✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 04/02/2019 वार - सोमवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जागतिक ब्रेल दिन* *जागतिक कर्करोग दिन* 💥 ठळक घडामोडी :- १९४४-श्रीलंका या देशाला स्वातंत्र्य मिळाले. २००४-मार्क झुकरबर्ग ने फेसबुकची स्थापना केली. 💥 जन्म :- १९२२ - स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी. १९७४-अभिनेत्री उर्मिला मातोंडकर 💥 मृत्यू :- १९७४-भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सत्येंद्रनाथ बोस *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *मुंबई : सरकारने अण्णा हजारें यांच्या जीवाशी खेळू नये; शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आवाहन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *नवी दिल्ली: महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला गोळी मारल्याचा निषेध म्हणून आज काँग्रेस देशभरात अखिल भारतीय हिंदू महासभेविरोधात निदर्शने करणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *उल्हासनगर : मेमसाहेब इमारतीचा स्लॅब कोसळून एक ठार, अनेकजण जखमी झाल्याचे वृत्त.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *येत्या आठ तारखेपर्यंत जर केंद्र सरकारने मागण्या मान्य केल्या नाही, तर पद्मभूषण सन्मान परत करण्याचा अण्णा हजारो यांचा इशारा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *तामिळनाडू - के. एस.अलगिरी यांची तामिळनाडू काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *मुंबई : आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव महासंघाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या मिस्टर आशियाई स्पर्धेत भारताच्या विजय भोयरने बाजी मारली. त्याचबरोबर मिस आशिया या स्पर्धेतही भारताच्या मंगला सेनने सुवर्णपदकाला गवसणी घातली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *वेलिंग्टन, भारत विरुद्ध न्यूझीलंड : पाचव्या एकदिवसीय सामन्यात भारताने न्यूझीलंडवर 35 धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने एकदिवसीय मालिका 4-1 अशा फरकाने खिशात टाकली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *पालकांचे मुख्याध्यापकास पत्र* http://prajawani.in/news_page.php?nid=1342 आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *लुई ब्रेल* जागतिक ब्रेल दिन ४ जानेवारीला लुई ब्रेल यांच्या वाढदिवसानिमित्त साजरा केला जातो. बालपणाच्या अपघातानंतर त्यांना अंधत्व आले आणि त्यांनी वयाच्या १५ व्या वर्षी ब्रेल भाषेचा शोध लावला. याच भाषेमुळे जगभरात आंधळ्या लोकांना लिहिता आणि वाचता येते. ब्रेल हा एक कोड किंवा लिपी आहे ज्यात अक्षरे दर्शविण्यासाठी पृष्ठभागावर अडथळे आणि खाचा यांचे मिश्रण करून वापरले जाते. हा कोड स्पर्श करून समजाला जातो. ब्रेलने कोडचा शोध लावण्या आधी, दृष्टिहीन लोक हाऊ प्रणालीचा वापर करून वाचन आणि लिखाण करत असे. जाड पेपर किंवा लेदरवर लॅटिन अक्षरे उभारऊन होऊ कोड तयार केला जात असे. ही खूप कठीण प्रणाली होती जिथे पुष्कळ प्रशिक्षण आवश्यक होते आणि सामान्य लोकांना केवळ वाचणे शक्य होते. यामुळे निराश होऊन लुई ब्रेल यांनी वयाच्या १५ व्या वर्षी ब्रेल कोडचा शोध लावला. ब्रेल कोड लहान आयताकृती ६ टिपक्यांमध्ये बनवण्यात येतो. ३ गुणीले २ च्या नमुन्यात असलेले ठिपके सेल म्हणून संबोधले जातात. प्रत्येक सेलमध्ये एक अक्षर, संख्या किंवा विरामचिन्हे दर्शविले असते. ब्रेल हा जगभरात ओळखणारा कोड असल्यामुळे, सर्व भाषा, गणित, संगीत आणि संगणक प्रोग्रामिंग असे जवळ जवळ सगळेच विषय ब्रेलमध्ये वाचता आणि लिहीता येतात. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आळशी माणुस शुभ दिवसाची वाट बघत असतो आणि जो कष्ट करतो त्याच्या साठी प्रत्येक दिवस शुभ असतो *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) अंटाक्र्टिका खंडातील सर्वोच्च शिखर कोणतं?* माऊंट विन्स्टन *२) कॅशलेस व्यवहारांसाठी 'डिजिटल डाकिया' ही योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली ?* मध्य प्रदेश *३) ऑलिंपिक ज्योत समारंभपूर्वक स्टेडिअमच्या प्रवेशद्वाराशी ठेवण्यास कधी सुरुवात झाली?* १९२८ *४) 'अँन अनसुटेबल बॉय'चे लेखक कोण?* करण जोहर *५) ओझोनचं आवरण कशाला रोखतं ?* अतिनील किरणोत्सार *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● मोहन रेड्डी ● संजय गायकवाड ● गोविंद राखेवार ● शेख इरफान ● राजरेड्डी गडमोड ● अहमद शेख ● शेख समीर ● शंकर कुऱ्हाडे ● कृष्णा तिम्मापुरे ● विलास थोरमोठे ● राजू माळगे ● आतिष पाटील ● भास्कर यमेवार *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *लक्षण* नाव मोठे अन् लक्षण खोटे असतात मोठे वाटणारांचे मन मात्र छोटे असतात दिसत त्या पेक्षा सारे वेगळे असते विश्वास बसणार नाही असे हे सगळे असते शरद ठाकर सेलू जि.परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *पावसाळा म्हणजे सृष्टीत चौफेर कसे चैतन्य भरलेलं असतं. नानाप्रकारचे चैतन्यकिडे, हिरव्या हिरव्या झुडपांमध्ये, नाजुक नक्षीदार वेलींवरती कसे मस्त रमलेले दिसतात. पानांआड लपून एकसारखा झीणझणझण आवाज हा ऐकायला येतो. पण एक दृष्टीभेट मात्र अलभ्य. एका वेलीच्या पानावर बघा कशी अंडी घातली होती. त्या अंड्यातल्या जीवाला मायेची ऊब देत एक मादी बसली होती. पण तेवढ्यात एका पक्षानं अचूक नेम धरला...बघता बघता किटक मादी बिचारी आकस्मिकपणे आपल्या न जन्मलेल्या जीवांना सोडून गेली. जीव बिचारे अनाथ पोरके झाले. पण त्यांना आधार होता तो हिरव्यागार पानांचा.* *मानवेतर प्राण्यांमध्ये जन्ममृत्यूचा हा खेळ असा आकस्मिक घडत असतो. हिरव्या पानांच्या उबदार पाळण्यात अंडी सुरक्षित होती. त्या अंड्यांतून जीव जन्माला येईल. जगण्याची एकाकी धडपड त्या जीवाची सुरू होईल. अल्पकाळ का होईना आईच्या प्रेमाची उब त्या अंड्यातल्या जीवाला मिळाली. कदाचित हीच निसर्गाची शिकवण असावी. एकटंच यायचं या जगात. जगायचा संघर्षही एकट्यानेच करायचा. त्या जगण्याचा भरभरून आनंदही घ्यायचा आणि एकट्यानेच परतायचं. हेच खरं जीवनाचं सूत्र.* *कवीने म्हटल्यानुसार या बिनभिंतीच्या शाळेत, अर्थात निसर्गात जशी वैविध्यपूर्ण समृद्ध उधळण असते, तशी मैत्रीची भावना देणारी ऊबही मिळते आणि गुरूसारखी शिकवणसुद्धा. त्यामुळे हेच खरं जगण्याचं सूत्र, असं म्हणणं संयुक्तिक नाही का ?* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 *संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल- 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ऊँचे पानी ना टिके , नीचे ही ठहराय | नीचा हो सो भारी पी , ऊँचा प्यासा जाय || अर्थ : माणसाला नम्रतेने व शालीनतेने ज्ञानाची प्राप्ती करता येते . गुरूसोबत नम्रतेने वागायला पाहिजे. ताठर ,उद्धट व मी पणाचा अहंकार मिरवणार्याला गर्विष्ठपणाशिवाय काही प्राप्त करता येत नाही.उगाच फुशारकीचा रिकामा ताठा मिरवणार्याचा भ्रमाचा फुगा फार काळ टिकत नाही. वाकणार्या नरम लोखंडालाच हवा तसा आकार देता येतो . पोलादाचा ताठरपणा त्याचे तुकडे व्हायला कारण ठरतो. महात्मा कबीरांनी सुंदर दाखला देत सांगितलंय की पाणी उंच जागेवर कधी थांबतं का? ते सदैव खोलगट जागेकडं धाव घेतं व तिकडंच वास्तव्य करतं. उंच माळरानावर व हवेत वावरणार्यांना तहाणेनं तरमळावं लागतं. मात्र खोलगट, सखल जागी वस्ती करणार्याला पावसाळ्यात थोडे कष्ट जरूर परंतु उन्हाळ्यात भरपेट पाणी मिळतं. त्याची तहाण भागते. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• काही लोकांचा स्वत:कडे आणि दुस-याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा असतो ते पहा.स्वत:च्या बाबतीत काही बरेवाईट घडले तर तो आपले नशीब म्हणून स्वीकारतो.आपल्या नशिबात होते त्याला काय करणार असे म्हणतो.तर इतरांच्या बाबतीत काही बरेवाईट घडले तर तो म्हणतो की,त्याच्या कर्माचे त्याला फळ मिळाले म्हणून त्याला भोगावे लागत आहे.कर्म आणि नशीब यांचा संबंध तो आपल्या मनातल्या वेगळ्या कप्प्यामध्ये ठेवून त्याचे मंथन करुन लोकांसमोर मांडतो.तेव्हा त्याच्या मनाचीच एक विकृत अवस्था पहायला मिळते.असा विचार न करता कोणतीही परिस्थिती असो त्या परिस्थितीला सामोरे जाऊन धैर्याने तोंड द्यायला शिकले पाहिजे अशी प्रत्येकाने तयारी ठेवली पाहिजे. जीवनात समस्या, संकटं तर येणारच.त्याला नशीबावर किंवा कर्मावर न लोटता आपल्या जीवनाचा तो एक खडतड प्रवास आहे.त्या प्रवासातून आपण चांगला मार्ग शोधून काढून ब-यावाईट गोष्टीतून जीवन जगायला शिकले तरच जगण्याचे खरे कौशल्य आणि महत्त्व कळेल.मग जग कोण काय म्हणेल याचा विचार करायचा नाही.कोणत्याही संकटाला न घाबरता माघार न घेता तेवढ्याच हिमतीने आणि कौशल्याने मार्ग काढून जीवन जगायला शिकले पाहिजे तरच जीवनाला खरा अर्थ प्राप्त होईल.मग कोणीही आणि कसाही अर्थ काढू द्या.त्यांच्या बोलण्याकडे लक्ष द्यायचे नाही.त्यांची आपल्याकडे पाहण्याची विकृत दृष्टी आहे असे समजून त्यांच्याकडे दुर्लक्ष द्यावे. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद...९४२१८३९५९०. 🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎡 मनाचे श्लोक 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• नको रे मना क्रोध हा खेदकारी। नको रे मना काम नाना विकारी॥ नको रे मना सर्वदा अंगिकारू। नको रे मना मत्सरु दंभ भारु ॥६॥ संकलन - सुभद्रा सानप, बीड •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *लठ्ठ कोंबडी व बारीक कोंबडी* एका माणसाच्या घरी टोपलीत काही कोंबड्या ठेवल्या होत्या. त्यातील एक अगदीच लठ्ठ व एक अगदीच बारीक होती. ती लठ्ठ कोंबडी बारीक कोंबडीची नेहमी चेष्टा करून हिणवीत असे. एकदा त्या माणसाकडे मेजवानी होती. तेव्हा त्याने नोकराला सांगितले की, ''हय़ा कोंबड्यात जी लठ्ठ कोंबडी असेल तिला मारून तिची कढी करा.'' त्याप्रमाणे नोकर जेव्हा त्या लठ्ठ कोंबडीला मारू लागला तेव्हा ती आपल्याच मनाशी म्हणाली, ''मी जर त्या दुसर्या कोंबडीसारखी बारीक असते, तर आज माझ्यावर हा प्रसंग नक्कीच आला नसता.'' तात्पर्य : ज्या गोष्टीमुळे माणसाला गर्व येतो तीच गोष्ट दु:खाला पण कारणीभूत होऊ शकते हे विसरू नये. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment