✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 15/02/2019 वार - शुक्रवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *संत सेवालाल महाराज जयंती* 💥 ठळक घडामोडी :- १९४२ - दुसरे महायुद्ध - सिंगापुरमध्ये ब्रिटीश सैन्याची शरणागती. ८०,००० भारतीय, ब्रिटीश व ऑस्ट्रेलियन सैनिक युद्धबंदी. १९६१ - सबिना एर फ्लाइट ५४८ हे विमान बेल्जियममध्ये कोसळले. ७३ ठार. मृतांत अमेरिकेचा संपूर्ण फिगर स्केटिंग संघ व त्यांचे मार्गदर्शक. १९६५ - कॅनडाने नवीन ध्वज अंगिकारला. १९९५ : ब्रेल लिपीतील पहिलं वृत्तपत्र 'केसरी' या संस्थेने प्रकाशित केलं. २0१४ : दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. २0१८ : नीरव मोदी याच्या १७ मालमत्तांवर ईडीचे छापे. नीरव मोदी फरार. ईडीकडून त्याच्या ५१00 कोटींची संपत्ती 💥 जन्म :- १९३० - वसंत दिवाणजी, कन्नड साहित्यात मौल्यवान योगदान देणारे प्रतिभावंत लेखक. 💥 मृत्यू :- १८६९ - प्रसिद्ध उर्दू कवी आणि शायर मिर्झा गालिब २0१३ : लढवय्या कामगार नेता, कट्टर शिवसैनिक, माजी विधानसभा अध्यक्ष दत्ताजी नलावडे *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *जम्मू काश्मीर: पुलवामात सीआरपीएफच्या दोन बसवर दहशतवाद्यांचा हल्ला; 40 जवान शहीद, उरी नंतरचा सर्वात मोठा रक्तपात* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी पुकारलेल्या आंदोलनात दिलेले लेखी आश्वासन सरकारने पाळले नसल्याचा आरोप करत सकल मराठा क्रांती महामोर्चाने २२ फेब्रुवारीपासून पुन्हा बेमुदत उपोषणाची दिली हाक* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *एमपीएससी परीक्षेत सोलापूरचा झेंडा, बार्शीचा आशिष बारकुल व पंढरपूरचा महेश जमदाडे अव्वल* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *बुलढाणा : मातृतीर्थ सिंदखेड राजा विकास आराखड्याला निधी कमी पडू देणार नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *मुंबई - शरद पवार माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार, राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर प्रफुल्ल पटेल यांनी दिली माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *मुंबई - 24 फेब्रुवारी रोजी रासपतर्फे मुंबईत धनगर मेळाव्याचे आयोजन, शिवाजी पार्कवर होणाऱ्या या मेळाव्यास मुख्यमंत्री उपस्थित राहणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारतीय संघ घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन ट्वेंटी-20 आणि पाच एकदिवसीय सामने खेळणार आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• व्हॅलेंटाईन स्पेशल आर्टिकल *विद्यार्थी हेच माझे दैवत* https://nasayeotikar.blogspot.com/2019/02/my-students-my-valentine.html *स्तंभलेखक नासा येवतीकर* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मिर्झा गालिब* मिर्झा असदुल्लाखान गालिब हे प्रसिद्ध फारसी आणि उर्दू कवी होते. ते सुधारक वृत्तीचे, सर्व धर्मांना समान मानणारे, कर्मठ नसलेले, नमाज न पढणारे, रोजा न ठेवणारे, कलेचे आसक्त, रसिक व्यक्ती होते. गालिब केवळ चार वर्षांचे असताना त्यांचे वडील वारले म्हणून आजोबा आणि काकांनी पालनपोषण केले. लहानपणी त्यांनी इस्लामचे धडे घेतले, फारसी भाषा शिकले. मस्तानी हिच्या वंशात जन्माला आले होते. गालिब यांनी फारसी भाषेत लिखाण काम सुरू केले. त्यांच्या साहित्यात जीवनाचे गंभीर तत्वज्ञान त्यांनी मांडले. वयाच्या ११व्या वर्षापासून गालिब शेर लिहीत होते. जीवनाच्या झळा सोसून मिर्झा गालिबने त्या सुंदर करून काव्यातून मांडल्या. त्यांनी एकूण १८,000 च्यावर शेर फारसी भाषेत रचले. पुढे मित्रांच्या आग्रहाखातर त्यातीलच १000-१२00 शेर त्यांनी उर्दू भाषेत लिहिले. गालिब यांनी कधी कोणताही उद्योगधंदा केला नाही. मित्रांच्या आणि नातेवाईकांच्या सहकार्याने ते राहत. त्यांना स्वत:ला प्रसिद्धी मिळविण्याची गरज वाटली नाही. उत्तर मोगल काळातील राजांच्या, उमरावांच्या दरबारी जाणेही त्यांना आवडत नसे. ते म्हणत माझ्या कविता माझ्या मृत्यूनंतरही अजरामर राहणार असल्याने माझे नाव आपोआपच सर्वत्र पसरणार. शायरी आह को चाहिए इक उम्र असर होते तक कौन जीता है तिरी ज़ुल्फ़ के सर होते तक *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• दिले तेव्हा प्रेम महान देणगी आहे. प्राप्त झाले तेव्हा तो सर्वोच्च सन्मान आहे. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *1) 'तलावाचा जिल्हा' असे कोणत्या जिल्ह्याला म्हणतात ?* गोंदिया *2) आशिया खंडातील सर्वात मोठी गुफा कोणती ?* कचारगड ( गोंदिया ) *3) संसद सदस्याला काय म्हणतात ?* खासदार *4) राज्यविधिमंडळाच्या सदस्याला काय म्हणतात ?* आमदार 5) *महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली ?* 1 मे 1960 *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा गोंदिया 📱 9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● अशोक गायकवाड ● दत्ता एम. भोसले ● जनाबाई निलपत्रेवार ● बाबूराव बोधनकर ● किरण गौड ● घनश्याम नानम ● गोविंद टेकूलवार ● भारत लाखे ● गुलाब जाधव ● रमेश पाटील कदम ● अविनाश सातपुते ● रमेश सोनकांबळे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मनातून उतरले* कोणाच्या नजरेतून कोणाचे मन उतरले आहे मन उतरले म्हणाले की लोक म्हणतात हे बिथरले आहे वाईट कामं केली की कोणीही मनातून उतरू शकतो वाईट कामं पाहून कोणीही कोणावर बिथरू शकतो शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• •••●‼ *विचार धन* ‼●••• *मुन्शी प्रेमचंद यांनी तारूण्याविषयी फार छान विचार मांडले. ते म्हणतात, 'तारूण्य जोश आहे, बल आहे, साहस आहे, दया आहे, आत्मविश्वास आहे. गौरव आणि सर्वकाही आहे. तारूण्य व्यक्तीच्या जीवनाला उज्ज्वल आणि परिपूर्ण बनविते. परंतु एकदा का ते भरकटले तर सर्व सद्गुणांचा नाश होऊन जीवन सैरभैर होते.' तारूण्याला विश्वात्मकतेचे परिमाण द्यायचे असेल, तर तेवढे साहस आणि उदार असणे आवश्यक आहे. उदारता आणि साहस यांच्या संयोगामुळेच डाॅ. कोटणीस मानवतेच्या भावनेतून चीनमध्ये स्थिरावतात. भारत-चीन या देशांमध्ये मानवतेचा सांस्कृतिक बंध निर्माण करतात. तारूण्याचा खरा अर्थ कळलेली 'डाॅ. कोटणीस की अमर कहाणी' संपूर्ण जगाला आकर्षणाचा आणि आत्मसंवेदनाचा विषय वाटते.* *जनावरे राखता राखता अभ्यास करीत बौद्धिक कर्तृत्वावर आणि तारूण्यातील सकारात्मक ऊर्जेमुळे तात्याराव लहाणे यांच्यासारखा तरूण नेत्ररोग तज्ञ म्हणून नावारुपाला येतो. अलिशान हाॅस्पिटल उभारून खासगी वैद्यकीय व्यवसाय सुरू करण्याच्या नादी न लागता सरकारी दवाखान्यात नोकरी करून सामान्यांची सेवा करण्यात धन्यता मानतो. तेही तारूण्याचा अर्थ समजल्यानेच. युवावर्गाने आपल्या तारूण्यावस्थेतील महत्वाचा काळ शक्ती, कार्यक्षमता, बुद्धिचातुर्य यांचा योग्य वापर केला तर कुटुंब, देश पर्यायाने मानवसमाज प्रगतीपथावर जाऊ शकतो.* ••●‼ *रामकृष्णहरी*‼●•• 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• कबीर सतगुर ना मिल्या , रही अधूरी सीश | स्वांग जाति का पहरी कर , घरी घरी मांगे भीष || अर्थ : महात्मा कबीर गुरूचे जीवनातील अनन्य साधारण असणारे महत्त्व सांगताना म्हणतात की, जीवन जगताना असो की शिक्षण घेताना असो गुरू असलाच पाहिजे. गुरू (मार्गदर्शक) भेटला नाही ज्ञानाची अर्धवट प्राप्ती होते. अर्धवट ज्ञान आत्मघातकी ठरतं. ते जीवनाच्या वाटेवर सर्वात घातक ठरू शकते. महाभारतातील अभिमन्यूचा प्रसंग समजून घेतला तरी अर्धवट ज्ञान किती धोकादायक ठरतं हे पुढील पिढ्यांच्या ध्यानी यायला वेळ लागणार नाही. अभिमन्यू कुशल योद्धा होता. चक्रव्युहात घुसणे जाणत होता परंतु चक्रव्पुह भेदण्याची कला त्याला जमत नव्हती. त्यातच त्याला प्राण गमवावा लागला. अर्धवट ज्ञानी पारंगत असल्याचं ढोंग करतो. या ढोंगापायी त्याला नकल करावी लागते. नकल करणारा परिपूर्ण असत नाही. अशा व्यक्तींच्या माध्यमातूनच अंधश्रद्धा व चुकीच्या रुढी समाजात पसरवल्या जातात. ही अर्धशिक्षित फौजच समाजाला चुकीच्या दिशेनं नेते. संभ्रम निर्माण करीत असतात. स्वतःच्या मार्गाला विवेकाची जोड नसल्याने स्वतःचीच फसगत करून घेतात. प्रसंगी पथ भरकटून भीक मागण्याचेही त्यांच्या नशिबी येते. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• तुमच्याजवळ जे आहे ते इतराजवळ नाही किंवा इतरांजवळ जे आहे ते तुमच्याजवळ नाही. असे जेव्हा तुम्हाला समजेल तेव्हा तुम्हाला कदाचित वाटेलही आपल्या जीवनात असं का बरं होतं आणि त्याबाबतीत नसल्याचीही मनाला खंत वाटते. खंत वाटून घ्यायचेही कारण नाही. पहिल्यांदा तुम्ही थोडा विचार करा असे जर सगळ्यांना सारखेच मिळाले असते तर आपण काहीच प्रयत्नही केले नसते. इतरांच्यासोबतही आपण तुलना करु नये. ज्याच्या त्याच्या कर्माचा आणि ज्याला आपण कधी कधी नशिब म्हणतो कदाचित नशिबाचाही भाग असू शकते. पण एक लक्षात असू द्यावे पहिल्यांदा आपण इतरांची बरोबरी करु नये आणि जर करायचीच असेल तर आपण आपल्या कामात आणि प्रयत्नात कसूर करायची नाही. इतर जर पुढे जात असतील तर आपण त्यांना प्रोत्साहन द्यावे आणि आपणही आपल्या प्रयत्नाने कसल्याही प्रकारचे मन खचून जाऊ न देता समोरच्या परिस्थितीला सामोरे जाऊन यशस्वी होण्याचा संकल्प करायचा. अशा कृतीमुळे आपलेही जीवन इतरांपेक्षा सुखी व समाधानी होऊ शकेल. इतरांबरोबर स्पर्धा करायची काही गरज नाही किंवा इतरांसोबत तुलनाही करायची गरज नाही. आपल्यालाही आपल्या कर्माने आणि आत्मविश्वासाने प्रयत्न केल्यामुळे आपणही आपल्या जीवनात खूप पुढे जाऊ शकतो हे निश्चित. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎡 मनाचे श्लोक 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• मना पाहतां सत्य हे मृत्युभूमी। जितां बोलती सर्वही जीव मी मी॥ चिरंजीव हे सर्वही मानिताती। अकस्मात सांडूनिया सर्व जाती ॥१५॥ संकलन : सौ. सुभद्रा सानप, बीड •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *निर्मळ मन* ‘‘भिक्षां देही’’ म्हणत एक साधू महाराज मंगलाबाईंच्या घरासमोर येऊन उभे राहिले. त्यांचा आवाज ऐकून मंगलाबाई भिक्षा घेऊन आल्या. त्या फार अस्वस्थ दिसत होत्या. बाहेर येऊन साधू महाराजांना म्हणाल्या, ‘‘महाराज, मी फार अस्वस्थ आहे मला काहीतरी उपदेश करा.’’ साधू महाराज म्हणाले, ‘‘माई, आज नाही, पण मी तुला उद्या उपदेश करीन.’’ महाराजांचे हे शब्द ऐकून मंगलाबाईंना अतिशय राग आला व त्या फणकार्याने म्हणाला, ‘‘मग तुम्हाला मी भिक्षाही उद्याच घालीन.’’ दुसर्या दिवशी साधू महाराज भिक्षा मागण्यासाठी पुन्हा त्या घराकडे निघाले. येताना त्यांनी आपल्या भिक्षापात्रात थोडी माती घेतली. साधू महाराज आज येऊन उपदेश करणार म्हणून मंगलाबाई सुद्धा चांगले दान घेऊन त्यांची वाट पहात होत्या. साधूमहाराजांनी घरासमोर येऊन ‘‘भिक्षां देही’’ अशी आळी दिली. मंगलाबाई भिक्षा घेऊन आल्या. भिक्षा घालणार तितक्यात त्यांच्या लक्षात आले की भिक्षा पात्रात माती आहे. त्या पटकन साधूमहाराजांना म्हणाल्या, ‘‘महाराज, भिक्षापात्रात माती आणि कचरा आहे तर मी भिक्षा कशात घालू ?’ महाराज म्हणाले, ‘‘ मला चालेल. तुम्ही भिक्षा घाला.’’ त्यावर मंगलाबाई म्हणाल्या, ‘‘भिक्षापात्रात माती असताना त्यावर मी अन्न घालणार नाही.’’ हे ऐकून महाराज म्हणाले, ‘‘भिक्षापात्र स्वच्छ केल्यावरच तुम्ही भिक्षा घालणार ना. मग तोच तुम्हाला उपदेश आहे. काल तुम्ही दुःख आणि चितेनी ग्रासलेल्या होतात, तुमचे मन अस्वस्थ होते; मग मी तुम्हाला कसा उपदेश केला असता ?’’ गुरुचा उपदेश घेताना मन अगदी निर्मळ असायला हवे. तात्पर्य – मन निर्मळ असेल तर त्यात भर घालणारी प्रत्येक गोष्ट निर्मळच होते. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment