळप या प्रवासावर निघतो. काही पक्षी तर हजारो किलोमीटर दूरवरच्या तात्पुरत्या अधिवासाच्या प्रदेशात स्थलांतर करतात. तो आपल्या विणीच्या हंगामासाठीही उपयुक्त आहे याची खातरजमा त्यांनी करून घेतलेली असते. त्याचा शोध त्यांनी पूर्वीच घेतलेला असतो व तिथं जाण्याची वाटही त्यांच्या आठवणीत साठवून ठेवलेली असते. त्यामुळं नेहमीच्या नैसर्गिक अधिवासातली परिस्थिती प्रतिकूल बनली, शरीरातल्या चरबीचं प्रमाण पुरेसं वाढलं, अंगात संप्रेरकांचा पाझर पर्याप्त झाला आणि सगळ्या कळपाची तयारी झाली की पक्षी स्थलांतर करतात. *बाळ फोंडके यांच्या 'केव्हा ?' या पुस्तकातून *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *Health is wealth.* (चांगले आरोग्य हीच खरी संपत्ती आहे.) *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *लोणार सरोवर कोणत्या राज्यात आहे ?* महाराष्ट्र 2) *दाल सरोवर कोणत्या राज्यात आहे ?* जम्मु काश्मीर 3) *चिल्का सरोवर कोणत्या राज्यात आहे ?* उडीसा 4) *सांभर सरोवर कोणत्या राज्यात आहे ?* राजस्थान 5) *वुलर सरोवर कोणत्या राज्यात आहे ?* जम्मू काश्मीर *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ●  डॉ. मनोज तानुरकर ●  गंगाधर कांबळे ●  गिरीश कहाळेकर ●  संतोष शेळके ●  फारुख शेख ●  नरेश शिलरवार ●  अजय चव्हाण ●  गजानन बुद्रुक ● बालकिशन कौलासकर ● रमेश अबुलकोड ● किशन कवडे ● सुधाकर चिलकेवार ● बबलू दबडे ● परमेश्वर अनिल कवडेवार ● सुदर्शन पाटील ● मोतीराम तोटलोड ● नागनाथ भत्ते ● मारोती कदम ● अनिल गायकांबळे ● चक्रधर ढगे ● सुभाष कुलकर्णी ● राजरेड्डी बोमनवाड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *स्वत:वर खुश असणा-यांना लोक खूप घाबरतात. त्यांना या लोकांबद्दल खूप आसूया वाटते. सर्वसामान्य माणसे जगात सर्वाधिक नाराज जर कोणावर असतील, तर ती स्वत:वरच असतात. त्यांच्या हातुन चुका होतात. कधी कधी तर त्याच त्याच चुका परत परत होतात. नियतीचे फासे सततच असे पडत राहतात, की सारखेच हस्यास्पद व्हायची वेळ यावी. इतरांच्या हातात कायम राजे, एक्के आणि यांच्या हातात दुर्री-तिर्री, हे तर नेहमीचेच. यांनी चुका सुधारायच्या ठरविल्या तरी पटापट यांना त्या सुधारता येत नाही. त्याच त्याच बाॅलवर परत परत विकेट जात राहते.* *काय केले म्हणजे आपल्याला प्रतिष्ठा मिळेल ? लोक आपल्याला महत्वाचे आणि सन्माननीय समजतील? याचा विचार करण्यात यांचे तासन् तास जातात. तरीही त्यांना असाच निष्कर्ष काढावा लागतो, की अजून आपल्याला खूपच मेहनत करावी लागेल. आणि मग स्वत:ला दोष देत, स्वत:ला सुधारण्याचा पुन:पुन्हा प्रयत्न करत ते जगत राहतात. अशा खचलेल्या आणि जगाच्या गणितात हुकलेल्या लोकांनी सगळा परिसर भरलेला असताना जर एखादा नखशिखांत स्वत:वर खुश असेल तर जगाला त्रास होणारच.* *"परंतु जो स्वत:वर प्रेम करीत नाही, त्याच्यावर जग प्रेम करीत नाही."* संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• नागिन के तो दोये फन, नारी के फन बीस जाका डसा ना फिर जीये, मरि है बिसबा बीस। सारांश महात्मा कबीर व्यभिचारी व दुराचारी स्त्री-लंपटाना वरील दोह्यातून सचेत करतात. सापिनीला तर केवळ दोनच दात असतात. तिचा दंश झाला तर वैद्याकडून विष उतरवून टाकता येईल. परंतु स्त्रिला वीस दात असतात. तिचा दंश ज्याला झाला त्यातला कोणीही जीवित सुरक्षित राहू शकत नाही. तिचा दंश जर वीस लोकांना झाला तर वीसचे वीस मरून जातील. काम भावना सीमित असली पाहिजे. तिचं संतुलन राखता आलं पाहिजे. काम भावनेचं संतुलन बिघडलं की ती माणसाच्या आवाक्यात राहात नाही. ती त्याला मन मानेल तशी नाचवते. परिणाम स्वरूप माणूस अधःपतित होतो. लोक लज्जेचा , हेटाळणीचा विषय होतो. मग ती ईश्वरांची रूप मानलेली पात्र असोत की सामान्य जण साबुत राहात नाहीत. शंकर , इंद्र, चंद्र, रावणाचे चारित्र्य या माया मोहिणीने डागाळून टाकले. तिथं सामान्यांची काय बात घेऊन बसला आहात. यावर चांगदेवांच्या पुढील ओळी फारच बोलक्या आहेत. वासनेच्या मागे नको धावू मना पहा त्या रावणा काय झाले चंद्रा पडली भगे इंद्र झाला काळा नारद चुकला चाळा भजनाचा अगदी अलीकडे समाजानं ज्यांना डोक्यावर घेतलं होतं अशा संत म्हणवून घेणार्‍यांनी स्व-संतुलन हरवून वासनेच्या आहारी जावून आज ते गजाआड दुर्दशेचे भोग भोगत आहेत. भल्या भल्यांची मायेनं अशी वासलात लावून टाकलीय. मात्र ज्यांनी स्वतः वरील नियंत्रण ढळू दिलं नाही. अशी पात्रंही कमी नाहीत की जी अनुकरणास पात्र ठरलीत. शुक, भीष्म हे निश्चयाचे महामेरूच होते. जगद्गुरू तुकोबारायही माया मोहात गुरफटलेल्या जीवांना पाहून हताश होवून म्हणतात बुडती हे जण न देखवे डोळा । येतो कळवळा म्हणोनिया । तेव्हा माणसानं आपण अवहेलनेचे धनी होणार नाहीत . याची जाणीव ठेवून वागण्याचा प्रयत्न करावयास हवा. तुकोबांनी सांगितलेलं 'पराविया नारी माऊली समान...' हे सुत्र कायम जपलं जपायला हवं. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• पैसा काहीवेळी कामाला येतो आणि त्यातून उपभोगण्यासाठी वस्तू खरेदी करता येतात परंतु आशीर्वाद हा आयुष्यभर पुरत असतो आणि कोणत्याही संकटातून दूर करण्यासाठी देवासारखा पाठीशी असतो... म्हणून कुणाच्या पैशाची अपेक्षा करु नका तर कुणाच्या आशीर्वादाची अपेक्षा करा यातच खरे समाधान आहे.... ©व्यंकटेश काटकर,नांदेड संवाद...९४२१८३९५९०. 🌹🌱🌹🌱🌹🌱🌹🌱🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *बिरबलाची युक्ती* एकदा दरबार चालू असताना बादशहाच्या मनात एक विचार आला. त्याने दरबालातील सर्व कामे बाजूला ठेऊन बिरबलला विचारले, बिरबल एखाद्या नालायक माणसाशी गाठ पडली तर काय करावे? बिरबल खूप कामात होता. कामाच्या वेळी बादशाहाने असा विचित्र प्रश्न विचारलेले बिरबलला आवडले नाही. परंतु काहीही न बोलता त्याला गप्प बसून आपले कामही करता येण्या सारखे नव्हते. “महाराज आपल्या या प्रश्नाचे उत्तर आपल्याला ह्याच वेळी मिळेल. बिरबल दरबारातील आपल काम उरकून घरी गेला आणि आपल्या एका मित्राला घरी बोलवलं. तो म्हणाला उद्या तू माझ्या बरोबर बादशहाच्या दरबारात ये. बादशहा तुला प्रश्न विचारतील तू काही बोलू नकोस. बादशहाने कितीही प्रयत्न केले तरी तू तोंड उघडू नकोस. घरी आल्यावर मी तुला इनाम देईन. दुसऱ्या दिवशी मित्राला घेऊन बिरबल बादशहाच्या दरबारात गेला. बादशहाला मुजरा करून तो म्हणाला खाविंद आपल्या कालच्या प्रश्नाच उत्तर माझा हा मित्र देईन. विचारा त्याला प्रश्न. बादशाहने त्याला प्रश्न विचारला एखादया नालायक माणसाशी गाठ पडली तर शहाण्या माणसाने काय करावे? बिरबलचा मित्र काही न बोलता चुळबुळ करत राहिला. बादशहाने आपला प्रश्न पुन्हा पुन्हा विचारला. परंतु बिरबलचा मित्र गप्पच. शेवटी बादशहा चिडला तो बिरबलाला म्हणाला, काय मूर्ख पणा चालवला आहे. तुझा मित्र तर काहीच बोलत नाही. बिरबल नम्र पणे म्हणाला खाविंद, माझ्या मित्राने आपल उत्तर दिले आहे. नालायक माणसाबरोबर गाठ पडली तर गप्प राहावे. बादशहाला उत्तर मिळाले. परंतु बिरबलने आपलयाला नालायक ठरविल्या मुळे तो मनातून खजील झाला. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 04/07/2019 वार - गुरूवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १९९९-लष्कराच्या१८व्या बटालियन ने कारगिलमधील द्रास सेक्टर मधील टायगर हिल्स हा लष्करीदृष्ट्या महत्त्वाचा टापू घुसकरांच्या तावडीतून मुक्त केला. १९९७-नासाचे 'पाथफाईंडर' हे मानवविरहीत यां मंगळावर उतरले. १७७६ - अमेरिकेने स्वतःला इंग्लंडपासून स्वतंत्र जाहीर केले. 💥 जन्म :- १८९८ - गुलजारीलाल नंदा, भारतीय पंतप्रधान. १९३० - जॉर्ज स्टाइनब्रेनर, अमेरिकन उद्योगपती. १९४३ - हराल्डो रिव्हेरा, अमेरिकन पत्रकार. 💥 मृत्यू :- १९०२ - स्वामी विवेकानंद, भारतीय तत्त्वज्ञ. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस पक्षाच्या घटनेनुसार हंगामी अध्यक्षपदी काँग्रेसचे सर्वात जेष्ठ सरचिटणीस मोतीलाल व्होरा यांची झाली निवड* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *'दूध अन् अन्नभेसळीचा 'फैसला ऑन दी स्पॉट', राज्यातील पहिल्या "मोबाईल फूड टेस्टींग लॅब"चा शुभारंभ राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आले.* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *नवी दिल्ली : डबघाईला आलेल्या बीएसएनएल आणि एमटीएनएल या सरकारी दूरसंचार कंपन्यांसाठी ७४ हजार कोटी रुपयांच्या बेलआऊट पॅकेजवर सरकार विचार करीत आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *देशद्रोहाचा कायदा गरजेचा, तो रद्द करणार नाही, नरेंद्र मोदी सरकारचं ठाम उत्तर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *Budget 2019: यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प बांधकाम क्षेत्रासाठी असणार 'स्पेशल'; 2022 पर्यंत सर्वांना घरं देण्याचं उद्दिष्ट* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *भारतीय संघातील मधल्या फळीतील फलंदाज अंबाती रायुडूचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *ICC World Cup 2019 : न्यूझीलंडवर विजय मिळवत इंग्लंड उपांत्य फेरीत दाखल, इंग्लंडचा 119 धावांनी दणदणीत विजय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *लघुकथा - मुलगी* https://storymirror.com/read/story/marathi/ah72vg9p/mulgii/detail वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ कथालेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *डायनासोरचा विनाश केव्हा झाला ?* पृथ्वीचं पर्यावरण सतत बदलत असतं. निसर्गाचा तो नियमच आहे. सजीवसृष्टीवर या बदलांचा प्रभाव पडतच असतो. त्यामुळे या बदलांशी मिळतंजुळतं घेत तगून राहण्याची क्षमता या सजीवांच्या प्रजातींमध्ये असते त्यांची वाढ होते, विकास होतो. ती प्रजाती तगडी होते. नैसर्गिक साधनसंपत्तीचा जास्त वापर तिच्याकडून होतो. सहाजिकच तुलनेने दुबळ्या असणाऱ्या प्रजातींची हळूहळू पिछेहाट होत कालांतराने ती प्रजाती नष्ट पावते. आजवर अशा अनेक प्रजातींचा उदय झाला, विकास झाला, काही काळ या पृथ्वीतलावर नांदल्या आणि हळूहळू विनाश पावल्या. आपण ज्या मनुष्यजातीत मोडतो त्या होमो सपायन्स या प्रजातीचा उदय होण्यापूर्वीही होमो इरेक्ट्स, निआनडर्थल वगैरे मानवासारख्या प्रजाती या भूमितलावर नांदत होत्या. पण त्या होमो सपायन्सइतक्या पर्यावरणाशी जुळवून घेण्याच्या बाबतीत तगड्या नसल्यामुळे विनाश पावल्या. निरनिराळ्या प्रजातींची उत्क्रांती करण्याचे असे प्रयोग निसर्गाकडून नेहमीच होत आले आहेत. त्यातले जे यशस्वी झाले त्या प्रजाती आज आपल्याला सभोवार दिसतात. जे प्रयोग अयशस्वी झाले त्या प्रजाती आता नष्ट झाल्या आहेत. डायनोसॉर ही अशीच एक प्रजाती होती. तिचा उदय निसर्ग नियमांनुसार झाला. तब्बल साडेसोळा कोटी वर्ष ती प्रजाती या भूमितलावर नांदली. त्या वेळेची ती सर्वात प्रबळ प्रजाती होती. पण कालांतराने तिचा विनाश झाला तो मात्र उत्क्रांतीच्या नियमानुसार झाला नव्हता. एका विलक्षण अपघातापोटी ती दुर्घटना झाली. अवकाशातून एक अजस्त्र लघुग्रह पृथ्वीवर येऊन आदळला. आज जिथे मेक्सिको आहे साधारण त्या प्रदेशात हा अाघात झाला. तो आघात इतका भयानक होता की तो लघुग्रह पृथ्वीचं कवच फोडून तिच्या पोटात घुसला. त्यातून मोठ्या प्रमाणावर धूळ, कचरा आकाशात फेकला गेला, आगी लागल्या, ज्वालामुखींचे उद्रेक झाले, त्सुनामी आली, प्रचंड वादळं झाली, तीव्र अाम्लवर्षा कोसळली. पृथ्वीच्या पर्यावरणात उलथापालथ होत सल्फ्युरिक आम्ल, नायट्रिक आम्ल यांचं प्रमाण वाढलं. स्फोटासारख्या त्या आघातामुळे उष्णतेची लाट पसरली. तिच्या मार्‍यात सापडलेले सजीव वाचू शकले नाहीत. त्याचबरोबर आकाशात पसरलेल्या धुळीच्या आवरणामुळे सूर्यप्रकाश अडवला गेला. पृथ्वीवरचं सरासरी तापमान घसरलं. वनस्पतींना वाढीसाठी सूर्यप्रकाशाची अत्यंत गरज असल्यामुळे त्यांचा विनाश होत गेला. पर्यावरणातल्या या अचानक आलेल्या बदलांशी मिळतेजुळते घेण्यासाठी आवश्यक तितका वेळही मिळाला नाही. त्यामुळे त्यात तगून राहण्याची क्षमता असलेले सजीवही नष्ट होत गेले. या अस्मानीसुलतानीपुढे डायनासाॅरसारख्या तगड्या प्रजातीचा टिकाव लागला नाही. ही घटना धरतीच्या इतिहासातील क्रेटेशियस कालखंडाच्या अखेरीस आणि टर्शरी कालखंडाच्या आरंभाच्या सुमारास म्हणजे साडेसहा कोटी वर्षांपूर्वी झाली. *बाळ फोंडके यांच्या 'केव्हा ?' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जो संपुर्ण वर्षाचा विचार करतो,तो धान्य पेरतो. जो पुढील दहा वर्षाचा विचार करतो, तो झाडे लावतो..जो आयुष्यभराचा विचार करतो, तो माणूस जोडतो..आणि जो माणसं जोडतो, तोच आयुष्यात यशस्वी होतो.... *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *कार्यक्रमाच्या शेवटी वंदे मातरम गाण्याची प्रथा कोणी सुरू केली ?* विष्णू दिगंबर पळसकर 2) *राष्ट्रगीत प्रथम कोणत्या भाषेत लिहिले गेले ?* बंगाली 3) *'चले जाव' ही घोषणा कोणी दिली ?* महात्मा गांधी 4) *'आराम हराम है' ही घोषणा कोणी दिली ?* पं जवाहरलाल नेहरू 5) *'शिका,संघटित व्हा,संघर्ष करा ' ही घोषणा कोणी दिली ?* डॉ बाबासाहेब आंबेडकर *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● बंडू अंबटकर ● बंडोपंत लोखंडे ● गोविंद कवळे ● वृषाली सानप काळे ● कमलाकर जमदाडे ● प्रदीप यादव ● अविनाश खोकले ● श्याम उपरे ● उदय स्वामी ● प्रभाकर शेळके ● परमेश्वर म्हेत्रे ● श्रीधर जोशी ● नवनाथ मुसळे ● राजकुमार बिरादार ● बालाजी मंडाळेकर ● गणेश मंडाळे ● प्रकाश भादेकर ● शहेबास खुरेशी *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कुटुंब संस्थेचा मध्यवर्ती केंद्रबिंदू म्हणजे घर. घराचे आकर्षण फक्त मानवालाच असते असे नाही, तर पहाटेपूर्वी आकाशात भरारी घेतलेले पक्षी, माळरानावर चरण्यासाठी गेलेली जनावरे सायंकाळी आपल्या घराकडे वळतात. घर हे माणसांइतकेच पशुपक्षी, जनावरांना हक्काचा निवारा वाटते. पूर्वीची घरे एकत्र कुटुंबपद्धतीला सामावून घेणारी होती. दोन-तीन पिढ्यांचे लोक गुण्यागोविंदाने एकत्र रहायचे. लहान मुला-मुलींच्या किलबिलाटाने घराचे गोकुळ होऊन जात असे. घराच्या भिंती फक्त दगड मातीच्या नव्हत्या, तर त्या प्रेम, जिव्हाळ्याने रसरसलेल्या होत्या. नातेसंबंध नुसते नातेसंबंध नव्हते, तर नात्यात मायेची ऊब होती.* *आज वृद्धांच्या समस्या 'आ' वासून उभ्या आहेत. मुलं परमुलखात गेल्यामुळे एकाकी पडलेली वृद्ध मंडळी एका बाजूला दिसतात, तर दुसरीकडे घरात मुलं, सुना, नातवंडे असूनही अवहेलनेने भरलेले एकाकीपण जगणारी वृद्ध मंडळी दिसत आहेत. समृद्ध संसारातील एक अडगळ म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातंय. मुला-लेकरांच्या सुखासाठी तुफान होऊन झगडलेल्या माता पित्यांना 'थकलेल्या तुफानाला कुणी घर देता का घर...?' असं म्हणत भटकायची वेळ येते. अशी अनेक झुंजलेली तुफानवादळे रस्त्याकडेला, पुलाखाली, किंवा वृध्दाश्रमात नशिबाला दोष देत कण्हत पडलेली दिसतात.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जहाँ न जाको गुन लहै, तहाँ न ताको ठाँव । धोबी बसके क्या करे, दीगम्बर के गाँव ॥ अर्थ : जिथे आपल्याला पात्रता व योग्यतेनुसार गुण व कौशल्य दाखवण्यासाठी कार्य कर्तृत्त्व करण्यास वावच नसेल तिथे राहून काय हशील होणार आहे ? तिथे राहाणे व्यर्थच आहे. ही बाब पटवून देताना महात्मा कबीर म्हणतात की, ज्या गावात सर्व दिगंबरच (कपडे विरहित लोक) राहातात तिथे राहून धोब्याला काय उपयोग होणार आहे ? कला ही जीवनाची सावली मानली जाते. 'कलेनेच माणसाची ओळख । एरव्ही कोण पुसतो आणिक ? तुम्ही आहात राव की रंक । आता कोणी पुसेना ।' असे राष्ट्रसंत तुकडोजी ग्रामगीतेत म्हणतात. कलावंतानं आपली कला जीवनाचा आधार केली व कलेचा अहंकार अंगी न बाळगता तिला विनयशीलतेची जोड दिली की सर्व जग आपलंस होवून जातं. आपलं कसब व कौशल्य अशा ठिकाणी दाखवायला हवं की ते आपल्या जीवनाला स्वावलंबनाकडे नेईल. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जेव्हा आपली वेळ वाईट असते तेव्हा आपल्याकडे लोक पाठ फिरवतात आणि जेव्हा आपली वेळ चांगली असते तेव्हा सगळेच जवळ येतात. परिस्थिती कशीही असली तरी प्रत्येकवेळी सुखदुःखात जे आपल्या पाठीशी असतात आणि आपण प्रत्येकवेळी कोणत्याही गोष्टीचा विचार न करता पाठीशी असतो तीच खरी माणुसकी असते आणि तीच खरी अंत:करणातून एकमेकांबद्दलची खरी आत्मियता असते. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *रेघ लहान झाली.* अकबर आणि बिरबल एकदा फिरायला गेले होते. चालता चालता बादशाह अचानक थांबला. बादशहाने वाळूत बोटाने एक रेघ मारली आणि बिरबलाला विचारले. “ही रेघ पाहिलीस? ही रेघ लहान करायची, पण पुसायची नाही, जमेल तुला?” बिरबलाने एकवेळ बादशहाकडे व एकवेळ रेघेकडे पाहिले.  थोडा विचार केला. पटकन खाली वाकला. रेघेशेजारी दुसरी लांब रेघ मारली आणि म्हणाला, “झाली की नाही महाराज तुमची रेघ लहान?” बादशाह चकित होऊन पाहतच राहिला! *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 03/07/2019 वार - बुधवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *महाकवी कालिदास जयंती* 💥 ठळक घडामोडी :- १८५२ - महात्मा फुले यांनी अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू केली. २००४ - थायलंडची राजधानी बँगकॉकची भुयारी रेल्वे सुरू. २००६ - २००४ एक्स.पी.१४ हा लघुग्रह पृथ्वीच्या जवळून (साधारण चंद्राइतक्या अंतरावरून) गेला. 💥 जन्म :- १९०९ - भाऊसाहेब तारकुडे, भारतीय स्वातंत्र्यसैनिक, कायदेतज्ज्ञ. १९२४ - सेल्लप्पन रामनाथन, तमिळवंशीय सिंगापुरी राजकारणी, सिंगापुराच्या प्रजासत्ताकाचा ६वा राष्ट्राध्यक्ष. १९८० - हरभजनसिंग, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- १३५० - संत नामदेव (पंढरपूर येथे समाधिस्थ). १९१८ - महमद पाचवा, ओट्टोमन सम्राट. १९३३ - हिपोलितो य्रिगोयेन, आर्जेन्टीनाचा राष्ट्राध्यक्ष. १९३५ - आंद्रे सिट्रोएन, फ्रेंच अभियंता. १९९६-कुलभूषण पंडित तथा राजकुमार हिंदी चित्रपट अभिनेता *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *मुंबई : जुन्या पेन्शन योजनेत बाबत नवीन अध्यादेश काढून शिक्षकांना पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी राष्ट्रवादीचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत केली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *चार दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे चिपळूणमधील तिवरे धरण फुटले; २३ जण वाहून गेल्याची भीती, एनडीआरएफची टीम दाखल, बचावकार्य सुरु* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *मुंबई : राज्यात सात नवीन सरकारी वैद्यकीय महाविद्यालये उभारण्यास केंद्र सरकारने दिली मंजुरी, उस्मानाबाद, परभणी, रायगड, सिंधुदुर्ग आदी जिल्ह्यांमध्ये नवीन वैद्यकीय महाविद्यालये उभारण्यात येणार असल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी विधान परिषदेत दिली माहिती.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *नवी दिल्ली - लोकसभेत भारतीय वैद्यकीय परिषद सुधारणा विधेयक मंजूर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *बीड : थकीत वेतनासाठी परळी नगर पालिकेच्या 250 कंत्राटी सफाई कामगाराचे काम बंद आंदोलन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *बर्मिंगहॅम : रोहित शर्माचे शतक आणि दमदार गोलंदाजीच्या जोरावर भारताने बांगलादेशला 28 धावांनी पराभूत केले. या विजयासह भारताने उपांत्य फेरीत केला प्रवेश* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *ICC World Cup 2019 : आज इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात होणार सामना* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *लघुकथा - वाढदिवसाची भेट* https://storymirror.com/read/story/marathi/989bz200/vaaddhdivsaacii-bhett/detail वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ कथालेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌧 *पाऊस केव्हा पडतो ?* 🌧 पाऊस आपल्याला हवाहवासाही वाटतो आणि नकोनकोसाही वाटतो. वैशाखवणव्यापायी धरती सुकून गेलेली असली, पावसाविना डोळ्यांना पाणी येऊ लागलं की आपण 'येरे येरे पावसा' अशी त्याची आळवणी करतो. आणि तोच पाऊस रुद्रावतार धारण करत आला की नको नको रे पावसा, असा धिंगाणा म्हणून त्याला दटावतोही. जगाच्या पाठीवर आपल्या उपखंडांसारखे इतरही काही प्रदेश आहेत की जिथलं सारं जीवनचक्र, सारं अर्थकारण पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलं तरी तो वर्षभरातून तीन चार महिनेच आपली हजेरी लावून जातो. उलट काही प्रदेशांत वर्षभर त्याची उपस्थिती असते. त्यामुळं पाऊस केव्हा पडणार आहे, याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलेलं असतं. धरतीवर असलेलं एकूण पाणी कायम असतं. त्यात वाढही होत नाही की घटही होत नाही. पण त्याचं सतत अवस्थांतर सुरू असतं. समुद्र तसंच नद्या नाले यांच्यामधलं पाणी प्रदूषित झालेलं असतं. सूर्याच्या उष्णतेनं त्याची वाफ होते. तापलेल्या पाण्याच्या जवळ असलेली हवाही तापते. तापलेली हवा आणि वाफ हलकी असल्यामुळे ती आकाशात वरवर जाते. वर गेल्यावर तिथलं तापमान थंड असतं. त्यामुळे त्या वाफेचं पाण्याच्या छोट्या छोट्या थेंबामध्ये अवस्थांतर होतं. हे थेंब हवेत तरंगत राहतात. वाफ आणि हे जलबिंदू मिळून ढग तयार होतात. वाऱ्याने हे ढग इकडेतिकडे फिरत राहतात. त्यांना थंड हवा लागली की त्यातल्या आणखी वाफेचे जलबिंदूंमध्ये अवस्थांतर होते. हे जलबिंदूही वेडेवाकडे फिरत असतात. एकमेकांवर आपटतात. त्यातले काही एकत्र येऊन त्यांचं आकारमान वाढतं. असे ते मोठे आणि जड झाले की तरंगू शकत नाहीत. जमिनीच्या दिशेने झेपावतात. वारे त्यातल्या काही बिंदूंना परत वरच्या दिशेने ढगांमध्ये ढकलतात. ही चढाओढ चालू राहत ते जलबिंदू आणखी मोठे होतात. आता ते हवेत तरंगू शकत नाहीत. जमिनीकडे खेचले जातात. पाऊस पडतो. हे पावसाचं पाणी शुद्ध झालेलं असतं. त्यातले प्रदूषण नाहीसे झालेले असतात. परत एकदा शुद्ध आणि गोड्या पाण्याचे साठे पूर्ववत होतात. असं हे जलचक्र अव्याहत चालूच असतं. उत्तर गोलार्धात विषुववृत्ताच्या जवळपास असणारा प्रदेश जास्त तापमानाचा असतो. जसजसं अधिकाधिक उत्तरेला जावं तसतसं तापमान घसरत जातं. त्यामुळे दक्षिणेकडून उबदार हवेचे झोत उत्तरेकडे आणि उत्तरेकडून थंड हवेचे झोत दक्षिणेकडे प्रवास करत असतात. त्यांच्या तापमानांमध्ये लक्षणीय फरक असल्यामुळे जिथं ते दोन एकमेकांना भिडतात तिथं ते एकमेकांमध्ये मिसळू शकत नाहीत. त्यांच्या सीमेवर फ्रंटल सिस्टम तयार होते. पुढे पुढे सरकत राहते. गरम हवा हलकी असल्यामुळे तिला पुढे पुढे येऊ पाहणाऱ्या थंड हवेच्या झोतावर चढावं लागतं. तसं झालं की ती थंड होते. तिच्यातल्या वाफेचं पाण्यात अवस्थांतर होऊन पाऊस पडतो. *बाळ फोंडके यांच्या 'केव्हा ?" या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• स्वभावातील गोडीने व जिभेवरील माधुर्याने माणसं जोडली जातात. *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *'झेंडा उंचा रहे हमारा' हे झेंडागीत कोणी लिहिले ?* श्यामलाल गुप्त 2) *'खरा तो एकची धर्म' ही प्रार्थना कोणी लिहिली ?* साने गुरुजी 3) *'सारे जहाँ से अच्छा' हे गीत कोणी लिहिले ?* डॉ महम्मद इकबाल 4) *'बलसागर भारत होवो' ह्या गीताचे रचनाकार कोण ?* साने गुरुजी 5) *भारताचे दोन राष्ट्रगीते कोणते ?* जन गण मन , वंदे मातरम *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● विजय लंके ● सुनील रेगुलवाड ● श्रीराम पाटील ● कुलदीप महाराज ● बालाजी मुंडलोड ● उत्तमराव नरवाडे ● सविता सावंत ● संतोष नलबलवार ● दिगंबर माने ● साहेबराव कांबळे ● लक्ष्मीकांत गिरोड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *तसं पाहिलं तर आपल्यापैकी बहुतेकांचं जीवन साचेबद्ध असतं. घर आणि नोकरी किंवा घर आणि व्यवसाय अशा दोन विश्वांतलं आपलं जीवन. त्यामधील माणसांभोवती फेर धरणारं जगणं. आपण स्वत:साठी जगत असतो; परंतु आई-वडिल, भावंडे, पती-पत्नी आणि मुलं, मित्र-मैत्रिणी, सहकारी यांच्यासाठीही जगत असतो. शिकत असतो त्यावेळी उत्तम गुण मिळवून परिक्षा उत्तिर्ण होण्याचं स्वप्न असतं आपलं. शिक्षणानंतर स्वप्न असतं ते करिअरचं. नोकरी वा व्यवसायात स्थिरावण्याचं आणि त्यानंतर स्वत:च्या कुटुंबाचं, घराचं. लग्नाचं आणि मग मुला-मुलींना वाढवण्याचं. म्हटलं तर हे चक्रच. त्या-त्या काळातील आपली महत्वकांक्षा हे चक्र फिरवित असते.* *महत्वकांक्षा हे एक मानवी मूल्य आहे. विद्यार्जनासाठी, कर्तृत्वासाठी, स्वयंप्रेरणेसाठी ते आवश्यकच असते. महत्वाकांक्षा नसेल तर मग आपण कशाचा ध्यास घेणार आणि त्याच्या मागे धावणार? आपली इच्छा असो वा नसो, आपण स्पर्धेत ओढलो जातोच. महत्वाकांक्षा आपल्यामधील स्पर्धात्मकता वाढविते, कष्ट करायला प्रेरणा देते, चिकाटी निर्माण करते. निसर्गाकडून आपल्या प्रत्येकाला कमी'-आधिक प्रमाणात प्रतिभाशक्ती मिळालेली असते. वैयक्तिक जीवनात महत्वाकांक्षा जशी आवश्यक, तशी ती समाजजीवनातही गरजेची आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळकांनी, गांधीजींनी, नेहरूंनी देशाला गुलामगिरीतून मुक्त करण्याची आकांक्षा बाळगली. देशवासियांना एकत्र करून त्यांनी त्याची पूर्ताताही केली. महत्वाकांक्षा समाजासाठी अशा प्रकारे उपयुक्त ठरते.* ••● ‼ *रामकृष्णहरी* ‼●•• ⭐🔹🔹🔹🔹🔹🔹⭐ *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल- 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  🌟! !  *कबिराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• कबीर जीवन कुछ नहीं, खिन खारा खिन मीठ कलहि अलहजा मारिया, आज मसाना ठीठ। सारांश जीवन क्षणभंगूर आहे. क्षणापूर्वी ते होते अन क्षणानंतर ते असेल अशी कोणीही खात्री देवू शकत नाही. जीवनाची नश्वरता पटवून देताना महात्मा कबीर म्हणतात, जीवन म्हणजे काहीही नाही. या क्षणाला ते खारट अनुभव देत असेल तर दुसर्‍या क्षणी ते कडवटपणाला गोडीमध्ये बदलू शकते. जीवनाचा मधूर अनुभव देवु शकतं. जो वीरयोद्भा काल युद्धामध्वे आपलं नैपुण्य पणाला लावून बाजी प्राणपणाने लढून आपल्या बाजूने ओढून आणण्यामध्ये यशस्वी झाला म्हणून त्याचे सर्वत्र कौतुक सोहळे साजरे झाले. सर्वांनी जयमाला गळ्यात घालून त्याचा जय जयकार केला गेला. ज्याने काल मैदान मारले तो स्वतःच आज चितेवर स्मशानी निपचित अचेतन पडला आहे. मृत्यूने भल्याभल्यांना सोडलेले नाही. तिथे सामान्य जीवांचं काय खरं आहे. घारीने भक्ष्यावर झडप घालावी तशी काळ कोणत्याही क्षणी झडप घालू शकतो, म्हणून माणसानं आपल्या हाती जे काही आयुष्य शिल्तक राहिले आहे. त्याचा सदुपयोग करून घ्यायला हवा व जीवन सत्कारणी लावायला हवे , म्हणजे सत्कर्माच्या किर्तीने मृत्यू पश्चातही जीवनाचा परिमल दरवळत राहातो. मृत्यू साक्षात पुढ्यात उभा राहिला तरी त्याचे भय राहात नाही एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• काळजी केल्याने कोणतेच प्रश्न मिटत नसतात तर अनेक प्रश्न तुमच्यासमोर उभे टाकतात.त्या काळजीमध्ये तुमच्या आजच्या कामावर लक्ष नसल्यामुळे तुमचे काम निकृष्ट दर्जाचे होऊ शकेल.त्यामुळे तुम्ही अधिक काळजी करायला लागाल.त्यापेक्षा काळजी न करणे सर्वात मोठा शहाणपणा आहे.ज्याची तुम्हाला काळजी वाटते त्याकडे लक्ष न घालणे सगळ्यात चांगले.आजच्या कामात अधिक लक्ष घातले आणि मन लावून काम केले तर त्या कामात गढून जाल.चांगले काम झाल्याचे समाधान तर वाटेलच आणि काळजी पण दूर होईल.काळजी कोणतीही असो.आजची असो की उद्याची.तो काळ तुमच्या काळजीमुळे थांबणार का ? नाही ना.मग आपले मन प्रसन्न ठेवा.येणा-या आणि हाती असलेल्या कामात अधिक लक्ष घाला मग तुम्हाला तुमचे समाधान मिळेल.समाधान हे काळजीला उत्तम पर्याय आहे हे कधीही विसरु नका. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०. 💠🌹💠🌹💠🌹💠🌹💠 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *चोरीची कबुली* एके दिवशी एक श्रीमंत व्यापारी बिरबलाकडे आला आणि म्हणाला, माझ्या घरी कोणीतरी चोरी केली आहे. माझे दागिने चोरले आहेत. माझ्या घरी दहा नोकर आहेत. त्यांच्यापैकीच कोणीतरी ते चोरले असल्याचा माझा संशय आहे. मी त्यांच्यापैकी सगळ्यांना विचारले पण त्यातील एकजणही कबूल झाला नाही. कृपा करून तुम्ही यातून काहीतरी मार्ग काढा. बिरबल त्या व्यापार्‍याच्या घरी गेला. त्याने त्या दहाही नोकरांना एकत्र बोलावले व त्यांना म्हणाला, की माझ्याकडे दहा जादूच्या काठ्या आहेत. त्या मी तुम्हाला देत आहे. या काठ्यांचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व काठ्या समान आहेत. मी त्या तुम्हाला देत आहे. आज तुमच्याकडे ठेवा व उद्या मला परत करा. ज्याने चोरी केली असेल, त्याची काठी रात्रीत एक इंचाने वाढेल. दागिने चोरणारा नोकर घाबरला. आपली चोरी पकडली जाईल म्हणून तो काठी एक इंचाने कापतो. त्याला वाटते की सकाळी ती परत एक इंचाने वाढेल व कुणाला काही कळणार नाही. दुसर्‍या दिवशी बिरबलाने नोकरांच्या हातातील काठ्या पाहिल्या. त्याला एका नोकराची काठी छोटी झाल्याचे आढळले. त्याच्याकडे बोट दाखवत बिरबल म्हणाला, 'हा नोकर चोर आहे. त्यानेच तुमचे दागिने चोरले.' शेवटी त्या नोकरानेही ते कबूल केले व त्या व्यापार्‍याचे दागिने परत केले. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 02/07/2019 वार - मंगळवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- २००० - मेक्सिकोमध्ये ७० वर्षे पार्तिदो रेव्होल्युसियोनारियो इन्स्तित्युसियोनाल या पक्षाच्या सत्तेचा अंत होउन पार्तिदो ॲक्सियाँ नॅसियोनाल पक्षातर्फे व्हिसेंते फॉक्सची राष्ट्राध्यक्षपदी निवड. २००१ - ॲबिकोर स्वयंचलित हृदयाचे सर्वप्रथम आरोपण. २००२ - स्टीव फॉसेट हा उष्णहवेच्या फुग्याद्वारे पृथ्वीप्रदक्षिणा करणारा सर्वप्रथम व्यक्ती झाला. २०१० - काँगोच्या लोकशाही प्रजासत्ताकात ट्रकचा स्फोट होउन किमान २३० व्यक्ती ठार 💥 जन्म :- १८८० - गणपतराव बोडस, मराठी संगीत नाटकांतील गायक-अभिनेता १०२९ - अल-मुस्तांसिर, कैरोचा खलिफा. १८२१ - चार्ल्स टपर, ऑस्ट्रेलियाचा पंतप्रधान. १८६२ - विल्यम हेन्री ब्रॅग, नोबेल पारितोषिक विजेता इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ. १८७६ - विल्हेल्म कुनो, जर्मनीचा चान्सेलर. १८७७ - हेर्मान हेस, नोबेल पारितोषिक विजेता जर्मन लेखक. 💥 मृत्यू :- १९२८ - नंदकिशोर बल, उडिया भाषेतील कवी, कादंबरीकार १९३२ - मनुएल दुसरा, पोर्तुगालचा राजा १९६३ - सेट बार्नेस निकोल्सन, अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ. १९९६ - राजकुमार, हिंदी अभिनेता *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* *जि प शाळा बिरसी* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *मराठा समाजास शिक्षणात १२, तर नोकऱ्यांत १३ टक्के आरक्षण; विधिमंडळात सुधारणा विधेयक एकमताने मंजूर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *पावसाच्या धिंगाण्याने मुंबईकरांचे हाल; पालघरमध्ये नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली, ठाण्यात संततधार* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *राहुल गांधींनीच राजीनामा मागे घ्यावा, या मागणीसाठी सुशीलकुमार शिंदे यांचीच आघाडी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *मुंबईतल्या ५०० फुटांच्या औद्योगिक, व्यापारी आणि निवासी गाळ्यांचा मालमत्ता कर माफ करण्याचे विधेयक आज विधान परिषदेत एकमताने झाले मंजूर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *आता कॉलेज मध्येच मिळणार लर्निंग लायसन्स; परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *ICC World Cup 2019: टीम इंडिया उपांत्य फेरीसाठी आज बांगलादेशविरुद्ध भिडणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : ऐन वेळी कच खाल्यामुळे श्रीलंकेविरुद्धच्या लढतीत वेस्ट इंडिजला पत्करावा लागला पराभव* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *लघुकथा - परतफेड* https://storymirror.com/read/story/marathi/ddi4xdrw/prtphedd/detail वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ कथालेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• "म्हसवे'' च्या वटवृक्षाची महती सातारा जिल्ह्यातील म्हसवे (ता. जावळी) येथील वटवृक्षाचा "वंश‘ तब्बल अडीच एकर परिसरात विस्तारला असून, तो विस्ताराने आशिया खंडात दुसऱ्या क्रमांकाचा आहे. पाचवड-कुडाळ रस्त्यावर पाचवडपासून पाच किलोमीटर अंतरावर म्हसवे गावानजीक हे वडाचे झाड आहे. या गावात देशातील सर्वांत जुने आणि विस्ताराने मोठे असे वडाचे झाड आहे. या वटवृक्षामुळेच गावाला "वडाचे म्हसवे‘ या नावाने ओळखले जाते. या वटवृक्षाची ब्रिटिशकालीन "फ्लोरा ऑफ बॉम्बे प्रेसिडेन्सी‘मध्ये प्रथम क्रमांकाचा वटवृक्ष म्हणून नोंद आहे. 1882 मध्ये ली वॉर्नर या ब्रिटिश अधिकाऱ्याने सातारा जिल्ह्यातील या वडाच्या झाडाचा उल्लेख केला आहे. 1903 मध्ये पुण्याच्या सायन्स कॉलेजचे प्राचार्य असलेल्या कूक थिओडोर या ब्रिटिशाने पश्चि्म घाटावरील वृक्षाची नोंद असलेले पुस्तक लिहिले आहे. त्यातही या वृक्षाची नोंद आहे. विस्ताराने मोठ्या असलेल्या या वटवृक्षावर पशुपक्ष्यांचे मोठ्या संख्येने वास्तव्य असते. वटवाघूळ, बुलबुल, सातभाई, भारद्वाज आदी 28 प्रजातींचे वास्तव्य आढळते. झाडाच्या सुमारे शंभर पारंब्यांचे खोडात रूपांतर झाले आहे. त्यामुळेच सुमारे दोनशे वर्षांहून अधिक काळाचे हे झाड अद्याप टिकून आहे. वडच का लावावा? -एक परिपूर्ण वड सुमारे 35 हजार जिवांना अभय-आश्रय देतो. -पाच वातानुकूल यंत्रे उघड्या वातावरणात 24 तास चालू ठेवल्यावर त्याचा वातावरणावर जो परिणाम दिसून येईल तो परिणाम एक पूर्ण वाढ झालेले वडाचे झाड देते. -जिथे वड, तेथील एक किलोमीटर परिसरात हमखास पाणी सापडते. *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *Work is worship.* ( कर्म हीच पूजा आहे. ) *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *भारताची अर्थव्यवस्था कोणत्या प्रकारची आहे ?* मिश्र 2) *'दक्षिण भारताची गंगा' असे कोणत्या नदीला म्हणतात ?* गोदावरी (1498 km) 3) *गोदावरी नदीचा उगम कोठे झाला ?* नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबक गावामागे सह्यांद्रीतील ब्रह्मगिरी डोंगरावर 4) *'तुम मुझे खून दो, मै तुमे आझादी दुगा' असे कोणी म्हटले ?* सुभाष चंद्र बोस 5) *राष्ट्रगीताला अधिकृत मान्यता केव्हा मिळाली ?* 24 जानेवारी 1950 *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● विक्रांत दलाल ● शिवानंद चौगुले ● पंडीत दगडगावे ● शैलेश तरले ● वसंत पाटील घोगरे ● श्रीनिवास पुलावार ● जेजेराव सोनकांबळे ● चिमणाजी हिवराळे ● लक्ष्मण कुमार ● मारोती जाधव ● साईनाथ सावंत ● बाबू हतोडे ● शिवा पांचाळ ● गोपाळ पामसकर *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सारा अंधारच प्यावा* *अशी लागावी तहान ॥* *एका साध्या सत्यासाठी* *देता यावे पंचप्राण ॥* *असं जगावेगळ पसायदान कवी म.म.देशपांडे यांनी 'तहान' या कवितेत मागितलं आहे. त्याचं तीव्रतेने स्मरण व्हावं अशी परिस्थिती आज आपल्या देशात आहे. कोणत्याही क्षेत्राकडे जा सारा अंधार आहे. अपवाद वगळले तर वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनातून सत्य हद्दपार झालेलं आहे. असत्याच्या अंधारात संवेदनशील मनाची घुसमट होत आहे. 'सत्यमेव जयते' ही या देशाची घोषमुद्रा आहे. तथापि समाजाचं, देशाचं नेतृत्व करणा-यांपासून तर रूग्णांची सेवा करण्याची शपथ घेतलेल्या डाॅक्टरांपर्यत सर्वांनी तिचे पदोपदी धिंडवडे काढले आहेत. सर्वच क्षेत्रात असत्यानं, अप्रमाणिक वृत्तीनं थैमान घातलं आहे. स्वातंत्र्योत्तर काळात भारतमातेची दु:स्थिती आधिकच चिंतनीय झाली आहे. 'सत्य हे जीवनमूल्य लोप पावत आहे. 'असत्य' उजळ माथ्यानं वावरत आहे.* *खरंतर सत्य, सत्याचा शोध, सत्याचा उद्धार आणि आचरण, सत्याचा पुरस्कार याला वैभवशाली परंपरा आहे. भीष्मनिती सांगते, 'सत्य हे प्रत्येक माणसाचं कर्तव्य आहे. माणसाचा सर्वश्रेष्ठ आधार आहे. शाश्वत कर्तव्य आहे. आसक्तीचं जाळ फक्त सत्यच तोडू शकतं. सत्य म्हणजेच अमरत्व. सत्यासाठी केलेला त्याग मानवी जीवनात सर्वश्रेष्ठ आनंदाचा उगम असतो. सदाचरणी माणूसच इतरांच्या हितासाठी दक्ष असतो आणि या मार्गानंच त्याचं स्वत:चही हित साधलं जातं. सत्यासारखं तप, पुण्य नाही. असत्यासारखं पाप नाही. ज्याच्या ह्रदयात सत्य असतं त्याच्या ह्रदयात परमशक्ती वास करते.* ••● ‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆 *संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  🌟! !  *कबिराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• कबीर गाफील क्यों फिरय, क्या सोता घनघोर तेरे सिराने जाम खड़ा, ज्यों अंधियारे चोर । सारांश महात्मा कबीर मृत्यूची आठवण करून देतात. हे मानवा तुला असा दुर्मिळ मनुष्य जन्म मिळालेला असताना तू असा गाफिलासारखा का फिरत आहेस ? कोणत्या घणघोर अंधार्‍या काळ कोठडीत तू स्वतःला जखडून घेत आहेस ? कुठल्याही संपत्तीच मोल देवूनही हा जन्म परत मिळणारा नाही . तुला मिळालेले ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रिये तुझ्या मुक्तीसाठीच विधात्याने दिलेली सर्वात महान भेट आहे. इत्तर प्राण्यांपेक्षा तू विधात्याला अधिक प्रिय म्हणून बुद्धी व बोलीचं अधिकचं वरदान तुला दिलं तर तू त्या वैभवाचा वापर करून या सृष्टीचा स्वर्ग करण्यासाठी धडपडायला पाहिजेस ! स्वर्ग निर्माणाचं जाऊ दे , किमाण या सृष्टीला तरी विद्रुप करण्याचं कुकर्म करू नकोस ! हे वैविध्पाने भरलेले जग तुझ्याचसाठी आहे .याच्याकडे डोळे उघडे ठेवून पाहिलेस. त्याच्या रचनेला धक्क् न देता त्याचा मानव कल्याणासाठी वापर करून घेतलंस तर भविष्य सुंदर नाही तर निसर्ग प्रकोप ठरलेलाच. तू कितीही सावध वागण्याचा प्रयत्न करीत असलास तरी हा मृत्यू रूपी चोर तुझ्यावर सारखी पाळत ठेवून आहे. तू भौतिक सुखसोयींचा कितीही इधार घेतलास तरी काचाच्या बंदिस्त महालातूनही तुझ्यातल्या चैतन्यरूपी आत्म्याला तो कोणत्याही क्षणी उचलल्याशिवाय राहाणार नाही. तेव्हा तू ज्या शरीर व रूपाला मोहवून हुरळून जातोस त्यापेक्षा सृष्टीकडं पाहाण्याची दिव्य दृष्टी देणार्‍या आत्मदृष्टीची जडणघडण चांगली होण्यासाठी मनाचा निकोप विकास होणे गरजेचे आहे. सुंदर मनेच सुंदर सुष्टी देवू शकतात. तेव्हा अज्ञानाचा अंधःकार दूर करून सत्यरूपी ज्ञान जाणून घे. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• व्यक्ती कितीही मोठी असेल परंतु संस्कार आणि ज्ञान नसेल तर त्याच्या मोठेपणाचा काहीच अर्थ नाही. कोणतीही व्यक्ती लहान असो किंवा मोठी असो ज्यांच्याजवळ संस्कार,नम्रता, सहनशीलता आणि ज्ञान आहे तीच व्यक्ती सर्वश्रेष्ठ ठरु शकते आणि तीच व्यक्ती जगाला प्रिय असते. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 📚🌸📚🌸📚🌸📚🌸📚 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *उपकाराचे स्मरण ठेवावे* एकदा एक श्रीमंत माणूस नदीकाठावरील मारूती मंदिरात देवदर्शनासाठी गेला. अचानक त्याच्या मनात आले, नदीत जाऊन हात-पाय धुवावेत व मग मंदिरात देवदर्शनासाठी जावे. तो नदीवर गेला. हात-पाय धूत असताना त्याच्या तोल गेला आणि तो नदीत पडला. त्याला पोहता येत नव्हते. त्याची धडपड सुरू झाली. तो ओरडू लागला पण त्याला वाचविण्यासाठी कुणीही पुढे येईना.  अखेर एका साधूने नदीत उडी घेतली. त्या साधूने त्याला वाचविले. काठावर आणले. काही वेळाने तो श्रीमंत गृहस्थ भानावर आला. त्याने खिशातून खूप नोटा बाहेर काढल्या. पण त्यातील फक्त एक रूपयाची नोट साधूच्या हातावर ठेवली. हे पाहून काठावर जमलेले लोक संतापले. चिडून त्यांना थांबविले. त्यांनी त्या व्यापार्‍याला उचलले व नदीत टाकणार इतक्यात साधूने त्यांना थांबविले. साधू म्हणाला, ‘थांबा, त्यांने स्वत:च किंमतीएवढीच बक्षिसी दिली. यात त्याची का चूक? त्याची किंमत एवढीच आहे.’ तात्पर्य - माणसाची खरी किंमत प्रसंगानेच कळते. उपकारकर्त्याचे उपकार स्मरणे हे माणसाचे पवित्र कर्तव्य आहे. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 01/07/2019 वार - सोमवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *महाराष्ट्र कृषी दिन* *डॉक्टर्स डे* 💥 ठळक घडामोडी :- १९५५-इमपीरिअल बँकेची स्टेट बँक ऑफ इंडिया नावाने स्थापना १९६१ -महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची स्थापना २००२ - बाश्किरियन एरलाइन्स फ्लाइट २९३७ हे तुपोलेव्ह टीयु-१५४ प्रकारचे विमान आणि डीएचएल कंपनीचे बोईंग ७५७ प्रकारचे विमान जर्मनीतील ऊबेरलिंगेन गावावर आकाशात एकमेकांस आदळली. ७१ ठार. २००६ - चीन मध्ये किंगहाइ-तिबेट रेल्वेचे उद्घाटन. 💥 जन्म :- १९१३ - वसंतराव नाईक, हरितक्रांतीचे आणि रोजगार हमी योजनेचे जनक, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री. १९४७ - शरद यादव खासदार १९४९ - व्यंकय्या नायडू भाजपा नेते १९६० - सुदेश भोसले गायक १९६० - गिरीश पंचवाडकर गायक १९६१ - कल्पना चावला, अंतराळवीर १९६१ - डायना, वेल्सची राजकुमारी. 💥 मृत्यू :- १९७१ - सर विल्यम लॉरेन्स ब्रॅग, ऑस्ट्रेलियन-ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता. १९९४ - राजाभाऊ नातू, मराठी रंगभूमीवरील नेपथ्यकार. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* *जि प शाळा बिरसी* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *लोकशाही हक्क हिरावले जाऊ नयेत यासाठी सजग राहा - मन की बात मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *काँग्रेसच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नेते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची निवड होण्याची शक्यता* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *पुणे : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, त्यामुळे विदर्भासह मध्य भारतातील अनेक राज्यांत पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *मुंबई : देशात ४४ टक्के डॉक्टर ताण-तणावाचे बळी असल्याची धक्कादायक बाब एका खासगी संस्थेने केलेल्या वैद्यकीय चिकित्सकांच्या आरोग्यविषयक अभ्यासातून समोर आली आहे. यात महिला डॉक्टरांचे प्रमाण सर्वाधिक आहे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *वारकऱ्यांच्या सेवेसाठी एसटी महामंडळ पाठविणार १ हजार २०० अत्याधुनिक बस, मूलभूत सुविधाही पुरविणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *लंडन : नोव्हाक जोकोव्हिच, रॉजर फेडरर आणि राफेल नदाल हे आजपासून सुरु होणाऱ्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेत जेतेपद पटकावण्यास आहेत उत्सुक* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *बर्मिंगहम, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : निर्णायक सामन्यात दमदार खेळ करत इंग्लंडने अपराजित असलेल्या भारतावर मिळविला विजय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *हरित क्रांतीचे प्रणेते - वसंतराव नाईक* http://blog.diecpdnanded.in/हरित-क्रांतीचे-प्रणेते-व/ वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ लेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *ढगांचं बारसं कोणी केलं ?* 📙 मे १७८३ पासून त्या वर्षाच्या ऑगस्ट महिन्यापर्यंत बहुसंख्य युरोपीय देशांच्या आकाशात एक विलक्षण दृश्य पाहायला मिळत होतं. आईसलँडमधील एल्डेयार इथं तसंच जपानमधील असामा यामा इथं ज्वालामुखींचे उद्रेक झाले होते. त्यातून बाहेर पडलेली राख आणि राळ यांचं मिश्रण साऱ्या उत्तर गोलार्धामधील आकाशात पसरलेलं होतं. त्या दृश्यानं अनेकांना विस्मयचकित केलं होतं. कलाकारांनी त्याची चित्रं रंगवली होती. नियमित रोजनिशी लिहिणाऱ्यांनी त्याची तपशीलवार वर्णनं नोंदवून ठेवली होती. साहित्यिकांनी आपल्या कथा कादंबऱ्यांसाठी त्या आकाशदर्शनाची पार्श्वभूमी वापरली होती. त्यात भर पडली ती १८ ऑगस्टच्या रात्री एक धगधगता तेजस्वी अशनी त्या आकाशात चमकून गेला तेव्हा. सर्वांच्याच डोळ्यांचं पारणं फेडणाऱ्या त्या दृश्यानं एका अकरा वर्षांच्या मुलाच्या मनावर कायमची मोहिनी घातली नसती तरच नवल. त्या दिवसांपासून ल्युक हार्वर्डला आकाशदर्शनाचा छंद जडला. वास्तविक पुढील आयुष्यात त्यानं खगोलशास्त्राचा व्यवसाय म्हणून स्वीकार केला नव्हता वा त्या विषयाचा अभ्यासही केला नव्हता. वनस्पतीशास्त्रातली पदवी त्यानं मिळवली होती. तरीही आकाशदर्शनाचं त्याचं वेड काही कमी झालं नाही. त्याच सुमारास डेन्मार्कमधील वनस्पतीशास्त्रज्ञ कार्ल लिनायस यानं वनस्पतीचं वर्गीकरण करणारी एक प्रणाली विकसित केली होती. ती सर्वत्र गाजली होती. आजतागायत त्याच प्रणालीचा वापर होतो आहे. तरुण ल्युकवरही त्याचा प्रभाव पडला होता. त्या भरात त्यानंही त्या वर्गीकरणामध्ये आपल्या परीनं थोडी भरही घातली होती. वनस्पतीचं वर्गीकरण करता येतं, तर मग आकाशात नेहमीच दिसून येणाऱ्या ढगांचं वर्गीकरण का करता येऊ नये, असा विचार त्याच्या मनात घोळू लागला होता. त्याच सुमारास फ्रेंच वैज्ञानिक ज्याँ बातिस्त लमार्क यानं आकाशात दिसणाऱ्या ढगांची पाच ढोबळ वर्गांमध्ये विभागणी केली होती. तशी ती जुजबीच होती; पण तोवर तसा प्रयत्न कोणीच केला नसल्यानं लमार्कच्या वर्गीकरणालाही मान्यता मिळाली. त्यामुळे ल्युक हाॅवर्डला अधिक प्रोत्साहन मिळालं आहे आणि मग त्यानं अधिक तर्कसंगत अशी आपली प्रणाली सादर केली. त्याने एकंदरीत चार मार्ग प्रतिपादित केले होते. एक *क्युम्युलस* म्हणजे एखाद्या ढिगासारखे दिसणारे, दोन *स्ट्रॅटस* म्हणजे एकावर एक थर असणारे, तीन *सिर्रस* म्हणजे कुरळ्या केसांसारखे वेटोळेदार आणि लांबलचक असणारे आणि चौथे *निम्बस* म्हणजे पाण्याचा साठा असणारे पावसाळी ढग. या चार वर्गांमध्ये संकर होण्याची शक्यताही त्यानं वर्तवली होती. त्यानुसार पावसाळी पण ढिगासारखे असणारे ते *क्युम्युलोनिम्बस* कुरळ्या केसांचे थरावर थर असणारे सिर्रोस्ट्रॅटस वगैरे. अठराव्या शतकाची अखेर होता होता हाॅवर्डच्या या वर्गीकरणाला सर्व स्तरांमधून विस्तृत मान्यता मिळत गेली. आजही यांच वर्गीकरणाचा वापर केला जात आहे. ढगांचे गुणधर्मही या वर्गीकरणातून प्रतीत होतात याचीही प्रचिती आता मिळालेली असल्यामुळे तर या वर्गीकरणावर शिक्कामोर्तबच झाले आहे. म्हणून ल्युक हॉवर्डलाच ढगांचं बारसं केल्याचं श्रेय द्यायला हवं. *बाळ फोंडके यांच्या 'कोण ?' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश इंग्रजी - मराठी सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• Knowledge is power. ( ज्ञान ही खरी शक्ती आहे. ) *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *'जय जवान, जय किसान' हा नारा कोणी दिला ?* लालबहादूर शास्त्री 2) *जगातील पहिले तिकीट कोठे छापले गेले ?* इंग्लंड 3) *भुंकपाची तीव्रता मोजणाऱ्या उपकरणाला काय म्हणतात ?* भूकंपमापी 4) *बॉलपेनचा शोध कोणी लावला ?* लाजिओ जोसेफ बिरो (1931) 5) *भारतात पहिली सहकारी बँक कोठे स्थापन झाली ?* बडोदा *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● एल वाय मुपडे ● श्रीकांत चरलेवार ● व्यंकटेश बतुलवार ● मारोती कांडले ● मोरेश्वर गायधने ● अशोक कांबळे ● बालाजी भगनुरे ● मधूसुदन पांचाळ ● गजानन कवळे ● हनुमंत भोपाळे ● सय्यद इलियास झुकलकर ● रामकृष्ण पाटील ● तुकाराम मुंगरे ● गणेश गोंटलवार ● विजय निलंगेकर ● हणमंतू देसाई ● पंढरी गड्डपवार ● विलास नांदूरकर ● पंढरीनाथ खांडरे ● मारोती भुसेवार ● विशाल कण्हेरकर ● राजू पांचाळ ● डी डी वाघमारे ● नागोराव रायकोड ● बालाजी बाबुराव डाके पाटील ● शहादेव सुराशे ● रघुनाथ नोरलावार ● निळकंठ पाटील ● त्रिरत्नकुमार भवरे ● बाबासाहेब ढोले ● शेषेराव आवरे ● बाबुराव दस्तुरे ● नितीन गाडे ● करुणा खंडेलोटे ● दिगंबर नागलवाड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *परिस्थिती कितीही कठीण असली तरी तोंड लपवून, मस्तक झुकवून जगू नका. दु:खांचे युग आले तरी हसतमुख राहून जगा. प्रसंग कितीही वाईट असला तरी हिंमतीने सामोरं जाता आलं पाहिजे....* *न मुंह छुपाके जियो* *और न सर झुकाके जियो...* *गमोंका दौर भी आये* *तो मुस्कुरा के जियो...* *ढगांनी झाकले गेले तरी तारे नष्ट होत नाहीत. संकटांच्या अंधाररात्री ह्रदयाचे दिप उजळून जगा. जीवनातील कुठला क्षण मृत्यूची ठेव म्हणून आरक्षित झाला आहे हे कोणीही जाणू शकत नाही, म्हणून प्रत्येक क्षण आनंदाने जगा. मानवी जीवन अखंड प्रवाही असून ते कोणत्याही टप्प्यावर कायमचे थांबू शकत नाही. म्हणून प्रत्येक मुक्कामानंतर पुढे पुढे जातच जीवन जगलं पाहिजे....!* *ये जिंदगी किसी मंजिल पे* *रूक नही सकती.....* *हर एक मकाम के आगे* *कदम बढा के जियो...*. *संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      कबीर गाफील क्यों फिरय, क्या सोता घनघोर तेरे सिराने जाम खड़ा, ज्यों अंधियारे चोर । सारांश महात्मा कबीर मृत्यूची आठवण करून देतात. हे मानवा तुला असा दुर्मिळ मनुष्य जन्म मिळालेला असताना तू असा गाफिलासारखा का फिरत आहेस ? कोणत्या घणघोर अंधार्‍या काळ कोठडीत तू स्वतःला जखडून घेत आहेस ? कुठल्याही संपत्तीच मोल देवूनही हा जन्म परत मिळणारा नाही . तुला मिळालेले ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रिये तुझ्या मुक्तीसाठीच विधात्याने दिलेली सर्वात महान भेट आहे. इत्तर प्राण्यांपेक्षा तू विधात्याला अधिक प्रिय म्हणून बुद्धी व बोलीचं अधिकचं वरदान तुला दिलं तर तू त्या वैभवाचा वापर करून या सृष्टीचा स्वर्ग करण्यासाठी धडपडायला पाहिजेस ! स्वर्ग निर्माणाचं जाऊ दे , किमाण या सृष्टीला तरी विद्रुप करण्याचं कुकर्म करू नकोस ! हे वैविध्पाने भरलेले जग तुझ्याचसाठी आहे .याच्याकडे डोळे उघडे ठेवून पाहिलेस. त्याच्या रचनेला धक्क् न देता त्याचा मानव कल्याणासाठी वापर करून घेतलंस तर भविष्य सुंदर नाही तर निसर्ग प्रकोप ठरलेलाच. तू कितीही सावध वागण्याचा प्रयत्न करीत असलास तरी हा मृत्यू रूपी चोर तुझ्यावर सारखी पाळत ठेवून आहे. तू भौतिक सुखसोयींचा कितीही इधार घेतलास तरी काचाच्या बंदिस्त महालातूनही तुझ्यातल्या चैतन्यरूपी आत्म्याला तो कोणत्याही क्षणी उचलल्याशिवाय राहाणार नाही. तेव्हा तू ज्या शरीर व रूपाला मोहवून हुरळून जातोस त्यापेक्षा सृष्टीकडं पाहाण्याची दिव्य दृष्टी देणार्‍या आत्मदृष्टीची जडणघडण चांगली होण्यासाठी मनाचा निकोप विकास होणे गरजेचे आहे. सुंदर मनेच सुंदर सुष्टी देवू शकतात. तेव्हा अज्ञानाचा अंधःकार दूर करून सत्यरूपी ज्ञान जाणून घे. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• व्यक्तीच्या व्यक्तिमत्व विकासासाठी ज्ञानाची गरज आहे.ज्ञानामुळे केवळ व्यक्तिमत्व विकास होत नाही तर आत्मविकासही होतो.ज्ञानाचा संचय जीवनासाठी तर आवश्यक आहेच आणि त्याबरोबरच जीवनव्यवहारात कसे जगायचे यासाठी ज्ञान दिशा दाखवते.आपल्यातील दुर्गुण घालविण्यासाठी,आत्मसन्मानासाठी आणि खरा माणूस म्हणून जगण्यासाठी ज्ञान आणि ज्ञानसंचयाची आवश्यकता आहे.स्वत:च्या व्यक्तिमत्व विकासाबरोबरच इतरांच्या कल्याणाच्याही बाबतीत विचार करायला प्रेरीत करते. ज्ञान आणि ज्ञानसंचय ह्यासाठी प्रत्येकाने अविरत प्रयत्नशील रहायला हवे. © व्यंकटेश काटकर,नांदेड संवाद.९४२१८३९५९०/८०८७९१७०६३ 📚🌷📚🌷📚🌷📚🌷📚 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *तीन वाटसरु* एके दिवशी तीन वाटसरू एका धर्मशाळेत रात्रीसाठी एकत्र आलेले असतात. तिथे स्वयंपाकासाठी एकच चूल आणि एकच भांडं असतं... तिघांनाही भूक लागलेली असते, मग ते एकत्र स्वयंपाक करायचा असं ठरवतात. चुलीवर भांडं ठेवून त्यात पाणी उकळायला ठेवतात आणि त्यात प्रत्येकानं आपापल्या जवळच्या तांदुळाची एक एक मूठ टाकायची असं त्यांचं ठरतं... पाण्याला उकळी फुटल्यावर त्यात तांदूळ टाकायची वेळ येते. पहिला वाटसरू विचार करतो तसंही बाकीचे दोघं एक एक मूठ तांदूळ टाकतीलच, तेवढा भात तिघांना पुरेल. मी कशाला माझे तांदूळ वाया घालवू...?? म्हणून तो स्वतःच्या पिशवीत हात घालून रिकामीच मूठ घेऊन येतो आणि पातेल्यावरचं झाकण बाजूला सारून तांदूळ आत टाकल्याचं नाटक करतो... गंमत म्हणजे exactly असाच विचार बाकीचे दोघंही करतात आणि पातेल्यात तांदूळ टाकल्याचा नुसता अभिनयच करतात... थोड्या वेळानं ते झाकण दूर करून बघतात तेंव्हा अर्थातच पातेल्यात फक्त गरम पाणी असतं, भाताचा पत्ताच नसतो...!! तिघेही चडफडत आणि एकमेकांना रागावून उपाशीच झोपतात....!!! तात्पर्यः स्वतःचा वेळ, पैसा किंवा कष्ट अशी कोणत्याही प्रकारची तांदुळाची मूठ contribute न करता, ह्या समाजातले सर्व प्रश्न, इतर कोणाच्या तरी प्रयत्नातून आपोआप सुटतील असं ज्यांना वाटतं आणि प्रश्न सुटत नाहीत म्हणून जे तावातावानं फक्त चर्चा करतात... *अशा सर्व "वाटसरूंना" ही गोष्ट अर्पण...* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 29/06/2019 वार - शनिवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १६१३ - विल्यम शेक्सपियरच्या नाटकांचे पहिले प्रयोग जेथे झाले ते ग्लोब थियेटर आगीत भस्मसात. १९५६ - अमेरिकेत देशभर हमरस्ते तयार करण्यासाठी केंद्रीय मदत देण्यासाठी कायदा मंजुर. 💥 जन्म :- १८७१ - श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, मराठी नाटककार, विनोदकार, व वाङ्मय समीक्षक. १९३४ - कमलाकर सारंग, मराठी अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता. 💥 मृत्यू :- २००० - कॅप्टन वासुदेव श्रीपाद बेलवलकर, मराठी ऐतिहासीक कादंबरीकार. २००३ - कॅथेरिन हेपबर्न अमेरिकन अभिनेत्री. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* *जि प शाळा बिरसी* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *जम्मू काश्मीरमध्ये आणखी 6 महिने राष्ट्रपती राजवट ; केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी मांडला प्रस्ताव* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मुंबईतील मोडकळीस आलेल्या इमारतींचा म्हाडा घेणार ताबा, मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केली घोषणा* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *कोकणसह मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी काल पावसाने जोरदार हजेरी लावली. मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडला असला तरी जोर कमी राहिला. कोकणासह विदर्भातही मुसळधार पावसाची शक्यता* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *'जात प्रमाणपत्राऐवजी वडिलांच्या हमीपत्रावर विद्यार्थ्यांना प्रवेश द्या', शिक्षणमंत्री आशिष शेलार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी केंद्राची २० सूत्री व्यापक योजना, शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात झाल्याची कबुली सरकारने शुक्रवारी लोकसभेत दिली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेला हरवत विश्वचषकातील दुसरा विजय नोंदविला.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *ICC World Cup 2019 : आज ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड यांच्यात होणार लढत, श्रेष्ठत्व सिद्ध करण्यास दोन्ही संघ सज्ज* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *लघुकथा - व्यसन* https://storymirror.com/read/story/marathi/wkjlo9ps/vysn/detail वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ कथालेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌫 *हिमालयाचा जन्म केव्हा झाला ?* 🌫 'उत्तरम् यत्समुद्रस्य । हिमाद्रेश्चैव दक्षिणम् । वर्षं तद् भारतं नाम । भारती यंत्र संतत.' भारतवर्षांची - आपल्या देशाची अशी ओळख सांगितली आहे. म्हणजे सागराच्या उत्तरेस आणि हिमालयाच्या दक्षिणेस असणारा देश. यावरून आपला देश अस्तित्वात आला तेव्हापासून उत्तरेला हिमालयाचा कोट आपलं संरक्षण करत आला आहे अशी आपली समजूत होईल. पण ती बरोबर नाही. कारण हिमालयाचा जन्म आपली भूमी अस्तित्वात आल्यानंतर कितीतरी शतकांनी झाला आहे. किंबहुना धरतीतलावरच्या एकूण उत्तुंग पर्वतांपैकी हिमालय हा सर्वात कमी वयाचा पर्वत आहे. फार फार पूर्वीचं म्हणजे साधारण पृथ्वीचा धगधगता गोळा थंड झाल्यावरचं पृथ्वीचं भौगोलिक रूप फार वेगळं होतं. तिच्या पृष्ठभागापैकी जवळजवळ सारा भाग पाण्यानं व्यापलेला होता. जी काही कमी होती ती आग्नेय कोपऱ्यात म्हणजे आज जिथं साधारणपणे ऑस्ट्रेलिया आहे तिथं एकच एक मुटकुळं करून चुपचाप पडून राहिली होती. तिचं नाव होतं पॅनगाईया. या ग्रीक शब्दाचा अर्थ आहे समस्त भूमी. त्यानंतरचा कितीतरी काळ अशीच परिस्थिती राहिली. साधारण साडेबावीस कोटी वर्षांपूर्वी या भूमीच्या गाठोड्याला जात आली. तिच्यात हालचाल सुरू झाली आणि तिचे दोन प्रचंड तुकडे झाले. पुढच्या अडीच कोटी वर्षांमध्ये हे तुकडे एकमेकांपासून पूर्णपणे अलग झाले. उत्तरेचा लॉरेशिया आणि दक्षिणेला गोंडवनालँड. लाॅॆशियाचं वायव्य दिशेनं भ्रमण सुरू झालं. आजची उत्तर अमेरिका आणि युरोप खंडं त्यात समाविष्ट होते. गोंडवनालँडमध्ये आजची आफ्रिका, दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका वगैरेंचा समावेश होतो. हे दोन्ही भूखंड एकमेकांपासून अलग होत पुढची साडेतेरा कोटी वर्षे दूर दूर जात राहिले. पृथ्वीच्या गाभ्यात तप्त शिलारस असून त्यावरच्या घन कवचाचे हे तुकडे तरंगत असतात. त्यांचं भटकणं अविरत चालूच असतं. यालाच आता वैज्ञानिक भाषेत प्लेट टेक्टॉनिक्स असं म्हणतात. या भूखंडांच्या भटकण्यातून या दोन प्रचंड भूखंडांचेही तुकडे झाले. त्यातूनच उत्तर अमेरिका आणि युरोपही एकमेकांपासून वेगळे झाले. गोंडवनालँडचे तर तीन चार तुकडे झाले. एकात दक्षिण अमेरिका आणि आफ्रिका होते. ते पश्चिमेकडे सरकू लागले. दुसऱ्यात ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिका होते. त्याचेही दोन तुकडे होऊन अंटार्क्टिका दक्षिण दिशेनं तर ऑस्ट्रेलिया थोडा अाग्नेयाकडे सरकला. एक दुसरा मोठा तुकडा बाजूला होऊन त्याचं एक बेट झालं. ते टेथिस महासागरात तरंगू लागलं. हेच भारतीय उपखंड. कालांतराने तेही वायव्येकडे सरकत राहिलं. आणि साधारण साडेसहा कोटी वर्षांपूर्वी त्यानं जाऊन आशिया खंडाला धडक दिली. त्यावेळी भारतीय उपखंडाच्या सरकण्याचा वेगही एका शतकात ९ मीटर एवढा होता. धडकीनंतर तो निम्म्यावर आला. आणि पाच कोटी वर्षांनंतर तो आताच्या एका वर्षांत २-३ सेंटीमीटर एवढा कमी झाला. जमिनीवरून आपण एखादा कागद सरकवत नेला तर तो सरकत राहतो. पण जेव्हा तो भिंतीला भिडतो तेव्हा पुढे सरकू शकत नाही. तरीही सरकण्याचा रेटा चालूच राहिला तर त्याला घड्या पडून तो तिथंच उंचावतो. भारतीय खंडाच्या आशिया खंडाला भिडलेल्या सीमारेषेवर तसाच प्रकार घडला आणि त्यातूनच हिमालयाचा जन्म झाला. टप्प्याटप्प्यानं त्याची उंची वाढत राहिली. ती अजूनही वाढतेच आहे. सर्वात उत्तुंग शहर एव्हरेस्टची उंची गेल्या शंभर वर्षांमध्ये ८-९ मीटरनी वाढली आहे. या रेट्यापायी तिबेटच्या पठाराचाही जन्म झाला. तो भूभाग पाच हजार मिटरने उंचावला गेला. तेव्हा हिमालयाचा जन्म हा गेल्या पाच कोटी वर्षांपूर्वीचा आहे. भारतवर्ष मात्र त्यापूर्वी कितीतरी कोटी वर्षं अस्तित्वात आलं होतं. *बाळ फोंडके यांच्या 'केव्हा ?' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *भूतकाळातील "अनुभूती", वर्तमानकाळातील "कृती", आणि भविष्याची "दूरदृष्टी", माणसाला "परिपक्व" बनवते.* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *पेरू या देशाची राजधानी कोणती ?* लिमा 2) *T V चा शोध कोणी लावला ?* जॉन लागी बेअर्ड 3) *जगातील सात वास्तू आश्चर्यापैकी भारतातील आश्चर्य कोणते ?* ताजमहाल 4) *ताजमहाल कोणी बांधला ?* शाहजहान 5) *आग्रा शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेला आहे ?* यमुना *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ●  चैतन्य दलाल ●  हौसाजी ढेपाळे ●  सदा वडजे ●  सुनील मद्दलवार ●  वर्षा लोखंडे ●  किशनराव भाऊराव पाटील ●  अनिल भाकरे ●  सिद्धार्थ डुमणे ● दलित सोनकांबळे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *दुस-याचं सुख पाहून सुखी होणारी आणि दुस-याचं दु:खं पाहून दु:खी होणारी माणसं सतत आनंदी वृत्तीनं जगतात. इतरांच्या सुखात आपलं सुख पाहण्यासाठी आपल्याजवळ मोठं अंत:करण असावं लागतं. माणसाच्या ठायीच्या ज्ञानापेक्षा कल्पकतेला आधिक महत्व असतं. कल्पनेला वास्तवतेचे पंख लाभले की, किती सुंदर काम होते याचं उत्तम उदाहरण आहे ताजमहाल! शहाजहानच्या मनात ताजमहालाची कल्पना आली आणि गड्यागवंड्यांच्या बोटांतून सफल साकारली. कलाकारांची पाच बोटं म्हणजे सुंदर महाकाव्यच असतं. कारण त्यातूनच अवीट सौंदर्याची निर्मिती होते. माणसाच्या जीवनातील खरी सौंदर्यप्रसाधनं कोणती ? शांतवृत्ती, उदार स्वभाव, सोशिकता, नम्रता, आचाराची शुद्धता आणि मानवतेचे प्रेम हीच खरी आपल्या आत्म्याची सौंदर्यप्रसाधनं.* *मानवी जीवन महान असल्यानं आपण आपल्या इच्छा-आकांक्षाही महान ठेवल्या पाहिजेत. यासाठी प्राप्त परिस्थितीचे दास होण्यापेक्षा स्वामी होण्यात आनंद असतो. एखादा माणूस यशस्वी होतो म्हणजे तरी काय ? तो आपला दृढ संकल्प सिद्धिप्रत घेऊन जातो. एकदा सिकंदरला एकानं विचारलं की, 'तुम्ही हे जग कसं जिंकलं?' त्यावर सिकंदर म्हणाला, 'अनिश्चित नीतीचा त्याग केल्यामुळे मी विजयी झालो.' आत्मनियंत्रण आणि आत्मसंयम हे तर यशप्राप्तीचे दोन धवल स्तंभच आहेत.* •• ● ‼ *रामकृष्णहरी* ‼ ● •• 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  🌟! !  *कबिराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• कलि मंह कनक कामिनि, ये दौ बार फांद इनते जो ना बंधा बहि, तिनका हूॅ अमै बंद । सारांश महात्मा कबीर सांगतात कलीयुगात जो माया मोहात अडकणार नाही. स्त्रियांच्या फंदात पडून जो स्वतःला बिघडवून घेणार नाही तोच या मायावी जगातून सुखरूप सुटेल. तो सर्वांच्या आदरास पात्र होईल. अन्यथा लोक टिकेला सामोरे जावे लागणार. अपमानाचे बोल सहन करावे लागणार. हे ठरलेलेच. म्हणून सन्मार्गावर चालणार्‍या माणसानं माया आणि कामिनी यांच्या मोहात पडणं म्हणजे स्वतःला अधोगतिच्या मार्गाला नेणं होय. रामायण घडण्यामागील मुख्य कारण स्त्री लालसेत सापडते, आर्य अनार्य संघर्षाच्या काळात आर्य पुत्र लक्ष्मणाकडून अनार्य कन्या शुर्पनखा या महाबली राजा रावनाच्या बहिणीला तपमानित केलं जाणं. तिला विद्रुप केलं जाणं. दुर्लक्षित कसं होणार ? ती काय गोरगरीबा घरची पोर थोडीच होती ? फूल हुंगून फेकून दिलं किवा तसाच त्याचा चोळामोळा केला तरी त्याची दखल कोण घेतंय ! मात्र इथ राज कुलाच्या इज्जतीचा पेच. सुडाग्निनं पेटलेल्या एका मानिनीनं दुसरीला संघर्षात ओढलं नाही तरंच नवल ! तिथं दोन्ही पैकी एका बाजुची राख रांगोळी होणं स्वाभाविकंच होतं. नेमकी न्यायाची बाजू कोणाची ? चिकित्सा करणारे करत राहतील .मात्र दोन स्त्रियांच्या पात्राभोवतीच हा महासंग्राम फिरत राहतो. महाभारत म्हणजे सत्ता, संपत्ती आणि सुंदरी यांच्या भोवती फिरणारी भावबंदकीच नव्हती का ! त्यातही अपरीमित हानी झालेली. महारती योद्धे माया, मोहिनीतच गारद केल्या गेलेले. आजही जागोजागी त्या बाबींची पूनरावर्त्ती होताना दिसते. अशा प्रकारापासून सावध व्हायला हवे. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जी व्यक्ती स्वत:च्या आणि इतरांच्या जीवनशैलीचा फरक जाणते तेव्हा ती व्यक्ती नक्कीच चिंतनशील आहे असे समजावे.इतरांच्या जीवन जगण्यामध्ये काही उणीवा असतील त्या आपल्या जीवनात तर नाही ना याचा वेध घेऊन त्या सुधारणा करता येतात असाही विचार करण्यास प्रवृत्त होते तर काही चांगल्या गोष्टी असतील तर अनुकरण करायला काहीच हरकत नाही असाही विचार करून चांगले जीवन जगण्यासाठी तयार होते.म्हणजेच चांगले विचार सुधारण्याची संधी देतात तर वाईट विचार मनातून काढून टाकण्याची इच्छा प्रकट करतात.ह्या दोन्ही बाजूंनी विचार करणारीच व्यक्ती आपले सुंदर जीवन जगू शकते.उलट विचार न करणारी किंवा अविचारी व्यक्ती जीवनात कधीही आपल्या चुकांना सुधारण्याची संधी देऊ शकत नाहीत आणि जीवनात कधीही सुधारु शकत नाहीत हे मात्र खरे आहे. @ व्यंकटेश काटकर, नांदेड •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सकारात्मक दृष्टिकोन* *एक बेडूक डोंगराच्या टोकावर चढण्याचा विचार करतो आणि पुढे सरकतो, तेंव्हा इतर सर्व बेडूक जोरजोरात ओरडायला लागतात, "हे अशक्य अाहे.... आजपर्यंत कोणीच चढू शकला नाही... हे संभव नाही....नाही चढू शकणार"* मात्र, कोणाचेही न ऐकता शेवटी तो बेडूक डोंगराच्या टोकावर पोहचतोच.... *तुम्हाला माहिती आहे याचे कारण काय आहे ते??* *कारण, तो बेडूक "'बहिरा"' होता... आणि सर्व बेडकांना ओरडताना पाहून त्याला वाटत होते की, ते माझा उत्साह वाढवत आहेत.* *म्हणूनच जर तुम्हाला तुमचे "'ध्येय"' गाठायचे असेल तर, नकारात्मक लोकांच्या प्रति "'बहिरे" व्हा.सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपले ध्येय गाठा. ..!* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 27/06/2019 वार - गुरूवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• शिवराज्याभिषेकदिन - या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडला स्वराज्याच्या राजधानीचा दर्जा दिला आणि याच गडावर छत्रपतींचा राज्याभिषेक झाला. 💥 ठळक घडामोडी :- १९९१ - युगोस्लाव्हियाने स्लोव्हेनियावर आक्रमण केले. १९९८ - कुआलालम्पुर विमानतळ खुला. 💥 जन्म :- १८६९ - हान्स श्पेमान, जर्मन प्राणीशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता. १९१७ - खंडेराव रांगणेकर, भारतीय क्रिकेट खेळाडू. १९३० - रॉस पेरो, अमेरिकन उद्योगपती व राजकारणी. १९५१ - मेरी मॅकअलीस, आयरिश राष्ट्राध्यक्ष. १९६३ - मीरा स्याल, ब्रिटीश लेखिका, अभिनेत्री. 💥 मृत्यू :- १९९९ - जॉर्ज पापादुपॉलस, ग्रीसचा हुकुमशहा. २००८ - सॅम माणेकशा, भारताचे फिल्ड मार्शल. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* *जि प शाळा बिरसी* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *आशिया-प्रशांत समूहाने संयुक्त राष्ट्रे सुरक्षा परिषदेत (यूएनएससी) दोन वर्षांच्या हंगामी सदस्यत्वासाठी भारताच्या उमेदवारीला ५५ देशांचा पाठिंबा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *एक कोटी घरे २०२२ मध्ये नव्हे, पुढील वर्षीच देणार, गृहनिर्माणमंत्री हरदीप सिंग पुरी यांची घोषणा* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *पालघर - जिल्ह्यातील 190 अनधिकृत शाळांवर कलम 188 अन्वये गुन्हे दाखल करण्याचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांचे आदेश* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *कोल्हापूर : पावसाळी अधिवेशनात राज्य सरकार लोकायुक्त नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण करेल - जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *अमिताभ कांत यांना नीती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी दोन वर्षांची मुदतवाढ* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद तीन हजार धावा करणारा आशिया खंडातील पाकिस्तानचा बाबर आझम ठरला पहिला क्रिकेटपटू* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारतापुढे विश्वचषकाच्या सहाव्या साखळी सामन्यात आज वेस्ट इंडिजचे आव्हान, या सामन्यात विजय मिळवून उपांत्य फेरीत स्थान निश्चित करण्याचा भारताचा प्रयत्न* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *लघुकथा - गोष्ट एका आंबेगावाची* https://storymirror.com/read/story/marathi/lzuhb7d4/gosstt-ekaa-aanbegaavaacii/detail वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ कथालेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌎 *पृथ्वीचा जन्म केव्हा झाला ?* 🌎 आपण कोणालाही त्याची जन्मतारीख विचारतो तेव्हा अप्रत्यक्षपणे आपण त्यांचं वय किती आहे, हेच विचारात असतो. पृथ्वीचा जन्म केव्हा झाला हे विचारताना पृथ्वीचं आजमितीचं वय काय आहे हेच आपल्याला जाणून घ्यायचं असतं. ते आता वैज्ञानिक प्रणालींच्या मदतीने जवळजवळ अचूकपणे सांगणे शक्य झालं आहे. पहिली प्रणाली ज्याला भूगर्भशास्त्रज्ञ स्ट्रॅटिग्राफिक अॅनॅलिसिस म्हणतात त्याची आहे. भूगर्भात आणि धरतीच्या पृष्ठभागावरही निरनिराळे कातळांचे थर सापडतात त्यांची चिकित्सा करून ते किती पुरातन आहेत याचा छडा लावण्याची प्रक्रिया या प्रणालीत अंतर्भूत आहे. त्यासाठी उपयोगात आणलेले बहुतेक कातळ रूपांतरित म्हणजेच मेटॅमाॅर्फिक जातीचे आहेत. या कातळांच्या रूपांचं तसंच त्यांच्या वेगवेगळ्या थरात सापडलेल्या जीवाश्मांचं परीक्षण करून त्या कातळांचं वय ठरवलं जातं. ते साधारण साडेतीन अब्ज वर्षे एवढं असल्याचं निदान केलं गेलं आहे. म्हणजेच पृथ्वीचं वय किमान तेवढं असलं पाहिजे. परंतु रूपांतरित खडक अग्निजन्य तसंच गाळांच्या खडकांचं रूपांतर होत होत तयार होत असतात. याचाच अर्थ असा की पृथ्वीचं वय त्याहीपेक्षा जास्त असलं पाहिजे. त्यासाठी रेडिओमेट्रिक डेटिंग प्रणालीचा अवलंब केला गेला. रेडिओकार्बन डेटिंगमध्ये कोणत्याही पदार्थातील कार्बनच्या बारा अणुभाराच्या आणि चौदा अणुभाराच्या अशा दोन समस्थानकांचं एकमेकांशी असलेलं प्रमाण तपासलं जातं. यापैकी चौदा अणुभाराचं समस्थानक किरणोत्सारी आहे. निसर्गात या दोन रुपांचं एकमेकांशी असलेलं प्रमाण निश्चित आहे. जेव्हा वनस्पती हवेतून कार्बनडायआॅक्साईड शोषून घेतात तेव्हा या दोन रुपांचं वनस्पतींमधील प्रमाणही निसर्गात जेवढं असतं तेवढंच भरतं. पण एकदा का वनस्पती मृत झाली की त्यात त्या वेळी असलेल्या किरणोत्सारी कार्बनच्या रूपाचं प्रमाण घटत जातं. त्यामुळे वनस्पतींच्या किंवा प्राण्यांच्या अवशेषांमधील या दोन रूपांचं एकमेकांशी असलेलं प्रमाण मोजून त्या जीवाश्मांचे वय निश्चित करता येते. याच तत्त्वावर आधारित पण कोट्यवधी वर्षे पुरातन असलेल्या वस्तूंचं, खडकांचं वय निश्चित करण्यासाठी युरेनियम शिसं, थोरियम शिसं, रुबिडियम स्ट्रॉन्शियम यासारख्या मूलतत्त्वांच्या जोड्यांचं एकमेकांशी असलेलं प्रमाण मोजण्याची पद्धत विकसित केली गेली आहे. तिसरी प्रणाली भूगर्भातील शिशाचं निरनिराळ्या ठिकाणी असलेल्या तसंच सौरमालिकेत इतरत्र असलेल्या त्याचं प्रमाण मोजण्याची आहे. या पद्धतीनुसारही पृथ्वी किमान साडेचार अब्ज वर्षांपूर्वी प्रस्थापित झाल्याचं निदान झालं आहे. म्हणजेच पृथ्वीचा जन्म साडेचार अब्ज वर्षांपूर्वी झाला असं आपण म्हणू शकतो. *बाळ फोंडके यांच्या 'केव्हा ?' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जीवन जगण्याची कला त्यांनाच माहित असते जे स्वत: सोबत दुसऱ्याच्याही आनंदाचा विचार करतात. *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *चीनचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत ?* शी जिनपिंग 2) *पाकिस्तानचे पंतप्रधान कोण आहेत ?* इमरान खान 3) *कोणत्या देशात भारतीयांची संख्या अधिक आहे ?* मॉरिशस 4) *भारताच्या विमान वाहतुकीचे नाव काय ?* इंडियन एअरलाईन 5) *भारतातील लोकसंख्येने सर्वात मोठे राज्य कोणते ?* उत्तरप्रदेश *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ●  सुशील कापसे ●  अनुपमा जाधव *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जीवनात आपल्याला जे काही यश मिळते ते फक्त आपल्या स्वत:च्या प्रयत्नांचे फळ आहे, असे आपण कधीही प्रामाणिकपणे म्हणू शकत नाही. आपल्या यशाचे श्रेय आई-वडिलांच्या कष्टाला, पतीच्या किंवा पत्नीच्या मदतीला, मित्रांच्या व* *सहका-यांच्या योगदानाला आपण दिले नाही, तर तो स्वार्थ ठरेल. पण आपल्या यशप्राप्तीत एक अदृश्य हितचिंतक नेहमीच आपली साथ देत असतो आणि तो असतो सर्वसाक्षी परमेश्वर. गरजेच्या वेळी आपल्याला त्याची आठवण येते, पण गरज भागल्यावर त्याचे आभार मानायचे आपण बहुतेकदा विसरून जातो.* *परमेश्वराचे आभार आपण का आणि कशासाठी मानायचे? आपल्याला त्याने जीवन दिले म्हणून. जीवनात आपली सतत प्रगती होत राहिली म्हणून, आपण सुरक्षित, निरोगी राहिलो म्हणून नाही, तर आपल्यासाठी हे सगळे करत असताना परमेश्वर मात्र अदृश्य राहतो आणि तो कशासाठीच स्वत:ला श्रेय घेत नाही म्हणून त्याचे आभार मानले पाहिजेत.* संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  🌟! !  *कबिराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• यह जग कोठी काठ की, चहुं दिश लागी आाग भीतर रहै सो जलि मुअै, साधू उबरै भाग । सारांश महात्मा कबीर क्रोधाचे दुष्परिणाम लक्षात आणून देतात. हा संसार म्हणजे लाकडी महालासारखा आहे. कोणत्याही क्षणी हा महाल आगीचे भक्ष होवू शकतो. मानवाच्य्या ठायी षड्विकार उत्पन्न होत असतात, त्या सर्व विकारांमध्ये क्रोध हा फारच घातक असतो. एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही की रागाची निर्मिती होते. रागाचं प्रकटीकरण क्रोधाद्वारे होत असतं. मनाची एकाग्र अवस्था साधली नाही की चिडचिड करणं , रागे भरणं अशा क्रिया सहज प्रकट होतात. त्यामुळे पुढचा कार्यभाग बिघडतो. राग ही क्षणिक स्वरूपात व्यक्त होणारी आणि नकारात्मक विचाराकडे नेणारी सहज भाव क्रिया होय. ती अचानक प्रकटत असली तरी ती माणसाचा जीवन विषयक सकारात्मक दृष्टीकोनच बिघडवून टाकते. क्रोधामुळे मानसिक संतुलन बिघडतं, रागाच्या भरात माणूस अविचाराने वागतो. स्वभावात चिडखोरपणा वाढायला लागतो. माणून आतल्या आत गुदमरून स्वतःचे नुकसान करून घ्यायला लागतो. शक्तीक्षय होवून शारीरिक दुर्बलता ओढवून घेतो. क्रोधामुळे मित्र नातलग दुरावतात. साधू, सज्जन मात्र आपल्या चित्त प्रवृत्ती स्थिर ठेवतात. क्रोधाचा वाराही अंगाला लागू देत नाहीत. त्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद, समाधान कधीही कमी होत नाही. म्हणून माणसानं क्षमाशिलता, समंजसपणा व धैर्य अंगी धारण करून क्रोधाला दूर पिटाळायला शिकलं पाहिजे एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जगाच्या पाठीवर असा एकच संप्रदाय आहे की,त्यात जातीयता नाही,धर्मभेद नाही,गरीब- श्रीमंत नाही,स्त्री-पुरुष असाही भेद नाही,कुणीही कुणाचे आणि एकमेकांचे एकमेकांबद्दल मन कलुषित होत नाही,जिथे मानवतेचे,एकात्मतेचे,भक्तीचे दर्शन घडते तो म्हणजे वारकरी संप्रदाय आहे.वारकरी संप्रदाय आमच्या मराठी भूमीत आणि अनेक शतकापासून संतांच्या पावनस्पर्शाने आणि विचाराने आजही त्यांच्या मार्गावर भगवंताचे नामस्मरण करीत भागवतांची पताका घेऊन अखंड चालू आहे.असा संप्रदाय अन्य इतरत्र कुठेही पाहायला मिळत नाही.म्हणून अशा संप्रदायाचा प्रत्येक वारक-याला सार्थ अभिमान आहे. © व्यंकटेश काटकर,नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🌎🚩🌎🚩🌎🚩🌎🚩🌎 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जंगलचा राजा* एका अरण्यात एक सिंह राहात होता. त्या अरण्यात तो एकटाच शक्तीशाली असल्यामुळे वाटेल तसा वागत असे व तेच योग्य असे म्हणत असे. एकदा सर्व प्राण्यांना एकत्र बोलावून तो म्हणाला, 'प्रत्येकाने मला आपल्या शक्तीप्रमाणे खाद्य पुरवावं म्हणजे रोज शिकार करण्याचा माझा त्रास वाचेल.' सगळ्यांनी ही गोष्ट मान्य केली. पण हा कर कोणत्या धोरणाने बसवावा याबद्दल निश्चित पद्धति ठरे ना. वाघ उभा राहून म्हणाला, 'मला वाटतं, कोणी किती पाप केलं ते पाहून त्या मानाने त्याच्यावर कराची आकारणी करावी, प्रत्येकाने आपल्या शेजार्‍यावरील कराची आकारणी करावी म्हणजे फसवेगिरीला जागा राहणार नाही.' त्यावर हत्ती लगेच म्हणाला, 'छे, छे, वाघोबाची ही युक्ती निरुपयोगी आहे. त्यामुळे द्वेष, जुलूम वाढतील. माझ्या मते प्रत्येकाचे सद्‌गुणावर कर बसवावा व तो ज्याचा त्यानेच द्यावा. अशा योजनेने सरकारी तिजोरीत पुष्कळ भर पडेल.' तात्पर्य - आपले दुर्गुण असतील तर ते झाकून ठेवायचे व थोड्याशा सद्‍गुणाचे मोठे प्रदर्शन करायचे असा प्रत्येकाचा स्वभाव असतो. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 26/06/2019 वार - बुधवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन सामाजिक न्याय दिन 💥 ठळक घडामोडी :- १८१९ - सायकलचा पेटंट देण्यात आला. १९६० - सोमालियाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य. १९६० - मादागास्करला फ्रांसपासून स्वातंत्र्य. १९९९-नांदेड तालुक्यातील किनवट तालुक्याचे विभाजन करून माहूर हा नवीन तालुका तयार करण्यात आला 💥 जन्म :- १८७४ - राजर्षी शाहू महाराज १८८८ - नारायण श्रीपाद राजहंस ऊर्फ बालगंधर्व, मराठी रंगभूमीवरील अभिनेते, गायक. १८९२ - पर्ल बक, अमेरिकन लेखिका. 💥 मृत्यू :- १९४४ - प्रफुल्लचंद्र रे, भारतीय रसायनशास्त्रज्ञ. २००१ - वसंत पुरुषोत्तम काळे, मराठी साहित्यिक. २००४ - यश जोहर, भारतीय चित्रपट निर्माता. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* *जि प शाळा बिरसी* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *समाजसेवेचे व्रत घेतलेल्या डॉ. अभय व डॉ. राणी बंग यांना महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे डी. लिट पदवी प्रदान करण्याची घोषणा विद्यापीठाचे प्रतिकुलपती तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी केली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *आरोग्यविषयक सर्वोत्तम कामगिरीबाबत केरळने देशात प्रथम क्रमांक पटकाविला आहे तर दुसऱ्या क्रमांकावर आंध्र प्रदेश व महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *नवी दिल्ली : केंद्रीय कॅबिनेट मंत्रीमंडळाने मोटर वाहन (संशोधन) विधेयकाला दिली मंजुरी, यामध्ये वाहतुकीचे नियम मोडल्यास तब्बल 1 लाख रुपयांपर्यंत दंड आकारण्याचा प्रस्ताव* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *नवी दिल्ली - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून 2 दिवसांच्या जम्मू काश्मीर दौऱ्यावर जाणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *बिहार- चमकी तापामुळे मृत पावलेल्या बालकांचा आकडा 131 वर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *दोन महिन्यांच्या उन्हाळी सुट्या संपल्यानंतर विदर्भात आज होत आहे शाळांची दारे उघडी, जिल्हा परिषद शाळांमध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प व पुस्तके देऊन केले जाणार त्यांचे स्वागत* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *आयसीसी वर्ल्ड कप 2019 : दमदार फलंदाजी आणि भेदक गोलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर मिळविला विजय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *लघुकथा - रमेशचे शौर्य* https://storymirror.com/read/story/marathi/hqfwvd9w/rmeshce-shaury वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ कथालेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 😴 *आपण केव्हा घोरतो ?* 😴 तसंच पाहिलं तर सर्वच जण घोरतात. पण कोणी ते कबूल करायला तयार नसतो. तसा सबळ पुरावा दाखवून ते कबूल करून घेणंही सोपं नसतं. कारण माणूस घोरतो ते झोपेत. त्या वेळी त्याला आजूबाजूच्या जगाचं भानच नसतं. त्याला उठवलं तर तो घोरत होता याचा पुरावाच नष्ट होतो. तरी बरं अलीकडे अँड्रॉइड वगैरे प्रकारच्या मोबाइल फोनवर कोणाचाही साग्रसंगीत व्हिडिओ घेण्याची सोय आहे. त्याचा वापर करून माणूस घोरी घराण्याचा सदस्य असल्याचं सिद्ध करता येतं. माणूस गाढ झोपलेला असताना घोरतो हे तर स्पष्टच आहे. तरीही नेमकी कोणती परिस्थिती त्याच्या घोरण्याला कारणीभूत होते हेही समजून घेतलं, तर तो केव्हा घोरतो हे स्पष्ट होईल. झोपेत असताना आपले स्नायू शिथिल पडलेले असतात. आपल्या घरातील अवयवांचं नियंत्रण करणाऱ्या स्नायूंचीही तीच स्थिती असते. त्यामुळे मऊ टाळू, जीभ, पडजीभ वगैरे अवयवांची या नियंत्रणापासून सुटका होते. त्याच वेळी श्वासनलिकाही सुस्तावल्यामुळे अरुंद झालेली असते. ज्या वेळी आपण श्वास घेतो तेव्हा तो या अरुंद श्वासनलिकेतून आत जाण्याचा प्रयत्न करतो. त्याला अर्थात त्या अरुंद नलिकेकडून विरोध होतो. त्याचा परिणाम जवळच्या मृदू अवयवांवर पडून ते फडफडू लागतात. त्यांचाच जोराचा आवाज होतो. तोच आपल्याला घोरण्याच्या स्वरूपात ऐकू येतो. कधीकधी सर्दीमुळे किंवा अशाच काही कारणांमुळे नाक चोंदलेलं असतं. त्यातून वाट काढणाऱ्या श्वासालाही विरोध होतो. त्यावर मात करण्यासाठी हवेला जास्त जोर लावावा लागतो. परिणामी हवेचा प्रवाह सुरळीत होण्याऐवजी खळबळल्यासारखा होतो. त्या खळबळीपोटी घशातल्या मृदू अवयवांची फडफड होते. माणूस घोरायला लागतो. घोरण्याचा केवळ इतरांना त्रास होतो असं नाही. तर घोरणाऱ्या व्यक्तीलाही त्याचा त्रास होत असतो. कारण घोरण्यामुळे बर्‍याच वेळा झोप चाळवली जाते. काही वेळा तर जागही येते. परत झोप लागणं कठीण होतं. व्यवस्थित झोप न मिळाल्यामुळे उठल्यावर माणूस तेवढा ताजातवाना राहू शकत नाही. जसा खोकला हा आजार नाही तर ते केवळ लक्षण आहे, तसंच घोरणंही हा आजार नाही. तेही एक गंभीर ठरू शकणाऱ्या आजाराचं लक्षण आहे. कधीकधी झोपेत असताना श्वासोच्छ्वासाला अडथळा होतो. याला अाॅब्स्टक्ट्रिव्ह स्लीपअॅंप्निया म्हणतात. झोपेत असल्यामुळे या अडथळ्याचं रूपांतर श्वासोच्छ्वास थांबण्यात कधी होतं ते कळतही नाही. तसं झाल्यास जीवघेणी परिस्थिती उद्भवू शकते. त्यावर वेळीच उपाय करणं आवश्यक असतं. त्यामुळे अतिघोरणं होत असेल व त्यातून झोप वरचेवर चाळवली जात असेल तर डॉक्टरी तपासणी करून घेणं हिताचं ठरतं. *बाळ फोंडके यांच्या 'केव्हा ?' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• “विचार करा निर्णय घ्या, आणि तुम्हाला जे योग्य वाटत तेच करा.” *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *अफगणिस्तान या देशाची राजधानी कोणती ?* काबुल 2) *राष्ट्रगीतात 'जय' हा शब्द किती वेळा आलेला आहे ?* 9 3) *नागपूर हे नाव कशावरून पडले ?* नाग नदीवरून 4) *अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत ?* डोनाल्ड ट्रम्प 5) *रशिया या देशाचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत ?* ब्लादिमिर पुतीन *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● रमेश इटलोड ● नारायण ईबीतवार ● राजेश पाटील उमरेकर ●  संतोष रेड्डी बोमीनवाड ●  सुरेश यादव ●  अनिल पाटील भुसारे ●  गणेश आरटवार ●  कैलास स्वामी ●  शेख बाशू ●  मनीष अग्रवाल ●  कृष्णा भोरे ● बालाजी सावंत ● लक्ष्मण नोमुलवार बाभळीकर ● अंकुश कामगोंडे ● पुरुषोत्तम रेड्डी चाकरोड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मुन्शी प्रेमचंद यांनी तारूण्याविषयी फार छान विचार मांडले. ते म्हणतात, 'तारूण्य जोश आहे, बल आहे, साहस आहे, दया आहे, आत्मविश्वास आहे. गौरव आणि सर्वकाही आहे. तारूण्य व्यक्तीच्या जीवनाला उज्ज्वल आणि परिपूर्ण बनविते. परंतु एकदा का ते भरकटले तर सर्व सद्गुणांचा नाश होऊन जीवन सैरभैर होते.' तारूण्याला विश्वात्मकतेचे परिमाण द्यायचे असेल, तर तेवढे साहस आणि उदार असणे आवश्यक आहे. उदारता आणि साहस यांच्या संयोगामुळेच डाॅ. कोटणीस मानवतेच्या भावनेतून चीनमध्ये स्थिरावतात. भारत-चीन या देशांमध्ये मानवतेचा सांस्कृतिक बंध निर्माण करतात. तारूण्याचा खरा अर्थ कळलेली 'डाॅ. कोटणीस की अमर कहाणी' संपूर्ण जगाला आकर्षणाचा आणि आत्मसंवेदनाचा विषय वाटते.* *जनावरे राखता राखता अभ्यास करीत बौद्धिक कर्तृत्वावर आणि तारूण्यातील सकारात्मक ऊर्जेमुळे तात्याराव लहाणे यांच्यासारखा तरूण नेत्ररोग तज्ञ म्हणून नावारुपाला येतो. अलिशान हाॅस्पिटल उभारून खासगी वैद्यकीय व्यवसाय सुरू करण्याच्या नादी न लागता सरकारी दवाखान्यात नोकरी करून सामान्यांची सेवा करण्यात धन्यता मानतो. तेही तारूण्याचा अर्थ समजल्यानेच. युवावर्गाने आपल्या तारूण्यावस्थेतील महत्वाचा काळ शक्ती, कार्यक्षमता, बुद्धिचातुर्य यांचा योग्य वापर केला तर कुटुंब, देश पर्यायाने मानवसमाज प्रगतीपथावर जाऊ शकतो.* ••●‼ *रामकृष्णहरी*‼●•• 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल- 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  🌟! !  *कबिराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• उदर समाता अन्न ले, तन ही समाता चीर अधिक ही संग्रह ना करें, तिस्का नाम फकीर। सारांश संन्याशी कसा असावा ? याबद्दल महात्मा कबीर सांगतात की जो पोट भर अन्न घेतो आणि काया झाकण्यापुरती वस्त्र मिळाली की संतुष्ट व समाधानी धारण करतो. यापेक्षा अधिकचे द्रव्य,कपडेलत्ते जमा करीत नाहीं किवा त्यांचा संग्रह ही करीत नाही तोच खरा फकीर किवा संन्यासी असतो . अध्यात्म सांगण्याच्या नावाखाली लोकांना लुटण्याचे प्रकार केले जातात. पूर्वी सामान्य माणसाला अध्यात्म किवा वेद पुराण कळायचं नाही. ते समजून घेण्यासाठी एखाद्या ज्ञानी पंडिताकडं जावं लगायचं. तो पंडितही भलता भाव खायचा .समोरच्याला माहिती सांगणे किवा मजकूर वाचण्याच्या मोबदल्यात त्या गरजू व्यक्तीकडून अंगमेहनतीची कामे फुकट करून घेणे. द्रव्यादी उकळणे असा प्रकार सर्रास चालायचा. आजही थोतांडी कर्मकांडाची भिती दाखवून लुबाडणूक होताना दिसते. भोळे भाबडे भक्तगण जादू छू मंतर हात चालाखीला भुलून बुवाबाजी व ढोगाला आहारी पडतात. ढोगी नाटकी सन्याशांचे आश्रम जागोजागी थाटले जातात. धर्म व पंथांच्या नावाखाली साध्या भोळ्या भक्तांना लुटून संन्यस्तपणाच्या बुरख्याआडून अधर्म करणार्‍यांना वेळीच ओळखून दूर राहावं. ऐसे कैसे झाले भोंदू| कर्म करूनी म्हणती साधू॥ अंगी लावुनिया राख| डोळे झाकुनिया करती पाप॥ दाखवुनिया वैराग्याची कळा| भोगी विषयाचा सोहळा॥ तुका म्हणे सांगो किती| जळो तयाची संगती॥ जगद्गुरू तुकोबांचा वरील अभंग ध्यानात घेतला तरी अशा ढोंगी सन्याशांपासून अलिप्त होता येईल. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• तुमच्या विचारात आणि तुमच्या विरोधकांच्या विचारात खूप फरक आहे.तुमचा विचार हा सर्वसाधारण पणे त्रास होऊ नये,आपल्या बोलण्यामुळे मन दुखवू नये,तो जरी आपल्याकडे काकदृष्टीने पाहत असला तरी आपण त्याच्याकडे चांगल्या दृष्टीनेच पाहणे.आपले एखादेवेळी नुकसान झाले तरी चालेल पण त्याचे नुकसान होऊ नये अशी आपली धारणा असते आणि यामुळेच समोरच्यापेक्षा आपले जीवन सुखावह जगण्याचे मंत्र्यांनी शिकवते.हाच जगण्याचा मंत्र समोरच्या व्यक्तीच्या बाबतीत नसतो आणि त्यामुळे त्यांच्या जगण्याचे चित्रच बदलून जाते.शेवटी त्यांच्या जगण्यात आणि जीवनात तुमच्यासारखा अर्थच नसतो.म्हणून तुमची जगण्याची जीवनशैली ही खरोखरच सर्वसमावेशक आणि आदर्श आहे हे विसरु नका.आज नाही उद्या तरी तुमच्या जीवनशैलीचा नक्कीच स्वीकार करतील. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *गुरुकृपा* *विठ्ठलाने स्वतः ज्ञान न देता गुरूंकडे पाठवणे* एकदा सर्व संत मंडळी जमली होती. तेव्हा मुक्ताबाईने गोरा कुंभारांना सांगितले की, 'सर्व संतांची परीक्षा घ्या'. त्यांनी एक लाकूड घेतले आणि लाकडाने सगळ्यांच्या डोक्यावर एक-एक थापटी मारली. जेव्हा नामदेवांच्या डोक्यावर थापटी बसली, त्या वेळी ते काहीच बोलले नाहीत; पण रागाने त्यांचे तोंड फुगले. त्यांनी अहंकाराने विचार केला, ‘मातीच्या भांड्यासारखी माझी परीक्षा होऊ शकते का ?' नंतर गोरा कुंभारांनी सांगितले, ‘‘नामदेव सोडून सगळ्यांची मडकी पक्की आहेत. हे ऐकून नामदेव विठ्ठलाजवळ आले आणि घडलेली सर्व घटना त्याला सांगितली. देवाने सांगितले, ‘मुक्ताई आणि गोरोबा म्हणत आहेत की, तुझे डोके कच्चे आहे, तर तू खरोखरीच कच्चा आहेस; कारण तू सद्गुरूंचा आश्रय घेतला नाहीस. माझा विसोबा खेचर म्हणून एक भक्त आहे. त्याच्याकडे तू जा. तो तुला ज्ञान देईल'. संत नामदेव विसोबा खेचरांकडे आले. तेव्हा विसोबा खेचर महादेवाच्या पिंडिकेवर पाय ठेवून झोपले होते. हे पाहिल्यावर नामदेवांनी विसोबांना सांगितले, ‘‘शिवलिंगावरून आपले पाय बाजूला काढून ठेवा". त्या वेळी विसोबांनी नामदेवांना सांगितले, ‘‘ज्या ठिकाणी शिवाचे अस्तित्व नाही, अशा ठिकाणी तू माझे पाय काढून ठेव". नामदेव जिथे जिथे पाय ठेवायचे, तिथे तिथे शिवलिंग प्रकट होत असे. त्यामुळे सगळा गाभारा शिवलिंगांनी भरून गेला. हे पाहून नामदेवांना आश्चर्य वाटले. त्या वेळी विसोबा खेचरांनी सांगितले, ‘‘भगवंत सर्वत्र आहे; पण या इंद्रियांनी आपल्याला त्याची जाणीव होत नाही". नामदेवांच्या ठिकाणी भक्ती होती. गुरुकृपेमुळेच ‘सर्वत्र ब्रह्म आहे', याचे त्यांना ज्ञान झाले. संत नामदेव परमेश्वराच्या सगुण रूपाशी एकरूप होते. केवळ गुरुकृपेनेच त्यांना निर्गुण रूपाशी एकरूप होता आले. तात्पर्यः गुरूचे कार्य महान असते.गुरुकृपा ही सर्वश्रेष्ठ असते. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 25/06/2019 वार - मंगळवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जागतिक कोड त्वचारोग दिन* 💥 ठळक घडामोडी :- १९७५ - भारताचे राष्ट्रपती श्री.फक्रुद्दीन अली अहमद यांनी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या शिफारशीवरून देशात अंतर्गत आणीबाणी जाहीर केली १९८३ - क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेत वेस्ट इंडिजचा पराभव करून भारत विजेता 💥 जन्म :- १९०० - लुई माउंटबॅटन, इंग्लंडचा भारतातील व्हाइसरॉय. १९३१ - विश्वनाथ प्रताप सिंग, भारतीय पंतप्रधान. १९७४ - करिश्मा कपूर, हिंदी चित्रपट अभिनेत्री. १९७८ - आफताब शिवदासानी, हिंदी चित्रपट अभिनेता. 💥 मृत्यू :- १९९७ - जाक-इवेस कूस्तू, फ्रेंच संशोधक. २००९ - फाराह फॉसेट, अमेरिकन अभिनेत्री. २००९ - मायकेल जॅक्सन, अमेरिकन गायक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* *जि प शाळा बिरसी,जि गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *राष्ट्रपतींच्या भाषणावरील आभारप्रदर्शनासाठी लोकसभेच्या कामाची वेळ 8 आणि राज्यसभेच्या कामाची वेळी 7.10 वाजेपर्यंत वाढविली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मुंबई - मराठी शिक्षण कायदा संमत करण्यासाठी एक महिन्यात वटहुकूम काढणार, शिष्टमंडळाला मुख्यमंत्र्यांनी दिले आश्वासन* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *मालेगाव महानगरपालिका पोटनिवडणुकीत काँग्रेसची बाजी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *नवी दिल्ली - पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशाबाबत राज्य सरकारला सुप्रीम कोर्टाचा दिलासा, मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाला आव्हान देणारी याचिका फेटाळली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांचा राजीनामा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *दुष्काळाची पार्श्वभूमी असताना राज्यात उशिराने दाखल झालेला मान्सून अद्याप सक्रीयही न झाल्याने राज्यभरातील धरणे कोरडीठाक पडली आहेत, मराठवाड्यात स्थिती बिकट* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *आयसीसी वर्ल्ड कप 2019 :  बांगलादेशने अफगाणिस्तानवर 62 धावांनी मिळविला विजय, शकीब अलहसन ठरला सर्वोत्तम खेळाडू* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *लघुकथा - सर्कस* https://storymirror.com/read/story/marathi/d6oevpyb/srks/detail वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ कथालेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌗 *दिवस व रात्र केव्हा सामान होतात ?* 🌗 हा प्रश्न सिंगापुरात कधीच विचारला जाणार नाही. विषववृत्तापासून अतिशय जवळ असल्यामुळे तिथे वर्षभर दिवस व रात्र समान असतात. उत्तर आणि दक्षिण, दोन्ही ध्रुवांजवळ हा प्रश्न विचारला जाणार नाही. कारण तिथं एक तर चोवीस तास रात्र तरी असते किंवा चोवीस तास दिवस. त्यामुळे दिवस आणि रात्र समान होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. इतरत्र मात्र दिवस आणि रात्र यांचे अवधी वर्षभरात सतत बदलत राहतात. कधी दिवस जास्त मोठे होतात तर कधी रात्र. त्यातही उत्तर गोलार्धात जेव्हा दिवस मोठे असतात तेव्हा दक्षिण गोलार्धात रात्री मोठ्या असतात. वास्तविक दिवस आणि रात्र ही एका 'दिवसा'ची कृत्रिम विभागणी आहे. पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत असतानाच स्वतःभोवतीही गिरकी घेत राहते. त्यामुळे पृथ्वीवरच्या कोणत्याही भागावर दिवसभर सूर्य तळपत नाही राहत नाही. म्हणूनच जोवर सूर्यप्रकाश आहे तोवर दिवस आणि सूर्यप्रकाश मिळणे बंद होऊन अंधाराचं साम्राज्य पसरलं की रात्र अशी विभागणी करण्यात आली आहे. तसंच पृथ्वीची सूर्याभोवती फिरण्याची कक्षा लंबवर्तुळाकार आहे. त्यामुळे त्या दोघांमधील अंतर कमी जास्त होत राहतं. कललेल्या अासापायी सूर्याचे किरण पृथ्वीवर सरळ न पडता एका कोनातून पडतात. त्यामुळे गोलाकार पृथ्वीच्या निरनिराळ्या भागात सूर्यप्रकाश असण्याच्या वेळात फरक पडला पडत जातो. उत्तरायणाच्या काळात उत्तर गोलार्धात दिवस मोठे असतात. तर दक्षिण गोलार्धात रात्री. जसजसा सूर्य दक्षिणायनाला प्रारंभ करतो तसतशी ही परिस्थिती उलट होत जाते. या परिस्थिती सतत उलट होण्याच्या प्रक्रियेमुळे दिवस मोठे होत जातात, कमाल पातळी गाठतात, परत लहान होत जातात, किमान पातळी गाठतात. रात्रीचीही हीच परिस्थिती असते. या उलटापालटीत दोन दिवस असे येतात की त्या दिवशी रात्र आणि दिवस यांचा कालावधी सारखाच म्हणजे बारा बारा तासांचा असतो. याला संपात म्हणतात. वसंत ऋतूची सुरुवात करणारा वसंत संपात तर शरद ऋतूची सुरुवात करणारा शरद संपात. हे दोन दिवस २१ मार्च व २३ सप्टेंबर या तारखांना येतात. म्हणजेच या दोन तारखांना दिवस व रात्र समसमान व्हायला हवेत. प्रत्यक्षात मात्र ते या दिवसांच्या आसपास होतात. याचं कारण म्हणजे सूर्य हा काही बिंदुवत नाही. त्याला निश्चित आकारमान आहे. आणि सूर्याची वरची कडा क्षितिजावर आली की दिवस सुरू होतो तर ती क्षितिजाखाली गेली की रात्र. यामुळेच दिवस व रात्र समान होण्याच्या तारखा २१ मार्च व २३ सप्टेंबरच्या आसपास येतात. *बाळ फोंडके यांच्या 'केव्हा ?' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• “खोटारडा जेव्हा खर बोलतो, तेव्हा कुणीही त्याच्यावर विश्वास ठेवत नाही.” *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *नाईल नदी किती देशांतून वाहते ?* 6 2) *फ्रांस या देशाची राजधानी कोणती ?* पॅरिस 3) *भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे ?* दिल्ली 4) *संसदेचे दोन सभागृह कोणते ?* लोकसभा व राज्यसभा 5) *भूतान या देशाची राजधानी कोणती ?* थिंम्पू *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● योगेश कात्रे ●  सुभाष लाखे ●  प्रल्हाद कापावार ●  ओम पालकृतवार ●  सुरेश कात्रे ●  रुपेश पांचाळ ●  श्रेयश इंगळे ●  संदेश कोडगिरे ● नागेश पाटील ● आदर्श गव्हाणे ● राजेश अलगुंडे ● रमाकांत गोणे ● नादयाप्पा स्वामी ● अशोक तनमुदले ● दीपक जायवाड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *स्वत:वर विश्वास असणे फार महत्वाचे आहे. तो नसल्यास न्यूनगंड निर्माण होतो. मानवी जीवन सुंदर आहे, यावर विश्वास ठेवल्यास मनात जगण्यासाठी नवी उमेद निर्माण होते. आशावदी दृष्टीकोन हा विश्वासाचाच अविभाज्य भाग आहे. आशावाद मानवी मनाला प्रेरणा देऊन कर्तव्य पार पाडण्यासाठी लागणारी ऊर्जा पुरवतो. विश्वासाचा संबंध व्यक्तीच्या ह्रदयाशी, मनाशी असतो. तो दृश्य स्वरूपात नसून अदृश्य स्वरूपाचा असतो. तो समजून घ्यायचा असेल, तर आपल्या आत डोकवावे लागेल.* *याच विश्वासाची गळचेपी होत असल्याचे आज पावलोपावली जाणवते. मुलांचा आईवडिलांवरील, आई-वडिलांचा मुलांवरील, पती-पत्नीच्या नात्यातील, विद्यार्थ्यांचा गुरूजनांवरील, रूग्णांचा डाॅक्टरांवरील, मित्र-मैत्रिणींचा एकमेकावरील, जनतेचा राजकारण्यांवरील विश्वास कमी होत चाललाय...त्याला तडा जात असल्याचे आपल्याला दिसते. याचे कारण स्वार्थधुंदीत आपण माणूसपण विसरू लागलो. औपचारिकता आणि आधुनिकतेच्या नावाखाली नावाखालीही विश्वासाला नख लावणे सुरू झाले. भूतकाळात विश्वासाची व्याप्ती समुद्राएवढी होती. प्रत्येकाच्या ह्रदयात विश्वासाला महत्वाचे स्थान होते. अशीच परिस्थिती चालत राहिली, तर भविष्यात विश्वासाची अवस्था केविलवाणी होईल. मानवी समाजात विश्वासाची जागा संशय घेईल व सर्वत्र सावळागोंधळ निर्माण होईल. चला तर..अंतस्थ विचार बदलून विश्वासाला पात्र बनू या..* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल-9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  🌟! !  *कबिराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• यह जग कोठी काठ की, चहुं दिश लागी आाग भीतर रहै सो जलि मुअै, साधू उबरै भाग । सारांश महात्मा कबीर क्रोधाचे दुष्परिणाम लक्षात आणून देतात. हा संसार म्हणजे लाकडी महालासारखा आहे. कोणत्याही क्षणी हा महाल आगीचे भक्ष होवू शकतो. मानवाच्य्या ठायी षड्विकार उत्पन्न होत असतात, त्या सर्व विकारांमध्ये क्रोध हा फारच घातक असतो. एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही की रागाची निर्मिती होते. रागाचं प्रकटीकरण क्रोधाद्वारे होत असतं. मनाची एकाग्र अवस्था साधली नाही की चिडचिड करणं , रागे भरणं अशा क्रिया सहज प्रकट होतात. त्यामुळे पुढचा कार्यभाग बिघडतो. राग ही क्षणिक स्वरूपात व्यक्त होणारी आणि नकारात्मक विचाराकडे नेणारी सहज भाव क्रिया होय. ती अचानक प्रकटत असली तरी ती माणसाचा जीवन विषयक सकारात्मक दृष्टीकोनच बिघडवून टाकते. क्रोधामुळे मानसिक संतुलन बिघडतं, रागाच्या भरात माणूस अविचाराने वागतो. स्वभावात चिडखोरपणा वाढायला लागतो. माणून आतल्या आत गुदमरून स्वतःचे नुकसान करून घ्यायला लागतो. शक्तीक्षय होवून शारीरिक दुर्बलता ओढवून घेतो. क्रोधामुळे मित्र नातलग दुरावतात. साधू, सज्जन मात्र आपल्या चित्त प्रवृत्ती स्थिर ठेवतात. क्रोधाचा वाराही अंगाला लागू देत नाहीत. त्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद, समाधान कधीही कमी होत नाही. म्हणून माणसानं क्षमाशिलता, समंजसपणा व धैर्य अंगी धारण करून क्रोधाला दूर पिटाळायला शिकलं पाहिजे एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎯 विचारवेध........✍🏻 ----------------------- जर एखादी व्यक्ती तुमच्या वर्तनातील तुमच्यासमोर दोष दाखवत असेल तर तुम्ही त्यांच्यावर रागावू नका.कारण आपल्यात असलेला अवगुण आपल्याला कधीच कळत नाही.आपण आपलेच आंधळे झालेलो असतोत.तो जर आपले दोष दाखवून देत असेल तर आपणाला आपल्यातले दोष घालवून सुधारण्याची संधी देत आहे.उलट त्यांचे आभार मानायला विसरु नका.अशा व्यक्ती आपल्याला खूप कमी मिळतात.जे आपल्या दोषांवर पांघरूण घालतात ते मात्र आपल्याला एका वाम मार्गाने जाण्यासाठी अप्रत्यक्ष प्रेरीत करतात.त्यामुळे आपण कोणत्या प्रवाहाकडे जात आहोत हे कळत नाही आणि जेव्हा कळायला लागते तेव्हा वेळ निघून गेलेली असते. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. ••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *युक्तिच सर्वश्रेष्ठ* नदीच्या तिरावर एक कोळी मासे धरायला गेला. फार मोठे मासे नदीत सापडतील असे त्याला वाटले नाही म्हणून त्याने मोठे जाळे बरोबर घेतले नाही. एका काठीच्या टोकाला एक बारीक दोरी बांधून गळ वर ओढू लागला, पण मासा बराच मोठा असल्याने गळ लवकर ओढला जाईना. कोळ्याने विचार केला की, गळ लवकर ओढला तर मासा आपल्या वजनाने व चळवळीने आपली बारीक दोरी तोडून पळून जाईल तेव्हा त्याने बराच वेळपर्यंत गळ पाण्यात राहू दिला व नंतर अगदी हळूहळू तो पाण्याच्या बाहेर काढला. तोपर्यंत मासा धडपड करून अगदी निर्बळ झाला होता. त्यामुळे दोरी तोडण्याची शक्ती त्यात उरली नव्हती. तात्पर्य युक्तीने सर्व प्रकारच्या अडचणीतून मार्ग काढता येतो. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड. http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

*शब्दपिसारा* (दि.२४-०६-२०१९) शब्दांच्या गाभाऱ्यातुन काव्य असे स्फुरावे जणू मनातील मोरपिसे शब्दांंनी बहरावे हृदयाच्या कपारीतून शब्द हा उमटवावा जणू शब्दांचा गर्भातून काव्य हा उजळावा सप्तरंगी या जीवनी काव्य असे फुलते जणू अंतरंगातील अंतर्भावच स्पर्शूनी खुलते शब्दाचा पाझर जीवनी असा फुलवावा जणू शब्दाचा जीवनात सागर व्हावा दाही दिशांनी स्वर शब्दांचे घुमतात जणू दिशाहीन या जीवनास मार्ग दाखवतात मनी शुद्ध शब्दांचे पावित्र्य निर्मळ ते जपतात ओवूनी शब्दांची माळ काव्यात जणू दरवळतात. 〰〰〰〰〰〰〰 ✍ प्रमिलाताई सेनकुडे ता.हदगाव जिल्हा नांदेड. 〰〰〰〰〰〰〰

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 24/06/2019 वार - सोमवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १९९४ - अमेरिकन वायुसेनेचे बी-५२ प्रकारचे विमान फेरचाइल्ड एरफोर्स बेस येथे कोसळले,४ ठार. १९९६ - मायकेल जॉन्सन याने १९.६६ सेकंदात २०० मीटर धावून विश्वविक्रम केला 💥 जन्म :- १९०९ - गुरू गोपीनाथ, शास्त्रीय नर्तक. १९२७ - कवियरासू कन्नडासन, तमिळ लेखक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* *जि प शाळा बिरसी* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *अरविंद केजरीवाल सरकारचा मोठा निर्णय ; दिल्लीतील गरीब विद्यार्थ्यांना मिळणार १०० टक्के शिष्यवृत्ती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *१९७२ नंतर कोणत्याही एका नेत्याने सलग पाच वर्षे मुख्यमंत्रीपदी राहण्याचा मान हा देवेंद्र फडणवीस यांना मिळाला आहे.* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *बालाकोट हल्ल्यानंतर पाकिस्तानची पाणबुडी गायब ; नौदलाने 21 दिवस घेतला शोध* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *मालवणी भाषेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी मुंबई विद्यापीठ कायम प्रयत्नशील असेल, असे आश्वासन मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी सहाव्या मालवणी बोली साहित्य संमेलनात दिले.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *विदर्भ व मराठवाड्यात दुधामुळेच क्रांती घडून येईल, असा विश्वास राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डचे अध्यक्ष दिलीप रथ यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *कर्णधार राणी रामपाल अंक ड्रॅग फ्लिकर गुरजित कौर हिच्या दोन गोलच्या बळावर भारताने अंतिम सामन्यात यजमान जपानचा ३-१ असा पराभव करीत महिला एफआयएच सिरीज फायनल्स हॉकी स्पर्धा जिंकली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *वर्ल्ड कप स्पर्धेनंतर जसप्रीत बुमराह, विराट कोहलीला मिळणार विश्रांती; बीसीसीआयचा निर्णय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *लघुकथा - सुंदर* https://storymirror.com/read/story/marathi/e8iw53kn/sundr/detail वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ कथालेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *आधुनिक मानवाचा उदय केव्हा झाला ?* 📙 वैज्ञानिक भाषेत आधुनिक मानवाचं नाव होमो सेपियन्स असं आहे. पण हा आधुनिक मानव एकाएकी अकस्मात जन्माला आला नाही. डार्विननं सांगितल्याप्रमाणे वानर प्रजातींपासून हळूहळू उत्क्रांती होत होत त्याचा उदय झाला. म्हणून होमो या प्रजातीच्याही काही जाती आधुनिक मानवाच्या आधी उदयाला येऊन अस्ताला गेल्या. त्यांचेही पूर्वसुरी होमिनिड या नावानं आणि त्यांचेही पूर्वज होमोनाॅइड या नावाने ओळखले जातात. आफ्रिकेच्या जंगलात राहणारे होमिनाॅईड प्रजातीचे वानर साधारण ५० ते ८० लाख वर्षांपूर्वी वावरत होते. त्या कालखंडात पडलेल्या दुष्काळापोटी तिथल्या वनराजीला ग्रहण लागलं. त्यामुळे झाडांवर राहणाऱ्या या वानरांना आपलं बस्तान दुसरीकडे तर हलवावं लागलंच, पण अन्नाच्या शोधासाठी तसंच वास्तव्यासाठीही झाडांचा आश्रय सोडून जमिनीवर उतरावं लागलं. आफ्रिकेतल्याच सॅव्हॅन्ना या गवताळ जंगलांमध्ये ज्यांनी आश्रय घेतला, त्या वानरांचे वंश टिकून राहिले. ही वानरं दिवसा जमिनीवर उतरून अन्नाचा शोध घेत, पण रात्र झाली की परत आपल्या झाडांवरच्या मुक्कामी परतत. जमिनीवरचं मिळालेलं अन्न परत आपल्या झाडांवरच्या मुक्कामस्थळी हलवायचं तर ते पुढच्या दोन पायांमध्ये म्हणजेच हातांमध्ये धरून आणावं लागे. ते करण्याची क्षमता ज्यांनी मिळवली त्या जातींना तगून राहण्यास मदत झाली. त्यातूनच हळूहळू दोन पायांवर उभे राहणारे नवीन होमिनिड प्राणी उदयाला आले. हे मानवसदृश असले तरी त्यांनी वानरजातीचे गुणधर्म संपूर्णपणे त्यागलेले नव्हते. झाडांचा आश्रय त्यांनी संपूर्ण सोडलेला नव्हता. या प्रजातीतही उत्क्रांती होत गेली. आणि त्यातूनच पहिले होमो प्रजातीतले प्राणी उदयाला आले. यांना होमो हॅबिलिस म्हणतात. पुढचे दोन पाय म्हणजेच हात मोकळे झाल्यामुळे त्यांचा अधिकाधिक उपयोग करायला हे प्राणी शिकले होते. ते काही आयुधं आणि अस्त्रं बनवून त्यांचा वापर शिकारीसाठी किंवा घरटं खोदण्यासाठी करायला शिकले होते. पण अजूनही ते संपूर्णपणे दोन पायांवर उभे राहू शकत नव्हते. थोडे डगमगत होते. शिवाय त्यांचा मेंदूचाही फारसा विकास झालेला नव्हता. ही झाली १५ ते ३० लाख वर्षांपूर्वीची गोष्ट. त्यानंतर उदयाला आले ते होमो इरेक्ट्स. हे दोन पायांवर ताठ उभे राहू शकत होते. त्यांच्या मेंदूचीही चांगलीच वाढ झाली होती. परंतु ते अजूनही वन्य प्राण्यांप्रमाणे गुहांमध्ये राहून गोळा करून आणलेल्या कंदमुळांवर व शिकार करून आणलेल्या मांसावर गुजराण करत होते. अग्नीचा शोधही त्यांनी लावला होता. त्यांची आयुधंही जास्त प्रभावी होती. त्यांचीच उत्क्रांती होत होमो सेपियन्स म्हणजे बुद्धिमान होमोचा किंवा आधुनिक मानवाचा उदय झाला. त्याच्या मेंदूचा झपाट्याने विकास झाला होता. बुद्धिमत्तेत वाढ झाल्यामुळे शेती किंवा सांस्कृतिक विकास यांचाही प्रवाह सुरू झाला होता. होमो सेपियन्सचा उदय साधारण ३५००० ते १०००० वर्षांपूर्वी झाला यावर सर्वांचंच एकमत आहे. *बाळ फोंडके यांच्या 'केव्हा ?' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जीवन चैनीची वस्तु नसुन कर्तव्याची भूमी आहे *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *जगातील सर्वात गरीब देश कोणता ?* भूतान 2) *नेपाळ या देशाची राजधानी कोणती ?* काठमांडू 3) *भारतात 'चारमिनार' कोठे आहे ?* हैदराबाद 4) *रशिया या देशाची राजधानी कोणती ?* मास्को 5) *भारताचे अर्थमंत्री कोण आहेत ?* मा.निर्मला सीतारमन *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ●  सचिन रेनगुंटवार ●  कल्पना डेव्हिड बनसोड ●  कवी अनिल रेड्डी ●  सदानंद कोडगळे ●  लक्ष्मण सुरकार ●  संदीप शंभरकर ●  लक्ष्मीकांत गोपाळराव कुलकर्णी ●  रवी गंगाधर भोरे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *तारूण्य आणि संगत यांचे महत्व विशद करताना जैन मुनीं तरूण सागर महाराज सांगतात, 'आपले मित्र, चित्र आंणि चरित्र नेहमी पवित्र ठेवा; कारण तेच खरे जीवनाचे अस्त्र आहे. तुम्हाला तर हे माहित आहे की., चारित्र्याचे पतन होण्यासाठी बहुधा चुकीचे मित्र आणि चुकीचे चित्र यांचाच हात असतो. चुकीचे मित्र आणि चुकीचे चित्र हेच चारित्र्य नष्ट करण्याचे शस्त्र आहे किंवा असेही म्हणता येईल की, कधीही न चुकणारे ब्रम्हास्त्र आहे.' तारुण्याच्या सळसळत्या उर्जेवर स्वार्थी व्यवस्थांचा डोळा असतो. त्यामुळेच तारूण्याची ऊर्जा सैरभैर करून तिला आपल्या इच्छेप्रमाणे वापरण्याचे धूर्त राजकारण या स्वार्थी व्यवस्था करत असतात. तारुण्याच्या ऐन उमेदीचा कालखंड निरर्थकपणे या स्वार्थी व्यवस्थेच्या नेतृत्वामागे घालविला जातो.* *एखादी पाण्याची बाटली वापरून फेकून द्यावी, त्या पद्धतीने तरुणांच्या ऊर्जेचा वापर करून त्यांना शेवटी फेकून दिले जाते. सर्व बाजूंनी निष्क्रिय केलेल्या तरूणांवर शेवटी पश्चात्तापाची वेळ येते. तारूण्याचे रखरखीत वाळवंट होते. आपले तारूण्य विवेकशून्य व्यवस्थेच्या हाती द्यायचे की, स्वत:वर विश्वास ठेवत स्वकर्तृत्वाच्या बळावर समाज जीवनात उजळवून टाकायचे हे ज्याला समजले, त्याला तारुण्याचा खरा अर्थ कळला. माजी राष्ट्रपती डाॅ. ए.पी.जे. अब्दुल कलाम हे युवकांना देशाची संपत्ती म्हणायचे, ही संपत्ती देशासाठी आपत्ती ठरू नये म्हणून तरूणांनी आपले मित्र विचारपूर्वक निवडावेत.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल- 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  🌟! !  *कबिराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• कबीर गाफील क्यों फिरय, क्या सोता घनघोर तेरे सिराने जाम खड़ा, ज्यों अंधियारे चोर । सारांश महात्मा कबीर मृत्यूची आठवण करून देतात. हे मानवा तुला असा दुर्मिळ मनुष्य जन्म मिळालेला असताना तू असा गाफिलासारखा का फिरत आहेस ? कोणत्या घणघोर अंधार्‍या काळ कोठडीत तू स्वतःला जखडून घेत आहेस ? कुठल्याही संपत्तीच मोल देवूनही हा जन्म परत मिळणारा नाही . तुला मिळालेले ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रिये तुझ्या मुक्तीसाठीच विधात्याने दिलेली सर्वात महान भेट आहे. इत्तर प्राण्यांपेक्षा तू विधात्याला अधिक प्रिय म्हणून बुद्धी व बोलीचं अधिकचं वरदान तुला दिलं तर तू त्या वैभवाचा वापर करून या सृष्टीचा स्वर्ग करण्यासाठी धडपडायला पाहिजेस ! स्वर्ग निर्माणाचं जाऊ दे , किमाण या सृष्टीला तरी विद्रुप करण्याचं कुकर्म करू नकोस ! हे वैविध्पाने भरलेले जग तुझ्याचसाठी आहे .याच्याकडे डोळे उघडे ठेवून पाहिलेस. त्याच्या रचनेला धक्क् न देता त्याचा मानव कल्याणासाठी वापर करून घेतलंस तर भविष्य सुंदर नाही तर निसर्ग प्रकोप ठरलेलाच. तू कितीही सावध वागण्याचा प्रयत्न करीत असलास तरी हा मृत्यू रूपी चोर तुझ्यावर सारखी पाळत ठेवून आहे. तू भौतिक सुखसोयींचा कितीही इधार घेतलास तरी काचाच्या बंदिस्त महालातूनही तुझ्यातल्या चैतन्यरूपी आत्म्याला तो कोणत्याही क्षणी उचलल्याशिवाय राहाणार नाही. तेव्हा तू ज्या शरीर व रूपाला मोहवून हुरळून जातोस त्यापेक्षा सृष्टीकडं पाहाण्याची दिव्य दृष्टी देणार्‍या आत्मदृष्टीची जडणघडण चांगली होण्यासाठी मनाचा निकोप विकास होणे गरजेचे आहे. सुंदर मनेच सुंदर सुष्टी देवू शकतात. तेव्हा अज्ञानाचा अंधःकार दूर करून सत्यरूपी ज्ञान जाणून घे. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• प्रत्येकजण आपल्या जीवनाबद्दल काही ना काही बोलत असतो.जेव्हा तो बोलत असतो तेव्हा त्याच्या जीवनात नव्वद टक्के नकारात्मक भूमिका असते.या जीवनात असे जीवन जगण्यात काय अर्थ आहे ? त्यापेक्षा न दिलेलेच बरे.आता जीवन जगणे असह्य आहे.असा जेव्हा विचार करतात त्यांनी जगण्याला आत्मविश्वास गमावलेला असतो.कोणतीही कृती न करता किंवा हातपाय न हलवता जीवन कसे सुखी बनेल ? हा विचार कधीच ते विसरुन बसले असणार आणि त्यामुळेच त्यांच्या जीवनात सदैव नैराश्याचे डोळ्यांसमोर काळे ढग दिसतात.अशी माणसे स्वत:ही जीवनाचा आनंद घेत नाहीत आणि इतरांच्या जीवनातला आनंदही त्यांना पाहवत नाही.अशा नैराश्ययुक्त व नकारात्मक विचार करणा-या माणसांनी थोडी डोळसपणे दुस-याच्या आनंदाने जीवन जगणाऱ्या माणसाकडे थोडा विचार करून पहायला हवे.त्यांची आत्मविश्वासाने व कृतीयुक्त शैलीने व आपल्यासमोर कितीही आणि कोणताही कठीण प्रसंग असो तो हसत हसत सामोरे जाऊन कसे जीवन जगतात याचे थोडे सूक्ष्म निरीक्षण करायला हवे.तसेच त्यांच्या जगण्याची जीवनशैली कशी आणि आपली जगण्याची जीवनशैली कशी हा प्रश्न स्वत:ला विचारुन पाहिला तर नक्कीच कळेल की,आपल्यामध्येच खरी त्रुटी आहे.आपणही त्यांच्यासारखे जीवन जगायला हवे.इतरांच्या जगण्यापेक्षा आपणही चांगले जीवन आपल्या कर्तृत्वाने, आत्मविश्वासाने जगू शकतो अशी शिकवण मिळाल्याशिवाय राहत नाही.नक्कीच चांगले बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करेल.मग तो नैराश्यमय जीवन जगणारे नाही अशी प्रेरणा घेऊन व कर्तृत्ववान लोकांचे नक्कीच चांगले जीवन जगण्यासाठी प्रेरणा मिळेल.मग तोच जगाला जीवन कसे जगायचे याचे ज्ञान देण्यासाठी तयार होई.म्हणून इतरांच्या लोकांचे चांगले अनुकरण घ्यायला काय हरकत असा सकारात्मक विचार निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *स्वार्थीवृत्ती* एका कोळ्याने आपले जाळे नदीत टाकले आणि माशांना घाबरवून जाळ्यात आणावे म्हणून एका लांब काठीने तो नदीचे पाणी गढूळ करू लागला. शेजारी काही लोक राहात होते. त्यांपैकी एक म्हणाला, 'अरे, तू जर अशी पाण्यात खळबळ केलीस तर आमचं पिण्याचं पाणी गढूळ होईल ना ?' तेव्हा कोळी म्हणाला, 'मित्रा, मला फक्त एवढंच माहीत आहे की, हे पाणी गढूळ केल्याशिवाय मला मासे मिळणार नाहीत, म्हणून मला हे केलंच पाहिजे.' तात्पर्य - काही लोक इतके स्वार्थी असतात की, स्वतःच्या फायद्यासाठी दुस-याचे नुकसान झाले तरी ते पर्वा करीत नाहीत. फक्त स्वतःचाच फायदा पाहतात. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

बडबडगीत दि.२२-०६-२०१९ विषयः खार खार बाई खार इवलीशी फार छोटीशी शेपूट तिची झुबकेदार खार बाई खार भिञी फार आवाज ऐकताच होते पसार खार बाई खार चंचल फार खाली उतरते भरभर झाडावर चढते सरसर खार बाई खार.... 〰〰〰〰〰〰 ✍ प्रमिला सेनकुडे ता.हदगाव जिल्हा नांदेड 〰〰〰〰〰〰

बडबडगीत दि.२२-०६-१९ विषयः पोपट पोपटा पोपटा बोलशील का लाललाल चोच दाखवशील का हिरव्या हिरव्या रंगाची पांघरूण शाल डाळींबाचे दाणे खातोस लाल पोपटा पोपटा बोलशील का लाललाल चोच दाखवशील का? झाडावरून उडून जातोस का पेरूचा फोडी खातोस का? पोपटा बोलशील का लाल लाल चोच दाखवशील का? ➖➖➖➖➖➖➖ ✍ प्रमिला सेनकुडे ता.हदगाव जिल्हा नांदेड. 〰〰〰〰〰〰〰

*बडबडगीत* दि.२२-०६-१९ *विषयः आगगाडी नातेवाईकांची* *(मराठी गीत)* 🚂🚃🚋🚃🚋🚃🚋🚃 आली आली बघा बघा आगगाडी (दोन वेळा) सरळ रेषेत चालणारी धावधाव धावणारी आली आली बघा बघा आगगाडी (दोन वेळा) आगगाडीत बसले कोण? आजी आजोबा आणखी कोण!👩‍🏫👨‍🏫 (दोन वेळा) आली आली बघा बघा आगगाडी.......(दोन वेळा) आगगाडीत बसले कोण? मामामामी आणखी कोण! (दोन वेळा)🙎‍♂👩‍🦰 आली आली बघा बघा आगगाडी.......(दोनवेळा) आगगाडीत बसले कोण? दादा वहिनी आणखी कोण (दोन वेळा)🙎‍♂🙎 आली आली बघा बघा आगगाडी .. आगगाडीत बसले कोण? काकाकाकु आणखी कोण 👳👩🏻 आली आली बघा बघा आगगाडी.....(दोनवेळा) ➖➖➖➖➖➖ 🚂🚋🚃🚋🚃🚋🚃 ➖➖➖➖➖➖➖ *✍ प्रमिला सेनकुडे* *ता.हदगाव जिल्हा नांदेड.* 〰〰〰〰〰〰〰

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 22/06/2019 वार - शनिवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १५१७ - अपंगांना कृत्रिम हातपाय पुरवणारे आणि रक्तवाहिन्या शिवून रक्तस्त्राव थांबविण्याची कल्पना मांडणारे अ‍ॅब्रायस्ते पेरी यांचा जन्म. १९४० - सुभाषचंद्र बोस यांनी काँग्रेसबाहेर पडून 'फॉरर्वड ब्लॉक' या पक्षाची स्थापना केली. फ्रान्सने अधिकृत शरनागती पत्करुन हीटलरसमोर गुडघे टेकले. १९८३ - तिसऱ्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतचा ध्वज भारत इंग्लंडचा ध्वज इंग्लंडचा उपांत्य फेरीत पराभव केला. १९८३ - तिसऱ्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत वेस्ट ईंडीझने पाकिस्तानचा उपांत्य फेरीत पराभव केला. 💥 जन्म :- १९३५ - वामन कुमार, भारतीय क्रिकेट खेळाडू. १८९६ - बाबुराव पेंढारकर, भारतीय अभिनेता. १९०८ - डॉ. विष्णू भिकाजी कोलते, महानुभाव साहित्य संशोधक 💥 मृत्यू :- १९४० - ब्लाडिमार पी. कोपेन, रशियन हवामानशास्त्रज्ञ. २००१ - डॉ. अरुण घोष, भारतीय अर्थतज्ञ. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *नांदेड जिल्ह्यात कालरात्री जाणवले भूकंपाचे सौम्य धक्के, माहूर, किनवट,हिमायतनगर, हदगाव आणि अर्धापुर या भागात जाणवले धक्के* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *देशभरात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा, नांदेडमध्ये रामदेव बाबा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये योगाभ्यासासाठी मोठी गर्दी* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *मुंबई - पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणात मराठा समाजाच्या आरक्षणासाठी विधिमंडळात विधेयक मंजूर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *उद्यापासून पुढील चार दिवस राज्यात वादळी पाऊस, कृषी विभागाचा शेतकऱ्यांना इशारा, मान्सून विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील बऱ्याच भागात अजून ही दाखल झालेला नाही.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *सातारा : इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रणेबाबत खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला संशय. सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करण्याची केली मागणी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्या अध्यक्षतेखालील पहिली जीएसटी काऊन्सिलची बैठक संपन्न* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *ICC World Cup 2019 : इंग्लंडचा धक्कादायक पराभव, लसिथ मलिंगा ठरला 'गेम चेंजर'!* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *लघुकथा - परीक्षा* https://storymirror.com/read/story/marathi/os217c0i/priikssaa/detail वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ कथालेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *२१ जूनची माहिती* *21 जून म्हणजे वर्षातील सर्वात मोठा दिवस.* पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते. या परिक्रमेत पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यास लागणाऱ्या वेगामुळे २१ जून हा दिवस १३ तास १३ मिनिटांचा असतो. त्यामुळे २१ जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो. २१ जूनपासून उत्तरायन संपून दक्षिणायन सुरु होते.पृथ्वी २३. ५ अंशाने एका बाजूस कललेली आहे आणि त्याच परिस्थितीमध्ये ती सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करते. पृथ्वीच्या या कललेल्या आसामुळे नॉर्वेच्या उत्तरभागात अर्ध्या रात्रीपण सूर्य दिसतो. त्यालाच मध्यरात्रीचा सूर्य म्हणतात. दोन्ही ध्रुवावर तर सहा महिन्याचा दिवस व सहा महिन्याची रात्र असते. या दिवशी दिवस मोठा तर रात्र लहान असते. दिवस १३ तास १३ मिनिटांचा असतो. पृथ्वी अक्षवृत्त साडे तेवीस डिग्रीच्या झुकावाने ११ हजार किमी प्रती तासाच्या गतीने पश्चिमेकडून पूर्व दिशेला फिरते. यासोबतच पृथ्वी आपल्या कक्षेतून एक लाख पाच हजार किमी तासाच्या वेगाने सुमारे ८९ कोटी ४० लाख किमी लंब वर्तुळाकार कक्षेत सूर्याची परिक्रमा करते. वर्षातील २१ जून जसा मोठा दिवस असतो तसाच वर्षातला लहान दिवस २२ डिसेंबर असतो. या दिवसापासून दक्षिणायन संपून उत्तरायण सुरू होत असते. पृथ्वीचा सूर्याभोवती फिरण्याचा वेग हा कमी होत आहे. २००४ मध्ये दक्षिण भारतात जी त्सुनामीची लाट आली त्यामुळे फिरण्याचा वेग हा ३ मायक्रोसेकंदनी कमी झाला. पृथ्वीचा फिरण्याचा वेग हा कमी होत चालल्याने ठरावीक वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय घडीत लिप सेकंद अॅाडजेस्ट करावा लागतो. १९७२ मध्ये सर्वात प्रथम लिप सेकंद अॅतडजेस्ट केला होता. इंटरनॅशनल अर्थ रोटेशन अॅणन्ड रेफरन्स सिस्टीम सर्व्हिस ही आंतरराष्ट्रीय संघटना लिप अॅाडजेस्ट करते. ३० जूनच्या मध्यरात्री किंवा ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री लिप सेकंद अॅयडजेस्ट केला जातो. *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• चुकणे ही प्रकृती, मान्य करणे ही संस्कृती आणि सुधारणे ही प्रगती आहे. *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *ऑस्ट्रेलिया या देशाची राजधानी कोणती ?* कॅनबेरा 2) *जगातील सर्वात मोठा वाळवंट कोणता ?* सहारा 3) *जगातील सर्वात मोठी नदी कोणती ?* नाईल (6650 Km) 4) *'गेट वे ऑफ इंडिया' कोठे आहे ?* मुंबई 5) *'इंडिया गेट' कोठे आहे ?* दिल्ली *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ●  बालाजी राजापूरकर, ●  भीमराव तायडे ●  गंगाधरराव तोटलोड, ●  स्वप्नील पाटील ●  सुधीर मरवळीकर ●  माधव बोडके ●  श्याम गाडे ●  निलेश दौडकर ● नंदकिशोर कोरे ● आशा मांकावार ● साईनाथ डब्बेवाड बामणी ● अभिषेक बकवाड यादव ● लक्ष्मण शीरमाने ● गंगाधर बोमलवाड ● दिनेश बंगारे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *तसं पाहिलं तर आपल्यापैकी बहुतेकांचं जीवन साचेबद्ध असतं. घर आणि नोकरी किंवा घर आणि व्यवसाय अशा दोन विश्वांतलं आपलं जीवन. त्यामधील माणसांभोवती फेर धरणारं जगणं. आपण स्वत:साठी जगत असतो; परंतु आई-वडिल, भावंडे, पती-पत्नी आणि मुलं, मित्र-मैत्रिणी, सहकारी यांच्यासाठीही जगत असतो. शिकत असतो त्यावेळी उत्तम गुण मिळवून परिक्षा उत्तिर्ण होण्याचं स्वप्न असतं आपलं. शिक्षणानंतर स्वप्न असतं ते करिअरचं. नोकरी वा व्यवसायात स्थिरावण्याचं आणि त्यानंतर स्वत:च्या कुटुंबाचं, घराचं. लग्नाचं आणि मग मुला-मुलींना वाढवण्याचं. म्हटलं तर हे चक्रच. त्या-त्या काळातील आपली महत्वकांक्षा हे चक्र फिरवित असते.* *महत्वकांक्षा हे एक मानवी मूल्य आहे. विद्यार्जनासाठी, कर्तृत्वासाठी, स्वयंप्रेरणेसाठी ते आवश्यकच असते. महत्वाकांक्षा नसेल तर मग आपण कशाचा ध्यास घेणार आणि त्याच्या मागे धावणार? आपली इच्छा असो वा नसो, आपण स्पर्धेत ओढलो जातोच. महत्वाकांक्षा आपल्यामधील स्पर्धात्मकता वाढविते, कष्ट करायला प्रेरणा देते, चिकाटी निर्माण करते. निसर्गाकडून आपल्या प्रत्येकाला कमी'-आधिक प्रमाणात प्रतिभाशक्ती मिळालेली असते. वैयक्तिक जीवनात महत्वाकांक्षा जशी आवश्यक, तशी ती समाजजीवनातही गरजेची आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळकांनी, गांधीजींनी, नेहरूंनी देशाला गुलामगिरीतून मुक्त करण्याची आकांक्षा बाळगली. देशवासियांना एकत्र करून त्यांनी त्याची पूर्ताताही केली. महत्वाकांक्षा समाजासाठी अशा प्रकारे उपयुक्त ठरते.* ••● ‼ *रामकृष्णहरी* ‼●•• ⭐🔹🔹🔹🔹🔹🔹⭐ *श्री. संजय नलावडे, मुंबई* *9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  🌟! !  *कबिराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• कोइ एक राखै सावधां, चेतनि पहरै जागि । बस्तर बासन सूं खिसै, चोर न सकई लागि ॥ भौतिकाच्या नादे काढी जागुनिया सारी रात जे देई परमानंद त्याची सांग काय बात अर्थ : जो सर्वकाळ दक्ष व तत्पर म्हणजेच जागा असतो. त्याच्या घरी चोरी होणे. कपडे भांडी कुंडी चोरीला जाणे असा प्रकार घडत नाही. माणूस भौतिक क्षणिक बाबींना जपण्याचा किती आटापिटा करत असतो. नाशीवंत वस्तुंच्या मोहासाठी माणसाची केवढी मोठी धडपड चाललेली असते. मानसाचं जीवन व शरीरही नश्वर व क्षणभंगूर आहे. कोणत्याही क्षणी ते नष्ट होऊ शकतं. म्हणून माणसानं तत्पर असावं. सत्कर्म व सन्मार्ग सोडू नये. विकारांपासून अलिप्त राहण्यासाठी वाईट संगती, वाईट विचार व वाईट प्रवृत्तीं सोडून दिल्या पाहिजेत व सदैव दक्षता बाळगली पाहिजे. सद्गुण व सत्संगतीचा मार्ग अाचरावा लागेल एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• एखाद्यावेळी माणसाच्या हातून झालेली एखादी चूक कळत नकळत झाली असे समजावे. ती चूक जर दुस-यावेळी झाली तर समजावे की, दुर्लक्ष केल्यामुळे झाली आहे . तिस-यावेळी तीच चूक झाली तर असे समजावे की, तुमचे त्या कामात लक्ष नसल्यामुळे झाली आहे आणि पुन्हा पुन्हा जर तीच चूक झाली तर असे समजावे की,आपण इतरांपेक्षा जास्त चूका करण्याचा जणू संकल्प केला आहे आणि त्यातही तुम्ही महामूर्ख आहात हे सिद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. मग तुम्हीच विचार करा. तुम्हाला तुमच्या जीवनात चूका करायच्या की चूका टाळायच्या ? *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• प्राप्त परिस्थितीत समाधान मानने. एकदा एक भुंगा गुंजारव करत फिरत होता. तेव्हा त्याला एक चिमणी म्हणाली, 'मूर्खा, तू जो एकसारखा एकच आवाज काढत बसतो तो कशासाठी? वसंतऋतूत गाणारी कोकिळा, हिरव्यागार झाडाच्या फांदीवर बसून गाणारा तो पक्षी बघ यांची बरोबरी तुला कधीतरी करता येईल का?  तसे जमत नाही तर भिकार सूर एकसारखा काढून तू लोकांना कंटाळा का आणतोस?' भुंगा म्हणाला, 'अगं चिमणे, परमेश्‍वराने या जगात प्रत्येक व्यक्तीत निराळेपणा ठेवला आहे. वैचित्र्य असणे हा जगाचा नियम आहे, दुसर्‍याचा हेवा न करता ज्याने त्याने आपापल्या शक्तीचा उपयोग केला तर त्यात वाईट काय? जेव्हा कोकिळेचे गाणे बंद पडते तेव्हा एखाद्या सुंदर बागेत निर्जनता भासू न देण्यात माझ्या गरीबाचा उपयोग होतो.' तात्पर्य:- सर्व मनासारखे होत नाही, तर जे असेल त्यात समाधानी असावे. प्राप्त परिस्थितीत समाधानी राहणे हेच उत्तम. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 21/06/2019 वार - शुक्रवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आंतरराष्ट्रीय योग दिन* *उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस.* *दक्षिण गोलार्धातील सर्वात छोटा दिवस.* 💥 ठळक घडामोडी :- • १९८९ - अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने देशाचा ध्वज जाळण्याची कृती ही वाचास्वातंत्र्याची अभिव्यक्ती असल्यामुळे वैध ठरवली. • १९९१ - पी.व्ही.नरसिंह राव भारताच्या पंतप्रधानपदी. 💥 जन्म :- •१९२३ - सदानंद रेगे, मराठी कवी, कथाकार आणि अनुवादक. • १९८२ - विल्यम, इंग्लिश राजकुमार. 💥 मृत्यू :- • १९२८ - नाथमाधव तथा द्वारकानाथ माधव पितळे, मराठी कादंबरीकार. • १९४० - केशव बळीराम हेडगेवार, भारतीय हिंदुराष्ट्रवादी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक व पहिले सरसंघचालक. • १९५७ - योहानेस श्टार्क, नोबेल पारितोषिकविजेता जर्मन भौतिकशास्त्रज्ञ. • १९८४ - अरुण सरनाईक, मराठी चित्रपट अभिनेता. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* *जि प शाळा बिरसी,गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *महाराष्ट्रामधील सर्व बोर्डांच्या शाळांमध्ये मराठी शिकवणे बंधनकारक, त्यासाठी कठोर कायदा करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात केली घोषणा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *कृषीविषयक सर्व योजनांचे लाभ घेण्याकरिता शेतकऱ्यांना एकच अर्ज करावा लागेल अशी सुविधा या पोर्टलच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी दिले* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *मान्सून अखेर महाराष्ट्रात दाखल, दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रात जलधारा, 22-23 जूनला उर्वरित कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *नवी दिल्ली - मत्स्य उत्पादनात भारत जगात दुसऱ्या स्थानावर, पहिल्या क्रमांकावर येण्याची क्षमता आहे असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे प्रतिपादन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज नांदेडमध्ये राज्यस्तरीय योगशिबिराचे आयोजन, योगगुरू रामदेव बाबा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लावली उपस्थिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *सरकारी सेवेत 30 वर्षांहून अधिक काळ असलेल्या कर्मचाऱ्यांचं पुनरावलोकन, शारीरिकदृष्टया अकार्यक्षम किंवा भ्रष्टाचारी कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला जाणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *शिखर धवन, भुवनेश्वरकुमार नंतर भारताला तिसरा धक्का, विजय शंकरलाही झाली दुखापत, भारतीय संघात चिंतेचे वातावरण पसरले आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *लघुकथा - वेळ नाही मला* https://storymirror.com/read/story/marathi/xbrom5jq/vel-naahii-mlaa/detail वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ कथालेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *ज्ञानेश्वरांचे समाधीस्थळ : आळंदी* वारकरी भक्तांसाठी तसेच समस्त मराठी जनांसाठी आळंदीला मोठे महत्त्व आहे. ज्ञानेश्वरांनी वयाच्या एकविसाव्या वर्षी येथे १२१८ साली जिवंत समाधी घेतली. त्यानंतर १५४० मध्ये भव्य समाधी मंदिर बांधण्यात आले . ज्ञानेश्वर महाराजांना आपल्या तपसामर्थ्याचा प्रभाव दाखविण्यासाठी वाघावरून आलेल्या चांगदेवाचे गर्वहरण करण्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवून दाखविल्याची आख्यायिका आहे. ती भिंत येथे आहे. त्यांच्याशिवाय येथे विठ्ठल रखुमाई, राम, कृष्ण, मुक्ताई यांची मंदिरेही येथे आहेत. आषाढी व कार्तिकी एकादशीला येथे मोठी यात्रा भरते. आषाढात येथून ज्ञानेश्वरांची पालखी पंढरपूरला जाते. आळंदी ते पंढरपूर हे अंतर दीडशे किलोमीटर आहे. पण भक्तीरसात चिंब भिजलेले वारकरी पावसापाण्याची तमा न बाळगता पायी हे अंतर पार पाडतात. आषाढ महिन्यात संत ज्ञानेश्र्वरांची पालखी आळंदीहून पंढरपूरला जाते. त्यात असंख्य वारकरी सामील होतात. आळंदी ते पंढरपूर हे अंतर (सुमारे २०५ कि. मी.) भाविक विठू माउलीच्या नामाचा गजर करत, ज्ञानोबा माऊली तुकाराम असा जयघोष करत, चालत पार करतात. आळंदी येथे अजानवृक्षाखाली संत ज्ञानेश्र्वर महाराजांनी जिवंत समाधी घेतली म्हणूनच या स्थानास संजीवन समाधी म्हटले जाते. कीर्तन-प्रवचन-वेदाभ्यास यासाठीचे महाविद्यालय येथे आहे. संस्कृत व अन्य धार्मिक ग्रंथांचा अभ्यास तेथे अविरत सुरू असतो.ज्ञानेश्वर महाराजांचे समाधीस्थान, विठ्ठल-रखुमाईचे मंदिर, मुक्ताईचे मंदिर, सोन्याचा पिंपळ अशी अनेक स्थाने या तीर्थस्थानी भक्तिभावाने पाहण्यासारखी आहेत. इंद्रायणी काठी , देवाची आळंदी लागली समाधी , ज्ञानेशाची ज्ञानियाचा राजा भोगतो राणिव नाचती वैष्णव , मागेपुढे मागेपुढे दाटे ज्ञानाचा उजेड अंगणात झाड कैवल्याचे उजेडी राहिले उजेड होऊन निवृत्ती , सोपान , मुक्ताबाई *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे. जो ते प्राशन करेल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही. - डॉ. बाबासाहेब आंबेडकर *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *भारतात लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो ?* 2 रा 2) *उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस कोणता ?* 21 जुन 3) *उत्तर गोलार्धातील सर्वात लहान दिवस कोणता ?* 22 डिसेंबर 4) *अमेरिका या देशाची राजधानी कोणती ?* वाशिंग्टन 5) *गुजरात या राज्याची राजधानी कोणती ?* गांधीनगर *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ●  धाराजी जोगदंड ●  संजयकुमार मांजरमकर ●  शुभम साखरे ●  वीरभद्र बसापुरे ●  आनंद जाधव ●  राहुल पाटील ●  हणमंत जगदंबे ●  माधव धोंडापुरे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मानवी जीवन हे सुखदु:खाच्या वाटेवरूनच पुढे जात असतं. जीवन पटाचं वस्त्र सुख दु:खाच्या धाग्यांनी तयार होत असतं. ते सुंदर जरतारी व्हावं, असं वाटणं स्वभावधर्मच आहे. दु:खाचा सल जाणवल्याशिवाय सुखाचं मोल कळत नाही. तरूणपणी स्वत:च्या सौंदर्याची जाण झाल्यामुळे आपण तारूण्याच्या धुंदीत सौंदर्याचा, सुखाचा आनंद उपभोगतो.* *हे सुख शाश्वत नसतं. वय आपलं काम करतच असतं. जीवनाचं अखेरचं पर्व, वृद्धावस्था सुरू झाली की, या गोष्टीत आनंद मिळत नाही. आपल्या मायेच्या माणसांनी प्रेमाचं, आपुलकीचं वस्त्र आपल्या अंगावर घालावं असं वाटतं. अशा त-हेने बालपण, तरूणपण व वृद्धावस्था हे जीवनपटाचं तीन अंकी वस्त्र विणलं जातं. आपल्या वाटेला येणारं सुखदु:खाचं वस्त्र जरतारी मानून जीवन व्यतीत करणं हेच आपल्या हातात असतं.* ••● ‼ *रामकृष्णहरी* ‼●•• ☀☀☀☀☀☀☀☀☀ *संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल- 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  🌟! !  *कबिराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• करनी बिन कथनी कथे, अज्ञानी दिन रात । कूकर सम भूकत फिरे, सुनी सुनाई बात ॥ कर्माविना कैसे वर्म बरळा अज्ञान भ्रम गल्लोगल्ली फिरे श्वान तया भुंकण्याचे कर्म अर्थ : अज्ञानी व्यक्ती रात्रंदिवस कामाशिवाय बिन कामाचेच जास्त बरळत असतो. याच्याकडे स्वताःचा विचारही नसतो किवा तर्क लावण्याची कुवतही नसते. ऐकलेल्या , कुणीतरी सांगितलेल्या गोष्टी मग त्या अविवेकी असल्या तरी जशास तशा सांगत फिरतो. अफवांच्या कंड्या पसरवित फिरत असतो. अज्ञानामुळे बालिश वक्तव्ये करीत फिरत असतो. आपण सांगत असलेलंच बरोबर आहे. असा त्याचा भ्रम असतो. परंतु तो आपल्या विचार व वक्तव्याप्रती कधीच सारासार विचारही करीत नाही. जसा मोकाट कुत्रा सारखा या गल्लीतून त्या गल्लीत भुंकत फिरत असतो. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जेव्हा आपली वेळ वाईट असते तेव्हा आपल्याकडे लोक पाठ फिरवतात आणि जेव्हा आपली वेळ चांगली असते तेव्हा सगळेच जवळ येतात. परिस्थिती कशीही असली तरी प्रत्येकवेळी सुखदुःखात जे आपल्या पाठीशी असतात आणि आपण प्रत्येकवेळी कोणत्याही गोष्टीचा विचार न करता पाठीशी असतो तीच खरी माणुसकी असते आणि तीच खरी अंत:करणातून एकमेकांबद्दलची खरी आत्मियता असते. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *अंतर्ज्ञान* दोघं मित्र एका गणपतीच्या देवळात दर्शनासाठी आले होते. देवळाच्या गाभाऱ्यात एक आंधळा बसला होता. ते पाहून रमेश गोविंदाला म्हणाला, ‘ ‘ह्या बाजूला बसलेल्या त्या व्यक्तिला पाहिलसं का ? तो आंधळा आहे पण गावातील विद्‌वान पंडित आहे. ” रमेशचे म्हणणे गोविंदाला पटेना. शेवटी गोविंदा त्या आंधळ्याजवळ गेला. त्याला आपली ओळख सांगून गोविंदा त्याच्याशी गप्पा मारू लागला. गप्पा मारता मारता तो जन्मापासून आंधळा आहे हे गोविंदाच्या लक्षात आले. पण तो पंडित आहे यावर त्याचा विश्वास बसेना. म्हणून गोविंदाने त्याला विचारले, ‘ ‘या देवळाच्या गाभाऱ्यात आपण रोज कुणाचं चिंतन करता? आपल्या अभ्यासाचा नक्की विषय कोणता आहे?” यावर तो आंधळा म्हणाला, ‘ ‘मी खगोलशास्त्राचा अभ्यासक आहे. ” हे त्याचे उत्तर गोविंदाला पटेना. ‘ ‘तुम्हाला अजिबात दिसत नाही मग तुम्ही ग्रह ताऱ्यांचे निरीक्षण कसं करता?” या त्याच्या संशयाने विचारलेल्या प्रश्नावर आंधळा स्वतःच्या छातीवर हात ठेवून म्हणाला, ‘ ‘अरे, ह्याच्या आतील सर्व ग्रह ताऱ्यांचे मी निरीक्षण आणि अभ्यास करत असतो. आता तरी कळलं का?” तात्पर्य : बाह्य ज्ञानापेक्षा अंतर्ज्ञान जाणून घेण्यातच विद्‌वत्ता आहे. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 20/06/2019 वार - गुरूवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *संकष्ट चतुर्थी* 💥 ठळक घडामोडी :-  २००१ - परवेझ मुशर्रफ पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षपदी.  💥 जन्म :-  १८६९ - लक्ष्मणराव किर्लोस्कर, मराठी उद्योगपती, किर्लोस्कर उद्योग समुहाचे संस्थापक  १९३९ - रमाकांत देसाई, भारतीय क्रिकेट खेळाडू.  १९७२ - पारस म्हाम्ब्रे, भारतीय क्रिकेट खेळाडू.  💥 मृत्यू :-  १९९७ - बासू भट्टाचार्य, भारतीय चित्रपट दिग्दर्शक.  १९९७ - वासुदेव वामन पाटणकर ऊर्फ भाऊसाहेब पाटणकर, मराठीतील प्रथम शायर.  २००८ - चंद्रकांत गोखले, मराठी रंगभूमी नट व चित्रपट अभिनेता. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *नवी दिल्ली - एक देश एक निवडणुकीच्या मुद्यावर सल्ला देणाऱ्या विविध पक्षांच्या प्रमुखांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मानले आभार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *नवी दिल्ली - लोकसभा अध्यक्षपदी भाजपा खासदार ओम बिर्ला यांची बिनविरोध निवड* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *बिहारमध्ये चमकी तापाचा कहर अद्यापही सुरूच असून यामुळे मृत बालकांची संख्या ११२ वर पोहोचली असून ३00 जण अद्यापही या गंभीर आहेत* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *यंदा जून महिन्याचा तिसरा आठवडा उलटला तरी वरुणराजाने पाठ फिरवल्याने बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे, यावर्षी पाऊस लांबल्याने सोयाबीन आणि भात पीक धोक्यात* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *मुंबई- चर्चगेटमधील बँक ऑफ इंडिया इमारतीत आग; अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *ICC World Cup 2019 भारताचा प्रमुख फलंदाज शिखर धवनचा वर्ल्ड कप स्पर्धेतून माघार, भुवनेश्वर कुमार बाबत संभ्रम अवस्था* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *विश्वचषक स्पर्धा 2019- न्यूझीलंडचा दक्षिण आफ्रिकेवर 4 विकेट राखून विजय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *लघुकथा - अपेक्षाभंग* https://storymirror.com/read/story/marathi/u55819bp/apekssaabhng/detail वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ कथालेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ☀ *उघड्या डोळ्यांनी सूर्यग्रहण पाहिल्यास काय होईल ?* ☀ ************************** थोडक्यात सांगायचं तर, ते डोळे कायमचे मिटतील. कारण सूर्यकिरणांची तीव्रता इतकी असते, की त्यापायी डोळ्यांच्या पडद्याला कायमस्वरूपी इजा होऊ शकते. त्यांची तशी कारणंही आहेत. सामान्यत: अशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून दिवसाच्या तळपत्या सूर्याकडे पाहवणार नाही आशीच योजना निसर्गानं करून ठेवली आहे. त्यापायी सूर्याकडे नजर वळवली की त्याचं तेज डोळ्यांना सहन न होऊन ते टाळण्यासाठी डोळ्यातली बाहुली कमालीची आकुंचन पावते. ते करण्यासाठी डोळ्यांभोवती स्नायूंना कमाल क्षमतेबाहेर काम करावं लागतं. सहाजिकच त्याचा ताण पडून स्नायु दुखू लागतात. ती वेदना सहन न झाल्यामुळेच मग नजर आपोआप सूर्यापासून दूर वळते. पण सूर्यग्रहणाच्या वेळेस चंद्राची सावली पृथ्वीवर पडल्यामुळे सूर्य काजळल्यासारखा दिसतो. सहाजिकच त्याच्या किरणांची तीव्रता कमी झाल्याची भावना होते. पण ही चुकीची कल्पना असते. साधारणपणे सूर्यकिरणांमध्ये जंबुपार विकीरणांपासून ते रेडिओलहरीपर्यंतची प्रारणं अस्तित्वात असतात. यापैकी जंबुपार किरणं जास्त धोकादायक असतात. शिवाय डोळ्यातील भिंग या किरणांचं डोळ्याच्या पडद्याच्या पेशींवर केंद्रीकरण करतं. या पेशी दोन प्रकारच्या असतात. दंडपेशी आणि शंकूपेशी. यांच्यावर प्रकाश पडताच तो शोषला जातो व विशिष्ट रासायनिक अभिक्रिया होऊन एक विद्युतरासायनिक संदेश मेंदूकडे पाठवला जातो. आपण एखाद्या वस्तूकडे पाहातो तेव्हा त्या वस्तूवरुन परावर्तित झालेला सूर्याचा प्रकाश या पेशींवर पडतो. तो सौम्य असतो. शिवाय या रासायनिक अभिक्रियेचा प्रभाव कायमस्वरूपी नसतो. त्यामुळं या पेशी पूर्वपदावर येतात. पण जेव्हा आपण थेट सूर्याकडे पाहतो तेव्हा त्या प्रखरता कितीतरी पट अधिक असते. त्यामुळे होणारी रासायनिक अभिक्रिया अपरिवर्तनीय स्वरूपाची ठरून पेशी कायमच्या निकामी होण्याची शक्यता असते. जेव्हा आपण एखाद्या भिंगातून सूर्यकिरण कागदावर केंद्रीत करतो तेव्हा काही वेळाने तो कागद जळू लागतो. आपल्या डोळ्यातल्या भिंगातून केंद्रीकरण झालेले सूर्याचे प्रखर किरणही अशाच तर्‍हेने या पडद्याच्या पेशी जाळून टाकू शकतात. त्यामुळे पडद्याचा तेवढा भाग जळून जातो. असे अनेक ठिपके पडद्यावर जमा झाल्यास संपूर्ण पडदाही जळून जाऊन कायमस्वरूपाचं आंधळेपण येऊ शकतं. खंडग्रास सूर्यग्रहणाच्या वेळेस सूर्याची लहानशी कोर जरी दिसत राहिली, तरी तिची प्रखरताही अशा प्रकारचं अंशिक किंवा संपूर्ण आंधळेपण आणण्यास पुरेसं ठरतं. खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळेसही संपूर्ण खग्रास अवस्था काही सेकंद किंवा मिनिटंच राहते. त्या वेळी कदाचित सूर्याकडे पाहणे शक्य होतं. पण या खग्रास अवस्थेच्या अलीकडच्या पलीकडच्या स्थितीतली सूर्यकोरही दाहक ठरू शकते. म्हणूनच कोणत्याही सूर्यग्रहणाच्या वेळेस डोळ्यांवर काळ्या काचेचं किंवा खास चष्म्याचं संरक्षण असल्याशिवाय सूर्याकडे पाहणे अतिशय धोकादायक असतं. *बाळ फोंडके यांचा 'काय ?' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• स्वभावातील गोडीने आणि जिभेवरील माधुर्याने माणसे जोडली जातात. *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *महात्मा गांधी यांना 'महात्मा' ही उपाधी कोणी दिली ?* रविंद्रनाथ टागोर 2) *'आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस' केव्हा साजरा केला जातो ?* 2 ऑक्टोबर 3) *महाराष्ट्रातील सर्वात लहान राष्ट्रीय महामार्ग कोणता ?* न्हावाशेवा पळस्पे - 27 Km 4) *महाराष्ट्रातील एकूण तालुके किती ?* 353 5) *महाराष्ट्रातील एकूण जिल्हा परिषद किती ?* 33 *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● गणेश अंगरोड ● लक्ष्मण तुरेराव ● शंकर कदम ● रमेश मुनेश्वर ● महेश कुडलीकर ● बालाजी गाडे ● विनोद गुम्मलवार ● गंगाधर गट्टूवार ● लक्ष्मण चन्नावार ● मन्मथ मोकलीकर ● राजेंद्र पाटील ● धनंजय उजनकर ● संभाजी आटोळकर ● निमेश गावित ● अनिल राठोड ● रामचंद्र विश्वब्रम्ह ● गणेश दघाळे ● किरण बेंद्रे ● शादूल चौधरी ● साईराम सुरकूटवार ● दौलतराव वारले ● नितीन पवार ● अजित पिंगळे ● शिवा बोधने *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *हातात काय आहे? बरेचसे तर हाताबाहेरचे आहे. जन्म-मरण हातात नाही. पुढचा क्षण कसा असावा, ते हातात नाही. भूतकाळ मागे सुटलेला, असल्याच तर ब-या-वाईट आठवणी. भविष्याच्या गर्भात काय दडले, माहित नाही. त्यामुळे त्याची उत्सुकता आणि त्याच्या अनिश्चिततेतून वाटणारी असुरक्षितता. भविष्यातील असुरक्षिततेवर मात करण्यासाठी भविष्याविषयीचे स्वप्नरंजन करणे किंवा कल्पनेचे मनोरे बांधणे हाच काय तो उतारा. हाही उतारा कधी क्षणात उधळला जातो आणि कल्पनेचे मनोरे जमीनदोस्त होऊन जातात आणि उरते ती अगतिकता आणि असहायता.* *थोडाफार हातात म्हटल्यापेक्षा चिमटीत आहे तो आताचा वर्तमानातील क्षण. तोही क्षण चिमटीत आहे म्हणता म्हणता निसटतो आणि भूतकाळाच्या शवागारात जमा होतो. वर्तमान हातात असतो, तेव्हा आपण ब-याच वेळा भूतकाळात रममाण असतो. नाहीतर भविष्यातील स्वप्नरंजनात दंग असतो. त्यामुळे हातात असलेला क्षण तसाच सटकून निसटून जातो. क्षणाक्षणाला प्रवाही असलेला क्षण जगता आला पाहिजे. तोच क्षण माझा; ना भूतकाळ माझा. तो तर मेलेला. ना भविष्य माझे; ते तर स्वप्न. आहे ते वर्तमान. यात जगता आले तरच ते जगणे. यासारखी नितांत सुंदर गोष्ट नाही.* *॥ रामकृष्णहरी ॥* 🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿 *श्री संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल- 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  🌟! !  *महात्माफुले यांची अखंड* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• प्राणिमात्रा सोई सुख करण्यास || निर्मी पर्जन्यास || नद्यांसह ||१|| त्यांचे सर्व पाणी वेगाने वाहती || आर्ये कुरापती || तिर्थे केली ||२|| दाढी दोई वेण्या मुढ भाररीती || भट करिताती || द्रव्यलूटा ||३|| आर्यानी कल्पीली थोतांडे ||ही सारी || दर्गे सर्वोपरी || जोती म्हणे ||४|| एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्या व्यक्ती स्वत:च्या सौंदर्याकडे कधीच पाहत नाहीत परंतु जगाचे अर्थात इतरांचे सौंदर्य कसे अधिक चांगले दिसेल यासाठी कोणत्या ना कोणत्या माध्यमातून प्रयत्न करण्यासाठी धडपडत असतात आणि त्यातच त्यांच्या सौंदर्यात अर्थात इतरांच्या सौंदर्यात समाधान मानतात.जेव्हा अशी व्यक्ती समाजात क्वचित पहायला मिळते ते इतरांचे अहोभाग्य समजावे.हे लोक स्वत:कडे आणि स्वत:च्या जीवनाकडे कधीच झुकून पाहत नाहीत.त्यांना स्वत:च्या जीवनात काही रस नसतो.रस असतो तो जगाकडे आणि जगाला सुंदर करण्याकडे.अशी व्यक्ती कधीच स्वार्थी वृत्तीची नसते.म्हणूनच इतरांच्या हृदयात सामावले जातात.उलट ज्या व्यक्ती आपले स्वत:चे सौंदर्य अधिकाधिक कसे खुलेल आणि इतरांपेक्षा आपण कसे खुलून दिसू,लोक आपल्याकडे कसे पाहतील अशी जर भावना असेल तर ती व्यक्ती स्वार्थी आणि मतलबी समजावी.अशा व्यक्तींना कुठेही स्थान मिळत नाही. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *त्‍यागाचे महत्‍व* फार वर्षापूर्वी एक स्‍वाभिमानी राजा होऊन गेला. त्‍याचे राज्‍य मोठे होते आणि अपार संपत्तीने खजिना भरलेला होता. त्‍याचे महाल सोन्‍यापासून बनलेले होते. नोकरचाकरांची रेलचेल होती. मात्र त्‍याचे सल्‍लागार त्‍याच्‍या अहंकाराला प्रोत्‍साहन देत होते. एकदा त्‍याच्‍या दरबारात एक तेज:पुंज साधू आला. राजाला पाहूनच त्‍याने ओळखले की राजाला फार गर्व चढला आहे. राजाने मोठ्या तो-यात विचारले,''तुला काय पाहिजे?'' साधू म्‍हणाला,'' राजन, मला तुझ्याकडून काहीच नको आहे. उलट मीच तुला काहीतरी देण्‍यास आलो आहे.'' राजाचा अहंकार दुखावला व राजा मोठ्याने ओरडला,''लहान तोंडी मोठा घास घेतोस. लाज वाटते का नाही. तुझ्याजवळ फुटकी कवडी नाही अन तू मला काय देणार?'' साधू मंद स्मित करत म्‍हणाला,''राजन, त्‍यागाशिवाय भोगाला चव येत नाही. वैभवात जेव्‍हा त्‍याग समाविष्‍ट होते तेव्‍हा तो वंदनीय आणि प्रशंसनीय ठरतो. त्‍याग येताच अहंकार दूर होतो. आसक्ती दूर होते आणि मन परमात्‍म्‍याकडे पोहोचण्‍यासाठी तयार होते.'' फकीराच्‍या राजा खजील आला आणि त्‍याचे डोळे उघडले. त्‍याने गर्वाचा त्‍याग केला. तात्‍पर्य :- त्‍यागाने अहंकाराचा नाश होतो. अहंकार हा मनुष्‍याचे नुकसान करतो. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 19/06/2019 वार - बुधवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- • १९६६ - शिव सेना या राजकीय पक्षाची स्थापना झाली. • १९७८ - गारफील्ड या कार्टून व्यक्तिमत्त्वाचे वर्तमानपत्रात पदार्पण. • १९९९- "मैत्रेयी एक्सप्रेस" या नावाने कोलकाता ते ढाका बस सेवेचे अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते उद्घाटन 💥 जन्म :- • १९४५ - ऑँग सान सू की, म्यानमारची राजकारणी. • १९४७ - सलमान रश्दी, ब्रिटीश लेखक. • १९७० - खासदार राहुल गांधी 💥 मृत्यू :- • १८६७ - मॅक्सिमिलियन पहिला, मेक्सिकोचा सम्राट (जन्म-१८३२), मृत्यूदंड. • १९०२ - आल्बर्ट, सॅक्सनीचा राजा. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *नवी दिल्ली - लोकसभा सभापतीपदासाठी एनडीएकडून भाजपाचे कोटा येथील खासदार ओम बिर्ला यांना उमेदवारी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मुंबई - अकरावीच्या प्रवेशासाठी तुकड्यांमध्ये वाढ करणार, शिक्षणमंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत माहिती* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *सोलापूर : शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना शाळेत न येऊ देता गेटला कुलुप लावून मज्जाव करणाऱ्या तिघांविरुद्ध सोलापुरात गुन्हा दाखल* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *दुचाकीस्वारांना पुणे पोलिसांनी केलेल्या हेल्मेट सक्तीला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली स्थगिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *त्र्यंबकेश्वर (नाशिक) येथून आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान, शेकडो दिंड्यांचा सहभाग* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप-शिवसेना सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प राज्य विधिमंडळात अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले सादर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *आयसीसी क्रिकेट विश्वचषक - इंग्लंडचा अफगाणिस्तानवर १५० धावांनी विजय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *लघुकथा - संघर्ष* https://storymirror.com/read/story/marathi/k5sul23x/snghrss/detail वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्यावे ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ कथालेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *आयोडीनयुक्त मीठ म्हणजे काय ?* 📙 घरातील मिठाची पिशवी पाहा. त्यावर मोठया अक्षरात 'आयोडिनयुक्त मीठ' असे लिहिलेले दिसेल. मिठात आयोडिन का मिसळतात, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल ! आयोडिन खूप अल्प प्रमाणात जरी शरीरास आवश्यक असते, परंतु तरी आयोडिन शरीराच्या वाढीसाठी फार आवश्यक असते. थायरॉईड ग्रंथींमध्ये या आयोडीनपासुन थायरॉक्सिन नावाचा अंत:स्राव तयार केला जातो. या स्रावावर शरीराची वाढ व चयापचयाच्या अनेक क्रिया अवलंबून असतात. आयोडीनच्या कमतरतेमुळे ही ग्रंथी सुजते. त्याला गलगंड असे म्हणतात. आयोडीनच्या कमतरतेमुळे गर्भातील अर्भक व लहान मुलांच्या वाढीवर, बुद्धिमत्तेवर याचा विपरीत परिणाम होतो व ती मतीमंद व मूकबधिर होतात. मोठ्या माणसांत लठ्ठपणा येतो. हालचाली मंदावतात. बौद्धिक क्षमता कमी होते. वाढ खुंटते. स्त्रियांमध्ये गर्भपाताचे प्रमाण वाढते. आयोडिन मुख्यत: समुद्री मासे, मीठ व काॅड माशाच्या यकृताचे तेल इत्यादीपासून मिळते. कमी प्रमाणात दूध, मांस, पालेभाज्या व तृणधान्यातही ते काही प्रमाणात सापडते. पिण्याच्या पाण्यातही थोड्या प्रमाणात आयोडीन सापडते. जमिनीमध्ये आयोडिनचे प्रमाण जेथे कमी असेल त्या भौगोलिक प्रदेशात आयोडीनच्या कमतरतेमुळे लोकांना मोठ्या प्रमाणात या व्याधीला बळी पडावे लागते. त्यामुळे आयोडिनचा अभाव टाळण्यासाठी आयोडीनचा पुरवठा करणे आवश्यक ठरते. आयोडीनचा पुरवठा करण्यासाठी मीठ व खाद्यतेल यांचा वापर करता येतो. मिठाचा जेवणात समावेश गरीब श्रीमंत असे सर्वच लोक करत असल्याने मिठात टाकल्याने सर्व देशातील या समस्येचा नायनाट करता येईल. त्यामुळे मिठात आयोडिन १ किलोला १५ ते ३० मिलीग्रॅम या प्रमाणात आयोडिन मिसळले जाते. *डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित* यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••• जिथं आपली कदर नाही, तिथं कधीही जायचं नाही. ज्यांना खर सांगितल्यावर राग येतो, त्यांची मनधरणी करत बसायचे नाही. जे नजरेतून उतरलेत त्यांचा त्रास करून घ्यायचा नाही. *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* *मुख्याध्यापिका प्रा.शा. पिठ्ठी ता पाटोदा* 📱  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *भारताचे राष्ट्रीय गीताचे रचनाकार कोण ?* बकीमचंद्र चॅटर्जी 2) *एका बिंदूतून किती रेषा काढता येतात ?* अनंत 3) *भारताची राजमुद्रा कोठून घेण्यात आली ?* सारनाथ येथील अशोकस्तंभावरून 4) *भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते ?* थरचे वाळवंट (राजस्थान) 5) *'राष्ट्रपिता' असे कोणाला आदराने संबोधले जाते ?* महात्मा गांधी *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ●  सुभाष दरबस्तेवार ●  खुशाल बोकडे ●  भारत सोनवणे ●  प्रताप भिसे ●  नागेश कोसकेवार ●  नारायण शिंगारे ●  शंकर बेल्लूरवाड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मनुष्य समाजशील प्राणी आहे. त्यामुळे समाजविकासाच्या दृष्टीने त्याच्याकडे जे काही गुण आवश्यक आहेत, त्यापैकी 'चारित्र्याचा' क्रमांक सर्वात वरचा लागतो. सामाजिक शांतता व प्रगती यामध्ये व्यक्तिचे चारित्र्य महत्वपूर्ण योगदान देते. चारित्र्याच्या अभावामुळे दुर्गुणांचे प्राबल्य वाढून सामाजिक अशांतता निर्माण होते तर सद्गुणांमुळे व्यक्ती व समाजाचे चारित्र्य सदृढ होते. कटु प्रवचनकार जैनमुनी तरूण सागर यांना, देशाचे संरक्षण प्रामाणिकपणे करणारा सैनिक व सामाजिक समतेसाठी झटणारा संत हे उत्तम चारित्र्याचे आदर्श नमुने वाटत.* *संत व सैनिक दोघांच्या चारित्र्य सामर्थ्यांचे महत्व सांगताना मुनी म्हणत,'संत आणि सैनिकाला झोपू देऊ नका. ते दोघे झोपल्यावर समाज आणि देशाचे भाग्य झोपी जाते. पापी माणूस आणि भ्रष्ट नेते यांना जागे होऊ देऊ नका. कारण ते जागे झाले तर देश आणि समाजातील शांतता, सुख चिरडले जाईल. ज्या देशातील संत आणि शिपाई जागे असतात, तो देश कधीही नष्ट होत नाही. जागरूक संत आणि प्रामाणिक शिपाई देशात शांतता आणि सुख निर्माण करू शकतात. आपल्या अवतीभवती असणा-या व्यक्तींच्या गरजा भागविण्याचे सामर्थ्य आपल्यात असावे. आपल्यावर ज्यांनी विश्वास ठेवला त्यांच्या विश्वासाला सदैव पात्र राहण्याचे बळ आपल्याला मिळावे, अशी चारित्र्यसंपन्न व्यक्ती विश्वनियंत्याकडे प्रार्थना करताना दिसते.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 *संजय नलावडे, चांदीवली, मुंबई* 📱 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  🌟! !  *महात्मा फुले यांची अखंड* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• निर्मीकाने जर एक पृथ्वी केली || वाही भार भली || सर्वत्रांचा ||१|| तृणवृक्षभार फाळी आम्हासाठी || फळे ती गोमटी || छायेसह ||२|| सुखसोईसाठी गरगर फेरे || रात्रंदीन सारे || तीच करी ||३|| मानवांचे धर्म एक नसावे अनेक || निर्मीक तो एक || जोती म्हणे ||४| *संकलन : एकनाथ डुमणे, मुखेड* 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्याप्रमाणे काट्यातून गुलाबाला फुलण्यासाठी काट्याशी टक्कर द्यावीच लागते तेव्हा कुठे गुलाबाला इतरांना आनंदी पाहता येते.जर इतरांना आनंद द्यायचा असेल तर आपले दुःख त्यांच्यासमोर मांडून चालणार नाही.जर मांडलेत तर त्यांना आनंदाने आपण पाहू शकणार नाही.उलट त्यांच्या आनंदावर विरजण टाकल्यासारखे होईल.इतरांना सुखात आणि आनंदात पहावयाचे असेल तर आपल्याला होत असलेले दु:ख बाजूला सारून त्यांना होणा-या दु:खावर फुंकर घालून सुखाचे काही क्षण देऊ शकतो आणि एवढी तयारी जर आपण ठेवली तर इतरांना जसा आनंद देता येईल त्या आनंदाबरोबरच आपल्या जीवनात आनंद लुटता येईल.नाही तर त्यांच्या डोक्यावर दु:खाचे ढग जसे दाटलेले पहायला मिळतील तसेच आपल्याही डोक्यावर दु:खाणे ढग अधिक गर्दी करुन राहतील.मग आपल्या सुखी जीवनाचे कोणतेही इप्सित साध्य होणार नाही.इतरांना दु:ख देण्यापेक्षा,मन दुखवण्यापेक्षा त्यांच्या चेहऱ्यावर हसू कसे फुलवता येईल याचा प्रयत्न करायला शिकले पाहिजे. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मैत्रीच्या मर्यादा* एका गावाच्या एका पेठेत एक कोळसेवाला राहात होता. जवळच एक धोबी राहावयास आला. त्या दोघांची चांगली ओळख झाली. कोळसेवाल्याला वाटले, 'धोबी फार चांगला मनुष्य आहे. आपल्या अर्ध्या घरात तो राहीला तर सोबत होईल नि हळुहळू परस्परांची मैत्रीही वाढत जाईल.' एक दिवस कोळसेवाल्याने धोब्याला आपल्या मनातील विचार बोलून दाखविले. कोळसेवाला पुढे म्हणाला, 'या महागाईच्या दिवसांत आपल्या खर्चात तेवढीच बचत होईल. शिवाय एकमेकांना सोबतही होईल!' 'फार फार आभारी आहे. तुम्ही खरोखरच फार चांगले आहात!' धोबी त्याला नम्रपणे म्हणाला. 'बाकी सर्व ठीक आहे हो, पण तुमचं आमचं एकत्र राहाणं जमायचं नाही. कारण मी जीवाचा आटापीटा करून जे जे स्वच्छ करीत जाईन, ते ते एका क्षणांत काळंकुट्टं होईल, तुमच्या शेजारानं! माफ करा!!' तात्पर्य - चांगल्या हेतूने होणा-या मैत्रीलाही परिस्थितीच्या नैसर्गिक मर्यादा असतात. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 17/06/2019 वार - सोमवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- २०१३ - भारताच्या उत्तराखंड राज्यात ढगफुटी होऊन एका दिवसात ३४० मिमी (१३ इंच पाउस) पडला. शेकडो व्यक्ती मृत्युमुखी, हजारो यात्रेकरी अडकले. 💥 जन्म :- १९७३ - लियँडर पेस, भारतीय टेनिसपटू. १९८० - व्हिनस विल्यम्स, अमेरिकन टेनिसपटू. 💥 मृत्यू :- १८५८ - राणी लक्ष्मीबाई, झाशीची राणी (लढाईत). १८९५ - गोपाळ गणेश आगरकर, समाजसुधारक, विचारवंत. २००४ - इंदुमती पारीख, सामाजिक कार्यकर्त्या. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *विदर्भ वगळता आजपासून शाळेला सुरुवात, पहिल्याच दिवशी मुलांना मिळणार पुस्तके, नवागताचे होणार स्वागत* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मुंबई - राधाकृष्ण विखे पाटील, जयदत्त क्षीरसागर, आशिष शेलार, अतुल सावे, अनिल बोंडे, सुरेश खाडे, डॉ. संजय कुटे, यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *मुंबई - नव्या मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर, राधाकृष्ण विखेंना गृहनिर्माण खात्यावर मानावे लागले समाधान* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *रायगड - पाताळगंगा येथील रिलायन्स कंपनीत आग, मोठा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *संसदेचे पावसाळी अधिवेशनास आजपासून सुरुवात, लोकसभेतील नेत्याविषयी काँग्रेसमध्ये अद्यापही अनिश्चितता* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *World Cup 2019 मँचेस्टर - विराट कोहलीचे एकदिवसीय क्रिकेट सामन्यात 11 हजार धावा पूर्ण* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *डकवर्थ-लुईस नियमांनुसार भारताने पाकिस्तानवर ८९ धावांनी विजय मिळवला. विश्वचषकात भारताचा पाकिस्तानवर हा सातवा विजय ठरला.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *आजची कथा - मैत्रीचं झाड* * https://storymirror.com/read/story/marathi/eqz2hwpv/detail/detail?undefined कथा वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्यावे ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ कथालेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *राणी लक्ष्मीबाई* लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर, म्हणजेच झाशीची राणी लक्ष्मीबाई, (नोव्हेंबर १९, इ.स.१८३५ - जून १८, इ.स. १८५८) या एकोणिसाव्या शतकातील झाशी राज्याच्या राणी होत्या. हिंदुस्थानात इ.स. १८५७च्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीविरूद्ध झालेल्या स्वातंत्र्य उठावातील या एक अग्रणी सेनानी होत्या. त्यांच्या शौर्याने यांना ‘क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता’ म्हणून जनमानसात अढळ स्थान प्राप्त झाले. लक्ष्मीबाईंचे मूळ नाव मनिकर्णिका होते. त्यांचे वडील मोरोपंत तांबे हे पुण्याच्या पेशव्यांच्या आश्रयाला होते. तांबे कुटुंब मूळचे सातारा जिल्ह्यातील धावडशी गावचे होते. लक्ष्मीबाईंचा जन्म भागीरथी बाई यांच्या पोटी उत्तर प्रदेशातील काशी येथे झाला होता.धोरणी, चतुर, युद्धशास्त्रनिपुण, शूर आणि थोर कर्तृत्व व नेतृत्व असणाऱ्या राणी लक्ष्मीबाई जन्मतः कोणत्याही राजघराण्यातील नसल्या तरी राजघराण्याशी संबंधित व्यक्तींमधे वावरलेल्या, वाढलेल्या होत्या. अश्वपरीक्षेचे सर्व मापदंड माहीत असणाऱ्या लक्ष्मीबाई घोडेस्वारी करण्यातही वाकबगार होत्या. त्या काळी पूर्ण हिंदुस्थानात श्रीमंत धोंडोपंत बाजीराव पेशवे व नानासाहेब पेशवे आणि जयाजी शिंदे व लक्ष्मीबाई या तिघांशिवाय कोणीही अचूक अश्वपरीक्षा करणारा नव्हता. अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असणाऱ्या राणी लक्ष्मीबाईंनी युद्धशास्त्रातही प्रावीण्य मिळविले. बाजीरावांच्या पदरी बाळंभट देवधर नावाचे उत्तम कसरतपटू आणि कुस्तीगीर होते. त्यांनीच मल्लविद्येत पारंगत होण्यासाठी मल्लखांब नावाचा कसरतीचा वेगळा प्रकार शोधून काढला. मनाची एकाग्रता, विलक्षण चपळता, शरीराचा तोल सांभाळण्याचे पूर्ण कौशल्य, काटकपणा आणि चतुरस्र भान वृद्धिंगत करणाऱ्या मल्लखांब विद्येतही राणी लक्ष्मीबाई तरबेज झाल्या. लक्ष्मीबाईंचे वैशिष्ट्य म्हणजे पुरुषप्रधान संस्कृती असणाऱ्या समाजाने एका विधवा राणीला दुर्लक्षित करू नये म्हणून त्यांनी धोरणीपणाने पुरुषी पोषाखात वावरण्याचे ठरवले. इ.स. १८४२मध्ये त्यांचा विवाह झाशी संस्थानाचे राजे गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी झाला. तेंव्हा त्यांचे नाव बदलून लक्ष्मीबाई असे ठेवण्यात आले. लग्नानंतर झाशीच्या प्रजाजनांत राणीबद्दल विशेष प्रेम निर्माण झाले. दरबाराचे कामकाज राणीने पाहणे गंगाधररावांस पसंत नसल्याने मिळालेल्या वेळेचा उपयोग लक्ष्मीबाईंनी स्वत्त्व जपण्यासाठी केला. त्यांनी आपला रोजचा व्यायाम, कसरत, घोडेस्वारी, तलवारबाजी नियमित सुरू ठेवली. गंगाधरराव नेवाळकर व लक्ष्मीबाई यांना मुलगा झाला परंतु तीन महिन्याचा असताना तो मृत्यू पावला. मुलाच्या रूपाने वारस मिळाल्याच्या आनंदात असणारे गंगाधररावही या गोष्टीने दुःखी झाले. त्यांनी वासुदेवराव नेवाळकर यांच्या मुलाला दत्तक घेऊन त्याचे दामोदर असे नाव ठेवले. इ.स. १८५३मध्ये गंगाधररावांचे निधन झाले. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• केवळ ज्ञान असून चालत नाही ते कस आणि केव्हा वापरायचं याचही ज्ञान असावं लागत. *संकलन : सौ. सुभद्रा खेडकर, बीड* *मुख्याध्यापिका प्रा.शा. पिठ्ठी ता.पाटोदा 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *थर्मामीटरचा शोध कोणी लावला ?* गॅलिलिओ 2) *सिग्नलचा शोध कोणी लावला ?* गॅरेट मॉर्गन 3) *प्लास्टिकचा शोध कोणी लावला ?* अलेक्झांडर पार्क्स 4) *महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते ?* गंगापूर ( गोदावरी नदीवर ) 5) *राष्ट्रगीत किती सेकंदात पूर्ण करणे आवश्यक असते ?* 52 सेकंद *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● आकाश रेड्डी येताळकर ●  गजानन पाटील ●  गणेश गुंडेवार ●  आप्पा यलकटवार ●  दिग्विजय चव्हाण पाटील ●  लालूभाई शंकरोड ●  धनंजय गुडसुरकर ●  गणपत कल्हाळे ● भास्कर भेदेकर चिटमोगरेकर ● साईबाबा बनसोडे ● प्रवीण जावळे ● अक्तर शेख *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *'यश' नेमकं काय? असं विचारल्यावर प्रत्येकाचं उत्तर वेगळं असतं. मुलांनी परीक्षेत चांगले मार्कस् मिळवणं? त्याला ‘योग्य’ तो मार्ग मिळणं, चांगली नोकरी मिळणं, भरपूर पैसे-प्रतिष्टा कमविणे? घर-गाडी मिळविणे.* *९५% मिळवून देखील आत्महत्या/नैराश्य असतेच. प्रतिष्टा-पैसा असूनही तुरुंगवास, वाद-विवाद... मग स्वतःला यशस्वी समजून देखील सुखी का नाही? असो... !* *कृष्णमूर्ती, रविंद्रनाथ टागोर याचं कधीही शाळेशी जमलं नाही. महात्मा गांधींना ३८%- ४०% गुण मिळत, तरीदेखील ही माणसं जगद्गुरू झाली. मुलं परीक्षा देऊन, गुणवत्ता दाखवून कधीच हुशार होत नाहीत किंवा यशस्वी होत नाहीत. जेव्हा शिक्षण संपतं आणि जगणं सुरु होत, तेव्हाच अनुभवाचं शिक्षण चालू होतं. worldclass होण्यासाठी अनुभवाचं शिक्षण आवश्यक आहे. त्यासाठी स्वप्रतिमा प्रबळ असावी लागते. आनंदी, समाधानी आणि जगावर प्रेम करणारी माणसंच "Worldclass Personality" म्हणून ओळखली जातात.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼ ●•• *संजय नलावडे, चांदीवली, मुंबई* 📱 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कबिराचे बोल.......!* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• कोइ एक राखै सावधां, चेतनि पहरै जागि । बस्तर बासन सूं खिसै, चोर न सकई लागि ॥ भौतिकाच्या नादे काढी जागुनिया सारी रात जे देई परमानंद त्याची सांग काय बात अर्थ : जो सर्वकाळ दक्ष व तत्पर म्हणजेच जागा असतो. त्याच्या घरी चोरी होणे. कपडे भांडी कुंडी चोरीला जाणे असा प्रकार घडत नाही. माणूस भौतिक क्षणिक बाबींना जपण्याचा किती आटापिटा करत असतो. नाशीवंत वस्तुंच्या मोहासाठी माणसाची केवढी मोठी धडपड चाललेली असते. मानसाचं जीवन व शरीरही नश्वर व क्षणभंगूर आहे. कोणत्याही क्षणी ते नष्ट होऊ शकतं. म्हणून माणसानं तत्पर असावं. सत्कर्म व सन्मार्ग सोडू नये. विकारांपासून अलिप्त राहण्यासाठी वाईट संगती, वाईट विचार व वाईट प्रवृत्तीं सोडून दिल्या पाहिजेत व सदैव दक्षता बाळगली पाहिजे. सद्गुण व सत्संगतीचा मार्ग अाचरावा लागेल - एकनाथ डुमणे, मुखेड ९०९६७१४३१७ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जीवनातील कोणत्याही व्यवहारात दोन बाजू असतात आणि जेव्हा मनुष्य दोन्ही बाजूंचा विचार करतो तेव्हा त्याला ख-या व्यवहाराचे ज्ञान अवगत झाले आहे असे समजावे.जर एकाच बाजूने विचार करायला लागला तर कधी कधी कमी फायदा होतो तर जास्त नुकसान.नुकसान जेव्हा व्हायला लागते तेव्हा त्याला ख-या व्यवहाराचे ज्ञान अत्यल्प आहे असे समजावे.कुठेतरी त्याची बाजू कमी आहे.अशावेळी त्याच्या मनात नकाराची,नैराश्याची,परिस्थितीशी टक्कर देण्याची क्षमता अधिक वृद्धिंगत झाली आहे.त्यामुळेच वेळोवेळी अपयशाला सामोरे जाण्याची वेळ येत आहे.ह्या अशा नकारात्मक उर्जेचा त्याग करायचा असेल तर उलट विचार करायला हवे.जीवनात येणा-या कोणत्याही प्रसंगाला तोंड देण्याची तयारी ठेवायला हवी.मन स्थिर ठेवून कृती करण्याची तयारी,ठाम विश्वास, कामात एकाग्रता आणि सातत्य ह्यावर जर अधिक भर दिला तर कोणतेही जीवनव्यवहारातले प्रश्र्न सोडवायला तत्पर व्हाल.तुमच्या मनातला नकार हा तुमच्या जीवनातला सदैव अपयशाकडे घेऊन जाणारा आहे की,त्यातून काहीच साध्य होणार नाही.त्यापेक्षा सकारात्मक बाजूने जर नेहमी जीवनात विचार करून मार्गक्रमण केले तर जीवनातले कितिही बिकट प्रश्न असले तरी सहजपणे सोडवता येतील.तेव्हा जीवनात ह्या दोन्ही बाजूने विचार करुन योग्य अयोग्य, चांगले वाईट ह्याचे ज्ञान असणे केव्हाही चांगले. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद...९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• साप आणि खेकडा एक साप आणि एक खेकडा एकमेकांचे मित्र होते. खेकडा सरळ वागणारा होता. त्याने सापाला चांगल्या रीतीने वागण्याचा खूप वेळा उपदेश केला, परंतु सापाने तिकडे लक्ष दिले नाही. एके दिवशी साप अंग ताणून विश्रांती घेत असताना खेकड्याने त्याला मारून टाकले व त्याच्याकडे बघून तो म्हणाला, 'तू आता जसा सरळ आहेस तसाच नेहमी राहिला असतास तर ही स्थिती कशाला झाली असती ? तात्पर्य - राजमार्ग सोडून वाकड्या मार्गाने जाणारा मनुष्य नेहमीच संकटात सापडतो. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00           ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 29/03/2019 वार - शुक्रवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १८५७ - मंगल पांडे या ब्रिटिशांच्या बंगाल पलटणीतील शिपायाने बराकपूर छावणीत अधिकाऱ्यांवर गोळ्या झाडल्या. हा १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धाचा प्रारंभ मानला जातो. १९६२ - भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते पिंपरी येथील हिंदुस्थान अँटिबायोटिक्सच्या पेनिसिलिन कारखान्यातील स्ट्रेप्टोमायसिनच्या उत्पादन प्रकल्पाचे अनावरण झाले. १९६८- महात्मा फुले विद्यापीठाची राहुरी येथे स्थापना १९८२ - एन.टी. रामाराव यांनी तेलुगू देसम पक्षाची स्थापना केली. २००४ - भारतीय फलंदाज वीरेंद्र सेहवाग याने पाकिस्तान विरुद्ध कसोटी क्रिकेट सामन्यात ३०९ धावांची खेळी केली व त्रिशतक झळकवणारा पहिला भारतीय फलंदाज झाला. 💥 जन्म :- १९२९ - उत्पल दत्त, हिंदी चित्रपट अभिनेता १९४३-जॉन मेजर,इंग्लंडचे पंतप्रधान १९४८-नागनाथ कोत्तापल्ले, साहित्यिक, शिक्षणतज्ञ 💥 मृत्यू :- १९६२ - करमचंद थापर, भारतीय उद्योगपती. १९६४ - शंकर नारायण जोशी, भारतीय इतिहाससंशोधक. १९९३ - उत्पल दत्त, हिंदी चित्रपट अभिनेता *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून 31 उमेदवारांची यादी जाहीर; यादीत राजस्थानमधील 19 आणि गुजरात व उत्तर प्रदेशातील प्रत्येकी 6 उमेदवारांची नावे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे नॅककडून मुल्यांकन जाहीर; विद्यापीठाचा 'अ' दर्जा कायम* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *एमबीबीएसच्या अभ्यासक्रमात आमूलाग्र बदल करण्यात आला असून भावी डॉक्टरांना पेशंटशी कसे वागावे याचे आणि एकूणच नैतिकतेचे धडेही अभ्यासावे लागणार आहेत. २०१९-२० च्या शैक्षणिक सत्रापासूनच याची अंमलबजावणी होणार आहे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *विद्यार्थ्यांना घरबसल्या मिळणार साक्षांकित शैक्षणिक कागदपत्रे; मुंबई विद्यापीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ * राज्यातील शासकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांनी अखेर प्रलंबित विद्यावेतनाच्या मागणीसाठी कामबंद आंदोलनाचा दिला इशारा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *महाराष्ट्र तापला; बहुतांश शहरांचे कमाल तापमान ४० ते ४२ अंशाच्या घरात, मुंबईला किंचित दिलासा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *IPL 2019 मुंबई आणि बंगळुरूच्या सामन्यात मुंबईचा निसटता विजय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *अतिथी देवो भव* https://nasayeotikar.blogspot.com/2018/08/blog-post_9.html स्तंभलेखक नासा येवतीकर 9423625769 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    नागनाथ कोत्तापल्ले यांचा जन्म नांदेड जिल्ह्यातील मुखेड या गावी २९ मार्च १९४८ रोजी झाला. हे मराठी भाषेतील लेखक, कवी, व समीक्षक आहेत व राजभाषा मराठीचे धोरण ठरविण्यासाठी शासनाने स्थापन केलेल्या समितीचे अध्यक्ष होते. शालेय शिक्षण मुखेडच्या जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये आणि बीए मराठीचे शिक्षण देगलूर महाविद्यालय येथे पूर्ण केले. त्यात ते मराठवाड्यात तिसरे तर मराठी विषयात पहिले आले. त्यांनी १९८० मध्ये पीएच. डी. मिळवली. नागनाथ कोतापल्ले हे इ.स. १९७७ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्राध्यापक होते. त्यानंतर ते पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख बनले. २००४ पासून २००९ पर्यंत कोतापल्ले मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू होते. नॅक, राज्य मराठी विकास संस्था, साहित्य अकादमी, राज्य ग्रंथ पुरस्कार समिती, बालपुरस्कार समिती आणि एसएससी बोर्डाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष असे कामही त्यांनी केले आहे. याउपर, नागनाथ कोतापल्ले हे १९८८ ते ९५ या काळात मराठवाडा साहित्य परिषदेचे कार्यवाह, १९९५ ते ९६मध्ये साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष आणि साहित्य संस्कृती मंडळाच्या मराठी वाङ्मयकोशाचे समन्वय संपादक होते. मुंबईतले युवक साहित्य संमेलन, श्रीगोंद्यात आठवे ग्रामीण साहित्य संमेलन आणि कराडजवळ उंडाळे येथील साहित्य संमेलन या संमेलनांची अध्यक्षपदे नागनाथ कोतापल्ले यांनी भूषविली आहेत. याशिवाय, ते २०१२ मध्ये चिपळूण येथील ८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचेही अध्यक्ष होते.  *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• विद्येवाचून मान नाही, विद्येवाचून द्रव्य नाही अन्‌ विद्येवाचून मनुष्यपण ही नाही. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *भारताच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे ?* अरबी समुद्र 2) *भारताच्या पूर्वेला कोणता समुद्र आहे ?* बंगालचा उपसागर 3) *भारताच्या दक्षिणेला कोणता महासागर आहे ?* हिंदी महासागर 4) *विमानाचा शोध कोणी लावला ?* राईट बंधू 5) *विद्युत बल्बचा शोध कोणी लावला ?* थॉमस अल्वा एडिसन *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144              •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• • पंकजकुमार पालिवाल • प्रदीप मनुरकर • बाबाराव पडलवार • पिराजी शेळके *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *डावपेच* राजकारण म्हणजे डावपेचाचा खेळ आहे डावपेच जमले की एकदम सोपा मेळ आहे मतभेद निर्माण करून ज्याला मत पळवता येते हे गणित जमले की सहज यश मिळवता येते शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन* ‼● ••• *खरेपणा, प्रामाणिकपणा, वास्तवता, अस्सलपणा आणि यथार्थपणा अशी आपल्या व्यक्तिमत्वाची ओळख ठेवणं चांगलं. हीच तर आपल्या जीवनाची खरीखुरी गुणसंपदा असते. माणसाने आपल्या ठायी असलेल्या गुणांची जाणीव विसरली तरी चालेल; परंतु आपल्या ठायी असलेल्या दोषांची चांगली जाणीव ठेवावी. जसं दगडातील नको असलेला भाग काढून टाकला की, सुंदर मूर्ती तयार होते, तसं आपल्या स्वभावातील दोष काढून टाकले की, निखळ आणि सुंदर व्यक्तिमत्व झळकत असतं. खरंतर गुणी माणसं लोखंडाचं सोनं बनविणा-या परिसासारखी असतात, ओसाड जमिनीचं नंदनवन करणारी असतात. म्हणून जीवनात यश मिळविण्यासाठी सत्य, पामाणिकपणा, कठोर परिश्रम, न्याय आणि चारित्र्याची गरज असते हे विसरता येणार नाही.* *सत्य म्हणजे सत्यवाणी, सत्य विचार, सत्य आचार आणि सत्य उच्चार होय. सत्य म्हणजे जीवन. असत्य म्हणजे मरण. अनेक माणसं अशी जगता जगता मरत असतात आणि अनेक माणसं मरूनदेखील जगत असतात. यासाठी आपण स्वत: सत्यभाषी झाले पाहिजे. समाज सत्याचा आदर करतो. प्रामाणिकपणाची कदर करतो. न्यायची चाड बाळगतो. श्रमाची महती गातो आणि चारित्र्याची पूजा करतो. आज 'सत्यमेव जयते' हाच आपल्या जीवनाचा मंत्र बनला पाहिजे. यासाठी सत्याचे महत्व आपल्या मनाच्या पाटीवर कायमचे कोरून ठेवले पाहिजे.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई         9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• राम  पियारा  छड़ी  करी ,  करे  आन   का  जाप  | बेस्या  कर  पूत  ज्यू , कहै  कौन  सू  बाप  || अर्थ       महात्मा कबीर जीवनात कृतज्ञतेवर भर देतात. आपल्यावर ज्यांनी ज्यांनी उपकार केले त्यांना माणसानं कधीच विसरू नये. आई, वडिल, गुरूंसह अवतीभोवतीच्या सर्व घटकांनी आपल्या जडणघडणीत योगदान दिलेलंच असतं. त्यामुळे त्यांना विसरून कसं चालणार बरं ! वरील बाबी  मानवी कक्षेतल्या आहेत. त्याही पलीकडील काही अलौकिक , अमानवीय शक्ती आपल्या जीवनाला साकारण्यामध्ये फार मोठ्या सहभागी आहेत. त्यांना पंचमहाभूते म्हणतात. पृथ्वी, आप, तेज , आकाश व वायू या पाच महाशक्तींना विश्वचालक शक्ती माणले गेले आहे. या शक्ती नसत्या तर सजीवांचं अस्तित्वंच राहिलं नसतं. या सर्वांचं नियंत्रण करणारी जी शक्ती आहे तिलाच आपण विधाता किवा ईश्वर माणतो. अलिकडे स्वार्थापायी दगडधोंडे पुजणे. पशू पक्ष्यांची देवाच्या नावावर हत्त्या करणे. हे सारं कळत्यांचं ढोंगीपण अज्ञानी लोकांच्या अज्ञानाचा गैरफायदा उठवणारं असतं. अंधरूढी व अंधश्रद्भा वाढवतात. अशा लोकांबाबत कबीरजीच सांगतात,  'जत्रा में बिठाया फतरा,  तीरथ बनाया पानी।  दुनिया भयी दीवानी,  ये सब है पैसे की धुलधानी॥'      अशा ढोंगांच्या मागं न लागता खर्‍या विधात्याप्रति कृतज्ञभाव जपला पाहिजे. खर्‍या विधात्याला सोडून जे इत्तरांना त्या मार्गावरून भरकटवतात व नको त्याच ढोंगाच्या मागे लागतात. त्यांबाबतीत कबीर म्हणतात , वेस्येच्या लेकानं खर्‍या बापाला विसरावं. तशी  त्यांची गत झालेली असते.      एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••• तुमच्याजवळ जे आहे ते इतराजवळ नाही किंवा इतरांजवळ जे आहे ते तुमच्याजवळ नाही. असे जेव्हा तुम्हाला समजेल तेव्हा तुम्हाला कदाचित वाटेलही आपल्या जीवनात असं का बरं होतं आणि त्याबाबतीत नसल्याचीही मनाला खंत वाटते. खंत वाटून घ्यायचेही कारण नाही. पहिल्यांदा तुम्ही थोडा विचार करा असे जर सगळ्यांना सारखेच मिळाले असते तर आपण काहीच प्रयत्नही केले नसते. इतरांच्यासोबतही आपण तुलना करु नये. ज्याच्या त्याच्या कर्माचा आणि ज्याला आपण कधी कधी नशिब म्हणतो कदाचित नशिबाचाही भाग असू शकते. पण एक लक्षात असू द्यावे पहिल्यांदा आपण इतरांची बरोबरी करु नये आणि जर करायचीच असेल तर आपण आपल्या कामात आणि प्रयत्नात कसूर करायची नाही. इतर जर पुढे जात असतील तर आपण त्यांना प्रोत्साहन द्यावे आणि आपणही आपल्या प्रयत्नाने कसल्याही प्रकारचे मन खचून जाऊ न देता समोरच्या परिस्थितीला सामोरे जाऊन यशस्वी होण्याचा संकल्प करायचा. अशा कृतीमुळे आपलेही जीवन इतरांपेक्षा सुखी व समाधानी होऊ शकेल. इतरांबरोबर स्पर्धा करायची काही गरज नाही किंवा इतरांसोबत तुलनाही करायची गरज नाही. आपल्यालाही आपल्या कर्माने आणि आत्मविश्वासाने प्रयत्न केल्यामुळे आपणही आपल्या जीवनात खूप पुढे जाऊ शकतो हे निश्चित. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        *🎡 मनाचे श्लोक 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• मना जे घडी राघवेवीण गेली। जनीं आपुली ते तुवां हानि केली॥ रघूनायकावीण तो शीण आहे। जनी दक्ष तो लक्ष लावूनि पाहे॥४६॥ संकलन : सौ. सुभद्रा सानप, बीड •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *आशेची थोरवी* एक भुकेलेला डोमकावळा एका उंबराच्या झाडावर बसला होता. तो वाट पाहात होता. उंबराची फळे अजून पिकली नाहीत. ती कधीतरी पिकतील याची वाट पाहात तो तिथेच बसून होता. हा डोमकावळा बराच काळ तिथेच बसला आहे, असे एका कोल्ह्याच्या लक्षात आले. तेंव्हा त्याने त्याला कारण विचारले. डोमकावळयाने कारण सांगितल्यावर कोल्हा त्याला म्हणाला, 'अरे वेडया, आशेने असा वाहून जाऊ नकोस. आशेमुळे माणसाला भ्रम तेवढा होतो. अशाने वाट पाहून कुणाचेच पोट भरत नाही. तात्पर्य - केवळ आशा करणे व्यर्थ आहे. प्रयत्न हवा. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00           ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 27/03/2019 वार - बुधवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जागतिक रंगभूमी दिवस* 💥 ठळक घडामोडी :- १८९३ - केशवसुत यांनी तुतारी, ही कविता लिहिली १९९२ - ख्यातनाम गायक पंडित भीमसेन जोशी यांना मध्य प्रदेश सरकारचा तानसेन पुरस्कार प्रदान. २००० - चित्रपट निर्माता-चित्रपट दिग्दर्शक बी. आर. चोप्रा यांना फाय फाउंडेशनतर्फे राष्ट्रभूषण पुरस्कार जाहीर. २००१ - लेफ्टनंट जनरल हरिप्रसाद यांनी फॉरवर्ड कॉर्प्सच्या प्रमुखपदाची सूत्रे हाती घेतली.  २००४- नासा या अमेरिकेच्यासंशोधन संस्थेने एक्स-४३ या सर्वाधिक वेगवान चालकरहित जेट विमानाची निर्मिती केली 💥 जन्म :- १९४१ - इव्हान गास्पारोविच, स्लोव्हेकियाचा राष्ट्राध्यक्ष. १९६३ - क्वेंटिन टारान्टिनो, अमेरिकन चित्रपट निर्माता, दिग्दर्शक व लेखक. १९७० - मरायाह केरी, अमेरिकन गायिका. 💥 मृत्यू :-  १९६८-युरी गागारीन,पृथ्वी प्रदक्षिणा करणारा रशियाचा  पहिला अंतराळवीर १९८१ - माओ दुन, चिनी भाषेमधील कादंबरीकार, पत्रकार. १९९२ - प्रा. शरच्चंद्र वासुदेव चिरमुले, मराठी साहित्यिक, प्राचार्य, गरवारे वाणिज्य महाविद्यालय. १९९७ - भार्गवराम आचरेकर, मराठी रंगभूमीवरील गायक-अभिनेता. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *मुंबई - निवडणूक काळात सोशल मीडियासाठी नियमावली तयार करण्यास हरकत काय, मुंबई हायकोर्टाचा केंद्रीय निवडणूक आयोगाला सवाल* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *जळगाव : एमआयडीसीतील स्मार्ट फार्मास्युटीकल या कंपनीतील उत्पादन विभागातील रिअ‍ॅक्टरला आग, एक कोटी ३० लाख रुपयांचे साहित्य जळून खाक* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *शैलेंद्र हंडा यांची निवडणूक आयोगाकडून गुजरात आणि महाराष्ट्राचे विशेष खर्च निरीक्षक म्हणून नियुक्ती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *परभणी - रासप नेते रत्नाकर गुट्टे यांना गंगाखेड कोर्टाकडून न्यायालयीन कोठडी, शेतकऱ्यांच्या नावे परस्पर कर्ज काढलं* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *तामिळनाडूमध्ये खासगी इमारतीच्या मलनिस्सारन टाकीमध्ये गुदमरून सहा स्वच्छता कर्मचाऱ्यांचा मृत्यू* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *गडचिरोली : पोलिसांनी उधळला घातपाताचा डाव, नक्षलवाद्यांनी पेरून ठेवलेला 5 किलोचा भुसुरुंग केला निकामी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *IPL 2019 : चेन्नईची दिल्ली कॅपिटलवर सहा विकेट्स राखून मात* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *नजर हटी, दुर्घटना घटी* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील ब्लॉगला क्लिक करावे. https://nasayeotikar.blogspot.com/2018/07/blog-post_29.html - नागोराव सा. येवतीकर, 9423625769 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      *केशवसुत* कृष्णाजी केशव दामले ( ७ ऑक्टोबर १८६६:मालगुंड - ०७ नोव्हेंबर १९०५) हे मराठी कवी होते. मराठीत संतकाव्य आणि पंतकाव्य ही परंपरा होती. ती मोडून अन्य विषयांवर कविता करणारे केशवसुत हे आद्य मराठी कवी समजले जातात. वर्षानुवर्षे एकाच विशिष्ट पद्धतीने रचल्या जाणा-या कवितेला स्वच्छंद आणि मुक्त रूपात केशवसुतांनी प्रथम सर्वांसमोर आणले. त्यामुळे त्यांना आधुनिक मराठी काव्याचे जनक संबोधले जाते. आम्ही कोण?, नवा शिपाई, तुतारी, सतारीचे बोल, झपुर्झा, हरपले श्रेय, मूर्तिभंजन, गोफण या काही त्यांच्या उल्लेखनीय कविता आहेत. इंग्रजी काव्य परंपरेतील रोमॅण्टिक समजला जाणारा सौंदर्यवादी दृष्टीकोन प्रथम मराठी साहित्यात आणि काव्यात आणण्याचा मन केशवसुतांकडे जातो. कवीप्रतिभा स्वतंत्र असावी, कवीच्या अंतःस्फूर्तीखेरीज ती अन्य बाह्य प्रभावात ती असू नये, असे त्यांचे म्हणणे होते. काव्य हुकुमानुसार नसते, नसावे, हा वास्तववाद मराठीत त्यांनीच आधुनिक परिभाषेत मांडला. त्यांच्या काव्य विचारांवर  वर्डस्वर्थ,  शेली,  किटस् यांसारख्या इंग्रजी कवींचा मोठा प्रभाव होता, पण त्यांची आविष्कार शैली भारतीय होती. इंग्रजी काव्यातील चौदा ओळींचा सॉनेट हा काव्यप्रकार ‘सुनीत’ या नावाने त्यांनी मराठीत लोकप्रिय केला. त्यांनी लिहिलेल्या कवितांपैकी फक्त १३५ कविताच आज उपलब्ध आहेत. पण त्यांच्या या अल्पसंख्य कवितांमध्ये अनेक विषय दिसून येतात. अन्याय, विषमता, अंधश्रद्धा, परस्पर स्नेहभाव, स्त्रीपुरुषांमधील प्रेम, त्याचबरोबर सामाजिक बंडखोरी, मानवतावाद, राष्ट्रीयत्त्व, गूढ अनुभवांचे प्रकटीकरण, आणि निसर्ग असे अनेक विषय त्यांनी सहजी हाताळले आहेत. गोविंदाग्रज (राम गणेश गडकरी), बालकवी, रेंदाळकरयांसारखे सुप्रसिद्ध कवीसुद्धा स्वत:ला केशवसुतांचे शिष्य म्हणवून घेत असत.. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• मुले म्हणजे नवजगाची आशा-उद्याचे जग बनविणारी थोर शक्ति म्हणजे मुले. – साने गुरुजी. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *महाराष्ट्रातील पहिल्या मुख्याध्यापिका कोण ?* सावित्रीबाई फुले 2) *शून्याचा शोध कोणत्या देशाने लावला ?* भारत 3) *भारतातील सर्वात लहान पक्षी कोणता ?* फुलटोचा 4) *भारतातील सर्वात मोठा पक्षी कोणता ?* सारस 5) *टेलिफोनचा शोध कोणी लावला ?* अलेक्झांडर ग्रॅहम बेल *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144              •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• •  धनंजय मांजरमकर •  वैदेही चिलका •  जगदीश्वर भूमन्ना •  प्रमोद मोहिते •  साईनाथ कल्याणकर •  प्रकाश शिंदे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *बेडूक* बेडूक कितीही फूगला तरी बैल होत नाही मगर मिठी कोणालाच कधी सैल होत नाही जास्त फुगल्यास बेडूक फटकन फुटू शकतो फुगण्याच्या नादात उगी आयुष्यातून उठू शकतो शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *"या जगात अनेक जातीचे प्राणी, अनेक जातीच्या वनस्पती इ. आहेत. (आंब्याची जात गोड चवीची तर कारल्याची जात कडू चवीची.) अशा अनेक जातींचे अनेक वेगवेगळे रंग आहेत. अशा अनेकविध जाती आणि त्यांच्या गुणधर्मानुसार व्यक्त होणारे रंग-ढंग एकत्र येऊन तर 'जग' हे नाव निर्माण झालं आहे." या जगात खूप काही असलं तरी हिताचं जे मोजकंच आहे, त्याला खरी किंमत आहे. 'शब्दज्ञान' किती मर्यादित असतं, याचं बोधक उदाहरण म्हणजे "उजेड काजव्यातूनही निघतो, पण तो फक्त त्याच्या पार्श्वभागापूरताच उजेड देतो, आणि तेही कायम नाही देत; तर चालू-बंद, चालू-बंद असा देतो." शब्दज्ञान हे काजव्याच्या उजेडासारखं आहे. ते देणा-याच्यासुद्धा समोर प्रकाश पाडत नाही. असा उजेड जगाला काय प्रकाश देणार? शब्दज्ञानानं समाजाचं जाऊ द्या, स्वतःचंही भलं होऊ शकत नाही.* *स्वतःसहीत समाजाचंही भलं करायचं असेल, तर कॉपी-पेस्ट बंद झालं पाहिजे. ज्ञान आता शब्दांचं नको तर अनुभवाचं असायला हवं.--* *तुका म्हणे झरा । आहे मुळचाची खरा ।।* *तुकोबा म्हणतात, "माझं ज्ञान हे काही कुठून आयात केलेलं नाही. ते कॉपी केलेलं नाही. माझ्या ज्ञानाचा जो झरा आहे, तो माझ्या अंतःकरणातून प्रकट होतो." याउलट शब्दज्ञानी माणसाचं ज्ञान समुद्राइतकं विशाल दिसत असलं, तरी ते अनेक नद्या, नाले, झरे यांच्यावाटे आलेलं आहे. जरी विशाल असला तरी समुद्राचं पाणी तहानलेल्याची तहान भागू शकत नाही, तसं शब्दज्ञान लोकांचं भलं करू शकत नाही. त्यासाठी आवश्यकता आहे ती अनुभवाच्या झ-याचीच.* संजय नलावडे, चांदीवली, मुंबई         9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• कबीर  सतगुर  ना  मिल्या , रही  अधूरी  सीश  | स्वांग जाति का पहरी कर ,  घरी  घरी  मांगे  भीष  || अर्थ :       महात्मा कबीर गुरूचे जीवनातील अनन्य साधारण असणारे महत्त्व सांगताना म्हणतात की, जीवन जगताना असो की शिक्षण घेताना असो गुरू असलाच पाहिजे.  गुरू (मार्गदर्शक) भेटला नाही ज्ञानाची अर्धवट प्राप्ती होते. अर्धवट ज्ञान  आत्मघातकी ठरतं.  ते जीवनाच्या वाटेवर सर्वात घातक ठरू शकते. महाभारतातील अभिमन्यूचा प्रसंग समजून घेतला तरी अर्धवट ज्ञान किती धोकादायक ठरतं हे पुढील पिढ्यांच्या ध्यानी यायला वेळ लागणार नाही. अभिमन्यू कुशल योद्धा होता. चक्रव्युहात घुसणे जाणत होता परंतु चक्रव्पुह भेदण्याची कला त्याला जमत नव्हती. त्यातच त्याला प्राण गमवावा लागला.        अर्धवट ज्ञानी पारंगत असल्याचं ढोंग करतो. या ढोंगापायी त्याला नकल करावी लागते. नकल करणारा परिपूर्ण असत नाही. अशा व्यक्तींच्या माध्यमातूनच अंधश्रद्धा व चुकीच्या रुढी समाजात पसरवल्या जातात. ही अर्धशिक्षित फौजच समाजाला चुकीच्या दिशेनं नेते. संभ्रम निर्माण करीत असतात. स्वतःच्या मार्गाला विवेकाची जोड नसल्याने स्वतःचीच फसगत करून घेतात.  प्रसंगी पथ भरकटून भीक मागण्याचेही त्यांच्या नशिबी येते.     एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जीवनात जर तुम्हाला काही करुन दाखवायचे असेल तर खालील गोष्टींना कधीच प्राधान्य देऊ नका. आळस,अज्ञान, खोटेपणा आणि स्वार्थीपणा. आळसाने कोणतेही काम पूर्ण होत नाही,अज्ञानाने काय खरे आणि काय खोटे हे कळत नाही,खोटे बोलण्याने आपली प्रतिष्ठा जनमानसात चांगली निर्माण होत नाही तर स्वार्थामुळे आपण एकाकीपणे पडतो त्यामुळे आपली किंमतही कोणी करत नाही. म्हणून यांना केव्हाही तुमच्या जीवनामध्ये कसलेही स्थान देऊ नका.जर तुमच्या जीवनात स्थान दिलात किंवा प्रवेश करु दिलात तर तुमचे चांगले जीवन खराब करण्यास प्रवृत्त करतात.सदैव जागृत राहणेच सर्वात महत्वाचे आहे. ©व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        *🎡 मनाचे श्लोक 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जयाचेनि संगे समाधान भंगे। अहंता अकस्मात येऊनि लागे॥ तये संगतीची जनीं कोण गोडी। जिये संगतीनें मती राम सोडी॥४५॥ संकलन : सौ. सुभद्रा सानप, बीड •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••• पाकोळी आणि कावळा एक पाकोळी आणि एक कावळा स्वतःच्या सौंदर्यावरून भांडत होते. बोलता बोलता कावळा पाकोळीला म्हणाला, 'तुझं सौंदर्य फक्त उन्हाळ्यातच पहावं, माझं सौंदर्य सदासर्वदा सारखंच असतं त्यामुळे मी नेहमीच सुंदर दिसतो,' तात्पर्य - दोन सुंदर वस्तूंपैकी जिचे सौंदर्य जास्त टिकाऊ तीच अधिक उपयोगी म्हटली पाहिजे. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00           ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 26/03/2019 वार - मंगळवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १९०२ - नेमस्त पक्षाचे अध्वर्यू आणि नेते नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांचे मध्यवर्ती कायदेमंडळात अर्थसंकल्पावर पहिले भाषण झाले, ज्यामुळे त्यांचे कर्तृत्त्व आणि नेतृत्त्व देशमान्य झाले. १९१० - लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी औंध संस्थानातील कुंडच्या माळावर कारखाना तसेच वसाहत उभारण्याच्या कामाला प्रारंभ केला. पुढे या परिसराला किर्लोस्करवाडी असे नाव रूढ झाले. १९७२-पहिली आंतरराष्ट्रीय संस्कृत परिषद संपन्न झाली 💥 जन्म :- १९६९ - विक्रम राठोड, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :-  १९९७ - नवकमल फिरोदिया, ज्येष्ठ गांधीवादी, स्वातंत्र्यसैनिक आणि उद्योगपती. १९९८ - डॉ. शांतिनाथ देसाई, कन्नड साहित्यिक. १९९९ - आनंद शंकर, संगीतकार. २००१ - जनार्दन हरी पटवर्धन, स्वातंत्र्यसैनिक आणि सनदी अधिकारी. २००३ - हरेन पंड्या, गुजरातचे माजी मंत्री(हत्या). २००३ - देविदास सडेकर, मराठी पत्रकार. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *अहमदनगर : महात्मा गांधी यांनी गावाकडे चला या संदेशाचे पालन सर्वांनी करावे. ग्रामराज्याविना रामराज्य अपुर्ण आहे. गावचा विकास झाला तरच देशाचा विकास होईल - उपराष्ट्रपती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदार संघातून वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी भरला उमेदवारी अर्ज* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *प्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी यांनी मथुरा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज केला दाखल, ही त्यांची शेवटची निवडणूक असेल.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *मुंबई - १९९३ बाॅम्ब स्फोटातील आरोपी आणि अंडरवल्ड डाॅन दाऊद इब्राहिमचा जवळचा हस्तक शकिल अहमद शेख उर्फ लंबूचा ह्रदयविकाराने झाला मृत्यू* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *यवतमाळ - भावना गवळी यांनी यावेळी सलग पाचव्यांदा खासदार होण्यासाठी सोमवारी यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून नामांकन अर्ज केला दाखल* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *सोलापूर शहर व परिसरात रात्री पडला पाऊस, शहरातील निम्म्या भागातील वीज गायब* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *IPL 2019 : अटीतटीच्या लढतीत पंजाबची राजस्थानवर मात* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *दैवम चैवात्र पंचमम* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे https://nasayeotikar.blogspot.com/2018/08/blog-post_38.html - नागोराव सा. येवतीकर, 9423625769 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  *जयपूर - गुलाबी शहर* जयपूर शहर येथील महल आणि जुन्या घरांसाठी वापरलेल्या गुलाबी दगडांसाठी प्रसिद्ध आहे. पूर्ण शहर सहा भागांत १११ फुटी रस्त्यांनी विभागले आहे. जयपूरला आधुनिक शहरी योजनाकार सर्वात नियोजित आणि व्यवस्थित शहरांमध्ये गणतात. एकोणविसाव्या शतकात जयपूर शहराचा विस्तार सुरू झाला. त्यावेळी त्याची लोकसंख्या १,६०,००० होती. येथील मुख्य उद्योग धातुकाम, संगमरमर, वस्त्र-छपाई इत्यादी आहेत. जयपूरमध्ये सिटी पॅलेस, जंतर मंतर, हवामहल, अंबर महाल, मुबारक महल, जलमहल, इत्यादी प्रेक्षणीय स्थळे आहेत. जयपूर हे भारतातील सर्व सुंदर शहरांतले एक आहे. भारताच्या पर्यटनातील सुवर्ण त्रिकोणात (जयपूर-आग्रा-दिल्ली) जयपूर शहर मोडते. जयपूर हे शहर महाराजा सवाई जयसिंह-२ यांनी स्थापन केले. त्यांनी १६९९ ते १७४४ पर्यंत राज्य केले तेव्हा त्यांची राजधानी अंबर होती. अंबर हे शहर आजच्या जयपूरपासून ११ किलोमीटरवर आहे. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• महापुरुषांची चरित्रे आणि आत्मचरित्रे ज्यांच्याशी बोलतात त्यांना स्वतंत्र चरित्र प्राप्त होते. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *जगातील सर्वात उंच पर्वत कोणता ?* माउंट एव्हरेस्ट 2) *भारताचे रेल्वेमंत्री कोण आहेत ?* मा पियुष गोयल 3) *भारताचे गृहमंत्री कोण आहेत ?* मा राजनाथ सिंह 4) *भारताचे कृषिमंत्री कोण आहेत ?* मा राधामोहन सिंह 5) *जन्माला आलेल्या बाळाच्या शरीरात किती हाडे असतात ?* 300 *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• •  राजेश जेठेवाड, बरबडा •  श्रेयश पेंडकर, धर्माबाद • महेश मुटकुले • श्रीकांत सरकलवाड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *नाटक* काही तरी मिळवायचे तर नाटकं करावे लागतात वेळ प्रसंगी नको त्याचे पायही धरावे लागतात ज्याला हे मिळवायचे ते सर्व नाटकं करतात ज्याला नाटकं जमले तेच शेवटी हिरो ठरतात शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *'उन्नती आणि यश' ही प्रक्रीया सोपी नाही. त्यात खाचखळगे असतातच. एक साधा न्याय आपण लक्षात घेतला पाहिजे की, जो परिक्षेत पास होण्याची अपेक्षा बाळगुन असतो त्याचीच परिक्षा घेतली जाते. हेच उदाहरण जीवनात सर्वत्र आहे. एक परिक्षा पास झालात, की पुढची परिक्षा अशी ही श्रृंखला न संपणारी असते. जो हरला तो संपला. हा नैसर्गिक न्याय आहे. ज्याला याची जाणीव झाली तो समाजजीवनात उडी घेतो. कोणतेही आवडीचे क्षेत्र आपलेसे करणे, त्यात प्राविण्य मिळविणे, त्यातून आसपासच्या लोकांचे कल्याण साधने हे त्याच्या अंगवळणी पडते.* *हे सगळे ज्याला समजते त्या समाजपुरूषांच्या ठिकाणी तुम्हाला कधी दु:ख दिसत नाही. त्याच्या चेह-यावरचे भाव प्ररेणादायी असतात, ते प्रेरणेचे क्षण निर्माण करतात. अशा व्यक्ति अल्पसंख्येत असतात, त्यांचे पीक फारसे येत नाही. एखादा समाजचिंतक असणे हे सामाजिक आरोग्याचे लक्षण आहे. आज सर्वत्र एकच ओरड असते, की मोठी माणसे राहिली नाहीत. मला वाटते की ती आहेत पण आपल्याला दिसत नाही. त्यासाठी आपली दृष्टी स्वच्छ हवी..!* संजय नलावडे, चांदीवली, मुंबई         9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• परबत परबत मै फिरया, नैन गवाए रोई | सो बूटी पौ नहीं , जताई जीवनी होई || अर्थ माणूस बर्‍याचशा ऐकीव आणि भ्रामक बाबींच्या मागे लागून जीवनातला अनमोल वेळ वाया घालवत असतो. अमृत प्राशन करणे, अमर होणे, संजीवनी व बर्‍याच अशा काही बाबी वारंवार चर्चेत येतात. या सर्व बाबींचा भौतिक विचार करून माणूस दमछाक करून घेतो. सर्व काही आपल्याच ठायी असणार्‍या कर्तृत्त्व , चिंतन , शांती व समाधानातून प्राप्त होणार्‍या या लौकिक बाबी ! मात्र माणूस वरवरचा विचार करून स्वतःची दमछाक करून घेतो. 'तुझं आहे तुजपाशी पण जागा विसरलाशी.' अशीच ही गत म्हणावी लागेल. कस्तुरी मृग कस्तुरीच्या सुगंधानं ऊर फुटेतो धाव धाव धावतो. कस्तुरी स्वतःजवळ असूनही त्याचा अंत मात्र तिच्याच शोधात होतो. तसंच माणसाचं झालंय. थोडसं पूर्वजांकडं डोकावून पाहिलं तर सर्वच जण अमरत्व गाठू शकले नाहीत. ज्यांनी ध्येयासाठी झपाटून आपल्या कर्तृत्तवाचा ठसा उमटवला. खरं तर त्यांनाच अमृताचा खर्‍या अर्थानं कुंभ सापडलेला ! त्यांनी तो कर्माच्या रूपानं प्राशन केला. आज हजारो शेकडो वर्षे लोटली. ते देहाने नसले तरी कार्य रूपानं अमर आहेत. त्यांच्या हयातीत कधी त्यांनी भ्रामक अमृताचा शोध घेतला नाही. त्यांनी कधी वेगळ्या स्वर्गाचा विचार केल्याचे ऐकिवात नाही. आपल्या कार्य क्षेत्रातंच मनोभावे स्वर्ग निर्माण केला. 'नर करणी करे सो नारायण होय ।' याची प्रचिती दिली. ज्यांनी लौकिकता व नैसर्गिकपण नाकारलं. ते सर्व अवहेलनेचे धनी ठरले आहेत. प्रतिकांचा उथळ अर्थ घेवून धावपळ करून चालत नाही. चिंतन व मननातून शाश्वत सत्ये बाहेर पडतात. ती शोधली की माणूस अजरामर होतो. हे त्या मागचं रहस्य सांगताना महात्मा कबीर म्हणतात, पर्वता पर्वतावर फिरून थकलो , दमलो, प्रसंगी रडलोही परंतु सहज अमर करणारी संजीवनी काही प्राप्त झालीच नाही. कर्म गुटिकाच माणसाला अमर करते. हे जीवनातून फलित निघालं. कर्मभूमीत हृदय आणि हृदयात कर्मभूमीला आसरा दिला की जीवनच नंदनवन होवून जातं.      एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• परमेश्वराने आपल्याला सुंदर असे जीवन दिले. जीवनात जीवनभर आनंद लुटण्यासाठी सुंदर असे डोळे दिले.या सुंदर डोळ्यांनी सा-या जगाचे सौंदर्य पाहण्याचे आणि त्याचा आस्वाद घेण्याचे काम आपले आहे. जगाचे जर थोडे सुक्ष्म निरीक्षण करुन पाहिले तर सर्वत्र आनंद ही आनंदच  पाहायला मिळतो.तशी आपली वृती असायला हवी.सुख,शांती,समाधान,  नवे चैतन्य,नवी आशा या सा-या गोष्टी आपल्याला या जगातल्या प्रत्येक गोष्टीकडे पाहून मिळते. आकाशाकडून मनाचा उदारपणा, धरतीकडून संयम आणि सहनशिलता, पक्ष्यांकडून आनंदाने संचार करणे,नदीच्या प्रवाहातून सदैव चालत राहणे, वा-याकडून जीवनात गतीने पुढे पुढे जाणे, ऊंच पर्वताकडून जगाकडे पाहून अंतःकरण मोठे करणे,वृक्षवेलीकडून इतरांना सहारा देणे असे कितीतरी गुण आपल्याला आत्मसात करुन घेता  येतात.हे आपल्या नजरेने निरिक्षण केल्यानंतर आपल्याला कळेल.मग आपल्याच डोळ्यांनी आपल्याला या जगात सुंदर जीवन जगण्याची प्रेरणा देते.यापेक्षा अजून सुंदर जीवन कुणाचे असेल? अशा सुंदर जीवन जगण्याला आपण खरे तर आनंदाने स्वीकारायलाच पाहिजे आणि आनंद लुटला पाहिजे.पुन्हा असे सुंदर जीवन या जगी येणार नाही.या जन्मासाठी आणि या जगण्यासाठी आपण परमेश्वराचे आभारच मानायला हवे. - व्यंकटेश काटकर,नांदेड.   संवाद.9421839590/   8087917063. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        *🎡 मनाचे श्लोक 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• मना रे जनीं मौनमुद्रा धरावी। कथा आदरे राघवाची करावी॥ नसें राम ते धाम सोडूनि द्यावे। सुखालागिं आरण्य सेवीत जावे॥४४॥ संकलन : सौ. सुभद्रा सानप, बीड •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  *कावळा आणि कासव* एक कावळा समुद्राकाठी फिरत असताना त्याला एक कालव सापडले. त्यातील मांस काढून खावे म्हणून तो ते दगडावर आपटू लागला. जवळच एक लबाड डोमकावळा बसला होता. तो त्याला म्हणाला, 'मित्रा, दगडावर आपटून हे कालव काही फुटणार नाही, तेव्हा तू हे तोंडात धरून उंच उंच जा आणि तिथून ते खाली टाकून दे. म्हणजे ते फुटेल.' कावळा बिचारा भोळा होता. त्याने कालव तोंडात धरून एक उंच भरारी मारली आणि तिथून ते खाली टाकून दिले. जमिनीवर पडताच लबाड डोमकावळ्याने ते पळवले आणि तो उडून गेला. तात्पर्य - लबाड मनुष्याच्या सांगण्यावर कधीही विश्‍वास ठेवू नये. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00           ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 25/03/2019 वार - सोमवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- ⌛१८९८ : शिवराम परांजपे यांनी साप्ताहिक ‘काळ’ चा पहिला अंक काढला. ⌛अत्याधुनिक सागर संशोधक ‘सागरकन्या’ या जहाजाचे जलावतरण झाले. 💥 जन्म :- ⌛१८९६ : सुप्रसिध्द कादंबरीकार र.वा. दिघे. ⌛१९३३ : अंतराळ संशोधक वसंतराव गोवरीकर. ⌛१९३२ : व.पु. काळे, मराठी साहित्यिक. 💥 मृत्यू :-  ⌛१९९३ : सुप्रसिध्द लेखक मधुकर केचे. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *जळगाव : पहिल्या लेवा गण बोली साहित्य संमेलनास जळगावमध्ये सुरुवात, या संमेलनात चर्चासत्र, व्याख्याने आणि कवी संमेलनासह विविध कार्यक्रम होणार आहेत.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *पालघर : मोखाडा त्र्यंबकेश्वर रोडवर तोरंगणा घाटात पालघरला येत असताना खासगी बस 25 फुट दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू, 45 जखमी* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *पालघर नगरपरिषदेच्या निवडणुकीत 67.57 टक्के एवढे झाले मतदान* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *वंचित बहुजन आघाडीला पक्ष म्हणून मान्यता* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *शेगाव : नोकरीचा बनावट आदेश देवून आठ लाख छत्तीस हजार रूपयांची सुशिक्षित बेरोजगार युवकाची फसवणूक; तिघांविरुध्द गुन्हा दाखल , एकास अटक* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *सोलापूर शहर परिसरात काल रात्री जोरदार पाऊस* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *IPL 2019: सनरायझर्स हैदराबादने विजयासाठी ठेवलेले 182 धावांचे लक्ष्य कोलकाताने 6 विकेट्स राखून पार केले.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *नामकरण ते अंत्यविधीचा प्रवास* वरील लेख खालील लिंकवर आहे. https://nasayeotikar.blogspot.com/2018/12/blog-post_91.html नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *व. पु. काळे*           वसंत पुरुषोत्तम काळे (मार्च २५, इ.स. १९३२ - जून २६, इ.स. २००१; मुंबई, महाराष्ट्र), व.पु. काळे नावाने प्रसिद्ध, हे मराठी भाषेतील लेखक, कादंबरीकार, कथाकथनकार होते.  वसंत पुरुषोत्तम काळे, अर्थात व.पु. काळे, मराठी भाषेतील खुूूप प्रसिद्ध असे लेखक, कादंबरीकार, कथाकथनकार होते. व. पु काळे यांचे विचार साहित्य रसिकांमध्ये खूप प्रसिद्ध आहेत. वसंत पुरुषोत्तम काळे पेशाने वास्तुविशारद  होते. जून २६, इ.स. २००१ रोजी हृदयक्रिया बंद पडून त्यांचे निधन झाले. वपुंना महाराष्ट्र शासनाचा उत्तम लेखकाचा सन्मान, ‘पु.भा.भावे’ पुरस्कार, फाय फाउंडेशनचा पुरस्कार आणि अमेरिकेत भरलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद बहाल केले गेले. वपुर्जा हे पुस्तक खुप प्रसिद्ध झाले. भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती,भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती आणि वेळप्रसंगी स्वत: उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती! असे चांगले विचार त्यांनी दिलें आहेत. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• बुध्दी आणि भावना यांचा समन्वय म्हणजेच विवेक. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *Whatsapp ची स्थापना कोणी केली ?* जेन कुम 2) *मोबाईलचा शोध कोणी लावला ?* मार्टिन कूपर 3) *छत्तीसगड राज्याची राजधानी कोणती ?* रायपूर 4) *भारतातील सर्वात उंच पर्वत कोणता ?* कांचनगंगा 5) *मध्यप्रदेश राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत ?* मा कमलनाथ *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144              •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• • पिराजी चव्हाण • अभिनंदन एडके • भीमराव भुरे • अनिल पेंटावार • नेताजी चव्हाण • सचिन पेटेकर • सोनू कुमार • जगदीश उराडे •  चिं.यश जितेंद्र आमटे • राजेश बाहे, अमरावती *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••• *विचार करा* आवडले की बरे वाईट काहीही पळवले जाते बेरजेच्या नादात मग काहीही मिळवले जाते विचार करावा मिळवतांना आपण मिळवतो काय नाहीतर माहित आहे बुडत्याचा डोहाकडे पाय शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *'नकार' साधा नसतो. त्याची एक किमंत असते. ती कधी अत्यंत स्वस्त असते तर कधी अत्यंत महाग. रामायण आणि महाभारताने असे अनेक नकार आपल्यासाठी उदाहरणे म्हणून ठेवले आहेत. रामायणात न दिलेले 'नकार' आदर्श निर्माण करतात. तर महाभारतात 'नकार' दु:ख आणि विध्वंस घडवतात.* *रामाने वनवासात जाण्यास नकार दिला असता तर पितृवचनी राम असा आदर्श राहिला नसता. एका धोब्याच्या टिकेवर रामाने विश्वास ठेवण्यास नकार दिला असता, तर जनहित जपणारा 'राजा' म्हणून रामाचे नाव झाले नसते. या प्रत्येक नकाराने पुढे अनंत यातनांना जन्म दिला, पण शेकडो वर्ष टिकणारे 'आदर्श' जन्माला घातले.* *महाभारतात पावलोपावली शक्तिशाली नकार दिसतात व सामान्यांना आधार देणारे आदर्श निर्माण करतात. कुंतीचा कर्णाला स्विकारण्यास नकार, दुर्योधनाचा पांडवांना राज्य देण्यास नकार, द्रौपदीचा दुर्योधनास नकार हे सर्व विध्वंसक ठरले.* *"अर्जुनाने युद्धाला नकार दिला नसता तर 'भगवद्-गीता' जन्माला आली नसती. आम्ही 'गीते'ला मुकलो असतो."*     ••●🔻‼ *रामकृष्णहरी* ‼🔻●••               ⚜⚜⚜⚜⚜ संजय नलावडे, चांदीवली, मुंबई         9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    ज्ञान भक्ति वैराग्य सुख पीव ब्रह्म लौ ध़ाये आतम अनुभव सेज सुख, तहन ना दूजा जाये। ज्ञान भक्ति वैराग्य सुख जलद ब्रम्हानंद दायी आत्मानुभव प्राप्तीची सर अन्यत्र कुणा न येई महात्मा कबीर अनुभव ज्ञानाची महत्ती विषद करताना म्हणतात , 'ज्ञान,भक्ति,वैराग्य सुख प्राप्तीद्वारे जलद गतीने ईश्वराचा साक्षात्कार होईल. ईश्वराची दिव्यताही अनुभवता येईल. हा मार्ग ईश्वरी लिला जाणून घेण्यासाठी महत्वपूर्ण ठरणारा आहे. मात्र आत्मानुभव आत्मा आणि परमात्म्याचंं मिलन घडवून आणतो. जेव्हा आत्माच परमात्म्याच्या रुपाशी एकरूप होऊन जातो. तिथे अन्य कुणाला प्रवेश कसा मिळणार बरे ! जीव आणि शिवाच्या एकरूपतेत मनाचाच मनाशी संवाद घडून येतो. विश्वातील नश्वरता व विकारांना त्याठायी यत्किंचितही स्थान उरत नाही. निसर्गाची सर्वव्यापकता व समद‌ृष्टी त्या जीवात्म्याच्या ठायी स्थापित होते. हा स्थितप्रज्ञतेचा सर्वोत्कट आविष्कार असतो. त्याच्यावर कोणत्याही प्रलोभनाचा प्रभाव पडत नाही . कारण तो स्वतःच अविनाशी विश्वरूपाशी तादात्म्य पावलेला असतो.      एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जो माणूस जसा विचार करतो त्याच विचारानुसार जीवनात वागतो. जर चांगले विचार असतील तर त्यांचे परिणाम त्याच्या जीवनात आणि इतरांराच्याही जीवनात चांगलेच होतील. आपल्याला आणि इतरांना त्रास होणार नसतील, उपदेशात्मक असतील तर ते नक्कीच जीवनात फलदायी ठरु शकते.अशी माणसे स्वत:च्या आणि इतरांच्याही जीवनात नवे चैतन्य आणू शकतात.ते कधीही वाईट विचारांना आपल्या जीवनात थारा देत नाहीत,त्यांना कुणाचेही नुकसान होऊ नये असेच वाटते. परंतू वाईट विचार करणारी माणसे कधीच आपल्या जीवनात यशस्वी होत नाहीत आणि इतरांच्या चांगल्या चाललेल्या जीवनात बाधा आणल्याशिवाय राहत नाहीत.अशी माणसे दुष्ट प्रवृतीची असतात.त्यांना स्वत:चे आणि इतरांचे काय आणि किती नुकसान होत आहे याचे भान देखील राहत नाही.अशावृत्तीच्या माणसांपासून केव्हाही दूरच राहिलेले बरे. © व्यंकटेश काटकर,नांदेड. 📲 9421839590 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        *🎡 मनाचे श्लोक 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• मना सज्जना एक जीवीं धरावें। जनी आपुलें हीत तूवां करावें॥ रघूनायकावीण बोलो नको हो। सदा मानसीं तो निजध्यास राहो॥४३॥ संकलन : सौ. सुभद्रा सानप, बीड •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *साप आणि खेकडा* एक साप आणि एक खेकडा एकमेकांचे मित्र होते. खेकडा सरळ वागणारा होता. त्याने सापाला चांगल्या रीतीने वागण्याचा खूप वेळा उपदेश केला, परंतु सापाने तिकडे लक्ष दिले नाही. एके दिवशी साप अंग ताणून विश्रांती घेत असताना खेकड्याने त्याला मारून टाकले व त्याच्याकडे बघून तो म्हणाला, 'तू आता जसा सरळ आहेस तसाच नेहमी राहिला असतास तर ही स्थिती कशाला झाली असती ? तात्पर्य - राजमार्ग सोडून वाकड्या मार्गाने जाणारा मनुष्य नेहमीच संकटात सापडतो. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00           ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 23/03/2019 वार - शनिवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *शहीद दिन* 💥 ठळक घडामोडी :- १९३१ -सँडर्सचा वध करणारे भारतीय क्रांतिकारी भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांना लाहोरच्यातुरूंगात फाशी. 💥 जन्म :- १९१९- डॉ राम मनोहर लोहिया १९३८ - मेनार्ड जॅक्सन, अटलांटाचा पहिला श्यामवर्णीय महापौर. १९५३ -किरण मुजुमदार शॉ-भारतीय उद्योजक 💥 मृत्यू :- १९३१-भगतसिंग -क्रांतिकारक १९३१-सुखदेव थापर-क्रांतिकारक १९३१-शिवराम हरी राजगुरू-क्रांतिकारक २००७ - श्रीपाद नारायण पेंडसे, मराठी साहित्यिक. २००८ - गणपत पाटील, मराठी चित्रपट अभिनेते *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *शिवस्मारकाच्या प्रकल्पामध्ये अनियमितता झाली असून त्याचे स्पेशल ऑडिट करण्यात यावं अशी मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाने कॅगच्या महाराष्ट्रातील प्रधान महालेखापालांना पत्र पाठवून केली आहे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *पुरातत्व क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल डॉ. गो. बं. देगलूरकर यांना यंदाचा पुण्यभूषण पुरस्कार* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून सातवी यादी प्रसिद्ध, सातव्या यादीत 35 उमेदवारांचा समावेश* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *सोलापूर - माढा लोकसभा मतदारसंघासाठी संजय शिंदे यांची उमेदवारी जाहीर, खुद्द शरद पवारांचीच घोषणा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *कर्नाटक नगरोत्थान मंत्री सी एस शिवळ्ळी यांचे हृदयविकाराने हुबळीत निधन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *शिवसेनेकडून लोकसभा निवडणुकीसाठी पहिली उमेदवार यादी जाहीर केली. शिवसेनेनं 21 उमेदवारांची यादी केली प्रसिद्ध* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *आयपीएलच्या बाराव्या हंगामाला आजपासून सुरुवात होत आहे. पहिल्या सामन्यात गतविजेता चेन्नई सुपरकिंग्ज संघ विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु संघाशी खेळणार आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आरोग्यदायी चांगल्या सवयी* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील लिंकला टच करावे. https://nasayeotikar.blogspot.com/2018/08/blog-post_54.html - नागोराव सा. येवतीकर •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      *राम मनोहर लोहिया* समाजवादी पक्षाचे प्रभावी कार्यकर्ते म्हणून स्वातंत्र्य चळवळीत ज्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला त्या राम मनोहर लोहिया यांची आज जयंती. देशात लोकशाही समाजवादी विचारसरणीचे लोण पसरविणारा हा स्वातंत्र्यपर्वातील आघाडीचा कार्यकर्ता. 23 मार्च 1910 रोजी जन्मलेल्या राम मनोहर लोहिया यांचे यांचे शिक्षण कोलकाता, मुंबई आणि बर्लिन येथे झाले. बर्लिनमधून पीएच.डी मिळवून ते भारतात परतले आणि सरकारी नोकरीचे आमिष लाथाडून स्वातंत्र्याच्या ध्येयप्राप्तीसाठी ‘चले जाव’ आंदोलनात उतरले.  1942 च्या ‘चलेजाव’ आंदोलनादरम्यान झालेल्या प्रतिकार सामर्थ्याचे जनक म्हणून त्यांचे नाव घेतले जाते. या आंदोलनादरमन्या आपल्या उपरोधिक शैलीत, विशिष्ट व्यक्ती व घटनांचे विश्लेषण करणारी भाषणे त्यांनी लिहिली. ती गुप्त रेडिओ केंद्रातून प्रसारित होत. 1955 मध्ये त्यांनी समाजवादी पक्षाची स्थापना केली. 1963 पासून ते संसद सदस्य होते. समाजवादी चळवळीचे नेतृत्व करणार्‍या लोहियांनी समस्यांच्या संदर्भात स्वदेशी समाजवाद विकसित करण्याची भूमिका मांडली. त्यांनी इंग्रजी आणि हिंदीतून लेखन केले. 12 ऑक्टोबर 1967 रोजी ते आपल्यातून निघून गेले.      *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• बालमनाची कळी प्रेमाच्या फुंकराने फुलवीत असतात तेच गुरु. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *महाराष्ट्राचा राज्यखेळ कोणता ?* कबड्डी 2) *भारताचे चलन कोणते ?* रुपया 3) *भारताचे खेलमंत्री कोण आहेत ?* मा राज्यवर्धन सिंह राठोर 4) *आधुनिक भारताचे शिल्पकार कोणाला म्हणतात ?* पं. जवाहरलाल नेहरू 5) *फेसबुकची स्थापना कोणी केली ?* मार्क जुकेरबर्ग *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144              •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• •  विनायक नरवाडे •  अशोक गड्डमवार •  संजय मनुरे •  आचार्य सूर्यकांत •  नरसिंग येम्मेवार •  अनिता पांढरे •  कालिदास देशमुख •  चंद्रकांत जाधव  •  प्रकाश मटके *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *पंचाईत* प्रत्येकाचिच इथे आपाआपली त-हा आहे सामान्याला कळत नाही यातला कोण खरा आहे खरा खोटा ओळखताना सामान्य ची पंचाईत होते खरं-खोटं ओळखण्यातच सारी ऊर्जा वाया जाते शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *परिक्षेत वरचा नंबर हवा, टक्केवारी चांगली हवी; म्हणून क्लास लावला जातो. मात्र, आपल्यातला माणूस घडला पाहिजे, त्याला चांगलं वळण लागलं पाहिजे यासाठी शोधला जातो का एखादा क्लास? संतानी माणसातला माणूस जागविण्यासाठी अभंगांचा शब्द न् शब्द खर्ची घातला. तो समजून घेण्याच्या फंदात कुणी पडत नाही. आपल्याला डाॅक्टर, वकील, इंजिनीयर व्हायचं! पण त्याबरोबर कधी आपण हा विचार केला की मला बाबा आमटे यांच्यासारखी रुग्ण्सेवा करायचीयं. सिंधूताई सपकाळांसारखी अनाथांची माय व्हायचंय.* *'समाजसेवा' घडवेल असा धडाच आपल्या पाठ्यपुस्तकात नाही किंवा असलाच तर समजून घेतला गेला नाही. तसं झालं असतं तर अमानुषतेचं एकही उदाहरण सापडलं नसतं. म्हणूनच-* *"माणूस माणूस, तुझी नियती बेकार*   *तुझ्याहून बरं, गोठ्यातलं जनावर"* *असा समाचार बहिणाबाई घेतात. संयम, विनम्रता, सौहार्द, सहिष्णुता हे फक्त निबंधातील शब्द आहेत. ते माणसाने आचरणातून हद्दपार केले आहेत. मातीत उगवून आलेल्या पिकांच्या अवतीभवतीचं तण-तणकट निंदणी-खुरपणी करून निर्मळ करावं लागतं. तसंच माणसाचं, माणसाचा सहजी माणूस बनत नाही. संस्काराच्या शाळेत माणूस घडतो. मात्र, माणूस संस्काराच्या शाळेत हजर राहण्यास नाखूष असल्याने, त्याची अॅब्सेंटी वाढत चाललीयं. मग कसा होऊ शकेल त्याचा माणूस ?* संजय नलावडे, चांदीवली, मुंबई         9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• नहाये  धोये  क्या  हुआ ,  जो  मन  मेल  न  जाय  | मीन  सदा  जल  में  रही ,  धोये  बॉस  न  जाय  || अर्थ :  नहाणे धुणे देखावा गेला न मनीचा मळ सदा पाण्यात मासळी दुर्गंध न काढी जळ       महात्मा कबीर दिखाऊ पणाला फटकारतात. नहाणे , धुणे  व सुंगधाने सजणे हा  तर केवळ बाह्य देखावा आहे. जर मनाचीच सफाई झाली नाही तर विवेकी व  निरामय जीवनशैली  विकसित होणार नाही व त्याशिवाय विश्वात्मक भाव दृढ कसा होणार ? मासा सदा सर्वकाळ पाण्यात राहूनही अंगीचा दुर्गंध त्यागीत नाही. तिथे पाण्याचा काय दोष असणार आहे. बाह्य बदलापेक्षा आंतरिक बदल महत्त्वाचा असतो. तो अवगुण कायमचे दूर करतो.     एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• काही लोकांच्या बाबतीत पैसा म्हणजे सर्वस्व आहे आणि पैशामुळे काहीही मिळवता येते. पैशामुळे तुम्हाला तुमच्या भौतिक सुविधा मिळवता येतात परंतु इतरांचे मन मिळवता येत नाही.इतरांचे मन जिंकायचे असेल तर या ठिकाणी पैसा चालत नाही.त्यासाठी हवे तुमचे उदार अंतःकरण,तुमची दुस-याबद्दलची आत्मियता,प्रेम इतरांना दिलात तर तेही तुमच्यावर अधिक प्रेम करायला लागतील.यासाठी तुमच्या जवळ असलेल्या पैशाची गरज नाही.एवढे सत्य आहे पैशाने सारे काही खरेदी करता येईल पण जगात असलेल्या सर्व जीवांचे मन आणि प्रेम कधीच खरेदी करता येत नाही.मग तुमच्या जगण्याला काय अर्थ आहे ? © व्यंकटेश काटकर, नांदेड ९४२१८३९५९०/८०८७९१७०६३ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        *🎡 मनाचे श्लोक 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• बहुतांपरी हेंचि आतां धरावें। रघूनायका आपुलेसे करावें॥ दिनानाथ हें तोडरीं ब्रीद गाजे। मना सज्जना राघवीं वस्ति कीजे॥४२॥ संकलन : सौ. सुभद्रा सानप, बीड •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *माणुसकीचे फळ* एका बर्फाच्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीची ही गोष्ट आहे. कामाचा वेळ संपत आला होता सगळे घरी जाण्यासाठी तयार होते. तेवढ्यात कंपनीमध्ये थोडा तांत्रिक बिघाड झाला. म्हणून तो व्यक्ति तो बिघाड दुरुस्त करायला गेला. त्याला काम करण्यात खुप उशीर लागला. तोपर्यंत प्लांट बंद झाला. लाइट बंद करून दरवाजे सील करण्यात आले. अशा परस्थितित त्याचा बर्फ आणि थंडी ने जिव जाणे, निश्चित होते. त्या माणसाला काही सुचेनासं झालं, पण तासा भरात एक चमत्कार झाला. आणि कोणी तरी दरवाजा उघडला. तो समोर पाहतो तर सुरक्षा रक्षक हातात टॉर्च घेऊन उभा होता. त्याने त्याला बाहेर काढून त्याचा जिव वाचवला. प्लांट बाहेर आल्यावर त्याने सुरक्षा रक्षकाला विचारले, “तुम्हाला कसे कळले की मी आत अडकलोय.” सुरक्षा रक्षक म्हणाला, “या प्लांट मध्ये जेवढे लोक काम करतात त्यात तुम्ही एकटेच असे आहात की जे रोज मला येताना नमस्कार आणि जाताना राम राम बोलता आणि आज सकाळी तुम्ही कामावर आलात पण संध्याकाळी गेला नाहीत. म्हणून माझ्या मनात शंका आली आणि मी पाहायला आलो.” त्या व्यक्तीला कधी वाटले देखील नव्हते की त्याचे एखाद्याला एवढा छोटा सन्मान देणे, एक दिवस त्याचा जिव वाचवेल. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा कधीही कोणाला भेटाल तेव्हा त्याच्या सोबत हसून सन्मान पूर्वक बोलून मग पुढे जा. माणूसकीच तुम्हांला शेवट पर्यंत साथ देईल… म्हणून सर्वांबरोबर माणूसकीने वागा… *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00           ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 22/03/2019 वार - शुक्रवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जागतिक जल दिन (World Water Day)* 💥 ठळक घडामोडी :- १८६८ - रॉबर्ट मिलिकेन, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ. १८६९ - एमिलियो अग्विनाल्डो, फिलिपाईन्सचा पहिला राष्ट्राध्यक्ष. १९४५-अरब लीगची स्थापना १९४८-माध्यमिक शालान्त परीक्षेची सुरुवात १९४९- जॉर्डन हा देश स्वतंत्र झाला १९७०-मुस्लीम सत्यशोधक मंडळांची स्थापना १९९९-लता मंगेशकर व भीमसेन जोशी यांना पदमविभूषण 💥 जन्म :- १९२४-मधुसूदन कालेलकर ,नाटककार व कथाकार 💥 मृत्यू :- १९८४-प्रभाकर आत्माराम पाध्ये, मराठी पत्रकार २००४-बॅरिस्टर व्ही एम तथा भाऊसाहेब तारकुंडे, कायदेपंडित, स्वातंत्रसैनिक, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश     *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *यवतमाळ - वाशिम लोकसभा मतदार संघातून प्रहार जनशक्ती पक्षाकडून साहित्य संमेलनाच्या उद्घाटक वैशाली येडे लोकसभेच्या रणांगणात, यांच्या नावाची अधिकृत घोषणा पक्षप्रमुख आमदार बच्चू कडू यांनी केली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *गोव्याहून परतणाऱ्या पर्यटकांच्या गाडीचा कर्नाटकात क्रूझर आणि कंटेनरची भीषण धडक, 9 जणांचा मृत्यू* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *नवी दिल्ली - काँग्रेसकडून आंध्रप्रदेशमधील 3 लोकसभा आणि 45 विधानसभा उमेदवारांची यादी जाहीर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *नवी दिल्ली - भाजपाच्या लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर, अनेक विद्यमान खासदारासह 180 जणांना संधी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *जम्मू-काश्मीर: पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, नौशेरा आणि राजौरी सेक्टरमध्ये केला गोळीबार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *एप्रिलमध्ये होणाऱ्या निवडणुकीआधी इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू अमेरिकेचा दौरा करणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *इंग्लंडच्या विल जॅक्स फलंदाजाने कुटले २५ चेंडूत शतक; षटकात सहा षटकारांची आतषबाजी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• संकलन By ऑनलाइन लोकमत *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जागतिक जल दिनानिमित्त प्रासंगिक लेख* जलसाक्षरता : काळाची गरज वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करावे. https://nasayeotikar.blogspot.com/2019/03/jalsakshartaa.html नागोराव सा. येवतीकर, 9423625769 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *प्रभाकर आत्माराम पाध्ये* प्रभाकर आत्माराम पाध्ये (जानेवारी ४, १९०९ - मार्च २२, १९८४) हे मराठी पत्रकार, विचारवंत, लेखक होते. प्रभाकर पाध्ये यांनी पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूटमधून प्रा. धनंजयराव गाडगीळ यांच्या हाताखाली शिकून अर्थशास्त्रविषयात एम.ए. पदवी मिळवली. पदवीनंतर त्यांनी मुंबईस परतून पत्रकारिता आरंभली. मो.ग. रांगणेकरांच्या 'चित्रा' साप्ताहिकात पाध्ये रुजू झाले. या साप्ताहिकातून पाध्यांनी राजकीय विषयांवर व्यासंगपूर्ण लिखाणास आरंभ केला. याशिवाय हरिभाऊ मोटे यांच्या 'प्रतिभा' साप्ताहिकात पाध्ये साहित्यिक घडामोडींवर लिहीत असत. चित्रा साप्ताहिकातले त्यांचे लिखाण झाल्यावर ते १९३८ - १९४५ सालांदरम्यान 'धनुर्धारी'चे संपादक होते. त्यानंतर १९४५ - १९५३ सालांदरम्यान ते 'नवशक्ती'चे संपादक होते; परंतु फ्री प्रेस समूहाचे मालक एस. सदानंद यांच्याशी वैचारिक मतभेद उद्भवल्यावर ते नवशक्तीतून राजीनामा देऊन बाहेर पडले. प्रभाकर पाध्ये १९५३-५४ मध्ये इंडियन कमिटी फॉर कल्चरल फ्रीडम या संस्थेचे चिटणीस, तर १९५५-५७ या काळात याच संस्थेच्या आशिया विभागाचे जनरल सेक्रेटरी होते. १९६७-७८ या काळात प्रभाकर पाध्ये सेंटर फॉर इंडियन रायटर्स या संस्थेचे संचालक होते. पत्रकारितेच्या जोडीनेच पाध्यांनी ललित साहित्यही लिहिले. त्यांची 'मैत्रीण' ही कादंबरी, 'त्रिसुपर्ण' (इ.स. १९८३) हा दृष्टांतकथासंग्रह व अन्य चार कथासंग्रह प्रकाशित झाले. पाध्यांनी प्रवासवर्णने व समीक्षाही लिहिल्या. त्यांच्या 'सौंदर्यानुभव' या समीक्षापर ग्रंथाला साहित्य अकादमी पुरस्कार लाभला. २२ मार्च १९८४ रोजी पाध्यांचे निधन झाले. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• बलहीन व्यक्ती कुणालाही क्षमा करू शकत नाही. बलवान माणूसच क्षमा करू शकतो. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1)  *भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता ?*       भारतरत्न 2)  *महाराष्ट्राचा RTO Code काय आहे ?*       MH 3)  *भारतरत्नाने सन्मानित होणारा पहिला खेळाडू कोण ?*       सचिन तेंडुलकर 4)  *संविधानाने मान्य केलेल्या भारतीय भाषा किती ?*       22 5)  *महाराष्ट्राचा नृत्यप्रकार कोणता ?*       लावणी *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• • सनीदेवल जाधव • गणेश मैद • गणेशकुमार माळगे • शंकर वर्ताळे • रमेश कत्तूरवार *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    *रंगोत्सव* रंगोत्सवाच्या रंगांनी जीवनात रंग यावे हर्ष उल्हास आनंदात सारे कुटुंब दंग व्हावे हर्ष उल्हासाचा रंग सर्वांना वाटू चला जगाच्या कल्याणाचा हा एक मार्ग भला रंगोत्सवाच्या शुभेच्छा    शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *एखाद्या उंच डोंगरावरच्या छोट्याशा मंदिरात, जिथला देव नवसाला न पावल्यामुळे एकाकी आहे, ज्याला मिणमिणती पणती पुरते, सकाळ संध्याकाळची किणकिणत्या छोट्या घंटेची संगीतमय पूजा पुरेशी असते. अशा मंदिरात पायउतार झाल्यास तिथली शांतता सगुण आणि निर्गुण अशा दोन्ही रूपात ईश्वराची अनुभूती देते. तिथल्या शांततेला जो एक 'ध्वनी' असतो तो कानात आत्मशोधाची रूंजी घालतो आणि आपोआप मूक संवाद सुरू होतो. ही शांतता नेमकं काय सांगते, हे समजण्याची कुवत असल्यास आनंदाचा परमोच्च बिंदू सापडू शकतो.* *कानठळे बसवणारा गोंगाट, मस्तक फिरवणारा कर्कश आवाज, वातावरण चिरणा-या उद्विग्न किंकाळ्या, पर्यावरणाची धूळदाण करणारा भेदक हिंसात्मक आवाज हे सर्व आधुनिक काळातले शांततेचे शत्रू. माणूस एका बाजूने हे सर्व 'हवयं' म्हणून लोकांमध्ये उधळत वाटत सुटला आणि दुसरीकडे 'नको नको' म्हणत वेडापिसा होऊन शांततेचा शोध घेत बसला. मानवनिर्मित 'आवाज' ते ईश्वरनिर्मित 'शांतता' यांचे द्वंद्व सुरू आहे. माणूस शांततेचा शोध घेत पुन्हा 'हिलस्टेशन' वर पोहचला आहे. पण ख-या अर्थाने शांतता तेव्हा मिळेल जेंव्हा तो अध्यात्माच्या आधारे 'शांतता' ओळखेल. "दया क्षमा शांती, तेथे देवाची वसती" या उक्तीप्रमाणे दया, क्षमा माणसाच्या हातात आहेत, नाही ती 'शांतता.'... ती ईश्वराने आपल्या हातात ठेवली आहे.*     ••●★‼ *रामकृष्णहरी* ‼★●••          🌼🌼🌼🌼🌼🌼 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई         9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••     प्रेमभाव एक चाहिए , भेष अनेक बनाय | चाहे घर में वास कर , चाहे बन को जाए || अर्थ मानवाचा धर्म मानवता . मानवता जपायची तर मानवाच्या अंतरात प्रेमभावनेचे अधिष्ठान महत्वाचे आहे. त्या शिवाय मानवता व मानव्य कसं प्रवाहित होणार ? भौगोलिक व भौतिक परिस्थितीशी समायोजन साधण्यासाठी भिन्न वेष परिधान करा . विभिन्र प्रकारच्या (उपलब्धतेनुसार महालापासून झोपडीपर्यंत) वास्तूत किवा वनात वास्तव्य करा ते परिस्थितीनुरूप स्वाभाविक आहे. परंतु त्यात अवडंबर असता कामा नये. सत्य व प्रेमभाव हाच खर्‍या जीवनाचा मुलाधार आहे. त्यामुळे जीवनाची गोडी व सुंदरता वाढते म्हणून माणसाने अशाश्वत अवडंबराच्या व बुवाबाजीच्या नादी लागून जगण्याला विनाकारणच अंधानुकरणी व भंपक बणवू नये . ते मानवतेला पूरक असू शकत नाही.      एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपण स्वतः केलेल्या कृतीतून मिळालेला अनुभव हा आपल्यासाठी खूप मोलाचा आहे.त्यातून आपल्याला बरेच काही शिकायला मिळते.आपण करत असलेल्या कृतीसाठी लागणारे साहित्य कौशल्य, एकाग्रता, पूर्वानुभव, समयसूचकता या गोष्टी शिकायला व अनुभवायला मिळतात. हे आपल्याला दुस-याच्या करण-या कृतीतून मिळत नाही. आपल्याला जो आनंद आणि कृती केल्याचे मनाला समाधान मिळते ते इतरांच्या कृतीतून मिळत नाही. यातून अजून एक आपल्याला स्वावलंबन कसे असते हे देखील शिकायला मिळते. -व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद.9421839590/           8087917063. 🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        *🎡 मनाचे श्लोक 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• बहू हिंडतां सौख्य होणार नाहीं। शिणावे परी नातुडे हीत कांहीं॥ विचारें बरें अंतरा बोधवीजे। मना सज्जना राघवीं वस्ति कीजे॥४१॥ संकलन : सौ. सुभद्रा सानप, बीड •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••            *लोभाची शिक्षा* एक ब्राह्मण यजमानाकडे पूजाअर्चा करून आपला चरितार्थ चालवत होता. दुर्दैवाने देशात दुष्‍काळ पडला. त्‍यामुळे ब्राह्मणाला रोजच्‍या जेवणाची भ्रांत पडली, यापेक्षा मरण पत्‍करलेले परवडले असा विचार करून तो जंगलात गेला. तेथे वाघाला पाहिले. ब्राह्मणाने विचार केला, या वाघाने मला जर खाल्‍ले तर तर त्‍याची भूक भागेल व माझीही मृत्‍यूची इच्‍छा पूर्ण होईल. तसा तो वाघासमोर उभा राहिला. वाघ मनुष्‍यवाणीत बोलू लागला,''तू असा माझ्यासमोर का उभा आहेस'' ब्राह्मणाने आपली कर्मकहाणी त्‍याला सांगितली. तेव्‍हा वाघाला त्‍याची दया आली. तो प्रत्‍यक्षात वाघ नसून वाघाचे रूप घेतलेली वनदेवता होती. वनदेवतेने आपले खरे रूप प्रगट करून त्‍याला एक हजार सुवर्णमुद्रा व धान्‍य दिले व भविष्‍यात कधीही आत्‍महत्‍येचा विचार करू नकोस असे बजावून त्‍याला परत पाठविले. ब्राह्मण अत्‍यानंदाने घरी परतला. दुस-या दिवशी एक सुवर्णमुद्रा घेऊन तो दुकानदाराकडे सामान खरेदी करण्‍यासाठी गेला तेव्‍हा दुकानदाराने या सुवर्णमुद्रा तुला कोठे मिळाल्‍या असे विचारले असता भाबडेपणाने ब्राह्मणाने खरेखरे सर्व सांगून टाकले. लोभी दुकानदाराला तोंडाला पाणी सुटले. त्‍यानेही तसेच वागण्‍याचे ठरविले. दुस-याच दिवशी त्‍याने जंगलात जाऊन त्‍याच ठिकाणी ठिय्या मांडला. वाघ त्‍याच्‍यासमोर प्रगटला. त्‍याला व्‍यापा-याने खोटी कर्मकहाणी सांगितली. वाघाला तत्‍काळ समजले, हा खोटे बोलत आहे, त्‍याने त्‍याच्‍यावर हल्‍ला चढवला आणि जखमी व्‍यापा-याला सुनावले, आज तुला जिवंत सोडत आहे ज्‍यायोगे तू असे धाडस पुन्‍हा करणार नाहीस *तात्‍पर्य –* लोभाने माणसाच्‍या जीवावरही बेतू शकते, लोभ माणसाचे नुकसान करतो. लोभ टाळणे आवश्‍यक आहे.    *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00           ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 20/03/2019 वार - बुधवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *होळीनिमित्त सर्वाना हार्दीक शुभेच्छा*   *जागतिक चिमणी दिवस* 💥 ठळक घडामोडी :- १६०२-डच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना १९१६-अल्बर्ट आईनस्टाईन ने सापेक्षवादाचा सिंद्धान्त प्रसिद्ध केला १७३९ - नादीरशहाने दिल्ली लुटली. मयूरासनासहित नवरत्ने लुटून इराणला पाठविली. १९२७-महाडच्या चवदार तळ्यावरील सत्याग्रह डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली. १९५६-ट्युनिशियाला फ्रांस कडून स्वातंत्र्य मिळाले. 💥 जन्म :- १७२५ - अब्दुल हमीद पहिला, ऑट्टोमन सम्राट. १९२०-वसंत कानेटकर, नाटककार १९६६-अल्का याज्ञीक ,गायिका १९८७-कंगना राणावत ,अभिनेत्री 💥 मृत्यू :- १९२५- लॉर्ड कर्झन, ब्रिटिश भारतातील मुत्सद्दी व्हाइसरॉय १९३४ - एम्मा, नेदरलँड्सची राणी. १९५६-बाळ सीताराम मर्ढेकर,कवी. २००४ - जुलियाना, नेदरलँड्सची राणी. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *नवी दिल्ली - न्यायाधीश पिनाकी चंद्र घोष यांची देशाचे पहिले लोकपाल म्हणून नियुक्ती, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केली नेमणूक* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून महाराष्ट्रातील सात उमेदवारांची नावे जाहीर* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेच्या प्रक्षेपणावर बंदी आणणे अशक्य; निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *लोकसभा निवडणुकीमुळे मुंबई विद्यापीठाने 76 परीक्षा पुढे ढकलल्या* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *भंडारा - गोदिंया लोकसभा मतदार संघात नामांकन दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी दोन उमेदवारांचे नामांकन दाखल. तर २६ जणांनी ५५ अर्जांची केली उचल* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *लष्कराचे जवान विजय कुमार, सीआरपीएफचे हवालदार प्रदीप कुमार पांडा यांचा होणार कीर्ती चक्रानं सन्मान* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय)  आयपीएलच्या  साखळी फेरीचे वेळापत्रक केले जाहीर, त्यानुसार प्रत्येक संघ घरच्या मैदानावर किमान सात सामने खेळणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *डिजिटल शाळा : जबाबदारी कुणाची ...?* वरील लेख वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करावे http://nasayeotikar.blogspot.com/2017/03/blog-post_21.html स्तंभलेखक नासा येवतीकर 9423625769 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *जागतिक चिमणी दिवस*  भारतात सर्वात जास्त संख्या असणारा पक्षी म्हणून चिमणी (नर- चिमणा, मादी-चिमणी) परिचयाची आहे. नर चिमणीच्या कपाळाचा, शेपटीवरचा आणि पार्श्वभाग राखाडी, कानाजवळ पांढरा, चोच काळी, कंठ ते छातीच्या भागावर मोठा काळा भाग, डोक्यापासून खाली पोटाचा भाग पांढरा असून पाठीवर तपकिरी काळ्या तुटक रेषा असतात. मादी मातकट तपकिरी रंगाची असून तिच्या अंगावर काळ्या तपकिरी रंगाच्या तुटक रेषा असतात. तिची चोच फिकट तपकिरी रंगाची असते.तीला भारतात तपकीर असेही म्हटले जाते. हा पक्षी हिमालयाच्या २००० मी. उंचीपर्यंत, तसेच भारतभरसर्वत्र आढळतो. तसेच  बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका,  म्यानमारसह इतरही देशांत आढळतो. भारतात काश्मिरी आणि वायव्यी अशा हिच्या किमान दोन उपजातीही आढळतात. माणसाच्या अगदी जवळच राहणारा हा पक्षी असून कीटक, धान्य, मध, शिजवलेले अन्न असे सर्व प्रकारचे खाद्य खातो. विणीचा हंगाम वर्षभर असू शकणारा पक्षी अशी ओळखही या पक्ष्याची आहे. गवत, कापूस, पिसे, मिळतील त्या वस्तू वापरून घराचे छत, वळचणीच्या जागा, दिव्यांच्या मागे, झाडांवर असे कुठेही घरटे बांधतो. मादी फिकट हिरव्या पांढऱ्या रंगाची, त्यावर तपकिरी ठिपके असलेली ४ ते ५ अंडी देते. अंड्यांच्या रंगात स्थानिक बदलही आहेत. नर-मादी घरटे बांधण्यापासून, अंडी उबविणे, पिलांना खाऊ घालणे वगैरे सर्व कामे मिळून करतात. चिमण्यांचे आयुष्य सहा महिने ते तीन वर्षांपर्यंत असते. ज्ञात असलेली सर्वात वयस्कर वन्य चिमणी जवळपास दोन दशके जगली. त्याचबरोबर नोंद असलेली सर्वात वयस्कर कैदेतील चिमणी २३ वर्षे जगली. चिमण्यांच्या बाबतीत अशी एक वदंता आहे की, एखाद्या चिमणीला माणसाने पकडले आणि परत सोडले, तर बाकीच्या चिमण्या त्या चिमणीला त्यांच्यामधे घेत नाहीत व चोचीने मारतात किंवा तिला बहिष्कृत करतात; प्रसंगी,जीव देखील घेतात. अलीकडे वाढत्या शहरीकरणामुळे चिमण्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. विशेषत: शहरांमध्ये मोबाईल टॉवर्समधून होणारे विद्युत् चुंबकीय उत्सर्जन, आधुनिक प्रकारच्या घरबांधणी पद्धतीमुळे घरट्यांच्या जागांची अनुपलब्धता, अन्नाची अनुपलब्धता, शहरांमधील वाढते प्रदूषण तसेच शेतात होणारा रासायनिक खते व कीटकनाशक यांचा वापर यांसारख्या अनेक कारणांमुळे चिमण्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. २० मार्च हा दिवस दरवर्षी "जागतिक चिमणी" दिवस म्हणून पाळला जातो. हा दिवस त्यांच्या संख्येबद्दल लोकांमध्ये जागृती घडवून आणण्यासाठी साजरा केला जातो. या काळात चिमणीची संख्या कमी होत आहे. (इंटरनेट वरून साभार )       *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• प्रार्थनेमुळे देव बदलत नाही ; तर ती प्रार्थना करणारी व्यक्ती बदलत असते. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *महाराष्ट्रात गंगापूर हे धरण कोणत्या नदीवर आहे ?* गोदावरी 2) *सूर्य कोणत्या दिशेला उगवतो ?* पूर्व 3) *आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस केव्हा साजरा केला जातो ?* 8 सप्टेंबर 4) *भारताचे विदेशमंत्री कोण आहेत ?* मा.सुषमा स्वराज 5) *जागतिक चिमणी दिवस केव्हा साजरा करतात ?* 20 मार्च *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा, गोंदिया 📱9765943144              •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• •  योगेश राजापूरकर •  रामदयाल राऊत •  गणेश गुरूपवार •  नागेश चिंतावार •  मनोहर राखेवार •  गंगाधर अडकीने •  रमेश कोंडेकर *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *होळी* राग लोभ मत्सराची चला होळी करू या सत्याकडे जाणारा चला सन्मार्ग धरू या राग लोभ मत्सर सारा होळीत जाळला पाहिजे जीवन जगायचे तर सन्मार्ग धरला पाहिजे शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कित्येकदा आपण ऐकतो की, 'त्यावेळी जरा चुकलंच, मी असा निर्णय घ्यायला नको होता, पण काय करणार ? वेळ निघून गेली होती' वगैरे. निर्णयक्षमता वाढविण्यासाठी विचारक्षमता वाढली पाहिजे. मन निर्विकार हवे. तरच एखादा प्रश्न उभा राहिला तर त्याकडे त्रयस्थपणे बघता येईल. ही निर्णयक्षमता वाढणार कशी? मन काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, लोभ या षडरिपूंनी ग्रासलेले आहे. परमेश्वराने मनुष्य घडवला, त्याला मन, बुद्धी दिली आणि सोबत संघर्षाची पुरचूंडी. शारीरीक क्षमतेच्या जोरावर कोणताही प्रश्न सोडवता येतो, हा भ्रम असून बुद्धीच त्यातून मार्ग काढू शकते याची समज येण्यासाठी मन शांत, कणखर आणि निर्वीकार हवं.* *षङरिपूत माणसाला उध्वस्त करण्याची ताकद असते. ते बुद्धीला जवळपासही फिरकू देत नाहीत. जेव्हा अशा उध्वस्त करणा-या घटना घडतात, त्या एका क्षणाच्या अविचाराचे परिणाम असतात. अशा निर्णायक क्षणी हमखास एखादे प्रलोभन, एखादी संधी, एखादा प्रसंग, एखादी घटना अशी घडते की निर्णय घेण्याची क्षमता चुकीच्या दिशेने वळते, आणि तो क्षण आयुष्यभराचे नुकसान करतो. शांत, धीर गंभीरपणे घेतलेले निर्णय इतिहास निर्माण करू शकतात.*      ••●★‼ *रामकृष्णहरी* ‼★●••              🌸🌸🌸🌸🌸🌸 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई         9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    कबीरा ते नर अन्ध है, गुरु को कहते और ।  हरि रूठे गुरु ठौर है,  गुरु रुठै नहीं ठौर ॥ अर्थ:         महात्मा कबीर गुरूंची महत्ती सांगताना म्हणतात की जो माणूस  गुरुचे जीवनातील महत्व  जाणत नाही , जो गुरूचा अनादर करतो. तो डोळे असूनही आंधळाच समजला पाहिजे.  कठीण समयी आपणास देव व दैवाची साथ मिळत नसली तरी आपणास  त्या कठीण व नाजूक अशा विपरित परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी गुरूच मदत करीत असतात. जर का गुरूनेच साथ सोडली तर मात्र भूतलावर कोणीही साथ देत नाही. कारण ईश्वराकडे जाण्याचा मार्गच  गुरूपासून सुरू होतो, तर गुरूकडे जाण्यासाठी  ईश्वराची मदत घ्यायची गरज असतेच कुठे ?  मात्र ईश्वर जाणायचा असेल तर गुरूचे महत्व अनन्य साधारण आहे. दाखलेच पाहायचे झाले तर  इथल्या व्यवस्थेनं ज्याचं शिक्षण नाकारलं, त्या महाभारतातील एकलव्याचं उदाहरण पहा. गुरूचा पुतळा करून त्याच्यासमोर स्वयं अध्ययनाचे धडे गिरवून सर्वोत्कृष्ट धनुर्धर म्हणून लौकिकास पात्र होतो. रामकृष्ण परमहंस आणि नरेंद्र दत्त ही गुरू शिष्याची जोडी पाहता विज्ञान शाखेचा विद्यार्थी असणार्‍या नरेंद्राला अध्यात्माचा बोध देवून विज्ञानाला अध्यात्माची जोड देणारे विवेकवादी भारतीय तत्त्वज्ञान जगाला  देणारा नरेंद्राचा विवेकानंंद  परमहंसानी घडवला. हे गुरूचं अदृश्य सामर्थ्य असतं. आदर्श विद्यार्थी एकलव्याचं शिक्षण नाकारणं, इथल्या खेकडा प्रवृत्तीच्या धर्माच्या ठेकेदारांनी विवेकानंदांच्या  भाषणाला विरोध करणं ही इथल्या व्यवस्थेच्या तोकडेपणाचीच उदाहरणे  म्हणावी लागतील.        गुरू मात्र आपल्या शिष्याला मजबुतीनं उभं करण्याचा आटोकाट प्रयत्न करीत असतात. हे विसरून कसं जमेल.      एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• तुम्ही हाती घेतलेल्या कोणत्याही कामात सातत्याने करत असलेले प्रयत्न आणि त्यात मिळालेले यश हे तुमच्या मनाला समाधान देणारे आहे.प्रयत्नातून मिळालेला आनंद हा तुमच्या जीवनात अधिक महत्वाचा आहे. - व्यंकटेश काटकर,नांदेड.   संवाद.9421839590 🍃🌺🍃🌺🍃🌺🍃🌺🍃🌺🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        *🎡 मनाचे श्लोक 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• मना पाविजे सर्वही सूख जेथे। अति आदरें ठेविजे लक्ष तेथें॥ विविकें कुडी कल्पना पालटिजे। मना सज्जना राघवी वस्ति कीजे॥४०॥ संकलन : सौ. सुभद्रा सानप, बीड •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *चढ आणि उतार* आपल्या छानदार खोगिराची एका घोडयाला घमेंड वाटत होती. हमरस्त्याने एक ओझे लादलेला गाढव चालला होता. तो त्या घोडयाला वाट करून द्यायला जरा बाजूला झाला. पण आपल्याच तो-यात घोडा उतावीळपणे त्याला म्हणाला, 'ए, जा रे, हट्. चल लवकर हो बाजूला. नाहीतर एखादी लाथच खाशील.' बिचारे गाढव गप्पच राहीले. पण घोडयाचे ते उध्दटासारखे वागणे त्याच्या मनात राहीले. काही दिवसांनी तो घोडा म्हातारा व निकामी झालेला पाहून त्याच्या मालकाने तो एका शेतकऱ्याला विकला. आता त्या शेतक-याच्या शेतखणाची गाडी ओढून नेण्याचे काम त्याला करावे लागत होते. थकला भागला तो घोडा असाच एकदा रस्त्यावरून जात असताना पूर्वीचे ते गाढव त्याला भेटले. त्याला पाहताच खोचकपणे गाढवाने त्याला विचारले, 'ओऽहो, कुठे निघाली स्वारी? नि हे काय? तुमचं ते पूर्वीचं छानदार खोगिर नाही दिसत कुठे? काय हो अश्वराज, त्या वेळच्या त्या घमेंडीत कधी अशी पाळी येईल, असं वाटलं होतं का तुम्हाला?...' *तात्पर्य - जीवनात चढ-उतार दोन्ही असतात, हे सदैव ध्यानी बाळगावे.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00           ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 19/03/2019 वार - मंगळवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १८४२-लोकहितवादी यांनी "शतपत्र"लेखनास प्रारंभ केलं १९७२-भारत-बांग्लादेश मैत्री करार २००३-अमेरिकेचे अध्यक्ष जार्ज बुश यांनी इराकविरुद्ध युद्ध पुकारले २००४ - तैवानच्या राष्ट्राध्यक्ष चेन शुइ-बियान वर हल्ला. २०१३ - राष्ट्रीय महामार्ग १७वरील खेडजवळ जगबुडी नदीवरील पुलावरुन बस नदीपात्रात कोळून ३७ ठार, १५ जखमी. 💥 जन्म :- १९३८-सई परांजपे, लेखिका व चित्रपट दिग्दर्शिका १९५४- इंदू शहानी, भारतीय शिक्षणतज्ञ १९८४ - तनुश्री दत्ता, हिंदी चित्रपट अभिनेत्री. 💥 मृत्यू :- २००८-सरआर्थर सी क्लार्क,विज्ञान कथालेखक व संशोधक २००२-नरेन ताम्हाणे,यष्टीरक्षक आणि फलंदाज १९९८-इ एम एस नंब्रूदीपाद,केरळ चे माजी मुख्यमंत्री १९८२-"आचार्य" कृपलानी, गांधीवादी ,स्वातंत्रसेनानी *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *मित्रपक्षांच्या नेत्यांसोबत प्रदीर्घ काळ चाललेल्या चर्चा आणि वाटाघाटींनंतर अखेर भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *लंडन - पीएनबी बँक घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदीला अटक होणार, 25 मार्च रोजी लंडन कोर्टात नीरव मोदीला हजर करणार, सूत्रांची माहिती* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *दिल्ली - भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज बैठक, 180 लोकसभा उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *भंडारा - गोंदिया लोकसभा मतदार संघात सोमवारी पहिल्याच दिवशी २० जणांनी ४७ नामनिर्देशन अर्जांची उचल केली. एकही नामांकन दाखल नाही* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर अनंत तात विलीन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *मुंबई : म्हाडाच्या घरांसाठीची 21 एप्रिलची सोडत पुढे ढकलली, लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर सोडत जाहीर होणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *पटियाला येथे सुरू असलेल्या फेडरेशन चषक वरिष्ठ अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या अविनाश साबळेचा राष्ट्रीय विक्रम, आशियाई व जागतिक स्पर्धेसाठी पात्र * ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• नासा येवतीकर लिखित *कथा :- नावाची लक्ष्मी* http://nasayeotikar.blogspot.com/2017/03/blog-post_42.html कथा वाचून आपले मत पोस्ट करायला विसरु नका •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••          *सई परांजपे* सई परांजपे (१९ मार्च, इ.स. १९३८) या एक मराठी लेखिका, नाटककार, बालनाट्ये लिहून रंगमंचावर सादर करणाऱ्या, पटकथाकार व चित्रपट दिग्दर्शक-निर्मात्या आहेत. समांतर चित्रपट या वर्गवारीत येणारे अनेक चित्रपट त्यांनी प्रामुख्याने दिग्दर्शित केले आहेत. सई परांजपे हे नाव त्यांच्या बालवयापासूनच लोकांना परिचयाचे आहे. कारण, ज्या वयात मुले लंगडी, लपाछपी खेळतात त्या वयात म्हणजे वयाच्या ८व्या वर्षी, सई परांजपे यांचे पहिले पुस्तक -मुलांचा मेवा- केवळ लिहून नव्हे तर, छापून प्रकाशित झाले होते. त्यामुळे त्यांची सुरूवातच मुळात बाल वयातील लेखिका म्हणून झाली. पुढे त्यांच्या लेखणीला सखोलता प्राप्‍त झाली आणि अल्पावधीतच त्या यशस्वी आणि लोकप्रिय लेखिकाही झाल्या. बालसाहित्य लेखिका, बालनाट्य लेखिका, नाटककार, पटकथाकार तसेच, निर्मात्या अश्या एकापेक्षा एक अश्या सरस कामगिर्‍या सई परांजपे यांनी पार पाडल्या आहेत. चिल्ड्रन फिल्म सोसायटी ऑफ इंडियाच्या त्या दोन वेळा अध्यक्षा होत्या. (इंटरनेट वरून साभार )    *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• प्रत्येक मनुष्य आपल्या पापाचे ओझे स्वत:च्याच खांद्यावर वाहत असतो. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *महाराष्ट्रातील सर्वात जास्त पावसाचा जिल्हा कोणता ?* सिंधुदुर्ग 2) *महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा कोणता ?* गडचिरोली 3) *महाराष्ट्रात पहिली मुलींची शाळा कोठे स्थापन करण्यात आली ?* पुणे 4) *महाराष्ट्रातील पहिल्या महिला डॉक्टर कोण ?* आनंदीबाई जोशी 5) *महाराष्ट्रातील सर्वात कमी पर्जन्यछायेचा जिल्हा कोणता ?* सोलापूर *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144              •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• •  प्रकाश गताडे •  व्यंकटी पावडे •  प्रेमराज रावसाहेब त्रिभुवन •  केदार ढगे, चिरली •  अशोक सोनवणे, धुळे •  आमरजुल इस्लाम •  मनोज शेटकर •  मंजुषा देशमुख, अमरावती •  रघुवेध तेहरा •  गंगाधर गुरलोड •  शंकर कंदेवाड, येवती *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *भांडण* दिवसा वाद रात्री मनोमिलन असते भांडणात पडणारा उगी व्हिलन असते लुटूपुटूच्या भांडणात कधी कोणी पडू नये त्यांची होते क्षणात मैत्री आपण दुश्मन घडू नये शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जीवनाचे अध्यात्म समजून घेताना रोज जगण्यातील प्रत्येक घटनेचा ऊहापोह चिंतनाच्या पातळीवर करणे आवश्यक असते. तेव्हांच दैनंदिन जीवनप्रवाहात अध्यात्म उतरू शकते. योग्यायोग्यतेचा निवाडा करून सुयोग्य मार्गावरून चालणे आणि आपल्यांसह इतरांनाही त्या मार्गावरून घेऊन जाणे जमायला हवे. याची सुरूवात आपल्यापासून करून मग ते इतरांना शिकविले, तर ते आचरणशील होते. अलीकडे लग्न व इतर उत्सवादी कार्यक्रमात अन्न टाकू नये, असे सांगितले जाते. जेवताना अन्न टाकायचे नसतेच, तो सुसंस्कृत जगण्याचा अविभाज्य भाग आहे; पण तरीही भराभर वाढून घेणे आणि नुसतीच चव चाखून ते टाकणे, असा*  *त-हेवाईकपणा वाढतो आहे.*  *आपले तत्वज्ञान तर अन्न प्राशनाविषयी खूप खोलवर जावून बोलते. अन्नाची निंदा करू नये आणि ते टाकू नये, असे साक्षात् उपनिषदांनी नोंदवून ठेवले आहे. त्याचे पालन होत नाही. बाहेरील मोठा कार्यक्रम तर जाऊ द्या: पण घरातही खूप अन्न वाया जाते. त्याचा विचार व्हावा. रोज हजारो भुकेल्यांचे पोट भरेल एवढे अन्न राज्यात वाया जात असेल. ते जर आपण वाचवले, तर 'अन्नदान श्रेष्ठदान' सारखी अध्यात्मिक कृती घडेल. Money saved is money earned याचा अर्थ पैसा वाचविणे हे पैसा मिळविण्यासारखेच असते. तसेच अन्नाचा काटकसरीने वापर करणे हे अन्न निर्माण करण्यासारखेच आहे.*    ••●★‼ *रामकृष्णहरी* ‼★●••             🔥🔥🔥🔥🔥🔥 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई         9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      कबीर कलि खोटी भाई , मुनियर मिली न कोय | लालच लोभी मस्कारा , टिंकू आदर होई || अर्थ : हल्लीच्या सामाजिक भानाचं वर्णन करताना महात्मा कबीर ढोंगाला भुलणार्‍या अर्थात वास्तव न पाहता वरवरच्या सोंगालाच सत्य मानणार्‍या समाजमनाचं निरीक्षण नोंदवतात. भूगोल सांगतं पृथ्वीचं वय साडे चार अब्ज वर्षापेक्षा जास्त जास्त. भारतीयांच्या मानण्याप्रमाणे गतकाळ ते सांप्रत असे चार युग . १ कृत युग, २ त्रेता युग , ३ द्वापार युग, व ४ कली युग अशी काल विभागणी सांगितली जाते. हल्ली म्हणजे कलीयुगी पूर्वीपेक्षा खोटारडेपणा खूपच वाढलाय. हे युग महाभारताच्या लढाईपासून ते सांप्रतपर्यंत चालूच आहे. या युगी खरे खुरे मुनी , ऋषी , संत भेटणे कठीण झाले आहे. स्वार्थासाठी त्यांची नाटकं करणारे अनेक जण भेटतील. लालचीपणा, मोह यांनी ग्रासलेल्यांना हेच ढोंगी , पाखंडी , खरंं अध्यात्म सोडून थट्टा मस्करी करणारे, द्रव्य लुटणारे, वासनांधच साधू, मुनी म्हणून मिरवत आहेत. अन भक्तजण त्यांनाच डोक्यावर घेवून मिरवतात अन फसगत झाली की वैफल्यग्रस्त होतात. तेव्हा खरा साधून ओळखून त्याच्या ठायी लिन व्हायला सांगितलेला संतांचा कानमंत्र विसरू नये. म्हणजे झालं. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जीवनव्यवहारासाठी जसा सुखदुःखाचा,कामाचा आणि वेळेचा अनुभव पाठीशी असावा लागतो तसा आपल्या सर्वांगीण विकासासाठी ज्ञानाचा अनुभव पाठीशी असावा लागतो.ते ज्ञान मिळविण्यासाठी मनाची तयारी असायला पाहिजे. मनाच्या परिपक्वतेसाठी व माणूस म्हणून चांगले आणि संस्कारीत जीवन फुलवण्यासाठी ज्ञानाची कास धरायलाच हवी.ज्ञान हे जीवनाला योग्य दिशा देण्याचे आणि मानव कल्याणाच्या  प्रगतीकडे नेण्याचे काम करते. - व्यंकटेश काटकर,नांदेड. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        *🎡 मनाचे श्लोक 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जया वर्णिती वेद शास्त्रे पुराणे। जयाचेनि योगें समाधान बाणे॥ तयालागिं हें सर्व चांचल्य दीजे। मना सज्जना राघवी वस्ति कीजे॥३९॥ संकलन : सौ. सुभद्रा सानप, बीड •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *घोडा आणि नदी* एकदा एका माणसाला त्याच्या घोड्यासमवेत एक नदी पार करायची असते. परंतु त्याला नदीची खोली माहीत नसल्याने तो तिथेच काठावर विचार करत बसतो. मदतीसाठी आजुबाजुला पाहत असताना त्याला तेथे एक लहान मुलगा दिसतो. तेव्हा त्या माणसाने लहान मुलाला नदीच्या खोलीबद्दल विचारले. मुलाने घोड्याकडे एकदा पाहीले आणि क्षणभर थांबुन तो विश्वासाने म्हणाला, " निश्चींतपणे जा, तुमचा घोडा नदी सहज पार करु शकेल". मुलाचा सल्ला मानुन त्या माणसाने नदी पार करण्यास सुरुवात केली. परंतु नदीच्या मध्यावर पोहोचल्यावर त्याच्या लक्षात आले की नदी खुप खोल आहे. आणि तो जवळ जवळ बुडायलाच आला. कसाबसा तो त्यातून सावरला आणि बाहेर येउन त्या मुलावर जोरात खेकसला. मुलगा पुरता घाबरला होता आणि घाबरत घाबरतच बोलला, "पण माझी बदके तर खुप लहान आहेत आणि ते दररोज नदी पार करतात. त्यांचे पाय तर तुमच्या घोड्यापेक्षा खुप लहान आहेत." उगाच कोणाचाही सल्ला ऐकण्याआधी त्यांना खरोखरच काही माहीती आहे का ते जाणुन घ्या.... प्रत्येकजण आपआपल्या अनुभवाने सल्ला देतात. तो सल्ला कितपत योग्य आणि बरोबर आहे ते जाणून घेणे महत्त्वाचे आहे. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00           ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 18/03/2019 वार - सोमवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *शहाजीराजे भोसले जयंती* 💥 ठळक घडामोडी :- १९१९-रौलेक्ट ऍक्ट पास १९२२ - महात्मा गांधींना असहकार आंदोलनाबद्दल ६ वर्षे तुरुंगवास. १९४४-नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेने भारताच्या ईशान्य सीमेवर ब्रिटीशांच्या सेनेचा पाडाव करून तिरंगा फडकवला १९६९-'कॉसमॉस' हे मानवविरहित अवकाशयान रशियाने यांचं दिवशी अवकाशात सोडले 💥 जन्म :- १५९४-शहाजीराजे भोसले. १९१९-इंद्रजित गुप्ता ,माजी केंद्रीय मंत्री. १९२१-एन के पी साळवे. -भारतीय राजकारणी,बी सी सी आय चे माजी अध्यक्ष. १९३८ - शशी कपूर हिंदी चित्रपट अभिनेता. १९४८-एकनाथ सोलकर ,अष्टपैलू क्रिकेटपटू 💥 मृत्यू :- १८७१-इंग्लिश गणितज्ञ ऑगस्टस द मॉर्गन १९०८-सर जॉन इलियट, ब्रिटीश हवामानशास्त्रज्ञ २००१ - विश्वनाथ नागेशकर, भारतीय,गोवेकर चित्रकार. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *: गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे निधन, आज सायंकाळी 05 वाजता होणार अंतीम संस्कार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मतदार नोंदणीत महाराष्ट्रातील तरुणांचा पुढाकार उल्लेखनीय असून राज्यातील  11 लाख 99 हजार 527 तरूण मतदार प्रथमच मतदानाचा हक्क बजावणार आहेत* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या 40 सीआरपीएफ जवानांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने 20 कोटी देण्याचे केले जाहीर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *श्रीनगर - माजी आयएएस अधिकारी शाह फैजल यांच्याकडून नवीन पक्षाची स्थापना, पक्षाचं नाव ''जम्मू आणि काश्मीर पिपल्स''* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *नवी दिल्ली - भाजपाकडून आंध्र प्रदेशमधील विधानसभा निवडणुकांसाठी 123 उमेदवारांची यादी जाहीर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची लोकसभा निवडणुकांतून माघार, पत्रक काढून मनसेची माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या वन डे क्रमवारीत भारताचा कर्णधार विराट कोहली आणि प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह यांनी राखले आपले अव्वल स्थान, केदार जाधवची आयसीसी क्रमवारीत मोठी भरारी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *पाणी म्हणजे जीवन* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/02/04.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *शहाजीराजे भोसले*         शहाजीराजे भोसले हे पराक्रम, युद्धप्रसंगीची बुद्धिमत्ता, उत्तम प्रशासन, व स्वतंत्र राज्यकारभार या मूलभूत गुण-कौशल्यांचे बीजारोपण शिवाजीराजांमध्ये करणारे ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व होते. मालोजी भोसले यांची पत्नी दीपाबाई (उमाबाई) हिच्या पोटी सिंदखेड इथे शहाजी यांचा जन्म १५ मार्च १५९४ रोजी झाला. (शहाजींच्या जन्मतारखेबद्दल इतिहासकारात मतभेद आहेत.) काहींच्या मते मालोजी भासले यांची मुख्य राणी उम्मवा साठे यांची कन्या उमा ही असून तिच्या पोटी शहाजी व शरीफजी यांचा जन्म झाला. तर काहींच्या मते फलटणच्या वणगोजी निंबाळकर यांची कन्या दीपा ह्या शहाजी व शरीफजी यांच्या माता होत. राजस्थानच्या चित्तोडगढच्या संग्रामातअल्लाउद्दीन खिलजीशी लढताना  राणा लक्ष्मणसिंह नावाचा सेनानी आपल्या सात मुलांसह धारातीर्थी पडला. पुढे याच वंशातील भैरोसिंह उर्फ भोसाजी महान कार्य करून गेले. त्यांच्यामुळेच या वंशाला पुढे ‘भोसले’ हे नाव प्राप्त झाले. याच वंशात पुढे वेरुळस्थित बाबाजीराजे भोसले  यांच्या घरात मालोजीराजे भोसले आणि उमाबाई भोसले यांच्या पोटी शहाजीराजे यांचा जन्म झाला. त्यांच्या जन्माच्या वेळी त्यांच्या मातोश्री उमाबाईंनी अहमदनगरजवळील शहाशरीफ पीराला ( मुकुंदनगर भागात हे तारकपूर बस स्टँड ,अहमदनगर जवळ) नवस बोलल्यामुळे त्यांनी आपल्या दोन्ही मुलांची नावे शहाजी व शरीफजी अशी ठेवली. पुढे सिंदखेडराजा येथील लखुजीराव जाधव यांच्या मुलीशी म्हणजेच जिजाबाईंशी शहाजीराजे यांचा डिसेंबर इ.स. १६०५ मध्ये विवाह झाला. या वेळी लखुजीराव व मालोजीराजे हे दोघेही निजामशाहीत होते. पुढे लगेचच मालोजीराजांचा दुर्दैवी मृत्यू झाला. कालांतराने जसेजसे शहाजीराजे मोठे होत गेले, तसतशी पराक्रम, राजकारण, मुत्सद्देगिरी या बाबतीत त्यांची कीर्ती वाढत सर्वदूर पसरत गेली. (इंटरनेट वरून साभार ) *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• प्रगती हे जीवनाचे ध्येय आहे, तर गती हा त्याचा आत्मा आहे. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *महाराष्ट्रात 'शनिवारवाडा' कोणत्या जिल्ह्यात आहे ?* पुणे 2) *महाराष्ट्रात 'ऑरेंज सिटी' असे कोणत्या शहराला म्हणतात ?* नागपूर 3) *महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला 'ज्वारीचे कोठार' म्हणतात ?* सोलापूर 4) *महाराष्ट्राच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे ?* अरबी समुद्र 5) *महाराष्ट्रातील पहिले एव्हरेस्ट शिखर पार करणारे व्यक्ती कोण ?* सुरेंद्र चव्हाण *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144              •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• • इरफान शेख • व्यंकट भंडारे • लक्ष्मण नरवाडे • बालाजी आगोड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *हुशार* आपण फक्त हुशार बाकी नाकाने वांगे सोलत नाहीत आपल्यालाच जास्त बोलता येते अन् बाकी कानाने बोलत नाहीत ज्याच्या त्याच्या परीने प्रत्येक शहाणा असतो मला काही समजत नाही हा फक्त बहाणा असतो शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *एका सोनाराच्या दुकानासमोरच एका लोहाराचे दुकान होते. सोनार जेव्हा काम करत असे तेंव्हा सोनाराच्या दुकानातून हळू आवाज होत असे पण जेंव्हा लोहार काम करत असे तेंव्हा मात्र लोखंडाचे काम होत असल्याने मोठा आवाज होत असे. तो आवाज मोठा कर्णकर्कश असे. एके दिवशी सोनाराच्या दुकानातील एक सोन्याचा कण कसा कोण जाणे पण लोहाराच्या दुकानात जावून पडला. त्या सोन्याच्या कणाची भेट एका लोखंडाच्या कणाशी झाली. खूप दिवसांची ओळख असल्यासारखे ते एकमेकांशी बोलू लागले. सोन्याच्या कणाने लोखंडाच्या कणाला म्हटले,,"दादा, आपले दुःख खरे तर एकसमान आहे. दोघांनाही आगीत तापवले जाते आणि हातोड्याने ठोकले जाते. मी तर बाबा चुपचाप हे सहन करतो, पण तुझे काय?"* *लोखंडाचा कण सोन्याच्या कणाकडे पाहून दुःखी स्वरात म्हणाला,"अरे ! तुझे म्हणणे अगदी बरोबर आहे. दोघांनाही तापवणारी आग एकच आहे आणि ठोकणारा हातोडाही एकाच धातूचा आहे. पण खरे दुःख याचे आहे कि तुला ठोकणारा हातोडा हा तुझा कोणीच लागत नाही पण मला ठोकणारा लोखंडाचा हातोडा हा नात्याने माझा भाऊच लागतो. दुस-याने दिलेल्या दुःखापेक्षा स्वकीयांनी दिलेला त्रास हा अगदी हृदयात वार करून जातो."* *"माणसांचेही तसेच आहे,  आपल्या माणसांकडून होणारा त्रास हा कायमच दुःखदायक वाटतो."*      ••●❤‼ *रामकृष्णहरी* ‼❤●••        ❤❤❤❤❤❤ संजय नलावडे, चांदीवली, मुंबई         9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      प्रेमभाव एक चाहिए , भेष अनेक बनाय | चाहे घर में वास कर , चाहे बन को जाए || अर्थ मानवाचा धर्म मानवता . मानवता जपायची तर मानवाच्या अंतरात प्रेमभावनेचे अधिष्ठान महत्वाचे आहे. त्या शिवाय मानवता व मानव्य कसं प्रवाहित होणार ? भौगोलिक व भौतिक परिस्थितीशी समायोजन साधण्यासाठी भिन्न वेष परिधान करा . विभिन्र प्रकारच्या (उपलब्धतेनुसार महालापासून झोपडीपर्यंत) वास्तूत किवा वनात वास्तव्य करा ते परिस्थितीनुरूप स्वाभाविक आहे. परंतु त्यात अवडंबर असता कामा नये. सत्य व प्रेमभाव हाच खर्‍या जीवनाचा मुलाधार आहे. त्यामुळे जीवनाची गोडी व सुंदरता वाढते म्हणून माणसाने अशाश्वत अवडंबराच्या व बुवाबाजीच्या नादी लागून जगण्याला विनाकारणच अंधानुकरणी व भंपक बणवू नये . ते मानवतेला पूरक असू शकत नाही. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जर प्रत्येकाने आपल्या कामाचे नियोजन पूर्वनियोजित आणि विचारपूर्वक केले तर ते काम यशस्वीपणे पार पडेल. अन्यथा कामामध्ये व्यवस्थितपणा राहणार नाही.कामाचा दर्जाही घसरेल,मनाची घालमेल होईल, कामामध्ये लक्ष राहत नसल्यामुळे आणि एकाग्रता नसल्यामुळे स्वत:मध्ये चिडचिडेपणा येऊन आपला राग समोरच्या व्यक्तीवर काढायला लागतो.या सर्व गोष्टी टाळण्यासाठी आपल्या कामात पूर्वनियोजन करायला हवे.तरच आपल्याला मानसिक समाधान मिळेल. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९० •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        *🎡 मनाचे श्लोक 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• मना प्रार्थना तूजला एक आहे। रघूराज थक्कीत होऊनि पाहे॥ अवज्ञा कदा हो यदर्थी न कीजे। मना सज्जना राघवी वस्ति कीजे॥३८॥ संकलन : सौ. सुभद्रा सानप, बीड •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *गुरु आणि शिष्य* डॉक्टर दारात आले, नेहमीसारखे जोडे काढून हातात घेतले आणि ओपीडीत गेले समोरच एक वृद्ध उभे होते. "सर, तुम्ही?" मी त्या वृद्धाचा हात धरत म्हटलं. "कोण?" "मी xxx....तुमचा विद्यार्थी." मी माझं नाव सांगितलं. "होय काय?....चेहऱ्यात खूप फरक पडलाय रे!...तब्बेतीनं पण मोठा झालायस....शाळेत होतास तेव्हा केवढा मरतुकडा होतास." सरांच्या बोलण्यावर रिसेप्शनिस्ट तोंड धरून हसली. "चला की सर!....आत चला." मी हातातले चप्पल रिसेप्शनिस्टच्या काऊंटरखाली ठेवत सरांना म्हटलं. "नको,तू जा....मी येतो माझा नंबर आल्यावर." "सर, नंबराचं काय घेऊन बसलाय?....तुम्ही माझे गुरू आहात... माझ्याबरोबर चला आत." "अरे, नंबराचं काय म्हणजे?" सर माझ्याकडं आश्चर्यानं बघत म्हणाले,"जगात नंबरालाच सर्वात जास्त महत्त्व आहे....तुझा वर्गात नेहमी पहिला नंबर असायचा... पण प्रगतीपुस्तकावर मी उत्तीर्ण क्रमांक १ च्या ठिकाणी उत्तीर्ण क्रमांक २ असंलिहलं असतं तर तुला चाललं असतं का?...नाही ना?...माझा साठावा नंबर आहे....म्हणजे माझ्या आधीचे एकोणसाठ जण माझ्या आधी नंबर लावून बसलेत....त्यांचा हक्काचा नंबर डावलून मी आत येणं बरं दिसतं का?" "पण सर..." "तू जा.....कामाला लाग....तू बोर्डवरल्या टायमिंगच्या आधी आलास त्याबद्दल तुझं कौतुक....शाळेत उशीरा आलास म्हणून मी छड्या मारायचो तेव्हा मारक्या म्हशीसारखा माझ्याकडं बघायचास पण आता त्या छड्यांचं महत्त्व लक्षात आलं असेलच.....तेव्हा छड्या दिल्या नसत्या तर आता आला असतास तासभर उशिरानं." "सिस्टर, यांचे केसपेपरचे पैसे घेऊ नका." मी केबिनमध्ये जाता जाता रिसेप्शनिस्टच्या कानात कुजबुजलो...पण तेही सरांना ऐकू गेलंच. "काय बोललास?...पैसे घेऊ नको?" सर माझ्यावर ओरडले,"पैसे तर तुला घ्यावेच लागणार....मी तुझा शिक्षक आहे म्हणून मी काही फुकट शिकवलं नाही तुला.....वीस हजार रुपये पगार घेत होतो सरकारकडनं....हां, आता तुलाही सरकार पैसे देत असेल तर नको घेऊ पैसे." मी हसत हसत आत आलो आणि पेशंट बघायला सुरुवात केली. पेशंट बघता बघता सीसीटीव्हीमधून माझं सरांकडे लक्ष होतंच. तीन तासांत सरांनी बसायच्या किमान तीस जागा बदलल्या असतील. नंबर आल्यावर सर आत आले. आल्या आल्या त्यांनी माझा हात हातात घेतला. तो आपल्या छातीवर दाबला आणि सर बोलले,"बाळा,मला खूप खूप आनंद झालाय. खूप कमावलंस तू." "एवढंही काही नाही सर!" "नाही कसं?....अरे, मघापासून मी तुझ्या सगळ्या नव्या जुन्या पेशंटशी बोलतोय.....पण एकही माणूस तुझ्याबद्दल वाईट बोलायला तयार नाही....सगळे गुणगानच गातायत. छाती अभिमानानं भरून आली माझी." बाहेर सर आपल्या बसण्याच्या जागा सारखं का बदलत होते ते आता लक्षात आलं. "सर, तुम्ही शाळेत शिकवत होतात तेव्हा तरी कुठला विद्यार्थी तुम्हांला नावं ठेवायचा?.....समोरच्या माणसाशी प्रेमानं वागायचं, आपलं काम सचोटीनं करायचं हे तुम्हीच तर शिकवत होतात ना !...आज या वयातही तुम्ही तुमची तत्वं सोडायला तयार नाही आहात....मीही त्याच तत्वानं जगतोय. ...त्यात मी विशेष काही करतोय असं काहीच नाही. प्रेमानं व्यवहार केला की जगणं सुंदर होतं हे शिकवतं तेच तर शिक्षण!" "तू शाळेत होतास तसाच आहेस....खेड्यातला साधा सरळ मुलगा." "आता आयुष्यभर हा विद्यार्थी असाच राहू दे असा आशीर्वाद द्या !" मी म्हटलं आणि सरांच्या डोळ्यांत पाणी तरळलं. "आईबाप आणि शिक्षक यांचं असंच असतं बघ....मुलं वाईट निपजली तर त्यांना वाईट वाटतं आणि मुलं नीतीवंत जन्मली तरी त्यांच्या डोळ्यांत पाणी येतं... पण असे आनंदाश्रू आजकाल दुर्मिळ झालेत रे!" सर पुढं बरंच काही काही बोलत होते आणि त्यांचा विद्यार्थी भान हरपून ऐकत होता....वाटत होतं सरांचं हे बोलणं कधी संपूच नये!...असे शिक्षक मिळणं म्हणजे भाग्यच नाही का? दुसऱ्याच्या मुलासाठी अश्रू गाळणारे शिक्षक आजही आहेत ना !!!! *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00           ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 15/03/2019 वार - शुक्रवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आंतरराष्ट्रीय ग्राहक दिन* *नियोजन दिन* *जागतिक अपंगत्व दिन* 💥 ठळक घडामोडी :- १८२७ - टोरोंटो विद्यापीठाची स्थापना. १९३७-अमेरिकेत पहिली blood bank सुरू १९८५-Symbolic. com हे internet वरील पहिलेडोमेन नोंदविले गेले. १९१९-हैद्राबाद च्या उस्मानिया विद्यापीठाचे उदघाटन २००३-हू जिताओ चीनच्या अध्यक्षपदी 💥 जन्म :- १६३८ - शुंझी, चीनी सम्राट. १७६७ - अँड्र्यू जॅक्सन, अमेरिकेचा ७वा राष्ट्राध्यक्ष. १७७९ - विल्यम लॅम्ब, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान. १९०२-विजयंपाल लालाराम तथा 'गुरू हनुमान' (कुस्ती प्रशिक्षक) १९२०-हॉकीपटू आर फ्रान्सिस 💥 मृत्यू :- १९३७ - व्यंकटेश बळवंत पेंढारकर, मराठी नाट्य-अभिनेते, गायक. १९९२-डॉ राही मासूम रझा,हिंदी व उर्दू कवी ,गीतकार २०००-लेडी राणू मुखर्जी ,विचारवंत आणि कलासमीक्षक *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील पादचारी पूल कोसळून 6 जणांचा मृत्यू* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *नवी दिल्ली - इव्हीएममध्ये गडबड होण्याचा संशय व्यक्त करत 21 विरोधी पक्ष नेत्यांची सर्वोच्च न्यायालयात धाव, याचिकेवर आज सुनावणी होण्याची शक्यता* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *नागपूर - रामेश्वरमहून अयोध्येला निघालेल्या रथयात्रेचे नागपुरात आगमन, विश्व हिंदू परिषदेतर्फे स्वागत* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी आपली उमेदवारांची पहिली यादी केली प्रसिद्ध, मात्र माढा आणि नगरबाबत सस्पेन्स कायम* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मान्य, सुजयचा निर्णय वैयक्तिक - राधाकृष्ण विखे पाटील* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *नवी दिल्ली: राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते वीरता पुरस्कार प्रदान* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारिप बहुजन महासंघ वंचित बहुजन आघाडीत विलीन करणार, प्रकाश आंबेडकर यांची अकोल्यात घोषणा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *नासा येवतीकर* या blog ला भेट देण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. https://goo.gl/A2cY7L आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••             *बापूराव पेंढारकर* मराठी रंगभूमीवर स्त्री भूमिका करणारे प्रसिद्ध नट, गायक आणि वादक बापूराव पेंढारकर यांचा जन्म १० डिसेंबर, १८९२ रोजी ग्वाल्हेर येथे झाला. व्यंकटेश बळवंत पेंढारकर ऊर्फ बापूराव पेंढारकर हे मराठी रंगभूमीवर स्त्रीभूमिका करणारे प्रसिद्ध नट, गायक आणि वादक होते. बापूराव हे केशवराव भोसले ह्यांनी स्थापन केलेल्या ललित कलादर्श ह्या नाट्यसंस्थेचे अध्वर्यू होते. केशवराव भोसले यांनी १९०७ साली हुबळी येथे ‘ललितकलादर्श’ ही संस्था सुरू केली. या संस्थेने अनेक नाटकांना लोकप्रियता मिळवून दिली. केशवरावांच्या मृत्यूनंतर बापूराव पेंढारकर यांनी ‘ललितकलादर्श’ची धुरा सांभाळून सत्तेचे गुलाम, कुंजविहारी, कृष्णार्जुनयुद्ध, श्री, सोन्याचा कळस, आदी नवी नाटके मराठी रंगभूमीवर आणली; पण त्यांच्या अकाली निधनानंतर‘ललितकलादर्श’ पोरकी झाली. त्याचवेळी बोलपटांमुळे संगीत नाटकांची लोकप्रियता ओसरू लागली होती, पण बापूरावांचे सुपुत्र भालचंद्र पेंढारकर यांनी वयाच्या एकविसाव्या वर्षी १९४२ साली नव्या जोमाने संस्थेचे पुनरुज्जीवन केले. त्यांना या कामात अनेक वेळा आर्थिक समस्यांनी ग्रासले, पण त्यांनी ललित कलादर्शचे काम तडफेने पुढे चालूच ठेवले. आत्तापर्यंत कवी ना. घ. देशपांडे यांनी लिहिलेली आणि जी. एन. जोशी यांनी गायलेली व संगीतबद्ध केलेली ‘रानारानात गेली बाई शीळ’ ही कविता पहिले मराठी भावगीत समजले जात होते. पण या गाण्यापूर्वी राम गणेश गडकरी ऊर्फ गोविंदाग्रज यांनी लिहिलेले आणि रंगभूमीवरील अभिनेते-गायक तसेच ‘ललित कला दर्श’ कंपनीचे चालक-मालक बापूराव पेंढारकर यांनी गायलेले ‘हे कोण बोलले बोला राजहंस माझा निजला’ हे ध्वनिमुद्रित झालेले पहिले मराठी भावगीत असल्याची माहिती अभ्यास व संशोधनातून नंतर समोर आली आहे. बापूराव पेंढारकर यांचे निधन १५ मार्च १९३७ रोजी झाले. संजीव वेलणकर पुणे. ९३२२४०१७३३ *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• “परमेश्वर प्रत्येकाला *हिरा* बनवुनच जन्माला घालतो , पण *चमकतो* तोच, जो *घणाचे घाव* सोसण्याची   हिमंत ठेवतो. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण ?* यशवंतराव चव्हाण 2) *महाराष्ट्रात केळीसाठी प्रसिद्ध जिल्हा कोणता ?* जळगाव 3) *महाराष्ट्रात 'पंढरपूर' हे तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे ?* सोलापूर 4) *भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो ?* 2 रा 5) *महाराष्ट्रात 'दीक्षाभूमी' कोठे आहे ?* नागपूर *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144      •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• •  राजेंद्र महाजन •  विलास फुटाणे •  संतोष कळसकर •  बालाजी मामीलवाड •  लक्ष्मण चिंतावार •  लक्ष्मीकांत धुप्पे •  गणेश गिरी •  अंबादास पवार • सुधाकर शेषराव बोडके • विठ्ठल इरन्ना रावजीवार *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मुलं* मोठ्यांची मुलं पहा कसे भैकत आहेत गोरगरिबांची मुलं बापाचं ऐकत आहेत मुलं ऐकण्यात रहायला योग्य संस्कार लागतात योग्य संस्कार असले की मुलं बरोबर वागतात शरद ठाकर सेलू जि.परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सुखकर्ता आणि दुखहर्ता ही गणेशाची स्तुती फक्त स्तुतीच्या पातळीवर न राहता आपल्यात कशी परिवर्तीत होईल याकडे लक्ष हवे. आपले उलट होते आरतीतल्या शब्दांपेक्षा सगळे लक्ष प्रसादावर असते. त्यामुळे आसक्ती वाढते. आरती म्हणणे ही चार चौघांमधली सक्ती होऊन बसते आणि सक्तीने केलेले कोणतेही काम फलप्रद नसते. घरातल्या माणसांना जेवायला लागते म्हणून स्वयंपाक करायचा आणि मन:पुर्वक स्वयंपाक करायचा यात जो मुलभूत फरक, तोच फरक जगण्यातल्या अध्यात्मात आहे.* *तो फरक जेव्हा आपल्याला कळेल तेव्हाच बदल घडेल. अन्यथा फक्त प्रतिक्रिया घडत राहील. प्रतिक्रियावादी असणे आणि गुन्हेगार असणे यात व्यापक अर्थाने फार फरक नाही. जगण्याच्या व्याप-तापात माणूसपण संभाळणे गरजेचे असते. सामाजिक उत्सव आणि उपक्रमांत ते संभाळण्याची संधी असते, पण त्या संधीचे सोने किती लोक करत असतील ? समाजातील जास्तीत जास्त वर्ग अशा उत्सवांतून उजळून निघायला हवा.*         ☘ *॥ रामकृष्णहरी ॥* ☘          🍀🍀🍀🍀🍀🍀 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई         9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      प्रेमभाव एक चाहिए , भेष अनेक बनाय | चाहे घर में वास कर , चाहे बन को जाए || अर्थ मानवाचा धर्म मानवता . मानवता जपायची तर मानवाच्या अंतरात प्रेमभावनेचे अधिष्ठान महत्वाचे आहे. त्या शिवाय मानवता व मानव्य कसं प्रवाहित होणार ? भौगोलिक व भौतिक परिस्थितीशी समायोजन साधण्यासाठी भिन्न वेष परिधान करा . विभिन्र प्रकारच्या (उपलब्धतेनुसार महालापासून झोपडीपर्यंत) वास्तूत किवा वनात वास्तव्य करा ते परिस्थितीनुरूप स्वाभाविक आहे. परंतु त्यात अवडंबर असता कामा नये. सत्य व प्रेमभाव हाच खर्‍या जीवनाचा मुलाधार आहे. त्यामुळे जीवनाची गोडी व सुंदरता वाढते म्हणून माणसाने अशाश्वत अवडंबराच्या व बुवाबाजीच्या नादी लागून जगण्याला विनाकारणच अंधानुकरणी व भंपक बणवू नये . ते मानवतेला पूरक असू शकत नाही.     एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जिद्द,मेहनत आणि प्रयत्न हे तुमच्या हाती घेतलेल्या कामासाठी वापरलेले कौशल्य आहे.यामुळे तुमचे काम अधिक चांगले व उत्कृष्ट दर्जाचे होण्यास मदत करते. कोणतेही काम जेव्हा हाती घ्याल तेव्हा  ह्या तीन गोष्टी आपल्या अंगी बाळगणे अत्यंत महत्वाचे आहे. त्यामध्येच आपली प्रगती  सामावलेली असेल. - व्यंकटेश काटकर,नांदेड.   संवाद..9421839590. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        *🎡 मनाचे श्लोक 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• सदा चक्रवाकासि मार्तंड जैसा। उडी घालितो संकटी स्वामि तैसा॥ हरीभक्तिचा घाव गाजे निशाणी। नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥३७॥ संकलन : सौ. सुभद्रा सानप, बीड •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *वेडे सांबर* एक सांबर नदीत आपले रूप पाहत होते. पाहता पाहता ते मनाशी बोलू लागले, ''अहाहा, ही माझी शिंगे किती छानदार आहेत! ही किती शोभिवंत दिसतात! अशी चांगली शिंगे देवाने कोणालाही दिली नाहीत! पण हे पाय बाकी फारच वाईट आहेत! किती रोडके आणि घाणेरडे आहेत! अरेरे, यापेक्षा मला मुळीच पाय नसते तर किती बरे झाले असते!'' सांबर असा विचार करीत आहे तोच काही शिकारी तेथे आले! पावलांची चाहूल लागताच सांबर जीव घेऊन पुढे पळू लागले व पारधी मागे पाठलाग करू लागले. पळता पळता सांबराची शिंगे एका काटेरी झुडपात अडकली. सांबराने बरीच खटपट केली तरी शिंगे काही निघेनात! अखेर शिकारी लोकांनी येऊन सांबराला ठार मारले! मरताना ते बोलले, ''अरेरे, उगीच मी या पायाला नावे ठेवली! तेच बिचारे मला पळताना उपयोगी पडले! पण या शिंगांनी बाकी माझा जीव घेतला!'' *तात्पर्य :- जे वरून चांगले दिसते तेच चांगले नसते! जे उपयोगी पडते तेच खरोखर चांगले!* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00           ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 14/03/2019 वार - गुरूवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १९८८-जपानमध्ये समुद्रांतर्गत रेल्वे वाहतुकीस प्रारंभ १९९४ - लिनक्सची १.० आवृत्ती प्रकाशित. १९९८ - इराणमध्ये रिश्टर मापनपद्धतीनुसार ६.९ तीव्रतेचा भूकंप. २००१-सिक्कीममधील  आदिवासी समाजातील चोकीला अय्यर यांनी भारताच्या पहिल्या महिला परराष्ट्रीय सचिव  म्हणून सूत्रे हाती घेतली. 💥 जन्म :- १८७९-अल्बर्ट आईन्स्टाईन ,नोबेल पारितोषिक विजेते जर्मन-अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ १९६५ - आमिर खान, हिंदी चित्रपट अभिनेता. 💥 मृत्यू :- १८८३ - कार्ल मार्क्स, समाजवादी विचारवंत व लेखक. १९९८- दादा कोंडके, अभिनेते, निर्माता व दिग्दर्शक २०१०-ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक व कवी  विंदा करंदीकर २०१८-पृथ्वीच्या उत्पत्ती सिंद्धान्त मांडणारे physicist professor स्टीफन हाकिन्स *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *मुंबई - दहावी व बारावीच्या परीक्षांसाठी नियामक व परीक्षक म्हणून नियुक्त केलेल्या  शिक्षकांची निवडणुकीतून सुटका* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *अमृतसर - पाकिस्तानचे उच्चायुक्त सईद हैदर शाह शिष्टमंडळ पंजाबमधील अमृतसर येथे दाखल, उद्या भारतीय शिष्टमंडळाला भेटणार* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *मुंबई : काँग्रेसकडून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादीत महाराष्ट्रातून सुशीलकुमार शिंदे, नाना पटोले, प्रिया दत्त, मिलिंद देवरा, डॉ. नामदेव उसेंदी यांना उमेदवारी जाहीर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *नाशिक : सोशल मीडियावर वॉच ठेवण्यासाठी विशेष पथक, आक्षेपार्ह मजकूर टाकणाऱ्यांवर थेट कारवाई* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *मुंबई : एसटी, बस स्टॉप, पेट्रोलपंपावर सरकारच्या जाहिराती; आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यासाठी काँग्रेसचे निवडणूक आयोगाला पत्र* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *बंगळुरू - कर्नाटकमध्ये लोकसभेचं गणित ठरलं, काँग्रेस 20 तर जेडीएस 8 जागांवर निवडणूक लढविणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *नवी दिल्ली : भारत वि. ऑस्ट्रेलिया दरम्यान पाचव्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने 35 धावांनी हा सामना जिंकला. 3-2 ने मालिका ही खिशात घातली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *सर सलामत तो ......* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. https://nasayeotikar.blogspot.com/2019/02/blog-post_24.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••             *विंदा करंदीकर*       गोविंद विनायक करंदीकर उर्फ 'विंदा करंदीकर' (जन्मः२३ ऑगस्ट १९१८ - मृत्यूः १४ मार्च २०१०) हे मराठीतील ख्यातनाम  कवी,  लेखक व समीक्षक होते. देशाच्या साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च प्रतिष्ठेचा एकोणचाळिसावा ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना अष्टदर्शने या साहित्यकृतीसाठी प्रदान करण्यात आला. वि.स. खांडेकर आणि कुसुमाग्रजांनंतर हा पुरस्कार मिळवणारे ते तिसरे मराठी साहित्यिक ठरले. याशिवाय करंदीकरांना महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार, कुसुमाग्रज पुरस्कार, कबीर सन्मान, जनस्थान पुरस्कारसारखे अनेक सन्मान व पुरस्कार देण्यात आले.     विंदाचे वडील विनायक करंदीकर कोकणात पोंभुर्ला येथे असत. विंदांनी त्यांचे शिक्षण कोल्हापूर येथे पूर्ण केले. हैदराबाद मुक्ती संग्रामात भाग घेतला आणि त्यासाठी तुरुंगवासही भोगला. कोकणच्या आर्थिक मागासलेपणाबद्दल ते संवेदनशील होते. राष्ट्रीय स्वयं संघ ते मार्क्सवाद असा त्यांचा वैचारिक प्रवास राहिला, पण ते अशा कोणत्याही संघटनेचे सभासद झाले नाहीत. अर्थार्जनासाठी त्यांनी अध्यापन स्वीकारले. बसवेश्वर कॉलेज, रत्नागिरी, रामनारायण रुईया महाविद्यालय , मुंबई, एस.आय.ई.एस. कॉलेज इत्यादी महाविद्यालयांमध्ये ते इंग्रजी विषयाचे प्राध्यापक होते. केवळ लेखन करण्यासाठी, इ.स. १९७६मध्ये व्यावसायिक आणि इ.स. १९८१सालामध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. विंदाचे वैयक्तिक जीवन साधे, स्वावलंबी राहिले. त्यांनी स्वातंत्र्य-सैनिकांना मिळणारे वेतनपण कधी स्वीकारले नाही. काटेकोरपणाबद्दल त्यांची भूमिका नेहमी आग्रही राहिली. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• पुस्तके ही काळाच्या विशाल सागरातून आपणास घेऊन जाणारी जहाजे होत. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *शिवाजी महाराजांचा जन्म कोठे झाला ?* शिवनेरी किल्ला (रायगड) 2) *'बीबी का मकबरा' कोठे आहे ?* औरंगाबाद 3) *महाराष्ट्रात 'अजिठा वेरूळ लेणी' कोठे आहेत ?* औरंगाबाद 4) *'हॉकीचा जादूगार' कोणाला म्हणतात ?* मेजर ध्यानचंद 5) *'राष्ट्रीय क्रीडा दिन' केव्हा साजरा करतात ?* 29 ऑगस्ट *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• •  संजय भोसले •  धर्मपाल धरम •  व्यंकट भंडारे •  उत्तम सोनकांबळे •  पार्थ पवार •  किरण सोनटक्के •  भगवान कांबळे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जीभ* मन मोकळे असावे पण जीभ मोकळी असू नये जीभ मोकळी सोडून घशात दात बसू नये जीभ मोकळी सोडली की घशात दात बसतात नको ते लोक मग आपल्याला हसतात शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *परिक्षेत वरचा नंबर हवा, टक्केवारी चांगली हवी; म्हणून क्लास लावला जातो. मात्र, आपल्यातला माणूस घडला पाहिजे, त्याला चांगलं वळण लागलं पाहिजे यासाठी शोधला जातो का एखादा क्लास? संतानी माणसातला माणूस जागविण्यासाठी अभंगांचा शब्द न् शब्द खर्ची घातला. तो समजून घेण्याच्या फंदात कुणी पडत नाही. आपल्याला डाॅक्टर, वकील, इंजिनीयर व्हायचं! पण त्याबरोबर कधी आपण हा विचार केला की मला बाबा आमटे यांच्यासारखी रुग्ण्सेवा करायचीयं. सिंधूताई सपकाळांसारखी अनाथांची माय व्हायचंय.* *'समाजसेवा' घडवेल असा धडाच आपल्या पाठ्यपुस्तकात नाही किंवा असलाच तर समजून घेतला गेला नाही. तसं झालं असतं तर अमानुषतेचं एकही उदाहरण सापडलं नसतं. म्हणूनच-* *"माणूस माणूस, तुझी नियती बेकार*   *तुझ्याहून बरं, गोठ्यातलं जनावर"* *असा समाचार बहिणाबाई घेतात. संयम, विनम्रता, सौहार्द, सहिष्णुता हे फक्त निबंधातील शब्द आहेत. ते माणसाने आचरणातून हद्दपार केले आहेत. मातीत उगवून आलेल्या पिकांच्या अवतीभवतीचं तण-तणकट निंदणी-खुरपणी करून निर्मळ करावं लागतं. तसंच माणसाचं, माणसाचा सहजी माणूस बनत नाही. संस्काराच्या शाळेत माणूस घडतो. मात्र, माणूस संस्काराच्या शाळेत हजर राहण्यास नाखूष असल्याने, त्याची अॅब्सेंटी वाढत चाललीयं. मग कसा होऊ शकेल त्याचा माणूस ?* संजय नलावडे, चांदीवली, मुंबई         9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• नहाये  धोये  क्या  हुआ ,  जो  मन  मेल  न  जाय  | मीन  सदा  जल  में  रही ,  धोये  बॉस  न  जाय  || अर्थ :  नहाणे धुणे देखावा गेला न मनीचा मळ सदा पाण्यात मासळी दुर्गंध न काढी जळ       महात्मा कबीर दिखाऊ पणाला फटकारतात. नहाणे , धुणे  व सुंगधाने सजणे हा  तर केवळ बाह्य देखावा आहे. जर मनाचीच सफाई झाली नाही तर विवेकी व  निरामय जीवनशैली  विकसित होणार नाही व त्याशिवाय विश्वात्मक भाव दृढ कसा होणार ? मासा सदा सर्वकाळ पाण्यात राहूनही अंगीचा दुर्गंध त्यागीत नाही. तिथे पाण्याचा काय दोष असणार आहे. बाह्य बदलापेक्षा आंतरिक बदल महत्त्वाचा असतो. तो अवगुण कायमचे दूर करतो.      एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• काही लोकांच्या बाबतीत पैसा म्हणजे सर्वस्व आहे आणि पैशामुळे काहीही मिळवता येते. पैशामुळे तुम्हाला तुमच्या भौतिक सुविधा मिळवता येतात परंतु इतरांचे मन मिळवता येत नाही.इतरांचे मन जिंकायचे असेल तर या ठिकाणी पैसा चालत नाही.त्यासाठी हवे तुमचे उदार अंतःकरण,तुमची दुस-याबद्दलची आत्मियता,प्रेम इतरांना दिलात तर तेही तुमच्यावर अधिक प्रेम करायला लागतील.यासाठी तुमच्या जवळ असलेल्या पैशाची गरज नाही.एवढे सत्य आहे पैशाने सारे काही खरेदी करता येईल पण जगात असलेल्या सर्व जीवांचे मन आणि प्रेम कधीच खरेदी करता येत नाही.मग तुमच्या जगण्याला काय अर्थ आहे ? © व्यंकटेश काटकर, नांदेड ९४२१८३९५९०/८०८७९१७०६३ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        *🎡 मनाचे श्लोक 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• सदा सर्वदा देव सन्नीध आहे। कृपाळूपणे अल्प धारिष्ट पाहे॥ सुखानंद आनंद कैवल्यदानी। नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥३६॥ संकलन : सौ. सुभद्रा सानप, बीड •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *हुबेहूब कला अवगत असणे.* एक मूर्तिकार मूर्ती व पुतळे अगदी हुबेहूब बनवी. ज्याची मूर्ती वा पुतळा तो तयार करी, ती व्यक्ती वा देव प्रत्यक्षच त्याच्या चित्रशाळेत अवतरल्याचा भास होई. त्याने खुर्चीवर बसलेल्या व एका हातात काठी घेतलेल्या रखवालदाराचा पुतळा तयार केला होता. त्या पुतळय़ाला तो दररोज रात्री झोपण्यापूर्वी आपल्या घराच्या पुढच्या फाटकापाशी नेऊन ठेवी. तो इतका हुबेहूब होता की, खराखुराच रखवालदार पहार्‍यावर बसला असल्याचा चोर-दरोडेखोरांचा समज होऊन ते त्या मूर्तिकाराच्या घराच्या आसपास फिरकण्याचा विचार सोडून देत. नामवंत कलावंत म्हणून त्याच्या पन्नाशीच्या, साठीच्या व पंचाहत्तरीच्या वेळी त्याचे अनेक शहरांतून सत्कार झाले होते. आता 'आपला शंभरीनिमित्त जंगी सत्कार व्हावा' एवढी एकच इच्छा त्याच्या मनात उरली होती, म्हणून तो प्रकृतीची फार काळजी घेत होता. यमदूताला हुलकावणी देण्यासाठी त्याने स्वत:चे नऊ पुतळे केले होते. अगदी हुबेहूब स्वत:सारखे. एकदा त्याला आपल्याला न्यायला आपल्या घराकडे काही यमदूत येत असल्याची चाहूल लागली. तो पटकन आपल्या चित्रशाळेत गेला व तिथे ठेवलेल्या आपल्या नऊ पुतळय़ांत दहावा पुतळा म्हणून निश्‍चलपणे बसून राहिला. यमदूत त्या चित्रशाळेत शिरले. पाहतात, तो तिथे एकासारखे एक असे दहा मूर्तिकार! काही म्हणजे काही फरक नाही! यातल्या कुणाला घेऊ जावे? हा त्यांच्यापुढे पेच पडला. तेवढय़ात त्यांच्यापैकी एक डोकेबाज यमदूत आपल्या सहकार्‍यांना मुद्दाम म्हणाला, 'बाबांनो, असे गोंधळून जाण्यासारखे काय आहे? कारण खर्‍या मूर्तिकारात जे एक व्यंग आहे, ते त्याच्या बाकीच्या नऊ पुतळय़ांत दाखवायचे राहून गेले आहे. त्या बुद्धिवान यमदुताच्या या विधानाने अपमानित झालेला तो मूर्तिकार पटकन उठून म्हणाला, 'उगाच जीभ आहे म्हणून काही तरी बडबडू नकोस. माझ्यात असलेला कोणता दोष तुम्हाला दिसला. हे मुर्तीकार आम्हांला माहिती होते तु बोलणार जर तुझ्याबद्दल मी काही बोललो नसतो तर आम्हाला चिञकार कोण ते ओळखायला आले नसते. चल आता आमच्याबरोबर तु. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00           ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 13/03/2019 वार - बुधवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १७८१-विल्यम हर्षेल याने युरेनस चा शोध लावला १९४०-अमृतसर येथील जालियनवाला बाग हत्याकांडाचे समर्थक पंजाबचे गव्हर्नर मायकेलओडवायर याची उधमसिंग यांनी गोळ्या घालून हत्या केली १९६३-अर्जुन पुरस्काराची सुरुवात १९९७ - कोलकात्यातील मिशनरीज् ऑफ चॅरिटीने मदर तेरेसांची वारस म्हणून सिस्टर निर्मला यांची निवड केली. २००७-वेस्ट इंडीज मध्ये ९व्या क्रिकेट विश्व करंडक स्पर्धेचे उदघाटन 💥 जन्म :- १९२७-रवींद्र पिंगे-ललित लेखक 💥 मृत्यू :- १८०० - नाना फडणवीस, पेशवे दरबारातील एक मंत्री १९९४-श्रीपाद यशवंत कोल्हटकर ,मार्क्सवादी कॅम्युनिस्ट नेते १९९६-शफी इनामदार अभिनेते १९९७-शीला इराणी, महिला हॉकी खेळाडू २००४-उस्ताद विलायतखा, सतारवादक *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *नवी दिल्ली - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेससोबत आघाडी नाहीच, बसपा प्रमुख मायावतींचं स्पष्टीकरण* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मुंबई - निवडणूक बंदोबस्तासाठी राज्य पोलीस दल सज्ज, मुंबईपासून गडचिरोलीपर्यंत प्रभावी उपाययोजना* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *ब्रिटन पाठोपाठ जर्मनी आणि फ्रान्सकडून बोइंग ७३७ मॅक्स ८ विमानांवर बंदी, बोईंग ७३७ विमानांचा वापर न करण्याच्या डीजीसीएच्या विमान कंपन्यांना सूचना* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *कल्याण: शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांची कोकण म्हाडा अध्यक्षपदी नियुक्ती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *राजस्थानः पोखरण येथून पिनाका गायडेड क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *नाशिक - साहित्यिक, चित्रपट दिग्दर्शक वेद राही यांना यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार घोषित.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *नवी दिल्ली : नवी दिल्लीतील फिरोज शाह कोटला येथे होणाऱ्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पाचव्या एकदिवसीय सामन्याकडे लागले सर्वांचे लक्ष* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मृत्यू : एक अटळ घटना* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. https://sharechat.com/post/VbwEWE4 आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *रवींद्र पिंगे* रवींद्र पिंगे यांचे बालपण मुंबईत गिरगावात गेले. पिंगे अर्थशास्त्राचे पदवीधर होते. त्यांचा जन्म १३ मार्च १९२६ रोजी कोकणातील उफळे गावी झाला. सुरुवातीला काही वर्षे ते रेशन विभागात नोकरीस होते. पुढे ते आकाशवाणीवर नोकरीस होते. सातत्याने ललितगद्य हा वायप्रकार हाताळणार्यात आणि आपल्या परीने त्यात भरही घालणार्‍या लेखकांत पिंगे हे नाव ठळक होते. ते एक कृतार्थ लेखक, माणूस होते. १९७८ मध्ये प्रकाशित झालेल्या मोकळं आकाश या पहिल्या ललित लेखसंग्रहापासून शकुनाचं पान या ललित लेखसंग्रहापयर्ंत त्यांचे एकूण तेरा संग्रह प्रसिद्ध झाले होते. रवींद्र पिंगे दुर्बिण, कॅमेरा, टिपण वही आणि जागृत नजर घेऊन भारताच्या या टोकापासून त्या तटापयर्ंत आपल्या लिखाणा साठी हिंडले. आसाम, अरुणाचल, अंदमान पाहून ते कच्छच्या चिखल-वाळूच्या रणात गेले. नर्मदेच्या तीरावर भटकले. दक्षिणेतला र्शुंगेरीचा सुळका सर करून ते तुंगभद्रेच्या किनार्याणवरल्या श्रीशंकराचार्यांच्या मठापयर्ंत पोहोचले. कृष्णेच्या डोहाकाठचं कविवर्य मर्ढेकरांचं चिमुकलं खेडं त्यांनी पाहिलं तसंच अयोध्येला जाऊन त्यांनी बंदीवान श्रीरामाला दंडवत प्रणिपात केला. शकुनाचं पान या त्यांच्या संग्रहात प्रवासवर्णनपर लेख (नर्मदेच्या उगमापाशी, मुक्काम झांशी, गणपती पुळे इ.) स्थलवर्णनपर (सानेगुरुजींचा जन्मगाव, हृदयाची हाक घालणारी ठिकाणं, अबूच्या पहाडावरील सूर्यास्त इ.), आत्मपरलेखन (माझी भूमिका, नवृत्तीतलं भाग्य, आकाशवाणीवरले उमेदवारीचे दिवस इ.) असे विविध प्रकारचे ३० लेख होते. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• पाण्याला बंध घातला तर ते "संथ" होते, आणि मनाला बंध घातला तर "संत" होतात *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *देशाचा प्रथम नागरिक कोण असतो ?* राष्ट्रपती 2) *'शिक्षक दिन' केव्हा साजरा करतात ?* 5 सप्टेंबर 3) *'वाळवंटाचा जहाज' कोणाला म्हणतात ?* उंट 4) *महाराष्ट्र राज्याचे उच्च न्यायालय कोठे आहे ?* मुंबई 5) *'गेट वे ऑफ इंडिया' कोठे आहे ?* मुंबई *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• •  शेख रुस्तुम •  भगवान कांबळे •  साईनाथ बोमले •  सज्जाद सय्यद •  सुरेश बोईनवाड •  आकाश काकडे •  कामाजी धुतुरे •  लक्ष्मण वडजे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *नम्रता* अती नम्रता प्रसंगी लाचारी वाटत असते अती नम्रता कोणाला कधीच पटत नसते अती नम्र माणसाला वेडे म्हणून शकतात लाचार म्हणून प्रसंगी कोणीही चिडू शकतात शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आपली सर्व धडपड कशासाठी असते ? प्रत्येकजण सुखासाठी खटपट करीत असतो. प्रपंचात सुख मिळावे असे सर्वांना वाटत असते, आणि त्यासाठी जो तो प्रयत्‍न करीत असतो. परंतु आजपर्यंत प्रपंचात कुणाला सुख मिळाले आहे का ? कुणी म्हणतो, मजजवळ संपत्ती आहे, पण संतान नाही, कुणी दारिद्र्य आहे म्हणून रडतो, कुणी काही, कुणी काही, सांगतच असतो, आपली हाव कधीच तृप्त होणे शक्य नाही. मृगजळ पिऊन कुणी कधी तृप्त झाला आहे का ?* *प्रपंचच जिथे खोटा तिथे सुख कसले मागता ? याचा अर्थ असा नाही की प्रपंच सोडावा, पण तो सुखाचा कसा होईल हे पाहावे. तुम्हांला खात्रीने सांगतो की, प्रपंच जर सुखाचा करायचा असेल तर त्याला एकच उपाय आहे. तो अगदी सोपा आहे, पण आचरणात आणायला अत्यंत कठीण आहे. परमात्म्याची अगदी मनापासून प्रार्थना करावी. मग तो ठेवील त्या परिस्थितीमध्ये आपण अगदी आनंदात व सुखात राहू शकतो.* संजय नलावडे, चांदीवली, मुंबई         9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• पत्ता  बोला  वृक्ष  से , सुनो  वृक्ष  बनराय  | अब  के  बिछड़े  न  मिले ,  दूर  पड़ेंगे  जाय  || अर्थ :      संघटनेचं विघटन झालं की उभारी घेणं अवघडच असतं. हे पटवून देताना महात्मा कबीरांनी निसर्गातला किती समर्पक दृष्टांत दिलेला आहे.  पान झाडाला म्हणतं, ' हे तरूवर  वृक्षराज तुम्ही ऐका तर खरं ! आज तुम्ही  भक्कमपणे उभे आहात. या तुमच्या भक्कम पणासाठी आम्ही लक्षावधी पानांनी स्वतःला ऊन्हात सूर्यासोबत टक्कर देत  त्याला न घाबरता अंगावर घेतलं. ऊन्हात राबून स्वतःचं नाजूकपण तुझ्या संगोपणात साकारण्यात विसरूनच गेलो. अन राठ होवून पिकत गेलो. आम्ही जुन्या दमाची परंतु अनुभवी तुझ्या स्वछंद बागडण्याला मुरड घालून ताळ्यावर आणू पाहाणारी तुला नकोशे वाटतोय. नव्या दमाची फौज तुला हवी. तिला जशी फुस दिली तशी ती उधळते. भूत भविष्याचा विचार न करता वर्तमानाच्या क्षणिक फसव्या मोहात पाडून तू त्या नव्या नाजूक पात्यांना फसवून स्वतःच वैभव आभाळी मिरवू पाहात आहेस. तुझे पाय त्या वटवृक्षावाणी मजबुतीनं कुठं घट्ट रोवलेले आहेत ? त्याच्या सोबतीला जुने नवे असे पानाचे अक्षौहिनी सैन्य खोडाआधी भक्कमपणे ऊन, वारा थंडीशी टकरायला तयार आहे. म्हणून तर वडाचं राज्य दीर्घकाल चालतं. तो आधार असणार्‍या पान अन  मातीची नाळ वड तुटू देत नाही. तू मात्र "विद्या आली हाता  अन गुरूला लाथा" असं वागून नवीन पिढी बिघडवत आहेस. ती पिढी बायका पोरं झाली की मायबापा पासून दुरावून स्वतःचा अधःपात करून ऊर फोडून घेत आहेत. तुला वैभव उंच आभाळी नेल्यासारखं वाटत असलं तरी वादळं वावटळी मध्ये सर्वात आधी ताडमाड उंचीची  दिखाऊपणा करणारी भक्कम आधार नसलेलीच झाडंच आधी आडवी होतात. दुरावलेलं गळालेलं पान पुन्हा आधाराला कधीच जवळ येत नाही. ते नव निर्माणासाठी मातीशीच एकरूप होवून जातं ! सोबत्यांना (जनतेला) मारून नव्हे तर सोबत घेवून मोठं होता येतं. हे झाडांनी विसरता कामा नये.     एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपण काही राक्षसीवृत्तीचे किंवा विध्वसंकवृत्तीचे नाही की, ज्यामुळे कुणाच्याही जीवनात असलेल्या नंदनवनाचे स्मशान बनवण्यासाठी.आपण आहोत सर्वसामान्यपणे एकमेकांच्या आधारे आपल्या जीवनाची नौका पार करण्यासाठी जन्माला आलेली सामान्य माणसे.आपला प्रत्येकाशी कुठे ना कुठे , कोणत्या ना कोणत्या कारणासाठी संबंध येतो.मग तो दु:खाचा असो की सुखाचा.मग आपला संबंध इतरांशी चांगला ठेवायचा असेल तर आपल्या मनात दुस-याविषयीची आत्मियता बाळगायला हवी,जो कोणी संकटात सापडला असेल तर त्याला आणखी संकटात न टाकता आहे त्या संकटातून बाहेर पडण्यासाठी त्याला कशी मदत करता येईल आणि वाचवता येईल हे प्रथम विचार करायला हवे.जर आज आपण दुसऱ्याच्या विध्वंसाचा विचार केला तर उद्या आपलीही गत तशीच होणार.मग आपण आपल्या संकटातून बाहेर पडण्यासाठी इतरांना बोलावण्याचा प्रयत्न केला तर ते आपल्या मदतीला कसे धावून येणार ?आपण अशावेळी दुसऱ्याकडून मदतीची अपेक्षाही करणे चुकीचे ठरेल.आपली व इतरांची जीवननौका व्यवस्थितपणे पार करायची असेल तर एकमेकांच्या साथीनेच करावी लागणार.आपल्या एकमेकांच्या मनातल्या उभ्या असलेल्या संशयाच्या,भेदाच्या व तिरस्काराच्या भिंती सा-या पाडून टाकायला हव्यात तरच आपले आणि इतरांचे चांगले,प्रेमाचे,सहकार्याचे संबंध प्रस्थापित होतील.ज्या काही असलेल्या मनातल्या राक्षसीवृत्ती आपल्या चांगल्या संबंधांमुळे केव्हाच लोप पावायला लागतील.असा हा आपला एकमेकांना सहाय्य करण्याचा आणि संकटाच्यावेळी मदतीचा हात पुढे करण्याचा माणुसकीचा खरा धर्म पाळला पाहिजे. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        *🎡 मनाचे श्लोक 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• उपेक्षी कदा रामरुपी असेना। जिवां मानवां निश्चयो तो वसेना॥ शिरी भार वाहेन बोले पुराणीं। नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥३४॥ संकलन : सौ. सुभद्रा सानप, बीड •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *ससा आणि कासव*   ससा आणि कासवाच्या शर्यतीत ससा झोपून राहिल्याने हरला. कासव जिंकले पण सशाला शांत बसवेना .आपल्यात वेगाने पळण्याची क्षमता अधिक असूनही निव्वळ झोपल्यामुळे आपण हरलो हे त्याच्या लक्षात आले. पराभवाचा हा सल संपविण्यासाठी त्याने कासवापुढे पुन्हा शर्यतीचा प्रस्ताव ठेवला. विजयाच्या आनंदात आपण जिंकू शकतो, यावर विश्वास बसलेल्या कासवाने होकार भरला. शर्यत पुन्हा सुरू झाली. यावेळी सशाने चूक केली नाही. तो थांबला नाही. झोपला नाही. परिणामी, वेगवान ससा शर्यत जिंकला. हळू चालणारे कासव हरले. पण एकदा विजयाची चव चाखलेलं कासव हार पत्करायला तयार नव्हतं. कासव पुन्हा सशाकडे गेलं. म्हणालं,'मी तुझं ऐकलं. आता तू माझे ऐक. आपण पुन्हा शर्यत लावू !'ससा हसला आणि म्हणाला, "एकदा माझ्या चुकीमुळे हरलो. पुनःपुन्हा मी ती चूक कशी करेन ? पण तुझी हरण्याचीच इच्छा असेल तर लावू पुन्हा शर्यत !' सशाचा होकार मिळाला तसं कासव म्हणालं, 'पण यावेळी शर्यतीचा मार्ग मी ठरवणार !' स्वतःच्या वेगाची आणि कासवाच्या धिम्या गतीची खात्री असलेल्या सशाने त्यालाही होकार भरला . शर्यतीचा मार्ग कासवाने ठरवला. शर्यत पुन्हा सुरू झाली ससा चूक करणार नव्हता. तो वेगात पळत राहिला. कासव मागे राहिलं पण पळता पळता अचानक ससा थबकला. जागेवर थांबला. पुढे आडवी नदी वाहत होती. कासवाने बरोबर मार्ग काढला होता. सशाला पोहता येत नव्हतं. ससा तिथेच थांबुन राहिला. हळूहळू येणारं कासव तिथे पोहोचलं. त्याने सशाकडे सस्मित पाहिलं आणि नदीत उडी मारून पलीकडच्या काठावर पोहत पोहोचलही.शर्यत कासवाने जिंकली. सशाच्या वेगक्षमतेवर कासवाने स्वतःच्या बुद्धिक्षमतेने मात दिली .हरलेला ससा विचार करत राहिला. आपल्याला पोहता येत नाही, म्हणून आपण हरलो, हे त्याच्या लक्षात आलं.तो विचार करून पुन्हा कासवाकडे गेला. म्हणाला,'मित्रा, आपण आजपासून शर्यत नाही लावायची.आजपासून एक करायचं. जिथे जमीन असेल तिथे मी तुला पाठीवर घेईन. जिथे नदी आडवी येईल तिथे तू मला पाठीवर घे. दोघे मिळून आपण असे पुढे जात राहिलो, तर सर्वात पुढे आपण दोघेच असू !' प्रत्येकात साऱ्या गोष्टी अथवा गुण कधीच नसतात. मात्र प्रत्येकात काहींना काही गुण असतोच.जे आपल्यात नाही ते इतरांकडे असू शकते. जे इतरांकडे नाही ते आपल्याकडे असू शकतं. अशा एकमेकांच्या गुणांचा वापर करीत आपल्यातला उणेपणा भरून काढता येतो.सर्वोत्तम यश गाठता येतं. एकमेकांना पराभूत करण्यात शक्ती खर्ची घालण्यापेक्षा एकमेकांच्या शक्तीच्या बळावर बलाढ्य काही करता येतं. वैयक्तिक मोठेपणाच्या अभिलाषेपायी निव्वळ दुसऱ्याच्या चुका काढण्यापेक्षा, त्यांच्यातील चुकांकडे दुर्लक्ष करून त्यांच्यातील उत्तम गुण हेरून त्यांचा वापर करून घेणं, ही खरी यशस्वी क्रियाशीलता ! उपयोगी पडणारी माणसं मिळवणं आणि आपण कोणाच्या उपयोगी पडू शकतो ते पाहून त्याला मदत करणं या सहकार्यभावनेच्या जोरावरच मोठमोठी कार्य सिद्धीस नेली जातात. काही लोकांकडे कल्पनाक्षमता असते;पण कल्पना सत्यात उत्तरावणारी कृतीक्षमता नसते.काहींकडे शक्ती असते; पण योग्य नियोजनक्षमता नसते. काहींकडे संघटनक्षमताअसते; पण निर्णयक्षमता नसते. निर्णयक्षमता असते; तर नेतृत्वक्षमता नसते. अशावेळी ज्याच्याकडे जे आहे त्याचा त्याच्या गुणांचा योग्य वापर करीत सांघिकपणे पुढे जाणे म्हणजेच बिकट रणांगणही जिंकणे! यश मिळवायचं असेल तर असे गुण आणि गुणी माणसं वेचणं हे फार महत्त्वाचं !संकटाच्या क्षणी गोगलगायीसारखे पोटात पाय घेऊन स्वतःच्याच कोषात लपून राहणं टाळलं पाहिजे!याउलट जास्तीत जास्त माणसं जोडा. जुन्या सौहार्दाचा शोध घ्या ! नव्याने मैत्री करा. साऱ्यांच्या संपर्कात राहा. मिळूनमिसळून वागा. तुमच्यासाठी जे जे उत्तम ते ते शोषून घेण्यासाठी तत्पर असलेले टिपकागद व्हा ! *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00           ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 12/03/2019 वार - मंगळवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १९९२-मारीशस प्रजासत्ताक राष्ट्र झाले. १९९३ - मुंबईत १२ ठिकाणी बॉम्बस्फोट. ३०० ठार (अधिकृत आकडा), हजारो जखमी. १९९९-सरकारी नोटांवर यापुढे महात्मा गांधींचेच चित्र  असेल असा सरकार तर्फे निर्णय घेण्यात आला. 💥 जन्म :- १८२१ - सर जॉन ऍबट, कॅनडाचा तिसरा पंतप्रधान. १८८१ - मुस्तफा कमाल अतातुर्क, तुर्कस्तानचा पहिला राष्ट्राध्यक्ष. १९१३- महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण १९८४-श्रेया घोषाल ,गायिका 💥 मृत्यू :- १८८९ - योहानेस चौथा, इथियोपियाचा सम्राट. १९९९ - यहूदी मेनुहिन, अमेरिकन-ब्रिटीश संगीतकार. २००१-राबर्ट लुडलूम ,अमेरिकन लेखक *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣*राज्यात तापमानाचा पारा लागला वाढू, यवतमाळमध्ये नोंदवले गेले सर्वाधिक तापमान, मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *शरद पवारांची माढ्यातून माघार, तरुणाईला संधी देण्यासाठी निवडणूक लढविण्यास नकार* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *लोकसभा निवडणुकांमुळे नागपूर विद्यापीठाने ७२ परीक्षा पुढे ढकलल्या, नागपुरात ११ एप्रिल रोजी आहे मतदान* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *नाशिक: माकपचे आमदार जे पी गावित दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *पंजाबः लोकसभा निवडणुकांच्या 13 जागांसाठी 6 पक्षांचे गठबंधन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *दिल्लीः सौदी अरेबियाचे परराष्ट्रमंत्री आदेल-अल-जुबेर यांनी घेतली परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची भेट* •••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *दिल्ली : रवींद्र कोल्हे यांच्यासह प्रसिद्ध गायक आणि संगीत दिग्दर्शक शंकर महादेवन यांचा पद्मश्रीने सन्मान.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••     *सैनिक : देशाचा संरक्षक* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/03/blog-post_26.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *डॉ. गंगाधर पानतावणे* गंगाधर विठोबाजी पानतावणे यांचा जन्म 28 जून 1937 रोजी नागपुरात झाला. त्यांचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण नागपुरातच झालं. 1956 मध्ये मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर, त्यांनी बी ए आणि एमएची पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी तत्कालिन मराठवाडा विद्यापीठातून पीएचडीही प्राप्त केली. महत्त्वाचं म्हणजे त्याच विद्यापीठात म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात त्यांनी मराठीचे प्राध्यापक म्हणून काम पाहिलं. खरं तर पानतावणे यांनी मॅट्रिकनंतर लिखानाला सुरुवात केली होती. दलित साहित्य हा त्यांचा जवळचा विषय होता. यामध्ये त्यांचा भरपूर अभ्यास होता, त्यामुळेच त्यांनी विपुल लेखन केलं. त्यांनी लिहिलेले `धम्मचर्चा` `मूल्यवेध` , मूकनायक, विदोहाचे पाणी पेटले आहे, वादळाचे वंशज, दलित वैचारिक वाड्गमय, किल्ले पन्हाळा ते किल्ले् विशाळगड, प्रकृती आणि प्रवृत्ती,  शोध आणि संवाद हे सर्व ग्रंथ वैचारिक आणि समीक्षात्मक असे आहे. अस्मितादर्श नावाचे नियतकालिक देखील त्यांनी चालविले. गंगाधर पानतावणे यांनी 2009 मध्ये अमेरिकेत झालेल्या पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते.       *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• निःस्वार्थी मन हाच सर्वोच्च आदर्श आहे. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *भारताचा गुलाबी शहर कोणता ?* जयपूर 2) *महाराष्ट्राचे राज्यवृक्ष कोणते ?* आंबा 3) *महाराष्ट्राचे अर्थमंत्री कोण आहेत ?* मा.सुधीर मुनगंटीवार 4) *गावाचा प्रथम नागरिक कोण असतो ?* सरपंच 5) *राज्याचा प्रथम नागरिक कोण असतो ?* राज्यपाल *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• • शिवराम पेंडकर • वशिम बाबू • विठ्ठल हिवराळे • मधुकर काठेवाडे • माधव पा. दिग्रसकर • आनंदा हंडावार *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *बंड* स्वहितासाठी इथे कधी बंड असते आश्वासन मिळाले की ते एकदम थंड असते बंडाच्या तलवारीही आश्वासनाने म्यान होतात कदाचित मोठ-मोठे बंड असेच बॅन होतात शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *खरंतर मरण्यासाठी शंभर बहाणे असले तरी जगण्यासाठी एक 'वजह' पुरेशी आहे. ही वजह सापडली की मनातील मळभ दूर होत जातं. इथेच संपतो माणसाच्या आत्मशोधाचा प्रवास. ही वजह उराशी कवटाळून जगणारी माणसं ख-या अर्थानं आनंदयात्रेमधील 'पाथेय' ठरतात. काळाच्या ओघात हे संदर्भ बदलतात नि पुन्हा सुरू होतो शोध नवीन कारणांचा नि जगण्याच्या नवीन वजहचा.* *ब-याचदा ती वजह सापडतही नाही हातात..... पण माणूस वाट पाहतो विवशतेतही एक नवा आशावाद साठवून आणि उभा राहतो या अक्षयी नि निरंतर  फिरणा-या चक्राच्या मध्यभागी........*             *जीवनाच्या अंतिम श्वासापर्यंत !* *एक कवी लिहून जातो.....*           *......सदियाॅ बित गयी टूटी*                      *हुई डोर को थामे*                    *शायद कोई वजह मिल*                      *जाए जिने की....!*                      ‼ *॥ रामकृष्णहरी ॥* ‼            🔶🔶🔶🔶🔶🔶 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई         9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   पांच पहर धंधा किया , तीन पहर गया सोय | एक पहर भी नाम बिन , मुक्ति कैसे होय || अर्थ : दिवसाचे दिन आणि रात्र असे दोन भाग होतात. रात्रीचे चार प्रहर व दिनाचे चार प्रहर असतात. असे एका दिवसाचे आठ प्रहर होतात. त्यापैकी पाच प्रहर म्हणजेच पंधरा तास माणूस नित्याच्या दैनंदिन धावपळीत व्यथित करीत असतो. सहजतेने इतका वेळ नोकरी-चाकरी , मनोरंजन, आदि बाबीत उडवित असतो. तीन प्रहर म्हणजे नऊ तासांचा वेळ दररोज झोपण्यात निघून जातो. खरे तर मनुष्य जन्म इत्तर प्राण्यांपेक्षा भिन्न आहे. बुद्धी आणि बोली यांच्या वेगळेपणामुळे मनन, चिंतन ,चर्चा संवाद-सुसंवाद यांचे माध्यमातून या विश्वाच्या कल्याणाचा वारसा मानव प्राणीच चालवू शकतो. गरज आहे ती आपल्या अष्टौ प्रहरापैकी अर्धा-एखाद प्रहर स्वार्थविरहित निरामय भावनेने जीवनाकडे बघण्याची. असा संकल्प सर्वांनी केला तर या अशा प्रगल्भ जगण्यानं या विश्वाचंं कल्याणंच होईल. सर्वांच्या दुःखाच्या व्याधीचं परिमार्जन होईल. अनावश्यक लालसा, मोह टाळता आले तर पृथ्वीवर नंदनवन बनवायला किती अवकाश लागणार आहे ! व्याधी व वेदना मुक्तीचा तोच तर खरा महामार्ग असणार आहे.      एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• शेतकरी शेतात बियाणे टाकून येणा-या किंवा उगवणा-या धान्याची वाट पाहणे हे सत्य आशा आहे. कारण त्याला त्याच्या केलेल्या कामावर, मेहनतीवर विश्वास आहे. तो कधीही राशीचक्रावरील राशीनुसार लिहिलेल्या भाकितावर विश्वास ठेवत नाही किंवा त्यानुसार चालतही नाही. जे राशीनुसार चालतात ते मात्र त्यावर विसंबून राहून आपल्याच जीवनात चांगल्याप्रकारे चाललेल्या संसारगाड्याला खीळ बसवतात. त्यामुळे व्हायची ती प्रगती होत नाही आणि करता येत नाही. म्हणून माणसाने कोणत्याही भाकितावर विश्वास न ठेवता आपण आपले काम प्रामाणिकपणे आणि सातत्याने जीव ओतून केले तर नक्कीच जीवनात यश मिळते तसेच जीवन सुखी व समृद्ध होते यात संशय नाही. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        *🎡 मनाचे श्लोक 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• वसे मेरुमांदार हे सृष्टिलीला । शशी सूर्य तारांगणे मेघमाला॥ चिरंजीव केले जनी दास दोन्ही। नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥३३॥ संकलन : सौ. सुभद्रा सानप, बीड •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *पारख* खूप वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. एक कामगार आपल्या गाढवासोबत जंगलातून चालला होता. इतक्यात रस्त्याच्या बाजूला त्याला काही चमकताना दिसलं. त्यानं जवळ जाऊन पाहिलं तर तिथे एक चमकणारा दगड पडलेला होता. त्यानं तो उचलून आपल्या गाढवाच्या गळ्यात अडकवला आणि पुढे चालू लागला. समोरून येणाऱ्या एका हिरे व्यापाऱ्यानं गाढवाच्या गळ्यात अडकवलेला तो मौल्यवान दगड बघितला. मग त्यानं गाढवाच्या मालकाला विचारलं, ‘भाऊ मला हा दगड विकत घ्यायचा आहे. तुम्ही याचे किती पैसे घेणार?’. कामगाराला दगडाच्या किंमतीबाबत काहीच कल्पना नव्हती. फक्त शंभर रूपये घेईन, असं त्यानं सांगितलं. त्यावर हिरे-व्यापारी म्हणाला ‘शंभर रूपये तर खूप जास्त आहेत. मी फक्त पन्नास रूपयापेक्षा अधिक रक्कम नाही देणार.’ कामगारानं थोडा विचार केला आणि शंभर पेक्षा कमी रुपये घेणार नाही, असं सांगितलं. व्यापाऱ्याला वाटलं की या मौल्यवान दगडासाठी त्याला कोणी गिऱ्हाइक मिळणार नाही. मग हा कामगार ५० रुपयात हा दगड विकण्यासाठी आपल्या मागं येईल. थोडावेळ जाऊनही कामगार त्या व्यापाऱ्याजवळ आला नाही. अखेर व्यापारीच त्याच्या शोधात निघाला. त्याला दिसलं की दुसरा एक व्यापारी त्याच्याकडून तो मौल्यवान दगड विकत घेत आहे. तो व्यापारी पळत कामगाराजवळ पोहोचला. तोपर्यंत व्यवहार पूर्ण करून समोरचा व्यापारी निघून गेला. त्या व्यापाऱ्यानं कामगाराला विचारलं की, ‘तो दगड तू किती रुपयांना विकला?’. कामगार म्हणाला, ‘२०० रुपये’. व्यापाऱ्यानं त्याला म्हणाला, ‘अरे मुर्खा तो दगड अत्यंत मौल्यवान होता आणि तू अवघ्या २०० रुपयांना विकलास!’ त्यावर कामगार उत्तरला, ‘मूर्ख मी नाही, तुम्ही ठरलात. कारण मला तर तो दगड रस्त्याच्या बाजूला पडलेला मिळाला होता आणि त्याची किंमत माहित नव्हती. पण तुम्हाला त्याची किंमत माहित असून देखील तुम्ही अवघ्या ५० रुपयांच्या हव्यासापोटी तो दगड विकत घेतला नाही. १०० रुपयात तो दगड विकत घेतला असता तर भविष्यात तुम्हाला मोठा फायदा मिळाला असता.’ *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00           ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 11/03/2019 वार - सोमवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *संभाजीराजे भोसले पुण्यतिथी* 💥 ठळक घडामोडी :- १८८६-पहिल्या भारतीय महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांना डॉक्टर ही पदवी मिळाली. १९९९- NASDAC शेयर बाजारात जागा मिळवणारी INFOSYSIS ही पहिली भारतीय कंपनी बनली. २००१-बॅडमिंटनपटू पी.गोपीचंद ने तब्बल २१ वर्षांनीऑल इंडिया बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद भारतास मिळवून दिले २००७ - २००७ च्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचे उद्घाटन. २०११ - जपानजवळ समुद्रात रिश्टर मापनपद्धतीनुसार ८.९ तीव्रतेचा भूकंप. यात आणि यानंतरच्या त्सुनामीमध्ये शेकडो ठार. 💥 जन्म :- १८९०-व्हॅनेव्हर बुश,पहिल्या analog electronic संगणकाचा निर्माता १९१५-विजय हजारे भारतीय क्रिकेटपटू १९८२ - हसन रझा, क्रिकेटपटू, वयाच्या १४व्या वर्षी कसोटीपटू झाला. 💥 मृत्यू :- १६८९ - छत्रपती संभाजीराजे भोसले १९५५-नोबेल पारितोषिक विजेते scotish शास्त्रज्ञ अलेक्झांडर फ्लेमिंग १९७९-संपादक यशवंत कृष्ण खांडीलकर *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *17 व्या लोकसभेसाठी देशातील 29 राज्यांमध्ये 7 टप्प्यांमध्ये मतदान होणार असून या महासंग्रामाचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *महाराष्ट्रामध्ये चार टप्प्यात मतदान होणार आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने केलेल्या लोकसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाच्या घोषणेबरोबरच देशात आदर्श आचार संहिता जाहीर झाली आहे.  * •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *नवी दिल्ली - परीक्षा, सण आणि शेतीच्या कामांची वेळ विचारात घेऊन निवडणुकीचा कार्यक्रम आखण्यात आला आहे - मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोडा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *मुंबई - महाराष्ट्रामध्ये एकूण 8 कोटी 73 लाख मतदार, राज्य निवडणूक आयोगाची माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *मध्यप्रदेश : राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी ओबीसी प्रवर्गासाठी असलेले आरक्षण 27 टक्के करण्याच्या अध्यादेशाला दिली मंजुरी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *यावेळी लोकसभा निवडणुकीमध्ये सर्व ठिकाणी व्हीव्हीपॅट मशीनचा वापर अनिवार्य, प्रत्येक इव्हीएमवर जीपीएसद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे, तसेच इव्हीएम मशीनवर उमेदवाराचे छायाचित्रही लावण्यात येणार आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *मोहाली, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर चार विकेट्स राखून विजय मिळवत मालिकेत 2-2 अशी बरोबरी केली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जुनी पेंशन योजना चालू करावी ( दैनिक जनशक्ती )* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. https://www.ejanshakti.com/जुनी-पेन्शन-योजना-चालू-कर/ आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *काय असते आचारसंहिता!* निवडणूक... मग ती ग्रामपंचायतीची असो किंवा लोकसभेची; टीका, आरोप-प्रत्यारोप तर होतातच! पण, प्रचारादरम्यान एकमेकांची उणीदुणी काढताना काही पथ्यं प्रत्येक उमेदवाराने आणि नेत्याने पाळणं बंधनकारक असतं. निवडणूक जाहीर झाल्यापासून ते निकाल लागेपर्यंत कसं वागायचं, कसं बोलायचं, याचे जे नियम निवडणूक आयोगाने तयार केले आहेत, तीच आचारसंहिता. म्हणजेच, Model Code of Conduct.  निवडणुका मुक्त आणि पारदर्शकपणे व्हाव्यात, या हेतूने ही मार्गदर्शक तत्त्वं ठरवण्यात आली आहेत. त्यालाच आचारसंहिता असं म्हटलं जातं. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज लोकसभा निवडणुकीची घोषणा केल्यानंतर ही आचारसंहिता देशभर लागू झाली आहे. या आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईची तरतूद आहे.  * आचारसंहितेच्या काळात पाळायची ठळक पथ्यं टीका करायची असेल तर ती राजकीय धोरणांवर करा. कामं, वचनं पूर्ण केली नसतील त्यावर बोट ठेवा. परंतु, एखाद्याच्या जातीवरून किंवा धर्मावरून टीका नको.  मतदारांकडे मतं मागताना आपण केलेली कामं दाखवा. कुठल्याही वस्तूचं आमीष देणं किंवा धमकावणं हे कायद्यात बसत नाही.  सत्ताधाऱ्यांनी पक्षाच्या कामासाठी सरकारी यंत्रणेचा वापर करणं हा आचारसंहितेचा भंग ठरतो. मंत्री म्हणून दौऱ्यावर गेलेल्या नेत्याने त्याच्या पक्षाच्या बैठकीत सहभागी होणं योग्य नाही. आचारसंहितेच्या काळात सरकारला नव्या घोषणा करता येत नाहीत किंवा एखाद्या योजनेसाठी निधीही जाहीर करता येत नाही.  सगळेच पक्ष आपापल्या जाहीरनाम्यांमध्ये आश्वासनं देत असतात. परंतु, मतदारांना मोठ्या प्रमाणात प्रभावित करू शकतील, अशी आश्वासनं देणं आचारसंहितेत बसत नाही.  मतदान केंद्रांमध्ये अधिकारी, कर्मचारी आणि मतदार यांच्याशिवाय कुणालाही जाण्याची परवानगी नसते. म्हणूनच, मतदान केंद्रापासून 100 मीटर अंतरावर अनेक पक्षांचे कार्यकर्ते टेबल टाकून बसल्याचं पाहायला मिळतं.   एखाद्या उमेदवाराने आचारसंहितेचा भंग केल्यास त्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे करता येते. त्यानंतर, आयोगाचे निरीक्षक तपास करून कारवाईबाबत निर्णय घेतात.  *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• देशातील दारिद्र व अज्ञान घालविणे म्हणजेच ईश्वराची सेवा होय. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *'पर्यावरण दिवस' केव्हा साजरा करतात ?* 5 जुन 2) *'जागतिक योग दिवस' केव्हा साजरा करतात ?* 21 जुन 3) *'स्वातंत्र्य दिवस' केव्हा साजरा करतात ?* 15 ऑगस्ट 4) *'नाताळ' केव्हा साजरा करतात ?* 25 डिसेंबर 5) *भारतातील सर्वात लांब नदी कोणती ?* गंगा *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• • प्रलोभ कुलकर्णी • भाऊसाहेब उमाटे • जब्बार मुलाणी • नरसय्या गैनवार • सूर्यकांत सोनकांबळे • संतोष देवणीकर • रमेश कवडेकर • संदीप दुगाडे • आदित्य तरवाल *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *दुटप्पीपणा* कशाला दाखवता मी आहे मोठ्या मनाचा किळस आहे तुमच्या असल्या दुटप्पीपणाचा तुमचा मोठेपणा दिसला कसा आहे तो लटका असे वागल्यास एक दिवस बसेल चांगला फटका शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सहज म्हणून ईश्वराची व्याख्या करावीशी वाटली , त्याची कृपा म्हणजे काय? त्याचे अस्तित्व म्हणजे काय? त्याचे नेमकेपण कशात आहे? तेव्हा लक्षात आले हे फार कठिण काम आहे. कारण त्याने स्वत:ला प्रत्येक चांगल्या व्याख्येत बसविले आहे. मग आता आणखी शोधायचे कशात? आपल्या दिवसभरातील सर्वात चांगल्या कामाची व्याख्या म्हणजे ईश्वर, चांगल्या कामाला मिळालेली भरघोस दाद म्हणजे ईश्वर. सत्पात्री दानात ईश्वर, न्याय बाजूत ईश्वर, प्रभातीचा सूर्य म्हणजे ईश्वर, अनुकूल पाऊस म्हणजे ईश्वर, जपलेलं माणूसपण म्हणजेही ईश्वर आणि निरागस बालकाचे हास्य म्हणजेही ईश्वर.* *पंढरपुरच्या वारीवर निघालेल्या एका म्हातारबाबाला एका पत्रकाराने विचारले,'का हो बाबा, तुम्ही इतकी वर्ष वारीला जाता, तुम्हाला एकदा तरी देव प्रत्यक्षात भेटलाय का? त्यावर थोडा विचार करून ते म्हणाले,'ज्ञानोबामाऊलीने आणि तुकोबाने सांगितले म्हणून जातो, त्यांना देव दिसला असंल, माझा त्यांचेवर विश्वास हाय. मला तो दिसलाच पायजे असा माझा हट्ट नाय.' खरा आनंद त्याला देवाने त्या दिड महिन्यात केव्हाच दिलेला असतो.*           ‼ *॥ रामकृष्णहरी ॥*‼          🍀🍀🍀🍀🍀🍀 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई         9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      हरिया जांणे रूखड़ा, उस पाणी का नेह । सूका काठ न जानई, कबहूँ बरसा मेंह ॥ सारांश वृक्षास कळे सिंचन जया प्रिय ते जीवन शुष्क काष्ठ काय जाणे ? थेंब मोतिया समान महात्मा कबीर पटवून देतात की मनाच्या तयारीवर सर्वकाही अवलंबून असतं. पाण्याचं महत्त्व , त्याचा स्नेह व सिंचन केवळ हिरव्या वृक्षाला समजू शकतात. वाळलेल्या लाकडाला जवळून जाणारा जल प्रवाह किवा अमृतरूपी जलधारांच्या वर्षावाचं काय अप्रुप वाटणार आहे बरं ! मोत्यासम थेंबाचं त्याला काहीच महत्व नसतं. कारण त्याच्या ठायी असणारं भावनाशिल मन कधीच मेलेलं असतं. मुर्दाड मनाच्या माणसाला बाग, हिरवळ, प्रेम, आपुलकी, सहानुभुती संवेदना आदि भावना काय कळणार ? ते खरं तर दगडा समान निगर गट्ठ बनलेले असतं. त्याच्यावर कितीही जलधारांचा अभिषेक केला तरी दगड द्रवत नाही. तसे दगणडासमान निष्ठूर निर्दयी माणसासोबत एकतर्फी कितीही प्रेमळ वागलात तरी त्याच्या मुळ स्वभावात तीळमात्र स्नेहार्द्र भाव निर्माण होण्याची सुतराम शक्यता नसते. . त्यांचा स्वार्थ साधला की संपलं . खरं तर यांचं असणं नसणं नसण्यातंच जमा असतं. ओसाड निर्दयी मनामध्ये दयेचे निर्झर प्रवाहित होणं अशक्य आहे.     एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• काहीवेळा काहींच्या बाबतीत मनुष्याचा स्वभाव समोरची परिस्थिती पाहून बदलत असतो.कधी कधी असेही वाटते की,आपण कमी वेळेत खूप काही करुन धनाढ्य व्हावे आणि आनंदाने जीवन जगावे.या वाईट मोहासाठी तो वेगवेगळ्या गैरमार्गाचा अवलंब करतो आणि संपत्ती अर्थात माया जमवण्याच्या मोहात पडतो.जी माया जमवली त्यात त्याला समाधान तर नसतेच अजूनही त्याच्यापेक्षा अधिक माया जमवण्यात वेळ खर्च करतो.परंतु हे त्याच्या लक्षात येत नाही की,आपण वाममार्गाला लागलो आहोत, दुस-याला लुटलो आहोत ही जी काही वाईट सवय लागली आहे ती आपल्या मनाला समाधान देणारी नाही.केवळ आपल्या मोहापायी, आपल्या स्वार्थासाठी इतरांच्या जीवाला त्रास देऊन आपल्या नको त्या गोष्टीच्या नादाला लागलो आणि हावरटपणाचा कहर केला. त्यामुळे आपले जीवन हे जीवन राहिले नसून आपण इतरांच्या नजरेत एक गुन्हेगार ठरलो आहोत आणि ते ही आपल्या स्वार्थी मोहापायी ? हा मोह काहीच कामाचा नाही.ज्यामुळे माणसातील माणुसकी नष्ट झाली.त्यापेक्षा मनाचा हावरटपणा सोडून द्यावा, भरपूर मेहनत करावी,आपल्या कृत्यामुळे इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी आणि आपले जीवन सुखासमाधात जावे.यापेक्षा आपल्या कोणत्याही अपेक्षा असू नयेत.हाच मंत्र चांगले जीवन जगण्यासाठी पुरेसा आहे.नाही तर नको त्या मोहात जाणे आणि आपल्याच हाताने जीवन दु:खमय जगणे यापेक्षा जीवनाचे वाईट चित्र काय असू शकेल ? © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद.९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        *🎡 मनाचे श्लोक 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• अहल्या शिळा राघवें मुक्त केली। पदीं लागतां दिव्य होऊनि गेली॥ जया वर्णितां शीणली वेदवाणी। नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥३२॥ संकलन : सौ. सुभद्रा सानप, बीड •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *एकीचे बळ* एका गावातील एक माणूस रोज जंगलात जात असे.  एकदा त्याने खड्डय़ात पडलेल्या जंगली कुत्र्याच्या पिल्याचा जीव वाचवला तेव्हापासून त्याला त्या पिलाचा लळा लागला. ते पिलू त्याला तेथे भेटत होते. ते पाहून इतरही जंगली कुत्रे त्याच्याजवळ येत असत. परंतु त्यांना सर्वाना एका वाघाने फार त्रस्त करून सोडले होते. तो रोज त्यांच्यावर हल्ले करत होता. त्या माणसाने एक योजना बनविली. नेहमीप्रमाणे वाघ डोंगराच्या माथ्यावर आला.  सर्व कुत्री वेगवेगळ्या ठिकाणी थांबून त्याच्यावर भुंकू लागली. वाघाने चवताळून एका कुत्र्यावर झेप घेतली तसा तो कुत्रा खाली बसला. वाघाची उडी थेट त्या कुत्र्याच्या मागे असणार्‍या एका मोठय़ा खड्डय़ात पडली. सगळ्या कुत्र्यांनी त्याच्यावर धाव घेतली व त्याच्यावर हल्ला करून त्याला ठार केले. *तात्पर्य : एकीचे बळ मोठे असते.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴  ✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00           ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 09/03/2019 वार - शनिवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १९५२-पुणे येथे पेशवे उद्यान प्राणी संग्रहालयाचे उदघाटन १९५९ - बार्बी या बाहुलीच्या विक्रीस सुरुवात. १९६७ - जोसेफ स्टालिनची मुलगी स्वेतलाना अलिलुयेवाने अमेरिकेला पळ काढला. १९८२-सूर्यमालेतील सर्व ग्रह  सूर्याच्या बाजूला आलेले असल्याचा अपूर्वयोग २००६-एन्सेलाडास या शनीच्या  चंद्राच्या द्रवरूपात पाणी असल्याचा शोध लागला 💥 जन्म :- १९२९ - डेसमंड हॉइट, गुयानाचा पंतप्रधान व राष्ट्राध्यक्ष. १९३६-पृथ्वी प्रदक्षिणा करणारे पहिले अंतराळवीर युरी गागारीन १९४३ - बॉबी फिशर, अमेरिकन बुद्धिबळ खेळाडू. १९५१- प्रख्यात तबला वादक उस्ताद झाकीर हुसेन 💥 मृत्यू :- १८८८ - कैसर विल्हेम पहिला, जर्मनीचा सम्राट. १९७१ - के. आसिफ, हिंदी चित्रपट दिग्दर्शक, निर्माता, पटकथालेखक. १९९४- देविकाराणी ,अभिनेत्री २००३-बर्नार्ड डोवियोगो, नौरूचा राष्ट्राध्यक्ष *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *दुधाला प्रतिलिटर देण्यात येणाऱ्या अनुदान योजनेस तीन महिने मुदतवाढ, अनुदानाच्या रकमेतही सुधारणा, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले काही महत्त्वाचे निर्णय, सामाजिक न्याय विभागाच्या नियंत्रणाखाली राज्यात कायमस्वरुपी विनाअनुदान तत्त्वावर दोन नवीन समाजकार्य महाविद्यालय स्थापण्यास मान्यता.* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *राज्यात २२५ मराठा, कुणबी उमेदवारांना यूपीएससी प्रशिक्षण निवडीसाठी सारथीकडून परीक्षा घेतली जाणार, तसेच दरमहा १३ हजार रूपये विद्यावेतन ही दिले जाईल* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *पुणे : गेल्या दीड वर्षांपासून रखडलेला पोलीस उपनिरीक्षक पदाच्या (पीएसआय) ६५० जागांचा निकाल अखेर जाहीर, या परीक्षेत रत्नागिरी जिल्हयातील सुमित कल्लप्पा खोत हा राज्यात प्रथम तर महिलांमधून अश्विनी हिरे या प्रथम आल्या आहेत* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *सोलापूर : सोलापूर स्मार्ट सिटीच्या सीईओ पदी दीपक तावारे यांची नियुक्ती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *आधार-मतदान ओळखपत्र जोडणीसाठीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली; निवडणूक आयोगाकडे जाण्याची सूचना* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *रांची, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : विराट कोहलीच्या शतकानंतरही भारताला तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात 32 धावांनी पराभव पत्करावा लागला* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• साहित्य स्पंदन समूह प्रस्तुत *मुक्ती महिला दिन 2019 विशेषांक* हे पुस्तक ऑनलाईन वाचण्यासाठी आणि डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे. https://drive.google.com/file/d/1GfoP0MqONsjlT9otGpC4ZPIXAVcfncNT/view?usp=drivesdk ई बुक वाचल्यानंतर आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवावे. तसेच पुस्तक परीक्षण केले तरी त्यांचे स्वागतच आहे. काही त्रुटी किंवा चूका निदर्शनास आल्यास निःसंकोचपणे आम्हाला जरूर कळवावे. *साहित्य स्पंदन समूह संपूर्ण टीम* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *नवीन जिंदाल*         नवीन जिंदाल हे भारतीय उद्योगपती आणि माजी लोकसभा सदस्य आहेत. हरियाणातील कुरुक्षेत्र येथून ते १४ व्या १५ व्या लोकसभेत निवडून आले होते. सध्या ते जिंदाल स्टील अँण्ड पॉवर लिमिटेडचे अध्यक्ष आणि ओ.पी.जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटीचे कुलपती म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा जन्म हरियाणातील हिस्सार येथे झाला. त्यांचे पिता ओमप्रकाश जिंदाल हे नावाजलेले उद्योगपती आणि राजकीय नेते होते. त्यांनी हरियाणा सरकारमध्ये मंत्री म्हणून काम पाहिले होते. नवीन यांच्या मातोश्री सावित्रीदेवी यादेखील मंत्री होत्या. नवीन यांनी एमबीएपर्यंतचे शिक्षण टेक्सासमध्ये घेतले. तेथे त्यांनी विद्यार्थीदशेतही आपल्या बुद्घिमत्तेसह नेतृत्वगुणाची चमक दाखवित उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून बहुमान पटकाविला होता. लोकसंख्या स्थिरीकरण, महिला सक्षमीकरण, पर्यावरण रक्षण, आरोग्य आणि शिक्षण अशा अनेक क्षेत्रात त्यांनी भरीव कार्य केले आहेत. सामान्यांनाही तिरंगा फडकविण्याचा अधिकार मिळवून देणारे म्हणून ते ओळखले जातात, हे विशेष. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• तुम्ही जेवढं इतरांना द्याल तेवढंच, किंबहुना त्याच्या कित्येक पटीने देव तुम्हाला देईल. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *'वंदे मातरम' हे राष्ट्रगान कोणी लिहिले ?* बकीमचंद्र चॅटर्जी 2) *'संविधानाचे शिल्पकार' कोणाला म्हणतात ?* डॉ बाबासाहेब आंबेडकर 3) *संविधान निर्माण करण्यासाठी किती कालावधी लागला ?* 2 वर्ष 11 महिने 18 दिवस 4) *'बालक दिवस' केव्हा साजरा करतात ?* 14 नोव्हेंबर 5) *'बालिका दिवस' केव्हा साजरा करतात ?* 3 जानेवारी *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• •  शिवा वसमतकर •  योगेश कदम •  शिवाजी साखरे •  गजानन शिंदे •  अरविंद आडे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *दुटप्पीपणा* कशाला दाखवता मी आहे मोठ्या मनाचा किळस आहे तुमच्या असल्या दुटप्पीपणाचा तुमचा मोठेपणा दिसला कसा आहे तो लटका असे वागल्यास एक दिवस बसेल चांगला फटका शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *एकदा पंक्चर काढणा-याकडे उभा असताना एका टायरमधली हवा फस्सकन गेली. वाटले 'मृत्यू' असाच होत असणार. मृत्यूविषयी एक ऑब्सेशन अनेकांच्या मनात खोल असते. एका मित्राला सतत एक विचित्र समस्या छळत असते. त्याच्या अंत्यदर्शनाला येणारे लोक गाड्या कुठे लावतील ? त्या दिवशी पाऊस असेल का ? आता याची काळजी मागे राहिलेले घेतील की ! अशी सत्वहीन माणसं जगण्याला काही देत नाहीत आणि घेतही नाहीत.* *दु:ख घेता येत नाही तर देऊ नये. 'सुख द्यावे आणि घ्यावे' हे सूत्र जगण्याचा 'तोल  आणि ताल' संभाळते. कविराज विंदा करंदीकर यांनी कुणाकडून काय घ्यावे याची यादी  दिलीय, पण....* *असे घेता येते का ?* *काही जिंदादिल माणसे सतत देत राहतात, घेणे त्यांच्या गावी नसते. जिंदगी घोटा-घोटाने पिण्याचा 'अमृतरस' आहे. या रसाचे भोक्ते किती राहिलयं ते चुकूनही पहात नसले तरी त्यामुळे त्यांचे 'अक्षयपात्र' भरलेले राहते. तसे तुमचे राहो, हिच साठा उत्तराची कहाणी....!*                       💧 *॥ रामकृष्णहरी  ॥* 💧            🎄🎄🎄🎄🎄🎄 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई         9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••     कबीर सब सुख राम है, और ही दुख की राशि सुर, नर, मुनि, जन,असुर, परे काल की फांसि। सारांश कबीर रामात सुख सारे अन्यत्र दुःखांच्या राशी । सुर,नर,मुनीजन,असुर सर्वांना काळाची फाशी । महात्मा कबीर जीवनांतल्या परमानंदाचं गुपित सांगतात. जीवनाचा खरा आनंद विकार विरहित जगण्यात सामावलेला आहे. सर्व चराचरात सामावलेला ईश्वर जाणून घेतला की जीवनाची सार्थकता साध्य होते. पंच महाभुतात ईश्वराचं अस्तित्व आहे. त्यांच्याद्वाराचं विश्व संचलित होतं. मात्र माणूस त्यालाच घाबरून दूर पळतो आणि बनावटी देवांच्या मागं लागतो. त्यात सर्वेश्वराचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो. तिथं कसा काय सर्वेश्वर साध्य होईल ! निसर्गाच्सा मुक्ताविष्काराकडं डोळे उघडून पाहाताच सर्वात्मकाचं दर्शन होतं. त्यात समस्त सुखाची प्राप्ती दडलेली आहे. अन्य सर्व ढोंगांचं स्तोम आहे. आम्ही ज्यांना वरवर देव मानतो त्या सर्व देवतांना, माणसांना, साधूंना, असुरांना काल फासाने कुठं मुक्त सोडलं आहे. मृत्यू जन्मा आले त्यांना मरणाचा फास घालतोच. पंचमहाभुतंच शाश्वत व त्रिकालाबाधित आहेत. बाकी सारा लबाडीचा खेळ. त्यातून आनंद कसा प्राप्त होणार बरं !     एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्याप्रमाणे सोन्याचा व्यापार करणारा व्यापारी किंवा सोन्याचे दागिने बनवणारा सोनार सोने पाहिल्याबरोबर किती चांगले आहे हे आपल्या नजरेने,हातात घेऊन आणि एका विशिष्ट दगडाच्या कसोटीवर घासून ओळखतो त्याचप्रमाणे चतुर,चाणाक्ष आणि मनकवड्या व्यक्ती समोर असणा-या आणि समोर आलेल्या व्यक्तींना आपल्या नजरेंनी तेव्हाच ओळखतात.कोण चांगल्या विचारांची,कोणत्या कारणासाठी आपल्याकडे आली आहेत,ती कोणत्या हेतूने आली आहेत,कोणत्या स्वभावधर्माची आहेत,आपण त्यांना कशाप्रकारे उत्तर द्यायचे किंवा आपण त्याला मदत करायची का नाही याचे ज्ञान नक्कीच असते.यावरुनच माणसे आपल्या नजरेने पहायला,वाचायला आणि शिकायला पाहिजे.यासाठी आपल्याला माणसांच्या मनाचे थोडे शास्त्र आपणही शिकले तर भविष्यात होणारे संभाव्य धोके टळू शकतील आणि आपले जीवन सुखावह होऊ शकेल. © व्यंकटेश काटकर,नांदेड संवाद.९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🌱🌹🌱🌹🌱🌹🌱🌹🌱🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        *🎡 मनाचे श्लोक 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• महासंकटी सोडिले देव जेणें। प्रतापे बळे आगळा सर्वगूणे॥ जयाते स्मरे शैलजा शूलपाणी। नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥३१॥ संकलन : सौ. सुभद्रा सानप, बीड •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *रामबाण औषध* एकदा एक सिंह आजारामुळे खूप दुबळा झाला .तेव्हा त्याची विचारणा करायला जंगलातील प्राणी,पक्षी येत-जात असत..तेव्हा एक लांडगासुद्धा सिंहाच्या भेटीला तेथे आला .त्याने सिंहाची विचारपूस केली व सिंहाचे कान भरायला सुरुवात केली ती अशी. लांडगा सिंहाला म्हणाला ,महाराज क्षमा असावी ,पण एक गोष्ट विचारायचे धाडस करू काय ? तेव्हा सिंहाने लांडग्याला लगेच परवानगी दिली व म्हणाला , विचार काय विचारायचे ते . तेव्हा लांडगा म्हणाला ,महाराज आपल्या आजाराची विचारण करायला जंगलातील सर्व प्राणी आले पण ...! पण काय .....? सिंह म्हणाला . महाराज या प्राण्यांमध्ये मला कोल्हा दिसला नाही . नाही मी सहज विचारलं या कोल्ह्याला महाराजांबद्दल बिलकुल आदर नाही ,असे मला वाटते .नाहीतर तो एकदा तरी येऊन गेला असता . कोल्हा तेवढ्यातच तेथे येऊन उभा झाला.लांडग्याचे शेवटचे शब्द कोल्ह्याच्या कानावर पडले होते .तेव्हा कोल्हा शांतपणे म्हणाला , महाराजांनी एकदा माझे बोलणे शांतपणे ऐकून घ्यावे नंतर काय ते बोलावे. महाराज आजपर्यंत एवढे पशु आपल्या भेटीला आले ,पण कोणी आपल्या आजाराचा उपाय शोधला ? या उपायासाठी मी आजपर्यंत खटपट करत होतो व ते औषध शोधल्यावरच मी आपल्याजवळ आलो.सिंह म्हणाला,सांग मग काय उपाय शोधला तू ! महाराज औषध एकदम रामबाण शोधल आहे. सांग बाबा लवकर काय ते औषध आहे , सिंह म्हणाला .कोल्हा म्हनला ते औषध असे आहे की एका जिवंत लांडग्याचे कातडे सोलून ते गरम असतानाच तुम्ही अंगावर घेतले म्हणजे झाल . त्याच क्षणी लांडगा तेथे मारून पडला.कोल्हा म्हणाला,कोणाचे कान भरण्यापेक्षा त्यांच्यातला सद्भावना जागृत करणे केव्हाही उत्तम ! *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

*जागतिक महिला दिन* 👩🏻👩👩🏻👱‍♀👩🏻👱‍♀👩🏻 💐💐💐💐💐💐 *आज दिनांक ८ मार्च रोजी जि.प.प्रा.शाळा गोजेगाव येथे 'जागतिक महिला दिन' मोठ्या उत्साहाने व आनंदाने साजरा करण्यात आला.💐🌹💐* गावचा प्रथम नागरिक सरपंचताई यांचा शाळेतील श्रीमती कुळकर्णी ,सेनकुडे,हिवराळे मॕडम तसेच छाञसेवा काळ अंतर्गत भावी महिला शिक्षिकांचा तसेच मदतनिस गोदावरीताईचा सत्कार शाळेचा वतीने करण्यात आला.💐💐 👩🏻 आजच्या या दिवशीच्या निमित्ताने शाळेतील विद्यार्थीनिंनी,गोदावरी ताईनी गीत गायन केले.त्याचप्रमाणे श्रीमती सेनकुडे मॕडम यांनी स्वरचित कविता सादर केली.त्यानंतर हिवराळे मॕडम यांनीही कविता सादर केली.त्यानंतर महिला दिनाची माहिती विद्यार्थ्यांना सांगण्यात आले.शाळेचे मु.अ.श्री कर्जतकर सर यांनीही मार्गदर्शन केले.आजच्या ह्या कार्यक्रमाचे सूञसंचलन श्री पंतगे सर यांनी केले तर आभार छाञशिक्षकांने मानले. 〰〰〰〰〰〰〰 *✍शब्दांकन* श्रीमती सेनकुडे प्रमिला जि.प.प्रा.शाळा गोजेगाव ता.हदगाव जिल्हा नांदेड 🙏🙏🙏🙏🙏🙏

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00           ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 08/03/2019 वार - शुक्रवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    *आंतरराष्ट्रीय महिला दिन* 💥 ठळक घडामोडी :- १९११-जागतिक महिला दिन पहिल्यांदा मानला गेला. १९४३ - दुसरे महायुद्ध-बोगनव्हिलची लढाई - जपानी सैन्याने प्रतिहल्ला सुरु केला. १९४८-सर्व संस्थाने भारतीय जिल्ह्यामध्ये  याच दिवशी समाविष्ट करण्यात आली १९८८ - फोर्ट कॅम्पबेल, केन्टकी येथे दोन हेलिकॉप्टरची टक्कर. १७ सैनिक ठार. 💥 जन्म :- १९६३ - गुरशरणसिंह, भारतीय क्रिकेट खेळाडू. १८६४-हरी नारायण आपटे- मराठीतील ज्येष्ठ कादंबरीकार १९७४- अभिनेता फरदिन खान 💥 मृत्यू :- १८७४-मिलार्ड फिलमोर ,अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष १९३०-विल्यम हावर्ड ट्राफ्ट ,अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष १९५७-स्वतंत्र भारतातील मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री बाळासाहेब खेर १९८८ - अमरसिंग चमकिला, पंजाबी गायक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *नवी दिल्ली : दिल्लीकडे येणाऱ्या सर्व ट्रेनच्या मार्गांचे विद्युतीकरण डिसेंबर 2019पर्यंत करण्यात येणार असून, सर्व मेल एक्स्प्रेस आणि राजधानी एक्स्प्रेसमध्ये बायो-टॉयलेट बसवण्याचे काम करण्यात येणार आहे - रेल्वेमंत्री पियुष गोयल* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची 15 उमेदवारांची यादी जाहीर, राहुल गांधी अमेठीतून तर सोनिया गांधी रायबरेलीतून निवडणूक लढणार* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *तेलंगणः डेटा चोरी प्रकरणाचा तपास करण्यासाठी तेलंगणा सरकारकडून एसआयटीची स्थापना* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *दिल्लीः शहिदांची माहिती असणाऱ्या डिक्शनरीचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते प्रकाशन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *रत्नागिरी - डॉ. संजय सावंत यांची दापोली कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *देशातल्या साखर कारखान्यांसाठी केंद्रांचा 2790 कोटी रूपयांचा अतिरिक्त निधी मंजूर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *रांची : महेंद्रसिंग धोनीच्या घरच्या मैदानावर भारत आज ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात विजयासह पाच सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी आघाडी घेण्याच्या निर्धाराने भारतीय संघ उतरणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जागतिक महिला दिनानिमित्त लेख* ग्रामीण महिला आणि महिला दिन वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. https://nasayeotikar.blogspot.com/2019/03/blog-post.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        *हरी नारायण आपटे* हरी नारायण आपटे, अर्थात ह.ना. आपटे, (मार्च ८, इ.स. १८६४ - मार्च ३, इ.स. १९१९) हे  मराठी लेखक, कादंबरीकार, नाटककार, कवीव व्याख्याते होते. ते करमणूक व ज्ञानप्रकाश या मासिकांचे काही काळ संपादक, आनंदाश्रम या प्रकाशनसंस्थेचे व्यवस्थापक, आणि करमणूक या मासिकाचे संस्थापक-संपादक होते. अकोला येथे भरलेल्या  महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते संमेलनाध्यक्ष होते. त्यांनी अनेक पुस्तकांना प्रस्तावना लिहिल्या आहेत. आठ स्त्रीरत्ने या सदराखाली ह.ना.आपटे यांनी भास्कराचार्यांची लीलावती, राणी दुर्गावती इत्यादी स्त्रियांची बोधप्रद माहिती प्रकाशित केली होती.  केशवसुतांची कविता आणि गोविंद बल्लाळ देवल यांचे शारदा हे नाटक हरीभाऊ आपट्यांनीच प्रकाशात आणले. आपटे अर्वाचीन  मराठी कादंबरीचे जनक मानले जातात. त्यांच्या लिखाणावर महादेव गोविंद रानडे, गोपाळ कृष्ण गोखले प्रभृतींचा प्रभाव होता. १२ सामाजिक आणि ११ ऐतिहासिक अशा एकूण २३ कादंबर्‍या लिहिणार्‍या ह.ना. आपटयांची 'पण लक्षात कोण घेतो?' ही कादंबरी मराठी साहित्यात मानदंड समजली जाते. सतत २५-३० वर्षे अशाप्रकारचे मराठी साहित्य निर्माण झालेल्या त्या ह.ना.आपट्यांच्या कालखंडाला हरीभाऊ युग म्हणतात, आणि हरीभाऊ आपट्यांना युगप्रवर्तक. हरिभाऊंनी नाटकेसुद्धा लिहिली आहेत. दोन नाटके स्वतंत्र आहेत, त्यांतले ’सती पिंगळा’ हे नाटक त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाले. उरलेली तीन नाटके व तीन प्रहसने रूपांतरित आहेत. धूर्तविलसत, मारून मुटकून वैद्यबुवा व जबरीचा विवाह ही फ्रेन्च नाटककार मोलियरच्या प्रहसनांची रूपांतरे आहेत तर, जयध्वज (मूळ व्हिक्टर ह्यूगोचे 'हेर्नानी'), श्रुतकीर्तचरित (कॉग्रेव्हचे ’द मोर्निंग ब्राइड’) व सुमतिविजय (शेक्सपियरचे’मेझर फॉर मेझर’) ही रूपांतरित नाटके आहेत. त्यांनी मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या तेराव्या वार्षिक सभेपुढे दिलेल्या व्याख्यानांची पुस्तिका ’विदग्धवाङ्‌मय’ या नावाखाली प्रकाशित झाली होती. ’नाट्यकथार्णव’ यामासिकासाठी त्यांनी मेडोज टेलर या इंग्रजी लेखकाच्या दोन कादंबर्‍यांची ’तारा’ व ’पांडुरंग हरी’ ही मराठी भाषांतरे केली होती. बिचारा या टोपणनावाने ह.ना. आपट्यांनी २९ मार्च, इ.स. १८८१च्या केसरीच्या अंकात कालिदास व भवभूती यांच्या संबंधांत लिहिलेल्या पत्रांतून त्यांचा व्यासंग व समीक्षा दृष्टी दिसून येते. निबंधकार चिपळूणकरयांच्या निधनानंतर हरीभाऊ आपट्यांनी शिष्यजनविलाप ही ८८ श्लोकांची विलापिका लिहिली होती. ती विद्वज्जनांनी वाखाणली होती. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• तीन गोष्टी सतत देत राहा-मान, दान आणि ज्ञान. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *पाकिस्तानची राजधानी कोणती ?* इस्लामाबाद 2) *सर्वात लहान पक्षी कोणता ?* हँमिंग बर्ड 3) *भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता ?* वाघ 4) *'जण गण मन' हे राष्ट्रगीत कोणी लिहिले ?* रवींद्रनाथ टागोर 5) *'खरा तो एकची धर्म' ही प्रार्थना कोणी लिहिली ?* साने गुरुजी *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• •  श्रीनिवास भुतावले •  मारोती भोसले •  संभाजी पाटील •  प्रवीण जाधव •  बालाजी पा. कदम •  तथागत कुमारे •  साईनाथ नुतीवाड, पेंटर *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *बाई* घरीदारी रात्रंदिवस बाई जळत रहाते उन्हातान्हात सर्वांसाठी नेहमी तळत रहाते बाई म्हणजे सात्विकतेचा अभंग कळस असते सर्वांसाठी जगणारी अंगणातली तुळस असते महिला दिनाच्या शुभेच्छा शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *तहानलेल्या जन्मदात्यांना पाणी देण्यासाठी तळ्यावर आलेला श्रावण, दशरथाच्या बाणाला बळी पडला आणि पुत्रविरहाचा शाप मिळण्यास कारण ठरला. सिकंदर आणि नेपोलियन यांची जग जिंकण्याची 'तहान' अनेक युद्धांना सामोरी गेली आणि कित्येक राजे शरण जाऊन कफल्लक झाले. तहानलेले 'हरिण' वा 'पाडस' ही व्याघ्राची पोटापाण्याची सोय आहे. सत्तेची 'तहान'ही अशीच, त्यात महत्वकांक्षा मिसळली की व्याकूळ होते आणि सत्तापिपासू बनते. म्हणजे तहानेने विकृत रूप धारण केले की ती केवळ तहान न राहता 'जीवो जीवस्य जीवनम्' या तत्वाने तहानलेल्याला समोर दिसेल ते ग्रहण करण्याचे व्यसन लागते. अशावेळी चित्तवृत्ती बेभान होतात, ताळतंत्र सुटतो व विवेक संपून दुष्कृत्य घडते.* *'तृष्णा' म्हणजे 'तहान'च आणि 'तहान' पाण्याशिवाय पूर्ण होत नाही. ही साधी तहान जेव्हा 'तृष्णा' होते तेव्हा तिच्यातले विविध पैलू दिसू लागतात. तहानेत असलेले आसुसलेपण मात्र स्वतंत्र असते, केव्हा एकदाचे 'पाणी' मिळते, अशी अवस्था होते. ही अवस्था 'तृष्णे'मधून येते. तेव्हाही आसुसलेपण येऊन इच्छापूर्ती न झाल्यास बुद्धी किंवा मनाचा आधार घेतला जातो. मनाच्या आहारी गेल्यास महत्वाकांक्षा भरकटते व तृष्णा भीषण रूप धारण करते* ••●★‼ *रामकृष्णहरी* ‼★●••     🌷🌷🌷🌷🌷🌷 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई         9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••     कबीर हरि सो हेत कर, कोरै चित ना लाये बंधियो बारि खटीक के, ता पशु केतिक आये। सारांश कबीरा हरी स्मरण कर नको मनी कचर्‍याचा भर कसाया दारी बांधला पशू तया आयुष्याचा विचार कर महात्मा कबीर म्हणतात की ईश्वराशी नाते जोड. जो सर्वत्र भरून उरला आहे. तो वार्‍याच्या रूपाने तुझ्याशी संवाद साधतो. पाण्याच्या रूपाने तुझे तन मन शितल करतो. प्रकाशाच्या रुपाने तुझं अंतरंग उजळून टाकतो. मात्र तू तर वरवरच्या बाह्य प्रतिक रुपालाच भुलतो आहेस. तू स्वार्थाने अंध होऊन ईश्वराचं सर्वव्यापी रूपंच विसरून गेला आहेस. अशा वरवरच्या ढोंगी भक्तीने तुला ईश्वराचं सत्य स्वरूप कसं काय कळणार आहे? शिवरूप तर सर्वत्र भरून आहे. निसर्गाच्या आविष्कारात ते सामावलेलं आहे. ते कळलंच नाही तर सुंदराचा कसा साक्षात्कार होईल बरे ! पळापळाने आयुष्य मृत्यूकडे धाव घेत आहे. मानवी जन्म जणू कसायाच्या दारी बांधलेल्या पशूसमान आहे. त्या पशूवर कसाई कोणत्या क्षणी सुरी चालवील काय माहित ? आयुष्याची क्षणभंगुरताही तशीच आहे. तुझ्याकडे उपलब्ध वेळेचा सदुपयोग करून घे. तो सत्कारणी लाव. से प्रेम करो। अपने चित्तात भरलेला विकारांचा कचरा भिरकावून दे. शिवस्वरूप सत्याचा अंगिकार कर. जीवनातल्या सुंदरतेच्या जागा परमानंदाने भरून घे . एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्यांनी आपल्या जीवनात खडतर परिस्थितीशी सामना करुन, अहोरात्र कष्ट केले आणि आपल्या जीवनाला कर्तृत्वाने जीवनाची सुंदर बाग बनवली अशा व्यक्तींना विचारा की, जीवन म्हणजे काय असते ? याचे उत्तर आपल्याला त्यांचे जीवन म्हणजे एक धगधगत्या पेटणा-या निखा-यासारखे असते,त्यांच्या त्यागातून,नि:स्वार्थ भावनेतून केलेल्या कठोर परिश्रमातून साकारलेले मूर्तीमंत आदर्श उदाहरण आपल्या डोळ्यासमोर दिसते.त्यांच्या जीवनातील एक जरी गुण घेतला तरी आपल्याही जीवनाला एक आकार मिळू शकतो आणि जीवन कृतार्थ होऊ शकते.फक्त आपल्यात परिवर्तन घडवून आणण्यासाठी मनाची तयारी असावी लागते. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        *🎡 मनाचे श्लोक 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• महासंकटी सोडिले देव जेणें। प्रतापे बळे आगळा सर्वगूणे॥ जयाते स्मरे शैलजा शूलपाणी। नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥३१॥ संकलन : सौ. सुभद्रा सानप, बीड •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *कृती महत्त्वाची* स्वामीजींच्या प्रवचनासाठी गावोगावहून लोक आले होते. स्वामीजी आपल्या श्रोत्यांना उत्तम उपदेश करत. या उपदेश सभेला ‘सत्संग‘ म्हणत. एकदा स्वामीजींना काही लोकांनी सत्संगासाठी निमंत्रित केल होत. दिवस थंडीचे होते. येणारे लोक शाली, स्वेटर घालून तसेच मफलर बांधून आले होते. त्यात काही काही उच्चभ्रू श्रीमंतही होते. मात्र, स्वामीजींचा वेश साधाच. अंगावर घाबळी पांघरलेली. एका मोठया प्रशस्त दिवाणखान्यात सभा सुरू झाली आधी एक भजन सुरू होते. मग स्वामीजींचा उपदेश. तेवढ्यात एक याचक त्या दिवाणखान्याच्या दाराशी आला. उघडाबंब थंडीने कुडकुडत, हातात कटोरा घेऊन उभा होता. दिनवाण्या मुद्रेने त्याने आत पाहिल. भजन सुरूच होत. स्वामीजी उठून त्या याचकाकडे गेले. आपल्या अंगावरची घाबळी त्याच्या अंगावर पांघरली आणि शिष्याला खूण केली. शिष्याने काही नाणी त्याच्या कटो-यात टाकली आणि मग तो गरीब याचक निघून गेला. हे सर्व दृष्य सर्वच लोक बघत होते. भजन संपलं. सत्संग सूत्रसंचालक म्हणाला, ‘आता स्वामीजी आपल्याला उपदेश करतील. आपले कान त्यासाठी आतुरले आहेत‘. पण स्वामीजी काही बोलेनात. बराच वेळ झाला तरी ते स्वस्थच बसून होते. श्रोत्यांमध्ये चुळबूळ सुरु झाली. अखेर सूत्रसंचालक म्हणाला, ‘स्वामीजी, आपण आम्हाला उपदेश देताय ना?‘ ‘मी उपदेश दिला आहे,‘ स्वामीजी खणखणीत आवाजात म्हणाले.  ’आपण काहीच बोलला नाहीत,‘ सुत्रसंचालक म्हणाला. ‘अस्स! म्हणजे तुम्हाला फक्त शब्दांचा उपदेश हवा आहे; कृती नको. त्या थंडीत कुडकुडणा-या माणसाची अवस्था तुमच्या ध्यानी नाही आली? मी केलेली कृती हाच माझा उपदेश! सर्व श्रोते थक्क झाले. *तात्पर्यः केवळ कोरड्या शब्दांपेक्षा कृती महत्वाची असते.बोलून दाखविण्यापेक्षा केलेली कृती अधिक योग्य.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~

नयन माझे भरले सख्या आठवणीत तुझ्या रोज तू येतोय आता स्वप्नातही माझ्या ✍

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00           ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 07/03/2019 वार - गुरूवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- २००९-Capeler Space Observatory या संशोधन संस्थेची स्थापना २००६-लष्कर-ए-तैय्यब्बा या आतंकवादी संघटनेने वाराणसी येथे बॉम्बस्फोट घडवून आणले २००५ - स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळण्यासाठी कुवैतच्या संसदेसमोर निदर्शने. 💥 जन्म :- १९३४ - नरी कॉँट्रॅक्टर, भारतीय क्रिकेट खेळाडू. १९४२ - उमेश कुलकर्णी, भारतीय क्रिकेट खेळाडू. १९५२-व्हिवीयन रिचर्ड्स ,वेस्ट इंडीज क्रिकेटपटू १९५५-अनुपम खेर ,चित्रपट अभिनेता 💥 मृत्यू :- १६४७ - दादोजी कोंडदेव १९५२ - परमहंस योगानंद, भारतीय तत्त्वज्ञ. १९६१ - गोविंद वल्लभ पंत, भारताचे दुसरे गृहमंत्री. २०००-प्रभाकर तामणे,साहित्यिक २०१२-रवी शंकर शर्मा उर्फ रवि-संगीतकार *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *स्वच्छ सर्वेक्षण 2019 मध्ये स्वच्छतेच्या बाबतीत देशातले तिसरे सर्वाधिक चांगली कामगिरी करणारे राज्य होण्याचा मान महाराष्ट्राने मिळवला आहे.इंदोर सलग तिसऱ्यांदा प्रथम क्रमांकावर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी एका पत्रकार परिषदेत बोलताना लोकसभा निवडणुका या ईव्हीएमच्या माध्यमातूनच घेतल्या जातील असे स्पष्ट केले* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *या वर्षीचा उन्हाळा देशाच्या बहुतांश भागात सर्वसाधारण राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) दिला आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *धनगर समाजाला आदिवासी विकास विभागाच्या योजनांचा लाभ देण्याचा निर्णय शासनाने घेतला असून याबाबत होणार्‍या कोणत्याही अपप्रचारास समाज बांधवांनी बळी पडू नये, असे आवाहन आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी केले आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *कॉम्रेड गोविंद पानसरे प्रेरित नववे कॉम्रेड अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन ९ व १0 मार्च रोजी स्थानिक मातोश्री विमलाबाई सभागृह, अमरावती येथे आयोजित केले आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *राज्यात १0 मार्च रोजी पल्स पोलिओ लसीकरण अभियान राबविण्यात येणार असून सुमारे १ कोटी २२ लाख बालकांना पो असे आवाहन आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केले.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *सोलापूर : सोलापूर विद्यापीठाचा नामांतर सोहळा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ असे झाले नामांतर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *मुलांच्या प्रगतीसाठी .........!* शाळेची गुणवत्ता खराब आहे किंवा शाळेतील मुलांना काही न येणे ह्यासाठी फक्त शिक्षक जबाबदार नाहीत असे यूनेस्कोने नुकतेच आपल्या न्यू ग्लोबल एजुकेशन मॉनिटेरिंग रिपोर्टमध्ये म्हटले आहे. शिक्षक हा एक .................... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_23.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *गोविंद वल्लभ पंत*     गोविंद वल्लभ पंत हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक नेते होते. त्यांचा जन्म १0 सप्टेंबर १८८७ रोजी अल्मोड.ा जिल्हयात श्यामली पर्वतीय क्षेत्रातील खूंट या गावात मूळच्या महाराष्ट्रीय कुटुंबात झाला. त्यांचे पुर्वीचे आडनाव पराडकर होते. डिसेंबर १९२१ मध्ये गांधीजींच्या आवाहनामुळे असहकार चळवळीच्या माध्यमातुन ते सक्रिय राजकारणात आले.पंत हे उत्तर प्रदेशाचे प्रथम मुख्यमंत्री आणि भारताचे दुसरे गृहमंत्री होते. भारत सरकारने इ.स. १९५७ साली त्यांना भारतर% ने सन्मानीत केले. हिंदी भाषेला राष्ट्रभाषा करण्याबाबत ते विशेष आग्रही होते. जमिनदारी पद्धत समाप्त करण्यात व कुळ कायदा अस्तित्वात आणण्यात त्यांचे मुख्य योगदान होते.अल्पसंख्यकांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी कुमाऊउ परिषदेची स्थापना केली. १९0५ च्या बनारस काँग्रेस अधिवेशनास ते हजर होते. १९१६ मध्ये ते काँग्रेसचे सक्रीय सभासद झाले. त्यांनी भिकार्‍यांची व्यवस्था, मजुरांची सक्तीने भरती, जंगलवासीयांवरील अत्याचार इ. प्रश्न कुमाऊँ परिषदेतर्फे हाताळले. उत्तर प्रदेशाच्या विधान परिषदेत ते निवडून आले (१९२३). त्याच वर्षी मोतीलाल नेहरू, चित्तरंजन दास आदींनी स्वराज्य पक्षाची स्थापन केली. स्वराज्य पक्षाचे ते सात वर्षे सचिव होते. १९२७ मध्ये ते प्रांतिक काँग्रेसचे अध्यक्ष झाले. त्यांना दोन वेळा तुरूंगावास घडला. कृषी विषयक सुधारणांसाठीच्या कामगिरीमुळे ते पार्लमेंटरी काँग्रेसच्या संसदीय मंडळाचे चिटणीस झाले (१९३४)       *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• संकटात उडी घेऊन जे कार्य करतात त्यांनाच विजयश्री हार घालते. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *सर्वात मोठा खंड कोणता ?* आशिया 2) *सर्वात लहान खंड कोणता ?* ऑस्ट्रेलिया 3) *जगातील एकूण सार्वभौम देश किती ?* 231 4) *जगातील सर्वात मोठा देश ( क्षेत्रफळ ) कोणता ?* रशिया 5) *जगातील सर्वात लहान देश कोणता ?* व्हॅटिकन सिटी *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• • गोवर्धन शिंदे • शिवम जाधव • भीमराव रेणके • अविनाश मोटकोलू • मनोज घोगरे • कन्ना कनकमवार • महेश कोकरे • मारोती लोणेकर • विश्वनाथ स्वामी *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सुकाळ* सभा-संमेलनात आता घोषणांचा सुकाळ आहे प्रत्यक्षात मात्र कुठेही नेहमीचा दुष्काळ आहे घोषणांच्या सुकाळात तो झोडपून गेला आहे असल्या या दुष्काळाने हवालदिल झाला आहे शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *गरीब माणसाला घरापासून दूर राहून पोटाच्या चार घासासाठी प्रचंड मरमर करावी लागते. पण पैशावाल्याच्या बाबतीत हे होत नाही. "एका बसल्या ठिकाणी त्याचा व्यापार चालतो. त्याला घर सोडून कुठेही जावं लागत नाही." गरीबाला एका वस्तूसाठी पैशाअभावी कुढत मरावं लागतं. शेवटपर्यंत ती वस्तू मिळेलच असं होतं नाही. पण "श्रीमंताला मात्र पाहिजे असणारी कोणतीही वस्तू रानावनातच काय या पृथ्वीतलावर कुठंही असली तरी पैशाच्या जोरावर मिळवणं सोपं असतं आणि वस्तू कोणतीही असू द्या, कितीही अनमोल असू द्या, कितीही महत्वाची असू द्या, शक्यतो जास्तीचे पैसे देऊन मिळवता येणार नाही, इतकी ती अवघड नसतेच." थोडे जास्त पैसे देऊन अति मौल्यवान वस्तुसुद्धा पैश्यावाल्याला सहज मिळवता येते.* *म्हणून, पैसा माणसाच्या आयुष्यात यासाठी महत्वाचा आहे. पैसा वाईट मार्गाने कमवायचा तर नाहीच, पण चांगल्या मार्गाने खूप पैसा कमवून तो वाईट मार्गावर खर्च सुद्धा नाही करायचा. चांगल्या मार्गाने कमावलेला खूप पैसा 'आनंदी आणि सुखकर आयुष्य' जगण्यासाठी खर्च करायचा आहे. पैशाचा लोभ नाही आणि तिरस्कारही नाही. त्याची हाव नको आणि त्याच्याविषयी विरक्ती नको. पैसा कमवताना आनंदाने कमवायचा तसाच तो खर्च करतानासुद्धा जीवनात आनंदच असला पाहिजे. एवढा सुंदर असा 'मध्यम मार्ग' संतानी आपल्याला दिला आहे..* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई         9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      आतम अनुभव जब भयो, तब नहि हर्श विशाद चितरा दीप सम ह्बै रहै, तजि करि बाद-विवाद। सारांश आत्म अनुभव होता नुपजे हर्ष-विशाद । चित्रदीपासम स्थिर त्यागून वाद-विवाद ।। महात्मा कबीर आत्मानुभवाची महत्ती विशद करतात. ज्याला आत्मानुभवाचा साक्षात्कार झालेला आहे. त्याच्या ठायी कोणताही भेदभाव उरत नाही. निसर्गातील उदात्त भावाची अभिव्यक्ती त्याच्याकडून प्रत्ययास येवू लागतात. वृक्ष संगोपक व संहारक दोघांनाही समान वागणूक देतो. दोघांवरही शितलता (सावली) सारखीच धरीत असतो. तशी वागणूक आत्म अनुभव्याची असते. तो आप-परभाव बाळगित नाही. आनंद व खेद अशा भावनाही त्याच्याठायी उपजत नाहीत. चित्रातील ज्योत स्थिरता धारण करते. तिच्यावर बाह्य घटकांचा काहीही परिणाम जाणवत नाही. जिथे परमात्म्याचं विशाल रूप ध्यानात आलेलं आहे. त्या विशाल रूपाचे आपण एक सुक्ष्म अंश आहोत. तेव्हा त्याबद्दलची मत मतांतरं कशी काय उत्पन्न होतील. सारे वाद-विवाद कधीच मिटलेले अाहेत.     एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• सायंकाळच्यावेळी थोडं तळ्याकाठी जाऊन पहा आणि काही क्षण त्याकडे पाहिले तर असे लक्षात येते की, तळ्यातल्या पाण्यावर तरंगणा-या लाटा एकामागून एक संथगतीने तळ्याच्या काठाकडे जणू हातात हात घालून येत आहेत आणि आम्ही एक आहोत असं सांगून जातात. त्यातून प्रत्येक लाटेच्या एकीचे दर्शन घडताना दिसते.त्यांच्या एकीबरोबरच निसर्गाचं सौंदर्य खुलताना दिसते.हे विहंगम दृश्य मानवी मनाला भुरळ पाडल्यावाचून राहत नाही.यातून निसर्गातील प्रत्येक घटक एकमेकांशी संवाद साधून एक मौलिक संदेश सा-या सजीवांना देतात.ज्याप्रमाणे एकमेकांच्याद्वारे निसर्गाच्या एकरुपतेचे दर्शन घडते.असे दर्शन मानवी जीवनाचे का दिसून येत नाही ? त्यात फक्त माणूसच असा आहे की,तो निसर्गाचे अनुकरण करायला थोडा विसरतो, निसर्गापासून दूर जाऊ पाहतो आणि आपले काही इतरांपेक्षा वेगळे आहे असे समजून जगायला पाहतो.तो अहंभाव मनात ठेवून जगण्याचा प्रयत्न करतो आणि कुठेतरी फसतो.पण एक माणसाने थोडे निरीक्षण करायला शिकले पाहिजे.शिकल्यानंतर असे लक्षात येईल की,निसर्गातला प्रत्येक घटक एकमेकांशी जुळवून घेऊन एक आगळेवेगळे विलोभनीय सौंदर्य निर्माण करुन आपले अस्तित्व टिकवून ठेवतो तर आपण का करत नाही.जर आपणही प्रयत्न केले तर आपल्याही जीवनात,जगण्यात, जीवनशैलीत भर पाडू शकतो.मग तरंगणा-या लाटा असतील किंवा अन्य घटक असतील. त्याचप्रमाणे मानवाने निसर्गावर प्रेम करत करत त्यातून मन शांत ठेवून, विचार करून आपणही एकमेकांतला असणारा भेद, तिरस्कार न करता एकतेने जीवन जगायला शिकले पाहिजे. इतरांनाही आपल्यात सहभागी करून घेऊन कुणालाही कमी न देता आपण सारे समान आहोत आपण सा-यांनी मिळून मिसळून राहून आपणही चांगली मानवसृष्टी निर्माण करु शकतो. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        *🎡 मनाचे श्लोक 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• समर्थाचिया सेचका वक्र पाहे। असा सर्व भुमंडळी कोण आहे॥ जयाची लिला वर्णिती लोक तीन्ही। नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥३०॥ संकलन : सौ. सुभद्रा सानप, बीड •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *शिंपले* एक 6 वर्षाचा मुलगा आपल्या 4 वर्षाच्या लहान बहिणीसोबत बाजारातून जात असतो. अचानक त्याला जाणवते की त्याची बहीण मागे राहिली आहे. तो थांबतो व मागे वळून पाहतो तर त्याला दिसते की, त्याची बहीण एका खेळण्याच्या दुकानासमोर उभी राहून अतिशय कुतूहलाने काहीतरी पहात आहे. तो मुलगा मागे जातो व तिला विचारतो, "तुला काही हवे आहे का?" ती एका बाहुलीकडे बोट दाखविते. तो मुलगा तिचा हात धरतो व एका जबाबदार मोठ्या भावा प्रमाणे तिला ती बाहुली देतो. ती बहीण अत्यानंदीत होते. हे सर्व तो दुकानदार पहात असतो व त्या मुलाचे प्रगल्भ वागणे पाहून आश्चर्यचकित होतो.इतक्यात तो मुलगा काउंटर कडे येतो व त्या दुकानदाराला विचारतो "काका, किती किंमत आहे या बाहुलीची?" दुकानदार एक शांत माणूस असतो व त्याने जीवनाचे अनेक चढ उतार पाहिलेले असतात. तो त्या मुलाला प्रेमाने व आपुलकीने विचारतो "बोल तू काय देशील?" मुलगा आपल्या खिशातील सर्व शिंपले,जे त्याने व त्याच्या बहिणीने नुकतेच समुद्रकिनाऱ्यावर गोळा केलेले असतात ते बाहेर काढतो व दुकानदाराला देतो. दुकानदार ते घेतो व जणूकाही पैसे मोजत आहे या अविर्भावात मोजायला सुरु करतो. शिंपले मोजून झाल्यावर त्या मुलाकडे पाहताच मुलगा म्हणतो " कमी आहेत का ?" दुकानदार म्हणतो " नाही नाही, हे बाहुलीच्या किमतीपेक्षा जास्त आहेत. ज्यादाचे मी परत करतो. असे म्हणून तो केवळ 4 शिंपले घेतो व बाकी सर्व शिंपले त्याला परत करतो. मुलगा एकदम आनंदात ते शिंपले आपल्या खिशात ठेवतो व बहिणीसोबत निघून जातो. हे सर्व त्या दुकानातील कामगार पहात होता. त्याने आश्चर्याने मालकाला विचारले, " मालक ! इतकी महागडी बाहुली तुम्ही केवळ 4 शिंपल्यांच्या मोबदल्यात दिलीत ?" दुकानदार एक स्मित हास्य करीत म्हणाला, "आपल्यासाठी हे केवळ शिंपले आहेत. पण, त्या मुलासाठी हे शिंपले अतिशय मौल्यवान आहेत. आणि आत्ता या वयात त्याला नाही समजणार पैसे काय असतात. पण जेंव्हा तो मोठा होईल ना, तेंव्हा नक्कीच समजेल. आणि जेंव्हा त्याला आठवेल कि आपण पैश्यांच्या ऐवजी शिंपल्यांच्या मोबदल्यात बाहुली खरेदी केली होती, तेंव्हा त्याला माझी आठवण होईल आणि तो हा विचार करेल कि हे विश्व चांगल्या माणसांनी भरलेले आहे.हीगोष्ट त्याच्यातील सकारात्मक दृष्टीकोन वाढण्यासाठी मदतीची ठरेल आणि तो सुद्धा चांगला माणूस बनण्यासाठी प्रेरित होईल." *तात्पर्य* -- " पेरावे तसे उगवते." म्हणून केवळ पैशांच्या मागे न लागता, असे काहीतरी चांगले काम करा, जे पुढच्या पिढयांना चांगले काम करण्याची प्रेरणा देईल, सकारात्मक दृष्टीकोन देईल..... *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00           ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 06/03/2019 वार - बुधवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १९६४ - कॉन्स्टन्टाईन दुसरा ग्रीसच्या राजेपदी. १९७५ - अल्जियर्सचा तह - ईराण व इराकने सीमाप्रश्नी संधी केली. १९९२-'मायकेल अँजेलो' नावाचा संगणक विषाणू पसरण्यास झाली सुरुवात. १९९८- गझलगायक जगजितसिंग यांना मध्यप्रदेश सरकारतर्फे दिला जाणारा 'लता मंगेशकर पुरस्कार' जाहीर. १९९९-जगप्रसिद्ध खजुराहो मंदिर समूहाच्या सहस्रब्दीसोहळ्याचे राष्ट्रपती  के आर नारायणन यांच्या हस्ते उद्धघाटन २०००-शहर निर्वाह भत्ता ,महागाई भत्ता आणि घरभाडे भत्ता म्हणून मिळणारी रक्कम करपात्र असल्याचे सर्वोच्च  न्यायालयाचे शिक्कामोर्तब 💥 जन्म :- १९५७-अशोक पटेल-  भारतीय क्रिकेट खेळाडू १९६५-देवकी पंडित-गायिका 💥 मृत्यू :- १९८२-रामभाऊ म्हाळगी- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठप्रचारक, भाजप चे महाराष्ट्राचे पहिले प्रादेशिक अध्यक्ष १९९२-प्रसिद्ध कादंबरीकार रणजित देसाई १९९९- सतीश वागळे-चित्रपट निर्माते २०००-नारायण काशीनाथ लेले-कृष्ण यजुर्वेद शाखेतील वेदमूर्ती *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *मुंबई - राज्यातील शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझरचा भाऊ मुफ्ती अब्दुर रौफसह बंदी असलेल्या या संघटनेच्या ४४ दहशतवाद्यांना पाकिस्तानने केली अटक* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे जेम एंड ज्वेलरी विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा केली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *दुष्काळ निवारणासाठी दुष्काळग्रस्त भागात २६०० टँकर्स सुरू करण्यात आले असून पाणी टंचाई असलेल्या गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठय़ासाठी १४७ कोटी रुपये निधी वितरीत करण्यात आला* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *जम्मू-काश्मीर- राजौरीतल्या सुंदरबनी सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार, दिवसभरात तिसऱ्यांदा पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *नवी दिल्ली - भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी घेतली अमेरिकन सुरक्षा सल्लागार जॉन बॉल्टन यांची भेट* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *नागपूर : चित्तथरारक ठरलेल्या सामन्यात 'टीम इंडिया'ने ऑस्ट्रेलियाचा ८ धावांनी पराभव करीत पाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत २-0 अशी विजयी आघाडी घेतली. भारताचा हा पाचशेवा विजय होता* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *प्रदूषण एक समस्या* लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. https://nasayeotikar.blogspot.com/2018/12/blog-post_10.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        *रणजित देसाई*       रणजित रामचंद्र देसाई (एप्रिल ८, १९२८ - मार्च ६, १९९२) हे प्रसिद्ध मराठी कादंबरीकार होते. त्यांच्या ऐतिहासिक कादंबऱ्या विशेष प्रसिद्ध आहेत. छत्रपती  शिवाजी  महाराजांच्या जीवनावरील श्रीमान योगी आणि थोरले माधवराव पेशवे यांच्या जीवनावरील स्वामी, या कादंबऱ्यांना मराठी साहित्यविश्वात मानाचे स्थान आहे. त्यांना स्वामीकार या नावाने ही ओळखले जाते.  *त्यांना मिळालेले पुरस्कार -* १९६३ - स्वामी कादंबरीसाठी महाराष्ट्र राज्य पुरस्कार १९६३ - स्वामी कादंबरीसाठी हरी नारायण आपटे पुरस्कार १९६४ - स्वामी कादंबरीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार १९७३ - पद्मश्री पुरस्कार १९९० - महाराष्ट्र गौरव पुरस्कार *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे. भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे. आणि ज्ञान, भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1)  *भारतीय क्रिकेट टीमचा कप्तान कोण आहे ?*       विराट कोहली 2)  *क्रिकेटमधील खेळाडूंची संख्या किती असते ?*       11 3)  *कबड्डी खेळात खेळाडूंची संख्या किती असते ?*       9 4)  *सायना नेहवाल कोण आहे ?*       बॅडमिंटनपटू 5)  *आपण कोणत्या खंडात राहतो ?*       आशिया *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• • अशोक पा. दगडे, सरपंच • सुरेश कटकमवार • सुरेश बावनकुळे, शिक्षक • माधव गोटमवाड • शेख जुबेर • कैलास वाघमारे • प्रकाश राजफोडे • राजू कांबळे • अविनाश गायकवाड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    *दुभंगलेले* वरवर एक,मने दुभंगलेले आहेत प्रत्येकजण आपल्या रंगात रंगलेले आहेत वरवर कितीही जोडा जोडलेले ते जोडलेले रहाते वरवर चिकटलेले सांगा कुठे एकजीव होते     शरद ठाकर   सेलू जि परभणी   8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        *सारा अंधारच प्यावा*        *अशी लागावी तहान ॥*        *एका साध्या सत्यासाठी*        *देता यावे पंचप्राण ॥* *असं जगावेगळ पसायदान कवी म.म.देशपांडे यांनी 'तहान' या कवितेत मागितलं आहे. त्याचं तीव्रतेने स्मरण व्हावं अशी परिस्थिती आज आपल्या देशात आहे. कोणत्याही क्षेत्राकडे जा सारा अंधार आहे. अपवाद वगळले तर वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनातून सत्य हद्दपार झालेलं आहे. असत्याच्या अंधारात संवेदनशील मनाची घुसमट होत आहे. 'सत्यमेव जयते' ही या देशाची घोषमुद्रा आहे. तथापि समाजाचं, देशाचं नेतृत्व करणा-यांपासून तर रूग्णांची सेवा करण्याची शपथ घेतलेल्या डाॅक्टरांपर्यत सर्वांनी तिचे पदोपदी धिंडवडे काढले आहेत. सर्वच क्षेत्रात असत्यानं, अप्रमाणिक वृत्तीनं थैमान घातलं आहे. स्वातंत्र्योत्तर काळात भारतमातेची दु:स्थिती आधिकच चिंतनीय झाली आहे. 'सत्य हे जीवनमूल्य लोप पावत आहे. 'असत्य' उजळ माथ्यानं वावरत आहे.* *खरंतर सत्य, सत्याचा शोध, सत्याचा उद्धार आणि आचरण, सत्याचा पुरस्कार याला वैभवशाली परंपरा आहे. भीष्मनिती सांगते, 'सत्य हे प्रत्येक माणसाचं कर्तव्य आहे. माणसाचा सर्वश्रेष्ठ आधार आहे. शाश्वत कर्तव्य आहे. आसक्तीचं जाळ फक्त सत्यच तोडू शकतं. सत्य म्हणजेच अमरत्व. सत्यासाठी केलेला त्याग मानवी जीवनात सर्वश्रेष्ठ आनंदाचा उगम असतो. सदाचरणी माणूसच इतरांच्या हितासाठी दक्ष असतो आणि या मार्गानंच त्याचं स्वत:चही हित साधलं जातं. सत्यासारखं तप, पुण्य नाही. असत्यासारखं पाप नाही. ज्याच्या ह्रदयात सत्य असतं त्याच्या ह्रदयात परमशक्ती वास करते.* ••● ‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई         9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   ज्ञानी तो निर्भय भया, मानै नहीं संक इन्द्रिन केरे बसि परा, भुगते नरक निशंक। सारांश       ज्ञानवंता भय नसे       शंका नसे तया मना ।       इंद्रिया आहारी जाता       निशंक नरक जाणा ।।       महात्मा कबीर ज्ञानी माणसाचे वैशिष्ट्य कथन करतात.  ज्ञानी माणसाचे ठायी सारासार विचार शक्ती असते. तो विवेकाने निर्णय घेतो. घाई गडबडीने निर्णय घेवून पुन्हा विचारात पडण्याची त्याची प्रवृत्ती नसते. तो पूर्णपणे आपल्या विचारावर ठाम असतो. पुढे काय होणार ? अशा द्विधा व संदिग्धावस्थेत तो गुरफटत नाही. व यशापयशा प्रती शंकाही घेत नाही. तो स्थिर असतो. मात्र जो षडविकारांना बळी पडून इंद्रियांच्या अधीन  गेलेल्या बद्दल काय सांगावे. क्षणोक्षणी त्याच्या विचारात बदल होत असतो. त्याची अस्थिर विचार सरणी त्याला कोणत्याही मतावर ठाम होऊ देत नाही म्हणून तो सदा सर्वकाळ साशंक मनाने जगत असतो. ही साशंकताच त्याचा घात करते. तो निसर्गाच्या शाश्वत सत्यांवरही शंका घ्यायला लागतो. त्याच जगणं जटील बणतं . तो स्वतःच जीवनानंदापासून अलिप्त होवून जीवनानंदाला नरकात ढकलून नैराश्यात्मक यातनामय जगणे पदरी ओढून घेतो.     एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• या जगात आतापर्यंत विद्वान माणसे शरीराने जरी या जगातून गेली असली तरी ती आपल्या विचारांनी अमरच झालेली आहेत.कारण त्यांचे विचार हे सर्वसामान्य माणसेही आपल्या जीवनात आदर्श विचार मानून त्या विचारांच्या मार्गावरुन चालतात म्हणजे विचार रुपाने ते सदैव आपल्या जीवनात पाठराखण करत असतात.म्हणतात ना ' मरावे परी कीर्तीरुपी उरावे ' म्हणजेच विद्वान माणसे आपल्या जीवनात सदैव आपल्या विचारांच्या,कार्याच्यारुपाने आपल्यामध्येच असतात हे ध्यानात ठेवून आपणही त्यांचा मार्ग अनुसरावा म्हणजे आपणासही विचाररुपी अमरत्व प्राप्त होईल. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद..9421839590/ 8087917063. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        *🎡 मनाचे श्लोक 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• दिनानात हा राम कोदंडधारी। पुढें देखतां काळ पोटीं थरारी॥ मना वाक्य नेमस्त हे सत्य मानीं। नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥२८॥ संकलन : सौ. सुभद्रा सानप, बीड •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *उंदराचे सिंहाशी लग्न* उंदरामुळे जाळ्यातून सुटलेला सिंह खूश होऊन त्या उंदराला म्हणाला, ''अरे, तू माझ्यावर फार उपकार केले आहेस त्यासाठी तुला जे काय हवे असेल ते माझ्याजवळ माग, मी देतो.'' ते ऐकून उंदीर गर्वाने फुगला व आपल्या योग्यतेचा विचार न करता म्हणाला, ''महाराज, ज्या अर्थी आपण आनंदाने काय पाहिजे ते माग म्हणता त्या अर्थी काहीही भीती न धरता मी मागतो की तुमची मुलगी मला द्यावी.'' हे ऐकताच सिंहाला फार वाईट वाटले, पण तो वचनात गुंतल्यामुळे त्याला नाही म्हणता आले नाही. त्याने आपली मुलगी आणून उंदराच्या स्वाधीन केली. ती तरुण मुलगी मोठय़ा डौलाने चालत असता तिचा पाय उंदरावर पडून तो तात्काळ मरण पावला. तात्पर्य : जे मागायचे ते विचारपूर्वक व आपल्या योग्यतेला साजेल असे मागावे, नाहीतर भलतेच मागणे मागितल्यामुळे संकट निर्माण होईल. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00           ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 05/03/2019 वार - मंगळवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १९३१- गांधी-आयर्विन करार झाला. १९६४-श्रीलंकेत आणीबाणी १९९१-पहिले आखाती युद्ध-इराकने सगळ्या युद्ध कैद्यांची मुक्तता केली. २०००-कर्नाटकातील कैगा अणू वीजप्रकल्प माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या हस्ते देशाला समर्पित २००१ - मक्केत हज सुरू असताना ३५ भाविकांचा चेंगरुन मृत्यू. 💥 जन्म :- १९१६-ओरिसाचे मुख्यमंत्री आणि स्वातंत्रसेनानी बिजू पटनायक १९४२ - फेलिपे गॉन्झालेझ, स्पेनचा पंतप्रधान. १९५९ - वाझ्गेन सर्ग्स्यान, आर्मेनियाचा पंतप्रधान. 💥 मृत्यू :- १५३९ - नुनो दा कुन्हा, भारतातील पोर्तुगीझ गव्हर्नर. १९६८-नारायण गोविंद चाफेकर, मराठीचे संशोधक १९८९- बाबा पृथ्वीसिंग आझाद,गदर पार्टीचे एक संस्थापक *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *पंजाब- लुधियाना रेल्वे स्थानकात 100 फूट उंचावर फडकला तिरंगा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *लक्ष्यावर अचूक प्रहार केल्यानंतर किती जण ठार झाले ते मोजण्याचे काम हवाई दल करत नाही, हवाई दल प्रमुख बीरेंद्र सिंग धनोआ* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *एमएचटी सीईटी सामाईक प्रवेश परीक्षा यंदा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे. जेईईच्या मेनच्या धर्तीवर ही परीक्षा होणार असून या परीक्षेत निगेटिव्ह पद्धत राहणार नाही.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी ४५ वर्षीय हमीद ए. मुर्तझा यांनी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीला ११0 कोटी रुपयांची देणगी देण्याचा दिला प्रस्ताव,* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *एका स्थानी सर्वाधिक गर्दी, सगळ्यात मोठे स्वच्छता अभियान आणि सगळ्यात मोठा चित्रकला कार्यक्रम यासह यंदाचे प्रयागराज कुंभमेळा २0१९ ने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवले आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *महिला क्रिकेट मध्ये भारताचा पहिल्या टी-२0 मध्ये ४१ धावांनी पराभव झाला. इंग्लंडने ३ सामन्यांच्या या मालिकेत १-0 अशी आघाडी घेतली आहे. * ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारत-ऑस्ट्रेलिया एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना आज नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडिअमवर खेळला जाणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *राष्ट्रगीत आणि राष्ट्रभक्ती* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *नारायण गोविंद चाफेकर*    नारायण गोविंद ऊर्फ नानासाहेब चाफेकर (५ ऑगस्ट, इ.स. १८६९:मुंबई, महाराष्ट्र - ५ मार्च, इ.स. १९६८:बदलापूर, महाराष्ट्र) हे मराठीतले ऐतिहासिक विषयावर लिहिणारे एक भाषातज्ज्ञ संशोधक लेखक व समीक्षक होते. पैसा, राज्यकारभार, समाज-नियंत्रण ह्यांसारख्या विषयांवरही त्यांनी ग्रंथ लिहिले असून ते त्यांच्या चौफेर विचारांचे द्योतक आहेत. वैदिक वाङ्‌मया विषयीचे चिंतन व शोधन हा त्यांच्या विचाराचा आणखी एक विषय होता. १९३४ साली बडोद्यात भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. चापेकरांचे शालेय शिक्षण रायगड जिल्ह्यातील  रेवदंडा  येथे झाले. मुंबईतून १८९४ साली कायद्याची पदवी घेतल्यानंतर त्यांनी काही काळ वकिली केली आणि मग ते न्यायखात्यात नोकरी करू लागले. १९२५ साली प्रथम वर्ग न्यायाधीश म्हणून निवृत्त झाल्यावर त्यांनी  ठाणे  जिल्ह्यातील बदलापूर येथे वास्तव्यास गेले व अखेरपर्यंत तेथेच राहिले. चाफेकरांनी सेवानिवृत्तीनंतरच्या काळात 'भारत इतिहास संशोधक मंडळ', 'मराठी ग्रंथोत्तेजक सभा', 'राजवाडे संशोधन मंडळ', 'धर्मनिर्णय मंडळ' आदी अनेक संस्थांमधून काम केले. अनेक नव्या-जुन्या साहित्यिकांना एकत्र आणून त्यांनी 'महाराष्ट्र साहित्य परिषदे'ला ऊर्जितावस्थेला आणले. पुणे विद्यापीठातून पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शन करीत. त्या विद्यापीठाकडून १९६६ साली ना.गो. चापेकर यांना डी.लिट्‌. ही सन्माननीय पदवी देण्यात आली        *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• संकटं तुमच्यातली शक्ती, जिद्द आणि चिकाटी पाहण्यासाठीच येत असतात. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1)  *भारताचे ब्रीदवाक्य कोणते ?*       सत्यमेव जयते 2)  *भारताचा ध्वज कोणता ?*       तिरंगा 3)  *भारताची राष्ट्रीय भाषा कोणती ?*       हिंदी 4)  *'प्रजासत्ताक दिन' केव्हा साजरा करतात ?*       26 जानेवारी 5)  *प्रजासत्ताक दिन केव्हापासून साजरा करतात ?*       26 जानेवारी 1950 *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144     •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• •  माणिक आहेर •  गंगाधर मदनूरकर •  बाळू भगत •  अशोक कहाळेकर •  गं.बा. नुकूलवार •  बालाजी तिप्रेसवार •  रमेश मेरलवार • समाधान शिंदे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    *दिखावा* दाखवण्या पुरता फक्त स्वाभिमानीबाणा आहे तसे पाहिल्यास इतिहास यांचा लाजिरवाणा आहे स्वाभिमानी असल्याचा उगीच दिखावा करतात लोकांच्या नजरेत दिखावा म्हणजे  नाटक ठरतात   शरद ठाकर सेलू जि परभणी ८२७५३३६६७५ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *तसं पाहिलं तर आपल्यापैकी बहुतेकांचं जीवन साचेबद्ध असतं. घर आणि नोकरी किंवा घर आणि व्यवसाय अशा दोन विश्वांतलं आपलं जीवन. त्यामधील माणसांभोवती फेर धरणारं जगणं. आपण स्वत:साठी जगत असतो; परंतु आई-वडिल, भावंडे, पती-पत्नी आणि मुलं, मित्र-मैत्रिणी, सहकारी यांच्यासाठीही जगत असतो. शिकत असतो त्यावेळी उत्तम गुण मिळवून परिक्षा उत्तिर्ण होण्याचं स्वप्न असतं आपलं. शिक्षणानंतर स्वप्न असतं ते करिअरचं. नोकरी वा व्यवसायात स्थिरावण्याचं आणि त्यानंतर स्वत:च्या कुटुंबाचं, घराचं. लग्नाचं आणि मग मुला-मुलींना वाढवण्याचं. म्हटलं तर हे चक्रच. त्या-त्या काळातील आपली महत्वकांक्षा हे चक्र फिरवित असते.* *महत्वकांक्षा हे एक मानवी मूल्य आहे. विद्यार्जनासाठी, कर्तृत्वासाठी, स्वयंप्रेरणेसाठी ते आवश्यकच असते. महत्वाकांक्षा नसेल तर मग आपण कशाचा ध्यास घेणार आणि त्याच्या मागे धावणार? आपली इच्छा असो वा नसो, आपण स्पर्धेत ओढलो जातोच. महत्वाकांक्षा आपल्यामधील स्पर्धात्मकता वाढविते, कष्ट करायला प्रेरणा देते, चिकाटी निर्माण करते. निसर्गाकडून आपल्या प्रत्येकाला कमी'-आधिक प्रमाणात प्रतिभाशक्ती मिळालेली असते. वैयक्तिक जीवनात महत्वाकांक्षा जशी आवश्यक, तशी ती समाजजीवनातही गरजेची आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळकांनी, गांधीजींनी, नेहरूंनी देशाला गुलामगिरीतून मुक्त करण्याची आकांक्षा बाळगली. देशवासियांना एकत्र करून त्यांनी त्याची पूर्ताताही केली. महत्वाकांक्षा समाजासाठी अशा प्रकारे उपयुक्त ठरते.*     ••● ‼ *रामकृष्णहरी* ‼●••   ⭐🔹🔹🔹🔹🔹🔹⭐ संजय नलावडे, चांदीवली, मुंबई         9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••     कबीर  कलि  खोटी  भाई , मुनियर  मिली  न  कोय  | लालच  लोभी  मस्कारा , टिंकू  आदर  होई  ||      अर्थ :           हल्लीच्या सामाजिक भानाचं वर्णन करताना  महात्मा कबीर   ढोंगाला भुलणार्‍या अर्थात वास्तव न पाहता वरवरच्या सोंगालाच सत्य मानणार्‍या समाजमनाचं निरीक्षण नोंदवतात.       भूगोल सांगतं पृथ्वीचं वय साडे चार अब्ज वर्षापेक्षा जास्त जास्त.  भारतीयांच्या मानण्याप्रमाणे गतकाळ ते सांप्रत असे चार युग . १ कृत युग, २ त्रेता युग , ३ द्वापार युग, व  ४ कली युग अशी काल विभागणी सांगितली जाते.  हल्ली म्हणजे कलीयुगी पूर्वीपेक्षा खोटारडेपणा खूपच वाढलाय. हे युग महाभारताच्या लढाईपासून ते सांप्रतपर्यंत चालूच आहे. या युगी खरे खुरे मुनी , ऋषी , संत भेटणे कठीण झाले आहे. स्वार्थासाठी त्यांची नाटकं करणारे अनेक जण भेटतील. लालचीपणा, मोह यांनी ग्रासलेल्यांना हेच ढोंगी , पाखंडी , खरंं अध्यात्म सोडून थट्टा मस्करी करणारे, द्रव्य लुटणारे, वासनांधच साधू, मुनी म्हणून मिरवत आहेत. अन भक्तजण त्यांनाच डोक्यावर घेवून मिरवतात अन फसगत झाली की वैफल्यग्रस्त होतात. तेव्हा खरा साधून ओळखून त्याच्या ठायी लिन व्हायला सांगितलेला संतांचा कानमंत्र विसरू नये. म्हणजे झालं.     एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• तुमची वाणी स्पष्ट, चारित्र्य पवित्र ,जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आणि जीवन व्यवहार चोख असतील तर तुम्ही इतरांच्या हृदयावर साम्राज्य सहजपणे करु शकाल. अन्यथा ह्या गोष्टी तुमच्या जीवनात नसतील तर तुम्हाला मनुष्य म्हणून जगण्याचा अधिकारही राहणार नाही.आपण मनुष्य म्हणून जन्माला आलो आणि मनुष्य म्हणूनच जगणार आहोत हा विचार समोर ठेवून जगण्यासाठी वरील महत्वाच्या चार गोष्टींना जीवनात प्राधान्य द्यायलाच हवे आणि त्या गोष्टी सहज करता येऊ शकतात. सुरुवातीला कठीण जाईल एकदा का सराव झाला की,मग आपोआपच व्हायला लागतात. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        *🎡 मनाचे श्लोक 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• दिनानात हा राम कोदंडधारी। पुढें देखतां काळ पोटीं थरारी॥ मना वाक्य नेमस्त हे सत्य मानीं। नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥२८॥ संकलन : सौ. सुभद्रा सानप, बीड •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••            *सिंह आणि उंदीर* उन्हाळ्यात एक सिंह एका झाडाच्या सावलीत अगदी शांत झोपला होता. तेथे उंदरांनी फारच त्रास दिला. त्यामुळे जागा होऊन त्याने एका उंदरास पंजात पकडले व त्याला फाडून खाणार तोच त्या उंदराने त्याची प्रार्थना केली, ''महाराज, आपण मोठे, सर्व प्राण्यांचे राजे, मी आपल्यापुढे अगदीच लहान. माझ्या रक्ताने आपले हात विटाळू नका. मला जीवदान द्यावं हेच योग्य.'' ते ऐकून सिंहाला त्याची दया आली व त्याने त्याला सोडून दिले. पुढे एकदा सिंह अरण्यात फिरत असता त्याच झाडाजवळ शिकार्‍याने जाळे लावले होते, त्यात सापडला. त्यावेळी त्याने आपली सगळी शक्ती खचरून धडपड केली, पण त्याची सुटका झाली नाही. तेव्हा तो निराश होऊन मोठय़ाने ओरडू लागला. तो आवाज ऐकून तो उंदीर तेथे आला व सिंहाला म्हणाला, ''राजा भिऊ नकोस, स्वस्थ बस.'' इतके बोलून त्याने आपल्या दाताने ते जाळे कुरतडले व सिंहाची सुटका केली.  तात्पर्य : मोठय़ाचे एखादे मोठे काम लहानाच्या हातून एखादे वेळी होते. यासाठी कोणाला क्षुद्र समजून हिणवू नये. आपल्या चलतीच्या काळात माणसाने लोकावर उपकार केलेत तर पडत्या काळात तेच त्याच्या उपयोगी पडतात.  *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴  ✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00           ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 02/03/2019 वार - शनिवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १९४९ - कॅप्टन जेम्स गॅलाघरने विमानातून विनाथांबा पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केली. १९५२-पंडित नेहरू यांच्या हस्ते सिंद्री येथील खत कारखान्याचे उदघाटन १९७२-अमेरिकेचे "पायोनीर-१०" यानाचे गुरूच्या दिशेने उड्डाण झाले २००४ - संयुक्त राष्ट्रांचा शस्त्रनिरीक्षण संघाने ने जाहीर केले की १९९४ नंतर इराककडे अतिविनाशकारी शस्त्रास्त्रे नव्हती. 💥 जन्म :- १९३१-राम शेवाळकर मराठी साहित्यिक १९६२ - जॉन बॉन जोव्ही, अमेरिकन रॉक संगीतकार. १९७७-अँड्रयु स्ट्रास-इंग्लिश क्रिकेटपटू 💥 मृत्यू :- १७९१ - जॉन वेस्ली, मेथोडिस्ट चर्चचा स्थापक. १८३५ - फ्रांसिस दुसरा, पवित्र रोमन सम्राट. १९२१ - निकोलस पहिला, मॉँटेनिग्रोचा राजा. १९४९-सरोजिनी नायडू १९८६ -काशीनाथ घाणेकर मराठी  अभिनेते *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे तीन दिवसांनंतर पाकिस्तानातून मायदेशात परतले, भारतीयांचा विजयी जल्लोष* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *कात्रज - देहूरोड बायपास होणार  सहा पदरी : २२३.४६  कोटी निधी मंजूर, खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठपुरावा * •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *दिल्ली - देशात सध्या तणावाची परिस्थिती असली तरी लोकसभा निवडणुका ठरलेल्या वेळेतच होणार, निवडणूक आयोगाची माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *जम्मू-काश्मीरमधील हंदवाड्यात अतिरेक्यांसोबत चकमक, भारताचे दोन पोलीस व एक अधिकारी शहीद* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *मुंबई : राज्यातील पोलीस पाटील यांच्या मानधनात तसेच होमगार्डच्या कर्तव्य भत्त्यात भरीव वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *दिल्ली - दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती वाल्मिकी मेहता यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारत वि. ऑस्ट्रेलिया : महेंद्रसिंग धोनीला दुखापत, पहिल्या सामन्यातील समावेशाबाबत संदिग्धता* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    *शिक्षकांना शिकवू द्या ...* राज्यातील बहुउद्देशीय कर्मचारी म्हणजे शिक्षक. कोणत्याही सरकारी कामासाठी सहज उपलब्ध होणारा आणि सांगितलेले काम मुकाट्याने करणारा कर्मचारी म्हणजे शिक्षक. वास्तविक पाहता शिक्षकांचे........... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_27.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••            *राम शेवाळकर* कयाधू नदीच्या काठावरील शेवाळ हे राम शेवाळकरांचे मूळ गाव. तिथूनच त्यांच्या घरून शेवाळकरांकडे साहित्याचा वसा आणि वारसा आला. त्यांचे मूळचे आडनाव धर्माधिकारी. कालांतराने अचलपुरास वस्तीला आल्यावर शेवाळकर झाले. गोपिका बाळकृष्ण शेवाळकर या त्यांच्या आई. वेदशास्त्रसंपन्न रामशास्त्री शेवाळकर हे राम शेवाळकरांचे पणजोबा, बाळकृष्ण काशीनाथ ऊर्फ भाऊसाहेब शेवाळकर हे त्यांचे वडील. त्यांनी पासष्ट वर्षे कीर्तनाने लोकांना मंत्रमुग्ध केले. अशा घराण्यात जन्मल्यामुळे राम शेवाळकरांना संस्कृत साहित्याची आवड लागली. त्यांच्यावर संस्कृत महाकाव्ये, मराठी संतसाहित्याच्या माध्यमातून वाङ्मयीन संस्कार झाले. राम शेवाळकरांचा जन्म मार्च २, १९३१ रोजी महाराष्ट्रातीलअमरावती जिल्ह्यामध्ये अचलपूर गावात झाला. पुढे त्यांनी नागपूर विद्यापीठातून संस्कृत व मराठीत एम.ए. केल्यानंतर शिक्षकी पेशा स्वीकारला. वाशीम येथे शासकीय प्रशालेत ते शिक्षक होते. पुढे यवतमाळ महाविद्यालय, नांदेडातील पीपल्स कॉलेज, वणीतील लोकमान्य टिळक महाविद्यालयात त्यांनी प्राध्यापक म्हणून शिकवले. या सुमारासच त्यांनी संस्कृतीविषयक साहित्यनिर्मितीही आरंभली. १९९४ साली गोव्यात पणजी येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. मराठी साहित्य महामंडळ, विश्वकोष निर्मिती मंडळ, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, अखिल भारतीय सानेगुरूजी कथामाला, महाराष्ट्र साहित्य परिषद, साहित्य अकादमी, नाट्य परीक्षण मंडळ, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ अशा संस्थांच्या कामात शेवाळकरांचा सहभाग होता. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता ?* हॉकी 2) *भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता ?* वड 3) *भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता ?* मोर 4) *भारताचा राष्ट्रीय फळ कोणता ?* आंबा 5) *भारताचा राष्ट्रीय फुल कोणता ?* कमळ *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• • रवी कन्नावार • आकाश पाटील ढगे • गणेश पाटील हतनुरे • संतोष कदम • संभाजी सोनकांबळे • चक्रधर ढगे • शेख जुनेद • मीनाक्षी रहाणे • सुरेश मिर्जापूरे • सुबास नाटकर • धर्मगीर गिरी • नरेंद्र लखमावाड • बालाजी धारजने *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *दिखावा* दाखवण्या पुरता फक्त स्वाभिमानीबाणा आहे तसे पाहिल्यास इतिहास यांचा लाजिरवाणा आहे स्वाभिमानी असल्याचा उगीच दिखावा करतात लोकांच्या नजरेत दिखावा म्हणजे नाटक ठरतात शरद ठाकर सेलू जि परभणी ८२७५३३६६७५ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आपल्या लहानपणी मुलांचं रडणं थांबविण्यासाठी कचकडी खुळखुळा होता. तो बाळाचे रडणे थांबवून त्याला हसरा करायचा. आता त्या खुळखुळ्याची जागा मोबाइलने घेतली आहे. कचकडी खुळखुळा बाळ लहान असेपर्यंत उपयोगी होता, मात्र हा नवा खुळखुळा माणसाच्या जन्मापासून मरेपर्यंत हाती राहतोय, असं दिसतयं. कचकडी खुळखुळ्यात नाद निर्माण करणारे खडे भरलेले असायचे. मोबाइलनामक खुळखुळ्यात नादाला लावणारे अॅप्स भरलेले असतात. हा खुळखुळा व्हिडीओ गेमचा नाद लावतो. हळूहळू फोन करायला शिकवतो, व्हाॅटस् अॅप शिकवतो, आठवीला गेला की 'मिस् काॅल' देऊ लागतो. युवापिढी रात्र-रात्र जागून चॅट करू लागते.* *माणूस कमवायला लागला की, मग तोंड लपवून 'फेसबुक' वर बाता मारू लागतो. लग्न झाले की, फेक अकाउंटवरून ह्रदय आणि मन मोकळं करत राहतो. कधी लाईक, कधी कमिंट, असं व्यक्त-अव्यक्त अभासी जगात जगू लागतो. गुड माॅर्निंग, गुड इव्हिनिंग, स्वीट ड्रीम, काँग्रॅट्स करत लक्षात येतं की, हे सारं झूट ! अवतीभवती संदेश, शुभेच्छा, सहवेदनांचा पाऊस; पण प्रत्यक्ष नक्षत्र मात्र कोरडंच ! अभासी जगात वाढलेली पिढी कोरडे जग जगताना आपण अनेकदा पाहतो. खरे पाहिले तर खुळखुळा, मोबाइल हे सारे त्या त्या काळातील अभासी भावच ! माणूस भावाचा भुकेला असतो. अभासी, भोगी संस्कृतीच्या जागी वास्तव, संवेदी, जीवाभावाची संस्कृती जपायची तर प्रसंगी जीव देऊन भाव, संबंध, नाते जपणे, जोपासणे म्हणजेच खरं जगणं !!!* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• ☀☀ ☀ ☀ ☀ ☀☀☀ संजय नलावडे, चांदीवली, मुंबई         9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••     धरती करते एक पग, करते समुद्रा फाल हातों पर्वत तौलते,  ते भी खाये काल  । सारांश        जगी ज्याचा जन्म झाला .त्याला मृत्यूने गिळंकृत केले आहे. हे महात्मा कबीर आपल्या  उपदेशपर अमृतवचनातून माया मोहाच्या बंधनात गुरफटलेल्या मानव प्राण्यास मृत्यूची जाणीव करून देताना सांगतात. वामनाची महत्ती सांगताना पुराण कर्त्यानं लिहून ठेवलंय की वामनानं एकाच पावलात संपूर्ण पृथ्वी व्यापून टाकली. हनुमानाने जन्मत:च एका उड्डाणात सूर्याला जेरीला आणले. सृष्टीच ज्याच्यावर अवलंबून आहे. त्यालाच गिळंकृत करायला निघाल्यामुळे, आता आपलं कसं होणार ? म्हणून सूर्य हनुमानापुढे निस्तेज पडला. आता आपलं कसं होणार म्हणून सर्वजण काळजीत पडले. याच हनुमानाने एकाच उड्डाणात समुद्र  ओलांडला.  कृष्णाने एका  हाताने गोवर्धन पर्वत तोलून  धरला आणि सृष्टीला वाचविले. अशा महा पराक्रमी वीरांनाही काळाने सोडलेले नाही.  तिथं सामान्य जीवांचं काय चालणार आहे !      नको नको मना गुंतू मायाजाळी, काळ आला जवळी ग्रासावया । काळाची ही उडी पावेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा मायबाप ।  या तुकोबांच्या ओळी किती समर्पक आहेत . जीवनात मृत्यू हे अंतिम सत्य आहे . माणूस कितीही महापराक्रमी असला किवा त्याने संपूर्ण जगाला ओरबाडून संपत्तीचा मुबलक साठा केला तरी त्याचे मरण अटळ आहे. जगज्जेत्या सिकंदराचे शेवटचे बोलही याचीच प्रचिती देतात.      म्हणून माणसानं माणसासारखं वागून मानव जन्म सार्थक करावा. जीवनात समाधान प्राप्त करावं . कोण जाणे कोणत्या क्षणी आपल्याला काळाचं बोलावणं येईल आणि आपली खेळी संपुष्टात येईल !     एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• रंग कितीही वेगवेगळ्या प्रकारचे असले तरी रंगांना कधीच भेदभाव,जातियता, प्रांतियता किंवा विषमता नाही.त्यांना कुठेही कॅनव्हासवर,कागदावर किंवा भिंतीवर वापरा कधीच काही म्हणत नाहीत.कितीही आणि कुठेही वापरले किंवा मिसळले तरी त्यांच्या वेगवेगळ्या छटा सौंदर्यात भर टाकतात आणि पाहणा-याच्या दृष्टीत अगदी सहज भरुन जातात. पाहाराही थक्क होऊन जातो तो विचार करायला लागतो की, वेगवेगळे असूनही एकात्मतेचे दर्शन घडवतात हे त्यांच्याकडून खरेच शिकायला हवे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        *🎡 मनाचे श्लोक 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• दिनानात हा राम कोदंडधारी। पुढें देखतां काळ पोटीं थरारी॥ मना वाक्य नेमस्त हे सत्य मानीं। नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥२८॥ संकलन : सौ. सुभद्रा सानप, बीड •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *चांगल्या विचाराची जोपासना* दोन साधू नदीच्या काठी आपले हात पाय धुवत होते. तेव्हा त्यांना एक विंचू बूडत असताना त्यांना दिसला. त्या साधूंपैकी एकाने लगेच त्याला ओंजळीत घेवून बाहेर काढले. पण त्याच वेळी त्या साधुला विंचुने डंक मारला आणि विंचु परत नदीत पडला. परंतु साधूने परत त्याला उचलुन घेतले तरी परत त्या विंचूने साधूला डंक मारला. हे बघुन दुसऱ्या साधूने त्या साधूला विचारले तो विंचू तुम्हाला सारखा डंक मारतो पण तुम्ही परत त्याला वाचवता का? त्यावर त्या साधूने अतिशय चांगले उत्तर दिले, 'डंक मारने हा त्याचा नैसर्गिक गुण आहे पण त्याला वाचविणे हा माझा नैसर्गिक गुण आहे'.. *लोक कितीही तुम्हाला त्रास देवो तुमचे चांगले कार्य मात्र सतत चालू ठेवा. काही क्षुल्लक लोकांसाठी तुमचे विचार कधीही बदलू नका.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

*अभिनंदन* अभिनंदन करीत आहे सारे भारतभूमीचा वीर सुपुञा.... धडाडीचे कार्य करून परतलास तू मायदेशी असा वीर जन्मलास तू भारत मातेचा उदराशी अभिनंदन करीत आहे सारे भारतभुमीचा विर सुपूञा...... लाख मानावे तुझे आभार तरीही नाही फिटणार भार अशी विरता तुझी अपार मातृभूमीसाठी तू लढणार अभिनंदन तुझे करीत आहे सारे भारतभूमीचा वीर सूपूञा....... अभिनंदनास अभिनंदनाचा अर्पूया वर्षाव शब्दसुमनांचा अभिमान वाटावे असे वागणे आहे तुझे शौर्य आणि विरतेचे अभिनंदन तुझे करीत आहे सारे भारतभूमीचा विर सुपूञा........ धन्य धन्य ती माता धन्य धन्य तो पिता असा पुञ जन्मला धाडसास तुझ्या वंदन करीतो शतशः अभिनंदन तुझे करित आहे सारे भारतभूमीचा सुपूञा...... 🙏🙏🙏🙏🙏🙏 ✍©श्रीमती प्रमिला सेनकुडे. ता.हदगाव जिल्हा नांदेड. 〰〰〰〰〰〰

*खातरजमा* खातरजमा करूनच करावे सर्व कामे जीवनातील मार्ग होतील सरळ आणि सोपे 〰〰〰〰〰〰 प्रमिला सेनकुडे

माझा परिचय *नावः श्रीमती प्रमिला कुंडलीक सेनकुडे (शिंदे)* *पदः सहशिक्षिका* *सध्या कार्यरत शाळाः जि.प.गोजेगाव ता.हदगाव जिल्हा नांदेड.* शिक्षणः B.A.(Ded ) छंद व आवडः सामाजिक कार्याची आवड, संघटणात्मक कार्याची आवड, (काव्य , चारोळी, लेख) लिखाणाचीआवड, शैक्षणिक विविध नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्याची आवड.वाचनाची आवड. *प्रकाशित काव्यसंग्रह: 'वास्तव.......एक सत्य'* तसेच काव्यप्रेमी शिक्षकमंच दिवाळी अंक, आम्ही काव्यस्तंभ विशेषांकात प्रसिद्ध कविता. *भुषवित असलेले पदः* १) म.रा.प्रा.शिक्षक महिला आघाडी संघ जिल्हासरचिटणीस नांदेड. २) रोटरी क्लब सदस्या हदगाव. ३) काव्यप्रेमी शिक्षकमंच नांदेड जिल्हाउपाध्यक्षा ४) जिजाऊ ब्रिगेड तालुका हदगाव कार्याध्यक्षापदी 〰〰〰〰〰〰〰 *मिळालेले पुरस्कार व* *सन्मानः* १) प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम शिक्षणाची वारी सन्मानपञ २) आई गौरव पुरस्कार (होप सामाजिक संस्था उमरखेड) ३) हदगाव तालुकास्तरीय 'गुणी' शिक्षक गौरव पुरस्कार ४)'गौरव कर्तृत्वाचा' (कै.देवराव प्रभुजी पाटील सेवाभावी संस्था शाखा वाटेगाव.) ५) 'गौरव गुणवंताचा' पुरस्कार (सहकारी पतपेढी शिक्षण विभाग मर्यादित जिल्हा परिषद नांदेड.) ६) मुलींची १००% पटनोंदणी पुरस्कार (प,स.हदगाव) ७) कुसुमताई चव्हाण 'महिला भूषण' पुरस्कार नांदेड ८) म.अॕ.पॕनल(MAP) तर्फे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार (नाशीक) ९) रोटरी क्लब, हदगाव तर्फे (Nation Builder Award) १०) गुरुकुल महाराष्ट्र समूहातर्फे गौरव चिन्ह ११) मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था नागपूर तर्फे राज्यस्तरीय काव्य पुरस्कार १२) 'आम्ही सावित्रीचा लेकी' पुरस्कार (राज्यस्तरीय उपक्रमशिल शिक्षिका समूह) १३) अखिल.म.प्रा.शिक्षक संघ ता.हदगाव गौरव समारंभ सन्मान. १४) स्वामी विवेकानंद शिक्षक पतसंस्था हदगाव/हिमायतनगर तर्फे सतत दोनवेळेस सत्कार व सन्मानचिन्ह (२०१७ व २०१८ ला) १५) मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था नागपूर तर्फे 'गुरू गौरव' पुरस्कार १६) 'आस शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना' तर्फे ' राज्यस्तरीय अध्यापक पुरस्कार' १७) छञपती शिवाजी राजे प्रतिष्ठाण नांदेड चा वतीने श्री गुरूगोविंदजी प्रेरणा पुरस्कार १८) विविध स्पर्धांची आॕनलाइन सन्मानपञे. 〰〰〰〰〰〰〰(02-03-2019)शुक्रवार

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00           ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 01/03/2019 वार - शुक्रवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १९४६ - बँक ऑफ इंग्लंडचे राष्ट्रीयकरण. १९४८-गुवाहाटी उच्च न्यायालयाची स्थापना. १९६१- अमेरिकेत शांतीदलाची स्थापना १९६२ - अमेरिकन एरलाइन्स फ्लाइट १ हे विमान न्यूयॉर्कजवळ कोसळले. १९९८-एकूण १अब्ज डॉलर पेक्षा जास्त कमाई करणारा टायटॅनिक हा पहिला चित्रपट झाला. 💥 जन्म :- १९३०-उद्योगपती राम प्रसाद गोयंका १९४२-रिचर्ड्स मायर्स,अमेरिकन सेनापती १९६८ - सलिल अंकोला, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- १९८९-वसंतदादा पाटील,महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री १९९१-एडविन लँड, अमेरिकन संशोधक २००३ - गौरी देशपांडे, मराठी लेखिका. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *भारतीय वायुदलाचे विंग कमांडर अभिनंदन यांची आज सुटका करणार - पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मुंबई : शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू झाली असून पहिल्या टप्प्यात १०,००१ जागा भरण्यासंदर्भात पवित्र वेब पोर्टलवर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *मुंबई : पुलवामा हल्ल्यानंतर देशात हाय अलर्ट जारी करण्यात आल्याने मुंबईतही सर्व महत्त्वपूर्ण स्थळांवरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *दिल्ली- परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कॉर्पोरेशनच्या परिषदेसाठी यूएईला रवाना* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *आजपासून दहावीच्या परीक्षेला प्रारंभ, मागील वर्षीपेक्षा यंदा राज्य माध्यमिक मंडळातर्फे इयत्ता 10 वीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या तब्बल 50 हजाराने कमी झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *सुरक्षा यंत्रणेवर अतिरिक्त ताण येऊ नये यासाठी अधिवेशन स्थगित करत आहोत - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धा : मुंबईचे बिरु बिंद, प्रथमेश नाडकर, मृणाल झारेकर अंतिम फेरीत* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *परीक्षार्थीना शुभेच्छा.....!* https://b.sharechat.com/aivK3qKgGU स्तंभलेखक नासा येवतीकर •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        *गौरी देशपांडे* गौरी देशपांडे यांचा जन्म ११ फेब्रुवारी १९४२ रोजी झाला.  या मराठीतील लेखिका होत्या. कथा, कादंबरी, ललित लेख, स्फुट लेखन, ललितेतर लेखन, भाषांतर, कविता, संशोधन यासारखे बहुतांशी सगळे साहित्यप्रकार गौरी देशपांडे यांनी हाताळले आहेत. मराठीबरोबरच त्यांचे बरेचसे इंग्रजी लिखाण तसेच काही इंग्रजी -मराठी व मराठी- इंग्रजी अनुवाद सुद्धा प्रकाशित झाले आहेत. प्रसिद्ध लेखिका, संशोधक इरावती कर्वे या गौरी देशपांडे यांच्या मातोश्री होत. दिनकर धोंडो ऊर्फ डी. डी. कर्वे हे त्यांचे वडील. जाई निंबकर या इंग्रजी व मराठीतील लेखिका त्यांच्या थोरल्या भगिनी. प्रसिद्ध समाजसुधारक व स्त्री-स्वातंत्र्याचे जनक महर्षी धोंडो केशव कर्वे हे डी. डी. कर्वे यांचे वडील व गौरी देशपांडे यांचे आजोबा होते. ’समाजस्वास्थ्य’ या लैंगिक शिक्षण देणार्‍या स्वातंत्र्यपूर्व काळातील मासिकाचे संपादक र. धों. कर्वे हे गौरी देशपांडे यांचे सख्खे काका. गौरी देशपांडे यांचे पुण्यातच प्रामुख्याने वास्तव्य राहिले आहे. काही काळ मुंबई, बऱ्याचशा परदेशवाऱ्या व विंचुर्णी, तालुका- फलटण येथेही त्यांचे वास्तव्य होते. दिनांक ०१ मार्च २००३ मध्ये त्यांचे निधन झाले.       *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्ञान हाच सर्व सामाजिक व राजकीय क्रांतीचा पाया आहे. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *भारताचे राष्ट्रपती कोण आहेत ?* मा.रामनाथ कोविद 2) *भारतातील एकूण राज्य किती ?* 29 राज्य 3) *भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते ?* राजस्थान 4) *भारतातील सर्वात लहान राज्य कोणते ?* गोवा 5) *भारताचे उपराष्ट्रपती कोण आहेत ?* मा.वैंकैय्या नायडू *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• •  अमोल अलगुडे •  साहेबराव बोणे •  राहुल मॅडमवार •  राजेश्वर बालकोंडवार •  संतोष चिद्रावार •  प्रभाकर गोरे •  आशा तेलंगे •  विक्रम अडसूळ •  नरेश बकवाड •  साहेबराव गुंजाळ •  साईप्रसाद ढेले •  सखाराम देवरे •  नरेश सुरकूटवार *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कानकोंडे* चांगल्याला चांगले वाईटाला वाईट भेटतात लुबाडलेली सारे आपसात वाटतात वाटून खाल्ले की दोघेही कानकोंडे होतात एकमेक पुढे शेपटी खाली घालून राहतात शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *निराशावादी लोक टोकाचा नकारात्मक विचार करतात. छोट्या संकटाला आकाश कोसळले समजले जाणारे भित्र्या सशासारखे असतात. झाडाचं पान पडलं तरी आकाश कोसळल्याच्या भ्रमाने जीव मुठीत घेऊन पळतात. हताश, निराश, उदास माणसं स्वत: निष्क्रिय होतात व दुस-याला काळजीच्या दरीत लोटत राहतात. अशांना सहानुभूती देण्यापेक्षा धैर्य देणं महत्वाचं. उलटपक्षी वस्तुनिष्ठ माणसं ! 'जीवन त्यांना कळले हो' पठडीतील असतात. ती आशेने हुरळत नाहीत नि निराशेने हताश होत नाहीत. ती व्यक्तिगत भावभावनांच्या कल्लोळात स्वत:स ना विसर्जित करतात, ना हारतात. 'अत दीप भव' म्हणत ती स्वत: अंधा-या वाटेवर पणतीच्या उजेडात चालतात. त्यांच्या हातातल्या मेणबत्तीची मशाल कधी झाली हे त्यांचे त्यांनाही कळत नाही.* *अशी माणसं सतत अंतर्मुख होऊन सिंहावलोकन करत विहंगमावलोकनाने नवी स्वप्न कवटाळत ती सत्यात उतरवत राहतात. ते पूर्वग्रहदूषित असत नाहीत नि दुस-यावर विसंबतही नाहीत. वास्तवाचं भान हा त्यांच्या जगण्याचा आधार असतो. भावनेपेक्षा तर्कावर जगणारी ही माणसं खाली जमीन न वर आकाशाचं भान ठेवून जीवन घडवतात. 'मी' आणि 'तू' याच्या पलिकडे आपण असा सामूहिक सद्-भाव व सभ्यता जोपासणारी ही तटस्थ माणसं. त्यांच्या वेदना नि संवेदना दोन्ही क्षितिजे विश्वव्यापी. अशा माणसांना मग दगडातल्या देवापेक्षा माणसातली माणुसकी महत्वाची वाटते. 'जे जे आपणांसी ठावे, ते ते इतरांसी सांगावे, शहाणे करूनि सोडावे सकलजन' असा त्यांचा सार्वजनिक सत्यधर्म असतो.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼🌸 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई         9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••     पर नारी पैनी छुरी,  मति कौई करो प्रसंग रावन के दश शीश गये, पर नारी के संग। सारांश       पर नारी तीक्ष्ण धार असणार्‍या सुरीसारखी असते. तिच्या सोबत संगती करता कामा नये. तिच्या सोबत संग करणे तर  दुरच राहिले. परनारीचा मनात निर्माण विचारही माणसाची शांती व समाधान हिरावून घेतो. आमचं लोकबोलीचं धन म्हणजे संस्काराचा ठेवाच आहे. जात्यावरच्या ओव्या मधून सुद्धा संस्काराचं दर्शन घडतं. घरची अस्तुरी जसा हळदीचा गाभा पराया नारीसाठी रहातो वळचणीला उभा ।        पोथी पुराणांमधून परनारीचा मोह बाळगणार्‍यांची काय अवस्था होते, याचे दाखले  वाचायला मिळतात. महारती लंकाधीश राजा रावनाने मंदोदरी सारखी पतिव्रता पत्नी असताना परनारीचा मोह केला. सीता पळवून नेली गेली. सीतेचा शोध घेताना क्रोधीत हनुमानाकडून लंका दहन केली जाणे, राजा रावणाचीच दाडी जाळली जाणे. यातूनही सावध न होण्यामुळे  रामायण घडले . क्षुल्लक कुंभकर्णासारखा बलशाली भाऊ, इंद्रजितासारखा कुशल मुलगा मारल्या गेला. मोहापायी राज्य बुडालं सेना मारल्या गेली. रावणाची दहाही शीरं उडवल्या गेली. परनारीच्या नादात अख्ख्पा साम्राज्याचा विनाश झाला.  तिथं सामान्य माणसाचं काय होईल ? याची कल्पनाच न केलेली बरी.     एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• इतरांना त्रास देऊन जर आपण आपले जीवन चांगल्याप्रकारे जगू म्हटले तर ते अयोग्यच आहे.कारण त्यांनी परिश्रमातून जे काही मिळवलेले असते ते गुण्यागोविंदाने जगण्याचे स्वप्न साकारत असतात.हे त्यांचे बघवत नाही आणि आपल्याने होत नाही म्हणून इतरांना त्रास देऊन त्यांचे सुख हिरावून घेणे हे वामवृत्तीचे लक्षणच म्हणावे. त्यामध्ये आपण सुखी होऊ शकतो का ? आपल्या बाबतीत इतरांनी असे केले तर आपणास कसे वाटेल ? ते आपल्या मनाला समाधान देते का ? ह्या सा-या गोष्टीचा आपण विचार केला तर नक्कीच त्याचे उत्तर सापडेल आणि पुन्हा आपण ती चूक करणार नाही याची नक्कीच जाणीव झाल्याशिवाय राहत नाही. इतरांच्याही सुखस्वप्नात आपणही सहभागी व्हावे हाच आपला माणुसकीचा खरा धर्म आहे. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        *🎡 मनाचे श्लोक 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• भवाच्या भये काय भीतोस लंडी। धरीं रे मना धीर धाकासि सांडी॥ रघूनायकासारिखा स्वामि शीरीं। नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी॥२७॥ संकलन : सौ. सुभद्रा सानप, बीड •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *विस्टन चर्चिल* लहानपणी विन्स्टन एकदा विहिरीत पडला. त्याने ‘वाचवा वाचवा’ असा धावा केला. एका शेतकर्‍याने त्याला विहिरीतून बाहेर काढले आणि त्याचा जीव वाचवला. एका अपघातातून आपण वाचलो म्हणून त्याने नि:श्‍वास तर टाकला, पण त्याला विहिरीतील जीव वाचवण्यासाठीची धडपड सदैव लक्षात राहिली. आयुष्यभर यशाशी संघर्ष करताना वडिलांनी शिकवलेले तत्त्व आठवायचे. त्या वेळेस विन्स्टनने मनोमन आपल्या वडिलांचे आभार मानले, कारण त्याच्या वडिलांनी त्याला एक अविरत प्रयत्न करण्याचे व कधीही माघार न घेण्याचे तत्त्व शिकवले होते. ते त्याला नेहमी आपल्या राजवाड्यासमोरील राजहंस दाखवायचे आणि म्हणायचे- ‘‘हा राजहंस पाण्यावर शांतपणे तरंगताना दिसतो. पण तेव्हाच तो पाण्याखाली तितक्याच जलद गतीने पायांची हालचाल करत असतो. लोकांना वरवर शांत दिसणारा राजहंस पाण्याखाली एखाद्या यंत्राप्रमाणे झपाटल्यासारखा काम करतो. तूही असाच झंझावात हो. जनसमुदायाला तू वरून जरी शांत दिसलास तरी त्यांच्या अपरोक्ष वादळासारखं काम करत राहा. आतून पेटून ऊठ आणि कार्याला लाग.’’  पुढे जीवनात अविरत काम करण्याचे तत्त्व बाळगल्यामुळे विन्स्टन चर्चिल इंग्लंडचे पंतप्रधान झाले. एकदा त्यांना ऑक्सफर्ड विद्यापिठात पदवीप्रदान सोहळ्यासाठी निमंत्रित केले होते. जेव्हा त्यांना व्यासपिठावर भाषणासाठी बोलावले तेव्हा ते त्या जनसमुदायासमोर ३० सेकंद नि:शब्द उभे राहिले. सभागृहात एकच शांतता पसरली. नेहमी उत्कृष्ट भाषण देणारे व्यक्तिमत्त्व बोलत का नाही, असा प्रश्‍न सर्वांना पडला. तितक्यात विन्स्टन चर्चिलच्या तोंडातून शब्द बाहेर पडले- ‘‘माघार घेऊ नका. कधीही माघार घेऊ नका.’’ त्यांनी भाषणाला सुरुवात करताच प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. तेव्हा ते पुन्हा ३० सेकंदांसाठी नि:शब्द झाले आणि पुन्हा उद्गारले- ‘‘माघार घेऊ नका, कधीही माघार घेऊ नका.’’ क्षणभर त्यांनी सर्व प्रेक्षकांवर एक कटाक्ष टाकला. सर्वांशी ते नजरेने बोलले आणि धन्यवाद म्हणून त्यांनी व्यासपीठ सोडले. लोकांनी उभे राहून टाळ्यांच्या गजरात त्यांचे अभिनंदन केले आणि एका महान नेत्याचे सर्वात लहान, पण अत्यंत प्रभावी भाषण म्हणून या भाषणाचा उल्लेख केला जातो. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00           ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 28/02/2019 वार - गुरूवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *राष्ट्रीय विज्ञान दिन* 💥 ठळक घडामोडी :- १९२८: डॉ. सी. व्ही. रामन यांनी भौतिकशास्त्रातील लावलेल्या शोधला रामन इफेक्ट असे नाव देण्यात आले. यामुळे हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणुन साजरा करण्यात येतो. 💥 जन्म :- १९२७: भारताचे १० वे उपराष्ट्रपती कृष्णकांत  १९४७ - दिग्विजय सिंघ १९४७ - विजय बहुगुणा १९५१ - करसन घावरी, भारतीय क्रिकेट खेळाडू. १९६९ - यू. श्रीनिवास, मेंडोलिन वादक १९७१ - परमजीत सिंघ, भारतीय खेळाडू 💥 मृत्यू :- १९३६: पं. जवाहरलाल नेहरू यांच्या पत्‍नी कमला नेहरू १९६३: भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेन्द्र प्रसाद २००६- ओवेन चेंबेरलेन ,नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावाबद्दल ब्रिटिश पंतप्रधान थेरेसा मे यांनी व्यक्त केली चिंता* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *नवी दिल्ली - भारत आणि पाकिस्तामधील तणावामुळे दोन्ही देशांच्या हवाई हद्दीतून होणारी आंतरराष्ट्रीय वाहतूक झाली प्रभावीत* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *नवी दिल्ली - भारताचा एक पायलट पाकिस्तानच्या ताब्यात, भारताने पाकिस्तानला दिले पुलवामा हल्ल्याचे पुरावे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *नाशिक : औरंगाबाद येथील पोलीस अधीक्षक आरती सिंग यांची नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *अहमदनगर : गावात दारूमुळे असुरक्षिततेची भावना आहे. गावे स्वच्छ व पाणीदार होतील. पण गावे संस्कारक्षम होण्याची गरज - पोपटराव पवार यांचे प्रतिपादन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *१९ हजार कोटी तुटीचा राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत केलेसादर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *बंगळुरु, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : ग्लेन मॅक्सवेलच्या धडाकेबाज नाबाद शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या ट्वेन्टी-20 सामन्यात सात विकेट्स राखून मिळविला विजय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *मतदार जागृती आवश्यक* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/02/blog-post_11.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••           *राष्ट्रीय विज्ञान दिवस*      नोबेल पारितोषिक हा जगातला सर्वात प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे. रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, साहित्य, जागतिक शांतता, वैद्यकशास्त्र किंवा जीवशास्त्र आणि अर्थशास्त्र या क्षेत्रातल्या अतुलनीय कामगिरीसाठी किंवा संशोधनासाठी प्रतिवर्षी हा पुरस्कार दिला जातो. सी. व्ही. रामन हे भारतीय भौतिकशास्त्रज्ञ होते. त्यांचं पूर्ण नाव चंद्रशेखर वेंकट रामन असं होतं. १९३० मध्ये त्यांना भौतिकशास्त्राचं नोबेल पारितोषिक मिळालं होतं. शिवाय १९५४ मध्ये भारतरत्न आणि १९५७ मध्ये त्यांना लेनिन शांतता हा पुरस्कारही देण्यात आला होता. सी. व्ही. रामन यांचा जन्म तिरुचिरापल्ली येथे सात नोव्हेंबर १८८८ रोजी झाला. त्यांचं शिक्षण चेन्नईला झालं. १९१७ ते १९३३ पर्यंत त्यांनी भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केलं. त्यानंतर १९४७ साली ते रामन संशोधन संस्थेचे संचालक झाले. रामन परिणाम (प्रकाशाचे मॉलिक्युलर स्कॅचरिंग) यासाठी ते ओळखले जाऊ लागले. चंद्रशेखर वेंकट रामन यांच्या सन्मानार्थ भारतात दरवर्षी २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो.  *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जितके निरीक्षण सुक्ष्म, तितकी समजूत अधिक, म्हणून जास्त सखोल आणि अचूक विचार करा. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *1) भारताची राजधानी कोणती ?*       दिल्ली *2) भारताची आर्थिक राजधानी कोणती ?*       मुंबई *3) भारताचे पंतप्रधान कोण आहेत ?*        नरेंद्र मोदी *4) भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते ?*       पं. जवाहरलाल नेहरू *5) भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते ?*       डॉ. राजेंद्र प्रसाद *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• •  साईनाथ सुरेश येवतीकर •  राजेश्वर भंडारे •  आनंद आनेमवाड •  मारुती पाटील •  प्रशांत चिखलीकर •  शंकर गर्दसवार •  श्रीकांत आदमवाड •  निर्मला सोनी •  मुरलीधर राजूरकर •  संदीप नागला •  अशोक होवाल •  मारोती पाटील •  सुनील कोल्हे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जशास तसे इट का जवाब पत्थर आहे जशास तसे चोख उत्तर आहे ही वेळच आहे जशास तसे उत्तर देण्याची गरज नाही कोणापुढे आता नतमस्तक होण्याची   शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मानवी जीवन हे सुखदु:खाच्या वाटेवरूनच पुढे जात असतं. जीवन पटाचं वस्त्र सुख दु:खाच्या धाग्यांनी तयार होत असतं. ते सुंदर जरतारी व्हावं, असं वाटणं स्वभावधर्मच आहे. दु:खाचा सल जाणवल्याशिवाय सुखाचं मोल कळत नाही. तरूणपणी स्वत:च्या सौंदर्याची जाण झाल्यामुळे आपण तारूण्याच्या धुंदीत सौंदर्याचा, सुखाचा आनंद उपभोगतो.* *हे सुख शाश्वत नसतं. वय आपलं काम करतच असतं. जीवनाचं अखेरचं पर्व, वृद्धावस्था सुरू झाली की, या गोष्टीत आनंद मिळत नाही. आपल्या मायेच्या  माणसांनी प्रेमाचं, आपुलकीचं वस्त्र आपल्या अंगावर घालावं असं वाटतं. अशा त-हेने बालपण, तरूणपण व वृद्धावस्था हे जीवनपटाचं तीन अंकी वस्त्र विणलं जातं. आपल्या वाटेला येणारं सुखदु:खाचं वस्त्र जरतारी मानून जीवन व्यतीत करणं हेच आपल्या हातात असतं.*             ••●‼  *रामकृष्णहरी*  ‼●•• ☀☀☀☀☀☀☀☀☀ संजय नलावडे, चांदीवली, मुंबई         9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• दूजा हैं तो बोलिये,  दूजा झगड़ा सोहि दो अंधों के नाच मे,  का पै काको मोहि। सारांश         विधाता निर्गुण  निराकार आहे. तो सर्व विश्व व्यापून उरलेला आहे. तरी त्याची विभिन्न मुर्त रूपे उभी करून एकमेकात  विनाकारणंच भांडून घेणार्‍यास उद्देशून महात्मा कबीर म्हणतात परमात्मा वेगवेगळा असता तर तुमचं म्हणणं मान्य केलं असतं. माझाच देव श्रेष्ठ आहे व इत्तरांचा चुकीचा आहे असे माणण्यातच तर भांडणाचं मुळ दडलेलं आहे. तेच  भांडणाला कारण ठरतं. दोन अंधांच्या नाचण्यावर कोण अांधळा कोणत्या कारणाने  त्या अंधावर मुग्ध किवा  प्रसन्न होईल ?       लिळाचरित्रात आंधळ्यांचा दृष्टांत सांगितलेला आहे. एका गावात सहा आंधळे असतात. त्यागावी एक हत्ती येतो. आंधळ्यांना हत्ती पाहाता येत नाही. प्रत्येक आंधळा आपआपल्या परीने हत्तीला चाचपून घेतो. त्यांना झालेल्या स्पर्श ज्ञानावरून ते हत्तीच्या रूपाचं वर्णन करायला लागतात. ज्याच्या हाती कान लागला, तो हत्ती सुपासारखा असल्याचे सांगतो. ज्याने सोंड चाचपली, तो हत्ती मुसळासारखा आहे म्हणतो. ज्याने पाय चाचपले, तो हत्ती खांबासारखा असल्याचे सांगतो. ज्याचा स्पर्श हत्तीच्या पोटाला झाला, त्याचे म्हणणे असते हत्ती पोत्यासारखा आहे. ज्याने पाठ चाचपून घेतली, तो हत्ती भिंतीसारखा असल्याचे सांगतो. ज्याने शेपटीला स्पर्शलेले असते, त्याला हत्ती खराटा म्हणजे झाडूसारखा भासतो. शेजारीच त्यांचा संवाद ऐकणारा एक डोळस असतो. त्याने पूर्ण हत्ती पाहिलेला असतो. तो संवाद ऐकून म्हणतो, तुम्ही तर फक्त हत्तीच्या अवयवांनाच हत्ती समजत आहात . प्रत्यक्षात हत्ती तर महाकाय आहे.        तसं विधात्याचं स्वरूपही विश्वात्मक आहे.तो सर्वव्यापी आहे. त्याला जाणण्याची आत्मदृष्टी जवळ असायला हवी. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• शिक्षणामुळे केवळ माणूस शहाणा होत नाही तर त्याच्यामध्ये असणारा अज्ञानपणा,अयोग्य दिशेने जाणारे पाऊल,आपल्यात असलेला कमीपणा दूर करण्याचा मार्ग आणि जीवनात कसे जगायचे याचे शास्त्रशुध्द ज्ञान शिक्षणामुळे मिळते.तसेच सुखी व समृद्ध जीवन म्हणजे काय याबद्दलचीही जाणीव शिक्षणामुळे मिळते.म्हणून शिक्षणाचा खरा मार्ग आपल्या जीवनासाठी आपल्या प्रगतीचे केंद्र मानून स्वीकारणे काळाची गरज आहे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        *🎡 मनाचे श्लोक 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• देहेरक्षणाकारणें यत्न केला। परी शेवटीं काळ घेउन गेला॥ करीं रे मना भक्ति या राघवाची। पुढें अंतरीं सोडिं चिंता भवाची॥२६॥ संकलन : सौ. सुभद्रा सानप, बीड •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••          *गरुड व घुबड* एक गरुड आणि घुबड फार दिवस एकमेकांशी भांडत असत. परंतु एक दिवस, त्यांनी एकमेकांशी मैत्रीने वागण्याचे ठरविले, तसेच एकमेकांची पिल्ले खाऊ नये असेही ठरवले. तेव्हा घुबड गरुडाला म्हणाले, 'मित्रा ! परंतु, माझी पिल्लं कशी आहेत ते तुला माहित आहे का ? नाहीतर दुसर्‍याचीच आहेत असे म्हणून तू त्यांना खाऊन टाकशील.' गरुड म्हणाला, 'माझी पिल्लं खूप सुंदर आहेत. त्यांचे डोळे, पिसं, आवाज सगळंच खूप सुंदर आहे. आता येईल ना तुला ओळखता ?' पुढे एके दिवशी, झाडाच्या ढोलीत गरुडाला घुबडाची पिल्ले सापडली. ती पाहून तो म्हणाला, 'किती घाणेरडी आणि कुरूप पिल्लं आहेत ही. घुबडाची पिल्लं तर खूप सुंदर आहेत. म्हणजे ही काही घुबडाची पिल्लं नसणार. यांना मारून टाकावं. असे म्हणून त्याने सगळ्या पिलांचा फडशा उडवला. नंतर घुबडाने येऊन पाहिले तो ढोलीत पिल्ले नाहीत. ते गरुडास म्हणाले, 'मित्रा, तूच माझी पिल्लं खाल्लीस.' गरुड म्हणाला, ' हो, मी खाल्ली; पण मला काय माहीत की ही कुरूप पिल्लं तुझी आहेत म्हणून ? तू तर म्हणालास की, माझी पिल्लं खूप सुंदर आहेत. मला वाटलं ती दुसर्‍याच पक्ष्याची आहेत. आता यात माझी काय चूक ? तात्पर्य - स्वतःची खरी माहिती लपवून खोटी माहिती सांगितली असता मनुष्य संकटात सापडतो. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

*थोरवी माय मराठीची* 📚📚📚📚📚📚 माय मराठीचा महिमा आहे अपार माय मराठी तुझ्यातच आहे जीवनाचे सारं माय मराठीचा बोलीत आहे किती गोडी शब्दाशब्दात दडली आत्मसन्मानाची गुढी माय मराठीने दिला थोरामोठ्यांना मान इथले सैनिक देतात देशासाठी हो प्राण राबराब राबून बळीराजा करतो जीवाचे रान इथेच दिला जातो आईवडिलास मान नामदेव माऊली तुकोबां जनाई यांची अभंगवाणी संभाजी शिवरायांचे पोवाडे इथेच गुंजती शूर वीरांची गाणी अनेक भिन्न रूपे तुझी चांदया पासून बांदया पर्यंत बदलती ही बोली खेड्या पासून शहरापर्यंत मातृभाषेचा घेऊनी ध्यास जागवूया मनामनात आत्मविश्वास मातृभाषेचा करूया विकास हाच एक ध्यास अन् हीच मनी असे आस कितीकिती गाऊ मी माय मराठीचे गुणगाण माय मराठीच आहे शान हाच आहे सार्थ अभिमान अनेक अलंकाराणी सजविले तुला समृध्द व्याकरणी सुंदर अलंकृत तुज सम नाही दुसरी भाषा कुणी माय मराठीचा साहित्यास नाही जगात हो तोड कितीही शोधले तरी नाही दुसरी या परी जोड अमृताहूनी गोड असे माय मराठी आमुची तुझ्याच परंपरेची, संस्कृतीची गाऊ गाणी सह्याद्रीची आकाशाचा करुनी कागद सागराची करूनही शाई माय मराठी तुझी थोरवी लिहण्यास पुरत नाही. *जागतिक मराठी राजभाषा दिनाच्या सर्वांना हार्दीक शुभेच्छा* 💐💐📚📚💐💐 *〰〰〰〰〰〰* *✍ ©प्रमिला सेनकुडे* ता.हदगाव जिल्हा नांदेड *〰〰〰〰〰〰〰*

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00           ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 27/02/2019 वार - बुधवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जागतिक मराठी राजभाषा दिन* 💥 ठळक घडामोडी :- *जागतिक नाट्य दिन* २००२ - गुजरातच्या गोधरा रेल्वे स्थानकात साबरमती एक्सप्रेसला आग लावण्यात आली. ५८ हिंदू यात्रेकरू ठार. या घटनेचा सूड म्हणून उसळलेल्या जातीय दंग्यांमध्ये १,००० हून अधिक व्यक्तींचे प्राण गेले. 💥 जन्म :- १९१२ - कुसुमाग्रज, मराठी कवी, नाटककार. वि. वा. शिरवाडकर 💥 मृत्यू :- १८८७ - आनंदीबाई गोपाळराव जोशी, भारतातील पहिल्या महिला डॉक्टर. १९५६-भारतीय वकील व राजकारणी गणेश वासुदेव मावळणकर *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *पाकिस्तान विरोधात भारताची मोठी कारवाई, सैन्याने 1000 किलोचा बॉम्ब फेकला, पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त, भारतीय हवाई दलाची कामगिरी; सुत्रांची माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *जैश ए मोहम्मद, लष्कर ए तोयबा आणि हजबूल या दहशतवादी संघटनांचं कंबरडं मोडलं तब्बल 21 मिनिटे भारतीय हवाई दलाकडून बॉम्बचा वर्षाव* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *भारत हा मजबूत देश आहे. मुंबईत नेहमी हाय अलर्ट असतो. जी काळजी घ्यायची ती घेत आहोत. सर्व यंत्रणांचे लक्ष आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *मराठा क्रांती ठोक मोर्चाचे आझाद मैदान येथे गाजर दाखवा आंदोलन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *आता मतदान केल्याची खातरजमा करणे शक्य, ईव्हीएमसोबत व्हीव्हीपॅट मशिनची सोय : निवडणूक आयोगाकडून व्यवस्थेची पाहणी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *कर्णबधिर विद्यार्थ्यांचा आक्रोश अखेर सरकारला ऐकू आला!, पुण्यात झालेल्या लाठीमाराच्या चौकशीचे आदेश : काही मागण्यांची केली पूर्तता, नोकरीतही प्राधान्य देणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *बेंगळुरू : आज आॅस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात भारत मालिका बरोबरीत सोडविण्याच्या निर्धाराने उतरेल. भारतीय संघ दोन सामन्यांच्या मालिकेत १-० ने पिछाडीवर आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जागतिक मराठी राजभाषा दिवस *मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व* https://nasayeotikar.blogspot.com/2019/02/blog-post_26.html वरील लिंक वर लेख वाचल्यानंतर आपल्या प्रतिक्रिया जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       वि. वा. शिरवाडकर* विष्णु वामन शिरवाडकर,(२७ फेब्रुवारी, १९१२-१० मार्च १९९९) हे मराठी भाषेतील अग्रगण्य  कवी,  लेखक,  नाटककार कथाकार व समीक्षक होते. त्यांनी कुसुमाग्रज या टोपणनावाने कवितालेखन केले. ते आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे मराठीतले महत्त्वाचे लेखक मानले जातात. शिरवाडकरांचे वर्णन सरस्वतीच्या मंदिरातील देदीप्यमान रत्‍न असे करतात. वि.स. खांडेकर यांच्यानंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे साहित्यिक होते. त्यांचा जन्म दिवस (२७ फेब्रुवारी) हा मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. मराठी आभिरुचीवर चार दशकांपेक्षा अधिक काळ प्रभाव गाजविणारे श्रेष्ठ प्रतिभावंत कवी, नाटककार, कथाकार, कादंबरीकार, लघुनिबंधकार व आस्वादक समीक्षक. प्रामाणिक सामाजिक आस्था, क्रांतीकारक वृत्ती आणि शब्दकलेवरचे प्रभुत्व ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये आहेत. त्यांच्यातल्या सखोल सहानुभूतीने त्यांना समाजाच्या सर्व थरांतील वास्तवाला भिडण्यासाठी आणि पौराणिक आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांमधील मानवी वृत्तीचा शोध घेण्यासाठी प्रवृत्त केले. त्यांच्यातल्या शोधक आणि चिकित्सक स्वभावाने त्यांना प्रत्यक्ष ईश्वरासंबंधी प्रश्न उपस्थित करायला आणि माणसाच्या समग्रतेचे आकलन करायला प्रवृत्त केले. त्यांचे समृद्ध आणि प्रगल्भ व्यक्तिमत्त्व वैविध्यपूर्ण आणि प्रसन्न रूपात त्यांच्या साहित्यात प्रतिबिंबित झाले आहे.       *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जशी रत्ने बाहेरुन चमक दाखवितात, तशी पुस्तके ही आतून अंतःकरण उजळवितात. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *1) महाराष्ट्राचा राज्यफुल कोणता ?*        ताम्हण *2) महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती ?*        पुणे *3) महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी कोणती ?*        कोल्हापूर *4) महाराष्ट्रात एकूण प्रशासकीय विभाग किती ?*       6 *5) भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर कोणते ?*       मुंबई *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• •  श्यामल पाटील •  गंगाधर मुटे •  साई पांचाळ •  साईनाथ मिरदोडे •  राजेश सब्बनवार •  उत्तम गवळे •  सोनाली सुरज मद्दलवार *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *लबाडाची मैत्री* स्वार्थासाठी लबाड लबाडांशी मैत्री करतात गरज पडेल तोवर एकमेकाचे पाय धरतात गरज संपली की एकमेकांचे पाय ओढू लागतात स्वार्थ संपताच छोट्या-मोठ्या कुरापती काढतात   शरद ठाकर सेलू जि परभणी दि.१८:०२:२०१९ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *"सहजीवन म्हणजे काय? खरंच काय लिहायचं सहजीवनाबद्दल? आणि कोणा-कोणाबद्दल लिहायचं? फक्त पती आणि पत्नीचंच सहजीवन असतं का? आई-वडील, बहीण, भाऊ, काका, मामा, आत्या यांच्याबरोबर घालवलेले लहानपणीचे सोन्यासारखे दिवस हे सहजीवन नाही का ? मला तरी एकाबरोबर घालवलेलं ते सहजीवन असं मर्यादित स्वरूपात नाही मांडता येणार. ज्या ज्या माणसांनी मला भले आणि बुरेही अनुभव देऊ केले त्या सगळ्यांबरोबर जीवन जगलो ते सहजीवनच वाटतं.’’सहजीवन म्हणजे नेमकं काय? बरोबर राहणं की जोडीनं राहणं? एकत्र एका घरात राहणं की कुठेही असलं तरी जवळ असल्याची भावना वारंवार उचंबळून येणं? माणूस कंपू करून, टोळी बनवून किंवा गर्दी करून राहतो त्याला सहजीवन म्हणायचं की प्राणी एकत्र कळपानं किंवा झुंडीनं राहतात त्याला सहजीवन म्हणायचं?* *आजकालच्या धकाधकीच्या आणि न संपणाऱ्या प्रवासानंतर घरी जाऊन बोलायला वेळ नाही म्हणून एकमेकांशी दूरध्वनीवरून किंवा संदेश पाठवून सगळ्या भावना व्यक्त करतो त्याला सहजीवन म्हणायचं? काहीच कळत नाही, की काही कळून घ्यायचं नाही आणि जोपर्यंत काही होत नाही, घडत नाही तोपर्यंत आपलं मस्त चाललंय.. म्हणून खोटय़ा निर्धास्त भावनेनं आला दिवस गेल्या दिवसापेक्षा बरा निघेल म्हणून एकाच छपराखाली राहायचं, त्याला कुटुंब असं नाव द्यायचं आणि जगण्याचं एक चोवीस तास चालणारं आणि हमखास बेरंग करणारं नाटक आपण प्रमुख पात्र म्हणून अभिनय करून पुढे चालू ठेवायचं?* *"कोणत्याही दोन नात्यांमधील सहजीवन हे व्यवहारीक असू शकते तसेच भावनिक सुध्दा असू शकते परंतु एखाद्या पती-पत्नीचे सहजीवन हे भावनिकच असावयास हवे अन्यथा तेथे राग, द्वेष, तिरस्कार, घृणा, मत्सर हे जरूर असणार जे त्या सहजीवनाला सुरुंग लावल्याशिवाय राहणार नाही ...म्हणूनच पती-पत्नीच्या सहजीवनाला वेगळा अर्थ आहे."* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई         9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••     आतम अनुभव जब भयो, तब नहि हर्श विशाद चितरा दीप सम ह्बै रहै, तजि करि बाद-विवाद। सारांश      जेव्हा हृदयात परमात्म्याची अनुभूती होते तेव्हा सर्व सुख-दु:ख विषयक वाद आपोआप नाहीसे होतात. सुख आणि दु:ख हे केवळ मानवी मनाचे खेळ आहेत. मानवी मनाच्या प्रवृत्तीनुसार सुख- दु:खाच्या भावना निर्माण होत असतात. माणसाचे मन शांत व स्थिर असेल तर समाधानाची भावना वाढीस लागते. मनाची बेचैनी अस्थिरता निर्माण करते. मन शांती नाहीशी होते. व त्यातून आपल्याकडे काहीतरी नसल्याची मनाला टोचणी लागते. ही अवस्था म्हणजेच दु:ख. स्थिर मनोवस्थेतला माणूस अर्धवट अवस्थेतल्या प्याल्याकडे अर्धा भरलेला आहे म्हणून सकारात्मकतेने पाहतो. त्याला त्यात समाधानाची प्राप्ती होते. उर्वरित अर्धा प्याला भरण्यासाठी तो आनंदाने सामोरा जातो. ही समाधानावस्था जगणं सुसह्य करते. याउलट असमाधानी माणूस हावरटासारखा त्या प्याल्याकडे अर्धा रिकामा असल्याची खंत मनी घेवून मनाला आणखी अस्थिर करून टाकतो. त्याचा अधाशी दृष्टीकोनच त्याच्या जगण्यातील आनंद नाहिसा करतो. जीवनाकडे उदासीनतेने पाहिले की नैराश्य पदरी पडतं. सुख आणि दु:ख जीवन मार्गातले चढ उतार आहेत. उल्हसित मनानं पुढं सरकत राहिलं की ती लिलय्या पार होतात. ही अनुभूती घेवून पुढं जाता आलं पाहिजे. स्वत:च्या ठायी असणारा ठाम आत्मविश्वासंच आपल्या जगण्याला सुंदर आकार देत असतो.       आत्मविश्वास असणार्‍या माणसाचं जीवन नंदा दीपासारखं अखंडितपणे  तेवतं असतं. विधायक वृत्ती अंगिकारली की त्याचे जीवन विषयक विचार सत्याला नाकारत नाहीत.  मनाची दोलायमान अवस्था नाहिशी होवून जाते. सत्य, शिव, व सुंदराची अनुभूती येवू लागते.     एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ईश्वराच्या नामस्मरणाने आपल्या चलबिचल झालेल्या मनाला स्थैर्य लाभते आणि नित्य चांगल्या कामामध्ये हात गुंतून राहिले तर तन आणि मन समाधानी होते.या दोन्ही मधून माणसाला सुखाने जीवन जगण्याचा खरा मार्ग सापडतो. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        *🎡 मनाचे श्लोक 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• मना वीट मानूं नको बोलण्याचा। पुढें मागुता राम जोडेल कैंचा॥ सुखाची घडी लोटतां सूख आहे। पुढें सर्व जाईल कांही न राहे॥२५॥ संकलन : सौ. सुभद्रा सानप, बीड •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••          *विश्वासाचा सुगंध* चित्तरंजन हे अतिशय हुशार परंतु कट्टर नास्तिक गृहस्थ म्हणून सर्वजण त्यांना ओळखत. म्हणूनच सहदेव महाराजांच्या कीर्तनाला त्यांना आलेले पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. सहदेव महाराज तर धर्माची, ईश्वराच्या अस्तित्वाची महती सांगणारे. आणि अशा धार्मिक विषयाशी संबंधित कार्यक्रमाला चित्तरंजन कसे काय आले ? हे कसे काय शक्य आहे ? म्हणून सर्वत्र मित्र काहीसे अचंबितच झाले. त्यांच्यापैकी एकाला न राहवल्याने त्याने अखेर चित्तरंजन यांना विचारलेच, '' भक्तिमार्गाची प्रवचने, कीर्तने ऐकायला जाणे आपल्याला पटते का ? आपल्या तत्त्वात ते बसते का ? नसेल तर आज येथे येण्याचे कारण काय ?'' चित्तरंजन म्हणाले, '' त्याचे असे आहे की, सहदेव महाराज आपल्या प्रवचनात जे सांगतात, त्यावर माझा मुळीच विश्वास नाही. परंतु आपण जे जे बोलतो, त्यावर महाराजांचा दृढ विश्वास आहे. आणि ज्याचा स्वतःच्या बोलण्यावर दृढ विश्वास आहे, अशा व्यक्तीचे बोलणे समजून घ्यायला मला आवडते.'' *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00           ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 26/02/2019 वार - मंगळवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *विनायक दामोदर सावरकर पुण्यतिथी* 💥 ठळक घडामोडी :- २००१- तालिबान ने बमयन (अफगाणिस्तान) येथे दोन विशाल बुद्ध प्रतिमांना विस्फोटकाद्वारे नष्ट केले. २०१०- अफगाणिस्तान येथील आतंकवादी हल्ल्यात ९ भारतीय नागरिक मारले गेले. 💥 जन्म :- १९०८-लीला मुजुमदार ,बांग्ला साहित्यकार. १९२८-एरियल शेरॉन, इसरायली प्रधानमंत्री. १९८२- ना ली ,महिला टेनिस खेळाडू. 💥 मृत्यू :- १९६६ - विनायक दामोदर सावरकर, भारतीय क्रांतिकारी, मराठी लेखक, कवि. २००४ - शंकरराव चव्हाण, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *50 वर्षांसाठी देशातील 5 मोठ्या विमानतळांचं कंत्राट अदानी समूहाला* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *91 व्या ऑस्कर पुरस्कारांची घोषणा; रेजिना किंगला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *मुंबई - देशातील पहिले पोलीस साहित्य संमेलन मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे मोठ्या दिमाखात पार पडले. जेष्ठ साहित्यिक अशोक बागवे यांनी पोलिसांचे केले कौतुक* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *पुणे- मूकबधिरांवरील लाठीमार प्रकरणी उद्यापर्यंत अहवाल सादर करा; मुख्यमंत्र्यांचे पुणे पोलीस आयुक्तांना आदेश* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *यावर्षी देशातील मान्सून सामान्य राहील, तसेच दुष्काळही पडणार नाही, असा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांची नाशिकला बदली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣*मुंबई : इंग्लंडविरुद्धच्या ट्वेन्टी-20 मालिकेसाठी भारतीय महिला संघाची करण्यात आली निवड, भारताच्या कर्णधारपदी महाराष्ट्राच्या स्मृती मानधाचे नाव घोषित* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/02/09.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••            *शंकरराव चव्हाण*           डाॅ.शंकरराव भाऊराव चव्हाण हे महाराष्ट्राचे चाैथे मुख्यमंत्री आणि भारत सरकारचे केंद्रीय मंत्री होते. त्यांचा जन्म शेतकरी कुटूंबात पैठण येथे झाला. प्राथमिक शिक्षण पैठण येथे घेऊन पुढे उस्मानिया (हैदराबाद) विद्यापीठातून ते बी.ए., एल् .एल्. बी. झाले. 1945 मध्ये त्यांनी वकिलाची सनद मिळवली. पण स्वामी रामानंद तीर्थ यांच्या सल्ल्याने ते हैदराबाद मुक्तिसंग्रामात सहभागी झाले. उमरखेड हे गाव त्यांच्या कार्याचे केंद्र होते. 13 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद संस्थान भारतात सामील झाले आणि शंकररावांच्या कर्तुत्वाचे एक पर्व पूर्ण झाले.1948-49 मध्ये नांदेड जिल्हा काँग्रेसचे ते सरचिटणीस झाले. 1952 च्या निवडणुकीत पराभव होऊनही ते खचले नाहीत. त्यांनी नांदेड नगरपालिकेत, सहकारी क्षेत्रात व कामगारवर्गात कार्य केले. नांदेडचे नगराध्यक्ष (1956), नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेचे अध्यक्ष आणि हैदराबाद राज्य सहकारी बँकेचे संचालक इ. विविध पदे त्यानी भूषविली. 1956 मध्ये मराठवाडा महाराष्ट्रात समाविष्ट झाला, त्यावेळी शंकररावांना मंत्रिमंडळात उपमंत्रिपद मिळाले. पुढे 1960 मध्ये पाटबंधारे व वीज खात्याचे ते मंत्री झाले आणि नंतर 1972 पासून फेब्रूवारी 1975 पर्यंत ते कृषिमंत्री होते. 21 फेब्रूवारी 1975 रोजी ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. पाटबंधारे मंत्री महणून त्यांनी भरीव कामगिरी केली. कृष्णा-गोदावरी पाणी तंटयात त्यांची भूमिका वाखाणण्यासारखी आहे. गोदावरी, पूर्णा आणि मांजरा या धरणांमुळे मराठवाडयाचा विकास झाला. जायकवाडी धरण हे शंकररावजींच्याच प्रयत्नांचे मोठे फळ आहे. कोणताही राजकीय प्रश्न ते समजुतीने सोडवीत. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा मे 1975 मधील संप ज्या पद्धतीने त्यांनी हाताळला, त्यावरून हे सिद्ध होते. ते रामानंदतीर्थ व गोविंद श्रॉफ यांना राजकीय गुरू मानत. मितभाषी व कर्तव्यदक्ष प्रशासक आणि अभ्यासू वृत्ती हे त्यांचे गुणविशेष. २६ फेब्रुवारी २००४ रोजी त्यांचे निधन झाले  *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जन्मभर संपत्तीच्या मागे लागलेला माणूस संसारातलं सुख, शांती हरवून बसतो. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *1) 'ऑरेंज सिटी' असे कोणत्या शहराला म्हणतात ?*       नागपूर *2) 'विद्येचे माहेरघर' असे कोणत्या शहराला म्हणतात ?*       पुणे *3) महाराष्ट्राला किती किमी लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे ?*       720 Km *4) महाराष्ट्रात एकूण विधानसभा सदस्य किती ?*       288 *5) महाराष्ट्रात एकूण विधानपरिषद सदस्य किती ?*        78 *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा, जि. गोंदिया 📱9765943144              •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• • नारायण मुदगलवाड • घनश्याम बोऱ्हाडे • निलेश जोंधळे • विलासराज भद्रे • प्रदीप तळणीकर • योगेश दरबस्तेवार • शैलेश फडसे • शंकर पवार • कपिल मनूरकर • अरुण टिरके *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       आदर जो लोकांची कधीच कदर करत नाही त्याचा जगात कोणी आदर करत नाही दुसऱ्याचा आदर करतो त्याला आदर मिळतो दुसऱ्याविषयी आदर नाही त्याची कोण कदर करतो   शरद ठाकर सेलू जि.परभणी ८२७५३३६६७५ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *तारूण्य आणि संगत यांचे महत्व विशद करताना जैन मुनीं तरूण सागर महाराज सांगतात, 'आपले मित्र, चित्र आंणि चरित्र नेहमी पवित्र ठेवा; कारण तेच खरे जीवनाचे अस्त्र आहे. तुम्हाला तर हे माहित आहे की., चारित्र्याचे पतन होण्यासाठी बहुधा चुकीचे मित्र आणि चुकीचे चित्र यांचाच हात असतो. चुकीचे मित्र आणि चुकीचे चित्र हेच चारित्र्य नष्ट करण्याचे शस्त्र आहे किंवा असेही म्हणता येईल की, कधीही न चुकणारे ब्रम्हास्त्र आहे.' तारुण्याच्या सळसळत्या उर्जेवर स्वार्थी व्यवस्थांचा डोळा असतो. त्यामुळेच तारूण्याची ऊर्जा सैरभैर करून तिला आपल्या इच्छेप्रमाणे वापरण्याचे धूर्त राजकारण या स्वार्थी व्यवस्था करत असतात. तारुण्याच्या ऐन उमेदीचा कालखंड निरर्थकपणे या स्वार्थी व्यवस्थेच्या नेतृत्वामागे घालविला जातो.* *एखादी पाण्याची बाटली वापरून फेकून द्यावी, त्या पद्धतीने तरुणांच्या ऊर्जेचा वापर करून त्यांना शेवटी फेकून दिले जाते. सर्व बाजूंनी निष्क्रिय केलेल्या तरूणांवर शेवटी पश्चात्तापाची वेळ येते. तारूण्याचे रखरखीत वाळवंट होते. आपले तारूण्य विवेकशून्य व्यवस्थेच्या हाती द्यायचे की, स्वत:वर विश्वास ठेवत स्वकर्तृत्वाच्या बळावर समाज जीवनात उजळवून टाकायचे हे ज्याला समजले, त्याला तारुण्याचा खरा अर्थ कळला. माजी राष्ट्रपती डाॅ. ए.पी.जे. अब्दुल कलाम हे युवकांना देशाची संपत्ती म्हणायचे, ही संपत्ती देशासाठी आपत्ती ठरू नये म्हणून तरूणांनी आपले मित्र विचारपूर्वक निवडावेत.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई         9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      प्रेमभाव  एक  चाहिए , भेष  अनेक  बनाय  | चाहे  घर  में  वास  कर , चाहे  बन  को  जाए  ||   अर्थ        मानवाचा धर्म मानवता . मानवता जपायची तर मानवाच्या अंतरात प्रेमभावनेचे अधिष्ठान महत्वाचे आहे. त्या शिवाय मानवता व मानव्य कसं प्रवाहित होणार ?  भौगोलिक व भौतिक परिस्थितीशी समायोजन साधण्यासाठी भिन्न वेष परिधान करा .   विभिन्र प्रकारच्या (उपलब्धतेनुसार महालापासून झोपडीपर्यंत) वास्तूत  किवा वनात वास्तव्य करा ते परिस्थितीनुरूप स्वाभाविक आहे. परंतु त्यात अवडंबर असता कामा नये. सत्य  व प्रेमभाव हाच खर्‍या जीवनाचा मुलाधार आहे. त्यामुळे जीवनाची गोडी व सुंदरता वाढते  म्हणून माणसाने  अशाश्वत अवडंबराच्या व बुवाबाजीच्या नादी लागून जगण्याला  विनाकारणच अंधानुकरणी व भंपक बणवू नये . ते मानवतेला पूरक असू शकत नाही.     एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जेव्हा एकाच बिंदूतून कितीतरी रेषा काढलेल्या आपण पाहिलेल्या आहेत तरीही त्या एकमेकांना एकाच बिंदूत छेदून पुढे सरळ मार्गाने निघून जातात आणि त्याच रेषा परत एकाच बिंदूत एकत्रीत येऊन मिळतानाही पाहिले आहे.असा जर आपण विचार केला तर आपले हृदय आणि मनही एकच आहे.आपणच आपल्या हृदयातून आणि मनातून अनेक माणसांना जोडण्याचे काम करत असतो.त्यात काहींना काही कारणाने जवळ करतो तर काही माणसे आपल्यापासूनच जवळ येऊन दूर जातात.जे दूर जातात त्यांचा विचार करु नका,कारण त्यांना स्वातंत्र्य आहे.परंतु जी माणसे तुमच्याजवळ येण्याचा प्रयत्न करतात त्यांना दूर करुन नका कारण त्यांना तुमचे मन आणि हृदय कळलेले असते.कारण तुम्ही त्यांचे केंद्रस्थानी बिंदूस्थानी आहात.तुम्हीच त्यांचे आधारही आहात आणि त्यांची प्रेरणाही आहात.सा-यांना जवळ करण्याचे बिंदूसारखेच काम करायला शिकले पाहिजे तरच जीवन समृद्ध होईल. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०./८०८७९१७०६३. 🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        *🎡 मनाचे श्लोक 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• रघुनायकावीण वांया शिणावे। जनासारिखे व्यर्थ कां वोसणावें॥ सदा सर्वदा नाम वाचे वसो दे। अहंता मनी पापिणी ते नसो दे॥२४॥ संकलन : सौ. सुभद्रा सानप, बीड •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *खंबीरतेने जगणे* (दोन मित्रातील संवाद) कोंबडीचे अंडे आणि घराच्या बांधकामासाठी वापरण्यात येणारी विट यांच्यात एका बाबतीत साम्य आहे ते कोणत्या बाबतीत आहे ? जरा ओळखुन दाखव!” एका मित्राने दुसऱ्या मित्राच्या समोर टाकलेले कोडे ...... मित्राला विचारचक्रात अडकवुन स्वतः मात्र पसार झाला. मी विचार करु लागलो, “बांधकामाची विट आणि कोंबडीचे अंडे यात काय साम्य असणार?” खुप विचार करुनही उत्तर न सापडल्यामुळे शेवटी शेजारी सुरु असलेल्या बांधकामावरुन दोन विटा आणि बाजारातुन अर्धा डझन अंडी घेउन घरी आलो. खूप निरीक्षण केले पण उत्तर सापडले नाही. दुसऱ्या दिवशी तोच मित्र पुन्हा माझ्याकडे आला आणि म्हणाला “काय सापडले काय उत्तर?” मी नकारार्थी मान हलविली आणि “आता तुच काय ते साम्य दाखवं!” असे म्हणुन ती अंडी आणि विटा त्याच्यापुढे ठेवल्या. मित्राने हातात अंडे घेतले. ते उभे ठेवले आणि दाबले, पण ते फ़ुटले नाही . मग त्याने अंड्याला आडवे केले आणि दाबले, ते चटकन फुटले. मग त्याने दोन फ़ुटावरुन हातात उभी धरलेली विट खाली सोडली, विटेला काहीच झाले नाही. नंतर तेवढ्याच अंतरावरुन त्याने आडवी धरुन विट खाली सोडली, आता मात्र विट फुटली. मित्र माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला “विट आणि अंडे उभे असेपर्यंत फ़ुटत नाही, आडवे होताच फ़ुटते. हे त्या दोघांमधील साम्य. माणुस त्या विट किंवा अंड्यासारखाच तो जोपर्यंत खंबीरपणे उभा आहे, सजग आहे, तो पर्यंत कोणीच त्याचे भवितव्य बिघडवू शकत नाही. पण जर का तो सुस्तावला, जरा आडवा झाला, की त्याचे भवितव्य फ़ुटण्याची शक्यता बळावते." खंबिरपणे उभे राहा. जग तुमचे काही बिघडवू शकत नाही. "ज्याच्यात हिंमत आहे त्यालाच जगात किंमत आहे." *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00           ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 25/02/2019 वार - सोमवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- २००६ - या दिवशी जगाची लोकसंख्या अंदाजे ६.५ अब्ज झाली. 💥 जन्म :- १८९४ - मेहेर बाबा, भारतीय तत्त्वज्ञ. १९४८ - डॅनी डेंझोग्पा, हिंदी चित्रपटअभिनेता. १९७४- दिव्या भारती चित्रपट अभिनेत्री १९८१ - शाहिद कपूर, हिंदी चित्रपटअभिनेता. 💥 मृत्यू :- १८८६- नर्मद ( नर्मदा शंकर दवे)    गुजराती कवी,विद्वान *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफ जवानांच्या वारसांना सरकारी नोकरी देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *सर्वसामान्यांना दिलासा; बांधकाम सुरू असलेल्या घरांचा जीएसटी १२ वरून ५ टक्के* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *आरटीईअंतर्गत प्रवेश प्रक्रिया जाहीर वेळापत्रकानुसार सुरु करण्यास शिक्षण विभागाला अपयश, 25 फेब्रुवारी ऐवजी 05 मार्च पासून प्रवेश प्रक्रिया होणार सुरू* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *यवतमाळ : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून दोन कोटी रुपये खात्यात जमा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *प्रयागराजः त्रिवेणी संगमावर स्नान करायला मिळणं आणि पूजन करायला मिळणं, हे माझं सौभाग्य - नरेंद्र मोदी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *16 वर्षीय सौरभ चौधरीचा नेमबाजी वर्ल्ड कपमध्ये विक्रमासह सुवर्णपदक, टोकियो ऑलिम्पिकचे तिकीट पटकावलं* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारत वि. ऑस्ट्रेलिया पहिल्या टी-20च्या रोमहर्षक सामन्यात भारताचा तीन विकेटने पराभव* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••     *सर सलामत तो ......* https://nasayeotikar.blogspot.com/2019/02/blog-post_24.html *स्तंभलेखक नासा येवतीकर* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        *वसंतदादा पाटील*           वसंतराव बंडूजी पाटील महाराष्ट्र राज्याचे पाचवे मुख्यमंत्री. वसंतदादांचा जन्म कोल्हापूर येथे झाला. ते पदमाळे, जिल्हा सांगली येथील शेतकरी कुटुंबातील आहेत. वडील बंडूजी व आई रुक्मिणीबाई. दादांचे शिक्षण जेमतेम सातवीपयर्ंत झाले. १९३७ मध्ये वसंतदादांनी राजकारणात प्रवेश केला. १९४0 मध्ये महात्मा गांधींनी वैयक्तिक सत्याग्रहाचा आदेश दिला. त्यात दादांनी भाग घेतला. त्यांना सहा महिन्यांची शिक्षा झाली. १९४२ च्या 'छोडो भारत' आंदोलनातही ते सहभागी झाले. ब्रिटीश सरकारने पकड वॉरंट काढून त्यांना पकडण्यासाठी एक हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले. अखेर दादा पकडले गेले; दोन वर्षांची शिक्षा झाली; परंतु त्याच दिवशी ते तुरुंगातून पोलिसांच्या बंदुका घेऊन आपल्या काही सहकार्‍यांसह पळून गेले. त्यांना पुन्हा पकडण्यात आले आणि एकूण तेरा वर्षे सर्शम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. १९४६ मध्ये त्यांची मुदतपूर्व मुक्तता झाली. १९५२ मध्ये ते विधानसभेवर निवडून आले. १९६७ पर्यंत ते आमदार होते. १९४८ मध्ये त्यांनी सांगलीला शेतकरी सहकारी साखर कारखाना काढला. त्यानंतर त्यांनी सहकारी तत्त्वावर सूतगिरण्या आणि तेल गिरण्या उभारल्या. वसंतदादा पाटील ते महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष (१९६५), राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंधाचे संचालक व अध्यक्ष (१९७0-७२) व साखर निर्यात मंडळाचे अध्यक्ष (१९७0-७१) होते. याशिवाय राज्य सहकारी बँक, राष्ट्रीय मिल मजदूर संघ आदी संस्थांचेही ते अनेक वर्षे अध्यक्ष होते. माहाराष्ट्र प्रांतिक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली (१९६७). १९६९ साली काँग्रेसचे विभाजन झाले. त्याच वर्षी डिसेंबरमध्ये मुंबईला काँग्रेस अधिवेशन झाले. त्यांनी स्वागताध्यक्ष म्हणून काम केले. मार्च १९७७ मध्ये लोकसभा निवडणुकीत ४८ पैकी २0 काँग्रेस सदस्य निवडून आले. म्हणून त्यांनी पुन्हा राजकारणात प्रवेश केला. १७ एप्रिल १९७७ रोजी दादा मुख्यमंत्री झाले. मार्च १९७८ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस व इंदिरा काँग्रेस यांचे संयुक्त मंत्रिमंडळ अधिकारारूढ झाले. तथापि हे संयुक्त मंत्रिमंडळ समाधानकारक कार्य करू शकत नाही, या कारणास्तव वसंतदादांना मंत्रिमंडळ बरखास्त करण्याचा आदेश दिला. त्यानुसार त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. १ मार्च १९८९ रोजी त्यांचे निधन झाले. ावसंतराव बंडूजी पाटील महाराष्ट्र राज्याचे पाचवे मुख्यमंत्री. वसंतदादांचा जन्म कोल्हापूर येथे झाला. ते पदमाळे, जिल्हा सांगली येथील शेतकरी कुटुंबातील आहेत. वडील बंडूजी व आई रुक्मिणीबाई. दादांचे शिक्षण जेमतेम सातवीपयर्ंत झाले. १९३७ मध्ये वसंतदादांनी राजकारणात प्रवेश केला. १९४0 मध्ये महात्मा गांधींनी वैयक्तिक सत्याग्रहाचा आदेश दिला. त्यात दादांनी भाग घेतला. त्यांना सहा महिन्यांची शिक्षा झाली. १९४२ च्या 'छोडो भारत' आंदोलनातही ते सहभागी झाले. ब्रिटीश सरकारने पकड वॉरंट काढून त्यांना पकडण्यासाठी एक हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले. अखेर दादा पकडले गेले; दोन वर्षांची शिक्षा झाली; परंतु त्याच दिवशी ते तुरुंगातून पोलिसांच्या बंदुका घेऊन आपल्या काही सहकार्‍यांसह पळून गेले. त्यांना पुन्हा पकडण्यात आले आणि एकूण तेरा वर्षे सर्शम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. १९४६ मध्ये त्यांची मुदतपूर्व मुक्तता झाली. १९५२ मध्ये ते विधानसभेवर निवडून आले. १९६७ पर्यंत ते आमदार होते. १९४८ मध्ये त्यांनी सांगलीला शेतकरी सहकारी साखर कारखाना काढला. त्यानंतर त्यांनी सहकारी तत्त्वावर सूतगिरण्या आणि तेल गिरण्या उभारल्या. वसंतदादा पाटील ते महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष (१९६५), राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंधाचे संचालक व अध्यक्ष (१९७0-७२) व साखर निर्यात मंडळाचे अध्यक्ष (१९७0-७१) होते. याशिवाय राज्य सहकारी बँक, राष्ट्रीय मिल मजदूर संघ आदी संस्थांचेही ते अनेक वर्षे अध्यक्ष होते. माहाराष्ट्र प्रांतिक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली (१९६७). १९६९ साली काँग्रेसचे विभाजन झाले. त्याच वर्षी डिसेंबरमध्ये मुंबईला काँग्रेस अधिवेशन झाले. त्यांनी स्वागताध्यक्ष म्हणून काम केले. मार्च १९७७ मध्ये लोकसभा निवडणुकीत ४८ पैकी २0 काँग्रेस सदस्य निवडून आले. म्हणून त्यांनी पुन्हा राजकारणात प्रवेश केला. १७ एप्रिल १९७७ रोजी दादा मुख्यमंत्री झाले. मार्च १९७८ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस व इंदिरा काँग्रेस यांचे संयुक्त मंत्रिमंडळ अधिकारारूढ झाले. तथापि हे संयुक्त मंत्रिमंडळ समाधानकारक कार्य करू शकत नाही, या कारणास्तव वसंतदादांना मंत्रिमंडळ बरखास्त करण्याचा आदेश दिला. त्यानुसार त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. १ मार्च १९८९ रोजी त्यांचे निधन झाले.  *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• शुन्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्याच्या अंगी असते, तोच खरा कर्तृत्ववान होय. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *1) महाराष्ट्रातील संपूर्ण साक्षर जिल्हा कोणता ?*       सिंधुदुर्ग *2) महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षर जिल्हा कोणता ?*        नंदुरबार *3) महाराष्ट्रातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता ?*        मुंबई उपनगर *4) महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता ?*        नंदूरबार *5) महाराष्ट्रातील सर्वाधिक आदिवासी असलेला जिल्हा कोणता ?*       नंदूरबार *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• •  साई डिब्बेवाड •  अनुराग आठवले बारडकर •  प्रदीप वल्लेमवाड येवतीकर •  दिलीप वाघमारे •  बालाजी अगोड •  नईम सय्यद •  बालाजी चिंतावार *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••     *वास्तव* खरे बोललेले शब्द कोणालाही कडू लागतात खरे बोलणारे त्यांच्या नजरेत वाईट वागतात कडू असले तरी खरे पचवता आले पाहिजे खरे वास्तव ऐकून जागरूक झाले पाहिजे       शरद ठाकर सेलू जी परभणी ८२७५३३६६७५ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मृत्यूपूर्वी आपण आपला मृत्यूदिन जाणू शकत नाही. मरण पावल्यानंतर आपली पुण्यतिथी, आपल्याकडे पाप्याचीही मेल्यावर पापतिथी नव्हे, पुण्यतिथीच कशी पार पडेल, हा प्रश्नच अर्थशून्य आहे. आप मर गये, दुनिया डुब गयी ॥ मृत्यू झाल्यानंतर मुक्ती मिळावी अशी तीव्र इच्छा असते. मरणापूर्वी एकदातरी देवाचे दर्शन व्हावे अशी भक्तांची आंतरिक ओढ असते. परंतु संत तुकारामांप्रमाणे सदेह स्वर्गात जाण्यासाठीचा स्वर्गाचा व्हिसा इतर कुणासही लागू नाही.* *पुण्यकर्मे केल्याने मोक्ष मिळतो का? अहो, एकदाचा सोक्षमोक्ष झाल्यावर कसला मोक्ष? भक्तिभावे सतत नामस्मरण केल्यानेही मृत्यू सुखद होतो काय? नाही...! तुम्ही देवभक्त आहात की दैत्यभक्त याच्याशी मृत्यूला कर्तव्य नाही. मृत्यू स्थितप्रज्ञ आहे. पापपुण्य, सुख-दु:ख, खरे-खोटे, राव-रंक सर्व मनुष्यनिर्मित आहेत. भूकंप आस्तिक-नास्तिक पाहात नाही. सर्वांना एकाच वेळी भुईत दफन करतो. तुफान सज्जन-दुर्जन असा भेद मुळीच ठेवत नाही. मृत्यू हाच एकमेव पूर्ण आणि अंतिम सत्य आहे. पण हा मृत्यू कसा अनुभवायचा? मृत्यूचा अनुभव सांगायला मृत व्यक्ति कुठे उपलब्ध असते. परंतु मृत्यू अनुभवत मृत्यूच्या सर्वोच्च परमानंदासह विश्वरूपाशी एकरूप होता येते, संत ज्ञानेश्वर, संत विनोबा भावे, स्वा. सावरकर हे या अनुभवांसह शून्यरूप झालेत.*    ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• ☀☀🌟☀☀☀☀☀☀ संजय नलावडे, चांदीवली, मुंबई         9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• लिखा लिखि की है नाहि, देखा देखी बात दुलहा दुलहिन मिलि गये, फीकी परी बरात। सारांश       विधात्याला जाणून घ्यायचं  असेल तर केवळ पोथ्या  पुराणे वाचून तो कसा काय कळणार ? वाचन व श्रवणात माणूस परमात्म्याच्या मुळ रूपापेक्षा त्याच्या कपोल कल्पित व वर्णनातून रंगवून चढवून सांगितलेल्याच रूपाभोवती घिरट्या मारीत राहातो. पुस्तकातून रंगवलेल्या कथा ह्या विधात्याच्या थोड्याच आहेत. त्या तर मानवाच्या पूर्वजांच्या.  तत्कालीन राजा महा राजांच्या युद्ध प्रसंगाच्या , सत्ता विस्ताराच्या , अधिराज्य प्रस्थापित करण्याच्या . दोन विचार प्रवाहातील संघर्षाच्या. भावबंदकीच्या कलहाच्या . महाकाव्यातल्या पात्रांनाच माणूस देवाची रूप माणू लागला. त्यांचीच उपासना करू लागला. मुळ विश्व व्यापक परमात्मा पंच महाभुतात सामावलेला. सृष्टीचालक मुळ ईश्वर बाजुलाच राहून गेला.  मंगेश पाडगावकरांच्या गीत पंक्ती किती बोलक्या आहेत.  कुढे शोधिशी रामेश्वर अन कुठे शोधीशी काशी हृदयातील भगवंत राहिला राहिला हृदयातून उपाशी.. देव बोलतो बाळ मुखातून देव डोलतो उभ्या पिकातून कधी होवून देव भिकारी अन्नासाठी आर्त पुकारी अवतीभवती असून दिसेना शोधितोस आकाशी....      खरे तर परमात्मा ही पाहाण्याची आणि प्रत्यक्ष अनुभवण्याची बाब आहे .  जेव्हा वधू वराची एकत्र गाठ मारली जाते तेव्हा वर्‍हाडी व वरातीचं आकर्षण नाहिसं होतं तसं  ईश्वराच्या मुळ स्वरुपाशी एकरूपता साधताच वरवरच्या भाकड गोष्टींचा लेप आपोआपच गळून जातो.   एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••           पहिल्याच प्रयत्नात यश मिळावे असे वाटत असेल तर ते एखाद्यावेळी चुकीचे ठरु शकेल.परंतु सातत्याने पाठपुरावा केला तर त्यात यश खात्रीने मिळू शकते हे निश्चित. आताच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला असे वाटायला लागले आहे की,कमी वेळेत,कमी कष्टात आणि दीर्घकालीन टिकणारे यश, आर्थिक समाधान आणि प्रतिष्ठा हवी आहे.असे म्हणणे चुकीचे ठरेल.या जगात कोणत्याही जीवाला हातपाय हलवल्या शिवाय,प्रयत्न केल्याशिवाय आणि त्या प्रयत्नात सातत्य ठेवल्याशिवाय काहीही साध्य होत नाही हे निश्चित आहे.एकाच ठिकाणी बसून मनाने उंच उंच मनोरे रचून काल्पनिक सारे काही करता येतील परंतु प्रत्यक्ष जीवनात प्रयत्नाला आणि सातत्याला दुसरा पर्याय नाही. © व्यंकटेश काटकर,नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        *🎡 मनाचे श्लोक 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• न बोलें मना राघवेवीण कांहीं। जनी वाउगें बोलता सुख नाहीं॥ घडिने घडी काळ आयुष्य नेतो। देहांतीं तुला कोण सोडूं पहातो?॥२३॥ संकलन : सौ. सुभद्रा सानप, बीड •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *कर्म सिद्धांत* डोळ्यांनी झाडावरचा आंबा पाहीला आणि खाण्याची ईच्छा जागृत झाली ,डोळेतर फळ तोडू शकत नाहीत म्हणून पाय गेले फळ तोडायला ,पण जवळ पोहोचूनही पाय आंबा तोडू शकले नाहीत ,मग हात गेले आंबा तोडायला ,हाताने आंबा तोडला पण हात पाय व डोळे तो खाऊ शकले नाहीत .आंबा खाल्ला तोंडाने पण तो तोंडात राहीला नाही ,तो गेला पोटात , आता माळ्याने ते पाहीले आणि त्याने दांड्याने मार दिला पाठीवर, पाठ म्हणाली मला का मारता?मी कुठे आंबा खाल्ला ? दांड्याने मार मिळाला पण अश्रू आले डोळ्यात कारण पहीला दोष डोळ्यांचा होता ,डोळ्यानी प्रथम आंबा पाहीला होता *हाच आहे कर्म सिद्धांत.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ ✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00           ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 22/02/2019 वार - शुक्रवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १९५४- पहिली कापड गिरणी मुंबईत सुरू २००२ - एम.एच.४७-ई जातीचे हेलिकॉप्टर फिलिपाईन्सजवळ समुद्रात कोसळले. १० ठार. 💥 जन्म :- १९६३ - विजय सिंग, फिजीचा गोल्फ खेळाडू. 💥 मृत्यू :- १९२१ - सलीम अल-मुबारक अल-सबाह, कुवैतचा अमीर. १९४४ - महात्मा गांधी यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी. २००९ - डॉ.लक्ष्मण देशपांडे, मराठी लेखक, दिग्दर्शक व कलाकार. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *सोलापूर : जलयुक्त शिवार अभियानाचे केंद्रीय जल संसाधन मंत्रालयाने घोषित केले पुरस्कार, सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून सोलापूर जिल्ह्यातील महुद बुद्रुक ग्रामपंचायतीचा प्रथम क्रमांक* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *जळगाव - राहुरी कृषी विद्यापीठाचे विभाजन करून जळगावात कृषी विद्यापीठासाठी लवकरच निर्णय - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *दिल्ली- निवडणूक आयोगाकडून ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटबद्दल जनजागृती शिबिराचं आयोजन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *आंध्र प्रदेश- नेल्लोरमध्ये माजी राष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्याकडून ऑल इंडिया रेडिओच्या स्टेशनचं उद्घाटन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *मुंबई - राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा विजया राहटकर यांची निवड, त्यांचा तीन वर्षाचा कालवधी संपल्यानंतर झाली पुन्हा अध्यक्षपदी निवड* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *नवी दिल्ली - नोकरदारांना ईपीएफकडून खूशखबर, ईपीएफच्या व्याजदरात वाढ, आता ईपीएफवर 8.55 टक्क्यांऐवजी 8.65 टक्के मिळणार व्याज* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *मुंबई, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मायदेशात होणाऱ्या ट्वेंटी-20 आणि वन डे मालिकेतून कर्णधार विराट कोहली भारतीय संघात कमबॅक तर दुखापतीमुळे हार्दिक पांड्या मालिकेतून माघार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *पाप आणि पुण्य* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/02/16.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••           *कस्तुरबा गांधी*             कस्तुरबा गांधी (११ एप्रिल,१८६९ ते २२ फेब्रुवारी, १९४४) या महात्मा गांधी यांच्या पत्नी होत्या. त्यांना प्रेमाने बा असे संबोधले जायचे. गोकुळदास माखजी या पोरबंदर येथील श्रीमंत व्यापाऱ्याच्या घरी जन्मलेल्या कस्तुरबांचा विवाह मोहनदास करमचंद गांधी यांच्याशी झाला. लग्नाच्या वेळी दोघांचेही वय १३ वर्षे होते. लग्नसमयी त्या निरक्षर होत्या- त्यांना गांधीजींनी लिहावाचायला शिकवले. त्यावेळच्या स्त्रियांच्या स्थितीचा विचार करता ही एक धक्कादायक गोष्ट होती. १८८८ साली जेव्हा गांधीजी विद्याभ्यासासाठी लंडन येथे गेले, तेव्हा कस्तुरबा तान्हुल्या हरिलालचे संगोपन करण्यासाठी भारतातच राहिल्या. त्यांना आणखी तीन मुले होती- मणिलाल, रामदास आणि देवदास. १९०६ साली गांधीजींनी ब्रम्हचर्य पालनाचा निर्णय घेतला. कस्तुरबांनी या निर्णयास खंबीर साथ दिली. गांधीजींचे अनेक निर्णय त्यांना पटत नसत. एखादी कल्पना त्यांच्या गळी उतरवण्यासाठी गांधीजींना बरेच परिश्रम पडत. असे असूनही गांधीजींच्या प्रत्येक निर्णयात त्या त्यांच्याबरोबर राहिल्या. त्या खूप धार्मिक होत्या. असे असूनही, आपल्या पतीप्रमाणेच त्यांनी जातिभेदाचा त्याग केला व सर्व जातिधर्मांच्या लोकांबरोबर त्या आश्रमात राहिल्या. कस्तुरबा गांधींनी पतीच्या राजकीय कार्यात सक्रिय सहभाग घेतला. १८९७ साली त्या महात्माजींबरोबर राहण्यासाठी दक्षिण आफ्रिकेस गेल्या. १९०४-१९१२ दरम्यान त्या दरबानशहराजवळील फिनिक्स वसाहतीमध्ये समाजकार्यात मग्न होत्या. १९१३ मधील भारतीय मजुरांच्या शोषणाविरोधातील चळवळीत त्यांना ३ महिन्यांची सश्रम कारावासाची शिक्षा झाली. त्या महात्माजींच्या तुरुंगवासाच्या काळात त्यांनी भारतामध्ये चळवळीचे कार्य सांभाळले. १९१५ मध्ये गांधीजी निळीचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या सत्याग्रहासाठी जेव्हा परतले, तेव्हा कस्तुरबाही त्यांच्याबरोबर भारतात आल्या. त्यांनी या शेतकऱ्यांच्या बायका आणि मुलांना साक्षरता आणि स्वच्छतेचे धडे दिले.    *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• समाजासाठी सेवाभाव बाळगून नि:स्वार्थपणे काम करणाऱ्याच्या सेवेस सारे जग मदतीला येते. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1)  *जगातील एकूण सार्वभौम देश किती ?*       231 2)  *सजीव सर्वात प्रथम कोठे निर्माण झाले ?*       पाण्यात 3)  *महाराष्ट्रातील शैक्षणिक शहर कोणते ?*        पुणे 4)  *भारतातील सर्वात सुंदर वास्तू कोणती ?*       ताजमहल 5)   *भारतात केंद्रशासित प्रदेश किती आहेत ?*         7 *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• • शाहरुख शेख • रोहन पाटील *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मतलबी* मतलबी माणूस मुका अन् बहिरा असतो मुके बहिरेपणाचा प्रभाव त्याच्यावर गिहरा असतो मतलब दिसला की मुके बहिरेपणा येतो चांगला वाटणारा माणूस बुद्धीने सुनासुना होतो शरद ठाकर सेलू जि. परभणी •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन* ‼● ••• *आपण चंद्र सूर्य यांच्या आकाराचे चित्र पटकन काढू शकू; पण त्यांच्यातल्या प्रकाशाचे अंग, म्हणजेच त्यांचे प्राणतत्व, आपल्या हाती लागत नाही. 'प्रकाशाचे अंग' हाती यावे, अशी इच्छा बाळगणा-यांना प्रकाशाचे चटके सोसण्याची तयारी ठेवावीच लागते. प्रकाशाची संजीवकता अनुभवताना त्यातली दाहकताही अनुभवावीच लागते. कोणत्याही कलेत ' प्रकाशाचे अंग' हाती लागावे, म्हणून मोठी साधना करावी लागते. ना.ग.गोरे यांनी 'दिगंबर'  कथेमध्ये एका मूर्तिकाराच्या निर्मितीप्रक्रियेचा प्रवास रेखाटला आहे.* *कथानायक अरिशिनेमी हा एक कसबी पाथरवट असतो. त्याने अनेक मंदिरे, प्रासाद घडवलेले असतात. मात्र एकाच प्रकारच्या कामामुळे तो अस्वस्थ झालेला असतो. बारा वर्षे तो काम न करता घालवतो. नंतर जेव्हा त्याला देऊळ बांधायचे बोलावणे येते, तेव्हा ते मंदिर 'बिनखांबाचं, बिनदाराचं, बिनमंडपाचं असणार!' असं तो ठरवतो. तो खूप भटकतो. खूप मंदिरे पाहतो. तो परत येतो, तेव्हा एका प्रचंड विजेच्या लोळामुळे एक शिलाखंड उजळून निघालेला तो पाहतो. तेव्हा तो ठरवतो की मूर्तीला टेकडी हेच आसन असेल आणि दिशांचा मंडप असेल ! त्यानंतर काही काळानंतर त्याच्याकडून जगप्रसिद्ध अशी श्रवणबेळगोळ येथील गोमटेश्वराची मूर्ती उभी राहिली. या कथेतून कलावंतांच्या आयुष्यात चाकोरीबाहेरच्या निर्मितीचे बीज सुचण्याचा, स्फूर्तीचा, क्षण किती ताणलेल्या प्रतीक्षेनंतर उगवू शकतो, कलावंतासाठी अस्वस्थता हे वरदान का ठरते, हे कळते.*   ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• ⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡ संजय नलावडे, चांदीवली, मुंबई         9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••     निरजानी सो कहिये का, कहत कबीर लजाय अंधे आगे नाचते, कला अकारथ जाये। सारांश     अज्ञानाच्या आनंदाने पखाली  वाहाण्यात धन्यता मानणार्‍यांना ज्ञान कसे समजावणार ? हे अज्ञानात इतके रमलेले असतात की त्यांना सत्य, ज्ञान ही खोटे वाटायला लागते. अशा मुढमतींना समजावताना आपणावरंच पश्चातापाची वेळ येते. हे अज्ञानी जीव अंधश्रद्धेच्या इतके आहारी गेलेले असतात की, त्यांना ज्ञानाचा प्रकाश किरण दिसणेही कठीणच. कारण त्यांच्या धारणाच इतक्या कर्मट बनलेल्या असतात. की त्यांना विवेक व विचाराचं काही एक देणं घेणंच नसतं. अशा अविवेकी विचारातूनच आत्मघातकी व दहशतवादी विचारांना खतपाणी मिळतं. अशा विचारांचे अनुयायीच तर कट्टर धार्मिक दहशतवादी बनत आहेत. अन धर्म या शब्दाचीच किव यावी अशी या लोकांनी धर्मांची अवस्था करून टाकलेली आहे.     आंधळ्यासमोर कितीही सुंदर नृत्य करून काय फायदा आहे? कारण तुमच्या नृत्यातलं कसब पाहाण्याची जाणण्याची दृष्टीच त्याच्याजवळ नाही तर त्या आंधळ्याला तुमचं नृत्य कसं कळणार ?  जसा बहिर्‍यापुढे गावून उपयोग नाही, तसा आंधळ्यापुढे नाचून उपयोग होत नाही. त्यातल्या त्यात झोपीचं सोंग घेणार्‍या ढोंग्याला कितीही जागवायचा प्रयत्न केला तरी तो प्रतिसादच देत नाही. कारण तो स्वार्थासाठीच ढोंग धारण करीत असतो. अज्ञानी माणसापुढे आत्मा, परमात्मा , अध्यात्म, धर्म सांगून तो कसा काय कळणार आहे ! उपदेशासाठी सांगितलेले शब्दही विनाकारण फुकटंच वाया जाणार आहेत. अशा लोकांना उपदेश करणेही व्यर्थ आहे.     एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• एखाद्यावेळी आपल्या कल्पनेने काढलेल्या रेखाटनामध्ये रंग भरते सोपे असते.कारण त्यात स्वातंत्र्य आणि कलात्मक दृष्टीकोन असतो.परंतु जीवनात रंग भरणे अतिशय कठीण असते.त्यात जीवनाचे अनेक रंग असतात.ते रंग कुठे आणि कसे भरायचे यासाठी आपले एक विशिष्ट कसब वापरावे लागते तेही समोरची व्यक्ती पाहून.ते एकदा त्याला जमले तर जीवन सुसह्य होते नाही तर आयुष्यभर असह्य होते.तेव्हा मात्र आपले कसब वापरण्यासाठी समोरच्यांच्या भावनिकतेचा विचार करावा लागतो.मग हे जमण्यासाठी अधिक मानसिकतेचा व आपल्या बुद्धीचातुर्याचा विचार करावा लागतो.तेव्हाच  आपल्या नि इतरांच्या जीवनात रंग अधिक खुलून दिसतात व जीवन समृद्ध व्हायला मदत होते. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद..9421839590/8087917063. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        *🎡 मनाचे श्लोक 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• मना वासना चूकवीं येरझारा। मना कामना सांडी रे द्रव्यदारा॥ मना यातना थोर हे गर्भवासीं। मना सज्जना भेटवीं राघवासीं॥२१॥ संकलन : सौ. सुभद्रा सानप, बीड •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *स्वतःची चूक समजणे.* एकदा एका गावात ठिकाणी चोर्‍या खूप वाढल्या, म्हणून व्यापार्‍यांचे शिष्टमंडळ बादशहाला भेटायला गेले, आणि रात्रीच्या वेळी शिपायांची गस्त वाढवावी, अशी विनंती त्यांनी बादशहाला केली. त्यावर बादशहा म्हणाला, ''शिपायांनीच का म्हणून गस्त घालावी? उद्यापासून तुम्ही गस्त घाला आणि आमचे शिपाई तुमच्या दुकानात बसण्याचे काम करतील.'' बादशहाचा हा विचित्र हुकूम ऐकून व्यापार्‍यांनी गुपचूपपणे बिरबलाची भेट घेऊन त्याला बादशहाच्या विचित्र हुकुमाबद्दल सांगितले. या जबाबदारीतून सुटका होण्याची एक युक्ती बिरबलाने त्यांना सांगितली. बिरबलाने सांगितल्याप्रमाणे व्यापार्‍यांनी डोक्याचे पागोटे पायात घातले आणि पायातले जोडे डोक्यावर घेतले आणि 'अंगावर पडलेच आहे, तर केलेच पाहिजे,' असे म्हणत रस्त्यारस्त्यावर गस्त घालणे सुरू केले. ''आ‍पण सांगितले, तसे व्यापारी रात्री गस्त घालतात की नाही?'' हे पाहण्यासाठी बादशहा रस्त्याने फिरू लागला, तर त्याला तेथे अजबच दृश्य दिसला. त्याने काही व्यापार्‍यांना याबद्दल विचारले, ''काय हो, हे पायांतले जोडे डोक्यावर घेण्याचा आणि डोक्यावरील पगडी पायात घालण्याचा काही उपयोग आहे?'' यावर ते व्यापारी उत्तरले, '' खाविंद, ज्यांना स्वत:चे रक्षणही स्वत: करता येत नाही, त्यांच्यावर शहर-रक्षणाची जबाबदारी टाकण्याचा उपयोग काय? आणि ज्यांना व्यापार कसा करावा, याची अंधुकशीही जाणीव नाही, त्यांना दुकानात बसवून उपयोग काय? तरीही पडलंच आहे अंगावर, तर गस्त घातलीच पाहिजे, म्हणून आम्ही कसं तरी ती पार पाडीत आहोत.'' व्यापार्‍यांचे हे उत्तर ऐकून बादशहाला आपली चूक समजली व त्याने ती त्वरित दुरुस्तही केली. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00           ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 21/02/2019 वार - गुरूवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १८८५ - वॉशिंग्टन डी.सी.मध्ये वॉशिंग्टन स्मारकाचे उद्घाटन. १९९५ - अल्जीरियातील कारागृहात उठाव. ४ रक्षक व ९६ कैदी ठार. 💥 जन्म :- १८७५ - जीन काल्मेंट, हिचे मृत्युच्या वेळचे वय १२२ वर्षे व १६४ दिवस होते. हा जागतिक उच्चांक आहे. 💥 मृत्यू :- १९०१ - जॉर्ज फ्रांसिस फित्झगेराल्ड, आयरिश गणितज्ञ. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *नवी दिल्ली - भारत आणि सौदी अरेबियासोबत पाच महत्त्वपूर्ण करार, दहशतवादाविरोधात पूर्ण सहकार्य करण्याचे सौदी अरेबियाचे आश्वासन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *हेग - कुलभूषण जाधवप्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकिस्तानच्या पाचही याचिका फेटाळल्या* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *चेन्नई - तामिळनाडूमध्ये काँग्रेस आणि डीएमके आघाडीची घोषणा, काँग्रेस तामिळनाडूमध्ये 9 आणि पाँडेचेरीमधील एका जागेवर लढणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *नांदेड - शहिदांना श्रद्धांजली वाहून महाआघाडीच्या सभेला सुरुवात, शरद पवार, जोगेंद्र कवाडे, मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते होते उपस्थित* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *मुंबई : आजपासून राज्यात बारावीच्या परीक्षेला होणार सुरूवात* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *पालघरमध्ये जाणवले भूकंपाचे तीन धक्के; धक्क्यांची तीव्रता 3 रिश्टर स्केल* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *नाशिक- सार्वजनिक वाचनालयाचा प्रतिष्ठेचा कार्यक्षम आमदार पुरस्कार विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांना जाहीर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      *हम सब एक है* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/02/15.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••             *नुतन* नूतन या हिंदी सिनेमातील सर्वोत्तम अभिनेत्रींपैकी एक मानल्या जातात. त्यांच्या नितळ सौंदर्याला मिस इंडिया पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. नूतन यांचा जन्म ४ जून १९३६ रोजी एका उच्च शिक्षित कुटुंबात झाला. त्यांच्या आईचे नाव शोभना सर्मथ आणि वडिलांचे नाव कुमारसेन सर्मथ होते. आपल्या चित्रपटसृष्टीतील कारकीर्दीची सुरुवात त्यांनी १९५0 मध्ये केली जेव्हा त्या शाळेत शिकत होत्या. त्यांचा विवाह लेफ्टनंट कमाण्डर रजनीश बहल यांच्याशी १९५९ मध्ये झाला. त्यांचा पुत्र मोहनीश बहल हादेखील सिनेसृष्टीत अभिनेता म्हणून कार्यरत आहे. नूतन यांची बहीण तनुजा आणि भाची काजोलही सिनेक्षेत्रात अभिनेत्री म्हणून नावाजल्या आहेत. नूतन यांना अनेक पुरस्कार मिळाले आणि त्यांना सहा वेळा फिल्मफेअर मिळाला आहे. त्यांच्या या पुरस्काराची बरोबरी त्यांची भाची काजोल हिने केलीय हे विशेष. नूतन यांना सिनेसृष्टीतील योगदानासाठी १९७४ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• क्षमा हीच एकमेव गोष्ट या जगात आहे; जी पापाचं रुपांतर पुण्यामध्ये करु शकेल. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *1) भारतीय रिझर्व्ह बँकेचे विद्यमान गव्हर्नर कोण आहेत ?*       शक्तीकांत दास *2) जगातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात उंच शिखर कोणते ?*       कांचनगंगा *3) भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता ?*       भारतरत्न *4) राष्ट्रीय क्रीडा दिन कधी साजरा केला जातो ?*        29 ऑगस्ट *5) मानवी मेंदूचे वजन किती असते ?*       1350 ग्रॅम (1300 ते 1400  ग्रॅम) *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा जि. गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• • विशाल चव्हाण • संजय कासलोड • पियुष मुजळगे • सचिन मानधनी • एकनाथ पांचाळ • डॅनिहल ग्रॅम्हबल *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      *दुनिया* ही दुनिया मतलबी आहे वर वर छान छबी आहे छान छबी मतलबा पूरती सर्व भार साहते धरती शरद ठाकर सेलू जि.परभणी ८२७५३३६६७५ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *नातेसंबंध टिकविण्यासाठी एकमेकांना समजून घेण्याची व प्रेमाची आवश्यकता असते. संत कबीर म्हणतात-"प्रेमाची अडीच अक्षरे ज्याला कळाली तो पंडित झाला." थोडे तारतम्य बाळगले, जीवनात शिस्त व करूणा आणली, तर सर्व आवडीच्या व्यक्तींशी आनंदाने नाते फुलवता येते. हे तारतम्य सुटले, अहंभाव जागवला, एकमेकांकडे दुर्लक्ष करून स्वार्थाचाच विचार केला, तर भरल्या घरात रितेपणा येऊन अशांती येते.* *सफल प्रेम हे फळासारखे असते, ते हळूहळू पक्व होत जाते. त्यासाठी वेळ द्यावा लागतो. आई-वडील, पत्नी-मुले, भाऊ-बहीण, मित्र ही नाती जपणे व फुलवणे ही एक साधनाच असते. त्यासाठी त्यागाची गरज असते, अहंकाराला तीलांजली देऊन, स्पर्धा न करता, एकमेकांना न डिवचता, स्वातंत्र्य देत, मैत्रीचे दार उघडे ठेवले तर कुठलेही नाते अभंग राहील. म्हणून वडिलधा-यांच्या आठवणीतून घराण्याचे महाभारत ऐकावे, पत्नी नावाच्या श्रमदेवतेचे 'नवरात्रौत्सव' घरात साजरे करावे, समाजात पसायदानाच्या ओव्या कानी पडण्याकरिता प्रयत्नशील राहावे.*    ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई         9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      लकड़ी कहे लुहार की , तू मति जारे मोहि | एक दिन ऐसा होयगा , मई जरौंगी तोही || अर्थ : लोहाराचा धंदा म्हटला की भट्टी आणि भाता आलाच. कठीण वाटणार्‍या लोखंडाला आकार देण्यासाठी लोहार त्याला भट्टीत टाकतो. भट्टीत इतका गरम करतो की ते लालबुंद होवून जातं अन् त्याच्या घनाच्या/ हातोड्याच्या दणक्या सरशी पाहिजे तसा आकार घेवू लागतं. मात्र त्याच्यामागं खरं समर्पण असतं लोहाराकडच्या लाकडांचं ! जसजसा लोखंडाला ताव चढू लागतो तसं तसा लोहार चेव चढतो. भट्टीत लाकडे टाकून भात्याने वार्‍याला फुस देत लाकडांना लाल इंगळ करीत संपवून टाकतो. त्याचा जोस लाकडांचा कर्दनकाळ असतो. ते पाहून लाकूड म्हणतं की आज मी तुझा अंकित आहे. माझा तुला हवा तसा वापर करून घे. एक दिवस माझाही असेल. त्यावेळी तू निचेष्ट पडलेला असशील. त्यावेळी मी तुला असेच बेमुर्वतपणे भस्मसात करीन. त्यावेळी तुझ्या अस्तिवाच्या खुणाही मागे असणार नाहीत. तात्पर्य: कार्य कर्तृत्त्वासाठी प्रत्येकाला काळ संधी देत असतो. बलशाली माणसे कमकुवतांवर हुकूमत गाजवतात. त्या हुकूमतीला कळवळ्याचा आधार असेल तर ती हुकूमत हवीहवीशी वाटू लागते. परतु ती अतिरेकी मनमानी करणारी असेल तर एक दिवस सहज पत्त्यांचा डाव कोसळावा तशी ती कोलमडते अन अन तिच्या अस्तित्वाच्या खुणाही शेष राहात नाहीत. मगधच्या धनानंद व आॅस्ट्रियाचा राजा सोळावा लुई ही उदाहरणं पाहता सर्वकाही कळून जाते.     एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• तुम्ही करत असलेल्या एखाद्या चुकीमुळे एखाद्याचे आयुष्य खराब होऊ शकते.त्यापेक्षा एखादा सकारात्मक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेऊन चांगला किंवा बरोबर असलेला विचार समोर ठेवला तर एखाद्याचे त्याला त्याच्या जीवनात एक चूक सुधारण्याची संधी मिळवता येईल व आयुष्य ही सुंदर बनवून जगताही येईल.त्याच्या जीवनात जे काही चैतन्य निर्माण झालेले असेल ते केवळ तुमच्या एका चांगल्या विचारामुळेच. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद..9421839590/8087917063. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        *🎡 मनाचे श्लोक 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• बहू हिंपुटी होईजे मायपोटी। नको रे मना यातना तेचि मोठी॥ निरोधें पचे कोंडिले गर्भवासी। अधोमूख रे दु:ख त्या बाळकासीं ॥२०॥ संकलन : सौ. सुभद्रा सानप, बीड •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   नक्कल नाही ;अनुकरण करावे. वर्ग सातवीतला मनिष हा नकला चांगल्या करायचा .मित्रांच्या बोलण्याच्या लकबी,शिक्षकांच्या बोलण्याच्या लकबी तो सहज करत असे.शिक्षकांना त्याच्यातील हा गुण माहिती होता ,त्यामुळे त्याला शिक्षकांनी सांगितले होते की, तू नकला चांगल्या करतोस हे ठीक आहे ; पण नक्कल करण्यापेक्षा एखाद्या व्यक्तीचे अनुकरण करावे .नक्कल ह्याचा अर्थ म्हणजे एखाद्या व्यक्तीचे हुबेहूब वर्तन ,त्याचे हावभाव जसेच्या तसे व्यक्त करणे होय,पण अनुकरण म्हणजे एखाद्या व्यक्तीतील चांगले गुण स्वत: रुजवून आपला विकास करणे होय . मनिषने शिक्षकांचे हे म्हणणे काही ऐकले नाही .नक्कल करणेच त्याला योग्य वाटले .एकदा शिक्षक दिनादिवशी सगळी मूल वेगवेगळ्या वर्गात शिक्षकांचे काम करणार होते .थोडक्यात त्यांना वर्गावर शिक्षकांच्या ऐवजी शिकविण्यासाठी जायचे होते.मनिषही पाचवीच्या वर्गावर शिकवण्यासाठी गेला.त्याला वाटले आपण एखाद्या शिक्षकांची नक्कल करून तास संपवू या . फारसे अवघड काही नाही. असा विश्वास ठेवून तो वर्गावर गेला .विषयांशी निगडित असलेल्या शिक्षकांची त्याने अचूक नक्कल केली .पण शिकवतानात्याला एका विद्यार्थ्याने पाठासंबंधी प्रश्न विचारला .मनिषला केवळ नक्कलच माहित होती. विचारलेल्या प्रश्नाचे काय उत्तर द्यावे ,याचा विचारच त्याने केला नव्हता .सगळी मुले हसायला लागली त्याची थट्टा करू लागली. त्यावेळी मनिषच्या मनात एक गोष्ट पक्की रुजली की सरांनी सांगितल्याप्रमाणे नक्कल करण्यापेक्षा अनुकरण करणे अधिक फायदेशीर ठरू शकते .कारण त्यामुळेच आपल्या व्यक्तिमत्वाचा बुद्धीचा विकास होऊ शकतो .अन्यथा आपण केवळ एखाद्या व्यक्तीची नक्कल करू शकतो .पण त्या व्यक्तीसारखे श्रेष्ठ बनू शकणार नाही. तेव्हापासून मनिष चांगल्या गोष्टींचे अनुकरण करण्यावर भर देऊ लागला . *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

*✍जीवन मिलना भाग्य की बात है, मृत्यू होना समय की बात हैl पर मृत्यू के बाद भी लोंगो के दिलों में जीवित रहना ये कर्मों की बात हैl* 📚📚📚📚📚📚📚

शिवबाराजे माँसाहेब जिजाऊ शाहूंचा पूञ होता शिवा,धैर्य,शील, चारित्र्याचा समाज क्रांतीचा तोची होता छावा जातीभेद सारे तोडूनी बंधने सारे मोडूनी स्त्री सन्मानाचा करी आदर रयतेचा तो पालनहार प्रजेचा रक्षणासाठी राजे स्थापन केले स्वराज्य तुम्ही असंख्य गुणांचे धनी तुम्ही रयतेचा मनात शिवराय तुम्ही झाडे लावा झाडे वाचवा पाणी आडवा पाणी जिरवा हाच दृष्टिकोन ठेवलात रयतेचा रक्षणासाठी सदा जागृत तुम्ही राहीलात बळीराजाचे पालनकर्ते स्त्री रक्षणाचे स्तंभ तुम्ही सार्वभौमत्वाचा प्रतीचे शककर्ते तुम्ही असा राजा शिवबा आपुला किती गाऊ गुणांची गाथा चरणी ठेवूनी मस्तक आता करूया नमन जिजाऊमाता 〰〰〰〰〰〰〰 🙏जय जिजाऊ जय शिवराय🙏 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 ✍ प्रमिला सेनकुडे

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00           ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 20/02/2019 वार - बुधवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *जागतिक सामाजिक न्याय दिवस* 💥 ठळक घडामोडी :- १९१३- ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेराची स्थापना. १९८७-मिझोरम व अरुणाचल प्रदेश या राज्यांना स्वतंत्र  राज्याचा दर्जा देण्यात आला. 💥 जन्म :- १९५१- इंग्लंडचे प्रधानमंत्री गार्डन ब्राऊन 💥 मृत्यू :- १९५०- नेताजी बोस यांचे वडील बंधू बॅ शरदचंद्र बोस १९८५ - क्लॅरेन्स नॅश, अमेरिकन अभिनेता, डोनाल्ड डकचा आवाज. २००१- माजी केंद्रीय गृहमंत्री  इंद्रजित गुप्ता *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *दहशतवादाच्या मार्गावर असणाऱ्या सर्व मुलांना परत बोलवा, काश्मीरमधील पालकांना लष्कराचं आवाहन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *सौदी अरेबियाचे राजे मोहम्मद बिन सलमान नवी दिल्लीत; स्वागतासाठी पोहोचले पंतप्रधान नरेंद्र मोदी* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *तिहेरी तलाकच्या अध्यादेशाला पुन्हा मंजुरी; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *पुलवामासारखा हल्ला भविष्यात होऊ नये याची काळजी घेऊ- संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *द हेग - आंतरराष्ट्रीय कोर्टाने कुलभूषण जाधव खटला स्थगित करण्याची पाकिस्तानची मागणी फेटाळली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *केंद्रीय कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता (डीए) तीन टक्क्यांनी वाढविण्याचा मंत्रिमंडळाने घेतला निर्णय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ * आयपीएलच्या 12 व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर, गतविजेता चेन्नई सुपर किंग्स आणिरॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या सामन्याने होईल सुरुवात* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *अति क्रोध करू नये* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/02/14.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *अनंत लक्ष्मण कान्हेरे*        अनंत लक्ष्मण कान्हेरे (जन्म : आयनी मेटे, रत्‍नागिरी जिल्हा, इ.स. १८९१; मृत्यू : ठाणे, १९ एप्रिल १९१०) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक सशस्त्र क्रांतिकारक होते. ते गणेश दामोदर सावरकर आणि विनायक दामोदर सावरकरयांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या 'अभिनव भारत' या क्रांतिकारक संघटनेचे सदस्य होते. नाशिकचा कलेक्टर ए.एम.टी. जॅक्सन याची हत्या करणारे अनंत कान्हेरे हे खुदीराम बोस यांच्यानंतरचे सर्वांत तरुण वयाचे भारतीय क्रांतिकारक ठरले. सावरकर बंधू, मदनलाल धिंग्रा यांच्याकडून स्फूर्ती घेऊन अनंत कान्हेरे ह्यांनी नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याला ठार मारण्याचे ठरविले. त्याला कृष्णाजी गोपाळ कर्वे आणि विनायक नारायण देशपांडे अशा समवयस्क साथीदारांची जोड मिळाली. जॅक्सनची मुंबई येथे वरच्या पदावर बदली करण्यात आली. त्याला नाशिक येथेच मारणे जास्त सोपे होते. २१ डिसेंबर १९०९ या दिवशी नाशकातल्या विजयानंद थिएटरमध्ये 'शारदा' या नाटकाचा प्रयोग जॅक्सनच्या निरोप समारंभासाठी ठरला होता. जॅक्सन मराठी भाषेचा आणि नाटकांचा चाहता असल्याने या प्रयोगास येणार होताच. नाटकाचा प्रयोग सुरू होण्याची वेळ झाली, सर्वजण आपापल्या जागेवर स्थानापन्न होत असताना अनंत कान्हेरे ह्यांनी जॅक्सनवर पिस्तुलातून गोळ्या झाडल्या. जॅक्सन जागीच ठार झाला. अनंत कान्हेरे आपल्या जागेवरच शांतपणे उभे राहिले, त्यांना अटक करण्यात आली. कान्हेरे, कर्वे आणि देशपांडे यांच्यावर खटला भरण्यात आला. २० मार्च इ.स. १९१० रोजी तिघांनाही फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. १९ एप्रिल १९१० या दिवशी तिघांनाही ठाण्याच्या तुरुंगात फाशी देण्यात आले. ठाण्याच्या तुरुंगात अनंत कान्हेरे यांचे स्मारक आहे. नाशिकमध्ये 'अनंत कान्हेरे' नावाचे क्रिकेटचे मैदान आहे. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• स्वतःवर असलेला विश्वास जेव्हा अधिकाधिक घट्ट होतो, तेव्हा तोच विश्वास आपल्या आयुष्यातही परावर्तित होतो. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *1) 'फुगडी' हे कोणत्या राज्याचा लोकनृत्य आहे ?*      गोवा *2) भारतीय साहित्यातील सर्वोच्च पुरस्कार कोणता ?*       ज्ञानपीठ पुरस्कार *3) हिमा दास ही कोण आहे ?*      धावपटू *4) मेरी कोम कोणत्या टोपणनावाने ओळखली जाते ?*       मॅग्नीफिसेन्ट मेरी *5) जगात सर्वात मोठी लोकशाही कोणत्या देशाची आहे ?*       भारत *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा जि. गोंदिया 📱 9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• • उत्तम कानिंदे • शिरीष गिरी • नागेश पांडे शेवाळकर • दिलीप लिंगमपल्ले • व्यंकटेश रोंटे • शिवाजी पाटील • साहेबराव कदम • संतोष कामगोंडे • विठ्ठल डोनगिरे • बालाजी उगले • नागेश काळे • विशाल खांडरे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      *राजे* राजे तुम्ही स्वराज्य निर्माते आहात तुम्ही सकलांचे भाग्यविधाते आहात तुमचा अभिमान मनामनात आहे प्रत्येक भारतीय तुमच्या ऋणात आहे   शरद ठाकर सेलू जि परभणी •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *चित्ताचं चैतन्य चेतलं की ज्ञानसूर्याचा साक्षात्कार होतो. तो काही विवेकी संतासह विचारवंतानाही होतो. विवेकी संत माणसा-माणसात माणुसकीचे अर्थात दया-प्रेम-करूणेचे पूल बांधत असतात. परोपकारातून परमेश्वराशी त्यांचं नातं जुळवत असतात. दुसरा एक संत प्रकार आहे लहरीबाबांचा, सतत मौनाचं नाटक करून हजारोंना नादी लावण्यात कुशल असलेल्या बुवांचा, प्रवचनाचं संमोहन वापरून जणू तो ईश्वर मलाच कळला आणि माझ्यावरच भाळला असा बनाव निर्माण करणा-यांचा. या लोकांच्या चरणांशी सर्व सुखं शयण असतात. तिथं कनक-कांतांचा सुकाळ असतो. कित्येक मती मारलेले भक्त आपल्या लेकीसुना या 'पहुंचे हुए' लोकांच्या नादी लावतात. सत्तेतील 'सत्ते' आणि राजकारणातील 'पत्ते'ही त्यांच्या आशीर्वादासाठी टपून असतात.* *कृष्णकथा-रामकथा कानाशी बिलगल्यानं आपण ईश्वरप्रिय होतो असा कुणाचा गोड गैरसमज असेल तर तो भाबडेपणा आहे. ईश्वर समजण्यासाठी पराकोटीचा त्याग आणि कष्ट उपसावे लागतात. कबीर-ज्ञानोबा-तुकोबाइतकं आत्मबोधन अनुभवावं लागतं. हा मार्ग जनसामान्यांना परवडण्यासारखा नाही. म्हणूनच ते कर्मकांडांच्या थोतांडाला ब्रम्हांडाचा साक्षात्कार समजतात. ईश्वर कुणालाही दर्शन देत नाही. सूर्यकिरणांनी सूर्याचाच शोध घेण्यासारखा तो अज्ञानी प्रकार आहे. म्हणूनच रोज काही क्षण आत्मशोधात व्यतीत करीत राहिल्यानं कुठल्या तरी क्षणी आपण आपल्या सत्य-असत्यासह आत्मदर्पणापुढे येतोच!* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल- 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••     कबीर पगरा दूर है, आये पहुचै सांझ जन जन को मन राखती, वेश्या रहि गयी बांझ। कबीरा दूरच मुक्ती होत आलिया सांज सर्वांच्या राखित मना वेश्या राहिली वांझ महात्मा कबीर म्हणतात की मुक्तिपासून मी आणखी कोसो राहिलोय. जीवनात अज्ञानामुळे अंधःकार भरलेला आहे. हा अंधःकार षडविकारांनी युक्त आहे. हे विकार वारंवार मनाला भुरलळ घालीत असतात. त्यांना भुलून अज्ञानाचा मोहमयी पडदा बाजुला सरतंच नाही. त्यासाठी कर्मठपणाही अंगिकारला. त्यातल्या रूढी परंपरांनी असं काही जखडून टाकलं की विकारांपासून दूर जाण्याऐवजी विकाराभोवती भरकटून जीवन अखेरच्या टप्प्यावर येवून थांबू पाहातं आहे. तरीही जीवनातल्या माया जाळातून अजूनही मुक्तता झालेली नाही. मानवी मनाचे खेळही मोठे विचित्र असतात. मन विषय उपभोगात रमत मात्र ते कधीही भरत नाही अतृप्तच राहातं. जसे वेश्या सर्वांचे मन जपते . इत्तरांना समाधान देते. मात्र इत्तरांना जपण्यात तिला स्वतःचं अस्तित्व कुठं जपता येतं. ती स्वतः वांझपणाच्या यातनेतंच संपते. सर्व इंद्रियांना तृप्त करताना मन मात्र अतृप्तंच राहातं.     एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्याप्रमाणे सुगंधीत असलेल्या फुलांना आम्ही सुगंधीत आहोत म्हणून तुम्ही आमच्याकडे या आणि सुगंध घ्या असं कधीच म्हणावं लागतं नाही.आपोआपच सुगंध असणा-या फुलांकडे लोक आकर्षित होतात. त्याचप्रमाणे सज्जन माणसे कधीच कुणाला म्हणत नाहीत की,तुम्हीआमच्याकडे आमच्या सहवासात या आणि आमचे सद्गुण घ्या. आपोआपच सर्वसामान्य माणसे सज्जनांच्या सहवासात जाऊन आपल्यातील असलेल्या दुर्गुणावर मात करुन सद्गुणी होण्याचा प्रयत्न करतात. तात्पर्य असा की सद्गुणांचा सहवास हाच दुर्गुणावर मात करु शकतो.त्यासाठी  आपली मानसिकता असावी  लागते. © व्यंकटेश काटकर,नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        *🎡 मनाचे श्लोक 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• मना सर्वथा सत्य सांडूं नको रे। मना सर्वथा मिथ्य मांडूं नको रे॥ मना सत्य ते सत्य वाचे वदावे। मना मिथ्य तें मिथ्य सोडूनि द्यावें ॥१९॥ संकलन : सौ. सुभद्रा सानप, बीड •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••             *विश्वासघात* जंगलात एक हरिणीचे पाडस चरत होते. अचानक तेथे एक चित्ता आला. पाडस जीव वाचविण्यासाठी दाट वेलीच्या जाळ्यात घुसले. त्याला पकडण्यासाठी चित्ताही त्या जाळीत घुसला. पाडस छोटे होते ते सहजच जाळीतून पळून गेले. मात्र चित्ता अडकून बसला. त्याच वेळी एक शेतकरी तेथून जात होता. चित्त्याने शेतकऱ्याला त्याला जाळीतून काढण्याची विनंती केली. परंतु शेतकरी म्हणाला," तू जंगली प्राणी ! तुझा काय भरवसा ! तुला सोडल्यावर तू मलाच खावून टाकशील." चित्त्याने तसे करणार नाही असे आश्वासन दिले. शेतकर्याने त्याला मुक्त केले. तेंव्हा चित्त्याने आपला मूळ स्वभाव दाखविला आणि शेतकऱ्याला खाण्याची भाषा सुरु केली. शेतकरी म्हणाला मी तुला मुक्त केले हाच का सहकार्याचा मोबदला का?. चित्त्याने भुकेचे कारण सांगितले. तेवढ्यात तेथे एक लांडगा आला. दोघांची चर्चा ऐकून तो शेतकऱ्याला म्हणाला, " हा एवढा मोठा चित्ता! वाऱ्याच्या वेगाने पळणारा! आणि हा एवढ्याश्या जाळीत कसा अडकून पडेल. तू खोटे बोलतो आहेस. तू एवढ्या मोठ्या चित्त्याला वाचवला हे खोटे आहे, हा संकटात फसू शकत नाही. तो जाळीत कसा काय अडकला हे मला दाखव मग तू खरा का चित्ता ? हे पाहू." हे ऐकून चित्ताही घमेंडीत गेला तो परत जाळीत गेला व पुन्हा जाळीत अडकला. त्याच क्षणी लांडगा शेतकऱ्याला म्हणाला, " अरे मित्रा आता तरी पळ! नाहीतर हा पुन्हा तुला फसवेल ! *तात्पर्य - जे नेहमी विश्वासघातक राहिले त्यावर कधीच विश्वास ठेवणे चांगले नाही. ते त्यांचा मूळ स्वभाव सोडत नाहीत.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00           ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 18/02/2019 वार - सोमवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १९४४- भारतीय ज्ञानपीठ संस्थेची स्थापना करण्यात आली. १९९८- ज्येष्ठ गांधीवादी नेते,माजी मंत्री व महाराष्ट्राचे  माजी राज्यपाल सी. सुब्रमण्यम यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी  सन्मान जाहीर. 💥 जन्म :- १८२३ - गोपाळ हरी देशमुख, लोकहितवादी समाजसेवक १८८३-क्रांतिवीर मदनलाल धिंग्रा 💥 मृत्यू :- १९६७- अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ,अणुबॉम्बचे जनक जे.रॉबर्ट ओपेनहायमर १९९२-चित्रकार नारायण श्रीधर बेंद्रे *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *पाटणा - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले पाटणा मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे भूमिपूजन, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार होते उपस्थित* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *पुलवामा हल्ला- राजौरीतील शहीद जवान नसीर अहमद यांच्या कुटुंबाला राज्यपालांकडून 20 लाखांची मदत जाहीर* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *शिव समर्थ स्मारकाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते अनावरण* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *शिवसेना-भाजपाचं जमलं! उद्या युतीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता, गेल्या काही दिवसांपासून युतीसाठी दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू होती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *राजस्थान- चालू वर्षात स्वाईन फ्ल्यूमुळे आतापर्यंत 127 जणांचा मृत्यू* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *सरकारी नोकऱ्यांची कल्पना डोक्यातून काढून टाका- महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *मुंबई: पीळदार सौंदर्यवतीच्या मिस मुंबई स्पर्धेत एफसीटी जिमची डॉ. मंजिरी भावसार ठरली विजेती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••     *आपले नशीब आपल्या हाती* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/02/12.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *गोपाळ हरी देशमुख ऊर्फ लोकहितवादी*         गोपाळ हरी देशमुख ऊर्फ लोकहितवादी (१८ फेब्रुवारी १८२३ ते ९ ऑक्टोबर १८९२) हे इ.स.च्या १९व्या शतकात होऊन गेलेले मराठी पत्रकार, समाजसुधारक व इतिहासलेखक होते. प्रभाकर नावाच्या साप्ताहिकातून लोकहितवादी या टोपणनावाने त्यांनी समाजसुधारणाविषयक शतपत्रे लिहिली. भाऊ महाजन उर्फ गोविंद विठ्ठल कुर्टे हे प्रभाकर साप्ताहिकाचे संपादक होते. वर्तमानपत्रात लिहिलेल्या एका 'शतपत्रांचा इत्यर्थ' मथळ्याच्या पत्रात त्यांनी सुधारक विचारांच्या त्यांच्या लेखनाचा हेतू स्पष्ट केला आहे. त्यांचे घराणे मूळचे कोकणातले वतनदार होते. घराण्याचे मूळचे आडनाव सिद्धये. त्यांच्या देशमुखी वतनामुळे देशमुख हे आडनाव रूढ झाले. गोपाळराव देशमुखांचे वडील हरिपंत देशमुख हे पुण्यात दुसर्‍या बाजीराव पेशव्यांचे सेनापती बापू गोखले यांचे फडणीस म्हणून काम करीत होते. गोपाळराव देशमुखांना ग्रंथसंग्रहाची व वाचनाची विलक्षण आवड होती. इतिहास हा त्यांचा आवडीचा विषय होता. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात इंग्रजी शिक्षणामुळे घडलेल्या पहिल्या काही नवशिक्षितांपैकी एक म्हणजे गोपाळ हरी होत. त्यांनी मराठी शाळेत शिक्षण घेत असतानाच इंग्रजीचा अभ्यास केला. त्यांच्या वयाच्या २१व्या वर्षी ते न्यायालयात भाषांतरकार झाले. 'सदर अदालती'ची मुन्सिफीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर १८६२पासून ते मुंबई सरकारच्या न्यायखात्यात न्यायाधीश झाले. हिंदुस्थानात ज्ञानाबरोबरच तंत्रज्ञान व नाना प्रकारचे उद्योगधंदे वाढावेत ही त्यांची तळमळ होती. स्वदेशात विद्यावृद्धी होऊन स्वभाषेत नवेनवे ज्ञान प्रसारित झाल्याशिवाय हिंदुस्थानला जगातील इतर प्रगत राष्ट्रांच्या बरोबरीचे स्थान मिळणार नाही, असे त्यांना तीव्रपणे वाटत होते. लोकहितवादींनी १८४२ मध्ये, म्हणजे वयाच्या एकोणिसाव्या वर्षी 'हिंदुस्थानचा इतिहास' हे पुस्तक लिहिले. १८४८ पासून त्यांनी मुंबईहून निघणार्‍या प्रभाकर या साप्ताहिकात लोकहितवादी या नावाने लोकहितार्थ लेखन सुरू केले. १८४८ ते १८५0 या काळात त्यांनी १0८ छोटे छोटे निबंध लिहिले. हेच निबंध लोकहितवादींची शतपत्रे नावाने ओळखले जातात. त्यांनी विविधविषयांवर लहानमोठे सुमारे ३९ ग्रंथ लिहिले, दोन नियतकालिके चालविली, आणि ज्ञानप्रकाश व इंदुप्रकाश ही नियतकालिके काढण्याच्या कामी पुढाकार घेतला. लोकहितवादींनी अनेक उत्कृष्ट इंग्रजी ग्रंथांचे मराठीत भाषांतर केले. त्यांच्या लेखनातून लोकांच्या सर्वांगीण उन्नतीची तळमळ दिसून येते. जातिसंस्था हा देशाच्या उन्नती होण्याच्या मार्गातील मोठा अडसर आहे असे प्रतिपादन त्यांनी आपल्या लेखनातून केले. लोकहितवादी हे एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वाधातील,म्हणजे रानडेपूर्व पिढीतील हिंदुस्थानातील अर्थशास्त्रज्ञ होते. १८५६ साली गोपाळराव 'असिस्टंट इनाम कमिशन' या पदावर नेमले गेले. १८६७ साली त्यांनी अहमदाबाद येथे स्मॉल कॉज कोर्टात जज्ज म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यांनी गुजरातमध्ये गुजराती वक्तृत्वसभा स्थापन केली. समाजातील बालविवाह, हुंडा, बहुपत्नीकत्व यासारख्या अनिष्ट प्रथांवर त्यांनी हल्ला चढविला. १८७७ साली दिल्ली दरबारप्रसंगी ब्रिटीश शासनाने रावबहादूर ही पदवी देऊन त्यांना सन्मानित केले होते    *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• कर्तव्याची जाणीव करून देते ती खरी संस्कृती ! *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *1) गावाचा प्रथम नागरिक कोण असतो ?*       सरपंच *2) गावात कायदा व सुव्यवस्था कोण पाहतो ?*       पोलीस पाटील *3) महाराष्ट्रातील 'जंगलाचा जिल्हा' कोणता ?*        गडचिरोली *4) महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता ?*        अहमदनगर *5) महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता ?*        मुंबई शहर *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा जि. गोंदिया      📱 9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ◆ सोमेश्वर तांबोळी ◆ संजय राचावाड ◆ गणेश पाटील ◆ लक्ष्मीकांत डेबेकर *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••     *सारखेच* शिकलेले अन् न शिकलेले सारखे आहेत शिकून ख-या विचाराला पारखे आहेत शिकले तरी जुन्या परंपरा सोडत नाहीत विचारा सोबत घेतलेल शिक्षण जोडत नाहीत    शरद ठाकर सेलू जि.परभणी ८२७५३३६६७५ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *गरीब माणसाला घरापासून दूर राहून पोटाच्या चार घासासाठी प्रचंड मरमर करावी लागते. पण पैशावाल्याच्या बाबतीत हे होत नाही. "एका बसल्या ठिकाणी त्याचा व्यापार चालतो. त्याला घर सोडून कुठेही जावं लागत नाही." गरीबाला एका वस्तूसाठी पैशाअभावी कुढत मरावं लागतं. शेवटपर्यंत ती वस्तू मिळेलच असं होतं नाही. पण "श्रीमंताला मात्र पाहिजे असणारी कोणतीही वस्तू रानावनातच काय या पृथ्वीतलावर कुठंही असली तरी पैशाच्या जोरावर मिळवणं सोपं असतं आणि वस्तू कोणतीही असू द्या, कितीही अनमोल असू द्या, कितीही महत्वाची असू द्या, शक्यतो जास्तीचे पैसे देऊन मिळवता येणार नाही, इतकी ती अवघड नसतेच." थोडे जास्त पैसे देऊन अति मौल्यवान वस्तुसुद्धा पैश्यावाल्याला सहज मिळवता येते.* *म्हणून, पैसा माणसाच्या आयुष्यात यासाठी महत्वाचा आहे. पैसा वाईट मार्गाने कमवायचा तर नाहीच, पण चांगल्या मार्गाने खूप पैसा कमवून तो वाईट मार्गावर खर्च सुद्धा नाही करायचा. चांगल्या मार्गाने कमावलेला खूप पैसा 'आनंदी आणि सुखकर आयुष्य' जगण्यासाठी खर्च करायचा आहे. पैशाचा लोभ नाही आणि तिरस्कारही नाही. त्याची हाव नको आणि त्याच्याविषयी विरक्ती नको. पैसा कमवताना आनंदाने कमवायचा तसाच तो खर्च करतानासुद्धा जीवनात आनंदच असला पाहिजे. एवढा सुंदर असा 'मध्यम मार्ग' संतानी आपल्याला दिला आहे..* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई         9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्ञान भक्ति वैराग्य सुख पीव ब्रह्म लौ ध़ाये आतम अनुभव सेज सुख, तहन ना दूजा जाये। ज्ञान भक्ति वैराग्य सुख जलद ब्रम्हानंद दायी आत्मानुभव प्राप्तीची सर अन्यत्र कुणा न येई महात्मा कबीर अनुभव ज्ञानाची महत्ती विषद करताना म्हणतात , 'ज्ञान,भक्ति,वैराग्य सुख प्राप्तीद्वारे जलद गतीने ईश्वराचा साक्षात्कार होईल. ईश्वराची दिव्यताही अनुभवता येईल. हा मार्ग ईश्वरी लिला जाणून घेण्यासाठी महत्वपूर्ण ठरणारा आहे. मात्र आत्मानुभव आत्मा आणि परमात्म्याचंं मिलन घडवून आणतो. जेव्हा आत्माच परमात्म्याच्या रुपाशी एकरूप होऊन जातो. तिथे अन्य कुणाला प्रवेश कसा मिळणार बरे ! जीव आणि शिवाच्या एकरूपतेत मनाचाच मनाशी संवाद घडून येतो. विश्वातील नश्वरता व विकारांना त्याठायी यत्किंचितही स्थान उरत नाही. निसर्गाची सर्वव्यापकता व समद‌ृष्टी त्या जीवात्म्याच्या ठायी स्थापित होते. हा स्थितप्रज्ञतेचा सर्वोत्कट आविष्कार असतो. त्याच्यावर कोणत्याही प्रलोभनाचा प्रभाव पडत नाही . कारण तो स्वतःच अविनाशी विश्वरूपाशी तादात्म्य पावलेला असतो.     एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• इतरांना त्रास देऊन जर आपण आपले जीवन चांगल्याप्रकारे जगू म्हटले तर ते अयोग्यच आहे.कारण त्यांनी परिश्रमातून जे काही मिळवलेले असते ते गुण्यागोविंदाने जगण्याचे स्वप्न साकारत असतात.हे त्यांचे बघवत नाही आणि आपल्याने होत नाही म्हणून इतरांना त्रास देऊन त्यांचे सुख हिरावून घेणे हे वामवृत्तीचे लक्षणच म्हणावे. त्यामध्ये आपण सुखी होऊ शकतो का ? आपल्या बाबतीत इतरांनी असे केले तर आपणास कसे वाटेल ? ते आपल्या मनाला समाधान देते का ? ह्या सा-या गोष्टीचा आपण विचार केला तर नक्कीच त्याचे उत्तर सापडेल आणि पुन्हा आपण ती चूक करणार नाही याची नक्कीच जाणीव झाल्याशिवाय राहत नाही.इतरांच्याही सुखस्वप्नात आपणही सहभागी व्हावे हाच आपला माणुसकीचा खरा धर्म आहे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        *🎡 मनाचे श्लोक 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• मना राघवेंवीण आशा नको रे। मना मानवाची नको कीर्ति तूं रे॥ जया वर्णिती वेद-शास्त्रे-पुराणें। तया वर्णितां सर्वही श्लाघ्यवाणे ॥१८॥ संकलन : सौ. सुभद्रा सानप, बीड •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आईवडिलांना विसरू नका एकदा एक वयोवृद्ध बाप आपल्या उच्च शिक्षित मुलासोबत घराच्या छतावरती बसला होता. तेथे एक कावळा आला. मुलाला बापाने विचारले, ते काय आहे? मुलगा म्हणाला कावळा. पुन्हा दुसऱ्यांदा बापाने विचारले, ते काय आहे? मुलाने पुन्हा उत्तर दिले कावळा.  तिसऱ्यांदाही बापाने विचारले ते काय आहे? मुलाने जरासे दात-ओठ खात म्हटले, कावळा. मग ते दोघे घरात गेले. त्याला पुन्हा बापाने विचारले ते आत्ता आले होते ते काय होते? मुलाचा संयम सुटला होता त्याने ओरडत सांगितले, समजत नाही का? कावळा...... कावळा... कावळा.  पाचव्यांदा बापाने विचारले ते आपण पाहिले ते काय होते? मुलगा आता मात्र जाम भडकला त्याने त्यांना सांगितले, का टाईमपास करताय? तुम्हाला कितीदा सांगितले तो कावळा होता म्हणून, तरी तुम्हाला समजत नाही का? का जाणून- बुजून त्रास देताय?  मग त्या वयोवृद्ध बापाने त्या मुलाला घरातील एक डायरी आणायला सांगितली. त्याने ती आणली, त्यात हीच कथा लिहिली होती.  परंतु, ती थोडी वेगळी होती. त्या बापाच्या जागी एक लहान मुलगा होता. त्याने बापाला एक-दोन नाही तर तब्बल 25 वेळा हाच प्रश्न केला होता, आणि तितक्याच वेळा त्याच्या वडिलांनी त्याच्या प्रश्नाला हसत हसत उत्तर दिले.  त्यांना त्याच्या विचारण्याचा मुळीच राग येत नव्हता, उलट त्यांना त्या मुलाचा निरागस स्वभाव आणि त्याचे ते विचारणे आवडत होते. तो बाप त्या मुलाचाच होता जो त्याला केवळ पाच वेळा विचारल्यावर त्यांच्यावर खेकसला.  फरक फक्त हाच, की मुलासाठी बापाने केलेले कष्ट, त्यांनी सहन केलेल्या सर्व वेदना तो विसरला होता. उलट त्याने वडिलांना केवळ दु:खच दिले. लक्षात ठेवा. तुमच्या आई-वडिलांनी तुमच्यासाठी कितीतरी कष्ट केले आहेत आणि तुम्ही त्यांच्यासाठी केवळ दु:खच देत आहात? *आई-वडिलांना विसरू नका. त्यांनी केलेल्या कष्टांना विसरू नका.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00           ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 16/02/2019 वार - शनिवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :-  १९२३ - प्राचीन इजिप्तचा राजा तुतेनखामेनची कबर उघडण्यात आली. १९४५-दुसरे महायुद्ध, अमेरिकेच्या सैन्याने बटान परत मिळविले. १९९८- चायना एरलाईन्स  फ्लाइट ६७६ हे एरबस ए३०० जातीचे विमान कोसळले. 💥 जन्म :- १२२२ - निचिरेन, जपानमधील निचिरेन बौद्ध पंथाचा स्थापक. १९४१-किम जोंग इल, उत्तर कोरियाचा राष्ट्राध्यक्ष. 💥 मृत्यू :-  १३९१ - जॉन पाचवा पॅलिओलोगस, बायझेन्टाईन सम्राट. १८९९ - फेलिक्स फॉउ, फ्रांसचा राष्ट्राध्यक्ष. १९४४- दादासाहेब फाळके, महाराष्ट्रातील व भारतातील पहिले चित्रपट निर्माते १९५५-मेघनाथ साहा, सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याप्रकरणी महाराष्ट्रात सर्वसामान्य नागरिकांनी संताप व्यक्त केला असून राज्यभर सर्वांनी हल्ल्याचा निषेध करत श्रद्धांजली सभा घेतल्या.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या महाराष्ट्रातील जवानांच्या कुटुंबीयांना ५0 लाख रुपयांची मदत व कुटुंबियांचे संपूर्ण पुनर्वसन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एक दिवसाच्या महाराष्ट्र दौर्‍यावर त्यांच्या हस्ते विविध प्रकल्पांचे भूमिपूजन, लोकार्पण होणार आहे तसेच ते दोन जाहीर सभांना संबोधित करणार आहेत* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *जम्मू- काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावरील हल्ल्यात ४0 जवान शहीद झाल्यानंतर, व्यापारासंदर्भात पाकिस्तानची कोंडी करण्यासाठी भारताने पाकिस्तानचा मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा काढून घेतला आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *मुंबईसह राज्यभरातील वातावरणात बदल नोंदविण्यात येत असून, कमाल आणि किमान तापमानात वाढ होत आहे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *राज्यात स्वाइन फ्लूचे दीड महिन्यात १७ बळी; आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣*ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मायदेशात होणाऱ्या ट्वेंटी-20 आणि वन डे मालिकेसाठी भारतीय  संघाची घोषणा करण्यात आली, कॅप्टन विराट कोहलीचे पुनरागमन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *मध्यान्ह भोजन : एक संजीवनी* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. https://nasayeotikar.blogspot.com/2019/02/blog-post_13.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        *दादासाहेब फाळके*          दादासाहेब फाळक्यांचा जन्म नाशकाहून तीस किलोमीटर अंतरावरच्या त्र्यंबकेश्‍वर येथे झाला. त्यांचे वडील प्रसिद्ध संस्कृतज्ञ होते. १८८५साली त्यांनी सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई येथे प्रवेश घेतला. १८९0साली जे.जे.तून उत्तीर्ण झाल्यावर ते कला भवन, बडोदा येथे शिल्पकला, तंत्रज्ञान, रेखाटन, चित्रकला, छायाचित्रणकला इत्यादी गोष्टी शिकले.त्यांनी गोध्रा येथे छायाचित्रकार म्हणून व्यवसाय सुरू केला. परंतु, ब्युबॉनिक प्लेगाच्या उद्रेकात त्यांची प्रथम पत्नी आणि मूल दगावल्यावर त्यांना ते गाव सोडावे लागले. लवकरच, त्यांची ल्युमिएर बंधूंनी नेमलेल्या ४0 जादूगारांपैकी एकाशी, र्जमन कार्ल हट्र्?झ याच्याशी ओळख झाली. त्यानंतर त्यांना भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण संस्थेसाठी ड्राफ्ट्समन म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्या धडपड्या स्वभावामुळे लवकरच ते नोकरीच्या बंधनांना कंटाळले व त्यांनी छपाईचा व्यवसाय सुरू केला. शिळाप्रेस छपाईच्या तंत्रात ते वाकबगार होते. त्यांनी राजा रविवर्मांसोबत काम केले. पुढे त्यांनी स्वत:चा छापखाना काढला, तसेच छपाईची नवी तंत्रे आणि यंत्रे अभ्यासायला र्जमनीची वारी केली. लाईफ ऑफ ख्रिस्त हा मूकपट पाहिल्यानंतर त्यांनी आपले लक्ष हलत्या चित्रांच्या व्यवसायाकडे वळवले व १९१२ साली त्यांनी राजा हरिश्‍चंद्र हा पहिला मूकपट काढला जो ३ मे १९१३ साली मुंबईच्या कॉरोनेशन चित्रपटगृहात प्रेक्षकांसाठी पहिल्यांदा दाखवण्यात आला. दादासाहेबांच्या जन्मशताब्दीपासून (१९७०) चित्रपटसृष्टीत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या कलावंत-तंत्रज्ञाला ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ देण्यात येतो.     *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• सामर्थ्य हे सांगण्याची अथवा पाहण्याची वस्तू नसून, वेळ आल्यावर कृती करण्याची ती गोष्ट आहे *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *1) महाराष्ट्रातील एकूण जिल्हे किती ?*           36 *2) महाराष्ट्राची राज्यभाषा कोणती ?*           मराठी *3) महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता ?*         हरियल *4) महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणता ?*         शेकरू *5) महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती ?*        गोदावरी *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा जि. गोंदिया   📱 9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● कु. सानिका कुणाल पवारे ● प्रदीप वाघमारे ●  बाप्पा महाजन ●  सतीश चव्हाण ●  प्रमोद हिवराळे ●  मारोती गंगाधर जाधव ●  राजू इटलावार ●  शंकर छपरे ●  महंमद सादिक खान ●  शंकर मसूनवार ●  बालाजी पाटील जाधव *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      *वाटण्या* वाटण्या वरून इथे रोजच भांडणं आहे माझा वाटा मोठा हेच मत मांडणं आहे ताटावर वढायच्या नादात कोण कस रास्त देणार वाटाघाटी करायच्या तर नक्की कमी जास्त होणार    शरद ठाकर सेलू जि.परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *चित्ताचं चैतन्य चेतलं की ज्ञानसूर्याचा साक्षात्कार होतो. तो काही विवेकी संतासह विचारवंतानाही होतो. विवेकी संत माणसा-माणसात माणुसकीचे अर्थात दया-प्रेम-करूणेचे पूल बांधत असतात. परोपकारातून परमेश्वराशी त्यांचं नातं जुळवत असतात. दुसरा एक संत प्रकार आहे लहरीबाबांचा, सतत मौनाचं नाटक करून हजारोंना नादी लावण्यात कुशल असलेल्या बुवांचा, प्रवचनाचं संमोहन वापरून जणू तो ईश्वर मलाच कळला आणि माझ्यावरच भाळला असा बनाव निर्माण करणा-यांचा. या लोकांच्या चरणांशी सर्व सुखं शरण असतात. तिथं कनक-कांतांचा सुकाळ असतो. कित्येक मती मारलेले भक्त आपल्या लेकीसुना या 'पहुंचे हुए' लोकांच्या नादी लावतात. सत्तेतील 'सत्ते' आणि राजकारणातील 'पत्ते'ही त्यांच्या आशीर्वादासाठी टपून असतात.* *कृष्णकथा-रामकथा कानाशी बिलगल्यानं आपण ईश्वरप्रिय होतो असा कुणाचा गोड गैरसमज असेल तर तो भाबडेपणा आहे. ईश्वर समजण्यासाठी पराकोटीचा त्याग आणि कष्ट उपसावे लागतात. कबीर-ज्ञानोबा-तुकोबाइतकं आत्मबोधन अनुभवावं लागतं. हा मार्ग जनसामान्यांना परवडण्यासारखा नाही. म्हणूनच ते कर्मकांडांच्या थोतांडाला ब्रम्हांडाचा साक्षात्कार समजतात. ईश्वर कुणालाही दर्शन देत नाही. सूर्यकिरणांनी सूर्याचाच शोध घेण्यासारखा तो अज्ञानी प्रकार आहे. म्हणूनच रोज काही क्षण आत्मशोधात व्यतीत करीत राहिल्यानं कुठल्या तरी क्षणी आपण आपल्या सत्य-असत्यासह आत्मदर्पणापुढे येतोच!*          ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••     🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई         9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••     ज्यों गूंगा के सैन को,  गूंगा ही पहिचान त्यों ज्ञानी के सुख को,  ज्ञानी हबै सो जान। सारांश         मुक्याची भाषा मुक्याला बरोबर समजते कारण दोघेही समान संवेदनेचे असतात. त्यांना बोलता येत नसले तरी त्यांची (देहबोली) खुणवाखुणवी इशार्‍याची भाषा असते. त्या खुणवण्यातून त्याला काय सांगायचंय  ते समोरचा बहीरा बरोबर ओळखतो. मात्र हे इशारे व सुचित करावयाचा भाव विद्वानालाही कळू शकत नाही. त्यासाठी त्याच्याच पातळीवर यावं लागतं. जसं  लहाण बाळाचं रडणं अन त्याचे चेहर्‍यावरचे हावभाव त्याच्या आईला वाचता येतात. म्हणून त्यांच्यात डोळ्याची भाषा विकसित झालेली असते. लेकराचं अर्ध अधिक पालन-पोषण तर आई  डोळ्याच्या ईशार्‍यावरंच पूर्ण करते.      विशिष्ट वयामध्ये वेगवेगळ्या सांकेतिक भाषा विकसित होतात. किशोरावस्थेपासून अशा सांकेतिक भिषा विकसित होतात. प्रत्येक शब्दात विशिष्ट अक्षर क्रमात एखादे अक्षर टाकून त,व,म,प....ची भाषा बोलता येणे. बोलणार्‍या दोघांनाच कळायचं बाकीचे उगा तोंडाकडं पाहात राहाणार . कुमारावस्थेनंतर अशा भाषांचं आकर्षण ओसरून जातं. जनावरांच्या बाजारात हेड्यांची दलालांची भाषा तरी कुठे कळते दलालांशिवाय दुसर्‍यांना !           कित्येक जणांच्या समुहात वावरणार्‍या दोन प्रेमींनी आपली एक भाषा विकसित केलेली असते. कितीही चौक्या पहारे असले तरी ती त्या दोघांना बरोबर कळते. चौक्या पहार्‍यांना भेदून ती एकमेकांची भेट घडवून आणतेच. त्याप्रमाणे  आत्मरूपाच्या आनंदात एकरूप झालेल्या आत्म ज्ञान्याला दुसरा आत्मज्ञानी बरोबर  ओळखू शकतो.     एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• तुमच्याजवळ जे आहे ते इतराजवळ नाही किंवा इतरांजवळ जे आहे ते तुमच्याजवळ नाही. असे जेव्हा तुम्हाला समजेल तेव्हा तुम्हाला कदाचित वाटेलही आपल्या जीवनात असं का बरं होतं आणि त्याबाबतीत नसल्याचीही मनाला खंत वाटते. खंत वाटून घ्यायचेही कारण नाही. पहिल्यांदा तुम्ही थोडा विचार करा असे जर सगळ्यांना सारखेच मिळाले असते तर आपण काहीच प्रयत्नही केले नसते. इतरांच्यासोबतही आपण तुलना करु नये. ज्याच्या त्याच्या कर्माचा आणि ज्याला आपण कधी कधी नशिब म्हणतो कदाचित नशिबाचाही भाग असू शकते. पण एक लक्षात असू द्यावे पहिल्यांदा आपण इतरांची बरोबरी करु नये आणि जर करायचीच असेल तर आपण आपल्या कामात आणि प्रयत्नात कसूर करायची नाही. इतर जर पुढे जात असतील तर आपण त्यांना प्रोत्साहन द्यावे आणि आपणही आपल्या प्रयत्नाने कसल्याही प्रकारचे मन खचून जाऊ न देता समोरच्या परिस्थितीला सामोरे जाऊन यशस्वी होण्याचा संकल्प करायचा. अशा कृतीमुळे आपलेही जीवन इतरांपेक्षा सुखी व समाधानी होऊ शकेल. इतरांबरोबर स्पर्धा करायची काही गरज नाही किंवा इतरांसोबत तुलनाही करायची गरज नाही. आपल्यालाही आपल्या कर्माने आणि आत्मविश्वासाने प्रयत्न केल्यामुळे आपणही आपल्या जीवनात खूप पुढे जाऊ शकतो हे निश्चित. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        *🎡 मनाचे श्लोक 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• मरे एक त्याचा दुजा शोक वाहे। अकस्मात तोही पुढे जात आहे॥ पुरेना जनीं लोभ रे क्षोभ त्याते। म्हणोनी जनीं मागुता जन्म घेते ॥१६॥ संकलन : सौ. सुभद्रा सानप, बीड •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••           *समर्पण* एक साधू भिक्षा मागत दारोदार फिरत होता. वृद्ध, असहाय अशा त्या साधूची दृष्टीही थोडी अधू होती. त्याने एका मंदिरासमोर जाऊन भिक्षेसाठी आवाज देण्यास सुरुवात केली. हे पाहून पांडुरंगाने त्याला म्हटले, '' महाराज, पुढे व्हा. तुम्हाला भिक्षा देईल अशा व्यक्तीचे हे घर नव्हे.'' साधू म्हणाला, '' जो कोणास काही देत नाही, असा या घराचा मालक आहे तरी कोण ?'' पांडुरंग म्हणाला, '' अहो, हे घरच नाही. हे मंदिर आहे. याचा मालक साक्षात परमेश्वर आहे. '' हे ऐकून त्या साधूने एकवार आकाशाकडे पाहिले. त्याचे हदय भरुन आले. त्याने आकाशाकडे पाहात हात पसरले. तेथेच उभा राहिला. पुढे मंदिराच्या दारात त्याला नाचतानाही पांडुरंगाने पाहिले. त्याचे डोळे अलौकिक तेजाने लकाकत होते. त्याच्या वृद्ध शरीरातून दिव्य प्रकाश पसरत होता. पांडुरंगाने त्याला आनंदाचे कारण विचारले. साधू म्हणाला, '' जो मागतो, त्याला मिळते. फक्त समर्पण करण्याची वृत्ती पाहिजे.'' *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00           ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 15/02/2019 वार - शुक्रवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *संत सेवालाल महाराज जयंती* 💥 ठळक घडामोडी :-  १९४२ - दुसरे महायुद्ध - सिंगापुरमध्ये ब्रिटीश सैन्याची शरणागती. ८०,००० भारतीय, ब्रिटीश व ऑस्ट्रेलियन सैनिक युद्धबंदी. १९६१ - सबिना एर फ्लाइट ५४८ हे विमान बेल्जियममध्ये कोसळले. ७३ ठार. मृतांत अमेरिकेचा संपूर्ण फिगर स्केटिंग संघ व त्यांचे मार्गदर्शक. १९६५ - कॅनडाने नवीन ध्वज अंगिकारला. १९९५ : ब्रेल लिपीतील पहिलं वृत्तपत्र 'केसरी' या संस्थेने प्रकाशित केलं.  २0१४ : दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली.  २0१८ : नीरव मोदी याच्या १७ मालमत्तांवर ईडीचे छापे. नीरव मोदी फरार. ईडीकडून त्याच्या ५१00 कोटींची संपत्ती  💥 जन्म :- १९३० - वसंत दिवाणजी, कन्नड साहित्यात मौल्यवान योगदान देणारे प्रतिभावंत लेखक. 💥 मृत्यू :-  १८६९ - प्रसिद्ध उर्दू कवी आणि शायर मिर्झा गालिब २0१३ : लढवय्या कामगार नेता, कट्टर शिवसैनिक, माजी विधानसभा अध्यक्ष दत्ताजी नलावडे  *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *जम्मू काश्मीर: पुलवामात सीआरपीएफच्या दोन बसवर दहशतवाद्यांचा हल्ला; 40 जवान शहीद, उरी नंतरचा सर्वात मोठा रक्तपात* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी पुकारलेल्या आंदोलनात दिलेले लेखी आश्वासन सरकारने पाळले नसल्याचा आरोप करत सकल मराठा क्रांती महामोर्चाने २२ फेब्रुवारीपासून पुन्हा बेमुदत उपोषणाची दिली हाक* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *एमपीएससी परीक्षेत सोलापूरचा झेंडा, बार्शीचा आशिष बारकुल व पंढरपूरचा महेश जमदाडे अव्वल* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *बुलढाणा : मातृतीर्थ सिंदखेड राजा विकास आराखड्याला निधी कमी पडू देणार नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *मुंबई - शरद पवार माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार, राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर प्रफुल्ल पटेल यांनी दिली माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *मुंबई - 24 फेब्रुवारी रोजी रासपतर्फे मुंबईत धनगर मेळाव्याचे आयोजन, शिवाजी पार्कवर होणाऱ्या या मेळाव्यास मुख्यमंत्री उपस्थित राहणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारतीय संघ घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन ट्वेंटी-20 आणि पाच एकदिवसीय सामने खेळणार आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• व्हॅलेंटाईन स्पेशल आर्टिकल *विद्यार्थी हेच माझे दैवत* https://nasayeotikar.blogspot.com/2019/02/my-students-my-valentine.html *स्तंभलेखक नासा येवतीकर* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••                   *मिर्झा गालिब* मिर्झा असदुल्लाखान गालिब हे प्रसिद्ध फारसी आणि उर्दू कवी होते. ते सुधारक वृत्तीचे, सर्व धर्मांना समान मानणारे, कर्मठ नसलेले, नमाज न पढणारे, रोजा न ठेवणारे, कलेचे आसक्त, रसिक व्यक्ती होते. गालिब केवळ चार वर्षांचे असताना त्यांचे वडील वारले म्हणून आजोबा आणि काकांनी पालनपोषण केले. लहानपणी त्यांनी इस्लामचे धडे घेतले, फारसी भाषा शिकले. मस्तानी हिच्या वंशात जन्माला आले होते. गालिब यांनी फारसी भाषेत लिखाण काम सुरू केले. त्यांच्या साहित्यात जीवनाचे गंभीर तत्वज्ञान त्यांनी मांडले. वयाच्या ११व्या वर्षापासून गालिब शेर लिहीत होते. जीवनाच्या झळा सोसून मिर्झा गालिबने त्या सुंदर करून काव्यातून मांडल्या. त्यांनी एकूण १८,000 च्यावर शेर फारसी भाषेत रचले. पुढे मित्रांच्या आग्रहाखातर त्यातीलच १000-१२00 शेर त्यांनी उर्दू भाषेत लिहिले. गालिब यांनी कधी कोणताही उद्योगधंदा केला नाही. मित्रांच्या आणि नातेवाईकांच्या सहकार्याने ते राहत. त्यांना स्वत:ला प्रसिद्धी मिळविण्याची गरज वाटली नाही. उत्तर मोगल काळातील राजांच्या, उमरावांच्या दरबारी जाणेही त्यांना आवडत नसे. ते म्हणत माझ्या कविता माझ्या मृत्यूनंतरही अजरामर राहणार असल्याने माझे नाव आपोआपच सर्वत्र पसरणार. शायरी आह को चाहिए इक उम्र असर होते तक कौन जीता है तिरी ज़ुल्फ़ के सर होते तक *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• दिले तेव्हा प्रेम महान देणगी आहे. प्राप्त झाले तेव्हा तो सर्वोच्च सन्मान आहे. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *1)  'तलावाचा जिल्हा' असे कोणत्या जिल्ह्याला म्हणतात ?*        गोंदिया *2)  आशिया खंडातील सर्वात मोठी गुफा कोणती ?*         कचारगड ( गोंदिया ) *3) संसद सदस्याला काय म्हणतात ?*        खासदार *4) राज्यविधिमंडळाच्या सदस्याला काय म्हणतात ?*        आमदार 5)   *महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली ?*        1 मे 1960 *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा गोंदिया 📱 9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● अशोक गायकवाड ●  दत्ता एम. भोसले ●  जनाबाई निलपत्रेवार ●  बाबूराव बोधनकर ●  किरण गौड ●  घनश्याम नानम ●  गोविंद टेकूलवार ●  भारत लाखे ●  गुलाब जाधव ●  रमेश पाटील कदम ●  अविनाश सातपुते ●  रमेश सोनकांबळे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मनातून उतरले* कोणाच्या नजरेतून कोणाचे मन उतरले आहे मन उतरले म्हणाले की लोक म्हणतात हे बिथरले आहे वाईट कामं केली की कोणीही मनातून उतरू शकतो वाईट कामं पाहून कोणीही कोणावर बिथरू शकतो     शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• •••●‼ *विचार धन* ‼●••• *मुन्शी प्रेमचंद यांनी तारूण्याविषयी फार छान विचार मांडले. ते म्हणतात, 'तारूण्य जोश आहे, बल आहे, साहस आहे, दया आहे, आत्मविश्वास आहे. गौरव आणि सर्वकाही आहे. तारूण्य व्यक्तीच्या जीवनाला उज्ज्वल आणि परिपूर्ण बनविते. परंतु एकदा का ते भरकटले तर सर्व सद्गुणांचा नाश होऊन जीवन सैरभैर होते.' तारूण्याला  विश्वात्मकतेचे परिमाण द्यायचे असेल, तर तेवढे साहस आणि उदार असणे आवश्यक आहे. उदारता आणि साहस यांच्या संयोगामुळेच डाॅ. कोटणीस मानवतेच्या भावनेतून चीनमध्ये स्थिरावतात. भारत-चीन या देशांमध्ये मानवतेचा सांस्कृतिक बंध निर्माण करतात. तारूण्याचा खरा अर्थ कळलेली 'डाॅ. कोटणीस की अमर कहाणी' संपूर्ण जगाला आकर्षणाचा आणि आत्मसंवेदनाचा विषय वाटते.* *जनावरे राखता राखता अभ्यास करीत बौद्धिक कर्तृत्वावर आणि तारूण्यातील सकारात्मक ऊर्जेमुळे तात्याराव लहाणे यांच्यासारखा तरूण नेत्ररोग तज्ञ म्हणून नावारुपाला येतो. अलिशान हाॅस्पिटल उभारून खासगी वैद्यकीय व्यवसाय सुरू करण्याच्या नादी न लागता सरकारी दवाखान्यात नोकरी करून सामान्यांची सेवा करण्यात धन्यता मानतो. तेही तारूण्याचा अर्थ समजल्यानेच. युवावर्गाने आपल्या तारूण्यावस्थेतील महत्वाचा काळ शक्ती, कार्यक्षमता, बुद्धिचातुर्य यांचा योग्य वापर केला तर कुटुंब, देश पर्यायाने मानवसमाज  प्रगतीपथावर जाऊ शकतो.*   ••●‼ *रामकृष्णहरी*‼●••   🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई         9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• कबीर  सतगुर  ना  मिल्या , रही  अधूरी  सीश  | स्वांग जाति का पहरी कर , घरी  घरी  मांगे  भीष  || अर्थ :       महात्मा कबीर गुरूचे जीवनातील अनन्य साधारण असणारे महत्त्व सांगताना म्हणतात की, जीवन जगताना असो की शिक्षण घेताना असो गुरू असलाच पाहिजे.  गुरू (मार्गदर्शक) भेटला नाही ज्ञानाची अर्धवट प्राप्ती होते. अर्धवट ज्ञान  आत्मघातकी ठरतं.  ते जीवनाच्या वाटेवर सर्वात घातक ठरू शकते. महाभारतातील अभिमन्यूचा प्रसंग समजून घेतला तरी अर्धवट ज्ञान किती धोकादायक ठरतं हे पुढील पिढ्यांच्या ध्यानी यायला वेळ लागणार नाही. अभिमन्यू कुशल योद्धा होता. चक्रव्युहात घुसणे जाणत होता परंतु चक्रव्पुह भेदण्याची कला त्याला जमत नव्हती. त्यातच त्याला प्राण गमवावा लागला.       अर्धवट ज्ञानी पारंगत असल्याचं ढोंग करतो. या ढोंगापायी त्याला नकल करावी लागते. नकल करणारा परिपूर्ण असत नाही. अशा व्यक्तींच्या माध्यमातूनच अंधश्रद्धा व चुकीच्या रुढी समाजात पसरवल्या जातात. ही अर्धशिक्षित फौजच समाजाला चुकीच्या दिशेनं नेते. संभ्रम निर्माण करीत असतात. स्वतःच्या मार्गाला विवेकाची जोड नसल्याने स्वतःचीच फसगत करून घेतात.  प्रसंगी पथ भरकटून भीक मागण्याचेही त्यांच्या नशिबी येते.     एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• तुमच्याजवळ जे आहे ते इतराजवळ नाही किंवा इतरांजवळ जे आहे ते तुमच्याजवळ नाही. असे जेव्हा तुम्हाला समजेल तेव्हा तुम्हाला कदाचित वाटेलही आपल्या जीवनात असं का बरं होतं आणि त्याबाबतीत नसल्याचीही मनाला खंत वाटते. खंत वाटून घ्यायचेही कारण नाही. पहिल्यांदा तुम्ही थोडा विचार करा असे जर सगळ्यांना सारखेच मिळाले असते तर आपण काहीच प्रयत्नही केले नसते. इतरांच्यासोबतही आपण तुलना करु नये. ज्याच्या त्याच्या कर्माचा आणि ज्याला आपण कधी कधी नशिब म्हणतो कदाचित नशिबाचाही भाग असू शकते. पण एक लक्षात असू द्यावे पहिल्यांदा आपण इतरांची बरोबरी करु नये आणि जर करायचीच असेल तर आपण आपल्या कामात आणि प्रयत्नात कसूर करायची नाही. इतर जर पुढे जात असतील तर आपण त्यांना प्रोत्साहन द्यावे आणि आपणही आपल्या प्रयत्नाने कसल्याही प्रकारचे मन खचून जाऊ न देता समोरच्या परिस्थितीला सामोरे जाऊन यशस्वी होण्याचा संकल्प करायचा. अशा कृतीमुळे आपलेही जीवन इतरांपेक्षा सुखी व समाधानी होऊ शकेल. इतरांबरोबर स्पर्धा करायची काही गरज नाही किंवा इतरांसोबत तुलनाही करायची गरज नाही. आपल्यालाही आपल्या कर्माने आणि आत्मविश्वासाने प्रयत्न केल्यामुळे आपणही आपल्या जीवनात खूप पुढे जाऊ शकतो हे निश्चित. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        *🎡 मनाचे श्लोक 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• मना पाहतां सत्य हे मृत्युभूमी। जितां बोलती सर्वही जीव मी मी॥ चिरंजीव हे सर्वही मानिताती। अकस्मात सांडूनिया सर्व जाती ॥१५॥ संकलन : सौ. सुभद्रा सानप, बीड •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *निर्मळ मन* ‘‘भिक्षां देही’’ म्हणत एक साधू महाराज मंगलाबाईंच्या घरासमोर येऊन उभे राहिले. त्यांचा आवाज ऐकून मंगलाबाई भिक्षा घेऊन आल्या. त्या फार अस्वस्थ दिसत होत्या. बाहेर येऊन साधू महाराजांना म्हणाल्या, ‘‘महाराज, मी फार अस्वस्थ आहे मला काहीतरी उपदेश करा.’’ साधू महाराज म्हणाले, ‘‘माई, आज नाही, पण मी तुला उद्या उपदेश करीन.’’ महाराजांचे हे शब्द ऐकून मंगलाबाईंना अतिशय राग आला व त्या फणकार्याने म्हणाला, ‘‘मग तुम्हाला मी भिक्षाही उद्याच घालीन.’’ दुसर्या दिवशी साधू महाराज भिक्षा मागण्यासाठी पुन्हा त्या घराकडे निघाले. येताना त्यांनी आपल्या भिक्षापात्रात थोडी माती घेतली. साधू महाराज आज येऊन उपदेश करणार म्हणून मंगलाबाई सुद्धा चांगले दान घेऊन त्यांची वाट पहात होत्या. साधूमहाराजांनी घरासमोर येऊन ‘‘भिक्षां देही’’ अशी आळी दिली. मंगलाबाई भिक्षा घेऊन आल्या. भिक्षा घालणार तितक्यात त्यांच्या लक्षात आले की भिक्षा पात्रात माती आहे. त्या पटकन साधूमहाराजांना म्हणाल्या, ‘‘महाराज, भिक्षापात्रात माती आणि कचरा आहे तर मी भिक्षा कशात घालू ?’ महाराज म्हणाले, ‘‘ मला चालेल. तुम्ही भिक्षा घाला.’’ त्यावर मंगलाबाई म्हणाल्या, ‘‘भिक्षापात्रात माती असताना त्यावर मी अन्न घालणार नाही.’’ हे ऐकून महाराज म्हणाले, ‘‘भिक्षापात्र स्वच्छ केल्यावरच तुम्ही भिक्षा घालणार ना. मग तोच तुम्हाला उपदेश आहे. काल तुम्ही दुःख आणि चितेनी ग्रासलेल्या होतात, तुमचे मन अस्वस्थ होते; मग मी तुम्हाला कसा उपदेश केला असता ?’’ गुरुचा उपदेश घेताना मन अगदी निर्मळ असायला हवे. तात्पर्य – मन निर्मळ असेल तर त्यात भर घालणारी प्रत्येक गोष्ट निर्मळच होते. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

*जी व्यक्ती प्रतीकुल वातावरणात तटस्थ असते,प्रतिकुल लोकमताला न घाबरता संघर्ष करते.स्वतःच्या विचारावर ठाम असते.चांगले आणि वाईट यातील भेद ओळखून स्वतः निर्णय घेते.परिस्थिती कोणतीही असो त्यातुन मार्ग काढते.* *दुसऱ्यांच्या हातचे बाहुले न होण्या इतकी बुद्धी ठेवतात, अशी व्यक्ती स्वाभिमानी असते,स्वतःचे आचार विचार दुसऱ्यावर न लादता सतत कार्यमग्न राहते.अशी व्यक्तीच स्वतंत्र असते.* 〰〰〰〰〰〰〰 ✍ प्रमिला

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00           ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 13/02/2019 वार - बुधवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :-  २०१० - पुणे येथे दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणला. १७ ठार, ६० जखमी. 💥 जन्म :- १८७९ - सरोजिनी नायडू, बंगाली कवियत्री. १९६९ - सुब्रोतो बॅनर्जी, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :-  २०१२ - अखलाक मुहम्मद खान ऊर्फ कवी शहरयार, ज्ञानपीठ पुरस्कारविजेते उर्दू कवी, गीतकार. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी शासकीय सेवा आणि शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशाकरिता १० टक्के आरक्षण देण्याबाबतचा शासकीय आदेश जारी, राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील अधिकारी, कर्मचार्‍यांना राज्य सरकारी कर्मचार्‍यांप्रमाणे सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *जानेवारीमध्ये महागाई दरात घट, गेल्या १९ महिन्यातील हा सर्वात नीचांक स्तर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *राज्याच्या दुर्गम, डोंगराळ तसेच आदिवासी भागामधील पशुपालकांकडील पशुरुग्णांसाठी मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजना सूरू करण्यासह योजनेच्या पहिल्या टप्प्यात ८0 तालुक्यांमध्ये फिरते पशुचिकित्सा पथक सुरू* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या मानधनात ११ सप्टेंबर २0१८ ला केलेली वाढ तत्काळ द्यावी आणि कर्मचार्‍यांच्या एकरकमी लाभांमध्ये तीन लाख रुपयांपर्यंत वाढ करावी; या मागणीसाठी अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने सोमवारपासून राज्यभर जेलभरो आंदोलनाला केली सुरुवात* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *वायुप्रदूषणामुळे देशात दरवर्षी 24 लाख बळी, त्यात महाराष्ट्रात सर्वाधिक तर मुंबई देशात सर्वाधिक प्रदूषित शहर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारतीय महिला संघातील खेळाडू जेमिमा रॉड्रीग्ज आणि स्मृती मानधना यांनी आयसीसी टी-२0 क्रिकेटपटूंच्या क्रमवारीत घेतली भरारी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कमवा आणि शिका हेच उपयोगी* स्वतःच्या विकासावर कुटुंबाचे विकास अवलंबून असते. कुटुंबाच्या विकासावर गावाचा विकास आणि मग राज्य व देशाचा विकास होतो. या विकासासाठी शिक्षण हे अत्यंत महत्त्वाची बाब आहे. शिक्षणाशिवाय कोणाचेही विकास अशक्य आहे. शिक्षणामुळे दोन डोळ्याचे माणसे तिसऱ्या डोळ्याने डोळस होऊ शकतात. अन्यथा डोळे असून ही आंधळ्याची अवस्था होते. महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाचे महत्त्व सांगताना......... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/06/blog-post_86.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••          *सरोजिनी नायडू* सरोजिनी नायडू (१३ फेब्रुवारी १८७९—२ मार्च १९४९). भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक थोर कार्यकर्त्यां, प्रभावी वक्त्त्या व कवयित्री. त्यांचा जन्म हैदराबाद येथे सधन कुटुंबात झाला. त्यांचे पूर्ण नाव सरोजिनी अघोरनाथ चट्टोपाध्याय (चतर्जी). अघोरनाथांचे मूळ घराणे पूर्व बंगालमधील व गाव ब्रह्मनगर. अघोरनाथ १८७८ मध्ये हैदराबादला शैक्षणिक संस्था स्थापन करण्याच्या उद्देशाने आले आणि पुढे निजाम महाविद्यालयाचे प्राचार्य झाले. ते शिक्षणतज्ज्ञ व कळकळीचे कार्यकर्ते म्हणून प्रसिद्ध होते. सरोजिनींच्या आई वरदासुंदरीदेवी मूळच्या बंगालच्याच. त्या बंगालीमध्ये कविता करीत. सरोजिनींवर अशा सुसंस्कृत पालकांचे संस्कार लहानपणीच झाले. यांतून त्यांचे कविमन घडले आणि लहानपणीच त्यांना कविता रचण्याचा छंद जडला व स्फूर्ती मिळाली. त्यांचे प्राथमिक शिक्षण घरीच खाजगीरीत्या झाले. वयाच्या बाराव्या वर्षी त्या मद्रास प्रदेशात मॅट्रिक परीक्षेत पहिल्या आल्या (१८९२). त्यानंतर सुमारे तीन वर्षे प्रकृती ठीक नसल्यामुळे त्या घरीच राहिल्या. निजामाची छात्रवृत्ती घेऊन पुढे त्या इंग्लंडला उच्च शिक्षणासाठी गेल्या (१८९५). लंडन आणि केंब्रिज येथे थोडे शिक्षण घेतल्यानंतर प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे अर्धवट शिक्षण सोडून इटली पाहून त्या मायदेशी परतल्या; पण या वास्तव्यात त्यांचा एडमंड गॉस या इंग्रज साहित्य समीक्षकाशी चांगला परिचय झाला. त्यांनी आपल्या काही कविता त्यास दाखविल्या आणि पुढील काव्यलेखनात गॉस यांचे त्यांस चांगलेच मार्गदर्शन लाभले. द गोल्डन थ्रेशहोल्ड (१९०५) या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहास गॉसनी प्रस्तावना लिहिली आणि हा काव्यसंग्रह त्या वेळच्या साहित्यक्षेत्रात चांगलाच गाजला. त्याला वृत्तपत्रांतून यथोचित प्रतिसाद मिळाला. रवींद्रनाथ टागोरांनीही सरोजिनींचे कौतुक केले. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• कर्ज, शत्रू आणि रोग यांची थोडीसुध्दा बाकी ठेवू नये. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) 'मथला पेंटिंग' कुठल्या राज्यातील प्रसिद्ध कला आहे?*  बिहार *२) 'मोनालिसा' नामक जगप्रसिद्ध चित्राची रचना कोणी केली?* लिओनार्दो द विंसी  *३) न्यूटनचा गतीचा पहिला नियम कोणता?*  जडत्वाचा नियम *४) प्रथम कोणत्या अवयवाचं प्रत्यारोपण करण्यात आलं?* हृदय *५) लोखंड आणि गंधक हे कोणत्या प्रकारचं मिश्रण आहे?*              असमांग मिश्रण *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● अशोक पाटील ● देवीसिंग ठाकूर ● नागनाथ भद्रे ● पंडीत डोरले *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *घात* कोणाला बोट दिले की तो हात धरतो आपलेपणाने जवळ केल की घात करतो माणूस ओळखूनच द्यायचा मदतीचा हात जागरूक राहिल्यास होणार नाही घात शरद ठाकर सेलू जि.परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *महत्वाकांक्षा आणि अतिमहत्वाकांक्षा यातील फरक जाणून घेण्याची गरज आहे. उत्तुंगतेचा ध्यास जरूर घ्यायला हवा; परंतु त्यामागे उदात्त विचार असायला हवेत. आपले आणि समाजाचे जीवन समृद्ध करण्याची कळकळ असावी. त्याऐवजी केवळ स्वार्थाचा आणि मूठभरांच्याच हिताचा विचार असेल, तर त्यामागची महत्वाकांक्षा हिंसक बनते. अतिमहत्वाकांक्षा नकारात्मक असून, आपल्या अधोगतीला कारणीभूत ठरते. इतिहासात अशी असंख्य उदाहरणे आहेत. शेक्सपियरच्या नाटकातील नायक मॅकबेथही अतिमहत्वाकांक्षेचा शिकार आहे. स्काॅटलंडचा राजा डंकनच्या दरबारातील तो पराक्रमी उमराव. राजा होण्याची महत्वाकांक्षा त्याला असतेच; परंतु लेडी मॅकबेथ याबाबतच्या अतिमहत्वाकांक्षेने पछाडलेली असते. आपला नवरा राजा व्हावा म्हणून प्रसंगी ही दुष्ट बाई विद्यमान राजाचा खून करायलाही तयार होते.* *एका लढाईत विजय मिळविल्याबद्दल सन्मान करण्यासाठी राजा मॅकबेथच्या घरी येतो. पती-पत्नी त्यांचे आदरातिथ्य करतात. दिलेल्या शयनगृहात राजा झोपी जातो. मॅकबेथ महत्वाकांक्षी होता; पण त्यासाठी तो कोणाचा खून करायला तयार नव्हता. मात्र उद्याच्या राजवैभवासाठी तसे करणे आवश्यक असल्याचे सांगून लेडी मॅकबेथ राजाचा खून करायला भाग पाडते. मॅकबेथला राजपद मिळते; परंतु त्यानंतर उसळलेल्या जनप्रक्षोभाला, युद्धाला सामोरे जावे लागते. लेडी मॅकबेथ भ्रमिष्ट होऊन मरते आणि मॅकबेथलाही प्राणास मुकावे लागते. अतिमहत्वाकांक्षा विघातक असून -हासाला कारणीभूत ठरते.*     ••●💥‼ *रामकृष्णहरी* ‼💥●•• संजय नलावडे, चांदीवली, मुंबई         9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• परबत परबत मै फिरया, नैन गवाए रोई | सो बूटी पौ नहीं , जताई जीवनी होई || अर्थ माणूस बर्‍याचशा ऐकीव आणि भ्रामक बाबींच्या मागे लागून जीवनातला अनमोल वेळ वाया घालवत असतो. अमृत प्राशन करणे, अमर होणे, संजीवनी व बर्‍याच अशा काही बाबी वारंवार चर्चेत येतात. या सर्व बाबींचा भौतिक विचार करून माणूस दमछाक करून घेतो. सर्व काही आपल्याच ठायी असणार्‍या कर्तृत्त्व , चिंतन , शांती व समाधानातून प्राप्त होणार्‍या या लौकिक बाबी ! मात्र माणूस वरवरचा विचार करून स्वतःची दमछाक करून घेतो. 'तुझं आहे तुजपाशी पण जागा विसरलाशी.' अशीच ही गत म्हणावी लागेल. कस्तुरी मृग कस्तुरीच्या सुगंधानं ऊर फुटेतो धाव धाव धावतो. कस्तुरी स्वतःजवळ असूनही त्याचा अंत मात्र तिच्याच शोधात होतो. तसंच माणसाचं झालंय. थोडसं पूर्वजांकडं डोकावून पाहिलं तर सर्वच जण अमरत्व गाठू शकले नाहीत. ज्यांनी ध्येयासाठी झपाटून आपल्या कर्तृत्तवाचा ठसा उमटवला. खरं तर त्यांनाच अमृताचा खर्‍या अर्थानं कुंभ सापडलेला ! त्यांनी तो कर्माच्या रूपानं प्राशन केला. आज हजारो शेकडो वर्षे लोटली. ते देहाने नसले तरी कार्य रूपानं अमर आहेत. त्यांच्या हयातीत कधी त्यांनी भ्रामक अमृताचा शोध घेतला नाही. त्यांनी कधी वेगळ्या स्वर्गाचा विचार केल्याचे ऐकिवात नाही. आपल्या कार्य क्षेत्रातंच मनोभावे स्वर्ग निर्माण केला. 'नर करणी करे सो नारायण होय ।' याची प्रचिती दिली. ज्यांनी लौकिकता व नैसर्गिकपण नाकारलं. ते सर्व अवहेलनेचे धनी ठरले आहेत. प्रतिकांचा उथळ अर्थ घेवून धावपळ करून चालत नाही. चिंतन व मननातून शाश्वत सत्ये बाहेर पडतात. ती शोधली की माणूस अजरामर होतो. हे त्या मागचं रहस्य सांगताना महात्मा कबीर म्हणतात, पर्वता पर्वतावर फिरून थकलो , दमलो, प्रसंगी रडलोही परंतु सहज अमर करणारी संजीवनी काही प्राप्त झालीच नाही. कर्म गुटिकाच माणसाला अमर करते. हे जीवनातून फलित निघालं. कर्मभूमीत हृदय आणि हृदयात कर्मभूमीला आसरा दिला की जीवनच नंदनवन होवून जातं.     एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जीवनात जर तुम्हाला काही करुन दाखवायचे असेल तर खालील गोष्टींना कधीच प्राधान्य देऊ नका. आळस,अज्ञान, खोटेपणा आणि स्वार्थीपणा. आळसाने कोणतेही काम पूर्ण होत नाही,अज्ञानाने काय खरे आणि काय खोटे हे कळत नाही,खोटे बोलण्याने आपली प्रतिष्ठा जनमानसात चांगली निर्माण होत नाही तर स्वार्थामुळे आपण एकाकीपणे पडतो त्यामुळे आपली किंमतही कोणी करत नाही. म्हणून यांना केव्हाही तुमच्या जीवनामध्ये कसलेही स्थान देऊ नका.जर तुमच्या जीवनात स्थान दिलात किंवा प्रवेश करु दिलात तर तुमचे चांगले जीवन खराब करण्यास प्रवृत्त करतात.सदैव जागृत राहणेच सर्वात महत्वाचे आहे. ©व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        *🎡 मनाचे श्लोक 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• मना सांग पां रावणा काय जाले। अकस्मात ते राज्य सर्वै बुडाले॥ म्हणोनी कुडी वासना सांड वेगीं। बळे लागला काळ हा पाठिलागी ॥१३॥ संकलन : सौ. सुभद्रा सानप, बीड •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *ईश्वरी अनुसंधानात सततचा आनंद* एकदा गरिबीने ग्रासलेल्या एका माणसाला आपल्या जीवनात फार दु:ख आहे, असे जाणवले. हे दु:ख दूर कसे करायचे, या चिंतेत तो होता. संत कबीर हे एक थोर संत असून त्यांच्या मार्गदर्शनाने अनेकांची दु:खे नाहीशी झाली असल्याचे त्याच्या कानी पडले. आपले दु:ख त्यांच्याजवळ सांगण्यासाठी तो त्यांच्याकडे गेला. कबिरांचे घर आणि त्यांचे राहणीमान अत्यंत साधे होते. हे पाहून क्षणभर तो माणूस आश्चर्यचकित झाला. आपल्या समोर आलेल्या कबीर यांना वंदन करून तो नम्रपणे म्हणाला, ”मी अत्यंत दीन आणि दु:खी आहे. तरी यावर काही उपाय असल्यास कृपा करून मला मार्गदर्शन करावे.” काहीही न बोलता कबीर त्या माणसाला घेऊन गावात फिरायला गेले. आपण इथे मार्गदर्शन घेण्यासाठी आलो असताना कबीर आपल्याला फिरायला का घेऊन चालले आहेत, हे त्या माणसाला समजेना. फिरता फिरता ते एका विहिरीजवळ थांबले. त्या काळी पाण्याचे नळ नव्हते. लोकांना विहीर किंवा नदीवरून पाणी आणावे लागत असे. मार्गसुद्धा नीट नव्हते. ओबडधोबड, खाचखळग्यांचे किंवा दगडगोट्यांचे होते. एका विहिरीवर काही बायका कपडे धूवत होत्या, तर काही जणी घरी नेण्यासाठी छोट्या-छोट्या घागरींमध्ये पाणी भरत होत्या. पाणी भरून झाल्यावर त्यातील काही बायकांनी आपल्या डोक्यावर एकावर एक अशा पाण्याने भरलेल्या तीन घागरी ठेवल्या आणि आपापसांत गप्पा मारत चालू लागल्या. कबिरांनी त्या माणसाला हे दृश्य दाखवले आणि म्हणाले, ”डोक्यावर पाण्याने भरलेल्या तीन घागरी असतांनाही कशा गप्पा मारत चालल्या आहेत. त्यांना त्या घागरी खाली पडून फुटतील याची भीती वाटत नाही. आपण त्यांना याचे कारण विचारून पाहूया.” आपल्या डोक्यावर पाण्याने भरलेल्या घागरी घेऊन जात असलेल्या काही महिलांच्या जवळ जाऊन कबिरांनी विचारले, ”बायांनो, डोक्यावर घागरी ठेवून तुम्ही अशा तऱ्हेने गप्पा मारत आहात. त्यावर त्यापैकी एका बाईने उत्तर दिले आम्ही गप्पा मारत असलो तरीही आमच सर्व लक्ष त्या घागरीकडे असते.यावर त्या माणसाला कळले संत कबिराला आपणास काय म्हणायचे आहे.बाह्यरंगात कितीही व्याप असला तरी अंतरगात माञ ईश्वरी अनुसंधान असावे. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00           ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 12/02/2019 वार - मंगळवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :-  १९७६: पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या हस्ते हडेक्की (केरळ) प्रकल्प देशास अर्पण. १९९३: एम. एन. वेंकटचलैय्या यांनी भारताचे २५ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला. २००३: आवाजापेक्षा दुप्पट वेगवान ब्राह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली. 💥 जन्म :- १८०९: अमेरिकेचे १६ वे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन  १९४९: शैलीदार फलंदाज गुन्डाप्पा विश्वनाथ  💥 मृत्यू :-  १९९८: कवयित्री पद्मा गोळे २०००: सहकार क्षेत्रातील नामवंत नेते विष्णुअण्णा पाटील  २००१: अभिनेत्री भक्ती बर्वे *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा मिळावा, या मागणीसाठी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी राजधानी दिल्लीत केले एका दिवसाचे उपोषण* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *सर्वोच्च न्यायालयाने अल्पसंख्यांक आयोगाला तीन महिन्यात देशातील अल्पसंख्यांकाची व्याख्या निश्‍चित करण्याचे दिले आदेश * •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *शेतामध्ये काम करत असताना अपघात घडल्यास जखमी शेतमजुरास किंवा मृत शेतमजुराच्या वारसास यापुढे शेतमालकाला नुकसान भरपाई, सानुग्रह अनुदान किंवा मृताच्या वारसाला द्यावी लागणार नोकरी.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *पुणे : महाराष्ट्रात आप लढविणार १० जागा, आम आदमी पक्षाने पुणे लोकसभा निवडणूक लढविण्याची केली घोषणा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *इपीएफओ आपल्या सहा कोटीहून अधिक अंशधारकांसाठी आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये कर्मचारी भविष्य निधीवरील ८.५५ टक्के व्याज दर कायम ठेवण्याची शक्यता* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *आदिवासी बांधवांना वनहक्काचे सातबारा देण्यासंदर्भात विशेष मोहीम सुरू करुन हे काम एक महिन्यात पूर्ण करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विभागांना स्पष्ट सूचना* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *एफसेंट ल्युसिया : वेस्ट विंडीज आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या तिसर्‍या कसोटीत इंग्लंड संघ मजबूत स्थितीत* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *पाऊलवाट भाग 10 आराम हराम है ।* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/02/10.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••          *अभिनेता प्राण* प्राण किशन सिकंदर ऊर्फ प्राण हे हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते होते. प्राण यांचे वडील कंत्राटदार असल्यामुळे गावोगावी फिरत असत. प्राण हे रामपुरी चाकूसाठी प्रसिद्ध असलेल्या रामपूर येथून मॅट्रिक पास झाले. पुढे न शिकता त्यांनी दिल्लीत कॅनॉट प्लेसजवळील दास फोटोग्राफी स्टुडिओ या दुकानात नोकरी धरली. दाससाहेबांनी दुकानाची लाहोरला शाखा काढली आणि प्राणला तेथे नेमले. दुकानातले काम संपले की एका ठरावीक उपाहारगृहात प्राण आणि त्यांच्या मित्रांची मैफिल रंगायची. एके दिवशी एक मुमताज शांती या त्या काळच्या आघाडीच्या अभिनेत्रीचे पती, आणि दलसुख पंचोली या चित्रपट निर्मात्याचे पटकथा लेखक वली हे प्राणच्या टेबलाजवळ आले आणि त्यांनी त्याला चित्रपटात काम देण्याची पक्की ऑफर दिली. दुसर्‍या दिवशी स्टुडिओत यायला सांगितले. मात्र प्राणसाहेबांनी या बोलावण्याकडे दुर्लक्ष केले. त्यांना चित्रपटात काम करण्याची मुळीच हौस नव्हती. नोकरीत मिळणारे २00 रुपये त्यांना पुरेसे वाटत होते. आठ दिवसांनी परत वली प्राणला भेटले, त्याला खूप बोलले आणि स्टुडिओत का आला नाहीस म्हणून जाब विचारला. प्राणसाहेब म्हणाले, मला काय माहीत की ही ऑफर खरी आहे? मात्र त्यांनी दुसर्‍या दिवशी स्टुडिओत यायचे कबूल केले. पंचालींसमोर उभे राहिल्याबरोबर त्यांनी प्राणला 'जट यमला'या पंजाबी सिनेमासाठी करारबद्ध केले आणि हातावर आगाऊ म्हणून ५0 रुपये ठेवले. त्यांनी भारतीय चित्रपटसुष्टीत ७0हून अधिक वर्षे घालवून ४00हून अधिक चित्रपटांत अभिनय केला आहे. खलनायक म्हणून त्यांच्या भूमिका गाजल्या असल्या तरी त्यांनी इतरही प्रकारच्या भूमिका केल्या आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांचा प्रवेश नूरजहान हिच्याबरोबर खानदान या चित्रपटात इ.स. १९४२ साली केलेल्या नायकाच्या भूमिकेपासून झाला. प्राण यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात लाहोरमध्ये तयार झालेल्या १७ चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. दिलीप कुमार, राज कपूर, अशोक कुमार, बलराज सहानी यांच्याबरोबर काम करताना आपले शिक्षण आणि वाचन कमी असल्याचे प्राण यांना जाणवले. आपल्याला रंगमंचावर काम करण्याचा अनुभव नाही, त्यामुळे असल्या नायकांबरोबर टिकून राहायचे असेल तर खूप मेहनत केली पाहिजे, आणि आपल्या भूमिकेत वेगळेपणा आणला पाहिजे याची त्यांनी खूणगाठ बांधली. मग ते पटकथा लेखकांशी आणि दिग्दर्शकांशी चर्चा करून भूमिका समजावून घेऊ लागले आणि आपल्या परीने त्यांत लकबींचा वापर करू लागले. 'जिस देश में गंगा बहती है'मध्ये राकाच्या मनातली फाशीची भीती दाखवणारी गळ्यावरून बोट फिरवायची त्यांची लकब राज कपूरला खूप आवडली. अशाच वेगवेगळ्या लकबी त्यांच्यातील खलनायकाने चित्रपटांमधून वापरल्या. प्राणसाहेबांनी हिंदी चित्रपटांतील खलनायकाला 'स्टार' बनवले. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्याला अनंत शक्ती, असीम उत्साह, अपार सहस आणि धीर पाहिजे. तरच आपल्याकडून महान कार्ये होतील. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) 'आनंदभुवन' हे पर्यटनस्थळ कोणत्या शहरात आहे?*  प्रयागराज *२) वाचन प्रेरणा दिन कधी साजरा करतात?*  १५ ऑक्टोबर  *३) मे २०१५ मध्ये महाराष्ट्र भूषण हा महाराष्ट्र सरकारचा सर्वोच्च सन्मान कोणाला मिळाला?* बाबासाहेब पुरंदरे *४) किरगीज लोकांचे मुख्य पेय कोणते?* क्युमीस *५) सशक्त सैन्याच्या दृष्टीने भारताचा जगात कितवा क्रमांक आहे?*              तिसरा *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● सुनील कवडे ● रविंद्र दुबिले ● विनोदकुमार भोंग ● अशोक शिलेवाड ● विजयकुमार पवारे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *दिशा* विचारा वरून कळते की दिशा काय आहे लक्षात येते लगेच की भविष्यात दशा काय आहे चांगले काम करणाराला कशाची आशा रहात नसते योग्य दिशा असली की कधीच दशा होत नसते शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *"या जगात अनेक जातीचे प्राणी, अनेक जातीच्या वनस्पती इ. आहेत. (आंब्याची जात गोड चवीची तर कारल्याची जात कडू चवीची.) अशा अनेक जातींचे अनेक वेगवेगळे रंग आहेत. अशा अनेकविध जाती आणि त्यांच्या गुणधर्मानुसार व्यक्त होणारे रंग-ढंग एकत्र येऊन तर 'जग' हे नाव निर्माण झालं आहे." या जगात खूप काही असलं तरी हिताचं जे मोजकंच आहे, त्याला खरी किंमत आहे. 'शब्दज्ञान' किती मर्यादित असतं, याचं बोधक उदाहरण म्हणजे "उजेड काजव्यातूनही निघतो, पण तो फक्त त्याच्या पार्श्वभागापूरताच उजेड देतो, आणि तेही कायम नाही देत; तर चालू-बंद, चालू-बंद असा देतो." शब्दज्ञान हे काजव्याच्या उजेडासारखं आहे. ते देणा-याच्यासुद्धा समोर प्रकाश पाडत नाही. असा उजेड जगाला काय प्रकाश देणार? शब्दज्ञानानं समाजाचं जाऊ द्या, स्वतःचंही भलं होऊ शकत नाही.* *स्वतःसहीत समाजाचंही भलं करायचं असेल, तर कॉपी-पेस्ट बंद झालं पाहिजे. ज्ञान आता शब्दांचं नको तर अनुभवाचं असायला हवं.--* *तुका म्हणे झरा । आहे मुळचाची खरा ।।* *तुकोबा म्हणतात, "माझं ज्ञान हे काही कुठून आयात केलेलं नाही. ते कॉपी केलेलं नाही. माझ्या ज्ञानाचा जो झरा आहे, तो माझ्या अंतःकरणातून प्रकट होतो." याउलट शब्दज्ञानी माणसाचं ज्ञान समुद्राइतकं विशाल दिसत असलं, तरी ते अनेक नद्या, नाले, झरे यांच्यावाटे आलेलं आहे. जरी विशाल असला तरी समुद्राचं पाणी तहानलेल्याची तहान भागू शकत नाही, तसं शब्दज्ञान लोकांचं भलं करू शकत नाही. त्यासाठी आवश्यकता आहे ती अनुभवाच्या झ-याचीच.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई         9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• कबीर सतगुर ना मिल्या , रही अधूरी सीश | स्वांग जाति का पहरी कर , घरी घरी मांगे भीष || अर्थ : महात्मा कबीर गुरूचे जीवनातील अनन्य साधारण असणारे महत्त्व सांगताना म्हणतात की, जीवन जगताना असो की शिक्षण घेताना असो गुरू असलाच पाहिजे. गुरू (मार्गदर्शक) भेटला नाही ज्ञानाची अर्धवट प्राप्ती होते. अर्धवट ज्ञान आत्मघातकी ठरतं. ते जीवनाच्या वाटेवर सर्वात घातक ठरू शकते. महाभारतातील अभिमन्यूचा प्रसंग समजून घेतला तरी अर्धवट ज्ञान किती धोकादायक ठरतं हे पुढील पिढ्यांच्या ध्यानी यायला वेळ लागणार नाही. अभिमन्यू कुशल योद्धा होता. चक्रव्युहात घुसणे जाणत होता परंतु चक्रव्पुह भेदण्याची कला त्याला जमत नव्हती. त्यातच त्याला प्राण गमवावा लागला. अर्धवट ज्ञानी पारंगत असल्याचं ढोंग करतो. या ढोंगापायी त्याला नकल करावी लागते. नकल करणारा परिपूर्ण असत नाही. अशा व्यक्तींच्या माध्यमातूनच अंधश्रद्धा व चुकीच्या रुढी समाजात पसरवल्या जातात. ही अर्धशिक्षित फौजच समाजाला चुकीच्या दिशेनं नेते. संभ्रम निर्माण करीत असतात. स्वतःच्या मार्गाला विवेकाची जोड नसल्याने स्वतःचीच फसगत करून घेतात. प्रसंगी पथ भरकटून भीक मागण्याचेही त्यांच्या नशिबी येते.     एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्यातील अहंकाराने आपल्या  रागावर नियंत्रण कधीच ठेवता येत नाही आणि त्यामुळे आपल्या जीवनात अनेक कटू प्रसंग ओढवले जातात.त्या काळात काय होत आहे याचेही भान राहत नाही.जेव्हा आपल्यातील राग संपून जातो तरी अहंकारमात्र तसाच चिटकून राहतो. पुन्हा पुन्हा आपल्यातील अहंकार जागा होऊन तीच ती कृती करण्यासाठी प्रेरणा देतो.त्यामुळे आपल्या जीवनात खूप काही नुकसान सोसावे लागते.म्हणून आपला राग आणि अहंकार नष्ट करायचा असेल तर पहिल्यांदा आपल्यातील अहंकाराला तिलांजली द्यायला हवी नंतर आपोआपच आपल्यातील राग नष्ट होईल आणि हे दोन्ही आपल्या जीवनातून गेले की, जीवन सुखावह होईल. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        *🎡 मनाचे श्लोक 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• मना मानसीं दु:ख आणूं नको रे। मना सर्वथा शोक चिंता नको रे॥ विवेके देहेबुद्धि सोडूनि द्यावी। विदेहीपणें मुक्ति भोगीत जावी ॥१२॥ संकलन : सौ. सुभद्रा सानप, बीड •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *इच्छाशक्तीचा बळावरच यश मिळविणे.* केवळ सव्वा वर्षांची असताना मेंदुज्वरामुळे दृष्टी आणि ऐकण्याची क्षमता गमावलेली एक मुलगी आज जगविख्यात लेखिका म्हणून नावारूपाला आली आहे. तुम्हाला हा चमत्कार वाटत असेल तर, त्याची जनकही हीच मुलगी आहे. हेलेन केलर असे या मुलीचे नाव.  आपल्या केवळ इच्छाशक्तीच्या बळावर तिने आपल्या कठीण मानल्या जाणार्‍या आजारालाही नियंत्रित केले. ज्या वयात तिचे खेळायचे-बागडायचे दिवस होते, त्या वयात तिच्या पुढ्यात केवळ अंधार होता.  आजारामुळे तिला सुरुवातीला नैराश्य आले होते. तिच्या पालकांनी मग तिची जबाबदारी एनी सुलियन यांच्याकडे सोपवली. अगदी ब्लॅक चित्रपटात अमिताभ ज्या पद्धतीने राणी मुखर्जीला स्पर्शाची भाषा शिकवतो. अगदी त्याच पद्धतीने एनीने हेलेनला स्पर्शाची भाषा शिकवली.  यानंतर एनीने तिला भाषा शिकवण्यासाठी जिवाचे रान केले. तिला प्रथम हाताने भाषा शिकवत शब्दांचे अर्थ तिला समजावले. यानंतर हेलरच्या मनात नवीन उमेद जागी झाली. हेलरने यानंतर कधीही मागे वळून पाहायचेच नाही हे ठाम केले.  तिच्यात एक अशी ऊर्जा निर्माण झाली, की या ऊर्जेने तिला नवीन दृष्टी दिली, आणि ही ऊर्जा होती तिच्या इच्छा शक्तीची. या बळाच्या आधारेच तिने रेडक्लिफ महाविद्यालयातून आपली पदवी मिळवली. या दरम्यान हेलेनचे पहिले पुस्तक 'द स्टोरी ऑफ लाईफ' प्रकाशित झाले. यानंतर याचे जवळपास 50 भाषांमध्ये या पुस्तकाचे भाषांतर करण्यात आले.  इथे हेलन यांच्या केवळ इच्छाशक्तीचाच विजय झाला. त्यांनी बालपणातच जर हार मानली असती तर जगाला इतकी प्रतिभाशाली लेखिका मिळालीच नसती. म्हणूनच केवळ इच्छाशक्तीच्या बळावरच आपण विजय मिळवू शकतो हे विसरता कामा नये. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00           ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 11/02/2019 वार - सोमवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १८३० - मुंबईचे हंगामी राज्यपाल सर सिडने ब्रेकनिथ यांच्या अध्यक्षतेखाली सभा होऊन ऍग्री हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना. १९७९ - पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी अंदमान निकोबार बेटावरील सेल्युलर जेल राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले. १९३३ - म. गांधी यांच्या हरिजन वीकली चा पहिला अंक प्रसिद्ध झाला. १९९९ - मध्यप्रदेश सरकारतर्फे दिला जाणारा लता मंगेशकर पुरस्कार प्रसिद्ध संगीतकार इलायराजा यांना जाहीर. 💥 जन्म :- १९४२ - गौरी देशपांडे, मराठी लेखिका. 💥 मृत्यू :- १९४२ - जमनालाल बजाज, प्रसिद्ध गांधीवादी कार्यकर्ते आणि बजाज उद्योगसमूहाचे प्रवर्तक. १९६८ - पंडित दीनदयाळ उपाध्याय, भारतीय जनसंघाचे अध्यक्ष. १९९३ - कमाल अमरोही, चित्रपटांचे निर्माते, प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *महाराष्ट्राने रेशीम शेती उद्योग क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरीसाठी महाराष्ट्राला उदयोन्मुख राज्याचा पुरस्कार केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज आणि वस्त्रोद्योग मंत्री स्मृती ईराणी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. * ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *किसान सन्मान योजना मोदींसाठी डोकेदुखी; केंद्र सरकारची लोकसभा निवडणुकीपूर्वी घाई* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *राजस्थानमध्ये आरक्षणासाठी गुर्जर समाजाचं आंदोलन सुरूच* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *केंद्र सरकार राज्यांकडून हिशेब मागत असल्यानं राज्य सरकार टेन्शनमध्ये आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *कडाक्याच्या थंडीने महाबळेश्वर गोठलं, परभणीमध्ये 6.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *हॅमिल्टन : स्मृती मानधनाच्या 86 धावांच्या फटकेबाजीनंतरही भारतीय महिला संघाला अखेरच्या ट्वेंटी-20 सामन्यात न्यूझीलंडकडून हार पत्करावी लागली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *हॅमिल्टन : यजमान न्यूझीलंड संघाने सांघिक कामगिरी करताना विजय मिळवला. न्यूझीलंडने तिसरा सामना 4 धावांनी जिंकून मालिका 2-1 अशी खिशात घातली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• प्रिय वाचक सप्रेम नमस्कार विनंती विशेष https://drive.google.com/file/d/14-L8iLJCkuh-hmQVdFop15I9B-cn-B-n/view?usp=drivesdk *आज सोनियाचा दिन* हे वाचण्यासाठी वरील लिंकवर क्लिक करावे. माझ्या आगामी येत असलेल्या ई बुकबद्दल विचारधनचे लेखक श्री संजय नलावडे, मुंबई यांचा शुभेच्छा संदेश खालील लिंक वर वाचन करता येईल. https://nasayeotikar.blogspot.com/2019/02/blog-post_47.html आपण ही शुभेच्छा संदेश माझ्या क्रमांकावर पाठवावे. ही विनंती. - नासा येवतीकर, स्तंभलेखक 9423625769 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        *पंडित दीनदयाळ उपाध्याय*        दीनदयाळ उपाध्याय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे चिंतक व विचारक होते. ते संघटनकार्य करणारे होते. ते उत्तम लेखक होते. त्यांचा जन्म २५ सप्टेंबर १९१६ रोजी मथुरा जिल्ह्यातील नगला चंद्रभान गावात झाला. त्यांनी पिलानी, आग्रा व प्रयाग येथे शिक्षण पूर्ण केले.नंतर मात्र ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य होते. ते संघाचे प्रचारक होते.१९५१ मध्ये अखिल भारतीय जनसंघाचे मंत्री बनले. पुढे १९५३ मध्ये त्यांना जनसंघाचे महामंत्री बनवण्यात आले. त्यांनी तब्बल पंधरा वर्षे हे पद सांभाळले. कालीकतच्या अधिवेशनात ते जनस्ंघाचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. १८६७ च्या सुमारास जनसंघाचे प्रमुख बनले. १९६८ मध्ये प्रखर राष्ट्रवादी नेते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा मृत्यू.  *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आनंदी मन, सुदृढ शरीर आणि अध्यात्मिक श्रध्दा ह्या तीनही गोष्टी लाभणं म्हणजे अमृत मिळणं. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) विद्युत प्रवाह मोजणारं उपकरण कोणतं?*           अँमीटर *२) जगातील पहिली भुयारी रेल्वे कोठे सुरू झाली?*           लंडन *३) बर्म्युडा ट्रँगल हे भौगोलिक ठिकाण कोठे आहे?*             उत्तर अटलांटिक महासागर *४) वादग्रस्त तेलंगणाप्रकरणी केंद्र सरकारने कोणती समिती नेमली होती?*             बी.एन.श्रीकृष्ण समिती *५) डायलिसिसचा उपयोग कधी होतो?*            मूत्रपिंडाच्या विकारात              *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ◆ प्रमोद शिंदे ◆ दत्तात्रय दळवी ◆ म. जावेद ◆ रविशंकर बोडके ◆ माधव हिमगिरे ◆ ज्ञानेश्वर पलिकोंडलवार ◆ राणी पद्मावार ◆ प्रभाकर बेरजे ◆ कृष्णकांत लोणे ◆ शिवराज हलीखेडे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *नाटकं* दिखाव्या करता ते शुद्ध नाटकं करतात काही क्षण लोकांच्या मनात हिरो ठरतात दिखावा ताबडतोब ओळखला जाऊ शकतो खोटं कितीही रंगवा प्रेक्षक काही काळच पाहू शकतो    शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••,     *आधीं फळासी कोठें पावो शके ।*      *वासनेची भिकेवरी चाली ।।*      *तुका म्हणे राजहंस ढोरा नाव ।*      *काय तया घ्यावे अळंकाराचें  ।।* *"एका चांगल्या गोष्टीबरोबर दुसरी वाईट गोष्ट सोबतच असते. माणूस विद्वान तर आहे, पण त्याला धन आणि मानाची अपेक्षा असेल तर?  ही अपेक्षाच त्याचा नाश करत असते, ही सिद्ध झालेली गोष्ट आहे." अपेक्षेसोबत अपेक्षाभंग असतो, हे पटवून देण्यासाठी प्रमाणाची आवश्यकता नाही. "आपण ज्या ज्या इच्छा करतो, जेवढ्या अपेक्षा बाळगतो त्या सर्वच्या सर्वच पूर्ण कशा होऊ शकतील? पण माणूस हे समजून घेत नाही. हे पाहिजे, ते पाहिजे या आणि अशा अनेक वासना  माणसाला शेवटी भीक मागायला लावत असतात." हव्यासापोटी भिकेला लागण्याची वेळ आली तरी माणूस शहाणा होत नाही.* *जुगारात मिळण्याची अपेक्षा सर्व घालवून बसते. राज्यच काय पण बायकोला सुद्धा 'डावात' हरून बसल्याची साक्ष महाभारतासारखे ग्रंथ देतात. संत तुकाराम आपल्याला शहाणं करण्याचा प्रयत्न करत आहेत. इच्छेतून अपमानित होण्याची वेळ येणार नाही ही काळजी घेतलीच पाहिजे. "एखाद्या गाढवाचं 'राजहंस' असं अलंकारीक नाव जरी ठेवलं, तरी त्या नावाचं त्या गाढवाला काय भूषण वाटणार आहे?" गाढवाची राजहंस नाव ठेवण्याइतकीसुद्धा पात्रता नसते आणि त्याला त्याचं भूषणही वाटत नसतं.*    ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 💥💥💥💥💥💥💥💥💥 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई         9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••• जो रोऊ तो बल घटी , हंसो तो राम रिसाई | मनही माहि बिसूरना , ज्यूँ घुन काठी खाई || अर्थ : सांसारिक जीवन षड्विकारांनी भरलेलं आहे. मोह , माया, मद, मत्सर, भय, मैथुन हे ते षड्विकार. यांनी जीवनातला परमानंद हिरावून घेतला आहे. ठायी ठायी करावी लागणारी तडजोड वारंवार मानवतेच्या विवेकशील सत्य मार्गापासून भरकटवून टाकते. त्यामुळे होणार्‍या यातना असह्य होतात. त्यामुळे रडकुंडीला येतो. रडायचं ठरवलं तर जगाच्या नजरेत भित्रा ठरण्याची भय. चालतोय तोच मार्ग योग्य आहे असे समजून हसायला लागलो तर ती वाट सत्याशी व अंतरात्म्याशी गद्दारी करणारी. अशा द्वंद्वात अडकून आगतिकपणे जीवनाकडे पाहण्याचा प्रयत्नही अधिकच बेचैन करतोय. मनाला शांती मिळत नाही. सतत अस्वस्थ वाटायला लागतं. एखाद्या मजबूत व भक्कम लाकडाला वाळवी लागावी आणि तिने त्या लाकडाला आतून कुरतडून काढावे. अशी गत झाली आहे संसारी. अशी घुसमट करून घेण्यापेक्षा ताठ मानेने जगायचे तर सत्याचा अंगीकार करून विवेकपूर्ण जगायला हवे. त्यायोगे आपलं नाणं खणखणीत राहील. सारवासारवी व बणवाबनवी असा कधी प्रसंगच येणार नाही . अंतरात्म्याकडूनही प्रताडणा होणार नाही. आंतरिक समाधान आपोआपंच चेहर्‍यावर विलसायला लागेल.     एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      तुमच्या आशारुपी पंखांना खूप पसरु द्या.कारण तेच पंख तुमच्या आशा पूर्ण करण्यासाठी मदत करतात.त्यांना जर संकुचित वृत्तीने तुमच्याच मनामध्ये जवळ करुन ठेवलात तर तुमच्या मनातल्या असलेल्या इच्छा पूर्ण कशा होतील ? त्यापेक्षा त्या पंखामध्ये आत्मविश्वासरुपी बळ निर्माण करुन त्यांना नवे काहीतरी करण्यासाठी पसरु द्या म्हणजे तुम्हाला आनंदाने आणि समाधानाने जीवन जगण्यासाठी संधी निर्माण करुन देतील. पक्षी आकाशात स्वच्छंदपणे विहार करतात ते पंखाच्या बळावरच ना ! मग पंखच पसरले नसते किंवा एखादी बाजू पंख विरहित असली तर कसे बरे आकाशात विहार करु शकले असते का ? नाही ना ? मग तसेच मानवी जीवनाचे आहे.आशारुपी पंखांचे तसेच आहे त्यांनाही थोडे स्वातंत्र्य द्या आणि जीवनरुपी आकाशात स्वच्छंदपणे विहार करायला प्रेरणा द्या. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद...९४२१८३९५९०. 🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        *🎡 मनाचे श्लोक 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जनीं सर्वसूखी असा कोण आहे। विचारें मना तुंचि शोधुनि पाहे॥ मना त्वांचि रे पूर्वसंचीत केले। तयासारिखे भोगणें प्राप्त जाले ॥११॥ संकलन : सौ. सुभद्रा सानप, बीड •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        *आयुष्याची खरी किंमत* एका नातवाने आपल्या आजोबांना प्रश्न विचारला " आयुष्याची खरी  किंमत काय असते हो? " आजोबांनी त्याला एक दगड दिला आणि म्हणाले " ह्या अगोदर तू ह्या दगडाची खरी किंमत कळावी अशी माझी इच्छा आहे. दगडाची फक्त किंमत काढून ये , विकू नकोस . " सर्वप्रथम नातवाने एका फळवाल्याला त्या दगडाची किंमत विचारली . तो त्या चकाकणाऱ्या दगडाला बघून  म्हणाला - ".या दगडाचा मोबदला म्हणून मी तुला एक डझन सफरचंदे देऊ शकतो." नातवाने  आजोबांच्या आज्ञेमुळे दगड विकू शकत नसल्याबद्दल  त्याची माफी मागितली व निघाला . वाटेत त्याला एक भाजीवाला दिसला आणि त्याने त्याला त्या चकाकणाऱ्या दगडाची किंमत विचारली - " मी तुम्हाला याच्या बदल्यात एक पूर्ण पोते भरून बटाटे देऊ शकतो. " पुन्हा एकदा नातवाने आजोबांच्या आज्ञेमुळे दगड विकू शकत नसल्याबद्दल त्याची माफी मागितली व निघाला. आता त्याला एका सराफाचे दुकान लागले. आत जाऊन त्याने तो चमकणारा दगड सराफाला दाखवून त्याची किंमत विचारली. आपल्या भिंगातून त्या खड्याचे निरीक्षण करताच तो सराफ उत्तरला - " या खड्यासाठी मी तुम्हाला  दश लक्ष रुपये देऊ शकतो." नातवंडाला फार आश्चर्य वाटले पण नातवाने आजोबांच्या आज्ञेमुळे दगड विकू शकत नसल्याबद्दल  त्याची माफी मागितली व निघाला. थोडे पुढे आल्यावर त्याला अतिशय दुर्मिळ रत्न आणि मणी विकणारे दुकान दिसले. त्याने तो दगड तिथल्या रत्नपारख्यास दाखवला. तो रत्नपारखी ह्या विषयात अतिशय निष्णात होता.त्याने अलगद तो दगड एका मखमली कापडावर ठेवला. त्या दगडाच्या अवती भोवती प्रदक्षिणा घालत तो म्हणाला - " अहो, एवढा अमूल्य दुर्मिळ  अनघड हिरा तुम्ही कुठून बरे आणला? मी माझे अख्खे दुकान जरी विकले तरी सुध्दा ह्या हिऱ्याची किंमत तुम्हाला देऊ नाही शकणार ." आता मात्र नातू अतिशय चकित झाला आणि गोंधळलेल्या मनःस्तिथीत  तो आजोबांकडे परतला . त्याचे सर्व अनुभव ऐकून आजोबा म्हणाले - "  मला वाटते फळवाला, भाजीवाला, सराफ आणि रत्नपारखी ह्यांच्या उत्तरावरून तुला आयुष्याच्या मोलाविषयी कळले असेल. तुम्ही जरी अतिशय दुर्मिळ अमूल्य हिरा असलात तरी सुध्दा लोक तुमची किंमत त्यांच्या सीमित समजुती, आकलनशक्ती, हेतू आणि कुवतीनुसारच करणार." त्यामुळे आयुष्यात स्वतःची किंमत जाणून घेणे सर्वात महत्वाचे असते. स्वतःचा आदर करा. इतरांबरोबर कोण्यात्याही निरर्थक तुलने मध्ये गुंतू नका.  तात्पर्य  :- मनुष्य या विश्वातील एक अभिनव आणि अद्वितीय निर्मिती आहेत. तुमच्या सारखे फक्त तुम्हीच आहात. हीच तुमच्या आयुष्याची खरी किंमत आहे. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00           ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 05/02/2019 वार - मंगळवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १९९६ - मुंबई येथील चौथ्या आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवात 'सोना माटी' या भारतीय लघुपटाने सुवर्णपदक पटकावले. २००३ - अंतराळवीर कल्पना चावला यांचे नाव भारताने २००२ मध्ये सोडलेल्या पीएसएलव्ही सी-४ या हवामानविषयक उपग्रहाला देण्यात आल्याची पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची घोषणा. २००४ - पुण्याच्या स्वाती घाटेने वूमन ग्रँडमास्टर किताबाचा तिसरा व शेवटचा नॉर्म संपादन केला. 💥 जन्म :- १९०० - अडलाई स्टीवन्सन, अमेरिकन राजकारणी. १९७६ - अभिषेक बच्चन, भारतीय चित्रपट अभिनेता. 💥 मृत्यू :- १९२० - विष्णुबुवा जोग, वारकरी संप्रदायाचे कार्य पुढे नेणारे. २००० - वैद्य माधवशास्त्री जोशी, महाराष्ट्र आयुर्वेद महासंमेलनाचे माजी अध्यक्ष. २००३ - गणेश गद्रे, ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *पश्‍चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवटीची शक्यता, जीव देईन पण तडजोड करणार नाही - पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी * ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *केंद्राप्रमाणे राज्यातही अराखीव प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना शासकीय सेवा व शैक्षणिक संस्थांमध्ये १० टक्के आरक्षण मंजूर करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या (पीएफ) सदस्यांनाही किमान ३००० रुपयांचे निवृत्तीवेतन देण्याचा निर्णय लवकरच घेतला जाण्याची शक्यता आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *कांदा अनुदानास ३१ जानेवारीपर्यंतची मुदतवाढ ग्राहय़ धरणार - सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *अण्णा हजारे उपोषणावर ठाम; केंद्रीय राज्यमंत्री सुभाष भामरेंसोबतची चर्चा अर्ध्यावरच सोडली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *मराठी अभिनेते रमेश भाटकर यांचे निधन, ते 70 वर्षाचे होते.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *न्यूझीलंडविरुद्धची एकदिवसीय मालिका भारताने ४-१ ने जिंकली, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव यांनी केले संघातील आपले स्थान पक्के* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••     *कथा - बदल्याचा बळी* वरील कथा पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_2.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *विष्णुबुवा जोग* विष्णु नरसिंह जोग (जन्म : पुणे, १४ सप्टेंबर १८६७ - ५ फेब्रुवारी १९२०) हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे कार्य पद्धतशीरपणे पुढे नेण्याचे प्रयत्‍न करणारे सत्पुरुष होते. विष्णुबुवा जोग म्हणून हे सर्वपरिचित आहेत. ते आळंदीतील कीर्तनकार, प्रवचनकार, वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक, आणि लेखक होते. विष्णुपंत जोग हे अत्यंत निरिच्छ असून लोकमान्य टिळक यांचे स्नेही व चाहते होते. ते स्वदेशी वस्तू वापरीत आणि टिळकांना यथाशक्ती मदत करीत. विष्णुबुवांचा जन्म पुण्यात झाला. त्यांच्या आईचे नाव सरस्वती होते. त्यांना तीन मोठे भाऊ होते. त्यांतील एक पांडोबा महाराज हा मल्ल होता. विष्णुबुवांनाही लहानपणापासून मल्लविद्येचा नाद होता. पांडोबांप्रमाणे तेही अविवाहित राहिले. विष्णुबुवा पुण्यातील नगरकर तालमीचे वस्ताद होते. विष्णुबुवा फारसे शिकलेले नव्हते, पण पांडोबांबरोबर आळंदीला जाऊन जाऊन ते पांडुरंगाचे भक्त झाले. त्यांनी कुठल्याही फडाचा आश्रय न घेता, आळंदीला जाऊन ज्ञानेश्‍वर महाराजांच्या समाधीवर माळ ठेवून तीच आपल्या गळ्यात घातली व आपण वारकरी झाल्याचे घोषित केले. जोग महाराजांची ही क्रांती त्यांच्याच पाच-दहा शिष्यांपुरती (ज्यांच्यात प्रसिद्ध कादंबरीकार ना. सी. फडकेही होते) मर्यादित राहिली असती, किंवा कदाचित त्यांचाच एक स्वतंत्र फड निर्माण झाला असता; पण आपल्या आयुष्याच्या अखेरच्या पर्वात त्यांनी आळंदीमध्ये वारकरी शिक्षण संस्थास्थापन केली व वारकरी संप्रदायाच्या वाढीची क्षमता अमर्याद केली.     *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• तुमच्या जीवनाला वळण देण्याचा एक छोटा प्रयत्न म्हणजे ध्येयवेडा प्रवास *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) झाकिर हुसेन या कलाकाराचा संबंध कोणत्या वाद्याशी आहे?* तबला *२) एस्किमोंचं घर कशापासून बनलेलं असतं?* बर्फ *३) श्रीलंकेत सर्वाधिक प्रमाणात वास्तव्यास असणारा समाज कोणता?* सिंहली *४) भारताची समुद्रसीमा किती किलोमीटर लांबीची आहे?* ७५०० कि.मी. *५) घाना पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे ?*              राजस्थान *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● सौ. रंजना जोशी ● सदाशिव मोकमवार ● निलेश गोधने ● भीमराव वाघमारे ● संदीप मुंगले ● श्याम राजफोडे ● विठ्ठल पेंडपवार ● बालासाहेब कदम ● अच्युत पाटील खानसोळे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जाहिरात* जाहिरातीत खोटं ते खरं असे ठसवले जाते  खोट्याला खरं म्हणून  डोक्यात बसवले जाते  विश्वसनिय वाटणारीही  जाहिरात फसवी असते  जाहिरात म्हणजे फक्त  खिसे उसवा उसवी असते      शरद ठाकर    सेलू जि परभणी    8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *प्रतिकूल परिस्थितीत सहाय्य करणारी माणसं ते निरपेक्ष करत नाहीत. आपण सतत त्यांच्या ताटाखालचं मांजर राहावं, अशी त्यांची धारणा असते. आजन्म लीन राहिलो की, अशी माणसं खुश असतात. पैसा, साधनसंपत्तीच्या जोरावर व्यक्तिगत प्रतिष्ठा जोपासण्याचा उद्योग अत्यंत चिड आणणारा आहे. 'शिक्षकदिनी' संस्थेतर्फे शिपायापासून प्राचार्यापर्यंत त्यांच्याप्रती आदर म्हणून एक छापील प्रमाणपत्र व फूल देऊन अध्यक्षांच्या हस्ते सत्काराचा कार्यक्रम पाहिला. सत्कार स्विकारल्या नंतर शिपाई ते प्राचार्य सर्वजण अध्यक्षांच्या नतमस्तक झाले. मूळ कार्यक्रमच मुळी सर्वांना वार्षिक दीन करण्याचा होता.*  *समाजव्यवस्थाच अशी बनून गेली आहे की, नोकरदारांना खिंडीत गाठून लीन, दीन, मलीन, अधीन करत ठेवायचे. त्याचं रूपांतर पाठीचा कणा नसलेला संप्रदाय आकाराला येऊ लागला आहे. त्यांना मन, मत, मनगट असून नसल्यासारखे आहे. 'खाल मान्या, हो नाम्या' असं जीणं त्यांनी आयुष्यभर जगायचं. काही कर्तृत्व नसताना संस्थापकांचा मुलगा, नातु, सून, मुलगी अध्यक्ष बनत राहतात, तर शिपाई, लिपीक, प्राध्यापक, प्राचार्य रोज कणाकणाने 'एक दर्जे का नीचे का इन्सान' बनत अस्तित्वशून्य होताहेत.*  *"समाज घडविणारे घटक अस्तित्वशून्य होणं, समाजाचा बुद्धिजीवी वर्ग मतिहीन करणे, त्यांना मतहीन बनवणे यासारखे सामाजिक अध:पतन दुसरे कोणते असू शकते ?"*          ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••     🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼     *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*          📱 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••     कबीरा ते नर अन्ध है, गुरु को कहते और । हरि रूठे गुरु ठौर है, गुरु रुठै नहीं ठौर ॥ अर्थ: महात्मा कबीर गुरूंची महत्ती सांगताना म्हणतात की जो माणूस गुरुचे जीवनातील महत्व जाणत नाही , जो गुरूचा अनादर करतो. तो डोळे असूनही आंधळाच समजला पाहिजे. कठीण समयी आपणास देव व दैवाची साथ मिळत नसली तरी आपणास त्या कठीण व नाजूक अशा विपरित परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी गुरूच मदत करीत असतात. जर का गुरूनेच साथ सोडली तर मात्र भूतलावर कोणीही साथ देत नाही. कारण ईश्वराकडे जाण्याचा मार्गच गुरूपासून सुरू होतो, तर गुरूकडे जाण्यासाठी ईश्वराची मदत घ्यायची गरज असतेच कुठे ? मात्र ईश्वर जाणायचा असेल तर गुरूचे महत्व अनन्य साधारण आहे. दाखलेच पाहायचे झाले तर इथल्या व्यवस्थेनं ज्याचं शिक्षण नाकारलं, त्या महाभारतातील एकलव्याचं उदाहरण पहा. गुरूचा पुतळा करून त्याच्यासमोर स्वयं अध्ययनाचे धडे गिरवून सर्वोत्कृष्ट धनुर्धर म्हणून लौकिकास पात्र होतो. रामकृष्ण परमहंस आणि नरेंद्र दत्त ही गुरू शिष्याची जोडी पाहता विज्ञान शाखेचा विद्यार्थी असणार्‍या नरेंद्राला अध्यात्माचा बोध देवून विज्ञानाला अध्यात्माची जोड देणारे विवेकवादी भारतीय तत्त्वज्ञान जगाला देणारा नरेंद्राचा विवेकानंंद परमहंसानी घडवला. हे गुरूचं अदृश्य सामर्थ्य असतं. आदर्श विद्यार्थी एकलव्याचं शिक्षण नाकारणं, इथल्या खेकडा प्रवृत्तीच्या धर्माच्या ठेकेदारांनी विवेकानंदांच्या भाषणाला विरोध करणं ही इथल्या व्यवस्थेच्या तोकडेपणाचीच उदाहरणे म्हणावी लागतील. गुरू मात्र आपल्या शिष्याला मजबुतीनं उभं करण्याचा आटोकाट प्रयत्न करीत असतात. हे विसरून कसं जमेल.     एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• बाह्य सौंदर्यापेक्षा आंतरिक सौंदर्य अधिक मौल्यवान आहे.कारण बाह्यसौंदर्य अधिक दिसण्यासाठी नानाप्रकारचे सौंदर्य प्रसाधने व मूल्य देऊन निर्माण केले तरी ते जास्त काळ टिकत नाही किंवा टिकवता येत नाही.ते अल्पकालीन आहे. आंतरिक सौंदर्य असे आहे की,त्याची किंमतही मोजून आणता येत नाही आणि अन्य माध्यमांतून प्राप्तही करता येत नाही.असे सौंदर्य आपल्या अंतःकरणात उपजतच असते फक्त त्याला योग्यप्रकारे हाताळता आले पाहिजे.ह्या आंतरिक सौंदर्यामुळे अनेक नाती जोडून जीवनातला आनंद उपभोगता येतो न इतरांनाही आपल्या आनंदात व इतरांच्या आनंदात भर पाडता येते तसेच कोणत्याही प्रकारचे मूल्य न देता शेवटपर्यंत टिकवता येते.फक्त त्याच्यासाठी आंतरिक तळमळ असायला हवी. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद...९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🎑📝🎑📝🎑📝🎑📝🎑📝🎑 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎡 मनाचे श्लोक 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• मना श्रेष्ठ धारिष्ट जीवीं धरावे। मना बोलणे नीच सोशीत जावें॥ स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे। मना सर्व लोकांसि रे नीववावें ॥७॥ संकलन : सौ. सुभद्रा सानप, बीड •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *लोभी माणूस* एका लोभी माणसाने आपला सगळा पैसा शेतात पुरून ठेवला होता. तेथे दिवसातून दोन वेळा जाऊन त्या पुरलेल्या जागेकडे पाहून तो मोठे समाधान मानीत असे. ते त्याचे वागणे त्याच्या नोकराने पाहिले व त्याने तर्क केला की, आपला मालक या जागेकडे नेहमी पाहतो, तेव्हा तेथे काहीतरी पुरलेले असावे. रात्री त्याने तेथे जावून खणून पाहिले तर आत बरेच धन त्याला दिसले. ते घेऊन तो पळून गेला. दुसर्‍या दिवशी तो लोभी माणूस नेहमीप्रमाणे तेथे येऊन पाहतो तर सगळे धन चोरीला गेलेले त्याला दिसले. मग तो डोके बडवून घेत रडू लागला. तेव्हा त्याचा शेजारी त्याच्याजवळ येऊन रडण्याचे कारण विचारू लागला. लोभी माणसाने घडलेली हकीकत त्याला सांगितली. ते ऐकून शेजारी म्हणाला, ''अरे मला वाटते की तसे तुझे काहीच गेले नाही. आपला पैसा येथेच आहे, असे समजून तू पूर्वीप्रमाणेच या जागेकडे पहात जा म्हणजे झाले.'' तात्पर्य : लोभी माणसे पैसे असून दारिद्र्यी व अशांना पैश्यांचा उपयोग न होता दुसरेच कोणीतरी त्याचा उपयोग करून घेतात. जवळ असलेला पैसा वापरायचा नाही तर तो चोरीला गेल्यावर शोक करण्यात काय अर्थ? *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00           ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 04/02/2019 वार - सोमवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जागतिक ब्रेल दिन* *जागतिक कर्करोग दिन* 💥 ठळक घडामोडी :- १९४४-श्रीलंका या देशाला स्वातंत्र्य मिळाले. २००४-मार्क झुकरबर्ग ने फेसबुकची स्थापना केली. 💥 जन्म :- १९२२ - स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी. १९७४-अभिनेत्री उर्मिला मातोंडकर 💥 मृत्यू :- १९७४-भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सत्येंद्रनाथ बोस *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *मुंबई : सरकारने अण्णा हजारें यांच्या जीवाशी खेळू नये; शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आवाहन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *नवी दिल्ली: महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला गोळी मारल्याचा निषेध म्हणून आज काँग्रेस देशभरात अखिल भारतीय हिंदू महासभेविरोधात निदर्शने करणार* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *उल्हासनगर : मेमसाहेब इमारतीचा स्लॅब कोसळून एक ठार, अनेकजण जखमी झाल्याचे वृत्त.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *येत्या आठ तारखेपर्यंत जर केंद्र सरकारने मागण्या मान्य केल्या नाही, तर पद्मभूषण सन्मान परत करण्याचा अण्णा हजारो यांचा इशारा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *तामिळनाडू - के. एस.अलगिरी यांची तामिळनाडू काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *मुंबई : आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव महासंघाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या मिस्टर आशियाई स्पर्धेत भारताच्या विजय भोयरने बाजी मारली. त्याचबरोबर मिस आशिया या स्पर्धेतही भारताच्या मंगला सेनने सुवर्णपदकाला गवसणी घातली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *वेलिंग्टन, भारत विरुद्ध न्यूझीलंड :  पाचव्या एकदिवसीय सामन्यात भारताने न्यूझीलंडवर 35 धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने एकदिवसीय मालिका 4-1 अशा फरकाने खिशात टाकली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *पालकांचे मुख्याध्यापकास पत्र* http://prajawani.in/news_page.php?nid=1342 आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      *लुई ब्रेल* जागतिक ब्रेल दिन ४ जानेवारीला लुई ब्रेल यांच्या वाढदिवसानिमित्त साजरा केला जातो. बालपणाच्या अपघातानंतर त्यांना अंधत्व आले आणि त्यांनी वयाच्या १५ व्या वर्षी ब्रेल भाषेचा शोध लावला. याच भाषेमुळे जगभरात आंधळ्या लोकांना लिहिता आणि वाचता येते. ब्रेल हा एक कोड किंवा लिपी आहे ज्यात अक्षरे दर्शविण्यासाठी पृष्ठभागावर अडथळे आणि खाचा यांचे मिश्रण करून वापरले जाते. हा कोड स्पर्श करून समजाला जातो. ब्रेलने कोडचा शोध लावण्या आधी, दृष्टिहीन लोक हाऊ प्रणालीचा वापर करून वाचन आणि लिखाण करत असे. जाड पेपर किंवा लेदरवर लॅटिन अक्षरे उभारऊन होऊ कोड तयार केला जात असे. ही खूप कठीण प्रणाली होती जिथे पुष्कळ प्रशिक्षण आवश्यक होते आणि सामान्य लोकांना केवळ वाचणे शक्य होते. यामुळे निराश होऊन लुई ब्रेल यांनी वयाच्या १५ व्या वर्षी ब्रेल कोडचा शोध लावला. ब्रेल कोड लहान आयताकृती ६ टिपक्यांमध्ये बनवण्यात येतो. ३ गुणीले २ च्या नमुन्यात असलेले ठिपके सेल म्हणून संबोधले जातात. प्रत्येक सेलमध्ये एक अक्षर, संख्या किंवा विरामचिन्हे दर्शविले असते. ब्रेल हा जगभरात ओळखणारा कोड असल्यामुळे, सर्व भाषा, गणित, संगीत आणि संगणक प्रोग्रामिंग असे जवळ जवळ सगळेच विषय ब्रेलमध्ये वाचता आणि लिहीता येतात.  *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आळशी माणुस शुभ दिवसाची वाट बघत असतो आणि जो कष्ट करतो त्याच्या साठी प्रत्येक दिवस शुभ असतो *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) अंटाक्र्टिका खंडातील सर्वोच्च शिखर कोणतं?* माऊंट विन्स्टन *२) कॅशलेस व्यवहारांसाठी 'डिजिटल डाकिया' ही योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली ?* मध्य प्रदेश *३) ऑलिंपिक ज्योत समारंभपूर्वक स्टेडिअमच्या प्रवेशद्वाराशी ठेवण्यास कधी सुरुवात झाली?* १९२८ *४) 'अँन अनसुटेबल बॉय'चे लेखक कोण?* करण जोहर *५) ओझोनचं आवरण कशाला रोखतं ?* अतिनील किरणोत्सार *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● मोहन रेड्डी ● संजय गायकवाड ● गोविंद राखेवार ● शेख इरफान ● राजरेड्डी गडमोड ● अहमद शेख ● शेख समीर ● शंकर कुऱ्हाडे ● कृष्णा तिम्मापुरे ● विलास थोरमोठे ● राजू माळगे ● आतिष पाटील ● भास्कर यमेवार *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *लक्षण* नाव मोठे अन् लक्षण खोटे असतात मोठे वाटणारांचे मन मात्र छोटे असतात दिसत त्या पेक्षा सारे वेगळे असते विश्वास बसणार नाही असे हे सगळे असते   शरद ठाकर सेलू जि.परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••              *पावसाळा म्हणजे सृष्टीत चौफेर कसे चैतन्य भरलेलं असतं. नानाप्रकारचे चैतन्यकिडे, हिरव्या हिरव्या झुडपांमध्ये, नाजुक नक्षीदार वेलींवरती कसे मस्त रमलेले दिसतात. पानांआड लपून एकसारखा झीणझणझण आवाज हा ऐकायला येतो. पण एक दृष्टीभेट मात्र अलभ्य. एका वेलीच्या पानावर बघा कशी अंडी घातली होती. त्या अंड्यातल्या जीवाला मायेची ऊब देत एक मादी बसली होती. पण तेवढ्यात एका पक्षानं अचूक नेम धरला...बघता बघता किटक मादी बिचारी आकस्मिकपणे आपल्या न जन्मलेल्या जीवांना सोडून गेली. जीव बिचारे अनाथ पोरके झाले. पण त्यांना आधार होता तो हिरव्यागार पानांचा.* *मानवेतर प्राण्यांमध्ये जन्ममृत्यूचा हा खेळ असा आकस्मिक घडत असतो. हिरव्या पानांच्या उबदार पाळण्यात अंडी सुरक्षित होती. त्या अंड्यांतून जीव जन्माला येईल. जगण्याची एकाकी धडपड त्या जीवाची सुरू होईल. अल्पकाळ का होईना आईच्या प्रेमाची उब त्या अंड्यातल्या जीवाला मिळाली. कदाचित हीच निसर्गाची शिकवण असावी. एकटंच यायचं या जगात. जगायचा संघर्षही एकट्यानेच करायचा. त्या जगण्याचा भरभरून आनंदही घ्यायचा आणि एकट्यानेच परतायचं. हेच खरं जीवनाचं सूत्र.* *कवीने म्हटल्यानुसार या बिनभिंतीच्या शाळेत, अर्थात निसर्गात जशी वैविध्यपूर्ण समृद्ध उधळण असते, तशी मैत्रीची भावना देणारी ऊबही मिळते आणि गुरूसारखी शिकवणसुद्धा. त्यामुळे हेच खरं जगण्याचं सूत्र, असं म्हणणं संयुक्तिक नाही का ?*     ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸         *संजय नलावडे, मुंबई*        *मोबाइल- 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ऊँचे पानी ना टिके , नीचे ही ठहराय | नीचा हो सो भारी पी , ऊँचा प्यासा जाय || अर्थ : माणसाला नम्रतेने व शालीनतेने ज्ञानाची प्राप्ती करता येते . गुरूसोबत नम्रतेने वागायला पाहिजे. ताठर ,उद्धट व मी पणाचा अहंकार मिरवणार्‍याला गर्विष्ठपणाशिवाय काही प्राप्त करता येत नाही.उगाच फुशारकीचा रिकामा ताठा मिरवणार्‍याचा भ्रमाचा फुगा फार काळ टिकत नाही. वाकणार्‍या नरम लोखंडालाच हवा तसा आकार देता येतो . पोलादाचा ताठरपणा त्याचे तुकडे व्हायला कारण ठरतो. महात्मा कबीरांनी सुंदर दाखला देत सांगितलंय की पाणी उंच जागेवर कधी थांबतं का? ते सदैव खोलगट जागेकडं धाव घेतं व तिकडंच वास्तव्य करतं. उंच माळरानावर व हवेत वावरणार्‍यांना तहाणेनं तरमळावं लागतं. मात्र खोलगट, सखल जागी वस्ती करणार्‍याला पावसाळ्यात थोडे कष्ट जरूर परंतु उन्हाळ्यात भरपेट पाणी मिळतं. त्याची तहाण भागते.     एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        काही लोकांचा स्वत:कडे आणि दुस-याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा असतो ते पहा.स्वत:च्या बाबतीत काही बरेवाईट घडले तर तो आपले नशीब म्हणून स्वीकारतो.आपल्या नशिबात होते त्याला काय करणार असे म्हणतो.तर इतरांच्या बाबतीत काही बरेवाईट घडले तर तो म्हणतो की,त्याच्या कर्माचे त्याला फळ मिळाले म्हणून त्याला भोगावे लागत आहे.कर्म आणि नशीब यांचा संबंध तो आपल्या मनातल्या वेगळ्या कप्प्यामध्ये ठेवून त्याचे मंथन करुन लोकांसमोर मांडतो.तेव्हा त्याच्या मनाचीच एक विकृत अवस्था पहायला मिळते.असा विचार न करता कोणतीही परिस्थिती असो त्या परिस्थितीला सामोरे जाऊन धैर्याने तोंड द्यायला शिकले पाहिजे अशी प्रत्येकाने तयारी ठेवली पाहिजे. जीवनात समस्या, संकटं तर येणारच.त्याला नशीबावर किंवा कर्मावर न लोटता आपल्या जीवनाचा तो एक खडतड प्रवास आहे.त्या प्रवासातून आपण चांगला मार्ग शोधून काढून ब-यावाईट गोष्टीतून जीवन जगायला शिकले तरच जगण्याचे खरे कौशल्य आणि महत्त्व कळेल.मग जग कोण काय म्हणेल याचा विचार करायचा नाही.कोणत्याही संकटाला न घाबरता माघार न घेता तेवढ्याच हिमतीने आणि कौशल्याने मार्ग काढून जीवन जगायला शिकले पाहिजे तरच जीवनाला खरा अर्थ प्राप्त होईल.मग कोणीही आणि कसाही अर्थ काढू द्या.त्यांच्या बोलण्याकडे लक्ष द्यायचे नाही.त्यांची आपल्याकडे पाहण्याची विकृत दृष्टी आहे असे समजून त्यांच्याकडे दुर्लक्ष द्यावे. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद...९४२१८३९५९०. 🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎡 मनाचे श्लोक 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• नको रे मना क्रोध हा खेदकारी। नको रे मना काम नाना विकारी॥ नको रे मना सर्वदा अंगिकारू। नको रे मना मत्सरु दंभ भारु ॥६॥ संकलन - सुभद्रा सानप, बीड •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *लठ्ठ कोंबडी व बारीक कोंबडी* एका माणसाच्या घरी टोपलीत काही कोंबड्या ठेवल्या होत्या. त्यातील एक अगदीच लठ्ठ व एक अगदीच बारीक होती. ती लठ्ठ कोंबडी बारीक कोंबडीची नेहमी चेष्टा करून हिणवीत असे. एकदा त्या माणसाकडे मेजवानी होती. तेव्हा त्याने नोकराला सांगितले की, ''हय़ा कोंबड्यात जी लठ्ठ कोंबडी असेल तिला मारून तिची कढी करा.'' त्याप्रमाणे नोकर जेव्हा त्या लठ्ठ कोंबडीला मारू लागला तेव्हा ती आपल्याच मनाशी म्हणाली, ''मी जर त्या दुसर्‍या कोंबडीसारखी बारीक असते, तर आज माझ्यावर हा प्रसंग नक्कीच आला नसता.'' तात्पर्य : ज्या गोष्टीमुळे माणसाला गर्व येतो तीच गोष्ट दु:खाला पण कारणीभूत होऊ शकते हे विसरू नये. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00           ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 02/02/2019 वार - शनिवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १९३३ - ऍडोल्फ हिटलरने जर्मनीची संसद बरखास्त केली. १९४३ - दुसरे महायुद्ध - स्टॅलिनग्राडच्या लढाईनंतर जर्मनीचे सैन्य सोवियेत संघाला शरण. १९५७ - सिंधु नदी वरच्या गुड्डु बंधार्‍याचे पाकिस्तानमध्ये भूमिपूजन. 💥 जन्म :- १८८४ - डॉ.श्रीधर केतकर, महाराष्ट्रीय ज्ञानकोशाचे संपादक, समाजशास्त्रज्ञ १९५४ - जयंत अमरसिंघे, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- १९१७ - महर्षी अण्णासाहेब पटवर्धन, लोकमान्य टिळकांचे स्नेही, विख्यात वैद्य. २००७ - विजय अरोरा, हिंदी चित्रपट अभिनेता. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *अर्थमंत्री पियुष गोयल यांनी सादर केला अर्थसंकल्प 2019* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *पाच लाखापर्यंत उत्पन्न करमुक्त करत मोदी सरकारने मध्यमवर्गींयांना दिले गिफ्ट.* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *रामायण महाकाव्याने जगाला मूल्ये व नवी दिशा दिली. हाच विचार जगभर पोहोचविण्यासाठी महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय रामायण महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सुरजकुंड आंतरराष्ट्रीय मेळ्यात केली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *पोस्ट आणि बँकांमधील बचतीवरील 40 हजारांपर्यंतचे व्याज करमुक्त होणार - पीयूष गोयल* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *डहाणू - शुक्रवारी सकाळपासून डहाणूत भूकंपाचे पाच भूकंपाचे धक्के, पाचवा धक्का काल दुपारी जाणवला* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *बंगळूरुतील एचएएलच्या विमानतळावर शुक्रवारी सकाळी मिराज 2000 हे लढाऊ विमान कोसळून दोन पायलटांचा मृत्यू झाला.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत आधीच दोन सामने जिंकणाऱ्या भारतीय महिला संघाने न्यूझीलंडविरुद्ध तिसरा सामना आठ गड्यांनी गमावला.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *बोलण्याचे संस्कार* आपल्यावर बोलण्याचे संस्कार आहेत काय ?असे कोणी विचारणा केली तर आपण संभ्रमात पडतो. बोलण्यासाठी कोणत्या संस्काराची गरज आहे ? किंवा तसे संस्कार करता येतात काय ? याविषयी आपण लहान असताना नकळत विचार करतो मात्र त्यास बोलण्याचे संस्कार.......... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/10/blog-post_25.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *अण्णासाहेब पटवर्धन*        अण्णासाहेबांच्या वडिलांचे नाव रामचंद्र व आईचे नाव जानकीबाई असे होते. ४ मे १८४७ रोजी अण्णासाहेबांचा जन्म झाला. त्या दिवशी संकष्टी चतुर्थी असल्याने त्यांचे नाव विनायक असे ठेवण्यात आले. अण्णासाहेब १०-१२ वर्षांचे असतानाच त्यांच्या आईचे निधन झाले. ज्या काळात अण्णासाहेबांचे शालेय शिक्षण झाले तो काळ राजकीयदृष्ट्या अत्यंत बिकट होता. १८५७चे स्वातंत्र्यसमर इंग्रजांनी मोडून काढले होते व त्यामुळे इंग्रजांची सत्ता बळकट झाली होती. या वातावरणात अण्णासाहेब १८६४मध्ये मॅट्रिक झाले. पुढे १८६८मध्ये अण्णासाहेब डेक्कन कॉलेजमधून बीए झाले. नंतर मुंबईत ‘एलएलबी’साठी प्रवेश घेतला. आपले मित्र अण्णा मोरेश्वर कुंटे यांच्या आग्रहाखातर ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये ‘एलएमअँडएस’साठी प्रवेश घेतला आणि एकाच वेळी दोन्ही परीक्षांचा अभ्यास सुरू केला. याबरोबर मुंबईत त्यांच्या सामाजिक कार्यासंबंधी उलाढाली चालूच असत. सुरुवातीचे काही दिवस त्यांनी न्या. रानडे आणि विष्णुशास्त्री पंडित यांच्याबरोबर स्त्री शिक्षण व विधवा पुनर्विवाह याबद्दल खूप काम केले; परंतु थोड्याच दिवसात या सुधारक लोकांचे व त्यांचे मतभेद झाले. राजकारण, सामाजिक कार्य याबाबत ते लोकमान्य टिळकांशी गुप्त मसलती करत. १९१७ मध्ये माघ शु. ११ या तिथीला अण्णासाहेब जग सोडून गेले. ओंकारेश्वजवळ नदीपात्रालगत त्यांचे अंत्यसंस्कार झाले. त्याजागी लोकमान्यांच्या पुढाकाराने समाधी बांधण्यात आली. दर वर्षी माघ शुद्ध पंचमी ते एकादशी या काळात त्यांचा समाधी उत्सव साजरा होतो. या वर्षी अण्णासाहेबांना जाऊन शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. त्यांच्या स्मृतीला अभिवादन     *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आरसा हा आपला सर्वोत्तम मित्र आहे कारण आपण जेव्हा रडतो तेव्हा तो कधीही हसत नाही *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) पुलित्झर पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जातो?* पत्रकारिता, साहित्य, संगीत *२) लोसांग नामक उत्सव कोणत्या देशात साजरा होतो?* तैवान *३) फोबोस हा कोणत्या ग्रहाचा उपग्रह आहे?* मंगळ *४) ऋतू प्रवास ही संकल्पना कोणत्या जमातीत आहे?* भूतिया *५) 'थर्ड आय' हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे?*              क्रिकेट *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ∆ डॉ. देविदास तारू ∆ विनोद गुडेटवार ∆ गजानन वासमकर ∆ राजू जगदंबे ∆ पोतन्ना चिंचलोड ∆ कामाजी पाटील ∆ किरण बासरकर ∆ संदीप वंजारी ∆ शंकर गोपत वाड ∆ पोतन्ना लखमावाड ∆ चेतन घाटे ∆ बालाजी गोजे ∆ संजय ढगे ∆ रुकमाजी भोगावार ∆ साहेबराव वानखेडे ∆ मल्लेश गुंटोड ∆ रवी नंदगमलू ∆ दत्ता लिंगमपल्ले ∆ चक्रधर ढगे ∆ शिवाजी कौठकर ∆ रोहित लकडे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *वाटेकरी* अपयशाच खापर दुस-यावर फोडतात आपली जबाबदारी लोकांवर सोडतात जबाबदारी झटकून दूर पळता येत नसते अपयशाचे वाटेकरी कोण माहित होत असते शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आपण मित्राला बोलतो, 'उद्या मला सकाळी फोन कर, मग आपण ठरवू या.' असं म्हणताना आजची रात्र सुखरूप पार करून उद्याची सकाळ आपण अनुभवणार आहोत यावर आपला ठाम विश्वास असतो. असे छोटे छोटे विश्वास ठेवल्याशिवाय गाडा पुढे हाकता येत नाही.* *एक बस स्टँडच्या फलाटाला लागते. आपण गावाच्या नावाची पाटी वाचून खात्री करून घेतो आणि बसमध्ये चढतो. तिकीट काढतो. सोबतचा घडी केलेला पेपर उघडून वाचायला लागतो किंवा डोळे बंद करून डुलक्या घेतो. हलणा-या बसमध्ये निवांतपणे खिडकीतून बाहेर बघत बसतो. काही वेळा चिल्लर पैशांवरून कंडक्टरशी वाद होतात. वळण घाटाचा रस्ता पार करून आपल्या थांब्यावर बस आणून सोडते. या सगळ्या प्रवासात बस चालवणा-या ड्रायव्हरचा चेहराही आपण पाहिलेला नसतो. त्या ड्रायव्हरच्या भरोशावर आपण बसमध्ये निवांतपणे बसलेलो असतो. कंडक्टरशी रुपया आठाण्यावरून वाद करणारा प्रवासी स्वत:चा जीव, चेहराही न पाहिलेल्या ड्रायव्हरच्या हवाली करतो. किती विश्वास ठेवतो आपण अनोळखी माणसावर.. 'विश्वास' फार महत्वाचा असतो.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• ☘☘☘☘☘☘☘☘☘ संजय नलावडे, चांदीवली, मुंबई         9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••     तन को जोगी सब करे , मन को बिरला कोय | सहजी सब बिधि पिये , जो मन जोगी होय || अर्थ : देहा सुलभ लेपन तुटे कशी रे वासना । सिद्धि होई वशीभूत रोख उधळ्या मना ।। महात्मा कबीरांचं भविष्यवेत्तेपण वरील दोह्यात दिसून येतं. हल्ली माणूस माणूसपण विसरून जाती धर्माच्या आहारी जाऊन मातीशीच गद्दारी करतोय. स्त्री-पुरूष या दोनंच जाती परंतु स्वार्थीपणा, महत्त्वाकांक्षा व सत्ता लोलुपतेने माणसात माणूस राहिलेला नाही. शारीरिक ठेवणीत बदल , मानवात भेद करून अंगाला रंगाने रंगवता येतं. कपड्याचीही विविधता जपणं सोपं आहे. इत्तरांना उपदेश केल्याप्रमााणे खरंच मानवाचे स्वतःचे आचरण असते का ! असा माणूस एखाद दुसराच असतो. ज्याने स्वतःच्या मनावर पूर्ण ताबा मिळवलेला असतो. मनालाच योगी म्हणजे विरक्त बनवले आहे. मनाला मोकाट उधळू देत नाही. त्याला मात्र सर्व सिद्धी सहज अवगत झालेल्या असतात.     एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जीवनात मौल्यवान वस्तू सांभाळून त्यात वेळ वाया घालवतो, त्यामुळे मानसिक अवस्थाही चलबिचल होते, एवढे सांभाळूनही कधी कधी जीवाला ही धोका पत्करावा लागतो आणि आपली झोपही उडून जाते.हे सांभाळण्यापेक्षा जीवनात चांगली माणसं भेटली तर त्यांना सांभाळण्याचा प्रयत्न करायला हवा.कारण ती आपल्या जीवनात आलेल्या कोणत्याही संकटकाळात आपल्या मदतीला धावून येतील.तीच खरी आपली मौल्यवान संपत्ती आहे. त्यांना आपल्या जीवनात मौल्यवान दागिण्यापेक्षा अधिक जपायला हवे.त्यांच्यापासून आपल्या जीवीताचे रक्षणही होईल,मन चलबिचल होणार नाही , निवांतही झोप लागेल आणि चांगली माणसे आपल्या जीवनात आली म्हणून समाधानही वाटेल.अशा माणसांना आपल्या काळजामध्ये स्थान देऊन त्यांचे जतन केले पाहिजे. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५०/८०८७९१७०६३. 🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎡 मनाचे श्लोक 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• मना पापसंकल्प सोडूनि द्यावा। मना सत्यसंकल्प जीवीं धरावा॥ मना कल्पना ते नको वीषयांची। विकारे घडे हो जनी सर्व ची ची ॥५॥ संकलन : सौ. सुभद्रा सानप, बीड •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *लाख मोलाचा देह* एक भिकारी भीक मागता मागता एका श्रीमंत व्यापार्‍याच्या वाडयासमोर उभा राहून भीक मागू लागला. मालकाने सेवकाला त्याला वर बोलावयाला सांगितले. सेवक बोलवायला आलेला पाहून भिकार्‍याला खूप आनंद झाला. त्याच्या मनांत आशा निर्माण झाली की, वर बोलावलं म्हणजे बरच काही देणार असेल. वर गेल्यावर व्यापारी म्हणाला, 'हे बघ तुला मी पाचशे रूपये देतो पण त्याबद्दल देतो पण त्याबद्दल तु मला तुझे डोळे दे' 'छे ! छे ! हे कसं शक्य आहे ? डोळे दिले तर मी काहींच करू शकणार नाही.' भिकारी म्हणाला. 'बरं मग असं कर हात तरी देतोस कां?' व्यापारी म्हणाला. अशाप्रकारे व्यापारी प्रत्येक अवयवाची किंमत वाढवत होता पण भिकारी एकही अवयव द्यायला तयार नव्हता. व्यापारी म्हणाला 'बघ ५००-५०० रूपये म्हटले तरी तुझ्या देहाची किंमत लाखाच्यावर झाली. एवढा लाख मोलाचा धडधाकट देह असतांना भीक कां मागतोस ? कष्ट कर पैसे मिळवं'. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00           ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 01/02/2019 वार - शुक्रवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १९९२ - भोपाळच्या मुख्य न्यायाधीशांनी युनियन कार्बाइडचा मुख्य अधिकारी वॉरेन अँडरसनला फरारी घोषित केले. २००३ - अंतराळातून परतताना स्पेस शटल कोलंबियाचा स्फोट. सात अंतराळवीर मृत्युमुखी. २००४ - मक्केत हज चालु असताना चेंगराचेंगरीत २४४ ठार. 💥 जन्म :- १८८४ - सिद्धेश्वरशास्त्री चित्राव, प्राच्यविद्यापंडित, मराठी कोशकार. १९०४ - बा.रा.घोलप, शिक्षणमहर्षी १९१० - जहांगीर खान, भारतीय क्रिकेट खेळाडू. १९५८ - जॅकी श्रॉफ, भारतीय चित्रपट अभिनेता. १९७१ - अजय जडेजा, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- १९९५ - मोतीराम गजानन रांगणेकर, मराठी नाटककार २००३ - स्पेस शटल कोलंबियातील अंतराळवीर मायकेल पी. अँडरसन, डेव्हिड ब्राउन, कल्पना चावला, लॉरेल क्लार्क, रिक डी. हसबंड, विली मॅककूल, इलान रमोन *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *राजस्थानात १ मार्चपासून बेरोजगारांना भत्ता, युवकांना तीन तर युवतींना साडेतीन हजार रुपये अशी माहिती अशोक गेहलोत यांनी दिली* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या अध्यक्षतेखाली सातवे राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संमेलन २ व ३ फेब्रुवारी रोजी चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आले आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *मोदी सरकारच्या नोटाबंदीचा फटका ; 2017-18 मध्ये सर्वात जास्त बेरोजगार, देशाचा यंदाचा बेरोजगारीचा दर हा गेल्या 45 वर्षांत सर्वाधिक असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *जळगाव : येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ परिसरात शिक्षणाची वारीचा शेवटचा टप्पा उत्साहात संपन्न* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 10 वाजता घेणार केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारत वि. न्यूझीलंड चौथ्या एकदिवसीय सामन्यात किवी गोलंदाज ट्रेंट बोल्टचा विश्वविक्रम, सर्वात जलद 100 विकेट्सचा पराक्रम* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *शिक्षकांना शिकवू द्या ...* शाळाबाह्य कामावर बहिष्कार टाकल्यामुळे 27 शिक्षकांवर निलंबनाची कारवाई झाल्याची बातमी वाचण्यात आली. राज्यातील बहुउद्देशीय कर्मचारी म्हणजे शिक्षक. कोणत्याही सरकारी कामासाठी सहज उपलब्ध होणारा आणि सांगितलेले काम मुकाट्याने करणारा कर्मचारी म्हणजे शिक्षक. वास्तविक पाहता शिक्षकांचे........... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_27.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••             *कल्पना चावला*           कल्पना चावला अमेरिकन अंतराळवीर होती. ती भारतीय वंशाची अंतराळात जाणारी प्रथम महिला होती.कल्पना चावला यांचे शालेय शिक्षण गावातील टागोर बाल निकेतन विद्यालयात झाले. कल्पना चावला हुशार असल्याने त्या नेहमी त्या पहिल्या पाच नंबरात असत. त्यांचा स्वभाव अतिशय साहसी होता. त्या कराटे शिकल्या.भरतनाट्यम या कला प्रकारातही त्यांनी नैपुण्य प्राप्त केले. संजय हा त्यांचा भाऊ कर्नालच्या फ्लाईंग क्लबमध्ये जात होता. तेव्हा कल्पना यांनाही तेथे जावे असे वाटत. पण जेव्हा वडिलांनी नोंदणी अर्ज दिला तेव्हा अधिकार्‍यांनी कल्पना महिला आहे, ती वैमानिक होणे योग्य वाटत नाही असे सांगितले. तसेच त्यांनी कल्पना यांना या वेडापासून परावृत्त करण्यास सांगितले. पंजाब विद्यापीठातून त्यांनी १९८२ साली एरोनॉटिकल अभियांत्रिकी पदवी घेतली. पुढे १९८४मध्ये अलिर्ंगटन टेक्सास विद्यापीठातून एरोनॉटिकल उच्च अभियांत्रिकी शिक्षण घेऊन,त्यांनी कॉलोरॅडो विद्यापीठांतून एरोस्पेस अभियांत्रिकी विभागातून १९८८मध्ये डॉक्टरेट मिळवली. लहानपणापासून विमान शिकण्याचे स्वप्न अमेरिकेत काही दिवसातच पूर्ण झाले. डिसेंबर १९९४ साली चावला यांची अमेरिकेतील नासामध्ये १५व्या अंतराळवीर समूहात निवड झाली. मिशन विशेषज्ञ म्हणून त्यांनी एसटीएस-८७ वर काम केले. अवकाशात त्यांनी ३७६ तास व ३४ मिनिटे प्रवास केला. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आयुष्यातला खरा आंनद भावनेच्या ओलाव्यात असतो. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) 'पृथ्वी शिखर संमेलन'चं आयोजन कोणी केलं होतं ?*             यूएनसीईडी *२) २0१0 मध्ये पार पडलेल्या विश्‍व मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते ?*           रामदास कामत *३) सजीवांच्या रचनेचे आणि कार्याचे एकक कोणते ?*           पेशी *४) एड्स हा रोग कशामुळे होतो ?*             विषाणूमुळे *५) एलआयसीचं मुख्य कार्यालय कुठे आहे ?*              मुंबई *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ∆ नारायण गायकवाड ∆ राजेश हाके ∆ शिवराज रंगावार ∆ शिवा पडोळे ∆ स्वप्नील कैवारे ∆ अतुल भुसारे ∆ प्रिया मदनकर ∆ सादिक शेख ∆ गजेंद्र ढवळापुरीकर ∆ हिलाल पाटील ∆ एम बी शेख ∆ शिवानंद सूर्यवंशी ∆ तानाजी कदम ∆ विठ्ठल चिंचोलकर ∆ जयश्री मगरे ∆ वशिम शेख ∆ सय्यद अक्तर *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      *सत्तेसाठी* सत्तेसाठी आता मारामारी आहे कोणाला वाटत ही गोष्ट बरी आहे सत्तेसाठी त्यांना हे सर्वच बरे वाटते कोणाला पटो ना पटो त्यांच त्यांना पटते   शरद ठाकर सेलू जि.परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *पदव्या-प्रमाणपत्रांनी भौतिक यशाच्या आकाशाला भिडता येते. पण चांगलं सुखा-समाधानाचं जगणं कधी शिकणार आपण? जीवनाशी नातं सांगत नैतिक जगण्याचा 'मंत्र' का होत नाही आपलं शिक्षण. माणसाला माणसापासून तोडणारी धर्मांधता, भोळ्या-भाबड्यांची दिशाभूल करणा-या कालबाह्य परंपरा आणि अंधश्रद्धेच्या खाईत लोटणारी बुवाबाजी... अशी विविध आव्हानं पेलणा-या शिक्षणाची आज गरज आहे. समता आणि बंधुभाव समाजमनात रूजविणे ही काळाची पुकार आहे. खरंतर माणसापुढेच माणूसपणाचं आव्हान उभं असावं, ही आपली शोकांतिका आहे. हा जन्म सार्थकी लागायचा असेल आणि माणसाला पशूपक्ष्यांहून उंच उठायचं असेल तर पारंपारिक शिक्षणाची चौकट मोडून नव्या मूल्यशिक्षणाचं आकाश खुलं व्हायला हवं.* *नद्या समुद्रात जाऊन मिळाल्या की त्या स्वत:च समुद्र होऊन जातात. सर्व जातीधर्मांना एकाच रंगाच्या समुद्रात विलीन करून निखळ माणूस म्हणून जगायला आपण कधी शिकणार? आपण शिकलो, वैभवसंपन्न झालो पण आपल्या समर्थ खांद्यावर कुण्या हताश-निराश माणसाला विश्वासानं मान कधी ठेवता येईल? ही सारी आव्हानं झेलत, वंचितांच्या चेह-यावर हसू फुलवण्यासाठी माणसांमाणसातलं अंतर कापू या...आणि आपण सारे माणूस होऊ या ! पूजा-प्रार्थना याहून वेगळी काय असते. सा-या विश्वाला घरपण देणारी संताची जीवनशैली मानवतेचे धडे देत आपल्याला वाट दाखवत असते.*    ⭐‼ *रामकृष्णहरी* ‼⭐  ⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐ संजय नलावडे, चांदीवली, मुंबई         9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   ऊँचे पानी ना टिके , नीचे ही ठहराय | नीचा हो सो भारी पी , ऊँचा प्यासा जाय || अर्थ : माणसाला नम्रतेने व शालीनतेने ज्ञानाची प्राप्ती करता येते . गुरूसोबत नम्रतेने वागायला पाहिजे. ताठर ,उद्धट व मी पणाचा अहंकार मिरवणार्‍याला गर्विष्ठपणाशिवाय काही प्राप्त करता येत नाही.उगाच फुशारकीचा रिकामा ताठा मिरवणार्‍याचा भ्रमाचा फुगा फार काळ टिकत नाही. वाकणार्‍या नरम लोखंडालाच हवा तसा आकार देता येतो . पोलादाचा ताठरपणा त्याचे तुकडे व्हायला कारण ठरतो. महात्मा कबीरांनी सुंदर दाखला देत सांगितलंय की पाणी उंच जागेवर कधी थांबतं का? ते सदैव खोलगट जागेकडं धाव घेतं व तिकडंच वास्तव्य करतं. उंच माळरानावर व हवेत वावरणार्‍यांना तहाणेनं तरमळावं लागतं. मात्र खोलगट, सखल जागी वस्ती करणार्‍याला पावसाळ्यात थोडे कष्ट जरूर परंतु उन्हाळ्यात भरपेट पाणी मिळतं. त्याची तहाण भागते.     एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        काही लोकांच्या बाबतीत पैसा म्हणजे सर्वस्व आहे आणि पैशामुळे काहीही मिळवता येते. पैशामुळे तुम्हाला तुमच्या भौतिक सुविधा मिळवता येतात परंतु इतरांचे मन मिळवता येत नाही.इतरांचे मन जिंकायचे असेल तर या ठिकाणी पैसा चालत नाही.त्यासाठी हवे तुमचे उदार अंतःकरण,तुमची दुस-याबद्दलची आत्मियता,प्रेम इतरांना दिलात तर तेही तुमच्यावर अधिक प्रेम करायला लागतील.यासाठी तुमच्या जवळ असलेल्या पैशाची गरज नाही.एवढे सत्य आहे पैशाने सारे काही खरेदी करता येईल पण जगात असलेल्या सर्व जीवांचे मन आणि प्रेम कधीच खरेदी करता येत नाही.मग तुमच्या जगण्याला काय अर्थ आहे ? © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद...९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎡 मनाचे श्लोक 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• मना वासना दुष्ट कामा न ये रे। मना सर्वथा पापबुद्धी नको रे॥ मना सर्वथा नीति सोडूं नको हो। मना अंतरीं सार वीचार राहो ॥४॥ संकलक - सौ. सुभद्रा सानप, बीड •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *हे क्षण हीं निघून जातील  !!!*         एका राजाला जीवनाविषयी अपार कुतूहल होते.त्याच्या दरबारात येणाऱ्या प्रत्येक साधू , संत , फकिराला तो विचारत असे की मला एक असा छोटा मंत्र द्या की तो अगदी कुठल्याही क्षणाला मला उपयोगी पडेल व मला कायम आनंदी ठेवेल.         अखेर एका बौद्ध भिक्षुने त्याला एक अंगठी दिली व सांगितले की यातील डबीत एका कागदावर मंत्र लिहिलेला आहे,पण जेव्हा जीवन-मरण असा प्रश्न तुझ्यापुढे उभा राहील तेव्हाच डबी उघड, तेव्हाच मंत्र कामाला येईल.          बरीच वर्षे शांत गेल्यावर राजाचे दिवस फिरले.राज्यात बंडाळी झाली व त्याच्याच दुष्ट व  कपटी प्रधानाने त्याला तुरुंगात टाकले.पहाटेला फाशी द्यायचे ठरले.         विश्वासू सेवकाने राजाला रात्री सोडवून, एक घोडा बरोबर दिला.मजल दरमजल करीत राजा सीमेपासून दूर पळाला.     हे समजल्यावर प्रधानाने सैनिकांची तुकडी राजाच्या मागावर पाठवली.राजा एका डोंगराच्या शिखरापर्यंत पोहोचला.पुढे दरी होती.घोड्याला चरायला सोडून, मोठ्या खडकाआड लपला. त्याला वाटले आता थोडया वेळात सैनिक गाठणार व आपण मरणार.  त्या क्षणी त्याला त्या अंगठीची आठवण आली अन् ती त्याने उघडली.त्यात एकच वाक्य लिहिले होते ,          " *This too shall pass* "                      म्हणजे           " *हाही क्षण निघून जाईल"*          केवळ ते वाक्य वाचून राजाचे मन शांत झाले.आश्चर्य घडले , सैनिक तेथपर्यंत पोहचले.त्यांना वाटले फक्त घोडा दिसतोय म्हणजे राजा दरीत पडून मेला असे समजून ते परतले.          राजाने शेजारच्या राज्याची मदत घेऊन काही दिवसांत आपले राज्य परत मिळवले. विश्वासघातकी प्रधानाचा शिरच्छेद केला.             विजयाचा जंगी समारंभ चालू असताना नवीन प्रधानाने पाहिले की , महाराज कुठेही अति-उत्साहित न होता शांत मुद्रेने सिंहासनावर विराजमान आहेत.त्याने अदबीने विचारले ,            " महाराज, आपल्या आयुष्यात एवढ्या भयानक घडामोडी घडल्या व त्यातून आपण सहीसलामत बाहेर पडला, तेव्हा आपण आज आनंदाने ओसंडून जायला हवे.             " राजा म्हणाला, " नाही , आता मला बुद्धाचा अनित्यता वादाचा अर्थ व सामर्थ्य कळले आहे. जगात कुठलीही गोष्ट कायमची टिकून राहत नाही.         *परिवर्तन जगाचा शाश्वत नियम आहे.या जगात सुख ही* *राहात नाही , दुःखही राहात नाही.हे मला आता समजलेले* *आहे.म्हणून दुःखात खचू नये अन्  सुखात नाचू नये."*            *This too shall pass !*              *हे क्षणही निघून जातील.*        ही बोधकथा आपल्याला जगायला शिकवेल.नुसतेच जगायला नव्हे तर प्रत्येक प्रसंगात मनाची शांती अबाधित ठेवण्याची, मन स्थिर ठेवण्याची गुरुकिल्ली आहे.                        _______ *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00           ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 31/01/2019 वार - गुरूवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १९५० - राष्ट्रपती म्हणून डॉ.राजेंद्रप्रसाद यांचे संसदेपुढे पहिले भाषण. त्यापूर्वी ते घटना समितीचे अध्यक्ष होते. 💥 जन्म :- १८९६ - दत्तात्रय रामचंद्र बेंद्रे, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कन्नड महाकवी. १९३१ - गंगाधर महांबरे, ज्येष्ठ संगीतकार १९७५ - प्रिती झिंटा, हिंदी चित्रपट अभिनेत्री. 💥 मृत्यू :- १९९४ - वसंत जोगळेकर, मराठी व हिंदी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक. २००० - के.एन.सिंग, प्रसिद्ध चित्रपट अभिनेते. २००४ - सुरैय्या, ज्येष्ठ गायिका व अभिनेत्री *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *21 फेब्रुवारीपासून राम मंदिराच्या बांधकामास सुरुवात, शंकराचार्यांच्या धर्मसंसदेत संतांकडून प्रस्ताव मंजूर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *नाशिकचे किमान तापमान 7.6 अंशावर, थंडीचा कडका कायम* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेत मार्च २०१९ अखेरपर्यंत ५० हजार शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्याचे महावितरणचे उद्दिष्ट असून, वीज जोडणीसाठी राज्यात ८ हजारांवर शेतकऱ्यांचे अर्ज.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *मुंबई : जागतिक कुष्ठरोग दिनानिमित्त आजपासून राज्यात जनजागृती पंधरवडा साजरा करण्यात येणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *पूर्णवाद परिवार सेवा मंडळ आणि पूर्णवाद लाईफ मँनेजमेंट इन्स्टिट्यूट यांच्यातर्फे दरवर्षी दिला जाणारा डॉ. पारनेरकर अर्थशास्त्र पुरस्कार यावर्षी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ, प्रसिद्ध वक्ते आणि लेखक चंद्रशेखर टिळक यांना जाहीर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *राळगेणसिध्दी(अहमदनगर) : संत यादवबाबांचे दर्शन घेऊन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे उपोषण सुरू* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *आज भारत वि. न्यूझीलंड चौथ्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्व करणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *हसा आणि हसवा* जीवनात हसण्याचे महत्व ....! वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2015/11/blog-post_29.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *लातूर*          लातूर शहर ही या जिल्ह्याची राजधानी आहे. या शहरास प्राचीन इतिहास आहे. हे शहर  राष्ट्रकूट घराण्याची राजधानी होते. त्यानंतर हे शहर बऱ्याच राज्यकर्त्यांच्या ताब्यात गेले. १९ व्या शतकात ते हैदराबाद संस्थान संस्थानच्या अधिकारक्षेत्रात आले. १९४८ मध्ये हा भाग स्वतंत्र झाला व १९६०मध्ये महाराष्ट्रात आला. कालांतराने उस्मानाबाद जिल्ह्या्चे विभाजन होऊन ऑगस्ट १६, १९८२ या दिवशी लातूर जिल्हा अस्तित्वात आला. लातूर हे महाराष्ट्राच्या,आंध्र प्रदेशाच्या आणि कर्नाटकच्या सीमेवर असल्यामुळे त्यांच्यामध्ये अनेक परंपरा व रूढी यांची देवाणघेवाण झालेली आहे. लातूर जिल्हा व त्या लगतचे कित्येक लोक मराठी व्यतिरिक्त कन्नड आणि  तेलुगू भाषा सहज बोलतात.   *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• खरा आनंद हा दुसऱ्यांना देण्यात असतो; घेण्यात किंवा मागण्यात नसतो. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) नेपोलियन बोनापार्ट सम्राट कधी बनला ?* १८०४ *२) आंतरराष्ट्रीय वाणिज्य मंडळाचं सचिवालय कुठे आहे ?* पॅरिस *३) वेरुळचं कैलासनाथ मंदिर कोणी बांधलं ?* राष्ट्रकूट राजा कृष्ण (द्व)  *४) मीठाचं सर्वाधिक उत्पादन घेणारं देशातील राज्य कोणतं ?* गुजरात *५) दाचीगाम राष्ट्रीय अभयारण्य कोठे आहे ?*              जम्मू काश्मीर *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ●  विनायक हिरवे ●  राजेश पटकोटवार ●  हिलाल पाटील ●  जयेश पुलकंठवार ●  राजेश्वर रामपुरे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *थंडीची लाट* राज्यात थंडीची लाट आली आहे काहींची अंथरूणात पहाट झाली आहे थंडीने काही गप्पा गार पडले आहेत सूर्याने नित्याचे कामं कुठं सोडले आहेत शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *परिक्षेत वरचा नंबर हवा, टक्केवारी चांगली हवी; म्हणून क्लास लावला जातो. मात्र, आपल्यातला माणूस घडला पाहिजे, त्याला चांगलं वळण लागलं पाहिजे यासाठी शोधला जातो का एखादा क्लास? संतानी माणसातला माणूस जागविण्यासाठी अभंगांचा शब्द न् शब्द खर्ची घातला. तो समजून घेण्याच्या फंदात कुणी पडत नाही. आपल्याला डाॅक्टर, वकील, इंजिनीयर व्हायचं! पण त्याबरोबर कधी आपण हा विचार केला की मला बाबा आमटे यांच्यासारखी रुग्ण्सेवा करायचीयं. सिंधूताई सपकाळांसारखी अनाथांची माय व्हायचंय.* *'समाजसेवा' घडवेल असा धडाच आपल्या पाठ्यपुस्तकात नाही किंवा असलाच तर समजून घेतला गेला नाही. तसं झालं असतं तर अमानुषतेचं एकही उदाहरण सापडलं नसतं. म्हणूनच-* *"माणूस माणूस, तुझी नियती बेकार* *तुझ्याहून बरं, गोठ्यातलं जनावर"* *असा समाचार बहिणाबाई घेतात. संयम, विनम्रता, सौहार्द, सहिष्णुता हे फक्त निबंधातील शब्द आहेत. ते माणसाने आचरणातून हद्दपार केले आहेत. मातीत उगवून आलेल्या पिकांच्या अवतीभवतीचं तण-तणकट निंदणी-खुरपणी करून निर्मळ करावं लागतं. तसंच माणसाचं, माणसाचा सहजी माणूस बनत नाही. संस्काराच्या शाळेत माणूस घडतो. मात्र, माणूस संस्काराच्या शाळेत हजर राहण्यास नाखूष असल्याने, त्याची अॅब्सेंटी वाढत चाललीयं. मग कसा होऊ शकेल त्याचा माणूस ?* ••● ‼ *रामकृष्णहरी* ‼ ●•• ☀☀☀☀☀☀☀☀☀ संजय नलावडे, चांदीवली, मुंबई         9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• नहाये धोये क्या हुआ , जो मन मेल न जाय | मीन सदा जल में रही , धोये बॉस न जाय || अर्थ : नहाणे धुणे देखावा गेला न मनीचा मळ सदा पाण्यात मासळी दुर्गंध न काढी जळ महात्मा कबीर दिखाऊ पणाला फटकारतात. नहाणे , धुणे व सुंगधाने सजणे हा तर केवळ बाह्य देखावा आहे. जर मनाचीच सफाई झाली नाही तर विवेकी व निरामय जीवनशैली विकसित होणार नाही व त्याशिवाय विश्वात्मक भाव दृढ कसा होणार ? मासा सदा सर्वकाळ पाण्यात राहूनही अंगीचा दुर्गंध त्यागीत नाही. तिथे पाण्याचा काय दोष असणार आहे. बाह्य बदलापेक्षा आंतरिक बदल महत्त्वाचा असतो. तो अवगुण कायमचे दूर करतो.     एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• तुमची वाणी स्पष्ट, चारित्र्य पवित्र, जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आणि जीवन व्यवहार चोख असतील तर तुम्ही इतरांच्या हृदयावर साम्राज्य सहजपणे करु शकाल. अन्यथा ह्या गोष्टी तुमच्या जीवनात नसतील तर तुम्हाला मनुष्य म्हणून जगण्याचा अधिकारही राहणार नाही. आपण मनुष्य म्हणून जन्माला आलो आणि मनुष्य म्हणूनच जगणार आहोत हा विचार समोर ठेवून जगण्यासाठी वरील महत्वाच्या चार गोष्टींना जीवनात प्राधान्य द्यायलाच हवे आणि त्या गोष्टी सहज करता येऊ शकतात. सुरुवातीला कठीण जाईल एकदा का सराव झाला की, मग आपोआपच व्हायला लागतात. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *मनाचे श्लोक* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• प्रभाते मनी राम चिंतीत जावा। पुढे वैखरी राम आधी वदावा॥ सदाचार हा थोर सांडूं नये तो। जनीं तोचि तो मानवी धन्य होतो ॥३॥ संकलन : सौ. सुभद्रा सानप, बीड •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *एक दिवसाचा पांडुरंग* "पंढरपूर येथील पांडूरंगाच्या मंदिरात गोकुळ नावाचा भक्त नियमितपणे झाडण्याची सेवा करत होता, तेव्हा त्याच्या मनात विचार आला कि, "विटेवर उभा राहून रोज हजारो लोकांना दर्शन देत असणाऱ्या पांडुरंगाचे पाय नक्कीच दुखत असतील, म्हणून एक दिवस त्याने पांडुरंगाला विचारले, '" देवा तू आमच्यासाठी सारखा उभा असतोस, तुझे पाय दुखत असतील तेव्हा तू आता विश्रांती घे, मी तुझ्या जागी उभे राहण्याची सेवा करेन"  त्यावर पांडुरंग म्हणाला, " ठीक आहे , पण तू इथे उभा राहून कोणालाही काही सांगू नकोस, काहीही झाले तरी बोलू नकोस, फक्त हसत उभा रहा" पांडुरंगाचे हे बोलणे गोकुळ ने मान्य केले व दुसऱ्या दिवशी सकाळी तो पांडूरंगाच्या जागी उभा राहिला. तेव्हा तेथे भक्तांचे येणे सुरु झाले,  श्रीमंत भक्त :- "देवा मी लाखो रुपायांची देणगी दिली आहे, माझ्या व्यवसायामध्ये भरभराट होऊंदे"  (त्यावर तो श्रीमंत भक्त तेथून निघून गेला, पण चुकून तो आपले पैशांनी भरलेले पाकीट तेथेच विसरला, पण देवाने काहीच न करता फक्त उभे राहण्याचे सांगितले असल्याने गोकुळ त्याचे पाकीट त्याला परत देऊ शकला नाही, त्यामुळे तो फक्त हसत उभा राहिला .......... पुढे तेथे एका गरीब भक्ताचे येणे झाले )  गरीब भक्त:- "पांडुरंगा, हा एक रुपया मी तुला अर्पण करतो, माझी हि धनाची सेवा स्वीकार कर. तसेच मला नेहमी तुझ्या चरणाशी ठेव, माझ्याकडून तुझी भरपूर सेवा करून घे....... देवा माझी बायको व मुले २ दिवसांपासून उपाशी आहेत, घरात अन्नाचा कण नाही, माझा सगळा भार मी तुझ्यावर सोडला आहे, जे काही होईल ते तुझ्या इच्छे प्रमाणे होईल असा मला विश्वास आहे" ( असे म्हणून तो भक्त आपले डोळे उघडतो तेव्हा त्याला तिथे पैशांनी भरलेले पाकीट दिसते, तेव्हा देवाचे आभार माणू तो ते पाकीट घेऊन जातो व आपल्या उपाशी बायकोला, मुलांना व इतर गरीब लोकांना अन्न देतो........ गोकुळ काहीच न बोलता हसत उभाच असतो ) पुढे तिथे एक नावाडी येतो, देवाला उद्देशून तो म्हणतो, " हे पांडुरंगा आज मला समुद्रातून खूप लांबचा प्रवास करायचा आहे, तेव्हा सर्व व्यवस्थित होण्यासाठी आशीर्वाद दे " (असे म्हणून तो नावाडी तेथून जाऊ लागतो तितक्यात तो श्रीमंत भक्त पोलीसांना घेऊन तिथे येतो, तिथे पाकीट नसल्याचे बघून तो श्रीमंत भक्त पोलिसांमार्फत पाकीट चोरल्याच्या संशयावरून नावाड्याला अटक करतो........तेव्हा गोकुळला फार वाईट वाटते पण तो काहीच करू शकत नसल्याने तो फक्त उभा राहतो )  तेव्हा नावाडी देवाकडे बघून म्हणतो, " पांडुरंगा हा काय खेळ मांडला आहेस, मी काहीच नाही केले तरी मला हि शिक्षा" (हे ऐकून गोकुळचे हृदय गहिवरते, तो विचार करतो कि स्वताहा पांडुरंग जरी इथे असला असता तरी त्याने काहीतरी केले असते, असे म्हणून न राहवून तो पोलीसांना सांगतो कि, " पाकीट नावाड्याने चोरले नसून गरीब भक्ताने चोरले आहे" ..... त्यावर पोलीस नावाड्याला सोडून देतात, तेव्हा नावाडी न श्रीमंत हे दोघे भक्त देवाचे आभार मानून तेथून निघून जातात.) रात्री पांडुरंग मंदिरात येतो व गोकुळाला विचारतो "कसा होता दिवस?"  गोकुळ म्हणतो , " पांडुरंगा मला वाटले होते कि इथे उभे राहणे फार सोपे काम आहे, पण आज मला कळाले कि हे काम किती अवघड आहे ते, ह्यावरून कळते कि तुझे दिवस हे सोपे नसतात" ....... पण देवा मी आज एक चांगले काम पण केले, असे म्हणून तो सारी हकीकत देवाला सांगतो. तेव्हा पांडुरंग निराश होऊन त्याला म्हणतो, " शेवटी तू माझ्या आज्ञेचा भंग केलास, तुला मी सांगितले होते कि तू कोणालाही काहीही बोलू नकोस पण तू ऐकले नाहीस, तुझा माझ्यावर (देवावर) विश्वासच नाही........ तुला काय वाटते कि मी भक्तांच्या ह्रुदयातील भावना ओळखू शकत नाही " ....... गोकुळ मान खाली घालून उभा राहतो .......... पांडुरंग पुढे म्हणतो ........ अरे त्या श्रीमंत माणसाने दिलेल्या देणगीतील पैसे हे चुकीच्या मार्गातील आणि भ्रष्टाचारातील होते, आणि त्या पैशांच्या बदल्यात त्याला व्यवसाया मध्ये माझ्याकडून भरभराट हवी होती. त्यामुळे पाकीट हरवण्याचा खेळ मला करावा लागला जेणेकरून ते पैसे चांगल्या मार्गाला वापरून त्याच्या पदरातील पापाचा साठा कमी होणार होता. त्या गरीब भक्ताकडे फक्त शेवटचा एकच रुपया राहिला होता, तरी देखील श्रद्धेने व भक्तीने त्याने मला तो अर्पण केला. म्हणून पैशांचे पाकीट मी त्याला दिले कारण तो सर्व पैसे फक्त गरीब लोकांसाठी वापरतो आणि त्याने तसेच केले आहे. त्या नावाड्याने काहीही चुकीचे केले नव्हते पण तो समुद्रामध्ये लांबच्या प्रवासाला जाणार होता, तेथील वातावरण आज खूप खराब आहे, मोठमोठ्या लाटा जोराने वहात आहेत, ह्या परिस्थितीत तो आपली नाव वाचवू शकला नसता व त्याचा प्राण गेला असता, म्हणून मी त्याला अटक करण्याचा खेळ रचला जेणेकरून तो तुरुंगात बंद राहील व मोठ्या संकटापासून सुटेल.  पण तुला वाटले कि आपण एक दिवसाचा देव झालो म्हणजे आपण सगळे समजू लागलो, पण तू तर सर्व खेळावर पाणी सोडलेस, आणि नेहमी जे होते तेच आजपण झाले ..... "देव मनुष्यासाठी चांगले खेळ रचतो, पण मनुष्याच त्यावर पाणी सोडतो"  तात्पर्य :- देव जे काही करत आहे ते फक्त आपल्या चांगल्यासाठीच करत आहे ...... फक्त आपण देवावर विश्वास ठेवून धीर बाळगला पाहीजे.श्रद्धा ठेवली पाहिजे. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00           ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 30/01/2019 वार - बुधवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *हुतात्मा दिवस* 💥 ठळक घडामोडी :- १९४८ - नथुराम गोडसेने महात्मा गांधींचा पिस्तुलाने गोळी झाडून खून केला. १९९४ - पीटर लोको बुद्धिबळातील सगळ्यात लहान ग्रँडमास्टर झाला. २००२ - भारतातील गरीब मुलांवर जवळजवळ ५७ हजार प्लॅस्टिक सर्जरी करणारे अनिवासी भारतीय डॉक्टर शरदकुमार दीक्षित यांना एनआरआय ऑफ द इयर २००१ हा पुरस्कार जाहीर. 💥 जन्म :- १९१० - चिदंबरम् सुब्रमण्यम्, भारतीय राजकारणी. 💥 मृत्यू :- १९४८ - राष्ट्रपिता महात्मा गांधी. १९९६ - गोविंदराव पटवर्धन, हार्मोनियम व ऑर्गन वादक. २००० - आचार्य जनार्दन हरी चिंचाळकर, मानववंशशास्त्रज्ञ व सामाजिक कार्यकर्ते. २००१ - प्रा. वसंत कानेटकर, ज्येष्ठ नाटककार. २००४ - रमेश अणावकर, प्रसिद्ध गीतकार. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *केंद्र सरकारकडून दुष्काळग्रस्त महाराष्ट्राला 4 हजार 714 कोटींची मदत* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *अहमदनगर - लोकायुक्तांना मंजुरी दिली म्हणजे कायदा झाला असे नाही, आंदोलन करणारच - अण्णा हजारे* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचं निधन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार वसंत आबाजी डहाके यांना जाहीर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *जळगाव : शिक्षणाची वारीच्या शेवटच्या टप्याला जळगाव मध्ये प्रारंभ, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी आणि संचालक डॉ. सुनील मगर यांच्या हस्ते उदघाटन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *यवतमाळ जिल्ह्यात थंडीचा पारा 6 अंशावर, विदर्भात सर्वाधिक कमी तापमानाची नोंद* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *तब्बल 24 वर्षांनी भारतीय महिला संघाने न्यूझीलंडच्या भूमीत वन डे मालिका जिंकण्याचा केला पराक्रम.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *प्रामाणिक वसंता* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://kathamaala.blogspot.com/2017/04/blog-post_48.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••             जळगाव शहर       जळगाव शहर महाराष्ट्र राज्यातील एक मोठे शहर आहे. जळगाव जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय असलेले जळगाव शहर एक महत्त्वाचे कृषी व्यापार केंद्र आहे. कापूस, खाद्यतेले, केळी इ. बाजारपेठा येथे असून जळगाव शहर हे सोन्याची बाजारपेठ म्हणून नावाजलेले आहे. येथील सोने शुद्धतेबद्दल प्रसिद्ध आहे. जळगाव शहरात ठिबक-सिंचन, पाण्याचे पाईप, डाळ व कापड इत्यादी उद्योग आहेत. जळगाव शहरात उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. व गांधी संग्रहालय या प्रसिद्ध संस्था आहेत. येथून जवळच जगप्रसिद्ध अजिंठा लेणी आहेत.जळगावला मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणतात. जळगाव शहराची स्थापना मराठी सरदार तुळाजीराव भोईटे यांनी केली. सरदार तुळाजीराव भोईटे हे सातार्‍याचे संस्थानिक होते. भोईटे कुटुंबाचे पूर्वज दुर्गोजीराव भोईटे हे छत्रपती शाहू महाराजांचे निष्ठावंत सेवक असल्याकारणाने महाराजांकडून त्यांना नशीराबाद आणि जवळील प्रांत अनुदान म्हणून मिळाले होते. भोईटे बऱ्याच काळपर्यंत जळगावचे राज्यकर्ते राहिले. त्यांनी जळगाव येथे एक वाडा बांधला. आज त्या वाड्याला भोईटे गादी म्हणून ओळखले जाते. जळगाव हे एक जिल्ह्यातले महत्त्वाचे रेल्वे जंक्शन असून तेभारतातल्या मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, कोलकाता, अलाहाबाद, चेन्नई यासारख्या मोठ्या शहरांशी रेल्वेमार्गाने जोडलेले आहे. जळगाव जिल्ह्यात भुसावळ, चाळीसगाव व पाचोरा हीही रेल्वे जंक्शने आहेत, त्यांपैकी भुसावळ रेल्वे स्थानक हे महाराष्ट्रातले मोठे जंक्शन म्हणून ओळखले जाते *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आयुष्यात नशीबाचा भाग फक्त एक टक्का आणि परिश्रमाचा भाग नव्याण्णव टक्के असतो *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) 'शांतता! कोर्ट चालू आहे' चे नाटककार कोण ?* विजय तेंडुलकर *२) १९४0 च्या 'ऑगस्ट प्रस्तावा'नुसार कोणत्या तरतुदी सादर करण्यात आल्या ?* वसाहतींचे स्वातंत्र्य  *३) नानासाहेबांनी कुठे स्वत:ला पेशवा म्हणून जाहीर केलं ?* कानपूर *४)कोणतं राज्य अँस्बेस्टसचं सर्वाधक उत्पादन घेतं ?* राजस्थान *५) एक किलोबाईट म्हणजे किती ?*              १०२४ *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ●  प्रा. बालाजी कोंपलवार ●  सौ. सारिका राजेश मद्दलवार ●  मगदूम अत्तार ●  अंकुश निरावार ●  शिवकुमार माचेवार ●  सतीश गंलोड ●  सुरज एडके ●  देवराज बायस *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *प्रदर्शन* नको त्या गोष्टींचा हल्ली  दिखावा जास्त आहे दिखावा करणाराला वाटते हे सर्वच रास्त आहे जे प्रदर्शनीय नाही ते विचारपूर्वक झाकल पाहिजे कशाच प्रदर्शन करतो याच प्रत्येकाने भान राखल पाहिजे     शरद ठाकर सेलू जि.परभणी   8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आपली सर्व धडपड कशासाठी असते ? प्रत्येकजण सुखासाठी खटपट करीत असतो. प्रपंचात सुख मिळावे असे सर्वांना वाटत असते, आणि त्यासाठी जो तो प्रयत्‍न करीत असतो. परंतु आजपर्यंत प्रपंचात कुणाला सुख मिळाले आहे का ? कुणी म्हणतो, मजजवळ संपत्ती आहे, पण संतान नाही, कुणी दारिद्र्य आहे म्हणून रडतो, कुणी काही, कुणी काही, सांगतच असतो, आपली हाव कधीच तृप्त होणे शक्य नाही. मृगजळ पिऊन कुणी कधी तृप्त झाला आहे का ?* *प्रपंचच जिथे खोटा तिथे सुख कसले मागता ? याचा अर्थ असा नाही की प्रपंच सोडावा, पण तो सुखाचा कसा होईल हे पाहावे. तुम्हांला खात्रीने सांगतो की, प्रपंच जर सुखाचा करायचा असेल तर त्याला एकच उपाय आहे. तो अगदी सोपा आहे, पण आचरणात आणायला अत्यंत कठीण आहे. परमात्म्याची अगदी मनापासून प्रार्थना करावी. मग तो ठेवील त्या परिस्थितीमध्ये आपण अगदी आनंदात व सुखात राहू शकतो.*      संजय नलावडे, चांदीवली, मुंबई         9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• पत्ता  बोला  वृक्ष  से , सुनो  वृक्ष  बनराय  | अब  के  बिछड़े  न  मिले , दूर  पड़ेंगे  जाय  || अर्थ :      संघटनेचं विघटन झालं की उभारी घेणं अवघडच असतं. हे पटवून देताना महात्मा कबीरांनी निसर्गातला किती समर्पक दृष्टांत दिलेला आहे.  पान झाडाला म्हणतं, ' हे तरूवर  वृक्षराज तुम्ही ऐका तर खरं ! आज तुम्ही  भक्कमपणे उभे आहात. या तुमच्या भक्कम पणासाठी आम्ही लक्षावधी पानांनी स्वतःला ऊन्हात सूर्यासोबत टक्कर देत  त्याला न घाबरता अंगावर घेतलं. ऊन्हात राबून स्वतःचं नाजूकपण तुझ्या संगोपणात साकारण्यात विसरूनच गेलो. अन राठ होवून पिकत गेलो. आम्ही जुन्या दमाची परंतु अनुभवी तुझ्या स्वछंद बागडण्याला मुरड घालून ताळ्यावर आणू पाहाणारी तुला नकोशे वाटतोय. नव्या दमाची फौज तुला हवी. तिला जशी फुस दिली तशी ती उधळते. भूत भविष्याचा विचार न करता वर्तमानाच्या क्षणिक फसव्या मोहात पाडून तू त्या नव्या नाजूक पात्यांना फसवून स्वतःच वैभव आभाळी मिरवू पाहात आहेस. तुझे पाय त्या वटवृक्षावाणी मजबुतीनं कुठं घट्ट रोवलेले आहेत ? त्याच्या सोबतीला जुने नवे असे पानाचे अक्षौहिनी सैन्य खोडाआधी भक्कमपणे ऊन, वारा थंडीशी टकरायला तयार आहे. म्हणून तर वडाचं राज्य दीर्घकाल चालतं. तो आधार असणार्‍या पान अन  मातीची नाळ वड तुटू देत नाही. तू मात्र "विद्या आली हाता अन गुरूला लाथा" असं वागून नवीन पिढी बिघडवत आहेस. ती पिढी बायका पोरं झाली की मायबापा पासून दुरावून स्वतःचा अधःपात करून ऊर फोडून घेत आहेत. तुला वैभव उंच आभाळी नेल्यासारखं वाटत असलं तरी वादळं वावटळी मध्ये सर्वात आधी ताडमाड उंचीची  दिखाऊपणा करणारी भक्कम आधार नसलेलीच झाडंच आधी आडवी होतात. दुरावलेलं गळालेलं पान पुन्हा आधाराला कधीच जवळ येत नाही. ते नव निर्माणासाठी मातीशीच एकरूप होवून जातं ! सोबत्यांना (जनतेला) मारून नव्हे तर सोबत घेवून मोठं होता येतं. हे झाडांनी विसरता कामा नये.     एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        आपण काही राक्षसीवृत्तीचे किंवा विध्वसंकवृत्तीचे नाही की, ज्यामुळे कुणाच्याही जीवनात असलेल्या नंदनवनाचे स्मशान बनवण्यासाठी.आपण आहोत सर्वसामान्यपणे एकमेकांच्या आधारे आपल्या जीवनाची नौका पार करण्यासाठी जन्माला आलेली सामान्य माणसे.आपला प्रत्येकाशी कुठे ना कुठे , कोणत्या ना कोणत्या कारणासाठी संबंध येतो.मग तो दु:खाचा असो की सुखाचा.मग आपला संबंध इतरांशी चांगला ठेवायचा असेल तर आपल्या मनात दुस-याविषयीची आत्मियता बाळगायला हवी,जो कोणी संकटात सापडला असेल तर त्याला आणखी संकटात न टाकता आहे त्या संकटातून बाहेर पडण्यासाठी त्याला कशी मदत करता येईल आणि वाचवता येईल हे प्रथम विचार करायला हवे.जर आज आपण दुसऱ्याच्या विध्वंसाचा विचार केला तर उद्या आपलीही गत तशीच होणार.मग आपण आपल्या संकटातून बाहेर पडण्यासाठी इतरांना बोलावण्याचा प्रयत्न केला तर ते आपल्या मदतीला कसे धावून येणार ?आपण अशावेळी दुसऱ्याकडून मदतीची अपेक्षाही करणे चुकीचे ठरेल.आपली व इतरांची जीवननौका व्यवस्थितपणे पार करायची असेल तर एकमेकांच्या साथीनेच करावी लागणार.आपल्या एकमेकांच्या मनातल्या उभ्या असलेल्या संशयाच्या,भेदाच्या व तिरस्काराच्या भिंती सा-या पाडून टाकायला हव्यात तरच आपले आणि इतरांचे चांगले,प्रेमाचे,सहकार्याचे संबंध प्रस्थापित होतील.ज्या काही असलेल्या मनातल्या राक्षसीवृत्ती आपल्या चांगल्या संबंधांमुळे केव्हाच लोप पावायला लागतील.असा हा आपला एकमेकांना सहाय्य करण्याचा आणि संकटाच्यावेळी मदतीचा हात पुढे करण्याचा माणुसकीचा खरा धर्म पाळला पाहिजे. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🌱🌹🌱🌹🌱🌹🌱🌹🌱 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎡 मनाचे श्लोक 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• प्रभाते मनी राम चिंतीत जावा। पुढे वैखरी राम आधी वदावा॥ सदाचार हा थोर सांडूं नये तो। जनीं तोचि तो मानवी धन्य होतो ॥३॥ संकलन : सौ. सुभद्रा सानप, बीड •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••          *यशाचे  बीजगणित* आजोबा! तुम्ही हे कुठले विचित्र गणित सोडविताहात?' अदितीने विचारले. मी माझ्या दैनंदिनीमध्ये काही तरी लिहित होतो व अदिती अजोबाच्या मागे केव्हा येऊन उभी ठाकली हे कळलेच नाही. दैनंदिनीच्या पानावर लिहिले होते- (त+म+ध) न? 'हे एक नवे बीजगणित आहे नि मी ते सोडविण्याचा प्रयत्न करतोय, आजोबानी  टाइमपास म्हणून उत्तर दिले.  'मलाही समजावून सांगा ना!' -अदिती म्हणाली.  आजोबानी तिला म्हटले, मी तुला नक्की समजावून सांगेन. आधी मला हे सांग '(त+म+ध) न' याचा अर्थ काय आहे? तुही बीजगणित शाळेत शिकली आहेस ना!'  'सिम्पल आहे, आजोबा! यातील 'ब्रॅकेट' काढून 'तन+मन+धन', असे लिहिले असावे. कारण 'त', 'म', 'ध' हे तिनही अक्षरे 'न'शी गुणिले आहेत ना- अदिती बोलली. 'शाब्बास', आजोबा म्हटले- 'चल, आता प्रश्नचिह्नाचा विचार करू. तन, मन, धन अर्पण करणे म्हणजे तरी काय?'  'खूप परिश्रम' घेऊन काम करणे, अदितीने अचूक उत्तर दिले. तन+मन+धन हे परिश्रमाचे सूत्र आहे.  'वाह! क्या बात है!' असे म्हणून आजोबानी तिची पाठ थोपटून कौतुक केले.  'आजोबा! हे ठीक आहे. पण एखादे उदाहरण देऊन समजावून सांगा ना, प्लीज।' अदिती म्हणाली.  'ओके! बघ, तुझ्या अभ्यासाचे उदाहरण घेऊ या. तुला परीक्षेत पहिला नंबर काढायचाय का?  अदितीने मान हलवून होकार दिला व आजोबाकडे लक्ष देऊ लागली. 'पहिला नंबर येण्याकरीताही हा फॉर्म्युला लागू पडतो. खाण्‍या-पिण्याकडे लक्ष दिले पाहिजे, दररोज थोडेसे खेळले पाहिजे, व्यायाम केला पाहिजे, तसेच स्वच्छतेकडे लक्ष दिले पाहिजे तरच तन अर्थात शरीर स्वच्छ राहिल. आजारी पडलात तर तुमच्याकडून अभ्यासच होणार नाही. दूसरे म्हणजे, मन. मनाची एकाग्रता असेल तरच अभ्यासात मन लागेल व चांगला अभ्यास करू शकाल. वर्गात शिक्षकांकडून जे शिकविले जाते, ते चटकन लक्षात राहते.  'मला हे समजले आजोबा! मात्र, हे धन मी कोठून आणू? अदितीने अतिशय योग्य प्रश्न विचारला. मी म्हणालो, तु त्याचा विचार करू नकोस ती माझी व तुझ्या वडीलांची जबाबदारी आहे. मात्र तुला मिळणार्‍या 'पॉकेटमनी'चा तू चांगल्या कामात उपयोग करू शकते. थोडे-थोडे पैसे जमा करून तू एखादे जनरल नॉलेजचे पुस्तक, ज्ञानवर्धक विषयाचे पुस्तक, डिक्शनरी, कॅल्क्युलेटर वगैरे. खरेदी करू शकते. या माध्यमातून तू 'धना'चा सदुपयोग करू शकते.  ''खूप चांगले! 'थॅंक्स!' अदिति खुश होऊन बोलली। 'खरंच, यशाचा हा फॉर्मूला खूप मजेदार आहे. पहिला नंबर येण्याकरीताही हा फॉर्म्युला लागू पडतो. खाण्‍या-पिण्याकडे लक्ष दिले पाहिजे, दररोज थोडेसे खेळले पाहिजे, व्यायाम केला पाहिजे, तसेच स्वच्छतेकडे लक्ष दिले पाहिजे तरच तन अर्थात शरीर स्वच्छ राहिल. आजारी पडलात तर तुमच्याकडून अभ्यासच होणार नाही. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00           ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 29/01/2019 वार - मंगळवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १७८० - जेम्स ऑगस्टस हिकी यांनी कोलकाता येथे 'कलकत्ता जनरल ऍडव्हर्टायझर' या नावाने साप्ताहिक वर्तमानपत्र सुरु केले. हिकीज बेंगाल गॅझेट नावाने ओळखले जाणारे हे वर्तमानपत्र म्हणजे भारतीय पत्रकारितेची सुरुवात. २००६ - शेख सबाह अल-अहमद अल-जबर अल-सबाह कुवैतच्या अमीरपदी. 💥 जन्म :- १८७१ - चंद्रशेखर शिवराम गोर्‍हे, बडोदा संस्थानचे राजकवी. 💥 मृत्यू :- १९५० - अहमद अल-जबर अल-सबाह, कुवैतचा अमीर. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *आगामी लोकसभा निवडणूक २०१९ च्या तारखा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घोषित होऊ शकतात. अधिकृत सूत्रांची माहिती * ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *राज्य शासनाच्या वतीने मुंबईतील आयआयटी पवई येथे २९ जानेवारी ते १ फेब्रुवारी २0१९ या काळात चौथ्या जागतिक आपत्ती व्यवस्थापन परिषदेचे आयोजन* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *पुणे - साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी साखर कारखान्यांवर कारवाईचे तसेच शेतकऱ्यांचे पैसे मिळवून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन मागे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी उपोषण करण्याचा घेतला निर्णय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *सोलापूर : राष्ट्रवादीचे माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी जालना येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात केला प्रवेश* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरामध्ये विक्रमी वाढ, सोन्याच्या दरात ३५० रुपयांची वाढ होत तो प्रति १० ग्रॅम ३३ हजार ६५० रुपयांवर पोहोचला* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *न्यूझीलंडविरुद्ध तिसर्‍या कसोटीत विराट आणि रोहितने दुसर्‍या गड्यासाठी शतकी भागीदारी करत भारताच्या विजयाची  हॅट्ट्रिक, मालिकेवर कब्जा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••          *ऑफरचा भुलभुलैय्या* कमी श्रमात जास्त संपत्ती मिळावी असे प्रत्येक मनुष्याला वाटणे म्हणजे आपल्या अंगात असलेल्या आळशीपणाला उत्तेजन देणे होय. ज्या ज्या वेळी मनुष्य असे प्रयत्न करत आला आहे त्या त्यावेळी त्याला उदासीनते शिवाय काहीही मिळाले नाही. तरी सुद्धा माणूस अश्या घटनेतून काही बोध न घेता पुन्हा तश्याच काही बाबीच्या शोधात राहतो. मी गोष्ट करतोय ऑफरची. रस्त्याने जाता येता ....... पूर्ण लेख वाचण्यासाठी खालील लिंकवरून ब्लॉगला भेट द्यावे. https://nasayeotikar.blogspot.com/2019/01/blog-post_28.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *चंद्रशेखर शिवराम गोर्‍हे*         चंद्रशेखर शिवराम गोर्‍हे तथा कवी चंद्रशेखर यांचा जन्म 29 जानेवारी 1871 रोजी झाला.  ते मराठी कवी होते. यांचे शिक्षण नाशिक, वडोदरा आणि पुणे येथे झाले. त्यांनी वडोदरा येथे वैद्यकीय खात्यात लेखनिकाची नोकरी केली. आयुष्याच्या अखेरीस बडोदा संस्थानाचे ते राजकवी झाले. चंद्रशेखरांचे पुष्कळसे काव्य प्रासंगिक स्वरूपाचे आहे. प्रौढ, गंभीर, बोधपर आणि अनेकदा निवेदनपर अशा कविता त्यांनी लिहिल्या. मोरोपंत, रघुनाथ पंडित वगैरे पंत कवींचा अलीकडच्या काळातील एक अवतार, असे त्यांना म्हटले जाई.    *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• माणूस त्याच्या कर्माने मोठा होतो जन्माने नव्हे - आर्य चाणक्य *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) वैदिककालीन देवतांमध्ये कोणती देवता सूर्याची आई म्हणून पुजली जाते ?*          आदिती *२) 'स्त्री विचारवती' ही सामाजिक संस्था कोणी स्थापन केली ?*           सरस्वती गणेश जोशी *३) कवितेचा आशय आणि अभिव्यक्तीमध्ये आमूलाग्र बदल म्हणजे कोणतं काव्य ?*           नवकाव्य *४) 'अजेंडा २१' हा पर्यावरणविषयक ठराव कुठे संमत झाला ?*            रिओ डी जानेरो *५) जहाजबांधणीमध्ये अग्रेसर देश कोणता ?*              द. कोरिया *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ●  मधूसुधन जाधव ●  सुनील वानखेडे ●  कोंडीराम केशवे ◆  नरेंद्र जोशी ◆  वीरभद्र करे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••     *आनंद* ज्याचे दु:ख त्यालाच इथे भोगावे लागते दु:खात ही आनंदाने सदा जगावे लागते दु:खात आनंदाने जगतो तो खरा आनंदी आहे आनंदातही रडतो कूढतो तो विचारांचा बंदी आहे     शरद ठाकर सेलू जि.परभणी   8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सत्याला 'सत्य' म्हणून ओळखा आणि असत्याला 'असत्य' म्हणून, असा संदेश गौतम बुद्धांनी दिला. सत्य या शाश्वत मूल्याचा  वैयक्तिक आणि सार्वजनिक  जीवनातील आचारासाठी माणसाचं विवेकी मन हाच मूलाधार असतो. वस्तुत: माणसाला सत्य सहज कळतं. सत्य पाहण्याची, बोलण्याची वा कृती करण्याची रूची स्वाभाविक असते. माणूस आसक्तीत अडकला की खोट्या, असत्य, अप्रामाणिकपणाची पुटं मनावर चढतात. विवेक हरपतो. तोंडानं सत्याचा पुरस्कार परंतु आचरण मात्र असत्य.  उच्चार-आचार यात पूर्णत: विसंगती. लग्नातील सातवी प्रतीज्ञा आहे, "सखा सप्तपदी भव" म्हणजे विवाहानंतर स्त्री व पुरूष यांच्यात मालक आणि नोकर असा भाव असता कामा नये. पती व पत्नी यांच्यात सख्याची -मैत्रिची भावना हवी. समानतेचा, कधीही न तुटणारा ऐक्याचा सख्य संबंध हवा. परंतु सत्यपालनाचे आचरण किती घडतं.* *सत्यनिष्ठेनं, सत्य आचरणानं खरंतर माणसाचं ह्रदय व्यापक होतं. अंत:करणात प्रेमभाव वाढतो. वैरभावनेचा लोप होतो. आत्म्याचा विकास होतो. सत्य हे सर्व समर्थ असल्यानं जगण्यातील विश्वास बळावत जातो. व्यापक अर्थानं सत्याचं पालन करण्याने स्वत:चं, कुटुंबाचं जगणं अर्थपूर्ण ठरतं, आनंददायी होतं.*    *दुष्ट कर्म तुम्ही, अजिबात टाळा !*    *पुढे नाही धोका, मुलांबाळा ॥* *सद्यस्थितीत देशात सत्य आचरणाच्या बाबतीत सर्वत्र अंधार दिसतो. सत्याचं पालन करणं हीच सर्वोत्तम समाजसेवा हा विचार रूझला तरच असत्याचा अंधार मिटून  सत्याचा सूर्योदय नक्कीच होईल.*    ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई         9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    नारी मदन तलाबरी, भव सागर की पाल नर मच्छा के कारने, जीवत मनरी जाल। महात्मा कबीर परनारी व नारीचा अतिसंग बरा नव्हे हे पटवून देताना म्हणतात . नारी वासनेचा तलावात या भवसागरात माया जालात बुडवून टाकते. माशानं सफाईदारपणे पोहत जलाशयी स्वत:ला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केलेला असतो. परंतू तो फसव्या गळांच्या नादी लागून स्वत: शिकार्‍याच्या तावडीत जातो. तसे पुरूषाला आपल्या जाळ्यात जखडून ठेवण्याचं काम स्त्री करीत असते. त्या मुळे स्त्री संगापासूम सांभाळून राहिलं पाहिजे. संन्याशी व ब्रम्हचार्‍यानं स्त्री सान्निध्यात राहून स्वत:ला सुरक्षित ठेवणं महा कठीण काम. आगीजवळ राहून लोण्यानं आपलं अस्तित्व कायम जपता येईल का ? तशातलाच हा प्रकार आहे. जप तपात आकंठ बुडून गेलेल्या ऋषी मुनींच्या जन्मभर केलेल्या तपश्चर्येला क्षणात भंग करण्याचं काम नारी सान्निध्यानं केलं आहे. ऋषी विश्वामित्राची तपश्चर्या मेनकेने नाहीशी केली होती , विभांडक ऋषींची तपश्चर्या भंग करण्याचं काम उर्वशीने पूर्ण केले होते. क्रोधी व कोपीष्ट म्हणून ख्याती असणार्‍या पराशरांचंही सत्यवतीपुढे काहीही चाललं नाही. अशी असंख्य उदाहरणे आपणास पोथी पुराणातून पाहता येतात. तेव्हा साधक , ऋषी, मुनींचाही निभाव न लागू देणार्‍या नारीपुढे सामान्यांचं काय खरं आहे?     एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   जीवनाच्या जीवनप्रवासाची प्रत्येक वाट ही सरळ असतेच असे नाही तरीही मनुष्य त्या वाटेवरुन चालतच असतो आणि चालायलाच हवे.त्याच्याशिवाय जीवनप्रवास कसा आहे हे कसे समजणार ! त्या वाटेवरील चढ उतार कसा आणि किती आहे हे तरी कसे समजणार.चढ जास्त आहे म्हणून थांबायचे नाही आत्मविश्वास ढळू द्यायचा नाही आणि उतार आहे म्हणून संथगतीने ही चालायचे नाही.कमीजास्त असले तरी त्याचपध्दतीने मार्गक्रमण करायचे.जोपर्यंत आपला जीवनप्रवास चालू राहील तोपर्यंत आपण न थकता तेवढ्याच आत्मविश्वासाने निरंतर चालायचे तरच आपल्या जीवनाला अर्थ आहे नाही तर आपल्या जीवनाची दिशाच बदलून जाऊन पदरी घोर निराशाच स्वीकारावी लागेल.काळ जसा सातत्याने पुढे पुढे चालत जातो तसा आपला जीवनप्रवासही सतत पुढे पुढे चालू द्यावा. किंचितही अडथळा आला तरी ती दूर करण्याची तयारी आपल्यामध्ये असू द्यावी तरच जीवन जगण्याला खरा अर्थ आहे हे नेहमी लक्षात असू द्यावे. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🛣🛤🛣🛤🛣🛤🛣🛤🛣🛤🛣 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎡 मनाचे श्लोक - समर्थ रामदास स्वामी 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा। मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा॥ नमूं शारदा मूळ चत्वार वाचा। गमूं पंथ आनंत या राघवाचा ॥१॥ संकलक : सुभद्रा सानप, बीड 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••          •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••                 *गुरुपदेश* एका गुरूकडे एक शिष्य रोज यायचा आणि म्हणायचा मला गुरुपदेश द्या. त्यावेळी गुरु म्हणायचा, ‘उद्या ये.’ तो उद्या आला की म्हणायचा, ‘उद्या ये.’ असे दहा दिवस झाल्यावर शिष्य म्हणाला, ‘द्या ना गुरुपदेश !’ त्यावेळी ते म्हणाले, ‘एकटा येरे, किती जणांना बरोबर आणतोस?’ तेव्हा तो चपापला. कारण कोणीच नसायचे बरोबर. दुसऱ्या दिवशी तेच ! तिसऱ्या दिवशी तेच! शेवटी त्याने धाडस करून विचारले, ‘महाराज, मी तर एकटाच येतो, किती जणांना बरोबर आणतोस असे का म्हणता?’ ते म्हणाले, ‘अरे, मनामध्ये काय आहे? काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मोह आहे, मद आहे, मत्सर आहे, दंभ आहे !’ समर्थांनी तर प्रपंचालाच सहावा रिपू मानला आहे. आता काय करायचे? ज्या प्रपंचाला आम्ही कवटाळून बसतो, तो सहावा रिपू म्हणतात समर्थ ! मग त्याला कळले की अरे हे सगळे काढले पाहिजे चित्तातून ! त्यावेळी गुरुपदेश मिळेल. तात्पर्य :- आपले चित्त हे शुद्ध व्हायला पाहिजे. चित्तशुद्धीनंतर धर्माचरणाचा, सदाचाराचा खरा अर्थ कळतो आणि धर्माधिष्टीत अर्थ-काम सेवन केल्यावर मोक्षाचा लाभही अपरिहार्य ठरतो. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~

🌹 *जीवन विचार*🌹 〰〰〰〰〰〰〰 (दिनांक३०- १२- २०१८) माणसाने आपल्या बाह्य सौंदर्यापेक्षा त्याच्या आंतरिक सौंदर्यावर लुब्ध झालेले अतिउत्तम. कारण सौंदर्य हे सत्य शोधण्याच्या दृष्टीत असते. आणि ही सौंदर्यात सत्य शोधण्याची दृष्टी आपण सामान्य माणसात उपजत करू शकत नाही. म्हणून त्यांना सत्य दाखवावे; म्हणजे सौंदर्याची परिभाषा आपोआपच समजेल, दिसेल. मानवी जीवन सामर्थ्यानं आणि सौंदर्यानं पुलकित झालेलं आहे. या सामर्थ्यमय जीवनाच्या वाटेवर संकटाचे आभाळ कोसळले तर ते मोठ्या हिंमतीने सामर्थ्यशालीपणाने दूर सारावे. आणि सौंदर्याचे क्षण आले तर ते आनंदानं हर्षमय मनाने उल्हासीतपणे जगावेत, अनुभवावेत. असे म्हणतात "सौंदर्य हे स्त्रीचे सामर्थ्य आहे, तर सामर्थ्य हे पुरुषाचे सौंदर्य आहे." या जगातील सर्वश्रेष्ठ प्राणी मानव आहे. स्त्री आणि पुरुष ही त्याची दोन भाग आहेत, रुपं आहे. माणसाने फुलासारखे आपले जीवन जगावे या smt.pramila senkude 'या जगण्यावर या जन्मावर शतदः प्रेम करावे'........ *"सौंदर्य ही परमेश्वराने निर्माण केलेल्या सृष्टीतील श्रेष्ठ सर्जन आहे."* असे मनू ह्या विचारवंताने आपल्या विचारातून स्पष्ट केले आहे. गवताच्या पात्यावर पडलेल्या मोत्यासारखं दवबिंदू हे सौंदर्याचं लेणं आहे.श्रावणातील सौंदर्य मनाला खुदकन हसवत असत. कितीही झालं तरी सौंदर्य हे पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते. 'जशी दृष्टी तशी 'सृष्टी. *तरीही आणखी पुन्हा एकदा सांगावस वाटतं...* माणसाने बाह्य सौंदर्य पाहण्यापेक्षा त्याचे आंतरिक सौंदर्य पाहणे आवश्यक आहे. 〰〰〰〰〰〰 ✍ प्रमिला सेनकुडे ता.हदगाव जिल्हा नांदेड.

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00           ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 28/01/2019 वार - सोमवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- २००३ - मराठी कवी मंगेश पाडगावकर यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार जाहीर. 💥 जन्म :- १८६५ - लाला लजपतराय, लाल बाल पाल या त्रयींतील. १९०० - के.एम.करिअप्पा, भारताचे पहिले सरसेनापती जनरल. १९२५ - डॉ.राजारामण्णा, भारतीय अणूशास्त्रज्ञ, अणुउर्जा आयोगाचे चौथे अध्यक्ष. १९३० - पंडित जसराज, भारतीय शास्त्रीय गायक. 💥 मृत्यू :- १९८४ - सोहराब मोदी, भारतीय चित्रपट निर्माता व दिग्दर्शक. १९८९ - हसमुख धीरजलाल सांकलिया, भारतातील उत्खननविषयक संशोधनाचा पाया रचणारे पुरातत्त्ववेत्ते. १९९६ - बर्न होगार्थ, जंगलसम्राट टारझनला कार्टूनद्वारे अजरामर करणारे. १९९७ - डॉ.पां.वा. सुखात्मे, भारतीय संख्याशास्त्रज्ञ व आहारतज्ज्ञ. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *जयपूर - राजस्थानमध्ये स्वाइन फ्लूचे थैमान, महिनाभरात 72 मृत्यू* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *खरीप-२०१८ मध्ये राज्यात तीव्र व मध्यम स्वरूपाच्या दुष्काळ जाहीर, १५१ तालुक्यांतील बाधित शेतकऱ्यांसाठी ७१०३.७९ कोटींच्या मदतनिधीस शासनाने शुक्रवारी दिली प्रशासकीय मान्यता* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *मेळघाटात गेल्या ३५ वर्षापासून आदिवासी बांधवांना अविरतपणे रुग्णसेवा देणारे डॉ. रविंद्र कोल्हे व डॉ. स्मिता कोल्हे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *जळगाव : जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, या मागणीसाठी सन 2005 नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वतीने जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *नवी दिल्ली - अयोध्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुन्हा लांबणार, एक न्यायमूर्ती अनुपस्थित असल्याने लांबणार सुनावणी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *सिडनी, ऑस्ट्रेलियन ओपन : दमदार खेळ करत सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचने राफेलवर मात करत ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेचे पटकावले विजेतेपद* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमद वर चार सामन्यांची बंदी, चार सामन्यांसाठी पाकिस्तानची धुरा शोएब मलिककडे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••           *कथा व्यसन* आज सगळं गाव दु:खात बुडालं होत.  हळहळ व्‍यक्‍त होत होती.  बापाच्‍या सरणाला पोराने विस्‍तू लावण्‍याऐवजी आज पोराच्‍या सरणाला बाप विस्‍तू लावीत होता हे चित्र गावातील लोकांना देखवत नव्‍हते.  परंतु काळासमोर कोणाचे चालते, जे व्‍हायचं ते होऊनच राहते.  अखेर आबा पाटलांच्‍या मुलाने पहाटे पहाटे झोपेतच दम तोडला.  वर्षभर खाटल्‍यावरच होता, आज जाईल ................ वरील कथा पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.  http://kathamaala.blogspot.com/2017/05/blog-post_10.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        *आर. व्यंकटरमण*      माजी राष्ट्रपती रामस्वामी वेंकटरमण यांचा जन्म २५ जुलै १९१0 रोजी तामिळनाडूतील पट्टूकोट्यय येथे झाला. ते भारताचे ८ वे राष्ट्रपती होते. १९८७ ते १९९२ पर्यंत ते राष्ट्रपतीपदावर होते. त्यांनी मद्रास विद्यापीठातून स्नातकोत्तर शिक्षण घेतले. तिथेच त्यांनी कायद्याचे शिक्षणही घेतले. मद्रास उच्च न्यायालयात त्यांनी वकिली केली. देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामात त्यांनी भाग घेतला. १९४२ च्या भारत छोडो आंदोलनात ते सहभागी झालेत. १९५७ मध्ये त्यांनी खासदारकीचा राजीनामा देऊन मद्रास सरकारमध्ये मंत्रीपद ग्रहण केले. त्यांनी उद्योग, समाज, परिवहन, अर्थव्यवस्थेत मोठे योगदान दिले. १९६७ मध्ये त्यांना योजना आयोगाचे सदस्य नियुक्त करण्यात आले. १९७७ मध्ये ते लोकसभेत निवडून आले. इंदिरा गांधी सरकारमध्ये त्यांना अर्थमंत्री बनविण्यात आले. १९८४ मध्ये ते देशाचे उपराष्ट्रपती बनले. त्यांनी इंदिरा गांधी शांती पुरस्कार व जवाहरलाल नेहरू पुरस्कारही मिळाला. २५ जुलै १९८७ रोजी देशाचे आठवे राष्ट्रपती म्हणून त्यांनी शपथ घेतली.     *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• सर्व गोष्टींना पुरून उरणारी एकच गोष्ट आहे. ती म्हणजे कष्ट *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••• *१) झाडांच्या किती प्रजाती नाहीशा होण्याच्या वाटेवर आहेत ?*          १५०० *२) चिपको आंदोलन कुठून सुरू झालं ?*           टिहरी गढवाल *३) छत्तीसगढमध्ये विधानसभेच्या किती जागा आहेत ?*       ९० *४) 'द विंटर पॅलेस' कुठे आहे ?*          रशिया *५) आद्य महाकाव्य कशाला म्हणतात ?*              रामायण *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ●  श्रीनिवास सितावर ●  राजेश अर्गे ●  अनिल सोनकांबळे ●  सलीम शेख ●  राम पाटील ढगे ●  सोपानराव डोंगरे ●  मोगलाजी मरकटवाड ●  कु. चैतन्या माणिक रेड्डी *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        *भान* योजना आखली पाहिजे योग्य भान ठेवून अन् ती राबवली पाहिजे सदा बेभान होऊन भान ठेवून आखलेली योजना सफल होईल बेभानपणे काम केल्यास कोण कसा विफल होईल     शरद ठाकर सेलू जि.परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *प्रचंड थकवा आल्यानंतर, दमल्यानंतर हळूहळू आपण आपला मूळ लयीतला श्वास गवसणं किती विलक्षण असतं. स्वत:चा ठाव लागणं, स्वत:चा थांग लागणं, जणू पुनर्जन्मच. म्हणून जगण्याच्या सुलभीकरणात थकवा गमावून बसू नये. थकव्या थकव्यात फरक करावा. प्राणपणानं जीव लावून खरंखुरं थकावं आणि थकव्याच्या गर्भातून स्वत:चं सर्जन होताना अनुभवावं. अर्थात इतकं सगळं घडलं तरी बाहेरच्या जगाला तुम्ही निव्वळ दमलेले, थकलेले दिसता. त्यांना जाणवतं की, तुमचा श्वास फुललाय, छातीचा भाता वरखाली होतोय. तुमच्या आप्तांना तुमची चिंता वाटते. त्यांना वाटतं की, तुम्ही इतकी दगदग करू नये. सकस, पौष्टिक अन्न खावं. आप्तांची चिंता रास्त असते.* *तरीसुद्धा आपली शक्ती पणाला लावून थकणं-दमणं योग्य असतं. थकण्याला घाबरून, न थकण्याचे उपाय शोधणं हा सर्वथा अलाभाचा व्यवहार आहे. त्यानं थकणं घटेल आणि आपले नवनवे जन्मही घटतील. श्वास फुलल्याशिवाय कसं कळणार श्वास घेतो आपण, छातीचा भाता वरखाली झाल्याशिवाय कसं कळणार की, प्राणवायुचं चलनवलन किती सुखाचं असतं. तो फुफ्फुसांना व्यापतो म्हणजे काय होतं हे कसं समजणार ? श्वासोच्छ्वासानं शरीरावर उठणा-या लाटांचं उठणं-विरणं कसं निरखता येणार? शक्तीपाताच्या अग्रावर जाऊन कोसळण्याच्या क्षणी स्वत:चा थांग सापडण्याची धडधड ऐकू येण्याला तुलना नाही. हेच थकव्यातलं सर्जन आणि हाच सर्जनाचा थकवा..!*    ••● ‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई         9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्ञान रतन का जतन कर , माटि का संसार | आय कबीर फिर गया , फीका है संसार || अर्थ : ज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा आहे. ज्याला हा चक्षू प्राप्त झाला त्याला कशाचीही भीती बाळगण्याचं कारण नाही. ज्ञान हे मौलिक रत्न आहे. माणूस अंगावर हिरे रत्न माणकांचे किमती ,हार घालून श्रीमंतीचं प्रदर्शन करीत असतो. या दागिण्यांमुळे मानवी शरीर काही काळासाठी झगमगून उठेलही ! सदा सर्वकाळ हे उपहार अंगावर मिरवणं सांभाळणंही कमी का जिकीरीचं असतं ! ज्ञानी मात्र कुठल्याही कृत्रिम आभुषणाशिवाय खुलून दिसतो. सदा सर्वकाळ त्याच्या जगण्यात आत्मविश्वास असतो. संपत्तीची वाटणी होवू शकते. ज्ञान प्राप्त कर्त्याची ती कायम जहागीर असते. ज्ञान अक्षय आहे. त्याला मरण नसते. कुठल्याही फसवणुकीची भीती नसते. बाकी सर्व गोष्टी मातीतून मिळणार्‍या व मातीशी एकरूप होणार्‍या नश्वर बाबी आहेत. महात्मा कबीर म्हणतात माणसाने जन्म घेतला की त्याचा मृत्यूही ठरलेलाच आहे. जीवनात ज्ञानप्राप्ती केली नाही. अज्ञानातच चाचपडत राहिला. तर 'सारा जन्म व्यर्थ घालविला.' असं होईल. 'ज्ञानाने उंचावते मान । अपमाना कारण अज्ञान । ' जीवनात काही भरीव काम केलं नाही. तर जगणंच बेचव होईल . जीवनातला आत्मिक आनंद व परमानंद गमावल्यासारखं होईल. म्हणून कार्य तत्पर राहिलं पाहिजे. कार्य प्रवणताच ज्ञानाची कायम अनुभूती देत असते.     एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• प्रत्येक व्यक्ती हा आपल्या विशिष्ट ध्येयाकडे जात असताना प्रत्येक पावलागणिक विचार करत असतो. आपले काम यशस्वीपणे पार पडणार का ? जर पार पडत नसेल तर अजून काही करावे लागते का? असे जेव्हा अनेक प्रश्न पडतात तेव्हा आपल्या मनात कुठेतरी आत्मविश्वास कमी आहे असे वाटायला लागते.असा आत्मविश्वास कमी असल्याचा भास कमी होऊ देऊ नका.कारण तुम्हालाच तुमचे काम पूर्ण करायचे आहे तेव्हा तुमचा आत्मविश्वास ढळू देऊ नका किंवा डळमळीत होऊ देऊ नका.मी हे काम पूर्ण करणारच आणि पूर्ण झाल्याशिवाय सर्वार्थ बसणार नाही असा सकारात्मक दृष्टिकोन आपल्या डोळ्यासमोर आणि प्रत्येक पुढे पाऊल टाकताना करा.नक्कीच तुम्हाला त्यात यश मिळेल यात शंकाच नाही. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••          *तल्लीन - Engrossed* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••                *मनशांती* एकदा संत एकनाथांना कोणी दोन प्रश्न विचारले. एक, त्याच्या स्वत:च्या भविष्याबद्दल, आणि दुसरा, एकनाथ स्वभावाने एवढे शांत आणि निर्द्वेषी कसे राहू शकतात याच्याबद्दल . एकनाथ हसले; आणि, 'केंव्हातरी याची उत्तरे देईन', म्हणून त्यांनी सांगीतले. काही दिवसांनी, एकनाथांची त्या गृहस्थाशी भेट झाली. तेंव्हा त्याला बाजूला नेऊन एकनाथ म्हणाले, "तुझ्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर देण्याची वेळ आली आहे, कारण, दुर्दैवाने, तू आता आठ दिवसांच्या आत मरणार आहेस." तो गृहस्थ सुन्न झाला, गोठला ! एकनाथ समोरून निघून गेले, तेंव्हा तो बधीर मनाने परतला.  जगलो तर एकनाथांसारख्या संतांच्या सदिच्छेने जगू, अशी त्याला भावना निर्माण झाली. ती त्याने सार्थ केली. आयुष्यातले आठ दिवस पूर्ण करून नवव्या दिवशी, एकनाथांच्या दर्शनाला तो गेला. एकनाथांना हात जोडून म्हणाला, "तुमच्या कृपेने वाचलो." एकनाथ मान डोलवित म्हणाले, "आता मी तुम्हाला दुस-या प्रश्नाचे उत्तर देणार आहे. गेले आठ दिवस तुम्ही कसे वागलात ? इतरांच्यावर किती रागावलात?" तो गृहस्थ उत्साहाने म्हणाला, "कसला हो रागावतो? अगदी छान, शांत आठ दिवस गेले. शांत म्हणजे, मरणाच्या भितीने बेचैन होतो, पण दुस-यावर रागावण्यासाठी ती बेचैनी नव्हती. घरात बायकोशी कधी भांडलो नाही. मुलांना मारले नाही. वाटायचे की, आता अखेरचे आठ दिवस उरले. बायका-मुले पुन्हा दिसणार नाहीत; त्यांना का दुखवावे? अहो, शेजा-याचे जमिनीवरून चार पिढयांचे भांडण होते. त्याला स्वत:च्या हाताने हवा तो तुकडा तोडून दिला. देणे होते ते देऊन टाकले. ज्यांच्याकडून येणे होते, त्यांच्यापैकी जे गरीब होते, त्यांचे येणे सोडून दिले. काही पैसे गमावले, पण शांती कमावली. खूप खूप शांत असे आठ दिवस त्या दृष्टीने गेले." एकनाथ समोरच्या माणसाच्या पाठीवर हात थोपटून म्हणाले,  "हे तुझ्या दुस-या प्रश्नाचे उत्तर. आठ दिवसांत जग सोडून जायचे आहे, अशा कल्पनेने मी सदाच वावरतो. म्हणून मी शांत वाटतो."  *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00           ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 26/01/2019 वार - शनिवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *भारतीय प्रजासत्ताक दिन* 💥 ठळक घडामोडी :-  १९३० - भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ने २६ जानेवारी हा पूर्ण स्वराज्य दिन असल्याचे जाहीर केले. वसाहतीच्या स्वराज्याऐवजी संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी करून काँग्रेसने २६ जानेवारी हा स्वातंत्र्यदिन मानण्याला सुरुवात केली. १९३३ - स्वातंत्र्यदिन साजरा केल्याने देशात धरपकड. १९४९ - भारताच्या राज्यघटनेचा पहिला मसुदा मंजूर झाला. १९५० - भारत प्रजासत्ताक देश झाला. डॉ. राजेन्द्रप्रसाद राष्ट्रपतिपदी. १९६५ - भारताने हिंदी भाषाला शासकीय भाषा जाहीर केले. २००१ - गुजरातमध्ये भूकंप. २०,००० ठार. 💥 जन्म :- १९५७ - शिवलाल यादव, भारतीय क्रिकेट खेळाडू. १९५७ - अशोक मल्होत्रा, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :-  १८८५ - एडवर्ड डेव्ही, ब्रिटीश संशोधक, भौतिकशास्त्रज्ञ. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *नवी दिल्ली : नानाजी देशमुख आणि डॉ. भुपेन हजारिकांना यांना मरणोत्तर भारतरत्न तर माजी राष्ट्रपती डॉ. प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न पुरस्कार मिळणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *विविधता, लोकशाही आणि विकास हीच भारताची ओळख आणि जगासमोरील आदर्श - राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे प्रतिपादन* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *विवेकानंद वैद्यकीय प्रतिष्ठान व संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. अशोक कुकडे यांना भारत सरकारचा पद्मभूषण पुरस्कार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *राष्ट्रपती पोलीस पदकांची घोषणा, महाराष्ट्रातील एकूण 44 पोलिसांना पुरस्कार जाहीर. 4 पोलिसांना उत्कृष्ट कार्याबद्दल पुरस्कार.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *नवी दिल्ली : अयोध्या खटल्यासाठी नव्या घटनापीठाची स्थापना, 29 जानेवारीला होणार सुनावणी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *रणजी करंडक : विदर्भ संघाचा अंतिम फेरीत प्रवेश, केरळ संघावर एक डाव व 11 धावांनी विजय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *नोवाक जोकोव्हीचने लुकासवर 6-0, 6-2, 6-2 असा सहज विजय मिळवित ऑस्ट्रेलिया ओपनच्या अंतिम फेरीत मारली धडक* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *26 जानेवारी : प्रजासत्ताक दिन* आपल्या देशात प्रामुख्याने दोन दिवस राष्ट्रीय सण म्हणून मोठ्या उत्साहात साजरी केली जातात. एक म्हणजे स्वातंत्र्य दिन आणि दुसरे प्रजासत्ताक दिन होय. प्रजासत्ताक दिनाला गणराज्य दिन म्हणून सुद्धा ओळखले जाते. व्यापारी म्हणून आलेले आणि राज्यकर्ते बनलेल्या इंग्रजांनी भारतावर जवळपास दीडशे वर्षे राज्य केले. ........ वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. https://b.sharechat.com/rcO9CGfOLT आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••          *भारतीय प्रजासत्ताक दिन* प्रत्येक भारतीयांसाठी फार महत्वाचा म्हणजे ‘प्रजासत्ताक दिन’ हा होय. दर वर्षी जानेवारी महिन्याच्या २६ तारखेला भारताचा ‘प्रजासत्ताक दिन’ साजरा केला जतो. आपला भारत १५ ऑगष्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. पण त्याची लोकशाही राज्य घटना २६ जानेवारी १९५० रोजी अमलात आली. म्हणून हा ‘प्रजासत्ताक दिन म्हणून मानला जातो. आमचा भारत हे एक मोठे लोकशाही राज्य आहे म्हणजे हे लोकांचे, लोकांनी, लोकांसाठी चालविलेले राज्य आहे. हा अधिकार भारताच्या घटनेनुसार २६ जानेवारी १९५० साली मिळाला. त्यादिवसापासून प्रजेची सत्ता सुरु झाली. हा दिवस भारतात सर्वत्र साजरा केला जातो. भारताच्या राजधानीत या दिवशी सकाळी ध्वजारोहणानंतर लालकिल्ल्यावरून पंतप्रधानांचे राष्ट्राला उद्देशून भाषण होते. या समारंभाचा मुख्य कार्यक्रम भारताची राजधानी दिल्ली येथे होतो. या कार्यक्रमात भारतातील सर्व घटकराज्ये भाग घेतात. भारताच्या सर्व क्षेत्रातील वैभवाचे दर्शन घडविणारी भली मोठी मिरवणूक काढतात. प्रत्येक राज्यात, जिल्ह्यात, तालुक्यात, शहरांत आणि गावागावातून ‘प्रजासत्ताक दिन’ साजरा होतो. शाळांतून, सरकारी कार्यालयांतून व अन्यत्र ही सकाळी ध्वजवंदन व अन्य मनोरंजनाचे कार्यक्रम होतात. ठिकठिकाणी प्रभातफेरी, भाषणे, प्रदर्शन यांचे आयोजन केले जाते. धाडशी मुलांचा आणि विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजविणाऱ्याचा या दिवशी सरकार तर्फे गौरव केला जातो. अनेक ठिकाणी रात्री रोषनाई केली जाते. प्राथमिक शाळांतून मुलांना खाऊ ही वाटप केला जातो. मुले ही आनंदित होतात.   *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• शील, करुणा, विद्या, मैत्री, प्रज्ञा या पंचतत्वावर प्रत्येक विद्यार्थ्याने आपले चरित्र बनविले पाहिजे. - डॉ. बाबासाहेब आंबेडकर *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *०१) भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता ?*          मोर *०२) भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता ?*           वाघ *०३) भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता ?*          हॉकी *०४) भारताचा राष्ट्रीय फुल कोणता ?*           कमळ ०५) भारताचा राष्ट्रगीत कोणते ?*              जन-गण-मन *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ●  रवींद्र मुपडे ●  सचिन पुरी ●  सुरेश पवार ●  बालाजी जोगे ●  कल्याण वतनदार ●  विशाल सोनालकर ●  जावेद शेख ●  सतिशकुमार साटले ●  ओमसाई कोटुरवार ●  चंद्रकांत लांडगे ●  दिलीप सोनकांबळे ●  निखिल मोटघरे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *भास* वागणं अन् बोलणं विरोधाभास असतो एखादा बोलण्यातच फक्त खास असतो वागणं अन् बोलणं एक असलं पाहिजे बोलण्यापुर्त फक्त नेक नसलं पाहिजे शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जन्माला आल्यापासून आपल्या शरीराचे आणि मनाचे भरणपोषण तर करायचे आणि कोणत्याही गोष्टींचा अतिरेक टाळायचे अतिशय अवघड कार्य आपल्याला करायचे असते. विकारांचे हे मोहमयी विश्व आपल्याला सतत आकर्षित करून घेत असते. अशावेळी डोंबा-याच्या खेळातील दोरावरच्या मुलीच्या हातातील काठीकडे आणि तिच्या हालचालींकडे पाहायचे किती शिताफीने ती आपले संतुलन साधत असते. पण अशावेळी आपण संभ्रमित होतो. कोणताही अचूक निर्णय आपल्याला घेता येत नाही.* *आयुष्याच्या या खेळात हजारदा बाद होण्याच्या शक्यता उद्भभवतात. मग महाभारतातल्या युद्धक्षेत्रावर प्रारंभी गलितगात्र झालेल्या अर्जुनासारखी आपली अवस्था होते. भगवद् गीता इथे उपयोगी पडते. शंकाकुल अर्जनाच्या एकेक प्रश्नाचे उत्तर श्रीकृष्ण देतो आणि त्याला जाणता अर्जुन, आपला प्रिय शिष्यत्तोम बनवतो. भगवद् गीतेच्या प्रारंभी भेटणारा अर्जुन आणि शेवटी भेटणारा ज्ञानी अर्जुन. यात श्रीकृष्णाने स्व-स्वरूपाची जाणीव करून त्याला ज्ञाता अर्जुन केलेले. जणू श्रीकृष्णाचे ते दुसरे रूपच. आपण मात्र श्रीकृष्णाची वाट पाहत स्वयं अध्ययनाने आपला मार्ग शोधायचा..!*    ••●🍁‼ *रामकृष्णहरी* ‼🍁●••              🍁🍁🍁🍁🍁🍁     *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*          📱 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••     जेता मीठा बोलना तेता साधु ना जान पहिले थाह देखि करि, औंदेय देसी आन। सारांश गोड बोलणारा प्रत्येक जण साधू असेलच असे नाही. त्यामुळे गोड बोलणार्‍या सर्वांनाच साधू म्हणून स्वीकारू नये. सुरूवातीला पोपटावानी गोड व खुपच आस्थेवाईकपणे बोलल्यासारखी वाटणारी बरीच माणसे अंतिमतः ढोगीरूपाने सामान्यांच्या भाबडेपणाचा गैरफायदा घेवून त्यांना फसवणारे साधुरूपातले लांडगेच निघाल्याची अनेक उदाहरणे आपल्या आजूबाजूला घडलेली अाहेत. तेव्हा खरा साधू ओळखता आला पाहिजे. संताची महत्ती सांगताना संत तुकाराम महाराज म्हणतात . 'जे का रंजले गांजले । त्यासि म्हणे जो आपुलें ॥ तो चि साधु ओळखावा । देव तेथें चि जाणावा ॥ मृदु सबाह्य नवनीत । तैसे सज्जनांचे चित्त ॥ ज्यासि अपंगिता नाही । त्यासि धरी जो हृदयी ॥ दया करणें जें पुत्रासी । ते चि दासा आणि दासी ॥ तुका म्हणे सांगू किती । त्या चि भगवंताच्या मूर्ति ॥' समर्थांनीही सज्जनाची लक्षणे सांगितलेली आहेत. 'वेष असे बावळा परि अंतरी नाना कळा ।। अगदी अलिकडे खर्‍या संताचं प्रात्यक्षिकच ज्यांनी आपल्या जगण्यातून समाजाला दाखवून दिलंय ते दृष्टे सुधारक संत गाडगेबाबा व तुकडोजी महाराज यांनी सुधारणावादी दृष्टी घेवून सामाजिक सुधारणांचा नवा अध्याय आपल्या कृतीतून समाजापुढे ठेवला आहे. आम्हाला खरे संत ओळखता आले पाहिजेत. अध्यात्माच्या नावाखाली लोकांना कर्मकांडाच्या व थोतांडाच्या नादी लावून साधू रूपाआडून साध्या भोळ्या लोकांचं शोषण करणारी गोचिडे आम्हाला वेचून फेकता आली पाहिजेत...     एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• इतरांना त्रास देऊन जर आपण आपले जीवन चांगल्याप्रकारे जगू म्हटले तर ते अयोग्यच आहे.कारण त्यांनी परिश्रमातून जे काही मिळवलेले असते ते गुण्यागोविंदाने जगण्याचे स्वप्न साकारत असतात.हे त्यांचे बघवत नाही आणि आपल्याने होत नाही म्हणून इतरांना त्रास देऊन त्यांचे सुख हिरावून घेणे हे वामवृत्तीचे लक्षणच म्हणावे. त्यामध्ये आपण सुखी होऊ शकतो का ? आपल्या बाबतीत इतरांनी असे केले तर आपणास कसे वाटेल ? ते आपल्या मनाला समाधान देते का ? ह्या सा-या गोष्टीचा आपण विचार केला तर नक्कीच त्याचे उत्तर सापडेल आणि पुन्हा आपण ती चूक करणार नाही याची नक्कीच जाणीव झाल्याशिवाय राहत नाही.इतरांच्याही सुखस्वप्नात आपणही सहभागी व्हावे हाच आपला माणुसकीचा खरा धर्म आहे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••          *प्रजासत्ताक - Republic* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••          *उपयुक्त जीवन* कोणे एके काळी एक राजा होता. त्याला असे वाटत असे, जगात फक्त मनुष्य हाच उपयुक्त प्राणी आहे. बाकीचे जीव जंतू, किडे यांचा जगाला काही उपयोग नाही. हे सिद्ध करण्यासाठी त्याने आदेश दिला कि, कोणकोणते जीव-जंतू, किडे हे निरुपयोगी आहेत? याची यादी करा आणि मला सांगा. खूप काळ शोध घेतल्यावर त्याच्या माणसांनी असे संशोधन केले कि या जगात जंगली माशी आणि कोळी (जाळे विणणारा कीटक, spider) हे फारशे उपयोगी नाहीत. त्यांचा जगाला काही उपयोग नाही. राजाने तत्काळ आदेश दिला कि या दोन किड्यांना आपल्या राज्यातून नामशेष करावे. याच दरम्यान त्या राज्यावर दुसऱ्या राजाने आक्रमण केले. त्यात या राजाचा पराभव झाला, जीव वाचविण्यासाठी त्याला राज्य सोडून पलायन करावे लागले. राजा पळाला आणि जंगलात गेला. दुसऱ्या राजाचे सैनिक त्याचा पाठलाग करतच होते. त्यांना चुकवून राजा कसातरी एका झाडाखाली झोपला. खूप श्रमामुळे त्याला गाढ निद्रा आली. काही काळाने त्याला नाकावर काही तरी चावत असल्याची जाणीव झाली, पाहतो तर काय एक जंगली माशी त्याच्या नाकाला चावली होती. झोपमोड तर झाली आणि त्याचबरोबर त्याला शत्रूच्या सैनिकांची चाहूल लागली, राजा पुन्हा पळाला आणि उघड्यावर झोपल्यास सापडण्याची भीती वाटल्याने त्याने एका गुहेचा आधार घेतला. राजा गुहेत गेला व काही तासातच गुहेच्या दारावर कोळ्यांनी जाळे विणले, शत्रूचे सैनिक तेथेही आले. त्यांनी त्या गुहेकडे पाहिले व एकमेकात चर्चा केली कि ज्याअर्थी येथे कोळ्याने जाळे विणले आहे त्याअर्थी आतमध्ये कोणीही नसणार, कारण कोळ्याचे जाळे तोडून कोणी आत जावू शकत नाही. गुहेत बसून राजा त्यांचे बोलणे ऐकत होता आणि त्याच वेळी त्याच्या डोक्यात प्रकाश पडला कि जंगली माशी चावली नसती तर जंगलात सैनिकांच्या हाती तो सहज सापडला असता किंवा कोळ्याने जाळे विणले नसते तर गुहेत येवून सैनिकांनी त्याला मारून टाकले असते म्हणजेच या जगात कोणताही जीवजंतू असा नाही कि ज्याचा उपयोग नाही. प्रत्येकाचे कार्य निराळे आहे. *तात्पर्य - जगात प्रत्येक जीवाचा काही न काही उपयोग आहे. कोणीच निरुपयोगी नाही. त्यामुळे कोणी कुणाला किंवा स्वताला कमी समजू नये.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~  

१)नभात शुभ्र चांदण्यानी रांगोळी काढली चंद्राच्या जोडीने गणतंञाचा प्रभातीची तयारी केली. २) हिरव्या हिरव्या सृष्टीला शोभे सूर्य लाल प्रजासत्ताक दिनाची उगवली सकाळ.... 〰〰〰〰〰〰 प्रमिला

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00           ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 25/01/2019 वार - शुक्रवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *राष्ट्रीय मतदार दिवस* 💥 ठळक घडामोडी :-  राज्याचा दर्जा मिळाला व ते भारताचे १८ वे राज्य बनले. १९८२: आचार्य विनोबा भावे यांना भारतरत्‍न प्रदान. १९९१: मोरारजी देसाई यांना भारतरत्‍न प्रदान. २००१: स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर व शहनाईनवाझ बिस्मिल्ला खाँ यांना भारतरत्‍न प्रदान. 💥 जन्म :- १८६३: सेवा सदन च्या संस्थापिका व सामाजिक कार्यकर्त्या रमाबाई रानडे 💥 मृत्यू :-  १६६५: सोनोपंत डबीर १९८०: सोलापूरचे दाते पंचांग कर्ते लक्ष्मणशास्त्री दाते १९९६: रंगभूमी व चित्रपट अभिनेते प्रशांत सुभेदार २००१: भारतीय जनता पक्षाच्या नेत्या विजयाराजे शिंदे २०१५: ज्येष्ठ समीक्षक मधुकर दत्तात्रय तथा म. द. हातकणंगलेकर *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना कॅन्सर झाल्याचे निदान झाल्यानंतर त्यांच्यावर न्यूयॉर्क येथील रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *अतिदूर्गम आणि नक्षलग्रस्त अशी ओळख असलेल्या गोंदिया जिल्हय़ाला नागरी विमान सेवेने जोडण्याची प्रक्रिया लवकरच आकाराला येईल, असा विश्‍वास सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केले* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *लोकसभा, विधानसभा निवडणुका या वेगवेगळ्याच होतील, चंद्रकांत पाटील यांनी केले स्पष्ट* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *आसाममध्ये राजकीय आणि संवदेनशील मुद्दा झालेल्या राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) प्रक्रियेचा अंतिम अहवाल ३१ जुलैपयर्ंत सादर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाने दिले आदेश* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *अनुसूचित जाती आणि जमाती कायद्यातील सुधारित तरतुदींना स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाने दिला नकार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *आगामी निवडणुका या ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या माध्यमांतूनच घेतल्या जातील मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी सांगितले.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *अष्टपैलू हार्दिक पंड्या तसेच लोकेश राहुलला बीसीसीआयच्या प्रशासक समितीकडून निलंबनाची कारवाई तूर्त मागे घेण्यात आली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त* मतदार राजा जागा हो....! इंग्रजांच्या दीडशे वर्षे गुलामगिरीच्या नंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश स्वतंत्र झाले. त्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी देश प्रजासत्ताक झाले. भारतात लोकशाही पद्धतीने राज्यकारभार चालविला जातो. जगात सर्वात यशस्वी लोकशाही....... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/01/blog-post_22.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        *रमाबाई रानडे* रमाबाई रानडे (जानेवारी २५, इ.स. १८६२ : देवराष्ट्रे, सातारा जिल्हा, महाराष्ट्र, भारत – २६ एप्रिल, इ.स. १९२४) या स्त्री हक्क आणि समान अधिकार चळवळीच्या खंद्या पुरस्कर्त्या होत्या. त्यांनी या क्षेत्रात केलेले भरीव कार्य हे भारतीय स्त्रीमुक्ती चळवळीसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरले आहे. स्त्री चळवळ आणि सामाजिक सुधारणा या क्षेत्रातील त्या अग्रणी होत्या. रमाबाई रानडे म्हणजे पूर्वाश्रमीच्या यमुना कुर्लेकर. रमाबाई रानडेंचा जन्म २५ जानेवारी इ.स. १८६२ रोजी साताराजिल्ह्यातील एका लहानशा खेड्यात झाला. रमाबाईंना माहेरी असताना अक्षर ओळख झाली नव्हती. वयाच्या ११व्या वर्षी त्यांचा महादेव गोविंद रानडे यांच्याशी विवाह झाला. स्त्री शिक्षण हे त्या काळात सामाजिकदृष्ट्या वर्ज्य गोष्ट होती. महादेव रानडे हे सामाजिक चळवळ आणि नवविचारी मतवादाचे खंदे पुरस्कर्ते होते. घरच्यांच्या आणि समाजाच्या विरोधाला झुगारून महादेव रानडे यांनी आपल्या पत्‍नीस शिक्षित केले. रमाबाईंनी उत्तम गृहिणी धर्मासोबतच आपल्या पतीच्या सामाजिक कार्यात मदत करून मोलाची भर घातली. स्त्रियांना समान अधिकारांसोबतच शिक्षणाचा अधिकारही समाजाने नाकारला होता. लग्नानंतर रमाबाईंच्या शिक्षणाची सुरुवात झाली. रमाबाईंनी मराठी, हिंदीआणि बंगाली या भाषांमध्ये विशेष प्रावीण्य संपादन केले.   *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर दिसण्याला काहीच अर्थ नाही. कारण सुंदर दिसण्यात अन असण्यात खूप फरक असतो. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) दात मुख्यत: कोणत्या घटकापासून बनलेले असतात ?* डेंटाईन *२) माणसाच्या मेंदूचं वजन साधारणत किती ग्रॅम असतं ?* १३५० ग्रॅम *३) निर्मल ग्राम पुरस्कार कोणाकडून दिला जातो ?* केंद्र सरकार *४) 'नाबार्ड'ची स्थापना कधी झाली ?* १२ जुलै १९८२ *५) बास्केटबॉलचा प्रणेता कोण ?*              जेम्स नाइस्मिथ *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ●  प्रा. वैशाली देशमुख ●  राहुल आवळे ●  नरेश दंडवते ●  कल्पना दत्ता हेलसकर ●  अंबादास कदम ●  इमरान खान ●  ललेश पाटील मंगनाळीकर ●  मुजीब फारुखी ●  राजीव सेवेकर ●  महेबूब पठाण ●  गंगाधर ईबीतवार *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••• *जातीयवाद* जे जातीयवाद करतात तेच वाईट म्हणत आहेत किती हे खोटारडे खोट्या गप्पा हाणत आहेत हे फक्त वरवर तोंड चोपड्या गप्पा हाणतात कोण काय करतो हे सर्व लोक जाणतात शरद ठाकर सेलू जि.परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कवी कुसुमाग्रज, अब्दुल कलाम, आगरकर किंवा तुकोबा यांना काय म्हणावं, ही खरंच वेगळी माणसं होती का? 'वेडी' होती का? आणि हे 'वेड' असलंच तर ते कोणत्या प्रकारचं होतं? ही एवढी बुद्धिमान, कर्तबगार माणसं पण 'अर्थप्राप्ती' ला त्यांच्या जीवनात नगण्य स्थान होतं. 'जोडोनिय धन उत्तम व्यवहारे' हे त्यांना कळलं नसेल का?* *जगरहाटी वेगळी असते. लिओ टाॅलस्टाॅय यांची 'हाऊ मच लँड डज ए मॅन नीड?' ही कथा आहे. पाखोम हा शेतकरी तीचा नायक. त्याला जमीन घेण्याचं वेड आहे. शेवटी त्याची बश्कीर समुदायाच्या लोकांशी ओळख होते. ते पाखोमला अत्यल्प किंमतीला जमीन विकायला तयार होतात. मात्र एक अट असते. पाखोमने सूर्योदयाला धावायला सुरूवात करायची आणि सूर्यास्ताला थांबायचे. त्या दरम्यान जितकी जागा तो चालेल, तेवढी त्याला मिळेल. दुस-या दिवशी पाखोम धावू लागतो. सूर्यास्तापूर्वी तो मूळ जागेवर बश्कीरना भेटायला आणि आपण किती अंतर तुडवले हे सांगायला परततोही. बश्कीरांना तो ते सांगतोही. पण अतिश्रमाने तो कोसळतो.* *वर उल्लेखिलेल्या ध्येय वेड्यांच्या अगदी विरूद्ध टोकाची वृत्ती पाखोमची. माणसाला जन्मत:च काही मूलभूत वृत्ती प्राप्त झालेल्या असतात. काही स्वत:साठी झटतात; काही दुस-यांसाठी. अनंत काणेकरांनी 'दोन मेणबत्त्या' नावाचा सुंदर लघुनिबंध लिहिला आहे. त्यात रात्रभर तेवत राहून इतरांना प्रकाश देणारी एक आणि जिचा काहीच उपयोग न झाल्याने सडून, कुरतडून गेलेली दुसरी अशा मेणबत्त्यांचे सुरेख दर्शन घडवले आहे. शेवटी ज्याने त्याने आपली मेणबत्ती कोणती हे ठरवायचे आहे !*     ••●🔶‼ *रामकृष्णहरी* ‼🔶●••               🔶🔹🔶🔹🔶🔹 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई         9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••     जा पल दरसन साधू का , ता पल की बलिहारी | राम नाम रसना बसे , लीजै जनम सुधारी || अर्थ : ज्या क्षणी खर्‍या साधूचं दर्शन होतं . त्या क्षणाला शतशः आभार व साधूंना साष्टांग दंडवत ! मी त्या साधूंना पूर्ण रूपाने शरण जात असततो. त्यांच्यामुळेच मला सत्संगती मिळते. माझ्याठायी असणार्‍या विकारांचं दमन होतं. सद्विचारांचा मार्ग मिळतो. साधूंच्या सहवास व परीसरूपी हस्तस्पर्शाने जगणंच आलपार बदलून मी मानवतेची वाट चालू लागतो. वाचेतले अभद्र शब्द नाहिसे होवून वाणीही शुभंकर होते. जीवन कृतार्थ होवून साफल्याची समाधान प्राप्ती होते.     एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• या जगात सर्वात जास्त वेगवान आणि गतीमान जर कोण असेल तर या प्रश्नांचे उत्तर अनेकजण वेगवेगळ्या प्रकारे देऊ शकतील.पण माझ्या मते सगळ्यात जास्त वेगवान आणि गतीमान जर कोणी असेल तर फक्त मानवी मनच आहे.पहा ह्या मनाची आतापर्यंत कुणीही वेग आणि गती मोजली नाही.बहिणाबाईंच्याच शब्दांत सांगायचे झाले तर मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोरं,किती हाकला हाकला फिरी येतं पिकांवर......मन पाखरू पाखरू तयाची काय सांगू मात आता व्हतं भूइवर गेलं गेलं आभायात... अशा या मनाची गती एवढी आहे की ती मोजता येणेच अवघड आहे.अशा या मनाला जर का आपण आपल्या जीवनात आपल्या वशमध्ये ठेवले तर तो यशस्वी होतो आणि नाही ठेवले तर जीवन जगण्यात अपयशी ठरतो. अशा सर्वश्रेष्ठ मनाला आपल्या वशमध्ये ठेवण्याचा अधिक प्रयत्न करायला हवा. म्हणजेच आपल्या जीवनाचा खरा अर्थही कळेल आणि सुखही मिळेल. *©व्यंकटेश काटकर, नांदेड.* संवाद...९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••          *प्रवचन - Discourse* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••     स्त्री स्वतःच पूर्णरुप ! ज्या रात्री गौतम बुद्धांनी घर आणि पत्नीला सोडले, त्याच रात्री त्यांना पुत्रप्राप्ती झाली. पुत्रप्राप्तीचा आनंद असतानाही पतीने घर सोडल्याची बातमी जेव्हा तिला समजली तेव्हा ती उध्वस्त झाली. पण तिने कुणाकडे ही तक्रार केली नाही. आणि जग ज्याच्याकडे अभिमानाने पाहिल, अशा पद्धतीने मुलाला वाढविण्याचे तिने ठरवले. सोडून गेलेल्या पतीला विसरून तिने नवे आयुष्य सुरु करावे,असे तिला सर्वांनी सुचवले. दुसरे लग्न करण्याची गळ घातली, तिने त्यास नकार दिला. आणि एका सुंदर सकाळी......... ते परत आले आणि तिच्या समोर उभे राहिले. तिने शांतपणे त्यांना विचारले, "आता तुम्हाला लोक 'बुद्ध 'म्हणून ओळखतात ना?" त्यांनी ही तितक्याच शांत पणे उत्तर दिले, "होय, मी देखील तसे ऐकले आहे. " तिने पुढे विचारले, "त्याचा अर्थ काय?" "जगण्याचा अर्थ कळला आहे, अशी व्यक्ती !"तेम्हणाले. ती किंचितशी हसली आणि मग शांत बसली. काही वेळाने ती म्हणाली, "आपण दोघेही काहीतरी नवे शिकलो आहोत, असे मला वाटते. तुम्ही जे शिकला आहात, त्यातून हे जग सम्रुद्ध होईल पण मी जे शिकले आहे, ते फारसे जगापुढे येणारच नाही." बुद्धांनी तिला विचारले, "तू काय धडा शिकलीस ?" तिचे डोळे चमकले. डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या. "तो धडा म्हणजे धैर्य! स्त्रीला उभी रहाण्यासाठी कुणाचीही गरज लागत नाही. तिचे स्वतःचे व्यक्तिमत्व हे परिपूर्ण असते. ती न डगमगता कोणत्याही परिस्थितीतून खंबीरपणे मार्ग काढू शकते. " यशोधरेतील 'स्त्री'ला मनापासून नमस्कार ! *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00           ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 24/01/2019 वार - गुरूवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :-  १९७२ -गुआममध्ये १९४४पासून लपलेला जपानी सैनिक, शोइची योकोइ सापडला. याकोइला दुसरे महायुद्ध संपलेले माहिती नव्हते. १९८६ - अंतराळयान व्होयेजर २ युरेनसपासून ८१,५०० कि.मी. अंतरावर पोचले. 💥 जन्म :- १९१२ - केनेथ वीक्स, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू. १९१५ - जॉन ट्रिम, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू. १९१६ - व्हिक्टर स्टॉलमायर, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :-  १९६६ - होमी भाभा, भारतीय भौतिकशास्त्रज्ञ. २०११ - पंडित भीमसेन जोशी, हिंदुस्तानी शास्त्रीय गायक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *मुंबई : 6 फेब्रुवारीपासून मराठा आरक्षणाच्या याचिकांवर अंतिम सुनावणीस होणार सुरुवात* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसकडून महाराष्ट्र समित्या जाहीर; मल्लिकार्जुन खर्गे महाराष्ट्र काँग्रेस समन्वय समिती प्रमुख.* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *नवी दिल्ली : पीयुष गोयल यांच्याकडे अर्थमंत्रालयाचा कार्यभार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *येत्या दोन वर्षांत सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जागा आणि इतर जागांसाठी एकूण 4 लाख कर्मचाऱ्यांची रेल्वेत भरती केली जाणार अशी माहिती रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी दिली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसची मोठी खेळी; प्रियांका गांधींवर मोठी जबाबदारी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस संग्रहालयाचं उद्घाटन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा आठ गडी राखून विजय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *कमवा आणि शिका* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.  http://nasayeotikar.blogspot.com/2017/06/blog-post_86.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        *राम गणेश गडकरी*        मराठी साहित्याचे शेक्सपिअर म्हणून ओळखले जाणारे मराठी कवी, नाटककार, आणि विनोदी लेखक राम गणेश गडकरी यांनी गोविंदाग्रज ह्या टोपणनावाने त्यांनी सुमारे १५० कविता लिहिल्या, आणि बाळकराम टोपणनावाने काही विनोदी लेख लिहिले. एकच प्याला, प्रेमसंन्यास, पुण्यप्रभाव, आणि भावबंधन ही चार पूर्ण नाटके लिहून गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली. त्यांचा जन्म २६ मे १८८५ रोजी नवसारी येथील गणदेवी या गावात झाला. पुण्यात महाविद्यालयात शिकत असताना मित्राच्या ओळखीने गडकरी किलरेस्कर नाटक मंडळीत दाखल झाले. रंगभूमी नावाच्या मासिकातून, तसेच शिवराम महादेव परांजपे यांच्या काळ वृत्तपत्रातून व हरिभाऊ आपट्यांच्या करमणूक नियतकालिकातून ते कविता, लेख, नाटके लिहू लागले. त्यांची नाटके हा आजही अनेकांच्या अभ्यासाचा विषय आहे. भावबंधन, एकच प्याला यांसारख्या नाटकांची तर आजही एव्हरग्रीन म्हणून जाहिरात केली जाते. वेड्याचा बाजार आणि राजसंन्यास ही त्यांची नाटके मात्र अपूर्ण राहिली. गडकरी दीघार्युषी झाले असते ती नाटके तर पूर्ण झालीच असती पण आणखी काही नव्या नाटकांचीही त्यात भर पडली असती. मराठीचे शेक्सपियर असा त्यांचा सार्थ उल्लेख होतो तो मुख्यत्वे नाटकांसाठीच. नुसती नाटकेच नाहीत तर त्यांची सुधाकर, सिंधू, तळीराम, घनश्याम, लतिका वगैरे पात्रेही अजरामर झाली आहेत. काळ बदलला, पण गडकर्‍यांची नाटके सदाहरित राहिली याचे श्रेय त्या देवदुर्लभ अशा लेखणीलाच द्यायला हवे.     *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ना कुणाशी स्पर्धा असावी, ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी, फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असावी. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) 'वर्ल्ड वाईड वेब कॉन्सोर्टीअम' या संस्थेला कोणत्या नावाने ओळखतात ?*            डब्ल्यू ३ सी *२) देशात अवयवदानात अग्रेसर असणारं राज्य कोणतं ?*            तामिळनाडू *३) 'कवी बी' हे कोणाचं टोपणनाव आहे ?*            नारायण गुप्ते  *४) न्यायमूर्ती सरकारिया आयोग कशासाठी स्थापन केला होता ?*            केंद्र-राज्य संबंध ५) कोणत्या वेदामध्ये गायत्री मंत्राचा उल्लेख आहे ?*              ऋग्वेद *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ●  राहुल तांबे, मुंबई ●  सोनू राजेंद्र येरमलवाड, येवती ●  प्रशांत उकिरडे, बार्शी ●  रेश्मा कासार, पुणे ●  सिध्दांत मनूरकर, पाथर्डी ●  योगेश फत्तेपुरे, येवती *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••          *माणसं* आपलीच माणसं आपल्याला टाळतात लपून छपून माघारी आश्रूही ढाळतात आश्रूच ढाळायचे तर टाळायचे कशाला टाळण शक्य नसल्यास पाळायचे अशाला   शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••• *स्वत:चं मरण पाहता येत नाही, इतरांच्या मरण्यातूनच हा अनुभव येतो. मृत्यू अटळ आहे, हे कळलेलं असतं. मरण आपल्या जाणिवेत केव्हा प्रवेश करतं ? घरात, शेजारी जेव्हा कुणाचा मृत्यू होतो तेव्हा. प्रत्येकजण या अनुभवातून जातो. मग सुरू होते आपले मरणरंजन. मरणाचे भय वाटत नाही, पण मरावेसे वाटत नाही. इतकी वर्ष जगलो, खूप झाले. तरी अजूनही जगावेसे वाटते. याचे काय उत्तर देणार ? आपले अध्यात्म जन्म-मरणाचा फेरा चुकवायला सांगतं. हा फेरा चुकविणे म्हणजे 'मोक्ष'. हीच 'मुक्ती.'* *निद्रा म्हणजे मरणाची छोटी आवृत्ती असते. आपण निद्रा घेतो म्हणजे नेणिवेच्या प्रांतात सुखनैव संचार करतो. तिथे सुखदु:खाचे भान नसते. निद्रा-जागृतीचा हा खेळ आपण नेहमीच खेळतो. झोपेत स्वप्न पडतात, ती जागेपणी आठवतात. अर्थ इतकाच, की आपण संपूर्णपणे जाणिवेच्या बाहेर गेलेलो नसतो. निद्रा ही विश्रांती आहे म्हणून आपणांस तिचे भय वाटत नाही.* *मरण हीसुद्धा अशीच निद्रा आहे...पण ती अंतिम, चिरनिद्रा आहे. मरण ही वस्तुस्थिती आहे. मरणाची भितीदायक कल्पना दूर सारून मूळस्वरूप न्याहळणे म्हणजे 'मरणसौंदर्य' पाहणे. एखादे ज्ञानेश्वर किंवा तुकारामच हे करू शकतात. मरणातील मरणपण काढायचे तर मरणापाशी समरस झाले पाहिजे.*   ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई         9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••     रात गवई सोय के दिवस गवाया खाय | हीरा जन्म अनमोल था , कौड़ी बदले जाय || अर्थ : महात्मा कबीर मनुष्य जन्माची दुर्लभता पटवून देतात. सर्व प्राणीमात्रांमध्ये मानव जन्म दुर्मिळ असून विश्वाची चिंता वाहण्याचं सामर्थ्य फक्त मानव जन्मातच आहे. मानव प्राणी चिंतनशील व विचारशील आहे. इतरांपेक्षा मानवाला बुद्धी आणि बोलीच वरदान लाभलेलं आहे. त्यामुळे तो जगताची काळजी वाहू शकतो. भल्या वाईटाचा विचार करू शकतो,परंतु हल्ली मानव स्वार्थांध झाला आहे. जग आपल्यामुळं सुंदर होवू शकतं. हा भावही तो जणू विसरूनच गेलाय की काय ? अशी परीस्थिती बनलीय. मानवाने विवेकी अन निरामय जगण्यातच त्याची जीवन सार्थकता आहे. परंतु हे मानवा तू देह विलासी बणून रात्र झोपून आळसात गमावत आहेस. दिवसचे दिवस देह शृंगारात व जिभीचे चोचले पुरवण्यातच तू मश्गूल होवून संपवून टाकत आहेस. अशा प्रकारे तू हिर्‍यासमान असणारा अनमोल असा मनुष्यजन्म उगाच कौडीचेही सार्थक न करता व्यर्थच वाया घालवत आहेस. अशा प्रकारे तुझ्या या जन्माला अर्थच काय राहिला बरे ? असे जगणे तर सर्लच पशू पक्षीही जगत असतात. पुढील संत सुवचन पहा. गेला गेला रे जन्म वाया । फुकाची झिजवली काया । नाही केला रे विचार । नराचा झाला रे खर ।     एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• इतरांना त्रास देऊन जर आपण आपले जीवन चांगल्याप्रकारे जगू म्हटले तर ते अयोग्यच आहे.कारण त्यांनी परिश्रमातून जे काही मिळवलेले असते ते गुण्यागोविंदाने जगण्याचे स्वप्न साकारत असतात.हे त्यांचे बघवत नाही आणि आपल्याने होत नाही म्हणून इतरांना त्रास देऊन त्यांचे सुख हिरावून घेणे हे वामवृत्तीचे लक्षणच म्हणावे. त्यामध्ये आपण सुखी होऊ शकतो का ? आपल्या बाबतीत इतरांनी असे केले तर आपणास कसे वाटेल ? ते आपल्या मनाला समाधान देते का ? ह्या सा-या गोष्टीचा आपण विचार केला तर नक्कीच त्याचे उत्तर सापडेल आणि पुन्हा आपण ती चूक करणार नाही याची नक्कीच जाणीव झाल्याशिवाय राहत नाही.इतरांच्याही सुखस्वप्नात आपणही सहभागी व्हावे हाच आपला माणुसकीचा खरा धर्म आहे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••          *रुबाबदार - Bourbon* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    *जंगलचा राजा !* एकदा एका अस्वलाने झाडामागे लपून सिंहाला जंगलात फिरताना पाहिलं.जंगलचा राजा सिंह जंगलात रुबाबात फिरे. थोडसं चालून मग पुन्हा एकदा मागे वळून बघे.अस्वलाला वाटलं...'आपण ही जंगलचा राजा व्हावं. सिंहासारखं रुबाबात फिरावं.'अस्वलानं ठरवलं... आता आपण रोज सिंहाचा पाठलाग करायचा. तो कसा चालतो? तो कसा बसतो? तो कसा खातो? तो कसा फिरतो? हे नीट पाहायचं. मग आपण ही तसंच करायचं. जंगलचा राजा व्हायचं. तेव्हापासून रोज ते अस्वल, सिंहाच्या पाळतीवर राहिलं. लांबून झाडामागून सिंहाच्या बारीक सारीक गोष्टी पाहू लागलं. सिंहाचं ऐटित चालणं. झाडाखाली त्याचं डौलदार बसणं. सिंहाची भरदार आयाळ. त्याचं राजा सारखं जंगलात फिरणं.पण, चार-पाच दिवसात अस्वल कंटाळलं. अस्वलाला वाटलं...खरं म्हणजे जंगलचा राजा मीच व्हायला पाहिजे. कारण सिंहापेक्षा मी जाडजूड आहे. सिंहाला तर फक्त मानेवरच आयाळ आहे.माझ्यातर सर्व अंगावर सिंहासारखी आयाळ आहे. आणि मी पण झाडाखाली डौलात बसतोच की! जंगलामधे फिरतोच की!पण... मला सिंहासारखं चालता येत नाही म्हणून मी जंगलचा राजा होत नाही! मी सरळ चालतना मागे वळून पाहात नाही म्हणून जंगलचा राजा होत नाही! बस्स!! आता ठरलं तर... आज पासून चालताना मधे-मधे मागे वळून पाहायचं आणि जंगलचा राजा व्हायचं. त्या दिवसापासून ते अस्वल चालताना मागे वळून पाहू लागलं. आपण चालताना मागे वळून पाहातो, हे इतर प्राणी पाहतात की नाही? हे पण पाहू लागलं. 'मी किती जाडजूड आहे पाहा. माझी अंगभर आयाळ पाहा. माझं रुबाबदार चालणं पाहा. आता तरी मला राजा म्हणा..असं भेटेल त्या प्राण्यांना सांगू लागलं.पण... तरीही जंगलातले छोटे मोठे प्राणी त्याला राजा म्हणेनात.अस्वलाच्या पाठी हेच प्राणी ख्वॅ ख्वॅ, फॅक्वॅक फॅक्वॅक करुन हसायचे. शेपट्या हलवून, तोंडं वाकडी करुन त्याला चिडवायचे.अस्वल वैतागलं. भलतंच चिडलं. चराचरा केस खाजवत, कराकरा दात चावू लागलं.अस्वलाने ठरवलं... 'आजच काय तो फैसला करू. जंगलातल्या या चुटूक पुटूक प्राण्यांच्या नादी लागण्यात काही अर्थ नाही. आपला रुबाब, आपली चाल त्या सिंहालाच दाखवू. सिंहाशीच सरळ सरळ पंगा घेऊ. माझी राजेशाही चाल पाहताच सिंह आपोआपच मान खाली घालून जंगलातून निघून जाईल. मग या जंगलचा मीच राजा होईन!! अस्वल जे घरातून उठलं ते तरातरा सिंहासमोरच गेलं. सिंह झाडाखाली सुस्तावला होता. अस्वल सिंहाच्या सरळ समोर जाऊन ऊभं राहिलं. सिंहाने शेपटी उडवत अंगावरच्या माशा हाकलल्या. मान वाकडी करत डाव्या पायाने आयाळ खाजवली.अस्वल सिंहासमोरच सिंहासारखं चाललं. म्हणजे थोडसं चालून त्याने पुन्हा पुन्हा मागे वळून पाहिलं. चालताना सिंहासारखं ऐटित चालण्याचा प्रयत्न केला.आता... 'हा कोण नवीन रुबाबदार राजा?' असं म्हणत सिंह चवताळून उठेल. किंवा... आपली ऐटबाज चाल पाहून सिंह हे जंगल सोडून पळूनच जाईल, असं अस्वलाला वाटलं होतं.पण.... सिंहाने अस्वलाकडे पाहिलं ही नाही! त्याला काही किंमतच दिली नाही. सिंह आपल्याच मस्तीत होता. सिंह आरामात शेपटी उडवत माशा हाकलवत होता. आता मात्र अस्वल भलतं म्हणजे भलतंच चिडलं. त्याच्या अंगावरचे केस ताठ झाले. त्याने उजव्या हाताची नखं झाडावर कराकरा घासली. अस्वलाने ठरवलं... आता आपण सिंहापेक्षा वरचढ व्हायचंच. राजा सिंह सरळ चालताना मधे मधे मागे वळून पाहातो. ठीक आहे. पण आपण आता.. मागे मागे बघतच सरळ चालायचं. आणि जंगलचा राजा व्हायचं. अस्वल मागे मागे पाहात पुढे चालू लागलं. राजा होईन म्हणता म्हणता सरळ खड्यात पडलं! *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00           ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 23/01/2019 वार - बुधवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :-  १९९६ - संगणक भाषा जावाचे सर्वप्रथम प्रकाशन. 💥 जन्म :- १८९७ - भारतीय क्रांतिकारक, नेताजी सुभाषचंद्र बोस १९२६ - मराठी राजकारणी, शिवसेना पक्षाचे संस्थापक व अध्यक्ष बाळासाहेब ठाकरे 💥 मृत्यू :-  ११९९ - याकुब, खलिफा. १५६७ - ज्याजिंग, चिनी सम्राट. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *उत्तराखंडः देहरादून जिल्हाधिकाऱ्यांकडून उद्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर; अतिवृष्टी आणि बर्फवृष्टीच्या इशाऱ्यानंतरचा निर्णय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मुंबई - राष्ट्रवादीकडून पाच विद्यमान खासदारांना लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी, उदयनराजे भोसलेंनेही उमेदवारी, सूत्रांची माहिती* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *नवी मुंबई : नवी मुंबईतील गावठाणांच्या विस्तारासाठी आवश्यक असलेला सिटी सर्व्हे सिडकोमार्फत होणार - मुख्यमंत्री* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *पश्चिमेकडील आणि पूर्वेकडील वाऱ्यांच्या परस्परविरोधी क्रियेमुळे महाराष्ट्रासह मध्य भारतात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *मुंबई : बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी 100 कोटींचा निधी मंजूर, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *ICC पुरस्कार सोहळ्यात 'विराट एके विराट'; एकाच वर्षी जिंकल्या तीनही मानाच्या ट्रॉफी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक वन डे मालिका विजयानंतर भारतीय संघ न्यूझीलंडचा सामना करण्यासाठी ऑकलंडला दाखल* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *कथा - वेळ नाही मला* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_14.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••          *नेताजी सुभाषचंद्र बोस* भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी भारतावर ब्रिटिश राज्य करत होते. सारी जनता ब्रिटिशांपुढे हतबल झाली होती तरी अशा परिस्थितीतही काही लोक धैर्याने ब्रिटिशांना लढा देण्यास उभे राहिले आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. अशा हुतात्म्यांचा नावे भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षराने कोरली गेलेली आहेत. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात आणि भारताला एक स्वतंत्र देश म्हणून आपल्या पायावर उभे रहाण्यात खूप लोकांनी मोलाचा वाटा आहे आणि अशाच काही थोर व्यक्तींपैकी एक म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस. तुम मुझे खून दो मै तुमहें आझादी दुंगा अशी गर्जना करून देशातील नवयुवकाना भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन केले. सुभाषचंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1897  रोजी ओरिसा राज्यातील कटक शहरात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जानकीनाथ आणि आईचे नाव प्रभावती होते. वेणीमाधव हे त्यांचे शिक्षक, त्यांनी सुभाषचंद्र बोस मधली सुप्त देशभक्ती जागृत केली. वयाच्या १५ व्या वर्षी, सुभाषचंद्र बोस गुरूच्या शोधात हिमालयात गेले हाते. गुरूचा हा शोध असफल राहिला. त्यानंतर स्वामी विवेकानंदांचे साहित्य वाचून, सुभाषचंद्र बोस त्यांचे शिष्य बनले. १९२१ साली इंग्लंडला जाऊन, सुभाष भारतीय नागरी सेवेच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. परंतु इंग्रज सरकारची चाकरी करण्यास नकार देऊन त्यांनी राजीनामा दिला व ते मायदेशी परतले. त्यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली. १८ ऑगस्ट १९४५ रोजी विमान अपघातात तैपेई विमानतळाजवळ नेताजींचे निधन झाल्याचे मानण्यात येते.    *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• "मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ." *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) पृथ्वीवर पडणार्‍या गुरुत्वीय दाबाला काय म्हणतात ?* वजन *२) संत गाडगे महाराजांचं मूळ नाव काय ?* डेबुजी झिंगराजी जानोरकर *३) डॉ. आत्माराम पांडुरंग यांनी कोणत्या समाजाची स्थापना केली ?* प्रार्थना समाज *४) पंडिता रमाबाई यांनी 'शारदा सदन' ही संस्था कुठे सुरू केली ?* मुंबई *५) अजमल शहा कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?*              हॉकी *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ●  संतोष बोधनकर ●  भालचंद्र गावडे ●  दिनेश चिंतावाड ●  सुनील बंडेवार ●  शंकर नरवाडे ●  श्याम खंडेलोटे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••• *ताठा* कितीही फुगो बेडूक बैला एवढा होत नसतो तसेच सुंभ जळाला तरी पिळ जात नसतो काहींच्या अंगात रिकामा ताठा उरलेला असतो अंगात बळ असो की नसो जोर भरलेला असतो शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• *अंत्ययात्रा निघालेली होती. एक छोटा मुलगा आईचा हात धरून स्वत:च्या वडिलांना शेवटचा निरोप देण्यासाठी सगळ्यांबरोबर चालत होता. दहा-अकरा वर्षाच्या या लाडक्या मुलासाठी वडिलांचं असं जाणं धक्कादायक होतं. अंत्ययात्रा दफनभूमीत आली. खोदलेल्या खड्ड्यात शवपेटी ठेवण्यात आली. विधीवत प्रत्येकाने मूठभर माती वाहिली. आई सोबत छोट्या मुलानेही मूठभर माती आपल्या आवडत्या वडिलांवर वाहिली. नंतर खड्ड्यात फावड्याने माती टाकणे सुरू झाले, मातीखाली झाकले जाणारे वडिल मुलगा पहात होता. एवढ्यात बुजत चाललेल्या खड्ड्यात एका पिटुकल्या बेडकाने उडी मारली, बेडकावर माती पडली. तो बेडूक बुजला गेला.* *दफनविधी उरकून शांतपणे घराकडे चालणा-या मुलाच्या चेह-यावरची अस्वस्थता आईच्या लक्षात आली. वडिलांच्या आठवणीने मुलाच्या डोक्यात काहूर माजले असावे म्हणून आईने मुलाला बोलते केले. पण मुलाने आईला वेगळाच प्रश्न केला,'दफनाचा खड्डा बुजवताना मातीखाली एक जिवंत बेडूक गाडला गेलाय. त्या बेडकाचं काय झालं असेल गं?' मुलाचा हा प्रश्न ऐकून आई अवाक् झाली. मृत वडिलांचे दु:ख बाजूला ठेवून जिवंत बेडकाचा विचार करणारा हा मुलगा म्हणजे प्रतिभावंत रशियन लेखक 'मॅक्झिम गार्की.' या दृष्टांतामधील अधोरेखीत तथ्य म्हणजे जगताना प्रश्न पडणे, हे मानवाचे भागध्येय आहे. मानवी स्वभाव आहे. किंबहुना, प्रश्न पडणे हे माणसाच्या जिवंतपणाचे लक्षण आहे. प्रश्न पडणारे व प्रश्न विचारणारे समाजाला पुढे नेत असतात.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई         9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    पतिबरता मैली भली , गले कांच को पोत | सब सखियाँ में यो दिपै , ज्यो रवि ससी को ज्योत || अर्थ मानसाचं व्यक्तिमत्व त्याच्या वर्तनावरून समजतं. चारित्र्यामध्ये शील जपणं अत्यंत महत्वपूर्ण माणलं गेलंय. ज्याला चारित्र्याची जोपासना करता आली त्याचं व्यक्तिमत्व आपोआपच खुलून दिसतं. रग्गड श्रीमंतीत जगणारी, सर्व सुख सोयीं उपभोगणारी , उंची वस्त्रे, अलंकार मिरवणारी, रूप गर्विता असेल. ती शिलाचं पावित्र्य जपत नसेल तर ती क्षण भंगूरतेला भुलून भौतिक सुखाच्या आहारी आत्मसन्मान गमावलेली व्याभिचारिणीच होय. तिच्यात आणि कळवातनीत काय फरक आहे ? द्रव्य लालसेपोटी आपलं सर्वस्व कुणापाशीही त्या गहान टाकित असतात. त्या देहाच्या व भ्रष्ट वासनेच्या पूजकंच मानल्या पाहिजेत. अशा शेकडो रुपगर्विता लावण्यवतीं पेक्षा फुटक्या मण्याचीही अपेक्षा न ठेवणारी. पतिव्रतेचा पातिव्रत्य धर्म जपणारी स्त्री दिसायला कुरूप असो की रंगाने काळी. भलेही तिच्या अंगावर दागदागिने नसू देत . तिला नेसायला उंची वस्त्र नसली तरी तिच्या पातिव्रत्यामुळे ती इत्तर स्त्रीयांधूनही आपसुकच उठून दिसते. भौतिक दारिद्र्य असलं तरी तिच्याकडं मनाची श्रीमंती असते . भलेही चारचौघीत मिरवण्या इतपत सौंदर्य तिच्याठायी नसलं तरी तिच्या पातिव्रत्यापुढे व तपश्चर्येसमोर त्या रूपगर्विता व लावण्यवती पार फिक्या पडतात. चंद्र सूर्याला तेज पुरवण्याचं सामर्थ्य पतिव्रतेच्या तपोबलात असतं .     एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जर प्रत्येकाने आपल्या कामाचे नियोजन पूर्वनियोजित आणि विचारपूर्वक केले तर ते काम यशस्वीपणे पार पडेल. अन्यथा कामामध्ये व्यवस्थितपणा राहणार नाही.कामाचा दर्जाही घसरेल,मनाची घालमेल होईल, कामामध्ये लक्ष राहत नसल्यामुळे आणि एकाग्रता नसल्यामुळे स्वत:मध्ये चिडचिडेपणा येऊन आपला राग समोरच्या व्यक्तीवर काढायला लागतो.या सर्व गोष्टी टाळण्यासाठी आपल्या कामात पूर्वनियोजन करायला हवे.तरच आपल्याला मानसिक समाधान मिळेल. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••          *नियोजन - Planning* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *यशाचा घडा* वसिष्ठांची पत्नी अरूंधती ज्ञानी, विद्वान, पतिव्रता होती. एकदा सूर्य अग्नी व वरूणासह वसिष्ठांच्या आश्रमात आले. तेंव्हा अरूंधती पाण्याचा घडा घेऊन नदीवर जायला निघाली होती. तिने तिघांना बसायला आसन दिलं आणि म्हणाली, 'थांबा थोडं, आता नदीवरून एवढा घडा भरून आणते.' त्यावर सूर्यदेव म्हणाले, 'आई नदीवर कशाला? मीच मंत्रसामर्थ्याने देतो घडा भरून' एवढे म्हणून त्यांनी मंत्रसामर्थ्याने घडा भरला, पण तो घडा १/२ रिकामाच राहिला. शेवटी तो पूर्ण भरण्याचे काम अरूंधतीने केले. नंतर ती म्हणाली कोणत्याही यशाचा ३/४ वाटा देवदत्त असला तरी १/४ भाग भरण्यासाठी मानवी प्रयत्नच लागतात. निढळाच्या घामाने उरलेला १/४ घडा भरणे भाग आहे. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00           ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 21/01/2019 वार - सोमवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १९७२ - मणिपूर व मेघालय या राज्यांना स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला. 💥 जन्म :- १८९४ - माधव ज्युलियन, मराठी कवी, कोशकार. १८९८ - मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर, अभिनेते, संगीतकार. १९२४ - प्रा.मधू दंडवते, माजी केंद्रीय मंत्री, ज्येष्ठ समाजवादी नेते. 💥 मृत्यू :- १९४५ - रासबिहारी बोस, स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतिकारक नेते. १९९८ - एस.एन.कोहली, माजी नौदलप्रमुख ॲडमिरल. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *आर्थिकदृष्ट्या दुर्बलांसाठी 10 टक्के आरक्षणाची अधिसूचना जारी, केंद्र सरकारच्या नोकऱ्यांमध्ये 10 टक्के आरक्षण मिळणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मेक्सिको : गॅस पाईपलाईनच्या स्फोटातील मृतांची संख्या 79 वर पोहोचली* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *पालघर : पालघर जिल्ह्यात भूकंपाचा धक्का, भूकंपाची तीव्रता 3.6 रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र आणि गोव्यातील भाजपा कार्यकर्त्यांशी साधला संवाद* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *पंजाबमध्ये आप सर्वच जागा लढवणार - अरविंद केजरीवाल* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *केनियाचा कॉसमस लॅगट मुंबई मॅरेथॉन 2019 चा विजेता* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *पुणे : शालेय विद्यार्थ्यांना क्रीडागुण देण्याबाबत राज्य सरकारने अवलंबिली नवी पद्धत, याबाबत येत्या २ दिवसांत बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही राज्याचे क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी दिली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    *कथा - मुख्यालय* वरील कथा पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://kathamaala.blogspot.com/2017/04/blog-post_22.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••               *संत नामदेव* संत नामदेव हे महाराष्ट्रातील वारकरी संतकवी होते. त्यांचे आडनाव रेळेकर असे होते. ते मराठी भाषेमधील  सर्वाधिक जुन्या काळातील कवींपैकी एक होते. त्यांनी पंजाबी व व्रज भाषांमध्येही काव्ये रचली.  शिखांच्या गुरू ग्रंथसाहिबात त्यांच्या बासष्ट काव्यरचना समाविष्ट आहेत. नामदेव हे ‘मराठी’तील पहिले चरित्रकार व आत्मचरित्रकार आणि ‘कीर्तना’च्या माध्यमातून भागवत धर्म पंजाबपर्यंत नेणारे आद्य प्रचारक होते. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो, पण त्यातून यशाच्या दिशेने जाण्यासाठी स्वतःलाच चालावे लागते. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१)  भारतीय पूर्व किनारपट्टीवरील सागरजलाची क्षारता किती टक्के आहे?* 👉    34% *२)  सयुंक्त राष्ट्रसंघाने जागतिक शैक्षणिक वर्ष कधी घोषित केले होते?* 👉    १९७० *३)   इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाची स्थापना कधी झाली?* 👉      २० सप्टेंबर १९८५              *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● पांडुरंग मामीडवार ●  ऋषीकेश पवार ●  अनिल मुपडे ●  कुलदीप सूर्यवंशी ●  संतोष हेंबाडे ●  साईनाथ जगदमवार ●  वीरभद्र बसापुरे ●  पिराजी कटकमवार *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *एकजूट* आमची संख्या मोठी हे डोक्यात खुळ असते संखेत नाही विचारत एकीचे बळ असते संख्येला नाही एकजुटीला कुठेही किंमत असते एकजुटी पुढे जाण्याची कोणातच हिंमत नसते शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *एका मुलाने काहीतरी खोडी केली म्हणून शेजारच्या बाईने त्याला एक चापट मारली. त्याबरोबर त्या मुलाने मोठे भोकाड पसरले आणि त्या बाईला शिव्या देऊ लागला. ते ऐकून त्याची आई बाहेर आली आणि तिने त्याला चांगलाच झोडपला. परंतु आईच्या हातचा इतका मार खाऊनसुद्धा तो मुलगा फारसा ओरडला नाही किंवा त्याने आईला उलट शिव्यापण दिल्या नाहीत.* *तसेच आपल्यावर येणारी संकटे ही भगवंताने आणली आहेत अशी निष्ठा असेल, तर आपल्याला त्यांचा त्रास होईल, पण त्यांनी आपली शांती बिघडणार नाही. भगवंताचा विसर आपल्याला पडला की आपली शांती बिघडते.* *ज्या दातांनी सिंह मोठ-मोठे प्राणी मारतो त्याच दातांनी तो आपल्या पिल्लांना इजा न करता उचलून एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी नेतो, हे लक्षात असू द्यावे.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• ☀☀☀☀☀☀☀☀☀ संजय नलावडे, चांदीवली, मुंबई         9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• खान खर्च बहु अंतरा, मन मे देखु विचार ऐक खबाबै साधु को, ऐक मिलाबै छार। सारांश माणसाने आपल्याकडील संपत्तीचा खर्च बरबादीसाठी न करता सत्कार्यासाठी करावा हे महात्मा कबीर आपल्या मधूर वचनातून सांगतात. खाणे आणि खाण्यासाठी खर्च करणे यामध्ये खूप मोठं अंतर आहे. हे आपापल्या परीने आपल्या मनाला विचारले व विचारपूर्वक जानले तर लक्षात येईल. माणसाकडे पैसा असेल तर माया उत्पन्न होणे स्वाभाविकच आहे. ती स्वभावानुरूप उत्पन्न होत असते. जसा ज्याच्या स्वभाव तशी ती प्रतिबिंबीत होत असते. जी व्यक्ती सत्संगतीत असते ती अन्नदानाला महत्व देत असते. अन्न हे भुकेल्यांना मिळालं पाहिजे ते वाया जाता कामा नये. पंक्तीला बसणारा गरीब की श्रीमंत याचा विचार तो करीत नाही. मात्र अन्न ग्रहन करणार्‍याच्या मुखात ते जावे, हा त्याचा सद् हेतू असतो. तो इत्तरांना तृप्त करीत असतो, त्याच्या ठायी परोपकारी वृत्ती विलसत असते. दुसर्‍या प्रकारचा माणूस अन्नाबाबतीत इत्तरांचा विचारंच करीत नाही. तो केवळ स्वत:पुरता मर्यादित विचार करतो. उरलेले अन्न सरळ फेकून देतो. वाया घालवतो. व्यसनी माणूस तर आपल्याकडील धन संपत्ती नको त्याच बाबीवर खर्च करून बरबाद करीत असतो. मदिरा व मांसाहारावर अनाठायी खर्च करीत असतो. या अन्नसेवनातून व मदिरापानातून मनात विकार उत्पन्न होतात व त्याला विनाशाकडे नेत असतात. माणसाने आपल्या कडील धनाचा उपयोग सन्मार्गाने सत्कार्यासाठी केला तर स्वत:ला समाधान मिळते व आनंदानुभूती मिळते.      एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• प्रत्येक व्यक्ती हा आपल्या विशिष्ट ध्येयाकडे जात असताना प्रत्येक पावलागणिक विचार करत असतो.आपले काम यशस्वीपणे पार पडणार का ? जर पार पडत नसेल तर अजून काही करावे लागते का? असे जेव्हा अनेक प्रश्न पडतात तेव्हा आपल्या मनात कुठेतरी आत्मविश्वास कमी आहे असे वाटायला लागते.असा आत्मविश्वास कमी असल्याचा भास कमी होऊ देऊ नका.कारण तुम्हालाच तुमचे काम पूर्ण करायचे आहे तेव्हा तुमचा आत्मविश्वास ढळू देऊ नका किंवा डळमळीत होऊ देऊ नका.मी हे काम पूर्ण करणारच आणि पूर्ण झाल्याशिवाय सर्वार्थ बसणार नाही असा सकारात्मक दृष्टिकोन आपल्या डोळ्यासमोर आणि प्रत्येक पुढे पाऊल टाकताना करा.नक्कीच तुम्हाला त्यात यश मिळेल यात शंकाच नाही. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••          *उद्दिष्ट - Objective* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   . *आयुष्यभराची प्रतिष्ठा* महाभारतातील युध्द संपवून कृष्ण घरी परतल्यावर पत्नी रुक्मिणीने त्याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. गुरु द्रोणाचार्य आणि पितामह भीष्म यांना ठार मारणाऱ्याच्या बाजुने तुम्ही कसे काय उभे राहिलात.? कृष्णाने उत्तर दिले. ते आयुष्यभर सत्याच्या मार्गावर चालत होते यात कुठलीच शंका नाही पण त्या दोघांकडून आयुष्यात एक पाप घडले आणि त्यामुळे त्याच्या जीवनभराच्या सत्यमार्गावर पाणी फिरले. *रुक्मिणीने विचारले..* *कोणते पाप.?* कृष्ण म्हणाला. जेव्हा भर दरबारात द्रौपदीचे वस्त्रहरण होत होते तेव्हा ते दोघेही दरबारात उपस्थित होते. दरबारातील जेष्ठ व्यक्ति म्हणून ते हा प्रकार रोखू शकत होते. पण त्यांनी तसे केले नाही. त्यांचा हा एकच गुन्हा त्यांच्या सगळ्या सत्यमार्ग जगणे अर्थहीन करण्यास पुरेसा आहे. *रुक्मिणीने विचारले.* *मग कर्णाचे काय.?* कृष्ण म्हणाला, कर्ण दानशूर होता, यात कुठलीच शंका नाही. त्याच्याकडे कुणी काही मागितले तर त्याच्या तोंडून कधीही 'नाही' असा शब्द बाहेर पडला नाही. पण बलाढ्य सैन्यासमोर यशस्वीपणे लढताना अभिमन्यू जेव्हा जखमी झाला व रणांगणावर मृत्युची वाट पाहत पडला होता, तेव्हा त्याने शेजारी उभ्या असलेल्या कर्णाकडे पाणी मागितले. तिथेच स्वच्छ पाण्याचे डबके होते.पण अभिमन्युला पाणी देऊन आपल्या मित्राला म्हणजेच दुर्योधनाला दुखवायचे नाही, म्हणून कर्णाने मरण पंथाला लागलेल्या वीराला पाणी दिले नाही.नंतर त्याच डबक्यात कर्णाच्या रथाचे चाक अडकून पडले आणि त्याचा शेवट झाला. *तात्पर्य :-* तुमच्या एका अन्यायकारक कृत्याने तुमच्या आयुष्यभराच्या प्रामाणिकपणाची किंमत एका क्षणात शून्य होवून जाते.! *चांगले कर्म, निस्वार्थी सेवा, स्वच्छ प्रतिमा आणि प्रामाणिकपणाच शेवटपर्यंत माणसाला अमर ठेवते यात तिळमात्र शंका नाही.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00           ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 19/01/2019 वार - शनिवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :-  १९५६ - देशातील सर्व विमा कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण करण्याचा राष्ट्रपतींचा वटहुकुम. त्यांचेच एकत्रित स्वरुपात आयुर्विमा महामंडळ झाले. १९६६ - इंदिरा गांधी भारताच्या पंतप्रधानपदी. १९९६ - ज्येष्ठ तबलावादक उस्ताद अल्लारखा खाँ यांची शास्त्रीय संगीतासाठीच्या मध्य प्रदेश सरकारच्या कालिदास सन्मानासाठी निवड. तसेच प्रसिद्ध मल्याळी लेखक एम.टी. वासुदेवन नायर यांची १९९५ च्या ज्ञानपीठ पुरस्कारासाठी निवड २००७ - सरदार सरोवर धरणावरील साडेचौदाशे मेगावॉट क्षमतेचा वीजनिर्मिती प्रकल्प गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाला अर्पण केला. 💥 जन्म :- १८९२ - चिंतामण विनायक जोशी, विनोदी लेखक व पाली भाषेचे अभ्यासक. १९०६ - मास्टर विनायक, मराठी चित्रपट दिग्दर्शक, अभिनेते, निर्माते. 💥 मृत्यू :-  १९०५ - देबेन्द्रनाथ टागोर, भारतीय तत्त्वज्ञानी. १९५१ - अमृतलाल विठ्ठल ठक्कर, महात्मा गांधींचे अनुयायी. १९६० - दादासाहेब तोरणे, मराठी चित्रपटाचे आद्य प्रवर्तक. १९९० - रजनीश, भारतीय तत्त्वज्ञानी. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *लोकसभा निवडणुकांची घोषणा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होऊ शकते, विश्‍वसनीय सूत्रांनी दिली माहिती, विद्यमान लोकसभेची मुदत येत्या ३ जून रोजी संपत आहे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *सवर्णांमधील आर्थिक दुर्बलांना सरकारी नोकर्‍यांमध्ये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये देण्यात येणार्‍या १0 टक्के आरक्षणाला द्रमुक पक्षाने मद्रास हायकोर्टात दिले आव्हान* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या आज होणाऱ्या सभेत सहभागी होण्यासाठी शरद पवार, देवेगौडा आणि अखिलेश यादव कोलकाता येथे दाखल* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *भारतात सर्वात जास्त वापरले जाणारे अँप म्हणून व्हॉट्सअँपने फेसबुकवर मात करीत पटकावला अव्वल क्रमांक* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *यवतमाळ : जिल्ह्यात संपूर्ण दारूबंदी करण्यात यावी, या मागणीसाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘स्वामिनी’ या संघटनेच्या नेतृत्वात हजारो महिलांनी दिली धडक* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *पोचाराम श्रीनिवास रेड्डी यांची तेलंगणा विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *ऑस्ट्रेलियाचे 231 धावांचे माफक लक्ष्य भारताने 7 विकेट राखून सहज पार करीत मिळविला ऐतिहासिक विजय, युजवेंद्र चहल सामनावीर तर महेंद्रसिंग धोनी ठरला मालिकावीर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *बालविवाह कसे रोखता येतील ?* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/05/blog-post.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••          *चिंतामण विनायक जोशी*  *चिंतामण विनायक जोशी यांचा जन्म १९ जानेवारी १८९२ रोजी पुण्यात झाला. हे विनोदी साहित्याकर म्हणून प्रसिद्ध असलेले मराठी लेखक होते. पाली भाषेचा त्यांचा विशेष अभ्यास होता. बडोदे महाविद्यालयात ते पाली विषयाचे प्राध्यापक होते. त्यांचे वडील विनायक रामचंद्र जोशी हे शिक्षक होते तसेच आगरकर यांच्या सुधारक या वृत्तपत्राचे त्यांनी काही काळ संपादनही केले होते. सार्वजनिक काका म्हणून ओळखले जाणारे गणेश वासुदेव जोशी हे देखील जोश्यांच्याच घराण्यातले होते. त्यांचे बहुतांशी लेखन हे विनोदी वाङ्मय असले तरी ते व्यावहारिक जीवनात धीरगंभीर प्रवृत्तीचे गृहस्थ होते. त्यांच्या मुलाचा अकाली मृत्यू झाला होता, त्यामुळे ते दु:खी असत. दूरचित्रवाणीवरची ’चिमणराव-गुंड्याभाऊ’ ही मालिका खूप गाजली. मालिकेत चिमणरावांचे काम दिलीप प्रभावळकरांनी, गुंड्याभाऊचे बाळ कर्वे यांनी केले होते. त्यांचा मृत्यू २१ नोव्हेंबर १९६३ झाला.     *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• विचार न करता शिकणे हे निरुपयोगी असते तर न शिकता विचार करणे हे धोकादायक असते. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) गाईचं दूध कोणत्या जीवनसत्त्वाचा प्रमुख स्रोत आहे ?* 'अ' जीवनसत्त्व *२) 'माझे विद्यापीठ' हा प्रसिद्ध काव्यसंग्रह कोणाचा ?* नारायण सुर्वे *३) जमिनीच्या वरच्या थरात पिके घेतात, झाडे लावतात त्यांना काय म्हणतात ?* जिओपोनिक्स *४) भुतिया ही जमात कुठे आढळते ?* कुमाऊ गढवाल *५) सोशल मीडियाचं व्यसन सोडवण्यासाठी देशातलं पहिलं क्लिनिक कुठे उघडण्यात आले ?*              बेंगळुरू *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ●  अजय कोंडलवाडे ●  अजय परगेवार उमरेकर ●  माधव चपळे ●  शिवशंकर स्वामी *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आनंद* दुस-याच्या आनंदासाठी जो हार मानत असतो तो जिंकण्याच महत्त्व स्वतः जाणत असतो आपल्यासाठी हारायला वाघाच काळीज लागत आपल्यांना आनंद द्यायचा तेच अशा प्रकारे वागत शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन* ‼● ••• *बहिणाबाईंनी सांगितलयं ,'जगण्या मरण्यात काय तर एका श्वासाचं अंतर ! एकच श्वास, फक्त एकच. पण तो एकच श्वास केवढं मोठ अंतर निर्माण करतो. असण्या-नसण्यातलं अंतर, जन्मा-मरणातलं अंतर, होत्या-नव्हत्यातलं अंतर, जागण्या-झोपण्यातलं अंतर, क्षणांत आहे आणि क्षणांत नाही, ही असामान्य गोष्ट श्वासाच्या अंतराने प्रत्येकाला अंतर्मुख करायला लावते.* *माणूस जातो, स्मृती उरतात. त्या चांगल्या उराव्यात असं सा-यांनाच वाटतं पण त्यासाठी काही चांगलं करावं लागतं, हे विसरून कसं चालेल ? मृत्यू अनेक गोष्टी शिकवितो, अर्थातच जिवंत असणारांना ! पण मृत्यूची शिकवण तरी किती वेळ स्मरणात राहते ? मृत्यू नावाचे जळजळीत सत्य उत्तम वागण्याचे, जगण्याचे आत्मभान निर्माण करून देते. माणूस गेल्यावर होणारी कालवाकालव, त्याच्या स्मृतींची असंख्य फुलंच म्हणावी लागतील. या फुलांसाठी तरी श्वासात अंतर पडण्यापूर्वी ' जे जे उत्तम ' आहे तेच करावयास हवे.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई         9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• खान खर्च बहु अंतरा, मन मे देखु विचार ऐक खबाबै साधु को, ऐक मिलाबै छार। सारांश माणसाने आपल्याकडील संपत्तीचा खर्च बरबादीसाठी न करता सत्कार्यासाठी करावा हे महात्मा कबीर आपल्या मधूर वचनातून सांगतात. खाणे आणि खाण्यासाठी खर्च करणे यामध्ये खूप मोठं अंतर आहे. हे आपापल्या परीने आपल्या मनाला विचारले व विचारपूर्वक जानले तर लक्षात येईल. माणसाकडे पैसा असेल तर माया उत्पन्न होणे स्वाभाविकच आहे. ती स्वभावानुरूप उत्पन्न होत असते. जसा ज्याच्या स्वभाव तशी ती प्रतिबिंबीत होत असते. जी व्यक्ती सत्संगतीत असते ती अन्नदानाला महत्व देत असते. अन्न हे भुकेल्यांना मिळालं पाहिजे ते वाया जाता कामा नये. पंक्तीला बसणारा गरीब की श्रीमंत याचा विचार तो करीत नाही. मात्र अन्न ग्रहन करणार्‍याच्या मुखात ते जावे, हा त्याचा सद् हेतू असतो. तो इत्तरांना तृप्त करीत असतो, त्याच्या ठायी परोपकारी वृत्ती विलसत असते. दुसर्‍या प्रकारचा माणूस अन्नाबाबतीत इत्तरांचा विचारंच करीत नाही. तो केवळ स्वत:पुरता मर्यादित विचार करतो. उरलेले अन्न सरळ फेकून देतो. वाया घालवतो. व्यसनी माणूस तर आपल्याकडील धन संपत्ती नको त्याच बाबीवर खर्च करून बरबाद करीत असतो. मदिरा व मांसाहारावर अनाठायी खर्च करीत असतो. या अन्नसेवनातून व मदिरापानातून मनात विकार उत्पन्न होतात व त्याला विनाशाकडे नेत असतात. माणसाने आपल्या कडील धनाचा उपयोग सन्मार्गाने सत्कार्यासाठी केला तर स्वत:ला समाधान मिळते व आनंदानुभूती मिळते.     एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• तुमचे जीवन योग्य दिशेने जाण्यासाठी एका विशिष्ट ध्येयाची किंवा योग्य दिशेची  निवड करा आणि त्यानुसार मार्गक्रमण करा.म्हणजे तुमचे जीवन सुखी, समृद्ध आणि संपन्न होईल.याचा आनंद तुम्हालाही मिळेल आणि इतरांनाही मिळेल.त्यातून चांगले जीवन जगण्यासाठी प्रेरणाही मिळेल.नाही तर सागरातल्या भरकटलेल्या जहाजासारखे होईल. जर एखाद्यावेळी जहाजामध्ये दिशादर्शक होकायंत्र अचानक बंद पडले तर त्या जहाज चालविणा-या माणसाला आपले जहाज कुठे चालले आहे याचा अंदाजच लागत नाही.अर्थात भरकटलेल्या जहाजासारखीच आपल्याही जीवनाची दिशाहीन आणि ध्येयहीन वाटचाल होईल. यासाठी आपल्या जीवनाचे ध्येय निश्चित करा आणि त्यानुसार मार्गक्रमण करा मग तुमच्या जीवनात कधीच अडथळे येणार नाहीत आणि जर का आलेच तर योग्य प्रकारे हाताळण्यात यश मिळेल.‌ *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••          *बक्षीस - Prize* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *एक कवी व श्रीमंत माणूस* एकदा एक कवी श्रीमंत माणसाकडे गेला. त्याने आपल्या सर्व कविता गाऊन दाखविल्या कवीला वाटले आपल्याला काही तरी बक्षिस मिळणार परंतु तो श्रीमंत माणूस अतिशय चिकू होता. तो कवीला खुश करण्यासाठी म्हणाला तुमच्या कविता ऐकून मी फारच खुश झालो आहे. उद्या तुम्ही परत माझ्या घरी या म्हणजे मी हि तुम्हाला खुश करून टाकेन बक्षीस मिळाले नाही म्हणून कवीला वाईट वाटले. परंतु उद्या बक्षीस भेटेल या आशेवर कवी घरी निघून गेला दुसऱ्या दिवशी ठरलेल्या वेळी न चुकता तो त्या श्रीमंत माणसाच्या घरी हजर झाला. परंतु बराच वेळ झाला तरी श्रीमंत त्याला बक्षीस देण्याचे नाव काढीना अखेर कवी घरी जाण्यासाठी उठला तेव्हा श्रीमंत म्हणाला कविराज आपण मला काल कविता ऐकवून खुश केलत तस तुम्ही उद्या माझ्या घरी या मी तुम्हाला खुश करून टाकेन असं म्हणून खुश केल प्रत्यक्षात तुम्ही मला काही दिल नाही. मी हि तुम्हाला काही दिल नाही आपला व्यवहार संपला या आता परत केव्हातरी बिचारा निराश होऊन निघून गेला एकदा संधी साधून घडलेली हकीकत बिरबलाला सांगितली बिरबलाने त्या श्रीमंत माणसाशी ओळख करून घेतली मैत्री वाढवली आणि एक दिवस त्याला आपल्या घरी जेवायला बोलवले कवीलाही त्याने आमंत्रण दिले सर्व मंडळी बिरबलाच्या घरी जमा झाली. तो कंजूष घरी येण्यापूर्वी सर्वांनी जेवून घेतले आणि ते गप्पा मारू लागले थोड्या वेळाने तो श्रीमंत हि घरी आला व त्या गप्पात सामील झाला. परंतु बराच वेळ झाला तरी बिरबल जेवनाच नाव घेईना न राहवून श्रीमंत म्हणाला जेवायचं नाही का ? त्यावर बिरबल म्हणाला आपल्याला फक्त खुश करण्यासाठी म्हणालो उद्या माझ्या घरी जेवायला या कंजूष श्रीमंत जे समजायचे ते समजला आणि काही न बोलता निघून गेला. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~

हस्तरेषा हस्तरेषेवरील भाग्याचा विश्वास नसलेला बरा कष्टाने मोडलेला भाकरीचा तुकडाच खरा 〰〰

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00           ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 18/01/2019 वार - शुक्रवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १९५६ - संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळी मुंबईत ११४ वेळा गोळीबार. १० ठार, २५० जखमी, औद्योगिक विभागात दंगल वाढल्याने २४ तास कर्फ्यू. मुंबईच्या पाच काँग्रेस आमदारांचा राजीनामा 💥 जन्म :- १८४२ - न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, अर्थशास्त्रज्ञ,समाजसुधारक, राजनीतीज्ञ. १८८९ - नाट्यछटाकार दिवाकर लेखक. १८९५ - विठठ्ल दत्तात्रय घाटे प्रसिद्ध लेखक १९७२ - विनोद कांबळी, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- १९८६ - प्राचार्य नारायण गोपाळ तवकर, शिक्षणतज्ज्ञ, इतिहासकार, सामाजिक कार्यकर्ते, लेखक २००३ - हरिवंशराय बच्चन, हिंदी साहित्यिक. १९४७ - कुंदनलाल सैगल, भारतीय अभिनेता, गायक. १९६७ - डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे, कृषितज्ज्ञ व क्रांतिकारक *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ * राज्यात पुन्हा डान्स बार सुरू, सरकार डान्सबारबाबत कायद्यात बदल करणार, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर सरकार नियम बनवणार - अधिकृत सूत्रांची माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *येत्या सोमवारी 21 जून रोजी भारतातून सुपरमून दिसणार; खग्रास चंद्रग्रहणाचीही पर्वणी* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *कोल्हापूर- अंबाबाई मंदिरात भक्तांना आता मोफत चहा, दुपारी 4 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मोफत चहा मिळणार, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचा निर्णय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *महेश एलकुंचवार 99 व्या नाट्य संमेलनाचे उद्धाटक, आज होणार अधिकृत घोषणा.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *नांदेड : शिक्षणाची वारीचा आज शेवटचा दिवस,नांदेड दक्षिणचे आमदार हेमंत पाटील यांची अनेक स्टॉलला भेट* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *पत्रकार हत्या प्रकरणी राम रहीमला जन्मठेपेची शिक्षा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *पंजाबमधील पतियाळा येथे भारतीय क्रीडा प्राधिकरणतर्फे २१ जानेवारी ते १७ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरासाठी औरंगाबादच्या प्रतिभावान जिम्नॅस्ट रिद्धी व सिद्धी हत्तेकर या जुळ्या बहिणींची निवड* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *एका शेतकऱ्याची आत्मकथा* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/12/blog-post_25.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        *महादेव गोविंद रानडे*  महादेव गोविंद रानडे यांचा जन्म १८ जानेवारी १८४२ रोजी झाला. माधवराव रानडे व न्यायमूर्ती रानडे नावाने प्रसिद्ध, हे मराठी समाजसुधारक, धर्मसुधारक, अर्थशास्त्रज्ञ व ब्रिटिश भारतामधील न्यायाधीश होते. इ.स. १८७८ साली पुणे येथे झालेल्या पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचे अध्यक्षही होते. महादेव गोविंद रानडे यांचा जन्म  नाशिकमधील  निफाड या गावी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण कोल्हापुरात झाले. त्यांना शालेय आयुष्यात विनायक जनार्दन कीर्तने यांची मैत्री लाभली आणि पुढे ती वाढली. लहानपणी माधवराव अबोल आणि काहीसे संथ होते. मात्र त्यांची तीव्र स्मरणशक्ती, सामाजिक भान इतरांच्या लक्षात आले होते. १८५६ नंतर ते आणि कीर्तने मुंबईत शिक्षणासाठी आले, एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये दाखल झाले. त्यांचे इंग्रजी-संस्कृत भाषांमधील वाचन वाढले. लॅटिनचाही त्यांनी अभ्यास केला. मॅट्रिकच्या परीक्षेसाठी त्यांनी 'मराठेशाहीचा उदय आणि उत्कर्ष' या विषयावर निबंध लिहिला. पुढच्या काळात त्यांनी त्याच नावाचे पुस्तक लिहिले. अफाट वाचनाने त्यांची बुद्धी प्रगल्भ झाली होती. त्यांचा मृत्यू १६ जानेवारी १९०१ रोजी झाला.       *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• कोणी कौतुक करो वा टीका लाभ तुमचाच, कौतुक प्रेरणा देते, तर टीका सुधारण्याची संधी. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) चांदी या धातूचं रेणूसूत्र काय ?*  एजी *२) विद्युत दिव्यामध्ये कोणत्या धातूची तार वापरण्यात येते ?* टंगस्टन *३) भारतातील व्याघ्र प्रकल्पाचे जनक कोण ?* कैलास सांकला *४) जागतिक व्यापार संघटना केव्हापासून कार्यान्वित झाली ?* १९९५ *५) १९०९ च्या सुधारणा कायद्याचे नाव काय ?*              मोर्ले मिंटो कायदा *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● श्रीमती विजया वाड, साहित्यिक ● प्रभाकर कमटलवार ● रामनाथ खांडरे ● त्र्यंबक आडे ● महेश गोविंदवार *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *राजकारण* आत वेगळ बाहेर वेगळ असलं धोरण आहे साहित्यातही पहा कसलं राजकारण आहे साहित्य क्षेत्रही त्या पासून सुटू शकत नाही राजकारणात कोणताच प्रश्न मिटूत शकत नाही शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *अलीकडे असण्यापेक्षा दिसण्यावर लोक जास्त लक्ष देतात. सुंदर दिसण्याचा मार्ग सुंदर असण्यातून जातो; हे न कळल्यामुळे दर महिन्याचा काॅस्मेटिकवरचा खर्च आतोनात वाढलेली कुटुंबे सर्वांच्या आसपास मोठ्या प्रमाणात आहेत. मेकअपपेक्षा मनाच्या मेकओव्हरची गरज आहे; हे त्यांना कुणीतरी सांगायला हवे. योगासने केल्याने, पालेभाज्या, फळे खाल्ल्याने आणि सकारात्मक दृष्टी ठेवल्याने तुम्ही दिवसभर तजेलदार राहता. एक सात्विक उर्जा कायम आपल्या आत दर क्षणी नव्याने जन्म घेत असते. मग कोणत्याही काॅस्मेटिकची गरज पडत नाही. तारूण्य सतत आपल्या आत उमलते; परिणामी आपण कांतिमान दिसतो.* *तेजस्वीता, तत्परता आणि तन्मयता हे तारूण्याचे तीन 'त' कार असतात. या तीन गोष्टी ज्याच्याकडे आहे. तो 'तरूण'! आज लौकिक अर्थाने तरूण असणा-यांकडे या तीन गोष्टी दिसतात का ? या प्रश्नाचे उत्तर शंभर टक्के, ठामपणे कुणालाही देता येणार नाही; कारण तशी परिस्थिती नाही. पिझ्झा-बर्गर हेच पूर्णान्न मानणा-या पिढीकडून तेजस्वीपणाची अपेक्षा ठेवणे वेडेपणाचे आहे.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई         9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      जेता मीठा बोलना तेता साधु ना जान पहिले थाह देखि करि, औंदेय देसी आन। सारांश गोड बोलणारा प्रत्येक जण साधू असेलच असे नाही. त्यामुळे गोड बोलणार्‍या सर्वांनाच साधू म्हणून स्वीकारू नये. सुरूवातीला पोपटावानी गोड व खुपच आस्थेवाईकपणे बोलल्यासारखी वाटणारी बरीच माणसे अंतिमतः ढोगीरूपाने सामान्यांच्या भाबडेपणाचा गैरफायदा घेवून त्यांना फसवणारे साधुरूपातले लांडगेच निघाल्याची अनेक उदाहरणे आपल्या आजूबाजूला घडलेली अाहेत. तेव्हा खरा साधू ओळखता आला पाहिजे. संताची महत्ती सांगताना संत तुकाराम महाराज म्हणतात . 'जे का रंजले गांजले । त्यासि म्हणे जो आपुलें ॥ तो चि साधु ओळखावा । देव तेथें चि जाणावा ॥ मृदु सबाह्य नवनीत । तैसे सज्जनांचे चित्त ॥ ज्यासि अपंगिता नाही । त्यासि धरी जो हृदयी ॥ दया करणें जें पुत्रासी । ते चि दासा आणि दासी ॥ तुका म्हणे सांगू किती । त्या चि भगवंताच्या मूर्ति ॥' समर्थांनीही सज्जनाची लक्षणे सांगितलेली आहेत. 'वेष असे बावळा परि अंतरी नाना कळा ।। अगदी अलिकडे खर्‍या संताचं प्रात्यक्षिकच ज्यांनी आपल्या जगण्यातून समाजाला दाखवून दिलंय ते दृष्टे सुधारक संत गाडगेबाबा व तुकडोजी महाराज यांनी सुधारणावादी दृष्टी घेवून सामाजिक सुधारणांचा नवा अध्याय आपल्या कृतीतून समाजापुढे ठेवला आहे. आम्हाला खरे संत ओळखता आले पाहिजेत. अध्यात्माच्या नावाखाली लोकांना कर्मकांडाच्या व थोतांडाच्या नादी लावून साधू रूपाआडून साध्या भोळ्या लोकांचं शोषण करणारी गोचिडे आम्हाला वेचून फेकता आली पाहिजेत...     एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपले विचार लोकांपर्यंत पोहचवायचे असतील तर पहिल्यांदा आपल्या मनातला भित्रेपणा नष्ट करुन आत्मविश्वासाने बोलण्यासाठी किंवा विचार व्यक्त करण्यासाठी लोकांसमोर उभे राहिले पाहिजे.दुसरी गोष्ट आपण काय बोलणार आहोत त्यात सत्यता असली पाहिजे कारण लोक सत्य काय आहे आणि किती सत्य आहे ह्याकडे लोकांचे तुमच्याकडे लक्ष असते. आपल्यावर कुणीही आक्षेप घेणार नाही याची दक्षता घ्यायला हवी. आपल्यामध्ये स्पष्टपणा आत्मविश्वास,सकारात्मक परिणामकारकता आणि सत्यता असल्यामुळे भ्यायची गरज नाही.मग आपोआपच आपल्यातला भित्रेपणा नष्ट व्हायला लागतो.भीती वाटते केव्हा आपल्या विचारात सत्यता नसेल,स्पष्टपणा नसेल आणि लोकांना आपण काहीतरी म्हणून फसवत आहोत तर भीती आपल्यामध्ये राज्य करते. मग ती कधीही आपल्याला पुढे जाऊ देत नाही. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *आत्मविश्वास - Self* confidence •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *बुड बुड घागरी* बुड घागरी तो टोपी घालणारा उंदिरमामा आठवतोय? तो गेला एकदा जंगलात. तिथे त्याला एक माकड आणि मांजर भेटले. त्या तिघांची चांगली मैत्री जमली. एक दिवस त्या तिघा मित्रांनी खीर करण्याचे ठरविले. माकड म्हणाले 'मी आणतो साखर'. मांजर म्हणाले 'मी आणतो दूध'. उंदीर म्हणाला 'मी आणतो शेवया'. तिघांनी पातेलेभर खीर केली. मग माकड म्हणाले 'चला आपण आंघोळ करून येऊ आणि मगच खीर खाऊ'. इकडे मांजराच्या तोंडाला सुटले होते पाणी. ते अर्ध्या वाटेतूनच परत आले. त्याने सगळी खीर खाऊन टाकली. थोडया वेळाने माकड व उंदीर आले. पहातात तो काय, खिरीचे पातेले रिकामे ! त्यांनी मांजराला विचारले 'खीर कोणी खाल्ली?' मांजर म्हणाले, 'मला नाही माहीत.' मग माकडाने एक घागर घेतली व सर्वजण नदीवर गेले. माकडाने घागर पाण्यात पालथी घातली. त्यावर उभे राहून माकड म्हणाले ' हुप हुप करी, वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुड घागरी'. पण घागर काही बुडाली नाही. मग उंदीर घागरीवर उभा राहिला व म्हणाला 'चूं चूं करी, वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुड घागरी'. पण घागर काही बुडाली नाही. आता मांजराची पाळी आली. मांजर खरे तर घाबरले होते. कसेबसे ते घागरीवर उभे राहिले व म्हणाले ' म्यांव म्यांव करी, वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुड घागरी'. अन काय आश्चर्य, घागर पाण्यात बुडाली. चोरून खीर खाल्ल्याची मांजराला शिक्षा मिळाली. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🌷🌷जीवन विचार*🌷🌷 〰〰〰〰〰〰〰 *माणसाचे जीवन हे विद्येवाचून निरर्थक आहे.* विद्येसारखी शरीराराला शोभा देणारी ,दुसरी कोणतीच वस्तू नसते. *विद्या* ही माणसाचे आईप्रमाणे रक्षण करते, पित्याप्रमाणे कल्याणाची काळजी घेते,व कौटुंबिक उदासिनता घालवते.आणि आपली कीर्ती दशदिशांमध्ये उजळविते.म्हणूनच विद्या ही जणू आपली कल्पकता आहे असे म्हटले आहे. विद्येविना मनुष्य पशूच असतो. विद्यारूपी धन हे सर्व धनापेक्षा अधिक मौलिक आहे.आपल्या जीवनात ह्या रत्नरूपी विद्येचे महत्त्व किती महत्वपूर्ण आहे हे ह्या श्लोकांवरून अधिक कळून येते. "किं कुलेन विशालेन विद्याहीनस्य देहिनःl अकुलीनोsपि विद्यावान देवैरपि स पूज्यते l l" *विद्याहीन माणसाच्या थोर कुलाचा काय उपयोग? विद्वान मनुष्य कुलीन नसला तरी त्याची देवदेखील पूजा करतात.* आपल्या सुखी जीवनाची पायरी आहे विद्या.ज्ञानमुळं का जगावं आणि कस जगावं हे कळत.आणि असं जगणं ठाऊक असणाऱ्यांना वागणं कस असावं हा प्रश्न ??कधीच पडत नाही.ज्ञानाचा हा प्रकाश सर्वांमध्ये सर्वोतपरी सततचा असावा आणि पसरावा. 〰〰〰〰〰〰〰 🌺🌸🌺🌸🌺🌸🌺 *✍शब्दांकन/संकलन* *श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे* जि.प.प्रा.शा.गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00           ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 17/01/2019 वार - गुरूवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :-  १९५६ - बेळगाव - कारवार आणि बिदर जिल्ह्यांतील मराठी भाग त्या वेळच्या म्हैसूर राज्यास जोडण्याची घोषणा. २००१ - मध्य प्रदेश सरकारचा शास्त्रीय नृत्यासाठीचा कालिदास सन्मान रोहिणी भाटे यांना जाहीर. अपारंपारिक उर्जा क्षेत्रातील राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेचा सूर्या पुरस्कार शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.एम.जी.ताकवले यांना जाहीर. 💥 जन्म :- १८९५ - विठ्ठल दत्तात्रय घाटे, मराठी लेखक, शिक्षणतज्ञ. १९०५ - दत्तात्रय रामचंद्र कापरेकर, भारतीय गणितज्ञ. १९०६ - शकुंतला परांजपे, भारतीय समाजसेविका. 💥 मृत्यू :-  २००० - सुरेश हळदणकर, जुन्या पिढीतील गायक आणि अभिनेते. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *नवी दिल्ली - भाजपाध्यक्ष अमित शाह यांना स्वाइन फ्ल्यू* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मुंबई : शिवस्मारकाच्या कामाला स्थगितीनंतर शिवस्मारक समितीची तातडीची बैठक सुरू* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *नवी दिल्ली - सीबीआयच्या नव्या संचालकांच्या निवडीसाठी 24 जानेवारी रोजी निवड समितीची बैठक* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *मुंबई : आयसीआयसीआय बँकेच्या कार्यकारी संचालकपदी विशाखा मुळे यांच्या पुनर्नियुक्तीस रिझर्व्ह बँकेने दिली मान्यता* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *नांदेड : नांदेडात शिक्षणाची वारी कालपासून प्रारंभ, पालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते झाले उदघाटन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *मुंबई : नऊ दिवसांनी हायकोर्टमध्ये काही मागण्या मान्य झाल्याने बेस्ट कामगाराचा संप मिटला, त्यानंतर रात्री आठ वाजेपर्यंत 893 बेस्टच्या बस रस्त्यावर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *खेलो इंडिया 2019 : बॉक्सिंग स्पर्धेत महाराष्ट्राच्या मितिका गुणेलेने 17 वर्षांखालील मुलींच्या विभागात विजयी वाटचाल कायम ठेवीत उपांत्य फेरी गाठली व पदक निश्चित* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *साहित्यसेवा हेच खरे काम* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/01/blog-post_76.html पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील लिंक वर क्लिक करावे. आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      *सुचित्रा सेन*     बंगाली व हिंदी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री सुचित्रा सेन यांचा जन्म १७ जानेवारी १९३१ रोजी झाला. सौंदर्य आणि उच्च दर्जाचा अभिनयाच्या त्या सम्राज्ञी होत्या. सुचित्रा सेन आणि उत्तम कुमार यांनी अभिनय केलेले अनेक बंगाली चित्रपट लोकप्रिय झाले. सुचित्रा सेन यांचे माहेरचे नाव रमा दासगुप्ता होते. त्यांचे वडील करुणामय दासगुप्ता हे एका शाळेत हेडमास्तर होते. सुचित्रा सेन यांच्या पतीचे नाव दिवानाथ सेन, मुलीचे मुनमुन सेन आहे आणि आईचे नाव इंदिरा होते. मॉडेल रिया सेन या सुचित्रा सेन यांच्या नात आणि मुनमुन सेन यांच्या कन्या आहेत.सुचित्रा सेन यांनी उत्तमकुमार यांच्या सोबत अनेक चित्रपटांत कामे केली आहेत. बंगाली आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील त्यांनी दिलेल्या योगदानासाठी त्यांना १९७२ मध्ये केंद्र सरकारने पद्मश्री सन्मान देऊन गौरव केला. सारे चतुर हा त्यांचा पहिला बंगाली चित्रपट होता. तर देवदास हा त्यांचा हिंदीतील पहिला चित्रपट होता. त्यांनी बंगालीतील देवदास चित्रपटात केलेली पारोची भूमिका विशेष गाजली होती. विशेष म्हणजे आतंरराष्ट्रीय स्तरावरसुद्धा त्यांनी आपल्या अभिनयाने छाप सोडली होती. विदेशात सन्मान झालेल्या त्या पहिल्या अभिनेत्री होती. त्यांची आंधी चित्रपटामधील इंदिरा गांधी यांची भूमिका ऐतिहासिक ठरली होती. मात्र रामकृष्ण मिशनच्या कार्यासाठी त्यांनी चित्रपटातून संन्यास घेतला होता.       *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• शरीराला श्रमाकडे, बुद्धीला मनाकडे आणि हृदयाला भावनेकडे वळविणे म्हणजे शिक्षण. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) भारताची पहिली अणुभट्टी 'अप्सरा' केव्हा सुरू झाली ?*          १९५६ *२) कोणत्या परजीवी जिवाणूमुळे हिवताप होतो ?*         प्लाझमोडियम *३) कोणत्या किरणांचा मारा करून फुलांची आणि फळांची उत्पादकता वाढवतात ?*            गॅमा *४) मानवी रक्ताचा पीएच किती आहे ?*          ७.५ *५) १९३२ मध्ये न्यूट्रॉनचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला ?*              प्रा.चॅडविक *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● जयप्रकाश भैरवाड ● शेखर घुंगरवार ● शरद दळवी ● सचिन पाटील पार्डीकर ● धम्मपाल कांबळे ● यश चेलमेल ● राम घंटे ● मन्मथ भुरे ● माधव गडमवाड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    *हातच सोडून* लोक हातचं सोडून पळत्याच्या मागे लागतात आहे त्यात आनंद मानायचा तर आश्रू ढाळत जगतात        पळत्या मागे लागल्यास आश्रुच ढाळावे लागतील आनंदी क्षणही दु:खाचे म्हणून गिळावे लागतील    शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *पुण्यमयी दे आम्हा अक्षर वरदान* *ज्ञान बनो कर्मशील, कर्म ज्ञानवान।* *ज्ञान आणि कर्म यांचा जीवन व्यवहारात अन्योन्य संबंध कसा असावा आणि त्यानं जीवनविकास कसा घडवावा, हा अर्थपूर्ण संदेश या गीतात आहे. ज्ञान आणि कर्म हे दोन वेगवेगळे मार्ग नाहीत, तर ज्ञानानं कर्मशील व्हावं आणि कर्मानं ज्ञानवान व्हावं, असा संदेश या गीतात आहे. सर्व विद्यामंदिरात ज्ञानसाधना कर्ममार्गानंच झाली पाहिजे, कर्ममार्गावर ज्ञानामृताचे झरे असले पाहिजेत, तरच ज्ञानाचा उपयोग जीवन उभारणीसाठी होईल.* *विज्ञानानं कितीही प्रगती केली, तरी जर विनाशाचा मार्ग दाखवला, तर ते विज्ञान आणि ती विज्ञानाची प्रगती नसलेलीच बरी. विज्ञानानं करूणेच्या चरणाशी नत व्हायला हवं; कारण करूणा हा सामाजिक, सामूहिक उत्थानाचा शांतीमार्ग असतो. या शांतीमार्गाने मानवतेच्या मंदिराची उभारणी करायची असेल, तर ' ज्ञान बनो कर्मशील, कर्म ज्ञानवान ' हा संदेश सर्वांनी अंगी बाणवला पाहिजे.*   ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई         9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• चाकी चली गुपाल की, सब जग पीसा झार रुरा सब्द कबीर का, डारा पात उखार ।      परमात्म्याच्या चलत्या चक्रात जगातील समस्त माणसे भरडून काढली जात आहेत. सर्व माणसे माया मोहात गुरफटून संभ्रमित अवस्थेत जगत आहेत. आसक्तीने त्यांना असे जखडून टाकले आहे की नियतीच्या चक्रात रगडून त्यांचं  पिठ होत आहे जणू . मोठमोठ्या राजा महाराजांचं वैभव देखील पानांच्या बंगल्यासारखं क्षणार्भात भूईसपाट होवून गेलं आहे. काल भिकारी असणारा आज वैभवात असू शकतो. आजचा श्रीमंत उद्या कवडीमोलाचाही ठरू शकतो. हे सारं ज्याच्या त्याच्या कर्मगतीवर किवा नियतीच्या मनावर अवलंबून आहे. बर्‍याचदा  नियती एखाद्याची खूपच कठीण चाचणी घेत असते. खरं तर अंधार्‍या किर्र रात्रीला भयंकर काळोख भिती दाखवित असला तरी पहाटेपर्यंत हिंमतीनं  टिकायला हवं ! मग पुढे लख्खं प्रकाशाचं अधिराज्य असणार आहे.  महात्मा कबीर म्हणतात की, सत्य व वास्तव खूपच बलशाली आहे. ते लबाडी व चमकोगिरीच्या पुढे थोडं  धुसर भासेलही परंतु चिकित्सेचा हलका वाराही असत्याच्या वांझाड ढगांना पळता भुई थोडी करतो आणि सत्याच्या विवेकाच्या प्रकाशापुदं लबाडी पुरती गारद झालेली असते. माया मोहाने निर्माण केलेली भ्रमिष्ट अवस्था नाहिशी होईल. सत्य मार्ग कठीण असल्याने त्याच्यावरुन चालताना थोडी दमछाक जरूर होईल , फसगत करणारा , चकवा देवून रानभुल करून उरी फोडणारा किवा बदनमी करणारा हा मार्ग नक्कीच नाही.     एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• चार भिंतींच्या आत कुढत बसण्यापेक्षा थोडं बाहेर या.हे जग खरंच किती सुंदर आहे.तुम्ही जे पाहिले नाही ते तुम्हाला पहायला मिळेल.जीवनाची अनेक रंग, अनेक ढंग पहायला मिळतील.प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या शैलीत जगताना दिसेल.कुणाच्या चेहरा हसलेला,कुणाचा रुसलेला,कुणाचा चिंतेचा,कुणाचा घामाने माखलेला तर कुणाचा जीवनाला त्रस्त असलेला पहायला मिळेल.जेव्हा तुम्ही त्यांच्याकडे पहाल तेव्हा तुम्हाला तुमच्या जीवन जगण्याची प्रेरणा मिळेल.नक्कीच तुमच्या तुम्हाला पडलेल्या प्रश्नाचे सुंदर उत्तर सुद्धा मिळेल.आपल्या जगण्याच्या शैलीत बदल होईल.तुमचे असलेले दु:ख सहज दूर होण्यास मदत होईल.मनावरचा ताणही कमी होईल.तुमच्या नकारात्मक जीवन जगण्याच्या पद्धतीत बदल होईल.मग तुम्हीच म्हणायला लागाल.एकांतात एकाकी जीवन जगण्यापेक्षा बाहेरच्या जगाकडे पाहून आपणही आनंदाने जीवन जगू शकते.जशी लोकांकडे जगण्याची वेगळी कला आहे तशी आपल्याही अवगत करता येईल.आपणही इतरांसारखे हसून खेळून कधी आनंदाने तर कधी कष्टाने जीवन जगू असे वाटायला लागेल.मग आपल्यालाच वाटायला लागेल की,चार भिंतींच्या आत स्वत:ला कोंडून घेऊन जीवाची घालमेल न करता मुक्तपणे बाहेरच्या जगाकडे पाहत पाहत जीवन चांगले जगता येऊ शकते असा तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही आनंदाने जगण्यासाठी एक आनंदाचा दीर्घ श्वास घेण्यास उत्सुक व्हाल.मग तुमच्या जीवनाचे खरे रहस्य काय आहे हे नक्कीच उलगडेल.माणसे जोडा-मनही जोडा,माणसे जोडा- मैत्री वाढवा आणि माणसे जोडा आयष्य वाढवा असे तुमच्या जीवनाचे सूत्रच बनेल. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद....९४२१८३९५९०. 🌸🍀🌸🍀🌸🍀🌸🍀🌸 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••          *मंडई - Boarding* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••             *भावस्पर्श* सातारा ह्या गावी रहात असलेल्या आपल्या आईला तिच्या वाढदिवसानिमित्त पोस्टाने फुले पाठविण्यासाठी मुंबईत राहणारे शामराव फुले घेण्यास मंडई मध्ये गेले, तिथे गेल्यावर त्यांना एक छोटीशी मुलगी रडत असल्याचे दिसले, त्यावर त्यांनी विचारले, शामराव :- तू का रडत आहेस बाळ ? मुलगी :- मला माझ्या आईसाठी फुल घ्यायचे आहे, फुल १० रुपयाला आहे पण माझ्याकडे ४ च रुपये आहेत ........ शामराव :- एवढेचना चल मी तुला फुल घेऊन देतो ......... ( फुल घेऊन दिल्यावर ) चल मी तुला घरी सोडतो. मुलगी :- हो चालेल मला माझ्या आईजवळ नेऊन पोचवा (त्यावर ती गाडीत बसते ). शामराव :- कुठे सोडू तुला ? मुलगी :- इथून सरळ गेल्यावर उजव्या हाथाला स्वर्ग आहे तिथे.  शामराव :- पण तिथे तर स्मशानभूमी आहे !!! मुलगी :- काका, " जिथे आई तोच स्वर्ग " ......... नव्हे का ??  शामरावांच्या हृदयाला तिच्या शब्दांनी स्पर्श केला ................ पोस्टाने सातार्याला फुले पाठविण्याच्या ऐवजी शामराव स्वताहा सातार्याला आपल्या आईला भेटावयास गेले !!! तात्पर्य :- " हि गोष्ट वाचून तुमच्या हृदयाला जी भावना स्पर्श करते तेच भावस्पर्श आहे. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00           ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 16/01/2019 वार - बुधवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :-  १९९६ - भारतीय कापड गिरणी कामगार नेता दत्ता सामंतची हत्या. १९९८ - ज्येष्ठ उर्दू कवी व लेखक अली सरदार जाफरी यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर. २००८ - टाटा मोटर्सच्या नॅनो या एक लाख रुपये किंमतीच्या 'पीपल्स कार'चे अनावरण 💥 जन्म :- १९४६ - कबीर बेदी, भारतीय अभिनेता. मृत्यू १९०१ - महादेव गोविंद रानडे, भारतीय समाजसुधारक, धर्मसुधारक, न्यायाधीश, अर्थशास्त्रज्ञ १९०५ - दत्तात्रेय रामचंद्र कापरेकर १९५४ - बाबूराव पेंटर, भारतीय चित्रपटनिर्माता, चित्रकार, शिल्पकार. १९८८ - लक्ष्मीकांत झा, भारतीय अर्थशास्त्रज्ञ. २००१ - पंडितराव बोरस्ते, भारतीय क्रीडा संघटक, शिवछत्रपती पुरस्कार विजेता. २००३ - रामविलास जगन्नाथ राठी, भारतीय उद्योगपती 💥 मृत्यू :-  १९३८: बंगाली साहित्यिक शरदचंद्र चटोपाध्याय १९५४: चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, चित्रकार, शिल्पकार आणि कलामहर्षी बाबूराव पेंटर  २०१८ - विधान परिषदेचे माजी सभापती, भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रा.ना.सि.फरांदे *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *नवी दिल्ली - सातव्या वेतन आयोगाचे लाभ शिक्षकांनाही मिळणार, केंद्र सरकारकडून 1 हजार 241 कोटींची तरतूद* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *गडचिरोली : नक्षलविरोधी अभियानातील ३३ पोलीस कर्मचाऱ्यांना वेगवर्धित पदोन्नती, गडचिरोली भेटीत पोलीस महासंचालकांकडून मंजुरी* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *हिंगोलीचे खासदार राजीव सातव यांना संसदेतील अष्टपैलू कामगिरीबद्दल सलग चौथ्यांदा संसदरत्न पुरस्कार जाहीर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *मध्यमवगीर्यांना दिलासा देत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली लवकरच करमुक्त उत्पन्नाची र्मयादा दुपटीने वाढवत पाच लाख करण्याची शक्यता* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *नांदेड : आजपासून नांदेडात शिक्षणाची वारी होणार प्रारंभ, पालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते होणार उदघाटन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *कर्नाटकात राजकीय घडामोडींना वेग, कुमारस्वामी यांच्या सरकारला धक्का, दोन अपक्ष आमदार शंकर, नागेश यांनी काढला काँग्रेसचा पाठिंबा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *अ‍ॅडलेड, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : कर्णधार विराट कोहलीचे शतक आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे अर्धशतक, याच्या जोरावर भारताने दुसऱ्या वन डे सामन्यात मिळविला विजय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *प्रत्येक शाळेला संरक्षणभिंत हवे* प्रत्येक गावात स्थानिक स्वराज्य संस्थेची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असते. पूर्वीच्या शाळा कोणाच्या घरात, ओसरीवर किंवा झाडाखाली भरविली जात असे आणि सर्वाना शिकवायला एकच शिक्षक असायचा. मात्र ...... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/01/blog-post_15.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••          *दत्तात्रेय रामचंद्र कापरेकर* द.रा. कापरेकर हे देवळाली (नाशिक) मध्ये राहणारे एक जागतिक कीर्तीचे गणितज्ञ होते. त्यांच्या महाविद्यालयीन काळात त्यांना गणितातले रँग्लर परांजपे पारितोषिक मिळाले होते. ते नाशिकजवळच्या देवळाली येथे शिक्षक होते आणि १९६२ मध्ये निवृत्त झाले. त्यांची राहणी अत्यंत साधी होती. धोतर, कोट, टोपी हा त्यांचा नित्याचा वेश होता. नोकरीच्या काळात आणि निवृत्तीनंतरही कापरेकरांचा गणितातील आकड्यांशी खेळ चालूच होता. नोकरीच्या काळात त्यांची यासाठी हेटाळणी होत असे. महाविद्यालयीन स्तरावर अनेक संशोधनपर लेख प्रसिद्ध होतात, पण शालेय स्तरावर आणि शाळा मास्तरांकडून असे लेख लिहिले जाणे अतिशय अपवादात्मक असते. दत्तात्रेरय रामचंद्र कापरेकर यांचे लेख हे त्यांतले एक होते. १९७५ साली अमेरिकेतील प्रा. मार्टिन गार्डिनर यांनी कापरेकरांच्या संशोधनाची दखल घेतली आणि त्यांच्या संशोधनावर आधारित Mathematical Games या सदराखाली Scientific American या मासिकात लेख लिहिला, आणि द.रा. कापरेकर भारतातच नाही तर जगभरात प्रसिद्ध झाले    *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• विश्वास हा खोडरबर सारखा असतो तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) मानवी डोक्याच्या कवटीत असणार्‍या हाडांची संख्या किती ?*      आठ *२) नॉनस्टीकच्या भांड्यावर कशाचा थर असतो ?*        टेफ्लॉन३ *३) शरीराचा तोल सांभाळण्याचे काम कोण करतं ?*         लहान मेंदू *४) कोणत्या अवयवाची त्वचा सर्वात पातळ असते ?*              डोळा *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● साईनाथ सायबलू, सहशिक्षक, धर्माबाद ● सचिन होरे, धर्माबाद ● किरण शिंदे ● ज्ञानेश्वर मोकमवार ● भीमसंदेश पतंगे ● रमेश सरोदे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *पत्रकार* सर्व सामान्याचे प्रश्न शासनापुढे मांडत असतो जनतेच्या हक्कासाठी तत्त्वाने भांडत असतो सामान्याचे प्रश्न सोडवते तुमच्या हातची लेखणी न्यायासाठी लढून ती अधिकच होते देखणी     शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••• *स्वत:वर विश्वास असणे फार महत्वाचे आहे. तो नसल्यास न्यूनगंड निर्माण होतो. मानवी जीवन सुंदर आहे, यावर विश्वास ठेवल्यास मनात जगण्यासाठी नवी उमेद निर्माण होते. आशावदी दृष्टीकोन हा विश्वासाचाच अविभाज्य भाग आहे. आशावाद मानवी मनाला प्रेरणा देऊन कर्तव्य पार पाडण्यासाठी लागणारी ऊर्जा पुरवतो. विश्वासाचा संबंध व्यक्तीच्या ह्रदयाशी, मनाशी असतो. तो दृश्य स्वरूपात नसून अदृश्य स्वरूपाचा असतो. तो समजून घ्यायचा असेल, तर आपल्या आत डोकवावे लागेल.* *याच विश्वासाची गळचेपी होत असल्याचे आज पावलोपावली जाणवते. मुलांचा आईवडिलांवरील, आई-वडिलांचा मुलांवरील, पती-पत्नीच्या नात्यातील,  विद्यार्थ्यांचा गुरूजनांवरील, रूग्णांचा डाॅक्टरांवरील, मित्र-मैत्रिणींचा एकमेकावरील, जनतेचा राजकारण्यांवरील विश्वास कमी होत चाललाय...त्याला तडा जात असल्याचे आपल्याला दिसते. याचे कारण स्वार्थधुंदीत आपण माणूसपण विसरू लागलो. औपचारिकता आणि आधुनिकतेच्या नावाखाली नावाखालीही विश्वासाला नख लावणे सुरू झाले. मॅथ्यू अरनाॅल्ड हा कवी मानवी जीवनातील विश्वासाची व्याप्ती व खोली स्पष्ट करण्यासाठी समुद्राची प्रतिमा वापरतो. भूतकाळात विश्वासाची व्याप्ती समुद्राएवढी होती. प्रत्येकाच्या ह्रदयात विश्वासाला महत्वाचे स्थान होते. अशीच परिस्थिती चालत राहिली, तर भविष्यात विश्वासाची अवस्था केविलवाणी होईल. मानवी समाजात विश्वासाची जागा संशय घेईल व सर्वत्र सावळागोंधळ निर्माण होईल. चला तर..अंतस्थ विचार बदलून विश्वासाला पात्र बनू या..*       ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••   🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई         9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••     कबीराचे बोल ———————— पर नारी पैनी छुरी, मति कौई करो प्रसंग रावन के दश शीश गये, पर नारी के संग। सारांश       पर नारी तीक्ष्ण धार असणार्‍या सुरीसारखी असते. तिच्या सोबत संगती करता कामा नये. तिच्या सोबत संग करणे तर  दुरच राहिले. परनारीचा मनात निर्माण विचारही माणसाची शांती व समाधान हिरावून घेतो. आमचं लोकबोलीचं धन म्हणजे संस्काराचा ठेवाच आहे. जात्यावरच्या ओव्या मधून सुद्धा संस्काराचं दर्शन घडतं. घरची अस्तुरी जसा हळदीचा गाभा पराया नारीसाठी रहातो वळचणीला उभा ।       पोथी पुराणांमधून परनारीचा मोह बाळगणार्‍यांची काय अवस्था होते, याचे दाखले  वाचायला मिळतात. महारती लंकाधीश राजा रावनाने मंदोदरी सारखी पतिव्रता पत्नी असताना परनारीचा मोह केला. सीता पळवून नेली गेली. सीतेचा शोध घेताना क्रोधीत हनुमानाकडून लंका दहन केली जाणे, राजा रावणाचीच दाडी जाळली जाणे. यातूनही सावध न होण्यामुळे  रामायण घडले . क्षुल्लक कुंभकर्णासारखा बलशाली भाऊ, इंद्रजितासारखा कुशल मुलगा मारल्या गेला. मोहापायी राज्य बुडालं सेना मारल्या गेली. रावणाची दहाही शीरं उडवल्या गेली. परनारीच्या नादात अख्ख्पा साम्राज्याचा विनाश झाला.  तिथं सामान्य माणसाचं काय होईल ? याची कल्पनाच न केलेली बरी.     एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       इतरांना त्रास देऊन जर आपण आपले जीवन चांगल्याप्रकारे जगू म्हटले तर ते अयोग्यच आहे.कारण त्यांनी परिश्रमातून जे काही मिळवलेले असते ते गुण्यागोविंदाने जगण्याचे स्वप्न साकारत असतात.हे त्यांचे बघवत नाही आणि आपल्याने होत नाही म्हणून इतरांना त्रास देऊन त्यांचे सुख हिरावून घेणे हे वामवृत्तीचे लक्षणच म्हणावे. त्यामध्ये आपण सुखी होऊ शकतो का ? आपल्या बाबतीत इतरांनी असे केले तर आपणास कसे वाटेल ? ते आपल्या मनाला समाधान देते का ? ह्या सा-या गोष्टीचा आपण विचार केला तर नक्कीच त्याचे उत्तर सापडेल आणि पुन्हा आपण ती चूक करणार नाही याची नक्कीच जाणीव झाल्याशिवाय राहत नाही. इतरांच्याही सुखस्वप्नात आपणही सहभागी व्हावे हाच आपला माणुसकीचा खरा धर्म आहे. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०. 🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••          *समाधान - Solution* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        *ज्ञानवर्धक बोधकथा* गौतम बुद्धा सोबत एक लहान मुलगा बसलेला असतांना त्यावेळेस तिथून एका चोराला काही शिपाई पकडून नेत होते, त्या मुलाने गौतम बुद्धाना विचारले "तो कोण आहे आणि त्याच्या भोवती शिपाई का आहेत?" बुद्ध म्हणाले"तो चोर आहे, त्याला पकडले आहे, त्याला आता शिक्षा होईल व तो तुरुंगात जाईल". थोड्या वेळा नंतर त्या नगरीचा राजा येत होता आणि त्याच्या भोवती पण शिपाई होते, त्यावेळेस मुलगा लगेच गौतम बुद्धानां म्हणाला " तो बघा आजून एक चोर आला", गौतम बुद्ध म्हणाले "तो राजा आहे."   मुलगा गौतम बुद्धाना म्हणाला "काय फरक आहे? राजा भोवती पण शिपाई आहे आणि चोरा भोवती पण शिपाई आहे."     गौतम बुद्ध म्हणाले "जमीन आसमानचा फरक आहे, त्या चोराच्या भोवती जे शिपाई होते त्यांच्या ताब्यात तो चोर होता, त्याला काहीही करायचे स्वतंत्र नाही, जिकडे नेतील तिकडे जायचं, जिथे ठेवतील तिथे राहायचे, देतील ते खायचं, त्याला स्वतच्या मनाच काहीच करता येत नाही." राजाच्या भोवती जे शिपाई आहेत ते राजाच्या ताब्यात आहेत, राजा सांगेन तिकडे नेतील, जे सांगणार ते करणार, राजा बोलला कि तुम्ही जा मला एकटे राहू देत, राजा मुक्त आहे." "आपले मन, आपल्या भावना आणि आपले विकार हे शिपाई आहेत', आपण त्यांच्या ताब्यात असलो तर आपण 'चोर' आहोत,    ते आपल्या ताब्यात असले तर आपण 'राजा' आहोत. निवड तुमची आहे." *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00           ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 15/01/2019 वार - मंगळवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मकरसंक्रांत, उत्तरायण भारत* 💥 ठळक घडामोडी :-  १९१९ - राजर्षी शाहू महाराजांनी आदेश काढून स्पृश्य-अस्पृश्य विद्यार्थ्यांना एकाच शाळेत शिक्षण देण्याची व्यवस्था केली. १९४९ - भारताच्या स्वातंत्र्यानंतर फिल्डमार्शल के.एम. करिअप्पा यांनी पहिले लष्करप्रमुख म्हणून सूत्रे स्विकारली. हा दिवस लष्करदिन म्हणून ओळखला जातो. १९९९ - ज्येष्ठ गायिका ज्योत्स्ना भोळे यांना राज्य सरकारच्या वतीने गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान. 💥 जन्म :- १९५६ - उत्तरप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती 💥 मृत्यू :-  १९७१ - दीनानाथ दलाल महाराष्ट्रातील अत्यंत लोकप्रिय व प्रतिभावान चित्रकार यांचे मुंबईत निधन. १९९८ - गुलझारीलाल नंदा, भारतीय पंतप्रधान, स्वातंत्र्यसैनिक व गांधीवादी कार्यकर्ते. २००२ - विठाबाई भाऊ नारायणगावकर, राष्ट्रपतीपदक विजेत्या तमाशा कलावंत. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *नागपूर : हक्क असलेल्या स्त्री साहित्यिक कायम संमेलनाच्या अध्यक्ष पदापासून वंचित राहिल्या, मराठी साहित्य संमेलन अध्यक्ष डॉ. अरुण ढेरे यांची खंत* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *दिल्ली : पंतप्रधान नरेंद मोदी आज ओरीसा दौऱ्यावर असून त्यांच्या हस्ते विविध योजनाचें उद्धाटन होणार आहे* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *ठाणे : आजपासून जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना दुचाकी चालविताना हेल्मेट घालणे सक्तीचे, हेल्मेट न घातल्यास कायद्यातील तरतुदीप्रमाणे शिक्षा होणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *मराठा आरक्षणाला स्थगिती नाही; राज्य सरकारला हायकोर्टाकडून मुदतवाढ* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणाऱ्या कलम 370 बद्दलच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयानं दर्शवली संमती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *विधान परिषदेचे माजी सभापती आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते शिवाजीराव देशमुख यांचं निधन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांना बदली खेळाडू म्हणून संघात विजय शंकर आणि शुबमन गिल यांना संधी दिली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    *हेडफोनपासून दूर रहा* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2016/12/blog-post.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *खाशाबा जाधव* खाशाबा जाधव हे देशातील पहिले ऑलिम्पिक पदक विजेते खेळाडू होते.१९५२ सालातल्या ऑलिम्पिकमध्ये त्यांनी जिंकलेले फ्रीस्टाइल कुस्तीतले कांस्यपदक हे भारतासाठी स्वातंत्र्योत्तर काळातले पहिले वैयक्तिक पदक होते. सातारा जिल्हय़ामधील कराड तालुक्यातील गोळेश्‍वर या खेडेगावात १५ जानेवारी १९२६ रोजी खाशाबा जाधव यांचा जन्म झाला. ख्यातनाम पैलवान दादासाहेब जाधव यांचे कनिष्ठ पुत्र होते. खाशाबा यांनी वयाच्या आठव्या वर्षी त्या भागातील प्रसिद्ध चॅम्पियनला २ मिनिटात लोळवले होते. खाशाबा यांनी १९४0-१९४७ दरम्यान कराड येथील टिळक हायस्कूलमधून आपले शिक्षण पूर्ण केले होते. महाविद्यालयीन शिक्षणानंतर पुढे त्यांनी त्यांचे लक्ष कुस्तिकडेच वळविले आणि त्या खेळातच मन रमविले. १९४८ मध्ये जेव्हा लंडन ऑलिम्पिकसाठी फ्लायवेट गटासाठी यांची निवड झाली तेव्हा ते ६ व्या क्रमांकावर होते. या क्रमांकापर्यंत पोहोचणारे भारतातील ते एकमेव खेळाडू होते. पुढे १९५२ साली त्यांना कास्य पदक मिळाले. पण तेच वैयक्तिक पातळीवरील स्वतंत्र भारत देशाला मिळालेले पहिले ऑलिंम्पिक पदक ठरले. १९५५ मध्ये ते सब इंस्पेक्टर या हुद्दय़ावर महाराष्ट्र पोलिस दलात भरती झाले. त्याचवेळी ते राष्ट्रीय स्तरावर स्पोर्ट्स मार्गदर्शक म्हणून काम करू लागले. हे करत असतानाच त्यांनी पोलिस खात्यात २७ वर्षे नोकरी केली आणि असिस्टंट पोलिस कमिशनर या हुद्दय़ावरून नवृत्त झाले. परंतु, पेन्शनसाठी त्यांना खूप झगडावे लागले. बरीच वर्षे स्पोर्ट्स फेडरेशनने देखील त्यांचेकडे दुर्लक्ष केले त्यामुळे त्यांचे जीवन गरिबीतच गेले. अखेर १९८४ साली त्यांचे एका रस्ते अपघातात दुर्दैवी निधन झाले.    *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• पैशाने श्रीमंत असणारी माणसं पावला-पावलावर भेटतात पन मनाने श्रीमंत असलेली माणसं भेटण्यासाठी पावले झिजवावी लागतात अशाच सोन्यासारख्या माणसांना मकर संक्रातीच्या हादीँक शुभेच्छा... *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) कोणत्या जिवाणुमुळे दुधाचे दही होते ?* लॅक्टोबॅसिलिस *२) सिस्मोग्राफने काय मोजले जाते ?* भूकंपाची तीव्रता *३) सांची स्तूप कोणत्या राज्यात आहे ?* मध्य प्रदेश *४) महानदीचे उगमस्थान कुठे आहे ?* रायपूर *५) 'इच वन टीच वन' हा कार्यक्रम कशाशी संबंधित आहे ?*              प्रौढ शिक्षण *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ●  साईनाथ अन्नमवार, नांदेड ●  नामदेव हिंगणे ●  सलीम शेख ●  बौद्धप्रिय धडेकर ●  व्ही. एम. पाटील ●  बालाजी ईबीतदार ●  एकनाथ पावडे ●  दत्ता बेलूरवाड ●  कोमल ए. रोटे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• "तिळगुळ " हेवेदावे विसरू सारे चला तिळगुळ देऊ अनोखा हा आनंद आपण सारे घेऊ दिल्या घेतल्याने आनंद बघाच कसा वाढतो चिमूटभर तिळगुळ माणूस माणूस जोडतो मकरसंक्रातीच्या शुभेच्छा शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन* ‼ ● ••• *दुस-याचं सुख पाहून सुखी होणारी आणि दुस-याचं दु:खं पाहून दु:खी होणारी माणसं सतत आनंदी वृत्तीनं जगतात. इतरांच्या सुखात आपलं सुख पाहण्यासाठी आपल्याजवळ मोठं अंत:करण असावं लागतं. माणसाच्या ठायीच्या ज्ञानापेक्षा कल्पकतेला आधिक महत्व असतं. कल्पनेला वास्तवतेचे पंख लाभले की, किती सुंदर काम होते याचं उत्तम उदाहरण आहे ताजमहाल! शहाजहानच्या मनात ताजमहालाची कल्पना आली आणि गड्यागवंड्यांच्या बोटांतून सफल साकारली. कलाकारांची पाच बोटं म्हणजे सुंदर महाकाव्यच असतं. कारण त्यातूनच अवीट सौंदर्याची निर्मिती होते. माणसाच्या जीवनातील खरी सौंदर्यप्रसाधनं कोणती ? शांतवृत्ती, उदार स्वभाव, सोशिकता, नम्रता, आचाराची शुद्धता आणि मानवतेचे प्रेम हीच खरी आपल्या आत्म्याची सौंदर्यप्रसाधनं.* *मानवी जीवन महान असल्यानं आपण आपल्या इच्छा-आकांक्षाही महान ठेवल्या पाहिजेत. यासाठी प्राप्त परिस्थितीचे दास होण्यापेक्षा स्वामी होण्यात आनंद असतो. एखादा माणूस यशस्वी होतो म्हणजे तरी काय ? तो आपला दृढ संकल्प सिद्धिप्रत घेऊन जातो. एकदा सिकंदरला एकानं विचारलं की, 'तुम्ही हे जग कसं जिंकलं?' त्यावर सिकंदर म्हणाला, 'अनिश्चित नीतीचा त्याग केल्यामुळे मी विजयी झालो.' आत्मनियंत्रण आणि आत्मसंयम हे तर यशप्राप्तीचे दोन धवल स्तंभच आहेत.* •• ● ‼ *रामकृष्णहरी* ‼ ● •• 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई         9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• धरती करते एक पग, करते समुद्रा फाल हातों पर्वत तौलते, ते भी खाये काल । सारांश जगी ज्याचा जन्म झाला .त्याला मृत्यूने गिळंकृत केले आहे. हे महात्मा कबीर आपल्या उपदेशपर अमृतवचनातून माया मोहाच्या बंधनात गुरफटलेल्या मानव प्राण्यास मृत्यूची जाणीव करून देताना सांगतात. वामनाची महत्ती सांगताना पुराण कर्त्यानं लिहून ठेवलंय की वामनानं एकाच पावलात संपूर्ण पृथ्वी व्यापून टाकली. हनुमानाने जन्मत:च एका उड्डाणात सूर्याला जेरीला आणले. सृष्टीच ज्याच्यावर अवलंबून आहे. त्यालाच गिळंकृत करायला निघाल्यामुळे, आता आपलं कसं होणार ? म्हणून सूर्य हनुमानापुढे निस्तेज पडला. आता आपलं कसं होणार म्हणून सर्वजण काळजीत पडले. याच हनुमानाने एकाच उड्डाणात समुद्र ओलांडला. कृष्णाने एका हाताने गोवर्धन पर्वत तोलून धरला आणि सृष्टीला वाचविले. अशा महा पराक्रमी वीरांनाही काळाने सोडलेले नाही. तिथं सामान्य जीवांचं काय चालणार आहे ! नको नको मना गुंतू मायाजाळी, काळ आला जवळी ग्रासावया । काळाची ही उडी पावेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा मायबाप । या तुकोबांच्या ओळी किती समर्पक आहेत . जीवनात मृत्यू हे अंतिम सत्य आहे . माणूस कितीही महापराक्रमी असला किवा त्याने संपूर्ण जगाला ओरबाडून संपत्तीचा मुबलक साठा केला तरी त्याचे मरण अटळ आहे. जगज्जेत्या सिकंदराचे शेवटचे बोलही याचीच प्रचिती देतात. म्हणून माणसानं माणसासारखं वागून मानव जन्म सार्थक करावा. जीवनात समाधान प्राप्त करावं . कोण जाणे कोणत्या क्षणी आपल्याला काळाचं बोलावणं येईल आणि आपली खेळी संपुष्टात येईल !     एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• सत्य स्वीकारा,सत्य आचरणात आणा आणि सत्याच्याच मार्गाने मार्गक्रमण करा हेच तुमच्या स्वाभिमानाने,निर्भिडपणे जगण्याचे आणि यशस्वी जीवन जगण्याचे खरे मंत्र आणि तंत्र आहे.तुम्ही स्वीकारलेला मार्ग आज जरी अवघड असला तरी जीवनभर आनंद आणि समाधान देणारा आहे.इतरांना हे सुरवातीला अनुकरण करायला अवघड वाटेल पण कालांतराने नक्कीच ते स्वीकारतील तुमचे अनुयायी बनतील.कोणत्याही कठीण प्रसंगी तुम्ही स्वीकारलेले सत्याचे जीवन चांगली दिशा दाखवून समृद्ध करु शकतात. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०. 🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••          *कंजूष - Stinginess* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *मोठेपणाचे सोंग* एका गावी एक कंजूष परीट राहात होता. तो दिवसा आपल्या गाढवाकडून भरपूर काम करून घेई, पण त्याला चारापाणी घालताना मात्र हात आखडता घेई. अखेर त्याने एका वाघाचे कातडे मिळविले. ते कातडे तो त्या गाढवाच्या अंगावर चपखलपणे बसवी आणि रात्रीच्या वेळी त्याला दुस याच्या शेतात सोडून देई. त्यामुळे त्या नकली वाघाला खरे समजून शेतातील झोपड्यांमध्ये राहणारे, पिकांचे पहारेकरी घाबरून आपापल्या झोपड्यांची दारे बंद करून घेऊन आत बसत. असे होऊ लागल्याने त्या गाढवाला रात्रभर शेतातले धान्याचे रोप भरपूर खायला मिळे. पहाट होताच तो परीट त्याला घरी घेऊन जाई व त्याच्या अंगावरचे कातडे काढून ठेवी. त्या नकली वाघाची अशा त हेने बरेच दिवस चंगळ झाली आणि त्याची प्रकृतीही सुधारू लागली. पण एके रात्री तो नित्याप्रमाणे शेतात चरत असता, त्याला कुठूनतरी गाढविणीचे ओरडणे ऐकू आले. त्याबरोबर तिच्या सादेला प्रतिसाद देण्यासाठी, वाघाच्या कातड्यातले ते गाढवही आपल्या भसाड्या आवाजात 'आँऽ आँऽ आँऽ' असे ओरडू लागले. त्यामुळे त्याचे खरे रूप उघडे झाले आणि शेताच्या रखवालदारांनी काठ्यांचा बेदम मार देऊन त्याला ठार केले. तात्पर्यः मोठेपणाचे सोंग केले त्यामुळे जीवावर बेतले *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00           ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 14/01/2019 वार - सोमवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मकरसंक्रांत, उत्तरायण भारत* 💥 ठळक घडामोडी :- १७६१ - पानिपतची तिसरी लढाई - मराठे व अहमदशाह अब्दाली मध्ये झालेले भीषण युद्ध. १९९३ - मराठवाडा विद्यापीठाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आले. १९९८ - ज्येष्ठ गायिका एम.एस. सुब्बलक्ष्मी यांना भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान जाहिर. २००० - ज्येष्ठ समाजसेवक व गांधीवादी विचारवंत बाबा उर्फ मुरलीधर देविदास आमटे यांना इ.स. १९९९चा गांधी शांतता पुरस्कार राष्ट्र्पतींच्या हस्ते प्रदान. 💥 जन्म :- १८८२ - रघुनाथ धोंडो कर्वे, संततिनियमन आणि लैंगिक शिक्षण या विषयी काम करणारे कृतिशील विचारवंत. १८९२ - दिनकर बळवंत देवधर , क्रिकेटमहर्षी १८९६ - डॉ. चिंतामणराव देशमुख. , भारताचे अर्थमंत्री १९०५ - दुर्गा खोटे, मराठी अभिनेत्री. १९०८ - द्वा.भ. कर्णिक , ज्येष्ठ पत्रकार आणि रॉयवादी विचारवंत. १९२६ - महाश्वेतादेवी , ज्ञानपीठ व इंदिरा गांधी एकात्मता पुरस्कार विजेत्या बंगाली लेखिका. 💥 मृत्यू :- १९३७ - जयशंकर प्रसाद, हिंदी साहित्यिक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *विठ्ठल-रुक्मिणी दर्शनाच्या ऑनलाइन बुकिंगसाठी मोजावे लागणार शंभर रुपये* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *सवर्ण आरक्षण 14 जानेवारीपासून राज्यात लागू करणार- गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *जयपूर- राजस्थानमधील ज्येष्ठ भाजपा नेते गुलाबचंद कटारिया यांची राजस्थान विधानसभेच्या विरोधीपक्षनेते पदी निवड* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *मुंबई, कोल्हापूर आणि वर्धा नंतर शिक्षणाची वारी पोहोचली नांदेड नगरीत, येत्या बुधवारपासून नांदेडमध्ये शिक्षणाच्या वारीस प्रारंभ होत असल्याची माहिती वारीचे संयोजक प्राचार्या सौ. जयश्री आठवले यांनी पत्र परिषदेत दिली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *हिमाचल प्रदेशातील शिमल्यात जोरदार हिमवृष्टी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *पोंडेचेरी- पोंडेचारीमध्ये 1 मार्चपासून लागू होणार प्लॅस्टिकबंदी, मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांची घोषणा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *हैदराबाद : तीन दिवसीय पतंग महोत्सवाला आजपासून सुरुवात* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *मकर संक्रांती निमित्त लेख* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/01/blog-post_12.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••          *दुर्गा खोटे* दुर्गा खोटे मराठी अभिनेत्री होत्या. १९३२ सालच्या अयोध्येचा राजा या मराठीतील पहिल्या बोलपटात प्रमुख भूमिकांपैकी राणी तारामतीची भूमिका यांनी केली होती. भरत मिलाप (इ.स. १९४२) चित्रपटात कैकेयी, तर मुघल-ए-आझम (इ.स. १९६0) चित्रपटात जोधाबाई, इत्यादी यांनी रंगवलेल्या भूमिकादेखील विशेष गाजल्या. सुमारे पाच दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत यांनी मराठी व हिंदी भाषांतील अनेक चित्रपट व नाटकांतून भूमिका केल्या. १९६८ साली पद्मश्री पुरस्कार, तर १९८३ साली दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन यांना गौरवण्यात आले. दुगार्बाई यांचा जन्म १४ जानेवारी १९0५ साली झाला. दुर्गा यांना लहानपणी बानू असे म्हणत होते. त्यांना दोन बहिणी होत्या. एका बहिणीचे नाव इंदू व दुसर्‍या बहिणीचे नाव शालू असे होते. कांदेवाडी या गावात दुगाबाई लहानाच्या मोठ्या झाल्या. त्यांचा तेथे वाडा होता. तो वाडा लहान बानू यांना खूप आवडायचा. तेथील वातावरण अतिशय आनंदी होते. दुर्गा यांची काकू काकीबाई ह्यांनी सर्व पोरांचा सांभाळ केला. त्या खूप प्रेमळ होत्या. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात..एक म्हणजे वाचलेली पुस्तकं आणि दुसरी भेटलेली माणसं. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) अजमेर शहर कोणत्या सुफी संताशी संबंधित आहे ?* ख्वाजा मोईनुद्दीन चिस्ती *२) जालियनवाला बाग कोणत्या शहरात आहे ?* अमृतसर *३) भारतातील पहिल्या रेल्वेचा प्रवास कधी सुरू झाला ?* १६ एप्रिल १८५३ *४) आपल्या सौर परिवारात किती ग्रह आहेत ?* 8 *५) प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली ?*              आत्माराम पांडुरंग *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ●  सुनील मुंडकर ●  तानाजी कांबळे ●  शिवहार चपळे ●  पवनकुमार तिकटे ●  दीपक उशलवार ●  बालाजी माळवदकर ●  सुधाकर कदम ●  कैलास तालोड ● रमेश बंडे ● राजू वाघमारे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *भास* वागणं अन् बोलणं विरोधाभास असतो एखादा बोलण्यातच फक्त खास असतो वागणं अन् बोलणं एक असलं पाहिजे बोलण्यापुर्त फक्त नेक नसलं पाहिजे शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *महाभारतातला सर्वोत्कृष्ट निर्णय म्हणजे अर्जुनाने श्रीकृष्णाला आपल्या पक्षात घेणे. श्रीकृष्णाला भेटायला अर्जुन आणि दुर्योधन गेले असता, झोपलेल्या भगवंताला पाहून,'मी एवढा मोठा सम्राट , याच्या पायाशी का बसू ? असा अहंकार निर्माण झालेला दुर्योधन उशाशी बसला, आणि उशीरा आलेला अर्जुन पायाशी. श्रीकृष्णासारखा बलाढ्य राजा, धूर्त राजकारणी, विद्वान मित्र आणि अपराजित योद्धा आपल्या बाजूने असावा, असे कोणाला वाटणार नाही?* *जागे होताच समोर बसलेल्या अर्जुनाला त्यांनी प्रथम मागणी विचारली. उशाशी बसलेला दुर्योधन 'मी प्रथम आलोय, आधी माझे ऐका' असे म्हणताच,'पण मी अर्जुनाला आधी पाहिलयं म्हणून त्यानेच पहिल्यांदा मागावे.मी आणि माझे सैन्य यातील एक गोष्ट आपणांस मिळेल, शिवाय मी प्रत्यक्ष युद्ध करणार नाही, मी फक्त सारथ्य करीन. तरीसुद्धा अर्जुनाने भगवंताला मागितले व दुर्योधनाने दहा हजार अक्षौहिनी सैन्य मिळाल्याचा आनंद ऊपभोगला खरा. पण त्यामुळे 'शक्ती' दुर्योधनाकडे आणि 'युक्ती' अर्जुनाकडे गेली. 'शक्ती'पेक्षा 'युक्ती' श्रेष्ठ ठरली. अर्जुनाचा 'भक्ती'पूर्ण निर्णय विजयी ठरला. शांत, धीरगंभीरपणे घेतलेले निर्णय इतिहास निर्माण करू शकतात.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• ⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜ संजय नलावडे, चांदीवली, मुंबई         9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    आतम अनुभव जब भयो, तब नहि हर्श विशाद चितरा दीप सम ह्बै रहै, तजि करि बाद-विवाद। सारांश जेव्हा हृदयात परमात्म्याची अनुभूती होते तेव्हा सर्व सुख-दु:ख विषयक वाद आपोआप नाहीसे होतात. सुख आणि दु:ख हे केवळ मानवी मनाचे खेळ आहेत. मानवी मनाच्या प्रवृत्तीनुसार सुख- दु:खाच्या भावना निर्माण होत असतात. माणसाचे मन शांत व स्थिर असेल तर समाधानाची भावना वाढीस लागते. मनाची बेचैनी अस्थिरता निर्माण करते. मन शांती नाहीशी होते. व त्यातून आपल्याकडे काहीतरी नसल्याची मनाला टोचणी लागते. ही अवस्था म्हणजेच दु:ख. स्थिर मनोवस्थेतला माणूस अर्धवट अवस्थेतल्या प्याल्याकडे अर्धा भरलेला आहे म्हणून सकारात्मकतेने पाहतो. त्याला त्यात समाधानाची प्राप्ती होते. उर्वरित अर्धा प्याला भरण्यासाठी तो आनंदाने सामोरा जातो. ही समाधानावस्था जगणं सुसह्य करते. याउलट असमाधानी माणूस हावरटासारखा त्या प्याल्याकडे अर्धा रिकामा असल्याची खंत मनी घेवून मनाला आणखी अस्थिर करून टाकतो. त्याचा अधाशी दृष्टीकोनच त्याच्या जगण्यातील आनंद नाहिसा करतो. जीवनाकडे उदासीनतेने पाहिले की नैराश्य पदरी पडतं. सुख आणि दु:ख जीवन मार्गातले चढ उतार आहेत. उल्हसित मनानं पुढं सरकत राहिलं की ती लिलय्या पार होतात. ही अनुभूती घेवून पुढं जाता आलं पाहिजे. स्वत:च्या ठायी असणारा ठाम आत्मविश्वासंच आपल्या जगण्याला सुंदर आकार देत असतो. आत्मविश्वास असणार्‍या माणसाचं जीवन नंदा दीपासारखं अखंडितपणे तेवतं असतं. विधायक वृत्ती अंगिकारली की त्याचे जीवन विषयक विचार सत्याला नाकारत नाहीत. मनाची दोलायमान अवस्था नाहिशी होवून जाते. सत्य, शिव, व सुंदराची अनुभूती येवू लागते.     एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• रंग कितीही वेगवेगळ्या प्रकारचे असले तरी रंगांना कधीच भेदभाव,जातियता, प्रांतियता किंवा विषमता नाही.त्यांना कुठेही कॅनव्हासवर,कागदावर किंवा भिंतीवर वापरा कधीच काही म्हणत नाहीत.कितीही आणि कुठेही वापरले किंवा मिसळले तरी त्यांच्या वेगवेगळ्या छटा सौंदर्यात भर टाकतात आणि पाहणा-याच्या दृष्टीत अगदी सहज भरुन जातात. पाहाराही थक्क होऊन जातो तो विचार करायला लागतो की, वेगवेगळे असूनही एकात्मतेचे दर्शन घडवतात हे त्यांच्याकडून खरेच शिकायला हवे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *दर्शन - Visions* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *बिरबलाची युक्ती* एकदा दरबार चालू असताना बादशहाच्या मनात एक विचार आला .त्याने दरबालातील सर्व कामे बाजूला ठेऊन बिरबलाला विचारले ,बिरबल एखाध्या नालायक माणसासमोर गाठ पडली तर काय करावे ? बिरबल खूप कामात होता .कामाच्या वेळी बादशाहने असा विचित्र प्रश्न विचारलेले बादशाहाला आवडले नाही .परंतु काहीही न बोलता त्याला गप्प बसून आपले कामही करता येण्या सारखे नव्हते "महाराज आपल्या या प्रश्नाचे उत्तर आपलेला ह्याच वेळी मिळेल बिरबल दरबारातील आपल काम उरकून घरी गेला आपल्या एका मित्राला घरी बोलवलं तो म्हणाला उद्या तू माझ्या बरोबर बादशहा च्या दरबारात ये बादशहा तुला प्रश्न विचारतील तू काही बोलू नकोस बादशाहने कितीही प्रयत्न केले तरी तू तोंड उघडू नकोस घरी आल्यावर मी तुला इनाम देईन दुसऱ्या दिवशी मित्राला घेऊन बिरबल बादशहा च्या दरबारात गेला बादशाहाला मुजरा करून तो म्हणाला खाविंद आपल्या कालच्या प्रश्नाच उत्तर माझा हा मित्र देईन .विचारा त्याला प्रश्न .बादशाहने त्याला प्रश्न विचारला एखादया नालायक माणसाशी गाठ पडली तर शहाण्या माणसाने काय करावे? बिरबलाचा मित्र काही न बोलता चुळबुळ करत राहिला बादशाहने आपला प्रश्न पुन्हा पुन्हा विचारला परंतु बिरबलाचा मित्र गप्पच शेवटी बादशहा चिडला तो बिरबलाला म्हणाला ख काय मूर्ख पणा चालवला आहे .तुझा मित्र तर काहीच बोलत नाही .बिरबल नम्र पणे म्हणाला खाविंद माझ्या मित्र ने आपल उत्तर दिले आहे .नालायक माणसाबरोबर गाठ पडली तर गप्प राहावे.बादशाहाला उत्तर मिळाले .परंतु बिरबलाने आपलेला नालायक ठरविल्या मुळे तो मनातून खजील झाला . *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

*माँ जिजाऊ* 🚩🚩🚩🚩🚩🚩 जाधव घराण्याची लेक भोसले घराण्याची सून स्वराज्य स्थापनेसाठी झटली मनापासून... राजमाते तुझ्या जन्मदिनी नतमस्तक मी चरणी तुला कोटी कोटी अभिवादन तुझेच नाव आज मनोमनी.. राजा शिवबाची आहेस तु माता आणि शिल्पकार स्वातंत्र्याची जननी आणि स्वराज्याची निर्मितीकार... जीवनाच्या लढाईत दुःखाचे तू चटके फार सोसीयले शिवबाला रयतेचा राजा तु बालपणीच बनविले.. एकच मागणी आजच्या दिनी एकच आकांक्षा मनातूनी .. शिवबा सारखा पुत्र यावा प्रत्येकाच्या घरातूनी.. 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 ✍ *श्रीमती प्रमिला सेनकुडे* ता.हदगाव जिल्हा नांदेड.

*ग्वाही मनाची* जे दिले दुःख नशिबाने झगडून त्याला ना हार मानली आयुष्य जगले असे मी जणू काट्यावरून चालत चालत किती बोचतील काटे तरीही जीवनाशी संघर्ष मी करीन अन् पुन्हा या भारतमातेचा कल्याणासाठी देह मी झीजवीन देह माझा लागो देश कल्याणा राखेतून राहीन पुन्हा उभी मी झिजुन स्वतः चंदनापरी घडविण माझ्या विद्यार्थ्यांना वाटेतल्या काट्यांना नाही मी जुमानणार धरूनी कास सत्याची चालत मी राहणार..... 〰〰〰〰〰〰〰 ✍ श्रीमती प्रमिला सेनकुडे ता.हदगाव जिल्हा नांदेड

*तु तिथं मी* *राजाराणीचा संसाराला नाही उणीव कशाची* *तु तिथं मी राहीले मिळूनी* *गोडीने केला संसार सुखानी* 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 *श्रीमती प्रमिला सेनकुडे नांदेड (हदगाव)*

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00           ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 12/01/2019 वार - शनिवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *राष्ट्रीय युवक दिन* 💥 ठळक घडामोडी :-  १९३६ - डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची धर्मांतराची घोषणा. इ.स. २००६ - हज यात्रेच्या अखेरच्या दिवशी मक्केजवळ मीना येथे प्रतीकात्मक दगड फेकण्याचा विधी चालू असताना झालेल्या चेंगराचेंगरीत ३४५ मुस्लिम भाविकांचा मृत्यु व २९० जखमी. 💥 जन्म :- १५९८ - जिजाबाई, छत्रपती शिवाजी राजांची आई. १८६३ - स्वामी विवेकानंद, भारतीय तत्त्वज्ञ. १९०२ - धुंडिराजशास्त्री विनोद,महर्षी न्यायरत्न. १९०६ - महादेवशास्त्री जोशी, भारतीय संस्कृतीकोशाचे व्यासंगी संपादक. १९१८ - सी.रामचंद्र, ज्येष्ठ संगीतकार. १९१७ - महाऋषी महेश योगी, भारतीय तत्त्वज्ञ. 💥 मृत्यू :-  १९४४ - वासुकाका जोशी, लोकमान्य टिळकांचे निकटचे सहकारी व चित्रशाळेचे विश्वस्त. १९९२ - पंडित कुमार गंधर्व, हिंदुस्थानी संगीताच्या क्षेत्रातील ख्यातनाम गायक. २००५ - अमरीश पुरी, भारतीय अभिनेता. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *जम्मू-काश्मीर : बर्फवृष्टीमुळे श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला आहे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *यवतमाळ : विदर्भ राज्य निर्माण यात्रा घाटंजीत दाखल, स्वतंत्र विदर्भ राज्य मागणीचा लढा तीव्र करण्यासाठी अॅड. वामनराव चटप आणि राम नेवलेंच्या नेतृत्वात मोर्चा* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *महिला अंतराळवीर गगनयान मोहिमेचा भाग असतील- इस्रोप्रमुख के. सिवन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *आलोक वर्मांनी दिलेले अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश प्रभारी संचालक एम. नागेश्वर राव यांच्याकडून रद्द* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *पत्रकार रामचंद्र छत्रपती हत्याकांड प्रकरणात राम रहिमसह चार जण दोषी; सीबीआयच्या विशेष न्यायालयाचा निकाल* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *ज्येष्ठ अर्थशास्त्रज्ञ आणि स्कॉटलंड बँकेच्या माजी सीईओ मीरा सन्याल यांचे निधन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारत वि. ऑस्ट्रेलिया एकदिवसीय मालिकेला आजपासून सुरुवात; कसोटी विजयामुळे भारतीय संघात संचारला उत्साह* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बातम्यांची audio clip ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे. Follow me on Share Chat *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *तरुण भारत देश* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2016/08/blog-post_27.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••          *राकेश शर्मा* हे अंतरिक्षात जाणारे पाहिले भारतीय आहेत. भारताचा पहिला आणि जगाचा १३८ वा अंतराळवीर बनण्याचा सन्मान विंग कमांडर राकेश शर्मा यांनी पटकावला तो २ एप्रिल १९८४ रोजी भारत-रशिया अवकाश संशोधन मंडळ कार्यक्रमांतर्गत रशियाच्या सोयूझ टी-२ यानातून दोन रशियन अंतराळ संशोधकासमवेत राकेश शर्माने अवकाश सफरीचा अनुभव घेऊन या क्षेत्रात प्रगतीचे नवे दालन भारतीयांसाठी खुले केले. राकेश शर्मा पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी अंतराळातून बोलत होते. अंतराळातून भारत कसा दिसतो, या प्रश्‍नाला त्यांनी "सारे जहाँसे अच्छा हिंदोस्ताँ हमारा' असे अभिमानी उत्तर दिले होते. पटियाला येथे जन्मलेले राकेश भारतीय वायू दलात वैमानिक होते. नंतरच्या काळात त्यांचा अशोक चक्र देऊन सन्मान केल्या गेला.       *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१)  डिसेंबरमध्ये इराणमधील कोणत्या बंदराचे उद्घाटन झाले?* 👉    चाबहार *२)  इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी कोणाची निवड झाली?* 👉  रोहित पवार *३)  इंडियन शुगर मिल्स असोसिएशनची स्थापना कोणत्या झाली?* 👉    १९३२              *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● सुधाकर थडके, देगलूर ● कन्हैया भांडारकर, गोंदिया ● रत्नाकर जोशी, जिंतूर ● सुरेश गभाले ● भारत राठोड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *संकल्प* नवे वर्ष आले की नवे संकल्प केल्या जातात नव्या संकल्प सिद्धीच्या घोषणा दिल्या जातात संकल्प सिद्धीस न्यायची गोष्ट मनात पक्की पाहिजे मनातच संकल्प सिद्धीची खुण गाठ नक्की पाहिजे शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मानवी' नात्यांमधील ओलावा हा जन्मजात असतो. तो सगळ्यांच्याच मनात झिरपत असतो. पण बरेचदा आम्हीच अनेक आवरणांचे थर लेपून त्यात प्रतिबंध तयार करतो. इथूनच 'मानवी' नात्यांमधील  दुरावे, विसंवाद प्रसवतात. स्वत:कडे दोष घेऊन नाते जपण्याची क्रिया  आत्मशुद्धीकडे नेणारी असते.* *बरेचदा आपल्या पुढाकारातून  व घडलेल्या संवादातून दुभंगलेली मने सांधली जातात  पण त्याकरिता मुखवटे उतरवून  माणूस वाचता यायला हवा. मनात क्षमाभाव जागृत ठेवायला हवा. निर्मळ, शुद्ध प्रेमभाव बाळगल्यास वाट्याला येणारी निराशा गळून पडल्याशिवाय राहणार नाही. हीच भावना जीवनदर्शी महाकवी 'मिर्झा गालिब' अगदी सहजपणे सांगून जातात.....*                                     *" कुछ इस तरह मैने*          *जिंदगी को आसान कर दिया,*                     *किसी से मांग ली माफी,*           *किसी को माफ कर दिया !"*           ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••     💥💥💥💥💥💥💥💥💥 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई         9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• खान खर्च बहु अंतरा, मन मे देखु विचार ऐक खबाबै साधु को, ऐक मिलाबै छार। सारांश माणसाने आपल्याकडील संपत्तीचा खर्च बरबादीसाठी न करता सत्कार्यासाठी करावा हे महात्मा कबीर आपल्या मधूर वचनातून सांगतात. खाणे आणि खाण्यासाठी खर्च करणे यामध्ये खूप मोठं अंतर आहे. हे आपापल्या परीने आपल्या मनाला विचारले व विचारपूर्वक जानले तर लक्षात येईल. माणसाकडे पैसा असेल तर माया उत्पन्न होणे स्वाभाविकच आहे. ती स्वभावानुरूप उत्पन्न होत असते. जसा ज्याच्या स्वभाव तशी ती प्रतिबिंबीत होत असते. जी व्यक्ती सत्संगतीत असते ती अन्नदानाला महत्व देत असते. अन्न हे भुकेल्यांना मिळालं पाहिजे ते वाया जाता कामा नये. पंक्तीला बसणारा गरीब की श्रीमंत याचा विचार तो करीत नाही. मात्र अन्न ग्रहन करणार्‍याच्या मुखात ते जावे, हा त्याचा सद् हेतू असतो. तो इत्तरांना तृप्त करीत असतो, त्याच्या ठायी परोपकारी वृत्ती विलसत असते. दुसर्‍या प्रकारचा माणूस अन्नाबाबतीत इत्तरांचा विचारंच करीत नाही. तो केवळ स्वत:पुरता मर्यादित विचार करतो. उरलेले अन्न सरळ फेकून देतो. वाया घालवतो. व्यसनी माणूस तर आपल्याकडील धन संपत्ती नको त्याच बाबीवर खर्च करून बरबाद करीत असतो. मदिरा व मांसाहारावर अनाठायी खर्च करीत असतो. या अन्नसेवनातून व मदिरापानातून मनात विकार उत्पन्न होतात व त्याला विनाशाकडे नेत असतात. माणसाने आपल्या कडील धनाचा उपयोग सन्मार्गाने सत्कार्यासाठी केला तर स्वत:ला समाधान मिळते व आनंदानुभूती मिळते.     एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• शब्द हे शस्त्रापेक्षाही धारदार असतात.शस्त्राची जखम शरीरावर होते नि काही काळ राहून ती मिटूनही जाते. परंतु एखादा शब्द जर आपण विचार पूर्वक न वापरला तर तो थेट काळजाला जाऊन लागतो आणि त्याची एवढी जखम होते की,ती आयुष्यभर तशीच काळजाला चिकटून राहते कधीच कमी होत नाही. म्हणून दैनंदिन जीवनव्यवहारात वावरत असताना मोजक्या आणि योग्य शब्दांचा,कुणालाही न लागणा-या शब्दांचा वापर करून आपण आणि इतरांनाही समाधानी रुपात रहावे.जेणेकरुन दोघांच्याही जीवनात आनंद आणि एकमेकांविषयी प्रेम निर्माण झाले पाहिजे.केवळ तुम्ही विचार न करता बोललेल्या एकाच शब्दाने वैरत्वाची भावना निर्माण होते तर त्याच एका शब्दाने इतरांची मने जिंकून जगावर राज्य करण्याची ताकद निर्माण होते. म्हणून शस्त्रापेक्षाही शब्दांना आपल्या जीवनात अधिक जास्त जपले पाहिजे. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद...९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••          *धारदार - Sharpened* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *मातृभक्त लक्ष्मणदेव* एका गांवात एक स्त्री गांवाबाहेर आपल्या लहान मुलाला घेऊन एकटीच रहात होती. मुलाचे वडील त्याच्या लहानपणीच देवाघरी गेले होते. मुलाचे नाव होते लक्ष्मणदेव. आई धुणीभांडी करून आपला चरितार्थ चालवित होती. मुलगाही आईला कामात मदत करत असे. काम करून तो लांबच्या शाळेत पण जाई. एक दिवस तो शाळेतून परत आला तर आई झोपलेली होती. तिला खूप ताप भरला होता. लक्ष्मण आईची सेवा करू लागला. बरेच दिवस झाले तरी आईचा ताप उतरेना. खांण बंद झालं. ती खूप अशक्त झाली. लक्ष्मणाला घरची बाहेरची सर्वच कामे करावी लागत. आईची सेवा तो अगदी मन लावून करत असे. तिला दूध गरम करून देणे तिची औषधं वेळच्या वेळी देणे. एका रात्री आईने लक्ष्मणाला हाक मारली. 'लक्ष्मणा थोडे पाणी देतोस' लक्ष्मण घरात पाणी आणायला गेला. पाणी घेऊन तो परत आला तेवढयात आईला झोप लागली. गुंगीत आई पडून होती. रात्र संपली पहाट झाली. गार वार्‍याच्या झुळुकीबरोबर आईला जाग आली. तिने पाहिले समोर हातात पाण्याचा पेला घेऊन लक्ष्मण उभा होता. आई म्हणाली 'लक्ष्मणा अरे तु रात्री झोपलाच नाहीस का ? वेडया अरे मला उठवायचे नाही कां ? लक्ष्मण आईच्या हातात पाण्याचा पेला देत म्हणाला, 'आई अग माझ्या लहानपणी माझ्यासाठी तु किती रात्री जागुन काढल्यास मग मी एक रात्र तुझ्या करता जागलो तर काय झालं'. तिने त्याला पोटाशी धरले. तिच्या डोळयातले अश्रू त्याच्या मानेवर ओघळत होते. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00           ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 11/01/2019 वार - शुक्रवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *लाल बहाद्दूर शास्त्री पुण्यतिथी* 💥 ठळक घडामोडी :-  १९२२ - मधुमेहाच्या रुग्णावर प्रथमतः इन्सुलिनचा प्रयोग केला गेला. १९४९ - लॉस ऍंजेलसमध्ये पहिल्यांदा हिमवर्षाव झाला. १९५५ - नेपानगरमध्ये पहिला भारतीय कागद कारखाना सुरू झाला. १९६० - चाडने स्वतःला स्वतंत्र घोषित केले. 💥 जन्म :- १८५८ - श्रीधर पाठक, हिंदी साहित्यिक. १८९८ - विष्णु सखाराम खांडेकर, मराठी साहित्यिक. १९४४ - शिबु सोरेन, भारतीय राजकारणी. १९५४ - बोनी कपूर, हिंदी चित्रपट दिग्दर्शक. १९७३ - राहुल द्रविड, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :-  १९२१ - वासुदेवाचार्य केसर, कन्नड साहित्यिक. १९६६ - लाल बहादूर शास्त्री, भारताचे पंतप्रधान. १९८३ - घनश्यामदास बिरला, भारतीय उद्योगपती. २००८ - यशवंत दिनकर फडके, मराठी लेखक, इतिहास संशोधक *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••• 1⃣ *मोदी सरकारकडून मोठी सवलत; आता ४० लाखांपर्यंत टर्नओव्हर असलेल्या कंपन्यांना GST नाही!* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *गडचिरोली : बदलीच्या ठिकाणी रुजू न होणाऱ्या आठ शिक्षकांवर निलंबनाची कारवाई* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *आर्थिक मागास आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान; युथ इक्विलीटी संघटना विरोधात* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *मराठा आरक्षणाविरोधी याचिकेवर सुनावणी, राज्य सरकारने उत्तर देण्याचे हायकोर्टाचे निर्देश. एमआयएमचे आमदार इ्म्तियाज जलील यांनी दाखल केली होती याचिका* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *जम्मू-काश्मीरमध्ये भूकंपाचे झटके, भूकंपाची तीव्रता 4.6 रिश्टरस्केल इतकी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *यवतमाळ - साहित्य संमेलनाचे उद्घाटन आत्महत्याग्रस्त शेतकरी महिलेच्या हस्ते होणार; महामंडळाचा निर्णय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्याचं वेळापत्रक ठरलं, बीसीसीआयनं जाहीर केल्या तारखा; ऑस्ट्रेलियाचा संघ फेब्रुवारी महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात भारत दौऱ्यावर येणार आहे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••     *शिक्षक आनंदी तर मुले आनंदी* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/09/blog-post_12.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* 9423625769 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••          *विष्णू सखाराम खांडेकर* (जानेवारी ११, १८९८ - सप्टेंबर २, १९७६) हे मराठी कादंबरीकार, लेखक होते. इ.स. १९२० साली खांडेकरांनी  महाराष्ट्रातल्या  सिंधुदुर्ग  जिल्ह्यातील शिरोडे या गावी शिक्षकी पेशास सुरुवात केली. तेथे त्यांनी इ.स. १९३८ पर्यंत काम केले. ह्या काळात मिळालेल्या फावल्या वेळेत त्यांनी मराठी साहित्याच्या निरनिराळ्या प्रकारांमध्ये लेखन केले आपल्या आयुष्यात त्यांनी १६ कादंबर्‍या, ६ नाटके, जवळपास २५० ललितलेख, १०० निबंध आणि कित्येक टीकाटिपण्या लिहिल्या वि.स. खांडेकर हे सोलापूरला १९४१ साली भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. साहित्य अकादमी पुरस्कार (१९६०) - ययाति (कादंबरी) पद्मभूषण पुरस्कार (१९६८) ज्ञानपीठ पुरस्कार (१९७४) - ययाति कादंबरीसाठी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाने त्यांना डी. लिट. (डॉक्टर ऑफ लिटरेचर) बहाल केली.     *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• मनुष्या जवळची नम्रता संपली कि, त्याच्या जवळची माणुसकीच संपली म्हणून समजावे *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१)  ७८व्या अखिल भारतीय आंतरविद्यापीट्ग ॲथलेटिक्स स्पर्धेत कोणी सुवर्णपदक जिंकले?* 👉    सायली वाघमारे *२) राष्ट्रमाता जिजाऊ यांचा जन्मदिवस कोणता ?* 👉     12 जानेवारी *३)  राष्ट्रमाता जिजाऊचे जन्मस्थान कोणते?* 👉    सिंदखेडराजा              *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● बालाजी पुलकंठवार ● सिध्देश्वर मोकमपल्ले ● हणमंत पांडे ● राहूल ढगे ● लोकेश येलगंटवार ● साई यादव, येवती *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *काळ* हे वर्ष सरेल आता नवे वर्ष येईल नव्याच्या स्वागताला मनी हर्ष होईल जुन्या कडून धडा घेऊ नव्याचे स्वागत करू काळ नित्य नूतन असतो एवढ मात्र ध्यानी धरू शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *संधी अमर्याद असतात हे खरे; परंतु एकदा आलेली संधी पुन्हा येईल याची खात्री नसते. संधीचे पुनरुज्जीवन होत नसल्याने ती मिळाली, की तिचे सोने करणे शहाणपणाचे असते. आज संपूर्ण मानवजातीचे जीवन संधीच्या शोधात आहे आणि त्यामुळे ते कमालीचे धकाधकीचे आणि वेगवान भोव-यासारखे झाले आहे. जगण्यातील विरोधाभास असा की, जीवनात स्थैर्य लाभावे म्हणून माणूस सतत धावतो आहे ! त्याला स्थिर होण्याची संधी मिळत नाही, असे नाही; पण अभासी संधीच्या मागे तो पळत सुटतो. संधी पकडून ठेवून जगण्याची मजा उपभोगणे त्याला जमत नाही, त्याला सुचत नाही, हातची संधी सुटते.* *मिळालेल्या संधीचे सोने करण्याची कला अनेकांना अवगत असते. विल्यम शेक्सपियर एका नाट्यगृहाचे द्वारपाल होते. तेथेच नाट्यकलेचे स्वयंशिक्षण घेऊन ते जगप्रसिद्ध नाटककार बनले. क्रिकेटचे कौशल्य दाखविण्याची संधी सचिन तेंडुलकर आणि त्याच्या जवळच्या मित्रांना एकाचवेळी मिळाली. सचिनने संधीचे सोने केले; पण त्याच्या मित्रांना ते साधले नाही. क्रिकेटच्या माध्यमातून सचिन भारतरत्न बनला. असे म्हणतात की सामान्यातील अतिसामान्य व्यक्तीलाही देव संधी देतो. ज्याला ही हाक ऐकू येते, तो संधीचे सोने करतो आणि ज्याला संधीचे संकेत समजत नाहीत, तो आयुष्यभर गोंधळलेला राहतो.* ••● ‼ *रामकृष्णहरी* ‼ ●•• ⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡ संजय नलावडे, चांदीवली, मुंबई         9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    वचन वेद अनुभव युगति आनन्द की परछाहि बोध रुप पुरुष अखंडित, कहबै मैं कुछ नाहि। सारांश वेदांचे वचन , अनुभव, युक्त्या इत्यादि परमात्माच्या प्राप्तिसाठी मानसानेच आपापल्या कल्पनेतून तयार केलेल्या आहेत. अस्थिर भटक्पा परंतु सश्रद्ध मनाला आधार देणारी केवळ आनंददायी सावलीरूप अशी ती प्रतिके आहेत . वेदा पुरानात तत्कालिन समाज जीवनानुरूप व त्या परिस्थितीनुरूप गरजेप्रमाणे वागणारी सत् पुरूष, नायक, राजांची रूपं पुस्तकात नोंदवली गेली. तीच पुढं दुबळ्या अज्ञानी मनाला तात्पुरता आधार देत देवाचं रूप धारण करून समोर आली. जे माणसात कोल्ह्यासारखे चतुर वृत्तीचे त्यांनी त्या देवाची ठेकेदारी घेतली. अज्ञानी व भाबड्या माणसांना अशा देवांच्या नादी लावून भितीच्पा सावटाखाली ठेवले. हत्तीचं बळ असणार्‍या माणसाला निरर्थक गोष्टींच्या नादी लावून परोपजीवी बांडगुळांनी अज्ञानी जीवांचा आपल्या हाती अंकुश घेतला. अशा भाकड कथांच देवाच्या मुखातलं ज्ञान म्हणून त्यात स्वतःच्या उदरनिर्वाहाची बेगमी करून घेतली. परमात्मा विश्वाला व्यापून उरलेला आहे. तो सर्व चराचरांच्या ठायी वास करतो. त्याचं व्यापकत्व इतकं अगाध आहे की तो केवळ एखाद्या प्रतिकरूप प्रतिमेतून कसा काय साकार होवू शकतो. त्याचं दिव्यत्व पाहायला आपल्याकडे पारखी नजर हवी. ईश्वराचं अस्तित्व चमकत आंडोल उठवणार्‍या विजांच्या तांडवातून कळतं. आभाळाच्या अथांग निळाईशी, दिववसभर सृष्टीशी एकरूप होणार्‍या सूर्याचं उगवताना व मावळताना विरक्त होवून भगवं रूप धारण करण्यातून कळतं . ते पाहाता आलं पाहिजे. वारा ,पाऊस, प्रकाश हिच तर खरी ईश्वराची रूपं. हे सर्व एकात्म स्वरुप असणार्‍या परमात्म्याच्या स्वरूपाबाबतीत मी बापुडा तुम्हाला काय सांगू शकणार आहे? त्याला जाणण्यासाठी आपण प्रत्यक्ष अनुभूती घ्यायला हवी. असे महात्मा कबीर म्हणतात.     एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आत्मा आणि ईश्वर हे एक असून ज्यांचे अंत:करणं शुद्ध आणि पवित्र आहे अशा ठिकाणीच परमेश्वर वास करत असतो.म्हणून नेहमी आपल्या अंतःकरणाला शुद्ध विचार,पवित्र मन,इतर जीवांना न दुखवता प्रसन्न ठेवणे,इतरांविषयी वाईट भावना न ठेवता जगणे,ह्या सा-यां गोष्टी आपल्या अंत:करणातून पवित्र मनाने जपल्या तर परमेश्वराशी नातं एकरुप होऊन एक आगळा वेगळा अनुभव आपल्या प्रत्ययास आल्याशिवाय राहत नाही.म्हणून आपले अंत:करण,आचार नि विचार पवित्र ठेवण्यास सदैव प्रयत्नशील असावे. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३ 🌄🌺🌄🌺🌄🌺🌄🌺🌄🌺🌄 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••          *पवित्र - Holy* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *माशीने केलेला निरर्थक विचार.* एकदा एक मधमाशी आपल्या मनाशीच विचार करू लागली की, 'मी सारखं कामाला जुंपलेलं असावं असं का? ही फुलपाखरं पहा ! किती आनंदात वेळ घालवतात. मीसुद्धा त्यांच्यासारखं का होऊ नये ?' त्या दिवसापासून तिने काम करायचं सोडले. इतर मधमाशांनी तिची समजूत घालण्याचा प्रयत्‍न केला, पण तो फुकट गेला. असे होता होता पावसाळा आला व पाऊस पडू लागला तेव्हा ती मधमाशी पोळ्याजवळ आली, पण त्याची सर्व दारे बंद झाली होती. शेवटी भुकेने व थंडीने ती मरण पावली. तात्पर्य - स्वतःच्या पोटाकरता कसलातरी उद्योग करणे योग्य. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

🐪 जि.प,प्रा.शाळा गोजेगाव ता.हदगाव जिल्हा नांदेड येथील *भाषा संगम चे विविध भाषेतील video* *पाहण्यासाठी खालील* *लिंक ला टच करा.* 👇👇👇👇 https://youtu.be/mRALiPRab58 👇 https://youtu.be/fjZQnoqqoO4 👇 https://youtu.be/PIaKv9E5fWQ 👇 https://youtu.be/cBlw_Mybxds 👇 https://youtu.be/sECmvcn2d1M 👇 https://youtu.be/fwx0dOPunDU 👇 https://youtu.be/7jmjdag-Uh0 👇 https://youtu.be/Scbf_O5-yyQ 👇 https://youtu.be/I-isHnJDDvM 👇 https://youtu.be/DgT8-yfchR4 👇 https://youtu.be/mRALiPRab58 🙏🙏🙏🙏

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00           ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 10/01/2019 वार - गुरूवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :-  १६६६: सुरत लुटून शिवाजी महाराज राजगडाकडे निघाले. १७३०: पुण्यातील शनिवारवाड्याच्या बांधकामास सुरुवात झाली. 💥 जन्म :- १९०१: इतिहास संशोधक डॉ. गणेश हरी खरे १९१९: संस्कुत अभ्यासक आणि रामायणातील शाप आणि वर, महाभारतातील कुमारसंभव या ग्रंथांचे लेखक श्री. र. भिडे १९२७: तमिळ अभिनेते शिवाजी गणेशन १९४०: पार्श्वगायक व संगीतकार के. जे. येसूदास 💥 मृत्यू :-  १९९९: स्वातंत्र्य सैनिक व समाजवादी विचारवंत आचार्य श्रीपाद कृष्ण केळकर  *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची तारीख जाहीर; 31 जानेवारी ते 13 फेब्रुवारी दरम्यान होणार अधिवेशन, 01 तारखेला अर्थसंकल्प होणार सादर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *नागपूर : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांचा राजीनामा.* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *आर्थिकदृष्ट्या मागास आरक्षण विधेयक राज्यसभेतही मंजूर; 165 मते पडली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *औरंगाबादचे पालकमंत्रिपद एकनाथ शिंदें यांच्याकडे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *नवी दिल्ली - सुप्रीम कोर्टाचा दिलासा; माथेफिरू एसटीचालक संतोष मानेला फाशीऐवजी जन्मठेप* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *सोलापूर : 30 हजार घरं मजुरांना दिल्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नरसय्या आडम यांनी मानले आभार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *कसोटी मालिकेतील ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघ एकदिवसीय मालिकेसाठी झाला आहे सज्ज, शनिवारपासून होणार सुरू* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बातम्यांची audio clip ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे. Follow me on Share Chat *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• सन 1998 मध्ये प्रचंड गाजलेली पुस्तिका खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत...           *चंदर - किशोर कादंबरी* खालील ब्लॉगवर अंतिम भाग बारावा वाचन करता येईल. https://shabdghar.blogspot.com/2019/01/12.html वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ लेखक  *अरुण वि. देशपांडे, परभणी/पुणे* 9850177342 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        *गणेश हरी खरे* गणेश हरी खरे ‍‌‍‍‍‍‍‍‍‍(जन्म १० जानेवारी १९०१ - मृत्यू०५ जून १९८५)  हे महाराष्ट्रातील इतिहाससंशोधक होते. दक्षिणेचा मध्ययुगीन इतिहास, शिवकालीन महाराष्ट्र, महाराष्ट्रातील दैवते, मूर्तिविज्ञान इ. विषयांवर त्यांनी संशोधनपर स्वरूपाचे विपुल लेखन केले आहे. तसेच मराठी, फार्सी इत्यादी भाषांतील ऐतिहासिक काळातील कागदपत्रांची संपादनेही केली आहेत. संशोधकाचा मित्र, मूर्तिविज्ञान, महाराष्ट्राची चार दैवते इ. त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.       *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतः चांगले व्हा आणि कुणीतरी तुम्हाला शोधत येईल. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) आशिया खंडातील सर्वात मोठा खत कारखाना कोठे आहे ?* सिंद्री (झारखंड) *२) आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्यालय कोठे आहे ?* वॉशिंग्टन *३) कोणत्या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असते ?* जिराफ *४) भारतातील सर्वात लांब धरण कोणते ?* हिराकुंड *५) केळीचे सर्वाधिक उत्पादन कोठे होते ?*              तामिळनाडू *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● श्रीनिवास रेड्डी ● साईनाथ सोनटक्के ● राजेश कुंटोलू ● गणेश वाघमारे ● शत्रूघन झुरे ● स्वरूप खांडरे ● आकाश क्षीरसागर *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *शाश्वत* छोट्यांची छोटी अन् मोठ्यांची मोठी रिश्वत आहे ज्याच्या त्याच्यापरीने घेतात ते सारे शाश्वत आहे लपून छपून घेणाराला काहीही पटत असते रिश्वत सुद्धा त्यांना शाश्वत वाटत असते शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *गीतेच्या दुस-या आध्ययात दुस-याच श्लोकात भगवंताने असे सांगितले आहे की, " मनुष्य जसा जुन्या वस्त्रांचा त्याग करून नवीन वस्त्र धारण करतो, त्याप्रमाणे आत्म्याचेही असते." याच विधानात आपल्याला नकारात्मकतेचे वस्त्र फेकून देत सकारात्मकतेचे वस्त्र परिधान करणा-यांना शोधावे, पाहावे लागेल.* *गीतेतला हा विचार सर्वोच्चतेची भाषा बोलणारा आहे; पण जीवन बदलाच्या विचारात तो ताडून बघायला हवा. सामान्यपणे जीवनात दोन मनं कार्यरत असतात. एक चांगले आणि दुसरे वाईट. जर वाईट बाजू प्रबळ झाली, तर षङरिपु घेरू लागतात आणि माणूस इंद्रियसुखाच्या आहारी जातो. उलट चांगली बाजू बलवान झाली, तर व्यक्ती संतोषी, संयमी, निर्व्यसनी, स्थिरचित्त होऊन जीवनाच्या वळणवाटा सहज पार करू शकतो. अशा वळणवाटा सहजसाध्य होणे म्हणजे सुखी होणे. यालाच सुखाची व्यापक व्याख्या म्हणता येईल.* •••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••• 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई         9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    ज्यों गूंगा के सैन को, गूंगा ही पहिचान त्यों ज्ञानी के सुख को, ज्ञानी हबै सो जान। सारांश मुक्याची भाषा मुक्याला बरोबर समजते कारण दोघेही समान संवेदनेचे असतात. त्यांना बोलता येत नसले तरी त्यांची (देहबोली) खुणवाखुणवी इशार्‍याची भाषा असते. त्या खुणवण्यातून त्याला काय सांगायचंय ते समोरचा बहीरा बरोबर ओळखतो. मात्र हे इशारे व सुचित करावयाचा भाव विद्वानालाही कळू शकत नाही. त्यासाठी त्याच्याच पातळीवर यावं लागतं. जसं लहाण बाळाचं रडणं अन त्याचे चेहर्‍यावरचे हावभाव त्याच्या आईला वाचता येतात. म्हणून त्यांच्यात डोळ्याची भाषा विकसित झालेली असते. लेकराचं अर्ध अधिक पालन-पोषण तर आई डोळ्याच्या ईशार्‍यावरंच पूर्ण करते. विशिष्ट वयामध्ये वेगवेगळ्या सांकेतिक भाषा विकसित होतात. किशोरावस्थेपासून अशा सांकेतिक भिषा विकसित होतात. प्रत्येक शब्दात विशिष्ट अक्षर क्रमात एखादे अक्षर टाकून त,व,म,प....ची भाषा बोलता येणे. बोलणार्‍या दोघांनाच कळायचं बाकीचे उगा तोंडाकडं पाहात राहाणार . कुमारावस्थेनंतर अशा भाषांचं आकर्षण ओसरून जातं. जनावरांच्या बाजारात हेड्यांची दलालांची भाषा तरी कुठे कळते दलालांशिवाय दुसर्‍यांना ! कित्येक जणांच्या समुहात वावरणार्‍या दोन प्रेमींनी आपली एक भाषा विकसित केलेली असते. कितीही चौक्या पहारे असले तरी ती त्या दोघांना बरोबर कळते. चौक्या पहार्‍यांना भेदून ती एकमेकांची भेट घडवून आणतेच. त्याप्रमाणे आत्मरूपाच्या आनंदात एकरूप झालेल्या आत्म ज्ञान्याला दुसरा आत्मज्ञानी बरोबर ओळखू शकतो.     एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्याप्रमाणे प्रत्येक फुलाचा आकार, रंग आणि सुगंध वेगवेगळा असतो त्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तींची शारिरीक रचना,आचार आणि विचार हे वेगवेगळे असतात.याचे कारण जरी वेगळे असले तरी  आपण एकमेकांना आपल्या जीवनात स्वभावानुसार समजाऊन घेऊन आपले जीवन व्यवहार अगदी व्यवस्थितपणे हाताळण्याचा प्रयत्न करायला हवा.काही अंशी कमी-जास्त असलेतरी ते आपण आपल्या स्वभावानुसार आणि विचारानुसार ओळखून जीवनात एकोप्याने राहण्यातच आपले खरे कौशल्य आहे.म्हणून कुणालाही आपल्यापेक्षा कमी लेखून आपले वर्चस्व इतरांवर लादू नये.त्यातील एखादा आपल्याला हवा असलेला गुण शोधून आपल्या जीवनात आचरणात आणून एकमेकांना समजावून घेऊन आपल्या जीवनाबरोबर घेऊन आनंदी जीवन जगण्यात धन्यता मानावी. हाच आपला व आपल्या माणुसकीचा खरा धर्म आहे. ज्या विविधतेत एकता असते त्या  एकमेकांच्या भावना दुखावण्यात नसते.तेव्हा आपण वेगवेगळे जरी असलो तरी अनेक विचारांना एकत्रीत बांधून एकतेचे दर्शन घडवू शकतो.हा विचार नित्यासाठी आचरणात आणायला हवा.त्यात आपल्यातही दडलेल्या चांगल्या विचारालासुध्दा इतरांमध्ये सामावून घेण्याची संधी मिळेल.एकमेकांना हीन समजून 'मी 'चे अस्तित्व वृध्दिंगत करणे अयोग्य आहे. © व्यंकटेश काटकर,नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🌻🌺🌸🌼🌹🌷🌻🌺🌸🌼🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••          *अपूर्ण - Incomplete* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      *गुरू ,परीक्षा ,शिष्य* गुरुकुलातून तीन शिष्य  उत्तीर्ण होणार होते. त्यांच्या अंतिम परीक्षा सुरू होत्या. गुरू म्हणाले, “एक परीक्षा तुम्हाला न सांगता होईल. तीच तुमची खरी अंतिम परीक्षा असेल.. आणि या परीक्षेत तुम्ही पास झाला तर तुमचे जीवन यशस्वी व सत्कारणी लागेल. आता आपल्या  गुरुकुलातल्या सगळ्या परीक्षा झाल्या. ती विशेष  परीक्षा काही झाली नाही. गुरुकुलात सत्कार   सोहळाही झाला. प्रथेप्रमाणे तिन्ही विद्यार्थी पुढील जीवनातील आयुष्य यशस्वी करण्यासाठी बाहेर पडले.  एके दिवशी ते संध्यासमयी जंगलातुन जात होती.आणखी काही क्षणांमध्ये  काळोख पसरणार होता .राञ होणार अंधार पडणार आणि त्या काळोखातुन त्यांना जंगल पार करून गावी  परतायचे होते . झपझप चालून पुढचं जंगल पार करायचं होतं, मुक्कामाचं गाव गाठायचं होतं. अचानक पुढे चालणारा विद्यार्थी  थबकला. वाटेत एक काटेरी झुडूप आडवं पडलं होतं. तो दोन पावलं मागे आला आणि धावत पुढे जाऊन त्याने एका झेपेत ते झुडुप पार केलं. दुसऱ्याने अंदाज घेतला आणि रस्ता सोडून खाली उतरून त्याने काटे पार केले आणि तो पलीकडच्या बाजूला पुन्हा वाटेवर आला.. तिसरा मात्र थांबून काटे वेचू लागला. बाजूला एका छोट्या खड्ड्यात ते लोटू लागला. दोघे मित्र म्हणाले, “अरे, ही काटे वेचायची वेळ आहे का? कोणत्याही क्षणी अंधार पडेल.आता सांज होत आहे.अशा या संध्यासमयी  आपल्याला लवकरात लवकर  मुक्कामाचं गाव गाठायचं आहे. रस्त्यात कुठे वाट चुकलो, तर जंगलात भटकत राहू. चल लवकर.. तिसरा युवक म्हणाला, अंधार पडणार आहे, म्हणूनच हे काटे वेचले पाहिजेत. आपल्याला ते दिसले तरी. आपल्यामागून जो वाटसरू  येईल, त्याला काटे दिसणारच नाहीत. त्याच्या पायात काटा घुसला तर त्याची इथे या भयाण जंगलात काय अवस्था होईल, विचार करा. तुम्ही पुढे निघा. मी हे काटे बाजूला करून गाठतोच तुम्हाला धावत.. ते दोघे पुढे निघतात, तोच शेजारच्या झाडामागून गुरू बाहेर आले आणि म्हणाले, तुम्हा दोघांना पुन्हा गुरुकुलात यावं लागेल तुमचं शिक्षण अजून अपूर्ण आहे. *तात्पर्यः* अंतिम परीक्षा ज्ञानाची नव्हती, प्रेमाची होती,भावनिकतेची होती , अनुकंपेची होती, सहवेदनेची होती,दुःख वाटून घेण्याची होती.तुम्ही दोघेजण ज्ञान खूप शिकलात, प्रेम अजून शिकणं बाकी आहे.भावनिकतेची जोपासना होणे बाकी आहे.बस तेवढी जोपासयला शिका.मगच जीवनात सर्वोतोपरी यशस्वी व्हाल *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00           ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 08/01/2019 वार - मंगळवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :-  जयपूर येथे राजस्थान विद्यापीठाची स्थापना. २००५ - अणुऊर्जावर चालणारी यु.एस.एस. सान फ्रांसिस्को (एस.एस.एन.०७७१) ही पाणबुडी पाण्याखाली पूर्णवेगात असताना समुद्रातील डोंगराशी धडकली. एक खलाशी ठार. पाणबुडी पृष्ठभागावर येण्यात यशस्वी. 💥 जन्म :- १९०९ - आशापूर्णादेवी- ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणार्‍या प्रथम लेखिका. १९४५ - प्रभा गणोरकर- मराठी लेखिका. 💥 मृत्यू :-  १९४१: बालवीर (Scout) चळवळीचे प्रणेते लॉर्ड बेडन पॉवेल  १९६७ - श्रीपाद कृष्ण बेलवलकर- प्राच्यविद्यापंडित. १९७३: सकाळ वृत्तपत्राचे संस्थापक संपादक ना. भि. परुळेकर उर्फ नानासाहेब परुळेकर  १९७३ - स.ज. भागवत -तत्त्वज्ञ व विचारवंत. १९९२ - द.प्र. सहस्रबुद्धे- 'आनंद' मासिकाचे माजी संपादक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *आर्थिकदृष्ट्या मागास संवर्णांना मिळणार 10 टक्के आरक्षण, मोदी सरकारचा मोठा निर्णय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *दिल्ली- जपानचे परराष्ट्रमंत्री तारो कोनो यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *राज्यसभेचं कामकाज आणखी एक दिवस चालणार; आजऐवजी उद्या अधिवेशन संपणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *भाजपा आमदार आणि माजी मंत्री गोपाल भार्गव यांची मध्य प्रदेश विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *औरंगाबाद : एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे करा, महामंडळातील वारेमाप खर्चाची श्वेत पत्रिका काढा; महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस(इंटक) संघटनेची मागणी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *10 जानेवारीला ओपन एसएससी बोर्ड लाँच करणार, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारत वि. ऑस्ट्रेलिया चौथ्या कसोटी सामन्यात भारताने रोवली 72 वर्षानंतर ऑस्ट्रेलियात मालिका विजयाची पताका, रचला नवा इतिहास* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    *जनसेवेतच ईश्वराचीही सेवा* माणसाच्या आयुष्यात संकटे आली की, त्याला कुणाचा तरी आधार हवा असतो. हा आधार शारीरिक जरी नसला मानसिक असला तरी त्यांना ते पुरेसे असते. त्यामुळे दुःखी, कष्टी माणसे देवाचा धावा करता......... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/12/blog-post_8.html वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    *गोदावरी परुळेकर* मराठी लेखिका आणि साम्यवादी स्त्री कार्यकर्ती       गोदावरी परुळेकर ( १४ ऑगस्ट, १९०८ - ऑक्टोबर ८, १९९६) (माहेरचे नाव- गोदावरी गोखले) या भारतीय स्वातंत्र्यसैनिक, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या, व मराठी लेखिका होत्या.   १९१२मध्ये ना.म. जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली गोदावरी परुळेकर यांनी मानद सहाय्यक सचिव म्हणून कामगारांच्या शिक्षणप्रसाराच्या कामात महत्त्वाची भूमिका पार पाडली. गिरगावपासून परळपर्यंतच्या भागात ठिकठिकाणी नागरिकांना वर्तमानपत्रे वाचण्यासाठी केंद्रे सुरू केली. त्यामुळे लोकांमध्ये वाचनाची आवड निर्माण झाली व त्यांना शिक्षणाची गरज वाटू लागली. याच सुमारास १९१७मध्ये चिंचपोकळी येथे वाचनालय सुरू केले. त्यावेळी ११ ग्रंथालये व १० वाचनालये मोफत चालविली जात.    १९७२ चा साहित्य अकादमी पुरस्कार – 'जेव्हा माणूस जागा होतो' या पुस्तकासाठी त्यांना देण्यात आला. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जे जीवनाशी प्रेम करतात त्यांनी आळसात वेळ घालू नये. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) अमिताभ बच्चन यांना कोणत्या विद्यापीठाने डी.लिट. ही पदवी दिली ?*         दिल्ली विद्यापीठ *२) भारतात 'राष्ट्रीय फलोद्यान योजना' कधीपासून सुरू करण्यात आली ?*             २००५ पासून *३) 'मानवजातीसाठी एक धर्म, एक जात आणि एक देव' हे ध्येयवाक्य कोणाचे ?*           श्रीनारायण गुरू *४) पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो ?*          ०५ जून *५) पुष्करालू उत्सव कोणत्या नदीच्या काठी साजरा केला जातो ?*              कृष्णा नदीकाठी *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● बालाजी पेटेकर, खतगावकर ● शेख आसिफ ● मंगेश जाधव ● आकाश गाडे ● पोतन्ना मुदलोड ● आनंदा कुमारे ● मारोती गोडगे ● किरण भंडारी ● मन्मथ चपळे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••       *लाईक-कमेंट* मदत गेलं बाजूला लोकं फोटो काढत असतात मदत करायची सोडून ग्रुप वर धाडत असतात मदती पेक्षा लोकांना फोटो काढायची घाई आहे अपघातात मदत महत्त्वाची लाईक-कमेंट वाई आहे    शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन* ‼ ● ••• *तासन् तास पारावर बसून राहणारी मंडळी आपण पाहिली आहेत. येणा-या जाणा-याला चहा पाजणे किंवा कोणाकडून तरी चहा उकळणे एवढेच त्यांचे काम असते. अनेक तरूण-तरूणी रात्रंदिवस राजकीय पुढारी किंवा धनाढ्य शेठजींच्या अवतीभवती असतात. छोट्याशा लाभासाठी ही मंडळी आपला वेळ आणि शक्ती खर्चिला घालतात. अमक्या तमक्याशी ओळख किंवा नाते सांगण्याचे त्यांना वेड असते. अशी मंडळी आपल्या स्वत:चे आणि कुटुंबाचे वाटोळे करतात. त्यांना त्यांचे वेड काही सुचू देत नाही.* *पु.ल.देशपांडे यांनी सुखासीन नोकरी सोडून साहित्य, नाटक, कला या प्रांतात स्वछंद विहार केला. उत्कृष्ट गायक असूनही दीनानाथ मंगेशकर किंवा बालगंधर्वांनी गल्लाभरू कार्यक्रम केले नाहीत. बॅरिस्टर असूनही देशाच्या वकिलीसाठी गांधीजींनी पोटार्थी वकिली सोडून दिली. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशप्रेमापोटी हालअपेष्टा भोगल्या. बाबा आमटे यांनी कुष्ठरूग्णांच्या सेवेसाठी विटाळाचे जगणे पसंत केले. खाण्यापिण्याला फाटा देऊन गॅलिलिओ, न्यूटन, आईनस्टाईन, सी. व्ही. रामन या शास्त्रज्ञांनी जगाच्या कल्याणासाठी अहोरात्र कष्ट उपसले...याचे कारण त्यांचे वेड असते. ही सर्व मंडळी वेडी होती* *माणसाला कसले तरी वेड असलेच पाहिजे; पण ते सकारात्मक असले म्हणजे त्याचे हसे होत नाही. असले वेड आपल्याला लागले तर जगावेगळं काम आपल्याही हातून घडून शकेल.*    ••● ‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 👏👏👏👏👏👏👏👏👏 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई         9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    आतम अनुभव जब भयो, तब नहि हर्श विशाद चितरा दीप सम ह्बै रहै, तजि करि बाद-विवाद। सारांश      जेव्हा हृदयात परमात्म्याची अनुभूती होते तेव्हा सर्व सुख-दु:ख विषयक वाद आपोआप नाहीसे होतात. सुख आणि दु:ख हे केवळ मानवी मनाचे खेळ आहेत. मानवी मनाच्या प्रवृत्तीनुसार सुख- दु:खाच्या भावना निर्माण होत असतात. माणसाचे मन शांत व स्थिर असेल तर समाधानाची भावना वाढीस लागते. मनाची बेचैनी अस्थिरता निर्माण करते. मन शांती नाहीशी होते. व त्यातून आपल्याकडे काहीतरी नसल्याची मनाला टोचणी लागते. ही अवस्था म्हणजेच दु:ख. स्थिर मनोवस्थेतला माणूस अर्धवट अवस्थेतल्या प्याल्याकडे अर्धा भरलेला आहे म्हणून सकारात्मकतेने पाहतो. त्याला त्यात समाधानाची प्राप्ती होते. उर्वरित अर्धा प्याला भरण्यासाठी तो आनंदाने सामोरा जातो. ही समाधानावस्था जगणं सुसह्य करते. याउलट असमाधानी माणूस हावरटासारखा त्या प्याल्याकडे अर्धा रिकामा असल्याची खंत मनी घेवून मनाला आणखी अस्थिर करून टाकतो. त्याचा अधाशी दृष्टीकोनच त्याच्या जगण्यातील आनंद नाहिसा करतो. जीवनाकडे उदासीनतेने पाहिले की नैराश्य पदरी पडतं. सुख आणि दु:ख जीवन मार्गातले चढ उतार आहेत. उल्हसित मनानं पुढं सरकत राहिलं की ती लिलय्या पार होतात. ही अनुभूती घेवून पुढं जाता आलं पाहिजे. स्वत:च्या ठायी असणारा ठाम आत्मविश्वासंच आपल्या जगण्याला सुंदर आकार देत असतो.      आत्मविश्वास असणार्‍या माणसाचं जीवन नंदा दीपासारखं अखंडितपणे  तेवतं असतं. विधायक वृत्ती अंगिकारली की त्याचे जीवन विषयक विचार सत्याला नाकारत नाहीत. मनाची दोलायमान अवस्था नाहिशी होवून जाते. सत्य, शिव, व सुंदराची अनुभूती येवू लागते.     एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        मनुष्याच्या जीवनातला सर्वात मोठा,महत्वाचा आणि मौल्यवान जर कुठला दागिना असेल तर तो म्हणजे नम्रता हा आहे. ज्यांच्या अंगी नम्रता असेल ती व्यक्ती महनीय, आणि वंदनीय असते.ती व्यक्ती केवळ अंगी असलेल्या नम्रतेमुळे इतरांच्या हृदयावर राज्य करु शकते. ©व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍀🌸🍀🌸🍀🌸🍀🌸🍀 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *दागिना - Jewelery* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••            *दृष्टिकोन*   एका गावात दोन शेतकरी होते, दोगेही मेहनती. खूप काम करत पण मोबदला खूप कमी मिळत असत. . . त्यांचं वय झालं, दोघे देवाघरी गेले.... . . दोघे देवासमोर गेले, देवाने विचारलं, ' पुढच्या जन्मसाठी तुम्हाला काय हवं??' . . पहिला शेतकरी बोलला, '' देवा, मी या आयुष्यात खूप काम केलं...खूप मेहनत घेतली...घाम गाळला..पण मला त्याचा योग्य मोबदला नाही मिळाला..जेवढा पैसा कमवला तो खूप कमी होता, कर्ज देण्यात सर्व पैसा संपला ! मला असा आशीर्वाद दे की या जन्मी मला फक्त पैसा मिळत राहो...कुणाला काही द्यावं लागू नये...'' देव बोलला 'तथास्तु.....' . . दुसर्या शेतकर्याला देखील तोच प्रश्न देवाने विचारला. दूसरा शेतकरी बोलला, '' देवा तू मला या जन्मी जे काही दिलं त्यात मी समाधानी होतो...दोन वेळचं पोट भरत होतं आमच्या कुटुंबाचं.... पण मला एका गोष्टीचं दुख: आहे की माझ्या दारावर आलेल्या भिकार्यांना मी पोटभर जेवण देऊन पाठवू शकत नव्हतो....! या जन्मी असा आशीर्वाद दे की माझ्या दारावर आलेल्या प्रत्येक भिकार्याचं पोट मी भरू शकेल...'' देव बोलला ' तथास्तु....'!! आता ते दोघेही त्याच गावी जन्मले.....मोठे झाले....!! पण, पहिला व्यक्ति ज्याने देवाला मागितलं की मला फक्त मिळत रहावे-मिळत रहावे कुणाला काही द्यावे लागू नये....' तो बनला भिकारी, ज्याला फक्त भिक मिळू लागली....तो इतरांना काहीच देऊ शकत नव्हता....' आणि, दूसरा व्यक्ति बनला त्या गावचा सर्वात श्रीमंत व्यक्ति ' ज्याच्या घरच्या दरवाज्यासमोर आलेल्या प्रत्येक भिकार्याचं पोट भरून तो पाठवत असे....' " या गोष्टीचा तात्पर्य एवढाच की , तुम्हाला सुखी राहायचं असेल तर आगोदर दुसर्यांना सुखी ठेवायला पहा.... तुम्हाला सुख आपोआप मिळेल.. '' *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

*काटेरी कुंपण* काटेरी निवडूंग असले जरी निसर्गातील तेही वाटेकरी मोहक फुले येती त्यासी संरक्षण करते जणू पहारेकरी पर्णास धारदार काटे दिसते जरी सूईवानी असे काटे रुततील कर तया लागतील पानाफुलांनी सजलेले निवडूंग जरी काट्यातले रक्षणकर्ते फुले बळकट कुंपनापरी भासे मळवट 〰〰〰〰〰〰 ✍ ®प्रमिला सेनकुडे हदगाव जिल्हा नांदेड ☘☘☘☘☘☘☘

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00           ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 03/01/2019 वार - गुरूवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *बालिका दिन*  *ऑक्युपेशन थेरपी दिन* 💥 ठळक घडामोडी :- १९५० - पुणेयेथे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे उदघाटन. १९५२ - स्वतंत्र भारतातपहिल्या राष्ट्रीय निवडणुका. १९५७ - विद्युत घाटांवर चालणारे पहिले घड्याळ बाजारात. 💥 जन्म :- *१८३१ - सावित्रीबाई फुले, आधुनिक भारतातील प्रथम स्त्री शिक्षिका, समाजसुधारक, महात्मा जोतीराव फुले यांची पत्नी* १८८८ - कागदी स्ट्रॉचा वापर सुरू. १९१७ - कर्तारसिंग दुग्गल, पंजाबी साहित्यिक. १९२२ - चोइथराम बाबाणी, सिंधी साहित्यिक. १९३१ - यशवंत दिनकर फडके, मराठी लेखक, इतिहाससंशोधक 💥 मृत्यू :- १९७५ - ललित नारायण मिश्रा, भारतीय रेल्वेमंत्री, राजकारणी. १९८२ - अब्राहम डेव्हिड, भारतीय अभिनेता. १९९४ - अमरेंद्र गाडगीळ, मराठी बाल-कुमार लेखक. १९९८ - केशव विष्णू बेलसरे, मराठी तत्त्वज्ञानी. २००१ - सुशीला नायर, भारतीय आरोग्यमंत्री, भारतीय राजकारणी. २००२ - फ्रेडी हाइनिकेन, डच बियर उद्योगपती. २००२ - सतीश धवन, भारतीय अंतराळशास्त्रज्ञ. २००५ - जे.एन.दिक्षित, भारतीय राजकारणी. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *कोल्हापूर - चंदगड ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा, अधिसूचनेची प्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते स्थानिक भाजप नेत्यांकडे सुपूर्द करण्यात आली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *दिल्ली- एआयएडीएमकेच्या 26 खासदारांचं केलं निलंबन, वेलमध्ये उतरून गोंधळ घातल्यानं केलं निलंबित* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *ठाणे : पंतप्रधान आवास योजनेच्या ठाणे जिल्ह्यातील घरकुल लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संवाद साधला.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *ज्येष्ठ क्रिकेट प्रशिक्षक आणि क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचे गुरु रमाकांत आचरेकर यांचे वृद्धापकाळाने निधन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत शिक्षणाची वारीचा तिसरा टप्पा सेवाग्राम परिसर वर्धा येथे आज पासून सुरू* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *राज्यात थंडीचा कडाका कायम, परभणीचं आजचं तापमान 5.5 अंश सेल्सिअस, तर साताऱ्यातील वेण्णालेक परिसरात 1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *सहावेळा जगज्जेती ठरलेली मेरी कॉम मुंबई मॅरेथॉनची सदिच्छादूत* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *विशेष बातमी : हदगाव येथील 46 व्या स्काऊट गाईड नांदेड जिल्हा मेळाव्यात गोजेगाव शाळेच्या श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे मॕडम यांच्या 'वास्तव ....एक सत्य' या काव्यसंग्रहाचे उदघाटन समयी झाले प्रकाशन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• सावित्रीबाई फुले जयंती निमित्त प्रासंगिक लेख              *मी सावित्री बोलतेय* नमस्कार ..... ववबाबवव मी सावित्रीबाई ज्योतीराव फुले, माझा जन्म 03 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगांव येथे झाला. वयाच्या नवव्या वर्षी महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी माझा विवाह झाला. मला शिक्षणाचा अजिबात गंध नव्हता. पण माझे पती महात्मा फुले यांनी मला शिकविले आणि घडविले. पुण्यात भिडेच्या वाड्यात मुलींसाठी त्यांनी पहिली शाळा काढली. पण तिथे मुलींना शिकविण्यासाठी कोणीही तयार होत नव्हते. तेंव्हा ज्योतिबानी मला याठिकाणी शिकविण्यासाठी............. वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/01/blog-post.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *यशवंत दिनकर फडके* यशवंत दिनकर फडके (जानेवारी ३, १९३१ - जानेवारी ११, २००८) हे मराठी चरित्रलेखक, इतिहाससंशोधक होते. ते २०००  साली  बेळगाव  साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यांचा जन्म सोलापूर येथे जानेवारी ३, १९३१  रोजी झाला. त्यांचे वडील स्वातंत्र्य चळवळीत  उतरले होते. स्वातंत्र्य चळवळीमुळे वडिलांचे कुटुंबाकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे फडक्यांना शिक्षणासाठी बरीच धडपड करावी लागली. सोलापुरातील ’हरीभाऊ देवकरण हायस्कूल’ शाळेत त्यांचे शालेय शिक्षण झाले. शालेय शिक्षण चालू असताना त्यांनी द्वा.भ. कर्णिकांच्या ’संग्राम’ वृत्तपत्रातून लेखनही केले. १९४७ साली मॅट्रिक परिक्षा उत्तीर्ण झाल्यावर महाविद्यालयीन शिक्षणाकरता ते पुण्यास गेले. राज्यशास्त्र हा विषय घेऊन पुणे विद्यापीठातून त्यांनी बी.ए. (१९५१) व एम्‌.ए. (१९५३) या पदव्या मिळवल्या. पुढे १९७३ साली त्यांनी मुंबई विद्यापीठाकडून  पीएच्‌. डी. पदवी मिळवली. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• असत्य हे अपंग प्राण्याप्रमाणे असते, दुसऱ्याच्या आधाराशिवाय ते कधीच उभे राहू शकत नाही. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१)  रिडल्स इन हिंदुइझम हा ग्रंथ कोणी लिहिला?* 👉    डॉ. आंबेडकर *२)  भीमा व कृष्णा खोरी कोणत्या डोंगररांगामुळे विभक्त झाली  आहेत?* 👉   महादेव *३)  दूरदर्शनने सुरू केलेली सर्वात पहिली मालिका कोणती?* 👉      श्वेतांबरा *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● ज्ञानेश्वर विजागत, सहशिक्षक, सोलापूर ● विठ्ठल सुवर्णकार, धर्माबाद ● रतन बहिर, भीर, महाराष्ट्र ● शुभांगी परळकर, नांदेड ● माधव पवार, पत्रकार, नायगाव ● संदीप जाधव, देगलूर ● प्रशांत बोड्डेवाड, येवती ● वीरेंद्र डोंगरे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      *मांजर* मांजर डोळे झाकून दूध पीत असते तिला वाटते कोणीच काही पहात नसते तिने डोळे झाकले तरी जग सारे पहात असते तिचे सारे पराक्रम सा-या  जगाला माहित असते     शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *प्रचंड थकवा आल्यानंतर, दमल्यानंतर हळूहळू आपण आपला मूळ लयीतला श्वास गवसणं किती विलक्षण असतं. स्वत:चा ठाव लागणं, स्वत:चा थांग लागणं, जणू पुनर्जन्मच. म्हणून जगण्याच्या सुलभीकरणात थकवा गमावून बसू नये. थकव्या थकव्यात फरक करावा. प्राणपणानं जीव लावून खरंखुरं थकावं आणि थकव्याच्या गर्भातून स्वत:चं सर्जन होताना अनुभवावं. अर्थात इतकं सगळं घडलं तरी बाहेरच्या जगाला तुम्ही निव्वळ दमलेले, थकलेले दिसता. त्यांना जाणवतं की, तुमचा श्वास फुललाय, छातीचा भाता वरखाली होतोय. तुमच्या आप्तांना तुमची चिंता वाटते. त्यांना वाटतं की, तुम्ही इतकी दगदग करू नये. सकस, पौष्टिक अन्न खावं. आप्तांची चिंता रास्त असते.* *तरीसुद्धा आपली शक्ती पणाला लावून थकणं-दमणं योग्य असतं. थकण्याला घाबरून, न थकण्याचे उपाय शोधणं हा सर्वथा अलाभाचा व्यवहार आहे. त्यानं थकणं घटेल आणि आपले नवनवे जन्मही घटतील. श्वास फुलल्याशिवाय कसं कळणार श्वास घेतो आपण, छातीचा भाता वरखाली झाल्याशिवाय कसं कळणार की, प्राणवायुचं चलनवलन किती सुखाचं असतं. तो फुफ्फुसांना व्यापतो म्हणजे काय होतं हे कसं समजणार ? श्वासोच्छ्वासानं शरीरावर उठणा-या लाटांचं उठणं-विरणं कसं निरखता येणार? शक्तीपाताच्या अग्रावर जाऊन कोसळण्याच्या क्षणी स्वत:चा थांग सापडण्याची धडधड ऐकू येण्याला तुलना नाही. हेच थकव्यातलं सर्जन आणि हाच सर्जनाचा थकवा..!*    ••● ‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई         9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    लिखा लिखि की है नाहि, देखा देखी बात दुलहा दुलहिन मिलि गये, फीकी परी बरात। सारांश       विधात्याला जाणून घ्यायचं  असेल तर केवळ पोथ्या  पुराणे वाचून तो कसा काय कळणार ? वाचन व श्रवणात माणूस परमात्म्याच्या मुळ रूपापेक्षा त्याच्या कपोल कल्पित व वर्णनातून रंगवून चढवून सांगितलेल्याच रूपाभोवती घिरट्या मारीत राहातो. पुस्तकातून रंगवलेल्या कथा ह्या विधात्याच्या थोड्याच आहेत. त्या तर मानवाच्या पूर्वजांच्या.  तत्कालीन राजा महा राजांच्या युद्ध प्रसंगाच्या , सत्ता विस्ताराच्या , अधिराज्य प्रस्थापित करण्याच्या . दोन विचार प्रवाहातील संघर्षाच्या. भावबंदकीच्या कलहाच्या . महाकाव्यातल्या पात्रांनाच माणूस देवाची रूप माणू लागला. त्यांचीच उपासना करू लागला. मुळ विश्व व्यापक परमात्मा पंच महाभुतात सामावलेला. सृष्टीचालक मुळ ईश्वर बाजुलाच राहून गेला. मंगेश पाडगावकरांच्या गीत पंक्ती किती बोलक्या आहेत. कुढे शोधिशी रामेश्वर अन कुठे शोधीशी काशी हृदयातील भगवंत राहिला राहिला हृदयातून उपाशी.. देव बोलतो बाळ मुखातून देव डोलतो उभ्या पिकातून कधी होवून देव भिकारी अन्नासाठी आर्त पुकारी अवतीभवती असून दिसेना शोधितोस आकाशी....      खरे तर परमात्मा ही पाहाण्याची आणि प्रत्यक्ष अनुभवण्याची बाब आहे .  जेव्हा वधू वराची एकत्र गाठ मारली जाते तेव्हा वर्‍हाडी व वरातीचं आकर्षण नाहिसं होतं तसं  ईश्वराच्या मुळ स्वरुपाशी एकरूपता साधताच वरवरच्या भाकड गोष्टींचा लेप आपोआपच गळून जातो.      एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• बोलणारी आणि बोलण्याप्रमाणे कृती करणारी व्यक्ती ही अतिशय संवेदनशील आणि कर्तव्यतत्पर समजली जाते. अशा व्यक्ती फार कमी प्रमाणात पहायला मिळतात. अशा व्यक्तींच्या सहवासात राहिले तर आपल्यातील आळशीपणा आणि कामामध्ये टाळाटाळ करण्याच्या वृत्तीला लगाम घातल्या जाऊन आपल्यामध्ये सुप्त असलेल्या क्रियाशिलतेला अधिक प्राधान्य मिळते व जीवनात चांगले जीवन जगण्यासाठी योग्य दिशा मिळते. © व्यंकटेश काटकर नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🎄🌸🎄🌸🎄🌸🎄🌸🎄🌸🎄 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••          *सोबत - Along with* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *इच्छाशक्तीचा बळावर जग जिंकता येते.* केवळ सव्वा वर्षांची असताना मेंदुज्वरामुळे दृष्टी आणि ऐकण्याची क्षमता गमावलेली एक मुलगी आज जगविख्यात लेखिका म्हणून नावारूपाला आली आहे. तुम्हाला हा चमत्कार वाटत असेल तर, त्याची जनकही हीच मुलगी आहे. हेलेन केलर असे या मुलीचे नाव.  आपल्या केवळ इच्छाशक्तीच्या बळावर तिने आपल्या कठीण मानल्या जाणार्‍या आजारालाही नियंत्रित केले. ज्या वयात तिचे खेळायचे-बागडायचे दिवस होते, त्या वयात तिच्या पुढ्यात केवळ अंधार होता.  आजारामुळे तिला सुरुवातीला नैराश्य आले होते. तिच्या पालकांनी मग तिची जबाबदारी एनी सुलियन यांच्याकडे सोपवली. अगदी ब्लॅक चित्रपटात अमिताभ ज्या पद्धतीने राणी मुखर्जीला स्पर्शाची भाषा शिकवतो. अगदी त्याच पद्धतीने एनीने हेलेनला स्पर्शाची भाषा शिकवली.  यानंतर एनीने तिला भाषा शिकवण्यासाठी जिवाचे रान केले. तिला प्रथम हाताने भाषा शिकवत शब्दांचे अर्थ तिला समजावले. यानंतर हेलरच्या मनात नवीन उमेद जागी झाली. हेलरने यानंतर कधीही मागे वळून पाहायचेच नाही हे ठाम केले.  तिच्यात एक अशी ऊर्जा निर्माण झाली, की या ऊर्जेने तिला नवीन दृष्टी दिली, आणि ही ऊर्जा होती तिच्या इच्छा शक्तीची. या बळाच्या आधारेच तिने रेडक्लिफ महाविद्यालयातून आपली पदवी मिळवली. या दरम्यान हेलेनचे पहिले पुस्तक 'द स्टोरी ऑफ लाईफ' प्रकाशित झाले. यानंतर याचे जवळपास 50 भाषांमध्ये या पुस्तकाचे भाषांतर करण्यात आले.  इथे हेलन यांच्या केवळ इच्छाशक्तीचाच विजय झाला. त्यांनी बालपणातच जर हार मानली असती तर जगाला इतकी प्रतिभाशाली लेखिका मिळालीच नसती. म्हणूनच केवळ इच्छाशक्तीच्या बळावरच आपण विजय मिळवू शकतो हे विसरता कामा नये. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00           ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 07/01/2019 वार - सोमवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :-  १७८९: अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून जॉर्ज वॉशिंग्टन निवडून आले. १९७२: कन्याकुमारी येथील विवेकानंद केन्द्राचे काम पूर्ण झाले. 💥 जन्म :- १८९३: स्वातंत्र्य वीरांगना जानकीदेवी बजाज १९२०: लोकसाहित्याच्या अभ्यासक सरोजिनी बाबर १९२१: अभिनेते चंद्रकांत गोखले १९२५: स्वातंत्र्यवीर सावरकर यांची कन्या प्रभात १९४८: विदुषी व लेखिका शोभा डे 💥 मृत्यू :-  २०००: विद्यार्थी सहायक समितीचे संस्थापक व स्वातंत्र्यसैनिक डॉ. अच्युतराव आपटे  *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *नवी दिल्ली - उत्तर भारतात थंडीची लाट, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये हिमवृष्टी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मोदी सरकारनं 50 कोटी जनतेला दिलं आरोग्य कवच - भाजपा अध्यक्ष अमित शहा* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *नयनतारा सहगल यांचं निमंत्रण साहित्य संमेलन आयोजकांकडून रद्द* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *देशातील 10 ठिकाणांहून शिर्डीसाठी विमानसेवा सुरू होणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *ओरिसाचे कृषिमंत्री प्रदीप महाराठी यांचा राजीनामा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *हिमाचल प्रदेश- शिमल्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 5 बर्फवृष्टीमुळे बंद* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *Ind vs Aus 4th test - सिडनी कसोटीत ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 300 धावांवर संपुष्टात, कुलदीप यादवचे पाच बळी, भारताला 322 धावांची आघाडी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बातम्यांची audio clip ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे. Follow me on Share Chat *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    *एकच ध्यास ; वाचन विकास* शिक्षण प्रक्रियेतील वाचन हे एक प्रमुख कौशल्य आहे. ज्यावर विद्यार्थ्यांची भविष्यातील प्रगती अवलंबून असते. भाषा विकासातील श्रवण व भाषण यानंतरचा टप्पा म्हणजे वाचनकौशल्याचा. प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ स्टुअर्ट रिची यांनी आपल्या संशोधनात असे म्हटले आहे की, मुलांची वाचन क्षमता आणि त्याला किती लहान वयात वाचन करता येते त्यावर त्याची पुढील प्रगती अवलंबून ........... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/01/blog-post_6.html वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ लेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *चंद्रकांत रघुनाथ गोखले* चंद्रकांत रघुनाथ गोखले (जानेवारी ७, इ.स. १९२१, मिरज, सांगली संस्थान - जून २०, इ.स. २००८, पुणे, महाराष्ट्र) हे मराठी नाट्यअभिनेते, चित्रपट अभिनेते आणि गायक होते. मराठी अभिनेत्री कमलाबाई गोखले या यांच्या आई होत्या. यांचे पुत्र विक्रम गोखले हे देखील अभिनेते आहेत. यांनी वयाच्या नवव्या वर्षी ’पुन्हा हिंदू’ या नावाच्या मराठी नाटकाद्वारे अभिनयक्षेत्रात पदार्पण केले. ७ दशकांहून अधिक काळाच्या कारकिर्दीत यांनी साठाहून अधिक मराठी नाटकांतून व साठाहून अधिक मराठी चित्रपटांतून अभिनय केला आहे. त्यांनी भूमिका केलेल्या नाटकांपैकी  भावबंधन,  राजसंन्यास,  पुण्यप्रभाव, बेबंदशाही, राजे मास्तर, बॅरिस्टर, पुरुष  ही प्रमुख नाटके होत. मराठीशिवाय त्यांनी काही हिंदी चित्रपटांमधूनदेखील भूमिका रंगवल्या.      *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१)  महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे?* 👉     शेकरू *२)  औरंगाबादला किती दरवाज्याचे शहर म्हणून ओळखल्या जाते?* 👉      ५२ *३)  जागतिक जलदिन म्हणून कधी साजरा केल्या जातो?* 👉     २२मार्च              *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● कुणाल पवारे, कुंडलवाडी ●  धनाजी माडेवार ●  शिवाजी गुजेवार ●  धनराज बनसुडे ●  संजय पवार ●  रमेश माने ●  आबासाहेब निर्मले ●  रघुनाथ नोरलावार ● संतोष कोयलकोंडे ● पद्माकर मुळे ● रवी पुपलवार ● राजकुमार धावडकर *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        *नशा* सत्तेची नशा तर कुठेही न्यारीच असते ज्याची सत्ता त्याचे जरा भारीच असते सत्ता आली की वेगळी नशा चढते सांगायच्या आधी हे सारेच घडते   शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *अलीकडे असण्यापेक्षा दिसण्यावर लोक जास्त लक्ष देतात. सुंदर दिसण्याचा मार्ग सुंदर असण्यातून जातो; हे न कळल्यामुळे दर महिन्याचा काॅस्मेटिकवरचा खर्च आतोनात वाढलेली कुटुंबे सर्वांच्या आसपास मोठ्या प्रमाणात आहेत. मेकअपपेक्षा मनाच्या मेकओव्हरची गरज आहे; हे त्यांना कुणीतरी सांगायला हवे. योगासने केल्याने, पालेभाज्या, फळे खाल्ल्याने आणि सकारात्मक दृष्टी ठेवल्याने तुम्ही दिवसभर तजेलदार राहता. एक सात्विक उर्जा कायम आपल्या आत दर क्षणी नव्याने जन्म घेत असते. मग कोणत्याही काॅस्मेटिकची गरज पडत नाही. तारूण्य सतत आपल्या आत उमलते; परिणामी आपण कांतिमान दिसतो.* *तेजस्वीता, तत्परता आणि तन्मयता हे तारूण्याचे तीन 'त' कार असतात. या तीन गोष्टी ज्याच्याकडे आहे. तो 'तरूण'! आज लौकिक अर्थाने तरूण असणा-यांकडे या तीन गोष्टी दिसतात का ? या प्रश्नाचे उत्तर शंभर टक्के, ठामपणे कुणालाही देता येणार नाही; कारण तशी परिस्थिती नाही. पिझ्झा-बर्गर हेच पूर्णान्न मानणा-या पिढीकडून तेजस्वीपणाची अपेक्षा ठेवणे वेडेपणाचे आहे.* संजय नलावडे, चांदीवली, मुंबई         9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• दूजा हैं तो बोलिये, दूजा झगड़ा सोहि दो अंधों के नाच मे, का पै काको मोहि। सारांश         विधाता निर्गुण  निराकार आहे. तो सर्व विश्व व्यापून उरलेला आहे. तरी त्याची विभिन्न मुर्त रूपे उभी करून एकमेकात  विनाकारणंच भांडून घेणार्‍यास उद्देशून महात्मा कबीर म्हणतात परमात्मा वेगवेगळा असता तर तुमचं म्हणणं मान्य केलं असतं. माझाच देव श्रेष्ठ आहे व इत्तरांचा चुकीचा आहे असे माणण्यातच तर भांडणाचं मुळ दडलेलं आहे. तेच  भांडणाला कारण ठरतं. दोन अंधांच्या नाचण्यावर कोण अांधळा कोणत्या कारणाने  त्या अंधावर मुग्ध किवा  प्रसन्न होईल ?       लिळाचरित्रात आंधळ्यांचा दृष्टांत सांगितलेला आहे. एका गावात सहा आंधळे असतात. त्यागावी एक हत्ती येतो. आंधळ्यांना हत्ती पाहाता येत नाही. प्रत्येक आंधळा आपआपल्या परीने हत्तीला चाचपून घेतो. त्यांना झालेल्या स्पर्श ज्ञानावरून ते हत्तीच्या रूपाचं वर्णन करायला लागतात. ज्याच्या हाती कान लागला, तो हत्ती सुपासारखा असल्याचे सांगतो. ज्याने सोंड चाचपली, तो हत्ती मुसळासारखा आहे म्हणतो. ज्याने पाय चाचपले, तो हत्ती खांबासारखा असल्याचे सांगतो. ज्याचा स्पर्श हत्तीच्या पोटाला झाला, त्याचे म्हणणे असते हत्ती पोत्यासारखा आहे. ज्याने पाठ चाचपून घेतली, तो हत्ती भिंतीसारखा असल्याचे सांगतो. ज्याने शेपटीला स्पर्शलेले असते, त्याला हत्ती खराटा म्हणजे झाडूसारखा भासतो. शेजारीच त्यांचा संवाद ऐकणारा एक डोळस असतो. त्याने पूर्ण हत्ती पाहिलेला असतो. तो संवाद ऐकून म्हणतो, तुम्ही तर फक्त हत्तीच्या अवयवांनाच हत्ती समजत आहात . प्रत्यक्षात हत्ती तर महाकाय आहे.       तसं विधात्याचं स्वरूपही विश्वात्मक आहे.तो सर्वव्यापी आहे. त्याला जाणण्याची आत्मदृष्टी जवळ असायला हवी.     एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• सोन्यासारख्या मौल्यवान धातूंच्या सानिध्यात लोखंडासारखा एखादा तुकडा जरी आला तरी त्या तुकड्याला सोन्याचाच तुकडा समजायला लागतात.कारण सहवास सोन्याचा असतो म्हणून. अशाचपध्दतीने सज्जनांचा सहवासात साधारण माणसे जर आली तर त्यांच्यातील असणारे दुर्गूण सज्जनांच्या सहवासाने काही प्रमाणात कमी होऊन तेही सज्जन होण्यास कारणीभूत ठरतात. म्हणून आपल्यातील काही दुर्गूण असतील तर ते दूर होण्यास सज्जनांची संगतच हवी.जीवनात दुर्जनांच्या संगतीत राहण्यापेक्षा सज्जनांच्या संगतीत राहणे केव्हाही चांगले. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••          *रक्षण - Protect* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••            *स्वतःमध्ये बदल* *कोकिळ पक्षी कधी स्वतः घरटे बांधत नाही. अंडी घालायची वेळ आली म्हणजे कोकिळा आपली अंडी एखाद्या कावळ्याच्या घरट्यात घालते. पिल्ले बाहेर पडून उडू लागेपर्यंत कावळा त्यांचे रक्षण करतो. एकदा एक कोकिळा एका घुबडाजवळ येऊन त्याला म्हणाली, 'घुबडदादा, हे कावळे किती दुष्ट आहेत पहा ! माझी अंडी पूर्ण विश्वासाने मी त्यांच्या स्वाधीन करतो. पण याबद्दल ते मला काय बक्षीस देतात पहा ! मी कुठेही एकटी सापडले तर ते माझा पाठलाग करून जीव नकोसा करतात. ही काय त्याची रीत झाली ?' घुबड म्हणाले, 'अग कृतघ्न कोकिळे, तुझ्या पिल्लांना तू टाकून दिलंस, त्यावेळी ज्या कावळ्यांनी मायेने त्यांना वाढवलं, त्यांचे उपकार तू विसरून जातेस, त्या अर्थी कावळे तुला टोचतात हेच योग्य.'* *तात्पर्य:- दुसर्‍याला उपदेश करण्या अगोदर आपल्यातील दोष दूर करून वागणूकीत बदल केलेला  कधीही चांगले असते.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00           ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 05/01/2019 वार - शनिवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १६७१ - छत्रपती शिवाजी महाराजांनी साल्हेर मुघलांकडून काबीज केले. १८३२ - दर्पण या मराठी वृत्तपत्राचा पहिला अंक प्रकाशित १९२४ - महाड महानगरपालिकेने चवदार तळे अस्पृश्यांसाठी खुले केले १९४९ - पुणे यथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी ही संस्था सुरू झाली १९५७ - भारतात विक्रीकर कायदा लागू झाला. 💥 जन्म :- १८६८ - गणेश दत्तात्रय सहस्रबुद्धे उर्फ दासगणू, मराठी संतकवी १८८३ - खलील जिब्रान, अरब कवी, तत्त्वज्ञानी व चित्रकार १८९२ - कृ.पां. कुळकर्णी मराठी भाषेचे अभ्यासक. १८९३ - परमहंस योगानंद, भारतीय तत्त्वज्ञानी.१९१३ - श्रीपाद नारायण पेंडसे, मराठी साहित्यिक. १९२५ - रमेश मंत्री, मराठी साहित्यिक . १९२८ - विजय तेंडुलकर, मराठी साहित्यिक . 💥 मृत्यू :- १९७१ - पी.सी.सरकार, भारतीय जादूगार. १९८२ - रामचंद्र चितळकर उर्फ सी.रामचंद्र, भारतीय संगीतकार. १९९० - रमेश बहल – चित्रपट निर्माता व दिग्दर्शक २००४ - ज्येष्ठ चित्रकार गजानन नारायणराव जाधव. २०१८- राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानपरिषदेचे माजी उपसभापती वसंत डावखरे *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ••••••••••••••••••••••••••••••••••••• 1⃣ *मराठी भाषा ज्ञानभाषा व्हावी. २१ व्या शतकातील तत्व, व्यवस्थेनुसार मराठी अग्रेसर झाली पाहिजे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *नागपुरात १६ व्या जागतिक मराठी संमेलनाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले.* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *नांदेड: वंचित बहुजन आघाडीकडून नांदेड लोकसभेसाठी उमेदवार जाहीर. धनगर समाजाचे नेते प्रा. डॉ. यशपाल भिंगे लढणार नांदेड लोकसभा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *07 जानेवारी पासून बेस्टचे कर्मचारी संपावर जाणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *वेतनवाढीच्या मागणीसाठी टपाल खात्याच्या रोजंदारी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन, कामावर फारसा परिणाम नाही* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *आरोग्यमंत्री दीपक सावंत राजीनामा देणार; 7 जानेवारीला सावंत यांच्या आमदारकीचा कार्यकाळ संपणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारत वि. ऑस्ट्रेलिया तिसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर भारताकडे 598 धावांची आघाडी, ऑस्ट्रेलिया बिनबाद 24* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *बोलण्याचे संस्कार* आपल्यावर बोलण्याचे संस्कार आहेत काय ?असे कोणी विचारणा केली तर आपण संभ्रमात पडतो. बोलण्यासाठी कोणत्या संस्काराची गरज आहे ? किंवा तसे संस्कार करता येतात काय ? याविषयी आपण लहान असताना नकळत विचार करतो मात्र त्यास बोलण्याचे संस्कार.......... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/10/blog-post_25.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••            पवनार आश्रम पवनार हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील वर्धा तालुक्यातील वर्धा शहरापासून ६ की.मी. अंतरावर असलेले एक गाव आहे. आचार्य विनोबा भावे यांचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यात मोलचे योगदान लाभले. भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी त्यांनी संपूर्ण भारतभर भूदान चळवळ उभारली. आश्रम - या गावी धाम नदीचे तीरावर आचार्य विनोबा भावे यांचा आश्रम आहे. हा आश्रम १५ एकर जागेवर् विस्तारलेला आहे. ह्यात खुप् जैविक विविधता आहे. अनैसर्गिक गोष्टींनपासून खुप दुर आणि निसर्गाच्या सान्निध्यात वसलेल्ला असा हा आश्रम ईथे येणार्या लोकांना आकर्शित करतो. ईथे येणारे बहुतेक लोक उच्च शिक्शित असतात. भुदान आंदोलनाचे प्रणेते विनोभा भावे यांनी हा आश्रम सुरु केला. विनोभांनी हा आश्रम खास करून् महिलांसाठी चालु केला. ईथे येणार्या महीला साध्वी (मीराबाई सारख्या) जिवनाच्या उपासक होत्या. आश्रमात रहाणार्या महीला याला ब्रह्म विद्या मंदिर म्हणून संबोधत. सध्या ह्या आश्रमाचे व्यवस्थापक विनोबा भावेके सहयोगी, श्री गौतम बजाज आहेत. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• राष्ट्र निर्माण करायचे असेल तर आधी राष्ट्रनिष्ठा निर्माण करायला हवी. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) कटक हे शहर कोणत्या नदीच्या किनारी वसलं आहे ?* महानदी *२) केंद्रीय सिसा संशोधन संस्था कोठे आहे ?* गडसा कुलू (हिमाचल प्रदेश) *३) रिव्हॉल्व्हरचा शोध कोणी लावला ?* सॅम्युअल कोल्ट *४) देशात सर्वाधिक शाखा असणारी बँक कोणती ?* भारतीय स्टेट बँक. *५) विश्‍वाच्या उत्पत्तीचा अभ्यास करणारे शास्त्र कोणते ?*              कॉस्मोलॉजी *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● सुरेंद्र अकोडे ● भाऊसाहेब चासकर ● सिंकदर डोंगरे ● गणराज गुरुपवार ● संजय घोगरे ● व्यंकटी केंद्रे ● राजकुमार बेरलीकर ● नितीन उत्तरवार ● लक्ष्मण मिरदुडे ● लक्ष्मीकांत पवार ● माधव रामपुरे ● किशन कांबळे ● प्रभाकर मिरेवाड ● बजरंग राजापूरकर *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *घमंड* वय अन् पैशाची घमंड करता येत नाही हे कायम राहील विश्वास धरता येत नाही जे मोजता येत ते नक्की नष्ट होतं नको त्याचा घमंड वाईट हे स्पष्ट होतं शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सज्जनत्वाच्या अनेकविध कसोट्यांपैकी एक म्हणजे व्यक्तीचे बोलणे होय. माणसाच्या जिभेवर खडीसाखर असली तर त्याची न होणारी, लांबणारी कामेसुद्धा झटक्यात होतात याचा अनुभव अनेकदा येतो. वाणीतील मवाळपणा माणसाला कुठच्या कुठे घेऊन जाणारा ठरला असल्याची अनेक उदाहरणे इतिहासात आहेत. व्यक्तीजवळ इतर कोणतेही धन नसेल तरी एकवेळ चालेल; पण त्याच्या जीवनव्यवहारात गोडवा हवा. त्याच्याशी बोलावे, नाते निर्माण करावे असा मोह जेव्हा इतरांना होतो तेंव्हा तो त्याचा जीवन-विजय असतो.* *लोक अनेकदा स्पष्टवक्तेपणाच्या नावाखाली दुस-याला दुखावतात, त्यांचा अपमान करतात; पण असे करणे चांगले नव्हे. मार्दवाने बोलल्यास कमीपणा येतो, आपली बाजू सत्याची असली तरी लोक साशंकतेने पाहतात, त्यात ठाशीवपणा नसतो, असा काही लोकांचा गैरसमज असतो. मोठ्याने, ओरडून बोलले तरच समोरचा नमतो, त्याच्यावर प्रभाव पडतो असे मानणे वेडेपणा आहे. ज्याला चांगुलपणाची आस असते, त्याच्या मवाळतेच्या चर्चा सर्वदूर पसरलेल्या असतात. बोलण्यातील मऊपणा म्हणजे दुय्यमत्व नव्हे. ते तुमच्या प्रभावी व्यक्तीमत्वाचे एक लक्षण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुणवर्णनातील वैशिष्ट्ये वाचली की, त्यांनी जे विराट काम केले, त्यांनी डोंगराएवढी माणसे प्राणपणाने जपली त्यात त्यांच्या स्नेहार्द्र वाचेचा वाटा सर्वोच्च होता.* ••● ‼ *रामकृष्णहरी* ‼ ●•• 🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई         9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्ञानी तो निर्भय भया, मानै नहीं संक इन्द्रिन केरे बसि परा, भुगते नरक निशंक। सारांश ज्ञानी सदा सर्वदा निर्भय असतो. कारण ज्ञानी माणसाला सर्व घटना घडामोडींमागील कार्यकारण भाव लक्षात येतो. अज्ञानी मात्र घटना घडामोडीमागील कार्य कारण भाव लक्षात न आल्यामुळे त्या घटनेला चमत्कार समजू लागतो. प्रत्येक घडामोडीमागे शास्त्र असते. वरवरचा विचार करणार्‍यांना ही घडामोड म्हणजे जादू किवा चमत्कार वाटते. चतुर माणसे अज्ञानी माणसांच्या अज्ञानाचा फायदा उठवत स्वतःचा स्वार्थ साधत असतात. मात्र ज्ञानी, सर्वज्ञ अशा चतुर व फसव्यांच्या ढोंगांना बाधत नाहीत. त्यांनी सृष्टीत सामावलेला परमात्मा जाणलेला असतो. परमात्माच्या रूपाबद्दल ते निशंक असतात. माणूस ज्ञानी असूनही तो जेव्हा माया मोहाच्या भ्रमात फसतो. षडविकारांच्या आहारी जातो, तेव्हा त्याच्या विचार वृत्ती दोलायमान होतात. विवेकी वृत्ती कचमरू लागते. जिथे फसव्या गोष्टी डोळसपणावर पांघरण घालू लागतात, तिथे सत्य व विवेक दबला जातो. चारित्र्यवान माणूसही अधःपतित होतो. त्याला सत्याकडे केलेल्या डोळेझाकीचे परिणाम भोगावे लागतात. म्हणून माणसाने सारासार विचाराने इंद्रियांवर अंकुश ठेवला पाहिजे. इंद्रियांवर विजय मिळविणारा जीतेंद्रीय असतो. त्याला जगातल्या कुठल्याही शक्ती विचलित करू शकत नाहीत. स्वतःला इंद्रियांचा दास बनविता कामा नये.     एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• दैनंदिन जीवनात नाना प्रकारची माणसे सहवासात येतात. त्यापैकी काही माणसांचा सहवास नित्य हवासा वाटतो कारण त्यांच्याकडून काही ना काही आपल्याला शिकायला मिळते. ते उदार अंतःकरणाने कशाचीही अपेक्षा न करता देत असतात.ते कधीही गर्वाने किंवा कसल्याही अपेक्षेने कार्य करत नाही.ते स्वत:ही शांत आणि संयमी वृत्तीने वागत असल्याने जणू विशाल सागराप्रमाणेच रहाणे पसंत करतात.प्रत्यक्ष जीवनात इतरांनाही घेऊन चालतात.अशांचा सहवास लाभणे म्हणजे एक भाग्यच असावे लागते. तर काही माणसे अशी भेटतात की,त्यांचा सहवास नकोसा वाटतो.त्याचे कारणही तसेच असते.सतत काही ना काही काम नसताना निरर्थक बोलणारी,मी म्हणजेच सारे काही म्हणणारी अहंकाराने भरलेली,जे काही चालते ते माझ्यामुळेच अशी म्हणणारी,अशा माणसांचा स्वभाव म्हणजे एखाद्या उथळ पाण्यासारखा खळखळणारा असतो तो काही काळ खळखळ वाहतो आणि नंतर आवाज बंद होतो.अशा माणसांकडून काय अपेक्षा करणार आणि त्यांचा कोणता गुण घेणार असा प्रश्न उपस्थित राहतो.अशांचा सहवास आपल्या जीवनात कधीकधी घातक होऊ शकत़ो.म्हणून आपल्या जीवनाचे खरेच सार्थक करुन घ्यायचे असेल तर योग्य विचार करुनच योग्य सहवासाची निवड करावी व आपले जीवन चांगल्या पध्दतीने जगावे. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••          *उदार - Generous* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••     *स्वतःमध्ये बदल* *कोकिळ पक्षी कधी स्वतः घरटे बांधत नाही. अंडी घालायची वेळ आली म्हणजे कोकिळा आपली अंडी एखाद्या कावळ्याच्या घरट्यात घालते. पिल्ले बाहेर पडून उडू लागेपर्यंत कावळा त्यांचे रक्षण करतो. एकदा एक कोकिळा एका घुबडाजवळ येऊन त्याला म्हणाली, 'घुबडदादा, हे कावळे किती दुष्ट आहेत पहा ! माझी अंडी पूर्ण विश्वासाने मी त्यांच्या स्वाधीन करतो. पण याबद्दल ते मला काय बक्षीस देतात पहा ! मी कुठेही एकटी सापडले तर ते माझा पाठलाग करून जीव नकोसा करतात. ही काय त्याची रीत झाली ?' घुबड म्हणाले, 'अग कृतघ्न कोकिळे, तुझ्या पिल्लांना तू टाकून दिलंस, त्यावेळी ज्या कावळ्यांनी मायेने त्यांना वाढवलं, त्यांचे उपकार तू विसरून जातेस, त्या अर्थी कावळे तुला टोचतात हेच योग्य.'* *तात्पर्य:- दुसर्‍याला उपदेश करण्या अगोदर आपल्यातील दोष दूर करून वागणूकीत बदल केलेला  कधीही चांगले असते. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00           ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📱 9423625769 📅 दि. 04/01/2019 वार - शुक्रवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  *आंतरराष्ट्रीय ब्रेल दिन* 💥 ठळक घडामोडी :-  १८८१ - लोकमान्य टिळकांनी केसरी वृत्तपत्र सुरू केले. २००४ - नासाची मानवरहित गाडी, स्पिरिट, मंगळावर उतरली. 💥 जन्म :- १९१४ - इंदिरा संत, मराठी कवियत्री १९३७ - सुरेंद्रनाथ, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :-  १८५१ - दुसरे बाजीराव पेशवे कानपूरजवळ ब्रह्मावर्त येथे निधन. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••• ••••••••••••••••••••••••••••••••••••• 1⃣ *इंग्रजी साहित्यिकाच्या हस्ते उद्घाटन हा मराठी सारस्वतांचा अपमान; यवतमाळचे मराठी साहित्य संमेलन उधळून लावण्याचा मनसेचा इशारा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *गेल्या दोन वर्षात उत्तर प्रदेशात एकही दंगल झाली नाही- योगी आदित्यनाथ* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *सिंधुदुर्ग : जिल्हा परिषद अध्यक्षपदी संजना सावंत यांची बिनविरोध निवड, स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *आणखी 900 गावांत दुष्काळ जाहीर होणार; मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय, राज्य सरकारकडून आज किंवा उद्या जीआर काढला जाण्याची शक्यता* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *महात्मा फुले दांपत्याला भारतरत्न देण्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *नाटककार महेश एलकुंचवार यांना राज्य शासनाचा यंदाचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार जाहीर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारत वि. ऑस्ट्रेलिया तिसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवसअखेर भारत 4 बाद 303* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• सन 1998 मध्ये प्रचंड गाजलेली पुस्तिका खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत...           *चंदर - किशोर कादंबरी* खालील ब्लॉगवर *भाग अकरावा* वाचन करता येईल. https://shabdghar.blogspot.com/2018/12/blog-post_31.html वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ लेखक  *अरुण वि. देशपांडे, परभणी/पुणे* 9850177342 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••          *कवयित्री इंदिरा संत* इंदिरा संत (जानेवारी ४, १९१४, इंडी - जुलै १३, २०००, पुणे) या मराठी कवयित्री आणि कथालेखक होत्या. शिक्षकीपेशा स्वीकारलेल्या इंदिरा संतांनी लहान मुलांच्या कथा लिहून आपल्या लिखाणाला प्रारंभ केला. १९५० च्या दशकात त्यांनी स्त्रीवादी कविता लिहण्यावर आपले लक्ष केंद्रित केले. आई, पत्नी, मुलगी या नात्यांतून भारतीय स्त्रीचे दिसणारे खडतर जीवन त्यांनी आपल्या कवितांमधून हळुवारपणे मांडले आहे. इंदिरा संत आणि त्याचे पती ना.मा. संत या दोघांच्या कवितांचा एकत्रित असा संग्रह 'सहवास' या नावाने १९४० ला प्रसिद्ध झाला. दुर्दैवाने ना.मा. संत यांचे १९४६ साली निधन झाले. वेळीच सावरून या घटनेचा इंदिरा संत यांनी आपल्या कवितेवर परिणाम होऊ दिला नाही. विशुद्ध रूपातील इंदिरा संत यांची कविता टीकाकार तसेच काव्यरसिकांनी उचलून धरली. आजमितीस इंदिरा संत यांची सुमारे पंचवीस पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. रमेश तेंडुलकर यांनी इंदिरा संत यांच्या निवडक कविता 'मृण्मयी' नावाने १९८२ साली संपादित करून प्रसिद्ध केल्या आहेत.    *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• शत्रूंपासून मुक्त होण्याचा उत्तम मार्ग म्हणजे त्यांना आपले मित्र बनविणे होय. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१)  महाराष्ट्राचा कोणत्या खनिज साठ्यात भारतात प्रथम क्रमांक लागतो?* 👉     मॅगनीज *२)  मदर तेरेसा यांचे संपूर्ण नाव काय?* 👉     मेरी तेरेसा बोझॉंक्झ्यु *३)  दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे?* 👉     सिंकदराबाद              *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• बालाजी डिगोळे, अहमदपूर अंकुशराजे जाधव माधव बोइनवाड, येवती चंद्रभीम हौजेकर, धर्माबाद राजेश कुकूटलवार निलेश आळंदे माधव सूर्यवंशी, मुंबई *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *उजेडाची लेक* सावित्री उजेडाची लेक तू चैतन्याचा ध्यास आहेस सावित्री तू स्त्रीमुक्तीचा खरा खरा श्वास आहेस तुझ्या जन्मामुळे स्त्रीला आज मोकळा श्वास आहे तुझ्यामुळे नारी नरात ख-या अर्थाने विश्वास आहे शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आपण प्रत्येकाच्या घरीदारी सुख, शांती, समृद्धी नांदो अशीच प्रार्थना करीत असतो. एकमेकांना शुभेच्छा देतो. हीच गोष्ट जर पदोपदी जीवनभर आमच्या ठायी वसली, तर कष्टप्रद जीवनाचे आनंदवन व्हायला फार वेळ लागणार नाही. तशी प्रत्येकाला उजेडाची आस असते. म्हणून तो प्रकाश आणि सत्याची आस भाकतो, पण डोक्यात कुठल्या नं कुठल्या प्रकारचा अंधार असतो. जेव्हा हा अंधार पूर्णत्वाने दूर होतो, त्यावेळी ती व्यक्ती तेजाने उजाळते आणि अनेक पिढ्यांना प्रकाशमान करते. आपल्या मेंदूतले असे सारे अंधारे कोपरे उजळून निघावेत नि आपल्यातला माणूस तेजाने तळपू लागावा, यासाठी आपण दिपदान का मागू नये ?* *जळणं वा तेवणं हे जिवंत असल्याचं द्योतक. परंतु दिव्याचं जळणं हे कधी त्याच्यासाठी नसतं. ते इतरांना प्रकाश देण्यासाठीच जळत असतात. इतरांना उजाळण्यातच त्यांच्या जळण्याची सार्थकता असते. लहानपणी दिवाळसणाला तांड्यातल्या मुलींचे उजेडाचे गाणे ऐकले आहे. या मुली अंधारून आलेल्या अमावस्येला रात्रभर तांड्यातल्या प्रत्येक दारी हातात दिवा घेऊन प्रेम, जिव्हाळा व्यक्त करतात. हाच दिवा हातात घेऊन जळता ठेवण्याचं नि उजेडाचं गाणं आजन्म गाण्याचं वचन जर आम्ही प्रत्येकाने स्वत:ला दिले, तर ख-या अर्थाने अंधारावर उजेडाने आम्ही मात करू.!* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई         9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   लिखा लिखि की है नाहि, देखा देखी बात दुलहा दुलहिन मिलि गये, फीकी परी बरात। सारांश विधात्याला जाणून घ्यायचं असेल तर केवळ पोथ्या पुराणे वाचून तो कसा काय कळणार ? वाचन व श्रवणात माणूस परमात्म्याच्या मुळ रूपापेक्षा त्याच्या कपोल कल्पित व वर्णनातून रंगवून चढवून सांगितलेल्याच रूपाभोवती घिरट्या मारीत राहातो. पुस्तकातून रंगवलेल्या कथा ह्या विधात्याच्या थोड्याच आहेत. त्या तर मानवाच्या पूर्वजांच्या. तत्कालीन राजा महा राजांच्या युद्ध प्रसंगाच्या , सत्ता विस्ताराच्या , अधिराज्य प्रस्थापित करण्याच्या . दोन विचार प्रवाहातील संघर्षाच्या. भावबंदकीच्या कलहाच्या . महाकाव्यातल्या पात्रांनाच माणूस देवाची रूप माणू लागला. त्यांचीच उपासना करू लागला. मुळ विश्व व्यापक परमात्मा पंच महाभुतात सामावलेला. सृष्टीचालक मुळ ईश्वर बाजुलाच राहून गेला. मंगेश पाडगावकरांच्या गीत पंक्ती किती बोलक्या आहेत. कुढे शोधिशी रामेश्वर अन कुठे शोधीशी काशी हृदयातील भगवंत राहिला राहिला हृदयातून उपाशी.. देव बोलतो बाळ मुखातून देव डोलतो उभ्या पिकातून कधी होवून देव भिकारी अन्नासाठी आर्त पुकारी अवतीभवती असून दिसेना शोधितोस आकाशी.... खरे तर परमात्मा ही पाहाण्याची आणि प्रत्यक्ष अनुभवण्याची बाब आहे . जेव्हा वधू वराची एकत्र गाठ मारली जाते तेव्हा वर्‍हाडी व वरातीचं आकर्षण नाहिसं होतं तसं ईश्वराच्या मुळ स्वरुपाशी एकरूपता साधताच वरवरच्या भाकड गोष्टींचा लेप आपोआपच गळून जातो.     एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• चंदन आणि संत यामध्ये खूप काही साम्य आहे.ज्याप्रमाणे चंदनाच्या सहवासात राहिलो तर चंदनाचा सुगंध आपल्या अंगाभोवती असल्याचे किंवा अंगाला येत असल्याचे जाणवते व आपणच चंदन झालो आहोत असे वाटायला लागते.चंदन जेव्हा सहानेवर पाणी टाकून घासायला लागतो तेव्हा ते स्वत: झिजायला लागते आणि त्याचा गंध सर्वत्र दरवळायला लागते. चंदनाचा गुण जसा आहे तसाच संतांचाही आहे.संतांच्या सहवासात जर आपण राहिलो तर आपल्या जीवनातले सारे दुर्गूण नष्ट होण्यास मदत होते तर त्यांचा सहवास आपल्याला चंदनासारखा नेहमी हवासा वाटायला लागतो.संत हे स्वत: जगाच्या कल्याणासाठी अविरत आपला देह झिजवतात ते स्वत:साठी जगत नाहीत तर आपल्या ईश्वराप्रती प्रेम निर्माण व्हावे,आपण सन्मार्गाला लागावे,आपण मानवतेच्या दृष्टीने आपल्याकडून काहीतरी चांगले कर्म घडावे.आपल्यातला खरा माणूस जागा व्हावा.आपला जन्म इतरांच्या काही चांगल्या कारणी लागावा यासाठी नेहमी सांगत असतात झिजवत असतात.चंदन आणि संत हे दोघेही तितकेच मानवाच्या जीवनात महत्वाचे आहेत.म्हणून चंदन आणि संत यांच्यात साम्य आहे आणि यांचा सहवास नित्य राहिला तर नक्कीच आपले कल्याण होईल. © व्यंकटेश काटकर, नांदेड संपर्क.९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••          *प्रवचन - Discourse* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *कृती महत्त्वाची* स्वामीजींच्या प्रवचनासाठी गावोगावहून लोक आले होते. स्वामीजी आपल्या श्रोत्यांना उत्तम उपदेश करत. या उपदेश सभेला ‘सत्संग‘ म्हणत. एकदा स्वामीजींना काही लोकांनी सत्संगासाठी निमंत्रित केल होत. दिवस थंडीचे होते. येणारे लोक शाली, स्वेटर घालून तसेच मफलर बांधून आले होते. त्यात काही काही उच्चभ्रू श्रीमंतही होते. मात्र, स्वामीजींचा वेश साधाच. अंगावर घाबळी पांघरलेली. एका मोठया प्रशस्त दिवाणखान्यात सभा सुरू झाली आधी एक भजन सुरू होते. मग स्वामीजींचा उपदेश. तेवढ्यात एक याचक त्या दिवाणखान्याच्या दाराशी आला. उघडाबंब थंडीने कुडकुडत, हातात कटोरा घेऊन उभा होता. दिनवाण्या मुद्रेने त्याने आत पाहिल. भजन सुरूच होत. स्वामीजी उठून त्या याचकाकडे गेले. आपल्या अंगावरची घाबळी त्याच्या अंगावर पांघरली आणि शिष्याला खूण केली. शिष्याने काही नाणी त्याच्या कटो-यात टाकली आणि मग तो गरीब याचक निघून गेला. हे सर्व दृष्य सर्वच लोक बघत होते. भजन संपलं. सत्संग सूत्रसंचालक म्हणाला, ‘आता स्वामीजी आपल्याला उपदेश करतील. आपले कान त्यासाठी आतुरले आहेत‘. पण स्वामीजी काही बोलेनात. बराच वेळ झाला तरी ते स्वस्थच बसून होते. श्रोत्यांमध्ये चुळबूळ सुरु झाली. अखेर सूत्रसंचालक म्हणाला, ‘स्वामीजी, आपण आम्हाला उपदेश देताय ना?‘ ‘मी उपदेश दिला आहे,‘ स्वामीजी खणखणीत आवाजात म्हणाले.  ’आपण काहीच बोलला नाहीत,‘ सुत्रसंचालक म्हणाला. ‘अस्स! म्हणजे तुम्हाला फक्त शब्दांचा उपदेश हवा आहे; कृती नको. त्या थंडीत कुडकुडणा-या माणसाची अवस्था तुमच्या ध्यानी नाही आली? मी केलेली कृती हाच माझा उपदेश! सर्व श्रोते थक्क झाले. *तात्पर्यः केवळ कोरड्या शब्दांपेक्षा कृती महत्वाची असते.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00           ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 03/01/2019 वार - गुरूवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *बालिका दिन*  *ऑक्युपेशन थेरपी दिन* 💥 ठळक घडामोडी :- १९५० - पुणेयेथे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे उदघाटन. १९५२ - स्वतंत्र भारतातपहिल्या राष्ट्रीय निवडणुका. १९५७ - विद्युत घाटांवर चालणारे पहिले घड्याळ बाजारात. 💥 जन्म :- *१८३१ - सावित्रीबाई फुले, आधुनिक भारतातील प्रथम स्त्री शिक्षिका, समाजसुधारक, महात्मा जोतीराव फुले यांची पत्नी* १८८८ - कागदी स्ट्रॉचा वापर सुरू. १९१७ - कर्तारसिंग दुग्गल, पंजाबी साहित्यिक. १९२२ - चोइथराम बाबाणी, सिंधी साहित्यिक. १९३१ - यशवंत दिनकर फडके, मराठी लेखक, इतिहाससंशोधक 💥 मृत्यू :- १९७५ - ललित नारायण मिश्रा, भारतीय रेल्वेमंत्री, राजकारणी. १९८२ - अब्राहम डेव्हिड, भारतीय अभिनेता. १९९४ - अमरेंद्र गाडगीळ, मराठी बाल-कुमार लेखक. १९९८ - केशव विष्णू बेलसरे, मराठी तत्त्वज्ञानी. २००१ - सुशीला नायर, भारतीय आरोग्यमंत्री, भारतीय राजकारणी. २००२ - फ्रेडी हाइनिकेन, डच बियर उद्योगपती. २००२ - सतीश धवन, भारतीय अंतराळशास्त्रज्ञ. २००५ - जे.एन.दिक्षित, भारतीय राजकारणी. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *कोल्हापूर - चंदगड ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा, अधिसूचनेची प्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते स्थानिक भाजप नेत्यांकडे सुपूर्द करण्यात आली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *दिल्ली- एआयएडीएमकेच्या 26 खासदारांचं केलं निलंबन, वेलमध्ये उतरून गोंधळ घातल्यानं केलं निलंबित* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *ठाणे : पंतप्रधान आवास योजनेच्या ठाणे जिल्ह्यातील घरकुल लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संवाद साधला.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *ज्येष्ठ क्रिकेट प्रशिक्षक आणि क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचे गुरु रमाकांत आचरेकर यांचे वृद्धापकाळाने निधन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत शिक्षणाची वारीचा तिसरा टप्पा सेवाग्राम परिसर वर्धा येथे आज पासून सुरू* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *राज्यात थंडीचा कडाका कायम, परभणीचं आजचं तापमान 5.5 अंश सेल्सिअस, तर साताऱ्यातील वेण्णालेक परिसरात 1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *सहावेळा जगज्जेती ठरलेली मेरी कॉम मुंबई मॅरेथॉनची सदिच्छादूत* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *विशेष बातमी : हदगाव येथील 46 व्या स्काऊट गाईड नांदेड जिल्हा मेळाव्यात गोजेगाव शाळेच्या श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे मॕडम यांच्या 'वास्तव ....एक सत्य' या काव्यसंग्रहाचे उदघाटन समयी झाले प्रकाशन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• सावित्रीबाई फुले जयंती निमित्त प्रासंगिक लेख              *मी सावित्री बोलतेय* नमस्कार ..... ववबाबवव मी सावित्रीबाई ज्योतीराव फुले, माझा जन्म 03 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगांव येथे झाला. वयाच्या नवव्या वर्षी महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी माझा विवाह झाला. मला शिक्षणाचा अजिबात गंध नव्हता. पण माझे पती महात्मा फुले यांनी मला शिकविले आणि घडविले. पुण्यात भिडेच्या वाड्यात मुलींसाठी त्यांनी पहिली शाळा काढली. पण तिथे मुलींना शिकविण्यासाठी कोणीही तयार होत नव्हते. तेंव्हा ज्योतिबानी मला याठिकाणी शिकविण्यासाठी............. वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/01/blog-post.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *यशवंत दिनकर फडके* यशवंत दिनकर फडके (जानेवारी ३, १९३१ - जानेवारी ११, २००८) हे मराठी चरित्रलेखक, इतिहाससंशोधक होते. ते २०००  साली  बेळगाव  साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यांचा जन्म सोलापूर येथे जानेवारी ३, १९३१  रोजी झाला. त्यांचे वडील स्वातंत्र्य चळवळीत  उतरले होते. स्वातंत्र्य चळवळीमुळे वडिलांचे कुटुंबाकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे फडक्यांना शिक्षणासाठी बरीच धडपड करावी लागली. सोलापुरातील ’हरीभाऊ देवकरण हायस्कूल’ शाळेत त्यांचे शालेय शिक्षण झाले. शालेय शिक्षण चालू असताना त्यांनी द्वा.भ. कर्णिकांच्या ’संग्राम’ वृत्तपत्रातून लेखनही केले. १९४७ साली मॅट्रिक परिक्षा उत्तीर्ण झाल्यावर महाविद्यालयीन शिक्षणाकरता ते पुण्यास गेले. राज्यशास्त्र हा विषय घेऊन पुणे विद्यापीठातून त्यांनी बी.ए. (१९५१) व एम्‌.ए. (१९५३) या पदव्या मिळवल्या. पुढे १९७३ साली त्यांनी मुंबई विद्यापीठाकडून  पीएच्‌. डी. पदवी मिळवली. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• असत्य हे अपंग प्राण्याप्रमाणे असते, दुसऱ्याच्या आधाराशिवाय ते कधीच उभे राहू शकत नाही. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१)  रिडल्स इन हिंदुइझम हा ग्रंथ कोणी लिहिला?* 👉    डॉ. आंबेडकर *२)  भीमा व कृष्णा खोरी कोणत्या डोंगररांगामुळे विभक्त झाली  आहेत?* 👉   महादेव *३)  दूरदर्शनने सुरू केलेली सर्वात पहिली मालिका कोणती?* 👉      श्वेतांबरा *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● ज्ञानेश्वर विजागत, सहशिक्षक, सोलापूर ● विठ्ठल सुवर्णकार, धर्माबाद ● रतन बहिर, भीर, महाराष्ट्र ● शुभांगी परळकर, नांदेड ● माधव पवार, पत्रकार, नायगाव ● संदीप जाधव, देगलूर ● प्रशांत बोड्डेवाड, येवती ● वीरेंद्र डोंगरे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      *मांजर* मांजर डोळे झाकून दूध पीत असते तिला वाटते कोणीच काही पहात नसते तिने डोळे झाकले तरी जग सारे पहात असते तिचे सारे पराक्रम सा-या  जगाला माहित असते     शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *प्रचंड थकवा आल्यानंतर, दमल्यानंतर हळूहळू आपण आपला मूळ लयीतला श्वास गवसणं किती विलक्षण असतं. स्वत:चा ठाव लागणं, स्वत:चा थांग लागणं, जणू पुनर्जन्मच. म्हणून जगण्याच्या सुलभीकरणात थकवा गमावून बसू नये. थकव्या थकव्यात फरक करावा. प्राणपणानं जीव लावून खरंखुरं थकावं आणि थकव्याच्या गर्भातून स्वत:चं सर्जन होताना अनुभवावं. अर्थात इतकं सगळं घडलं तरी बाहेरच्या जगाला तुम्ही निव्वळ दमलेले, थकलेले दिसता. त्यांना जाणवतं की, तुमचा श्वास फुललाय, छातीचा भाता वरखाली होतोय. तुमच्या आप्तांना तुमची चिंता वाटते. त्यांना वाटतं की, तुम्ही इतकी दगदग करू नये. सकस, पौष्टिक अन्न खावं. आप्तांची चिंता रास्त असते.* *तरीसुद्धा आपली शक्ती पणाला लावून थकणं-दमणं योग्य असतं. थकण्याला घाबरून, न थकण्याचे उपाय शोधणं हा सर्वथा अलाभाचा व्यवहार आहे. त्यानं थकणं घटेल आणि आपले नवनवे जन्मही घटतील. श्वास फुलल्याशिवाय कसं कळणार श्वास घेतो आपण, छातीचा भाता वरखाली झाल्याशिवाय कसं कळणार की, प्राणवायुचं चलनवलन किती सुखाचं असतं. तो फुफ्फुसांना व्यापतो म्हणजे काय होतं हे कसं समजणार ? श्वासोच्छ्वासानं शरीरावर उठणा-या लाटांचं उठणं-विरणं कसं निरखता येणार? शक्तीपाताच्या अग्रावर जाऊन कोसळण्याच्या क्षणी स्वत:चा थांग सापडण्याची धडधड ऐकू येण्याला तुलना नाही. हेच थकव्यातलं सर्जन आणि हाच सर्जनाचा थकवा..!*    ••● ‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई         9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    लिखा लिखि की है नाहि, देखा देखी बात दुलहा दुलहिन मिलि गये, फीकी परी बरात। सारांश       विधात्याला जाणून घ्यायचं  असेल तर केवळ पोथ्या  पुराणे वाचून तो कसा काय कळणार ? वाचन व श्रवणात माणूस परमात्म्याच्या मुळ रूपापेक्षा त्याच्या कपोल कल्पित व वर्णनातून रंगवून चढवून सांगितलेल्याच रूपाभोवती घिरट्या मारीत राहातो. पुस्तकातून रंगवलेल्या कथा ह्या विधात्याच्या थोड्याच आहेत. त्या तर मानवाच्या पूर्वजांच्या.  तत्कालीन राजा महा राजांच्या युद्ध प्रसंगाच्या , सत्ता विस्ताराच्या , अधिराज्य प्रस्थापित करण्याच्या . दोन विचार प्रवाहातील संघर्षाच्या. भावबंदकीच्या कलहाच्या . महाकाव्यातल्या पात्रांनाच माणूस देवाची रूप माणू लागला. त्यांचीच उपासना करू लागला. मुळ विश्व व्यापक परमात्मा पंच महाभुतात सामावलेला. सृष्टीचालक मुळ ईश्वर बाजुलाच राहून गेला. मंगेश पाडगावकरांच्या गीत पंक्ती किती बोलक्या आहेत. कुढे शोधिशी रामेश्वर अन कुठे शोधीशी काशी हृदयातील भगवंत राहिला राहिला हृदयातून उपाशी.. देव बोलतो बाळ मुखातून देव डोलतो उभ्या पिकातून कधी होवून देव भिकारी अन्नासाठी आर्त पुकारी अवतीभवती असून दिसेना शोधितोस आकाशी....      खरे तर परमात्मा ही पाहाण्याची आणि प्रत्यक्ष अनुभवण्याची बाब आहे .  जेव्हा वधू वराची एकत्र गाठ मारली जाते तेव्हा वर्‍हाडी व वरातीचं आकर्षण नाहिसं होतं तसं  ईश्वराच्या मुळ स्वरुपाशी एकरूपता साधताच वरवरच्या भाकड गोष्टींचा लेप आपोआपच गळून जातो.      एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• बोलणारी आणि बोलण्याप्रमाणे कृती करणारी व्यक्ती ही अतिशय संवेदनशील आणि कर्तव्यतत्पर समजली जाते. अशा व्यक्ती फार कमी प्रमाणात पहायला मिळतात. अशा व्यक्तींच्या सहवासात राहिले तर आपल्यातील आळशीपणा आणि कामामध्ये टाळाटाळ करण्याच्या वृत्तीला लगाम घातल्या जाऊन आपल्यामध्ये सुप्त असलेल्या क्रियाशिलतेला अधिक प्राधान्य मिळते व जीवनात चांगले जीवन जगण्यासाठी योग्य दिशा मिळते. © व्यंकटेश काटकर नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🎄🌸🎄🌸🎄🌸🎄🌸🎄🌸🎄 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••          *सोबत - Along with* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *इच्छाशक्तीचा बळावर जग जिंकता येते.* केवळ सव्वा वर्षांची असताना मेंदुज्वरामुळे दृष्टी आणि ऐकण्याची क्षमता गमावलेली एक मुलगी आज जगविख्यात लेखिका म्हणून नावारूपाला आली आहे. तुम्हाला हा चमत्कार वाटत असेल तर, त्याची जनकही हीच मुलगी आहे. हेलेन केलर असे या मुलीचे नाव.  आपल्या केवळ इच्छाशक्तीच्या बळावर तिने आपल्या कठीण मानल्या जाणार्‍या आजारालाही नियंत्रित केले. ज्या वयात तिचे खेळायचे-बागडायचे दिवस होते, त्या वयात तिच्या पुढ्यात केवळ अंधार होता.  आजारामुळे तिला सुरुवातीला नैराश्य आले होते. तिच्या पालकांनी मग तिची जबाबदारी एनी सुलियन यांच्याकडे सोपवली. अगदी ब्लॅक चित्रपटात अमिताभ ज्या पद्धतीने राणी मुखर्जीला स्पर्शाची भाषा शिकवतो. अगदी त्याच पद्धतीने एनीने हेलेनला स्पर्शाची भाषा शिकवली.  यानंतर एनीने तिला भाषा शिकवण्यासाठी जिवाचे रान केले. तिला प्रथम हाताने भाषा शिकवत शब्दांचे अर्थ तिला समजावले. यानंतर हेलरच्या मनात नवीन उमेद जागी झाली. हेलरने यानंतर कधीही मागे वळून पाहायचेच नाही हे ठाम केले.  तिच्यात एक अशी ऊर्जा निर्माण झाली, की या ऊर्जेने तिला नवीन दृष्टी दिली, आणि ही ऊर्जा होती तिच्या इच्छा शक्तीची. या बळाच्या आधारेच तिने रेडक्लिफ महाविद्यालयातून आपली पदवी मिळवली. या दरम्यान हेलेनचे पहिले पुस्तक 'द स्टोरी ऑफ लाईफ' प्रकाशित झाले. यानंतर याचे जवळपास 50 भाषांमध्ये या पुस्तकाचे भाषांतर करण्यात आले.  इथे हेलन यांच्या केवळ इच्छाशक्तीचाच विजय झाला. त्यांनी बालपणातच जर हार मानली असती तर जगाला इतकी प्रतिभाशाली लेखिका मिळालीच नसती. म्हणूनच केवळ इच्छाशक्तीच्या बळावरच आपण विजय मिळवू शकतो हे विसरता कामा नये. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00           ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 02/01/2019 वार - बुधवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १९५५ - पनामाच्या राष्ट्राध्यक्ष होजे अँतोनियो रेमोनची हत्या. १९५९ - सोवियेत संघाने लुना १ या अंतराळयानाचे चंद्राकडे प्रक्षेपण केले. २0१८ : महिलांसाठी हज यात्रा सुकर. पुरुष पालक बरोबर असण्याची प्रथा संपुष्टात १९५४ : राष्ट्रपतीपदी विराजमान असताना डॉ.राजेंद्र प्रसाद यांनी 'भारतर%' या सर्वोच्च किताबाची सुरुवात केली. 💥 जन्म :- १९३२: अकाली दलाचे अध्यक्ष हरचंदसिंग लोंगोवाल यांचा जन्म.  ४१९५९ : भारतीय क्रिकेटपटू कीर्ती आझाद यांचा जन्म. ४१९६0: भारतीय क्रिकेटपटू रमण लांबा यांचा जन्म.  💥 मृत्यू :- १९४६ - ज्यो डार्लिंग, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू. १९९५ - सियाद बारे, सोमालियाचा राष्ट्राध्यक्ष. १९४४ : महाराष्ट्रातील थोर सुधारक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे निधन. २0१५: भारतीय शास्रज्ञ वसंत गोवारीकर यांचे निधन. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *नगरपालिका, पंचायतच्या कर्मचाऱ्यांचा संप मागे; प्रधान सचिवांच्या बैठकीत सातव्या वेतन आयोगात समावेश करण्याचे आश्वासन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *जळगाव जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अधिकारीपदी पी. एन. पाटील यांची नियुक्ती* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *मुंबई - देशभक्तीचा प्रचार आणि प्रसार व्हावा, यासाठी गुजरातमधील शाळांमध्ये  विद्यार्थ्यांना  हजेरी लावताना येस सर/मॅडम किंवा प्रेझेंट सर/मॅडम म्हणण्याऐवजी आता 'जय हिंद' अथवा 'जय भारत' बोलावे लागणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *पुणे शहर पोलिसांनी काल (1 जानेवारीपासून) हेल्मेट नियमाची प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू केल्यावर पुणेकरांनी केला विरोध केला* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *सिंघम चित्रपटातील जयकांत शिखरे अर्थात अभिनेते प्रकाश राज निवडणूक रिंगणात, २०१९ ची निवडणूक लढवणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *ज्येष्ठ अभिनेते कादरखान यांंचे वयाच्या 81 व्या वर्षी निधन, कॅनडामधील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *दुबई : ऑस्ट्रेलियात 2020 मध्ये होणाऱ्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी थेट पात्र ठरलेल्या संघांची करण्यात आली घोषणा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बातम्यांची audio clip ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे. https://b.sharechat.com/fWDMPyOy8S Follow me on Share Chat *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• सन 1998 मध्ये प्रचंड गाजलेली पुस्तिका खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत...           *चंदर - किशोर कादंबरी* खालील ब्लॉगवर *भाग नववा* वाचन करता येईल. https://shabdghar.blogspot.com/2018/12/blog-post_25.html वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ लेखक  *अरुण वि. देशपांडे, परभणी/पुणे* 9850177342 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••               *विठ्ठल रामजी शिंदे* विठ्ठल रामजी शिंदे ऊर्फ महर्षी शिंदे हे मराठी समाजसुधारक, धर्मसुधारक व लेखक होते. शिंदे यांनी पुण्याच्या फग्यरुसन कॉलेजमधून बी.ए.ची पदवी मिळवली. कायद्याच्या शिक्षणाचे प्रथम वर्ष उत्तीर्ण केल्यावर ते एल.एल.बी. परीक्षेकरिता मुंबईला गेले.तेथे ते प्रार्थना समाजात दाखल झाले. १८ अँक्टोबर, इ.स. १९0६ रोजी महर्षी शिंदे यांनी 'डिप्रेस्ड क्लास मिशन' या संस्थेची स्थापना केली. त्यांनी इ.स. १९२८ साली पुणे येथे शेतकरी परिषद भरवली.शिंदे यांनी वेगवेगळ्या कालखंडात रोजनिशी लिहिली. पहिल्यांदा १८९८ मध्ये फग्यरुसन कॉलेजात शिकत असताना, मग १९0१-३ या काळात इंग्लंडमध्ये धर्मशिक्षण घेत असताना, व त्यानंतर कायदेभंग सहभागाबद्दल शिक्षा झाल्यानंतर १९३0 साली येरवडा तुरुंगात असताना त्यांनी रोजनिशींचे लेखन केले आहे. याशिवाय १९२८ साली शिंदे यांनी 'ब्राह्मसमाज शतसांवत्सरी सफर' नावाची रोजनिशी लिहिली आहे. या चारही रोजनिशीत महर्षी शिंदे यांच्या प्रगल्भ व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडते. पहिल्या तीन रोजनिशींचे संपादन १९७९ साली गो. मा. पवार यांचे असून 'ब्राह्मसमाज शतसांवत्सरी सफर' या नावाच्या चौथ्या रोजनिशीचे संपादन रणधीर शिंदे यांचे आहे. वि.रा. शिंदे यांच्या आत्मपर लिखाणाचे अनेक खंड प्रकाशित झाले आहेत. पहिल्या खंडात 'भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न : संशोधन आणि चिंतन' हे लेखन आहे. दुसरया खंडात महर्षी शिंदे यांच्या चार रोजनिशींचा समावेश असून, 'माझ्या आठवणी व अनुभव' हे पावणे ४00 पानी आत्मचरित्र व काही प्रवासवर्णने आहेत. 'माझ्या आठवणी व अनुभव' नावाचे हे आत्मचरित्र तीन भागांत विभागले असून पहिल्या भागात त्यांनी आपला जीवनवृत्तान्त सांगितला आहे. तर उर्वरित भागात शिंदे यांच्या ब्राह्मसमाज, प्रार्थना समाज, डिप्रेस्ड क्लासेस मिशन या सामाजिक व राजकीय कार्याचे विवेचन आहे. लहानपणी त्यांच्या घरी अनेकजण येत. त्यात साधू, रामदासी, संन्यासी व सिद्ध येत. त्यांचे लहानपणाचे अनुभव मोठे हृदयस्पश्री आहेत. आपल्या वाड्मयात सर्व शाळासोबती कसे जमत असत व त्यातून धांगडधिंग्याचा जिमखाना कसा बनत असे, हे ते सांगतात. शेतकरी चळवळी व परिषदांचे वृत्तान्त या आत्मनिवेदनात आहेत. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• अंत:करण स्वच्छ ठेवण्याकरिता नियमितपणे ईश्वर प्रार्थना केली पाहिजे - भगवान महावीर *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) दुसरी गोलमेज परिषद कधी पार पडली ??           १९३१ *२) भारतातील पहिल्या महिला बॅरिस्टर कोण ?*            कार्निलिया सोराबजी *३) खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती ?*            आयसीआयसीआय *४) एव्हरेस्ट शिखर सर करणारी सर्वात तरुण महिला कोण ?*              डिक डोमा *५) देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण ?*              अजित डोवाल *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ★ संदीप ढाकणे, साहित्यिक, औरंगाबाद ★ मो. विखार, शिक्षक, धर्माबाद ★ कविता जोशी, शिक्षिका ★ साईनाथ ईबीतवार पांचाळ, येवती ★ महेंद्रकुमार पद्मावार ★ मोगरे शंकर ★ श्रीकांत काटेलवार ★ आनंदराव धोंड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••••   *दृष्टीकोन* दृष्टी सर्वांना असते योग्य दृष्टीकोन नसतो दृष्टीकोन नसेल तर नजरेला अर्थ गौण असतो दृष्टी असो की नसो दृष्टीकोन योग्य हवा  अंधत्वालाही ठरू शकतो योग्य दृष्टीकोन दवा    शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• •••● ‼ *विचार धन* ‼ ●••• *नोकरी, कौटुंबिक जबाबदारी, सण-उत्सव, आजारपण, मुलांचं संगोपन यामुळे जोडप्यांना एकमेकांसाठी वेळ मिळतोच असं नाही. दैनंदिन कामात इतकं व्यग्र व्हायला होतं, की प्रिय व्यक्तिजवळ प्रेम व्यक्त करायलाही फुरसत मिळत नाही. काहींना तर एकमेकांची साधी विचारपूस करणं होत नाही. खरं तर, एकमेकांसाठी जगणं, एकमेकांचा आनंद समाधान जपणं या गोष्टी नात्यातला गोडवा वाढवण्याचं काम करतात. तुमच्या नात्यामध्ये नव्याने प्रेम आणि ताजेपणा आणतात.* *एकाच छताखाली राहत असूनही कामातील व्यस्ततेमुळे तुमच्यात संवाद होत नसेल, तर तो होऊ द्या. सशक्त नातेसंबंधांसाठी एकमेकांशी विविध विषयांवर बोलणं, चर्चा करण गरजेचं आहे. घराबाहेर एकत्र, एकांतात वेळ घालवणं, बागेत जाऊन, फोन बाजूला ठेऊन भरपूर गप्पा मारल्याने परस्परांतील नाती घट्ट होतात.*    ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• ☀☀☀☀☀☀☀☀☀ संजय नलावडे, चांदीवली, मुंबई         9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••     निरजानी सो कहिये का, कहत कबीर लजाय अंधे आगे नाचते, कला अकारथ जाये। सारांश     अज्ञानाच्या आनंदाने पखाली  वाहाण्यात धन्यता मानणार्‍यांना ज्ञान कसे समजावणार ? हे अज्ञानात इतके रमलेले असतात की त्यांना सत्य, ज्ञान ही खोटे वाटायला लागते. अशा मुढमतींना समजावताना आपणावरंच पश्चातापाची वेळ येते. हे अज्ञानी जीव अंधश्रद्धेच्या इतके आहारी गेलेले असतात की, त्यांना ज्ञानाचा प्रकाश किरण दिसणेही कठीणच. कारण त्यांच्या धारणाच इतक्या कर्मट बनलेल्या असतात. की त्यांना विवेक व विचाराचं काही एक देणं घेणंच नसतं. अशा अविवेकी विचारातूनच आत्मघातकी व दहशतवादी विचारांना खतपाणी मिळतं. अशा विचारांचे अनुयायीच तर कट्टर धार्मिक दहशतवादी बनत आहेत. अन धर्म या शब्दाचीच किव यावी अशी या लोकांनी धर्मांची अवस्था करून टाकलेली आहे.     आंधळ्यासमोर कितीही सुंदर नृत्य करून काय फायदा आहे? कारण तुमच्या नृत्यातलं कसब पाहाण्याची जाणण्याची दृष्टीच त्याच्याजवळ नाही तर त्या आंधळ्याला तुमचं नृत्य कसं कळणार ? जसा बहिर्‍यापुढे गावून उपयोग नाही, तसा आंधळ्यापुढे नाचून उपयोग होत नाही. त्यातल्या त्यात झोपीचं सोंग घेणार्‍या ढोंग्याला कितीही जागवायचा प्रयत्न केला तरी तो प्रतिसादच देत नाही. कारण तो स्वार्थासाठीच ढोंग धारण करीत असतो. अज्ञानी माणसापुढे आत्मा, परमात्मा , अध्यात्म, धर्म सांगून तो कसा काय कळणार आहे ! उपदेशासाठी सांगितलेले शब्दही विनाकारण फुकटंच वाया जाणार आहेत. अशा लोकांना उपदेश करणेही व्यर्थ आहे.     एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   जीवनाच्या जीवनप्रवासाची प्रत्येक वाट ही सरळ असतेच असे नाही तरीही मनुष्य त्या वाटेवरुन चालतच असतो आणि चालायलाच हवे.त्याच्याशिवाय जीवनप्रवास कसा आहे हे कसे समजणार ! त्या वाटेवरील चढ उतार कसा आणि किती आहे हे तरी कसे समजणार.चढ जास्त आहे म्हणून थांबायचे नाही आत्मविश्वास ढळू द्यायचा नाही आणि उतार आहे म्हणून संथगतीने ही चालायचे नाही.कमीजास्त असले तरी त्याचपध्दतीने मार्गक्रमण करायचे.जोपर्यंत आपला जीवनप्रवास चालू राहील तोपर्यंत आपण न थकता तेवढ्याच आत्मविश्वासाने निरंतर चालायचे तरच आपल्या जीवनाला अर्थ आहे नाही तर आपल्या जीवनाची दिशाच बदलून जाऊन पदरी घोर निराशाच स्वीकारावी लागेल.काळ जसा सातत्याने पुढे पुढे चालत जातो तसा आपला जीवनप्रवासही सतत पुढे पुढे चालू द्यावा. किंचितही अडथळा आला तरी ती दूर करण्याची तयारी आपल्यामध्ये असू द्यावी तरच जीवन जगण्याला खरा अर्थ आहे हे नेहमी लक्षात असू द्यावे. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🛣🛤🛣🛤🛣🛤🛣🛤🛣🛤🛣 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••          *प्रवास - Travel* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••                *कृती महत्त्वाची* स्वामीजींच्या प्रवचनासाठी गावोगावहून लोक आले होते. स्वामीजी आपल्या श्रोत्यांना उत्तम उपदेश करत. या उपदेश सभेला ‘सत्संग‘ म्हणत. एकदा स्वामीजींना काही लोकांनी सत्संगासाठी निमंत्रित केल होत. दिवस थंडीचे होते. येणारे लोक शाली, स्वेटर घालून तसेच मफलर बांधून आले होते. त्यात काही काही उच्चभ्रू श्रीमंतही होते. मात्र, स्वामीजींचा वेश साधाच. अंगावर घाबळी पांघरलेली. एका मोठया प्रशस्त दिवाणखान्यात सभा सुरू झाली आधी एक भजन सुरू होते. मग स्वामीजींचा उपदेश. तेवढ्यात एक याचक त्या दिवाणखान्याच्या दाराशी आला. उघडाबंब थंडीने कुडकुडत, हातात कटोरा घेऊन उभा होता. दिनवाण्या मुद्रेने त्याने आत पाहिल. भजन सुरूच होत. स्वामीजी उठून त्या याचकाकडे गेले. आपल्या अंगावरची घाबळी त्याच्या अंगावर पांघरली आणि शिष्याला खूण केली. शिष्याने काही नाणी त्याच्या कटो-यात टाकली आणि मग तो गरीब याचक निघून गेला. हे सर्व दृष्य सर्वच लोक बघत होते. भजन संपलं. सत्संग सूत्रसंचालक म्हणाला, ‘आता स्वामीजी आपल्याला उपदेश करतील. आपले कान त्यासाठी आतुरले आहेत‘. पण स्वामीजी काही बोलेनात. बराच वेळ झाला तरी ते स्वस्थच बसून होते. श्रोत्यांमध्ये चुळबूळ सुरु झाली. अखेर सूत्रसंचालक म्हणाला, ‘स्वामीजी, आपण आम्हाला उपदेश देताय ना?‘ ‘मी उपदेश दिला आहे,‘ स्वामीजी खणखणीत आवाजात म्हणाले.  ’आपण काहीच बोलला नाहीत,‘ सुत्रसंचालक म्हणाला. ‘अस्स! म्हणजे तुम्हाला फक्त शब्दांचा उपदेश हवा आहे; कृती नको. त्या थंडीत कुडकुडणा-या माणसाची अवस्था तुमच्या ध्यानी नाही आली? मी केलेली कृती हाच माझा उपदेश! सर्व श्रोते थक्क झाले. *तात्पर्यः केवळ कोरड्या शब्दांपेक्षा कृती महत्वाची असते.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~