शिवबाराजे
माँसाहेब जिजाऊ शाहूंचा
पूञ होता शिवा,धैर्य,शील, चारित्र्याचा समाज क्रांतीचा तोची होता छावा
जातीभेद सारे तोडूनी
बंधने सारे मोडूनी
स्त्री सन्मानाचा करी आदर रयतेचा तो पालनहार
प्रजेचा रक्षणासाठी राजे
स्थापन केले स्वराज्य तुम्ही
असंख्य गुणांचे धनी तुम्ही
रयतेचा मनात शिवराय तुम्ही
झाडे लावा झाडे वाचवा
पाणी आडवा पाणी जिरवा
हाच दृष्टिकोन ठेवलात
रयतेचा रक्षणासाठी सदा
जागृत तुम्ही राहीलात
बळीराजाचे पालनकर्ते
स्त्री रक्षणाचे स्तंभ तुम्ही
सार्वभौमत्वाचा प्रतीचे
शककर्ते तुम्ही
असा राजा शिवबा आपुला किती गाऊ गुणांची गाथा
चरणी ठेवूनी मस्तक आता
करूया नमन जिजाऊमाता
〰〰〰〰〰〰〰
🙏जय जिजाऊ जय शिवराय🙏
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
✍ प्रमिला सेनकुडे
No comments:
Post a Comment