✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 05/02/2019 वार - मंगळवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १९९६ - मुंबई येथील चौथ्या आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवात 'सोना माटी' या भारतीय लघुपटाने सुवर्णपदक पटकावले. २००३ - अंतराळवीर कल्पना चावला यांचे नाव भारताने २००२ मध्ये सोडलेल्या पीएसएलव्ही सी-४ या हवामानविषयक उपग्रहाला देण्यात आल्याची पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची घोषणा. २००४ - पुण्याच्या स्वाती घाटेने वूमन ग्रँडमास्टर किताबाचा तिसरा व शेवटचा नॉर्म संपादन केला. 💥 जन्म :- १९०० - अडलाई स्टीवन्सन, अमेरिकन राजकारणी. १९७६ - अभिषेक बच्चन, भारतीय चित्रपट अभिनेता. 💥 मृत्यू :- १९२० - विष्णुबुवा जोग, वारकरी संप्रदायाचे कार्य पुढे नेणारे. २००० - वैद्य माधवशास्त्री जोशी, महाराष्ट्र आयुर्वेद महासंमेलनाचे माजी अध्यक्ष. २००३ - गणेश गद्रे, ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवटीची शक्यता, जीव देईन पण तडजोड करणार नाही - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी * ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *केंद्राप्रमाणे राज्यातही अराखीव प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना शासकीय सेवा व शैक्षणिक संस्थांमध्ये १० टक्के आरक्षण मंजूर करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या (पीएफ) सदस्यांनाही किमान ३००० रुपयांचे निवृत्तीवेतन देण्याचा निर्णय लवकरच घेतला जाण्याची शक्यता आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *कांदा अनुदानास ३१ जानेवारीपर्यंतची मुदतवाढ ग्राहय़ धरणार - सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *अण्णा हजारे उपोषणावर ठाम; केंद्रीय राज्यमंत्री सुभाष भामरेंसोबतची चर्चा अर्ध्यावरच सोडली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *मराठी अभिनेते रमेश भाटकर यांचे निधन, ते 70 वर्षाचे होते.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *न्यूझीलंडविरुद्धची एकदिवसीय मालिका भारताने ४-१ ने जिंकली, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव यांनी केले संघातील आपले स्थान पक्के* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कथा - बदल्याचा बळी* वरील कथा पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_2.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *विष्णुबुवा जोग* विष्णु नरसिंह जोग (जन्म : पुणे, १४ सप्टेंबर १८६७ - ५ फेब्रुवारी १९२०) हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे कार्य पद्धतशीरपणे पुढे नेण्याचे प्रयत्न करणारे सत्पुरुष होते. विष्णुबुवा जोग म्हणून हे सर्वपरिचित आहेत. ते आळंदीतील कीर्तनकार, प्रवचनकार, वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक, आणि लेखक होते. विष्णुपंत जोग हे अत्यंत निरिच्छ असून लोकमान्य टिळक यांचे स्नेही व चाहते होते. ते स्वदेशी वस्तू वापरीत आणि टिळकांना यथाशक्ती मदत करीत. विष्णुबुवांचा जन्म पुण्यात झाला. त्यांच्या आईचे नाव सरस्वती होते. त्यांना तीन मोठे भाऊ होते. त्यांतील एक पांडोबा महाराज हा मल्ल होता. विष्णुबुवांनाही लहानपणापासून मल्लविद्येचा नाद होता. पांडोबांप्रमाणे तेही अविवाहित राहिले. विष्णुबुवा पुण्यातील नगरकर तालमीचे वस्ताद होते. विष्णुबुवा फारसे शिकलेले नव्हते, पण पांडोबांबरोबर आळंदीला जाऊन जाऊन ते पांडुरंगाचे भक्त झाले. त्यांनी कुठल्याही फडाचा आश्रय न घेता, आळंदीला जाऊन ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीवर माळ ठेवून तीच आपल्या गळ्यात घातली व आपण वारकरी झाल्याचे घोषित केले. जोग महाराजांची ही क्रांती त्यांच्याच पाच-दहा शिष्यांपुरती (ज्यांच्यात प्रसिद्ध कादंबरीकार ना. सी. फडकेही होते) मर्यादित राहिली असती, किंवा कदाचित त्यांचाच एक स्वतंत्र फड निर्माण झाला असता; पण आपल्या आयुष्याच्या अखेरच्या पर्वात त्यांनी आळंदीमध्ये वारकरी शिक्षण संस्थास्थापन केली व वारकरी संप्रदायाच्या वाढीची क्षमता अमर्याद केली. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• तुमच्या जीवनाला वळण देण्याचा एक छोटा प्रयत्न म्हणजे ध्येयवेडा प्रवास *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) झाकिर हुसेन या कलाकाराचा संबंध कोणत्या वाद्याशी आहे?* तबला *२) एस्किमोंचं घर कशापासून बनलेलं असतं?* बर्फ *३) श्रीलंकेत सर्वाधिक प्रमाणात वास्तव्यास असणारा समाज कोणता?* सिंहली *४) भारताची समुद्रसीमा किती किलोमीटर लांबीची आहे?* ७५०० कि.मी. *५) घाना पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे ?* राजस्थान *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● सौ. रंजना जोशी ● सदाशिव मोकमवार ● निलेश गोधने ● भीमराव वाघमारे ● संदीप मुंगले ● श्याम राजफोडे ● विठ्ठल पेंडपवार ● बालासाहेब कदम ● अच्युत पाटील खानसोळे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जाहिरात* जाहिरातीत खोटं ते खरं असे ठसवले जाते खोट्याला खरं म्हणून डोक्यात बसवले जाते विश्वसनिय वाटणारीही जाहिरात फसवी असते जाहिरात म्हणजे फक्त खिसे उसवा उसवी असते शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *प्रतिकूल परिस्थितीत सहाय्य करणारी माणसं ते निरपेक्ष करत नाहीत. आपण सतत त्यांच्या ताटाखालचं मांजर राहावं, अशी त्यांची धारणा असते. आजन्म लीन राहिलो की, अशी माणसं खुश असतात. पैसा, साधनसंपत्तीच्या जोरावर व्यक्तिगत प्रतिष्ठा जोपासण्याचा उद्योग अत्यंत चिड आणणारा आहे. 'शिक्षकदिनी' संस्थेतर्फे शिपायापासून प्राचार्यापर्यंत त्यांच्याप्रती आदर म्हणून एक छापील प्रमाणपत्र व फूल देऊन अध्यक्षांच्या हस्ते सत्काराचा कार्यक्रम पाहिला. सत्कार स्विकारल्या नंतर शिपाई ते प्राचार्य सर्वजण अध्यक्षांच्या नतमस्तक झाले. मूळ कार्यक्रमच मुळी सर्वांना वार्षिक दीन करण्याचा होता.* *समाजव्यवस्थाच अशी बनून गेली आहे की, नोकरदारांना खिंडीत गाठून लीन, दीन, मलीन, अधीन करत ठेवायचे. त्याचं रूपांतर पाठीचा कणा नसलेला संप्रदाय आकाराला येऊ लागला आहे. त्यांना मन, मत, मनगट असून नसल्यासारखे आहे. 'खाल मान्या, हो नाम्या' असं जीणं त्यांनी आयुष्यभर जगायचं. काही कर्तृत्व नसताना संस्थापकांचा मुलगा, नातु, सून, मुलगी अध्यक्ष बनत राहतात, तर शिपाई, लिपीक, प्राध्यापक, प्राचार्य रोज कणाकणाने 'एक दर्जे का नीचे का इन्सान' बनत अस्तित्वशून्य होताहेत.* *"समाज घडविणारे घटक अस्तित्वशून्य होणं, समाजाचा बुद्धिजीवी वर्ग मतिहीन करणे, त्यांना मतहीन बनवणे यासारखे सामाजिक अध:पतन दुसरे कोणते असू शकते ?"* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• कबीरा ते नर अन्ध है, गुरु को कहते और । हरि रूठे गुरु ठौर है, गुरु रुठै नहीं ठौर ॥ अर्थ: महात्मा कबीर गुरूंची महत्ती सांगताना म्हणतात की जो माणूस गुरुचे जीवनातील महत्व जाणत नाही , जो गुरूचा अनादर करतो. तो डोळे असूनही आंधळाच समजला पाहिजे. कठीण समयी आपणास देव व दैवाची साथ मिळत नसली तरी आपणास त्या कठीण व नाजूक अशा विपरित परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी गुरूच मदत करीत असतात. जर का गुरूनेच साथ सोडली तर मात्र भूतलावर कोणीही साथ देत नाही. कारण ईश्वराकडे जाण्याचा मार्गच गुरूपासून सुरू होतो, तर गुरूकडे जाण्यासाठी ईश्वराची मदत घ्यायची गरज असतेच कुठे ? मात्र ईश्वर जाणायचा असेल तर गुरूचे महत्व अनन्य साधारण आहे. दाखलेच पाहायचे झाले तर इथल्या व्यवस्थेनं ज्याचं शिक्षण नाकारलं, त्या महाभारतातील एकलव्याचं उदाहरण पहा. गुरूचा पुतळा करून त्याच्यासमोर स्वयं अध्ययनाचे धडे गिरवून सर्वोत्कृष्ट धनुर्धर म्हणून लौकिकास पात्र होतो. रामकृष्ण परमहंस आणि नरेंद्र दत्त ही गुरू शिष्याची जोडी पाहता विज्ञान शाखेचा विद्यार्थी असणार्या नरेंद्राला अध्यात्माचा बोध देवून विज्ञानाला अध्यात्माची जोड देणारे विवेकवादी भारतीय तत्त्वज्ञान जगाला देणारा नरेंद्राचा विवेकानंंद परमहंसानी घडवला. हे गुरूचं अदृश्य सामर्थ्य असतं. आदर्श विद्यार्थी एकलव्याचं शिक्षण नाकारणं, इथल्या खेकडा प्रवृत्तीच्या धर्माच्या ठेकेदारांनी विवेकानंदांच्या भाषणाला विरोध करणं ही इथल्या व्यवस्थेच्या तोकडेपणाचीच उदाहरणे म्हणावी लागतील. गुरू मात्र आपल्या शिष्याला मजबुतीनं उभं करण्याचा आटोकाट प्रयत्न करीत असतात. हे विसरून कसं जमेल. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• बाह्य सौंदर्यापेक्षा आंतरिक सौंदर्य अधिक मौल्यवान आहे.कारण बाह्यसौंदर्य अधिक दिसण्यासाठी नानाप्रकारचे सौंदर्य प्रसाधने व मूल्य देऊन निर्माण केले तरी ते जास्त काळ टिकत नाही किंवा टिकवता येत नाही.ते अल्पकालीन आहे. आंतरिक सौंदर्य असे आहे की,त्याची किंमतही मोजून आणता येत नाही आणि अन्य माध्यमांतून प्राप्तही करता येत नाही.असे सौंदर्य आपल्या अंतःकरणात उपजतच असते फक्त त्याला योग्यप्रकारे हाताळता आले पाहिजे.ह्या आंतरिक सौंदर्यामुळे अनेक नाती जोडून जीवनातला आनंद उपभोगता येतो न इतरांनाही आपल्या आनंदात व इतरांच्या आनंदात भर पाडता येते तसेच कोणत्याही प्रकारचे मूल्य न देता शेवटपर्यंत टिकवता येते.फक्त त्याच्यासाठी आंतरिक तळमळ असायला हवी. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद...९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🎑📝🎑📝🎑📝🎑📝🎑📝🎑 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎡 मनाचे श्लोक 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• मना श्रेष्ठ धारिष्ट जीवीं धरावे। मना बोलणे नीच सोशीत जावें॥ स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे। मना सर्व लोकांसि रे नीववावें ॥७॥ संकलन : सौ. सुभद्रा सानप, बीड •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *लोभी माणूस* एका लोभी माणसाने आपला सगळा पैसा शेतात पुरून ठेवला होता. तेथे दिवसातून दोन वेळा जाऊन त्या पुरलेल्या जागेकडे पाहून तो मोठे समाधान मानीत असे. ते त्याचे वागणे त्याच्या नोकराने पाहिले व त्याने तर्क केला की, आपला मालक या जागेकडे नेहमी पाहतो, तेव्हा तेथे काहीतरी पुरलेले असावे. रात्री त्याने तेथे जावून खणून पाहिले तर आत बरेच धन त्याला दिसले. ते घेऊन तो पळून गेला. दुसर्या दिवशी तो लोभी माणूस नेहमीप्रमाणे तेथे येऊन पाहतो तर सगळे धन चोरीला गेलेले त्याला दिसले. मग तो डोके बडवून घेत रडू लागला. तेव्हा त्याचा शेजारी त्याच्याजवळ येऊन रडण्याचे कारण विचारू लागला. लोभी माणसाने घडलेली हकीकत त्याला सांगितली. ते ऐकून शेजारी म्हणाला, ''अरे मला वाटते की तसे तुझे काहीच गेले नाही. आपला पैसा येथेच आहे, असे समजून तू पूर्वीप्रमाणेच या जागेकडे पहात जा म्हणजे झाले.'' तात्पर्य : लोभी माणसे पैसे असून दारिद्र्यी व अशांना पैश्यांचा उपयोग न होता दुसरेच कोणीतरी त्याचा उपयोग करून घेतात. जवळ असलेला पैसा वापरायचा नाही तर तो चोरीला गेल्यावर शोक करण्यात काय अर्थ? *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment