✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 13/02/2019 वार - बुधवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- २०१० - पुणे येथे दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणला. १७ ठार, ६० जखमी. 💥 जन्म :- १८७९ - सरोजिनी नायडू, बंगाली कवियत्री. १९६९ - सुब्रोतो बॅनर्जी, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- २०१२ - अखलाक मुहम्मद खान ऊर्फ कवी शहरयार, ज्ञानपीठ पुरस्कारविजेते उर्दू कवी, गीतकार. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी शासकीय सेवा आणि शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशाकरिता १० टक्के आरक्षण देण्याबाबतचा शासकीय आदेश जारी, राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील अधिकारी, कर्मचार्यांना राज्य सरकारी कर्मचार्यांप्रमाणे सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *जानेवारीमध्ये महागाई दरात घट, गेल्या १९ महिन्यातील हा सर्वात नीचांक स्तर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *राज्याच्या दुर्गम, डोंगराळ तसेच आदिवासी भागामधील पशुपालकांकडील पशुरुग्णांसाठी मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजना सूरू करण्यासह योजनेच्या पहिल्या टप्प्यात ८0 तालुक्यांमध्ये फिरते पशुचिकित्सा पथक सुरू* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील अंगणवाडी कर्मचार्यांच्या मानधनात ११ सप्टेंबर २0१८ ला केलेली वाढ तत्काळ द्यावी आणि कर्मचार्यांच्या एकरकमी लाभांमध्ये तीन लाख रुपयांपर्यंत वाढ करावी; या मागणीसाठी अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने सोमवारपासून राज्यभर जेलभरो आंदोलनाला केली सुरुवात* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *वायुप्रदूषणामुळे देशात दरवर्षी 24 लाख बळी, त्यात महाराष्ट्रात सर्वाधिक तर मुंबई देशात सर्वाधिक प्रदूषित शहर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारतीय महिला संघातील खेळाडू जेमिमा रॉड्रीग्ज आणि स्मृती मानधना यांनी आयसीसी टी-२0 क्रिकेटपटूंच्या क्रमवारीत घेतली भरारी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कमवा आणि शिका हेच उपयोगी* स्वतःच्या विकासावर कुटुंबाचे विकास अवलंबून असते. कुटुंबाच्या विकासावर गावाचा विकास आणि मग राज्य व देशाचा विकास होतो. या विकासासाठी शिक्षण हे अत्यंत महत्त्वाची बाब आहे. शिक्षणाशिवाय कोणाचेही विकास अशक्य आहे. शिक्षणामुळे दोन डोळ्याचे माणसे तिसऱ्या डोळ्याने डोळस होऊ शकतात. अन्यथा डोळे असून ही आंधळ्याची अवस्था होते. महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाचे महत्त्व सांगताना......... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/06/blog-post_86.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सरोजिनी नायडू* सरोजिनी नायडू (१३ फेब्रुवारी १८७९—२ मार्च १९४९). भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक थोर कार्यकर्त्यां, प्रभावी वक्त्त्या व कवयित्री. त्यांचा जन्म हैदराबाद येथे सधन कुटुंबात झाला. त्यांचे पूर्ण नाव सरोजिनी अघोरनाथ चट्टोपाध्याय (चतर्जी). अघोरनाथांचे मूळ घराणे पूर्व बंगालमधील व गाव ब्रह्मनगर. अघोरनाथ १८७८ मध्ये हैदराबादला शैक्षणिक संस्था स्थापन करण्याच्या उद्देशाने आले आणि पुढे निजाम महाविद्यालयाचे प्राचार्य झाले. ते शिक्षणतज्ज्ञ व कळकळीचे कार्यकर्ते म्हणून प्रसिद्ध होते. सरोजिनींच्या आई वरदासुंदरीदेवी मूळच्या बंगालच्याच. त्या बंगालीमध्ये कविता करीत. सरोजिनींवर अशा सुसंस्कृत पालकांचे संस्कार लहानपणीच झाले. यांतून त्यांचे कविमन घडले आणि लहानपणीच त्यांना कविता रचण्याचा छंद जडला व स्फूर्ती मिळाली. त्यांचे प्राथमिक शिक्षण घरीच खाजगीरीत्या झाले. वयाच्या बाराव्या वर्षी त्या मद्रास प्रदेशात मॅट्रिक परीक्षेत पहिल्या आल्या (१८९२). त्यानंतर सुमारे तीन वर्षे प्रकृती ठीक नसल्यामुळे त्या घरीच राहिल्या. निजामाची छात्रवृत्ती घेऊन पुढे त्या इंग्लंडला उच्च शिक्षणासाठी गेल्या (१८९५). लंडन आणि केंब्रिज येथे थोडे शिक्षण घेतल्यानंतर प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे अर्धवट शिक्षण सोडून इटली पाहून त्या मायदेशी परतल्या; पण या वास्तव्यात त्यांचा एडमंड गॉस या इंग्रज साहित्य समीक्षकाशी चांगला परिचय झाला. त्यांनी आपल्या काही कविता त्यास दाखविल्या आणि पुढील काव्यलेखनात गॉस यांचे त्यांस चांगलेच मार्गदर्शन लाभले. द गोल्डन थ्रेशहोल्ड (१९०५) या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहास गॉसनी प्रस्तावना लिहिली आणि हा काव्यसंग्रह त्या वेळच्या साहित्यक्षेत्रात चांगलाच गाजला. त्याला वृत्तपत्रांतून यथोचित प्रतिसाद मिळाला. रवींद्रनाथ टागोरांनीही सरोजिनींचे कौतुक केले. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• कर्ज, शत्रू आणि रोग यांची थोडीसुध्दा बाकी ठेवू नये. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) 'मथला पेंटिंग' कुठल्या राज्यातील प्रसिद्ध कला आहे?* बिहार *२) 'मोनालिसा' नामक जगप्रसिद्ध चित्राची रचना कोणी केली?* लिओनार्दो द विंसी *३) न्यूटनचा गतीचा पहिला नियम कोणता?* जडत्वाचा नियम *४) प्रथम कोणत्या अवयवाचं प्रत्यारोपण करण्यात आलं?* हृदय *५) लोखंड आणि गंधक हे कोणत्या प्रकारचं मिश्रण आहे?* असमांग मिश्रण *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● अशोक पाटील ● देवीसिंग ठाकूर ● नागनाथ भद्रे ● पंडीत डोरले *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *घात* कोणाला बोट दिले की तो हात धरतो आपलेपणाने जवळ केल की घात करतो माणूस ओळखूनच द्यायचा मदतीचा हात जागरूक राहिल्यास होणार नाही घात शरद ठाकर सेलू जि.परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *महत्वाकांक्षा आणि अतिमहत्वाकांक्षा यातील फरक जाणून घेण्याची गरज आहे. उत्तुंगतेचा ध्यास जरूर घ्यायला हवा; परंतु त्यामागे उदात्त विचार असायला हवेत. आपले आणि समाजाचे जीवन समृद्ध करण्याची कळकळ असावी. त्याऐवजी केवळ स्वार्थाचा आणि मूठभरांच्याच हिताचा विचार असेल, तर त्यामागची महत्वाकांक्षा हिंसक बनते. अतिमहत्वाकांक्षा नकारात्मक असून, आपल्या अधोगतीला कारणीभूत ठरते. इतिहासात अशी असंख्य उदाहरणे आहेत. शेक्सपियरच्या नाटकातील नायक मॅकबेथही अतिमहत्वाकांक्षेचा शिकार आहे. स्काॅटलंडचा राजा डंकनच्या दरबारातील तो पराक्रमी उमराव. राजा होण्याची महत्वाकांक्षा त्याला असतेच; परंतु लेडी मॅकबेथ याबाबतच्या अतिमहत्वाकांक्षेने पछाडलेली असते. आपला नवरा राजा व्हावा म्हणून प्रसंगी ही दुष्ट बाई विद्यमान राजाचा खून करायलाही तयार होते.* *एका लढाईत विजय मिळविल्याबद्दल सन्मान करण्यासाठी राजा मॅकबेथच्या घरी येतो. पती-पत्नी त्यांचे आदरातिथ्य करतात. दिलेल्या शयनगृहात राजा झोपी जातो. मॅकबेथ महत्वाकांक्षी होता; पण त्यासाठी तो कोणाचा खून करायला तयार नव्हता. मात्र उद्याच्या राजवैभवासाठी तसे करणे आवश्यक असल्याचे सांगून लेडी मॅकबेथ राजाचा खून करायला भाग पाडते. मॅकबेथला राजपद मिळते; परंतु त्यानंतर उसळलेल्या जनप्रक्षोभाला, युद्धाला सामोरे जावे लागते. लेडी मॅकबेथ भ्रमिष्ट होऊन मरते आणि मॅकबेथलाही प्राणास मुकावे लागते. अतिमहत्वाकांक्षा विघातक असून -हासाला कारणीभूत ठरते.* ••●💥‼ *रामकृष्णहरी* ‼💥●•• संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• परबत परबत मै फिरया, नैन गवाए रोई | सो बूटी पौ नहीं , जताई जीवनी होई || अर्थ माणूस बर्याचशा ऐकीव आणि भ्रामक बाबींच्या मागे लागून जीवनातला अनमोल वेळ वाया घालवत असतो. अमृत प्राशन करणे, अमर होणे, संजीवनी व बर्याच अशा काही बाबी वारंवार चर्चेत येतात. या सर्व बाबींचा भौतिक विचार करून माणूस दमछाक करून घेतो. सर्व काही आपल्याच ठायी असणार्या कर्तृत्त्व , चिंतन , शांती व समाधानातून प्राप्त होणार्या या लौकिक बाबी ! मात्र माणूस वरवरचा विचार करून स्वतःची दमछाक करून घेतो. 'तुझं आहे तुजपाशी पण जागा विसरलाशी.' अशीच ही गत म्हणावी लागेल. कस्तुरी मृग कस्तुरीच्या सुगंधानं ऊर फुटेतो धाव धाव धावतो. कस्तुरी स्वतःजवळ असूनही त्याचा अंत मात्र तिच्याच शोधात होतो. तसंच माणसाचं झालंय. थोडसं पूर्वजांकडं डोकावून पाहिलं तर सर्वच जण अमरत्व गाठू शकले नाहीत. ज्यांनी ध्येयासाठी झपाटून आपल्या कर्तृत्तवाचा ठसा उमटवला. खरं तर त्यांनाच अमृताचा खर्या अर्थानं कुंभ सापडलेला ! त्यांनी तो कर्माच्या रूपानं प्राशन केला. आज हजारो शेकडो वर्षे लोटली. ते देहाने नसले तरी कार्य रूपानं अमर आहेत. त्यांच्या हयातीत कधी त्यांनी भ्रामक अमृताचा शोध घेतला नाही. त्यांनी कधी वेगळ्या स्वर्गाचा विचार केल्याचे ऐकिवात नाही. आपल्या कार्य क्षेत्रातंच मनोभावे स्वर्ग निर्माण केला. 'नर करणी करे सो नारायण होय ।' याची प्रचिती दिली. ज्यांनी लौकिकता व नैसर्गिकपण नाकारलं. ते सर्व अवहेलनेचे धनी ठरले आहेत. प्रतिकांचा उथळ अर्थ घेवून धावपळ करून चालत नाही. चिंतन व मननातून शाश्वत सत्ये बाहेर पडतात. ती शोधली की माणूस अजरामर होतो. हे त्या मागचं रहस्य सांगताना महात्मा कबीर म्हणतात, पर्वता पर्वतावर फिरून थकलो , दमलो, प्रसंगी रडलोही परंतु सहज अमर करणारी संजीवनी काही प्राप्त झालीच नाही. कर्म गुटिकाच माणसाला अमर करते. हे जीवनातून फलित निघालं. कर्मभूमीत हृदय आणि हृदयात कर्मभूमीला आसरा दिला की जीवनच नंदनवन होवून जातं. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जीवनात जर तुम्हाला काही करुन दाखवायचे असेल तर खालील गोष्टींना कधीच प्राधान्य देऊ नका. आळस,अज्ञान, खोटेपणा आणि स्वार्थीपणा. आळसाने कोणतेही काम पूर्ण होत नाही,अज्ञानाने काय खरे आणि काय खोटे हे कळत नाही,खोटे बोलण्याने आपली प्रतिष्ठा जनमानसात चांगली निर्माण होत नाही तर स्वार्थामुळे आपण एकाकीपणे पडतो त्यामुळे आपली किंमतही कोणी करत नाही. म्हणून यांना केव्हाही तुमच्या जीवनामध्ये कसलेही स्थान देऊ नका.जर तुमच्या जीवनात स्थान दिलात किंवा प्रवेश करु दिलात तर तुमचे चांगले जीवन खराब करण्यास प्रवृत्त करतात.सदैव जागृत राहणेच सर्वात महत्वाचे आहे. ©व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎡 मनाचे श्लोक 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• मना सांग पां रावणा काय जाले। अकस्मात ते राज्य सर्वै बुडाले॥ म्हणोनी कुडी वासना सांड वेगीं। बळे लागला काळ हा पाठिलागी ॥१३॥ संकलन : सौ. सुभद्रा सानप, बीड •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *ईश्वरी अनुसंधानात सततचा आनंद* एकदा गरिबीने ग्रासलेल्या एका माणसाला आपल्या जीवनात फार दु:ख आहे, असे जाणवले. हे दु:ख दूर कसे करायचे, या चिंतेत तो होता. संत कबीर हे एक थोर संत असून त्यांच्या मार्गदर्शनाने अनेकांची दु:खे नाहीशी झाली असल्याचे त्याच्या कानी पडले. आपले दु:ख त्यांच्याजवळ सांगण्यासाठी तो त्यांच्याकडे गेला. कबिरांचे घर आणि त्यांचे राहणीमान अत्यंत साधे होते. हे पाहून क्षणभर तो माणूस आश्चर्यचकित झाला. आपल्या समोर आलेल्या कबीर यांना वंदन करून तो नम्रपणे म्हणाला, ”मी अत्यंत दीन आणि दु:खी आहे. तरी यावर काही उपाय असल्यास कृपा करून मला मार्गदर्शन करावे.” काहीही न बोलता कबीर त्या माणसाला घेऊन गावात फिरायला गेले. आपण इथे मार्गदर्शन घेण्यासाठी आलो असताना कबीर आपल्याला फिरायला का घेऊन चालले आहेत, हे त्या माणसाला समजेना. फिरता फिरता ते एका विहिरीजवळ थांबले. त्या काळी पाण्याचे नळ नव्हते. लोकांना विहीर किंवा नदीवरून पाणी आणावे लागत असे. मार्गसुद्धा नीट नव्हते. ओबडधोबड, खाचखळग्यांचे किंवा दगडगोट्यांचे होते. एका विहिरीवर काही बायका कपडे धूवत होत्या, तर काही जणी घरी नेण्यासाठी छोट्या-छोट्या घागरींमध्ये पाणी भरत होत्या. पाणी भरून झाल्यावर त्यातील काही बायकांनी आपल्या डोक्यावर एकावर एक अशा पाण्याने भरलेल्या तीन घागरी ठेवल्या आणि आपापसांत गप्पा मारत चालू लागल्या. कबिरांनी त्या माणसाला हे दृश्य दाखवले आणि म्हणाले, ”डोक्यावर पाण्याने भरलेल्या तीन घागरी असतांनाही कशा गप्पा मारत चालल्या आहेत. त्यांना त्या घागरी खाली पडून फुटतील याची भीती वाटत नाही. आपण त्यांना याचे कारण विचारून पाहूया.” आपल्या डोक्यावर पाण्याने भरलेल्या घागरी घेऊन जात असलेल्या काही महिलांच्या जवळ जाऊन कबिरांनी विचारले, ”बायांनो, डोक्यावर घागरी ठेवून तुम्ही अशा तऱ्हेने गप्पा मारत आहात. त्यावर त्यापैकी एका बाईने उत्तर दिले आम्ही गप्पा मारत असलो तरीही आमच सर्व लक्ष त्या घागरीकडे असते.यावर त्या माणसाला कळले संत कबिराला आपणास काय म्हणायचे आहे.बाह्यरंगात कितीही व्याप असला तरी अंतरगात माञ ईश्वरी अनुसंधान असावे. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment